कोकणातील बऱ्याच गावांचा उल्लेख आपण इतिहासात किवा शिवकाळात वाचलेला असतो पण तेथे एखादा किल्ला असावा हे आपल्या खिजगणतीतही नसते. खारेपाटण व राजापुर हि मुंबई - गोवा महामार्गावर असलेली अशीच दोन शहरे. खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. वाघोटन नदीच्या दक्षिणतीरावर खारेपाटण वसलेले आहे. इतिहासकाळात महत्त्वाचे स्थान मिळवलेले खारेपाटण हे पुर्वी देवगड तालुक्याचे मुख्यालय होते. इ.स. १८१८ ते इ.स. १८७५ पर्यंत मुख्य ठिकाण असलेल्या खारेपाटणाला एक किल्ला होता याची माहिती खुद्द खारेपाटणवासीयांनाही नाही याचे मात्र आश्चर्य वाटते.
खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे आहे. मुंबई-पणजी हा महामार्ग खारेपाटण जवळून जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा वाघोटन नदीच्या तीरावर येवून मिळतात. मुंबईकडून निघाल्यावर वाघोटन नदी ओलांडताच पहीले गाव खारेपाटण आहे. महामार्गाच्या पश्चिमेकडे वसलेल्या खारेपाटणास कोल्हापूर गगनबावडा मार्गही येता येते.
इ.स. ८ व्या शतकात दक्षिण कोकणात शिलाहारांचे राज्य होते. त्याकाळी बलिपत्तन नावाने ओळखले जाणारे खारेपाटण गाव हे शिलाहार राजाची राजधानी होती. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनाऱ्यावर वसलेले असुन प्राचिन काळी व्यापारी जहाजे विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून बलिपत्तन गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडाघाट मार्गे देशावर पाठविला जात असे. शिलाहार घराण्याचा मुळ पुरुष सणफुल्ल याने राष्ट्रकुटांना बहुमोल सहाय्य केल्यामुळे राजा कृष्ण राष्ट्रकुट याने त्यास बराच मोठा प्रदेश दिला.शिलाहार राजा संणपुल्ल याचा पुत्र धम्मियरने इ. स ७८५ ते ८२० मध्ये बलिपत्तन शहर वसवून त्याला लागून असलेल्या टेकडीवर या प्राचिन बंदराचे व राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधला.मुळ गाव जरी आधी अस्तित्वात असले तरी त्याला महत्व देण्याचे काम धम्मियरने केले.
खारेपाटण येथे शिलाहार राजाने दिलेले तीन ताम्रपट मिळाले आहेत. राजा रट्टराजने ( सन ९१५-१०२४ ) दोन ताम्रपट दिले असून पहिला ताम्रपट २२ मे १००८-०९ चा असून यात शिलाहार,राष्ट्रकुट व पश्चिमी चालुक्य यांच्या वंशावळ व दिलेल्या देणग्या आहेत. दुसर्या ताम्रपटात दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे.तिसर्या ताम्रपटात राजा अनंतपाल यांनी कोकणातील सुपारीक ,श्रीस्थानक,चेमुली व इतर बंदरातून येणर्या व जाणार्या मालाच्या गाडयावरील आयात व निर्यात कर रद्द केल्याचे जाहीर केले.
देवगिरीच्या यादवांनी शिलाहाराची सत्ता नष्ट केली. देवगिरी नंतर विजयनगर साम्राज्याची सत्ता आली. मुस्लीम शासनकाळात हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. सन १४८४ मध्ये संगमेश्वर येथील मावंलकर देशमुख घराण्यापैकी केशव नायक देशमुखी करत असताना 'नर्मदेपर्यंत सर्व देश विध्यानगरकरांही ( विजयनगर साम्राज्यातील हंपी ) आक्रांत ( पादाक्रांत ) केला. मग केशव नायकाने विद्यानगरास जाउन राजदर्शन घेतले. तळकोकणार सासस्त ( ६६ ) गावची राजसत्ता केली. तिमपा ब्राम्हण खारेपाटणास आणिला.खारेपाट्णी कारभार होय या देशाचे पाटण देश नाव जाह्ले.केशव नायकानंतर या घराण्यात अनेकांनी सत्त्ता भोगली व यादवीला सुरवात देखील झाली.यातून पुढे रंगोबा नायकाने पुढे विजयनगरला जाउन वेकांप्पा अधिकारी खारेपाटणास आणला अशी माहिती मिळते.
याचा अर्थ विजयनगर साम्राज्यात खारेपाटण शहरास महत्व होते. सन १४७० मध्ये बहामनी सत्तेने कोकण घेतले. त्यासुमारास खारेपाटण बहामनी राजवटीखाली गेले. सन १४९० मध्ये आदिलशहा हा बहामनी राजवटीतून फुटून स्वतंत्र झाल्यावर लवकरच त्याने खारेपाट्ण आपल्या वर्चस्वाखाली आणले. सन १५६५ मध्ये मामले मुज्जफराबाद मध्ये तपे खारेपाट्ण मोडत होता. खारेपाट्णचा उल्लेख खारापाट असा येतो. २ जुलै १६५० मध्ये सिद्दी अजम काजी आल्ली सेर हा खारेपाटणचा किल्लेदार होता. १० नोव्हे १६५९ शिवाजी महाराजांनी अफझलखानास मारल्यावर मराठे कोकणात उतरले.त्यांनी राजापुर घेउन १५ जानेवारी १६६० रात्री दोनशे मराठे सैनिक खारेपाटणच्या किल्ल्याच्या दिशेने गेले आणि फारसा प्रतिकार न होताच त्यांनी किल्ला घेतला.
राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. अफझलखानाचे दभोळ बंदरात असलेले जहाज इंग्रजांनी आत नेउन लपवले होते.ते जहाज जोपर्यंत हवाली करत नाहीत तोपर्यंत इंग्रज कैद्यांना सोडणार नाही असे मराठ्यांनी बजावले.राजापुरच्या वखारीचा इंग्रज प्रमुख रेव्हिंग्ट्न याने १३ फेब्रुवारी १६६० रोजी पत्र लिहीले "अद्याप त्या इंग्रजाला ( म्हणजे गिफर्डला ) खारेपाटणच्या किल्ल्यात कैदेत ठेवले आहे." व त्याच्या सुटकेची विनंती केली.विशेष म्हणजे हे इंग्रज आपल्या देशबांधवाची किती काळजी करित याचे उदाहरण म्हणजे कैदेत असलेल्या गिफर्डसाठी खास राजापुरवरुन मद्य व मास पुरवले जात असे.हा प्रकार महिनाभर चाललाअ.पुढे गिफर्डला खारेपाटण किल्ल्याच्या बाहेर काढून विशाळगड किंवा साटवलीच्या किल्ल्यावर हलविण्यात आले.
पुढे सन १६६३ रोजी गोव्याहून गिफर्ड त्याच्या सुरतेच्या वखारीला कळवतो 'फोंड्याचे सुभेदार व कुडाळचे देसाई ( सावंत ) यांनी आपली सर्व लहानसहान राजांची ( म्हणजे देसायांची ) सैन्य एकत्र करुन शिवाजीला खारेपाटणमधून काढून लावाले असे आदिलशहाने फर्मावल्याचे कळते.खारेपाटण आता आदिलशहाने महमंदखानाला दिले आहे".
अर्थात हि माहिती चुकीची असावी कारण वेंगुर्ल्याच्या डचांच्या डाग रजिस्टर प्रमाणे १२ जुन १६६५ च्या पत्राप्रमाणे "डचांचा माल लुटून तो ( म्हणजे शिवाजी महाराज ) आता खारेपाटणास जाउन बसला आहे.".
सन १६६६ मध्ये कुडाळ व वेंगुर्ला आदिलशहाकडे व खारेपाटण व राजापुर शिवाजी राजांकडे अशी स्थिती होती. एप्रिल-मे १६७४ मध्ये म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराजांच्या आरमाराचे अधिकारी दर्यासारंग यांंनी भडोच येथील इंग्रजांचे गलबत पकडून खारेपाटण येथे नेउन ठेवले.
पुढे संभाजी महाराजांच्या काळात सन १६८२ मध्ये तळकोकणातील फितुर झालेल्या देसायांनी गोव्याच्या पोर्तुगीजांना मराठ्यांच्या किल्ल्यांची माहिती पाठविली.त्यात खारेपाटण किल्ल्याची माहिती दिलेली आहे,त्याप्रमाणे खारेपाट्ण किल्ला नदीकिनारी असून तिथे शिबंदी व तोफा आहेत.अर्थात पुढे औरंगजेबाचे सैन्य या प्रदेशात पसरले आणि खारेपाटण किल्ला निश्चित मोघलांकडे गेला असण्याची शक्यता आहे.मात्र हा गड पुन्हा मराठ्यांनी जिंकला असावा, कारण सन १६९३ च्या उल्लेखाप्रमाणे हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता.

सन १७०७ मध्ये औरंगजेब मेला आणि मराठा साम्राज्यावरचे संकट टळले.मात्र मराठा साम्राज्याची दोन शकले होउन सातारा गादी आणि करवीर गादी अशी दोन राज्ये झाली.खारेपाटणचा किल्ला करवीर गादीत मोडत होता. सन १७०८ मध्ये खेम सावंत यांनी सिद सावंत व चांदजीराव आसळेकर यांना खारेपाटणवर पाठ्वून करवीरराज्याचे साठम हे किल्लेदार असताना आक्रमण केले.मात्र याचा उपयोग झालेला दिसत नाही.कारण करवीर संस्थानाचे रामचंद्रपंत आमात्य यांनी १४ मे १७०८ रोजी हिरोजी,बापुजी व प्रतापजी साटम यांना पत्र लिहीले "तुमचा उच्छेद होतो.राजश्री बाबाजी यास खारेपाटणी ठाणेयाची मजबुती करणे म्हणून लिहून पाठविले आहे.तरी तुम्ही जमावानिशी राजश्री रामराव यास अनुकुल होउन खारेपाटणचे ठाणे मजबुत करणे"
इ.स. फेब्रुवारी१७१३ मधे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर खारेपाटणचा किल्ला कान्होजीं आंग्रेकडे राहीला. अर्थात खारेपाटण फक्त कागदावरच आंग्रेयांच्याकडे राहीला,प्रत्यक्ष तो करवीर संस्थानाच्या अधिपत्याखाली होता. आंग्रे आणि सावंत यांच्यात सख्य नव्हते.आंग्र्यांच्या आश्रयाने राहीलेल्या कुडाळच्या देश्स्थ प्रभु यांचा बीमोड करण्यासाठी सावंतांनी खारेपाटणवर हल्ला केला.यात मोठी लढाई होउन बाबाजी प्रभु पडले व इतर देसाई कुडाळला पळून गेले.मात्र सावंतांनी खारेपाटणचा कोट आपल्या ताब्यात घेतला नाही. कन्होजी आंग्रे यांचे चुलत बंधु दत्ताजी आंग्रे यांनी जानेवारी-फेब्रुवारी १७१६ मध्ये खारेपाटणचा किल्ला घेतला.यावर करवीरकर संभाजी राजे १५ फेब्रुवारी १७१६ च्या पत्रात चांदजी राणे यांना लिहीतात "दत्ताजी आंग्रे यांनी खारापाटणची गढी घेउन किले गगनगडचे तनखियाचे ( गडाखालील ) गावी उपद्रव मांडला आहे. तरी तुम्ही आपले कबिले वरघाटी ठेवून किले गगनगडचे लोक व तुम्ही जमावनिसी स्वारी सिकारी करुन गावांस उपद्रव न लागे असे करणे".
मात्र करवीरकारांना खारेपाटण आंग्र्यांकडून घेता आले नाही, किल्ला आग्र्यांच्याच ताब्यात राहीला. सन १७३४ मध्ये सरखेल संभाजी आंग्रे खारेपाटणला आले.संभाजी नंतर तुळाजी आंग्रे सरखेल बनले. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वैमनस्य होते. पेशव्यांना तुळाजीचे किल्ले व आरमार हवे होते.पेशव्यांनी इंग्रजांशी १९ मार्च १७५५ रोजी तह केला.तहानुसार दोघांनी तुळाजीच्या प्रदेशावर स्वारी केली. या स्वारीत पेशव्यांनी तुळाजीच्या खारेपाटणवर चाल केली. यावेळी पेशव्यांचे सरदार रामजी महादेव नेतृत्व करीत होते. सुरवातीला पेशव्यांनी तुळाजीचा पराभव केला.याची माहिती काशी त्रिंबक २४ एप्रिल १७६५ च्या पत्रात देतात "आंगरेयानी दाभोळ सुभा श्रीमंतास दिल्हा. राजापुरची गढी व खारेपाटणची त्यास द्यावी.याप्रमाणे तह झाला".
मात्र यावर समाधानी न रहाता पेशव्यांना तुळाजी आंग्र्यांचा समुळ नाश हवा होता. यासाठी सन १७५६ च्या पावसाळ्यात पेशव्यांचे सैन्य खारेपाटणच्या भुईकोटाभोवती जमले.या मोहीमेची माहिती कृष्णराव भगवंत पेशव्यांना १५ सप्टेंबर १७५५ च्या पत्रात लिहीतात "आम्हाकडील जमाव येउन खारेपाटणानजीक दोन कोशावरी मेढा घालून जबरदस्तीने राहीले आहेत.येक रोखी शह जाला.यामुळे आंगरे याने अवघा जमाव खारेपाटणी जमा करुन बल धरिले आहे त्यास भारी फौज आलियाविना स्थल हस्तगत होत नाही".यावेळी भयकंर पाउस कोसळत होता.

एक खारेपाटणास वेढा दिल्यास किल्ला सर होणे अवघड जाईल कारण आंग्रे आपली सर्व फौज तिथेच एकवटतील. तेव्हा एकाच वेळी त्यांच्या तीन-चार किल्ल्यांना वेढा दिल्यास त्यांची फौज विखुरली जाउन किल्ला हस्तगत करणे सोपे जाईल हे सांगताना कृष्णराव पुढे लिहीतात "त्यास भारी फौज आल्याविना स्थले हस्तगत होत नाही.भारी फौज व आरमाराचे साहित्य आलियानंतर शत्रुचा उपमर्द येथास्थित होईल.येकरोखे शह दिल्याने आयास येत नाही.दोन-च्यार स्थलास शह दिल्यावर दिवसगत लागणार नाही."
रामजी महादेव १३ ऑक्टोबर १७५५ रोजीच्या पत्रातून पेशव्यांना लिहीतात "खारेपाटणास ( आंग्रे यांचा ) रुद्राजी धुळूप पाचसातशे माणसांनी आहे.प्रस्तुत वलवल करिता रुद्राजी धुळूप करितात.त्यास राउत ( घोडेस्वार ) गेल्यानंतर खारेपाटण साध्य जाहल्यास मुलकी बादेज जाहल्याने साहित्य संरजाम होणार नाही,येथील तेथे भरणा गुंतोण उपराला होणार नाही.खारेपाटणचा बंदोबस्त होउन, दुराख ( दोन्हीकडून ) शह बसला पाहीजे,त्यासी राउतविना मजबुती होत नाही.आंग्रेजांचा माणुस कालजी धरुन साहेबकाम करावे यैसा रवाना केल्यास उत्तम आहे".परंतु रुद्राजी यावेळी किल्ल्यावर नव्हते.

सरदार जावजी गवळी हे करुळ घाटातून खाली उतरले.याशिवाय जोडीला खंडोजी माणकर्,खंडेराव बर्गे ईत्यादी सरदार होते.दिवसरात्र खारेपाटणवर हल्ले चालु होते.वारंवार छापे टाकण्यात येउ लागले.जावजी गवळी १३ डिसेंबर १७५५ रोजी पेशव्यांना लिहीलेल्या पत्रात उल्लेख करतात "आम्ही मोर्चेवाशी जावे तरी गनिमाचा शह मातबर,मोर्चेयाशी कुमक करुन लष्कर जतन करावे एसा प्रसंग पडला.ठाणेयात ( किल्ल्यास ) दोन तीनशे आरमारी माणुस व तुळाजी कदम आहेत."
खारेपाटणास पेशव्यांच्या सैन्याचा वेढा बसत आहे असे पाहून तुळाजीने ११ डिसेंबर १७५५ रोजी आपला पराक्रमी सरदार रुद्राजी धुळूप याच्याबरोबर पोर्तुगीज सैन्य आरमारासहीत खारेपाटणला रवाना केले.या दोन्ही फौजात तुंबळ युध्द झाले.मात्र पेशव्यांचे सैन्य वरचढ चढून तुळाजी आंग्र्याचा पराभव झाला आणि पेशव्यांच्या सैन्याने खारेपाटण काबीज केले.

या विजयाची माहीती सरदार जावजी गवळी यांनी १३ डिसेंबर १७५५ च्या पत्रात पेशव्यांना कळविली "पेशव्यांच्या सैन्याची किल्ल्याभोवती मोर्चे बसवून हल्ला सुरु असता चौथे दिवशी रुद्राजी धुळुप जमावसुध्दा फिरंगी व पनालाचे लोक व तेथील निवड करुन दीड हजार माणुस व आरमार महागिर्या ( जहाज ) व गलबते बावीस भरुन खारेपाटणच्या बंदराच्या नाक्यास प्रतःकाळ दोन घडी रात्री आले.तडीस उतरुन लष्करावर चाल केली.तो हशमी लोकांच्या चौक्या व कृष्णाजी महादेव टेकडीच्या माथ्यावर होते.त्याच्याने दम न धरवे.इतक्यात आम्ही व खंडेराव बरगे तयार होउन कुमकेस पोचलो.गनिमाने तो फारच शर्त केली.परंतु स्वामींच्या पुण्यप्रतापेकरुन लोकांना घोडी घालून उभयतांच्या करोलांनी ( बंदुकधारी ) मार दिल्हा.
धुकट फार आले होते.येथे रुद्राजी धुलप व दुलबाजी माने मातबर माणुस यास व फिरंगियाचा सरदार इतक्यात गोळी जखमा झाल्या.पाच्,सात फिरंगी ठार जाले.लोकही जखमी फार जाले.आणकिही सरदार फार जावा जाले.फौजेची इभ्रत पाइच्यावरी भारी.यामुळे मोर्चे जसे होते त्याप्रमाणे कायमच होते.रुद्राजी याचा मोड जाला.सरोन गलबतात गेले.काही खुसकीने ( जमीनमार्गे ) निघोन झाडीतून पळाले.
साहेबाच्या पुण्यप्रतापे असे जाले कि जेथे पुरुष दोन पुरुष पाणी होते तेथे ओहोटीने वाळु दिसु लागली.गलबतावर मिठी पडली.तेव्हा लोक पळाले.रुद्राजी धुलप व त्याचा मेव्हणा दुलबाजी मान्या व साठवलीच्या ठाणेदाराच्या लेक तिचे हस्तगत जाले.वरकड लोक झाडीत पळोन गेले.दोन गलबत व सात महागिर्या मागेच होती.ती मागच्या मागे पळून गेली.बारा गलबते व लहान एक,एकुन तेरा पडाव जाली.लहान थोर चाळीस पन्नास तोफा सापडल्या.गनीमास जरब फारच बसली."
खंडेराव बर्गे खारेपाटण येथून १३ डिसेंबर १७५५ रोजी पेशव्यांना लिहीतात "रुद्राजी धुलप जमावसुध्दा आले.आरमारे,दारुगोळा, बाण संरजामसुध्दा आले.मोर्चे उठवावे ,लस्कर धुंडाउन घावे.हशम तो त्याच्या इभ्रतीने निघले.परंतु धन्याचे पुण्यप्रतापे रुद्राजी धुलप हस्तगत होउन राजश्री राजश्री तुलाजी आंगरे यांजवर इभ्रत बसली".

तुळाजी आंग्रे कदाचित फिरुन खारेपाटण किल्ल्यावर आक्रमण करतील तेव्हा चांगला बंदोबस्त ठेवावा यासाठी ते पेशव्यांना लिहीतात."परंतु याचे सार्थक तेव्हाच कि फौज भारी आल्याने खावंदांची कार्यसिध्दी होईल.येथे जावजी बाबा गौली ( गवळी ) माकुल धन्याच्या कार्यास येकनिष्ट परंतु याचा उपाय काय ?याने काय करावे ? रात्रंदिवस धन्याच्या कार्यास मेहनतीस चुकत नाहीत.परंतु जमावाखेरीज काय करावे ? दिवसा बातमी राखावी असे आहे".
सर्व काम पेशवे करण्यास समर्थ आहेत.पण सध्या येथील काम जावजीबाबा खेरीज होणार नाही हे पेशव्यांना सांगण्यास बर्वे विसरले नाहीत. ते लिहीतात "करणार धन्याचे पुण्य समर्थ,परंतु तरतुदेस जावजीबाबांखेरीज इतरास होणे नाही.येथील सविस्तर वर्तमान जावजीबाबांनी लिहीले आहे.गनीमाचा धीर सुटला आहे. गोवेकर सामील जाला,त्याचे पारिपत्य करावे.फौज सत्वर रवाना करावी.सर्वांनी जावजीबाबांच्या बुध्दीने चालल्याने साहेबकामे निसंशय होइल.यात अंतर नाही.घोडी बसावयास नाही.पुर्वी विनंती केली होती.आज्ञा करणार खविंद आहेत".
आणि जावजी गवळी लिहीतात "फौज येत नाही तेव्हा जो आब धन्यानी दिल्हा आहे ते आबरु आमची रहाणार नाही.फौज मातबर आलियाशिवाय साहेब काम होत नाही."

खारेपाटण फत्ते केल्यावर जावजी गवळी याचे कौतुक करताना कृष्णराव भगवंत जावजीबाबांना ९ डिसेंबर १७५५ रोजी लिहीले "तुम्ही खंडोजी माणकर समागमे येउन गढी खारेपाटणास मोर्चेबंदी केली.गड हस्तगत करावी येवेसी बंदोबस्ती करणे ती केलीच होती.त्यास रुद्राजी धुळप सैन्य व आरमारसुध्दा येउन छापा घालावा हा मनोदय होता परंतु ईश्वर ईच्छेने गनिमास नामोहरम करुन रुद्राजी धुळूप यासी हस्तगत केले".
खारेपाटण पेशव्यांच्या अंमलाखाली आला आणि विजयदुर्ग ताब्यात घेउन तुळाजींना कैदेत ठेवल्यामुळे आता आंग्रे यांच्या स्वारीची भिती नाहीशी झाली. पुढे खारपाटण हा विजयदुर्गच्या आनंदराव धु़ळूपांच्या ताब्यात असताना पंतआमात्यांनी तो घेतला.त्यावर पेशव्यांनी त्यांना समज दिली.तेव्हा हैबतराव गायकवाड यांनी धुळुपांना सांगितले कि "आपण पंतआमात्यांनी खारेपाटणची गढी ती आमच्य्हा जिमा करुन देविली.आम्हाकडून आपलेकडील भले मनुष्य येतील त्यांच्याकडे ठाणे स्वाधीन करविले जाईल".
परंतु खारेपाटण ताब्यात येत नाही पाहून धुळूपांनी स्वारी केली.यासंबधी २५ डिसेंबर १७९९ रोजीच्या पत्रात उल्लेख असा आला आहे "बावडेकर यासी धुलपाने लढाई देउन खारेपाटणची गढी घेतली आणि राजेपुरचे ठाणे येउन बावडेकर यास ( विशाळगड ) किल्ल्यापर्यंत पोहचविले".म्हणजे सन १७९९ मध्ये बावडेकरांनी खारेपाटण घेतला होता.तो नंतर विजयदुर्ग येथील पेशव्यांचे सरदार धुळूप यांनी बावडेकरांकडून खारेपाटण हस्तगत केला.
शेवटचे बा़जीराव पेशवे यांनी ९ डिसेंबर १८११-१२ खारेपाटण कसबे येथे मुक्कामाला होते.दुसर्या दिवशी तिथून विजयदुर्गास रवाना झाले.११ डिसेंबर रोजी पुन्हा खारेपातणला आले होते.इंग्रजांनी सन १८१८ मध्ये खारेपाटण पेशव्यांकडून घेतला.सन १८१९ मध्ये इंग्रजांनी उल्लेख केला आहे कि "व्यापारासाठी अतिशय योग्य असे हे ठिकाण आहे".
इतिहासाचा इतका पट पाहिलेला हा नदीकिनारी वसलेला भुईकोट बघायचा तर मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण गाव आहे. कोकण रेल्वेने गेल्यास राजापूर व नांदगाव या स्टेशनांपासून अंदाजे २५ कि.मी वर खारेपाटण आहे.मुंबई खारेपाटण हे अंतर ४०६ कि.मी. आहे तर राजापुर खारेपाटण हे अंतर २० कि.मी.आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरुन खारेपाटण गावात जाणार्या रस्त्याने सरळ गेल्यावर, प्रथम एसटीस्टॅड व पुढे बाजारपेठ लागते. बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायर्यांची वाट खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते. ही शाळा खारेपाटण किल्ल्यातच आहे.
खारेपाटण ही चांगली बाजारपेठ आहे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे रस्ता जातो. किल्ला म्हणून विचारल्यास अनेकांना तो माहित नाही. दुर्गामातेचे मंदिर म्हणून विचारल्यास लोक सांगू शकतात, हे मंदिर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात आहे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे जाणाऱ्या तीन वाटा आहेत. किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिराचे बांधकाम चालु असल्याने तेथवर सामानाची ने-आण करण्यासाठी कच्चा रस्ता बांधलेला असुन तो थेट किल्ल्याच्या वरील भागात जातो. दुसरी वाट बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायऱ्यानी किल्ल्यात असलेल्या खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते व तिसरी वाट बाजारपेठेच्या टोकाला असलेल्या नदीकाठच्या धक्क्याकडून पायऱ्यांनी वर चढते. हि वाट सर्वात सोयीची असुन या वाटेने संपुर्ण किल्ला पहाता येतो.

किल्ल्याच्या खालच्या भागातील उतारावर सध्या शासकिय विश्रामधाम आहे. या विश्रामधामधून किल्ल्यावर जाता येते हाच मार्ग सोयीचा आहे. येथपर्यंत गाडीमार्गही आहे. स्वत:चे वाहन नसल्यास महामार्गापासून अर्ध्यातासात चालत इथपर्यंत पोहोचतो येते.या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत.

शासकीय विश्रामधामाच्या पायर्या चढायला लागल्यावर डावीकडे लगेच फाटा फुटतो. या फाटय़ालाही काही पायर्या आहेत. येथुन पायऱ्या चढायला लागल्यावर सुरवातीलाच भिंतीलगत असलेले चुन्याच्या घाण्याचे चाक दिसते. ते पाहुन पायऱ्या चढुन डावीकडे वळल्यावर विश्रामधामच्या खालील बाजुस काही प्रमाणात शिल्लक असलेला एक बुरुज पहायला मिळतो. येथुन विश्रामधामच्या मागील बाजुने आपण एका घराच्या अंगणातून शाळेकडे येतो. त्या चढून आपण एका घराच्या अंगणातून पुढे चढून गेल्यावर एक शाळा लागते. येथे गावातून येणारा रस्ता मिळतो.
इथुन समोरच बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. इथे असणारा किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झालेला असुन केवळ पाच फुट उंचीची तटबंदी व फांजी शिल्लक राहिली आहे. छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला उताराच्या बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. किल्ल्याचा आकार आयताकृती असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण अडीच एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन चारही बाजुंना असलेली तटबंदी मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेली आहे. काही ठिकाणी हि तटबंदी ढासळली असली तरी या ढिगाऱ्यावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते.

या आयताक.ती माथ्याच्या चारही बाजुंना असलेल्या तटबंदीची अवस्था सध्या मातीच्या ढिगार्यात झालेली दिसते. किल्ल्याचे तीन कोपऱ्यावरील बुरुज कसेबसे उभे असुन आपण प्रवेश केलेला कोपऱ्यावरचा बुरुज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या तटावरून फेरी मारताना किल्ल्याच्या पुर्व व उत्तर बाजूस असलेला खंदक दिसतो तर पश्चिमेस खोल भाग असुन तेथे व दक्षिणेस वाघोटण खाडीचे सरंक्षण आहे.
पुर्व बाजुच्या खंदकाबाहेर एक लहान व एक मोठा असे दोन समाधी चौथरे दिसतात. किल्ल्याच्या वरील भागात दुर्गामातेचे नव्याने बांधलेले मंदिर असुन या मंदिराच्या बांधकामासाठी तटबंदी फोडुन व खंदक बुजवुन आत रस्ता आणला आहे. येथे पुर्वी असणारे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधल्याचे सांगण्यात येते. मंदिरात देवीचा तांदळा व नवीन मूर्ती आहे. मंदिराच्या बांधकामात येथे असलेले मूळ वास्तू अवशेष नष्ट झाले असुन मंदिरासमोरील झाडाखाली एक जुनी दीपमाळ दिसते.
मंदिराच्या आसपास मोठया प्रमाणात उद्ध्वस्त वास्तूंचे चौथरे दिसुन येतात. या मंदिराजवळील विहिरीतून एक भूयार आहे व त्याचे दुसरे टोक खाडीवरील ‘‘घोडेपथार’’ या जागी झुडुपात लपलेले पाहायला मिळते.
याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’ ,उध्वस्त वास्तूंचे चौथरे इ. गोष्टी पाहायला मिळतात.मंदिराच्या समोरील बाजुस असलेल्या बुरुजामध्ये एक लहान दरवाजा असुन या दरवाजातून बाहेरील खंदकात उतरता येते.
दरवाजा लहान असला तरी तो वळणदार मार्गावर बांधलेला आहे. हा खंदक झाडी आणि गवताने भरलेला आहे. त्यामुळे या परिसरामधे जपूनच फिरावे लागते. खरेतर कोकणातील हे झाडीभरलेले किल्ले मार्च ते मे महिन्यात पाहिल्यास गवताचा फारसा त्रास जाणवत नाही. बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूला मोठी घळ आहे. घळीच्या पलीकडे एका स्मारकाचा चौथरा पहायला मिळतो.
किल्ल्याच्या मध्यभागी एक ७० ते ८० फुट खोल भली मोठी पायऱ्यांची विहीर असुन असुन हि विहीर आपल्याला कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावरील विहिरींची आठवण करून देते. सध्या कोरड्या पडलेल्या ह्या विहिरीत मोठया प्रमाणात झाडी माजली असुन यातील पायऱ्यांनी विहिरीच्या आत उतरता येते. विहीर पाहुन बाहेर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. शासकीय विश्रामगृहामधून पाण्याची सोय केल्यास येथे मुक्काम करता येवू शकतो.

मोठा इतिहास असताना खारेपाटणचा किल्ला इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच दखल नाही घेतली तर किल्ला कालौघात नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र खरे.साधारण १८५० च्या सुमारास किल्ल्याचे तट व बुरुज पाडून त्याची दगड काढण्यात आले. ही घडवलेले दगड वापरुन नदीच्या काठावर एक धक्का बांधण्यात आल्याची नोंद आहे. हा धक्का उतारु लोकांना तीरावर उतरण्यासाठी बांधला होता. सध्या तो ही निरुपयोगी ठरलेला आहे.
याशिवाय खारेपाटणमध्ये काळ भैरव मंदिर व कपिलेश्वर मंदिर आहे. यातील कपिलेश्वर मंदिरात असलेली प्राचीन सूर्यनारायण मुर्ती व विष्णुमुर्ती आवर्जुन पहावी अशी आहे.
चंद्रप्रभू जैन मंदिर आणि नेमिनाथ जैन मंदिर , खारेपाटणमध्ये सुखनदीच्या किनारी स्थित ग्रामस्थचे श्रद्धास्थान असलेली अशी हि दोन मंदिरे आहेत . मुख्य रस्तापासून २-४ मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे .मंदिराकडे जाताना मुख्य प्रवेश कमानी आहे आणि तिथूनच मंदिराचा भाग सुरु होतो .गावातील लोक त्याला बस्ती असेही संबोधतात .
https://puputupu.blogspot.com/2010/12/8.html#.YEu7q5vhXIU

No comments:
Post a Comment