ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. सातवाहनांनी निर्मिलेला नाणेघाट, त्याच्या माथ्यावरील जीवधनगड, पुलूसोनाळे लेणी, भैरमगड, नलदुर्ग, मच्छिंद्र व गोरक्षगड आणि सिद्धगड अशी ऐतिहासिक स्थळे आहेत. मुरबाडची प्राचीन परंपरा जपणारी म्हसाची यात्रा आहे. देशप्रेम व सामाजिक जीवनात स्वत:ला झोकून देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आहेत. देशाची मान जगभर उंचावणारे मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांची नाळ मुरबाडशीच जोडली आहे. असा प्राचीन ते अर्वाचीन इतिहास जपणाऱ्या मुरबाड भूमीकडे पर्यटकांची पावले न वळली तरच नवल. सुप्रसिद्ध सिद्धगड हा त्यापैकीच एक.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून बाहेर आलेला,प्रशस्त माची आणि त्यावर एखादा पिरॅमिड ठेवावा असा बालेकिल्ला असलेला ह्या गडावर कातळकोरीव गुहा आहे.यावरुनच या गडाचे प्राचीनत्व अधोरेखीत होते.आज आपण या सिध्दगडाची सैर करणार आहोत.
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल विविध व्यापारी मार्गांनी घाटमाथ्यावर असलेल्या जुन्नर या बाजारपेठेच्या गावात जात असे. त्यापैकी एक व्यापारी मार्ग कल्याण - म्हसा - अहुपे घाट - जुन्नर हा होता. म्हसा याठिकाणी कर्जत कडून येणारा मार्गही कल्याण कडून येणार्या मार्गाला मिळतो. या व्यापारी मार्गावर आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी मच्छिन्द्रगड, गोरखगड आणि सिध्दगड या किल्ल्यांची निर्मिती केली होती. सिध्दगड किल्ला हा भिमाशंकर अभयारण्याचा भाग झाला आहे . सिध्दगड माचीवर असलेले गाव विस्थापित होणार आहे अशा बातम्या अधून मधून येत असतात. त्यामुळे तेथे जाणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. तसेच हा गडपरिसर वनखात्याच्या जागेत असल्यामुळे इथे फिरण्यावर बंधने आहेत.
सिद्धगडाच्या इतिहास विशेष उपलब्ध नसला तरी किल्ल्यावरील कातळात कोरलेली गुहा पहाता हा किल्ला गायदरा या घाटमार्गाच्या रक्षणासाठी ९ व्या शतकात शिलाहारांनी बांधला असावा. इ.स.१६५७–५८ दरम्यान कोकण मोहिमेत हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला तो इ.स.१६९३ पर्यंत स्वराज्यात होता. २० ऑक्टोबर १६९३ रोजी मोगलांनी पुन्हा या किल्ल्याचा ताबा घेतला. त्यानंतर तो स्वराज्यात केव्हा दाखल झाला याची नोंद येत नाही पण पेशवे दप्तरातील नोंदीनुसार इ.स. १७३४ मधील वसई मोहिमेत सिद्धगडावर काही काळ मराठा सैन्य होते. शिवशाहीत किंवा पेशवाईत जरी या किल्ल्याचे कार्य मोठे नसेल पण या गडाचा उपयोग भीमाशंकर,कल्याण, माहुली ,नेरळ या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असणार हे मात्र स्पष्ट आहेहा किल्ला गायधरा या महत्वाच्या घाटरस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘भिवाचा आखाडा’ येथे विश्रांतीसाठी थांबत होते. या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची पंच धातूची एक तोफ आहे. पेशवे दप्तरानुसार १७३४ मध्ये मराठयांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काहीकाळ सैनिक ठेवल्याची नोंद आहे.सन १८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि पुर्ण सह्याद्रीत ब्रिटीशांचा वरवंटा फिरला,त्यांनी किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला.मात्र बर्याच गडांनी त्यांचा तिखट प्रतिकार केला. असेच दोन किल्ले सिद्धगड आणि वासोटा अजून त्यांच्या हाती लागत नव्हते. शेवटी हतबल ब्रिटिशांनी भीमाशंकर वरून तोफा सिद्धगड च्या शेजारी असणाऱ्या दमदम्या च्या डोंगरावर आणून तिथून सिद्धगडवर तोफा डागल्या आणि १८२० साली सिद्धगड ब्रिटीशांच्या ताब्यात आला. नंतरच्या काळात या किल्ल्याचा इतिहास पुसटसा होत गेला. प्रसिद्ध इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांनी या किल्ल्यावर एक पुस्तक लिहिले आहे.
या सिध्दगडासंदर्भात आणखी एक हकिकत सांगितली जाते.इ.स.१८६७ च्या सुमारास भिवाजी नाईक नावाचा एक पुंड या गडावरील गुहेत आश्रयास होता.याने इंग्रज शिपायांना अगदी सळो कि पळो करुन सोडले होते.एका न्हाव्याच्या आवडी नावाच्या बायकोस त्याने पळवून इथे आणुन ठेवले होते.तिच्यासह तो या गुहेत रहात असे.तो या गुहेत रहात असला तरी त्याची खबर पोलिसांना लागली नव्हती.त्याने हरी नावाचा मनुष्य आपल्या नोकरीला ठेवला होता.भिवाजी बाहेर पडला कि हरी आवडीचे संरक्षण करीत असे.मात्र भिवाजीला पुढे या हरीचा संशय आला आणि त्याला त्याने कड्यावरुन खाली ढकलून दिले.पुढे हा भिवाजी म्हसे गावात एका लग्न संभारता भाग घेण्याकरीता गेला असता मागचा पुढचा विचार न करता दारु प्याला.म्हसे गावातील लोकांनाही या भिवाजीने त्रास दिला असल्यामुळे त्यांनी त्याला बेशुध्द अवस्थेत चोप दिला व त्याला मुरबाडला नेउन पोलिसांच्या ताब्यात दिले.तिथे मरण्यापुर्वी त्याने पोलिसांना सगळी हकीकत आवडी व हरीविषयी सांगितले.पोलिसांनी सिध्दगडावर जाउन आवडीला ताब्यात घेतले व हरीचा सांगाडा शोधून काढला.या गुहेत त्यांना बरीच धनसंपत्ती सापडली. इ.स. १८६२ जेव्हा या किल्ल्याची पहाणी झाली तेव्हा 'हा गड मोडून गेला आहे', असा शेरा दिला गेला.

सिध्दगडासंदर्भात एक दुर्गकथा सांगितली जाते.सुर्यास्तानंतर काही दगाफटका होउ नये यासाठी सुर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद करुन घ्यावे व कोणीही आज्ञा दिली तरी सुर्योदय होईपर्यंत गडाचे दरवाजे उघडू नये असा स्पष्ट हुकुम शिवाजी महाराजांच्या सर्व गडावरील किल्लेदारांना दिलेला होता.अगदी शिवाजी महाराजही त्याला अपवाद नव्हते. एकदा शिवाजी महाराज मोहिमेवर असताना सिध्दगडाच्या दरवाज्यापर्यंत पोहचायला त्यांना वेळ झाला,त्यामुळे ते महाद्वारापाशी येईपर्यंत गडाचे दरवाजे बंद झाले होते.सहाजिकच शिवाजी महाराजांनी किल्लेदाराला दरवाजा उघडण्याची आज्ञा केली.मात्र स्वतः महाराजांचाच 'दरवाजा कदापि न उघडणे ' असा हुकुम असल्याने किल्लेदाराने दरवाजा उघडण्यास नकार दिला.शिवाजी महाराजांनी आपल्या मागावर मोघल सैनिक असून दरवाजा उघडावा असे किल्लेदाराला सांगितले.त्यावर किल्लेदार उत्तरला 'महाराज तुमच्या संरक्षणासाठी इथे तटबंदीवर आम्ही शस्त्र घेउन उभे रहातो.मात्र सुर्योदय होइपर्यंत गडाचा दरवाजा उघडणार नाही.'रात्र सरुन पहाट झाली,सुर्याचा पहिला किरण डोंगराआडून बाहेर आला.किल्लेदाराने गडाचा दरवाजा उघडला आणि बाहेर येउन मुजरा करुन, महाराज काय शिक्षा देतात ,त्याची वाट पाहु लागला.पण आपण दिलेली आज्ञा या किल्लेदाराने तंतोतंत पाळलेली बघून महाराज प्रसन्न झाले.त्या किल्लेदाराचा तिथेच सत्कार करुन त्यांनी त्याच्यासह सिध्दगडात प्रवेश केला.अर्थात या कथेत फारसे तथ्य नाही.मात्र शिवकालात गडाच्या व्यवस्थेसंदर्भात कडक नियम होते व ते काटेकोरपणे पाळले जात होते हाच निष्कर्श काढता येईल.
गड,कोट म्हणले कि आपल्याला आठवतो तो प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास.मात्र काही गड,कोटांनी भारतील स्वातंत्र्य संग्रामात देखील सहाय्य करुन आपला तिखट लढावु बाणा दाखवून दिलेला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या आधारे शिवाजी महाराजांनी 'गनिमी कावा' या युद्धतंत्राच्या कौशल्याने वापर करून स्वराज्य स्थापिले. तेच तंत्र वापरून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हैराण केले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी प्रबळगड आणि कर्नाळा किल्ला परिसरातील घनदाट जंगलाचा आश्रय घेतला होता.
तसाच रणसंग्राम या सिध्दगड परिसरात घडला आहे.त्याची आपण माहिती घेउया. १९४२च्या 'चले जाव'च्या चळवळीत 'करेंगे या मरेंगे' या घोषणेची प्रेरणा घेऊन जहालवादी क्रांतिकारक भाई उर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल या पदवीधर युवकाने क्रांतीदल स्थापन करून रेल्वे रुळ उखडणे, टेलिफोनच्या तारा कापणे, विजेचे खांब पाडणे, ट्रान्सफॉर्मर उडविणे ही कामे जिवावर उदार होऊन, प्रसंगी मृत्यूला सामोरे जाऊन केली.
आझाद दस्ता या नावाने ओळखणारी ही क्रांतिकारकांची टीम भाई ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल-माथेरान-नेरळ यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असे. सरकारी नोकरी व सुखवस्तू कुटुंबातील जीवन सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. त्यावेळी त्यांचे प्रमुख सहकारी होते मानवली-नेरळ वास्तव्य असलेले ६० वर्षीय तरुण गोमाजी हिराजी पाटील ऊर्फ काका. हुतात्मा हिराजी पाटील यांचे पिताश्री. स्वातंत्र्यलढय़ात पिता-पुत्र जोडी अभावानेच आढळतील. वास्तविक हिराजींचा स्वातंत्र्यलढय़ात थेट असा संबंध नव्हताच. आझाद दस्त्यातील स्वातंत्र्यवीर जेव्हा नेरळ परिसरातील मुक्कामी असत तेव्हा त्यांना शिधासामुग्री पुरविणे, इकडच्या तिकडच्या खबरबात देणेघेणे हे काम ते करीत. मुक्काम जसजसा दूर जाई तसतसा संपर्क तुटत जाई. पण काका ऊर्फ गोमाजी पाटील यांचा ठावठिकाणा कुठे आहे यासाठी पोलीस अत्याचार व मारहाणीचा मार्ग अवलंबून असत. एकदा पोलिसांनी हिरोजींना पकडून नेरळहून कल्याण येथे नेत असताना पलायन केले व थेट वडिलांना भेटायला सिद्धगड मुक्कामी गेले. यापुढे पोलिसांचा मार खाण्यापेक्षा स्वातंत्र्यलढय़ासाठीच काम करू असे जाहीर केले.
गोमाजीकाका पाटील हे दस्त्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ. भाई कोतवालसहित सर्वांनाच ते आदरणीय होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी सतत ७० कि.मी. चालण्याचा विक्रम केला होता. ते काका दस्त्यातील उत्तम आचारीही होते. एकदा एका जंगलातील मुक्कामात जेवणाची सामुग्री उपलब्ध नव्हती. तेव्हा जंगलातील आदिवासींनी दिलेल्या रताळय़ाचे चविष्ट वडे बनवून दस्त्यातील सहकाऱ्यांच्या जिभेवर त्याची चव दीर्घकाळ रेंगाळत ठेवली होती. पोलिसांच्या माराने पायाला आलेले व्यंग त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ करून होते. भाई कोतवाल हे लढय़ातील पुढील कार्यक्रम, आखणी, मुक्काम तसेच दस्त्यातील नवीन भरती इत्यादी सर्व काकांच्या सल्ल्यानेच करीत.
आझाद दस्त्याचे प्रमुख काम, इंग्रज सरकाराच्या कामकाजात अडथळे आणून त्यांना जेरीस आणणे हे होते. त्यासाठी ते प्रामुख्याने मुंबईला विद्युत पुरवठा करणारे चालू पायनल (टॉवर) कापून विद्युत पुरवठा बंद करणे, टेलिफोन तारा तोडणे, रेल्वे सामुग्री उखडणे, पोलीस चौकींना आग लावणे, गाफील पोलिसांवर थेट हल्ला करून त्यांच्या बंदुकी पळविणे अशा प्रकारची कामे करीत. मुंबई-कल्याण-पाली, माथेरान-मुरबाड-अमरावती-रामकोट-व उत्तर कर्नाटक अशा ठिकाणचे सुमारे ५० जण थेट तर तितकेच अप्रत्यक्ष क्रांतिकारक आझाद दस्त्यात काम करीत होते. एका मुक्कामी ते सहसा ३-४ दिवसांपेक्षा जास्त राहत नसत. दुर्दैवाने सिद्धगडावरील मुक्काम ७-८ दिवस पडला व तेथेच घात झाला.
ज्या दिवशी गोळीबार (२ जानेवारी १९४३) झाला त्याच्या आदल्याच दिवशी रात्री सर्वजण भीमाशंकरकडे कूच करणार होते. पण काळाच्या उदरात दुर्दैव लपले होते. बॅटरीचे सेल संपले होते व कंदिलाचे रॉकेलही नव्हते. नेरळ व माथेरान येथून खबरबात काढणारी माणसेही येणार होती. भाईंच्या सांगण्यावरून भगत मास्तरांनी मारुती पाटील यांच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी ‘लाल्या वाझे’ या आदिवासींकडे दिली होती. दुर्दैवाने ती चिठ्ठी मारुती पाटलांच्या ऐवजी गोविंद साबळे यांच्या हाती लागली. साबळे यांना दस्त्यातील स्वातंत्र्यवीरांवर पोलिसांनी लावलेली हजारो रुपयांची बक्षिसेही माहीत होती. आता त्यांना स्वातंत्र्यवीरांचा मुक्कामही माहीत झाला. त्यांनी ती चिठ्ठी मुरबाडच्या अण्णा बोकड यांना दिली. त्यांनी थेट ठाण्याचे डीएसपी इंग्रज अधिकारी हॉल यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्वरित मोठा फौजफाटा घेऊन भल्यापहाटे सिद्धगड गाठले.
दस्त्यातील जवान सिद्धगडावर आळीपाळीने पहारा देत होते. पहाटे हिराजींची वेळ होती. पहाटे हिराजी चूळ भरण्यासाठी घळीतील नाल्यात आले आणि खाली मोठय़ा दगडाआड लपलेल्या इंग्रज हॉलच्या बंदूक गोळीने पोटाला आरपार छेद दिला… मेलो! सावधान! बाबा मेलो! ही आर्त किंकाळी पहाटेच्या थंडीत, बंदुकीच्या आवाजाने पक्ष्यांच्या किलबिलाटाबरोबर दऱ्याखोऱ्यात कंप पावत गेली. क्षणार्धात सर्वजण जागे व सावध झाले. भाईंना संकटाची कल्पना आली. पोलीस फौजफाटा मोठा असल्याने त्यांनी सहकाऱ्यांना पळा जा आणि जीव वाचवा असे सांगितले. पहाटेच्या झोपेत अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बंदुकी असूनही प्रतिकार करू शकले नाहीत. सगळीकडे पांगापांग झाली. गोमाजी काकांचे भाचे व एक सैनिक भगत मास्तर यांनी कपारीचा आधार घेत लपून राहिले. त्यांच्या अंगावर झिपरू गवळी, मारुती शेलार, कांतरा शेट्टी असे एकमेकांच्या अंगावर निपचित पडून वरून अंगावर गवत घेऊन लपून राहिले.
हिराजी पडल्यावर तुफानी गोळीबारात घळीतून वर चढताना भाईंच्या मांडीचा वेध एका गोळीने घेतला. भाई तशा अवस्थेत लंगडत पोलिसांना चकवत पुढे चालले होते. सोबत अंबरनाथचे धोंडू देसाई त्यांना आधार देत चालत होते. जसजसे पोलीस जवळ येऊ लागले तसे भाईंनी देसाईंना पुढे जाण्यास सांगितले. भाईंना एकटे सोडून जाण्यास धोंडू देसाईंच्या जिवावर आले. पण भाईंनी आज्ञा केली. शेवटी नाइलाजाने ते पुढे सटकले. जखमेमुळे भाईंनी एका झाडाचा आधार घेतला. पोलीस मागावर होतेच. त्यांनी भाईंच्या देहाची चाळण केली. काही गोळ्या झाडातही गेल्या. आजही ते पवित्र झाड सिद्धगडाच्या या थराराचा एक साक्षीदार म्हणून उभे आहे. क्रूरकर्मा इंग्रज हॉल भाईच्या देहाजवळ ओळख पटविण्यासाठी आला. त्याने भाईंच्या शरीरात अजूनही धुगधुगी आहे हे पाहून अतिशय निर्दयतेने डोक्यावर बंदूक ठेवून चाप ओढला… क्षणार्धात जाज्ज्वल्य स्वातंत्र्यप्रेम आणि उत्तुंग स्फुल्लिंग असलेल्या त्या थोर स्वातंत्र्यप्रेमीची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. एक धगधगते अग्निकुंड निमाले.
गोमाजी काका रस्ता चुकल्याने नेमके पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. भाई व हिरोजींची कलेवर उघडय़ावर पडून होती. बराच वेळ चालू असलेली धुमश्चक्री संपली. गडावर आता कुणी नाही याची खातरजमा करून पोलिसांनी हिराजी व भाईंची पार्थिव दोरीने बांधून फरफट खाली बोरवाडीपर्यंत चालविली होती. इकडे कपारीत लपलेले भगत मास्तर व इतर खालील सर्व थरार पाहत होते. दुसरीकडे एका बाजूलाच रामलालही एका खड्डय़ात पालापाचोळा अंगावर घेऊन लपला होता. त्यावरून पोलीस चालत होते. जरा कुठे सळसळ झाली की त्या दिशेने गोळ्यांचा वर्षाव होत होता. लपलेले सर्वजण २४ तास तसेच पडून होते. अखेर दुसऱ्या दिवशी पोलीस फौजफाटा निघून गेला. त्यानंतर सर्वजण बाहेर आले. हुतात्मादिनी निर्जला एकादशी होती. समोर झरा वाहतोय, पण पाण्याचा एकही थेंब ते ग्रहण करू शकले नाहीत. खऱ्या अर्थाने सर्वाना निर्जला एकादशी घडली. त्यानंतर सर्वजण झिपरू गवळीच्या मामाकडे आश्रयाला गेले, पण अगोदरच कुणीतरी खबर दिल्याने तिसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. भाईंना सोडून नाइलाजाने पुढे निघालेले धोंडू देसाई एका शेतकऱ्याच्या आश्रयाला आले, पण शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांना दोरीने बांधून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले.अशा रीतीने उरलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अटक झाली आणि अखेर देश स्वतंत्र झाल्यावरच त्यांची सुटका झाली.

आज सिद्धगडवाडीच्या दक्षिण बाजूला बोरवाडीतील एका ओढ्यात हुतात्मा स्मारक उभे राहिले आहे. त्याचे दर्शन अवश्य घ्यावे.
सिद्धगडाचे उत्तुंग रांगडे रूप मनाला भुरळ घालीत असल्यामुळे गिरीभ्रमण व दुर्गभ्रमण करणाऱ्या साहसी युवकांचीही पावले हमखास इकडे वळत असतात. प्राचीन अश्या या गडावर जायचे तर विवीध पर्याय आहेत.
सिध्दगडाचा परिसराचा नकाशा
![]() |
| नारिवली गावातून दिसणारे सिद्धगडाचे दृश्य. उजवीकडील डोंगर सिद्धगड आहे. |
मुंबई किंवा पुण्यावरून ट्रेनने कल्याणला उतरावे.कल्याण ते मुरबाड एसटी पकडावी. ह्या मार्गावर सतत एक तासाने मुरबाडसाठी गाडी असते. कल्याण ते मुरबाड अंतर ३० किमी आहे. साधारण पाऊणतास ते एक तासात मुरबाडला पोहचतो. मुरबाड वरून नारिवली गावासाठी, देहरी गावाची एसटी आहे. नारिवली करता सतत २ तासाने मुरबाड वरून गाडी आहे. एसटी चुकली असता, एसटी स्थानकाबाहेरून म्हसा पर्यंत शेअर गाडी असतात ते प्रत्येकी २० रुपये घेतात. मुरबाड ते म्हसा १२ किमी अंतर आहे. आणि म्हसा ते नारिवली गाव ९ किमी आहे. म्हसा वरून नारिवली गावापर्यंत शेअर गाडी असतात. ते प्रत्येकी १० रुपये घेतात.नरिवली वरून येते वेळी शेअर गाडी ५.३०/६ नंतर बंद होतात. हे लक्षात ठेवावे नंतर तुम्हाला एसटीचा पर्याय आहे. नारिवली वरून मुरबाड साठी शेवटची एसटी ७. ४५ ची आहे.
२) उचले मार्गे :-
सिद्धगडावर जाण्यासाठी ठाणे-मुरबाड एसटीने व तेथून म्हसा-धसईमार्गे उचले गावी येऊन पायउतार व्हावे. किंवा कल्याणहून थेट धसई बससेवा उपलब्ध आहे. त्या बसने उचले गावी यावे. समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंच असलेले बोरवाडी हे अवघ्या पंधराएक उंबरठ्याचे आदिवासी गाव सह्याद्रीच्या ऐन कुशीत घनदाट जंगलाने वेढलेले आहे. बोरवाडी सिद्धगडाला अगदी खेटून आहे.
जांबुर्डे मार्गे होणारे सिध्दगडाचे दर्शन
३) जांबुर्डे मार्गे–
कल्याणहून एसटी बसने मुरबाड गाठावे. मुरबाडहून एसटीने किंवा जीपने म्हसा गाव गाठावे. कल्याण - म्हसा अंतर ४२ किलोमीटर आहे. म्हसा गावातून जांबुर्डे गाव ५ किलोमीटर अंतरावर आहे. म्हसा गावातून रिक्षा, जीप किंवा एसटीने जांबुर्डे गाव गाठावे. गावात धरण आहे. धरणाच्या पुढे वनखात्याचे चेकपोस्ट आहे. चेकपोस्टच्या पुढे कच्च्या रस्त्याने चालत गेल्यावर ६-७ घरांची वस्ती असलेले एक गाव लागते. या गावाच्या शेवटी विहिर आहे. या विहिरीच्या पुढे डाव्या बाजूने जाणारी वाट सिध्दगडला जाते. पण हा मार्ग वनखात्याच्या हद्दीतून (भिमाशंकर अभयारण्यातून) जात असल्यामुळे वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. हा मार्ग सोपा व कमी वेळ लागणारा आहे. यामार्गाने आपण प्रवेशव्दाराच्या विरुध्द बाजूला माचीवर (सिध्दगडवाडीत) पोहोचतो.
नारिवली गावाच्या दिशेने सार्वजनिक वाहनांची सोय असल्याने बहुतांशी भटके नारिवली गावाकडून गडावर जाणे पसंद करतात. सोबत जीपसारखे खाजगी वाहन असल्यास आपण नारिवली गावापुढील उचले गावातुन धापटपाडा गाठु शकतो. यामुळे चालण्याचे अंतर साधारण तासाभराने कमी होते. नारिवली गावातून धापडपाडा गावात पोहचायला सव्वा तास लागतो. खरे पाहायला गेले तर धापडपाडा सिद्धगडचा पायथ्याचे गाव आहे. कारण गड चढायला सुरवात येथूनच होते पण गावात कच्चा आणि अरुंद रस्ता जात असल्यामुळे ह्या गावापर्यंत चालत यायला लागते. पण अजून काही वर्षात बहुतेक जर पक्का रस्ता झाला आणि गाडी ह्या गावापर्यंत आली तर ट्रेकचा तेवढा वेळ कमी होईल
प्रख्यात दुर्गप्रेमी व साहित्यिक श्री. गो.नि.दांडेकर यांनी त्यांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' या पुस्तकात सिध्दगडाच्या त्यांनी केलेल्या भ्रमंतीचे वर्णन दिले आहे.ते मुळातून वाचणे रोचक आहे.त्यांनी या गडाची चढाई त्याकाळी अस्तित्वात असलेल्या निसणीच्या वाटेने केली.निसणी म्हणजे जिथे कडा चढणे अशक्य असेल तिथे झाडाचे एखादे खोड रोवून त्याला व कड्यावर पाय रोवून चढाई करायची.सध्या मात्र हि वाट वापरात नसल्याचे गावकर्यांनी सांगितले.बहुधा गडावर ये जा करायला इतर सोप्या वाटा असल्याने थरारक पण जवळची वाट मात्र मोडली.
सिध्दगडाच्या पायथ्याच्या या नारिवली गावाच्या परिसरात 'नलदुर्ग' नावाचा एक किल्ला असल्याचा उल्लेख जुन्या कागदपत्रात सापडतो. मात्र या गडाचे नेमके स्थान आज समजत नाही. शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजे जयसिंगाबरोबर तह केला.त्यावेळी त्यांनी जे तेवीस किल्ले मोघलांना दिले, त्यात या नरदुर्ग किंवा नलदुर्ग गडाचा उल्लेख येतो.मात्र तो गड हाच का ? या प्रश्नाचे ठाम उत्तर आजतरी आपल्यापाशी नाही.
.नारिवली गावातून आपण १० मिनिटात चालत गावाच्या बाहेर येतो. जेथे गाव संपतो तेथे मातीचा कच्चा रस्ता धापड पाड्यापर्यंत जातो. पण रस्त्याला मध्येमध्ये शेतात जाणारे किंवा दुसरीकडे जाणारे इतर रस्ते ही लागतात. त्यामुळे आपण चुकू शकतो.

मच्छिंद्रगड (डावीकडचा ) आणि गोरखगड (उजवीकडचा)
बहुतेक गावातील शेतकरी ट्रॅक्टर ने शेती करत असावे, म्हणून शेतात रस्ते जातात. दोन तीन वर्षापूर्वी धापड पाडा अगोदर मोठा ओढा ओलांडून जावा लागत असे. आता ह्या ओढ्यावर पूल बांधला असल्यामुळे सोयीस्कर झाला आहे.
![]() |
| धापडपाड्याचा अगोदर लागण्याऱ्या ओढ्यावर बनवलेल्या नवीन पूल |
![]() |
पूल पार करताच आपण धापडपाडा गावात पोहचतो.धापटपाडा व बोरवाडी येथुन गडावर जाणाऱ्या वाटा मळलेल्या असल्या तरी धापटपाडा मार्गे जाताना पावसाळ्यात या मार्गावर असलेल्या धबधब्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असल्याने या मार्गाला दोन ठिकाणी धबधब्यावर जाण्यासाठी फाटे आहेत. या फाट्यावर चुकण्याची शक्यता असल्याने वाटचाल सुरु करण्यापुर्वी धापटपाडा गावातुन वाट समजुन घ्यावी. सिद्धगड किल्ला माची व बालेकिल्ला असा दोन भागात विभागला असुन माचीवर सिद्धगडवाडी हे १०-१२ घरांचे गाव वसले आहे. या वाडीतील लोक खाली गावात ये-जा करत असल्याने वाट चांगली मळलेली आहे. नारिवली अथवा बोरवाडी येथुन माचीवरील सिद्धगडवाडीत जाण्यास तीन तास व तेथुन बालेकिल्ल्यावर जाण्यास दीड तास लागतो. उचले गावातुन चालत धापटपाडा गाठण्यास अर्धा तास लागतो.
आता पुढे एक खडी चढण सुरु होते आणि वाटेत एक जंगलात धबधब्याची वाट लागतो .ती कोरड्या पडलेल्या धबधब्याची वाट ओलांडून पुढे अजून खूपच दाट जंगलात आपला प्रवेश होतो .आता तुम्हाला विविध प्रकारचे आवाज ऐकू येतात कधी वानरांचे तर कधी पक्ष्यांचे ,कधी कीटकांचे वगैरे (कमकुवत हृदय किंवा घाबरट लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कि भीमाशंकर ते आहुपे-सिद्धगड च्या जंगलात बिबटे,अस्वल,रानडुक्कर अजिबात नाही .बिबटे तर या भागात केव्हाच संपले आहेत,बाकी अस्वल पण नामशेष होण्याचा मार्गावर आहे(किंवा नामशेष झाले असतील ) त्यामुळे सहसा अस्वले तुम्हाला दिसणार नाही, रानडुक्कर फक्त भीमाशंकर च्या पठारावर आहे पण त्यांची पण खूप शिकार होते शिवाय रानडुक्कर मारणे हा वन खात्या तर्फे गुन्हा नोंद होत नाही कारण शेतीला उपद्रव या कारणाखाली रानडुक्करला सर्रास पणे मारण्यात येते त्यामुळे रानडुक्कर देखील क्वचित दिसते(जवळ जवळ नाहीतच) .आता या जंगलात फक्त भेकर,हरीण,मोर, चंदेरी वानर आणि कुत्रे यांचा वावर आहे .त्यामुळे लोकांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. वाघ किंवा बिबट्याची डरकाळी किंवा अस्वलाचा चित्कार सोडा पण त्यांच्या पाउल खुणा देखील जंगलात दिसणार नाही)
या जंगलात कारंजाचे भरपूर झाडी आहेत . करंज वृक्षाचे एक वैशिष्ट्य आहे कि आजू बाजूला कितीही गर्मी असली तरी पण करंज वृक्षाच्या सावलीत कायम गार वारेच लागणार . पूर्वीच्या काळी एखाद्या माणसाचा ताप उतरत नसेल तर त्या माणसाला कारंजाच्या सावलीत आणत असत आणि त्या माणसाचा ताप उतरायला लागत असे .

कारंजाचे झाड फोटोत खालील प्रमाणे दाखवलेले आहे
धापडपाड्यातून सिद्धगड माची पर्यंत जाण्याकरता बऱ्यापैकी वाट रुळलेली आहे. त्यामुळे तुम्ही न चुकता माचीपर्यंत पोहचता. तसेच काही ठिकाणी वाटेत वनविभागाने वन्यपशूंची माहिती देणारे मोठे फलक लावलेले आहेत. तेथुन मळलेल्या वाटेने १० मिनिटात आपण गावामागील पठारावर पोहोचतो.

येथुन समोर पहिले असता उजवीकडे मुख्य डोंगरापासून सुटावलेला एखाद्या जहाजासारखा दिसणारा सिद्धगड, डावीकडे आहुपे तर मध्यभागी धमधम्याचा डोंगर दिसतो. येथे एक झोपडे असुन येथुन उजवीकडील वाट धबधब्याकडे तर डावीकडील वाट माचीवर सिद्धगडवाडीत जाते. या दोन्ही वाटा मळलेल्या आहेत. येथुन अर्ध्या तासाची चढाई करून आपण दुसऱ्या झोपडीपाशी येतो. या झोपडीकडुन १० मिनीटे चालत गेल्यावर पुन्हा एक वाटेला फाटा असुन तैलरंगाने रंगवलेला बाण आहे. हा फाटा व बाण सहजपणे दिसत नाही.
सिद्धगड आणि त्याचा बाजूचा डोंगर त्याचा मध्ये एक V आकार आहे. त्याच घळेच्या दिशेने वाट वर जाते.येथुन सरळ जाणारी वाट धबधब्यासाठी जाते तर डावीकडील वाट गडाच्या माचीवर जाते. येथुन पुढील वाट मात्र प्रशस्त व मळलेली असुन चुकण्याची शक्यता नाही. साधारण तासाभरात धापड पाड्यापासून वर चालून आल्यावर, एक मोठा ओढा लागतो. ह्या ओढयाच्या पलीकडे समोरून वाट वर जाते. पावसाळ्यात हा ओढा ही भरून वाहत असल्यामुळे, ओढा पार करायला, ओढ्यात दगड रचून वाट केलेली दिसते. या वाटेने वर चढत अर्ध्या तासात आपण ओढयाचे पात्र ओलांडुन पलीकडे जातो व गडाच्या बांधीव वाटेला सुरवात होते.

| वाटेतील दुसऱ्या टाकी जवळून दिसणारी माची वरची तटबंदी |
![]() |
| वाटेतील टाकी ह्या टाकीतले पाणी पियायला वापरतात. |
या वाटेने वर चढत जाताना उजवीकडे एका ठिकाणी सपाटीवर कातळात खोदलेले पाण्याचे लहानसे टाके दिसते.ह्या टाकीतील पाणी माची वर राहणारे लोक गड चढते किंवा उतरतेवेळी पिण्यासाठी वापरतात.
सिध्दगडाचा नकाशा
हे टाके पाहुन पुढे आल्यावर गडाचे पडझड झालेले बांधकाम दिसते. विखुरलेल्या या अवशेषात अनेक घडीव दगड असुन या ठिकाणी दरवाजाचा अडसर कोरलेले दगड पहायला मिळतात. उजवीकडील कातळावरून वाहुन येणारे पाणी वाटेवर येऊ नये यासाठी या भागात कड्याखाली ओबडधोबड दगडांचा नाला बांधलेला आहे. या कड्यावर अर्धवट खोदलेले पाण्याचे एक टाके असुन डावीकडील कड्यावर पाण्याचे दुसरे टाके खोदलेले आहे. डावीकडील टाक्याकडे जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे सर्व बांधकाम पहाता या भागात गडाची चौकी अथवा दरवाजा असण्याची शक्यता आहे.
ओढ्यापासून सिद्धगड माची (दरवाजा) पर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा खडा चढ लागतो. येथुन पुढे दहा मिनिटात बांधीव पायवाटेने आपण गडाच्या माचीवरील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजात पोहोचतो. दरवाजाची डावीकडील तटबंदी झाडीने झाकोळली असुन उजवीकडे घडीव दगडात बांधलेली तटबंदी पहायला मिळते.
दरवाजाच्या अलीकडे डाव्या बाजुला दिसणारी वाट बोरवाडीतुन आलेली वाट आहे. दरवाजातुन आत न जाता सर्व प्रथम बोरवाडीच्या वाटेला लागावे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर डावीकडे झाडीत लपलेली एक कोरीव समाधी पहायला मिळते.
या समाधी शेजारी दिवा लावण्यासाठी लहानसा कोरीव स्तंभ आहे. या समाधीशेजारी मातीत गाडलेला समाधीचा दुसरा चौथरा आहे. या समाधी पाहुन पुढे पठारावर आल्यावर अजुन दोन घडीव समाधी पहायला मिळतात. पठाराच्या काठाने दरीच्या दिशेने फेरी मारली असता टोकावर तटबंदीच्या पायासाठी खोदलेले चौकोनी व गोलाकार आकाराचे मोठमोठे खळगे पहायला मिळतात तर काही ठिकाणी रचीव दगडांची ढासळलेली तटबंदी दिसते. या ढासळलेल्या तटबंदीतुन बोरवाडीकडे जाणारी वाट दिसते. येथुन मागे फिरून पुन्हा दरवाजाकडे यावे.
![]() |
| गडाचा दरवाजा |
ढासळत असलेले प्रवेशव्दार
दरवाजाच्या आतील बाजुस देवडीचा चौथरा असुन आतील पाणी वाहुन जाण्यासाठी बाहेरील बाजुस दगडी पन्हाळ बांधलेले आहेत.
![]() |
दरवाजाचा समोर असलेल्या लहान पठारावरून वरती माथ्याला बुरुजाचा चोरदरवाजाची चोकट दिसते. आणि खालील वर्तुळात दिसणारी गुहा. येथे जाण्याची वाट कुठून आहे, ते कळले नाही. बहुतेक आता ती नसावीच |
दरवाजा समोर लहान पठार आहे, ह्या पठारावरून समोर सिद्धगड कडे पहिले असता आपल्याला डावीकडे गुहा दिसते. ह्या गुहे जवळ पोहचायला वाट दिसत नाही. आपले वाहन गावात ठेवून गड चढावयास सुरुवात केली की, तासाभरात आपण गडावर दाखल होतो. दरवाजातून वाट उजवीकडे फिरत सिद्धगड माची गावात जाते.
![]() |
| बालेकिल्ल्यावर जाताना गुहा लागते. गुहेचा डाव्याबाजूला अजून दोन टाकी लागतात. मी फोटोत पिवळ्या रंगाने वर्तुळ करून दाखवला आहे. त्यातील एका टाकीचा फोटो खाली लावला आहे. |
पठारावरील छोटेसे दगडी मंदीर
दरवाजातुन आत येऊन काही अंतर पुढे गेल्यावर डाव्या बाजुस उंचवट्यावर एक मंदीर पहायला मिळते. थोडे आत चालत आल्यावर मंदीर असलेल्या या उंचवट्याच्या खालील भागात दोन विरगळ पहायला त्यातील डावीकडे १ मोठी पूर्ण आणि १ तुटलेली आहे. ह्या वीरगळ जेथे आपल्याला दिसतात, त्याच्या वरती आपल्याला एक मंदिर दिसते. तेथे अजून १०-१५ वीरगळी दिसतात. काही तुटलेल्या तर काही अखंड आहेत. येथुन पुढे सरळ जाणारी वाट सिद्धगडवाडीत जाते तर डावीकडे वळलेली वाट उंचवट्यावरील नारमातेच्या देवळाकडे जाते.
उंच चौथऱ्यावर बांधलेले हे देऊळ पुरातन असुन गाभाऱ्यात नारमातेची तांदळा स्वरूपातील मुर्ती आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी दोन बाजुस घडीव दगडांच्या पायऱ्या असुन मंदिराचा गाभारा व त्याच्या दोन बाजुस असलेली ओसरी यात २०-२५ जणांची राहण्याची सोय होईल. मंदिराच्या आवारात १८-२० विरगळ मांडलेल्या असुन प्राचीन मंदिराचे काही अवशेष पहायला मिळतात.
![]() |
| दरवाजाचा आत गेल्यावर येथे वीरगळ दिसतात. त्याचा वरती मंदिर आहे. तिथे अजून १०/१५ वीरगळ आणि काही मूर्ती तसेच एक तुटलेली तोफ दिसते. |
![]() |
| दगडाचे भांडे |
![]() |
| दगडाचे गोळे |
तिथेच मंदिराच्या बाहेर एके ठिकाणी शंकराची पिंडी आणि काही मुर्त्या ही
ठेवलेल्या आहेत. त्याच्या जवळच एक तुटलेली तोफ ही आहे. पण ह्या मंदिराजवळ
जाण्यासाठी थोडे पुढे जाऊन वरती वाट लागते. जेथे आपल्याला सुरवातीला वाटेत
वीरगळ दिसते तेथून वाट नाही. वाडीकडे जाते वेळी रस्त्यात डाव्याबाजूला थोडा
उंचावर दगडी भांडे असा झाडाला फलक लावलेला दिसतो. तेथे एका दगडात
भांड्यासारखा खड्डा केलेला दिसतो. ते पाहून आम्ही पुढे चालू लागलो असता,
वाटेत डावीकडे अशाच एका झाडाला "दगडी गोळे " म्हणून फलक लावलेला दिसतो आणि
तेथून एक वाट डावीकडे पाठीमागे वाट झाडातून जाताना दिसते. त्या वाटेने आत
गेलो असता, झाडांमध्ये एका मोकळ्या जागेत गोल आकाराचे, दगडाचे ८ गोळे
दिसतात. त्याच्या बाजूलाच भग्न अवस्थेतला एक नंदी बैल सुद्धा दिसतो. त्याचा
समोरच आंब्याच्या एका मोठ्या झाडाखाली छोटा दगडाचा बांध आहे. त्यात तांदळा
स्वरूपाचा शेंदूर लावलेला देव दिसतो. ते पाहून पुन्हा मुख्य वाटेला येऊन
सिद्धगड वाडी गावाकडे जायचे.
धापटपाडा येथुन सुरवात केल्यापासुन माचीवर येण्यास ३ तास लागतात. नारमातेचे दर्शन घेऊन आपण सिद्धगडवाडीत येतो, तेव्हा सुखद धक्का बसतो. अवघ्या पंचवीस-तीस घरांचा उंबरठा असलेला सिद्धगड गाव अतिशय उंच आणि आडरानात असूनसुद्धा स्वयंपूर्ण आहे. सदाहरित वनराई, आल्हाददायक हवा, प्राथमिक शाळा, अलीकडेच गावात आलेली वीज, मुबलक पाणी, शेती आणि जंगल संपत्तीमुळे गावकऱ्यांच्या साऱ्या मूलभूत गरजा इथेच भागत असल्याने त्यांचा आधुनिक जगाशी फारसा संबंध येत नाही. गावात प्रवेश करताना डावीकडे एक शाळा असुन या शाळेत १५-२० जणांची राहण्याची सोय होते. वाडीतील मातीची काही घरे जुन्या घरांच्या घडीव चौथऱ्यावर बांधलेली आहेत. माचीवर पावसाळी पाणी साठविण्याचा एक तलाव व दोन विहिरी असुन या दोन्ही विहिरीचे पाणी गावकरी पिण्यासाठी वापरतात. इथली आदिम वस्ती महादेव कोळी जमातीची असून येथे हेमाडे, घीगे, वडेकर, यंदे, कोकाटे, भवारी या आडनावांची कुटुंबे राहतात. लोक सुखी-समाधानी आणि अगत्यशील आहेत. २००४ पर्यंत येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा होती. तिचे रूपांतर वस्तीशाळेत केले असून सिद्धगड वाडीतील तानाजी मारुती हेमाडे हे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. अशा या स्वावलंबी, स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या गावावर २६ ते २९ जुलै २००५ साली नैसर्गिक प्रकोप झाला, त्यावेळी संपूर्ण कोकणातच अतिवृष्टीने थैमान घातले होते. त्या काळरात्री धरणीकंप व्हावा तसा गड हादरला. कानठळ्या बसविणारा कडकडाट करीत सिद्धगडाच्या दक्षिणेकडील काही भाग व पूर्वेकडील सह्याद्रीचा प्रचंड कडा, त्यावरील मोठमोठ्या झाडाझुडुपांसहीत खाली कोसळला आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्याने दरीतील नदीचे पात्र बदलले. यामुळे सिद्धगडावरील लोकांचा जगाशी असलेला संपर्क तुटला. परंतु या विलक्षण आपत्तीनंतर गावकरी लगेच सावरले आणि त्यांनी नव्या उमेदीने जीवनक्रम सुरू करताना हजारो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या आकाशातील घरट्याशी जोडली गेलेली नाळ तुटू दिली नाही.
वाडीतील कौलारु घरे
सिद्धगड हा पुणे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर उभा आहे. सह्याद्रीतील भीमाशंकर रांगेच्या उभ्या भिंतीला बिलगून असलेली सिद्धगडाची माची किंवा सिद्धगडवाडी सुमारे दोन हजार फूट उंच आहे. हा आहे किल्ल्याचा पहिला भाग. माचीवरील प्रवेशद्वार ओलांडले की, मग सुरू होतो शिखरमाथा म्हणजे बालेकिल्ल्याचा दुसरा भाग. सिद्धगडाच्या माचीवर सह्याद्रीपासून किंचित सुटलेला आणि समुद्रसपाटीपासून ३२३६ फूट उंच असा हा बालेकिल्ला घराच्या दोन पाकी छपरासारखा आकाशात निमुळता होत गेलेला दिसतो. जणू विशालकाय चौरंगावर अलगदपणे आणून ठेवलेला इजिप्तचा पिरॅमिड वाटावा तसे दुरून सिद्धगडाचे विलोभनीय दर्शन होते.

परंतु त्याचे हे देखणे रूप त्याच्याजवळ जाईपर्यंतच टिकते, कारण प्रत्यक्ष सिद्धगडावर चढाई करीत जसजसे आपण वर जावे, तसतसे त्याचे रौद्रभीषण स्वरूप समोर येत जाते. समोरची सह्याद्रीची उंच कातळ भिंत आणि तळकोकणातील वाढत जाणारी खोल दरी पदोपदी आपल्या काळजाचा ठोका चुकवीत असते. सिद्धगडाची भव्यता आणि भीषणताही आपल्याला स्तिमित करते व आपसूकच त्याच्याबद्दल एकप्रकारे भीतीयुक्त सुप्त आकर्षण वाटू लागते. या आकर्षणापायीच शेकडो वर्षांची परंपरा जपणारी आदिम संस्कृती सिद्धगडावर अद्याप सुखनैव नांदते आहे, याचे मग आपल्याला आश्चर्य वाटत नाही. गडावर शिवलिंग, नंदी, गणपती कार्तिकेय आणि शिवपरिवारातील देवदेवता तसेच सतीशिळा व वीरगळ गडावरील अज्ञात झुंजीची आठवण करून देतात.
सिद्धगडवाडीतुन बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दिड तासांचा उभा चढ असल्याने व गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने वाडीतुन पुरेसे पाणी सोबत घेऊनच चढाईची सुरवात करावी.
सिद्धगडवाडीतुन बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दिड तासांचा उभा चढ असल्याने व गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने वाडीतुन पुरेसे पाणी सोबत घेऊनच चढाईची सुरवात करावी.
बालेकिल्ला किंवा गुहेकडे जाण्यासाठी तुम्हाला गावात जाण्याची गरज नाही. गावात पोहोचायच्या थोडे अगोदर डावीकडे, पाठी एक वाट आत झाडा-झुडपातून जाताना दिसते. त्यावाटेच्या बाजूलाच डावीकडे एक लहान फलक लावला आहे. झाडामुळे तो पटकन दिसत नाही. बालेकिल्ल्याची वाट पायथ्याच्या झाडाझुडपातून वर किल्ल्यावर जाते. त्यामुळे पायथ्याला वाट चुकण्याची खूप शक्यता आहे. त्यात मुख्य कारण वाटेला मध्ये मध्ये अजून फाटे फुटतात, त्यामुळे तुम्ही चुकू शकता. त्यामुळे आम्ही गावातील एखाद्या स्थानिक व्यक्तिला विचारुन वाटेची खात्री करायला हरकत नाही. सुरवातीची वाट दाट झाडीतुन जाणारी असल्याने व फारशी मळलेली नसल्याने वाडीतून वाट समजुन घ्यावी किंवा वाटेच्या सुरवातीला काही काळ वाटाड्या सोबत घ्यावा. सरळ वर चढायचे आहे, हे लक्षात ठेवून वाटेत येणर्या फाट्याकडे दुर्लक्ष करायचे. काही ठिकाणी दगडावर केलेले बाणाचे चिन्ह आहेत.एकदा तुम्ही त्या झुडपातून बाहेर आलात कि गुहेपर्यंतची वाट न चुकता पोहचतात. पण काही ठिकाणी वाट जरा जपून चढायला लागते. वीस मिनिटात आम्ही गुहे जवळ पोहचलो.या वाटेने अर्ध्या तासाची थकवणारी चढाई केल्यावर नव्याने बांधलेली एक समाधी पहायला मिळते. बारकाईने पाहिल्यास हि समाधी गडाच्या वाटेवर असलेल्या चौकीच्या चौथऱ्यावर उभारलेली आहे.
येथुन १० मिनीटे चढुन गेल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस कड्यात कोरलेली एक
गुहा पहायला मिळते. गुहेचा तोंडाकडील भाग घडीव दगडांनी बंदीस्त केला असुन
त्यात दरवाजा बांधलेला आहे. गुहेत जाण्यासाठी एकावर एक दगड रचुन पायऱ्या
बनविल्या आहेत. गडाच्या वाटेवर मुक्काम करायचा झालास १५-२० लोकांना या
गुहेत राहता येईल.
वास्तविक हि गुहा मानवनिर्मित म्हणजे लेणे आहे.या कातळकोरीव गुहेवरुन या गडावर मानवाचा प्राचीन वावर होता याचा स्पष्ट पुरावा आहे. कदाचित या परिसरातील इतर प्राचीन वाटा पहाता हे लेणे सातवाहन कालातील किंवा नंतरचे असावे. कल्याणच्या कोण्या व्यक्तीला जगरहाटीचा कंटाळा आला आणि त्याने वैराग्य पत्करुन खुप काळ या गुहेत मुक्काम केला.सध्या मात्र गुहेत कोणाचा मुक्काम नाही.खरतर प्राचीन वारसा असणार्या या गुंफाचा असा वैयक्तीत रहिवासासाठी वापर होउ नये अशी अपेक्षा आहे.
गुहेच्या दोन्ही बाजुस कातळात कोरलेली पाण्याची २-२ म्हणजे एकुण ४ टाकी असुन यात डाव्या बाजुचे एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. ही टाकी खालून लगेच दिसत नाही. जेव्हा वाट वर फिरते तेव्हा दिसते.
गुहेसमोरून गडाची माची, गोरखगड व आहुपे डोंगराचे सुंदर घडते.
गुहेसमोरून गडाची माची, गोरखगड व आहुपे डोंगराचे सुंदर घडते.
ह्या वाटेत बहुतेक ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या, तर काही जीर्ण झालेल्या पायऱ्या लागतात. तर काही ठिकाणी दगडावर पाय ठेवून जायला लागते.
![]() |
| बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेत अशाप्रकारच्या तुटलेल्या पायऱ्या लागतात. |
वाटेत एके ठिकाणी लहानशी बसण्यासाठी गुहा लागते, त्याच्या बाजूने, डाव्याबाजूला वर जायला पायऱ्या लागतात. वाटेत विशेष करून किल्ल्याच्या माथ्यावर पोहचण्याचा वरच्या भागात, वेगवेगळ्या अंतरावर दोन मोठ्या कातळात खोदलेल्या पाण्याची टाकी लागतात.
![]() |
| गडमाथ्याला लागूनच खाली असलेली टाकी. ह्या टाकीचा बाजूनेच वाट जाते. आणि खालील फोटोत गड माथ्यावर आलेली वाटेचा फोटो. |
पहिली टाकी तुटलेली आहे. तर दुसरी रिकामी टाकी एकदम माथ्याच्या जवळ लागते. ह्या टाकी जवळ पोहचताच आपण माथ्यावर पोहचतो.गुहेपासून गडमाथ्यावर पोहचायला १ तास लागला. तर सिद्धगड वाडीतून दीड तास लागतो.
किल्ल्याचा या भागात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन भग्न तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. टाकी आणि गुहा बघून आम्ही उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेने चालू लागावे.
बुरुजाकडे जाण्याचा मार्ग
बालेकिल्ल्याचा माथा अरुंद आणि पूर्व-पश्चिम पाव मैल लांब असून समुद्रसपाटीपासुन २१७० फुट उंचावर असुन साधारण ४ एकरवर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. प्रत्यक्ष बालेकिल्ल्याची लांबी-रुंदी ७५ फूट बाय २४५ फूट आहे.
गडावर पडक्या मंदिरात उघड्या आभाळाखाली शंभूमहादेवाची पिंडी आणि त्यावर अनादी काळापासून नजर स्थिर ठेवून बसलेला नंदी आहे. पिंड आणि त्याच्या बाजूला असलेले काही दगड पाहून, तिथे पहिले मंदिर असावे,
असा अंदाज येतो. पिंडीच्या बाजूलाच ३ मोठ्या टाक्या लागतात आणि त्याच्या पुढे मोजून १०-१२ पाऊले चाललो असता, त्याच्या पुढे पाच टाक्यांचा समूह दिसतो.
आपण माथ्यावर जिथे पोहचतो ते बहुतेक आपण बरोबर माथ्याच्या
मध्यभागी पोहचतो. त्यामुळे आपल्या एका बाजूला वाड्याचे अवशेष लागतात तर
दुसऱ्या बाजूला पाण्याची टाकी आणि टोकाला बुरुज लागतो.
बालेकिल्ल्याचे दोन भाग पडलेले असुन उजवीकडे तटबंदीने बंदीस्त केलेल्या भागात मोठया प्रमाणात वाड्यांचे अवशेष असुन डावीकडील लांबलचक भाग सोंडेच्या दिशेने निमुळता होत गेला आहे.
डावीकडुन माथा फिरायला सुरवात केल्यावर सुरवातीस एका रेषेत कातळात कोरलेली ३ टाकी पहायला मिळतात. यातील शेवटचे टाके काही प्रमाणात बांधकाम केलेले आहे. या टाक्यांच्या पुढील भागात डोंगर उतारावर ४ टाक्यांचा समुह दिसतो. यातील १ टाके बुजलेल्या अवस्थेत असुन उर्वरित ३ टाक्यात पाणी असले तरी पिण्यायोग्य नाही.ह्या मधील पहिल्या टाकीच्या कातळाची भिंत चांगली असल्यामुळे अखंड टाकी दिसते. पण दुसरी आणि तिसरी टाकीच्या मधील कातळ भिंत अर्धी तुटल्यामुळे एक झाली आहे. तर त्याच्या वर अजून दोन टाकी दिसतात. पण त्याचा बाजूचा कातळ तुटलेला असल्यामुळे टाकीचा खड्डा दिसतो येथे दोन टाक्या असाव्यात.गडाच्या माथ्यावरील एकाही टाकीतील पाणी पिण्यायोग्य वाटत नाही.
टाकी पाहुन पुढे ५ मिनिटांची वाटचाल केल्यावर एका ठिकाणी १५ फुटांचे सोपे प्रस्तरारोहण करून आपण सोंडेच्या खालील भागात उतरतो. या ठिकाणी भगवा झेंडा रोवलेला आहे.
टोकाला असलेला बुरुज
टोकाला असलेला बुरुज
टाकी बघून पुढे चालू लागावे. ह्या बाजूचे टोक थोडे लांब आहे आणि खाली आहे. त्यामुळे बुरुज थोडा खाली असल्यामुळे, गडाच्या टोकाला गेल्याशिवाय दिसून येत नाही.याच्या पुढील भागातील सोंडेची तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीत २ बुरुज पहायला मिळतात. सोंडेच्या टोकावर साधारण ४० फुट उंचीचा मोठा बांधीव बुरुज असुन या बुरुजात गडावरून खाली उतरण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. हा बुरुज जवळ जाईपर्यंत दिसुन येत नाही. दरवाजाची चौकट व कमान आजही शिल्लक असुन दरवाजाचा तळातील ४-५ फुट उंचीचा भाग दगड टाकुन बंद करण्यात आला आहे पण यातुन बाहेर जाता येते. या दरवाजाच्या वाटेने काही अंतर खाली उतरता येते पण पुढची वाट मात्र वापरात नसल्याने पुर्णपणे मोडलेली आहे. बुरुजावर मशाल रोवण्यासाठी असलेले घडीव दगड पहायला मिळतात.
![]() |
| बुरुजावरून खाली दिसणाय्रा टेकडी कडे पहिला असता. टेकडीवर दोन टाक्या दिसतात |
बुरुजाच्या समोरील बाजुस टेकडीवर कातळात कोरलेली पाण्याची २ कोरडी पडलेली टाकी दिसतात. टाकी रिकामी आहेत. पण तिथे टाकी असण्याचे प्रयोजन कळत नाही किंवा त्याकाळी ती टेकडी वापरत असावी.गडमाथ्याचा डावीकडील भाग पाहुन झाल्यावर पुन्हा माथ्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणी येऊन उजवीकडील भाग पहाण्यास सुरवात करावी.
पुढे गेल्यावर डावीकडे आपल्याला लहान मंदिरासारखा चौथरा दिसतो. ह्या चौथऱ्यावर पिंडीच्या वरच्या भागासारखा, तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेला देव सिमेंट लावून स्थापित केलेला दिसतो.
![]() | ||||||||||||||||
| दरवाजाने आत गेल्यावर काढलेला फोटो |
पुढे गेल्यावर डावीकडे आपल्याला लहान मंदिरासारखा चौथरा दिसतो. ह्या चौथऱ्यावर पिंडीच्या वरच्या भागासारखा, तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेला देव सिमेंट लावून स्थापित केलेला दिसतो.
सोंडेचा हा भाग तटबंदीने बंदीस्त केला असुन आत जाण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी ओवऱ्या आहेत. तटबंदीच्या आतील भागात एक ढासळलेला बुरुज पहायला मिळतो.
![]() |
| वाड्याचे अवशेष आणि खालील फोटोत त्याचा दरवाज्याचा फोटो |
या भागात मोठया प्रमाणात वास्तुचे चौथरे असुन डावीकडील उतारावर कातळात कोरलेले पाण्याचे लहान टाके आहे. यातील एका चौथऱ्यावर रचलेले दगड पहाता या ठिकाणी बहुदा मंदीर असावे. गडाच्या या टोकावर चौकीच्या पडक्या भिंतीचे अवशेष पहायला मिळतात. वाड्याच्या दरवाजातूनच आपल्याला प्रवेश करायाला लागतो. वाड्याच्या फक्त चौथऱ्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या दरवाजाच्या खालची अर्धी चौकट शाबूत आहे, त्याच्या बाजूला पडकी भिंत आहे. दरवाजातुन आत गेल्यावर आपल्या दोन्ही बाजूला चौथरे लागतात आणि समोर थोड्याच अंतरावर अजून एक चौकोनी चौथरा लागतो हा चौथरा घराचा वाटत नाही. त्याच्या बाजूने वाट पुढे गडाच्या टोकाला जाते. पुढे गडाचे टोक लागते. गडाच्या टोकाला, बहुतेक लहान चौकी किंवा घराचा पडक्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्याच्या मागे गडाचे टोक लागते तिथे भगवा झेंडा लावलेला आहे. इथे आपल्याला बुरुज किंवा तटबंदीचे काही अवशेष दिसत नाही.
सिद्धगडच्या माथ्यावर पोहोचल्यावर मात्र आपला आनंद गगनात मावेनासा होतो .सोबत आणलेल्या न्याहरीचा आस्वाद घेता घेता भोवताल निरखावा. सगळीकडे गर्द हिरवे पसरलेले जंगल ,समोर भीमाशंकरचे होणारे लोभसवाणे दर्शन ,भीमाशंकर ते दमदम्या हा परिसर पुर्वेला दिसतो.भीमाशंकर-घोनेमाळच्या डोंगराचे सह्याद्री वरून खाली कोकणात उतरणारे कडे थरारक दिसतात.उत्तरेला आहुपे - गोरख गड आणि दुर्ग ढाकोबा,दर्या घाट पर्यंत पसरलेले अफाट भीमाशंकर अभयारण्य दिसते.वायव्य दिशेला माहुली ,बारवी धरण जलाशय पर्यंतचा परिसर तर पश्चिमेला माथेरान, प्रबळगड, पेब, मलंगगड,चंदेरी, ताहुली सामावणारी पुर्ण हाजीमलंग-माथेरान रांग दिसते.त्यापलीकडे माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड आणि प्रबळगड डोकावताना दिसतो. डावीकडे म्हणजे दक्षिणेला पूर्ण सपाट प्रदेश दिसत होता बहुतेक खांडस गावापर्यंत दिसतो. दक्षिणेला नजारा मोठा झक्कास आहे. भीमाशंकर, पदरगड,पदरगडच्यामागे कोथळीगड अंधुक दिसतो, तुंगी असे सह्याद्रीचे शिलेदार दिसतात. खाली दिसणारे जाम्बुर्डे धरण हुतात्मा भाई कोतवालांचे समाधी स्मारक हे सगळे दृश्य बघून झाल्यावर ४ ते ४.५ तास केलेली पायपीट सार्थक झाल्याचे वाटते
गडाच्या पश्चिम टोकावरुन अफाट परिसर दिसतो.अगदी खाली सिध्दगडाची माची आणि त्यावरची कौलारु घरांची माची सिध्दगडवाडी दिसते.
राकट कडे असणारी सह्याद्रीची मुख्य रांग
भीमाशंकरच्या पठाराचे कातळकडे आणि पुढे धमधम्या डोंगर
सिध्दगडावरुन दिसणारा गोरखगडाचा सुळका
संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गसंपदा ठाण्याची -सदाशिव टेटविलकर
३) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.in हि वेबसाईट
७) महाराष्ट्र देशातील किल्ले -चिं.ग,.गोगटे
८) http://ontheedgeofsahyadris.blogspot.com/2012/04/ हा ब्लॉग
९) https://kunalstrek.blogspot.com/2018/07/siddhgad.html हा ब्लॉग

१०) दै. सामना,लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स, प्रहार यामधील लिखाण

सारे काही आम्ही दोघे त्या शांततामय परिसरात नजर खिळवून बघत होतो.. असा आस्वाद ग्रुपमध्ये ट्रेक केला तर मिळत नाही.. खरच सुख असते हे सारे अनुभवण्यात..
आमची क्षणभर विश्रांती चालू असतानाच समोरच एक ढगाचा भलामोठा कापूस कुठलाही आवाज न करता येउन
Members: Sulekh Baikar and Sambhaji Chopdekar
1. The beginning from Uchale:
During Gorakhgad hike, one must have seen the massive Siddhagad on the way. We decided to visit this mighty fort on this Sunday. We reached Mhasa at 08.45 am via Murbad. As per the literature available, Narivali is the base village to this beautiful fort. But in one of the books* it’s mentioned that Uchale, the next village to Narivali on the Mhasa-Dehri road, would be an ideal halt to start this hike. We decided to do the same as some of the local people advised us not to proceed from Narivali since there are lots of routes that may confuse a naïve trekker while the route from Uchale is a straight forward one. And it proved the same as we lost the valuable time while returning to Narivali in the evening.
We alighted at Uchale at about 09.10 am. From here, the view of both Machchhindra and Gorakhgad is simply awesome. The area surrounded by Siddhagad, has now been declared as the Bheemashankar Sanctuary. A board depicting the same welcomes us there.
The ‘Rajmarg’ for the Siddhagadwadi from here is just amazing! Most of the times, we had to walk through the watery path due to overflow from the nearby streams. It was not raining but we couldn’t spot our destination i.e. Siddhagad due to thick fog.
Soon we came across a small, narrow river that might be flowing through the Gorakhgad valley. We found a suitable place there to have some breakfast. A villager joined us while we were discussing the next route as the clouds were not yet cleared from the Siddhagad machi. But this local confirmed that we were on the right track.
Actually the route is quite simple. One must eye for heading toward the ‘Siddha’ pinnacle (Siddhachi Lingi) as the first destination. After having breakfast, we resumed our journey and soon reached a hamlet called Shindewadi. As per the advice of a local boy, we kept on going straight and came across a river. This same river may be flooded when the rains may be in full swing. The Gorakhgad always accompanies us to the left. And we were so amused by the surrounding beauty that we were almost trying to capture each and every frame that we found beautiful. It might be one of the reasons for which we had to pay afterwards.
We crossed this not so flooded river easily and soon reached another hamlet called Siddhagadwadi at about 10.15 am. Now the way ahead was familiar to Sulekh who had done this hike seven years ago.
2. Motiram Bhaware’s jhaap:
There is a steep route from this small hamlet that goes through a thick jungle. There are too many tracks on the way that may confuse us. But it’s always advisable to go through the middle one which is the most prominent one and not to forget to keep the stream (remember the same earlier river!) to the left. The route was leading us to the base of the Siddha pinnacle keeping the Siddhagadmachi toward right.
It was almost 11.00 am when we came upon a small hut belonging to Mr. Motiram Bhaware. It’s the only shanty on this way; so reaching here, one must feel relieved to know that s/he is on the right track. From here, the Siddhagadmachi remains toward our right and the way, mostly known as the Narivali ghat further goes toward the Siddha pinnacle.
3. Narivali Ghat:
We continued our hike keeping an eye on the Siddha pinnacle, keeping the stream originating from this pinnacle as well as the beautiful Siddhagadmachi toward our right. After hiking for about 30 minutes, we reached a point where one has to cross this stream to the right (11.30 am). Again, the same thing happened. We couldn’t control ourselves from capturing the beauty of this full-fledged flowing stream in our cameras and spent some valuable 15 minutes at this junction. But I think, it was worth.
After having that fun, we crossed this stream and started climbing the ghat. Soon we came across another stream that jumps down the valley gracefully. From here, the mouse shaped Kakadmala pinnacle looks fabulous. There is a small rock-cut water tank near a chafa tree at this junction. The beautiful ghat then led us toward the Siddhagad machi keeping the Siddha pinnacle always in front. On the way, there is a beautiful stone arrangement.
At about 12.15 pm, we were welcomed by the equally beautiful gate. The route from Bheemashankar meets this junction. Before proceeding toward the entrance, we changed our track to visit the two stone structures lying near a small plateau which is facing the Siddha pinnacle. The Kakadmala pinnacle and the adjacent mighty hill (Damdamya Dongar) toward right present an excellent view from here. The Siddhagad machi and its massive citadel (balekilla) offer an equally fascinating view toward our left. One can easily locate the Naarmata temple surrounded by thick jungle from here.
4. Siddhagadmachi:
We returned from this heaven and entered the gate. The entrance is still in wonderful condition. It was almost 12.30 pm so we skipped the Naarmata temple and went ahead. After walking for about 15 minutes we reached the famous school (Just kidding! But it is a well-known place among trekkers as it’s an ideal place for the night-stay).
Just before this school, the route bifurcates toward left for the balekilla. The route to the top can be visualized from here-just look at the massif for a cave which is of Saatvahan era. Just above it, there is another rectangular-shaped excavation. The route is through a hidden col which is situated to the right of this Saatvahan cave. Here some small steps (paavtya) offer the much needed help.
5. Toward the balekilla:
We decided to have our lunch at top and marched toward the balekilla. The route is quite easy which passes by a big mango tree. We entered the jungle and started climbing toward the balekilla. The view of Siddhagadmachi and Gorakhgad after ascending some distance is simply breathtaking.
At about 13.35 pm, we reached the cave of Saatvahan era. There are two small water cisterns nearby to the right of this cave. We then traversed to the right and reached the hidden col. This is the first set of steps that are cleverly made. Hats off to the creator!
After ascending those, we came across another set of about 30-35 useful steps. One must be careful while ascending further as the valley offers a frightening look to the left. It was then a zigzag route that reminded me of my Salher hike. The steps are really helpful. The most dangerous spot is just before the rectangular excavation where the water flows down the steps continuously to make them slippery and there is a free fall behind. We must thank nature as it didn’t rain during our march.
6. The summit:
At about 14.40 pm, we reached the top and we were happy that we could make it at last after 5 hrs. Before having lunch, we decided to inspect the fort first. We were first welcomed by a well-carved Shivpindi and Nandi who have been here bearing the wrath of nature without having any shelter. One can locate the Jambhurde dam to the South-west. The view of Padargad from here to the South is just superb!
There are two big water cisterns to the left beside the shivpindi. When we started toward the eastern part, we found a complex of three more water cisterns ahead which are interconnected and the water seemed to be potable. We went further to find a beautiful green spur just similar to Vinchukata of Lohgad.
We came back and then proceeded toward the western part. There is a small gate which comprises of two small guard rooms (devdya) inside it. We entered it and moved toward the western end to find some remains of houses. There is one dilapidated structure at the end and the view of Gorakhgad from here is beyond explanation.
We returned back to the Shivpindi, had lunch and set out for the return journey at about 15.40 pm. Thus we spent full one hour atop. Descending was fun but at some point, frightening too, especially near the rectangular excavation. A rope is certainly advisable for this patch.
7. The climax:
We reached Siddhagadmachi at 17.00 pm. You know what, it was our first hike that was not yet over; otherwise we try to finish it by this time as it’s sometimes dangerous due to the diminishing light. However we were fortunate as the sunlight was quite in abundant and it took about half an hour to reach the stream where we had enjoyed in the morning. It was time to get refreshed so we spent another 15 minutes there to enjoy the waters. At about 17.50 pm we resumed and within 20 minutes we had been at the Bhaware’s hut (18.10 pm). Still Dilli was far ahead!
We set out for Narivali from here as the ST for Murbad does not go up to Uchale. We made it really fast keeping the Siddhagad machi toward left. But the route is not so simple. We were walking endlessly to find our dearest destination, Narivali. But it was not yet in our sight. No doubt, we were helped by the local people on this route. But still it was a long route than our expectations.
We crossed the river (the same!) and were on the most convincing bullock cart way. But it proved deceptive. The time was running out like the dried sand through the palms. At about 18.45 pm, we were literally running desperately to look for the Narivali village and we lost our way.
But soon, Sulekh identified a villager in the dimming light and called upon for the further way. Due to his great help, we reached a field where a farmer was just returning home after his work. He accompanied us up to Narivali and in the diminishing light, we reached there at about 19.20 pm, only to discover, the ST had left for Murbad.
It was our mistake that we could not make out it and decided not to repeat such mistake again in future. It was our fault as we unnecessarily spent time in the morning. Really it was a very frustrating situation as the private vehicles plying on this road had gone for taking rest. But there was a last hope, an ST for Murbad** at 20.30 pm and we desperately waited for it like a lover waits endlessly for his lady!
* Reference: A Marathi book entitled ‘Chala Trekkingla’, by Pandurang Patankar, Snehal Prakashan, Pune
**Note: The ST for Murbad does not go via Mhasa.
सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा