कातर खटाव येथील कात्रेश्वर मंदिर
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कातर खटाव गाव आहे. गावाच्या बाहेर उत्तरेस कातरेश्वर मंदिरा आहे. या मंदीरासंदर्भात एक दंतकथा सांगितली जाते, ती अशी, खटाव तालुक्यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले.
या कातरखटाव गावात एक प्राचीन कात्रेश्वर मंदीर आहे. एका वाड्याला असावा अश्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात आपण प्रवेश करतो. मुळात या मंदिराभोवती सीमा भिंत होती. मंदिरासमोर पुष्करणी आहे. मंदिराच्या आवारात अनेक वीरगळ आणि शिवलिंग आणून टाकलेले आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे.एका वाड्याला असावा अश्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात आपण प्रवेश करतो. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. याचा तलविन्यास पंचरथ आहे. मंदिराचा विण्यास व स्थापत्य खटाव येथील नागनाथ मंदिराप्रमाणे आहे. मात्र येथील स्तंभ अधिक संस्कारित आहेत.
विमान आणि मंडप या दोघांचाही तलविण्यास पंचरथ आहे. विमानावरील प्रत्येक भद्राला दोन जादा नंदिका आहेत. प्रत्येक भद्रावर देवकोष्ट असून देवकोष्टांवर वेसर प्रकारचे शिखर आहे. देवकोष्ठांमध्ये सध्या असलेल्या मूर्ती चुन्याच्या आहेत. त्यामुळे ह्या मूर्ती नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मंदिराचे विटांनी बांधलेले मूळ छप्पर कोसळले आणि त्याची दुरुस्ती झाली तेव्हा बसविलेल्या असाव्यात हे उघड आहे. मूर्तिशास्त्र दृष्ट्या या मूर्ती विविध प्रकारच्या आणि विशिष्ट संप्रदायाच्या शिव आणि वैष्णव आहेत. विमान आणि मंडप यांच्यावरील सध्या असलेले छप्पर मध्ययुगीन काळात कधीतरी बांधण्यात आले आहे. पण विमानाच्या दक्षिणेकडील जंघेच्या खालच्या भागात जे शूरसेनक शिल्लक आहे त्यावरून मंदिराचे मूळ शिखर भूमिज असावे असा अंदाज बांधता येतो. शूरसेनकाचा आतील भागात अर्ध उठावात वेसर शिखराची बाह्य रेषा दाखवली आहे. हे सर्व काम विटांनी केलेले असून त्यावर चुन्याचा गिलावा आहे. या मंदिराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे वेदिकेतच सामावलेले स्तंभ आणि अर्धस्तंभ. वेदिकेवर बहुधा वामनस्तंभ असतात पण इथे मात्र कक्षासनाच्या पाठ टेकण्याच्या भागांमध्ये पूर्ण स्तंभ आहेत.बाहेरून पाहिल्यास या स्तंभांचा खालचा अर्धा भाग झाकलेला दिसतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस वेदिकेवरील कक्षासन भागावर प्रतिहार आहेत. राजसेनाच्या थरावर मिथुन शिल्पांचा पट्टा आहे. खुद्द वेदिका भागावर आधीच्या काळातील मंदिरांवर आढळतात तसे कुटस्तंभ नाहीत तर फक्त स्तंभच आहेत. त्याचप्रमाणे दोन स्तंभाच्या मधील भागात सुरसुंदरी दाखवण्याऐवजी फक्त चौकट नक्षी दाखवली आहे.

मंदिराच्या बाह्य भागावर म्हणजे मंडोवरावर कसलेही शिल्पांकन नाही. मात्र मंडोवराच्या उत्तर, दक्षिण व पश्चिम बाजूस प्रत्येकी एकेक देवकोष्ट ठेवले आहे. त्यापैकी एका देवकोष्ठात उमामहेश्वरची मूर्ती आहे. मंदिरावर विटात बांधलेले शिखर आहे. आज ते अवशेष रुपात शिल्लक आहे. विमानाच्या वर पूर्व भागात मूळ विटातील शिखराचा अंगभाग शिल्लक आहे. यावर शूरसेनक असून वेसर शिखराच्या प्रतिकृती दाखविल्या आहेत. यावर लता असावी. यावरून असे म्हणता येईल की या मंदिरावर भूमीत शिखर असावे. मूळ शिखर ढासल्यावर अठराव्या शतकात या भागाची दुरुस्ती झाल्याचे दिसते.
खुद्द मंडपात बाजूच्या आणि मागच्या भिंतीत एकूण चार देवकोष्ट आहेत. त्यातील बाजूच्या भिंतीतील एक देवकोष्ट इतर देवकोष्ठांपेक्षा आकाराने मोठे असून त्यात खटाव येथील नागेश्वर मंदिराप्रमाणे सप्तमातृकांचा शिल्पपट आहे. या शिलापट्टात गणेश आणि भैरवाचाही समावेश आहे. इतर देव कोष्टांपैकी दोन देवकोष्टांमध्ये गणेश आणि उमा महेश्वर मूर्ती आहेत. सर्व देवकोष्ठांवर वेसर शिखरे आहेत. मंडपास मधोमध अंक असून त्यावरील चतुष्कीवर क्षिप्तोक्षिप्त प्रकारचे घुमटाकार छत पेललेले आहे. या छतात अष्टबिंदू तारकाकृती तीन थर असून वरून व मधून खाली आलेले कमळ दाखविले आहे.
अंतराळाच्या (२.४५ × २.१५ मीटर) प्रवेशद्वारालालगत दोन पूर्ण स्तंभ आहेत. याच्या उत्तर व दक्षिण भिंतीत प्रत्येकी एक देवकोष्ट आहे. मंदिराचा सभामंडप (५.८० × ५.८० मीटर) हा सोळा स्तंभांवर उभा आहे. त्यापैकी चार पूर्ण स्तंभ असून त्यामध्ये रंग शिळा आहे. यावर विविध प्रकारची भौमितिक नक्षी कोरली आहे. स्तंभमध्यावर हंसयुगुल, कमलपुष्प, मोर व शृंखला दाखविल्या आहेत. स्तंभपादावर योग्यांची व शिरावटीवर नागबंधाची नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंतीस चार देवकोष्टे असून त्यामध्ये अनुक्रमे सप्तमातृकापट, महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर व गणेश मूर्ती आहे. सभामंडपास कक्षासण असून वेदिका स्तंभाच्या वर मिथुनशिल्प दाखविले आहे. वेदिकेच्या भागावर उभट चतुर्दलपुष्प नक्षी आहे. वेदिका भागावर देवनागरी लिपीतील दोन ओळींचा शिलालेख आहे. मंदिराचे वितान क्षिप्त-उत्क्षिप्त पद्धतीचे आहे. सभामंडपात असलेल्या रंग शिळेवर मात्र वर्तुळाकार करोटक पद्धतीचे वितान आहे.

अंतराळाच्या बाजूच्या दोन्ही भिंतीत प्रत्येकी एक देवकोष्ट आहे.मंदिराचा विन्यास व स्थापत्य खटाव येथील नागनाथ मंदिराप्रमाणे आहे. मात्र येथील स्तंभ अधिक संस्कारित आहेत. गर्भगृह ( २.४५ × २.४५ मीटर) चार अर्धस्तंभावर उभे असून त्यात शिवपिंड आहे. गर्भगृहाचे द्वार चतु:शाखा पद्धतीचे असून त्याची स्तंभ शाखा अगदी ठळक आणि नजरेत भरणारी आहे. द्वारे शाखांवर खालच्या भागात प्रतिहारांच्या मूर्ती नाहीत की उंबर्यावर कीर्तीमुख नाही. ललाट बिंबावर गणेश आहे आणि उत्तरांगावर वेसर शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींच्या मधील भागात केश उठावात व्याल दाखविले आहेत.

मंदिरासमोर चौरस आकाराची एक बारव बांधलेली आहे. ती पुर्णपणे ढासळलेली आहे. मंदिराच्या पुढे असलेल्या मूर्तीशिल्पांपैकी नंदीची मूर्ती उल्लेखनीय आहे. या नंदीवर हे एक बालक नैवेद्याची टोपली ठेवून असल्याचे दाखवले आहे. मंदिराच्या समोर काही वीरगळ आहेत. मंदिराची उत्तर भिंत पडण्याच्या अवस्थेत आहे, त्या बाजूस मातीचा ढिगारा टाकला आहे.
कात्रेश्वरातील कन्नड शिलालेख
कातरखटाव येथील कात्रेश्वराची रचना देखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे. हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणाºया विरगळी, नंद, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघड्यावर विखरून पडल्या आहेत.

सोमेश्वर मंदीर गुरसाळे -
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.वडूज-कराड मार्गापासून ५ किलोमीटर अंतरावर हे गुरसाळे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी. त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी असे मानतात. महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.
सोमेश्वर मंदीर गुरसाळे -
गुरसाळे गावी हे मंदिर आहे सदर मंदिर पंचभुम भूमीज प्रसाद असून मुख्य मंडप मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. मंदिराचे बाह्यंग पूर्णपणे साधे सपाट आहे त्यावरील थरही सपाट पट्ट्यांच्या स्वरूपात आहेत. ह्या पट्ट्यांच्या निर्गमामुळेच एरवी सपाट असणाऱ्या बाह्यांगाला काहीशी कलात्मकता प्राप्त झाली आहे. मुखमंडपावर आणि मंडपावर साधी फासना शिखरे आहेत. या अगदीच साध्या सपाट मंदिराला काहीसा अलंकारिक भाग म्हणजे शुकनास आणि गर्भगृहावरील भूमीज शिखर होत. शिखरावर चार मुख्य दिशांना चार लता आहेत. या चार लतांच्या तळाशी प्रत्येकी लतेवर एका ऐवजी एक अशी दोन शूरसेनके आहेत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अमलसाराच्या खाली आणि शिखराच्याच पाचव्या भूमीच्या कुठ स्तंभाच्या वर ओळीने अंग येतात. या अंगाच्या वरच्या बाजूस आमलकाच्या कंगोर्याना सुरुवात होते.
या मंदिराचे साधे सपाट बाह्यांग, शिल्प ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे व्यवच्छेदकपणे ओळखता येतील अशा थरांचा अभाव यावरून हे मंदिर १४ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले असावे.
मंदीराचा हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी एक पुष्करणी किंवा बारव आहे.
माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेश महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.
जलसाठे करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर ११ व्या आणि १३ व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली.
बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर काय होईल?
पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलदान आणि जलसंरक्षण हे पुण्य कार्य आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ज्या बारवांनी आपली तहान भागवली त्या बारवांकडेच आपण दुर्लक्ष केले. बारवांची निगा राखण्यासाठी आपण निधी नाही म्हणतो आणि दुष्काळात २० रुपये लिटरने पाणी विकत घेण्यास मात्र आपण तयार होतो. आपण आजवर ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची आता वेळ आली आहे. बारवांचे स्थापत्य सौंदर्य न्याहाळात त्यातील स्वच्छ पाणी औंजळीने पिण्याचे स्वप्न पूर्ण करूया. लोकसहभाग आणि जलसंवर्धनासाठी दान देत अखंड महाराष्ट्रात बारव संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात केली जावी. या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलय. नुकतीच या बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते. हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच..
गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :-
गुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.
जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताºयातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

फासनाकार शिखरे मंदिराच्या विमानावर नसून मंडपावर किंवा अर्धमंडपावर आढळतात. यावरूनच हा शिखर प्रकार भव्य आणि सौंदर्य संपन्न शिखरासाठी अस्तित्वात आला नाही हे स्पष्ट होते. मंदिर संकुलातील दुय्यम मंदिरांवर विशेषतः एका ओळीत असलेल्या मंदिरांवर आढळणारी फासनाकार शिखरे वरील निष्कर्ष पक्का करतात. फासना शिखरांना दिले जाणारे दुय्यम महत्त्व हेही समाधी मंदिरांकरता होणाऱ्या या शिखराच्या वापराचे प्रमुख कारण असू शकेल. गुरसाळे ( ता.-खटाव जिल्हा सातारा ) येथील मंदिर या दोन मंदिरांच्या मंडपावर आणि मुख मंडपावर फासनाकार शिखरे आहेत. आधीच नमूद केलेल्या कारणामुळे मुळ शिखर फासनाकार असलेली मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत.

No comments:
Post a Comment