सर्वसामान्य पर्यटक असो कि नियमित दुर्गभटके या सर्वांपासून दुर्लक्षित आणि अज्ञात असे काही किल्ले महाराष्ट्रात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सदानंदगड त्यापैकी एक. हा किल्ला रामगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर आहे. १९८६ साला पर्यंत सदानंदगडाची माहिती कोणालाही नव्हती. आजही या दुर्लक्षीत किल्ल्याची माहिती अनेकांना नाही. सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही.
फोंडा घाटात उगम पावणारी आचरा नदी साधारण ६० कि.मी.प्रवास करत आचरा येथे अरबी समुद्राला मिळते. समुद्रापासून साधारण ३५ कि.मी.आत आचरा नदीकाठी असलेले साळशी गाव मध्ययुगीन काळात बंदर म्हणुन प्रसिध्द होते. बंदराहुन घाटावर जाण्यासाठी फोंडाघाट हा जवळचा घाटमार्ग होता. या साळशी गावामागे असलेल्या झाडीभरल्या टेकडीवर सदानंदगड नावाचा अपरीचीत व दुर्लक्षीत किल्ला आहे. या गावाचा कागद पत्रातून ‘ साळशी महाल ‘ असा इतिहासमध्ये उल्लेख पण आहे. ८४ गाव अधिपत्या खाली असल्याने मुख्य गाव म्हणून साळशी गाव महत्व प्राप्त झालेइतिहासाच्या पानात साळशी व सदानंदगड नावाने क्वचित आढळणारा हा किल्ला अलीकडील काळापर्यंत कोणाला माहीत नव्हता. आजही या किल्ल्याची माहिती अनेकांना नाही. ब्रिटीश गॅझेटीयरमध्ये देखील या किल्ल्याची नोंद दिसुन येत नाही.

रामगडमधून एक रस्ता शिरगावकडे जातो. या मार्गावर गोठणे, सांडवे, कुवळे अशी गावे लागतात या मार्गावर एस.टी. बसेस मर्यादीतच आहेत. स्वत:चे वाहन सोयीचे पडते.सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही. याशिवाय मुंबई गोवा मार्ग याने तळेरे – कणकवली नांदगाव असे येता येईल. गड पायथ्याचे साळशी गाव २०कि . मी .अंतरावर आहे ( नांदगाव -शिरगाव – साळशी ) मिळेल त्या वाहनाने साळशी गाठावे.साळशी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव कणकवली पासुन २० कि.मी.अंतरावर असुन साळशी व अलीकडील कुवळे गावातुन गडावर जाण्यासाठी वाटा आहेत. रामगड ते कुवळे हि वाट अतिशय निसर्गरम्य आहे.या वाटेने कुवळे गावात आपण केव्हा दाखल होतो ते आपणास समजत नाही. कुवळे हे कोकणातील ईतर गावाप्रमाणेच वाड्यांनी बनलेले आहे.या मार्गावर एस.टी. सेवा मर्यादीत असल्याने स्वत:चे वाहन सोयीचे पडते. साळशी व कुवळे या दोन्ही वाटांनी गडावर जाण्यासाठी साधारण एक तास लागतो. गडावर असलेल्या दाट झाडीमुळे वाट चुकण्याची शक्यता असल्याने सोबत वाटाड्या असणे गरजेचे आहे.
आपण कुवळे गावातून जाणार्या वाटेची माहिती घेउ. कुवळे गावात प्रवेश केल्यावर डावीकडे बौद्घवाडीकडे जाणारी वाट आहे तर उजव्या हाताची वाट एका चार-पाच घरांच्या वस्तीकडे जाते.यातील एका घराजवळची वाट पठारावर चढते.या वाटेने वीस-पंचवीस मिनीटात आपण कातळकोरीव पायर्याजवळ येतो.या पायर्या प्राचीन आहेत असे लक्षात येते.मात्र गावातील लोकांना या गडाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही.त्यांच्या मते या पायर्या वरच्या पठारावरुन पलीकडे जाण्यासाठी कोरल्या आहेत.कुवळेगावाच्या पुढे सदानंदगडाचा डोंगर आहे. पुर्णपणे झाडीने झाकल्यामुळे त्याचे गडपणही हरवून गेले आहे. इथून आपण वरच्या बौध्द वाडीजवळ येतो. इथून कच्च्या रस्त्याने अर्धा तास चाललयानंतर मोठा रस्ता संपतो व पायवाट सुरु होते.या वाटेने सडे देवीच्या डोंगराजवळ कातळात खोदलेल्या रुंद पायर्याजवळ येउन पोहचतो. या पायर्या वरच्या पठारावर घेउन जातात.वर कुकटबाव नावाची विहीर असून या विहीरीला आत उतरायला पायर्या आहेत.
या बावेत बारमाही पाणी असते.दुसर्या विहीरीत मात्र पाणी नसते. अर्थात हा सर्व परिसर म्हणजे किल्ला नव्हे.कुवळे गावातून आणखी एका पठारावर संदानंदगड आहे.पण गावकरी गैरसमजाने या सडे डोंगरावर जाण्यास सांगतात. सदानंदगडाच्या पश्चिम पायथ्याशी कुवळे गाव तर उत्तर पायथ्याला साळशी गाव आहे.सदानंदगडावर चढण्यासाठी कुवळे गावातून रस्त्याने उतरत नदी किनार्याने वाडीत जायचे.विशेष म्हणजे कोकणातील नदी असूनही आचरा नदीला एन उन्हाळ्यातही पाणी असते.पुढे जांभ्या दगडात बांधलेल्या पायर्या दिसतात्,त्याने चढ्त राहीले कि पायवाट लागते.आडव्या येणार्या ढोरवाटा सोडायच्या आणि सरळ चालत रहायचे.
दहा मिनीटात आपण गडाच्या कातळकोरीव पायर्याशी पोहचतो.या रुंद पायर्या चढून गडमाथ्यावर यायचे.गडाच्या प्रवेशद्वाराचे तुरळक अवशेष दिसतात. 

तटबंदीही थोडीफार तुटक तुटक दिसते.गडावरील तटबंदी व इतर वास्तू कालौघात नष्ट झाल्याचे आढळते. मात्र बालेकिल्ल्यावर पाण्याच्या दोन विहीरी आहेत. त्यात दगडमाती पडल्याने त्याही बुजत चालल्या आहेत.पहिली विहीर लगेचच दिसते.साधारण वीस फुट लांब्,रुंद अशी हि विहीर पंचवीस फुटाच्या आसपास खोल होती.इथुन दहा मिनीटाच्या अंतरावर दुसरी विहीर आहे.हि विहीरही मोठी आहे.मात्र या विहीरीतही पाणी नाही.
त्यामुळे गडावर जाताना पुरेसे पाणी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
जवळच एक गुहा असून आतमध्ये गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
गडाच्या उत्तर टोकावर काही चौथरे बांधले आहेत.गडावर मानवी वावर फारसा नाही,अस्ताव्यस्त पसरलेले पठार आणि दाट झाडी यामुळे ईथे बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर आहे.कुवळे गावाकडून चढून साळशी गावाकडे उतरता येईल.
गडाच्या उत्तर बाजुलासुध्दा कातळकोरीव पायर्या आहेत्,त्याने साळशी गावात उतरता येईल.गडाच्या या बाजुला मुख्य दरवाजा होता जो नष्ट झाला आहे.ईथली तटबंदी देखील नष्ट झाली आहे.
तटबंदीतील एका कोनाड्यात 'दुरुचा चाळा' हा दगड रुपातील देव आहे.दुर्लक्षित अशा या दुर्गावर सध्या "मावळे आम्ही स्वराज्याचे संघ" हि संघटना दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहे.त्यांचा संपर्क क्रमांक 082862 17176. या संघटनेने अतिशय उत्तम कार्य केले आहे.गडावरचा तलाव आणि विहीरीची स्वच्छता, दरवाज्याची साफसफाई यात शक्य ते संवर्धनाचे कार्य केले आहे.त्यांनी केलेल्या कार्याचे फोटो बघता येतील.
सदानंदगडासारख्या उपेक्षीत किल्ल्याची भ्रमंती येथील निसर्गरम्य परिसरामुळे आपल्याला वेगळाच आनंद देवून जातो.
अतिशय अनवट या किल्ल्याला इतिहास मात्र आहे. साळशी गावात पावणाई व सिद्धेश्वर हि दोन सुंदर मंदिरे असुन पावणाई मंदिराच्या आवारात दोन उलट पुरलेल्या तोफा पहायला मिळतात. मंदीर परिसरात मोठया प्रमाणात नवीन जुन्या समाधी दिसुन येतात. साळशी हे प्रमुख शहर व व्यापार पेठ असल्याने साळशी गावामागे असलेल्या डोंगरावर करवीरकर संभाजीराजे यांनी १७३० मध्ये सदानंदगड बांधला अथवा याची पुनर्बांधणी केली असावी. सन १७१२ मधील एका कैफियतीत "दाभोळ वेंगुर्ले सोबत साळशी बंदर विजापुरच्या ताब्यात होता" असे म्हणले आहे. आदिलशाही काळात १५७० साली साळशीचा ठाणेदार खान असल्याचा उल्लेख येतो. त्यानंतर आदिलशाही सरदेशमुख जानातराव यांच्या ताब्यात असलेला साळशी महाल इ.स. १६६१ ते ६४ दरम्यान मराठयांच्या ताब्यात आला. त्यानंतर १६८५ दरम्यान सरदार चंद्राजी घाटगे यांनी साळशी गावातील देवस्थानाला सनद दिल्याचा उल्लेख येतो. राजाराम महाराजांच्या काळात एप्रिल १६९३ मध्ये साळशीची सरदेशमुखी रामचंद्रपंत अमात्य यांना देण्यात आली. सन १७०७ मधील मराठा राज्याच्या वाटणीनंतर सावंत करवीरकराना सामील झाले पण शाहु महाराजांना आपण त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत त्यांच्याकडून साळशी महालाचे अर्धे उत्पन्न वसुलीची सनद घेतली. आंग्रे व सावंत यांच्यात असलेला वादात या साळशी गावाच्या उत्पन्नावरुन कटकट निर्माण झाली.चकमकी होउ लागल्या.एकमेकांचे लोक कैद करण्यात आले.तेव्हा सावंतांच्या तक्रारीवरुन शाहु राजेंनी कान्होजी आंग्रे यांना ११ मार्च १७२४ रोजी लिहीले "तुमचा त्यांचा ( सावंतांचा ) एक्यभाव करावा.तुम्ही त्यांचे मुलुखास उपद्रव न द्यावा,त्यांनी तुमच्या प्रातांत धामधुम न करावी.सालसी येथील निमे एवज तुम्ही घ्यावा निमे त्यांनी घ्यावा असा सिध्दांत करुन तुम्हास आज्ञापत्र पाठविले वर रघुनाथ हरी बरोबर स्वमुखे आज्ञा सांगून पाठविली.त्यावरुन तुम्ही मान्य केले.त्यांनीही मान्य करुन मुलुखात उपद्रव करीत होते तो राहिवला."
"असे असता सांप्रत सालसी महाली तुम्हाकडील धामधुम होते.एसास स्वामीनी तह करुन दिला आहे.त्याप्रमाणे वर्तणुक करणे,तुम्ही त्याच्या मुलुखास उपद्रव न देणे ते तुमच्या मुलुकास उपद्रव करणार नाही.सालसी महालाचा एवज आपले कारकून ठेवून निमेनिमेप्रमाणे येणे.पुढे त्यांच्या तुमचा हर्षमर्ष न वाढे तो अर्थ करणे. जेणे करुन मुलुकाची आबादानी होय.स्वत सुखी राहे ते गोष्टी करणे"
अश्या रितीने साळशी गावातून आंग्रे व सावंत निम्मे निम्मे उत्पन्न घेउ लागले. २३ एप्रिल १७३१ रोजी झालेल्या वारणेच्या तहानुसार साळशी ते अंकोलेपर्यंतचा प्रदेश करवीर करांच्या ताब्यात आला. अर्थात तहानुसार साळशी महाल करवीरकरांकडे आला तरी तसाही तो त्यांचे चाकर सावंताकडे होताच. मात्र तहापुर्वीच साळशी महाल करवीरकर संभाजी राजे यांनी सावंताकडून ताब्यात घेतला व या काळातच साळशीच्या संरक्षणासाठी जवळच्या पठारावर सदानंदगड बांधला गेला.कदाचित आधीच अस्तित्वात असलेल्या गडाची पुनर्बांधणी केली असेल.सन १७३२ साली सदानंदगडाचे बांधकाम पुर्ण झाले.
याचा उल्लेख संभाजी राजे यांनी ५ सप्टेंबर १७३२ रोजी घोणसरीचे गावकरी व मिरासींना लिहीलेल्या पत्रात सदानंदगडाच्या बांधणीचा उल्लेख असा केला आहे "किले सदानंदगड नवा वसवला आहे.त्याचे बेगमी बध्दल मौजे घोणसरी पेशजीच्या मुकासी याकडून दुर करुन हाली किल्ले सदानंदगडाकडे मुकासा दिल्हा असे".
तसेच तालुका सौंदलमधून गावगन्ना पट्टी बसवून एक हजार रुपये सदानंदगडाच्या बेगमीस लावून दिल्याबध्दल संभाजी राजेंनी सौंदलच्या देसाई व कुलकर्णी यांना पाठविलेल्या आज्ञापत्रात उल्लेख असा "किले सदानंदगड नवा वसवून तेथे राजश्री गोपाल रामराव मुतालिक दिमत अमात्य यांस ठेविले आहेत.तेथील बेगमी जाली पाहिजे" तसेच तर्फ साळशी मधील आरे,एनल्,तोंडवळी इत्यादी गावचा वसूल सदानंदगडाच्या तनख्याकरिता पाठवीत जाणेबध्दल व दुसरीकडे एक रुका वसुल न देणेबध्दल आज्ञा दिली होती.व खारेपाटण तालुक्यातून हजार रुपये वसुल करुन गडाकडे पाटविणंयास सांगितले होते.तसेच गोपाळ रामराव यांना सांगितले कि गडाच्या वसुली करताना रांगणाच्या तनख्येसाठी नेमलेल्या गावांना उपसर्ग देउ नये.
करवीरकरांनी साळशी महाल ताब्यात घेउन तिथे सदानंदगड बांधल्यामुळे सावंतांची मात्र अडचण झाली.कारण जरी सावंत करवीरकरांचे नोकर असले तरी ते नेहमी करवीरकरांच्या मुलुखावर हल्ला करित.इ.स.१७३२ साली फोंड सावंतानी सदानंदगडावर हल्ला केला पण संभाजी राजेंनी भगवंतराव आमात्यांना आज्ञा देउन सावंताना रोखण्यास सांगितले. अमात्यांचे सरदार गोपाळ रामराव यांचे सैन्य आल्याने सावंतानी माघार घेतली. सदानंदगडाच्या पायथ्याचा साळशी महाल समृध्द असताना गडाला मुलुख म्हणून लांबवरचा घोणसरी व फोंडाघाट का जोडला हा प्रश्नच पडतो.या परिसरात शिवगड आहेच.कदाचित सावंत व आंग्रे यांना साळशी महालाचे उत्पन्न निम्मे निम्मे वाटून घेण्यास सांगितले म्हणून अधिकचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून असे केले असावे हि एक शक्यता.
विजयदुर्गच्या साक्षीने तुळाजी आंग्रेना बुडवून नानासाहेब पेशव्यांनी त्याला कैदेत टाकलयावर साळशीवरील आंग्रेंची सत्ता संपुष्टात आली.इ.स.१७५६ मधील तुळाजी आंग्रे यांच्या पराभवानंतर त्याच्या अमलाखालील साळशीचे अर्धे वतन पेशव्यांच्या ताब्यात आले पण करवीरकरांचा निम्मा हक्क अबाधित होता.त्यांनी तो सिंधुदुर्गास जोडला होता.सन १७६५-६६ च्या पत्रात उल्लेख असा "इंग्रजांतर्फे मालवणाकडील ( यावेळी इंग्रजांनी सिंधुदुर्ग ताब्यात घेतला होता ) सदाशिव नारायण यांजकडून साळशी महाला उपद्रव जाहला.सबब त्यास कैद करुन ठेवले आहे.त्यास सोडून साळशी महालाचा मालवण तर्फेचा हिस्सा चालत आहेत.त्याप्रमाणे मालवणास देत जाणे.इंग्रजांचा व सरकारचा ( पेशवे ) घरोबा.सबब सोडणे लागणे".
लवकरच सावंतानी हा प्रदेश ताब्यात घेतला. इ.स.१७८५ साली पेशवे व करवीरकर यांच्या संयुक्त स्वारीत सावंतांचा पराभव झाला व साळशी महाल पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८०५ साली चिटकोपंत हे पेशव्यांचे साळशी येथील अमंलदार होते. इ.स.१८१८ साली साळशी महाल इंग्रजांच्या ताब्यात आला.मात्र यासुमारास सदानंदगड बहुधा पुर्णपणे बेवसावू झाला असावा,करण त्याचा कोठेच उल्लेख मिळत नाही.अगदी इंग्रजांनी लिहीलेल्या गॅझेटियरमध्येही सदानंदगडाचा उल्लेख नाही.अश्याप्रकारे सदानंदगडावरील आनंद संपुन तो विजनवासात गेला तो आजअखेर.
सदानंदगडावर आज पहाण्यासारखे अवशेष फारसे उरले नसले तरी या परिसरात भेट द्यावी अशी दोन ठिकाणे नक्की आहेत.एक म्हणजे आदिमानवाने काढलेले कातळचित्र आणि साळशी गावातील सिद्धेश्वर पावणाई मंदिर.
कातळशिल्पा उर्फ पेट्रोग्लिफ्स :-
आदिमानवाच्या पाऊलखुणा आता कोकणच्या माळरानावर सापडू लागल्या आहेत. देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावाचे यामुळे महत्व आणखी वाढले आहे. पुराणात सप्त पाताळांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे या ठिकाणी कैक वर्षांपासून प्रगत लोकवस्ती असल्याचे यामुळे समोर येत आहे. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
प्रागैतिहासिक काळातील संस्कृती?
कातळशिल्पाच्या माध्यमातून अधोरेखित झाली आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड असलेतरी विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे कोरली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात.
कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशी शिल्पे आढळून येत आहेत.मात्र, देवगडमधील साळशी गावाच्या माळरानावर सापडलेल्या कातळशिल्पा बरोबरच या गावाला ऐतिहासिक महत्व देखील आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होत. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखी वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडत, असल्याची माहिती संतोष गावकर यांनी दिली आहे. कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गावकर यांनी सांगितले. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. त्यामुळे या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो त्यामुळे यावर संशोधन होऊन साळशी गाव पर्यंटन दृष्ट्या जगाच्या नकाशावर येण्याची गरज आहे.
कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये यापूर्वी कातळशिल्प आढळली आहेत. साळशी गावातील युवकांना कातळशिल्प आढळली आहेत. आजूबाजूच्या कातळशिल्पांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचे आहे, असं प्रणव नाडनकर यांनी सांगितले. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
संत सिद्धेश्वर पावणाई देवस्थान :-
देवगड-निपाणी या मार्गावरील शिरगांव या मध्यवर्ती गावापासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या साळशी या निसर्गरम्य गावाच्या मध्यभागी प्राचीन कलाकुसरीची साक्ष देत उभ्या असलेल्या वास्तूमध्ये साळशीचे पुरातन प्रसिद्ध इनाम देवस्थान श्री संत सिद्धेश्वर पावणाई उभे आहे.खारेपाटणजवळच्या पियाळी नदीपासून कणकवली येथील गडनदीपर्यंत आणि सहय़ाद्री पायथ्याच्या कुंभवडे (ता. कणकवली) पासून ते आचरा, कुणकेश्वर, देवगड या अरबी समुद्रापर्यंतची ८४ खेडी तथा देवस्थाने साळशी येथील ‘श्री देव सिद्धेश्वर आणि श्री देवी पावणाई’ या देवस्थानांच्या अखत्यारीत असायची. त्यामुळे या देवस्थानाला चौ-यांशी खेडय़ांचा अधिपती म्हणून संबोधले जाते.
ही खेडी पुढीलप्रमाणे – वाघोबा (फोंडा), नवलादेवी (नरडवे), पावणाई (दिगवळे), रामेश्वर (नाटळ), दिर्बाई-रामेश्वर (भिरंवडे), गांगो-महालिंग (कुंभवडे), पावणादेवी (हरकुळ-खुर्द), गांगो (घोणसरी), गांगो (लोरे), गांगो (पियाळी), गांगो (मठ-खुर्द), रासाई-सईम (वाघेरी), अनभवणी-गांगो (डांमरे), रामेश्वर (कोंडये), रामेश्वर (करुळ), गांगो (हुंबरट), लिंग रामेश्वर (करंजे), लिंगेश्वर (साकेडी), नागेश्वर (नागवे), रामेश्वर-दिर्बादेवी (सांगवे), लिंगेश्वर (कणकवली), रामेश्वर (हरकुळ ब्रु.), गांगेश्वर (आशिये), कलेश्वर (कलमठ), लिंगेश्वर (जानवली), चंडिकादेवी (वरवडे), भगवती (पिसेकामते), टेवणादेवी (तरंदळे), रवळनाथ (बिडवाडी), नवलादेवी (गोठणे), रामेश्वर (बेळणे बु.), रामेश्वर (श्रावण), जयंती (पळसंब), महालक्ष्मी (आडवली), रामेश्वर (रामगड), गणपती (कोळली), भराडी (बांदिवडे), रवळनाथ (वायंगणी), वाघोबा (वाडीतोंडवली), गांगो (त्रिंबक), माऊली (चिंदर), रामेश्वर (आचरे), गांगो (पोयरे), गांगो (कुडोपी), मार्लेश्वर (बुधवळे), बोभडेश्वर (मठबुद्रुक), रामेश्वर (कुवळे), गांगो (भरणी), धावगीर (माईण), गांगो (सावडाव), पावणाई (बेळणे खुर्द), गांगो (तिवरे), गांगो (बावशी), रामेश्वर (तोंडवली), रामेश्वर (असलदे), गारडी-गांगो (कोळोशी), गांगो (हडपीड), रामेश्वर (नांदगांव), भैरी (ओटव), नागेश्वर (आयनल), गांगो (चाफेड), सिद्धेश्वर-पावणाई (साळशी), पावणाई (शिरगांव), नवलाई (ओंबळ), गांगो (शेवरे), महादेव (वळिवंडे), ब्राह्मण (चांदोशी), पावणी (तळवडे), भावई (वरेरी), स्थानेश्वर (किंजवडे), आरेश्वर (आरे), भगवती (कोटकामते), महादेव (दहिबांव), गांगेश्वर (नारिंग्रे), भगवती (मुणगे), भैरी-काळभैरव (हिंदळे), रामेश्वर (मिठबांव), कुणकेश्वर (कुणकेश्वर), मुंबरेश्वर (मुंबरी), लक्ष्मी (इळये), संतपुरुष (दाभोळे), कवळादेवी(टेंबवली), दिर्बादेवी (जामसंडे), नारायण (मालडी).
तत्कालीन ‘साळस महाल’ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने मुख्य बाजारपेठही साळशी या ठिकाणी भरत असे. त्यावेळी या महालात दहा-पंधरा हजार लोकवस्तीचा समावेश होता. या महालात बारा बलुतेदार होते. मुख्य बाब म्हणजे या महालाच्या नावाने ओळखली जाणारी वजने, मापे आजही शाबूत आहेत. विशेषत: ‘साळशी पायली’ हा शब्दप्रयोग संपूर्ण जिल्हय़ात प्रचलीत आहे.

संपूर्ण साळशी गाव, येथील सदानंद गड आणि श्री देव सिद्धेश्वर-पावणाई देवस्थानांबाबत अनेक आख्यायिका आणि दंतकथा सांगितल्या जातात. सदानंद गडाचा इतिहास पाहता साळशी गाव इ. स. ७०० ते ९०० या सालात झाले असावे, कारण सदानंद गड इ. स. ११००च्या दरम्यान बांधला गेला असे उल्लेख सापडतात.
साळशी गावातील वयोवृद्ध जाणकार आणि या देवस्थानचे अभ्यासक अनंत गोविंद गांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इ. स. १५०० दरम्यान पैठण येथून मिराशी घराणे कोंकणात दाखल झाले. मिराशी घराण्याचे गांवकर आणि नाईक हे बंधू होत. या मिराशी घराण्याने आपली कुलदेवताही साळशी या ठिकाणी वसवली. स्वामी छत्रपती शंभूराजे यांनी हा गाव या देवतेस इनाम दिला. श्रीयुत अमात्य यांना कोल्हापूरच्या राजांनी बावड जहागिरी दिली. यावेळी हा पूर्ण साळस महाल अमात्य यांच्या ताब्यात गेला. भगवंतराव अमात्य यांनीही साळशी येथील श्री देव सिद्धेश्वर पावणाईला सनद दिली होती.
पेशवाई सन १८१८ मध्ये खालसा झाली. कोल्हापूरचे स्वामी छत्रपती शंभू राजे यांनी दिलेली सनद ग्राह्य मानून ब्रिटिश सरकारने ३० ऑगस्ट, १८६४ मध्ये ही सनद दिलेली आहे. ही सनद व्हिक्टोरिया राणीच्या वतीने त्यावेळच्या मुंबई इलाख्यातील गव्हर्नर इन कौन्सिल यांच्या हुकुमाने व त्यांच्या सहीनिशी देण्यात आलेली आहे.
शिरगांव येथून ‘साळशी’ गांवात प्रवेश करताच या देवस्थानच्या अनेक प्राचीन वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या प्राचीन वास्तूंमध्ये इनाम देवस्थान श्री देव सिद्धेश्वर व देवी पावणाई ही प्रमुख मंदिरे आहेत. श्री देव सिद्धेश्वर मंदिर भव्य असून या मंदिरात शिवाचे वाहन असलेल्या ‘नंदी’ याची महाकाय अशी दगडी मूर्ती आहे. या दगडी मूर्तीबाबत असे सांगण्यात येते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोणत्याही शिव मंदिरात एवढा मोठा नंदी पाहावयास मिळत नाही.

या मंदिरात शिवाची मोठी पिंडी असून गाभा-याच्या बाहेरील चौकात गणपती व अन्य मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या देवतेच्या पूजाविधीसाठी ब्राह्मण किंवा लिंगायत गुरव यांच्या व्यतिरिक्त कोणीही पूजारी म्हणून काम पाहत नाही. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे विजयादशमी याच दिवशी फक्त भाविकांना गाभा-यांपर्यंत प्रवेश मिळतो. अन्य वेळी बाहेरील चौकातून दर्शन घेता येते.
या देवस्थानातील सर्वात मोठे व प्राचीन कलाकुसरीने सजवलेले आकर्षक असे मंदिर म्हणजे श्री देवी पावणाई मातेचे मंदिर. या मंदिराचा गाभारा, तरंग भाग व भव्य सभामंडप असे प्रमुख भाग आहेत. गाभा-यात देवीची मूर्ती असून त्याचबरोबर शिव (बाबा), शक्ती काळकाय (कालिका माता) यांच्याही प्रतिमा आहेत. बहुधा देवीची मूर्ती राजस्थानी शिल्पांतील असावी असे गावातील वयोवृद्ध जाणकार सांगतात.
सभामंडपाच्या दरवाजातून देवीचे मनोहारी दर्शन घडते. या मूर्तीबाबत कोल्हापूर येथील श्री देवी अंबाबाईची मूर्ती, तुळजापूरची भवानी माता आणि या ठिकाणची श्री देवी पावणाई या तिन्ही मूर्तीच्या जडणघडणीत साम्य आढळते. श्री देवी पावणाईची मूर्ती मात्र गावांतील कारागिराने घडविली असल्याचे गावातील जाणकारांचे मत आहे.
श्री देवी पावणाईचे हे प्राचीन मंदिर प्रचंड असून लाकडी खांबांनी तोललेली तक्तपोशी आहे. प्रत्येक खांबाचा वरचा निम्मा भाग कोरीव, नक्षीकामयुक्त आहे. तसेच दरवाजाच्या चौकटीवरही कलाकुसर लक्ष वेधून घेते. श्री देवी पावणाई व श्री देव सिद्धेश्वर या दोन्ही देवालयांत सततचा नंदादीप तेवत असतो व अंध:कार नाहीसा करण्याचा संदेशच तो देत असतो.
तत्कालीन ‘साळस महाला’तील व आताच्या देवगड, कणकवली व मालवण तालुक्यातील चौ-यांशी खेडय़ातील भाविक आपल्या शुभ कार्याप्रसंगी तसेच सण समारंभावेळी या देवीला श्रीफळ ठेवून अभय मागतात. पूर्वी या मंदिरात गावाचे न्याय होत होते. श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तसेच मधला भाग चि-यांनी फरसबंद केला आहे. या प्रशस्त आवारातून या देवीची पालखी फिरते. तसेच दोन्ही मंदिरांच्या एका बाजूला प्राचीन शिल्पांची आठवण करून देणा-या भव्य दीपमाळा व प्रशस्त तुळशीवृंदावने आहेत.
यात्रेकरूंसाठी धर्मशाळाही अस्तित्वात आहे. याच धर्मशाळेजवळ पुरातन दोन ऐतिहासिक तोफाही उभ्या असल्याची साक्ष देतात. तसेच पराक्रमी पुरुषांच्या स्मृतिप्रित्यर्थ छोटी-मोठी स्मारकेही आहेत. धार्मिक कार्याप्रसंगी त्या स्थानांना वेगवेगळय़ा प्रकारे महत्त्व देण्यात येते. तसेच श्री देव रवळनाथ व श्री देवनाथ ही दोन नाथ संप्रदायातील मंदिरेही आढळतात. गावाच्या परिसरात जैन सांप्रदायातील मंदिरेही आहेत.
पूर्वी जैन लोकांची वस्ती या भागात होती असे सांगितले जाते. या मंदिर परिसरात जैन मूर्ती येथेही आढळतात. तळखंबा-वशिक, गांगो, इटलाई, बाणकी देवी, धुरी ब्राह्मण देव, बांदा ब्राह्मण देव, सत्पुरुष ठिकाण, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, श्री देव वटेश्वर अशी लहान-मोठी मंदिरे या परिसरात आहेत. त्या त्या ठिकाणचे मानकरी त्या त्या देवांची पूजा-अर्चा करतात.
श्री देव सिद्धेश्वर आणि श्री देवी पावणाई देवस्थानचा विजयादशमी उत्सव इतिहास कालीन राजवैभवाच्या थाटात पार पडतो. घडशीवादनांसाठी नाशिकहून धुमाळ खास उपस्थित असतात. वाद्यांच्या गजरात निशाणे, मशाली, पालखी, चौरवी, तरंग, भालदार, चौपदारांसह भाविकांचा प्रचंड लवाजमा सिमोल्लंघनासाठी अरुंद चढणीतून जातो व सोन्याची लयलूट करून परततो. ही एक आनंदाची पर्वणी असते.
संदर्भग्रंथ :-
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com हि वेबसाईट
३) "मावळे आम्ही स्वराज्याचे संघ" यांचे फेसबुक पेज
४) दैनिक प्रहार यातील पावनाई देवस्थानाची माहिती
५) https://sindhudurglive.com यावरील कातळशिल्पाची माहिती