1) १९५८ मध्ये एक प्रवासी घाईघाईने भोपाळच्या रेल्वेस्थानकावर गाडी पकडण्यासाठी आला. त्याला नागपूरला जायचे होते. गाडी सुटल्यावर सुमारे पाऊण तासाने त्याने खिडकीबाहेर पाहिले तेव्हा त्याला एका डोंगरावर बेड्यावाकड्या आकारांच्या काही प्रचंड शिळा दिसल्या. कुतूहलापोटी त्याने सहप्रवाशाला विचारले, की हे काय आहे. त्यावर तो उत्तरला माहीत नाही नक्की काय आहे ते, परंतु तेथे काही खूप प्राचीन काळातल्या गुहा आहेत असे म्हणतात. गाडी वेगाने पुढे धावत होती आणि ह्या प्रवाशाची नजर दूरदूर जाणाऱ्या त्या शिळांवरून हालत नव्हती. त्याने पुन्हा शेजाऱ्याला विचारले की. पुढील स्टेशन कधी येईल त्यावर त्याने होशंगाबादपर्यंत गाडी कुठेही थांबणार नसल्याचे सांगितले.दहाच मिनिटांनी काही सहप्रवासी आपले सामान उचलून दाराकडे चालू लागले.
"अरे, तुम्ही तर म्हणालात की गाडी मध्ये थांबत नाही." "हो ! ते खरं आहे. पण आमचे गाव इथेच जवळ आहे." "पण तुम्ही उतरणार कसे?" "काही नाही, पुढील स्थानकाच्या अलीकडे एक मोठे वळण असल्यामुळे गाडीचा वेग थोडा मंदावतो आणि आम्ही त्याच वेळेस पटापट उड्या मारतो. आम्हाला हे रोजचेच आहे." याही प्रवाशाने घाईघाईने आपले सामान गोळा केले व त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. वळणावर गाडी हळू होताच त्यांच्या पाठोपाठ यानेही सामानासकट चालत्या गाडीतून स्वतःला झोकून दिले. सवयीचे नसल्यामुळे खाली पडताना अंग भरपूर खरचटले. त्याच अवस्थेत त्याने जवळच असणारे बरखेडा स्थानक गाठले. तिथून नागपूरला आपण येऊ शकत नाही अशी तार करून टाकली आणि त्या डोंगरावरील शिळांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. १५ ते २० मैलांचा तो प्रवास त्याने जंगलातून आणि काट्याकुट्यातून वाट काढत काढत केला आणि उन्हे उतरत असताना तो तिथे पोहोचला. अत्यंत निर्मनुष्य आणि घनदाट अरण्यात असणाऱ्या त्या शिळांखालील एका गुहेत एक साधू राहत असल्याचे त्याला दिसले. त्याने त्यास विचारले, "इस जगह का नाम क्या है ?" साधू म्हणाला, "भीमबेटका." "ऐसा क्यूं ?" "ऐसा माना जाता है, इन शिलाऑपर भीम बैठा करता था। ये तो मानो कि भीम की बैठक है।" त्या प्रवाशाने घरून आणलेला डबा साधूबरोबर संपवून रात्री तिथेच मुक्काम केला. सकाळी त्या जंगलातून वाट काढत शिळांमधील अन्य गुहांचा शोध घेतला. त्यात अनेक ठिकाणी भिंतीवर असंख्य चित्रे काढलेली दिसली. भारतीय चित्रकलेतल्या प्राचीनत्वाचा शोध घेण्याचा तो सोनियाचा दिवस उजाडला होता. त्या संशोधकाचे नाव आहे, विष्णू श्रीधर उपाख्य हरिभाऊ वाकणकर. भीमबेटका येथील चित्रकला
मुर्तीशास्त्राचा अभ्यास करताना काही संज्ञा समजून घ्याव्या लागतात. त्यातीलच एक म्हणजे मुर्तीचा भंग. आसन म्हणजे बैठी मुर्ती, स्थानक म्हणजे उभी मुर्ती तर शयन म्हणजे झोपलेल्या अवस्थेत दाखवलेली मुर्ती.
उभ्या मूर्ती ज्या चार भिन्न अवस्थेमध्ये बनविलेल्या असतात त्या अवस्थांना मूर्तीशास्त्राच्या पारिभाषिक शब्दात भंग असे म्हणतात. मूर्तीचे सौंदर्य तिच्या भंगात असते.
• समभंग -दोन्ही पायावर सारखा भार देऊन शरीर कुठेही न वाकविता ताठ उभे राहणे आणि त्या वेळी दृष्टी समोर असणे याला समभंग असे म्हणतात. समभंग मुद्रास्थितीत मुर्ती बसलेल्या किंवा उभ्या अवस्थेत असली तरी शरीराचे संतुलन राखलेले असते. अर्थात या प्रकारच्या मुर्ती फारश्या आकर्षक वाटत नाहीत. बहुतेकदा ब्रम्हदेव, ऋषी, मुनींच्या मुर्ती समभंग स्थितीत केलेल्या असतात.
समभंग स्थितीतील गणेश मुर्ती
• आभंग :-
शरीराचा वरचा व खालचा भाग या अवस्थेत किंचित वक्र असतो .टाळूपासून निघालेली लंबरेषा नाभीच्या किंचित उजव्या बाजूने जाते. या मुद्रेत शरीराला कंबरेच्या वक्रपणामुळे बाक आलेला असतो. बर्याचदा एक पायही पुढे घेतलेला असतो.
अभंग स्थितीतील नर्तकीचे शिल्प
• त्रिभंग :- त्रिभंग स्थितीत मुर्तीच्या शरीराचे तीन भाग वेगवेगळ्या दिशेत वळालेले असतात. मान, कंबर आणि गुढगे अश्या रितीने वक्र दाखवलेले असतात कि मुर्तीमध्ये एक चेतना जाणवते. मस्तक डाव्या किंवा उजव्या बाजूस कललेले धड डाव्या किंवा उजव्या बाजूस वाकलेले अशा अवस्थेला त्रिभंग म्हणतात त्रिभंगामुळे मुर्तीला डौल येतो; पण अशा मूर्ती तुरळक असतात. बहुतेकदा अप्सरा किंवा सुरसुंदरीची शिल्प या त्रिभंग मुद्रेत घडवलेली असतात.
त्रिभंग मुद्रेतील मुर्ती
• अतिभंग :- यात त्रिभंगापेक्षा अधिक वक्रता असते वरचा भाग पुढे, मागे किंवा एका बाजूला बराच झुकलेला असतो. उग्र देवता, क्रोध देवता यांच्या मूर्ती या अवस्थेत असतात. नटराज शिव आणि इतर नृत्यमग्न मुर्ती याच मुदेर घडवलेल्या असतात. यामध्ये मुर्तीची मान, कंबर, मनगट, घोटा हे सर्व निरनिराळ्या बाजुला वक्र झालेले दाखवलेले असते. यामुळेच याला अतिभंग मुद्रा म्हणतात.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकामध्ये काही आजीवक पंथातले मुनी हे सम्राट अशोकाला भेटले आणि त्यांनी एका कायमच्या आश्रयाची मागणी केली. आपल्या शेजारच्या देशामध्ये लेणी कोरण्याची कला ही अत्यंत विकसित अवस्थेला गेलेली होती. त्या वेळेस आपल्या शेजारचा देश म्हणजे आजचा इराण, इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि काश्मीर पासून कर्नाटकपर्यंत सम्राट अशोकाचे राज्य पसरलेले होते. इराण मधल्या नक्श-ई-बहाई या ठिकाणी इ. स. पूर्व १००० पासूनच लेणी कोरली जात होती. अशोकाला काही आजीवक पंथाच्या भिक्षूनी विनंती केल्यामुळे त्यांना एकांतात साधन करता यावी म्हणून त्याने बाराबर येथे काही लेणी कोरून घेतल्या. तिच भारतातील पहिली लेणी! बाराबार हे स्थान आजच्या पटना शहरापासून दक्षिणेकडे ७५ कि.मी. अंतरावर आहे. त्या परिसरातील डोंगरात ग्रॅनाईटच्या विशाल शिलांमध्ये ही लेणी कोरण्यात आली. तिथे एकूण लहान मोठ्या अशा ३२ लेण्या आहेत. त्यातील लोमश ऋषी गुंफा ही भारतातील पहिली लेणी आहेत. मानवी हातांनी कोरलेल्या गुंफेला लेणे किंवा लेणी असे म्हणतात. या लेण्यांमध्ये गजपृष्ठाकाराचे छत असून सर्व लेण्यांमधं आतील बाजूने भिंतींना आणि छतावर विलक्षण झिलई करण्यात आलेली दिसते. त्या भिंतीवर कुठे हात लावल्यास संपूर्ण पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत असल्याचे जाणवते. याला 'मौर्यन् पॉलिश' असे म्हणतात. मौर्य काळानंतर पुढील काळात दगडांना असे गुळगुळीत करण्याची कला कुठे दिसत नाही. या लेण्यांमध्ये अनेक शिलालेखही कोरलेले आहेत.
आदिम काळापासून जेव्हा बुद्धिमान माणूस पृथ्वीवर वावरायला लागला तेव्हापासूनच त्याने दृश्य-अदृश्य शक्तींना कधी भक्तिभावाने तर कधी भीतीभावाने पुजायला सुरवात केली. उत्क्रांतीच्या ओघात हळूहळू जशी बौद्धिक क्षमता वाढू लागली तशी त्याने अजून आणि अजून सुंदर मंदिरांची उभारणी सुरु केली. खरतर मंदिर ही कल्पनाच किती सुंदर आहे. भारतीय स्थापत्यातील एक महत्त्वाचा स्थापत्य प्रकार म्हणजे मंदिर स्थापत्य.प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. पण त्याही आधी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात होती.
आपण लहानपणी देवळात जातो. मोठे होताना प्रत्येकाच्या बौध्दीक जडणघडणीनुसार विचारात बदल होतात आणि नास्तिक मानसिकता झाली कि मोठेपणी ती व्यक्ती मंदीरात जातेच असे नाही.पण देवळांबद्दलचे एक आकर्षण मनात घर करून रहातेच. ही भावना सर्व भारतीयांच्या मनात शेकडो वर्षे घर करून राहिली आहे.त्यामुळे संपुर्ण भारतभुमीमध्ये शेकडो मंदीरे आढळतात. हिंदू धर्मात अनेक देव असल्याने त्यात भर पडते. वर्षानुवर्षे कलाकारांनी अपार कष्ट करून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यामुळे देवळे भक्तांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आकर्षणे ठरली आहेत. तर अशी ही देवळे बांधावयास सुरवात तरी केंव्हा झाली ? किंवा असे विचारले की सर्वात पुरातन देऊळ पहावयाचे असेल तर ते कोणत्या शतकातील असेल ? तर याबाबतीत बहुतेकांचा अंदाज चुकीचा असेल. इ.स. पूर्वी किमान २००-२५० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
आपल्याकडे अनेक प्रेक्षणीय, महत्त्वाची स्थळे येता-जाता वाटेवर असूनही आपल्याकडून ती सहजपणे दुर्लक्षित होतात. समाजाचे दुर्लक्ष आणि सरकारच्या उपेक्षेतून हळूहळू अशी स्थळे दृष्टिआड होऊ लागतात. पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे जिल्हय़ातील नसरापूरजवळचा ‘स्वराज्य स्तंभ’ही असाच वर्तमान आणि समाजाशी नाळ तुटलेला! पुण्याहून तीसएक किलोमीटरवर नसरापूरफाटा. याला चेलाडी असेही म्हणतात. या जागेवरूनच पुरंदर, भोर, रोहिडा, रायरेश्वर, राजगड, तोरणा, सिंहगड आदी ऐतिहासिक स्थळांकडे मार्ग फुटतात. शिवरायांच्या स्वराज्याचेच जणू हे प्रवेशद्वार! स्वराज्य स्थापनेस जेव्हा तीनशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा या स्थळीच तत्कालीन भोर संस्थानने हा स्तंभ उभारला.
महामार्गावरील वर्दळीमुळे आज हा सारा भाग हॉटेल, टपऱ्यांनी व्यापून गेला आहे. या टपऱ्यांच्या गर्दीतच स्वराज्याचा हा स्तंभ शोधावा लागतो. पण इथे पोहोचल्यावर त्याची भव्यता आणि दर्शनाने थक्क व्हायला होते. एका मोठय़ा बांधीव चौथऱ्यावर हा तब्बल नऊ मीटर उंचीचा स्तंभ! तळाशी चौकोनी, मध्ये अष्टकोनी, त्यावर गोलाकार आणि शिरोभागी कलश-श्रीफळ घेतलेला! यातील चौकोनी भागाच्या चारी अंगांना संगमरवरात लेखांचे, तर त्याच्यावर अर्धवर्तुळाकार महिरपींमध्ये विविध विषयांवरचे शिल्पपट बसवलेले.
पश्चिम दिशेने स्मारकात शिरलो, की या बाजूचा देवनागरीतील लेखच आपल्याला या स्मारकाची माहिती देत पुढे येतो- छत्रपति श्री शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रांतील या प्रदेशांत स्वराज्याचा पाया घातला. त्या घटनेचा त्रिशत्सांवत्सरिक उत्सवाच्या प्रसंगी हा स्मारकस्तंभ भोरचे अधिपती श्रीमंतराजे सर रघुनाथराव पंडित पंतसचिव के. सी. आय. ई. यांनी उभारला शके १८६७ छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६४५ मध्ये रायरेश्वरावर स्वराज्याची जी शपथ घेतली त्यास १९४५ मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाली. याबद्दल त्या वर्षी तत्कालीन भोरचे संस्थानिक श्रीमंतरघुनाथराव पंडित पंतसचिवांनी ( शके १८६७ ) यावर्षी हा स्तंभ उभा केला. वरील लेखातील याच आशयाचा मजकूर उर्वरित बाजूंवर संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेत कोरला आहे. या लेखांच्या वर महिरपीमध्ये एकेक शिल्पपट बसवलेला आहे. यामध्ये पश्चिम अंगास स्वराज्य स्थापनेचा प्रसंग, उत्तर अंगास धनुष्यबाण आणि बाणांनी भरलेला भाता दाखवला आहे. पूर्वेस शिवमुद्रा कोरली आहे. तर दक्षिण अंगास ढाल-तलवारीची छबी संगमरवरात उतरवली आहे. यातील पश्चिम अंगाचे शपथ सोहळय़ाचे शिल्प तर आवर्जून पाहावे असे आहे.
या शिल्पपटात खांब, महिरपी, कोनाडय़ातून मंदिराची रचना साकारली आहे. मधोमध ती आई भवानी अष्टभूजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात विराजमान आहे. तर तिच्या पुढय़ात कुमारवयातील शिवबा त्यांच्या सवंगडय़ांसह स्वराज्याचे दान मागत आहेत. प्रसन्न भाव, पाय दुमडलेले आणि दान घेण्यासाठी हात उचललेला अशी शिवबांची मुद्रा. बरोबरचे सवंगडीही त्याच भक्तीच्या भावात. भोवतीने ढाल-तलवार, धनुष्यबाण, कु ऱ्हाड आदी शस्त्रे खाली ठेवलेली. उठावातील हे सारे शिल्प, त्यातील पात्रे त्रिमितीचा उत्तम भास निर्माण करतात. फक्त एकच गोष्ट, शिवाजीमहाराजांनी हिरडस मावळातील रायरेश्वर मंदिरात शपथ घेतलेली असताना इथे भवानीमातेसमोर हा प्रसंग कसा सादर केला हे कळत नाही. या शिल्पांच्या जोडीनेच या स्तंभाच्या चौथऱ्यावर तत्कालीन स्वराज्यातील स्थलखुणा दर्शविणाऱ्या संगमरवरी पट्टय़ा बसवल्या आहेत. मराठी-इंग्रजी भाषेतील या मार्गदर्शिकांवर तत्कालीन गावे-शहरे, गडकोटांचे उल्लेख, त्यांची या स्तंभापासूनची अंतरे दिलेली आहेत. उत्तरेस सुधागड ४१ मैल, सिंहगड साडेअकरा मैल, तुंग ३९ मैल, तिकोना ३८ मैल; आग्नेयेस पुरंदर ६ मैल; नैर्ऋत्येस आंबाड खिंड १६ मैल, भोर ८ मैल, रोहिडा १२ मैल, आंबवडे साडेचौदा मैल, रायरेश्वर साडेअठरा मैल तर पश्चिमेस राजगड साडेतेरा मैल आणि तोरणा १९ मैल अशी माहिती दिलेली आहे. या साऱ्यांतून जणू स्वराज्याचा भूगोलच जोडला जातो. या भूगोलातून मग इतिहास नाचू लागतो.
शिवकाळ, त्याचा इतिहास जागवणारे असे हे स्मारक. पण आज मात्र ते उपेक्षेच्या खाईत आहे. दुर्लक्षित, एका कोपऱ्यात बंदीवानाचे जीवन जगत आहे. त्याच्यावरील काही शिल्पपटांना हानी पोहोचली आहे तर काही लेखांवरची अक्षरे पुसू लागली आहेत. या साऱ्याला वेळीच वाचवले नाही तर एका स्मारकाचेच स्मरण करण्याची वेळ येईल. पुर्वी याच्यावरील अंतराच्या खुणा दगडावर कोरलेल्या होत्या त्या नष्ट झाल्याने सध्या तीथे संगमरवराची पट्टी कोरून चिकटवलेली दिसते. खरेतर महामार्गालगत असलेल्या या स्मारकाभोवती एखादी बाग फुलवली, या स्मारकाची माहिती लावली तर येत्या-जात्या साऱ्यांनाच त्याचे महत्त्व कळेल. चार पावले इथे थांबतील, इतिहासाची खरी प्रेरणा घेऊन पुढे जातील.
सिंहगड म्हणले कि आपल्या समोर नाव येते ते नरवीर तानाजी मालुसरे यांचे. वास्तविक तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव कोंडीवली, तर आजोळ म्हणजे उमर ! स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणारा शुर योध्दा. तानाजीनी पोटापाण्यासाठी गाव सोडले आणि पुण्यात शिवबाची लालमहालात भेट झाली आणि पुढे रायरेश्वरावरील स्वराज्याच्या शपथेपासून सुरु झालेला प्रवास, सिंहगडावर ४ फेब्रुवारी १६६६ ला थांबला. तानाजीला वीरमरण जरी सिंहगडावर आले तरी काही लोकांच्या मते त्यांचे अंतिम क्रियाकर्म त्यांच्या मुळ गावी, म्हणजे उमरठला करायचे ठरले, त्यासाठी तानाजींचे शव तोरण्याजवळच्या घाटातून खाली कोकणात उतरवले गेले आणि उमरठला पोहचले. या घाटाला नाव पडले "मढ्या घाट". रायगडाच्या भवानी टोकावरुन समोरच हा मढ्या घाट दिसतो. उमरठला अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याठिकाणी समाधी उभारली गेली असे मानले जाते. तर काही अभ्यासकांच्या मते सिंहगडावरच तानाजींचा अंत्यसंस्कार केला गेला.
पुढे या समाधीचा जीर्णोध्दार झाला आणि नरवीर तानांजीच्या रहात्या वाड्याच्या जागेवरच सभोवती एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखी तटबंदी उभारली गेली. आतमधे आवेशात उभारलेला नरवीर तानाजीचा पुतळा आहे.
आतमधे शेलारमामा आणि नरवीर तानाजीं यांच्या समाधी एकमेकांजवळच उभारल्या आहे.याचे अनावरण १६ एप्रिल १६६५ रोजी करण्यात आले. दरवर्षी तानाजीची पुण्यतिथी इथे साजरी होते.
गावाजवळच एक घळ आहे, तानाजींच्या वडीलांच्या मृत्युनंतर लहानग्या तानाजी आणि सुर्याजीला घेउन तानाजीच्या आईने तिथे मुक्काम केला होता.जवळच एका झाडाच्या ढोलीत त्यांची तलवार ठेवली आहे. विनंती केल्यास गावकरी ती आपल्याला दाखवितात.
पेमगिरी गावाच्या दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा नावाच्या भागात एक विशाल वटवृक्ष आहे. वादळ-वा-याला तोंड देत अनेक वर्षांपासून तो तेथे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरवर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे.या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. रक्तबंबाळ झाले. पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत! या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही येथेच अखेरचा श्वास घेतला. आपल्या भावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले. आणि भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करतच तिनेही प्राण सोडला. पुढे या जागेवर रामोशांनी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली.मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. कुणी जाणीवपूर्वक फांद्या तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा बसली. त्यामुळे झाडाचा कुणी विध्वंस करत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला. त्या त्या वेळी त्या त्या लोकांना अद्दल घडली गेली, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. कारणं काहीही असोत, पण हा वट वृक्ष दिवसेंदिवस त्यामुळे विस्तारत गेला. आजमितीस हा महाराष्ट्रातला सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की. महाराष्ट्रातील हा महावृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, निसर्गप्रेमी या ठिकाणी आवर्जून येत असतात. कोलकात्याजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये आपल्या देशातील सर्वात विशाल वटवृक्ष आहे. देशभरात त्याखालोखाल येथील वटवृक्ष विस्ताराने मोठा असल्याचा दावा केला जातो. त्या झाडाचं वय काही शतके नक्की असणार. या पारंब्यांच्या मधून आपल्याला आतपर्यंत जाता येते. मध्यभागी शेंदूर फासलेले काही दगड, वीरगळ ठेवलेले आहेत. या वडावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळेच हा वटवृक्ष अजून उभा आहे. जशी अनेक आंब्यांची आमराई होते तशी ही भल्यामोठय़ा वडाची वटराई इथे पाहायला मिळते. कलकत्त्याच्या शिवपुरी उद्यानातील वडाचे झाड तसेच दक्षिण भारतातील अडय़ार इथला वटवृक्ष हे प्रसिद्ध आहेत. पेमगिरीचा हा भव्य वटवृक्ष तितकाच दर्जेदार आहे.
पाचगणीच्या पारशी पॉईंट्वर उभारले कि कातळटोपी घातलेला एक डोंगर समोर उत्तरेला दिसतो. त्याचा एकुण आकार लक्षवेधी आहे, मात्र एक फोटो काढला कि सर्वसामान्य पर्यटकांचे काम संपते आणि हा डोंगर एक प्राचीन गड याचीही उत्सुकता फार कोणी दाखवत नाहीत. पर्यटकांच्या किंवा शिवप्रेमींची अलिकडेच वर्दळ वाढलेल्या रायरेश्वर पठार चढउतार करताना समोर पुर्व दिशेला शंभुमहादेव डोंगररांगेतील मांढरदेव शिखरावर असलेला टोपीच्या आकाराचा सुळका आपले लक्ष वेधुन घेतल्याशिवाय रहात नाही. मांढरदेव डोंगररांगेवर असलेला हा सुळका म्हणजे किल्ले केंजळगड . एकाच डोंगर रांगेवर असलेले रायरेश्वर व केंजळगड केवळ एका खिंडीने एकमेकांपासुन वेगळे झाले असुन रायरेश्वर पठार पुणे जिल्ह्यात तर केंजळगड सातारा जिल्ह्यात मोडतो. भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्याच्या वाई प्रांतात असलेला हा किल्ला हिरडस मावळचाच एक भाग आहे.
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. गडाच्या कोरीव पायऱ्या व तळात असलेली खोदीव गुहा त्याच्या प्राचीनत्वाचे दाखले देतात. घेराकेंळजा, केंजळगड अथवा केळंजा अशा विवीध नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला ओळखला जातो. इ.स. १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. स्वराज्याच्या सीमेवरला हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. अल्याड भोर परगणा जो महाराजांचा ताब्यात होता आणि पल्याड वाई परगणा जो आदिलशीत होता,असा भू-राजनैतिक आणि लष्करी महत्व असलेला हा किल्ला ऐन राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर शत्रूच्या ताब्यात असणं धोकादायक होतं. म्हणूनच शिवरायांनी एक बेत ठरवला. अचानक हल्ला करून केंजळगड स्वराज्याच्या सेवेत दाखल करायचा. मोहिमेची आखणी झाली. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बिनीची फौज आणि त्यावरील शिलेदार निश्चित झाले.शत्रू गाफील असताना रात्रीच्या मुहूर्तावर सुलतानढवा करून गडावर मोर्चे लावायचं पक्क झालं. स्वतः शिवाजी महाराजच या हल्ल्याचे नेतृत्व करणार होते.राज्याभिषेक केवळ 40 दिवसांवर आलेला असताना महाराज मोठं धाडस करायला तयार झाले होते. मला सांगा, आजचा कोणता नेता स्वतःचे प्राण असे धोक्यात घालायला तयार होईल? राज्याभिषेकाची एकीकडे रायगडावर गडबड सुरू असताना महाराज मात्र इकडे राज्यसाधनेच्या मागे लागले होते! आपल्याकडे एक संस्कृत वचन आहे. साहसे श्री: प्रतिवसति! अर्थात जिथे साहस आहे तिथे यश हमखास आहे. चैत्र वद्य १४,शके १५९६, इंग्रजी दिनांक २४ एप्रिल १६७४(ज्युलियन दिनांक)! केंजळगडवर शत्रूचा मोठा करोल पहारा होता. गंगाजी नाईक किरदत्त नावाचा एक मराठी किल्लेदार आदिलशहाच्या वतीने गडावर किल्लेदार म्हणून तैनात होता. महाराजांनी स्वतः मावळयांची निवड केली आणि त्या निवडक सेनेसह माहाराज बिनीचे सेनापती होऊन त्यानी किल्ल्यावर एकच एल्गार केला. गंगाजी एक कसलेला योद्धा आणि रांगडा, मर्द शिपाईगडी होता. मराठी आणि आदिलशाही सेना एकमेकांना भिडल्या. स्वतः माहाराज त्या सैन्याचे नेतृत्व करत होते. त्यामुळे प्रत्येक मराठी छाव्याला आपसूकच दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले होते.
मराठयानी पराक्रमाची शर्थ केली. गंगाजीनेही मोठा पराक्रम गाजवला. काहीं मावळ्यांना त्याने धारातीर्थी पाडले पण त्याने मराठे बिलकुल कचरले नाहीत. अखेर तो विजयाचा क्षण समीप आला. लढता लढता गंगाजी नाईक किरदत्त पडला. केंजळगड स्वराज्यात सामील झाला. आदिलशाही निशाण उतरवून किल्ल्यावर मराठ्यांनी भगवे निशाण फडकवले. विशेष म्हणजे गंगाजीचा पुत्र सिदोजीने वाईच्या सुभेदाराकडे अर्ज केला,'मी आपला हिंदु गुलाम असून बाप मृत्युमुखी पडला तरी माझी चाकरी चालु रहावी व माझी दुसर्या ठिकाणी नेमणुक चालु रहावी'. एकीकडे महाराष्ट्राला सिंहासनाधिष्ट राजा मिळत असताना काही मराठ्यांची हि मानसिकता अनाकलणीय आहे.
पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.सातारा प्रांतातील काही मोजक्या किल्ल्यांमधुन ब्रिटिशांना प्रतिकार झाला त्यात केंजळगडचे नाव येते. या किल्ल्यांवरून इंग्रज सैन्यावर तोफा डागल्या गेल्या पण आजमितीला किल्ल्यावर एकही तोफ दिसुन येत नाही. या भागात असलेल्या किल्ल्यावरील तोफांचे नेमके काय झाले हा एक अभ्यासाचा विषय आहे. इंग्रज अधिकारी एलफिन्स्टन गडाविषयी लिहिताना म्हणतो, 'जर हा किल्ला चांगल्या रीतीनें लढविला तर शत्रूस अभेद्य आहे.'
गेल्या शतकात मुर्तीपुजेच्या प्राचीनत्वाचा शोध घेण्यासाठी जे संशोधन झाले, त्यात भारतीय मंदीर स्थापत्याला कशी व कधी सुरवात झाली, याचाही शोध घेण्यात आला. भारतात सापडलेल्या प्राचीन मुर्ती बुध्दाच्या व कुषाणकालीन असून त्या अनुक्रमे गंधार व मथुरा शैलीत आहेत. त्यामुळे मुर्तीपुजा व मंदीरस्थापत्य या बाबी भारतीयांनी ग्रीकांकडून किंवा भारताच्या वायव्य परिसरात वस्ती करुन असलेल्या ग्रीक संस्क्रुतीकडून आल्या असाव्यात असे गृहित धरण्यात आले आहे.कारण वैदिक संस्कृतीत देवांना आहुती द्यायची असेल तर यज्ञात आहुती दिली जाई. म्हणजे अग्नी त्या आहुती देवांपर्यंत पोहचवतो, अशी धारणा होती. त्यामुळे यज्ञविधी हाच पुजेचा एकमेव प्रकार होता. मुर्तीपुजेचे उल्लेख वेदामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे देवाच्या मुर्ती बनवणे व मुर्तीसाठी वास्तु म्हणजेच मंदीर बांधणे हि संकल्पनाच वेदकाळात माहिती नव्हती. अर्थात याबाबत तज्ञांंध्ये मतांतरे आहेत. युरोपियन तज्ञांच्या मते जशी मुर्तीपुजा वैदीक धर्माला ज्ञात नव्हती, त्याचप्रमाणे त्यानंतर निर्माण झालेल्या जैन व बौध्द धर्मियांनाही हि संकल्पना नवीन होती. मात्र युरोपियन तज्ञांचे हे मत भारतीय विद्वांनानी विशेषत आनंद कुमारस्वामी यांनी पुरावे सादर करुन मुर्तीपुजा व मंदीर स्थापत्याची मुळे सुरवातीच्या काळात प्रचलित असलेल्या यक्षपुजेत असल्याचे दाखवून दिले.
याबाबत सपुंर्ण अभ्यास करण्यासाठी धार्मिक वाहमय, उत्खननात आढळलेले पुरावे, एतिहासिक वस्तु आणि पुरावस्तु याचा सकल अभ्यास केल्याने असे लक्षात आले कि इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकात वैदीक, जैन आणि बौध्द अश्या विवीध धर्मीयांना देवाच्या सगुण उपासनेची तीव्र गरज भासली
अर्थात मुर्तीपुजा सुरु झाली तरी मुर्तीचे स्वरुप कसे असावे, तीची वैशिष्ट्ये काय असावीत ? हे सर्व स्थानिक कलाकारांवर अवलंबून होते. ज्या भागात ग्रीक धर्माचा प्रभाव होता, त्या परिसरातील लोकांनी शिव, विष्णु किंवा बुध्दाची मुर्ती ग्रीक देवतेशी साम्य असलेल्या स्वरुपात साकारली. तर ज्या प्रेदेशात हा ग्रीकांचा प्रभाव नव्हता, त्यांनी या मुर्ती साकारताना आधीपासून प्रचलित असलेल्या यक्षमुर्तींशी साम्य असलेल्या असलेल्या स्वरुपात साकारल्या. सुरवातीच्या काळात बांधलेली मंदीर म्हणजे दगडी फरशी किंवा शिळाफलकावर देवाची मुर्ती आणि सभोवताली दगडी कठडा हे सर्व एखाद्या झाडाखाली असत. यामध्ये मुर्तीच्या खाली असलेल्या शिळेवर त्या देवतेचे वाहन कोरलेले असे. तसेच प्राचीन काळी पुजा केल्या जाणार्या देवतांना एखाद्या स्तंभावर कोरले जाई. या स्तंभाना ध्वज म्हणण्यात येई.या ध्वजावर म्हणजेच स्तंभावर जे लांछन कोरलेले असे त्यावरुन त्याच्या नावापुढे ध्वज हा शब्द लावून त्या राजाचे नाव घेतले जाई. उदा. गरुडध्वज, मकरध्वज. श्रीकृष्णाचा नातु प्रद्युम्न मकर हे लांछन वापरत असे म्हणून त्याचा उल्लेख भागवतात मकरध्वज म्हणून येतो. श्रीविष्णु गरुडध्वज तर बलराम तालध्वज म्हणून पुराणात विख्यात आहेत.
या पुजास्थानाचे वेगळेपण दिसावे व त्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्याभोवती दगडी कठडा असे. राजस्थानातील घोसुंडी येथील स्तंभावर इ,स. पुर्व पहिल्या शतकातील शिलालेख आहे. त्यात नारायण नामक देवाच्या पुजास्थानाभोवती म्हणजे नारायण वाटीक भोवती उभारलेल्या दगडी कठड्याचा उल्लेख, गुड्डीमल्लम येथे सापडलेले कायालिंग, सांची, भारहुत येथे दगडात कोरलेली अश्या प्रकारची उदाहरणे म्हणजे मंदिर स्थापत्याची प्रारंभिक स्थिती आहे. या पुज्य वास्तु म्हणजे प्राथनिक काळातील मंदीर आणि त्याच्या परिसरात असणारी झाडे यांच्याभोवतॉ असलेल्या झांडाच्या भोवती दगडाचा वापर करुन प्रकार म्हणजे संरक्षक भिंत बांधलेली असे. याचा पुरातत्वीय पुरावा म्हणजे तात्कालीन नाण्यावर असे चित्र बघायला मिळते. अगदी त्याकाळच्या मंदीर म्हणजे झाडाखाली असलेल्या मुर्तीवर दगडाचे छत घातले जाइ. अर्थात झाडे वाढली कि ती छत तोडून बाहेर पडत. हे माहिती असून देखील असेच छत घातले जाई. याचा अर्थ त्याला काहीतरी धार्मिक मह्त्व असले पाहिजे.
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये काही मंदिरे बांधली गेली, परंतु त्यातील एकही वास्तू सापडलेले नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देवायतन असा उल्लेख येतो. कुठल्या चौकात कुठले मंदिर असाई असेही त्रोटक उल्लेख आहेत. परंतु ह्या सगळ्या लहान वास्तू असाव्यात असे वाटते. मूर्तिशास्त्राचे निका प्रमाणित झाल्यावर या मूर्तीना कुठेतरी बसवले गेले पाहिजे हे तर नक्कीच होते. त्यासाठी प्रचलित लेणी कोरण्याच्या पद्धतीमध्ये लेणी मंदिरे करण्याचा प्रयोग झाला. गुप्त वंशाचा चंद्रगुप्त द्वितीय (इ.स. ३८० ते ४२०) याच्या कारकिर्दीत मध्य प्रदेशमध्ये विदिशाजवळ लेणी मंदिर कोरण्याचा प्रयोग झाला आजच्या भिलसा या गावी 'उदयगिरी गुंफा' या नावाने ते प्रसिद्ध आहे. यामध्ये एकाच डोंगरात दोन- तीन मंदिरे करण्याचा तो प्रयोग होता. त्यातल्या एका गुहे बाहेर स्तंभावर आधारित छत असेहे करण्याचा प्रयोग केला. आज तो भाग अस्तित्वात नाही. यामध्ये एक केवळ शेषशायी विष्णूचेही शिल्प एका गुहेत कोरले आहे. त्याच्या शेजारी वराहाचे मोठे शिल्प असलेली गुंफा हे तेथील सर्वात मोठे लेणीमंदिर. यातील मूर्तीचे तपशील पुढे येतीलच. देशातील अन्य काही लेणी मंदिरांमध्ये कर्नाटकातील बदामी, ऐहाळे (इ.स.६. वे-७ वे शतक), आंध्र प्रदेशमधील अक्कण्णा मादण्णा, मोगलाजपुरम्, उंडवली (इ.स.७ वे ८ वे शतक), महाराष्ट्रातील वेरुळ (क्रमांक १४ ते ३१), घारापुरी-मुंबई, पाताळेश्वर-पुणे (इ.स. ७ वे ते ९ वे शतक) यांचा उल्लेख करता येईल. उदयगिरी लेणी, विदिशा
सोनगडाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ च्या दरम्यान जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, कांगोरी, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हे किल्लेही स्वराज्यात दाखल करून घेतले. ह्यातील काही गड केवळ टेहळणीसाठी वापरत असल्यामुळे ते घेणे फारसे अवघड गेले नसावे पण ते घेण्यासाठी त्यांनी नेमका कुठला मार्ग घेतला ते इतिहासाला माहित नाही पण हे सर्व किल्ले नोव्हेंबर व डिसेंबर १६५७ ह्या दोन महिन्यात घेतल्याचे दिसुन येते. महाराज पन्हाळगडावर अडकले असता राजापुरच्या इंग्रजांनी विजापूरकरांना केवळ दारुगोळाच पुरवला नाही तर सिद्धी जोहारच्या सैन्यात येऊन इंग्रजी निशाण फडकावीत तोफा डागल्या त्यामुळे पन्हाळ्याच्या कोंडीतून सुटल्यावर मार्च १६६१ मध्ये एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळ महाराज राजापुरास धडकले. राजापुर वखारीचा रेसिडेंट रेव्हिंग्टन व काही इंग्रजाना पकडून कैद केले. त्यातील दोन इंग्रज कैदेतच मरण पावले. या कैद्यांना महाराजांनी रायगडजवळील सोनगड येथे आणले व त्यांना रावजी पंडितांच्या स्वाधीन केले. हे कैदी काही काळ सोनगडावर कैदेत होते. शेवटी रेसिडेंट रेव्हिंग्टन आजारी पडला तेव्हा बरे होताच परत येण्याच्या अटीवर तो १७ ऑक्टोबर १६६१ रोजी सुरतेस गेला. पुरंदर तहात मोघलांना दिलेल्या २३ किल्ल्यात सोनगडाचा उल्लेख येतो. मात्र महाराष्ट्रात तीन सोनगड असल्याने नेमका कोणता याचा गोंधळ होतो. अर्थात यावेळी कणकवलीजवळचा सोनगड आणि सिन्नरजवळचा सोनगड शिवाजी राजांच्या ताब्यात नसल्याने, रायगडाजवळचा सोनगड महाराजांनी मोघंलाना दिला असला पाहीजे. अर्थात पुढे लगेचच दोन वर्षांनी हे सर्व गड महाराजांनी परत घेतले. यानंतर सोनगडचा उल्लेख इ.स.१८१७ मध्ये पेशवे दफ्तरात मिळतो. यात रायगड ताब्यात घेतल्यावर पेशव्यांनी सोनगड भागाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी ३०० पायदळ नेमल्याची नोंद आढळते.
पुरातत्त्वामध्ये बौद्ध गुंफा, जैन गुंफा हे त्या त्या पंथाच्या अनुयायांनी कोरल्यामुळे त्या शैलींचे नामाभिधान आहे. वैदिक परंपरेतून हिंदू लेण्यांची निर्मिती झाली. तसेच मूर्तिशास्त्रातही जैन, बौद्ध आणि हिंदू कला हे त्या शैलींचे नामकरण केले आहे. कनिष्काने दिलेल्या प्रोत्साहनामुळे बौद्ध आणि संस्कृत साहित्याची निर्मिती होऊ लागली. बौद्ध पंथ हा राजाश्रयामुळे सुदृढ होता. वैदिक पंथामध्ये मात्र सम्राट अशोकानंतर आमूलाग्र परिवर्तन सुरू झाले. हिंदू समाजातील वर्णाश्रमामुळे अनेक हिंदू हे जैन किंवा बौद्ध धर्माकडे आकृष्ट होत होते. यज्ञ संस्था सुरू होती. मात्र त्यातील बळीची प्रथा बंद झाली आणि पूजापद्धतीमध्ये भक्तिमार्गाचा उदय झाला. अनेक जाती जमातींच्या दैवतांचा, शिव, विष्णू आदी प्रमुख दैवतांबरोबरच हिंदूंच्या इतर देवांचा देवतागणात समावेश झाला. याचबरोबर देवाच्या दारी सर्व एक या सूत्राने समाजाला एकरूप ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून
भक्तिमागनि खूपच जोर धरला. विष्णूची चार रूपे न राहता त्याचे अनेक अवतार झाले. तर शिवाचे लिंग रूपातील पूजन होत असून सुद्धा त्याचे, पार्वती, गणपती, कार्तिकेयासह परिवाराचेही पूजन होऊ लागले. या सर्व देवासंबंधीच्या कथा त्या वेळच्या पुराणांमध्ये प्रथम आल्या. चौथ्या शतकानंना देशामध्ये सत्ता पालटाचे वारे वाहू लागले आणि गुप्त घराण्याचा उदय होऊन मौर्यांसारखेच अत्यंत प्रबळ सत्ता केंद्र स्थापन झाले. पुराण कथांच्या रोचकतेमुळे त्या अत्यंत लोकप्रियही झाल्या (आजो आहेत). ह्याच बरोबर पुराणिकांनी एक मोठे कार्य असेही केले की त्यांच्या प्रवचनात त्यांनी रामायण आणि महाभारताप्रमाणेच पुराण कथाही सांगायला सुरुवात केली. हे काम संपूर्ण देशभर केले गेले असे दिसते. यामुळे देशाची वैचारिक एकात्मता दृढपणे प्रस्थापित झाली. याच काळामध्ये देशात राष्ट्रीय ऐक्याची भावनाही सुनिश्चित झाली (इसवी सनाच्या चौथ्या शतकात) आणि राष्ट्रवादाचा उदय झाला. चाणक्याच्या काळीही अशीच राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करून त्याने बाल्हीक प्रांतावरील ग्रीकांचे आक्रमण मोडून काढले होते.
पुराण कथांना दृश्य रूप दिल्यास त्यांचे ग्रंथांशिवाय जतन आणि संवर्धन होऊ शकेल असे त्या काळातील काही धुरीणांना वाटले. देवांच्या कथा तर होत्याच आणि त्याप्रमाणे त्या कथांचे रंगभूमीव नृत्य नाट्यातून सादरीकरणही सुरू होते. त्यामुळे त्यांना मूर्ती रूपामध्ये परिवर्तित करावे असे वाटणे स्वाभाविक होते. लेणी कोरणाऱ्यांच्या परंपरेमुळे उत्तम छिन्न्या, हातोड्या करण्याचे शास्त्र विकसित झाले होते. तसेच उत्तम शिल्पेही तयार झाली होती. आधीच्या काळातील विष्णूच्या व्यूहांच्या प्रतिमांऐवजी आता विष्णूचे अवतार साकारता येणार होते. त्याच बरोबर ब्रह्मा, नवग्रह, गंधर्व इ. देव तसेच लक्ष्मी, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, सप्तमातृका या स्त्री देवतांबरोबरच अन्य व्यंतर देवताही आकार घेऊ लागल्या. या सर्वांमध्ये समानता यावी यासाठी दोन गोष्टी करणे आवश्यक होते. एक म्हणजे त्यांचे स्वरूप नक्की करणे आणि दुसरे म्हणजे त्यांचे प्रमाणीकरण करणे. हे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मात्र एक अत्यंत कल्पक आणि व्यवच्छेदक निकष लावला गेला. त्याचे नाव 'लांछन', देवदेवतांची वाहने आणि त्यांच्या हातातील शस्त्रे याला 'लांछन' असे म्हणतात. याच्या निश्चितीमुळे शंकर म्हणजे त्रिशूल, डमरू, भुजंग, चंद्र आणि गंगाधारी. त्याचे वाहन नंदी. विष्णू म्हणजे शंख, चक्र, गदा आधि पद्मधारी ज्याचे वाहन गरुड. याचप्रमाणे सर्व देवतांची लांछने ठरवली गेली. या काळानंतर केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर कुठेही हिंदू देवतांच्या मूर्ती करताना या नियमात तसूभरही फरक केलेता दिसत नाही. मूर्तीचे प्रमाण, सुबकता, प्रतिभा, नवनवीन प्रयोग, विविध भौगोलिक परिस्थितीमुळे केशभूषा, वेशभूषा, राहणीमान आणि आहारामध्ये प्रांताप्रांतात विविधता येऊ शकते, इतकेच नाहीत त्याला अनेक भाषांची जोड आहे. एकच भाषा दर सहा मैलावर वेगळी बोलली जाते. तसेच भौगोलिक प्रदेशाप्रमाणे वेशभूषा आणि आहार पद्धती सुद्धा भिन्न असणे स्वाभाविक होते. परंतु त्यामुळे परकीय अभ्यासकांच्या मते भारतात अनेक संस्कृतींचे मिश्रण होते असा गैरसमज झाला आणि या भ्रामक कल्पनेचा प्रचार आणि प्रसार आजचे विद्वानही करताना दिसतात. परंतु वरील बाह्य निकषात एकात्मता असूच शकत नाही. या देशाच्या एकतेचे व सांस्कृतिक एकात्मतेचे सर्वात प्रबळ पुरावे म्हणजे हिंदू देवता, मूर्ती आणि प्राचीन मंदिरे. ज्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की इथे एकच संस्कृती नांदत होती, आजही नांदते.
ऐतिहासिक वास्तू या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. एखाद्या गडावर गेल्यावर आजही मराठी मावळ्यांचा पराक्रम आठवून ऊर अभिमानाने भरून येतो. किल्ल्यांप्रमाणेच अजून एक महत्वाची वास्तू म्हणजे लेण्या.लेण्या त्या त्या काळातील सामाजिक,आर्थिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थितीचे संदर्भ आपल्यापर्यत पोहचवतात. ‘लेणी’ म्हणजे डोंगर, टेकडी पर्वत, खडक कोरून तयार केलेली गुहा. संपूर्ण भारतात मिळून एकूण १२०० च्या आसपास लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास ८०० लेण्या या फक्त महाराष्ट्रात आढळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील अग्निजन्य खडक हा अशा प्रकारच्या कोरीव कामासाठी अनुकूल होता. हा खडक मध्यम कठोर असून यावर कोरीव काम करणे सहज शक्य होते. घारापुरी, कान्हेरी, महाकाली अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने बौध्द्,हिंदु ( ब्राम्हणी ) व जैन लेणी दिसतात.आपण या मालिकेत तिन्ही धर्माच्या लेण्यांची माहिती घेणार आहोत.अजिंठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी तर परदेशी पर्यटकसुद्धा गर्दी करतात.
या लेण्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक वास्तू आहेत. सर्वात जास्त गुहा बौद्ध धर्मियांसाठी केलेल्या आहेत. विविध धर्मांच्या आश्रयदात्यांनी त्या कोरण्यासाठी सढळ हातांनी दानधर्म केला. या लेण्या घडवण्यासाठी बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या राजांकडून ही भरघोस मदत घेतली जायची. आतापर्यंतच्या संशोधनानुसार महाराष्ट्रात लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व पहिले -दुसरे शतका पर्यंत मागे नक्कीच खेचता येईल. भाजे, कार्ले, बेडसे या लेण्या या अगदी सुरवातीच्या काळात कोरण्यातआल्या असे संशोधकांचे मत आहे. सम्राट अशोकाने अंदाजे तिसऱ्या शतकात बिहार येथे बांधलेल्या लोमसऋषि लेणीचा महाराष्ट्रातील लेण्यांच्या घडणीत प्रभाव दिसून येतो.
एकीकडे काळानुसार मंदिराची आंतरबाह्य रचना बदलत होती, तर दुसरीकडे मुर्तीच्या संबंधीही अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या अंगाने विचार होत होता. मंदिरांची तुलना मानवी देहाशी केली जाऊ लागली. मंदिराच्या विविध अंगाना नावे देण्यात आली, त्यामुळे मानवाच्या देहाप्रमाणे मंदिरांचे सुध्दा भाग निर्माण झाले. मानवाचा गर्भ म्हणजे मंदिराचा गाभारा. जसा गर्भात मानवाचा आत्मा असतो तसा गाभार्यात सृष्टीच्या आत्म्याचा सहवास असतो. "यथा देह तथा देव', असे मानले जाऊ लागले. मंदिर म्हणजे केवळ दगड विटांची एक इमारत न राहता हिंदु तत्वज्ञानाला आकार आणणारी वास्तू असे तिचे स्वरुप झाले. मनुष्य देह आणि देवळाचे भाग यांच्यात साम्य दाखवण्यात आले. उदा. केस म्हणजे कळस, आमलक म्हणजे डोके, मान म्हणजे ग्रीवा असे वर्णन अग्निपुराणात मंदिराबद्दल करण्यात आले आहे.
मंदिरात पावित्र्य आणि भक्तीचे वास्तव्य असल्यामुळे त्याच्या प्रत्येक भागाला अर्थ असतो. त्यामागे एक उद्देश असतो.जिथे देव प्रतिष्ठीत होतो त्याला गाभारा म्हणतात. गाभार्या शिवाय देऊळ असू शकत नाही. त्यानंतर येतो तो सभामंडप. सभामंडप ही एक प्रशस्त जागा असते. जिथे भक्तगण थांबू शकतात, शांत चित्ताने बसू शकतात. या सभामंडपाला किती दरवाजे असावेत हे त्याच्या व्याप्तीवर अवलंबून असते. सभामंडप आणि गाभार्या मध्ये असणार्या जागेला अंतराळ म्हणतात. सभामंडपाच्या समोर एक छोटा मंडप असतो याला मुखमंडप म्हणतात. सभामंडपात मधोमध असेणार्या चार खांबांमध्ये जमिनीवर एक उंचवटा असतो त्याला रंगशिला म्हणतात. देवाची उपासना कलेच्या माध्यमातून करावी आणि ती सादर करण्याची जागा म्हणज "रंगशिला'. सभामंडपाच्या छताचे सुध्दा भागांनुसार प्रकार पडतात. या सभामंडपाला असणार्या खिडक्यांना "जालवातायने" असे म्हणतात. संपूर्ण मंदिराच्या बाहेर असणार्या जागेला प्राकार म्हणतात.
१५ ) सामानगडाचा इतिहास :- कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जातो. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन २९ सप्टेंबर १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व ८ मार्च १७०२ रोजी शहामीर यास किल्लेदार नेमले. यावेळी साबाजी क्षीरसागर गडाचे किल्लेदार होते. सन जुलै-ऑगस्ट १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली.
धारवाड प्रांताचे प्रांत अधिकारी दाजीकृष्ण पंडित यांच्या गद्दारीमुळे इंग्रजांनी हलकर्णीच्या माळावर तळ ठोकला. सामानगडचे किल्लेदार मुंजाप्पा कदम यांचा पुत्र दौलतराव यांनी इंग्रजांवर हल्ला चढवला. मराठयांनी विजय मिळवला. पण दौलतराव इंग्रजांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्या जिजाबा या नोकराने व चंद्रा या दासीने तमासगिरांचे सोंग घेऊन इंग्रजांपुढे नाचून दौलतरावांची सुटका केली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, रविवारची युद्धबंदी इंग्रजांनी पुकारून देखील शेवटी सामानगडावर तोफा डागल्या. साडेतीनशे सैनिकांनी जोराचा प्रतिकार केला. दारूगोळा कमी पडला; पण मराठे डगमगले नाहीत. मुंजाप्पा कदम यांची सून चिमाक्कानं हाती तलवार घेऊन ती चोरखिंडीत रणचंडिका होऊन उभी ठाकली. गो-या माकडांना कापत सुटली. साडेतीनशेहून अधिक इंग्रजांना तिनं यमसदनाला पाठवलं. आपला पती युद्धात शहीद झाल्यामुळे तिने सती जाण्याचे ठरवले आणि चितेत उडी घेतली. इंग्रजांच्या तोफा व बंदुकांपुढे मोजक्या असणा-या मराठय़ाचा टिकाव लागला नाही. शेवटी मुंजाप्पा कदम महादरवाजाजवळ हातात काठी घेऊन विरासन घालून बसले. कॅप्टन उठरणने त्यांच्या छातीत गोळी घातली; पण त्याअगोदरच मुंजाप्पा अनंतात विलीन झाले होते. मुंजाप्पा कदम यांच्या निश्चल प्रेताला देखील इंग्रज घाबरत होते. शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. या परिसरातील भुदरगड, रांगणा,महिपालगड्,वल्लभगड या किल्ल्यांच्या मधोमध सामानगड असल्याने रसद पुरवण्याच्या दृष्टीने एकदम चांगला असा हा किल्ला. त्यामुळेच याच महत्व अनन्य साधारण. यावर रसद, दारुगोळा वगैरे ठेवत असत त्यामुळे या गडाला सामानगड हे नाव पडले असावे.
बौध्द भिक्षु आणि व्यापारी यांच्यातील संबंधामुळे बौध्द भिक्षुंची वर्दळ व्यापारी मार्गावर जास्तीतजास्त असायची.सहाजिकच बौध्द लेणी आपल्याला व्यापारी मार्गाच्या नजीक कोरली गेलेली दिसतात.व्यापार्यांनी हि लेणी कोरण्यासाठी मोठ्या प्रमाणात दान दिलयाचा परिणाम म्हणून लेणी कोरण्याच्या शैलीत मोठ्या प्रमाणात चांगले बदल झाले.केवळ निवासासाठी गुंफा या संकल्पनेपासून अधिकाधिक कोरीवकाम व आकर्षकपणात वाढ झाली.विहार आणि चैत्यगृहातून मोठ्या प्रमाणात कोरीवशिल्प्,भित्तीचित्र,उठावदार नक्षीकाम केले गेले.तसेच लेण्याचा समोरचा भाग कमानी,स्तंभ आणि नक्षीकाम करुन सजवला जाउ लागला.विहार फक्त रहिवासासाठी असले तरी ते कोणत्या काळात उभारले त्याप्रमाणे त्याच्या स्वरुपात बदल घडत गेले.तर चैत्यगृहात बुध्दाची प्रतिमा मानून स्तुपाची पुजा केली जात असे. हा काळ होता इ.स.पुर्व दुसरे शतक ते सहावे शतक.
साधारण पाचव्या शतकानंतर आणखी प्रमुख बदल झाले.यामध्ये महत्वाचा बदल म्हणजे स्तुपाएवजी थेट भगवान बुध्द्दांची मुर्ती लेण्यात कोरली जाउ लागली आणि त्या प्रतिमेची पुजा होउ लागली.चैत्यगृहात आणि स्तुपांवरही जातककथेवर आधारीच भित्तीचित्र चितारली जाउ लागली तसेच भिंतीवर कातळ कोरुन या कथांची शिल्प खोदली गेली. अगदी विहारामध्येही असेच शिल्पकाम बघायला मिळते.
हीनयान ( थेरवादी पंथीय ) लेण्यात असणारा स्तुप
महायान पंथीय लेण्यात असणारी बुध्द प्रतिमा
हिनयान आणि महायान अशा दोन कालखंडात या लेण्यांचे प्रकार प्रामुख्याने विभागले जातात. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहित धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना महत्त्व होते. बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटना चार प्रतीकांच्या द्वारे दर्शविल्या जात. जन्माचे प्रतीक हत्ती (श्वेत गज), ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र(धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रीतीने हीनयान पंथाची कला दिसून येते. हिनायन पंथ बुद्धांच्या मूळ शिकवणीचे पालन करतो. आत्म-शिस्त व ध्यान यांच्याद्वारे हे मोक्ष मिळवणे यावर भर देतात. हीनयान लेणी प्रामुख्याने चार शतकांच्या काळात बहरली.हा काळ प्रामुख्याने सातवाहन राजवटीशी जुळतो.नंतर हि प्रक्रीया खंडीत झाली.इ.स. पाचव्या शतकानंतर लेण्यांचे खोदकाम पुन्हा नव्या जोमाने सुरु झाले.हाच टप्पा महायान पध्दतीच्या लेण्याचा.हे कोरीवकाम प्रामुख्याने आठव्या शतकापर्यंत म्हणजे चालुक्यांच्या कारकीर्दीपर्यंत सुरु राहीले. हीनयान पंथीयांच्या मान्यतेप्रमाणे मनुष्य मेला कि देवही त्याला पाहु शकत नाही.सहाजिकच हीनयान पंथीय लेण्यात बुध्द प्रतिमा नव्हती.हि लेणी शैली आणि एकंदरीत अलंकरणात साधी पण विचारगर्भतेत मात्र भव्य्,भारदस्त.
महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमांची निर्मिती झाली. बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्रा-प्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रा, भूमीस्पर्श मुद्रा, अभय मुद्रा, वितर्क मुद्रा हे त्याचे काही प्रकार. महायान पंथीयांनी त्यांच्या लेण्यात केवळ बुध्द प्रतिमा न कोरता त्यांची आवडती दैवत अवलोकीतेश्वर्,बोधिसत्व्,पद्मपाणी यांच्या प्रतिमा कोरल्या.इतकच नव्हे तर आधी अस्तित्वात असणार्या हीनयान पंथीय लेण्यांमध्ये दैवी मुर्ती स्थापन करुन त्यांचे रुपांतर करण्याचा प्रयत्न केला.नाशिकची पांडवलेणी किंवा कान्हेरी लेण्यात हे पहायला मिळते.
हीनयान काळ इ. स १५० ते २०० च्या आधीचा समजला जातो. मुळात हीनयान ही संकल्पना तेव्हा नव्हतीच. नंतरच्या काळात बुद्धपूजेला मूर्तीरूपात मान्यता मिळाली आणि महायान (श्रेष्ठ वाहन) हा पंथ सुरु झाला. त्यांनी बोधिसत्वाच्या स्वरूपात मूर्तीपूजा चालू केली तसेच पूर्वीच्या पंथाला काहीसे हीन /कमी प्रतीचे समजण्यात येऊन हीनयान नाव मिळाले.मुळात मूर्तिपूजा भगवान बुद्धांना अपेक्षित नव्हतीच. पण देवापेक्षा त्याला भजणार्या भक्तांची ताकदच मोठी असते या उक्तीप्रमाणे असे बदल अपेक्षितच धरायला हवेत. अशा बदलांमुळे त्या त्या धर्मांचे मूळ उद्दीष्टच हरवले जाते.
याशिवाय वज्रयान हा बौध्दधर्माचा आणखी एक पंथ.इ.स.सहाव्या शतकात मैत्रेय याने तांत्रिक वज्रयान या गुप्त तत्वज्ञान-उपासनेचे कलम महायान पंथावर केले.चतुर्हस्त्,राजवेषातील व मुकुटात अमिताभची ( पाच ध्यानी बुध्दापैकी एक.अन्य चार वैरोचन्,रत्नसंभव्,अमोघसिध्दी व अक्षोभ्य ) मुर्ती दर्शविणारा अवलोकीतेश्वर हे या पंथातील सर्वसामाईक दैवत.महाराष्ट्रात अवलोकीतेश्वराची प्रतिमा प्रथम सहाव्या-सातव्या शतकात औरंगाबाद येथील लेणी क्र.७ मध्ये खोदली गेली.त्यानंतर ती अनेक ठिकाणी अस्तित्वात आली.रत्नागिरी जिल्ह्यात खेडजवळ पन्हाळेकाजी येथील लेणी क्रमांक १० या लेण्यात हातात खडग व तर्जनीपाश घेतलेली ,डावा हात,गुढघा जमीनीवर टेकलेली महाचंडरोषणची भयंकर प्रतिमा,तर मुंबईतील कोंदीवटे ( अंधेरी पुर्व ) लेण्यातील महाकाल हि अन्य वज्रयान दैवते.आज लडाख, हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पिती,नेपाळमध्ये शेर्पाचा सोला खुंबु, तिबेट्,मंगोलिया,जपान्,चीन इथे आचरल्या जाणार्या तांत्रिक बौध्द धर्माचा उगम या वज्रयान पंथात आढळतो.
अशाप्रकारे निर्गुण्,निराकार उपासनेपासून ते अनेकेश्वरवादी तंत्रसाधनेत झालेले रुपांतर याचा सह्याद्री साक्षीदार आहे.
हिंदु लेण्यांची वैशिष्ट्य :-
हिंदु लेणी हि भारतात सर्वत्र दिसतात.हि लेणी बौध्द लेण्यांपासून प्रेरणा घेउन उभारल्याने त्यांची रचना साधारण तशीच दिसते.एकप्रकारे बौध्द लेण्याच्या वास्तुरचनेच्या विकासाचा हा पुढचा टप्पा.हि लेणी साधारण इ.स. चौथे ते आठवे शतक या कालावधीत कोरली गेली.हिंदु लेण्यांसाठी बौध्द लेणी हि प्रेरणा असली तरी हिंदु धर्मातील रुढी आणि परंपरेचा प्रभाव पडून हिंदु लेण्याच्या वास्तुरचनेत बदल झालेला दिसतो.हिंदु धर्मातील सर्वात मह्त्वाचे ग्रंथ रामायण्,महाभारत तसेच दशावतार हे लेण्यांमध्ये कोरलेले दिसतात.हिंदु लेण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे द्रविड काळाच्या प्रभावामुळे मंडप आणि रथ उभारलेले दिसतात.मंड्प हे दोन किंवा अधिक दालनांचे असते.इथे पुजापाठ केली जात असत.रथ हा बहुधा एकाच दगडातून कोरला जाई.
हिंदु लेण्याची उदाहरण
जैन लेण्यांची वैशिष्ट्य :-
लेण्यांच्या स्थापत्याचा अखेरचा टप्पा म्हणजे जैन लेणी.जैन लेणी इ.स.सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत कोरली गेली.अर्थात जैन लेण्यां सुरवातीच्या काळात कोठे कोरल्या गेल्या हे आज सांगणे कठीण आहे.या सर्व लेण्यात जैन धर्मातील तीर्थंकरांचे शिल्प पहायला मिळतात.महाराष्ट्रातील वेरूळ आणि तामिलनाडुतील सित्तानावसल इथे लेण्यांच्या छतावर रंगीत चित्रे दिसून येतात.या लेण्यात अलंकरण मोठ्या प्रमाणात दिसते.जैन लेणी हा लेण्यांच्या वास्तुविशेषाचा सर्वोच्च अविष्कार मानता येईल.
महाडबंदरातून नेण्यात येणारा माल रायगडाजवळच्या कावळ्या घाटातून आणि मढ्या घाटातून नेला जात असे. सहाजिकच महाडवरुन उत्तरे दिशेने जाणार्या या मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि व्यापारी तांड्याच्या संरक्षणासाठी लष्करी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. यापैकी एक चांभारगड उर्फ मंहेद्रगड.
या गडाबध्दल एक मजेदार दंतकथा आहे. शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी वसविल्यानंतर रायगडाच्या रक्षणासाठी त्यांना परिसरात नवे किल्ले वसवायचे होते. हे काम महत्वाचे असल्याने त्यासाठी कोणावर हि जबाबदारी न सोपवता स्वतः महाराज वेष पालटून डोंगरदर्यात फिरत होते. एक दिवस ते फिरता फिरता चांभारखिंडीजवळच्या झोपडीपाशी आले.त्या झोपडीत एक वृध्द बाई एकटीच रहात होती. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्याबरोबरचे लोक झोपडीत शिरले आणि जेवणाची व्यवस्था होउ शकेल का? याची विचारणा केली. तीनेही मोठ्या आपुलकीने सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. जेवणाचा बेत अगदी साधा होता, कढी आणि भात. वेषांतर केलेले शिवाजी महाराज जेवायला बसले. वृध्द बाईने आधी भात आणी मग कढी वाढली. शिवाजी राजांच्या ताटातील कढी भातातून पसरून ताटाबाहेर वाहू लागली. त्यावर ती वृध्दा महाराजांना म्हणाली, "साध कढीला पाल घालायला जमत नाही ! तुझं अगदी त्या शिवाजी राजासारखं आहे, तो एकीकडे गड-मुलुख जिंकत जातो अन दुसरीकडून शत्रु हल्ला करुन तो भाग पुन्हा ताब्यात घेतो". म्हातारीच्या या परखड बोलण्यामुळे महाराज चांगलेच चपापले. राज्याला बळकट गडांची किती गरज आहे ते त्यांच्या चांगलेच लक्षात आले. चांभाराने पारणी टोचावी तसे त्या म्हातारीचे बोल त्या जाणत्या राजाच्या चांगलेच लक्षात राहीले. पुढे महाराजांनी त्या टेकडीवर गड उभारला व त्याला नाव दिले चांभारगड. अर्थातच या दंतकथेत कोणतेही तथ्य नाही. एकतर शिवाजी महाराज पहिल्यापासून किल्ल्यांचे महत्व जाणत होते,प्रत्येकवेळी मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी नवे दुर्ग उभारले, त्यासाठी अश्या कोण्या वृध्देच्या सल्ल्याची गरज नव्हती. दुसरे महत्वाचे म्हणजे चांभारगड आधीच अस्तित्वात होता, शिवाजी राजांनी त्याची उभारणी केली नाही. याच चांभारगडासंदर्भात आणखी एक दुर्गकथा. चांभारगडावर शिवाजी महाराजांनी एका शुर चर्मकाराची गडकरी म्हणून नेमणूक केली. शत्रु आला तर गडमाथ्यावर जाळ करुन त्याची सुचना रायगडाला देण्याची व शत्रुसैन्याचा हल्ला झाला तर प्रसंगी त्यांचा मुकाबला करण्याची कामगिरी या वीरावर सोपवली होती. अर्थात या वीरपुरुषाने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी चोख बजावली. त्यावर महाराजांनी खुष होउन त्याला ईनाम देण्याचे ठरविले. त्यावर शुरपुरुष म्हणाला, 'मला गायवाट चामड्याच्या दोर्याईतक्या लांबीची जमीन बक्षिस द्यावी'. अर्थातच हि मागणी महाराजांनी मान्य केली. त्याने एखाद्या कसबी कारागिराकडून बारीक दोर काढून घ्यावा आणि तो चांभारखिंडीतील एखाद्या जागी बांधून दोर तुटेल तिथंपर्यंत चालत जायचे. जिथे तो दोर तुटेल तिथपर्यंत जमीन त्या चर्मकार वीराची असे ठरले. हा दोर तुटला तो महाडच्या वीरेश्वर मंदिरापाशी. ती सर्व जमीन अर्थातच त्याच्या मालकीची झाली. या हि दंतकथेत फार अर्थ नाही. असे म्हणतात कि चांभारगडावर एक शिलाखंड असून त्यावर चांभारकामासाठी लागणार्या हत्याराच्या आकृती कोरल्या आहेत. तसेच महाडच्या चवदार तळ्याशेजारी पुर्वी चांभारतळे होते. या तळ्यातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याने हत्यारांना धार लावली तर ती उत्तम लागत असे.
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी.
बुलढाणा जिल्ह्यात मेहेकर हे तालुक्याचं ठिकाण आहे जालना देऊळगावराजा, सिदखेड राजा, सुलतानपूर, मेहेकर, डोणगाव, मालेगाव अकोला या रस्त्यावर मेहेकर गाव आहे. अजिंठा टेकड्यांच्या पायथ्याजवळून पैनगंगा वाहते अन् या पैनगंगेच्याच काठी लावण्यसुंदर अशी श्री शारंगधराची प्रतिष्ठापना झाली आहे.
मत्स्यपुराणात मेघंकर (मेहेकरचे मूळ नाव) नगरीचा उल्लेख आढळतो. तो असा-
एतेषु पितृतीर्थेषु, श्राद्धमानन्त्यमश्नुते।
तीर्थं मेघंकरं नाम, स्वयमेव जनार्दन ॥ ३१ ॥
त्याचप्रमाणे गौतमी माहात्म्यामधील श्लोकही मेघंकर नगरीचं वर्णन करतो
पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते." तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे या मुर्तीची सविस्तर माहिती घेण्यापुर्वी याचा इतिहास समजून घेउया. जंबू द्वीप आणि भारतवर्ष या नावाने ओळखला जाणारा भारत हा इतिहासापेक्षा जुना आहे जोपर्यंत कला, इतिहास, पुरातत्व आणि धर्माचा संबंध आहे, तो प्रत्येकापेक्षा दुर्मिळ आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना आहे. या प्राचीन भूमीतील अशा दुर्मिळ आणि मौल्यवान खजिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील पेनगंगा नदीच्या काठावर मेहकर नावाचे एक महान पुरातन ठिकाण आहे. प्राचीन काळी ती मेघणकर नगरी म्हणून ओळखली जात होती आणि त्याचा उल्लेख स्कंद पुराण, पद्म पुराण, मत्स्य पुराण आणि आईन--अकबरी मध्ये आढळतो. नदीकाठच्या जंगलात अनेक ऋषी-मुनी राहत होते. पौराणिक कथेनुसार, सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात, भगवान ब्रह्मदेवाने एक भव्य यज्ञ सुरू करताना आपल्या प्रणितपत्र’ वापरून पेनगंगा नदीची निर्मिती केली. या नदीत डुबकी मारणे आणि आपल्या दिवंगत नातेवाइकांचे श्राद्ध येथे करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या वनवासाच्या काळात प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता नाशिकजवळील पंचवटीला जाताना या भागात गेले. मेहकरमध्ये हरण टेकडी किंवा हिरण टेकडी नावाचे एक ठिकाण आहे, जिथे श्री रामाने हरणाची शिकार करून मारते असे म्हणतात. त्या जागेची खूण करण्यासाठी आता तिथे एक जीर्ण मंदिर आहे मेघनकर नावाचा एक दैत्य या परिसरात राहत असे आणि ऋषींच्या यज्ञकुंडाना अपवित्र, करून आणि त्यांची हत्या करून खाऊन त्यांच्या कर्मकांडात आणि तपश्चर्यामध्ये गंभीर व्यत्यय आणत असे. ऋषीमुनी आणि ऋषींनी अनेक वर्षे भगवान हरीची त्यांच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली. स्थानिक पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या प्रसिद्ध सारंग किंवा शारंगा धनुष्याचा वापर करून राक्षसाचा वध केला. असे असू शकते की स्वतः श्री रामानेच असुराचा वध केला होता ज्याप्रमाणे त्याने जंगलात प्रवास करताना इतर अनेकांना भारले होते. भगवान रामाचे धनुष्य सारंगा या नावानेही प्रसिद्ध आहे.मरणासन्न मेधनकरांच्या प्रार्थनेवर, परमेशराने त्या जागेचे नाव मेघनकर ठेवण्यास सहमती दर्शविली, जी नंतर मेहकरमध्ये बदलली गेली. कृतज्ञ साधु आणि मुनींनी परमेश्वराला त्याच्या चतुर्भुज स्वरुपात (चतुर्भुज विष्णु स्वरूप) राहण्यासाठी प्रार्थना केली, चक्र, गदा, पद्म आणि शेख यांसारख्या विविध प्रतीकांच्या विशिष्ट स्थानामुळे देवतेला बालाजी म्हणून ओळखले जाते पण शारंगधर का? परमेश्वराच्या चार हातामध्ये धनुष्य दिसत नाही. याचे उत्तर असे की देवतेच्या मुकुटात शारंगा धनुष्य घरलेल्या भगवान विष्णूची बसलेली प्रतिमा आहे. शारंगधर बालाजीचे देवता ११.५ फूट उंच आहे आणि मंदिराच्या पुजाऱ्यानुसार गंडकी पाषाणाच्या एका स्लॅबमधून कोरलेले आहे. मराठीत पाषाण म्हणजे दगड गंडकी पाषाणचा अर्थ एकच आहे तो म्हणजे शालिग्राम शिळा कारण हे दगड नेपाळमधील गंडकी नदीत मोठया प्रमाणात आढळतात.
या मुर्तीच्या शोधाची कथाही काही कमी रोचक नाही. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १८९०, शुक्रवार म्हणजे ७ डिसेंबर १८८८ रोजी त्या छोट्या खेड्यात एक आश्चर्यजनक नि खळबळजनक घटना घडली. श्री. रामभाऊ भिते पाटील यांनी इमारती बांधण्यासाठी पाया खोदण्याचं काम सुरू केलं. मातीच्या खाली दगड अन् विटांचा थर लागला. तो दूर करण्याचं काम सुरू झालं. कुदळीच्या घावाबरोबर 'खण्ण' असा धातूचा आवाज आला. रामभाऊंनी काम थांबवलं अन् हातानं माती बाजूला सारली. खोदकाम करताना मजूराना एक मोठा लाकडी आयताकृती पेटी सापडली. त्या पेटीचा आकार पाहून ते थक्क झाले. ती १५ फूट लांब आणि अडीच फूट रुंद होती. हिरवा-निळा झालेला तांब्याचा तो पत्रा होता, येथे दगडावर कोरलेल्या बाणाचं टोक असलेल्या दिशेकडे खालच्या मूर्तीचं मस्तक होतं. दोन-अडीच सें.मी. जाडीचा अन् तब्बल पावणेदोन मीटर रुंदीचा हा तांब्याचा पत्रा होता. सर्वांना गुप्तधनाचीच शंका आली. पत्र्याखाली लाकडाचा (बहुदा चंदनाच्या लाकडाचा) भुसा होता. तो भुसा दूर करताचा काळ्याभोर चकचकीत पाषाणी मूर्तीची साजिरी पदचिन्हे आढळली. गावच्या प्रतिष्ठित मंडळींना बोलावून हळुवार हातानं मूर्ती मोकळी केली. शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेली श्रीविष्णूची प्रसन्न मूर्ती सर्वांना दिसली. भगवान विष्णूंची ती देखणी मूर्ती अप्रतिम सौंदर्याचा साक्षात नमुना होती. हिंदू दिनदर्शिकेनुसार ती होती मार्गशीर्ष शुक्ल पंचमी, शुक्रवार, श्रवण नक्षत्र, गोरज मुहूर्त, नाग दीपावली. छोट्या गावात ही बातमी वेगाने पसरली.
.. देव निघाला म्हन्तात्...' करत आजूबाजूच्या गावांमधून हीऽऽ गर्दी जमली. हळद-कुंकवाचे सडे पडले, नगारा झडला अन् ग्रामजोशांनी- श्रीपत भटजींनी यथासांग पूजा केली. आरती झाली. साखर वाटली.
होता होता ही वार्ता बुलढाण्याच्या कलेक्टरच्या कानावर गेली. मूर्तीबरोबर सापडलेलं अतिशय महत्त्वाचं ताम्रपट बुलढाण्याला रवाना झालं होतं; पण मूर्ती मात्र अजूनही मेहेकरलाच होती.
मूर्तीच्याच पीठाच्या खाली त्याच दगडाचा एक एकसंध निमुळता भाग सुमारे एक मीटर होता. तो तिथल्याच एका कडुनिंबाच्या वृक्षासमोर खड्डा खणून त्यात तो निमुळता भाग घालून बुंध्याच्या आधारे ही मूर्ती उभी केली होती. रोज तिची पूजाअर्चाही सुरू झाली होती.
२०)
रायगडावर शिवस्मारकाची आबाळ पाहून व्यथित होणारे सर रिचर्ड टेंपल हे आता बुलढाण्याचे कलेक्टर होते. शिवस्मारक अन् रायगडाची रेखाचित्रे स्वतः काढून आपल्या अधिकारात तेथील दुरुस्ती व देखरेखीच्या आज्ञा देणारा हा इंग्लिश अधिकारी होता. घोड्यावर बसून हे जिल्हाधिकारी मेहेकरला आले. मूर्तीचं अपूर्व सौंदर्य पाहून ते प्रसन्न झाले. विलायतेमध्ये ही मूर्ती पाठवली, तर तेथील वस्तुसंग्रहालयाचं ते भूषण ठरेल, हा विचार त्यांच्या मनी आला.टेंपल साहेबांना ती मूर्ती म्हणजे एक शिल्प वा मूर्ती वाटत होती. पण इथल्या गावकऱ्यांना 'इथे अवतरले भगवान' असं वाटत होतं. आपापल्या परीनं दोघांचंही बरोबर होतं.मूर्ती नेण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना करून साहेब बुलढाण्याला परतले अन् इकडे खळबळ माजली.त्यावेळी गावचे तहसीलदार अंबादास संती देशपांडे नावाचे गृहस्थ होते आणि पोलीस पाटील रंगनाथ जोशी होते. लंडनमधील ब्रिटीश म्युझियममध्ये जतन करण्यासाठी इंग्रजांनी मूर्ती इंग्लंडला नेण्याचा निर्णय घेतला होता हे त्यांना समजले. त्यांनी स्थानिक लोकांना माहिती दिली आणि सुचवले की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा विधी अभिषेक लवकर करावा, कारण एकदा मूर्तीचा अभिषेक झाला की तिची नियमित पूजा करावी लागते आणि ती हलवता येत नाही. मात्र, त्यावेळी शुभ मुहूर्त किंवा मुहूर्त उपलब्ध नसल्याने काय करावे, या संभ्रमात ते पडले होते. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला.यावेळी जानकीराम आप्पा पाठक, रामभाऊ पिटे पाटील, अण्णासाहेब देशमुख आदी गावातील काही प्रतिष्ठित व ज्येष्ठ मंडळींनी शुभ मुहूर्त वगैरेची तमा न बाळगता देवतेला अभिषेक करण्याचा निर्णय घेतला..पहाटे ४ वाजता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्रघोषाने झाली. मुर्तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला.
मूर्ती नेण्यास खुद्द टेंपलसाहेब येण्याच्या दिवशी भोवतालच्या सर्व खेड्यापाड्यांतून हजारो लोक जमा झाले. 'जय जय गोविंद, जयहरी गोविंद,' 'लक्ष्मीरमण शाऽऽरंगधर गोऽऽविंद', 'बालाजी महाराजकी जय' असा घोष त्यांनी लावला होता. रिचर्ड टेंपल विचारी होते. अवघ्या जनसमुदायाला लाथाडून शक्तीच्या जोरावर ही मूर्ती नेणं शहाणपणाचं नाही, हे त्यांना उमगलं. अंबादास पंत व अण्णासाहेब यांनी साहेबांना हे समजावून सांगितलं. मूर्तीतील सौंदर्याबरोबर मूतींतील देवही जिल्हाधिकाऱ्यांना जाणवला. स्थापना झालेली, पूजाअर्चा होणारी मूतीं हलवली तर हिंदू रयतेच्या भावना दुखावतील, क्षोभ निर्माण होईल, म्हणून साहेबानं मूर्ती नेण्याचा बेत तर रहित केलाच. पण गढीवरील सर्व जमीन आणि त्या जमिनीतून निघणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी या मंदिराला देण्याचा हुकूम काढला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला. टेंपलसाहेब रित्या हातानं पण जनतेच्या जिंकलेल्या मनांसह माघारी गेला. आता भलंथोरलं मंदिर उभारण्यासाठी सरकार, सरदार, सावकार अन् जनता एकत्र आली. शिवरामभाऊ या ओव्हरसीयरनी देवळाचा नकाशा काढला, त्याबरहुकूम काम सुरू झालं. देवळाचा पाया खणता खणता आणखी चार मूर्ती सापडल्या. त्याही अशाच देखण्या नि सालंकृत.
मात्र इंग्रजांनी शिलालेख असलेली ताम्रपट काढून घेतला. या कृत्यामुळे जानकीराम आप्पा पाठक व इतर दोघांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि रामभाऊ भिटे पाटील यांना पाटील पद गमवावे लागते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६० हून अधिक व्यक्तींना विविध ढोल-ताशांच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांना विविध प्रकारे शिक्षा देण्यात आली.
मुर्ती ठेवण्यासाठी एक लहान तात्पुरते मंदिर बांधले गेले. विष्णु मुर्ती सापडल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आले आणि त्यांनी सध्याचे मंदिर बांधण्यासाठी उदार हस्ते योगदान दिले. जानकीराम आप्पा पाठक यांनी आपले संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले. ते अनेक ठिकाणी भागवत कथा करायचे आणि मिळालेला सर्व पैसा मंदिराच्या सेवेसाठी सोपवायचे. दूरदूरच्या ठिकाणी हि बातमी पसरवण्यात आणि सध्याच्या मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला पैसा मिळवण्यासाठी अनेकांना प्रेरणा देण्यात त्यांचा मोठा हात होता. मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कुंभाची स्थापना १९१३ मध्ये मेहकर येथील निवासी वारकरी संत श्री बाळाभाऊ पितळे यांच्या आश्रयाने करण्यात आली, ज्यांना परिसरात भगवान नरसिंहाचा अवतार मानले जाते.
शताब्दी सोहोळ्याची तयारी चालू असताना नोव्हेंबर १९८८ मध्ये श्री शारंगधराची एक छोटी सुंदर मूर्ती सापडली. श्री बालाजी शताब्दी सोहोळ्याच्याच नेमक्या वेळी हा योग यावा हा आनंददायी शकुनच आहे, असं सर्वांनी मानलं, तर त्यात चूक काहीच नाही.
बालासाहेब ट्रस्ट व हजारीमल ट्रस्ट यांच्यापासून सध्या देवस्थानला विविध उपक्रमांसाठी साहाय्य मिळतं. देवस्थानला पूवीं मिळालेली शेतजमीन कुळांकडे गेली. त्यामुळे मंदिराच्या मालकीच्या जागांचं भाडं व पेटीत जमा होणारं द्रव्य एवढीच उत्पन्नाची बाब आहे.
• श्रीशारंगधर मूर्ती
श्री विष्णुमूर्ती साडेअकरा फुटाची ही भव्य, काळ्या कुळकुळीत पाषाणाची अन् घासून गुळगुळीत केल्यानं तेजस्वी आहे. भगवान विष्णूचं ते सुंदर ध्यान पाहताच,
लाचावले मन लागलीसे गोडी।
ते जीवे न सोडी, ऐस जाहले ।।
सौदर्य, भव्यता, प्रमाणबद्धता, रेखीवपणा, बारीक-सारीक तपशील बिनचूक असणारी ही एकसंध मूर्ती पाहताच मन थक्क होतं. बालाजी ऊर्फ बालासाहेब या नावानं त्या भागात ओळखल्या जाणाऱ्या या मूर्तीचं वर्णन तेथीलच एका खेडूतानं केलं, ते असं : 'बालासाहेब फक्त बोलायचे तेवढे शिल्लक आहेत' यात किंचितही अतिशयोक्ती नाही. प्रभावळीसकट ३ ॥ मीटर उंचीच्या या एकसंध शिल्पात शारंगधराची उंची ३ मीटर भरते. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी, तर उजव्या बाजूला श्रीभूदेवी आहेत. तेथेच जयविजयही कोरलेले आहेत. मूर्तीमागील प्रभावळीत मूर्तीच्या उजव्या बाजूला हातांच्या तळव्यांच्या रेषेत दशावतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन या मूर्ती खालून वर या क्रमानं तर मूर्तीच्या डाव्या अंगाला परशुराम, कृष्ण, राम, बौद्ध, कलंकी या मूर्ती वरून खाली या क्रमानं खोदल्या आहेत. मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात पद्म, वरच्या उजव्या हातात गदा, वरच्या डाव्या हातात चक्र व खालच्या डाव्या हातात शंख अशी आयुधं आहेत. या पगचश क्रमामुळे ही मूर्ती मूर्तिशास्त्रदृष्ट्या त्रिविक्रमाची ठरते.पण मेहकरला या मूर्तीला शारंगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात. मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे.. शारंगधर म्हणून नाव आहे.
गळ्यातील वैजयंतीमाला, कानांतील कुंडलं, यज्ञोपवीत, तळहातावरील सूक्ष्म रेषांचे हुबेहूब चित्रण थक्क करते. कटिमेखला, अंगावरील वस्त्राचा तलमपणा, आयुधं धारण करताना असणारी बोटांची ठेवण, त्या लांबसडक बोटांमधील अंगठ्याचा तपशील, डोक्यावरील सारंगधर मूर्ती (धनुष्यधारी, बैठी मूर्ती) असणारा करंडक मुकुट व त्यावरील जडावाचा तपशील तसंच चेहऱ्यावरचं मंद स्मित प्रसन्नभाव जागृत करतं.
उभ्या महाराष्ट्रात अशी मूर्ती नाही. या अजोड शिल्पकामाची प्रकाशचित्रं (फोटो) काढून ते विक्रीस ठेवायला हवेत. रेखीव प्रमाणबद्ध आयुधधारी हातांची कमनीयता मनावर ठसेल अशी प्रकाशचित्रं उपलब्ध करून द्यायला हवीत. हा महाराष्ट्र वैभवाचा कळसाध्यायच आपल्या प्राचीन शिल्पकारांचं महत्त्व आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना स्मरेल अशी तरतूद करायला हवी. दिवसात काही काळ का होईना ही मूर्ती अनलंकृत स्वरूपात दिसेल अशी व्यवस्था करायला हवी, त्यामुळे हे मूर्तिवैभवही भाविकांना पाहता येईल.
या मूर्तीसोबत असलेले ताम्रपट अतिशय महत्त्वाचे आहेत. या मूर्तीच्या आजवर अज्ञात असलेल्या इतिहासावर ह्यातून प्रकाश पडेल. पण मूर्ती नेता न आल्यावर एक शतकापूर्वी ब्रिटनमध्ये नेण्यात आलेल्या त्या ताम्रपटांच्या शोधाचा पद्धतशीर प्रयल कोणी केल्याची नोंद नाही. पण असा प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. कदाचित लंडनमधील वस्तुसंग्रहालयात असणाऱ्या या ताम्रपटांना हिंदुस्थानात आणणं जरी जमलं नाही, तरी त्यात काय लिहिलं आहे, याचा शोध घेतला जाणं अत्यावश्यक वाटतं
२१)
बहुदा तेराव्या शतकात धर्मांध, आक्रमक, परकीय मुस्लीम सत्ताधीशांच्या स्वाऱ्या दक्षिण हिंदुस्थानात सुरू झाल्या ह्या मूर्तिभंजकांच्या तावडीतून अशा देवमूर्ती जमिनीत पुरून ठेवून विध्वंसापासून वाचवायच्या मिषानं ही शारंगधर मूर्ती भूमिगत केली गेली असावी, असा संशोधकांचा कयास आहे. म्हणूनच मूतींचं मस्तक दाखविणारा बाण कोरलेली शिळा त्याजागी ठेवलेली असावी. या वेळी उपलब्ध झालेल्या ताम्रपटांखेरीज अन्य कोणताही मार्ग त्या मूर्तीच्या पूर्वेतिहासावर प्रकाश टाकण्यास असमर्थ आहे. याच परिसरात आणखी उत्खनन करता आलं, तर आणखीही प्राचीन मूर्ती-शिल्पावशेष हाती लागण्याचा संभव आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न करायला हवेत. औरंगाबाद/खडकी सारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गजबजलेल्या पर्यटन पंढरीजवळ असणाऱ्या मेहेकरला त्याचं योग्य ते स्थान मिळवून देणं अवघड नाही. त्या दृष्टीनं प्रयत्न मात्र करायला हवेत.
तांब्याचा शिलालेख उपलब्ध नसल्यामुळे, १२ व्या ते १४/१५व्या शतकातील मुस्लिम आक्रमणांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, ज्याने आपली राजधानी जवळच्या दौलताबाद येथे हलवली आणि त्यानंतर औरंगजेब याच्या आक्रमण काळात या प्रदेशातून जाताना, अनेक हिंदू मूर्ती एकतर विहिरीमध्ये लपवून ठेवल्या होत्या किंवा त्यांना अपवित्र होण्यापासून वाचवण्यासाठी जमिनीखाली खोल गाडल्या होत्या. शारंगधर बालाजीच्या बाबतीतही असेच झाले असावे
जसे जगन्नाथ पुरी येथे परमेश्वराचे रूपाने तिरुपती व पंढरपुरात नाद रूप श्री विठ्ठलाचे आणि नाथद्वारात अष्टकाली रूपाचे दर्शन होते, तसेच मेहकर येथे बालाजीचे आत्मरूपाचे दर्शन आपल्याला मिळते. याचा अर्थ आपल्या अंत: करणात जी काही भावना आहे तीच मेहकर येथील परमेश्वराच्या चेहऱ्यावर दिसून येते. आपण आनंदी, दुःखी, रागावलेले किया थकलेले असो, भक्ताच्या चेहयावर एकच भाव दिसून येतो. यामुळे आत्मरूपाचे दर्शन देणारे हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे
ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री बालाजीची मूर्ती आहे. तसा उल्लेख बुलडाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तीर्थक्षेत्रांच्या यादीत या मंदिराचे नाव असले तरी याला अद्याप हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही.
जालन्यापासून वाशीमकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे. आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) पासून १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे गाव असूनही जगाला या अद्भुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे.मूर्तीचा शोध लागण्यापूर्वी हे गाव नृसिंहाचे स्थान म्हणून ओळखले जात होते. येथे लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५ व्या शतकात ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.
लेण्यांचे किंवा शैलगृहांचे चैत्यगृह्,विहार्,मंडप, पोढी,न्हाणपोढी,कोढी असे भाग पडतात.चैत्यगृह आणि विहार हे त्यातील मुख्य प्रकार असून याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. भिक्षुंच्या वास्तव्यासाठी प्रथम विहार खोदण्यात आले आणि नंतर विहारात वास करणार्यांच्या धार्मिक बाबींसाठी चैत्यगृह खोदण्यात आली.त्यामुळे अनेक ठिकाणी विहारांबरोबर चैत्यगृह आढळते.चैत्यगृह अधिकच कलात्मक आणि वैशिष्ट्यपुर्ण असल्यामुळे विहारंच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असते.
जेवणासाठी/शिक्षणासाठी सभागृहजुन्नर येथील शिलालेख
विहार :-
सर्व शैलगृहापैकी विहार हा प्रकार ज्या भिक्षुंनी सर्वसंगपरित्याग केलेला आहे आणि ज्यांना संन्यस्त वृत्तीने जीवन कंठायचे आहे त्यांच्यासाठीच असल्यामुळे शक्य तितका साधा आणि उपयुक्ततावादी दृष्टीकोणातून खोदले गेले.गौतम बुध्दांच्या शिकवणीप्रमाणे चैन आणि स्वयंपीड्न या दोन्ही टोकाच्या भुमिकापासून दुर रहाण्याचे प्रतिबिंब या विहारांच्या उभारणीत दिसून येते.हे विहार गावापासून आणि नगरापासून दूर असले तरी फार आडवळणाला नव्हते,शक्य तेव्हा आणि आवश्यक असेल त्यावेळी सहज गावात किंवा नगरात जाणे शक्य होईल इतपतच ते लांब कोरलेले असत. विहारामुळे भिक्षुंचे उन,पाउस ,वारा यापासून संरक्षण होउन सुर्यप्रकाश,मोकळी हवा आणि शुध्द पाणी सहज उपलब्ध होतील अशीच त्यांची रचना होती. केवळ निवासासाठी उपयुक्त हा हेतु असल्यामुळे विहाराच्या रचनेमध्ये फारसे विकास झाले नाहीत.
विहार हे मुख्यतः पावसाळ्यात रहाण्यासाठी असल्यामुळे त्यांना वर्षावास असे नाव होते.सुरवातीच्या काळात विहार कसे होते हि माहिती रंजक आहे.सध्याच्या उत्तर प्रदेशातील सहेथ-महेथ ज्याला बुध्दकाळात श्रावस्ती नगरी असे नाव होते त्याठिकाणी अनाथपिंडक या भक्ताने बुध्द आणि त्यांच्या शिष्यांसाठी जेतवन नामक विहार बांधला होता.खास विहार बांधण्यासाठीच त्याने जमीन विकत घेतली होती.बौध्द वागमयात भगवान बुध्द आपल्या शिष्यांसमवेत तात्पुरत्या निवासात राहील्याचे उल्लेख आहेत.या तात्पुरत्या निवार्यांनाही विहार म्हणले जाई. असे विहार नगराबाहेरील जुन्या उद्यानात किंवा फळबागांमध्ये असत.दगडामध्ये खोदलेला सर्वात प्राचीन विहार म्हणजे गयेच्या परिसरातील बराबर टेकडीत खोदलेले विहार.दक्षिण भारतात खोदलेल्या विहारा व्यतिरिक्त आणखी उल्लेखनीय लेणे म्हणजे ओरिसातील ( कलींग देश ) भुवनेश्वरजवळील उदयगिरी लेण्या.शिलालेखांमधे लेणे हा शब्द आला आहे तो विहार या अर्थी आहे.
अनेक मजली विहार
विहाराच्या दालनाला असलेले नक्षीकाम
विहाराचा विचार करुन लेण्यांचे काही प्रकार पडतात.
अ) विहारांच्या संख्येवरुन
१) एक खोली असलेले विहार
२) अनेक खोल्या असलेले विहार
३) विपथगामी ( aberrant)
ब) खोल्यांच्या वास्तुरचनेनुसार
१) समोरचा भाग खुला असलेल्या चौरस आणि आयताकृती खोल्या
२) मुखभिंत आणि दरवाज्याने युक्त असलेल्या खोल्या
३) दरवाजा आणि ओसरी असलेल्या खोल्या
४) ओसरीयुक्त मोठ्या दालनाला लागून असलेली अरुंद व खोल खोली
क) खोल्यांच्या मांडणीनुसार
१) ओसरीच्या मागे असलेली विहारांची ओळ
२) मोठ्या खुल्या दालनाभोवती खोल्या असणे
३) ओसरीयुक्त मोठ्या दालनाभोवती खोल्या असणे
23)
विहारांच्या विकासाचे चार टप्पे मानले जातात.
१) मौर्यकाळातील (इ.स.पुर्व ३०० ते २५० ) :-हे विहार मौर्यकालीन असून यांची रचना पुढे दालन किंवा सभागृह नसलेली छोटी खोली असे स्वरुप आहे.या खोलीमध्ये शयनपीठ व पाणी साठविण्याची टाकी नसते.हे विहार टेकडीवर बर्यापैकी उंचीवर खोदलेले दिसतात.मुंबईजवळ विरार परिसरात जीवदानी डोंगरावर खोदलेली लेणी किंवा जुन्नरजवळील तुळजा लेण्यातील १,६,७,१३ ते १४ हे विहार याचे उदाहरण. भिक्षुंचे तात्पुरते निवास ते कायमस्वरुपी निवास यातील स्थितंत्यर म्हणजे या प्रकारचे विहार.
२) इ.स.पुर्व २५० ते २००: -या टप्प्यात भिक्षूंनी भटकी जीवनपध्दती सोडून मठ पध्दतीची जीवनशैली अंगिकारली.सहाजिकच मंडंपाभोवती कक्ष,व्हरांड्यामागे कक्ष्,सपाट छत ( समतल वितान ) आणि बिनखांबी मंडप असलेले विहार उदयाला आले.याची उदाहरणे अजिंठा लेणे क्र.१३ ,भाजे लेणे क्र. ११) या लेण्यांमध्ये द्वारावरील कमानी बंद असतात.तर कमानीच्या खालच्या बाजुला कठड्यासारखी नक्षी दिसते.
३) इ.स.पुर्व २०० ते इ.स. १०० :-यामध्ये लेण्याचे छत गजपृष्ट आकाराचे आहे.तसेच शिल्प आणि कथापर शिल्पपट्ट दिसतात.तसेच लेण्याच्या व्हरांड्यात घंटाशीर्ष असलेले स्तंभ.कोंढाणे मंडप,नाशिक लेणे क्रमांक १९, अजिंठा लेणे क्रमांक १२, १३ इत्यादी उदाहरणे आहेत.
४) इ.स. १०० ते ३००:-या टप्प्यात अष्टकोनी स्तंभ, गजपृष्टाकार छत, मंडंपाच्या मुखभागात स्तंभांची रांग हि वैशिष्ट्ये दिसून येतात.
पश्चिम भारतातील लेणी उभारण्याचा कालखंड पाहीला तर इ.स. पुर्व काळात आणि नंतर सुध्दा लेणी उभारली गेली नाहीत किंवा त्या कार्यात खंड पडलेला दिसतो.याचे कारण कदाचित अस्थिर राजकीय परिस्थिती असावी. याचे एक कारण म्हणजे संपुर्ण दक्षिण भारतावर राज्य करणार्या प्रबळ अश्या सातवाहन कुलाला पार्शियन आणि शक सत्तांकडून मार खावा लागला होता.अर्थात गौतमीपुत्र सातकर्णीने या सत्तांना हरवून पुन्हा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी या संपुर्ण घडामोडीत सत्ताकेंद्र पुर्वेला सरकले आणि सातवाहन साम्राज्यही अनेक शाखात विभागले गेले.सातवाहन कालखंडात साधारण इ.स.पुर्व ७५ ते इ.स. ७५ या कालखंडामध्ये उभारलेल्या लेण्यांमध्ये काही वैशिष्ट्य दिसतात.
१) पुढे व्हरांडा असलेले कक्ष
२) सामायिक व्हरांडा असलेली कक्षांची ओळ
३) मंडपाच्या भोवती असलेले कक्ष
यातील पहिली दोन वैशिष्ट्य जुन्नरजवळील मानमोडी आणि बेडसे लेण्यात दिसतात.मात्र यानंतरच्या काळात औरंगाबाद, बेडसे, कोंदीवटे व नाणेघाट इथे नवीन लेण्यांची उभारणी जवळपास बंद झाली.मात्र भाजे, कोंढाणे व पितळखोरे इथे नवीन लेणी उभारली जात होती.जुन्नर्,नाशिक, कान्हेरी लेण्यात बदल झाले व तिथे मुर्ती आल्या.लेणी उभारण्याचा पुढचा टप्पा म्हणजे इ.स. १०० ते इ.स ३०० या काळात कोकण परिसरात काही नवीन केंद्र उभारली गेली.
एखादा एतिहासिक किल्ला बघायच्या मोठ्या अपेक्षेने ईथे आलेलो असले तरी आपली मात्र निराशाच होते. आज राशोल किल्ल्याचे जवळपास सर्व अवशेष काळाच्या ओघात नष्ट झालेले असले तरी किल्ल्याचे प्रवेशद्वार मात्र आवर्जून वाट वाकडी करून पाहण्यासारखे आहे. मुख्य दरवाजा अजूनही सुस्थितीत असून सुंदर रंगसंगतीत रंगवलेलला आहे.
पोर्तुगीज राजचिन्हे कोरलेले हे प्रवेशद्वार आजही उन, वारा व पाऊस यांचे तडाखे झेलत भक्कमपणे उभे आहे. दरवाजाच्या अलीकडे खंदकाचे काही अवशेष दिसतात.
राशोल किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार राशोल गावात असणाऱ्या प्रसिद्ध सेमिनारीला जाण्याऱ्या रस्त्यावर आहे. या प्रवेशद्वारातुनच आपला राशोल गावात प्रवेश होतो. सेमिनारी म्हणजे ख्रिश्चन पाद्री आणि धर्मगुरु यांना शिक्षण देणारे कॅथलिक विद्यालय.
राशोल गावात असणारी सेमिनारी खूप जुनी असून पूर्वी ती किल्ल्याचाच एक भाग होती. याचे नाव आहे पॅट्रीआर्चल सेमिनरी ऑफ़ राशोल (Patriarchal Seminary of Rachol). आज सेमिनरी आणि राशोल गाव ज्या छोट्या टेकडीवर वसलेले आहे त्या पूर्ण टेकडीच्या बाजूने पूर्वी तटबंदी व खंदक होता.
लेण्यांना भेट दिली कि आपल्याला लेण्याचे काही महत्वाचे विशेष लक्षात येतात. याची एकेक करुन माहिती घेउया.
मंडप :-
मंडप हे स्थापत्याचे आणखी एक स्वरुप. मंडप खुप कमी लेण्यात आढळत असले तरी या का़ळात कोरल्या गेलेल्या लेण्यांचा ते एक भाग आहेत.आज दिसत असलेल्या मंडपावरुन मात्र त्याकाळातील मंडपांच्या संख्येचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल.नंतरच्या काळात म्हणजे इ.स. तिसरे व चौथे शतक व कान्हेरी लेण्यातील प्रांगणात आढळणार्या खांबाकरीता खाचा किंवा खड्ड्यावरुन मंडपांच्या उभारणीचा अंदाज करता येतो.लेण्यात येणार्या प्रवाशांच्या किंवा यात्रेकरुंच्या सोयीसाठी लाकडी मंडप उभारले जात ज्यांचे छत झावळ्या किंवा झांडांच्या फांद्यानी आच्छादले जाई.याच मंडपात भोजन वाढले जाई.मंड्पात बसण्याची व्यवस्था असलेले किंवा नसलेले असे दोन प्रकार आहेत.
काळाच्या अवश्यकतेनुसार साधारण पहिल्या शतकांनंतर लेण्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मंडप उभारले जाउ लागले.नाशिकच्या २१ क्रमांकाच्या लेण्यामध्ये प्राचीन मंडपाचा एक नमुना बघायला मिळतो.जुन्नर येथील शिवनेरी गडाच्या पोटात असणार्या लेणी क्रमांक ६४ येथील शिलालेखानुसार 'चित्ता येथील यवनाने भिक्षुसंघाकरीता भोजन मंडप उभारल्याचे नमुद केले आहे.पहिल्या शतकानंतर भिक्षुंच्या संख्येत वाढ झाली त्यांना निवार्,भोजन पुरवणे या गरजा निर्माण झाल्याने मंडप उभारणे आवश्यक झाले.मंडप खोदण्याचे उपक्रम दुसर्या,तिसर्या शतकापर्यंत चालु राहीले.
विहार किंवा मंडप उभारणीत सौदंर्याचा दृष्टीकोन फार नसला तरी मंडपाच्या उभारणीतून तात्कालीन भिक्षुंचा चालीरितीचा आणि जीवनपद्घतीचा अभ्यास करता येतो.तसेच तसेच एखाद्या लेण्यात रहाणार्या भिक्षुंच्या संख्येचा अंदाज करता येतो.
विहार आणि मंडप याखेरीज लेण्यांमध्ये वास्तुशास्त्राचा विचार केला तर आणखी काही अंग आहेत.यामध्ये पेढीका,आसनपेढीका आणि कोढी येतात.दगडात खोदलेली बाके म्हणजे आसनपेढीका.जुन्नर आणि कान्हेरी लेण्यामंध्ये अश्या आसनपेढीका आढळतात.
लेण्यांमध्ये जमीनीपासून ६० ते ७० से.मी. उंचीवर असलेली आणि ६० से.मी. ते १ मीटर उंच आणि रुंद व ३८ ते ५० से.मी.खोल आकाराची देवकोष्टे म्हणजे पोढी. ( देवकोष्ट म्हणजे एक प्रकारचा कोनाडा म्हणता येईल ज्यात देवाच्या मुर्तीची किंवा पुजायोग्य वस्तुची स्थापना केलेली असे ) महाडच्या लेणे क्रमांक २७ मध्ये देवकोष्ट असून आज ते रिक्त असले तरी एकेकाळी त्यामध्ये दगड्,धातु किंवा लाकडाच्या पुजावस्तु असणे शक्य आहे.अश्याच प्रकारच्या कोढ्या बेडसे,भाजे ,महाड आणि कान्हेरी येथील लेण्यात दिसतात.
डोंगर उतार तीव्र नसताना लेण्याच्या पुढे कोरलेले अंगण ,कुडा लेणी
डोंगर उतार तीव्र असल्यामुळे लेण्याच्या पुढे अंगण कोरण्यासाठी जागा नाही ,अजंठा लेणी
बर्याचदा लेण्यांचा आकार किंवा ठेवण ती लेणी ज्या डोंगरात कोरलेली आहेत त्यावर अवलंबून असतो.जर डोंगराचा उतार तीव्र असेल तर कोरलेल्या लेण्यांसमोर अंगण ठेवता येत नाही. याच कारणाने अजिंठा,पितळखोरे,कोंढाणे,बेडसे या लेण्यांच्या समोर प्रांगण दिसत नाही.पण जर डोंगर सौम्य उताराचा असेल तर मागे भरपुर जागा असल्यामुळे अंगणाची योजना करणे शक्य होते.कराडची लेणी याच प्रकारची आहेत.कुडा व कान्हेरीची लेणीही अशीच आहेत.
पोढी :-
पोढी म्हणजे लेण्यात असलेली पाण्याची टाकी.अशी पोढी लेण्याच्या प्रवेशद्वारापाशी किंवा एखाद्या स्वतंत्र जागी दिसतात.सुरवतीच्या काळातील बौध्द किंवा ब्राम्हणी लेण्यात अश्या पोढी दिसतात.अर्थात लेणी खोदण्याचा सुरवातीच्या काळातील उद्देश हा भिक्षुंचा पावसाळ्यातील निवासस्थान म्हणजे वर्षावास असल्यामुळे या काळातील लेण्यात पोढी आढळत नाहीत्,कारण लेणी पाण्याच्या झर्याजवळ किंवा एखादा धबधबा नजीक आहे असे बघून कोरली जात्,सहाजिकच पाण्याची वेगळी व्यव्स्था करण्याची गरज नसे.याचे उदाहरणे म्हणजे अजिंठा येथील सुरवातीच्या काळातील लेणी,विरार येथील जीवदानी लेणी, जुन्नर जवळील तुळजा लेणे आणि भाजेची सुरवातीच्या काळातील लेणी.याउलट नंतर कोरलेल्या लेण्यात म्हणजे शिवनेरी,कुडा,कान्हेरी येथील लेण्यात मोठ्याप्रमाणात कोढी दिसतात.
पोढीचे वापरानुसार दोन प्रकार पडतात.
१) पिणाच्या पाण्यासाठी पोढी जीला पाणीपोढी किंवा पाणपोढी म्हणतात.या पाणपोढ्यांच्या आकारावरुन पुन्हा त्यांचे प्रकार मानता येतात
अ)चौरसाकृती तोंड असलेल्या भृपुष्टावर तोंड असलेल्या पाणपोढ्या.या पाणपोढया पावसाळ्यात टेकडीवर वाहून जाणारे पाणी गोळा करण्यासाठी कोरल्या असाव्यात.अश्या पाणपोढ्या इ.स.पुर्व पहिले शतक ते इ.स पहिले शतक या दरम्यान कोरल्या गेल्या असाव्यात.
ब) या पाणपोढ्या लेण्याच्या प्रवेशद्वारात चौरसाकृती आकारात कोरलेल्या दिसतात.यामध्ये पाण्यात एखादी वस्तु पडून त्याचे प्रदुषण टाळले जाई.पाणपोढीत हा विकास साधारण दुसर्या शतकात झाला असावा.
या झाल्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोढ्या.इतर वापरासाठी उदा. अंघोळ पाणी आवश्यक होते.त्यासाठी पाणी साठवायला लागायचे.
२) अंघोळीचे पाणी साठविण्यासाठी जी टाकी कोरली जायची तीला न्हाणपोढी असे म्हणत.या टाक्या आकाराने खुप मोठ्या म्हणजे १ ते २ मीटर खोली असलेल्या १ ते १० मीटर लांबी असलेल्या आहेत.
"प्रचंड मोठी विहीर आणि तातोबा महादेवाचे मंदिर" पहाण्यासाठी. धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीर वजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. ह्या चौरसाकृती टाक्याची लांबी-रुंदी साधारण तीस फूट, तर खोली जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट आहे. इतकं मोठं खोदीव टाकं यापुर्वी धुळ्याजवळचा सोनगिर आणि संकेश्वर जवळच्या वल्लभगडावर पाहिले होते. टाक्यात पाणी नाही. माती आणि मुरूम ह्यामुळे ह्या टाक्याच्या बराच भाग बुजलेल्या अवस्थेत होता. शिव सह्याद्री संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला, त्यामुळे टाक्यांची खोली आठ ते दहा फूट वाढली. टाक्याची मूळ खोली अजूनही जास्ती असण्याची शक्यता आहे.
एकुणच या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेउन इतकी खोल विहीर खोदलेली असावी. हि विहीर पाण्याने पुर्ण भरत असल्यावर गडावरच्या लोकांना काळजीचे कारण उरत नसणार. याच विहीरीचे पाणी नळाद्वारे ताथवडा गावात आणले जात होते. १९९३ पर्यंत त्याचा वापर होत होता , नंतर तो बंद झाला. टाक्यात उतरण्यासाठी खोदीव पायऱ्या काढल्या आहेत. खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. यालाच "तातोबा महादेव" म्हणतात. याची एक कथा रहाळात सांगितली जाते. तातोबा नावाचा एक साधू या डोंगरावर राहत असे. त्याच्या ख्यातीमुळे रोजच भक्तांची गर्दी व्हायची. त्यामुळे त्याला साधनेला वेळ मिळत नसायचा. शेवटी कंटाळून त्याने या डोंगरावर एक विहीर बांधली आणि त्या विहिरीत तो राहू लागला. जेणेकरून लोकांना आपण कुठे आहोत याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना साधूबाबा अचानक कुठे गेले हेच कळेना. एक दिवस या डोंगरावर आलेल्या एका गुराख्याला प्रचंड तहान लागली. पण त्याला पाणी कुठे आहे हे माहीत नव्हतं. अचानक त्याच्यासमोर हे तातोबा प्रकट झाले आणि आपल्या कमंडलूमधलं पाणी त्याला प्यायला दिलं आणि अचानक ते अंतर्धान पावले. चकित झालेल्या गुराख्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर त्याला त्या विहिरीत एक शिवमंदिर आणि हे तातोबा दिसले. पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर गडावर बांधलं आणि त्यांचंच नाव पायथ्याच्या गावाला दिलं. तेव्हापासून या डोंगराला आणि त्याच्या पायथ्याच्या गावाला ‘ताथवडा’ असं म्हणू लागले. अर्थात ही एक दंतकथा असून याचा कोणताही पुरावा नाही. पण घटकाभर मनोरंजनाची गंमत मात्र यात आहे हे नक्की!!
भोर म्हणले कि इतिहासात चंडपराक्रम गाजवणार्या वीरांची आणि राजगड , तोरण्यासारख्या बलदंड किल्ल्यांची भुमी हेच आधी डोळ्यासमोर येते. मात्र याच भोरवर निसर्गाने देखील मुक्तहस्ताने उधळण केली आहे.इथे एक निसर्गनवल आहे. पंढरपुरची चंद्रभागा आपल्याला वर्षानुवर्षे माहिती आहे. भीमा नदीला पंढरपुरजवळ हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक रचनेने भीमेच्या पात्राने अर्धवर्तुळाकार घेतलेले वळण. पंढरी हे तीर्थक्षेत्र असल्याने हे नाव आणि वैशिष्ट्य रुळले आणि प्रसिध्दीच्या झोतात आले. मात्र याच भीमेच्या उपनदी असणार्या नीरा नदीला असेच एक झोकदार वळण भोर परिसरात आहे.
नीरा नदी नीरबावी या उगमस्थानापासून वहात येत सुप्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांच्या इंगवली या गावाजवळ जवळपास २७० अंशात नदी वळते आणि सातारा जिल्ह्याची उत्तर सीमा ठरवत वीर धरणापाशी क्षणभर विसावा घ्यायला थांबते. पुणे- बेंगळुरू अशीयाई महामार्गावरील कापुरहोळपासून भोरच्या दिशेने निघाले कि इंगवली गावाजवळ हे निसर्गनवल बघायला मिळते. अलीकडेच हा परिसर नेकलेस पॉईंट या यथार्थ नावाने प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. अर्थात हा संपुर्ण निसर्गाचा अविष्कार आहे तर मुंबईत नेताजी सुभाषचंद्र बोस रोड उर्फ मरीन ड्राईव्ह मानव निर्मीत "क्वीन्स नेकलेस" आहे.पण ईथे भुमातेने स्वताला जणु मढवले आहे. महाराष्ट्रात अजून काही ठिकाणी जसे रायगड जिल्ह्यातील महाडजवळ तसेच पालघर जिल्ह्यात असे नेकलेस पॉईंट आहेत, मात्र तितके प्रसिध्द झालेले नाहीत. जगातही असे काही पॉईंट आहेत. उदा, अमेरीकेतील कोलोरॅडो नदीचा हॉर्स शु बेंड. याला इंग्लिश भाषेत Oxbow म्हणतात.
अर्थात अशा प्रकारचे पात्र भविष्यात काहीशे वर्षानी नष्ट होईल. नदी सरळ वाहू लागेल आणि एका बाजुला चंद्राकार तळे तयार होइल. अर्थात आज तरी त्याचा विचार करायचे कारण नाही. मस्तपैकी या भोर परिसरात या आणि हा नेकलेस पॉईंट जरुर बघा.
भारतातील प्राचीन वास्तुविशेषापैकी एक महत्वाचा स्थापत्य प्रकार म्हणजे लेणी. लेण्यांनाच शैलगृह किंवा शैलकृत्य असे नाव आहे. वास्तविक शैलगृह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करू या
डोंगरामध्ये वा पर्वतामध्ये खोदून वा कातळाला छेदून वास्तू निर्माण केल्या जायच्या त्यांना शैलगृह म्हणतात जसे घरे राजवाडे इमारती अश्या वास्तू तयार केल्या जायच्या त्याच पद्धतीने डोंगरात शैलगृह बांधली जायची आणि अशी शैलगृह बांधण्याची सुरुवात मौर्य सम्राट चक्रवती सम्राट अशोकाने सुरुवात केली आहे अशोकाने प्रथम बिहार राज्यातील बाराबार डोंगरावर अशी शैलगृह बांधलेली आहेत आणि हि शैलगृह केवळ बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याची वा निवासस्थानाची सोय व्हावी म्हणून कोरलेली आहेत याला वर्षावास हि म्हटले जाते पुढे याच शैलगृह यांना विहार म्हणू लागले डोंगरात कोरलेली शैलगृह प्रामुख्याने केवळ बौद्ध धम्माशीच निगडीत आहेत यामध्ये चैत्य स्तूप विहार स्तंभ आणि शैलगृह यांचा समावेश आहे मुळात शैलगृह हि बौद्ध धम्माशी निगडीत यासाठी कि सर्वात प्रथम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशोकाने धम्म दूत गावोगावी पाठवले होते व त्यांच्या निवासाची गैरसोय होवू नये म्हणून त्यांच्यासाठी अशी शैलगृह निर्माण केली गेली
आता एकूण शैलगृह कशी असतात याचे काही पुरावे आपणास पाहायला हवेत तर त्यासाठी महत्वाच्या गोष्टी वास्तुकेलेत पाहायला मिळतात. लेण्याचे द्वार हे कोरीव काम केलेलं असतात साधारण तीन चिन्ह अथवा पाच अथवा अष्ट अशी चिन्ह असतात याचा सबंध थेट बुद्ध तत्वांशी आहे तीन चिन्ह त्रिशरण पाच चिन्ह हि पंचशील तर आठ चिन्ह हि अष्टांग मार्गाचे प्रतिनिधित्व लेण्यावर करतात यांना विहार म्हणण्याची पुढे पद्धत आली काहीना संघाराम हि हि म्हटले जाते लेण्यामध्ये खास करून हि शैलगृह भिक्षूच्या राहण्यासाठी असतील तर तिथे कोणत्याही प्रकारचे शिल्प नसते
दुसरी गोष्ट काही शैलगृह मध्ये चैत्य असेल तर त्याला चैत्यगृह म्हटले जाते मूर्ती असतात स्तूप असतात अश्यांना विहार म्हटले जाते शिवाय यांच्या स्तंभ तुम्हाला अष्टकोनी वा षटकोनी पाहायला मिळतात बर्याच बौद्ध लेण्यावर तुम्हाला भिक्षु न राहण्यासाठीची लेणी साम्यता साधणारी सापडतात
त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सापडणारी बहुतांश लेणी साम्यता दर्शवणारी आहेत. विशेष हि लेणी तुम्हाला प्रवासी रस्त्यावर पाहायला मिळतात यामध्ये दोन महत्वाचे फायदे असतात एक भिक्षु ना प्रचार प्रसार करण्यासाठी व दुसरी व्यापारी लोकांना व्यापार करण्यासाठी लेण्यांचा वापर केला जातो.
मात्र कालांतराने जनमानसावर असणारा बुध्द धर्माचा प्रभाव ओसरु लागला आणि लेण्यांचा मुळ उद्देश आणि वापर कमी झाल्याने तिथली वर्दळ संपली.सहाजिकच लेण्यांची माहिती जनमानसात राहीली नाही.पुढे परकीय आक्रमकांनी इथली संस्कृती पुसायचा प्रयत्न केला.सहाजिकच अनेक शतकांचे हे ज्ञान लोकांच्या आठवणीतून नाहीसे झाले. कधी काळी या शैलकृत्याकडे कोणाचे लक्ष गेलेच्,चुकलामाकला येथे आलाच तर तो कातळातून कोरलेल्या या गुंफा पाहून आश्चर्यचकीत होत असे. कदाचित असे काम सामान्य मानवी हातातून शक्य नाही असे वाटून हे कोरीवकाम प्राचीनकाळी वावरणार्या पांडवांसारख्या अचाट सामर्थ्याच्या व्यक्तिंकडून झाले असावे असे समजून या लेण्यांना पांडवांनी घडवलेल्या गुंफा समजून पांडवलेणी म्हणले जाउ लागले.मग अर्थातच काही अपुर्या दिसणार्या गुफांसाठी कथा जोडल्या गेल्या.सगळ्यात लोकप्रिय कथा म्हणजे 'या गुहा पांडवांना एका रात्रीत कोरायच्या अशी अट घातली होती.मात्र पहाटे कोंबडा आरवला आणि काम अपुरे राहीले म्हणुन पांडव या गुंफा अशाच सोडून गेले' हि कथा.वास्तविक ज्या ज्या ठिकाणी या कथा सांगितल्या जातात्,तिथे पांडव खरोखरच गेले होते का ? गेले असले तरी अश्या गुंफा एका रात्रीतच कोरायची अट का ? पांडवांना अश्या गुंफेत रहायची गरज का भासली ? वास्तविक मुळ महाभारतात पांडव काही नगरात राहिल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत.उदा.बकासुर वधाच्या कथेत ते एकचक्रानगरीत निवास करतात्,तर अज्ञातवासाच्या काळात ते विराटनगरीत वेष पालटून रहातात.मग अश्या गुंफा पांडवाना कोरायचे कारण काय ? अर्थात हा अंधश्रध्देचा भाग असला तरी पांडवांचे नाव जोडले गेले म्हणून या गुंफाना धक्का लागला नाही,हे वास्तव आहे.'पांडवांनी कोरलेल्या गुहा' या आकर्षणामुळे असेल्,पण जनसामान्यांचा इथे वावर राहिला आणि थोडीफार स्वच्छताही राहिली.अर्थात काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने अजिंठासारखी लेणी मातीत गाडली गेली आणि इंग्रज अधिकार्याच्या शिकारीच्या निमित्ताने पुन्हा प्रकाशात आली.याही घटनेचा फायदा असा झाला कि अजिंठ्यातील भित्तीचित्र सुरक्षित राहिली.दुर्दैव म्हणजे अजिंठा लेणी प्रकाशात आल्यावर काही चित्र कायमची नष्ट झाली.पण पांडवलेणी म्हणुन समजले गेल्याने लेण्यांचे अगदीच नुकसान झाले असे नाही.
याच पांडवलेणी नावाची आणखी एक उपपत्ती सांगितली जाते, बौद्ध भिक्खुंनी भिक्षाटन केल्यानंतर संपूर्ण वेळ एकांतात ध्यान आणि अभ्यासासाठी व्यतीत करायचा असतो. हे भिक्खू डोंगरातील या लेणींमधे राहत असत. स्थानिक लोकांना त्यांना “भिक्खू” म्हणतात हे कदाचित माहीत नसावे. तेव्हा जर कोणी विचारले कि डोंगरातील या लेणींमधे कोण राहते, तर स्थानिक सांगत असणार – “पंडु वस्त्रधारी” राहत आहेत व दिवसातून एकदा भिक्षा मागायला गावात येतात. भिक्खू “चीवर” घालतात जे पीत अर्थात पिवळ्या किंवा पिवळासर रंगाचे असते. त्यामुळे स्थानिक लोकं भिक्खूंना “पंडु वस्त्रधारी” म्हणत असावीत.
पालि भाषेत पंडु शब्दाचा अर्थ पिवळा किंवा फिकट पिवळा असा आहे. पांढऱ्या रंगला देखील पालि भाषेत पंडु किंवा पंडरु म्हणतात. पालि भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत आले आहेत. उदा. पंडुरोग म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन शरीर पिवळसर दिसते. पालि ही भ. बुद्धांच्या काळापासून आणि नंतर सम्राट अशोकाच्या काळात भारतातील एक राजमान्य भाषा होती. त्यामुळे नकळतपणे मराठी भाषेवर देखील पालि भाषेचा प्रभाव अधिक आहे.
पुढे या लेणींना “पंडु वस्त्रधारी राहणारे लोक” असे म्हणण्या ऐवजी “पंडु लेणीं” म्हणण्यास सुरुवात झाली. या लेणींना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधिकृत नाव देखील पंडु लेणी असेच आहे. हेच पुढे अपभ्रंशित होऊन “पांडू लेणीं” झाले. काही काळानंतर म्हणजे अंदाजे १६व्या शतकानंतर या लेणींना “पांडव लेणीं” म्हणण्यास सुरुवात झाली. आणि मग या लेणींचे कोरीवकाम पांडवांनी कसे केले याच्या अनेक सुरस कथा रचल्या गेल्या.
29 ) गड, कोटांवरचे जलव्यवस्थापन
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभुत गरजा मानल्या जातात. पाणी हि मानवाची किती अंत्यतिक गरज आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. एकवेळ अन्नाशिवाय माणुस काही दिवस काढेल, वस्त्र हि त्यानंतरची गरज पण अल्प वस्त्र किंवा ईतर पर्यायाचाही मानवाने वापर केल्याचा दिसून येतो, निवारा हे कदाचित प्राधान्यक्रमात शेवटी येईल, पण निवार्याखेरीजही माणुस काही काळ राहु शकेल.मात्र सर्वाधिक मह्त्वाची गरज म्हणजे पाणी. मानवी शरीरातच सत्तर टक्के पाणी असल्यामुळे पाण्याशिवाय एक दिवसही काढणे कठीण. 'जल नही होता तो ये जग जाता जल' यासाठीच म्हणले आहे.
अर्थात प्राचीन काळापासून दुर्ग उभारताना पाणी या घटकाचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. पाण्याची व्यवस्था होईल असे न वाटल्यामुळे शिवाजी महाराजांनी मालवणजवळ भरतगडाची उभारणी केली नाही. सह्याद्रीत अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या ढाकोबा या शिखरावर दुर्गउभारणी होउ शकली नाही. पाण्याची व्यवस्था ही कोणत्याही प्रकारच्या मानवी समूहासाठी एक मुलभूत गरज आहे. सह्याद्रीतल्या उंचच उंच किल्यांचा विचार करता आणखीच महत्वाची ठरते! रामचंद्र अमात्य आपल्या आज्ञापत्रामध्ये लिहितात:
"गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक म्हणून बांधणे झाले तर आधी खडक फोडून तळी,टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पुरेल अशी बांधावी. गडावर झराही आहे. जसे-तसे पाणी मुरते म्हणून तितकीयावरिच निश्चिंती न मानावी. झुन्जामध्ये भांडीयाचे आवाजाने(तोफांच्या आवाजाने) झरे स्वल्प होतात तेव्हा संकट पडते. या करिता तसे जागी जखीरीयाचे(साठवणीचे) पाणी म्हणून दोन-चार तळी,टाकी बांधावी. त्यातील पाणी खर्च न होऊ देणे. गडाचे पाणी बहुत जतन करावे"
हा वरील उतारा गडावरील जलव्यवस्थेच मर्मच कथन करतो. ह्या कारणास्तव आपणास दुर्गभ्रमंती करताना जागोजाग पाण्याची टाकी दिसून येतात. किंबहुना अनेक गडांवर पाण्याची टाकी हेच काही मोजके अवशेष राहिले आहेत. टाकी ही सर्वच गडांवर आहेत. अनेक गडांवर खोदीव टाक्यांचा समुहच आढळून येतो.
आकाशातून पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी सर्वत्र सारखेच एकाच रंगरूपाचे व चवीचे सर्वत्र असते, पण भूमीत सामावले गेल्यावर भूमीच्या अंतर्भागातील रसाने पाण्याची चव बदलते. जमिनीतील क्षाराप्रमाणे पाण्याचे गुणधर्म बदलतात, विशेषत: विहिरीतील पाण्यात गोड, मचूळ, खारट, तुरट, कडवट इत्यादी रुचीवैविध्य दिसून येते.
मनुष्याने आपल्या अनुभवातून आणि निरीक्षणातून पाणवठ्याच्या जागा निश्चित करून तिथे वस्ती केली, शेती करता येऊ लागल्यावर नदीकिनारी वसाहती होऊ लागल्या, कोट-किल्ले आणि नगरे उभी राहू लागली. नगर म्हटले की, जनतेला आवश्यक सोयी-सुविधा, रस्ते, गटारे, उद्योगधंदे आलेच आणि त्याबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आली. ख्रिस्तपूर्व पाचव्या सहस्त्रकात शेतीचा विकास व स्थिर ग्रामीण जीवन भारतामध्ये निर्माण झाले होते. १९२१ सालापासून वायव्य व पश्चिम भारतात केलेल्या उत्खननात हडप्पा व रूपड (पंजाब), मोहेंजोदडो, चन्हुदडो, आमरी (सिंध), महेश्वर व नावडातोडी (मध्य भारत), रंगपूर, प्रभासपट्टण, सोमनाथ (काठेवाड), लोथल (गुजरात) इत्यादी विस्तृत प्रदेशातील नदीकिनारील शहरांचे अवशेष सापडले आहेत. मोहेंजोदडो व हडप्पा येथे जुन्या भग्नावशेषांवर सात वेळा नवीन वस्ती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे उत्कर्ष व लयाबद्दल पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे. अजूनही होत आहे. मोहेंजोदडो व हडप्पा ही दोन्ही शहरे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसली असल्यामुळे त्यातील संस्कृतीला प्राचीन सिंधू संस्कृती किंवा सैंधव संस्कृती म्हणून ओळखली जाते. या दोन्ही शहरांच्या नगररचनेत साम्य आहे. येथील बरीचशी घरे दुमजली व क्वचित तीन मजली होती. सामान्यत: प्रत्येक घरात मध्यभागी चौक व चोहोबाजूस राहण्याच्या खोल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यास घराबाहेरून अरुंद व उंच जिना असे. प्रत्येक घरात स्नानगृह, मोरी, मधल्या चौकात विहीर, वरच्या मजल्यावरही स्नानगृह आढळले आहेत. यावरून प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र बिऱ्हाडे असावीत. स्नानगृहास एका बाजूस उतरती फरसबंदी असे व आतील बांधकाम पक्के करीत.
अर्ध्या भिंतीपर्यंत पक्की चुनेबंदी करून वर डांबराचा दाट थर देत व कोठेही पाणी मुरणार नाही, याची काळजी घेत वरच्या मजल्यावरील सांडपाणी खालच्या तळमजल्यात सोडण्याची व्यवस्था असे आणि मग हे सांडपाणी बंदिस्त गटारातून दूरवर नदीत सोडत. हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना एका ओळीत ही घरे असत. मोहेंजोदडो येथील किल्ल्यामध्ये एक विस्तीर्ण स्नानगृहाचा विस्तार १८०' x १०८' एवढा प्रचंड आहे. त्याच्या मध्यभागी ३९' x २३' x ८' खोल स्नानकुंड आहे. कुंडात उत्तरेच्या बाजूस लहान मुलांच्या सोयीसाठी पायऱ्यांजवळ कुंडाची खोली कमी आहे. तलाव साफ करण्याच्या सोयीसाठी नैऋत्येच्या बाजूस तळमोरी ठेवलेली आहे. आग्नेयेस असलेल्या विहिरींमधून तलावास पाणीपुरवठा केला जाई. येथील घरांमध्ये आड (विहीर) असले तरी काही ठिकाणी सार्वजनिक विहिरी आढळतात. नदीकाठावरील ही शहरे असल्याने विहिरींना भरपूर पाणी लागत असे. येथे दोरीनेच पाणी शेंदून काढावे लागे. विहिरीभोवती चुनेबंदी असून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधीव गटारे आढळतात. जमिनीखालील जलस्रोतांचे विहिरीमध्ये संचय करून जीवनोपयोगी पाणी वर्षभर कसे पुरवावे, हे त्यावेळच्या लोकांना माहीत झाले होते.
बहुतेक सर्व लेण्यातील सर्वात महत्वाचा आणि आकर्षक वास्तुविशेष म्हणजे चैत्यगृह.विहार हे फक्त निवासासाठी असल्यामुळे त्याच्या उपयुक्तता हा महत्वाचा भाग असे.सहाजिकच विहारात फारसे कोरीवकाम आढळत नाही.मात्र चैत्यगृह हे प्रार्थना,पुजा करण्याचे स्थान असल्यामुळे इथे स्तुप्,स्तंभ, शिलालेख दिसून येतात.चैत्यगृह म्हणजे प्रार्थनामंदिर किंवा अचूकपणे सांगायचे झाले तर स्तूपयुक्त प्रार्थनामंदिर. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे.चैत्यगृहामध्ये स्तूप असतो.
स्तुपाची निरनिराळी अंग
स्तूप म्हणजेच, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचला जायचा. मृताचे स्मारक म्हणून घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जायचे. वेदिका, अंड, हर्मिका आणि छत्रावली अशा रचनेमध्ये हे स्तूप शक्यतो बांधले जात. गोलाकार जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटकार अण्ड त्यावर चौकोनी हर्मिका असते. या हर्मिकेवर लाकडी छत्र अशी स्तूपाची रचना असते. घुमटाकार अण्ड म्हणजे आकाश, आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग. ही हर्मिका सात उतरत्या चौकोनी पायºयांनी बनलेली असते. या सात पायºया म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक बौद्धधर्मात मानले जाई.
चैत्यगृहाच्या रचनेतील विकासाचा टप्पा म्हणजे त्यांच्या आकार घोड्याच्या नालेसारखा करण्यात आला.
स्तुपाच्या विकासाचे निरनिराळे टप्पे
31)
स्तूप म्हणजे ढीग किंवा स्तू म्हणजे स्तवन करणे आणि स्तूप म्हणजेच जोडणे किंवा एक करणे. वर्तुळाकार जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटकार अण्ड, त्यावर चौकोनी हर्मिका आणि त्याजवर लाकडी छत्र अशी स्तूपाची रचना. जोते म्हणजे मृत्युलोक, घुमटाकार अण्ड म्हणजे आकाश, आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग, ही हर्मिका सात उतरत्या चौकोनी पायर्यांनी बनलेली आढळते ह्या सात पायर्या म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक अशी तत्कालीन धारणा.
स्तूप हे बुद्धाच्या स्मरणार्थ उभारले गेले. अशोकाच्या अहिंसक आक्रमक धर्मप्रसारानंतर तर प्रचंड संख्येने स्तूप उभारले गेले. सर्वसाधारणपणे बुद्ध किंवा बुद्धाच्या श्रेष्ठ अनुयायांच्या अवषेशांवर स्तूप उभारले जात. पार्थिव देहाच्या किंवा वापरत्या वस्तूच्या अवशेषांना धातु व त्यांवर उभारल्या गेलेल्या स्तूपांना धातुगर्भ अशी संज्ञा आहे. दागोबा हे त्याचे सिंहली स्वरूप. महाराष्ट्रातील गिरिलेण्यांतील स्तूपांना पण दागोबा अशीच संज्ञा दिली जाते.स्तूप या वास्तूप्रकाराचे स्वरूप मृतदेहाच्या दफनावर उभारलेला मातीचा ढिगारा एवढे साधे होते.याला विशेष महत्त्व मिळाले ते गौतम बुद्धामुळे .त्याचा महापरिनिर्वाणानंतर त्याच्या अनुयायांनी त्याच्या अस्थी, केस ,दात अशा विविध अवशेषांवर स्तूप बांधले. सांचीचा स्तूप हे याचे जुने उदाहरण म्हणून सांगता येईल.अंड, पेटी, हर्मिका, छत्रावली,कठडा,वेदिका,प्रवेशद्वारावर तोरण हे स्तूपाचे मुख्य भाग असतात.
पांडवलेणीतील जोते, वेदिकापट्टी, अण्ड आणि हर्मिका यांनी युक्त असलेला स्तूप
हीनयानकाळातील हे स्तूप अगदी साधे, अनलंकृत असल्यामुळेच आकर्षक दिसत. साधे असल्यामुळेच अतिशय डौलदार दिसत आणि पूजनीय वाटत. बुद्धपूजा स्तूपप्रतिकात करण्याची प्रथा होती पण नंतरच्या महायानकाळात बुद्धमूर्ती कोरण्यास अनुमती मिळाल्यानंतर लेण्यांबरोबरच स्तूपांवरही बुद्धमूर्ती खोदण्यात येऊ लागल्या. आपलेच लेणे आकर्षक करत जाण्याच्या स्पर्धेमुळे स्तूपांचे अलंकरण होवून चैत्यगृहे अधिकाधिक ऐश्वर्यसंपन्न होत गेली व स्तूप बांधण्याचा मूळ उद्देशच लयाला गेला आणि स्तूपांचा तोल बिघडला. बुद्धमूर्ती कोरण्यामुळे स्तूपांची उंची साहजिकच वाढत गेली व मूळच्या डौलदार स्तूपाचा आकार बदलला जाऊन स्तूप बेढब दिसायला लागले. हर्मिकेवरील छत्रांची संख्या वाढायला लागली. एकाच छत्राची जागा एकावर एक असे तीन छत्र घेऊ लागले. आजमितीस ही तीन छत्रे कुठेही अस्तित्वात नाहीत पण कान्हेरीतील चैत्यगृहातील एका कोनाड्यात अशा प्रकारच्या स्तूपाचे प्रारूप त्यावरील तीन छत्रांसह कोरलेले आढळते.
अजिंठा येथील महायानकाळातील तोल बिघडलेला स्तूप. (चित्र आंतरजालावरून)
कान्हेरीतील तिहेरी छत्र असलेले कोरीव स्तूपाचे प्रारूप
रायगड दरबाराची प्रतिकृती निर्माण करणारा कलाकार :-
आज रविवार, सहाजिकच खरेदी निमीत्ताने बाहेर पडल्यावर एक उत्तन योग जुळून आला. हळदीकु़कवाच्या खरेदीच्या निमीत्ताने बाहेर पडलो असताना श्री. रोहीत कुसुरकर यांचा कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड येथील रहात्या घरी असलेला कारखाना बघायचा योग आला.गेली कित्येक वर्षे कराडमध्ये राहून या अवलिया कलाकाराचा इतक्या उशीरा परिचय झाला याची खंत वाटली. रोहीत हे अक्षता, तिळगुळ, हळ्दी कुंकु यांचे आकर्षक पॅकींग केलेले पाउच विकतात. इतरही अनेक वस्तु ते विकतात. मात्र त्यांच्या कारखान्याला भेट दिल्यावर चटकन नजरेत भरतो, त्यांनी हाताने तयार केलेली रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती ! सध्या दरबार सभा कशी आहे आणि शिवकाळात हा दरबार कसा असावा, याची सार्थ कल्पना हि दोन्ही मॉडेल बघून येते. भविष्यात असे उपक्रम राबवून त्यांचे वस्तुसंग्रहालय उभा करण्याचा त्यांचा मानस आहे.या कलाकाराला कराड परिसर आणि उभ्या महाराष्ट्रातील नागरीकांनी या कार्यासाठी शक्य ती मदर करावी हि विनंती. कराड परिसरात कधी आलात तर थोडी वाट वाकडी करुन कुसुरकर यांनी बनवलेल्या या प्रतिकृतींना जरुर भेट द्या. इतिहासप्रेमी दानशुर व्यक्ती, लोकप्रतिनीधी यांनी मदत केली तर अश्या प्रतिकृतींचे संग्रहालय उभा केले जाउन कराड परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन आकर्षण निर्माण होईल.