Thursday, December 31, 2020

खिद्रापूर

 

कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात. आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.

खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण कोपेश्वर देवालय आहे. खिद्रापूरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. सांगली - खिद्रापूर या मार्गे यावे. सुमारे ३ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या खिद्रापूरचे ' कोपेश्वर ' हे ग्रामदैवत आहे.

 चि १

_MG_5147

प्रचि २

_MG_5149

प्रचि ३

Khidrapur

प्रचि ४

_MG_5163

प्रचि ५

_MG_5154

प्रचि ६

_MG_5171

प्रचि ७

_MG_5263

प्रचि ८

_MG_5244

प्रचि ९

_MG_5231

प्रचि १०

_MG_5257

प्रचि ११

_MG_5219

प्रचि १२

_MG_5229

प्रचि १३

_MG_5223

प्रचि १४

_MG_5222

प्रचि १५

_MG_5261

प्रचि १६

_MG_5226

प्रचि १७

_MG_5249

प्रचि १८

_MG_5212

प्रचि १९

_MG_5207

प्रचि २०

_MG_5213

प्रचि २१

_MG_5217

प्रचि २२

_MG_5176

प्रचि २३

_MG_5179

प्रचि २४

_MG_5159

प्रचि २५

_MG_5210

तळटीप : वॉट

आख्यायिका

येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले.[३] त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.संदर्भ हवा ]

इतिहास

साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी.[४] पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे.[५] येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.

मंदिराचे सौंदर्य

देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.[३]

मंदिराची रचना

मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्या[३] ला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.

स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.

सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.

शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना

केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.

कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत.[६] गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात.[७]

संरक्षित स्मारक

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.[८]

हे सुद्धा पहा

सुरसुंदरी

चित्रदालन

संदर्भ आणि नों

 

 


कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला, तर मग मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयीची काही रंजक तथ्ये जाणून घेऊया...

know about amazing top 5 facts of kopeshwar temple at kolhapur

वाचाः कोल्हापुरातील १०८ खांबी कोपेश्वर मंदिराची 'टॉप ५' रहस्ये

भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे, तितकीच लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड-किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र, काही वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना म्हणावा अशाच आहेत. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला, तर मग मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयीची काही रंजक तथ्ये जाणून घेऊया...

​अद्भूत स्थापत्यशास्त्र आणि भव्यता

कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच हजार वर्षांनंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते.

​कोपेश्वर मंदिराचा इतिहास

कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या मंदिराची निर्मिती 'शिलाहार' राजवटीत १२ व्या शतकात झाली असावी. ११०९ ते ११७८ या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे, असे दर्शवण्यात आल्याचे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

​१०८ खांबांचे वैशिष्ट्य

कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप स्वर्ग मंडप ४८ खाबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च अविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.

​नंदीचे स्वतंत्र मंदिर!

येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

​'कट्यार काळजात घुसली'मधील शिव भोला भंडारी

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील हे गाव. नरसोबावाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर. या गावी कोपेश्वर मंदिर आहे. बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारे शिलाहार शिल्प-स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर. इ.स. 1109-1178 दरम्यान गांधारादित्य, विक्रमादित्य व भोज-2 या शिलाहार राजांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधण्यात आले. कोप्पम या गावचा देव तो कोप्पेश्वर, असे म्हणता येईल. पण येथे 'कोप्पेश्वर' या नावामागे रंजक पौराणिक कथा आहे.

शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान.

दुसरे एक वैशिष्ट्य असे की, येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. सतीसंगे तो तिच्या माहेरी गेला होता. तो परतलाच नाही. हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

कोप्पमचे खिद्रापूर कसे झाले, याची एक आख्यायिका आहे.
आपण कोप्पेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तो मंडप स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या मंडपाला छत नाही. अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा. या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. एका मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने स्वर्गमंडपाचे गोल छत उभे केले आहे. अशी दुसरी स्थापत्यरचना माझ्या ऐकण्यात नाही. या मंडपातील दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहात राहावे असे आहे. खांबांवरील कामात सुबकता आहेच, पण एका साच्यातून काढावेत इतकी एकसंधता या कामात आहे. अष्टदिक्पालांची दंपती मंडपात कोरून काढलेली आहे. छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे.

म्हणतात, स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. या मंडपाला यज्ञमंडप असेही म्हणतात. होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी छत गोलाकार मोकळे सोडले असावे, असे सांगितले जाते. पण यज्ञयागाच्या अन्य कोणत्याही खुणा येथे दिसल्या नाहीत. या मंडपात रंगशिळा आहे, म्हणून एक वेगळा विचार मनात येतो. पूर्वी गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन, नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर झाला, असे म्हणतात.

मंदिराचे अवयव कसे असावेत, हे अग्निपुराणात सांगितले आहे. मनुष्यदेहाशी मंदिराचे साम्य दाखवण्यात आले आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस. गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. गर्भाशयात काळोख असतो म्हणून गर्भगृहही फार प्रकाशमान असणार नाही, याची काळजी घेतली जाते. गर्भाशयात गर्भ तशी गर्भगृहात मूर्ती. गर्भात आत्मा, तसा गाभाऱ्यातील मूर्तीत सृष्टीचा आत्मा. असे काही. कोपेश्वराच्या मंदिराचा गाभाराही अंधाराच आहे. मंद तेवत्या समईंच्या प्रकाशात कोपेश्वर व धोपेश्वर दिसतात. दक्षिणाभिमुखी आडवे विभूती लेपन केलेला कोपेश्वर आणि त्याच्यापुढे समजूत घालायला आलेला उभा गंध लावलेला धोपेश्वर. डोळे अंधाराला सरावले की भिंतीवर कोरलेल्या शिवलीलामृतातील कथाही दिसतील.

मंदिराच्या प्रत्येक भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. खिद्रापूरच्या मंदिराला मुखमंडप नाही. त्याऐवजी मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला स्वर्गमंडप आहे. त्यानंतर सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे.

आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो. पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. सभामंडपात मधोमध असणार्‍या चार खांबांमध्ये जमिनीवर रंगशिला आहे. येथेही रंगभोग म्हणजे देवाची कलेच्या माध्यमातून सेवाउपासना केली जाते. येथे भक्तगण उपासनेला, कीर्तन-प्रवचन ऐकायला बसलेले असतात. त्यांना सहज आतबाहेर करता यावे यासाठी या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. एक व्यालशिल्प आवारात पडलेले दिसले. पण यापेक्षा मंदिरातील शिल्प अधिक सुबक आहे. सर्वच व्याल मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे व्याल कोरलेला असतो. हा काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला होता, असे लक्षात येते. सभामंडपाच्या मधे बारा स्तंभ आहेत. त्यांच्याभोवती वीस स्तंभ आहेत. या स्तंभांच्यापलीकडे मंडपाची भिंत आहे. मंडपाला प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. तसेच हवा खेळती राहावी यासाठी जालवातायनेही आहेत.

या मंडपातून अंतराळकक्षात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. अंतराळकक्षातही सुरेख कोरीव स्तंभ आहेत. इथल्या प्रत्येक खांबावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आढळतात. पंचतंत्रामधील माकड आणि मगरीची कथा, दोन पक्ष्यांनी काठीच्या आधारे कासवाला वाचवण्याची केलेली धडपड या कथा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहात जाताना उंबरठ्यापाशी सुंदर रांगोळीसारखी सुघड नक्षी कोरलेली दिसते. कोप्पेश्वर मंदिर ही अंतर्बाह्य सुंदर, सुघड कलाकृती आहे. हे मंदिर जेवढे आतून सुंदर आहे, तेवढेच बाहेरूनही. कितीही वेळ निरखावे, डोळे निवत नाहीत.

मंदिराच्या दक्षिण-उत्तर अंगाला ऋषभ जोडलेले रथ आहेत. रथात दंपती. शिव-पार्वती वाटत नाहीत, पण तीच अपेक्षित असतील का? विवाहानंतरची नवथरता चेहऱ्यावर दिसते. दक्षाघरी यज्ञाला जाण्याआधीची शिव-पार्वती असतील का ही? मंदिराच्या मागे भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत. या शिल्पाच्या एका बाजूला ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णूही आहेत. मंदिराच्या समोर नंदी नसला तरी, भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.

एक स्मरण..
कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात.

गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जुळणी आहे. येथील गजथरातील पंच्याण्णव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. मंडोवरावरील विष्णू अवतार, गणपती, चामुंडा, दुर्गा यांची शिल्पेही सुंदर आहेत. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर अनेक अन्य शिल्पेही लक्ष वेधून घेतात. बाळाला खेळवणारी माता, विविध केशरचना करणाऱ्या ललना मला पाहता आल्या. सगळ्याच शिल्पांची रेखणी आखीव आहे. शिल्पांमध्ये आखीव ऱेखणी करणे अवघड असते, पण येथे ते सुघड झाले आहे. ही शिल्पे पाहायला वेळ कमी पडतो. ज्येष्ठ चित्रकार मित्रवर्य चंद्रमोहन कुलकर्णी यांचा फोन आलाच, शिल्पपट्टीतील गुजराती-राजस्थानी भारतीय व्यापारी, अरब व्यापारी, माल वाहून नेणारे हबशी यांची शिल्पे पाहिलीस का रे? नाही, अजून खूप पाहायचे राहिले आहे. पुढच्यावेळी एक छोटी दुर्बीणही सोबत नेईन, जरा नजरेच्या वरच्या पट्ट्यातील शिल्पे निरखायला.

म्हणतात, औरंगजेबाच्या कन्येने कोप्पेश्वराचे मंदिर पाहिले आणि ती येथील शिल्पांच्या प्रेमात पडली. ती येथेच राहिली. अनेक प्रकारे तिच्या मिनतवाऱ्या करण्यात आल्या, पण ती खिद्रापूर सोडेना. अखेर, या मंदिराला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही, असे औरंगजेबाने वचन दिल्यावर ती माघारी परतली. या मंदिराच्या रक्षणासाठी खैदरखान याची नेमणूक करण्यात आली.

म्हणतात, खैदरखानलाही हे मंदिर, हा परिसर खूप आवडला. त्याने आपल्या नावावरून कोप्पमचे खिद्रापूर केले. म्हणतात, खैदरखानने या मंदिराच्या बाह्यभागावरच्या शिल्पांची नासधूस केली. अनेक कहाण्या या मंदिराच्या प्राकारात विखरून पडल्या आहेत ध्वस्त शिल्पासारख्याच. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराच्या खर्चासाठी दान दिले होते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्याबाहेरच्या शिलालेखात तसा उल्लेख आहे. जे उरले आहे तेही विलक्षण आहे.

कोप्पेश्वर मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात. शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले दिसते, तेच कीर्तीमुख. येथील या शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख नावाचा असूर शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली. महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेव म्हणाले, स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवालयाच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली.

या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्‍या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असेही अनेकजण मानतात. या सुरसुंदरी मंदिराच्या भिंतीवर आवर्जून कोरण्यात येतात. आपल्याला शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध या विषयांनी ग्रासलेले असते. या विषयांत मन न गुंतवता, मंदिरात जातांना सावध चित्त असावे, असे  या सुरसुंदरी सुचवतात. तसेच, यातील काही जणी देवदर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे, देवदर्शनाला कसे जायचे असते याचेही मार्गदर्शन करतात. रिक्त हस्ते देवाला जाऊ नये. पाने, फळे, फुले असे काहीच जवळ नसेल तर मनोभावे केवळ जलही अर्पण केले तरी चालते. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी, भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.

प्राचीन काळापासून लोकश्रद्धेत स्थान मिळवून बसलेल्या यक्ष-यक्षींची योजना भारतीय शिल्पकारांनी वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते. मंदिरशिल्पात यक्ष-यक्षीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पौराणिक कथांमधून यक्ष-यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी दिलेली दिसते. यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. या मंदिरावरही ती दिसेल. एका यक्षाला भक्तांकडून हळद-कुंकू वाहिलेलेही दिसते.

दक्षिण भारतात नाग अनंताची पूजा मंदिराच्या प्राकारात केलेली आढळते. या मंदिराच्या प्राकारातही बाहेर एका वृक्षातळी भंगलेले शिल्प आढळते. नाग हे काळाचे प्रतीक आहे. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो, वेगाने पुढे सरकणाऱ्या काळासारखा. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाला अंत नाही म्हणून तो अनंत. म्हणूनच नागालाही अनंत म्हणतात. हा नागपुरूष सर्वांवर कृपाक्ष ठेवून असतो. तोच विष्णूसाठी शय्या होतो आणि शिवाच्या गळ्यात डोलतो.

काळ वेगाने सरकतो आहे. ऊन-वारा-पावसाच्या माऱ्यातही ही शिल्पे आपल्याला आनंद देण्यासाठी उभी आहेत. आक्रमकांचे हातोडे झेलूनही ती उभी आहेत. कोण होता हा आक्रमक? खैदरखानचे नाव घेतले जाते, पण त्याच्याविषयीच्या अन्य कहाण्या ऐकल्यावर त्याचे हे कृत्य असेल हे तेवढेसे पटत नाही. म्हणतात, स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाने वाटेतील मंदिरे ध्वस्त केली, त्यात खिद्रापूरचे हे शिवालयही होते. विजापूरकडून वाईकडे येण्याच्या वाटेत खिद्रापूर आहे. त्यामुळे मला तरी हेच पटते.

जाल कसे?
सांगली किंवा कोल्हापूर या दोन्हीकडून नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे जायचे. तेथून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर. नरसोबाच्या वाडीपासून 25 किलोमीटरवर.

 कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव ‘खिद्रापूर’ होय. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे आहे. सर्व प्रदेश हिरवागार करणाऱ्या ह्या संगमानंतर पूर्वेकडे येणारी हे जीवनदायी नदी गावास वळसा घालून परत पश्चिमेकडे फिरते. खिद्रापूर म्हणजे आहे, महाराष्ट्र-कर्नाटक प्रदेशांची सीमारेषा.

शिरोळ हा तसा वैशिष्टयपूर्ण तालुका. जीवनाला सर्व दिशांनी स्पर्श करणारा असा हा प्रदेश. त्यात नरसोबावाडीचे दत्त मंदिर, शाहु महाराजांनी वसविलेले व्यापारी केंद्र जयसिंगपूर, ‘कुरुदंवाडकर’ सरकारचे राजवाडे, शिरोळचा साखर कारखाना, घरातील एक तरी व्यक्ती भारतीय सेनेत असलेली… ‘सैनिक टाकळी’ हे खिद्रापूरचं वैशिष्टयं. आवर्जून उल्लेख करण्यासारख्या आणखी दोन गोष्टी म्हणजे, खिद्रापूरचे ‘कोपेश्वर मंदिर’ आणि ‘जैन मंदिर’ होय. या मंदिरांच्या सौदंर्यानं व शिल्पकलेनं भल्याभल्या वास्तुविशारदांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत.

खिद्रापूरचा प्रवास
३०६ हेक्टर जमीन असलेले, खिद्रापूर हे गाव ३००० लोकवस्तीचे छोटेसे गाव. हे गाव देवळांच्या सेवकांना इनाम म्हणून दिलेले. यामध्ये वाजंत्री, गुरव आदी आले. एक धर्मनिरपेक्ष गाव म्हणून तालुक्यात प्रसिध्द.

उत्सव
विशालतीर्थ यात्रा भरते यावेळी हजारो भाविक कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून दर्शन घेऊन जातात. गावातील सर्व पंथाचे लोक ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवितात व आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवणी करतात.

कुरुंदवाड मार्गे खिद्रापुराला जाता येतं. दुतर्फा हिरवीगार ऊस शेती, केळीच्या बागा, मध्येच लागणारी नारळाची झाडे, आणि पुष्कळ झुळझुळ पाणी. संपूर्ण प्रवासभर आनंदच आनंद जाणवत राहतो.

खिद्रापूर मंदिराविषयी
बस स्थानकावर उतरल्यावर पूर्वेस भव्य कृष्णेचे पात्र आणि पश्चिमेस एक अद्वितीय मंदिर दिसल्यावर नजरेचं पारणं फिटतं. मंदिराचं आवार सुरू झाल्यावर एक फलक आहे. त्यात आपल्याला वाचायला मिळते की हे प्राचीन मंदिर केंद्र शासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले आहे.

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. इ.स. १००० ते १३५० हा यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंङ यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. हे एक विद्वान वास्तूविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे आपल्याला जंगलात किंवा पठारावर कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करुन, इतर कुठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करुन मंदिर बांधण्याची कला या वास्तु-विशारदाने प्रचलीत केली. खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे.

मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.

स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमूना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. मध्यवर्ती स्वर्गमंडपालाच यज्ञमंडप असेही नाव आहे. एका मोठया, अखंड शिलेवर अट्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जातं. या स्वर्गमंडपाचे उघडे छत हे होम-हवनाच्या समिधांचे धूर जाण्यासाठी ठेवले आहे. आणि छिद्रांमुळेच या गावाचे नाव छिद्रापूर… ते खिद्रापूर असे पडले.

स्वर्गमंडपाच्या नंतर येतो तो सभामंडप. सभामंडप हा सुध्दा दगडी खांबांवर उभा आहे. वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे. या दालनाला सहा खिडक्या, तीन दरवाजे आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी गोलाकार शिळा आहे. त्यावर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. या मंडपाच्या खांबावर रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवर सुंदर दगडी कोरीव काम आहे. पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे दालन खरोखरच अप्रतिम आहे.

या नंतरचा मुख्य भाग म्हणजे, गर्भगृह. जय-विजय या दोन द्वारपालांनी गर्भगृहाचा दर्शनी भाग सजला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक राहीला आहे. मोठया दरवाजाच्या पायथ्याशी कासव व बाजूला भितीवर यक्ष यक्षिणीचे दर्शन होत आपली नजर खिळते ते दक्षिणाभिमुख असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर. हे शिवलिंग किंचिंत तांबूस रंगाचे असून शाळुंखा रंगाने काळी कुळकुळीत आहे. गाभाऱ्यात भरपूर गारवा जाणवतो. गर्भमंडपाच्या दालनात तीन लहान कमानी आहेत, परंतु तेथील सिंहासनांवर मूर्ती मात्र नाहीत.

शिवलिंग व कोपेश्वराचे दर्शन घेऊन ज्यावेळी सभामंडपात येतो त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. प्राचीन भाषेतील हा शिलालेख अनाकलनीय आहे. वाटाडयांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव सम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आणि मंदिराच्या खर्चासाठी ‘कुडलदामवाड’ नावाचे दान दिल्याचा या शिलालेखात उल्लेख असल्याचे सांगितलं जातं. बाहेरुन मंदिराचे निरीक्षण करताना वेरुळच्या लेण्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिर एकशे आठ गजपीठांवर विराजमान आहे. हत्तींच्या वरच्या रांगेमध्ये कोरलेल्या देव, यक्ष, यक्षिणी यांची रूपे फार मोहक आहेत. पण खालील हत्तीची ओळ अखंड अशी मिळत नाही. या तळातील गजरुपानंतर साधारणपणे ८ ते ९ फुटावर अनेक नर्तकी, नर्तक, वादक आणि शस्त्रधारी शिल्पांची मुक्त उधळण शिल्पकाराने येथे केली आहे. त्यावेळच्या बांधकामांची रचना, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा व या परिसरातील तत्कालीन राजांचा वैभवशाली कालखंड, त्याचं कलाप्रेम खिद्रापूरमुळे मनात अधोरेखित केलं जातं.

जैन मंदिर
हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूरपेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे तशी आज जतन होत नाही, याचेच फार दु:ख वाटते.

१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही.
२. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे.
३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही.
४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.

समारोप
कितीही प्रसिध्दीच्या अंधारात असले तरी बरेच शिल्प-प्रेमी, देशी व परदेशी पर्यटक उन्हाळयात या जागेस भेट देतात. अनेक शाळांच्या सहली येथे येतात. कला शाळांच्या कार्यशाळा, वर्षातून एखादा तरी साप्ताहिक शिक्षण वर्ग येथे भरतो. येथील शिल्प सौदर्याने अनेक पर्यटक मोहीत होतात. आपलं एक सांस्कृतिक शक्तिपीठ व धर्मपीठ असलेलं हे अतिशय सुंदर स्मारक जतन कसं होणार हाच भेडसावणारा प्रश्न आहे.

 

‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती कानासोबत नजरेलासुद्धा होते असे एक सुंदर स्थळ आहे. कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चहुबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि त्यावर उसाचे मळे. उन्हाळ्यात देखील सुखावणारी हिरवळ. हे ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले खिद्रापूर गाव. कोल्हापूरहून इचलकरंजी माग्रे अथवा सांगलीहून नरसोबाची वाडी- कुरुंदवाड माग्रे खिद्रापूर गाठता येते.
इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्टय़ असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. महादेवाच्या आधी नंदीचे दर्शन येथे नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे.
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत याच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. या मंदिराचं खरे सौंदर्य दडलंय त्याच्या रचनेत. छोटय़ाशा दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो आणि समोर उलगडत जातो कित्येक शतकांचा इतिहास. समोर दिसतो ४८ खांबांवर तोललेला एक मंडप. आत जाऊन बघितल्यावर लक्षात येते कीत्याला तर छतच नाही. पण नीट लक्षपूर्वक बघितले की कळते संपूर्ण वर्तुळाकार रिकामी जागा मुद्दाम ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.
पुढे सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.
केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. अन्य शिलालेखांप्रमाणे हासुद्धा पुरातत्त्व खात्याच्या ‘विशेष मर्जीतला’ असल्याने त्यालाही उन्हा-पावसाचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतोय.

 

डॉ. आरती आढे-रोजेकर
 
 

 

 

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...