महाराष्ट्रातील सर्व मंदिराना सरसकट हेमाडपंथी मंदिरे म्हणायची पध्दत पडलेली आहे. हेमाद्री (हेमाडपंत) हा यादवांचा कर्णाधीप (प्रधान् होता. यादवांच्या सत्तेला स्थैर्य मिळाल्यावर त्यांनी कला साहित्य निर्मितीला प्रोत्साहन् दिले. त्यामुळे या मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे या नावाने ओळखले जाते. पण त्यापूर्वीही वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, होयसाळ यांनी एकापेक्षा एक सुंदर मंदिरे महाराष्ट्रात बांधलेली आहेत. यादवांच्या उत्तरकाळात मंदिरांवरील नक्षीकाम कमी कमी होत गेले. व्दारशाखा, सभामंडप, बाह्यभिंती त्यावरील मुर्ती, शिल्प, नक्षी जाऊन मोठमोठ्या सपाट दगडांनी बांधलेली मंदिरे सर्वत्र दिसायला लागली.
उत्तर भारतात नागर शैलीची मंदिरे पाहायला मिळतात तर दक्षिण भारतात द्रविड पध्दतीची मंदिरे पाहायला मिळतात. या दोन्ही शैलीपेक्षा वेगळ्या शैलीतील मंदिरे महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्यांना भुमिज शैलीतील मंदिरे म्हणतात. या मंदिरांसाठी चतुरस्त्र आणि तारकाकृती या दोन प्रकारचे आराखडे वापरले जातात. अशाच शैलीतील दोन मंदीरांची आपण माहिती घेणार आहोत, ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सिध्देश्वर आणि गंगेश्वर मंदीरांची माहिती घेणार आहोत.
नगर जिल्हा असे नाव उच्चारले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते शिखरसम्राज्ञी 'कळसूबाई'! या शिखराच्या परिसरातच नगर जिल्ह्यातील डोंगरांच्या कुशीत 'अकोले' नावाचे अत्यंत सुंदर टुमदार गाव वसलेले आहे. या गावाशेजारून अमृतवाहिनी 'प्रवरा नदी' वाहते तसेच 'अगस्ती ऋषींच्या' वास्तव्याने पावन झालेल्या 'अकोले' ह्या गावामध्ये 'सिद्धेश्वर' नावाचे अत्यंत सुंदर कलाकुसरीचे साधारणतः १३ व्या शतकात एक मंदिर उभारले गेले आहे.
'सिद्धेश्वर' मंदिराला भेट द्यायची असल्यास संगमनेर मार्गे 'अकोले' हे गाव गाठावे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या या सुंदर गावी जाण्याचा रस्ता तसेच आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आपले लक्ष वेधून घेतो 'संगमनेर' या गावापासून अवघ्या २५ कि.मी. वर असणाऱ्या या गावी जाणारा रस्ता देखील अत्यंत चांगला आहे. 'अकोले' या गावी जायला शक्यतो स्वतःचे वाहन असलेले कधीही उत्तम तसेच पुण्यामधून 'अकोले' पर्यंत थेट बससेवा उपलब्ध आहे. आपली स्वतःची गाडी थेट 'सिद्धेश्वर' मंदिरापर्यंत जाते.
शिल्पकलेचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण असलेल्या ह्या मंदिराचा शोध इ.स. १७८० साली एका शेतकऱ्याला लागला. पेठकर नावाचे गृहस्थ प्रवरा नदीच्या काठी आपले शेत नांगरत असताना नांगराचा फाळ अडकला तेव्हा जिथे नांगराचा फाळ अडकला होता तिथे खोदले असता मंदिराचा भाग दृष्टीस पडला आणि एक जमिनीच्या पोटामध्ये लपलेले मंदिर महाराष्ट्राच्या कलेच्या इतिहासावर आले. जेव्हा या मंदिराला जमिनीमधून बाहेर काढले तेव्हा 'सिद्धेश्वर' मंदिराचे ऐतिहासिक महत्व ओळखून 'अकोले' येथील गावकऱ्यांनी हे मंदिर संपूर्ण स्वच्छ केले. जेव्हा या 'सिद्धेश्वर मंदिर' परीसरामध्ये स्वच्छतेचे काम गावकरी करीत होते तेव्हा मंदिरामध्ये काही कागदपत्रे तसेच नाणी देखील आढळून आली होती. त्याची थोडीफार डागडुजी करावी लागली. मुखमंडपापैकी एकाची पुनर्बांधणी केली गेली. हे मंदीर श्री.मदन पेठकर यांच्या खाजगी मालकीचे. याची सर्व कागदपत्रे श्री. दत्तो वामन पोतदार यांनी पुण्याला भारत इतिहास संशोधक मंडळात नेली व अभ्यासली. गो.नि.दांडेकर ,बाबासाहेब पुरंदरे या दिग्गजांनी इथे भेट दिली. या मंदीराची मालकी असणारे पेठकर कुटुंब मुळचे कोतवाल घराण्याचे, इंदोरचे. त्यांना अकोले, म्हाळादेवीची जहागिरी मिळाली. त्यांनी अकोलेचा विस्तार केला. तत्पुर्वी हे गाव म्हणजे देशमुखाची गढी आणि छोटीशी वस्ती होती. आता मात्र अकोलेचे वेगाने शहरीकरण होत आहे. आधुनिक ब्रँडची दुकाने , शॉपिंग सेंटर, उभे रहात आहेत. गावात जुन्या बांधणीचे चप्ट्या वीटाचे वाडे दिसतात.


सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्यभागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे दिसतो.
मुख्य मंडप ८ खांबावर तोललेला आहे. त्यातील चार नक्षीदार खांब आधी वर्णन केल्याप्रमाणे आहेत. तर उरलेले चार खांब साधे आहेत त्यावर थोडेच अलंकरण आहे. मुख्य मंडपाच्या बाजूला दोन अर्ध मंडप आहेत . या अर्धमंडपांना अर्धभिंती असल्याने त्यातून येणारा प्रकाश खांबावर पडून छाया प्रकाशाच्या खेळात खांबावरील मुर्ती उठून दिसतात. सिद्धेश्वर' मंदिराच्या मूळ स्तंभांंची रचना ही चौरस स्तंभपाद किंवा तळखडा याच्यावर आपल्याला पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, ब्रम्हाणी या स्त्रीदेवता आपल्याला त्यांच्या आयुधांच्या सहित पहायला मिळतात. मंदिराचे स्तंभमध्य हे अष्टकोनी असून त्यामध्ये आडव्या शिल्पपट्टांंत देवदेवतांची शिल्पे आपल्याला पहायला मिळतात. मंदिराच्या स्तंभांच्या शीर्षावर आपल्याला भारवाहक यक्ष पहायला मिळतात. तसेच मंदिराच्या सभामंडपामध्ये असलेले अर्धस्तंभ हे कमी कलाकुसरीचे असून त्याच्यावर आपल्याला किर्तीमुख कोरलेली पहायला मिळतात. मंदिराच्या स्तंभशिर्षांवर आपल्याला उलटे नाग देखील कोरलेले पहायला मिळतात.सभामंडपात मध्यभागी चार अर्धस्तंभ आहेत. विवीध देवता, कुंभ, पाने, नागशिल्प, यांनी हे स्तंभ अलंकृत केले आहेत. मध्यभागी असलेले चार स्तंभ, भिंतीमधील आठ अर्धस्तंभ या सर्वांवर आडव्या दगडी तुळ्या टाकल्या आहेत. त्यामुळे मंदीराचे वितान ( म्हणजे छत ) नउ भागत विभागले गेले आह. मधल्या तुळ्याच्या आतील बाजुला कोरीवकाम केले आहे. त्यावर समुद्रमंथन ,शेषशायी विष्णु ,हत्ती, घोडे असे मंदीरावर सहजासहजी न दिसणारे उंटशिल्प कोरले आहे.हत्ती, घोडे यांच्या शरीराला नैसर्गिक डौल असतो, जो उंटाला नसतो , त्यामुळे कदाचित उंटाचे शिल्प नसते.
मुखमंडपाच्या पुढे अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात पिंड आहे. मंदिराच्या बाह्यभिंतींवर दोन देवकोष्ठ आहेत. त्यातील मुर्ती भंगलेल्या आहेत. अर्ध मंडपांच्या भिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर सर्वात खाली फ़ुलांची पट्टी व सर्वात वर किर्तीमुखांची पट्टी आहे. मंदिराचे मुळ कळस अस्तित्वात नाहीत.
मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगाची स्थापना ही खोल भागात केलेली आपल्याला पहायल मिळते. सिद्धेश्वर मंदिराचे गर्भगृहाचे दुसरे प्रवेशद्वार हे पूर्वेकडे असून तेथे आपल्याला नंदीमंडप पहावयास मिळतो. नंदीमंडपाच्या स्तंभावर आपल्याला देवी-देवता, काही पुराणातील प्रसंग तसेच ऋषीमुनी यांची शिल्पे पहायला मिळतात. नंदीमंडपामध्ये आपल्याला स्तंभांच्यावर जे यक्ष पहावयास मिळतात त्या यक्षांची मुखे ही आपल्याला मूषक(उंदीर) आणि नरसिंह यांची आहेत असे पहायला मिळते. सिद्धेश्वर मंदिराला उत्तर आणि दक्षिण बाजूला अर्धमंडप असून ते साधेच आहेत त्याच्यावर आपल्याला कोणतेही कोरीव कामं दिसून येत नाही. अर्धमंडपाच्या बाह्य भागामध्ये असलेल्या देवकोष्ठामध्ये तांडवनृत्य करणारा शिव आणि दुसऱ्या देवकोष्ठात आपल्याला चामुंडा यांची शिल्पे पहायला मिळतात.

हेन्री कझिन्स याने काढलेले अकोले येथील 'सिद्धेश्वर' मंदिराचा तलविन्यास आणि स्तंभाची रचना यांचे चित्र.
हेन्री कझिन्स याने लिहिलेल्या 'Mediaeval Temples of The Dakhan' या पुस्तकात पान क्रमांक ५५ वर लिहितो कि या मंदिरामध्ये एक शिलालेख देखील आहे त्याबाबत 'हेन्री कझिन्स' याने केलेले वर्णन पुढीलप्रमाणे:-
Mr Sinclair writing of this temple, said "unfortunately the front porch has been restored by some pious blockhead in the Sarasanic style of a handsome modern temple in the village, so that it is not available for purpose of comparison. More than that the vandal threw away the ruins of the old porch on one of which was a long Sanskrit inscription observed but not copied, by Dr. Gibson twenty five years ago. After long search I found that the fragment, on which it was, had been turned face up under a nim tree, and used as a seat by the idlers of the village, who had with their barbarous hinder parts obliterated the inscription (never very deep or clear cut) beyond all hope of transcription or estampage, though it is possible that a competent Sanskrit scholar, with time and the stone before him, might decipher a few words"
सिद्धेश्वर मंदिराचे शिवलिंग आणि मंदिराची रचना तसेच स्तंभांच्यावरील नक्षीकाम.
परंतु 'हेन्री कझिन्स' ज्या शिलालेखाचा उल्लेख करतो त्याबाबत आपल्याला मंदिरावर असलेल्या शिलालेखाची ओळख मिळत नाही.
असे हे यादव काळातील सिद्धेश्वर मंदिर हे अकोले गावाचे प्राचीनत्व सांगणारा अत्यंत महत्वाचा वारसा आहे या प्राचीन 'सिद्धेश्वर' मंदिराला भेट देऊन या मंदिर स्थापत्याचा अभ्यास नक्कीच करायला हवा.
गंगाधरेश्वर मंदिर :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) https://www.santsahitya.in
३) https://www.discovermh.com
४) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
५) http://www.pankajz.in/
पुढचा टप्पा होता २७ किलोमीटर वरील अकोले गाव प्रवरा नदीकाठी गाव वसलेले आहे या ठिकाणी एकेकाळी अगस्ती मुनींचा आश्रम होता आणि वनवासात असताना राम लक्ष्मण सीता या आश्रमात येउन गेले होते अशी दंतकथा आणि गावकऱ्यांची श्रध्दा आहे. अगस्ती ऋषींचे मंदिर गावात आहे. पण आम्हाला पाहायची होती ती सिध्देश्वर आणि गंगेश्वर मंदिरे . भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने प्रवरा नदीला पाणी होते. एवढ्या उन्हात ते पाणी नुसते पाहूनही नजरेला थंडावा मिळत होता. प्रवरा नदीवरील पुल ओलांडल्यावर डाव्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आहे .
![]() |
| Kirti Mukh |
सिद्धेश्वर मंदिर शोधण्यास विशेष सायास पडले नाहीत. बर्यापैकी लोकांना ठाऊक होते. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. गाड्या नीट पार्क करुन ठेवल्या. कॅमेरे काढून एकदम कुणाला भिववून टाकण्याऐवजी जरा आसपासचा आढावा घेतला.
पुजारी आणि दर्शनाला आलेल्या भक्तगणांशी गप्पा मारुन मंदिरात कुठे आणि काय काय आहे त्याची माहिती जाणून घेतली. एकंदर परिस्थिती पाहून थोडेफार समाधान वाटले. मंदिर कुठेही ऑईलपेंटने न रंगवता आणि कॉंक्रीटचे आधार न लावता नीट जपले होते. मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरु होता आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला होता.
खिडक्यांमधून डोकावले असता तिथे मोठा शिल्पखजिना आहे जे जाणवत होते. त्यामुळे काहीही करुन कुलूप उघडून आत जायला मिळाले पाहिजेच असे मनाशी ठरवले. मंदिराच्या पुजार्याकडे चावी असते आणि ती कुणाच्या तरी शिफारशीवर मिळेल अशी माहिती समजल्यावर आम्ही आसपास दर्शनास येणारे भक्त हेरु लागलो. एक जरा गावात वजन आहे असे वाटणारी व्यक्ती दिसलीच. रासने मामा. कॅमेरे पाहून त्यांचेही कुतूहल जागे झालेच होते. त्यांच्याशी बोलून आमच्या दौर्याचा कार्यक्रम थोडक्यात सांगितला, आम्हांला माहिती असलेल्या काही मूर्तींची माहिती त्यांना करुन दिली. आणि मग हळूच सभामंडपाच्या चावीचा विषय काढला. त्यांनीही तत्काळ पुजार्याला कुलूप उघडून देण्यास सांगितले. आमच्यासोबत पुन्हा नव्या नजरेने सभामंडप पाहिला. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्यभागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे दिसत होता.
रासने मामांनी आम्ही कसले फोटो काढतोय हे कुतूहलाने पाहिले, कौतुक केले.
आणि बोलता बोलता गावातील आणखी एका पुरातन गंगाधरेश्वर मंदिराचा उल्लेख
केला. मग तो धागा आम्ही कसला सोडतोय? अधिक माहिती विचारुन घेतली आणि
त्यांनाच आम्हांला तिथे सोडण्याची गळ घातली. रासने मामा आम्हांला त्या
मंदिरात घेऊन गेले नसते तर आम्हांला खरेच ते सापडले नसते. गावातल्या अगदी
लहानशा गल्लीत घरासारखा दिसेल असा दरवाजा असलेले मंदिर असले तरी आतमध्ये
मात्र प्रशस्त होते. पुण्यातील पोतनीस कुटुंबाच्या खाजगी मालकीचे असलेले हे
मंदिर अलीकडच्या काळात म्हणजे साधारण पेशवाईत बांधलेले आहे. अतिशय सुबक
शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल कोरलेले खांब, प्राचीन काचेची झुंबरे,
फरसबंदी प्रशस्त आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू नये असे.
http://www.pankajz.in/2016/08/TempleRide-1.html
सिद्धेश्वर मंदिर, अकोले, अ.नगर –
अकोले शहरात असणारे सिद्धेश्वर मंदिर शोधण्यास आपल्याला विशेष सायास पडत नाहीत. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. सिद्धेश्वर मंदिर अकोले कुठेही ऑइलपेंटने न रंगवता आणि कॉंक्रीटचे आधार न लावता नीट जपले आहे. सिद्धेश्वर मंदिर यादवकालीन असून साधारणतः १३ व्या शतकातील असावे. मंदिर भूमिज शैलीतील असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरू आहे आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला आहे. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्य़भागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे आपल्याला पहायला मिळतो.
सिद्धेश्वर मंदिर १७८० पर्यंत प्रवरा नदीच्या जलाशयाच्या खाली पुरले गेले होते. अठराव्या शतकाच्या अखेरीस केलेल्या उत्खननात याचा शोध लागला. त्याची थोडीफार डागडुजी करावी लागली. मुखमंडपापैकी एकाची पुनर्बांधणी केली गेली. वास्तूशैलीच्या बाबतीत उर्वरित मंदिर अगदी अखंड आहे. मंदिराला नदीच्या कडेला एक आणि जागेच्या दिशेने एक प्रवेशद्वार आहे. हे रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरासारखे आहे जिथे गर्भगृहाचे प्रवेशद्वार दोन्ही बाजूंनी आहे. मंदिराच्या परिसरात हनुमान मंदिर, महादेव मंदिर व श्रीराम मंदिर ही पेशवेकालीन लहान मंदिरे असून त्यातील हनुमान मंदिरातील मारुतीची मूर्ती सुबक आहे. आपल्याला मंदिर परिसरात अनेक वीरगळी इतरत्र विखुरलेल्या दिसतात. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगस्ती ऋषींच्या प्रवरा नदीच्या तीरावरील ऐतिहासिक आणि पौराणीक वारशांप्रमाणेच हे मंदिर देखील अकोले शहराचा ऐतिहासिक वारसा आहे.
Rohan Gadekar
भटकंती : अकोल्यातील सिद्धेश्वर मंदिर
पंकज झरेकर
नमस्कार मंडळी,
आपण
साधारण दोन-अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर वीकेंड भटकंती पुन्हा सुरू करतोय.
पावसाळा काही दिवसांतच सुरू होईल, तर सुरुवात करूया एखादी लाईटवेट, कमी
कष्टाची भटकंती घेऊन. आज पाहूया नगर जिल्ह्यातील अगस्तीनगरी अकोले आणि
तेथील मध्ययुगीन कोरीव मंदिर सिद्धेश्वर. अकोलेला पोचण्यासाठी पुण्याहून
आळेफाटा-संगमनेर-अकोले आणि नाशिकहून सिन्नर-गोंदे फाटा-दापूर-अकोले असा
रस्ते मार्ग आहे.
अकोले गावात पोचल्यावर सिद्धेश्वर मंदिर
शोधण्यास फारसे प्रयास पडणार नाहीत. गावातील जवळपास प्रत्येकास हे मंदिर
ठाऊक असावे. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. प्रवेशद्वारातून
मंदिराच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर त्याच्या विस्तीर्ण प्रांगणाची आणि
मंदिराच्या शिल्प कौशल्याची चाहूल लागते. मंदिर कुठेही ऑइलपेंटने न रंगवता
आणि कॉंक्रिटचा आधार न घेता नीट जपले आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी
शैलीची आहे. मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरू आहे
आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला आहे. मुख्य सभामंडपात खिडकीतून
डोकावल्यास अनेक सुंदर मूर्तींच्या खजिन्याची झलक पाहावयास मिळते. मुख्य
गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतल्यानंतर सभामंडपात जाण्यास आसपास चौकशी
करावी. शक्यतो मंदिराच्या पुजाऱ्याकडे चावी असते. विनंती केल्यास ते कुलूप
उघडून देतात. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष
देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर
असून, अतिशय नाजूक कोरीव काम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका,
विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग,
बाह्य भागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे समोर मांडून ठेवला आहे. या
सर्व शिल्पकलेचा आस्वाद घेतल्यानंतर अकोले गावात चहा-नाश्त्याची सोय होऊ
शकते.
त्यानंतर गंगाधरेश्वर मंदिराचा रस्ता विचारावा. हे खासगी
मालकीचे मंदिर अलीकडच्या काळात, म्हणजे पेशवाईत बांधले गेले आहे. एका अरुंद
रस्त्याने पेठेतल्या एका गल्लीत असे विशाल मंदिर असेल याचा अंदाजही येत
नाही. तिथे मालकांची परवानगी घेऊन हे मंदिर पाहता येते. विशाल वृक्षाच्या
छायेत अतिशय सुबक शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल कोरलेले खांब,
प्राचीन काचेची झुंबरे, प्रशस्त फरसबंदी आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू
नये असे.
या अकोलेच्या मंदिरांसोबत रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर,
ताहाकारीचे जगदंबा मंदिर अशी प्राचीन मंदिरे पाहता येतील. सोबत भंडारदरा
परिसराच्या निसर्गसौंदर्याचीही जोड देता येईल.
अकोल्याचे उत्कृष्ट शिल्पकलेचे 'सिद्धेश्वर मंदिर'
नगर जिल्हा असे नाव उच्चारले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते शिखरसम्राज्ञी 'कळसूबाई' या शिखराचे अत्यंत भौगोलिक वैविध्याने नटलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये डोंगरांच्या कुशीत 'अकोले' नावाचे अत्यंत सुंदर टुमदार गाव वसलेले आहे. या गावाशेजारून अमृतवाहिनी 'प्रवरा नदी' वाहते तसेच 'अगस्ती ऋषींच्या' वास्तव्याने पावन झालेल्या 'अकोले' ह्या गावामध्ये 'सिद्धेश्वर' नावाचे अत्यंत सुंदर कलाकुसरीचे साधारणतः १३ व्या शतकात एक मंदिर उभारले गेले आहे.
'सिद्धेश्वर' मंदिराला भेट द्यायची असल्यास संगमनेर मार्गे 'अकोले' हे गाव गाठावे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या या सुंदर गावी जाण्याचा रस्ता तसेच आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आपले लक्ष वेधून घेतो 'संगमनेर' या गावापासून अवघ्या २५ कि.मी. वर असणाऱ्या या गावी जाणारा रस्ता देखील अत्यंत चांगला आहे. 'अकोले' या गावी जायला शक्यतो स्वतःचे वाहन असलेले कधीही उत्तम तसेच पुण्यामधून 'अकोले' पर्यंत थेट बससेवा उपलब्ध आहे. आपली स्वतःची गाडी थेट 'सिद्धेश्वर' मंदिरापर्यंत जाते.

सिद्धेश्वर मंदिराचा शोध हा इ. स. १७८० साली लागला.
शिल्पकलेचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण असलेल्या ह्या मंदिराचा शोध इ.स. १७८० साली एका शेतकऱ्याला लागला शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ अडकला तेव्हा जिथे नांगराचा फाळ अडकला होता तिथे खोदले असता मंदिराचा भाग दृष्टीस पडला आणि एक जमिनीच्या पोटामध्ये लपलेले मंदिर महाराष्ट्राच्या कलेच्या इतिहासावर आले. जेव्हा या मंदिराला जमिनीमधून बाहेर काढले तेव्हा 'सिद्धेश्वर' मंदिराचे ऐतिहासिक महत्व ओळखून 'अकोले' येथील गावकऱ्यांनी हे मंदिर संपूर्ण स्वच्छ केले. जेव्हा या 'सिद्धेश्वर मंदिर' परीसरामध्ये स्वच्छतेचे काम गावकरी करीत होते तेव्हा मंदिरामध्ये काही कागदपत्रे तसेच नाणी देखील आढळून आली होती.
'अकोले' गावामध्ये असलेले 'सिद्धेश्वर मंदिर' याची रचना ही भूमिज शैलीमध्ये आहे. यादवकाळातील कला आणि स्थापत्य यांचा संगम हा आपल्याला 'सिद्धेश्वर मंदिरामध्ये' आपल्याला पहावयास मिळतो. अकोल्याचा वारसा असणाऱ्या या 'सिद्धेश्वर' मंदिराची आपण रचना पहायला गेल्यास 'सिद्धेश्वर मंदिर' हे पश्चिमाभिमुख असून मंदिरामध्ये मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आपल्याला बघायला मिळतात. मंदिर हे उत्तम स्थितीमध्ये असून आपल्याला दुर्दैवाने या मंदिराचे शिखर पहायला मिळत नाही. परंतु अकोले येथील 'सिद्धेश्वर मंदिर' याचे शिखर हे अकोले येथूनच जवळ असलेल्या रतनवाडीच्या 'अमृतेश्वर' मंदिरासारखे असावे.

'सिद्धेश्वर मंदिर' याला आपल्याला पश्चिम आणि पूर्व अश्या दोन बाजूंनी प्रवेश पहायला मिळतो.
'सिद्धेश्वर मंदिर' याला आपल्याला पश्चिम आणि पूर्व अश्या दोन बाजूंनी प्रवेश पहायला मिळतो परंतु मंदिरात जाण्यासाठी मुख्य प्रवेश हा पश्चिमेकडून आहे. 'सिद्धेश्वर' मंदिराच्या द्वारशाखा या आजही सुस्थितीमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. तसेच 'सिद्धेश्वर'मंदिराच्या व्हरांड्यातील स्तंभाचे तळखडे जर आपण नीट पाहिले तर ते चौरस असून आपल्याला त्याच्यावर एक नृत्यगणेशाची मूर्ती पहायला मिळते. तसेच मंदिराच्या बाजूच्या स्तंभावरील नक्षी आणि सुरूच्या झाडाच्या आकाराची रचना देखील बघण्यासारखी आहे ही रचना पेशवेकाळातील वाटते. या 'सिद्धेश्वर' मंदिरातील गोष्टी नीट पाहिल्यावर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजायला मदत होते कि या मंदिराची डागडुजी प्रत्येक कालखंडात वेळ पडल्यावर केली गेली आहे.
'अकोले' गावामध्ये असलेल्या 'सिद्धेश्वर मंदिर' याचा उंबरठा हा देखील आपल्याला नजरेत येण्यासारखा आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे या मंदिराच्या उंबरठ्याच्या मध्यभागी मंडारकाचे अंकन केलेले असून त्याच्यावर आपल्याला किर्तीमुखांची रंग बघायला मिळते. उंबरठा ओलांडून आपण सभामंडपामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला सभामंडपामध्ये चार मुख्य स्तंभ तसेच भिंतीमध्ये दडलेले सहा अर्धस्तंभ पहायला मिळतात. तसेच दोन स्तंभ बाजूला असलेल्या अर्धमंडपाच्यामध्ये तसेच नंतरच्या काळामध्ये बांधलेले पाच स्तंभ हे मंदिराच्या छताच्या आधारासाठी तयार केलेले आपल्याला पहायला मिळतात. सिद्धेश्वर मंदिराच्या स्तंभांवर आपल्याला गुजरात मधील सोळंकी स्थापत्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो.

'सिद्धेश्वर' मंदिराच्या द्वारशाखेवरील आणि आतील शिल्प.
'सिद्धेश्वर' मंदिराच्या मूळ स्तंभांंची रचना ही चौरस स्तंभपाद किंवा तळखडा याच्यावर आपल्याला पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, ब्रम्हाणी या स्त्रीदेवता आपल्याला त्यांच्या आयुधांच्या सहित पहायला मिळतात. मंदिराचे स्तंभमध्य हे अष्टकोनी असून त्यामध्ये आडव्या शिल्पपट्टांंत देवदेवतांची शिल्पे आपल्याला पहायला मिळतात. मंदिराच्या स्तंभांच्या शीर्षावर आपल्याला भारवाहक यक्ष पहायला मिळतात. तसेच मंदिराच्या सभामंडपामध्ये असलेले अर्धस्तंभ हे कमी कलाकुसरीचे असून त्याच्यावर आपल्याला किर्तीमुख कोरलेली पहायला मिळतात. मंदिराच्या स्तंभशिर्षांवर आपल्याला उलटे नाग देखील कोरलेले पहायला मिळतात.
'सिद्धेश्वर मंदिर' याचे जर आपण वितान पाहिले तर हे करोटक शैलीचे असून वितानाच्या चार तुळयांच्यावर आपल्याला समुद्रमंथन, शेषशायी विष्णू, मिरवणूक, युद्धप्रसंग यांचे शिल्पांकन केलेले आपल्याला पहायला मिळते. मंडपातून आपण जेव्हा गर्भगृहाकडे जातो तेव्हा आपल्याला छोटेसे अंतराळ लागते गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला पत्र, नर, स्तंभ, रत्न, व्याल अश्या पाच द्वार शाखा आपल्याला पहायला मिळतात. या द्वारशाखेच्या तळाशी आपल्याला देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पहायला मिळतात.

सिद्धेश्वर मंदिरातील आतील आणि बाहेरील मूर्ती तसेच देवकोष्ठामधील तांडवनृत्य करणारा शिव.
'सिद्धेश्वर मंदिर' याच्या गर्भगृहातील शिवलिंगाची स्थापना ही खोल भागात केलेली आपल्याला पहायल मिळते. सिद्धेश्वर मंदिराचे गर्भगृहाचे दुसरे प्रवेशद्वार हे पूर्वेकडे असून तेथे आपल्याला नंदीमंडप पहावयास मिळतो. नंदीमंडपाच्या स्तंभावर आपल्याला देवी-देवता, काही पुराणातील प्रसंग तसेच ऋषीमुनी यांची शिल्पे पहायला मिळतात. नंदीमंडपामध्ये आपल्याला स्तंभांच्यावर जे यक्ष पहावयास मिळतात त्या यक्षांची मुखे ही आपल्याला मूषक(उंदीर) आणि नरसिंह यांची आहेत असे पहायला मिळते. सिद्धेश्वर मंदिराला उत्तर आणि दक्षिण बाजूला अर्धमंडप असून ते साधेच आहेत त्याच्यावर आपल्याला कोणतेही कोरीव कामं दिसून येत नाही. अर्धमंडपाच्या बाह्य भागामध्ये असलेल्या देवकोष्ठामध्ये तांडवनृत्य करणारा शिव आणि दुसऱ्या देवकोष्ठात आपल्याला चामुंडा यांची शिल्पे पहायला मिळतात.
तसे पहायला गेले तर यादवकाळामध्ये मंदिरांवर जेवढे शिल्पांकन केलेले आपल्याला पहायला मिळते त्याच्यापेक्षा कमी शिल्पांकन आपल्याला या सिद्धेश्वर मंदिरामध्ये पहायला मिळते. मंदिराची रचना आणि आणि त्याच्यावरील नागशिल्पे आणि इतर शिल्पांच्यामुळे मंदिराचा कालखंड हा यादव काळातील किंवा थोडा यादवांच्या उत्तरार्धात बांधले गेले ठरविण्यास आपल्याला मदत होते.
हेन्री कझिन्स याने काढलेले अकोले येथील 'सिद्धेश्वर' मंदिराचा तलविन्यास आणि स्तंभाची रचना यांचे चित्र.
हेन्री कझिन्स याने लिहिलेल्या 'Mediaeval Temples of The Dakhan' या पुस्तकात पान क्रमांक ५५ वर लिहितो कि या मंदिरामध्ये एक शिलालेख देखील आहे त्याबाबत 'हेन्री कझिन्स' याने केलेले वर्णन पुढीलप्रमाणे:-
Mr Sinclair writing of this temple, said "unfortunately the front
porch has been restored by some pious blockhead in the Sarasanic style
of a handsome modern temple in the village, so that it is not available
for purpose of comparison. More than that the vandal threw away the
ruins of the old porch on one of which was a long Sanskrit inscription
observed but not copied, by Dr. Gibson twenty five years ago. After long
search I found that the fragment, on which it was, had been turned face
up under a nim tree, and used as a seat by the idlers of the village,
who had with their barbarous hinder parts obliterated the inscription
(never very deep or clear cut) beyond all hope of transcription or
estampage, though it is possible that a competent Sanskrit scholar, with
time and the stone before him, might decipher a few words"

सिद्धेश्वर मंदिराचे शिवलिंग आणि मंदिराची रचना तसेच स्तंभांच्यावरील नक्षीकाम.
परंतु 'हेन्री कझिन्स' ज्या शिलालेखाचा उल्लेख करतो त्याबाबत आपल्याला मंदिरावर असलेल्या शिलालेखाची ओळख मिळत नाही. असे हे यादव काळातील सिद्धेश्वर मंदिर हे अकोले गावाचे प्राचीनत्व सांगणारा अत्यंत महत्वाचा वारसा आहे या प्राचीन 'सिद्धेश्वर' मंदिराला भेट देऊन या मंदिर स्थापत्याचा अभ्यास नक्कीच करायला हवा.
______________________________________________________________________________________________
१) Notes on the antiquities of the Talukas of Parner, Sangamner, Ankole, and Kopargaum, forming the charge of the second assistant collector, Ahmadnagar:- W. F. Sinclair, Government Central Press, Bombay, 1877.
२) Gazetteer of The Bombay Presidency Ahmadnagar:- 1884.३) भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ८३ :- २००६- २००७.
४) Mediaeval Temples of the Dakhan:- पान क्रमांक ५३, ५४, ५५, Henry Coussens, Indian Historical Researches, Vol 27, Cosmo Publication, 1987.
५) Temple Architecture & Sculpture of Maharashtra:- G. B. Deglurkar, Registrar, Nagpur University, Nagpur, 1974.
६) भारतीय मुर्तीशास्त्र:- डॉ. नि. पू. जोशी, प्रसाद प्रकाशन, २०१३.
कसे जाल:-
पुणे - पिंपरी - चाकण - राजगुरूनगर - नारायणगाव - आळेफाटा - संगमनेर - अकोले.
पाचव्या शतकातील शिलाहार राजांच्या कारकिर्दीत सिद्धेश्वर हे पुरातन शिव मंदिर प्रवरा नदीकाठावर बांधले गेले असावे. या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे सन 1780 पर्यंत हे मंदिर जमिनीखालीच होते. उत्तर आणि दक्षिणेस लहान मोकळे मंडप आहेत. दोन्ही बाजूंच्या (पूर्व आणि पश्चिम) दरवाज्यांचे कोरीव काम आश्चर्यकारक आहे परंतु नंदीचं स्थान पूर्व मंडपात आहे. महाराष्ट्रात मंदिरात उंटांची शिल्पे फारच क्वचित आढळतात. ते इथे आहे, हे विशेष आहे.
हे सिद्धेश्वर मंदिर मागील शतकापर्यंत प्रवरा नदीच्या जलाशयाच्या खाली पुरले गेले होते. अठराव्या शतकाच्या अखेरीस केलेल्या उत्खननात याचा शोध लागला. त्याची थोडीफार डागडुजी करावी लागली. मुखमंडपापैकी एकाची पुनर्बांधणी केली गेली.
वास्तूशैलीच्या बाबतीत उर्वरित मंदिर अगदी अखंड आहे. इतर दोन मुखमंडप बंद आहेत. हे एक दुर्मिळ मंदिर आहे जेथे मजला शेणाच्या माळाने बनलेला आहे! मंदिराला नदीच्या कडेला एक आणि जागेच्या दिशेने एक प्रवेशद्वार आहे. हे अमृतेश्वर रतनगड मंदिरासारखे आहे जिथे गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दोन्ही बाजूंनी आहे. मंदिराचे तोंड पूर्वेस आहे. खांब सुंदर आणि गुंतागुंतीने सुशोभित केलेले आहेत आणि आधारस्तंभांमध्ये देवी-देवतांचे आकृती आहेत.
उत्तर व दक्षिण दिशेला असलेल्या बाह्य कोनाड्यांमध्ये चामुंडा आणि नटराज यांची परिवर्तित प्रतिमा आहेत.
अगस्ती आश्रमासारख्या प्रवरा नदीच्या तीरावरील ऐतिहासिक आणि पौराणीक वारशांप्रमाणेच हे मंदिर देखील अकोले शहराचा ऐतिहासिक वारसा आहे.
प्रमुख शहरांपासून अंतर -
अकोले - 1 किमी., संगमनेर - 24 किमी., नाशिक - 77 किमी, मुंबई - 200 किमी व पुणे - 163 किमी.
जवळपासची पर्यटक आकर्षणे -
अगस्ती आश्रम, अकोले
गंगाधरेश्वर मंदिर
भंडारदरा धरण
जगदंबा मंदिर, तहकरी
नमोस्तुते !
अकोले गाव प्रवरा नदीकाठी गाव वसलेले आहे या ठिकाणी एकेकाळी अगस्ती मुनींचा आश्रम होता आणि वनवासात असताना राम लक्ष्मण सीता या आश्रमात येउन गेले होते अशी दंतकथा आणि गावकऱ्यांची श्रध्दा आहे. अगस्ती ऋषींचे मंदिर गावात आहे. पण आम्हाला पाहायची होती ती सिध्देश्वर आणि गंगेश्वर मंदिरे . भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने प्रवरा नदीला पाणी होते. एवढ्या उन्हात ते पाणी नुसते पाहूनही नजरेला थंडावा मिळत होता. प्रवरा नदीवरील पुल ओलांडल्यावर डाव्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आहे .
![]() |
| Siddheshwar Temple , Akole |
![]() |
| Mukhya Mandap, Siddheshwar Temple, Akole |
![]() |
| Kirti Mukh |
![]() |
| Gangadhareshwar Mandir, Akole |
https://samantfort.blogspot.com/2018/04/blog-post.html

















































































No comments:
Post a Comment