Thursday, December 10, 2020

धारावी काळा किल्ला

 आजची एकसंध दिसणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समुह होती. ही बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आपले पारंपारीक शत्रु सिध्दी, मराठे, पोर्तुगिज ह्यांच्या पासून मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याला स्थानिक लोक ‘‘काळ किल्ला‘‘ म्हणून ओळखतात.
इतिहास :
इ.स १७३७ मध्ये मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर () ह्याने मिठी नदी काठी किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या ‘‘सालशेत बेटावर‘‘ आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. हा किल्ला काळ्या दगडात बांधला गेला असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये "काळा किल्ला" ह्या नावाने ओळखला जातो. माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला या चार एका रांगेत असलेल्या किल्ल्यांमुळे मुंबी बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती.
पहाण्याची ठिकाणे :
सदर किल्ला जगप्रसिध्द धारावी झोपडपट्टीत असल्यामुळे सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढलेला आहे. आता अस्तित्वात असलेल्या अवशेषात प्रथम दर्शनी काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत व त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची दगडात कोरलेला शिलालेख दिसतो. किल्ल्याच्या आत जाण्यासाठी ८ फुट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग कचर्‍याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशद्वार, जीना व फांजी यांचे अवशेष दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन-बांद्रा लिंक रोडवरुन साधारण १० मिनीटे चालल्यावर, ओ.एन.जी.सी.बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळाकिल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला किल्ला आहे. किल्ल्यात जाण्यासाठी वाट नाही. ८ फुट भिंत चढून जावी लागते.
सूचना :
काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला हे तीनही किल्ले सायन मध्ये आहेत.हे तीनही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात. स्व:तचे वाहान असल्यास एका दिवसात या तीन किल्ल्यांबरोबर शिवडीचा किल्ला, वरळीचा किल्ला, माहिमचा किल्ला, व बांद्र्याचा किल्ला हे किल्ले पाहाता येतात.
मुंबईच्या इतर किल्ल्यांची माहिती साईट्वर दिलेली आहे.

 Fort: Dharavi (also known as Kala Killa)
Type: Land fort
Location : Sion (E) - Dharavi Slums (Mumbai)

Route: Sion circle (turn right to Sion railway station) - cross to Sion east and ask for Kala Killa (near Hanuman Seva Mandal)


The plaque on the fort describing the details

The walls of the fort

Some remnants of structure on top of the fort
A tunnel on top of the fort - this goes to sion fort as per locals (myth or reality?)


This fort is also known as Riwa fort and was built in 1669-1677. This was built by the British as a watchtower. Not many people know of the existence of the fort inside the slum. Although many of the structures are in good condition.
 Based on Wing Coamander (Retired)Dr. M.S. Naravane's book The maritime and coastal forts of India, Dharavi's little fort seems to be of Portuguese construction (over a former watchtower) and the EIC inscription mentioning an engineering officer Horn is tottaly wrong or refers to works of improvement.Congratulations for the blog

 Significance: Used as watchtower to guard against the Portuguese and Marathas.
Hidden between the slums of Dharavi, we will find the Riwa Fort that was built by the Portuguese at the beginning of the 17th century, which remained in their control until 1665 when the British gained control over it. Because it was made using black stone, the locals commonly refer to Riwa Fort as the Kala Killa (Black Fort). In 1739, the island of Salsette was ceded to the Marathas and their power became obvious to everyone, including the British. They realized the importance of the Riwa Fort in helping them beat the Marathas and began to use it as a watchtower.
For many years, the fortress was fully functioning but with the change of war techniques, it began to lose importance. Sadly enough,the structure is currently in a broken down state and is still holding on thanks to the efforts of some locals around the area.
Did you know? There are three citadels in a stretch--on the Eastern Express Highway, on the Sion railway lines and the third behind the bus depot at Dharavi--making the exact location of this fortress a mystery even today.

आम्ही आमचा मोर्चा सायन मधीलच तिसऱ्या किल्ल्याकडे वळविला. घनदाट जंगला प्रमाणे येथे घनदाट मनुष्य वस्ती असलेल्या "धारावी" भागात हा किल्ला आहे. हा किल्ला बांधताना उपयोगात आणलेल्या काळ्या पाषाणामुळे ह्या किल्ल्याचे नाव "काळा किल्ला" असे पडले आहे. इ. स. १७३७ मधे ह्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे आपल्याला येथे असलेल्या इंग्रजीतील शिलालेखाच्या वाचनावरून कळते. किल्ल्याला प्रवेश मार्ग नाही परंतु प्रवेश करण्यासाठी शिडीचा वापर करून आत मधे जाता येते. आम्ही हा किल्ला बघण्यास गेलो असता शिडी विदिर्ण अवस्थेत होती आणि ती वापरताना अपघात होण्याची शक्यता होती म्हणून सिमेंटच्या राशीचा उपयोग करून आम्ही आत मधे प्रवेश मिळविला. आत मध्ये बघण्यासाठी अवशेष नाहीत, पूर्वी येथे एक भुयार होते जे त्याकाळी शेजारी असण्याऱ्या नदीच्या पल्याड घेऊन जात असे आणि ह्या मार्गाचा उपयोग सुटके साठी केला जात असावा असा अंदाज आहे. सद्यस्थितीत उंदीर, घुशी किंवा इतर प्राण्यांच्या उपद्रवा पासून वाचण्या साठी हा भुयारी मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि ह्या मार्गाच्या प्रवेश द्वाराचे ठिकाण तेवढे दिसून येते
स्थळ दर्शक माहिती : 19.046838, 72.867615 (19°02'48.6"N 72°52'03.4"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : सायन उर्फ शिव (सेंट्रल मार्गिका)
शिलालेख
Kala Killa - 1.jpegबंद करण्यात आलेला भुयारी मार्ग
Kala Killa - 2.jpeg

धारावी अर्थात काळा किल्ला
सायनच्या किल्ल्याच्या अगदी समोरच दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा धारावीचा काळा किल्ला आहे. आजुबाजूला पसरलेल्या झोपड्यांमधून माग काढत या किल्ल्यापर्यंत पोहोचावं लागतं. किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याला आत जाण्यासाठी प्रवेशद्वारच नाहीय. किल्ल्यामधले लोक त्या काळी आत वा बाहेर जाण्यासाठी शिडीचा वापर करीत असत. किल्ल्याच्या तटबंदीला शिडी लावली की त्या शिडीवरून आत-बाहेर ये जा करता येत असे. शत्रूचं आक्रमण झाल्यास, ती शिडी काढून घेतली की शत्रूला किल्ल्यामध्ये येणं अशक्य होऊन बसेल अशी यामागची कल्पना. किल्ल्याच्या संरक्षणाचा हा एक वेगळाच नमुना इथे बघता येतो. या किल्ल्याच्या मधोमध एक भुयारही आहे. किल्ल्याच्या एका तटबंदीवर इंग्रजी भाषेतला शिलालेख असून त्याचं नीटपणे जतन होणं आवश्यक आहे. इ. स. १७३७ च्या आसपास बांधलेल्या या किल्ल्याचा रीवा किल्ला असाही उल्लेख आढळतो.

धारावीचा किल्ला :-  १६६५ मध्ये मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर १६७३ मध्ये डचांनी मुंबईवर स्वारी केली. १६८९ व १६९२ या दोन वर्षी सिद्धीने मुंबईवर स्वा-या केल्या या तीन आक्रमणांनंतर ब्रिटिशांनी मुंबईच्या सीमांची सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने असलेल्या किल्ल्यांची मजबुती करायला सुरूवात केली. १७३७ साली चिमाजी अप्पांच्या आक्रमणाच्या धास्तीने साष्टी बेटासमोरची हद्द सुरक्षित करण्याच्या हेतूने शीव व माहिम या दोन किल्ल्यांच्या मधल्या खाडीवर नियंत्रण राखण्यासाठी धारावीचा किल्ला १७३७ साली बांधण्यात आला.
(३) धारावीच्या किल्ल्याच्या तटबंदीवरील शिलालेख -  गूगलवरून साभार
(३) धारावीच्या किल्ल्याच्या तटबंदीवरील शिलालेख – गूगलवरून साभार
या किल्ल्याभोवती एक पूर्वीची जुनाट झालेली अशी तटबंदी आहे आणि त्यावर चढून जाण्यासाठी एका शिडीचा उपयोग करावा लागला. आमच्यापैकी काही जण आत उतरल्यावर मात्र तेथील दुरवस्था पाहून त्यांचे मन विषण्ण झाले . अस्ताव्यस्त वाढलेली झाडे आणि पसरलेला पालापाचोळा हे आतील दृश्य आहे. आज किल्ल्याच्या सभोवती एका बाजूला आहे ती झोपडपट्टी, हल्ली उगवलेला एखाददुसरा टॉवर आणि दुस-या बाजूला धारावीचे बेस्टचे बस आगार.  या किल्ल्याला आणि म्हणून परिसराला काळा किल्ला असे आज म्हणण्यात येते.

 

 गोष्ट धारावीच्या 'काळ्या किल्ल्या'ची - १

© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार. कथा एकूण दोन भागात..)
धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य 'मुंबई आमची, नाही कोणाच्या बापाची' म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित..!
इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव 'फोर्ट रिवा किंवा रेवा' असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला 'काळा किल्ला' या नांवानेच ओळखला जातो..या इतिहास पुरूषाचं आजचं वय वर्ष २८० मात्र..!!
धारावीच्या 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'च्या समोर 'बीइएसटी'चे धारावी व काळा किल्ला असे शेजारी शेजारी दोन बस डेपो आहेत..या बस डेपोच्या पूर्वेकडील भितीला अगदीलगटून हा 'काळा किल्ला' उभा आहे..बस डेपोच्या उगवतीच्या दिशेच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या तीन-चार फुटाच्या पॅसेजमधून थेट या किल्ल्याकडे जायला वाट आहे, मात्र हा पॅसेज अत्यंत घाणेरडा असून चालणेबल नाही आणि म्हणून थोडा लांबचा वळसा घेऊन झोपड्यांच्या भुलभुलैयासम गल्ल्यातून, लोकांना विचारत विचारत या किल्ल्याकडे जावं लागतं..
मी व माझे सहकारी श्री. अनिल पाटील नुकतेच हा किल्ला पाहून आलो. हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आत प्रवेशकरण्यासाठी याला दरवाजा नाही.आता मुळात दरवाजाच नव्हता की आजुबाजूला पडलेल्या झोपड्यांच्या गराड्यात याचा दरवाजा गायब झाला हे समजण्यास मार्ग नाही..पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आंत प्रवेश करता येतो.. अर्थात आम्ही तो प्रयत्न केला नाही कारण आजुबाजूच्या रहिवाश्यांची आम्ही संशयास्पद इसम (पक्षी-सरकारी अधिकारी) आहोत अशी खातरी झाली होती व त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्यांच्या मदतीशिवाय आत जाणे शक्यही नव्हते..
असो. किल्ल्याची तटबंदी मुळची अती मजबूत असल्याने अजून शाबूत आहे..तटबंदीच्या दर्शनी भागावर "सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला" अशी दगडात कोरलेली पाटी असून सदर मजकूराखाली 'इंजिनिअर' म्हणून कोणाची तरी आद्याक्षरे कोरलेली आहेत..पाटीचा फोटो सोबत देत आहे..









किल्ल्याची तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजूनही सुरक्षित आहेत..किल्ल्याच्या आतील भागाचे फोटो काढण्यासाठी आम्ही किल्ल्याला लागून अभ्या असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेलो..वरूनही किल्ला झोपड्यांच्या व झाडांच्या गराड्यात हरवून गेला होता. वरून दिसणारा किल्ल्याचा बाणाच्या फाळासारखा आकार लक्षात येत होता..हे फोटोही सोबत पाठवत आहे..या किल्ल्यात एक भुयार असल्याचा उल्लेख bijoor.me या वेबसाईट वर सापडतो परंतु आम्ही आत न गेल्याने ते पाहता आले नाही..








इमारतीच्या गच्चीवरून समोर उत्तरेला मिठी नदीचे पात्र, पश्चिम दिशेला काही अंतरावर असलेला माहीमचा किल्ला आणि पूर्वेच्या टेकडीवरचा सायनचा किल्ला अस्पष्टसा दिसत होता..सायन ते माहीमच्या दरम्यान मिठी नदी (माहीमची खाडी) पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहते..एके काळी या मिठी नदीचं पात्र विस्तीर्ण असून ते या काळ्या किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत होतं असं इतिहासात नोंदलेलं आहे..धारावी बस डेपो, डेपोपलीकडील मोठा रस्ता व निसर्ग उद्यान या सगळ्या आजच्या काळातील गोष्टी मिठी नदीच्या पात्रात भरणी टाकून केलेल्या आहेत हे त्या इमारतीच्या गच्चीवरून बघताना सहज लक्षात येत होतं..
'काळा किल्ला' मिठी नदीच्या दक्षिण तिरावर असून माहीमचा किल्ला मिठी नदी समुद्रास जिथे मिळते त्या ठिकाणी आहे तर पूर्वेचा सायनचा किल्ला याच मिठी नदीच्या दक्षिण तटावर सायनच्या टेकडीवर उभा आहे..हे तिन्ही किल्ले ‘ब्रिटीश मुंबई’च्या उत्तर सीमेचे खंदे रखवालदार होते..
ब्रिटीशांच्या ताब्यात तेंव्हा मिठीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा इलाखा होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश, ‘साष्टी’ इलाखा, म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तूगिजांच्या ताब्यात होता.. पोर्तुगीजांनी त्यांच्या ताब्यातील भूभागाचे सागरी शत्रूंपासून रक्षण व्हावे या हेतूने वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर (आताच्या ‘ताज लॅण्ड्स एंड’ किंवा ‘हॉटेल सी रॉक’ येथे) बांधलेला ‘केस्टेला डी अग्वादा’ अगदी आजही बघता येतो.
या लेखाचा विषय असलेला ‘काळा किल्ला’ ब्रिटीशांनी इसवी सन १७३७ मध्ये बांधला हे आपण सुरुवातीस पहिले. सन १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी इलाखा छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची प्रचंड दहशत मनात बसलेल्या ब्रिटीशांना आपल्या मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे इलाख्याचे रक्षण करण्यासाठी माहीम व सायन यांच्या मध्यावर एक किल्ला बांधण्याची निकड वाटली आणि त्यातून या किल्ल्याची निर्मिती झाली..एका अर्थाने ‘काळा किल्ला’ मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे असे म्हटले तर चुकणार नाही..
जाता जाता –
‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. मुंबईतील धारावी व भाईंदर येथील ‘धारावी’ याचा काय संबंध असावा किंवा मुंबईतल्या धारावीचे, ‘धारावी’ व किल्ल्याचे ‘रीवा फोर्ट’ अशी नांवे कशी पडली असावीत, या संबंधी एक तर्क पुढील भाग दोन मध्ये..!
लेखक- नितीन साळुंखे
 
गोष्ट धारावीच्या 'काळ्या किल्ल्या'ची - २
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार. एकूण दोन भागात..)
या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. आता भाईंदरच्या या किल्ल्याचे नाव देवीवरून पडले की देवीवरून किल्ल्याचे नाव पाडले हे समजणे कठीण आहे.
‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ असे आहे. जनरली किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव किंवा किल्ल्याच्या गावाच्या नावावरून किल्ल्याचे नाव पडण कॉमन आहे. ‘रीवाचा किल्ला’ आणि ‘धारावी’ या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे हे निश्चितच..या संबंधाने मी काही तर्क केले आहेत, ते इथे देतोय..
किल्ल्याच्या नावाबाबत तर्क –
हा किल्ला ब्रिटीशांनी बांधला व त्याला नाव दिले ‘फोर्ट रीवा’ असा अनेक ग्रंथात उल्लेख आहे.. मिठी नदीच्या किनारी, मोक्याच्या जागेवर हा किल्ला आहे..नदी म्हणजे इंग्रजीत ‘The River’..या ‘The River Fort’च बोलीभाषेत ‘द रीवा’ झाले असणे शक्य आहे व पुढे काळाच्या ओघात ‘द’ गळून केवळ ‘रीवा’ शिल्लक राहिला असणे सहज शक्य आहे...अश्या तऱ्हेने या किल्ल्याचे नाव ‘फोर्ट रीवा’ झाले असावे..!
‘धारावी’च्या नावाबाबत तर्क –
मुंबई परिसरातील ‘धारावी’ हे नाव ‘धारा देवी’ या देवीच्या नावावरून आले असावे अशी शक्यता इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी त्यांच्या ‘महिकावतीच्या बखरी’त मांडला आहे. परंतु या परिसरात ‘धारा देवी’ नावाची देवी होती असल्याचे शोधूनही सापडले नाही..हां, नाही म्हणायला ‘धारेश्वर’ नावाचे शंकराचे देऊळ असल्याचा उल्लेख सापडतो..राजवाडे यांनी मांडलेली शक्यता भाईंदर येथे सिद्ध झाली आहे..तिथे ‘धारावी किल्ला’ही आहे आणि ‘धारावी देवीही’, परंतु मुंबईत तसा धागा सापडला नाही..
इतिहासाचार्यांच्याच बखरीचा आधार घेऊन असे म्हणता येते की सन १३००च्या आसपास मध्ये बिम्ब नावाचा राजा प्रसिद्ध झाला व त्याने महिकावती (मुंबई माहीम) शहर वसवले..हा राजा साष्टी(ठाणे) इलाख्यातून येथे आला होता..या राजा बिम्बाने मुंबईत नव्याने राजधानी वसवताना आपल्या साष्टी इलाख्यातील स्थानाचीच नावे इथल्या स्थानांना दिली असे दिसते..उदा. ‘माहीम’ मुंबईतील व केळवे-पालघरमधील, ‘नायगाव’ हे ठाण्यातही आहे आणि मुंबईतही, शितलादेवी पालघर व मुंबईतील माहीमच्या शिवेवरही सापडते..तद्वत राजा बिम्बाने भाईंदर येथील ‘धारावी’चे नाव, माहीमपासून जवळच असलेल्या परिसराला देऊन त्याचे नाव ‘धारावी’ ठेवले असावे का?
की ‘ब्रिटीशांच्या ‘द रीवा’ या किल्ल्याच्या नावाचा अपभ्रंश पुढे ‘धारावी’ होऊन या किल्ल्याच्या परिसराला ‘धारावी’ हे नाव मिळालं असावं का? मला तरी दोन्ही तर्क पटतात..बघा आपल्यालाही पटतात का..
लेखक- नितीन साळुंखे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...