सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील काही घाटमार्ग हे प्रामुख्याने व्यापारासाठी वापरले जात होते. कोकणातील बंदरात आलेला माल या घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी घाटमार्गातील हनुमंतघाट हा एक प्रमुख घाटमार्ग होता व याच्या रक्षणासाठी शिवपुर्वकाळात घाटाच्या माथ्यावर रांगणा तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोष हि दुर्गजोडी उभारली गेली. आजही हे दुर्ग आपल्या अंगावर अनेक अवशेष बाळगुन असले तरी घनदाट जंगलात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली अपुरी दळणवळण व्यवस्था यामुळे दुर्गप्रेमींची पावले या किल्ल्यांकडे सहसा वळत नाही.

महाराष्ट्रातील अनेक गडांवर शिवाजी महाराजांची पायधुळ झडली आहे पण काही गडांच्या वाटयाला हे भाग्य थोडे जास्तच प्रमाणात लाभले आहे. अशा भाग्यवान गडापैकी एक गड म्हणजे मनोहरगड. या गडावर महाराजांचे एक महिन्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य होते.या गडाची मुळ बांधणी कोणी व केंव्हा केली हे माहित नसले तरी बहामनी काळानंतर आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला १६६४ मधील जुन-जुलै महिन्यात स्वराज्यात दाखल झाला. ५ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानाला लाल महालात धडा दिल्यावर १३ एप्रिल १६६३ रोजी दक्षिण कोकणात उतरत मे महिन्यापर्यंत कुडाळपर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. कुडाळ येथे रावजी सोमनाथ पंडीत यांना सुभेदार नेमले.याच मोहीमेत २४ जुलै १६६४ पुर्वी मनोहरगड स्वराज्यात आला. यावेळी गडाच्या मदतीला आदिलशाही सरदार असलेले सावंतवाडीचे लखम सावंत धावून आला. लखम सावंतानी चांगला पराक्रम गाजवला पण मराठ्यांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. २४ ओगस्ट १६६४ रोजी लखम सावंतांचे कौतुक करणारे पत्र आदिलशाहीने लिहीले "सरनौबत फतहखान याच्या सल्ल्याने १००० प्यादे नव्याने चाकरीस ठेवावे.स्वताचे जुने प्यादे व हे नवे प्यादे एकत्र करुन मनोहरगडास वेढा घालावा आणि त्याच्या आसपासचा मुलुख आपल्या ताब्यात आणावा.नवीन ठेवलेल्या शिपायांच्या वेतनाची व्यवस्था फतहखान करील व तुम्हास मदतही करील.तुम्ही मात्र मनोहरगड हस्तगत करण्याचा शक्य तितका प्रयत्न करावा".
गडावरील काही बांधकाम पहाता याची डागडुजी शिवकाळात झाली असावी. मनोहरगडच्या पत्रव्यवहारातून या किल्ल्याबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते. १६६६च्या सुमारास बाजी घोलप येथील किल्लेदार तसेच रुद्राजी तुकदेव,बोमाजी कालुजी हे सरनोबत तर रामजी विश्वनाथ हे सबनीस असल्याचे दिसुन येते. दत्तो यादव सुभेदार यानी किल्लेदार बाजी घोलपना २३ नोव्हेंबर १६६६ रोजी लिहीलेल्या पत्राप्रमाणे "हणवत ( म्हणजे हणवंत ) माचीस नामाजी नाईक पाच लोकास नाईक होता.तो माणसासहीत तिघा राजपुतानसि ( राजपुत सैनिक ) रात्री पळोन गेला".माची हि संकल्प्नाच मुळी शिवकालीन असल्यामुळे शिवछत्रपतींच्या ताब्यात गड आल्यावर हि हणमंत माची बांधली गेली असावी.,आज मात्र हि माची नेमकी कोठे आहे याचा पत्ता लागत नाही. शिवकालात या गडाची निगा राखली जाण्यासंदर्भात पत्र आहे.पावसाळ्यात गडावरच्या ईमारती गवताने शाकारल्या जात.पाटगावचे ठाणेदार विसाजी विठठल यांनी सन १६६६-६७ मध्ये मनोहरगडाचे सुभेदार दत्तो यादव यांना लिहीलेल्या पत्राप्रमाणे "शाकाराबध्दल सैनिक पाठवून देणे" यावर दत्तो सुभेदार यांचे उत्तर "... तरी हाली बाजी नाईक व १० सैनिक पाठविले असती आठ रोजा मध्ये एक लाख गवत किलेवरी येसारिखे करणे .. तरी रात तो दिवस करुन बहुत मर्दानगिने शाकराचे सरंजाम करवणे... हे कागद हजार कागदाचे जागा मानून शाकाराचे सरंजामी केले म्हणजे बहुत बरे असे"...तसेच रांगणा गडाचे किल्लेदार विठोजी जाधव यांनी २१ ऑगस्ट १६६६ ला मनोहरगडाचे किल्लेदार बाजी घोलप गोसावी यांना लिहीलेले पत्र उपलब्ध आहे."गोसावियाचे किलाचे सरनोबताचा बाबा हरि येथे ( कैदेत) होता.तो सोडून पाठविला असे.येथे काही यास शास्त करावी तर गोसावियास राग येईल म्हणून गोसावियास गोसावियाजवळ पाठविली.पोचविला असे घेउन पावलियाचा जाब पाठविला पाहिजे.".
शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडाला परतल्यानंतर मनोहरगडाच्या परिसरातील शेतीत आलेला तांदुळ रायगडास पाठवून देण्यास सांगितले.भात रवाना करायचीतयारी सुरु असताना बैलाची अडचण जाणवू लागली तेव्हा दत्तो यादव सुभेदार मनोहरगड यांनी किल्लेदार बाजी घोलपना २४ डिसेंबर १६६६ रोजी पत्र लिहीले "बैलाबध्दल रायाजी पाठविला व तुम्हासी लिहीले होते.त्याचे उत्तर नाही व तो रायाजी गायब जाहला हे ही कळो येत नाही.आता राजेश्री आण्णाजीपंताचे कागद पाठविला असेल तो घेणे आणि बैलाचे तलाश करुन लिहील्याप्रमाणे बैल पाठवून देणे.हे विशी दिरंग न लावणे भात येथे रानामध्ये पडोन राहीला असे.रायगडासी रवाना करणे असे.बैल आलेवरी पाठवून देउन कळले पाहिजे." मनोहरगडाच्या रानातून भात रायगडास कधी रवाना झाला याची माहिती मिळत नाही.३ मे १६६७ रोजीच्या पत्रात किले मनोहरगड येथील कचेरीतून जासुद रखमाजी जनाजी नाईक याच्यावर घागरी व मडक्याचा खर्च दाखविला आहे.येलाजी गोविंद सुभेदार यांनी रायाजी यांना १६६६-६७ मध्ये मनोहरगडावर साठा करण्यासाठी व शाकारणीसाठी गवत पाठविण्यासंदर्भात आज्ञा केली आहे. "किले मनोहरगडास चुडी सिसवी १० हजार व गवत ४० हजार येसे जे येलेस कागद पावेल ते सिस्त करुन पाठविणे .काम नाजुक आहे.खर्च मनोहरगडास पाठविणे.पैकियाकडे न पहाणे".अर्थात मुळ पत्र जीर्ण झाल्याने नीट वाचन होत नाही.
यानंतरचा मनोहरगडाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणजे अर्थातच आग्राभेटीनंतर शिवाजी महाराज एक महिना मनोहरगडावर मुक्कामास असल्याचे उल्लेख येतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ( शहाजीराजांची द्वितीय पत्नी तुकाबाई यांचे पुत्र एकोजी उर्फ व्यंकोजीराजे ) याने रांगणा किल्ल्याला घातलेला वेढा असावा. आग्र्याहून परत आल्यावर रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले.ईथे महाराजांचे कसे जंगी स्वागत झाले असेल याची आपण कल्पना करु शकतो.या मुक्कामा दरम्यान महाराजांनी गड आपल्या नजरेखालून घातला असेल. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला. याचा उल्लेख ५ जुलै १६६७ च्या पोर्तुगीज कागदपत्रातून येतो. गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉइसरॉयने यासंदर्भात महाराजांना ५ जुलै १६६७ रोजी पत्र लिहीले "शेणवी याच्याकडून असे कळाले कि आग्रा येथील कैदेतून सुटून आपण आपल्या राज्यात सुखरुपपणे पोहचला असून मनोहरगड येथे रहात आहात.पोर्तुगॉलमधून येताच मी आपली माहिती मिळवली व आपण मनोहरगड येथे असतानाच वकील पाठविणार होतो.पण रामजीकडून असे समजले कि त्या गडाची वाट पार अडचणीची असून आपण मनोहरगडावरुन निघून रायगडावर राहून राहणार.यास्तव मनोहरगडावर असताना वकील पाठविला नाही.पण आपण रायगडावर आता मुक्काम केला असे समजल्यावर हे अभिनंदनाचे पत्र पाठवित आहे."
इतका काळ येथे रहाण्यामागे प्रकृती बिघाड होता किंवा काही अन्य राजकीय कारणे होती ते सांगता येत नाही. शिवकालात मनोहरगड बांदा तालुक्यात येत होता.सन १६८३ मध्ये फितुर केशवप्रभु देसाईने मराठ्यांकडे असलेल्या गडकोटांची माहिती पोर्तुगीजांकडे पाठविली,त्यात मनोहरगडावर शिबंदी व तोफा असल्याची माहिती दिली.पुढे इ.स. १६८१ ते १७०७ दरम्यान औरंगजेब मराठा राज्य बुडवण्यासाठी आला असता त्याने अनेक किल्ले घेतले पण मनोहरगड त्याला जिंकता आला नाही. नंतरच्या काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला. नानासाहेब पेशव्यांचे बंधु सदाशिवरावभाऊ करवीरकरांचे पेशवे बनल्यावर करवीरच्या संभाजी राजांनी त्यांना दिलेल्या १३ जानेवारी १७५१ रोजीच्य सनदेप्रमाणे "पारगड,मनोहरगड्,भीमगड्,कलानिधीगड व सामानगड एसे पाच गड सदोबास ( सदाशिवराव भाउंना ) दिले" म्हणजे सदाशिवराव भाउंना जे ५ किल्ले मिळाले त्यात मनोहरगडचा समावेश होता. मनोहरगड जरी करवीर संस्थानाच्या अधिपत्यात होता तरी सावंतवाडीजवळ असल्यामुळे सावंतापासून त्याला नेहमीच धोका होता.सावंत जरी करवीरकरांचे सेवक असले तरी ते वारंवार बंड करीत असल्यामुळे या किल्ल्याला नेहमीच दक्ष रहावे लागे.सन १७९९ मध्ये सुलतानराव मालप हे मनोहरगडाचे किल्लेदार असताना आजरे व उत्तुर ठाणे घेण्यासाठी किल्ल्यावरील शिबंदीची कुमक पाठविण्यासंदर्भात आज्ञा झालेली दिसते. इंग्रजांनी सन १८१५ मध्ये करवीर संस्थान बुडवीले. अर्थात सर्व गड इंग्रजांच्या अमंलाखाली चालु लागले.मनोहरगडाच्या खर्चासाठी असलेल्या गावाब्ध्दलकरवीर व सावंतवाडी संस्थानात तंटा होता.तो इंग्रजांच्या मदतीने सोडवला गेला.दोन्ही संस्थाने ब्रिटीश अंमलाखाली असल्याने सन १८२० मध्ये यासाठी मध्यस्थी करण्यात आली. पुढे १८२७ च्या उल्लेखाप्रमाणे मनोहरगडावर असलेला दारुगोळा असा होता, १००० लोखंडी तोफगोळे, ३ हत्यारे १५५० बंदुकीच्या गोळ्या व ईतर असे युध्द साहीत्य होते.
१ ऑक्टोबर १८१२ च्या तहाप्रमाणे करवीर संस्थानाचे स्वातंत्र्य संपले होते. पुढे झालेल्या नवीन कराराप्रमाणे जे काही स्वातंत्र्य राहीले होते ते देखील नाहीसे झाले.सर्वत्र अंदाधूंदी माजली होती. करवीरकरांचे नामांकीत सरदारच महाराजांविरुद्ध कट-कारस्थान करीत होते,त्यांच्याविरुध्द शस्त्र हाती घेत होते. वेळप्रसंगी महाराजांची तक्रार इंग्रजांकडे करीत होते. आपापसातील लढाया,दंगेधोपे वाढले होते.छत्रपतींचे काही निंयत्रण राहीले नव्हते. सन १८३४ मध्ये मनोहरगडाच्या गडकऱ्यानी बंड केले. तंटा मिटविण्याचा प्रयत्न झाला "आलीकडे तेथील मामलेदारास बाबासाहेब सरनौबत याचे मार्फतीने गडकरी लोकांचे बोलणे चालणे होउन गडाकरी लोक कोल्हापुरास महराज साहेबांपाशी आलेले आहेत." मात्र समेट झाला नाही.तंट्याचे कारणही कळत नाही.अखेरीस बंड मोडण्यासाठी छत्रपतींनी अप्पाजीराव जाधव यांना पाठवुन बंड मोडले.त्यांनी २५ ऑगस्ट १८३४ रोजी करवीरकर छत्रपतींना पत्र लिहीले "आज्ञेप्रमाणे किल्ले मनोहरगडाचे बंदोबस्ता करिता निघालो,मार्गी किल्ल्याचा मजकुर एकण्यात आला.नंतर एक मुक्काम शेणगाव ( माणगाव ) येथे करुन मौजे वेंगळुरास आलो..किल्ल्यास पत्र पाठविले आहे.दोन मुक्काम येथेच करावे नंतर किल्ल्याचा हुकुम होईल त्याप्रमाणे आपण निघावे असे नरमगरम बोलणे लाविले.अध्यापि त्यांची दांडेली जात नाही.सबब एक दिवस राहून काही नवे लोक जमा करुन आज दोन प्रहरी ठाण्यास ( गड पायथ्यासी ) येउन दाखल झालो.बंडखोर होते ते पळून गेले.ठाण्यात लोक घालून बंदोबस्त केला व मुक्काम करुन राहीलो.गडकर्यांचा पक्का बंदोबस्त झाल्याशिवाय परिणाम नाही"करवीरकरांच्या फौजा पाहून बंडकर्यांनी महाराजांचे अभयपत्र व खात्रीपत्र मिळाल्यास शरणागतीची तयारी दर्शविली.तेव्हा महाराजांनी मागणी मान्य केली.मनोहरगडावरील बंड तात्पुरते शांत झाले असले तरी मुळ कारण नष्ट न झाल्याने दोन वर्षांनी पुन्हा गडावरील लोकांनी आपल्या धन्याविरुध्द्द बंड उभारले. पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज स्वत: १८३६ साली गडावर चालून आले. त्यांनी गडकऱ्याना अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. इ.स. १८४२ मध्ये गणपतराव विचारे हे मनोहरगडाचे किल्लेदार तर येसाजी घाटगे हे सरनौबत होते. इ.स.१८४४मध्ये इंग्रजांनी करवीरकरांचे स्वतंत्र हिरावल्याने राज्यातील गडकऱ्यानी २२ जुलै १८४४ला बंड पुकारले. या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले. हे बंड मोडण्यासाठी मेजर बेनबो याच्या नेतृत्वाखाली एक तुकडीने मनोहरगड व रांगणा यामधील हनुमंतघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नेरुर गावी तळ दिला. १० ऑक्टोबर १८४४ला गडावरील तुकडीने गोठोस गावातील सबनीस व कुलकर्णी यांना ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील सरकारी व खाजगी कागदपत्रे जाळली. दुसऱ्या दिवशी रात्री या तुकडीने नेरुर येथील सैन्यतळावर हल्ला केला. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे अनासाहेब यांना बंडात सामील करून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. त्यात तयार होणारा माल सामानगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांवर इंग्रजांविरुध्द लढण्यासाठी पाठविण्यात आला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी कर्नल वॉलेस व जनरल डेलामोंटी यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. १६ जानेवारी १८४५ रोजी कर्नल वॉलेस याने शिवापुर येथे बंडकऱ्यावर भयानक गोळीबार केला. २६ जानेवारी १८४५ रोजी जनरल डेलामोंटी याने केलेल्या कुलपी गोळ्यांच्या माऱ्याने त्रस्त होऊन सावंतानी त्यांची मुले व अण्णासाहेब यांना सोबत घेऊन इंग्रजांना चकवत गोव्याला पलायन केले व गड इंग्रजांच्या ताब्यात आला.

आजही हे दुर्ग आपल्या अंगावर अनेक अवशेष बाळगुन असले तरी घनदाट जंगलात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली अपुरी दळणवळण व्यवस्था यामुळे दुर्गप्रेमींची पावले या किल्ल्यांकडे सहसा वळत नाही. मनोहर- मनसंतोष या दुर्गजोडीतील हे दोन्ही दुर्ग केवळ एका लहान खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झाले असुन मनोहरगडावर सहजपणे जाता येते तर मनसंतोष गडावर जाण्यासाठी मात्र गिर्यारोहण साधनांची गरज भासते. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी गडाची पेठ असलेल्या पेठशिवापुर येथुन तसेच शिरसिंगे गावाच्या गोठवेवाडीतुन वाट आहे. पेठशिवापुर व गोठवेवाडी हि दोन्ही गावे या गडाच्या दोन बाजुस असुन एकमेकाशी रस्त्याने जोडली गेली आहेत पण शिवापुर येथुन गडाच्या खिंडीपर्यंत येणारा रस्ता कच्चा आहे तर गोठवेवाडी येथुन येणारा रस्ता पक्का आहे. या दोन्ही गावात जाण्यासाठी असलेली एसटी बसची मर्यादीत सेवा पहाता खाजगी वाहनाने गोठवेवाडी येथे जाणे सोयीचे पडते. शिवाय खाजगी वाहनाने आपण थेट गडाच्या पायवाटेजवळ पोहोचत असल्याने आपला जवळपास २ तासाचा वेळ तर वाचतोच पण चढ चढायचे श्रमही काही प्रमाणात कमी होतात. मनोहरगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सावंतवाडी शहर गाठावे लागते. मुंबई-गोवा महामार्गाने सावंतवाडी हे अंतर ५०६ कि.मी.असुन सावंतवाडीहुन कळंबस्ते-शिरसिंगे-गोठवेवाडी ३० कि.मी. अंतरावर तर पेठशिवापुर ४० कि.मी.अंतरावर आहे. या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यास अडीच तास लागतात
१) शिवापुर गावातूनः- सावंतवाडीतून थेट शिवापुरला बसची सोय आहे. सावंतवाडीतून मुंबई-गोवा महामार्गाने कुडाळच्या दिशेने निघाल्यावर वाटेत आकेरी फाटा लागतो.तेथून महामार्ग सोडून माणगाव-वाडोस्,निळेली,चाफेली,फाटामार्गे दुकानवाडी,वसुली,शिवापुर असा सुमारे ४० कि.मी.चा प्रवास करुन गाडी पायथ्याच्या निसर्गरम्य शिवापुर या गावी पोहचते.वाटेतील माणगाव म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे मुळगाव आणि जन्मस्थान.येथे असलेला त्यांचा आश्रम पहाण्यासारखा आहे.
शिवापुर गावातील भैरवनाथाचे मंदिर
शिवापुर गावात येण्यासाठी एस.टी.बसच्या वेळा
सकाळी ५.४५,७.०० ( फुटब्रीज) १०.००,१.३०,३.३० ( फुटब्रीज ),४.३०
फुटब्रीज हे गाव शिवापुरच्या अलीकडे आहे.इथे इंग्रजकालीन लोखंडी पुल आहे त्यामुळे त्याला फुटब्रीज नाव पडले आहे. शिवापुर गावातील भैरवनाथाचे मंदिर ओलांडून गडाकडे निघायचे.शिवापुरच्या शाळेतून समोर पाहताना उंच उठावलेला मनोहरगड दिसतो आणि त्या समोरची उजव्या अंगावरची सोंड. हिच आपली वाट.
शिवापूर गावातून गडकरवाडीकडे निघायचं इथे किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या टेकडावर जण्यासाठी दोन वाटा आहेत. एक गडकरवाडीतून जाणारी तर दुसरी थेट मधून जाणारी.शिवापूर शाळेपासून पुढे गेल्यावर एक सिमेंट रस्ता उजवीकडे जातो.इथून उजवीकडे जाताच एक ओढा पुलावरून पार करायचा आणि एक वाट डावीकडे रानात शिरते.इथून मग उजवीकडे वर जायचं आणि मळलेल्या वाटेने साधारण अर्धा पाउण तासाची चढण पार करताच आपण एक सपाटीवर येतो.इथेच गोठवेवाडीतून येणारी वाट आपल्या वाटेला मिळते.
रांगणागडावरुन दिसणारे मनोहर-मनसंतोषगड
२) रांगणामार्गे शिवापुर :- हा मार्ग अरण्यभ्रमंतीचा उत्तम अनुभव देतो. कोल्हापुर जिल्ह्यातील कडगावमार्गे पाटगाव या धरणस्थळी यावे.इथे सत्पुरुष मौनीबाबांचा आश्रम आहे.येथून पुढे हणंमत्ये घाटाच्या दुर्गम मार्गाने जंगलवाटेने पदभ्रमंती करत आपण गडपायथ्याच्या शिवापुर गावात पोहचू शकतो.अर्थात किमान ४ ते ५ तासाची हि पायपीत असून माहितगार वाटाड्या असल्याशिवाय या मार्गाने जाणे कठीण आहे.

३) गोठवेवाडीतून :-खाजगी वाहन असल्यास गोठवेवाडी पुढील ४ कि.मी अंतराचा चढ आपण वाहनाने पार करतो व आपले ४५ मिनिटांचे श्रम वाचतात. या रस्त्यावरून गडाची पायवाट जेथुन सुरु होते त्या ठिकाणी किल्ल्याच्या डोंगराची एक सोंड उतरलेली असुन गावातील तरुण मंडळींनी येथे कमान उभारली आहे. हि सोंड गरुडझाप म्हणुन ओळखली जाते. या सोंडेवरून उभा चढ चढत किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुला ठेवत आपण पुर्व दिशेला असलेल्या किल्ल्याच्या दरवाजाखालील वाटेवर पोहोचतो. शिवापुर येथुन येणारी पायवाट देखील येथेच या वाटेला मिळते. चढाचा काही भाग वगळता उर्वरित भागात जंगल असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही शिवाय गोठवेवाडी ग्रामस्थांनी गडाच्या वाटेवर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे सहसा वाट चुकण्याचा संभव नाही.या वाटेवर आपल्याला गडाचे एक मेट (चौकी) पहायला मिळते.
४) आंबोली या सुप्रसिध्द पर्यटन स्थळी जाउन महादेवगड व नारायणगड पाहून पायथ्याच्या शिरशिंगे गावात जाउन तेथून गोठवेवाडी मार्गे मनोहरगड असा खास साहसी तरुणांसाठी अजून एक पर्याय आहे.

कोणत्याही मार्गाने या वाटनाक्यापाशी आल्यावर गडाची अंतिम टप्प्यातील चढाईला सुरवात होते.



इथेच मनोहरगडाच्या दक्षिणबाजुच्या कड्यात नैसर्गिक गुहा आहेत.त्या बघून घ्याव्यात. तिथून काही उध्वस्त पायऱ्या व घसारा पार करत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचतो.
मनोहरगडाचा नकाशा

या ठिकाणी असलेला किल्ल्याचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन आज केवळ एकच बुरुज शिल्लक आहे. या दरवाजातून आत आल्यावर सरळ जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोष गडाकडे तर उजवीकडची वाट मनोहरगडावर जाते.
येथुन साधारण तीस बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजाखाली येतो.
येथुन पुढील पायऱ्या काही प्रमाणात ढासळल्या असुन त्यावर माती पडल्यामुळे जपून चढावे लागते. किल्ल्याचा दुसरा दरवाजा उभ्या कड्यावर बांधलेला असुन पहिल्या दरवाजात शिरल्यावर हि संपुर्ण वाट गडावरून माऱ्याच्या टप्प्यात ठेवुन बांधलेली आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजुस असलेले भक्कम बुरुज व त्यावरील ढासळलेल्या देवड्या नजरेस पडतात. या बुरुजावरून गडाची दूरवर पसरलेली तटबंदी, त्यावरील पायऱ्या व एका उंच चौथऱ्यावर बांधलेले कोठार नजरेस पडतो. त्रिकोणी माथा असलेला हा किल्ला पुर्वपश्चिम साधारण १४ एकरवर पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २४६० फुट आहे. तटावरून संपुर्ण गडाला फेरी मारत मध्यभागी असलेले अवशेष पहाता येतात. दरवाजाच्या उजवीकडील

तटावरून गडफेरीस सुरवात केल्यावर भगवा झेंडा फडकत असलेल्या गडाच्या उत्तर टोकावर जाताना या तटबंदीत असलेले एक शौचकुप पहायला मिळते.
येथुन तटाच्या कडेकडेने गडाच्या पश्चिम टोकावर मनसंतोषगडाकडे जाताना दोन चार लहान चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत.


गडाच्या या पश्चिम टोकावरून दोन गडांमधील दरी व मनसंतोषगडाचे सुंदर दर्शन होते. सध्या मनसंतोष गडावर सहजपणे जाता येत नसल्याने येथुनच त्याचा माथा पाहावा लागतो. गडाच्या पश्चिम टोकावर जवळपास १८ फुट उंचीचा मातीचा ढिगारा पहायला मिळतो. हा बहुदा येथुन मनसंतोष गडावर व गडाच्या अंतर्गत भागात नजर ठेवण्यासाठी बांधलेला सुटा बुरुज असावा जो काळाच्या ओघात ढासळला असावा. येथुन दक्षिणेकडील टोकावर जाताना काही ठिकाणी तटावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात.


किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडून किल्ल्याच्या दरवाजापर्यंत असलेली संपुर्ण तटबंदी आजही पुर्णपणे सुस्थितीत असुन या तटबंदीत एकुण तीन शौचकुप बांधलेली आहेत.

या तटाची रुंदी साधारण १०-१२ फुट असुन तटामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या नाळी पहायला मिळतात. या तटबंदीच्या आधारे पाण्याचा तलाव बांधल्याने हि तटबंदी एका ठिकाणी कोसळली असुन आधार म्हणुन या तटबंदीच्या आतील बाजुस दुसरी अर्धवट बांधलेली तटबंदी पहायला मिळते.
या सर्व वास्तु पहाण्यासाठी तटावरून न जाता तटाच्या कडेने गडफेरी करावी. गडाच्या संपुर्ण तटबंदीचा फेरा पुर्ण झाल्यावर आतील वास्तु पहाण्यास सुरवात करावी. जेथे तटबंदी कोसळली आहे 

त्याच्या वरील बाजुस डावीकडे एका लहान झाडाखाली बांधीव विहिर असुन या विहिरीत बारमाही पिण्याचे पाणी असते. गडावर पिंण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय आहे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी पोहरा पाहून.. एकदा पाणी शेंदून.. गडावरचं पाणी पिवून तृप्त व्हायचं

गडावरील मंदीर नष्ट झाल्याने विहीरीकडून उजवीकडे दिसणाऱ्या औदुंबराच्या झाडाखाली काही देवतांच्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. यात दोन भैरव,एक गजलक्ष्मी व एक देवीची मुर्ती पहायला मिळते.


औदुंबराच्या झाडासमोर एका मोठया वास्तुचा उध्वस्त चौथरा व त्यात काही कोरीव दगड पहायला मिळतात. येथे बहुदा गडाची राजसदर असावी. गडाच्या या भागात विखुरलेले बहुतांशी अवशेष पहाता येथे मोठया प्रमाणात वस्ती असावी.

चौथऱ्याच्या पुढील बाजुस एका उंच जोत्यावर दोन दालनाचे दगडी कोठार असुन त्याला एक मोठा व एक लहान असे दोन दरवाजे आहेत. या वास्तुचे छप्पर वगळता हि वास्तु आजही चांगल्या अवस्थेत आहे. माथ्यावरती औदुंबराची दोन झाडे व विहिरीकडील लहान झाड वगळता इतर कोठेही सावली नाही.

गडावरून मोठा विस्तृत परिसर दिसतो.आग्नेयेला आंबोलीचा कावळेसाद पॉईंट परिसर, नारायणगड , महादेवगड तर वायव्येला रांगणागडाची सोंड दिसते.स्वच्छ हवेत पश्चिमेला सागराची निळी रेघ ही दिसु शकते. कोकणचा मोठा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण गडफेरीस दीड तास पुरेसा होतो.
गड तर बघून झाला आता उतरायचे दिव्य करायचे असते.एकवेळ चढाईच्या खडतर मार्गाने आधार घेत वर येणे सोपे असते.पण समोर पाताळवेरी गेलेल्या दर्या पहात मुरमाड घसरड्या वाटेने उतरायचे असते.हे दिव्य पार पाडाताना पायथ्याच्या गावकरी लोकांचे बोल पटतात.पण उतरावे तर लागणारच.फारच कच्च्या दिलाचे भिडु सोबत असतील तर मुरमाड पॅचवर दोरी लावलेली चांगली. शेवटी एकदाचा जीवघेणा टप्पा पार पायऱ्या उतरू लागलो.गडाची एकंदरीत भटकंतीचा अनुभव 'आहे मनोहर तरी' असाच आहे.साक्षात शिवछत्रपतींच्या आयुष्यातील दोन महिन्याचा काळ ज्या गडावर गेला त्या गडाची माती आपल्या भाळी लागल्याचे समाधान घेउन आपण परतले असतो.
किल्ले मनसंतोषगड.
मनोहरगडाच्या पश्चिम टोकावरुन किल्ले मनसंतोषगडाचे दर्शन झाले तरी ज्यांच्या मनाला गडाला दुरुन पाहून संतोष झाला नाही त्यांनी मनसंतोषगडाची चढाई करायला हरकत नाही.मात्र हि चढाई तांत्रिक स्वरुपाची असून अवघड आहे.ज्यांना प्रस्तरारोहणाचा अनुभव आहे त्यांनीच हा प्रयत्न केलेला बरा. मनोहरगडाकडे चढणार्या वाटेने आपण किल्ल्याचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा जो पुर्णपणे नष्ट झाला त्याठिकाणी येतो. आज इथे केवळ एकच बुरुज शिल्लक आहे.
या दरवाजातून आत आल्यावर सरळ जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोषगडाकडे तर उजवीकडची वाट मनोहरगडावर जाते. या वाटेने थोडे चालुन गेल्यावर काही नैसर्गिक गुहा दिसतात. या गुहा पार करून मनोहरगडला वळसा मारत आपण गोठवेवाडीच्या दिशेने मनोहर आणि मनसंतोषमधील खिंडीत पोहोचतो.
येथे मनसंतोषगड सुळका उजव्या हातास ठेवून एक पायवाट मनसंतोष गडाच्या पायथ्याशी जाते.
हि डावीकडे वाट झाडी-झुडुपातून सोंडेवर जाते तिकडे निघायचं.थोडी खुरट्या झाडामधील चढण पार करायची. सोंडेवरून चढाई सुरु होते.अर्ध्या तासाने बऱ्यापैकी सपाटी येते.दोन्ही बाजूस दाट जंगल आणि मध्ये वाट अशी वाटचाल सुरु असते. साधारण १५-२० मिनिटे सपाटीवरून चालत गेल्यास कारवीचे जंगल सुरु होते आणि मग आहे सोंडेवरची चढाई.पुढे वाट डावीकडे वळते
आणि आपण एक २० मिनिटांचा ट्राव्हर्स मारीत मनसंतोषगडाच्या कातळभिंतीखाली पोहोचतो इकडे उजवीकडे तिरपे वर जाताच समोर कातळभिंत दिसते आणि आपण गडाच्या समीप येवून पोहोचतो.
या वाटेने थोडे अंतर चालल्यावर पुन्हा डावीकडे जाताच आपण किल्ल्यावर जाणाऱ्या उद्ध्वस्त पायऱ्यांपाशी पोहोचतो.
मनसंतोष गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेला पायरीमार्ग आहे.या पायऱ्या चढून उजवीकडे वर जाताच, मनसंतोषगडाच्या कातळ भिंतीमध्ये खोदून काढलेल्या पायऱ्या डावीकडे वर कातळाला खेटून वर जाताना दिसतात.
हि वाट वाहून आलेल्या मातीने माखला आहे. कातळाच्या बाजूने पायऱ्यांचा दगड डोकं वर काढताना दिसला आणि दमाने पायऱ्या चढून वर जायचं. इथे २० एक पायऱ्या चढून जाताच, मध्ये साधारण पंधरा फुटाची वाट ढासळली आहे.
या पायऱ्या इंग्रजांनी हा किल्ला निकामी करण्यासाठी सन १८४५ साली तोफा डागुन उध्वस्त केल्याने पुढचा टप्पा थोडासा अवघड बनला आहे.

हा टप्पा दोर लावुन पार करावा लागत असल्याने गिर्यारोहण तंत्राची माहिती व साहित्य सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा मनोहरगड वरूनच मनसंतोष गडाचा माथा पहाणे उत्तम. इथे पायऱ्या नाहीत तेंव्हा जीव मुठीत घेवून मुरमाड चिंचोळ्या पायवाटेने वर जायचं.चुकीला क्षमा नाही.नजर हटी आणि दरीच्या भेटी असा असा हा कठीण टप्पा आहे. तेंव्हा सावधपणाने पाय टाकीत, उजव्या अंगाच्या कातळाचा आधार घेत वर सरकायचं की आपण थोडं वर येतो. साधारण शे-दीडशे फुट आलो कि मग वाट पुन्हा उजवीकडे वळते आणि मनसंतोषगडाचा भग्न दरवाजा वर दिसू लागतो.. इथेही कातळाला चिटकून.. हळूहळू वर सरकायचं.. ३०-४० ओबडधोबड पायऱ्या चढून जाताच आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर येवून पोहोचतो. किल्ला सर करण्याची कामगिरी फत्ते झालेली असली तरी आता आलेल्या निसरड्या मुरमाड वाटेने उतरण्याचे दिव्य करायचे असल्याने मनावर ताण कायम असतो.तरीही शिवछत्रपतींचा जयजयकार करत गड प्रदक्षिणेला निघायचे. शिवापूर व गोठवेवाडी गावातुन गडमाथा गाठण्यास २ ते २.५ तास लागतात.

मनसंतोषगडाचा निमुळता गडमाथा पुर्वपश्चिम साधारण एक एकरवर पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २०६५ फुट आहे.सुरवातीला डाव्या अंगाने निघायचे.खुरट्या जंगलातून पुढे जाताच डावीकडे प्रशस्त तटबंदी खालच्या अंगाला बांधल्याचे दिसते. उजवीकडे.एक भक्कम कोठार दिसते, तिकडे निघायचं.कोठाराच्या पुढ्यातून जाताच एक ओढा पार करायचा आणि मग उजवीकडे एक भलेमोठे झाड आहे हे झाड या गडावरचे एकमेव मोठे झाड. झाडाखाली एक भग्न मूर्ती आणि दगडी समई आहे.याशिवाय गडाच्या माथ्यावर एक-दोन घरांचे चौथरे व दोन कोरडी पडलेली पाण्याची टाकी वगळता फारसे अवशेष नाहीत.

गडावरून पारपोली घाटाचा परीसर, नारायणगड , महादेवगड, रांगणा हे किल्ले तसेच कोकणचा मोठा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण गडफेरीस १५ मिनिटे पुरेशी होतात. शिवकाळात तसेच करवीरच्या कागदपत्रात मनोहरगडचा वारंवार उल्लेख येत असला तरी मनसंतोष गडचा मात्र उल्लेख येत नाही. त्यामुळे शिवकाळात हा गड अस्तित्वात असावा का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. असल्यास हे दोन्ही गड एकच किल्ला मानल्याने मनोहरगडचा इतिहास हाच मनसंतोष गडाचा इतिहास ठरतो.
एकंदरीत सह्याद्रीच्या कुशीतील अनोखा थरार अनुभवायचा असेल आणि मनाला अनोखा संतोष मिळवायचा असेल तर थोडी इच्छाशक्ती,थोडे धैर्य आणि पुरेशी तयारी आणि खबरदारी घेउन मनसंतोषगडाची चढाई करायला हरकत नाही.
संदर्भग्रंथः-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
४) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
५) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
६) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
७) श्री.अमर अडके यांचा दै.तरुण भारतमधील लेख
८) साद चाकोरीबाहेरील किल्ल्याची -पांडुरंग पाटणकर

.
असा मनोहर - मनसंतोष गडाचा थरार अनुभवून शिवापूरात दाखल झालो.. ट्राव्हलर काका तयार होते.. इथे चौकशी करता.. इथून एक शोर्टकट गाडी वाट.. गोठवे गावात जात असल्याचे कळले.. इथून गेल्यास कमीत कमी ४० किमी अंतर वाचणार असल्याने.. याच रस्त्याने जायचे ठरले.. दत्तमंदिराच्या समोरून हा रस्ता घाटवाटेने आपल्याला शिरशिंगे गावाकडे घेवून जातो.. शिरशिंगे - अंबोली.. आणि कागल वरून पुण्याकडे धूम ठोकली..
https://vatadya.blog/2017/06/07/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87/
शिवपूर्वकाळातील ‘मनोहर-मनसंतोष’ गड!
घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी चार घाट आहेत. पहिला आंबा, दुसरा बावडा,
तिसरा दाजीपुर जंगलातून उतरणा फोंडा आणि सर्वात शेवटी आंबोली. या चारही
घाटांचे वैशिष्ट म्हणजे त्यांच्या माथ्यावर किल्ले आहेत. यातील बहुतेक
किल्ले हे शिवपूर्व कालखंडातील आहेत. या सर्वांमधील आंबोली घात तर चक्क
महादेवगड फोडूनच बनविलेला आहे. याच्या घाटमाथ्यावर नारायणगड तर, पायथ्याशी
मनोहर-मनसंतोष गडांसारखे बलदंड किल्ले आहेत. यापैकी नारायणगड हा मुख्य
सह्यधारेपासून थोडा सुटलेला आहे. एके काळच्या प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी
संस्थानाच्या पूर्व हद्दीवरील हे सारे किल्ले. परंतु फार कमी
गिर्यारोहकांचे पाय इकडे वळतात.
मनोहर-मनसंतोष गडावर जाण्यासाठी पेठशिवापूर आणि शिरसिंगेजवळच्या
गोथावेवादीतून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन
एस.टी. ची सोय आहे. परंतु या एसटीच्या सेवा दुर्गभटक्यांसाठी उपयोगाच्या
नाहीत. सावंतवाडीहुन पेठशिरापुरास मुक्कामाची एक एसटी जाते. या गाडीने
रात्रीच गावात दाखल होत सकाळी गड जवळ करता येते. दुसरा मार्ग गोठवेवाडीतून
जातो. या गोठवेवाडीसाठी सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील शिरसिंगे गावातून वाट
जाते. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये इथला निसर्ग आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारा
असतो. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यामधून चालताना जलधारांचे प्रपात सतत कानावर
पडत असतात. वाडीत पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन घडते.
ज्याचा पसारा मोठा तो मनोहरगड तर ज्याचा पसारा कमी तो मनसंतोषगड!
या गाठवेवाडीतूनच एक पायवाट या दोन्ही गडांच्या दिशेने झेपावते. वाट
खड्या चढणीची असल्यामुळे छातीचा उये फाटतो की काय असे वाटते. जसेजसे आपण
उंची गाठू लागतो, तसे आंबोली खोऱ्यामधील गावाचे विहंगम दृश्य पाहायला
मिळते. साधारण तेथून दीड तासाच्या चढाईनंतर एक जंगलाचा पत्ता लागतो. मध्येच
पेठशिवापुराहून येणारी वाट येऊन मिळते. त्यानंतर अर्ध्या तासाच्या
चढाईनंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहचतो. तेथून डावीकडे जाणारी वाट
मनोहरगडास वेढा मारून मनसंतोषकडे तर उजवीकडची मनोहरगडाकडे जाते आधी आपले
लक्ष मनोहरगडाकडे असल्यामुळे उजवीकडची कोरीव पायऱ्यांची वाट लागते. साधारण
पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पूर्वाभिमुख उध्वस्त दरवाजाचे
दर्शन होते. आत शिरल्यावर एक भक्कम बुरुजावर पोहचतो. इथून डावी उजवीकडे दोन
वाट वळतात. यातील उजव्या वाटेवरून चालत गेल्यावर आपण उत्तर टोकापाशी
पोहचतो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाची वाट मात्र मोकळीस
आलेली नाही. त्यामुळे दरवाजा दुरूनच बघावा लागतो.
डावीकडील वाटेने गेल्यास तटबंदीची रांग थेट दक्षिण टोकापर्यंत धावत
गेलेली आहे. समोरील उंचवट्यावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष
वेधून घेते. खाली भलामोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली ही इमारत दोन
खोल्यांमध्ये विभागलेली आहे. या इमारतीच्या जवळच औदुंबराचे एक झाड आहे. या
झाडाच्या खाली भैरोबांच्या दोन मूर्ती आहेत. याला स्थानिक लोक ‘गडाचा चाळा’
म्हणतात. पश्चिमेकडच्या टोकावर गेल्यावर मनसंतोषगडाचा संपूर्ण नजारा
दिसतो. हे पाहून पुन्हा औदुंबराच्या झाडाकडे यायचे आणि उत्तर तटाकडे येताना
वाटेत एक विहीर लागते. विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असल्याने इथे थोडा
इसावा मिळतो. नंतर गड उतरायला लागल्यास मनसंतोषगडाकडे जाणारी वाट मिळते. या
वाटेने थोडे चालू लागले की, काही अंतरावर एक भली मोठी गुहा दिसते. या
गुहेत मधमाशांचे पोळे असतात त्यामुळे इथे थोडी दक्षता बाळगणे महत्वाचे
ठरते.
थोड्या वेळेचा प्रवास करून आपण मनोहर आणि मनसंतोष खिंडीपाशी पोहचतो.
इथून मनसंतोष गडाचा सुळका अंगावर आल्यासारखा वाटतो. मनसंतोष गडाच्या उजव्या
हातास लागून एक पायवाट पुढे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर किल्ल्याच्या
उध्वस्त पायऱ्या दिसतात. या पुढचा रस्ता जरा अवघड असल्याने या ठिकाणी
सुरक्षारक्षक दोर असणे आवश्यक आहे. या टप्पा पार केल्यावर आपण थेट गडाच्या
माथ्यावर जाऊन पोहचतो. मनसंतोष गडाचा माथा निमुळता असून, तो पूर्व-पश्चिम
पसरलेला आहे. सध्या या माथ्यावर एक-दोन वाड्यांची जोती दिसतात. याठिकाणी
दोन पाण्याच्या टाकी आहेत. याशिवाय वर फारसे अवशेष नाहीत. मात्र गडावरून
आंबोली घाटाच्या खोऱ्यातील निसर्गाचे नयनरम्य दृश्य दिसते. धाडसी
गिर्यारोहकांसाठी हे अतिशय मोहक ठिकाण आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : सह्याद्री
जिल्हा :सिंधुदुर्ग
श्रेणी : मध्यम
https://marathiworld.com/manohar-mansantoshgad
ऐन घाटमाथ्यावर, आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेली ही जोडगोळी. अवघड वाट, दळणवळणाच्या गैरसोयी यामुळे भटक्यांची पावले फारशी इकडे वळत नाहीत. ‘मनोहर-मनसंतोष’चे हे अनगड रूप आणि त्याची
ऐन घाटमाथ्यावर, आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेली ही जोडगोळी. अवघड वाट, दळणवळणाच्या गैरसोयी यामुळे भटक्यांची पावले फारशी इकडे वळत नाहीत. ‘मनोहर-मनसंतोष’चे हे अनगड रूप आणि त्याची वाट..
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी चार घाट आहेत. पहिला अंबा, दुसरा बावडा, तिसरा दाजीपूर जंगलातून खाली उतरणारा फोंडा आणि सर्वात शेवटचा आंबोली. या चारही घाटांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या माथ्यावर किल्ले आहेत. यातील बहुसंख्य हे शिवपूर्वकाळात बांधलेले आहेत. या सर्वामधील आंबोली घाट तर चक्क महादेवगड फोडूनच बनविलेला आहे. याच्या घाटमाथ्यावर नारायणगडासारखा तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोष गडांसारखे बलदंड किल्ले आहेत. यापैकी नारायणगड हा मुख्य सह्य़धारेपासून थोडा सुटावलेला आहे. सद्यस्थितीला त्यावर एक-दोन चौथऱ्यांशिवाय फारसे काही नाही. एके काळच्या प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या पूर्व हद्दीवरील हे सारे किल्ले. पण फारच कमी डोंगरभटक्यांचे पाय इकडे वळतात. यातीलच ‘मनोहर-मनसंतोष’ जोडीच्या भटकंतीला आज निघुयात.
मनोहर-मनसंतोष गडावर जाण्यासाठी पेठशिवापूर आणि शिरसिंगेजवळच्या गोठवेवाडीतून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहून एस.टी.ची सोय आहे. पण या एस.टी.च्या वेळा दुर्गभटक्यांच्या उपयोगाच्या नाहीत. तरीही त्यातल्या त्यात सावंतवाडीहून पेठशिवापुरास मुक्कामाची एक एस.टी. जाते. या गाडीने रात्रीच गावात दाखल होत सकाळी गड जवळ करता येतो. दुसरा मार्ग गोठवेवाडीतून जातो. या गोठवेवाडीसाठी सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील शिरसिंगे गावातून वाट जाते. शिरसिंगे ते गोठवेवाडी ही वाट चांगली वळणावळणाची आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तर इथला निसर्ग एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे उधाणलेला असतो. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमधून पडणाऱ्या जलधारांचे प्रपात सतत कानावर पडत असतात. वाडीत पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन घडते. ज्याचा पसारा मोठा तो मनोहरगड तर ज्याचा कमी तो मनसंतोषगड!
या गोठवेवाडीतूनच एक पायवाट या दोन्ही गडांच्या दिशेने झेपावते. वाट खडय़ा चढणीची असल्यामुळे छातीचा ऊर फाटतो की काय असे वाटते. जसे आपण उंची गाठू लागतो, तसे आंबोली खोऱ्यांमधील गावांचे विहंगम दृश्य दिसायला लागते. साधारण दीड तासाच्या चढाईनंतर आपण एका जंगलाच्या पट्टय़ामध्ये शिरतो. मध्येच पेठशिवापुराहून येणारी वाट येऊन मिळते. अध्र्या तासाच्या चढाई नंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचतो. इथून डावीकडे जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोषकडे तर उजवीकडची मनोहरगडाकडे जाते. आधी आपले लक्ष मनोहरगड असल्यामुळे आपण उजवीकडची कोरीव पायऱ्यांची वाट पकडायची. साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख उद्ध्वस्त दरवाज्यापाशी पोहोचतो.
आत शिरल्यावर आपण एका भक्कम बुरुजावर पोहोचतो. इथून डावी, उजवीकडे दोन वाटा वळतात. यातील उजव्या वाटेने तटावरून चालत गेल्यावर आपण उत्तर टोकापाशी पोहोचतो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजापर्यंत उतरण्याची वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे दरवाजा दूरवरूनच बघायचा आणि माघारी मूळ जागी यायचे. इथून आता डावीकडची वाट धरायची. या उद्ध्वस्त दरवाजापासून तटबंदीची रांग थेट दक्षिण टोकापर्यंत धावत गेलेली आहे. या तटाचे वैशिष्टय़ म्हणजे यात जागोजागी शौचकूप बांधलेले आहेत. समोरील उंचवटय़ावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष वेधून घेते. खाली भला मोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली ही इमारत दोन खोल्यांमध्ये विभागलेली आहे. या इमारतीच्या जवळच औदुंबराचे झाड आहे. या झाडाच्या सावलीत भैरोबांच्या दोन मूर्ती आहेत. याला स्थानिक लोक ‘गडाचा चाळा’ असे म्हणतात. या औदुंबराच्या झाडापासून आपण पश्चिमेकडची वाट धरायची. या पश्चिम टोकावरून मनसंतोषगडाचा संपूर्ण नजारा दिसतो. हे पाहून आपण पुन्हा औदुंबराच्या झाडापाशी पोहोचायचे आणि उत्तर टोकाकडच्या तटाकडे वळायचे. वाटेत एक विहीर लागते. या विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असल्याने इथे थोडा विसावा मिळू शकतो. ही विश्रांती घेत गड उतरायला लागायचे. पायऱ्या उतरल्यावर आपण थोडय़ावेळेपूर्वीच्या मनसंतोषगडाकडे जाण्यास सोडलेल्या वाटेला येऊन मिळतो. या वाटेने थोडे चालू लागलो की, काही अंतरावर एक भली मोठी गुहा दिसते. या गुहेच्या वर मधमाशांची पोळी असल्याने थोडी सावधानता बाळगावी. थोडय़ाच वेळात आपण मनोहर आणि मनसंतोषमधील खिंडीपाशी पोहोचतो. इथून मनसंतोषगडाचा सुळका अंगावर आल्यासारखा भासतो. मनसंतोषगडाला उजव्या हातास ठेवून एक पायवाट पुढे जाते. या वाटेने थोडे अंतर चालल्यावर आपण किल्ल्यावर जाणाऱ्या उद्ध्वस्त पायऱ्यांपाशी पोहोचतो. या पुढचा टप्पा थोडासा अवघड आहे. यासाठी जवळ एखादा सुरक्षारक्षक दोर असणे आवश्यक आहे. हा टप्पा पार केल्यावर आपण थेट गडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो.
मनसंतोषगडाचा गडमाथा निमुळता असून, तो पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. सध्या या माथ्यावर एक-दोन वाडय़ांची जोती दिसतात आणि दोन पाण्याची टाकी आहेत. याशिवाय वर फारसे अवशेष नाहीत. मात्र गडावरून आंबोली घाटाच्या खोऱ्यातील परिसराचे नयनरम्य दृश्य दिसते. हे दृश्य पाहतच मनोहर-मनसंतोषगडाचा निरोप घ्यायचा आणि उतरू लागायचे. अनगड वाटेवरचे हे दोन गड पाहताना पावले थकलेली असतात पण मन समाधानाने भरून पावलेले असते.
No comments:
Post a Comment