Saturday, February 20, 2021

सावंतवाडी संस्थान

 वाडी सुंदर, शिरोडा बंदर,
मोचेमाड गुळी, आरवली खुळी
अतिशाणो कुडाळ, गवळदेवाचो माळ
शिरोडा शिटुक आणि आरोंद्यान् रेडीच्या
xxत मारल्यान् बेटुक
     मालवणी मुलखात गेल्या कित्येक पिढय़ांपासून प्रसिद्ध असलेले हे लोकगीत! या लोकगीतात सावंतवाडी संस्थानात समाविष्ट असलेल्या भूप्रदेशांची आणि तिथल्या लोकांची सगळी नमुनेदार भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्टय़े सामावलेली दिसतात. यात सावंतवाडीचा उल्लेख ‘वाडी सुंदर’ असा आला आहे, तोही यथार्थ असाच आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी सावंत-भोसल्यांनी सावंतवाडीला आपल्या संस्थानाची राजधानी बनवण्याआधी निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या या प्रदेशाला ‘सुंदरवाडी’ असेच संबोधले जात होते. सुंदरवाडीला संस्थानाचे मुख्यालय केल्यावर सावंत-भोसले या राजघराण्याच्या नावावरून सुंदरवाडीचे नामकरण ‘सावंतांची वाडी’ म्हणून ‘सावंतवाडी’ असे केले गेले. या संस्थानात प्रारंभी कुडाळदेश व भीमगड (गोमंतकाचा पेडणे ते सांखळी असा काही भाग) या दोन परगण्यांचा समावेश होत असे. सावंत-भोसल्यांनी हे दोन्ही मुळात स्वतंत्र असलेले परगणे जिंकून त्यांचा समावेश आपल्या अधिपत्याखालील संस्थानात केला होता. मात्र पुढे इंग्रज, पोर्तुगीज, कोल्हापूरकर संस्थानिक, गोव्यातील बारदेशकर यांनी या परगण्यांतर्गत काही भागांवर कब्जा केला. कुडाळ परगण्यापैकीं तीन तर्फा, एक बंदर व दोन तर्फांपैकीं कांहीं गांव इंग्रजांनीं घेतले. एक कर्यात कोल्हापूर संस्थानाकडे गेली. भीमगड परगण्यापैकीं तीन महाल पोर्तुगीज सरकारच्या ताब्यांत गेले. शेवटीं नऊ तर्फा, एक कर्यात व दोन महाल सावंत भोंसले यांच्या सत्तेखालीं राहिले. हा मुलूख व चंदगड तर्फेपैकीं मिळालेले आंबोली, चौकूळ व गेळें हीं तीन गांवें मिळून सध्याचें सावंतवाडी संस्थान झालेलें आहे.याशिवाय संस्थानत सुंदरवाडी, चऱ्हाटा, ओटवणे, माजगाव, बांदा अशा काही निवडक गावांचाच समावेश असल्याचे दिसते.या संस्थानाचे कुडाळ्,वाडी आणि बांदे असे तीन परगणे होते.संस्थानाच्या अखत्यारीत कुडाळ परगणा व बांदे, मणेरी, पेडणे, डिचोली व साखळी हे पाच महाल होते. त्यामुळे तत्कालीन पत्रव्यवहारात सावंत-भोसले यांस ‘सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय’ असे उल्लेखिले आहे. 

 इतिहास.— सावंतवाडी व शेजारील प्रदेश यांत सापडलेले शिलालेख व ताम्रपट यांवरून संस्थानी प्रदेशाचा प्राचीन इतिहास ज्ञात होतो. इ. स. सहाव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत हा प्रदेश चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार वगैरे वंशांच्या आधिपत्याखाली होता. नंतर विजयानगर व विजापूर येथील राजांच्या अंमलाखाली तो गेला.

या संस्थानच्या राजघराण्याच्या पूर्वजांची माहिती साधारणत: स. १५०० च्या सुमारापासून मिळते.  सावंतवाडी आणि आसपासचा सर्व प्रदेश विजापूरकरांच्या अंमलाखाली असताना १५५०-५५ च्या दरम्यान सावंत-भोसल्यांचे पूर्वज विजापूरच्या बादशहाच्या चाकरीच्या निमित्ताने या परिसरात आले आणि आदिलशाही राजवटीदरम्यान येथेच स्थिरावले. या सावंत-भोसले घराण्याचा पहिला ज्ञात कर्तबगार पुरुष मांग सावंत हा आदिलशाहीत सुभेदार होता. मूळच्या उदेपूर येथील शिसोदिया घराण्यातील असलेल्या मांग सावंताचे सूर्यवंशीय उपनाव ‘भोसले’ असे होते. सावंतवाडीजवळच्या होडावडे या गावात त्यांनी आपले मुख्य बस्तान बसवले होते. शेजारील मठ गावात त्यांची छत्री आहे. हा भाग आजही ‘मांगेल्याचा मठ’ या नावाने ओळखला जातो. या गावात सापडलेल्या शिलालेखावरूनही तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयीची थोडीफार माहिती मिळते.यावेळीं या प्रांतीं विजयानगरच्या हिंदु राजांचा अंमल होता. विजयानगरचा पाडाव झाल्यावर हा प्रांत आदिलाशाहीकडे गेला. पुढे त्याचे वारस भाम सावंत पुन्हा आदिलशहाकडे गेले. आदिलशहा व पोर्तुगीज यांतील लढायांत मांग सावंताच्या वंशजांनी आदिलशहास मदत केली. म्हणून त्यास आदिलशहाने ‘सावंत बहादर’ असा किताब दिला. आदिलशाहींतून कुडाळ परगण्याच्या देशमुखीचें काम एका कुडाळदेशस्थ प्रभु घराण्याकडे देण्यांत आलें होतें. या प्रभु देशमुखांकडे दळवी या आडनांवाचें सेनापति होते. हे दळवी मूळचे जोधपूर येथें राहणारे असून प्रभूंची सत्ता या प्रांतांत सुरू झाली तेव्हां प्रभूंनीं त्यांस आपले सेनापति केले. या प्रांतावर मराठ्यांची सत्ता स्थापन करावी या उद्देशानें तत्कालीन सेनापति देवदळवी व मांग सावंत हे कांहीं दिवस एक होऊन देशमुखांचा पाडाव करूं लागले, परंतु या कामीं त्यांस यश न येतां ते दोघेहि इ. स. १५८० त मृत्युमुखी पडले. मांग सावंत यास सात बायका होत्या; त्यापैकीं सहा त्याच्याबरोबर सती गेल्या, आणि एक गरोदर होती, ती ओटवणे येथें जाऊन राहिली. तिला पुढें मुलगा झाला, त्याचें नांव फोंड सावंत.या फोंड सांवतांचा मुलगा म्हणजेच खेम सावंत ( पहिला).तेच सावंतवाडी संस्थानचे राज्यसंस्थापक होते. त्यांना सोम,फोंड व लखम असे तीन मुलगे होते. खेम सावंत यांनी १६४० पर्यंत देशमुखी उपभोगली. त्यानंतर सोम व फोंड यांनी देशमुखी उपभोगली (१६४१–५१).

खेम सावंत (पहिला )— फोंड सावंताचा हा मुलगा. हाच सावंतवाडीचा राज्यसंस्थापक म्हणतां येईल. यानें १६२७ सालीं विजापूरकरांकडून देशमुखी मिळवून तिचा १४ वर्षे उपभोग घेतला. खेम सावंत हा नाईक म्हणून काम पहात होता.पुढे त्याच्या बहादुरीवर खुष होउन आदिलशहाने त्याला १६२७ च्या सुमारास देशमुखीची सनद दिली.सन १६३५-३६ मध्ये खेम सावंत सरदेसाई परगणे कुडाळ असा उल्लेख येतो. पहिल्या खेम सावंतांशी निगडित एक दंतकथा प्रचलित आहे. फोंड सावंताची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्याचा मुलगा खेम सावंत ओटवणे येथील वर्दे नावाच्या ब्राह्मणाकडे गुरे राखत असे. एकदा संध्याकाळपर्यंत तो परत न आल्याने त्याचा शोध घेत रानात गेलेल्या ब्राह्मणास तो एका वडाच्या झाडाखाली निजलेला दिसला. त्याचवेळी खेम सावंताच्या डोक्यावर एक नाग फणा काढून असलेला त्याने पाहिला. त्यावरून हा मुलगा पराक्रमी निपजेल, स्वतंत्र राज्य स्थापन करेल असे भाकीत त्याने केले. पुढे खेम सावंताने विजापूरकरांच्या चाकरीत राहून त्यांच्या साहाय्याने स्वत:चे सन्य तयार केले. काही प्रांत जिंकून घेऊन चराठा भागात आपली सत्ता स्थापन करून सावंतवाडी संस्थानची मुहूर्तमेढ रोवली. सावंत-भोसल्यांच्या राजसिंहासनावर असलेली नागाची प्रतिमा किंवा ओटवणे येथे नागाच्या दगडी प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा यामुळेच निर्माण झाली असावी असे वाटते.

 

दक्षिण कोकणवर अधिराज्य गाजवलेल्या सावंत भोसले घराण्याची कारकीर्द कौतुकास्पद

 संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकिर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत. 

उदेपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते. मेवाड प्रांतातील चित्तोड येथील गादी स्थापन करून सिसोदिया घराण्यातील हे वंशज त्या काळात राज्य करत असल्याचे संदर्भ आहेत. याच प्रांतात उदेपूर हे शहर आहे. या घराण्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. महाराणा प्रताप हेही याच सिसोदिया वंशाचे.
        दक्षिण कोकणात या घराण्यातील मांग सावंत हे सगळ्यात आधी येथे आले. तेच सावंतवाडीतील राजघराण्याचे मुळ पुरुष मानले जातात. विजयनगर राजाच्या सैन्यासोबत ते या प्रांतात आले. सुरूवातीला काहीकाळ चंदगड तालुक्‍यातील गंधर्वगड येथे त्यांचे ठाणे होते. त्यामुळे त्यांना चांदगुढाधिपती या नावानेही संबोधले जायचे.
कोकणात आल्यानंतर त्यांनी होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे सर्वांत आधी आपले ठाणे वसवले. त्या काळात या भागावर प्रभाव असलेल्या स्थानिक सरदाराचा त्यांनी पराभव केला. त्यांची ख्याती हळूहळू या प्रांतात पसरली. मागील भागात याच मांग सावंत यांचा या भागावर वर्चस्व असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंशी संघर्ष झाल्याचा संदर्भ आला आहे. 1580 मध्ये मांग सावंत आणि कुडाळदेशस्थ प्रभूंचे सेनापती देव दळवी यांनी मिळून कुडाळ प्रांताविरूद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांची सत्ता स्थापन करणे हा या मागचा हेतू होता. कुडाळच्या प्रभूंनी विजापूरच्या बादशहाकडून मदत मिळवली. होडावडे येथे दोघांच्याही सैन्यात लढाई होवून यात मांग सावंत मारले गेले.
         मृत्यूवेळी मांग सावंत यांना अपत्य नव्हते. त्यांना एकूण सात पत्नी होत्या. यातील एक गर्भवती होती. ती ओटवणे येथे एका आप्तांकडे गेली. उर्वरीत सहाजणी सती गेल्या. यानंतर पुढचा काही काळ सावंत-भोसले घराणे प्रकाशझोतात नव्हते.
ओटवणेत मांग सावंत यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ते म्हणजे फोंड सावंत. त्यांचे पुत्र खेम सावंत ओटवणेकर हे राजयोग घेवून जन्माला आले. त्यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.
       ओटवणेत त्या काळात वरदे आडनावाचे कुलकर्णी होते. खेम सावंत लहानपणी त्यांची गुरे राखण्याचे काम करायचे. एकदिवशी दुपारी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. तेथेच त्यांना झोप आली. इतक्‍यात एक मोठा नाग तेथे आला आणि फणा पसरून त्याने खेम सावंत यांच्या अंगावर छत्रीसारखी सावली निर्माण केली. याच दरम्यान शेणवी हे गृहस्थ खेमसावंत यांना शोधण्यासाठी तेथे आले. हा प्रकार पाहून हा मुलगा तेजस्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खेम सावंत यांना जागे करून घरी आणले. "भविष्यात आयुष्यात मोठा लाभ झाला तर मला काय देशील?' असा सवाल त्यांनी खेम सावंत यांना केला. यावेळी "जेथे माझी पत्रावळ तेथे तुझा द्रोण' असा शब्द त्यांनी दिला.
        पुढे सावंत भोसले घराण्याची गादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी या शेणवी अर्थात सबनीस यांना प्रधान म्हणून नेमले. आजही ओटवणेमध्ये ही आख्यायिका सांगितली जाते. त्या ठिकाणी सापाची पाषाणी मूर्ती पुजेला लावलेली पहायला मिळते. या देवस्थानला ओटवणेच्या मुख्य देवस्थानामध्ये स्थान आहे.
पुढे पराक्रमाच्या जोरावर खेम सावंत यांनी देशमुखी मिळवली. एका संदर्भानुसार वरदे यांनी खेम सावंत यांना व्यायाम, खेळाची गोडी लावली. एकदा ते बांद्याच्या पेठेतून मित्रासोबत जात होते. याचवेळी विजापूरच्या राजवाड्यातील एक शाही पाहुणी मेण्यातून जात होती. याच दरम्यान एक उधळलेला बैल या मेण्याच्या दिशेने चालून आला.

खेम सावंत यांनी पुढे येत या बैलाचा प्रतिकार केला. या पाहुणीने बांद्यातील सरदाराला खेम सावंत यांना जहागिरी स्वरूपात बक्षीस देण्यास सांगितले. याचा वरदे यांनी पाठपुरावा करून खेम सावंत यांना देशमुखीची सनद मिळवून देण्यात सहकार्य केले.
दुसऱ्या एका संदर्भानुसार, त्या काळात कुडाळदेशस्थ प्रभू यांनी प्रत्येक तर्फेवर (विभाग) नाईक म्हणून अंमलदार नेमले होते. माणगाव तर्फेची नाईकी खेम सावंत यांच्याकडे होती. वसुली करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. हा कर वसुल करून तो कुडाळ प्रांतात पाठवायचा अशी व्यवस्था होती. ठराविक काळानंतर खेम सावंत यांनी कुडाळला वसुली पाठवणे बंद केले.
         इतकेच नाही तर इतर नाईकांकडून ते वसुली करू लागले. त्या काळात हा एकप्रकारचा बंड होता. विजापुरच्या बादशहाचा ह्यामदराजा नावाचा एक सरदार याच काळात पारपोली घाटातून जात होता. खेम सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून पराभव केला. हा सरदार खेम सावंत यांच्या हाती सापडला. सोबत असलेल्यांनी त्याला ठार करावे असे मत मांडले; मात्र खेम सावंत यांनी त्याला जीवदान दिले. पुढे या सरदाराने विजापुरात जावून त्यांच्या पराक्रमाची आणि दिलदार स्वभावाची बादशहाकडे तारीफ केली. यामुळे खुश होवून बादशहाने खेम सावंत यांना देशमुखीची सनद दिली. 1627 च्या दरम्यान ही सनद देण्यात आली. खेम सावंत यांनी आपले ठाणे ओटवणे येथे वसवले.
चौदा वर्षे देशमुखीचे काम
           खेम सावंत यांनी चौदा वर्षे देशमुखीचे काम केले. याच काळात उत्तरेकडून तीन तेजस्वी साधू या प्रांतात आले. यातील दामोदर भारती हे आताच्या सावंतवाडी जवळ असलेल्या चराठे या गावात थांबले. दुसरे गिरी पंथाचे गोसावी हे मातोंड (ता. वेंगुर्ले) येथील गोडे कोंड येथे आणि तिसरे परशुराम भारती हे तळवणे येथे गेले. यातील परशुराम भारती हे खेमसावंत यांचे गुरू. त्यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाची माहिती करून घेतली. खेम सावंत तासनतास समाधी लावून बसायचे. एकदा ते असेच दीर्घकाळ समाधिस्थ होते. त्यांचे देहावसन झाले, असे लोकांना वाटले. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. योग बलाने हा प्रकार तळवणेत असलेल्या परशुराम भारती यांना समजला. खेम सावंत यांची समाधी उतरवण्यासाठी ते तेरेखोल नदीतून ओटवणेकडे यायला निघाले; मात्र त्या आधीच खेम सावंत यांचा अंत्यविधी झाला होता. 1640च्या दरम्यानची ही घटना आहे. परशुराम भारती बांद्याजवळ आले असता अंत्यविधीवेळी काढलेले बंदूकीचे बार त्यांच्या कानी आले. निराश होवून ते तेथूनच तळवणेत परतले. त्यांनीही तळवणेत समाधी घेतली. आजही तेथे भंडारा उत्सव साजरा केला जातो. 

याच्या मागून याचा वडील मुलगा सोमसावंतामागून धाकटा मुलगा फोंडसावंत गादीवर आला. स. १६५१ त फोंड सावंत मरण पावल्यावर त्याचा धाकटा भाऊ लखम सावंत या प्रांताचा सत्ताधीश झाला. 
    सावंतवाडी संस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात संघर्षाचा इतिहास आहे. असे असले तरी ही दोन राजांमधील लढाई होती. त्यांच्यामध्ये झालेला तह दोन मराठा राज्यकर्ते एकत्र यावे या मुद्‌द्‌यावर होता. शिवाय सावंतवाडी संस्थानच्या पराक्रमाचे शिवाजी महाराजांनीही कौतुक केल्याचे संदर्भ इतिहासात आहेत. सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन राजे लखम सावंत यांच्या कारकीर्दीत हा संघर्ष झाला. लखम सावंत यांची कारकीर्द पराक्रमाबरोबरच राज्याच्या स्थैर्य आणि सुबत्तेसाठी महत्त्वाची होती. या काळात सावंतवाडी संस्थानची ताकदही वाढली होती.
   सन १६५९ ते १६७५ या दरम्यान लखम सावंत यांनी सावंतवाडी संस्थानच्या विस्तारासाठी खूप मोठे काम केले. त्यांची कारकीर्द खूप संघर्षमय राहिली. लखम सावंत हे शूर आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या जोडीला त्यांचे पुतणे खेम सावंत हेही होते. या दोघांनी मिळून खूप मोठा पराक्रम गाजवला. या लखम सावंतानें शिवाजी महाराजांना कोंकणांतून दुर करण्याचा विजापुरकरांच्या वतीनें प्रयत्न चालविला. पण शिवाजी राजांच्या हातून पराभव पावून हा तहास कबूल झाला (१६५९). या तहान्वयें सावंतानें शिवाजी महराजांचें मांडलिकत्व पत्करिल्यासारखें झालें. हा नामुष्कीचा तह न आवडून लखमानें स. १६६४ त शिवाजी महाराजांशीं लढाई करून जय मिळविला. महाराजांनी पोर्तुगीजांचा फोंडा किल्ला घेतला. तेव्हा पोर्तुगीजांनी तह केला व लखम सावंताने महाराजांबरोबर पाच कलमांचा तह करून मराठी राज्याची सेवा फौजेनिशी करण्याचे मान्य केले आणि देशमुखीच्या उत्पन्नापैकी सहा हजार होन दरसाल छ. शिवाजींना देण्याचे ठरले (१६५९); परंतु लखम सावंत पुन्हा विजापूरकडे गेला (१६६४). त्याने महाराजांची सर्व ठाणी उठवून तेथे आदिलशाही सत्ता स्थापिली. तेव्हा आदिलशहाने मालवण गाव सर्व हक्कांसह त्यास इनाम करून दिला. शिवाय परगण्याची नाडगौडी व मसुरे, पेंडूर, घावनळे, मुळगाव, होडावडे, रेडी, आरवली, मठ वगैरे गावे दिली (१६६४).

भवानी तलवार आणि सावंतवाडी संस्थान

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीविषयी अनेक तर्क वितर्क मांडले जातात. ही तलवार महाराजांकडे कशी आली, ती कशी होती, ती आता कुठे आहे? यावर बरेच संदर्भ दिले जातात. याच तलवारीशी संबंधीत एक मौखीक संदर्भ सावंतवाडी संस्थानशी जोडला जातो. ही तलवार सावंतवाडी संस्थानतर्फे शिवाजी महाराजांना भेटीदाखल दिल्याचा हा मौखीक संदर्भ आहे. इतिहासाच्या कसोटीवर तो सिद्ध झालेला नाही; मात्र मौखीक परंपरेने हा संदर्भ सांगितला जातो. या संस्थानचे तत्कालीन राजे लखम सावंत आणि त्यांचे पुतणे खेम सावंत (दुसरे) यांच्या कारकीर्दीतील हा संदर्भ आहे. 
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या "जगदंबा', "तुळजा' आणि "भवानी' या तलवारीविषयी इतिहासाला नेहमीच औत्सुक्‍य राहिले आहे. यातील "भवानी' तलवार आता नेमकी कुठे आहे? याबाबत अनेक इतिहासकारांनी संशोधन केले. याबाबतचे तर्क वितर्क मांडले. ही तलवार महाराजांना कोणी दिली? या संदर्भातही बरेच प्रवाद आहेत. जुने संदर्भ, बखरीचा आधार घेत याबाबत अनेक अंदाज आतापर्यंत बांधले गेले आहेत. एका मौखीक संदर्भानुसार ही तलवार लखम सावंत यांच्या सत्ताकाळात सावंतवाडी संस्थानचा छत्रपतींशी तह झाला तेव्हा त्यांना भेटीदाखल दिल्याचे सांगितले जाते; मात्र याचा पुरावा कुठेही सापडत नाही. लखम सावंत आणि खेम सावंत (दुसरे) यांचे कर्तृत्व जाणून घेत असताना हाही संदर्भ मांडत आहोत. 
     सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या आणि काही जुन्या जाणत्यांकडून हा मौखीक संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न केला. यानुसार लखम सावंत गादीवर असताना त्यांचे पुतणे खेम सावंत (दुसरे) हेही सोबत असायचे. याचे संदर्भ या आधीही आले आहेत. शिवाजी महाराजांशी सावंतवाडी संस्थानच्या तीन लढाया झाल्या. 1659 मध्ये झालेल्या लढाईत सावंतवाडी संस्थानचा पराभव झाला. यावेळी युद्धचे नेतृत्व करणारे राजे लखम सावंत हे पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांवरही हल्ला केला. शेवटी लखम सावंत आणि शिवाजी महाराजांमध्ये एप्रिल 1659ला पाच कलमी तह झाला. यावेळी भेट म्हणून सावंतवाडी संस्थानमार्फत जी तलवार दिली गेली ती भवानी तलवार असल्याचे सांगण्यात येते. ही तलवार पोर्तुगिज बनावटीची होती. तिला हिरेजडीत मुठ असल्याचे सांगितले जाते. अर्थात ही सर्व माहिती मौखीक स्वरूपाची आहे. ती सिद्ध करणारे पुरावे मिळत नाहीत. 
     या भवानी तलवारीबाबत इंद्रजीत सावंत यांच्या "शोध भवानी तलवारी'चा या पुस्तकात अनेक संदर्भ दिले आहेत. यानुसार भवानी तलवार ही स्वतः भवानी मातेने प्रकट होवून महाराजांना दिल्याच्या प्रचलीत आख्यायिकेवर भाष्य केले आहेत. याचे संदर्भ संत कविंद्र परमानंद नेवासकर यांनी लिहिलेल्या "शिवभारत' या संस्कृत ग्रंथात काव्य स्वरूपात मिळत असल्याचे सांगितले जाते; मात्र याचा अर्थ खुद्द भवानी मातेने ती दिली, असा काढणे धाडसाचे ठरेल. हे शिवाजी महाराजांवर स्तुतीपर लिहिलेले काव्य आहे. परमानंद यांच्या काव्यात इतरही दैववादाची उदाहरणे आहेत. त्यामुळे तलवार भवानी मातेने दिली असल्याचे सिद्ध होत नसल्याचे आणि ती एका कवीची कल्पना असल्याचे मत या पुस्तकात मांडले आहे. 
     ही तलवार नेमकी कुठून आली याबाबतही बखरीच्या आधारे विविध संदर्भ या पुस्तकातून दिले आहेत. चित्रगुप्ताची बखर, चिटणीस बखर, शिवदिग्विजय बखर यामध्ये भवानी तलवारीचे संदर्भ आढळतात. यात ही तलवार कशी होती या संदर्भातीलही वर्णन आहे. या बखरीमध्ये ही तलवार गोवलेकर सावंत या सरदार घराण्याकडून महाराजांना मिळाल्याचे सांगितले जाते. या बखरींमध्ये "श्री तुळजा फिरंग' असा या तलवारीचा नामोल्लेख आढळतो. चिटणीस बखरीच्या उल्लेखानुसार महाराज कोकणात मोहिमेवर असताना त्यांना गोवलेकर सावंत येवून भेटले. त्यांनी महाराजांना एक तलवार दिली. तिचे नाव भवानी तलवार ठेवल्याचे उल्लेख आढळतो.
     यातील गोवले हे गाव महाड (जि. रायगड) या तालुक्‍यात येते. असे असले तरी ही मुळ तलवार पोर्तुगिज बनावटीची आहे. इंद्रजीत सावंतांच्या याच पुस्तकात ही तलवार नेमकी कोठून मिळाली याबाबतचा एक मौखीक संदर्भ सांगितला आहे. यानुसार गोवलेकर सावंत यांच्या सैन्याने बांदा बंदरावर ओहोटीमुळे अडकून पडलेल्या पोर्तुगिज जहाजावर हल्ला केला. हे जहाज भरतीची वाट पाहत थांबले होते. यावर ओग फर्नांडेस नावाचा पोर्तुगिज सेनापती होता. त्याच्याकडे चारफूटी लांब रत्नजडीत मुठीची तलवार होती. या चकमकीमुळे उडालेल्या गोंधळात गोवलेकर सावंत यांच्या हाती ही तलवार सापडली. पुढे ही तलवार या घराण्यातील अंबाजी सावंत यांचे पुत्र कृष्ण सावंत यांनी 7 मार्च 1659ला शिवाजी महाराजांना सप्तकोटीश्‍वर या मंदिरात पुजेला बसले असताना भेटीदाखल दिली. अर्थात हा सुद्धा मौखीख संदर्भ आहे. याचा कोणत्याही बखरीत उल्लेख नाही. यातील सप्तकोटेश्‍वर मंदिर गोव्यात आहे आणि गोवलेकर सावंतांचा उल्लेख असलेले गोवले गाव रायगड जिल्ह्यात येते. 
     दरम्यान, सावंतवाडी संस्थानातील मौखीक संदर्भानुसारही 1659 मध्येच ही तलवार शिवरायांना दिल्याचे सांगितले जाते. त्याकाळात सावंतवाडी संस्थानकडे स्वतःचे आरमार होते. बांदा आणि परिसरावर त्या काळात याच संस्थानची सत्ता होती. कृष्ण सावंत हे नाव सावंतवाडी संस्थानच्या इतिहासातही शिवाजी महाराज आणि लखम सावंत यांच्या समकाळात येते; मात्र या उल्लेखातील कृष्ण सावंत हे तिरवडे येथील असल्याचे सांगितले जाते. लखम सावंत आणि शिवाजी महाराज यांच्यात झालेला तह सावंत यांनी पुढे पाळला नाही. यानंतर महाराजांनी कोकणात मोहीम काढून सावंतवाडी संस्थानच्या ताब्यात असलेला रांगणागड जिंकला. तो परत मिळवण्यासाठी लखम सावंत यांनी युद्ध केले; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळी महाराजांनी कुडाळ प्रांताच्या देशमुखीची वस्त्रे कृष्ण सावंत यांना दिल्याचे उल्लेख आढळतात. पुढे लखम सावंत यांनी शिवाजी महाराजांशी कुडाळात लढाई करून विजय मिळवला; मात्र कृष्ण सावंत त्यांच्या हाती लागले नाहीत. पुढे लखम सावंत यांनी त्यांना कैद करून ठार केल्याचे संदर्भ सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात आहेत. 
    "शोध भवानी तलवारीचा' याच पुस्तकात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिलेल्या प्रस्तावनेत गोवलेकर सावंतांनी छत्रपती शिवरायांना ही तलवार दिल्याचे आणि महाराजांनी त्यांना 300 होन दिल्याचे म्हटले आहे. गोवलेच्या पुढे असलेल्या हरीहरेश्‍वर देवाच्या दर्शनाहून परतताना ही तलवार दिल्याचा संदर्भ यात दिला आहे. सावंतांच्या याच पुस्तकात शिवाजी महाराजांकडे भवानी देवीच्या नावाने असणाऱ्या एक नव्हे तर कमीत कमी तीन तलवारी असाव्यात, अशी शक्‍यताही व्यक्‍त केली आहे. एकूणच भवानी तलवार, छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी संस्थान याचे थेट नाते सांगणारे बखर, इतिहासातील उल्लेख किंवा अन्य कोणतेही पुरावे सध्यातरी उपलब्ध नाहीत. इंद्रजीत सावंत यांनीही आपल्या पुस्तकात तसेच मांडले आहे. असे असले तरी सावंतवाडीमध्ये याबाबतचे मौखीक संदर्भ आजही सांगितले जातात. 
शिवाजी महाराजांची तलवार "सिंधुदुर्गा'त 
सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले. यात शिवराजेश्‍वरांची मूर्ती स्थापन करण्यात आली. या मूर्तीच्या समोर एक तलवार आहे. ती शिवाजी महाराजांची असल्याचे "शोध भवानी तलवारीचा' या पुस्तकात म्हटले आहे. ही तलवार मराठा मुठीची आहे. याचे म्यान आजही सुस्थितीत आहे. त्यावर चांदीचा वापर झाला आहे. त्याच्या एका बाजूस गरूड आणि दुसऱ्या बाजूला हनुमंताच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत.      
    खेम सावंत यांच्याच कारकीर्दीत कुडाळ परगण्यावर असलेली कुडाळदेशस्थ प्रभूंची सत्ता पूर्णपणे जावून सावंतवाडी संस्थानचे वर्चस्व निर्माण झाले. लखम सावंत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन. त्या काळात सावंतवाडी संस्थानकडे १२ हजार इतकी फौज होती. पायदळ आणि स्वतंत्र घोडदल याचाही संस्थानच्या सैन्यदलात समावेश होता. त्याही काळात संस्थानकडे स्वतःचे आरमार होते हे विशेष.
    संस्थानच्या हद्दीत मोठ्या नद्या, समुद्र होता. त्यामुळे आरमार ही त्या काळात गरज होती. लखम सावंत यांच्या कारकीर्दीत युद्धासाठी सक्षम व्यवस्था उभी केली होती. समुद्र मार्गातून मोठ्याप्रमाणात व्यापार चालत असे. यामुळे सागरावर आपले स्वामित्व असावे म्हणून हे आरमार उभारले होते. अरब आणि इतर व्यापाऱ्यांवर वचक बसण्यासाठी ही व्यवस्था होती. त्याकाळात आरमारात लक्ष्मीप्रसाद, भवानीप्रसाद आणि साहेबराव ही तीन गुराबा होती. गुराबा हा शब्द घोराव अर्थात डोंबकावळा यात अरबी शब्दाच्या अपभ्रंशातून बनला आहे. यात दोन ढोलकाठ्या असायच्या. दीडशे ते तीनशे टनापर्यंत वजन नेण्याची यात क्षमता होती.
   गुराबाचा तळ पाण्यात खोलपर्यंत जात नसे. त्यामुळे हळुवार वाऱ्यावरही ते अतिशय गतीने चालत असे. या गुराब्याची नाळ पाण्याच्या सपाटीपासून तिरकस खोलवर लांबपर्यंत जात असे. त्यामुळे तोल सावरणेही सहज शक्‍य होते. त्यामुळे लढाईमध्ये अतिशय चपळपणे शत्रूवर हल्ला करता येणे शक्‍य असायचे. या तुलनेत परदेशातून येणारी गलबते अवजड असायची. त्यांना गाठून हल्ला करून जेरीस आणणे सहज शक्‍य व्हायचे. त्या काळात आरमारामध्ये रामबाण, रघुनाथ, दुर्गा, यशवंती, लक्ष्मी, हनुमंत अशी सहा गलबते होती. ती आकाराने लहान होती; मात्र लढाईत त्यांचा खूप उपयोग व्हायचा. यामध्ये तलवारी, खंजीर, खांडा, बर्ची अशा शस्त्रांचा साठा असायचा. अठराव्या शतकाच्या अखेरीस या आरमारात ३३१ सैनिक, २०६ दर्यावर्दी असे ५३७ जण सेवेत होते.
अशी होती तयारी
        या संदर्भात फ्रायर या नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने केलेले वर्णनही या आरमाराची ताकद सांगायला पुरेसे आहे. त्यावेळी वेंगुर्ले बंदरात या आरमाराचा वावर होता. १६७४ मध्ये लखम सावंत यांचे पुतणे खेम सावंत यांनी गोवा आणि वेंगुर्ले या किनाऱ्यावर एक इंग्रज व्यापाऱ्यांचे गलबत पकडले. या इंग्रजांच्या गलबतावर असलेल्या फ्रायर याने केलेल्या वर्णनानुसार त्यांनी (सावंतवाडी संस्थानचे आरमार) आमच्या गलबतावर कौच्यांचे गोळे फेकले; पण आमच्या गलबतावरील कोणीही त्यामुळे जखमी झाला नाही; मात्र अचानक सुरू झालेल्या या वर्षावाने गलबतावरील वल्हेवाले खूपच घाबरले. समोरून दारूगोळा आणि गोफणीतून दगड फेकले जात होते. ढाल फिरवून भालेही फेकले जावू लागले. त्यांचे गलबत आमच्या गलबतापेक्षा दहापट मोठे होते. त्यांची तयारीही कडेकोट होती. त्या गलबतावर वल्हे मारणाऱ्यांशिवाय सुमारे 60 जण होते. आमच्या गलबतावर तोफगोळा होता, पण तो उडवण्यासाठी गोलंदाज नव्हता; मात्र शेवटी सावंतवाडी संस्थानचे गलबत मागे फिरले. इंग्रज व्यापाऱ्यांच्या गलबताच्या तुलनेत सावंतवाडी संस्थानच्या आरमाराची किती तयारी होती, याचा या वर्णनावरून अंदाज येतो.
 नरेंद्रावर हलवले संस्थानचे ठाणे
      लखम सावंत यांच्याच कारकीर्दीत संस्थानचे ठाणे ओटवणेतून आताच्या सावंतवाडीकडे सरकले. तत्कालीन चराठे गावच्या हद्दीत असलेल्या नरेंद्र डोंगरावर लखम सावंत यांच्या काळात राजवाडा उभारण्यात आला. याचे अवशेष आताही पहायला मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने त्या काळात राजधानीचे ठिकाण दुर्गम भागात असायचे. कदाचित त्याच हेतूने हे ठाणे वसवले गेले असावे. अधिकाधिक भूभागावर वर्चस्व मिळवून राज्याच्या विस्ताराच्या दृष्टीने लखम सावंत यांच्याच काळात खऱ्या अर्थाने विचार करायची सुरूवात झाली. नरेंद्र डोंगरावरील ठाणे हे याचेच उदाहरण म्हणता येईल. 
शिवाजी महाराजांशी सावंतवाडीचा संघर्ष अन् शौर्य दाखवणाऱ्या घोड्याचे स्मारक 
    लखम सावंत यांच्या कारकीर्दीत सावंतवाडी संस्थान खऱ्या अर्थाने ताकदवान राज्य म्हणून उदयाला येत होते. सावंत-भोसले घराण्याने कुडाळच्या परगण्यावर वर्चस्व मिळवून दक्षिण कोकणात दबदबा निर्माण केला. याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केले होते. कोकण त्यांच्यासाठीही महत्त्वाचे होते. कारण या भागात अनेक दुर्गम आणि जिंकण्यास कठिण असणारे किल्ले होते. शिवाय समुद्र असल्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने कोकण महत्त्वाचे होते. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युध्दकौशल्यात कोकणातील दुर्गम भौगोलिक स्थिती उपयोगी पडणारी होती.
    महाराजांनी कोकणातील विजापूरच्या बादशहाकडे असलेला भाग जिंकून घेत आपली सत्ता स्थापन करायला सुरूवात केली. लखम सावंत यांनी विजापूरच्या बादशहाला आपण महाराजांकडून कोकण प्रांत सोडवून देतो अशी ग्वाही दिली. बादशहाने त्यांना खवास खान नावाचा एक सरदार दहा हजाराच्या फौजेसह मदतीला पाठवला. मागून बाजी घोरपडे-मुधोळकर हे 1500 स्वारांसह खवास खानाच्या मदतीला येत होते. शिवाजी महाराजांना हे कळल्यामुळे त्यांनी बाजी घोरपडेंना वाटेतच गाठून ठार केले. खवास खानाचाही गनीमीकावा वापरून पराभव केला. यामुळे तो पळून गेला. यानंतर शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात सैन्य घुसवून लखम सावंत यांच्या ताब्यातील ठाणे किल्ले ताब्यात घ्यायला सुरूवात केली.
    अखेर लखम सावंत आणि त्यांचे पुतणे खेम सावंत हे गोव्यातील पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले. महाराजांनी पोर्तुगिजांवरही हल्ला करून त्यांचा फोंडा येथील मजबूत गड ताब्यात घेतला. त्यामुळे नरमलेल्या पोर्तुगिजांनी महाराजांशी तह करत त्यांना तोफा नजराणा म्हणून दिल्या. त्यामुळे लखम सावंत यांना आश्रय देणे पोर्तुगिजांसाठी कठिण बनले. शेवटी लखम सावंत यांनी पितांबर शेणवी यांना शिवाजी महाराजांकडे वकील म्हणून पाठवले. मराठी राज्याची स्थापना करण्याचा दोन्ही राजांचा समान हेतू असल्यामुळे शिवाजी महाराजांनी तह करण्याचा निर्णय घेतला.
    अखेर एप्रिल 1659 मध्ये शिवाजी महाराज आणि लखम सावंत यांच्यात तह झाला. त्यानुसार महाराजांनी कुडाळ प्रांतात घेतलेले किल्ले आणि ठाणी सावंत यांच्या स्वाधिन केली. सावंत यांनी या प्रांताच्या वसुलीतून दरवर्षी सहा हजार होन घेवून तीन हजार इतकी फौज ठेवावी आणि गरज असेल तेव्हा महाराजांना मदत करावी असे ठरले. त्यानुसार लखम सावंत यांना कुडाळची देशमुखी आणि सावंत बहादर हा किताब देण्यात आला. याचवेळी महाराजांनी लखम सावंत यांचे सरदार राम दळवी आणि तान सावंत यांना एक एक हजार स्वारांची मनसबदारी दिली.
   आपले तीन सरदार कुडाळ प्रांताच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमले. नंतर मात्र हा तह फार काळ टिकला नाही. लखम सावंत यांनी विजापूरच्या बादशहाशी पुन्हा सलोखा केला. त्याकाळात तळकोकणात विजापूरकरांचा अजीजखान सरनोबत हा सुभेदार होता. सावंत यांनी त्याला मदत करून कुडाळ प्रांतातील शिवाजी महाराजांची सर्व ठाणी उठवली. अजीजखानने विजापुरच्या बादशहाकडे लखम सावंत यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. यामुळे बादशहाने 1664 मध्ये मालवण येथील हक्‍क लखम सावंत यांना बहाल केले. पुढच्या काळात कुडाळ परगण्याची सुभेदारी (नाडगौडकी) देवून मसुरे, पेंडूर, घावनळे, मळगाव, मठ, होडावडे, आरवली, रेडी व आरोंदा हे भाग लखम सावंत यांना इनाम म्हणून दिले.
    याच दरम्यान शिवाजी महाराज पुन्हा कोकणच्या स्वारीवर आले. त्यांनी रांगणा उर्फ प्रसिध्द गड हा किल्ला ताब्यात घेतला. तो परत मिळवण्यासाठी विजापूरहून बलूल खान नावाचा सदरदार मदतीला आला. त्याच्या सैन्यासह लखम सावंत यांनी रांगणा गडावर हल्ला केला; मात्र शिवाजी महाराजांची तयारी चांगली होती. त्यामुळे यात सावंत यांना यश आले नाही. यानंतर कुडाळ प्रांताच्या देशमुखीची वस्त्रे शिवाजी महाराजांनी कृष्ण सावंत यांना दिली. हे कृष्ण सावंत मुळचे तिरवडे येथील असल्याचे सांगितले जाते. ते काहीकाळ सावंतवाडीकर सावंत भोसले यांच्याकडे सरदारकीला होते. या घराण्यातील रामसावंत, रवळसावंत हे बंडात सहभागी झाल्यामुळे त्यांच्याकडून सरदारकी काढून घेतली गेली. याच घराण्यातील कृष्णसावंत यांच्याकडे सरदेशमुखीची वस्त्रे आली.
  ही वस्त्रे परत मिळवण्यासाठी लखम सावंत यांनी बादशहाची मदत मागितली. बादशहाने वझीर महम्मद एकखलासखान याला कोकणचा सुभेदार व श्रीपतराव मजलसी यांना कारभारी नेमून मदतीला पाठवले. यानंतर त्यांच्या मदतीने लखम सावंत आणि शिवाजी महाराज यांची कुडाळ येथे मोठी लढाई झाली. यात लखम सावंत यांनी शौर्याची पराकाष्टा केली. यामुळे शिवाजी महाराजांना पराभव पत्करून मागे फिरावे लागले. या पराक्रमामुळे बादशहाने सावंत यांना चौकुळ गाव मोकळा करून दिला. पुढे सावंत यांनी बाकीचा मुलखही ताब्यात घेतला. इतके होवूनही कृष्णसावंत त्यांच्या हाती लागले नाही. शेवटी लखम सावंत यांनीच त्यांना कैद करून ठार केले. आणि 1665 मध्ये बादशहाच्या ताबेदारीत त्यांनी देशमुखीची सत्ता कायमची स्थापन केली. लखम सावंत यांचे 1675 मध्ये निधन झाले. लखम सावंत यांच्या शौर्याचे शिवाजी महाराजांनीही कौतुक केल्याचे संदर्भ मिळतात.
पुन्हा आणली समृध्दी
   लखम सावंत यांच्या कारकीर्दीत लढाईमुळे पूर्ण प्रांत ओस पडला होता. सगळीकडे अस्थिरता होती. गावांमध्ये शेती-भाती थांबली होती. याचा परिणाम राज्याच्या महसुलावरही होत होता. लखम सावंत यांनी ही अवस्था बघून राज्यात सुबत्ता आणण्यासाठी लागवड सुरू केली. लोकांना विश्‍वासात घेवून काम केले. यामुळे ओस पडलेला तत्कालीन प्रांत पुन्हा समृध्द झाला. 


 शौर्य दाखवणाऱ्या घोड्याचे स्मारक
    नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी जुना बाजार भागात एक घोड्याचे स्मारक आहे. हे राजाच्या घोड्याचे स्मारक असल्याचे स्थानिक सांगतात. उपलब्ध मौखीक संदर्भानुसार हा घोडा लखम सावंत यांचा होता. एका युध्दादरम्यान या घोड्याने प्रयत्नांची पराकाष्टा करत राजाचे संरक्षण केले. युध्दाहून परतत असताना तत्कालीन नरेंद्रावरील राजवाड्याच्या वाटेवर या घोड्याने प्राण सोडले. त्याचीच आठवण म्हणून हे घोड्याचे स्मारक उभारले गेल्याचे सांगण्यात येते. 
    हा शूर सावंत १६७५ सालीं मरण पावला. पुढे लखम सावंतचा पुतण्या दुसरा खेम सावंत यांनी कुडाळ देशस्थ प्रभूंचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळ १२,००० फौज होती. त्यांनी आदिलशहाची मर्जी मिळविण्यासाठी विजापूरचा सरदार खवासखान याच्या मदतीने छ. शिवाजी महाराजांवर चढाई केली, तेव्हा महाराजांनी दोघांचा दारुण पराभव केला. लखम व दुसरा खेम सावंत यांनी तेव्हा पोर्तुगीजांचा आश्रय घेतला.खेम सावंत (दुसरा) गादीवर यानें मोठ्या पराक्रमानें पोर्तुगीजांनां नामोहरम करून आपल्या राज्याचा विस्तार केला व कुडाळच्या प्रभूंनां जिंकून स्वतंत्र झाला. याचवेळी आदिलशाहीचा अंत झाल्यानें सावंतानें मोंगलांचें सार्वभौमत्व नांवाचेंच कबूल केलें. 
     खेम सावंत यांनीही पराक्रम आणि राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत राज्याचा विस्तार केला. त्यांच्याच काळात सावंतवाडीची उभारणी झाली. विजापूरच्या बादशहाच्या सत्तेचा अस्त आणि दिल्लीचा वाढता प्रभाव या काळात होता. प्राप्त परिस्थितीत खेम सावंत यांनी आपल्या राज्याला स्थैर्य मिळवून दिले. कुडाळदेशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट खेम सावंत यांच्याच कारकिर्दीत झाला. यामुळे सावंतवाडी संस्थानच्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र कारभाराची नांदी याच राजांच्या सत्ताकाळापासून झाली. 
 
 
दिल्लीला महसूल पाठवणे झाले बंद अन् सावंतवाडीच्या स्वतंत्र कारभाराची नांदी झाली सुरु   
    खेम सावंत हे लखम सावंत यांच्या लढाया आणि राजकीय निर्णयामध्ये सामील असायचे. त्यांनी गादीवर बसण्याआधीच अनेक लढायांमध्ये शौर्य गाजवले होते.
    लखम सावंत यांचे पुतणे खेम सावंत यांनीही पराक्रम आणि राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत राज्याचा विस्तार केला. त्यांच्याच काळात सावंतवाडीची उभारणी झाली. विजापूरच्या बादशहाच्या सत्तेचा अस्त आणि दिल्लीचा वाढता प्रभाव या काळात होता. प्राप्त परिस्थितीत खेम सावंत यांनी आपल्या राज्याला स्थैर्य मिळवून दिले. कुडाळदेशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट खेम सावंत यांच्याच कारकिर्दीत झाला. यामुळे सावंतवाडी संस्थानच्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र कारभाराची नांदी याच राजांच्या सत्ताकाळापासून झाली.
      खेम सावंत हे लखम सावंत यांच्या लढाया आणि राजकीय निर्णयामध्ये सामील असायचे. त्यांनी गादीवर बसण्याआधीच अनेक लढायांमध्ये शौर्य गाजवले होते. त्यांची त्या काळातही विजापुरच्या दरबारात ख्याती होती. लखम सावंत यांच्या निधनानंतर 1675 मध्ये खेम सावंत गादीवर आले. ते राजे होताच विजापुरच्या बादशहाने तीन फरमाने काढली. यात खेम सावंत यांनी एकनिष्ठेने वागावे, मोगलांबरोबर मैत्री ठेवू नये आणि शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांना मदत करू नये, असे त्यात उल्लेख होते. त्या काळात खेम सावंत यांना बादशहा मदतीसाठी आपल्या फौजेसह बोलवत असत. त्यांचा एक व्यक्‍ती विजापूरच्या दरबारात कायम राहत असे.
     याच दरम्यान विजापूरमध्ये सत्ता बदलाचे वारे सुरू झाले. 1656 मध्ये महम्मद आदिलशहा याचा मृत्यू होवून त्याचा मुलगा अल्ली हा सत्तेवर आला. दिल्लीच्या बादशहाने ही संधी साधत विजापूरवर हल्ला केला. दिल्लीचे मोगल आणि विजापूरच्या बादशहात संघर्ष वाढतच गेला. अखेर 1673 मध्ये सुलतान अल्ली याच्या निधनानंतर विजापूरची व्यवस्था पूर्ण बिघडली. पुढे दिल्ली सत्ताधिश असलेल्या औरंगजेबाने 15 ऑक्‍टोबर 1683 ला विजापूरच्या बादशाहीचा शेवट केला. ही बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेवून खेम सावंत यांनी मुत्सद्दीपणा दाखवत दिल्लीच्या बादशहाशी मैत्री केली. त्यांच्याकडून 1689 मध्ये कुडाळ परगण्याची देशमुखी मिळण्याबाबतचे फरमान मिळवले. शिवाय बादशहाकडून चार हजार स्वारांची मनसबदारीही मिळवली.
    याच दरम्यान शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. त्यांना शह देण्यासाठी तळकोकणात सरदार अब्दूल रजाकखान या सुभेदाराची दिल्लीच्या बादशहाने नेमणूक केली होती. त्याला मदत करण्याचे काम खेम सावंत यांच्यावर सोपवले होते. हा सुभेदार आणि खेम सावंत यांनी पोर्तुगीजांनी उद्‌ध्वस्थ केलेल्या बांदा बंदराच्या पुर्ननिर्माणाचे काम 1690 मध्ये पूर्ण केले.
     1691 मध्ये सखोजी याच्या रूपाने दक्षिण कोकणात एक नवी ताकद तयार झाली. सावंतवाडी संस्थानने कुडाळच्या प्रभूदेसाईंची ताकद बरीच कमी केली असली तरी ती पूर्ण नष्ट झाली नव्हती. सखोजी याने या प्रभू देसाईंच्या विरोधात बंड केले. त्या दोघांमध्ये अनेक छोट्या लढाया झाल्या; परंतु कोणाचाच विजय झाला नव्हता. सखोजी हा वेंगुर्ले येथे तळ ठोकून होता. कुडाळदेशस्थ प्रभू आणि सावंत भोसले यांना जिंकून आपली सत्ता स्थापन करण्याचा त्याचा प्रयत्न होता. खेम सावंत यांच्यावर 1692 मध्ये सखोजी याने हल्ला केला. आरवली येथे या दोघांमध्ये लढाई झाली. त्यात सखोजीचा पराभव होवून तो पळून गेला. पुढे सखोजी आणि खेम सावंत यांच्यात तह झाला. त्या दोघांनी एकत्र येत कुडाळदेशस्थ प्रभूंचे ठाणे असलेल्या कुडाळवर 1693 मध्ये हल्ला केला. सगळ्यात आधी सखोजीने कुडाळवर हल्ला चढवला. खेम सावंत यांनी मागून येत या लढाईमध्ये भाग घेतला. बराचकाळ ही लढाई चालली. 

   खेम सावंत हे लखम सावंत यांच्या लढाया आणि राजकीय निर्णयामध्ये सामील असायचे. त्यांनी गादीवर बसण्याआधीच अनेक लढायांमध्ये शौर्य गाजवले होते. त्यांची त्या काळातही विजापुरच्या दरबारात ख्याती होती. लखम सावंत यांच्या निधनानंतर 1675 मध्ये खेम सावंत गादीवर आले. ते राजे होताच विजापुरच्या बादशहाने तीन फरमाने काढली. यात खेम सावंत यांनी एकनिष्ठेने वागावे, मोगलांबरोबर मैत्री ठेवू नये आणि शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांना मदत करू नये, असे त्यात उल्लेख होते. त्या काळात खेम सावंत यांना बादशहा मदतीसाठी आपल्या फौजेसह बोलवत असत. त्यांचा एक व्यक्‍ती विजापूरच्या दरबारात कायम राहत असे.
    याच दरम्यान विजापूरमध्ये सत्ता बदलाचे वारे सुरू झाले. 1656 मध्ये महम्मद आदिलशहा याचा मृत्यू होवून त्याचा मुलगा अल्ली हा सत्तेवर आला. दिल्लीच्या बादशहाने ही संधी साधत विजापूरवर हल्ला केला. दिल्लीचे मोगल आणि विजापूरच्या बादशहात संघर्ष वाढतच गेला. अखेर 1673 मध्ये सुलतान अल्ली याच्या निधनानंतर विजापूरची व्यवस्था पूर्ण बिघडली. पुढे दिल्ली सत्ताधिश असलेल्या औरंगजेबाने 15 ऑक्‍टोबर 1683 ला विजापूरच्या बादशाहीचा शेवट केला. ही बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेवून खेम सावंत यांनी मुत्सद्दीपणा दाखवत दिल्लीच्या बादशहाशी मैत्री केली. त्यांच्याकडून 1689 मध्ये कुडाळ परगण्याची देशमुखी मिळण्याबाबतचे फरमान मिळवले. शिवाय बादशहाकडून चार हजार स्वारांची मनसबदारीही मिळवली.
     याच दरम्यान शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. त्यांना शह देण्यासाठी तळकोकणात सरदार अब्दूल रजाकखान या सुभेदाराची दिल्लीच्या बादशहाने नेमणूक केली होती. त्याला मदत करण्याचे काम खेम सावंत यांच्यावर सोपवले होते. हा सुभेदार आणि खेम सावंत यांनी पोर्तुगीजांनी उद्‌ध्वस्थ केलेल्या बांदा बंदराच्या पुर्ननिर्माणाचे काम 1690 मध्ये पूर्ण केले.
     1691 मध्ये सखोजी याच्या रूपाने दक्षिण कोकणात एक नवी ताकद तयार झाली. सावंतवाडी संस्थानने कुडाळच्या प्रभूदेसाईंची ताकद बरीच कमी केली असली तरी ती पूर्ण नष्ट झाली नव्हती. सखोजी याने या प्रभू देसाईंच्या विरोधात बंड केले. त्या दोघांमध्ये अनेक छोट्या लढाया झाल्या; परंतु कोणाचाच विजय झाला नव्हता. सखोजी हा वेंगुर्ले येथे तळ ठोकून होता. कुडाळदेशस्थ प्रभू आणि सावंत भोसले यांना जिंकून आपली सत्ता स्थापन करण्याचा त्याचा प्रयत्न होता. खेम सावंत यांच्यावर 1692 मध्ये सखोजी याने हल्ला केला. आरवली येथे या दोघांमध्ये लढाई झाली. त्यात सखोजीचा पराभव होवून तो पळून गेला. पुढे सखोजी आणि खेम सावंत यांच्यात तह झाला. त्या दोघांनी एकत्र येत कुडाळदेशस्थ प्रभूंचे ठाणे असलेल्या कुडाळवर 1693 मध्ये हल्ला केला. सगळ्यात आधी सखोजीने कुडाळवर हल्ला चढवला. खेम सावंत यांनी मागून येत या लढाईमध्ये भाग घेतला. बराचकाळ ही लढाई चालली.
     संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सन १६८४ मध्ये सावंत मोघलांना सामील झाले.इथुन पुढची सावंतांची मोगलांकडून मराठ्यांकडे, तिथून पुन्हा मोघलांकडे आणि मोघलांचे कोकणातून उच्चाटन झाल्यानंतर सावंत करवीरकर गादीचे सरदार असताना त्यांच्याविरुध्दच बंड करीत व स्वताला पोर्तुगीजांचे मांडलीक म्हणवून घेत. वेळप्रसंग पडल्यास पेशव्यांची मदत देखील घेत. समुद्रावरचे अनभिषीक्त राजे आंग्यांशीहि त्यांचे जमत नव्हते. मात्र सावंतानी अनेक कट-कारस्थाने करीत आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निम्म्या भागावर पसरलेल्या आपल्या संस्थानावर स्वतंत्र ताबा राखण्यात अखेरपर्यंत यश मिळवले. दुसरा खेम सावंतच्या वेळी आदिलशाही मोगलांनी जिंकून घेतली (१६८७). तेव्हा दुसऱ्या खेम सावंताने मोगलांकडून कुडाळ परगण्याची देशमुखी आपल्याकडे राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले (१६८९) आणि कुडाळ देशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट केला (१६९७) व आपल्यास ‘सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय’ असे म्हणवू लागले. तेथून भोसले घराण्याची स्वतंत्र कारकीर्द सुरू झाली.

या खेम सावंतानें चराठें हें राजधानाचें ठिकाण करून तेथें मोठी वस्ती करविली. याच गांवाला पुढें सुंदरवाडी म्हणूं लागले. शाहु छत्रपति झाल्यावर खेम सावंत त्याच्याशीं राजनिष्ठ राहिला. शाहूनेंहि त्याची सरदेशमुखी कबूल केली.  दुसऱ्या खेम सावंतानी कोल्हापूरचे छत्रपती दुसरे शिवाजी (कार.१७०७–१४) यांजकडून कुडाळ परगणा व पाच महाल मोकासा यांचे हक्क प्राप्त करून घेतले (१७०८); मात्र त्यानंतर त्यांनी पुढे छ. शाहूंस एकनिष्ठा दाखवून कुडाळ परगणा व पाच महाल इनाम करून घेतले. यावेळी त्यांना साळशी महालाचा अर्धा वसूल इनाम मिळाला. त्यास तीन कन्या असून पुत्रसंतान नव्हते. त्यामुळे त्यांच्या बंधूंचे चिरंजीव गादीवर आले, ते तेव्हा सहा वर्षांचे होते. म्हणून राज्यकारभार मातुश्री जानकीबाई व मुख्य प्रधान जिवाजी सबनीस पाहात असत.हा सावंत स.न. १७०९ त निर्वतला.
 सावंतवाडीच्या रूपाने वसली राजधानी
    खेम सावंत यांच्या काळात खऱ्या अर्थाने सावंतवाडी संस्थानला स्वतंत्र असे स्वरूप आले. त्यांनीच सावंतवाडी शहराचा राजधानी म्हणून विकास केला. संस्थानचे ठाणे आताच्या राजवाड्याच्या ठिकाणी आणले. त्या काळात एका सुनियोजीत शहराची रचना त्यांनी केली. पोर्तुगिजांना शह देण्याबरोबरच बदलत्या परिस्थितीनुसार साताऱ्याच्या छत्रपतींशी जवळचे संबंध निर्माण केले.
            खेम सावंत यांनी सावंतवाडी संस्थानला स्वतंत्र केल्यानंतर त्यांच्याकडे कुडाळ परगणा, बांदा, मणेरी, पेडणे, डिचोली आणि साखळी हे पाच महाल होते. त्यावरून सावंत यांना "सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय' असे ओळखले जायचे. हे पाच महाल भिमगड या परगण्यात मोडत असत. भिमगड हा किल्ला आताच्या गोव्यातील साखळी भागामध्ये सह्याद्रीच्या शिखरावर होता. यावरून त्याचे नाव पडले होते.
          लखम सावंत यांच्या काळात नरेंद्र डोंगरावर सावंतवाडीचे ठाणे होते. खेम सावंत यांनी ते चराठा गावाच्या हद्‌दीतील आताचा राजवाडा असलेल्या ठिकाणी आणले. त्याला सुंदरवाडी असे नाव देण्यात आले. तेथे 1692 मध्ये राजवाडा बांधला. तो नवाकोट म्हणून ओळखला जावू लागला. नरेंद्रावर असलेल्या राजवाड्याला जुनाकोट म्हटले जायचे. यानंतर सावंतवाडीच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सुमारे पाऊण चौरस मैल इतक्‍या क्षेत्रफळात हे शहर वसवले गेले.
     शहर वसवण्यासाठी खेम सावंत यांनी कोणताही सारा न घेता लोकांना राहण्यासाठी मोफत जमिनी दिल्या. राजपुरोहित कोळंबेकर, शास्त्री देवस्थळी, पुराणीक जांभेकर, ताटकर आदींना राजवाड्याच्या जवळ वस्तीला ठेवले. पूर्वी सबनीस, चिटणीस व खासनीस असे तिनच दरकदार होते. त्याशिवाय जमाबंदीचे काम पाहण्यासाठी दप्तरदार रांगणेकर, खजिन्याच्या व्यवस्थेसाठी पोतनीस, पागेच्या देखरेखीसाठी पागनीस, सामानाच्या कोठीवर कोटणीस, तटाचे काम पाहण्यासाठी तटणीस, वारनिशीच्या कामासाठी फडणीस असे दरकदार त्यांनी नेमले.
         सैन्याच्या कामावरील मुख्याधिकारी राम दळवी हे सेनापती होते. शिवाय कानसावंत गुरबुटकर, मादसावंत कारिवडेकर, भोजसावंत व रूपसावंत माणगावकर आदी मराठा सरदार होते. या सगळ्यांची कामे वंश परंपरेने चालायची. शहरातील वाड्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण होती. लेखन स्वरूपाचे काम करणाऱ्यांसाठी सबनिसवाडा, खाते, सरदार यांचा खासकिलवाडा, व्यापारी वर्गाकरीता वैश्‍यवाडा, प्रामुख्याने सैनिकांसाठी सालईवाडा, राजवाड्यातील निधन झालेल्या व्यक्‍तींची माठी (स्मारके) असेल्या भागाला माठेवाडा, भिक्षूकी करणाऱ्या तसेच ब्राह्मणांसाठीच्या वाड्याला भटवाडी, कारागिरी किंवा तत्सम स्वरूपात फिरती कामे करणाऱ्यांसाठी बाहेरचा वाडा अशी रचना करून त्या आराखड्यानुसार शहरात वसाहत निर्माण केली गेली. यात राजवाडा केंद्रस्थानी राहील अशी रचना करण्यात आली.
       खेम सावंत यांच्या काळात बऱ्यापैकी स्थैर्य निर्माण झाले. असे असले तरी या भागावर प्रभाव असलेल्या राज्यकर्त्यांमध्ये बदलाचे वारे होते. लगतच्या गोव्यातून पोर्तुगीज सावंतवाडी संस्थानला त्रास देत होते. या भागात येवून ते लुटालुट व जाळपोळ करायचे. खेम सावंत यांनीही त्याला जशास तसे उत्तर दिले. तेही पोर्तुगिजांच्या प्रभाव क्षेत्रात घुसून वचक बसवत असत.
        या संघर्षातून काहीप्रमाणात अस्थितरता होती. 1703 मध्ये गोव्याचा पोर्तुगिज राजवटीचा गव्हर्नर जनरल असलेल्या कैतान डिमेलो याने सावंतवाडी संस्थानच्या प्रभावातील आमोणे किल्ल्यावर स्वारी करून तो उद्‌ध्वस्त केला. आणखी दोन वर्षांनी डिचोलीचा किल्लाही सर केला. 1706 मध्ये खोरजूवे आणि फोंडे ही बेटे ताब्यात घेतली. पुढे या गव्हर्नर जनरलने डिचोली आणि साखळीचा भागही आपल्या प्रभावाखाली आणला. यामुळे सौद्यांचा राजा पोर्तुगिजांचा मांडलीक झाला. त्यामुळे आताच्या गोव्याकडचा बराचसा भाग पोर्तुगिजांकडे गेला.
         खेम सावंत हे दिल्लीच्या बादशहाला महसूल देत नसत; मात्र त्यांची सत्ता पूर्ण जुगारून दिली नव्हती. अधूनमधून त्यांना मदत देण्याचा मुत्सदीपणा त्यांनी कायम ठेवला होता. 1706 च्या दरम्यान मोगलांचा सरदार सैय्यद गजफर अल्ली खान हा फोंडा येथील लष्कराचा प्रमुख होता. त्याला मदत देण्याचे काम दिल्लीच्या बादशहाने खेम सावंतांवर सोपवले होते. पुढे 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या सत्तेला उतरती कळा लागली. यानंतर खेम सावंत यांनी त्यांच्याशी असलेले संबंध जवळजवळ तोडून टाकले.
         यानंतर सावंत यांनी साताऱ्याच्या छत्रपतींशी जवळीक निर्माण केली. त्या काळात साताऱ्याच्या गादीवर राजाराम यांचे पूत्र शिवाजी हे होते. सर्व कारभार त्यांच्या आई ताराबाई पाहत असत. छत्रपती संभाजींचा मुलगा शाहू हे दिल्लीच्या कैदेत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोअज्जीम हा गादीवर बसला. त्याने शाहू यांना बंधमुक्‍त केले. यानंतर शाहू यांनी राज्यावर हक्‍क सांगितला; मात्र ताराबाई यांनी ते मान्य केले नाही. तेव्हा शाहू यांनी काही सरदारांना आपल्या बाजूला वळवून ताकद निर्माण करायला सुरूवात केली. या काळात खेम सावंत यांनी शिवाजी यांच्या बाजूने आपले बळ देण्याची तयारी केली.
       रांगणा आणि पन्हाळा या किल्ल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी मदत दिली. याच दरम्यान खेम सावंत यांनी विश्राम अनंत सबनिस आणि जीवाजी राम चिटणीस यांना शिवाजी यांच्याकडे पाठवून कुडाळ परगणा व पाच महाल वतनादाखल देण्याची विनंती केली. यानंतर शिवाजी यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना खेम सावंत यांच्याशी चर्चेला पाठवले. त्यांची माणगाव येथे चर्चा होवून शिवाजी यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचे व शाहू राजांना मदत न करण्याचे त्यांनी कबूल केले. यानंतर 27 फेब्रुवारी 1708 ला कुडाळ परगणा आणि पंचमहाल त्यांना मोकळे करून देण्यात आले. शिवाय सावंतांचा बहुमान करण्यासाठी हत्ती, घोडा आदी पाठवून दिले. यावरून साताऱ्याच्या दरबारात खेम सावंत यांचे किती वजन होते हे लक्षात येते.
         तिकडे साताऱ्याच्या गादीसाठी सुरू असलेल्या संघर्षात शाहू राजांची सरशी झाली. काही दिवसांनी ते रांगणा गडावर आले होते. छत्रपतींशी एकनिष्ठेने वागण्याचे वचन खेम सावंत यांनी निश्‍चित केले होते. त्यामुळे छत्रपतींना भेटण्यासाठी पाटगाव येथे खेम सावंत यांनी आपले कारभारी पाठवले. छत्रपती शाहू महाराज यांनी सावंत यांना आपल्या राज्यकाळातही कुडाळ परगणा व पंचमहाल इनाम म्हणून दिले. एकूणच खेम सावंत यांनी देशमुखी आणि सत्ता आपल्याकडे राखण्यास यश मिळवले. 1709 मध्ये खेम सावंत यांचे निधन झाले.
  34 वर्षांची सत्ता
    खेम सावंत हे एकपत्नीव्रत पाळणारे होते. त्यामुळे त्यांची सावंतवाडीत असलेली माठी वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. त्यात स्त्रियांना प्रवेश नाही. खेम सावंत यांना पुत्र संतती नव्हती. तीन मुली होत्या. यातील द्वारका ही रामराव पाटणकर, भवानी ही घाटगे आणि तिसरी भागू ही जगदेवराव निंबाळकर यांच्या घराण्यात दिली. खेम सावंत यांनी 1697 ते 1709 अशी 34 वर्षे स्वतंत्रपणे राज्याचे काम केले. 

सावंतवाडीच्या कारभाराची घडी बसवली

       दुसरे फोंड सावंत (कार.१७०९–३८) गादीवर आले. दुसरे फोंड सावंत (आनासाहेब) यांच्या कारकीर्दीत राज्याच्या विस्तार आणि संरक्षणाबरोबरच इतरही अनेक गोष्टींकडे लक्ष दिले गेले. यात राज्याची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी करव्यवस्थेत सुधारणा, नव्या गडकिल्ल्यांची बांधणी, जुन्यांची डागडुजी, अशी कामे केली गेली. चारही बाजूंनी प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष करत असतानाही त्यांनी केलेली ही कामे विशेष म्हणावी लागतील. 
     दुसरे फोंड सावंत यांच्या करकीर्दीत पोर्तुगिज आणि इंग्रजांशी बराचकाळ संघर्ष झाला. कोल्हापूर संस्थानकडूनही त्या काळात हल्ले झाले. 1730च्या सुमारास कोल्हापुरकरांनी सावंतवाडीवर दुसरा हल्ला केला. यात कोल्हापुरच्यावतीने सरदार उदाजीराव मोहिते हे नेतृत्व करत होते; मात्र सावंतवाडीकरांच्या चोख प्रतित्युत्तरामुळे त्यांना परतावे लागले. पुढे जून 1732 मध्ये फोंड सावंत दुसरे यांनी बोलवण-घोणसरी येथील डोंगरावर तटबंदी उभारण्यासाठी सैन्य पाठवले. ही माहिती कोल्हापुरच्या राज्यकर्त्यांना कळली. त्यांनी आपल्या समर्थक सरदारांना तेथे पाठवून त्याला विरोध केला. त्यामुळे सावंतवाडीच्या सैन्याला परत यावे लागले. पुढे सावंतवाडीकरांनी त्याच वर्षाच्या ऑगस्टमध्ये सदानंद गडावर हल्ला केला; पण त्यांना यात यश आले नाही. 
      हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांना पोर्तुगिजांशीही दोन हात करावे लागले. बराच काळ शांत असलेल्या पोर्तुगिजांनी 1732 मध्ये पुन्हा उचलखाली गोव्याचा गर्व्हनर जनरल म्हणून त्यावर्षी कोंद दि सांदोमिल याची नियुक्‍ती झाली. त्याने सावंतवाडीकरांवर हल्ल्याची तयारी सुरू केली. यासाठी सावंतवाडी संस्थानच्या क्षेत्रात सैनिकांचे तीन गट पाठवले. त्यांनी लुटालुट सुरू केली. 
सावंतवाडीकरांच्या सैन्याने नियोजनबद्ध प्रतिहल्ला करत अवघ्या 80 जणांच्या पथकाने या तिन्ही गटांना पळवून लावले. हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांनी राज्याची घडी बसवण्याच्या दृष्टीने भरीव काम केले. त्यांनी कुंबळे स्वरूपात कर आकारणीच्या पायंडा घातला. कुंबळे म्हणजे जमिनीवर घेतला जाणारा सारा. तसा कुंबळे हा शब्द 1673 मध्ये सावंतवाडी संस्थानमधून दिलेल्या एका सनदेमध्ये आढळतो. 
      फोंड सावंत दुसरे यांनी यात बरीच सुधारणा केली. त्यातही दुबळ्या आणि गरिबांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली. विशिष्ट परिस्थितीत हा कर माफ करण्याची व्यवस्था यात केली. त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी संस्थानात काही नवे किल्ले बांधण्यात आले. यात फुकेरी येथील हनुमंतगड, गेळे येथील नारायणगड, आंबोली येथील महादेवगड, सोनवडे येथील नरसिंहगड किंवा सोनगड, मसुरे येथील भरतगड, ओवळीये तर्फे मालंड येथील सिदगड, आवाडे येथील आवर किल्ला आणि हळर्ण (गोवा) येथील कोट याची उभारणी केली. शिवाय कुडाळ, बांदा, डिचोली, साखळी, वेंगुर्ले येथील जुन्या कोटांची डागडूजी केली. 
     फोंड सावंत दुसरे यांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी आवाडे गावातील आवर किल्ला उर्फ आवडकोट हा भुईकोट होता. सावंतवाडीपासून पंधरा मैलावर इशान्येला हा गाव आहे. तो केवळ दगडमातीचा बनवला असला तरी प्रशस्त होता. तटाभोवती खंदक होते. या खंदकाच्या बाहेरच्या बाजुला एक पडकोट होता. 1844 मध्ये इंग्रजांविरूद्ध सावंतवाडीत उद्रेक झाला. त्यावेळी अशाच गडकिल्ल्यातून मदत पुरवली जात होती. त्यामुळे हे कोट उद्‌ध्वस्त करण्याचे धोरण इंग्रजांनी ठरवले. त्यानुसार 1845 मध्ये तो पूर्व भुईसपाट करण्यात आला. फोंड सावंत यांच्या कारकिर्दीत या कोटावर एक किल्लेदार, एक कारखाननीस, 1 तासजी, 35 लोक, एक कुणबीण आणि खर्चासाठी 973 रूपये अशी तरतुद होती. 

       हनुमंतगड हा फुकेरी येथे असलेला गिरीदुर्गही त्यांच्याच कारकिर्दीत बांधला गेला. कातळात खोदलेल्या दोन पाण्याच्या टाक्‍या, उद्‌ध्वस्त वाडे-इमारती, प्रवेशद्वाराची कमान येथील गतवैभवाची आजही साक्ष देते. या किल्ल्यावर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. या किल्ल्याच्या खर्चासाठी सावंतवाडी संस्थानकडून तीन हजारांची तरतुद होती. शिवाय एक किल्लेदार, तीन कारकून, 2 किर्तनी, एक कोठावळा, 80 गडकरी, 47 लोक, 2 कुणबीणी, अशी येथील व्यवस्था होती. हा किल्लाही इंग्रजांविरूद्धच्या उद्रेकावेळी महत्त्वाची भूमिका पार पाडणारा ठरला. 
       फोंड सावंत दुसरे यांनी आंबोलीत नारायणगड आणि महादेवगड असे दोन वनदुर्ग बांधले. महादेवगड पारपोली घाटीच्या शिखरावर होता. गेळेच्या हद्दीत नारायणगड होता. महादेवगडावर पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटीशांनी तो उद्‌ध्वस्त केला. नारायणगड हा मोठा किल्ला नव्हता. कोकणातून घाट चढून वर आल्यावर जकातीचे मेट याच किल्ल्याच्या ठिकाणी होते. हे देवाचे स्थळ म्हणून जास्त परिचित होते. 
       कुडाळ तालुक्‍यातील सोनवडे गावाच्या डोंगरात विसावलेला नरसिंहगड हाही फोंड सावंत त्यांनीच बांधला. हा किल्ला पुढे सावंतवाडीकर आणि कोल्हापूरकर यांच्या संघर्षाचे केंद्रही बनला. त्यांनी बांधलेल्या इतर किल्ल्यात कसाल-ओवळीये येथील सिदगड या गिरी दुर्गाचा समावेश आहे. सैन्यासाठी विश्रांती आणि सुरक्षित स्थळ म्हणून याची उभारणी झाली. हा किल्लाही पुढे ब्रिटीशांनी उद्‌ध्वस्त केला. मसुरे येथे कालावल खाडीच्या किनाऱ्यावर त्या फोंड सावंत दुसरे यांनीच भरतगड उभारला. 150 मीटर लांब, 30 मीटर रूंदीचा बुलंद बालेकिल्ला, त्याला 2 मीटर रूंद आणि चार मीटर उंचीचा चिरेबंदी तट, प्रशस्त बुरूज अशी त्याची रचना होती. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी येथे किल्ला उभारायचा प्रयत्न केला होता; पण पाण्याची उपलब्धता नसल्याने त्यांनी तो विचार सोडला होता. फोंड सावंत दुसरे यांनी आधी विहीर खोदून मग याची उभारणी केली. 6 एकर क्षेत्रातील हा किल्ला पुढे बऱ्याच राजकीय हालचालींचे केंद्र बनला. हळर्ण येथेही फोंड सावंत दुसरे यांनी किल्ला उभारला. पुढे तो पोर्तुगिज व सावंतवाडीकरांच्या एका मोठ्या लढाईचा साक्षीदार बनला. 
 सावंतवाडीवर इंग्रजांची पडली नजर :-
    दुसरे फोंड सावंत अर्थात (आनासाहेब) यांच्या सत्ता काळात आरमाराची ताकद वाढली. त्या काळात युरोपातून व्यापाराच्या निमित्ताने येणाऱ्यांच्या दृष्टीने सावंतवाडी संस्थान ही दक्षिण कोकणातील एक महत्त्वाची ताकद बनली. सावंतवाडीकरांचे आरमार या परदेशी व्यापाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते. यातून विशेषतः पोर्तुगिज आणि त्यापाठोपाठ इंग्रजांसोबत अनेक संघर्षाचे प्रसंग उद्भवले. दुसरे फोंड सावंत यांच्याच कारकीर्दीत इंग्रजांचा तहाच्या निमित्ताने सावंतवाडी संस्थानमध्ये पहिला शिरकाव झाला. 
       युरोपातील अनेक देशामधील लोक भारताकडे जलमार्गाने व्यापारासाठी येवू लागले होते. पोतुर्गिज आणि डच यांनी तर इथला काही मुलुख पण काबीज केला. कोकणावर, विशेषतः येथील किनारपट्टीवर त्यांचा प्रभाव होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांची यात भर पडली. 1612 मध्ये त्यांनी सुरतमध्ये आपली वखार टाकली. 
हळूहळू इंग्रज भारतभर हातपाय पसरू लागले. 1662 मध्ये पोर्तुगिज राजाने इंग्लंडच्या दुसऱ्या चार्लस राजाला मुंबई बेट आंदण म्हणून दिले. इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती. राजाने हे मुंबई बेट 1668 मध्ये या कंपनीला विकले. तेथे त्यांनी पश्‍चिम किनाऱ्यांचे मुख्य ठाणे बनवून स्वतंत्र गव्हर्नरची नेमणूक केली. 
      सगळीकडे सत्ता मिळवायची असली तरी त्यांचा मुख्य उद्धेश व्यापार, तोही जलवाहतुकीने होणारा हाच होता. कोकण किनारपट्टीवरून जात येत असताना इंग्रजांच्या दृष्टीने सावंतवाडी संस्थान आणि कुलाब्याचे आंग्रे हे अडचणीचे होते. ते त्यांना चाचे म्हणत. विशेषतः सावंतवाडी संस्थानची वाढलेली ताकद त्यांच्यासाठी अडचणीची ठरत होती. त्यांची गलबते कोकण किनारपट्टीवरून बिनधास्त ये-जा करू शकत नव्हती. त्यामुळे सावंतवाडी संस्थानला शह देण्याचे इंग्रजांचे सुरवातीपासूनच प्रयत्न होते. मिस्तर बुन हा मुंबईचा गव्हर्नर असताना त्याने एप्रिल 1717 मध्ये सावंतवाडीच्या आरमारावर हल्ल्याची मोहीम आखली. त्यासाठी कोमोडोर विक्‌स या अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली. वेंगुर्ले बंदर परिसरावर हल्ल्याचे टार्गेट निश्‍चित झाले.
     फेम्‌, ब्रिटानिया आणि रिव्हेंज अशी तीन मोठी गलबते आणि इतर छोटी गलबते, तुटपुंजे सैन्य घेवून विक्‌स हा वेंगुर्लेवर चाल करून आला; मात्र तो खूप भित्रा होता. त्याच्याकडे पुरेसे सैन्यही नव्हते. वेंगुर्ले बंदराचा परीसर खडकाळ आहे. त्याच्या जवळ लाटाही मोठ्याने येवून आदळतात. त्यामुळे विक्‌स याला गलबते किनाऱ्यावर आणायला कित्येक दिवस लागले. शेवटी एक जागा मिळाली. तिथून त्यांनी किनाऱ्याकडे तोफांचा मारा सुरू केला. या मोहिमेत स्ट्यांटन नावाचा आणखी एक अधिकारी होता. सैन्य त्यांच्या अधिकाराखाली होते. हल्ला सुरू असतानाच विक्‌स आणि स्ट्यांटन यांच्यात कडाक्‍याचे भांडण झाले. ते इतके विकोपाला गेले की इंग्रजांना ही मोहिमच गुंडाळावी लागली. 
      इंग्रजांचे सावंत आणि आंग्रे हे दोघेही शत्रू होते; पण सावंत आणि आंग्रे यांच्यातही वाद होता. कान्होजी आंग्रे यांनी सावंतवाडी संस्थानच्या काही गलबतांवर हल्ला केल्याने हे शत्रूत्व वाढले होते. 1720 मध्ये इंग्रजांनी आंग्य्रांना शह देण्यासाठी त्यांच्यावर हल्ल्याची योजना बनवली. सावंतवाडीकरांनी आंग्य्राना शह देण्यासाठी याकडे संधी म्हणून बघीतले. सप्टेंबर 1720 ला आपला वकील इंग्रजांकडे पाठवून आंग्य्रांवरील हल्ल्यासाठी मदत करण्याची तयारी दाखवली. आंग्य्रांचे अधिपत्य असलेल्या देवगड किल्ल्यावर पहिला हल्ला करावा, अशी अट घातली. तशीच हल्ल्याची योजना ठरली.
      इंग्रजांनी देवगड किनाऱ्यांच्या टेहाळणीसाठी 7 ऑक्‍टोबर 1720 ला काही गलबते पाठवली. 18 ऑक्‍टोबर 1720ला ऍडमिरल ब्राऊन यांच्या नेतृत्वाखालील इंग्रजांचे आरमार देवगडात दाखल झाले. त्यांनी देवगड किल्ल्यावर तोफाचा हल्ला सुरू केला; पण या किरकोळ प्रमाणातील हल्ल्याचा उपयोग होईना. यामुळे ऍडमिरल ब्राऊन याने सैन्य जमिनीवर उतरवण्याचा आदेश दिला; पण त्याच्या हाताखालचे अधिकारी हा आदेश मानायला तयार होईनात. शेवटी इंग्रजांना आरमार परत मुंबईकडे न्यावे लागले. यात इंग्रजांचे बरेच नुकसान झाले. या सगळ्या घटनाक्रमात कबुल केल्याप्रमाणे सावंतवाडीकर राजांनी इंग्रजांना मदत केल्याचे संदर्भ मात्र कुठे मिळत नाही. 
      मुंबईचा गव्हर्नर मिस्तर बून याच्या मनात या सगळ्या घटनाक्रमांमुळे सावंतवाडी संस्थानला शह देता आला नसल्याचे शल्य होते. त्याच्या जागी फ्रिक्‍स या नव्या गव्हर्नरची नियुक्‍ती झाली. 9 जानेवारी 1722 ला बून इंग्लंडला निघाला. कारवार येथे व्हिक्‍टोरीया आणि रिव्हेंज नावाची गलबते माल घेवून जात होती. या गलबतांसोबत लंडन या नावाच्या आपल्या गलबतात बसून तो जात होता. अंजेदिवास येथे त्याची ही गलबते आली असता सावंतांच्या आरमारातील गुराबानी एका गलबतावर हल्ला चढवल्याचे त्याने पाहिले. हे अंजेदिवास (अंजेहिरा) गोव्याच्या मुरगावच्या दक्षिणेला असलेले बेट आहे. बून याने आपल्या ताब्यातील गलबतांना सावंतांच्या गुराबावर चाल करायचे आदेश दिले. तेथे चकमक झाली. याच दरम्यान तेथे आलेल्या नव्या गव्हर्नर फ्रिक्‍स याची साथ मिळाली. यामुळे सावंतांच्या अरमाराला माघार घ्यावी लागली. जाता जाता मिळालेला हा छोटा विजय बून याला समाधान देणारा ठरला. 
      सावंतवाडीकरांची आरमारी ताकद आणखी दोघांसाठी डोकेदुखी ठरत होती. गोव्यातले पोर्तुगीज आणि त्यांचे अधिपत्य मान्य केलेला सौंद्याचा राजा. 1726 मध्ये सावंत भोसले यांनी सौंद्याच्या राजाच्या ताब्यातला फोंडा किल्ला हस्तगत केला. त्याने पोर्तुगिजाकडे मदत मागितली. ती मदत देवून पोर्तुगिजांनी हा किल्ला सौंद्याच्या राजाला परत मिळवून दिला. 
     तिकडे कुलाब्याच्या आंग्रे यांच्या सत्तेतही नेतृत्व बदल झाला. 1729 ला कान्होजी आंग्रेंचा मृत्यु झाला. आंग्रे कुटुंबात गादीसाठी संघर्ष सुरू झाला. यात ताकदवान आणि मुत्सद्‌दी असलेल्या तुळाजी आंग्रेनी राजगादी मिळवली. त्यांच्या कारकीर्दीत इंग्रज आणि सावंतवाडीकर यांचा त्रास आणखी वाढला. यातून आंग्य्राना शह देण्यासाठी सावंतवाडीकर आणि इंग्रज यांच्यात तह करण्याचे ठरले. 30 जानेवारी 1730 ला जंजिरे-मुंबई येथे हा इंग्रजांसोबतचा पहिला तह झाला. यात सावंतवाडीकरांतर्फे आरमाराचे मुख्य अधिकारी बापूजी नाईक-तोंडोलकर तर इंग्रजांतर्फे मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर राबर्ट कावन हा होता. सावंतवाडी संस्थानात इंग्रजांचा झालेला हा तहाच्या रूपाने पहिला शिरकाव म्हणता येईल. 

काय होता तह? 
* एकमेकांच्या गलबतांना त्रास देवू नये किंवा हल्ला करू नये 
* समुद्रात एकमेकांची गलबते संकटात असतील तर मदत करावी. 
* व्यापार करताना वाजवी जकात लावावी 
* तुळाजी आंग्रे यांना शह देण्यासाठी एकत्र येवून प्रयत्न करावे. 
* सावंतांना तोफांची गरज पडेल तेव्हा किंमत घेवून इंग्रजांनी त्या पुरवाव्या. 
* शत्रूच्या मुलखातील (आंग्रे) किल्ले कोट मिळाले तर ते सावंतांनी घ्यावे 
* विजयदुर्ग किल्ला आणि खांदेरी बेट विजयानंतर इंग्रजांना मिळावी. 

सत्ताधीशांचे महत्त्व दिसले तहात 
      तह झाला त्या काळात सावंतवाडीकरांचे सागरी सामर्थ्याच्या जोरावर मोठे वजन होते. या तहात सुरूवातीला सावंतवाडीकरांबाबत वापरलेल्या विशेषणावरून ते दिसते. "हिसमत व शौकत सेकबाल व इजलाल दस्तगाः वाला कदरबुलंद मकानी फोंड सावंत भौसुले सरदेसाई पां कुडाळ महालानिहाय कामियाब मकानी बादबागंद छ अजी खैरखा ः सादफुल येखलास' अशी याची सुरवात आहे. अशी विशेषणे अन्य तहात फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. 
असा होता राजपरिवार 
       फोंड सावंत दुसरे यांचे 2 जानेवारी 1738 ला निधन झाले. त्यांचा परिवार मोठा होता. त्यांना सहा पत्नी होत्या. त्यांना 11 मुलगे आणि 6 मुली मिळून 17 अपत्य होती. त्यांच्या ज्येष्ठ पत्नी लक्ष्मीबाई या तांबुळकर सावंत घराण्यातील. त्यांना नारोबा सावंत हा मुलगा आणि अंबुबाई व गोदुबाई या मुली होत्या. दुसऱ्या पत्नी सावित्री या बुधकर घाटगे यांच्या कन्या. त्यांना नाग सावंत, लखम सावंत व खेम सावंत असे तीन मुलगे होते. तिसऱ्या पत्नी रूक्‍मीणी या निंबाळकर घराण्यातील. त्यांना जयराम सावंत हे पुत्र आणि कृष्णाबाई व राजसबाई या दोन मुली होत्या. चौथ्या पत्नी पार्वती या खोडुलकर घराण्यातील. त्यांना गंगा व आनंदी अशा दोन मुली होत्या. पाचव्या पत्नी तारा यांना रघुनाथ सावंत, सोम सावंत, शिवराम सावंत व आत्माराम सावंत असे चार मुलगे होते. सहाव्या पत्नी अहिल्या या पिसाळ घराण्यातील. त्यांना श्रीराम सावंत व कृष्ण सावंत असे दोन मुलगे होते. या सगळ्या अपत्यामध्ये नार सावंत, नाग सावंत, जयराम सावंत आणि सोमसावंत हे आपल्या कर्तृत्वामुळे विशेष प्रसिद्ध होते.
        त्यानंतर त्यांचा नातू रामचंद्र व जयराम सावंत (कार. १७३८–५५), तिसरे खेम सावंत (कार. १७५५–१८०३) वगैरे राजे आले.  
 पोर्तुगीजांना केले "सळो की पळो' 

        संस्थानातील महापराक्रमी योद्धा म्हणून जयराम सावंत यांची ओळख आहे. फोंड सावंत दुसरे यांनी हयात असतानाच रामचंद्र सावंत यांना गादीवर बसवले होते. त्यांच्या पश्‍चात रामचंद्र सावंत आणि त्यांचे काका जयराम सावंत यांनी मिळून सत्ताकारभार पाहत राज्यांचा विस्तार वाढवला. विशेषतः सावंतवाडी संस्थानासाठी डोकेदुखी ठरलेल्या पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडले. 
         सावंतवाडी संस्थानचा कारभार रामचंद्र सावंत आणि जयराम सावंत यांनी 1738 ते 1755 या काळात संयुक्‍तपणे पाहिला. ही कारकीर्द संस्थानच्या साम्राज्य विस्ताराची होती. फोंड सावंत दुसरे यांच्या निधनावेळी रामचंद्र सावंत 26 वर्षांचे होते. ते लहान असतानाच फोंड सावंत दुसरे यांनी त्यांना राजगादीवर बसवले होते. त्यांच्या पश्‍चात रामचंद्र सावंत आणि जयराम सावंत कारभार पाहू लागले. 
जयराम सावंत हे धिप्पाड, शूर आणि पराक्रमी योद्धा होते.
     सावंत कुळातील सर्वांत पराक्रमी योद्धा असे त्यांचे वर्णन काही संदर्भात आढळते. सावंतवाडी संस्थानचे मधल्या काळात गेलेले वैभव त्यांनी परत मिळवले. शिवाय त्याचा विस्तारही केला. सैन्य आणि आरमाराची ताकद वाढवली. यामुळे त्यांच्या काळात सावंतवाडी संस्थानचे वैभव शिखरावर होते. गोव्यात स्थिरावलेल्या पोर्तुगीजांशी सावंतवाडी संस्थानचा संघर्ष सुरूच होता. तिकडे पेशवाई सुरू झाली होती. बाजीराव बल्लाळ त्या काळात पेशवे होते. वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी पेशव्यांचा प्रयत्न चालू होता. पेशवे पोर्तुगीजांना जेरीस आणायच्या प्रयत्नात होते. सावंतवाडीकर पोर्तुगीजांचे पारंपरिक शत्रू असल्याने पेशवे आणि सावंतवाडीकरांचा स्नेह आणखी वाढला. 
      या पार्श्‍वभूमीवर जयराम महाराजांनी 1738 मध्ये पोर्तुगीजांवर स्वारी केली. त्यांच्यासोबत 2200 घोडेस्वार होते. डिचोली आणि साखळी हे दोन्ही आपले महाल सावंतवाडीकरांनी परत मिळवले. पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालील बार्देस प्रांतावर स्वारी करून तोही ताब्यात घेतला. पोर्तुगीजांचे सैन्य अगदीच तोकडे पडल्यामुळे सावंतवाडीकरांना हा विजय सहज मिळाला. या स्वारीत पोर्तुगीजाच्या बऱ्याच तोफा, निशाणे सावंतवाडीकरांना मिळाली. या स्वारीत मिळालेले डिचोली आणि साखळी महाल आधी सावंतवाडीच्याच अधिपत्याखाली होते; मात्र बार्देस हा पोर्तुगीजांकडचा प्रांत सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला होता. या स्वारीत पांडुरंग विश्राम सबनीस आणि जीवाजी विश्राम सबनीस हे दोघे बंधू जयराम महाराजांसोबत होते. बार्देसच्या व्यवस्थेसाठी या दोघांनाही तेथे ठेवून महाराज सावंतवाडीत परतले. काही दिवसांनी जीवाजी सबनीस हेही सावंतवाडीत आले; मात्र पांडुरंग सबनीस पुढे अनेक वर्षे तिथेच राहिले. 
      तिकडे पेशव्यांचेही पोर्तुगीजांशी युद्धा सुरूच होते. अखेर पोर्तुगीजांनी पेशव्यांसमोर हार मानली आणि वसईचा किल्ला त्यांच्या स्वाधीन केला. 2 मे 1739ला पेशवे आणि पोर्तुगीजांमध्ये तह झाला. त्यात पेशव्यांनी सावंतवाडीकरांसाठीही बरंच काही मागून घेतलं. यात गोव्यातील उत्तेरेकडे असलेली खोरजुवे आणि पांडिवे ही बेटे पोर्तुगीजांनी सावंतवाडीकरांना द्यावी. आधी झालेल्या पोर्तुगीज-सावंतवाडीकर तहात ठरलेले दरवर्षीचे पोर्तुगीजांना द्यावे लागणारे 1000 झेऱ्याफिन यापुढे देवून नये. साष्टी, बार्देस या भागातील एकमेकांचे कैदी खंडणी न घेता सोडून द्यावे. कैद्यांनी आपल्या स्वातंत्र्याची फारकत लिहून दिली असल्यास ती त्यांची परत करावी असे ठरले; मात्र या तहानंतर बार्देस प्रांत पोर्तुगीजांना परत मिळाला. 
      हा काळ पोर्तुगीजांसाठी खूपच वाईट होता. पोर्तुगीजांच्याच कागदपत्रात याचे वर्णन आढळते. यानुसार 6 एप्रिल 1737 ते 13 फेब्रुवारी 1740 या दरम्यान पोर्तुगीजांच्या ताब्यातील चार मुख्य बंदरे, 340 गावे असलेली सुमारे 2300 पौंड वसुलीची वरसेवापासून दमणपर्यंतची 66 मैल लांबीची पट्टी, वसईचा किल्ला, शिवाय आणखी आठ शहरे, 20 किल्ले, दोन तटबंदी केलेले डोंगर, ठाण्याचा किल्ला, ठाणे शहर, साष्टी बेट, जुवा किंवा करंजाबेट आणि गोव्यातील साष्टी, बार्देस हे प्रांत गेले. पोर्तुगिज गव्हर्नरच्या ताब्यात सहा मैल लांबीचे व अठरा मैल रूंदीचे गोव्याचे बेट, चोडण, दिवाडी, कुंभारजुवा व अंजेदीव बेट इतकाच मुलुख राहिला. 
       1740च्या सुरूवातीला सावंतवाडीकरांनी पुन्हा बार्देसवर स्वारी केली. त्यावेळी गोव्याचा गव्हर्नर डॉम पेट्रो म्यास्केरेन्हास होता. त्याने सावंतवाडीकरांचे सैन्य पुढे यायला दिले नाही. 27 फेब्रुवारी 1740ला पोर्तुगीज आणि सावंतवाडीकरांमध्ये तह झाला. यात असे ठरले, की सावंतवाडीकरांची जी गलबते मस्कतला जातात त्यावर पोर्तुगीजांनी हल्ले करू नये. पोर्तुगीजांनी बाजारभावाने सावंतवाडीकरांना दारू पुरवावी, पोर्तुगीजांनी भोसलेंच्या शत्रूला आश्रय देवू नये, खोर्जुवे बेट सावंतवाडीकरांचे आणि पनेळे बेट पोर्तुगीजांचे आहे असे समजावे; मात्र पोर्तुगीजांनी मिळालेल्या बेटावर किल्ला बांधू नये. भोसलेंनी दिलेल्या पनेळे बेटाच्या बदल्यात पोर्तुगीजांनी बार्देस प्रांतातील पिरणे हा गाव सावंतवाडीकरांना द्यावा असे ठरले. शिवाय तहात पोर्तुगीजांकडून सावंतवाडीकरांना 25,000 रूपये खंडणीही मिळाली. तहाच्या अटी अंमलात येईपर्यंत पोर्तुगीजांतर्फे दाबक फिरंगी हा व्यक्‍ती सावंतवाडीकरांकडे ओलीस होता. 
   गोव्यातील सौंद्याचा राजा पोर्तुगिजांचा मांडलीक होवून सावंतवाडीकरांचा शत्रू झाल्याचे संदर्भ याआधी आले आहेतच. जयराम महाराजांनी सौंद्यावर हल्ला करण्याची योजना 1743 मध्ये आखली. बार्देसमध्ये थांबलेले पांडुरंग सबनीस मग साखळी, डिचोली भागाची व्यवस्था बघायचे. त्यांना महाराजांनी बांद्यात बोलावून घेतले. त्यांना हेवाळकर, उसपकर देसाई, भीमगडकरी, साखळीकर राणे आदी सरदारांची पथके सोबत आणायला सांगितले. बांद्यात बऱ्यापैकी सैन्य जमले. जयराम महाराज 12 एप्रिल 1743ला सावंतवाडीतून निघाले. 25 एप्रिल 1743 पर्यंत सैन्यांची जमवाजमव केली जात होती. त्याच दिवशी सौंद्याकडे प्रस्तान करण्यात आले; पण या स्वारीत फारसे काही हाती लागले नाही. 
पराक्रमी योद्धा 
जयराम सावंत खूप धिप्पाड होते. ते उत्तम लढवय्ये होते. ते युद्धात वापरत असलेले चिलखत सावंतवाडीतील पूर्वीच्या वेस्टॉप म्युझियममध्ये ठेवले होते. हे म्युझीयम आताच्या कोर्ट असलेल्या इमारतीच्या परिसरात होते. तेथे एक भव्य प्रवेशद्वारही होते. मध्यंतरी आलेल्या पुरात या म्युझियमचे मोठे नुकसान झाले. यामुळे जयराम महाराजांच्या चिलखतासह काही वस्तू कोल्हापुरच्या टाऊन हॉल म्युझियममध्ये स्थलांतरीत करण्यात आल्या. हे चिलखत पाहून महाराजांच्या विशाल देहयष्टीची कल्पना येते. 
 
 
 
याच्यामागून फोंड सावंत गादीवर बसला. त्याला कोल्हापुरकर, आंग्रे व पोर्तुगीज यांशीं झगडावें लागत असल्यानें त्यानें इंग्रजांशीं दोस्तीचा तह केला (१७३०). फोंडानंतर त्याचा नातू रामचंद्र सावंत राजा झाला. त्याचा सर्व कारभार त्याचा महापराक्रमी व कर्तबगार चुलता जयराम हा पहात असे. पण चुलत्या-पुतण्यांत कलह लागून पोर्तुगीज लोकांचें पुन्हां फावलें. त्यांनीं सावंतावर स्वारी करून खंडणी लादली. या पराजयाचा वचपा रामचंद्राचा पुत्र खेम सावंत गादीवर आल्यानंतर (१७५५) त्यानें काढला व पोर्तुगीजांपासून गेलेला मुलुख परत मिळविला (१७९१). जिवबादादा बक्षी यानें या सावंताला हाताशीं धरून संस्थानला ऊर्जितावस्था आणिली. पण संस्थानच्या वाईट अंतःकारभारामुळें संस्थान कर्जबाजारी व परावलंबी बनलें. हा खेम सावंत १८०३ मध्यें निपुत्रिक वारल्यानंतर गादीविषयीं भांडणें लागली. 
 
गृहकलहाला सामोरे जात चालवला कारभार
        खेम सावंत (दुसरे) यांच्या नंतर दुसरे फोंड सावंत (आनासाहेब) हे गादीवर आले. त्यांच्या काळात गृहकलहाला तोंड फुटले. या सगळ्या परिस्थितीला तोंड देत त्यांनी चोख कारभार चालवला. खेम सावंत (दुसरे) यांनी सावंतवाडी संस्थानची घडी बऱ्यापैकी बसवली होती. त्यांच्या निधनानंतर फोंड सावंत (दुसरे) अर्थात आनासाहेब हे १७०९ मध्ये गादीवर बसले. खेम सावंत यांना पुत्र संतान नसल्यामुळे त्यांचे बंधू नार सावंत यांचे पुत्र असलेल्या फोंड सावंत यांच्याकडे सत्ता आली. ते राज्याभिषेकाच्यावेळी ४२ वर्षांचे होते.
       राज्य व्यवस्था बदलली की, काही प्रश्‍नही तयार होतात. कारण नवा राजा आल्यानंतर त्याला सर्व घडी बसवायची असते. फोंड सावंत गादीवर आल्यानंतर बदललेली व्यवस्था ही संधी समजून कोल्हापूरच्या छत्रपतींनी सावंतवाडी शहरावर हल्ला केला. त्यांनी राजधानीचे हे शहर आपल्या वर्चस्वा खाली घेतले. सावंतवाडी संस्थानने पूर्वी साताऱ्याच्या छत्रपतींशी दळणवळण ठेवल्याच्या रागातून हा हल्ला घडल्याचे मानले जाते; मात्र फोंड सावंत यांनी तातडीने हालचाली करून राजधानीचे ठिकाण पुन्हा ताब्यात घेतले. अवघ्या काही दिवसात या हालचाली झाल्या.
        कुडाळ परगण्यातील कुडाळदेशस्थ प्रभूंपैकी युध्दात बचावलेले नारायण प्रभू यांनी ही संधी साधत कोल्हापूरच्या छत्रपतींकडे सावंतांच्या विरोधात लढण्यासाठी मदत मागितली. यावेळी बऱ्हाणजी मोहिते यांना नारायण प्रभूंना मदत करण्याबाबत छत्रपतींनी निरोपही दिला होता; पण पुढे त्याचा काही उपयोग झाला नाही. यावेळी नारायण प्रभू साळशी येथील महालात आश्रयाला होते. फोंड सावंत यांनी त्यांना शह देण्यासाठी खारेपाटण येथे त्यांच्यावर स्वारी केली. यावेळी मोठी लढाई झाली. यात नारायण प्रभूंचा मोठा मुलगा बाबाजी प्रभू हा मारला गेला. यानंतर १७१५ मध्ये नारायण प्रभू कुंभवडे येथे पळून गेले. त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे मदत मागितली. यावेळी मात्र त्यांनी मदत देण्यास इन्कार केला. पुढे नारायण प्रभू कुंभवड्यातच बरीच वर्षे राहिले. १७३६ मध्ये त्यांचे निधन झाले. पुढे त्यांचे वंशज कोल्हापूरच्या छत्रपतींच्या आश्रयाने मालवणच्या किल्ल्यात राहू लागल्याचे संदर्भ मिळतात.
       फोंड सावंत बाह्य शत्रूंशी लढत असताना त्यांना खूप मोठ्या गृहकलहाला सामोरे जावे लागले. त्यांचे कुटुंब मोठे होते; मात्र फोंड सावंत यांची स्वतःची अशी तत्व होती. ते व्यवहाराबाबत दक्ष असायचे. अनावश्‍यक खर्च त्यांना मान्य नसे. आपल्या मुलांनी स्वतः मिळवावे आणि खावे असे त्यांचे तत्त्‍व होते. मुलांनी आपले कतृत्व सिद्ध करावे असे त्यांना वाटायचे.
         साधेपणाने राहावे असे त्यांचे म्हणणे असायचे. ते स्वतः ही ते तत्व पाळायचे; मात्र त्यांच्या कुटुंबातील काहींना ते पटले नाही. १७१५ च्या दरम्यान फोंड सावंत यांच्या जेष्ठ पत्नीचे पुत्र नार सावंत यांनी बंड केले. त्यांनी काही सरदारांना आपल्या बाजूने वळवून राज्यात बंडाळी सुरू केली. त्यांनी काही जमिनी परस्पर इनाम म्हणून करून दिल्याच्या सनदा सापडतात. १७१६ मध्ये बांदा येथील मठ पर्वतावरील देवस्थानकडे काही जमिनी इनाम दिल्याच्या सनदा याच काळातल्या. त्यांनी प्रचलीत राज्यपध्दतीच्या विरूध्द जात लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली.
       यामुळे फोंड सावंत यांनी त्यांच्या बंदोबस्तासाठी आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांना पाठवले. त्यांनी नार सावंत यांना विरोध करत शह द्यायला सुरूवात केली. यामुळे नार सावंत यांचा नाईलाज झाला. ते त्यांच्यापासून बचावासाठी नरेंद्र डोंगरावर असलेल्या जुन्या कोटात येवून राहिले. तेथेही फोंड सावंत यांनी पाठवलेले लोक त्यांना पकडण्यासाठी पोहोचले. यावेळी चकमक झाली. याच दरम्यान कोटाच्या खिडकीतून नार सावंत हे बाहेर पाहत होते. चकमकी दरम्यान उडालेली एक गोळी त्यांना लागली. यातच १७१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नार सावंत यांना रामचंद्र सावंत नावाचा चार वर्षाचा मुलगा होता. त्यांच्या पत्नी राजसबाई या रामचंद्र यांना आपले सासरे फोंड सावंत यांच्याकडे सोपवून सती गेल्या.
        नार सावंत यांच्या मृत्यूने फोंड सावंत यांना अती दुःख झाले. नार सावंत यांच्या आई लक्ष्मीबाई याही दुःखात बुडाल्या. या सगळ्या दुःखाचे निवारण म्हणून फोंड सावंत यांनी रामचंद्र सावंत या बालकाच्या गळ्यात राज्यकारभाराचे शिक्‍के घालून ते कारभार पाहू लागले. याच दरम्यान फोंड सावंत यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र नाग सावंत, लखम सावंत आणि खेम सावंत हे घाटावर गेले. तेथे चंदगड व हेरे या महालावर स्वारी करून ते त्यांनी हस्तगत केले. तेथे आपले स्वतंत्र ठाणे वसवले. पुढे १७२१ मध्ये गंधर्वगड हा किल्ला त्यांनी बांधला. नाग सावंत हे सुरूवातीला गादीवर होते. त्यांच्या मागून लखम सावंत हे गादीवर आले. लखम सावंत यांना मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांच्या मागून त्यांची आई भागिरथीबाई यांनी वर्षभर कारभार चालवला. त्यांच्या नंतर लखम सावंत यांच्या पत्नी मैनाबाई कारभार पाहू लागल्या.
  १८४२ मध्ये एक मुलगा दत्तक घेवून त्यांचे नाव विश्‍वासराव असे ठेवले गेले. त्यांनी काही वर्षे कारभार पाहिला. पुढे रामचंद्र सावंत उर्फ बाळासाहेब हे गादीवर आले. पुढे ही वंश परंपरा सुरू राहिली. हेच ते हेरे संस्थान होय. या संस्थानचे आणि सावंतवाडीचे ऋणानुबंध कायम राहिले.
असा आहे गंधर्व गड
       गंधर्व गडाच्या परिसरात अनेक ऐतिहासीक घडामोडी घडल्या; मात्र त्याविषयी फारशी माहिती मिळत नाही. रत्नाकरपंत राजाज्ञा, हिम्मतबहाद्दर चव्हाण, हेरेकर यांचा या गडाशी संबंध आला आहे. करवीर छत्रपती घराण्याच्या इतिहासात पोर्तुगीज कागदपत्रानुसार हरिपंत व राणोजी घोरपडे यांनी हजार स्वारांनिशी गंधवर्गगड ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. हा गड समुद्रसपाटीपासून ४१० मीटर उंचीवर आहे.  
     गडाचा बहुतांश भाग ताशीव बुरुजांचा आहे. गडावर चाळोबाचे जागृत मंदिर आहे. येथे दरवर्षी वार्षिक यात्रोत्सव होतो. गडावरून गडहिंग्लज तालुक्‍यातील नेसरीपासून हलकर्णीपर्यंतचा टापू नजरेत येतो. गडावर लोकवस्ती आहे. गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. हा गड बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर नागनवाडीपासून सहा किलोमीटरवर आहे.
 
 
 
गादीसाठी फोंड सावंताचा मुलगा सोमसावंत आणि सोमसावंताचा मुलगा श्रीराम यांच्यातील वादाने लढाईचे रुप धारण केले. श्रीराम सावंताने सोमसावंताना कुटुंबकबिल्यासह सावंतवाडीच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले.भोवती ठेवलेले दारुचे बुधले जाळल्याने सर्व कैदी मृत्युमुखी पडले.मात्र सोमसावंताचा मुलगा फोंड सावंत यशवंतगडावर असल्यामुळे बचावला. या घटनेचा सुड उगवण्यासाठी फोंडने करवीरकर छत्रपतींची मदत घेउन श्रीराम सावंतावर हल्ला केला. करवीरकरांचे सैन्यबळ पाठीशी असल्यामुळे फोंड सावंताला गादीवर बसता आले. मात्र सन १८०५ मध्ये कोल्हापुरकरांचे सैन्य माघारी जाताच श्रीराम सावंतानी पुन्हा हल्ला करुन फोंड सावंताला पराभुत करुन आपला मुलगा रामचंद्र उर्फ भाऊसाहेब सावंत याला खेम सावंताची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या मांडीवर बसून राज्याधिकारी केले. श्रीराम सावंत २८ ऑगस्टला मृत्युमुखी पडला तरीही हा संघर्ष सुरुच राहीला.फोंड सावंताच्या मदतीला पुन्हा करवीरकरांचे सैन्य आले.सन १८०६-०७ मध्ये करवीरकारांनी सावंतवाडी कोटावर हल्ला केला तेव्हा चंद्रोबा सुभेदार कोटाच्या बंदोबस्तास होते.करवीरकर सैन्याचा तळ वाडीजवळ कोळगाव येथे होता. करवीरकरांनी हल्ला केला.मुशीच्या दरवाज्याजव़ळ लढाई होउन त्यात करवीरकरांचा सरदार बाळा चांभार ठार झाले.करवीरकरांचा पराभव झाला आणि त्यांनी माघार घेतली करवीरकरांना वाडी घेता आले नाही. लवकरच दत्तक मायलेकरांत वितुष्ट आलें व सन १८०८ त भाऊसाहेबाचा खून झाला व लक्ष्मीबाई वारली. तेव्हा खेम सावंता(तिसरा)ची दुसरी पत्नी दुर्गाबाई हिला दुसरा एक मुलगा दत्तक दिला. सन १८१० मध्ये सावंताच्या मदतीला आलेले सुभेदार सुबराव यांनी कोट ताब्यात घेतला होता. सुबराव कोटात नसल्याच्या संधीचा फायदा घेउन चंद्रोबा सुभेदार यांनी ताब्यात घेतला आणि फुकेरीच्या घाटात सुबराव यांचा पराभव करण्यात आल्याने निपाणीकरांना सावंताच्या मुलुखातून माघार घ्यावी लागली. हा फोंड सावंत १८१२ सालीं वारला, तेव्हां अज्ञान मुलगा (चवथा) खेम सावंत गादीवर आला.हा सावंत सज्ञान झाल्यावर देखील राज्यकारभार नीट चालवीना, संस्थानांत बंडाळ्या होऊं लागल्या व एकंदर फार अनास्था माजली. तेव्हां इंग्रज सरकारनें से. १८३८ त राजघराण्यांत लायक पुरुष होईपर्यंत राज्यकारभार पोलिटिकल सुपरिंटेंडेंटमार्फत स्वतः पहाण्याचें ठरविलें. १८४४ त प्रसिद्ध फोंड सावंताचें बंड उद्भवलें त्यांत प्रत्यक्ष युवराज फोंड सावंत उर्फ आबासाहेब सामील होता. लवकरच हें बंड मोडलें व संस्थानांत बर्याच सुधारणा घडून आल्या. स. १८६७ त खेम सावंत निवर्तून त्याचा मुलगा फोंड सावंत नांवाचा गादीवर आला. हा दीड वर्षांतच वारल्यानंतर त्याचा मुलगा रघुनाथ सावंत उर्फ बाबासाहेब गादीवर बसला. यास बडोद्याच्या जमनाबाईसाहेबांची कन्या ताराराजे ही दिली होती. १८९९त बाबासाहेब मृत्यु पावला व त्याचा चुलत भाऊ श्रीराम गादीवर आला. याच्या राज्याभिषेकाच्या वेळीं असा ठराव झाला होता कीं, पोलि. सुपरिटेंडेंटनें पोलि. एजंट या हुद्द्यानें संस्थानिक राजेबहाद्दरच्या नांवानें सर्व कारभार पहावा. स. १९०९ पासून हा सावंत पागा, देवस्थान व दरबार यांचीं कामें पूर्ण मुखत्यारीनें पाही. हा १९१३ मध्यें वारला. रघुनाथानंतर (१८९९) काही काळ त्याच्या चुलतभावाने गादी सांभाळली; कारण रघुनाथाचा मुलगा पंचम खेम राज सावंत (१८९७–१९३७) अल्पवयीन होता. त्यावेळीं युवराज बापूसाहेब (प्रस्तुतचे राजे) अल्पवयस्क होते. यांचे शिक्षण इंग्लंडांत झालें असून गेल्या महायुद्धांत यांनीं मेसापोटेमियांत चांगली मर्दुमकी गाजविल्यामुळें यांनां 'हिज हायनेस' व कॅप्टन या पदव्या मिळाल्या. १९२४ सालच्या आक्टोबर महिन्यांत (ता. २९) बापूसाहेबांच्या हातीं (८६ वर्षे आपल्याकडे घेतलेलीं) सर्व सूत्रे इंग्रजसरकारनें दिलीं.

.ते बापूसाहेब महाराज या नावाने ख्यातनाम असून प्रजाहितदक्ष, न्यायी व धर्मपरायण राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी देवदासी प्रतिबंधक कायदा (१९३५), धार्मिक कृत्यासाठीची पशुहत्या बंदी इ. महत्त्वाचे कायदे केले.पंचम खेम सावंत ऊर्फ बापूसाहेबमहाराजांच्या काळात (१९३०) महात्मा गांधी आंबोलीला प्रकृतिस्वास्थ्यासाठी काही काळ येऊन राहिले होते. त्यावेळी बापूसाहेब महाराजांनी म. गांधींना निसर्गसंपन्न रांगणा, मनोहर-मनसंतोषगड पाहायला नेण्याची व्यवस्था केली होती अशी नोंद सापडते.
   पाणीपुरवठय़ासाठी नसर्गिक झऱ्यांचा केलेला वापर, दलितोद्धारासाठी व सामाजिक समतेसाठी केलेले कायदे,  तसेच संस्थानातील मुली व अस्पृश्यांना मोफत शिक्षणाची केलेली सोय ,विविध कोटकिल्ल्यांचा नितांतसुंदर परिसर याविषयी जाणून घेतल्यावर म. गांधींनी बापूसाहेब महाराजांना ‘रामराजा’ व त्यांच्या कारभाराला ‘रामराज्य’म्हणून गौरवले होते.

त्यांनी इंग्लंडमध्ये लष्करी तसेच मानव्यविद्यांचे शिक्षण घेतले होते. पहिल्या महायुद्घाच्या वेळी मेसोपोटेमियात त्यांनी मर्दुमकी गाजविली (१९१४–१७). संस्थानातील बहुसंख्य लोकांच्या उपजीविकेचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने रयतेच्या शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून बापूसाहेब महाराजांनी बांधलेले तलाव आजही उपयुक्त ठरत आहेत. छोटे संस्थान, मर्यादित महसूल, परकीय आक्रमणाची सततची धास्ती, ब्रिटिशांची करडी नजर अशा सगळ्या प्रतिकूल गोष्टी असूनही रयतेच्या कल्याणामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी बापूसाहेब महाराज नेहमीच काळजी घेत. स्वत: फिरून जनतेमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असे. स्वतंत्र कृषी खाते निर्माण करून शेतीसाठी पुरविलेल्या अशा सुविधा, आरोग्य, स्त्रीशिक्षण, व्यसनमुक्ती यासाठी केलेले प्रयत्न, गांधीजींच्या सूतकताईच्या प्रयोगाचा प्रसार, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रात्रशाळांची सोय, फिरते वाचनालय, बलसंवर्धनासाठी व्यायामशाळा, देशी-विदेशी खेळांना प्रोत्साहन, सहकारी पतसंस्थांची स्थापना यांमधून त्यांची सामाजिक बांधिलकीची वृत्ती व दूरदृष्टी दिसून येते. सावंतवाडी आणि परिसरातील लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेले जानकीबाई प्रसूतिगृह महाराजांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधले होते. ते आजही कार्यरत आहे. अशा लोकोपयोगी संस्थांच्या व कार्याच्या रूपाने या लोकराजाच्या स्मृती सावंतवाडी संस्थानाच्या जनतेच्या मनात कायम राहिल्या आहेत.

    सावंतवाडी संस्थानाला लागूनच असलेल्या गोमंतकातील पेडणे महाल, सत्तरी, मंगेशी, काणकोण तसेच अन्य ठिकाणी असलेल्या देवस्थानांमध्ये देवाच्या सेवेकरी म्हणवल्या जाणाऱ्या भाविणी, नायकिणी, देवदासी अशा स्त्रियांचे शोषण व अवहेलना करणाऱ्या प्रथा प्रचलित होत्या. सावंतवाडी संस्थानाशी संबंधित असलेल्या व नजीकच्या काही देवस्थानांमध्येही अशा प्रथा रूढी व परंपरेच्या नावाखाली सुरू होत्या. मात्र, स्त्रीसुधारणाविषयक कळकळ असलेल्या बापूसाहेब महाराजांनी संस्थानामध्ये देवदासी प्रतिबंधक कायदा करून या प्रथा बंद करायला लावल्या. सावंतवाडी संस्थानामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आणि स्त्रियांना आत्मसन्मान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यपूर्व काळात उचलले गेलेले हे एक महत्त्वाचे पाऊल होते, हे नक्की. स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याचा हा वारसा संस्थानाच्या विलीनीकरणानंतर आज सावंत-भोसले राजघराण्याच्या वर्तमान पिढीतील मंडळींनीही कायम राखला आहे. महिलांसाठी स्वतंत्र आरोग्यसुविधा देणाऱ्या संस्था, शाळा, वसतिगृह, शासनसंस्थेतील सहभाग, कलाप्रशिक्षण केंद्र अशा माध्यमांतून स्त्री-सक्षमीकरणासाठी संस्थानशी संबंधित मंडळी जातीनिशी साहाय्य करत असतात. यामुळेच जानकीबाई सूतिकागृह, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, पंचम खेमराज कॉलेज इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांत स्त्रीवर्गाचा सहभाग लक्षणीय आहे.
    गावोगावच्या ग्रामदैवतांचे वार्षिक उत्सव, दसऱ्यासारखे काही सण इत्यादींच्या निमित्ताने रेडा, बकरा यांसारखे पशू बळी देण्याची अमानुष प्रथाही परंपरेने संस्थानातील काही गावांमधून चालत आलेली होती. प्राण्यांविषयीच्या भूतदयेपोटी व पर्यावरणरक्षणाच्या हेतूने पशूबळी प्रतिबंधक कायदाही सावंतवाडी संस्थानात करण्यात आला. त्याची काटेकोर अंमलबजावणी आजही होत असल्याने कोकणातील अन्य गावांच्या तुलनेत सावंतवाडीत सण-उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या रूढी व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी पशुहत्या फारशी आढळत नाही.
      सामाजिकतेच्या बरोबरीने विधायक सांस्कृतिक दृष्टिकोन असलेला असाही हा राजा होता. संस्थान परिसरातील दशावतारी नाटके, गोफनृत्य, धनगर समाजाचे चपयनृत्य, विविध जातीजमातींच्या पारंपरिक लोककला, लोकगीत, भजन, स्त्रीगीते यांना उत्तेजन मिळावे म्हणून त्याकाळी विविध धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने या लोककलाकारांचे वार्षिक मेळे भरवले जात. कलाकारांना त्यांच्या कला लोकांसमोर पेश करण्याची संधी दिली जाऊन त्यांना सन्मानपूर्वक बिदागी दिली जाई. आजच्या काळात भरणाऱ्या साहित्यिक-सांस्कृतिक संमेलनांसारखे काहीसे या मेळ्यांचे स्वरूप असे. आजही जिल्ह्य़ात अन्य कुठेही नाही इतक्या मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळ्या सांस्कृतिक सोहळ्यांनिमित्ताने सावंतवाडीत पारंपरिक लोककला सादर केल्या जातात. साहित्य संमेलने, काव्यसंमेलन, ग्रंथमेळावे, लोककला महोत्सव अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे येथे सातत्याने आयोजन केले जाते. कणकवली, कुडाळ यांसारख्या राजकीयदृष्टय़ा सतत अशांत असलेल्या गावांशी तुलना करता सावंतवाडी राजकीय व सामाजिकदृष्टय़ाही नेहमीच सुसंस्कृत राहिली आहे, याची कारणेही इथल्या संपन्न सांस्कृतिक वातावरणात असू शकतात. एकूणच, सावंतवाडीला जिल्ह्य़ाची सांस्कृतिक राजधानी म्हटली जावी अशा प्रकारची श्रीमंती या सुंदरवाडीने जपली आहे. त्यामागे बापूसाहेब महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा कारणीभूत आहे.
    त्यांच्यानंतर शिवरामराजे (कार. १९३७–४८) हे अल्पवयात गादीवर आले. त्यांच्यावेळी संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले (१९४८). स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन आमदारकी मिळविली. ब्रिटिशांच्या काळात संस्थानात आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा अशा काही सुधारणा झाल्या. विसाव्या शतकापूर्वीच मूळ संस्थानाच्या भूप्रदेशाचा संकोच झाला होता. सावंतवाडी मूळ मुलखातील कुडाळ परगण्यातील तीन तर्फा, एक बंदर व दोन तर्फांपैकी काही गावे इंग्रजांनी घेतली होती. एक कर्यात कोल्हापूर संस्थानाकडे गेली व भीमगड परगण्यापैकी तीन महाल पोर्तुगीजांनी बळकावले होते. त्यामुळे सामीलीकरणाच्या वेळी नऊ तर्फा, एक कर्यात व दोन महाल सावंत-भोसले यांच्या सत्तेखाली होते आणि हनुमंतगड (फुकेरी), महादेवगड (आंबोली), नारायणगड (गेळे), नरसिंहगड किंवा सोनगड (सोनवडे) व मनोहरगड हे किल्ले ताब्यात होते.

सावंतवाडी संस्थानाचा ध्वज

मुंबई ईलाक्याचा नकाशा
सावंतवाडी संस्थानाचा नकाशा


   सावंतवाडी संस्थानाचे प्रतिक




 सावंतवाडी संस्थानाची तिकीट

सावंतवाडी संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पश्चिम महाराष्ट्रातील (कोकण) एक संस्थान. उत्तरेस गडनदी, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा व त्यापलीकडे कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्हा आणि दक्षिणेस तेरेखोलची खाडी व गोवा यांनी ते सीमित झाले होते. 

  ‘सुंदरवाडी’ परमेश्वराला पहाटे पडलेलं एक सुंदर स्वप्न. ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेले हे संस्थानकालीन शहर. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी  ‘रामराज्य’ म्हणून उल्लेख केलेल्या व ३५० वर्षाचा कलात्मक संस्कृतीचा देदीप्यमान इतिहास लाभलेल्या या सावंतवाडी संस्थानच्या गौरवशाली इतिहासाची सुवर्णपाने चाळण्याचा हा प्रयत्न 

‘इतिहासाचे इथे निनादले अवघे पडघम
टापांचे ते टप, टप आवाज!
अन् गगनभेदी ती दीर्घ तुतारी,
चौघडा अन् नौबत सारी
उजळत राहिली अभिजात संस्कृती,
पुण्यश्लोकांची ही पावन भूमि.
संत महात्म्यांची तीच ही तपोभूमि,
सुंदरवाडी.. सुंदरवाडी!’

       या संस्थानचा बहुतेक भाग डोंगरांनीं व सुशोभित अशा अरण्यांनीं व्यापिलेला असल्यामुळें या संस्थानाचा परिसर सृष्टिसौंदर्यने रम्य आहे. तांदूळ, नाचणी, वरी व नारळ हीं संस्थानचीं मुख्य पिकें होत. अफू, जरतार, शिंगाचें काम, खेळणीं व लाखेचे जिन्नस तयार होत असत. संस्थानांत सुमारें १५० शाळा आहेत. शिक्षणाकडे खर्च सुमारें ८०,००० रुपयें होतो. संस्थानचें एकंदर क्षेत्रफळ ९२५ चौरस मैल ( २,३९८ चौ. किमी.) असून उत्पन्न सुमारें ६८६००० रुपये आहे, व सन १९२१ च्या खानेसुमारीप्रमाणें लोकसंख्या २०६४४ आहे.   



  

 साधारण तीन-साडेतीनशे वर्षांपासून सावंतवाडीत लाकडी खेळणी बनवणाऱ्या कलाकारांची घराणी वास्तव्यास आहेत. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या या चिताऱ्यांनी या भागातील जंगलांतून विपुल प्रमाणात सापडणाऱ्या पांगारा या झाडांसाठी येथे वास्तव्य केले होते. या झाडाचे खोड वजनाने हलके, मऊ आणि टिकाऊ असते. त्यामुळे त्याच्यावर कोरीवकाम करण्याच्या दृष्टीने ते अतिशय उपयुक्त ठरते. अशा झाडांच्या लाकडाच्या शोधात आलेल्या या कलाकारांना सावंतवाडीकर संस्थानिकांनी केवळ राजाश्रय दिला नाही, तर त्यांची कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी म्हणून साहाय्यही केले. या चितारी कलावंतांनी लाखकाम करून बनवलेल्या ‘गंजिफा’ या श्रीमंत व राजेलोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या खेळाच्या गोलाकार लाकडी चकत्या, ‘ठकी’सारख्या वेगवेगळ्या आकर्षक बाहुल्या, विविध फळांच्या प्रतिकृती, अन्य खेळणी यांची भारतात सर्वत्र प्रसिद्धी व्हावी, त्यांना मागणी यावी यासाठी जयरामराजे, शिवरामराजे, राजमाता सत्त्वशीलादेवी यांनी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नकेले. आजही येथील राजवाडय़ात असलेला लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना पाहायला मिळतो. सत्त्वशीलादेवींच्या प्रोत्साहनामुळे अनेक नवनव्या कलाकारांना ही पारंपरिक कला शिकण्याची आणि त्यातून स्वयंरोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

         सावंतवाडी संस्थानातील गावांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून १८९३ पासून नळपाणी योजना सुरू करण्यात आली. जयरामराजांच्या काळात केसरी या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या गावात असलेल्या नसर्गिक जलस्रोतांचे पाणी सावंतवाडीतील चिवार टेकडी येथे आणून तेथून सर्वत्र पुरवले जात असे. या चिवार टेकडीला हे नाव तेथे असलेल्या ‘चिवा’ किंवा ‘चिवारी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या बांबूच्या एका प्रजातीवरून पडले आहे. साहित्यिक कै. वि. स. खांडेकर सावंतवाडी मुक्कामी असताना त्यांचे फिरायला जाण्याचे हे एक आवडते ठिकाण होते.

       सावंतवाडी संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि सुरक्षित कधीही नव्हते. एका बाजूने कोल्हापूरकर, दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज, याशिवाय कुडाळदेशकर, विजापूरचा आदिलशहा, इंग्रज आणि छत्रपती शिवाजीमहाराजांशी घेतलेले वैर यांमुळे सतत या संस्थानात राजकीय अस्थिरता राहिली. याचा परिणाम आर्थिक स्थर्यावर झालेला दिसतो. मात्र, असे असले तरी समाजसुधारणा, त्यासाठी आवश्यक असलेली बांधकामे, सांस्कृतिक संस्था, वास्तू यांचा संपन्न वारसा निर्माण करण्याचे आणि तो जतन करण्याचे महत्त्वाचे काम या संस्थानाने केले.दुसरे असे की, संस्थानचे बहुसंख्य राजे हे समाजाभिमुख व अध्यात्मप्रिय वृत्तीचे असल्यानेही त्यांनी रयतेवर ओझे टाकून व्यक्तिगत बडेजाव, ऐषोरामी जीवनशैली अपवादानेच स्वीकारलेली दिसते. त्यामुळेच लोकशाहीला पूरक ठरणाऱ्या सामाजिक समता, स्त्रीस्वातंत्र्याविषयी आदरभाव, सहकार अशा मूल्यांना या संस्थानात नेहमीच प्राधान्य दिले गेले. दलितांना मंदिरप्रवेश, स्त्रीशिक्षण, देवरायांच्या माध्यमातून पर्यावरणरक्षण, लोककलाकारांना उत्तेजन, सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावाचा विकास, शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठय़ाच्या सोयी अशा लोकहितकारी गोष्टींतून राजेशाहीऐवजी लोकशाही मूल्यांचीच रुजवण करण्याच्या दृष्टीने त्यांचे धोरण राहिले.

       सावंतवाडीतील माठेवाडा येथे असलेले स्वयंभू आत्मेश्वर मंदिर, ओटवण्याचे रवळनाथ मंदिर, आकेरी येथील काष्ठ व दगडी शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले रामेश्वर मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे संस्थानकाळापासून भाविकांची श्रद्धास्थान बनून राहिली आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे येथील अनेक संस्थानिकांशी संबंधित दंतकथाही प्रचलित आहेत. आकेरी येथील रामेश्वराचा कलात्मक लाकडी रथ श्रीराम महाराजांनी बनवून घेतला होता. पहिल्या खेम सावंतांच्या काळात माठेवाडय़ातील आत्मेश्वर मंदिरातील बारमाही जिवंत पाणी असलेली तळी बांधून घेण्यात आली. या ठिकाणी तेव्हा असलेल्या घनदाट जंगलात दामोदर भारती या साधूपुरुषाचे वास्तव्य होते. खेम सावंत शिकारीसाठी या जंगलात आले असता त्यांना तहान लागल्याने भटकत ते या साधूपुरुष असलेल्या जागेपाशी आले. आपल्या हातातील त्रिशूल जमिनीत मारून पाणी काढून त्यांनी राजांची तहान शमवली. तेथेच पुढे ही तळी बांधण्यात आली. आजही त्यातून अखंड पाणी पाझरताना दिसते. दामोदर भारती यांची समाधीही या मंदिरापाशीच आहे. या मंदिरांना पूजाअर्चा, उत्सव इत्यादी खर्चासाठी संस्थानकाळात जमिनी व इनामे देण्यात आली. संस्थानातील अनेक राजांशी येथील योगीपुरुषांशी निगडित अशा कथा इथल्या जनमानसात प्रचलित आहेत.

          संस्थानी काळातील अनेक वास्तू, देवालये, स्मारके इ. वास्तु हे शिल्पकलेचे अप्रतिम नमुने आहेत. सावंतवाडीकर भोसल्यांचा तीनशे वर्षांपूर्वीचा जुना राजवाडा सावंतवाडीच्या पश्चिमेला असलेल्या नरेंद्र डोंगरावर बांधलेला होता. आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक असले तरी एका दुर्गम ठिकाणात केले गेलेले गडकोटाचे वैशिष्टय़पूर्ण बांधकाम म्हणून त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. जायबंदी राजाला घेऊन या राजवाडय़ापर्यंत गेलेल्या घोडय़ाचे डोंगराच्या पायथ्याशी दगडी स्मारकही आहे. या घराण्यातील एक पराक्रमी राजा म्हणून ओळख असलेल्या जयरामराजे सावंत यांच्या ‘बोरमाणकी’या घोडीचंही स्मारक बांदा येथे आहे. या राजाने कुडाळ कोटाच्या जवळ ‘घोडेबाव’ नावाची एक मोठी विहीर बांधली होती. स्वाराला घोडय़ावरून खाली न उतरताच त्याला पाणी पाजण्यासाठी पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत जाता यावे, या उद्देशाने या विहिरीची रचना केलेली आहे. आजही ही वैशिष्टय़पूर्ण विहीर अस्तित्वात आहे. सुंदरवाडीला संस्थानाची राजधानी बनवल्यानंतर रमणीय मोती तलावाकाठी बांधला गेलेला नवा राजवाडा, त्याचे कमानीदार प्रवेशद्वार, राणीमहालाची इमारत, न्यायालयीन इमारत, संस्थानकालीन विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, आकेरीचे रामेश्वर मंदिर, संस्थानकाळात सावंतवाडीचे प्रवेशद्वार असलेला कोलगाव दरवाजा, संस्थानिकांच्या स्मरणार्थ बांधलेली माठी अशा काही वास्तू शैलीदार बांधकामासाठी पाहता येतील. पर्यटक, इतिहासप्रेमी आणि वास्तुशिल्पकलेचे अभ्यासक यांच्यासाठी संस्थानकालीन अशा अनेक वास्तू कायम आकर्षण ठरत आल्या आहेत. सावंतवाडी संस्थानच्या पूर्वेकडे असलेल्या सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये बांधलेले संस्थानी काळातील अनेक किल्ले इतिहासाचे अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरावेत असे आहेत. त्यापैकी माणगाव-शिवापूरजवळील दुर्गम खोऱ्यात असलेले मनोहर-मनसंतोष गड हे जुळे किल्ले वैशिष्टय़पूर्ण आहेत. संस्थानचे गतवैभव आज अनुभवण्यासाठी राजवाडा, विविध महाल व हे किल्ले यांचेच साहाय्य घ्यावे लागते.

सावंतवाडीकर राजघराण्याने प्रारंभापासूनच आध्यात्मिक शिकवण देणारे संत, साक्षात्कारी पुरुष, कवी व पंडित यांना आश्रय दिला. त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांना किंवा त्यांच्या समाधीस्थळांना श्रद्धास्थानांचा दर्जा देऊन त्यांचे जतन केले. १७८० मध्ये तेलंगणातून आलेल्या कुंदबोयझल नावाच्या पंडिताने राजश्री खेम सावंताच्या आज्ञेवरून ‘सामंतविजय’नावाचा ग्रंथ रचला होता. त्यात सावंत-भोसले घराण्याच्या आद्यपिढय़ांविषयी गुणगान केले होते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरीभजनाविण काळ घालवू नको रे’ असा संदेश देणारे संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे वास्तव्य असलेले बांदा गाव, सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार ज्या टेकडीवर झाला तो परिसर या संस्थानिकांनी विशेष लक्ष पुरवून विकसित केला. बापूसाहेब महाराजांचे आध्यात्मिक गुरू असलेल्या संत साटम महाराज या अवलिया महापुरुषाचे वास्तव्य असलेला दाणोली हा आंबोलीच्या पायथ्याचा जंगली परिसराने वेढलेला भाग संस्थान काळापासून आजतागायत भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन कुडाळ महालात समाविष्ट असलेल्या तेंडोली या गावी बागलाची राई हा एक नितांत रमणीय आणि दाट जंगली वनश्रीने नटलेला भाग आहे. या भागात पूर्णानंदस्वामी या महंतांचे वास्तव्य होते. तेथे त्यांचे शिष्य चिदानंदस्वामींचाही मठ आहे. आधुनिक मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी व लेखक कै. आरती प्रभू तथा चिं. त्र्यं. खानोलकर यांची चिदानंदस्वामींवर विशेष श्रद्धा होती. त्यांच्या कवितांमध्येही याचे संदर्भ सापडतात. याखेरीज सद्गुरू मियाँसाहेब हे अवलिया पुरुषही हिंदू व मुस्लीम भाविकांमध्ये लोकप्रिय असलेले महंत होते. अशा सर्व संत-महंतांना संस्थानच्या मंडळींनी आश्रय दिला होता. कुणकेरी येथील देवी भवानीचा वार्षिक हुंडा महोत्सवही संस्थानच्या राजांच्या प्रेरणेतून लोकप्रिय झाला. जात-धर्म विसरून सर्व स्तरांतील लोक या उत्सवात उत्साहाने सहभागी होताना दिसतात. लोकसंघटन, जनजागृती, जातपातविरहित समता या आंतरिक उद्देशानेच अशा श्रद्धा व उत्सवांना संस्थानच्या राजांनी नेहमी पाठिंबा दिलेला दिसतो. आजही ही समाधीस्थळे, वार्षिक उत्सव यांसाठी संस्थानातर्फे सहकार्य केले जाते. यातील अनेक श्रद्धास्थळांच्या विश्वस्त मंडळावरही संस्थानच्या आजच्या पिढय़ांतील मंडळी कार्यरत आहेत.

बापूसाहेब महाराज सावंत-भोसले यांनी रयतेच्या मुलांसाठी फिरत्या वाचनालयाची योजना राबवली होती. त्यांच्या वडिलांच्या नावाने उभारलेले श्रीराम वाचन मंदिर गेल्या १६० वर्षांपासून या परिसरातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनून राहिले आहे. बापूसाहेबमहाराज हे शिक्षणप्रेमी व आधुनिक विचारांचे संस्थानिक होते. विशेषत: स्त्रिया आणि दलितांना शिक्षण मिळून त्यांच्या आत्मोद्धाराची संधी त्याद्वारे त्यांना मिळाली पाहिजे असे त्यांचे विचार होते. त्यासाठी खास मुलींची शाळा त्यांच्या काळात सावंतवाडीत त्यांनी सुरू केली. १८९०-९१ मध्ये आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सावंतवाडीतील वास्तव्यात त्यांनी ‘संध्याकाळ’ ही प्रसिद्ध कविता लिहिली. याच शाळेचे नामकरण पुढे बापूसाहेब महाराजांच्या पत्नीच्या नावे ‘राणी पार्वतीदेवी हायस्कूल’ असे करण्यात आले. बेळगाव येथेही याच नावाचे कॉलेज अस्तित्वात आहे, तेही मूळचे ‘राणी पार्वतीदेवी हायस्कूल’ होय. प्लेगच्या साथीमुळे बेळगाव येथे काही काळासाठी त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. नंतर त्याच नावाने तेथे स्वतंत्र कॉलेज सुरू करण्यात आले. सावंतवाडीतील आजची राणी पार्वतीदेवी हायस्कूलची इमारत ही मुळात संस्थानच्या मालकीची राणीमहालाची वास्तू होती. मात्र, ९९ वर्षांच्या नाममात्र भाडेकरारावर ही इमारत हायस्कूल चालविणाऱ्या ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली. पंचम खेमराज ऊर्फ बापूसाहेब महाराज यांच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाची इमारत हीसुद्धा मुळात राजप्रासाद होता. या वास्तूसह आसपासची २० ते २५ एकर जागा या शिक्षणसंस्थेला देण्यात आली. संस्थानातील मंडळींची शिक्षणाविषयीची आस्था व सामाजिक उत्तरदायित्वातून कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न करता संस्थानच्या मालकीच्या वास्तू व जमिनी विविध संस्थांना समाजोपयोगी कामांसाठी देण्यात आल्या आहेत. शाळा व कॉलेज इमारतींप्रमाणेच हॉस्टेलची इमारत, तालुका न्यायालयाची इमारत, एस्. टी. स्टॅन्डचा परिसर (जिथे पूर्वी संस्थानच्या मालकीची घोडय़ांची पागा होती.), प्रशासकीय कार्यालयांसाठी दिलेला नव्या राजवाडय़ातील काही भाग अशा अनेक बाबींचा उल्लेख करता येईल. सावंतवाडीकर संस्थानिक कोल्हापूर, सातारा या अन्य संस्थानांशी तुलना करता ऐश्वर्यसंपन्न नसतानाही विलीनीकरणानंतर संस्थानच्या मालकीच्या जुन्या वास्तू, पॅलेस इ. कोल्हापूर वा अन्य संस्थानांप्रमाणे हॉटेल, म्युझियम्स वगरेंत रूपांतरीत न करता शैक्षणिक व शासकीय संस्थांना विनामूल्य वा नाममात्र मोबदल्यात दिल्या गेल्या आहेत. यामागे या संस्थानाने सतत जाोपासलेला भारतीय संस्कृतीतील संतत्वाचा निरिच्छवादी विचार, सामाजिक ऋणातून मुक्त होण्याची उदात्त भावना या गोष्टीही असू शकतात.

सावंतवाडी संस्थान विलीन होण्यापूर्वी राजेपदाची धुरा सांभाळलेले शेवटचे अधिकृत संस्थानिक कै. शिवरामराजे भोसले यांनी महसूल व न्याय क्षेत्राच्या अभ्यासाबरोबरच सैनिकी प्रशिक्षणही घेतले होते. विलीनीकरणानंतर देशाच्या व राज्याच्या राजकारण-समाजकारणात ते सक्रिय राहिले. काँग्रेस पक्षात सामील होऊन त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ व लोकसभेसाठी राजापूर मतदारसंघातून निवडणुका लढविल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांना जनता दलाच्या प्रा. मधु दंडवतेंकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी १९५७ ते १९७३ या कालावधीत सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून जाऊन त्यांनी सावंतवाडीचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्य नागरिक सुरक्षा कमिटी, राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र विधानसभा कायदे मंडळ, वनविभाग सल्लागार मंडळ, हस्तकला मंडळ, अल्पबचत सल्लागार समिती, निवृत्त सैनिक पुनर्वसन निधी समिती अशा शासकीय समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. शिवरामराजांना संगीत, चित्रकला, हस्तकला यांत उत्तम गती होती. सावंतवाडी संस्थानातील लाकडी खेळणी बनवणाऱ्या पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व त्यांची कला राज्याबाहेरही पोचावी म्हणून त्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडक कलाकारांना प्रशिक्षण देणे, विविध राज्यांतील अन्य लोककलाप्रकारांशी व कलाकारांशी त्यांचा परिचय करून देणे, सावंतवाडीतील चिताऱ्यांनी बनवलेल्या खेळण्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रसार माध्यमांपर्यंत कलाकारांना नेऊन त्यांच्या कलेची ओळख करून देणे अशा अनेक प्रकारे त्यांनी या प्राचीन कलेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी योगदान दिले. लाकडी खेळणी, काष्ठशिल्प, लाखकाम, गंजिफा खेळाच्या साहित्याची निर्मिती, विविध हस्तकला व्यवसाय, काथ्याकाम, महिला गृहोद्योग इ.ना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य हस्तव्यवसाय मंडळ’ या संस्थेची निर्मिती केली होती.

     शिवरामराजेंच्या पत्नी राजमाता सत्त्वशीलादेवी याही कलानिपुण असल्याने त्याही सावंतवाडीतील हस्तकला परदेशात पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत असतात. त्या स्वत:ही एक उत्तम कलाकार असल्याने त्यांनी राजवाडा परिसरात कलात्मक वस्तूनिर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. येथे बनवण्यात येणाऱ्या कलात्मक लाकडी वस्तूंना देशविदेशातून मोठी मागणी आहे. त्यात हिंदू पुराणांतील देवदेवता, दशावतार यांच्या पारंपरिक शैलीतल्या प्रतिमा चितारलेल्या गंजिफा, बुद्धिबळाच्या लाकडी सोंगटय़ा, बाहुल्या, मूर्ती, देव्हारे, चौरंग, काष्ठशिल्प, अभिषेकपात्रे, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या प्रतिमा, देवाचे सामान, पेयपात्रे इ. वस्तू विशेष लोकप्रिय आहेत. या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा, कारखान्यातील नियोजन, व्यवस्थापन, विक्रीव्यवस्था, जाहिरात यासाठी या कलाकारांना संस्थानिकांच्या आजच्या पिढीतील मंडळींकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात आस्थेने मदत केली जाते. शिवरामराजे भोसले स्मृतिसंग्रहालयात सावंतवाडी संस्थानच्या गतेतिहासाच्या खाणाखुणा जपणाऱ्या ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी सावंत-भोसले मंडळींनी इतिहासप्रेमींना मोलाचे सहकार्य केले आहे. राजमाता सत्त्वशीलादेवी यांचा पुत्र खेम सावंत सध्या बेंगरुळूला असतो. सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीला भोसले यांचे दुःखद निधन १८ जुलै २०१८ रोजी झाले. विद्यमान राजेसाहेब खेमसावंत भोसले, विद्यमान राणीसाहेब, सौ. शुभदादेवी भोसले हा वारसा आजही चालवित आहेत.

Sawantwadi sansthan rajparivar - SUNDARWADI SAWANTWADI | Facebook

                 सावंत-भोसल्यांच्या सुसंस्कृतपणाचे एक उदाहरण सहज देता येईल. विठ्ठल पुरुषोत्तम पिंगुळकर यांनी संस्थानच्या इतिहासाची दुर्मीळ साधने गोळा करून ‘सावंतवाडी संस्थानाचा इतिहास’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. हे पुस्तक छापण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मात्र, या ग्रंथात आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून सावंतवाडीकर संस्थानाविषयी प्रतिकूल मत बनावे अशा अनेक गोष्टी होत्या. सावंत-भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना असलेला विरोध, विजापूरकर मुस्लीम सत्ताधीशांची मदत घेऊन शिवाजीराजे व कुडाळदेशकरांच्या विरोधात केलेल्या कारवाया, पोर्तुगीज व ब्रिटिश मालवाहू जहाजांची लूट, घराण्यातील भाऊबंदकी, हत्या, राजस्त्रियांची गुप्त कारस्थाने अशा काही गोष्टी ऐतिहासिकदृष्टय़ा सत्य असल्या तरी या संस्थानिकांची जनमानसातील प्रतिमा कलुषित करणाऱ्या होत्या. याची जाणीव असूनही संस्थानातर्फे या पुस्तकाच्या छपाईसाठी आर्थिक मदत देण्यात आल्याने हे पुस्तक अभ्यासकांसमोर येऊ शकल्याची कृतज्ञतापूर्ण नोंद लेखकाने प्रस्तावनेत केली आहे. इतिहासाची किंवा भूतकाळातील पूर्वजांची चिकित्सा करून काही ऐतिहासिक सत्य सांगू पाहणाऱ्याला आज अविवेकी झुंडशाहीच्या रोषाला कसे सामोरे जावे लागते, हे लक्षात घेता सावंतवाडीकरांनी दाखवलेला हा सुसंस्कृतपणा ठसठशीतपणे जाणवतो. कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांप्रमाणेच बापूसाहेब महाराजांच्या आठवणी आजही येथील लोकांच्या मनात ताज्या आहेत.

राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर नेहमी भर देणारे, राजेशाहीपेक्षा लोकशाही मूल्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे व आक्रमकता, हुकूमशाही, दंडेलशाही, मनगटशाही यापेक्षा विवेक, संयम, सुसंस्कृतता या मूल्यांवर विश्वास असणारे सावंत-भोसले घराण्यातील सर्वच संस्थानिक जनमानसामध्ये नेहमीच
‘वाडीचो राजा आमचो थोर
सावंत-भोसले कुळी सरकार
रयतेच्या हितास देती थार
तयांच्या औदार्या नाही पार
देवाजीचो जसो चोख येव्हार
तयांवरी संतकृपा अनिवार
दुमदुमे किरत प्रीतवीच्या पार..’
अशा आपुलकीच्या भावनेने चिरस्थान मिळवून राहिले आहेत.

सावंतवाडीचा राजवाडा

  मालवणी भाषेचा गोडवा, कोकणी पाहुणचार, शाकाहारी-मांसाहारी मेजवानीचा बेत, मस्त थंडगार हवामान आणि काहीही न करता निवांत पडून राहण्याची पुरेपूर संधी हे सगळं अनुभवायचं असेल तर सावंतवाडीत यायला हवं. कोकण रेल्वेवरील हे ठिकाण. तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी अशा जलद ट्रेन्स मुळे मुंबईहून वीकएंड प्लॅन करावा इतपत जवळ आलेलं. खेम-सावंत घराण्याची राजधानी असलेलं हे एक छोटंसं शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुकुटातील शिरपेच आहे असं म्हणता येईल. या सावंत भोसले घराण्यातील कर्तबगार राजांनी इथं अनेक शतके राज्य केलं. आजही या राजघराण्यातील वंशज ज्या राजवाड्यात राहतात तो आपण पाहू शकतो. पाश्चिमात्य वास्तुरचनेला कोकणी साज चढवलेली ही वास्तू आज राहता राजवाडाही आहे आणि पर्यटकांचे अगत्याने स्वागत करणारे संग्रहालयही.

आंबोली घाट उतरून कोकणात प्रवेश केला की सावंतवाडीला पोहोचणे अगदी सोपे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या भटक्यांसाठी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणता येईल. इथून तेरेखोल, रेडी, शिरोडा, मोचेमाड ते वेंगुर्ला हा पूर्ण पट्टा भटकणे सोपे पडते.राजवाडा पाहायला गेलं की एक रेखीव बांधणीचे सुंदर प्रवेशद्वार आपले स्वागत करते. नुकतीच रंगरंगोटी केलेली असल्याने इथं एक प्रसन्नता जाणवते. या राजवाड्यात कमाविसदार्,दफ्तरदार, रजिस्ट्रार्,न्यायाधीश, खजिनदार वगैरे अधिकार्‍यांच्या कचेर्‍या आहेत.नव्या राजवाड्याच्या घड्याळाचा मनोरा केलेला आहे, या ईमारतीपासून जवळ सरकारी तुरुंग्,अश्वशाळा वगैरे ईमारती होत्या. सध्या दरवाज्यासमोर दोन तोफा रचून ठेवल्या आहेत.

सावंतवाडीचा हा राजवाडा म्हणजे एकेकाळी किल्ल्याचे किंवा कोटाचे ठिकाण होते. जांभा दगडात इथं केलेलं बांधकाम, कमानी, चिऱ्यांची रचना यातील प्रमाणबद्धता लक्ष वेधून घेणारी आहे. इथं असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवडीचे बांधकाम आपले वेगळेपण जपून असलेले वाटले.राजवाड्याच्या मध्यभागी दरबार हॉल आहे.

राजवाड्याचा निवासी भाग सोडला तर इथं अतिशय सुंदर संग्रहालय पाहता येते. राजघराण्यातील लोकांच्या वापरातील वस्तू, इतर सांस्कृतिक वारसा, शस्त्रे, शिल्प-संग्रह अशा अनेक गोष्टींनी हे संग्रहालय समृद्ध आहे. इथं पाऊल ठेवताच चौकोनी रचना दिसते आणि मागे डौलात उभे असलेले माड दिसतात. कोकणी बांधकामातील साधेपणाचे सौंदर्य फारसे परिचित नसले तरीही परिणामकारक आहे हे इथं जाणवते.

राजवाडा पाहत असताना इथला मोकळेपणा, खेळता सूर्यप्रकाश मनाला उल्हसित करतो. खेम-सावंत घराण्याने आपला वारसा जपलेला असल्याने विविध वस्तू पाहताना इथल्या परंपरा, लोकजीवन यांची झलक पाहता येते. सतराव्या शतकापासून खेम-सावंत, फोंड-सावंत, रामचंद्र सावंत अशा शासकांनी इथं राज्य केले, सत्ता गाजवली. युद्धे केली, राजकारण केले, लोकांचे जीवन समृद्ध केले. आजही हे कोकणातील कला संवर्धनाचे केंद्र आहे.

राजवाड्यातील दरबार हॉल अतिशय भव्य आणि देखणा आहे. इथली झुंबरे, लाकडी कोरीवकाम अगदी निरखून पाहिलं पाहिजे. राजचिन्हे, शासकांच्या प्रतिमा, सिंहासन, लोखंडी कमानींवर तोललेला छज्जा, वेगळ्या धाटणीचे छत हे सगळं पाहिलं की अजून एक विलक्षण गोष्ट न विसरता अनुभवली पाहिजे. ही गोष्ट आजही या राजवाड्याला जागृत ठेवत आहे.वाड्याच्या मागील व डावीकडच्या बाजूस तटबंदी,बुरुज व खंदकाचे अवशेष दिसतात.

सावंतवाडी लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. खेम-सावंत राजघराण्याच्या आश्रयाने आजही इथं अगदी पारंपरिक पद्धतीने गंजिफा हा पत्त्याचा खेळ तयार केला जातो. अनेक कलाकारांना इथं काम तर मिळतेच आणि कोकणाचा मानबिंदू असलेल्या हा कलेचे संवर्धनही होते. ही चित्रे कशी काढतात, कशी रंगवतात, नवे कलाकार हे सगळं कसं शिकतात हे आपण इथं पाहू शकतो. निरीक्षण करून, काही प्रश्न विचारून गंजिफा बद्दल जाणून घेऊ शकतो.

 सावंतवाडी शहरात मोती तलाव नावाचा तलाव आहे. तिथंच बाजारपेठ आहे. राजवाडा पाहून झाला की चहा पीत आणि भजी खात इथं एक निवांत चक्कर मारायला विसरू नका!

सावंतवाडीचा कोट उर्फ भुईकोट किल्ला :-

सुंदरवाडी उर्फ सावंतवाडीत खुप मोठा असा मोती तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस भुईकोट किल्ला होता.तो जुना कोट नावाने ओळखला जात होता. पुर्वेस राजवाडा होता ज्याची माहिती आपण आधीच घेतली.या राजवाड्याला "नवा कोट" असे म्हणले जाते.या दोन्ही कोटांना जोडणारी तटबंदी होती,याच्या संरक्षणात कदाचीत सावंतवाडी शहर वसले असावे. जुन्या कोटाचे बांधकाम चिखलात दगड बसवून केलेले होते.त्याच्या आग्नेय व दक्षिण दिशास खंदक होते. उन्हाळ्यात हे खंदक कोरडे पडायचे. भुईकोटाच आकार वेडावाकडा असून त्याची लांबी ३५० यार्ड तर रुंदी १५० यार्ड होती. त्याला सर्व बाजूने बुरुज होते आणि तटबंदीत बंदुकाची मारगिरी करण्यासाठी जंग्या होत्या.मुख्य दरवाजा उत्तर बाजूला असला तरी तो फार भक्कम बांधणीचा नव्हता. किल्ल्यात दोन पितळेच्या व बाकीच्या लोखंडी तोफा होत्या. मोती तलावाच्या काठावर मुस दरवाजा होता.त्याच्या आत बालेकिल्ला होता.बालेकिल्ल्याचा दरवाजा भव्य ,दोन्ही बाजुला भव्य बुरुज बांधले होते.सध्या तिथे पोस्ट ऑफिस आहे. त्याच्या बाजुला काही ईमारती आहेत्,तिथे पुर्वी शिकारखाना होता,म्हणजे तिथे हिंस्त्र पशु ठेवले होते. कोटाला बरेच दरवाजे होते.त्यांची नावे अशी मुशीचा दरवाजा, परवानगीचा दरवाजा,सालईचा दरवाजा,पहलेचे दार, पागेचा दरवाजा,सदरेचा दरवाजा. सध्या यातील फक्त कोलगाव दरवाजा अस्तित्वात आहे. 

  कोलगाव दरवाजा

याखेरीज सावंतवाडी कोटाला दिंडी म्हणजे लहान दरवाजे होते.त्यांची नावे आढळतात, ती अशी काजीची दिंडी,सबनीस दिंडी,कारिवडे दिंडि,खासकिलवाडा दिंडी,पाटणकरांची दिंडी. सावंतवाडीच्या भुईकोटाला असलेल्या बुरुजाची नावे अशी वडाचा बुरुज्,नगारखान्याचा बुरुज्,ब्राम्हण बुरुज,काळे बुरुज इत्यादी. 


 

राजवाडा व मोती तलाव पाहून कुडाळ मार्गावरील दोन बुरुजात लपविलेला कोलगाव दरवाजा ईतकेच एतिहासिक अवशेष आज शिल्लक आहेत. 

संदर्भग्रंथः-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले -चिंतामण गोगटे
३) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील -सतिश अक्कलकोट
४) मराठी विश्वकोष
५) दै.लोकसत्तामधील सावंतवाडी संस्थानावरचा लेख
६) स्थलकाल- अरुण टिकेकर
७) दर्याफिरस्ती हा ब्लॉग
८ ) शिवप्रसाद देसाई यांचे लिखाण






खेमसावंतांचा राजवाडा
गोव्याचे पोर्तुगीज आणि वाडीचे सावंत सख्खे शेजारी, तेव्हा त्यांच्यात प्रेमाचे देणे घेणे, रुसवेफुगवे, हेवेदावे, मारामारी १६ व्या शतकापासून १९६१ च्या गोवा मुक्ती संग्रामापर्यंत सतत चालू होते. म्हणून मोहिमेची सुरुवात सुंदरवाडी ऊर्फ सावंतवाडीच्या राजवाडय़ापासून करावी असे ठरवून सावंतवाडीला पोहोचलो, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता खेमसावंतांचा तलावाकाठचा सुंदर राजवाडा पाहावयास गेलो, तेव्हा सावंतवाडी संस्थानच्या विद्यमान राजमाता सत्वशीलादेवी भोसले, राजवाडय़ाबाहेरील व्हरांडय़ात सहकाऱ्यांसमवेत कामकाजात मग्न असलेल्या दिसल्या. सर्वसामान्यांना राजवाडा पाहण्याची वेळ पाचला संपते आणि आम्ही तेव्हाच नेमके पोहोचल्यामुळे राजवाडय़ाच्या व्यवस्थापकांनी घाईघाईनेच राजवाडा दाखविण्यास सुरुवात केली. दरबार हॉल, त्यातील नक्षीदार लाकडी गवाक्ष, छतावरील नक्षीकाम अतिशय देखणे आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजगादीची स्थापना इ.स. १६२७ साली पहिल्या खेमसावंतांनी केली. दरबार हॉलमध्ये त्यांचे चांदीचे उंच सिंहासन आहे. सिंहासनाच्या दोन्ही हातावर सिंह कोरलेले असून, पाय ठेवण्यासाठी चांदीचा छोटा मंचक तयार करण्यात आला आहे. सिंहासनाच्या पाठीमागच्या बाजूला सूर्य कोरला असून, त्याच्या खाली मध्यावर चिलखताचे चिन्ह आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन नागराज आहेत. खेमसावंत घराण्याचे हे राजचिन्ह आहे. राजवाडय़ातील म्युझियमही पाहण्यासारखे आहे. त्यातून राजघराण्याची माहिती तर मिळतेच, शिवाय सावंतवाडी संस्थान परिसरात सापडलेल्या ब्रह्मदेव, विष्णू, शिव-पार्वती इत्यादी देवदेवतांच्या सुंंदर दुर्मिळ मूर्ती, वीरगळ, सतीशीला, शिलालेख तिथल्या प्राचीन इतिहासावर प्रकाशझोत टाकतात. इतिहासकाळापासून लाकडाची खेळणी बनविण्यात सावंतवाडीतील चितारआळी प्रसिद्ध आहे. राजवाडय़ातील कलादालनातही हस्तकला निर्मिती व विक्री केंद्र आहे. त्यात राजेशाही खेळाचे साहित्यही आहे. सारीपाटासारखाच पण वेगळ्या प्रकारे खेळण्यात येणारा ‘गंजिफा’ नावाचा खेळ सावंतवाडीकर-भोसले घराण्यात परंपरेने चालत आला आहे. या गंजिफाची किंमत ५०० रु. पासून १२ हजार रुपयांपर्यंत आहे. तो कसा खेळावा त्याची माहिती पुस्तिका गंजिफा खरेदी करणाऱ्याला दिली जाते.
सावंतवाडी नव्हे सुंदरवाडी
सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ का म्हणतात ते येथे आल्याशिवाय समजायचे नाही. भोवतालची डोंगर दाटी हिरवाईने नटली आहे. आणि मधोमध उघडलेल्या शिंपल्यातील मोती दिसावा तसा प्रचंड तलाव शहराच्या मधोमध चमचमताना दिसतो. त्याचे नावही तसे समर्पक ठेवले आहे मोती तलाव. हा मोती तलाव चहूबाजूने बांधून काढला आहे. त्याच्या मधोमध एक पूल असून नौकाविहारासाठी नावाही ठेवल्या आहेत. तलावाभोवतीच्या रस्त्यालगत अनेक ऐतिहासिक वाडे, मंदिरे आहेत. कारागृहही त्यापैकीच आहे. सावंतवाडीला जुना किल्लाही आहे. पण तलावाकाठच्या राजवाडय़ाने तलावाला शोभा आली की तलावामुळे राजवाडय़ाच्या सौंदर्यात भर पडली, हे रसिक मनाला ठरवता येणे कठीण आहे. इतके अनुपम सौंदर्य या परिसराला लाभले आहे.
वाडीकर सावंत-भोसले
सावंतवाडी संस्थानाबद्दल खुद्द राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘सावंतवाडी संस्थान हे एक देशातील चिमुकले संस्थान असूनही येथे आमच्या राजघराण्याने इ. स. १६२७ पासून प्रत्यक्ष कारभारास सुरुवात केली, त्याही अगोदर इ. स. १३३५ मध्ये आमच्या घराण्याचा मूळ पुरुष उदेपूर (राजस्थान) येथून विजापूर सैन्यातील सरदार म्हणून चंदगड व त्यानंतर दक्षिण कोकणपट्टीत आला. साधारणत: १६ व्या शतकाच्या सुरुवातीस या पुरुषाच्या पुढील वंशजाने आपले ठाणे होडावडा (ता. वेंगुर्ला) येथे वसविले. पुढे ओटावणा-चऱ्हाठा अशी स्थित्यंतरे होत खेमसावंत पहिले यांनी सध्याच्या सावंतवाडीस आपल्या प्रमुख ठाण्याचा दर्जा दिला. या दीर्घ वाटचालीत या भूप्रदेशाला एक स्वतंत्र अस्तित्व देऊन आर्थिक, सामाजिक, कला, आरोग्य आणि शिक्षणाचा विकास करण्याचा प्रयत्न आमच्या घराण्याने येथे जाणीवपूर्वक केला आहे.’ राजे लखम सावंत (१६५९-७५) यांच्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ साली कुम्डाळ, वेंगुर्ला, मनोहरगड आणि गोव्याचा फोंडा किल्ला जिंकून घेतला व कुडाळच्या कृष्णा सावंत यांना देशमुखी बहाल केली. तेव्हा सावंतवाडीचे राजे आणि शिवाजीराजे भोसले हे उदयपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या रजपूत वंशातील असल्याचे उभयतांना समजले. तेव्हापासून सावंतवाडीचे राजे हे वाडीकर सावंत-भोसले या जोडनावाने ओळखले जाऊ लागले.
भुईकोट किल्ले
सावंतांनी आपल्या सत्तेखालील परिसरात हुकेरी येथे हनुमंतगड, अंबोलीत महादेवगड, मसुरे येथे भरतगड, ओविळ्ये येथे सिंदगड, निवतीचा किल्ला, सोनगड, गोव्यात नारायणगड व आवाडे येथे भुईकोट किल्ला बांधला. शिवाय हळर्णे, बांदा, वेंगुर्ले, तेरेखोल, डिचोली, साखली येथील गड-कोटांची वेळोवेळी डागडुजीही करून घेतली आहे. तेरेखोल नदीने महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा अधोरेखित केली आहे. तेरेखोल नदीच्या उत्तरेला एका छोटय़ा डोंगरावर तेरेखोलचा किल्ला आहे. सकृतदर्शनी तो सावंतवाडी परिसरात असला तरी त्याचा समावेश गोवा राज्यात करण्यात आला आहे.
रेडी-नागोळेवाडीचे गजानन मंदिर
तेरेखोलचा किल्ला करून गोमंतकातील इतर स्थळ दर्शन करण्यापूर्वी रेडी-नागोळेवाडीतील प्रसिद्ध गजानन मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी. १९७५ ला उत्खनन करताना ६ फूट उंच व ३ फूट रुंद जांभ्या दगडात कोरलेली गणपतीची सर्वागसुंदर मूर्ती सापडली. ही गणपतीची मूर्ती द्विभूज असून, बसलेली आहे व तिच्याभोवती मखराकृती सुंदर कोरीव काम केलेले आहे. रेडीच्या नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील हे गजानन मंदिर पाहण्यासाठी भाविकांची सतत वर्दळ असते. गजानन मंदिरापासून चार कि.मी. अंतरावर माऊलीदेवीचे अतिशय भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. दक्षिणेकडील मंदिरांची प्रतिकृती वाटावी अशी या मंदिराची शिखर गोपुरांची रचना आहे. अद्यापी दीपमाळ, आवारातील इमारतींचे सुशोभीकरण पूर्ण झाले नाही. हे मंदिर जेव्हा परिपूर्ण होईल, तेव्हा कोकणच्या मंदिर वैभवात एका उत्कृष्ट मंदिराची भर पडेल. ही दोन मंदिरे पाहून गाडी रस्ता तेरेखोल नदीला डाव्या बाजूला ठेवून थेट तेरेखोल किल्ल्याला जाऊन भिडतो. येथे आल्यावर आपण देहभान विसरून जातो.
गोव्याला भारताचे नंदनवन म्हटले जाते. त्याची एक झलक किल्ल्यात प्रवेश केल्यावर पाहावयास मिळते. हिरवीकंच वनराई, डावीकडून भूमी चिरीत दूरवरून सह्याद्रीतून आलेली आरवंदी नदी ऊर्फ तेरेखोलची नदी आणि फेसाळत्या सागराचा अनोखा संगम किल्ल्यावरून पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. तेरेखोलचा किल्ला नदीच्या ऐन मुखावर असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवता येते. माथ्यावरच्या बालेकिल्ल्यात आधुनिक रेस्टॉरंट आणि राहण्याची सोय आहे. संपूर्ण पोर्तुगीज बनावटीच्या या किल्ल्यात प्रवेशद्वाराच्या आत समोरच चर्च आहे. किल्ल्यातील बरीचशी दालने हॉटेलमुळे बंद करण्यात आली आहेत. पर्यटकांना चर्चसमोरील तटबंदीच्या पायऱ्या चढून समुद्राकडील बुरुजावर जाऊन भोवताल निरखता येतो. किल्ल्याची मुख्य तटबंदी आणि प्रवेशद्वार समुद्रासमीप असून, तेथे सुंदर बाग बनवून प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गप्रेमींचा हिरमोड होतो. पण आपण जेवढे पाहतो त्यावरून या किल्ल्याच्या भौगोलिक स्थानाचे इतिहासातील महत्त्व लक्षात येते. हा किल्ला नेमका केव्हा बांधला त्याचा निश्चित कालावधी उपलब्ध नाही. पण इ. स. १७४० साली वाडीचे सावंत-भोसले यांच्या ताब्यात तो होता. इ. स. १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी तो जिंकून घेतला. त्यानंतर तेरेखोलवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज आणि वाडीचे सावंत यांच्यात अनेकवार युद्धे झाली. इ. स. १८१७ साली तो पुन्हा वाडीच्या सावंतांकडे आला. १९५४ ला स्थापन झालेल्या गोवा मुक्ती विमोचन संघटनेचे अनेक कार्यकर्ते पोर्तुगीज सरकारने येथे डांबून ठेवले होते.



सावंतवाडीकरांनी आंग्य्रांना चारली धूळ; राजघराण्यात अंर्तगत कलह
By शिवप्रसाद देसाई : सकाळ वृत्तसेवा
6-8 minutes

 सावंतवाडी संस्थांनचे तत्कालीन राजे रामचंद्र सावंत यांचा धीरोदत्त कारभार आणि जयराम सावंत महाराजां शौर्याच्या जोरावर सावंतवाडी संस्थानने पोर्तुगीजांबरोबरच रत्नागिरीकडच्या भागात सत्ता असलेल्या आंग्य्रांनाही शह दिला. राज्याचा विस्तार केला; मात्र नंतरच्या काळात या दोघांमध्ये वाद निर्माण झाले. यामुळे पोर्तुगीजांनी पुन्हा डोके वर काढले. काही विघ्नसंतोषी लोकांनी या दोघांमध्ये निर्माण केलेली कटुता सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने मात्र नुकसानकारक ठरली.
    सावंतवाडी संस्थानने पोर्तुगीजांचा मिळवलेला भाग पुन्हा त्यांनी काही प्रमाणात मिळवला. इकडे रत्नागिरीकडच्या भागात सत्ता गाजवणारे आंग्रे या आधीच संस्थानचे शत्रू बनले होते. आंग्य्रांचा सागरी किनारपट्टीवर दबदबा होता. त्या काळात जलवाहतुकीला व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व होते. यामुळे किनारपट्टीवरील वर्चस्व खूप महत्त्वाचे ठरायचे. साहजीकच भक्‍कम आरमार असलेल्या आंग्रे आणि सावंतवाडीकरांच्यात स्पर्धा असणे स्वाभाविक होते. यातून या दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्षाचे प्रसंग आले; मात्र जयराम महाराजांच्या शौर्यामुळे यात सावंतवाडीकरांची सरशी झाली.

आंग्य्रांच्या साम्राज्याचे तत्कालीन प्रमुख तुळाजी आंग्रे हे इंग्रज आणि सावंतवाडीकरांच्या जोडीने साताऱ्याच्या छत्रपतींनाही किनारपट्टी भागात त्रास देवू लागले. यावेळी छत्रपतींनी आंग्रेंना शह देण्यासाठी सावंतवाडीकरांनी त्यांच्यावर हल्ला करावा, अशी भूमिका मांडली. सुरूवातीला सावंतवाडीकरांनी हे फारसे मनावर घेतले नाही; मात्र साताऱ्याच्या गादीकडून यासाठीचा आग्रह वाढत गेला. शेवटी 1749ला सावंतवाडीकर आणि मराठ्यांचे सरदार भगवंतराव पंडीत यांनी मिळून आंग्य्रांवर हल्ला केला. यात त्यांनी लांजापर्यंतचा भाग जिंकला. यात आंग्रेंना धडा शिकवणे हा सातारकर छत्रपतींचा हेतू होता. या हल्ल्यामुळे आंग्रे पेटून उठले. त्यांनी सावंतवाडी संस्थानवर रोष धरला. त्यांनी सावंतवाडीकरांना धडा शिकवण्यासाठी मसुरे (मालवण) येथील संस्थानचा भरतगड किल्ला ताब्यात घेतला.
   जयराम महाराजांना हे समजल्यानंतर ते स्वतः मसुरेत गेले. त्या किल्ल्यावरील नाईकवडी घराण्यातील शुरांना समजावून आपल्या बाजूला वळवत पुन्हा हा किल्ला सावंतवाडी संस्थानच्या अधिपत्याखाली आणला. हे समजल्यानंतर तुळाजी आंग्रे आणखी संतप्त झाले. त्यांनी मोठे सैन्य जमवत 1750 मध्ये थेट कुडाळवरच स्वारी केली. ही लढाई बरीच प्रसिद्ध आहे. आंग्रे तळगावच्या मार्गाने बांबार्डे येथे पोहोचले आणि त्या ठिकाणी तळ ठोकला. आंग्रे हल्ला करणार असल्याची माहिती संस्थानचे एकनिष्ठ असलेल्या शिवाजी लोंढे यांनी जयराम महाराजांना दिली. त्यांनीही युद्धाची तयारी केली. हेवाळकर, उसपकर आदी प्रमुख सरदारांना सैन्यासह बोलावले.
    स्वतः जयराम महाराज आपल्या बोरमाणकी नावाच्या घोडीवर बसून या सैन्याचे नेतृत्व करत होते. सगळ्यात आधी या दोन्ही सैन्याची गाठ बांबार्डे येथे पडली. येथे छोटीशी लढाई झाली; मात्र यात सावंतांना माघार घ्यावी लागली. पुढे आंग्य्रांनी थेट कुडाळवर हल्ला केला. या ठिकाणी दोन्ही सैन्याचे मोठे युद्ध झाले. सगळ्यात आधी आंग्य्रांकडे शूर सरदार मानाजी फाकंडे हे यात मारले गेले. सावंतवाडीकरांतर्फे लढणारे रजपूत सरदार नवसिंग व आंगोजी काट्या यांचाही मृत्यू झाला; मात्र जयराम महाराजांनी प्रयत्नांची शिकस्त करत आंग्य्रांचा पराभव केला. यावरच न थांबता त्यांनी आंग्य्रांचा लांजा-देवरूखपर्यंत पाठलाग केला. वाटेत मिळालेली आंग्य्रांच्या अधिपत्त्याखाली अनेक गावे जाळली. या लढाईचा आंग्य्रांनी बराच धसका घेतला. ते परत सावंतवाडीकरांच्या वाटेला आले नाहीत.
    संस्थानकाळात राजवाड्यात वाजवली जाणारी नौबत याच लढाईत आंग्य्रांकडून मिळवली होती. या लढाईत संस्थानचे मुख्य प्रधान जीवाजी विश्राम सबनीस यांनी पराक्रम दाखवला. यामुळे त्यांना कुडाळ तालुक्‍यातील बाव हे गाव इनाम देण्यात आले होते. या लढाईतील विजयामुळे सावंतवाडी संस्थानची किर्ती वाढली. या दरम्यान साताऱ्याच्या छत्रपतींच्या नावाने पेशवे राज्यकारभार पाहू लागले होते. पेशव्यांच्या दरबारातही सावंतवाडी संस्थानचे राजे आणि त्यांचे प्रधान जीवाजी सबनीस यांचे वजन आणखी वाढले. ही सर्व घडी नीट बसत असतानाच अंतर्गत कलहाचा सावंतवाडी संस्थानला फटका बसला.
    जयराम महाराज आणि संस्थानचे राजे रामचंद्र सावंत यांच्यात 1752 मध्ये कलह निर्माण झाला. याचे नेमके कारण सांगता येत नाही; मात्र याबाबत दोन शक्‍यता वर्तवल्या जात आहेत. यातील एक म्हणजे राजघराण्याचा पुढचा वारस कोण? यावरून काही विघ्नसंतोषी लोकांनी मने कलुषीत केल्याने हा वाद निर्माण झाला. दुसऱ्या शक्‍यतेनुसार त्या काळात सावंतवाडी संस्थानने बरेच इमारती लाकूड जमा केले होते. रामचंद्र सावंत महाराजांना त्यातून संस्थानच्या किर्तीला साजेसा भव्य वाडा बांधायचा होता. जयराम महाराजांना यातून आणखी गलबते बांधून आरमार अधिक भक्‍कम करायचे होते. या मतभेदातूनही दोघांमध्ये वितुष्ट आल्याची शक्‍यता वर्तवली जाते.
     हा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र त्यात यश आले नाही. शेवटी हा विषय पुण्यात पेशव्यांना कळला. त्याकाळी बाळाजी बाजीराव हे पेशवे होते. त्यांनी या दोघांनाही कलह मिटवण्यासाठी उपदेशपर पत्रे पाठवली. त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी या दोघांमधील वाद शमवण्यासाठी विश्‍वासू असलेले रामचंद्र बाबा सुखठणकर यांना सावंतवाडीत पाठवले. त्यांनी दोघांना समजावले. तरीही याचा उपयोग झाला नाही. शेवटी पेशव्यांनी यातून मार्ग काढला. त्यानुसार रामचंद्र सावंत यांनी सावंतवाडीत राहून जीवाजी सबनीस यांच्या मदतीने राज्यकारभार चालवावा आणि जयराम महाराजांनी आपले दोन मुलगे व पांडुरंग विश्राम सबनीस यांच्यासह पुण्यात पेशव्यांच्या दरबारी येवून रहावे असे सांगितले; मात्र जयराम महाराज स्वाभिमानी होते. त्यांना आपले राज्य सोडून दुसऱ्याच्या दरबारी राहणे पटले नाही. 1753 मध्ये ते आपल्या कुटुंबासह कुडाळमध्ये रहायला गेले. पुढे काही दिवसांनी त्यांचे तेथेच निधन झाले. त्यांना एकूण तीन मुलगे होते; मात्र त्यांच्याबाबत फारशी माहिती मिळत नाही. हा कलह समजल्यामुळे सावंतवाडीकरांचे शत्रू असलेले पोर्तुगीज सक्रिय झाले. त्यांनी रामचंद्र सावंत महाराजांना आपल्याला हवा तसा तह करायला भाग पाडले. 25 ऑक्‍टोबर 1754ला गोव्याचा गर्व्हनर जनरल कोंद दी आल्वा आणि रामचंद्र सावंत यांच्यात हा तह झाला. यानुसार मिशनरी लोकांना सावंतवाडीकरांच्या मुलखात धर्म प्रसाराला मोकळीक मिळाली.
           पोर्तुगीज सरकारने केरी, साखळी व मोरजी येथील देसाई तसेच पोर्तुगीजांशी एकनिष्ठ वागण्यास तयार असलेल्या सगळ्यांचे पोर्तुगीजांनी रक्षण करावे. सावंतवाडीकरांनी डिचोली, पेडणे महाल, हळर्ण, सत्तरी व तेरेखोल किल्ला येथील सर्व हक्‍क पोर्तुगीजांना सोडून द्यावे. त्याऐवजी रेडी व निवती हे किल्ले सावंतवाडीकरांना परत द्यावे असे ठरले. या तहापासून पुढे सावंतवाडीकरांनी पोर्तुगीजांना नियमित खंड द्यावा असेही यात ठरले. या सगळ्या घडामोडीनंतर रामचंद्र सावंत महाराज पुढच्या काही वर्षात म्हणजे 1755 मध्ये निवर्तले. त्यांनी 17 वर्षे राज्य केले. मृत्यूवेळी त्यांचे वय अवघे 43 होते. त्यांना एक मुलगा, चार मुली मिळून पाच अपत्य होती.
 बोरमाणकी घोडीचे बांद्यातील स्मारक
       जयराम महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात अजरामर आहेत. त्यांची बोरमाणकी ही फार आवडती घोडी होती. तिच्यावर स्वार होवून त्यांनी अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. शेवटी एका खंदकावरून उडी मारून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्यावर बांदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयराम महाराजांनी त्या ठिकाणी या बोरमाणकी घोडीचे त्याकाळात स्मारक उभारले. तेथे दिवाबत्ती करण्यासाठी शेख दाऊदबीन शंख महम्मद, बांदेकर मुजावर यांना सनद दिली होती. आजही हे स्मारक सुस्थितीत आहे.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीकरांचे जुळले शिंदे घराण्याशी नाते
By शिवप्रसाद देसाई

     सिंधुदुर्ग : रामचंद्र सावंत यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र तिसरे खेम सावंत (राजश्री) हे गादीवर आले. 1755 ते 1803, अशी त्यांची कारकीर्द अनेक चढउताराने भरलेली आहे. सावंतवाडी संस्थानचे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशी त्यांच्याच कारकीर्दीत जिव्हाळ्याचे नाते संबंध निर्माण झाले. त्यांच्या पहिल्या पत्नी लक्ष्मीबाई या शिंदे घराण्यातील. या काळात सावंतवाडी संस्थानशी स्वामीनिष्ठ असलेल्या जीवबादादा बक्षी अर्थात जीवाजी बल्लाळ यांची सावंतवाडी संस्थानच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
      रामचंद्र सावंत यांना उशिरा पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या निधनावेळी त्यांचे पुत्र खेमसावंत तिसरे अर्थात राजश्री हे अवघे सहा वर्षांचे होते. सावंतवाडी संस्थानचे वारस म्हणून त्यांना राजा करण्यात आले. त्यांच्यावतीने त्यांच्या आई जानकीबाई या मुख्य प्रधान जीवाजी विश्राम सबनीस यांच्या मदतीने कारभार पाहत होत्या. याच दरम्यान संस्थानने पराभव केलेल्या कुडाळच्या तत्कालीन देशमुखी असलेल्या प्रभू घराण्यातील वारसांनी पुन्हा सत्ता स्थापनेसाठी डोके वर काढले. सावंतवाडीकरांच्या हल्ल्यानंतर 1697 मध्ये पळून गेलेल्या नारायण प्रभू यांचा मुलगा दादाजी प्रभू यांनी 1756 मध्ये सत्ता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला प्रतिनिधी पुण्यातील पेशव्यांच्या दरबारात पाठवला. कुडाळमध्ये आपल्याला पुन्हा सत्ता मिळावी यासाठी सावंतवाडीकरांना शह द्यायला सैन्याची मदत करावी, अशी मनधरणी त्यांनी केली. पेशव्यांनी ती मान्यही केली. पेशव्यांचे सरदार नारो त्रिंबक हे दंडाराजपुरी येथे होते. त्यांना या कामासाठी नियुक्‍त केले. त्रिंबक हे तीन हजारची फौज घेवून कोकणात उतरले. त्यांचे सैन्य अगदी नेरूरपर्यंत चाल करून आले.
       हा सगळा घटनाक्रम सावंतवाडीकरांना आधीच कळला होता. मुख्य प्रधान जीवाजी सबनीस यांनी आधीच पेशव्यांचे मन वळवून हे सैन्य मागे नेण्याविषयी हुकुम मिळवला. अगदी वेळेत तो हुकुम त्रिंबक यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी आपले सैन्य माघारी नेले. प्रभू यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. यानंतर मात्र त्यांनी कधी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही. हे सावंतवाडीवरील संकट टळल्यावर जीवाजी सबनीस यांनी पोर्तुगीजांनी घेतलेला मुलूख परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याच काळात पोर्तुगीजांनाही उतरती कळा लागली होती. त्यांनी सावंतवाडीकरांकडून मिळवलेल्या पेडणे महालातील लोकांवर अन्याय करायला सुरूवात केली होती. त्याकाळात तंबाखुचे मोठे महत्त्व होते. हा तंबाखु पोर्तुगीजांच्या सत्तेखालील गोव्यातूनच घ्यावा, अशी सक्‍ती त्यांनी केली होती. याचा असंतोष लोकांमध्ये होता.
       सावंतवाडीकरांसाठी हे एक कारण मिळाले. त्यांच्या आधारे 9 एप्रिल 1858 ला त्यांनी पोर्तुगीजांच्या सैन्यावर चाल केली. त्यांच्याकडून पेडणे आणि साखळी हे महाल परत मिळवले; मात्र या प्रांतातील हळर्ण, तेरेखोल आणि डिचोली हे तिन्ही किल्ले त्यांच्या हाती आले नाही. हे किल्ले सावंतांकडे गेले तर पर्यायाने त्यांच्याशी सख्य असलेल्या पुण्यातील पेशव्यांना किनारपट्‌टीवर बळकट स्थान मिळेल अशी भिती पोर्तुगीजांना वाटत होती. त्यामुळे तत्कालीन गर्व्हनर जनरल हा स्वतः गोव्यातील आमोणे येथील सैन्याला घेवून आला. सावंतवाडीचे सैन्य तेथील एका मंदिराच्या परिसरात होते. पोर्तुगीजांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. यात सावंतवाडीकरांना माघारी यावे लागले.
      पुढे 16 जुलै 1759 ला गव्हर्नर जनरलने सावंतवाडीकरांशी एक गुप्त तह केला. त्यात त्यांनी 25 ऑक्‍टोबर 1754 च्या तहाने पोर्तुगीजांकडे सावंतवाडीकरांचा जो मुलुख होता, तो सर्व किंवा त्याचा काही भाग परत देण्याची पोर्तुगीज सरकारकडे शिफारस करण्याचे मान्य केले; मात्र पुढे तसे प्रत्यक्षात घडले नाही. 1761 मध्ये सावंतांनी पुन्हा पोर्तुगीजांवर स्वारी केली. यात पेडणे, डिचोली, साखळी ही ठाणी पुन्हा हस्तगत केली. याच काळात सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने आताच्या गोव्याच्या हद्‌दीत एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे पेडणे महालाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या केरी येथील रहीवाशी असलेल्या जीवाजी बल्लाळ उर्फ जीवबादादा बक्षी यांचा उदय. जीवबादादा हे अत्यंत पराक्रमी होते. त्याचबरोबर सावंतवाडी संस्थानात जन्मल्यामुळे संस्थानशी स्वामीनिष्ठ होते.
    1756 मध्ये सोळा वर्षाचे असताना ते आपल्या भाग्याच्या शोधात केरी गाव सोडून निघाले. कोल्हापूरहून साताऱ्यात छत्रपतींच्या दरबारी पोहोचले. तेथे काही काळ त्यांनी नोकरी केली. 1761 मध्ये पानीपतची लढाई झाली. यात त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी गाजवलेला पराक्रम पेशव्यांच्याही मनात भरला. पानीपतहून परतल्यानंतर 1762 मध्ये पेशव्यांनी त्यांची ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या दरबारात त्यांचे सेनापती म्हणून नियुक्‍ती केली. तेथे त्यांनी अनेक पराक्रम गाजवले. यामुळे शिंद्यांच्या दरबारात त्यांचे महत्त्व वाढले. पुढे आयुष्यभर त्यांनी आपल्याला मिळालेल्या महत्त्वाचा आपले मुळ स्वामी असलेल्या सावंतवाडी राजघराण्यासाठी उपयोग केला.
     सावंतवाडीकरांची अनेक मोठी कामे जीवबादादामुळे सहज झाली. या सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते शिंदे घराणे आणि सावंतवाडीकरांचा जुळून आलेला नातेसंबंध. त्याकाळात शिंदे घराण्याच्या राजगादीवर महादजी शिंदेसारखे पराक्रमी पुरुष होते. त्यामुळे या घराण्याला आणि ग्वाल्हेर संस्थानाला एक शक्‍तीशाली सत्ताधीश अशी ओळख होती. या घराण्याचा सावंतवाडी संस्थानशी नाते संबंध जुळावा अशी जीवबादादा यांची इच्छा होती. महादजींचे बंधू जयाप्पा शिंदे यांची मुलगी लक्ष्मीबाई या त्यावेळी लग्नासाठी उपवर होत्या. त्यांचा विवाह खेमसावंत तिसरे यांच्याशी झाल्यास सावंतवाडीच्या दृष्टीने ती महत्त्वाची घटना ठरेल, असे केवळ जीवबादादाच नाही तर सावंतवाडी राजदरबारातील मुत्सदी सल्लागारांनाही वाटत होते. त्यांनीही जीवबादादांना तसा प्रयत्न करायला सांगितले होतेच. याच दरम्यान लक्ष्मीबाई यांच्या विवाहासाठी प्रयत्न सुरू झाले.
   लक्ष्मीबाई यांच्या आई सखुबाई शिंदे यांनी महादजी यांना पत्र लिहून आपल्या मुलीच्या लग्नाविषयी लिहिले होते. योगायोगाने महादजींनी ही गोष्ट जीवबादादांना सांगितली. यावेळी जीवबादादांनी क्षणाचाही विलंब न करता सावंतवाडीचे सरदेसाई खेमसावंत तिसरे हे आपल्या पुतणीसाठी योग्य वर आहेत. तुम्ही कोकणात आपले दूत पाठवून खात्री करून घ्यावी असे सांगितले. महादजींनी आपली माणसे सावंतवाडीत पाठवली. जीवबादादांनी ही माहिती सावंतवाडी संस्थानातील मुत्सदी सल्लागार असलेल्या नरोबा व इतर मंडळींना कळवली. एकदिवशी दरबार भरवून शिंदे यांच्याकडून आलेल्या लोकांची आणि राजघराण्याची भेट घडवून आणण्यात आली. महादजी शिंदे यांचा हेतू राजेसाहेब, राजमाता आणि इतर मंडळींना सांगण्यात आला. अर्थातच त्याला होकार मिळाला. पुढे ही मंडळी ग्वाल्हेरला गेली आणि सावंतवाडीकरांचा होकार कळवला. शिवाय सावंतवाडीच्या दरबाराची बरीच तारीफ केली.
    महादजी शिंदे आणि त्यांची भावजय सखुबाई यांना हे स्थळ पसंत पडले. पुढे 1763 मध्ये शिंदे घराण्याचे मुळ जहांगीरीचे गाव असलेल्या श्रीगोंदे येथे खेमसावंत तिसरे आणि लक्ष्मीबाई यांचे लग्न थाटामाटात झाले. त्यावेळी राजांचे वाय चौदा वर्षांचे होते. पुढे खेमसावंत तिसरे यांची आणखी तीन लग्न झाली. दुर्गाबाई, नर्मदाबाई आणि सावित्रीबाई अशी त्यांच्या पत्नींची नावे. यातील दुर्गाबाई या धारराव खानवीलकर यांच्या कन्या, नर्मदाबाई या मानसिंगराव सुरवे तर सावित्रीबाई या हनमंतराव घाटगे यांच्या कन्या.
कुडाळचे महत्त्व मोठे
    सिंधुदुर्गाच्या इतिहासात कुडाळचे महत्त्व मोठे आहे. याचे संदर्भ या आधीच्या लेखात वारंवार आले आहे. कुडाळ प्रांताची देशमुखी पाहणाऱ्या घराण्याचे मुख्य ठाणे कुडाळ शहरातच होते. या शहराने अनेक लढाया पाहिल्या. याच्या केंद्रस्थानी कुडाळमधील भुईकोट होता. हे स्थान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हा भुईकोट आदिलशाहीच्या काळात उभारला गेला. तो कुडाळ परगण्यातील मोक्‍याचा मानला जाई. वेंगुर्ले, मालवण आणि राजापूर या विजापूरच्या अधिपत्याखालील महत्त्वाची बंदरे होती. यातील वेंगुर्ले आणि मालवणवर याच कोटातून नियंत्रण चाले. आता या ठिकाणी घोडेबाव ही एक प्राचीन विहीर, जुन्या बांधकामाचे अवशेष आदी आहेत. भुईकोटाचा पडकोट किंवा मुख्य कोटाचा तट यापैकी फारसे काही शिल्लक नाही. या परीसरात भुईकोटातील इमारत मात्र सुस्थितीत आहे. त्यात सध्या न्यायालयाचे कामकाज चालते

हळर्णची लढाई आणि पोर्तुगिजांचे 'कम बॅक'
By शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : सावंतवाडी संस्थानचे राजे रामचंद्र सावंत आणि त्यांचे काका जयराम सावंत महाराज यांच्या सुरवातीच्या स्वतंत्र कारभार काळात गोव्यात स्थिरावलेल्या पोर्तुगीजांची पिछेहाट झाली; मात्र पोर्तुगीजांचा गव्हर्नर बदलला आणि परिस्थितीही बदलून गेली. पोर्तुगीजांनी सावंतवाडीकरांना शह देत जोरदार 'कम बॅक' केले. यात हळर्ण येथील लढाई सावंतवाडीकरांना धक्‍का देणारी ठरली.
      पोर्तुगीजांसाठी 1737 ते 1740 ही दोन वर्षे नुकसानकारक ठरली होती. वसई भागात पेशव्यांनी आणि गोव्यात सावंतवाडीकरांनी त्यांचा बराचसा मुलुख ताब्यात घेतला होता. 1744 मध्ये गोव्यात "कोंद दी अशुमर' हा नवा गव्हर्नर जनरल पोर्तुगिज सरकारने नेमला. त्याने पोर्तुगीजांचे वर्चस्व पुन्हा राखण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. हळर्ण (गोवा) येथे झालेली लढाई यात महत्त्वाची ठरली. किल्ल्यावर वर्चस्वासाठी झालेल्या या लढाईचे सविस्तर वर्णन पोर्तुगीजांच्या एका संदर्भ पत्रात आढळते. हे पत्र गव्हर्नर जनरल अशुमर यानेच आपल्या पोर्तुगालमधील शासनकर्त्यांना पाठवले होते. ही लढाई समजून घेण्यासाठी या किल्ल्याबाबत जाणून घ्यायला हवे. हळर्ण हे गाव म्हापसा-गोवा येथून साधारण 20 किलोमीटरवर आहे.
        पूर्वी हा भाग सावंतवाडी संस्थानचे अधिपत्य असलेल्या पेडणे महालात यायचा. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांचे हळर्ण गावाशी रोटी बेटीचे संबंध आहे. पोर्तुगिजांना शह देण्यासाठी दुसरे फोंड सावंत यांनी हळर्ण येथे शापोरा नदीच्या काठावर भुईकोट बांधला होता. पुढे यावर पोर्तुगिजांनी वर्चस्व ठेवले. प्रामुख्याने जांभा दगडाचा बांधकामासाठी वापर केलेल्या या किल्ल्याने बरेचसे अवशेष आजही शाबूत आहेत. पोर्तुगिजांनीही पुढे त्याचे नुतनीकरण केल्याचे संदर्भ मिळतात. याला अलोर्णा किल्ला म्हणूनही संबोधले जाते. चार बुरूज, चारही बाजूनी तटबंदी, त्यावर तोफा चढवण्यासाठीचा मार्ग अशी याची रचना आहे.
     याच किल्ल्यावर नवा गव्हर्नर जनरल कोंद दी अशुमर याने पहिला हल्ला केला. याबाबत पोर्तुगीजांनी ठेवलेल्या नोंदीमधील हळर्ण किल्ल्यावरील लढाईचे वर्णन खूप रोचक आहे. 5 मे 1746 ला पोर्तुगीजांनी लढाई करून सावंतवाडीकरांकडून हा किल्ला हस्तगत केला. पोर्तुगीजांनी हल्ल्यासाठी हळर्ण किल्लाच पहिल्यांदा का निवडला याचीही कारणे होती. कोलवाळच्या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या किनाऱ्यावरच हा किल्ला आहे. तिथे याला पोरोकाव नदी असेही म्हणायचे. सावंतवाडीकरांचा हा या भागातील सगळ्यात मजबूत किल्ला होता. तो मिळवला तर रेडी आणि डिचोली किल्ल्यावर हल्ला करणे सोपे जाणार होते;
          पण तो मिळवण इतक सोप नव्हत. यात मुख्य अडचण होती ती दुर्गमतेची. या किल्ल्याजवळ दारूगोळा नेण्याचे आव्हान होते. त्यासाठी गाड्या, ओझी वाहणारे बैल मिळणे मुश्‍कील होते. त्यामुळे माणसांनी हे साहित्य नेणे हाच पर्याय होता. इतके मनुष्यबळ मिळणेही कठीण होते. अशा स्थितीतही गव्हर्नर जनरल अशुमर याने हल्ल्याचा नियोजित आराखडा बनवला. त्याने सैन्याची दोन टप्प्यात विभागणी केली. आधी जमिनीवरील सैन्याचा अधिकारी पेटीपॉटल यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी हळर्णनकडे नेण्याचा आदेश दिला.
          निवडक शिपायांच्या सहा तुकड्या आणि इतर 17 फलटणी मिळून सुमारे चार हजार सैनिक, 80 घोडेस्वार, 150 तोफखान्यातील गोरे शिपाई, 1000 काळे शिपाई, शार्पशुटरची तुकडी अशा सैन्याने 4 मार्च 1746 ला एकत्र येवून हळर्णकडे निघाले. त्याच दिवशी स्वतः गव्हर्नर जनरल 27 गलबतातून शापोरा नदीतून सैन्य घेवून निघाला. दोन्ही सैन्यांच्या तुकड्या बरोबर 10 तासांनी हळर्णला पोहोचल्या. एकाच वेळी केलेल्या नियोजनबद्ध हल्ल्यामुळे या सैन्याला किल्ल्यापर्यंत सहज पोहोचता आले. पहिल्या हल्ल्यात पोर्तुगिजांचा एक शिपाई मृत्यूमुखी पडला आणि सात जण जखमी झाले. यावरून हळर्ण प्रवेश या सैन्याला किती सोपा झाला याची कल्पना येते.
     पूर्व हळर्णला वेढा घालून थांबण्यापेक्षा पोर्तुगिजांनी एकदम हल्ला करून किल्ल्यापर्यंत मजल मारण्याची रणनिती आखली व ते त्यात यशस्वी झाले. पुढे किल्ला मिळवण्यासाठी खटाटोप सुरू झाला. 5 मे 1746ला पहाटे तीन वाजता पोर्तुगिज सैन्याने किल्ल्यावर एकदम हल्ला चढवला. किल्ल्याच्या पहिल्या मोठ्या प्रवेशद्वारावर एक कुलपी गोळा ठेवून तो दरवाजा उडवून दिला; मात्र सावंतवाडीकरांच्या किल्लेदाराने जोरदार प्रतिकार केला. यात पोर्तुगिज सैन्याचे बरेच नुकसान झाले. अनेक सैनिक घायाळ झाले. मृत्यू झालेल्यांची संख्याही मोठी होती. यात पेरीपॉटल हाही जखमी झाला; मात्र त्याने शौर्य दाखवत आपल्या सैन्याला उत्तेजन दिले. आत आणखी दोन दरवाजे होते. ते पार करणे कठीण बनले.
    शेवटी पोर्तुगिज सैन्याने तटबंदिला शिड्या लावून वर चढत आणि खालून हल्ला सुरूच ठेवला. हा हल्ला तसाच काही काळ चालल्यानंतर किल्लेदाराला शरण यायला सांगण्यात आले; पण त्याने याला नकार देत पोर्तुगीजांना धुळ चारण्याचा इशारा दिला. यामुळे उरले सुरले पोर्तुगिज सैन्य आणखी निकराने लढू लागले. आतील दरवाजावर हल्ला सुरू केला. सैनिक तटावर चढू लागले; पण बळकट तटबंदीमुळे हे सैनिक खाली कोसळू लागले. यात पोर्तुगीजांचे आणखी नुकसान झाले. किल्लेदाराच्या प्रतिहल्ल्यात पोर्तुगीजांची मोठी कत्तल झाली. कित्येक अंमलदार मृत्यूमुखी पडले. यातच हळर्ण किल्ल्याचे बुरूज दारूगोळ्याच्या मोठ्या साठ्याने भरल्याची अफवा पोर्तुगिज सैन्यात पसरली. ते घाबरून पळू लागले; मात्र यावेळी पोर्तुगिज सैन्य अधिकारी सार्जंट मेजर पेट्रो व्हिसेंत याने मोठा पराक्रम दाखवत युद्धाचे चित्रच पालटले. आतील दरवाजाच्या समोर लागलेल्या आगीतून वाट काढत त्या दरवाजाखाली कुलपी गोळा ठेवला आणि दरवाजा उडवून दिला. यामुळे पोर्तुगीज सैन्याला किल्ल्यात घुसायला मार्ग मोकळा झाला.
    दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. यात पोर्तुगीजांची सरशी झाली; मात्र युद्ध इथे संपले नाही. आत त्याहून मजबूत दरवाजा होता. तोही कुलपी गोळ्याने उडवण्यात आला. किल्लेदार, किल्ल्यावरचे लोक, अंमलदार यांना पोर्तुगिज सैन्याने अक्षरशः कापून काढले. यावेळी या सैन्याने क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा उल्लेख पोर्तुगीजांनीच आपल्या पत्रात केला आहे. ही लढाई पाच तास चालली. पोर्तुगिज शिपायांनीच या किल्ल्याला 'सान्ता क्रूझ दी अलर्न' असे नाव दिले. विजयाचे प्रतिक म्हणून समोर एक क्रूझ उभा केला. पुढे किल्ल्याची दुरूस्ती करून याचा किल्लेदार म्हणून जुजे लोपेस याला नेमण्यात आले.
     या मोठ्या विजयामुळे पोर्तुगिज सरकारने गव्हर्नर जनरलला "मार्क्‍किस दी अलर्न' हा किताब दिला. पुढे त्याने तेरेखोल, निवती हे किल्लेही सावंतवाडीकरांकडून जिंकले. 26 ऑक्‍टोबर 1746ला डिचोली आणि साखळी या प्रांताच्या देसाईंनी पोर्तुगीजांचे मांडलीकत्व पत्करले. पोर्तुगीजांनी त्यांना सावंतवाडीकरांकडून मिळत असलेले हक्‍क अबाधित ठेवण्याबरोबरच त्यांचे पूर्वीचे गमावलेले हक्‍कही प्रदान केले. शिवाय त्यांना 800 शिपायांची फौज बाळगायला परवानगी दिली. देसाईंना आपल्या धर्माप्रमाणे पूजा करण्यास परवानगी दिली; मात्र मिशनही त्यांच्या प्रांतात प्रार्थनास्थळे उभारत असतील तर त्याला अटकाव न करण्याची अट घातली. देसाईंनी पोर्तुगीजांच्या परवानीविना सावंतवाडीकर राजांशी बोलणी न करण्याचीही अट घातली. त्यांच्या मुलखातील तंबाखूवरील कर, जकात पोर्तुगीजांच्या खजिण्यात जमा करण्याचे आदेश दिले.
हळर्ण किल्ल्यासाठी आटापिटा का?
       गव्हर्नर जनरल अशुमर अर्थात "मार्क्‍किस दि अलर्ण' हा 1750ला बदलून पोर्तुगालला परत गेला. यावेळी त्याने हळर्ण किल्ल्यावरच हल्ला का केला? याची माहिती नव्याने येणाऱ्या गव्हर्नर जनरलसाठी लिहून ठेवली. यात तो म्हणतो, की समुद्रकिनारा नसलेल्या शत्रूच्या मुलुखात स्वारी करणे निरूपयोगी असते. आपण हळर्ण किल्ला घेतला त्याची दोन कारणे होती. एक तर तिथे वाकड्या तिकड्या नदीच्या मार्गातून जाता येते. दुसरे म्हणजे हा किल्ला या प्रांताच्या मध्यभागी आहे. त्यामुळे तो किल्ला मिळवणे म्हणजे सावंतवाडीकरांना जबरदस्त धक्‍का देणे असे मानता येईल. सावंतवाडीकर तह करून साखळीपासून तेरेखोल किल्ल्यापर्यंतचा मुलुख आम्हाला देत असतील तर आम्ही रेडी व निवतीचा किल्ला त्यांना सोडू शकतो. याला सावंतवाडीकर तयार नसले तर निवती आणि रेडी किल्ल्यावर आमची गलबते सहज ताबा राखू शकतील, असे त्यांचे म्हणणे होते.
सौंद्याच्या राजावर हल्ला केला; पण..
      गोव्यातील सौंद्याचा राजा पोर्तुगिजांचा मांडलीक होवून सावंतवाडीकरांचा शत्रू झाल्याचे संदर्भ या आधी आले आहेतच. जयराम महाराजांनी सौंद्यावर हल्ला करण्याची योजना 1743 मध्ये आखली. बार्देसमध्ये थांबलेले पांडुरंग सबनीस मग साखळी, डिचोली भागाची व्यवस्था बघायचे. त्यांना महाराजांनी बांद्यात बोलावून घेतले. त्यांना हेवाळकर, उसपकर देसाई, भीमगडकरी, साखळीकर राणे आदी सरदारांची पथके सोबत आणायला सांगितले. बांद्यात बऱ्यापैकी सैन्य जमले. जयराम महाराज 12 एप्रिल 1743 ला सावंतवाडीतून निघाले. 25 एप्रिल 1743 पर्यंत सैन्यांची जमवाजमव केली जात होती. त्याच दिवशी सौंद्याकडे प्रस्तान करण्यात आले; पण या स्वारीत फारसे काही हाती लागले नाही.







 

































 

   


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...