‘आम्ही बघतो काय ते’ म्हणत पाय काढला.. नि पुन्हा मागे फिरलो… एका दुकानात चौकशी केली तर कळले स्टेशनबाहेर डाव्या बाजूला उडपी हॉटेल, बॉम्बे कॅफे अशी चांगली हॉटेल्स आहेत.. तिथूनच मग दुपारच्या खाण्याचे मेंदुवडा-इडली पार्सल (अगदी चटणी-सांबारासकट !!!) घेउन आम्ही पुन्हा एसटी स्टँडकडे जाणार्या वाटेला लागलो.. वाटेतच डॉ. आंबेडकर यांचे चौक लागते तिथेच डावीकडे एक चढणीचा रस्ता जातो तिथून पुढे सरकलो.. ते चढण काय पार केले नि अगदी शांतमय परिसरात येउन थडकलो.. अगदी सुनसान रस्ता.. तिथल्या भयावह शांततेला थंड हवेची सोबत.. तिथेच एक जुने चर्च नि मागच्या झाडीत वसलेली कबरीस्तान.. नि कुठूनतरी खाटीक पक्ष्याचा चिरकणारा आवाज.. शिवाय पावसाने काळोख केला होता तेव्हा अगदी भुतपटात शोभेल असे चित्र !
पुढे सरळ चालू लागलो तसे थंड हवेचा झोत वाढू लागला.. एव्हाना पावसाने थोडेफार शिंतोडे उडवायला सुरवात केली होती.. काही अवधीतच दोन वाटा झाल्या एक डावीकडे वळून लगेच संपत होती तर दुसरी उजवीकडच्या चढणीवर जाउन लुप्त झालेली.. त्या दुसर्याच वाटेने आम्ही चालून गेलो नि समोर सुंदर नजारा उभा राहीला..एका बाजूला हिरव्या डोंगरांची रांग.. तर उजवीकडे भलामोठा तलाव.. रेल्वे टँक म्हणतात.. नि त्या तलावाला अगदी शोभुन दिसेल असा हिरव्या रंगाचा काठ.. त्यात उमललेली छोटछोटी रानफुले नि गवत रवंथ करणारी गुरे.. पलिकडे एका अवाढव्य पहाड हा तलाव आपल्याच मालकीचा असल्याचे भासवत होता.. त्याचा माथा ढगांमध्ये बेधुंद झालेला..अर्धाभाग सुर्यकिरणांमध्ये न्हाउन निघालेला.. तर अर्धाभाग मेघांच्या सावलीत गुरफटलेला.. इतरत्र सुद्धा अशेच पडसाद उमटताना दिसत होते.. सरत्या पावसाळ्यात दृष्टीस पडणार्या निसर्गाचे हे अगदी साजेसे रुप.. त्या ‘मालक’ पहाडाची एक सोंड डावीकडच्या डोंगराच्या सोंडेशी हातमिळवणी करताना दिसली.. नि आमच्या ट्रेकमध्ये लागणार्या वाघोली खिंडीची ओळख पटली..

– –

– –

एकंदर ट्रेकारंभ अगदी दणक्यात झाला होता.. ही तर खरी सुरवात होती.. पावसाची इथे कृपादृष्टी असतेच तेव्हा इथला निसर्ग सुंदर नजराणा पेश करणारच.. अश्या रम्य परिसरात कोणीही खुळावेल.. इथेच तलावाकाठी बसून निसर्गाविष्कार अनुभवावा असे वाटत होते.. पण रो.मा चे आपले भलतेच.. गेला लगेच तलावकाठच्या झुडूपात मासे पकडायला ! जल्ला ट्रेक दोन दिवसाचा असो वा एक दिवसाचा या साहेबांना कळ लागतेच.. !!
या तलावकाठच्या बाजूनेच डांबरी रस्ता थेट वाघोली खिंडीकडे घेउन जातो.. प्रथमदर्शनी हा रस्ता थेट पहाडाच्या उदरात घुसतो की काय असेच वाटते..
इथली वाटचाल करताना ट्रेकमध्ये नेहमीच मोहक वाटणार्या रानफुलांचा ताटवा लागला.. नि साहाजिकच आमचा वेग अगदी कासवछाप झाला.. इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून इतक्या जवळ असा रमणीय परिसर असेल असे वाटले सुद्धा नव्हते.. पुढच्या खेपेस या तलावाकाठीच एक फॅमिल पिकनिक करु असे स्वतःशीच खोटे आश्वासन देत आम्ही खिंडीकडे निघालो..

– –

– –

रस्ता अगदी सरळ.. पण खिंड जशी जवळ आली तसा उंचीला मोठा पण लांबीला छोटा चढ लागतो.. ‘खिंड’ या इतिहासातील सुप्रसिद्ध शब्दालाच इतके वजन आहे की कोणालाही साहाजिकच कुतुहल वाटावे.. खिंडीत उभे राहीले की वार्याचा झोत स्वागत करणारच… दोन्ही कडून खिंडीत येणारा रस्ता दिसणारच.. दोन प्रदेशांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम ही खिंडच करते.. इथेही या खिंडीमुळेच पलिकडच्या गावांना इगतपुरीच्या अगदी जवळ आणले गेले.. या खिंडीतच देवीचे मंदीर आहे..
खिंडीपासून पलिकडचा रस्ता सुरु होतो.. रस्ता म्हणाल तर अगदी कच्चाही नाही पक्काही नाही.. पण गाडी नक्कीच जाउ शकते.. इथूनच इगतपुरीला कॉलेजला जाणार्याला त्रिंगलवाडीची दिशा विचारली तर ‘कुठे चालत जाताय.. गाडी आणायची ना’ असा सल्ला मिळाला… त्याच्या बोलण्यात तथ्य होते खरे.. त्रिंगलवाडी दुरवर अगदी मुंगीसदृश वाटत होती… पल्ला बराच मोठा गाठायचा होता.. पण त्याचसाठी तर आम्ही आलेलो.. घडयाळ्याकडे बघून लेटस गो केले.. ट्रेकमध्ये सर्वात त्रासिक बाब म्हणजे रस्त्यावरुन चालणे.. इथे तर अगदी वळसे घेत जाणारा होता.. आम्हाला त्रिंगलवाडीची दिशा तर कळली होती.. साहाजिकच मागचा पुढचा विचार न करता रस्त्याला फाटा देत आम्ही शेतमळयातून जाणारी पाउलवाट पकडली.. रस्त्याला उजवीकडे ठेवले.. आमच्यासाठी शॉर्टकट पेक्षा हिरव्यागार रानाने नटलेल्या वाटेचा आस्वाद घेणे महत्त्वाचे होते..

(दुरवर समोर दिसतोय तो त्रिंगलवाडी किल्ला)
– –

कधी एखादा धनगरवाडा लागतोय.. तर कधी छोटेसे घर.. कधी पिवळ्याधम्मक फुलांची शेती लागतेय.. तर कधी हिरवीगार भातशेती.. कधी विविधरंगी रानफुलांनी सजलेले हिरवे रान.. शेतमळ्यातून जाणारी वाट म्हणजे नांगी वर करुन अभिवादन करणार्या खेकडयांची भेट तर ठरलेली.. नि सभोवताली क्षितीजाच्या आड येणारी सह्याद्रीरांग.. आमच्या ट्रेकचे प्रायोजन तर इथेच सफल झाले होते..
अशावेळी आपले ट्रेकमार्क उडडाण असतेच !! (फोटो By रो.मा)

– –

(बुध्या डोंगर नि मागे कावनईचे डोके दिसतेय)
पुढे दोन- तीन घरांची वाडी लागली नि तिथून मात्र रस्त्याची वाट धरावी लागली.. एक छोटा ओहळ पार करुन पुढे कंटाळवाण्या रस्त्यावर आलो… आतापर्यंत बरीच वाट तुडवली होती.. गेले दोन तास चालतच होतो.. सध्या वारंवार ट्रेक्स होत नाहीत म्हणून की काय माहीत नाही पण रो.मा. ची थकबाकी सुरु झाली.. रस्त्यावरच मग क्षणभर विश्रांती घेउन पुन्हा तंगडतोड सुरु केली..

रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेतं, शेतामध्ये वेढलेली पिटुकली घरं व शेतापलिकडे दिसणारे हिरवे डोंगर.. असा नजारा असताना चालणेही सुसह्य होउन गेले.. काही अवधीतच त्रिंगलवाडी गावात पोहोचलो.. गावातल्या मंदीरातील देवीला मनोमन नमस्कार करुन गावच्या मागून जाणारी बटबटीत चिखलाची ढोरवाट पकडली.. धरणाच्या भिंतीवर चढून गेलो नि समोर… समुद्रापरी लाटांच्या तालावर झुलणारे धरणाचे पाणी व त्यापल्ल्याड ध्यानस्थ बसलेला त्रिंगलवाडी किल्ला !

किल्ल्याची चढाई फारशी वाटत नव्हती.. पण एव्हाना मध्यदुपार होउन गेलेली.. किल्ल्याचे चरण स्पर्श जरी करायचे तरी बराच पल्ला गाठणे बाकी होते.. तिथे पोचणार कधी.. चढणार कधी.. फिरणार कधी नि उतरणार कधी.. सार्या प्रश्नांचा कल्लोळ बाजूस सारुन डावीकडून लेटस गो केले.. इथूनच आमची आतापर्यंतची खिंडीपासूनची घोडदौड दिसून येत होती.. जल्ला बरीच पायपीट झाली होती.. नि अजुन बरीच बाकी होती..

(आतापर्यंतची घोडदौड.. अगदी उजवीकडच्या खिंडीतून इथवर मजल मारली होती)
धरण अगदी मोठे असले तरी भिंत पुर्णपणे बांधलेली नाही.. साहाजिकच पाणी भरुन ओसंडून वाहणेच नाही.. धरणाचे पाणी जिथून बाहेर पडते तिथूनच आम्ही उतरुन पुढे गेलो.. ही जागा खूपच मस्त वाटली.. क्षणभर इथेच ट्रेक संपवूया असा खोडकर विचारही आला..

– –

उजवीकडची पाउलवाट पकडली नि धरणाच्या काठाकाठाने मार्गाक्रमण सुरु ठेवले.. भेटलेल्या एका गुराखीला विचारले तर किल्ल्याचा माथा गाठण्यास अजुन दिडेकतास तरी लागणार होता.. ! पण त्रिंगलवाडीचे स्थान आता लक्षात आल्याने चुकण्याचा संभव नव्हता तेव्हा लवकारात लवकर अंतर कापण्याचे ठरवले.. वातावरणही ढगाळ असल्याने उन्हाच्या तडाख्याचा प्रश्नच नव्हता. तिथे डावीकडचा म्हळुंग्याचा डोंगर आपल्या दणकट शरीरयष्टीने लक्ष वेधून घेत होता.. शेवटी एकदाचे धरणाचा जलाशय मागे पडला तसे म्हळुंग्याला पाठ करत गर्द हिरव्या झाडीत जाणारी वाट पकडली.. तत्पुर्वी हातात बेचकी मिरवता जाणारी शाळकरी पोरांची भेट झाली..

सभोवतालची हिरवाई तशीच असली तरी पाउलवाटेचे स्वरुप पदोपदी बदलत होते.. नि पुन्हा एकदा उत्तम क्षणभर विश्रांतीसाठी अगदी योग्य जागा सामोरी आली.. अगदी हिरवागार गालिचा पांघरलेला नि त्यावर एकच लाल मातीची रेघ उमटवलेली.. जन्मतः शीतल वाटणार्या हिरवळीवर थकल्याभागल्या जीवांना मस्तपैंकी लोळून डुलकी काढण्याची हुक्की येणारच.. पण आम्ही या मोहात फसलो नाही..

त्या मोहजलातून बाहेर पडलो नि त्रिंगलवाडी अगदीच समोर आला.. पण वाट मात्र उजवीकडे जात होती.. वेळही आता भराभर निसटून जात होता.. तेव्हा पुन्हा एकदा मुळ वाटेला बगल देत बिनदिक्तपणे बंधार्यावरुन चालायला घेतले.. पण त्रिंगलवाडीने त्याच्यापर्यंत पोहोचण्यातच इतके नैसर्गिक अडथळे निर्माण करुन ठेवलेले की थांबणे मस्टच होते.. मग ती अगदी यशचोप्रांच्या सिनेमांमध्ये दिसणार्या पिवळ्या फुलांसारखी बाग असो वा गर्द जांभळ्या रानफुलांची वस्ती असो..

– –

– –

अखेरीस आम्ही त्रिंगलवाडीला चरणस्पर्श झालो.. इथेच एक भलीमोठी गुहा आढळते.. दहाव्या शतकात कोरलेली जैन लेणी म्हणे.. इतकी प्राचिन लेणी पहाणे खरच भाग्यवान समजावे.. बरीच पडझड झालेली आहे पण जे काही अवशेष शिल्लक आहेत ते पाहूनच त्याकाळची सुंदरता, कल्पकता सहज लक्षात येते.. मग ते प्रवेशद्वार असो वा प्रवेशद्वाराच्या बाहेरील ओसरीचा परिसर.. सारे काही शिल्पकामाने बांधलेले.. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस झरोक्यासाठी बांधलेल्या खिडक्या.. सारे काही अप्रतिम.. हे न्याहाळतच आत शिरलो तर गुहेतील ऐसपैस अशा सभामंडपात झिरपणार्या पाण्याचाच काय तो खळखळाट निनादत होता.. चार खांबांपैंकी सध्या एकच खांब शिल्लक आहे.. अनपढ लोकांचे गिरवणे सोडले तर खांबावरील नक्षीकामही उल्लेखनीय.. नि समोरच अजुन एक गुहा (गाभारा) तिथे जैन धर्माचे प्रथम तीर्थकर भगवान आदिनाथजी (ऋषभदेव) यांची भग्नावस्थेतील मुर्ती आहे.. त्रिंगलवाडीच्या कुशीत असलेली ही लेणी म्हणजे खरच एक खजिना आहे..

– –

– –
प्रवेशद्वाराची एक सुंदर बाजू

– –

– –
प्रवेशद्वारावरील सुंदर नक्षीकाम

– –
गुहेच्या आतील परिसर

इथेच आम्ही आमचे पार्सल उघडून खादाडी कार्यक्रम उरकला नि गुहेच्या डाव्या बाजूने वरती जाणारी वाट पकडली.. फारसा चढ नाही.. जेमतेम पंधरा वीस मिनीटांचा चढ असावा.. पण आमची तंगडतोड अगदी इगतपुरीपासून सुरु असल्याने दमछाक होणे भाग होते.. वाटेत एक छोटी माची लागते जिथे एक घर व शेती आहे.. पुढे ही वाट त्रिंगलवाडीच्या सोंडेवर आणून सोडते.. इथे पोहोचलो नि सभोवतालच्या परिसराने वेड लावले.. चोहोबाजुंचा निसर्ग हिरव्या रंगात माखला होता.. वार्याला उधाण आले होते.. कडयावरची सोनकी तेरडयाचे ताटवे अगदी प्रसन्न मनाने डोलत होते.. आम्ही सगळे शांतपणे बघत पुढे जात होतो.. तरीसुद्धा अधुनमधून घडयाळ्याकडे लक्ष जात होतेच.. तीन वाजत आले होते नि आम्ही अजुन माथा गाठला नव्हता..

– –

—

– –

समोरच त्रिंगलवाडीच्या शेंडयाची कातळभिंत उभी राहिली.. जाण्यासाठी दोन्ही बाजूने वाट होत्या त्यापैंकी आम्ही मागची सरळ वाट पकडली.. काही अंतरावरच कातळात कोरलेल्या पायर्या नजरेस पडल्या.. म्हटले गुप्त दरवाज्याकडे नेणार्या पायर्या असाव्यात.. पुढे जाउन अजुन काही वाट दिसतेय का म्हणून खात्री केली नि त्या पायर्यांकडेच वळालो.. सहजासहजी नजरेस न पडणार्या या पायर्या सध्याच्या पावसाने चांगल्याच ओल्याचिंब नि शेवाळाच्छादीत झालेल्या.. पायर्या चढून गेल्यावर समोरच कातळात कोरलेली हनुमानाची मोठी मुर्ती आशिर्वाद देण्यासाठी उभी दिसली नि बाजूलाच गुप्त दरवाजा.. हे पाहताच ट्रेक सार्थक झाल्याचे समाधान मिळाले..

– –

आतापर्यंत आम्ही फक्त दोघेच या परिसरात होतो तोच कुठूनतरी खालच्या गावातला एक कॉलेजकुमार समोर आला.. गुरांना घेउन आला होता.. एकटेपणा कंटाळलेला तेव्हा आमच्याबरोबर स्वतःहून फिरण्यास आला… आमच्यासाठी बरेच झाले कारण आधीच वेळ कमी होता.. शिवाय माथ्यावर भरमसाठ रान वाढलेले.. त्याचे अजुन दोन सवंगडीदेखील आमच्यामध्ये येउन सामिल झाले.. त्याच्याच मागून रानातून वाट काढत आम्ही वाडयाचे अवशेष, खांबटाके व बारामाही पाण्याचे टाके पाहीले..

– –
गुहेच्या पुढील पाण्याच्या टाकीतील बारामाही असणारे पाणी चवीला उत्तम

– –

आकाशात ढगांची गर्दी झाली असल्याने दुरवरचा प्रदेश काही पहायला मिळणार नव्हता पण माथ्यावरची भटकंतीदेखील समाधान देण्यास पुरेशी होती.. नि त्यामध्ये सर्वोच्च क्षण म्हणजे माथ्यावरील मंदीराचा परिसर… अख्खा दिवस त्या जागेवर बसून काढण्याइतपत सुंदर जागा… ! गाभार्यात शेंदुर लावलेल्या गणपतीची, देवीच्या मुर्ती आहेत.. तर बाहेर शिवलिंग आहे.. इथेच मग त्या सवंगडयांसोबत गप्पाटप्पा करत क्षणभर विश्रांती घेतली.. तो कॉलेजकुमार म्हणे रोज पहाटे साडेचार उठून इगतपुरीच्या कॉलेजमध्ये चालत जातो !! आम्ही तर आजच्या दिवसभरच्या तंगडतोडीपुढे हतबल झालेलो..

– –

त्या सवंगडयांचा निरोप घेउन आम्ही आता पुढच्या बाजूस असणार्या पायर्यांनी खालीउतरण्यास सुरवात केली.. चारच्या आत खाली म्हणत सुसाट निघालो..

पण मघाशी वरती येतानाच सोंडेवरच्या एका खडकाने ‘पुन्हा भेटा’ म्हटले होते.. सो इथे उडयांचे प्रकार झाले.. तंगडतोडीने अगदी मेटकुटीस आलेला रो.मा देखील उडया मारण्यासाठी मात्र अगदी ताजातवाना झाला.. या एकमेकांच्या फोटोशूटमध्ये पंधरा मिनीटे आमची अशीच गेली.. जल्ला त्यावेळेत खाली पोहोचलो पण असतो… नॉssनसेन्स !

खाली उतरुन आता आलो त्याच वाटेने जायचे नव्हते.. म्हणजेच त्रिंगलवाडी गावातून येताना धरणाच्या डाव्या बाजूने आलो होतो तर आता उजव्या बाजूने जायचे ठरले होते.. एवढी तंगडतोड थकलेल्या रो.मा ला तरी सोसवणारी नव्हती.. तेव्हा आम्ही जिथपर्यंत रस्ता येतो त्या गावाकडे मोर्चा वळवला.. शिवाय त्या सवंगडयांनी गावातून इगतपुरी/घोटी कडे जाण्यास पिकअप गाडी मिळेल असे अगदी छातीठोकपणे सांगितले होते.. त्यावर मी त्याला ‘जर असे घडले तर तू यंदा बारावीला बोर्डात नक्कीच पहिला येशील’ अशी गोड शुभेच्छाही दिलेली.. पण कसले काय.. गावात पोहोचलो तर सांगितले गेले त्रिंगलवाडीतूनच गाडी मिळेल.. रो.मा अजूनही आशावादी होता तर एकीकडे आता पायदळीच इगतपुरी गाठावे लागणार हे मी समजुन गेलेलो.. धरणाला पुरता वळसा घालत वाटेतल्या तीन- चार छोटया गावांचे थांबे घेत गेलेल्या लांबलचक अश्या रस्त्याने नुसते चालणे म्हणजे खूपच कंटाळात्मक नि वेदनादायी होते.. संपुर्ण वाटचालीसाठी दिडेकतासाची तंगडतोड करावी लागली.. या रस्त्याने यायचे तर गाडी हवीच.. अन्यथा सरळ धरणाच्या त्या डावीकडील पाउलवाटच पकडावी !!

हाशहूश करत एकदाचे त्रिंगलवाडीत पोहोचलो.. मला तरी त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव वाटलेच नाही.. जल्ला इथून किल्ला दिडेक तासावर पडतो.. शिवाय या रस्त्याने गेलो तर तीन चार गावंही लागतात.. एव्हाना पाच वाजत आले होते.. आता त्रिंगलवाडीहून इगतपुरी गाठायचे तर अजुन दिड-दोन तासांची अजुन तंगडतोड शिल्लक होती !! तरीसुद्धा आम्ही अंधुक आशा ठेवून इथे-तिथे चौकशी केली.. पण दुपारी दोन-तीन नंतर घोटीकडे जाणारी गाडी मिळणे म्हणजे चमत्कारच.. रो.मा तर अगदी कुणाच्या घरासमोर दोन-तीन बाईक लावलेल्या पाहून विचारायला निघाला.. पण घरात बायकाच दिसत होत्या तेव्हा बाईकचा विचार सोडून दिला..
शेवटी पुन्हा त्याच वाटेने, त्याच बंधार्यावरुन जाण्यास सुरवात केलेली… त्रिंगलवाडीकडे येताना अगदी जोशमध्ये होतो पण आता सारे अवसान गळत चालले होते.. रो.मा ने पुरती शरणागती पत्करलेली तेव्हा त्याला तर अगदी चालत-ढकलत नेत होतो.. संध्याकाळी साडेसहाच्या ट्रेनचे लक्ष्य ठेवले होते.. तेव्हा जल्ला भाग रो.मा भाग म्हणत रो.मा ला चालते केले.. एसटी महामंडळाने या गावापर्यंत एसटीची सोय का नाही केली म्हणून मनोमनी लाखोल्यादेखील अर्पण केल्या..अखेरीस इगतपुरी स्टेशन एकदाचे आले.. बहुतेक जण स्वेटर घालून हिंडताना दिसत होते.. आम्ही मात्र घामाघूम झालेलो.. शेवटी संध्याकाळी सातची ट्रेन पकडून मुंबईकडे रवाना झालो..
म्हटले त्रिंगलवाडी.. एक सोप्पा ट्रेक म्हणून ख्याती.. पण आपल्यासाठी कुठलाच ट्रेक सोप्पा नसतो.. खासकरुन तुमचे स्वतःचे वाहन नसेल वा एसटीची सोय नसेल अशा परिसरात ट्रेक करणे म्हणजे अवघडच.. पिक-अप ची वडापदेखील जर नाही मिळाली तर अधिकच समस्या.. त्यात पहाटे निघून एकादिवसात आटपून परतायचे म्हणजे आपल्याच तंगडीची पिसे काढत ट्रेक करणे.. टोटल लावली तर दिवसभरात सात-आठ तासांची तंगडतोड झालेली.. पण संपुर्ण वाटचाल नेत्रसुखद निसर्गामुळे प्रसन्न वाटली.. त्रिंगलवाडी किल्ल्याचा परिसर खरे तर ह्याच मोसमात पहाण्यासारखा.. अगदी निसर्गकोंदण..नि ट्रेकींग कम नॅचरल ट्रेलची असली मजा चाखायची असेल तर इगतपुरी गाठा नि सुरवात करा तंगडतोडीला..
गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे लेण्यांच्या डाव्या बाजूने एक वाट गडावर घेऊन जात होती. त्याप्रमाणे आम्ही डावीकडे चालू लागलो, पाऊस आणि धुकं यामुळे अजूनही आम्हाला गडाचं मुखदर्शन झालं नव्हतं. थोडी उभी चढण तोडून आम्ही एका पठारावर आलो, येथे एका पल्यापासून आम्ही पुन्हा डावी वाट धरली, गावकऱ्याने सांगितल्याप्रमाणे. पुढे डोंगराच्या धारेवर दोन लहान दगड एका विशिष्ट उभ्या दगडांपाशी आलो. इथून समोर किल्ल्याच्या उभा कातळकडा दिसत होता. या कड्याची उजवी वाट सोपी आहे तर डावीकडची वाट थोडी कठीण असून सुंदर आहे. आम्ही डावी वाट घेतली. ही वाट कातळाला चिटकून चालत कोरलेल्या पायऱ्यां पर्यंत घेऊन गेली. या पायऱ्यां अगोदर एक लहानसा कातळटप्पा लागला. दोन-तीन स्टेप्स मध्ये तो पार केला आणि कातळात खोदलेल्या उंच पायऱ्या चढू लागलो. जोराचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा त्या दगडाच्या खिंडीत एक घुमून कानांना सुखावत होता. पावसाळ्यात हाच अनुभव वर्षभर पुरतो आमच्यासारख्या भटक्यांना. या पायऱ्या शेवटच्या टप्प्यात फिरून एका ५ फुटी मारुतीच्या मूर्तीच्या समोर संपल्या. या मूर्तीच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेलं किल्ल्याच सुंदर प्रवेशद्वार आहे. दोन शरभ शिल्प आणि चंद्र-सूर्य या दरवाज्यावर कोरलेले आहेत. या प्रवेशद्वारातून आता जात आम्ही उजवीकडून गडफेरी सूरु केली. काही अंतरावर दगडात खांब रोवण्यासाठी केलेले खोबणी दिसल्या या पुढे वाड्याचे अवशेष होते. इथून जवळच असलेली किल्ल्याच्या माथ्यावर असणारी वाट आम्ही धरली. तिथे काहीच अवशेष नव्हते आणि पाऊस आणि धुख्यामुळे सभोवतालचा परिसरही पाहता आला नाही. ही वाट तुडवून आम्ही किल्ल्याच्या माथा उतरून आलो इथे उजव्या बाजूला शंकराच लहान मंदीर आहे. ते पाहून आम्ही पुन्हा प्रवेशद्वारासाठीची डावीकडची वाट धरली. वाटेत दोन पाण्याची टाकी लागली आणि पुढे उजवीकडची सोपी वाट दिसत होती. आमच्या वाचन्याप्रमाणे किल्ल्यावर २०-२५ माणसे राहू शकतील अशी गुफा आहे पण ती काय आम्हाला सापडत नव्हती. पुन्हा एक फेरी मारली पण नाहीच सापडली म्हणून मग नाईलाजाने उजव्या वाटेने उतरायला सुरुवात केली. या वाटेवर देखील काही कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या सुरवातीला. पुढे जाऊन मागे वळता एक पुसटशी वाट डावीकडे जात आहे असं वाटलं म्हणून मग गुफेसाठीचा शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. सचिन पुढे गेला आणि मला आवाज दिला त्याने. खरंच ही गुफा अश्या ठिकाणी आहे की ती शत्रुलाही शोधता येऊ शकत नव्हती. पायऱ्या जिथे संपतात तिथे डाव्या बाजूला ५ मिनिटांवर कातळात एक २.५x२.५ फुटाचा एक चौकोन खोदलेला आहे. तो जवळ जवळ २५ फूट आत जाऊन गुफेत उघडत होता. नेहमीप्रमाणे खबरदारी म्हणून आम्ही जोरात आवाज काढून, दगड मारून आत कोणी प्राणी तर नाही ना ही खात्री केली आणि मग गुढघ्यावर रांगत आत गेलो. आत खरंच २०-१ माणसं राहू शकतील अशी मोठी गुफा होती. ती पाहून आमची गडफेरी संपवली आणि गावात उतरून आलो.
या रांगड्या सह्याद्रीत अनेक आडवाटेवरचे दुर्लक्षित किल्ले आहेत पैकी एक त्रिंगलवाडी आज आम्ही पहिला होता. आता हा किल्ला इथे का? चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ मार्गे नाशिक बाजारपेठेत येत असे या मार्गाच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला होता. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते.
त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग)
त्रिंगलवाडीला जायला मुंबई – आग्रा महामार्गावर घोटी आणि इगतपुरीच्या दरम्यान टोलनाक्यावर जातानाचे ९० अन् येतानाचे ९० असा टोल ‘उग्गाच’ भरावा लागला. उग्गाच अश्यासाठी कारण, टोल भरल्यावर अवघ्या १ कि.मी.वर त्रिंगलवाडीकरता ‘टाके’ गावापाशी उजवीकडे वळलो. मग अर्थातंच ‘आपण भरलेल्या टोलच्या पैश्याचे लाभार्थी कोण’, यावर रवंथ करणं आलंच..
डावीकडे म्हाळुंगे डोंगराचे करकरीत कडे मागे टाकत त्रिंगलवाडी गावात आलो. त्रिंगलवाडी धरणाच्या पल्याड असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याला चालत जाण्यापेक्षा पेठेच्या वाडीपर्यंत खराब रस्त्यावरून गाडी नेऊन पाऊणेक तास वाचवला. इतक्या उन्हांतही गडाचं पहिलं दर्शन सुखावह होतं.
वाटाड्या मागितला नसतानाही गावातली पोरं (पांडुरंग अन् त्याचा दोस्त) आमच्याबरोबर गडावर निघाली.
पायथ्याच्या जैन लेण्या पाहून थक्क व्ह्यायला होतं.
लेण्यांवरचा डोंगर चढून गडाच्या कातळमाथ्याजवळ गेलो. पाठीमागे इगतपुरी अन् कोकणाचं उत्तम दर्शन झालं.
कातळकड्यापासून डावीकडे आडवं गेलो.
नैसर्गिक घळ अन् तासलेले कातळ यांतून ७०-८० उंचंच उंच पाय-यांची सुरेख वाट चढू लागलो.

विशाल मारुतीरायाची मूर्ती अन् कातळकोरीव प्रवेशद्वारावरील शरभ शिल्पानं लक्ष वेधून घेतलं.

गडाच्या माथ्यावरून भास्करगड, उतवड, हर्षगड, त्र्यम्बक, अंजनेरी, डांग्या, गडगडा, कावनई, मोरधन आणि कळसूबाई रांग लक्षवेधी होती. दुर्गेच्या राऊळापाशी उतरलो.

गुहा-टाक्याचं थंड पाणी..
उतरताना दुस-यां बाजूची पाय-यांची वाट घेतली, अन् त्रिंगलवाडी दर्शन संपवलं.
परत निघाल्यावर आता ऊन्हातलं पोळणं - आलेला घाम - लागलेला दम – घश्याला पडलेली कोरड, असंलं काहीच आठवत नव्हतं... वाटलं, वैशाख-वणव्यात वणवण करून एका दिवसात ३ किल्ले बघून आपण काय साध्य केलं.. फक्त ‘ईगो’ सुखावा या हट्टानं केलं, की खरंच काही आनंद मिळाला या प्रवासात. अन् मग डोळ्यासमोर तरळू लागली गेल्या १० तासांमधली काही देखणी दृश्यं.
ढगांआडून झालेला देखणा सूर्योदय..
ऐन मे महिन्यात कोरड्या ठणठणीत करपलेल्या जमिनीत उमललेली फुलं पाहून, ‘जगण्याची – उमलायची उत्कट प्रेरणा कुठून आली असावी’ या विचारानं चकित झालो.
दारणा नदीच्या पार्श्वभूमीवर मोरधन अन् windshield वर ढगांची मोहक नक्षी दिसत होती.
कावनईचा जोडीदार दास्कोनच्या दांडावर गुरांच्या वाटांचं mosaic design मोठ्ठं विलक्षण दिसत होतं..
ट्रेकची धुंदी तनामनावर चढली असताना, परतीचा प्रवास सुरू केला.. कारमध्ये गाणंही असलं apt लागलं – अग्गदी मनातलं गुज सांगणारं::
![]() |
| लेणीच्या वाडीच्या अगोदर वाटेत हि शिळा दिसली, बहुतेक समाधी शिळा असावी. |
![]() |
| गडावरील खांब टाकी किंवा गुहा आणि त्याचा बाजूला खाली टाकी दिसत आहे. |
![]() |
| दुसरी टाकी |
![]() |
| तिसरी टाकी |
![]() |
| मंदिरातील मूर्ती |
![]() |
| मंदिराच्या मागाहून शिखर माथ्यावर जाताना. हा शेंदूर लावलेला पाषाण दिसतो. |
![]() |
| दुसऱ्या वाड्याजवळ आढळणारी खोबी |
![]() |
| लेणीचे गाभाऱ्याचे दृश्य |
![]() |
| गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे |
![]() |
| गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे |
![]() |
| गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे |
![]() |
| धरणाच्या काठावरून पॅनोरमा मोड मध्ये टिपलेले दृश्य. |
त्रिंगलवाडी म्हणजे इगतपुरीहुन सुमारे आठ किलोमीटरवर असणारं छोटंसं गाव. ट्रेक जरी त्रिंगलवाडी असला तरी त्याचं पायथ्याचे गाव म्हणजे "तळ्याची वाडी". भर पावसात ११.३० च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर गावचं निसर्ग डोळ्यात भरणारं होतं, पावसाळा असल्याने शेतातली कामे जोरात चालू होती. वाटेत काही गुराखी गुरांना घेऊन बाहेर पडले होते.
Tringalwadi is a village near Igatpuri, that is about 120 km from Mumbai along the Mumbai - Nashik highway (NH 160). Tringalwadi is about 7 kms from Igatpuri and is on the banks of the Tringalwadi reservoir held together by the Tringalwadi Dam.
Tringalwadi Fort is located on a hill behind the village, at a height of 987 msl. The climb to the fort is an easy 30-45 minute trek that is largely gentle sloped with the last steep section covered by steps cut into the rock.
Video Summary of the Trek
Here is a summary video of the trek:
Tringalwadi Fort
The trek starts at Tringalwadi village. A small mud path leads from the
village through rice fields and small streams, along the coast of the
reservoir northward till we reach the Jain cave at the foothill of the
fort. From there, one starts climbing the hill behind the cave to the
left of the cave to reach the ridge, then walk along the western rock
face till the narrow set of stairs cut into the rock face lead up to the
main gate.
The main gate is the most impressive part of the fort, with a large
relief of Lord Hanuman on the wall adjoining the doorway with a holding
chamber behind it. Being extremely cloudy, we did not explore the
farther areas on the fort itself. We examined the ruins of the castle on
the fort and a few water tanks dug into the rock for holding water.
The return path is from the east adjoining the castle ruins, till it
meets the ascending path at the ridge. The entire trek can be completed
in an hour without breaks.
The Tringalwadi Jain Caves
The Jain caves are built in a rock outcropping at the foothills of the
fort. The entrance is decorated with a carved frame with pillars that
are now disintegrated. The caves were excavated by the Yadavas, who
ruled the Deccan region in the 12th and the 13th centuries with their
capital at Chandradityapura (modern Chandor, District Nasik) and
Devagiri (modern Daulatabad, District Aurangabad) (ref: An inscribed Jain Image from Daulatabad Fort, by M. N. Deshpande in Satabda-kaumudi (1954))
The cave has a verandah on the outside, that has carved walls that are
largely disintegrated or destroyed. Along the front of this verandah is a
low parapet wall from which rise two pillars, one on either side of the
entrance, supporting the outer eave of the verandah. The front of the
cave with the main doorway was originally painted, traces of which still
remain.
Opposite these pillars are pilasters, and between the latter, is the
main doorway into the hall. Beyond these pilasters, and between them and
each end of the verandah there is a grille window — two square bars
each way dividing it into nine lights. The front of these bars is
prettily chased with lotus rosettes at the junctions.
In the centre of the verandah ceiling, and in front of the doorway,
hanging in deep relief, is a group of five figures in a circle. The
middle figure appears to be assisted or carried through the air by
another on either side, while two others, beneath, also help.
The partition wall between the verandah and the inner hall has been
entirely built of great irregular blocks of stone well fitted together
(ref: Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27, by Henry, Cousens)
The inner chamber is a large hall, 35 feet square, off the back of which
are an antechamber and a shrine. The hall ceiling was supported upon
four columns set square in the middle of the hall, The walls and ceiling
are plain. Bound the two sides of the south-west and north-west comers
are very low continuous altars for images while round the two sides of
the north-east and south-east comers are high benches which are not
altare. The south-east pillar, only, remains intact; the south-west one
is continuous from floor to ceiling, but is much corroded about the
middle. The north-west and north-east pillars have completely gone,
fragments hanging from the ceiling, and their stumps on the floor, being
all that is left of them.
The shrine doorway is much disintegrated, but it was not so elaborately
decorated as the front door. Over it, one above the other on three of
mouldings, are three Jinas. (ref: Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27, by Henry, Cousens)
Within the shrine, which is quite measuring 13 by 12 feet, are the
remains of a Jaina image upon an altar placed against the back wall. The
chest, head and umbrella have been smashed and thrown away — part of
the umbrella lies outside the cave — but the legs and the cushion are
left. On the middle of the cushion is the bull, showing that the image
was that of a Rishabdeva, while on either side of it is an inscription
dated Saka 1266.
There was a very fine inscription upon the wall in the north end of the
cave, but only a very small fragment of it remains. The letters are
small and well shaped. The inscribed surface seems to have been about
four to five feet across, but it is not certain how deep. (ref: Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27, by Henry, Cousens)
Getting To Tringalwadi
The easiest way to get to Tringalwadi village is from Igatpuri. There are jeeps that ply from Igatpuri station to Tringalwadi that could be used to arrive at the base village.
https://bijoor.me/2018/08/16/trek-to-tringalwadi-fort-and-jain-caves/




































































No comments:
Post a Comment