ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर एक दुर्गत्रिकुट उभे आहे.सह्यमंडळाचे हे मानकरी आहेत सिध्दगद्,गोरखगड आणि मच्छिंद्रगड.महाराष्ट्राच्या भौगोलिक नकाशाकडे नजर टाकली कि दक्षिणेकडून उत्तरेकडे धावणारी सह्याद्रीची रांग ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर अचानक इशान्येकडे वळते.हरिश्चंद्रगड गडाच्या कोकणकड्याला धडकून पुन्हा उत्तरेकडे सरकते.सह्याद्रीच्या या कोपर्यावरच दोन बोटांसारखे सुळके दिसतात.हे आहेत गोरखगड आणि मच्छिंद्रगड.हे दोन्ही सुळके जणु इंग्रजी व्हि आकारात एकमेकांशी जोडले गेल्याने ते जणु व्हिक्टरी म्हणजे विजयाचे प्रतिक बनले आहेत.तर यांच्या दक्षिण बाजुला सह्याद्रीच्या मुख्य रांगेला टेकून बसलेला सिध्दगड आहे.या गोरखगडाचे देखणे दर्शन अनेक ठिकाणावरुन होते.नाणेघाटातून , ढाकोबावरुन्,माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवरुन हि दुर्गजोडी खुणावत रहाते.
गोरखगडाचे मोक्याचे स्थान पहाता हा गड नक्कीच सातवाहनकालीन असावा असे वाटते.याचा कातळकोरीव मार्ग आणि गुंफा पहाता हाच निष्कर्श निघतो. गोरखगडाचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा. पुर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. गोरखगड येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही पण १६५७ साली मराठयांच्या ताब्यात असलेल्या या गडाचा मोगलांनी २० औक्टोबर १६९३ रोजी ताबा घेतल्याचा एकमेव उल्लेख आढळतो.सन १८१८ मध्ये कॅप्टन डिकीन्सनने हा गड घेतला.त्यावेळी त्याने काही निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत.त्याच्या मते या गडाचे वरचा आणि खालचा असे दोन भाग आहेत.मात्र १८१८ ला डिकीन्सनने गड घेतला तेव्हा आजुबाजुची परिस्थिती फारच गंभीर होती.या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरु-शिष्यांमुळे या दोनही सुळक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड अशी नावे आहेत. दरवर्षी मार्गशीष पौर्णिमेला येथे जत्रा भरते . लांबुन पहिले असता गोरखगडाच्या माथ्यापार्येंत वाट असेल यावर विश्वास बसत नाही.
ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ाच्या सीमेवरील सह्याद्रीच्या डोंगररांगेत माळशेज, नाणेघाट, अहुपे हे प्राचीन घाटमार्ग आहेत. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी लहानमोठे टेहळणी दुर्ग उभारले गेले. यातील अहुपे घाटाचा पहारेकरी म्हणजे गोरखगड.
अर्थात स्थानिक लोक देहरीचा इतिहास सांगतात तो मोठा मनोरंजक आहे. त्यांच्या मते, इसवीसनाच्या बाराव्या शतकात, त्या गावाचे नाव "उंबर" असे होते. महसूलकार्यालयात अजूनही देहरीचा उल्लेख उंबर असाच सापडतो. घाटावरून खाली उतरण्याचे अनेक मार्ग तत्कालिन उंबरगावाच्या आसपास होते. नंतरच्या काळात त्या घाटवाटा लुप्त झाल्या. त्या वाटा कोकणात उतरल्यावर लागणारे साडेतीन लाख चुला (चुला = चूल किंवा घरे या अर्थी) असलेले हे गाव होते. तेराव्या शतकात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमणांत गावाचे नाव बदलून दहलीज (उंबर्याला उर्दू प्रतिशब्द) झाले आणि त्याचा अपभ्रंश होऊन देहरी झाले. त्या काळात देहरीमध्ये साडेदहा लाख वस्ती होती .अर्थात या सर्व सांगोवांगीच्या गोष्टी असल्यामुळे यात फार तथ्य नाही.
मुंबई व पुणे येथील दुर्गप्रेमीना एक दिवसात सहज साध्य करता येणारी हि भटकंती असल्याने सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर बऱ्यापैकी गर्दी असते. गोरखगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. देहरी हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुरबाडहून देहरी येथे येण्यासाठी खाजगी जीप अथवा एस.टी उपलब्ध आहे. येथे मुक्काम करावयाचा असल्यास गावातील विठ्ठल मंदिरात मुक्काम करता येतो.
गोरखगडावर यायचे तर विवीध पर्याय आहेत.
१ कल्याण मार्गे :-
गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला, तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून - म्हसा - देहरी फाटया मार्गे धसई गावात यावे. येथून देहरी पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी ची सेवा उपलब्ध आहे. देहरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात.
२ मुरबाड मिल्हे मार्गे :-
मुरबाड - मिल्हे मार्गाने देहरी गावी यावे. या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते.
३ सिध्दगड ते गोरखगड
गोरखगडावर येण्यासाठी सिध्दगडावरूनही एक वाट आहे अनेक ट्रेकर्स सिध्दगड ते गोरखगड असा ट्रेक करतांना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिध्दगडावर जाण्यासाठी मुरबाड नारिवली मार्गाने यावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिध्दगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिध्दगड उतरावा वाटेत असलेल्या ओढ्याबरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो. या वाटेने वर आल्यावर आपण एका छोटयाश्या पठारावर येऊन पोहचतो. पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे आणि दोन समाध्या देखील आहेत. येथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. आपण कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. या मार्गाने गड गाठण्यास तीन तास पुरतात.
४. खोपिवली मार्गे :-
मुरबाडहून - म्हसा मार्गे देहरी गावाकडे जाताना, देहरीच्या अलिकडे २ कि.मी. अंतरावर खोपिवली गाव आहे. या गावातून मळलेली पायवाट गोरखगडावर जाते. या पायवाटेवर एक आश्रम आहे. ही वाट इतर वाटांपेक्षा सोपी आहे. या मार्गाने गड गाठण्यास २ तास पुरतात.
देहरीत मुक्काम किंवा जेवणाची सोय करायची असेल तर गावातील श्री. हमीदभाई यांच्याशी संपर्क करायला हरकत नाही.
देहरी गावातून दिसणाऱ्या दोन सुळक्यापैकी मोठा सुळका गोरखगड किल्ला तर छोटा सुळका म्हणजे मच्छिंद्रगड. मच्छिंद्रगडच्या नावात गड असला तरी हा गड नसुन केवळ एक सुळका आहे. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून २१३७ फुट आहे. गोरखगडाच्या आसपासचा परिसर वनखात्याच्या ताब्यात असुन भीमाशंकर अभयारण्यामुळे प्रसिध्द आहे

मुरबाडमधील देहरी गाव बसथांब्यावर उतरून गोरक्षगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूने डोंगराच्या धारेवरच्या पाऊलवाटेने सुमारे १ किमी चालल्यावर आपण घनदाट जंगलात येतो. जंगलात जाणारी खडी चढण असलेली वाट आपल्याला गोरखगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिंडीत आणून सोडते. तिथून डावीकडे वरच्या दिशेने गोरखगडाकडे वाट जाते. तर सरळ वाट समोरच्या डोंगराच्या कुशीतल्या भवानी मंदिराकडे जाते.
या खिंडीत महादेवाचे छोटेसे मंदिर असुन मंदिरासमोर दोन प्राचीन समाध्या आहेत. पुर्वीच्या काळी येथे एखादे मंदिर असावे कारण या खिंडीत मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले मंदिराचे दगड दिसुन येतात.
गोरखगडाचा नकाशा
किल्ल्याची खरी सुरुवात येथूनच होते. वळच विहीरही आहे, रानकिड्यांच्या किर्रऽऽ किर्रऽऽ आवाजात माकडांचा 'हूपऽऽ हूपऽऽ' आवाज आपण जंगलाच्या ऐन गाभ्यात आलोय याची सूचना देतो. पुर्वी या भागात किल्ल्याचा दरवाजा असावा पण आता मात्र आपला प्रवेश ढासळलेल्या तटबंदी मधून होतो. थोड्याच वेळात नि:शब्दपणे निसर्गाचे अवलोकन करत, गडाला पूर्ण वळसा मारत पूर्वेकडील बाजूला आल्यावर उभ्या कातळाची चढण लागते.
कातळामध्ये कोरलेल्या पायर्यांचा पहिला चाळीस एक फुटांचा भाग आहे. त्या भागाच्या शेवटी गोरखगडाचा छोटा पण सुंदर दरवाजा आहे.
कातळात खोदलेल्या जवळपास १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपला गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो. हा दरवाजा वेगळ्याच धाटणीचा असुन दरवाजाच्या चौकटीतून आत गेल्यावर पायऱ्या असलेला भुयारी मार्ग कोरण्यात आला आहे.
थोडे वर गेल्यावर पायऱ्यापूर्वी एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले पाण्याचे टाके असुन शेजारी खडकात खोदलेली छोटी गुहा आहे. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. येथुन गडावर जाण्यासाठी पायऱ्या कोरल्या असुन या पायऱ्यांना काही ठिकाणी पकड घेण्यासाठी खोबणी केलेल्या आहेत तर काही ठिकाणी केवळ पाउल ठेवण्या इतपत खोबणी आहेत. येथून सुमारे तीनशे फुटांचा अत्यंत बिकट मार्ग असून त्याच्या उजव्या बाजूला खोल दरी आहे.या पायऱ्या उभ्या कड्यात खोदलेल्या असल्याने थोडे सांभाळूनच चढावे लागते.
पायऱ्या चढताना वाटेतच एका ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेला पण उघडयावर असल्याने झीज होऊन अस्पष्ट झालेला शिलालेख दिसतो.
प्रवेशव्दारातून चढून गेल्यावर वर पाण्याची तीन टाकी दिसतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. इथुन परत एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली एक गुहा आहे.या गुहेतून सिद्धगडाचे दर्शन होते. अत्यंत भेदक दिसणारा सिद्धगड गोरक्षगडापेक्षाही हजार एक फुटाने उंच आहे.
गुहा पाहिल्यावर आपण पुन्हा मागे येऊन उजव्या वाटेने गेल्यावर गोरक्षगडाच्या पोटात खोदलेल्या विशाल गुहेपाशी येतो, तेव्हा आपल्या कल्पनेपलीकडच्या अद्भूत दृश्याने मन थक्क होतो. वर निमुळत्या होत गेलेल्या शिखराच्या पोटात ही प्रचंड आकाराची गुहा खोदलेली असून तिच्या मुखावर तीन आणि आतल्या भागात दोन ३ x ३ फूट रुंदीच्या कोरीव खांबांनी या गुहेचे छत तोलून धरले आहे.या गुहेत ५० लोक सहजपणे मुक्काम करू शकतात. स्थानीक लोक या गुहेला मंडप म्हणुन ओळखतात.
गुहेतून दिसणारा मच्छिंद्रगड -
गुहेतुन समोरच दरीत झुकलेले चाफ्याचे डेरेदार झाड आणि मच्छिंद्रगड निसर्गाचे भव्य आणि उग्ररूपाचे दर्शन करून देतो.
या गुहेत कातळात खोदलेले एक शिल्प असुन त्यात दोन व्यक्ती घोडयावर स्वार झालेल्या आहेत व शेजारी एक कावड घेतलेल्या व्यक्तीचे छोटे शिल्प आहे. दोन्ही शिल्पांना गावकऱ्यानी रंगवलेले आहे. गावकरी या शिल्पाला मामा भाच्याचा दगड म्हणतात.तर काहींच्या मते हे सातवाहन सातकर्णीच्या राजवटींतील शिल्पचित्र असावे. गुहेत एक पाण्याचे टाकेही खोदलेले आहे. पायऱ्या उतरून प्रांगणात आल्यावर दरीच्या तोंडावरील चाफ्याचे झाड मंद सुवासाने आपले स्वागत करते. पण जरा बेतानेच कारण खाली दरी आऽ वासून बसली आहे. गुहेत जाण्यासाठी जिना असून त्याच्या शेजारी अवीट गोडीचे पाण्याचे कुंड आहे. मुक्कामाला आदर्श अशा या गुहेतून पूर्वेकडची सह्याद्रीची रांग, त्यावरील दुर्गी किल्ला ते भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावरील आहुपा घाट,नाणेघाटाचा परिसर दिसतो.
गुहेजवळ पाण्याची टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गोरखगडावर पाण्याची एकुण बारा टाकी आहेत. गुहेपासून डावीकडे गेल्यावर या वाटेवर डावीकडे पाण्याची टाकी आढळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेपासून येथपर्यंतची वाट अरुंद असून तेथे खबरदारी आवश्यक आहे. या टाक्यांपासून पुढे आल्यावर उजवीकडे दगडांवर झेंडा लावलेला दिसतो. या झेंड्यासमोर गोरक्षगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत.

त्यानंतर पुन्हा आम्ही गुहेपासून वर जाणार्या पायर्यांपाशी आलो. गोरखगडाचा अवघड म्हणता येईल असा पॅच इथून सुरू होतो. सरळसोट कातळामध्ये खड्या पायर्या आहेत.

या पायर्याच्या वाटेवर कातळातच कोरून काढलेल्या पूर्ण वर्तुळाकार खाचा आहेत! एक छोटा अँकरही आरामात बसेल इतक्या आकाराच्या खाचा असल्याने ग्रीप मिळते.
डावीकडील वाटेने पुढे आल्यावर आपण गडाच्या पश्चिम बाजूला येतो. येथे कातळात छोटी गुहा कोरलेली आहे. गुहा ते गोरखगडाचा माथा हा या ट्रेकमधील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. गडाच्या अंतिम टप्प्याकडे म्हणजे शिखरमाथ्यावर जातेवेळी आपल्या पाठीवरची सॅक वगैरे गुहेत ठेवून निघावे. कारण शिखरावरील वाट अतिशय अवघड आहे. याशिवाय हा ट्रेक पूर्णच होऊ शकत नाही. सुळक्यावर जाण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या कोरल्या आहेत
त्यातील सुरवातीच्या १० -१२ पायऱ्या तुटलेल्या असल्याने आपल्याला थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्याची वाट काही ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारी असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. काही ठिकाणी खोबण्या कोरलेल्या असून त्यात हातपाय गुंतवीत वर चढावे लागते. कड्याला छाती चिकटवलेली आणि पाठीमागे खोल दरी - असा मनावर दडपण आणणारा थरारनाट्याचा अनुभव घेत माथ्यावर येतो, तेव्हा जग जिंकल्याचा आनंद होतो.पायऱ्यांच्या या वाटेच्या मध्यावर एक लहान गुहा कोरलेली आहे.
जेमतेम दोन गुंठे क्षेत्रफळ असणाऱ्या या माथ्यावर केशरी रंगावी गोरक्षनाथांची प्राचीन समाधी गोल घुमटासारखी असून आत पादुका आहेत. हे सिमेंटने बांधलेले मंदिर अलीकडेच उभारले आहे. घुमटासमोर एक लहानसा नंदी आहे. गोरक्षगडाच्या या शिखराला चहूबाजूंनी तुटलेले कडे असून कड्यावरून खाली झुकलेली दोन-तीन औदुंबराची झाडे नवनाथांचे आणि दत्तदिगंबराचे अस्तित्व दर्शवितात. गडमाथ्यावर जाण्यासाठी देहरी मार्गे २ तास लागतात. खोपिवली मार्गे २ तास लागतात.
या शिखरमाथ्यावरून नाणेघाटाचा परिसर, समोर आहुपे घाट, उत्तरेस मच्छिंद्रगड,आजोबा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, जीवधनगडाचे तर दक्षिणेस सिद्धगडाचे दर्शन होते.खोल दऱ्याखोऱ्या, सह्याद्रीच्या राकट कणखर आणि रानदांडगेपणाचा रोमांचकारी अनुभव देणाऱ्या आहेत. दुर्गम, बिकट वाटांमुळे गोरक्षगड आणि मच्छिंद्रगडाची जोडगोळी पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा असला तरी गोरक्षगडावरील गुहेतील एका रात्रीचा मुक्काम हा पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात निसर्गाच्या गहिरेपणाचा एक अनोखा अनुभव देऊन जातो.
संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गसंपदा ठाण्याची -सदाशिव टेटविलकर
३) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.in हि वेबसाईट
७) महाराष्ट्र देशातील किल्ले -चिं.ग,.गोगटे
किल्ल्याच्या सुळक्यावरील कातळात खोदलेल्या पायर्या चढता - उतरताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. गिर्यारोहणातील अनुभव असल्याशिवाय सुळका चढण्याचे साहस करु नये.
जिल्हा : ठाणे
उंची : १९३० फुट
श्रेणी : कठीण
ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ाच्या सीमेवरील सह्याद्रीच्या डोंगररांगेत माळशेज, नाणेघाट, अहुपे हे प्राचीन घाटमार्ग आहेत. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी लहानमोठे टेहळणी दुर्ग उभारले गेले. यातील अहुपे घाटाचा पहारेकरी म्हणजे गोरखगड. मुंबई व पुणे येथील दुर्गप्रेमीना एक दिवसात सहज साध्य करता येणारी हि भटकंती असल्याने सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर बऱ्यापैकी गर्दी असते. गोरखगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. देहरी हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुरबाडहून देहरी येथे येण्यासाठी खाजगी जीप अथवा एस.टी उपलब्ध आहे. येथे मुक्काम करावयाचा असल्यास गावातील विठ्ठल मंदिरात मुक्काम करता येतो. देहरी गावातून दिसणाऱ्या दोन सुळक्यापैकी मोठा सुळका गोरखगड किल्ला तर छोटा सुळका म्हणजे मच्छिंद्रगड. मच्छिंद्रगडच्या नावात गड असला तरी हा गड नसुन केवळ एक सुळका आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून या किल्ल्याचे नाव गोरखगड पडल्याचे मानले जाते. गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून २१३७ फुट आहे. गोरखगडाच्या आसपासचा परिसर वनखात्याच्या ताब्यात असुन भीमाशंकर अभयारण्यामुळे प्रसिध्द आहे. गोरखगडाचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा. पुर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. गोरखगडचा विस्तार लहान असला तरी पाण्याची उपलब्धता व निवाऱ्याची सोय गडावर आहे. गावातील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूने जंगलात जाणारी खडी चढण असलेली वाट आपल्याला गोरखगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिंडीत आणून सोडते. या खिंडीत महादेवाचे छोटेसे मंदिर असुन मंदिरासमोर दोन प्राचीन समाध्या आहेत. पुर्वीच्या काळी येथे एखादे मंदिर असावे कारण या खिंडीत मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले मंदिराचे दगड दिसुन येतात. किल्ल्याची खरी सुरुवात येथूनच होते. पुर्वी या भागात किल्ल्याचा दरवाजा असावा पण आता मात्र आपला प्रवेश ढासळलेल्या तटबंदी मधून होतो. थोडे वर गेल्यावर पायऱ्यापूर्वी एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले पाण्याचे टाके असुन शेजारी खडकात खोदलेली छोटी गुहा आहे. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. येथुन गडावर जाण्यासाठी पायऱ्या कोरल्या असुन या पायऱ्यांना काही ठिकाणी पकड घेण्यासाठी खोबणी केलेल्या आहेत तर काही ठिकाणी केवळ पाउल ठेवण्या इतपत खोबणी आहेत. या पायऱ्या उभ्या कड्यात खोदलेल्या असल्याने थोडे सांभाळूनच चढावे लागते. पायऱ्या चढताना वाटेतच एका ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेला पण उघडयावर असल्याने झीज होऊन अस्पष्ट झालेला शिलालेख दिसतो. कातळात खोदलेल्या जवळपास १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपला गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो. हा दरवाजा वेगळ्याच धाटणीचा असुन दरवाजाच्या चौकटीतून आत गेल्यावर पायऱ्या असलेला भुयारी मार्ग कोरण्यात आला आहे. प्रवेशव्दारातून चढून गेल्यावर वर पाण्याची तीन टाकी दिसतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. इथुन परत एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली एक गुहा आहे. या गुहेत कातळात खोदलेले एक शिल्प असुन त्यात दोन व्यक्ती घोडयावर स्वार झालेल्या आहेत व शेजारी एक कावड घेतलेल्या व्यक्तीचे छोटे शिल्प आहे. दोन्ही शिल्पांना गावकऱ्यानी रंगवलेले आहे. गावकरी या शिल्पाला मामा भाच्याचा दगड म्हणतात. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. या वाटेने पुढे थोडे खाली पायऱ्या उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या विशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. या गुहेत ५० लोक सहजपणे मुक्काम करू शकतात. स्थानीक लोक या गुहेला मंडप म्हणुन ओळखतात. गुहेतुन समोरच दरीत झुकलेले चाफ्याचे डेरेदार झाड आणि मच्छिंद्रगड निसर्गाचे भव्य आणि उग्ररूपाचे दर्शन करून देतो. गुहेजवळ पाण्याची टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.

गोरखगडावर पाण्याची एकुण बारा टाकी आहेत. गुहेपासून डावीकडे गेल्यावर या वाटेवर डावीकडे पाण्याची टाकी आढळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेपासून येथपर्यंतची वाट अरुंद असून तेथे खबरदारी आवश्यक आहे. या टाक्यांपासून पुढे आल्यावर उजवीकडे दगडांवर झेंडा लावलेला दिसतो. या झेंड्यासमोर गोरक्षगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. डावीकडील वाटेने पुढे आल्यावर आपण गडाच्या पश्चिम बाजूला येतो. येथे कातळात छोटी गुहा कोरलेली आहे. गुहा ते गोरखगडाचा माथा हा या ट्रेकमधील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय हा ट्रेक पूर्णच होऊ शकत नाही. सुळक्यावर जाण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या कोरल्या आहेत त्यातील सुरवातीच्या १० -१२ पायऱ्या तुटलेल्या असल्याने आपल्याला थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्याची वाट काही ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारी असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. पायऱ्यांच्या या वाटेच्या मध्यावर एक लहान गुहा कोरलेली आहे. गडाचा माथा फारच लहान असुन वर केशरी रंगाचे गोरक्षनाथांची समाधी असलेले लहान सिमेंटने बांधलेले मंदिर आहे. येथुन समोरच मच्छिंद्रगड, सिद्धगड, जीवधन, अहुपेघाट हा सर्व परिसर नजरेत भरतो. गोरखगडाचा माथा चढाईसाठी अवघड असला तरी तो चढल्याशिवाय आपली गोरखगडची दुर्गवारी पुर्ण होत नाही. गोरखगड येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही पण १६५७ साली मराठयांच्या ताब्यात असलेल्या या गडाचा मोगलांनी २० औक्टोबर १६९३ रोजी ताबा घेतल्याचा एकमेव उल्लेख आढळतो.

पावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं.
सुशील त्या रविवारी ट्रेक न करण्याच्या मूडमध्ये होता. मग शेवटी मी आणि मयूरनेच जायचं ठरवलं आणि एकदाही नेट न धुंडाळता गड ठरवला - न भेटलेला जुना दोस्त - गोरखगड! ओळखीच्या जवळजवळ सगळ्या ट्रेकमेट्सने गोरखगड याआधीच केला होता. न केलेला बहुधा असा मी एकटाच होतो.
शनिवारी देहरीमधल्या हमीदभाईला फोन करून 'आम्ही येतोय, चहा-नाष्टा-जेवण' याची सोय होईल ना?' असं विचारून ठेवलं. मी मुंबईतून आणि मयूर पुण्यातून येणार असल्यामुळे कल्याण-मुरबाड-म्हसामार्गे जाण्याऐवजी कर्जत-म्हसामार्गे जायचं ठरवलं. (दोन्हीकडून तिकीट साधारण तेवढंच आहे).
कर्जतहून सव्वाआठला म्हसाची एसटी आहे. त्या एसटीने म्हसाला पोचलो. तिथे संक्रातीनिमित्त म्हसोबाची आठवडाभराची जत्रा होती. आम्ही म्हसामध्ये पोचलो तेव्हा पावणेदहा झाले होते. जत्रेतले स्टॉल्स त्यांच्या मालकांप्रमाणेच झोपेत असावेत. 'जत्रेमध्ये येताना फिरू' असा विचार करून म्हसाहून देहरीला जाणार्या रस्त्यावर लागलो. ह्या रस्त्यावर समोरच एक सुंदर डोंगर दिसत होता. धुकेजलेल्या हवेमुळे तो ओळखता आला नाही (याबद्दल मी स्वतःला नंतर भरपूर दोष दिला). डावीकडे गोरख-मच्छिंद्रगडाचे दोन सुळके दिसत होते. 'छोटाच दिसतोय गड. होईल लवकर बघून' आम्ही मनात हिशेब मांडला. म्हसोबा यात्रेमुळे 'रापम'ची मिनिबस सेवा तासातासाला सुरू होती. त्या बसने देहरी गाठले.
हमीदभाईंच्या घरी गेलो. चहा-नाष्टा केला. त्याच्या व्हरांडा कम ओटी कम फरसबंदी अंगणात एक मातबर वाटणारे गृहस्थ बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता देहरीचा इतिहास समजला. त्यांच्या मते, इसवीसनाच्या बाराव्या शतकात, त्या गावाचे नाव "उंबर" असे होते. महसूलकार्यालयात अजूनही देहरीचा उल्लेख उंबर असाच सापडतो. घाटावरून खाली उतरण्याचे अनेक मार्ग तत्कालिन उंबरगावाच्या आसपास होते. नंतरच्या काळात त्या घाटवाटा लुप्त झाल्या. त्या वाटा कोकणात उतरल्यावर लागणारे साडेतीन लाख चुला (चुला = चूल किंवा घरे या अर्थी) असलेले हे गाव होते. तेराव्या शतकात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमणांत गावाचे नाव बदलून दहलीज (उंबर्याला उर्दू प्रतिशब्द) झाले आणि त्याचा अपभ्रंश होऊन देहरी झाले. त्या काळात देहरीमध्ये साडेदहा लाख वस्ती होती (साडेतीन गुणिले तीन - नवरा,बायको आणि एक अपत्य या हिशेबाने) याचंच मला नवल वाटत होतं. "एवढी लोकसंख्या सध्याच्या कल्याणचीही नाहीये" - ते मातब्बर गृहस्थ म्हणाले. "आता आम्ही इथले जुने, त्यामुळे आम्हाला माहित आहे गावची. मी सरपंच आहे या गावचा आणि (हमीदकडे बोट दाखवून) हे उपसरपंच!". मी मनातल्या मनात जागीच उभा राहिलो! हायला! गावच्या चक्क सरपंच-उपसरपंचांची ओळख झाली आणि तीही गावात शिरल्या शिरल्या!
मग त्यांची परवानगी वगैरे घेऊन गडाकडे निघालो. थोडंसं अलिकडे येऊन डाव्या हाताला एक वाट मंदिराकडे जाते.
तिथून एक ठसठशीत पायवाट मधलं एक टेपाड चढून पलिकडे थोडंसं गोरखगडाच्या पायथ्याला खाली उतरते. दुपारी अकराच्या उन्हात सुरू केल्यामुळे अर्ध्याच तासात माझा आणि मयूरचा 'डॉबरमॅन झाला'. (डॉबरमॅन होणे - दमल्यामुळे जीभ बाहेर काढून श्वास घेणे). पण वाट अगदी सोपी आहे. "हे दोघे ट्रेकमध्ये असले की हमखास वाट चुकते" असा लौकिक असलेले आम्ही दोघेच या ट्रेकमध्ये असूनही एकदाही वाट चुकलो नाही, इतकी वाट सोपी आहे! गडाच्या दिशेने चालत रहायचं मात्र!

टेपाड उतरून पलिकडच्या सोंडेवर उतरून गडाच्या दिशेने वीस-एक मिनीटं चाललं की एक पणती येते. तिथून डावीकडे वरच्या दिशेने गोरखगडाकडे वाट जाते. तर सरळ वाट समोरच्या डोंगराच्या कुशीतल्या भवानी मंदिराकडे जाते. जाताना दिसलेला सुंदर सिद्धगड आणि त्याच्या अलिकडे साखरमाची डोंगराची सोंड -

कातळामध्ये कोरलेल्या पायर्यांचा पहिला चाळीस एक फुटांचा भाग आहे. त्या भागाच्या शेवटी गोरखगडाचा छोटा पण सुंदर दरवाजा आहे.

आम्ही त्या दरवाजात फोटो काढत असताना गावातून देवाला नारळ वहायला चाललेली दोन तरूण मुले आली - दिनू आणि प्रशांत. आणि मग खाली उतरपर्यंत आम्ही एकत्रच होतो. तिथून वर गेलं की गुहा लागतात. नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका सरपंचांनी सांगितली होती. म्हणून हा गोरखगड! गुहा प्रशस्त आणि शांत असून आत मुक्कामाची, स्वयंपाकाचीही सोय होते.

गडाच्या माथ्यावर जाण्यापूर्वी आम्ही गडाला प्रदक्षिणा मारायचं ठरवलं. मागच्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन छोटेखानी गुहा आहेत. (ही 'कपलगृहे' असावीत - इति प्रशांत!) ती गुहा साधारण १०-१२ फूट उंचीवर असल्यामुळे मयूर-दिनू-प्रशांत यांनी प्रस्तरारोहणाची हौस भागवून घेतली. धडपडत, पाय रोवत वगैरे चढले आणि उतरताना तीच कसरत करून सुखरूप खाली आले. मला कंटाळा आल्यामुळे मी खालूनच त्यांची मजा बघत बसलो होतो.
चढताना पाठीमागे थेट दरी असली तरीही या खाचांच्या आधारे हा पॅच कोरड्या ऋतूमध्ये अगदी सोपा आहे. पावसाळ्यात त्या पायर्यांवर पाणी वाहत असल्यामुळे आणि कातळ गुळगुळीत होत असल्यामुळे गुहेपासून वर जाता येत नाही, असे ऐकले. (आता पावसाळ्यात गोरखगड करायचा आहे!)
वर गोरक्षनाथांचे छोटेसे मंदिर आहे. गडाचा माथा साधारण बाराशे ते पंधराशे स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा (इतकाच) आहे. आजूबाजूचा नजारा केवळ अप्रतिम! डावीकडे नानाचा अंगठा दिसल्यावर तर मी एकदम उत्तेजितच झालो. कारण सह्यांकन २०११ च्या वेळी याच भागात चार दिवस पायपीट झाली होती. आणि गोरखगडावरून काही क्षणात पुन्हा 'सह्यांकन' फिरून आलो. डावीकडून नाणेघाट, अलिकडे जीवधन-वानरलिंगी, पायथ्याचं सिंगापूर गाव (अंदाजाने), आंबोली घाटाची खाच, सर्वात उंच दिसणारा ढाकोबा डोंगर (दुर्ग दिसला नाही), त्याच रेषेत अहुप्याचा कडा, अहुपे पठाराचा माथा, त्याच्या अलिकडच्या डोंगरावर आत भट्टीचं रान, साखरमाचीचा पुढे आलेली सोंड, दमदम्या, राजाची लिंगी, सिद्धगड! सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून काहीसा अलग असल्यामुळे गोरखगडावरून ही रांग नुसत्या डोळ्यांनीही दिसते.

पायथ्याचे, जिथून वाट सुरू होते, ते मंदिर -

मच्छिंद्रगड -

मच्छिंद्रगड आणि मागे खोपिवली गाव -

पंधरा-वीस मिनिटे थांबून खाली उतरलो. आता दरी समोर होती -

दोन केव्हाच वाजून गेले होते. झपाझप उतरून तासाभरात पायथा गाठला. हमीदभाईंकडे गेल्यावर भात-भाकरी-रस्सा-कांदा-पापड असं फर्मास पान समोर आल्यावर 'आता न जेवता निघू, नाहीतर मयूरला पुण्याची ट्रेन गाठायला उशीर होईल' हा आधी केलेला विचार विसरूनच गेलो.
मिनिबसने म्हसाकडे येताना मी सिद्धगडच बघत बसलो होतो. मला गड बघतच बसावं वाटत होतं!सिद्धगडाला वळसा घालून रस्ता असल्यामुळे गडाची चतकोर प्रदक्षिणा झाली.

म्हसाच्या अलिकडे, सिद्धगडाचा डोंगर बाजूला झाला आणि थेट दूरवर नजर गेली - पदरगड! आह!! "नानाचा अंगठा-नाणेघाट-जीवधन-ढाकोबा-अहुपे टोक-साखरमाची-दमदम्या-सिद्धगड-भीमाशंकर-पदरगड-" असला विस्तीर्ण नजारा एका रेषेत दिसला. अजून काय हवं?
हॉटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क केली आणि ८.३० च्या सुमारास गोरखगडाच्या चढाईला सुरवात केली. बरोबर पाण्याच्या बाटल्या आणि ड्रायफुड घेतल होतच.
देहरी गावातुन गोरख आणि मछींद्र गडाचे प्रथम दर्शन
पहिली टेकडी चढुन वर आलो आणि समोरील रांगेत असलेल्या सिध्दगडाचे मनोहारी दर्शन झाले.
अस्मादिकांनाही फेसबुक किंवा व्हॉट्स अप च्या प्रोफाईल साठी स्वत:चा फोटो काढायचा मोह न झाला तर नवलच
दुसरी टेकडी पार करुन मधल्या पठारावरील महादेव मंदिरापाशी यायला ९.३० झाले.
खड्या चढाईच्या वाटेने साधारण अर्ध्यातासात आपण एका लहान दरवाज्यातुन गडात प्रवेश करतो.

दरवाजा पार करुन १५ मिनीटातच गुहेपाशी पोहोचलो. समोरच मछींद्र गडाचा सुळका खूणावत होता.

गुहेत जास्तवेळ न दवड्ता तडक गोरखगडाच्या अत्युच्च्य टोकावर जाण्यासाठी निघालो.

कातळात खोदलेल्या पायर्या
१५-२० मिनीटातच गोरखगडाच्या अत्युच्च्य टोकावर पोहोचलो. गोरक्षनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आजुबाजुचा सिध्दगड, आहुपे घाट आणि नाणेघाट पर्यंतचा दिसणारा परिसर पहात गप्पा मारत बसलो.

मी, मंदार, मन्यामामा, सुजीत
अवघड, पण देखणा गोरक्षगड
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड-किल्ले यांचे अतूट नाते मराठी तनमनात घट्टपणे रुजले आहे. मग गड कोणताही असो, तो पाहण्यासाठी मुहूर्त पाहावा लागत नाही. गडापाशी पोहोचताच हर हर महादेवाची उत्स्फूर्त घोषणा देत शिवरायांशी तद्रूप व्हावे व नवउर्मी घेऊन परतावे. चला तर आज आपण आद्य गुरूशिष्यांचे नाव असलेल्या एका जोड किल्ल्याला भेट देणार आहोत.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात यात्रेसाठी प्रसिद्ध असलेली, म्हसा गावापासून अवघ्या १४ किमी अंतरावरील देहरी गावाजवळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराने लक्ष वेधून घेणारी किल्ल्यांची जोडगोळी आहे. त्याचे नाव आहे मच्छिंद्रगड व गोरक्षगड. यापैकी मच्छिंद्रगडावर गड-किल्ल्यांचे कोणतेही अलंकार नाहीत.\B \Bपरंपरेने श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरू-शिष्यांची नावे या दोन सुळक्यांना लाभली आहेत.\B \Bत्यापैकी गोरक्षगड हा घाटवाटांवर नजर ठेवणारा किल्ला सुमारे २,१३५ फूट उंच असून त्यावरील रोमहर्षक चढाईसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे येथील साहसी गिर्यारोहकांची पथके येत असतात. प्रत्येक वेळी नवे आव्हान पेलत गड परिसरातील निसर्गातील बदलत्या रूपातील अविस्मरणीय, रोमांचकारी अनुभवाची शिदोरी गाठीला बांधून जातात. अशा या गडावर आहे तरी काय? खुद्द गोरक्षगडाला चहूबाजूंनी तुटलेले बेलाग कडे आहेत, गुहा आहेत, सातकर्णीची कोरीव शिल्पकृती आहे, शिलालेख आहेत, खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहे, भुयारी जिने आहेत, आकाश भेदणारा शिखरमाथा आहे, त्यावर गोरखनाथांची प्राचीन समाधी आहे, दऱ्या आहेत, खिंडी आहेत, घनदाट जंगलात विविध प्रकारची झाडे-झुडपे आहेत, पशुपक्षी आहेत. या सर्व आकर्षणापायी इतिहास, निरीक्षण, जिद्द आणि साहसाची भूक भागविणाऱ्या गोरक्षगडावर मग दुर्गरोहींची पावले आपोआप वळतात.
मुरबाडमधील देहरी गाव बसथांब्यावर उतरून गोरक्षगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोरखनाथांच्या मंदिरामागून डोंगराच्या धारेवर पाऊलवाटेने सुमारे १ किमी चालल्यावर आपण घनदाट जंगलात येतो. येथे महादेवाची पुरातन पिंडी असून बाजूला कोरीव दगड इतस्त: पडले आहेत. जवळच विहीरही आहे, रानकिड्यांच्या किर्रऽऽ किर्रऽऽ आवाजात माकडांचा 'हूपऽऽ हूपऽऽ' आवाज आपण जंगलाच्या ऐन गाभ्यात आलोय याची सूचना देतो. थोड्याच वेळात नि:शब्दपणे निसर्गाचे अवलोकन करत, गडाला पूर्ण वळसा मारत पूर्वेकडील बाजूला आल्यावर उभ्या कातळाची चढण लागते. थोडे वर चढल्यावर कातळात कोरून काढलेल्या भुयारी मार्गातून पंचवीस एक पायऱ्या चढून गेल्यावर आपण उघड्या आकाशाखाली येतो व पुन्हा खडकात खोदलेल्या अरुंद पायऱ्यांनी वर चढल्यावर अरुंद दगडी चौकट लागते. या चौकटीच्या पायरीवर एक शिलालेख आहे. येथून सुमारे तीनशे फुटांचा अत्यंत बिकट मार्ग असून त्याच्या उजव्या बाजूला खोल दरी आहे. हा मार्ग चढून गेल्यावर शेवाळेयुक्त पाण्याचे कोरीव टाके दिसते. त्याच्या डोक्यावर गोरक्षगडाचा मुख्य सुळका आहे. त्यापलीकडे खोल दरी आणि त्यापलीकडे मच्छिंद्रगडाचा गगनाला भिडलेला उत्तुंग सुळका लक्ष वेधून घेतो.
गोरक्षगडाच्या अंतिम टप्प्यात सुळक्याच्या दोन्ही बाजूंना पायवाटा दिसतात. डाव्या बाजूच्या पायवाटेने गेले की, थोड्या अंतरावर कातळात खोदलेली एक गुहा दिसते. तिच्या भिंतीवर सातवाहन सातकर्णीच्या राजवटींतील शिल्पचित्र खोदलेले आहे. घोड्यावर स्वार झालेले राजाराणी आहेत. राजाच्या हातात तलवार तर राणीच्या हातात जंबिया असून दोघांचेही घोडे एकमेकांसमोर उभे आहेत, तर बाजूला कावड घेऊन जाणारा सेवक आहे. गुहेत एक पाण्याचे टाकेही खोदलेले आहे. या गुहेतून सिद्धगडाचे दर्शन होते. अत्यंत भेदक दिसणारा सिद्धगड गोरक्षगडापेक्षाही हजार एक फुटाने उंच आहे. गुहा पाहिल्यावर आपण पुन्हा मागे येऊन उजव्या वाटेने गेल्यावर गोरक्षगडाच्या पोटात खोदलेल्या विशाल गुहेपाशी येतो, तेव्हा आपल्या कल्पनेपलीकडच्या अद्भूत दृश्याने मन थक्क होतो. वर निमुळत्या होत गेलेल्या शिखराच्या पोटात ही प्रचंड आकाराची गुहा खोदलेली असून तिच्या मुखावर तीन आणि आतल्या भागात दोन ३ x ३ फूट रुंदीच्या कोरीव खांबांनी\B \Bया गुहेचे छत तोलून धरले आहे. पायऱ्या उतरून प्रांगणात आल्यावर दरीच्या तोंडावरील चाफ्याचे झाड मंद सुवासाने आपले स्वागत करते. पण जरा बेतानेच कारण खाली दरी आऽ वासून बसली आहे. गुहेत जाण्यासाठी जिना असून त्याच्या शेजारी अवीट गोडीचे पाण्याचे कुंड आहे. मुक्कामाला आदर्श अशा या गुहेतून पूर्वेकडची सह्याद्रीची रांग, त्यावरील दुर्गी किल्ला ते भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावरील आहुपा घाट आणि त्याच्या बाजूने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे सातकर्णीचा महाल म्हणून ओळखली जाणारी कोकणतळी उतरत गेलेल्या करालदंती डोंगराच्या धारेमुळे सह्याद्रीच्या रौद्रभीषण स्वरूपाचा छाती दडपून टाकणारा अनोखा आविष्कार आपल्या स्मृतीपटलावर कायमचा कोरला जातो.
गुहेत विश्रांती घेऊन गडाच्या अंतिम टप्प्याकडे म्हणजे शिखरमाथ्यावर जातेवेळी आपल्या पाठीवरची सॅक वगैरे गुहेत ठेवून निघावे. कारण शिखरावरील वाट अतिशय अवघड आहे. कड्याच्या पोटात खोदलेल्या अरुंद पायऱ्या झिजून गेल्या आहेत, तर काही ठिकाणी खोबण्या कोरलेल्या असून त्यात हातपाय गुंतवीत वर चढावे लागते. कड्याला छाती चिकटवलेली आणि पाठीमागे खोल दरी - असा मनावर दडपण आणणारा थरारनाट्याचा अनुभव घेत माथ्यावर येतो, तेव्हा जग जिंकल्याचा आनंद होतो. जेमतेम दोन गुंठे क्षेत्रफळ असणाऱ्या या माथ्यावर गोरक्षनाथांची प्राचीन समाधी गोल घुमटासारखी असून आत पादुका आहेत. घुमटासमोर एक लहानसा नंदी आहे. गोरक्षगडाच्या या शिखराला चहूबाजूंनी तुटलेले कडे असून कड्यावरून खाली झुकलेली दोन-तीन औदुंबराची झाडे नवनाथांचे आणि दत्तदिगंबराचे अस्तित्व दर्शवितात. या शिखरमाथ्यावरून नाणेघाटाचा परिसर आहुपा घाट, सिद्धगड, भीमाशंकर, बाजूचा दुर्घट मच्छिंद्रगड आणि खोल दऱ्याखोऱ्या, सह्याद्रीच्या राकट कणखर आणि रानदांडगेपणाचा रोमांचकारी अनुभव देणाऱ्या आहेत. दुर्गम, बिकट वाटांमुळे गोरक्षगड आणि मच्छिंद्रगडाची जोडगोळी पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा असला तरी गोरक्षगडावरील गुहेतील एका रात्रीचा मुक्काम हा पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात निसर्गाच्या गहिरेपणाचा एक अनोखा अनुभव देऊन जातो.

| From Trek to Gorakh Gad |

गोरखगड ( Gorakhgad )
मग परत चढायला सुरुवात केली. तीव्र चढ असल्यामुळे पायवाटेला लागून असलेल्या झाडा- झुडूपांना व झाडाच्या मुळांना हाताने धरून चढावं लागत होतं. धापा टाकत व दम घेत घेत एकदाचा एक मुख्य चढ पार केला व समोर थोडा सपाट भाग आणि कालभैर वाच मंदिर लागत, मंदिराच्या समोर शंकराची पिंडी आहे कालभेरावसमोर त्रिशुळ आहे, बाजुलाच महराष्य्र पर्यटन चा बोर्ड लावलाआहे.रणरंत उन असून सुद्धा तिथल्या हवेत गारवा होता.समोर एक पिपलाचा डेरेदार झाड आहे . तिथून पुढे गडाचा मुख्य सुळका चालु होतो...
नमस्कार ,मित्रानो ऑक्टोम्बर नोव्हेंबर महीना म्हंटल म्हणजे दिवाळीची गडबड आणि मौज मस्ती . दिवाळी म्हंटल की आईने बनवलेला चमचमित फराळ ,प्रत्येक दिवासच एक वैशिष्ट्य , या वर्षी दिवाळी मध्ये फटाक्यांची अतिशबाजी नक्कीच कमी झलि आहे पर्यावरण हितच दृष्टीने टाकलेल एक चांगल पाउल आहे , दिवाळी म्हंटल की अजुन एक आपण लहानपणी करायचो ते म्हणजे मातीचे किल्ले...किल्ले म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज आणि महाराज म्हणजे त्यांचे बुलुंद किल्ले ..
.महाराजांच्या किल्यावर एक दिवस दिवाळीपहाट साजरी करायच ऑफिस मध्ये मी अणि माझा ऑफिस मधला मित्र समीर गोसावी याने ठरवल होतं.समीर चा ट्रैकिंग चा अनुभव खुप होता त्याच्यासोबत कोथळीगड करायचा प्रयत्न फसला होता म्हणूनच या वेळी नक्की केल. ऑफिस मधून अजुन दोघे जन आणि त्याचा मित्र महेंद्र येणार होता. प्रथम गोरखगड़ ठरला होता पण नंतर मात्र ग्रुप मध्ये मूली असल्याने कलावंती दुर्ग ठरला. पण संध्याकाळी समीर चा कॉल आल " बॅक टू गोरखगड अंकुश " दोघे कमी झाले होते .

सर्व तयरि झलि होती इंटररनेट वर थोडिशि माहिती घेतली गोरकगडबद्दल गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे त नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे.शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते. मात्र येथे कोणत्याही प्रकाराच्या लढाईचा उल्लेख नाही. शिवकाळात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. गोरखनाथ येते साधनेसाठी बसत म्हणून याच नाव गोरखगड पड़ल.
इंटरनेटवर गोरखगदाचि वर्गवारी " मध्यम " अशी केल्यामुळे थोडी काळजी होती पण समीर आणि महेंद्र सारखे जवळपास पंधरा हुन अधिक किल्ले सर केलेला अनुभव असल्यामुळे काळजी करण्याच कारण नव्हतं घाटकोपर वरुण समीर आणि महेंद्र कल्याण ला मला भेटनार होते पहाटे पाचवाजता मला समीर ने कॉल करुण मला उठवलं सर्व तयारी करुण साडेसहा ला कल्याणला आम्ही भेटलो . महेंद्र ला प्रथमच मी भेटत होतो पण ,त्याच्याबद्दल मी समीर च्या कडून खुपदा एकल होत असच एकदा समीर बोलून गेला होता की" एका दिवसात एक वाचून काडलेल पुस्तक आणि माहि सोबतचा सपूर्ण दिवस " यात माहि सोबतचा घालवलेला दिवस खुपच चांगलेलं अनुभव सांगून जातो . त्याने माझी अणि महेंद्र ची ओळख करुण दिली आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
पुढे बुसस्थानकतुं मुरबाड कडे जाणारी बस पकडली आणि ट्रेकिंगला सुरू झाली.थोड्याच वेळात गाव सुरु झाली आणि हवेतला गारवा जाणवायला सुरवात झाली समीर आणि माहि घरातून पहाटेच निघाल्यामुळेथोड्याच वेळात दोघेही साखर झोपेत गेले बस मध्य कुटेच नथांबता मुरबाड बस डेपोत थांबणार होती , बसने चांगलाच वेग पकडला होता थोड्याच् वेळात बस गावातील नागमोडी वळने घेत मुरबाड़ ला पोचलो.घरातून नाश्ता नकारताच निघाल्यामुळे पोटात भुकेचे कावळे ओरडतच होते . बाहेरच एका हॉटेल मधे गर्मागर्म मिसळ आणि वडासांबारावर ताव मारला .तिघे ही खाण्याचे शौकीन असल्यामुळे पोटभर नाश्ता केला मिसळ अणि वडासंभारचीचव अप्रतिम होती .हॉटेलवेटर कडे चौकशी केल्यावर समजले की देहरी गावत जाणारी बस रद्द झलि आहे म्हणून खजगीवाहन करुण आम्हाला म्हसे गावत जायला लागेल आणि तिथून पुढे परत खाजगी वाहन करुण देहरी गावत जायला खाजगी वाहन करावे लागेल .मग तिथेच पुढचा प्रवास मध्ये खाण्यासाठी केळी आणि पाणी बॉटल्स घेऊन सहा चाकी पकडली. खाजगी वाहनातील अनुभव मात्र भयानक होता सहाचाकी वाहनांमधून चालक जवळपास पंधरा माणसे घेऊन निघालो.एक तासांच्या प्रवासनतर आम्ही देहरी गावात पोहचलो .
आतापर्यंतचा मुरबाड पासून देहरी गावापर्यंतच्या प्रवासात तिथल्या लोकांचा राहणीमानातला आणि मूख्य म्हणजे त्याचा भाषेतला फरक आम्हला जाणवत होता. महाराष्ट्रात मराठी भाषा हि तर २० किलोमीटर ने बदलते.तिथली भाषा गावरान होती आणि त्यांच्या भाषेत एक गोडवा आहे .म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरानीं म्हंटलय "माझ्या मराठीचीबोलूकवतुकें..परीअमृतातेहीपैजा जिंके... ऐसीअक्षरेरसिकेमिळविना!!"
आम्हला गावातूनच दिसणार गोरखगड़ आणि मचिंद्रगदाचा सुळका आम्हाला खुनावत होता.रस्त्यालाच लागून हामिद पटेल यांच घर आणि टपरी आहे कित्तेक वर्ष ते ट्रैकिंग ला येणाऱ्या मंडळींची मनापासून स्वागत आणि सेवा करतायत ,तेथे जेवनाची आणि राहण्याचीसोय होते त्यांनी आम्हला कस जायच ते सांगतल मग त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर आम्हला दिला त्याचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.

रस्त्याला लागूनच गोरक्षनाथांचं मंदीर आहे. त्याच्या मागून गडाच्या दिशेने पायवाट जाते. मंदिर मोठं अणि प्रशस्त आहे .आम्ही बाहेरुणच दर्शन घेऊन चालायला सुरवात केली मंदीरापासून पुढे आल्यावर लवकरच दाट झाडी सुरू झाली. पायवाट मात्र स्पष्ट व मळलेली होती. पण बरीच अरुंद होती. काही अंतर पुढे गेल्यावर खडा चढ सुरू झाला. गाव आणि रस्ता मागे दूरवर दिसत होते आणि समोर नजारा दिसत होत होता.मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन पर्वत एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसत होते. बाजूला भरपूर डोंगर आणि दरीसुद्धा. पाऊस पडून एक महीना उलट ला होता म्हणून अजुबाजूच् गवत सुकलेल होत थोडं थांबत थांबत आणि फोटो घेत घेत समोर जात होतो. हळुहळु बराच तीव्र चढ सुरू झाला. आणि सलग होता. एक मोठा चढ पार करून झाल्यावर मग दोन तीव्र उतारसुद्धा लागले.पायवाटेत जागो जागी ट्रेककर्स चुकु नये म्हणू भगव्या रंगचा बानाचे निशान दाखवले आहेत त्याचा नक्की फायदा होतो सुरुवात केल्यापासून जवळ जवळ तासाभराने एक चढ बराच तीव्र लागला. मग मात्र काही वेळ बसून आराम केला.
इथून पुढचा ट्रेक हा निव्वळ रॉक क्लाइंबिंग .अर्थात पाय-यासुद्धा होत्या. पण पुढे पुढे त्या तुटक होत गेल्या व त्यामध्ये अंतरही खूप जास्त होतं . प्रथमच आम्ही एक सरळ कातळामध्ये रॉकक्लीम्बिंग चा थरार अनुभवला .प्रथम मी आणि नंतर माही आणि नंतर समीर ने कातळ पार केला . त्यात माझा आणि समीर ला थोड़ी जख्म झाली.अनुभव थरारक होता मग मात्र पायरयनि पुढे जाण्यास सुरुवात केली.... इथून पुढे सर्व रस्ता दगडांच्या स्वरूपातच आहे. मध्ये मध्ये पाय-या व जिन्यासारखी रचना आहे. पण ते तुटलेलेही आहेत. शिवाय मागे काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे.आतपर्यन्त चढताना तितकी अडचण आली नाही ,उतरताना कसं होणार, ही भिती मनात होतीच. दगडी तुटक पाय-यांमधून चढून वर गेल्यावर किल्ल्याचं प्रवेशद्वार लागतं.त्याला भगवा रंग दिला आहे.एका मोठ्या खिडकीसारखं ते आहे. तिथून आत जाऊन परत वर जाण्यासाठी दगडी वाट मिळते. तिथेच ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहे. तिथून मछिंद्र गडाचा नजारा दिसत होता, थोडा विश्राम करुण पुढे निघालो .
दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे.पाच सहा दगडी पायरया उतरून गुंफे मधे पोहचतो समोर जवळच मच्छिंद्रगड दिसत होता..... आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी..... आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते.....इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे . गुहा खुप मोटि आहे त्यला पाच सहा दरवाजे आहेत आत नवनाथचे फ़ोटो लावले आहेत, गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.गुहेतून निघाल्यावर लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. त्यातील पाणी हिरव्या रंगाचं दिसत होतं. पण अधिक महत्त्वाची गोष्ट ही होती, की त्याच्या उजव्या बाजूने पायवाट जात होती आणि त्या पायवाटेपासून दरी जेमतेम दोन फूटभर अंतरावर होतं.... इथून पुढे नजारा व चित्र कसं असणार आहे, ह्याचा अंदाज त्या वाटेवरून येत होता. जवळ पास एक तासांच्या वरती चाल्यमुळे जो थकव आला होता तो इतल्या निसर्गरम्य आणि गोरखनाथंच पदपर्शाने पावन झालेल्या परिसरात नाहिसा झाला . आता मात्र आम्ही विश्राम करायच ठरवल, जवळच्या एका पिण्या योग्य असलेल्या पानी टाके मधून पानी पिऊन थंड झालो ,ग्लुकोन् डि आणि केळी खाऊन निवाण शांततेत विश्राम केला.आता पुढे मार्गक्रमण करायच ठरवलं .
गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते. सरळ उभा चड आहे .एक पाय पुढे टाकून नंतर पुडच्या पायरी मध्ये केलेल्या खचाचा आधार घेत घेत तो पॅच पार झाला. पायरींवर खांचा केल्यामुळे वरती चडन खुपच सहज होतो. माही ला बराच अनुभव असल्याने तो पटापट पुढे जात होता आम्ही दोघे मात्र सावध आधार घेत त्या गडाच माथा गाठला .आणि सुटकेचा सुस्कारा टाकला .
गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे.महादेवाचे वर गडापर्यन्त सुखरूप पोहचवला म्हणून आभार मानले.माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघात असा सर्व परिसर न्याहाळता येतो .तिघानि तो परिसर नजरेत साठवून काढला.आणि फ़ोटो काढले . वरुण खालच्या परिसर स्पष्ट दिसतो अनेक ट्रैकिंग ला आलेले ग्रुप अगदी मुंग्या रांगेने चालेले दिसत होते.आता आम्ही महादेवचा मंदिराला लागुणच बसून आईने दिलेल्या फराला वर ताव मारला आणि थोडा विश्राम करुण परतीच मार्ग पकडला. आता मात्र उतरण्याच् आव्हान आमचा समोर होत.
आता आम्ही हळू हळू उतरन्यास सुरवात केलि सुरवातीला पायरय उतरताना थोडी भीति वाटत होती नंतर मात्र पायर्यांना केलेल्या खाचा आणि कातळाचा आधार घेत आम्ही मुख्य गुहेपर्यन्त पोहचलो.तो पॅच पूर्ण करताना खालची दरी अगदी स्पष्ट दिसत होती मनातच ज्याने कोणी खाचा करून ठेवल्या होत्या त्याचे मनापासून धन्यवाद मनात होतो. जवळपास वीस मिनिटाचा पॅच नंतर मुखय गुंफेत पोहचलो . आता गुहेमधे अजुन काही ट्रेक्किंगचे ग्रुप आले होते . पण त्या ग्रुपचे जे काही प्रताप चालु होते ते बघून खरच राग येत होता ,मोठमोठ्या आवाजाचे फटाके ते त्या गुंफे मध्ये लावत होते.अशा सर्व वागणुकी मुळे तिथे असलेल्या प्राणी पक्षांना नक्कीच त्रास होतो फटाक्यंचा ठिनगी मुळे वनवा लागायचा धोका पण नाकरता येत नाही.तिथलि जी नीरव शांतता पूर्णपने भंग झाली होती आम्ही तेथे नथांबता पुढे निगालो, आपण जेवा आशा गड निसर्गाचा सनिधयत जातो तेव्हा नेहमी लक्षात ठेवावा " घेऊन यावेत ते निसर्गाचा कुशीत घालवलेले सुंदर क्षण आणि ठेवून यावेत फ़क्त पाऊल खुणा "

मुख्य गुहेपासून आता आम्ही नथांबता भराभर दोन्ही हातांच भार कातळावर देऊन उतरन्यास सुरवात केली वाऱ्याचा वेग खुप कामी झला होता, त्यामुळे उतरून खूप सोप झालं होत . गडाचा दरवाजपर्यन्त पोहचलो तिथे थोडा विश्राम केला बरेच ग्रुप खालूंन येत होते, परत सवधगिरिने दगडाचे पँच पूर्ण करुण आम्ही गडाचा पायथ्याशी सुखरूप पोचलो.
आता पुढचा प्रवास आमच्यासाठी सोपा होता आता फक्त दुपारचा उन्हाचा त्रास होत होता , आणि पाण्याचासाठा सुद्धा संपल होत.अजूनही जमीन व रस्ता दूर दिसत होता. सभोवती झाडी व नजारा. पण दुपारच्या उष्ण झळा लागत होत्या. असं झालं होतं कधी आम्ही मंदिरात पोहचतो . आता मात्र समीर चा भाषेत पायतल तेल संपल होत,महेंद्र त्यानी केलेल्या रात्रीच्या ट्रेक्किंचा आठवणी सांगत होता . हळु हळु उतार कमी झाला; पायवाट सोपी होत गेली आणि झपाझप सुकलेल गवत तुडवत आम्ही एकदाचे गोरक्षनाथांच्या मंदीरात येऊन पोचलो!!!! समोरच रस्ता दिसत होता.
मंदीरात थोडा वेळ टेकलो. विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतलं . तिथेच भगवे वस्त्र परिधान आणि कानातमोठी कुंडल परिधान केलेल्या बाबांनी पाणी आणून दिल . बराच वेळ तिथेच बसून राहिलो आणि मग खाली गावात पोचलो. हमीद पटेलांच्या येथे लिंबू सरबत घेतलं . तितुनच आम्हला मुरबाड कडे जाणारी बस भेटणार होती बराच वेळ आराम केला. थोड्याच वेळात बस आली आणि आमचा कल्याण कडचा प्रवास सुरु झाला .....
किल्याचे नाव: गोरखगड
जाण्याचा रस्ता: कल्याण-मुरबाड-म्हसे-देहरी
पाहण्यासारखे: रॉक कॅलिंबिन्गचा थरार , मुख्य गोरखनाथांची गुहा , दाट अभयारण्य , पाण्याची तीन टाके , टोकावरचे महादेवाचे मंदिर . गोरखगडावरून दिसणारा मछिंद्र गडाचा सुळका .
श्रेणी: मध्यम ते कठीण
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर
ऊंची :२१३०फिट
गोरखगड
दोन आठवड्यांपुर्वी ठरलेलं गोरखगड करायचा, दिवस १३ डिसेंबर २०१५. या वेळेस beyond mountains सोबत ट्रेक करायचं ठरलं. सगळीकडे प्रचार झाला. या वेळेस आम्ही एकूण ३५ जण जाणार होतो. एक मोठी बस बुक केलेली. रविवारी (१३ डिसेंबर २०१५) ला सकाळी ५.३० ला निघायचे ठरले. एक दिवसाचा ट्रेक असल्याने नेहमीप्रमाणे २ पाण्याचा बाटल्या, २-३ बिस्कीटचे पुडे आणि खजूर बरोबर घेतले. बाकी नाश्ता, जेवण वगैरे बाहेरूनच सांगितले होते. नाशिक मधील सातमाळ डोंगररांगेचा बेत डोक्यात असतानाच गोरखगडचा बेत शिजला. सगळी तयारी झाली fc road ला भेटायचे ठरले. सकाळी ४ वाजता उठावे लागणार होते. आधी सलग ट्रेक झाल्याने डोळ्यावर झोप होतीच. आता फक्त उद्या पहाटेची वाट बघत झोप लागली.
पहाटेचे ४ वाजले आणि कर्णकर्कश्य आवाजात गजर कानाजवळ वाजला. साखरझोपेची मोड झाली. चला आता उठायची वेळ झाली. अजुन राविराजांना डोक बाहेर काढायला बराच वेळ होता. पटापट आवरून घराचा उंबरठा ओलांडला आणि आम्ही कोथरूड वरून निघालो. fc road पाशी बस उभी होतीच. समोरच पार्किंगमध्ये आम्ही गाड्या उभ्या केल्या आणि सर्व जण जमायची वाट बघत उभे राहिलो. ५.३० वाजता सर्व जण जमले पण मुळात सोबत न्यायचे नाश्ता आणि जेवण अजुन आले नव्हते. ६ वाजता डबाबंद जेवण आले ते आम्ही गाडीत चढवले आणि चिंचवडच्या दिशेने निघालो.
चिंचवडमध्ये काही लोकांना घेऊन आम्ही थेट मुरबाडचा रस्ता धरला. निघेपर्येंत ७ वाजले. बाहेर बऱ्यापैकी थंडी होती. आम्ही जसे जसे पुढे सरकत होतो, तसतसा रविराज डोके उंचावु लागला. बोचणाऱ्या थंडीसोबतच आता कोवळ्या उन्हाची ऊब मिळत होती. साधारण ९ वाजता आम्ही कर्जत पार करून नेरळ मध्ये मुरबाड फाट्यावर येऊन पोहोचलो. पण तेवढ्यात लक्षात आले मुंबई वरून दोघे जण यायचे होते. त्यांना फोन केले आणि जकात नाक्यापाशी बोलवुन घेतले. ते ९.४५ वाजता पोहोचले आणि आम्ही मुरबाड ते देहरी (गोरखगडाच्या पायथ्याचे गाव) असा आमचा अंतिम टप्प्यातील प्रवास सुरु केला. उशीर झाल्या कारणाने आम्ही जवळ आणलेल्या नाश्त्याची गाडीतच वाटप केली आणि नाश्ता उरकला. थोड्याच वेळात समोर सिद्धगड आणि मागे उभा आहुपे घाट व भिमाशंकरचे जंगल असे विलक्षण आणि मोहक दृश्य दिसु लागले. आता गोरखगडापर्येंत पोहोचेस्तोर गडाबद्दल थोडे ऐकुयात.
देहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचे गाव असुन याला गोराखचा सुळका असेही म्हणतात. मुरबाड मधील पसरलेल्या आहुपे या सह्यारांगेम्ध्ये गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन सुळके लक्ष वेधुन घेतात. मच्छिंद्रगड हा गोरखगडाच्या बाजुचा सुळका असुन गावातील लोकं याला गोरखगडाचा भाऊ असेही म्हणतात. मच्छिंद्रगडाची चढाई बिकट आणि अवघड असल्याने तांत्रिक साधनांशिवाय या किल्ल्याची चढाई करणे कठीण आहे. तर गोरखगडाची चढाई तांत्रिक साधनांशिवाय माथ्यापार्येंत करता येते. गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरु-शिष्यांमुळे या दोनही सुळक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड अशी नावे आहेत. दरवर्षी मार्गशीष पौर्णिमेला येथे जत्रा भरते असे गावातील लोकांनी आम्हाला सांगितले. लांबुन पहिले असता गोरखगडाच्या माथ्यापार्येंत वाट असेल यावर विश्वास बसत नाही. ऐतिहासिक काळात आहुपे घात आणि परिसरावर नजर ठेवण्यास या किल्ल्याची उभारणी केली असावी. शिवकाळात हा गड मराठ्यांच्या अंमलाखाली होता.
नंतर १९६३ च्या सुमारास मोघाळणी यावर विजय मिळवला. पुढे १७४८ च्या सुमारास मराठ्यांनी या गडावर भगवा झेंडा रोविला. दुर्दैवाने १८१८ मध्ये या गडाचा ताबा ब्रिटीशांकडे गेला. छोट्या दिसणाऱ्या या सुळक्यावर बरेच अवशेष शिल्लक आहेत. गडावर बघायला पाण्याची टाके, प्राचीनकालीन गुहा, खोबणीच्या पायऱ्या आणि सर्वोच्च माथ्यावर गोरखनाथांचे मंदिर आहे. हा सुळका, यावरील कातळ कडे, गडावर शिरण्याचा भुयारी मार्ग आणि कसदार (छातीवर) चढाईमुळे या किल्ल्याला वेगळाच असा मान आहे. या गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सिद्धगड, आजोबा, कळसुबाई, जीवधन, नाणेघाट, ढाकोबा, हरिश्चंद्रगड असा बराच लांबचा प्रदेश न्याहाळता येतो.
११.१५ वाजले होते आम्ही देहरी गावात पायउतार झालो. तसा बराच उशीर झाला होता. रविराज डोक्यावर बसून थैमान घालत होते. ठाण्याच्या उकाड्याने नकोस होत होतं. आम्ही पटापट सामान आवरले आणि गडाच्या दिशेने निघालो. येथे पायथ्याशी गोरखनाथांचे मोठे आणि प्रशस्त मंदिर आहे. या मंदिरामध्ये सर्वांना योग्य ते सल्ले दिले गेले. सोबत आणलेल्या जेवणाचे डबे वाटले गेले. मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या पायवाटेने आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. सुरुवाती पासुनच सर्व चढ छातीवर आहे आणि त्यात उकाडा जीव घेत होता. दुपारचे बारा वाजले होते.
संपूर्ण शरीरातुन घाम निथळत होता. निव्वळ तासभराच्या चढाईनंतर आम्ही गडाच्या समोर असलेल्या मोकळ्या पठारावर येऊन पोहोचलो. येथे थोडासा गारवा आला आणि मनाला ठंडक पोहोचली. येथुन पुढील वाट जंगलातुन असल्याने उन्हाचा एवढा त्रास होणार नव्हता. थोडंस पुढे गेल्यावर आपण सुळक्याच्या पदरात येऊन पोहोचतो. येथून डावीकडे जाणारी वाट मच्छिंद्रगडाकडे जाते तर उजवीकडील वाट गोरखगडाकडे जाते. सुळका डाव्या बाजूस आणि दरी उजव्या बाजूस ठेवून आपण सरळ चालत राहायचे. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या दुसऱ्या टप्प्यात (पदरात) उघड्यावर असलेल्या शिवलिंग आणि नक्षीदार खांबांपाशी येऊन पोहोचलो. येथेसुद्धा गोरखनाथांचे एक सुरेख मंदिर आहे. येथे घनदाट सावली असल्यामुळे येथे थोडा वेळ आराम करावा कारण येथुन पुढे खडी चढण आहे आणि अजिबात सावली नाही. आम्ही जर वेळ येथे आराम केला आमच्या जवळ असलेल्या खाद्य पदार्थ आणि फळांवर ताव मारला आणि पुढे निघालो.
आता १२.४५ वाजले होते. आम्ही गडाच्या तिसऱ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. थोडस पुढे जाताच आपण तिसऱ्या टप्प्याच्या खाली येऊन पोहोचतो. वर नजर टाकली असता केशरी शेंदूर फसलेला, कातळात कोरलेला भव्य असा गोरखगडाचा दरवाजा दिसतो. त्या दरवाज्यापर्येंत खडी चढण आहे. येथे पोहोचण्याठीच्या थोड्या कठीण असुन दोन्ही बाजूस दरी असल्याने काळजीपूर्वक चढावे लागत होते. या टप्प्याच्या मध्यावर पोहोचताच एक पायरीवर शिलालेख कोरलेला नजरेस येतो. आम्ही साधारण २० मिनिटात दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो. येथुन पुढे एक वाट डावीकडे आणि एक वाट उजवीकडे जाते. डावीकडील वाटेवरून गेल्यावर एक गुहा, पाण्याचे टाके आणि शिल्प लागते. हे बघुन माघारी फिरायचे. आम्ही परत येऊन उजवीकडील वाटेने सरळ गेलो. येथे वाटेतच २-३ पाण्याची टाके लागतात. ५-१० मिनिटात आपण गडावरील प्रशस्त गुहेजवळ येउन पोहोचतो. आता पर्येंत १.१५ वाजले होते. आम्ही जरा वेळ गुहेत आराम केला. आता पोटात कावले ओरडु लागले होते. आमच्याजवळ असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. आता गडाची अंतिम चढाई बाकी होती.
आमची जेवण आटपली, जवळच असलेल्या पाण्याच्या टाक्यातून पाणी पिऊन घेतले. मन तृप्त झालं. आता अंतिम चढाई थोडी अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील समान गुहेतच ठेवले आणि सर्वोच्च माथ्याकडे कुच केली. येथे आधीच भरपूर मंडळी उपस्थित होती. माथ्यावर पोहोचायला प्रथम ९-१० फुटांचा कातळटप्पा पार करावा लागतो. येथे बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही थोडा वेळ वाट बघितली आणि सर्व मंडळी परतल्यावर आम्ही चढाई सुरु केली. कातळटप्पा पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. ह्या पायऱ्या कमरे एवढ्या उंच असुन याला पकडायला खोबण्या तयार केल्या आहेत. जेमतेम आपण उभ राहु एवढ्या आकाराच्या ह्या पायऱ्या आहेत तर दुसऱ्या बाजूस खोल दरी आहे. या पायऱ्या चढत असताना मच्छिंद्रगडाचे सुंदर दर्शन होते. तसेच मागील बाजुस आजोबा, नाणेघाट आणि जीवधन माना उंचावून उभे आहेत. १५ मिनिटात आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथे गोरखनाथांचे सुंदर मंदिर आहे. गडाचा माथा सुळका असून बऱ्यापैकी मोठा आहे. येथूनच समोर आहुपे घाट, उत्तरेस सिद्धगड तर दक्षिणेस मच्छिंद्रगड, आजोबा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, जीवधनगडाचे दर्शन होते.
http://www.saketghanekar.in/2015/12/blog-post_20.html

No comments:
Post a Comment