कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात. आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.
इतिहास :-
अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या या मंदीराचा इतिहास सर्वप्रथम जाणून घेउया.कल्याणी चालुक्यशैलीचा अप्रतिम नमुना कोल्हापूरच्या आग्नेयस शिरोळ तालुक्यामध्ये स्थित आहे. मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी आहे.करवीर महात्म्यांमध्ये खिद्रापूच्या कोपेश्वर या देवतेचा करवीर क्षेत्रातील अष्टमहालिंगापैकी एक असा गौरव केलेला आहे. कोपेश्वरचे खिद्रापुरात असणाऱ्या अस्तित्वा मागे सुप्रसिद्ध सतीच्या आत्मदहनाची कथा करवीरमहात्म्यात दिलेली आहे, ती अशी.
दक्ष राजाला सोळा मुली होत्या,त्यात सर्वात लहान मुलगी म्हणजे सती.दक्ष प्रजापती हे सतीचे म्हणजेच शंकराच्या पत्नीचे वडील,शंकराचे सासरे.दक्ष राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. त्यावेळेस शंकर आणि दाक्षायणी ( सती ) ला आमंत्रित करीत नाही.मात्र माहेरी जाण्याच्या हट्टापायी सती नंदीला घेऊन तिच्या वडिलांकडे यज्ञासाठी जाते.शंकर मानी असल्याने आमंत्रणा शिवाय तिथे जात नाही.सती तिथे गेल्यावर दक्ष राजा सर्वांसमोर तिचा अपमान करतो आणि तिला हाकलून लावतो.मात्र हा अपमान सहन न झाल्यामुळे ती तिथल्याच अग्निकुंडात उडी घेते.हि माहिती समजल्यावर शंकराचा राग (कोप) अनावर होतो.त्यानंतर शंकर वीरभद्राला पुत्रकामेष्टी यज्ञाचा विध्वंस करण्याचे आवाहन करतो.हा राग शांत करण्यासाठी साक्षात विष्णू शिवाला घेऊन खिद्रापूरला येतात.शंकरानी क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आदळून इथे क्रोध प्रकट केला आणि म्हणूनच या मंदिराचे नाव कोपेश्वर (चिडलेला देव) असे आहे.तसेच येथे विष्णूची पिंड देखील आहे.म्हणूनच कोपेश्वर आणि धोपेश्वर ( विष्णू ) आणि सती वडिलांकडे जाताना सोबत नंदीला घेऊन जाते त्यामुळे कोपेश्वर मंदिरात नंदी देखील नाहीये.
खिद्रापूर या गावाचे प्राचीन काळातील नाव कोप्पम असे होते.यास पुरावा म्हणून सुप्रसिद्ध अश्या कोपेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाला लागूनच असलेल्या भिंतीवरील शिलालेखात हे नाव आढळते. हा शिलालेख इ.स १२१३ मधील असून यादव राजा सिंघणदेव द्वितीय याचा आहे.तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हा मध्ये येऊर येथील एका शिलालेखात सुद्धा कोप्पम हे नाव येते. हा शिलालेख इ.स १०७७ चा असल्याने खिद्रापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी ११ व्या शतकापर्यंत मागे जाते.इ.स. १०७७ मध्ये कोपेश्वर मंदिर छोटेखानी का होईना अस्तित्वात असावे याचे कारण येऊरच्या शिलालेखात शंकर आर्य नावाच्या व्यक्तीने पुत्रप्राप्ती साठी कोप्पम मधील कोप्प देवाची ( कोपेश्वर) ची अनेक व्रत करून पूजा केली.
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. हे मंदिर उभारण्याचे काम सुरु असताना विविध देशातील राजांनी बलाढ्य पुलकेशी राजाला नजराणा पाठवून मैत्रीचे नाते घट्ट केले होते. पुलकेशी राजाबद्दल सामर्थ्य आणि सद्गुणाचे गौरवोद्गार त्याकाळी आलेला चिनी प्रवासी युवन श्वांगने काढले, जे त्यावेळी लिहून ठेवले आहेत. इराणचा राजा खुश्रो दुसरा याने सुद्धा पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. नेमके त्याचवेळी कोपेश्वर मंदिर बांधणारा स्थापत्य विशारद तेव्हा दरबारात हजर होता आणि म्हणूनच या प्रसंगाची आठवण म्हणून इराण आणि आखातातील व्यक्तीशिल्प तिथे कोरलेली आढळतात.
इ.स ११ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेतून उत्तरेकडे आक्रमणे वाढली होती. परमप्रतापी चोल राजवंश त्यांच्या राज्याच्या सीमा रुंदावत महाराष्ट्रापर्यंत आला होता.त्यावेळी आपला महाराष्ट्र उत्तरं कालीन चालुक्य राजवंशाच्या हाताखाली होता. चौल सम्राट राजाधिराज १ ला याने महाराष्ट्र राज्यावर आक्रमण केले होते. त्याची अजस्त्र सेना अवाढव्य हत्तिदळ, अश्वदळ सह कृष्णा नदीच्या तीरावर येऊन स्थिरावले होते. मंदाध हत्ती व तेवढेच तगडे सैन्य असल्याने खिद्रापूर ला रणभूमीचे स्वरूप आले होते.त्यांना प्रतिकार कार्यासाठी सज्ज होता चालुक्य राजा पहिला सोमेश्वर अर्थात अहमल्लदेव.
ही घटना आहे सन १०५८ ची जेव्हा चालुक्यांनी पराक्रमाची नुसती शर्थच केली नाही तर राजाधिराज चोल चा पराभव करीत त्याच्या सैन्याचा धुव्वा उडविला या लढाईत राजाधिराज चोल मारण पावला. महाराष्ट्राच्या सुपुत्रांचा हा पराक्रमाचा वारसा आहे.जो आज ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही . प्राचीन चोळ साम्राज्य आणि महाराष्ट्राचा संबंध आहे खिद्रापूर मुळे. खिद्रापूर कोपेश्वर मंदिर तर सातव्या शतyकापासून बांधले जात होते पण पूर्ण झाले ११ व्यां शतकात. सातव्या शतकापासून याचे कळस निर्मिती ३०० वर्ष थांबलेली पूर्ण केली यादव साम्राज्यात.
इ.स. ११ वे शतक. महाराष्ट्रावर बहुतांशी चालुक्य व शिलाहारांचे राज्य होते.राज्यविस्तारासाठीच्या संघर्षात चोळ आणि चालुक्यांमध्येअनेक लढाया झाल्या. या अनेक दशके चाललेल्या संघर्षात कैक लढाया या आजच्या सांगली बेळगाव कोल्हापूर जिल्ह्यात झाल्या. "कोप्पतीर्थम" ( खिद्रापूर) येथील युद्धात चोळ साम्राज्याचा शक्तिशाली राजा "राजराजा चोळ" याचा नातू राजाधिराज चोळ याने कोल्हापूरवर आक्रमण करताना तेथील श्रीमहालक्ष्मी मंदिरही जाळण्याचा प्रयत्न केला होता. याच विरोध करताना तेथील मुथ्थय्या नामक फूलविक्रेत्याने आपले प्राण गमावले, असे सांगणारा वीरगळ न्यू पॅलेसमध्ये आहे.सदर वीरगळाची भाषा व लिपी कन्नड आहे.
खिद्रापूर त्याकाळात कोप्पाल म्हणून प्रसिद्ध होते.या लढाईचा खूप इतिहास चेन्नईच्या एका उपनगरानजीक मणिमंगलम या गावात राजगोपाल-पेरुमाळ या नावाचे एक मंदिर मधील शिलालेखांत आहे.त्यानुसार, कोल्हापूरचा उल्लेख "कोल्लिपक्कै" असा येतो आणि तेथील लढाईत चोळांच्या हाती बरेच सोने, हत्ती, घोडे लागले.ह्या लढाईत चोल जिंकले तरी त्यांचा राजा राजाधिराज चोल लढाईत मरण पावला. पुढें १०० वर्षांनी इथेच आणि एक मोठे युद्ध झाले ते म्हणजे यादव साम्राज्याचा सिंघम आणि शिलाहार राजा भोज द्वितीय. खिद्रापूरचे मंदिर सातव्या शतकापासून बांधत असले तरी ते कैक शतके अपूर्णच होतें. शिखर शिवाय आणि वरील नृत्यमंडपाच्या वरील छत कोसळले आहे, त्यामुळं आकाश दिसते, पौर्णिमेला वगैरे चंद्र पाहणे वगैरे.
हे देऊळ शिलाहार राजांनी बांधले याचा भक्कम पुरावा असल्यामुळे त्यात संशय घेण्यास काही जागा उरत नाही. यांना काही ठिकाणी सिलार, शियलार व सेळार या नावानेही ओळखले जाते. (मराठी शेलार हे आडनाव व यांचा काय संबंध आहे हे एकदा अभ्यासले पाहिजे) या घराण्याच्या तीन शाखा होत्या व यांचा मूळपुरुष होता जीमूतवाहन. या घराण्याची वंशावळ एका ताम्रपटावर सापडली त्यात एका शूर योद्ध्याने परशूरामाच्या बाणांपासून पश्चिम समुद्राचे रक्षण केले तो शिलाहारांचा मूळपुरुष असा स्पष्ट उल्लेख सापडतो. महाराष्ट्रात शिलाहारांची राज्ये ठाणे, कुलाबा येथे एक शाखा, गोवा, रत्नागिरी इ. येथे दुसरी शाखा व तिसरी सांगली कोल्हापूर, सातारा, बेळगाव...इ. येथे राज्य करत होती. शिलाहारांची मुख्य राजधानी होती मराठवाड्यातील तगर (तेर) येथे. हे सर्व राजे मुख्यत: कन्नड भाषिक होते असे मानले जाते आणि ते बरोबरही असावे कारण त्यांचे बरेच शिलालेख या भाषेत आहेत व त्यांनी बांधलेल्या देवळांची छाप हंपीवरही आहे.
कोल्हापूरच्या शिलाहार राजांचा मूळपुरुष पहिला जतिग हा गोमंथ किल्ल्याचा किल्लेदार ग्ंगनृपती पेर्मानडी याचा मामा होता. हा किल्ला शिमोगा जिल्ह्यात आहे यावरुन असे म्हणता येईल की हे राजे काही काळ कर्नाटकातही राज्य करत होते. शिलाहारांनी दक्षिण महाराष्ट्रावर जवळ जवळ २०० वर्षे राज्य केले. जतिग, नायिवर्मा व चंद्र हे पहिले तीन राजे शूर होते परंतू बहुदा राष्ट्रकुटांचे मांडलिक असावेत. यानंतरच्या मारसिंह राजाचा १०५८ साली मिरज येथे दिलेला एक ताम्रपट सापडतो. हे अर्थातच दानपत्र आहे. याची राजधानी किल्ले पन्हाळा येथे होती. मारसिंहानंतर आला गुवल व त्यानंतर आला बल्लाळ. बल्लाळनंतर आलेल्या राजामधे आपल्याला जास्त रस आहे कारण हा बऱ्यापैकी सार्वभौम होता व त्याचे नाव होते गंडरादित्य. या राजाचे १११० पासून ११३५ पर्यंत खोदलेले अनेक शिलालेख सापडले आहेत.
गंडरादित्य राजाचा ताम्रपटावरील शिक्का.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची पायाभरणी यानेच केली. एका शिलालेखात त्याने स्वत:चा उल्लेख मिरिज देश, सात खोल्ल ( कदाचित घरातील ‘खोली’ हा शब्द यातूनच निर्माण झाला असावा) व कोंकण देशाचे आधिपती आहोत असे जाहीर केले आहे. त्याच्या राणीचे नाव होते कर्णावती. या राजाराणीचा ओढा जैन धर्माकडे होता परंतु तो महालक्ष्मीला शिलाहारांची कुलदेवता मानत असे.
शिलाहारांची कुलदेवता:महालक्ष्मी
गंडरादितत्याचा मुलगा विजयादित्य हा ११४० साली गादीवर आला व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा भोज हा गादीवर आला. हा इतिहासात बराच प्रसिद्ध झाला व तो सार्वभौम राजा होता हे त्याच्या काही शिलालेखातून समजते. १२१२ मधे यादवांनी शिलाहारांवर स्वारी करुन शिलाहार भोजाचा पराभव केला व त्याला त्याच्या राजधानीतच म्हणजे पन्हाळ्यावर कैदेत टाकले. या राजाच्या मृत्युनंतर शिलाहार घराण्याचे राज्य खालसा झाले असे म्हणायला हरकत नाही. यादवांनी मात्र ज्या मंदीरांची बांधकामं शिलाहारांनी चालू केली होती ती बंद पडू न देता त्यांची चांगली व्यवस्था लावून दिली.
राजा भोज दुसरा याची राजधानी पन्हाळा:
गंडरादितत्याने अनेक शिवमंदिरे बांधली व जैन मंदिरेही बांधली. त्याने मिरजच्या आसपास एक तलावही बांधला व त्याला गंडसमुद्र असे नाव दिले होते. शिलाहारांच्या लेखात शिव, ब्रह्मा, महालक्ष्मी, जोगेश्वरी, भगवती अशा अनेक देवदेवतांचा उल्लेख होतो. ब्रह्माचे एक देऊळ कोल्हापूरात आहे तर दुसरे गोव्यात करमळी येथे आहे. शिलाहारांनी आदित्याची मंदिरेही बांधली. त्याने बांधलेली काही जैन देवळे म्हणजे आजुरिका यथे बांधलेले जिनालय त्रिभुवनतिलक, कोल्हापूरातील रुपनारायण व खिद्रापूरातही एक मंदीर आजही दिसते. नांदगिरी किल्ल्यावरही एक जैन स्थान आहे तेही याच काळातील असावे.
खिद्रापूर येथे दुसरी लढाई मोठी झाली ती म्हणजे शिलाहारांचा राजा द्वितीय भोज आणि देवगिरीच्या यादवांचा राजा सिंघण यांच्या बलाढ्य सैन्यात. या तुंबळ लढाईत शिलाहारांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो. खिद्रापूरचंग कोप्पेश्वर मंदिरातील एका लेखानुसार 'बन्नेस' हा या लढाईमध्ये मारला गेला. हा बहुतेक शिलाहारांचा सेनापती असावा असे वाटते. तसेच शिलाहार राजा भोज हा यादवांच्या सैन्याच्या तावडीत सापडला. या भोज राजाला राजकैदी म्हणून पन्हाळगडावर बंदोबस्तात ठेवले गेले होते. ही सर्व घटना कोप्पेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळील सिंघणाच्या इ.स. १२१३ च्या शिलालेखात नमूद केलेली असून या घटनेनंतर शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचा अस्त झाला असे आपल्याला दिसते.

लॉकिंग सिस्टीम
आता एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे, हे मंदिर बांधले कसे? येथे मंदिरात वापरलेला दगड आसपासचा नाही. तो खिद्रापूरच्या पश्चिमेला कोल्हापूरच्याही पुढे असलेल्या सह्याद्री पर्वतातून तराफ्यांच्या साह्याने पंचगंगेतून येथे आणला गेला. नदीवरून हत्तींच्या साहाय्याने तो ओढत आणला गेला. त्यावर वेगवेगळ्या आकाराच्या शिळा घडवून ‘लॉकिंग सिस्टीम’मध्ये (खालच्या शिळेमध्ये वरच्या बाजूला खोबणी करून त्यामध्ये वरील शिळेच्या खालच्या बाजूला खालच्या खोबणीत बसेल अशी जीभ कोरून अडकवायचे, अशा प्रकारचे हे बांधकाम असते). जमिनीत सुरुवातीला मोठा खड्डा करून त्यात ‘डबर सोलिंग’ करून वर मंदिर उभारले गेले.
असे हे महत्वाचे खिद्रापूरचे मंदिर किती महत्वाचे क्षेत्र त्याकाळात असावे असे यावरून लक्षात येते. तसेच हा परिसर देखील तत्कालीन राजसत्तांच्या दृष्टीने महत्वाचा भूभाग होता हे समजण्यास आपल्याला मदत होते.

मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.
मंदिराचे दार इतके साधे आहे, की येथे आत काही बघण्यासारखे आहे असे वाटतच नाही. आत आलो, की नगारखाना लागतो. तो ओलांडून पुढे गेल्यावर मंदिराचा भव्य परिसर दिसू लागतो. नगारखान्याच्या दरवाज्यातून मंदीराच्या प्राकारातून प्रवेश करताच आपण आश्चर्याने थक्क आणि स्तब्ध होतो. पाषाणात घडवलेले शिल्पांच्या कलाकुसरीने भरुन टाकलेले हे मंदीर म्हणजे जणु जमीनीतून प्रकट झालेले भुईकमळ वाटते. इतक्या आडबाजुला स्थापत्यशास्त्राचा अदभुत अविष्कार पहायला मिळेल याची आपण जराही कल्पना केलेली नसते. दिगमुड अवस्थेतून भानावर आल्यावरच आपण मंदीराच्या मुख्य आकर्षणाकडे म्हणजे स्वर्गमंडपाकडे धाव घेतो. पण त्यापुर्वी मंदीराच्या आवारात ठेवलेल्या शिल्पाकृतीकडे एक नजर टाकायला हवी. प्राकार भिंत आणि परिसर मात्र आधुनिक काळात बांधलेला आणि दुरुस्ती केलेला आहे जाणवतो.महादेवाचे मंदिर असल्याने प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, म्हणून इकडे-तिकडे पाहावे तो समजते की या मंदिरात नंदी नाही व भारतातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जिथे नंदीशिवाय महादेव आहे.
बहुतेक सर्व एतिहासिक महत्व असलेल्या शहरात किंवा गावात आपल्याला असे वीरगळ नेहमी आढळतील. हे त्या गावाच्या रक्षणासाठी हौताम्य पत्करलेल्या वीरांचे स्मृतीस्तंभच आहेत म्हणाना. शक्य झाल्यास मातीतून/कचऱ्यातून काढून त्याची पुनर्स्थापना करावी. काही वीरगळांवर लेखही लिहिलेले असतात. ( काही गळ शाप देण्यासाठीही असतात. त्यांना गध्धेगाळ म्हणतात. त्याच्या आणि याच्यात फरक आहे हे लक्षात ठेवायला लागेल) हे वीरगळ विवीध काळातील असतात.
१) मुखमंडपा ऐवजी किंचित विलग असा स्वर्गमंडप.
२) गर्भगृह आणि मंडपाच्या पिठावर नेहमीपेक्षा खूप उंच अशा गजथराची योजना
३) गर्भगृहालागतच गर्भगृहातून प्रवेश असलेल्या तीन उपदेवळांची दालने
४) स्वर्ग मंडपात दीक्पाल असूनही गर्भगृहाच्या बाह्यांगावर उदगम पातळीवर शक्तीसही दाखवण्यात आलेले दिक्पाल आणि
५) सोळंकी शैलीतील करोटक छताचे साम्य असणारे स्वर्ग मंडपाच्या घुमटाचा छतावरील ( याचा फक्त खालचा भागच बांधला गेला आहे ) अलंकरण.
(याचे गणित करून बघितलं तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणल तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे. ३ लाख ८४ हजार किलोमीटर.)
ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुरण आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहिता येतात, दोन्ही मिळून संख्या होते १०८. ह्या शिवाय इतर अनेक गोष्टी १०८ ह्या संख्येचं हिंदू धर्मातील महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या संस्कृतीत महत्वाच्या असणाऱ्या संख्येला मानून त्यावरून एखाद्या मंदिराची पूर्ण रचना करणे हे विज्ञान, तंत्रज्ञान ह्या शिवाय शक्यच नाही. आपल्या संस्कृतीच्या कलेच्या आविष्कारात गणिताला स्थान देणे हे त्या प्रगत संस्कृतीचा एक दाखला नक्कीच आहे!
स्वर्गमंड्प :-

प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.ह्या सगळ्या खांबांची रचना आणि त्यावर शिल्पकलेची मांडणी करताना हे आकार कुठेच विसंगत वाटत नाहीत.इथल्या शिल्पकलेवर एक वेगळा ग्रंथ होईल इतकी ती सुंदर आहे. नजाकत असणाऱ्या अनेक मूर्ती डोळ्याचं पारणं फेडतात.
या मंदिराच्या फक्त गर्भगृहावरील मुळ शिखर पडून गेलेले नसून अंतराळ, मंडप आणि त्यापासून किंचित विलग असलेल्या आणि स्वर्ग मंडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडपाचेही मूळ छप्पर आज अस्तित्वात नाही असे काही अभ्यासकांचे मत आहे. स्वर्ग मंडपाच्या छताचा मध्यभाग उघडा असल्यामुळे काही अभ्यासकांचे म्हणणे असे आहे की मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले असावे. पण निरीक्षणाअंती असे लक्षात येते की यामध्ये तथ्य नसावे याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मंदिर बांधून पूर्ण झाल्याशिवाय गर्भगृहातील देवताच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठाता होत नसते. ती तशी झाली असणार, कारण मंदिराच्या दक्षिण द्वाराशी असलेल्या सिन्हा यादवाच्या शिरा रेखा शिरा रेखात कोपेश्वरच्या पूजा-अर्चे साठी दोन गावाचे उत्पन्न दिल्याचा उल्लेख आहे.
दुसरे असे की मंडपाच्या मूळ प्रवेशद्वारापासून सुमारे वीतभर दूर स्वर्ग मंडप बांधलेला आहे. मंदिराच्या मंडपाला लागूनच तो आहे याचाच अर्थ तो नंतर बांधण्यात आला असावा किंवा नंतर केव्हातरी त्याच्या छताची पडझड झाली असावी.
तर स्वर्ग मंडपावर छत कधीच नव्हते, यामुळे काही विद्वानांचे मत असे आहे कि 'केवळ स्वर्ग मंडपच आकाशाला खुला होता ( छप्पर रहित होता ) एवढेच नव्हे तर सर्व मंदिराचेच बांधकाम अपूर्ण होते आणि याचे कारण यादव राजा सिंघनाच्या ( इस १२१० ते १२४७ ) हातून झालेला शिलाहारांचा शेवट हे असावे', असे टोकाचे बनले. तथापि मंदिरात देवाची प्रतिष्ठापना झाली होती. मंदिराच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन पूजे अर्चेसाठी देणग्याही देण्यात आल्या होत्या. इंग्रजी दिनदर्शिका नुसार इ.स. १२१४ मधील एप्रिल महिन्यात शके ११३६ झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी त्यात आणखी देणग्यांची भर पडली. यादव राजा सिंघनाने या अपूर्ण मंदिराला असलेली आधीची अनुदाने तर कायम केलीच, पण आणखीही अनुदाने दिलेली आहेत हि बाब जरा विसंगत वाटते. मंदीरात नियमित पुजा,अर्चा होते आहे, शिवाय राजाकडून त्यासाठी देणग्या मिळत आहेत, याचा अर्थ स्वर्गमंडप हा जाणून्,बुजून उघडा ठेवला असणार हेच योग्य वाटते. शिवाय महाराष्ट्रातील इतर काही मंदीरात जसे अमरावती जिल्ह्यातील आनंदेश्वर, सोलापुर जिल्ह्यातील कुडलसंगम तसेच नाशिक जिल्ह्यातील गोंदेश्वर इथे अशीच रचना पहायला मिळते.
या मंदिराच्या मुखमंडपाचे छत हे कोल्हापूर शहरातील शेषशायी व ओंकारेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या छतासारखे क्षिप्तोक्षिप्त पद्धतीचे असावे असे अंदाज आहे.









सभामंडप :-
आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो. पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. मंदिराचा दुसरा भाग म्हणजे सभामंडप. मुखमंडपातून ( स्वर्गमंडपातून ) सभामंडपात प्रवेश करताना अतिशय सुबकतेने घडवलेले तोरण व प्रवेशद्वार निदर्शनास येते.




गवाक्ष ( जालवातायन ) मधल्या ओळीततील कमळात शिल्पकाराने केलेली चूक बघितली का ? पण अर्थातच ती डिझाईनवाल्याची चूक आहे व ती शिळेची चुकीची मोजमापे घेतल्यामुळे झाली असवी.

प्रत्येक खांबावर विलक्षण कोरीव कामाचे नमुने आहेत.कुठल्याही खांबावर एकच चित्र किव्वा नक्षी परत कोरलेली नाही.दक्षिणेचे अधिपती असलेले विष्णू,हरणावर स्वर झालेला वायू,बोकडावर बसलेला अग्नी,हत्तीवर बसलेले इंद्र,रेड्यावर बसलेला यम आणि मोरावर बसलेले कार्तिकेय यांची त्या खांबांवर कोरलेली शिल्प लक्ष वेधून घेतात.मंदिराचे पूर्ण बांधकाम हे बेसॉल्ट खडकापासून झालेले आहे.मंदिर उभारायची पद्धत भिन्न स्वरूपाची होती.खांब एकमेकांना दुव्यांनी जोडले गेले त्यामध्ये नंतर माती भरली गेली आणि मग उभारणी पूर्ण झाल्यावर त्यातील माती काढून टाकण्यात आली.अशा पद्धतीने संपूर्ण मंदिर उभारले गेले आहे. सभामंडपाच्या चारही बाजूंना असलेल्या खिडक्यांवर जरबेराची फुले कोरलेली आहेत.खांबांवर असलेले चालुक्य राजांचे चिन्ह म्हणजे उलटा नाग आणि यादव साम्राज्याचे चिन्ह म्हणजे व्याल या गोष्टी अतिशय कलात्मक पद्धतीने कोलेल्या आहेत. ‘Cloning animal' या शास्त्राच्या आधारावर तोंड बैलाचे आणि देह वेगळ्याच जनावराचा किंवा तोंड रेड्याचे आणि देह वेगळ्याच प्राण्याचा असे संकरित प्राण्याची कोरीव शिल्प येथील खांबांवर बघायला मिळतात.




मकर, मयूर एवं पूर्ण कुम्भ – कोपेश्वर मंदिर में मंगल चिन्ह


खांबांवर आणि भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा कोरलेल्या आहेत.राम-रावणाच्या युद्धात बाण लागून जखमी झालेल्या लक्ष्मणाला मांडीवर घेऊन हनुमानाला संजीवनी बुटी आणायला पाठविण्याचा प्रसंग मोठ्या कल्पकतेने कोरलेला पहावयास मिळतो.बुद्धावतारातील मूर्ती,बालाजीची मूर्ती तसेच वाल्मिकी आणि कोदंडधारी रामाची सर्वांगसुंदर शिल्प येथे कोरलेली आढळतात. जैन श्रावक व भगवान महावीर यांची शिल्पे येथे आहेत.कोपेश्वर मंदिरात सभा मंडपात उत्तरेकडील खांबावर लहान आकारात मिथुन शिल्प आहे. स्त्रिया न्हायल्यानंतर आपले ओले केस एका बाजूला घेऊन चालतात त्या रूपातील स्त्रीचे शिल्प रेखाटलेले आहे.शंकर,पार्वती,ब्रह्मदेव आणि गंगा यांच्या कथांचे शिल्प देखील पहायला मिळते. याच बरोबर दुर्गा,कालीमाता,महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवींची शिल्पे कोरलेली आढळतात.रंगशिलेमध्ये गणपतीला कोनशीला बसवून पूजा केली गेली आणि तिथूनच मंदिराचे बांधकाम सुरु केले गेले अशी माहिती सांगण्यात येते.रंगशाळेतील एका खांबाच्या पायाला गणपती बसविला आहे.
अर्थात या देवळाच्या बाहेर जेवढी उठावदार शिल्पकला आहे तेवढी आत नाही. सभामंडपात एका कोपऱ्यात सप्तमातृकांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतील पण त्या अत्यंत वाईट अवस्थेत आहेत व अंधारात असल्यामुळे व्यवस्थित छायाचित्र काढता येत नाही. अनेक देवळात आपल्याला सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. कोण असतात त्या ? या सप्तमातृका म्हणजे स्त्रीशक्तीची रुपे आहेत. यातील सर्व मातांच्या जन्माच्या कथा आहेत व बहुतेक मातांचा जन्म हा राक्षसांचा वध करण्यासाठी झालेला दिसतो. उदा. अन्धकासुर कथेत त्याच्या जमिनीवर पडणाऱ्या रक्तापासून नवीन राक्षस तयार हो़ऊ नयेत म्हणून या देवांनी उत्पन्न केल्या अशी कथा आहे तर एका कथेत नैर्ऋतीचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यांना उत्पन्न केले असे म्हटले आहे. त्या काळी या मातृकांना बरेच महत्व असले तरीही यांचे वेगळे मंदीर पाहण्यात नाही. यांना अनेक देवळात जागा मात्र दिलेली असते. बदामीचे राजे त्यांचे राज्य हे सप्तमातृकांच्या कृपेने मिळाले असे म्हणतात. यांना नावेही आहेत, ती अशी – ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा.कोप्पेश्वराच्या सभामंडपात उजव्या व डाव्या अशा दोन्ही कोपर्यांत सप्तमातृकांचे दोन शिल्पपट आहेत. दोन्ही अगदी सारखेच आहेत.
डाव्या बाजूला वीरभद्र शिव, मध्यभागी सप्तमातृका आणि उजवीकडे गणेश. ह्या सर्व मूर्तींखाली त्यांची वाहनेसुद्धा कोरलेली आहेत.

अंतराळ आणि गर्भगृह :-
सभागृह आणि गाभारा याच्या मधील भागाला अंतराळ म्हणतात.मंदिराचा अंतराळामध्ये तसा बऱ्यापैकी काळोख आहे.छोटासा चौकोनी आवारासारखी हि जागा असून याच्या संपूर्ण भिंतीवर विविध शिल्प साकारलेली आहेत. सभा मंडपातून पुढे अंतराळात आल्यावर उत्तरेकडील भिंतीवर काही शिलालेख आढळतात. याचे वाचन झालेले आहे. नेहमी अंतराळात आढळतात तसे देवकोष्ठे येथे नाहीत. मात्र स्त्री पुरुषांच्या मिळून येथे सहा प्रतिमा भिंतीजवळ आहेत.
.jpg)
गाभार्याची चौकट, बाजुला असलेल्या द्वारशाखा आणि वरच्या बाजुला कपोतालीवर असलेल्या शिखरांच्या प्रतिकृती
सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकोनी शंकाकृती शिखर निश्चितपणे मराठा काळातही नंतर बांधण्यात आले आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे.पडून गेलेले मुख्य शिखर बांधताना ते या प्रतिकृतीनुसार बांधता आले असते, परंतु जीर्णोद्धाराचे काम करणाऱ्या स्थपतीने तसे केलेले नाही. यावरून त्याला शिल्प ग्रंथाचे ज्ञान नव्हते हे उघड आहे. कपोतालीवर असलेल्या मुख्य शिखरांच्या प्रतिकृती, भद्रावर असलेल्या देवकोष्टांवरील शिखरे यावरून मुळात हे मंदिर शिलाहार शैलीचे सप्तरथ भूमीज प्रसाद असावे हे उघड आहे.या मंदिराच्या फक्त गर्भगृहावरील मुळ शिखर पडून गेलेले नसून अंतराळ, मंडप आणि त्यापासून किंचित विलग असलेल्या आणि स्वर्ग मंडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडपाचेही मूळ छप्पर आज अस्तित्वात नाही. विशेष म्हणजे चौकटीच्या दोन्ही बाजूंना कामासाठी वापरलेली छिन्नी अडकवलेली आहे.

तसेच चौकटीखाली गर्भगृहाच्या उंबर्याशी सुंदर अशा कोरीवकामाने युक्त चंद्रशिळा पहावयास मिळते. स्थापत्याच्या उत्तरकाळात अशी मोहक चंद्रशिळा जवळजवळ सर्वच मंदिरामध्ये पाहावयास मिळते. चंद्रशिळेचे वैशिष्ट्य म्हणजे हिची झीज फारच कमी असते.



आतील नाहिसा झालेला विजय:
ही खालचा व वरचा भाग तोडलेली मूर्ती एकसंध असताना खरोखरच सुंदर असणार हे त्याच्या दागिन्याच्या नक्षिकामामुळे कळून येते. त्याचे एका जवळून काढलेले छायाचित्र:

शंकर हा वर देण्याच्या बाबतीत तसा भोळा आणि उदार देव होता. त्याच्यावर प्रेम करणाऱयांना, खर तरं त्याची भक्ती करणाऱयांना तो चांगले वर देत असे. त्याच्या उदार वराचे दुष्परिणाम वाढले की, मग विष्णूला ते सर्व निस्तरावं लागे. शिवभक्त रावणाने शंकराकडून वर घेतला आणि मग विष्णूला राम होऊन रामायण घडवावं लागलं. इथे त्या मानाने विष्णूचं काम सोपं होतं. शंकराने आपल्या भक्तांना जाहीर केलं की, शंखनाथ (संकेश्वर), बकनाथ (रायबाग) आणि कोपनाथ (खिद्रापूर) या तीन ठिकाणाच्या शिवलिंगांचं दर्शन जो भक्त एका दिवसात करील त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल. अर्थात ज्या काळात प्रवास जिकरीचा होता, पण स्वर्ग मिळणार यासाठी अनेकांनी हा अट्टहास केला. त्याचा परिणाम असा झाला की, स्वर्गाची लोकसंख्या वाढायला लागली. त्यामुळे स्वर्गातले जे मूळचे रहिवासी देव, ते वैतागले. त्यामुळे सर्व देव विष्णूला शरण गेले. विष्णूने काय केले असेल? तो कोपनाथात आला आणि राहिला. त्याने कोपेश्वराच्या मंदिरात आपलं अस्तित्व शिवलिंगापेक्षा अंमळ जास्त असेल असं पाहिलं. त्यामुळे देवळात शिरल्यावर पहिली नजर विष्णूकडे जाते आणि मग शंकराकडे. त्यामुळे वर भंग होतो. स्वर्गात येणारे ‘उपरे’ थांबले. आजही मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. अर्थात धोपेश्वराची पिंड हि विष्णुरुप मानली तरी बहुधा हि सुध्दा एक शाळूंका असावी.पिंडीवरील अभिषेकाचे पाणी उत्तर बाजूला जाण्याची व्यवस्था आहे.
गर्भगृहाच्या आत देखील सुरसुंदरीची शिल्पे आढळतात. ही शिल्पे आठ दिशांमध्ये बसवलेली असून ती भग्नावस्थेत आहेत. या सुरसुंदरीची रचना पाहता असे अनुमान निघते की सुस्थित असताना यांच्या हातामध्ये घट,कलश व पात्र यांची योजना केली असावी. शिवाय गाभाऱ्यात तीन दिशेस एकेक देवळी आहे तिच्या दोन्ही बाजूस एकेक द्वारपालीका आहे या सालंकृत आणि प्रमाणबद्ध आहेत. त्यांच्या चेहरे पहात तुटलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही. गाभाऱ्याच्या भिंतीत अर्धस्तंभ असून त्याच्या तळभागी एकेक स्त्री प्रतिमा आहे. गाभाऱ्यात अशा शिल्पाकृती असलेल्या अन्य तर कोठेही नाही म्हणूनच या गाभाऱ्याला अनोख्या रचनेचा गाभारा असे म्हणता येईल.
दुसरे एक वैशिष्ट्य असे की कोणत्याही शंकरांच्या मंदिरात आपल्याला आधी नंदी दिसतो. मगच शंकरांची पिंड दिसते. पण, या मंदिरात असे नाही. येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे, असे माहितीगार सांगतात. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर (चिकोडी, जि. बेळगाव) या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. लोक असेही म्हणतात की ते केवळ नंदिचे मंदिर असावे. पण, तसे नाही. खिद्रापूर मंदिराच्या बाजूलाच मुख असलेला नंदी इथे आहे. तो कर्नाटकात आहे. श्री वीरभद्र व भद्रकाली याची स्वतंत्र मंदिरे आपल्याला आज पाहायला मिळतात. श्री वीरभद्रेश्वराचे लिंग व श्री भद्रकाली दिवीेेची मुर्ती आहे.तसेच विरभद्र मंदिरापासून काही अंतरावर देवी सती बरोबर आलेला नंदीचे स्थान आहे.मंदिराच्या गर्भगृहामध्ये पाषाणातील भव्य नंदी आपल्याला दिसुन येतो.खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
लोककथेनुसार, भगवान शिव एका मधमाशीमध्ये (भ्रमारा) रूपांतरित झाले आणि देवी पार्वती फासेच्या खेळात मग्न असताना त्यांनी खेळकरपणे डंक मारला. प्रत्युत्तर म्हणून, देवीने खेळकरपणे मधमाशीला मारले, ज्यामुळे रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला. हे पवित्र स्थान असे मानले जाते की जेथे खिद्रापूर मंदिर आता उभे आहे, या दैवी घटनेमुळे कायमचे पवित्र झाले आहे.
खिद्रापुर मंदीरातील उत्सव :-

दरवर्षी ५ ते १० मे च्या दरम्यान, वैशाख शुक्ल १४ चैत्र नक्षत्रला हा योग येतो. भारतात अशी बोटावर मोजण्यात इतपत मंदिरं आहेत जिथे शिवपिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. त्यापैकी खिद्रापूरचे एक मंदिर आहे. मंदीर पुर्वाभिमुख असल्यामुळे सकाळी सुर्योदयाला मुख्य प्रवेशद्वारातून सुर्यकिरण प्रवेश करतात. काही काळ हा किरणोत्सव आपल्याला अनुभवता येतो.
असं म्हटलं जात की आपली सावली कधीच आपली साथ सोडतनाही परुंतु मे महिन्यात काही विशिष्ट दिवशी आपली सावली अदृश्य होते .खगोल शास्त्रामध्ये ह्या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असं म्हणतात. कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा आनंद घेता येतो. हा दिवस अनुभवण्यासाठी खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदीरातील स्वर्गमंडप हे अतिशय नेमके ठिकाण आहे.



उन्हाळ्यातील शिवरात्रीपासून पावसाळ्याच्या आरंभीचे मृगनक्षत्र लागेपर्यंत सोमवारी व गुरुवारी कोपेश्वराच्या पिंडीला दही-भाताची पुजा बांधली जाते. स्वच्छ धुतलेल्या तांदळाचा फार मउ वा फार मोकळा नसलेला, खाली न लागलेला भात व उत्तम निर्भेळ दुधाचे दही, फडक्यावर घालून हाताने मळून घेतात. आवश्यकेतानुसार निरसे दुध घालतात.मग या भाताने कोपेश्वराच्या पिंडीला भाताने मढवतात. त्यातच शिव-पार्वती, गणपती, नंदी यांचे आकार करुन केस्,डोळे इत्यादी रंगवतात. तीन तासाच्या बुत्तीपुजेनंतर हि पिंडी संगमरवरी असावी अशी भासते. संध्याकाळी गुरव हि पुजा उतरवतात. खिद्रापुरमधील श्री. अप्पाशास्त्री जोशी व त्यांचा मुलगा रघुनाथराव जोशी यांनाच हि पुजा बांधता येते. सहा किलो तांदुळ, चार लिटर दुधाचे दही, अर्धालिटर निरसे दुध व किरकोळ साहित्य दिले तर अशी पुजा बांधता येते.
कोपेश्वर मंदीरातील शिलालेख :-
राजघराणे व राजा :- देवगिरीचा यादवराजा सिंदण
भाषा व लिपी:- संस्कृत, देवनागरी
वर्ष व तिथी :- शके ११३६ श्रीमुख संवत्सर, चैत्र, सूर्यपर्व, सोमवार इ.स.- १२१४-१५
सारांश :- या लेखाचा मुख्य उद्देश यादव बृपती सिंघण देव याने मिरींज जिल्ह्यातील कुडल, कृष्ण वेणी व भेणसी या नद्यांच्या संगमावर वसलेले कुडलादामवाड हे गाव तेथील वृक्ष व या गावाच्या कक्षेत येणारी कृष्णवेणी व कुवेणी ह्या नद्यांच्या संगमापर्यंत पसरलेली जमीन व इतर संपत्ती कोपेश्वर देव मंदिराला अंगभोग, रंगभोग व इतर धार्मिक कृत्यासाठी दान दिली. हे नमूद करण्याचा होता. याशिवाय सिंघण देवाने जुगूल व सिरीगुप्प ही दोन गावे या मंदिराला दान दिल्याचा उल्लेख केलेला आहे.
व्यक्तीनामें :- सिंघण देव यादव नृपती
ग्रामनामे :- १) द्वारावतीपूर ( मैसूर संस्थांतील हल्लीचे हळेबीड ) २) सिरीगुप्प ( ओळख पटत नाही ) ३) जुगूल (ओळख पटत नाही )
४ ) कुडलदामवाड ( ओळख पटत नाही ) ५) मिरींज ( मिरज )

याच
सिंघण यादवाच्या शिलालेखाची शिळा गुढमंडपाच्या दक्षिण द्वाराबाहेर लावलेली
आहे. या शिलालेखाचे भाषांतर श्री. मिराशी यांनी केलेले आहे ते ही पटकन
बघून टाकू –
श्री—नमस्तुगशिरश्चुबिचंद्रचमरचारवे—त्रैलोक्य-
नगरारभमूलस्तभाय शभवे ।..धर्म सुस्थिरतामु-
पैतु जगतामानददायी सदा वृद्धि चाभिनवातरेण
भजता कोप्पेश्वरस्याभित । स्थानस्वोचितमूर्जित च
वहुना कालेन लब्ध्वाधुना श्रीमद्धीमदुदारसारचतुरायुष्मन्म -
हापूरुषान् ।। भूदेवाशीरमृतात्मवृष्टयाप्यायितोयमनवरत (तम्)।
अकुरतात्पल्लवतात्कुसुमतु फलतात्सुधर्मकल्पतरु ३।।
स्वस्ति—श्रीशकवर्षे ११३६ श्रीमुखसवत्सरे सूर्यपर्वणि सोमदिने
श्रीमद्देवगिरावधिष्ठित समस्तभुवनाश्रय श्रीपृथ्वीवल्लभ महाराजाधिराज
परमेश्वर द्वारवतीपुरवराधिश्वर विष्णुवशोद्भव
यादवकुलकलिकाविकासभास्कर समस्तअ रि-
रायतगजप इत्येवमादिसमस्तराजावलीसमलकृत श्रीम-
त्प्रतापचक्रवर्तिश्रीमहाराजश्रीसिघणदेव शासनपत्र प्रयच्छति ।
यथा । कूडलकृष्णवेणीभेणसी नद्यो सगमे मिरिजिदेशमध्ये
च तिष्ठमान कूडलदामवाडग्राम सवृक्षमालाकुल क्षेत्रस्थ
लवाटसहित नवनिधानसयुक्त चतुराघाटोपेत स्वसीमापर्यंत
श्रीमत्कृष्णवेणीकुवेणीनदीसगमात् श्रीमदाद्दस्वयभुवे
श्रीकोप्पेश्वरदेवाय मकलागभोगरगभोगपरिमलरिपु-
रणार्थ अष्टविधार्चननिमित्त शासनोदकेन प्रदत्तवान् ।। अस्य
ग्रामस्योत्पन द्रवेण सकलागस्थानपतिभि श्रीमद्देवकायं
सर्वमपि अगभोगपूजादिप्रभृतिक करणीयम् ।
अन्यच्च जुगुलसिरिगुप्पग्रामेद्धये यत्पूर्वेण विद्दते तदेव जीर्णो-
द्वारीकृत्य श्री सिंघणदेव श्रीकोप्पेश्वरदेवाय प्रदत्तवान् ।।
आनंदामृतसागरस्य भरणेय पूर्णचंद्रायते य कार्पण्यमस्ततेश्च
हरणे मार्तंडता ढौकते । यश्चाय ह्रदये निवेशितहरि
क्षीराब्धिना स्पर्धते तस्य श्रीभुजवल्लरी विजयते सिंहा-
ह्रपृथीपते ४।। रिपुभूमिपालभालस्थलनिहित क्षालयन्रेणेषु चकास्ति ।
गल्लगलितमदाबुप्रवाहतोसौ जगयी सिंहनृप ।। मंगलम ।।
यातील
काही (४ ते ५) शब्द श्री मिराशींनी दुरुस्त केले आहेत. ते केल्यावर या
शिलालेखाचा अर्थ खालीलप्रमाणे. भाषांतर अर्थातच श्री मिराशींनी केलेले आहे
इंग्रजीमधे. ते मी मराठीत केले आहे. मी एकंदरीत अर्थावर जास्त भर दिला आहे.
‘‘हे
त्रैलोक्य ज्याने निर्माण केले व जो त्याचा पाया आहे अशा शंकराला वंदन
असो. ज्याच्या मस्तकावर खुद्द चंद्र चौऱ्या ढाळतो आहे व ज्यामुळे ज्याचा
शिरोभाग चमकत आहे अशा शंकराला नमन असो.
नवीन
राजाधिप्त्याखाली श्री कोप्पेश्वराच्या प्रदेशात धर्माचे अधिष्ठान असो,
ज्याने त्रैलोक्याला सदासर्वदा आनंद मिळो कारण आता कोप्पेश्वराला
यादवांसारख्या शूर, बुद्धिमान, वैभवशाली, शक्तिशाली व दिर्घायुष्य
लाभलेल्या राजाचे राज्य वसतिस्थान म्हणून मिळाले आहे.
ज्याला ब्राह्मणांचा आशिर्वाद लाभलेला आहे असा हा धर्माचा कल्पतरु असाच फोफावणार आहे व त्याला इच्छापूर्तीची फळेही लागोत.
नमन
असो ! शके ११३६ श्रीमुख वर्षाच्या चैत्रात सूर्यग्रहणाच्या पवित्र
मुहुर्तावर सोमवारी प्रतापचक्रवर्ति, महाराज सिंघणदेव ज्याला महाराजाधिराज,
परमेश्वर असे ओळखले जाते, जो द्वारावती सारख्या सुंदर शहराचा मालक आहे, जो
प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, ज्याच्या कुळाची काळजी खुद्द सूर्य वाहतो,
जो त्याच्या शत्रूवर नेहमी विजय मिळवतो व जो देवगिरीला वसतो, आज खालील दान
करत आहे –
त्याने
उदक सोडून मिरिंजिदेशातील कुडलदामवाड जे कुडलकृष्णावेणी व भेणसी याच्या
संगमावर वसले आहे ही गावे त्यांच्या हद्दीतील झाडांसकट, शेतीसकट, सर्व
ठिकाणे, बागा व नऊ खजिनने व चतु:सिमांसह श्री कोप्पेश्वर देवस्थानाला, जे
कृष्णावेणी व कुवेणी नद्द्यांच्या संगमावर वसलेले आहे त्या देवस्थानाला दान
दिले आहे. हे दान देवाची अष्टपूजा बांधण्यासाथी करण्यात आलेले आहे. या दान
दिलेल्या गावाच्या उत्पन्नातून गावाच्या अधिकाऱ्यांने प्रसाद, करमणूक व
सुगंधी उटण्याचा खर्च भागवावा.
याच
बरोबर सिंघणदेवाने जी जुगुल व सिरिगुप्प नावाची गावे कोप्पेश्वराला दान
मिळालेली होती तीही मंदीराच्या दुरुस्तीसाठी पुनर्दान केली आहेत.
या
पृथ्वीचा स्वामी सिंघण, ज्याच्या कर्तृत्वाने आनंदसमुद्रालाही
पोर्णिमेच्या चंद्रामुळे येते तशी भरती येते, ज्याच्या तेजाने
सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंध:कार नष्ट होतो, त्याचा विजय असो !
युद्धात
ज्या सिंघणाच्या हत्तीच्या मस्तकातून वाहणाऱ्या मदामधे भल्या भल्या
राजांच्या ललाटी लिहिले गेलेले भविष्य पुसले जाते त्या सिंघणाचा विजय असो !
या पृथ्वीवर सगळीकडे आनंद नांदो...........’’
दुसरा शिलालेख अंतराळगृहाच्या उत्तर भिंतीवर कोरलेला आहे. मंदिराचे साफसफाई करताना काही वर्षांपूर्वी सदर लेख आढळून आला. या लेखाचे वाचन कोल्हापूरचे श्री अनंत बळवंत करवीरकर व धारवाडचे डॉक्टर रिती यांनी केले.या लेखात कोपेश्वराची स्तुती असून कोपेश्वरला कुसुमेश्वर, कुटकेश्वर या नावाने ओळखतात असे लिहिले आहे. यावर कालतिथी नाही व राजवटीचाही उल्लेख नाही.
तिसरा शिलालेख नगारखान्यातील दक्षिणेच्या भिंतीत बसवलेल्या वीरगळेच्या पट्टीवर जुन्या कानडीत असून सेनापती बम्मेश याचा मृत्यू संगम खिंडीतील लढाईत झाल्याचे दर्शवितो. यावरही काल किंवा तिथी दिलेली नाही.
बाकीचे नउ शिलालेख मंदिराच्या बाहेरच्या बाजूने नरपट्टाच्या मूर्ती खाली कोरलेले आहेत. त्यांचे वाचन व संकलन श्री कुंदनगर यांनी केले आहे.शिलाहार राजा विजयादित्य याचा दंडनायक बोप्पण्णा हा होता. त्याने आपल्या राजाची व स्वतःची स्तुती व पराक्रमाचे वर्णन शिलालेखात केलेले असून त्यावर ही काल निर्देश नाही.

आणखी एका तांम्रपटात कोपेश्वर देवालयाचा उल्लेख आहे. ताम्रपटाचे वाचन श्री श.गो. तुळ्पुळे यांनी केले असून त्याचा सारांश असा, चालुक्य नृपती सत्याश्रयदेव यांचा लष्करी तळ कोपेश्वर देवळाच्या परिसरात भाव संवत्सर, ज्येष्ठ कृष्ण पक्ष सोमवार सप्तमी शकत १०७६ मध्ये होता. मिरज प्रांतातील सलगरे हे गाव करमुक्त करून दान दिल्याचा उल्लेख सदर ताम्रपटात असून सध्या हातावर पट लंडन येथील म्युझियम मध्ये आहे.
भाषा - कन्नड, लिपी - कन्नड,
राजवंश राजा :- महामंडलेश्वर भोज देव ( बहुदा हा शिलाहार राजा असावा )
वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
सारांश :- या लेखांमध्ये महामंडलेश्वर भोज देव याचा उल्लेख असून संगम खिंडीमध्ये झालेल्या युद्धात निधन पावलेल्या बम्मेश याचाही उल्लेख आहे.
व्यक्तीनामे :- १) भोजदेव - महामंडलेश्वर २) बम्मेश ( युद्धात मृत्यू पावलेला वीर )
३) प्राप्ती स्थळ :- हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या बाहेर भिंतीवर हस्त मूर्तीच्या खाली कोरला आहे.
भाषा व लिपी :- कन्नड
राजवंश व राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
या लेखात विजादित्याचा सेवक बप्पण दंडनायक यांच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे.
व्यक्तीनामे :- १) विजयादित्य २) बप्पण- विजयादित्याचा सेवक दंडनायक
भाषा व लिपी :- कन्नड
राजघराणे, राजा :-उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
सारांश :- या लेखांमध्ये बप्पण दंडनायक याची स्तुती केलेली आहे
व्यक्तीनामे :- १) बप्पण दंडनायक
५) हा लेख खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिरातील मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी :-कन्नड
राजघराणे,राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
सांराश :- या लेखात सेनापती शिरिग याचे सदगुण वर्णन करणे सहस्त्रशीर्ष व दोन सहस्त्र जिव्हा असणाऱ्या शेषासही अशक्य आहे असे नमूद केलेले आहे
व्यक्तीनामे :- शिरीग सेनापती
६) हा शिलालेख खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिरातील मूर्तीच्या खाली
भाषा व लिपी :- कन्नड
राजघराणे,राजा :- उल्लेख नाही
वर्षा व तिथी :- उल्लेख नाही
सारांश :- या लेखात बोप्पणा नामक सरसेनापतीची, त्यांने आपल्या राजाच्या एक छत्राखाली सर्व प्रदेश आणून लोकांना सुखी केल्याबद्दल प्रशंसा केलेली आहे
व्यक्तिनामे :- बोप्पण्णा ( सरसेनापती )
भाषा व लिपी :- कन्नड
राजवंश राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- दिलेली नाही
सारांश :- या लेखात बोप्पणा दंडनायक याच्या ठिकाणी पाच पांडवांचे गुण एकवटले आहेत असे लिहिले आहे
व्यक्तीनामे :- बोप्पणा ( दंडनायक )
८) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी कन्नड
राजवंश राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- दिलेली नाही
सारांश:- या लेखात उत्पन्नाच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे
व्यक्तीनामे :- बोप्पणा ( दंडनायक )
९) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी :- कन्नड
राजवंश राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- दिलेली नाही
सारांश :- हा लेख तोटक आहे सुसंगत अर्थ लागत नाही
१०) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी :- कन्नड
राजवंश राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- दिलेली नाही
सारांश:- या लेखात ज्या व्यक्तीच्या शौर्याची स्तुती केली आहे त्या व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
११) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी :- कन्नड
राजवंश राजा :- उल्लेख नाही
वर्ष व तिथी :- दिलेली नाही
सारांश :- या लेखात सिरीयण याची स्तुती केली आहे
व्यक्तीनामे :- सिरीयण
खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदीरावरील शिखर मुळ स्वरुपात अस्तित्वात असताना कसे दिसत असेल याचा काल्पनिक फोटो
सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकोनी शंकाकृती शिखर निश्चितपणे मराठा काळातही नंतर बांधण्यात आले आहे. मुळ शिखर कसे होते याची साधारण कल्पना येण्यासाठीच म्हणून कि काय, शिखराचा थोडासा भाग आजही अस्तित्वात आहे. त्यावरुन आपण मुळ शिखर कसे होते ? याची फक्त कल्पनाच करु शकतो.मंदिराच्या वरील बाजूस भूमीज नागर शैलीच्या लहान शिखरांची आडवी मालिका आहे. यालाच 'मेखला' अशी संज्ञा आहे.
मंदीराची बाह्यभिंत अथवा मंडोवर :-
या मंदिराच्या बाह्यांगाचे तीन भाग होतात. अधिष्ठान (ओटा व चौथरा) मंडोवर ( बाह्य भिंत ) आणि शिखर. कोपेश्वर मंदिराच्या अंतर्भागाचे वेगळेपण पाहिलेच आहे तसेच वेगळेपण बाह्यभागाचेही आहेत. ही सर्व वैशिष्ट्य आहेत या मंदिराची !
अधिष्ठान हे मंदिर ज्या ओट्यावर उभारलेले आहे तो भाग म्हणजे अधिष्ठान. सन १९२७ पर्यंत हा भाग जमिनीमध्ये गाडला गेला होता. आता याचा जो भाग उघडकीस आला आहे त्यात खुर, द्विस्तर पद्म, अंतरपट्टी, रत्नरूपकयुक्तपट्ट, पूर्वपट्ट आणि गजखर या घटकांची योजना केलेली आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. या देवळाच्या बाह्य भिंती नखशिखांत मूर्तींनी मढविलेल्या आहेत. बाह्य बाजू मुख्यत्वेकरून खूरशिळा, गजपट्ट, नरपट्ट व त्यावर असलेले नक्षीकाम, त्यावर छत अशी विभागली गेलेली दिसते. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये उत्तर, पश्चिम व दक्षिण बाजूला देवकोष्ठ व त्यावर छोटे शिखर दाखविले आहेत. मंडोवराच्या मागे व पुढे अशी प्रक्षेपणामुळे छाया प्रकाशाच्या माध्यमातून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.मंदिर जंगा ( भिंती ) या तीन आडव्या विभागात विभाजित केल्याचे जाणवते. मंदिराच्या बाहेरूल बाजूस डोळे दिपविणारी कलाकृती आहेत .कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात. संपूर्ण मंदिर हे ९२ हत्तीवर उभे आहे.या गजपट्टीवर नरपट्ट आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही नरपट्टवर उभं राहू शकता.
अशा या मंदिराच्या बाह्य भिंतीवर अगदी अधिष्ठानापासूनच मूर्तीशिल्पांची रेलचेल दिसते. या नरपट्टात शिवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत तर विष्णूचे दशावतार केशव, नारायण मूर्ती तसेच शेषशायी इत्यादी प्रकारच्या प्रतिमा आहेत. त्यात अर्थातच शिवमुर्ती अधिक आहेत. शिवाच्या व्यक्तिमत्वात बराच विरोधाभास आहे. मंगल आणि अमंगल तसेच सौम्य आणि रौद्र सहांरक (महाकाल )आणि सुखनिधान (सदाशिव ) भयंकर आणि आशुतोष ( तात्काळ प्रसन्न होणारा )असा तो आहे. येथे त्याच्या 'एवमपूर्णविशिष्ट' कारी मूर्ती आहेत. भैरव, नटराज, लकुलीश, उमामहेश्वर अर्धनारीश्वर, भिक्षाटनशिव या मूर्ती देखण्या आहेत. या सर्व मूर्ती शिवाय विष्णूचाही अनेक प्रकारच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात.
तसेच अष्ट दिकपालाच्या पत्नीचे म्हणजे दिक देवींचे स्वतंत्रपणे केलेले शिल्पांकन, स्वतंत्रपणे दाखवलेले नवग्रह, दशाश्वरथी ( दहा घोड्यांच्या रथावरचा ) चंद्र, दुर्मिळ धन्वंतरी आणि विविध विभ्रमांनी सुशोभित अशा सुरसुंदरी यांच्या अप्रतिम प्रतिमा आढळतात.याशिवाय पार्वती, लक्ष्मी, गजलक्ष्मी, सावित्री यांच्या मूर्ती येथे आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील अनेक मंदिरावर अशा मूर्ती आढळतात, मात्र या मंदिरांच्या वैशिष्ट्य असेल की येथे अष्टदिक्पालांच्या सपत्नी प्रतिमा तर आहेतच पण दिग्देवींच्या स्वतंत्र प्रतिमाही आहेत, असे इतरत्र आढळत नाही. धन्वंतरीची प्रतिमा आहे केवळ याच मंदिरावर आढळते. आता बोलूया काही प्रसंग शिल्पाकृतीकडे ! येथे महाभारतातील एक प्रसंग प्रत्यकारीपणे दाखवलेला आहे. द्रोपदी आपल्या मोकळ्या केशव संंभाराकडे निर्देश करून प्रतिज्ञेची आठवण करून देते आणि गदादारी भीम मिशीवर बोट ठेवून स्वतःच्या पराक्रमाची ग्वाही देतो. दुसऱ्या प्रसंगशिल्पात हनुमान अशोकवनातल्या सितेला राममुद्रात देतो आहे. आणखी एका प्रसंगात रति आपले दोन्ही हात पसरून समोर उभ्या असलेल्या मदनाला जणू सांगते 'तुझ्या वाऱ्यालाही उभे राहणार नाही, हे मंदिर आहे ना !'





शिलाहारांनी त्यांना मशिदी बांधण्यासाठी अनुमती देऊन त्यासाठी दाने सुद्धा दिली होती. तर दक्षिण कोकणच्या अवसर (तिसरा) याने दोन व्यापार्यांना १०० दिनारांची वृत्ती दिली होती असा उल्लेख त्याच्या एका ताम्रपटात आहे.
याच परदेशी माणसाच्या शेजारीच एका मंगोलियन माणसाचे शिल्प कोरलेले आहे.
मंदिराच्या समोर नंदी नसला तरी, भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.
ही रचना गजपट्टावर आहे. वर नरपट्टात मंदिराच्या स्थापत्य शास्त्राला शोभा देणारी देवडी ( चौकटीचा आतील भाग ) म्हणजेच देवकोष्ट कोरलेला आहे.



कडेवर बालक घेतलेली माता येथे आहे. मातेचा हात हाती घेऊन चालणारे बालक आहे. युद्धावर निघालेला वीर इथे आहे. हस्तरेषा वरून भविष्य जाणून घेत इच्छिणारा माणूस व भविष्य सांगणारा पंडित येथे शिल्पात आहे. विष्णूचे दहा अवतार आहे.हातात धनुष्य आणि भात्यात असलेले पाच बाण यावरून कामदेव आणि रती ओळखता येतात
त्याकाळी चालत असलेल्या तांत्रिक पंथातील उपासकांची दैवत व दैवतांची शिल्प येथे आहेत. डोक्यावर सर्प हातात सर्प दंडावर व अंगावर माळा अशा स्वरूपातील उपासक येथे आहेत. नरमुंडमाळा गळ्यात घालणारा काळभैरवाची तसेच गणपती, सरस्वती, महिषासुरमर्दिनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांची दर्शनीय शिल्प येथे आहेत.काही शिल्प हि इतक्या आतील बाजूस कोरलेली आहेत कि त्यांची मूळ लकाकी अजून बऱ्यापैकी अबाधित आहे.ती बघून आपण पूर्वीच्या सौन्दर्याचा अंदाज नक्की लावू शकतो.खऱ्या अर्थाने काळा बेसॉल्ट आपल्याला पहायला मिळतो.
त्याकाळी वापरात असलेली वाद्य व त्यांचे आकार येथे पहावयास मिळतात. डमरुवादक आहे. वीणावादक आहेत. बासरी वादक आहेत. ढोल वादक आहेत. सनई व भोंगळा वादक आहेत. टाळ वादक आहेत, झांजवादीका आहे. एका हातात झेंगटी व दुसऱ्या हातात खुंटी अशा वादिका आहेत. तेथे ते वाद्य वाजवताना होणाऱ्या शारीरिक हालचालीच्या बारकावे बघायला मिळतात. भोंगळा वादकाचे गाल फुगलेले आहेत. तिरंदाजी दाखवणार्या शिल्पाचा डोळा मिटलेला आहे. जेव्हा आपण बासरी वाजवणारे ओठ पाहतो. ती टोकदार ठेवण हुबेहूब दगडात चितारलीय. .
गर्भगृह
व गुढमंडप चांदणीच्या आकाराच्या पायावर उभे असल्यामुळे जेव्हा आपण बाहेरुन
या भिंती बघतो तेव्हा आपल्याला एक मूर्ती समोरुन दिसते तर एक मूर्ती
बाजूने दिसते. (प्रकाश चित्रे बघताना हे अधिक स्पष्ट व्हावे) त्यांच्या
सावल्यांचा खेळ फारच मजेदार दिसतो.
हे देऊळ प्रकाशाच्या वेगवेगळ्या योजनांमधे बघायलाच पाहिजे. म्हणजे सकाळी, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना.
भिंतींवर
अनेक सुरसुंदरींची शिल्पे मोठ्या डौलाने उभी आहेत. त्यांच्याकडे बघताना
काही तर स्वर्गातील अप्सरा तर येथे अवतरल्या नाहीत ना असा भास होणे असंभव
नाही. यातील काही वाद्ये वाजवत आहेत तर काही नृत्य करत आहेत. त्यातील काही
शिल्पांचे रसग्रहण आपण पुढे करणारच आहोत. दक्षिण भिंतीवर गणपती आहे तर
उत्तरेच्या भिंतीवर सरस्वती. याच भिंतींवर महिषासुरमर्दिनी, भैरव, विष्णू,
ब्रह्मा इ. देवतांच्या मूर्ती आहेतच.
सरस्वती:
ही
मूर्ती जराशी उंचावर असल्यामुळे मूर्तीभंजकांच्या तावडीतून सुटली असावी.
भारतीय मूर्तीशस्त्रात सरस्वतीची एकंदरीत बारा रुपे पहायला मिळतात.
त्याप्रकारात तिच्या हातात असलेली आयुधांवरुन तिची नावे पडलेली आहेत. उदा.
महाविद्या सरस्वती : हिच्या हातात अक्षमाला, पद्म, वीणा व पुस्तक असते. पण
सर्व प्रकारात मला वाटते पुस्तक असतेच. ही मूर्ती पद्मासनात बसलेली असून
तिच्या मस्तकावर तिने मुकुट धारण केलेला दिसतो. एका हातात अक्षमाला असून
दुसऱ्या हातात एक पोथी दिसते. (इथे दिसत नाहे) एका हातात पाश आहे तर
दुसऱ्या हातात अंकुश आहे. गळ्यात सुंदर दागिने घातलेले असून पायातही
दागिने घातलेले दिसतात. महाराष्ट्र व कर्नाटकात वीणाधारी सरस्वतीचे शिल्प
फार दुर्मिळ असते.
एका राजपुत्राचे शिल्पही उल्लेख करण्याजोगे आहे.
राजपुत्र ‘
या मूर्तीचा मुकुट बघण्यासारखा आहे. शिलाहार शिल्पकलेचा हा एक चांगला नमुना म्हणावा लागेल. काही हलकीफुलकी शिल्पही दिसतात.
उदा येथे एक नाचणाऱ्या स्त्री-पुरुषाचे शिल्प कोरलेले आहे.
गजपट्टामध्ये ९२ हत्ती असून, प्रत्येक हत्तीचे शिल्प बारकाईने पाहिले असता वेगवेगळे असल्याचे दिसून येते. हत्तींनी हे देवळाचे वजन पेलल्याचा आपल्याला भास होतो. तसेच हत्तीच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवता दर्शविल्या आहेत. गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जोडी आहे.या देखण्या अधिष्ठानावरील हत्तींची रांग प्रेक्षणीय आहे संपूर्ण मंदिराला विळखा घालणारे हे हत्ती अर्धा मीटर उंचीचे असून प्रत्येक हत्तीच्या हालचालीत वेगळेपण आहे.
येथील गजथरातील ब्यान्नव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. हा गजपट्ट बरोबर आपल्या नजरेच्या पातळीवर येतो. त्यामुळे त्याचं सौंदर्य जवळून न्याहाळता येतं. ती शिल्पं तयार करणं कारागिरांना शारीरिकदृष्टय़ा इतर शिल्पांपेक्षा सोपं झालं असावं म्हणून कदाचित त्या शिल्पांत बारकावे जास्त पाहायला मिळतात.हत्तीच्या दागिन्यांची नक्षी वेगळी आहे. दुर्दैवाने या हत्तीचे बरेचसे नुकसान झालेले आढळते. हत्तीवर बसलेल्या देवतांचे अलंकार, त्यांचे पोषाख, त्यांच्या हातातली शस्त्र अगदी ठळकपणे दिसतात. काळय़ा कातळात ती कोरताना किती कष्ट पडले असतील आणि किती काळजी घ्यावी लागली असेल! कारण तिथे चुकीला दुरुस्ती नाही. एक गोष्ट जाणवते की, हत्तींनासुद्धा योद्धय़ाप्रमाणे नटवलं जाई. त्यामुळे हत्तीच्या गळय़ात अलंकार दिसतात. हत्तीच्या गंडस्थळासाठी आणि सोंडेसाठीही अलंकार होते हे जाणवतात. हत्तीवरच्या बैठकासुद्धा कलाकुसरीने समृद्ध असत. त्या काळातल्या श्रीमंतीचं दर्शन जेवढं या शिल्पांतून होतं, तेवढंच दागिने तयार करण्याच्या कलेचं आणि रसिकतेचंही होतं. दीड हजार वर्षांपूर्वीचं हे समाजजीवन आहे. हिंदुस्थानातून सोन्याचा धूर वगैरे निघायचा म्हणतात तो हाच असावा. येतील हत्तीची आभूषण आहे नंदी व अश्वाला त्याकाळी घालण्यात येणारा साज आजही आपल्याला आकर्षण घेतो. हत्तीचे नैसर्गिक विभ्रम येथे जितके पाहायला मिळतात तितके अन्य तर कुठेही नाहीत.


• मृदंगवादिनी – मृदंग वाजवणारी मदनिका, जीला मर्दला सुध्दा म्हणतात
• विषकन्या – हाता,पायावर विषारी सर्प गुंडाळलेली आणि नग्न असणारी मदनिका
• शुक सारिका – हातात पोपट घेतलेली मदनिका
• पत्रलेखा – पत्र लिखाण करत असलेली मदनिका. या मंदीरावर तीन प्रकारच्या पत्रलेखीका आहेत, त्यात एक मदनिका पत्राची सुरवार करणारी, एक पत्र अजून लिहीत असणारी आणि एक पत्राचा शेवट करणारी.
• मरीचिका – हातात धनुष्य घेउन बाण मारणारी मदनिका।
• मर्कटसुंदरी - एक वानर हिचे वस्त्र ओढत आहे
• चामरवाहिनी – हातात चामर धारण केलेली मदनिका
• नर्तकी – विभिन्न नृत्य मुद्रा दाखवणारी मदनिका
• वीणावाहिनी – वीणा वाजवणारी मदनिका
• शालभंजिका – वृक्षाची फांदी पकडलेली मदनिका
• भुजंग त्रासिता – सर्पामुळे भयभीत झालेली मदनिका।
• कंदुक क्रीड़ा मग्न – चेंडुशी खेळण्यात मग्न असलेली मदनिका
• पिचकारी घेउन रंग खेळणारी मदनिका
दर्पणा, पुत्रवल्लभा, पत्रलेखिका, कर्पूर मंजिरी, मर्दला इत्यादी महत्त्वाच्या आहेत मंदिरावर असणारे त्यांचे काही प्रयोजन आहे. त्याचप्रमाणे डालमालिका, जया, पद्मगंधा या आपणास मंदिरात जावे कसे हे सांगत असतात. देव, गुरु आणि मान्यवर यांच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं संकेत आहे. पत्र पुष्प फलतोय घेऊन जावे असे भगवद्गीता सांगते. येथे डालमालिकेच्या हाती झाडाचे पान, जयाचे हाती पाण्याचा कुंभ आणि पद्मगंधाचे हाती फुल दिसते आणि आपणास त्यांचे असणे कळते. वर उल्लेख केलेल्या काही सुरसुंदरींचे प्रयोजन काय ते पाहिले पाहिजे उदाहरणार्थ दर्पणा ही आरशात पाहते आहे असे दिसते काही शिल्पसमीक्षक ते सौंदर्यप्रसादनात मग्न असल्याचे सांगतात. पण मंदिरावर अशा प्रकारे तिला दाखवण्याचे कारण काय हे ते सांगत नाहीत. वस्तुतः समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपण आपणास पहावे हे तिचे प्रयोजन असते. मंदिरात कोण कोणत्या कारणाने जातो इतरांना कळत नाही अशावेळी जाणाऱ्याने आपणासही पहायचे असते. भक्तिभावाने तो जातोय की अन्य हेतु मनात ठेवून, हे त्याचे त्यालाच कळायचे असते, दुसऱ्यांना नाही.
दुसरी आहे पुत्रवल्लभा आणि तिच्या कडेवर मूल असते. ती संत नामदेवांच्या एका अभंगात देव आणि भक्त यांचे नाते आई आणि मूल यांच्याप्रमाणे असते. 'तू माझी माऊली मी तुझा लेकरू| नको दुरी धरु विठाबाई' असे ते म्हणतात. आणखी एका सुरसुंदरी पत्र लिहिण्यात मग्न असल्याचे दिसते. विरहव्याकुळ भक्ताचे ते चित्रण आहे.
चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी | सरेना कि ग बाई रजनी काळी काळी ||
संत ज्ञानदेवांची विरहीणी लक्षात आणून देणारे हे शिल्प आहे.
येथील आणखी एका लक्षवेधी शिल्पाकडे पाहिले पाहिजे. या शिल्पातून तळणीच्या अंगावरील वस्त्रे ढळली आहे लज्जेन डोळे मिटले आहेत हाताने नैसर्गिक प्रमाण नैसर्गिकपणे लज्जा रक्षण करीत आहेत. त्यांच्या पायाशी असलेली माकड त्यांचे राहिलेले वस्त्र ओढीत आहे. मानवाच्या मार्केट वृत्तीचे दर्शन या शिल्पातून होते. त्या स्त्रीला ती चेष्टा आवडतेय असे भाव तिच्या चेहऱयावर आहेत.माकड जसे चंचल असते तसे मन चंचल असते. 'मन एवं मनुष्यांना कारणम बंध मोक्षयोहो' तेव्हा मंदिरात जाताना मनावर ताबा ठेवायला पाहिजे, हे त्या शिल्पातील सुंदरीचे असे म्हणणे आहे हे लक्षात ठेवूया.
काही युवतींच्या मांडीला वेटोळे घातलेल्या भुजंगाची शिल्पे आहेत. त्यांच्या हातात कालसर्प आहेत. काहींच्या खांद्यावर जहरी नाग आहेत. त्या युवती ‘विषया’चा (म्हणजेच कामवासनेचा) अतिरेक नको असं दर्शवतात. कामवासनेत लडबडलेला पुरुष सापांच्या म्हणजे मृत्यूच्या जबडय़ात असतो असं त्यांना सुचवायचे आहे.
मंदिराच्या उजव्या बाहेरील बाजूस पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे शिल्प,तसेच पत्राचे लिखाण मध्यंतरावर आलेले शिल्प आणि त्याच पत्राखाली स्वाक्षरी करणारे शिल्प मोठ्या कलात्मक पद्धतीने कोरलेले आहे.
सुरसुंदरीचे शिल्पे पाहताना मधुरता आणि शृंगारे सुरेखता असल्याचे भासते डोळ्यांना निवणारे, मनाला भिजवणारे, मतीला चालना देणारे आणि भक्तीचे समाधान करणारे हे शिल्प वैभव न्याहाळताना 'सौभाग्य पोखले सुखाचे येत' अशी जाणीव होते हे मात्र खरे.
या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी, भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.
पत्र लेखिका.
पत्र
लेखिकांची एकूण पाच शिल्पे आहेत. कदाचित पत्र लिहायला सुरवात आणि त्याचा
शेवट असा क्रम असावा. त्यातील काही शिल्पांची छायाचित्रे खाली देतो.

या स्त्रिया कागदाच्या भेंडोळ्यांवर लिहित असताना दाखविलेल्या आहेत. म्हणजे आपण जुन्या सिनेमात जे खलिते पहातो त्या प्रकारच्या कागदावर. मला वाटते त्या काळात कागदाचे ताव भेंडोळ्यांच्या स्वरुपातच उपलब्ध होत असावेत. त्यांनी अत्यंत नाजुकपणे हातात लेखणी धरलेली आहे. पहिल्या दोन बोटात लेखणी धरल्यावर उरलेली बोटे अत्यंत मोहकरित्या विलग झालेली दाखविलेली आहेत. मानवी आकृत्या काढताना किंवा घडवितांना गुडघ्याची ठेवण (वरून दिसणारी) किंवा कोपराचा बाक व ठेवण काढणे किंवा कोरणे अत्यंत अवघड. विशेषत: कोपराचे टोक ज्याप्रमाणे दिसते तसे आले नाही तर साऱ्या प्रतिमेची रयाच जाते. चित्र किंवा शिल्प मग बेढब दिसू लागते. किंवा ‘फ्लॅट’ होते. असे येथे ही अनेक शिल्पाच्या बाबतीत झाले आहे पण शिल्पकारांनी सुरसुंदरींच्या बाबतीत असे होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. हे आपल्याला वरील छायाचित्रात दिसुन येते. तिन्ही शिल्पात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे परिधान केलेली दिसतात. फॅशन डिझायनरला हे देऊळ म्हणजे कल्पनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेवटच्या शिल्पातील शॉर्ट स्कर्टसारखे दिसणारे वस्त्र आजही लोकप्रिय हो़ऊ शकते ( तो शॉर्टस्कर्ट नाही हे मला माहीत आहे). किंवा ती वस्त्रे व त्याला शोभतील असे दागिने असा एक उत्तम पोषाख हो़ऊ शकतो. असो.
वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिपुरुषांची शिल्पे.
वरील
स्त्रीने तिचे केस अंबाडा घालून खाली सोडले आहेत. तसेच तिने केसातही
दागिने घातलेले दिसतात. तिच्या हातात एक छोटे मृदूंग दिसत आहे. कोपराजवळ एक
दागिना आहे किंवा ती वाकी असावी पण ती दंडावर न घालता बरीच खाली घातलेली
दिसते. व खांद्यावरही एक दागिना आहे. असे दागिने मी तरी बघितले नाहीत.
शेजारील शिल्पात एक पुरुष मृदूंग वाजवताना दिसत आहे तर त्याच्या शेजारील
माणसाची टोपी वेगळीच दिसते.
खालील
शिल्पात ही स्त्री जे वाजवते आहे ते साधे मृदूंग नाही. याच्या वर
चामड्याला ताण देण्याच्या दोऱ्यांखाली सरकत्या खुट्या असतात. एका हाताने
हे वाद्य वाजवायचे व त्याचवेळेस त्या खुट्ट्या सरकवून वेगळा ध्वनी निर्माण
करायचा असा हा अवघड प्रकार असतो. या प्रकारचे वाद्य दक्षिणेत वाजवत असत पण
बहुदा आता कोणी वाजवत नाहीत.
खालील
चित्रात एक स्त्री विणेसारखे एक वाद्य वाजवताना दाखविले आहे. ती वीणा
निश्चितच नाही पण दोन भोपळ्याच्या वाद्यासारखे काहीतरी दिसत आहे. शेजारीच
काटकोनातील भिंतीवर एक सुंदर स्त्री नृत्य करताना दिसते. मी मागे म्हटले ते
येथे स्पष्ट व्हावे.समजा ती नृत्य स्त्री समोरुन बघितली तर वाद्य
वाजविणारी स्त्री बाजूने दिसते. जर ती समोरुन बघितली तर नृत्य करणारी
बाजूने दिसते.
हे
शिल्प चक्क एका धनुर्धारी स्त्रीचे आहे. एका हाताने तिने तिचे धनुष्य
तोलले आहे तर दुसरा हात भात्याकडे वळलेला दिसतोय. या मूर्तीचे
परस्पेक्टीव्ह जरा चुकलेले दिसते....
माझी
अत्यंत आवडती दोन शिल्पे.. या दोन शिल्पांवर पडणारा प्रकाश हा केवळ
अद्वितीय आहे. याचीही मोडतोड झाली आहे नाहीतर या सुंदरींच्या लावण्याची
किर्ती दुरवर पसरली असती.
वरील अर्धे छायाचित्र हे पहिल्या शिल्पाचेच आहे. आता ही दोन शिल्पे बघण्याची मजा समोरुन नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. समोरुन ही शिल्पे साधी मान वळवलेल्या स्त्रियांची वाटतात पण मी हे छायचित्र ज्या कोनातून काढले आहे त्या कोनातून बघा मग तुम्हाला त्याचे खरे सौंदर्य समजून ये़ईल. दुसऱ्या चित्रात ती स्त्री अचानक मागे वळून बघते आहे व तेही इतक्या मोहकपणे, तिच्या चेहऱ्यावरचे भावही बघण्यासारखे आहेत.
ही अजून एक सुंदर स्त्री. यात तिचा कमनीय बांधा आपल्याला मोहवून टाकतो. दुसरे शिल्प एका नग्न स्त्रीचे दिसते.
समारोप
कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
पुरातत्त्व विभागानेही थोडीफार दखल घेतली आहे. एक मात्र नक्की, कोणी कितीही वर्णन केले, तरी तेथील गाइडशिवाय मंदिर बघू नये. कारण त्यातील बारकावे नुसते बघून लक्षात येत नाहीत. येथे रात्री विद्युत दिव्यांचे झोत टाकण्याची व्यवस्था केली, तर हे मंदिर आणखी खुलून दिसेल.
अर्थात भविष्यकाळात हे मंदीर आणि परिसर यांचा विकास होण्यासाठी काही गोष्टी आवश्य्क आहेत.
१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही.
२. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे.
३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही.
४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.
कोपेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे
कोल्हापूर हे जसे ऐतिहासिक शहर आहे तसेच निसर्ग सौंदर्य याचा अमोल ठेवा असलेले शहर आहे. विविधतेने नटलेले इथले पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावत असते. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि प्रत्येक शहरातून कोल्हापूरला हायवे जोडला गेला असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर हे शहर पर्यटनासाठी सोयीस्कर वाटते.
कोपेश्वर मंदिराखेरीज कोल्हापूर मधील आणखीन काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- कणेरी मठ
- दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर
- रंकाळा तलाव
- भवानी मंडप
- न्यू पॅलेस
- पंचगंगा नदी घाट
- विशाळगड
- पन्हाळगड
- दाजीपूर अभयारण्य
- राधानगरी धरण
- श्री क्षेत्र नृसिंहवाडी
ही कोल्हापुरातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर तिथून तुम्हाला जावेसे वाटणार नाही याची खात्री आहे.
कोपेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स
कोपेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण असूनही या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने वाढ झालेली नाही. त्यामुळे येथील गाव आणि आजूबाजूचा परिसर शांत दिसून येते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी हॉटेल सोडली, तर बाकी पर्यटकांसाठी कोणतीच व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे कोपेश्वर मंदिर अजूनही तसे फार प्रसिद्धीला आलेले नाही.
- हॉटेल माऊली
- हॉटेल गुरुप्रसाद
- हॉटेल कन्हैया
कोपेश्वर मंदिराजवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो तो तांबडा पांढरा रस्सा नंतर आठवते ते झणझणीत कोल्हापुरी मिसळ. हे दोन पदार्थ फारच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर कोल्हापुरी चटणी, दावणगिरी लोणी डोसा याची सुद्धा खासियत आहे. सुके मटण, सुके चिकन, खिमा हे प्रकार संपूर्ण कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्या म्हणजे चपात्यांची खासियत आहे ती तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली गरम चपाती अप्रतिम लागते. या ठिकाणची पोकळा नावाची पालेभाजी सुद्धा अप्रतिम लागते. येथे मिळणारी भाकरी आणि खर्डा सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क
खिद्रापूर मधील कोपेश्वर हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने वाढीस आले नसल्यामुळे या ठिकाणी जाताना तुम्ही कोणत्याही वेळी जाऊ शकता. हे मंदिर 24 तास उघडे असते. तसेच या मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे जून पासून ते अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा योग्य कालावधी असतो.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे
विमान – कोल्हापूर विमानतळापासून खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे ५५ किलोमीटर म्हणजेच साधारणपणे सव्वा तासाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी विमानतळावरून येताना ऑटो किंवा कॅबने येऊ शकतो.
ट्रेन – कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे साधारणपणे ६० किलोमीटर असून जवळपास दीड तासाचे अंतर आहे. रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत येताना ऑटो किंवा केबने येऊ शकता.
बस – कोल्हापूर बस स्थानक ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे ६० किलोमीटर असून जवळपास दीड तासाचे अंतर आहे या ठिकाणी येताना ऑटो किंवा कॅबने येऊ शकता.
खाजगी वाहने – कोल्हापूर हायवे हा आजूबाजूच्या शहरांनाही जोडला गेल्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटकांसाठी स्वतःच्या खाजगी गाडीने येणे सोयीस्कर होते.
मुंबई ते कोल्हापूर – मुंबई ते कोल्हापूर पुणे मार्गे साधारणता सात तासाचे म्हणजे जवळपास ३८० किलोमीटरचे अंतर आहे
पुणे ते कोल्हापूर – पुणे ते कोल्हापूर साधारण साडेचार तासाचे म्हणजे जवळपास २०० किलोमीटरचे अंतर आहे.
२) स्थलकाल - अरुण टिकेकर
३ ) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख – वा.वि.मिराशी
४ ) भारतीय संस्कृती कोष खंड ७
५) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर
६) सुरसुंदरी -डॉ.गो.बं.देगलूरकर
७) कोप्पेश्वर ( खिद्रापुर) - डॉ.गो.बं.देगलूरकर
८) खिद्रापूरची मंदिरं - डॉ. रामचंद्र गोविंद चोथे
९) दै. लोकसत्ता, सकाळ, पुढारी यातील लिखाण
१०) श्री. जयंत कुलकर्णी, श्री. सागर बोरकर यांचे लिखाण
११) कोल्हापुरातील मंदिर वैभव – योगेश प्रभुदेसाई
१३ ) शिलाहारांचे कोल्हापूरः एक शोध – डॉ.अरुणचंन्द्र पाठक
१४) https://shriyogweb.wordpress.com/2019/12/21/kolhapur-vagare-2/
१५) https://marathi.indiatimes.com
१६) http://hrishikeshpandkar.blogspot.com/2017/01/blog-post.html
१७) https://www.inditales.com/hindi/kopeshwar-mandir-khidrapur-kolhapur/
१८) https://drifteradwait.com/kopeshwar-temple-khidrapur/
१९) https://kolhapurexplorer.com/khidrapur-yadur-mahatmya/
२० ) https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/
२१ ) https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/
२२ ) https://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=41708&tblId=41708
२३) https://marathizatka.com/khidrapur-kopeshwar-temple-information-in-marathi-language/

Figure 1 हत्तींच्या विविध आभूषण विलसित 92 मूर्तींचा दगडी चौथरा

Figure 2 मंदिर कळसावर फारच कमी कलाकुसर दिसते

Figure 3 मंदिर परिसर

Figure 4 पंचतंत्रातील कथा -गतीमंद कासवाला भुलवून सिहाला खाऊ घालणारे धूर्त बगळे

Figure 5 चलाख मर्कट- दुष्ट सुसर संवाद कथा

Figure 6 हत्तीवर आरूढ ध्यानस्थ बुद्ध

Figure 7 चुकून काढला गेलेला स्वर्गमंटपाकाशाचा फोटो

Figure 8 जो असा काढला पाहिजे होता !

Figure 9मूर्ती भंजकांच्या तावडीतून सुटलेला पूर्णसोंडेचा हत्ती

Figure 10 पोकळ करून केलेल्या खोबणीतील सुबकता

Figure 11 दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ

Figure 12 मैथुन आकृती

Figure 13 दक्षिण मुखीशिवांचे आडवे व विष्णूंचे उभे गंध अर्चित दोन लिंग समान आकृतीबंध

Figure 14 जोडवी अन पैंजण पावलाचे सांगाती

Figure 15 अंब्याच्या डहाळ्या व कैऱ्या चैत्र महिना दर्शवतात

Figure 16 संदर्भ न आठवणारे शिल्प कदाचित चोरून भेटणारे तरुण जोडपे?

Figure 17 गाल फुगवलेला वादक शिवगण

Figure 18 अष्ट कोनी कुंड त्याला जोडून असलेले सांड पाण्यासाठीचे मकरमुख

Figure 19 अस्थिपंजर कलिका

Figure 20 डाव्या बाजूचा अरबी व उजव्या बाजूचा बसक्या नाकाच्या वंशाचा
शिवाय अनेक फोटो आहेत पण त्याचे संदर्भ आठवत नाहीत...
Few meters away from Kopeshwar, in the heart of the village is a Jain temple, which is much smaller in size. The outer wall of the shrine being in the star-shaped Hemadpanti plan.
The building is of black stone. The carvings on outer wall are less in number but the beautiful women in various poses are strikingly similar to kopeshwar.
Most of statues have very calm, peaceful glowing look.
It is said that Adinath Bhagwan idol looks of different colour in Morning, afternoon & evening.
The pillars of the hall are richly carved.
There are some very fine carvings on left hand wall at the entrance.

https://drifteradwait.com/kopeshwar-temple-khidrapur/
https://kolhapurexplorer.com/khidrapur-yadur-mahatmya/
https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/
https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/
https://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=41708&tblId=41708
https://marathizatka.com/khidrapur-kopeshwar-temple-information-in-marathi-language/




.webp)




















.webp)






























.webp)
























































































































































.jpg)


















