मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी
जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणार्या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पुर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचिन रस्ता म्हणजे चौल या प्राचिन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पुर्वेस वळतो. याच प्राचिन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचीतगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्त्या कुंडलीका खाडीच्या पुर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पुर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत. यशवंत खार हून एक वळण घेतल्यावर खर्या अर्थी कुंडलीका नदी संपून खाडीस सुरुवात होते, डोंगर दर्यामधून प्रवास करताना अधुन मधुन या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत मात्र मुळ रस्ता रामराहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.
रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदीरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा असून कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत, प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत त्याच परिसरात हे संग्राम झालेले असायचे त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी ही विरगळी वेगळी व अद्भुत आहे. ही विरगळी तीन स्वरुपांत पहायला मिळत असली तरी मुळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकुण तिन झाल्या असाव्यात असा अंदाज येतो. या विरगळींची कालनिश्चीती करणे कठीण आहे कारण येथे को़णताही लेख नसल्याने किंवा प्राचिन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहार कालीन आहेत की यादव कालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तिन प्रसंग कोरले असून पहील्या भुमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसर्या तथा तिसर्यामध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठा दोरखंडास धरुन हे सैनिक चाल करीत आहेत असे प्रथमदर्शनी पाहील्यावर वाटते मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झिज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही. दुसर्या विरगळीचेही तिन भाग असून या तिनही भागात एकून सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते, तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही या सर्वाचा सांकेतीक अर्थ काय ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल.
हुकलेले होकायंत्र व देवाचे गोठणे
पेशव्यांचे गुरु श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते. राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मेंद्रस्वामींनी या गावात असलेल्या श्रीगोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात एक आगळीवेगळी परशुरामाची मूर्ती स्थापन केली.
अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. डाव्या हाताच्या घडीत परशु खोचलेला दिसतो. परशुरामाची अशी मूर्ती अन्यत्र कुठे दिसत नाही. मंदिराचे पुजारी म्हणून पेशव्यांनी गणेश केशव आपटे यांना सनद देऊन त्यांची नेमणूक केली. धावडशी संस्थानामार्फत एक कमिटी नेमली असून देवालयाची व्यवस्था पाहिली जाते. राजापूर तालुक्यात दोन गोठणे नावाची गावे आहेत. एक आहे ‘दोनिवडे गोठणे’ आणि दुसरे हे, जिथे देवाची मंदिरे आहेत ते ‘देवाचे गोठणे !’ देवळाचा प्राकार फरसबंदी असून बकुळीच्या फुलांचा सडा इथे पडलेला असतो. मंदिराच्या भिंतीवर गंडभेरुंड या काल्पनिक पक्षाचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. इथल्या दीपमाळेचा आकार अगदी वेगळा असून मंदिराच्या दारातच पोर्तुगीज घंटा टांगलेली पाहायला मिळते.
समस्त आपटे मंडळींचे हे मूळ गाव असल्याचे समजते. मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे...............इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते. हे इथले अजून एक निसर्गनवल होय.
कोकणात मुख्यत्वे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कातळखोद शिल्पे आढळू लागली आहेत. डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत प्रधान यांनी या कातळखोदचित्रांचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्याचा उद्देश आणि कालावधी शोधण्यात मोलाचे कार्य केलेले आहे. तसेच विविध व्यक्तींचे या शोधकार्यत योगदान लाभलेले आहे. गेल्या काही दिवसात श्री सुधीर रिसबूड (भाई रिसबुड) आणि श्री धनंजय मनोज मराठे यांनी अजून काही नवीन ठिकाणे उजेडात आणली. स्थानिकांच्या सहभागातून हा ठेवा जतन करण्याचे आणि सरकार दरबारी प्रयत्न करून या बहुमोल ठेव्याचे संवर्धन करण्याचे मोठे काम हाती घेतले आहे.
असेच एक आश्चर्यकारक कातळ शिल्प देवाचे गोठणे गावच्या सड्यावर आहे. इथे एका झोपलेल्या माणसाची आकृती कोरलेली असून त्याच्या पोटावर जर होकायंत्र नेले तर त्याची सुई चक्क गंडते. ती वाट्टेल ती उत्तरदिशा दाखवू लागते. या दगडात चुंबकीय क्षेत्र प्रबळ असल्यामुळे होकायंत्राच्या सुईचे हे असे डिफ्लेशन होते असे तज्ञ सांगतात. एका विशिष्ट ठिकाणीच ह्या सुईचे डिफ्लेशन होते. जरा दुसरीकडे होकायंत्र नेले तर ते योग्य दिशा दाखवते. कोकणप्रांत हा खरोखर निसर्ग नवलांनी पुरेपूर भरलेला आहे. देवाचे गोठणे गावचे हे प्रकरण त्याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. !!!
राजापूर-सोलगाव मार्गे इथले अंतर २५ कि.मी. आहे. वर्षाचे बाराही महिने हिरवेगार असलेले निसर्गरम्य असे हे गाव आणि इथले मंदिर मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे.
- आशुतोष बापट
अर्थात या सर्व विरगळी प्राचिन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधीत्व करतात, चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मीती येथे करण्यात आली असवी. हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पुर्वीपासून समुद्रमार्गे येथे परकियांचे हल्ले होत असत व या भुभागाचे रक्षण करण्याकरीता येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत तेव्हा असेच एखादे परकिय आक्रमण थोपावताना हे अज्ञात विर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचिन काळातील लिखीत पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात विरांची नावे मिळणे दुरापास्तच असते मात्र त्यांनी या भुमीकरीता वेळोवेळी दिलेल्या बलीदानामुळेच आपण वेळोवेळी स्वातंत्र्य उपभोगित आलो हे विसरता कामा नये. मेढामार्गे चौल या रस्त्यावरील या विरगळी त्या सर्व अज्ञात विरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फुर्ती देतात. अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा रायगड जिल्ह्यात जागोजागी आहे व या फक्त शिळा नसून त्याकाळातला इतिहास आहे जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करुन कोश तयार केल्यास प्राचिन रायगड जिल्हाचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते तेव्हा या विरांच्या स्मरणार्थ का होईना या आडवाटेवरुन एकदातरी प्रवास करावाच.
प्राचीन जलव्यवस्थापन - सप्तेश्वर
कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काहीतरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं, आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं.
सप्तेश्वरबद्दल पण असंच झालं. कसबा संगमेश्वर परिसरात अनेकदा फिरणं झालेलं पण त्याच्याच समोरच्या डोंगरावर हे सुंदर ठिकाण दडलेलं माहिती नव्हतं.
मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्रीनदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगली डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढ्यावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर. डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे.
जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्या समोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे. आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहात विभागून ते परत मोठ्या कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे. पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेल मधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’ सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळे बांधकाम देखणेसुद्धा केलेले आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशु कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे केलेले आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागातून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठ्या कुंडात पडतात. कुंड तरी किती मोठे.. ३० फुट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते. आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढ्याला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.
सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग, आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा. इथून खरोखरच पाय निघत नाही.
- आशुतोष बापट
आवळसचा सोनगिरी
“सोनगिरी”, कर्जत जवळचा मुंबई-पुणे लोहमार्गावरील छोटासा(फक्त म्हणण्यापुरता) किल्ला. सोनगिरीला जायच्या अनेक वाटा आहेत. त्यापैकी एक वाट लोहमार्गाच्या बाजूने जाते तर दुसरी वाट पायथ्याच्या नेवळीगावातून जाते. दोन्ही वाटांवरून जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबई-खोपोली मार्गावरील पळसदरी गाठावे. पळसदरी स्थानकात उतरल्यावर समोरच सोनगिरी उभा ठाकलेला दिसतो.
नोव्हेंबर मधील राजमाचीच्या मोहिमेनंतर पुढचे दोन महिने इकडे जाऊ तिकडे जाऊ म्हणत गेले. चाचणी परीक्षा झाली होती आणि सत्र परीक्षेला खूप वेळ असल्याने सह्याद्रीत भटकण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. वेगवेगळी ठिकाणे google search करून मागील वेळेस अर्धवट राहिलेल्या कर्जत जवळच्या सोनगिरीवर जाण्याचे निश्चित झाले. नेहमीच्या सदस्यांना फोनाफोनी केली. काही जण busy असल्याने व काहींनी मागील वेळेचा धसका घेतल्याने शेवटी कमलेश, मी आणि दिपक सोनगिरीसाठी सज्ज झालो.
१९ फेब्रुवारीला सकाळी छ.शि.ट.हून १ली खोपोली लोकल पकडून रवाना झालो. दिपक कर्जतला हीच लोकल पकडणार होता. पण त्याची लातूर एक्स्प्रेस चुकल्यामुळे आम्हीच कर्जतला उतरलो. दीपकला लोणावळ्याहून यायला खूप वेळ होता म्हणून आम्ही स्थानकातून बाहेर पडलो आणि दगडू वडेवालेंकडे गेलो पण इतक्या सकाळी त्यांचे दुकान उघडले नसल्याने दुसरीकडे न्याहारी उरकली. थोडा वेळ रेल्वे स्थानक भटकून timepassकेला. अखेर ८.०० वाजता सिंहगड एक्सप्रेसने दीपकराव कर्जतला हजर झाले. बाजूलाच उभी असलेली खोपोली लोकल पकडली. थोड्याच वेळात पळसदरीला उतरलो. समोरच सोनगिरी आपले पंख पसरून उभा होता.
“सोनगिरी”, कर्जत जवळचा मुंबई-पुणे लोहमार्गावरील छोटासा(फक्त म्हणण्यापुरता) किल्ला. सोनगिरीला जायच्या अनेक वाटा आहेत. त्यापैकी एक वाट लोहमार्गाच्या बाजूने जाते तर दुसरी वाट पायथ्याच्या नेवळीगावातून जाते. दोन्ही वाटांवरून जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबई-खोपोली मार्गावरील पळसदरी गाठावे. पळसदरी स्थानकात उतरल्यावर समोरच सोनगिरी उभा ठाकलेला दिसतो.
पळसदरीला
उतरून लोहमार्गाजवळची वाट न पकडता आम्ही सरळ नेवाळी गावची वाट पकडली. कारण
मागील वेळेस लोहमार्गाजवळच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला असता अनेक
छोट्या फसव्या वाटांमुळे वाट चुकून समोर गड दिसूनसुद्धा अर्ध्यावरून परतावे
लागले होते. तो trek ऐवजी आमचा track track खेळ झाला होता. म्हणून यावेळी
नेवाळी गावातून जायचा निर्णय घेतला. नेवळी गावाकडे जाताना वाटेत आवळस गाव
लागते. याच गावामुळे सोनगीरीला आवळसचा किल्ला असेही म्हणतात. गावात
शिवजयंती(तारखेप्रमाणे) निमित्त ध्वनिक्षेपकावर मस्त गाणी लावली होती.
गावात नेवळीची वाट विचारून मार्गस्थ झालो. थोड्याच वेळात डांबरी सडकेवरून
नेवाळी गावात पोहोचलो. सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि उल्हास नदीच्या काठावर
वसलेले नेवाळी गाव एक छोटंसं गाव आहे. गावात थेट गाडी रस्ता पोहोचला आहे.
गावातील लोक मुंबई, खोपोली, कर्जतकडे शिक्षण, नोकरी निमित्त जात असल्याने
त्याचा थोडा प्रभाव गावावर आहे.
आम्ही गडावर जायला आलेले पाहून “काय ठेवलंय त्या वरच्या सुकलेल्या रानात, कशाला जातायत काय माहित” असा एका काकींचा टोमणा ऐकू आला. अर्थात त्याचे वाईट न वाटता हसत हसत आम्ही पुढे गेलो. एका काकांना वर जायचा रस्ता विचारला नि गावातील घरांच्या मागून डोंगरवाटेला लागलो. सकाळी ९.०० वाजता आमची डोंगरयात्रा सुरुवात झाली. दमट हवामान जाणवू लागले होते. साधारण १० मिनिटांमध्ये थोड्या उंचीवर जाऊन पोहोचलो. तिथून पश्चिमेला पळसदरी धरण, स्थानक तिथून जाणाऱ्या आगगाड्या तर पूर्वेला सह्याद्री रांग, उल्हास नदी व तिच्या काठावर वसलेली छोटी गावे, ढाकचा किल्ला व त्याचा कळकराय सुळका असे नयनरम्य दृश दिसत होते.
नंतर थोडा वेळ खड्या चढाईमुळे व गरमीने घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यामुळे सावलीत बसून थोडा फलाहार केला व त्याच फळांच्या फायद्यांवर चर्चा ... यावेळी चुकू नये म्हणून पुढची योग्य दिशा ठरवली आणि पुन्हा मार्गस्थ झालो. पुढचा मार्ग डोंगराच्या सावलीतून जात होता. त्यामुळे प्रवास सुखाचा चालू होता. डोंगर उतारावर उतरत पुन्हा वर चढत मोठ्या वृक्षांच्या छायेतून सुकलेल्या धबधब्यातून, डोंगराच्या कडेने चालत अखेर एका सुकलेल्या धबधब्याच्या वाटेसमोर येऊन उभे राहिलो. आता सोनगिरी जवळ आला असे वाटू लागले होते. पण खरा प्रश्न होता तो पुढील मार्गक्रमणाचा... धबधब्याच्या वाटेवर छोटे-मोठे दगड पडले होते आणि गच्च रान माजले होते. शेवटी पाण्याचे दोन-चार घोट घेतले आणि याच वाटेने पुढे जायचे ठरवले. कारण आता मागे फिरून पुन्हा वाट शोधणे वेळ खाऊपणाचे होते.
सकाळचे १०.३० वाजले होते. ऊन जाणवू लागलं होतं. धबधब्याच्या वाटेवरून निघालो. जागोजागी पडलेल्या छोट्या-मोठ्या दगडांवरून वाट काढत, रानफुलं पाहत सोनगिरी जवळ करत होतो. झाडांच्या गर्दीमुळे ऊन लागत नव्हते. पण दमट हवामानामुळे आणि वाऱ्याचा काहीच पत्ता नसल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. काटेरी झाडांमधून वाट काढत अंतर कापत होतो. काही वेळानंतर समोर झाडांची दाटी वाढल्यामुळे काहीच दिसत नव्हते. उजव्या बाजूला डोंगराचा कडा आणि डाव्या बाजूला डोंगराची आडवी धार दिसत होती. धारेकडचा मार्ग सोपा वाटला म्हणून त्या बाजूला वळलो. बाभळीच्या काट्याची टोचण सहन करत, सोपे climbing करत सोंडेवर आलो. बाजूलाच असलेल्या वाटेने पुढे गेलो पण ही वाट पुन्हा धबधब्याच्या वाटेतच उतरत होती. त्यामुळे माघारी फिरलो आणि पठारावर आलो. खूप वेळानंतर सोनगिरीचा माथा दिसू लागला होता.
थोडे पुढे जाऊन खाली उतरलो नि समोर असलेल्या छोट्या टेकाडावर गेलो. तेथे आडव्या (न)असलेल्या पायवाटेवर चालू लागलो. सुकलेली पाने, गवत आणि भुसभुशीत मातीची टेकड्याच्या कडेची वाट पुन्हा धोकादायक वळणावर नेऊन थांबली. म्हणून पुन्हा मागे फिरलो. ऊन आता खूप तापू लागले होते. वर एक कपार दिसत होती.कसाबसा तिथे गेलो.खूप वेळानंतर वाऱ्याची थंड झुळूक अनुभवली. थोडा आराम केल्यावर पुढे कसं जायचे हा यक्ष प्रश्न होता. यावेळी मोहीम फत्ते झाल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असे ठरवल्यामुळे विचाराअंती सुलतानढवा करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यच ठरला. तापलेल्या कातळावरून केलेल्या सुलतानढव्यामुळे थंड गर्द रानात दाखल झालो आणि समोरच सोनगिरीवर जाणारी ठळक वाट दिसू लागली होती. हा! खूप काही मोठं मिळाल्याचा आनंद तिघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जणू याचसाठी केला होता सुलतानढवा..
याच वाटेवरून पुढे निघालो. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून एका काटेरी झाडाच्या सावलीत बसून जेवण उरकले आणि थोडा वेळ तिथेच पडून आराम केला. दोन वाजत आले होते. गड पण टप्प्यात आला होता आणि वाटही सुस्पष्ट होती. त्यामुळे वेळ न दवडता सोनगिरीकडे कूच केली. खड्या चढणीची वाट जंगलातून जात होती. मधेच काही प्रमाणात मुरमाड माती होती. थोड्या पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. त्यापैकी डावीकडची वाट अस्पष्ट, थोडी कठीण, प्रचंड घसारा व दाट काटेरी झुडुपांमधून जात होती. त्याऐवजी आम्ही उजवीकडची स्पष्ट आणि गडाच्या कातळकड्याला लागून असलेली वाट धरली. एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरळसोट दरी असलेल्या वाटेवर एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो व तेही अतिशय सावधपणे जावे लागते. या वाटेवरून आम्ही अर्धवट पार केलेली. धबधब्याची वाट आणि पळसदरी परिसर दिसत होता.
पुढची वाट चांगली होती व पुन्हा जंगलातील पालापाचोळ्यातून चढून उजाड जागी आलो. इथून गडाची तटबंदी दिसू लागली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या अंगात बळ संचारले आणि छोटे दगड, घसारा, किल्ल्याच्या मातीखाली गाडलेल्या उद्ध्वस्त पायऱ्यांचालत गड जवळ केला. गडाचे दोन भाग आहेत. गडप्रवेश करण्याआधी गडाच्या कोपऱ्यात असलेल्या एका दगडावर विसावा घेत थंडगार वाऱ्याचा आनंद लुटला.
गडप्रवेशाच्या सुरुवातीला तटबंदी शिल्लक आहे. तटबंदीच्या बाजूच्या वाटेने सावधपणे चढून गडप्रवेश केला. इथेही तुरळक तटबंदी आहे. बाकी गडाच्या कातळकड्यामुळे गडाला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. थोड्या अंतरावर एक पाण्याचे टाके आहे. त्यात थोडेफार पाणी होते. पण खूप गाळ साठून चिखल झाल्याने पाणी पिण्यास अयोग्य होते.ब तिथून पुढे वाटचाल करत गडाच्या उत्तर टोकाकडे गेलो. हा गडाचा सर्वोच्च भाग. इथून फार दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. त्यामुळेच येथे गडाची निर्मिती केली गेली असावी. या टोकावरून थोड्या खालील बाजूस असलेला बुरुज दिसतो. पण तिथे पोहोचण्याची वाट नाही.
आता माघारी फिरून माथ्यावरील अर्ध्या वाटेवरून डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेला लागलो. थोड्या अंतरावर इथे पाण्याचे टाके लागते. पण हे पाण्याचे पूर्णपणे सुकलेले होते व त्यात गवत वाढीस लागले होते. आल्या वाटेने पुन्हा पिछेमूड करत गडाच्या दुसऱ्या भागाकडे निघालो. इथे कोणत्याही अवशेषाच्या खुणा दिसट नाहीत. पण एके ठिकाणी दगडात एक Hole दिसला. असे holes गडावर अजून दोन ठिकाणी होते व ते नैसर्गिक वाटत नाहीत.
या दुसऱ्या भागातील वाट उताराकडे जाते. वातावरण अस्वच्छ असल्याने दूरवर राजमाची पण अस्पष्ट दिसत होता. दरवेळी पुण्याला जाताना सोनगिरी विविध बाजूने दर्शन द्यायचा पण यावेळी लोहमार्गाचे विविध बाजूने दर्शन होत होते. दुपारचे ३ वाजले होते. आता परतायची वाट जवळ करायला सुरु केली. माघारी येऊन दोन्ही भागांमधील खिंडीत आलो. आलेल्या वाटेने न उतरता दुसऱ्या बाजूच्या वाटेने उतरू लागलो. काटाकुटयांनी भरलेली, दगड धोंड्यांची वाट खूपच त्रासदायक ठरली. थोड्याच वेळात काटाकुटयांमधून वाट काढत पठारावर आलो नि समोर असलेल्या पायवाटेने गावाकडे निघालो.
थोडे अंतर पार केल्यानंतर समोर पाहतो तर जंगलात आग पेटली होती. मोठी झाडे वगळता सुकलेले गवत आणि छोटी झुडूपे जळत होती व आग पसरतच चालली होती. पुढे जाण्याच प्रयत्न केला पण आगीच्या गरमीमुळे व प्रचंड धुरामुळे पुढे जाणे शक्य नव्हते. आग थोडी कमी झाली तेव्हा तोंडाला रुमाल बांधत आगीचा दाह सहन करत धवत धावत वाट पार केली.आग लागलेल्या जंगलातून पुन्हा सपाटीवर आल्याने जीवात जीव आला. पुन्हा पुढची वाट वाटचाल करत उतरायला लागलो. तर पुन्हा इथेही आग लागली होती. मग पुन्हा ही वाट धावत उतरत पार करावी लागली.
तहान लागली होती व पाणी आधीच संपले होते. पण वाट सोपी असल्याने पटापट उतरू लागलो. थोड्याच वेळात गावातील एका घराजवळ आलो पाणी प्यालो. समोरच उल्हास नदी खुणावत होती. मग काय आपोआप मोहित होऊन उल्हासात खेचलो गेलो....दिवसभर बुटांमध्ये जखडलेले पाय मुक्त केले आणि अतिउल्हासात “उल्हासात” प्रवेश केला. नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच दिवसभराचा सर्व क्षीण निघून गेला. थोडा वेळ पाण्यात बसून राहिलो. photoshoot वगैरे पार पाडले आणि नेहमीप्रमाणे पुस्तकांची अदलाबदल केली नि पळसदरी रेल्वे स्थानकाकडे निघालो. सूर्यराव मावळतीला चालले होते. पाखरे आणि चाकरमानी घराकडे परतत होते.
पळसदरी स्थानकात पोहोचल्यावर कळले की कर्जतकडे जाणारी ट्रेन १ तासाने होती. ट्रेनची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. मग काय तिथल्या मराठी भैय्याकडून भेळ घेतली अन् पायगाडीने रेल्वे मार्गावरून चालत चालत अंधारात कर्जत स्थानक जवळ केले. पुन्हा नव्या भटकंतीची आश्वासने देऊन दिपक लोणावळ्याकडे नि आम्ही छ.शि.ट.कडे मार्गस्थ झालो.
- अमित म्हाडेश्वर
श्री शिवराजेश्वर - सिंधुदुर्ग किल्ल्यातील महाराजांचे सर्वात पहिले मंदिर
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत व अशावेळी त्यांची मंदिरे अवघ्या महाराष्ट्रात व भारतातही असणे हे त्यांच्या कीर्तीस शोभेल असेच आहे. मात्र अनेकदा आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न येत असेल कि महाराजांचे सर्वात पहिले मंदिर कुठले? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिर!
सिंधुदुर्ग या अरबी समुद्रातील प्रसिद्ध अशा जलदुर्गात अगदी मध्यवर्ती ठिकाणी महाराजांचे हे मंदिर आहे. या मंदिराची उभारणी शिवरायांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत झाली. मंदिराची लांबी १७ मीटर लांब तर रुंदी ७ मीटर आहे.
या मंदिरातील महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हि मूर्ती बिन दाढीची अशी असून वेशभूषा हि पारंपरिक नावाड्याची आहे. कृष्ण पाषाणात घडवलेली हि मूर्ती वीरासन पद्धतीची बैठक असलेली अशी असून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांकडे केलेले आणि उजवा हात उजव्या मांडीवर तसेच डावा हात डाव्या गुडघ्यावर आहे . मूर्तीच्या गळ्यात कंठा, डाव्या दंडामध्ये तसेच`उजव्या व डाव्या मनगटांत कडे आहेत. मूर्तीच्या पायांत वाळे असून कमरेस मेखला व छातीवर जानवे अथवा यज्ञोपवीत आहे.
मूर्तीस वेगळ्या पद्धतीचे शिरस्त्राण असून कमरेस तुमान आहे. मूर्तीच्या मागे उजव्या बाजूस सूर्य तर डाव्या बाजूस चंद्राची प्रतिमा कोरली आहे यावरून जोवर चंद्र सूर्याचे अस्तित्व आहे तोपर्यंत महाराजांची कीर्ती दिगंत राहील असे विचार मूर्तीचे निर्माण करणाऱ्याने मांडले आहेत. प्रभावळीत दोनही बाजूस मोरचेल सुद्धा कोरली आहे.
अनेकांना हा प्रश्न पडू शकेल कि महाराजांची सर्वमान्य प्रतिमा तर दाढी असलेली आहे तर सदर मूर्ती हि दाढीशिवाय कशी असू शकते ? तर याचे उत्तर असे आहे कि या मंदिराचे निर्माण हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात झाले होते व राजाराम महाराजांचा जन्म हा १६७० साली झाला असल्याने १६८० साली जेव्हा शिवाजी महाराजांचे देहावसान झाले तेव्हा राजाराम महाराजांचे वय फक्त १० वर्षे होते तसेच शिवाजी महाराजांची जी काही मूळ चित्रे आज उपलब्ध आहेत ती राज्याभिषेकापूर्वीची असून राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाऊंचे निधन झाले व अशावेळी क्षौर केल्यामुळे शिवाजी महाराजांचे दाढीशिवाय असलेले रूप लहानग्या राजाराम महाराजांच्या मनात ठासले असावे व ते रूपच या श्री शिवराजेश्वर मंदिरातील मूर्तीच्या रचनेत उतरले असावे.
शिवाजी महाराजांच्या या मंदिराची व्यवस्था येथील संकपाळ या घराण्याकडे पारंपरिक असून या मूर्तीची रोज पूजा केली जाते. पूजा केल्यावर मूर्तीस मुखवटा चढवला जातो. मूर्तीस दोन मुखवटे असून एक सोन्याचा तर एक चांदीचा आहे. मूर्तीच्या समोर एक शिवकालीन तलवार असून तिच्या म्यानावर एका बाजूला उड्डाण करणारा हनुमान व दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेला आहे.
तर असे हे श्री शिवराजेश्वर मंदिर म्हणजे समस्त महाराष्ट्रीय लोकांचे श्रद्धास्थान असून या मंदिरास भेट देऊन अनेक शिवभक्त महाराजांचे दर्शन घेत असतात. तेव्हा आपणही महाराजांच्या या शिवलंकेस भेट देऊन श्री शिवराजेश्वर महाराजांसमोर नतमस्तक व्हा.
सिद्दीचा जंजिरा व त्यांचे हिंदू कारभारी
अनेकदा जंजिरा किल्ल्यावरिल 'शरभ' शिल्पाविषयी प्रश्न विचारले जात असतात व जर शरभ हे शैव संस्कृतीचे प्रतिक असेल तर जंजिरा किल्ल्यावर शरभ असण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न अनेकांना असेल त्याची उत्तरे या लेखात आपण जाणुन घेऊ.
निजामशाही काळात या बेटावर कोळ्यांची वस्ती असून राम पाटील हा तेव्हाचा कोळ्यांचा नायक होता व या टापूच्या रक्षणाकरिता तेव्हा लाकडी मेढेकोट बांधण्यात आला होता. यावेळी राजपुरी येथे निजामशाही ठाणेदार होता त्याचे काही कारणावरुन रामा पाटलासोबत बिनसले तेव्हा त्याने निजामशहाची मदत मागितली तेव्हा निजामशहाने आपल्या पिरमखान या सरदारास आरमार देऊन टापुवर पाठवले त्याने कपटाने किल्ला घेण्याचा बेत केला व चर्चेचे निमित्त करुन दारुचा नजराणा पाठवुन टापुवरिल लोकांना धुंद करुन मग कैद केले तसेच नंतर तह करुन किताब व छत्राचा मान दिला. मात्र पिरमखानाचे व रामा पाटलाचे सारखे बिनसत असल्याने पिरमखानाने निजामशहाच्या मदतीने एक दिवस त्याचे डोके मारले. १५७१ मध्ये बुर्हाण नामक सरदाराने निजामशहाकडून परवानगि घेऊन या टापुवर कोट बांधून त्याचे जंजिरा असे नामकरण केले व हा बुर्हाण सिद्दी नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर १६१७ साली पहिला सिद्दी सरदार या किल्ल्याचा कारभारी झाला तेव्हापासुन सिद्दींचा अमल येथे सुरु झाला.
या सिद्दींचे अनेक वंशज या किल्ल्याचे मालक झाले मात्र त्यांचे कारभारी हे अनेक हिंदूच होते १८व्या शतकात सिद्दी याकुतखान होता त्याचे कारभारी बाळाजी विश्वनाथ व जानोजी विश्वनाथ होते मात्र कुठल्यातरी संशयाने त्यांचे बिनसले व बाळाजी देशावर निघुन गेले व जानोजीला गोणत्यात घालून समुद्रात बुडवले गेले.
किल्ल्याच्या कामात हिंदू लोक आघाडीवर असल्याचे पुरावे आहेत, बाळसावंत मोकाशी नामक एक सरदार होता त्याने तब्बल ३२ माणसांच्या वजनाची चिरा उचलुन किल्ल्याच्या थरावर ठेवली तेव्हा सिद्दीने खुष होऊन त्याला व त्याच्या कुटुंबास करात माफी दिली.

तुर्तास आपण किल्ल्याची बाहेरची तटबंदी अथवा कोट पहातो तो सन १७२८ साली बांधला गेलेला आहे. याकाळात सिद्द्यांमध्ये सिद्दी याकुत म्हणुन एक सरदार होता त्याला शेख याकुत असेही म्हणायचे तो मुळचा हिंदू असुन गुहागरचा पाटलांपैकी होता मात्र त्याला लहानपणीच बाटवण्यात आले होते. जंजिर्याचे राजे सिद्दी असले तरी मुख्य कारभारी हे हिंदू असून अगदी संस्थानाच्या आरंभी प्रधान आडनावाच दिवाण किल्ल्याच्या बांधकामापासुन होते कालांतराने कर्णिक घराण्याकडे जबाबदारी येऊन नंतर मग गुप्ते घराण्याकडे हा हक्क आला, शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांचे घराणेही पुर्वी सिद्दीकडेच होते.
जंजिरा किल्ल्यात वस्ती करणारी दोन प्रमुख हिंदू घराणी म्हणजे सबनिस व दिवाण हे अगदी पुर्वीपासून याच किल्ल्यात आहेत व यांच्या हाती संपुर्ण संस्थानाचा कारभार असे. शादी खुशीचे सर्व शिरस्ते व मानमतराब यांना संस्थानात चालू होते व यांना सर्व सिद्दी लोक खुप मान देत असत. कालांतराने हि घराणी राजपुरी येथे गेली मात्र नंतर १८६६ साली किल्ल्याला आग लागल्यावर यांचे इतरत्र स्थलांतर झाले.
सिद्दीचा जंजिरा व त्यांचे हिंदू कारभारी
अनेकदा जंजिरा किल्ल्यावरिल 'शरभ' शिल्पाविषयी प्रश्न विचारले जात असतात व जर शरभ हे शैव संस्कृतीचे प्रतिक असेल तर जंजिरा किल्ल्यावर शरभ असण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न अनेकांना असेल त्याची उत्तरे या लेखात आपण जाणुन घेऊ.
निजामशाही काळात या बेटावर कोळ्यांची वस्ती असून राम पाटील हा तेव्हाचा कोळ्यांचा नायक होता व या टापूच्या रक्षणाकरिता तेव्हा लाकडी मेढेकोट बांधण्यात आला होता. यावेळी राजपुरी येथे निजामशाही ठाणेदार होता त्याचे काही कारणावरुन रामा पाटलासोबत बिनसले तेव्हा त्याने निजामशहाची मदत मागितली तेव्हा निजामशहाने आपल्या पिरमखान या सरदारास आरमार देऊन टापुवर पाठवले त्याने कपटाने किल्ला घेण्याचा बेत केला व चर्चेचे निमित्त करुन दारुचा नजराणा पाठवुन टापुवरिल लोकांना धुंद करुन मग कैद केले तसेच नंतर तह करुन किताब व छत्राचा मान दिला. मात्र पिरमखानाचे व रामा पाटलाचे सारखे बिनसत असल्याने पिरमखानाने निजामशहाच्या मदतीने एक दिवस त्याचे डोके मारले. १५७१ मध्ये बुर्हाण नामक सरदाराने निजामशहाकडून परवानगि घेऊन या टापुवर कोट बांधून त्याचे जंजिरा असे नामकरण केले व हा बुर्हाण सिद्दी नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर १६१७ साली पहिला सिद्दी सरदार या किल्ल्याचा कारभारी झाला तेव्हापासुन सिद्दींचा अमल येथे सुरु झाला.
या सिद्दींचे अनेक वंशज या किल्ल्याचे मालक झाले मात्र त्यांचे कारभारी हे अनेक हिंदूच होते १८व्या शतकात सिद्दी याकुतखान होता त्याचे कारभारी बाळाजी विश्वनाथ व जानोजी विश्वनाथ होते मात्र कुठल्यातरी संशयाने त्यांचे बिनसले व बाळाजी देशावर निघुन गेले व जानोजीला गोणत्यात घालून समुद्रात बुडवले गेले.
किल्ल्याच्या कामात हिंदू लोक आघाडीवर असल्याचे पुरावे आहेत, बाळसावंत मोकाशी नामक एक सरदार होता त्याने तब्बल ३२ माणसांच्या वजनाची चिरा उचलुन किल्ल्याच्या थरावर ठेवली तेव्हा सिद्दीने खुष होऊन त्याला व त्याच्या कुटुंबास करात माफी दिली.

तुर्तास आपण किल्ल्याची बाहेरची तटबंदी अथवा कोट पहातो तो सन १७२८ साली बांधला गेलेला आहे. याकाळात सिद्द्यांमध्ये सिद्दी याकुत म्हणुन एक सरदार होता त्याला शेख याकुत असेही म्हणायचे तो मुळचा हिंदू असुन गुहागरचा पाटलांपैकी होता मात्र त्याला लहानपणीच बाटवण्यात आले होते. जंजिर्याचे राजे सिद्दी असले तरी मुख्य कारभारी हे हिंदू असून अगदी संस्थानाच्या आरंभी प्रधान आडनावाच दिवाण किल्ल्याच्या बांधकामापासुन होते कालांतराने कर्णिक घराण्याकडे जबाबदारी येऊन नंतर मग गुप्ते घराण्याकडे हा हक्क आला, शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांचे घराणेही पुर्वी सिद्दीकडेच होते.
जंजिरा किल्ल्यात वस्ती करणारी दोन प्रमुख हिंदू घराणी म्हणजे सबनिस व दिवाण हे अगदी पुर्वीपासून याच किल्ल्यात आहेत व यांच्या हाती संपुर्ण संस्थानाचा कारभार असे. शादी खुशीचे सर्व शिरस्ते व मानमतराब यांना संस्थानात चालू होते व यांना सर्व सिद्दी लोक खुप मान देत असत. कालांतराने हि घराणी राजपुरी येथे गेली मात्र नंतर १८६६ साली किल्ल्याला आग लागल्यावर यांचे इतरत्र स्थलांतर झाले.
No comments:
Post a Comment