पाटणे येथील हे मंदिर जगती वर उभे असून मुख मंडप अर्धकुला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. गर्भगृहाचा तलगिन्यास पंचरता प्रकारचा असून तारकाकृती आहे. अर्ध खुदा मंडप अनेक थर असलेल्या पिठावर असून पिठाच्या सगळ्यांवरच्या भागावर गज थर आहे. अर्ध खुल्या मंडपाला तिन्ही बाजूंनी वामन भिंती असून त्याच्या राजसेनाकाचे स्वरूप कीर्ती मुखांचा पट्टा असे आहे. या पट्टावर कक्षा संयुक्त वेदिका आहे. कक्षा सणाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील आकृती शिल्प होय. गर्भगृहाच्या भद्रभागामधील देवकुष्टांमधील महिषासुरमर्दिनी आणि भैरव या मूर्तींचा अपवाद वगळता गर्भगृहाच्या बाह्य अंगावर मूर्ती नाहीत.
पिठावर अनुक्रमे खूर जाडंब कुंभ आणि कपोत असे थर आहेत. कपोथावर गज थर आहे. मंडोवराच्या तळ भागात जाडंभ कुंभ कलश आणि कपोत असे थर आहेत. त्यावर जंगबाज असून तो स्तंभकुठाने अलंकृत केलेला आहे. गर्भगृहाच्या द्वाराला सहा शाखा असून त्यावर अनुक्रमे १) पद्मपट्टा २) वादक ३) ४) व्याल ५) कमळाच्या पाकळ्या व ६) चौकशी आणि गोलकांची नक्षी असे अलंकार आहे. गणेश असून उत्तरांगातील प्रतिकांमध्ये सप्तमातुरकांपैकी तीन मातृ का आणि गणेश भैरव आहेत. या मंदिरांची वास्तुशाली द्वार स्तंभ घटक क्रम आणि मंडोवर लक्षात घेता हे मंदिर ईसचा १२ व्या शतकाच्या अखेरीस बांधले गेले असे अनुमान करता येते. शके १०७५ चा लेक आहे. इस ११५३-५४ चा लेख निकुंभ नृपती इंद्राराज वन द्रोपती गावंचा आहे.
पाटणे येथील पंचायतन
पाटणे गावाच्या हद्दीत आणि सातमाळा टेकड्यांच्या पायथ्याशी नदीच्या तीरावर हे पंचायतना आहे. हे पंचायतन आई भवानी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात यादवांचा मांडलिक असलेल्या सोयदेवाचा शिलालेख आहे. हा सोईदेव यादव द्रुपती सिंगणाचा समकालीन असून शिलालेखात त्याने चांगदेव नामक राज ज्योतिषाच्या अधिपत्याखाली असलेल्या मठास दिलेल्या देण्यांचा उल्लेख आहे. या शिलालेखावरून सदर मंदिर इस. १३ व्या शतकाच्या सुरुवातीस शके ११२८ म्हणजे ९ ऑगस्ट १२०७ च्या सुमारास बांधले गेले असावे. या लेखात निकुंभशातील सोईदेव व हेमाडी देव व यादव द्रुपती सिंघम याचा उल्लेख आहे. लेखाचा हेतू सिंगणाचा राज ज्योतिषी चांगदेव याचा आजार भास्कराचार्य याने रचलेल्या सिद्धांत शिरोमणी व इतर ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी मठाची स्थापना करण्याविषयीची नोंद करणे हा आहे.
हे मंदिर खूप लोकप्रिय असल्याने आणि दरवर्षी येथे मोठी जत्रा भरत असल्याने मध्ययुगीन आणि ब्रिटिश काळात त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सध्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर एक सज्जा लागतो. आणि या सज्जा मागे हे मंदिर आहे. चार गर्भग्रहांना समाईक असलेल्या लंब चौकोनाकृती खुला मंडप असे मंदिराचे सध्याचे स्वरूप आहे. यापैकी तीन गर्भगृहे मंडपाच्या एकाच बाजूस एकाच दिशेला अभिमुख असून चौथे गर्भ ग्रह या तीन गर्भगृहांच्या काटकोनात मंडपांच्या अरुंद बाजूला लागून आहे. पण या चौथ्या गर्भगृहासमोरील मंडपाच्या दुसऱ्या अरुंद बाजूला लागून आणखी एक गर्भगृह होते हे सिद्ध करण्याइतपत पुरावा किंवा अवशेष आजही शिल्लक आहेत. आधी नमूद केल्याप्रमाणे या मंदिराची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती होताना त्यात अनेक बदल झाले आहेत. काही मंदिर घटकांचे तर आकारही बदलले असण्याची शक्यता आहे. परिणामी आज या मंदिराकडे पहिले असता ते आधुनिक काळात बांधलेले मंदिर वाटते. याआधी वेसर आणि फासना प्रकारचे शिखर असलेल्या मंदिरांचे विवेचन करताना फासना प्रकारचे शिखर असलेल्या विष्णूच्या गर्भ ग्रुप हा ची आणि दक्षिणेकडील वेसर शिखर असलेल्या गर्भगृहाची चर्चा आपण केलेलीच आहे. ही मंदिरे मुळात कशी असावीत याची साधारण कल्पना क्रूझीन कृत मेडिकल टेंपल्स ऑफ द डेक्कन या ग्रंथात दिलेल्या छायाचित्रावरून येऊ शकेल. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण तळीविन्यासामुळे त्याची या प्रकरणात आवर्जून चर्चा केली आहे. कारण सामान्यपणे मध्यभागी मुख्य मंदीर किंवा मुख्य आयातन आणि याच्या चारही बाजूंना काही अंतर सोडून चार उप आयातने असेच पंचायतनाचे स्वरूप असते. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर याचा उत्तम नमुना आहे. पण येथे मात्र पाचही आयातने लंब चौकोनाकृती खुल्या मंडपाच्या तीन बाजूंना जोडून आहेत.
फासनाकार शिखरे मंदिराच्या विमानावर नसून मंडपावर किंवा अर्धमंडपावर आढळतात. यावरूनच हा शिखर प्रकार भव्य आणि सौंदर्य संपन्न शिखरासाठी अस्तित्वात आला नाही हे स्पष्ट होते. मंदिर संकुलातील दुय्यम मंदिरांवर विशेषतः एका ओळीत असलेल्या मंदिरांवर आढळणारी फासनाकार शिखरे वरील निष्कर्ष पक्का करतात. फासना शिखरांना दिले जाणारे दुय्यम महत्त्व हेही समाधी मंदिरांकरता होणाऱ्या या शिखराच्या वापराचे प्रमुख कारण असू शकेल.
पाटणे येथील पंचायतन संकुलातील विष्णू मंदिर हे प्राचीन फासना मंदिराचे एक उदाहरण आहे. हे एक निराळ्याच प्रकारचे पंचायतन आहे आज उपलब्ध असलेल्या अवशेषावरून मध्यभागी लंब चौकोनी मंडप, त्याच्या मागील बाजूस मंडपाला जोडून एका जवळ एक अशी तीन गर्भगृहे आणि मंडपाच्या दोन अरुंद बाजूला जोडून प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे एकूण दोन गर्भगृहे असे या पंचायतनाच्या स्वरूप असल्याचे लक्षात येते. मागील तीन गर्भगृहापैकी मधले गर्भगृह विष्णूचे असून त्यावर साधे फासणा शिखर आहे. इतर आयतनांवर हे असेच शिखर होते का ? हा संशोधनाचा विषय आहे. हेन्री कझिन्स लिखित 'मेडिव्हियल ऑफ डेक्कन' या ग्रंथात प्लेट क्रमांक मध्ये या पंचायतनाच्या मागच्या बाजुचा हा फोटो दिलेला आहे. तो पाहून याबाबत फक्त तर्क करता येणे शक्य आहे.
समुद्रसपाटीपासून ६६० मीटर ( २१६५ फुट ) उंचीवर असणाऱ्या या गडास भेट देण्यासाठी चाळीसगाव या तालुक्याच्या गावी पोहोचावे लागते. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. पाटणादेवी हे या भागातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे चाळीसगावच्या बसस्थानकावरून सकाळी ७.३० पासून दर तासास एक याप्रमाणे (चाळीसगाव-पाटणादेवी अंतर १८ कि.मी.) बस सुटतात. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत.
आपण बसने साधारण पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर पाटणे नावाचे गाव लागते. येथून बसने आपण सरळ पाटणादेवीला न जाता पाटणादेवीच्या अलीकडे दीड कि.मी. अंतरावर असणाऱ्या महादेव मंदिर बसथांब्यावर पायउतार व्हायचे.
![]() |
कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. पाटणा गावाच्या पुढे रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो.
८ फूट उंच दगडी चौथर्यावर हे पूर्वाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्यावर फरसबंदी केलेली आहे. या चौथर्यापसून ६ फूट उंचीवर मंदिर बांधलेल आहे.मंदिराच्या आसपासच्या परिसरात दिसणारे कोरीव दगड व इतर अवशेष पहाता या ठिकाणी केवळ एकच मंदिर नसुन मंदिरसमुह व मोठया प्रमाणात वस्ती असल्याचे दिसुन येते.
मंदिर ७५ फूट लांब ,३६ फूट लांब ,१८ फूट उंच आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे या मंदिराचा ताबा असून त्यांनी तसा निळा फलक लावला आहे. या मंदिराची भव्यता नजरेत भरण्यासारखी आहे . मंदिर परिसरात अनेकठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात . त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो . यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते .
या पुरातन मंदिराभोवती दगडी भिंत असून त्यावर काटेरी तारांचे कुंपण लावलेले आहे.पुरातत्व विभागाने मंदिराकडे जाणारा घडीव दगडातील मार्ग बांधून काढला आहे.मंदिराच्या विशाल प्रांगणात शेंदुर विलेपित हनुमानाची मुर्ती भाविकांनी स्थापन केलेली आहे.
मंदिराच्या सभोवती कडुनिंब्,चिंच, बोरी-बाभळी याची झाडी असून या वृक्षांवर काळतोंडे लंगुर बसलेले पहायला मिळतात.
प्रांगणाच्या मधोमध आठ पायर्यांच्या उंचीचा घडिव दगडातील चौथरा असून त्यावर आठ पायर्या चढून गेले कि मुख्य मंदिरात प्रवेश होतो. मंदिराचे द्वारमंड्प,सभामंडप, अंतराळ व गर्भगृह, असे चार भाग आहेत.
नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात . छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहे . 
द्वारमंडपापुढे नंदीमंडप असून त्यात नंदीचे सुंदर शिल्प आहे.सभामंडप विशाल असून आतमध्ये चार खांबांच्या तीन रांगा आहेत.
मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे . साधारणपणे २४ खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसते प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे . खांबांवरील तुळया त्यांचे जोतरे त्यावर रचलेले आयताकृती दगड , सगळं कसं अगदी जुळवून आणलंय . अतिशय कसलेल्या मुरब्बी कारागिरांच्या हातून या कलाकृतीचे निर्माण झाले आहे . प्रत्येक चौकीतील छताच्या रचनेत वैविध्य जाणवते .कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून २५ फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानामुळे मन थक्कच होते .
स्तंभावर व भिंतीवर कीर्तिमुख व इतर कोरीव शिल्प आहेत.बाजुच्या एका शिलालेखावर 'शके १०२५' हि अक्षरे वाचता येतात.
गर्भगृहाच्या पट्टीवर गणपती , सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. गर्भगृहाच्या बाहेर जमिनीवर कोरलेली शंख व चक्र ही विष्णू आयुधे बघतांना मनात कोडे निर्माण होते .प्रवेशद्वाराच्या पायथ्याला मेंढ्यांची शिंगे व सिंहाचा जबडा असलेला बटबटीत डोळ्यांचा किर्तीमुख लक्ष वेधून घेतो . त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शिल्पे पुसट असल्याने नीट आकलन होत नाही . प्रवेशद्वारावर श्रीगणेश विराजमान असून सप्तमातृका कोरलेल्या आहेत .तसेच गणसेना दिसते चौकटीवर यक्ष गंधर्व किन्नर गायन वादन व नृत्य करतांना दिसतात .
गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो . त्यावरील अक्षरांची ठेवण व एकसंधता पाहून कलाकारांना प्रणाम करावासा वाटतो . आज या शिलालेखाला कुठलेही संरक्षण कवच नाही . त्यामुळे पर्यटकांच्या भक्ष्यस्थानी तो पडेल की काय अशी भिती वाटते .( कुतूहल म्हणून प्रत्येकजण त्याला हात लावतोच ) म्हणून काचेच्या शोकेसमध्ये त्याला बंदिस्त केल्यास एक समृद्ध वारसा सुरक्षित राहील . काही ठिकाणी त्याचे पापुद्रे पण निघत आहेत.
गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गर्भगृहाचा आकार चंद्राकृती असून मध्यभागी असलेली शिवपिंडी मन प्रसन्न करते आत बराच अंधार असल्याने सुरुवातीला काहीच दिसत नाही .पण नंतरमात्र हळूहळू दिसायला लागते याला आतून २८ कोपरे आहेत .
आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत . प्रदक्षिणा करतांना मंदिराची भव्य दिव्यता नजरेत भरते . मंदिराची भौमितिक संरचना वाखाणण्याजोगी आहे .बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना सरळ रेषेत न उभारता त्रैमितीक रचना पध्दतीचा वापर केला आहे . प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे ( समजा कालांतराने एखादा खांब ढासळला तर तितकीच जागा रिक्त होईल .पण मूळ वास्तूला कुठलीही हानी पोहचणार नाही याची काळजी वास्तू उभारतांना घेतलीआहे .)
स्तंभावरील कोरीवकाम अप्रतिमअसून उठावदार शैलीतील मूर्तिकाम नजर खिळवून ठेवते . उठावदार शैली शिल्पांवर शेकडो वर्षाचा ऊन वारा पाऊस यामुळे परिणाम झालेला दिसतो .अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत . काहीचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही .तर काही शिल्पे मानवी हस्तक्षेपामुळे विद्रुप झालेली दिसतात . काही हौशी गवशी मंडळी शिखराच्या अर्ध्यावर चढून आईलपेंटने स्वतःची इंग्रजी आद्याक्षरे लिहून पापाचे भागीदार झालेले दिसतात . यांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे .
मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तारेच्या जाळीचे कुंपण घालून अशा नतद्रष्ट लोकांपासून काही शतके मंदिर वाचवता येईल .जेणेकरून भावी पिढीसाठी हा वारसा जीवंत राहील .( ही वास्तू पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी काहीतरी पावले उचलावी ही रास्त अपेक्षा आहे .)
मंदिरावरील शिल्प कला ही मंत्रमुग्ध करणारी आहे .संपूर्ण मंदिराला एका मेखलेने बद्ध केले आहे या मेखलेवरील शिल्पे डोळ्यांचे पारणे फेडतात . नंदिवर आसनस्थ शिव, तांडव मुद्रेतील शिव, धनुष्यबाण धारण केलेला पिनाकपाणी शिव,पद्मासनस्थ शिव , अशी कितीतरी शिवशिल्प मन मोहून टाकतात .
नृत्य गणेश , विणावादक गणेश , वरददायक गणेश अशी वेगवेगळ्या स्वरूपात गणेश शिल्प आढळतात .आश्चर्य म्हणजे हनुमानाचे शिल्प देखील या मेखलेवर विराजमान आहे .
सर्वात आश्चर्य म्हणजे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते .ही प्रतिमा बाहुबली गोमटेश्वराचीच का ? या विषयी निश्चित माहिती नसले तरी तेथील मूर्तीशी तिचे कमालीचे साधर्म्य आहे .
यावरून एक निष्कर्ष काढता येतो की या कारागिरांना गोमटेश्वराची माहिती असावी किंवा त्या निर्माणकार्यात यांचाही सहभाग असावा . त्या काळातील दळणवळण इतके प्रगत नसतांना असे साम्य पाहून मन थक्क होते .
मंदिर शिखराच्या वरच्या बाजूला दगडात कोरलेल्या पताका शिखर सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात . त्यांच्यातील जिवंतपणा बघण्यासारखा आहे .
मेखला पट्टीच्या खाली बाहेर धावणारी हत्तीशिल्पे , व वृषभशिल्पे दिसून येतात . जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे .
हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी मंदिराच्या वरच्या बाजूला गावक्षांचे कोरीवकाम अद्भुत आहे .या गवाक्षांना दोन नक्षीकाम केलेल्या स्तंभानी आधार दिला आहे तर खालच्या बाजूने अर्ध गोलाकार दगडी स्तंभांवर पेललेला भार नजर हटू देत नाही .एका गावक्षात कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती विस्मित करते .तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे .पायाखाली एका दैत्याला दाबले आहे .ते मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे .हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते . शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे .त्यांच्या प्रतिभशक्तीला लाख प्रणाम !
उठाव शैलीतील हे शिल्प आज बरेच झिजलेले दिसते पण तरीही त्याचे सौंदर्य कमी होत नाही . मंदिराच्या प्रत्येक कोनाड्यात यक्ष गंधर्व व नृत्यांगना यांच्या असंख्य प्रतिमाचा चपखल मेळ बसवलेला आहे . मंदिर निर्माण शास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या कलाकारांच्या हातून या वास्तूचे निर्माण झाले आहे .यात तिळमात्र शंका नाही .
मंदिराच्या उजव्या बाजूला दोन सात फूट उंचीचे स्तंभ उभे आहेत . त्यावर शंख चक्र गदाधारी विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत .बाजूला जय विजय उभे आहेत . हे बघतांना वेरूळ लेण्यांची आठवण येते . या मंदिर निर्माण काळात शैव व वैष्णव यांच्यात बरीच एकरूपता झाल्याचे दिसते .
मेखला पट्टीच्या खाली बाहेर धावणारी हत्तीशिल्पे , व वृषभशिल्पे दिसून येतात . जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे .
हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी मंदिराच्या वरच्या बाजूला गावक्षांचे कोरीवकाम अद्भुत आहे .या गवाक्षांना दोन नक्षीकाम केलेल्या स्तंभानी आधार दिला आहे तर खालच्या बाजूने अर्ध गोलाकार दगडी स्तंभांवर पेललेला भार नजर हटू देत नाही .एका गावक्षात कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती विस्मित करते .तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे .पायाखाली एका दैत्याला दाबले आहे .ते मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे .हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते . शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे .त्यांच्या प्रतिभशक्तीला लाख प्रणाम !
उठाव शैलीतील हे शिल्प आज बरेच झिजलेले दिसते पण तरीही त्याचे सौंदर्य कमी होत नाही . मंदिराच्या प्रत्येक कोनाड्यात यक्ष गंधर्व व नृत्यांगना यांच्या असंख्य प्रतिमाचा चपखल मेळ बसवलेला आहे . मंदिर निर्माण शास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या कलाकारांच्या हातून या वास्तूचे निर्माण झाले आहे .यात तिळमात्र शंका नाही .
मंदिराच्या उजव्या बाजूला दोन सात फूट उंचीचे स्तंभ उभे आहेत . त्यावर शंख चक्र गदाधारी विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत .बाजूला जय विजय उभे आहेत . हे बघतांना वेरूळ लेण्यांची आठवण येते . या मंदिर निर्माण काळात शैव व वैष्णव यांच्यात बरीच एकरूपता झाल्याचे दिसते .
मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत.
ही प्राचीन वास्तू सन१९५८ च्या अधिनियम २४ नुसार पुरातत्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे . परंतु वास्तू संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत याचे वैषम्य वाटते .
प्रत्येक गोष्ट कायद्याने संरक्षित होईल तेव्हाच का आपण तिचे संरक्षण करणार ? एक जबाबदार पर्यटक म्हणून आपणही प्रत्येक वास्तूचा आदर केला पाहिजे .आपल्याकडून त्या वास्तूला काही नुकसानतर पोहोचत नाही ना याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे .तरच हा अनमोल ठेवा आपण भावी पिढीसाठी संरक्षित ठेऊ शकू !
हे सर्व सुंदर अवशेष पाहाताना आपणास वेळकाळाचे भान राहात नाही. हे मंदिर बाराव्या शतकात निकुंभ राजवटीत बांधले गेल्याची मान्यता आहे.निकुंभ राजवटीतील इंद्रराजाने हे मंदिर बांधायला घेतले व त्याचा मुलगा गोविंद याने ते काम पुर्ण केले असा शिलालेखात उल्लेख आहे.

No comments:
Post a Comment