तुम्ही पुलंचं ” मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर ” हे अप्रतीम स्वगत वाचलं असणार, आम्ही मुंबईकर “आमच्या मुंबई”ला किती नावाजतो, या महानगराबाहेर कुठेही गेलो तरी तेथील वातावरणाशी, सुखसोयींची मुंबईतील तशाच प्रकारांची तुलना करू पाहातो. पण आम्हाला मुंबईचा खरा इतिहास किती माहित असतो ? फार थोडा. एवढंच नक्की माहित असतं की हे मुंबईचं बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना आपल्या राजाच्या लग्नात आंदण म्हणून मिळालं. बस ! एवढंच. त्यापलीकडे कोणीही जात नसावं. मुंबई ही ज्या सात छोट्या छोट्या बेटांची बनलेली आहे ती प्रत्यक्षात तिथे जाऊन पहाण्याचा कोण प्रयत्न करतं ? फार तर राणीची बाग, गेट ऑफ इंडिया, हॅन्गिंग गार्डन, फ़ोर्टमधील जुन्या ब्रिटिशकालीन इमारती आणि हल्लीची सी लिंक, उंच उंच गगनाला भिडणारे टॉवर्स, ही स्थळे पाहिली की आम्ही म्हणतो ही आमची मुंबई. पण आजच्या वाढलेल्या पसरलेल्या मुंबईचा इतिहास ज्या वास्तूंनी सतत पाहिला, निरखला, त्या वास्तूंना आपण जाणीवपूर्वक कधी भेट देतो का ? या वास्तू म्हणजे मुंबईतील किल्ले. यांची इत्यंभूत माहिती देणारी माणसे आता कमी झाली आहेत.
किल्ले म्हटलं की रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड अशी नावं चटकन
डोळ्यांसमोर येतात. पण मेट्रोसिटी मुंबईमध्येही ऐतिहासिक महत्त्व असणारे
काही किल्ले आहेत. बऱ्याचशा मुंबईकरांना याची कल्पनाही नाही. यंदाच्या
उन्हाळी सुट्टीत या शहरातल्या किल्ल्यांचा एक दौरा करायला काय हरकत आहे?
उन्हाळी सुट्टी लागली लागली की मग कुठे ना कुठे भटकंतीचे बेत ठरू लागतात.
कुणाच्यातरी डोक्यात ट्रेकची कल्पना येते. उन्हाळ्यात ट्रेक्स तसे कमी होत
असले तरी उपलब्ध पर्यायांमधले वेगवेगळे पर्याय चाचपून पाहिले जातात.
मुंबई-पुण्याजवळचे बहुतेक किल्ले आपल्याला ठाऊक असतात. कधी ना कधी
फिरण्याच्या निमित्तानं किंवा ट्रेकच्या नमिित्तानं तिथं जाऊनही आलेलो
असतो, पण आपण ज्या महानगरी मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईमध्येही काही किल्ले
आहेत हे अनेकांना माहितही नाही. मुंबईत जे किल्ले आहेत ते सध्या बऱ्यापैकी
अवस्थेत आहेत.
मुंबईमधील किल्ल्यांचा आणि शिवरायांचा तसा काही संबंध नाही. मुंबई बेटाच्या
रक्षणासाठी हे किल्ले बांधले ते इंग्रजांनी आणि त्या अगोदरच्या
पोर्तुगीजांनी. एका दिवसात सहज भेट देता येऊ शकेल अशा मुंबईच्या काही
किल्ल्यांवर या लेखातून नजर टाकण्याचा हा एक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे
यातले बहुतांश किल्ले अगदी भर वस्तीत आहेत.
मुंबईचे किल्ले
सतराव्या शतकातील मुंबई सात बेटांमध्ये विभागली होती, या प्रत्येक बेटाला स्वत:चे महत्त्व होते. त्यामुळे प्राचीन व मध्ययुगात माहीम, शिवडी, माझगाव, शीव या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले होते. त्यांची डागडुजी, पुनर्बांधणी सतत होत असे, मुंबई बेटांना मुख्य भूमीपासून अलग करणारी महिकावती उर्फ माहीमची खाडी अतिशय महत्त्वाची होती. या माहीम खाडीच्या मुखावर बिंबराजांचा किल्ला होता, माहीमचा किल्ला म्हणजे मुंबईचा पूर्व-पश्चिम किनारा जोडणाऱ्या जलमार्गाचा द्वाररक्षकच!
सतराव्या शतकातील मुंबई सात बेटांमध्ये विभागली होती, या प्रत्येक बेटाला स्वत:चे महत्त्व होते. त्यामुळे प्राचीन व मध्ययुगात माहीम, शिवडी, माझगाव, शीव या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले होते. त्यांची डागडुजी, पुनर्बांधणी सतत होत असे, मुंबई बेटांना मुख्य भूमीपासून अलग करणारी महिकावती उर्फ माहीमची खाडी अतिशय महत्त्वाची होती. या माहीम खाडीच्या मुखावर बिंबराजांचा किल्ला होता, माहीमचा किल्ला म्हणजे मुंबईचा पूर्व-पश्चिम किनारा जोडणाऱ्या जलमार्गाचा द्वाररक्षकच! १४व्या शतकात गुजरातच्या सुलतानांनी त्यावर कब्जा केला. पुढे १६व्या शतकात पोर्तुगीजांचे हल्ले माहीमवर होऊ लागले. त्यावेळी शेख नावाचा प्रमुख किल्ल्यावर होता. पोर्तुगीजांच्या अद्ययावत लांब पल्ल्याच्या तोफांच्या माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्याच वेळी दिल्लीचा हुमायून बादशहा गुजरातच्या सुलतानावर चाल करून आला होता. हुमायूनच्या हल्ल्याने हैराण होऊन बहादूरशहाने पोर्तुगीजांकडून शस्त्र आणि दारूगोळ्याची मदत मागितली. त्या बदल्यात त्याने मुंबई बेट पोर्तुगीजांना देण्याचा तह केला. परिणामी, माहीम आणि मुंबईची सारी बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यात आली. पूर्वेकडील माहीम उत्तरेकडील बांद्रा व दक्षिणेकडील वरळी यामुळे अर्धवर्तुळाकार असा माहीमचा उपसागर तयार झाला आहे. पोर्तुगीजांनी या अर्धवर्तुळाकार दोन टोकावरील वरळी व बांद्रा येथे दोन किल्ले बांधून माहीम खाडीच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त करून टाकला. (अलीकडेच बांद्रा आणि वरळी दरम्यान सागरीसेतू बांधण्यात आल्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.) पैकी साष्टी बेटाच्या समुद्रात घुसलेल्या भूशिरावर बांधलेल्या बांद्रा किल्ल्यावर पोर्तुगीजांनी लिहिलेला शिलालेख अजूनही आपल्याला पहावयास मिळतो. हा शिलालेख प्रवेशद्वारावर आहे. या प्रवेशद्वाराच्या आत आणखी एका प्रवेशद्वाराचे अवशेष असून त्यातून किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला इतिहास काळाची आठवण करून देतात. किल्ल्याच्या पूर्वेकडील भाग समुद्राच्या लाटांनी पोखरून काढल्यामुळे त्या भागातील तटबंदी ढासळून गेली आहे. त्याची कसर पश्चिमेकडील उतारावरील ताड वृक्षांनी भरून काढली आहे. त्यांना लँड अॅण्ड गार्डन आणि समुद्राची साथ लाभल्याने पश्चिमेकडून बांद्रा किल्ल्याच्या लोभस रूपाने दर्शन घडते.
माहीमची खाडी आणि वरळी बेटाच्या उत्तरेकडील अंतर्वक्र भूशिरामुळे समुद्राच्या प्रचंड लाटांपासून लहान सहान मचवे, गलबते, पडाव त्यांना आडोसा मिळत असल्याने आजही येथून मोठी जलवाहतूक होते. त्याकाळात इथल्या व्यापारावर देखरेख करण्यासाठी पोर्तुगीजांनी इ. स. १६६१च्या सुमारास वरळीचा किल्ला बांधला, किल्ल्याच्या भिंती बऱ्यापैकी सुस्थितीत असून रूंद आणि भक्कम आहेत. किल्ल्याबाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी तीन चौथरे केलेले दिसतात. ते ब्रिटिशांनी सतराव्या शतकाच्या अखेरीस चाच्यांचा उपद्रव वाढल्यामुळे बांधले होते. काहींच्या मते फ्रेंच आक्रमणाच्या भीतीपोटी ते चौथरे बांधले असावेत.
ब्रिटिशांनी नव्या किल्ल्याबरोबर जुन्या किल्ल्यातही आपल्या सोयीनुसार फेरफार केले आहेत. इंग्रज आर्किटेक्चर जेरॉल्ड आँगियार याने मुंबईतील बहुतेक किल्ल्यांची पुर्नबांधणी केली. त्यापैकी माहीमचा किल्ला असून त्याने तो इ. स. १६७०साली नव्याने बांधला. हा किल्ला अतिशय भक्कम आणि शस्त्रसामुग्रीसह परिपूर्ण होता. इ. स. १६७३ साली डचांनी माहीमवर स्वारी केली तेव्हा येथील भंडारी लोकांची तयारी पाहून त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर १४ फेब्रुवारी १६८९ रोजी सिद्धी याकूत खनाने २५०० सैनिक घेऊन मुंबईवर हल्ला केला तेव्हा त्याने शिवडी माझगांव व डोंगरीसह माहीम किल्लाही जिंकून घेतला. त्यावेळी माहीमच्या रयतेवर त्याने अतोनात अत्याचार केले आणि सुमारे वर्ष-दीड वर्षे येथे धुमाकूळ घालून सोबत प्रचंड लूट घेऊन गेला. माहीमचा किल्ला आजही समुद्राशी टक्कर देत उभा आहे. ब्रिटिश स्थापत्यकलेची साक्ष देणारी प्रवेशद्वारे व त्याच्या दोन्ही बाजूस कलाकुसर केलेले अर्ध उठावातील स्तंभ अद्यापही आपले लक्ष वेधून घेतात, मात्र किल्ल्याभोवती आणि किल्ल्याच्या आत दर्यावर्दी मुस्लिम कोळी लोकांच्या झोपड्यांनी माहीम किल्ल्याची पार रयाच घालवून टाकली आहे. माहीम किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारित आहे. परंतु गलिच्छ आणि दुर्दशा होत चालेल्या या किल्ल्याकडे त्यांचे बिलकुल लक्ष नाही असेच म्हटले पाहिजे, आज हे किल्ले कालबाह्य झाले आहेत. परंतु ज्या काळात त्यांची आवश्यकता होती, तेव्हा त्यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन आपली कामगिरी चोखपणे पार पडली, हे मात्र आपण विसरता कामा नये.
माहीम खाडीच्या पश्चिम मुखावरील वरळी, बांद्रा आणि माहीमचा किल्ला पाहिल्यावर तिच्या दक्षिण तिरावरून पूर्वेकडे जाताना काळा किल्ला, रिवा किल्ला आणि शीवचा किल्ला असे आणखी तीन लहान किल्ले आपल्याला पाहाता येतात. मात्र आज खाडी आणि रवाजण यात भराव टाकल्यामुळे पूर्वेकडून आत येणारा जलमार्ग बंद होऊन मुंबई व साष्टी एकजीव झाले आहेत, परंतु मुंबई बेटांवरील या किल्ल्याच्या स्थानांचा जुना नकाशा पाहिला की या किल्ल्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. मुंबईच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याकडून पूर्वकिनाऱ्याकडे येणारा हा जलमार्ग सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे होते कारण मुंबई बेटांच्या पूर्वेलाच खरा संपत्तीचा स्रोत वाहात होता. शिवडी, माझगांव फोर्ट, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे कॅसल येथे युरोपियन देशात आयात-निर्यात करणाऱ्या प्रचंड बाजारपेठ उभ्या राहत होत्या. त्यावर शत्रूंचा हल्ला किंवा समुद्र चाच्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून सतत जागृत राहावे लागे. इ. स. १६७०च्या सुमारास जेरॉल्ड आँगियार याने ही गोष्ट लक्षात घेऊन शीव व रिवा हे दोन किल्ले प्रथम बांधले. त्यानंतर इ. स. १७३७मध्ये गव्हर्नर जॉन हॉर्न याने ब्लॅक फोर्ट (काळा किल्ला) बांधला, त्याला कारण ही तसेच होते. इ. स. १७३४ ते १७३९ या सालात चिमाजी आप्पा पेशवे यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांना हकलून साष्टी तथा ठाण्यात मराठे प्रबळ झाले होते, त्यामुळे मराठ्यांचा मुंबईवर होणारा संभावीत हल्ला लक्षात घेऊन इंग्रजांनी दारूगोळ्याचा साठा काळा किल्ल्यात करून ठेवला. काळ्या बेसॉल्ट दगडांच्या बांधलेल्या या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या किल्ल्याला प्रवेशद्वारच नाही. अर्नाळा किल्ल्याच्या दक्षिणेकडील एकांगी प्रचंड गोल बुरूजाला जसे जमिनीखालून आत जाण्याचा मार्ग आहे, तसा या काळ्या किल्ल्याला असण्याची शक्यता आहे. परंतु झोपडपट्टीच्या विळख्यात तो शोधूनही सापडत नाही. या किल्ल्याच्या उत्तरेकडील खाडीमध्ये भराव टाकून धारावी बसडेपो बांधण्यात आला आहे. तर बाकी तीनही बाजूंनी धारावीच्या झोपडपट्ट्यांच्या विळख्यात काळा किल्ला जखडून गेला आहे, किल्ला दक्षिणोत्तर अरुंद आणि पूर्व पश्चिम लांबुडका बांधण्यात आला असून किल्ल्याची तटबंदी २० फूट उंच आहे. पश्चिमेकडील बुरूज आणि किल्ल्याच्या भिंतीवरील शिलालेख यांच्यामध्ये तटबंदीत पिंपळाचे एक मोठे झाड उगवले असून झाडाच्या मुळांना धरून तटावर गेले की आतल्या बाजूला उतरणाऱ्या पायऱ्या दिसतात. स्फोटके ठेवलेले दारू कोठार सर्व बाजूने बंदिस्त असते. येथे मात्र वर मोकळे आकाश आहे. त्यामुळे या किल्ल्याचे नेमके प्रयोजन काय, हे मात्र समजू शकत नाही.
बॉम्बे कॅसल

इंग्रजांनी, मनोर हाऊस येथे स्वत:ला प्रस्थापित केले व त्याला “दि बॉम्बे कॅसल” असे नवीन सार्वभौम नाव बहाल केले. हे पहिले `गव्हर्नमेंट हाऊस` फोर्टच्या मध्यवर्ती भागात, टाऊन हॉलच्या मागे आणि टांकसाळ (मिंट) व ओल्ड कस्टम हाऊसच्या मध्ये वसलेले होते.
बॉम्बे कॅसलकडे एवढे आधिपत्य होते की ते, बंदराला लष्करी डावपेचाप्रमाणे घेराव घालू शकत होते. त्याला दोन उपसागर होते व ते एक नगर होते. सेकंड लेफ्टनंटच्या शब्दात, बॉम्बे कॅसल हा आपण बनविलेला भारतातील सर्वात मजबूत बालेकिल्ला होता.
इतिहासकार जेम्स डग्लस यांनी बॉम्बे कॅसलचा शक्तिशाली प्रभाव असल्याचे जाहीर केले. उंच दारामधून तुम्ही जाताना, दोन आकृत्या तुमच्याकडे बघतात. स्वत: महान जगत्प्रवासी असलेले उंच पोतुगीज सैनिक समुद्रमार्गे व जमिनीद्वारे वसाहतीच्या साम्राज्यात वाढ करणारे सूचक ध्येयचिन्ह आहे.
चार्ल्स दुसरा या राजाला निधीची सतत आवश्यकता भासत होती. त्याने 1668 मध्ये कर्जाच्या बदल्यात व वार्षिक दहा पौंड इतक्या भाडेतत्त्वावर हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला दिले. सर जॉर्ज ऑक्सीनडेन हे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे नियुक्त केलेले पहिले राज्यपाल (गव्हर्नर) होते.
1686 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून बॉम्बेला हलविले. 1710 मध्ये, कॅसलमध्ये बळकट शस्त्रागार, सैनिकांसाठी घरे व वीस महिन्यांसाठी हजार लोकांकरिता शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल यासाठी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
नंतर, तटबंदीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. हे काम सुरू असतानाच अन्य ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले. गव्हर्नरांनी तटबंदीच्या आत राहणे धोरणात्मक दृष्ट्या अयोग्य असल्याचे समजण्यात आले. कारण त्यांना भेटावयास येणाऱ्या सर्वांना तटरक्षक सेनेची शक्ती व सिध्दाता याची माहिती मिळाली असती. नवीन निवासाचा शोध घेण्यास सुरुवात झाली
Bombay Castle - मुंबईचा किल्ला
It is today known as INS Angre, the HQ of the Western Command of Indian Navy. It is located right behind the Asiatic Library. You need be naval employee or accompanied by one to enter the premises.
आज हा किल्ला भा.नौ.पो. आंग्रे या नावाने ओळखला जात असून, हे भारताच्या आरमाराचा पश्चिम किनाऱ्यावरील मुख्यालय आहे.
हा किल्ला ऐशीयाटीक लायब्ररीच्या मागे असून, इथे प्रवेश फक्त नाविक कर्मचाऱ्यांना, किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्यांना आहे.
मुंबई शहरात सुद्धा असे छोटेखाणी किल्ले आहेत ह्याची प्रचिती जानेवारी मधील सेंट जॉर्ज किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून कळून आले आणि मग ध्यास लागला ह्यांच्या माहितीची जुळवा जुळव करण्याचा, ह्यांची एक भ्रमंती करण्याचा.
शहरीकरणा मुळे गजबजलेल्या ह्या किल्ल्यांच्या श्वास कोंडत चालला आहे.
दाट वस्ती - झोपडपट्टी, आजूबाजूला असलेला प्रचंड कचरा आणि भटक्यांची
अनास्था, हि व अशीच अनेक कारणे ह्यामुळे हे किल्ले शेवटचा श्वास घेत आहेत.
न ह्या किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे रौद्र रूप न दिसतो दरी खोऱ्यासारखा
अप्रतिम नजरा, दिसतात त्या टोलेजंग इमारती तर कधी दिसते विद्रुप झालेले
शहर.
ह्याही किल्ल्याना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे, ह्याही किल्लयांनी
आपली भूमिका चोख बजावली आहे पण भटक्यांच्या यादीत यांचा क्रम कदाचित शेवटी
येतो किंवा ह्यांना काही स्थानही नाही. घरापासून लांब असणाऱ्या किल्ल्यावर
आपण संवर्धन करतोय पण आपल्या अंगणात असलेली हि वारसास्थळे मात्र उपेक्षित
आहेत. बऱ्याच मंडळींना तर हे किल्ले अस्तित्वात आहेत हे ठाऊक सुद्धा नाही.
आम्हीही असे भटके होतो ज्यांनी पूर्वी ह्या किल्ल्याना कधी भेट दिली
नव्हती.
ठरलं मग, करायची एक भटकंती. ट्रेकक्षितीज (http://trekshitiz.com) आणि बिजूर (http://bijoor.me) ह्यांच्या संकेतस्थळावर थोडीफार माहिती मिळाली, सोबतीला गुगल बाबा होतेच, त्यांनीही मदतीचा हात पुढे केला.
गेल्या भटकंती प्रमाणेच यंदाही सोबत होती ती आमच्या सौ ची तसेच सोबत
होते मित्र - परिवार. आमचा पहिला थांबा होता सेंट जॉर्ज इस्पितळाच्या
आवारातील ह्याच नावाच्या किल्ल्याचा. गेल्या वेळा पेक्षा आमचे नशीब यंदा
थोडे वरचढ होते. ह्यावेळी आम्हाला आत मध्ये प्रवेश मिळाला होता. आम्हाला हे
पूर्वकाळीचे दारुकोठार यंदा निरखून बघता येणार होते. आत प्रवेश करताच
आम्हाला दिसल्या त्या इंग्रजी धाटणीच्या कमानी आणि खोल्या तसेच आम्हाला
बघता आले किल्ल्यातील “तळघर”. किल्ल्यापासून समुद्रतट जवळच असल्याने भरती
दरम्यान ह्या तळघरात समुद्राचे पाणी शिरते. ह्या पाण्याचा वापर आग
विझविण्या करत असतील, कदाचित दारुकोठार असणाऱ्या ह्या इमारतीची हि आगी
पासून रक्षण करण्याची सुरक्षा पद्धत असावी.
स्थळ दर्शक माहिती : 18.941247, 72.838511 (18°56'28.5"N 72°50'18.6"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : छत्रपती शिवाजी टर्मिनस
किल्ल्यावरील जंग्या
तळघर

यंदाचे मुख्य आकर्षण होते ते "St जॉर्ज फोर्टचे", ह्याच नावाच्या
दवाखाण्यात हा छोटेखानी किल्ला (त्याचे अवशेष म्हणा ना) आहे. मुंबईला
असलेल्या परकोटाची हे सध्या अस्तित्वात असलेले अवशेष आहेत. पूर्वीचे हे
दारुगोळा कोठार सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनाचे "पुरातत्व व
वस्तूसंग्राहालय संचालनालाय" म्हणून कार्यरूपात आहे.
यंदाचे मुख्य आकर्षण होते ते "St जॉर्ज फोर्टचे", ह्याच नावाच्या
दवाखाण्यात हा छोटेखानी किल्ला (त्याचे अवशेष म्हणा ना) आहे. मुंबईला
असलेल्या परकोटाची हे सध्या अस्तित्वात असलेले अवशेष आहेत. पूर्वीचे हे
दारुगोळा कोठार सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनाचे "पुरातत्व व
वस्तूसंग्राहालय संचालनालाय" म्हणून कार्यरूपात आहे.
मुंबईतील इतर किल्ले करण्याच्या बेत होता पण वेळे अभावी तो करता नाही आला. तो पुन्हा होईलच.
तर मुंबईत मारलेल्या फेरफटाक्याची हि काही क्षणचित्रे........
प्रचि १:
St जॉर्ज फोर्ट ( सध्याचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय")
प्रचि २:
St जॉर्ज फोर्ट ( सध्याचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय")
प्रचि ३:
प्रचि ४:
किल्लयाची मागील बाजू
प्रचि ५:
किल्लयाची मागील बाजू
किल्ला
Bombay (we reserve our right to call it that for historic purposes)
has had more facelifts than most starlets in the entertainment industry.
It’s a city that has transformed beyond recognition for those who have
had the good fortune to look out at the same view for over a decade; and
into a completely different world for anybody who’s been around for
longer than that. It’s made the shift from an archipelago of seven
islands to the metropolis it is now, but for our story today we’re
taking a trip back to its former heydays.
As far back as the 16th
century, each one of the seven islands were protected by forts that had
been built by ancient kings, the Portuguese and the British. And even
though these were built using primitive methods and rudimentary
material, they are considered to be magnificent works of architecture
and testaments to military strategy, even today.
To our
generation, these forts have varying levels of significance. For some,
it’s the go-to haunt for couples to get cosy away from prying eyes, to
others, nothing more than a slightly dilapidated landmark that their
taxi driver will surely know to get them to their actual destination and
to our most filmy counterparts, a scenic location to shoot a Bollywood
song perhaps. Of course, we’re here to cast aside the ordinary labels
for a bit and dwell upon the stories that make them fascinating even
today.
Homegrown’s history lessons are officially in session.
I. BOMBAY CASTLE
Location: Fort Area
Significance: Administrative building & the residence of the First Governor of Bombay.
Also known as Casa da Orta , the Bombay Castle is one of the oldest
surviving structures from the history of Mumbai. From 1554 until his
death in 1570, a Portuguese nobleman Garcia de Orta had leased the
Bombaim Island from the King of Portugal and he built the Manor House
here.
When the East India Company came to India, it took control
of the castle and began to construct fortifications around the mansion.
What makes this one of the most important parts of the city’s heritage
is that fact the Fort and the city of Bombay both grew from and around
it.
When the Company shifted its headquarters to Bombay, the
Governor resided in the Bombay Castle. Gerald Aungier, the first
Governor of Bombay used to stay here.
In 1934, the formation of
Royal Indian Navy created a need for space and they were able to acquire
Bombay Castle and so today, we can find two gates of the Manor within INS Angre,
in South Mumbai. There are various other pieces of history that you can
find here, such as large portions of the original Castle walls and
bastions, here. At present, the building acts as the office of the Flag
Officer Commander-in-Chief of the Western Naval Command.
Did you know? A sundial
that is believed to date back to the Portuguese era can also be found
here. What makes the sundial different is that it does not mark the 12
hours of the day but certain periods the people then thought to be
important.
FORT GEORGE
Location: Fort
Significance: Used as a defensive fortification.
Back in 1769, the British began to fear the rapid success of Napoleon
Bonaparte and decided to get prepared for any unexpected attack from
him. So they built the St. George Fort or Fort George , as an extension
of the fortified Bombay region. Along with being a defensive
fortification, it was also used as a warehouse for arms and ammunitions.
The
logic behind its construction was that if Napoleon were to attack, then
the army on the main fort and navy would engage in war with French army
and if they were to feel as if they are failing then they would take
the shelter of the Marathas, traveling through Thane or Panvel by boats.
The British
successfully defeated the French and once again consolidated their
position in India. Once its purpose was served and the British no longer
needed the fortress, Sir Barter Fier demolished it.
In the period of 1889 to 1892, a hospital called St. George was build in its place and its remains can still be seen.
Did you know? In
2010, a 200-year-old passage was discovered on the premises of the
General Post Office at CST, Mumbai. It is rumoured that this was an underground escape route constructed by the British from the St. George Fort in case they needed to escape from the French
इतिहास : मुंबई बेटावरचा ब्रिटिश किल्ला
वर उल्लेख केलेल्या मुंबईच्या सात बेटांपैकी फक्त मध्ये असलेले मुंबई बेट क्षेत्रफळाने मोठे होते.
निर्मिती आणि अखेर
१६६५ पासूनची ब्रिटिशकालीन मुंबई आणि आजची मुंबई यातल्या जमीनअस्मानाच्या
फरकांचा नकाशांच्या साहाय्याने अभ्यास करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकाने
केला आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या सात बेटांच्या समूहाने म्हणजे
मुंबईने शेकडो वर्षांपासून देशी व परदेशी राज्यकर्त्यांना आकर्षित केले
होते. कुलाबा-धाकटा कुलाबा- मुंबई- माझगांव- परळ- वरळी व माहीम अशा या सात
बेटांवर मूळ वस्ती फक्त कोळी, भंडारी व आगरी लोकांची होती. गुजराथमधील
चंपानेरमधून दक्षिणेकडील प्रदेश जिंकत जिंकत येथवर आलेल्या राणा प्रताप
बिंबाने मोक्याच्या माहीम बेटावर इ.स. ११४० ते १२४१ दरम्यान मोठा मजबूत
दगडी किल्ला बांधला. त्यानंतर इ.स. १३४८ मध्ये येथे घुसलेल्या मुगलांनी
काही व १५३४ मध्ये मोगलांना हटवून मुंबई बळकावलेल्या पोर्तुगीजांनी काही
बेटांवर किल्ले बांधले. मात्र नंतर त्यांनी राजघराण्यांतील सोयरिकीमुळे
मुंबई बेट ब्रिटिशांना १६६१ मध्ये आंदण दिले व ते प्रत्यक्ष हस्तांतरित
होण्याची प्रक्रिया १६६५ मध्ये पूर्ण झाल्यावर येथे आधी ब्रिटिश ईस्ट
इंडिया कंपनीचा व नंतर यथावकाश इंग्लंडच्या राणीचा राज्यकारभार सुरू झाला.
मुंबईचे खरे महत्त्व ब्रिटिशांनीच ओळखले होते.
41-lp-fort-mumbai
वर उल्लेख केलेल्या मुंबईच्या सात बेटांपैकी फक्त मध्ये असलेले मुंबई बेट
क्षेत्रफळाने मोठे होते. त्यामुळे त्यावर वस्ती करणे ब्रिटिशांना जास्त
सोयीचे होते. येथूनच वस्ती व कारभार करताना त्यांनी प्रशस्त व प्रचंड मोठा
किल्ला येथे उभारला. तथापि काही काळानंतर त्यांनीच तो पाडूनही टाकला. आज
त्याच किल्ल्याबद्दल काही माहिती मिळवू या.
या माहितीचा मागोवा घेताना लक्षात आलेली विशेष गमतीदार गोष्ट अशी की,
किल्ल्याच्या निर्मितीचे प्रयोजन आणि दोनशे वर्षांनंतर तो पाडण्याचा निर्णय
या दोन्ही गोष्टींशी संबंधित असलेला विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
आणि त्यांचे मावळा मराठे वंशज यांचा, स्वत:ला जगज्जेता म्हणविणाऱ्या
ब्रिटिशांनी घेतलेला धसका!
इ. स. १६१२ मध्ये ब्रिटिशांनी सुरत येथे वखारी स्थापन केल्या व तेथून
समुद्रमार्गाने त्यांचा व्यापार सुरू झाला. तेथे राज्य मोगलांचे होते.
नाशिक येथे देवदर्शनासाठी आलेल्या शिवाजी महाराजांच्या चुलतीला मोगलांच्या
टोळीने पळवून नेले. त्यांचा पाठलाग करून शिवाजी महाराजांनी चुलतीला सोडवून
आणले (नोव्हेंबर १६६३) व या आगळिकीची मोगलांना अद्दल घडविण्याकरिता मोजक्या
मावळ्या घोडेस्वारांसोबत दौडत जाऊन जानेवारी १६६४ मध्ये सुरतेमधील सर्व
मोगलांना लुटून साफ केले. महाराजांच्या सक्त ताकिदीमुळे वखारीमधील
ब्रिटिशांना मावळ्यांनी हातही लावला नाही. परंतु ब्रिटिशांनी मराठय़ांचा
धसका मात्र घेतला. सुरत व मुंबई या दोन्ही ठिकाणी त्यांचे गव्हर्नर नेमलेले
असत. त्यांच्या राणीबरोबरच्या तत्कालीन पत्रव्यवहारामध्ये हा धसका
स्पष्टपणे व्यक्त झालेला दिसतो.
मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर इ.स. १५३८ च्या आसपास ज्याला मुंबई बेट
पोर्तुगीजांनी भाडय़ाने दिले होते, त्या मार्सिया दा ओर्ता या शास्त्रज्ञाने
मॅनॉर हाऊस या नावाचा बंगला बांधला. त्या बंगल्यात १६२६ नंतर पोर्तुगीज
गव्हर्नर राहात असे. नंतर १६६५ मध्ये तेथे ब्रिटिश गव्हर्नर राहाण्यास आला.
त्याने, म्हणजे हम्फ्रेकूकने, मॅनॉर हाऊसभोवती तटबंदी करून घेतली व त्यावर
अठरा तोफा बसवल्या. त्याला ‘बॉम्बे कॅसल’ असे नाव दिले. हा ब्रिटिश
राज्यकारभाराचा त्या काळातील मुख्य पत्ता होता. ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला
गव्हर्नर जॉर्ज ऑक्झेंडन (नियुक्ती १६६८) व नंतर जिराल्ड आँजियर (१६७२) हे
सुरत व मुंबई दोन्ही ठिकाणांचा कारभार पाहात.
42-lp-fort-mumbai
दि. ३, ४ व ५ ऑक्टोबर १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटून
साफ केली. त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांची हायच खाल्ली. १७१५
मध्ये नियुक्ती झालेल्या चार्ल्स बून या गव्हर्नरने तोपर्यंत
विस्तारलेल्या शहराभोवती उंच, रुंद व भक्कम भिंती बांधून त्याला किल्ल्याचे
स्वरूप आणले. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस समुद्र असल्याने तेथून दोन
दरवाजे होते, त्यांना मरीन गेट असे म्हणत. उत्तरेच्या भिंतीत, दक्षिणोत्तर
बझारगेट स्ट्रीटच्या उत्तर टोकास बझारगेट या नावाचा तिहेरी दरवाजा होता.
त्याला तीन दरवाजा असेदेखील म्हणत. पश्चिमेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलजवळील
सेंट थॉमस चर्चकडून सरळ पश्चिमेस जाणाऱ्या रस्त्यावर तो दरवाजा होता,
त्याला चर्चगेट असे नाव होते व त्या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे म्हणत.
किल्ल्याबाहेर पडल्यावर हीच चर्चगेट स्ट्रीट पुढे पश्चिमेकडे गेल्यावर
इ.स. १८६७-७२ च्या आसपास उत्तरेकडून आलेल्या व कुलाब्यापर्यंत जाणाऱ्या
बीबीसीआय रेल्वेला तिने जेथे छेदले तेथील स्टेशनला चर्चगेट असे नाव दिले व
तेच अजून प्रचारात आहे. मूळचा चर्चगेट दरवाजा कधीच इतिहास जमा झाला!
चर्चगेट स्ट्रीटने रेल्वेला जेथे छेदले तेथे लेव्हल क्रॉसिंग होते. रेल्वे
कुलाब्यापर्यंत जात होती व शेवटचे स्टेशन ही फार देखणी इमारत होती. १९३०
नंतर रेल्वे चर्चगेटपुढचे कुलाब्यापर्यंतचे रूळ तोडले, १९३७ मध्ये कुलाबा
स्टेशन पाडले व स्टेशनच्या जागेत १९५० नंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी
फ्लॅट्स बांधून ‘बधवार पार्क’ निर्माण केले.
किल्ल्याच्या दक्षिणेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलकडून सरळ दक्षिणेस आलेल्या
अपोलो स्ट्रीटच्या टोकाशी ‘अपोलो गेट’ या नावाचा दरवाजा होता. आता तेथेच
आसपास पूर्वेस ‘रॉयल सेलर्स होम’ म्हणजे पोलीस मुख्यालय आहे. अपोलो गेटच्या
दक्षिणेस बाहेर पडल्यावर कुलाबा बेटापर्यंत समुद्रच होता. तेथे भरतीच्या
वेळी अपघाताने बुडून अनेक सैनिक मारले गेल्यामुळे तेथून ससून डॉकपर्यंत
समुद्रात भर घालून कुलाबा बेटाला जोडणारा कुलाबा कॉजवे १८३८ मध्ये पूर्ण
केला.
आक्रमणाच्या भीतीमधूनच या किल्ल्याची, म्हणजे फोर्टची निर्मिती झाली. तरीही
मराठय़ांचा धसका होताच! चिमाजी आप्पा पेशवे यांनी १७३९ मध्ये चढाई करून
पोर्तुगीजांना हरवून वसईचा किल्ला जिंकला. ही बातमी आल्याबरोबर इथे
ब्रिटिशांनी मुंबई फोर्टच्या दक्षिणेच्या अपोलो गेटपासून पश्चिमेच्या
चर्चगेटपर्यंत व तेथून उत्तरेस जाऊन बझारगेटच्या पूर्वेस
समुद्रकिनाऱ्यापर्यंत, असा ३० फूट रुंद व २० फूट खोल सलग खंदक खणण्यास
ताबडतोब सुरुवात केली! बाहेरून दौडत आलेल्या शत्रूच्या घोडेस्वारांना झेप
टाकून ओलांडणे कठीण व्हावे म्हणून ३० फूट रुंदी! परिचितांना फळ्या टाकून
आणले किंवा सोडले जाई. ‘ऑपरेशन चिमाजी आप्पा’च्या प्रभावामुळे,
पोर्तुगिजांनी १५८० मध्ये बांधलेला शिवच्या टेकडीवरील किल्लाही लगेच
दुरुस्ती करून मजबूत केला गेला आणि पूर्व तटावर शिवडीचा किल्लाही लगेच
बांधला गेला (इ.स. १७६८). मुंबई किल्ल्याभोवतीचा खंदक खणून १७४३ मध्ये
पाण्याने भरला.
43-lp-fort-mumbai
मुंबई फोर्टला एकूण आठ बुरुज होते. वर उल्लेख केलेल्या तीनही गेट्स्मधून
सूर्योदयाला फोर्टबाहेरील लोकांना व कर्मचाऱ्यांना आत येऊ दिले जाई.
दिवसभराच्या कामानंतर सूर्यास्त होण्यापूर्वी त्यांनी बाहेर जाणे आवश्यक
असे व सूर्यास्तास गेट्स् बंद केले जातात. कोणत्याही कारणाने कुणीही या
गेट्स्मधून छत्री उघडून अथवा पेटता कंदील हातात घेऊन जाणे हा गुन्हा मानला
जाई असा उल्लेख आहे!
मुख्य किल्ल्याच्या ईशान्य कोपऱ्याच्या उत्तरेस किल्ल्याबाहेर सैनिकांसाठी
सेंट जॉर्जेस् हॉस्पिटल बांधले होते. त्या हॉस्पिटलच्या भोवताली मूळ
फोर्टला जोडून इ. स. १७६९ मध्ये ‘फोर्ट जॉर्ज’ हा छोटा फोर्ट बांधला. येथे
याआधी डोंगरीचा किल्ला होता.
त्याच्या पूर्वेकडील भिंतीस लागूनच समुद्र होता व बोटी नांगरण्याची सोय
होती. मोठय़ा फोर्टमध्ये राहाणारे ब्रिटिश अधिकारी व त्यांचे कुटुंबीय,
परदेशी शत्रूचा हल्ला झाल्यास या छोटय़ा फोर्टमध्ये आश्रय घेतील व तेथून
पूर्वेकडील बोटींमधून पेण किंवा पनवेल येथे पेशव्यांच्या आश्रयास जातील अशी
योजना होती! मात्र तशी वेळ आली नाही. या फोर्ट जॉर्जच्या पूर्व भिंतीचा
थोडासा भाग आजही उभा आहे. (छायाचित्र पहावे). त्यात शासनाची कार्यालये
आहेत. तेथूनच मूळ किल्ल्यांत जाणारे भुयार आहे व ते स्वत: पाहिल्याचे मला
स्व. प्रमोद नवलकर (‘भटक्याची भ्रमंती’चे लेखक) यांनी सांगितले होते.
ब्रिटिश कुटुंबांच्या पलायन योजनेला या भुयाराने पुष्टीच मिळते.
सदर लेख लिहीत असताना, जनरल पोस्ट ऑफिसमध्ये एका भुयाराचा दरवाजा
सापडल्याची बातमी वाचली. हा सेंट जॉर्ज फोर्टमधील भुयाराचा दुसरा दरवाजा
असला पाहिजे.
सेंट जॉर्ज फोर्ट हरवलाय सरकारी कार्यालयात! - Navshakti
मुंबईचा गतइतिहास जपायचा असेल, त्याचे संवर्धन करायचे असेल तर ‘सेंट जॉर्ज किल्ल्या’चे पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे कार्यालय म्हणून नव्हे तर‘ सेंट जॉर्ज किल्ला’ म्हणूनच अस्तित्व राहायला हवे. हा किल्ला म्हणूनच नावारुपाला आणल्यास त्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकेल व त्याकडे देशीविदेशी पर्यटकांचा ओढा वाढेल हे नक्की !
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून बाहेर पडून पूर्वेच्या दिशेने काही पावले चालत गेल्यावर सेंट जॉर्ज रुग्णालय लागते. या रुग्णालयाच्या आवारात पोहोचल्यावर उत्तरेच्या दिशेला पुन्हा काही पावले चालत गेल्यावर एक छोटासा गडद निळ्या रंगाचा फलक आपल्या दृष्टीस पडतो. या फलकावर नजर टाकल्यास आतील बाजूस एकेकाळच्या मुंबई इलाख्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे काही अवशेष असतील याची कोणतीच खूणगाठ बांधता येत नाही. या फलकाजवळ असलेले लोखंडी गेट उघडून आत गेले की उत्तर दिशेला एकेकाळच्या ‘सेंट जॉर्ज फोर्ट’चे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. सेंट जॉर्ज किल्ला हा ‘राज्य संरक्षित स्मारक’ असून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या ताब्यात आहे. या उरल्यासुरल्या किल्ल्याचा वापर आता याच पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे कार्यालय म्हणून केला जात आहे. या ठिकाणी विभागाचे 22-25 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
सेंट जॉर्ज किल्ल्याकडे जाणार्या मार्गावर ‘पुढे किल्ला आहे’ असे दर्शविणारा कोणताही फलक नाही. आत गेल्यावर टिपिकल सरकारी कार्यालय बघायला मिळते. त्यामुळे मुंबईच्या सेंट जॉर्ज फोर्टकडे कुणी चुकूनही फिरकत नाही. एखादा जिज्ञासू पर्यटक किल्ला पाहण्यासाठी अथवा माहिती घेण्यासाठी आलाच तर तेथील किल्ल्याची अवस्था पाहून त्याचा पुरता हिरमोड झाल्याशिवाय राहत नाही. ज्या ठिकाणी सेंट जॉर्ज किल्ल्याचे कोठार होते, तिथे आता सरकारी कार्यालय थाटण्यात आले आहे. मूळ किल्ल्याच्या दगडी भिंतीवर प्लायवूड डकवण्यात आले आहे. कार्यालयासाठी आवश्यक असलेली टेबले, खुर्च्या, एसी, पंखे, कपाटे, फाईली यांचे ढिगारेच किल्ल्याच्या कोठारात रचण्यात आले आहेत. त्यामुळे मूळ किल्ल्याचे अस्तित्वच पुसले जाऊन त्या ठिकाणी सरकारी कार्यालयाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. अवघ्या वीस-पंचवीस अधिकारी-कर्मचार्यांच्या कार्यालयीन सोयीसाठी मुंबईच्या या ‘फोर्ट’ची आहुती देऊन किल्ल्याच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यात आला आहे.
मुंबईच्या इतिहासाचे मूक साक्षीदार असलेल्या बॉम्बे कॅसल, सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, धारावी, माहीम, सायन, वर्सोवा यासारख्या किल्ल्यांनी या एकेकाळी सात बेटांच्या या शहराचे गतवैभव जपले व समृध्द केले. मात्र, मुंबईच्या सेंट जॉर्ज किल्ल्याचे चक्क सरकारी कार्यालयात रुपांतर झाल्याने मूळ किल्ल्याचे अस्तित्वच पुसले गेले आहे. मुंबईचा ‘फोर्ट’ विभाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सेंट जॉर्ज रुग्णालय, रिझर्व्ह बँक, हुतात्मा चौक हा परिसर आजही ओळखला जात आहे. पण, या ‘फोर्ट’मधील फोर्ट-किल्ला नेमका कुठे आहे असा प्रश्न विचारला तर अनेकांना तो ठामपणे कुठे आहे, हे सांगता येणार नाही. कारण, ‘फोर्ट’मधील ‘फोर्ट’चे अस्तित्त्व केवळ नावापुरतेच उरले आहे. ‘सेंट जॉर्ज किल्ला’च सरकारी कार्यालयात हरवला आहे….
मुंबईच्या गतइतिहासाची साक्ष देणारा सेंट जॉर्ज फोर्ट सध्याच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारातच आहे. राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत सेंट जॉर्ज किल्ल्याचा समावेश आहे. हा किल्ला एकेकाळी जेव्हा अस्तित्वात होता, तेव्हा त्याचे उत्तरेकडील टोक आताच्या मस्जिद परिसरात होते. हा किल्ला आज पूर्ण स्वरुपात अस्तित्वात नसला तरी या किल्ल्याच्या भिंती पोर्जुगीज धाटणीप्रमाणे उताराच्या होत्या. या किल्ल्यात गोलाकार कमानींनी व तळघरांनीयुक्त अशा वास्तू होत्या. हा किल्ला ब्रिटिशांकरिता व तोही संकटकाळातील उपाययोजना म्हणून बांधला गेला होता.
नेपोलियनच्या पतनानंतर ब्रिटिशांना महत्त्वाचा असा एकही सागरी शत्रू उरला नाही. 1818ला पेशवाई बुडाल्यानंतर मुंबईत स्वसंरक्षणासाठी तटबंद्या ठेवण्याचीही ब्रिटिशांना गरज उरली नाही. म्हणून 1862 ते 65 या काळात सर बार्टर फ्रियर याने सेंट जॉर्ज किल्ल्याचा काही भाग पाडून टाकला. मुंबईच्या बंदर व रेल्वे विकासासाठी या भागात अनेक बदल घडविण्यात आले. सेंट जॉर्ज किल्ल्याच्या आवारात सेंट जॉर्ज रुग्णालय उभे राहिले.
या सगळ्या घडामोडीतही सेंट जॉर्ज किल्ल्यातील दारुगोळ्याच्या कोठाराची इमारत टिकून राहिली ती इमारत म्हणजे सेंट जॉर्ज किल्ला म्हणून आजही ओळखली जाते. ही इमारत तिच्या मूळ स्वरुपात शाबूत आहे. सेंट जॉर्ज किल्ल्याची ही वास्तू दक्षिणाभिमुख आहे. मधोमध दारुगोळा साठवण्याचे दालन आहे. या दालनांच्या पूर्व, पश्चिम व दक्षिणेला मार्गिका आहेत. उत्तरेकडे एक छोटी खोली आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या बाहेरच्या दगडी भिंती उताराच्या आहेत. कोठाराच्या मुख्य दालनाच्या बाजूला मार्गिकांचे छत अर्धअंडाकृती आकाराचे आहे. या मार्गिकांच्या व उत्तरेकडील खोलीच्या बाहेरच्या अंगाला वैशिष्ट्यपूर्ण गोळीबार गवाक्षे व वातायने आहेत. किल्ल्यातील पश्चिम व दक्षिण मार्गिकांखाली तळघर आहे. या तळघराचा पुढचा मार्ग बुजून गेल्याने त्याचा वापर नेमका कशासाठी होत होता, याचे कुतुहल आजही कायम आहे. या दणकट व अभेद्य इमारतीला वायुविजनाची अतिशय समर्पक अशी व्यवस्था आहे. त्यामुळे आतील वातावरण हिवाळ्यात उबदार तर उन्हाळ्यात थंडगार राहत आहे. वास्तूच्या अंतर्भागातील तापमान सुसह्य ठेवण्याची ही पध्दत वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच ठरावा. या कार्यालयाच्या आतील भागात जमिनीलगत एक लाकडी दरवाजा आहे. हा दरवाजा वरच्या दिशेने उघडला की आत एक भुयारी मार्ग पाहायला मिळतो. या भुयारी मार्गात उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी आहे. भुयारी मार्गात पाणी असल्याने तिथे उतरून जाण्याचे धाडस कुणी करीत नाही.
सेंट जॉर्ज किल्ल्याचा आतून व बाहेरून फेरफटका मारला असता तेथील अनेक बाबी खटकल्या. मुळात हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक असेल तर मूळ किल्ल्याचे जतन व संवर्धन करून तो देशविदेशी पर्यटकांसाठी खुला करण्याचे मुख्य कर्तव्य व जबाबदारी राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाची आहे. तथापि, या संचालनालयालाच आपल्या कर्तव्याचा व जबाबदारीचा विसर पडला आहे असे खेदाने नमूद करावे लागेल.
मुंबईच्या सेंट जॉर्ज फोर्टचे उरलेसुरले अवशेषही कार्यालयाच्या अडगळीने काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या किल्ल्याचे अशाप्रकारे अस्तित्वच पुसण्याचे प्रयत्न झाल्याने त्याकडे देशविदेशी पर्यटकांनी अक्षरश: पाठ फिरवली आहे. फोर्टच्या पूर्वेकडील बाजूस पी डिमेलो रोड आहे. त्याला खेटूनच सेंट जॉर्ज किल्ल्याच्या कोठाराची गवाक्षे व वातायने आहेत. या गवाक्षे व वातायने असलेल्या दगडी भिंतीला सध्या झाडा-झुडपांनी वेढले आहे. या दगडी भिंतीवर एकेकाळचा मुंबईच्या सेंट जॉर्ज किल्ल्याचा हा भाग आहे असे काहीही लिहिलेले नाही. या भिंतीवर राज्य संरक्षित स्मारक ठळकपणे लिहिले गेल्यास या मार्गावरून ये-जा करणार्या शेकडो प्रवाशांना मुंबईच्या या किल्ल्याचे ओझरते तरी दर्शन घडेल. मुख्य म्हणजे ही केवळ दगडी भिंत नव्हे तर एकेकाळचा मुंबईचा सेंट जॉर्ज किल्ला आहे एवढी तरी ओळख अधोरेखित होईल हे नक्की ! मुंबईचा गतइतिहास जपायचा असेल, त्याचे संवर्धन करायचे असेल तर ‘सेंट जॉर्ज किल्ल्या’चे पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे कार्यालय म्हणून नव्हे तर तो सेंट जॉर्ज किल्ला म्हणूनच अस्तित्व राहायला हवे. हा किल्ला म्हणूनच नावारुपाला आणल्यास त्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकेल व त्याकडे देशीविदेशी पर्यटकांचा ओढा वाढेल हे नक्की !
पुनश्च मराठा प्रभाव!
१८१८ मध्ये पेशव्यांचा पाडाव झाला. त्यामुळे ब्रिटिशांना प्रबळ शत्रू उरला
नाही. शिवाय मुंबईतील व्यापार व तिचे महत्त्व वाढत होते, त्यामुळे वस्ती
पसरण्याची आवश्यकता होती. १८५५ मध्ये अपोलो गेटचा काही भाग व फोर्टची थोडी
तटबंदी पाडली. पण १८६२ ला नियुक्ती झालेल्या सर बार्टल फ्रियर यांनी हुकूम
दिला व १८६५ नंतर १८६७ पर्यंत फोर्टच्या सर्व तटबंदी पाडून सर्व खंदक
बुजवून टाकले, तसेच नवे रस्ते तयार करून पूर्वीचे रस्ते रुंद करून शहराचे
रूप बदलण्यास सुरुवात झाली. पूर्वी जेथे चर्चगेट उभा होता तेथेच १८६७ नंतर
सुंदर ‘फ्रियर फाऊंटन’ उभारले, आता त्याचे नांव ‘फ्लोरा फाउंटन’ असे आहे.
(नकाशा व छायाचित्र पाहावे)

ब्रिटिशांनी तयार केलेल्या ‘प्लॅन ऑफ फोर्ट अँड एस्प्लनेड ऑफ बॉम्बे,
१८२७’ चा संदर्भ घेऊन, माझ्याकडील १९४२ ची मुंबई दाखवणाऱ्या नकाशावर मुंबई
फोर्टचे अंदाजे अध्यारोपण केले आहे. ते पाहताना पूर्वीची मुंबई आणि नंतरची
मुंबई यात हरवून जायला होते! तेव्हाच्या मुंबईची वर्णने म्हणजे सुरस आणि
चमत्कारिक कथाच आहेत! फक्त या सुरस कथा ऐकण्यासाठी आणि मुंबईची ‘मुंबई नगरी
बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका’ ही पठ्ठे बापूरावांनी केलेली स्तुती
ऐकून, कल्पनेने तेव्हाच्या मुंबईची दृश्ये नजरेसमोर आणण्यासाठी, आजच्या
मुंबईभक्त वाचकांना वेळ पाहिजे!
'सेंट जॉर्ज हॉस्पिटल' हे नाव कसं पडलं?
सीएसटीएम स्टेशनच्या मागच्या बाजूला ब्रिटिशांनी बांधलेल्या वाढीव तटबंदीचा भाग अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. या वाढीव बांधकामाला ब्रिटिशांनी नाव दिलं 'फोर्ट सेंट जॉर्ज'. सध्याचं सेंट जॉर्ज हॉस्पिटल याच भागावर उभारण्यात आलं. त्यामुळे त्याला 'सेंट जॉर्ज' असं नांव दिलं गेलं.
चर्चगेट
चर्चगेट हा त्यावेळचा मुख्य दरवाजा होता. सध्याच्या फ्लोरा फाऊंटनसमोर तो उभारण्यात आला होता.
शाहू छत्रपतींना घाबरून मुंबईभोवती बांधले ‘मराठा डीच’

1739 साली मराठ्यांनी वसईवर विजय मिळवला आणि पोर्तुगिजांच्या वसाहतीमधील महत्त्वाचा किल्ला ताब्यात घेतला. वसई आणि परिसराचा पाडाव झाल्यावर मराठे मुंबईकडे सरकतील या भितीने इंग्रजांनी आपल्या किल्ल्याचे संरक्षण वाढवण्याची तयारी सुरु केली. त्यांनी किल्ल्याच्या भोवती खंदक खोदायला सुरुवात केली. या खंदकाच्या कामासाठी शहरातील धनाढ्यांनी आर्थिक मदत केली होती. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केलेले मुंबईतले ते पहिले काम असावे. त्यानंतर किल्ल्यापासून थोडी लांब अशी मोकळी जागा ठेवण्यात आली. ज्याला एस्प्लनेड म्हटलं जातं. मराठे चाल करुन आलेच तर त्यांना थांबवण्यासाठी, मारण्यासाठी या जागेचा वापर करता येईल, ते बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यात येतील असा विचार करण्यात आला होता.
सध्याच्या दक्षिण मुंबईच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्याच्यामध्ये हा मराठा डीच खंदक होता
नंतर कोणताही प्रबळ शत्रू न राहिल्याने आणि मुंबई च्या विस्तारासाठी इंग्रजांनी फोर्ट च्या भिंती , चर्चगेट पाडून टाकले आणि मराठा डीच सुद्धा बुजवून टाकला.
मराठ्यांच्या धाकामुळे तत्कालीन सुरत,मुंबई,कोलकाता यांसारखी धनाढ्य व्यापारी शहरे दहशतीखाली असत.कित्येकदा कान्होजी आंग्रे यांनी इंग्रजांची जहाजे लुटली,इंग्रज अधिकारी ओलीस ठेवले,वेळोवेळी त्यांना पराभूत केले.स्वतः शाहू छत्रपती यांनी कान्होजी आंग्रे यांचा त्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे सत्कार केला होता.
मराठ्यांच्या आरमाराची हीच काय ती ताकद आणि दहशत..!!










No comments:
Post a Comment