Sunday, December 13, 2020

घोडबंदरचा किल्ला

 

 घोडबंदर किल्ला(ठाणे)
प्राचीनकाळी कल्याण हे महत्वचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे.
या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला
अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती.
सह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते, तिचे टोक घोड्यासारखे दिसते.
त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले सह्याद्रीच्या ह्या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला
घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांनी युरोपियन आर्किटेक्चरल स्वरुपात बनविला आहे. हा किल्ला पूर्णपणे दगडांच्या अवरोधांनी बनलेला आहे
निवडलेली जागा डोंगरावरील माउंटवरील एक अतिशय चांगला बचावात्मक क्षेत्र आहे. ठाणे शहराच्या उपनगरामध्ये हा डोंगर आहे आणि समुद्र बंदरे व जवळपासच्या शहरांमध्ये सहज प्रवेश होता. या किल्ल्याला तटबंदीच्या बाजूने अनेक बुरुजांचा उत्तम तट आहे. या भिंती त्याच्या शीर्षस्थानी तोफांच्या सहाय्याने लावल्या आहेत
इतिहास :
इ.स १६७२ मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला,
पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही, इ,स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला,
त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे.
वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
१८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.

Architectural Importance
Ghodbunder Fort is built by the Portuguese in the European architectural form. This fortress is totally made of stone blocks, which were locally mined from the same areas were this fort was built. The place chosen is a very good defensive area on a hill mount. These hills were located in the suburbs of the Thane City and were easily accessible to the sea ports and nearby towns. This fort has got a great rampart with many bastions alongside its walls. These walls are mounted with cannonade on its top. Inside there is a vast court yard found in open place, which is centrally placed with pillared verandahs on its sides. There are many living areas found here. Many structures found here are used as granaries, other storage room, and weapon storage house. It has got very good watch towers built on the top of this fort. Its main gateway is surrounded by large curved bastions in the front. There are two Churches built here in the European models, one of these are in god conditions even today. The other church is in ruined stage found here now. This church was locally accessed by its civilians living in the downhill villages. All of its inner complexes were roofed with wood and leave materials. This fortress had once a natural garden with very old trees inside this fortress. There are still marks of its roots growing on its structures, which looks very authentic. It has got a very good stone built and stone carved steps to reach the top fort from its foot hills. Thus with every sphere, the architectural phenomenon is simply outstanding and is well observed and well mechanized to provide the appeal of the era architectural brilliance.
Historical Importance
Ghodbunder Fort is also known as Cacabe de Tanna. It was the actual name kept by the Portuguese. It got the name as Ghodbunder as this place was prominent in Horse Trading towards Middle East from India. Locally tribal peoples kept its name as horse fort, which means in Marathi as Ghodbunder. Ghod is for Horse and Bunder is meant for Fort. The Portuguese who came here as spice traders, built this fort in the year 1550 AD. This was to safeguard their interest in the India soil. This fort was their main officials and residential complex for nearly 187 years. Meanwhile the Great King of Maratha named Shivaiji, tired it to conquer but unable to fight with the Portugal troops and this fort too stood as a great defensive fort for centuries. But in the year this fort came under the Maratha's, when one of its commander named Chimnaji Appa defeated the Portugal troops and brought this fortress under the Maratha Empire. After occupying this fort many new structures were modified inside this fortress. The importance of new towers was built here to watch further colonial impacts. But in 1818 AD to BEIC took over this fort from the Marathas and made its local administrative office. After independence of India the archeological department took in charge f this fort and renovated its many times. This fort comes under the protected monument acts of India.

पोर्तगीजनी मराठयांचा धर्म छल सुरु केला होता त्या जाचाला कंटाळून ठाण्याच्या पलीकडे जे अंजूर गाव आहे तिथले रहिवासी गंगाजी नाईक अंजूरकर यांनी छत्रपती शाहू आणि बाजीराव पेशवे याना साकडं घातलं कि आम्ही भ्रस्ट तर झालो आहोत आता नष्ट होण्यास आलो आहोत तरी इथे येऊन महाराष्ट्र धर्म वाचवावा
आणि ह्या मुळॆ बाजीराव पेशव्यांनी मनावर घेऊन वसई ची मोहीम चिमाजी अप्पा कडे सोपिवली १७३७ सालच्या आसपास इथे प्रचंड लढाई चे खटके उडाले 


Ghodbunder Fort | घोडबंदर किल्ला | Rohit Bhosale |

#rohitrbhosale #rohitbhosaletrekvideos #GhodbunderFort

इतिहासात कल्याण, ठाणे आणि वसई हे महत्वाची अशी प्राचीन बंदरे होती. हा खाडीमार्गाद्वारे अरबी समुद्रातून परदेशी व्यापार अगदी प्राचीन काळापासून चालत होता. या परदेशी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पक्के ठाणे असावे यासाठी विविध राज्यकर्त्यांनी या महत्वाच्या खाडीकिनारी किल्ले बांधून आपले आरमार सुसज्ज केले. कल्याण जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी याच परकीय सत्ताधीशांवर जरब बसता यावी यासाठी कल्याण जवळ दुर्गाडी किल्ला बांधून मराठी साम्राज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. 



आज आपण अशाच एका इतिहासात महत्वाचे स्थान असलेला आणि सध्या काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या ठाण्याजवळील घोडबंदर किल्याला भेट देणार आहोत. पोर्तुगीज हे एक उत्तम दर्यावर्दी होते.त्यांनी आपला परदेशी व्यापारासाठी या मार्गाचे महत्व ओळखून ठाण्याजवळ घोडबंदर येथे हा किल्ला बांधला. येथे इतिहासकाळात अरबस्तानातून येणाऱ्या घोड्याचा व्यापार चालत असे म्हणून या विभागाला घोडबंदर असे नाव पडले आहे समजते.

घोडबंदर किल्ला हा पूर्वीच्या ठाणे प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी एक अतिमहत्वाच्या किल्ला होता. इ.स. १६७२ साली स्वतः छ .शिवाजी महाराजांनी घोडबंदर किल्यावर आक्रमण केलेले पण काही कारणास्तव हा किल्ला महाराजांना जिंकता आला नाही. मग इ.स. १७३७ मध्ये छ. शाहू महाराज यांनी चिमाजी अप्पाना वसई मोहिमेसाठी धाडले तेव्हा , त्यांच्या नेतृत्वात हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. आणि याच किल्ल्याच्या मदतीने मराठ्यांनी वसई किल्ला जिंकून घेतला. पेशवाईच्या अस्तानंतर म्हणजेच इ.स. १८१८ मध्ये सदर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. तत्कालीन ठाणे जिल्ह्याचा कलेक्टर याच किल्यामधून या प्रांताचा कारभार हाकत होता.
इ.स १६७२ मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही, इ,स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला, त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.
http://chauferbhatakanti.blogspot.com/2015/07/ghodbandar-killa.html

घोडबंदरचा किल्ला :

ठाणे शहरापासून जवळच उल्हास नदीच्या काठावर घोडबंदर किल्ला शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. ऐतिहासिक वस्तू ह्या जतन करण्यापेक्षा त्या दुर्लक्ष करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो हे घोडबंदर किल्ला बघितला की प्रकार्ष्याने जाणवते. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज असा खांदेपालट बघता बघता हा किल्ला एकेकाळी इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय ही होता. पण आता किल्याची अवस्था फारच दैनीय आहे . मागे काही वर्षापूर्वी ह्या किल्याची डागडुजी करून हा किल्ला एक पर्यटक आकर्षण बनवायचे प्रयत्न केले गेले असं ही ऐकलं पण ते पूर्ण फेल गेलेलं दिसून येत

पोर्तुगीज ठाण्यात आल्या नंतर त्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी सुरु केली ती साधारण १५५० साली, अरबी घोड्यचा व्यापार ह्या बंदरातून व्हायचा म्हणून हे घोडबंदर आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हा घोडबंदर किल्ला 

नंतर ह्या किल्ल्यात काहीना काही भर पडत राहीली ती १७३० पर्यंत. ह्या किल्ल्याचे नाव Cacabe de Tanna असं  ठेवलं होता त्यांनी. 

ह्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी एक चर्च बांधलं होतं ती वस्तू आज ही उभी आहे. जिथे कालांतराने एक हॉटेल मग कार्यालय आणि आता ओसाड खोल्या आहेत. आतील भिंत आणि जमिनी पूर्णपणे नवीन वाटतात, म्हणजे त्या आहेतच फक्त मूळ बांधकाम आणि दरवाजा पोर्तुगीज बांधणी दर्शवतो. 

ह्या चर्च च्या बाहेर एक मस्त वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर ८-१० माकड भरदुपारी अगदी शांत झोपली होती. आमचं लक्ष सहज वर गेलं तर ही सतत धिंगाणा घालणारी माकड शांत झोपलेली दिसली. मी खरतर झाडावर झोपलेली माकड पहिल्यांदाच बघत होतो.

हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांकडून ही बरेच प्रयत्न झाले होते. १६७२ साली शिवाजी महाराजाच्या सैन्याला ही अपयश पचवावं लागलं होतं. पोर्तुगीजांचे सशक्त आरमार आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्या जोरावर दिव दमण, वसई ते गोवा पर्यंत मुलुख मारला होता आणि जनतेवर जबरदस्ती धर्मांतर लादले जाऊ लागले. ती तक्रार छत्रपतीकडे गेली आणि मग पोर्तुगीजांना धडा शिकवायची कामगिरी थोरल्या बाजीरावांनी उचलली आणि त्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना पोर्तुगीजांवर चालून गेली. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला आणि साष्टी बेट हे दोन्ही १०-१५ दिवसाच्या युद्धानंतर मराठांच्या हाती लागलं आणि पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून इथली जनता मुक्त झाली. पुढे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला आणि तेथे इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय वसवले.

किल्यामध्ये हल्ली काही दगडी कमानीचे अवशेष बाकी आहेत त्याच्या पुढे मोकळी जागा आहे. कमानी जवळ एक बुरुज आहे जिथे जायला लहानश्या दरवाजातून दगडी पाहिऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून खाडी आणि बाजूचा हिरवागार निसर्ग अप्रतिम दिसतो. किल्ल्याच्या एका बाजूला गोडाऊन सारख्या चौकोनी खोल्या आहेत. पण त्याच्यावरचं छप्पर मात्र उडून गेलेल आहे 


किल्ल्याच्या मध्ये पाण्याचं मोठे टाकं आहे आणि त्याला पाण्याचा जिवंत प्रवाह आजही ही आहे त्यामुळे पाणी नेहमी  असते असं समजलं. किल्ल्यात आणि परिसरात बिबट्याचा वावर आहे आणि तशी बिबट्या संबंधी पाटी सुद्धा चर्चकडे जाण्याच्या रस्त्यावर दिसते

किल्ल्या मध्ये जागोजागी करटूल्याचे वेल लागलेले आहेत. त्याच्या पिवळ्या फुलांनी किल्ला सजलेला दिसला 


एकंदरीत हा इतिहासाचा साक्षीदार हल्ली मदतीची हाक मारत जीर्ण होत चाललेल्या अवस्थेत उभा आहे

घोडबंदर किल्ला आणि पोर्तुगीज कालीन चर्च - गुगल नकाश्यावर


किल्ले घोडबंदर: मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार

ghodbunder fort arches

कमानींची रांग व मागे दिसणारा बुरुज 

कधीकधी आपल्या अगदी जवळ खूप खास गोष्टी, खूप खास जागा असतात … पण तिथं जाणं, तिथला इतिहास समजून घेणं आपल्याला जमतंच असं नाही घोडबंदर ही अशीच एक जागा … मी छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता …. त्यांच्या आरमाराबद्दल गजानन भास्कर मेहेंदळेंनी लिहीलेलं पुस्तक वाचताना प्रथमच जाणवलं की महाराजांच्या आरमाराची सुरुवात ही मुंबईच्या आसपास कल्याण-भिवंडीजवळ कुठंतरी उल्हास नदीत झाली आहे … या नदीच्या मुखावर वसईचा बेलाग किल्ला आहे आणि दक्षिण किनाऱ्यावर मुंबईच्या टोकावर घोडबंदरचे ठाणे … शिवाजी महाराजांच्या आरमाराची पहिली तुकडी खुल्या समुद्रात बाहेर पडली ती इथूनच असं पोर्तुगीज कागदपत्रांच्या हवाल्याने स्पष्ट होतं … या ऐतिहासिक घटनेची साक्ष असलेला घोडबंदरचा किल्ला त्याची चित्रकथा तुमच्या समोर मांडतो आहे.

Screen Shot 2017-06-06 at 6.39.52 PMScreen Shot 2017-06-06 at 6.40.15 PM

कल्याणजवळ रुई व्हीएगश नावाच्या पोर्तुगीज कारागिराच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी गलबते बांधून घेतली … इथे जोडलेले दोन नकाशे पाहिले तर लक्षात येते की दोन्हीकडे असलेल्या वसई व घोडबंदर या पोर्तुगीज किल्ल्यांवर असलेल्या तोफांच्या नाकाखालून या नवजात आरमाराला बाहेर पडावे लागणार होते … उत्तरेचा पोर्तुगीज गव्हर्नर आणि गोवेकर पोर्तुगीज यांना जेव्हा शिवाजीच्या या प्रयत्नांची कुणकुण लागली तेव्हा या गलबतांना बाहेर पडू देता कामा नये अशी भूमिका घेण्याचं ठरलं … पण ते अंमलात आणायचं असेल तर शिवाजी महाराजांशी शत्रुत्व पत्करणं आलं … साष्टी बेटाच्या सभोवार महाराजांचे घोडदळ सज्ज होतेच … मी दंडा राजपुरीच्या सिद्दीच्या विरोधात हे आरमार उभे करत असून त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये असा निरोप महाराजांच्या दूतांनी वसईच्या कप्तानाला पाठवला असेलच … पोर्तुगीज कागद असे दाखवतात की या शिवाजीला सौम्य शब्दांत समज देऊन प्रकरण मिटवावे अशा मवाळ भूमिकेपर्यंत वसईचे पोर्तुगीज पोचले

vasai creekulhas riverShivaji navy

या ठिकाणी उल्हास नदी आणि वसईची खाडी एकत्र येतात … मराठा आरमाराच्या ३५ गलबतांना समुद्रात झेपावताना इथूनच पोर्तुगीज पहारेकर्यांनी पाहिले असावे … दुर्दैवाने घोडबंदर गावातील ही जागा आज दुर्लक्षित आहे … तिथे साचलेले प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग सिद्ध करतात की ना आपल्याला भूतकाळाची किंमत आहे ना वर्तमानाची … घोडबंदर किल्ल्याकडे गावातून जावं लागतं … मुंबईतली ही जुनी गावठाणं म्हणजे मुंबईचे वैभव …. अस्सल मुंबईकर हेच ना! मग क्रिकेट लोकप्रिय असणारच!

ghodbunder villageghodbunder walan

या गावातून टेकडीचा माथा गाठला की एका दुर्लक्षित वळणावर किल्ल्याचा बुरुज आणि त्यावर फडकणारा जरीपटका लक्ष वेधून घेतात … इथे ना पुरातत्व विभागाच्या पाट्या ना सूचना … काळाशी झुंज घेत ही वास्तू हळूहळू कोसळत चालली आहे .. या ठिकाणाला काही ग्रंथांमध्ये हिप्पाकुरा असे संबोधण्यात आले आहे आणि एकेकाळी अरब घोड्यांचा व्यापार इथून होत असे म्हणून हे घोडबंदर अशी कहाणी सांगितली जाते … आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले हे ठाणे नंतर मराठ्यांनी काबीज केले आणि मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी इथे कार्यालय म्हणून वावर केला … स्वातंत्र्य मिळालं आणि आपण दुर्लक्ष केलं.

ghodbunder arches 2ghodbunder depthghodbunder arches longghodbunder ruins

पोर्तुगीज शैलीतल्या या कमानींची रांग अजूनही शाबूत आहे … त्यातून झाडांची मुळे जागा शोधत आहेत … पलीकडे एक मोठे टाके आहे ज्याला नव्या काँक्रीटचा गिलावा झालाय असं वाटलं … चर्च सारखी भासणारी मोकळी जागा आणि त्याला लागून असलेल्या अनेक हॉल्स ची रांग हेच काय ते बांधकाम आज आपण इथे पाहू शकतो

ghodbunder fort rooms2ghodbunder fort rooms

पुढे पाऊलवाटेने मुख्य बुरुज चढून गेल्यावर किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर दिसतो आणि आतल्या बांधकामांचा आढावा घेता येतो … खाडीपलीकडे आजचे मीरा भाईंदर आकार घेताना दिसते आहे … बुरुजात छोट्याशा दारातून प्रवेश करावा लागतो … सन १७३८ मध्ये खंडोजी मानकराने इथे मराठ्यांसाठी बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात (वसईची – मोहीम केळकर पृ १८०)

citadel framedghodbunder citadel gateghodbunder citadelarches topmira roadtanknawab palace

इथे एक चर्चवजा पण मुस्लिम धाटणीची इमारत आहे … नरवणेंच्या पुस्तकात त्याला नवाबाचा राजवाडा असे म्हंटले आहे! त्याला दुरूनच नमस्कार केला आणि मार्गस्थ झालो! वसईच्या किल्ल्याची गोष्ट पुन्हा कधीतरी

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...