Monday, February 22, 2021

हनुमंतगड

   महाराष्ट्रात हनुमानाचे नाव असणारे दोन गड आहेत.एक आहे जुन्नरजवळ.निमगिरी या दुर्गाचा उपदुर्ग हनुमंतगड, दुसरा आहे तळकोकणात बांद्याजवळ.जुन्नरजवळील हनुमंतगडावर मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी जातात.मात्र तळकोकणात असणारा हा हनुमंतगड तसा अपरिचित आहेत.आज याचीच ओळख करुन घेउया.
   या अनवट गडाचा इतिहास बघायला गेलो तर  कोकणचा प्राचिन इतिहास हा इ. स. पूर्व पहिल्या, दुसऱ्या काळापासून मोर्य यांच्या सत्तेपासून सुरू होतो. त्यानंतर सातवाहन, चालुक्‍य, राष्ट्रकृट, मोर्या शिलाहार अशा राजवटी होऊन गेल्या. त्या काळात घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती केली होती. त्यानंतरच्या काळात मध्ययुगीन आदिलशहा निजामशहा, मुघल, पोतुर्गीज, डच मराठे असा अंमल हा कोकणावर राहिला आहे. कोल्हापूरमार्गे, दोडामार्गमार्गे येथे जाणाऱ्या प्रमुख घाटमार्गवर हनुमंत गडाची निर्मिती केली असून किल्ल्‌यावर खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्‍या आहेत. पूर्वी हा गड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणीसाठी वापरात असावा. बांदा किल्ला हा जवळच असलेला किल्ला असून या किल्ल्याच्या अनेक घडामोडी या इतिहासाला अज्ञात आहेत. 

      हनुमंत गडावरील  फोंड दुसरा सावंत यांच्या काळात इ.१७०९ मध्ये किल्याची बांधकाम आणि डागडुजी झाल्याची नोंद आहे. सावंतवाडीच्या फोंड सावंतांनी हनुमंतगडाची निर्मिती करवीरकर व पोर्तूगिजांपासून आपल्या संस्थानाचे रक्षण करण्यासाठी  सन १७०९ ते १७३८ च्या दरम्यान केली असावी.अर्थात याला कोणताच पुरावा नाही.सावंतांच्या काळात किल्यावर बऱ्याच घडामोडी घडल्या.करवीरकरानी १७८७ मध्ये हनुमंत गड जिकून घेतला व परत १७९३ मध्ये सांवत यांच्याकडे दिला.
    सन १८०४ मध्ये सावंताच्या अंतर्गत कलहात फोंड सावंत याने करवीरकरांना मदतीस बोलाविले. करवीरकरांनी रत्नाकरपंत राजाज्ञ यांना पाठविले.त्यांनी लक्ष्मीबाईंकडून भरतगड व ईतर किल्ले घेतले.पुढे १८०५-०६ मध्ये रावसाहेबांनी बांद्यास जाउन बांद्याचा कोट व हनुमंतगड घेतले. फोंड सावंताचा पराभव करुन त्यांच्या काही लोकांना हनुमंतगडावर कैदेत ठेवले. सन १८१० मधे सावंतवाडीतील कलहाच्या वेळी चंद्रोबा सुभेदार याने हनमंतगडास वेढा दिला.तो उठविण्यासाठी निपाणीकरांचा सरदार सुबराव हा चालून गेला. तेव्हा चंद्रोबाने त्याला फुकेरीच्या घाटात गाठून पराभुत केले.त्यामुळे निपाणीकरांना माघार घेणे भाग पडले. सन १८३२ मध्ये हनुमंतगड वाडीकरांच्या ताब्यात होता. अर्थात यावेळी वाडीकरांची स्थिती हलाकीची असल्याने गडाकडे त्यांचे दुर्लक्षच होते.यावेळी गडावर किल्लेदार,८० सैनिक, ३ कारकुन, २ किर्तनी, १ कोठावळा, २७ लोक व २ कुणबीणी अशी नेमणुक होते. या सर्वांसाठी ३००० रुपये खर्च नोंदवला आहे. इ.स १८३८ मध्ये ब्रिटीशांनी सावंतवाडी संस्थानाचा ताबा घेतल्यावर आत्मो चौकेकर यांनी आपल्या साथिदारांबरोबर बंड करुन हनुमंतगड ताब्यात घेतला. परंतु फितुरीमुळे हे बंड फसले. शेवटी अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हनुमंत गड हा दि.१९ डिसेंबर १९३८ रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हनुमंतगड हा किल्ला येतो. बांद्यापासून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या फुकेरी गावापर्यंत जाणारा रस्ता दाट जंगलातून जातो. पायथ्याचे फुकेरी गाव चारही बाजूने डोंगराने वेढलेले आहे.दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या फुकेरी गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ५०० लोकवस्तीचा हा गाव वसलेला आहे. हनुमंत गडा व्यतिरिक्त तिकडे जंगलामध्ये सात ठिकाणी रांजण खळगे असल्याचे स्थानिक सांगतात.सदर ठिकाणाचे नाव राजिंगण असून ते देवाचे स्थान असल्याचे स्थानिक लोक मानतात.एका मोठ्या ओहोळामध्ये नैसर्गिकरित्या एकाखाली एक असे तीन छोटे तलाव तयार झाले आहेत. तिथल्या दगडांची एक विशिष्ट अशी रचना झाली आहे, काही खडक गोलाकार तर काही आयताकृती मोठ्या लाद्यांसारखे पण जाड आहेत .काही खडक एकसंध दिसतात त्यातूनच पाण्याच्या घर्षणाने ते तीन रांजण खळगे तयार झाले आहेत.  
    हनुमंत गडामुळे या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर या गडाची बांधणी करण्यात आली आहे.  गावापासून किल्ल्याची उंची अंदाजे १५० मीटर आहे. गड उंचावर असल्याने येथील वातावरण हवेशीर व आल्हाददायक असते. डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत येथील वातावरणात गारवा असतो.या गडावर हनुमंताचे पाषाण होते. यावरुनच त्याला ‘हनुमंतगड’ असे नाव पडले. कालांतराने हे पाषाण गावातील मंदिरात स्थानापन्न करण्यात आले.
   या गडावर जायला तीन मार्ग आहेत
१) फुकेरीवरुन :-
मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा गावातून एक रस्ता दोडामार्ग गावाकडे जातो. या रस्त्यावर बांद्यापासून ७ किमी अंतरावर, डावीकडे तळकट गावाला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरुन तळकट गाव ६ किमीवर आहे. तळकट गावातील पैनगंगा बँकेजवळून दोन फाटे फुटतात. त्यापैकी डाव्या बाजूच्या रस्त्याने ३ किमीवर झोंळाबे गाव आहे. झोळांबे गावानंतर परत दोन रस्ते फुटतात. त्यातील उजव्या हाताचा रस्ता ३ किमी वरील फुकेरी गावात जातो.
    फुकेरी गावातील शाळा, ग्रामपंचायत व देवळात राहण्याची सोय होऊ शकते. गावात एकच हॉटेल आहे. तिथे आधी ऑर्डर दिल्यास जेवणाची सोय होऊ शकते. किल्ल्यावर दाट रान असल्याने शक्यतो वाटाड्या घेतलेला चांगला.गावात वाटाड्या मिळू शकतो. बांद्यापासून फुकेरीला जाण्यासाठी सकाळी १०.३० व संध्याकाळी ५.३० ला मुक्कामी बस आहे. हिच बस सकाळी फुकेरीवरुन ६.४५ ला सुटते आणि दुसरी बस थेट ११.३० ला आहे. शक्यतो स्वताचे वाहन असणे हेच सोयीचे.
  २) चौकुळ मार्गे :-
आंबोलीवरुन चौकुळ गाव गाठावे.आंबोलीवरुन चौकुळला थेट एस.टी.बस आहे. चौकुळ आंबोली रस्त्यावर घटप्रभा नदीवर सखल पूल आहे. पुढे एका मोठया नदीवर साकव आहे. तिथून थोडं पुढे आंबोली चौकुळ इसापूर मुख्य सडक लागते.ती सोडून उजव्या हाताला म्हणजे नैऋत्य दिशेला चालंण्यास सुरवात करावी.पुढे चौकुळची कुठलीशी वाडी लागते. बांधलेला रस्ता, त्याच्या दुतर्फा घरं. अनेक मोठ्या दगडातून वाट काढत अखेरीस सह्याद्रीच्या धारेवर येउन पोहचतो. ईथून खाली उतरायला तीन पर्याय आहेत. नेढ्याजवळून उतरणारी वाट पकडून तीन तासात फुकेरीला उतरणे किंवा डोंगरसोडेच्या नाकावर तीव्र उतार सावधगिरीने उतरुन 'फोण्याच्या पाजेने' उतरुन धारपी गाव एक तासात गाठावे.आणखी एक तास चढून हनुमंतगड गाठता येईल.सध्या या परिसरात मोठे बदल होत आहेत. घारपी आणि उडेली दोन्ही गावात हजारो एकर जागा १७००० रुपये एकर अशा नगण्य भावाने ७ वर्षांपूर्वी विकलीय. केरळातल्या कंपन्या इथे रबर आणि काजू लावतात. लागवडीसाठी जमीन उतार तयार करणे. रस्ते तयार करणे इत्यादी कामे चालू आहेत. इथली सगळी परिसंस्था बदलून गेलीय.  घाट वाटा मोडल्यात आता हे रस्तेच वापरायचे.इथे कधी चहा कॉफीची लागवड झाली तर आश्चर्य वाटायला नको. 

३) पारगड ते हनुमंतगडः
   पारगड पाहून जवळचे इसापुर गाठावे. इसापुरातून भेकूर्लीकडे निघायचे. गावाबाहेर सडा आहे.इथे आंबोलीच्या जंगल लागते. इसापुरातून एक सोंड ४०० मीटर खाली भेकूर्लीत उतरलीय. तिथून रमणीय निसर्गदृश्याचा आनंद घेत खाली भेकूर्लीत उतरायचे.भेकूर्लीतून कळणे / कुकुडजा नदी साकवावरून पार करुन खडपाडा गाठायचे. खडपाडा चौकुळातून खाली उतरणाऱ्या एका सोंडेवर आहे. नदी पार करुन पुन्हा चढाई करायची. डांबरी सडक लागते. खडपडाच्या उत्तरेला आणि दोन सोंडा चौकुळ वरून खाली उतरल्यात. त्यातल्या सर्वात उत्तरेकडच्या सोंडेवर आहे हनुमंतगड. या दोन सोंडांच्या मध्ये फुकेरी. खडपाड्यातून फुकेरीत जायला एक सोंड चढून उतरायला हवी. वाट दाट जंगलाची आहे. अंधारबन झक मारेल असं सगळं निबिड अरण्य. फुकेरीतून हनुमंतगड चढता येईल. 
 
 
 
 
  फुकेरी गाव निसर्गरम्य आहे.गड पायथ्यावर वैजामाउली ( महिषासुर मर्दिनीचे ) देऊळ आहे तेथे तोफा पण आहेत.  गडावरील तोफांविषयी माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मते गडावर पूर्वी ५ तोफा होत्या. त्या तोफा या घळीत ढकलून देण्यात आल्या होत्या. गावात प्रवेशकरतेवेळी आपल्याला सुरवातीलाच दोन तोफा दिसतात. त्यातील एक तोफ जमिनीत गाडलेली होती. ती ३० जुलै २०१८ ला बाहेर काढण्यात आली. त्यानंतर तोफेचे महत्व पटवून देत तोफसंवर्धन करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीत पत्र देण्यात आले. या गावातून वर चढताना खिंड लागते. या खिंडीतील झाडीत सहा फुट लांबीच्या दोन तोफा पडलेल्या होत्या. या तोफा गावकऱ्यांनी गडाच्या पायथ्याकडे असलेल्या देवी माऊली मंदिराजवळ ठेवल्या आहेत. या तोफांना चौथर्‍यावर बसविण्याची ना हरकत सह्याद्री सिंधुदुर्ग विभागाला ग्रामस्थांनी दिलेली आहे.
 गावकर्‍यांच्या मते शिवकाळात शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेऊन या किल्ल्यावर ३६ गावातील शूर सैनिकांची गडकरी म्हणून नेमणूक केली होती. पुढे मोगलांनी हा गड खालसा केल्यावर हे गडकरी वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. त्यापैकी पेंढूरकर भोसले-सावंत, मसुरकर सावंत, कुणकेरकर सावंत ठिकार, कोलते व पोकळे असे एकूण सहा गडकरी वंशज आजतागायत या परिसरात राहतात.श्री देव पाटेकर यांची एक तनु श्री देव नितकारी गडावर एका कमंडलुच्या स्वरुपात अस्तित्वात होती. तीची मालकी व पूजापाठ गडकरी करत. हनुमंत गडावरील नितकारी जो राज्याचा रक्षक त्याबद्दल आजही राजघराण्यात आस्था असून राजघराण्याकडून देण्यात आलेली चांदीच्या घोड्यावरील नितकारीची मूर्ती आजही गावातील मंदिरात पूजेसाठी ठेवलेली आहे.

    फुकेरी गावातून एक कच्चा रस्ता उत्तरेकडील डोंगरावर जातो. गडावर पाणी नाही त्यामुळे गावातूनच पाण्याची सोय करावी.
 
थोड्याच अंतरावर रस्ता संपून पायवाट सुरु होते व ती हनुमंतगड डावीकडे ठेवत डोंगराला वळसा घालून पठारावर येते. 
 
इथून डाव्या हाताला वर हनुमंतगडाचे उध्वस्त प्रवेशद्वार दिसते; पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी खडा चढ चढावा लागतो. चढ चढून आल्यावर एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. 
 
समोरच तटबंदीचे अवशेष दिसतात. त्याच्या बाजूने गेल्यावर आपण दक्षिणमुखी उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो. 
 
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागा मार्फत हनुमंतगडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाचा प्रवेशद्वार संस्थेच्या सदस्यांनी मातीतून मोकळा करण्याचे ठरविले आणि दि.२६,२७ डिसेंबर २०२०  आणि १६,१७ जानेवारी २०२१ या दिवशी गडावर मुक्कामी मोहिमांचे आयोजन करून अथक प्रयत्नाने या प्रवेशद्वाराला मोकळा केला दरवाजाची कमान पडलेली असून देवड्या या सुस्थित आहेत. 
 
 
 
 
 
  गडावर मोठे पठार असून मधल्या उंचवट्याभोवती तटबंदी बांधून पूर्वी बालेकिल्ला बनविलेला असावा. आता मात्र बालेकिल्ल्याच्या भिंतींची केवळ कल्पनाच करता येते. गडाच्या पठारावर आल्यावर उजव्या बाजूने गडाच्या कडेकडेने गडफेरी मारण्यास सुरुवात केल्यावर मध्ये मध्ये तटबंदीचे अवशेष दिसतात. 
 
उत्तरेकडे तटबंदीजवळ एक सुकलेला पाण्याचा बांधीव तलाव आहे. तलावावरुन पुढे पूर्वेकडे गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वार लागते. त्याची रचना पाहाता, हाच गडाचा मुख्य दरवाजा असावा याची खात्री पटते. तेथून पुढे चालत पुन्हा दक्षिणमुखी प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.
 
 याशिवाय फुकेरी गावात २ तोफा उलट्या पुरलेल्या पाहायला मिळतात, त्यावर त्या बनविल्याचे वर्ष (१७८३) कोरलेले आहे.
   गडावरील मुख्य चाळ्याचे देवस्थान श्री देवी पिसादेवीची वार्षिक गड ओवाळणी येथील गावकरी सालाबादप्रमाणे करतात. रथसप्तमीला वार्षिक कार्यक्रम येथे होतात. गडावर या पिसादेवीचे स्थान आहे. गडावर प्राचीन गोड्या पाण्याची तळी देखिल आहे.गडाच्या पूर्वेस चौकुळ, उत्तरेस घारपी, पश्चिमेस असनिये तर दक्षिणेस खडपडे, कुंभवडे या गावांच्या सीमा येतात.हनुमंत गडाच्या अधिपत्याखाली गडघेरा म्हणून असनिये, घारपी, झोळंबे हे तीन गाव येतात.हनुमंतगड पूर्णपणे ढासळला असून केवळ गडाचे काही अवशेष शिल्लक आहेत. गडावरील तत्कालीन न्यायसभेच्या जागेची दुरवस्था झाली आहे. गडावर झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गडावर जाताना झाडाझुडपातून वाट काढावी लागते. 
    अर्थात ज्यांना अनवट निसर्ग पहायचा आहे, काहीतरी ऑफबीट ट्रेक हवाय आहे, त्यांनी हा दुर्गम जागी असलेला हनुमंतगड एकदा पाहण्यास हरकत नाही

 संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड-किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतीश अक्कलकोट
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
५) मधुकर धुरी यांचे लिखाण
६ ) दै. लोकमत मधील लेख
७ ) https://vnsweb.in हि वेबसाईट












 बांदा -शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक वास्तू आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत. बांदा-तळकट राज्यमार्गापासून नजीकच असलेला फुकेरी गावातील शिवकालीन हनुमंतगड दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गावातील हा इतिहासकालीन ठेवा पुढील पिढीलाही समजावा, यासाठी गावकरी झटत आहेत. या गडाच्या स्मृती काही अवशेषांच्या माध्यमातून गडावर, गावात आजही सुस्थितीत आहेत. मात्र, गडाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पुरातत्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या फुकेरी गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ५०० लोकवस्तीचा हा गाव वसलेला आहे. शिवकालीन हनुमंत गडामुळे या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर या गडाची बांधणी करण्यात आली आहे. गड उंचावर असल्याने येथील वातावरण हवेशीर व आल्हाददायक असते. डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत येथील वातावरणात गारवा असतो.या गडावर हनुमंताचे पाषाण होते. यावरुनच त्याला ‘हनुमंतगड’ असे नाव पडले. कालांतराने हे पाषाण गावातील मंदिरात स्थानापन्न करण्यात आले. शिवकालीन असलेला या गडाचा इतिहास पुढील पिढीला समजावा, यासाठी इतिहासकालीन ठेवा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी फुकेरीवासीयांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच गडाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.हनुमंत गडाविषयी समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर सुमारे २००० फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगररांगात २६ एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात या गडाची उभारणी करण्यात आली आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून गडावरून सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांचा काही भाग व थेट गोव्यापर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. शत्रुला चढाई करण्यासाठी अत्यंत कठीण असलेल्या या गडाचा वापर शिवकाळात टेहळणीसाठी करण्यात येई. गडाच्या एका बाजूने कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग देखील दृष्टीस पडतो. पश्चिम घाटातून कोकण प्रदेशात संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी पारगडावरुन येथे सांडणीस्वारामार्फत संदेश पाठविण्याचे काम करण्यात येई. त्यामुळे शिवकाळात या गडाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. गडाचे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने शत्रुला या गडावर हल्ला करुन ताबा मिळविणे कठीण होते.हनुमंत गडाच्या अधिपत्याखाली गडघेरा म्हणून असनिये, घारपी, झोळंबे हे तीन गाव येतात. गडाची तटबंदी पुरातन असून गडाचा मुख्य दरवाजा पश्चिमेला आहे. मात्र, सद्य:स्थितीत गडाची तटबंदी व दरवाजा पूर्णपणे ढासळला आहे.शिवकाळात शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेऊन या किल्ल्यावर ३६ गावातील शूर सैनिकांची गडकरी म्हणून नेमणूक केली होती. पुढे मोगलांनी हा गड खालसा केल्यावर हे गडकरी वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. त्यापैकी पेंढूरकर भोसले-सावंत, मसुरकर सावंत, कुणकेरकर सावंत ठिकार, कोलते व पोकळे असे एकूण सहा गडकरी वंशज आजतागायत या परिसरात राहतात.श्री देव पाटेकर यांची एक तनु श्री देव नितकारी गडावर एका कमंडलुच्या स्वरुपात अस्तित्वात होती. तीची मालकी व पूजापाठ गडकरी करत. हनुमंत गडावरील नितकारी जो राज्याचा रक्षक त्याबद्दल आजही राजघराण्यात आस्था असून राजघराण्याकडून देण्यात आलेली चांदीच्या घोड्यावरील नितकारीची मूर्ती आजही गावातील मंदिरात पूजेसाठी ठेवलेली आहे. गडावरील मुख्य चाळ्याचे देवस्थान श्री देवी पिसादेवीची वार्षिक गड ओवाळणी येथील गावकरी सालाबादप्रमाणे करतात. रथसप्तमीला वार्षिक कार्यक्रम येथे होतात. गडावर या पिसादेवीचे स्थान आहे. गडावर प्राचीन गोड्या पाण्याची तळी देखिल आहे.गडाच्या पूर्वेस चौकुळ, उत्तरेस घारपी, पश्चिमेस असनिये तर दक्षिणेस खडपडे, कुंभवडे या गावांच्या सीमा येतात. हनुमंतगड पूर्णपणे ढासळला असून केवळ गडाचे काही अवशेष शिल्लक आहेत. गडावर २ तोफा असून गडाच्या पायथ्याशी गावात २ लोखंडी तोफा आहेत. गडावरील तत्कालीन न्यायसभेच्या जागेची दुरवस्था झाली आहे. गडावर झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गडावर जाताना झाडाझुडपातून वाट काढावी लागते. या गडाबाबत राजाराम आईर, अमित गवस, सुभाष आईर यांनी माहिती दिली.फुकेरी येथील ऐतिहासिक हनुमंत गडाची दुरवस्था झाली असून, स्थानिकांनी याबाबत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र प्रत्येकवेळी शासनाने दुर्लक्ष केल्याने या गडाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. पुरातत्व खात्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. या गडाचा विकास केल्यास याचा फायदा फुकेरी गावाबरोबरच परिसरालाही होणार आहे.- राजाराम आईर, ग्रामस्थ फुकेरी
https://www.lokmat.com/sindhudurga/way-destroy-hanumantgaon/

 

नितांत रमणीय सभोवार लाभलेला , हनुमंतगड याची माहिती लिहित आहे

सिंधुदुर्ग जिल्हाच्या दक्षिण सरहद्दीवर दोडामार्ग तालुकात फुकेरी गावाजवळ
हनुमंत गड आहे समुद्रसपाटी पाभगवान चिले सून २५० अडीचशे मीटर उंचीवर उभा किल्ला आहे

   सह्याधारेवर दक्षिणेला पसरेला सोंडेवर किल्ला आहे नयन रम्य आहे गडाच्या पायथ्याशी
फुकेरी गाव याची वाट राहे वाकडी वाट करून आलेली दुर्गप्रेमी अवशेष संपण हनुमंत गड आहे

जाण्यासाठी मुंबई -गोवा मार्गे बांदा येथे उतरावे लागते तेथून फुकेरी गाव १८ कि. मी.
एसटी पासून दुपारी १२. ३० साडे बारा वाजता व संध्याकाळी ५. ३० साडे पाच वाजता तास भर
फुकेरी गाव येण्यास १तास लागतो

तेथे गड पायथ्यावर वैजामाउली ( महिषासुर मर्दिनीचे ) देऊळ आहे तेथे तोफा पण आहेत
त्या पाहाव्यात

महादरवाजा चे अवशेष पाहून चालायचे गड याचा काठ उजव्या हातात ठेवून दिंडी दरवाजापर्यंत
चालायचे
गड याची उभारणी सन १७०९ ते १७३८ च्या दरम्यान सांवत वाडी च्या फोंड सावंत यांनी केली
करवीर करा यांनी १७८७ मध्ये हनुमंत गड जिकून घेतला व परत १७९३ मध्ये सांवत यांच्या कडे दिला

दुर्गम जागी हनुमत गड आहे तरी एकदा पाहण्यास हरकत नाही 

 




 

 सावंतांची आंबोली. घाटावर असून कोकणातल्या सावंतवाडी तालुक्यात मोडणारी. ८०० मीटर उंचीच पठार. सह्याद्रीची आणि सिंधुदुर्गाची शान. सह्याद्रीच्या जैव विविधतेचं आगर आणि प्रयोगशाळा. आंबोलीच्या दक्षिणेला आहे चौकुळ. पर्यटकांपासून दूर. सुंदर रानफुलांच गाव. आमचं चेरापुंजी. आंबोली चौकुळ रस्ता पुढे इसापूर, पारगडला जातो.  सर्व पठारावरली गावं.


इसापुरातून भेकूर्लीकडे निघालो. गावाबाहेर सड्यावर आलो. आंबोलीच्या जंगलाची ओळख होऊ लागलीय. इसापुरातून एक सोंड ४०० मीटर खाली भेकूर्लीत उतरलीय. तिथून रमणीय निसर्गदृश्याचा आनंद घेत खाली भेकूर्लीत उतरलो.


छोटे मोठे व्हाळ पार होताहेत. पाण्यात जळवा आहेत. त्या दिसल्या कि काढून टाकायच्या. चिटकल्या तर लिंबूचा मारा, अगदी वेळ नसेल तर रेलिस्प्रे. हाताने सुद्धा काढता येतात पण काळीज पाहिजे. भेकूर्लीत येईपर्यंत बऱ्यापैकी दम लागलाय. कळणे / कुकुडजा नदी साकवावरून पार केली. नदी पार तळातून वाहते. दोन वाजून गेलेत. पुढलं लक्ष आहे खडपाडा. खडपाडा चौकुळातून खाली उतरणाऱ्या एका सोंडेवर आहे. म्हणजे पुन्हा चढाई आली. नदी पार केली, पुन्हा चढाई. डांबरी सडक लागली. खडपडाच्या उत्तरेला आणि दोन सोंडा चौकुळ वरून खाली उतरल्यात. त्यातल्या सर्वात उत्तरेकडच्या सोंडेवर आहे हनुमंतगड. या दोन सोंडांच्या मध्ये फुकेरी.  खडपाड्यातून फुकेरीत जायला एक सोंड चढून उतरायला हवी. चार वाजलेत, खडपाड्यात एका सुंदर वळणावर बसून आम्ही डबे खाऊन घेतले. जेवून झाल्यावर मी शूज काढून एकदा चेक केलं. पॅन्ट वर करून पहिली. आम्ही घातलेल्या कागदावर एक जळू टुमटुमीत होऊन आळसवलंय . हे रक्त कुणाचं, किंवा कुणाकुणाच जळूलाच ठाऊक. 

जेवून झाल्यावर ट्रेक चालू. आसावरी खूप दिवसांनी ट्रेक करतेय. त्यातून वाडेकरांचा तंगडतोड. ती हरपलीय. नी कॅपच्या वर मला पॅन्टच्या आत जळू जाणवतंय. खडपाड्यात चढताना सुद्धा तिथे जळू आहे अशी जाणीव झाली होती. तेव्हा पॅन्ट वर करून चेक केली तेव्हा काही नव्हतं. आता मात्र नक्की आहे. पॅन्टच्या आतून पाहतो जळू दिसतंय. झिप आणि बटन काढून पॅन्ट खाली. जळुवर लिंबू रसाचा मारा. बऱ्यापैकी जाड झालय. हे लिहिताना सुद्धा तिथे थोडी सूज आहे. इतर सहकाऱ्यांना टेन्शन. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जळू दिसू लागलंय. एक जळू भाराभर चिंकाळ्या. ट्रेकर्सच्या मनात जळू. खुनभरा जळू. एक आणि अनेक जळू म्हणींचा सुकाळ झालाय. पाच वाजलेत. दोन तासात फुकेरीला पोचायला पाहिजे. काल २१ जून होता. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.  वाट जंगलाची आहे. अंधारबन झक मारेल असं सगळं निबिड अरण्य. जळूच साम्राज्य. अंधेरा कायम रहे. पण होसले बुलंद आहेत तोवर डर के आगे जीत है. आसावरीला प्रमोदनी चालायला बरीच मदत केली. 
सात वाजल्यानंतर टॉर्च चालू करून आठ वाजता आम्ही फुकेरीत येतो. गाववाले तोंडात बोटं घालतात. या अंधारात जंगलातून. गावात मंदिरात मुक्काम. शेजारी अहिरांकडे जेवण. गोडी डाळ, भात, बटाट्याची पिवळी तजेलदार भाजी, कोशिंबीर आणि कोकणी स्पेशल वालीची भाजी. वालीची भाजी म्हणजे चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी असते. या इथल्या वालीवर सात जन्म कुर्बान. पाऊस चालूच आहे. मंदिरात झड मारू नये म्हणून प्लास्टिक कागद लावलाय. दात घासून झोपून जातो. ट्रेकला मी शक्यतो सकाळी दात घासत नाही. रात्री नक्की. अधून मधून जळू निघत आहेत. कुणाच्या कपड्यातून, बुटातून, अंगाला चिकटलेले. रक्त पिपासूं जळू. डोळा लागलाय. "मधू, मोबाईलवर विडिओ लागलाय का कुणाच्या? आवाज येतोय." सरदार माझ्या डोक्याकडे उभे आहेत,  शोधाशोध करताहेत. झी हॉरर शो चालू झाल्यासारखं वाटतं. ये क्या हो रहा है. यांना झोपेत चालायची सवय आहे कि काय? बेडकांची मैफिल चालूच आहे. उगाचंच कसले कसले भास होत राहतात. अर्ध्या तासांनी पुन्हा गाढ झोप.


२८, २९ ऑगस्ट २०१० युथ हॉस्टेल मालाड युनिट साठी मी एक ट्रेक लीड केला होता. पारगड, गंधर्वगड, कलानिधीगड, आंबोली, हनुमंतगड. त्यानंतर आज पुन्हा फुकेरीत. दुसरा दिवस उद्या लिहितो. शुभ्रातरी मंडळी.
- मधुकर धुरी

map link
Looking at the  map, I realised that there was no need to go Isapur. We could have approached Bhekurli from Pargad itself. Other than breakfast there was no major attraction at Isapur.

पारगड, इसापूर, चौकुळ या गावातून प्रत्येक घरटी दोन तरी आर्मी पेन्शनर आहेत. मग हल्लीच हि परंपरा का खुंटलीय. नार्वेकर सांगतात हल्ली भरती व्हायला पैसे द्यावे लागतात. हेच खरं असेल का ?



दुपारी दोनची एसटी आहे इथून बांद्याला जायला. आसावरी इथून बसने जाणार आहे. शरद गावडे आमचे गाईड आल्यावर आम्ही फोण्याच्या पाजेकडे निघालोय. एक माकड फणसाच्या झाडावर प्रत्येक फळ वाजवून वास घेऊन चावून चेक करतय. वट पौर्णिमेचे फणस काढून झाले कि उरलेले सगळे झाडावरच कुसणार. माकड होतं त्या झाडावर फणस बरे दिसत होते. घारपीतून चिक्कार (किमान ३) वाटा चौकुळात चढतात. प्रत्येक सोंडेवर एक वाट.
घारपी आणि उडेली दोन्ही गावात हजारो एकर जागा १७००० रुपये एकर अशा नगण्य भावाने ७ वर्षांपूर्वी विकलीय. केरळातल्या कंपन्या इथे रबर आणि काजू लावतात. लागवडीसाठी जमीन उतार तयार करणे. रस्ते तयार करणे इत्यादी कामे चालू आहेत. इथली सगळी परिसंस्था बदलून गेलीय.  घाट वाटा मोडल्यात आता हे रस्तेच वापरायचे. तारेची कुंपणं. आम्ही चढत असताना एक एसयूव्ही समोरून आली. महिंद्रा ऍडव्हेंचर स्पर्धेत भाग घेतल्याचं स्टिकर आहे अजून तिच्यावर. नंबर प्लेट केरळची. हॅट घालून ड्रायवर शेजारी एक माणूस रुबाबात बसला होता. इथे कधी चहा कॉफी दिसली तर आश्चर्य वाटायला नको. 
या इस्टेट मधून चालत आम्ही फोण्याच्या पाजेच्या धारेवर येतो. (फोटो ईश्वर गायकवाड)

उडेली आणि घारपी गावांची सीमा हि धार. शिवाय जमीन मालक कंपन्या वेगवेगळ्या. इथे तारेचं कुंपण आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाट मोडलीय. शेवटी घाटावर चढण्यआधी छोटासा रॉक पॅच आहे. त्याला उत्तम आधार आहेत पण पावसात सॅक घेऊन चढणे त्रासाचे तसेच जिकरीचे होऊ शकते. योग्य ती सावधगिरी बाळगावी. (फोटो ईश्वर गायकवाड) 


पाज म्हणजे पास, इंग्रजी शब्दावरून आलाय तो. फोणे म्हणजे टकली / डोके. कदाचित या रॉक पॅच वरून या घाटवाटेच नाव आलंय. कोकणातला घाटवाटेचा ८० टक्के भाग केरळच्या इस्टेट मधूनच आहे. 

घाटावर चढून बसलोय. समोर सुंदर नजारा आहे. घारपीतून चढणाऱ्या घाटवाटा. केरळची इस्टेट. धुक्यातला हनुमंतगड , त्याच्या शेजारी आम्ही ओलांडून आलो तो पास. हनुमंतगडाच्या पाठी आहे फुकेरी आमचा कालचा मुक्काम. वेळेच्या गणितात हनुमंतगडावर आज जाणे झाले नाही. २०१० ऑगस्ट मध्ये मी अगोदर हनुमंतगड केलाय. ऊन, पाऊस, ढग, धुके यांचा खेळ चाललाय. प्रसन्न वाटतंय. 


पाज चढणारा मी दुसराच. प्रत्येकाने २ मिनिट घेतली तरी एक तास ग्रुप चढायला लागणार. वरती आलेली मंडळी आम्ही डबे खाऊन घेतो. काल जेवायला ४ वाजले होते. माझी भाकरी खाली डॉक्टर पागरूत कडे आहे. हरकत नाही. सोबत मंडळी दिलदार आणि भाकरीदार आहेत. आमचं खाऊन झालं आणि सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरु होतो. माझी छत्री मोडली. अजित आल्यावर लगेच आम्ही चौकुळकडे निघालोय. 




टिपिकल पठार आहे. पाऊस, धुके, हिरवळ. नवखा माणूस जिपीएस शिवाय हरवेल. आमच्या गाईडचा इथला भूगोल पक्का आहे. अलीकडे दहा वर्ष नाही परंतु त्याआधी या भागाची त्यांची पारायणं झालीत. ट्रेक मधील या भागात आम्हाला प्रचंड जळवांचा त्रास झाला. एका वेळेला ७ ते ८ जळवा बुटावर चढायच्या. त्या काढून टाकेपर्यंत हालत खराब. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जळू दिसू लागल्यावर कधी एकदा हा ट्रेक संपतो असं झालं. चारच्या सुमारास आम्ही कच्या मोटारेबल रस्त्यावर आलो. जंगल संपलं. शरद गावडे इथून परत गेले. 

मुसळधार पाऊस सुरु झालाय.  लाल गढूळ पाण्याचे लोट वाहताहेत. पुढे चौकुळची कुठलीशी वाडी लागते. बांधलेला रस्ता, त्याच्या दुतर्फा घरं. रस्त्याची नदी झालीय. आम्ही त्या पाण्यात उड्या मारत बागडत चाललोय. आठवतयना यशवंत ? घरांच्या पाठी संखलात शेती आहे. त्यांची नदी झालीय. गुढग्यावर पाणी वाहतंय. गाववाल्या कडून खात्री करून घेऊन आम्ही ती नदी ओलांडतो. पुढे एका मोठया नदीवर साकव आहे. तिथून थोडं पुढे आंबोली चौकुळ इसापूर मुख्य सडक. बस स्टॉप. पाऊस सुरूच आहे. ट्रेक संपलाय. तिथे रस्त्यावर आम्ही आनंदाने नाचतोय. फोटो काढतोय. ज्यांनी डबा खाल्ला नव्हता त्यांच्यासाठी हा ब्रेक. ५ वाजता आंबोली एसटी येते. 

चौकुळ आंबोली रस्त्यावर घटप्रभा नदीवर सखल पूल आहे. नदीला होऊर आलाय. पुराचं पाणी गार्ड स्टोन वरून वाहतोय. ड्राइवर गाडी बंद करून थांबतो. दोन्ही बाजूला वाहनांची रांग आणि बघ्यांची रीघ. अर्धा तास थांबल्यावर पाणी थोडंसं कमी झालंय, तस अजून ते गार्ड स्टोनवरच आहे. प्रोटोकॉल नुसार गाडी पुलावर घालता कामा नये. त्यात प्रवाश्यांच्या जीवाला धोका आहे. शिवाय एक तक्रार ड्रायव्हरची  नोकरी घालवेल. तरीसुद्धा आमच्या ग्रुपच्या रेट्याला बळी पडून त्याने थोडी रिस्क घेण्याचं ठरवलंय. गाडीतले स्थानिक प्रवासी आणि खाली असणारे स्थानिक बघे त्याला गाडी पुलावर घालू नको म्हणून सांगताहेत. तो गाडी बंद करतो. खालच्या इरलं वाल्या स्थानिक महिलांशी त्याचं काही बोलणं होतं. गणपती बाप्पाचा गजर होतो आणि गाडी पूल पार करते. आमच्या मागच्या छोट्या गाड्या हि हिम्मत करणार नाहीत. असो आम्ही बचावलोय. मी उगाचच शेजारील खिडकीतून कसं बाहेर पडता येईल याचा अंदाज घेत होतो. गाडी थांबली होती तेवढ्या वेळात मी अंगात सुके कपडे घालून घेतलेत. एक जळू मानेला खांद्याच्या वर चावलंय , केव्हा कधी कुठे वगैरे माहित नाही. 

आंबोली बस स्थानक. आम्ही उतरलो तोवर सावंतवाडी एसटी लागलीय. बेळगाव वरून आलेली. डॉक्ट्रांनी शूज बस मध्येच सोडलेत. शूज दान. ते कुणीतरी ग्रामस्थ या बसमध्ये आणून देतात. आतमध्ये जळू दिसतंय. शूज खिडकीतून पुन्हा बाहेर जातात. खिडकी बंद. बस सुटते. आंबोलीचा घाट सदा सर्वदा मस्तच असतो. अजून पाऊस कमी आहे. धबधब्यांना पाणी कमी आहे. तरी पर्यटक आहेतच. आमची गाडी गळतेय. मी आदित्यला माझी छत्री काढून देतो. 


गडावरील तोफांविषयी माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मते गडावर पूर्वी 5 तोफा होत्या. त्या तोफा या घळीत ढकलून देण्यात आल्या होत्या. गावात प्रवेशकरतेवेळी आपल्याला सुरवातीलाच दोन तोफा दिसतात. त्यातील एक तोफ जमिनीत गाडलेली होती. ती 30 जुलै 2018 ला बाहेर काढण्यात आली. त्यानंतर तोफेचे महत्व पटवून देत तोफसंवर्धन करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीत पत्र देण्यात आले. या गावातून वर चढताना खिंड लागते. या खिंडीतील झाडीत सहा फुट लांबीच्या दोन तोफा पडलेल्या होत्या. या तोफा गावकऱ्यांनी गडाच्या पायथ्याकडे असलेल्या देवी माऊली मंदिराजवळ ठेवल्या आहेत. या तोफांना चौथजयावर बसविण्याची ना हरकत सह्याद्री सिंधुदुर्ग विभागाला ग्रामस्थांनी दिलेली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अनेक कामे
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे गडावर संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ याचे सहकार्य नेहमीच लाभले आहे. गडावर जाणाऱ्या वाटा दुरुस्ती करणे, तटबंदी, बुरुजावरील झुडपे काढणे, दिशा दर्शक, सूचना फलक आणि वास्तू दर्शक लावणे अशी कामे नियमितपणे प्रतिष्ठानतर्फे सुरु आहेत. गडाच्या दुर्ग अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थांच्या मदतीने ही सुद्धा कार्य सुरु आहेत.

पाचव्या तोफेची शोध मोहीम
गडावर 26 आणि 27 डिसेंबरला झालेल्या मोहिमेदरम्यान गडावर येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य राजमार्गावर वाटांची दुरुस्ती करण्यात आली. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे तोफेचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्यावेळी गडावरील 5 वी तोफ निदर्शनास आली नाही. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आप्पा आईर यांच्या निदर्शनास तोफ आली, त्यांनी संस्थेचे सदस्य रामचंद्र आईर, न्हानू आईर यांना कळविले. त्यांनी 4 जानेवारीला रामचंद्र आईर, न्हानू आईर यांच्या नेतृत्वखाली स्थानिक ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य विठ्ठल आईर, संदीप आईर, सदाशिव आईर, सिद्धेश आईर, अप्पा आईर यांच्या मदतीने यांनी फुकेरी गावातून गडावर जाण्याजया दिंडी दरवाजाच्या वाटेवर असलेल्या पाण्याच्या ओहळात पूर्णपणे गाडलेली तोफ बाहेर काढली. या सर्व तोफांचे संवर्धन फुकेरी ग्रामस्थ व सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

इतिहास काय सांगतो
- जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणचा प्राचिन इतिहास हा इ. स. पूर्व पहिल्या, दुसऱ्या काळापासून मोर्या यांच्या सत्तेपासून सुरू होतो. त्यानंतर सातवाहन, चालुक्‍य, राष्ट्रकृट, मोर्या शिलाहार अशा राजवटी होऊन गेल्या. त्या काळात घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती केली होती. असा प्राचीन इतिहास हा कोकणाला लाभलेला आहे. त्यानंतरच्या काळात मध्ययुगीन आदिलशहा निजामशहा, मुघल, पोतुर्गीज, डच मराठे असा अंमल हा कोकणावर राहिला आहे.

- खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली तर काही नवीन किल्ले बांधले. त्यातील समुद्रातील राजधानी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. कोल्हापूरमार्गे, दोडामार्गमार्गे येथे जाणाऱ्या प्रमुख घाटमार्गवर हनुमंत गडाची निर्मिती केली असून किल्ल्‌यावर खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्‍या आहेत. पूर्वी हा गड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणीसाठी वापरात असावा. बांदा किल्ला हा जवळच असलेला किल्ला असून या किल्ल्याच्या अनेक घडामोडी या इतिहासाला ज्ञात आहेत.


- हनुमंत गडावरील फोंड दुसरा सावंत (इ. 1709 मध्ये) यांच्या काळात किल्ल्याची बांधकाम आणि डागडुजी झाल्याची नोंद आहे. सावंतांच्या काळात किल्ल्यावर बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर इ. स. 1808 मध्ये निपानीकर निंबाळकर यांच्या ताब्यात किल्ला होता. शेवटी अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हनुमंत गड हा 19 डिसेंबर 1938 ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, अशी माहिती गडाविषयी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून देण्यात आली.



सावंतवाडी बस स्टॉप. अर्धा तास कपडे बदलणे झाल्यावर ग्रुप तयार आहे. ८ वाजलेत बस येते. पुढे झारपीत जेवणासाठी ब्रेक आणि नंतर थेट सकाळी साडेपाचला महाड. आसवरीच्या आगाऊपणामुळे माझी सीट दारासमोर आहे. त्याला पुढे धरायला काही नाही. रात्रभर झोपेचं खोबरं. रस्त्याची चाळण झालीय त्याला चौपदरी करनाच निमित्त. महाड ब्रेक नंतर मी पाठी डॉक्टरांकडे जाऊन बसतो. महिला मंडळ यापुढे झोपायला तयार नाहीये. त्यांनी बस डोक्यावर घ्यायला सुरवात केलीय. सुकेळी खिंडीपासुन गाडीतला ब्लु टूथ स्पीकर गाडीवाल्याने यांना दिलाय तो पनवेल पर्यंत. बस जॉकी आपआपली कला सादर करताहेत.     

कर्नाळ्याला ट्राफिक. आपटा, रसायनी करून बस येते. मी पनवेलला उतरून ट्रेन ने ठाणे, कळवा . कालचा दिवस पावसाने धमाल केलीय मुंबईत सुद्धा. म्हणजे आम्ही गाडीत धमाल करत होतो तेव्हा. अजित वाडेकरच 'कॅनडा राजा पंढरीचा' अजून कानात गुंजतय. आषाढी एकादशी येतेय. विठुरायाचं बोलावणं येतें काय ते पाहायचं ...

-मधुकर धुरी 
  सावंतवाडीपासून साधारणपणे तीस किलोमीटर वर निसर्गाच्या कुशीत वसलेलं फुकेरी गाव, या फुकेरी गावाचं अगदी टोकाचं ठिकाण म्हणजेच हनुमंत गड. या आधी मी फुकेरी येथे आमच्या एका प्रोजेक्टच्या वर्कआउट साठी गेलेलो, पण गड कधी चढलो नव्हतो. फुकेरी गावची नैसर्गिक संपन्नता आणि भौगोलिकता मी पहिली होती. हनुमंत गडा व्यतिरिक्त तिकडे जंगलामध्ये सात ठिकाणी रांजण खळगे असल्याचे माहित होते, त्यामुळे सकाळी हनुमंत गडाचा ट्रेक करावा आणि त्यानंतर दुर्गम भागात असलेल्या त्या रांजण खळग्याच्या विलोभनिय ठिकाणी दुपारचं जेवण करावं असा बेत आम्ही ठरवला होता. त्यानुसार ८ नोव्हेंबर चा दिवस निश्चित करण्यात आला होता, पण त्यावेळी घडलेल्या एका शोकाकुल घटनेमुळे हा ट्रेक पुढे ढकलण्यात आला. व त्यानुसार आमच्या सर्व सदस्यांच्या संमतीने २९ नोव्हेंबर या दिवशी हा ट्रेक करण्याचे निश्चित करण्यात आले.
                ट्रेक च्या आदल्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबरला संध्याकाळी जेवणासाठी लागणारया सामानाची खरेदी व इतर सहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आमचा एक प्रसाद नावाचा सदस्य त्याने या अगोदर हनुमंत गडावर चढाई केली होती. त्यामुळे त्याच्याच ओळखित फुकेरी येथील आईर काका, काकुंकडे जेवण बनवण्यासाठी लागणारया भांडयाची आम्ही तजवीज करुन ठेवली होती.
              दुसऱ्या दिवशी सकाळी लागणारं सर्व साहित्य घेवून सर्व सदस्य निश्चित ठिकाणी जमल्यावर साधारण साडे सात च्या सुमारास आम्ही फुकेरीच्या दिशेने निघालो. आमचे चार सदस्य अगोदरच फुकेरी येथील मंदिरात पोचले होते, साडे आठ च्या सुमारास आम्ही सर्वजण फुकेरी येथे पोहोचलो, तिथल्या मंदिरांमध्ये देवतांचा दर्शन घेऊन पोचलो ते आईर काकूंकडे, त्यांच्या कडून योग्य ती भांडी घेऊन साधारण नऊ च्या सुमारास आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव जी गर्जना करत गड चढण्यास सुरवात केली.
              हनुमंत गडाचं क्षेत्रफळ जरी मोठं असलं तरी काही ठिकाणचा भाग वगळता चढाई सोपी व त्यासाठी लागणारा वेळही कमी आहे. तसेच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले होते. अर्ध्या तासामध्ये आम्ही गडावर पोचलो. गडावर पोहोचल्यानंतर आम्ही सोबत नेलेली शिदोरी खाल्ली. काही ठिकाणची झाडं झुडूपं सोडली तर गड संबंध गवताळ कुरणाने आच्छादलेला होता. महाराजांचा एक पुतळा, बुरुज व गडावरील इमारतीचे नाममात्र अवशेष याव्यतिरिक्त गडावर फारसं काही नाही. गडावर दृष्टीस पडणाऱ्या मनमोहक ठिकाणी छायाचित्रे घेत आम्ही संपुर्ण गड फिरलो.
            दुपारच्या जेवणासाठी आम्हाला दुसऱ्या एका पॉईंट ला जायचे होते, त्या पॉईंट वर जाण्यासाठी गडावरूनच वाट असल्याचे कळल्याने मी आणि आमचा एक रोहित नावाचा सदस्य दोघेही वाट शोधत शोधत गडाच्या डाव्या साइड ने एका कड्यावर पोहोचलो, तिथून परत मागे येऊन दुसऱ्या बाजूने खाली चालत जाण्याचा प्रयत्न केला पण मध्येच वाट दिसेनाशी झाल्याने आम्ही माघारी परतलो. नंतर, गडावरून त्या पॉईंट वर जाण्यासाठी वाट न सापडल्याने सर्वानी गड उतार व्हावयाचे ठरविले, त्याप्रमाणे सर्व सदस्य आल्या वाटेने गडाच्या प्रवेशद्वारापाशी गडउतार होण्यास निघाले. त्याचवेळी मी आणि आमचा एक अजित नावाचा सदस्य गडाच्या दुसऱ्या बाजूने गडाचे निरीक्षण करत चालू लागलो. आम्ही गडाला विळखा घालून प्रवेशद्वारापाशी पोचलो तरी आमचे इतर सदस्य अजूनपर्यंत प्रवेशद्वारापाशी पोचले नव्हते. त्यांची वाट बघत न बसता आम्ही दोघेही वेगाने पावले टाकत गडउतार झालो आणि आईर काकुंच्या घरी पोहोचलोे, काकुंना झालेली फसगत सांगितली, आम्ही हनुमंत गड चढून उतरलो पण रांजण खळग्याचं ते ठिकाण काही सापडलं नाही. तसं त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं आम्हाला वाटत होतं तेवढं सोपंही नव्हतं याची काकुंनाही कल्पना होती. त्यामुळे त्या स्वतः वाट दाखवण्यासाठी अमच्यासोबत त्या चढणीवरून चालू लागल्या, मागे राहिलेल्या आमच्या इतर सदस्यांना तशा सूचना मी दिल्या होत्या. काकू एका पॉइंटवरून जंगलातून सदर ठिकाणापर्यंत जाणारी वाट दाखवून माघारी परतल्या, त्यांच्या बोलण्यावरून सदर ठिकाणाचे नाव राजिंगण असून ते देवाचे स्थान असल्याचे आता मला कळले होते.
              आमचे सर्व सदस्य गडउतार होऊन, साधारण दुपारी १२ च्या दरम्याने, सांगितल्याप्रमाणे माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. तिथुन मग सर्व एकत्रितपणे जंगलातून जाणाऱ्या त्या पायवाटेने काकूंनी सांगितल्याप्रमाणे इच्छित स्थळी जाण्यास निघालो. बराच वेळ चालल्यानंतर पुढे गावातील लोकांचे शेतमांगर (शेतघरं) आम्हाला दिसले. तिथून थोडं पुढे गेल्यावर बुचकळ्यात टाकणारया दोन वाटा आम्हाला लागल्या, आमच्या सर्व सदस्यांना त्या पॉईंट वर थांबायला सांगून मी आणि अजित दोन्ही मार्गाने चालत गेलो व पुढे एकत्र भेटलो. त्या दोन्ही वाटांचे पुढे एकाच पायवाटेत रूपांतर झाले होते. तसेच पुढे मी आणि अजित चालायला लागलो, पुढे आम्हाला एक छोटा ओहोळ लागला, त्याठिकाणी थोडा झरयासारखा प्रवाह होता, त्यामुळे, “मी पुढच्या वाटेने राजिंगण नावाचं ते ठिकाण शोधतो, मिळालं तर ठीक नाहीतर इथे अपल्याला पुरेल एवढं पाणी असल्याने आपण इथे जेवण करु, त्यामुळे मागे थांबायला सांगितलेल्या सर्व सदस्यांना तू घेवून ये”. असं अजितला सांगितलं. आणि मी पुढे सरकलो तसा अजित मागे परतला, त्यानंतर त्या जंगलामध्ये पायाला चकत्या लावल्यासारखा मी तिथल्या भौगोलिकतेचा अंदाज घेत वाट शोधत राहिलो, बरं पाण्याच्या आवाजाचा कानोसा घ्यावा म्हटलं तर त्यावेळी त्या जंगलामध्ये वारयाने झाड़े हालत होती त्यामुळे त्याचा ही आवाज येत होता. तरीही जंगलातल्या त्या इवल्याश्या वाटेने समोर येणाऱ्या झाडांच्या फांदया बाजूला करत वेडापिसा होवून ते ठिकाण शोधून काढण्याच्या तीव्र इच्छेने मी चालत होतो, चालत चालत अंदाज घेत बराच पुढे गेल्यावर एक मोठा ओहोळ मला दिसला. आणि किंचितही पुढे न सरकता माझी पावलं मागे वळली ती माझ्या सर्व सदस्यांना त्याठिकाणी घेवून जाण्यासाठी. तसा मी मागे येण्यास निघालो.
             इकडे मला यायला उशीर झाल्याने जेवणासाठी सोबत नेलेले चिकन मीठ मसाला लावून पुनच्छ पिशवी मध्ये ठेवले गेले होते, व ते मला हाका मारत होते, दुरुनच मी सर्वाना आवाज देवून यायला सांगितले, तसे सर्वजण माझ्या दिशेने चालू लागले, सर्व सदस्यांना घेवून मग आम्ही जंगलातील ती पायवाट तुडवत काट्या कुटया बाजूला सारत त्या राजिंगण पाशी आलो. सर्वजण ती जागा बघून आनंदुन गेले, चालताना आलेला शीण विसरून गेले. एका मोठ्या ओहोळामध्ये नैसर्गिकरित्या एकाखाली एक असे तीन छोटे तलाव तयार झाले होते. तिथलं पाणी अतिशय गार होतं. काहीजण थेट पाण्यात घुसले तर काहीजण चूल मांडून जेवण बनवण्याच्या तयारीस लागले, तिथली नैसर्गिक भव्यता, खूपच विलोभनिय होती, तिथलं वातावरणही खूपच आल्हाददायक होते. तिथल्या दगडांची एक विशिष्ट अशी रचना होती, काही खडक गोलाकार तर काही आयताकृती मोठ्या लाद्यांसारखे पण जाड होते .काही खडक एकसंध होते त्यातूनच पाण्याच्या घर्षणाने ते तीन रांजण खळगे तयार झाले होते. सर्वजण तिथे मनसोक्त डूबले. नेहमीप्रमाणे जेवणाची जबाबदारी पेलणारे आमचे सखाराम बुगड़े नावाचे सदस्य, त्यांनी इकडे रस्सा तयार केला होता, त्या गार पाण्यामध्ये अंग गारठल्याने सर्वानी गरम गरम रस्सा भुरकला. काही वेळ मौज करत, छायाचित्रे घेत वेळ झाल्यानंतर जेवण करून, तिथला परिसर स्वच्छ करून आम्ही मग घरच्या दिशेने निघालो. जाताना जवळपास तासभर तुडवलेली ती पायवाट आम्ही येताना अर्ध्या तासात संपवून आईर काकूंच्या घरी आलो, आम्ही नेलेली त्यांची भांडी देऊन, काकुंचे आभार व्यक्त करून, त्यांचा निरोप घेवून आम्ही थेट घरच्या दिशेने निघालो.
             खरं तर हनुमंत गडाचा ट्रेक यशस्वी झाला होता, त्यामुळे अर्धी मोहीम आधीच फत्ते झाली होती, पण राजिंगणचा तो परिसर शोधून सापडला नसता तर मोहीम अयशस्वी ठरली असती, निसर्गाचं ते शाश्वत मनोहारी रूप पाहता आलं नसतं. आणि सर्व सदस्य हिरमुसले असते, मनामध्ये तिथपर्यंत पोचता न आल्याची रुखरुख राहिली असती. पण राजिंगणाच्याच कृपेने आणि भांडी व जेवणाच्या सामनाचं ओझं घेवून चालणाऱ्या माझ्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही सहल यशस्वी आणि आठवणीत राहणारी झाली. इच्छा असुनही, काही कारणास्तव आमच्या दोन सदस्यांना या मोहिमेसाठी येता आलं नाही, त्यांची मात्र मी मनापासून आठवण काढली.
https://vnsweb.in/2020/12/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3/
 
 




















कोकणचा प्राचीन इतिहास हा इ.स.पूर्व पहिल्या दुसऱ्या काळापासून मोर्या यांची सत्ता होती नंतर सातवाहन,चालुक्य,राष्ट्रकृट,मोर्या शिलाहार अश्या राजवटी होऊन गेल्या. त्या काळात घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. असा प्राचीन इतिहास हा कोकणाला लाभलेला आहे.  त्यानंतरच्या काळात (मध्ययुगीन)आदिलशहा निजामशहा,मुघल,पोर्तुगीज डच मराठे असा अंमल हा कोकणावर राहिलेला आहे.
 खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कोकणातील स्वारी करून कोकणातील काही जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली तर काही नवीन किल्ले बांधले त्यातील समुद्रातील राजधानी म्हणजे सिंधुदूर्ग किल्ला होय. महराजांच्या दूरदृष्टी हि किल्ल्यांचा बांधकामावरून अभ्यासात येते.कोल्हापूर मार्गे दोडामार्ग मार्गे येथे जाणाऱ्या प्रमुख घाटमार्गवर हनुमंत गडाची  निर्मिती करण्यात आली असून किल्ल्यावर खडकात खोदलेले पाण्याच्या टाक्या आहेत पूर्वी हा गड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणी साठी वापरात असावा.  बांदा किल्ला हा जवळच असेलला किल्ला असून या किल्ल्याच्या अनेक घडामोडी या इतिहासाला ज्ञात आहेत.
हनुमंत गडावरील  फोंड दुसरा सावंत यांच्या काळात इ.१७०९ मध्ये किल्याची बांधकाम आणि डागडुजी झाल्याची नोंद आहे. सावंतांच्या काळात किल्यावर बऱ्याच घडामोडी घडल्या त्यानंतर इ.स.१८०८ निपानीकर निंबाळकर यांच्या ताब्यात किल्ला होता. शेवटी अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हनुमंत गड हा दि.१९ डिसेंबर १९३८ रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सह्याद्रीचे गडावरील कार्य-
 – हा किल्ला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ता.दोडामार्ग फुकेरी गाव  येथे हनुमंतगड आहे. सावंतवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून ३१ किमी अंतरावर फुकेरी गावातून गडावर जाता येते. गडावरील तोफांना विषयी माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मते गडावर पूर्वी ५ तोफा होत्या त्या तोफा या घळीत ढकलून देण्यात आल्या होत्या.
गावात प्रवेशकरत्या वेळी आपल्याला सुरवातीलाच दोन तोफा दिसतात त्यातील एक तोफ हि जमिनीत गाडलेली तोफ ३० जुलै २०१८ रोजी गेले असता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तोफेचे महत्व पटवून देत तोफ बाहेर काढून संवर्धन करण्या संदर्भात ग्रामपंचायतीत पत्र देण्यात आले.
तसेच या गावातून वर चढताना खिंड लागते या खिंडीत झाडीत सहा फुट लांबीच्या दोन तोफा पडलेल्या होत्या या तोफा गावकऱ्यानी गडाच्या पायथ्याकडे असलेल्या देवी माऊली मंदिराजवळ ठेवल्या आहेत. या तोफांना चौथऱ्यावर बसविण्याची ना हरकत सह्याद्री सिधुदूर्ग विभागाला ग्रामस्थांनी दिलेली आहे.
 सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाततर्फे गडावर संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ याचे सहकार्य नेहमीच लाभले आहे. गडावर जाणाऱ्या वाटा दुरुस्ती करणे,तटबंदी,बुरुजावरील झुडपे काढणे,दिशा दर्शक, सूचना फलक आणि वास्तू दर्शक लावणे अशी कामे नियमितपणे सुरु आहेत. गडाच्या दुर्ग अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थांच्या मदतीने हे कार्य सुरु आहे.

५ व्या तोफेची शोध मोहीम – दि.२६ आणि २७ डिसेंबर रोजी सलग झालेल्या मोहिमे दरम्यान गडावर येणाऱ्या मुख्य राजमार्गावर वाटांची दुरुस्ती करण्यात आली तसेच ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे तोफेचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु त्यावेळी गडावरील ५ वी तोफ निदर्शनास आली नाही. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ श्री आप्पा आईर यांच्या निदर्शनास तोफ आली त्यांनी संस्थेचे सदस्य श्री रामचंद्र आईर नान्हु आईर  यांना कळविले त्यांनी दि.४ जानेवरी २०२१ रोजी रामचंद्र आईर नान्हु आईर यांच्या नेतृत्वखाली स्थानिक ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य विठ्ठल आईर, संदीप आईर,सदाशिव आईर,सिद्धेश आईर,अप्पा आईर, यांनी फुकेरी गावातून गडावर जाण्याऱ्या दिंडी दरवाजाच्या वाटेवर असलेल्या पाण्याच्या ओह्ळात पूर्णपणे गाडलेली तोफ बाहेर काढली.

गडावरील जमिनीत गाडलेल्या प्रवेशद्वारास मोकळा श्वास –
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागा मार्फत हनुमंतगडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाचा प्रवेशद्वार हा संस्थेच्या सदस्यांनी मातीतून मोकळा करण्याचे ठरविले आणि दि.२६,२७ डिसेंबर २०२०  आणि १६,१७ जानेवारी २०२१ या दिवशी गडावर मुक्कामी मोहिमांचे आयोजन करून अथक प्रयत्नाने या प्रवेशद्वाराला मोकळा केला दरवाजाची कमान पडलेली असून देवड्या या सुस्थित आहेत. या मोहिमेत संस्थेचे सदस्य सुनील राऊळ,प्रकाश सावंत,रोहन सावंत, विवेक गावडे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी  आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थं यांचे हि सहकार्य लाभले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किल्ले हनुमंत गड हा आता संवर्धनातून पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थं यांच्या सहकार्याने गडावर सतत भविष्यात संवर्धन मोहिमा राबवण्यात येणार असून गडावर नव्याने निदर्शनास आलेली तोफ आणि गावातील तोफ या दोन तोफांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ तोफगाड्यांवर विराजमान करण्यात येणार आहेत.
सह्याद्रीच्या कार्यात आपण हि सहभागी व्हावे असे सिंधुदूर्ग विभागाकडून जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींना आव्हान करण्यात आले.

चिन्मय घोगळे, कोकण नाऊ, सावंतवाडी​.





https://kokannow.com/marathi/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/
 

Distances covered
Gharpi choukul 12.1 (gps)
Gharpi Fukeri 3.61 (map draw apprx)
Fukeri Khadpada 4.21 (map draw apprx)
Bhekurli Khadpada 4.33 (map draw apprx)
Isapur Bhekurli 4.36 (map draw apprx)
Pargad Isapur 4.65 (map draw apprx)
 

 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...