https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/?multi_permalinks=3863117147308144%2C3861376500815542¬if_id=1704013100010575¬if_t=group_highlights&ref=notif
रामजन्मभूमी आपल्या ताब्यात घ्यावी असं मराठा धुरीणांना का वाटलं नसावं अशा अर्थाचा एक प्रश्न समूहावर आल्यामुळे हे सविस्तर उत्तर देत आहे. लेख थोडा विस्तृत झाल्याने, ८ हजार शब्दांच्या पुढे कमेंटमध्ये देता आला नाही, सबब इथे स्वतंत्र पोस्ट करत आहे.
-----------------------------------------
हिंदूंची अथवा मराठ्यांची उत्तरेतली मोठी तीर्थक्षेत्र म्हणजे प्रयाग, काशी, मथुरा आणि अयोध्या. गया होतं, पण तितकंसं त्याला महत्व दिल्याचं आढळत नाही. गोकुळ-वृंदावन वगैरे प्रदेशही धार्मिकदृष्ट्या महत्वाचा होता. आता या ठिकाणी कोणाकोणाची सत्ता होती ते आधी पाहू. अयोध्या अथवा अवध हे तिथलं मोठं क्षेत्र. काशी आणि प्रयाग ही दोन्ही तिर्थस्थळे त्या काळी अयोध्येच्या सुभेदाराच्या अथवा नवाबाच्या अंतर्गत येत असत. मथुरा, वृंदावन, गोकुळ वगैरे जाटांच्या, पर्यायाने हिंदूंच्याच ताब्यात होतं, त्यामुळे त्याबद्दल तितकासा धोका नव्हता. त्यातही १७७० मध्ये मराठ्यांनी मथुरा जिंकून घेतलं.
अयोध्या, काशी आणि प्रयाग ही तीन स्थळं मराठ्यांकडे घ्यायला नानासाहेब पेशव्यांनी सुरुवातीपासून मोठे प्रयत्न केले होते. काशीत मराठ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात १७३४-३५च्या आसपास सुरू झाला. नारायण दीक्षित-पाटणकर हे काशीत स्थायिक झाले, अन तिथले जणू काही प्रमुख बनले. या सुमारास काशी थेट आपल्याकडे नसली तरी आपल्या लोकांनी काशीत मोठमोठे घाट बांधायला सुरुवात केली होती, कधीतरी काशी आपल्याकडे येईल ही अपेक्षा होतीच. काशीचा राजा बळवंतसिंग असला तरी त्याच्यावर सत्ता चालायची ती अयोध्येच्या नवाबाची.
आता अयोद्धेकडे वळू. मराठ्यांच्या कार्यकाळात सुरुवातीला अयोध्येचा नवाब होता सादतखान. हा मराठ्यांचा कट्टर शत्रू. बाजीरावांनी दिल्लीची मोहीम याचाच माज उतरवायला काढली. नादिरशहाच्या स्वारीत सादतखानाच्या मृत्यूनंतर मन्सूरअलिखान अयोध्येचा नवाब झाला. हाच तो प्रसिद्ध सफदरजंग. मन्सूर हा शाहजादा अहमदचा मित्र असल्याने त्याला १७४८मध्ये अयोध्येच्या नवाबीसोबत वजीरीही मिळाली. इथवर मन्सूर आणि मराठे यांचं काही सख्य होतं असं दिसत नाही. कशावरून?
नानासाहेब पेशव्यांनी १७४३च्या सुरुवातीला काशीत प्रवेश करण्यापूर्वी आपली चतुरंग सेना काशीच्या जवळ आणली. ऐंशी हजारांची ही भली मोठी फौज पाहून कोणाच्याही मनात धडकी भरली असती, की आता ही फौज जाईल तिथे जिंकत जाणार. नानासाहेबांचं हे शक्तिप्रदर्शन वेगळ्याच कारणासाठी होतं, तो आत्ताचा विषय नसल्याने टाळतो. पण १७४३चे किमान दोन विश्वसनीय उल्लेख आपल्याकडे आहेत की नानासाहेब-मल्हारराव होळकरांनी काशीत जाऊन ज्ञानवापी पाडावी आणि विश्वेश्वर पुन्हा उभारावा अशी इच्छा धरली, तेव्हा तिथले ब्राह्मण नारायण दीक्षितांच्या भेटीस गेले आणि पेशव्यांना परावृत्त करायला सांगितलं. का? तर मन्सूरअलीने म्हणजेच सफदरजंगाने साऱ्यांना धमकी दिलेली, "पेशवा आत्ता तात्पुरता येऊन जिंकून जाईल, पण पुन्हा आम्ही येऊ तेव्हा त्याला मदत करणाऱ्या साऱ्यांची कत्तल करू." या वेळेस काशी घेणं उघडपणे शक्य नव्हतं, अयोध्या तर सफदरजंगचा बालेकिल्ला होता, तोही घेता येत नव्हता. हा बेत तूर्तास राहिला. इथपासून पुढे नानासाहेबांनी प्रत्येक वेळेस राजकारण करून ही सारी तीर्थक्षेत्र मराठ्यांकडे घेण्याचा प्रयत्न चालवलेला आढळतो, पण दर वेळेस काही ना काही कारणाने राजकारण फसलं.
१७४८ नंतर सफदरजंग वजीर झाला आणि राजकारण बदललं. कितीही झालं तरी तो शिया होता. अहमदखान बंगशासह इतर पठाण-रोहिले हे त्याच्या विरोधात उठले. या वेळेस त्याला मराठे जवळचे वाटू लागले. नानासाहेबांनी शिंदे-होळकरांना फ्री हॅन्ड दिलेला त्यामुळे उत्तरेत दोन्ही सरदारांनी वजीराला मदत केली. कदाचित या काळात तीर्थक्षेत्र येऊ शकली असती हा विचार होता. या सोबतच दुसरं राजकारण नानासाहेबांनी चालवलं होतं ते म्हणजे निजामाचा थोरला मुलगा गाझिउद्दीन याला वजीरी देववून त्याच्याकरवी तिर्थक्षेत्रांच्या सनदा घ्यायच्या. १७५१ नंतर बादशाह आणि वजीर यांच्यात झगडा लागल्याने हे नवं राजकारण होतं. पण गाझिउद्दीनला वजीरी मिळाली नाही आणि त्याचा खून पडला, त्यामुळे हेही फसलं.
सफदरजंग १७५४ पर्यंत जिवंत होता, पण १७५३नंतर तो तसाही निष्क्रिय झाला होता. त्याच्यानंतर त्याचा मुलगा शुजा अयोध्येचा नवाब झाला. इथे गम्मत अशी, की सफदरजंग मराठ्यांना अनुकूल असला तरी बादशाह-वजीर झगड्यात मराठ्यांना बादशहाची बाजू घ्यावी लागली आणि सफदरजंग काहीसा नाराज झाला, पर्यायाने पुढे शुजाही नाराज होता.
नानासाहेबांनी शुजाकरवीही अयोध्या आणि इतर तीर्थक्षेत्र हाती घेण्याचे प्रयत्न केले होते, पण पुढच्या पाच वर्षात ते असफल झाले. सफदरजंगानंतर वजीरीवर आलेला कमरुद्दीनचा पुत्र इंतजाम उद्दौला फारसा टिकला नाही, आणि थोरल्या गाझिउद्दीनचा मुलगा धाकटा गाझिउद्दीन उर्फ इमादउलमुल्क नवीन वजीर झाला. हा इमाद आणि शुजा यांच्यात पुन्हा वाकडं असल्याने या काळात शुजाने तीर्थक्षेत्र मराठ्यांना देण्याची वेळ आली नाही. मराठ्यांना बादशाही आपल्या ताब्यात घेणं जात महत्वाचं असल्याने शुजाच्या राजकारणापेक्षा इमादला पाठिंबा देणं गरजेचं वाटलं, कारण सततची सुरू झालेली राजकारणं आणि अब्दालीच्या स्वाऱ्या. तरीही या काळात नानासाहेबांची जयाप्पा आणि पुढे दत्ताजी शिंद्यांना या तिर्थक्षेत्रांबद्दलची पत्रं आहेतच.
१७५९-६० मध्ये राजकारण पुन्हा बदललं. इमादने बादशहाचा खून केला ही गोष्ट नानासाहेबांना-भाऊंना पटली नाही. सुरजमल जाटाने इमादला पाठीशी घातलं, त्यात नजीबाने अब्दालीला पुन्हा बोलावलं. आता अखेरचा उपाय होता तो म्हणजे शुजा उद्दौल्याला बादशहाची वजीरी देणं. शुजाला वजीर करणं यात तीन हेतू होते: एक म्हणजे त्याच्याकडून अब्दालीशी लढण्यासाठी पैसा आणि मोठी फौज मिळाली असती. दुसरं म्हणजे दिल्ली दरबारात आपल्या मैत्रीतला वजीर राहिला असता, आणि तिसरं म्हणजे त्याच्याकडून तिर्थक्षेत्रांचा ताबा मिळवता आला असता. शुजाने मराठ्यांची ही मागणी मान्य केली असतीही, पण त्याला ती लिखित स्वरूपात हवी होती. नेमकं भाऊ शुजाकडे पोहोचायच्या आधीच नजीब जाऊन पोहोचला आणि त्याने याहून जास्त मागण्या मान्य केल्या. नजीब आणि शुजा मित्र कधीच नव्हते, कारण रोहिले सुन्नी होते तर शुजा शिया. पण तरीही, शाहवलीउल्ला देहलवीच्या जिहादच्या नाऱ्याने आणि सैन्याच्या दबावाने शुजाला नजीब-अब्दालीला मिळणं भाग पडलं. पुढे पानिपतात सगळंच संपल्याने, नानासाहेब-भाऊ, दत्ताजी-जनकोजी वगैरे गेल्याने हा प्रयत्न अर्धवटच राहिला.
पानिपतनंतर १७७१ मध्ये मोठ्या मोहिमेत मराठ्यांनी उत्तरेकडचा आपला जुना प्रदेश परत मिळवला खरा, पण तीर्थक्षेत्र सोडवण्याची इच्छा अपुरीच राहिली. पुढे अहिल्याबाईंनी काशीचा विश्वेश्वर मुक्त केला, म्हणजे किमान नवं मंदिर तरी उभारलं, पण तो प्रयत्न अयोध्या-प्रयागच्या बाबतीत झाला का ते समजत नाही. नाना फडणवीसांच्या आणि महादजींच्या काही पत्रात उल्लेख आढळतो, पण त्याबद्दल प्रत्यक्ष काही होऊन ही स्थळं आपल्याकडे आली असं मात्र काही दिसत नाही.
इथे एक अभ्यासक म्हणून सहज:
अयोध्या हे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याकडे असावं असं मराठी धुरीणांना वाटत होतं. पण बाबरी मशीद हेच रामजन्मस्थान आहे किंवा तिथे रामाचं मंदिर पाडून मशीद बांधली आहे वगैरेचे उल्लेख मराठी वा फारसी कागदांत आढळत नाहीत. तसे उल्लेख कुठेही नाहीत. त्यामुळेच बहुदा, त्या काळातही बाबरी मशीद हीच रामजन्मभूमी असावी असं जनमत नसावं. बाबरी मशिदीत १९९२ साली सापडलेल्या विष्णू-हरी शिलालेखाबद्दल अनेक दावे-प्रतिदावे आहेत. हा शिलालेख बाराव्या शतकातला असून यात शिवापासून परशुरामापर्यंत साऱ्यांचे उल्लेख आहेत. त्यातल्या सत्तावीसाव्या श्लोकात विष्णूच्या चार अवतारांची माहिती आहे त्यात महत्कृत्य करणाऱ्या आणि दशाननाला मारणाऱ्या प्रभू श्रीरामांचाही उल्लेख आहे. त्यामुळे, मंदिर पाडून ही मशीद उभारली गेली असली तरी ते मूळ रामाचं मंदिर होतं का याबद्दल जुन्या कागदांत काही आढळत नाही. याच कारणाने, ज्याप्रमाणे आपल्याकडे ज्ञानवापी पाडण्याबद्दल आणि विश्वेश्वराची पुनर्स्थापना करण्याबद्दल उत्सुकता दिसते ती बाबरी मशीद प्रकरणात अठराव्या शतकात दिसत नाही, किमान उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तरी. कोण जाणे, नवीन पुरावा मिळाल्यास त्यावरही अधिक प्रकाश पडू शकेल भविष्यात. पण आहे हे असं आहे.
यात एका दृष्टीने महत्वाचं म्हणजे, जोसेफ टिफेंथेलर नावाच्या एका ऑस्ट्रियन ख्रिश्चन मिश्नऱ्याच्या प्रवासवर्णनात मात्र पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो, "सम्राट औरंगजेबाने रामकोट नावाची ही जागा पाडून टाकली आणि तीन घुमट असलेली ही मशीद बांधली. इतरांचं म्हणणं आहे हे बाबराने बांधलं आहे. या वास्तूत, डाव्या बाजूला एक प्लॅटफॉर्म आहे, हिंदू ज्याला बेदी (वेदी) म्हणतात, कारण पूर्वी इथे एक वास्तू होती जिच्यात विष्णू आणि त्याच्या तीन भावांचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं. हिंदूंनी इथे चालवलेला पूजापाठ आणि उत्सव थांबवण्यासाठी, कोणी म्हणतं औरंगजेबाने तर कोणी म्हणतं बाबराने ही वास्तू उध्वस्त केली. पण तरीही, हिंदूंनी इथे प्रार्थना आणि उत्सव करायचं थांबवलं नाही. ते या वास्तुभवताली तीन प्रदक्षिणा घालतात आणि अखेरीस साष्टांग नमस्कार घालतात. चैत्राच्या चोविसाव्या दिवशी इथे रामजन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो." हे वर्णन पाहता मात्र अठराव्या शतकात ही जागा रामजन्मभूमी असल्याचं किमान अयोध्या आणि आजूबाजूच्या लोकांचं तरी मत असल्याचं जोसेफने नमूद केलं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याने घोळ एकच घातला तो म्हणजे रामनवमी ही चैत्राच्या नवव्या दिवशी (शुद्ध नवमी) असते असं द्यायचं सोडून चोविसाव्या दिवशी (वद्य नवमी) म्हटलं, जे अर्थातच समजण्यासारखं आहे. त्याला शुद्ध-वद्यातला फरक लक्षात आला नसणार. हा जोसेफ १७४३ मध्ये भारतात आला आणि १७६० मध्ये त्याने अयोध्येला भेट दिली. (या माहितीसाठी विशेष आभार, श्री. निखिल बेल्लारीकर)
श्री राम शर्मा यांच्या 'द रिलिजिअस पॉलिसी ऑफ द मुघल एम्पेरर्स' या पुस्तकात पृष्ठ २४ वर त्यांनी बाबरी मशीद ही रामाचं मंदिर पाडून बांधली असल्याचं म्हटलं आहे, आणि त्यासाठी एस के बॅनर्जींच्या 'बाबर आणि हिंदूज्' या शोधनिबंधाचा संदर्भ दिला आहे, पण मला बॅनर्जी यांचा हा निबंध सापडला नाही, त्यामुळे क्रॉसचेक करता आलं नाही.
- कौस्तुभ कस्तुरे
श्री रोहित सहस्रबुद्धे यांनी मुख्य प्रधानाबद्दल (पेशवा पदाबद्दल) समूहावर पोस्ट केल्यानंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांच्या वैयक्तिक वॉलवर देखील अनेकांनी प्रधान म्हणजे एक सामान्य नोकर वगैरे कमेंट्स केल्या. यामागचं कारण सांगण्याची खरंतर काही आवश्यकता नाही, एकंदर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता ते कोणालाही चटकन समजून येईल. हल्ली इतिहासाचा वापर हा राजकीय फायद्यासाठी होतो, त्यात अनभिज्ञ तरुणांची माथी भडकावून काही वेगळाच इतिहास मांडला जातो यात नवीन काही राहिलं नाही. असो, मुद्दा वेगळाच आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्रातील "प्रधान म्हणजे सरकारकून" एवढं एकच वाक्य सोयीस्कररित्या उचलून, आजच्या काळातील "कारकून" हा अर्थ लावला जातो आहे. पेशवा हा कारकुनी करणारा होता हे बिनडोक तत्वज्ञान मांडलं जातं आहे. मुळात, जुन्या काळातल्या शब्दांचे अर्थ आत्ता प्रचंड बदलले आहेत, त्याचंच हे उदाहरण, पण ते समजून न घेता काहीही ठोकून द्यायची घाई. ही पोस्ट यासाठीच आहे, की "प्रधान म्हणजे सरकारकून" या वाक्याचा नेमका अर्थ काय!
पुढे मूळ कागदात काय आहे ते देतो आहेच, पण त्या आधी रामचंद्रपंत अमात्य म्हणजे नेमकं कोण ते सांगणं भाग आहे. अमात्य हे पद शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचं पद. रामचंद्रपंतांचे वडील निळो सोनदेव हे शिवरायांच्या खास मर्जीतले. महाराजांचं निळोपंतांना दिलेलं एक महत्त्वाचं पत्रं (तह म्हटलं आहे त्याला) सारं काही बोलून जातं. हे निळोपंत राज्याभिषेकापूर्वी मृत्यू पावले असता त्यांच्या दोन पुत्रांमध्ये महाराजांनी अमात्यपद विभागून दिलं. थोरला नारोपंत आणि धाकटा रामचंद्रपंत. पुढे संभाजी महाराजांची कारकीर्द पंतांनी पाहिली. त्याही पुढे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत धामधूम झाली तेव्हा राजाराम महाराजांनी पंतांना "हुकूमतपनाह" हा किताब दिला आणि महाराष्ट्रात राजाच्या अनुपस्थितीत राजाज्ञा देण्याची योग्यता कोणाची आहे तर या माणसाची असंच जणू काही सुचवलं. औरंगजेबाविरोधात जी पाच महत्वाची नावं होती त्यात संताजी-धनाजी हे लष्करात तर राज्यकारभारात रामचंद्रपंत महत्वाचे असून सोबतीला शंकराजी नारायण सचिव आणि परशुरामपंत प्रतिनिधी होते. राजाराम महाराजांच्या नंतर ताराऊसाहेबांच्या पाठीशी पंत भक्कमपणे उभे ठाकले. कोल्हापुरात सत्तापालट झाला तेव्हा रामचंद्रपंतांनी राजारामपुत्र संभाजी दुसरे यांना "राजनीती" समजावण्यासाठी एक विशेष ग्रंथ लिहून घेतला, त्यालाच आपण "आज्ञापत्र" म्हणून ओळखतो. थोडक्यात काय, तर रामचंद्रपंत म्हणजे स्वराज्याच्या पाच छत्रपतींची कारकीर्द पाहिलेली तालेवार असामी होती.
आता मूळ मुद्द्याकडे येऊ. "प्रधान म्हणजे सरकारकून" एवढ्या तीन शब्दांत पराचा कावळा करणाऱ्यांनी मूळ आज्ञापत्र वाचलं तरी नसतं, किंवा वाचलं असल्यास लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोजकाच भाग ते देतात. पुढे मूळ आज्ञापत्रातला हा सरकारकूनांसंबंधी पूर्ण भाग देतो आहे. हे वाचून आपणच ठरवा.
खाली दिलेला मजकूर दोन्ही चित्रात वाचता येईल. या मजकुराची सुरुवात पहिल्या चित्रात माझा अंगठा जिथे ठेवला आहे तिथपासून होते आहे.
-------------------------------------------------------
परंतु, केवळ नृपानें स्वतांच इतकाहि धंदा करीन म्हणतां होतो यैसे नाहीं. याकरितां हा सकळ राज्यभार चालवावयाकारणें आपले प्रतिनिधि प्रधान करावे लागतात. प्रधानविरहित राज्यभार चालत नाहीं. मागें जे जे राजे जाले त्यांणीं स्वहित चित्तांत आणून राज्यभारार्थ प्रधान निर्माण केले. त्यांचे आपणांसारखे बहुमान वाढऊन राज्यभार चालविले. प्रधान म्हणजे राज्यलक्षणगृहाचे स्तंभ आहेत. राज्य यथोचित संरक्षून नूतन निर्माण करणें याचें मुख्य कारन प्रधान. प्रधान म्हणजे नृपसत्ताधारक. प्रधान म्हणजे धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष. प्रधान म्हणजे राज्यमदजनित अन्यायसागराची मर्यादा. प्रधान म्हणजे हत्तीचे अंकुश. किंबहुना प्रधान म्हणजे यहलोकीं राज्यकृत्यसंपादनामुळें नृपाची विश्रांती, धर्मप्रतिपालनामुळें परलोकपंथींची दीपिका. प्रधानापेक्षा राजेलोकांस इतर आप्त व अधिकोत्तर किमपि नाहीं. सकळ सेवकांपेक्षा प्रधानाचा बहुमान विशेष आहे. प्रधान हेच राजे लोकांची बाजू. प्रधान हेच राजबंधू. यैसे राजेलोकीं पूर्ण चित्तांत आणून लाक्षणिक प्रधान पाहून करावें. त्यांवरीं सर्व राज्यभार ठेवावा.
प्रधान म्हणजे सरकारकून, त्याची भीड सकळांपेक्षां अधिकोत्तर वागवावी. आपलें शासनाप्रमाणें त्याचें शासन सकलांवरीं चालवावें. लहान - थोर राज्यकृत्य त्याचेंच विचारें करावें. सकलांमध्यें त्याचें थोरपण वाढलें पाहिजे. याकरितां समयविशेषें आपला आग्रह सोडून त्याचा शब्द चालविलासा करावा. स्वल्प गोष्टीनिमित्त त्यास दिलगीर न करावें. पाच टक्क्याच्या प्याद्यापासोन सरकारकुनापर्यत भिडेचा शिरोभाग तो सरकारकून. हे भीड येकायेकीच वाढते वैसें नाहीं. पर्यायें चढत चढत बहुताश्रमें हे भीड वाढली असते. ते स्वल्पकार्यास्तव प्रमाद करून सर्वसाधारण लोकांमध्ये अवाच्य संभाषण अथवा चालत आले बहुमान अंतरें तोडिली तऱ्ही पुन्हां ते पाणी चढतें यैसे नाही; तेव्हा इतर लोक त्याची भीड कसी वागवितील? त्याची भीड नाहीं तेव्हां त्याचे म्हटलें कोन यैकतो? त्याचें म्हटलें यैकत नाहीं, तेव्हां यथोचित राज्यकारभार कसा चालतो? इतर साधारण अप्रसिध्द मनुष्य या महत्कार्यात घातलिया त्याची भीड वाढावया बहुत दिवस लागतील. तों कित्येक वर्षे नाश होणार. याकरितां आधीं सरकारकुनी देणें ते बहुत विचारून, मनुष्यपरीक्षा करून, केलें कार्यामध्ये फिरोन आपणांस संकट न पडे यैसें बरें शोधून, लाक्षणिक मनुष्य वाढवीत कार्यधुरंधर पाहून, मग सरकारकुनी सांगावी.
सरकारकुन पदवी सामान्य नव्हे. नृपपदवीउपरीं सरकारकुनाची पदवी. तदनुरूपच यथोक्त नृपतुल्य गुण सरकारकुनाचे गुण असावें. सरकारकून म्हणजे कुलीन, कृतकर्मे, कार्याकार्यविचक्षण, शास्त्रज्ञ, राजधर्मविशारद, पापभीरू, स्वामीसेवकभाव जाणोन वर्तते. दैवतैकनिष्ठ, दर्शनीय, सदयपूर, सधैर्य, समंजस, स्फुटवक्ते, निरालस्य, निराग्रही, निर्व्यसनी, निष्पाप, पुण्यशील, उद्योगशील, अतीत-अनागत, कार्यकर्ते, अलालुची, अहिंसक, सामदाम, दंडभेद, संधिविग्रह, मित्रभेद-मित्रसंधानादि अनेक उपायें शत्रुसाधनीं चतुर इत्यादि उत्तमगुनसंपन्न यैसे पाहून त्यासी सरकारकुनी सांगावी. या गुणांस विपरीत अंगहीन, चोरी करणार, यैशास इतर मामले न सांगावे. तेथें तर सरकारकुनी तरी महत्पद, तें नच सांगणें. यदर्थी संशय काय आहे? कुलीन, सामान्य अथवा थोर परंतु बहुत दिवसांचा सेवक ज्याचे वडिलीहि सेवा बहुत केल्या आहेत यैशास नवाजावें हें उचित आहे.
-------------------------------------------------------
अमात्यांनी तीनशे वर्षांपूर्वीच हे लिहिलं आहे. त्याचा आत्ता कोणी हवा तसा अर्थ काढून अर्धवट वाक्य पसरवत असेल तरी मूळ इतिहास बदलत नाही. इतिहास पुराव्यांवर चालतो, मनमर्जीने नाही. बहुत काय लिहिणे?
© कौस्तुभ कस्तुरे
!!!... छत्रपती राजाराम महाराज ....!!!
आज स्वराज्यचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा स्मृतीदिन. आज म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये महाराजांचे किल्ले सिंहगड येथे देहावसान झाले.
छत्रपती संभाजी महाराज कैदेत पडल्याची बातमी कळताच रायगडावर कोलाहल मजला व हि बातमी म्हणजे रायगडावर व मराठा साम्राज्यावर पडलेला मोठा आघात होता. मराठा साम्राज्यातील सर्वच प्रमुख मंडळींची अवस्था हि भांबवल्यासरखी झाली होती.
त्या वेळी राजकुटुंबातील महत्वाच्या व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी सकवारबाई साहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई साहेब या गडावर होत्या. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थिती मुळे सर्व जबाबदारी हि महाराणी येसूबाई साहेब यांच्यावर पडली होती. या वेळी चांगोजी काटकर हा रायगडाचा किल्लेदार होता व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वासू येसाजी कंक तसेच रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी व इतर प्रमुख मंडळी हे सुद्धा रायगडी होते. अशा या अस्मानी संकटाच्या वेळी सर्व मराठ्यांचे नीतीधौर्य हे महाराणी येसूबाईसाहेब यांनी उंचाविले.
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका हि अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते. छत्रपती संभाजी यांचे पुत्र शाहूमहाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षांचे होते. अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते ते म्हणजे आपला पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून "छत्रपती" बनविणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे व दुसरा पर्याय म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून त्यांना मराठा साम्राज्याचे "छत्रपती" बनविणे व राज्यकारभाराची सूत्रे हि प्रमुख अष्टप्रधानांच्या हाती सोपविणे.
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्री ने आपल्या पोटच्या मुलाचाच सर्वप्रथम विचार केला असता परंतु अशा कठीण व गंभीर परिस्थिती मध्ये महाराणी येसूबाईसाहेब यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या ऐवजी आपल्या दिरास म्हणजे राजाराम महाराज यांचे दिनांक ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राज्याभिषेक न करता मंचकरोहन केले. कारण राज्याभिषेक हा निवांत व वैभवाने करण्याचा समारंभ होय. त्यावेळच्या परिस्थिती नुसार राजाराम महाराज यांना मंचकरोहन करून सर्व कारभार त्यांच्या हाती सोपविला गेला.
अशा गंभीर व संकटकालीन कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा महाराणी येसूबाईसाहेब यांनी संपूर्ण मराठा साम्राज्याच्या पुढे एक निस्वार्थीपणाचा व आपल्या संकट समई धीरोदत्त वागण्याचा आदर्श निर्माण केला.
यामुळे समस्थ मराठा साम्राज्य धीरोदत्तपणे व एकदिलाने औरंगजेबाच्या विरुद्ध ठामपणे लढण्यास सज्ज झाले.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या मंचकरोहनानंतर महाराणी येसूबाईसाहेब यांच्या पुढाकाराने झालेल्या मसलतीत ठरल्या प्रमाणे राजाराम महाराज यांनी शूर सरदारांच्या बरोबर रायगडावरून बाहेर पडावे व मोगलांशी संघर्ष चालू ठेवावा. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालमीत तयार झालेली एक पिढी अद्यापही अस्तित्वात होती त्यात प्रामुख्याने प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे, बहिर्जी घोरपडे, बंकी गायकवाड, रुपाजी भोसले, विठोजी चव्हाण, मालोजी घोरपडे, जनार्दनपंत हणमंते हि मंडळी त्यावेळी मसलतीसाठी रायगडावर उपस्थित होती.
रायगडावर ठरलेल्या मसलतीप्रमाणे राजाराम महाराज यांनी रायगडाचा व्यवस्तीत बंदोबस्त करून आपल्या दोन्ही राण्याच्या बरोबर तसेच प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव व इतर प्रमुख सरदारांच्या बरोबर गुप्तपणे रायगड सोडला. राजाराम महाराज हे रायगड सोडून थेट प्रतापगडावर दाखल झाले. परंतु हे रायगडला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकारखान यांच्या लक्षात आले व त्याने फतेहजंग खान यास राजाराम महाराजांच्या पाठलागावर पाठवले. प्रतापगडावर दाखल होताच राजाराम महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली व सर्व सरदार व इतर लोकांना दिलासा व धीर देण्यास प्रारंभ केला व आपल्या सरदारांना व लष्कराला शत्रू मुलखात धामधूम उडवून गडकोट हस्तगत करण्यास सांगितले.
या वेळी पाठलागावर आलेल्या फतेहजंग खान याने प्रतापगडाच्या पायथ्याशी पार या गावी छावणी केली. या वेळी फतेहजंग खान याच्या तुकडीचे नेतृत्व काकरखान हा करत होता. या मोगल तुकडी बरोबर छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली लढाई लढले तशी हि लढाई मराठ्यांच्या इतिहासात अज्ञातच राहिली (या लढाईवर अभिषेकदादा कुंभार यांनी फेसबुक वर सविस्तर पोस्ट टाकली आहे).
यानंतर राजाराम महाराज यांनी प्रतापगडावरून वासोट्या किल्ल्या कडे प्रयाण केले. या दरम्यान महाराजांचा पाठलाग मोगल सैन्य करत होते. वासोट्यावर जास्त काळ न थांबता सातारच्या किल्ल्यावर आले व तिथे हि जास्त काळ न थांबता ते पन्हाळागडावर गेले (ऑगस्ट १६८९). मोगल सैन्य इथेही पाठलागकरत पोहोचले त्याच वेळी इतर काही किल्ल्यांना देखील मोगल फौजेणे वेढे घातले होते. याच दरम्यान संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमपराक्रम केला. तुळापूर मुक्कामी असणाऱ्या बादशहाच्या डेर्याचे सोन्याचे कळस घेऊन सिंहगड मुक्कामी गेले. या घटनेमुळे मराठा सैन्याचे नितिधोर्य उंचावले गेले व स्वतः औरंगजेब या घटनेने धास्तावला गेला. या नंतरच छत्रपती राजाराम महाराज यांनी संताजी घोरपडे यांना "ममलकतमदार" हा किताब दिला.
मराठ्यांची जी खरी शक्ती म्हणजे गडकोट त्यांची संख्या कमी होत होती. कारण मोगल सैन्याचा पूर्ण प्रतिकार मराठा सैन्य थोपवू शकत नव्हते. अशा परिस्थिती मध्ये एका किल्ल्यावर जास्त काळ वास्तव्य करणे धोक्याचे होते म्हणून प्राप्त परिस्थितीचा विचार करून कर्नाटक प्रांती असणाऱ्या जिंजी किल्ल्यावर आश्रयास जाणे राजाराम महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडला कारण या एका गोष्टी मुळे अनेक गोष्टी साध्य करता येणार होत्या. पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण राजकुटुंबास एकाच वेळी कैद करून मराठ्यांची दक्षिणेतली सत्ता नष्ट करणे या बादशहाच्या महत्वकांक्षेस शह देता येणार होता व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी जिंजी किल्ल्यावर स्थापन केल्यास औरंगजेबाच्या मोगल सैन्यास दोन आघाड्यांवर मराठयांच्या सैन्याबरोबर संघर्ष करावा लागणार होता. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील व दक्षिणेतील भागातील अनेक गडकोट मोगलांनी जिंकली होती ती सांभाळून ठेवण्यासाठी मोगल सैन्याचा खूप मोठा भाग गुंतून राहणार होता त्याच वेळी मराठा सैन्य मोठया प्रमाणात रिकाम्या होत्या या सैन्याला एकत्र करून त्याचे नियंत्रण संताजी व धनाजी यांनी करून त्यांनी नाशिक ते जिंजी च्या प्रदेशात धामधूम उडवू शकणार होते व चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे राजाराम महाराज यांनी दक्षिणेतील नायक पाळेगार यांच्या मदतीने मोगल सैन्याच्या विरुद्ध संयुक्त आघाडी उभारू शकणार होते .
जिंजीला जाण्याअगोदर राजाराम महाराज यांनी महाराष्ट्रातील कारभाराची जबाबदारी हि रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव शंकराजी नारायण यांच्या हाती सोपवला. अशा परिस्थिती मध्ये २६ सप्टें १६८९ रोजी मध्यरात्रीच्या वेळी वेषांतर करून राजाराम महाराज व त्यांच्या सहकार्यानी जिंजी कडे प्रयाण केले. या वेळी महाराजांच्या बरोबर मानसिंग मोरे, प्रल्हाद निराजी, *बंकी गायकवाड* , मानसिंग मोरे, रुपाजी भोसले, कान्होजी आंग्रे, तिमाजी हनुमंते, बाजी कदम, गिरजोजी यादव,खंडोजी दाभाडे, कृष्णाजी अनंत, खंडो बल्लाळ व इतर मराठा सरदार हि मंडळी होती. ज्यावेळी राजाराम महाराज यांनी बेद्नूर राणीच्या प्रदेशात प्रवेश केला त्यावेळी महाराजांच्या बरोबर जवळपास ३०० मातब्बर सरदार होते असे मोगल इतिहासकार साकी मुस्तैदखान याने लिहून ठेवले आहे.
बेदनूर च्या राणीने देखील राजाराम महाराज यांना त्यांच्या प्रवासात मदत केली व त्यांच्या प्रवासाची चोख व्यवस्था ठेवली . मराठ्यांना मदत करणे म्हणजे आपला राजधर्म आहे असे बदनूरच्या राणीने मानले होते. तुंगभद्रा नदीकाठी शिमोगा येथे मोगलांनी राजाराम महाराजांच्या छावणीवर छापा घातला परंतु राजाराम महाराज व इतर सरदार शिताफीने निसटले. निसटण्या पूर्वी शत्रूला ओळखपटू नाही म्हणून आपल्या राजवस्त्रांचा त्याग केला. या वेळी महाराज सुखरूप बाहेर पडावेत म्हणून रुपाजी भोसले, येकोजी, बहिर्जी, मानाजी घोरपडे यांनी प्रयत्नाची शर्थ केली परंतु महाराज निसटल्या नंतर शत्रुसैन्यापुढे निरुपाय होऊन ते कैदेत पडले. या घटनेबद्दल केशव पंडित व साकी मुस्तैदखान यांनी सविस्तर लिहले आहे. राजाराम महाराज व त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी पुढचा प्रवास यात्रेकरू, व्यापारी, कापडी अशी वेगवेगळी वेषांतरे करून चालू ठेवला व बंगलूर पर्यत सुखरूप पोहचले. बेंगलोर मुक्कामी असताना देखील महाराजांच्यावर आणखी एक संकट ओढवले होते परंतु त्यातूनही महाराज सुखरूप निसटून चंदीला पोहोचले. चंदीहून महाराज अंबुर या ठिकाणी पोहचले हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते व येथे बाजी काकडे नावाचे सरदार ठाणेदार होते त्यांनी राजाराम महाराज यांचा यथोचित स्वागत केले इथपासून राजाराम महाराज गुप्तप्रवास संपला व ते उघडपणे मराठा सैन्या सह पुढच्या प्रवासाला निघाले. येथून महाराज वेलोरला गेले. वेलोर सुद्धा मराठ्यांच्याच ताब्यात होते. महाराजांना पन्हाळाकिल्ला ते वेल्लोर या प्रवासाला ३३ दिवस लागले २८ ऑगस्ट १६८९ रोजी महाराज वेल्लोरच्या किल्ल्यात पोहचले होते. व अखेरीस नोव्हें १६८९ मध्ये राजाराम महाराज जिंजी किल्ल्यावर सुखरूप पोहचले.
नोव्हें १६८९ च्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज जिंजी इथे पोहचतात त्यावेळी जिंजी व परिसराचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या अबिकाबाईसाहेब (हरजीराजे महाडिक यांच्या पत्नी. हरजीराजे त्यावेळी हयात नव्हते त्यांचे काही महिने अगोदर निधन झाले होते) या बघत होत्या. त्यांनी आपल्या बंधूंचें म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांचे यथोचित स्वागत गडावर केले. राजाराम महाराज जिंजी मध्ये पोहचताच त्यांनी राज्यकारभाराची विस्कळीत झालेली घडी व्यवस्तीत बसविण्यास सुरवात केली. जिंजीत तख्त स्थापन करून राजाराम महाराज यांनी आपले नवे अष्टप्रधान मंडळ नेमले -
निळोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवे)
रामचंद्रपंत - हुकूमत-पन्हा (अमात्य)
संताजी घोरपडे - सेनापती
जनार्दनपंत हणमंते - अमात्य
महादजी गदाधर - सुमंत
शंकराजी नारायण - सचिव
रामचंद्र त्रिंबक - मंत्री
श्रीकराचार्य - पंडितराव
व या व्यवस्थेत छत्रपती राजाराम महाराज यांनी एक नवीन पद निर्माण केले व त्यास "पंतप्रतिनिधी" असे नाव दिले व या पदावर प्रल्हाद निराजी यांची नेमणूक केली व त्यांना कारभाराचे प्रमुख केले. तसेच मोठ्या सरदारांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यात प्रामुख्याने धनाजी जाधव, *बंकी गायकवाड*, बाजी कदम, खंडो बल्लाळ हि मंडळी होती. या राजमंडळाच्या साहाय्याने छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या राज्यकारभरास सुरवात केली. कर्नाटकातील वेगवेगळ्या ठाण्यांवर, किल्ल्यांवर विश्वासातील माणसांच्या नेमणुका केल्या.
याच वेळी इकडे महाराष्ट्रात पन्हाळगड घेण्यासाठी शेख निजाम उर्फ मुकर्रबखान हा आला होता त्यावेळी एक मोठी लढाई पन्हाळगडाच्या इथे झाली व यात संभाजी महाराजांना कैद करणारा शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याला संताजी व धनाजी यांनी हरवले.
हे सगळे चालू असताना संभाजी महाराजांच्या दुर्दैवी हत्येनंतर रायगड जवळपास ८ ते ९ महिने लढता ठेवला गेला होता. अखेर ३ नोव्हें १६८९ रोजी महाराणी येसूबाईसाहेब, *महाराणी सकवरबाईसाहेब (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व गाईकवाड घराण्याची लेक)*, शाहू महाराज यांच्या सह रायगड मोगलांच्या स्वाधीन झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा कुटुंबकबिला हा महाराणी सकवारबाई साहेब यांच्या बरोबर औरंगजेबाच्या कैदेत असताना महाराणी येसूबाईसाहेब व छत्रपती राजाराम महाराज यांच्यात गुप्तपणे निरोप देवाणघेवाण करण्याचे महत्वाचे काम he *बंकी गाईकवाड* यांनी केले.
जिंजीत राजधानी स्थापन केल्या नंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समोर खरी अडचण होती ती पैशांची. राज्यकारभार करण्यासाठी फौजफाट, सैन्य उभारण्यासाठी पैसा हवा होता. खजिना भरून काढण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. याचाच एक भाग म्हणजे मद्रास किनारपट्टीवर असलेल्या इंग्रज, पोर्तोगीज, फ्रेंच यांनी आपल्या वाखारींच्या ठिकाणी परवानगी न घेता बांधलेल्या बांधकामाबद्दल दंड म्हणून रक्कम बसवली गेली.
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले मराठयांचे राज्य बुडालेले नाही व बुडत नाही" हे पाहून रयत व सर्व सरदार, वतनदार यांच्यात विश्वास निर्माण झाला. त्याच वेळी जे मराठा सरदार मोगलांची चाकरी करत होते ते सुद्धा परत स्वराज्यात चाकरी साठी माघारी येऊ लागले त्यात नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने हि मंडळी होती. या मंडळींना महाराजांनी वतने दिली. या घडामोडीच्या मुळे महाराष्ट्रातील सरदार मंडळी मोगलांच्या ताब्यात गेलेले गडकोट परत घेण्याचे प्रयत्न सुरु झाले हे प्रयत्न कोल्हापूर सातारा भागापूरते न राहता ते बादशहाच्या इतर मूलखांवर म्हणजे औरंगाबाद, सोलापूर या भागात सुद्धा सुरु झाले. सगळीकडे पुन्हा स्वराज्यासाठी जिंकू किंवा मरू असे वातावरण परत तयार झाले याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सर्जाखान याचा पाडाव तसेच संताजी, धनाजी यांनी सातारा व खटाव परिसरात मोगलांजी उडवलेली धांदल असो किंवा परत स्वराज्यात घेतलेले राजगड, प्रतापगड, रोहिडा असो. या सर्व मोहिमांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांची एकवाक्यता, मोहिमांचे उत्कृष्ट नियोजन, गुप्त हालचाली व शत्रूस हुलकावणी देऊन त्यास गोत्यात आणण्याचे हुकमी पान म्हणजे गनिमी काव्याचा अतिसुंदर वापर होय.
छत्रपती राजाराम यांच्या मुळे एकूणच दक्षिणेतील राजकारणाचे रंगच बदलले. मोगल फौजांना जर कोणी विरोध करतील तर ते फक्त मराठे हि भावना दक्षिणेत निर्माण झाली व त्यास कारण ठरेल ते छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीमधून उद्घोशीत केलेली ध्येयधोरणे होत. जिंजी मध्ये आल्यावर प्रथम राजाराम महाराजांनी जाहीर केले होते की मोगलांनी जिंकलेली विजापूर व गोवळकोंडा हि दोन राज्ये दक्षिणेतील हिंदू राजांना एकत्र करून पुन्हा जिंकून घेन्याचा इरादा मराठ्यांनाचा आहे. कारण औरंगजेबाने दक्षिणेत साम्राज्य विस्तारासाठी केलेला संघर्ष हा केवळ लष्करी नव्हता तर त्याला धार्मिक सुद्धा बनवले होते जिंकलेल्या प्रदेशातील जनतेला तो काफिर समजून जाचक असा जिझिया कर लावत असे. या मुळे दक्षिणेत एक वेगळी भावना निर्माण झाली होती व या परिस्थितीचा अचूक वेध घेऊन दक्षिणेतील नायक व पाळेगारांची एक आघाडी मोघलांच्या विरुद्ध स्थापन केली.
मोगलांनी जिंजीला घातलेला वेढा हा प्रदीर्घ असा होता व यात मुगल सरदार जुल्फिकारखान व असदखान यांना दारुण पराभव पत्करावा लागला व राजाराम महाराजांन बरोबर वाटाघाटी कराव्या लागल्या. याच वेळी मराठ्यांचे आरमार हे कोकण किनाऱ्यावर संचार करत होते. फेब्रुवारी १६९५ मध्ये मराठा आरमार हे तापी नदीच्या मुखापर्यंत येऊन गेले व त्यांनी शत्रूची अनेक गलबते ताब्यात घेतली या बद्दलची नोंद सुरतकर इंग्रजांच्या पात्रात आहे ही नोंद खूप महत्त्वाची आहे कारण राजाराम महाराजांच्या काळात मराठा आरमाराचे खूप कमी संदर्भ मिळतात. या कालखंडात मराठ्यांचे आरमार हे कारवार गोव्यापासून गुजरात पर्यंत मुक्त संचार करत होते.
२२ फेब्रुवारी १६९८ रोजी छत्रपती राजाराम महाराज आपल्या परिवारासह परत महाराष्ट्रात विशालगडास सुखरूप पोहचतात. येथून १० एप्रिल १६९८ रोजी महाराज उत्तर कोकणच्या मोहिमेवर जातात. तेथून महाराज प्रतापगडावर जातात व परत तेथून ते विशाळगडावर परतात. जुलै च्या शेवटच्या आठवड्यात महाराज परिवारासह सातारच्या किल्ल्यात मुक्कामी येतात. या दरम्यान म्हणजे १६९८ - ९९ दरम्यान महाराज स्वराज्यात एकसारखे फिरत होते याच दरम्यान ते एकदा कर्नाटकप्रांती गेल्याची देखील नोंद आहे. म्हणजे महाराजांनी महाराष्ट्रात आल्या पासून उत्तर कोकण मोहीम, दक्षिण कोकण मोहीम, उत्तर कर्नाटक मोहीम, शेवटी खानदेश वऱ्हाडची मोहीम अशा चार मोठ्या मोहिमा त्यांनी १६९८-९९ च्या काळात केल्या. या दरम्यान सातारा भागात मराठे व मोगलांच्यात अनेक लढाया झाल्या. हि धावपळ चालू असताना महाराज फेब्रुवारी १७०० च्या अखेरीस सिंहागाडी मुक्कामी येतात. या सगळ्या धावपळीचा त्रास होऊन छत्रपती राजाराम महाराज हे आजारी पडतात व ३ मार्च १७०० रोजी महाराजांचे दुःखद निधन होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्ली जिकण्याचे स्वप्न होते त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य छत्रपती राजाराम महाराज यांनी केले. कारण छत्रपती राजाराम महाराजांच्या शेवटच्या काळात मराठ्यांनी सर्व दक्षिण आपल्या घोड्यांच्या टापाखाली घेऊन नर्मदा पार केली जी मोगल साम्राज्याच्या हृदयस्थानी वार केल्या सारखी घटना होती व १६९९ मध्ये कृष्णा सावंत या मराठा सरदाराने नर्मदा पार करून माळव्यात धडक मारली. व पुढे ताराबाईच्या काळात माळवा भागात मराठ्यांच्या स्वाऱ्या सुरु झाल्या.
मराठ्यांच्या उत्तराभिमुख धोरणाची, दिल्ली पादक्रांत करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी हि राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सुरु झाली व याचे फलित ४० वर्षांनी मराठ्यांनी माळवा जिकुंन व अटकेपार झेंडा फडकावून सिद्ध केली
!!!...छत्रपती राजाराम महाराज यांना विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
संकलन - संतोषराजे गायकवाड
संदर्भ-
१) मराठे व औरंगजेब
२) मोगल - मराठा संघर्ष
३) शिवपुत्र छत्रपती राजाराम
४) मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध
५) थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र
६) ताराबाईकालीन कागदपत्रे
७) राजारामचरितम
८) शिवचारित्रप्रदीप
९) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
१०) Martin's Memories
११) History of Aurangzeb
फोटो :
१) छत्रपती राजाराम महाराज
२) छत्रपती राजाराम महाराज यांची राजमुद्रा
३) छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावरची समाधी
४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील चंद्रशेखर बाण छत्रपती राजाराम महाराज यांच्या नित्य पूजेत सुद्धा होता.
५) छत्रपती राजाराम महाराज यांची अस्सल सनद
राणी की वाव ' पाटण (गुजरात) येथे चालुक्यसोलंकी राणी उदयमतीने त्यांचे पती राजाभीमदेव यांच्या स्मरणार्थ म्हणून बांधली होती . तिथे वेगवेगळ्या मूर्ती आहेत.त्यापैकी खाली दिसणारी मूर्ती ही श्रीरामांची असल्याचे सांगितले जाते.
ही खरोखरच श्रीरामाची मूर्ती आहे का?
गोवळकोंड्यावरील शिलालेख. काय लिहीलंय यावर फारसी भाषा जाणणाऱ्यांपैकी कोणी सांगेल का?
संपूर्ण वाचन
फार्सी
दर अहदे दौलते पादशाह जमजाह
मलायक सिपाह सुलतान अब्दुल्ला
कुत्बशाह ब-सई बंदा ए दरगाह खैरात खान
इन अंबारखाने बा तमाम रसीद
ब-तारीख शहर रजब अल मुरज्जब सना १०५२
मराठी-
अब्दुल्ला
कुत्बशाह च्या कारकिर्दीत खैरात खानाच्या प्रयत्नातून हा अंबारखाना १०५२
हिजरीच्या (१६४२ इसवी) रजब महिन्यात पूर्णत्वास गेला.
गोवळकोंड्यावर हा धातुचा ठोकळा दाखवलाय गाइडने. एका हाताने हा ठोकळा उचलून दाखवला तर कुतुबशहाच्या सैन्यात सैनिकाची नोकरी मिळे असं सांगितलं. वजन म्हणे 240 किलो आहे या ठोकळ्याचं.
हे नक्की काय आहे? याचा खरा उपयोग काय असेल? कृपया तज्ञांनी उजेड टाकावा.
देवीच्या देवळाला ग्रामदान व भूमिदान देणारा अरब मांडलीक :-
भारताच्या वायव्य दिशेकडून मोहम्मद बिन-कासीमाचे पहिले मुसलमानी आक्रमण झाले(इ. स.711-12). या काळी गुप्त घराण्या सारखी प्रबळ केंद्रीय सत्ता भारतात नव्हती. गुर्जर-प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाल सेन यांचे सतत झगडे सुरु होते. कासीमाच्या पहिल्या आक्रमणा नंतर मुसनमानी उपसर्ग प्रतिहारांना बसत असे. परंतु दक्षिणेत राष्ट्रकुटां सोबत नवमुसन्मानांचे संबंध सलोख्याचे असे. त्याकाळी व्यापाऱ्याकरिता आलेल्या मुसलमानांनी म्हटले आहे की “सिंध व हिंद मध्ये बव्हारा राजाप्रमाणे इतर कोणीही राजा मुसलमानांना मानाने वागवत नाही.” “बव्हारा” हे वल्लभराज यांचे अपभ्रष्ट रूप आहे. कारण राष्ट्रगीत स्वतःस वल्लभ राज ही पदवी लावत. या राष्ट्रकूट राजांनी त्याकाळी आपल्या नगरीचा अधिपती म्हणून मुसलमानांना नेमले होते. त्यातील प्रस्तुत ताम्रपट देणारा अरब अधिपती सुगतीप हा राष्ट्रकूट राजा तृतीय इंद्र नित्यवर्ष याचा मांडलीक होता. हा ताम्रपट अरब अधिकाऱ्याने दिला असूनही संस्कृत भाषेत आहे आणि नागरी लिपीत आहे. यातील मुसन्मानांची संस्कृतोत्पन्न नावे आलेली दिसतात :-1) मधुमती:- महम्मद
2)सहियारहार :- शहरियर
3)सुबक्त :- सुगतीप
सुबक्त उर्फ सुगतीपाचा आजा मोहम्मद उर्फ मधुमती याला राष्ट्रकूट सम्राट द्वितीय कृष्ण याच्या कृपेने राज्य मिळाले होते (कृष्णराजदयावाप्तकृत्सनसंयानमंडल: l
आसीन्मधुमति: श्रीमान नृपतिस्ताजिकान्वये ll)
त्याने समुद्रकाठच्या सर्व अधिपतींना जिंकून त्यांच्या देशात आपली ठाणी बसवली असे ताम्रपटात म्हटले आहे.
या ताम्रपट्टाचा राष्ट्रकूटांची वंशावळ दिली असून त्यात त्यांची वंशोत्पत्ती चंद्रापासून दिली आहे(राष्ट्रकूट नृपती स्वतः चंद्रवंशी म्हणत).
सोबतच आपला मालक तृतीय इंद्र याच्या विजयाचे वर्णन केलें आहे.
देवीच्या देवळाला ग्रामदान व भूमिदान :-
संजान येथे मैत्रायणीय शाखी व भारद्वाज गोत्री वासुदेव नामक ब्राह्मणाचा नातू व नारायणभट्टाचा पुत्र अन्नमैय किंवा आन्नेय याने देवीची मठीका किंवा देऊळ बांधलें होतें. त्या देवळाच्या डागडुजीकरिता तसेंच संजान येथील पंचगौडीय परिषदेच्या नऊ सभासदांच्या तसेंच भगवती देवीच्या सर्वोपकरणांनी युक्त अशा उपभोगाकरिता अन्नमैयाच्या आग्रहा वरून सुगतिप ऊर्फ मधुमति याने राष्ट्रकूट वंशी परमभट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर श्रीइन्द्रराजाला विनंती केली आणि त्याच्या संमतीने कोलि- महार नामक विषयांतील म्हणजे जिल्ह्यांतील काणाडुक नामक गाव दान दिला. या गावाच्या चतुःसीमा सांगतांना त्याच्या पश्चिमेस असलेल्या कल्लग्रामाचा उल्लेख आला आहे. तसेंच देवीहर नामक गावांतील कांही भमिहि त्याने दान दिली. या गावांत चाट, व भट या राजसेवकांनी प्रवेश करू नये, यांत अधिकाऱ्यांना वेठबिगारीचा हक्क आहे, तसेच यांतील करभार घेण्याचा हक्क, लहानसहान खटले चालविण्याचा अधिकार देहि त्यांत अंतर्भूत होतात, असेहि म्हटले आहे. यानंतर भावी राजांनी वा दानाचे पालन करावे म्हणून अनेक शापाशीर्वादात्मक श्लोक घातले आहेत. शेवटी पूर्वोक्त कालनिर्देश करून हे राजशासन परमभट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर अकालवर्षदेव (द्वितीय कृष्ण) याच्या चरणांचे चिंतन करणाऱ्या श्रीनित्य वर्षदेवाच्या (तृतीय इन्द्राच्या) अनुमतीने व श्रीसुगतिपाच्या आज्ञेने संजान येथील ध्रुव (महसूलाधिकारी) वथैयाच्या संमतीने श्रीभुवराज व सांधिविग्रहिक (परराष्ट्रमंत्री) अजित याचा पुत्र सुगत याने लिहिले असे म्हटले आहे. नंतर हीं दानें देणारा सुगतिप, त्याचा मित्र आन्नेय, तसेंच रेवण व कौतुक असे इतर दोघेजण हे अमरगिरीवर (कैलासा- बर) सदैव वास करोत व हैं ताम्रशासन कल्पांतापर्यंत टिको, अशी आशा व्यक्त करून 'मंगलं महती श्रीः' या मंगलवाचक शब्दांनी ताम्रशासनाचा शेवट केला आहे.
संदर्भ :- संशोधन मुक्तावली सर तिसरा :- V. V.Mirashi( अरब मांडलिक सुगतिपाचा चिंचणी ताम्रपट)
-पृथ्वीराज धवड
त्या
काळातील समाजाला / राज्यकर्त्यांना इस्लामचे यथातथ्य ज्ञान झाले नव्हते ,
त्यामुळे इतर उपासना पद्धती प्रमाणे ही एक नवीन पद्धत , आपल्या कडील अनेक
दैवतांप्रमाणे अल्ला हा एक नवीन देव , इतकी बाळबोध कल्पना त्यांनी करून
घेतली होती , त्यामुळे ती उपासना पद्धती काहींनी स्वेच्छेने स्वीकारली असेल , पर धर्मियांना आश्रय दिला असेल , आणि यातून या घटना घडल्या असाव्या .
पेशवा घाट, माहेश्वर इथे असलेली ही वास्तू थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधीची प्रतिकृती असल्याचे काही स्थानिकांचे मत आहे.
ही कोणाची समाधी आहे किंवा खरेच बाजीराव पेशव्यांच्या स्मरणार्थ बांधलेली त्यांच्या रावेर येथील समाधीची प्रतिकृती आहे याबाबत काही संदर्भ असल्यास कृपया सांगावे
North to paste
"Govidrai ji, without #Peshwai you will not be able to last even 1 year against Mughals in Punjab" said Pingle Sardar while welcoming Guru Govid Singh in Maratha country. Guruji, we Marathas have considered Lord Parshuram as our adorable, then we also fight against the rules told by him". Guru Govind Singh ji was surprised !!
They almost forgot Lord Parashuram, the destructive incarnation of Vishnu... They didn't care, but when they saw Maratho's victory against Mughals, they couldn't resist.....
They asked what is this #Peshwe_method?
Sardar Moropant Pingle said Guruji, this is the fastest war policy of the Hindus described in the Sahyadri section based on ancient Brahman - Kshatriya method which we... GAMANI KAWA SAYS #GAMANI_KAWA, IT MEANS, FIGHT THE ENEMY WHERE YOU ARE NOT... Our King sits here in Satara. Her place war fights her Peshwa. Policy setting is somewhere and Peshwa's beatings is somewhere else.... Being a Brahmin, he has hostess and relatives in every province... Their success is rapid and threatening as reserve in need. They all fight under Peshwa but the King lives and becomes stronger...
This is the 4th generation warfare.
Guruvar understands the thing. That guy appoint Mohiali as his Peshwa and sends him north! But Sikhs cannot follow this method and rebel against the last warrior appointed by their Guru Shrimant Bandabahadur (Hindu-Brahmin) ...
Sikhs are divided into the khem - Bebe-Sikh (Khalsa) and Bandai Sikh (People of Shrimant Banda Bahadur)... Later, this is the only rich man who arrests Bahadur and Mughal... They kill Bandabahadur's most brutal..
There were 5 regulators to identify the people of Banda Bahadur, whom Khalsa (Babe-Sikh) opposed...
(1) Drinking of feet
(2) Wearing Janeu
(3) Wearing White (Avoid Black & Green)
(4) Dhoti going down to the knees
(5) Hail- Hail Darshan... Hail Guru's...
This is the handwritten instruction of Bandabahadur called "Banda Order". It is safe in 5 copies and decorated with the seal of Guru Gobind Singh Ji Maharaj....
इतिहासातल्या गंमतीजमती : भाग १
—————————————————
पुरंदरे दफ्तर खंड १ मध्ये २० मे १७४८चं भाऊसाहेबांचं एक पत्रं छापलं आहे, काही तहनाम्याविषयी पत्रं आहे ते. पण त्यात ऐनवेळेस महादोबा पुरंदरे यांनी काहीसा गोंधळ घातला असं भाऊंना वाटलं, आणि काही पैसे जे त्या तहानुसार मिळणार होते ते ऐनवेळेस सोडून द्यावे लागले. भाऊसाहेबांना वाटलं आपण काहीतरी चूक केली.. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर “आम्ही .... ‘वेडझवेपण’ केले” !!
भाऊंसारखा एवढा तत्वनिष्ठ, सरळमार्गी माणूस वैतागल्यावर अशी शिवी देतो म्हटल्यावर राघोबा काय थयथयाट करत असेल कल्पनाच न केलेली बरी
छत्रपती संभाजी महाराजांना कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न करणारे - बाळाजी विश्वनाथ
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी मुघलांचा सरदार मुरकरबखानाने संभाजी महाराजाना संगमेश्वर येथे कैद केले. त्यावेळी मुघल बादशाह औरंगजेब अकलूज या ठिकाणी होता आणि मग तो पुढे बहादूरगडला आला. या ठिकाणी संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. आणि पुढे ११ मार्च रोजी त्यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली.
या सर्व घटनाक्रमात एक प्रश्न सर्वाना पडतो या ४० दिवसांदरम्यान संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला का ? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहलेली २ पत्रं पहावी लागतात. सदर पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते. यातलं एक पत्र त्यांनी जिंजीला असणारे छत्रपती राजाराम महाराज यांना तर दुसरे पत्र प्रल्हाद निराजींना लिहलेले आहे. ही पत्र इंग्रजीत भाषांतर केलेली असून त्यात स्पष्ट नमूद केले आहे की,
"संभाजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव शाहू यांना मुघलांनी कैद केल्यानंतर त्यांच्या सुटकेकरिता धनाजी जाधवांचे मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांना संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुटकेकरिता मुघलांच्या मागे पाठवून दिले"
अर्थात बाळाजी विश्वनाथ यांना या मोहिमेत यश आले नाही हे खरे असले तरीही इतिहासातील या एका प्रश्नाची उकल मात्र या पत्रांमुळे झाली आहे. मॅकेंझी संग्रहातील तेराव्या खंडात मराठयांच्या इतिहासासंबंधी काही पत्रं असून त्यात ही २ पत्रे आहेत. इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी ही दोन पत्रं शोधून त्याचे संपादन करून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १९३१ सालच्या. त्रैमासिकांमध्ये ती प्रकाशित केली होती. मूळ पत्र डॉ.उदय कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात देखील छापले आहे, तसेच डॉ.केदार फाळके लिखित 'छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' या ग्रंथाच्या परिशिष्टात देखील याचा समावेश केला आहे.
संदर्भ :
छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती - डॉ. केदार फाळके
Era Of Bajirao - Dr. Uday Kulkarni
#इतिहासाच्या_पाऊलखुणा
- रोहित पवार
Post Edit : सदर पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते. यावेळी राजाराम महाराज जिंजीस होते. ही जूनी हकीगत पात्रातून सांगिलेली आहे.
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी मुघलांचा सरदार मुरकरबखानाने संभाजी महाराजाना संगमेश्वर येथे कैद केले. त्यावेळी मुघल बादशाह औरंगजेब अकलूज या ठिकाणी होता आणि मग तो पुढे बहादूरगडला आला. या ठिकाणी संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. आणि पुढे ११ मार्च रोजी त्यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली.
या सर्व घटनाक्रमात एक प्रश्न सर्वाना पडतो या ४० दिवसांदरम्यान संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला का ? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहलेली २ पत्रं पहावी लागतात. सदर पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते. यातलं एक पत्र त्यांनी जिंजीला असणारे छत्रपती राजाराम महाराज यांना तर दुसरे पत्र प्रल्हाद निराजींना लिहलेले आहे. ही पत्र इंग्रजीत भाषांतर केलेली असून त्यात स्पष्ट नमूद केले आहे की,
"संभाजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव शाहू यांना मुघलांनी कैद केल्यानंतर त्यांच्या सुटकेकरिता धनाजी जाधवांचे मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांना संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुटकेकरिता मुघलांच्या मागे पाठवून दिले"
अर्थात बाळाजी विश्वनाथ यांना या मोहिमेत यश आले नाही हे खरे असले तरीही इतिहासातील या एका प्रश्नाची उकल मात्र या पत्रांमुळे झाली आहे. मॅकेंझी संग्रहातील तेराव्या खंडात मराठयांच्या इतिहासासंबंधी काही पत्रं असून त्यात ही २ पत्रे आहेत. इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी ही दोन पत्रं शोधून त्याचे संपादन करून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १९३१ सालच्या. त्रैमासिकांमध्ये ती प्रकाशित केली होती. मूळ पत्र डॉ.उदय कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात देखील छापले आहे, तसेच डॉ.केदार फाळके लिखित 'छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' या ग्रंथाच्या परिशिष्टात देखील याचा समावेश केला आहे.
संदर्भ :
छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती - डॉ. केदार फाळके
Era Of Bajirao - Dr. Uday Kulkarni
#इतिहासाच्या_पाऊलखुणा
- रोहित पवार
Post Edit : सदर पत्र १६९७ ला लिहली असावीत असे मजकुरावरून दिसते. यावेळी राजाराम महाराज जिंजीस होते. ही जूनी हकीगत पात्रातून सांगिलेली आहे.
कर्णवेध
"सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् | दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||" असे करारी बोल ज्याच्या ओठी वेणीसंहाराचे कर्ते भट्टनारायण घालतात तो म्हणजे सूर्यपुत्र कर्ण. कर्णाच्या दातृत्व आणि पराक्रमाच्या कथांनी, स्तुतीसुमनांनी, उपमांनी आधुनिक वैचारिक आणि ललित लेखकांचे लेख अथवा ग्रंथ भरलेले आहेत; परंतु या लेखकांनी महाभारताचा आधार न घेता स्वैरिणी तर्कशक्तीचा आश्रय घेऊन कर्णाचे महिमामंडन करणारी प्रतिमा तयार केली आहे. कर्णाचे महाभारतातील वास्तविक रुप आज जनमानसाला ज्ञात नाही, किंबहुना जाणीवपूर्वक होऊ दिले जात नाही. एखादा अपवाद वगळल्यास इतिहासात कोणतीही व्यक्ती पूर्णतः सदोष किंवा पूर्णतः निर्दोष नाही. काही लेखकांनी मात्र लेखनाच्या नावाखाली कर्णाचे सर्व दोष झाकून आणि नसलेले गुण 'तयार करुन' कर्णाला कृष्णाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश कर्ण ही 'महाभारतातील' व्यक्ती 'व्यासकृत महाभारतानुसार' कशी होती याचे विवरण करणे हा आहे.
अपमान
आधुनिक मराठी वैचारिक तथा ललित साहित्यातील काही लेखकांनी कर्णाचा पदोपदी अपमान झाला असे सतत सांगितले आहे. ही अवहेलना करणाऱ्या लोकांमध्ये भीष्माचार्य, भीमसेन, द्रौपदी आणि शल्य यांची नावे पुन: पुनः घेतली जातात. तस्मात् सर्वप्रथम अपमानांचे प्रकरण कुठून सुरु होऊन कुठपर्यंत जाते आणि कर्णाची त्यावर काय प्रतिक्रिया असते ते बघू.
आरोपांमध्ये अग्रमणि आहे तो महाबली भीमसेन. "तं दृष्ट्वा .... प्रहसन्निव ||, (आदिपर्व १३६.५)" येथे भीमसेन कर्णाचा सूतपुत्र म्हणत पाणउतारा करतो. याच श्लोकाचा आधार घेऊन कर्णभक्त 'अपमान अपमान' असा बुभु:कार करत असतात. आधी तो प्रसंग काय आहे ते पाहूया. कर्ण हा कौरव आणि पांडवांसोबत द्रोणांकडे शिकत होता. तेव्हापासूनच तो अर्जुनाचा द्वेष करत असे (आदिपर्व १३१.१२). भीमावर जो विषप्रयोग झाला त्यात कर्णही होता (आदिपर्व १२८.४०). थोडक्यात, कर्णाच्या मनात पांडवांविषयी आधीपासूनच द्वेष होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा सर्व विद्यार्थी आपलं कौशल्य सर्वांपुढे दाखवतात, त्यात अर्जुन सर्वांचं मन जिंकतो. तत्पश्चात कार्यक्रमाच्या अंतिम समयी कर्ण रंगभूमीवर येतो आणि द्रोणादिकांना 'विशेष आदर न दाखवता' नमस्कार करून काहीही कारण नसताना अर्जुनाला फटकळपणे बोलतो. तरीही, त्याला त्याचं कौशल्य प्रकट करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तो कौशल्य प्रकट करतो आणि मग अर्जुनाला द्वंदासाठी आव्हान देतो. अकारण अर्जुनाला द्वंदाचे आव्हान देणे हा कर्णाचा शुद्ध आगाऊपणा होता. त्यानंतर कृपाचार्य पुढे येऊन द्वंदाचे नियम सांगून कर्णाला त्याच्या कुळाचा परिचय द्यायला सांगतात. तेव्हा, कर्णाची मान खाली जाते. त्याचवेळी दुर्योधन पुढे येऊन भीष्मांच्या अनुमतीने ब्राह्मणांकडून कर्णाचा राज्याभिषेक करतो. इथे भीष्म, विदुर, द्रोण, कृप, पांडव तथा उपस्थित पौरजन यांपैकी कोणीही त्याला विरोध करत नाही (आदिपर्व १३५). यानंतर जेव्हा अधिरथ रंगभूमीवर येतो तेव्हा भीमसेनास कर्ण सूतपुत्र आहे याची खात्री पटून तो त्याचा मर्मभेदक उपहास करतो. इथे भीमसेनाचे चुकले हे मान्य, परंतु कर्णाने अर्जुनाचा अपमान केला असल्यामुळे भीम संतप्त होणं स्वाभाविकच होतं. त्या संतापाची अभिव्यक्ती पुढील अपमानात झाली. त्यामुळे इथे अर्धा दोष कर्णाचाही आहे. तसंही, अपमान सहजासहजी सहन करायला, किंवा अपमानाच्या निषेधासाठी 'आमरण उपोषणाला' बसायला भीमसेन निश्चितच गांधीवादी नव्हता. बरे, सूतपुत्र हा उल्लेख अपमानास्पद आहे असे म्हणावे तर दुर्योधन "पुरा निघ्नन्ति .... रक्षणे ||, (द्रोणपर्व १३७.१९)" असे म्हणून कर्णास सूतपुत्र संबोधतो. जेव्हा प्रत्यक्ष आपला जीवश्च कंठश्च मित्र आपणास एखाद्या नावे संबोधत असेल तर तो निश्चितच अपमानकारक शब्द असू शकत नाही. भीमसेनाने ज्या प्रकारे आणि ज्या प्रसंगी उच्चारला आहे त्यामुळे तो शब्द अपमानास्पद झाला आहे. या उलट त्याच अध्यायात पुढे "भवतां च .... जनिष्यति ||, (आदिपर्व १३६.१६)" असे म्हणत दुर्योधन कर्णासारख्या वीरवराची माता सूत कशी असू शकते? असे विधान करून सूत लोकांच्याच सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. हा कर्ण आणि पर्यायाने सूतांचा बहुमान म्हणावा की अपमान? त्यामुळे येथे भीमसेन, दुर्योधन आणि कर्ण तिघेही दोषी आहेत. उलटपक्षी या प्रसंगी राज्यपद प्राप्त होऊन कर्णाचा भाग्योदयच झाला.
दुसरा क्रमांक आहे द्रौपदीचा, जिच्यावर असा आरोप होतो कि तिने आपल्या स्वयंवरात कर्णाचा अपमान केला. वास्तविक या श्लोकांसंदर्भात प्रत्यक्ष महाभारतात विरोधाभास आहे. तो असा की एके ठिकाणी कर्ण धनुष्यावर प्रत्यंचाही चढवू शकला नाही असे सांगणारा "यत् कर्णशल्यप्रमुखैः .... धनुर्द्विजाः ||, (आदिपर्व १८७.४,५)" हा श्लोक आहे तर दुसरीकडे "दृष्ट्वा तु तं .... धनुस्तत् ||, (आदिपर्व १८६.२३)" जिथे धनुष्य पेललेल्या कर्णास आपण एका सूतपुत्राशी विवाह करु इच्छित नाही असे द्रौपदी म्हणते. या श्लोकद्वयींतील परस्परविरोध बघता खरोखर कर्णाचा अपमान झाला की त्याने स्वतःचे दौर्बल्य स्वतःच सिद्ध केले हे सांगणे कठीण आहे. जरीही अपमान झाल्याची गोष्ट प्रमाण मानली तरीही "एतन्महत् कर्म .... ब्रवीमि ||, (आदिपर्व १८४.३६)" अशी घोषणा द्रूपदपुत्र धृष्टद्युम्न स्वयंवरास प्रारंभ होण्यापूर्वीच करतो ज्यात तो सर्व उत्सुक वरांना त्यांच्या उत्तम कुळ, गोत्र, सौंदर्य, शौर्य इत्यादि युक्त असल्यासच सहभागी व्हायचे आवाहन करतो. तत्कालीन समजानुसार कर्ण निश्चितच सूतपुत्र म्हणून विख्यात असल्याने या चौकटीत बसत नव्हता. पण तरी त्याने स्वयंवरात सहभागी होऊन पांचालकुमाराने घातलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले होते. एका उपवर वधुची दिशाभूल करुन तिच्याशी विवाह करु बघणाऱ्यास सन्मानजनक वर्तणूक मिळण्याची अपेक्षा करणे म्हणजे स्त्रीच्या अपेक्षांचा आणि स्वातंत्र्याचा अपमानच नाही का? आता कर्णाची द्रौपदीविषयीची मुक्ताफळे पाहा: "मन्यसे वा .... वसु ||, (सभापर्व ६८.३४ ते ६८.३७)" म्हणजेच "तिला (द्रौपदीस) एक वस्त्र परिधान करून सभेत आणणे अशोभनीय आहे असे जर तुम्हास वाटत असेल, तर त्या संदर्भातही मी उत्तर देतो, हे कुरुनंदन तुम्ही ऐका! देवांनी स्त्रियांसाठी एकच पती निर्धारित करून दिलेला आहे, पण द्रौपदी अनेक नवऱ्यांच्या आधिपत्याखाली आहे, त्यामुळे ती निश्चितच वेश्या आहे, त्यामुळे ती एकवस्त्रा किंवा नग्न असली तरी तिला सभेत आणण्यात काही वावगे नाही, हे माझे मत आहे. या पांडवांकडे जी काही संपत्ती, ही द्रौपदी आणि हे पांडव होते, त्या सर्वांस सुबलपुत्र शकुनिने धर्माने जिंकले आहे." असे दिव्यविचार अंगनरेशाव्यतिरिक्त कोण करु शकेल? तस्मात् याचेही श्रेय कर्णास द्यायलाच हवे. एवढ्यावरच ही दिव्यवाणी थिजत नाही तर पुढे कर्ण द्रौपदीस "त्रयः किलेमे .... तवास्तु ||, (सभापर्व ७१.१ ते ७१.४)" म्हणतो, ज्याचा 'उदात्त' अर्थ "दास, शिष्य आणि अधीनस्थ स्त्री हे तिघे निर्धन आहेत आणि हे द्रौपदी आता तू दासाची पत्नी असून आमची संपत्ती आहेस, कारण दासाच्या पत्नीवर आणि त्याच्या संपत्तीवर स्वामीचा अधिकार आहे. तू राजा दुर्योधनाच्या घरी जा आणि तुला जे काम मिळेल ते करून सेवेने आम्हाला संतुष्ट कर. आता तुझे पती पांडव नव्हे तर आम्ही धृतराष्ट्राचे पुत्र आहोत. जुगारामुळे तुला दुःख प्राप्त होऊ नये म्हणून तू लवकर दुसरा पती शोध, पती कसाही वागला तरी दास त्यास प्रश्न करु शकत नाही, हा दास्यत्वाचा नियम आहे, तो तुला कळलाच पाहिजे." असा आहे. येथे द्रौपदीने दुर्योधनाची सेवा करुन त्याला संतुष्ट करावे असे सांगणारा कर्ण हा वेश्यांच्या दलालासमान भासतो! व्यक्ती स्वातंत्र्य काय ते यावरुनच ठरवावे. इथे कुणी कुणाचा किती आणि कसा अपमान केला याची तुलनाच नाही.
भारतीय संस्कृतीत ज्यास अनादि काळापासून त्याज्य मानले जाते त्या अहंभाव या दुर्गुणाचाही आपल्या चरित्रनायकास किती सहवास होता याची गोग्रहण, घोषयात्रा, कुरुक्षेत्राचे अंतिम युद्ध या घटनांमधून प्रचिती येते. गोग्रहणाच्या प्रसंगी हाच कर्ण अहंकारोक्तीने बढाया मारुन अर्जुनाचा पराभव करण्याचा मानस व्यक्त करतो आणि कहर म्हणजे आपले गुरु द्रोण यांचाही अपमान करतो. तेव्हा अखेर तिथे उपस्थित कृपाचार्य त्यास "सदैव तव .... नानुबन्धमवेक्षसे ||, (विराटपर्व, ४९.१)" या शब्दात अर्थात् "हे राधानंदना, युद्धाबद्दल तुझे विचार सदैव क्रूर असतात. तुला कार्याचे स्वरूपही माहिती नसते आणि तू त्यांचा परिणामही विचारात घेत नाहीस." असे म्हणत त्याची मानसिकता दाखवून अर्जुनाची आणि त्याची तुलना करत त्याला वास्तविकतेची अनुभूती करुन देतात. इथेच द्रोणपुत्र अश्वत्थामाही कर्णाची कान उघाडणी करतो. शेवटी कसेबसे भीष्म सर्वांना शांत करतात. ऐन युद्धाच्या आधीही कर्ण आपला आगाऊपणा सोडत नाही (विराटपर्व ४७-५१). पण बोध घेईल तो सुज्ञ कसला? कुरुक्षेत्रावर अशाच वल्गना करत कर्ण आपले शिक्षक कृपाचार्यांना "व्यवसायद्वितीयोऽहं .... नश्यति ||, (द्रोणपर्व १५८.२९, १५८.३०)" उद्दामपणे ऐकवतो ज्यात तो "मी पांडवांशी लढत असताना तुमचे काय जाते?" असे बोलतो. यावर कृपाचार्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याचे कान टोचावे लागतात. त्यानंतर अश्वत्थामा चिडून कर्णाला यमसदनी पाठवायला उद्युक्त होतो. शेवटी दुर्योधन मध्यस्थी करुन प्रकरण शमवतो.
भीष्माचार्य त्याला अर्धरथी म्हणतात. हा कथित् अपमानही कर्णपक्षधरांना चांगलाच वर्मी बसलेला दिसतो. भीष्म कर्णासोबत अश्वत्थाम्यालाही रथी मानत नाहीत (उद्योगपर्व १६७.७,८). कर्णास रथी म्हणून नाकारण्याची कारणे भीष्म पुढीलप्रमाणे देतात "सखा ते .... विमोक्ष्यते ||, (उद्योगपर्व १६८.३ ते १६८.७)" अर्थात् "राजन! हा, तुझा प्रियमित्र कर्ण, जो तुला पांडवांशी युद्ध करण्यास नेहमीच प्रोत्साहित करतो आणि रणांगणात नेहमीच आपला क्रूरपणा दाखवतो, तो अत्यंत कडवट, आत्म-स्तुतीपारंगत आणि क्षुद्र आहे. हा कर्ण तुझा मंत्री, नेता आणि मित्र झाला आहे. तुझा आश्रय मिळाल्यावर हा अहंकारी माणूस बलिष्ठ झाला आहे. हा कर्ण अतिरथीही नाही आणि रणांगणावर रथी म्हणवण्यासही पात्र नाही, कारण या मूर्खाने आपले नैसर्गिक कवच आणि दैवी कुंडलं गमावले आहे. त्याच्या मनात सदैव इतरांबद्दल द्वेषाची भावना असते. परशुरामांचा शाप, ब्राह्मणाचा शाप आणि विजेत्यासाठी वर सांगितलेल्या उपकरणांचे तोटे यामुळे हा कर्ण माझ्या दृष्टीने अर्धरथी आहे. अर्जुनाशी युद्ध केल्यास तो जीवंतही राहू शकणार नाही." कोणास रथी म्हणावे तथा कोणास अर्धरथी म्हणावे यासाठीचे भीष्मांचे काही निकष आहेत. त्या निकषांमध्ये कर्ण आणि अश्वत्थामा बसत नाहीत, म्हणून ते दोघेही रथी नव्हे असे भीष्म म्हणतात. रथी म्हणून गणना केली नाही म्हणून अश्वत्थामा चिडत नाही, पण कर्ण चिडतो, आणि भीष्म असेपर्यंत न लढण्याची प्रतिज्ञा करुन बसतो. कर्णाचे हे वर्तन, गांगेय भीष्मांचे सत्य असे कटूवचन आणि त्यास कर्णाचे गुरु द्रोणाचार्य यांची सहमती हे पाहता कर्ण किती पाण्यात होता याचा प्रत्यय येतो. यापूर्वीही कर्णाने प्रौढी मिरवल्यावर भीष्मांनी कर्णास अशीच वास्तविकता दाखवली असताना कर्ण तावातावात सभा सोडून निघून जातो (उद्योगपर्व ६२).
कर्णाचा अखेरचा उपमर्द होतो तो कुरुक्षेत्रावर मद्रपति शल्याकडून (कर्णपर्व ३९). एखादी व्यक्ती आपला वैयक्तिक अपमान करते त्यावेळी आपण प्रतिशोध घेणे ही मानवी प्रवृत्ती आहे जी साहजिक आहे पण प्रतिशोध घेताना समोरच्याच्या अख्ख्या समुदायाचा उद्धार करण्याचा मान मात्र राधेयालाच देता येईल. कुरुक्षेत्रावर ज्यावेळी मद्रनरेश शल्य कर्णाचा व्यक्तिगत अपमान करतो त्यावेळी कर्ण त्यास म्हणतो की "मित्रध्रुङ्मद्रको नित्यं .... श्रुतम् ||, (कर्णपर्व ४०.२३, ४०.२४)" अर्थात "मद्रदेशातील लोक मित्रद्रोही असतात आणि त्यांच्यात कुणाहीप्रति सौहार्दभावना नसतात, आमचा अकारण द्वेष करणारी अधम व्यक्ती मद्रजनच असते, तुम्ही दुरात्मा, खोटारडे, कपटी असता आणि आमरण दुष्टच राहता." पुढे स्त्रियांवर घसरत हे महात्मा कर्ण म्हणतात की "पिता पुत्रश्च माता .... सदामलः | (कर्णपर्व ४०.२५ ते ४०.३०)" ज्याचा सार 'मद्रदेशातील स्त्रिया स्वैरिणी असून कुणाही पुरुषाशी संबंध ठेवतात आणि गोमांससहित मदिरा ग्रहण करुन विलास करतात, अशा मद्रदेशात धर्म कसा टिकणार? अशा लोकांसह मैत्री किंवा शत्रुत्वाने संबंध ठेवू नये' असा आहे. याच्याही वरताण पुढे म्हणतो की "यास्तिष्ठन्त्यः प्रमेहन्ति .... बहु ||, (कर्णपर्व ४०.३७ ते ४०.४१)" म्हणजे "उंट आणि गाढवांप्रमाणे उभ्याने मूत्रविसर्जन करणाऱ्या मद्रनिवासी स्त्रियांची संतति असून तू मला धर्माचे उपदेश देतोस? मद्रनिवासी स्त्रीस कुणी कांजी मागितल्यास ती त्यास कमरेस धरुन ओढून नेत म्हणते की ती आपला नवरा, मुलगा द्यायलाही सिद्ध होईल पण कांजी देणार नाही. अशा मद्रवासी स्त्रिया गोऱ्या, उंच, निर्लज्ज आणि पांघरुणाने अंग झाकणाऱ्या असून अत्यंत अपवित्र असतात." आता कर्ण केवळ मद्र लोकांचाच उद्धार करुन थांबतो का? तर नाही, सोबत सोबत आता तो गांधार, आरट्ट, प्रस्थल, सिंधु-सौवीर, खस, वसति आणि वाहिक देशांचाही यथेच्छ समाचार घेऊन सर्वांनाच पापी, निंदनीय, अधर्मी, मंदबुद्धी म्हणून मोकळा होतो (विस्तार भयास्तव इथे समाविष्ट करत नाही. तसेच या उकिरड्यात पाय ठेवायची आमची इच्छा नाही. वाचकांनी इच्छुक असल्यास कर्णपर्व, अध्याय ४०, ४४, ४५ चे वाचन करावे. वाचून मळमळल्यास आम्ही उत्तरदायी नाही.). व्यक्तिगत टीकेवर सूडबुद्धीने शत्रूच्या पौरजनांची, माता-भगिनींची, शेजारील राज्यांची पार धूळधाण करण्याचे हे तंत्र अलौकिकच म्हणावे. या सर्वात दक्षिण भारतीय लोकांचा अर्थार्थी संबंध नसताना कर्ण त्यांनाही बोल लावत म्हणतो की "ब्राह्मं पञ्चालाः .... सुराष्ट्राः ||, (कर्णपर्व ४५.२८)" ज्याचा अर्थ की "पांचालदेशातील लोक वेदोक्त धर्माचा आश्रय घेतात, कुरुदेशातील लोक धार्मिक कार्य करतात, मत्स्यदेशातील लोक सत्याचे पालन करतात आणि शूरसेनाचे लोक यज्ञ करतात. पूर्वेकडील देशाचे लोक चाकरीचे काम करतात, दक्षिणेकडील रहिवासी वृषल (अशुद्ध संतति) आहेत, वाहीक देशातील लोक चोर आहेत आणि सौराष्ट्रातील रहिवासी जातीमिश्रित आहेत." कर्ण दक्षिणेकडील जनांना 'वृषल' म्हणतो आहे. दक्षिणेकडील भागात महाराष्ट्रही येतो. 'महाराष्ट्राचा अपमान' म्हणून आता कर्णाविरुद्ध आणि कर्णाच्या आधुनिक मराठी भाटांविरुद्ध आंदोलन करायला कुणी पुढे येईल का? या वाक्यांतून कर्णाची प्रवृत्ती कळते. आम्हाला यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
यावरून असे लक्षात येते की, महाभारतात कर्णाचा अपमान होण्याचे फार थोडे प्रसंग असून कर्णाने अपमानित केलेल्या लोकांची सूची लांबलचक आहे आणि कर्णाने ओढलेले कोरडे कुठल्या स्तराचे आहेत हे जाणून त्यास या क्षेत्रातील विशारदच मानणे योग्य होईल.
अन्याय
कर्णावर अन्याय झाल्याचे चर्वितचर्वण वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. कर्ण किती सोशिक, पीडित, वंचित होता याचे गायन सांप्रत सर्वत्र होताना दिसते. इत्यर्थ या सर्वाची शहानिशा करणे क्रमप्राप्त ठरते. कर्ण सूतपुत्र असल्याने त्याच्यावर अन्याय झाला, त्याला विद्यार्जन करता आले नाही, पांडवांनी त्यास वंचित ठेवून ज्ञाती बघून सन्मानायोग्य मानले नाही इत्यादि आरोप आधुनिक साहित्यिकांनी केले आहेत. सर्वप्रथम कर्ण, त्याचे शिक्षण आणि त्याचे गुरु यांविषयी महाभारत काय म्हणते ते पाहा.
"तवापि विदितं .... द्रोणान्महात्मनः ||, (वनपर्व ३०२.९)" असे स्वतः राधेय कर्ण आपल्या पिता सूर्यास सांगतो ज्यात तो द्रोणाचार्यांना महात्मा तर म्हणातोच पण सोबतच परशुराम आणि द्रोणाचार्यांनी मला नानाविध शस्त्रास्त्रे शिकवलीत असे सांगतो. आता आपण कुणाकडे काय शिकलो हे कर्ण उत्तमप्रकारे सांगू शकेल की आधुनिक साहित्यिक? "तत्रोपसदनं चक्रे .... गतः ||, (वनपर्व ३०९.१७, ३०९.१८)" हे श्लोकही सांगतात की परशुराम, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडून कर्ण धनुर्विद्या प्राप्त करुन एक श्रेष्ठ योद्धा झाला होता. तेव्हा एक सूतपुत्र असून राजकुमारांच्या अध्यापकाने तथा साक्षात् विष्णुचा अवतार म्हणून ज्यांना पूजतात त्याने आपल्याला शिकवावे याहून मोठा सन्मान तो कायच? सारांश, कर्णाचे तीनही गुरु ब्राह्मण होते. त्याला द्रोणांनी अस्त्रविद्या शिकवली, परंतु ब्रह्मास्त्र दिले नाही, द्रोणांनी केवळ अर्जुनास ब्रह्मास्त्र दिले कारण तोच त्यास पात्र होता. त्यांनी ते युधिष्ठिरालाही दिले नाही आणि दुर्योधनालाही नाही, ते तर क्षत्रिय होते. तस्मात् इथे अन्याय घडल्याचा दुर्गंध मुळीच नाही.
"अभिषिक्तोऽङ्गराज्ये स .... जयशब्दोत्तरेण च ||, (आदिपर्व १३५.३८)" या श्लोकानुसार दुर्योधन कर्णास अंगदेशाचा राजा बनवण्यापूर्वी भीष्माचार्यांची अनुमति घेतो आणि नंतरच ब्राह्मणांद्वारे त्यास राज्याभिषेक करवतो. जर कर्णाप्रति कुणाच्या मनात हिन भाव असता तर तिथे उपस्थित भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, पांडव तथा प्रजाजनांपैकी कुणीतरी विरोध अवश्य नोंदवला असता पण याविरुद्ध सर्वानुमते कर्ण अंगराज झाला होता. इतक्या सहजासहजी उच्चकुलोद्भव असून पांडवांना राज्यप्राप्ती झाली नाही पण कर्णास ती झाली. म्हणजे नियतीनेही काही अंगराजावर अन्याय केला नाही. यावरुन त्याच्याशी जातीभेद झाल्याचे विधान सपशेल खोटे ठरते.
इतकेच काय तर "अचलो वृषकश्चैव .... महारथः ||, (सभापर्व ३४.७)" प्रमाणे राजसूय यज्ञाच्या प्रसंगी सन्मानित राजांच्या यादीत युधिष्ठीर कर्णास पाचारण करतो ज्यावरून त्याचे तत्कालीन राजकीय महत्त्व सिद्ध होते. "तथा द्रोणेन .... विभुः सह ||, (सभापर्व ५८.२३)" हे सांगते की द्युतसभेत जाण्याआधी धर्मराज युधिष्ठीर भीष्म, कृप, द्रोण, अश्वत्थामा आणि यांसह कर्णासही जाऊन भेटतो. यातून हे सिद्ध होते की किमान द्युतसभेपूर्वी तरी पांडवांच्या मनात कर्णाप्रति द्वेष मुळीच नव्हता.
कर्णावर अन्याय झाला असेल तर तो केवळ कुंतीमुळे. अन्यथा कर्ण तर जन्मजात कवच-कुंडलं घेऊन येतो, सूताच्या घरी वाढूनही गुरुश्रेष्ठांकडे शिकतो, काहीं कर्तृत्व नसताना राजा होतो, अनेक प्रसंगी पराजित होऊन मृत्यूस हुलकावणी देतो, मरणास आलिंगन देतो तेही कुठे? तर कुरुक्षेत्र समरांगणात, जिथे मरणारी व्यक्ती सदेह स्वर्गस्थ होते. यास कर्णाचे भाग्य नाही म्हणता येणार? स्वतःच्या अधिकारासाठी वारंवार झगडणारे आणि युद्धात बहुतांश पुत्रांना पराङ्मुख होणारे पांडव कर्णापुढे करंटे म्हणायची वेळ आहे.
कपट
आपले गुरु भगवान भार्गव राम यांच्याशी खोटे बोलून विद्यार्जन करणारा (शांतिपर्व ३) कर्ण कपटी नव्हता असे म्हणणे एकप्रकारे दिवसा ढवळ्या सूर्यप्रकाश झाकणेच आहे. पण कर्णाने आयुष्यात केलेला हा एकमेव छल नव्हता. या प्रसंगाच्या आधीही आणि नंतरही त्याने आपली कुटीलबुद्धी चालवल्याची उदाहरणे आहेत.
"ततः सुबलपुत्रस्तु .... बुद्धिमकारयन् ||, आदिपर्व १४०.१, १४०.२)" हे बघून कळते की पांडवांना कुंतिसह कपटाने लाक्षागृहात संपवून मारण्याच्या खलबतात कर्ण सहभागी होता.
"स प्रयाहि .... भार्याः स्वलंकृताः ||, (वनपर्व २३७.१४ ते २३७.२२)" असे म्हणत दुर्योधनास द्वैतवनात जाऊन पांडवांना खिजवण्याचा सल्ला देणारे अंगराज कर्ण आणि गांधारराज शकुनि कुठेही एकमेकांपेक्षा यत्किंचितही उणे भासत नाहीत, जणू उभयतांनी करस्थानांचे शिक्षण एकाच गुरुकडे घेतले असावे!
अशा कर्णाकडूनही सत्याची अपेक्षा करता त्याचेच उद्गार डोळ्यापुढे येतात "निकृत्या वञ्चिताः .... विनिपातितम् ||, (द्रोणपर्व १५२.२८, १५२.२९)" ज्यात स्वतःच्या पूर्वकर्मांची स्वीकृती देताना तो म्हणतो की "आपण पांडवांना विश्वासघाताने फसवले, त्यांना मारण्यासाठी विषप्रयोग केला, त्यांना लाक्षागृहात जाळू पाहिले, त्यांना जुगारात पराभूत केले आणि राजकारणाने त्यांना अरण्यात पाठवले. अशाप्रकारे आपल्या प्रयत्नांनी केलेली ती सर्व कामे देवांनी नष्ट केली आहेत." याला प्रांजळपणाची पराकाष्ठाच म्हणावी.
एवढे बघून कर्ण निष्कपट, निष्कलंक आणि हंसासमान शुभ्र चरिताचा होता असे उपरोधातही म्हणण्यास सज्जन तरी धजावणार नाहीत. आपल्या जन्मदात्री आणि सहोदरांचा जीव घेणारी व्यक्ती कुलहंत्रीच म्हणावी. "दुर्योधनो मन्युमयो .... धृतराष्ट्रोऽमनीषी ||, (आदिपर्व १.११०)" अर्थात "दुर्योधन हा क्रोधाचा महावृक्ष आहे, कर्ण खांदा आहे, शकुनि वृक्षाची फांदी आहे, दु:शासन हे फुल आणि फळाचे मूळ हे मूर्ख राजा धृतराष्ट्र आहे." असे महाभारतकार अकारण म्हणत नाहीत. याचीच पुनरोक्ती भगवान् वासुदेव श्रीकृष्ण शिष्टाई करायला हस्तिनापुर राजसभेत "नृशंसानामनार्याणां पुरुषाणां च भाषणम् | कर्णदुःशासनाभ्यां च त्वया च बहुशः कृतम् ||, (उद्योगपर्व १२८.१२)" या शब्दात करतात.
पराक्रम
पराक्रमात कर्णाची उपमा देण्यापासून प्रत्यक्ष सभासद बखरकर्ते कृष्णाजी अनंत हिरेपारखीसुद्धा स्वतःची लेखणी आवरू शकले नाहीत परंतु भीष्माचार्य ज्यास अर्धरथीही समजण्यास प्रत्यवाय करत तो कर्ण खरच अतुल्य पराक्रमी होता का? याचे उत्तर कदाचित पुढील उदाहरणांतून मिळेल.
द्रोणाचार्य ज्यावेळी गुरुदक्षिणा म्हणून कौरव, पांडवादिक शिष्यांकरवी पांचाल देशावर स्वारी करतात त्यावेळी सगळे धार्तराष्ट्र आणि कर्ण पांचालनरेश द्रूपदाच्या हस्ते पराजित होतात असे महाभारतकार पुढीलप्रमाणे लिहितात "व्यधमत् तान्यनीकानि तत्क्षणादेव भारत | दुर्योधनं विकर्णे च कर्णे चापि महाबलम् ||, (आदिपर्व १३७.२१)"
द्रौपदी स्वयंवरावेळी ब्राह्मणवेषातील अर्जुनावर कर्णासकट सर्वांनी चाल केली होती. तेव्हा कर्णासह इतरांना अर्जुनाने एकट्याने पराजित केल्याचे असे दिसते "ब्राह्मणोऽस्मि युधां श्रेष्ठः सर्वशस्त्रभृतां वरः | ब्राह्मे पौरंदरे चास्त्रे निष्ठितो गुरुशासनात् || स्थितोऽस्म्यद्य रणे जेतुं त्वां वै वीर स्थिरो भव | एवमुक्तस्तु राधेयो युद्धात् कर्णो न्यवर्तत || ब्राह्मं तेजस्तदाजय्यं मन्यमानो महारथः |, (आदिपर्व १८९.२१ ते १८९.२३)"
द्वैतवनात जेव्हा पांडवांपुढे स्वतःची प्रौढी मिरवण्याच्या नादात दुर्योधन आणि गंधर्वांचे संगर होते त्यात कर्णाची काय दुर्दशा झाली हे सांगायला पुढील श्लोक पर्याप्त आहेत, "ततो रथादप्लुत्य .... मोक्षायाश्वानचोदयत् ||, (वनपर्व २४१.३२)" अर्थात् पांडवांना पीडायला गेलेला योद्धा स्वतःचा जीव वाचवायला रणांगणातून पाठीला पाय लावून पळून गेला आणि तेही आपल्या मित्राला, दुर्योधनाला सोडून! हे आहे शौर्य! पुढे याच गंधर्वांपासून दुर्योधनाची सुटका पांडवांनी केली हे वेगळे सांगणे नको.
पांडवांच्या दिग्विजययात्रेत वृकोदर भीमसेन अंग देशावर स्वारी करुन कर्णासही परास्त करतो असे पुढील श्लोकातून कळते "स कम्पयन्निव महीं बलेन चतुरङ्गिणा | युयुधे पाण्डवश्रेष्ठः कर्णेनामित्रघातिना ||, (सभापर्व ३०.१९)".
"स पार्थमुक्तैरिषुभिः .... पाण्डवबाणतप्तः ||, (विराटपर्व ५४.३६)" नुसार गोग्रहणावेळी अर्जुनाच्या बाणवर्षावास त्रासून कर्ण युद्धातून परागंदा झाला. यावेळी त्याचा बंधू संग्रामजित तिथे मरून पडलेला असतो. काही वेळाने गेलेला कर्ण युद्धात परततो पण पुनश्च धनंजय अर्जुनाकडून मार खाऊन उत्तर दिशेस पलायन करतो "स गाढवेदनो हित्वा रणं प्रायादुदङ्मुखः | ततोऽर्जुन उदक्रोशदुत्तरश्च महारथः ||, (विराटपर्व ६०.२७)"
कुरुक्षेत्राच्या निर्णायक संग्रामात कर्णाचा सौभद्र अभिमन्युने प्रतिकार करून त्याचा ध्वज आणि रथ भुईसपाट करून त्याला हरवले होते "ततो मुहूर्तात् .... भूमावपातयत् |, (द्रोणपर्व ४०.३५, ४०.३६)". याच सिंहरुपी अभिमन्युच्या वधार्थ कौरवपक्षातील जे सहा योद्धे निर्दयपणे सरसावले त्यात कर्णही एक होता आणि याची साक्ष "द्रोणकर्णमुखैः .... मतो हि नः ||, (द्रोणपर्व ४९.२२)" हा श्लोक देतो. अभिमन्युस एकहस्ते मारणे शक्य झाले नाही तेव्हा तरसांप्रमाणे लचके तोडायला कर्ण इतरांसह धजावला. हे असते अतुल्य युद्धकौशल्य!
पुढे महाबाहू भीमसेनाने राधेयास आपल्या बाणांने पळता भुई थोडी केली आणि तेही एक नाही, दोन नाही तर चक्क पाच वेळा! (द्रोणपर्व १२९, १३१, १३३, १३४, १३६), या उलट कर्ण मात्र केवळ एकदाच भीमावर डोईजड होतो (द्रोणपर्व १३९), याच वेळी युयुधान सात्यकिही कर्णास आपले पाणी पाजून हुसकावून लावतो (द्रोणपर्व १४७). यात भीम कर्णाच्या डोळ्यादेखत कौरवांना कंठस्नान घालतो पण कर्ण मात्र हतप्रभ होऊन बघण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.
सव्यसाची अर्जुन आणि दानवीर कर्ण सहोदर, परंतु हाडाचे शत्रू असल्याने त्यांच्याही अनेक चकमकी या कालावधीत झाल्या आहेत ज्यात अर्जुनाने कर्णावर मात केली (द्रोणपर्व १३९, १५९). आयुष्यभरात कैकवेळा कर्णाची रणांगणी दुर्दशा करुन त्यास मृत्युलोकी न धाडणे हे अर्जुनाचे दौर्बल्य निश्चितच नव्हते. अर्जुनास हे सहज साध्य होते परंतु कर्णाच्या पलायन काढण्याच्या नैपुण्याने त्यास प्रत्येकदा वाचवले. त्यामुळे अर्जुन निःशस्त्र असल्याकारणानेच कर्णास मारु शकला या विधानातील फोलपणा सिद्ध होतो.
खरं पाहता महाभारतात कर्णाची युद्ध करण्याची अशी वेगळीच शैली आहे. कर्ण युद्धाच्या आधी अवाढव्य वल्गना करतो, शत्रू पुढे उभा राहतो, युद्धात मार खातो, पलायन करतो, पुन्हा शत्रूपुढे उभा राहतो, त्याला डिवचतो, पुन्हा मार खातो, आणि पुन्हा पलायन करतो! अशा मनोहर युद्ध शैलीच्या स्वामीला मदिरेच्या धुंदीतसुद्धा पराक्रमी म्हणू नये! कर्णाचा प्रताप दुर्योधनाच्या दिग्विजयात आणि भारतीय युद्धात वाखाणण्यायोग्य असला तरीही प्रसंगावधान बघून रणक्षेत्रातून पलायन करण्याची त्याची शैली तत्कालिन पुरुषार्थाच्या परिभाषेत अभिमानास्पद नक्कीच नाही. तसेच कर्ण अजेय होता याही उक्तीचे उपरोल्लेखित उदाहरण बघता समूळ खंडन होते.
उपरोक्त सर्व प्रसंग, विधानांचे अन्वेषण करून सदोष कोण आणि निर्दोष कोण याचा निर्णय करणे क्लिष्ट नाही. आजच्या उदारमतवादी काळातील परिपेक्ष्याने असो किंवा पुरातन, प्रतिगामी मतांच्या निकषावर असो, कर्णाच्या दानी वृत्तीस जसे नाकारता येत नाही तसेच त्याच्या अक्षम्य अपराधांना दृष्टीआड करता येत नाही. जनमानसात शकुनि जरी दुर्योधनास उद्युक्त करणारा खलपुरुष असला तरीही कर्ण या पाताळयंत्री वृत्तीत यत्किंचितही कमी नव्हता हे सर्वार्थाने सिद्ध होते. त्यामुळे कर्ण ही व्यक्ती चिखलात उमललेले कमळ नसून त्याच चिखलातील साजेसी घाण होती. या उपरांत काही शंका असल्यास इच्छुकांनी स्वतः शतसहस्रसंहितेचे अवगाहन करुन शहानिशा केल्यावरच कर्णाविषयी स्वतःचे मत दृढ करावे. व्यासकृत महाभारत हेच कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाच्या आकलनासाठीचे एकमेवाद्वितीय प्रमाण आहे. काही आधुनिक लेखकांनी केलेल्या स्वच्छंद कल्पनाविलासाला कोणीही प्रमाण मानू नये. तरीही शंका असतील तर भगवान् कृष्णद्वैपायन वेदव्यासांकडे निरसनासाठी जावे.
बहुत काय लिहिणे? सुज्ञ असा.
राजते लेखनावधी |
स्रोत :
१) नीळकंठी प्रत
२) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र प्रत
३) गीता प्रेस, गोरखपुर प्रत (आम्ही प्राय: गीता प्रेस प्रतीचा उपयोग केला आहे)
४) श्री वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले) कृत महाभारताचे वास्तव दर्शन
- शुभम् जयंत सरनाईक©
- अद्वैत भूषण आठवले©
(प्रेरणा स्रोत : वैभव श्रीकांत भांगे)
(हा लेख पूर्वप्रकाशित असल्यामुळे लेखकांच्या नावासकटच सामायिक करावा अन्यथा न्यायालयीन कारवाई करण्यात येऊ शकते.)
सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई भोसले

सादर दानपत्र दिल्यानंतर नरसाबाई यांच्या नावावरून एका गावाला नरसांबपूर असे नाव पडले. नरसापूर हे नेमके कोणते याचा उल्लेख नसलातरी राणी नरसाबाई या मुळच्या कर्नाटकातील असून 1637 साली ज्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले. तेव्हा त्यांनी नरसाबाईसोबत लग्न केले असावे. उपरोक्त पत्र हे १६८८ सालचे असून नरसाबाई या पुढे बरेच दिवस हयात होत्या. यातील नरसापूर म्हणजे कर्नाटकातील बेंगलोर जिल्ह्यातील नरसापुरा म्हणून ठिकाण आहे ठिकाणी या भागात कोणतं मराठा घराणे नांदले आहे काय याचा शोध भविष्यात घ्यावा लागेल किंवा आजही हे मंडळी तिथे आहेत का याचा शोध भविष्यात घ्यावा लागेल कारण बेंगलोर शहर हे शहाजीराजे महाराज साहेबांचं जहागिरीचे गाव असून याच परिसरातील एखाद्या वतनदार घराण्यातल्या या राणीसाहेब असाव्यात असा एक अंदाज आहे पण तत्कालीन कालखंडात कोणतं मराठा घराणे या ठिकाणी होऊन गेलं याबद्दल मराठ्यांच्या इतिहासातील कागदपत्र अजिबात बोलत नाहीत हे दुर्दैव! !
सरलस्कर शहाजीराजे भोसले व राणीसाहेब नसराबाई यांचा विवाह कधी झाला याबद्दल काही उल्लेख नाही तसेच औरंगजेबाच्या आगमनानंतर संभाजीराजे आल्यानंतर या परिसरात येऊन गेल्याचे बेंगलोर व आदी परिसरात लष्करी तर असल्याचेही उल्लेख आढळतो तसेच तसेच सादर पत्रातून संताजी राजे यांचा उल्लेख सापडतो संताजी राजे हे शहाजी महाराजांचे पुत्र होते आणि नसराबाई या त्यांच्या विवाहित तिसऱ्या पत्नी होत्या याबद्दल उल्लेख वरील पत्रात स्पष्ट दिला आहे यामुळे 91 कलमी बखरीत दिलेल्या नसराबाई या सरलष्कर शहाजीराजे भोसले महाराजांच्या रक्षा पत्नी होत्या याबद्दल मुद्दा या ठिकाणी खोडून निघतो तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत कैदेत असलेले रायभानजी काका भोसले यांचा उल्लेख पुढे सातारा दरबारात आल्यानंतर रायभानेकाका भोसले हाच सापडतो कारण छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या पत्रातून त्यांचा उल्लेख रायभान काका असाच येतो त्याअर्थे रायभान राजे भोसले हे कोण होते हे सांगण्याची मुळीच गरज नाही फक्त ते शहाजीराजांच्या कोणत्या पत्नीपासून जन्माला आले किंवा वंश होता याबद्दल माहिती उपलब्ध होत नाही कारण छत्रपती शाहू महाराजांचा येसूबाई यांच्या सह चाळीस मंडळी कैदीत होती जुल्फिकर खान याच्या कैदेत सापडलेल्या तंजावर येथील राजघराण्यातील मंडळींपैकी रायभानराजे काका भोसले हे एक होते औरंगजेबाने रायभानराजे काका भोसले यांची नियुक्ती छत्रपती शाहू महाराज यांच्या कारभारी म्हणून केली होती याबद्दल मोगल दरबारच्या कागदपत्रे नोंद आहे व त्यानंतर त्या घराण्यातील वंशाचे काय झालं याबद्दल ही काही लिहिलं आणि बोललं जात नाही किंवा आज त्यांचा वंश कुठे आहे याबद्दलही काही सांगितलं जात नाही तसेच जिंती येथील थोरले संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या सुनबाई व उमाजी राजे भोसले यांच्या पत्नी मकाऊ राणी सरकार पाटलीण या कनार्टकातून येऊन येऊन मासाहेब जिजाऊ साहेबांच्या याच्या वतनने जिंती गावात स्थायिक झाल्या पण आज घडीला त्या घराण्या कडेही कागदपत्रे किंवा कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे या राणीसाहेब कोण व रायभान काका भोसले, नरसाबाई राणी सरकार याबद्दल कागद बोलत नाहीत तसेच तंजावर येथील छत्रपती घराण्यातील वंशजांनी याबद्दल पुढाकार घेऊन मराठ्यांच्या तंजावर छत्रपती दप्तरात उपलब्ध असलेल्या कागदपत्रातून भविष्यात खरी इतिहास बाहेर पडले वरील उल्लेख केलेला बहुतेक चारही गाव हे त्याचा मराठ्यांचा इतिहासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंदवी स्वराज्याची संबंध आहे व या भागात मराठ्यांची लष्करी हालचाली तसेच छत्रपती घराण्यातील संबंधित घराण्याचं वास्तव्य झालेला आहे पण नरसा बाई या कर्नाटकातील होतय याबद्दल दुमत नाही फक्त या कोणत्या घराण्यातील होत्या व त्यांचे मूळ गाव कोणतं याबद्दल संशोधनास वाव आहे जर याबद्दल काही उल्लेख माहिती असल्यास आवश्यक कळवावा सादर दानपत्र
संतोजी राजियाची माता राजेश्री नसराबाई 

हे उल्लेख संताजी राजे हे शहाजी महाराजांचे व नरसुबाई या शहाजी महाराजांच्या पत्नी होत्या हे सांगण्यास पुरस आहे
राजश्री नरसाबाईंनी हे दानपत्र अरवी गावात रहाणारे बाळंभट रामेश्वर प्रभाकर भट उपाध्ये. यांना दिले आहे.
तोरपाडी या गावाचे नाव बदलून ते नरसांबापूर असे केले आहे.
तोरपाडी ( नवीन नाव नरसांबापूर ) हे गाव तर्फे तायणूर गावाच्या पूर्वेस, इकोणा गावाच्या पश्चिमेस , मांबट गावाच्या दक्षिणेस व पुदपट गावाच्या उत्तरेस आहे.
या गावाचा परगणा बेंटवाल व प्रांत त्रिणमल आहे. असा सर्व उल्लेख पत्रात आहे, थर २२जानेवारी १६८८या तारीखाचे सादर दानपत्र दिले आहे तसेच नरसाबाई यांनी आरवी येथील भट उपाध्ये यांनी दानपत्र दिले या अर्थाने त्याच्या महाराष्ट्र तील जडणघडणीशी संबंध आले आहे व सरलष्कर शहाजीराजे भोसले महाराज च्या सोबत जो मराठा सरदार बंगलोर येथे गेले त्यापैकी एखाद्या घराण्यातील असावीत 
सदर पत्राच्या शेवटी संस्कृत श्लोक असून पत्राच्या वरील बाजूस फारशी शिक्का आहे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
जेऊर ग्रामनामाचं पुराणकाळापासून ते अर्वाचीनकाळापर्यंत प्रदिर्घ काळ लोकमानस दंतकथानांही व्यापलेलं. त्याकाळातील अनेक व्यक्तींची व घटनांची स्मृती लोकमानसाने कथांव्दारे जतन केलेली आहे.जेऊरजवळून राष्ट्रकुट,चालुक्य,यादव,शिलाहार यांच्या राजवटींध्ये बौध्द भिक्षूपेक्षा मोठया संख्येनं शैव,वैष्णव पंथीयाचे तांडे फिरू लागले होते. जेऊर गावचे लिखित सदंर्भ हे पंधरा ते सोळाव्या शतकापासून फारसी साहित्यातून येतात.सामरिकदृष्टया ही भूमी सैनिक संचालनाच्यादृष्टीनं अत्यंत महत्वाची होती.ते मध्ययुगात युध्दाचे डावपेच आखण्याच्याबाबतीत मोठं ठिकाण होतं. अहमदनगरच्या निजामशाही राजवटीच्या प्रारंभीच्या हालचाली येथच घडल्या. तसेच पुढं इथंच बिदरचा महान मुत्सददी सेनानायक सय्यद मुर्तझा व अहमदनगरचा दुसरा सलाबतखान यांच्यात एक वादग्रस्त लढाई डिसेंबर 1584 ला झाली. त्यामुळं जेऊरचं नाव मोघल सम्राट अकबरापर्यंत पोहचलं. 18व्या शतकात इथं संतुकनाथ हा नाथसिध्द होऊन गेला. तर मराठा साम्राज्याच्याकाळात जेऊर मोठं जाहगिरीचं गाव होतं. अहमदनगर सरकारातील दहा परगण्यापैकी पांडेपेडगावमधील तर्फ जेऊर एक होतं. त्यात 13 गावांची विभागणी ग्रेट मराठा महादजी शिंदे व नऊकोट नारायण नाना फडणीस यांच्यात झालेली होती.त्यावरून जेऊर गावचं महत्व लक्षात येतं. बायजामाता या साध्वीची हीच ती पुण्यभूमी. तर इंग्रजकाळात इथं ख्रिश्चन मिशनरींनी सेवाकार्यातून मोठा वारसा निर्माण केला. जेऊरला शिक्षणाची मोठी पंरपरा निर्माण झाली. जागतिक महायुध्दाच्याकाळात मोठं लढाऊ मनुष्यबळ या गावानं पुरवलं. त्याबाबतचा गाववेशीवरला शिलालेख भूमीपूत्रांच्या पराक्रमाच्या स्मृती जपतोय. स्फुर्तीदायक इतिहास घडवणारं गाव म्हणजे जेऊर. सेवेचा गौरव करणारं जेऊर.
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर जेऊर बायजाबाई नावाचं गाव वसलेलं आहे. ते अहमदनगरच्या ईशान्येस अवघ्या पंधरा की मी अतंरावर आहे. मध्ययुगातल्या दख्खणच्या प्रादेशिक राजवटी व मुघलबादशहा यांच्या सैन्य हालचालींच्या इतिहासावरून जेऊरचा ऐतिहासिक परीघ लिखित सदंर्भामुळं मोठा झालेला आढळतो. थोर फारसी इतिहासकार फरिस्ता आपल्या तारीख ए इब्राहिमी याग्रंथात जेऊरचा उल्लेख करतो. बिदरचा सेनापती जहाँगिरखान व जुन्नरचा सुभेदार अहमनिजाम उल्क मुल्क बहिरी यांच्यातील रोमांचक युध्दाची माहीती देतांना लिहितो “ जहाँगिरखान हा अहमनिजामावर चालून आल्यावर तो परिंडयाहून पैठणकडे गेला.तिथं अहमद वऱ्हाडच्या फताउल्ला इमाद उल्क मुल्कची मदत मागतो.ती बोलणी अयशस्वी होते.दरम्यान पाठलागावर असलेला जहाँगिरखान पैठणजवळ पोहचतो.त्यावेळी अहमद माघार घेऊन जेऊरच्या डोंगराळ मुलुखाचा आश्रय घेतो.त्यावेळी अहमदला जेऊरमध्ये कादिराबाद म्हणजे सध्याच्या मांडवगणचा नसीर उल्क मुल्क गुजराती येऊन मिळला”. सय्यद अलि तबा तबा सुध्दा आपल्या बुऱ्हाणे माशिरमधुन अहमनिजाम व जहाँगिरखान यांच्यात झालेल्या शेवटच्या निर्णायक युध्दाचा तपशिल जेऊरच्या सदंर्भाने देतो.याच मातीत अहमदनिजामशहाला मोठा विजय गनिमी युध्द तंत्रानं मिळालय.पंधराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात इथं जहाँगिरखान बिदरहून लाखभर सैन्यघेऊन बीड-पैठण-शेवगाव-करंजीघाटातून भिंगारला पोहचला. नुकत्याच झालेल्या मोठया अवकाळी पावसानं त्याचं जोरदार स्वागत केलं.त्यावेळी त्यानं जेऊरच्या डोंगराळभागात आश्रय घेतला.तिथं सर्वत्र सर्वदूर त्याचा अफाट सैन्यसागर छावणीच्या रूपानं जेऊरनं जवळहून पाहिलाय.एका रात्री शत्रू बेसावध असतांना अहमदने जेऊरच्या छावणीत मोठी कापाकानी केली. ज्यामूळं अवघ्या पंचवीस हजाराच्या सैन्यानं लक्षभर सैन्याला पळता भूई थोडी केली हा सर्व विजयाचा थरार याच परीसराने अनुभवलाय.त्यावेळी अहमनिजामानं जेऊरच्या डोंगराळ भागाचा एका शस्त्राप्रमाणे वापर केला अन त्यात तो त्यात कमालीचा यशस्वी झाला. केवळ या घाटमाथ्याची,डोंगरवाटाची,घाटाच्या तोंडावरील खिंडीची अचूक भौगोलिक माहिती असल्यानेच.जेऊरची खिंडी ही आजून एका वादग्रस्त लढाईसाठी इतिहासात फार प्रसिध्द मानली जाते. बेरारचा धुर्त सेनानायक सय्यद मुतर्झा व दुसरा सलाबतखान यांच्यात एक वादग्रस्त लढाई 1584च्या डिंसेबरमध्ये जेऊरच्या ऐतिहासिक खिंडीत झाली.डॉ. राधेश्याम आपल्या अहमदनगरचे राज्य या ऐतिहासिक शोध ग्रंथात जेऊरच्या वादग्रस्त लढाईचा तपशिल देतांना सलाबतखानाच्या सैन्य हालचालीचे बारीक सारीक निरिक्षण नोंदवतात. सय्यद मुर्तझा व सहकारी मोठा फौजफाटयासह अहमदनगरवर चालून आले. त्यावेळी त्यांनी जेऊरच्या खिंडीत तळ ठोकला. तिथं रात्र काढण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळीच अहमदनगरवर हल्ला केला जाणार होता. इकडे निजामशाहीचा प्रमुख कारभारी दुसरा सलाबतखान यांचयापासून मिर्झा यादगार व शहा यासारखे थोर वर्दीखान यांनी सलाबतखानापासून वेगळे झाले. ते सर्व शत्रूला म्हणजे सय्यद मुर्तझाला सामील झाले. 1584च्या डिंसेबरमध्ये सय्यद मुर्तझा व सहकारी अहमदनगरवर हल्ला करण्यापुर्वीच सलाबतखानाने शत्रूला आर्श्चायाचा धक्का दिला. त्यावेळी सलाबतखानानं जेउरच्या सर्व बाजूंनी डोंगराला वेढा घातला. बंडखोरांवर माघार घेण्याचा मार्ग बंद केला. इथं एक वादग्रस्त लढाई झाली.ज्यामध्ये बेरारचा मोठा पराभव झाला.शत्रु सैन्य पळून गेले. त्यांचा नेता सय्यद मुर्तझाला मुघल सम्राट अकबराचा आश्रय घेण्यास भाग पाडले.सलाबतखान विजय होऊन परतला.तेलगु साहित्यात जेऊरचा उल्लेख येतो.18मार्च1596रोजी दौलताबादहून मुघलांचा मोठा फौजफाटा जेऊरमार्गेच अहमदनगरवर चालून आल्याचा तो उल्लेख आहे. त्यावेळी अफाट मुघल फौजेचा संबंध जेऊरशी आला होता. त्यापुर्वीसुध्दा प्राचीनकाळात येथुनच राष्ट्रकुट,चालुक्य,यादव,शिलाहार यांच्या राजवटींध्ये बौध्द भिक्षूपेक्षा मोठया संख्येनं शैव,वैष्णव पंथीयाचे तांडेफिरू लागले होते.नाथपंथी व शक्ती उपासक यांचे ही परिभ्रमण सिना नदी व तिच्या प्रवाहाबरोबरच जेऊरच्या दऱ्याखोऱ्यात होऊ लागले. त्यासर्वांचं सांस्कृतिक जीवन प्रवाहित राहीले ते या भूमीत. त्याचा मोठा प्रभाव येथील लोकमानसावर झालेला आढळतो.त्यामुळंच जेऊर हे ज्ञानार्जनाचं व ज्ञानसाधनेचं केद्र बनलं. पुढं ती परंपरा ख्रिश्चन मिशनरींनी इथं शाळा सुरू करून प्रदीर्घ काळ चालवीली,त्यांनी ज्युबिली मेमोरियल चॅपलची वास्तू इथं उभारल्या. तर ही ज्ञानगंगा कर्मवीरांच्या रयतनं श्री संतुकनाथ विदयालयाच्या माध्यमातून जोपासली हा केवळ योगा योग नाही. स्वातंत्रपुर्वकाळात इथं संस्थात्मक मोठं काम उभ राहीलं. ज्या संस्थामुळं जेऊरचा सर्वांगिन विकास दिसतो. 1929ला जेऊर ॲग्र.कॉ. ऑफ क्रेडिट सोसायटी लि. जेऊर. तसेच 1943ला जेऊर बेटर फर्मिंग सोसायटी जेऊर ही अहमदनगर जिल्हयातील एक प्रमुख संस्था मानली जाते.द्राक्षांच्या बागासाठी कधीकाळी जेऊर प्रसिध्द होतं.त्यावेळी सीनेला बरेचपाणी होते.सिना नदीच्या बाजुने विकसित झालेले जेऊर. आर्वाचीनकाळात जेऊरबायजाबाई असं नामकरण या गावचं झालेलं आढळतं. त्यामागील रहस्य मोठं उदबोधक आहे. बायजामातेनं एका जेवणाच्या डब्यात गाडीभरून आलेल्या सैन्याला जेवण देऊन डब्यामध्ये अन्न शि ल्ल क रा हिल्याची आख्ययिका सांगितली जाते. यावरूनच या गावाला जेऊर नाव पडल्याची आख्ययिका प्रसिध्द आहे. जेऊरच्या म्हस्केच्या बायजामातेची दखल मराठी लोककथा स्वरूप मिंमासा,स्त्रिसाहित्याचा मागोवा आदी ग्रंथानी घेतली हे विशेष. माता बाजयाबाई हे या गावचं ग्रामदैवत. जेऊरच्या उंच टेकाडावर अत्यंत आकर्षक बायजामातेचं सुंदर मंदीर उभारलयं. ते पहाताच आपल्याला तामीळनाडूतील तंजावरच्या कृष्णकोणमच्या मंदिराची आठवण येते.लोकवर्गनीतून तीनकोटी रूपये खर्चून नगर तालूक्यातील हे एकमेव मंदिर आहे. ते आध्रंप्रदेशच्या कारागीरांनी सोनेरी मंदीर बाधंलय. तेथून अवघ्या जेऊरचंविहंगम दृश्य दिसतं. गावातला पवारांचा पुरातन वाडा आता अखेरचा घटका मोजतोय.प्रा.डाॅ. नवनाथ काशिनाथ वाव्हळ इतिहास संशोधक,९८८१८२७८३४
मार्कंड ऋषी मंदिर, मार्कंड पिंपरी
नाशिक जिल्ह्यातील कळवण पासून साधारणपणे १६ किलोमीटरवर वसलेले मार्कंड पिंपरी हे छोटसं गावं. श्री सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावापासून हे गावं अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणेला मार्कंड ऋषींच्या तपश्चर्याने पावन झालेला मार्कंड गड तर पश्चिमेला श्री सप्तशृंगीगड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर गावं निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. गावात मार्कंड ऋषींचे पुरातन मंदिर आहे. तसेच गावचे वैभव असणारे एक शिवमंदिर पूर्वी गावात होते. आजमितीस मात्र या मंदिराच्या केवळ खाणाखुणा शिल्लक आहेत.
नामशेष झालेल्या शिवमंदिराचे अवशेष आपल्याला परिसरात विखुरलेले दिसतात. मंदिरातील शिवलिंग जवळच ठेवलेले असून त्यावर ग्रामस्थ आता नव्याने मंदिराचे बांधकाम करीत आहेत. मंदिराच्या परिसरात अजून एक छोटेखानी पुरातन मंदिर असून मार्कंड ऋषींच्या माता पित्यांचे हे मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराची देखील आता पडझड होत आहे. मंदिराच्या आवारातून मार्कंडेश्वर पर्वत आणि सप्तशृंगी गडाचं मनमोहक रूप दिसतं.
नामशेष झालेल्या मंदिराचे अवशेष पाहिल्यानंतर आपल्या मनाला अतीव वेदना होतात. आपण खूप भाग्यवान आहोत कि, या इतिहासकालीन पुरातन वास्तूंचा वारसा पूर्वजांनी आपल्याकडे ठेवा म्हणून दिला आहे. अशा या इतिहासकालीन पुरातन वास्तू जपल्या पाहिजेत, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना ह्या पुरातन वास्तूंचा इतिहास समजेल, नाहीतर काळाच्या ओघात हे सर्व त्यांच्या इतिहासासोबतच नामशेष होऊन जाईल.
रोहन गाडेकर
अल्लाउद्दीन हसन शाहला हसन गंगु बहमनी हे नाव का पडले ?*
बहमनी
सल्तनतीचा संस्थापक अल्लाउद्दीन हसन शाह म्हणजेच हसन गंगु बहमनी याला आणि
त्याच्या सल्तनतीला 'बहमनी' हे नाव का पडले याची हकीकत इतिहासकार मुहम्मद
कासीम फिरिश्ता याने आपल्या तारीख-इ फिरिश्ता या फार्सी पुस्तकात दिली आहे.
तारीख-इ फिरिश्ताच्या पहिल्या खंडाच्या पृ. २७३-७४ वर ही हकीकत पुढील
प्रमाणे येते -
*फार्सी पाठ*
हसन
नाम शख्सी ब-दारुल ख़िलाफ़त देहली दर मुलाज़िमत गांगोई बहमन मंजम की नज्द
शहज़ादा मुहम्मद तुग़लक़ शाह क़ुर्ब ओ मंज़लती दाश्त मी बूद व दर कमान फलाकत-इ
रोज़गार मी-गुज़रानीद। रोजी अज़ तंगी मआश बे तंग आमदा अज़ गंगोई दर खबर अस्त
शुग़ूल व ख़िदमति नमूद की ब-आन कियाम निहायद गंगोई यक जफ्त गाव व दो मज़दूर ऊ
रा दादा दर हदाली व हली (?) ज़मीन ख़राबाबाद हवाला नमूद ताआन रा जराअत
नुमायद व ज़मीमा आंची बाद मी-रसद साख़्ता औकात ब-फ़राग़त गुजरानीद। हसन अज़ ग़ायत
इजतरार ओ एहतियाज़ अताअत नमूदा. ब-अम्र जिराअत व कुल्बा रा फय मश्गुल गश्त
नागाह रोज़ी कुल्बा दर ज़मीन न-बरशद. मजदूर हसन रा खबर कर्द. हसन बाद अज़ हफर
आन मौजा कुल्बा रा दर जंज़ीर मी बंद शूदे याफ्त व चूं खूब मुलाहिज कर्द
जंजीर रा दर गर्दन ज़रफी ममलू अज़ अशरफी अलाए व तिलाए गैर मस्कुक दीद अम्मा
बी आन की दस्त-इ खियानती बर इन दराज़ कुनद. आन रा दर चादर मी पेचीदा वक्त-इ
शब ब-खाना-इ गंगोई बहमन बरदा. हकीकत हाल मअरुज़द अस्त.
गंगोई
बहमन बर दियानत व अमानत ऊ आफरीन गोफ्ता आली असबाह इन वाकिया अजुबा रा
ब-अर्ज शाहजादा रसानीद. शाहजादा अज़ कमाल दियानत व अलू हिम्मत हसन तआज्जुब
नमूदा ऊ रा ब-हुजूर खूद तलबीद व वजह व तरज़ ओ खुशी कर्दा ब-मिसामाह बादशाह
घियासुद्दिन तुग़लक शाह रसानीद. बादशाह ऊ रा ब-मर हिम्मत खुसरवाने इख्तीसास
दादा दर रिसाला(?) अमीरान सदा मुन्तज़ीम साख्त.
अलकिस्सा
रोजी गंगोई बहमन ब-हसन गुफ्त की अज़ जांच ताली-इ तू चुनान मी याबम की साहब
इक़बाल बाशी व अज़ ज़ानिब हक़ तआला मौक़ूफ़ व मोयद गरदीदा अनक़रीब बर रजा आला व
असली गरदी पस बा मन अहद व शर्त कुन की अगर बख़शन्दा बी-मनत दौलत अज़ीम ब-तू
अज़ रा मी गोयंद इस्म मरा खबर व इस्म खुद गरदानी ता बया मन नाम तू नाम तीर
सिफ़त बकवाद व अम पंदीद व दफ़तर खुद रा मन व औलाद-इ मन रुजू नुमाई। हसन कबुल
इनमोअय्यानी करदा। हनुज़ ब-दौलतज़ादा बूद की इस्म ऊ रा खबर व नकश नगीन खुद
गरदानिदा 'हसन गंगु बहमनी' मशहूर गरदीद।
*मराठी भाषांतर*
हसन
नावाचा एक माणूस दिल्ली येथे ज्योतिषी असलेल्या एका गंगोई ब्राह्मणाकडे
नोकरी करीत असे. हा गंगोई ब्राह्मण शाहजादा मुहम्मद तुघलक याचा निकटवर्ती व
उच्चपदस्थ होता. दैव प्रतिकूल असल्यामुळे हसन या गंगोई ब्राह्मणाकडे नोकरी
करून आपले पोट भरीत असे. हसनच्या बेरोजगारीबद्दल जाणून असलेल्या गंगोई
ब्राह्मणाने हसनला एक जोडी बैल आणि दोन मजूर सोबतीला देऊन, एक वैराण जमीन
कसायला दिली. हसन गरजवंत असल्याने त्याने हे
कष्टाचे
काम स्वीकारले आणि ही जमीन तो कसू लागला. एके दिवशी जमीन नांगरत असताना
अचानक त्याचा नांगर जमिनीत अडकला व तो काही केल्या वर येईना. हसनच्या
मजुरांनी हसनला या बद्दल सांगितले तेव्हा हसनने त्या ठिकाणी खोदले तेव्हा
त्याला दिसले की नांगर एका साखळीमध्ये अडकला आहे. त्याचे बारकाईने परीक्षण
केल्यावर त्याला दिसले की नांगरात अडकलेल्या त्या साखळीचे एक टोक एका
भांड्याला अडकवलेले होते व ते भांडे दुसऱ्याच कोणत्यातरी राजवटीच्या
सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरलेले होते. (जंजीर रा दर गर्दन ज़रफी ममलू अज़
अशरफी अलाए व तिलाए गैर मस्कुक दीद ) हे एवढे द्रव्य पाहून देखील हसनच्या
मनात ते द्रव्य घ्यावे असा वाईट विचार आला नाही. त्याने ते द्रव्य एका
चादरीमध्ये बांधले व ती चादर घेऊन तो संध्याकाळच्या वेळी त्या गंगोई
ब्राह्मणाच्या घरी आला व त्याला घडलेली हकीकत सांगितली.
हसनच्या
प्रामाणिक पणाची त्या गंगोई ब्राह्मणाने खूप तारीफ केली ( बर दियानत व
अमानत ऊ आफरीन गोफ्ता ) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ही विलक्षण हकीकत
शाहजादा मुहम्मद तुघलक याला सांगितली. शाहजादा मुहम्मद तुघलक याला हसनच्या
या असामान्य प्रामाणिकतेचे आश्चर्य वाटले व त्याने स्वतः ही हकीकत आपले
वडील व बादशाह घियासुद्दीन तुघलक यांच्या कानावर घातली. बादशाहने
प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून हसनवर शाही कृपा करून त्याला घोडदळच्या शंभर
सैनिकांवर प्रमुख म्हणून नेमले.
सारांश
असा की त्या गंगोई ब्राह्मणाने हसनला सांगितले की , "मी तुझ्या
जन्मकुंडलीचा अभ्यास केला आहे आणि मला त्यातून समजले आहे की तुझ्या नशिबाने
तुला लवकरच राजासारखे उच्चपद प्राप्त होणार आहे. परंतु तू मला एक वचन
दिले पाहिजेस, ते असे की देवाच्या कृपेने जर तुला अपरंपार द्रव्य आणि
अधिकार प्राप्त झाले तर तू तुझ्या नावामध्ये माझे नाव घालून त्या नावानेच
लोकांना आपली ओळख सांगितली पाहिजेस ! आणि तुझ्या कचेरीत माझी आणि माझ्या
वंशजांची पंडीत म्हणून नियुक्ती केली पाहिजेस. हसनने गंगोई ब्राह्मणाचे हे
म्हणणे कोणत्याही अटी शिवाय मान्य केले आणि पुढे जेव्हा त्याला राज्य
प्राप्त झाले तेव्हा त्याने आपले नाव आपल्या राज्यव्यवहारात व आपल्या
मुद्रेमध्ये 'हसन गंगु बहमनी' असे प्रसिद्ध केले !
पुढे
पृ. क्रमांक २८१-८२ वर फिरिश्ता लिहितो की, "हसन गंगु बहमनी हा इराण
मधील प्राचीन बहमन वंशाचा होता असे म्हटले जाते, मी अहमदनगर येथील
ग्रंथालयात त्याची एक वंशावळ पाहिली व त्यावरून ती वंशावळ त्याला राज्यपद
प्राप्त झाल्यानंतर खुशमस्कऱ्यांनी व कवींनी मुद्दाम तयार करून घेतली असावी
असे वाटते. हसनचे एकंदर पूर्वायुष्य पाहता त्याच्या पुर्वजांचा पत्ता
लागणे दुरापास्त आहे असेच वाटते. 'बहमनी' हे त्याचे नाव त्याला त्याचा मालक
असलेल्या ब्राह्मणाकडूनच मिळाले आहे यात शंका नाही."
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे
पाटण
ता शिंदखेडा जि धुळे येथील चालुक्य सोलंकी कालीन निर्मिती असलेल्या
अशापुरा माता मंदिरांवर सदर शिलालेख कोरलेला आहे. याचे मराठी भाषांतर
जाणकारांनी करावे ही विनंती
Built by Rani Chennabhairadevi under the Vijayanagara Empire. A longest ruling queen in Indian history for a period of 54 years.
#karnataka #uttarkannada #kannada #goa #mumbai #costal #tulu #mangalore #india




























No comments:
Post a Comment