ऑपरेशन ट्रायडंटल
अलीकडून "संसार" एवढेच उत्तर दिले गेले.
अपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब
भाऊबंदकी आम्हाला कधी सुटली नाही, आणि या गोष्टीला इतिहास देखील आहे, ही गोष्ट वेगळी, पण तरीही स्वातंत्रतेचा बाणा मनाशी बाळगून असणाऱ्यांनी कधीही या गोष्टीचा तसूभरही आपल्या ध्येयावर प्रभाव पडून दिला नाही ही देखील महत्वाची बाब.
कंपनी सरकारची कोल्हापूर राज्याच्या कारभारातील अवाजवजी लुडबुड आता सहन होण्यासारखी नव्हती, पण पर्याय नव्हता, आपल्या बंधूचे कंपनी सरकारकडे कललेले मत चिमासाहेबांना डाचत असे आणि या गोष्टी त्यांनी उघड उघड बोलूनही दाखवल्या होत्या. त्यामुळे दोन भावंडांमध्ये असणाऱ्या या वैचारिक भिन्नातेतून ते दोन्ही ध्रुव एकमेकांपासून दुरावू लागले. चिमासाहेबांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आवाजावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, पण "हातावर तुरी देणे" हा वाक्प्रचारचं जणू या घराण्याने मराठी भाषेला दिला असावा अशीच करामत घडत असत. इंग्रजी रेसिडेंटला - त्यांच्या बंधूंना अपयश येत असे. हे वारे काहीतरी वेगळ्या दिशेने वाहणारे आहे,या गोष्टीची मात्र त्यांना निश्चित कल्पना आली होती.
चिमासाहेब शूर, सशक्त, व देखणे, त्यात त्यांना जात्याचा शिकारीचा नाद, भालाफेक देखील अचूकच असे. शिकारीमुळे बरीच रानं - वनं तुडविल्यामुळे करवीर नगराचा संपूर्ण भूगोल त्यांना माहिती होता.
"चिमासाहेबांची वागणूक स्वैर, ते नेहमी स्वच्छंदीपणाने वागतात. शिकारीचा छंद अनिवार आहे, कंपनी सरकारविरुद्ध सतत टीका करीत असतात. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, अशी तक्रार थोरल्या युवराजांच्या मातोश्री ताराबाई यांच्याकडे होत." यावर उपाय म्हणून चिमासाहेबांचे लग्न करण्याचे पक्के झाले, व नेसरीकर शिंदे - नरसिंगराव यांच्या कन्येशी चिमासाहेब यांचा विवाहसोहळा पार पडला. हा काळ १८४७चा होता. पण उरात एकदा क्रांतीची मशाल पेटलेली असता, तिला कुठलीच गोष्ट शमवू शकत नाही ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही.
याचवेळी सामानगडाच्या गडकऱ्यांच्या उठावात असणाऱ्या रामसिंगनामक राजपूत व्यक्तीशी चिमासाहेबांचा सबंध आला, अज्ञानवासात असताना रामसिंग याने नेसारीकर शिंद्यांकडेच काही दिवस काढले होते, हे लागेबांधे वेगळेच. हा रामसिंग मुळात इंग्रजद्वेष्टा त्यामुळे रामसिंगाचे भेटणे म्हणजे चिमासाहेबांच्या मनात असणाऱ्या क्रांतीला उत्तेजन मिळण्यासारखेच ठरले. आणि तश्या गुप्त हालचाली सुरु झाल्या. यावेळी इंग्रजांशी सुत जुळलेले असलेल्या नाना आत्माराम यांची चिमासाहेबांचा शिक्षक म्हणून वर्णी लागली,आणि चिमासाहेबांच्या विरोधात कटकारस्थानाला वाड्यातच जोर चढला, राहत्या वाड्यातही चिमासाहेबांच्या आसपास हेर फिरू लागले. यातचं बेळगावहून चिमासाहेबांना अटक करण्याचे फर्मान असलेला लखोटा स्वतः त्यांच्याच हाती पडला आणि मग उघड उघड बंडालाच सुरवात झाली.
इंग्रज रेसिडेंटने छत्रपतींचे निष्ठावान म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वांना निरोपाचे विडे देत, त्याजागी आपली माणसे पेरली होती, आता तिथे उघडउघड पुन्हा आपल्या जुन्याजाणत्या लोकांना जवळ करण्याचे सत्र सुरु झाले, एवढं सगळं झाल्यावर कंपनीसरकार स्वस्थ बसणार नाही आणि म्हणूनच त्या दिशेने ठोस पावलं उचलावी लागणार हे जाणून युवराज व त्यांच्या शिबंदीने वाड्याबाहेर तंबू ठोकले व लष्करभरती सुरु झाली. आणि दहा - बारा हजार लष्कर जमा देखील झाले. जुन्या जाणत्या लोक - सरदारांकडून आर्थिक स्वरूपाच्या सहाय्याची जमवाजमव झाली. हिंदुस्थानशी संपर्कात राहून ५७ साली उठणाऱ्या बंडात आपणही कारकीर्द गाजविण्याचे चीमासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसह नक्की केले होते.
इंग्रजांनी कोल्हापूरमध्ये ठेवलेल्या सत्ताविसाव्या नेटिव्ह इंफंट्रीतील २०० सैनिकांनी रामजी शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले. ३१ जुलै रोजी त्यांनी सरकारी खजिना लुटत एल्गार केला. पराक्रमाची शर्थ करत प्रत्येकजण लढला पण म्हणावे ऐसे यश संपादित जाहले नाही आणि कोल्हापूरचा आवाज दाबण्यात आला. या उठवाची पाळमुळे खोदून काढण्यासाठी आलेल्या मेजर जनरल जेकबने धरपकडीचा सपाटाच लावला होता, लोकांना तोफेच्या तोंडी द्या, रस्त्यात गोळ्या घाला असे नानाविध प्रकार करून लोकांवर दहशत बसविण्यात येत होती पण याही अवस्थेत पुन्हा एकदा बंड घडले आणि ते देखील इंग्रजांनी तात्काळ हाणून पाडले. यावेळी चीमासाहेबांच्या हालचालींचा वेग इंग्रज रेसिडेंटला कळत होता, आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी इथून पुढे चीमासाहेबांवर बंदिवास चालू झाला. संपूर्ण वाद्याला असेलेले इंग्रजांचे वेढे यावेळी कुणी भेदू शकले नाहीत. ५ डिसेंबर १८५७पासून नजरकैदेत असलेल्या चीमासाहेबांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सरकारचे जंग जंग पछाडणे सुरुच होते. ही चौकशी मार्च १८५८ रोजी जाऊन थांबली.
३१ मार्च १८५८ रोजी पोलीटिकल सुपरिटेंडंट याने सायंकाळी चिमासाहेब यांना वरिष्ठांचा हुकुम देण्यासाठी बोलावले असा निरोप पाठवला व ताबडतोब रेसिडेन्सीत येण्याचा हुकुम केला. चीमासाहेब रेसिडेन्सीत गेल्यावर त्यांची अंगावरील राजवस्त्रे काढून घेऊन साधा पोशाख देण्यात आला. व तिथेच तयार असलेल्या मेण्यात बसवून ऐनमध्य रात्री मेणा राधानगरी, फोंडा मार्गे वाघोटणे बंदरात न्हेण्यात आला. तेथून चीमासाहेबांची रवानगी कराचीला करण्यात आली.
"शाहू" हे नाव असलेले हिंदुपती शाहू यांच्यानंतर भोसले कुळात हे नाव दुसऱ्यांदा आलं ते म्हणजे चीमासाहेब महाराज यांना. आणि या नावाचा लौकिक तिथून पुढल्या पिढीतही तसाच सुरु राहिला हे विशेष.
#क्रांतीपर्व
#आम्हीच_ते_वेडे
(सन्माननीय खासदार युवराज संभाजी राजांनी, आपल्या स्तरावर काहीतरी तजवीज करून पाकिस्तानमधील (जर अद्याप अस्तित्वात असेल तर) चीमासाहेबांचे समाधीस्थळ आम्हा हौश्या - नौश्यांसमोर आणलं तर ती इतिहासासाठी खूप मोठी देण ठरेल. कुणीतरी आमची विनंती महाराजसाहेबां पर्यंत पोहचवावी _/'\_ )
© अभिषेक कुंभार
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
इतिहासकर्ते
या
देशात फार कमी ठिकाणं अशी आहेत जिथे मराठयांचं रक्त सांडले नाही मग ते १६
व्या शतकातील मराठे असोत वा इंग्रजांच्या जुलमी राजवटीतील क्रांतिकारक असोत
वा आजच्या घडीला देखील देशाच्या रक्षणासाठी खडे ठाकलेले आमचे जवान असोत
एकप्रकारे या मुलखाची, देशाची रक्षण करण्याची जवाबदारी हि मराठ्यांवरचं
येऊन पडलेली. अखंड लढत-झुंजत राहणाऱ्या मराठ्यांच्या तलवारीचे खणखणीत आवाज
पार दिल्लीश्वराच्या कानी आदळले आणि ज्या तख्ताविरुद्ध मराठे लढत होते
त्याचं तख्ताच्या रक्षणासाठीची जवाबदारी यांच्या खांद्यावर येऊन पडली. हा काळ होता १७६४ सर्वत्र धुमाकूळ, सत्ता गाजवत मराठे सारा हिंदोस्ता हाकत होते. गुजरातचा विचार करता, गुजरातच्या राजकीय सत्ता या सतत बदली होत राहिल्या, तसेच एकाच वेळेस मराठे, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींच्या सत्ता होत्या. मराठ्यांमध्येही पेशवे, गायकवाड, शिंदे इत्यादींची सत्ता गुजरातवर होते. तसेच काही भाग हा स्वतंत्र संस्थानिकांकडे होता. यापैकी काही संस्थाने मांडलिक तर काही स्वतंत्र होती, त्यामुळे राजकीय परिस्थिती थोडी अस्थिर व कायम लढाई राहिली, अशावेळी कायमस्वरुपी सैन्य, तोफखाना इत्यादींची गरज गुजरातमध्ये होती.
त्यामुळे गुजरातमधील मोठ्या शहरांत व जी शहरे लष्करीदृष्ट्या महत्वाची आहेत. तिथे तोफखाना होता व त्याचे स्वतंत्र प्रशासन होते. सुभेदार किंवा कमविसदार हे या तोफखान्यावर लक्ष ठेवून असत. अहमदाबाद, सुरत, बिरमगाव इत्यादी ठिकाणी तोफखाना असल्याचे उल्लेख मिळतात. त्या त्या ठिकाणच्या ताळेबंदात तोफखान्याकडील कर्मचाऱ्यांचा पगार, तोफांची मरम्मतदारुगोळा शिसे वगैरेचा खर्च नोंदविलेला दिसतो.
तोफ ओतण्याचे कामही गुजरातमध्ये केले जात होते. दमाजी गायकवाड यांनी गोविंदराव गायकवाड यांना ४ सप्टेंबर १७६४ रोजी लिहिलेल्या पत्रात इंग्रजी लोखंड खरेदीची आज्ञा केली होतो ती अशी
"तोफखाण्याबद्दल इंगरेजी लोखंडी मण - १ - पाच मण पक्के चांगला माल पाहून सरकार निरखे किफायतशीर खरेदी करून जलदीने हुजूर पाठविणे"
वांदीवॉशला मुघलांची दाणादान
इतिहासकार भीमसेन सक्सेना यावेळी हजर होता त्याने लिहलेला प्रसंगातून हे कळते कि
जुल्फिकार खान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले चढविले, मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. मोगली सैन्याची अशीकाही दाणादाण उडाली होती कि तिथे असणार्या भाताच्या शेतीत मोगली उंट, बैलगाड्या, हत्ती रुतून बसले चिखलातून मार्ग काढत उरल्यासुरल्या सैन्याने जीव वाचवून पळ काढला
उंबरखिंड
बरेच मोठे सैन्य घेऊन कारतालाबखान लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने पुढे सरकू लागला. वाट मोठी बिकट निरुंद गहन अरण्य ओलांडून पुन्हा सह्याद्रीची बिकट चढण चढून उतरायची व मग उंबरखिंडीतून खाली उतरायचे होते. इकडे कारतलबखानाच्या सर्व बातम्या महाराजांपातूर पोचतच हुत्या. राजांनी उंबरखिंडीच्या झाडीत सैन्य दाबून ठेवले.
मोठी चढण चढून उतरून खानाचे सैन्य खिंडीत उतरले आणि रणभेरी निनादू लागल्या शत्रूने घेरल्याचे एव्हाना खानास समजले होते. बाणांचा बंदुकांचा मारा परस्परांवर होऊ लागला. प्रारंभी अमरसिंहाने व मित्रसेनाने मराठ्यांना चांगलेच तोंड दिले. रानोरान पळत सुटलेल्या आपल्या सैन्याला मित्रसेन घाबरू नका, स्थिर राहा असा धीर देत होता. पण एक गोष्ट होती कि कोंडीत सापडून सुधा कारतालाब खान युद्धावेश सोडत नव्हताचं, पण मराठ्यांच्या माऱ्यापुढे आता मात्र मोघलांची मात्र चालेन तेव्हा रायबाघन खानकडे आली. आणि तिने कारतालाबखानाला युद्धाची भाषा सोडून शरणागतीचे बोलणे करण्याचा सल्ला दिला.
उशिरा का होईना पण कारतालाब खानास शहाणपणा सुचला आणि ३ फेब्रुवारी १६६१ रोजी युद्धविराम झाला अर्थात त्यासाठी मोठी खंडणी खानास मोजावी लागलीचं
फोटो - नेट साभार
छत्रपती राजाराम महाराज भोसले द्वितीय
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात देशात, महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या परंतु इंग्रज अधिपत्याखाली असणाऱ्या जनतेमध्ये असणारा असंतोष आणि स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड यामध्ये काही गोष्टी, काही व्यक्ती, काही इतिहास हा समाजापुढे आलाच नाही. आणि त्यामुळे आज एकविसाव्या शतकात जगताना पुराव्याअभावी अशा घटना, वास्तू वा व्यक्ती यांविषयी जास्त काही माहिती मिळतचं नाही. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणायला गेले तर छत्रपती राजाराम महाराज द्वितीय.
लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव.
३१ जुलै १८९७ च्या हा द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस, वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे राधानगरी धरणाचे बांधकाम सुरु केले होते, ते बांधकाम शाहूराजांच्या पश्चात पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले. आजही सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू शाहू राजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे, राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले.
१८व्या शतकात हे राजे होऊन गेले परंतु त्यांनी जे कोल्हापूर वसविले उभारले ते आपण आजही पाहू शकतो. दसऱ्याच्या सणाला सोने लुटायचा कार्यक्रम होतो म्हणून दसरा चौक अशी ओळख मिळालेल्या चौकात असणारा राजर्षी शाहूंचा पुतळा हा राजाराम महाराज यांनीच बसविला, सध्या जिल्हास्तरीय खटले जिथे चालतात त्या सध्याची जिल्हा न्यायालयाची इमारत ही देखील राजाराम महाराजांचीच देण, जग जवळ यावे म्हणून कोल्हापूरात विमानतळ निर्माण करणारे देखील राजाराम महाराजचं होय..........
कर्तुत्वाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.........
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
राणोजी शिंदे
१७२७-२८ पासून राणोजी शिंदेचा कार्यकाळ सुरु होतो. माळवा प्रांतातून, चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक होती. माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला त्यात उदाजी पवार, मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे देखील आपल्या पथकासोबत उपस्थित होते.
१७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले. जुलै १७३६ च्या दरम्यान महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे राणोजी शिंदे यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व विशेष खुलून दिसते. असे हे राणोजी शिंदे १७३५ ते १७४५ मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत सतत आघाडीवरचं होते.
जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवरुन चाललेल्या वारसाहक्कात राणोजी शिंदे यांना ईश्वरसिंहाने विशेष पत्र लिहून मदतीस बोलाविले यावरून त्यांचे त्याकाळचा दरारा देखील लक्षात येतो. या केलेल्या मदतीखातर ६६ लाख रुपये राणोजी शिंदेंना मिळाले
छत्रपती शाहू राजांच्या पदरी असणाऱ्या अशा या रणमर्द सेनानायकाचा १९ जुलै १७४५ रोजी मध्य प्रदेशातील शुजालापूर या ठिकाणी स्वर्गवास झाला.
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.....!
बारगीर
'Captain Fitzgerald' या इंग्रज अधिकाऱ्याने बेरर (सध्याचा मराठवाड्यातील काही भाग) या भागात सह्हायक आयुक्त असताना काही माहिती गोळा केली त्यात असे म्हटले आहे कि. " हटकर असे म्हणतात कि जेव्हा दिल्लीच्या बादशहातर्फे निजामाला दक्खनचा सुभेदार म्हणून नेमले गेले त्याच काळात आम्ही इथे आले आहोत, सर्व हटकर हे मेंढपाळ (धनगर) ,भाला घेऊन मेंढपाळ करणारे आहेत. हटकर असे म्हणतात कि, ते जेव्हा कधी कुठल्या मोहिमेसाठी बाहेर निघतात तेव्हा फक्त सात हात लांब घोंगडी आणि भाला, बर्ची घेऊनच. त्यामुळेच कदाचित त्यांना बारगीर म्हटले जात असावे. हटकर यांचा स्वभाव हट्टी आणि भांडखोर आहे असे म्हटले जाते." उडिया आणि बंगाली या भाषिक लोकांनी तिथल्या भाषेत आपली लहान मुले झोपावीत म्हणून काही अंगी गीते तयार केली आहे त्यातील हि प्रसिध्द कडवी. "छेले घुमलो पारा जुरालो बर्गी एलो देशे बुल्बुलीते धन खेयेच्छे खंजा डेबो किसे ?" याचा मराठी अर्थ- मुलांनो शांत झोपा बारगीर आपल्या जमिनीवर (शेतात) आलेले आहेत. आणि पक्षी पण आपल धन खाऊन जातील. मग आपण आपले जमिनीचे कर (पैसे) कसे भरणार ?
आभार - सुमित लोखंडे.
दुसरा राज्याभिषेक
अजून रायगडाच्या महादरवाज्या वरील तोरणं काढली सुद्धा नव्हती तोच. मातोश्री जिजाऊसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. गडावर सुतककाळ येऊन पडला, तरी कर्तव्यपारायण राजे स्वराज्याची चिंता सदैव हाकत होते. सुतकातच त्यांनी अधिकाऱ्यांसाठी कानुजाबता तयार केला. कवी भूषणचा शिवराज-भूषण ग्रंथही लिहून बाळाजी आवाजी चिटणीस याजकडे दाभोळ वगैरे गावांच्या खोतीसुद्धा मोकासा दिल्याचे व त्या कामावर हुसेन याकुब दळवी याला ठेवल्याचे कळवून त्याचेकडून काम घेण्याची आज्ञा केली.
राज्याभिषेकाला प्रचंड खर्च झाला होता. आता राजे तो भरून काढण्याच्या मागे लागले तेही याचकाळात बऱ्याच मोहिमा काढण्यात आल्या त्याचपैकी एक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आण्णाजीपंतांना महाराजांनी फोंड्यावर अचानक छापा घालण्यासाठी रवाना केले. अण्णाजीपंत त्याप्रमाणे कुडाळपर्यंत आले. पण महमदखानाला ही बातमी कळली व तो सावध राहिला. त्यामुळे आण्णाजीपंतांना डाव साधता आला नाही. त्यांना अपयश आले.
जिजाऊ साहेबांच्या मृत्यूमुळे आधीच रायगडावर अपशकुनाची भावना बळावत चाललेली होती. त्यातच प्रतापगडावरील घोड्याच्या पागेला आग लागून महाराजांचे मौल्यवान घोडे जळाले. एक हत्तीही जळून मेला. आणखीही काही दुष्चीन्हे राजवाड्यात अनुभवास आली असे निश्चलपुरी म्हणतात. यानंतर महाराजांनी निश्चलपुरीची भेट घेऊन तांत्रिक पद्धतीने पुन्हा राज्याभिषेक करवून घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार सुदिन, सुलग्न, सुमुहूर्त पाहून निश्चलपुरीने काही जापक मंत्रानुष्ठानास बसविले. त्यांची आसने व वस्त्रे रक्तवर्णी होते. चतुःषष्ठीतंत्राधारे सिद्धारीचक्र सिद्ध करून निश्चलपुरीने महाराजांना सांगितले की, पंधराव्या दिवशी शत्रू हस्तगत होईल. त्याप्रमाणे प्रचीती आली व तुकोराम हस्तगत झाला असे निश्चलपुरी सांगतात.
हा तुकोराम म्हणजे प्रभावळीचा सुभेदारचं असावा डी. ८ सप्टेंबर १६७४ च्या एका पत्रावरून तुकोराम हा राजांशी निष्ठेने वागत नव्हता असे लक्षात येते.
निश्चलपुरीच्या कथनानुसार, तुकोराम हस्तगत झाल्यामुळे निश्चलपुरीच्या मंत्रशक्तीवर राजांचा विश्वास बसला. त्यांनी आपल्या पुरोहितांजवळ निश्चलपुरीकडून मंत्रोपदेश आणि तांत्रिक राज्याभिषेक करून घेण्याबाबत सल्ला मागितला. यावर त्यांनी राजांना सल्ला देताना म्हटले की निश्चलपुरीकडून मंत्रोपदेश न घेता फार तर दुसरा राज्याभिषेक करवून घ्यावा. कारण गायत्र्यूपदेश घेतल्यानंतर आपत्ती आल्या. आता पुन्हा दुसरा उपदेश घेतल्यावर कोणता उत्पात होईल ते कुणी सांगावे!
आणि आनंद नाम संवत्सराच्या अश्विन शुद्ध पंचमीला (काही ठिकाणी तारीख २३ तर काही ठिकाणी २४ सप्टेंबर १६७४) प्रातःकाळी उठून निश्चलपुरीने कलश स्थापना केली. व पुढील विधी पार पडले.
गागाभट्टानी शुद्ध वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केल्यामुळे तांत्रिक विधीवर विश्वास ठेवाणारा एक गट नाराज झाला परंतू अपशकुनांच्या जाणिवेमुळे सर्वजण गोंधळून गेले होतेच. या सर्वांच्या समाधानासाठी काही अगतिकतेतूनच हा तांत्रिक राज्याभिषेक घडून आला काहीही असले तरी उज्वल भविष्याकडे झेप घेणाऱ्या द्रष्ट्या पुरुषावरही त्याच्या सभोवती वावरणार्या सामान्य जणांकडूनचं कशी मर्यादा पडते व प्रगतीचा कसा गतिरोध होत जातो याचे हे तांत्रिक अभिषेक हे उत्तम उदाहरण आहे. ! मज्जा अशी की, या दुसऱ्या राज्याभिषेकानंतर दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावर पुन्हा वीज पडली.
Comments

आधीचे
सिंहासन भंग करुन त्या जागी ८ दिशांकडे तोंड केलेले ८ सिंह असलेले दुसरे
सिंहासन स्थापन केले गेले. प्रत्येक सिंहाला बळी दिला गेला. ही सर्व कृत्ये
काळी अथवा रकतवर्णी वस्त्रे नेसून केली गेली.
प्रगतीचा गतीरोध
वगैरे का म्हणावे? ह्या तत्कालिन समजुती होत्या. त्यातून कोणीच वाचू शकले
नाही. तट - बुरुज जर सारखे ढासळत असतील तर एखाद्याला त्यात चिणून नरबळीच
दिला जात असे क्वचित गर्भार स्त्रीला सुद्धा चिणत असत. आज तीनशे - सहाशे -
हजार वर्षांनी आपल्याला हे ऐकून विचित्र वाटतं पण त्याकाळी ह्या समजूती फार
सहज होत्या. महाराज हे समाजाचे भाग होते. त्यांच्या कार्यकालात त्यांच्या
परोक्ष अथवा त्यांच्या माहीतीत असं काही घडलं असेल तर त्यात विशेष काही
नाही. अखेरीस महाराजही एक माणूस होते. त्यांना त्यांच मन होतं, त्यांना
भावना होत्या, त्यांचे भले - बुरे विचार होते, त्यांच्या तत्कालिन
समाजानुसार श्रद्धा (व अगदि अंधश्रद्धाही जमेस धरायला हव्यात) होत्या.
त्यांना कुटुंब होतं, वैयक्तिक जीवन होतं. हे आपण कधीच समजून घेत नाही. हे
एकदा मान्य केलं की पुढच्या अनेक गोष्टी सोप्या होतील.
मुघलांकदे
जाण्यात संभाजीराजांची चूक ही त्यांच्या सळसळत्या रक्ताची चूक होती. डोकं
थंड झाल्यावरती एका जीवावरच्या संकटातून ते निसटून परत आले आणि पुढचा
ज्वलंत व धगधगता इतिहास आपण सर्व जाणतोच. थोरले महाराज अथवा शंभूराजे
"माणसे" होती माणूसच चूका करतो मात्र "महामानव" त्या चूकांची जबाबदारी घेऊन
शक्य होईल तेव्हा त्या दुरुस्त करतात व इतिहास घडवतात ... फरक इथून सुरु
होतो. :-)
दिपाजी राऊत
प्रतापरावांनी साऱ्या सैन्यासमवेत जिवाच्या बाजीने घोडी हाकली अन् बहलोल खानच्या तळालाचं वेढा दिला. अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.
सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते, सिधोजी निंबाळकर यांसारख्या त्यातल्यात्यात अनुभवी तरुणांमध्ये दिपाजी राऊत हे अगदी तलवारीच नवखं पातं पण हेदेखील तिखट हत्यार चालवीत होते.
बेहलोलखान व त्याचे सरदारही जबर युद्ध खेळू लागले. त्याचा एक सेनानी सिद्दी मुहम्मद बर्की याने चांगलाच पराक्रम गाजवला. पण नंतर त्याचीही मात्रा चालेना अंधाराचा फायदा घेऊन तोदेखील निसटून जाऊ लागला. पण दिपाजी राऊतांनी पळता पळवता केलेल्या हल्ल्यात बर्की जबर जखमी झाला. दिपाजींची तलवार गर्जतच होती. घोड्यावर बसून दिपाजी घुमत होते समोर येईल त्याला गारद करीत होते अशातच त्यांचा सामना झाला तो सिद्दी मुहम्मद या सेनानीशी तसा हा सेनानी रापलेलाच त्याच्यामानाने दिपाजी नवखं सिद्दी मुहम्मद ने दिपाजींचा घोडा मारला, दिपाजी दुसऱ्या घोड्यावर स्वारं झाले; परंतू हा देखील घोडा सिद्दी ने मारिला त्यामुळे चिडलेल्या दिपाजींनी जमदाढीचा मारा करून त्याला ठार केले.
असे हे नवं उगवत पातं म्हणजे दिपाजी राऊत परंतू आपल्या इतिहासाला या एवढ्या प्रसंगाशिवाय दिपाजींचा दि सुद्धा माहीत नाही _/\_
हा माझा छोटासा प्रयन्त इतिहासाच्या पानातच हरविलेल्या मावळ्यांना शोधण्याचा
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
अभिषेक कुंभार
आंग्र्यांनी फिरंग्यांची केलेली दाणादाण १३ सप्टेंबर १७२०
लंडन हे ४० तोफांचे, चांडोस हे ४० तोफांचे, व्हिक्टोरिया २६ तोफांचे, रिव्हेंज १८ तोफांचे, डिफायन्स हे १६ तोफांचे आणि पेल्हाम हे १६ तोफांचे अशी लढाऊ जहाजे या आरमारात होती.
याशिवाय हंटर या नावाचे एक दुकाठी जहाज, प्रिन्स या नावाचे एक एकाच डोलकाठीचे जहाज या आरमारात होते. 'टेरिबल बॉम्ब' या नावाचे एक बॉम्बफेक करणारे जहाज होते. ह्या जहाजांखेरीज दोन गलबते होती. एक अग्निक्षेपक जहाज होते आणि शिवाय किनाऱ्याला लावण्यास सोयीची अशी अनेक मच्छीमारी होडकी होती.
किनाऱ्यावर उतरणाऱ्या तुकडीत ३५० इंग्रज शिपाई, ८० निवडक शिपाई आणि २००० पेक्षा अधिक खलाशी प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊ शकतील असे होते.
पण एवढी जय्यत तयारी करून सुद्धा विशेष असे काही हाती लागलेच नाही.
ब्राऊन याने आपले काही सैनिक किल्ल्यावर उतरवले व पुष्कळशी प्राणहानी केली. प्राईम जहाज किल्ल्यापासून बंदुकीच्या गोळीच्या टप्प्याच्या माऱ्यापर्यंत जवळ हाकारले गेले व तेथून प्राईमने किल्ल्यावर सारखा अग्निवर्षाव सुरु केला; पण किल्ल्यातून त्याचा प्रतिकार तितक्याच जोराने झाला.
शत्रूची जेवढी शत्रूला न नेता येण्यासारखी जहाजे सापडतील ती जाळून नष्ट करण्याचे हुकुम देऊन ब्राऊनने काही जहाजे घेरीयाच्या खाडीच्या तोंडावर पाठविली. ब्राऊनच्या जहाजांनी आंग्र्यांची दोन मोठी जहाजे व कित्येक लहान जहाजे जाळली. शिवाय प्राईमवरून एक अग्निगोलक आंग्र्यांच्या एका लढाऊ जहाजावर पडला, त्यामुळे त्या जहाजावरील एक भरलेली बंदूक पेटून उडाली व आंग्र्यांच्या शूर शिपायांची जवळजवळ एक संबध पलटण ठार झाली. बाकी राहिले ते जखमी झाले.
तरीही आंग्रे हटत नव्हते ! त्यांचा जोर फारच वाढला. इंग्रजांच्या काफिल्यास कान्होजींकडून बराच उपद्रव होऊ लागला. इंग्रजांची प्राणहानी वाढी लागली.
याच सुमारास खेमसावंत वाडीकर ५००० व २०० घोडेस्वारांनिशी आंग्र्यांवर स्वारी करण्यासाठी निघाल्याची बातमी इंग्रजांना कळली; तेव्हा त्यांना जरा धीर आला.
'खेम सावंताने आंग्र्यांच्या मुलखात शिरून राजापूरपर्यंत त्याचा मुलुख बेचिराख केला व राजापूरच्या खाडीत आंग्र्यांची चार लढाऊ गलबते बुडविली.' असे ब्राऊनने २४ ऑक्टोबर १७२० च्या पत्राने कळविले होते.
इतके होऊनही आंग्र्यांना इंग्रजांच्या हल्ल्याची कदर वाटली नाही.
शेवटी इंग्रजांना या लढाईत अपयशच आले !
- अभिषेक कुंभार
तिरसट आणि अस्वस्थ औरंगजेब
अशा रीतीने दक्षिणेत आल्यानंतर एकवर्षापेक्षा म्हणजे नोव्हेबर १६८१ ते एप्रिल १६८३ पासूनचा कालखंड लोटून गेला तरी बादशहाला, त्याच्याजवळ इतकी अफाट साधनसामग्री असताना सुद्धा, कोणतीही भरीव कामगिरी साध्य करता आली नाही. खरी परिस्थिती अशी होती की बादशहाला ह्यावेळी घरगुती आणि मानसिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत होते, स्वतःच्या कुटुंबावरचा त्याचा विश्वास उडून गेला होता. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये आणि आपण कुठे रहावे म्हणजे सुरक्षित राहू हेही त्याला कळेनासे झालेले होते. ह्यामुळे बादशाहचे ह्यानंतरचे धोरण धरसोडीचे, संशयी, सावध आणि वरवर पहाता दुष्टपणाचे आणि परस्परविरोधी असे झालेले होते. २ ऑक्टोबर १६८६ रोजी सुरतेच्या इंग्रजांनी लिहिले, "बादशहाचे मन केव्हा फिरेल हे सांगणे कठीण झाले आहे. त्याची वृत्ती सतत धरसोडीची झालेली आहे. राजपुत्र अकबरामुळे तो कमालीचा तिरसट आणि अस्वस्थ बनला आहे. अकबराला ममता दाखवितात ह्या केवळ संशयावरून सुलताना आझम, बेगम (जहानजेब बानू) आणि दिलेरखान यांना सर्वांसमक्ष अपमानीत करण्यात आले. वास्तविक ह्या आरोपात कोणतेही तथ्य नव्हते. त्यामुळे ज्यांचे बादशहाही नाजुक संबंध आहेत ती सगळी माणसे बादशहाशी वागतांना अतिशय काळजी घेत आहेत."
मराठ्यांनी खुद्द औरंगजेब सारख्या माणसाचे मानसिक खच्चीकरण केले. त्याकाळात औरंगजेब म्हणजे TIME Magazine मधला MAN OF THE YEAR या खिताबाच्या तोडीचा तर होताच होता त्यालाचं येडा बनवला
मावळच्या मराठ्यांची माळव्यातील आक्रमणे (सुरवात)
ऑक्टोबर १७०३ मध्ये नेमाजी शिंदे हे एखाद्या लाटेप्रमाणे वऱ्हाडवर जाऊन कोसळले. त्यांनी (फिरोजजंगच्या वतीने नेमल्या गेलेला) वऱ्हाडचा नायाब सुभेदार रुस्तुमखान याचा पराभव केला आणि त्याला युद्धाकैदी म्हणून पकडले, त्यानंतर हुशंगाबाद जिल्ह्यावर हल्ला चढवून नेमाजी शिंदे छत्रसालाच्या विनंतीवरून नर्मदा ओलांडून माळव्यात आला. अनेक खेडी आणि गावे लुटल्यानंतर त्याने सिरोंजला वेढा दिला. परंतु यावेळी दुसऱ्या एका मराठा सैन्याचा पाठलाग करीत फिरोजजंगाने वऱ्हाडात प्रवेश केलेला होता
त्याने निवडक सैनिकांनीशी बातमी मिळताच हल्लेखोरांचा (मराठ्यांचा) पाठलाग चालविला. त्यामुळे यावेळी मराठ्यांना काढता पाय घ्यावा लागला. युद्धकैदी बनवलेल्या रुस्तमखान, त्याचा अनुयायांना सोडून द्यावे लागले. यानंतर पुन्हा एकदा नेमाजींच्या सैन्यावर धामुणीच्या जंगलानजीक हल्ला चढविण्यात आला, या हल्ल्यात मराठ्यांचे बरेच सैनिक मारले गेला तसेच मोगलांच्या बाजूनेदेखील बरेच नुकसान झाले.
मोग्ल्यांचे यामुळे फारच मोठ्या संकटातून सुटका झाली. वऱ्हाडमध्ये मराठ्यांनी जो उपद्रव चालविला होता त्यामुळे खबरकरांनी पाठवलेली पत्रे आणि सरकारी पत्रे ही जवळजवळ चार पाच महीने नर्मदेच्या तीरावरचं रोखली गेली होती. फिरोजजंगाच्या धाडसामुळे माळवयाची संकटातून सुटका झाली. आणि त्यामुळे तिथली स्थिती किती गंभीर आहे. याची औरंगजेबाला कल्पना आह्ली. म्हणून त्याने औरंगाबाद आणि खानदेश या ठिकाणी नेमण्यात आलेला सुभेदार राजपुत्र बिदरबख्त याची, तो अतिशय शूर आणि धाडसी सेनापती असल्यामुळे, ३ ऑगस्ट १७०४ रोजी माळव्याचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.
पण विशेष काही परिणाम झाला नाही. "नोकरीत नसलेल्या मराठ्यांनी, बुंदेल्यांनी आणि अफगाणांनी या सुभ्यात उपद्रव चालविला आहे." औरंगजेबाने स्वतः या परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. "खानदेशचा सुभा पूर्णपणे उजाड बनलेला आहे. माळव्याचा सुद्धा नाश घडून आलेला आहे - फारच थोडे पीक उभे असलेले दिसते.
(Short Histroy of Aurangjeb - Jadunath Sarkar
औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास - अनु. डॉ. कोलारकर)
पोर्तुगीजांचा समाचार
पोर्तुगीजाचे पश्चिम किनाऱ्यावर दोन ठिकाणी राज्य होते. पहिले गोव्याचे तर दुसरे उत्तर कोकणातील चौल, वसई, दमण इ. भागाचे. संभाजी महाराजांशी मैत्रीची बोलणी सुरु असतानाच पोर्तुगीज व्हाईसरॉयने स. १६८२ च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांच्या मुलखांवर हल्ले करावयास आलेल्या मोगली फौजांना आपल्या प्रदेशातून जायला वाट दिली. यासंबंधीचे पत्र देखील पोर्तुगीज व्हाईसरॉय ने औरंगजेबास पाठविले.
परंतू आक्रमणास तितक्याच तीव्रतेने किंबहूना अधिक तीव्रतेने प्रतिकार हे संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचे सूत्र होते. पोर्तुगीजांच्या कुरापातीचा बदला त्यांनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ यासह त्यांच्या उत्तरेकडील राज्यावर स्वारी करून घेतला (जून १६८३) ही स्वारी ६ महिने चालू होते. डॉ. व्ही. टी. गुणे यांनी म्हटले आहे की, ''उत्तर फिरंगणातील दमण ते चेऊन (चौल) पर्यंतचा सर्व प्रांत निळोपंत पेशव्याने ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८३ पर्यंत काबीज केला. तेव्हा ४००० गोवेकर ख्रिस्ती व गोरे सैनिक मुंबईच्या आश्रयास गेले."
खुद्द संभाजी महाराजांनी चौलच्या ठाण्यास वेढा दिला व तोफांची मारगिरी सुरु केली तेव्हा आतील पोर्तुगीजांची कशी दयनीय अवस्था झाली हे स्नाग्ताना मराठा-पोर्तुगीज संबंधाचे दुसरे मोठें संशोधक स. शं. देसाई म्हणतात : १० ऑगस्ट पासून १८ ऑगस्टपर्यंत मराठ्यांनी चौलच्या तटबंदीवर अविरत हल्ले चढविले. आतील शिबंदी लढून लढून थकून गेली. ते पाहून शहरातील भिक्षु आणि नागरिक लढावयास आले. त्या दरम्यान मराठ्यांचे हल्ले विफल व्हावे, म्हणून पोर्तुगीजांनी 'मेरी व्हर्जिन आणि सेंट स्टीफन यांची करुणा भाकण्यास प्रारंभ केला होता ठाण्याच्या कॅप्टन तर 'सेंट अँथनी'ची आळवणी करून त्याच्या चरणाजवळ साथ अश्रफी ठेवल्या. (पण) मराठे मागे हटेनात...
संभाजी महाराजांच्या गोव्याच्या स्वारीत तेथील पोर्तुगीजांनी सेंट झेवियर ची केलेली प्रार्थना इतिहासात प्रसिद्ध आहे. ही अजून एक!
उत्तरेकडून मराठ्यांनी काढतापाय घ्यावा म्हणून पोर्तुगीजांनी दक्षिण गोव्यालगतच्या प्रदेशावर फोंडा किल्ल्यावर स्वारी करण्याचे ठरविले.
फोंड्याची लढाई ही इतिहास प्रसिद्ध आहेच............तर अशा प्रकारे मोडला पोर्तुगीजांचा माज
शहाजीराजांस कैद
पहिला सेनापती रणदुल्लाखान शहाजीराजांच्या सल्ल्यानेच वागत असल्याने तोच प्रघात खानखानाने पाळला. परंतू वजीर मुस्तफाखान हा शहाजीविरोधी पक्षाचा असल्याने शहाजीविरोधी आघाडी प्रबळ झाली. या आघाडीत अफजलखान, बाजी घोरपडे, यशवंतराव वाडवे इत्यादी प्रभावी सरदार मुस्तफाखानाला सामील झाले. मुस्तफाखान खान कर्नाटकस्वारीवर गेला पुन्हा विजापुरी आला परंतू कर्नाटक प्रांती विजापूर दरबारावविषयी घातपाती कट रचण्यात येत् असल्याचे वृत्त विजापूर ला येऊन पोचले (पोचवले?) त्यामुळे मुस्तफा पुन्हा कर्नाटकात दाखल झाला. व तिथें पोचताच त्यांने शहाजीराजांस दगाबाजीने कैद केले.
अटकेची पार्श्वभूमी - कानडी संस्थानिकांच्या गुंतागुंतीच्या राजकारणात कुत्बशहा मदत करण्याच्या उद्देशाने त्रीमलनायकाच्या बाजूने लढ्यात उतरला त्याने श्रीरंगराजचा ताब्यातील पेनुकोंडा हा प्रदेश जिंकून घेतला,व खुद्द त्रीमालनायकाच्याचं (ज्यांच्यासाठी कुत्बशहा मैदानात उतरला होता त्याच्या) जिंजी किल्ल्यावर चाल केली. श्रीरंगराजचा प्रदेशही गिळला. भीतीपोटी तंजावरच्या वेंकटनायकाने तह करून खुशाली पत्करली यात त्रीमलनायकचं एकाकी पडला नाईलाजाने त्याने विजापूरला मदतीचा हात मागितला यात शहाजी राजांनी त्यास धीर दिला, शहाजीसारखा भरभक्कम पाठींबा लाभल्याने त्रीमलनायकासोबत कावेरीपट्टणचा जगद्देव, म्हैसूरचा चामराज वोडीयार, बेदनूरचा वीरभद्र या सर्वांनीच भय टाकले व एका अर्थी हे सारे संस्थानिक शहाजीराजांना वश झाले असल्याने शहाजीराजांनीच कर्नाटक हस्तगत केल्यासारखे झाले ! अर्थातच नबाब मुस्तफाखानास हे अर्थातच सहन होण्यासारखे नव्हते.
त्यामुळेच घातपात घडला आणि श्रावण वद्य प्रतिपदा शके १५७०, मंगळवार, दि. २५ जुलै १६४८ रोजी सकाळी शहाजीराजे मुस्तफाखानाने जिंजीनजीक कैद केले.
दत्ताजी शिंदे

गुरुवार १० जानेवारी १७६१ रोजी संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.
दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड
बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
देसूर मुक्कामी जुल्फिकारचा समाचार
हा काळ होता १६९२चा मराठे पळवून पळवून मोगलांना मारत होते. संताजी धनाजी, असे सारेच वीर शर्थीने राज्य राखत होते. मराठ्यांचा तिसरा छत्रपती राजे राजाराम महाराज यावेळी जिंजीस होते आणि जिंजीस औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष याचे वेढे पडले होते परंतू त्याचे आणि राजाराम महाराजांचे संबंध अगदी चांगले झाले होते. *(बापाच्या मृत्यू पश्चात गादीसाठी होणाऱ्या भांडणामध्ये मराठ्यांनी आपली बाजू धरावी यासाठी ) त्यामुळे तो वेढा देऊन बसलाय असे कधी वाटच नसे.
जिंजी पासून वांदीवॉश हे ठिकाण सुमारे २५ मैल दूर आहे. तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती मराठे मोगलांनी तिथपर्यंत जाऊ देत नव्हते मोगलांचे पहिले २ प्रयत्न फसले पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांना यश आले. जुल्फिकार खान. ते अन्नधान्य घेऊन पुन्हा आपल्या तळाकडे निघाला. मार्गात देसूर *(जिंजीपासून १३ मैल ईशान्येस) या ठिकाणी संताजीने आपल्या २० हजार सैन्यानिशी खानावर हल्ला चढविला
मोठी तेज लढाई झाली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या वेळी हजर होता. त्याने ही लढाई प्रत्यक्षात पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भीमसेन लिहितो.
....जुल्फिकार खान प्रत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली. मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते. त्यांनी मोगलांची वाट अडविली. मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळलीआणि त्याने शत्रूंना हटविले इतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसऱ्याच दिसावी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यांनी निकराचे हल्ले चढविले. त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगलांच्या सोबत अस्केके वंजारी हवालदिल झाले. मराठ्यांची बंदुकी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फिकारखान व राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या. आम्ही कुच करीत असताना. वाटेत भातशेते लागली आमच्या सैन्यातील कितीतरी बैल. आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले. आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली .
पळता भुई थोडी केली या मोगलांची मराठ्यांनी सह्याद्रीच्या कुशितले हे वाघबच्चे कर्नाटक जिंजी सारख्या परराज्यात देखील पराक्रमाचे तमाशे दाखवीत होते आपली तलवार गाजवीत होते. गुलामी मराठ्यांच्या रक्तातच नाही म्हणून राजाशिवाय प्रजा कित्येक काळ झगडत होती. त्या रावदलपत ला सुचेना काय करायचे. जुल्फिकारखान तर पाठीला पाय लावून पळत सुटला त्यांचे सैन्य चहू बाजूला आपला जीव मुठीत धरून पळत सुटले होते पळताना सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य होते
भागो ....! भागो... संताजी आया
ही लढाई घडली जेव्हा घडली तेव्हा तारीख होती. ५ जानेवारी १६९३....
|| त्र्यंबकजी इंगळे ||

१ नोव्हेंबर १६९२ ला पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला.
... या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे.
बादशहाने हा किल्ला घेण्यसाठी पिराजी घाटगे, सुहराबखान, लुत्फ़लुल्लाखान, मुख्तारखान, राजा किशनसिंह, मरहमतखान, तरबियतखान, मंसूरखान आणि असे अनेक नामवंत मोघली मनसबदार पाठविले होते. पण यातील कुणाचीच डाळ त्र्यंबकजी इंगळे आणि त्यांच्या वीरांनी शिजू दिली नाही. मोघली सरदारांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार पन्हाल्यावर करून पाहिले पण त्यांना यात कशातच यश आले नाही.
या लढ्यात बादशहाने प्रचंड प्रमाणात तोफेचा वापर केला. इतकेच नव्हे तर पन्हाल्याच्या
हा वेढा चालू असतानाच बाहेरून धनाजी जाधव आणि त्यांचे सैन्य मोघलांवर हल्ले करीत होते. अशा अनेक चकमकी होतच होत्या. त्यातच किल्ल्यावरून सुद्धा, मराठे मोघली छावणीवर हल्ले करीत आणि त्यांची रसद मारून जमेल तेवढे मोघल कापून पुन्हा गडावर पसार होत.
मराठे सुद्धा किल्ल्यावरून तोफांचा भडिमार करीत होतेच. एकदा तर मराठ्यांनी केलेल्या मारात, खुद्द बेदारबख्ताचा घोड़ा जाया झाला. मराठे रात्रीचे तर अति आक्रामक बनत असत, अशाच एका रात्री मराठे कोंकणी दरवाजातुन बाहेर पडून मंसूरखानच्या छावणीवर एल्गार केला. त्याच्या काही तोफा निकामी केल्या आणि अनेक मोघली सैनिकांस मारून ते गडावर पसार झाले.
१२ एप्रिल १७०१ रोजी,गडावरील मराठ्यांनी थेट तरबियतखानाच्या तोफखान्यावर झेप घेतली. तरबियतखान पान्हाळा व पवनगडच्या बेचक्यात उभा होता, या छाप्यात मराठ्यांनी मोघलांनचा दारुगोळा उडवून दिला आणि त्यांचे काही सैनिक कापून, पुन्हा गडावर पसार झाले.
अखेर दाणागोटा संपल्यामुळे पन्हाळा मुघलांच्या हवाली केला गेला. पन्हाळा किल्ल्यावरील त्र्यंबकजी इंगळे, बाळोजी इंगळे, कान्होजी इंगळे, पवनगडाचे विठोजी केसरकर, आणि त्यांची ८००-९०० ची शिबंदी तब्बल ८ वर्षे बादशहाच्या थोडीथोडकी नव्हे तर ३० हुन अधिक मनसबदारांना भारी पडले.
पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्याचा संदर्भ बादशाहच्या दरबारातील बातमीपत्रात मिळतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे याचा काहीच उलेख नाही. म्हणुनच या पत्रात मोघलांच्या पन्हाल्याच्या रंगवलेल्या बातम्या मिळतात आणि मराठ्यांना त्यांनी कसे हरवले हे सापडते. पण या बातम्यांवर जर आपण विशवास ठेवला तर पन्हाळा काबिज करण्यासाठी त्यांना एवढी वर्षे का लागली? हां प्रश्न राहतो. पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यावर अप्पा परब यांचे एक पुस्त
बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ति झाली होती, इंग्रज वकील विलियम नॉरिस इंग्रज बनावटीच्या तोफा घेउन मोघलांनच्या छावणित सामिल झाला. मोघली तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्याच्या तटा बुरुजांना खिंडारे पडली होती पण त्यात सुद्धा, मराठे पुन्हा ह्या तटा बुरुजांची दुरुस्ती करुन लढायांस सिद्ध राहित
लेख
नेट साभार
एक फसलेला डाव
मोगली
सैन्याशी निकराची पंजेफाड करत मावळी सेना लढतचं होती कारण परिस्थितीवर
रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ मानणारी ही स्वराज्य सेना.काळ होता १६९९ चा राजाराम महाराज गादीवर येऊन बराच काळ लोटला होता. मराठे सगळीकडेच मोघलांना धूळ चारत होती. भाउबंदकी नडली दुहीचा शाप पुन्हा एकदा दिसून आला.
एक लढवय्या आणि जिगरबाज सेनापतीस आपल्याच लोकांनीच दगा करून मारले होते. त्यांचे नांव संताजी घोरपडे.
पण धनाजी नावाचा वाघ अजून मैदान गाजवतच होता. मोगलांच्या प्रतिष्ठित सरदारांना धनाजी जाधव यांनी मेटाकुटीस आणले होते. त्यानंतर त्यांनी खुद्द बादशाही छावणीवरच हल्ला करून
एकच खळबळ उडवून दिली होती. शत्रू नुसतं त्यांच्या नावानं चळाचळा कापयचा. ३ नोव्हेंबर १६८९ साली रायगड पडल्यावर तह करून बंदिवासात जाणाऱ्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब
आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे अजून मोगलांच्या बंदिवासातच होते.
राहून राहून ही गोष्ट मराठ्यांना सतावीत आणि त्यातूनच काही धाडसी बेत आखले जात. काही करून शाहूंना मोगली बंदिवासातून बाहेर काढायचेच असा त्यांचा बेत. परंतू नुकताच दस्तुरखुद्द बादशहाच्या छावणीत या पठ्ठ्यानं धुडगुस घातल्याने मोगल कमालीचे घाबरले होते आणि ही जणू शाहूंना असंच छापा मारून सोडून नेणार अशी ताकीद देण्याची पूर्वसूचना म्हणून सतर्क बनले होते. त्यामुळे छावणी भोवताली सैन्याचा वेढा पक्का बसवला होता.
१९ डिसेंबरच्या बातमीनुसार बादशहाने गनिमांच्या परीपत्यासाठी बक्षीउल्मुल्क बहरामंदखान, फत्तेहुल्लाखान, मतलबखान व खुदाबंदाखान वगैरेंना नेमेले.
इकडे मावळ्यांचा बेत ठरला आणि बेत शिजवण्याचा दिवस देखील. धनाजी जाधवराव आणि त्यांचे निवडक सहकारी (जास्त पुरावे उपलब्ध नसल्याने मावळ्यांची संख्या अचूक सांगता येत नाही आणि काळ देखील तरीही तर्क) - मध्यरात्रीच्या काळोखात आपले इतर सहकारी मोजक्या अंतरावर ठेवून मोजक्या दोन-तीनशे सैन्यानिशी ब्रम्हपुरी येथील बादशाही छावणीवर झडप घातली बिनबोभाट कत्तली चालू केल्या.
काही मोगल पळू लागले काही ओरडू लागले अचानकच छावणीत गोंधळ माजला. धनाजी आया धनाजी आया भागो भागो अशा आरोळ्या उठत होत्या. खासे मोगली सरदार तंबूतून बाहेर येत नव्हते. अचानक झालेल्या हल्ल्यात सारे गडबडले पण मोगलांचे सैन्य जास्त असल्याने. धनाजींना काढता पाय घ्यावा लागला.
तेव्हा जर शाहू महाराजांची सुटका झाली असती तर आज इतिहास काही वेगळाच असता.
हा प्रसंग घडला तो दिवस होता 22 डिसेंबर १६९९
पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. झाडांच्या आडगळीतून आलेल्या बाणांनी त्यांच्या नऱ्हडीचाच घोट घेतला
शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता आपल्या परिने योजना आखून खानास जेरीस आणावे. ही शिवरायांची ताकीदच होती.
अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.
सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले. सोमाजी मोहिते. सिधोजी निंबाळकर हे देखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुष्मनावर तुटून पडत होते.
समोर येणाऱ्यांची खेर नव्हती. नंतर बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले हे गजराज. मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुता करवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला. आणि महाराजांकडे चालविला.
याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे राजांनी खुश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात थोडी बढती दिली असेलच. साधनांच्या आभावी जास्त माहिती मिळत नाही बेहलोलखाना नंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत
Retribuition Visited the Maratha army very much sooner. jalna, both town and suburb, was thoughly plundered and devastated for four days. Then as the Marathas were retreating, loaded with booty cinsisting of "countless gold, silver, jewwls, clothes, horses, elephants and camels, an enterprising Mughal officer,Ranmast Khan, * attacked their rearguard . Sidhoji Nimbalkar with 5,000 men heald him in check for three days, but was at last slain with many of his men.
राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी ४ दिवस राजेंनी पेठा मारिल्या, शहर लुटून फन्ना केले. जडजवाहीर कापड घोडे हत्ती उंट फस्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्वाचे शहर ते मारिल्या मुळे
मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर
हे या पाच हजाराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व करीत होते. अखेर लवकर जेरीस येतील ते कसले मराठे आणि कसला मराठी बाणा कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी रणमस्तखानास सलग ३ दिवस झुंजवत ठेवला अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.
धन्य ते मावळे धन्य त्यांची स्वामीनिष्ठा.........
Source -
Shivaji and his time - Jadunath Sarkar
सेनापती संताजी घोरपडे - जयसिंगराव पवार
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
सभासदाची बखर - कृष्णाजी अनंत सभासद
मराठी रियासत - गो. स. सरदेसाई
ह्याला म्हणत्यात मराठी बाणा.....!

११ मार्च १६८९ संभाजी महाराज गेले, मराठा रियासतीवर शोककळा पसरली. काही काळ मराठ्यांचा निर्घुण पाडावच झाला. मराठ्यांचे अनेक किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले. अशाच वेळी राजाराम महाराजांनी सूत्रे हातात घेऊन खंबीरपणे लढा दिला. जणू मोडलेले डाव पुन्हा उभारणे हा मराठ्यांचा रक्तगुणच आणि ह्याच गुणावर संताजी धनाजी आणि कित्येक ज्ञात अज्ञात
मावळ्यांच्या भीम पराक्रमामुळे ही गोष्ट साधता आली म्हणूनच १६८९ ते १६९१ पर्यंत जो मोगल मराठा संघर्ष चालू होता त्यात संपूर्ण मराठी रयतेस एक गोष्ट मनोमन उमजली की, मराठी राज्य आता बुडत नाही, औरंगजेब बादशाहाला-मोगलांना जाऊन मिळालेल्या मराठी सरदारांना देखील असेच काही उमगले असावे. म्हणूनच नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने यांसारखे मराठे सरदार पुन्हा स्वराज्यात आले. अखिल मराठी जनतेत आता एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता.
या सुमारास महाराष्ट्रात एक प्रकारे नवचैतन्याचे वारे वाहत होते, याचे दर्शन घडविणारे एक महत्वाचे पत्र उपलब्ध आहे. हे पत्र मावळ प्रांताचा सुभेदार. महादजी शामराज या मराठा अधिकाऱ्याने तर्फ मुठे खोऱ्याच्या हवालदारास लिहिले आहे - (२४ सप्टेंबर १६९०).
त्यात महादजी म्हणतो " मोगलाची धामधूम आपल्या राज्यात आजी तीस वर्षे होत आहे. यामुले मुलुख वैराण जाला. मुलखात मोगलाईचा अमल चालिला. हली श्रीकृपेने आपल्या राज्याचा मामला थाटात चालला आहे."
रायगड नोव्हेंबर १६८९ मध्ये मोगलांच्या हाती पडला तेव्हा आकाश कोसळल्यासारखी मराठ्यांची स्थिती झाली होती आणि अवघ्या वर्षभराने म्हणजे सप्टेंबर १६९० मध्ये मराठे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते की, श्रीकृपेने राज्याचा मामला थाटात चालला आहे !
ह्याला म्हणत्यात मराठी बाणा.....!
(संदर्भ - सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार)
छत्रपतींचा सय्यम आणि सेनापतीचे झंजावात
संभाजी
महाराज गेले आणि मराठा रियासतीवर शोककळाच पसरली औरंगजेबाचा हैदोस मात्र
महाराष्ट्रावर अखंड चालूच होता, त्याला जणू असे वाटले होते. की आता
मराठेशाही देखील आपण गिळंकृत करूच पण परिस्थितीवर रडण्या पेक्षा
परिस्थितीशी लढण्यातच पुरुषार्थ आहे. ही शिकवण शिवाजी महाराज देऊन गेले
होते तेच शिवसूत्र मानून अनेक संकटे पार करीत राजाराम महाराज जिंजीच्या
किल्ल्यावरून स्वराज्याचा गाडा हाकू लागले. मोठ्या धैर्याने राजे हे कार्य
बजावत होते.
त्याकाळी राजाराम राजेंची कर्नाटक मधील स्थिती किती बळकट झाली होती हे एका अस्सल मराठी पत्रावरून समजते. त्यात असे नमूद केले आहे की, छत्रपतींनी कर्नाटकात चाळीस हजार घोडदळ, एक लक्ष पंचवीस हजार पायदळ उभारले असून केसो त्रीमाल सोबत पंधरा हजार घोडदळ आणि पंचवीस हजार पायदळ आणि एक लाख होनाचा खजिना देऊन महाराष्ट्रात धाडले होते.
औरंगजेबाने तर मराठेशाही संपविण्याचा चंगच बांधला होता. रायगड विजेत्या जुल्फिकार खानास त्यांनी राजाराम महाराजांना पकडून आणण्यासाठी जिंजीस धाडले. ही खबर छत्रपतींना समजली तेव्हा जिंजीकडे येत असलेल्या संकटास थोपविण्यासाठी राजेंनी मराठी - नायकांची संयुक्त फौज खानावर धाडली. परंतू खानासमोर फौज सपशेल पराभव खाऊन माघारा आली. आणि खान विजयाच्या धुंदीत दुगण्या वेगाने जिंजीचा किल्ला घेण्यासाठी खडा ठाकला तो दिवस होता २७ ऑगस्ट १६९०. लवकरच उभयपक्षी लढाई सुरु झाली.
परंतू शिवरायांनी निर्माण केलेल्या एका दुधारी शास्त्राच्या बळावर (रसाळ आणि मधाळ जीभ) राजाराम महाराजांनी खानच्या छावणीत भेद निर्माण करून टाकला. मराठी राज्यावर पाखरे झालेल्या नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, व नागोजी माने या बड्या मराठी सरदारांच्या मनात. ते
स्वराज्यज्योती पेटवण्यास राजे यशस्वी झाले. परिणामी हे मराठा सरदार मोगली छावणी सोडून आपल्या लष्करासह जिंजीत राजेंकडे दाखल झाले (२३ नोव्हेंबर, १६९०) हा मोगलांना बसलेला जबरदस्त धक्का होता तरी खानाने वेढा चालूच ठेवला. तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला एक अजस्त्र किल्ला जिंकणे सोपी बाब नाही हे खान उमगला. आणि बादशहाच्या कानाला लागून त्याने वजीर आसदखान आणि व पुत्र शहजादा कामबक्ष यांच्या समवेत फौजफाटा पाठवून दिला. १६ डिसेंबर १६९१ ते छावणीत दाखल झाले देखील.
आता मोगलांचे बळ वाढले ते देखील अनेक पटीने. आणि भेद शक्य नव्हता आता अजगराचे विळखे जबर पडू लागले. लागले तेव्हा राजाराम महाराजांचे दोन वाघ शत्रू प्रदेशात धुमाकूळ घालत होते त्यातील एक वाघ निघाला जिंजीचा वेढा उठवायला शिवरायांचा अंकुर जपायला कोण होता तो वाघ? दस्तुरखुद्द शिवरायांच्या तालमीत तयार झालेले हे घोंगावतं मराठी वादळ म्हणजे सेनापती संताजी घोरपडे होय
आपल्या मुख्य सैन्याच्या कचाट्यात आणून सोडले.
अचानक हल्ल्याने मोगल धास्तावले ते हरले अलीमर्दाखान मराठ्यांच्या हाती लागला, ५ हत्ती, ३०० उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे आणि त्यांच्या पाठीवरची प्रचंड रसद मराठ्यांना लाभली.
या विजयामुळे तळावरील सैन्यास प्रचंड धक्काच बसला. शत्रू सैन्याने इतकी दहशत खाल्ली की. मोगली फौज आणि बादशाही छावणी या दरम्यान दळण वळण बंद पडली. स्वतः औरंगजेब परलोक वासी झाल्याच्या बातम्या उठू लागल्या. बादशहाच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी होणाऱ्या झगड्यात मराठ्यांकडून सहाय्य मिळावे आसदखाना करवी त्याचे प्रयत्न चालू झाले.
आणि अशा संधीचा फायदा घेऊनच मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उधवस्त केले. मराठ्यांचा मोठा जय झाला
(संदर्भ - सेनापती संताजी घोरपडे जयसिंगराव पवार)
सिंहगडाचा दुसरा सिंह

संभाजी महाराज जाऊन ४ वर्षे लोटली होती. संपूर्ण स्वराज्याचाच घास घेण्यासाठी औरंगजेब चौताळून उठला होता. आज हा किल्ला उद्या तो किल्ला असे एक एक करून सारे किल्ले मोगलांकडे चालले होते. राजाराम महाराज स्वराज्यापासून दूर जिंजीस वास्तव्य करीत होते. स्वराज्याचे काम संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, शंकराजी नारायण सचिव, परशुराम त्रिंबक आदी लोकं बघत.
राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर आदी बलाढ्य किल्ले शत्रूच्या हाती लागले होते. त्यामुळे ठोस हालचाल करणे मराठ्यांना जमत नव्हते. सह्याद्रीच्या कुशीतल्या ह्या वाघांना जणू सह्याद्रीचीच भीती वाटत असें. हालचालींचा वेग वाढविण्यासाठीच म्हणून की काय धाडसी लोकांच्या सहाय्याने १९९३ च्या दरम्यान स्वराज्याच्या ह्या जुन्या शिलेदारांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने काही बेत सचिव शंकराजी नारायण यांनी आखले. त्यातीलच एक म्हणजे सिंहगडावर पुन्हा कब्जा मिळवायचा
शिवा - संभाला जशी त्यांच्या यार दोस्तांनी मदत केली. स्वताच्याच जीवावर उदार होणाऱ्यांची मांदियाळी राजाराम महाराजांच्या पाठीशी देखील उभी राहिली त्यातीलच एक म्हणजे नावजी लखमाजी बलकवडे. बलकवडेंनी सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले. बदल्यात शंकराजींनी त्यांना पवन मावळातील सारगाव इनाम द्यायचे असें ठरले.
नावजी हे शंकराजींच्या पायदळातील पंचसहस्त्री. अंगापिंडाने माणूस अगदी दणकट, टोलेजंग जिवंत देखावा. जणू तान्हाजीच त्यो. पण अनुभवाने थोडे कमी. शंकराजीना सिंहगडाचा पूर्ण परिसर अवगत होता. नवजी सारख्या एकट्यांचे हे काम नाही हे टिपूणच विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून धाडले.
२५ जून रोजी निवडक माणसे सोबत घेऊन. या दोन वीरांनी किल्ले राजमाची सोडली. ऐन पावसाळ्याची ही मोहीम. अंधार, चिखल अशात किर्र रानं तुडवीत. ती मावळी भूतांची सेना सिंहगडनजीकच्या जंगलात येऊन पोचली आणि योग्य संधीची वात बघत ५ दिवस दबा धरुन बसले. दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले.अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलांचे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते,
२० वर्षांपूर्वी एका सिंहानेच दिलेल्या तडाक्याची याद मनात होतीच म्हणूनच प्रत्येक किल्लेदाराला सक्त गस्तीचे आदेश औरंगजेबाने आधीच दिले होते. त्यामुळे आपला कामचुकारपणा टाळत सर्वजण जागसुदच होते
म्हणून मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तीवाल्या पथकाची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते.जणू पुन्हा निसर्ग मराठ्यांच्या मदतीस धावला होता नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला. थोडी झटापट उडाली पण अखेर मराठी बाणा दाखवत गड फत्ते केला
धन्य ते नावजी आणि धन्य त्यांचे ते मावळे
संभाजी राजांची दुर्मिळ पत्र संग्रह
राजांना अरेतुरे आणि पळपुटा सिद्धी "मालिक" ??
कल्पना दोघांना सांगितली, तेही शेवटी मावळेच..लागलीच तेही तयार झाले.. अलिबाग येथे कष्टाने एकास विनवणी करून जेवण आटोपले.. थोडा वेळ गप्पा मारल्या.. मुरुड ला जाण्याऱ्या रस्त्याविषयी विचारपूस केली आणि गाडी सुरु केली..
पहाटे ३.३० वाजता समुद्राच्या लाटांच्या आवाजासोबत जाताना प्रसन्न वाटत होते आणि पुढे एक विशाल किल्ले जंजिर्याचे दर्शन होणार यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली..
शेवटी एकदा पोचलोच.. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विश्राम गृहामध्ये तयार झालो आणि भल्या पहाटेच ६ वाजता बाहेर पडलो..
अतिभव्य असा समुद्र किनारा पाहून जोश आला.. समोर भव्य असा जंजिरा जणू बोलावत होता..
तिथे गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी नौका आणि बोटी आहेत.. जसजसा जवळ जाऊ लागलो मनात शंकेचे काहूर माजले..
जिकडे बघावे तिकडे धर्मांध मुस्लिमच दिसू लागले.. किनार्यावर नाश्ता करताना हॉटेल मधेही तेच.. गडाची माहिती सांगताना "हे" म्हणत "मालिक" बहोत होशियार थे.. ये किला मालिक का है.. मी अचंभित झालो.. शेवटी बोटीत बसलो तेव्हा त्या बोटीवर काम करणारा एक मराठी माणूस भेटला त्याने सांगितले कि "हे" मालिक असे "सिद्धी जोहर" ला संबोधून म्हणतात.. पूर्ण बेटावर, नौकेत, दुकानात जिथे तिथे फक्त हे धर्मांध मुस्लिमच आहेत.. (वाटले पाकिस्तानात आलो कि काय) पुढे "गाईड" भेटला तोही धर्मांध मुस्लिमच..
गडाची माहिती सांगताना त्याचा त्याच्या "मालकाबद्दल" अभिमान डोळ्यात स्पष्ट दिसत होता.. तिथे बोलता बोलता तो म्हणाला.. "शिवाजी ने बहोत बार कोशिश किया फिर भी नाही जीत पाया" ....
(सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही हे जन्जीर्याबद्दल सत्य मला माहितीच होते)
समोर नजर गेली तेव्हा दूरवर असण्याऱ्या "कांसा" वर नजर गेली.... अजूनही तो दिमाखाने उभा असून शिवाजीराज्यांचा त्याकाळचा दूरदृष्टीपणा आणि दर्यासारंग आणि दौलतजीची कणखर कामगिरी सांगत आहे असच वाटते..
शिवरायांनी हरामखोर पळपुट्या सिद्दीला चहुबाजूंनी स्थानबद्ध केले होते. जमीनीवरील सर्व भाग मराठ्यांच्या ताब्यात होताच. पण सिद्दी हा समुद्रीमार्गे मुंबईला इंग्रज आणि गोव्याला पोर्तुगीझ आश्रयाला जाई. तेंव्हा त्याची हे बाजु तोड़ण्यासाठी राजांनी पद्मदुर्ग आणि खांदेरी हे २ जलदुर्ग उभे केले. ह्या दोन्ही जलदुर्गांची कहाणी मोठी रोचक आहे..
सायंकाळी ४ वाजता परत निघालो.. कधी नजर जन्जीर्यावर तर कधी कांस्यावर जात होती.. हळूहळू समुद्राचे पाणी अलगत बाजूला सारून बोट किनारी जात होती..
आणि मनात प्रश्नांचा हल्लकल्लोळ माजला होता.........कोणत्या प्रश्नांचा हल्लकल्लोळ ते तुम्ही जाणताच....
दिनेश सूर्यवंशी
!! जयंतू हिंदुत्व !!
!! जयंतू हिंदुराष्ट्रम !!









































