Monday, March 6, 2023

महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य

 












 

मंदिर स्थापत्यशैलीमागचा विचार...

 एखादं जुनं हिंदुमंदिर बघताना आपल्यापैकी काही जणांना तरी प्रश्न पडत असेल की या मंदिराचं स्थापत्य असंच का आहे? या कोनाड्यात हीच मूर्ती का बसवली आहे? काही मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या दरवाजाच्या, म्हणजे द्वारशाखेच्या, दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना या नदीदेवतांच्या मूर्ती दिसतात, त्यांचं प्रयोजन काय? उत्तरेकडची बहुतेक सारी मंदिरं एका विशिष्ट पद्धतीनं का बांधलेली असतात? उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये काही गोष्टी सारख्या असल्या तरी नवशिक्या नजरेलाही दोन्हीकडच्या मंदिरांच्या स्थापत्यातला फरक एका नजरेत कळू शकतो, त्यामधले बारकावे समजत नसले तरी. या दोन्ही स्थापत्यशैली वेगळ्या का आहेत? हे प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी पडलेले असतीलच.

आजच्या लेखातून अशाच काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे, पुढच्या लेखांमध्ये जेव्हा मी वेगवेगळ्या पुरातन मंदिरांविषयी लिहीन तेव्हा मंदिर समजून घ्यायला या लेखातली माहिती उपयुक्त ठरेल. मंदिरस्थापत्य हे शास्त्र फार अभ्यासानंतर विकसित झालेलं शास्त्र आहे हे आपण कुठलंही प्राचीन मंदिर बघताना लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही मंदिरात असलेली कोणतीही मूर्ती, प्रतिमा, मंदिराचे वेगवेगळे भाग हे सगळं मंदिरनिर्मात्यांनी, त्यांच्या मनात आलं म्हणून, उगाचच घडवलेलं नाही. मंदिर म्हणजे देवाचं घर. मानवी जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या देव-देवतांचं प्रतीकरूपानं अथवा मूर्तींच्या रूपानं भाविकांना दर्शन घडवणारं मानवानंच निर्मिलेलं आलय म्हणजे मंदिर.

हिंदुमंदिराच्या वास्तूच्या प्रत्येक भागामागं हिंदू धर्मतत्त्वज्ञान तर आहेच; पण एक निश्चित अशी वैज्ञानिक बैठकसुद्धा आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा विचारही आहे आणि मंदिरात आलेल्या माणसाला कलास्वाद घेता आला पाहिजे अशी अपेक्षाही आहे. 

मुळात कुठलीही भारतीय कला  - मग ती गायन, वादन, नृत्य, चित्रकला, वस्त्रकला, शिल्पकला - अशी कुठलीही असो, ‘केवळ कलेसाठी कला’ हा भारतीय कलेचा उद्देश कधीच नव्हता. संत तुलसीदासांची एक प्रसिद्ध चौपाई आहे :
राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार।
तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर॥ 
म्हणजे, रामनाम हा देहा-मनाच्या उंबरठ्यावर ठेवलेला असा दीप आहे की ज्याचा प्रकाश शरीराच्या आतही पडतो आणि बाहेरही. 
भारतीय मंदिरस्थापत्यकलेचंही तसंच आहे, एखादं मंदिर बघताना, त्यावर कोरलेली अद्भुत शिल्पं समजून घेताना आपली दृष्टी तर दिपून जातेच; पण मंदिर भाविकाना एक आत्मिक समाधानही देतं.

‘भारतीय कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रसनिष्पत्ती. ही रसनिष्पत्ती दोन्ही बाजूंनी असावी लागते, म्हणजे एखादी कलाकृती निर्माण करताना त्या कलाकाराला स्वतःला रसानुभूती व्हावी लागते आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे रसिकालाही त्याच रसाची अनुभूती व्हावी लागते तरच त्या कलाकृतीमागचं प्रयोजन सिद्ध होतं,’ असं भारतीय सौंदर्यशास्त्राचे थोर अभ्यासक आनंद कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्थापत्यशास्त्राचंही हेच वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कलेचा आस्वाद घेणं ही अत्यंत एकाग्र होऊन करायची क्रिया आहे, मग मंदिरस्थापत्य तरी त्याला अपवाद कसं असेल? पण या निरामय आस्वादासाठी रसिकाचं मन भाविक तर असलं पाहिजेच; पण त्याचबरोबर संस्कारितही असलं पाहिजे.

मंदिरस्थापत्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी किंवा काहीतरी शिकवण्यासाठी विचारपूर्वक घडवलेली असते. उदाहरणच द्यायचं झालं तर, मंदिराची जगती किंवा जोतं हे सहसा आजूबाजूच्या जमिनीच्या समतलापासून चांगलंच वर धरलं जातं. काही पायऱ्या चढूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. आपल्या मर्त्य जीवनाच्या पातळीपेक्षा देवाची पातळी वरची आणि म्हणूनच देवदर्शनाला जाताना आपणही स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढवून स्वतःला त्यायोग्य करावं हा त्यामागचा विचार. खजुराहोमधल्या लक्ष्मणमंदिराचं जोतं प्रचंड उंच आहे.

बऱ्याच मंदिरांमध्ये बाह्य भिंतीवर आकर्षक विभ्रम असणाऱ्या सुंदर स्त्रियांची शिल्पं असतात. त्यांना ‘सुरसुंदरी’ किंवा ‘शालभंजिका’ असं म्हटलं जातं. काही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर मैथुनशिल्पं असतात. ही सर्व शिल्पं म्हणजे मानवाच्या भौतिक आयुष्याचं प्रतीक आहेत. मानवी आयुष्यातले काम, लोभ आदी विकार हे अशा प्रतीकांच्या रूपानं मंदिराच्या बाहेरच्या भागावर दाखवले जातात. ते सर्व विकार बाहेर ठेवून भक्तानं ईश्वराच्या ठाई चित्त ठेवून मंदिरात प्रवेश करावा असा धर्मविचार यामागं होता, म्हणूनच गर्भगृहाच्या द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना गंगा-यमुना असतात. गंगा ही पावित्र्याचं प्रतीक आणि यमुना ही भक्तीचं. मनातले सर्व क्षुद्र विकार मंदिराबाहेर सोडून भक्तानं पवित्र मनानं देवाच्या दर्शनाला भक्तिपूर्वक यावं हेच जणू त्या गंगा-यमुना भक्तांना सांगत असतात.

प्राचीन हिंदुस्थापत्यशास्त्रानुसार, मंदिरशैलीचे ‘नागर’ म्हणजे साधारणतः उत्तर भारतीय आणि ‘द्राविड’ म्हणजे दक्षिण भारतीय असे दोन प्रकार मानले जातात. या दोहोंचा संगम असलेली ‘वेसर’ नावाची आणखी एक उपशैलीही दिसून येते. नागर शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहावर उंचच उंच शंकूसारखं निमुळतं होत जाणारं शिखर आणि शिखरावर बसवलेला गोल आवळ्याच्या आकारातला आमलक; किंबहुना आवळ्याच्या आकारात आहे म्हणूनच त्याला ‘आमलक’ असं नाव दिलेलं आहे. द्रविडशैलीच्या मंदिरांत शिखराच्या उंचीपेक्षा विस्ताराला जास्त महत्त्व आहे. द्रविडशैलीचं शिखर तळाला पसरत पिरॅमिडच्या आकाराचं असतं आणि अगदी वर आमलकाऐवजी एक मोठी शिळा बसवलेली असते, जिला ‘स्तूपी’ असं नाव आहे. द्रविडशैलीचं अजून एक मोठं आणि सहज लक्षात येण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे भव्य अनेकमजली गोपुर! हे गोपुर मंदिराच्या संपूर्ण प्राकाराभोवती मोठा तट बांधून प्रवेशद्वारावर बांधलेलं असतं. दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये मदुराई मीनाक्षीमंदिराची आणि श्रीरंगम्‌च्या रंगनाथमंदिराची गोपुरं जगप्रसिद्ध आहेत.

साधारणतः पूर्ण विकसित मंदिरस्थापत्यामध्ये मंदिराचे चार भाग असतात, मुख्य आराध्यदेवतेची प्रतिष्ठापना असलेलं गर्भगृह आणि त्यावरचं शिखर हे दोन्ही मिळून मंदिराचं विमान बनतं. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोहोंमधली चिंचोळी जागा. भाविकानं मुख्य मंडपात संगीत, नृत्य आदी कलांचा आस्वाद घेतल्यानंतर गर्भगृहाकडे वळताना या अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. मंडप म्हणजे गर्भगृहापुढं असलेलं मंदिराचं मुख्य दालन. हे बहुधा अनेक स्तंभांवर तोलून धरलेलं असतं आणि प्रदक्षिणापथ हा बहुधा जुन्या मंदिरांमध्ये मुख्य मंदिराच्या बाहेर असतो. मंदिरात दर्शनाला आलेल्या भक्तानं आधी मंदिराचं चोहोअंगानी बाह्य दर्शन घ्यावं, मंदिराचं प्रयोजन समजून घ्यावं आणि मगच आत प्रवेश करावा हा त्यामागचा विचार.

मंदिर म्हणजे दैवी शक्तीच्या प्रतीकरूपातल्या दर्शनाचं आणि उपासनेचं स्थान. हिंदू धर्मातल्या देव-देवता जितक्या विपुल आहेत तितकीच त्यांची मंदिरंही विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फक्त मंदिरं बघताना मंदिरस्थापत्याचे  बारकावे समजून घेतले तर आपलं देवदर्शन तर जास्त सुफल होईलच; पण सुसंस्कृत रसिक म्हणून आपण जास्त अनुभवसंपन्न होऊ यात दुमत नसावं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

मंदिर स्थापत्य : मंदिर बांधकाम शैली

लोकसत्ता टीम

आनंद कानिटकर

आशियाई देशात सापडलेल्या शिलालेख, नाणी यांतून दिसणाऱ्या धार्मिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भाच्या सहाय्याने या देशांतील वैशिष्टय़पूर्ण प्राचीन मंदिरांचा आणि या मंदिरांच्या स्थापत्यात वापरल्या गेलेल्या संकल्पना, स्थापत्य शैलींचा आढावा घेणारे सदर

प्राचीन भारतातील संपन्न वारशाचा प्रभाव केवळ दक्षिण आशियाच नाही तर आग्नेय आशिया तसेच मध्य आशियातील अनेक देशांवर पडला होता. व्यापारानिमित्त प्राचीन भारताचा अनेक देशांशी संपर्क आलेला होता. विसाव्या शतकात ‘बृहत्तर भारत’ किंवा भारतीयीकरण झालेली राष्ट्रे म्हणून या देशांचा अभ्यास काही प्रमाणात भारतीय अभ्यासकांनी केला. परंतु त्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निर्माण झालेला राष्ट्रवाद अधिक होता. भारतदेखील युरोपातील राष्ट्रांपेक्षा कमी नाही हे दाखवण्याकडे जास्त कल होता. एकविसाव्या शतकात आशियातील भारतीय वारशाचा म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही आणि तो सामान्य लोकांसमोर आलेला नाही.

आग्नेय आशियामध्ये व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि इंडोनेशिया या देशामंध्ये प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती पोचली होती. या देशांतील सांस्कृतिक वारशावर म्हणजे चालीरीती, परंपरा, शिल्प, स्थापत्य, धर्म, व्यक्तिनामे, ग्रामनामे इत्यादी बाबतीत भारतीय प्रभाव दिसून येतो. किमान इ. स. पाचव्या शतकापासून आपल्याला शिलालेख, नाणी यांच्याद्वारे भारतीय संस्कृतीचे अवशेष या देशामंध्ये आढळतात. भारतीय संस्कृतीबरोबर हिंदू आणि बौद्ध धर्म आग्नेय आशियात पोचले होते. आणि त्याचाच परिपाक आपल्याला तेथील प्राचीन हिंदू आणि बौद्ध मंदिरांतून पाहायला मिळतो.

हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञान, धार्मिक परंपरा, भारतीय मंदिर स्थापत्य शैलीचा अंगीकार केल्यानंतर आग्नेय आशियात इ. स. सहाव्या शतकापासून विविध हिंदू आणि बौद्ध मंदिरे आणि स्तूप उभारले गेले. भारतीय प्रभावासोबत त्यात या प्रत्येक देशातील स्थानिक स्थापत्य आणि शिल्प शैलीचा प्रभावही दिसून येतो. आजूबाजूच्या परिसराचा विचार करून आग्नेय आशियातील या मंदिरांची दगड, विटा, चुना यांच्या सहाय्याने केलेली विविध प्रकारची स्थापत्य रचना ही अजूनही महाराष्ट्रातील वाचकांना काहीशी अपरिचित आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात आग्नेय आशियातील मंदिरांची अथवा सापडणाऱ्या मूर्तीची अर्धवट किंवा बऱ्याचदा चुकीची माहिती फॉरवर्ड केली जाते.

आग्नेय आशियातील व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि इंडोनेशिया या देशांत सापडलेल्या शिलालेख, नाणी यांतून दिसणाऱ्या धार्मिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भाच्या सहाय्याने या देशांतील मंदिरांचा आणि या प्रत्येक देशात मंदिर स्थापत्यात वापरल्या गेलेल्या संज्ञा, संकल्पना, स्थापत्य शैलींचा आढावा घेणारी ही लेखमाला. या लेखमालेसाठी शैव, वैष्णव, बौद्ध (महायान, तंत्रयान) इत्यादी तसेच स्थापत्य आणि शिल्पांच्या दृष्टीने वैशिष्टय़पूर्ण मंदिरांची निवड केली आहे.

भारतीय मंदिर : संकल्पना

भारतीय स्थापत्यातील एक महत्त्वाचा स्थापत्य प्रकार म्हणजे मंदिर स्थापत्य. भारतात जरी गुप्तकाळामधील म्हणजे इ. स. चौथ्या, पाचव्या शतकापासून मंदिरांचे अवशेष आढळत असले तरी त्याआधीच्या काळातही मंदिर निर्मिती होत होती हे उत्खननात सापडलेल्या काही अवशेषांवरून लक्षात येते, तर गुप्तकालापूर्वीच्या काही शिलालेखांतून मंदिर निर्मितीचे उल्लेखही आढळून आले आहेत. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथातही मंदिरांचे उल्लेख आढळतात.

भारतात दगड, विटा, लाकूड, चुना, इत्यादींच्या सहाय्याने मंदिरनिर्मिती केलेली आढळून येते. अनेकदा मंदिराचा मुख्य भाग दगडात तर शिखर विटांमध्ये बांधल्याचे दिसून येते. संपूर्णपणे विटांनी बांधलेले भितरगाव (उत्तर प्रदेश) येथील गुप्तकाळातील मंदिर अजूनही पंधराशे वर्षे उभे आहे. तर महाराष्ट्रात तेर या गावातील उत्तरेश्वर आणि कालेश्वर ही प्राचीन मंदिरे संपूर्णपणे विटांनी बांधलेली आहे. या दगड–विटांनी बांधलेल्या मंदिरांवर शंखपूड, चुना इत्यादींच्या मिश्रणाने तयार केलेला लेप दिला जात असे. तसेच विटांच्या मंदिरांवर याच मिश्रणातून तयार केलेल्या मूर्तीदेखील बाभिंतींवर लावल्या जात असत. गुप्तकाळातील मंदिरांचे स्वरूप अगदी साधे म्हणजे चौकोनी गर्भगृह (गाभारा) आणि असल्यास त्यापुढे छोटासा दोन खांबांचा मंडप असे होते.

मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह (गाभारा). हा जाड भिंतींचा, चौकोनी असतो जिथे शिविलग किंवा मुख्य देवतेची मूर्ती स्थापन केलेली असते. प्रासाद किंवा मंदिर हे या गर्भगृहाचे कवच असते त्यामुळे अनेकदा प्राचीन मंदिरांची पुनर्बाधणी झाली तरी गाभारा हा मूळचाच ठेवलेला असतो. या गर्भगृहाच्या वरील बाजूला प्रमाणबद्ध शिखर असते.

मंदिरात गर्भगृह, त्यापुढील छोटय़ाशा जागेत अंतराळ, पुढे मंडप अशी आडवी रचना असते तर गर्भगृहाच्या वरच्या बाजूला शिखर असते. गर्भगृहाच्या पुढे असणाऱ्या मंडपांवर शिखरे असली तरी ती गर्भगृहावरील शिखरापेक्षा कमी उंचीची असतात. मंदिर आणि मंदिराचे शिखर हे लांबून बघितल्यावर एखाद्या पर्वताप्रमाणे भासते अशी कल्पना केलेली आहे. इ. स. सहाव्या शतकात वराहमिहिराने लिहिलेल्या बृहत्संहिता या ग्रंथात तसेच मत्स्यपुराणात विविध प्रासादांचे प्रकार सांगताना त्यासाठी मेरू, मंदार आणि कैलास अशी पर्वतांची नावेही वापरली आहेत. मेरू पर्वत हा पृथ्वीचे नाभिस्थान आहे, मंदार पर्वत हा सागरमंथनात सागर घुसळण्यासाठी कूर्माच्या पाठीवर ठेवला होता, तर कैलास पर्वतावर शंकराचा निवास असतो अशा प्राचीन भारतीय संकल्पना आहेत. त्यामुळे भारतीय मंदिर हे अनेकदा पर्वताप्रमाणे विशेषत: मेरू पर्वताप्रमाणे पृथ्वीचा मध्य असल्याचे दाखले दिले जातात.

गर्भगृहात जिथे शिविलग किंवा मूर्ती स्थापन केलेली असते त्यावरच मुख्य शिखर असते. ही मूर्ती अथवा शिविलग ज्या पीठावर स्थापन केलेले असते त्या पीठाच्या केंद्रिबदूपासून ते शिखराच्या अखेरच्या टोकापर्यंतच्या बिंदूपर्यंतची अदृश्य रेखा त्या मंदिराचा अक्ष मानला जातो. मंदिराच्या शिखराच्या केंद्रिबदूपासून ती रेषा अनंतात एका बिंदूपर्यंत जाऊन भिडते. ही गर्भगृहातील मूर्तीखालील केंद्रिबदूपासून निघणारी आणि अनंतातील एका बिंदूला जाऊन भिडणारा हा अक्ष हाच जगाचा किंवा विश्वाचा मध्य आहे असे त्या मंदिरापुरते मानले जाते. याच संकल्पनेने ते मंदिर मेरू पर्वताची प्रतिकृती बनते. ही संकल्पना भारतात वापरली गेलीच; पण भारताबाहेर भारतीय संस्कृतीचा प्रसार झाल्यावर आग्नेय आशियात निर्माण झालेल्या मंदिरांमध्येदेखील वापरली गेली. त्यामुळेच कंबोडियातील मंदिरांमध्ये विशेषत: अंकोरवट या मंदिरामध्ये ती विशेषकरून पाहायला मिळते. तंजावर येथील बृहदीश्वर या शिव मंदिराला ‘दक्षिणमेरू’ असे का म्हटले आहे ते या स्पष्टीकरणावरून लक्षात येते.

भक्तीभावाने निर्माण केलेल्या मंदिराच्या निर्मितीने निर्माणकर्त्यांला पुण्य मिळते. मंदिर चिरकाल टिकत असल्याने निर्माणकर्त्यांला चिरकाल पुण्य मिळते आणि तो चिरकाल स्वर्गलोकात राहू शकतो. त्याचप्रमाणे मंदिरात येणाऱ्या भाविकांनादेखील पुण्य मिळते. भाविक विविध खांबांनी, मूर्तीनी नटलेले मंदिर ‘बघायला’ येत नाहीत तर भक्तिभावाने देवाच्या, मंदिराच्या ‘दर्शनाला’ येतात. त्यांच्यासाठी देव आणि मंदिर हे एकरूप झालेले असतात.

अनेकदा प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे सध्या पुजली जात नसल्याने प्राचीन वास्तू म्हणूनच अभ्यासली जातात. मंदिरांवरील मूर्तीची विविध स्थापत्य घटकांची ओळख पटवणे आणि ती सांगणे याच्या जोडीने ही मंदिरे कशी वापरली जात होती किंवा आजही कशी वापरली जातात हा पूजेचा, भक्तीचा भाग मंदिरस्थापत्याच्या अभ्यासात काहीसा दुर्लक्षिला जातो. तो लक्षात घेतला तर त्या मंदिराचा, त्याच्या निर्मिती आणि वापरामागील तसेच बाभिंतींवरील मूर्तीयोजनेमागील अर्थ स्पष्ट होतो.

प्राचीन भारतातील या संपन्न वारशाचा प्रसार हा भारताच्या सध्याच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे झालेला होता. प्राचीन भारतीय लिपी, भाषा, धर्म, परंपरा, चालीरीती यांचा प्रभाव केवळ दक्षिण आशियाच नाही तर आग्नेय आशिया तसेच मध्य आशियातील अनेक देशांवर पडला होता. प्राचीन काळात व्यापारानिमित्त सागरी मार्गाने आणि खुष्कीच्या मार्गाने भारतीयांचा अनेक प्रदेशांशी संपर्क आलेला होता. विसाव्या शतकात ‘बृहत्तर भारत’ किंवा भारतीयीकरण झालेली राष्ट्रे म्हणून या सर्व प्रदेशाचा अभ्यास काही प्रमाणात भारतीय अभ्यासकांनी केला. परंतु त्यात स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतदेखील युरोपातील राष्ट्रांपेक्षा कमी नाही, आम्हीदेखील सांस्कृतिक वसाहती निर्माण केल्या होत्या हे दाखवण्याकडे जास्त कल होता. एकविसाव्या शतकात आशियातील भारतीय वारशाचा म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही आणि तो सामान्य लोकांसमोर आलेला नाही.

पाकिस्तान आणि बांग्लादेश हे देश तर स्वातंत्र्यप्राप्तीआधी भारताचा भाग होते. परंतु दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशांत तसेच आग्नेय आशियातील व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि इंडोनेशिया या देशामंध्ये प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती पोचली होती. या देशांतील सांस्कृतिक वारशावर विशेषत: आग्नेय आशियातील देशांमध्ये अजूनही चालीरीती, परंपरा, शिल्प, स्थापत्य, धर्म, व्यक्तिनामे, ग्रामनामे इत्यादी बाबतीत भारतीय प्रभाव दिसून येतो. त्याचाच परिपाक आपल्याला तेथील प्राचीन हिंदू आणि बौद्ध मंदिरांतून पाहायला मिळतो. भारतीय प्रभावासोबत त्यात या प्रत्येक देशातील स्थानिक स्थापत्य आणि शिल्प शैलीचा प्रभावही दिसून येतो. आजूबाजूच्या परिसराचा विचार करून आग्नेय आशियातील मंदिरांची दगड, विटा, चुना यांच्या सहाय्याने केलेली विविध प्रकारची स्थापत्य रचना ही अजूनही वाचकांना काहीशी अपरिचित आहे. या विविध आशियाई देशात सापडलेल्या शिलालेख, नाणी यांतून दिसणाऱ्या धार्मिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भाच्या सहाय्याने या देशांतील वैशिष्टय़पूर्ण प्राचीन मंदिरांचा आणि या मंदिरांच्या स्थापत्यात वापरल्या गेलेल्या संकल्पना, स्थापत्य शैलींचा आढावा घेणारी ही लेखमाला.

kanitkaranand@gmail.com

मंदिर स्थापत्य : सुरुवातीची भारतीय मंदिरे

लोकसत्ता टीम

आनंद कानिटकर

मंदिर स्थापत्याचा दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील प्रवास बघायचा असेल तर भारतातील प्राचीन काळातील मंदिरांचा आढावा घेणे गरजेचे आहे. भारतात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून दगडात कोरलेल्या प्राचीन लेणी आढळतात. परंतु भारतातील मंदिर स्थापत्याचा विचार करताना अनेकदा प्रसिद्ध गुप्त घराण्यातील राजांच्या काळात म्हणजे इसवी सन चौथ्या, पाचव्या शतकात (सुमारे १५०० वर्षांपूर्वी) निर्माण झालेल्या मंदिरांपासून सुरुवात केली जाते. कारण या काळातील दगड आणि विटांनी बांधलेली मंदिरे अजूनही देवगड, सांची, भितरगाव इत्यादी ठिकाणी उभी असलेली आढळतात. परंतु गुप्त घराण्यातील राजांपूर्वीच्या काळातील शिलालेखांतून, शिल्पांतून, साहित्यातील उल्लेखांतून आणि भारतातील काही उत्खननांत सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांवरून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनचे (सुमारे बावीसशे वर्षांपूर्वीचे) मंदिरांचे अस्तित्व, त्यांचा आकार, तलविन्यास (प्लॅन) लक्षात येतो.


राजस्थानातील चितोडपासून जवळ असलेल्या घोसुंडी या गावातील विहिरीत सापडलेल्या इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील एका शिलालेखात संकर्षण आणि वासुदेव या देवतांच्या पूजनाकरिता ‘पूजा शिला प्राकार’ निर्माण केला गेला होता आणि त्याला ‘नारायणवाटिका’ असे नाव होते हा उल्लेख केला आहे. येथून जवळच असलेल्या नागरी या गावातील हाथी बाडा या जागेत अकबराने चितोडवर स्वारी करताना हत्ती बांधले होते, त्यामुळे त्याला हाथी बाडा असे नाव पडले. या जागेला असणारी भिंत ही मोठय़ा शिळांनी बनवलेली आहे. या भिंतीच्या दक्षिणेच्या बाजूच्या एका दगडावर एक लेख सापडला होता, जो घोसुंडी येथे सापडलेल्या लेखाशी मिळताजुळता होता. त्यावरून डॉ. भांडारकर यांनी हाथी बाडा म्हणजेच नारायण वाटिका असावी आणि ही हाथी बाडाची भिंत मूळच्या नारायण वाटिकेची भिंत असावी असा निष्कर्ष मांडला होता. तिथे झालेल्या उत्खननात एकात एक दोन लंबवर्तुळाकार भिंती असलेली स्थापत्य रचना आढळली होती. यातील आतली लंबवर्तुळाकार वास्तू म्हणजे मुख्य गाभारा सुमारे १० मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद तर बाहेरील लंबवर्तुळाकार वास्तू म्हणजे बाहेरील भिंत ही १४ मीटर लांब होती. या दोन्ही वास्तूंच्या मध्ये १.८ मीटर रुंदीची जागा होती, जी प्रदक्षिणा पथ म्हणून वापरली जात असावी. लाकूड आणि माती वापरून हे मंदिर बांधण्यात आलेले होते. या मंदिराचा काळ इ.स. पूर्व तिसरे शतक असावा असा संशोधकांचा तर्क आहे. याच मंदिरात  शिलालेखात नमूद केलेली संकर्षण आणि वासुदेवाची पूजा केली जात असावी.

मध्य प्रदेशातील विदिशा येथे खांब बाबा नावाने ओळखला जाणारा स्तंभ हा इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीक राजा अँटिअल्कायडस याच्यातर्फे तक्षशिलेहून काशीपुत्र भागभद्र राजाकडे आलेला ग्रीक दूत हेलिओडोरस याने उभारलेला आहे. या हेलिओडोरसने हा गरुडध्वज वासुदेवासाठी म्हणजे वासुदेवाच्या मंदिरासमोर उभारला असावा. त्या शिलालेखात हेलिओडोरसचा उल्लेख भागवत असा केला आहे. म्हणजे तो वैष्णव होता.

याशिवाय याच परिसरात अजून एका स्तंभाचा तुकडा सापडला- ज्यावरदेखील शिलालेख कोरलेला होता. या खांबाच्या तुकडय़ावरील खंडित शिलालेखानुसार तो स्तंभ ‘भगवंताच्या उत्तम प्रासादाचा गरुडध्वज’ होता. म्हणजे हेलिओडोरसच्या गरुडध्वजाखेरीज इतरांनीही त्या परिसरात गरुडध्वज उभारले होते आणि हा वासुदेवाचा उत्तम प्रासाद असल्याने कदाचित हेलिओडोरसने, जो स्वत:ला भागवत म्हणवून घेतो, त्याने अजून एक गरुडध्वज त्या मंदिराच्या परिसरात उभारला असावा.

डॉ. भांडारकर यांना हेलिओडोरसने उभारलेल्या स्तंभाच्या आसपासच्या भागात केलेल्या उत्खननात एका मंदिराचे अवशेष सापडले होते. त्यावरून तेथे लंबगोलाकार गाभारा आणि त्यात प्रवेश करण्यासाठी चत्यकमान असलेले प्रवेशद्वार होते हे लक्षात येते. याशिवाय या मंदिराभोवती दगडी वेदिकादेखील होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील मंदिराला शिलालेखात प्रासाद म्हणून संबोधले आहे.

गुडीमल्लम (चित्तूर जिल्हा, आंध्र प्रदेश) येथील परशुरामेश्वर मंदिरात असलेले सुमारे पाच फूट उंचीचे प्राचीन शिविलग इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचे संशोधकांचे मत आहे. या शिविलगाच्या पुढील बाजूस शिवमूर्ती अर्धउठावात कोरली आहे. या शिविलगाच्या चारी बाजूने सव्वा मीटर लांबीरुंदीची वेदिका (कठडा) उभारलेली होती, जी अजूनही दृष्टीस पडते. प्राचीन काळी हे शिविलग या वेदिकेमध्ये कोणत्याही मंदिराशिवाय होते. कालांतराने इ.स. पहिल्या ते तिसऱ्या शतकात शिविलग आणि वेदिकेच्या बाजूने त्यावर चापाकार apsidal) मंदिर उभारले गेले, तर मध्ययुगात या मंदिराच्या प्रदक्षिणापथावर खांबांनी युक्त बांधकाम करण्यात आले. या आधीच्या लेखात बघितल्याप्रमाणे, गर्भगृह आणि तेथील मूर्ती हा मंदिराचा गाभा असल्याने त्यात बदल केले जात नाहीत. त्याप्रमाणे येथेही मूळचे बावीसशे वर्षांपूर्वीचे शिविलग आणि त्याभोवतीची वेदिका तशीच ठेवून त्याभोवती मंदिर उभारण्यात आले.

सोंख (मथुरा) येथे उत्खननात सापडलेल्या एका चापाकार apsidal’) मंदिर हे  वस्ती आणि आजूबाजूच्या रस्त्यांच्या मध्यभागी होते. पूर्व-पश्चिम असलेले हे मंदिर मूळचे छोटेखानी होते आणि नंतर त्याचा विस्तार करण्यात आला. या मंदिराचा मूळ गाभारा ३ मीटर लांबीरुंदीचा चौकोनी गाभारा होता. त्याचे रूपांतर नंतर चापाकार गाभाऱ्यात झाले. सोंख येथील या मंदिराचा काळ संशोधकांच्या मते इ.स. पहिले ते दुसरे शतक असावा. या काळात नऊ टप्प्यात या मंदिराचा विस्तार करण्यात आला. येथीलच दुसऱ्या एका चापाकार गाभाऱ्याचे मंदिर एका उंच जोत्यावर बांधलेले असून, त्या मंदिराच्या आवारात काही खोल्यादेखील होत्या. या मंदिराच्या आवाराला नक्षीकाम केलेली दगडी वेदिका (कठडा) होती. तसेच दगडी स्तंभ आणि तोरण असलेले प्रवेशद्वारही होते. हे तोरण असलेले प्रवेशद्वार सांची येथील स्तूपाच्या प्रवेशद्वारासारखे होते. येथे सापडलेल्या मूर्तीवरून तसेच या प्रवेशद्वारावरील नाग आणि नागी यांच्या शिल्पांवरून सोंख येथील हे मंदिर नागाचे मंदिर असावे.

आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा (प्राचीन विजयपुरी) येथील उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून आणि इक्ष्वाकु राजांच्या दानलेखांतून लक्षात येते की येथे एकोणीस मंदिरे होती. यातील काही मंदिरांच्या दानलेखांतून राजाचे नाव येत असल्याने त्यांचा इ.स. तिसरे ते इ.स. चौथे शतक हा काळ ठरविणे शक्य होतेच, परंतु ती मंदिरे कुठल्या देवतेची होती हेदेखील लक्षात येते. उत्खननात या मंदिरांचा पाया सापडला आहे. यातील सर्व मंदिरे एकसारखी होती असे मात्र नाही. काही मंदिरे लंबवर्तुळाकार आकाराच्या गाभाऱ्याची होती, तर काही चापाकार आकाराच्या गाभाऱ्याची.

यातील पाच मंदिरे शिव आणि कार्तिकेयाची होती. इक्ष्वाकु राजा एहुवल याचा सेनापती एलिसिरी याने उभारलेल्या सर्वदेव मंदिराला शिलालेखात या मंदिराला ‘मंडप प्रासाद’ असे संबोधले आहे. हे सर्वदेव मंदिर म्हणजे कदाचित अनेक देवांचे मंदिर असावे.

इक्ष्वाकु राजा एहुवल चंटमुल याच्या राजपुत्राने एक शिव मंदिर उभारले होते. या शिव मंदिराचा गाभारा चापाकार (apsidal) होता. या गाभाऱ्याच्या समोर थोडय़ा अंतरावर एक मंडप होता, त्यापुढे ध्वजस्तंभ होता आणि या सर्वाभोवती प्राकार (भिंत) होता. याच राजाच्या काळात बांधल्या गेलेल्या दुसऱ्या एका मंदिराचा गाभारा लंबवर्तुळाकार होता आणि त्यासमोर मंडप उभारलेला होता. नागार्जुनकोंडा येथेच सापडलेल्या एका कार्तिकेयाच्या मंदिराचा गाभारा चौकोनी होता. तेथे कार्तिकेयाची एक खंडित मूर्तीदेखील सापडली होती.

वरील सुरुवातीच्या मंदिरांच्या पुराव्यांवरून लक्षात येते की सुरुवातीला यक्ष, नाग यांच्या मूर्तीची पूजा ज्याप्रमाणे उघडय़ावर केली जात असेल, त्याचप्रमाणे शिव, विष्णू यांच्या

प्रतिमांचे पूजन खुल्या आकाशाखाली केले जात असेल. परंतु त्या मूर्तीभोवती वेदिका (कठडा) उभारून त्या मूर्तीभोवतीची पवित्र जागा अधोरेखित केली जात असे. कालांतराने त्यावर लाकडी छत उभारून अथवा लाकूड, मातीच्या भिंती करून त्या मूर्ती असलेल्या त्या पवित्र जागेचे रूपांतर कुटीवजा देवगृहात करण्यात आले.

कालांतराने या देवगृहाच्या लाकडी रचनेचे रूपांतर विटा आणि दगड वापरून केलेल्या देवगृहात झाले, जी दीर्घकाळ टिकू शकत होती. याच छोटय़ा चौकोनी किंवा लंबवर्तुळाकार गाभाऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणापथ आणि समोरील जागेत अंतराळ, मंडप, मुखमंडप, इत्यादी स्थापत्य रचना निर्माण करून त्याला मंदिराचे सुधारित स्वरूप मिळाले. गाभाऱ्यावर विशेषत: चौकोनी आकाराच्या गाभाऱ्यावर अनेक मजली शिखर बांधले जाऊन त्याला प्रासादाचे स्वरूप देण्यात आले.

kanitkaranand@gmail.com

कलात्मक पुष्करणींचा

अरुण मळेकर

अरुण मळेकर

आपल्या संस्कृतीत जलदान, जलसंवर्धन आणि त्याचे व्यवस्थापन करताना अज्ञात वास्तुरचनाकारांनी नुसत्याच पुष्करणी बांधल्यात असे नव्हे, तर त्यांना कलापूर्ण चेहरा देताना त्या प्राचीन ‘स्वयंभू’ वास्तुरचनाकारांनी आपल्या अंगभूत कालकृतीचा अजरामर आविष्कारही दाखवल आहे. हा कलाकृतीचा प्राचीन वारसा जपायलाच हवा ही त्या अज्ञातांचीही हाक आहे..

१८ एप्रिल या जागतिक वारसा दिनानिमित्त..

आपल्या देशात कलापूर्ण स्थापत्यशैलीच्या बांधकामात सुमारे १२०० लेणी शिल्पाकृती आणि प्रत्येक प्रांताच्या सांस्कृतिक तसेच त्यांच्या विविध शैलींच्या मंदिर वैभवांनी सर्वाधिक लौकिक मिळवलाय. श्रद्धेपोटी आणि मंदिर वास्तुवैभवाच्या आकर्षणाने भाविक, अभ्यासू आणि पर्यटकांचे ते एक आकर्षण आहे. परंतु त्यातील मंदिर वास्तूंच्या चित्ताकर्षकपणाकडे आपले सारे लक्ष केंद्रित होताना त्या मंदिर प्रवेशद्वाराच्या दीपमाळा, त्याच्या सभोवतीच्या तटबंदीवरील कलाकृतीसह प्रांगणातील पुष्करणींकडे तितक्याच जाणीवर्पूक आपण लक्ष देत नाही.

आपल्या पूर्वापारच्या संस्कृतीमध्ये घरासमोरचे तुळशी वृंदावन, केरसुणी, चूल यांची पूजा करून ऋण मानण्याचा परिपाठ आहे. त्यात ग्रामीण भागात विहिरींचीही मनोभावे पूजा करण्याचा रिवाज आहे. उपरोक्त घटक आमचं दैनंदिन जीवन सुखद करण्यासाठी अत्यावश्यक असून, त्याला पूर्वजांनी देवस्वरूप दिल्याने त्यांच्या संवर्धनाबरोबर त्यांचे पावित्र्यही जपले जाते.

वास्तविक भव्य मंदिर वास्तूत प्रवेश करण्याआधी याच पुष्करणीच्या पाण्याने मंदिर पावित्र्य राखण्यासाठी हात-पाय धुऊन प्रवेश करत असतो. मात्र, मंदिर वास्तूतील देवदेवतांच्या मूर्तीसह सभोवतालच्या कलाकृतीमध्ये काही पुष्करणींचा सर्वत्र बोलबाला झालाय. असल्या पुष्करणींची निर्मिती होण्यासाठी मंदिर वास्तू कारणीभूत आहेतच. कारण मंदिर उभारणीसाठी नजीकचा पत्थर काढण्यासाठी जो खड्डा निर्माण होऊन त्यात पाणीसाठा होत असतो. दूरदृष्टीचा अज्ञात वास्तुविशारदकांनी त्यालाच प्राचीन काळी कलापूर्ण पुष्करणींचे स्वरूप देऊन बारमाही पाणी साठय़ाची सोय केली.

कालांतराने पाणीसाठा करणाऱ्या पुष्करणींना देवस्वरूप देऊन त्या अधिकाधिक चित्ताकर्षक करण्याच्या प्रयत्नात त्यात तितक्याच आकर्षक मूर्तीची निर्मिती करण्याबरोबर उपलब्ध क्षेत्रानुसार त्याचा आकार ध्यानी घेऊन पुष्करणीच्या आत उतरण्यासाठी दगडाच्याच सुरक्षित पायऱ्यांची सोय करण्यात आली. हे आकारमान साधत पुष्करणीच्या चौफेर उभारण्यात आलेल्या कोनाडे तयार करताना वास्तुकारांनी भूमिती शास्त्राचा उपयोग केल्याचे दिसते..

या कोनाडय़ातील देवादिकांच्या सुबक मूर्ती निर्माण करताना कलाकाराने आपल्या कौशल्याचा आविष्कार दाखवलाय. भगवान विष्णू आणि पाण्याचं अतूट नातं असल्याने बऱ्याच पुष्करणींत शेषशायी विष्णूचे शिल्प आढळते.

वारसा यादीत समावेश झालेल्या प्राचीन पुष्करणीत काहींनी विश्वव्यापी लौकिक मिळवलाय. त्यातील गुजरातमधील मोधेरा सूर्यमंदिरासमोरची पुष्करणी म्हणजे स्थापत्यकलेचा आदर्श, वस्तुपाठ आहे. मोधेराच्या सूर्यमंदिराइतकेच त्या समोरच्या अलौकिक वास्तुकलेची ही पुष्करणीही आपले लक्ष वेधून घेते. मंदिर मुखमंडपावरील शिल्पाकृतीच्या दगडी कमानी पार करून बाहेर मार्गस्थ झाल्यावर सरळ पायऱ्या उतरून आपण या पुष्करणीच्या क्षेत्रात येऊन पोचतो, चौरस-आयतकोनी या पुष्करणीत भक्कम आकर्षक बांधकाम साधले आहे ते तर लाजवाब आहे. पुष्करणीच्या चौफेर कोनाडे आहेत त्यातून बांधकामातील एकसूत्रीपणाबरोबर अचूकपणाचेही दर्शन घडते.

अलौकिक कलाकृतीची आणखीन एक पुष्करणी म्हणजे गुजरातमधील पाटणनजीकची ‘रानी की बाव’ सुमारे एक हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या कलापूर्ण अशा पुष्करणीला सांस्कृतिक मोलासह इतिहासही आहेच. गुजरात सत्ताधीश राजा भिमदेवाची स्मृती जतन करण्यासाठी त्याची पत्नी राणी उदयमतीनी इ. स. १०२२ ते १०६३ या प्रदीर्घ काळात निर्माण झालेली ही पुष्करणी वास्तुकलेचा अजब नमुना आहे. ही पुष्करणी देखणी तर आहेच, पण आमचे प्राचीन वास्तुरचनाकार जल व्यवस्थापनासह स्थापत्य शास्त्रात कसे प्रगत होते हे जागोजागी जाणवते.

या सात मजली पुष्करणीचे बांधकाम दगडाचे असून, त्यातून गुजरात-राजस्थानी वास्तुशैलीचे दर्शन घडते. ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद, २६ मीटर खोलीवरून या पुष्करणीची व्याप्ती ध्यानी येते. या विहिरीच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि सुरक्षेसाठी जे अनेक खांब उभे केलेत त्यावर धार्मिक पाश्र्वभूमीची उत्कृष्ट शिल्पे आहेत. त्यातून महिशासुरमर्दिनी, राम, वामन या मूर्तीतील भाव तर सजीव आणि बोलके वाटतात.

मोधेरा पुष्करणीच्या उभारणीप्रमाणे येथेही अज्ञात शिल्पकारांनी आपले कसब पेश करताना भूमितीचा आधार घेतलाय. या पुष्करणीला एकूण सात मजले असून, आजही पाच मजल्यांचे बांधकाम सुरक्षित आहे. जलस्रोत संवर्धनाबरोबर आपत्कालीन सुरक्षेसाठी या पुष्करणीत भुयारी मार्गाचीही योजना होती. परंतु नैसर्गिक स्थित्यंतराने तो मार्ग बंदच झालाय.

वेरुळ लेण्याच्या खोदकामाप्रमाणे शिखरावरून तळाकडे या पुष्करणीचे बांधकाम साकारले आहे. धरणीमातेच्या उदरातील एक अप्रतिम सौंदर्य म्हणून या पुष्करणीचा जगभर बोलबाला झाल्याने आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये तिचा समावेश झालाय. भारतात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या प्राचीन पुष्करणी आहेत त्या सर्वाची सम्राज्ञी म्हणून तिचे स्थान अबाधित आहे.

सामाजिक जाणिवेने एक पुण्यकर्म म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातही काही ठिकाणी पुरातन पुष्करणी आजही आपलं अस्तित्व राखून आहेत. उदा. अहमदनगर जिल्ह्यतील अमृतेश्वर शिवालय मंदिराशेजारची पुष्करणी. तिच्या बांधकामात कलापूर्ण चेहरा आहेच, तर सिद्धेश्वर मंदिरानजीकच्या पुष्करणीला अनेक सुबक मूर्तीचे कोंदण लाभले आहे. या सर्वच प्राचीन पुष्करणींचा आढावा घेतल्यावर आमचे पूर्वज दूरदृष्टीसह स्थापत्य शास्त्रात कसे वाकबदार होते हे जागोजागी जाणवते.

औद्योगिकीकरण, शहरीकरणाच्या झंजावातात आपला मूळ चेहरा लुप्त होत असलेल्या मुंबईसारख्या अवाढव्य शहरातही तीन शतक पार केलेल्या पुष्करणींना वारसा वास्तूसह तेथील जलसाठय़ाबरोबर संस्कृतीचे मोल आहे. मुंबईतील चर्चगेटनजीकची पारशी बावडी धार्मिक अधिष्ठानासह आपलं समाजऋ ण मानत सांस्कृतिक मोलही जपून आहे. दानशूर भिकाजी बेहरामची या श्रद्धावान माणसाच्या नावे ही विहीर असली तरी ‘पारसी बावडी’ म्हणून तिची ओळख आहे.

वारसा यादीत समावेश झालेल्या अन्य पुष्करणींच्या तुलनेत या विहिरीला कलात्मक चेहरा तसा अल्पच आहे. सुमारे २५० वर्षांपूर्वी अरबी समुद्राचं पाणी चर्चगेट स्थानकापर्यंत येत असे तेव्हा त्याच्या नजीकच्या या पुष्करणीला गोड पाणी कसे? हा चमत्कार समाजमनात रुजल्यावर ही पुष्करणी सर्वच धर्मीयांचं आपली मनोकामना पूर्ण करणारं श्रद्धास्थानही झालं. हा लौकिक आजही आहेच.

या बावडीच्या चौफेर संरक्षणासाठी भिंत आहे. दर्शनीभागी जी कमान लागते त्यावर पारसी धर्मीयांच्या तत्त्वप्रणालीनुसार काही बोधचिन्हेही आढळतात. अग्नीबरोबर जलदेवतेलाही पारसी धर्मीयात अनन्यसाधारण श्रद्धास्थान आहेच. समाजऋ ण मानून पारसी बांधवांनी सर्वत्र अनेक पुष्करणी बांधल्यात तरी श्रद्धेचं स्थान या पारसी बावडीला आहे. या बावडीचे संवर्धन करताना त्याच्या पुरातन बांधकामाला बाधा येणार नाही यासाठी आपल्या संस्कृतीचे मोल जपणारा पारसी समाज नेहमीच दक्ष आहे.

एक प्राचीन वास्तू म्हणून पारसी बावडीला ‘अ’ श्रेणीचा वारसा वास्तू दर्जा लाभलाय..

‘पाणी म्हणजे जीवन’ हे सार्वत्रिक सूत्र मान्य केल्यावर आपल्या संस्कृतीत जलदान, जलसंवर्धन आणि त्याचप्रमाणे जलव्यवस्थापन करताना अज्ञात वास्तुरचनाकारांनी नुसत्याच पुष्करणी बांधल्यात असे नव्हे, तर त्यांना कलापूर्ण चेहरा देताना त्या ‘स्वयंभू’ वास्तुकारांनी आपल्या अंगभूत कलाकृतीचा अजरामर आविष्कारही दाखवलाय या आपल्या पूर्वजांच्या अलौकिक कलाकृतीचा हा प्राचीन वारसा जपायलाच हवा. ही त्या अज्ञातांचीही हाक आहे..

arun.malekar10@gmail.com

माट येथील कुषाणकालीन मंदिर

लोकसत्ता टीम

|| आनंद कानिटकर

गुप्तपूर्व मंदिरांच्या उत्खननात सापडणाऱ्या पुरातत्त्वीय अवशेषांबद्दल अधिक न लिहिले गेल्यामुळे, तसेच त्याची विशेष चर्चा न केली गेल्यामुळे अनेकदा भारतीय उपखंडातील ही प्राचीन मंदिरे आपल्याला अधिक परिचित नसतात. गुप्त राजवंशापूर्वी उत्तर भारतात आलेल्या कुषाण या राजवंशातील राजांनी तसेच त्यांच्या कालखंडात बांधल्या गेलेल्या मंदिरांची उत्खननातून आपल्याला माहिती मिळाली आहे.

कुषाण राजे साधारणपणे इ. स. ४० ते इ. स. ३६० या काळात होऊन गेले. कुजुल कडफायसिस हा अंदाजे इ. स. ४० ते इ. स. ९० या काळात राज्य करणारा कुषाण राजा या घराण्याचा संस्थापक म्हटला जाऊ शकतो. कारण तो अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बाल्ख या भागात प्रांताधिकारी असताना त्याने स्वतंत्रपणे राज्य करायला सुरुवात केली. नंतर या वंशातील विम तक्षम (अंदाजे इ. स. ९० ते ११३), विम कडफायसिस (इ. स. ११३ ते इ. स. १२७) इत्यादी राजांनी चीनवरून येणाऱ्या रेशीम मार्गावरील व्यापार ताब्यात ठेवण्यासाठी या मार्गावरील सध्याचा दक्षिण उझबेकिस्तान, ईशान्य अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तानचा भाग हा आपल्या आधिपत्याखाली आणला. या राजघराण्यातील पुढील महत्त्वाचे राजे म्हणजे कनिष्क (इ. स. १२७ ते इ. स. १५०), व हुविष्क (इ. स. १५० ते इ. स. १९०). कनिष्काच्या काळात काश्मीरपासून बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) पर्यंत कुषाणांचा राज्यविस्तार झाला.

या कुषाण राजांच्या काळातील अनेक मंदिर अवशेष, मूर्ती, शिलालेख उत्तर भारतात विशेषत: मथुरेच्या आसपासच्या परिसरात आढळतात. या परिसरात यक्ष, यक्षी, नाग, शिव, विष्णू, मातृका, दुर्गा, सूर्य, लक्ष्मी, इत्यादींच्या कुषाणपूर्व तसेच कुषाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत.

१९११-१२  साली पंडित राधा-कृष्ण यांनी मथुरेच्या उत्तरेला असणाऱ्या माट या गावातील टोकरी टिला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन अवशेषांच्या टेकाडावर उत्खनन करून कुषाण राजांच्या काळात विटांनी बांधलेल्या एका ‘देवकुला’चे (मंदिराचे) अवशेष उजेडात आणले. या उत्खननात त्यांना आयताकृती १०० फूट लांबीचे आणि ५९ फूट रुंदीचे जोते सापडले होते. त्यावर एका वर्तुळाकार मंदिराच्या बांधकामाचे तसेच इतर खोल्या बांधल्याचे पुरावे सापडले होते. या जोत्याच्या ईशान्येला पायऱ्या होत्या. तर जोत्यावर पश्चिमेकडे लंबगोलाकार गर्भगृह असल्याचे पुरावे सापडले होते. आसपासच्या गावातील रहिवाशांनी या टेकाडातून विटा मिळत असल्याने घरबांधणीसाठी येथील विटा काढून नेल्याने या मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला होता.

या जोत्याच्या दक्षिणेला आवाराच्या भिंतीचा काही भाग व त्याला लागून असलेल्या खोल्यांचे अवशेष सापडले होते. तर जोत्याच्या पश्चिमेला जवळ जवळ जोत्याएवढीच लांबी-रुंदी असलेला, पण विटांनी बांधून काढलेल्या तलावाचे अवशेष होते. या तलावाच्या काठावरील विटांचा आकार आणि जोत्याच्या व मंदिराच्या विटांचा आकार सारखा आहे. म्हणजे हे दोन्ही एकाच काळात निर्माण झाले होते.

या मंदिराच्या परिसरातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे या जोत्यावर सापडलेले कुषाण राजांचे पूर्णाकृती पुतळे! यातील तीन पुतळ्यांवर लेख कोरलेला आहे. त्यावरून ते कुषाण राजांचे पुतळे होत, यात शंका उरत नाही. परंतु हे पुतळे जोत्यावरील वर्तुळाकार गर्भगृहात न सापडता त्यापासून थोडय़ा अंतरावर, पण जोत्यावरच एका खोलीपाशी सापडले होते. यात एक सिंहासनावर बसलेल्या राजाचा पुतळा होता. या पुतळ्याचा कमरेवरील धडाचा भाग मंदिराशेजारी असलेल्या तलावाकाठी ठेवलेला सापडला. या अध्र्या पुतळ्याची स्थानिक लोक ‘वरुण’ म्हणून पूजा करीत होते. या पुतळ्याच्या दोन पायांमधील जागेत दोन ओळींचा संस्कृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील एक लेख कोरलेला होता. या शिलालेखात ‘महाराजो राजातिराजो देवपुत्रो कुषाणपुत्रो शाही विम तक्षुमस्य बाकणपतीन (हुमस्फल) देवकुलं कारिता’ असा उल्लेख आहे. म्हणजे वर उल्लेख केलेल्या विम तक्षम या कुषाण राजाच्या हुमस्फल नावाच्या बाकणपतीने- म्हणजे अधिकाऱ्याने देवकुलाची निर्मिती केली. तसेच या शिलालेखातील पुढील वाक्यात येथे बाग, पुष्करणी, विहीर, सभागृह तसेच द्वारतोरण (कदाचित सांची येथील स्तुपासमोरील तोरणाप्रमाणे असलेले तोरण) बांधल्याचा उल्लेख आहे. त्यावरून हा पुतळा कदाचित अंदाजे इ. स. ९० ते इ. स. ११३ या काळात राज्य करणाऱ्या विम तक्षम या कुषाण राजाचा असावा. येथेच सापडलेला एक पुतळा कनिष्क या राजाचा होता, हे त्यावरील ‘महाराजा राजातिराजा देवपुत्रो कनिष्को’ या कोरीव लेखाने लक्षात येते.

माट येथे एक भग्न मूर्तीचे पादपीठ सापडले होते. या पादपीठावरील कोरीव लेखानुसार कुषाण राजा हुविष्क याच्या पितामहांनी बांधलेले देवकुल भग्न, विशीर्ण झालेले असल्याने हुविष्काचा महादंडनायक (एक अधिकारी) याने या देवकुलाची दुरुस्ती करविली. या लेखाच्या पहिल्याच ओळीत ननाया (किंवा नना या मध्य आशियातील प्रसिद्ध) देवीच्या उत्सवात तिच्याकडून राज्य प्राप्त झालेला राजा हुविष्क’ असा हुविष्काचा उल्लेख केला आहे. हुविष्काचे वडील कनिष्क याच्या अफगाणिस्तानातील रबाटक येथे सापडलेल्या शिलालेखात कनिष्कालाही ‘नना’ या देवीकडून राज्यप्राप्ती झाली होती हे पहिल्याच ओळीत नमूद केले आहे, हे या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय येथे नित्य येणाऱ्या ब्राह्मणांसाठी काही तरतूद केलेली होती.

काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार, माट येथील हे देवकुल म्हणजे कुषाण राजांचेच मंदिर होते. परंतु येथे सापडलेल्या अजून एका भग्न मूर्तीमध्ये एका पुरुषाचा कमरेपर्यंतचा भाग दिसतो आहे. या मूर्तीच्या पायामागे एक सिंह कोरलेला आहे. तर याच मंदिराच्या आवारात एक स्त्री प्रतिमाही सापडली होती. या स्त्री प्रतिमेच्या मागील बाजूस सिंह दाखवला होता. वासुदेव शरण अग्रवाल या ज्येष्ठ संशोधकांच्या मतानुसार, या प्रतिमा अनुक्रमे शिव व दुग्रेच्या असाव्यात. कुषाण राजे शिवपूजक होते हे त्यांच्या नाण्यांवरील शिवप्रतिमांवरून दिसून येते. परंतु माट येथे कुषाण राजांच्या पुतळ्याची देवतारूपात पूजा होत असावी याबद्दल संशोधकांत एकमत नाही. विशेष म्हणजे, हे राजांचे पुतळे मुख्य गर्भगृहात नव्हते व असू शकत नव्हते हे या मंदिराचा आराखडा, पुतळ्यांचा आकार बघितला तरी लक्षात येते.

भास या लेखकाच्या संस्कृत ‘प्रतिमानाटक’ या नाटकात राम वनवासाला गेल्यानंतर आपल्या आजोळहून अयोध्येला परत येणाऱ्या भरताला अयोध्येच्या बाहेर असलेल्या एका प्रतिमागृहात इतर तीन राजांच्या पुतळ्यासोबत दशरथाचाही पुतळा दिसतो. या प्रतिमागृहात केवळ मृत राजांचे पुतळे उभारला जाण्याचा संकेत असल्याचा उल्लेख भासाने केला आहे. येथे उभारलेल्या दशरथाच्या पुतळ्यावरून राखणदाराकडे अधिक चौकशी करता भरताला दशरथाचा मृत्यू झाल्याची वार्ता कळते, असे भासाने दाखवले आहे. या नाटकातील राजांचे पुतळे असणाऱ्या प्रतिमागृह या उल्लेखाच्या आधारे १९२४ मध्ये पहिल्यांदा दया राम साहनी यांनी माट येथील कुषाणांच्या या देवकुलाला कुषाण राजांचे ‘प्रतिमागृह’ असल्याचे म्हटले.

देवकुल (देवगृह) हा शब्द केवळ कुषाणांच्या माट येथील या मंदिराच्या बाबतीतच वापरला गेला आहे असे नव्हे, तर मथुरा येथे सापडलेल्या काही जैन शिलालेखांमध्येदेखील देवकुल हा शब्द वापरला आहे. याशिवाय येथील कोणत्याही लेखांत हे कुषाण राजासाठी बांधलेले देवकुल आहे असा उल्लेख नाही. उलट या देवकुलाच्या दुरुस्तीच्या पुण्याने हुविष्क राजाचे आरोग्य वाढावे अशी लेखात शेवटी प्रार्थना केली आहे. त्यामुळे हे कुषाण राजांच्या पूजनासाठी बांधलेले देवकुल नसून, कुषाण राजांनी बांधलेले व कदाचित शिव आणि दुग्रेच्या प्रतिमा असलेले हे देवकुल होते; ज्याच्या आवारात कुषाण राजांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या, हे लक्षात घेतले पाहिजे. राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा उभारण्याची पद्धत जुन्नरजवळील नाणेघाट येथील इ.स. पूर्व पहिल्या शतकात कोरलेल्या लेण्यातील सातवाहन कुळातील व्यक्तींच्या प्रतिमांवरून लक्षात येते. परंतु माट येथील कुषाणांच्या या देवकुलावरून नाणेघाटातील सातवाहन राजांच्या लेण्याचा उल्लेख अनेकदा ‘सातवाहनांचे देवकुल’ असा केला जातो हे योग्य नाही; कारण ते लेणे कोणत्याही देवाचे मंदिर म्हणून उभारण्यात आले नव्हते.

कुषाण वंशातील महत्त्वाचा राजा कनिष्क याच्या काळात अफगाणिस्तानात बांधलेल्या दोन मंदिरांबाबत पुढील लेखात विस्ताराने पाहू या.

kanitkaranand@gmail.com

मंदिर स्थापत्य : अफगाणिस्तानातील कुषाणकालीन मंदिरे

लोकसत्ता टीम

आनंद कानिटकर

मागील लेखात बघितल्याप्रमाणे इ. स. पहिले शतक ते इ. स.चौथे शतक या काळात कुषाण घराण्यातील राजे उझबेकिस्थानचा दक्षिण भाग, उत्तर अफगाणिस्तान ते उत्तर भारत या भूभागावर राज्य करत होते. या कुषाण राजांच्या नाण्यांवर ओएशो, मिथ्र, नना इत्यादी इराणीयन देवता तर बुद्ध, मत्रेय, महासेन, विशाख इत्यादी भारतीय देवता आढळतात. सध्याच्या दक्षिण उझबेकिस्तान, उत्तर अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तान आणि उत्तर भारत या भूभागात प्राचीन काळी पूजनीय असणाऱ्या देवतांना कुषाण राजांनी आपल्या नाण्यांवर स्थान दिले होते.

त्यांच्या उत्तरप्रदेशातील मथुरेजवळील माट येथील मंदिराबद्दल आपण मागील लेखात बघितले होते. पण याच कुषाणांची अफगाणिस्तान येथे सुर्ख कोताल आणि रबाटक या दोन ठिकाणी दोन मंदिरे होती असे तेथील उत्खननातून आणि शिलालेखांतून समोर आले आहे. ही दोन्ही ठिकाणे कुषाणांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहेत. इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की सुर्ख कोताल अथवा रबाटक येथील कुषाणांच्या मंदिरांची स्थापत्य शैली भारतीय मंदिराप्रमाणे नसून, त्या भागात प्रचलित असणाऱ्या ग्रीक मंदिराप्रमाणे होती.

डॉ. श्लुमबर्गर यांनी १९५३ ते १९६३ च्या दरम्यान अफगाणिस्तानातील सुर्ख कोताल येथील टेकडीवर केलेल्या उत्खननातून तेथील तटबंदीयुक्त मंदिर प्रकाशात आले. येथे चार शिलालेख सापडले आहेत. त्यात कुषाण अधिकाऱ्यांचे ग्रीक लिपीतील आणि बॅक्ट्रियन भाषेतील शिलालेखदेखील सापडले, ज्यातून या मंदिराबद्दल अधिक माहिती मिळते. येथे सापडलेल्या ग्रीक लिपी आणि ग्रीक भाषेतील शिलालेख या मंदिराच्या निर्मितीची माहिती देतो. पण यातील राजाचे व अधिकाऱ्याचे नाव नष्ट झाले आहे. हा लेख कुषाण राजा कनिष्क याच्यापूर्वीचा असावा म्हणजेच सुर्ख कोताल येथील मंदिराची निर्मिती कदाचित कनिष्काआधी करण्यात आलेली असावी. परंतु येथेच सापडलेल्या अंदाजे इ. स. १५८ सालच्या शिलालेखात या मंदिराच्या निर्मितीचे श्रेय कनिष्काला देण्यात आले आहे.



सुर्ख कोताल येथील मंदिराची रचना एका टेकडीवर केलेली असून, टेकडीचा पुढील भाग फोडून त्यावर चार ठिकाणी मंच (टेरेस) तयार करण्यात आले होते. हे चारही मंच जिन्यांनी एकमेकांना जोडले होते. येथेच सापडलेल्या अंदाजे इ. स. १५८ सालच्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे येथे नोकोनझोको नावाच्या कुषाण अधिकाऱ्याने येथील विहिरीला पाणी लागत नसल्याने दुसरा कालवा खोदवून घेऊन त्या कालव्याने पाणी आणून विहिरीत सोडले व मंदिराला पाणीपुरवठयाची व्यवस्था केली. (रेखाचित्र पहा).

सुर्ख कोताल येथील टेकडीवरील मंदिराच्या आवारात पश्चिमेला मध्यभागी एक गर्भगृह होते. डॉ श्लुमबर्गर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एक स्त्री व पुरुषाची कमरेपर्यंतची भग्न मूर्ती याच गर्भगृहात सापडली होती. ती भग्न मूर्ती उमामहेश्वराची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. याशिवाय कालांतराने याच टेकडीवर अजून दोन मंदिरे उभारण्यात आली. त्यात एक प्राचीन इराणीयन पद्धतीचे अग्निमंदिरदेखील होते.

याच मंदिराच्या आवारात कुषाण राजांचे आणि राजपुत्रांचे तीन पुतळे सापडले होते. त्यावर कोणताही लेख नसल्याने ते नक्की कोणत्या राजाचे पुतळे आहेत हे समजले नसले तरी त्यातील एक पुतळा राजा कनिष्काचा नाण्यावरील असलेल्या त्याच्या चित्राच्या साधम्र्यामुळे कनिष्काचा असल्याचे मानले जाते.

याशिवाय उत्तर अफगाणिस्तानातील रबाटक येथे १९९७ साली एका मोठय़ा शिळेवर लिहिलेला लेख सापडला होता. हा लेखदेखील कुषाणकाळातील असून त्यात कुषाण राजा कनिष्क याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी म्हणजे इ. स. १२८ मध्ये रबाटक येथील मंदिराची निर्मिती करण्यात आली होती हे नमूद केले आहे. या लेखानुसार कनिष्काला इराणीयन देवी नना हिच्या कृपेने राज्यप्राप्ती झाली आणि त्याने येथे ‘बगोलांगो’ म्हणजे देवांचे मंदिर उभारले होते. याच शिलालेखात कनिष्कापर्यंतची कुषाणांची वंशावळ दिलेली असल्याने कुषाण घराण्याच्या इतिहासावर महत्त्वाचा प्रकाश पडला. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे येथे कुजुल कडफायसिस, विम तक्षम, विम कडफायसिस आणि कनिष्क यांचे पुतळे उभारले होते. परंतु येथे कोणतेही पुतळे सापडले नाहीत.

रबाटक येथील शिलालेख तालिबान काळात १९९७ साली सापडल्याने या ठिकाणी कोणतेही उत्खनन होऊ शकलेले नाही. तालिबाननंतरच्या काळात २००२ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणादरम्यान रबाटक येथेही टेकडीवर मंदिर होते हे तेथे सापडलेल्या अवशेषांवरून लक्षात आले. परंतु अफगाणिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीमुळे रबाटक येथील पुरातत्वीय स्थळाची खणून अवैध लूट करण्यात आली होती. त्यामुळे तेथे काही खांबांच्या अवशेषांखेरीज व काही घडीव दगडांखेरीज काहीही सापडले नाही. येथील शिलालेखातील उल्लेखावरून कदाचित येथे नना (प्राचीन इराणीयन स्त्री देवता) व उमा या देवतांच्या मूर्तीदेखील पुजल्या जात असाव्यात.

माट येथील शिलालेखात मंदिरासाठी ‘देवकुल’ हा शब्द वापरलेला असून, त्याच अर्थाचा ‘बगोलग्गो’ अथवा ‘बगोलांगो’ हा बॅक्ट्रिअन भाषेतील शब्द अनुक्रमे रबाटक व सुर्ख कोताल येथील शिलालेखांत वापरला आहे. या शब्दाचा अर्थ बग + लांग (किंवा लग्गो) म्हणजे देवाचे मंदिर असा होतो. काही संशोधकांच्या मतानुसार, सुर्ख कोताल आणि रबाटक मंदिरे अफगाणिस्तानातील सध्याच्या ज्या बागलाण प्रांतात आहे, तो ‘बागलाण’ हा शब्द तेथील बगोलांगो या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कुषाण मंदिरांवरून आला असावा.

माट व सुर्ख कोताल येथील मंदिरे कुषाण राजा हुविष्क याच्या काळात दुरुस्त करण्यात आली होती हे तेथील लेखांवरून समजते. परंतु रबाटक येथील लेखात दुरुस्तीचा नव्हे तर मंदिर उभारणीचा उल्लेख आढळतो. तसेच माट येथे मंदिरासोबतच पुष्करणी, सभागृह व बाग उभारल्याचा उल्लेख शिलालेखात आहे तर सुर्ख कोताल येथील शिलालेखात तेथे कालवा व विहीर खोदल्याचा उल्लेख केलेला आहे. माट, रबाटक आणि सुर्ख कोताल येथील शिलालेख आणि मंदिरांचे अवशेष यातून विविध देवीदेवतांचे उल्लेख व अवशेष आढळतात. किमान माट आणि सुर्ख कोताल येथील मंदिरांच्या गाभाऱ्यात नव्हे तर आवारात कुषाण राजांचे पुतळे सापडले होते हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.

मागील लेखात बघितल्याप्रमाणे भासाच्या ‘प्रतिमा नाटकम्’ या नाटकात त्याने ज्या प्रतिमागृहाचा उल्लेख केला आहे त्यात मृत राजांचे पुतळे उभारल्याचा उल्लेख आहे. १९२४ साली संशोधक दयाराम साहनी यांनी या ‘प्रतिमा नाटकम्’ मध्ये उल्लेखिलेल्या प्रतिमागृहाप्रमाणे माट येथील कुषाणांच्या देवकुलाला ‘प्रतिमागृह’ म्हणून संबोधता येऊ शकते असे सूचित केले. यानंतर अनेक संशोधकांनी याचा वापर अथवा उल्लेख केल्यामुळे देवकुल, प्रतिमागृह हे शब्दप्रयोग या मंदिरांच्या बाबतीत सहजरित्या वापरले जाऊ लागले.

रबाटक येथील कनिष्काच्या काळातील शिलालेखात खुद्द कनिष्काचा पुतळा उभारल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रतिमागृह हा शब्द ज्या संदर्भात ‘प्रतिमा नाटकम्’ मध्ये वापरला आहे तो मृत राजांचे पुतळे उभारलेली जागा हा संदर्भ कुषाणांच्या मंदिरांना लागू पडत नसल्याने या माट, सुर्ख कोताल येथील कुषाण मंदिरांना प्रतिमागृह म्हणून संबोधणे योग्य ठरत नाही. या कुषाणांच्या मंदिरांत राजांचे पुतळे उभारलेले असण्याला त्या राजांच्या चक्रवर्ती असण्याशी जास्त संबंध असावा.

kanitkaranand@gmail.com

मंदिर स्थापत्य : तक्षशिला येथील मंदिरे

तक्षशिला ही गांधार प्रदेशातील महत्त्वाची नगरी होती.

March 30, 2019 01:40 am

(संग्रहित छायाचित्र)

आनंद कानिटकर

आपल्याला आता पाकिस्तानात असलेल्या तक्षशिलेची ओळख प्राचीन भारतातील एक शैक्षणिक केंद्र म्हणून असते. परंतु तिथे झालेली उत्खनने, त्यात सापडलेले अवशेष यांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याच तक्षशिलेच्या परिसरात झालेल्या उत्खननात सापडलेल्या काही मंदिरांबद्दल या लेखात जाणून घेऊ या.

तक्षशिला ही गांधार प्रदेशातील महत्त्वाची नगरी होती. पश्चिमेला स्वात नदी आणि पूर्वेला सिंधू नदी यांच्यामधील खोऱ्यात गांधार हा प्रदेश प्रामुख्याने येतो असे मानले जाते. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याने विविध भागांत नेमलेले ग्रीक अधिकारी स्वतंत्रपणे राज्य करू लागले. त्यांच्यामुळे तेथे आलेले ग्रीक कला आणि स्थापत्य आणि तेथे असलेले मूळचे भारतीय कला आणि स्थापत्य यांच्या संगमातून ‘गांधार शैली’ जन्माला आली. साधारणपणे इ. स. पहिले शतक ते इ. स. चौथे शतक या काळात कुषाण राजांच्या राजवटीत ही कला बहरली. सध्याच्या पूर्व अफगाणिस्तानातही ही शैली पोचली. तर भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेशातील मूर्ती व स्थापत्यावर या शैलीचा प्रभाव पडला. गांधार प्रदेशातील तक्षशिला, पुरुषपूर (म्हणजे सध्याचे पेशावर) ही महत्त्वाची नगरे  होती.

तक्षशिला येथे सर जॉन मार्शल यांनी १९१४ ते १९३४ च्या दरम्यान उत्खनन केले आणि येथील अनेक स्थळे प्रकाशात आणली. विशेषत: येथील भिर, सिरकाप आणि सिरसुख या तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या कालखंडांतील वसाहती सापडल्या. भिर येथे तक्षशिलेची अंदाजे इ. स.पूर्व सहाव्या शतकात निर्माण झालेली प्राचीन वसाहत होती. सिरकाप येथे इ. स.पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीकांनी निर्माण केलेले तटबंदी असलेल्या आखीवरेखीव शहराचे अवशेष सापडले तर सिरसुख येथे कुषाणांच्या काळात निर्माण झालेले शहर होते. या भागात अनेक घरे, स्तूप व मंदिरांचे अवशेष सापडले.

मौर्याच्या काळापासून तक्षशिला हे महत्त्वाचे नगर होते. वर उल्लेख केलेल्या सिरकाप येथील  शहराच्या अवशेषांत सर जॉन मार्शल यांना अरमाइक भाषेतील एक छोटेखानी शिलालेख सापडला होता. या शिलालेखाचे वाचन पूर्णपणे समाधानकारक झालेले नाही. काही संशोधकांच्या मते, यात उल्लेख केलेला प्रियदर्शी राजा म्हणजेच प्रसिद्ध मौर्य सम्राट अशोक होय. तर काहींच्या मते, हा उल्लेख अशोकाचा असला तरी हा शिलालेख सम्राट अशोकाचा नसावा. ज्याने लेख कोरून घेतला त्याने तत्कालीन राजा म्हणून अशोकाचा उल्लेख केला असावा. या शिलालेखावरून सर जॉन मार्शल यांनी सम्राट अशोक स्वत: युवराज असताना तक्षशिलेला अधिकारी म्हणून नियुक्त असावा, असे मत मांडले होते.

याच रेखीव सिरकाप शहरात एक संपूर्णपणे ग्रीक स्थापत्य असलेले मंदिरही होते. सिरकाप ग्रीक राजांच्या पदरी असणाऱ्या ग्रीक कलाकार, कारागीर यांनी ग्रीक स्थापत्य आणि कला स्वतंत्रपणे वापरली अथवा तिचा उत्तम संगम भारतीय कलास्थापत्याबरोबर केला. तर याच सिरकाप शहरात एका चापाकार म्हणजे इंग्रजी व अक्षराच्या आकाराची भिंत असलेले मंदिराचे अवशेषही सापडले. या मंदिराला वर्तुळाकार गाभारा होता. मागील काही लेखांत बघितल्याप्रमाणे भारतात सोन्ख, गुडिमल्लम, नागार्जुनकोंडा इत्यादी ठिकाणी अशीच चापाकार मंदिरे सापडली होती. त्याच पद्धतीचे मंदिर या ग्रीकांनी निर्माण केलेल्या शहरात उभारले होते. या मंदिराच्या गाभाऱ्यात कोणती मूर्ती होती याचा पुरावा आढळत नाही. परंतु येथे गाभाऱ्यात स्तूप असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत त्यामुळे हे एखाद्या हिंदू देवतेचे मंदिर असावे असे तज्ज्ञांचे मत आहे. इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये या कालखंडातील अनेक बौद्ध स्तूप, विहार सापडले आहेत तसेच या भागात शंकर, दुर्गा, कार्तिकेय, गणेश, विष्णू, इत्यादी हिंदू देवीदेवतांच्या प्राचीन मूर्तीदेखील सापडल्या आहेत. त्यामुळे हे चापाकार मंदिर एखाद्या हिंदू देवतेचे असणे अशक्य नाही.

सिरकापमध्येच काही ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्तुपांचे आता केवळ चौथरेच शिल्लक आहेत. त्यातील एक चौथरा त्यावरील वैशिष्टय़पूर्ण नक्षीकामामुळे वेगळा ठरतो. या चौथऱ्याला एका बाजूने पायऱ्या आहेत. या चौथऱ्याला ग्रीक कॉरिंथियन शैलीचे अर्धस्तंभ दाखवण्यात आले आहेत तर  या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चत्य कमान असलेले दार, सांची येथील तोरणाप्रमाणे तोरण असलेले दार

आणि ग्रीक मंदिराच्या दाराप्रमाणे असलेले दार दाखवले आहे. प्राचीन भारतात वेगवेगळ्या भागांत वापरात असलेल्या स्थापत्यघटकांचे अंकन या एका चौथऱ्यावर केले आहे. विशेषत: ग्रीक आणि भारतीय स्थापत्याच्या संगमाचा हा एक उत्तम नमुना आहे. कदाचित या तीनही पद्धतीच्या दारांचा वापर या स्तुपाच्या आवारात केला गेला असावा. हा स्तूप इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक या काळात कधीतरी बांधण्यात आला. याच स्तुपाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे, या चौथऱ्यावरील या दारांच्या नक्षीकामावर दाखवलेले गंडभेरूंडाचे शिल्प. गंडभेरूंड म्हणजे दोन डोकी असलेला एकच पक्षी. हा मूळचा बॅबिलोनिया येथील संस्कृतीत अंकन झालेला एक काल्पनिक पक्षी, याच गांधार भागातून तो शकवंशीय राजांमुळे हा एक चिन्ह म्हणून भारतात आला असावा आणि भारतात विशेषत: मध्ययुगात राजचिन्ह म्हणून प्रसिद्ध झाला.

याच भागात कुषाण काळात बांधलेला धर्मराजिका स्तूप, जौलीयान इत्यादी ठिकाणी बौद्ध स्तूप, विहार आणि मंदिरे सापडली आहेत. त्यातील मूर्तीवर गांधारशैलीची छाप स्पष्टपणे दिसून येते. याच गांधारशैलीचा प्रभाव कुषाण काळापासून काश्मीरमधील कला स्थापत्यावर पडला आणि काश्मीरमधील मंदिरे जरी हिंदू किंवा बौद्ध देवतांची असली तरी त्यांचे स्थापत्य ग्रीक शैलीचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

गंडभेरूंड म्हणजे दोन डोकी असलेला एकच पक्षी. हा मूळचा बॅबिलोनिया येथील संस्कृतीत अंकन झालेला एक काल्पनिक पक्षी, याच गांधार भागातून तो शकवंशीय राजांमुळे हा एक चिन्ह म्हणून भारतात आला असावा आणि भारतात विशेषत: मध्ययुगात राजचिन्ह म्हणून प्रसिद्ध झाला.

kanitkaranand@gmail.com



मंदिर स्थापत्य : पाकिस्तानातील मंदिरे

लोकसत्ता टीम

आनंद कानिटकर

फाळणीपूर्व भारताचा भाग असलेल्या पाकिस्तानातील काही मंदिरांबद्दल आपण ऐकलेले किंवा वाचलेले असते. पाकिस्तानातील प्राचीन गांधार भाग हा तेथील बौद्ध स्तुपांसाठी जगभरातील संशोधकांत प्रसिद्ध आहे. पण पाकिस्तानातील काही प्राचीन मंदिरे आपल्याला माहीत नसतात. त्यापैकीच इ. स. पाचव्या ते दहाव्या शतकात बांधलेल्या आणि अजूनही उभ्या असलेल्या मंदिरांची ओळख पुढील काही लेखांत करून घेऊ या.

मागील लेखांत बघितल्याप्रमाणे कुषाण काळातील हिंदू देवीदेवतांच्या उदाहरणार्थ शिव, कार्तिकेय, विष्णू इत्यादींच्या मूर्ती अफगाणिस्तान, पाकिस्तान भागात सापडल्या आहेत. तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या भागात कुषाणराजांच्या नंतर आलेल्या हूण, तुर्की शाही आणि हिंदू शाही राजवटींच्या काळातील मूर्तीदेखील सापडल्या आहेत. परंतु पुरेसे सर्वेक्षण न झाल्याने मंदिरांचे अवशेष मोठय़ा प्रमाणावर सापडले नाहीत. पाकिस्तानातील उत्तर भागात सिंधू नदीच्या खोऱ्यात स्थानिक आणि परदेशी संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणांतून काही मंदिरांच्या अवशेषांवर अभ्यास झालेला आहे. त्यावरून येथील बहुतांश मंदिरे ही उत्तर भारतात आढळणाऱ्या नागर शैलीतील शिखरांची होती.

ह्युआन त्सांग या सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवाशाने आपले प्रवासवर्णन लिहून ठेवले आहे. त्यात त्याने गांधार प्रदेशाचे वर्णन करताना शेकडो बौद्ध विहार अस्तंगत होत असल्याचे लिहिले आहे. तसेच या भागात अनेक मंदिरे असल्याचेही वर्णन केले आहे. त्या मंदिरांपैकी काही मंदिरे अजूनही उभी असलेली आढळतात. ह्युआन त्सांग याने वर्णन केलेल्या एका मंदिराचे अवशेष प्रसिद्ध संशोधक ओरेल स्टाइन यांना १९४० च्या दशकात पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील कटास (कटास राज या नावानेदेखील हे गाव ओळखले जाते) गावाजवळील एका भागात सापडले होते त्या भागाला ‘मूर्ती’ असेच नाव होते. ओरेल स्टाइन यांच्या मतानुसार, येथे सापडलेले एक कृत्रिम टेकाड म्हणजे प्राचीन स्तूप असावा आणि त्यासमोरील भागात एका मंदिराचे विविध अवशेष स्टाइन यांना सापडले होते. ह्युआन त्सांग याने वर्णन केल्याप्रमाणे स्तूप आणि देवाचे मंदिर समोरासमोर असल्याचा हा पुरावा ओरेल स्टाइन यांना मिळाला असे त्यांचे मानणे होते. लाल दगडात बनवलेल्या या प्राचीन मंदिराचे विखुरलेले आमलक, चंद्रशाला, घटपल्लवयुक्त खांब इत्यादी अवशेष ओरेल स्टाइन यांनी गोळा केले आणि आता ते अवशेष लाहोर संग्रहालयात ठेवलेले आहेत.

जरी ‘मूर्ती’ या भागातील या मंदिराचा आराखडा किंवा स्थापत्य शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून पूर्णपणे लक्षात येत नसले, तरी या अवशेषांवरील नक्षीकामावरून पाकिस्तानातील सापडलेल्या हिंदू मंदिरांच्या कालक्रमातील हे सर्वात जुने मंदिर आहे, असे संशोधकांचे मत आहे. या दगडी अवशेषांवरील मूर्ती आणि नक्षीकाम हे भारतातील पाचव्या शतकातील गुप्त मंदिरांवरील मूर्ती आणि नक्षीकामासारखे आहे असे हे अवशेष शोधणारे ओरेल स्टाइन व गुप्तकाळातील कला व स्थापत्यावरील तज्ज्ञ जोआना विल्यम्स या दोघांचेही मत आहे.

हे मंदिर जरी स्थानिक लाल वालुकाश्मात घडवलेले मंदिर असले तरी यावरील मूर्ती आणि नक्षी भारतातील मध्यप्रदेशातील भुमरा येथील गुप्तकाळातील शिवमंदिरावरील मूर्ती आणि नक्षीकामाशी प्रचंड साम्य दाखवणारे आहे. त्यामुळे इ. स. पाचव्या शतकात दगडात कोरीव काम करू शकणारे कारागीर मध्य प्रदेशातून सध्या पाकिस्तानात असणाऱ्या मूर्ती या गावी हे छोटेखानी मंदिर घडवण्यासाठी आणले गेले असावेत.

मध्यप्रदेशातील भुमरा येथील गुप्तकाळातील मंदिराच्या अवशेषांत सापडलेल्या एका गवाक्षाच्या अवशेषांत दोन्ही हातांत कमळ घेतलेली सूर्याची मूर्ती कोरलेली आहे. या सूर्याचा वेश इराणी म्हणजे ज्याला आपण झब्बा आणि सुरुवार म्हणतो तो दाखवलेला आहे. या सूर्याच्या दोन्ही बाजूला असणारे गण किंवा प्रतिहार यांचाही वेश इराणीच दाखवलेला आहे. सूर्याची उपासना जरी वैदिक काळापासून भारतात होत असली तरी सूर्याची मूर्ती मात्र कुषाण काळात भारतात घडवली गेली. आणि तिचा हा इराणी वेश आणि गुढग्यापर्यंतचे बूट हे इराणी वैशिष्टय़ अफगाणिस्तातील सूर्यमूर्तीपासून ते अगदी कोणार्कच्या मंदिरातील सूर्यमूर्तीपर्यंत दिसून येते.

पाकिस्तानातील मूर्ती या जागी सापडलेल्या मंदिराच्या अवशेषांवरून व त्यांचे भुमरा येथील मंदिराशी असलेले साम्य बघता कदाचित मूर्ती येथील मंदिराची रचना एका चौथऱ्यावर एका बाजूला असलेले चौकोनी गर्भगृह, त्यासमोर खांबयुक्त मंडप, आणि समोर जिना अशी भुमरा येथील शिवमंदिराप्रमाणे असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.

वर उल्लेख केलेल्या कटास या गावातही ओरेल स्टाईन यांना काही मंदिरे आढळली. 1940 च्या दशकात स्टाईन यांनी या ठिकाणाला भेट दिली तेव्हा तेथे पूजा सुरू असल्याचे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. कटास येथील या शिवमंदिरात आजही पूजा होते आणि पाकिस्तानातील हिंदू या मंदिरांत नित्यनेमाने जातात. कटास येथील ही दोन मंदिरे मूळची किमान इ.स. सहाव्या शतकातील आणि इ. स. दहाव्या शतकातील असावीत. कटास येथील मंदिरे वापरात असल्याने अनेक वर्षे त्यांची पुनर्बाधणी आणि जीर्णोद्धार करण्यात आला आहे.  त्यात मध्ययुगातील अगदी अठराव्या शतकातील काही नक्षीकाम आढळते.

कटास येथील एका तळ्याचा उल्लेखही ओरेल स्टाइन यांनी केला आहे. दक्षकन्या सतीने स्वत:ला दक्षयज्ञात जाळून घेतल्यावर शंकराच्या डोळ्यांतून जे अश्रू आले त्या अश्रूंमुळे कटास येथील तळे बनल्याची आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रसिद्ध असल्याचे ब्रिटिश काळापासून नमूद केलेले आहे. आजही तेथील स्थानिक ही आख्यायिका सांगतात.

येथील सतघर समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समूहातील मुख्य दुमजली मंदिराचे मूळ स्वरूप बऱ्यापैकी टिकून आहे. यात या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक छोटेखानी मंदिरांतील नऋत्येला असणारे एक मंदिरही आपले मूळ स्थापत्य घटक टिकवून आहे. या छोटेखानी मंदिराची रचना चौकोनी गाभारा, त्यावर घुमट, बाह्य़िभतींवर दोन छद्म कॉरिंथियन (ग्रीक शैली) अर्धस्तंभ अशी आहे. तर समोरील भागात महिरप आणि बाजूला दोन गोलाकार खांबही आहेत. पाकिस्तान, जम्मू व काश्मीर भागात आढळणाऱ्या ग्रीक शैलीची छाप असणाऱ्या हिंदू मंदिरांप्रमाणे हे छोटेखानी मंदिर दिसते. या मूळच्या स्थापत्य घटकांवरून हे छोटेखानी मंदिर इ. स. सहाव्या/सातव्या शतकातील असावे तसे सतघर समूहातील मुख्य दुमजली मंदिर इ. स. दहाव्या शतकात पुन्हा बांधले गेले असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. गेल्या दहा वर्षांत कटास येथील मंदिरांचे पाकिस्तान सरकारकडून जतन संवर्धन करण्यात आले आहे. पाकिस्तानातील इ.स. सातव्या ते दहाव्या शतकात बांधण्यात आलेल्या विटांच्या मंदिरांबद्दल आपण पुढील लेखांत अधिक माहिती घेऊ.

येथील सतघर समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समूहातील मुख्य दुमजली मंदिराचे मूळ स्वरूप बऱ्यापैकी टिकून आहे. यात या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक छोटेखानी मंदिरांतील नऋत्येला असणारे एक मंदिरही आपले मूळ स्थापत्य घटक टिकवून आहे. या छोटेखानी मंदिराची रचना चौकोनी गाभारा, त्यावर घुमट, बाह्य़िभतींवर दोन छद्म कॉरिंथियन (ग्रीक शैली) अर्धस्तंभ अशी आहे. तर समोरील भागात महिरप आणि बाजूला दोन गोलाकार खांबही आहेत. पाकिस्तान, जम्मू व काश्मीर भागात आढळणाऱ्या ग्रीक शैलीची छाप असणाऱ्या हिंदू मंदिरांप्रमाणे हे छोटेखानी मंदिर दिसते.

kanitkaranand@gmail.com



महाराष्ट्रातील प्राचीन मंदिराचे प्रकार आणि अंतरंग


Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

मंदिर संकल्पना आणि उदय
मंदिर स्थापत्याचा विकास काळाप्रमाणे होत गेला. पूर्वी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात असे, यालाच गुहा मंदिर म्हणतात. मुर्ती ही पुजनीय असल्यामुळे त्यासाठी पवित्र वास्तूची निर्मिती झाली पाहिजे अशी भावना हळुहळू समाजामध्ये विकसित होत गेली. तेव्हांची मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिर ही एक खोली व तिच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. यथावकाश भक्तीचा प्रभाव वाढत गेला त्यातच "तत्वज्ञान नि अध्यात्म" यांचा विचारही महत्वाचा ठरला. त्यामुळे स्थापतींना अशी जाणीव झाली की, सामान्य घरांपेक्षा मंदिर ही वेगळी असली पाहिजेत आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराच रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. मंदिरांच्या वास्तू्चे स्वरुपही बदलायला लागले, त्याचे एक कारण म्हणजे त्याच्यातून प्रतिष्ठापित केल्या जाणार्‍या मुर्तीचे शास्त्र ही काळानुसार प्रगत होत गेले.

भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांचे साकार रुप म्हणजे "मुर्ती'. जसा या सकल्पनेचा विस्तार वाढत गेला तसा मंदिरांच्या वास्तूत आमुलाग्र बदल होत गेला. "देवघर' व्यक्ती वा कुटुंबासाठी तर 'मंदिर' समूहासाठीच झाले. त्यामुळे सहाजिकपणे सभामंडापाचा आकार वाढला. भक्तांची संख्या वाढली तशी प्रवेशद्वारांची संख्या सुध्दा वाढली. एका ऎवजी मंडपाच्या तीन बाजूंना तीन दरवाजे तयार करण्यात येऊ लागले. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, गाभार्‍यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जावे अशी योजना केली गेली. या प्रकारच्या सेवेला "रंगभोग" म्हणतात. मंडपाच्या मध्यभागी असणार्‍या शिळेला "रंगशिळा" त्यामुळेच म्हणतात.
मंदिरातील १८ विभाग खालील प्रमाणे आहेत.

1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा.

Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

मंदिरांचे प्रकार

कल्पक भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली. या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत.           
विटांची मंदिरे :- मंदिर बांधणीच्या उपक्रमांमध्ये सुरुवातीला  विटांची मंदिरे बांधली गेली. पण शतकानुशतक टिकून राहण्याच्या दृटीने वीट नाशिवंत असल्याने सुरुवातीच्या कालखंडातील विटांची मंदिरे आजमितीस फारच कमी प्रमाणात आढळतात. मांढाळ, रामटेक, तेर येथिल विटांची मंदिरे आजही पाहावयास मिळतात.

हेमाडपंथी मंदिरे :-  हा वास्तुरचना आणि कौशल्याचा स्वतंत्र प्रकार आहे.याचे वैशिष्ट्य असे की, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यससाठी चुना, माती वापरले जात नाही. मंदिरे विविध प्रकारच्या म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.

नागर शैली मंदिरे :- यांनाच इंडो आर्यन मंदिरे असेही म्हणतात. हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व काहीसा बहिर्वक्र स्वरुपाचा असतो. शिखराच्या मुख्य आकाराच्या वर बसक्या लोट्या प्रमाणे भाग असतो ज्याला "आमलक' म्हणतात. ही मंदिर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.

द्रविड शैली मंदिरे :- द्रविड हा शब्दच मुळात भौगोलिक प्रदेशाचे सूचक आहे. कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली प्रसिध्द होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मंदिराच्या शिखरात मजले  बांधलेले असतात. यांनाच "भूमी' असे म्हणतात. ही मंदिरे मोठ्या परिसरात पसरलेली असतात. या मंदिराचा आणखी एक विशेष म्हणजे "गोपूर'.

वेसर शैलीची मंदिरे:- या शैलीची मंदिरे प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळतात. विंध्यपर्वता पासून कृष्णानदी पर्यंत ही शैली प्रचलित आहे. यात नागर आणि वेसर दोन्ही पध्दतीचा समावेश दिसतो. यालाच "मिश्रक' असेही नाव आहे.

भूमिज शैलीची मंदिरे :- ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात, माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात. यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर, गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकारची मंदिरे आहेत.

Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

मंदिरांचे भाग

एकीकडे काळानुसार मंदिराची आंतरबाह्य रचना बदलत होती, तर दुसरीकडे मुर्तीच्या संबंधीही अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या अंगाने विचार होत होता. मंदिरांची तुलना मानवी देहाशी केली जाऊ लागली. मंदिराच्या विविध अंगाना नावे देण्यात आली, त्यामुळे मानवाच्या देहाप्रमाणे मंदिरांचे सुध्दा भाग निर्माण झाले.  मानवाचा गर्भ म्हणजे मंदिराचा गाभारा. जसा गर्भात मानवाचा आत्मा असतो तसा गाभार्‍यात सृष्टीच्या आत्म्याचा सहवास असतो. "यथा देह तथा देव', असे मानले जाऊ लागले. मंदिर म्हणजे केवळ  दगड विटांची एक इमारत न राहता हिंदु तत्वज्ञानाला आकार आणणारी वास्तू असे तिचे स्वरुप झाले.  मनुष्य देह आणि देवळाचे भाग यांच्यात साम्य दाखवण्यात आले. उदा. केस म्हणजे कळस, आमलक म्हणजे डोके, मान म्हणजे ग्रीवा असे वर्णन अग्निपुराणात मंदिराबद्दल करण्यात आले आहे.

Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
मंदिरात पावित्र्य आणि भक्तीचे वास्तव्य असल्यामुळे त्याच्या प्रत्येक भागाला अर्थ असतो. त्यामागे एक उद्देश असतो.जिथे देव प्रतिष्ठीत होतो त्याला गाभारा म्हणतात. गाभार्‍या शिवाय देऊळ असू शकत नाही. त्यानंतर येतो तो सभामंडप. सभामंडप ही एक प्रशस्त जागा असते. जिथे भक्तगण थांबू शकतात, शांत चित्ताने बसू शकतात. या सभामंडपाला किती दरवाजे असावेत हे त्याच्या व्याप्तीवर अवलंबून असते. सभामंडप आणि गाभार्‍या मध्ये असणार्‍या जागेला अंतराळ म्हणतात. सभामंडपाच्या समोर एक छोटा मंडप असतो याला मुखमंडप म्हणतात. सभामंडपात मधोमध असेणार्‍या चार खांबांमध्ये जमिनीवर एक उंचवटा असतो त्याला रंगशिला म्हणतात. देवाची उपासना कलेच्या माध्यमातून करावी आणि ती सादर करण्याची जागा म्हणज "रंगशिला'. सभामंडपाच्या छताचे सुध्दा भागांनुसार प्रकार पडतात. या सभामंडपाला असणार्‍या खिडक्यांना "जालवातायने" असे म्हणतात. संपूर्ण मंदिराच्या बाहेर असणार्‍या जागेला प्राकार म्हणतात.

मंदिरातील मुर्ती

जसजशी मंदिराची आंतर बाह्य रचना बदलत गेली तसतसे मुर्तीच्या बांधणीत नवनवे बदल होत गेले. मंदिरातील मुर्तीच्या स्थापनेसाठी अनेक प्रकारच्या देवतांची निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने ब्रम्हा, विष्णू, महेश, गणेश, कर्तिकेय, हनुमान या प्रमुख देवतांचा तर सूर्य, दिकपाल, नवग्रह या दुय्यम देवतांचा समावेश करण्यात आला.

Bramha,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
ब्रम्हा हा जगताचा निर्माता, उत्पतीचा जनक , ब्रम्हदेवाच्या मुर्ती फारच थोड्या मंदिरात आढळतात. त्याची चार शीरे ही चार वेदांची प्रतिके समजली जातात. याच वाहन हंस, सरस्वती ही देवी. मंदिरावर ब्रम्हदेव यज्ञ करीत असतांना सोबत मोरावर सरस्वती उभी असलेली बर्‍याच ठिकाणी दाखवण्यात येते.

Ganapati,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
गणेश शिव पार्वती यांचे पुत्र. मानवी शरीर व हत्तीच शीर, चतुर्हस्त हातात अंकुश, हस्तिदंत, कमळ व परशु. गजानन हे मुर्तीचे नाव वर्णन करते. तर गणपती हे नाव यक्षगणांचा अधिपती ही पार्श्वभूमी दाखवते. 

विष्णूमुर्ती :- विष्णू हा "नारायण' नावानेही प्रसिध्द आहे.विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण,बुध्द, कल्की हे विष्णूच दशावतार प्रसिध्द आहेत.हे दशावतार मंदिरात, मंदिरांवरील शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय विष्णूची मुर्ती २ प्रकारात पाहायला मिळते. "केवळ विष्णू" आणि "शेषशायी विष्णू". केवळ विष्णूच्या मुर्तीमध्ये चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले असतात. मुर्ती साधारण पणे उभी दाखवलेली असहे. वाहन म्हणून गरुड व पायाशी श्रीदेवी व भूदेवी, उजव्या/ डाव्या हाताला लक्षी अशा मुर्ती कोरलेल्या आढळतात. शेषशायी विष्णूच्या मुर्तीत शेषावर पहुडलेल्या विष्णूच्या नाभीतून बाहेर आलेल्या कमळावर ब्रम्हदेव, पायाशी लक्ष्मी कोरलेल्या आढळतात.

  शिव-महेश :- "शिव', "शंकर', "महेश' या नावान ओळखला जाणारा हा देव त्रिमुर्ती पैकी एक, त्याच्याकडे लयाला नेण्याचे काम आहे.शिव हाच सृष्टीचा निर्माता असून त्याच्या नृत्यातून सृष्टीचा अविर्भाव झाला असे ही काही पंथीय लोक मानतात. शिव हा स्मशानात राहणारा देव. अंगाला राख फासून राहणारा "योगी' हिमलयाची कन्या पार्वती हिचा पती अहे. नंदी हे त्याचे वाहन आहे. त्याशिवाय अनेक गण त्याचे सहचर आहेत. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष त्याने प्राशन केले होते म्हणून निळकंठ अशा अनेक प्रकारे मुर्तीकारांनी त्याच्या मुर्ती निर्माण केल्या आहेत.

याशिवाय गजलक्ष्मीची मुर्ती सुध्दा काही मंदिरात आढळते. यात पद्मासनात विराजमान झालेल्या लक्ष्मीवर हत्ती पुष्पवृष्टी करतांना दाखविलेले असतात..याशिवाय काही मंदिरात हनुमंताच्या, इंद्राच्या मुर्ती सुध्दा आढळतात.

कासव
मंदिरात प्रवेशद्वाराशी कासवाचे शिल्प देवतामुर्तीकडे तोंड करुन कोरलेले असेत. यामागचे कारण असे की, कासवाचा स्वत:च्या इंद्रियांवर ताबा असतो. सर्व इंद्रियांवर ताबा असणार्‍या योग्याचे प्रतीक म्हणजे "कासव'. 


नंदी
नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा होता. शेत नांगरत असत्तंना त्यांना हा मिळाला. नंदीने शंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांनी त्याला आपले वाहान आणि त्याला आपल्या गणांचे नायकही बनविले.  नंदी हा शंकराचा निस्सीम भक्त ही आहे.. तो शंकराच सर्व काम करणारा सेवकही आहे..विष्णूच्या  बाबतीत गरुडाचे किंवा गणपतीच्या बाबतीत उंदराचे स्थान इतके महत्वाचे नाही पण, शंकराच्या नंदीचे स्थान अधिक महत्वाचे आहे म्हणूनच की काय शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचे नाव सांगितले आहे.. नंदीची, नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशी अनेक नावे आहेत. काही ठिकाणी विष्णूपुत्राचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवाने बैलाच रुप धारण केले आणि त्याचेच पुढे नंदी नाव रुढ झाले. त्यामुळे सहाजिकच शिवा आधी नंदीचे दर्शन व पूजन करणे भक्तांना बंधनकारक असेत.
 
Nandi, Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
काही ठिकाणी तर नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाच दर्शन घेण्याची पध्दत आहे.. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात शिवाच्या गाभार्‍यात शिरण्या आगोदर नंदी स्थापन कलेला असतो.  काही मंदिरात सभामंडपाच्या अगोदर नंदीसाठी स्वतंत्र मंडप बनविलेले असतात. त्यालाच नंदीमंडप असेही म्हणतात. खूप ठिकाणी नंदीची मुर्ती पूर्णाकार स्वरुपाची असते, त्याची शिंगे आखूड टोकदार, शिंड आकारान मोठे असून पुढचा पाय जरी पायाखाली मुडपलेला असला तरी क्वचित पुढे टाकलेले असतो. त्यामुळे हा वृषभ कधीही उठून उभा राहील असे वाटते.  शोके जरी एका बाजूला कललेले असले तरी दृष्टी मात्र गाभार्‍यातील पिंडीकडे लावलेली असते.गळ्यात किंवा पाठीवर घुंगराच्या आणि घंटांच्या माळा, पायात घुंगराच चाळ अशा अनेक अलंकारांनी नंदमुर्ती नटवलेली असते. या सार्‍या अलंकारापेक्षा बघणार्‍यावर जी छाप पडते ती त्याच्या भरदार शरीरयष्टीची. याशिवाय अनेक नंदींच्या पाठीवर शिवपिंड कोरलेली असते. उदा. नाशिकच्या सटाणा जवळ असणार्‍या देवळाणे या मंदिरातील मुर्ती.
 
  शिवमंदिरात नंदी नसणारी सुध्दा काही मंदिर आहेत. यात कोल्हापूरच्या खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिराचा समावेश होतो.  यामागच कारण असे की प्रजापति दक्षाच्या १६ कन्यांपैकी सतीने प्रजापतिला न जुमानता शंकराशी लग्न केले. त्यामुळे दक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हते म्हणून दक्षाने केलेल्या वाजपेय यज्ञात त्याने शंकराला आणि आपल्या कन्येलाही बोलावले नाही. शंकर मानी असेल्याने न बोलविता तो गेलाही नाही पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. म्हणून शंकराने तिला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठविले यामुळे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात नंदी नाही.

घंटा - एक मंगलमय नाद

Bells,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
आपण जेव्हा जेंव्हा मंदिरात जातो तेंव्हा तेंव्हा आपण देवासमोर हात जोडण्यापूर्वी घंटा वाजवतो. घंटेतून येणार्‍या नादामुळे आपल्या मनातील ऎहिक विचारांची साखळी तुटते आणि निर्विचार मनाने आपण देवाला नमस्कार करतो. या घंटेच्या बाबतीत योगशास्त्रात बरेच उल्लेख आहेत.याबद्दलचा एक श्लोक असा आहे की,
आगमनार्थ तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्। 
कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ।।
म्हणजेच "देवाच्या आगमनार्थ आणि राक्षसांच्या गमनार्थ तू घंटे तुझा मधुर मंगलमय असा नाद कर''. अर्थात घंटा ही मंगलतेची सूचक आहे..पृथ्वी आणि आकाश यामधील पोकळीचे प्रतिक घंटा आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सर्व मंदिरात या घंटा आढळतात. मात्र महाराष्ट्रातील काही काही घंटा एवढ्या मोठ्या आहेत की, त्या तेथे कशा आणून लावल्या असतील याबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते. भिमाशंकरच्या मंदिरातील घंटचे वजन ५ मण आहे.. त्यावर १७२९ असा रोमन लीपीतील आकडा सुध्दा कोरलेली आहे. कदाचित त्या साली ती घंटा ओतली असावी. १७३९ च्या सुमारास चिमाजी आप्पांनी वसई जिंकल्यावर ठाणे जिल्ह्यातील वाशिंद गावातून ती आणली असावी असा अंदाज आहे.पंचवटीच्या परिसरात असणार्‍या नारोशंकर मंदिराच्या समोर सुध्दा अशीच घंटा आहे.. त्या घंटेला सुध्दा "नारोशंकराची घंटा' असे म्हणतात. या घंटेवर सुध्दा १७२१ असा आकडा आहे.. या घंटेचे सुध्दा एका पोर्तुगीज चर्चवरुन स्थलातर झालेले आहे. मंदिराच्या समोरच्या तटावर चढून सुध्दा ही घंटा वाजवता येत म्हणजे त्याची उंची आणि आकार केवढा असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरेतर या मोठ्या प्रकारच्या घंटा म्हणजे मराठ्यांची विजयचिन्हे आहेत. पण सध्या मात्र ऊन, वारा, पाऊस यांचा मारा खात त्या उभ्या आहेत. या सर्व घंटा साधारणपणे पितळेच्या किंवा पंचधातूच्या बनविलेल्या असतात..

किर्तीमुख
अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले.  त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.

Kirtimukh, Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

मंदिरांवर किर्तीमुखाची विविध स्वरुपातील शिल्पे आढळतात. खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदिराच्या प्राकारात १६ प्रकारात सादर केलेली किर्तीमुख त्यातील कलाकुसर यास तोड नाही. या प्रत्येक किर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम करणार्‍याने शिवापार्वतीलाही किर्तीमुखात बद्ध केलेले आहे. अनेक ठिकाणी किर्तीमुखातील नक्षीकामातून मोर आणि हंस साकारलेले दिसतात, याशिवाय फळफुले सुध्दा बहरलेली दिसतात. काही ठिकाणी व्याघ्र ही साकारलेले दिसतात. वानर सुद्धा किर्तीमुखाच्या शिल्पात दाखवितात. काही मंदिरात सभामंडपातही खांबांवर किर्तीमुख कोरलेली आहेत.

शिलालेख
काळ्या पाषाणात कोरलेली किंवा बांधलेली ही मंदिरे आपल्या सारख्या सामान्य माणसांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. ती पहात असतांना सहाजिकपणे मनात प्रश्न येतो की, कोणी बरे ही मंदिरे बांधली असतील? तर याच उत्तर मिळते ते शिलालेखांवरून आणि ताम्रपटांवरुन.  शिलालेखांमध्ये मंदिराचा स्थापनकर्ता, काळ, त्याचे प्रारंभीचे स्वरुप, पुढे त्यात काय बदल झाले, त्यासाठी कोणी दान दिले या सर्व गोष्टींची माहीती मिळते.दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक मंदिरावर असे शिलालेख आढळतात. अशा प्रकारचे शिलालेख ही मंदिरासमोरच्या दिपमाळेवर, पुष्कर्णीवर, पायर्‍यावर, द्वारांवर, रंगेशिळे, उंबरठ्यावर, तुळवटांवर, खांबांवर तर कधी घंटांवर सुध्दा कोरलेले आढळतात.काही ठिकाणी मुर्तीच्या पायथ्याशी सुध्दा शिलालेख कोरलेले आढळतात.

सुरसुंदरी

Sursundari,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा वा पर्‍या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असाही अनेकांचा समज आहे. या सुरसुंदरीचा मंदिराच्या भिंतीवर असण्याचा उद्देश काय ? प्रयोजन काय ? हे समजणे महत्वाचे आहे.. शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध हे ५ विषय एकएकटे सुध्दा मारक असतात.. मानवाला तर या ५ विषयांनी पूर्णपणे ग्रासल आहे. मग त्यांची स्थिती कशी होईल. भक्तगणांनी मंदिरात जातांना कसे सावध चित्त असावे,  या संबंधीचे सूचन करणार्‍या सुरसुंदरी आहेत. शिवाय, काही जणी देवाच्या दर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे,देव दर्शनाला कसे जायचे असते इत्यादिंचे मार्गदर्शन करतात.रिक्तहस्ते देवाला जायचे नसते. पान,फळ, फुल इ. काहीच जवळ नसतांना केवळ पाणी सुध्दा मनोभावे देवाला अर्पण केले तरी चालते. गीतेत याविषयी छान श्लोक आहे.
पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ  दे मज । 
ते त्या पवित्र भक्तांचे अर्पिले खाए मी सुखे।।

Sursundari,Temples of Sahyadri, Temples in MaharashtraSur sundari,Temples of Sahyadri, Temples in MaharashtraSursundari,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

डालमलिका, पद्मगंधा, जया इत्यादी सुरसुंदरी हेच सुचवित असतात.. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नता सुध्दा असावी लागते. मध्ययुगीन मंदिरावर मोठ्या प्रमाणात सुरसुंदरीची शिल्पे कोरण्यात आली आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भक्तिसंप्रदायाची असणारी त्या काळातील लोकप्रियता. देवालय ही त्या गावांतील सांस्कृतिक केंद्र होती. भक्तजनांमध्ये नितीमूल्य निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उध्दार होईल. मंदिरावर गळ्यात लहानस, डमरुसारख वाद्य अडकवून ताल धरणार्‍या सुरसुंदरीस मर्दला असे म्हणतात. उर्वशी, मेनका, तिलोत्तमा या बहुदा प्रतापाची जाणीव करुन देण्यासाठी कोरलेल्या असाव्यात. सुरसुंदरी ज्या भावभावना, गुणधर्म वा हेतु प्रकट करतात. ते सर्वच ठिकाणी आढळत असेल तरी कलेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रकटीकरणात वेगळेपण असेल्याचे जाणवते. अनेक ठिकाणच्या मंदिराच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वारापाशी २ सरीतांची शिल्पे कोरलेली असतात. ती गंगा आणि यमुना यांची होत. त्यांच्या हातात जलकुंभ दाखविलेला असतो. तर पायाशी क्रमाने मकर व कासव कोरलेले असेत.

यक्ष-यक्षी
भारतीय शिल्पकारांनी यक्षांची आणि यक्षींची योजना वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते.पौराणिक कथांमधून यक्ष आणि यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी असून यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. कुबेर हा त्यांचा नायक किंवा राजा, हा धनाचा, संपत्तीचा अधिपती. यामुळे स्वाभविकपणे  त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. प्राचीन काळापासून लोकश्रध्देत स्थान मिळवून बसलेल्या स्थानिक व मर्यादीत शक्तीच्या देवतांचाही समावेश याच यक्षयोनीत होतो. असे करीतकरीत निसर्गातील वादळवारे,पूर, वृक्षवल्ली या सगळ्यांना मानवी म्हणजे यक्ष-यक्षीचे रुप देण्यात आले. मानवाने जे आपल्या आकलना पलिकडचे आहे आणि आपल्यापेक्षा सामर्थ्यवान अशा सर्व गोष्टींना यक्षरुप देऊन, त्याची पूजाअर्चा, उपासना करण्यात येऊ लागली. स्थलदेवता, जलदेवता, वृक्षदेवता यांना यक्षरुप देऊन त्यांची शिल्पे मंदिरात कोरण्यात आली. पूरात एखादा माणूस वाहून जाणे, अपघातात दगावणे या गाष्टी नैसर्गिक न समजता मानवाने त्याला जलदेवतेचा, वृक्षदेवतेचा कोप असे स्वरुप दिले आणि सर्व देवता यक्ष योनीत जमा झाल्या आणि माणूस या अतितमानवी शक्तीपुढे नतमस्तक झाला. अशा प्रकार या यक्ष यक्षींचा संभार वाढत गेला. 

Yaksha,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

मंदिर शिल्पात यक्षांना थोडी अवघड कामे दिली आहेत. ती म्हणजे भारवाहनाची! मंदिराच्या खांबाना आपल्या खांद्यावर तोलून धरण्याची. या भारवाहकांना "किचक' असेही म्हणतात. रतनगडच्या पायथ्याशी असणार्‍या "अमृतेश्वर' मंदिरात अशा प्रकारचे यक्ष आहेत. वेरूळच्या कैलास मंदिरात तीन तीनच्या समूहांत पट्टावरील हसतमुख,बावळट चेहर्‍याच्या यक्षांना पाहून मन प्रसन्न होत. याच मंदिरावर काही यक्षगण वीणा वादन करतांना दिसतात तर काही यक्षगण आपल्याच धुंदीत नाचतांना दिसतात. तात्पर्य काय तर शिल्पकारांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी निश्चित असा अर्थ आहे.


व्याल

Vyal,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra


मध्ययुगीन मंदिरांच्या भिंतीवर जे शिल्पकाम आहे त्यात अनेक ठिकाणी पुढचे पाय वर उचलून, मागच्या पायावर उभा असलेल्या सिंहासारखे, हत्तीसारखे डोके असलेला एक प्राणी दिसतो. त्याला "व्याल' असे म्हणतात.नागपूर पासून २१६ कि.मी. अंतरावर असणार्‍या मार्कंडी नावाच्या मंदिरावर विवध प्रकारच्या व्यालांच्या मुर्ती आढळतात. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे हा कोरलेला असतो. या व्यालांचे अनेक प्रकार आहेत. सिंहव्याल, व्याघ्रव्याल, गजव्याल, वृकव्याल हे त्यापैकीच काही. बहुतेक मंदिर शिल्पात या व्यालांच्या पाठीवर स्वार असतो. तर पायाखाली एखादा बैठा यक्ष असतो. या व्यालांची निर्मिती पश्चिम आशियात झाली . इराणमध्ये मौर्यकाळात अनेक शिल्पांमध्ये याचा वापर करण्यात आला. शिल्पकारांच्या कौशल्यामुळ हा परका, काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला. सर्वच व्यालमुर्ती मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत असे असूनही या व्यालमुर्ती कधी देवता, सुरसुंदरी या मूर्तींच्या आड येत नाहीत किंवा त्यांच्याशी स्पर्धा सुध्दा करत नाहीत.

नाग

Nagshilp,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
काही मंदिरांवर किंवा मंदिरा बाहेर नागाचे शिल्प कोरलेली आढळतात. नाग हे वास्तविक "काळाचे प्रतीक' आहे.. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो. काळही तसाच, तो अतिशय वेगाने पुढे सरकतो. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाचा दुसरा अर्थ म्हणजे "अनंत' म्हणूनच नागालाही "अनंत' म्हणतात.  काळ  ज्याच्या हातात आहे तो देव, देखिल याच नागाचे एक रुप आहे.

गोमुख

Gomukh,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra
"गो" म्हणजे गाय, तर गोमुख म्हणजे गाईचे मुख. गाईला हिंदुधर्मात महत्वाच स्थान आहे..तिला माता मानले आहे.. गोमातेचे दूध, शेण, मूत्र इत्यादी सासारेच कमालीच आरोग्यप्रद आहे.. त्यामुळे पूजाविधी करतांना पिंडीवर ओतलेले पाणी बाहेर काढतांना गोमुखातून सोडले जाते. याच्या मागची संकल्पना अशी की मुळातच देवावरून सोडलेले पाणी गोमुखातून बाहेर सोडल्यामुळे आणखीनच पवित्र आणि आरोग्यवर्धक होत. अनेक ठिकाणी गोमुखातून बाहेर सोडलेले पाणी एका छोट्याश्या कुंडामध्ये साठेवले जाते.अनेक मंदिरांमध्ये देवावरून सोडलेले पाणी वाहून जाण्यासाठी गोमुखा ऎवजी मकरशिल्प कोरलेले असते. अशा प्रकारची शिल्पे सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत. यांनाच "मकरप्रणाल' असेही म्हणतात.

 
दिपमाळ

Deepmal,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra

दिपमाळ हा एक महाराष्ट्रीयन शिल्प प्रकार आहे. देवाच्या मुर्ती समोर अखंड नंदादिप तेवत ठेवण्याची एक जुनी पध्दत आहे.. देवाच्या आरतीच्या वेळी दिप लावतात. उत्सव प्रसंगी शहरात दिपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायण ग्रंथामध्ये आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दिपलक्ष्मी आणि दिव्यांची झाडे लावण्याची प्रथा आहे. याशिवाय देवालयासमोर दिपदंड किंवा दिपस्तंभही असतात. पण दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे.विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत. म्हणूनच म्हटले  आहे. "दिपमाळ उजळे। मंदिरी परमप्रकाश पडे।।". याचा आणखी एक फायदा म्हणजे उंचीमुळे सर्वांना सणांची एक सार्वत्रिक घोषणा होत असे. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रुढ होती. विषेशत:जेजुरीच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या शेकडो दिपमाळा याचीच साक्ष देत आजही उभ्या आहेत.

वीरगळ
अनेकवेळा मंदिराच्या प्राकारामध्ये एक उभट आकाराची उंच आयताकृती अशी शिळा पडलेली दिसते. या शिळेलाच "स्मारक शिळा' असेही म्हणतात. धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारकशिळा म्हणजेच "वीरगळ'. तसेच  व्यक्तीच्या निधनानंतर अशा प्रकारची स्मारके उभारण्याची प्रथा होती आणि त्यातही एखादा वीर किंवा राजा किंवा थोर व्यक्ती असेल तर त्यासाठी अशाप्रकारची वीरगळ उभारण्यात येत असे. अर्थातच ही थोर व्यक्ती किंवा हा वीर पूजनीय असल्याने त्या वीरगळीला मंदिरात स्थान मिळाले. कर्नाटक मध्ये या वीरगळींना "कांदळ" म्हणतात. या वीरगळीवरील कोरीव कामाची योजना सर्वसाधारणपणे एकाच स्वरुपाची असते. या शिळांचे तीन भाग किंवा चौकटी पाडलेल्या असतात.. तळाच्या चौकटीत वर्ण्य म्हणजे विषय म्हणजेच वीराचे युध्द त्याचा मृत्यू, मधील चौकटी मध्ये त्याचे स्वर्गारोहण व वरील चौकटीमध्ये तो वीर स्वर्गात करीत असलेली ईशपूजा याप्रमाणे दृश्ये चित्रीत केलेली असतात. तात्पर्य, वीरगळ म्हणजे वीपुरुषाचा एक संक्षिप्त चरित्रपटच होय


कुंड/ पुष्करणी
पंचोपचार पूजा, अष्ट्भोग यासाठी म्हणून मंदिराच्या परिसरात अनेक आकाराच्यार बारवा निर्माण करण्यात आल्या. लहान आड ही मंदिर वास्तूच्या पावित्र्याची संकल्पना जपण्यासाठी निर्माण करण्यात आली. याच बरोबर मंदिरात विशेषत: शिवमंदिरात अखंड चालणार्‍या जलाभिषेकासाठी म्हणून गर्भगृहाच्या मंदिर परीसरातील एखादे "कळ्ळाल' पुष्करणी किंवा कुंडातील  व्यवस्था कलेली होती. देवालयात जाण्यापूर्वी  स्नान करुन शुचिर्भूत होऊन जाता यावे यासाठी ही व्यवस्था आवश्यक  मंदिरासाठी लागणारा दगड विहिरीचा आकार मोठा करुन त्यातून निघत असे तोच वापरला जाई.  अनेक ठिकाणी कुंडाना किंवा पुष्करणीला चारही बाजूंनी पायर्‍या असतात.

Temples of Sahyadri, Temples in MaharashtraWindow,Temples of Sahyadri, Temples in Maharashtra



Edited by amitsamant - 18 Dec 2013 at 11:28am
** सुरवात **

जेव्हापासून बुद्धिमान माणूस पृथ्वीवर वावरायला लागला तेव्हापासूनच त्याने दृश्य-अदृश्य शक्तींना कधी भक्तिभावाने तर कधी भीतीभावाने पुजायला सुरवात केलीहळूहळू जशी बौद्धिक क्षमता वाढू लागली तशी त्याने अजून आणि अजून सुंदर मंदिरांची निर्मिती सुरु केली.

पहिलं मंदिर माणसाने कधी बनवलं असेल ? ह्या प्रश्नच उत्तर साधारणपणे आपण देऊ ..पूर्व ५००-६०० ला तरी असेलचपण इतिहास असं नाही म्हणतसध्या असलेल्या माहिती नुसार त्या काळात मंदिरांची निर्मिती भारतीय उपखंडात तरी अजून झालीच नव्हतीआता अर्थातच आपण सध्या भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरशैलींबद्दलच बोलतो आहोतबाकी बौद्ध - जैन लेणी मंदिरे बऱ्याच आधी पासून बनणे सुरु झालेच होतेत्यांबद्दल पुन्हा कधीतरी बोलूया.

भारतीय उपखंडाच्या विचार केला तर वैदिक काळात म्हणजे साधारण पणे  ..पूर्व १५०० पर्यंतच्या काळात इंद्रवरुणअग्नीवायूभूमी अश्या देवतांची उपासना ही यज्ञांद्वारे केली जाईयज्ञाच्या अग्नीत अर्पण केलेले नैवद्य आवाहन केल्या जाणाऱ्या दैवतेपर्यंत पोहोचते अशी मान्यता होती.

वैदिक काळानंतर येणारा महत्वाचा कालखंड म्हणजे नंद राजघराण्याचा काळ ..पूर्व ५०० ते ३५०या काळात मूर्ती तसेच प्रतिमांचा ऐतिहासिक साधनांत उल्लेख येऊ लागतोमौर्यकाळातही म्हणजे नंदांनंतर १५० वर्ष पर्यंतही मूर्तीपूजा प्रचलित होती मात्र कोणत्याही साधनांत मंदिरांचा उल्लेख मात्र येत नाही.

साधारण ..पूर्व ११० दरम्यान नारायण वाटक ( म्हणजेच मंदिर ) बनवल्याचा उल्लेख एका अभिलेखात येतोतसेच मध्य प्रदेशातील विदिशा नगरी जवळ उत्खननात ..पूर्व ११३ मध्ये हेलिओडोरस या स्वतःला भागवत म्हणवणाऱ्या ग्रीक राजदूताने बनवलेल्या गरुडध्वज खांबाजवळच एका चापाकृती मंदिराचे अवशेष मिळालेह्या सुरवातीच्या काळात मंदिर डोलमेन प्रकारचे असायचेम्हणजे तीन उभ्या फरश्या आणि वरून आडवी एक फरशी छतासारखी टाकून एक लहानशी पडवी बनवली जात असावी.

डोलमेन 




आज ज्या वास्तूला आपण मंदिर म्हणून ओळखतो तश्या प्रकारच्या मंदिर वास्तूच्या बांधणीची खरी सुरवात गुप्त काळापासून होते म्हणजे साधारण .५००-६०० दरम्यानयाच काळातील एक मंदिर मध्य प्रदेशात बघायला  मिळतंतीगाव मधलं किकली देवीचं मंदिर हे अगदी गुप्तकाळातील मंदिर शैलीचं उदाहरण आहेहे मंदिर निराधार मंदिर आहेआता हे काय असतं ? तर मंदिर आहे म्हटल्यावर प्रदक्षिणा मार्ग तर हवाच ना… जर प्रदक्षिणा मार्ग मंदिराच्या बाहेरून असेल तर ते मंदिर निराधार मंदिर म्हणवले जातेपण जर मार्ग मंदिराच्या आतमध्येच असेल आणि वरून छताने आच्छादलेला असेल तर ते सांधार मंदिर असते

कंकली देवी मंदिर, तीगाव, मध्य प्रदेश 


 सुरवातीच्या काळात मंदिर वास्तू अगदीच गरजेपुरती होतीदेवाला ठेवायला गाभारा हवा मग बांधली दगडाची छोटीशी चौकोनी खोलीदेवासमोर बसायला छत हवं मग एक छोटासा मंडप बांधून टाकला दगडाचाबस अजून काय पाहिजेशिखर नकोओटा नकोकलाकुसरयुक्त स्तंभ नकोहा या मंदिरात फक्त गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवर थोडी कलाकुसर केलेली दिसते पण ती ही थोडीशीचसुरवातीची मंदिरे अशीचपण त्या मंदिर स्थापतींचे मन भरत नव्हतेहळू हळू मंदिरे फक्त देवाच्या पूजेची जागा ना राहता ग्रामातील एक सामाजिक स्थळ बनू लागलेत्याच सोबत मंदिरांनी कात टाकायला सुरवात केली आणि .१००० पासून ते .१४०० पर्यंत मंदिर वास्तुकलेची उच्चतम पातळी गाठली गेलीगुप्तमगधचंदेलसोळंकीगंगराष्ट्रकूटशिलाहारचालुक्यहोयसाळपल्लवचोलविजयनगर या आणि अश्या अनेक राजवटींनी मंदिर बांधणीला चालना दिली आणि या कलेचा उत्तरोत्तर विकास केला

            आता आपल्या मूळ विषयाला हात घालू तो म्हणजे ही मंदिरं कशी बघावीत्यांत काय बघावं आणि कसं ओळखावं आणि या मंदिरांचे प्रकार कोण कोणते असतातलिहिण्याच्या सोयीसाठी लेखाचे दोन भाग करूया.मंदिराचे भाग , .मंदिरांचे प्रकार. 




भाग एक  ** मंदिराची अंगे किंवा भाग **

नागर मंदिर बाह्यांगे 

अधिष्ठान :- मंदिर ज्या ओट्यावर उभे असते त्याला अधिष्ठानपीठ किंवा जगती म्हणतातमंदिरांचे अधिष्ठान हे चौकोनीआयताकृतीवर्तुळाकारलंबवर्तुळाकार किंवा अष्टकोनी असतेअधिष्ठानाचे महत्व फार असतेएक तर मंदिर त्यामुळे जमिनीपासून उंचावर दिसतेपावसाच्या पाण्यापासून बचाव होतोप्रदक्षिणा मार्गासाठी जागा मिळतेतसेच हत्तीघोडे वगैरेंचा शिल्पपट कोरून मंदिराची सुंदरता अजून वाढवता येते

मंडोवर :- मंदिराची बाह्यभिंतगाभारा तसेच बाहेरील विविध मंडप यांच्या बाह्य भिंतीला मंडोवर किंवा मसूरक म्हणतातया भिंती इतक्या मजबूत असतात कि त्या प्रचंड मोठ्या छताला आधार देऊ शकतील त्याच सोबत त्या इतक्या अलंकृत असू शकतात कि पाहणाऱ्याला भिंतीचा मूळ उद्देश छताला आधार देण्याचा आहे हेच विसरायला होईलया भिंतींवर देव दैवतांची अनेक रूपांतील शिल्पे तसेच मानवाकृती शिल्पांच्या पट्टीका असतातत्यांना जंघा म्हणतातया जंघांवर मंदिराच्या मूळ देवतेची रूपे तसेच देवतेच्या परिवारातील इतर देवतांची शिल्पेविचिध विभ्रमांतील नर तसेच स्त्री प्रतिमा असतातकाही मंदिरांच्या मंडोवरावर इतक्या मूर्ती असतात कि भिंतीचा इंचभरचा भागही दिसत नाहीएक जंघा पट्टीका कमी पडते कि काय म्हणून काही मंदिरांचे स्थपती दोन किंवा तीन तीनही जंघा मंडोवरावर वसवतातजसे अंबरनाथच्या मंदिराचे मंडोवर हे एकजंघा मंडोवर आहे कारण मंदिरावर एकाच जंघा पट्टीका आहेमात्र खिद्रापूरच्या मंदिरात तसेच औंढा नागनाथ मंदिरात द्विजंघा मंडोवर आढळते आणि मार्कंडी येथील मार्कंडेश्वर मंदिरात तसेच खजुराहोच्या मंदिरांचे मंडोवर तर त्रिजंघा युक्त आहेत

वेदिबंध :- अधिष्ठान आणि मंडोवरच्या मधील भागाला वेदिबंध म्हणतातहे वेदिबंध अनेक आडव्या थरांनी बनलेले असते जसे सर्वांत खाली तळात खूरकीर्तिमुखथरगजथरअश्वथरपुष्पथर इत्यादी

सुरसुंदरी:- मंदिराच्या बाह्य तसेच आतल्या भितींवर तसेच खांबांवर विविध विभ्रमांतील स्त्री प्रतिमा असतातअसतात त्या अगदी अप्सराच पण त्यांना सुरसुंदरी म्हणतातशिल्पशास्त्रात १६ तर क्षीरवर्णात बत्तीस सुरसुंदरींचे वर्णन आलेले आहेत्यापैकी काही सुरसुंदरी अश्या;

दर्पणा :- आरशात स्वतःला पाहणारीभक्तांनी मंदिरात शिरण्यापूर्वी आपल्या अंतर्मनात पाहून असलेले सगळे विकार काढून टाकले पाहिजेत असे सांगणारी

पुत्रवल्लभा :- देव भक्तांचे अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणेच लाड करतो हे सांगणारी 

शुभ गामिनी :- पायात रुतलेला काटा काढत असतांना.  भक्तीच्या मार्गात येणारे अनेक अडथळे खऱ्या भक्ताने असेच दूर करून भक्तीच्या मार्गावर चालत राहावे हे सांगणारी

शत्रू मर्दिनी :- हिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात शत्रूचे मुंडके असते

शुकसारिका :- एका हातावर शुक म्हणजेच पोपट बसवून दुसऱ्या हाताने त्याला खाऊ घालतांना हिला शिल्पित केले जातेदेव आपल्या भक्तांच्या पोटाचा प्रश्न स्वतःच सोडवतो हे सांगणायचा प्रयत्न असेल का हीचा ? 

डालमालिका शालभंजिका :- झाडाची डहाळी / फांदी धरून उभी असलेली

पत्रलेखिका :- अतिशय सुंदरपणे आपले विभ्रम दाखवत उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी मध्ये बोरू धरून कागदावर पत्र लिहीत असते

स्त्री आणि माकड :- पूर्णपणे सालंकृत होऊन घराबाहेर पडलेल्या ह्या सुंदरीच्या एक किंवा दोहोबाजूने माकडे तिचा कधी मेखला ओढत तर कधी पदर खेचत छळ करत असतात आणि सुंदरीही हाताच्या फटकाऱ्याने त्यांना दूर करण्याच्या आवेशात असते

नर्तकी :- नृत्य मुद्रेतली सुंदरी 

१०मर्दला :- ढोलकी वाजवत असलेली सुंदरी 

या आणि अश्या अनेक स्वरूपातील शिल्पे मंदिराचे बाह्यांग आणि अंतरंग सजवत असतात
असे म्हणतात कि मंदिरातील देवतेचे दर्शन घेण्याआधी मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारावीत्याने मंदिर कोणत्या देवाचे आहे तेही कळते आणि मंदिरात जाण्याआधी भक्ताने आपल्या मनाची तयारी कशी करावी हेही कळते


सुरसुंदरी 



गर्भगृह आणि त्याचे प्रवेशद्वार :- वरती म्हटल्याप्रमाणेच मंदिरांचे निर्माणच मुळी देवतेच्या स्थापनेसाठी झालेत्यामुळे, सर्वात आधीच्या मंदिरापासून ते आजच्या मंदिरांपर्यंत सगळ्याच मंदिरांत जी एक सामायिक गोष्ट सापडते ती म्हणजे गाभारा किंवा गर्भगृहतेव्हापासून आतापर्यंत आणि कोणत्याही प्रकारच्या मंदिरात गाभारा असतोही लहानसाचमंदिराचे स्थपती सहाव्या शतकातल्या मंदिरांतही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला सालंकृत करत होतेजसा जसा काळ पुढे सरकत गेला गर्भगृहाच्या द्वारपट्टीका अजून अजून सुंदर बनत गेल्यानीट निरीक्षण केल्यास गाभाऱ्याच्या दरवाजात लहान लहान द्वारशाखा बनवून त्यावर फुले पानेव्यालगज, स्तंभ, गंधर्व तसेच मिथुन शिल्पे कोरलेली आढळतात. काही मंदिरामध्ये तर या द्वारशाखेचे नऊ नऊ थरही आहेत. तसेच या द्वारशाखांच्या तळाशी दोन्ही बाजूला द्वारपाल आणि गंगा तसेच यमुना यांची शिल्पे असतात. गर्भगृह प्रवेशद्वाराच्यावरच्या पट्टिकेला ललाटपट्टी आणि त्याच्या मध्यभागाला ललाटबिंदू म्हणतात. या ललाटबिंदूंमधे मंदिराच्या मुख्य देवतेचे शिल्प असते मात्र ११व्या  शतकानंतर ललाटबिंदूंमधे गणेशाला स्थान मिळाले मग मंदिर कोणत्याही देवतेचे असले तरीही.  







गर्भगृह प्रवेशद्वार
अंतराळ :- गाभारा आणि मंडप यांना जोडणारे दालन म्हणजे अंतराळ . हा लहानगाच भाग असतो आणि पूर्णपणे उघडा म्हणजे ना छत ना भिंती असा असू शकतो (जसा सुरवातीच्या काही मंदिरांत आढळतो) किंवा पूर्णपणे बंदिस्त असतो. अंतराळात साधारणपणे मंदिराच्या मुख्यदेवतेची किंवा परिवारातील इतर देवतांची शिल्प किंवा मूर्ती देवकोष्ठकांत असतात. काही मंदिरांत मात्र अंतराळ पूर्णपणे रिकामे असते. 

मकरप्रणाल :-  मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या मूर्तीवर पाण्याच्या आणि दुधादि द्रव्यांचा अभिषेक केला जातो, या पाण्याचा निचरा करण्यासाठी गाभाऱ्यातून एका वारिमार्गाची योजना केलेली असते. या वारिमार्गाचे मुख गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने असते. बाहेरच्या बाजूने मार्गाच्या तोंडाशी मगरीचे मुख किंवा गाईचे मुख असते. प्राचीन काळातल्या मंदिरांमध्ये आपल्याला येथे मकरमुख (मगरीचे मुख) दिसते कारण हे बाहेर येणारं अभिषेकाच पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं जातं आणि मगर म्हणजे गंगेचं वाहन. त्यामुळे तिथून पडणारे ते गंगाजल. मराठेकालीन मंदिरांमध्ये मात्र मगरीचे महत्व कमी झाले आणि तिथे गोमुख दिसू लागले कारण गायही पवित्र मानली जाते. 



संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर                                










मकर तोरण :- मंदिराच्या प्रवेशाच्या किंवा मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशाच्या वरच्या बाजूला एक मकरतोरण असते. दोन्हीबाजूच्या मगरीच्या तोंडातून ते तोरण  बाहेर पडत असते. नक्षी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते कधी तिथे गंधर्व उडत जात असतानाची नक्षी असते तर कधी मोराच्या पिसाऱ्यासारखी. 

मकर तोरण 

मंडप :- ज्या कारणांसाठी आधुनिक काळात मानव मंडप बांधतो त्याच कारणांसाठी मंदिरांतही मंडपाची योजना केलेली असतेकाही काळ सानिध्यात बसण्यासाठीमंदिरात अर्थातच देवाच्या सानिध्यासाठीमंदिरात होणाऱ्या नृत्यगायनभजनप्रवचनादी कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठीमंदिर कोणत्याही प्रकारचं असलं तरीही मंडप हा असतोचनागर शैली मंदिरांमध्ये लहानच पण  ते  एका मागे एक असे मंडप असू शकतातद्राविड शैली मंदिरांत मात्र साधारणपणे एकच आणि मोठासा मंडप असतोमंडपही दोन प्रकारचे असतातजर मंडपाच्या दोन्ही बाजूंना भिंती नसतील किंवा फक्त कठडे असतील म्हणजेच भिंती पूर्णपणे खालपासून वरपर्यंत जाणाऱ्या नसतील तर अश्या मंडपाला रंगमंडप म्हणतातया रंगमंडपात मध्यभागी होत असणाऱ्या नृत्यभजनप्रवचन वगैरे सारख्या देवाच्या सेवेला पाहण्यासाठी भक्तांना येथे संधी असतेपण जर मंडप बंदिस्त असेल तर त्याला गुढमंडप म्हणतातजसा माणकेश्वर मंदिराचा आहे
रंगमंडप, पाटणादेवी, चाळीसगाव महादेव मंदिर








भाग दोन :   ** मंदिरांचे प्रमुख प्रकार आणि त्यांना ओळखण्याच्या खुणा **

भारतात मंदिर बांधणीत साधारणपणे  मुख्य प्रकार आहेत;
A.           उत्तर भारतातील नागर शैली 
B.           दक्षिण भारतातील द्राविड शैली 

याशिवाय ११ ते १३ व्या शतकांत प्रचलित असलेल्या अजूनही काही उपशैली प्रामुख्याने आढळतात;
C.                  मध्य भारतातील वेसर शैली 
D.                 भूमिज मंदिर शैली 
E.                  फांसणा शिखर शैली 

वरीलपैकी भूमिज शैली ही नागर शैलीचेच एक रूप आहे तर वेसर ही नागर आणि द्राविड शैलीचे मिश्रण आहेफांसणा ही वेगळी मंदिर शैली असण्यापेक्षा वेगळी शिखर शैली आहे असे म्हटले पाहिजेया मंदिर शैलींबद्दल अभ्यासताना अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील भूगोलाचावेगवेगळ्या राजघराण्यांचा भरपूर प्रभाव मंदिरांच्या बांधणीवर झालेला दिसतोजसा संगीतामध्ये सूर सगळे तेच असतांना सुद्धा गायकीची वेगवेगळी घराणी असतात तसंच येथेही आहेत्यामुळे गुजराथेतली मंदिरं आणि ओडिशा मधली मंदिरं सगळी नागरचंपण मंदिरांमधलं वेगळेपण दिसून येतमंदिरांचे प्रकार ओळखण्यासाठी साधारणपणे त्या मंदीरांची शिखरे बघितली जातातमंदिर शिखरांत असलेल्या वैविध्यावरून त्या मंदिराचा प्रकार ठरवलं जातो

सर्वप्रथम आपण दोन मुख्य शैली समजून घेऊ नागर आणि द्राविड

उत्तर भारतीय नागर मंदिर शैली शिखर  

खजुराहो मंदिर, मध्य प्रदेश 




खजुराहो मंदिर



ह्या शैलीची मंदिरे पंजाब पासून ते बंगाल पर्यंत तसेच काश्मीर आणि नेपाळ पासून ते विंध्याचल पर्यंतच्या परिसरात आढळतातनागर शैलीच्या मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आमलकमंदिराच्या मुख्य शिखराच्या कळसाखाली चपट्या आवळ्यासारखं असतं ते

नागर शैलीचे अजून एक लक्षण म्हणजे मंदिरावर छताची थोडीशीही जागा शिल्लक  ठेवता बनवलेली  एका पेक्षा अधिक शिखरेमंदिराच्या अंतरंगातील गाभाराअंतराळ तसेच विविध मंडप या सर्वांच्या वरून छतावर वेगवेगळ्या शिखरांची योजना केलेली असतेगर्भगृहापासून ते मंदिर वास्तू प्रवेशद्वारापर्यंत हि सर्व शिखरे उंचीत उतरत्या क्रमाने असतातगाभाऱ्यावर असते ते शिखर किंवा रेखाशिखर त्यानंतर महामंडप शिखरमंडप / भोगमंडप शिखरअर्धमंडप शिखर अश्या प्रकारे लहान लहान होत जाणारी शिखरे असतातशिखरांची संख्या मात्र कमी अधिक असू शकते
            गर्भगृहाच्या छातीवरचे शिखर खालून चौकोनी असते आणि वरच्या दिशेने निमुळते होत जातेयाच्या चारही दिशांनी मध्यभागी पूर्ण आमलकापासून ते शिखराच्या तळापर्यंत एक कलाकुसरयुक्त पट्टी असते तिला मूलमंजिरी किंवा रहपग किंवा लॅटिन म्हणतातमूलमंजिरीच्या दोन्ही बाजूंना हिच्या पेक्षा कमी उठावदार नक्षिदार पट्ट्या असतात त्यांना रथ म्हणतात
            अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रेखाशिखराच्या चारही बाजूच्या अंगावर मूळ शिखरावर लहान उंचीचे शिखर असते त्याला उरुशृंग म्हणतातह्या उरुशृंगावर अजून एक अजून लहान उंचीचे शिखर असते त्याला प्रत्यंग म्हणतातह्या  प्रकारचे शिखर आपल्याला भीमाशंकर मंदिर तसेच राजस्थान आणि गुजराथेतील मंदिरांवर सहजपणे बघता येते.


दक्षिण भारतीय द्राविड शैली मंदिर शिखर 




द्राविड शैलीची मंदिरे ही पिरॅमिड प्रमाणे खालून वर लहान लहान होत जाणाऱ्या पायऱ्यांची असतातप्रत्येक पायरीला भूमी म्हटले जातेप्रत्येक पायरीच्या म्हणजेच भूमीच्या कोपऱ्यांवर देवळाची लहान प्रतिकृती असते त्याला कूट म्हणताततसेच मध्यभागी गजपृष्ठाकृती छताचे लहान देऊळ असते त्याला शाल म्हणतात. (गजपृष्ठाकृती म्हणजे हत्तीला मागून बघत असल्याचा विचार करा त्याची पाठ आपल्याला जशी गोलाईमध्ये दोन्ही बाजूला उतरती दिसते तसेच छत बनवले जाते).


द्राविड शैली मंदिर शिखर 




















द्राविड शैली मंदिराचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिखरावरील कलशाखाली असलेली स्तूपीकाहि स्तूपीका चौकोनीषटकोनी किंवा अष्टकोनी असतेद्राविड मंदिरांत मंडपावरील छत मात्र पूर्ण सपाट असतेनागर मंदिरांप्रमाणे अधिकची शिखरे बनवली जात नाहीत आणि त्यामुळेच या मंदिरांचे मंडप नागर मंदीरांपेक्षा फार मोठ्या आकाराचे असतातवेरूळच्या लेण्यांतले कैलास मंदिर हे द्राविड शैलीतले आहे.

वेरूळ, कैलास मंदिर























फांसणा शिखर 





श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर

            
फांसणा हि मंदिर शैली असण्यापेक्षा फक्त एक शिखर पद्धती आहेनागर तसेच द्राविड दोन्हीप्रकारच्या  मंदिरांमध्ये हि शिखरे आढळतात.  साधारण लहान मंदिरांचे शिखर अश्या प्रकारचे असतेहि शिखरे उतरत्या पायऱ्यांसारखी असतातपिरॅमिड प्रमाणेच खालून वर निमुळत्या होत जाणारी आणि  लहान लहान होणाऱ्या पायऱ्यांचीमात्र या पायऱ्यांवर कूट किंवा शाल दिसत नाहीतअश्या प्रकारचे शिखर आपल्याला महाबळेश्वराच्या मंदिरावर दिसतेकाही ठिकाणी मंदिराचे मुख्य शिखर सोडून बाकी मंडप शिखरे या प्रकारची असतात जसे कि अंबरनाथच्या महादेव मंदिरात दिसतेया शिखराच्या कलाशाखाली जर आमलक असले तर ते मंदिर नागर समजावे आणि जर स्तूपीका असेल तर द्रावीड


मध्य भारतातील भूमिज मंदिर शैली शिखर 

सिन्नरचे गोंदेश्वर महादेव मंदिर 

महाराष्ट्रात भरपूर संख्येत आढळणारी मंदिरे हि भूमिज प्रकारची आहेतवर म्हटल्या प्रमाणे भूमिज ही नागर शैलीची उपशैली आहेत्यामुळे रेखशिखरमंडप शिखरअर्धमंडप शिखर वगैरे सर्व असतात ह्या मंदिरांच्या छतावरही मात्र

रेखा शिखराची बांधणी थोडीशी वेगळी असतेह्या मंदिरांवर उरुशृंग आणि प्रत्यंग आढळत नाही त्याऐवजी आमलकापासून ते शिखराच्या तळापर्यंत मूलमंजिरीची नक्षीदार पट्टीका असते.  मुख्य लक्षण म्हणजे शिखराच्या प्रत्येक दोन बाजूंच्या मूलमंजिरींच्या लतांच्या मधल्या भागात मूलमंजिरीच्या लघुरूपातल्या आणि खालून वरच्या दिशेने लहान लहान होत जाणाऱ्या प्रतिकृतीच्या उभ्या रांगा असतातएका रांगेत एका वर एक अश्या , क्वचित  असतात आणि अश्या  किंवा  उभ्या रांगा असतातया रांगांना कूटस्तंभ म्हणतातरतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराच्या शिखरावर जिथे आपल्याला  कूटस्तंभ बघायला मिळतात तिथेच अंबरनाथचे महादेव मंदिरसिन्नरचे गोंदेश्वर मंदिरांच्या शिखरांवर  कूटस्तंभ आहेतमहाराष्ट्रातील सर्वांत जुने भूमिज मंदिर हे अंबरनाथ चे शिव मंदिर आहेशिलाहारांच्या शिलालेखाद्वारे हे म्हणता येते कि हे मंदिर .१०६० मधेच बांधून पूर्ण झाले होते


रतनवाडी अमृतेश्वर मंदिर 

त्रिजंघा मंडोवर, मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडी, गडचिरोली 

एकजंघा मंडोवर, अंबरनाथ महादेव मंदिर 




























वेसर मंदिर शैली शिखर

वेसर शैली मंदिर शिखर 





            वेसर मंदिर शैली म्हणजे उत्तर भारतीय नागर आणि दक्षिण भारतीय द्राविड शैलीचा सुरेख संगम आहेनागरशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच आणि अतिशय सुंदर दिसणारे रेखाशिखर म्हणजेच गर्भगृहाच्या छतावरचे शिखर पण या मंदिरांची अडचण एकच ती म्हणजे लहानसा मंडपनागर मंदिरांचा मंडप लहान का असतो याचा उहापोह वरती आधीच केलेला आहेप्राचीन काळी मंदिरे हि सामाजिक केंद्रे होती राजाला किंवा गावाला कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनांसाठी मंदिरेच उपयुक्त वाटतपण मग आता मंडप लहान असल्यावर तिथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरसहभाग नोंदवणाऱ्या लोकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होइआता याचा इलाज काय करावा तर या मंदिरांच्या स्थपतींनी त्यासाठी दक्षिण भारतातील मंदिरांकडे पाहिलेद्राविड शैलीच्या मंदिराचा मंडप आकाराने फार मोठा असतो किंवा मंदिर बांधणाऱ्याला गरज वाटल्यास कमी अडचणीत मोठा मंडप सहज बांधला जाऊ शकतोमध्य भारतातील मंदिर स्थपती नागर आणि भूमीज मंदिर शिखरांच्या प्रेमात होते त्यांनी मंदिरांच्या गर्भगृह छतांवर उंचच उंच नागर आणि भूमिज शिखरे उभी केली मात्र मंडपाची छते दक्षिणेकडील पद्धतीसारखी सपाट बनवायला सुरवात केलीहीच उत्तर आणि दक्षिण संगम शैली वेसर शैली म्हणवतेमहाराष्ट्रात तसेच जास्त करून कर्नाटकात वेसर शैलीची मंदिरे आढळतातचालुक्य आणि होयसळ राज्यकर्त्यांनी वेसर शैलीचा भरपूर वापर केलाबदामी आणि हंपी ची मंदिरेबेलूर तसेच हळेबिडूची मंदिरे वेसर शैलीची आहेत



हेमाडपंथी मंदिरांचं गुपित
यादवांच्या काळात १३व्या शतकात हेमाडपंत किंवा हेमाद्री पंडित हा प्रधानमंत्री होतायादवराजे हे शंकराचे निस्सीम भक्त असल्या कारणाने त्यांच्या आज्ञेने हेमाडपंताने संपूर्ण यादव साम्राज्यात शिव मंदिरे बांधविलीहेमाड स्वतः अनेक शास्त्रांत निपुण होता त्याने त्याकाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेल्या नागर आणि भूमिज शैलींचा वापर मंदिरे बांधण्यासाठी केलामात्र त्याने बांधकामाची स्वतःची वेगळी शैली विकसित केली होती सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा  भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापूनत्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जातेमंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते.

हरिश्चंद्रेश्वर महादेव मंदिर, हरिश्चंद्रगड 

आपल्याकडे प्राचीन दिसणारे कोणतेही मंदिर हेमाडपंथी मंदिर म्हटले जातेपण हे चुकीचे आहे हेमाद्री पंडितांच्या शेकडो वर्ष आधीही महाराष्ट्रात उत्कृष्ट प्रकारची मंदिरे बनवली जात होतीहेमाडपंती स्थापत्यशैली मध्ये बनवलेली बरीच मंदिरे महाराष्ट्रात आहेतजसे की रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिरऔंढा नागनाथमंदिरइत्यादी.




मंदिरांचे अंतरंग आणि बाह्यांग यांची थोडीफार माहिती घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या अश्या मंदिरांची यादी बनवूया जी पहिलीच पाहिजेतहि मंदिरे आपल्या सुंदरतेनेवास्तुशास्त्रानेशिल्पकलेने आपले एक विशिष्ट स्थान कमावून बसलेली आहेत

अंबरनाथचे महादेव मंदिर 
कोप्पेश्वर मंदिरखिद्रापूर 
महालक्ष्मी मंदिरकोल्हापूर 
अन्वा शिवमंदिरसिल्लोडऔरंगाबाद 
निळकंठेश्वर मंदिरनिलंगालातूर 
श्रीविठ्ठल मंदिरपानगावलातूर 
धर्मपुरीचे केदारनाथ मंदिरपानगाव पासून ३० कि.मी., लातूर 
ताकाहारी मंदिरनगर 
औंढानागनाथ मंदिरहिंगोली
१०सिद्धेश्वर मंदिरहोट्टलनांदेड 
११मार्कंडेश्वर मंदिरमार्कंडीगडचिरोली 
१२दैत्यसुदन मंदिरलोणार 
१३गोंदेश्वर पंचायतन मंदिरसिन्नरनाशिक 


·        धवल भंगाळेपाऊल ट्रेकर्सडोंबिवली.

https://dhawalbhangale85.blogspot.com/2020/04/blog-post.html

माहिती आणि काही छायाचित्र साभार आंतरजाल.
1.       http://misalpav.com/node/16630 blog by Sharad
2.       Google.com Images

3.       BOOK: मंदिर कसे पाहावे -- गोबंदेगलूरकर

 

भारतातील मंदिरे - १

 

गाभा: 

भारतातील मंदिरे
(भारतातील मंदिरांचा इतिहास,त्यांच्या उभारणीमधील वेगवेगळ्या शैली, त्यांतील उपशैली, निरनिराळ्या प्रांतातील देवळांत आढळणारे फ़रक, तसेच वैयक्तिक देवळातील वैशिष्टे, नेमके काय पहाण्यास विसरू नये यांची तोंडओळख करून देणारी लेखमाला. इथे आपणास काही पारिभाषिक शब्दांची सूचीही पहाता येईल. तिचा उपयोग आपणाला इतर तांत्रिक लेख वाचतानाही होईल. विषयाचा आवाका फ़ार मोठा असल्याने जास्त माहिती देणे शक्य नाही. दिग्दर्शन एवढाच माफ़क उद्देश.)

इतिहास.
आपण लहानपणी देवळात जातो. मोठेपणी जातोच असे नाही.पण देवळांबद्दलचे एक आकर्षण मनात घर करून रहातेच. ही भावना सर्व भारतीयांच्या मनात शेकडो वर्षे घर करून राहिली आहे.त्यामुळे क्षेत्रांमध्ये सोडाच पण पुण्यासारख्या शहरातही शेकडो देवळे आढळतात. हिंदू धर्मात अनेक देव असल्याने त्यात भर पडते. वर्षानुवर्षे कलाकारांनी अपार कष्ट करून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यामुळे देवळे भक्तांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आकर्षणे ठरली आहेत. तर अशी ही देवळे बांधावयास सुरवात तरी केंव्हा झाली ? किंवा असे विचारले की सर्वात पुरातन देऊळ पहावयाचे असेल तर ते कोणत्या शतकातील असेल ? माझी खात्री आहे बहुतेकांचा अंदाज चुकीचा असेल. बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
पुराणांनी जेव्हा शंकर, विष्णु असे "सगुण" देव "हिंदू" धर्माला दिले तेंव्हा देवळे बांधावयाची सोय झाली. पहिल्यांदा मूर्ती आली व नंतर तीचे घर.आधीच्या वाङ्मयात उल्लेख असले तरी दगड विटांची टिकावू देवळे उभारावयाची वेळ तिसऱ्या शतकातच आली. शंख-चक्र-गदा-पद्मधारी मूर्तीची पूजाअर्चा करावयाची तर गाभारा पाहिजे, चार लोकांना बसावयाला मंडप पाहिजे, प्रदक्षणा मार्ग पाहिजे. बस, सुरवातीच्या देवळात एवढीच सोय होती. मध्य प्रदेशातील तिगवा "कंकाली मंदिर" सर्वात जून्या देवळातील एक. गाभारा बाहेरून पावणेचार मि.लांब-रूंद, आतल्या बाजूने अडीच मि.चौरस.समोरचा मुखमंडप पावणेचार मि.लांब व पावणेदोन मि. रुंद आहे. चार स्तंभ, त्यावर पूर्ण कलश व सिंहाच्या मूर्ती. सपाट छप्पर.द्वाराभोवती गंगा- यमुनेच्या मूर्ती. पूजेला आवश्यक तेवढ्याच भागांचा समावेश. पण सुरवात जरी अशी साधी-सुधी असली तरी पुढील प्रगती भराभर झाली.याचे कारण परत अगदी साधे. बौद्ध-जैन स्थापत्यकलेमुळे कलाकार कलेत आणि तांत्रिक बाबतीत परिपूर्ण होते. काय करावयाचे सांगा. कसे करावयाचे आम्ही बघू. बुद्ध हवा? बुद्ध घ्या. शंकर हवा? शंकर घ्या; तितकाच सुंदर. काय बांधावयाचे, कसे बांधावयाचे ते ठरवण्यास एक दोन शतके लागली. हा काळ चाचपणीचा (trial and error) होता. निरनिराळ्य़ा शैलींचा उगम या काळातीलच. आज पाहावयास मिळणारे सर्वात जुने देऊळ, तिगवा, मध्यप्रदेश.

सुरवातीलाच मी काही पारिभाषिक शब्दांची सूची देतो आहे. त्याची गरज भासेलच असे नाही. पण माहिती असेल तर नागर-द्रविड शैलींमधील बारकावे समजावून घेणे सोपे जाईल.

अर्धमंडप: मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरचा लहान आकाराचा, तीन बाजूंनी उघडा असलेला मंडप.
अर्धस्तंभ: भिंतीत गुंतवल्यामुळे ज्यांचा अर्धाच भाग दृष्टीस पडतो असा खांब.
आमलक: शिखराच्या माथ्यावर येणारे, रायआवळ्यासारख्या खाचा असलेले दगडी चक्र.
उत्क्षिप्त: भिंतीचे पुढे सरकलेले ( फ़ेकलेले म्हणजे क्षिप्त ) काही भाग यांना रथ असे म्हणतात.यांना विसंवादी, मागे सरकलेले, उठाव .देणारे भाग म्हणजे उत्क्षिप्त.
उद्गम: भिंतीवर सजावटीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोणी रूपक .
अंतराळ: देवळाचा गाभारा आणि मंडप यांच्या मधोमध येणारे दालन. आरंभी याच्यावर छप्पर नसे. पीठ : जोते
उपपीठ :पीठावर येणारे, कमी उंचीचे जोते किंवा चौथरा.
कपोत: सज्जा किंवा पागोळी .
कोष्ठ: कोनाडा
गजपृष्ठ: चापाकार वास्तूचे छप्पर.
जंधा: देवालयाच्या भिंतीचा मधला भाग.हा सहसा सपाट असून यावर मूर्तिकाम केलेले आढळते.
तरंगहस्त: bracket.
प्रणाल: पन्हाळ.
भद्र: कोणत्याही इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर बांधण्यात येणारा उघडा मंडप.
भूमी: मजला.
मंडप: आयताकार दालन. विशेषत: गाभाऱ्य़ासमोरील.
रथ: गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे. हे एकापुढे एक सरकतात. या रथांच्या संख्येवरून विधानाला त्रिरथ, पंचरथ अशी नावे देतात.
वितान: छत.
विमान: गाभारा व शिखर यांना मिळून दिलेले नाव.
वेदिका: कठडा.
व्याल: सिंह, वाघ, हत्ती अशा निरनिराळ्या प्राण्यांचे अवयव जोडून केलेला प्राणी.शरीर मुख्यत्वे सिंहाचे असते.
शाला: आयताकार विधानाची इमारत.
शिखर: छप्पर. यात कळसाचाही समावेश होतो.
शुकनास: "अंतराळ" य़ा भागावर येणारे गोलाकर छप्पर. याच्या लहान बाजूंपैकी एक शिखराला चिकटलेली असते तर दुसरीत कोनाडा करून देवमूर्ती बसवतात.
हस्त: क्षिप्त भाग. Bracket सारखा बाहेर आलेला भाग
काही इन्ग्रजी शब्दही बघू.
Apsidal : चापकार विधानाची वास्तू.
Arc : कमान
Barrel vaulted roof : गजपृष्टाकार छप्पर.
Brace: कर्ण
Bracket : हस्त
Capital : स्तंबशीर्ष, मथळा
Ceiling : छत, वितान
Column : खांब
Facade : गृहमुख
Frieze : शिल्पपट्ट
Medallion: तबक
Monolithic : एकपाषाणी
Motif : रूपक
Pilaster : अर्धस्तंभ
Plan : पदविन्यास,विधान
Recess : प्रतिक्षेप
Relief : उठाव

बुद्ध-जैन स्थापत्यकलेचा देवळांवरचा परिणाम
बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेचच त्याच्या अवशेषावर (उदा. दात ) इमारत बांधावयास सुरवात झाली. तसेच विहार, चैत्य यांचीही उभारणी सुरू झाली. हा काळ सुमारे इ.स.पूर्व ४०० च्या आधी. बौद्ध धर्माचा ओसर इ.स. ३०० ते ४०० धरला तर जवळजवळ ७०० वर्षे ही बांधकामे चालू होती. या काळात चाचपणी होत असणारच.हिंदू देवळांची लाकडी किंवा कच्च्या विटांची बांधकामे आधीपासून चालू असली पाहिजेतच कारण वाङ्मयात तसे उल्लेख मिळतात. कबूल. पण दगडांची देवळे तिसऱ्या शतका नंतरचीच मिळतात. त्या काळच्या स्थपती समोर विहार, चैत होते आणि देवळे बांधताना तो त्यांचा उपयोग करणारच. आधाराबाबत म्हणाल तर बौद्ध कलेचा देवळांच्या बांधणी वरचा परिणाम यावर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.. सुरवातीला म्हटल्याप्रमाणॆ विषयाचा आवाका मोठा असल्याने सगळ्याच गोष्टींबद्दल लिहणॆ अवघड आहे. क्षमस्व.
आता एक विनंती. लेखातील संदर्भाकरिता लागणारी चित्रे मी देईनच. पण आपणही आपल्याकडचे फोटो डकवलेत तर सगळ्यांच्या आनंदात भरेच पडेल.

बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.

वैदिक आणि अवैदिक या दोन्ही उपासना खूप जुन्या आहेत... उगाच हिंदुनी बौद्धांनंतर मंदिरे आणि मूर्त्या उभारल्या असे कशाला म्हणायचे? रामाने समुद्र ओलांडण्यापूर्वी रामेश्वरला शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली होती.. म्हणजे त्या काळात शिवलिंग आणि शिवलिंग्मंदिर असणार. श्रीकृष्णानेही गुजरात्जवळ समुद्र ओलांडून द्वारका बेटावर जाताना सोमनाथाची ( म्हणजे शिवलिंगाचीच ) पूजा केली होती.. ( आता आम्हीही समुद्र ओलाम्डणार असल्याने आम्हीही एक शिवलिंग पूजणार आहोत. :) ) वैदिक देवांच्या मूर्ती नसतात, वैदिक धर्म जुना आहे. पण मूर्ती पूजणारा शैव आणि इतर हिंदु पद्धतीही तितकीच जुनी आहे..

 तसेच असावे. मूर्तीपूजा ही वैदिक धर्मात नाही. सध्याची हिंदू मूर्तीपूजा ही बौद्धांच्या काळानंतरच आली आहे. अर्थात बौद्धांच्याही आधी मातृदेवतांची पूजा आणि कुळाच्या नैसर्गिक दैवतांची पूजा ही होतच असावी. 

मूर्तीपूजा वेदात नव्हती. पण वैदिकांच्याबरोबरच त्या काळात जो अवैदिक स्मूह होता , त्यातील बरेच लोक शिव, स्कंद, गणपती आणि विविध स्त्री रुप देवी यांचे पूजन करत होते. त्यांच्या मूर्ती होत्या आणि देवळेही होती... हिंदु धर्मातील स्कंद हाच देव बौद्धानी वज्रपाणी या रुपात उचलला. त्याच्याच नावावरुन वज्रयान हा संप्रदाय तयार झाला. हाच स्कंद दक्षिणेत मुरुगन नावाने ओळखला जातो आणि महाराश्ट्रात कार्तिकेय या नावाने गणपतीचा भाऊ म्हणून आपण याला ओळखतो. http://en.wikipedia.org/wiki/Skanda_(Buddhism) , सारांश, मूर्तीरुप देवपूजा ही बौद्धांच्या आधीपासून आहे.
लेखातच म्हटलेले आहे की पुराणांनी मूर्तीरुप देवता दिल्या. आणि त्यानंतर असेही म्हणायचे की बौद्ध धर्मानंतर मूर्तीपूजा आली. म्हणजे मग पुराणे बौद्धांच्या नंतर आली की काय? :)  

श्री. जागोमोहनप्यारे :मी म्हटले आहे कीं सर्वात पुरातन मंदिर पहावयाचे असेल तर तिसर्‍या शतकापर्यंत यावे लागेल. त्या पूर्वी देवळे होती; तसे उल्लेख आहेत, पण ती देवळे लाकडी/वीटांची असावीत; ती आज पहावयास मिळत नाहीत.इ.स.पूर्व स्तूप, विहार पहावयास मिळतात.
लेखमाला आहे मंदिरांवर. मूर्तिपूजेवर नाही. तो विषय निराळा. आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर मीही माझ्याकडील मजेदार माहिती देईन.( उदा. बौद्धांची तारा ही देवता गणपतीवर नाचत आहे अशी मूर्तीही पहावयास मिळते!)
पुराणे अर्थातच बुद्धानंतर ६००-७०० वर्षांनंतरची आहेत.

श्री. चित्रा : शिल्पांत पक्षी (गरुड, हंस, गंडभेरुंड इत्यादी) आहेत. शस्त्रे योद्ध्यांच्या हातात आहेत. अवजारे नसावित कारण फार शोभादायक नाहीत म्हणून, हा माझा अंदाज. आज नजरेसमोर नाहीत पण आता लक्षात ठेवीन व दिसली तर कळवीन.
शरद

आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर मीही माझ्याकडील मजेदार माहिती देईन.( उदा. बौद्धांची तारा ही देवता गणपतीवर नाचत आहे अशी मूर्तीही पहावयास मिळते!)

पुन्हा तेच ! आता हिंदुंच्या मूर्ती या जर बौद्धांच्यानंतर आल्या, तर या ताराबाईला टाळक्यावर नाचायला गणपती कुठून सापडला ???? :)

आणि मुळातच बौद्ध धर्मात देव असणं हाच मोठा विनोद आहे... बुद्धानी देव नाकारलेला असून बौद्ध धर्म हा एक नास्तिक धर्म आहे.. ( नास्तिक दोन्ही अर्थाने- वेदानाही मानत नाहीत आणि देवानाही मानत नाहीत. ) त्यांच्या अनुयायानी हे असे देव तयार केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुराणे अर्थातच बुद्धानंतर ६००-७०० वर्षांनंतरची आहेत.

तुम्हाला कोपरापासून दंडवत ! सन ७८६ पूर्वी जग आस्तित्वातच नव्हते असेही म्हणणारे लोक आहेत!! त्यांच्यापुढे तुमचे 'हे ' संशोधन काहीच नाही !! :) बुद्धानंतर ६०० वर्षानी हिंदु मूर्ती आल्या असे म्हणताय, मग इ स पूर्वी जी लाकडाची आणि विटांची देवळं होती असे तुम्ही म्हणताय, त्या देवळात कोण बसत होतं??? :)

बौद्ध धर्मात जे लोक गेले ते त्या काळातले पूर्वीचे हिंदुच तर होते.. म्हणजे बुद्धापूर्वी वास्तु आणि स्थापत्यचे ज्ञान लोकाना नव्हते आणि अचानक बौद्ध धर्मात गेल्यावर या लोकाना वास्तु आणि स्थापत्य ज्ञानाचा दृष्टांत झाला की काय? :) .. हिंदु धर्म बाकी धर्माना अर्वाचीन कसा हे सिद्ध करायची आजकाल चढाओढच लागलेली आहे.. ! :)

बौद्ध धर्मात जे लोक गेले ते त्या काळातले पूर्वीचे हिंदुच तर होते.. म्हणजे बुद्धापूर्वी वास्तु आणि स्थापत्यचे ज्ञान लोकाना नव्हते आणि अचानक बौद्ध धर्मात गेल्यावर या लोकाना वास्तु आणि स्थापत्य ज्ञानाचा दृष्टांत झाला की काय? हिंदु धर्म बाकी धर्माना अर्वाचीन कसा हे सिद्ध करायची आजकाल चढाओढच लागलेली आहे.. !

असे नसावे. जैन, बौद्ध आणि वैदिक अशा तीन ढोबळ पद्धती धरल्या, तर हे सर्व एकमेकांकडून काही ना काही विचार/आचार घेऊनच तयार झाले असावेत.

बौद्ध धर्मात गेल्यावर स्थापत्याचा दृष्टांत झाला नाही, तर अशोकाच्या आणि त्याच्यानंतरच्या काळात बौद्ध मठांना जे दान दिले गेले, त्यातून मठांकडे पैशाचा ओघ वाढला आणि स्तूप बांधता आले. जैनांचीही देवळे नंतरच झाली. गुप्तकाळात व्यापार-उदीमही वाढला असावा, त्यामुळे हिंदू देवतांची देवळे बांधली गेली असावी.

याउलट तत्कालीन बौद्ध जैन किंवा हिंदू असा कुठचाही शिक्का नसलेली घरे/राजवाडे यांचे अवशेष फारसे दिसत नाहीत, कारण त्यांच्याकडे हे खूपकाळ टिकणारे बांधकाम साहित्य (दगड) नसावेत/तेवढे उत्खननही शक्य नसावे. विटामातीची घरे, किंवा लाकडी/गवताची घरे नष्ट झाली असतील. जे दगडात कोरले होते ते तसेच राहिले. पण बौद्धांआधी नागरी स्थापत्य नव्हते असे समजण्याचे कारण नाही. कुठच्याही काळातील लोकांची राहणी कशी होती याबद्दल आपल्याला भित्तीचित्रांमधून, शिल्पांमधून काही ना काही समजतच असते.

 भारतातील मंदिरे -२

 

गाभा: 

भारतातील देवळे -२
(देवळे ह्या इमारती आहेत. आज ह्या इमारतींच्या प्रमुख भागांची,जोते(पीठ), दरवाजा, भिंत आणि छप्पर यांची माहिती घेऊं)
देवळांची उत्क्रांती कशी झाली याचा मागोवा घेण्याआधी सुरवातीला काय होते ते बघू. देवळाच्या अत्यंत गरजेच्या गोष्टी तीन.मूर्तीकरता जागा म्हणजे गाभारा. लोकांना (म्हणजे भक्तांना/पुजाऱ्याला) जागा, त्याला मंडप म्हणू आणि प्रदक्षिणॆकरिता जागा. कोणत्याही इमारतीला भिंती,दरवाजा व छप्पर लागणारच. लहान-मोठा आकार व सुशोभन हे नंतर.
सुरवात तिगवा येथील कंकाली मंदिरापासून करू. फोटो पहा. भिंती दगडाच्या, साध्या दिसतात.; गाभाऱ्यावर आणि मंडपावर सपाट छप्पर आहे. प्रदक्षिणा मार्ग इमारतीच्या बाहेर व तो आच्छादित नाही. आच्छादित असेल तर त्याला "सांधार" म्हणतात, नसेल तर "निरंधार". येथे निरंधार. आत थोडे सुशोभन केले आहे.गंगा यमुना यांच्या मूर्ती आहेत.आकारही तसा लहानच म्हणावयास हरकत नाही. ही झाली सुरवात.
329f

देवळांचे दोन प्रकार. पहिला उघड्यावरील देवळॆ. दुसरा प्रकार म्हणजे डोंगर कोरून केलेली गिरिशिल्पे. काल गणनेने गिरिशिल्पे आधीची.पण आपण त्यांचा विचार नंतर करू.
देऊळ म्हणजे इमारतच. तर आता या ठिकाणीच इमारतींच्या भागांचा विचार करू. पाया किंवा जोते, दार, भिंती, छप्पर ही महत्वाची अंगे. खालची फरशी सगळीकडे सारखीच, दगडाची.
पीठ :
पीठ म्हणजे जोते. इमारतीच्या मजबूतीसाठी जोते पाहिजेच. शिवाय ते जमीनीपासून उंचही पाहिजे. तेवढेही पुरेसे वाटले नाही तर त्याच्यावर उपपीठ किंवा चौथरा. पीठ/उपपीठ जर प्रशस्त असेल तर देवळाभोवती प्रदक्षीणेला जागा मिळते. पीठ/उपपीठ उंच असल्यास त्याच्या थरामध्ये निरनिराळ्या प्राण्यांच्या आकृती/शिल्पपट्ट दाखवता येतात. उदा. खाली हती,त्यावर घोडे वगैरे.
पाया मजबूत असला की इमारतीला मजबूती मिळते हे झालेच पण पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून बचाव व मंदिर लांबवरून दिसते हेही महत्वाचे फ़ायदे..
निरनिराळ्या कालखंडातील पीठाची छायाचित्रे देत आहे.
पीठ १
peeth-1

पीठ २
peeth-1
पीठ दिसते पण सजावट नाही.
उपपीठ
upapeeth-1
उपपीठ लहान आहे पण सजवले आहे. आपणास याहून उंच उपपीठे (छान सजवलेली) पहावयास मीळतील.

द्वारशाखा :
द्वारशाखा म्हणजे प्रवेश करावयाची जागा.कडी-कोयंडा-कुलुप लावून बंद करावयाचा घराचा दरवाजा नव्हे. बऱ्याच ठिकाणी बंद करावयाचा दरवाजा नसतोच. द्वारशाखा समोरून तसेच बाजूंनीही असातात. चौकट एक असते किंवा अनेक. काही वेळा चौकट नसतेही. दोन बाजूंच्या भिंतीच ते काम करतात. चौकट (किंवा चौकटी) करावयास व सुशोभनास सोप्या. दोनही बाजूला गंगा-यमुना किंवा द्वारपाल उभे केले की एकदम उठाव येतो. रुंदी व उंची आटोपशीर असल्याने नाजूक कोरीव कामास आदर्श. देवळात प्रवेश करण्या आधीच तुमचे मन उल्हसित होऊन जाते. या पुढे जेंव्हा कुठल्याही देवळाला भेट द्याल तेंव्हा दारापाशी थांबा.दोन्ही बाजूचे द्वारपाल बघा. चौकट एक आहे की अनेक आहेत, त्यांवर वेल-पताकांचे न्क्षीकाम आहे की लहान मूर्ती आहेत, वरपर्यंत एकच थर आहे की अनेक, अनेक असतील तर त्यांत काही योजना दिसते का, वरची गणेशपट्टी दरवाजाच्या किती बाहेर गेली आहे, त्यावरील कोरीव काम कसे आहे, वर कीर्तिमुख वगैरे काय काय आहे हे सर्व बघून मगच आत पाऊल टाका.( फ़ोटो काढावयाची सुरवात येथून होते.घरच्या माणसांचे/मित्रांचे छान फ़ोटो येथेच येतात.जास्त वेळ थांबणार असाल तर उन्हाचा अंदाज घेऊन फ़ोटो केंव्हा काढावयाचे तेही ठरवा.)
येथे काही द्वारशाखांची छायाचित्रे देत आहे. ती एका कालखंडातील नसली तरी सुरवातीपासून दरवाजे कसे नटवले जात याची कल्पना येईल.
door-1
मकरतोरणांकित, पण फार सजावट नाही. पापनाथ मंदिर

door-2
सजावट वाढली.

1954278 Halebid-dvar
कडेला मूर्ती आल्या. वरची पट्टीही प्रेक्षणीय

भिंत :
इमारतीचा दुसरा भाग भिंत. खोली बंदिस्त करणे ही महत्वाची गोष्ट. पण आणखी दोन उपयोग म्हणजे सुशोभन आणि छपराला आधार देणे. तिगवाच्या देवळाच्या भिंती साध्या आहेत. छपराला आधार देणे हे महत्वाचे काम. पण पुढे सुशोभन एवढे महत्वाचे झाले की हळेबिड-बेलूर येथील देवळांच्या भिंती दिसतच नाहित. दिसतात मूर्ती, मूर्ती आणि परत मूर्तीच. हां,भिंती छपराला आधार देतात, पण जणू नाइलाजाने. अंगभर दागिने घालून,रेशमी शालू नेसून, सुहास्य वदनाने पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या वधूमातेने थोडा वेळ नवर्‍याबरोबर कन्यादानाला बसावे तसे! लक्षात राहते ती पहिली प्रतिमा, दुसरी नव्हे. खरे म्हणजे या भिंती चांगल्या जाडजूड असतात. मोठे वजन पेलण्याकरताच त्यांची योजना असते. शिवाय सुरवातीच्या गिरिशिल्पात, थोडक्यात गुहेत, गेल्यावर जसे गार व काळोखलेले वाटेल तसे वाटावे हीही एक मनोकामना होती.( प्राग-ऐतिहासिक काळात उघड्यापेक्षा गुहेत माणसाला जास्त सुरक्षित वाटत असावे. त्याचा तर हा परिणाम नाही ना?) . माणूस नवे निर्माण करतांना " जूने जाऊ द्या मरणालागूनी" असे फ़ार वेळी म्हणत नाही. मागच्यातले चांगले घेऊन त्यात भर घातली जाते. मग ते शास्त्र असो, कला असो, सामाजिक नीतीनियम असोत. अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते. असो. या भिंतीना आतील व विशेषत: बाहेरच्या बाजूंनी नटवतांना निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. रथ, थर, देवादिकांच्या मूर्ती, रामायण-महाभारतातील कथा, रुपके, फ़ुले-वेली, मिथूने, जे जे कलाकाराला योग्य वाटेल, त्याचा उपयोग केला गेला आहे. नंतरच्या काळात या भिंती शक्यतो एका सरळ रेषेत येत नाहीत ना इकडे लक्ष दिले गेले. बघणाऱ्याची नजर सावकाशपणे फ़िरेल, त्याला छायाप्रकाशाचा खेळ बघावयाला वेळ मिळेल याची काळजी घेतली गेली. काही छायाचित्रे पहा.
रथ. भिंतीतून पुढे आलेले खांब. काही वेळा यांत व मूर्तींमध्ये भिंतच सापडत नाही.
रथ

छप्पर :
हा इमारतीचा भाग केवळ शिल्पीच्या आवाक्यातला नव्हता. आता गरज होती वास्तूशास्त्रज्ञाची. (Architect & Engineer). खऱ्या अडचणींना इथे सुरवात झाली. हा महत्वाचा भाग अनेक शैलींमुळेही जास्त जागा घेणारा आहे. त्याची चर्चा पुढील भागात करू.
पहिल्या भागात व या भागात दिलेल्या काही माहितीची चित्रे बघा. जर आणखी एखाद्या विशेष गोष्टीबद्दल
विचारावे वाटले तर संकोच नको. 

 मला शंका आहे.. :१] देवी आणि देव यांचे मंदिरात काही वेगळेपण असते का?
२]पुर्वी मंदिर बांधताना दिशेला महत्व दिले गेले होते का?
३]मंदिराचा काही विशिष्ट आकार ठर्लेला असतो का किंवा प्रमाण?
उदा.गाभार्याच्या चौरसाचे मोजमाप अथवा रेशिओ/प्रपोर्शन...

वरील फोटोतील मंदीरे कोणत्या काळातील आहेत? तसेच ही मंदीरे बनवायला किती कालावधी लागायचा याचा काही उल्लेख कोणत्या ग्रंथात, शीलालेखात आहे काय?

जशी शास्त्रीय संगीताची "घराणी" असतात तशी भारतात मंदीरे बनवणारी घराणी, विशिष्ट शहरे, कारागीर प्रसिद्ध होते काय? त्याविषयी माहीती वाचायला आवडेल. आजच्या काळात बनलेली काही भव्य मंदीरांविषयी काही?

 मंदिराची घराणे नाहीत तर त्यांच्या शैली आहेत..
मुघल शैली,हेमाडपंथी,राजपुत..ई.(चु,भु,दे,घे.) शरद काका प्रकाश टाकतीलच..
पुन्हा त्याच्या जोत्यांच्या आकारानुसार सप्तरथ्,पंचरथ असे प्रकार आहेत..

श्री. लालसा ; दिशेला महत्व दिलेले दिसत नाही. आकार प्रांतानुसार (उदा. केरळ) व शैलीनुसार (उदा. होयसाळ) बदलू शकतो. हे शैली या लेखात थोडे विस्ताराने येईलच. आपण म्हणता त्याप्रमाणे प्रमाण ठरालेले नाही.
श्री.सहज : फोटो बघितल्यावर ढोबळ फरक लक्षात यावा. आता सविस्तर माहिती देणे अवघड नसले तरी लेखाच्या लांबीवर त्याचा परिणाम होईल. जालावर आपणास ही सर्व माहिती सहज उपलब्ध आहे.(pun unintented)द्वार साधे आहे की सुशोभित आहे यावरून सुरवातीचे-नंतरचे हे लक्षात येते. या पुढील फोटोंबरोबर कोठले देऊळ ते देतो म्हणजे शोध सोपा होईल.
श्री. स्वतंत्र : गोपूर म्हणजे जमिनीवर उतरलेले शिखरच. ते जमिनीवरच बांधावयाचे असल्याने (भिंतींवर नाही) काम सोपे होते व स्थपतीला वाव जास्त मिळतो. गोपूराकडे द्वार म्हणूनही पहाता येतेच.
पीठांचे फोतो देतांना चूक झाली. आज आणखी एक फोटो बघा.

तेलीका मंदिर, मध्य प्रदेश.

Teli kaa maNdir

शरद

 

गाभा: 

भारतातील मंदिरे-३
देवळांचा पहिल्यांदा नजरेत भरणारा भाग म्हणजे त्याचे शिखर किंवा छप्पर.सर्वसाधारणपणे हे कोनाकृती असते. आपण पाहिले आहे की सुरवातीच्या देवळांची छप्परे सपाट होती. त्या ऐवजी हा त्रिकोणी आकार कसा आला ? एक विचार असा की सुरवातीला देवळे ही गिरिशिल्पे होती. म्हणजे नैसर्गिक गुहा मोठी करून त्यात देऊळ तयार केले वा डोंगर खोदून, गुहा निर्माण करून,त्यात देऊळ निर्माण केले. कसेही असले तरी लांबून हे देऊळ पहातांना, तुम्हाला त्याचे छप्पर म्हणून डोंगरच दिसतो; बरेचदा निमुळता होत गेलेला त्रिकोणी डोंगर. आता तुम्ही मैदानात देऊळ बांधले तर हा डोंगराचा भास निर्माण करावयाला डोंगर कोठून आणणार? तर त्या ऐवजी छप्परच निमुळते केले गेले. पणहे एकदम झाले नाही.
सपाट छप्पर करणे तसे सोपे. भिंती उभ्या करा, त्यांवर वासे टाका, वाश्यांवर फ़रशा टाका. काम खलास. जो पर्यंत आकार लहान होता तो पर्यंत हे लिहण्यासारखेच सोपे होते. ३०-४० फ़ूट लांबीच्या, इमारती लाकडाच्या तुळया आसेतूहिमालय सर्वत्र मिळत होत्या. देवळाचा आकार वाढल्यावर दगडी छप्परांचे वजन इतके वाढले की त्यांचा भार लाकडी तुळयांना झेपणे अशक्य झाले. दगडी तुळयांना भार झेपला असता पण एवढ्या लांब दगडी तुळया मिळणे शक्यच नव्हते.या करिता काय उपाय शोधले गेले ते पहाण्या आधी सपाट छपारातील एक बदल (Veriation) पाहू.
या प्रकारच्या छप्पराला नाव आहे "गजपृष्ट". नाव मजेदार वाटते पण आहे मात्र एकदम चपखल. सपाट छपराचा एक मोठा तोटा म्हणजे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागा नसे. उपाय सोपा असल्याने लगेच अमलात आणला गेला. आयताकृती छप्पराच्या समोरासमोरच्या दोन बाजू उतरत्या केल्या म्हणजे पाणी साचत नाही. आणि असे छ्प्पर हुबेहुब हत्तीला मागून पाहिले तर त्याच्या दिसणाऱ्या पाठीसारखे दिसते. द्राविड शैलीच्या देवळांची बरीच छप्परे अशी असतात.
महाबलीपुरम येतील मंदिराच्या चित्रावरून एकदम पटेल
आता उपाय बघू. पहिला उपाय म्हणजे मधे खांब उभे करणे. हे "कॉलम" म्हणून काम करतात आणि "बीम"ची लांबी एकदम कमी होते. ४० फ़ूट X ४० फ़ूट च्या मोठ्या दालनात दहा दहा फ़ूटावर नऊ खांब उभे केलेत तर तुळईची लांबी दहा फ़ूटावर येते. आणि जर हे खांब सुशोभित केले तर ते कशाकरिता बांधले हे ही लक्षात येत नाही. उलट " या देवळाचे खांब मोजता येत नाहीत " अशीच प्रशंसा केली जाते!".अबब म्हणावयाचे आहे? श्रीरंगमच्या विष्णुमंदिरातील एका मंडपाचे नाव आहे "हजारीमंडप" लांबी १७५ मी. व रुंदी ५० मी. यात फक्त ९५३ खांब आहेत ! बाजूचे स्तंभ साडे तीन मीटर उंच आहेत, आतले त्याच्या दुप्पट.सगळे दगडी आणि बारकाईने कोरलेले ! आता बोला.
पण स्थपतींना पूर्ण कल्पना होती की हे खांब अडचण आहेत. नृत्यमंडपात, कल्याणमंडपात त्यांना जागा नाही. त्यांनी कमानीची कल्पना छप्पर बांधण्याकरिता वापरली.छोटे दगड किंवा वीटा कमानी व तत्जन्य घुमट उभारण्याकरिता वापरले गेले. वापर वीटांचा आहे व उदाहरणेही फ़ार नाहीत. पण घुमट आहे म्हणून त्यांना Indo-sarsenik म्हणावयाचे कारण नाही. आणि एक मार्ग म्हणजे दगडांचे एकावर एक असे थर बसावयाचे की मधल्या उघड्या भागाचा आकार कमी कमी होत जाईल व शेवटी सर्वात वर एवढाच आकार राहील की तो एकाच दगडाने झाकता येईल. तंजावूर येथील बृहडेश्वर मंदिरातील हा शेवटचा दगड ८३ टन वजनाचा आहे ! पिरॅमिड्सची आठवण झाली की नाही ? बांधणीमुळे छपराला "पायऱ्या" किंवा "मजले" निर्माण होतात. अर्थातच अशा छप्परांचा भार प्रचंड असल्याने भिंती भक्कम, जाडजूड लागतात. वरच्या पायरीचा प्रत्येक दगड खालच्या पायरी़च्या थोडासा पुढे झुकलेला दिसतो. हे काम फ़रशा भिंतीला समांतर मांडून करता येईल वा चौकानाचे कोन छेदले जातील अशा प्रकारे फ़रशा मांडून करता येईल.उतरंडीच्या छप्पराच्या या पायऱ्या सलग एका रेषेत असतील तर ती नागरी शैली; मजले स्पष्ट दिसत असतील तर द्राविड शैली. पण हे मजले वेगळे आहेत याची जाणीव ठेवण्याकरिता त्यांना "भूमि" म्हणतात. मंदिरांच्या शैलींची माहिती आपण पुढे घेणार आहोतच; पण इथे नमुद करून ठेवावयास हरकत नाही की नागर व द्राविड शैलींमध्ये " भूमी"चे सुशोभन वेगवेगळ्या पद्धतीने करतात व हा दोहोंमधील एक महत्वाचा फरक आहे.
भिंतींचे सुशोभन करण्यासाठी वापरावयाचे सर्व साधने येथेही वापरण्यात आली आहेत.कलष, मूर्ती, स्तंभ, कोनाडे, पाने-फ़ुले, मिथुने, रत्नहार इत्यादी सर्वांचा उपयोग केला गेला. सगळ्यात जास्त गमतीचा भाग म्हणजे ही शिखरे गाभारा-मंडप यांच्यावरून खाली उतरून देवळासमोर गोपुरे म्हणूनही आली. काही फ़ोटो बघू.
(आणि देवळांच्या प्रयेक फ़ोटोत छप्परे दिसतातच की.)
मजले कसे तयार करत याचे एक चित्र पहा. खालचा मोठा चौरस भाग फरश्या आत आत आणत वर लहान झाला आहे.
Vimaan scetch

(१) महाबलीपुरम ...गजपृष्ट छप्पर. शेजारी हत्ती असल्याने लगेच साम्य कळते.
Gajaprusht- mahaabalipuram

(२) पट्टडकलु-१ ... द्राविडी शैली. भूमीचे स्थर वेगवेगळे दिसतात.
Pattadakalu-2
(३) पट्टडकलु-२ ... नागरी शैली. भूमींचे कोन एका रेघेत.
Paattadakalu-1

सौजन्य : श्री. धनंजय.

(४) सोमनाथपूर . भूमी एकदम निरनिराळ्या बघता येतात.

somanaathapur-4
(गोपूरांची छायाचित्रे कोण देतो बरे ? )

पुढील भागात "गिरीशिल्पे" यांची माहिती घेऊ.

 माझ्याही काही शंका आहेत, या एका तेलगु चित्रपटावरुन आलेल्या आहेत.

१. दगडांमध्ये स्त्री , पुरुष व इतर असे प्रकार असतात काय ?
२. देवांच्या व देवींच्या मुर्तीसाठी वापरण्यात येणा-या दगडांत फरक असतो काय ?
३. जो दगड मंदिराच्या बांधकामात वापरलो जातो तो मुर्तिसाठी वापरत नाहीत असे असते काय ?

माझा एक जुना अनुभव आहे, एका मंदिरात काम करताना आम्ही देवाच्या आसनाच्या दुरुस्तीसाठी वेगळे सिमेंट, विटा व वाळु आणत होतो, ते बाहेर कुठेही वापरायची आम्हांला परवानगी नव्हती, उरलेला सगळा माल टाकुन द्यावा लागत असे. तसेच ते काम होते ८ दिवसांचे पण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवसाची विशिष्ट वेळ पाळणे या मुळे अडीच महिने केले होते.

तो तेलगु चित्रपटाचे नाव किंवा युटुबची लिंक मिळाली की देतो लगेच. हा चित्रपट मुर्तिकार / मंदिरकार बाप लेकावर आधारित आहे. दोन पिढ्यातील संघर्ष मुर्तिकलेच्या / मंदिरकलेच्या माध्यमातुन दाखवला आहे. बाप आपल्या मुलाला मंदिराच्या शिखरावर काम करत असताना वरुन छिन्नी हातातुन सोडुन मारुन टाकतो असा शेवट आहे. इतर कोणाला माहित असेल तर मदत करावी. 

हर्षद साहेबांप्रमाणे मला पण एक अनुभव आला आहे...
((एका मंदिरात काम करताना आम्ही देवाच्या आसनाच्या दुरुस्तीसाठी वेगळे सिमेंट, विटा व वाळु आणत होतो, ते बाहेर कुठेही वापरायची आम्हांला परवानगी नव्हती, उरलेला सगळा माल टाकुन द्यावा लागत असे. तसेच ते काम होते ८ दिवसांचे पण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवसाची विशिष्ट वेळ पाळणे या मुळे अडीच महिने केले होते. ))

माझा अनुभव असा की :
एका रात्रीत मंदीर बांधून काढायचे, जर झाले नाही तर आहे तसेच सोडायचे(सुर्योदया पूर्वि). मग त्या देवाचा कोप ई.ई. आमच्या येथे एक पुरातन मंदीर होते, त्या बाबत ही आख्यायिका सांगितली जाते. पण ते आता हल्लीच बांधून झाले एका रात्रीत.
याबाबत आपण अधिक सांगू शकाल का??? अर्थातच ते सर्व वास्तूशैली झाल्यावर.
एक "मंदीरांच्या आख्यायिका" अशी लेख्माल येवूदेत की...

गाभा: 

गिरिशिल्पे
ऊन-पाऊस व जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी मानवाने गुहेचा उपयोग केला. नंतर मैदानात घरे बांधावयास सुरवात केल्यावरही त्याने गुहा अजिबात सोडून दिली असे नाही. भारतात ऋषिमुनींनी,तपस्व्यांनी चिंतनाकरिता गुहाच योग्य मानली.तर ही गुहा चैत्य-विहार-मंदिरे बांधावयास चांगली आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी इसविसन पूर्व ३००-४०० वर्षे आधी पासूनच असा वापर सुरू केला. पण नैसर्गिक गुहेला लांबी-रुंदी-उंची यांच्या मर्यादा असल्याने सुरवातीला त्या फ़क्त मोठ्या केल्या; त्यांना आयताकृती-चापाकृती आकार दिला.
गुहेत सुरवातीपासून सुशोभन केले. प्रथम चित्रे काढली, मग पाने-फ़ुले-वेलबुट्टी, व उथळ उठावाची चित्रे कोरली, रुपकांचा उपयोग केला, त्यानंतरचा भाग म्हणजे गुहेचे तोंड, मुखदर्शन, सुशोभित करणे व आत गाभारा, ओवऱ्या, मंडप,स्तंभ, मजले आदींची भर घालावयास सुरवात करणे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरवातीला लाकडी घरच डोळ्य़ासमोर होते. त्यामुळे लाकडी खांब, वासे यांचा उपयोग केला गेला. आज ह्या लाकडी वस्तु दिसत नाहीत पण त्यांच्या करता केलेल्या खोवणी वगैरे पहाता येतात. पुढे विटा, चुन्याचा गिलावा वगैरेचा उपयोग केला व शेवटी पत्थराचा.त्या नंतर पूर्ण उठाव व शेवटी मूर्ती. नुसती चित्रे काढलेल्या गुहा हजारो वर्षांपूर्वीच्या आहेत. कोरीव नक्षीकाम ते मूर्तीपर्यंत पोचावयाला ७००-८०० वर्षे लागली. किरकोळ अपवाद सोडले तर आठव्या शतकापासून गिरिशिल्पे निर्माण होणे बंद झाले. आपण जवळ जवळ एक हजार वर्षांचा इतिहास बघणार आहोत. (इ.स.पूर्व३०० ते इ.स.७००). तसेच हा लेख "मंदिरे" या लेखमालिकेतील असला तरी चैत्य-विहार यांचा विचार अपरिहार्य आहे.
गिरिशिल्पांची ओळख शास्त्रीय पद्धतीने करून घ्यावयाची तर ती (१) काल, (२) धर्म व (३) स्थळ (प्रदेश) या तीन प्रकरणात विभागून करून घेणे उचित. पण इतक्या खोलात न जाता थोडक्यात माहिती हा एकच निकष ठरवणॆ जास्त सोपे. शेवटी ही माहिती आनंद मिळवण्यासाठीच आहे.तर सुरवात करू या भारतातील पहिल्या सुशोभित गुहांपासून.
गुहेत आदीमानवाने काढलेली चित्रे आढळतात.जगभरातील अशा चित्रांप्रमाणे ही पशू, त्यांची शिकार अशा विषयांवर आहेत. सर्वात पुरातन कला म्हणून त्यांचे मह्त्व. भारतात अशा गुहा आसेतुहिमालय आढळतात.बिल्लासुरगम,वायनाड,भलदरिआ,घोडामांगर, सिंधनपुर,जोगिमार,मिर्ज़ापुर, रायगड,छोटा नागपुर, कर्नूल इत्यादी ठिकाणी अशी गुहाचित्रे आढळली आहेत. आजही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा येथील आदिवासी काढत असलेली चित्रे या गुहाचित्रांशी नाळ टिकवून आहेत. पुढे दिलेले चित्र व वारली चित्रकला ताडून पहा.(१)
भारतातील गिरिशिल्पांचा अभ्यास करतांना एक गूढ गोष्ट समोर येते. अशोकानंतरच्या काळातील अनेक गुंफ़ा ज्ञात आहेत, या काळाच्या आधीच्या नाहीत. आणि या ज्ञात गुंफ़ा उच्च श्रेणीच्या आहेत. म्हणजे कोणत्याही कलेच्या आरंभी दिसून यावे असे "शिकावू", चुकत माकत केलेले, काम दिसून येत नाही. तुम्ही सुरवात केली आणि भाजे-कार्ले सारख्या श्रेष्ट दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यात हे उमगण्यास अवघड जाते.काही अभ्यासकांच्या मते याचा संबंध भारताबाहेर ईजिप्त,भुमध्य सागरानजिकचा आशियाचा भाग येथील गिरिशिल्पांशी जोडला पाहिजे.(नक्श-इ-रुस्तुम येथील शिल्पगृह). अशोकाच्या काळातील कलासंप्रदायावर इराणी कलासंप्रदायाची छाप पडली होती हे मान्य. पण स्तंभ व स्तंभशिरे सोडली तर येतील सर्व गिरिशिल्पे शंभर टक्के भारतीय आहेत. कोडे सुटण्यास अवघड आहे. गर्वाने म्हणावयाचे असेल तर म्हणा की भारतीय कलाकार एवढे श्रेष्ट होते की त्यांनी तेथील कल्पना उचलली आणि शंभर टक्के भारतीय बीजे त्यात रुजवली.न चुकता, न अडखळता ! असो. इतिहासात रुची असलेल्या सभासदांनी यावर झोत टाकावा.
तर आता सुरवात करू या इ.स.पूर्व २०० पासूनच्या गिरिशिल्पांपासून.योग्य दगड असलेली जागा सर्वत्र मिळेलच असे नाही. त्यामुळे महाराष्ट्र,ओरिसा, बिहार, आंध्र अशा मोजक्या जागीच ही कला बहरली.नागार्जुनी टेकड्या, सितामढी, राजगीर येथील शैलगृहे मौर्यकालीन. यात निरनिरळ्या प्रकारची विधाने आढळतात. सुरवातीला खोली कमी व रुंदी जास्त असे.
सुरवात झाली तेंव्हा प्रथम नैसर्गिक गुहा फोडून मोठी करावयाची; तीत देवाची व भक्तांच्या रहाण्याची सोय करावयाची एवढी माफक अपेक्षा असावी. नंतर भक्ती-वैराग्यात कलासक्ती आली. गुहेच्या प्रवेशापाशीच, मुखदर्शनापाशी इतक्या सुंदर कलारचना केल्या गेल्या की वाटावे येथेच थांबावे. (२) आत गेल्यावर मंदिरात असावेत असे स्तंभ. खाली पीठे, मध्ये नक्षीकाम, वर पुष्पाकार स्थंभशीर. कोरीव काम तर इतके नाजूक की स्तंभांच्या प्रचंड आकाराचा विसरच पडावा.
इथे "कलेकरता कला" हाच उद्देश, नाही तर खांब काय वरच्या डोंगराला आधार म्हणून पाहिजे होते ? वेरुळ. घारापूरी, बदामी, एहोळे येथील गुंफामधील स्तंभ प्रेक्षणीय आहेत. नंतर पहावयाच्या भिंतींवरील मूर्ती. पहिल्यांदी चित्रे होती पण लवकरच त्यांची जागा मूर्तींनी घेतली. देवळांसारखीच मुखदर्शना नंतर मंडप, अंतराळ व गाभारा (वा चैत्य) हा क्रम राखला गेला. काही ठिकाणी प्रदक्षिणा मार्गही. थोडक्यात ही गिरिशिल्पे म्हणजे वातानुकुलित देवळेच !
महाराष्ट्रात हे लोण पोचले. येथील दगड या कामाला फ़ार सोयिस्कर. भाजे (इ.स.पूर्व २०० ते १५०), कोंडाणे, घारापूरी,पितळ्खोरे, अजिंठा, बेडसे, नाशिक, जुन्नर,कान्हेरी, औरंगाबाद व कार्ले (इ.स.५० ते १००) ही त्यातील महत्वाची
" भारतातील लेण्यांपैकी ७५ % महाराष्ट्रात आहेत. "
ओरिसात हाथीगुंफ़ा, व्याघ्रगुंफ़ा, राणीगुंफ़ा या नोंद घेण्यासारख्या. इ.स.च्या सुरवातीला येथील कलाकार दक्षिणेला आंध्रमध्ये गेले.
उदयगिरी(मध्यभारत), वेरूळ(महाराष्ट्र], बदामी(कर्नाटक) व महाबलीपुरम(आंध्र) ही हिंदू-जैन गिरिशिल्पांची प्रमुख केंद्रे.ही सगळीच इ.स.च्या तिसऱ्या-चवथ्या शतकानंतरची आहेत.आठव्या शतकानंतर लेणी खोदणे बंद झाले.
मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील उदयगिरी येतील गिरिशिल्पे म्हणजे मंदिरांच्या, डोंगरात कोरलेल्या, प्रतिकृतीच आहेत.तेथे एक गुंफ़ा एकपाषाणी मंदिरच आहे.
वेरुळच्या लेण्यांचे कालदृष्ट्या दोन भाग पडतात.पहिल्या भागातील लेणी बुद्ध विहारांसारखी(४) आहेत तर दुसऱ्या भागातील वेगवेगळ्या "मंदिर" कल्पनांचा आविष्कार.पहिला कालखंड इ.स.५०० च्या आसपास सुरू होतो तर दुसरा ७०० च्या. दोनही भागात चापाकर विधान टाळले आहे.सर्वात बाहेर ओसरी,आत मंडप,त्याच्या तीनही बाजूंना चौरस दालनाच्या ओळी व मागच्या भिंतीतील मधल्या दालनात गाभारा. हा आराखडा विहाराच्या पदविन्यासा सारखा आहे.
कर्नाटकातील गिरिशिल्पे बदामी,एहोळे येथे पहावयास मिळतात. मुख्य "विष्णू मंदिर" इ.स.५७८ मध्ये खोदून पुरे झाले.अतिशय प्रेक्षणीय वास्तू.
आंध्र-तामिळनाडूतही अनेक शैलगृहे आहेत. सुरवातीची बौद्ध व नंतरची हिंदू. विजयवाड्यानजीक "अनंतशायीगुडी" गुंफ़ा चार मजली आहे. डोंगराच्या उतारावर खोदकाम असल्याने एकामागे एक असे सरकून खोदले आहे असा भास होतो. (७)
इथे लक्षात घ्यावयाची एक गोष्ट म्हणजे अनेक मजली गुंफा करावयाची असेल तर पहिल्यांदी सर्वात वरचा मजला करावयाची, नंतर त्याच्या खालचा. जरा विचार केला तर याचे फायदे ध्यानात येतील. एकपाषाणी मंदिरे तयार करतांना हेच पद्धती वापरली आहे.
तामिळनाडूत चेन्नाई पासून अवघ्या ४० कि.मि. अंतरावर महाबलिपुरम (आता ममलापुर) येथे अप्रतीम शिल्पे पहावयास मिळतात. मंदिरे, एकपाषाण मंदिरे ( यांना "रथ" म्हणतात), गुहाशिल्प व डोंगराच्या उतारावरील कोरीव काम, सर्व काही एका ठिकाणी. तेथे बाजारात आजही कलाकार मूर्ती घडवतांना दिसतात. असे दृष्य फ़क्त येथे व ओरिसात पहावयास मिळाले.
या भागाचा एक उपविभाग म्हणजे एकपाषाण मंदिरे.पण वेरुळ येथील कैलास व महाबलीपुरम येथील रथ यांवर एक निराळाच लेख पाहिजे
किती लिहणार ? तांत्रिक माहिती कंटाळवाणी होते व आस्वाद घेण्याकरिता लिहावयाचे तर प्रत्येक स्थळावर दोन लेख होतील ! तेंव्हा असे लेख वाट दाखवण्यापुरते. पुस्तकांत व विशेषत: जालावर भरपूर माहिती व छायाचित्रे मिळतील. आज लेखात सर्व प्रांतांतील गिरिशिल्पे असलेली गावांची नावे दिली आहेत कारण तरुण सभासदांनी मनावर घेतले तर ५-७ मिनिटांत ते जालावरील चित्रे येथे डकवू शकतील.
(उशीरा संगणक हाताळावयास शिकलेल्या माझ्यासारख्याला फार वेळ लागतो !)
(१) आदमगड येथील शैलचित्र. प्राचिन गुहाचित्र, पण वारली लोककला याच्याशी नाळ जोडून आहे.
AADAMAGAD ROCK PAINTING
(२) लोमश लेणे. मौर्यकालीन लेणे. सुरवातीच्या काळात मुखदर्शनावर जोर होता.
lomash -3

(३) आंध्र प्रदेशमधील चार मजली लेणे, उंडवल्ले. डोंगराच्या उतारावर चार मजले असल्याने सरकवून बांधल्यासारखे वाटते की नाही ?
undavallicaves_11580

(४)महाबलीपुरम, हे गिरिशिल्प आहे, लेणे नाही, पण प्रेक्षणीय आहेव पलिकडे लेणेही दिसतेच.
mahabalipuram

(५) बदामी, कर्नाटक, लेण्याच्या दाराशीच प्रेक्षणीय शिवमूर्ती आहे !
mahabalipuram
आता काही महाराष्ट्रातील लेणी पहा. मुखदर्शन पहा, भले मोठे स्तंभ पहा (पाया, मधील चौकनी व गोल होत जाणारा भाग व स्तंभशीर्ष बघा, वरील पट्टेही ) व आतील चैत्य, मूर्ती वगैरे.
(६) भाजे
bhaje-2

(७)कार्ले
karla

(८) अजंठा
Ajantha caves-1

(९) घारापूरी
Ele-pillared-hall_1036

(१०) वेरुळ
VERUL-1

शरद

 आमच्या मते कर्जतजवळचे कोंडाणे लेणे हे महाराष्ट्रातील आद्य लेणे होय. भाजे त्याच्यानंतरचे आहे. कोंडाणे लेण्यात झालेल्या चुका नंतरच्या बांधकामात सुधारल्या गेल्या. उदा. पावसाळ्यात वरून पडणार्‍या पाण्यामुळे झालेली झीज. नंतरच्या लेण्यांमध्ये पाणी वाहून जायलाही मार्ग काढण्यात आले.
लेणीमंदिरे मुख्यतः घाटवाटांवर वाटसरूंच्या मुक्कामासाठी व भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी निर्माण करण्यात आली. याकामी सातवाहनांच्या प्रबळ राजसत्तेबरोबरच इतर व्यापार्‍यांचेही अर्थसहाय्य मोलाचे ठरले.

नाशिकजवळच्या पांडवलेण्याचे काही फोटो. नाव जरी पांडवलेणे असले तरी ही लेणी खोदलीयत ती हिनयानपंथीय बौद्धांनी.

 वर बादामीच्या नटराजाचे चित्र काही कारणास्तव दिसत नाही. ते येथे देत आहे :

 

श्री. धनंजय यांनी लिहल्याप्रमाणे बदामीचे चित्र दिसत नव्हते; महाबलीपुरमचे दोनदा पडले. क्षमस्व. बदामीचे येथे देत आहे,
badaami caves

शरद

 

श्री. कांदळकर : पहिल्या लेखात जी तांत्रिक शब्दांची माहिती दिली आहे त्या प्रमाणे रथ म्हणजे " गाभार्‍याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे, हे एकापुढे एक सरकतात, क्षिप्त (बाहेर फेकलेले) असतात. या रथांच्या संख्येवरून मंदिराच्या विधानाला "त्रिरथ", "पंचरथ" अशी नावे देतात. हे रथ उंचीला कपोता(पागोळा, सज्जा)पर्यंत असतात किंवा काही वेळा आमलकापर्यंतही पोचतात. मालिकेतल्या दुस्र६या भागात थर दाखवणारे एक भुवनेश्वर येथील राजराणी मंदिराचे छायाचित्र दिली आहे. या संदर्भात आपण पंचरथ बघा. (व पंचरथ दाखवणारे छायाचित्रही मिळवून य़ेथे टाका !) पहिल्या भागात श्री. जयंत कुलकर्णी यांनी सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराची वित्रे दिली आहेत. त्यांचेही रथ बघा. Bada चा अर्थ वा संदर्भ लागला नाही. आपण जेथे वाचले तेथील एखादा परिच्छेद दिलात तर शोधावयाचा प्रयत्न करीन. व्यनि पाठवा.
महाबलीपुरम येथील एकपाषाणी देवळांनाही रथ म्हणतात. पण हे झाले स्थानिक नाव. त्यांची माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोतच.

श्री. जयंत कुलकर्णी : गोंदेश्वर मंदिराची माहिती देण्यास उशीर झाला. क्षमस्व.मुख्य मंदिर, समोर अलग असा नंदीमंडप,चार उपदिशांना छोटी उपमंदिरे व सर्वांना वेढणारा प्राकार ( ८४ मी.x ८५ मी.) यादव-शिलाहार घराण्यांच्या काळातले( ११-१२ वे शतक ). साधारणत: मध्यभागी चौथर्‍यावर मंदिराची वास्तु आहे. आमलकाच्या जागचा घुमटाकार भाग सोडला तर सर्व वास्तू मूळ स्वरुपात आहे. भोवतालची मंदिरे,गणेश, नारायण,सूर्य व देवी यांची आहेत. त्यांची शिखरे मुख्य देवालयासारखी नसून त्रिरथ, पंचरथ पद्धतीची आहेत.छत, स्तंभ यावर कोरीव काम आहे. सर्व देवालयांत कक्षासने, अर्धस्तंभ यांसारखीचे नेहमीचे भाग आहेत.
शरद

 

गाभा: 

एक पाषाणी मंदिरे :
गिरिशिल्पे तयार करतांना कलाकाराच्या मनात विचार आला असणार कीं, "अरे, मी डोंगर कोरून मंदिर तयार करतो, दगड घेऊन मूर्तीही बनवतो. मग एक मोठा दगड घेऊन मंदिर का बनवता येणार नाही ? " काम अवघड तर होतेच पण जास्त "चॅलेंजिंगही " होते. तयार मूर्ती, हस्त, तरंग, एके ठिकाणी करून दुसरीकडे मंदिरात बसवणे सोपे होते. आता छिन्नीचा पहिला घाव घालावयाच्या आधी पीठ, भिंत, शिखर आतील व बाहेरील मूर्तीकाम सगळे, सगळे काही एकाच्या नव्हे, सगळ्या कारागीरांच्या मनावर बिंबण्याची गरज होती.आणि हे किती काळा करिता ? वर्ष-दोन वर्षांकरिता ? लक्षात घ्या, वेरुळ्चे कैलास मंदिर हे एकपाषाणी मंदिर घडवावयाला कलाकारांच्या काही पिढ्या लागल्या ! आज संगणकाच्या युगात 3D नकाशा काढणे व त्याच्या अनेक प्रति करणे सोपे आहे पण पंधराशे वर्षांपूर्वी याला चमत्कारच म्हणावयास पाहिजे.
एक पाषाणी मंदिरे सगळ्या भारतात आढळतात. कांगडा जिल्हा (मस्त्रूर), मध्य प्रदेश (धामणूर), तिरुनेलवेली (कगमुविल), वेरूळ (कैलास व छोटा कैलास), महाबलीपुरमधील रथ याची साक्ष देतात. वेरूळ्चे कैलास व रथ एवढ्यांचीच माहिती आपण येथे बघू.

कैलास :
जगामधील ही अशी एकमेव वास्तू आहे. डोंगराच्या दरडीपासून काटकोन करून ६३ मीटर लांबीचे दोन चर खणण्यात आले. आतल्या टोकांना जोडणारा ४५ मीटर लांबीचा चर खणून ६३मी.x 45 मी x ३० मी. उंच (किंवा खोल म्हणा) असा एक महाप्रचंड खड्डा तयार झाला. त्यात होता ५० मी. लांबीचा (पूर्व-पश्चिम), ३३ मी.रुंद व २९ मी. उंच शिलाखंड. कैलास निर्माण करण्यासाठी समोर होता पट्टडकल येथील विरुपाक्ष मंदिराचा आराखडा. चला तर, लावा शिड्या व करा सुरवात शिखरापासून. प्रथम जेव्हा ऐकले की या मंदिराची सुरवात शिखरापासून झाली तेव्हा फार आश्चर्य वाटले होते. पण नंतर जेव्हा या विषयावरील वाचनाला सुरवात केली तेव्हा कळले की सर्वच गिरिशिल्पात सुरवात वरूनच करतात. फोडलेले दगड फेकण्यापासून साफसफाई करण्यास, केलेल्या कामाचे सिंहावलोकन; जास्त योग्य शब्द विहंगावलोकन, करावयास हीच योग्य पद्धत.

वेरुळमध्ये हिन्दु गिरिशिल्पांचा बौद्ध लेण्याशी असणारा निकटचा संबंध प्रकर्षाने प्रचीतीस येतो. चापाकार विधान गाळण्यात आले (महायान काळात बुद्धांनीही तेच केले). सर्वात बाहेर एक ओवरी, आत मंडप, मंडपाच्या तीनही अंगाला चौरस दालने (नंतरच्या काळात चौकटी), चौकटींमध्ये प्रचंड शिल्पपट्ट व मागील भिंतीच्या मधल्या दालनात गाभारा. कैलास हे एकपाषाणी शिल्प असल्याने येथे आतील व बाहेरील दोन्ही बाजूच्या सजावटीला वाव होता. प्रथम इमारतेच्या वैधानिक बाजूबद्दल थोडे. याची शैली द्राविड.

वर सांगितल्या प्रमाणे ज्या शीलाखंडातून मंदिर बनवण्यात आले त्याच्यापेक्षा वेगळ्या अशा आठ मी.चौरस अशा खंडातून नंदीमंडप तयार केला. नंदीमंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे ऐरावत व त्यांच्या शेजारी सुबक असे ध्वजस्तंभ उभे आहेत. आणि हो, या भागात न आढळणारे गोपुर, साधे, लहान व शाला पद्धतीचे ! गोपूर, नंदीमंडप व मुख्य मंदिर दुमजली आहेत.नंदीमंडप व मंदिर यांचा पहिला मजला भरीव असल्याने त्याला एकमजली पीठ म्हणावयास हरकत नाही. वरचे मजले एकमेकांना पुलांनी जोडले आहेत. चौरस गाभारा, अंतराळ व चौरस मंडप ही मुख्य अंगे. तीन बाजूंना अर्धमंडप, गाभार्‍याभोवती प्रदक्षिणा मार्ग व ५ उपमंदिरे आहेत.मंडपात चार खांबांचा एक असे चार गट आहेत. त्यांना अनुसरून भिंतीत अर्धस्तंभही आहेत. गाभार्‍यात स्तंभ नाहीत.

पीठ किंवा तळमजला हा सर्वात प्रेक्षणीय भाग. जमिनी लगतचा कुंभपट्ट इत्यादी थरांच्यावर एक चांगला रुंद पट्टा आहे. तळमजल्याची
भितच म्हणा; त्यावर हत्ती, सिंह यांच्या पूर्णाकृती मूर्ती पूर्ण उठावात कोरल्या आहेत. त्यावर पट्ट, कुंभ, कपोत. त्यावर येते दुसर्‍या मजल्याची भिंत. भिंतीवर अर्धस्तंभ मालिका व देवकोष्ट आहेत. माथ्यावर कूटशालाहार असून वर द्राविड पद्धतीचे विमान व त्यावर अष्टकोनी शिखर आहे.

राष्ट्रकूट राजा कृष्ण (इ.स.७५७ ते ७८३ ) याच्या कालात सुरवात झालेया या मंदिराचे काम १०० वर्षे चालले होते. या वेळी द्राविड शैली महाराष्ट्रात प्रचलित नव्हती. तेव्हा ही स्फूर्ती व कौशल्य दक्षिणेतल्या कांचीकडून आले असावे काय ? मंदिराच्या आतील भागावर चुन्याचे विलेपन होते व त्यावर रंगकाम केलेले होते. कैलास सारखेच वेरुळ येथील "छोटे कैलास" ही त्याचीच एक लहान (व कनिष्ट दर्जाची) एक पाषाणी प्रतिकृती.

कैलास येथील मूर्तीकामाबद्दल येथे लिहित नाही. कलेच्या बाबतीत तुलना अप्रस्तुत असते. पण तरीही स्वत:चे वैयक्तिक मत असतेच की नाही ? येथील मूर्तीकाम जिवंत व रसरशित आहे. तुलना जर दुसर्‍या प्रसिद्ध दिलवाड्याच्या संगमरवरी मूर्तींशी केली तर संगमरवरी मूर्ती निर्जीव वाटतात. एकच उदाहरण देतो : रावण कैलास पर्वत उचलत आहे या शिल्पात शंकर तिकडे दुर्लक्ष करत आहे, बेफिकिरच आहे म्हणा ना. तर पार्वती मात्र स्त्रीसुलभ भीरूपणाने, घाबरून शंकराला बिलगली आहे. हे भाव शिल्पात प्रगट करणे काय सोपे आहे ?

महाबलिपुरम येथील "रथ"

चेन्नाईच्या दक्षिणेला साधारणत: ६० कि.मी. समुद्राकाठी महाबलिपुरम (मामल्लपुरम-महामल्लपुरम) येथे पल्लव राजवटीतील नरसिंहवर्मनने
खोदलेली सहा एकपाषाणी मंदिरे आहेत. याशिवाय, मंदिरे, गिरिशिल्पे, डोंगराच्या उतारावर केलेले शिल्पकाम वगैरे पहावयास किमान दोन दिवस लागतील. आणखी एक आकर्षण म्हणजे आजही तेथे शिल्पकार मूर्ती घडवत असतात.अगदी बाजारात. तुम्हाला पूर्वी कसे काम करत असावेत याची कल्पना येऊ शकते.दोन समुहात हे रथ असून दक्षिण समुहात चार, मध्ये एक व पश्चिमेस एक असे सहा रथ आहेत. द्रौपदी,धर्मराज,अर्जुन व पिडारी हे "कूट" पद्धतीचे रथ आहेत. म्हणजे त्यांची विधाने चौरस आहेत व त्यांना अनुसरून छपरे चारी बाजूंनी उतरती आहेत. भीम आणि गणेश रथ आयताकार विधानाचे व दोहो बाजूला उतरत जाणारी छप्परे असलेले आहेत.त्यांच्या कण्यावर बारीक कळसांची ओळ आहे. चित्रात आपण दोनही पद्धती पाहू शकता. रथ, एक-दोन-तिमजली आहेत. नकुल-सहदेव हा चाप पद्धतीचा रथ आहे व त्याचे छप्पर गजपृष्ठाकार आहे. स्तंभ अष्टकोनी, काहिसे निमुळते असून त्यावर कुंभ आहेत, पायाशी गजमूर्ती कोरलेल्या आहेत. द्रौपदी व धर्मराज या रथात दुर्गा व स्कंद यांच्या मूर्ती आहेत, इतरत्र नाहीत. असे वाटते की या रथांची कामे पूर्ण झालेली नाहीत.

कांगडा जिल्ह्यातील मस्रूर येथे नागरी शैलीतील एकपाषाणी मंदिरे नवव्या शतकात कोरली असून जास्त सौंदर्यदृष्टी ठेवून केलेली आहेत.
पडझड फार झाली आहे. इतर देवी मंदिरांच्या तुलनेत दुर्लक्षित आहेत.
काही छायाचित्रे दिली आहेत. जालावर भरपूर माहिती मिळू शकेल.

(१) यात तुम्हाला डोंगरात खणलेले चर व शीलाखंडातील मंदिर पहाता येते. गज, विजयस्तंभ, विमान, शिखर आदी वरून फोटो काढला असल्याने नीट दिसते.
ellora002 view

ellora004 VijayastaMbh

Ellora-Caves-in-Aurangabad-Maharashtra-India

(२) रावण कैलास उचलताना.

b443b84c557ca910256ba5e7b7fc_grande

(३) महाबलिपुरम येथील रथ. कूटशाला, गजपृष्ट, इत्यादी प्रकार लक्षात येतील.
गजपृष्ट

Gajaprusht- mahaabalipuram

गणेशरथ
GaneshRatha1

द्रौपदी रथ
FiveRathas03 draupadee

चारी बाजूंनी उतरते छप्पर
FiveRathas02

मस्रूर, कांग्रा जिल्हा
IMG_5960Masrur-1

IMG_5967-Masroor Temples

शरद

 

गाभा: 

भारतातील मंदिरे-६
नागर व द्राविड शैली
संगीतात घराणी असतात; ग्वाल्हेर, किराणा, जयपूर वगैरे. म्हणजे काय हो ? शेवटी सगळेजण सारेगम हे सूर व बांधलेले रागच गातात ना ? काय होते, संगीतात सौंदर्य निरनिराळ्या प्रकाराने कलाकाराला भावते.कोणाला सूरात तर कोणाला तालात, कोणाला संथ, विलंबित आलापीत तर कोणाला आक्रमक दृत तानेत, या सौंदर्याची भुरळ पडते. तो संगीतातील या भागाला जास्त मह्त्व देतो. मग घराणी जन्मास येतात. मग रसिकही ग्वाल्हेर गायकीत सुलभ, सरलता, किराण्यात स्वराचा गोडवा तर जयपूर गायकीत विद्वत्ता शोधू लागेतो. सगळ्याच गायकीत स्वराची सच्चाई व तालाचा पक्केपणा गृहित धरलेला असतोच. पण फरक असतोच. हे सर्व कलांत दिसून येते; चित्रकलेत, नृत्यातही. मग मंदिर बांधणीतही हे आढळणारच की. त्यांना म्हणावयाचे शैली. प्रमुख दोन, नागर व द्राविड. केरळ व कर्नाटकच्या थोड्या भागातील वेसर शैलीत गोलाकार देवळाचा प्रकार आढळतो पण तो तसा गौणच. आता एका शैलीतील सर्व मंदिरे सारखी नसतात. एकाच घराण्यातील उ.अ. करीमखॉ, गंगूबाई हनगळ व पं. भीमसेन यांचे गाणे स्वतंत्रच. तसेच नागर शैलीतील राजस्थानातील व ओरीसातील मंदिर वेगळेच. त्यामुळे या दोन शैलींमध्येही उपशैल्या उपजल्याच. गंमत म्हणजे गायनात जशी घराण्यांची नावे स्थानावरून पडली, ग्वाल्हेर, किराना, जयपूर, वगैरे तेच येथेही घडले. राजस्थान-गुजराथ शैलीची मंदिरे निराळी व ओरिसातली निराळी; दोन्हीही नागर शैलीचीच बरे का. या शिवाय मंदिरे बांधतांना प्रचंड प्रमाणात पैसा पाहिजे. तो पुरवणार राजघराणे. तेंव्हा त्यांच्या नावाच्या उपशैल्या आल्या. वाकाटकांच्या काळात बांधली गेली ती मंदिरे वाकाटक शैलीची. होयसाळांच्या राजवटीतील शैली होयसाळ शैली. उत्तरेत चंदेल राजांनी पैसा पुरवला, मग खजुराहो येथील मंदिरे चंदेल शैलीची. ( विसाव्या शतकात बिर्लांनी अनेक शहरात मंदिरे उभी केली, ती "बिर्ला मंदिर" या नावानेच त्या गावात ओळखली जातात; म्हणूनच म्हटले आहे "धन मूलमिदं जगत " ) हां, प्रत्येकातला फरक दाखवता येतो पण नावे पडली ती अशीच. तुम्ही विचारलेत "नावात काय आहे ?" तर उत्तर देणे अवघड आहे.Rose is a rose is rose हे खरेच. पण प्रत्येक शैलीची वैशिष्टे माहीत असतील तर कोणार्कला काय पहावयाचे व बेलूरला काय हे तुम्ही जास्त डोळसपणाने ठरवू शकाल. गायनातला आनंद मिळवतांना गायकाच्या घराण्याचे नाव माहीत पाहिजे असे नाही. पण घराणे व त्याची वैशिष्टे माहीत असतील तर हा आनंद जरा वरच्या दर्जाचा असेल. असो. नमनाचे तेल थोडे जास्तच जळले.

आपण पाहिले की सुरवातीला मंदिर म्हणजे गाभारा, लहानसा मंडप व वर सपाट छप्पर. बांधणार्‍याला फारसा वाव नव्हता. जेंव्हा आकार वाढला, सजावटी, रुपके, स्तंभ वाढले तेंव्हा खरी मजा आली. आता कलाकाराला कल्पनेचे पंख फुटले. एक म्हणाला, " माझे मंदिर उंच असणार. त्याचे शिखर पाच कोसावरून दिसले पाहिजे." दुसरा म्हणाला, "उंचीला काय मह्त्व द्यावयाचे ? भक्त काय माकडासारखे वर चढून बसणार आहेत ? त्याच्या ऐवजी माझा मंडप दोन हजार भक्तांना पुरून उरेल. मंदिराच्या कल्याणमंडपात एक काय दोन लग्ने लावा." झाला दोन शैलींचा उगम. ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजराथ, थोडक्यात उत्तर भारताने हिमालय समोर ठेवून पहिली शैली स्विकारली; तिला म्हणावयाचे "नागर शैली ". दक्षिण भारताने दुसरी कल्पना स्विकारली, तिला म्हणावयाचे " द्राविड शैली". थोडे सुलभिकरण केले आहे, पण कळावयास सोपे. बाकी फरक पुढे बघणार आहोतच.

हेही खरेच कीं कुठे तरी या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देवून सुरवात केली गेली असली पाहिजे. पट्टडकल, एहोळे, कर्नाटकातील विजापूर-गदगच्या जवळील गावे. इथे तुम्हाला या दोनही प्रकारची मंदिरे शेजारी शेजारी बांधलेली दिसतील. अगदी सातव्या शतकापासूनची. या दोनही शैलीतली मंदिरे आपण बघा. नागर शैलीची राजस्थान, मध्य प्रदेश, येथील नागर मंदिरे पाहिलीत तर पीठाबाहेर मंदिराचा संबंध उरतच नाही असे आढळेल. उलट द्राविड शैलीतील मंदिरांच्या बाहेरचे आवार कित्येक पटीत मोठे असते. उदा.: त्रिचनापल्लीचे श्रीरंगम हे विष्णुमंदिर आकाराने अगदी छोटे आहे. पण त्याला ७ आवरणे (प्राकार) आहेत, एकाबाहेर एक. सर्वात आतले लहानात लहान आहे ८५ मी.x ६३ मी. लांबरुंद, तर सर्वात बाहेरचे आहे ९६० मी.x ८५० मी. लांबरुंद. एकुण १४ गोपुरे आहेत. सर्वात बाहेरच्या दक्षिणेकडील गोपूराचे मोजमाप आहे ४५ मी. लांब व ३५ मी. रुंद. दरवाजा असलेला पहिला मजला आहे २० मी. उंच. गोपूर पुरे झाले असते तर उंची झाली असती १०५ ते ११० मी. चवथ्या प्राकारातला हजारी मंडप आहे १७५ मी. लांब व ५० मी. रुंद. हजारी मंडप नाव असले तरी तितके स्तंभ नाहीत; केवळ ९५३ आहेत ! द्राविड सौंदर्य कल्पना लक्षात आली ना ? ( तुम्हाला दाक्षिणात्य सिनेनट्या व या प्राकारात काही साम्य आढळले तर तो योगायोग समजावा; वास्तुशास्त्रात तसा काही उल्लेख मला दिसला नाही).

आपण मागे पाहिले की शिखर तयार होतांना भूमी (मजले) तयार होतातच. यावर निरनिराळ्या पद्धतीची सजावट केली जाते. मूर्ती, कलश, शाला, गवाक्षे, पट्ट,रथ यांनी भूमी सजवली जाते. नागर शैलीत ही सर्व एकावर एक, एका रेषेत येतात. भिंतीपासून तुमची नजर थेट आमलकापर्यंत पोचते. द्राविड शैलीत तसे नसते. प्रत्येक मजला पृथक पृथक नजरेस येतो. सहज लक्षात येणारा फरक.

तसे काही तांत्रिक भेदभाव आहेतच. पण ते लक्षात ठेवावयास पहिल्या लेखात दिलेले पारिभाषिक शब्द ध्यानात राहिले पाहिजेत व प्रत्यक्ष मंदिर बघतांना तेवढा वेळ देता आला पाहिजे. काही बघू. पण हा भाग तुम्ही सोडून दिलात तरी बिघडत नाही.
(१)छपराची जागा नागर मंदिरात त्रिकोणिकांनी घेतली आणि द्राविड मंदिरात मकरतोरणांनी.
(२) गाभारा, अर्धमंडप व मंडप यांच्या भिंतीचा मिळून जो एक सलग पट्टा तयार होतो त्यात अर्धस्तंभ, स्तंभ यांनी कवाडे करून त्यात मूर्ती बसवणे वा जाळी बसवणे द्राविड मंदिरात आढळते, नागर शैलीतील मंदिरात नाही. कोनाडे आहेत पण ते अर्धस्तंभांमुळे तयार झालेले नाहीत. नंतरच्या मंदिरात मूर्ती सरळ भिंतींवरच बसवल्या आहेत.
(३) नागर मंदिरात कणी,कुंभ अशा थरांची मांडणी दिसते,त्यावर कपोत, त्यावर भूमी व वर शिखर. द्राविड मंदिरात भिंतीच्या माथ्यवर कपोत, कपोतावर कूटशाला यांचे हार व त्यावर विमान व मग शिखर.
(४) प्रगत अवस्थेमध्ये दोनही शैलीतील स्तंभांमध्ये फरक असतो.
(५) दोन्ही शैलीत सौंदर्यकल्पना भिन्न आहेत. नागर शैलीत सर्व आखणी अशी असते की तुम्हाला वास्तु खूप उंच दिसावी तर द्राविड शैलीत विस्ताराला महत्व देण्यात आले. अनुक्रमे "ऊर्ध्ववृत्ती" व "समतलवृत्ती". द्राविड शैलीत प्रात्येक मजल्याच्या पृथक आविष्काराला महत्व दिलेले असते. नागर शैलीत तुमची नजर भिंतीपासून थेट आमलकाकडे खेचली जावी असा प्रयत्न असतो,
(६) असले फरक कितीही असले तरी एका गोष्टीत अजिबात भेद नाही. ती म्हणजे भक्त व देव यांची जवळीक. गाभारा-प्रदक्षिणामार्ग-मंडप सगळीकडे सारखेच, हा भारतीय मंदिराचा अविभाज्य भाग.
(अवांतर : भारतात हिंदु मंदिरात भक्त व देव एका पातळीवर असतात, तुम्ही देवाला "भेटू" शकता, गळामिठी घालू शकता पण ख्रिस्ती चर्चमध्ये येसू बर्‍याच वेळी भक्तापासून दूर, उंचावर असतो, तो "आकाशातल्या बापाचा" लेक म्हणून तर असे नाही ना ! )

आता थोडी माहिती "उपशैल्यां"बद्दल. वर सांगितले आहेच की निरनिराळ्या राजवटींनी, निरनिराळ्या काळांत, निनिराळ्या राज्यांत मंदिरे उभी केली व त्यांत काही बदल आढळले तर त्या मंदिरांना त्या राजवटींच्या उपशैलीची म्हणावयास सुरवात झाली. येथे मी सर्वांची माहिती देण्यास मला काहीच अडचण नाही पण वाचकांना कंटाळवाणे वाटावयाची शक्यताच जास्त. तेव्हा माहिती पुढीलप्रमाणे देतो. राजवट, प्रांत, काल, गाव व मंदिर. आपण आपल्या सोयीने जालावरून फोटो पहा, सविस्तर माहिती मिळवा.

नागर शैली :
तिसरे ते सहावे शतक... साधी, प्राथमिक पायरीची, प्रायोगिक मंदिरे. तिगवा, देवगड, भुमरा, नाचणा, मध्यप्रदेश. गोप..सौराष्ट्र एहोळे..कर्नाटक.

गुजराथ ..सोळंकी...दहावे ते बारावे शतक.. मोढेरा सूर्यमंदिर,... झालावाड जिल्हा सेजकपूर मंदिर. अबू..जैन मंदिरे.
मध्यभारत ... दहावे-अकरावे शतक... चंदेल..खजुराहो. भेडाघाट .. चौसष्ट योगिनी. ग्वाल्हेर (तेली मंदिर व सास-बहू)
ओरिसा ... तेरावे शतक ..गंग राजवट ...कोनार्कचे सूर्यमंदिर. भुवनेश्वर, पूरी
राजस्थान ... दहावे ते बारावे ...सोळंकी ...औसिया, जगत, चितोडगड.
" " ...तेरावे शतक आणि नंतर .. चितोड..कीर्तिस्तंभ,अबु पहाड,राणकपूर,
माळवा ...(राजस्थान-महाराष्ट्र)... परमार-यादव-शिलाहार वंश..अकरावे शतक आणि पुढे .. उदयपूर, देवास, रामगड, अंबरनाथ, वलसाणे (धुळे), सिन्नर, झोडगे (नाशिक)
महाराष्ट्र ... राष्ट्रकूट...आठवे शतक वेरुळ कैलास मंदिर,(द्राविड), पट्टडकल ..जैन मंदिर
कर्नाटक .. सातव्या शतकाच्या पुढे .. चालुक्य ..पट्टडकल, एहोळे, बदामी... पापनाथ, कुकनुर..नवलिंग समुह.
" " पुढे सहाशे वर्षे .. एका राजवटीचे नाव देण्याऐवजी "कर्नाट" उपशैली म्हणा ...कुकनूर, लक्कुडी, इट्टगी.

द्राविड शैली
कर्नाटक .. सातवे-आठवे शतक ..बदामी.पट्टडकल ..मालेगिती, विरुपाक्ष
वरंगळ ..काकतीय वंश ..बारावे-तेरावे शतक ..हनमकोंड, पालमपेट, वरंगळ,
होयसाळ वंश ..(द्राविड-नागर शैलींचे मिश्रण) ..बारावे-तेरावे शतक ...हळेबिड, बेलुर, सोमनाथपुर.
तामिळनाडू ..पल्लव वंश ..सहावे-आठवे शतक ..महाबलिपुरम, कांचीपुरम.
" " .. चोळ वंश ...दहावे-बारावे शतक .. तंजावर,गंगैकोंड,धारासुरम. या पाद्धतीची मंदिरे सतराव्या-अठराव्या शतकांपर्यंत चालू राहिली
तिरुवल्लर, श्रीरंगम, चिदंबरम, रामेश्वर, मदुरा, विजयनगर, ताडपत्री.

या लेखमालेतला हा शेवटचा लेख.बरेच काही राहून गेले आहे (उदा. हेमाडपंथी मंदिरे) याची मला कल्पना आहे. विसाव्या शतकात नवीन
पद्धतीने बांधली गेलेली मंदिरे, उदा. बिर्ला मंदिरे, अक्षरधाम इ. यांचीही माहिती येणे योग्य झाले असते. पण कोठेतरी थांबले पाहिजेच ना ?

(1) पट्टडकल :पापनाथ मंदिर. येथे नागर व द्राविड शैलीची मंदिरे शेजारी शेजारी दिसतात तसेच दोहोंची सांगड घातली तर कसे दिसेल तेही बघितले गेले. या फोटोत गाभार्‍याचे शिखर नागर तर शेजारचा मंडप लांबच लांब द्राविड पद्धतीचा. त्याचे छप्पर सपाट आहे. खालच्या नागर देवळात मंडपावर शिखर दिसत आहे.
3512326070_167ab8bef1 Papanath

3482463028_83ed72f6c2 Bhuvaneshvar

(२) होयसाळ शैलीचे सोमनाथपुर येथील मंदिर. येथे नागर पद्धतीचे शिखर आहे पण एकूण ठसा बसकट, द्राविड पद्धतीचाच.

20090600029480-hqsomanaathapur

(३) खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिरात ऊर्धगामी रेषा आपली नजर थेट आमलकाकडे घेवून जातात.

khaju2 ka mahadev temple

शरद

 हेमाद्री वा हेमाडपंत हा देवगिरीकर यादवांच्या काळात ( १३ वे शतक) एक वरिष्ट अधिकारी होता. ह्या प्रकांड पंडिताच्या नावावर अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एका विशिष्ट घाटाच्या मंदिरांना हेमाडपंती म्हणावयाची पद्धत आहे. यात बांधणीकरिता चुन्याचा वापर केला जात नाही.ठराविक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा घेवून हे बांधकाम केले जाते. या पद्धतीत पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच आकाराची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक असते. पायाची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसवल्यामुळॆ लहान लहान शिखरे रचून मोठे शिखर तयार केले असे वाटते.ही शिखरे जागच्या जागी रहावीत म्हणून उपयोगात आणलेल्या दगडांवर नक्षीकाम करून उठाव आणतात.शिखरांमध्ये अनेक प्रकार असून अश्वथर, गजथर इत्यादी प्रकार प्रामुख्याने वापरतात. ही शिल्पपद्धती हेमाडपंताच्या नावाने प्रसिद्ध असली तरी अशा प्रकारची देवळे त्याच्या काळाच्या आधीपासून आढळतात.
हेमाद्रीचे नाव देवळे बांधावयाच्या पद्धतीवरून पडले आहे. त्यामुळे अशी देवळे नागर वा द्राविड या दोनही शैलीत बांधता येणेशक्य आहे.आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या काळाच्या आधीही अशी देवळे बांधत होतेच. त्याचे स्वत:चे वास्तव देवगिरीला, महाराष्ट्रात असल्याने बरीच देवळे नागरी पद्धतीची आढळतात. विदर्भात, वर्‍हाडात, जयपुर-कोटली, अमदापूर,शिरपूर, मेहेकर,लोणार, धोत्रा, सातगाव (जि.बुलढाणा), निलंगे, नारायणपुर येथील देवळे बर्‍यापैकी स्थितीत आहेत. आंध्र प्रदेशातील देवळे या पद्धतीची आहेत पण त्यांचा संबंध हेमाद्रीशी जोडणे अवघड आहे. आपण जेंव्हा वेरुळ-घृष्णेश्वर बघावयाला औरंगाबादला जाता तेंव्हा एक दिवस काढून लोणारला अवष्य जा. उल्का निर्मीत सरोवर, देवळे, सिंदखेडराजा वगैरे एका दिवसात बघून होते.
आज एका पुस्तकाचा परिचय करून द्यावयाचा आहे. श्री. के.आ.पाध्ये यांनी "हेमाद्रि उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र" नावाचे एक पुस्तक १९३१ साली प्रसिद्ध केले होते. वरदा प्रकाशनचे श्री.भावे यांनी २००८ ला त्याचे पुनर्मुद्रण करून एक महत्वाचे काम केले आहे. नानाविध माहितीचा खजिनाच या पुस्तकात आढळतो.हेमाद्रीचे चरित्र,त्याचे ग्रंथरचना,यादव घराण्याचा इतिहास,मोडीलिपी, महानुभाव वाङ्मय, हेमाडपंती देवळे,इत्यादी विविध भाग असून शिवाय ४ परिशिष्टेही आहेत. वाचनीय पुस्तक.
जालावर अनेक फोटो पहावयास मिळतील
शरद

शरदराव माहितीबद्दल आभारी आहे. हेमाडपंथी शैली यादवकाळापुर्वीपासूनच महाराष्ट्रात अस्तिवात आहे. फक्त नक्की माहीत नव्हते. कारण हेमाद्रीपंडिताचा आणि आधीच्या मंदिरांचा न जुळणारा काळ. पण तुमच्या स्पष्टीकरणामुळे समाधान झाले. महाराष्ट्रात विविध किल्ल्यांच्या पायथ्याला शिलाहारकालीन भोज राजांनी विशेषतः झंझ राजाने मंदिरे बांधली. त्यात हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, त्याच्या पायथ्याच्या खिरेश्वरजवळील नागेश्वर, कुकडीकाठचे कुकडेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर. ही सर्व ९/१० शतकातील हेमाडपंथी मंदिरे आहेत.

काही प्रकाशचित्रे पाहा.

रतनवाडीचा अमृतेश्वरः

 http://misalpav.com/node/16630

 

 

 Ancient Temples in Maharashtra (महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य)

महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर, जि. नाशिक

पुण्याजवळचा पुरंदर किल्ला पाहून पायथ्याच्या नारायणपूर गावात उतरलो. नारायणपूर गाव बालाजी मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणून आज प्रसिध्द आहे. याच गावात चालुक्य कालिन प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. इतक्या वेळा येऊनही हे मंदिर एकदाच पण घाईघाईत पाहिल होत. आजचा मुक्कम गावातच होता त्यामुळे कॅमेरा घेऊन मंदिरा भोवती तटबंदीतील छोट्या दरवाजातून आवारत शिरलो. मंदिराच्या कळासाकडे पाहून आपण येथे का आलो ? असा मला प्रश्न पडला. मंदिराचा मुळचा कळस काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे त्या जागी मंदिराच्या रचनेला न शोभणारा सिमेंटचा कळस बांधलेला आहे. नुसता सिमेंटचा कळस बांधून हा आधुनिक शिल्पकार गप्प बसला असता तरी ठिक होत. पण त्याने त्या भोवती पाच फण्यांचा मोठा नाग बनवलेला आहे. एवढे कमी होते म्हणून त्या नागाच्या डोळ्यात लाल रंगाचे दिवे लावून वेगखाच "इफेक्ट" दिला होता. खरतर आमचा भ्रमनिरास झाला होता पण, हिम्मत करून मंदिरात गेलो. मंदिराचा पुजारी मंदिरात एकटाच होता. आमची जिज्ञासा पाहून त्याने संपूर्ण मंदिर त्यातील बारकाव्यां सकट दाखवले. जोडीला अनेक दंतकथा सांगितल्या. पाच मिनिटात मंदिर पाहून जाऊ म्हणून आत आलेलो आम्ही तब्बल दिड तासाने तृप्त होऊन बाहेर पडलो.

नारायणेश्वर मंदिर


  सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात केलेल्या भटकंतीत अशी अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळाली होती. दमुन भागुन या मंदिराच्या शांत गार सभामंडपात विश्रांती घेतली होती. खरतर मंदिर ही कल्पनाच किती सुंदर आहे. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. पण त्याही आधी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात होती. सह्याद्री डोंगररांगेत आजही देवरुख जवळचे मार्लेश्वर मंदिर, वासोट्या जवळचे नागेश्वर मंदिर, ढाक किल्ल्या वरील बहिरीची गुहा इत्यादी अनेक गुहा मंदिर आपल्याला पाहायला मिळतात.

लहुगडा वरील गुहेतील मंदिर, जि. औरंगाबाद

वासोट्या जवळचे नागेश्वर मंदिर

गुहा मंदिर हरीश्चंद्रगड

त्यानंतरच्या मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिरे (४ थे शतक) ही एक खोली व तीच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. पुढील काळात पूजापद्धतीचा विस्तार होऊन पूजन, नैवेद्य यांच्या जोडीला नृत्य, गायन ह्या गोष्टी आल्या. देवाचे स्नान, भोग, सोहळे आले. हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच प्रकारची मंदिरे उभी राहिली पाहीजेत याची स्थापतींना जाणीव झाली आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराचे रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. गाभार्‍या भोवती प्रदक्षिणापथ व समोर मोठा मंडप आला. मंडपाचे छप्पर सपाट, आणि गाभार्‍यावर शिखर आले.  गाभार्‍याच्या आणि मंडपाच्या मधला भाग म्हणजे अंतराळ व त्यावर गजपृष्ठ पद्धतीचे छप्पर असे. चौकोनी मंडप बाधू लागल्यावर कोनाकार, शंकूसारखी छपरे बसविण्यात येऊ लागली. या छपरांची उंची गाभार्‍यापासून मंडपाच्या दिशेने कमी कमी होत जात असे.

Photo courtesy google.com
  
या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, ग्रामसभा, न्यायसभा होत. गाभार्‍यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जात असे. मंदिरात 1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा हे विभाग होते.

भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली. या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत.  
     
नागर शैली मंदिरे :- यांनाच इंडो आर्यन मंदिरे असेही म्हणतात. हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व काहीसा बहिर्वक्र स्वरुपाचा असतो. शिखराच्या मुख्य आकाराच्या वर बसक्या लोट्या प्रमाणे भाग असतो ज्याला "आमलक' म्हणतात. ही मंदिर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.

द्रविड शैली मंदिरे :- द्रविड हा शब्दच मुळात भौगोलिक प्रदेशाचे सूचक आहे. कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली प्रसिध्द होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मंदिराच्या शिखरात मजले  बांधलेले असतात. यांनाच "भूमी' असे म्हणतात. ही मंदिरे मोठ्या परिसरात पसरलेली असतात. या मंदिराचा आणखी एक विशेष म्हणजे "गोपूर'. मालवण जवळील कुणकेश्वराचे देऊळ हे द्रविड शैलीत बांधलेले प्राचीन मंदिर आहे.

वेसर शैलीची मंदिरे:- या शैलीची मंदिरे प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळतात. विंध्यपर्वता पासून कृष्णानदी पर्यंत ही शैली प्रचलित आहे. यात नागर आणि वेसर दोन्ही पध्दतीचा समावेश दिसतो. यालाच "मिश्रक' असेही नाव आहे.

भूमिज शैलीची मंदिरे :- ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात, माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात. यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर, गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकारची मंदिरे आहेत.

चाळीसगाव जवळचे महादेव मंदिर

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर

 सिध्देश्वराचे मंदिर, माचणूर

अमृतेश्वर मंदिर,रतनगड

कर्णेश्वर मंदिर,संगमेश्वर 













   महाराष्ट्रातील मंदिरात हेमाडपंथी मंदिरे हा वास्तुरचना आणि कौशल्याचा स्वतंत्र प्रकार आहे.  देवगिरीच्या यादवांचा मंत्री असलेला हेमाद्री हा मोडी लिपी व हेमाडपंथी मंदिरे यांचा जनक मानला जातो. हेमाडपंथी मंदिरांचे वैशिष्ट्य असे की, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यासाठी चुना, माती यांचा वापर केला जात नसे. मंदिरे विविध म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.


सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. इअसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकांपासून तेराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात शेकडो मंदिरे बांधण्यात आली. यातील बहुतेक मंदिरांचे बांधकाम एखाद्या राजाने करून घेतले आहे, त्यामुळे ही मंदिरे त्यावेळच्या राजधान्या, व्यापारी मार्ग, बाजारपेठा यांच्या जवळ बांधली गेली. अशाच घाटमार्गांवर असलेले भीमाशंकरचे प्राचीन शिवमंदिर आजही प्रसिध्द आहे. हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले खिरेश्वर गावातील मंदिर, रतनगडाच्या पायथ्याशी असलेले अमृतेश्वर मंदिर, सोलापूर पंढरपूर मार्गावर असलेले माचणूर येथील सिध्देश्वराचे मंदिर, डोंबिवली जवळचे खिडकाळेश्वर मंदिर, अंबरनाथचे शिव मंदिर, टाकेदचे जटायू मंदिर अशी अनेक मंदिरे व्यापारी मार्गांवर होती. तर संगमेश्वर जवळचे कर्णेश्वर मंदिर, नगर जवळचे सिध्देश्वराचे मंदिर, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, फलटणचे जरबेश्वर मंदिर ही प्राचीन नगरांजवळ बांधण्यात आली होती.

याशिवाय पूराण कथांमधील उल्लेखांमुळे पवित्र मानल्या गेलेल्या स्थानांवर देखील अनेक मंदिरे बांधण्यात आली. चाळीसगाव जवळचे पाटणादेवी मंदिर व महादेव मंदिर, नाशिक परीसरातील मंदिरे, मुंबईचे वालुकेश्वर मंदिर, सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरचे मंदिर, लोणारचे मंदिर अशी अनेक मंदिरे पूराण कथांमधील पवित्र स्थानांवर बांधण्यात आली.


फलटणचे जरबेश्वर मंदिर

निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर


















 


महाराष्ट्रातील मंदिरे प्रामुख्याने चालुक्य, विजयनगर, यादव यांच्या काळात बांधली गेली. त्यामुळे मंदिरांच्या रचनेत व बांधकामावर त्याचा प्रभाव पडला. त्याशिवाय स्थानिकरित्या उपलब्ध झालेली साधने वापरून ही मंदिरे बांधल्यामुळे, सह्याद्रीच्या कुशीतील व घाटमाथ्यावरील मंदिरे काळया पाषाणात बांधण्यात आली. मंदिरासाठी लागणारा दगड मंदिराच्या परिसरातूनच काढला गेला आणि त्याजागी पाण्याची कुंड किंवा पुष्करणी तयार केल्या गेल्या. कोकणातील मंदिरे चिर्‍यापासून बनवलेली होती, त्यावर कौलारू छप्पर असे.



 दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे. विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत.


नाग
सतीगळ
किर्तीमुख

गोमुख

गध्देगाळ
वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone) यावर वेगळा ब्लॉग लिहिलेला आहे. तो जरुर वाचावा. ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
 https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html


सुरसुंदरी




पुष्कर्णी

सह्याद्रीतील ही प्राचीन मंदिर हा किल्ले, लेणी यासारखा अभ्यासण्याचा विषय आहे. मंदिराची रचना, त्यावरील कोरीव काम, मुर्ती, शिलालेख, विरगळ, गध्देगाळ, मंदिरां भोवतीच्या अनेक दंतकथा या सर्वांचे मिळुन खरतर मंदिर तयार होत. आज काळाच्या रेट्याने काही प्राचीन मंदिरे नष्ट झाली, काही आडबाजूला पडल्यामुळे लोकांच्या विस्मरणात गेली आहेत.


https://samantfort.blogspot.com/2015/06/blog-post_10.html


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...