गिरि गहर नद - निर्झर मय लता
गुल्म तरु कुंज भूमि है,
तपोभूमि साहित्य कलायुत
वीर भूमि बुंदेल भूमि है ।
एक
समय था, जब बुंदेलखंड का विस्तृत
प्रदेश एक शासन-सूत्र में बंध कर उत्तर
में यमुना से लेकर दक्षिण में नर्मदा
तक और पश्चिम में चम्बल से लोकर
पूर्व में टां... तक फैला हुआ था, किंतु
इन नदियों द्वारा घिरे हुए भाग में सीमांत
की ओर के क्षेत्र बघेली गोंडा, जयपुरी,
मालवी, निमाड़ी, छत्तीसगढ़ी और गोंडी
बोलियों का दबाव प्रभाव वाले हैं
। बुंदेली बोली की दृष्टि से जो भाग
वास्तविक बुंदेलखंड है, उसका आज कुछ
भाग उत्तर-प्रदेश और शेष मध्यप्रदेश के
कुछ भागां में विस्तार पाये हैं । इस
प्रकार झांसी, हमीरपुर, बांदा, जालौन,
सरीला, ग्वालियर, ईसागढ़, विदिशा,
भोपाल, टीकमगढ़, छत्तरपुर, पन्ना, चरखारी,
समथर, दतिया, विजावर, अ्जयगढ़ तथा
सागर, दमोह, जबलपुर और होशंगाबाद
इसमें सम्मिलित किये जाते हैं। सवनी
का कुछ भाग भी इसके अंतर्गत लिया जाता
है। राजनितिक सीमाओं की दृष्टि से
विभिन्न ऐतिहासिक युगों में राज्यों
के अंतर्गत आने वाले क्षेत्रों को लेकर
विभिन्न दिशाओं में बढ़ाया-घटाया जा
सकता है।
पुराकाल
से अब तक बुंदेलखंड अनेक शासकों के
अधीन रहा है इसलिए उसके नाम समय-समय
पर बदलते रहे हैं - जैसे - पुराणकाल
मे यह "चेदि' जनपद के नाम से अभिहित
हुआ है तो साथ-साथ इसको दस नदियों
वाला "दशार्ण' प्रदेश भी कहा गया
है। विन्धय पर्वत की श्रेणियों से आवेष्टित
होने के कारण इसे "विंधयभूमि'
या "विंधय निलय', "विंधय पार्श्व'
आदि संज्ञाऐं भी मिलती हैं। "चेदि' का
दूसरा नाम "डाहल' माना जाता है
दशार्ण और "चेदि' अलग-अलग जनपद भी
हैं। चेदी और त्रिपुरी का सम्बंध भी
महत्वपूर्ण माना जाता है। बुंदेलखंड
की दक्षिणी सीमा रेवा (नर्मदा) के द्वारा
बनती है इसलिऐ इसे "रेवा का उत्तर
प्रदेश' भी माना जाता है। बुंदेलखंड
में पुलिन्द जाति और शबरों का अनेक
समय तक निवास रहा है इसलिए कतिपय
विद्वान इसे "पुलिन्द प्रदेश' अथवा
"शबर-क्षेत्र' भी घोषित करते हैं।
बुंदेलखंड
राजनैतिक इतिहास में दसवीं शताब्दी
के बाद ही अपनी संज्ञा को सार्थक करता
है। चंदेली शासन मे यह क्षेत्र "जुझौती'
के नाम से जाना जाता था किन्तु जव पंचम्
सिंह बुंदेल के वंशजों ने पृथ्वीराज
के खंगार सामन्त को कुण्डार में परास्त
किया और इस प्रदेश पर अधिकार जमाया,
इस भूमि का नाम बुंदेलखंड पड़ा ।
पंचम
सिंह यूं तो स्वयं गहरवार थे । वे
बुंदेला कब हुं, इस संबंध में अनेक
विंवदन्तियाँ हैं । कतिपय विद्वानों का
मत है कि यह शब्द विंध्यवासिनी देवी
से संबंधित है । पंचम सिंह ने विंध्यवासिनी
देवी की आराधना की थी । विंध्यवासिनी
देवी का मंदिर विंध्य पर्वत श्रेणियों
पर स्थित है, इसलिए कहा जाता है कि
पंचम सिंह ने अ्पने नाम के साथ "विंध्येला'
जोड़ लिया था । यह विंध्येला शब्द
ही बाद में "बुंदेला' रुप में विकसित
हो गया और जिस क्षेत्र में पंचम
सिंह अथवा उसके वंशजों ने राज्य
विस्तार वह बुंदेलखंड कहलाया । टाड
के अनुसार ""जसौंदा नामक गरहवार ने विंध्यवासिनी
देवी के सम्मुख एक महायज्ञ करके अपने
वंशजो को "बुंदेला' प्रसिद्ध किया
और इससे बुंदेलखंड बना ।''
बुंदेलखंड के विभिन्न खंड एक लम्बे
समय तक भिन्न-भिन्न शासकों के बंधन
मे रहे इसलिए विभिन्न भागों के बुंदेलखंडियों
में एकता के बीच किंचित विधिता का आभास
मिलता है, फिर भी बुंदेलखंड के
विभिन्न भाग मिला कर अपनी प्राकृतिक
रचना, जलवायु और भाषा तथा
साहित्य रीति-नीति और लोक-व्यवहार
मे ऐसा खंड है, जिसका एक विशेष अपनापन
है।
भारतात ज्या दैवतांची पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात चालते, त्यांत शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग झाले आहेत.
आजचा शिव म्हणजे ऋग्वेदातील रुद्र असे मानले जाते. रुद्र हा शब्द ‘रुद्’ या धातूपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ रडणे, ओरडणे किंवा प्रकाशणे असा होतो. तो तांबडा रंगही सुचवतो. ऋग्वेदात, यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेत, अथर्ववेदात, ऐतरेय ब्राह्मण व शांखायन ब्राह्मण या वाङ्मयात रुद्रासाठी ‘शिव’ हे विशेषण वापरलेले आढळते. शिव, शंकर, शंभू ही पावित्र्यसूचक व कल्याणकारी स्वरूपाची विशेषणे आहेत. शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या वरून रुद्राच्या ऊर्ध्व लिंगाची कल्पना केली गेली असावी. शिवलिंगाला ज्योतिर्लिंग म्हणतात त्याचे रहस्य हेच आहे. अग्नि वेदीवर जळत आणि तापत राहतो; म्हणून शिवरूपात त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकी अभिषेकाची संततधार धरावी लागते. शिव किंवा शिवभक्त आपल्या शरीरावर भस्मचर्चन करतात त्यातही रुद्राचे अग्नीशी तादात्म्य सूचित होते.
चतुर्मुख लिंग शिव, जावा.
शिव (जि. बलिया), उत्तर प्रदेश.
रुद्राच्या घोर व अघोर अशा दोन तनु मांडलेल्या आहेत. यजुर्वेद आणि अथर्ववेदात रुद्राला मारक असे म्हटले आहे. तर यजुर्वेदात त्यास अघोर म्हणजे सौम्य रूप विशद केला आहे. भव आणि शर्व ही शिवाची दोन प्रसिद्ध नावे आहेत. या दोन्ही मुळात भिन्न देवता होत्या. शिवमहात्म्य वाढल्यावर या दोन्ही देवता शिवाच्या भूपती आणि पशुपती या स्वरूपात विलीन झाल्या. अशाप्रकारे अनेक देवतांना आपल्यात समाविष्ट करून शिव हा महादेव बनला.
रुद्र हा भयप्रद आणि संहारक आहे, त्याचे अवयव दृढ आहेत, त्याचा रंग सोनेरी-पिंगट आहे, तो लांब केसांची वेणी घालतो, सोन्याचे अलंकार घालतो व रथात बसतो असे वर्णन ऋग्वेदात येते. पुढे वाजसनेयी संहिता व अथर्ववेद यांनी त्यात भर घालून त्याला ‘नीलकण्ठ’ संबोधले. तो कातडे वापरतो व पर्वतात राहतो, मांसभक्षक कुत्रे त्याच्यासोबत असतात असेही म्हटले आहे. ऋग्वेदातील सूत्रांत रुद्राबद्दल भीती व्यक्त केलेली आहे. ‘तू आमच्या गुराढोरांचे रक्षण कर, आमचे गाव, मुलेबाळे यांना मारू नकोस’ अशा स्वरूपाच्या प्रार्थना आढळतात. प्रार्थना केल्यास तो संकटनाशकही आहे. त्याला औषधांचा स्वामी मानले आहे; यासंबंधी ‘जलाषभेषज’ हे त्याचे विशेषण आढळते. पशुंना वाचविणारा अर्थात पशुपतीही तो आहे. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट या तीन भयप्रद निसर्गक्रमांचे द्योतक म्हणजे त्र्यंबक-रुद्र होय (त्र्यंबक – तीन डोळे असलेला). म्हणूनच तो स्वत: भयप्रद व संहारक आहे. रुद्राचे एकंदर स्वरूप हे मांगल्य आणि अमांगल्य यांचा संयोग आहे. शत्रूंना रडविणारा (रुद्र), पर्वतांचा अधिपती (गिरीश), निळ्या गळ्याचा (नीलग्रीव), लाल रंगाचा (विलोहित), रात्री फिरणारा (नक्तंचर), पशूंत प्रवेश करणारा (शिपिविष्ट), पिनाक हे धनुष्य धारण करणारा (पिनाकपाणी) असे रुद्राचे वर्णन रुद्राध्यायात आहे. ब्राह्मणकाळात रुद्राचे उन्नयन झालेले दिसून येते. उपनिषदांतून रुद्र-शिवाची भक्ती आढळते. श्वेताश्वतर उपनिषदाने रुद्राचे महेश्वर असे वर्णन केले आहे. बहुधा याच काळात रुद्र आणि शिव एकरूप झाले असावेत. पुराणात शिवमाहात्म्य सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. त्यांचा प्रसार सर्व वर्गांत झाला व शिव हे सर्व जातिजमातींचे आराध्यदैवत बनले. तो ब्रह्मा व विष्णूपेक्षा वरचढ समजला जाऊ लागला. त्याचे स्वरूप थोडे सौम्य झाले; पण वैदिक काळातील त्याच्या रौद्र रूपाचे धागेदोरे पौराणिक काळातही टिकून राहिलेले दिसतात. शिवाने ब्रह्मदेवाच्या आणि दक्षाच्या यज्ञांचा विध्वंस केल्याच्या कथांतून हे दिसून येते. तसेच त्याचे स्मशानात राहणे, कातडे नेसणे, वृषभ वाहन व भूतप्रेतादी सहचर, विषप्राशन करणे आणि कौल, कापालिक, पाशुपत या अवैदिक मतांशी शिवाचा संबंध या साऱ्यांतून त्याचे अतिप्राचीन रौद्र स्वरूप जाणवते. विनाश, तीक्ष्णदंष्ट्र, विरूपाक्ष, ऊर्ध्वकेश ही त्याची नावे याला पुष्टी देतात. ब्रह्माविष्णूमहेश या त्रयीत ब्रह्मदेवाकडे सृष्ट्योत्पादन, विष्णूकडे सृष्टीसंवर्धन आणि महेश-शिवाकडे सृष्टीच्या संहाराचे कर्तेपण दिले आहे, हे एका अर्थी त्याच्या उग्र रूपाला साजेसेच आहे. शिवपूजन हे मुख्यत: शिवप्रतिके, शिवलिंग आणि मूर्ती या तीन स्वरूपांत केले जाते. अश्वत्थाम्याने शिवाचा ‘स्वेतविग्रह’ निर्माण केला होता व होम इ. करून त्याची पूजा केली होती, असा उल्लेख महाभारतात आहे. शिवप्रतिकांमध्ये लिंग हे सर्वांत महत्त्वाचे आहे. लिंगपूजा ही जवळपास सबंध आशिया खंडात प्रचलित आहे. शिवाचे सर्वमान्य प्रतीक म्हणजे वृषभ किंवा बैल. ऐतिहासिक काळात बऱ्याच शिवोपासक राजांच्या मुद्रांवर, नाण्यांवर बैलाचे अंकन आढळून येते. विम, वासुदेव या कुषाण राजांच्या नाण्यांवर त्रिशूळ-परशू ही शिवचिन्हे आहेत. दक्षिण भारतीय अंकनात शिवाच्या हातात फक्त परशू दिसतो; त्रिशूळ नाही. या व्यतिरिक्त मंदिर, लिंग, नंदीपद, अर्धचंद्र असलेला वृषभ इ. चिन्हे गुप्तकालीन मृण्मुद्रांवर मिळाली आहेत. शिवमूर्तीचे प्राचीनत्व मौर्यकाळापर्यंत मागे जाते. भीटा (अलाहाबाद) येथून प्राप्त झालेल्या एका सर्वतोभद्र प्रतिमेच्या एका बाजूस मुकुट घातलेली कलशधारी द्विभुज प्रतिमा आहे. तिच्या पायाशी सिंह व वराह कोरलेले आहेत. या प्रतिमेच्या पाठीशी दुसरी स्थूल, द्विभुज प्रतिमा आहे. हातात कडे व पाठीमागे वळवलेले केस अशी ही प्रतिमा यक्षप्रतिमेच्याजवळ जाते. ही प्रतिमा शिवाची असावी व तिच्यामागे वराह, सिंहासह विष्णू दाखविला असावा, असे मत नी. पु. जोशी यांनी व्यक्त केले आहे. मथुरा येथून अनेक कुषाणकालीन मृण्मूर्ती व पाषाणमूर्ती तसेच लिंगे मिळाली आहेत. दक्षिण भारतातील सर्वांत प्राचीन शिवप्रतिमा तमिळनाडू राज्यातील गुड्डीमलम मंदिरात आहे. येथे पाच फूट उंच शिवलिंगाच्या दर्शनी भागावर उभ्या शंकराची द्विभुज प्रतिमा आहे. गोपीनाथ राव यांच्या मते, ही मूर्ती इ. स. पहिल्या/दुसऱ्या शतकातील असावी.
या महादेवाची पुजा लिंगरूपात करावी असे पुराणांनी सांगितलेले आहे. ही लिंग पूजा फार प्राचीन असून तिचे अवशेष सर्व जगामध्ये आढळतात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात ह्या गोष्टीचा पुरावा मिळालेला आहे. तिथे सापडलेल्या एका खापरावर एक त्रिमुख पूर्णाकृती उमटवलेली असून ती ऊर्ध्वमेंढर (उत्थित लिंग ) दाखवलेली आहे. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा हा उपास्यदेव असावा आणि त्याची पूजा लिंगरूपात करीत असावेत हे तिथल्या अवशेषावरून कळून येते.
शाळुंका आणि त्यावर ऊर्ध्व लिंग आकृती ही दोन्ही मिळून लिंग प्रतिक बनते. शाळुंका हे योनी प्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण हे लिंगप्रतीक समजावे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारी स्त्री-पुरुषांची ही जननेंद्रिय सिंधू संस्कृतीच्या लोकांनी तसेच इतरही अनेक आदिम जमातींनी शिवलिंग स्वरूपात उपास्य बनवली. लिंगा बद्दल लिंगपुराणात सयोनी लिंगाचे वर्णन दिलेले आहे. लिंग वेदी अर्थात शाळुंका म्हणजे पार्वती व लिंग म्हणजे साक्षात महेश्वर होय. त्या दोघांच्या पूजनाने शिवपार्वतीची पूजा केल्यासारखे होते.
शिवलिंग निर्मिती कशी करावी याविषयी तपशील सुप्रभेदागम मध्ये दिलेला आहे. लिंगे ही आदिम काळापासून भारतात दिसून येतात, जी नंतर शिवलिंगा सोबत जोडली गेली. श्रीपरीपूर्णानंद वर्मा म्हणतात की, जगाच्या कानाकोपऱ्यात वासना आणि प्रजनन या दोन कारणांमुळे लिंग पूजेचा प्रसार झाला होता. कटनर असे म्हणतात की, लिंग पूजा सर्वप्रथम इजिप्त देशात सुरू झाली. जी चौथ्या शतकापर्यंत टिकून होती. आयसीस याने लिंग पूजेचा प्रारंभ केला होता. आयसीसीच्या मंदिरातही अग्नि पेटत ठेवत असत. या अग्नीचे पूजन "अक्षतयोनि" कुमारिकाच करीत असत. यातही शिव संकल्पनेचे आदिम रूप आम्ही पाहू शकतो. शिवाचा आणि अग्नीचा असलेला सहसंबंध, त्याचे शिखी हे नाव, त्याचा अग्नीमुळे तिसरा नेत्र, शाश्वत प्रजनन शक्ती दर्शविणारा त्याचे ऊर्ध्व लिंग, काम दहनाचा केलेला पराक्रम. तसेच शिव ज्ञानस्वरूप असून काम दहन केले म्हणजे पार्वतीचे लैंगिक सुख हिरावून घेतले असे मात्र नाही. आपल्या ज्ञानाग्नीने अविद्या आणि अज्ञानरूपी तमांचा नाश केला असे म्हणता येईल.
शिवाने वैदिक परंपरेला असंख्य कथा दिल्या. रुद्र आणि योगिनी हे शिवाशी संबंधित आहेत. शिव हा योगापासून भोगा पर्यंत, सर्व शाखांचा उद्गाता, विषा पासून गांजा पर्यंत, कामापासून वैराग्य पर्यंत पुरुषोत्तमाचे सर्व बिंदू शिवा मध्ये आहेत.
वात्सायनाने कामसूत्र लिहीत असताना त्याचे सर्व श्रेय शिवाला दिलेले आहे. पहिल्यांदा काम कलाही शिवाने पार्वतीला सांगितली, ती नंदीने ऐकली. त्यावर नंदीने अनेक खंडाचा ग्रंथ लिहिला तो सामान्यांना वाचणे शक्य नसल्यामुळे त्याचे लघुरूप मी मांडत आहे असे मुनी वात्सायन म्हणतात. कालिदासाच्या कुमारसंभवात शिवपार्वतीच्या समागमाचे सविस्तर वर्णन मांडलेले दिसून येते.
शिव म्हणजे मंगल, रौद्र, सौम्य, संहारक, नवसर्जन, सुखनिधान, भयंकर, आशुतोष अशा रूपात आढळतो. सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. अमरकोशात शिवाची ४८ नावे आहेत. या नावात त्याच्या रूपाची, लंच्छनाची, कार्याची माहिती देणारी आहेत. ऋग्वेद मधील रुद्र पुढे शिव झाले. हे शिवरूप लिंग पूजेच्या माध्यमातून समाजात स्थापित झाले. पुढे यातूनच कलामुख, लकुलिश, कपालिक, वीरशैव असे पंथ निर्माण झाले. यास तत्वज्ञानाची जोड होतीच. शिव दर्शनिक आणि लोकप्रचलित अशी दोन रूपे ही पहावयास मिळतात. तो योग्याचा परमपुरुष असून स्वतः ही महायोगी आहे. शिवपुरानातील अद्भुत आणि अलौकिक कथा त्याच्या संहारक आणि उपकारक कामाची माहिती देतात.
शिव गजासूरला मारतो तर मार्कंडेयला जीवदान देतो. दक्ष यज्ञ संपवितो तर जगाला वाचविण्यासाठी हलाहल प्राशन करतो. तपोभंग करणाऱ्या मदनाला जाळतो तर अर्जुनाचा, विष्णुचा अनुग्रह करतो. स्वर्गातून येणाऱ्या गंगेचा ओघ मस्तकी धारण करून वाट मोकळी करून देतो. अशा कितीतरी कथा सांगता येतील.
मूर्ती कलेत सदाशिव, गंगावतरण, स्त्री पुरुष समानता दर्शविणारी अर्धनारीश्वर, सामान्य लोकभावना प्रकट करणारी कल्याणसुंदर, वृषभवाहन, अंधःकासुर वध, रावणानुग्रह, लिंगोदभव, त्रिपुरानंतक, नृत्य शिव, भिक्षाटण शिव, गौरीहर, अष्टमुख, सोमस्कंद, चांडेशनुग्रह, महेशमूर्ती, एकादश रुद्र, बालशिव असे कितीतरी प्रकार आढळून येतात.
आरंभ :
पौराणिक काळांतील देवतासंघ जरी एकेश्वर वादांचे समर्थन करीत असला तरी त्याचे मूळ आधार शिव, विष्णू व ब्रह्मदेव हे आहेत. यापैकी पुढें ब्रह्मदेवाचे महत्त्व कमी होऊन त्याची जागा शक्ती, सूर्य व गणपती यांनी घेतली व पंचदेवोपासना रूढ झाली. हे वर पाहिलेच आहे. आता आपण शिवासंबंधी विचार करू.
समन्वयवादी भारतीय प्रवृत्तीची एक फार मोठी फलश्रुती म्हणून शिवाकडे बोट दाखविता येईल. आज विद्यमान असलेल्या शैव संप्रदायांत अनेक प्राचीन मतें व संप्रदायांची मिळवणी झालेली दिसते. शिव व शक्ती हे भौतिक जगताचे आधार स्तंभ होत. सृष्टीचे मूळ शिवशक्तीच्या संयोगात आहे, पण जर शक्ती शिवाकडून विनियंत्रित नसली तर मात्र ती कहर उडवून देते. पूर्ण विकसित अशा शक्तीला शांत करण्याचे सामर्थ्य शिवाचेच आहे. तो येन केन प्रकरेण हे कार्य करीत असतो. रणोन्मादाने बेफाम झालेल्या शिवारूढ कालीची मूर्ती हाच अभिप्राय दर्शविते. असें सांगतात की रणांत उन्मत्त झालेल्या कालीला आवरणें जेव्हां असंभव होऊं लागले तेव्हां ऊर्ध्वमेढ शिव स्वतः उताणा पडला व त्यानें आपल्या अंगावर बेफाम उसळणाऱ्या कालीचे पाय पडू दिले व नंतर तिला आवरले. कालीच्या मूर्तीप्रमाणेंच अर्धनारीश्वर, शाळुंकेत बसविलेली शिवाची पिंडी, हरिहर, वगैरे प्रतिमा शिव-शक्तीच्या अविच्छिन्न संबंधाच्याच द्योतक आहेत. भग व लिंग हे शक्ती व शिवाचे प्रत्यक्ष प्रतीक होय. सर्व सृष्टी याच दोन प्रतीकांभोवती फिरते आहे. या मूळ सिद्धांताला साहित्य, दर्शन, कला, वगैरे अनेक पर्यायानें प्रतिपादन करण्यांचा प्रयत्न झालेला आहे. महाभारतात उपमन्यूच्या आईनें प्रत्यक्ष योनी व भंगचिन्हांकित जगताचे उदाहरण घेऊन माहेश्वर मताची बाजू फारच सफाईदारपणे उचलून धरली आहे'; व या मताच्या प्राचीनतेकडेही संकेत केला आहे.
पिंडी किंवा शिवलिंग :
सिंधुनदीच्या खोऱ्यांत ज्या प्राचीन वसाहतीचे अवशेष सापडले आहेत. त्या वसाहतीच्या वेळेपासून लिंगपूजा या देशात चालत आली असें म्हणतां येते. श्रीपरिपूर्णानंद वर्मा यांनी अनेक पाश्चात्य लेखकांच्या मतांचा आधार घेऊन आपल्या ग्रंथांत हे दाखविण्यांचा प्रयत्न केला आहे' कीं 'जगाच्या कान्याकोपऱ्यांत वासना आणि प्रजनन या दोन कारणामुळे लिंग-पूजेचा प्रसार झाला होता.' एका दुसऱ्या लेखकाचे, कटनरचे, म्हणणें असें कीं लिंगपूजा सर्वप्रथम इजिप्त देशांत सुरू झाली व ती तेथे ख्रिस्ताच्या चौथ्या शतकापर्यंत चालू होती. श्री. वर्मा यांनी या पद्धतीविषयी जास्त विस्ताराने लिहितांना असें विधान केले आहे कीं इजिप्तमध्ये आयसिस याने सर्व प्रथम लिंग-पूजनांचा प्रारंभ केला. पुढे आयसिसची रोममधे पूजा सुरू झाली. आयसिसच्या मंदिरात अग्नी सदैव पेटत ठेवीत व तेथील पुजाऱ्यांना आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घ्यावे लागत असे. या अग्नीचे पूजन 'अक्षतयोनि' अशा कुमारिकाच करीत. या विधानांत आलेल्या काही ठळक गोष्टींना शिवाचे अग्निरूप, त्याचे 'शिखि' हे नांव, त्याचा अग्निमय तिसरा डोळा, शाश्वत प्रजजन शक्तीला दर्शविणारी त्याची ऊर्ध्वमेढू स्थिती आणि त्यानें केलेला कामदहनाचा पराक्रम, वगैरे शैव कथानकांशी ताडून पहातांना खरोखरच मौज वाटते. अध्यात्माच्या रंगात रंगलेल्या भारतात आयसिसच्या कथेला एक निराळेच वळण मिळाले. येथे शिव हा ज्ञान स्वरूप असून त्यानें कामदहन केले म्हणजे पार्वतीचे सुख हिरावून घेतले असें नाही; तर त्यानें ज्ञानाश्रीनें अविद्या किंवा अज्ञानरूपी तमांचा नाश केला. येथे शिव लिंगाचा अर्थ आहे अग्नीची ज्वाला आणि शाळुंका किंवा योनी म्हणजे
यज्ञवेदी किंवा यज्ञ कुंड !
ते काहीही असले तरी मुळांत वैदिक आर्यांना बाहेरून येऊं पाहत असलेला लिंगपूजेचा प्रकार पटलेला दिसत नाहीं. त्याचें अवलंबन करणाऱ्यांना वैदिकांनी 'शिश्नदेव' असे नांव दिले व हेटाळणी केली. तरी पण इतरत्र दृढमूल झालेल्या लिंगपूजेच्या परंपरेला आपल्या परिसरांत न शिरू देणें त्यांना अशक्यप्राय झाले व तिला आपल्यात समाऊन घ्यावे लागले. हे परिवर्तन शें दोनशे वर्षांत झाले नसेल हे उघड आहे. त्याला कित्येक पिढ्या लागल्या असतील, शास्त्रार्थाचा कीस पडला असेल व अनेकांचा कंठशोष झाला असेल. ह्याची चुणूक कलेंत झालेल्या परिवर्तनांत कशी दिसते ते पहा.
मुळांत शिवलिंग हुबेहूब मानवलिंगांसारखे घडवीत असत. पुढे त्याला सुरेख अशा खांबाचे स्वरूप मिळाले; व सुपारी किंवा लिंगाग्र भागांस दर्शविणारी रेखा पुष्पमाळेत बदलत गेली. तिला पुढें 'ब्रह्मसूत्र' असेंही म्हणू लागले. लिंगाचे आकार बदलत गेले. ते चौकोनी अष्टपैलू आणि गोल अशा तीन भागांत वाटले जाऊ लागले. त्याच्यावर कधीं तोंड, कधी आवक्ष प्रतिमा तरी कधी शंकर किंवा सूर्य, गणपती, वगैरे देवाच्या पूर्ण प्रतिमा दिसू लागल्या, व होतांकरितां मूळ मानवलिंगांपासून शिवलिंगानें अगदीच वेगळे वळण घेतले. कलेच्या क्षेत्रांत एवढी परिवर्तनें होण्यांसाठी सुमारे चौदाशें (इ.पू. दुसऱ्या शतकांपासून सु. १२ व्या शतकांपर्यंत) वर्षाचा कालावधी लागला. अर्थात् त्याचे अगोदर लिंगपूजा समाजांत मान्य होण्यास किती तरी काळ लागला असेल !!
प्रतिमा :
शिव-पूजनाचे दुसरें प्रतीक म्हणजे शंकराची मानवाकार प्रतिमा हे होय. हिचा देखील प्रारंभ सिंधु-सभ्यतेच्या वेळेपासून झालेला असावा असें वाटतें. सिंधुच्या खोऱ्यातून मिळालेल्या एका ठशावर (रे. चि. एकोणतीस ४८) 'पशुपति' शिवाचे अंकन आहे असे मत सर्व प्रथम सर जॉन मार्शल यांनी प्रतिपादिले. पण सालेतोर, चौधरी, एच्. पी. सुलीवान, बी. प्रकाश, सौ. डोरिस श्रीनिवासन् वगैरे रे मंडळींना हे मत मान्य नाही. सौ. श्रीनिवासन् यांच्या मतें ही वृषमुख देवाची मूर्ती असून तिचा संबंध उत्पादन आणि समृद्धीशी फार जवळचा असावा. अस्तु. 'पशुपतीच्या ठश्याविषयीं मागें उल्लेख आलेला आहेच.' ऋग्वेदांत रुद्रांचे नांव येतें, तसाच तो अथर्ववेदांतही दिसतो, रुद्राचे स्वरूपांत मांगल्य व अमांगल्य यांचा विचित्र संयोग आहे. हे अर्थातच स्वकीय व परकीय धारांच्या संगामाचे फल होय. वेदांचा शिव सर्वव्यापी, परम बलवान्, शत्रूना रडविणारा (रुद्र), पर्वतांचा अधिपती (गिरीश), निळ्या गळ्याचा (नीलग्रीव), लाल रंगाचा (विलोहित), धनुष्य व बाण घेतलेला (निषंगि, इषुधिमान्), आक्रमकांना दंड देणारा, संरक्षण करणारा, उपवीत धारण करणारा, उच्चस्वराने ओरडणारा (उच्चैर्घोषायाक्रं दयते), चोरांचा अधिपती (स्तेतांना पती) रात्रीं फिरणारा (नक्तंचर), पशूत प्रवेश करणारा (शिपिविष्ट) शिरस्त्राण आणि कवच धारण करणारा (विल्मिन्, कवचिन्), अशा प्रकारचा आहे. एकादशणीं किंवा नेहमीच शंकराला अभिषेक करताना ज्या रुद्राध्यायाचे पारायण करतात, त्यांत वरील व अशाच प्रकारच्या अन्य विशेषणाचा उल्लेख आढळतो. एकूण हा शिव एकीकडे शत्रूच्या डोळ्यांतून आसवे गाळणारा संहारत प्रबल पराक्रमी योद्धा आहे, तर दुसरीकडे तो अमंगलाचा विनाश करून मांगल्याची स्थापना करणारा असून 'देवाचा प्रथम वैद्य' (प्रथमो दैवो भिषक् ) आहे. पौराणिक काळांची मजल गाठीपर्यंत रुद्राने 'महादेव' हे नांव घेऊन वैदीक धर्मांत बरेच वरचे स्थान मिळविले, तरी पण त्याच्या परकीय स्वरूपाचे धागेदोरे लोकमानसांतून अगदीच नष्ट झाले होते असें मात्र दिसत नाही. पौराणिक वाङ्मयांत देखील शिव व त्याचा पुरस्कार करणाऱ्या काही मतांना बऱ्याच ठिकाणी याच दृष्टीनेच पाहिले गेले आहे. या विषयीं काही संकेत पहा : १) वेदमान्य शैव संप्रदायाचे बरोबर कौल, पाशुपत, वगैरे अवैदिक मतांचे वेगळे अस्तित्व असणें. २) शिवाला यज्ञभाग न देण्यांचा अट्टहास व तत्संबंधानें दक्ष प्रजापतीचे विस्तृत आख्यान. ३) शिवाचे द्वारा बल प्रयोगाने यज्ञ भागाची प्राप्ती करून घेणे." ४) शिवाने ब्रह्मदेवाच्या यज्ञांचा केलेला विध्वंस, यज्ञांचे मृगरूपाने पलायन व त्याच्या पाठीस लागल्यामुळे शंकराला प्राप्त झालेली 'मृगव्याध' ही संज्ञा. ५) इंद्रपदांवर बसलेल्या पांच व्यक्तींचा रुद्रांकडून पराभव व पर्वत कारागृहांत त्यांची कैद'. याच प्रकारे 'पूषण' आणि 'भग' हे दोन वैदिक देव शिवाकडून दंडित झाले होते व त्यामुळे शंकराला पूष्णोदंतविनाश', भगध्न आणि भगनेत्रांकुश" अशी अभिधानें प्राप्त झाली होती. ६) शंकराची 'ऊर्ध्वकेश', 'ऊर्ध्वमेद्र', 'महालिंग', 'तीक्ष्णदंष्ट्र', 'विरुपाक्ष', अशा प्रकारची नांवे व त्यातून दिसून पडणाऱ्या शिष्ट समाजाला असंमत अशा सवयी, उदाहरणार्थ बायकोच्या पुढे नाचणें, विषादिवस्तूंचे सेवन, स्मशानांत राहणें, चामडें नेसणें, माणसाच्या कवट्यांना अलंकार म्हणून वापरणें, वगैरे. ७) राक्षस व असुरांचा आराध्य व त्यांची कड घेणारा देव म्हणून शिवांचे बऱ्याच ठिकाणी वर्णन येते. शिवाय भुर्ते, पिशाच्चें, यक्ष ही मंडळी त्यास फार जवळची होत. ८) भृगुत्रार्षीकडून शंकराला मिळालेल्या अनेक शापांचे वर्णन जसें शिवाचे लिंग-योनी स्वरूप होणें, द्विजांकरिता अपूज्य असणें, शंकराला अर्पण केलेली फुले, अन्न, जल, आदि पदार्थ प्रसाद म्हणून देखील अस्वीकार्य समजले जाणें, शंकराच्या पायाचे तीर्थ अग्राह्य असणें, इत्यादि. ९) विशेषकरून दक्षिण भारतांत शिवाच्या प्रसादाला हेय मानले जाते. 'शिवस्व' हा शब्दच अस्वीकार्य वस्तूंच्या अर्थात आजही आपण वापरतो. शिवाचे पूजन करणारे व शिव नैवेद्य भक्षण करणारे 'गुरव' या विशिष्ट जातीच्या लोकांना ब्राह्मण आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत. यांचा मुख्य व्यवसाय मृदंग वाजविण्याचा असे. १०) शिवाकडून ब्राह्मणांचा वेळोवेळी केला गेलेला विरोध व शेवटी स्वतःच्या श्रेष्ठत्वाची स्थापना ११) शिवाच्या रौद्र व संहारक स्वरूपांमुळेच कदाचित लोकांत असें मत मान्य झाले असावे की विष्णुव्रत सोडता येतें, पण शिवव्रत मात्र टाकता येत नाही. शंकराचा पौराणिक धर्मांत पूर्ण रूपाने समावेश केव्हां झाला असावा हे सांगता येणें कठिण आहे, पण या विषयी रुद्र व नरनारायणांत झालेल्या युद्धाची कथा थोडी महत्त्वाची वाटते. या कथेंप्रमाणें दक्षयज्ञांचा विध्वंस केल्यावर रुद्रानें बद्रिकाश्रमांत बसलेल्या नर व नारायणांवर आक्रमण केले. प्रथम युद्धाला चांगलेच तोंड लागले पण पुढे ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीमुळे ते आवरले व दोन्ही पक्षांत समेट झाला. युद्धांत नारायणाने रुद्रांचा गळा दाबल्यामुळें रुद्राला 'शितिकण्ठ' असें नांव मिळाले, तर नारायणाने रुद्राच्या शूलाला 'श्रीवत्स' या चिह्नाच्या रूपाने स्वतःच्या वक्षस्थलांवर मिरविण्याचे कबूल केले." या कथेचा मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें परामर्श घेतल्यास दोन मुद्दे समोर येतात. एक तर असे की सुरुवातीच्या विष्णुप्रतिमांत 'श्रीवत्स' दिसत नाही, गुप्तकाळांपासून हळुहळू त्याचे दर्शन होऊ लागते. दुसरे म्हणजे शिव व विष्णूच्या संयुक्त प्रतिमा म्हणजे हरि-हर मूर्ती कुषाण कालाचे अगोदर मिळत असल्याचा पुरावा आज तरी हातांत नाही. शिव व विष्णू यांचे घोर युद्ध व शेवटी विष्णूचे श्रेष्ठत्व" स्थापित होण्याचे वर्णन वाल्मीकिय रामायणांत देखील मिळते. उघड आहे कीं पौराणिक क्षेत्रांत मिळालेली मान्यता एका दिवसांत झालेली घटना नाही. हे होण्यास कितीतरी वर्षे लागली असतील व वादांची रणें माजली असतील. शैवाप्रमाणेंच सौर आणि शाक्तमतांच्या काही धारांचे ओघही बाहेरून आले आहेत. हे निरनिराळे प्रवाह आपल्या देशांत इसवीसनांच्या प्रथम तीन शतकांच्या अवधीत किंवा त्यापूर्वी आले असावेत. कारण गुप्तकाळांपर्यंत या सर्व धारा मूळरूपांत किंवा रूपांतरे करून ब्राह्मणधर्मात विलीन झालेल्या दिसतात. याची प्रमुख कारणें एकेश्वरवादाचा सिद्धांत आणि 'महाविलयनांची' प्रवृत्ती ही होत. वरील सर्व विवेचनाने हे स्पष्ट होते की अवैदिक शिवाने रुद्राशी एकत्व स्थापन करून वेदोत्तरकालीन देवता संघांत आपल्या पराक्रमांने प्रमुख स्थान प्राप्त करून घेतले, पण यासाठी झालेल्या प्रबल संघर्षाचे प्रतिध्वनी मात्र बरेच दिवस उमटत राहिले. आता शिव पूजनांची माध्यमें म्हणजे शिवप्रतीकें, शंकराची मूर्ती आणि शिवाची पिंडी याचे मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनें परीक्षण करू.
शिवप्रतीकें :
शिवाचे एक जुने प्रतीक वृष किंवा बैल हे आहे. (र. चित्र बावीस १,४) महाभारतांत शंकराला वृष, वृषावर्त, वृषनाथ, वृषध्वज, वृषदर्प, वृषपती, वगैरे अभिधानें प्राप्त आहेत. सिंधु वसाहतींत बऱ्याच प्रामुख्यानें दिसणाऱ्या डौलदार बैलाचा शैवमतांशी निकटतम संबंध होता असे निश्चयात्मक विधान करणें जरी शक्य नसले तरी एवढे मात्र खरे की ऐतिहासिक काळांत बैल हा शिवाचे फार जवळचे प्रतीक म्हणून गाजला. जुन्या ठोकीव फार नाण्यांवर (punch marked conis) बैल दिसतो, भारतीय शक राजांच्या नाण्यांवर दिसणारा बैल नक्कीच शैव प्रतीक आहे. एका प्रकारच्या नाण्यांवर तर बैलांबरोबरच 'उसभे' किंवा वृषभ अशी अक्षरे ही आहेत. हूण राजा मिहिरकुल याचे नाण्यांवर बैलासमोर 'जयतुवृषः' असा लेख आढळतो." हा राजा शिवोपासक होता. नाण्यांवर दिसणारे दुसरे शैवप्रतीक म्हणजे स्थल-वृक्ष व त्यासमोर असलेले शिवलिंग हे होय. औदुंबरांचे नाण्यांवर असलेला त्रिशूलपरशु शिवाचेंच प्रतीक होय." वेम, वासुदेव, वगैरे कुषाण राजांच्या नाण्यांवर त्रिशूल-परशूचे एकत्र दर्शन होते (रे.चि. नऊ-४). मात्र समकालीन पाषाण प्रतिमेत अशा प्रकारचा त्रिशूल परशु अजून मिळालेला नाही. दक्षिण भारतांत शिवाचे हातांत फक्त परशू आढळतो. त्रिशूल कचित असतो. औदुंबरांच्याच नाण्यांवर शिवाचे अन्य प्रतीक म्हणजे देवायतन किंवा मंदिर दिसते.
मातीच्या काही ठशांवर देखील शैवप्रतीके आढळतात. काही नमुन्यांवर वृक्षांच्यामधे शिवलिंग (पादपेश्वर, आम्रातकेश्वर वगैरे नावांचे ठसे) आणि मोठें वाशिंड असलेले (ककुद्मान) बैल अंकित आहेत. आरामिकेश्वर असे नांव असल्या एका गुप्तकालीन ठश्यावर त्रिशूल-परशु, मंगलघट, शक्ती आणि शिवलिंग दिसतें. भीटा (अलाहाबाद) वेधून मिळालेल्या शैव ठश्यावर नंदीपद चिन्ह पर्वतांवर ठेवलेल्या चेंडूप्रमाणें दिसणारे शिवलिंग, " अर्धचंद्राने शोभित वृष, धनुष्यबाण", वगैरे काही निराळी शैवप्रतीकें आढळतात. राजघाट (वाराणसी) येथून प्राप्त झालेल्या ठश्यांवर त्रिशूल-परशूसह यूप ही मिळतो." यूप किंवा यूपस्तंभ हे यज्ञांचे प्रतीक आहे. (उदाहरणार्थ रे. चि. बावीस-४). वरील पैकी कित्येक प्रतीकें गुप्तोप्तर कालांतही शिवाशी आपला संबंध टिकवून राहिली.
शिवप्रतिमा :
अर्थशास्त्र आणि पतञ्जलीच्या आधारावर शिवमूर्तीची प्राचीनता मौर्यकाळांपर्यंत नेता येते. अश्वत्थाम्यानें शिवाचा 'श्वेतविग्रह' निर्माण केला होता व त्याची होम, वगैरे करून पूजा केली होती अशी नोंद महाभारतात मिळते." येथे असे ही सांगितले आहे की अश्वत्थाम्याचे पूर्वजन्मांत शिवाच्या अर्चेचे पूजन केले होते, व नरनारायणांनी लिंग-पूजा करून शिवाची आराधना केली होती. या प्रकारे अर्चापूजनांपेक्षा लिंगपूजनांचे श्रेष्ठत्व स्वीकारण्यांत आले आहे. भीटा (अलाहाबाद) येथून उत्तर मौर्यकालीन अभिलेख असलेले एक चतुर्मुख शिवलिंग मिळाले आहे. त्याच्या वरच्या भागांवर द्विभुज शिवाची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). अभिलेखाने हे उघड होते की या लिंगांची प्रतिष्ठा पूजेकरिताच केली होती. हा अलंकरणाचा नमूना नव्हता. उत्तर भारतांतील शिवप्रतिमेत हे लिंग व या वरील 'आनाभि' प्रतिमा सर्वांत जुन्या आहेत. भीटा येथूनच प्राप्त झालेल्या एका अन्य प्रतिमेची चर्चा देखील येथे आवश्यक आहे, कारण तिच्या एका भागाचे शिवमूर्तीशी बरेच साम्य आहे (चित्र ४४-४७). ही संपूर्ण प्रतिमा 'सर्वतोभद्र' पद्धतीची असून हिच्या एकाबाजूला मुगुट घातलेली व कलश घेतलेली द्विभुज प्रतिमा आहे. (चित्र-४४) हिच्या आजुबाजूच्या कडेला वर मानवमुख व खाली वराह आणि सिंह कोरलेले आहेत (चित्रे-४७,४६). पाठीकडे असलेल्या अन्य मानवमूर्तीचा प्रस्तुत प्रसंगाशी संबंध आहे. ही प्रतिमा द्विभुज असून स्थूल बांध्याची आहे (चित्र-४५). हिनें मनगटातील कड्या व्यतिरिक्त कोणताही दागिना घातलेला नाही, केसमात्र पाठीकडे वळविले आहेत. उजवा हात देवत्वाचे चिन्ह अशा अभय मुद्रेत उचललेला आहे. डाव्यांत कदाचित कलश होता पण तो आतां खंडित आहे. नेसूच्या धोतरांशिवाय कोणतेही वस्त्र दिसत नाही. ही सर्वतोभद्र प्रतिमा उघडच यक्षप्रतिमांच्या आधारांवर पडविली गेली आहे, पण हे यक्ष मात्र नव्हेत. येथें शिव आणि विष्णूचे वराह व सिंह रूपांबरोबर अंकन असण्यांची शक्यता आहे.
दक्षिण भारतांतील प्राचीनतम शिवप्रतिमा तामिळनाडू राज्यातील रेणुगुंठा नांवाच्या गावांजवळ असलेल्या गुड्डीमलम्च्या मंदिरांत आहे (रे.चि. सत्तावीस २५). परशुरामेश्वर नांवाने प्रसिद्ध असलेले हे पांच फूट उंच शिवलिंगा असून त्याच्या दर्शनी भागांवर उभ्या शंकराची द्विभुज प्रतिमा आहे. त्याने आपल्या उजव्या हातांत अधोमुख लोंबणात एक मेंढा त्याच्या मागील पायाकडून धरला आहे व डाव्या हातात कलश असून खांद्यावर परशू टाकलेला दिसतो शंकराच्या मस्तकांवर उष्णीष असून त्यानें विविध अलंकारही धारण केले आहेत. त्याच्या पायाखाली अपस्मार पुरुष दिसतो. श्रीगोपीनाथ राव यांच्या मतें ही मूर्ती इसवीसनाच्या पूर्वी दुसऱ्या किंवा पहिल्या शतकांतील आहे.** इसवीसनांच्या सुरुवातीला उत्तर भारतांत कुषाण साम्राज्याचा उदय झाला. या वंशाच्या काही राजांचा कल शैव धर्माकडे होता. यावेळी शैवधर्मांच्या हालचाली उत्तर पश्चिम भारतांकडे चालल्याच होत्या, त्याचप्रमाणें खाली मथुरा हैं नगर ही त्यांचे एक केंद्र झाले होते. मथुरा व तिच्या जवळपासच्या भागांतून मिळालेल्या व्रज जनपदांतून म्हणता येईल या काळच्या हजारो कलाकृती आज आपणांस प्राप्त आहेत. त्यांत ब्राह्मण धर्माप्रमाणेंच बौद्ध व जैन प्रतिमांचा ही समावेश होतो. शैवमतापुरतेंच बोलावयाचे असल्यास असें सांगता येईल कीं मथुरेला कुषाण काळाच्या पूर्वीपासूनच शैवमतांचा पाया घातला गेला होता. येथून प्राप्त झालेल्या एका शुंगकालीन शिलापट्टांत पंख असलेल्या पशुंच्या मध्यें झाडाखाली स्थापन केलेले शिवलिंग दिसते. (म.सं.सं. ५२ ३६ २५) वाङ्मयीन प्रमाणाकडे वळल्यास हरिवंशात असा उल्लेख सापडतो कीं मथुरेचा परित्याग करून द्वारकेकडे जाण्याच्या वेळी यादवांनी विशेष करून शंकराचे पूजन केले होते. यादव शिवपूजक होते. स्वतः श्रीकृष्णांने पुत्रप्राप्तिसाठीं शिवाराधनच केले होते. " मथुरेंहून कुषाणकाळांत तयार झालेल्या माती व पाषाणांच्या अनेक शिवमूर्ती व लिंगें मिळाली आहेत. असेंही म्हणता येईल कीं व्रजभूमींत या वेळीं शिव, विष्णू, कार्तिकेय, लक्ष्मी, वगैरे देवांशी संबंधित निरनिराळे संप्रदाय प्रचलित होते. तेथे परस्पर विद्वेष किंवा मालिन्य फारसें नसावे. येथून मिळालेल्या एका शिलापट्टावर (म.सं.सं. ३४.२५२०) एकाच ओळीत अर्धनारीश्वरविष्णु, गजलक्ष्मी व कार्तिकेय उभे असलेले दिसतात (चित्र २) त्याचप्रमाणे परस्परांच्या देवतांना अपमानित करणाऱ्या प्रतिमांचाही येथे पूर्ण अभाव आहे. शिवप्रतिमा व त्यांचे प्रकार इकडे वळण्यांपूर्वी कुषाणकालीन किंवा त्यापूर्वीची नाणी व मातीचे ठसे यावर दिसणाऱ्या शंकराच्या मानवाकृतींचे थोडक्यात सिंहावलोकन करू.
नाण्यांवरील शिवप्रतिमा :
याबाबतीत सर्वप्रथम उज्जयिनी येथून मिळालेली नाणीं आपले लक्ष वेधून घेतात. इसवीसनांपूर्वीच्या प्रथम दोन शतकांतील या नाण्यांवर शिवाची निम्नलिखित ध्यानें मिळतातः १) दंड व कमंडलू घेऊन उभा असलेला शंकर. २) हाच प्रकार पण त्या बरोबरच 'देववीक्षणतत्पर' असा बैल (रे.चि. बावीस १) ३) दंड- कमंडलू धारण करणारा पण त्याला तीन डोकी असणारा शिव. मुख्य मस्तकाच्या आजुबाजूला एक एक मस्तक असलेला त्रिशिर शिव उत्तरपश्चिम भारतांतील काही प्रतिमा व कुषाण नाण्यांवरही दिसतो (र.वि. बावीस २). डॉ. बॅनर्जी यानी याकडे संकेत केला आहे. पण वाङ्मयीन पुराव्याशी त्याला ताडून पहाण्यांचा तेथे प्रयत्न दिसत नाही.
नाण्यावर असलेल्या शिवप्रतिमा
महाभारतांत त्रिमुख शिवाचे उल्लेख फारच तुरळक आहेत." शंकराची द्विमुख चतुर्मुख आणि पंचमुखें लिंगें तर मिळतात, पण त्रिमुख लिंग अजून अज्ञात आहे. त्यामुळे आमची कल्पना अशी आहे की जेथें ब्रह्मा व विष्णू या बरोबर शंकराला एकत्र दाखविणें अभिप्रेत असते. तेथें त्याला त्रिशिर दाखवितात, पण अन्यत्र अशा प्रकारच्या प्रतिमांत शिवाला चतुर्मुख दाखविण्यांचा कलाकाराचा मनोदय असतो समोरून दिसू शकणारी तीन तोंडे व चौथें अर्थात् पाठीकडील तोंड अदृश्य अशी ही चार मुखें असावीत. शिवाच्या चार मुखांची कथा महाभारतांत आली आहे." देवांना प्रदक्षिणा घालणारी अप्सरा तिलोत्तमा हिचा अप्रतीम सौंदर्याला न्याहाळण्याकरिता चारी दिशांना शिवाची चार तोंडे प्रगट झाली अशी ही कथा आहे. मथुरेहून प्राप्त झालेल्या एका प्रतिमेची ओळख चतुर्मुख शिव अशा प्रकारें श्री रत्नचंद्र अग्रवाल यांनी करून दिली आहे. फरक एवढाच कीं येथे चौथे मुख पाठीकडे नसून त्या ऐवजी खांद्यावर एक अतिरिक्त प्रतिमाच दिसते. हे विवेचन करतांना त्यांनी रंगमहाल येथून मिळालेल्या एका मृत्फलकांचाही उल्लेख केलेला आहे. ज्यावर तीन मस्तकांचा शंकर दिसतो. हा फलक प्रारंभिक गुप्तकाळाचा आहे. या बाबतीत पुनः उहापोह करूच. उज्जयिनीच्या संदर्भातच हे ही नमूद करणें योग्य होईल की प्राचीन काळापासूनच ते शैव केंद्र होते. कालिदासाचे वेळीं तेथें चंडीश्वर महाकालाचे सुंदर स्थान असल्याचे मेघदूत सांगतो." उज्जयिनीप्रमाणेंच कुणिंदांच्या नाण्यावर त्रिशूल परशू घेतलेला शंकर दिसतो. त्याला तेथें 'छत्रेश्वर महात्मा' असे म्हटले आहे. परदेशी राजांच्या नाण्यांपैकी गुदफर किंवा गोण्डोफर यांच्या नाण्यांवर डॉ. बॅनर्जी यांनी त्रिशूल आणि तालशाखा घेतलेला शंकर ओळखला आहे. यावर ग्रीक देव 'पोसोडॉन' यांच्या ध्यानांची छाप दिसते. गुदफराच्या नाण्यांवर राजाला 'देवव्रत' असे अभिधान आहे, जें कदाचित तो शैवमताचा असल्याचे पुष्ट करते. नाण्यांवर त्रिशूलधारी शंकर असलेला अन्य परदेशी राजा 'माऊस' हा होय. येथें कधी कधी शिव अपस्मार पुरुषांचे मर्दन करीत असतांनाही दिसतो."
इ. स. पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील नाणी उज्जयिनी येथे सापडली आहेत; त्यांवर दंड व कमंडलू घेऊन उभा असलेला शिव आढळतो. कुणिंद नाण्यांवर त्रिशूळ व परशू घेतलेला शंकर आढळतो. तेथे त्याला ‘छत्रेश्वर महात्मा’ असे म्हटले आहे. गोण्डोफरस या इंडो-पार्थियन राजाच्या नाण्यांवर त्रिशूळ व तालशाखा घेतलेला शंकर अंकित केला आहे. त्यावर ग्रीक देव पोसेडॉन याचा प्रभाव दिसतो. येथे राजाच्या ‘देवव्रत’ या विशेषणाने तो कदाचित शैवमताचा असल्याचे सूचित होते. सिरकप (तक्षशिला) येथून १९१४-१५ च्या सुमारें एक तांब्याचा ठसा मिळाला आहे. त्यावर त्रिशूळ व गदा घेतलेला शंकर दिसतो. येथील गदा ग्रीक देव हरक्यूलियस यांच्या गदेच्या धर्तीवर आहे. (रे.चि. बावींस ६) परदेशी शासकांच्या या कांही नाण्या व्यतिरिक्त शंकरांचे भरपूर दर्शन कुषाण राजांच्या नाण्यांवर होते. मूर्तिविज्ञानांच्या दृष्टीनें येथें बरीच महत्त्वाची माहिती मिळते. कुषाण राजांच्या नाण्यांवर शंकराचे मोठ्या प्रमाणावर आणि वैविध्यपूर्ण अंकन आढळते. अगोदर कडफिश दुसरा आणि वेम यांच्या नाण्यांना पाहू. येथे शिवाची दोन रूपें मिळतात. दिगंबर शंकर एकटा उभा आहे. त्याच्या उजव्या हातांत त्रिशूल-परशू असून डाव्यात घट आहे. डाव्या हातांवर कोणत्या तरी जनांवराचे चामडे लोंबत आहे. प्रो. रोझेनफील्ड याला सिंह-चर्म समजतात व त्याचा संबंध महाभारतांतील 'सिंहचर्मोत्तरच्छिदः' या पदाशी लावतात" पण रोझेनफील्ड यांनी दिलेल्या चित्रांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास चामड्याला असणारे पशुमस्तक सिंहाचे नसून ते बैलाचे असावे असे वाटते." शैवांमध्यें बैलाचे चामडे खांद्यावर पांघरण्याची पद्धत गुप्तकालांत होती ही गोष्ट अहिच्छत्रा येथून मिळालेल्या महाभैरवाच्या मृफलकाने उघड दिसते. राजा वेम याच्या मुद्रेवरही शिवाचे हे रूप दिसते पण त्यांत शिवाच्या मस्तकावर दिसणाऱ्या अग्निज्वाला हे वैशिष्ट्य होय (रे. चित्र बावीस ३) अर्थात् या काळांत शिव व अग्नी यांचा निकट संबंध मान्य झाला होता. येथे शंकराच्या डाव्या खांद्यावर जानव्याप्रमाणें लोंबणारी माळा ही अवलोकनीय आहे. तिच्यांत काही पदकें ओवलेली आहेत. हा अलंकार समकालीन कांही गांधार मूर्तीत व गांधार कलेची छाप असलेल्या माधुरी कलाकृतींतही दिसतो आणि शंकराच्या 'उपवीती' या नांवाला सार्थकता येते (रे. चि. बावीस ७). वेम याच्या नाण्यांवर शंकराचे जें दुसरे रूप दिसते तें पहिल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत आहे. येथे शंकर विवस्त्र, महालिंगी किंवा बैलाच्या चामड्याला धारण करणारा नसून तो बैलाला टेकून व अंमळ एकीकडे कललेला असा उभा आहे. त्याच्च्या डाव्या हातांत त्रिशूल किंवा क्वचित त्रिशूल-परशू दिसतो, त्याचप्रमाणें नेसूचे वस्त्र आणि जानव्यासारखा दागिना हे ही स्पष्टपणे दिसतात. मस्तकांवर असणाऱ्या अग्निज्वाळांचा आकार बराचसा त्रिशूलासारखा आहे. वेमाच्या नाण्यावरील अभिलेखांत जरी शंकराचे स्पष्ट असे नांव आढळत नाही तरी राजाचे 'माहेश्वर' हे अभिधान शिवाची नीट ओळख पटवून देतें. कनिष्काच्या मुद्रेवर" चतुर्भुज शंकर दिसतो. प्रदक्षिणाक्रमानें त्याच्या हातांत अधोमुख घट आणि अंकुश, वज्र, त्रिशूळ आणि उसळी मारणारें हरण आहे. प्रत्येक नाण्यांवर अंकुश दिसत नाही तसेच मृगाच्या स्थितीतही फरक आहे. शिवाचे धोतर आणि जानव्यासारखा दागिना येथेही दिसतात. याच राजाच्या नाण्यांवर सर्वप्रथम शंकराचे प्रभामंडल आढळते. शंकराची काही नवीन रूपें हुविष्काच्या नाण्यांवर" पाहतां येतात. प्रो. रोझेनफील्ड यांनी एका नाण्यांवर शिवाच्या मस्तकांवरील चंद्रकोर शोधण्यांचा प्रयत्न केला आहे, पण तें संदिग्ध आहे कारण इतर नाणी त्या बाबतीत मौन आहेत. शिवाय या काळांतील पाषाण मूर्तीकडे दृष्टिक्षेप केल्यास एक अपवाद वगळला तर इतरत्र शिवांचे डोक्यावर चंद्रकोर दिसत नाही. या काळांतील दुसरें महत्त्वाचें असे ध्यान म्हणजे चार हातांचा आणि तीन तोंडाचा शंकर हे होय. येथे घट आणि अंकुश याऐवजीं चक्र शोभू लागते व शंकराची ऊर्ध्वलिंगावस्था ही नजरेंत भरते. हुविष्काच्या नाण्यांच्या तिसऱ्या प्रकारांत जटाभार असलेल्या त्रिमुख शिवांबरोबरच त्याची आयुधें म्हणून घट, प्रकीर्ण किरणांचे वज्र (?), त्रिशूल आणि गदा ही दिसूं लागतात. कुषाण सम्राटांत वासुदेव हा शेवटला उल्लेखनीय राजा होता. त्याचा शैवधर्मांकडे चांगलाच कल होता. याच्या नाण्यावर५२ शिव मूर्तीचे खालील प्रकार पाहण्यात येतात : क) त्रिशूल, घट किंवा तुंबी, पाश" आणि कमळ घेतलेला त्रिमुख शंकर, पाठीमागे बैल. ख) फक्त पाश आणि त्रिशूल घेतलेला त्रिमुख शिव, पाठीमागे डावीकडे तोंड केलेला बैल. पाश सोडला तर हा शिव वेम याच्या नाण्यावरील शिवासारखा आहे. पण बैल व त्रिशूल यांत थोडा फरक आहे. ग) तिसरा प्रकार ही वरील प्रमाणेच आहे, पण येथे शंकर जास्त सुरेख आणि एक प्रकारें गुटगुटीत आहे. उत्तर कुषाणकालीन नाण्यांच्या शिवप्रतिमा पुनः बटबटीत आणि बेडौल दिसू लागतात व गुप्त काळांपर्यंत त्यांत फरक दिसत नाही. याच वेळी शंकराच्या मस्तकांवरील चंद्रकोर स्पष्टपणें उगवते (रे. चित्र बावीस ५). घ) वासुदेवाच्या काही नाण्यांवर शिवाचे बरोबर बैलाच्या ऐवजी हत्ती दिसतो शिवाचा सिंहाप्रमाणेंच हत्ती बरोबरही नेहमीचा संबंध नाही. कनिष्काच्या मुद्रेवर आपण शिवाच्या हातांत अंकुश बघितला होता, येथे प्रत्यक्ष हत्ती आहे. तेव्हा असें गृहीत धरावयांस हरकत नाही कीं गांधार परंपरेत कुठे तरी शिव आणि हत्ती याचा जवळचा संबंध असावा.
याच प्रसंगांत त्या कुषाणकालीन नाण्यांकडे संकेत करणें आवश्यक आहे. ज्यावर शंकराबरोबर देवी उमा आणि नना यांचे ही दर्शन घडते. याची विस्तृत चर्चा पुढे 'शक्तिप्रकरणांत' येईलच. कुषाण नाण्यांवर शंकराला बहुतेक 'ओएशो' असें नांव दिलें आहे. या शब्दांचे प्राकृत भाषेचा 'हवेश' आणि संस्कृतांचा 'भवेश' या शब्दांशी साम्य आहे, तसेंच काही विद्वानांच्या मतें हे 'वृष' याचे रूप आहे. महाभारतांच्या शिव नामांवलीत वृष, वृषभ, वृषावर्त, वृषनाक, वृषपती, वगैरे नांवांची गणना केलेली आहे. याशिवाय 'ओएशो' नांवाची उग्रेश, ऊर्धकेश यासारख्या शब्दांबरोबर देखील संगती लावता येईल. वरील नाण्यांशिवाय डॉ. बॅनर्जी यांनी काही इतर नाण्यांकडे ही लक्ष वेधिले आहे. कलकत्ता संग्रहालयांतील दोन सुवर्णमुद्रांविषयीं लिहिताना त्यांवर ब्राह्मी लिपींत लिहिलेल्या 'गणेश' या नांवाच्या आधारें त्यांनी तेथें मानवरूपी शिवाला ओळखण्यांचा प्रयत्न केला आहे." हुविष्काच्या एका नाण्यांवर त्यांच्या मतें हरिहराची आकृती आहे. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या एका उत्तर कुषाणकालीन सोन्याच्या नाण्यांवर 'अर्धनारीश्वर' अंकित केलेला आहे (रे. चित्र बावीस). हा या काळच्या एका अन्य मुद्रेवर ही दिसतो.
आणखी एक तत्कालीन वैविध्य म्हणजे चार हातांचा व तीन शिरांचा शंकर. हुविष्काच्या नाण्यांवर जटाधारी त्रिमुख शिव, त्याच्या हातात घट, वज्र, त्रिशूळ आणि गदा आढळतात. वासुदेवाच्या नाण्यांवरही अशाच प्रकारे त्रिशूळ, घट, पाश, कमळ घेतलेला त्रिमुख शंकर आढळतो. उत्तर कुषाणकालीन शिवप्रतिमा बटबटीत व बेडौल असून शंकराच्या मस्तकावर चंद्रकोर दिसून येते. प्रारंभिक गुप्तकालीन शैव मुद्रांमध्ये बसरा येथील अर्धनारीश्वराचे अंकन असलेली मुद्रा व भीटा येथील ‘भद्रेश्वर’ नावाने ललितासनात बसलेला शिव हे उल्लेखनीय आहेत. वाराणसीहून मिळालेल्या मुद्रेवर ‘श्रीदेवस्वामी’ हा लेख आणि चौथऱ्यावर उभा असलेला द्विभुज शिव दिसतात. या शिवाच्या हातात कलश व दुसऱ्या हातात माळ किंवा पाश आहे. डावीकडे सापही दिसतो. उत्तर कुषाणकालीन व गुप्तकालीन मृत्तिकाफलकांमध्ये रंगमहाल येथून मिळालेले दोन फलक महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी एकावर चतुर्मुख, द्विभुज व महालिंगधारी शंकर बैलावर स्वार दिसतो. मुख्य मुखांच्या आजूबाजूला एकेक मुख असून मानेकडून एक जटाजूट असलेली सूर्यचंद्रधारी द्विभुज पुरुषी आकृती प्रकट होताना दिसते. शिवाजवळ उत्तर भारतीय पद्धतीचा घागरा घातलेली पार्वती असून हा फलक चौथ्या शतकातील समजतात. दुसऱ्या फलकावर रुद्राचे बकऱ्याचे मुख व हत्तीच्या पायाप्रमाणे दिसणारा एकच पाय दर्शविला आहे. नी. पु. जोशी यांच्या म्हणण्याप्रमाणे हा अजएकपाद रुद्र असून प्रमुख अकरा रुद्रांपैकी एक आहे. तो अहिर्बुध्न्य आणि कुबेरासह धनाचे रक्षण करत असतो. याच काळातील भीटा येथील आसनारूढ शिव-पार्वती, नेवल (जि. उन्नाव, उत्तर प्रदेश) येथील अर्धनारीश्वर आणि अहिच्छत्र येथील महाभैरव फलक महत्त्वाचे आहेत.
गुप्तोत्तर काळात शैव मताचा बराच विस्तार होऊन अन्य मतांचा, त्यांच्या प्रतीकांचा प्रभाव शिवमूर्तींवर पडला. या काळातील शिवमूर्ती दागदागिन्यांनी मढलेल्या दिसतात. मस्तकावरील जटाजूटाचे नीटस जटामुकुटात रूपांतर झालेले असून त्यावरही काही रत्नमाला परिधान केलेल्या आढळतात. वस्त्रप्रावरणे इतर देवतांप्रमाणेच आढळतात. काही अपवाद वगळता तो दिगंबरावस्थेत दिसत नाही. या व पुढील काळातील शिवाची सर्वमान्य आयुधे म्हणजे त्रिशूळ, सर्प, डमरू, खट्वांग तसेच घट, अक्षमाला, कमळ, वीणा ही स्थानपरत्वे आढळतात. कुषाणकालीन आडवा त्रिनेत्र गुप्तकाळापासून उभा दाखविला जाऊ लागला. शिवाच्या परिवारदेवतांमध्ये मुख्य स्थान पार्वतीचे आहे. विविध रूपांत ती शिवासह असते. वृषभस्वरूप नंदीही सर्वत्र आढळतो. काही ठिकाणी तो वृषमुख मानवी रूपातदेखील दिसून येतो. अनेक उमामहेश्वर प्रतिमांमध्ये कार्तिकेय, गणपती आणि हाडांच्या सापळ्याच्या स्वरूपात शिवगण ‘भृंगरिटी’ हाही अंकित केलेला आढळतो. वैविध्यपूर्ण शिवमूर्ती व शिवलिंगे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. महाराष्ट्रातही देवालयाच्या गणेशपट्टीवर शिवप्रतिमा, लिंग वा प्रतीक कोरले जातच असे. अष्टदिक्पाल आणि सप्तमातृका शिलापट्टांवरही एखाद्या तरी शिवस्वरूपाचे अंकन केलेले आढळते. शिवमूर्तींचे ढोबळमानाने सामान्य व विशेष असे दोन उपवर्ग पडतात. एकटा उभा वा बैठ्या स्वरूपातील, सहकुटुंब शिव या सामान्य मूर्ती होत. विशेष या उपवर्गात सहसा वैदिक व पौराणिक कथांवर आधारित तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिवमूर्तींचा समावेश होतो. त्यांचे मुख्यत्वे करून अनुग्रहमूर्ती, दक्षिणामूर्ती, संहारमूर्ती, नृत्यमूर्ती व संकीर्ण असे प्रकार आहेत. मातीच्या ठशांवरील शिवप्रतिमा : याप्रसंगी सर्व प्रथम उल्लेखनीय असा संग्रह लखनऊ संग्रहालयांत असलेला सुमारे शंभर ठशांचा आहे. जानेवारी १९२० मध्ये डॉ. हिरानंद शास्त्री यांना संकिसा (जुनी संकाश्य नगरी) येथें खोदकामांत हा मिळाला होता. यांत शैव उसे आहेत यापैकी वर 'भद्राक्षस्य' या अक्षरांसह द्विभुज असा शंकर विद्यमान आहे. त्याच्या उजव्या हातात त्रिशूल असून डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. नेसूचे वस्त्र स्पष्ट आहे व डोक्यांवरचे केस तीन गांठींच्या रूपांत बांधलेले आहेत. ठशाच्या दुसऱ्या बाजूला बसलेला बैल असून त्याखाली 'भद्राक्षस्य' ही अक्षरें झळकतात. उरलेल्या ठशांवर शिव आणि ब्राह्मी लेख पूर्ववत् आहेत पण दुसऱ्या बाजूला मात्र काहीच दिसत नाही. हे ठसे त्यावरील लिपीला पाहिले असता प्रथम शतकांच्या जवळपासचे असावेत असा कयास बांधता येतो. प्रारंभिक गुप्तकाळाच्या शैव ठशांकडे लक्ष पुरविल्यास ब्लॉक याला बसाढ येथून मिळालेल्या शैव सामुग्रीचा उल्लेख अगत्यानें करावा लागेल. त्यापैकी एकांवर डॉ. बॅनर्जी यांच्या म्हणण्यांप्रमाणें अर्धनारीश्वर दिसतो. शिवमूर्तीने युक्त असा दुसरा मातीचा ठसा सर जौन मार्शल यांना 'भीटा' येथून मिळाला होता. चौथ्या-पाचव्या शतकांतील या ठशावर 'भद्रेश्वर' या नांवाने ललितासनांत बसलेला शिव दिसतो. हा द्विभुज असून याच्या हातांतील वस्तू मात्र अनिश्चित आहे. याच्या डोक्यावर व खांद्यावर अग्नीच्या ज्वाला किंवा झाडाचा वरचा भाग दिसत असावा. याच काळांतील वाराणसीहून मिळालेल्या ठशांवर 'श्रीदेवस्वामि' हा लेख व चौथऱ्यावर उभा असलेला द्विभुज शिव दिसतात. त्यांच्या एका हातांत कलश व दुसऱ्यांत माळा किंवा पाश आहे. डाव्या बाजूला साप ही दिसतो.
प्रतिमेच्या क्षेत्रांत सर्वप्रथम अर्धनारीश्वर मथुरेच्या कुषाण कलेंत" दिसतो (र. चि. बावीस ७). मथुरा संग्रहालयांतील एका शिलापट्टावर (चित्र-२) एकाच ओळींत अर्धनारीश्वर, विष्णू, गजलक्ष्मी व कार्तिकेय कोरलेले आहेत. अर्धनारीश्वर द्विभुज असून निरायुध आहे. प्रतिमेचा उजवा भाग पुरुषाचा आणि डावा स्त्रीचा आहे, येथें ऊर्ध्वलिंग व योनी यांचे एकत्रच अंकन आहे. कर्धीकधी अर्धनारीश्वराबरोबर बैलही दिसतो (रे. चित्र तेवीस १०). गुप्तकालीन अर्धनारीश्वराच्या दोन सुंदर प्रतिमांचे फक्त वरचे भाग मथुरेच्या संग्रहालयांत आहेत (चित्रे ५३, ५४). मथुरेचे हे लोण या काळांत वाराणसीपर्यंत पोंचले होते. वाराणसी येथील सारनाथ संग्रहालयांत एका सर्वतोभद्र प्रतिमेत चतुर्भुज अर्धनारीश्वर दिसतो. अशा प्रकारच्या प्रक्षतमा राजस्थानांत व मध्यप्रदेशांतही घडविल्या गेल्या.
झालवाड येथील संग्रहालयांत योनिलिंगांकित चतुर्भुज अर्धनारीश्वराची फारच सुंदर मूर्ती आहे. सागर येथून बसलेला अर्धनारीश्वर मिळाला आहे. विष्णुधर्मोत्तर, अंशुमद्भेदागम, उत्तरकामिकागम, सुप्रभेदागम, पूर्वकारणागम, शिल्परत्न, वगैरे ग्रंथात अर्धनारीश्वराचे वर्णन मिळतें. यांत उजवीकडे शंकर व डावीकडे पार्वतीचे असणें सर्वांस मान्य आहे, पण ऊर्ध्वलिंगाचा उल्लेख मात्र फक्त विष्णुधर्मोत्तरांतच सापडतो. द्विभुजांपेक्षा चतुर्भुज मूर्तीची वर्णनें जास्त मिळतात.
शिवाची विविध रूपे :- शिवाचे अधिकृत रूप प्रामुख्याने चार प्रकारामध्ये मानली जातात- संहारमूर्ती - शिव आसुरी शक्तींना मारतो. अनुग्रहमूर्ती - चंदेश्वरनुग्रहमूर्ती, रावणनुग्रहमूर्ती इत्यादि ज्या ठिकाणी शिव कृपा करतो. नृत्यमूर्ती - वीणाधर-दक्षिणामूर्ती इत्यादी उदाहरणे म्हणजे शिव नृत्य. दक्षिणामूर्ती – जिथे शिव योगी, दैवी रूपात आढळतो. इतर रूपे- गंगाधर्ममूर्ती, अर्धनारीश्वर इ.
एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. यामध्ये एकटा शिव समभंग अवस्थेत (दोन्ही पायावर सरळ) उभा असतो. या मूर्तिप्रकारात फारसे लालित्य नसते. प्रसंगी त्याच्या मागे नंदीही काडलेला असतो. शिवासह नंदी असतोच असे नाही. साधारणत: अशी मूर्ती चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, सर्प व घट हे प्रामुख्याने दिसतात. नाणी व मुद्रा यांवर केवल शिवाचे अंकन मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र पाषाणमूर्तींची संख्या तुलनेने कमी आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकात उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या कुषाण वंशातील काही राजे शैव होते; साहजिकच त्यांच्या अधिपत्याखालील मथुरा व आसपासच्या प्रदेशांतून अनेक शिवमूर्ती प्राप्त झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून मिळालेली एक द्विभुज शिवप्रतिमा उल्लेखनीय आहे. तिचा उजवा हात वरदमुद्रेत असून डाव्या हातात त्रिशूळ आहे. डोक्यामागे प्रभावळ आहे. ही प्रतिमा प्रारंभिक गुप्तकाळाची वाटते. उत्तर भारतात खजुराहो, राजस्थानात ओसिया इ. ठिकाणी अशा अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातील भांदक येथे काही उल्लेखनीय केवल शिवमूर्ती मिळाल्या आहेत. एका शिल्पात त्याच्याजवळ तीन फण्यांचा नाग, त्रिशूळ, पाश व कमळपुष्प आढळतात. आणखी एका प्रतिमेत शिवासह बैल आणि एक चवरीधारी सेविका आहे. केवल शिवाची एक आसनमूर्ती इंदूरच्या संग्रहालयात आहे.
केवल शिव प्रकारातील काही मूर्ती सिंहासह आहेत. माट येथून मिळालेली एक मूर्ती सध्या मथुरा संग्रहालयात आहे. हिचे डोके व उजवा हात भग्नावस्थेत असून शेजारी आखूड पायाचा व मोठ्या पोटाचा शिवगण आहे. प्रा. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते, ही शिवप्रतिमा आहे. माट येथे शिवोपासक कुषाण राजांचे देवकुल होते, ही गोष्ट या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी आहे. तेथूनच एक सिंहवाहिनी पार्वतीची मूर्तीही मिळाली आहे. डॉ. नी. पु. जोशी यांनी मूसानगर (जि. कानपूर, उत्तर प्रदेश) येथील एका वेदिकास्तंभावर कोरलेल्या दोन शिवप्रतिमांचा उल्लेख केला आहे. त्या मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या स्तंभाच्या दोन बाजूंस असलेल्या कोरीव चौकटींपैकी प्रत्येकी पहिल्या चौकटीत शंकराच्या मूर्ती आहेत. एका बाजूच्या मूर्तीत शिव ऊर्ध्वलिंग असून अभयमुद्रेत आहे. त्याचे केस मानेपर्यंत लांब असून डाव्या हातात घट आहे. उजवीकडे, वर मान करून पाहणारा सिंह व डावीकडे आखूड पायांचा ढेरपोट्या गण आहे. ही प्रतिमा मथुरा संग्रहालयातील प्रतिमेशी मिळतीजुळती आहे. याच स्तंभाच्या दुसऱ्या बाजूस शिवाची आसनमूर्ती आहे. येथे द्विभुज शिवाचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्या हातात घट आहे. येथेही शिव ऊर्ध्वलिंगी आहे; त्याने पागोटे व दागिने घातले आहेत. आसनाखाली सिंह बसलेला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवाच्या दोन्ही खांद्यांतून दोन व मानेकडून एक असे एकूण तीन द्विभुज पुरुष प्रकट झालेले दिसतात. साधारणत: मुख्य देवतेची काही रूपे किंवा शक्ती सूचित करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिमा दर्शविण्याची ही पद्धत मथुरा व समकालीन गांधार प्रतिमांमध्येही आढळते. या खांद्यातून उद्भूत होणाऱ्या देवता वा शक्तींना ‘व्यूह’ असे म्हटले जाते. डॉ. नी. पु. जोशी यांच्या मते, या मूसानगरच्या प्रतिमेत कुषाणकालीन वासुदेवाच्या ‘चतुर्व्यूह’ प्रतिमेचे शैव रूपांतर असावे किंवा याच काळात प्रचलित होऊ पाहणाऱ्या ‘चतुर्मुखलिंग’ संकल्पनेचे हे पुरुषरूप अंकन असावे.
दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातील पाश्चात्त्य छाप असलेले एक उत्तर कुषाणकालीन शिवशीर्ष विशेष उल्लेखनीय आहे. या शिवाच्या डोक्यावर जटाजूट वा जटामुकुटाऐवजी कुरळे केस दर्शविलेले आहेत; तसेच डावीकडे चंद्रकोर आहे. कपाळावर ग्रीक शासकांप्रमाणे ‘डायडेम’ बांधलेला दिसतो. त्याला शिल्परत्नात ‘ललाटपट्ट’ असे नाव आहे. कपाळावर तिसरा नेत्र उभा अंकित केला आहे; वास्तविक हे वैशिष्ट्य गुप्तकालीन मूर्तींचे आहे; पण त्याचा प्रारंभ कुषाणकाळाच्या शेवटी झाला असावा. वेरुळच्या कैलास मंदिरामध्ये अनेक ठिकाणी याचे शिल्पांकन दिसते.
केवल शिव, कैलास मंदिर, वेरूळ
सुखासनातील केवल शिव :-
औंढा येथील नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर अभ्यासक भक्त शिल्पशास्त्राचे विद्यार्थी सर्वांसाठीच आकर्षणाचे ठिकाण आहे. या मंदिरावर विविध मूर्ती आहेत. त्यांचे आव्हान अभ्यासकांना नेहमीच राहिलेले आहे.
सुखासनात बसलेली ही मूर्ती. वरच्या हातात त्रिशुळ आणि सर्प आहे. या सर्पाचा फणा उगारलेला नसून खाली झुकलेला शांत असा दाखवला आहे. खालचे दोन्ही हात वरद मुद्रेत आहे. डाव्या खालच्या हातात काय आहे लक्षात येत नाही पण अगदी याच मूद्रेतील इतर एका ठिकाणी याचे वर्णन शक्ती असे देगलुरकरांनी केले आहे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. तसेच त्रिशुळाच्या जागी खट्वांग आहे अशाही सुखासनातील मूर्ती आहेत.
खाली बसलेला नंदीही मान खाली घालून शांत बसलेला आहे. शिवाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. उजव्या पायाचा दूमडलेल्या पंजा शिल्पकाराने मोठा कलात्मक असा कोरलेला दिसून येतो. लांब कर्णभुषणे लक्ष वेधून घेतात. गळ्यात कमरेला पायात अगदी मोजकेच पण रेखीव अलंकार आहेत. एरवी शिवाचे अलंकार नागबंधादी किंवा उग्र असे दर्शवलेले असतात.
हे बारकावे पाहिल्यावर हे शिल्पकार कुणी साधे पाथरवट नसून अभ्यासु साधना करणारे प्रतिभावंत असल्याची खुण पटते.
पुरूष देहाचे सौंदर्य वर्णन करताना कमरेचे वर्णन "सिंहकटी" असे केलेले असते. या वर्णनात वरील मूर्ती बरोबर बसते. शिवाची कटी तशीच दाखवली आहे.
औंढा नागनाथाला भेट देणार्यांना विनंती आहे कृपया घाईघाईने दर्शन आटोपून निघून जावू नका. अप्रतिम असा शिल्प खजिना मंदिरावर आहे. कोरणार्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. तूम्ही डोळे भरून किमान पहा तरी.
अंजली मुद्रेतील केवल शिव :-
औंढा (ता. औंढा जि. हिंगोली) येथील नागनाथ मंदिर अभ्यासकांसाठी आणि ज्योतिर्लिंग असल्या कारणे भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. त्या मंदिरांवरील काही मूर्ती आजही अभ्यासकांसाठी आवाहन आहेत. ही जी मूर्ती आहे ती शैव देवतेची आहे. हातात त्रिशुळ, पात्र, वरद मुद्रेतील हातात अक्षमाला, कमंडलू दिसून येत आहेत. पायाशी मुंडमाला लोंबत आहे. खाली शिवाचे वहान नंदी आहे. मधले दोन हात अंजली मुद्रेत आहेत. अंजली मूद्रेतील तीन भव्यमुर्ती याच मंदिरावर आहेत. आणि त्या शिवाच्याच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले होते. त्या मूर्ती दोन हातांच्या आहेत. इथे तर सहा हात आहेत.
अंजली मुद्रा आणि नमस्कारासाठी जोडलेले हात यात फरक आहे. नमस्कारासाठीच्या मुद्रेत समांतर असे तळवे एकमेकांना जोडलेले असतात. अंजली मुद्रेत तळवा आणि बोटं यांच्यात कोन केलेला असतो.
एकुण लक्षणं पाहता ही मूर्ती अंजली मुद्रेतील केवल शिवाची असावी असे सिद्ध होते. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. वैराग्य भावना या ठिकाणी जाणवते. मस्तकाच्या पाठीमागे प्रभावळ दाखवलेली आहे. पायात हातात कमरेला अलंकरण केलेले आहे. दंडातही बाजूबंद आहेत.
औंढ्या नागनाथचा केवल शिव :-
शिवाची मूर्ती ज्या आणि जितक्या विविध भावमूद्रेतल्या आढळून येतात तशा इतर कुठल्याच देवतेच्या नाहीत. औंढा नागनाथच्या प्राचीन मंदिरावर शिव विविध मूर्तीं पैकी हा एक वैशिष्ट्यपूर्ण "केवल शिव".
शिवाचा उजवा खालचा हात वरद मूद्रेत असून त्यावर अक्षमालाही आहे. उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात नाग धारण केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या नागाचा शेपटाकडचा भाग खाली भक्तांच्या माथ्यावर आशिर्वाद वाटावा असा पसरला आहे. उजव्या त्रिशुलधारी हातात तोडे आहेत. पण डाव्या नाग धारण केलेल्या हाताला सर्पाचाच वेढा तोड्या सारखा दाखवला आहे. कलात्मकतेची कमाल आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. शिवाच्या उजव्या बाजूला नंदी बसलेला आहे.
शिवाची आभुषणेही उग्र रूपातच दाखवली जातात. पण इथे केवल रूपात ही आभुषणे जाडसर ठोकळच पण कलात्मक दाखवून शिल्पकाराने आपल्या प्रतिभेची पावतीच दिली आहे. पायात रूळणारी नररूंडमाळ इथे जाडसर दागिना दर्शवली आहे. कानात झुलणारे वर्तूळाकार कुंडल, यज्ञोपवितही कलात्मकरित्या खाली जावून परत वर मेखलेच्या पट्टीत अडकवले आहे.मुद्रा केवळ सौम्य नसून जरासे स्मित करणारी आहे. या मुर्तीच्या वरच्या हातातील त्रिशुळ, सर्प आणि खालचा नंदी झाकला तर आपण खुशाल याला विष्णु म्हणू शकतो. खालच्या भक्तांसोबत एक चामरधारिणीही आहे.
केवल शिवाचा अर्थ एकट्या शिवाची मूर्ती असा ढोबळ नाही. उत्पत्ती स्थिती लय यात लयाची देवता असलेल्या शिवाची केवल शिवाची मूर्ती फार वेगळं काही सुचवते. जिर्ण झालेलं, नकोसं असलेलं, विहित कार्य संपलेलं ते मी नष्ट करतो. आणि नविन सुंदर रसरशीत अर्थपूर्ण जगण्याला निर्माण होण्यासाठी जागा करून देतो असा व्यापक सुंदर अर्थ "केवल शिवा"चा लावता येतो. सनातन धर्मात मृत्युला वाक्याच्या शेवटचा पूर्णविराम न मानता दोन वाक्याच्या मधला ठिपका मानतात. (पूनर्जन्म संकल्पना) केवल शिवाची ही किंचित स्मित शांत मूद्रा त्या आगामी जिवाच्या स्वागतासाठी उत्सुक अशी आहे. शिवलीलामृतात
कारूण्य सिंधू भवदू:ख हारी
तूजवीण शंभो मज कोण तारी
अशी प्रार्थना याच आर्ततेतून उमटते.
महाकवी गालिबला आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर, तो परिसर आणि आख्या काशी नगरीचेच फार अप्रुप वाटले. त्याने या शहरावर फार्सीत कविता लिहिली. (गझल नाही, नज्म म्हणजे कविता) शिवाच्या सान्निध्यात आपल्याला शांती लाभली हे वर्णन करणारी गालिबची ही कविता. मूळ कविता फार्सी. तिचे नाव "चराग-ए-दैर".त्याचा गद्य अनुवाद निशिकांत ठकार सरांनी केलाय. पद्य अनुवाद मी केलाय.
दिव्यांचे देऊळ
आपल्या रंगभर्या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो
अमरत्वाचा जर
हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग
इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या
कुंकवागत जाणवे
पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी
तार्यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्या कोमल भावनांचा
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन
हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ
केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय,
मुंबईआता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.. लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.
शिव किरात -
किरा शिव हा परंपरेने जसा योगी मानला गेला आहे तसाच तो शिकारीही (किरात) आहे. हरप्पा येथील पट्टीकेत शिवाची ही दोन्ही रुपे चित्रीत केली गेली आहेत. बारकाईने पहा, शिकारी शिवाच्या हातात त्रिशुळाचे आद्य रूप आहे (दोन फाळ वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने आहेत) शैव संस्कृतीचे हे सुस्पष्ट पुरातन पुरावे आहेत...जी आजही जपली जात आहे.
भिक्षाटनमूर्ती :-
पुराणातील एका कथेनुसार शिव-पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत असताना पार्वतीने शिवाचे त्रिभुवनासहीत सर्व वस्त्रेही जिंकून त्याला दिगंबर केले. त्यामुळे शिवाला भिक्षा मागत फिरावे लागले. भिक्षापात्र घेऊन उभा असलेल्या शिवाचे शिल्प अनेक मंदिरांमध्ये आढळते. या मूर्तीला भिक्षाटन शिव असे म्हणतात. वेरुळ येथील कैलासमंदिराच्या मागील (पूर्वेकडील) विथिकेत (व्हरांड्यात) हे शिल्प आढळते. येथे शिवाला भिक्षा वाढणारी स्त्री ही अन्नपूर्णा पार्वतीमाताच असते.
शिवाच्या भिक्षाटनांची कथा पद्मपुराणांत येते. एकदां सहस्र वर्षे चालणाऱ्या ब्रह्मदेवाच्या यज्ञांत 'पञ्चमुंड' व 'बृहत्कपाल' धारण करणारा शंकर भिक्षेसाठी गेला व त्याने अन्नाची याचना केली ब्रह्मदेवाने 'हो' म्हटल्यावर तो आपले कपाळ तेथेच ठेऊन आंघोळीकरिता म्हणून पुष्कर तीर्थावर गेला. इकडे त्या अपवित्र वस्तूला म्हणजे कपाळाला तेथून फेकून देण्यांचा ब्रह्मदेवांने प्रयत्न केला, पण तेथें एकाच्या जार्गी दुसरे कपाळ प्रगट होऊ लागले व सरतेशेवटी ब्रह्मदेवानें शिवाला पुरोडाशांतील भाग देणें स्वीकार केले.
भिक्षाटन प्रतिमेचे आगमांत बरेच वर्णन मिळते. उत्तर व दक्षिण दोन्हीकडे या प्रतिमा घडविल्या जात. खालील बाबतीत त्यांचे उभयसाम्य दिसते : क) डोक्यावर जटामंडल : ख) अंगावर दागिने ग) बेंबीपर्यंत उचलेल्या डाव्या हातांत कपाळ किंवा भिक्षापात्र घ) मस्तकावर असलेली तीन नरमुंडे. या प्रकाराची एक सुंदर प्रतिमा लखनऊ संग्रहालयात आहे. तेथें वरील सर्व वैशिष्ट्ये तर दिसतातच पण त्याशिवाय विशेष लक्ष पुरविण्यांसारखें म्हणजे आयुधपुरुषाच्या रूपात त्रिशूल दिसतो. (चित्र ५५) विष्णूच्या मानानें शंकराचा आयुधपुरुष कमी दिसतो. महाभारतांत शंकराच्या विजय नांवाच्या त्रिशूलाचें मानवरूपांत वर्णन प्राप्त होते. त्रिशूलाव्यतिरिक्त शंकराची परशू, पिनाक पाशुपत अस्त्र किंवा बाण याचेही मनुष्यरूपांत वर्णन मिळते. कांचीपुरमच्या कैलासनाथार मंदिरात फिरताना शिवाचे एक वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळालं आणि याचे वेगळेपण शोधताना एक आगळीवेगळी कथा समोर आली ती म्हणजे “भिक्षाटन” करणाऱ्या शिवाची. ही मूर्ती जवळपास नग्न, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेली आहे आणि भैरवासारखी उग्र देखील नाही. याची कथा थोडक्यात समजली ती अशी…
लिंगोद्भव शिवाच्या स्वरूपाने कालभैरवाला जन्म देत ब्रम्हाचे ५ वे शीर कापले. या ब्रह्महत्येच्या पापामुळे ते शीर त्याचा हाताला चिकटले. म्हणून पापाचे परीक्षालन करण्या करिता शिवाने भैरवाचे रुप टाकून कापालिकाचे (ब्रम्हाच्या कपालातून भिक्षा मागणारा) रुप धारण केले. हाच कापालिक म्हणजे देशोदेशी भिक्षाटन करत फिरणारा शिव.
भिक्षाटन शिव, तिरुवनमलाई मंदीर
आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे
डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे,
हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग,
कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर
असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या
दैवत्वाचा पुरावा देतात.. लिंगपुराण,
शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात.
वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव
म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे. दक्षिणेकडील काही देवळात शिवाचे हे “भिक्षाटन” रुप आढळते. राजाराजा चोलाचा पुत्र राजेंद्र चोला याने बांधलेल्या गंगाईकोंडा चोलापूरम येथील मंदिरात देखील हे आहे. भिक्षाटन करणारा हा शिव तिन्ही लोकात भटकतो तसा तो देवदार वनात (अथवा दारुक वनात) देखील जातो. तेथे ऋषीमुनी यज्ञ कार्यात गुंतलेले असतात. ऋषीपत्नी या शिवाचे नग्न पण तेजस्वी रुप पाहून मोहित होतात व त्यांची वस्त्रे ढळतात, अशीही शिल्पे काही ठिकाणी आहेत. कधीकधी या शिवाबरोबर इतर स्त्रिया, किंवा भिक्षा टोपलीत घेऊन चालणारा सहायक असेही दाखविले जातात. काही ठिकाणी ऋषीमुनी त्याला मारायला धावतात (आपल्या स्त्रियांना नादाला लावल्यामुळे) अशीही शिल्पे आहेत. यात शिल्पांमध्ये बरेचदा शिवाच्या पायात खडावा देखील दाखविल्या जातात. बरेचदा भिक्षा देणारी स्त्री “देवी अन्नपूर्णा” म्हणून देखील दर्शविली जाते. भिक्षाटन शिवाच्या पुराणातील कथा पुराणातील कथांनुसार यात वैविध्य आढळते. कूर्म पुराणानुसार या भटकंतीत शिव पुढे वैकुंठाला जातो तेव्हा त्याचे हे कापालिक रूप बघून विष्णूंचा द्वारपाल “विश्वकसेन” त्याला अडवितो तेव्हा संतप्त झालेला भिक्षाटन शिव विश्वकसेनाला आपल्या त्रिशुळाने मारून उचलतो व अजून एक पाप जोडतो. आता हे भिक्षाटन रुप कंकालमूर्तीत परिवर्तित होते व विष्णूकडे आपल्या मुक्ततेसाठी भिक्षा मागते. यावेळी विष्णू त्याच्या मस्तकाची शीर कापून त्याचीच धार अन्नरूपात या कंकालाच्या भिक्षापात्रात टाकतो व त्याला वाराणसीत जाऊन पापक्षालनाचा सल्ला देतो. तसे केल्यावर भिक्षाटन शिवाच्या हस्ताला चिकटलेले ब्रम्हाचे शीर गळून पडते. ही जागा म्हणजेच वाराणसीतील “कपाल मोचन कुंड” याच ठिकाणी विश्वकसेनाचे शव देखील अदृश्य होते व शिवाचे पापक्षालन होऊन तो पुन्हा कैलासावर परततो.
भिक्षाटन शिव, बृहदीश्वर मंदिर, तंजावर
वामन पुराणात हि कथा थोड्या वेगळ्या स्वरूपात येते. या कथेनुसार प्रजापती दक्षाच्या यज्ञात सती पार्वतीने स्वतःला झोकून दिल्यावर तिच्या विरहाने व्याकुळ झालेला व त्याचबरोबर मदनाने त्याला उन्माद आणि विजृम्भण नावाचे दोन बाण मारून विद्ध केले. हा शिव संतापात विश्वात भ्रमण करून जगताला पीडा देत असताना यक्षाधिपती कुबेराचा पुत्र “पांचालिकाने” त्याला पाहिले व शिवाकडून ही दोन्ही अस्त्रे धारण करत तो “पांचालिकेश” झाला आणि शिव पुढे विंध्य पर्वताकडे भिक्षाटनासाठी निघाला तोच शिव म्हणजे हा “भिक्षाटन शिव”. पण शंकराला त्या अवस्थेत पाहून वसिष्ठ पत्नी अरुंधती आणि अत्री पत्नी अनुसूया यांच्या व्यतिरिक्त इतर ऋषीपत्नी मोहित होऊ लागल्या, त्यांची वस्त्रे ढळू लागली आणि म्हणून संतप्त झालेल्या ऋषींनी शिवलिंग पृथ्वीवर पतित होईल असा शाप दिला आणि शंकराची कामभावना गळून पडली, आणि शंकर तेथून अंतर्धान पावले.
भिक्षाटन शिव, जलकंठेश्वर मंदिर , वेल्लोर
याप्रकारे शांत झालेले शंकर वनांत शांत बसलेले असताना कामदेव मदन त्यांच्या मागावर आला. त्याला पाहून शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले, म्हणजेच त्यांनी कामभावनेवर संपूर्ण विजय प्राप्त केला. भस्म झालेला कामदेव मदन त्यानंतर विना अंगाचा म्हणजेच अनंग म्हणून फिरू लागला.
भिक्षाटन शिव, एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम
स्कंद पुराणानुसार ही कथा अगदी वेगळ्या स्वरुपात येते. यानुसार दारुक (देवदार) वनातील ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिवाने “भिक्षाटन” रूप धारण केले तर विष्णूने मोहिनीरूप. तेथे तपश्चर्या करणाऱ्या ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिव तेथे भिक्षेला गेले तेव्हा ते सतीच्या विरहाने व्याकुळ व तिच्याच विचारात होते. म्हणून ऋषिपत्नींना त्यांची दया आली व त्या त्यांना भिक्षा देऊ लागल्या. ते सहन न झाल्याने ऋषींनी त्यांना तुम्ही षंढ व्हाल असा शाप दिला पण यानंतर त्या ऋषींना सर्व जागाच लिंगमय भासले व त्याचा आदी आणि अंत त्यांना सापडेना. यावर त्यांनी हि गोष्ट ब्रह्मदेवानं सांगितली तेव्हा ब्रह्मदेवांनी शंकरांना हंसरूप घेऊन त्या लिंगाचे मूळ सापडल्याची कथा सांगितली आणि केतकीच्या फुलाची साक्ष दिली. यानंतर लिंगपूजा सर्वव्यापी झाली व अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली गेली. भिक्षाटन शिव शिल्प ओळखायचे कसे?
भिक्षाटन शिव, वीरभद्रस्वामी मंदिर, लेपाक्षी. उजवीकडील खांबावर वस्त्र ढळलेली स्त्री
या शिवाच्या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाचे नग्न स्वरूप. यातील शिल्पात बरेचदा शिवचरणी लीन झालेल्या स्त्रिया असतात. कामासक्तीने वस्त्रे ढळलेल्या स्त्रीचे शिल्पदेखील कधी कधी सोबत दाखविलेले असते. तर कधी जमलेली भिक्षा एका टोपलीत सोबत घेऊन चाललेला गण असतो व शिव त्यातीलच काही भाग सोबत असणाऱ्या कुत्र्याला देत असतात. भैरव स्वरूपात हातात ब्रम्हाचे ५ वे शीर हातात घेऊन चाललेला शिव असतो. खांद्यावर अथवा हातात त्रिशूल असतो आणि बरेचदा या शिल्पांच्या पायात खडावा असतात ज्या इतर शिव शिल्पांमध्ये आढळून येत नाहीत.
भिक्षाटन शिवाच्या पायातील खडावा, कैलासनाथार मंदिर, कांचीपुरम
भिक्षाटन मूर्ती, कैलास मंदिर, वेरूळ
भिक्षाटन शिवाच्या अनेक मूर्ती तामिळनाडूच्या विविध देवळातून पाहायला मिळाल्या. बृहदीश्वर मंदिर (तंजावर), एकांबरेश्वर मंदिर (कांचीपुरम), जळकंठेश्वर मंदिर (वेल्लोर) अशा काही मूर्तींची छायाचित्रे मी येथे टाकली आहेत पण सर्वसाधारणपणे दक्षिणेकडील बऱ्याच मंदिरात एकाहून अनेक खांबांवर शिवाचे भिक्षाटन, भैरव, कापालिक अशी अनेक रूपे सापडतात. फक्त आपण नीट निरीक्षण केले पाहिजे आणि या पाठीमागची कथा आपल्याला समजली तर ती शिल्प कळल्याचा आनंद देखील होतो.
महाराष्ट्रातील खिद्रापूरच्या कोप्पेश्वर (Koppeshwar Temple, Khidrapur, Maharashtra) मंदिरात, अंबरनाथच्या आम्रेश्वर शिव मंदिरात (Ambreshwar Temple, Ambarnath, Maharashtra) देखील हि शिल्पे कोरली असल्याचे आढळले.
लिंगोद्भव मूर्ती :-
शिव मूर्तीच्या शिल्पांकनांचे तीन गट पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि व्यक्ताव्यक्त. ज्या मूर्ती शारीर रूपात शिव दिसतो त्याला व्यक्त म्हणतात. अव्यक्त रूप म्हणजे शिवलिंग आणि त्याचे प्रकार. लिंगोद्भव शिवाची. ही मूर्ती लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही प्रकारांत गणली जाते.
त्रिशुंड गणपती मंदीर, पुणे येथील लिंगोद्भव शिवमुर्ती
याची कथा अशी, कल्पाच्या अंती महाप्रलयाच्या वेळी विष्णू आपल्या योगनिद्रेमध्ये होते. तेव्हा त्यांच्यासमोर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्माने विश्वाचा निर्माता म्हणून विष्णूला स्वतःची ओळख करून दिली, ज्या वर विष्णूने सांगितले की तो विश्वाचा शिल्पकार आहे. यावरून एकमेकांवरील श्रेष्ठत्वाबद्दल दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यांचे भांडण विकोपाला गेले. त्यावेळेस एक प्रचंड मोठी ज्वाला (अग्री स्तंभ) दोघांमध्ये प्रकर दोघांपैकी जो याच्या टोकाचा थांग लावेल तो श्रेष्ठ असे ठरले. हंसाचे रूप घेऊन ब्रह्माने आकाशाचे टोक शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे खालचे टोक शोधायला वराहाचे रूप घेऊन विष्णु पाताळात गेला. त्या दोघांनाही ते टोक काही सापडले नाही.यावेळी ब्रह्मदेवांनी मात्र त्या तेजोस्तंभाचा वरचा भाग शोधला आहे असे सांगायचे ठरविले.ब्रह्मदेव हंसाच्या रूपात वरच्या दिशेने उडत असताना त्यांना केतकीच्या फुलाच्या पाकळ्या खाली पडताना दिसल्या होत्या. गूढ तेजोस्तंभाच्या शिखरावर पोहोचून त्याचा अंत शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना कंटाळलेल्या, ब्रह्माने, त्या केतकीच्या फुलाला, आपल्या असत्यकथनात सहभागी होण्याची विनंती केली. ते केतकीचे फुल तेथूनच आले आहे असे त्याने सांगावे, असे ठरले. ब्रह्मदेवांनी तेजोस्तंभरूपी शिव आणि विष्णूची भेट घेतली आणि त्याने या विश्वस्तंभाचे मूळ शोधले असल्याचे ठामपणे सांगितले. यासाठी त्यांनी त्या केतकीच्या फुलाची साक्ष देखील काढली.
क्रोधित शिव अग्निमय स्तंभातून प्रकट झाला .भगवान शिवांचे स्वरुप असे होते. त्यांना हजार हात आणि पाय होते. त्यांचे डोळे म्हणजे सुर्य, चंद्र आणि अग्नी होते.त्यांनी गजचर्म धारण केले होते.त्यांनी आपले धनुष्य पिनाक आणि त्रिशुल धारण केले होते. त्यांनी सर्पाचे जानवे धारण केले होते.त्यानी क्रोधीत होउन ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवरील मंदिरांमध्ये त्याची पूजा केली जाणार नाही. ब्रह्मदेवाची मंदिरे पृथीवर न आढळण्याची ही कथा. त्याचबरोबर शंकराच्या शापामुळेच केतकीचे फुल देखील पूजेसाठी का वापरले जात नाही, याचीही संगती आपल्याला या कथेमुळे लागते. अर्थात महाशिवरात्रीला केतकीचे फुल शिवपुजनात चालते.शिवाच्या प्रकटीकरणाचा हा काळ म्हणजेच लिंगोद्भव काळ हा शिवरात्र म्हणून साजरा केला जातो, अशा प्रकारचे वर्णन आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते.यावेळी असत्यकथनाबद्दल क्रुद्ध होत शंकराने भैरवाची निर्मिती केली. या भैरवाने ब्रम्हाचे ५ वे शीर कापून टाकले. आपले भवितव्य समोर दिसताच ब्रह्मदेवाने शंकरांची माफी मागितली आणि शंकरानी त्याला क्षमा केली. म्हणूनच ब्रम्हाची काही मंदिरे असली तरी त्याची विशेष पूजा होत नाही. भैरवाची मूर्ती दाखविताना कधी कधी त्याच्या हातात ब्रम्हाचे हे शीर देखील दाखवले जाते. शैव पंथाचे माहात्य्य सांगणारे हे कथानक आणि त्याला अनुसरून केलेले हे शिल्प आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते.भगवान विष्णु आणि ब्रम्हदेव भगवान शिवांच्या समोर हात जोडून क्षमायाचना केल्यामुळे शिवशंकरांचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी वर दिला कि प्रत्येक युगाच्या शेवटी सर्व देवता त्यांच्यामध्ये विलीन होतील आणि नवीन युगाच्या आरंभी पुन्हा जन्म घेतील.विष्णु आणि ब्रम्हदेव हे भगवान शिवांपासूनच निर्माण झालेले आहेत.
परंतु या शिल्पामध्ये काळ अवकाश यांची अथांगता आणि अवकाश-ऊर्जेचे नाते स्पष्टपणे दाखविण्याचा प्रयत्न असावा असेही मत आहे (झिमर: १९९०, पृ.४८-५०). कैलासमंदिराच्या पायऱ्या उजवीकडून चढून जाताना प्रवेशद्वारावरील उजवीकडील भिंतीवर हे शिल्प दिसते.
वेरूळ कैलास लेण्यातील लिंगद्भव शिवप्रतिमा
पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील लिंगोद्भव प्रतिमा. अंबरनाथच्या शिवमंदिरातील लिंगोद्भव शिवाचे शिल्प[
लिंगोद्भव मूर्ति, चोल राजवंश,१२ वे शतक (सध्या राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली )
एक लिंगरूपी तेजोस्तंभातून शिवाचे प्रकटीकरण ही शिवकथा आपल्याला दक्षिणेकडील काही मंदिरात पाहायला मिळते. कुंभकोणम येथील ऐरावतेश्वर मंदिराच्या मागील भागात याचे एक उत्कृष्ट शिल्प आहे. या शिल्पसंकल्पनेचा उगम आपल्याला थिरुक्कुरल या प्राचीन तामिळ ग्रंथात आढळतो. अशाच प्रकारचं पण काहीसे वेगळे शिल्प आम्हाला कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरात देखील आढळले. कांचीपुरमच्या एकांबरेश्वर मंदिरात देखील विष्णुमंदिराच्या पाठच्या भिंतीवर लिंगोद्भव शिवाचे सुंदर शिल्प आहे. महाराष्ट्रातील मुंबईजवळच्या अंबरनाथ येथील आम्रनाथ शिवमंदिरामध्ये देखील हे शिल्प आपल्याला जीर्णावस्थेत आढळून येते.
दारासुरम, तमिलनाडु मधील भगवान शिव लिंगोद्भव मूर्ति
ऐरावतेश्वर
मंदिरातील मागील भिंतीवरील लिंगोद्भव शिव मूर्ती. डावीकडे ब्रम्हा तर
उजवीकडे विष्णू. तसेच वरच्या बाजूला हंसरूपात ब्रह्मा तर खालच्या बाजूला
वराहरूपातील विष्णू
कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरातील लिंगोद्भव शिवलिंगोद्भव शिव – वरच्या बाजूला हंसरूपात ब्रह्मा तर खालच्या बाजूला वराहरूपातील विष्णू ( एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम )
लिंगपुराण, कूर्म पुराण, वायु पुराण आणि शिवपुराण यामध्ये हि लिंगोद्भव शिवाची कथा आहे. त्यामध्ये शिवांना ब्रम्हदेव आणि विष्णुची मुळ देवता मानलेले आहे. दक्षिण भारतात लिंगोद्भव शिल्पपट मोठ्या प्रमाणात दाखवलेला असतो. बहुतेकदा हा शिल्पपट मंदीराच्या गर्भगृहाच्या पश्चिमी भिंतीवर दाखवलेले असते. हे शिल्प पश्चिमी भिंत किंवा मंडोवरावर असण्याचे कारण म्हणजे लिंगोद्भव शिवाची उर्जा मंदीराच्या पुर्वेच्या दरवाज्यातून बाहेर पसरते. आणि हि उर्जा शिवभक्तांना आशिर्वाद स्वरुपात मिळते. प्राचीन शिल्पशास्त्रानुसार लिंगोद्भव मूर्तिमध्ये शिवलिंगाचा पाचवा भाग वर आणि पाचवा भाग खाली दाखवलेला असतो. मध्ये भगवान शंकरांचे चंद्रशेखर स्वरुपात दाखवलेले असते. जर भगवान शंकरांना चार हात असलेल्या रुपात दाखवायचे असल्यास एक हात अभय मुद्रेत, दुसरा वरद मुद्रेत, तिसरा हातात परशु किंवा शुळ धारण केलेला असतो तर चौथा हातात काळ्या रंगाचे हरण दाखवलेले असते. भगवान शिवांच्या चेहर्यावर शांतता दाखवलेली असते. त्यांचे केस जटेच्या मुकुट स्वरुपात दाखवलेला असतो, तर डोक्यावर अधचंद्र धारण केलेला असतो. त्यांनी दागिने म्हणून नागांना धारण केलेले असते.
दारासुरम, तमिलनाडु मधील लिंगोद्भव शिल्पपट
कर्नाटकमधील पट्टदकल मधील लिंगोद्भव शिल्पपट
तमिलनाडु दारासुरम मधील लिंगोद्भव मूर्ति जवळून
कुंभकोणम, तमिलनाडु येथील शिव लिंगोद्भव मूर्ति
लिंगोद्भव मूर्ति, कांची कैलाशनाथर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
क्रोधित शिव ब्रम्हदेवाचे पाचवे शीर कापताना, कांची कैलासनाथर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
गुजरातमधील दहाव्या शतकातील लिंगोद्भव मूर्ति, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली
Simhanatha Temple, Badamba, Cuttack.
भगवान शिव लिंगोद्भव मूर्ति, गंगैकोंडचोलपुरम ( तमिलनाडु )
लिंगोदभव शिवाची ही सर्व घटना तामिळनाडूतील अरुणाचलेश्वर मंदिर परिसरात घडली असे मानले जाते. म्हणूनच हे मंदिर पंचमहाभूतांपैकी अग्नी तत्वाचे निदर्शक मानले. जाते. या घटनेचे वर्णन आपल्याला अरुणाचल पुराण या स्थलमाहात्म्य पुराणात आढळून येते.
या शिल्पामध्ये आपल्याला बरेचदा डावीकडे ब्रह्मदेव तर उजवीकडे श्रीविष्णू पाहायला मिळतात व लिंगातून प्रकटलेल्या शिवपिंडीवर आपल्याला हंसरुपातील ब्रह्मदेव आणि खालच्या बाजूला वराहरुपातील श्रीविष्णू दिसून येतात.
लिंगिन शिवमूर्ती
हा
एक शिवमूर्तीचा आगळावेगळा प्रकार. सर्वसाधारणपणे ही मूर्ती उमामाहेश्वर
प्रकारात दिसते. यात शिवाने शिवलिंग धारण केलेले दिसते. यालाच लिंगायत
मूर्ती असेही काहीजण म्हणतात. आजही लिंगायत लोक आपल्याकडे सतत शिवलिंग धारण
करत असतात. उमामाहेश्वर प्रकार (म्हणजे शिव पार्वती यांच्या एकत्रित मूर्ती) यातच अंतर्भूत असल्याने त्याचे वेगळे वर्णन करीत नाही.
वेरूळच्या कैलास लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुरावर असणारा हा लिंगिन शिव
वेरूळ कैलास लेणीच्याच प्रदक्षिणापथावर असलेला हा लिंगिन शिव
प्रदक्षिणापथावरच असलेली लिंगिन शिवाची अजून एक प्रतिमा. ह्याने आपल्या उजव्या हातातील बोटांमध्ये शिवलिंग धारण केले आहे.
ड) नृत्य - मूर्ती :
शंकराचे नर्तन देखील फारच प्रसिद्ध आहे.
शिव तांडवाचे अंकन दक्षिणेंत लोकप्रिय होतें. उत्तर भारतांत शिवाच्या
नृत्य-मूर्ती कमी मिळतात, पण त्याची सुरुवात मात्र गुप्तकाळांपासून झालेली
आहे. नचना कुठरा येथून नृत्य करणाऱ्या चतुर्भुज शंकराची एक खंडित प्रतिमा आपणांस मिळाली आहे.
नटेश अथवा नटराज :-
मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील नृत्यरत शिव अवलोकन आज करायचे आहे.
मकर तोरणावरील देखणा नटेश
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या मकर तोरणावर हा नृत्य करणारा शिव कोरला आहे ( नृत्य शिव म्हणजे नटराज नव्हे). नटराज मूद्रेशिवाय शिवाच्या नृत्य मूद्रीत शिल्पांना नटेश असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय उचललेला अशी ही मूद्रा आहे. (नटराज मूद्रेत उजवा पाय जमिनीवर आणि डावा उचललेला असतो) आजूबाजूला भक्तगण वाद्य वाजवत संगीतात गुंग झालेले आहेत. भक्तांच्या चार मूर्ती असून दोन वाद्य वाजवत आहेत तर दोन ललित मूद्रेत उभ्या असून नृत्याला साथ देत आहेत. मुख्य नर्तकाच्या मागे "कोरस" म्हणून कसे इतर उप नर्तक नाचत असतात तसे.
मगरीच्या मुखातून निघालेले नक्षीचे तोरण शिवाच्या माथ्यावर आहे. हे तोरण मोठे कलात्मक आणि सुंदर आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजव्या वरच्या हातात डमरु आणि खालचा हात वरद मूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. पायाशी नंदी बसलेला आहे.
हे मंदिर शिवाचे आहे हे सुचित करणारे हे शिल्पांकन गर्भगृहाच्या चौकटीवर दिसून येते. मंदिरांवरच्या शिल्पात खुप अर्थ दडलेला असतो. केवळ कोरायचे म्हणून शिल्प कोरले असे होत नाही. या शिल्पातील इतर मूर्तीही लयबद्ध आहेत. तोरणाच्या वरतीहि डाव्या उजव्या कोपर्यात गंधर्व किन्नर कोरलेले दिसून येतात. शिडी लावून वर चढून ही शिल्पं नीट पाहिली पाहिजेत. त्यांची सुंदर छायाचित्र, चलचित्रण (व्हिडिओ) करून ठेवले पाहिजे. म्हणजे सामान्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा शिल्पातले बारकावे लक्षात येत नाहीत. खुप वरचे किंवा पुरेसा प्रकाश नसलेल्या जागचे दिसतही नाही.
उमरगा
चालुक्य शैलीतील मकर तोरण – उमरगा येथील शिवमंदिर हे त्रिदल म्हणजे तीन गर्भगृहयुक्त आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यप्रवेशद्वार आणि तीनही गर्भगृहांची प्रवेशद्वार यांवर तीन अशी एकूण चार मकर तोरणे आहेत. यांपैकी एका मकर तोरणावर चतुर्भुज शिव नृत्यमग्न असल्याचे शिल्पित केले आहे. सर्व हस्त मुद्रा या नृत्यमुद्रा आहेत. दक्षिणाधक्रमाने अलपल्लव, लताहस्त, हंसपक्ष आणि एका हाताची करीहस्त मुद्रा करून आशीर्वचनाप्रमाणे एका उद्दकी वाजविणाऱ्या गणाच्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्रिभंग अवस्थेतील शिव ऊर्ध्वजानु पदन्यास करीत आहे. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला वेणुवादक आहे. वेणुवादकाच्या मागे किन्नर युगुल शिल्पांकित केले आहेत. शिवाच्या डाव्या बाजूला एक मृदुंग वादक असून त्याच्याही बाजूला किन्नर युगुल शिल्पित केले आहेत. या तोरणावर काही आकाशगमी गन्धर्व पुष्पमाला घेऊन येताना दाखवले आहेत.
दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय
काकतीय शैलीतील मकर तोरण – सध्या हे मकरतोरण दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. या मकर तोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी नृत्यरत शिव आहेच पण सोबतच ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही शिवासोबत नृत्य करीत आहेत. दोन मकरांच्या मुखातून निघालेल्या लता दाखवल्या आहेत. दशभुज शिवाच्या उजव्या हातांमध्ये अक्षमाला, डमरू, खट्वांग, बाण आणि खड्ग आहे तर डाव्या हातांमध्ये खेटक, धनुष्य, त्रिशूल, सर्प आणि बिजपुरक ही आयुधे आहेत. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे. उजव्या बाजूला असलेले ब्रह्मदेव त्रिमुखी चतुर्भुज शिल्प्त केलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये अक्षमाला, स्रुक, पाश आणि कमंडलू आहे. ब्रह्मदेवाच्या पायाशी त्यांचे वाहन हंस दाखवलेला आहे. भगवान विष्णू चतुर्भुज असून त्यांच्या हातांमध्ये गदा, पद्म, शंख आणि चक्र आहे. विष्णूच्या पायाशी हात जोडून बसलेला गरुड शिल्पित केला आहे. त्रिदेव हे सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे
आहेत. दोन्ही बाजूला असलेले वादकांनी त्यांच्या तालवाद्यांनी ठेका धरलेला आहे.
या मकर तोरणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तोरणावर दोन्ही बाजूंना अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनावर आरूढ होऊन हा या नर्तन सोहळ्यास उपस्थित झाले आहेत. यामध्ये उजवीकडे इंद्र, अग्नी, यम आणि निरुत्ती तर डावीकडे वरूण, पवन, कुबेर आणि ईशान हे शिल्पित केले आहेत.
याशिवाय भारतभर अनेक मंदिरामध्ये अशी विलक्षण सुंदर आणि लक्षवेधी कोरीव मकरतोरणे आपल्याला बघायला मिळतात.
नटेश शिव (नीलकंठेश्वर मंदिर, निलंगा, जि. लातुर)
शिवाच्या विविध मनमोहक मूर्ती मराठवाड्यात आहेत. निलंग्याच्या मंदिरावर बाह्यभागावर देवकोष्टकात ही मुर्ती आहे. उजवा हात अभय मुद्रेत असून हातातअक्षयमाला आहै. वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात खट्वांग आहे. खालच्या हातात बीजपुरक (मातुलिंग) आहे. शिवाच्या उजव्या बाजूस खाली नंदी बसलेला आहे. डाव्या बाजूस गंगा आहे. डावा पाय जमिनीवर टेकवला असून उजवा पाय गुडघ्यात दूमडून वर उचलला आहे. अशा १०८ नृत्यप्रकार सांगितले जातात त्यातील ही मुद्रा भुजंगतलास म्हणून ओळखली जाते. मूर्ती तीन फूटाची आहे.
१२ व्या शतकातील हे उत्तर चालुक्य कालीन मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. मुख्य गाभार्यात शिवलिंग असून इतर दोन गाभार्यांत विष्णु व हर गौरी (शिव पार्वती एकत्र) या मूर्ती आहेत. (माया पाटील शहापुरकर यांच्या "मंदिर शिल्पे' या ग्रंथात या मंदिरावर सविस्तर लिहिले आहे. ही माहिती त्यातीलच आहे.)
शिवाच्या या नृत्य मूर्तीला नटेश असे म्हणतात. नटराज हा शब्द आपण शिवाच्या सगळ्याच नृत्य मूर्तीला वापरतो. पण तो तसा नाही. (फोटो सौजन्य डाॅ. दत्तात्रय दगडगावे, लातुर)
लोलितपाद नटराज (लेणी क्र. २१, वेरूळ)
नटराजाची प्रतिमा जी आपल्या सतत डोळ्या समोर येते ती एक पाय वर उचललेली व एका पायावर शरिराचा सगळा भार तोलून धरणारी अशी असते. ही प्रतिमा तंजावरच्या मंदिरातली आहे. दहाव्या शतकातील. पण त्याच्या जवळपास ३०० वर्षे आधी नटराजाची प्रतिमा कोरल्या गेली आहे वेरूळला. २१ क्रमांकाची ही लेणी "रामेश्वर लेणी" नावाने ओळखली जाते. नटराजाचे हे सर्वात पुरातन कलात्मक आणि भव्य असे शिल्प आहे. या नटराजाला "लोलितपाद नटराज" म्हणतात. शिवाने व्याघ्रचर्म कटीस परिधान केले आहे. दोन्ही बाजूला वादक दिसून येतात. अंतराळात ब्रह्मा, विष्णु, इंद्र यांची शिल्पे आहेत. एक परिपूर्ण कलात्मक दृश्य अशी या शिल्पपटाची ओळख आहे. १४ व्या क्रमांकाच्या लेणीतही नटराज शिवाचे अप्रतिम शिल्प आहे.
गायन वादन नृत्य यांचे सगळ्यात जूने संदर्भ औरंगाबाद परिसरांतील लेण्यांत सापडतात हा पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आम्रपालीचे एक विलक्षण शिल्प औरंगाबाद लेण्यात याही पूर्वीच्या काळात कोरलेले आहे.
महाराष्ट्राची सांगितिक कलात्मक अस्मिता या शिल्पाला मानले पाहिजे कारण हे तंजावरच्या आधीचे आहे अशी आग्रही भुमिका Mahagami Gurukul गुरूकुलाच्या संचालिका विख्यात ओडिसी/कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता या मांडत असतात. वेरूळ लेण्यात नृत्य विषयक भरपुर मुद्रा आढळून येतात.
शार्ङगदेवाचा संगीत रत्नाकर हा ग्रंथही याच परिसरात देवगिरी किल्ल्यावर रचला गेला. तेव्हा ही भुमी कलेची भुमी आहे हे निश्चित. मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर बाह्य भागात वादन, नृत्य करणारी सुरसुंदरींची शिल्पे अधिक आहेत. होट्टल येथे नृत्य गणेश आहे. जामखेडच्या (जि. जालना) खडकेश्वर महादेव मंदिरात लहान आकारात गायन वादन नृत्य करणार्या स्त्रीयांचे स्तंभ शिल्प आहे.
नटराज शिवाच्या विविध मुद्रा मराठवाड्यातील औंढा, उमरगा, माणकेश्वर, निलंगा येथील मंदिरांवर आहेत.
(हे शिल्प नटराज शिवाचे नसून नटेश शिवाचे आहे आसे तज्ञ सांगत आहेत. शिवाय हा लोलीत पद शिव नाही. यावर अजून प्रकाश पडला पाहिजे.)
नटराज शिव अथवा नृत्य मूर्ती
हा एक सर्वपरिचीत प्रकार. नटराज प्रकारात शिव हा नृत्यमुद्रेत दिसतो. शिवाने १०८ प्रकारे नृत्य केले अशी मान्यता आहे. तांडवनृत्यसुद्धा ह्या नटराज प्रकारातच येते. नटराज शक्यतो चारापेक्षा अधिक हातांचा दर्शवला जातो. ८, १०, १६ हातांचेही नटराज आहेत. हातांमध्ये त्याने खङग, शक्ती, दंड, त्रिशुल, नाग, ज्वाला इत्यादी आयुधे धारण केलेली असतात.
वेरूळ लेणी क्र. २१ रामेश्वर येथील कटीसमनृत्यमुद्रेत असलेली शिवप्रतिमा
वेरूळ लेणी क्र. १६ येथील शिवतांडव प्रतिमा
दशावतार लेणीतील नटराज -
वेरूळ मधील लेणी क्र.15 म्हणजे दशावतार लेणी. पहिला मजल्यावर चढून गेलो
की शिल्पांनी संपन्न असा एक भव्य सभामंडप दृष्टीस पडतो. या लेणीमध्ये
दक्षिण दिशेला ओळीने विष्णूच्या विविध अवतार शिल्पित केले आहेत. याच
सभामंडपाच्या उत्तर दिशेला शिवाचे विविध विग्रह दिसतात. त्यापैकी दुसरा
शिल्पपट हा नृत्यरत शिवाचे नर्तन दाखवणारा आहे.
नटराजाचे शिल्प काही अंशी हे क्षतिग्रस्त आहे. अष्टभुज शिवाच्या
दक्षिणक्रमाने संदर्शन मुद्रा, त्रिशूल, डमरू असून डाव्या हातांमध्ये
हंसपक्ष हस्त, सर्प, एका हातातील आयुध भग्न असावे, आणि पुढचा हात करीहस्त
मुद्रेत आहे. शिवाचा जटामुकुट असून तो ब्रह्मकपालाने सुशोभित केला आहे.
खांद्यावरून वैकक्षक रुळत आहे तर पोटाला उदरबंध आहे. हातामध्ये कंकण आणि
दंडामध्ये त्रिवलययुक्त केयूर आहेत. याशिवाय शिवाच्या डाव्या पायातील
अत्यंत सुरेख असे पैंजण आपल्याला दिसते. सुंदर अश्या पद्मपीठावर मध्यभागी
त्रिभंगावस्थेत नटेश्वर नर्तन करतानाचे हे शिल्प आहे. शिवाच्या पायाजवळ
शिवाप्रमाणे नर्तन करणारे तण्डू मुनी असावेत. उजवीकडे तालवाद्य तर डावीकडे
सुशीर वाद्य वाजवणारे वाद्यवृंद आहेत.
वेरूळ मधील दशावतार लेणी ही विशेष आहे. पर्यटकांचा ओघ या लेणीकडे काहीसा
कमी असल्याने कदाचित इथे शिल्प-संवाद अधिक प्रखर उमटतो. ही लेणी बघताना
आपण भारावून जातो. हा माझा स्वानुभव आहे, अत्यंतिक शांतता या लेणीतील
शिल्पांना जिवंत करते. प्रत्येक शिल्प, त्यांच्या कथा, त्या कथांतील भाव
साकार होत राहते. हा सोहळा केवळ अनुभवावा असाच आहे. एक एक शिल्पातून नाद
उमटायला लागतात आणि आपण स्तब्ध आणि निशब्द होऊन केवळ ही अनुभूती
आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. इथला नटराज बघताना या
दिव्य नृत्याचा अनुग्रह आपल्यावरही होत आहे, या भावनेने साश्रु या
शिल्पांना न्याहाळत राहतो आणि तृप्त मनाने या लेणीमधून बाहेर येतो.
अपस्मार पुरुषावर नर्तन करणारा नटराज
कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम इथली ही नटराजाची प्रतिमा आहे. यामध्ये
आक्राळ अश्या अपस्मार पुरुषावर शिव नृत्य करतो आहे. त्याचा उजवा पाय हा
अपस्माराला दाबतो आहे तर दुसरा ऊर्ध्वजानु करणामध्ये वर उचललेला आहे. या
शिल्पामध्ये शिवाची चर्या काहीशी भयानक झाली असली तरी चेहऱ्यावर स्मित
आहे. या शिल्पामध्ये नटराज चतुर्भुज आहे. त्याच्या हातामध्ये त्रिशूल,
पाश, अलपल्लव मुद्रा आणि सूची मुद्रा आहे. त्याच्या डाव्या पायाशी फणा
काढलेला भुजंग आहे. नटराजाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात गोल कुंडले
आहेत. खांद्यावर कोरीव यज्ञोपवीत आहे. दंडात त्रिवलय केयूर आणि हातांमध्ये
कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपर दाखवले आहेत.
त्रिनेत्र नटराजाचे डोळे गोल व मोठे आणि दात बाहेर आलेले दाखवून यातील
उग्र भाव सहज प्रदर्शित होत आहे. या नटराजाने त्याचा उजवा पाय या जाडजूड,
बेढब मूलयकावर ठेवला आहे. शिवाची सूची मुद्रा ही अपस्मार पुरुषासाठी
चेतावनी देणारी आहे. या अपस्मार पुरुषाच्या चेहऱ्यावर त्याची हतबलता स्पष्ट
दिसत आहे. शांत चित्ताने या शिल्पाकडे पहिले तर, शिवाच्या नृत्यावस्थेतील
संवेग, शिल्पातून अभिव्यक्त होणारे भाव एखाद्या कथेप्रमाणे आपल्या मनात
झिरपत जातात.
औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज
महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ
मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ
मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या
मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार
आहोत.
मंदिराच्या खालाच्या म्हणजे प्रथम जंघा भागात, दक्षिण दिशेकडील
बाह्यांगावर असलेली ही नटेश्वराची अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिमा आहे.
शिवाच्या या वैश्विक नृत्याचे दर्शन या शिल्पामधून होते. या विग्रहामध्ये
नटेश्वर षोडशभुज म्हणजे सोळा हातांचा असून त्याच्या हातामध्ये अभयमुद्रा,
भग्नावस्थेत असलेले त्रिशूल, शंख, एका हातातील आयुध भग्न आहे, वज्र, डमरू
आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प धारण केला आहे. डाव्या हातामधील आयुधे
भग्नावस्थेत असल्याने आयुधांचा आढावा घेता येत नाही, परंतु पुढचा हात हा
करीहस्त मुद्रेत आहे. सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे हे
नटराज स्वरूप आहे. शिवाच्या डोक्यावर सुंदर जटामुकुट आहे. हा मुकुट छोट्या
कवट्यांनी सुशोभित केला आहे. कानांमध्ये सर्पभूषणे आहेत. गळ्यात रत्नजडित
ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावर गोल मणी किंवा रुद्राक्षाचे यज्ञोपवीत रुळत
आहे. दंडामध्ये असलेल्या मण्यांच्या केयुरामध्ये सिंहमुखाचे अलंकरण आहे.
हातांमध्ये कंकण आहे. पायांमध्ये पादकटक आणि पादवलय आहेत. कटीवस्त्र हे तलम
शेल्याने बांधून त्याचा सोगा हा नृत्याच्या लयीमध्ये हेलकावे खात आहे.
शिवाच्या पदन्यासाचा विचार केला तर मण्डल स्थानामधील शिवाने डावा पाय
कमरेपर्येंत उचलून ऊर्ध्वजानु करण साधले आहे.
या शिल्पामध्ये शिवाच्या या दिव्य नृत्याला संगत करण्यासाठी ब्रह्मदेव
आणि भगवान विष्णूही वाद्यांचा ताल देत नृत्य करीत आहेत. विशेष म्हणजे
ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही मृदुंगम् हे तालवाद्य वाजवत आहेत. शिवाच्या
उजव्या पायाजवळ ब्रह्मदेव तर डावीकडे विष्णू आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू
दोघेही चतुर्बाहु असून त्यांच्या पुढच्या दोन हातांनी ते मुदुंग वादन करीत
आहेत. मागच्या दोन हातांमध्ये ब्रह्माने स्रुक आणि पुस्तक धारण केले असून
विष्णूच्या मागच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र ही आयुधे आहेत.
ब्रह्मदेवाचा उजवा पाय भग्नावस्थेत आहे. विष्णू भगवान स्वस्तिक पदन्यासात
शिल्पीत केले आहेत. शिवाच्या डाव्या पायाशी त्याचे वाहन वृषभ विराजमान आहे.
आपली मान उंचावून वृषभही या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत आहे.
ज्याप्रमाणे नाट्य आणि नृत्य या कलांमध्ये शिवाचे नटराज स्वरूप पूजनीय
आहे, त्याचप्रमाणे दार्शनिकदृष्ट्या शैव साधकांच्या, योगीजनांच्यादृष्टीने
नटराज हे तत्त्व महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ही नटराज प्रतिमा अलौकिक आणि
महत्त्वपूर्ण आहे.
कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज :-
ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प
धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत
शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा,
कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे.
त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे.
गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. पोटाला
उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर तर हातांमध्ये केयूर आहे. कटीला वस्त्र आहे.
नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला कुरूप, बेढब शरीरयष्टी असलेला मूलयकही
लक्षवेधी आहे.
वेरूळ मध्ये अनेक नटराज प्रतिमा आहेत. कैलास मंदिराच्या मार्गीकेवरील हे
दुसरे नटराज शिल्प काहीसे भिन्न आहे. कैलास मंदिराच्या मार्गिकेवर कोरीव
देवकोष्टामध्ये असलेल्या दक्षिणाभिमुख अश्या नटराजाचे दर्शन होते. अपस्मार
पुरुषाच्या अंगावर डावा पाय रोवून आवेशपूर्ण नर्तन करणाऱ्या चतुर्भुज नटेश
या शिल्पामधून दिसतो. या चार भूजांपैकी काही भग्न झालेल्या आहेत. मात्र
उजव्या मागच्या हातामध्ये डमरू आहे तर मागचा डावा हात शिवाने कमरेवर ठेवला
आहे. भुजंगत्रसित पदन्यासात शिवाने त्याचा उजवा पाय उचललेला असून डावा पाय
अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. या शिल्पामध्ये आ-वासलेला भुजंग शिवाच्या
उजव्या बाजूला दाखवलेला आहे. शिवाच्या डोक्यावरील जटा या रत्नपट्टाने
बांधलेल्या आहेत. त्रिनेत्र शिवाची चर्या रुद्र भाव दर्शवणारी आहे. गळ्यात
ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. नटराजाच्या
पायाखाली दाबल्या गेलेला जाड-जुड शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे.
त्याच्या गळ्यात एक माळा आहे. त्याच्या केसांच्या कुरळ्या बटाही
शिल्पकाराने बारकाईने कोरल्या आहेत. त्यामुळेच हे शिल्प लक्षवेधी झाले आहे.
ऊर्ध्वरेता नटराज -
छत्तीसगढ राज्याची जीवनधारा इथे महानदीच्या रूपाने वाहते. या महानदीच्या
काठावर सिरपुर येथील गन्धेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवाची ही अष्टभुज
नटराज प्रतिमा आहे. गन्धेश्वर महादेव मंदिरात शिवाचे विविध विग्रह,
महिषासुरमर्दिनी आणि काही जैन, बौद्ध प्रतिमांचे अवशेष आहेत. या मंदिराचा
काळ साधारण 5 वे शतक मानला जातो. या मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या अष्टभुज
नटराजाची अत्यंत विशेष अशी ही प्रतिमा आहे. यामध्ये शिवाचे शीर्ष हे
जटामुकुटाने मंडित असून त्यावर सुंदर अशी चंद्रकोर आहे. दोन्ही कानांमध्ये
कुंडले आहेत. गळ्यात मोत्याची एकावली आहे. डाव्या खांद्यावरून रुळणारे
यज्ञोपवीत आहे. कमरेला मेखला आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात
नृत्यरत शिव ऊर्ध्वरेतस स्वरूप शिल्पित केला आहे. शिवाच्या दोन पायांमध्ये
त्याच्याप्रमाणे नृत्य करणाऱ्या एका व्यक्तीचे शिल्प आहे.
डॉ.सि.शिवराममूर्ती यांच्या मते ते तण्डू मुनी किंवा भरत मुनी असावेत.
नृत्यरत नटेशाच्या उजवीकडे गणेश असून डावीकडे मयुरावर आरूढ कार्तिकेय आहे.
डावीकडे पार्वती बसलेली दाखवली आहे, जी शिवाच्या या नृत्य लीलेचे अवलोकन
करीत आहे. नटेशाचा उजवा पुढचा करीहस्त असून, उर्वरित हातांमध्ये त्रिशूल,
डमरू, सर्प, कपाल आणि एका हाताने शिवाने पार्वतीच्या हनुवटीला स्पर्श केला
आहे. डावीकडील पुढचा हात भग्न झाला आहे. पदन्यासाचा विचार केला तर एका पद्म
पीठावर शिव मंडल स्थानात आहे. शिवाचा उजवा पाय त्याने उचललेला असून
निकुट्टकम् करणात आहे. या पद्म पीठाखाली शिवाचे वाहन वृषभ या नृत्याचे
अवलोकन करण्यासाठी मान वर करून बघताना शिल्पित केला आहे.
महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये शिवाच्या सहस्र नावांचा उल्लेख येतो.
त्यामध्ये शिवाला ऊर्ध्वरेता म्हटले आहे. मुळात ऊर्ध्वरेता या स्वरूपातील
शिव भारतीय परंपरेमध्ये पूजनीय आहे. याचे कारण, ऊर्ध्वरेतस ही उच्चतम योगिक
स्थिती मानलेली आहे. शिव पशुपती, लकुलीश, क्वचित अर्धनारीश्वर अश्या विविध
विग्रहांमध्ये शिवाचे ऊर्ध्वरेता योगी स्वरूप शिल्पांमधून अभिव्यक्त केले
आहे, तसेच या नृत्यरत शिवाच्या शिल्पातही बघायला मिळते.
भुजंगत्रसितम् -
नटराज शिल्पांमध्ये भुजंगत्रसितम् करण हे अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाचे
करण आहे. या करणात पदन्यास करणारी शिवाची असंख्य सुंदर शिल्पे किंवा धातु
प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. ‘भुजंगत्रसित’ या करणामध्ये पायाजवळ भुजंग
आल्याच्या कल्पनेने लगबगीने पाय कुञ्चित अवस्थेत उचला जातो. चोल शैलीमधील
नृत्यरत शिव हा भुजंगत्रसित करण करताना शिल्पित केला आहे. परंतु आगम
काळामध्ये याच करणाला आनंद ताण्डव ही संज्ञा रूढ झाली. आगम शास्त्रामध्ये
नृत्यमूर्ती करताना भुजंगत्रसितम् करणावर अधिक भर दिला गेला आहे.
गंगैकोंडचोलपूरम् येथील चोल राजवंशाचा राजेंद्र चोल याच्या काळात
निर्मित झालेले बृहदिश्वर मंदिरमध्ये नृत्यरत शिवाच्या अनेक प्रतिमा बघायला
मिळतात. इ.स.11 शतकातील हे द्राविड शैलीतील मंदिराच्या जंघाभागावर अपस्मार
पुरुषावर नर्तन करणाऱ्या नटराजाची सुंदर अशी प्रतिमा आहे. अत्यंत सुबक आणि
प्रसन्न चर्या, अर्धोन्मेलीत डोळे, स्मित हास्य असलेले हे नटराज शिल्प
आहे. देवकोष्टामध्ये असलेल्या या नटेशासोबत डावीकडे ऊर्ध्वकेशी अष्टभुजा
भद्रकाली देवीही नृत्य करताना शिल्पित केली आहे. उजव्या पायाशी भृंगी ऋषी
असावेत. या शिल्पाच्या खाली चामुण्डा, शिवगण आणि वाद्यवृंद दाखवले आहेत.
चतुर्भुज नटराजाच्या हातामध्ये भक्तांना अभय प्रदान करणारी अभय मुद्रा,
शब्दब्रह्माचे प्रतिक म्हणून डमरू, लय कार्यान्विन करण्यासाठी अग्नी आहे
आणि डावा पुढचा हात करीहस्त मुद्रेत म्हणजेच तिरोधन क्रियेत आहे. शिवाने
त्याच्या संपूर्ण शरीराचा भार हा उजव्या पायावर घेत डावा पाय कुञ्चित
अवस्थेत उचलेला आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून तो अपस्मार पुरुषावर ठेवला
आहे. अपस्मार पुरुषाच्या हातामध्ये भुजंग आहे. हा अपस्मार पुरुष किंवा
मूलयक म्हणजे खरतर अपस्मृतीचे प्रतिक मानले आहे. अपस्मृती ही मनुष्याच्या
मोहावस्थेशी निगडीत आहे. थोडक्यात अज्ञानरूपी अपस्माराला भगवान नटराज
आपल्या पायाखाली दाबून जिज्ञासु भक्तांच्या जीवनमार्ग प्रशस्त करीत आहेत.
त्रिनेत्र शिवाची चर्या प्रसन्न भावाने तेजाळली आहे. त्याचे मस्तकावरील
जटामुकुट अतिशय बारकाव्याने शिल्पकाराने सुशोभित केला आहे. शिवाच्या शीर्ष
पट्टाने जटा या सर्पवेष्टानाने मंडित करून त्यावर कवटी आहे. ही कवटी म्हणजे
ब्रह्मकपालाचे निदर्शक आहे. सुंदर अशी कोरीव चंद्रकोर या जटामुकुटामध्ये
आहे. नृत्याच्या संवेगामध्ये एका सर्पाचे वेष्टन सैल झाले आहे आणि यापैकी
काही जटा या मुक्त होऊन दोन्ही बाजूला पसलेल्या आहेत. शिवाच्या एका
कानाध्ये सिंहकुंडल असून दुसऱ्या कानामध्ये पत्रकुंडल आहे. गळ्यात
ग्रेवेयक आहे. उदारबंध आणि डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत आहे. दंडावर
वलयांकृत नक्षीयुक्त केयूर आहे, हातांमध्ये कंकण असून बोटांमध्ये अंगुलिका
आहेत. मांडीपर्येंत तलम कटीवस्त्र नेसलेले असून त्यावर तलम शेला आणि अलंकृत
मेखला आहे. पायामध्ये पादवलय आणि सुंदर अशी नुपूरे आहेत. या नटराज
प्रतिमेतून धर्म, कला आणि तत्त्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो.
शुकनासिकेतील नटराज -
मंदिर स्थापत्यातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी घटक म्हणजे शुकनास.
मंदिराच्या छाद्य भागावर शिखर सुरु होते. या शिखरावर शुकनासिका किंवा
महाशुकनासिकेची रचना केलेली असते. ‘शुक’ म्हणजे पोपट आणि ‘नासिका’ म्हणजे
नाक त्यामुळे या स्थापत्य घटकाचा आकार हा पोपटाच्या नाकाप्रमाणे असल्याने
याला शुकनास असे म्हणतात. या शुकनासिकांमध्ये विविध देवी- देवता किंवा
क्वचित सिद्धांची शिल्पे असतात. त्यापैकी नटराज शिल्पांचा विचार आज करणार
आहोत.
अनेक मंदिरांच्या शिखरांवर शुकनासिका या नृत्यमग्न शिवाच्या नटराज
विग्रहाने सुशोभित केलेल्या असतात. भारतभर अनेक मंदिरांवर अश्या
शुकनासिकेतील नटराज शिल्पे बघायला मिळतात. नागर शैलीतील इ.स. 8 व्या
शतकातील जम्बूलिंगेश्वर मंदिर, पट्टदकल (प्रतिमा क्र.1) या मंदिराच्या
शिखराच्या शुकनासिकेवर नटराज शिवाचे शिल्प आहे. मध्यभागी अष्टभुज नटराज
कटीसम ताण्डव करीत आहे. शिवाच्या मागे वृषभ असून त्याच्या डावीकडे द्विभुजा
उमा त्रिभंग स्थितीत उभी आहे. शिवाचा उजवा हात नाभीजवळ आणि दुसरा सिंहकर्ण
मुद्रेत तर डावा हात करीहस्त आणि एक हात मांडीवर ठेवला आहे. इतर
हातांमध्ये डमरू, परशु, सर्प असून एक हात उमेच्या खांद्यावर आहे ही सालंकृत
प्रतिमा आहे. या शुकनासिकेच्या दोन बाजूला दोन नाग हात जोडून शिवाचे हे
नृत्य बघत आहेत. तसेच आकाशगामी गंधर्व हे या दिव्य नृत्याचे आकाशातून
अवलोकन करीत आहेत.
अंबरनाथ मंदीराच्या शुकनासेमधील नटेश
उदयेश्वर मंदिर (प्रतिमा क्र.2) उदयपुर विदिशा येथील शिखरावरील
शुकनासिकेतील ही नटराज प्रतिमा असून सध्या ग्वाल्हेर संग्रहालायात आहे. हा
शुकनासिकेचा भाग असून त्यामध्ये ऊर्ध्वजानु पदन्यासात तल्लीन नटराजाची
सुंदर असे शिल्प आहे. यामध्ये अष्टभुज नटराजाच्या हातामध्ये अलपल्लव
मुद्रा, त्रिशूल, बाण आणि सर्प असून डाव्या हातांमध्ये हंसपक्ष मुद्रा,
धनुष्य, घंटा आणि कपाल आहे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. गळ्यात
एकावली, ग्रेवेयक आणि एक माळा आहे. डाव्या खांद्यावरून रुळणारे यज्ञोपवित
आहे. हातामध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र असून त्यावर सुंदर मेखला आहे.
पायामध्ये पादकटक आणि पादजालक दोन्ही आहे. शिवाच्या उजव्या पायाशी एक गण
डमरू वाजवतो आहे तर डाव्या पायाशी हातामध्ये झांज घेतलेला गण आहे. संपूर्ण
शुकनासिका ही पद्मदल आणि पुष्पवेलींनी वेढलेली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील अंबरनाथ, भुवनेश्वर येथील परशुरामेश्वर मंदिर,
वेताळ मंदिर यांसारख्या अनेक मंदिरांच्या शिखरावर शुकनासिकेमध्ये
विशेषत्वाने नटराज शिल्पे दिसतात.
शिवाच्या तांडवमूर्ती :-
सर्व साधारणपणे कलाकारांचा देव म्हणून परिचित असलेले नटराजाचे धातूचे शिल्प सर्वांना परिचित रूप आहे. शिवाच्या तंडू नावाच्या भक्तापासून या नृत्याची निर्मिती झाली, म्हणून याला 'तांडव' असे म्हणतात. तांडवाचे एकूण १०८ प्रकार असतात. चिदम्बरम (तामिळनाडू) येथील तिल्लई नटराज मंदिराच्या गोपुराच्या (प्रवेशद्वाराच्या) भिंतीवर हे सर्व १०८ प्रकार कोरलेले आहेत. तसेच तामिळनाडूमधल्या कुंभकोणम् येथील शारङ्गपाणी मंदिर, वृद्धाचलम येथील वृद्धगिरीश्वरार मंदिर आणि तिरुवनमलई येथील अन्नमलैयर मंदिराच्या गोपुरावरही हे १०८ प्रकार कोरलेले आढळतात. कटीसम तांडव :- वेरुळमधील रामेश्वर लेण्यात (क्र.२१) याचे अत्यंत श्रेष्ठ असे शिल्पांकन दिसते. यात शंकराचे डावे पाऊल पूर्ण उचललेले असून केवळ त्याची बोटे खाली टेकलेली आहेत आणि उजवे पाऊल अर्धवट उचललेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्नी असून खालचा उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात नृत्य मुद्रेत आहे. कानात कुंडले, गळ्यात कंठी आणि हार, पोटाभोवती उरबंध, हातात कंकणे, दंडावर सर्पकेयूरे व कंबरेत मेखला आहे. त्याने वाघाच्या कातड्याचे वस्त्र नेसले असून त्या वस्त्राच्या टोकाला बारीक वाघनखेही दिसतात. त्या शिल्पाच्या मागील भिंतींवर शिवाच्या डाव्या हाताच्या बाजूला वायू, कुबेर, इंद्र आणि यम हे अष्ट दिक्पालांपैकी चार दिक्पाल आपापल्या वाहनांसहित आहेत आणि शिवाच्या उजव्या हातावर काही आकाशमार्गाने उडणारे तपस्वी आणि गंधर्व आहेत.
कटीसम तांडव, रामेश्वर लेणे, वेरूळ
साथ करणारे वादक, रामेश्वर लेणे, वेरूळ
शिवाच्या उजव्या पायाशेजारी तीन वादक असून त्यांच्यावरच्या अंगाला एका हत्तीचे डोके दिसते. तो गणपती आहे. शिवाच्या डावीकडे एक मिशा असलेला पुरुष उभा असून त्याच्या समोर कडेवर बाळ कार्तिकेयाला घेउन एक स्त्री उभी आहे. त्या दासीच्यासमोर शिवाकडे तोंड करून पार्वती बसली आहे आणि पार्वतीकडे तोंड करून वादन करणारी एक स्त्री आहे. तिच्यामागे उभ्या असलेल्या दासीचा चेहरा आणि गळा तेवढाच दिसतो. शिवाच्या पायामध्ये एक छोटा अस्थिपंजर गण (भृंगी) नाचताना दिसतो.या नृत्य प्रकाराला 'कटीसम तांडव' म्हणतात. नटराजाच्या या शिल्पाची गणना भारतातील श्रेष्ठ शिल्पात केली जाते. किंबहुना नटराजाच्या शिल्पामधील कटीसम मुदे नृत्याबरोबरच भावदर्शन घडविणारे हे सर्वात श्रेष्ठ शिल्प ठरेल. या शिल्पात तांडवाचे सर्व गुणधर्म दाखवत असताना (उत्पत्ती, स्थिती, लय, तीरोभाव आणि अनुग्रह) त्याचबरोबर भारतीय नृत्याचाही फार बारकाव्याने विचार केलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला असलेल्या चार वादकांपैकी दोघीजणी बासरी वाजवताहेत, नृत्याला संगीताची जोड आवश्यक असते. परंतु भारतीय संगीताला तालाची आवश्यकता असते. म्हणून तिथे खोळ (मृदंगासारखे वाद्य) बाजवताना आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर चुंबळावर उभे तबल्यासारखे वाद्य अशी ताल वाद्ये वाजवणारा बसलेला आहे. तबलावादक महिला, भाजे लेणे
अमीर खुसरो (इ.स.१४वे शतक) याने तबल्याचा शोध लावला असा गैरसमज आहे. तो दूर करण्यास कारण इ.स. च्या सातव्या शतकात तबल्याचे स्पष्ट शिल्पांकन या शिल्पात दिसते. तबला हे वाद्य भारतीय संगीताइतकेच प्राचीन असावे. (भाजे येथील इ.स. पू. दुसऱ्या शतकातील लेण्यांमध्ये एक स्त्री उजव्या हाताने तबला आणि डाव्या हाताने डग्गा वाजवताना कोरलेली आहे.) भारतीय संगीतातील तालाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्याला ठराविक मात्रा असतात. यामध्ये पहिल्या मात्रेला 'सम' असे म्हणतात. आणि तालाच्या रचनेनुसार त्यातील एक मात्रा 'काल' अशी असते. परतपरत समेवर येण्याच्या कालांतराला 'लय' असे म्हणतात. या शिल्पांमध्ये तबलेवाल्याच्यासमोर त्यांच्याकडे तोंड करून बसलेली, हातात झांज घेतलेली एक स्त्री वादक आहे. प्रत्येक वेळेस तालवादक समेवर आल्यावर ती झांज वाजवते. हिच्या दोन झांजांच्या वाजण्यामधील कालावधीने तालाची आणि या नृत्याची लय प्रस्थापित होते नृत्याच्या बाबतीतील अगदी महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे त्याला गती असावी लागते. स्थिर शिल्पामध्ये गतिमानता दाखविण्यासाठी कलाकाराने यात आणखी एक युक्ती केलेली आहे. शंकराच्या केशसंभाराचा जटांना आवळून त्याचा टोप केलेला दाखवला जातो. इतर देवांप्रमाणे याच्या डोक्यावर टोपी किंवा मुकुट नसतो. या केशरचनेला 'जटा मुकुट' असे म्हणतात. या शिल्पामध्ये कलाकाराने अशी कल्पना केली की हे नृत्य अनंत काळ चालत राहिले आणि एका क्षणी शंकराचा जटामुकुट हा सैल झाला आणि त्यातील वेण्या निखळल्या. निखळलेल्या एका वेणीची बट सुटून ती शंकराच्या खांद्यावर रूळताना दिसते. ज्यांना नृत्याची जाणीव आहे, अशा लोकांना हे शिल्प पाहताना अशी बट निखळण्यासाठी नृत्याची हालचाल कशी असू शकते हे ज्ञात असते त्यामुळे स्थिर शिल्पातही असणारी गतिमानता त्यांना कळू शकते. अपेक्षा अशी आहे की जर दगडातील ही गतिमानता दर्शकाला समजू शकली तर संभवतः सभोवतालच्या चराचर सृष्टीमधील चैतन्याचा साक्षात्कारही त्याला कधीतरी होऊ शकेल या शिल्पातील पार्वती ही शिवाचे नृत्य पाहते आहे. नवऱ्याचा पराक्रम कौतुकाने पाहणारी स्त्री ही देखील कलाकाराची प्रतिभा आहे की काय असे वाटावे. परंतु ज्ञानदेवांनी मात्र या प्रसंगावर कोटी केलेली आहे. 'वामांगीचा लास्यविलासु ! जो हा जगतूप आभासु ! तो तांडव मिसें कळासू ! दाविसी तू !' (ज्ञा. अध्याय १७ ओवी ८) पार्वती जणू काही म्हणते की, , सृष्टीच्या निर्मितीची प्रसूती वेदना तर माझी, केवळ तांडवाच्या रूपाने हे (शिव) नृत्यातून दाखवतात आणि निर्मितीचे सारे उत्पत्ती आणि लयाचे हे अविरत चालणारे चक्र दाखविण्यासाठी त्याने तालवादकाचर्चा श्रेय बळकावतार। हे केलेली आहे. सम म्हणजे निर्मिती (जन्म) आणि काल म्हणजे लय (मृत्यू) प्रत्येक आवर्तनार जन्म आणि एकदा मृत्यू अशी कल्पना करून संगीतामध्येही आपल्या पुनर्जन्माच्या प्रतिनिधित्व केलेले आहे. काळाचे चक्र अविरत फिरत असून त्यात पुनःपुन्हा घटना घडतात असे असले तरी आपल्या जीवनात एकदाच जन्म आणि मृत्यू येत असतो आपल्या दृष्टीने काळ हा चक्र नसून एकमार्गी (unidirectional) असतो. कारण आपल्या दृष्टीने आपण काळात सतत पुढेच कसे असतो. हे दाखविण्यासाठी शंकराच्या डाव्या पायाखालील स्त्री वादकाच्या हातात तालाच्या प्रत्ये मात्रेवर वाजणारे एक वाद्य आहे. तिच्यासाठी सम आणि काल नाही तर तिचा ताल एकमार्गी शिवाचे वैश्विक नर्तन हे चक्राकार (cyclic) असून त्याची पार्थिव अनुभूती मात्र एकमार्गी (unidirectional) असते हे सांगण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. तांडवाच्या शिल्पांच्या कल्पकतेसमोर जगातील कलाकार आणि विद्वान विनम्र होतात. रोडी (Rodin) या जगप्रसिद्ध फ्रेंच शिल्पीने तर हे शिल्प पाहिल्यावर असे म्हटले आहे की, यातील परिपूर्णता पाहून मला छिन्नी आणि हातोडी फेकून शिल्पकलेतून निवृत्त व्हावेसे वाटते. उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे हे महान नृत्य ज्या रंगमंचावर चालते त्याला चिदंबरम् असे नाव दिलेले आहे.आनंद कुमारस्वामी हे जन्माने श्रीलंकेतील असले तरी भारतीय शिल्पशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्याने नटराजाचे हे नृत्य चालणाऱ्या रंगमंचाचे नाव चिदंबरम् का? यावर भाष्य केले आहे. ते असे म्हणतात की चिदंबरम् या शब्दावर श्लेष केलेला आहे. त्याचा दुसरा अर्थ मानवी अंतःकरणाचा केंद्रबिंदू असाही होतो. कुमारस्वामी पुढे म्हणतात, की या भारतीय कलाकारांची महती काय तर त्यांच्या शब्दात "While the artists of the world were trying to understand and imitate nature ancient Hindu artists were trying to understand nature's nature."
नादंत तांडव :-
कलेच्या कार्यक्रमात रंगमंचावर हे शिल्प नेहमी दिसते किंवा नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे त्याचे पूजन केले जाते. धातुमुर्तीमध्ये गोलाकार वलयामध्ये एका पायावर उभ्या असलेल्या शंकराची नृत्य मुद्रा यात दिसते. वलयावर प्रत्येकी पाच ज्वाला असलेल्या अग्नीचे शिल्यांकन असते.चार हातांच्या ह्या मूर्तीतील वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्री असून, उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात गजहस्त (हत्तीच्या साडेसारखा झुलणारा) उजव्या मनगटाखाली डाव्या हाताचे मनगट असते, डाव्या हाताच्या बोटाने त्याने उचललेल्या पायाकडे अंगुलीनिर्देश केलेला असतो. तोल सावरण्यासाठी किंचित गुडघ्यात वाकविलेल्या उजव्या पायाखाली एक व्यक्ती दिसते. हात पाय दुमडून बसलेल्या या व्यक्तीच्या पाठीवर शिवाचा उजवा पाय असतो. तांडवाचे एकूण एकशे आठ प्रकार आहेत. त्यातील या मुद्रेला नादंत तांडव असे म्हणतात. शंकराभोवताली असणारे हे ज्वालांचे वलय यातील प्रत्येक ज्वालेला पाच शिखा असतात. पंचमहाभूतांचे ते निर्देशक आहे. यांची संख्या सत्तावीस असून हे सत्तावीस नक्षत्रांमध्ये बद्ध असलेल्या आपल्या आकाशगंगेचे रूप असते. डमरू हे उत्पत्तीचे रूप. ब्रह्मांडामध्ये सर्वप्रथम महानाद झाला आणि मानवी बोधाचे शब्द प्रकटले- अइउण्। ऋलृक् । एओङ्। ऐऔच्। हयवरट्। लण्। अमड. णनम्। झभ ञ। घढधष् । जबगड्रदश् । ख फ छठ थचटतव्। कपय्। श ष सर्। हल् । या महानादाच्या पाठोपाठ झालेल्या स्फोटातून प्रचंड मोठा अग्नी निर्माण झाला. या ज्वाळा ब्रह्मांडाची मूलभूत ऊर्जा आहे. म्हणून शिवाच्या डाव्या हातात अग्ग्री दाखविलैला असतो. यातून नंतर पंचमहाभूतांची निर्मिती झाली. महाभूतांच्या मिश्रणातून सृष्टी उत्पन्न झाली.
नादंत तांडव, धातुमूर्ती
काहीही निर्माण करण्यासाठी काही तरी वापरावे लागते, काही तरी तोडावे लागते, मोडावे लागते किंवा त्याचे आहे ते स्वरूप बदलावे लागते. आधी केलेले सर्व तोडून मग नवीन आणि पुन्हा हे सर्व मोडून त्यातून नवीनतम करायचे म्हटल्यास सगळेच क्षणाक्षणाला नष्ट करावे लागेल. मग सृष्टी राहणार कशी म्हणून शिवाचा उजवा हात अभय मुद्रेत असतो. जे इष्ट आहे, जे सुष्ट आहे त्याला त्वरित न तोडता तसेच राखण्याचे आश्वासन तो देतो. परंतु जे अनिष्ट आहे त्याचे रूपांतर म्हणजे लय आणि जे दुष्ट आहे त्याचा नाश म्हणजे संहार तो करतो. हे कार्य त्याचे अविरत सुरू असते म्हणून त्यांच्याभोवती फिरण अग्रिगोलकांचे वलय हेच सुचित करत असते. याला 'तिरोभाव' असे म्हणतात.
नावंत तांडव, दशावतार लेखणे, वेरूळ
शिवाचा पाय हे त्याच्या अनुग्रहाचे निर्देशक असते. जर त्याचे दोन्ही पाय टेकलेले दाखवले गेले असते कोणालाच मुक्ती देत नाही असा त्याचा अर्थ झाला असता. शिवाने एक पाय उचलल्यामुळे ध्यास घेतलेल्या मुमुक्षांना तो मुक्ती मार्गावरून जाऊ देतो. त्यासाठी त्याने (शिवाने) त्यांना (मुमु अनुमती दिली आहे हे त्याच्या डाव्या पावलाकडे निर्देश करणाऱ्या डाव्या हातांच्या बोटांवरुन केले जाते. ब्रह्मांडातील दुष्ट शक्तींचा, दुष्ट प्रवृत्तींचा आणि उपद्रवी घटकांचा कधीही समूळ नाश करता येत नाही. त्यांचे फक्त दमन करता येऊ शकते किंवा त्यांच्यावर तात्कालिक नियंत्रण ठेवता येते. त्याच्या पायाखालील व्यक्तीच्या रूपात या दुष्ट शक्तीचे प्रतिनिधित्व केलेले असते. याला 'अप पुरुष' असे म्हणतात. त्यामुळे तांडवाच्या शिल्पाचे उत्पत्ती (डमरू), स्थिती (अभय मुद्रा), (अग्नी), तिरोभाव (प्रभावळ) आणि अनुग्रह (उचललेला पाय) हे पाच गुणधर्म मानले आहे धातूशिल्पांमध्ये दिसणारे हे रूप पाषाणशिल्पांमध्ये मात्र क्वचितच दिसते. पाषाणशिल्पांमध्ये तांडवाची अन्य रूपे कोरलेली दिसतात याचे कारण धातूमूर्ती ओततानाची काही तांत्रिक बंधने येथे नसतात. तसेच पाषाण शिल्पांमध्ये उचललेला पाय पण दाखविताना त्याचा त्रिमितीचा आभास निर्माण करणे तसे अवघडच जाते. नादंत तांडवाचे एक विलोभनीय शिल्प वेरुळमधील दशावतार लेण्यामध्ये (वेरुळ क्रं. १५) कोरलेले आहे. या शिल्पात नृत्य मुद्रेत असलेला शिव हा आठ हातांचा असून त्याचा डावीकडचा एक आणि उजवीकडचा एक असे कोणत्याही दोन हातांचा विचार केल्यास त्यातून एक नृत्य मुद्रा प्रकटते.
वेरुळ मधल्या विविध तांडव मूर्ती ललित तांडव - हे लंकेश्वर लेण्यातील (लेणी क्र. १६) शिल्प असून अत्यंत गतिमान नृत्याचे शिल्पांकन आहे. जवळजवळ आठ फूट उंचीच्या या मूर्तीमध्ये कलाकाराने त्याची प्रतिभा पणाला लावलेली दिसते. गती दाखविण्यासाठी त्याचे हललेले केस, उडणारे वस्त्र याशिवाय त्याच्या डाव्या हातात डमरू दाखवलेला आहे. इतकी गती आहे की पाहणाऱ्याला डाव्या हाताच्या ठिकाणी उजवा हात असल्याचा भ्रम होतो. ललित तांडव, लंकेश्वर लेणे
भुजंगत्रासित तांडव साप पाहिल्या नंतर दचकून पाय जसा उचलला जातो त्याप्रमाणे डावा पाय उचलून भुजंग त्रासित ही मुद्रा नृत्यात केली जाते. साधारणपणे रंगमंचीय प्रस्तुतीकरणात मांडी जमिनीला समांतर होईल या उंचीपर्यंत नर्तकाचा पाय उचललेला असतो, या शिल्पात मात्र शंकराची ही मुद्रा असल्यामुळे त्याचा गुडघा, हनुवटीपर्यंत उचललेला दिसतो. हे शिल्प कैलास मंदिरातील प्रदक्षिणा पथावर मुख्य मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर कोरले आहे
भुजंगत्रासित तांडव, कैलास मंदिर, वेरूळ
ऊर्ध्वजानू तांडव :- याची कथा अशी कालीचे नृत्य आणि शंकराचे तांडव याची स्पर्धा सुरू झाली. शिवाप्रमाणे कालीने सर्व तांडवांचे प्रकार लीलया करून दाखवले. शेवटी शंकराने नृत्य करताकरता एका पायावर नृत्य सुरू केले आणि उजव्या पायाचा अंगठा हातानी धरून आपल्या कपाळावर टेकवला. ही मुद्रा कालीलाही करणे शक्य होते परंतु स्त्रीसुलभ संकोचाने तिने ते तसे केले नाही. (शिवरामामूर्तीः १९७४१. ३७९). कैलास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील डावीकडच्या भिंतीवर हे शिल्प आपल्याला दिसते यात शंकराचा उजवा पाय ताठ होऊन त्याच्या खांद्यावर गेल्याचे कोरलेले आहे.
ऊर्ध्वजानु तांडव, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
वीणाधर शिव :- या मूर्तीमध्ये शंकराच्या हातात वीणा दाखवलेली असते. वेरुळच्या कैलास मंदिराभोवताली असणाऱ्या उत्तरेकडील विथिकेमध्ये हे शिल्प आहे. या मध्ये शंकर पार्वती बसलेले दाखवलेले असून, शंकराने हातात वीणा धरलेली दाखवली आहे. काही मंदिरांमध्ये नृत्य मुद्रेमध्ये सुद्धा शिवाने वीणा धरल्याचे दिसते.
दक्षिणामूर्ती : - शिवाच्या बसलेल्या मूर्तीमध्ये ध्यानस्थ शिव अशी मूर्ती आपल्याला दिसते. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिण भारतात प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. काहींच्या मते कला, संगीत व इतर भौतिक शास्त्रे यांचा उपदेश देत असताना शंकराचे तोंड दक्षिण दिशेकडे होते. श्रीमद शंकराचार्यांनी इतरांबरोबर दक्षिणामूर्तींचेही बरेंच स्तवन केले आहे. गुप्तकालीन लकुलीशांशी बरेच साम्य असलेली प्रतिमा दक्षिणामूर्तीची होय. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिणभारतांत विशेष रूपानें प्रचलित आहे. श्री गोपीनाथ राव यांनी या रूपांचे योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान असे चार भेद सांगितले आहेत त्यांचा पुढे विचार करू.
दक्षिण भारतात शिवाच्या रुपात ते विविध कला व ज्ञानाचे गुरू मानले जातात. त्यांचे तोंड दक्षिण (यम) दिशेला असून वडाच्या झाडाखाली ते एक पाय मांडीवर घेऊन आसनस्थ आहेत. त्यांच्या सोबत अनेक विषयाचे विचारक व साधक ज्ञान प्राप्तीसाठी दाटीने मिळेल त्या दगडाधोंड्यांवर बसून विचारविनिमय करताना दिसतात. कधी कधी नंदी बाजूला ते निरखनाता दिसतो. उजव्यापायांच्या खाली एका बुटक्या अपस्मार नावाच्या दैत्याला शिवांनी त्याने अज्ञान, संशय व दुर्मतीला पायाने दाबून धरलेले आहे असे मानले जाते. या रूपात शिव चार हाताचे असून एका मागच्या हातात धगधगता अग्नी वा मशाल तर दुसऱ्या हाती जपमाला तर कधी ताडपत्रांची चवड, धरलेली दिसते. काही ठिकाणी ते वीणावादन करताना किंवा वीणा बाजून ठेवलेली असे दिसतात. उजवा हात इथे त्यांनी आपल्या हृदयाला उजव्या बाजूला असल्याचा संकेत करताना दिसतो.
दक्षिणामुर्ती शिवांची शिल्पमुद्रेचा फोटो
या चित्रात उजवा खालचा हात कर्तरिमुद्रेत तर डावा वरदमुद्रेत दिसतो. कर्तरी मुद्रा ज्ञान मुद्रेसमान असावी. पैकी तीन उघडलेली बोटे गर्व, दुष्कृत्य व स्वतः बद्दलची भ्रामक वा आभासी समजूत यांच्यापासून दूर अंगठा म्हणजे शिवतत्व आणि तर्जनी म्हणजे जीव तत्व यांचे एकत्र येणे असे मानले जाते.
गुप्तकाळाच्या पूर्वीचा दक्षिणामूर्ती आज तरी आपणांस माहीत नाही, या काळातील मूर्तीपैकी ठळक म्हणून फक्त तीन प्रतिमांकडे संकेत करता येईल. एक तर अहिच्छत्रा येथील मृफलकांवर अंकित वृक्ष व पात्र घेतलेला शिव, दुसरा मथुरा संग्रहालयांतील शिष्यांसह सोटा घेऊन आसनांवर बसलेला ऊर्ध्वलिंगी शिव आणि तिसरा म्हणजे अशाच प्रकारचा वाराणसी येथील तिलभांडेश्वर मंदिरांत असलेला शंकर. यापैकी वाराणसीची प्रतिमा विशेष रूपाने अवलोकनीय आहे. (चित्र ५२) एका विशाल वृक्षांचे खाली कुंचित केशधारी ऊर्ध्वलिंगी शंकर सोटा घेऊन व्याख्यानमुद्रेत बसला आहे. त्याने स्वतःच्या मांडी भोवती योग पट्ट गुंडाळला आहे. त्याच्या सभोवताल चार शिष्य बसलेले आहेत. हे चार म्हणजे कदाचित आचार्य लकुलीशाचे शिष्य कुशिक, गार्ग्य, मैत्रेय आणि करुष - दुसऱ्या शब्दांत चार मुख्यशैवाचार्य असणें शक्य आहे. पुराणें व शिलालेखांत यांचा उल्लेख येतो. दक्षिणामूर्ती आणि लकुलीश यांच्या प्रतिमेतील साम्य उघड आहे.
दक्षिणामूर्तीच्या ध्यानांतील कित्येक गोष्टी, उदाहरणार्थ व्याख्यानमुद्रा, पायाजवळ असलेली दोन हरणें, भोवतालचे चार शिष्य, वृक्षांखाली आसन असणें, इत्यादि स्पष्ट रूपानें बौद्ध प्रभावाच्या सूचक आहेत. मध्यकाळांत या प्रतिमांचे प्रकार वाढले. महायोगी शिव, कैलास मंदिर, वेरूळ
वेरुळमध्ये कैलास मंदिराखाली पश्चिम भिंतीवर याचे विराट शिल्प आहे. या शिल्पात झाडाखाली पद्मासना बसलेली, उजवा हात मांडी घातलेल्या उजव्या गुडघ्यावर असून डावा हात डाव्या मांडीच्या गुडघ्यावर जमिनी बोटे असलेल्या स्थितीत (भूमी मुद्रेमध्ये) आहे. एका आसन बसलेली ही शिवाची मूर्ती आहे. निर्माण करणाऱ्या त्या महायोगा समाधी लागली. आता नवनिर्मिती कशी होणार ह्या चिंतेतून अष्टदिश देव धावत आले. शिल्पाच्या वारच्या भागात आपापल्या वाहनांवर देव शिवाला हात जोडून विनंती करताना दिसतात. शिवाच्या खालच्या बाजूला दोन गण दाखवले आहेत. समाधी सोडण्याची त्यातील एक जण ढोल बडवतो आहे तर दुसरा त्याच्या वाद्याचा कर्कश आवाज काढून शिवाला जागे करावयाचा प्रयत्न करतो आहे. या गणांच्या वादनाने अन्य योग्यांची समाधी भंग पावली. शिवाच्या बाजूला गुडघ्याभोवती योगपट्ट गुंडाळलेले योगी दिसतात. भगवान शिव मात्र अविचलित आणि शांतच बसलेले दिसतात.
सप्तस्वरमयशिव :-
आधुनिकतेच्या शिखरावर असलेली मुंबई तेवढीच प्राचीन सुद्धा आहे. याच मुंबईच हृदय समजला जाणाऱ्या परिसरात म्हणजेच परळ गावात एक प्राचीन शिवमूर्ती आहे. परळ गावातील चण्डिकादेवी किंवा बारदेवीच्या मंदिराच्या शेजारीच ही मूर्ती आहे. १९३१ मध्ये रस्त्याचे बांधकाम चालू असताना सापडलेली ही मूर्ती स्थानिकांच्या हट्टामुळे (अर्थात चांगलंच आहे) आजही इथेच आहे. पुरातत्व विभागाच्या माहिती प्रमाणे ही मूर्ती गुप्तकालीन म्हणजेच इसवी सनाच्या पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावी.
जवळपास १३७ इंच उंचीची ही मूर्ती ७७ इंच रुंदीच्या भागावर उठावशीर कोरलेली आहे. मध्यभागी मुख्य प्रतिमा, तिच्या डोक्यावर एकावर एक अश्या दोन मूर्ती तर मुख्य मूर्तीच्या खांद्यातून दोन मूर्ती, आणि त्या वरील मूर्तीच्या खांद्यावरून दोन मूर्ती त्रिभंगावस्थेत अश्या एकूण सात मूर्ती नजरेला पडतात. मुख्य मूर्तीच्या पायाजवळ एकूण पाच वादक बसलेले आहेत. सात पैकी सहा मूर्ती ह्या द्विभुज असून, या मूर्तीच्या डाव्या हातात एक हातात कमंडलू आणि दुसरा हात मुद्रा अवस्थेत आहेत. मध्यभागी सर्वात वरची मूर्ती मात्र दहा हातांची आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात हातात कमंडलू, चक्र, खेटक, तलवार, आणि एक हात मुद्रा अवस्थेत आहे, तर डाव्या बाजूला एक हात अभिषेक मुद्रेत असून इतर हातात धनुष्य, दोन भरीव चक्र आणि एका हातात कमंडलू आहे. एकाही मूर्तीवर मुकुट नसला तरी केसांची जटामुकुट सारखी अतिशय सुंदर आणि वेगळी रचना, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात हार, नक्षीदार कटीवस्त्र,कानातील कुंडल, हातात कडे, यांनी युक्त ह्या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात.काही अभ्यासकांच्या मते मधल्या तीन मूर्ती म्हणजे तमोगुणी शिव, सत्वगुणी विष्णू, आणि राजस ब्रह्मा असावा, तर इतर चार मूर्ती ह्या सद्योजात, वामदेव, अघोर, आणि तात्पुरुष असावेत. तर काहींच्या मते मधल्या मूर्ती ह्या पाश, पशु आणि पती असावे तर इतर प्रतिमा या विद्या, क्रिया, योग आणि चर्या हे शिवसिद्धांताचे लक्षण असावेत. श्री. सी शिवरामन यांनी या मूर्तीला शिवाची सप्तस्वरमय मूर्ती असे म्हणलेले आहे, मात्र मुख्य प्रतिमेपैकी कोणाकडेही कोणतेही वाद्य नसल्याने हा विचार विवादित आहे.
तर पायाजवळ बसलेले वादक हेच शिवाच्या सप्तस्वरमय रुपाकडे संकेत करीत आहेत, त्यामुळं सुरांशी मेळ घातला जाऊ शकतो असेही काहींचे म्हणणे आहे.
हरिहरमूर्ती :-
अर्धनारीश्वरांप्रमाणेंच शिव आणि विष्णू यांची संयुक्त मूर्ती देखील सृष्टीच्या उत्पादनांकडे संकेत करते. फरक इतकाच कीं येथें उमेचे स्थान विष्णू घेतो. काही भक्तांच्या मते हरी शिवाय पृथ्वीवर दुसरा देव नाही तर काही भक्तांच्या मते हर शिवाय दुसरा परमेश्वर नाही पण मानवाच्या मनातील गोंधळ दुर व्हावा म्हणून हरिहर अवतार धारण केला त्यांची कृपा आपल्यावर राहो असे एक शिलालेख दावणगिरी येथे इ.स. १२२४ मधल्या शिलालेखात लिहीलेला आहे.
हरिहरांचे सुंदर वर्णन वायुपुराणांत सापडतें. तेथें असें वर्णन आहे कीं प्रथम बीजरूपानें आदिसर्गिक लिंग तयार झालें, नंतर विष्णुरूप योनीशी त्याच्या संयोगानें हिरण्यमय अंडे निर्माण झाले व त्याच्यापासून ब्रह्मदेव व पुढची सर्व सृष्टी तयार झाली. त्याच पुराणांत अन्यत्र विष्णू डावीकडे असतो असें सांगून'" शिवाला 'पुरुष', 'ज्ञेय', 'सत्य', 'यज्ञफल' व विष्णूला 'प्रकृति', 'ज्ञान', 'अनृत', 'यज्ञ' इत्यादि नांवानें संबोधिले आहे. पद्मपुराणांत सृष्टीचे आदि कारण अशा शिवाच्या लिंगाला ब्रह्मदेव आणि भगाला जनार्दन असें म्हटलें गेले आहे. शिवाबरोबर विष्णूनें स्त्रीरूप धारण करून फिरत राहण्यांची कथा कूर्मपुराणांत ही आहे. याच प्रसंगाने भागवतपुराणांकडेही वाचकांचे लक्ष वेधणें अयुक्तिक होणार नाही. त्या पुराणांप्रमाणें विष्णूच्या मोहिनी रूपांतील सौंदर्यावर आसक्त होऊन 'प्रमुषितेंद्रिय' अवस्थेंत शंकर त्याचे पाठी मार्गेधाऊ लागला. दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणें शिव आणि मोहिनीच्या संयोगाने जो पुत्र उत्पन्न झाला
तोच मल्याळम् भागाचा संरक्षक व मल्याळी लोकांकडून पूजला जाणारा शास्ता, आर्य, अय्यनार, किंवा हरि-हर-पुत्र या नावांचा देव होय.
सामाजिक ऐक्यासाठी कोरलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश करावा लागेल. शैव आणि वैष्णव यांच्यात उफाळलेल्या संघर्षाला उत्तर म्हणून या मूर्तीची निर्मिती झाली. ही दोन्ही वेगळी तत्त्वज्ञाने नसून एकाच वैदिक तत्त्वज्ञानाची ही दोन अंगे आहेत. ह्या उभ्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या उजवीकडील अंग हे शिवाचे. उजव्या हातात त्रिशूल, डोक्याच्या अर्ध्या भागावर जटामुकुट आणि त्याखाली कोपऱ्यात नंदी ही शिवाची लक्षणे तर त्यातील शिवाच्या डाव्या बाजूला डोक्यावर विष्णूचा मुकुट, डाव्या वरच्या हातात चक्र, डाव्या खालच्या हातात शंख आणि खाली कोपऱ्यात हात जोडून बसलेला मानवी रूपातील गरुड ही सर्व विष्णूची लक्षणे. कैलास मंदिरातील पूर्वेकडील म्हणजे मागच्या विधिकेतील शिल्पपटात बरोबर मधोमध हे शिल्प कोरलेले आहेत.
या काळच्या हरिहराच्या इतर विशाल प्रतिमा मथुरेकर्डे असाव्यात (चित्रे ५७, ५८) कारण त्याची मोठाली दोन मस्तकें मथुरा (सं.सं. १३३; १९३६) व लखनऊच्या संग्रहालयांत ठेवलेली आहेत. काही छोट्या आकाराची डोकी सोडली तर गुप्तकालीन हरिहराच्या प्रतिमेचा एक नमूना प्रयाग संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र मूर्तीत पाहता येतो. येथे दोघांची मुख्य आयुर्थे त्रिशूलपुरुष व चक्रपुरुषाच्या रूपांत कोरली आहेत. (सं.सं. २९२)
अन्य एका मान्यतेनुसार बौध्द धर्माच्या वाढत्या प्रभावाला थांबवण्यासाठी वैदीक धर्मीयांनी आपसातील पंथातील वाद सोडून एकत्रीकरण व्हावे म्हणून शिव व वैष्णवपंथीय एकत्र यावेत यासाठी हरीहर मुर्तीची कल्पना पुढे आणली.
विष्णु-दुर्गा -भगवान कृष्ण यांची बहीण मानली जाणार्या दुर्गेचे शिल्प - तंजावर संग्रहालय ( तिरुवलंजुली मधून हि १० व्या किंवा ११ व्या शतकातील मुर्ती मिळाली )
भगवान शिवशंकराच्या पत्नीला दुर्गादेवीला शंख आणि चक्र धारण केलेल्या स्वरुपात दाखवलेले असते. वास्तविक शंख आणि चक्र हे विष्णूची लांछने आहेत. काही पुराणे आणि ललिता सहस्त्रनामाप्रमाणे दुर्गादेवी या भगवान विष्णूंच्या भगिनी आहेत. यामुळे शिव व विष्णु यांच्यात नातेसंबंध निर्माण झाले. भगवान विष्णुंनी शिव उपासना केली, त्यामुळे शिव प्रसन्न होउन त्यांना सुदर्शन चक्र दिले. अर्थात अनेक पौराणिक कथेमध्ये आपल्याला हे पहायला मिळते कि भगवान शिव किंवा विष्णु यांना एकमेकाच्या मदतीची गरज पडल्यास त्यांनी एकमेकांना सहाय्य केले आहे. भस्मासुराच्या कहानीमध्ये हेच बघायला मिळते. भस्मासुराने भगवान शिवाची आराधना करुन त्यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून वरदान मिळवले कि भस्मासुर ज्याला स्पर्श करेल, ते जळून राख होईल.अर्थात हे वरदान मिळाल्यावर भस्मासुर थेट शिवशंकरांनाच स्पर्श करुन त्यांना जाळून टाकू इच्छीत होता, पण नेमके त्याचवेळी विष्णुंनी मोहीनी रुप धारण करुन शिवांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मोहीनी रुपात विष्णूंनी भस्मासुराला मोहीत करुन स्वतःलाच स्पर्श करण्यास भाग पाडले आणि तो जळून राख झाला. याचा अर्थ हे दोन भगवान प्रंसगी एकमेकाची सहाय्यता करत असताना, त्यांचे अनुयायी मात्र नाहक श्रेष्ठत्वावरुन वाद घातल होते. हे टाळण्यासाठीच हरिहर मुर्तीची संकल्पना असावी.
यासंदर्भात एक कथाही सांगितली जाते.
राक्षस गुहासुराची कहाणी :-
पौराणिक कथेनुसार गुहासुर नावाचा एक राक्षस गुहारण्यात ( सध्या कर्नाटकातील हरिहरचा परिसर ) रहात होता. सध्याचे हरिहर शहर कर्नाटकाच्या मधोमध असल्यामुळे जेव्हा कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यामुळे राजधानी म्हणून त्याचा विचार झालेला होता.
गुहासुराने अतिशय उग्र तप केले. त्याला ब्रम्हदेव प्रसन्न झाले व कोणती देव, मनुष्य ,असुर त्याचा वध करु शकणार नाही, अगदी हरि किंवा हर ही त्याचा वध करु शकणार नाहीत असा वर दिला. अर्थातच या वराचा व्हायचा तोच परिणाम झाला. उन्मत्त झालेला गुहासुर अखिल ब्रम्हांडाला धोकादायक बनला. सर्व मनुष्यलोक हरी ( विष्णु ) आणि हर ( शंकर ) या दोन देवतांक्डे गेले आणि गुहासुरापासून वाचवण्यासाठी प्रार्थना करु लागले. विष्णू आणि शंकरांना वेगवेगळे गुहासुराचा वध करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी एकत्रित रुप धारण करण्याचा निर्णय घेतला. हरिहर रुपात गुहासुराचा वध करुन विष्णू व शिवशंकरांनी मानवजातीला त्रासातून मुक्त केले.
या कथेचा एक अर्थ असाही सांगितला जातो कि गुहा हे मानवाचे चेतना स्थान आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या चेतनेचा आवाज एकण्याचे बंद करते, तेव्हा त्याचे रुपांतर एका राक्षसात होते. आणि तो केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी देखील घातक होतो. याच अवस्थेत त्याला हरिहर मदत करतात. हरि जो पालनकर्ता आहे, त्याच्या रुपात विश्वास आणि सकारात्मकता, करुणा, दुसर्यासाठी प्रेम, मिळते तर हरच्या रुपात मानवातील नकारात्मकता वासना, क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि इर्षा अश्या दुर्गुणांचा नाश होतो.
जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी निर्माण करणार्या वाईट शक्तीपासून सोडवणुक करुन घ्यायची असेल तर त्याला हरिहर मुतीची पुजा करण्याचा सल्ला दिला जातो. भगवान हरिहर यांनीच अयप्पाला जन्म दिला असे मानले जाते. हरिहर संदर्भात आणखी एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार दुर्गेने वध केलेल्या महिषासुराची बहीण महिषी हिला आपल्या भावाच्या मृत्युचा बदला घ्यायचा होता. तीने भगवान ब्रम्हदेवाची पुजा करुन त्यांच्याकडून वरदान प्राप्त करुन घेतले. त्याप्रमाणे भगवान शिव आणि विष्णू यांच्या संयोगातून होणार्या पुत्राकडूनच तीला मृत्यु येईल. अर्थात महिषीला मारण्यापुर्वी हा मुलगा बारा वर्ष मानव लोकात राहील. अर्थात हा वर मागण्यामागे माहिषीचा एकच विचार होता कि दोन पुरुष देवता एकत्र येउन अश्या पुत्राची निर्मिती होणे अशक्य आहे आणि या मार्गाने आपण एक प्रकारे अजिंक्य झालो आहोत. अर्थात या राक्षसीचा नाश करण्यासाठी भगवान शिव व विष्णु एकत्र आले. शिवशंकर पुरुष रुपात तर विष्णु स्त्रीरुपात मोहीनी अवतार धारण करुन एकत्र आले व त्यांनी एका पुत्राला जन्म दिला ज्याला अयप्प्पा मानले जाते. भगवान अयप्पांना हरिहरसुदन किंवा हरिहरपुत्र असेही मानले जाते. अयप्पा हि केरळमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पुजली जाणारी देवता आहे. भगवान अयप्पांचे पालनपोषण राजा राजशेखर पांडियन आणि कोपेरुंदेवी या निसंतान जोडप्याने केले. अयप्पा धार्मिक आणि नैतिक मुल्यांचे पालन करीत मोठे झाले. त्यांना भगवान शिव आणि विष्णुपासून प्राप्त झालेल्या शक्तीचा उपयोग करुन महिषीला हरवले.
भगवान हरीहर, दुर्गा मंदिर, ऐहोळ
हरिहर, गंगाईकोंडचोलापुरम, तमिलनाडु
मुर्तीशास्त्रानुसार हरिहर मुर्तीचे दोन भाग आहेत. भगवान विष्णू म्हणजेच हरि यांची मुर्ती उजव्या बाजुला दाखवली जाते, तर भगवान शिवांची मुर्ती डाव्या बाजुला दाखवली जाते. अर्थात त्यांच्या पत्नीची शिल्पहि सोबत कोरलेली असतात, उजव्या बाजुला देवी लक्ष्मी तर डाव्या बाजुला देवी पार्वती दाखवलेल्या असतात. तसेच विष्णूंच्या बाजुला त्यांचे वाहन गरुड दाखवले असते तर शिवाच्या बाजुला नंदी दाखवला असतो. हरिहर मुर्तीचा डावा भाग उग्र स्वरुपात तर उजवा भाग शांत स्वरुपात दाखवलेला असतो. या दोन्ही बाबी देवतांची प्रकृती दर्शवतात. शिव मुर्ती कोरताना त्यांच्या अर्ध्या बाजुला जटा दाखवलेल्या असतात्,तसेच अर्धचंद्र डोक्यावर दाखवलेला असतो, त्यांच्या मस्तकी गंगा वाहताना दाखवलेली असते, तसेच भगवान शिवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिसरा डोळा अर्धा दाखवला असतो. त्यांनी आपल्या डाव्या कानात सर्पकुंडल धारण केलेले असते. बहुतेकदा हरिहर प्रतिमा चर्तुहस्त असते. शिवांच्या बाजुला एका हातात त्रिशुल, डमरु, अक्षमाला किंवा छोटे हरीण धारण केलेल असते, तर दुसर्या हात अभय किंवा वरद मुद्रेत असतो. तर विष्णु मुर्ती कोरताना त्यांच्या छातीवर साप दाखवलेला असतो. नागाचे जानवे, कमरेला सर्प मेखला किंवा करदोडा दाखवलेला असतो. त्यांच्या कमरेपासून ते घोट्यापर्यंतचा पाय व्याघ्रचर्माने झाकलेला असतो. भगवान विष्णु मुकुट धारण केलेले असतात, ज्याच्यावर रत्ने धारण केलेली दाखवलेली असतात. त्यांच्या उजव्या कानात मकर कुंडले धारण केलेली असतात. तसेच दंडात केयुर, मनगटात कंकण आणि इतर आभुषणे धारण केलेली असतात. तसेच पिवळ्या रंगाचा शेला धारण केलेला असतो. जर हरिहर मुर्ती चतुर्हस्त असेल तर भगवान विष्णूंचा जो हात वरच्या दिशेन वळलेला असतो, त्या हातात शंख, चक्र किंवा गदा असते तर दुसरा हात कटक मुद्रेत असतो. हरिहर मुर्तीचे दोन्ही पाय जमीनीवर सपाट टेकलेले असतात. उजव्या पायात बहुतेकदा साप एखाद्या तोड्यासारखा लपेटलेला असतो. तर डाव्या पायात रत्नजडीत पैंजण दाखवलेले असते.
भगवान हरिहर, २० व्या शतकातील चित्र , (भारतीय संग्रहालय कोलकाता )
जर हरिहर मुर्तीचे चित्र असेल तर भगवान शिव निळ्या रंगाच्या राखेने त्यांचे शरीर माखलेले असते. निळी राख हे योगी असल्याचे प्रतिक आहे. तर विष्णुंचा भाग निळ्या रंगात रंगवलेला असतो. जो पवित्रतेचे प्रतिक आहे.
हरिहर – बादामी गुंफा क्र. १
अर्धनारीश्वर आणि हरिहर शिल्पपट - विरुपाक्ष मंदिर, पट्टदकल
भगवान हरिहर १० व्या शतकातील बेसाल्टमध्ये कोरलेली उभी मुर्ती , सूरजकुंड, नालंदा, बिहार (भारतीय संग्रहालय कोलकाता)
हरिहर, बदामी गुफा क्र. १
मध्य प्रदेशातील वर्धनमधून मिळालेली ७ व्या शतकातील हरिहर मुर्ती ( सध्या राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली )
हरिहर, बादामी गुफा क्र. ३
८ व्या शतकाच्या प्रारंभी पश्चिमी चालुक्यांनी निर्माण केलेली हरिहर मुर्ती, बदामी, कर्नाटक (सध्या राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली )
राजस्थान येथील गहड़वाला येथे मिळालेली १२ व्या शतकातील हरिहर मुर्ती (सध्या राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली )
भारतात हरिहर मुर्ती प्रामुख्याने बादामी लेणी परिसर १ आणि ३, महाबलीपुरमच्या धर्मराज रथ, ओसियां (राजस्थान), हिमाचल प्रदेशमधील बैजनाथ मंदिर आणि ओडिशामधील मुक्तेश्वर मंदिरात बघायला मिळतात. ज्या मंदीरात हरिहर मुर्ती असतात, तिथे उत्सव साजरा करताना एका वर्षी भगवान शिव तर त्यानंतरच्या वर्षी भगवान विष्णु यांचा आलटून पालटून साजरा केला जातो.
हरिहर मूर्ती, कैलास मंदिर, वेरूळ
हरि-हराची
सुमारे चौथ्या शतकांतील मूर्ती विदिशा येथून मिळाली आहे (चित्र ५६). येथे
ही अर्धनारीश्वर प्रतिमेंप्रमाणें ऊर्ध्वलिंग दिसतें, पण हात मात्र खंडित
आहेत. याच्या थोड्या नंतरची हरिहराची प्रतिमा कलकत्ता येथील
बिरला-अकादमी-संग्रहालयांत ठेवलेली आहे. मूर्तीला चार हात असून वरील हातांत
त्रिशूल व चक्र आहे आणि खाली अक्षमाला व शंख. शिवाची जटाभार, अर्धचंद्र
आणि व्याघ्रांबर ही चिन्हें असून विष्णूकडे सिंह, मुखांकित मुगुट शोभत आहे.
हरिहराचे ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे.
धनवंतरी
धनवंतरी :
धनवंतरीची दुसरी प्रतिमा पुर्णे येथील भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. या मध्यकालीन शिल्पांत द्विभुज धनवंतरीच्या मध्यावर आधी तीन फणाचा व त्याखाली पंधरा फणाचा असे दोन नाग आहेत. डाव्या हातांतही सर्प आहे. आणि भग्नावस्थेत असलेल्या उजव्यात बटवा आहे. देव वैद्य धनवंतरी आणि सर्प यांच्या परस्पर संबंधाचे कारण विचारणीय आहे.
- गो. बं. देगलूरकर. विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्, पा. ६१, चित्र
महादेव एक ‘महावैद्य’:- १. प्रस्तावना भगवान शिव यांना आपण प्रामुख्याने ‘संहारकर्ता’, ‘तांडवकर्ता’, ‘योगीश्वर’, ‘कालमहाकाल’ या रूपांत ओळखतो. परंतु एक फार दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे – शिव हे ‘वैद्यनाथ’ (महावैद्य) होते. त्यांनीच आयुर्वेदाचा आद्य स्रोत मानवजातीला दिला, आणि अनेक प्रकारच्या रुग्णोपचार तंत्रांची निर्मिती केली. --- २. वैद्यनाथ - नावामागील गूढ शिवाचे एक प्रमुख नाव आहे – "वैद्यनाथ". > स्त्रोत: शिव सहस्रनामस्तोत्रम् श्लोक: "ॐ वैद्यनाथाय नमः" अर्थ: जो समस्त रोगांचा नाश करणारा महावैद्य आहे, त्याला नमस्कार. या नावाचा संदर्भ झारखंडच्या देवघर येथील ज्योतिर्लिंगाशीदेखील जोडला जातो, जिथे भगवान शिव ‘वैद्यनाथ’ रूपात पूजिले जातात. तेथे पार्वती देवीसह वैद्यरूपी भगवान शिवाने ‘रक्तपित्त’ (रक्तस्राव) ग्रस्त रावणावर उपचार केले, अशी स्थानिक श्रद्धा आहे. --- ३. आयुर्वेदाचा आद्य स्त्रोत - शिव शास्त्रीय आधार: > संदर्भ: चरक संहिता, सूत्रस्थान, अध्याय १ श्लोक: “अथातोsत्रायणेयं वेदं ब्रह्मा प्रजापतये प्रजापतिः अश्विन्यौ, अश्विन्याविंद्राय, इंद्रो धन्वन्तरये...” परंतु, या ज्ञानाचा मूळ स्रोत कोण? उत्तर: "भगवान शिव" शैव आणि आयुर्वेदीय परंपरेत असं मानलं जातं की, शिवाने प्रथम ‘आदियुक्त आयुर्वेद’ प्रजापतीला सांगितला, ज्याने तो अश्विनीकुमारांना दिला. > स्कंद पुराण, वैद्येश्वर खंड यामध्ये असं वर्णन आहे की – “भगवान शिवाने धन्वंतरि, अश्विनीकुमार आणि चरक इत्यादींना विविध प्रकारचे औषधज्ञान दिले.”
--- ४. तंत्रशास्त्रात ‘महामृत्युंजय’ मंत्राचे औषधी प्रभाव मंत्र: > “ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||” हा मंत्र केवळ आध्यात्मिक नाही, तर वैद्यकीय दृष्टीनेही प्रभावी मानला जातो. अनेक ग्रंथांमध्ये या मंत्राचे उच्चारण करून रोगमुक्ती मिळते, असा उल्लेख आहे. > संदर्भ: रुद्रयामल तंत्र “मृत्यंजयमन्त्रमिदं जपित्वा भस्मना रोगनाशनं कुर्यात्।” --- ५. भस्म – शिवाचा आरोग्यसंकेत शिवाच्या शरीरावर लावलेली भस्म (विभूती) हे फक्त आध्यात्मिक नसून, आयुर्वेदीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. भस्म मध्ये कषाय, तिक्त रस असल्यामुळे ती त्वचारोगांवर परिणामकारक मानली जाते. अनेक आयुर्वेदिक भस्म औषधं (जसे की सुवर्णभस्म, लोहभस्म) शिवाच्या भस्मतेचं अनुकरण मानली जातात. --- ६. नंदी – आयुर्वेदीय संप्रेषणवाहक नंदी म्हणजे शिवाचा वाहन, पण एक आयुर्वेदीय दृष्टिकोनानुसार, नंदी हा ज्ञानसंप्रेषणाचा वाहक मानला जातो. नंदीनेच तंत्रोपासकांना "रोग निवारण तंत्र" शिकवलं, असं काही शैव आगम ग्रंथांत म्हटलं आहे. --- ७. झारखंड वैद्यनाथ धाम: आधुनिक चिकित्सेचा श्रद्धास्थान वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हीच भारतातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या शिवाची सर्वात प्रसिद्ध पद्धतीची प्रातिनिधिक जागा मानली जाते. येथे दरवर्षी लाखो रुग्ण ‘गंगाजल’, शिवभस्म, आणि औषधी वनस्पतींच्या वासनेने युक्त अभिषेकात सहभागी होतात. --- ८. आधुनिक विज्ञान आणि शिवतत्त्व Nataraja (Lord of Dance) हे CERN (European Organization for Nuclear Research) मध्ये विज्ञान आणि नृत्य यामधील समांतरतेचं प्रतीक म्हणून उभं आहे. काही भारतीय वैज्ञानिक (उदा. डॉ. फणसे, ICMR) यांच्या संशोधनानुसार – “Shiva's symbolism has biochemical analogues in Ayurveda and Yogic healing.” --- भगवान शिव यांचे महावैद्य रूप हे केवळ एक धार्मिक श्रद्धा नसून, तो एक प्राचीन वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्यांचे "वैद्यनाथ" रूप आयुर्वेद, मंत्रशास्त्र, तंत्रविज्ञान आणि अध्यात्म यांचं एकत्रीकरण आहे. प्राचीन ग्रंथ, आधुनिक संशोधन आणि भक्तिपरंपरा यांमधून हा पैलू अधिकच ठामपणे पुढे येतो.
मोहिनी :
समुद्रमंथनानंतर विष्णूने अत्यंत सुंदर स्त्रीचे रुप घेऊन दैत्यांना मोहित केले आणि अमृताचा वाटा देवांना दिला. ती मोहिनी, किंवा शिवमोहिनी (पहा भामूशा. पा. १४९) ही अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. हिची शिल्पे अगदी मोजकीआहेत.
संक्षेपत :-
१) नगर संग्रहालयात शेषशायी विष्णूपटाच्या वरच्या अंगास कोरलेल्या समुद्रमंथन दृष्यांत डाव्या हातानें घटाला स्पर्श करणारी मोहिनी दिसते.
२) नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात मोहिनी अमृतघट घेऊन कासवावर उभी आहे. त्यातील अमृत ती विष्णूला देत आहे.
-गो.बं. देगलूरकर, विष्णुमूर्ते., पान ९७ - ३) रामराकुटी, धुब्री, आसाम येथे काष्ठावर कोरलेल्या दृष्यांत समुद्रमंथनाचे अंकन आहे. तेथे अमृतघट घेतलेली मोहिनी दिसते.
R.D. Chaudhary, 'Wooden Sculptures of Ramarai Kuti' Kala VI, 1997-98 Fig. 11, pp. 32-37
४) कमंडलेश्वर शिवमंदिर, पाली, तामिळनाडू येथील १२व्या शतकाच्या एका शिल्पात दर्शनी भागावर श्रीदेवी व भूदेवीसह विष्णूचे दहा अवतार आहेत व पाठीकडे विश्वमोहिनीची सुंदर प्रतिमा आहे. R.Champakalakshmi, Vaisnava Iconography of the Tamil country, 1981 New Delhi p. 277
त्रिमुखी शिव.
ह्याला
तीन मुखे असतात. त्रिमुखी शिवाची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे घारापुरी
येथील ब्रह्मा-विष्णू-महेश अशी मानली गेलेली शिवप्रतिमा. वास्तविक ही
प्रतिमा ब्रह्मा-विष्णू-महेश अशी नसून शंकराच्याच सदाशिव रूपाची आहे.
वेरूळ येथील त्रिमुखी शिव
चतुर्मुख शिव.
ह्याच्या
नावाप्रमाणेच ह्याला चार मुखे आहेत. काही संशोधक ह्यालाच सदाशिव (पंचमुखी
शिव) असे मानतात ह्याचे पाचवे मुख हे दाखवले नसते व ते आकाशाच्या दिशेने
असे मानले जाते.
पाटेश्वर येथील चतुर्मुख शिव
चतुर्मुख शिव :मांढळ,
तहसील उमरेड (जि. नागपूर) येथून मिळालेल्या काहीं सातवाहन-वाकाटककालीनप्रतिमा नागपूर संग्रहालयांत आहेत. त्यांत चतुर्मुखी दिसतो. चारी दिशांकडे पाहणारी चार मुखें याच्या मानेंवर असून डाव्या हातांत दण्ड असावा असें वाटतें. ऊर्ध्वलिंग नेसूच्या वस्त्रानें झाकलेले आहे. प्रतिमा लालसर दगडाची आहे.
(* या माहितीबद्दल लेखक नागपूर संग्रहालयांचे अध्यक्ष श्री पी.एम्. मुळे यांचा आभारी आहे. श्री. मुळे यांच्या सहयोगानें या प्रतिमा पाहतां आल्या. अजून या अप्रसिद्ध आहेत.)
अष्टमुख शिव :
याच संग्रहालयांतील मांढळची दुसरी प्रतिमा अष्टमुख शिवाची आहे. ही देखील उभयांकित असून हिला दोनच हात असावेत असें वाटते. त्यापैकी आज हयात असलेल्या डाव्या हातांत घट (तुंबी) आहे व तिच्यातून एक लांबट वस्तू निघत असावी असें भासित होतें. हिला चहूबाजूला चार तोंडे तर आहेतच, मागील मुखाला त्रिनेत्र व मिशाही आहेत. हैं अघोरमुख असावे. याशिवाय डाव्या बाहुमूलांवर (तुटलेल्या
उजव्या बाहूमुलांवरही तसेंच असले पाहिजे) व दोन्हीं जघांमूलांवर प्रत्येकी एक अशी चार अतिरिक्त मुखेंही दिसतात. जंघामूलांवर दिसणाऱ्या मुखांचा व मांड्यावरील धोतराचा असा खुबीदार जोड बसविला आहे कीं धोतराचा भाग या मुखांवरील उष्णीषासारखाच वाटतो. या प्रतिमेत देखील वरील प्रमाणें वस्त्राच्छादित ऊर्ध्वलिंग आहे. शिवाच्या खांद्यावर जानवेही आहे. शिवाची ही आठ मुखें त्याच्या अष्टमूर्तित्वाकडे संकेत करतात.
खजुराहो येथील खंडारीया महादेव मंदिरामध्ये हे शिल्प दिसते. आणखी एक शिल्प खजुराहो येथील संग्रहालयात आहे. या शिल्पात आठ तोंडाचा शिव म्हणजे दर्शनी भागात खांद्यावर तीन मुखं आणि त्याच्यावर तीन छोटी मुखे, या दोन्ही स्तरांमध्ये चवथे मुख मागील बाजूला आहे हे गृहीत धरले जाते. अशी त्याच्या आठ मुखांची रचना आहे. डोक्यावर मध्यभागी शिवलिंग कोरलेले आहे. या मूर्तीला चार पाय असून त्यातील दोन पाय पद्मासनात आणि खाली सोडलेले दोन पाय जमिनीवर टेकलेले दिसतात. या मूर्तीला बारा हात होते. परंतु आता त्यातला एकच शिल्लक आहे. चतुष्पाद म्हणजे चार पायांचा. या ठिकाणी पाद शब्दावर श्लेष केलेला आहे. शैव पंथांच्या अनुयायांसाठी चार मार्ग किंवा चार पाद सांगितले आहेत. शैव सिद्धान्तामधील हे चार मार्ग म्हणजे योग-पाद, ज्ञान- पाद, क्रिया-पाद आणि चर्या-पाद. सदाशिवाच्या पद्मासनात असलेले दोन पाय म्हणजे ज्ञान आणि योग पाद होय आणि खाली सोडलेले दोन पाय क्रिय पाद (उपासना पद्धत) आणि चर्या पाद (आचरणाचे नियम) होय. केवळ या मूर्तीच्या दर्शनाने भक्तांन जीवनात मुक्ती देणाऱ्या चार मार्गांचे स्मरण व्हावे अशी यांची योजना आहे.
एकादश रुद्र :-
एकादश रुद्र, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
ज्या शिल्पातून सगळे तत्त्वज्ञान साकारले जाते, अशा शिल्पांना डॉक्टर गो. बं. देगलूरकर यांचा मते 'बिंब ब्रह्म' असे म्हणतात. याशिवाय अष्ट मुख आणि द्वादश मुख शिव अशीही शिवाची शिले असतात. काही शिल्पांमध्ये सिंहासह शिव कोरलेला असतो. शिवाचे शिल्पांकन अनेक प्रकारे होते. त्यातील सर्वच प्रकार सर्व मंदिरात दिसत नसल्यामुळे येथे सर्वाधिक प्रचलित आणि संख्येने जास्त असणाऱ्या तसेच सामान्यतः अनेक देवळांमध्ये प्रकर्षनि आढळणाऱ्या शिल्पांचेच वर्णन प्रामुख्याने केले आहे. अकरा रुद्र यांचे एकत्रित किंवा स्वतंत्र शिल्पांकन दिसते. (कांचीपुरम - तामिळनाडू येथील कैलासनाथाचे मंदिर, सिद्धापूर-गुजराथ येथील शिव मंदिर) तसेच अज मुख, अघोर, नीलकंठ, वीणाधर, हनुस्पर्श (पार्वतीच्या हनुवटीला हात लावलेला बालशिव, विषपायी आवक्ष, महेशमूर्ती अशी विविध रूपेही दिसतात. (जोशी : १९७९, पृ.२०२- २०३). तालागाव (बिलासपूर, छत्तीसगढ) येथे दहाव्या अकराव्या शतकातील रुद्र शिवाची एक उभी असलेली द्विभुज प्रतिमा मिळाली आहे. ही ऊर्ध्वलिंगी असून हातात आयुधे नाहीत. त्यांच्या संपूर्ण शरीरावर विविध प्राणी अंकित केलेले आहेत. छाती, पोट, मांड्या यावर सात मानव मुखे आहेत. गुडघ्याच्या ठिकाणी दोन सिंहाची तोंडे दिसतात. पोट हे महाकुर्माचे रूप, भुवयां ऐवजी मासे, एका विशाल कपाळावर टिळ्याच्या ऐवजी पाल, बुबुळाऐवजी मानवी कवट्या, याशिवाय डोके, कान, लिंग यासारख्या अवयवांवर साप, मोर, मगर वगैरे प्राणीही लहानमोठ्या प्रमाणात दिसतात. डॉ. देगलूरकर झांनी याला 'सर्वभूतवहित्र' असे म्हटले आहे.
द्वादशमुखी शिव : नागपूर विद्यापीठानें मांढळ येथे केलेल्या उत्खननांत सातवाहन वाकाटककालीन बरेच अवशेष मिळाले आहेत. त्यांत एक द्वादशमुखी, शिवाची मूर्ती आहे. याचा दगड, घडण व डौल अष्टमुख शिवप्रतिमें प्रमाणेंच आहे. डॉ अजयमित्र शास्त्री यांनी 'महासदाशिव' म्हणून हिला ओळखले आहे. या प्रतिमेंच्या मानेंवर आठ डोकी असून ती चारचा एक थर या प्रमाणे एकांवर एक असलेल्या दोन थरांत दाखविली आहेत. खालील चार तोंडे मुख्य दिशांकडे व वरील उपदिशांकडे आहेत. या शिवाय वरील अष्टमुख प्रतिमेंप्रमाणेंच दोन बाहुमूलांवर व दोन जंघामूलांवर अशी आणखी चार मुखें आहेत. या मुखांना मिशा नाहीत. या प्रमाणें एकूण मुखांची संख्या झाली बारा !! शिवाच्या डाव्या हातांत कमंडलू असावा. त्याच्या शरीरांवर फलकहार, जानवें, कटिबंध, आणि कच्छा दिसतो. ऊर्ध्वलिंग वस्त्राच्छादितच आहे. विष्णूच्या चतुर्व्यहाप्रमाणें मूसानगरचा शिव आपण मागें पाहिला आहे. तसेच या बारामुखीं शिवांचा विष्णूंच्या बारा विभवांशी काही अर्थाअर्थी संबंध नसेल नां?
शिवाच्या अन्य मूर्ती
सदाशिव मूर्ती :-
पाच तोंडाचा व दहा हातांचा शंकर हा 'सदाशिव' या नावाने ओळखला जातो. तसेच अनेक मुखांच्या शंकराच्या मूर्तीलाही सदाशिव म्हटले जाते. अशा वर्णनाच्या काही विशेष मूर्ती आढळतार परंतु साधारणपणे अनेक मुख असणाऱ्या शंकराच्या शिल्पाला सदाशिव म्हणतात. तत्पुरुष, वामदेश अघोर, सद्योजात, आणि ईशान अशी याच्या पाच मुखांची नावे असतात. मूर्तीमध्ये हा तीन किंवा चार तोंडाचा दिसतो. त्याचे समोर मध्यभागी असणाऱ्या मुखाला तत्पुरुष असे म्हणतात. त्याचा डावीकडील वामदेव तर उजवीकडील मुखाला अघोर म्हणतात. डोक्यावरील मुखाला ईशान म्हणतात तर पाचवे मुख जे दिसत नाही त्याला सद्योजात म्हणतात. ही पाच मुखे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित करतात. यातील डोक्यावरील मुख ईशान हे आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते काही शिल्पांमध्ये दाखवले जात नाही. घारापुरी (एलिफंटा) येथील त्रिमूर्ती या नावाने प्रसिद्ध असलेले शिल्प हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांचे नसून सदाशिवाचे शिल्प आहे. या शिल्पात तीनच मुखे दिसतात आणि डोक्यावरील ईशान दाखवलेला नाही. शिवाच्या डावीकडील तोंडाचे नाव वामदेव. वामदेव म्हणजे परिष्कृत निर्मिती म्हणून याचा चेहरा अत्यंत सुकुमार तरुणाप्रमाणे कोरलेला आहे. त्याचे उजवे तोंड म्हणजे अघोर. यातील अघोर म्हणजे निर्मिती साठी लागणारी ऊर्जा आणि शक्तीचे रूप. हातोडीचा ठोका कठीण पदार्थाबर घालताना दाताखाली ओठ चावून भुवया विस्फारून अत्यंत त्वेषाने तेवढाच नियंत्रित आणि संयमित करून तो ठोका घालावा लागतो याचे ते प्रतीक आहे. या शिल्पातीत अघोराने चावलेला ओठ आणि त्याची वक्र झालेली भुवई यांची साक्ष देतात. या दोन्हीतील समतोल साधणारा निःपक्ष म्हणूनच निर्विकार तरीही निर्मितीचे समाधान दाखवणारा चेहरा हा मधल्या तोंडावर म्हणजे तत्पुरुषाचा असतो, घारापुरीतील हे शिल्प खरं तर अर्धशिल्पच (bust) आहे. शंकराच्या छातीपर्यंतच कोरलेले हे शिल्प आहे. हे शिल्प २१ फूट उीचे आहे. अर्धशिल्पांमध्ये जगातील सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.
महासदाशिव मुर्ती
एकपाद शिव मूर्ती :-
हा शंकराच्या मूर्तीचा एक अतिशय दुमिळ प्रकार. ही शिल्पे संख्येने अतिशय कमी असतात आणि साधारणतः तांत्रिक पंथाच्या मंदिरात ही दिसतात. हि मुर्ती सहसा एकाच पायावर ताठ उभा असलेल्या स्थितीत दिसतो जी शिव हा सर्वोच्च देव आणि विश्वाचा आधारस्तंभ असल्याचे सूचित करतो. भगवान शिवाचे हे रूप प्रामुख्याने दक्षिण भारत आणि ओरिसातील मंदिरांमध्ये आढळते.
यामध्ये कमरेवरील शंकराचे शरीर पूर्ण असते आणि कमरेखाली एकच पाय दोन्ही पायाच्या जागी कोरलेला असतो. या शिल्पात शंकर ऊर्ध्वलिंगी दाखवलेला असतो. भुवनेश्वर उबळील हीरापूर येथील चौसष्ठ योगिनींच्या मंदिरात हे शिल्प दिसते. एकपादाचे वर्णन भगवान शिवाच्या ६४ रूपांपैकी एक म्हणून तसेच २५ लीला मूर्तींमध्ये केले आहे. वेद, आगम आणि अनेक पवित्र धर्मग्रंथांमध्येही या स्वरूपाचा उल्लेख आहे. या स्वरूपाच्या मूर्ती सामान्यतः दक्षिण भारतातील मोठ्या शैव मंदिरांमध्ये मंदिराच्या अंतर्भागात असलेल्या मूर्ती किंवा गोपुरावर चित्रित केल्या जातात. ओरिसामध्ये, या देवाला एकपादभैरव मानले जाते आणि प्राचीन मंदिरांमध्ये असलेल्या देवतांच्या मूर्तींमध्ये हे शिल्प खुपदा दिसते.
महाभारतात वर्णिल्याप्रमाणे हा रूद्र कुबेराबरोबरच धनाचे रक्षण करत असतो. याचे तोड बकर्याचे असल्याने हा अग्नीशी समान मानला जातो तर ह्याने आपले संतुलन एकाच पायांवर खुबीने साधलेले असते. त्याची ४ वेगवेगळी नावे आणि रूपे आहेत.
१. एकपद-मूर्ती ("एक-पाय असलेले चिन्ह") स्वरुप, त्याला एक पाय आणि चार हातांनी चित्रित केले आहे.
२. एकपद- त्रिमूर्ती ("एक-पाय त्रिमूर्ती") रूपात, त्याला विष्णू आणि ब्रह्मा या देवतांच्या धडांसह चित्रित केले आहे, जे शिवासोबत मिळून त्याच्या बाजूने, कंबरेच्या वर आणि एका पायाने उत्सर्जित हिंदू त्रिमूर्ती (त्रिमूर्ती) बनवतात. .
३. त्रिपदा- त्रिमूर्ती ("तीन-पाय त्रिमूर्ती") जेथे शिवाच्या मध्यभागी एका पायासह, विष्णू आणि ब्रह्मदेवाचे दोन लहान पाय बाजूंनी बाहेर पडतात.
४. एक पद भैरव :- ओरिसा तंत्रशास्त्रातील भैरवाचा एक पद हा सर्वात लोकप्रिय पैलू आहे आणि त्याला वैदिक अज एकपद, अग्नी/अग्नी, यज्ञ, विश्वाचा वैश्विक स्तंभ आणि योगिनी देवी यांच्याशी जोडतो. त्यांना सप्तमातृकांचे पालकही मानले जाते.
हि सर्व रुपे एकमेकांशी संबंधित आहेत परंतु त्याचवेळी तिन्ही रूपे भिन्न आहेत.
त्यांच्यामध्ये, एकपाद मूर्ती हे एक रूप आहे जी केवळ एका पायावर उभे असलेल्या शिवाचे प्रतिनिधित्व करते आणि भगवान शिव हे या संपूर्ण विश्वाचा वैश्विक स्तंभ म्हणून कार्य करतात हे दर्शवते.
तामिळनाडूच्या ७ व्या शतकातील मंदिराचे एकपाद शिल्प.
एकपादाचे एक रुप
एकपाद शिव, सोमेश्वर मंदीर, आंध्र प्रदेश
एकपाद त्रिमुर्ती
एकापद त्रिमूर्तीकडे हे असे स्वरूप आहे की ब्रह्मा आणि भगवान विष्णू हे शिवामधून बाहेर पडतात आणि भगवान शिवांचे वर्चस्व दर्शवितात आणि ब्रह्मा आणि विष्णू दोघेही शिवातून बाहेर पडले आहेत असे हि मुर्ती सूचित करते.
त्रिपदा त्रिमूर्ती आणि एकपाद-त्रिमूर्ती सारख्याच आहे परंतु विष्णू आणि ब्रह्मदेवाचे पाय पूर्णपणे बाहेर पडलेले असले तरी त्यांचा एक पाय अजूनही एकपादाशी जोडलेला दाखवलेला असतो. हे स्वरूप असे सूचित करते की विष्णू आणि ब्रह्मदेवाचे कार्य भगवान शिवाने नियुक्त केले आहेत असे अनेक तज्ञांचे मत आहे. त्रिपदा त्रिमूर्ती आणि एकपाद त्रिमूर्ती या दोन्ही रूपांमध्ये, ब्रह्मा आणि विष्णू अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूने बाहेर आलेले दिसतात. अनेक तज्ञांच्या मते हे रूप वेदांमध्ये नमूद केलेल्या अजेकपदापासून विकसित झाले आहे.
वेदांमध्ये, एकापदाचा संबंध खोल महासागरातील सर्पाशी, अहि-भुज्ञाशी, जोडलेला दिसतो. अजा आणि एकापदाचे हे अग्नीचे रुप मानके जाते आणि त्याचा संबंध रुद्राशी जोडलेला आहे.
आगमांच्या मान्यतेनुसार, हे रुप रुद्रांच्या अनेक अवतारापैकी एक म्हणून केले आहे आणि एकपद-त्रिमूर्ती विद्योश्वरांचे एक रूप आहे. तांत्रिक शास्त्रात हे रूप भैरव रूप मानले गेले आहे.
लिंग पुराण आणि विश्वकर्मा शिल्प शास्त्रानुसार अजा आणि एकपद या दोन्हींही एकादश (अकरा) रुद्र रूप आहे.
एकपादाचे मुर्तीशास्त्र :-
भगवान एकपदाचे वैशिष्ट्य म्हणजे मुर्ती उभी ताठ स्थितीत,एकच पाय आणि साधारणपणे चार हात, तीन डोळे आणि कमरेभोवती वाघाचे कातडे घातलेले दर्शविले जाते. वरच्या हातात टांका आणि हरीण आहे, तर खालचे हात अभय आणि वरद मुद्रेत आहेत.
मस्तक जटामुकुटाने आणि शरीर अलंकारांनी सजलेले आहे. तसेच, पाय पद्मपीठावर ठेवलेला दिसतो.
या देवतेच्या सोळा हातापैकी उजव्या हातात खटवांग, डमरू, बाण, चक्र , मुदगल, सर्प, वरद मुद्रा आणि त्रिशूळ तर डाव्या हातात धनुष्य, घंटा, कौमुदी, घट, तर्जनी मुद्रा, कपाल, चक्र आणि परसू (कुऱ्हाड) धारण केलेले असते.
ओरिसामध्ये, हे रूप एकापदभैरव म्हणून मानले जाते आणि एक पायावर उभे असून त्यांना चार हात आणि तीन डोळे असल्याचे दर्शवले जाते. कधीकधी या मुर्तीबरोबर भक्तही दाखवलेला असतो.
ज्या एकपाद त्रिमूर्तीच्या रूपात, विष्णू आणि ब्रह्मा या रूपात भगवान शिवामधून बाहेर पडताना दाखवले असतात तिथे विष्णू आणि ब्रह्मदेव आपल्या चारपैकी खालचे हात अंजली मुद्रेत असून त्याने शिवाची पूजा करताना दाखवतात, तर वरच्या हातांत त्यांनी त्यांची दैवी शस्त्रे धरलेली असतात.
एकापदाची पूजा :-
एकपादाची उपासना वैदिक काळापासून अस्तित्वात आहे आणि दक्षिण भारत आणि ओरिसामध्ये शैव धर्माच्या वाढीमुळे ती खूप लोकप्रिय झाली होती, याच काळात या देवाची मंदिरे उभारली होती.भगवान शिवाच्या विविध रूपांना मान्यता मिळवण्याच्या काळात आणि मंदीर बांधताना अजपादाच्या तिन्ही रूपांना महत्त्वपूर्ण स्थान मिळाले.
तसेच, प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तांत्रिक, योगिनी पंथाचा उदय, विशेषत: ओरिसा आणि उत्तर आंध्रच्या काही भागात भैरवाचे रूप म्हणून या स्वरूपाला महत्त्व मिळाले.
नंतर एकापदभैरव रूपाने पूजा करण्याची प्रथा रुढ झाली.या दरम्यान शिवाचे हे स्वरूप सप्तमातृक आणि देवी महिषासुरमर्दिनी यांच्याशी जवळून संबंधित मानले आणि पुढे विशेषत: ओरिसामध्ये एक दुय्यम देवता किंवा परिवर देवता म्हणून स्थान मिळाले.
पुढे, भगवान शिवाच्या ६४ रूपे आणि २५ लीलामूर्तींपैकी एक अशी एकपास रुपाला मान्यता मिळाल्याने पूजेसाठी या स्वरूपाचे महत्त्व वाढले.
एकपद आणि अजएकपद या नावांचा गोंधळ?
हिंदू धर्मग्रंथ वाचताना एकपाद, अजएकपाडा, अजैकपाद इत्यादी नावे वाचायला मिळतात त्यामुळे गोंधळ होतो. काही विद्वानांच्या मते ही सर्व नावे सारखीच आहेत. परंतु काही तज्ञ्य याच्याशी सहमत नाहीत आणि त्यांच्या मते अज वेगळे आणि एकपद वेगळे आहेत. त्यांच्या मते अज किंवा अजेस हे अव्यक्त परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतात, तर एकपद हा एक पाय असलेला परमेश्वर आहे.अकरा रुद्रांच्या नावात (एकादशरुद्र) अजा आणि एकपद दोन्ही स्वतंत्रपणे सुचित केले आहेत.
लकुलीश शिव :-
लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा
त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण
तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य
झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. लकुलिश या शब्दाचा अर्थ लाठी धारण केलेल परमेश्वर असा होतो. खरेतर लकुलीश एक सुधारणावादी शैवपंथीय संत होते, ज्यांना शिवाच्या अठ्ठावीस रुपात स्थान मिळाले.
लकुलीश यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कारवान गावात ऋषी अत्री यांच्या गोत्रातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. अर्थात लकुलीशांच्या अनुयायापैकी काही व्यक्तींच्या मते त्यांची एक वेगळीच कथा आहे. भगवान शिवांनी एकदा भगवान विष्णुंना वासुदेव स्वरुपात पृथ्वीवर प्रगट झाल्यावर त्याचवेळी अवतार घेण्याचे वचन दिले होते. जेव्हा विष्णूनी वासुदेव रुपात जन्म घेतला तेव्हा भगवान शिव एका मृत ब्राम्हणाच्या शरीरात प्रवेश करुन पृथ्वीवर प्रगटले.हाच तो लकुलीश अवतार मानला जातो.
लकुलीश हे सतत भ्रमण करणारे भिक्षु झाले. त्यांनीच शैव पंथातून पुढे पाशुपत संप्रदायाची स्थापना केली. तसेच पाशुपत संप्रदायीसाठी अध्यात्मिक जीवन कसे जगावे यासाठी सुत्र लिहीले. पुढे याच संप्रदायातील इतर गुरुंनी त्यात भर घातली.
अर्थात लकुलिश हेच पाशुपत संप्रदायाचे संस्थापक होते का ? तसेच त्यांनीच त्यांनीच पाशुपत सुत्र लिहीली का ? याबद्दल काही तज्ञांना शंका आहे. त्यांच्या मतानुसार पाशुपत संप्रदाय आधीच अस्तित्वात होता किंवा कमी प्रमाणात प्रसार झालेला होता.
त्यांच्या
मते पाशुपत आणि इतर शैव संप्रदायाची पुन्रबांधणी आणि संस्थापना, सुधारणा
करण्याचे श्रेय लकुलिश यांच आहे. तसेच या तज्ञांच्या मते पाशुपत सुत्र खुप
आधीच लिहीले गेले होते, पण लकुलिश यांनी त्यांना सर्वसामान्यांना समजेल
अश्या सोप्या पध्दतीने भाषांतरीत केले. एकतर पाशुपत सुत्रांची रचना एकंदरीत
प्राचीन वाटते आणि त्यात ती सुत्रे कोणी रचले याचा उल्लेख नाही असा या
तज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या सुत्रांची रचना लकुलिश यांनी केलेली नाही
असा दावा केला जातो.
पाशुपत संप्रदाय हा सहा मुख्य सिध्दांतापासून बनला आहे. यामध्ये कारण,
कार्य, कला, विधि, योग आणि दुखांत हि सुत्र आहेत. लकुलिश यांनी आर्यांच्या
आधीच्या काळातील सिंधु संस्कृतीतील कर्मठ परंपरांचे पुनर्संस्थापन केले.
तसेच हठयोग आणि तांत्रिक परंपराचे पुननिर्माण केले. तसेच लकुलिश यानी
वैदीक, जैन आणि बौध्द धर्माचा हिंसक मार्गाने विरोध केला.
पाशुपत संप्रदाय पाळत असलेली तपस्वी प्रथा :-
पाशुपत संप्रदायी ज्या उग्र प्रथा पाळतात, त्यात दिवसातून तीन वेळा
राखेने स्नान करणे, ध्यान करणे आणि ओम मंत्राचा जप करणे, भगवान शिवाची
स्तुती आणि आराधना करताना जोरात हसणे, जीभ हासडणे आणि बैलासारखे डुरक्या
देणे याचा समावेश होतो.
भगवान
शिव यांना समर्पित झालेली व्यक्ती मग ती कोणत्याही जातीची असु देत पाशुपत
संप्रदायी होउ शकते. या लोकांचा पोषाख काळया रंगाचा असतो. तसेच शिवाचे
दर्शन घेण्याची आणि पुजेची पध्दत विशिष्ट प्रकारची असते. याच पध्दतीने
केल्या जाणर्या काही अस्पष्ट सिध्दांतामुळे आणि काही रहस्यमय प्रथा, तसेच
विकृत आणि विभिन्न परंपरा यातून कापालिक आणि काळामुख या दोन तांत्रिक
पंथाना जन्म दिला गेला.
कापालिक संप्रदाय :-
कापालिक हा शब्द कपाळ या शब्दावरुन आला आहे. कापालिक संप्रदायानुसार भोजन
आणि पेयपान मानवी कवटीतून केले पाहिजे असे मानणारे आहेत. तांत्रिक पंथाच्या
सर्व प्रथा कापालिक कठोरतेने पाळतात. त्यामध्ये स्मशानामध्ये रहाणे, तसेच
पुजापाठामध्ये संभोगातून निर्माण झालेले रक्त, मांस, अश्या पदार्थांचे सेवन
केले जाते. कदाचित कापालिकांच्या पुजेत या गोष्टीचा समावेश हे
होण्याचे कारण म्हणजे प्राचीन हिंदु मंदीरात कामशिल्प असतात, याचा अर्थ या
संप्रदायाचा हा प्रभाव असावा का ? असा प्रश्न निर्माण होतो. कालमुख संप्रदाय :-
कापालिक लोकांच्या प्रथा अतिशय कठोर असल्या तरी त्या तुलनेत कालामुख
संप्रदायाचा प्रथा तुलनेने सौम्य आहेत. कालामुख संप्रदायिक पुरुष देवाची कि
स्त्री देवतेची पुजा करतात, त्यावरुन कालामुख संप्रदायाचे दोन प्रकार
पडतात.पुरुष देवाला भजणार्या अनुयायांना सिंहप्रसाद म्हणले जाते तर जे
कालामुख स्त्री देवतांची पुजा करतात त्यांना शक्तिप्रसाद म्हणतात. काही
पाशुपत संप्रदायी हे तुलनेने उदारमतवादी आहेत. या संप्रदायाचे शिक्षण हेच
आधुनिक शैव धर्माचे केंद्र झाले. लकुलिशाने पुनर्थान केलेल्या शैव
धर्माचा प्रभाव सुरवातीला खुप होता, प्रारंभी तो उत्तर भारतात वाढला, नंतर
पुर्व भारत, नेपाळ, ओडीशा आणि आसामच्या जंगली भागात एखाद्या वणव्यासारखा
पसरला. चौथ्या शतकात लकुलिशाचा शिष्यांचा प्रभाव खुप वाढला, तर पुढे
सातव्या शतकात चीनमधून भारतात आलेल्या यात्रेकरु ह्युएन त्संगने पाशुपत
संप्रदायासंदर्भात विस्ताराने लिहीले. ह्युएन त्संग लिहीतो कि, पाशुपत
संप्रदायीक आपल्या शरीराचर राख माखायचे, आपल्या केसांच्या जटा बांधायचे आणि
नग्न असायचे. त्यांना राजकीय संरक्षण मिळाले होते आणि समाजावर त्यांचा खुप
प्रभाव होता. चोल राजवटीत तामिलनाडूत लकुलिश लोकप्रिय होते आणि त्यांच्या पंथाची शाखा काळामुख कर्नाटकात राजकीय प्रभाव राखून होती. चोल काळात पाशुपत संप्रदायाचा इतका प्रभाव होता कि जेव्हा चोल अधिपती राजाराजा याने त्याचे अजोबा अरिंजय चोल यांच्या समाधीचे म्हणजे पल्लीपदाईचे प्रशासन पाशुपत संप्रदायिकांकडे दिले होते.
शैव धर्माचे पुनरुत्थान :-
शैव पंथाचे पुनरुथान झाल्यावर खांद्यावर शिवलिंग घेउन नाणार्या भारशिवांना
मध्य आणि उत्तर भारतातील वालाटक पंथीयाकडून पाठींबा मिळाला. जवळपास
अकराव्या शतकापर्यंत उत्तर भारतात या पंथाचा प्रभाव राहिला. अकराव्या
शतकाच्या दरम्यान या पंथाने आपला विस्तार दक्षिण भारतात केला. विषेशतः
मनिषी आणि नयनार जे कलाकारी करतात, त्यांच्यात या पंथाचा प्रभाव खुपच
वाढला. तामिलानाडूतील सर्व ६३ नयनार संतानी रचलेले मंत्र भगवान शिवांशी
संबधीत आहेत. भगवान शिवांची आपल्या भक्तांवर कृपा व्हावी हिच इच्छा त्यात
व्यक्त केली आहे. हे मंत्र आजही लोकप्रिय आहेत.
लकुलिशाच्या काळात त्याच्या तत्वानुसार आखाडे म्हणजे धार्मिक सेनांचे
महत्व वाढले. त्यांच्याच काळात दशनामी नाग हा संप्रदाय सर्वात जुना असून तो
आजही अस्तित्वात आहे. पुढे याच लकुलिशांपासून गोरखनाथ आणि मत्स्येंद्रनाथ
यांनी प्रेरणा घेउन हटयोग वाढवला. आजच्या काळात लकुलिश संप्रदायी हातात
काठी धारण करुन फिरताना दिसतात. ते शरीराचा वरचा भाग घोंगडे पांघरुन
झाकतात, तर खालचा भाग एक रुंद कपड्याने झाकतात. ते स्वतःच्या जटांचा मुकुट
डोक्यावर धारण करतात. ते दिवसातून तीनवेळा आपल्या शरीरावर राख लावतात आणि
कोणत्याही चवीचा विचार न करता भोजन करतात. हे संप्रदायी बहुधा जंगलात
रहातात आणि ज्यांना सिध्दी प्राप्त झाली आहे, ते बहुधा नग्न असतात. भगवाम
शिवांचे श्वेतपासून लकुलिश अवतारापर्यंत प्रत्येकवेळी चार प्रमुख शिष्य
होते,लकुलिश अवतारात त्यांचे चार शिष्य असे ओते कुशिक, मैत्रेय, गर्ग आणि
कौरुष्य.
भगवान
शिवांचे सर्व अवतार एकतर हिमालयात उत्पन्न झाले किंवा गंगेच्या मैदानी
प्रदेशात. लकुलिश मात्र गुजरातमध्ये प्रगट झाले. लकुलिश यांनी शैव पंथाचे
पुनर्उथ्थानाचे कार्य संपल्यावर अवतार समाप्त करण्याचा निर्णय घेतला आणि ते
ज्योतिर्लिंगाच्या अग्रभागात विलीन झाले. गुजरात मधील कारवानच्या लकुलिश
मंदीरातील गर्भगृहात असलेली मुर्ती ब्रम्हेश्वर आणि लकुलिश यांची संयुक्त
मुर्ती आहे. या मुर्तीमुळे लकुलिशांच्या निर्वाणाच्या कथेची पृष्टी होते.
लकुलिशाच्या मुर्ती :-
याच्या प्रतिमेची मुख्य लक्षणें
म्हणजे ऊर्ध्वलिंगावस्था व हातांत सोटा. हा कमळावर बसलेला असून नागसेवकांनी
कमळाचा देठ घट्ट धरून ठेवला आहे. शिवाला दोनच हात दाखवले असून त्याचा उजवा
हात व्याख्यान मुद्रेत आहे तर दुसर्या हातात त्याने लगूड अथवा लाकडी सोटा
उचलून धरला आहे. गळ्यात नागरूपी हार असून कपाळी अस्पष्टसा असा तिसरा डोळा
दिसतो आहे. हे शिवाचे योगी स्वरूप. ह्याचा एक हात नेहमी वरदमुद्रेत असतो.
लकुलीश शिवाची मूर्ती पद्मासनी अथवा उभ्या अशा दोन्ही प्रकारांत सापडते. लकुलीश
शिव प्रतिमा ही बुद्धासारखीच दिसते. किंबहुना बुद्धप्रतिमेवरूनच शिवाचे हे
रूप तयार झाले असावे. कित्येक महायानकालीन बौद्ध लेण्यांत पद्मपाणी
बुद्धाची अगदी अशीच प्रतिमा कोरलेली आढळते.सभामंडपाच्या डाव्या बाजूला
भिंतीवर कासवावर उभी राहिलेली यमुनेची प्रतिमा कोरलेली आहे. एका हातात तिने
शंख का फूल असे कायसे धरीले आहे तर दुसरा हात सैलसर असा कमरेच्या बाजूला
मुक्त सोडलेला आहे. तिने अगदी तलम वस्त्र नेसलेले नसून यात तिच्या
प्रवाहीपणा प्रकट होतो तर बाजूला एक सेविका दाखवलेली असून वर आकाशगामी
गंधर्व कोरलेले आहेत.लकुलिश यांची कमल मुद्रा त्यांच्या उच्च अध्यात्मिक स्तराचे प्रतिक आहे.
तसेच जागृत लिंग हे त्यांच्या ब्रम्हचारी असण्याचे आणि वीर्य धारण
करण्याच्या शक्तीचे प्रतिक आहे. हे लिंग खुपदा डोक्यापर्यंत दाखवले असते,
जे तेजाचे प्रतिक आहे.
आपल्या माहितीतील लकुलीशाच्या प्रतिमांत
राजस्थानच्या नांद शिवलिंगावर असलेली मूर्ती सर्वांत जुनी आहे. येथे
उष्णीषधारी शिव दोन्ही पाय आसनांवर ठेऊन बसलेला दाखविला आहे (रे. चि.
सत्तावीस २६). मथुरा संग्रहालयांत चंद्रगुप्त विक्रमादित्याचे
वेळेचा एक अभिलिखित स्तंभ आहे. ज्यावर नग्न आणि मुक्तकेश असा दंडधारी
लकुलीश दिसतो (चित्र ५१). मथुरेतूनच मिळालेली जवळजवळ याच काळची दुसरी
प्रतिमा लखनऊ संग्रहालयाच्या एका शिलापट्टांवर आहे. येथें तो सोटा घेतलेला
ऊर्ध्वलिंग तर आहेच पण मांडी घालून बसलेला आहे व त्याने मांडीभोवती योगपट्ट
गुंडाळला आहे. दंड व ऊर्ध्वलिंग लकुलीशाची चिन्हे होत पण
सुरुवातीच्या सर्व प्रतिमात ही समानरूपाने मिळत नाहीत. लकुलीश या शब्दानें
त्याच्याजवळ सोटा असणें अपरिहार्य दिसते (लकुलीश, लगुडीश = लगुडेश; लगुड =
सोटा). हा सोटा म्हणजे गांधार कलेत मिळणाऱ्या शिवाला गदेचे परिवर्धित रूप
असू शकत.
वेरूळ लेणी क्र. २९ मधील पद्मासनस्थ लकुलीश शिवाची मूर्ती
बदामी येथील गुंफेत असलेली चार शिष्यांसह असलेली लकुलीशाची मुर्ती. इथे खाली असलेल्या स्कंदाच्या त्रिशुळातून लकुलिशाची गदा बाहेर निघालेली दिसते.
बोधगया, बिहार येथील दरवाज्याच्या चौकटीवर असलेली सुर्य, शिव आणि लकुलिश यांच्या ७७०- ८१० काळातील मुर्ती ( भारतीय संग्रहालय, कोलकाता)
Lakulisha- this prominent Shaivite revivalist, is the founder of Pashupatha sect of Shaivism. Linga Purana considers him as an avatar of Shiva. Born in Karavan village on the banks of Narmada in Gujarat, he opposed Buddhism & Jainism and restored practices of Hata Yoga & Tantrism. Below is the image of Lakulisha carved on the outer walls of Kudavalli Sangameshwara Temple at Alampur, Telangana buily by Western Chalukya Pulakesi I in 540- 566 AD.
Lakulisha is usually depicted as a naked Yogi. He carries prayer beads, a club (1 in the left hand, unfortunately it is lost), a cup of human skull and accompained by people (2). Characteristically, his images appear with Erect penis (3) (Urdhva Linga). The representation of penile erection illustrates the centrality of Brahmacharya. Controlling the seminal fluid is thought to entain control of all passions & achievement of Yogic sadhana (Supreme asceticism).
चंद्रशेखर शिव
पूर्वजन्मातील
दक्षकन्या सती हिने, हिमावन आणि मेना यांची कन्या गिरीजा म्हणून पुन्हा
जन्म घेतला. ही गिरीजा किंवा पार्वती लहानपणापासूनच शिवभक्तीत लीन होती.
पुढे बाल्यावस्था संपल्यावर मात्र तिने साक्षात शिवाने तिचे पाणिग्रहण
करावे असा हट्टच केला आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.
अश्या अनेक कथा आपल्याला शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण यांसारख्या
पुराणांमध्ये आढळतात. पण जास्त भावलेली कथा म्हणजे शिव पार्वतीच्या कठोर
तपश्चर्येला प्रसन्न होतो. त्या दोघांचा विवाह निश्चित होतो आणि सुरुवात
होते ती लग्नाच्या तयारीची, ती कथा. लग्नाच्या तयारीची कथा तशी कमीच आहे पण
त्यातून संन्यासी शिव हळूहळू कसा आकर्षक चंद्रशेखर बनतो, याचे उल्लेख
आपल्याला मिळतात.
देवांचा देव महादेव, ज्याला आपण सदैव अंगाला चिताभस्म लावलेला, जटांचा केशसंभार असलेला, वाघाची कातडी कमरेला गुंडाळलेला, अंगावर सर्प खेळविणारा बघितला आहे. पण चंद्रशेखर शिव म्हणजे एखाद्या राजकुमाराप्रमाणे तेजस्वी आणि आकर्षक दिसणारा अश्या स्वरूपाचा आहे. नावाप्रमाणेच या प्रकारच्या शिवप्रतिमेत चंद्रकलेला महत्त्व आहे. या मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिवाच्या जटेत खोचलेली चंद्रकोर. ही चंद्रकोर कधी डाव्या, तर कधी उजव्या बाजूस असते. चंद्रशेखर शिवाची प्रतिमा सर्वप्रथम कुषाण राजांच्या नाण्यांवर दिसून येते. देगलूरकर यांच्या मतानुसार, ज्या शिवप्रतिमांच्या जटांमध्ये चंद्रकोर आहे, अशा केवल शिव किंवा उमासहित शिव अशा उभ्या स्थितीतील चतुर्भुज प्रतिमांनाच चंद्रशेखर शिव म्हणून संबोधले जाते. इतर कोणत्याही आसन किंवा स्थानक मूर्तीत शिवाच्या जटेत चंद्रकोर असेल तर ती चंद्रशेखर म्हणून गणली जात नाही. लिंगोत्भव कथेच्या शिल्पंकनामध्येही चंद्रशेखर आढळतो. चंद्रशेखर मूर्तीचे तसे तीन प्रकार सांगितले आहेत. केवल चंद्रशेखर, उमासहित चंद्रशेखर आणि उमामहेश्वर आलिंगन मूर्ती. आज आपण केवल चंद्रशेखर मूर्ती बघणार आहोत.
नावाप्रमाणेच या प्रकारच्या शिवप्रतिमेत चंद्रकलेला महत्त्व आहे. या
मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिवाच्या जटेत खोचलेली चंद्रकोर. ही
चंद्रकोर कधी डाव्या, तर कधी उजव्या बाजूस असते. चंद्रशेखर शिवाची प्रतिमा
सर्वप्रथम कुषाण राजांच्या नाण्यांवर दिसून येते. देगलूरकर यांच्या
मतानुसार, ज्या शिवप्रतिमांच्या जटांमध्ये चंद्रकोर आहे, अशा केवल शिव
किंवा उमासहित शिव अशा उभ्या स्थितीतील चतुर्भुज प्रतिमांनाच चंद्रशेखर शिव
म्हणून संबोधले जाते. इतर कोणत्याही आसन किंवा स्थानक मूर्तीत शिवाच्या
जटेत चंद्रकोर असेल तर ती चंद्रशेखर म्हणून गणली जात नाही.
चंद्रशेखर शिव म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. सुप्रभेदागम, अंशुमदभेदागम, उत्तरकामिकागम, शिल्परत्न या ग्रंथांत शिवाची मुद्रा व आयुधे यांचे वर्णन येते. चतुर्भुज, समपाद स्थानक. तिसरा नेत्र धारण केलेल्या या शिवाचा चेहरा सतेज, प्रसन्न आणि शांत भावांनी युक्त असतो. प्रदक्षिणाक्रमाने त्याचे चार हात उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत. मागच्या उजव्या हातात टंक (कुदळ किंवा फावड्यासारखे आयुध-बहुधा कालौघात त्याची जागा परशुने घेतली असावी), किंवा परशु धारण केलेला आणि डाव्या हातात कृष्णमृग/ काळवीट. त्याला तीन नेत्र असून डोक्यावरील जटेत डाव्या बाजूला चंद्रकोर असते.जटामुकुट अलंकारांनी सुशोभित केलेला आणि त्यावर बारीक चंद्रकोर सजवलेली. त्या जटामुकूटात एक सर्प. चंद्रशेखर शिव हे अतिशय लोभस स्वरूप आहे ज्यात शिव दोन्ही पायांवर समान भार देऊन उभा आहे. ही त्याची समभंग अवस्थेतील मूर्ती त्याचा राजस भाव दर्शविते. व्याघ्रचर्मा ऐवजी पितांबर नेसलेला शिव ह्या मूर्तीत दिसतो. अलंकारांमध्ये मात्र प्रदेश, कालपरत्वे वैविध्य आढळते. तो बरेच वेळा समभंग स्थितीत सरळ उभा असतो. सोबत उमा असल्यास तिच्या हातात कमळ असते. गोपीनाथ राव असे प्रतिपादन करतात की, दक्षिण भारतातील बऱ्याच पाषाण व धातू प्रतिमा आगमांतील वर्णनाबरहुकूम आहेत, तर बॅनर्जी याबाबत पूर्व आणि उत्तर भारतातील शिवप्रतिमांचे उदाहरण देतात. मात्र देगलूरकर यांच्या मते, एकूणच दक्षिणेत चंद्रशेखर मूर्ती कमी आढळतात. शिवाय दक्षिणेतील शिवप्रतिमांच्या मागच्या हातात परशू आणि मृग असतात, तर इतरत्र त्यांची जागा डमरू व त्रिशूळ घेतात, हा महत्त्वाचा फरक होय. उमासहीत मूर्तींचे पुनः दोन प्रकार पडतात; त्यांपैकी एक उमा व शिवाचे साहचर्य दाखवते, तर दुसरी आलिंगन चंद्रशेखर मूर्ती होय. यातील पहिल्या प्रकारात शिव हा उमेसह असतो, मात्र कधीकधी दोघेही स्वतंत्र पीठांवर असतात. आलिंगन मूर्तीत तीन प्रकारचे वैविध्य आढळते; शिवाने त्याच्या डाव्या हाताने उमेला आलिंगन देणे, उजव्या हाताने आलिंगन देणे आणि तिसरा प्रकार म्हणजे दोघांनीही एकमेकांना आलिंगन देणे. श्रीतत्त्वनिधीतील वर्णनानुसार पार्वती ही त्रिभंगावस्थेतच असायला हवी आणि तिच्या उजव्या किंवा डाव्या हातात एखादे फूल (विशेषत: निलोत्पल कमळ) हवे. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीकोनातून जेव्हा आपण ह्या मूर्तीकडे बघतो त्यावेळी शिल्पशास्त्र ग्रंथ, अगमग्रंथ शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाची चर्चा करतात. बारकाईने बघितल्यास त्याच्या हस्तमुद्रा, कर्णाभूषणे, अलंकार, वस्त्र, चेहऱ्यावरील भाव आपल्याला ह्या चंद्रशेखर कथेशी एकरूप करतात.
मुद्रा आणि भाव
ही चंद्रशेखर शिव मूर्ती चार हातांची आहे. तिचा पुढचा उजवा हात अभय
मुद्रेत असतो आणि पुढचा डावा हात वरद मुद्रेत. कधीकधी पुढचा डावा हात हा
कटावलंबित मुद्रेत असतो. मागचे दोन्ही हात हे कर्तरीमुख मुद्रेत असतात.
मागच्या उजव्या हातात परशु आणि डाव्या हातामध्ये हरीण असते. या परशूच्या पात्याचे मुख हे बाहेरच्या दिशेला असते तर मृग शिवाच्या चेहऱ्याकडे बघणारे असते.
नंदिकेश्वराच्या अभिनय-दर्पणया ग्रंथाच्या अनुवादात या
कर्तरीमुख मुद्रेच्या उत्पत्तीची कथा आली आहे. जलंधर वधाच्या आधी शिव
पृथ्वीच्या मध्यावर त्याच्या तर्जनीने कर्तरीमुख मुद्रेत एक वर्तुळ काढतो
अशी ह्या मुद्रेची उत्पत्ती सांगितली आहे. पण मुर्तीशास्त्र ग्रंथांमध्ये
ह्या मुद्रेची माहिती येते. अंगठा आणि अनामिका हे बरोबर तळहाताच्या मध्यावर
आणून अंगठ्याने अनामिका धरलेली असते आणि तर्जनी आणि मध्यमा एकमेकांपासून
लांब, कात्रीच्या स्वरूपात असतात.
या मुद्रेचे अनेक अर्थ होतात परंतु चंद्रशेखर मूर्तीशी जर या मुद्रेचा संबंधातील अर्थ घ्यायचा झाला तर या
मुद्रेचा आणि त्या मुद्रेत धारण केलेल्या आयुधांचा एक विशिष्ट अर्थ प्रतीत
होतो पण त्याची चर्चा आपण भविष्यातील लेखांमध्ये करणार आहोत.
चंद्रशेखर मूर्ती ही मुळातच सोळा वर्षीय तरुणाप्रमाणे दाखवली जाते.
त्याच्या चेहऱ्यावर तरुणाईचे तेज तर असतेच, सोबत शांत, गहिरे भावही स्पष्ट
दिसतात.
अलंकार आणि आभूषणे
शिवाच्या जटांची विशिष्ट केशरचना चंद्रशेखर या
मूर्तीतून दिसते. काही जटा ह्या डावीकडे, काही उजवीकडे आणि काही मधून मागे
गेलेल्या एकावर एक अश्या पद्धतीने व्यवस्थित बांधलेल्या असतात. हा
जटामुकुट सर्पबंधाने बांधून अलंकरणांनी सुशोभित केलेला असतो. खऱ्या अर्थाने
ह्या मुकुटाचे सौंदर्य खुलते ते बारीक पण तेजस्वी चंद्रकोरीने. खरंतर
डोक्यावर चंद्रकोर धारण केलेला म्हणूनच ह्या मूर्तीला चंद्रशेखर शिव असे म्हणतात.
कर्ण अलंकारांमध्ये, एका कानात जी कर्णभूषणे असतात त्यांना रत्नकुंडल,
शंखपत्र किंवा पद्मपत्र म्हणतात. दुसऱ्या कानातील कर्णभूषणांना मकरकुंडल
किंवा पत्रकुंडल म्हणतात.
गळ्यात मोत्याचे मुक्ताहार असावेत, रत्नांनी युक्त रत्नाहार असावेत. या हारांना सुशोभित करणारी पदके असावीत. डाव्या खांद्यावरून येणारे यज्ञोपवित असावे. याशिवाय
छन्नावीरा आणि उदरबंध असावे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कटक असावेत.
बोटं अंगठ्यांनी अलंकृत असावीत आणि पायामध्ये नुपूर असावीत असे
मूर्तीशास्त्र सांगते.
पुराणांतील चंद्रशेखर
चंद्रशेखराच्या मूर्तीचे विशेष आपण बघितले, पण या मूर्तीत हे अलंकार कसे आले आणि मग शिव जे धारण करतो तो सर्प, व्याघ्रचर्म, चिताभस्म गेले कुठे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या कथांचा आधार घ्यावा लागतो. पुराणकथा या जरी
मिथक सांगत असल्या तरी त्यांच्या सहाय्याने प्रतिमेचा, शिल्पाचा किंवा
मूर्तीचा रसास्वाद घेताना अधिक आनंद होतो. त्यामुळे त्यांचे संदर्भ हे
कलात्मक दृष्टीने संकल्पना समजवून घेण्यास सहाय्यक असतात. शिवपुराणामधील
पार्वती खंडामध्ये या चंद्रशेखर रूपाची छोटीशी कथा येते.
शिव-पार्वतीचा विवाह निश्चित होऊन दोन्हीकडे लग्नाची तयारी सुरु आहे.
शिव परिवारात लग्नाची तयारी करण्यासाठी तशी व्यक्ती किंवा स्त्री नसल्याने
सप्तमातृकाच त्यांच्या त्यांच्या परीने विविध गोष्टी शिवापुढे आणून ठेवतात.
शिव त्याच्या स्वाभाविक वेषातच जायचे ठरवतो. पण अंगाला फासलेले चिताभस्म
स्वतःहून चंदनात परावर्तीत होते. कानातील सर्प मनोहारी कुंडलांमध्ये तर
हातातले सर्प केयुरांमध्ये परावर्तीत होतात. अंगावर खेळणारे साप विविध
रत्न-मौतिक आभूषणे बनतात. चर्मवस्त्र पितांबर बनते. भालप्रदेशावरील तिसरा
नेत्र शुभ तिलक बनतो. त्याच्या जटांचा मुकुट होतो, चंद्रमा स्वतः
जटामुकुटात विराजमान होऊन अधिक तेजस्वी होतो आणि शिवाच्या चंद्रशेखर
स्वरूपाचे दर्शन होते.
हे छोटेसे कथा वर्णन आपल्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटवून जाते. आता या वर्णनातील
प्रसंग आणि मूर्ती एकत्रित पहिली की विसंगती वाटत नाही. तात्पर्य इतकेच की
कथेचा भावार्थ लक्षात घेऊन मूर्तीचे परीक्षण करताना त्या मूर्तीची
निर्मिती, त्या मूर्तीमधील तत्त्वज्ञान यांची ओळख पटायला लागते. मूर्तीतील
कलेचा खरा आस्वाद घ्यायला सुरुवात होते.
केवल चंद्रशेखर, थिरुप्पराईथुराई (जि. तिरुचिरापल्ली), तमिळनाडू.
बँकॉकच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात एक द्विभुज चंद्रशेखर मूर्ती आहे.
तिच्या दोन्ही हातांत काक व हरीण आहेत. तिच्या अंगावर पायघोळ वस्त्र,
जानवे व मोजके दागिने आहेत. ओडिशा राज्यात खिचींग (जि. मयूरभंज) येथील
शिवप्रतिमा रूढ संकेतांनुसार नसली तरी अतिशय सुंदर आहे. उभ्या शिवाच्या
मागील दोन हातांत अक्षमाळा आणि त्रिशूळ आहेत. खालचा उजवा हात भंगलेला असून
डाव्या हातात कवटी आहे. लाखामंडळ (डेहराडून) येथील आलिंगन चंद्रशेखराची
गुप्तकालीन मूर्ती त्रिभंगी असून त्यांच्या मागे नंदी आहे; तो आपले तोंड
पुढे आणून त्यांच्याकडे पाहत आहे. या शिवाने आपल्या खालच्या उजव्या व
वरच्या डाव्या हातात मिळून वीणा धारण केली आहे. वरच्या उजव्या हातात बहुधा
त्रिशूळ असावा. खालचा डावा हात पार्वतीच्या पाठीवरून खाली स्तनापर्यंत आला
आहे. पार्वतीच्या दोन्ही हातांत मिळून माला आहे. शिवाच्या अंगावर कुंडले,
कंठा, केयूर, मेखला इ. दागिने आहेत. पार्वतीच्याही अंगावर अनेक दागिने
आहेत. कर्नाटकातील अंगूर (जि. बळ्ळारी) येथे एक सुरेख आलिंगन चंद्रशेखर
प्रतिमा आहे. शिवपार्वती त्रिभंगावस्थेत आहेत. शिवाने जपमाळ, त्रिशूळ, डमरू
धारण केलेले असून एक हात उमेच्या खांद्यावर आहे. तिनेही आपला उजवा हात
शिवाच्या खांद्यावर ठेवला आहे आणि डाव्या हातात कमळ धारण केले आहे.
आजूबाजूला स्कंद व गणेश आहेत. ही प्रतिमा अकराव्या-बाराव्या शतकातील आहे.
महाराष्ट्रात आटपाडी (जि. सातारा) येथे एक आलिंगन चंद्रशेखराची मूर्ती आहे.
ती तेथील कल्लेश्वराच्या देवळात एका बाजूस ठेवलेली आहे. सुमारे तीन फूट
उंचीच्या या शिल्पात दोन्ही देवता उभ्या आहेत. शंकर चतुर्भुज आहे;
प्रदक्षिणाकर: क्रमाने पहिल्या तीन हातांत अक्षमाला, त्रिशूळ आणि नाग असून
खालचा डावा हात पार्वतीस आलिंगन देत आहे. त्यांच्या उजवीकडे नंदी आहे.
Blackstone Sculpture of Mahadev Shiv as Mrityunjay:
Dated: 12th Century, Bengal (India)
This is an extremely rare representation of Shiv ji as Mrityunjay, the destroyer of death and disease. He is shown deep in meditation in yogic form, as indicated by his interlocked legs and resting hands.
The Uttarakamika, a ritual and iconographic text (agama), dictates that he should be represented in a tranquil state with three eyes, six arms, and matted dreadlocks (jatamukut) adorned with the crescent moon. He displays a rosary and a water vessel, and his two missing hands would have held his trident (trishul) and a skull bowl (kapal), completing the ritually required iconography.
A chain garland hangs below his legs (the text speaks of a garland of skulls). He is flanked by female attendants bearing fly-whisks and the hybrid bird-humans kinnara and kinnari, who provide music about his head.
Celestial garland bearers hover above. His throne is a lotus pedestal with a makara-finial throne back. His devotee the bull kneels at lower left; the donor figure, at lower right.
महादेव म्रुत्यंजय मुर्ती :-
मृत्युंजय, मृत्यू आणि रोग यांचा नाश करणारे शिवजींचे हे अत्यंत दुर्मिळ रूप आहे. त्याला योगिक स्वरूपात खोलवर ध्यान करताना दाखवण्यात आले आहे, त्यांचे वज्रासन आणि जोडलेल्या हातांनी हेच सूचित केले आहे.
उत्तरकामिका, एक विधी आणि प्रतिमाशास्त्रीय मजकूर (अगामा), त्याला तीन डोळे, सहा हात आणि अर्धचंद्राने सुशोभित मॅटेड ड्रेडलॉक्स (जटामुकुट) शांत अवस्थेत प्रस्तुत केले जावे असे सांगते. तो एक जपमाळ आणि पाण्याचे भांडे दाखवतो आणि त्याच्या दोन हरवलेल्या हातांनी त्याचे त्रिशूल (त्रिशूल) आणि कवटीची वाटी (कपाल) धरलेली असते, ज्याने विधीनुसार आवश्यक प्रतिमाशास्त्र पूर्ण केले असते.
त्याच्या पायांच्या खाली एक साखळी हार लटकलेली आहे (मजकूर कवटीच्या मालाबद्दल बोलतो). त्याच्या पाठीशी माशी-विस्क असलेल्या महिला परिचारक आणि संकरित पक्षी-मानव किन्नरा आणि किन्नरी आहेत, जे त्याच्या डोक्यावर संगीत देतात.
स्वर्गीय पुष्पहार वाहक वरती फिरतात. त्याचे सिंहासन हे कमळाचे पीठ असून त्याच्या पाठीमागे मकर-अंतिम सिंहासन आहे. त्याचा भक्त बैल खालच्या डावीकडे गुडघे टेकतो; दात्याची आकृती, खालच्या उजवीकडे.
रुद्राय नमः -
देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. पिनाकपाणी रुद्र या देवतेसाठी ऋग्वेदामध्ये तीन ऋचा संकलित केल्या आहेत. हा रुद्र भयानक, उग्र आणि विनाशकारी आहे. पण सोबतच तो मांगल्याचेही प्रतिनिधित्व करणारा म्हणून ओळखला गेला आहे. अनेक वेगवेगळ्या उल्लेखातून रुद्राच्या व्यक्तित्वाची संकल्पना स्पष्ट होताना दिसते. हा गौरवर्णाचा तेजस्वी युवक आहे ज्याची कांती सुवर्णालंकारांनी तेजोमयी झाली आहे. ज्याच्या हातामध्ये पिनाक नावाचे धनुष्य आहे आणि सोबत तीक्ष्ण आणि तीव्र वेगाचा असा बाण आहे. या रुद्राचा देह पुष्ठ आहे आणि त्याचे हात शीतलता देणारे, जीवनदायी आहेत असा उल्लेख येतो. कारण रुद्र वैद्य असून तो जलाष नावाच्या दिव्य औषधीने उपचारही करतो. मूजवान पर्वतामध्ये याचे निवासस्थान आहे. मरुत गणांचे पितृत्व हे रुद्राकडे आहे पण पुढे अथर्ववेदात हे मरुत रुद्राचे सहचारी म्हणून येतात.
यजुर्वेदातील शतरुद्रीय, रुद्राच्या शभंर विविध रूपाची ग्वाही देतो. तैत्तिरीय संहितेमध्ये रुद्राच्या नावाचा संबंधित अतिशय रोचक असा कथाभाग आहे. देव-दानव ह्यांच्या युद्धामध्ये देव त्यांची संपत्ती अग्नीकडे ठेवतात. युद्धानंतर ती संपत्ती परत घेण्यासाठी देव येतात तेव्हा अग्नी रडतो. अग्नी रडला म्हणून त्याला रुद्र म्हटले आहे. इथे अग्नी आणि रुद्र यांचा संबंध आपल्याला दिसतो. शतपथ ब्राह्मणामध्ये मात्र रुद्रचा अर्थ होतो रडवणारा. उपनिषदांमध्ये रुद्राचे महेश्वर असे वर्णन येते. महाभारतातील अनुशासन पर्वात रुद्र हे शिवाचे रौद्र तर शिव हे शांत स्वरूप म्हणून सांगितले आहे. याच महाभारतामधील शांती पर्वामध्ये दक्ष, शिवाची स्तुती करतानाचा उल्लेख रुद्राच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रु म्हणजे संकट आणि द्र म्हणजे द्रावण करणारा म्हणजेच तो संकटे दूर करणारा रुद्र असा उल्लेख दक्ष करतो. अठरा महापुराणांपैकी मत्स्य, वायू, लिंग, शिव पुराणातही या रुद्राचे उल्लेख सापडतात. पुराणांमध्ये शिव कल्याणमय आणि भक्तवत्सल रूपात साकार होतो. इथे मात्र हा भीषण रुद्र त्याचे आधिपत्य ईशान हे मंगलमयी रूप दर्शवतो.
रुद्र देवतेचे स्वरूप बहुतांशी शिव स्वरूपाच्या जवळ जाणारे आहे. रुद्र हाच त्र्यंबक आहे. त्रि + अंबक म्हणजे तीन नेत्र धारण करणारा असा अर्थ होतो. अग्नीशी संबधित असल्याने या रुद्राचा तिसरा नेत्र म्हणजे अग्नी आहे. रुद्र हा जटाधारी आहे. अनेक ठिकाणी रुद्राचा उल्लेख कपर्दिन असा येतो. कपर्द म्हणजे जटा. रुदाला नवनिर्मितीचा कारक मानला आहे. त्याला वृषभ हे विशेषण येते. त्यामागेही हेच कारण आहे कि रुद्राकडे अपरिमित शक्तीचा संचार आहे. तो पुनरोत्पत्तीचा देव मानला गेला आहे.
भव आणि शर्व अश्या दोन नावांचा उल्लेख या रुद्राच्या संदर्भात येतो. अथर्ववेदाच्या सुरुवातीला भव आणि शर्व या दोनही देवतांचे एकत्रित स्तवन केले आहे. येथे त्यांना श्रेष्ठ धनुर्धर या उपाधीने गौरविण्यात आले आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये अग्नीच्या अशांत रूपाला भारताच्या पूर्वेकडे म्हणजे बिहार भागात शर्व म्हणत तर पश्चिमेला भागात भव या नावाने पूजले जात, असा उल्लेख येतो. या दोघांना भूपती आणि पशुपती असे संबोधनही आलेले दिसते. भव आणि शर्व ह्या दोन स्वतंत्र देवता असल्या तरी त्यांचा अग्नीशी असलेला संबंध रुद्र स्वरूपाच्या जवळ जाणारा आहे. श्वेताश्वर उपनिषधात रुद्राचा उत्कर्ष साकार होतो आणि तो योगेश्वरत्व प्राप्त करतो.
प्राचीन ग्रंथातून उमटणाऱ्या भयानक रुद्राच्या संकल्पना पुराणकाळापर्येंत येताना शिव या सौम्य स्वरूपात विलीन होतात दिसतात. पुराणांनी शिवाचे मांगल्य उचलून धरले आणि आपल्यासमोर उभा राहिला तो सर्वमंगलकारी शिव. रुद्र रूपाने झंझावातासारखा येणारा हा महोदेव उन्नत होऊन चराचरात संचार करणारा महादेव होतो. हा पिनाकपाणी रुद्र म्हणजे शिवाचे अलौकिक रूप आहे जो विनाश आणि सृजन ह्याचे एकत्व दाखवतो.
शिवपार्वती :-
आतापर्यंत आपण भगवान शिवांच्या एकल मुर्ती आणि त्यांचा अर्थ समजावून घेतला. आता शिवशंकरांच्या पत्नी पार्वतीसह असलेल्या मुर्तीविषयक अधिक माहिती घेउया.
अलिकडच्या काळात आपण आपल्या देशातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ किंवा खरेतर ‘व्हॅलेंटाईन सप्ताह’ साजरा करताना बघतो. यामध्ये ‘रोझ डे’, ‘टेडी डे’, ‘चॉकलेट डे’ वगैरे कसले कसले ‘डेज्’ साजरे केले जातात. ‘रोझ डे’ला गडद लाल रंगांचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करायचे. ‘प्रॉमिस डे’ हा प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या. ‘प्रोपोज डे’ आपल्या प्रेमाची कबुली देऊन, लग्नाची मागणी घालायची. प्रेमी युगुलांसाठी हा एक सणच म्हणा. प्रेम करणे, प्रपोज करणे नवीन का आहे? मानव पृथ्वीवर अवतरण्याच्या आधीपासून ‘प्रपोज डे’ आहे.
मानवांमध्ये, देवांमध्ये मात्र मनपसंत जोडीदाराला ‘प्रपोज’ करणाऱ्यांमध्ये आद्य प्रेमिका आहे – उमा!
शिव अर्धांगिनी उमा म्हणजेच पार्वती. हिमवान आणि मेना यांची कन्या पार्वती आणि शिव यांचा विवाह होतो आणि उमा, त्या महेश्वराची पत्नी होते. शिवतत्त्व हे या मनुष्यरूपी उमापेक्षा खूप भिन्न आहे. उमेचा जन्म शिवतत्त्वाशी एकरूप होण्याकरिता योजला होता. पूर्वजन्मात दक्ष कन्या सती आणि मग तीच पार्वती रूपात पुन्हा जन्म घेऊन शिवपत्नीत्व स्विकारते. शिवा आणि शिव यांच्या एकत्वाची साक्ष अर्धनारीश्वर स्वरूपात साकार होते. पण उमा महेश्वर मूर्तीत उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवाशी जोडले जात आहे अश्या स्वरूपात साकार होते. उमा महेश्वर म्हणजे संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप आहे. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो.
हिमवान् पर्वताची कन्या पार्वती. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या! ही गिरीकन्या गिरीजा, आकंठ प्रेमात पडली! कुणाच्या? तर अंगाला भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढवलेल्या एका कफल्लक जोग्याच्या! त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी! पण, पार्वती काही बधली नाही. तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले. पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले, तेव्हा तिला ‘अपर्णा’ नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वत: पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती आदर्शच म्हणायला हवी.
शंकर तर ध्यान लावून बसलेले. त्यांना या कशाचाच पत्ता नाही! इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार! पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली, “जा रे, तू तरी शंकराला ध्यानातून जागे कर. तुझ्या मदनबाणाने त्याला घायाळ कर! म्हणजे तो पार्वतीशी विवाह करायला उत्सुक होईल!” कामदेवाने त्याचा उसाचा गोड धनुष्य घेतला, भात्यात पाच प्रकारचे मदनबाण घेतले आणि कैलासावर पोहोचला. त्याने शंकरावर मदनबाण सोडताच शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले! (शंकराचा राग उतरल्यावर, कामदेवाच्या पत्नीने रतीने, शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जीवंत केले. कामदेवाला जिथे पुन्हा शरीर प्राप्त झाले, नवीन रूप मिळाले तो प्रांत ‘कामरूप’ या नावाने प्रसिद्ध झाला. जो आज आपण ‘आसाम’ म्हणून ओळखतो.)
आत्ता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. “तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला न घर ना दार. कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल! त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का!” शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला! त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला!
फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे! वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखून दिले. ‘प्रपोज’ केल्यावर ‘नाही’ म्हटले म्हणून किंवा उपभोग घेऊन स्त्रीला जाळले गेले. अशा घटना वाचून सांगावेसे वाटते की, स्त्रीला नाही, कामवासनेला जाळायचे असते. स्वत:च्या ‘Lust’ ला जाळायचे असते. पण, हे शिकवणार कोण? शिवपुराणातील ही शंकराची कथा हे शिकवण्यासाठीच लिहिली आहे. लहानपणापासून पुराणातील या गोष्टी सांगितल्या-ऐकल्या तर संस्कार होतील आणि याचसाठी आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत, तर आजही ‘रिलेव्हन्ट’ आहेत. त्यातील धडे आजही गरजेचे आहेत.
शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई-वडील आलेत. विवाहाला स्वत: ब्रह्म पुरोहित म्हणून आला आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. मंगल वाद्ये वाजत आहेत. वधू-वर दोघेही किंचित संकोचलेले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वरच्या हातात द्यायच्या ऐवजी, चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे! चुकलं का काही पुरोहिताचे? की पार्वतीने लग्नात शंकराचा हात मागितला असे सुचवायचे आहे?
प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिव-पार्वतीने घालून दिले आहेत. शंकर उगीच फोनमध्ये किंवा पेपरमध्ये डोके खुपसून बसणारा किंवा लग्नाच्या आधी गणांसोबत रमायचा तसे तासन्तास त्यांच्यात रमणारा नवरा नाहीये. पार्वती पण आपल्या माहेरच्या वैभवाचे गुणगान करणारी बायको नाही. दोघे एकमेकांना वेळ देतात. गप्पागोष्टी करतात. आपल्या मनातील गुज सांगतात. एकत्र फिरायला जातात. कित्येक कहाण्यांची सुरुवात ही ‘एकदा काय झालं? शंकर पार्वती विमानातून जात होते’ अशी होते. इतकंच काय, दोघे मिळून सारीपाटाचा डावसुद्धा खेळतात. एकदा सारीपाट खेळताना शंकर सारखा जिंकला, तेव्हा पार्वती खट्टू झाली. मग शंकर एक डाव मुद्दाम हरला, त्या डावात पार्वतीने त्याचा नंदी जिंकून घेतला आणि आपल्या सख्यांकडून तिने नंदी आणवून घेतला!
लक्षात घेण्यासारखे आहे बरे, पार्वती कधीच एकटी नसते. तिच्याबरोबर कायम तिची सखी असते. सखी-पार्वती अशी जोडगोळीच आहे. तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणी असतात. ‘माझे मूड, माझ्या स्त्रीमनातील तरल संवेदना’ वगैरे नवऱ्याने समजून घेतल्याच पाहिजेत, असा तिचा आग्रह नाही. शॉपिंगला नवऱ्याने आलेच पाहिजे, अशी तिची अपेक्षा नाही. अशा तिच्या गरजा पण नाहीत. कारण, तिला मैत्रिणी आहेत. जीवाभावाच्या, साथ देणाऱ्या, तिच्या तक्रारी ऐकून घेणाऱ्या, उपाय सुचवणाऱ्या आणि तिची चूक असेल तर ती चूक दाखवून देणाऱ्यासुद्धा.
आता संसार म्हटला की, भांडणे आलीच! शंकर-पार्वती असले म्हणून काय झालं? एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला. पण द्वारपालांनी त्याला अडवले. ‘अंदर की बात’ अशी की, शंकर-पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती. रागावून, तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, “मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो!” रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी, यक्ष-गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो!
शिव-पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार पण आलेत. आता हा गंगावतरणाचाच प्रसंग पाहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय, या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, “अगं, जाऊ नकोस. तू समजतेस असे काही नाही! या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच!”
शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. ‘ऑफिसचा स्ट्रेस’ घरी आणून बॉसचा राग तो बायकोवर काढत नाही. घरी तो अतिशय शांत, सुस्वभावी, प्रेमळ आणि भोळा नवरा आहे. संसारात, मुलाबाळात रमणारा गृहस्थ आहे. एखाद्या रविवारी सकाळी जर पार्वतीने “अहो! किती रद्दी साठली आहे, तेवढी टाकून येता का?” असे म्हटले तर तो शांतपणे, “येताना भाजी आणायची का?” असे विचारून रद्दीची पिशवी घेऊन जाईल! शंकर-पार्वती आणि त्यांची दोन मुले हे चौकोनी कुटुंब आहे. अशा कुटुंबवत्सल शंकराचे वर्णन करताना संत कृष्णसुत म्हणतात-
या दैवी जोडप्याच्या संसारात, पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे, समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव! तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला. तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पट्कन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्याचा कंठ विषाने काळानिळा झाला. कर्पुरासारख्या गौरवर्णीय शंकराला ‘नीलकंठ’ नाव मिळाले. शंकर-पार्वतीचा संवाद तर दैवी आहे!
कधी पार्वतीने म्हणावे, “मला किनई आज अगदी बोअर झालंय गडे! एखादी गोष्ट सांगा ना!” की लगेच शंकराने तिला विद्याधर राजांच्या सात भल्यामोठ्या रोमांचकारी कहाण्या सांगाव्यात. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात, ते गीतातत्त्व आहे तरी काय? तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, “देवी, तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही. तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करू जावे, तर रोज नवीनच आहे असे दिसते!”
तेथ हरू म्हणे नेणीजे । देवी जैसे का स्वरूप तुझे । तैसे हे नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ॥ ज्ञा. १.७१ ॥
त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले, तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे, ‘गिरिजापती’, ‘उमाकांत’, ‘पर्वतीपती.’ पण, पार्वतीची मात्र स्वत:ची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा! ती कधी स्वत:ची ओळख, ‘मी शंकराची भार्या’ अशी करून देत नाही. पहा तर या शिल्पात शंकरदेखील हेच सुचवत आहे – शक्तीशिवाय मी अचेतन शव आहे! पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे!
सहजच भारतातील ‘व्हॅलेंटाईन डे’ हा शिव-पार्वतीच्या स्मरणाने होतो. लग्नाच्या आधी वधू गौरीहराची पूजा करते ते याकरिता की, माझा संसार शिव-पार्वतीच्या संसारासारखा होवो! लग्नानंतर पहिली पाच वर्षे नवरी श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करते. ते देखील यासाठी की, गौरीने प्रसन्न होऊन माझा प्रपंच नेटका करावा! पार्वती जशी शंकराच्या गळ्यातील ताईत झाली, तालिका झाली तसे पत्नीने नवऱ्याच्या गळ्यातील ताईत व्हावे, म्हणून विवाहिता दर वर्षी हरतालिकेची पूजा करते. हे सगळे आपल्याकडचे प्रेम साजरं करायचे ‘डेज’ आहेत. सेंट व्हॅलेंटाईनच्या कित्येक शतके आधीपासून आपल्याकडे प्रेमाचे ‘डेज्’ साजरे केले जात आहेत. या ‘डेज्’ ना शिव-पार्वतीच्या कथेची पार्श्वभूमी लाभली आहे.
शिव-पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक, प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे. शिव-पार्वती नुसतेच ‘प्रपोज’ करायला शिकवत नाहीत, तर ‘प्रपोज’ करणाऱ्याची/करणारीची परीक्षा घ्यायला शिकवतात. ‘प्रपोज’ करणारा/करणारी परीक्षेत पास झाली तरच ‘हो’ म्हणायचे हे शिकवतात. नुसतेच ‘एकमेकांवर प्रेम करत फिरा,’ असे शिकवत नाहीत, तर ते विमानातून फिरताना कोणी दु:खी कष्टी दिसले, तर तिथे थांबून त्याची चौकशी करून त्याला मदत करायला शिकवतात. नुसतेच लग्न करायला शिकवत नाहीत तर ते निभवायला शिकवतात. नवरा – बायकोची बरोबरी शिकावात. “गप गं! तुला काय कळते यातले!” असे न म्हणता बायकोचे ऐकायला शिकवतात आणि नवरा-बायकोचे अद्वैत शिकवताना दोघांना पुरुष-प्रकृतीच्या पातळीवर घेऊन जातात.
शिव पार्वतीच्या मुर्तीचे अंकन :-
उमा महेश्वराच्या अश्या अलौकिक प्रेमबंधाला शिल्पकारांनी शिल्पांमध्ये तर कवींनी काव्यबद्ध केले आहे. महाकवी कालिदासरचित कुमारसंभव हे माधुर्ययुक्त काव्य पार्वती-परमेश्वराला समर्पित आहे. चंद्रशेखर रूपातील राजस शिव, कोमलकांती हैमावतीचे पाणिग्रहण करतानाची, कल्याणसुन्दर मूर्ती या दोघांच्या मनातल्या मदनरंगाचे सुंदर चित्रण साक्षात समोर उभे करते. चंद्रशेखर शिव मूर्तीच्या विविध छटा या केवल
चंद्रशेखर, कल्याणसुन्दर मूर्ती, उमासहित चंद्रशेखर, आणि सोमस्कंद
मूर्तींमध्ये साध्य होतात. परंतु उमा-महेश्वर आलिंगन मूर्ती
शिव-पर्वतीमधल्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणारी मूर्ती आहे.
Huvishka Coin Obverse हुविष्क काळातील नाणे Uma-Mahehswara Reverse
मागच्या बाजुला असलेले उमा महेश्वर
उमा महेश्वराचे प्राचीन अंकन, कुषाण राजा कनिष्क याचा वारस,
हुविष्कच्या नाण्यावर येते. डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या भारतीय नाणकशास्त्र
मध्ये शिव आणि उमा यांची हुविष्कच्या नाण्यावरील अंकनाबद्दल माहिती मिळते.
या नाण्याच्या दर्शनी बाजूस शिरस्त्राण आणि अलंकारांनी युक्त
राजाचा अर्धपुतळा आहे. त्याच्या हातामध्ये राजदंड आहे. नाण्याच्या कडेने
ग्रीक लिपीमध्ये शावनानो शाओ उएष्की कोशानो असा लेख आहे. दुसऱ्या बाजूस, शिव
आणि उमा एकमेकांच्या समोर उभे आहेत. शिवाच्या मागे प्रभावलय आणि डोक्यावर
जटाभार आहे. अंतरीय नेसले असून शिव चतुर्भुज आहे. डाव्या हातामध्ये
त्रिशूळ, मृग (?) आणि उजव्या हातामध्ये अंकुश आणि कमंडलू आहे. उमेने ग्रीक
पद्धतीचा वेश परिधान केला असून ती द्विभुज दाखवली आहे.
म्हैसूरचे राजा कृष्णराजा 3 ओडेयर इ.स. 1799–1868 यांच्या नाण्यावर
उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे अप्रतिम अंकन आहे. शिव सव्य-ललीतासनात बसले
असून उमा त्यांंच्या मांडीवर आसनस्थ झाली आहे. मागे शिवाकडे त्रिशूल आहे
आणि उमेच्या बाजूस एका मृगाचे अंकन आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर श्री कृष्णराजा हा लेख आहे.
डॉ. नि. पु. जोशी यांच्या भारतीय मूर्तीशास्त्र यात गुप्तकालीन
शिव-पार्वतीची मूर्ती मथुरा संग्रहालयात असलेल्या मूर्तीचा उल्लेख आहे.
तसेच कुमारगुप्ताच्या काळातील अभिलेखीत मूर्ती कौसंबी इथे सापडल्याची नोंद
आहे. या दोनही मूर्ती आलिंगन मुद्रेत नसून केवळ जवळ उभ्या आहेत. शिवाच्या
डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. उजव्या हातामध्ये अक्षमालेसह अभय मुद्रा आहे
आणि उमेच्या हातामध्ये दर्पण आहे. डॉ. गो. बं. देगलूकर यांच्या शिवमूर्तये नमः मधेही उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे विवेचन येते. उमा महेश्वर या दम्पतीच्या आलिंगन मूर्ती भारतभर सापडतात. उमा महेश्वर आलिंगन मूर्ती या स्थानक म्हणजे उभ्या, तर कधी आसनस्थ म्हणजे बसलेल्या असतात. शिल्पकारांनी या मूर्ती घडवताना वापरलेल्या वेगवेगळ्या रचनात्मक पद्धती या शिल्पांमधून बघायला मिळतात. स्थानक म्हणजे उभ्या शिल्पामध्ये उमा महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे असतात. सुंदर वस्त्रे दम्पतिनी परिधान केलेली असतात. आभूषणे आणि अलंकार यांनी दोघांचे देह शोभिवंत असतात. पार्वतीची विलोभनीय केशसज्जा असते आणि शिवाच्या डोक्यावर सुव्यवस्थित असा जटामुकुट असतो. चंद्रशेखर शिव काही शिल्पांमध्ये दाखवतात. उमा द्विभुज असून तिचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये नीलोत्पल किंवा पुष्प असते. क्वचित उमेच्या दुसऱ्या हातामध्ये आरसाही असतो. शिव चार हातांचा दाखवतात. रूपमंडन या ग्रंथामध्ये आलिंगन मूर्तीचे वर्णन आले आहे. त्याच्या मागच्या दोन हातांमध्ये त्रिशूळ आणि सर्प असतो तर मागच्या हातामध्ये कधी डमरू किंवा कपाल धरलेला दाखवतात. पुढच्या दोन हातांमधील उजव्या हातामध्ये कधी पुष्प असते तर कधी मातुलिंग किंवा क्वचित अक्षमाला ही दाखवतात. शिवाचा डावा हात उमेला आलिंगन देणारा असतो. काही शिल्पांमध्ये उमेच्या खांद्यावर शिवाचा हात स्थिरावलेला दाखवला आहे.
९ व्या शतकात मध्य प्रदेशात सापडलेली उमा-महेश्वर मुर्ती
उमा महेश्वर यांच्या आसनस्थ म्हणजे बसलेल्या शिल्पांमध्ये अतिशय सुंदर भाव शिल्पकाराने शिल्पित केले आहेत. शिव पार्वतीच्या बसलेल्या शिल्पांमध्ये कधी त्यांचे आसन भद्रपीठ असते तर कधी ते नंदीच्या पाठीवर विराजमान असतात, असे दाखवतात. शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली दाखवातात. या आलिंगन शिल्पांमध्ये शिव पार्वतीसोबत नंदी, गण, कार्त्तिकेय, गणेश, भृंगी, गंधर्व आणि अप्सरा यांचेही अंकन केलेले असते. या आलिंगन मूर्तीमध्ये उमा महेश्वर एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात, त्या दोघांनाही जणू काही त्याच्या आजूबाजूला असलेल्या संसाराचा पूर्णतः विसर पडला आहे. सलज्ज पार्वतीच्या नयनांचे सुख अनुभवण्यासाठी शिव आपल्या हाताच्या बोटांनी तिची हनुवटी हलकेच वर करीत आहे, अशी शिल्पे दैवी शृंगार रसाचे दर्शन घडवतात. उमा महेश्वरांच्या चेहऱ्यावरील स्मित, आत्मिक आनंद, डोळ्यांचा कटाक्ष, हातांचा स्पर्श, देहबोली हे सर्व विभाव या शिल्पांमधून शृंगार ही भावना प्रकट करतात. जगन्माता आणि पिता यांचा हा दैवी शृंगार एका अलौकिक अनुरागाचे मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रतिक रूपात शिल्पबद्ध झाला आहे.
अकराव्या शतकात पाल राजवटीतील, बिहार येथील उमा-महेश्वर मुर्ती
अश्याच उमा महेश्वर मूर्तींच्या अद्वितीय प्रेमाचे साक्षात दर्शन आपल्याला मथुरा, नाचणा, लातूर येथील निलंगा, नांदेड येथील कंधार, घारापुरी, वेरूळ, पट्टडकल आणि उत्तरेपासून अगदी दक्षिण भारतापर्येंत आणि भारताबाहेरही सर्वत्र सापडते.
शिल्पशास्त्र अश्या मूर्तीचा निर्माण करण्याचे निर्देश सांगते ते असे-
पत्नी उमा, शंकरासोबत आहे. ज्याच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग
आणि त्रिशूल आहे. डाव्या हाताने उमेला आलिंगन दिले आहे आणि दुसऱ्या
हातामध्ये नागेंद्र आहे. उमेचा एक हात शिवाच्या स्कंदावर (खांद्यावर)
स्थिरावला आहे आणि तिच्या दुसऱ्या हातामध्ये दर्पण आहे.
दहाव्या शतकातील उमा-महेश्वर मुर्ती ( राणी दुर्गावती वस्तुसंग्रहालय, जबलपुर , मध्य प्रदेश )
शिल्पकलेतील काही अंकनात उमा आणि महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे
असतात. बऱ्याचदा महेश्वर सव्य-ललीतासनात बसलेले आणि त्यांच्या डाव्या
मांडीवर उमा बसलेली दाखवतात. कधी ते नंदीवर आरूढ असतात तर कधी शिवाच्या
पायाशी नंदी आणि उमेच्या पायाशी सिंह किंवा गोधा (घोरपड) दाखवतात. शिव
चतुर्भुज असून त्याच्या हातामध्ये मातुलिंग किंवा अक्षमाला, त्रिशूळ आणि
सर्प असतो. एका हाताने त्याने उमेला आलिंगन दिलेले असते. उमेचा एक हात
शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये दर्पण किंवा उत्पल असते.
क्वचित उमाही चतुर्भुज अंकित केलेले असते. या अश्या अनेक मूर्ती सध्या
भग्नावस्थेत आहेत. तरीही या पाषाणांच्या अंतरातले लालित्य शिल्पकाराने
साकारलेले होते याची निश्चितच जाणीव होते. काही मूर्तीमध्ये शिव त्याच्या
हाताने सलज्ज उमेच्या हनुवटीला हलका स्पर्श करून तिचा चेहरा वर उचलत आहे
असे दिसते. उमा महेश्वराच्या लोचनांचे झालेले मिलन होऊन त्यांना पडलेला
सृष्टीचा विसर या शिल्पांतून दिसतो. अश्याच उमा महेश्वर मूर्तींच्या
अद्वितीय प्रेमाचे साक्षात दर्शन आपल्याला मथुरा, नाचणा, लातूर येथील
निलंगा, नांदेड येथील कंधार, घारापुरी, वेरूळ, पट्टडकल आणि उत्तरेपासून
अगदी दक्षिण भारतापर्येंत सर्वत्र असंख्य ठिकणी घडत राहते. शिवपार्वतीच्या
मुग्ध स्नेहाचे, उमामहेश्वराय नमः हे स्वर काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून सतत मधून उमटत राहतात.
उमा-महेश्वरमूर्ती अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे त्यात स्थलकालपरत्वे पुष्कळ वैविध्य आढळते. काही ठिकाणी शिव आणि पार्वती दोघांचेही हात एकमेकांच्या गळ्यात असतात, तर काही ठिकाणी पार्वतीचा केवळ उजवा हात शंकराच्या मांडीवर असतो. कधी पार्वती शिवाच्या मांडीवर बसलेली असते, तर कधी शेजारी. ‘हनुस्पर्श’ प्रकारात शंकर डाव्या हाताने पार्वतीला आलिंगन देतो आणि उजव्या हाताने तिच्या हनुवटीला स्पर्श करत असतो. गंगाधर शिव-पार्वतीच्या प्रतिमेत स्वर्गातून शंकराच्या मस्तकावर अवतरणारी गंगा व शेजारी पार्वती असे दृश्य आढळते. या प्रकारच्या प्रतिमा भारतात कमी असल्या, तरी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. लिंगारूढ उमा-महेश्वर प्रतिमा मध्य भारतात सापडल्या आहेत. दक्षिण भारतात काही ठिकाणी उमेचे वाहन म्हणून गोधा (घोरपड) दाखवतात.
उमा-महेश्वरमूर्ती साधारणतः सातव्या-आठव्या शतकापासून तेराव्या
शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर घडवलेल्या आढळून येतात. त्यासाठी
स्थलकालपरत्वे बेसाल्ट, ग्रॅनाइट, वालुकाश्म, संगमरवर असे विविध प्रस्तर
आणि पितळ, कांस्य व मिश्रधातूंचा वापर केलेला दिसून येतो.
उमामहेश्वरमूर्तीची काही निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे : १. कुंभेश्वर, गौरिधारा (नेपाळ) येथील बाराव्या शतकातील उमामहेश्वराच्या मूर्ती उभयता चतुर्भुज आहेत. २. नेपाळ येथीलच आणखी एका शिल्पात शंकर अठरा हातांचा असून पार्वती मात्र द्विभुज आहे. ही मूर्ती सध्या जर्मनीत आहे. ३.
कनौज (उत्तर प्रदेश) येथील पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयातील प्रतिहारकालीन
मूर्ती. यात पार्वतीच्या मांडीवर बाळ स्कंदही असून ही मूर्ती बरीचशी
भंगलेल्या अवस्थेत आहे. ४. उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळ येथील
गुप्तकालीन मूर्ती. येथे शिव आणि पार्वती दोघेही द्विभुज असून पादपीठावर
कुमारगुप्ताच्या काळातील लेख कोरला आहे. ५. पाटणा (बिहार) वस्तुसंग्रहालयात काही उमामहेश्वर प्रतिमा आहेत. ६.
छत्तीसगढमध्ये मिळालेल्या काही मूर्तींमध्ये पार्वती चतुर्भुज आहे. अशी
काही शिल्पे मल्हार संग्रहालय, बिलासपूर आणि आय. के. एस्. युनिव्हर्सिटी
संग्रहालय, खैरागढ येथे आहेत. ७. गौरीशंकर मंदिर, भेडाघाट, मध्य प्रदेश येथे गौरीशंकर मंदिरात वृषभारूढ शिवपार्वती आहेत. ८. वृक्षाखाली बसलेले उमामहेश्वर या प्रकारची एक प्रतिमा भरतपूर, राजस्थान येथील संग्रहालयात असून एक इंदूरच्या संग्रहालयात आहे. ९.
वाराणसी, खजुराहो या भागांमध्ये लिंगारूढ उमामहेश्वराच्या प्रतिमा
प्रचारात असाव्यात. अशा प्रकारच्या प्रतिमा कोलकाता, वाराणसी (संस्कृत
विश्वविद्यालय संग्रहालय), लखनऊ आणि अलाहाबाद येथील संग्रहालयात आहेत. १०.
मार्कण्डी (जि. गडचिरोली), महाराष्ट्र येथे एक सोमास्कंदाची प्रतिमा आहे.
त्यात शिव आणि पार्वती हे एकाच आसनावर, पण वेगवेगळे बसलेले असून बाळ
कार्तिकेय मध्ये उभा आहे. ११. वेरूळच्या कैलास लेण्यात, गाभाऱ्यासमोरील अंतराळाच्या दक्षिण भिंतीवर नंदीवर बसलेले सोमास्कंद शिल्प आहे. १२. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात एक उमामहेश्वर प्रतिमा आहे. तिचे आटपाडी (जि. सांगली) महाराष्ट्र येथील प्रतिमेशी बरेच साम्य आहे. १३. मायावरम् (तमिळनाडू) येथील मयूरनाथस्वामी मंदिरात एक सुंदर उमामहेश्वर प्रतिमा आहे. १४. कर्नाटकात अंगूर (जि. बळ्ळारी) आणि हवेरी (जि. धारवाड) येथे उमामहेश्वर प्रतिमा आहेत. १५. ऐहोळे, कर्नाटक येथे एक उमामहेश्वर प्रतिमा आहे. १६. त्रिवेंद्रम येथील कला विद्यालयात असलेली प्रतिमा हस्तिदंती असून शिवपार्वतीसह नंदी, बाल स्कंद व गणेश हेदेखील आहेत. १७. महाबलिपुरम् येथील धर्मराज रथात सोमास्कंदाची उत्कृष्ट मूर्ती आहे.
उमामहेश्वर आलिंगन मूर्ती-
उमामहेश्वर या शिल्पामध्ये नंदीवर आरूढ शंकर आणि पार्वती ज्यामध्ये
दोघांचेही दोन्ही पाय नंदीच्या एकाच बाजूला (दर्शनी बाजूला) सोडलेले
दिसतात. शंकराचा डावा हात पार्वतीच्या कमरेभोवती असून त्याने तिला एक हलके
आलिंगन दिलेले असते. या शिल्पाला उमामहेश्वरालिंगन मूर्ती असे म्हणतात.
कैलास मधील दक्षिणे-कडील व्हरांड्यात हे शिल्प आहे. उमामहेश्वर, कैलास मंदिर, वेरूळ
वेळापुर येथील उमा-महेश्वर मुर्ती :-
मुख्य गाभार्यात शिवलिंगावर सालंकृत शंकर-पार्वतीची मूर्ती उभी आहे. वर किर्तीमुख, किर्तीमुखापासून दोहोबाजूस अष्टगण, ब्रह्मदेव, विष्णू, पायाजवळ नंदी, अस्थिपंजर, उभी सरस्वती, उंदीर, गणपती अशा प्रतिमा कोरल्या आहेत. उजव्या बाजूस शेजघर आहे. त्यामध्ये सागाचा पलंग देवाच्या विश्रांतीसाठी आहे. मुख्य गाभा-यामध्ये मध्यभागी शिवलिंग आकारामध्ये शिवलिंगाच्या अर्ध्या अर्ध्या स्वरूपाला मूळ एकाच शिवलिंगात शिवपार्वतीच्या स्वतंत्र पूर्ण मूर्ती आहेत. ती मूर्ती अर्धी नसून शिवलिंगाच्या दोन भागांमध्ये आलिंगन स्वरूपात आहेत. शिव व शक्ती ह्या लिंग स्वरूपात एकरूप असल्याने तेथे शिवपार्वती स्वरूपातील एकलिंगामध्ये प्रकट आहेत. त्यामुळे त्या मूर्ती शिवपार्वती, उमामहेश्वर अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती अशा नावांनी पूज्य मानल्या गेल्या आहेत. शिवाची मूर्ती चतुर्भुज आहे. जटेमध्ये उजव्या बाजूस सूर्य व डाव्या बाजूस चंद्र कोरलेले आहेत असे वाटते. विश्वातील सर्वांत तेजस्वी रत्न जटेमध्ये धारण केलेले आहे. कपाळाच्या वर जटेखाली मुंडमाळा बांधलेल्या आहेत. शिवाचा चेहरा ध्यानमुद्रेत, नाजूक हास्य असलेला, सुंदर आहे. त्याने कानामध्ये कुंडले धारण केलेली आहेत. मूर्ती गळ्यापासून खाली पायांपर्यंत सुवर्णालंकाराने नटलेली आहे. अलंकार नाजूक आकारात पाषाणामध्ये कोरलेले आहेत. बोटावरील नखे व रेषा आणि लहान कोरलेली जटेची केशरचना कोरीव आहे. शिवाच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ व दुस-या हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे. जपमाळेचा अंगठा तुटलेला असून त्यामध्ये चांदीसारख्या धातूचे हाड पाहावयास मिळते. म्हणतात, की अफझलखानाच्या स्वारीच्या वेळेस मूर्तीचे संरक्षण व्हावे म्हणून पूर्वजांनी मूर्ती समोरील बारवेत ठेवली. त्यावेळी तिला थोडी इजा पोचली व नंतर तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शिवाने डाव्या बाजूचा हात पार्वतीच्या डोक्यावरील अंबाड्याच्यावर ठेवलेला आहे. त्याने हातामध्ये पाच फड्या असलेला शेषनाग पकडलेला आहे. दुस-या हाताने पार्वतीला कमरेला आलिंगन दिलेले आहे. उजव्या हातात त्रिशूल असून दुसरा हात आशिर्वादात्मक उभा आहे. अंगठ्यात जपमाळ असून अंगठा, अनामिका, करंगळीचा छेद गेला आहे. पार्वतीमातेची मूर्ती नाजूक चेहरा असलेली, उजवा हात शिवाच्या खांद्यावर आलिंगन दिलेला आहे. दुस-या हातात कमळ व पाश घेतलेला आहे. पार्वतीच्या दोन हातांमध्ये बांगड्या, बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये विविध हार, पायात जोडवी, पैंजण वगैरे दागिने कोरलेले आहेत. तीमधून जुनी अलंकारकला पाहण्यास मिळते. नाकामध्ये नथ घालण्यासाठी छिद्र ठेवलेले आहे. इतके नाजूक काम मूर्तीमध्ये केले आहे. अंबाडा ही केशरचना बारीक कलाकुसरीने साधली आहे. तिच्या कानात कर्णफुले पाहण्यास मिळतात. पार्वतीचा चेहरा, नाक, डोळे बघितल्यावर वाटते, की साक्षात पाहते अशी शिवलिंग आकारात शिवशक्ती एकरूप दाखवल्या आहेत. शंकरमूर्ती दोन्ही पायावर उभी असली तरी तो डाव्या पायावर रेलला आहे व उजवा पाय किंचीत सैल आहे. पार्वती डाव्या पायावर देहुडाचरण मुद्रेत उभी आहे. उजव्या तूळ पायावर चक्र आहे. या चक्रामुळेच या गावास एकचक्रनगर नाव असावे व येथे भिम-बकासुराच्या युद्धात बकासुराचा वध झाला असावा व त्यानंतर या गावाचे नांव वेळापूर झाले असावे असाही समज येथे आहे. हे मंदिर गजलक्ष्मीस अर्पण केले आहे.
मूर्तीला बाह्य पोषाख फेटा, धोतर, साडी, यांसारखी वस्त्रे नेसवली जातात. मूर्तीला पाषाणाची प्रभावळ आहे. त्यामध्ये शिवाच्या हातातील त्रिशुळाच्या वर ब्रम्हदेवाची लहान आकारामध्ये मूर्ती कोरलेली आहे. त्याच्यावर चार यमइंद्र, वरुण, कुबेर, ईशान अशा देवता मिळून अष्टदेवता आहेत. त्यांच्या मध्यभागी कीर्तिमुख मुख्य दोन्ही मूर्तींच्या वर मधोमध अतिशय सुंदर पाहून कीर्तिसंपन्न शिवपार्वती पाहण्यास मिळतात. पार्वतीच्या डाव्या बाजूस अष्टदेवतांच्या खालील बाजूस विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. त्यामुळे ब्रम्ह, विष्णू यांच्या मूर्ती शिवशक्तीसहित पाहण्यास मिळतात व त्या दर्शनाने सर्वांनंद प्राप्त होतो. तो शिवदरबारच आहे… शिवाच्या चरणाजवळ मूर्तीमध्ये भृगू ऋषी उभे आहेत. त्यांची मूर्ती ही अस्थिपंजर, अशक्त रूपात उभी दिसणारी आहे. श्री अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीची रचना अत्यंत कोरीव असून ही मूर्ती सालंकृत आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत उच्चप्रतीची शिल्पकृती आहे. मूर्तीकाराने मूर्ती कोरताना वस्त्रांऐवजी अलंकाराचा वापर खुबीने केला आहे. अत्यंत देखणी अशी ही मूर्ती १.१५ मीटर उंचीची आहे. तेथेच पार्वतीचे वाहन घोरपड आहे व शेजारी सर्वांत प्रथम पूज्य अशी गणेशाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे काम अतिशय नाजूक आहे.
उमा महेश्वर आलिंगन मूर्ती
उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर, लातुर)
लातुर शहराचे मुळ नाव रत्नपुर. येथे रत्नेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. त्या मंदिरातील हे अप्रतिम उमा महेश्वर शिल्प. जे आता सिद्धेश्वर मंदिरात जरा अडगळीत पडलेले आहे. याचे पूर्ण छायाचित्र घेण्याचा प्रयत्न गिरीश कुलकर्णी व भाउसाहेब उमाटे यांनी केला. पण ते जमले नाही. हे छायाचित्र निवृत्त शिक्षक एस.के. माने यांनी पाठवले आहे.
या शिल्पात शिव सव्य ललितासनात असून (डाव्या पायाची मांडी घातलेली उजवा पाय मोकळा खाली टेकवलेला) पार्वती वाम ललितासनात (उजव्या पायाची मांडी, डावा पाय खाली सोडलेला) मांडीवर बसलेली आहे. शिवाच्या डाव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे, डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजवा एक हात पार्वतीच्या स्तनांना स्पर्श करत असून दूसरा हात पाठीमागे आहे. त्या हातात सर्प असावा. नीट दिसत नाही. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे त्याची बोटं दिसतात. डाव्या हातात बीज पुरक आहे. एरव्ही जटा मुकुटात असणारा शीव येथे करंड मुकूटात आहे. कपाळावर मुकुटाची छान नक्षीदार महिरप आली आहे. पार्वतीही अशाच नक्षीदार मुकुटात दाखवली आहे. शिवाला नेहमी सर्पालंकार दाखवतात. पण इथे गळ्यात, कानात, दंडात, छातीवर सुंदर अलंकार आहेत. पायाशी नंदी आहे. या शिल्पाच्या उजव्या बाजूस गणेश आणि डाव्या बाजूस कार्तिकेय आहेत. एका फ्रेममध्ये येत नसल्याने त्यांची छायाचित्रे दिली नाहीत.
शिव पार्वतीच्या मध्ये एक हात दिसत आहे पण तो कुणाचा हे ओळखु येत नाही. पार्वतीचा तो हात असेल तर तिचा चौथा हात कुठे असेल?
ही मूर्ती फार मोठा ठेवा आहे. अभ्यासक जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. सध्या ज्या अडचणीच्या जागी आहे तिथून बाहेर काढून तिची स्थापना चांगल्या ठिकाणी करावी. जेणेकरून छायाचित्र नीट काढता येईल, अभ्यासकांचे लक्ष जाईल.
उमा महेश्वर व महिषासुरमर्दिनी मूर्ती
नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली
श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला फलदायी मानले गेले आहे.
शिवाची पूजा मुर्ती रूपात केली जात नाही पण नेरले ता. वाळवा, जि. सांगली येथे ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये शिव मुर्तीरूपात पार्वती सोबत पुजला जातो. प्रत्यक्षात ही एक मुर्ती नसून उमा महेश्वराची संयुक्त मुर्ती आहे.
शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालचा उजव्या हातात निलोत्पल (निळे कमळ) व डाव्या वरच्या हातात नागफणा असून हा हात पार्वतीच्या केसांच्या पाठीमागे आहे. खालचा डावा हात पार्वतीच्या किंवा उमेच्या कमरेच्या वर आहे. डोक्यावर जटामुकुट अगदी कोरीव आहे, शिवप्रतिमा चतुर्भुज आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे. दूसऱ्या हातात फासा आहे. शिवाचा जटामुकूट तर पार्वतीचा अंबाडा डोक्या मागे कोरलेला आहे.
पार्वतीच्या डाव्या पाया जवळ मयुरावर आसनस्थ कार्तिकेय व त्यांच जवळ खाली गणेश असून तो बदामी येथील लेण्यातील गणेशा सारखा दोन हातांचा कोरला आहे शिवाच्या उजव्या बाजूस खाली बसलेला नंदी व उभा शिवगण आहे, उमा महेश्वरी दोघाच्या मध्ये गोधा (घोरपड) दाखवली आहे. पार्वतीच्या पायाशी घोरपड असल्याने तिला गौरी असे संबोधतात. दक्षिण भारतात काही ठिकाणी उमेचे वाहन म्हणून गोधा (घोरपड) दाखवतात, उमा महेश्वराच्या अंगावर विविध अलंकार,केसाची रचना, मुकुट, वनमाला इ. दागिने अत्यंत कोरीव आहेत.
मागची प्रभावळ अतिशय कोरीव असून मध्यभागी किर्तीमुख आहे. उमा महेश्वर मुर्तीत पार्वती ही शिवाच्या खांद्यावर हात ठेवलेली दाखली जाते हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खांद्यावरचा हात बरोबरीचे मैत्रिचे नाते सुचवतो.
या मूर्तीसोबतच महिषासुरमर्दिनीची मूर्ती ही अतिशय सुंदर पुरातन असून या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती चतुर्भुज आहे. प्रभावळी वरती सप्तमातृका पट्टी आहे देवीच्या उजव्या हातातील खडग (तलवार), त्रिशूल अगदी कोरीव बघण्या सारखे आहेत डाव्या एका हातात ढाल व दुसऱ्या डाव्या हाताने रेड्याच्या रुपात लपलेल्या राक्षसाला बाहेर काढुन दुसऱ्या उजव्या हातातील त्रिशूलाने त्याचा संहार करताना दर्शवले आहे. मूर्ती अतिशय कोरीव व देखणी आहे, मूर्ती मध्ये सिंह व रेडा अतिशय कोरीव आहेत मूर्तीच्या उजव्या बाजूस वराह रूपातील देवी व डाव्या बाजूला बाजूस वाजंत्री देवीच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. देवीच्या अंगावरील आभूषणे, केसाची रचना, मुकुट अतिशय सुंदर कोरीव व रेखीव आहे. देवीच्या मूर्तीच्या मुकुटात किर्तीमुख कोरलेला आहे
या दोन्ही मुर्त्या चालुक्यकालीन असून इ.स. ८०० ते इ.स. १२०० या दरम्यान प्राचीन व दुर्मिळ मुर्त्या कोरल्या गेल्या असाव्यात अशी माहिती इतिहास अभ्यासक संजय पाटील व विक्रम पाटील नेर्ले यांनी दिली.
नेरले येथील मूर्ती शाळीग्राम या दगडा पासून बनवलेली आहेत. आशा प्रकारच्या मूर्त्या वेळापूर, जि. सोलापूर, राजापूर, जि. हिंगोली, तसेच बदामी, जि. बागलकोट कर्नाटक येथे आढळतात.
वृषवाहन (Vrushvahan)
वृषवाहन आणि वृषभारूढ अर्थात आपले वाहन नंदीसह असलेला शिव हा
शिवप्रतिमांपैकी एक लोकप्रिय प्रकार. याच स्वरूपात तो आपल्या भक्तांना
दर्शन देतो, अशी कल्पना आहे. कुषाण सम्राट विम कदफायसिस याच्या नाण्यांवरही
असाच शिव आहे. दक्षिण भारतातील देवळात होणाऱ्या उत्सवांत शिवाच्या वृषवाहन
स्वरूपाला फार महत्त्व आहे. या स्वरूपात शिव हा नंदीशेजारी, डावा पाय
जमिनीवर घट्ट रोवून व उजवा पाय थोडा वाकवून किंवा डाव्या पोटरीवर तिरपा
ठेवलेला अशा स्थितीत उभा असतो. त्याचा डावा हात नंदीच्या पाठीवर, डोक्यावर
ठेवलेला असून उजवा हात कमरेवर किंवा खाली सैल सोडलेला असतो. कधीकधी उजव्या
हातात काहीशी वक्र काठी असते. शिवप्रतिमा चतुर्भुज असल्यास मागच्या दोन
हातांत टंक वा परशू आणि मृग असतात. वाहन वृषभ त्याच्यामागे उभे असून त्याची
उंची ही शिवाच्या कमरेइतकी किंवा छातीइतकी असते. अनेकदा वृषवाहन प्रतिमेत
शिवासह पार्वतीही असते. तिच्या किंचित वाकवलेल्या उजव्या हातात कमळ असून
डावा हात सैल सोडलेला असतो. अशी प्रतिमा दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असून
सर्वच महत्त्वाच्या आगमांमध्ये तिचा उल्लेख आढळतो.
वृषवाहन शिव-पार्वती, होयसळेश्वर मंदिर, हळेबीड (कर्नाटक).
ऐहोळे (जि. विजापूर, कर्नाटक) येथील सातव्या शतकातील भव्य वृषवाहन
मूर्ती सर्वांत प्राचीन समजली जाते. येथे शिव आठ हातांचा असून
त्रिभंगावस्थेत नंदीवर रेलून उभा आहे. आपल्या दोन हातांनी त्याने नंदीची
दोन्ही शिंगे धरली आहेत. दोन हात भग्न झालेले असून इतर हातांत त्रिशूळ,
सर्प, जपमाळ ह्या वस्तू आहेत; आठव्या हातातील वस्तू अस्पष्ट आहे. त्याने
जटामुकुट व इतर अलंकार धारण केले आहेत. मस्तकाभोवती प्रभावळ आहे.
वेदारण्यम् (जि. नागपट्टीनाम, तमिळनाडू) येथील वृषवाहन शिव-पार्वतीची
चोलकालीन कांस्यमूर्ती विशेष उल्लेखनीय आहे. शिवाचा उजवा हात नंदीच्या
मस्तकावर असून डावा हात कटकमुद्रेत आहे. पार्वती स्वतंत्र पीठावर उभी असून
तिच्या उजव्या हातात उत्पल (कमळ) आहे. डावा हात सरळ खाली सोडलेला आहे.
दोन्ही प्रतिमा अलंकाराभूषित आहेत. उत्तर भारतातही काही गुप्तकालीन वृषवाहन
मूर्ती मिळाल्या आहेत.
वृषभारूढ शिवमूर्ती ही वृषवाहन प्रतिमेहून थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे.
यात शिव एकटाच किंवा सपत्नीक नंदीवर बसलेला असतो. अशा प्रकारच्या
प्रतिमांचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात : १) शिव आणि पार्वती स्वतंत्रपणे
नंदीवर बसलेले असतात. २) नंदी उभा असून शिव आणि पार्वती हे त्याच्यावर
आलिंगनमुद्रेत बसलेले असतात. ३) नंदीवर शिव-पार्वती हे आलिंगनमुद्रेत
बसलेले असतात आणि पार्वती शिवाच्या मांडीवर बसलेली असते. या
मूर्तीप्रकाराचा उल्लेख आगमग्रंथांत नाही; मात्र गोपीनाथ राव यांनी त्याचा
समावेश ‘वृषभारूढ’ या शीर्षकांतर्गत केला आहे. मध्ययुगीन कालखंडातील
वृषभारूढ शिव-पार्वतीच्या अनेक प्रतिमा सबंध भारतभर मोठ्या संख्येने
आढळतात. आवरा (जि. टोंक, राजस्थान) येथून मिळालेली एक मूर्ती मध्य
प्रदेशातील इंदौर (इंदूर) संग्रहालयात आहे. यात शिव चतुर्भुज असून उजव्या
हातांत त्रिशूळ व माळ आहे. मागचा डावा हात पार्वतीला आलिंगन देत असून खालचा
डावा हात स्तनस्पर्श करीत आहे. पार्वतीचा उजवा हात भंगलेला असून डाव्या
हातात फूल आहे. उभयता नंदीवर बसलेले आहेत.
नंदीवर आरूढ झालेल्या एकट्या शिवाच्या प्रतिमा मात्र काहीशा दुर्मीळ
आहेत. कोलकाता (प. बंगाल) येथील इंडियन म्युझियममध्ये अशी एक शिवप्रतिमा
आहे. येथील शिव त्रिमुखी व चतुर्भुज असून त्याच्या मागील दोन हातांत
त्रिशूळ आणि पाश आहेत, तर पुढच्या उजव्या हातात दंड धारण केला आहे. पुढचा
डावा हात उभ्या नंदीच्या मानेवर ठेवलेला दिसतो. उत्तर भारतीय शिल्पांत नंदी
उभा व बसलेला अशा दोन्ही प्रकारे दाखवतात.
सारिपाट क्रीडा :- शिव पार्वती यांचा विवाहानंतर संसार सुरू झाला, स्वाभाविकच पती- पत्नींच्या मनोरंजनाचेही कार्यक्रम सुरू झाले. शंकर पार्वती सारिपाट खेळावयास बसले. नवविवाहितांच्या मानसिकतेप्रमाणे सुरुवातीचे डाव शंकर मुद्दाम हरत राहिले. एकेक गोष्ट पणाला लावत पार्वतीच्या आग्रहाने त्यांनी त्यांच्या प्रिय नंदीलाही पणास लावले आणि हरले. नंदीला घेऊन जायला पार्वतीची दासी गेली आणि तिने त्याला कानाने ओढून नेत असल्याचे कलाकाराने दाखविले आहे. बलाढ्य नंदी आता दास झाला आहे हे कळल्यावर शिवाच्या काही गणांनी त्याला त्रास द्यावयाला सुरुवात केली. कोणी शेपूट चावत आहे तर कोणी शिंग धरत आहे, तर तो जाऊ नये म्हणून कोणी त्याचे पाय धरत आहे. अन्य गण नंदीच्या दहशतीतून मुक्त झाल्यामुळे त्यांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. कोणी दुसऱ्याचे केस उपटतो आहे तर कोणी मुष्टिप्रहार करतो आहे, कोणी आपला पृष्ठभाग उघडा करून दाखवितो आहे, तर कोणी चक्क वाकुल्या दाखवितो आहे, वर्गातून शिक्षक बाहेर गेल्यानंतर बालवाडीमध्ये आपणही हेच करत नव्हतो का ?
सारीपाट खेळ, रामेश्वर लेणे, वेरूळ
शिल्पामध्ये वरील भागात खेळाला वेगळीच कलाटणी मिळालेली कलाकाराने दाखवली आहे. हातात फासे घेऊन अजून एक शेवटचा डाव खेळायचा आग्रह शिवाने केला. पार्वतीच्या लक्षात आले की हा अंतर्यामी महादेव आतापावेतो हरलेले सर्व काही परत मिळविणार, म्हणून तिने डाव सोडून जायची तयारी केली. तिच्या उठण्याच्या हेतूचे शिल्पांकन कलाकाराने तिच्या डाव्या हाताखालील उशी दबली गेली असल्याचे दाखवून केले आहे. तसेच तिचे डावे ढोपरही सरळ आहे. तिचा उजवा हात विस्मय मुद्रेमध्ये आहे. जणू काही ती शिवाला विचारते आहे, "काय देवा, हे तुम्हाला शोभते का ? काय काय डावावर लावायचं आणि कोणचे दान पडणार हेही तुम्हीच ठरविणारे, माझी काय फजिती करण्यासाठी हा आग्रह सुरू आहे का? " भगवान शंकराची मुद्रा मात्र अत्यंत बोलकी आहे. ते म्हणत आहेत की कोण जिंकलं किंवा कोण हरलं याच्यासाठी खेळ खेळला जात नाही.खेळ तर केवळ खेळासाठी असतो. एवढ्याशा कारणाने खेळ कधीही अर्धवट सोडता कामा नये कारण हा केवळ सारिपाट नव्हे तर संसाराचाच खेळ असतो.
सारिपाट खेळणारे शिवपार्वती (लेणी क्र १४ वेरूळ) "-
शिवपार्वती सारिपाट खेळत आहेत असे मोठ्या आकारातील दोन शिल्पपट वेरूळमध्ये आहेत. सारिपाटसाठी संस्कृतमध्ये "अक्षक्रिडा" असा शब्द वापरला जातो. एका शिल्पावर पूर्वीच या सढरात लिहिले होते. अजून एक संधी मागणारा शिव असा त्या शिल्पपटाचा आशय होता. वरिल शिल्पपट अजून मनोज्ञ आणि देवतांचेपेक्षा स्वाभाविक मानवी भावनांना शिल्पांकित करतो.
खेळताना शिवाने काहीतरी लबाडी केली आहे. चिडून पार्वतीने तोंड फिरवले आहे. शिव तीचा हात धरून साॅरी म्हणतो आहे. मागे गणेश भृंगी चामरधारिणी आणि बाकी गण आहेत.
या शिल्पाचे खरे सौंदर्य खालच्या बाजूस दडलेले आहे. शिवाचा नंदी मोकळा सहज उभा आहे. त्याच्या भोवती शिवगण मस्त त्याची मजा घेत आहेत. कुणी त्याच्या गळ्यातली घंटा वाजवत आहे. कुणी शेपटीशी खेळत आहे. कुणी पाय धरला आहे. कुणी पाठीवर चढू पहात आहे. विठु माझा लेकुरवाळा तसा हा नंदी आहे. एखादा समजूतदार ड्रायव्हर असेल तर त्याच्या कारशी गल्लीतील पोरांनी खेळावं तसं हे शिल्प आहे. देवतांचे मानवी स्वभावाप्रमाणे चित्रण हे वैशिष्ट्य इथे आढळून येते.
वेरूळला कैलास लेण्यांशिवायही खुप सुंदर शिल्पे आहेत. पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. इतर लेण्यांसाठी म्हणून खास वेरूळला भेट द्या. कैलास तर जागतिक चमत्कार आहेच. पण इतरही ठिकाणं पाहिली पाहिजेत.
रूसलेली पार्वती आणि शांत शिव :-
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या बाजूला शिव मंदिराच्या मंडोवरावर हे अतिशय वेगळं मनोज्ञ असं शिल्प आहे. डमरूआणि नाग दोन हातात असून पायाशी नंदी आहे, गळ्यातही नागबंध आहे. त्यावरून हा शिव आहे हे स्पष्ट होते. पार्वती डोळ्यात काजळ भरत आहे. तिच्या दूसर्या हातात आरसा आहे. लक्ष वेधण्यासाठी शिवाच्या डाव्या हातात दंडासारखे दिसणारे जे आयुध आहे त्याला पार्वतीने आपला उजवा पाय लावला आहे. शिवाच्या उजव्या खालच्या हातात बीजपुरक आहे.
हे शिल्प अलीकडच्या काळातले असल्याने फारसे बारीक नक्षीकाम त्यावर आढळून येत नाही. पार्वतीचे वस्त्र, त्याचा मागे दाखवलेला पदर सुंदर आहे. साधेच पण प्रमाणबद्ध आकर्षक असे हे शिल्प. यात कुठला पौराणीक संदर्भ न दाखवता नवरा बायकोच्या नात्यातील सहज भाव दाखवला म्हणून वेगळे उठून दिसते.
गौरी रूसली असं म्हणण्यापेक्षा शिवच रूसला आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी खालील ओळीतील भावना पार्वती व्यक्त करत आहे.
दर्पण देखू रुप निहारु
और सोला सिंगार करू
फेर नजरीया बैठा बैरी
कैसे अखिया चार करू
(प्रसन्न माळेकर या मित्राने सुचवलेल्या समर्पक ओळी)
गंगाधर मूर्ती :-
संस्कृति आणि नदी यांचे अतूट नाते असते. कोणत्याही संस्कृतीचा मोगोवा घेताना तिथल्या भौगोलिक भागाशी जोडल्या गेलेल्या अनेक नद्या आणि त्यांच्या उपनद्या त्या प्रदेशात वाहत असतात. काळाच्या ओघात अनेक नद्या लुप्त होतात, त्यांचे मार्ग बदलतात, त्याच्या प्रवाहात बदल होतात. पण संस्कृति आणि नदी यांचे सामाजिक, धार्मिक, भावनिक अगदी आर्थिक किंवा राजकीय पदर हे अनुभवता येतात, अभ्यासता येतात. नदी ही माणसासाठी जीवनदायिनी असतेच, पण मानवी मनाच्या भावभावना, संवेदना या नद्यांशी आपण जोडून ठेवल्या आहेत. आज कोरना सारख्या वैश्विक संकटामुळे या नद्यांच्या सानिध्यापासून वंचित असलेला मानव या नद्यांचे नितळ, तरल, स्वच्छ सौंदर्य अनुभवतो आहे. आपल्या भारतीय संस्कृतिमध्ये सात पवित्र नद्यांपैकी एक नदी ही गंगा आहे. गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥ मंगलस्नानादिक कर्मांमध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी यांचे अवाहन करून आपल्याकडे असलेल्या जलामध्ये या नद्यांच्या पवित्र जलाचा अंश उतरावा आणि या सप्त पवित्र नद्यांच्या सानिद्ध्यात हे जल पवित्र होवो, अशी आपण कामना करतो. केवळ गंगा नदीच्या संदर्भात म्हणायचे झाले तर, गंगा शब्दाची व्युत्त्पती पुढीलप्रमाणे सांगितली आहे – गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिती गङ्गा म्हणजे मोक्षार्थी जिच्याकडे जातात ती गंगा. भौगोलिकदृष्ट्या गंगा नदीचा उगम गंगोत्री, टेहरी – गढवालमध्ये होतो. या ठिकाणाला पुराणामध्ये गोमुखी म्हटले आहे. इथून गंगेचे अनेक प्रवाह विविध शाखांना जाऊन मिळतात आणि गंगा सागराला जाऊन मिळेपर्येंत तिच्या विविध स्वरूपाचे दर्शन आपल्याला होते. मोक्षदायिनी गंगा नदीचे अवतरण या पृथ्वीतलावर केव्हा झाले, या काळामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. काही पुराणांमध्ये वैशाख शुद्ध तृतीया ही तिथी मानली आहे. काही पुराणांमधून कार्तिक पौर्णिमा ही तिथी येते. पण काही पुराणांनुसार, ज्येष्ठ शुद्ध १०. ही तिथी लोकांमध्ये अधिक प्रचलित झाल्याने आजच्या तिथीला म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध १०. ला गंगेचे पृथ्वीवर अवतरण झाले असे मानतात. गंगा अवतरणाला कारणीभूत होता भगीरथ. या भगीरथाने त्याच्या घोर तपोबलाने देवी गंगेला पृथ्वीवर आणले. एकार्थी ती भगीरथाची कन्या झाल्याने गंगेला भागीरथी हे नाव गंगेला प्राप्त झाले. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याचा प्रसंग वेगवगेळ्या कथा भागांतून आपल्या समोर येतो. महाभारतातील वनपर्वात गंगा अवतरणाची कथा येते. गंगा प्रत्यक्ष भूतलावर येणे हा दिव्य अनुभूति देणारा एक सोहळा म्हणता येईल. याचे कारण भगीरथाचे तपाचरण, त्या तपावर गंगेचे प्रसन्न होऊन पृथ्वीवर येणे, गंगेचा प्रचंड प्रवाह पृथ्वीवर हळुवार उतरवणे, तिच्या प्रवाहाची तीव्रता कमी करण्यासाठी भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण करून तिला सप्तधारांनी पृथ्वीवर सोडणे अश्या अनेक दिव्य घटनांचा समावेश या एकाच प्रसंगामधून उलगडतो. या संपूर्ण प्रसंगातील नाट्य भारतीय परंपरेतील प्राचीन शिल्पांमध्ये शिल्पकाराने साकारले आहे. गंगेच्या मानवी स्वरूपातील अनेक मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. भगीरथाने दीर्घ प्रयत्न करून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता स्वर्गातून गंगेला आणण्याच उपक्रम केला, वेरुळ येथील कैलास मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गंगावतरणाचे विलक्षण शिल्प कोरले आहे. डाव्या कोपऱ्यातील तप करणाऱ्या भगीरथाच्या तपश्चर्येने गंगेचे अवतरण झाले आहे. ती शिवशंकराच्या खांद्यावर आरूढ आहे, श्रीशंकराने आपली एक बट मोकळी करून गंगेला प्रवाही केले आहे. जन्हु राजाने तिला अडवली. शिल्पामध्ये डावीकडे जन्हु राजा बसलेला दिसतो. त्याची समजूत काढल्यावर त्याने तिला न गिळता आपल्या कानातून वाट काढून दिली. त्याला कानातून ती पुन्हा वाहू लागली. शिल्पाच्या खालच्या बाजूला मुक्तीची वाट पाहत बसलेले सगरपुत्र दिसतात. गंगेच्या पावन स्पशनि त्यांना मुक्ती मिळाली. कलाकाराची कल्पकता मात्र या शिल्पात कोरलेल्या पार्वतीमुळे उठून दिसते. तिला वाटले की तिच्या नवऱ्याने सवत आणली म्हणून ती चिडते, रुसते. शंकराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याचा हात झिडकारताना दाखवली आहे. तरीही तो तिची हनुवटी उचलून तिला जणू काही हे सांगतो की, अगं वेडाबाई ही सवत नाही, तिच्यावर उगीच रागावू नकोस. भरतभूमीवर घडणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याला डोळे भरून पाहा, केवळ सगरपुत्रांनाच नव्हे तर कोट्यवधी मानवांना शतकानुशतके मुक्ती देण्याकरता, भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याकरता ही पावन गंगा आज पृथ्वीवर अवतरते आहे तिचे स्वागत कर. पार्वती मात्र संतापाने काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शिवाचा हात ती त्वेषाने झिडकारते आहे. कोण्या मूखनि तिच्या तोंडावरच घणाचा घाव घातल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील क्रोधित मुद्रा मात्र आज दिसू शकत नाही.
गंगावतरण, कैलास मंदिर, वेरूळ
गंगेचा प्रवाह आणि तिचे भूतलावरील अवतरण यांची अनुभूती देणारा एक शिल्पपट, UNESCO च्या जागतिक वारसा असलेल्या महाबलीपुरम येथे आपल्याला अनुभवायला मिळतो. शिवाच्या गंगावतरण शिल्पातही शिवाच्या जटांमध्ये गंगेचे आगमन होताना दाखवले जाते. महाबलीपूरम येथील शिल्पपटामध्ये गंगेचे स्वतंत्र शिल्प दिसत नाही. ती जलाच्या रूपात प्रवाहित होत असल्याचा आभास या शिल्प कथेतून निर्माण करण्याचा प्रयत्न शिल्पकारांनी केलेला आहे.
तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० कि.मी. अंतरावर सागर तटावर महाबलीपुरम हे एक पूर किंवा नगर वसलेले आहे. इ.स. सातव्या शतकापासून पल्लव राजवंश आणि त्यांच्या नंतर चोल राजवंश येथे राज्य करीत होते. या महाबलीपूरमच्या भूमीवरच एक सुंदर शिल्पपट आहे तो म्हणजे गंगावतरण. या शिल्पपटाला अर्जुनाची तपश्चर्या असेही म्हणतात. दोन मोठ्या शिलाखंडांचा अतिशय कल्पकतेने वापर करून शिल्पकारांनी साक्षात गंगा अवतरणाचा प्रसंग प्रस्तुत केला आहे. गंगावतरण हा शिल्पपटाची रचना अतिशय कलात्मक आणि नैसर्गिक रचनेला समर्पक केली आहे. हा शिल्पपट ज्या दोन मोठ्या शिलाखंडांवर शिल्पांकित केला आहे त्याच्या मध्ये एक नैसर्गिक घळ निर्माण झालेली आहे. या दोन खडकांच्या माथ्यावर एका कुंडामध्ये पाणी साठवले जाते आणि त्या कुंडातून ते पाणी या शिल्पपटातील घळीतून सतत पडत राहते अश्या प्रकारची सोय केली आहे. पावसाळ्यामध्ये माथ्यावरून सतत पडणाऱ्या पाण्याच्या रूपात साक्षात गंगाच पृथ्वीवर अवतरीत होत असल्याचा सोहळा इथे अनुभवता येतो. या खडकाच्या अरुंद घळीमध्ये नागराज आणि नागस्त्रिया यांची शिल्पे आहेत. नागराज आणि नागस्त्री यांनी त्यांचे हात जोडले आहेत. शिलाखंडावर चंद्र, सूर्य, किन्नर दम्पती, सिद्ध, गंधर्व आणि अप्सरा यांची अंकने आहेत. ज्या भगीरथाने कठोर तपश्चर्या करून गंगेला भूतलावर आणतो आहे हा क्षण या शिल्पामध्ये बघायला मिळतो. भगीरथ एका पायावर उभा राहून कठोर तपश्चर्य करीत आहे. त्याच्या शरीरावरील त्वचा तपश्चर्येने सुकून केवल हाडांचा ढाचा दिसत आहे. सर्व ग्रह, गंधर्व, सिद्ध, अप्सरा तिथे अवतरीत होत असलेल्या गंगेला बघण्यासाठी त्या घळीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. भगीरथाच्या बाजूला चतुर्भुज शिव त्याच्या गणासह उभा दाखवला आहे. अनेक सिद्ध योग-पट्ट धारण करून योगिक असनामध्ये बसलेले आहेत. याशिवाय सिंह, वाघ, हत्ती, वानर, हरीण यांसारखे प्राणीही शिल्पांकित केले आहेत.
वन्यजीवनाचे सुंदर शिल्पांकन या शिल्पांत दिसते. यांत हरीण निवांत सिंहाजवळ बसलेले दाखवले आहे. म्हणजेच हे तपोवन योगीजन, सिद्ध यांच्या सानिद्ध्याने इतके सात्विक झाले कि हिंस्त्र प्राणी आणि इतर प्राणी या वनामध्ये शांतीने, आनंदाने आणि भयमुक्तपणे जगत आहेत. इतकेच नाही इथे एक मांजर दाखवले आहे जे भगीरथाप्रमाणे दोनही हात वर करून तप करीत आहे आणि त्याच्याच शेजारी एक उंदीर त्या मांजराला नमस्कार करीत आहे. हत्तींचा एक कळप आपल्या पिल्लांना घेऊन हे गंगावतरणाचे साक्षी होण्यास येत आहेत. त्यांची पिल्ले त्या मोठ्या हत्तींच्या पायांमध्ये घुटमळत चालत आहेत. हा संपूर्ण शिल्पपट प्रत्यक्ष समोर थांबून बघताना आपल्याला देवी गंगा साक्षात स्वर्गातून पृथ्वीवर खाली उतरत आहे या भाव निर्माण होतो. या शिल्पाच्या माध्यमातून हा दिव्य सोहळा अनुभवताना आपल्या मुखातून आपसूकच शब्द निघतात हर गंगे भागीरथी.
अर्धनारीश्वर :-
अर्धनारी नटेश्वराची अधिक माहिती घ्यायची झाल्यास शतकानुशतके भगवान शंकराची पूजा केली जात आहे. परंतु फार कमी लोकांना माहित आहे की शंकराचे दुसरे रूप आहे अर्धनारीनटेश्वर! वास्तविक शंकराने हे रूप स्वेच्छेने घेतले. स्त्री-पुरुष समान आहेत हा संदेश त्यांना यामधून द्यायचा होता. तेव्हा सर्वप्रथम जाणून घेऊया, कोणत्या कारणास्तव भगवान शंकराला हे रूप धारण करावे लागले. भगवान शंकराच्या अर्धनारीनटेश्वर अवतारात आपण पाहतो की त्यांचे अर्धे शरीर स्त्रीचे आहे आणि अर्धे शरीर पुरुषाचे आहे. हा अवतार स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देतो. समाजात, कुटुंबात आणि जीवनात पुरुषाचं महत्त्व तितकंच आहे जेवढं स्त्रीचं आहे. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण आहे, दोघेही एकमेकांना पूर्ण करतात. शिवपुराणानुसार, ब्रह्माजींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, जेव्हा ब्रह्मांडाची वाढ होत नव्हती. तेव्हा त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. पण तोपर्यंत शिवापासून स्त्रियांच्या कुळाचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवाने शिवाला शक्तीने संतुष्ट करण्यासाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान शंकर अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण करून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या शरीरातील देवी शक्तीचे अंश वेगळे केले. त्यानंतर ब्रह्माजींनी त्यांची पूजा केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, शक्तीने त्याच्या कपाळाच्या तेजाने आणखी एक शक्ती निर्माण केली, जी दक्षाच्या घरी मुलगी म्हणून जन्मली. स्त्रियांना पुरुषांइतकाच मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, असा संदेश देवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप घेऊन दिला आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये.तर, अशी ही अर्धनारीनटेश्वराची कहाणी!भारतात भगवान शंकराला काही ठिकाणी अर्धनारीनटेश्वर या स्वरूपातही पुजले जाते. देशात अशी जवळपास पंधरा सोळा मंदिरे आहेत, अर्धनारी नटेश्वराची पुराणात अशी कथा आहे, की एकदा भगवान शंकर व पार्वती बसले असताना अनेक देव व ऋषी भृगू तेथे आले. त्यांनी शिवपार्वती, दोघांना प्रदक्षिणा घातली आणि वाकून नमस्कार केला. पण भृगू यांनी पार्वतीमातेकडे दुर्लक्ष केले. तिला नमस्कार पण केला नाही. कारण ते फक्त शंकराचे भक्त होते. देवी पार्वतीला ते आवडले नाही. पार्वतीने भृगू ऋषींना शाप दिला, की भृगूच्या शरीरामधील मांस-रक्त नाहीसे होईल! लगेच तसे झाले व शरीर हाडावर फक्त कातडे घातल्यासारखे झाले. त्यांना नीट उभे राहता येईना, तेव्हा शंकरांना त्याची दया आली. शंकरांनी भृगूंना उभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला. भृगू आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले. पार्वतीला ते आवडले नाही. तेव्हा पार्वतीने तपश्चर्या करून शंकराकडून वर प्राप्त केले, की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाहीत. त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप धारण केले.
अर्धनारीश्वर
शिवाच्या शिल्पांमधील सर्वपरिचित आणि लोकप्रिय असलेले हे शिल्प. बहुतेक
वेळा ही मूर्ती उभी असते. पण क्वचित प्रसंगी बसलेलीही आढळते. हरिहर मूर्ती
प्रमाणेच हे एक जोड शिल्प आहे. यातील मूर्तीचा उजवीकडचा अर्धा भाग हे
शंकराचे अंग आणि डावीकडील भाग हे पार्वतीचे अंग. यामध्ये डोक्यातील केश
रचना सुद्धा वेगळी दिसते. तसेच चेहरा आणि अन्य शरीराचे भाग ह्यातील वेगळेपण
दाखवायला अत्यंत कौशल्याने कोरलेले दिसतात. पार्वतीच्या डाव्या हातामध्ये
आरसा दिसतो. स्वतःला पूर्णत्व आणण्यासाठी ती शिवाशी एकरूप होते. परंतु तोंड
वळवून ते न पाहता असल्यामुळे आरशात बघून त्याची खात्री करून घेते. सांख्य
तत्त्वज्ञानातील पुरुष आणि प्रकृती ऐक्य सांगणारे, वैश्विक तत्वज्ञानातील
जड आणि चेतन किंवा वेदातील अद्वैत कल्पना साका शिल्प असून असून अणूची
संरचना आणि कार्य याचे हे प्रतिक आहे. या एकरूपतेचे अत्यंत समर्पक निरूपण
ज्ञानेश्वरांनी (ज्ञानेश्वरी, अध्याय ५ ओवी क्र. १३२ ते १३५) केले आहे.
अर्धनारीश्वर
२० व्या शतकातील तामिळनाडूमधील अर्धनारीश्वराचे शिल्प
आर्ट ऑफ लिविंग आश्रमातील बेंगळुरु येथील अर्धनारीश्वर
अर्धनारीश्वर रूपातील शिव - एक संपूर्ण समन्वयात्मक रूप आपल्या शरीराचा डावा भागात हृदय आहे, जे अंर्तज्ञान आणि रचनात्मक कार्यासाठी आवश्यक मानले जाते. तर शरीराचा उजवा भाग तर्क, वीरता आणि विचारपुर्वक कार्य करण्याची क्षमता असलेला आहे असे मानले जाते. शिवाचे हे रुप ब्रम्हांडातील उर्जा हे पुरुष आणि स्त्रीच्या संयोगातून येते असे मानले जाते. परिपुर्ण जीवन जगण्यासाठी पुरुष आणि स्त्रीची एकरुपता आणि समानता याचे प्रतिक म्हणजे अर्धनारी रुप. या रुपाचा अर्थ हा आहे कि स्त्री आणि पुरुष यांच्यात द्वंद नसून ते एकमेकांचे अविभ्याज अंग आहेत आणि त्यांचे मिलन परमानंद निर्माण करते. भगवान शिवांची काही रुपांची आता पुजा केली जात नाही, मात्र अर्धनारीश्वराचे रुप सर्वव्यापी आहे आणि त्याची पुर्ण भारतभरात आजही पुजा केली जाते. शिवांची इतर रुपांची आराधना विशिष्ट पंथीय किंवा संप्रदायाचे लोकच करतात, मात्र अर्धनारी रुप हे कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायाशी संबधित नसल्यामुळे हे शिल्प आपल्याला अनेक मंदीरावर कोरलेले पहायला मिळते, अर्थात फक्त अर्धनारी रुपाची स्वतंत्र अशी मंदीरे खुप कमी आहेत.
तीन भुजा असलेले अर्धनारीश्वर, गंगैकोंडचोलपुरम, तमिलनाडु
अर्धनारी शिवाची मुख्य मुर्ती असणारी बहुतेक मंदीरे तामिळनाडूत आहेत. या रुपाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत, याचे एक कारण हे रुप प्रजनन आणि दंपती जीवनाशी संबधीत असल्यामुळे असे मानले जाते. अनेक भाविक मंदीरात जातात, त्यासाठी बरीच कारणे असतात, त्यातील एक म्हणजे संतानप्राप्ती हे असते.
अर्धनारीश्वर रूपाचे पहिले अंकन आपल्याला कुषाण राजवटीतील नाण्यावर पहायला मिळते. हि नाणी इ.स. पुर्व आणि इ.स. पहिल्या शतकातील आहेत. अर्थात या नाण्यावरील प्रतिमा झीजल्यामुळे अस्पष्ट झाली आहे, त्यामुळे अर्धनारी शिवाचे रुप मथुरेच्या सरकारी वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या कुषाणकालीन शिळेवर कोरलेले पहायला मिळते. हाच सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.
शिवाच्या अर्धनारी स्वरुपासंबधीत कथा :-
काही तज्ञांच्या मते हे प्रतिक निर्माण करण्याचा कारण म्हणजे शैव आणि शाक्त पंथीय एकत्र यावेत यासाठीस असावे.अर्धानारीश्वर मुर्तीत भगवान शिव बहुतेक प्रतिमेत उजवीकडे असतात, अर्थात अपवाद म्हणून काही मुर्तीत शिवांना डावीकडेही दाखवले आहे. तज्ञ्जांच्या मते डावीकडचे दाखवलेले स्त्री रुप मुख्यतः शाक्तपंथीयांचे प्रतिक आहे.बृहदारण्य उपनिषदाप्रमाणे भगवान शिवांचे हे अर्धनारीश्वराचे रुप म्हणजे पृथ्वीवरचा पहिला प्राणी आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला हे समानप्रमाणात संयोग पावलेले आहेत.अर्थात या अवस्थेत संभोग शक्य नव्ह्ता आणि नवनिर्माणही शक्य नव्हते. सहाजिकच या प्राण्याने स्वतःला धरणीवर पाडून घेतले आणि त्यातून पुरुष आणि स्त्री वेगळे झाले.मात्र शक्तीपंथीयांच्या मतानुसार हा प्राणी शक्ती किंवा देवीचा अवतार होता आणि हे देवीचेच शरीर होते, जे दोन भागात विभागले गेले होते. म्हणजे एका संप्रदायासाठी शिव हे सर्वोच्च पुरुषाचे प्रतिक आहे तर दुसर्या पंथीयांसाठी देवी हाच सर्वोच्च आत्मा आहे.भगवान शिवांनी अर्धनारीश्वराचे रुप धारण करुन जणू ब्रम्हदेवांना त्यांच्या चुकीची जाणीव करुन दिली. दुसर्या एका कथेनुसार भगवान ब्रम्हदेवांनी ब्रम्हांडांची निर्मिती करताना त्यांनी मनुष्याला बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक प्रजापती बनवले. भगवान ब्रम्हदेवांना पहिले बीज फेकून त्यातून संतान उत्पन्न करावे असा विचार होता. मात्र संतान निर्माण करण्यात प्रजापतींनी या प्रक्रीयेत काहीच रस दाखवला नाही आणि ब्रम्हदेव निराश झाले. शेवटी ब्रम्हदेवांनी शिवशंकरांची प्रार्थना केली. शिवशंकरांनी ब्रम्हदेवाची अडचण जाणून घेतली आणि चुक लक्षात आल्यावर मंद स्मित केउन त्यावर उपाय म्हणून अर्धनारीश्वराचे रुप घेतले.यामुळे भगवान ब्रह्मदेवाला आपली चूक लगेच लक्षात आली की प्रजापतींची निर्मिती करताना आणि त्यांच्याकडून संतती निर्माण करण्याची अपेक्षा करताना ते स्त्री स्वरूप, सर्जनशील शक्ती विसरले होते. त्यामुळे स्त्रीची निर्मिती आणि जन्म झाला.
गंगैकोंडाचोलपुरम, तमिलनाडु मधील अर्धनारीश्वर शिल्पपट
शिवाचे अर्धनारीश्वर रूप - वैवाहिक ईर्षेचा परिणाम :- पती-पत्नीमधील मत्सराशी संबंधित आणखी एक समज आहे. शिवाने देवी गंगेला आपल्या मस्तकावर धारण केले आणि देवी पार्वतीना आपल्या मांडीवर स्थान दिले. यामुळे शिव दुसऱ्या स्त्रीला जास्त महत्त्व देत असल्याचा पार्वतीला राग आला. वैवाहिक विवाद मिटवण्यासाठी आणि देवी पार्वतीला तिचे शंकंराच्या जीवनातील स्थान स्पष्ट करण्यासाठी, शिव देवी पार्वतीमध्ये अशा प्रकारे विलीन झाला की तिचा अर्धा भाग स्वतःचा झाला. प्रतिकात्मकपणे, त्याने कबूल केले की त्याचा अर्धा भाग त्याची पत्नी आहे. यासंदर्भात शिव आणि पार्वती या दोघांमधला एक रंजक संवाद पाहुया. (जो आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनातही पाहू शकतो). देवी पार्वती अस्वस्थ होते आणि शिव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. भगवान शिव - देवी, तू का काळजी करतेस? मी काय चूक केली? देवी पार्वती - भगवान, आपण आता माझ्यावर प्रेम करत नाहीत असे मला वाटते आहे. भगवान शिव - हे खरे नाही. तुला असे का वाटते? देवी पार्वती - आजकाल आपण मला आवडत असलेली फुले आणत नाहीत, यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो ? भगवान शिव (हसत) - अरे, फक्त इतकेच कारण आहे तर ! हे बघ, तुला माहीत आहे की नंदीची तब्येत बरी नाही आणि तुला माहीत आहे की तुझी आवडती फुले आणण्यासाठी मला त्याच्याबरोबर उंच पहाडावर जावे लागेल. जर नंदी आजारी असताना मी त्याला घेउन पहाडावर गेलो तर या अवस्थेत त्याच्यासाठी हे खूप त्रासदायक होईल. देवी पार्वती - ठीक आहे. मला हे मान्य आहे. पण अलीकडे आपण मला आपल्याबरोबर नृत्य करायला बोलावत नाही. भगवान शिव - देवी, तू माझी प्रिय पत्नी आहेस. नृत्य करण्यासाठी मला तुला आमंत्रित करण्याची गरज आहे का? तुला पाहिजे तेव्हा तू माझ्याबरोबर येऊ शकतोस. देवी पार्वती - मला फसवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ध्यान करत असता तेव्हा तुम्ही हसत असता हे माझ्या लक्षात आले आहे. मला माहीत आहे, तुम्ही दुसऱ्या स्त्रीबद्दल विचार करत आहात आणि हसत आहात. भगवान शिव - देवी, तू स्वत: सिद्ध योगिनी आणि आत्मज्ञानी आहेस. तुला माहिती आहे की ध्यान केल्याने माणसाच्या चेहऱ्यावर आंतरिक आनंद आणि शांती येते. देवी पार्वती - आजकाल तुम्ही सकाळी लवकर घरातून निघता आणि रात्री उशिरा परतता. भगवान शिव - देवी, हे तुला चांगलेच माहीत आहे. माझ्याकडे खूप गण आहेत,त्यांची मला काळजी घ्यायला हवी. तुला माझ्या जबाबदाऱ्या आणि चिंता माहित आहेत. कृपया तुझा नेमकी काय खरा मुद्दा आहे, तो कथन कर.
देवी पार्वती - (तिच्या दुःखाची सर्व काल्पनिक कारणांना भगवान शिव यशस्वीरित्या उत्तर दिल्याने चिडून तिच्या चिंतेचे खरे कारण सांगावे की नाही? यावर थोडा विचार करते, शेवटी जे काही मनात आहे, ते सांगायचेच असा निर्णय घेते) भगवान, आपण आपल्या मस्तकी जी ही गंगा धारण केलेली आहे, यामुळेच आपले माझ्यावर प्रेम आहे का नाही? याची शंका मनात आहे, माझ्या काळजीचे खरे कारण हेच आहे. भगवान शिव - (या सर्व रुसव्याचे खरे कारण समजल्यामुळे ) देवी, तु गंगेची काळजी करू नका. ती माझ्या मस्तकाचा हा एक छोटासा भाग आहे. तीची आणि स्वतःशी तुलना करू नका. तू माझी पत्नी आहेस आणि तू माझी अर्धांगिनी आहेस. आणि मग तो तिचे अर्धनारीश्वर रूप दाखवतो आणि देवी पार्वतीला खात्री देतो कि तीला वैवाहिक सुखाबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही.
भगवान शिव देवी पार्वतीची समजूत काढताना, गंगाईकोंडाचोलापुरम, तामिळनाडू
शिवाचे अर्धनारीश्वर रूप- ऋषी भृंगी यांना त्यांची चूक कळते शिवाने हे रूप कसे धारण केले याबद्दल आणखी एक कथा आहे. यानुसार, एकदा देव आणि ऋषी भगवान शिव आणि देवी पार्वतीला नमस्कार करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. सर्वांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली, ऋषी भृंगी हे भगवान शिवाचे कट्टर आणि निस्सीम भक्त होते, त्यांनी मात्र देवी पार्वतीकडे दुर्लक्ष केले. असे मानले जाते की भृंगी ऋषींनी हे फक्त भगवान शिवानाच सर्वश्रेष्ट मानत होते. म्हणून, त्यानी पार्वतीची पूजा करण्यास नकार दिला आणि केवळ भगवान शंकराची पूजा आणि प्रदक्षिणा केली.
भृंगी ऋषि, एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम
देवी पार्वतीला त्यांच्या वागण्याने आश्चर्य वाटले आणि रागही आला. भृंगी ऋषींना आपली चूक कळावी म्हणून पार्वतीनी त्यांचे सर्व स्त्रीरूप त्यांच्यापासून काढून घेतले. मांस आणि रक्त हे स्त्री शक्तीचे रूप आहे. यामुळे,शृंगी ऋषी केवळ सांगाड्याच्या स्वरुपात शिल्लक राहीले, अशा स्थितीत भृंगी ऋषींना उभे राहताही येत नव्हते.भगवान शिवानी आपल्या भक्ताची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा त्याने त्याला एक काठी दिली, जेणेकरून तो किमान त्याच्या पायावर उभा राहू शकेल. भृंगी ऋषींना या काठीच्या साहाय्याने चालण्याची इतकी सवय झाली की तो त्यांचा तिसरा पाय दिसू लागला. तथापि, या अडथळ्याला न जुमानता त्यांनी फक्त शिवाची पूजा आणि प्रदक्षिणा सुरू ठेवली.
बदामी,
कर्नाटक येथील अर्धनारीश्वर शिल्प, डाव्या बाजुला भृंगी तर उजव्या बाजुला
दाखवलेली महिला भक्त हातात एक पेटी घेउन जाताना दिसत आहेत.
याची तक्रार देवी पार्वतीने भगवान शंकराकडे केली. भगवान शिवानॉ पार्वतीचे म्हणणे मान्य केले की ते दोघेही एकच आहेत, परंतु आपल्या हट्टी भक्ताला ते पटवून देऊ शकले नाहीत.शेवटी त्याने देवी पार्वतीला आपल्यामध्ये विलीन होण्यासाठी आणि अर्धनारीश्वराच्या रूपात ऋषीसमोर येण्यास सुचवले, जेणेकरून दोघांच्या एकरुपतेबद्दल कोणाच्याही मनात शंका उरणार नाही;भगवान शिव आणि पर्वती हे दोन नाहीत तर एक आहेत याची सर्व ऋषींना खात्री पटेल आणि शिव-पार्वतीपैकी कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही हा संदेश सर्वत्र पसरेल. पुढच्या वेळी जेव्हा भृंगी ऋषी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आले तेव्हा शिव अर्धनारीश्वराच्या रूपात प्रकट झाले. तथापि, भृंगी ऋषी केवळ शिवाची उपासना करण्याबाबत इतके ठाम होते की त्यांनी स्वत: ला सुपारीमध्ये रूपांतरित केले आणि शिवाच्या अर्धनारीश्वर रूपाच्या मध्यभागी छिद्र पाडण्यास सुरुवात केली जेणेकरून ते केवळ शिवाच्या त्या भागाभोवती फिरू शकतील. त्यांची अलोट भक्ती आणि त्यासाठी काहीही करायची तयारी बघूनआश्चर्यचकित आणि प्रसन्न होऊन देवी पार्वतीने त्यांचा कट्टरपणा स्वीकारला आणि त्यांना आशीर्वादही दिला.अर्धनारीश्वर रूप हे शिवाचे पत्नीसोबत एकरुप होण्याच्या इच्छेचा परिणाम आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार, शिवाचे अर्धनारीश्वर रूप हे आपल्या जोडीदाराबरोबर सर्व काही सामायिक करण्याच्या इच्छेचा परिणाम आहे.त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा, अगदी त्याचे शरीर आणि तो अनुभवत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिने एक भाग असावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी आपल्या अर्ध्या शरीराचा त्याग केला आणि देवी पार्वतीला स्वतःमध्ये विलीन होण्याची विनंती केली, परिणामी अर्धनारीश्वर रूपाचा जन्म झाला.
भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपावरील आख्यायिका :- महाभारतात उपमन्यूचे असे मत दाखवले कि भगवान शिव हेच सर्वोच्च असून शिव हे एकटेच असे आहेत जे आपल्या शरीराचा अर्धा भाग आपल्या पत्नीसोबत विभागून घेतात. नयनार संतांनी त्यांच्या स्तोत्रात भगवान शिवांची स्तुती केली आहे. संत सुंदरर म्हणतात की, हे रूप शिव आणि माता पार्वतीदेवीची अविभाज्यता दर्शवते. संत संबंधर म्हणातात की, शिव या रूपात संदेश देतात कि ते म्हणजे स्त्री ही केवळ त्यांची पत्नी नसून त्यांचा एक शाश्वत भाग आहे. कवी कालिदास यांनी त्यांच्या काव्यात उपमा देताना लिहीले आहे की, हे रूप धारण करून भगवान शिव हा संदेश देऊ इच्छितात की ते आणि देवी पार्वती हे शब्द आणि त्याचा अर्थ किंवा अक्षर आणि उच्चार यांसारखे अविभाज्य आहेत. नवव्या शतकातील संत माणिककावचकर म्हणतात की हे रूप दर्शवते की देवी पार्वती ही भगवान शिवाची निस्सीम भक्त आहे आणि देवी पार्वतीच्या रूपात भगवान शिवाशी एकरूप होणे हेच भक्ताचे अंतिम ध्येय आहे.आचार्य रजनीश यांनी या रुपाला वैश्विक महत्त्व असलेले एक रहस्य मानले आहे कारण हे रुप पुरुषत्व आणि स्त्रीत्व या दोन परस्परविरोधी प्रतिकांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करते.
एलिफेंटा लेण्यातील अर्धनारीश्वर के रूपातील शिव मुर्ती
शेवटी आपण अर्धनारीश्वर म्हणून भगवान शिवाच्या प्राचीन मूर्ती कशा पाहायच्या, काय पाहायच्या आणि त्यांचे कौतुक कसे करावे याबद्दल बोलू. अर्धनारीश्वर स्वरूपाचा वरचा भाग :- या स्वरुपात मूर्तीचा शिव भाग सामान्यतः जटा असलेल्या केसांसह अर्धचंद्र कोरलेला असतो, तर देवी पार्वती भाग सामान्यतः फुल माळलेल्या केसांसह कोरलेला असतो. शिव भाग नख-कुंडल, सर्प-कुंडल किंवा साधे कुंडल परिधान केलेला दाखवला असतो तर देवी पार्वती पत्र-कुंडल, नख-कुंडल किंवा वालिका-कुंडल परिधान केलेले दाखवले असते. शिवाच्या कपाळावर तिसरा डोळा असतो आणि त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे पार्वतीच्या बाजुला तिसऱ्या डोळ्याच्या रेषेत बिंदू दाखवला असतो. अर्धनारीश्वर स्वरूपाचा मध्य भाग :- मध्यभागी, शिव रुपाला सपाट मर्दानी छाती, रुंद खांदे, रुंद कंबर आणि पुष्ट स्नायूं असलेल्या मांड्या दाखवल्या असतत. शिवाच्या गळ्याला सहसा यज्ञोपवीता असते. काही शिल्पांमध्ये हा धागा नाग-यज्ञोपविता (सापाचा धागा) किंवा मोती आणि रत्नांच्या माळा म्हणून दर्शविला असतो.या यज्ञोपविता, बहुतेक शिल्पाचे दोन भागांमध्ये विभाजन होते, शिव बाजू आणि पार्वती बाजू. उत्तर भारतातील चिन्हांमध्ये, पुरुषाची बाजू नग्न दर्शविली जाते, पूर्ण किंवा अर्धे लिंग आणि अंडकोष दाखवलेला असतो. तर दक्षिण भारतातील प्रतिमांमध्ये, शिवाने रेशीम किंवा सुती धोतर किंवा वाघाचे कातडे घातलेले, कंबरेपासून फक्त गुडघ्यापर्यंत शरीर झाकलेले आणि सर्प-मेखला, नागाच्या कमरपट्टा धारण केलेले दाखवले असते.बहुतेकदा पाउल वाकलेले आणि कमलासनात असते.
त्रिभंग मुद्रेतील, तीन भुजा असलेली अर्धनारीश्वर शिव , तंजावरर, तमिलनाडु
तर, देवी पार्वतीच्या बाजुला गोलाकार छाती दाखवली असते.तीने हातात निळे कमळ धारण केलेले असते जे गळ्याजवळ असते.तीचे हात बांगड्या आणि इतर दागिन्यांनी सुशोभित केलेले तसेच सिंहकटीवर मेखला दिसतो. तिला भरीव मांड्या, सुडौल शरीर आणि नितंब दाखवले आहे. धड, नितंब आणि पायाचा भाग हे पुरुष आणि मादी शरीरातील फरक दर्शवण्यासाठी उत्तमरित्या कोरलेले असतात. अर्धनारीश्वर स्वरूपाचा खालचा भाग :- पार्वतीने घोट्यापर्यंत लांबीचे रेशमी वस्त्र परिधान केलेले दाखवले असते आणि तीचे पाय मेंदीने लाल रंगवलेले असतात. ती हिमालयाची कन्या असल्याचे दर्शविणारा पोपट हिरव्या रंगवलेला असतो किंवा तिला गौरी म्हणून दर्शविण्यासाठी शिवाच्या पुरुष बाजूपेक्षा अधिक गोरी दाखवलेली असते.या शिल्पात इतके बारकावे दाखवलेले असतात कि मुर्तीचे उजव्या बाजुला भगवान शिवाचे भेदक दृष्टी तर मुर्तीच्या डाव्या बाजूला पार्वतीचे शांत आणि सौम्य करुणामय डोळे दाखवलेले असतात.
भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर स्वरूपाची उभी किंवा बसलेली मुद्रा :- या मूर्ती सामान्यतः शरीर वळवलेल्या स्थितीत दाखवलेल्याअसतात, बहुतेक अर्धनारी शिल्पे उभ्या म्हणजे स्थानक स्वरुपात असतात, परंतु काही मुर्ती बसलेल्या स्थितीतील म्हणजे आसन मूर्ती देखील आढळतात. जर या मुर्ती त्रिंभग अवस्थेतील असतील तर त्या शरीराच्या दोन जागी म्हणजे मान व कंबर इथे वळवलेल्या असतात. काही मुर्ती अभंग स्वरुपात असते (यामध्ये मूर्ती किंचित पुढे किंवा मागे वाकलेली दर्शविली जाते) तसेच या मुर्ती स्तंभन मुद्रेतही (उभ्या मुद्रा) दिसतात. जर मुर्ती आसन स्थितीत असेल तर सहसा कमळाच्या पीठावर बसलेली दर्शविली जाते. बहुतेक वेळा नंदी हे देवतेचे वाहन म्हणून कोरले जाते, जरी शिवाच्या बाजूला नंदी आणि देवी पार्वतीच्या बाजूला सिंह असलेली शिल्पे देखील आहेत.
अर्धनारीश्वर शिवाची त्रिभंग मुद्रेतील स्थानक मुर्ती
भगवान शिवाच्या अर्धनारीश्वराच्या दोन, तीन, चार आणि आठ हातांच्या मूर्ती :- अर्धनारीश्वर स्वरूपातील शिव दोन, तीन, चार आणि आठ हातांचे दाखवलेले असतात. दोन हात असलेली शिल्प हे सर्वात जुने स्वरूप आहे. या स्वरुपामध्ये सामान्यतः अभय मुद्रा (हात बोटे सरळ असून या मुद्राद्वारे व्यक्त केलेली कल्पना अशी आहे की देवता तुम्हाला सर्व वाईटांपासून वाचवते ) , वरदा मुद्रा ( यामध्ये हा उजवा तळहात सामान्यत: खालच्या बाजुला वळवलेला असतो. इथे कल्पना अशी आहे की देव त्याच्या भक्तांना वरदान देतो). तर पार्वतीच्या बाजुला, तीचा हातात नीळे कमळ किंवा आरसा असतो, तसेच हा हात कटक मुद्रेत (ज्याला सिंहकर्ण मुद्रा देखील म्हणतात, या मुद्रामध्ये बोटांची अग्रे किंवा टोक एकत्र जोडून अंगठीसारखा आकार बनतो. या आकारात पुजा करताना दररोज एक फूल अर्पण केले जाते) अनेक शिल्पांमध्ये देवी पार्वतीला वीणा वाजवताना दाखवलेली आहे, अर्थात वीणा वाजवण्यासाठी दोन्ही हात लागतात, ( एक हात शिवाचा तर एक पार्वतीचा ) म्हणून ते दैवी समरसतेचे प्रतीक मानले आहे. देवीचा पुढील हात बांगड्यांनी सजवलेला आहे.
दोन भुजा असलेली अर्धनारीश्वराची मूर्ति, पट्टदकल, कर्नाटक
त्रिभुज स्वरूपात शिवाच्या बाजुला दोन हात कोरलेले आहेत. पार्वतीच्या बाजूच्या एकाच हातात कमळ, आरसा किंवा पोपट दाखवलेला असतो. शिवाचे अलौकिकत्व दोन हातांनी दाखवले असते तर पार्वतीला मानव स्वरुपात एकाच हाताने दाखवले असते.
विष्णु-धर्मोत्तर पुराणात चार हात असलेल्या मूर्तींचे शाब्दिक वर्णन आहे. यानुसार, मुर्तीचे हात सामान्यतः कोपरमध्ये दुमडलेला असतो. शिवाच्या बाजुचा हात सामान्यतः अभय-मुद्रामध्ये कोरलेला असतो आणि दुसऱ्या हातात परशु किंवा त्रिशूळ किंवा जपमाळ असते, एक हात किंचित वाकलेला असतो आणि नंदीच्या डोक्यावर असतो आणि दुसऱ्या हात अभय मुद्रेत असू शकतो. तर पार्वतीच्या बाजूचा एक हात कटक-मुद्रामध्ये कोरलेला असतो, जो बौद्धिक क्षमतेचे संकेत देतो. किंवा त्या हातात कमंडलु, आरसा, कमळ, वीणा, डमरू किंवा पोपट धारण केलेले देखील दाखवलेले असू शकते.
मामल्लापुरम, तमिलनाडुमधील अर्धनारीश्वर शिवाची चार भुजा असलेले रूप
आठ भुजा असलेल्या मूर्तीमध्ये माला, तलवार, पाशा, मुसळ, कवटी (कपाल), कमळ आणि इतर वस्तू आहेत. भुवनेश्वरच्या परशुरामेश्वर मंदिरात आणि तामिळनाडूतील दारासुरममध्ये आठ हात असलेली मूर्ती आढळते. दारासुरम येथील मूर्ती तीन मुखी आहे.
तमिलनाडुमधील दारासुरम मधील आठ भुजांची, तीन शीर असलेली अर्धनारीश्वर शिव
श्री मुरली नटराजन यांच्या एका पोस्टवरून कळलं की ही मूर्ती खरं तर सदाशिवमूर्ती आणि भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपाचं मिश्रण आहे.
हातात
आरसा दिसला की मूर्तीत दर्पणा शोधायची नेहमी घाई असते... पण मग निरखून
पाहिल्यावर डोळ्यासमोर उंची राहिली ती हस्तीदंता मध्ये कोरलेली #अर्धनारीश्वराची सुबक आकृती.......!!
कवीकुलगुरू कालीदास रचित रघुवंश या महाकाव्याच्या प्रारंभीच अर्धनारीश्वर रूपाला नमस्कार केला आहे. वरील श्लोकामध्ये कालिदास असे म्हणतात की, शब्द व त्याचा अर्थ यांचे सम्यक ज्ञान व्हावे अश्या पद्धतीने एकमेकांशी निगडीत झालेल्या वाणी आणि अर्थ यांच्याप्रमाणे एकमेकांत मिळून गेलेल्या जगताचे मायबाप अश्या पार्वती-परमेश्वरांना मी वंदन करतो.
अर्धनारीश्वर हे स्वरूप विस्मय निर्माण करणारे आहे. पुरुष-प्रकृती तत्त्वातील सामरस्य या शिल्पामधून समजून घेता येते. शिवशक्तीची नित्य समरसता म्हणजे अद्वैत असे मानले आहे. या दोनही तत्त्वांच्या सामरस्याची सुरुवात दिसते ती उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमध्ये. पार्वती परमेश्वर या दम्पतींच्या शृंगार रसाचे दर्शन आलिंगन शिल्पातून अभिव्यक्त होते. या दिव्य, मुग्ध प्रेमातून शिव स्वरूपाला झालेला स्वयं साक्षात्कारामुळे हे ऐक्य साध्य होते. प्रकृती स्वरूप पार्वतीच्या दिव्यत्त्वाची प्रचीती येऊन शिव-पार्वती, अर्धनारीश्वर रूपाने संपूर्ण सृष्टीला दिव्य अद्भुत रसाचा साक्षात्कार घडवतात. शिव पार्वतीच्या शृंगार रसाचा परमोच्च बिंदू म्हणजे अद्भुत रसाच्या रूपात साकार होणारे हे अर्धनारीश्वर स्वरूप. शिवागामातील अद्वैतांत शक्तीचा म्हणजे मायेचा त्याग केलेला नसून ब्रह्मशक्ती म्हणजे तिचा संग्रहच केला आहे. माया ही प्रकृतीस्वरूपा असून महेश्वर तिचा धरणकर्ता आहे. स्वात्मपरिचयातून निर्माण होणारी जिज्ञासा विस्मय निर्माण करते जी या शिल्पांमधून शिल्पकारांनी साकारली आहे.
अर्धनारीश्वरचे स्वरूप हे शिल्पकारांसाठीही आकर्षक विषय ठरला असणार हे भारतभर आढळणाऱ्या वेगवेगळ्या शिल्पांमधून स्वाभाविकच दिसते.
अर्धनारीश्वर मुर्ती, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली
अंशुमदभेदागम, कामिकागम, सुप्रभेदागम, कारणागम या आगम ग्रंथात तसेच शिल्परत्न, बृहत्संहिता, विष्णुधर्मोत्तर पुराण आदि ग्रंथांमधून अर्धनारीश्वर विग्रहाचे स्वरुप-वर्णन बघायला मिळते. अर्धे शरीर पुरुषाचे आणि अर्धे नारीचे म्हटल्यावर दोनही शरीरांची ठेवण, त्यांचा बांधा, लवचिकता, नाजूकता या सर्वच गोष्टींचा प्रतेक्ष मूर्ती साकारताना अतिशय बाराकाईने विचार केला गेला आहे. उजवे अर्धे शरीर हे पुरुषाचे म्हणजे शिवाचे आणि वामंग म्हणजे डावे अर्धे शरीर हे स्त्रीचे म्हणजेच पार्वतीचे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आणि त्यावर चंद्रकोर असते. तर पार्वतीची, धम्मिल्ल प्रकारची केशसज्ज असते. शिवाच्या मस्तकावर अर्धा त्रिनेत्र असतो तर पार्वतीच्या मस्तकावर उभा अर्धा तिलक असतो. दोघांच्या शरीरावर असलेली आभूषणे आणि वस्त्रेही वेगवेगळी दाखवली जातात. शिवाच्या कानांमध्ये नक्रकुंडले, सर्पकुंडले असतात तर पार्वतीच्या डाव्या कानांमध्ये कुंडले असतात. दंडावरील केयूर , हातामधील कंकणे आणि पायामधील वलये यांमध्ये फरक असतो. पार्वतीची आभूषणे नाजूक आणि अधिक कोरीव दाखवतात. शिवाच्या कमरेपासून गुडघ्यापर्येंत नेसलेले व्याघ्र वस्त्र असते तर पार्वतीच्या कमरेपासून ते पायापर्येंत सुंदर असे नक्षीयुक्त मुलायम, तलम रेशमी वस्त्र दाखवले जाते. अर्धनारीश्वर मूर्तीमध्ये दोन, तीन किंवा चार हात दाखवतात. चतुर्भुज मूर्ती असेल तर शिवाकडे त्रिशूळ, परशु, अंकुश, अक्षमाला, टंक, अभय किंवा कराव अश्या मुद्रा शिल्पांकित करतात. पार्वतीच्या डाव्या हातामध्ये नीलोत्पल, दर्पण, पोपट किंवा कधी कधी तिच्या हात कट्यावलंबित अवस्थेमध्ये तिच्या मांडीवर स्थिरावलेला दाखवतात. शिव नंदीच्या डोक्यावर हात ठेऊन शरीराचा भार किंचितसा झुकवल्याने पार्वतीच्या शरीराला आपोआपच सुडौल अशी अवस्था प्राप्त होते.
इ.स ६-७ व्या शतकातील घारापुरी या लेणीमध्ये शिव-पार्वतीचे भव्य असे अर्धानिश्वर हे स्वरूप बघण्यासाठी देव-देवता, ऋषिगण, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, समस्त दिशापाल, संपूर्ण देवलोकच या शिल्पपटामध्ये अवतरीत झाला आहे. हा दिव्य अद्भुत रसाने व्याप्त सोहळा शिल्पकारांनी साक्षात शिल्पामधून साकार करून या अद्भुत रसाची अनुभूती अनंत काळापर्यंत डोळ्यात साठवून घेण्यासाठी ठेऊन गेले आहेत.
अर्धनारीश्वर (राजापुर, जि. हिंगोली)
औंढा नागनाथ जवळ राजापुर येथे तीन मुर्ती आहेत. यात सरस्वती आणि योग नरसिंह यांच्या मुर्ती आहेत. तिसरी अप्रतिम मुर्ती आहे अर्धनारीश्वराची. शिव पार्वतीची संयुक्त मुर्ती. उजव्या बाजुला शिव आहे आणि डावीकडे पार्वती. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते म्हणूनच वामांगी असा शब्द आला आहे. या शिल्पकाराचे कसब अगदी एक एक जागी आढळते. पार्वतीचा मुकुट सजलेला (करंडमुकुट) आणि शिवाचा मुकुट जटांचा. तिच्या कानात सुंदर नाजूक कुंडले तर शिवाच्या कानात सर्पाकार कुंडले. पार्वतीला हातभर काकणं, तोडे. बाजुबंद, खालच्या हातात नाजुकपणे धरलेला कमंडलू. कमरेला मेखला. कमाल म्हणजे तिच्या वस्त्रांवरची नक्षीही दाखवलेली आहे. पायात तोडे तर आहेतच पण अंगठ्या जवळच्या बोटात जोडवे पण आहेत. वरच्या हातात आरसा आहे. शिवाच्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या हातात अक्षयमाळा आहे. बाजुबंद सर्पाकार राकट आहे. पायात रूंडमाळा दिसतात, पण हीच माळ पार्वतीच्या बाजूने नाजूक दागिना बनते. गळ्यातील माळेचेही असेच. शिवाच्या बाजूने सरळ ठाशीव दिसणारी माळ पार्वतीच्या स्तनांवरून वळण घेत कलात्मक डौलदार बनते. तिचे वार्यावर उडणारे वस्त्र आणि शिवाचे जाडे भरडे वस्त्र. खाली शिवाचे वाहन नंदी आहे आणि पार्वतीचे सिंह न दाखवता लोध (मुंगुस किंवा घोरपड) दाखवले आहे. महाराष्ट्रात अर्धनारीश्वराच्या मुर्ती फार थोड्या आहेत. ज्या आहेत त्या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मुर्ती म्हणून कोरलेवी हाच एकमेव अप्रतिम नमुना. अर्धनारीश्वराच्या मांडीवर गणेश मुर्ती :-
मनुचरित्रमच्या प्रास्ताविक श्लोकात कृष्णदेवरायांच्या दरबारातील अष्टदिग्गज अल्लासनी पेद्दना यांनी लिहिलेल्या कवितेमध्ये त्यांनी अर्धनारीश्वराच्या रूपात माता पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या बाल गणेशाची कल्पना केली आहे.
शिव आणि पार्वती या दैवी जोडप्याचा विवाहप्रसंग ‘कल्याणसुंदर’ या नावाने
शिल्पांकित केला गेला आहे. विवाहप्रसंगाची लगबग, पाहुण्यांची गर्दी, सलज्ज
वधूवर आणि विधींचे तपशील या सर्व घटकांची रेलचेल दर्शविणारे कल्याणसुंदर
शिल्पपट भारतात सर्वत्र आढळून येतात. कल्याण म्हणजे लग्न. शंकर पार्वतीच्या
लग्नाचे अत्यंत मनोहारी शिल्पांकन अनेक मंदिरात दिसते. या शिल्पामध्ये
साधारणतः शंकराने पार्वतीय पाणिग्रहण केलेले दाखवते त्यामध्ये खाली होम
पेटलेला असतो आणि ब्रह्मदेव पौरोहित्य करताना दिसतो. याशिवाय
पार्वतीच्यामागे तिचे वडील हिमवान, तिची आई मेना आणि शिवाचे गण, दासदासी
वगैरे ही दाखवलेले असतात. दशावतार लेणीतील (वेरुळ लेणी क्र. १५) एका
शिल्पात पार्वतीने आपले दोनही शंकराच्या हातात दिलेले दिसतात. कैलास
मंदिरातील पूर्व भिंतीवर मात्र या मालिकेतील सर्वात सुंदर शिल्प कोरलेले
आहे. या शिल्पामध्ये पार्वतीने आपल्या उजव्या हाताने शंकराचा हात पकडलेला
असे अजब शिल्पांकन आहे. ही कलाकाराची चूक नसून त्याची असामान्य प्रतिभा इथे
प्रगटलेली दिसते. या शिल्पात वधू पार्वती लज्जेने मान झुकविलेली (अधोवदना)
व नजर खाली वळविलेली (सलज्जा) आणि डावा पाय किंचित वाकवून (सविनया) अशी
उभी आहे. पण गंमत पहा तिने शंकराचा हात हाती घेतला आहे. कलाकाराची चूक तर
नव्हे ? नाही, अहो हेच व्हावे म्हणून पार्वतीनेच तर तप केले होते. हे
जमविण्यातला तिने घेतलेला पुढाकार यात दर्शविलेला आहे. पण हे धारिष्ट्य
सर्वांसमोर करावे लागले त्यामुळे ती संकोचली आहे. ज्यामुळे तिच्या डाव्या
पायाच्या अंगठ्याने उजव्या पायाचा अंगठा घासते आहे. निर्जीव पाषाणात साकार
केलेला हा जिवंत देखावा खरोखरच पाहण्यासारखा आहे. शंकराचाही उजवा गुडघा
किंचित वाकलेला आहे. साहजिकच आहे. मी मी म्हणणाऱ्या नवरदेवांप्रमाणे
साक्षात महादेवाचीही बोहल्यावर चढल्यावर अशीच गत झाली असेल नाही का? शिवपार्वती विवाह, कैलास मंदिर, वेरूळ कल्याणसुंदर मूर्ती, रतनपुरा (जि. बिलासपूर, छत्तीसगढ).
दक्ष प्रजापतीने एक यज्ञ केला आणि त्यासाठी सर्व देवदेवतांना निमंत्रण
दिले. मात्र स्वतःची मुलगी सती आणि जावई शिव यांना कटाक्षाने वगळले.
पित्याच्या या कृतीमुळे अपमानित झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःची
आहुती देऊन प्राणत्याग केला. पुढे तिने हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून
जन्म घेतला. याही जन्मात शिवच आपल्याला पती म्हणून लाभावा यासाठी तिने
घनघोर तप सुरू केले. त्यावेळी शंकरही तपश्चर्येत मग्न होते. इकडे, तारकासुर
नावाचा दैत्य देवादिकांना त्रास देत होता. विधिलिखिताप्रमाणे त्याचे
पारिपत्य शंकराच्या पुत्राच्या हातून व्हावयाचे होते. त्यासाठी शंकराने
लवकर विवाह करावा म्हणून देवांनी मदनाला त्याची तपश्चर्या भंग करण्यास
पाठवले. हे लक्षात आल्यावर क्रोधित झालेल्या शिवशंकरांनी आपला तिसरा डोळा
उघडून मदनाला भस्म केले. मात्र नंतर सर्व देवतांच्या इच्छेचा मान राखून
त्यांनी पार्वतीशी विवाह केला. या कथेवर आधारित दोन प्रकारच्या प्रतिमा
अस्तित्वात आल्या; पहिली कामांतक/मदनांतक शिव आणि दुसरी कल्याणसुंदर.
अंशुमद्भेदागम, पूर्वकारणागम, उत्तरकारणागम इत्यादी आगमग्रंथांमध्ये
कल्याणसुंदर मूर्तीचे वर्णन तपशीलवार केलेले आढळते. त्यानुसार या
विवाहप्रसंगाच्या चित्रणात वरवधू शिव आणि पार्वती हे पूर्वेस तोंड करून
मध्यवर्ती असावेत. चंद्रशेखर शिव हा त्रिभंगावस्थेत एक पाय जमिनीवर व दुसरा
पाय किंचित उचललेला, अशा स्थितीत उभा असावा. त्याच्या मागील दोन्ही हातांत
परशू आणि मृग असावेत, तर पुढच्या दोन हातांपैकी डावा हात वरदमुद्रेत व
उजवा हात वधूच्या हातात असावा. त्याच्या कानात वासुकी सर्पाची कुंडले,
पुष्कर सर्पाचा हार, तक्षकाचा उदरबंध व जटामुकुटादी आभूषणे असावीत. शिवाची
प्रतिमा चतुर्भुज, त्रिनेत्र आणि रक्तवर्णीय असावी; अपवादात्मक परिस्थितीत
तो द्विभुज असतो. शिवाच्या डावीकडे (कधी उजवीकडे) उभी असलेली पार्वती
सावळ्या वर्णाची, सलज्ज असून आपला उजवा हात तिने पाणिग्रहणासाठी शिवापुढे
लांबविलेला असावा. तिची उंची शिवाच्या छाती, खांदा किंवा हनुवटीइतकी असावी.
ती द्विभुज असून रेशमी वस्त्रे आणि यथायोग्य अलंकारांनी नटलेली असावी.
ब्रह्मा आणि विष्णू हे अनुक्रमे पुरोहित व वधुपित्याच्या भूमिकेत असावेत.
विष्णूच्या हाती उदकपात्र असून तो कन्यादान करत असावा. चतुर्मुख व चतुर्भुज
ब्रह्मा हा खाली यज्ञकुंडाजवळ बसून होम व इतर विधी पार पाडत असावा. क्वचित
एखाद्या ठिकाणी तो अग्नीजवळ नसून दूर, कमंडलू घेऊन उभा असल्याचे पाहावयास
मिळते. विष्णूच्या दोन्ही पत्नी लक्ष्मी आणि भूदेवी पार्वतीच्या मागे, तिला
विवाहवेदीकडे आणण्याच्या आविर्भावात असावयास हव्यात. पार्श्वभूमीवर विविध
देवतांचे अंकन असावे, त्यात अष्टदिक्पाल, विद्याधर, सिद्ध, यक्ष, गंधर्व,
ऋषी, मातृका आणि इतर देवदेवतांचा समावेश असावा. काही ठिकाणी शिव-पार्वतीचा
विवाह पर्वताच्या आत म्हणजेच पार्वतीचा पिता हिमालयाच्या घरी होत आहे, असे
दर्शविलेले आढळते. कल्याणसुंदर प्रतिमा सहसा इ. स. सातव्या
शतकानंतर विकसित झालेल्या आढळून येतात. त्यांपैकी सर्वांत भव्य आणि कलात्मक
आविष्कार म्हणून मुंबई येथील घारापुरी (एलिफंटा) बेटावरील लेण्यातील
प्रतिमेकडे बोट दाखवता येईल. यात शिव आणि पार्वती मध्यवर्ती ठिकाणी उभे
असून पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस आहे. चतुर्भुज शिवाचा पुढचा उजवा हात
पार्वतीच्या उजव्या हातात आहे. पार्वतीची देहयष्टी अतिशय आकर्षक असून तिची
अधोवदन मुद्रा सलज्ज आहे. तिच्या एका बाजूस पिता हिमालय व दुसऱ्या बाजूस
लक्ष्मी आणि तिच्या मागे हाती उदकपात्र घेऊन विष्णू उपस्थित आहेत. ब्रह्मा
होमाशेजारी बसून पौरोहित्य करत आहे. या मंगलप्रसंगासाठी अंतराळात
अष्टदिक्पाल व इतर देवदेवतांनी गर्दी केलेली दिसते. वेरूळच्या धुमार
लेण्यातील (लेणे क्र. २९) शिल्पपटाशी घारापुरी येथील शिल्पाचे लक्षणीय
साम्य आहे, मात्र कलादृष्ट्या घारापुरीचे शिल्प अधिक उजवे आहे.
कल्याणसुंदर शिव, वेरूळ लेणे क्र. २९, (जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र).
वेरूळच्या
रामेश्वर लेण्यात (लेणे क्र. २१)
उत्तर भिंतीवर भव्य कल्याणसुंदर शिल्पपट
आहे. तो तीन भागांत विभागलेला आहे. सर्वांत डावीकडे पार्वती पंचाग्नीसाधना
(चारही दिशांना अग्नी व माथ्यावर तळपता सूर्य यांच्या दाहक तेजामध्ये उभे
राहून तप करणे) करताना दिसते. तिच्या एका हातात अक्षमाला असून दुसरा हात
सैल सोडलेला आहे. तिच्याजवळ एक याचक अन्नाची याचना करताना दिसतो.
वराहपुराणातील कथेनुसार प्रत्यक्ष शंकर तिची परीक्षा पाहण्यासाठी याचकाचे
रूप घेऊन आले. पार्वतीने अन्नदान करण्यापूर्वी त्यास स्नान करून येण्यास
सांगितले, तेव्हा नदीत एका मगरीने त्याचा पाय धरला; याचकाच्या हाका ऐकून
पार्वती तेथे गेली असता तिच्या लक्षात आले की, मगरीच्या तोंडातून
सोडविण्यासाठी त्याचा हात धरून वर ओढणे आवश्यक होते. उजवा हात शंकरासाठी
राखून ठेवलेला असल्यामुळे तिने आपला डावा हात देऊन याचकाला बाहेर यायला मदत
केली व त्याचा जीव वाचविला. या भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी
आपले खरे स्वरूप प्रकट केले. हा सारा कथाभाग या शिल्पात चित्रित केलेला
आहे. उजवीकडच्या शिल्पात ब्रह्मा, बृहस्पती व पार्वतीपिता हिमालय
विवाहप्रस्तावासंबंधी चर्चा करीत आहेत. एका बाजूला पार्वतीही उभी दिसते.
मध्यवर्ती शिल्पात प्रत्यक्ष विवाहाचे अंकन दिसते. पार्वती शिवाच्या
उजवीकडे उभी असून तिचा उजवा हात शिवाच्या उजव्या हातात आहे. विष्णूच्या
हाती उदकपात्र असून तो कन्यादानाच्या पावित्र्यात आहे. ब्रह्मा व इतर
ऋषीमुनी उजव्या कोपऱ्यात खाली बसून होमादी विधी करत आहेत. सोहळ्यास उपस्थित
असलेले इतर देवदेवता आजूबाजूला दिसतात, तर खालच्या सलग पट्टिकेत शिवगण
वाद्ये वाजवत, नाचत आहेत. अशीच काही भावस्पर्शी शिल्पे वेरूळ येथील दशावतार
लेणे (क्र. १५) आणि कैलास (लेणे क्र. १६) मध्येसुद्धा पाहायला मिळतात.
कैलासमधील मंदिरासभोवतीच्या व्हरांड्यात असलेले शिल्प खूप बोलके आहे. या
लग्नासाठी पार्वतीचा पुढाकार असल्यामुळे तिने शिवाचा हात हातात घेतला आहे,
असे दिसते. तसेच ती विवाहप्रसंगी सलज्जा असल्यामुळे अंगठ्याने जमीन
खरवडताना दाखवली आहे.
झाशीच्या राणीमहाल येथील संग्रहात एक मिश्र
प्रतिमा आहे. येथे कल्याणसुंदर आणि उमामहेश्वर हे दोन्ही प्रकार एकाच
मूर्तीत दाखविले आहेत. शिव आणि पार्वती एका हाताने पाणिग्रहण करीत असतानाच
दुसऱ्या हाताने एकमेकांना आलिंगन देत आहेत. शंकर चतुर्भुज असून त्याच्या
मागच्या दोन्ही हातांत त्रिशूळ व सर्प आहेत, तर पुढील हातांपैकी उजवा हात
पाणिग्रहण व डावा हात पार्वतीस स्तनस्पर्श करीत आहे. खाली होमाजवळ
ब्रह्मदेव विधी पार पाडत आहे. वधूवरांच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी आठ
घटांच्या उतरंडी ठेवलेल्या असून सर्वांत वरच्या घटांवर कळस आहेत.
तमिळनाडूतील तिरुवोट्टियुर येथे कांस्याची एक सुरेख चोलकालीन प्रतिमा आहे.
त्यात शिव आणि पार्वती हे वेगवेगळ्या पद्मपीठांवर उभे असून शिवाची प्रतिमा
त्रिनेत्री व चतुर्भुज आहे. त्याच्या मागच्या उजव्या हातात परशू व डाव्या
हातात मृग असून पुढचा डावा हात अभयमुद्रेत आहे. त्याने आपल्या पुढच्या
उजव्या हाताने पार्वतीचा उजवा हात धरला आहे. शिव द्विभंगावस्थेत उभा असून
त्याने जटामुकुट, यज्ञोपवीत, हार, कटिबंध ही आभूषणे धारण केली आहेत; तर
पार्वतीची द्विभुज प्रतिमा सलज्ज व काहीशी अधोवदन आहे. तिच्या मस्तकावर
करंडमुकुट असून ती इतर अनेक अलंकार ल्याली आहे. ही कलात्मक प्रतिमा
अकराव्या शतकातील आहे. या व्यतिरिक्त रतनपुरा (जि. बिलासपूर,
छत्तीसगढ), गया (बिहार), औंढा नागनाथ (जि. हिंगोली, महाराष्ट्र),
सुंदरेश्वर मंदिर (मदुरा, तमिळनाडू) येथे काही उल्लेखनीय कल्याणसुंदर
प्रतिमा आढळतात.
शिव पार्वती पाणिग्रहण कैलास लेणं हे केवळ अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले आहे, वास्तुशास्त्राचा अद्वितिय नमुना आहे इतकंच नव्हे. तर या लेण्यात संस्कृतीक चालीरिती कोरलेल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी आजही सनातन पद्धतीने जो विविहसोहळा पार पडतो त्यात "पाणिग्रहण" असा विधी आहे. तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेण्यांत हाच विधी अशाच पद्धतीने शिल्पांकित केला आहे. हा प्रसंग शिव पार्वती विवाह सोहळ्याचा आहे. शिवाचा डावा हात पार्वतीच्या उजव्या खांद्यावर आहे. उजवा हात हातात घेतला आहे. पार्वती सलज्ज अशी जराशी मान खाली झुकवून उभी आहे. दोघेही ललित मुद्रते सहजतेने उभे आहेत. सुख दू:खात हीला सोबत घेवून धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ मी प्राप्त करेन, हीला सुखात ठेवेन, ही माझी सहधर्मचारीणी आहे अशा आशयाचे हे संस्कृत मंत्र आहेत. हे आजही उच्चारले जातात. शिव पार्वती जसे उभे आहेत अगदी तसेच आजही जोडप्याला उभे केले जाते. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते. म्हणूनच तीला "वामांगी" असा शब्द आहे. उजव्या बाजूला आई, बहिण, मुलगी, सुन अथवा पुरूषाची शक्ती दर्शविलेली असते.खाली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. जे की या विवाह सोहळ्याचे पौराहित्य करत होते. कैलास लेणे या दृष्टीनेही पहायला पाहिजे.
उमा-महेश्वरमूर्तीचे एक चित्र, ऐहोळे, कर्नाटक.
गौरीहर किंवा हरगौरी प्रतिमा :-
उमा-महेश्वर प्रकारातील आणखी एक वैविध्य म्हणजे गौरीहर किंवा हरगौरी प्रतिमा. यात शिवाजवळ त्याचे वाहन नंदी आणि पार्वतीजवळ तिचे वाहन गोधा (घोरपड) दाखवतात. या गोधेबद्दल ‘गोधसना भवेद गोधा’ अर्थात गोधेवर आसनस्थ झालेली ती गौरी, असे म्हटले आहे. गौरीहर मूर्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे निलंगा (जि. लातूर, महाराष्ट्र) येथील निळकंठेश्वर त्रिदल मंदिरात असलेली प्रतिमा. यात हर आणि गौरी वज्रपीठावर एकत्र बसलेले असून वर मकरतोरण आहे. हराच्या मागच्या दोन्ही हातांत त्रिशूळ, नाग असून पुढील उजव्या हातात अक्षमाला आहे व डावा हात पार्वतीच्या खांद्यावर आहे. गौरीनेही आपल्या उजव्या हाताने हरास आलिंगन दिलेले असून तिच्या डाव्या हातात बीजफल धारण केले आहे. शिवाजवळ शिवगण, मोरावर बसलेला कार्तिकेय आणि नंदी, तर गौरीच्या जवळ गणेश आणि तिचे वाहन गोधा आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती राहेर (जि. नांदेड), वेळापूर (जि. सोलापूर), राजापूर (जि. हिंगोली), तसेच बदामी (जि. विजापूर) कर्नाटक येथे आढळतात.
देवीदेखील अशा प्रकारच्या प्रतिमेत त्याच आसनावर शिवासह स्थानापन्न झालेली असेल, तर ती उमासहितमूर्ती होय. देवी सहसा शिवाच्या डाव्या बाजूस असते. द्विभुज अशा पार्वतीने उजव्या हाती कमळ धारण केलेले असते; डावा हात सिंहकर्णमुद्रेत किंवा पीठावर सहजपणे ठेवलेला असतो. तिच्या मस्तकावर करंडमुकुट व अंगावर इतर आभूषणे असतात. अशा प्रकारे एकाच प्रभामंडळाखाली एकत्र बसलेली शिव-पार्वतीची मूर्ती ही ‘उमासहितमूर्ती’ म्हणून ओळखली जाते.
सोमास्कंदमूर्ती :-
उत्तर भारतातील शिव-पार्वतीच्या आसनमूर्तींत उमा-महेश्वरमूर्ती लोकप्रिय आहेत. दक्षिणेतही सुखासनमूर्ती, उमासहितमूर्ती, उमा-महेश्वर, सोमास्कंद या सर्व महत्त्वाच्या मानल्या जातात. मत्स्यपुराण, अपराजितपृच्छा या ग्रंथांत त्यांचे वर्णन आढळते. शिल्परत्नात सुखासनमूर्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘ही चतुर्भुज मूर्ती बैठ्या अवस्थेत असून अतिशय देखणी, रजोगुणयुक्त असावी. पोवळ्या लाल रंगाची ही मूर्ती भद्रपीठावर डावा पाय दुमडलेल्या व उजवा पाय खाली लोंबकळत असलेल्या अवस्थेत असावी. तिने व्याघ्रचर्म तसेच रेशमी वस्त्रे परिधान केलेली असावीत. मागच्या उजव्या व डाव्या हातात अनुक्रमे परशु व मृग असावेत, तर पुढचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा हात वरद किंवा सिंहकर्णमुद्रेत असावा. जटामुकुट, यज्ञोपवीत, सर्पकंकणादी आभूषणे असावीत.ʼ अशा वर्णनात बसणाऱ्या शिवप्रतिमेला सुखासनमूर्ती म्हणतात. देवीदेखील अशा प्रकारच्या प्रतिमेत त्याच आसनावर शिवासह स्थानापन्न झालेली असेल, तर ती उमासहितमूर्ती होय. देवी सहसा शिवाच्या डाव्या बाजूस असते. द्विभुज अशा पार्वतीने उजव्या हाती कमळ धारण केलेले असते; डावा हात सिंहकर्णमुद्रेत किंवा पीठावर सहजपणे ठेवलेला असतो. तिच्या मस्तकावर करंडमुकुट व अंगावर इतर आभूषणे असतात. अशा प्रकारे एकाच प्रभामंडळाखाली एकत्र बसलेली शिव-पार्वतीची मूर्ती ही ‘उमासहितमूर्ती’ म्हणून ओळखली जाते. सोमास्कंद मूर्तीदेखील अशाच प्रकारची शिव-पार्वतीची एकत्रित प्रतिमा असून त्यात व उमासहितमूर्तीत मुख्य फरक म्हणजे शिव आणि उमेच्या मध्ये बाळ कार्तिकेय दाखवितात. (स उमा स्कंद) पार्वती आणि स्कंद - कार्तिकेय यांच्यासह असणारे हे शिल्प असते. या शिल्पामध्ये शंकर आणि पार्वती यांच्या बरोबरच छोटासा (बाल) स्कंदही असतो. तो उभा, दोघांमध्ये पीठावर बसलेला किंवा उमेच्या मांडीवर बसलेला असतो. कधीकधी तो नृत्य करतानाही दाखवतात. अशावेळी कार्तिकेयाला एकच मुख, दोन डोळे व दोन बाहू दाखवतात. त्याने करंडमुकुट, नक्रकुंडले व इतर आभूषणे धारण केलेली असतात. उभ्या स्कंदाच्या उजव्या हातात कमळ व डावा हात सैल सोडलेला असतो.सहसा सोमास्कंद प्रकारची उभी मूर्ती आढळत नाही. महाबलिपुरम् येथील धर्मराजरथाच्या शिल्पात एक उत्तम सोमास्कंदमूर्ती आहे. येथे शिव-पार्वती दोघेही वामललितासनात बसलेले असून बाळ स्कंद पार्वतीच्या मांडीवर आहे. शिवाचा वरचा उजवा हात व खालच्या हाताचा पंजा नाहीसा झालेला असून वरचा डावा हात खांद्यास स्पर्श करीत आहे, तर खालचा, ध्यानमुद्रेत आहे. पार्वतीने उजव्या हाताने स्कंदास धरले असून डावा हात आसनावर ठेवलेला आहे. शिवाच्या मागे उजवीकडे ब्रह्मदेव आणि डावीकडे विष्णू आहेत. हात लांबवलेली व पाय किंचित उचललेली बाळ कार्तिकेयाची मूर्ती अत्यंत नैसर्गिक वाटते. वेरूळ येथील कैलास लेण्यात नंदीवर बसलेल्या सोमास्कंदाची मूर्ती आहे. शिव चतुर्भुज असून त्याच्या शेजारी पार्वती व तिच्या मांडीवर कार्तिकेय आहे. शिवाच्या सोमस्कंदमार्ति पैलूबद्दल अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. शिव आणि उमा यांच्यातील बालक मुरुकनचे शिल्प दाखवणे हे प्रामुख्याने कौटुंबिक जीवनात मुलाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केले जाते. पुरनरू आणि तिरुक्कूरा सारख्या तमिळ काव्ये देखील आनंदी आणि सुसंवादी समाजासाठी मुलांच्या महत्त्वावर भर देतात. संस्कृत ग्रंथ अवंती सुंदरी कथा देखील या मताचे समर्थन करते. पल्लव राजाच्या राणीने, मंडपातील सोमस्कंदाचे चित्र पाहून, तिला चित्रात दर्शविलेल्या स्कंदासारखे सुंदर मूल मिळावे म्हणून देवाकडे प्रार्थना केली. दुसरे मत असे आहे की या तीन मुर्ती सत्, चित् आणि आनंद दर्शवतात. याशिवाय असे मानले जाते की शिव, उमा आणि स्कंद अनुक्रमे इच्छा-शक्ती, क्रिया-शक्ती आणि जनक-शक्ती यांचे प्रतिनिधित्व करतात (वैत्यलिंगम १९८०-९० ). पुन्हा उमा आणि स्कंद यांच्या सहवासात शिव हे वैश्विक पितृत्वाचे प्रतीक आहे (नागस्वामी, १९८३). कालिदासाने जगाचे पिता आणि माता (जगत पित्रौ) म्हणून या जोडप्याचे कौतुक केले आहे. कालिदासाने कुमारच्या जन्मावर कुमारसंभवम् हे अमर महाकाव्य लिहीले. कुमारकुरुपार यांनी त्यांच्या पिरापंतथिरट्टूमध्ये तीन मुर्तींची तुलना अनुक्रमे सत्त्व, तमसा आणि रजस या तीन गुणांशी केली आहे. शेवटी, सोमस्कंदमार्ति हे शिव आणि उमा यांचे एकत्रित रूप असलेल्या स्कंदाच्या उपासनेवर भर देते. सोमास्कंद मुर्तीचे शास्त्र :- उमा-महेश्वरमूर्तीबद्दल विष्णूधर्मोत्तर पुराण आणि रूपमंडन सविस्तर माहिती देतात. विष्णूधर्मोत्तर पुराणाच्या मते, शिव व उमा हे आलिंगनावस्थेत एका पीठावर बसलेले असावेत. शिव द्विभुज असून त्याच्या उजव्या हातात निलोत्पल (निळे कमळ) व डावा हात उमेच्या खांद्यावर असावा. डोक्यावर जटामुकुट व चंद्रकोर असावी. उमेचाही हात शिवाच्या अंगाभोवती असून डाव्या हातात आरसा धरलेला असावा. रूपमंडन ग्रंथाच्या मते, शिवप्रतिमा चतुर्भुज असावी; तिच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ, खालच्या हातात म्हाळुंग (एक फळ), एका डाव्या हातात नाग व दुसरा पार्वतीच्या खांद्यावर असावा. ऐहोळे (कर्नाटक) येथील उत्तर चालुक्यकालीन शिल्पात शिव सव्यललितासनात बसलेला असून उजव्या हातात नाग आणि त्रिशूळ आहेत. खालच्या डाव्या हाताने पार्वतीस आलिंगन दिले आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या व डावा स्वतःच्या मांडीवर ठेवला आहे. सभोवार नंदी, भृंगी व इतर शिवगण आहेत. वेरुळमध्ये हे शिल्प कैलास मंदिराच्या गर्भगृहाबाहेरील उजवीकडच्या भिंतीवर आहे. यातील पार्वतीचे डोके मात्र आता नाही. शिवाच्या मांडीवर बाल स्कंद असून तो आपल्या आईकडे बघतो आहे, परंतु त्याचा उजवा हात उचललेला असून त्याची मूठ वळलेली आहे. तो आपल्या छोट्या तर्जनीने शिवाकडे बोट दाखवून आपले बाबा हे किती मोठे आहेत हे अभिमानाने सांगतो आहे.
उत्तर भारतातील शिव-पार्वतीच्या आसनमूर्तींत उमा-महेश्वरमूर्ती लोकप्रिय आहेत. दक्षिणेतही सुखासनमूर्ती, उमासहितमूर्ती, उमा-महेश्वर, सोमास्कंद या सर्व महत्त्वाच्या मानल्या जातात. मत्स्यपुराण, अपराजितपृच्छा या ग्रंथांत त्यांचे वर्णन आढळते. शिल्परत्नात सुखासनमूर्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘ही चतुर्भुज मूर्ती बैठ्या अवस्थेत असून अतिशय देखणी, रजोगुणयुक्त असावी. पोवळ्या लाल रंगाची ही मूर्ती भद्रपीठावर डावा पाय दुमडलेल्या व उजवा पाय खाली लोंबकळत असलेल्या अवस्थेत असावी. तिने व्याघ्रचर्म तसेच रेशमी वस्त्रे परिधान केलेली असावीत. मागच्या उजव्या व डाव्या हातात अनुक्रमे परशु व मृग असावेत, तर पुढचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा हात वरद किंवा सिंहकर्णमुद्रेत असावा. जटामुकुट, यज्ञोपवीत, सर्पकंकणादी आभूषणे असावीत.ʼ अशा वर्णनात बसणाऱ्या शिवप्रतिमेला सुखासनमूर्ती म्हणतात.
सोमास्कंद, महाबलीपुरम, तमिळनाडू
असेच शिल्प महाबलिपुरमच्या समुद्र किनाऱ्याजवळील मंदिरातही आहे. तेथे कार्तिकेयाच उजवा हात अशाच प्रकारे शंकराकडे बोट करताना दिसतो, तर त्याचा डावा हात त्याने स्वतःच छातीवर ठेवला आहे. माझे बाबा आहेत असे तो आग्रहाने दाखवतो आहे.
सहसा सोमास्कंद प्रकारची उभी मूर्ती आढळत नाही. महाबलिपुरम् येथील धर्मराजरथाच्या शिल्पात एक उत्तम सोमास्कंदमूर्ती आहे. येथे शिव-पार्वती दोघेही वामललितासनात बसलेले असून बाळ स्कंद पार्वतीच्या मांडीवर आहे. शिवाचा वरचा उजवा हात व खालच्या हाताचा पंजा नाहीसा झालेला असून वरचा डावा हात खांद्यास स्पर्श करीत आहे, तर खालचा, ध्यानमुद्रेत आहे. पार्वतीने उजव्या हाताने स्कंदास धरले असून डावा हात आसनावर ठेवलेला आहे. शिवाच्या मागे उजवीकडे ब्रह्मदेव आणि डावीकडे विष्णू आहेत. हात लांबवलेली व पाय किंचित उचललेली बाळ कार्तिकेयाची मूर्ती अत्यंत नैसर्गिक वाटते. वेरूळ येथील कैलास लेण्यात नंदीवर बसलेल्या सोमास्कंदाची मूर्ती आहे. शिव चतुर्भुज असून त्याच्या शेजारी पार्वती व तिच्या मांडीवर कार्तिकेय आहे.
काशीपुरम कुमार कट्टम मंदिरात खोली क्रमांक ४१ मध्ये सोमास्कंदाचे चित्र आहे.चित्रकला अतिशय सुंदर आहे (आशिवरी मूर्ती, १९६८:६५). शिशु स्कंद हे निरागसतेचे एक प्रतिक आहे. एक लहान मुकुट त्याच्या किशोरवयीन डोक्यावर शोभतो. आईच्या कुशीतून तो वडिलांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहतो.
सोमस्कंदची कांस्य मूर्ती
स्मस्कंदमृतींच्या कांस्य मुर्तीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या, या मुर्ती कलात्मक उत्कृष्ट होत्या. या मुर्तीत स्कंद बसलेले, उभे आणि नृत्य करताना दिसतात.
सुरुवातीच्या काळातील सर्वोत्तम सोमास्कंद मुर्तीपैकी एक पल्लवनेश्वरम येथील पल्लवनेश्वरस्वामी मंदिरात आहे. मंदिराचे आणि गावाचे नावावरुनच आपण अंदाज बांधू शकतो कि या नावाचा संबंध पल्लवांच्या राज्याशी संबंध आहे.इथे असलेली मुर्ती पल्लव कालखंडातील म्हणजे नवव्या आणि दहाव्या शतकातील कालखंडातील शिल्पकला पाहता येते. पल्लव समुहाच्या कालखंडातील शिल्पात स्वप्नात हरवलेला स्कंद नैसर्गिक पद्धतीने बसला आहे (शिवरामृति, १९६३: ५८). या मुर्तीला कर्णभुषण म्हणजे फुले दाखवली आहेत. कपाळावर दागिने माळले केले आहेत. उजव्या हातात कमळाचे फूल तर डावा हात वरद मुद्रेत आहे. स्कंदाची दृष्टी वर आहे. अंगावर धारण केलेल दागिने अत्यंत नाजुक आणि उत्कृष्ट कोरीवकाम केलेल दाखवले आहेत. विशेष करुन केयुर, कंकण आणि इतर हस्त अभुषणे लक्षवेधी आहेत.
सोमस्कंद मुर्ती
तिरुत्तुरप्पी येथील वर्धमानेश्वर मंदिरातील शकंद शिल्पसमूहात इसवी सन ९५० मधील मुर्तीमध्ये स्कंद पाय दुमडून बसला आहे. दोन्ही हातात फुले आहेत. त्यांनी अधोवस्त्र परिधान केले असून त्यांच्या डोक्यावर फुलांची छोटी माला आहे. त्यांचा एक हात काक मुद्रेत आणि दुसरा वरद मुद्रेत आहे.
शिवपुरम येथून सापडलेली स्कंदाची मूर्ती १० व्या शतकाच्या मध्यातील आहे.खरेतर स्कंदाची मूर्ती हि एक रत्न आहे.मुर्तीतील प्रत्येक बारकावा अचूकतेने दाखवला आहे. नृत्यमुर्ती असल्यामुळे नृत्यातील लयबद्धपणा दाखवला आहे. तिरुवेस्कूच्या श्वेतरण्येश्वर मंदिरातून मिळालेली स्कंद मूर्ती अतिशय सुंदर आहे.हि मुर्ती स्थानक म्हणके उभ्या स्थितीत असल्याने त्याचा चेहरा स्थिर दिसतो.
तिरुत्तुरप्पी येथील शिव मंदिराच्या समुहात असलेल्या वर्धमानेश्वर मंदिरातील इसवी सन ९५० मध्ये कोरलेल्या मुर्तीत स्कंद पाय दुमडून बसला आहे. दोन्ही हातात फुले आहेत. त्यांनी रेशमी वस्त्र परिधान केले असून त्यांच्या डोक्यावर फुले माळलेला छोटा हार आहे. त्यांचा एक हात काक मुद्रेत आणि दुसरा वरद मुद्रेत आहे.
तंजावर जिल्ह्यातील नादूर येथून मिळालेल्या स्कंद शिल्पाचा इतिहास
इसवी सन ११व्या शतकापर्यंत मागे जातो. यामध्ये शिशुस्कंदाचे शिल्प अतिशय
प्रभावी पद्धतीने केले आहे. स्कंद शिल्पाची कलात्मक वैशिष्ट्ये त्यातील
बारकाव्याने आणखी वाढवली आहेत, ज्यामध्ये कर्णभुषण आणि कमरबंद यासारख्या
दागिने दाखवले आहे, ज्यामध्ये दोन्ही मांड्यांवर दागिने दाखवले आहेत.
सोमास्कंद मूर्ती, शिव मंदिर, मडेयूर (मड्डूरू), आंध्र प्रदेश.
वैट्टुकुवरण येथील १२ व्या शतकातील शेवटच्या पंचवीस वर्षात कोरलेली
स़्कंदाची मुर्तीत चतुर मुद्रेत नाचत आहे,याचा उजवा पाय किंचित वर आणि डावा
हात नृत्यशैलीत वळवला आहे. उजव्या हातात एक फूल आहे. केसांची रचना आकर्षक
आहे.
तंजावर जिल्ह्यातील वल्लूर-एरुवेराई येथे इसवी सनाच्या १२ व्या शतकाच्या मध्याला कोरलेले स्कंदाची मुर्ती आहे.या अभय मुद्रेत स्कंदाचा उजवा हात पसरलेला आहे. डावा हात वरद मुद्रेत आहे. तसेच १३ व्या शतकाच्या पूर्वार्धातील स्कंद मुर्ती जी आता व्हिक्टोरिया म्युझियममध्ये आहे,या शिल्पात स्कंद हातात फुले घेऊन समभंग मुद्रेत उभा आहे. अगदी थोडे कोरीवकाम आणि सफाईदार वळण याचा वापर करुन मुर्ती कुशलतेने तयार केली गेली आहे.कुन्नंदर कोविल येथे १३ व्या शतकाच्या अखेरी कोरलेली स्कंदाची मुर्ती आहे.या स्कंद मुर्तीच्या दोन्ही हातात फुले आहेत. या शिल्पात डोक्यावर मुकुट घातलेला आहे. डावा पाय जागेवर स्थिर आणि उजवा पाय किंचित पुढे वाकलेला आहे.पांगल येथील शिवमंदिरात असलेल्या स्कंदा शिल्पाचे दोन हात पसरलेले आहेत. डावा पाय घट्ट रोवला आहे आणि उजवा पाय किंचित पुढे वाकलेला आहे. तिलायडी इथे असलेल्या स्कंद मुर्तीने आपल्या दोन्ही हातात फुले धरली आहेत. पाय समरुप स्थितीत आहेत.
रामानंदेश्वर इथे असलेल्या स़्कंद मुर्तीचा डावा हात मुक्तपणे खाली सोडलेला आहे आणि उजव्या हातात एक फूल आहे. दोन्ही पाय किंचित पुढे वाकलेले आहेत. तिरुप्पनायूरच्या सौंदरेश्वर मंदिरात आणि कुडवासलाच्या कृष्णावरा मंदिरात असलेली स्कंद मुर्ती हातात फुले घेऊन पद्मासनात बसलेली आहे. तिरुविलीमलाई अलई इथे असलेल्या स्कंदाच्या पाषाणमुर्तीची मुद्रा अनोख्या पद्धतीने कोरलेली आहे. डावा हात वरच्या दिशेने उंचावला आहे आणि उजवा हात कटक मुद्रामध्ये आहे. उजवा पाय वाकलेला आहे जणू तो युद्धासाठी तयार आहे. कानात पत्रकुंडल आहेत. पांड्या काळातील सर्वोत्तम स्कंद मुर्ती तिरुप्परकुंरम, (एकंबरनाथन, १९८४:७८), आणि तिरुप्पनगिली येथे आहेत.
विजयनगर काळातही मोठ्या प्रमाणात कांस्य मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. इसवी सन १९१३ मध्ये नेल्लोर येथे एक मूर्ती सापडली (गंगोली, १९१५: १२५) जी शैलीत्मक दृष्टिकोनातून विजयनगर काळातील असावी असा अंदाज आहे. स्कंद मुर्ती दोन्ही हातात फुले घेऊन उभी मुद्रेत उभी आहे.
होसूरच्या शिल्पात, स्कंद बैलाच्या पाठीवर चतुरा मुद्रेत उभा आहे. दोन्ही हातात कमळाची फुले आहेत. डोक्यावरील करंडा उंच आहे, जो विजयनगर कलेचे एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे. दागिन्यांची संख्या अधिक आहे. उदयरपालयम तालुक्यातील कोलूमूर येथील शिल्पात, स्कंदची मुर्ती त्याच शैलीत केले आहे, केसांची रचना पंखाच्या आकाराची आहे. बाहुबंद आणि कर्णकुंडले उत्कृष्टरित्या कोरले आहेत.
कल्लाकुरिची तालुक्यातील सोमंदरकोविल येथून मिळालेल्या स्कंदाच्या मुर्तीचा विचार केला तर दोन्ही पाय समोरच्या बाजूस समान अंतरावर आहेत. दोन्ही हातात फुले आहेत.अंगावरील वस्त्र आणि डोक्याची केशभूषा उत्कृष्ट पद्धतीने कोरण्यात आली आहे. तिरुक्कुरल्लम येथील कुर्रलनाथस्वामीन मंदिरातील स्कंदाचे शिल्प अनोखे आहे. डावा पाय दुमडून आसनावर ठेवला आहे. उजवा पाय कुकुटासन मुद्रेत आहे.केसांची रचना अनोखी आहे.
शिलालेखात उल्लेख असलेली सोम स्कंद मुर्ती :-
सालुवनकुप्पम येथील अथिरन्नचंद दगडी मंदिरातील शिलालेखात शिवाचा पशुपती, पार्वती मल्यामकल आणि स्कंदाचा गुहा असा उल्लेख आहे. चोल राजा राजाधिराज प्रथमच्या शिलालेखात त्याचा उमा-स्कंद-साहित्यम् असा उल्लेख आहे.
आगमास सोमस्कंद :-
श्रीतत्त्वनिधि नावाच्या एका ग्रंथात स्कंदाविषयी उल्लेख आहे. स्कंद हा दोन हात असलेले बालक आहे, हातात पद्म असते. बसणे, उभे राहणे आणि नृत्य करणे या मुद्रांचे वर्णन काव्यात्मक स्वरुपात केले आहे. काही शिल्प नग्न तर काही वस्त्र परिधान केलेली असतात. दोन हातांपैकी डावा हात वरद मुद्रेत फळ धरलेला असावा आणि उजवा हात शशी मुद्रामध्ये असावा. शिल्परत्न नावाच्या ग्रंथात दोन्ही हातांमध्ये एकतर फुले असावीत किंवा डाव्या हात वरद मुद्रेत असावा आणि उजव्या हातात ग्रंथ असावा असे सांगितले आहे. या ग्रंथात आसन मुर्ती, स्थानक मुर्ती आणि नृत्य मुर्ती या मुद्रांचेही वर्णन केले आहे. नृत्य शिल्पात डाव्या हातात फळ आणि उजव्या हात सुची मुद्रेत असावा. रौरवागम यांमध्ये हातात फुले दाखवलेली असतात.
तमिळ साहित्यातील सोमस्कंद :-
कांतापुरीम ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे, शिव आणि पार्वती-स्कंद यांच्यातील स्कंदाच्या स्थितीला कुमारवल म्हणतात. या शिल्पात शिव आणि उमा हे अनुक्रमे अंधार आणि दिवस या रुपात मानले आहेत. तर स्कंद या दोघांच्या मधली स्थिती म्हणजे संधिप्रकाश मानला आहे, अंधार आणि प्रकाश यांच्यातील वेळ,ज्याला तामिळमध्ये शाम, मलाई म्हणतात. पिरपंत तिराऊ मधील कुमारगुरुप्रार ग्रंथात सोमस्कंद पैलूचा संदर्भ येतो. स्कंदाला नाकिलाम्कु एल अवी, म्हणजे मूल असे म्हटले जाते. कौमर, स्कंद यांना तमिळमध्ये मतलाई म्हणतात.
वर वर्णन केलेल्या संदर्भावरून समस्कंद स्वरूपातील स्कंदाचे महत्त्व समजू शकते.
अनुग्रह शिव मुर्ती :
अनुग्रहमूर्ती म्हणजे शंकराच्या वरप्रदानास अथवा अनुग्रहास प्राप्त झालेल्या व्यक्तिची कथा.एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात कृपा करणाऱ्या शिवाची अनेक रूपे प्रसिद्ध आहेत. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाच्या अनुग्रहमूर्ती म्हणजे अर्जुनानुग्रह, चंडेशानुग्रह, रावणानुग्रह, विष्णवनुग्रह, नंदेशानुग्रह, मार्कंडेयानुग्रह या होत. मात्र अनुग्रहमूर्ती या संहारमूर्तींइतक्या प्रसिद्ध नाहीत. शिवाच्या अनुग्रह मूर्तीमध्ये रावणानुग्रह, चंडेशानुग्रह, विष्णवानुग्रह असे विविध प्रकार आढळतात. यातील रावणानुग्रह मूर्ती हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. वेरुळ मध्ये रामेश्वर लेणे (क्र.२१), रावण की खाई (क्र. १४), दशावतार लेणे (क्र.१५) कैलास आणि लंकेश्वर (क्र.१६) आणि धुमार लेणे (क्र.२९) इथे हे शिल्प पाहावयास मिळते. याशिवाय घारापुरी, विरूपाक्ष मंदिर (पट्टदकल), परशुरामेश्वर मंदीर (ओडिशा), बृहिदश्वर मंदिर (तंजावर), आँढा नागनाथ या ठिकाणी हे शिल्प दिसते. एवढेच नाही तर कंबोडियातील मंदिरांमधेही याचे अत्यंत कल्पक शिल्पांकन आढळते. याशिवाय गंगाई कोंडचोलापुरम् (तामिळनाडू) येथे चंडेशानुग्रह यांचे सुंदर शिल्प आहे. कैलास मंदिराच्या दक्षिण भिंतीवर कोरलेले शिल्प हे या सर्वांमधील सर्वात भव्य आणि सर्वात श्रेष्ठ शिल्प आहे.
रावणानुग्रहशिवमूर्ती
रावणानुग्रहाच्या दोन प्रकारच्या मूर्ती दिसतात १) यामध्ये आपली दहा डोकी कापून शंकराल अर्पण करणाऱ्या रावणाचे एक शिल्प असते. याशिवाय २) शिव पार्वती ज्यावर विराजमान आहेत तर कैलास पर्वताला रावण उखडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिल्प असते.
रावणानुग्रह क्र. १ :-
वेरुळमधील कैलास मंदिराभोवतालच्या उत्तरेकडील व्हरांड्यातील पहिले शिल्प रावणानुग्रहाचे आहे. एका पिंडीभोवती ९ मानवी शिरे कोरलेली दिसतात. रावणाने श्रीशंकराला अर्पण केलेली स्वतःची ९ मस्तके (नवविधा भक्तीची प्रतीके) आहेत. दहावे मस्तकही तो कापत असल्याचे थरारक दृश्य आहे. याची कथा अशी की रावण रोज सकाळी तलावातून कमळ तोडायचा. स्नान करून शंकराची पूजा करायचा. एकदा शंकराच्या मनात विचार आला की रावणाची भक्ती आपण तपासून पाहावी. शंकराने त्याच्या ताटातील फुले काढून घेतली. स्नान करून रावण आला. पाहतो तर काय ? तेथे कमळे नाहीत. आता फुले आणायला माघारी वळला तर संकल्प मोडतो आणि तसाच पूजेला देवळात देला तर देवाच्या पूजेसाठी रिकाम्या हाताने जावे लागणार. रावण काय ते समजला. क्षणाचाही विचार न करता तो तलवार घेऊन तरातरा तसाच पिंडीसमोर गेला आणि म्हणाला, देवा, परीक्षाच घ्यायची होती तर इतकी साधी कशाला ? दहा शिरकमले जी तू मला दिली आहेस, त्याचा उपयोग कधी होणार? असे म्हणून त्याने एका मागून एक आपली डोकी कापायला सुरुवात केली आणि पिंडीला तो अर्पू लागला. दहावे डोकेही कापण्याच्या तो तयारीत होता. शिल्पामध्ये एका हाताने कपाळ घट्ट धरलेले दिसते ते त्राग्याने नव्हे तर कापण्यासाठी, ते घट्ट धरून त्याचा निश्चय व्यक्त करण्यासाठी. समर्पित भक्तीची ही परिसीमाच नव्हे काय? ही भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला अनुग्रह दिला. देऊळ पाहायला सुरुवात केल्यावर विथिकेमध्ये अगदी प्रथमच हे शिल्प हेतूपुरस्सर कोरले आहे. इतकी अविचल निष्ठा आणि भक्ती आपल्या मनात असेल तर पायऱ्या चढून गेल्यावर त्या परब्रह्माचे दर्शन होऊ शकते, हा संकेत येणाऱ्या सर्व भक्तांसाठी सूचकतेने दिलेला आहे. कोणतेही मोठे काम करायचे असल्यास प्रसंगी शीर कापून द्यायची सुद्धा तयारी असेल तरच ते काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असते असा संदेश या शिल्पातून देण्याचा प्रयत्न दिसतो. (देगलूरकर : २००८, पृ.५१)
रावणानुग्रहशिवमूर्तीचा एक प्रकार वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर पाहावयास मिळतो. या कथेप्रमाणे वरप्राप्तीसाठी रावण दहा हजार वर्षे तप करतो प्रत्येक सहस्त्र वर्षानंतर आपले एकेक मस्तक कापून शंकराला अर्पण करतो जेव्हा शेवटी आपले शेवटचे मस्तक कापून देण्यास सिद्ध होतो तेव्हा भगवान शंकर प्रकट होऊन त्याला वर प्रदान करतात.
वेरूळ येथील कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील रावणानुग्रहशिवमूर्ती
अर्थात यातील गंमत म्हणजे ही कथा आहे मूळची ब्रह्मदेवासंदर्भात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा ब्रह्मदेवाला मस्तके अर्पण करून वरप्राप्ती करून घेतो. तर येथे मात्र शिवाची कथा कोरलेली आहे. एकंदरीतच वैदिक देवता विस्मृतीत जात असताना शैव, वैष्णव पंथांचे प्राबल्य कसे वाढायला लागले होते याचा हा एकप्रकारे पुरावाच.
कथेचा थोडक्यात आशय वर दिलाच असल्याने आता याचे परत भाषांतर करीत नाही.
रावणानुग्रह क्र. २ :-
या प्रकारच्या शिल्पाला कैलास तोलन असे म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा आणि तमिळनाडू या ठिकाणच्या मंदिरातील हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. ह्याच्या तीन कथा-आशय तोच ठेवून - तपशिलात थोड्याफार फरकाने आढळतात. अनुग्रहमूर्तींपैकी सर्वाधिक प्रसिद्ध असणारे हे शिल्प. इ. स. सहाव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंतची अशी शिल्पे उत्तर व दक्षिण भारतात सर्वत्र पाहावयास मिळतात.
रावणानुग्रह मूर्ति, होयसाळेश्वर मंदिर, हळेबीड, कर्नाटक (मुर्तीचा काळ इ.स. ११५० )
दक्षिण भारतातील शिवमंदिरांमध्ये कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या रावणाचे अनेक मस्तके आणि अनेक हात असलेले मुर्ती पहायला मिळतात.रावण हा भगवान शिवाचा कट्टर भक्त मानला जातो. मात्र हे आधीपासून होते का? उत्तर आहे, नाही. एक अशी घटना घडली ज्यामुळे रावण बदलला.हा शिल्पपट त्याच घटनेबद्दल आहे. आगमां ग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे हे स्वरूप भगवान शिवाच्या अनेक रूपांपैकी एक आहे, ज्यामध्ये शिव कृपा करतात आणि या मुर्तींना रावणनुग्रह-मूर्ती किंवा रावण-दर्पा-विनाशा मूर्ती म्हणून ओळखले जाते.यासंबंधीची पहिली कथा ‘ब्रह्मपुराणा’त सापडते.
प्रथम रावणाची वंशावळी आणि त्याच्या संपूर्ण वंशाची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊया.
रावण अनुग्रह प्रकरण :-
रावणाची वंशावळ :-
पुलस्त्य ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. तृणबिंदु ऋषींची कन्या मानिनी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. या जोडप्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला.विश्रवाने मंदाकिनी उर्फ इलाविदा हिच्याशी विवाह केला, जी ऋषी भारद्वाज यांची कन्या आणि गर्ग ऋषींची बहीण होती. या जोडप्याला वैश्रवण किंवा कुबेर नावाचा मुलगा झाला.
कुबेरांनी ब्रह्मदेवाची पूजा केली. त्यांच्या भक्तीवर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दोन वरदान दिले. त्याने कुबेराला आठ दिशांपैकी एका दिशांचा अधिपती बनवले आणि त्याला केवळ मनाने नियंत्रण करुन चालवणारे जाणारे पुष्पक विमान भेट दिले.
त्या वेळी लंकेवर माली, सुमाली आणि मल्यवान या तीन राक्षस भावांचे राज्य होते. भगवान विष्णूने त्यांच्याशी युद्ध केले आणि लंकेचा अधिपती असलेल्या मालीला मारले. त्यामुळे सुमाली आणि मल्यवान पळून जाऊन पाताळामध्ये लपले. राक्षस बंधूंनी लंका सोडल्यानंतर कुबेराने लंकेवर राज्य करण्यास सुरुवात केली.
कर्नाटक के पट्टाडकल मधील कुबेर मुर्ती
काही दिवसाने सुमाली परत आली. त्याला लंकेवर पुन्हा राज्य करायचे होते. तथापि, त्याच्या लक्षात आले की कुबेर खूप शक्तिशाली आणि साधनसंपन्न आहे आणि त्याला पराभूत करणे कठीण आहे. त्याला एक सुंदर मुलगी होती - कैकेसी. ती केवळ सुंदरच नव्हती, तर हुशार, मेहनती, शक्तिशाली आणि अत्यंत महत्त्वाकांक्षीही होती. सुमालीने तिच्या मुलीला विश्रवा ऋषींना मोहित करण्याचा आणि मोहित करण्याचा सल्ला दिला. तिला तिच्या प्रयत्नात यश आले आणि या विवाहातून तीन मुलगे आणि एक मुलगी झाली - दशग्रीव, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा. सुरुवातीला दशग्रीव यांचे सावत्र भाऊ कुबेर यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध होते. रावण त्याचा सावत्र भाऊ आणि त्याच्याकडे अद्भुत पुष्पक विमानाने खूप प्रभावित झाला होता.
रावण/दशग्रीव की मूर्ति, विट्ठल मंदिर, हम्पी, कर्नाटक
रावण आणि कुबेर यांचे नाते
एके दिवशी कैकसीने आपल्या तीन मुलांना कठोरपणे फटकारले आणि त्यांची निंदा केली, "कुबेर आपल्या वर्तनाने त्याच्या आईचा अभिमान वाटेल असे कार्य असताना, मला अभिमान वाटेल असे काहीही तूम्ही काहीही केले नाहीत".
यामुळे तिन्ही भावांचा अहंकार दुखावला. ते तिघे वनात गेले आणि कठोर तपश्चर्या करू लागले. त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. भगवान ब्रह्मदेवाने दशग्रीवाला वरदान दिले की तो मनुष्यांशिवाय सर्वांसाठी अजेय असेल. तरीही दशग्रीवाने मानवाला आपल्यासाठी खरा धोका मानला नाही, त्यामुळे त्याला फारशी चिंता नव्हती. त्याला शस्त्रे आणि रूप बदलण्याचे वरदान देखील मिळाले होते. अशाप्रकारे तिन्ही भावांना मिळालेल्या वरदानांमुळे ते ताकदवान झाले. लवकरच दशग्रीवाने कुबेराकडून सत्ता हिसकावून घेतली आणि लंकाधिपती - लंकेचा राजा झाला.
अलकापुरीत कुबेरांची स्थायिक :-
आपल्या सावत्र भावासोबतच्या युद्धात हरल्यानंतर, कुबेर पुष्पक विमानात बसून लंकेतून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यांने अनेक ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. पण दशग्रीवाच्या भीतीमुळे त्यांना कोणी आश्रय द्यायला तयार नव्हते. कुबेर यांनी आजोबा पुलस्त्य यांचा सल्ला घेतला. पुलस्त्यानी त्याला भगवान शंकराचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यास सुचवले. कुबेर भगवान शिवाच्या दर्शनाला गेले. भगवान शिवाने त्यांना कैलास पर्वताजवळ अलकापुरी येथे स्थायिक होण्यास सुचवले. हे शहर लवकरच पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत शहर बनले.
रावणानुग्रह मूर्ती, दारासुरम, तमिलनाडु
रावणाने कुबेराकडून पुष्पक विमान हिरावून घेतले :-
कुबेर अलकापुरीत राहत असल्याचे दशग्रीवाला कळताच त्यांनी नगरावर हल्ला केला. पुष्पक विमान हिसकावणे आणि काबीज करणे हे त्याचे मुख्य ध्येय होते. यक्ष (कुबेराचे सैन्य) आणि राक्षस (दशग्रीवांचे सैन्य) यांच्यात मोठी लढाई झाली. दशग्रीवाच्या सैन्यापुढे कुबेराचे सैन्य काहीच नव्हते. दशग्रीवाने केवळ कुबेराचा पराभव केला नाही तर त्याच्याकडून पुष्पक विमान हिरावून घेतले. अहंकाराच्या नशेत दशग्रीव पुष्पक विमानाने लंकेला परतत होते. रावणाने कैलास पर्वत ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा विमान हवेतच थांबले. दशग्रीवाच्या लक्षात आले की काही अदृश्य शक्ती पुष्पक विमानाला पुढे जाऊ देत नाही. तो व्याकूळ झाला. आपले विमान थांबवण्याचे धाडस कोणी केले असा प्रश्न त्याला पडला.
रावणाला शाप :-
अचानक दशग्रीवाला शिव-गण (नंदिकेश्वर) वानराचे तोंड असलेले दिसले. त्याने विचारले, "अरे, माझे विमान हा डोंगर पार का करू शकत नाही ते सांग ?" शिवगणाने उत्तर दिले, "हे भगवान शिवाचे निवासस्थान आहे. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही या भागावर उडू शकत नाही".
नुकत्याच झालेल्या विजयांनी दशग्रीवाला अहंकारी बनवले होते. त्याने शिव-गणाकडे पाहिले आणि तिरस्काराने उत्तर दिले, “केवळ तुमच्यासारखा वानर चेहरा आणि बुद्धी असलेला माणूसच असे विचार करू शकतो की मी दशग्रीव आहे आणि मला कोणी थांबवू शकतो, इथून निघून जा, नाहीतर मी तुला हाकलून देईन. या अपमानाने शिवगण संतापले. त्याने दशग्रीवाला शाप दिला, “माझ्या चेहऱ्यामुळे तू माझी चेष्टा करतोस, मी तुला शाप देतो, एके दिवशी तुझा आणि तुझ्या राज्याचा नाश माझ्यासारख्याच माकडांच्या हातून होईल, जे सामर्थ्य आणि रूपाने माझ्यासारखेच आहेत." यावर रावण काही उत्तर देण्यापुर्वी शिवगण गायब झाले.
रावणानुग्रह मूर्ति , एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
रावणानुग्रह मूर्ति , श्री रामलिंगेश्वर स्वामी मंदिर, अवनी, कोलार, कर्नाटक
रावणानुग्रह मूर्ति, भगवान शिवानी देवी पार्वतीला आश्वस्त केल त्याचवेळी रावण कैलाश पर्वताला हलवतो आहे, रामलिंगेश्वर मंदिर, अवनी, कर्नाटक
दशग्रीवाने शिव-गणाला चुकीचे सिद्ध करून त्यांना व त्याच्या स्वामीला म्हणजे भगवान शिवांना शिक्षा करण्याचे ठरवले.कुबेरावरील विजयाने रावण मत्त झाला होता; त्याने कैलास पर्वत उखडून आपल्या मार्गापासून दूर फेकण्याचा निर्णय घेतला. त्याने आपले शक्तिशाली बाहू डोंगराभोवती गुंडाळले आणि तो उंच करू लागला.कैलासाला धक्के बसू लागले आणि उमेसह सर्व शिवगण भयभीत झाले. सुरुवातीला तो यशस्वी झाला. अचानक डोंगर हादरल्याने सर्वजण घाबरले. पर्वतावर असलेले प्राणी पळून गेले. देवी पार्वती भगवान शंकराची काहीतरी सेवा करत होती. अचानक पर्वत हलल्यामुळे ती घाबरली आणि तिने शक्तीशाली भगवान शिवाला मिठी मारली. भयभीत झालेल्या पार्वतीच्या कोमल मिठीचा भगवान शिवांनी आनंद घेतला.
कंबोडियातील बांतेय सराय येथील रावणनुग्रह शिल्प, कैलास पर्वत हलवणारा रावण, ऋषी आणि शिव गण कैलासवर दाखवले आहेत, तर सर्वात खालच्या भागामध्ये भयभीत प्राणी इकडे-तिकडे धावताना दिसतात. शांत मुद्रेतील शिव भयभीत पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन बसले आहेत.
कैलाश पर्वताला हलवणारा रावणचा शिल्पपट, कैलास पर्वत विवीध थरात दाखविला असऊन त्यावर ऋषि आणि शिव गणो दाखवले आहेत. सर्वात खालच्या स्तरात भयभीत पशु इकडेतिकडे पळताना दाखवले आहेत, तर त्याचवेळी भगवान शिव शांत मुद्रेत देवी पार्वतील धीर देताना दाखवले आहेत.
कैलाश पर्वतावर शिव-पार्वती समीप बसलेले असताना, रावण कैलास पर्वताला हलवत आहे; बांतेय सराय, कंबोडिया येथील रावणानुग्रह मूर्ति ,
दशग्रीवाचे नाव रावण पडले :-
या सर्व घडामोडीमागील व्यक्तीला भगवान शिव चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यानी देवी पार्वतीला आपल्या मिठीत घेतले आणि आपल्या घाबरलेल्या पत्नीला सर्व काही नियंत्रण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यानी पर्वत स्थिर होण्यासाठी आणि दशग्रीवाला धडा शिकवण्यासाठी पायाचे बोट खाली दाबले. भगवान शंकराच्या पायाच्या बोटाच्या दाबामुळे कैलास पर्वताचे वजन खूप वाढले. दशग्रीव आता ते सांभाळू शकत नव्हते.आणि दशग्रीवाचे हात त्याखाली अडकले. तो खूप जोरात ओरडला. त्याच्या मोठ्या किंकाळ्याने तिन्ही ब्रह्मांड - स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ हादरले.
रावण अनुग्रह - रावणाने आपले एक डोके आणि एक हात कापला आणि भगवान शिवांना समर्पित केला ज्याला रावणहथ म्हणतात, सोमेश्वर महादेव मंदिर, उलसूर, बंगलोर
रुद्र-वीणा, राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली
रावण आणि रुद्रवीणा :-
ऋषी आणि त्यांच्या मंत्र्यांनी दशग्रीवाला भगवान शिवाकडून क्षमा मागून स्वतःचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.दशग्रीवाने कश्याबश्या वेदना सहन करत स्वत:ला नियंत्रित केले आणि भगवान शिवाची कृपा होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्याने आपले एक डोके आणि एक हात कापला आणि आपल्या नसा, शिरा आणि आतडे वापरून एक वाद्य बनवले आणि नटराजाच्या (भगवान शिव) स्तुतीसाठी शिव तांडव स्तोत्र म्हणू लागला. हे वाद्य दुसरे, तिसरे काही नसून रुद्र वीणा होती. दशग्रीव रुद्रवीणा वाजवणारा एक महानतम वादक होता.
रावणानुग्रह - भगवान शिवाची कृपा
भगवान शिवाने दशग्रीवाला हजार वर्षे पर्वताखाली गाडून ठेवले.आता मात्र रावणाचा अहंकार गळाला आणि त्याने शंकरांची प्रार्थना करायला सुरुवात केली. अखेरीस भगवान शिव रावणाच्या प्रार्थना आणि स्तुती गाण्यामुळे शांत झाले. त्याला जाणवले की दशग्रीवाला आपली चूक कळाली आहे. भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याचे नाव रावण ठेवले - म्हणजे एक भयंकर किंचाळणारा - कारण त्याच्या मोठ्या किंकाळ्याने तिन्ही जग हादरले होते. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला चंद्रहास - म्हणजे एक अजिंक्य तलवार आणि पूजा करण्यासाठी एक शक्तिशाली आत्मलिंग दिले. शंकरांनी त्याला मुक्त करून लंकेस जायची परवानगी दिली.
दुसन्या एका कथेमध्ये रावणाने शंकराला लकेत चलण्याचे आवाहन केले. तेव्हा आपण सोडून जाऊ शकत नसल्याचे शिवाने त्याला सांगितले. त्यावर उपाय म्हणून रावणाने कैलासासह शिवपार्वतीला लकेत न्यायचे ठरविले. म्हणून कैलास पर्वत उचकटण्याचा प्रयत्न त्याने केला.शंकराने कैलास हलल्यास ब्रह्मांडाचे संतुलन बिघडेल म्हणून आपल्या उजव्या पायाचा अंगठा दाबून स्थिर केले. तसेच रावणाचेही दमन केले. रावणाची ही भक्ती पाहून शिवाने त्याला चंद्रहास तलवार दिली. या कथेवर आधारित शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी कोरलेले दिसते.
तर तिसऱ्या कथेमध्ये शंकर पार्वती यांच्यामध्ये काही कारणाने विसंवाद निर्माण झाला त्यामुळे शिवाच्या द्वारपालाने रावणाला कैलासावर जाण्यापासून अडवले. या कथेवर आधारित संबध भारतातील हे एकमेव शिल्प असावे. (अपवाद लंकेश्वर लेण्यामध्ये याचा एक प्रयत्न झालेला दिसतो. )
वेरूळ लेणी क्र २९ मधील रावणानुग्रहशिवमूर्ती
वेरूळ लेणी क्र. २१ (रामेश्वर) येथील रावणानुग्रहशिवमूर्ती. लक्ष्यपूर्वक पाहिल्यास रावणाचे दहावे मुख हे गर्दभाचे असल्याचे दिसेल.
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील बाह्यभिंतीवर कोरलेली रावणानुग्रहशिवमूर्ती
वेरुळ येथील कैलास मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सर्वात विलक्षण, कल्पक, परिपूर्ण तोलनाचे शिल्प आहे. त्याची कथा अशी, रावण कुबेराचा पराभव करून आकाशमार्गे परतताना चाटेवर कैलास पर्वत दिसला. तो पाहण्याच्या इच्छेने तो पर्वतावर उतरला. उतरताक्षणी श्रीशंकराच द्वारपालांनी त्याला रोखले. उन्मत रावणाचा अहंकार जागृत झाला व मस्तीने तो म्हणाला, 'ज्या ठिकाणी मला मुक्त प्रवेश नाही, ती जागाच लंकेत घेऊन जातो. मग बघतो मला शंकराचे दर्शन घेण्यापासून कोण प्रतिबंध करतो ते." रागाच्या भरात तीरासारखा तो कैलास पर्वताच्या खाली गेला, वीरासनावर बसून आपल्या वीसही हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवून उखडून काढला. कैलासाला भूकंपासारखे हादरे बसू लागले. त्या वेळी कैलासावर काय स्थिती होती बरे? शिव पार्वती असले तरी ते शेवटी नवराबायको. काही भांडण झाल्याने पार्वती तोंड फिरवून कृतक्कोपाने महादेवापासून दूर बसली होती. दासी तिची समजूत घालत होती. अचानक बसणाऱ्या हादऱ्यांनी दासी भयकंपित होत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळू लागली व पार्वती राग विसरून भयभीत होऊन शंकराला बिलगते. शिल्पकाराने खोदलेल्या बारकाव्यांमुळे हे शिल्प जिवंत झाल्यासारखे वाटते. पळणाऱ्या दासीला अंशात कोरलेले आहे, तिचा अंबाडा अर्धवट सुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तिचा वेग नजरेला जाणवतो. या गतीने पळताना समोर पाहून पळणे स्वाभाविक असते. पण या दासीचा नेत्रकटाक्षा मागे आहे, नवरा बायकोचे भांडण आता तरी मिटले की नाही हे पाहण्याच्या स्त्रीसुलभ उत्सुकने ! पार्वतीने भयकंपित होऊन शिवाचा दंड धरला आहे. तो तिने प्रेमाने घरलेला नसून भीतीने पकडला असल्यामुळे तिची बोटे विलग झाली आहेत. अत्यंत रेखीवपणे कोरलेले हे शिल्प तो क्षण आजही जणू जिवंत करते, कैलासाला बसलेल्या हादऱ्यांनी आजूबाजूच्या निसर्गावर आणि मनुष्यमात्रांवर झालेला परिणाम तितक्याच उठावदारपणे कोरलेला आहे. झाडावरची माकडे भयभीत झालेली आहेत.शिवगण रावणावर दगडांचा वर्षाव करत आहेत तर वादन करणारे कलाकार आपली वाद्ये खांद्यावर पळायच्या तयारीत आहेत, हिमालयात तप करणारे ऋषी महादेवाकडे अपेक्षेने पाहत आहेत, देवा देवा आता कसे होणार ? पण हा सर्व कोलाहल श्रीशंकर शांतपणे न्याहाळत आहे. जणू त्याला विचारायचे आहे, अरे मी असताना तुम्हा सर्वांना इतके धाबरण्याचे कारण काय? तेही या यत्किचित रावणाला ? शिवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने किंचित दाब द्यायला सुरुवात केली. या किंचित दाबानेही रावणाच्या अंगावर प्रचंड दबाव येऊ लागला. त्याचा एकेक हात श्रमाने थकून खाली पडू लागला, एक चेहरा रडू लागला, एक चेहरा मर्कटासारखा वेडावाकडा झाला. त्याच्या लक्षात आले की कैलास उपटणे सोपे पण तो हलवणे अशक्य कारण ही झुंज तर प्रत्यक्ष महादेवाशी आहे. येथे आपली डाळ शिजणार नाही. अशा प्रसंगी शिवाची स्तुती केली तरच आपली सुटका होईल हे रावणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने एक स्तोत्र रचले. याला रावणविरचित शिवतांडवस्तोत्र असे म्हणतात. ते त्याने मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केली. "जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लब्मितां भुजंगतुंगमालिकाम् । डमड्डमड्डमड्मन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ।।" अशा प्रकारच्या पंधरा श्लोकांचे हे स्तोत्र ऐकून प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने त्याला क्षमा केली. अचाट शक्तिशाली माणसाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी परमेश्वराच्या यत्किंचित अंगठा टेकवण्याएवढी शक्ती पुरेशी असते. या शिल्पातून बोध घ्यायचा आहे तो असा की जीवनात भूकंपासारखे प्रसंग येतात. प्रत्यक्ष भूमी हादरून किंवा कुटुंबात भूकंपसदृश घटना घडल्यानेसुद्धा अशा प्रसंगी प्रज्ञावान मंडळींनी ठामपणे उभे राहून धैर्याने त्याचा सामना केला पाहिजे. हीच गोष्ट भगवंताने गीतेत सांगितली आहे. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ।। भ. गीता २-५६ ।।
एका श्रेष्ठ तत्त्वज्ञानाला एका पुराणकथेच्या माध्यमातून अत्यंत नाट्यमय पद्धतीनी शिल्पांकित करून आजरामर करण्याचा हा एक असामान्य प्रयोग म्हणावा लागेल. कैलासतोलन या मालिकेतील जगातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.
रावणानुग्रह मूर्ती सर्वत्र प्रसिद्ध असल्या तरी त्यांची ग्रांथिक वर्णने उपलब्ध नाहीत. रावणाच्या हातांची संख्या व त्यातील आयुधे यांत वैविध्य दिसते. दोन व चार हातांच्या रावणाच्या प्रतिमा राणी महाल, झाशी (उत्तर प्रदेश) येथे, तर सहा हातांच्या रावणाची प्रतिमा लखनौ येथील संग्रहालयात आहे. क्वचित गर्दभमुखी रावणही पाहावयास मिळतो. मथुरा संग्रहालयातील गुप्तकालीन शिल्पपट्टावर कोरलेली रावणानुग्रह प्रतिमा ही सर्वांत प्राचीन समजली जाते. महाराष्ट्रातील घारापुरी येथील राष्ट्रकूटकालीन रावणानुग्रह शिल्प भग्न असले तरी त्याची भव्यता व बारकावे नजर खिळवून ठेवणारे आहेत. या शिल्पपटाचे दोन भाग असून खालच्या भागात कैलास हलवू पाहणारा रावण दिसतो; त्याच्या हातांपैकी फक्त उजवीकडचे सहा-सात हात वगळता इतर भग्न झाले आहेत. डावीकडे शिवगण आहेत. वरच्या भागात मध्यभागी शिवपार्वती आणि त्यांच्या आजूबाजूला देवदेवता, यक्षकिन्नर इ. दिसतात. शिवपार्वती संपूर्ण उठावात कोरल्यामुळे जिवंत वाटतात.
वेरूळच्या कैलास लेण्यात पाच तोंडे आणि वीस हातांचा रावण वीरासनात शिल्पांकित केला आहे. त्याचे सर्वांत वरचे दोन हात कैलास पर्वत उचलत आहेत. वर शिवपार्वती त्यांच्या गणांसह दिसतात. दोन्ही कोपऱ्यांत अनेक ऋषीमुनी रावणाचे गर्वहरण पाहण्यास एकत्र आले आहेत. शिवाचा शांत भाव आणि उन्मत्त रावणाची हिंसक मुद्रा यांतील फरक येथे प्रकर्षाने जाणवतो. कर्नाटकमधील बेलूर येथील चन्नकेशव मंदिरावरील शिल्प १२ व्या शतकातील आहे. त्यात मध्यभागी एका चौकोनी मंडपात शिवपार्वती असून पर्वताखाली गुडघ्यांवर बसलेला आणि पर्वत हलवण्याचा प्रयत्न करणारा रावण आहे. त्याच्या हातात तलवारही आहे. या शिल्पात अनेक देवदेवता, विविध पशुपक्षी, इतर बारीकसारीक तपशील विलक्षण कौशल्याने दाखवले आहेत.
रावणानुग्रह मूर्ती (औंढा, हळेबीडू)
डावीकडील शिल्प औंढ्याच्या नागनाथ मंदिरावरील आहे. या शिल्पाला "रावणानुग्रह" असे नाव डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात आढळते. कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेले आहेत. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डावा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या उजव्या खांद्यावर आहे. हा पर्वत रावणाने उचलून धरला आहे. रावण वज्रासनात बसलेला आहे. शिव सव्यललितासनात बसलेला आहे (उजवा पाय खाली सोडलेला, डाव्याची मांडी). पार्वती वामललितासनात (डावा पाय मोकळा, उजव्या पायाची मांडी) असून शिवाच्या मांडीवर बसलेली आहे. असेच शिल्प वेरूळला कैलास लेण्यात आणि "सीता की नहानी" नावाने ओळखल्या जाणार्या २९ क्रमांकाच्या लेण्यातही आहे. उजवीकडचे शिल्प हळेबीडूच्या होयसळेश्वर मंदिरावरचे आहे. इथे रावणाचे पाच तोंडं दिसत आहेत. शिव पार्वती ज्या कैलास पर्वतावर बसलेले आहेत त्या पर्वताचे बारकावे तिथले प्राणी पक्षी पशु यांच्यासह दाखवले आहेत. हे थक्क करणारे आहेत. एक बाय दोन फुटाच्या या छोट्या दगडी तूकड्यात इतके बारकावे कोरणे म्हणजे किती कौशल्याचे काम. पर्वताच्या टोकावर बसलेले शिव पार्वती जे या चराचराचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या उच्चासनावरून हे सहज सुचित होते. या मूर्तीचा अर्थ अभ्यासक वेगवेगळा लावतात. पण हळेबीडूच्या मूर्तीतून शिव पार्वती सोबतच प्रकृती आणि पुरूष असे म्हणता येईल. शिवाय रावणाने कितीही हलविण्याचा प्रयत्न केला तरी प्रकृती आणि पुरूष यांच्या मुळे हे चराचर व्यवस्थित चालू आहे असाही अर्थ लावता येतो. रावणाला पर्वत ओलांडायचा होता. पण शिव पार्वती त्यावर विलास करत होते. त्यामुळे कुणालाच तिथून जायची परवानगी नव्हती. रावणाला आपल्या शक्तीवर गर्व होता. त्याने पर्वतच हलवायला सुरवात केली. मग शिवाने त्याला जखडून ठेवले. मग रावणाने शिवाची तपस्या केली व अनुग्रह मागितला. अशी काहीशी पुराणकथा सांगितली जाते.
रावणनुग्रह रुपाचे मुर्ती शास्त्र :- आगम किंवा शिल्पशास्त्रात ही मूर्ती कोरण्यासाठी कोणतेही विहित स्वरूप नाही. बहुतेक रावणनुग्रह मूर्तींमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती मूर्तीच्या वरच्या भागात कैलास पर्वतावर बसलेल्या दर्शवतात. खालच्या भागात रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले जाते. कैलास पर्वत हा त्रिकोणी स्वरुपात किंवा समभुज चौकोनी आकाराचा दाखवला असतो, तर काही वेळा अनेक थर असलेल्या व्यासपीठासारखा दाखवला असतो.
रावणनुग्रह शिल्पपट, वेरुळ , महाराष्ट्र कैलास पर्वताच्या हादरण्याने अनेक देव, देवी, ऋषी आणि प्राणी घाबरलेले दाखवले जातात. देवी पार्वती देखील अचानक घडलेल्या घटनेने अस्वस्थ, नकळत आणि घाबरलेली दिसते. ती वाकून भगवान शिवाला आलिंगन देत असलेली दाखवली जाते. या सर्व कोरीव कामांमध्ये, भगवान शिव देवी पार्वतीच्या कोमल मिठीचा आनंद घेत शांत मुद्रेत कोरलेले असतात.कैलास पर्वताला स्थिर करण्यासाठी त्यानी पायाचे बोट दाबून धरलेले दाखवले जाते.
रावणानुग्रह शिल्पपट , बंटेय सेराई, कंबोडिया
रावण गुडघ्यावर बसून सर्व शक्तीनिशी पर्वत उखडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले असते. तो शक्तिशाली राक्षस म्हणून दाखवण्यासाठी त्याच्या शरीर मजबूत स्नायूंचे आणि डोके वाकलेले दर्शविले जातो. तसेच शिवाच्या पायाचे बोट दाबण्यामुळे त्याचा प्रभाव म्हणून रावणाच्या चेहऱ्यावरील वेदना दिसून येतात. थकलेल्या अंगांनी आणि अवघडलेल्या शरीराने तो कासावीस झालेला दिसतो.
पट्टदकल मधील रावणानुग्रह / रावणदर्प विनाश मुर्ती
साहित्यातील रावणनुग्रह प्रकरण :-
या घटनेचे वर्णन रामायणातील उत्तरकांडात आहे.
शैव लोकांचा असा विश्वास आहे की सातव्या शतकातील तमिळ शैव कवी-संत अप्पर यांनी त्याच्या मागील जन्मात रावणाला भगवान शिवाचे भजन गाण्याचा सल्ला दिला आणि त्याचे रक्षण केले.अप्पर यांनी आपल्या सर्व स्तोत्रांमध्ये रावणाचा उल्लेख केला आहे.
तामिळनाडूमध्ये बर्याच प्राचीन काळापासून हा प्रसंग मान्यताप्राप्त आहे. संगमकाळातील कवी कपिलर यांनी आपल्या ग्रंथात हत्ती आपल्या सुळ्यांनी जंगलातील वृक्ष जेव्हा हलवून पाडतात, त्याची तुलना रावणाकडून कैलास पर्वत हलविला जाण्याशी केली आहे. रावणानुग्रह प्रसंगाचे महत्व :- भगवान शिवांच्या चरित्रातील हा प्रसंग त्यांची शक्ती आणि क्षमाशीलतेचे उदाहरण आहे. या कथेचा प्रसार होण्याचे कारण म्हणजे शैव आणि वैष्णव पंथीयांचा संघर्ष. जर विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाचा वध केला आणि भगवान विष्णूंचे श्रेष्ठ्त्व सिद्ध झाले म्हणून भगवान शिवांचे महत्व कायम रहावे यासाठी शिवांनी रावणाचा अत्यंत सहज पराभव केला हे ठळकपणे दिसावे यासाठी हि कथा महत्वाची ठरते. मुळात रामायणात रावणाचा पराभव श्रीरामाने केला, त्यामागे रावणाला शिव गणांनी दिलेला शापही कारणीभुत ठरला. यातून हा धडा घ्यायचा आहे कि एखाद्या व्यक्तीने मी कितीही बलवान आहे याचा गर्व केला तरीही त्याची गाठ त्याच्यापेक्षा ताकदवान वीराशी पडतेच.
राजस्थान येथून मिळालेली सातव्या शतकातील रावणाची मुर्ती ज्यामध्ये तो रुद्र वीणा वाजवताना दाखवला आहे, हि मुर्ती सध्या राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे आहे.
रावणाच्या दहा शिरांचे महत्व :- रावणाला दशग्रीव हे नाव मिळाण्यामागे त्याला असलेली दहा तोंडे हेच कारण होते.अर्थात रावणाला दहा तोंडे का होती, याच्यामागेही काही कारण होते. लहानपणी रावणाला एकच मुख होते, मात्र तो धारण करत असलेल्या रत्नांच्या माळेत दहा मणी होते, ज्यामध्ये त्याच्या एका चेहर्याचे प्रतिबिंब उमटून दहा शिर असल्याचा आभास होत होता. रावण त्या काळातील अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान व्यक्ती होता. त्याला असलेली दहा तोंडे चार वेद आणि सहा शास्त्र यांची प्रतिक होती.
हि शास्त्र आणि वेद यांची यादी पुढील प्रमाणे १) सांख्य शास्त्र ( गणित ) २) योग शास्त्र ( योग आणि ध्यान ) ३) न्याय शास्त्र ( विधी आणि प्रशासन ) ४) वैशेषिक शास्त्र ( भौतिकी, खगोल विज्ञान , अभियांत्रिकी ) ५) पुर्वमिंमासा ( दर्शन, औचित्य ) ६) उत्तर मीमांसा शास्त्र ७) ऋग्वेद ८) यजुर्वेद ९) सामवेद १०) अथर्ववेद मुलतः रावण चौसष्ट कला आणि सर्व शास्त्रात निपुण होता.
राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे असलेल्या या चित्रात गाढवाचे मुख असलेला रावण आपल्या एका मंत्र्याला आदेश देताना दाखवला आहे.
पण त्याच बरोबर या दहा मस्तकांना नकारात्मक गोष्टींशीही जोडले जाते. १) काम ( वासना ) २) क्रोध ३) मोह ( भ्रम ) ४) लोभ ( लालचीपणा ) ५) मद ६) मत्सर ७ ) बुध्दी ८) मनस ( मन ) ९) चित्त ( इच्छा ) १०) अहंकार
महाबलीने एकदा रावणाला सल्ला दिला कि स्वतःच्या बुध्दीवर विश्वास ठेवून
फक्त एकच शिर ठेवून बाकीच्या डोक्यांचा त्याग करावा, त्यावर रावणाने उत्तर
दिले कि सर्व गुणांचे संतुलन आवश्यक आहे, म्हणूनच हि दहा मुखे आवश्यक आहेत.
रावणाची बुध्दी दहा व्यक्तींच्या बरोबरीची असल्यामुळे त्याचे नाव दशग्रीव
पडले,
त्याच बरोबर अशीही एक मान्यता आहे कि दशानन म्हणले जायचे कारण त्याच्या आदेशाचे पालन दहा दिशात केले जायचे.काही चित्रात रावणाला गर्दभ मुख असलेले दाखवले जाते. यातून त्याची खिल्ली उडवली जाते, याम्धून हा संदेश दिला जातो कि त्याला असलेल्या एका गाढवाच्या शिरामुळे बाकी बुध्दीमान मुखांचा उपयोग शुन्य झाला. एक प्रकारे, विनाशकाले विपरीत बुध्दी !
मार्कडेयानुग्रह :-
आपल्या
निस्सीम भक्ताची यमाच्या तावडीतून सुटका करणाऱ्या शिवाचे दर्शन
मार्कंडेयानुग्रह प्रतिमेतून घडते. मर्कड ऋर्षीना अनेक अपत्ये झाली. पण ती
जगली नाहीत. ऋषींनी मग मृत्यूलाच साकडे घातले. यम प्रसन्न झाला आणि
म्हणाला, मी तुम्हाला पुत्र देईन परंतु तो एक तर दीर्घजीवी आणि मतिमंद असेल
किंवा अत्यंत हुशार परंतु अल्पजीवी असेल. मातापित्यांनी अल्पजीवी पण हुशार
मुलगा होऊ दे असा वर मागितला. मुलगा झाल्यावर त्याचे नाव त्यांनी माकैडेय
ठेवले. ही मार्कंडेय जन्माची कथा आहे. मार्कंड ऋषींना शिवाच्या कृपेने एक
मनासारखा मुलगा झाला. तो कुशाग्र बुद्धीचा व सर्वज्ञानी होता, पण तो केवळ
१६ वर्षेच जगेल हे विधिलिखित होते. हा मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो
हुशार असल्यामुळे शिवाची भक्ती करू लागला. हा मार्कंडेय मोठा शिवभक्त होता.
त्याला आपल्या मृत्यूबद्दल समजले तेव्हा तो तीर्थयात्रेला निघाला. प्रवास
करत तो तमिळनाडूमध्ये तिरुक्कदवूर या ठिकाणी आला, तेथे तो शिव-आराधनेत अगदी
तल्लीन होऊन गेला. योगायोगाने त्याच दिवशी मार्कंडेयाच्या वयाची १६ वर्षे
पूर्ण होत होती. त्याप्रमाणे यम त्याचे प्राण नेण्यास आले.
मार्कंडेयानुग्रह, वेरूळ (महाराष्ट्र)
यमाचा पाश मार्कंडेयाभोवती पडला तेव्हा त्याने शिवलिंगाला घट्ट आलिंगन
दिले होते. मार्कंडेय शिवाच्या आराधनेत इतका गुंग झाला होता की
त्याच्याभोवती यमाने पाश टाकला आहे याचेसुद्धा त्याला भान राहिले नाही.
शिवाने पाहिले की, एक अनन्यसाधारण भक्त आपली इतकी मनोभावे आराधना करता
असताना त्याच्यावर मृत्यूसुद्धा काय म्हणून झडप घालेल ? अशा वेळी आपल्या
भक्ताचे प्राण वाचविण्यासाठी शिव स्वतः लिंगातून बाहेर आले व त्यांनी
यमावरतीच हल्ला केला. त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आणि कमरेत लाथ मारली.
ती लाथ इतकी जबरदस्त आहे की, यम अक्षरशः भेलकांडत गेल्याचे कलाकाराने कोरले
आहे.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे की, आपल्याला मारणारा हा कोण? तेव्हा
यमाने क्षमायाचना करून माघार घेतली व मार्कंडेयाचे प्राण वाचले. त्याचवेळी
त्याचे वय १६ वर्षांपुढे कधीच वाढणार नाही अशी योजना केली आणि मार्कंडेय
चिरंजीव झाला. शैव पंथांचे उदात्तीकरण करणारी ही कथा आहे.
मार्कंडेयानुग्रह कथा शिल्पकार तसेच चित्रकारांच्या आवडीचा विषय
आहे. ‘अंशुमद्भेदागम’, ‘कामिकागम’, ‘कारणागम’ अशा आगमांमध्ये याचे वर्णन
आढळते. ‘अंशुमद्भेदागमा’त सांगितल्याप्रमाणे शिव त्रिनेत्र, चतुर्भुज किंवा
अष्टभुज असावा. चतुर्भुज असल्यास एका उजव्या हातात परशू व दुसऱ्या उजव्या
हातात शूल असावा. हा शूलधारी हात कानापर्यंत वर उचललेला असावा. खालचा डावा
हात सूची मुद्रेत असून वरचा हात विस्मयमुद्रेत असावा. शिव अष्टभुज असल्यास
उजव्या हातात शूल, परशू, वज्र व खड्ग असावेत आणि दोन्ही डाव्या हातांत खेटक
व पाश असावेत. उरलेले दोन्ही हात सूची व विस्मयमुद्रेत असावेत. त्याने
आपला एक पाय पद्मपीठावर ठेवलेला असून दुसरा पाय यमाला लाथ मारण्यासाठी
त्याच्या छातीपर्यंत आणलेला असावा. यम हा करंडमुकुटधारी आणि दोन्ही बाजूस
सुळे असलेला असा दाखवला जातो. त्याच्या हातात पाश असतो, पण तो भयभीत व
क्षमायाचना करणारा असतो.
‘कामिकागम’ या ग्रंथात असे वर्णन
आहे की, शिव उजव्या पायाने यमाला लाथ मारत आहे, तेव्हा त्याचा डावा पाय
जमिनीवर ठेवलेला असतो. उजव्या हातात शूल व परशू असतात, डाव्या हातात नागपाश
असतो, शुलाचे टोक खाली यमाच्या मानेत घुसत असते आणि यम खाली पडलेला असतो.
या कथेवर आधारित सर्वांत प्राचीन मूर्ती ही इ. स. आठव्या शतकातील असून ती
पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिराच्या महामंडपावर आहे. येथे मार्कंडेय भयभीत
झालेला दिसतो. शिवलिंगाच्या पद्मपीठावर शिव उभा आहे. त्याच्या वरचा उजव्या
हातात त्रिशूळ असून खालचा हात कमरेवर आहे. यम दोन्ही हात शिवापुढे पसरून
क्षमायाचना करताना दिसतो.
मार्कंडेयानुग्रह, कैलास मंदिर, वेरूळ
वेरूळच्या दशावतार लेण्यातील
मार्कंडेयानुग्रहाची मूर्ती अतिशय तपशीलवार आणि भव्य आहे. येथे शिव
लिंगातून बाहेर प्रकट होत असलेला दिसतो. त्याचा उजवा पाय अजून आतच आहे, तर
डाव्या पायाने तो यमाला लाथ मारत आहे. त्याने आपला त्रिशूळ वरच्या उजव्या
आणि खालच्या डाव्या हातात मिळून धरला आहे आणि तो यमाच्या पोटात खुपसला आहे.
खालचा उजवा हात कट्यावलंबित आहे आणि वरचा डावा हात विस्मयमुद्रेत.
पिंडीजवळ गुडघ्यावर बसलेला मार्कंडेय दिसतो; त्याच्या गळ्यात यमाने टाकलेला
पाश आहे. कैलास लेण्याच्या उत्तरेकडील मार्गिकेवरही अशीच एक प्रतिमा आहे,
मात्र तपशिलात फरक आढळतो. येथे मार्कंडेय शिवलिंगाला मिठी मारून बसला आहे. वेरुळमधील
कैलास लेणे क्र.१६ तर दशावतार लेणे (क्र. १५) येथे कोरलेले हे कालारी या
नावाने सुध्दा ओळखले जाणारे शिवाचे संहारशिल्प सर्वोत्तम म्हणावे लागेल.
याशिवाय विघ्नेश्वरानुग्रह व नंदिशानु अशी अनुग्रह शिल्पेही असतात.
तमिळनाडूतील
पट्टीश्वरम येथे दहाव्या किंवा अकराव्या शतकातील एक काहीशी वेगळी मूर्ती
आहे. येथे यम पाठीवर पडलेला असून शिव त्याच्या छातीवर उभा आहे. तो आपल्या
उजव्या पायाने यमाला चिरडत आहे आणि डावा पाय त्याच्या शरीरावर रोवून ठेवला
आहे. शिव चतुर्भुज असून त्याने परशू, मृग, त्रिशूळ व कपाल धारण केले आहेत.
अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक प्रतिमा महाराष्ट्रातील अंबरनाथच्या
शिवमंदिरावरही आहे.
चंडेशानुग्रह :-
चंडेशानुग्रह
प्रकारच्या प्रतिमा दक्षिण भारतात आढळून येतात. तमिळनाडूमधील ६३ नायनमार
किंवा नयनार या शैव संतांची माहिती असणारे पेरीय पुराण १२व्या शतकात लिहिले
गेले. यामध्ये चंडेश्वराची कथा येते. तमिळनाडूमध्ये मन्नी नदीकाठी
सेयनालुर या गावात विचार सर्मण हा शिवभक्त राहत असे.तो गायी चरायला नेई आणि
तिथेच वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असे. या गावातील लोक
गायींना नीट वागवत नाहीत हे पाहून त्याने स्वतः गायींची काळजी घ्यायचे
ठरविले. त्याने या गायी काही दुष्ट प्रवृत्तीच्या गुराख्यांच्या तावडीतून
सोडवल्या होत्या. यावर प्रसन्न होऊन गायी त्याला भरपूर दूध देत. हे सर्व
दूध तो शिवाच्या वाळूच्या केलेल्या शिवलिंगावर रोज वाहून टाकायचा. हे सर्व
पाहणाऱ्या त्या दुष्ट गुराख्यांनी त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. हे
त्याच्या वडीलांना कळले. त्यांनी रानात जाऊन पाहिले तर हा शिवपूजेत मग्न
होऊन वाळूच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत होता. क्रोधाने त्यांनी त्याला
काठीने मारायला सुरुवात केली. त्यांनी संतापून त्या शिवलिंगाला लाथ मारली.
शिवलिंग मोडले. आपल्या भक्तीत व्यत्यय आणणाऱ्याकडे न पाहताच विचार सर्मणाने
ती काठी हिसकावली आणि मारणाऱ्याच्या माध्य आपल्याच वडीलांच्या दिशेने
भिरकावली. शिवकृपेने त्या काठीची कुऱ्हाड झाली आणि त्यामुळे त्याच्या
वडीलांचा मृत्यू झाला. तरीही हा पूजेतच मग्न होता. त्याची ही निस्सिम भक्ती
पाहून शिव झाले आणि पार्वतीसह ते प्रकट झाले. त्यांनी आपल्या भक्ताला
आलिंगन दिले. त्यामुळे सर्मण सारुप्य मुक्ती मिळाली. शिव त्याला म्हणाले
की, 'आता मीच तुझा पिता. तू चंडिकेश्वराच्या धामीड तिथे तुला
माझ्याप्रमाणेच पूजतील'. यानंतर आपल्या गळ्यातील माळ स्वहस्ते चंडेशाच्या
डोक्या फेट्यासारखी बांधली. आणि शिवपार्वती अंतर्धान पावले. विचार सर्मण
चंडेश झाला. अशा निम्तो शिवभक्ताच्या हाताने मृत्यू आल्यामुळे त्याच्या
वडीलांनाही मुक्ती मिळली आणि पितृहत्येचे चंडेशला लागले नाही. (शिवानंद :
१९९९, पृ. २८). गंगाईकोंडचोलापुरम येथील मंदिरात या प्रमाण उत्कृष्ट
शिल्पांकन केलेले आहे.
इ. स. आठवे शतक ते अकरावे शतक या काळातील चंडेशानुग्रहमूर्ती कांची,
मदुराई, कांचीपुरम, गंगैकोंड चोलपुरम् येथे आढळतात. ‘अंशुमद्भेदा’तील
वर्णनाप्रमाणे शिव हा वरदमुद्रेत असावा, त्याचा चेहरा डावीकडे वळलेला असून
त्याचा उजवा हात थोड्या खालच्या पीठावर पद्मासनात बसलेल्या किंवा उभ्या
चंडेशाच्या डोक्यावर ठेवलेला असावा. चंडेश अंजलीमुद्रेत असावा. शिवाशेजारी
पार्वती असावी व ते चंद्रशेखर मूर्तीप्रमाणे बसलेले असावेत. चंडेशाची उंची
शिवाच्या गुडघा, मांडी, छाती, मान किंवा चेहऱ्याइतकीच असली पाहिजे. अशा
प्रकारातील मूर्तींपैकी सातव्या शतकातील चंडेशानुग्रहाची प्राचीन मूर्ती
कांचीपुरम येथे कैलासनाथ मंदिरावर पाहायला मिळते. ही मूर्ती काहीशी झिजलेली
असून चतुर्भुज शिवाच्या हातातील आयुधे नीट दिसत नाहीत. त्याचा एक उजवा हात
वरदमुद्रेत आहे, उजवा पाय जमिनीवर असून डावा पाय आसनावर दुमडून घेतला आहे.
त्याच्या उजव्या बाजूस खांद्यावर परशू घेतलेला चंडेश आहे. त्याचे वडील
यज्ञदत्तही जमिनीवर पडलेले दिसतात.
चंडेशानुग्रह, गंगैकोंडचोलपुरम, तमिळनाडू
इ. स. ११ व्या शतकातील एक मूर्ती गंगैकोंडचोलपुरम् येथील बृहदीश्वर
मंदिरात आहे. यात शिवपार्वती वामललितासनात बसलेले आहेत. चंडेश शिवासमोर
खाली अंजलीमुद्रेत बसलेला असून त्याने आपले मस्तक आदराने पुढे झुकवले आहे.
शिवाच्या मागच्या दोन्ही हातात परशू आणि मृग आहेत, तर पुढचा डावा हात
चंडेशाच्या डोक्यावर ठेवला असून उजव्या हाताने तो त्याच्या डोक्याला
फुलांचा हार गुंडाळतो आहे, असे दिसते.
विष्णवानुग्रह किंवा चक्रदानमूर्ती :
विष्णूंना
शंकराकडून सुदर्शन चक्र कसे मिळाले याची कथा ‘महाभारता’त आहे. एकदा
असुरांशी लढणे विष्णूंना कठीण जाऊ लागले, तेव्हा त्यांनी आपली शक्ती
वाढवण्यासाठी शिवाची आराधना केली. सुदर्शनचक्र मिळवण्यासाठी ते अधिकाधिक
कठोर तप करू लागले. त्यांनी एक सहस्त्र कमळे शिवाला अर्पण करण्याचे ठरवले
होते. एक दिवस पूजा करताना त्यांच्या लक्षात आले की, कमळाचे एक फूल कमी
आहे. वास्तविक, विष्णूची परीक्षा पाहण्यासाठी शिवानेच ते लपवून ठेवले होते.
त्या कमळपुष्पाची भरपाई करण्यासाठी विष्णूंनी स्वतःचा एक डोळा काढून तो
शिवाला अर्पण केला (विष्णूचे डोळे हे कमळासारखे-कमलनयन-आहेत असे मानले
जाते). या निस्सीम भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना
सुदर्शनचक्र दिले. ‘शिवपुराण’ व ‘स्कंदपुराण’ या कथेला अप्रत्यक्ष पुष्टी
देतात.
या प्रकारच्या प्रतिमा केवळ दक्षिण भारतात आढळतात. त्यांचे
वर्णन ‘उत्तरकारणागम’, ‘उत्तरकामिकागम’ व ‘श्रीतत्त्वनिधी’ या ग्रंथांत
येते. ‘उत्तरकारणागमा’नुसार शिव हा त्रिनेत्र आणि चतुर्भुज असावा. त्याने
दोन्ही उजव्या हातात चक्र, टंक आणि वरच्या डाव्या हातात मृग धारण केलेले
असावे. खालचा डावा हात वरदमुद्रेत असावा. तो सव्यललितासनात बसलेला असावा;
त्याच्या डावीकडे पार्वती बसलेली असावी, तर उजवीकडे ब्रह्मदेव उभा असावा.
विष्णू अंजलीमुद्रेत कमळपुष्प व स्वत:चा डोळा अर्पण करून पूजा करत असावा.
‘उत्तरकामिकागमा’तील वर्णनाप्रमाणे विष्णू हा अंजलीमुद्रेत उभा असून त्याने
एका हातात चक्र धारण केलेले असावे, इतर दोन हातांत कमळ व शंख असावेत.
‘श्रीतत्त्वनिधी’त असे वर्णन आहे की, शिवाने टंक, मृग व परशू धारण केले
असून त्याचा एक हात वरदमुद्रेत आहे. तो जटामुकुटधारी व त्रिनेत्र असावा.
विष्णू वर्णाने काळा असावा आणि अंजलीमुद्रेत शिवासमोर उभा असावा.
या वर्णनाचे इ. स. आठव्या शतकातील एक शिल्प कांचीपुरमच्या कैलासनाथ
मंदिरात आहे. येथे शिवपार्वती उच्चासनावर बसलेले आहेत. शिवाच्या उजवीकडे
खाली विष्णू बसलेला असून तो आपला एक डोळा काढून शिवाला अर्पण करताना
दाखवलेला आहे.चतुर्भुज शिवाने आपले मागचे दोन्ही हात आश्चर्याने वर उचलले
आहेत. खालचा डावा हात सिंहकर्ण मुद्रेत असून उजवा हात पार्श्वभागावर ठेवला
आहे. त्याच्या आसनासमोर खाली गुडघ्यावर चतुर्भुज विष्णू बसला आहे. पुढच्या
डाव्या हाताने तो आपला डोळा काढतो आहे, तर मागच्या डाव्या हातात कमलपुष्प
आहे. उजव्या हातांपैकी पुढचा हात कटकमुद्रेत आहे, पण मागचा दिसत नाही.
विष्णवानुग्रह, मीनाक्षी सुंदरेश्वर स्वामी मंदिर, मदुराई (तमिळनाडू).
तमिळनाडूमधील मदुराई येथील
मीनाक्षी सुंदरेश्वरस्वामी मंदिरात १६ व्या शतकातील एक विष्णवानुग्रह शिल्प
आहे. येथे शिव सव्यललितासनात तर पार्वती वामललितासनात बसलेले आहेत.
शिवाच्या मागच्या हातात परशू आणि मृग तर पुढचा डावा हात वरदमुद्रेत असून
उजव्या हाताने तो विष्णूला चक्र देत आहे. विष्णू शिवाच्या खालच्या बाजूस
असून तो आपल्या दोन्ही हातांनी ते सुदर्शनचक्र घेत आहे.
अर्जुनानुग्रह किंवा किरातार्जुनमूर्ती:-
अर्जुनाने शिवाकडून पाशुपतास्त्र कसे प्राप्त केले याची कथा ‘महाभारता’तील वनपर्वात येते. पांडवांच्या वनवासात धर्मराजाने अर्जुनाला इंद्राकडून दिव्यशक्ती प्राप्त करून घ्यायला सांगितले.अर्जुन इंद्राला भेटला तेव्हा इंद्राने त्याला सर्व सामर्थ्यशाली शिवाकडून पाशुपतास्त्र घेण्यास सांगितले. अर्जुन हिमालयात गेला आणि त्याने घोर तपश्चर्या आरंभ केली. ती पाहून हिमालयातील ऋषींनी शंकरांना सांगितले की तो एवढी तपश्चर्या करतो आहे, तर त्याची इच्छा पूर्ण करावी. शंकराने अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवले. किरात वेष धारण करून शंकर अर्जुनाच्या जवळ पोचला. तेव्हा त्याला दिसले की, मूक नावाचा एक राक्षस वराहचे रूप घेऊन अर्जुनावर हल्ला करायच्या तयारीत आहे. म्हणून त्याने आपले धनुष्य काढले. तोपर्यंत अर्जुनानेही आपले धनुष्य सज्ज केले. शंकर म्हणाला की मी त्या वराहला आधी पाहिले म्हणून मी त्याला मारणार. अर्जुनाने किराताच्या बोलण्याचा अनादर करून वराहावर बाण सोडला. तिकडून शंकरानेही एक बाण सोडला. दोघांच्या बाणाने वराहरूपी मूकराक्षस याने आपले भयंकर रूप प्रकट केले आणि मरून पडला. वराहला कोणी मारले यावरून या दोघात वाद सुरू झाला. दोघांनीही एकमेकांवर बाणांचा वर्षाव केला. आपल्या बाणांनी किरातला काही होत नाही हे पाहून अर्जुन त्याच्या अंगावर धावून गेला. मग त्यांच्यात द्वंद्वयुद्ध झाले, मग मुष्ठीयुद्ध झाले. द्वंद्वयुद्धात अर्जुन पराभूत झाला; पण शेवटी त्याने किराताचे खरे रूप ओळखले आणि त्याचे पाय धरले. शिवालाही अर्जुनाच्या शौर्याची आणि तो संहारक अस्त्र धारण करण्यास सक्षम आहे याची कल्पना आली. मग शिवशंकराने आपला कृपाप्रसाद म्हणून अर्जुनाला आपले पाशुपतास्त्र दिले आणि त्याने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला पाशुपतास्त्र दिले. (महाभारत, आरण्यपर्व, किरातपर्व, अ. ३८-४०), ही कथा भारवीच्या ‘किरातार्जुनीय’ व अनंतभट्टाच्या ‘भारतचंपू’ या ग्रंथांतही येते. मूर्तिकला व चित्रकलेत हा विषय लोकप्रिय आहे, मात्र या प्रकारच्या प्रतिमेचे वर्णन केवळ ‘श्रीतत्त्वनिधी’ या एकाच ग्रंथात सापडते. त्यातील वर्णनानुसार शिव हा चतुर्भुज, त्रिनेत्र व लाल रंगाचा असावा, त्याने जटामुकुट, यज्ञोपवीत व इतर आभूषणे ल्यालेली असावीत. तो समभंग स्थितीत उभा असून वरच्या दोन हातांत परशू व मृग, तर खालच्या हातात धनुष्यबाण असावेत. त्याच्या डाव्या बाजूस पार्वती आणि जवळच अर्जुन दाखवावेत; पैकी आभूषणे ल्यालेला अर्जुन हा हात जोडून उभा असावा, असे सांगितले आहे. किरातार्जुनमूर्ती या इ. स. सहाव्या शतकापासून पाहायला मिळतात. त्यांपैकी बहुतेक प्रतिमा दक्षिणेकडील मंदिरांमध्ये आढळतात. बदामी चालुक्यकालीन पापनाथ मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष मंदिरातील प्रतिमा ही सर्वांत प्राचीन समजली जाते. वेरूळच्या कैलास लेण्यात मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या उत्तरेकडील भिंतीवर ‘महाभारता’तील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत. त्यांत वरच्या पट्टिकेत एक किरातार्जुनाचे शिल्प आहे. कथेतील सर्व घटनाक्रम येथे पाहायला मिळतो. प्रथम तपश्चर्या करणारा अर्जुन दिसतो. एका पायावर उभा राहून त्याने आपले हात आकाशाच्या दिशेने उंचावले आहेत. त्यापुढे शिकारीचे दृश्य आहे; एका बाजूस अर्जुन तर दुसरीकडे किरात दिसतो. त्यापुढे प्रत्यक्ष शिकार, मग त्या दोघांचे द्वंद्व. पुढील दृश्यात शिवाची ओळख पटल्यावर अर्जुन साष्टांग नमस्कार करताना दिसतो आणि शिव त्याला पाशुपतास्त्र बहाल करतात. येथे शिव चतुर्भुज असून त्यांनी त्रिशूळ, धनुष्यबाण धारण केले आहेत. किरातार्जुन (राजा रविवर्माकृत एक चित्र).
श्रीशैल्य येथे एका शिल्पपटात शिव अर्जुनाला बाणाच्या रूपात पाशुपतास्त्र देत आहेत, असे दृश्य कोरले आहे. चतुर्भुज शिवाच्या वरच्या हातात परशू व त्रिशूळ आहेत, तर खालचा डावा हात कमरेवर आहे. उजव्या हाताने ते अर्जुनाला बाण देत आहेत. समोर उभ्या अर्जुनाने उजवा हात अस्त्र घेण्यासाठी पुढे केला आहे, त्याच्या डाव्या हातात धनुष्य आहे. पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस उभी असून तिच्या हातात कमळ आहे. अर्जुनानुग्रह, महाबलीपुरम, तमिळनाडू :-
वेरुळमधल्या महाभारताच्या शिल्पपटाची सुरुवातच या कथेने होते. त्यात सुरुवातीला वराहाभोवती दोन धनुर्धर दाखवले आहेत. नंतर त्यांच्यामध्ये झालेले मुष्टी युद्ध आणि द्वंद्र आणि त्यापुढे आसनस्थ शिव त्यांच्या पुढे गुडघे टेकून शंकराच्या पाया पडणारा अर्जुन दिसतो. महाबलिपुरम येथे अर्जुनाच्य तपश्चर्येचे हे शिल्प पंधरा फूट उंच आणि चाळीस फूट रुंद अशा विराट कातळावर कोरलेले आहे. शिल्पात दोन्ही हात डोक्यावर धरून डाव्या पायावर उभे राहून उजव्या पायाचा तळवा डाव्या गुढगा टेकून उभ्या असलेल्या तप करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प असून त्याच्या शेजारी चार हातांचा त्रिशुलधारी शिव उभा असल्याचे शिल्प आहे. अर्जुनाने केवळ वायू भक्षण करून हात वर करून स्थिर स्थितीत तप केले म्हणून या शिल्पात वृक्षासनामध्ये उभा असलेला अर्जुन दिसतो. या कातळावर असंख्य शिल्प असून अर्जुनानुग्रहाचा हा सर्वात मोठा शिल्पपट आहे.
मानवस्वरूप नंदी (सपत्नीक), संस्कृत विश्वविद्यालय संग्रह.
नंदेशानुग्रह/अधिकारनंदिन् : ‘शिवमहापुराणा’तील कथेनुसार नंदी हा सालंकायण ऋषींचा पुत्र होय. बरीच वर्षे पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे त्यांनी सालग्राम या ठिकाणी साल वृक्षाखाली तप केले. त्यामुळे विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी सालंकायण ऋषींना वर मागण्यास सांगितले. ऋषींनी आपल्याला सद्गुणी पुत्र मिळावा अशी विनंती केली. त्याबरोबर विष्णूच्या उजव्या कुशीतून एक पुरुष बाहेर आला, तो हुबेहूब शिवासारखा दिसत होता. त्याचे नाव नंदिकेश्वर असे ठेवण्यात आले. ‘लिंगपुराणा’त दिलेल्या कथेनुसार सिलाद नावाचे नेत्रहीन ऋषी होते. त्यांना मानवापासून न झालेला पण अमर्त्य असा पुत्र हवा होता. तेव्हा इंद्राने त्यांना शिवशंकरांची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन त्यांना तसा वर दिला. एकदा सिलाद यज्ञ करत असताना त्यातून अगदी शिवासारखा दिसणारा एक मुलगा बाहेर आला. त्यालाही शिवासारखेच चार हात, त्रिनेत्र व जटामुकुट होते. त्याने आपल्या हातात शूल, टंक, गदा आणि वज्र धारण केले होते. शंकरांनी त्याचे नाव ‘नंदी’ असे ठेवले. नंदीचे उपनयन झाले व लवकरच त्याने वेदाध्ययनात प्रावीण्य मिळवले. मात्र काही काळाने मित्र व वरुण या दोन ऋषींनी सांगितले की तो अल्पायुषी आहे. तेव्हा नंदीने घोर तप करण्यास सुरुवात केली. शेवटी शिव प्रसन्न झाले, त्यांनी त्याला आलिंगन दिले व आपल्या गळ्यातील हार त्याच्या गळ्यात घालून नंदीला वृद्धत्व आणि मृत्यू यांतून मुक्त केले; त्याची नेमणूक आपल्या गणांच्या प्रमुखपदी केली आणि मरुताची कन्या सुयशा हिच्याशी त्याचा विवाह लावून दिला. ‘रामायणा’त नंदीकेश्वर हा शिवाचा एक अवतार म्हणून येतो. कैलासाकडे जाणाऱ्या रावणाला त्याने अडवले. रावणाने त्याला उद्देशून अवमानकारक शब्द वापरले तेव्हा नंदीने त्याला शाप दिला की तुझ्या वंशाचा नाश हा माकडांच्या हातून होईल. ‘भागवतपुराणा’त असे वर्णन आहे की, यज्ञप्रसंगी दक्ष-प्रजापतीने शिवाबद्दल जे अपशब्द उच्चारले ते असह्य झाल्याने नंदीने त्याची चांगलीच कानउघाडणी केली. ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा’तील वर्णनानुसार नंदीला तीन डोळे, चार हात असावेत व तो लाल रंगाचा असावा. त्याने व्याघ्राजिन (वाघाचे कातडे) परिधान केलेले असावे. त्याच्या हातात त्रिशूळ असून लोकांची व्यवस्था करण्याकडे त्याचे लक्ष असावे. नंदीकेश्वर बऱ्याच वेळा वृषभरूपात किंवा शिवाचे प्रतिरूप असा चित्रित केलेला असतो. प्रत्येक शिवमंदिरात गाभाऱ्याकडे तोंड करून वृषभरूपी नंदी बसलेला दिसतो. इ. स. ११ व्या शतकातील चोळ शैलीत घडवलेली नंदीची पंचधातूची एक सुंदर प्रतिमा वेलुवर (तमिळनाडू) येथे आहे. तो त्रिभंग अवस्थेत उभा असून त्याच्या जटामुकुटात गंगा व चंद्रकोर आहेत. त्याच्या मागच्या दोन्ही हातांत परशू व मृग असून पुढचे दोन्ही हात नमस्कारमुद्रेत आहेत. पत्नी सुयशासह ते पद्मपीठावर उभे आहेत.
संहार मूर्ती :-
एक शिवरूप. शिवशंकराचे रूप एकीकडे शांत, वरदायी, त्याचवेळी दुसरीकडे उग्र, विध्वंसक असे दिसून येते. शंकराने आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ आणि अन्याय करणाऱ्यांना शासन करण्यासाठी जी प्रखर व संहारक रूपे धारण केली त्यांचा समावेश संहारमूर्तींमध्ये केला जातो. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. या सर्व संहारक प्रतिमा नावांप्रमाणेच शिवाच्या रौद्र अवतारांची जाणीव करून देणाऱ्या व भयावहदेखील आहेत. ह्या सर्व कथा संहारमूर्तींमध्ये कोरलेल्या असतात. शिवाच्या तांडवाचे वर्णन करताना शिव त्याचा तिसरा डोळा उघडतो आणि तो सर्वांचा सा कमलो असे सांगितले जाते. यावरून आकांडतांडव करणे हा वाक्यचारही रूढ झाला आहे.परंतु शिल्पकलेत मात्र असे संहार तांडव दिसत नाही. उलट पक्षी निर्मितीचा परमानंद चेहऱ्यावर प्रकटलेले त्याचे प्रसन्न आणि शांत रूपच दिसते. शिवाचे आक्रमक रूप त्याच्या संहार शिल्पांमध्ये दिसते. निरनिराळ्या असुरांचा वध दर्शवणारी ही शिल्पे असतात, ज्यामध्ये भैरव, गजासुरवध, अंधकासुर, त्रिपुरांतक, कालारी, कामंतक, शरभ, ब्राह्म शिरच्छेदक, वीरभद्र आदी शिल्पांचा समावेश असतो. संहारमूर्तीमध्ये पहिली मूर्ती घेऊ ती म्हणजे कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहमूर्ती
कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती.
मार्कंडेयानुग्रहमूर्ती आणि कालारीमूर्ती या वास्तविक एकच होत.ह्या
मूर्तीचा समावेश एकाचवेळी अनुग्रह आणि संहार अशा दोन्ही प्रकारांमध्ये
होतो याचे कारण म्हणजे मार्कंडेयावर अनुग्रह करून शिव साक्षात कालरूपी
यमाचे पारिपत्य करीत आहे.
याची थोडक्यात कथा अशी.
पुराणकथेप्रमाणे
निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर
त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा
अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो
तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या
मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम
ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात
यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम
शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात
कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला
कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.
वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर असलेली कालारी शिव प्रतिमा
वेरूळ येथील कैलास लेणीमधील कालारी शिवप्रतिमा
शिवाने आपला परमभक्त मार्कंडेय याची यमाच्या तावडीतून सुटका कशी केली हे अनेक कथा, दंतकथांतून स्पष्ट होते. तदनुषंगिक प्रतिमा वेरूळ, अंबरनाथ, तंजावर, पट्टडकल येथे पाहावयास मिळतात. निव्वळ कालारीमूर्ती (कालाचा अंत करणारा, काळाचा शत्रू शिव) म्हणता येईल, अशी एक प्रतिमा महाबलीपुरम् (तमिळनाडू) येथे धर्मराजरथ मंदिरात आहे. ही मूर्ती इ. स. सातव्या शतकात घडवलेली असून त्यात शिव चतुर्भुज आहे; त्याच्या खालच्या उजव्या हातात परशू आहे तर वरचा उजवा हात भग्न आहे. खालचा डावा हात सूचिमुद्रेत आहे आणि तो काळाकडे निर्देश करत आहे. मात्र वरच्या डाव्या हातातील आयुध संदिग्ध आहे. शिवाने यमाला लाथ मारून खाली पाडले आहे आणि त्याच्या पायांजवळ पडलेला यम भयभीत नजरेने शिवाकडे पाहत आहे.
अंधकासुरवध :-
अंधकासुराची कथा काहीशी अशी आहे. मंदार पर्वतावर एक सुंदर दिवस उगवला. भगवान शिव चिंतन मुद्रेत होते, तर देवी पार्वती शृंगार मुद्रेत होत्या. भगवान शिवांचे दोन्ही डोळे पुर्ण उघडे आणि व्यग्र होते, जणू ते भविष्याचा वेध घेत होते. मात्र त्यावेळी पार्वती मातेला वाटले कि भगवान शिव त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी शिवशंकराचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शिव आपल्या विचारात व्यग्र राहीले. तेव्हा पार्वतीना लक्षात आले कि जोपर्यंत शिवशंकरांचे डोळे उघडे आहेत, तोपर्यंत शिव फक्त जगाचा विचार करतील. म्हणून शंकराचे लक्ष विश्वापासून स्वतःकडे वळवण्यासाठी त्यांनी आपल्या कमलहस्ताने शिवाचे डोळे झाकले. मात्र यामुळे विश्वात गोंधळ निर्माण झाला. जशी भगवान श्ंकरांचे डोळे बंद झाले तसा सर्वत्र अंधार पसरला.
देवी पार्वतीने भगवान शिवांचे डोळे बंद करतानाचे शिल्प, एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम
भगवान शिवांचे डोळे बंद राहिल्यामुळे प्रंचंड उष्णता वाढली व नेत्र आग ओकू लागले, त्याची झळ देवी पार्वतीच्या हातांना लागली व हात घामाने थबथबले, तो घाम जमीनीवर पडला व त्यातून अंधकासुर निर्माण झाला. हे विचित्र, कुरुप दिसणारे आणि अंध असे मुल जन्माला आले. याच्या जन्माच्या वेळी भगवान शंकरांचे डोळे बंद असल्यामुळे जन्मलेल्या मुलाचे डोळे अंध होते. आपलयाकडून जन्म झालेले हे विचित्र मुल पाहून पार्वती भयभीत झाली. मात्र शंकंरानी तिची समजुत काढली कि आपल्या मिलनातून हा पुत्र जन्माला आल्यामुळे आपल्याला त्याला स्विकारावेच लागेल. नेमक्या याच वेळी हिरण्याक्ष हा राक्षस पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची आराधना करत होता. या हिरण्याक्ष नेमका कोण होता ? हे पाहुया.सप्तर्षीपैकी एक असलेले कश्यप ऋषीना तेरा पत्नी होत्या. या तेरा बायका एकमेकाच्या सख्या बहिणी होत्या. या सर्व दक्ष प्रजापतीच्या मुली होत्या. या तेरा पत्नीपैकी एक होती दिती. जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा त्यामध्ये राक्षसांवर अन्याय झाला असे दितीचे मत होते. तीने काश्यप ऋषींकडे हा अन्याय दुर करण्यासाठी शक्तीशाली पुत्र मागितला, जो राक्षस कुळाचे सामर्थ्य पुन्हा निर्माण करेल. यामधूनच हिरण्यकशिपु आणि हिरण्याक्ष यांचा जन्म झाला.
दुसऱ्या मान्यतेनुसार दितीला संध्यासमयी ऋषीसोबत समागम करण्याची इच्छा होती - हा काळ अशुभ आणि मिलनासाठी अयोग्य मानला जातो. संध्याकाळ ही अशी वेळ आहे जेव्हा भगवान शिव आणि त्यांचे भूत आणि गण फिरण्यास बाहेर पडतात. कश्यप ऋषींना हे माहिती होते आणि त्यांनी दितीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ठाम होती. अर्थात पत्नींची समागमाची विनंती कधीही न नाकारणे हा संकेत असल्यामुळे ऋषींनी अनिच्छेने ते मान्य केले.
या मिलनातून हिरण्यक्ष आणि हिरण्यकशपू यांचा जन्म झाला. अशुभ वेळी मिलन झाल्यामुळे दोघांचा जन्म झाला म्हणून ते खूप शक्तिशाली असूनही त्यांच्यात आसुरी गुण होते. इथे एक गोष्ट लक्षात येते की अनेक पौराणिक कथांमध्ये कोणत्याही लैंगिक दुष्कृत्याचा दोष महिलांवर सोईस्करपणे टाकला जातो, या कथेतही तेच दिसून येते.
हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू दोघेही खूप शक्तिशाली होते. त्यांनी अनुक्रमे रुषभानू आणि कयाधूशी विवाह केला. हिरण्याक्ष हा दोघां भावांमध्ये मोठा होता आणि थोरला असल्यामुळे त्याने राक्षसी जगावर राज्य केले. दोघे भावांची खुप एकी होती आणि त्यांना एकमेकांबद्दल खूप आदर होता.
कालांतराने, धाकटा भाऊ हिरण्यकशिपूची पत्नी कयाधूने चार मुलगे आणि एका मुलीला जन्म दिला - प्रल्हाद, सहलाद, अहलाद, अनुहलाद आणि सिंहिका. तथापि, हिरण्यक्ष आणि रुषभानू यांना संतती नव्हती.
एके दिवशी रुषभानूने हिरण्यक्षाला टोमणा मारला की त्याच्या भावाला चार मुलगे आहेत आणि त्याला एकही नाही; त्यामुळे पुढचा राजा हिरण्यकशपूचा मुलगा असेल आणि त्यांची काळजी घेणारा कोणीही पुत्र नसेल. हिरण्यक्षला हि बाब पटली. पराक्रमी पुत्राचे वरदान मिळावे म्हणून त्यांनी शिवाची आराधना करण्याचे ठरवले.
आधी सांगितलेल्या कथेप्रमाणे, ज्या वेळी अंधकासुराचा जन्म झाला, त्याच वेळी हिरण्याक्ष उग्र तपस्या करत होता. त्यांच्या तपस्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी हिरण्यक्षाला त्यांच्या तपाचे कारण विचारले. जेव्हा हिरण्यक्षाने आपण एका शक्तिशाली पुत्रासाठी तपस्या करत असल्याचे कारण सांगितले, तेव्हा भगवान शिवाला आश्चर्य वाटले.
हिरणायक्षला जैविक पुत्र होऊ शकत नाही हे त्याला माहीत होते आणि हिरणायक्ष कठोर तपस्या करत असताना त्याच वेळी अंधकासुराचा जन्म झाला. भगवान शिवांना माहिती होते की तो मुलगा खूप शक्तिशाली असेल कारण तो त्याचा आणि देवी पार्वतीचा मुलगा आहे. भगवान शिवाने हिरणायक्षला स्पष्ट केले की त्याला स्वतःचा मुलगा होऊ शकत नाही, परंतु तो एक आंधळा मुलगा दत्तक घेऊ शकतो जो एक दिवस खूप शक्तिशाली होईल. हिरणायक्षाने भगवान शिवाची हे म्हणणे वरदान म्हणून स्वीकारली आणि नवजात मुलासह त्याच्या राज्यात परतला.
समुद्र मंथनाचा शिल्पपट
हिरण्यक्षाचा वध करून भूदेवी (पृथ्वी) वाचवणार्या भगवान विष्णू वराह-अवतार - कर्नाटकातील बदामी येथील शिल्प
हिरण्याक्षाच्या घरी जेव्हा बालकरुपातील अंधका त्याच्या चुलत भावांसोबत खेळत होता, तेव्हा त्यांनी त्याची चेष्टा केली, "काकानी याला का आणले हे कळत नाही, तो आंधळा आहे आणि त्याचे शरीर विचित्र आहे". या टोमण्याने अंधाकाला त्याच्या शारीरिक कुरुपतेची जाणीव करून दिली कि तो आपल्या चुलत भावांना उत्तर देउ शकणार नाही. त्यांने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्याचे ठरवले.
अंधकाने हजारो वर्षे उग्र तपश्चर्या केली, मंत्रांचा जप आणि पठण केले आणि देव किंवा असुर करू शकत नाहीत अशी कठोर उपासना केली.यामुळे ब्रह्मदेवाला अंधकाकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते आणि ते त्याच्या समोर प्रकट झाले आणि विचारले, “ तुझी इच्छा काय आहे? तू अशी कठोर तपश्चर्या का करत आहेस?" अंधकाने उत्तर दिले, “मला खूप शक्तिशाली व्हायचे आहे. इतका सामर्थ्यवान कि ज्याला कोणीही पराभूत करू शकत नाही आणि कोणीही मारू शकत नाही.”
मात्र अंधकासुराला हा वर देणे ब्रम्हदेवांना शक्यच नव्हते आणि ते म्हणाले, “अंधका, जन्मलेल्या प्रत्येकाला मरावे लागते हे .तू समजून घेतले पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे आणि तो मी कधीही बदलू शकत नाही.”
नरसिंहाने भक्त प्रल्हादाल वाचवण्यासाठी हिरण्यकश्यपुचा वध करतानाचा शिल्पपट, पट्टदकल, कर्नाटक
अर्धवट कोरलेले अंधकासुर वधाचा शिल्पपट, वेरुळ, महाराष्ट्र
अंधकासुराने ब्रह्मदेवाचे स्पष्टीकरण मान्य केले आणि विचारले, "मग मी दीर्घायुष्य मागू शकतो का?" भगवान ब्रह्मदेवाने उत्तर दिले, "हो ! तु असे वरदान मागू शकतोस."
अंधकाने उत्तर दिले, “या विश्वातील सर्व स्त्रिया, मग त्या प्रौढ, मध्यम किंवा तरुण वयाच्या, माझ्यासाठी आईसारख्या असतील. तेव्हा हे भगवन, मला असे वरदान द्या की जोपर्यंत मी मातेकडे वाईट नजरेने बघत नाही तोपर्यंत कोणीही मला मारू शकणार नाही. मी जर एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुध्द ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यास, माझा तात्काळ विनाश होऊ दे आणि माझे राज्य हिरावून घेवो.". भगवान ब्रह्मदेवाने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांला इच्छीत वरदान दिले.
या वरदानाने अंधक शक्तिशाली राक्षस बनला. त्याची दृष्टीही परत मिळाली. तो तपश्चर्या करुन परत आला तोपर्यंत त्याचे वडील आणि काका मरण पावले होते आणि प्रल्हादानेही राज्य सोडले होते. त्याच्या इतर चुलत भावांना लवकरच लक्षात आले की ते अंधाकाच्या ताकदीला तोंड देउ शकत नाहीत आणि त्या सर्वांनी त्यांचा राजा म्हणून स्वीकारले. अंधकाने लवकरच देव, नाग, राक्षस, गंधर्व, यक्ष आणि मानव यांच्यावर विजय मिळवून संपूर्ण विश्वाला आपल्या अधीन केले.
एरावतावर आरुढ, बांतेय स्रेई, कंबोडीया
शक्तिशाली अंधकासुराने इंद्राचा अनेक वेळा पराभव केला आणि त्याच्या दरबारातून अनेक अप्सरांचे अपहरणही केलं. त्रासलेला देवांचा राजा अंधकासुरापासून मुक्त होण्यासाठी नारद मुनींकडे मदतीसाठी गेला.
भगवान नारदांनी थोडा विचार केला आणि ते अंधकासुराला भेटायला गेले. नारदांनी सुगंधी मंदाराच्या फुलांच्या माळा घातल्या होत्या, ज्याच्या मधुर वासाने अंधकासुराला मोहित केले. त्याने नारदांना विचारले, "तुम्हाला ही फुले कोठून मिळाली?" त्यांनी अंधकासुराला सांगितले की मंदार पर्वतावर हि फुले आहेत, तेव्हा त्याने मंदार पर्वत असलेला भाग ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. हा एक सापळा होता कारण नारद मुनींना माहित होते की हा हंकारी गर्विष्ठ राक्षस लवकरच मंदार पर्वतावर स्चारी करेल जिथे त्याची गाठ भगवान शिवाशी होईल आणि देवी पार्वतीसह मंदार पर्वतावर वास करणारे भगवान शिव याचा वध करतील. अपेक्षेप्रमाणे अंधकासुराने स्वारी करुन मंदार पर्वताच्या शिखरावर एक सुंदर शहर वसवले. एके दिवशी अंधकाचे तीन मंत्री - दुर्योधन, विघास आणि हस्ती यांनी एका सुंदर स्त्रीला तिथे विहार करताना पाहीले आणि ते चकित झाले आणि त्या सुंदर स्त्रीच्या मागे गेले. एका गुहेत ती सुंदर स्त्री एका तपस्वी पुरुषासोबत ( भगवान शिव) रहाताना दिसली. त्या स्त्रीवर मोहीत झालेल्या मंत्र्यांनी अंधाकाला देवी पार्वतीची माहिती दिली. त्यांनी त्याला सल्ला दिला, “ही स्त्री एखाद्या रत्नासारखी आहे. तुझ्या अनेक सुंदर बायकांमध्येही तिच्या सौंदर्याशी बरोबरी साधणारी कोणीही नाही. ती तुझी बायको असावी.”हे वर्णन एकून धकाला, त्या स्त्रीची इच्छा झाली. त्याने मदिरा प्याली आणि स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन एकून एखाद्या मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे राजवाड्यातून त्या गुहेच्या दिशेने निघाला.
ज्या ठिकाणी भगवान शिव ध्यान करत होते त्या ठिकाणी तो पोहोचला आणि त्याना म्हणाला, “हे देखण्या तपस्वी, तू तुझे ध्यान आणि तप चालू ठेव.मात्र एवढ्या सुंदर स्त्रीच्या मालकी असावी असे तुमच्याकडे कोणतेही सामर्थ्य नाही. कृपया त्या स्त्रीला माझ्या स्वाधीन करा. माझ्या प्रस्तावावर विचार करा आणि तुमचा सुरक्षेचा विचार करा.”
अंधाकाने विचार केला की हा तपस्वी त्याला आणि त्याच्या सामर्थ्याला घाबरेल आणि अशा प्रकारे त्याची पत्नी शांतपणे आपल्याला स्वाधीन करेल. भगवान शिवाने देवी पार्वतीला सांगितले की हा राक्षस खूप शक्तिशाली आहे आणि त्याला पराभूत करण्यासाठी त्याला ध्यान करावे लागेल आणि काही शक्ती परत मिळवावी लागेल. त्याने तिच्याकडे ध्यानमग्न होण्यासाठी जाण्याची अनुमती मागितली. देवी पार्वतीने त्यांना सांगितले की त्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिवांना पुरेसे सामर्थ्य मिळेपर्यंत जो काल लागेल त्या वेळात ती सहजपणे स्वतःची काळजी घेऊ शकते. भगवान शिव जेव्हा देवी पार्वतीला सोडून जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी निघाले तेव्हा शिव परत येईपर्यंत तिच्या मदतीसाठी सात देवांना बोलावले. परंतु देवी पार्वती एकटी असल्याने देवांना स्वतः जाण्यास अयोग्य वाटले. म्हणून त्यांनी त्यांची स्त्री रूपे निर्माण केली आणि भगवान शिव परत येईपर्यंत या सात देवी किंवा सप्तमातृकांना देवी पार्वतीचे रक्षण करण्यासाठी पाठवले.
सप्तमातृका पट, आईहोळचे चालुक्य शिल्प ( डावीकडून उजवीकडे देवी अश्या आहेत – ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा)
अशा प्रकारे निर्माण केलेल्या सात देवी खालीलप्रमाणे होत्या:
ब्राह्मणी - ब्रह्मदेवाचे हे स्त्री रूप गर्वाचा नाश करते. ब्रह्माप्रमाणे ती हंसावर स्वार होते. तिच्या हातात अक्षमाला आणि पाण्याचे भांडे आहे.
कौमारी - भगवान कुमार (भगवान कार्तिकेयन) चे हे स्त्री रूप आसक्तीचा नाश करते. तिचे वाहन मोर असून तिने फुलांच्या माळा घातल्या आहेत.
वैष्णवी - भगवान विष्णूचे हे स्त्री रूप लोभाचा नाश करते. ती गरुडावर स्वार आहे आणि तिच्या दोन वरच्या हातात चक्र आणि गदा आहे आणि बाकीचे दोन हात अभय आणि वरद मुद्रा आहेत.
महेश्वरी - भगवान महेश्वराचे हे स्त्री रूप क्रोधाचा नाश करते. ती नंदीवर स्वार होऊन जटा मुकुट धारण करते. तिने हातात त्रिशूळ धारण केले आहे, साप तिच्या बांगड्या आहेत आणि चंद्र तिच्या कपाळावर बसला आहे.
वाराही - भगवान विष्णूच्या वराह अवताराचे हे स्त्री रूप मत्सर नष्ट करते. तिला मानवी शरीर आणि वराहाचे डोके दाखवण्यात आले आहे.
इंद्राणी - भगवान इंद्राचे हे स्त्री रूप दोष शोधणे आणि मत्सर नष्ट करते. ती हत्तीवर स्वार होते आणि हातात वज्र धरते.
चामुंडा - भगवान यमाचे हे स्त्री रूप दुष्टतेचा नाश करते. तिने कवटीच्या हार घातलेले कोरलेले आहे आणि तिच्या हातात एक काठी घेऊन दाखवले आहे.
अंधकासुरवधमूर्ती, घारापुरी, महाराष्ट्र.
अंधकासुराला जेव्हा कळाले की संन्यासी गुहेतून निघून गेला आहे. संन्यास्याने आपल्या पत्नीचा त्याग केला याचा त्याला आनंद झाला. काही दिवस वाट पाहिल्यानंतरही तो त्या सुंदर स्त्रीचे वाट बघत थांबला पण तरीही ती सुंदर स्त्री लग्नासाठी त्याच्याकडे आली नाही. त्या स्त्रीला पकडून त्याच्याकडे आणण्यासाठी त्याने आपले सैन्य पाठवले.मात्र सप्तमातृकांनी त्याच्या सैन्याचा पराभव करून त्यांना परतवून लावले. सात स्त्रियांच्या या प्रखर प्रतिकारामुळे अंधकाला राग आला आणि हे युध्द लवकर संपवण्यासाठी त्याने स्वतःच्या सैन्याचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला.
हि घटना होण्याच्या वेळीच भगवान शिव परत आले. पण, संकटे एकावेळी येत नाहीत. त्याचवेळी दुसरा राक्षस नीलासुरने भगवान शिवांना मारण्याची योजना आखली आणि तो हत्तीच्या रूपात आला. मात्र नंदीने वेळीच हा राक्षस नजरेस पडला, त्याने वीरभद्रला हे सांगितले. वीरभद्रने सिंहाचे रूप धारण केले, हल्ला केला आणि हत्तीच्या रुपातील नीलासुराला ठार केले. त्याने मारल्या गेलेल्या राक्षस-हत्तीचे चामडे भगवान शंकराला अर्पण केले. भगवान शिव अंधकासुराशी युद्धासाठी सज्ज झाले. त्याने उत्तरीय वस्त्र म्हणून हत्तीचे चामडे परिधान केले;सोबत असलेले नागा - वासुकी, तक्षक आणि धनंजयाला पट्टा आणि केयुर घातले आणि हा विचित्र पोशाख धारण करुन आपली युद्धमोहीम सुरू केली. ते त्यांचे त्रिशूळ घेऊन निघाले. त्यांच्यासोबत शिव-गण, भगवान विष्णू आणि इतर देव देखील मोहिमेत सामील झाले.भगवान शिवाने अंधकासुराला कोंडीत पकडले आणि आपल्या बाणाने त्याला जखमी केले. मात्र जमिनीवर पडणाऱ्या अंधकासुराच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून दुसरा अंधकासुर जन्म घेत होता. त्याच्या शरीरातून रक्ताच्या उत्सर्जनातून लवकरच अनेक अंधकासुरांची उत्पत्ती झाली, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले
यावेळी भगवान शिवाने मुखातून बाहेर पडणाऱ्या ज्योतीतून देवी योगेश्वरीची निर्मिती केली. योगेश्वरी रक्तस्त्राव झालेल्या अंधकासुराच्या जवळ गेली आणि त्याने आपल्या शरीरातून टपकणारा रक्ताचा थेंब एका भांड्यात गोळा केला आणि त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही याची खात्री केली. देवी योगेश्वरी वासना नष्ट करते असे मानले जाते.त्याच वेळी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सर्व नंतर निर्माण झालेल्या अंधकासुरांचा नाश केला.
भगवान शिवानी ही संधी साधली आणि मूळ अंधकासुराच्या शरीरात आपला त्रिशूळ घुसवला आणि मृत्यू आणि विनाशाचे नृत्य सुरु केले. शेवटी शिवाने अंधकासुराला त्याच्या त्रिशूळावर बसवले आणि त्याला उंच धरले. शिवाने त्याचे शरीर असेच हजार वर्षे धारण केले. मुसळधार पावसाने अंधकासुराचे शरीर भिजवले आणि वाऱ्याने त्याचे हातपाय कुजले.
लेणी क्र. २९, वेरुळ, महाराष्ट्रातील अंधकासुर शिल्पपट ज्यात शिवांचे उग्र भाव दिसतात
ज्या क्षणी भगवान शिवाने अंधकासुराला फाडले, त्या क्षणी अंधकासुराला आपली चूक समजली आणि या युद्धात त्याचा पराभव का झाला याचे कारण लक्षात आले. त्याने आपल्या आई-वडिलांचाही आदर केला नाही आणि अगदी त्याच्या स्वत:च्या आईवर वासना ठेवली. हि जाणीव झाल्यावर तो त्रिशूलावर आडवा झाला आणि त्याने भगवान शिवाची स्तुती करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर हजार वर्षा अशीच गेली आणि त्याचे रुपांतर सांगाड्यात झाले परंतु तरीही त्याने भगवान शिवाची स्तुती करणे थांबवले नाही, अशा प्रकारे तो पवित्र झाला आणि पापांपासून मुक्त झाला.
अंधकासुराला त्याची चूक कळली आहे हे भगवान शिवांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी त्याला क्षमा केली, त्याचे झीजलेले शरीर आधी होते तसे केले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख बनवले आणि त्याचे नाव भृंगी ठेवले.
अशा प्रकारे शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अंधकासुराला स्वर्गीय दर्जा मिळाला आणि तो भगवान शिवाचा कट्टर समर्थक भृंगी बनला. शिवाचे माहात्म्य अपार आहे असा संदेश ही कथा देते. जे भगवान शिवांचा आश्रय घेतात त्यांचे ते संरक्षण करतात.
भृंगी शिल्पामध्ये सहसा एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात जपमाळ असते. त्याचे डोळे त्याच्या इष्ट देवतेवर - भगवान शिवावर स्थिर आहेत. आख्यायिका सांगते की या घटनेनंतर भृंगी भगवान शिवाचा उत्कट अनुयायी बनला आणि त्याची भगवान शिवांवर इतकी कट्टर श्रध्दा कि देवी पार्वती देखील त्याची बरोबरी करू शकत नाही.पार्वतीच्या जिद्दीमुळे भगवान शिवाचे अर्धनारीश्वर रूप होते.
विशेष म्हणजे शिल्पशास्त्रानुसार शिवमंदिरांचे रक्षण करणाऱ्या देवतांचा समूह असतो, त्याची रचना अशी असते, पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे रक्षण नंदी आणि महाकाल करत असतात, भृंगी आणि विनायक दक्षिणेकडील प्रवेशद्वाराचे रक्षण करतात, नंदी आणि स्कंद पश्चिम प्रवेशद्वाराचे रक्षण करतात आणि चंडी सहसा उत्तरेकडील प्रवेशद्वाराचे रक्षण करतात.
अंधकासुराचे शिल्पशास्त्र :-
अंधकासुराच्या शिल्पांमध्ये सहसा शिव त्याच्या त्रिशूळाने राक्षसाच्या शरीराला छेदलेले असते. या शिल्पांमध्ये देवी योगेश्वरी देखील दाखवली असते, ती अंधकासुराच्या शरीरातून टपकणारे रक्त गोळा करणारी वाटी धरून आहे. अंधकासुराच्या सर्व शिल्पपटांमध्ये शिवाचे अनेक हात दाखवले आहेत. यापैकी काहीं हातांमध्ये ते कपाल (कवटी) किंवा खाली वाहणारे रक्त गोळा करणारी वाटी घेऊन जातो. दुसऱ्या हातात तो डमरू (ढोल) आणि खडगा (खंजीर) घेऊन आहे. त्याचे दुसरे हात प्रभामंडलाप्रमाणे हत्तीची ताणलेली कातडी धरून आहेत. त्याचा उरलेला हात तर्जनी मुद्रेमध्ये आहे.
अंधकासुर वध शिल्पपट, लेणी क्र. २९,वेरुळ, महाराष्ट्र
सर्वात वरच्या शिल्पपटामध्ये, देवी योगेश्वरी कालीच्या रूपात कोरलेली आहे. वाडग्याशिवाय, ती हातात एक खंजीर घेऊन आहे. तिचे शरीर कृश आहे आणि डोक्यात जटा दाखवले आहेत. देवीच्या मस्तकाच्या वरती अर्ध मानव, अर्धा पक्षी रुप असलेली डाकिनी दाखवली आहे - , ती शिकारीची वाट पाहत आहे. देवी पार्वती योगेश्वरी देवीच्या उजवीकडे अर्धमत्स्येंद्रासनात बसलेली आहे, समोर घडणारा प्रसंग आश्चर्याने पाहत आहे. सप्तमातृका पद्मासनात बसल्या आहेत.
अंधकासुरवध शिल्प, गलगनाथ मंदिर, पट्टडकल
पट्टडकलमधील अंधकासुर शिल्पपट हि घटना दर्शविते, अंधकासुराला त्रिशूळाच्या एका टोकाला घुसवले आहे आणि नंतर त्याला खाली आणुन अखेरीस त्याला पायाखाली ठेवून भगवान शिवाने आशीर्वाद दिला.
अंधकासुर वध प्रसंगाच्या मागील तत्वचिंतन :-
अंधकासुर हे अज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात आणि शिव ज्ञानाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. हा प्रसंग अंधार/अज्ञानाचा राक्षस आणि ज्ञानाची शक्ती यांच्यातील लढ्याबद्दल आहे.
अंधकासुर वध – बेलूर – कर्नाटक
ज्ञान हे सामर्थ्यवान आहे तरीही माणसाला शुद्ध, परिपूर्ण ज्ञान तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तो गर्व, आसक्ती, लोभ, क्रोध, मत्सर, दोष शोधणे, दुराचरण आणि वासना या आठ वाईट दुर्गुणांचा नाश करतो. जसे प्रत्येक सप्तमातृका आणि देवी योगेश्वरींनी केले होते; अन्यथा ज्ञानामुळेही अज्ञान, खोटा अभिमान आणि अहंकार वाढतो.
अंधकासुरवध, कैलास मंदिर, वेरूळ
अंधकासुरवध शिल्पपट:-
अंधकासुराचा वधाचे शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी दिसते. परंतु त्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार दशावतार लेंणे (क्र.१५) मध्ये दिसतो. शिवाने अंधकासुराला म्हणजे अज्ञानाच्या राक्षसाला भाल्याच्या टोकावर घेतले आणि दूर अंतराळात भिरकावून दिले. ही क्रिया या शिल्पामध्ये अत्यंत आवेशपूर्ण दाखविली आहे. परंतु दैवीकरण करणे म्हणजे काय तर हेच कृत्य करायला माणसाला प्रचंड शक्ती वापरायला लागली असती. तर इथे मात्र शिवाने अत्यंत लीलया हे केल्याचे शिल्पकाराने कोरले आहे. त्या अचाट शक्तीला पाहून प्रभावित झालेली पार्वती शेजारी कोरलेली आहे. अंधकासुराच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन अंधकासुर जन्माला येणार म्हणून ते पडणारे थेंब गोळा करायला कपाल घेऊन काली शिवाला साहाय्य करीत आहे. कालीचा अजस्त्र आकार शिल्पामध्ये चपखलपणे
सामावलेला आहे. इथे कलाकाराला असे वाटले की, शिवाने भाला जर एवढ्या जोराने भोसकला असेल तर अंधकासुराच्या शरीरातून रक्ताबरोबर मांसाचेही तुकडे उडू शकतात, त्यांना हवेतल्या हवेत झेलण्यासाठी कलाकाराने एका उडणाऱ्या गरुडालाही शिवाच्या कपाल धरलेल्या हाताखाली कोरलेले आहे.शिल्पाचा विशाल आकार, त्यातील पात्रांची संरचना आणि यांचा आवेश हे सगळेच थक्क करणारे !
वेरूळच्या लेणी क्र. २९ मधील अंधकासुरवधाचे हे अतिशय प्रत्ययकारी शिल्प. पहा शिवाचे डोळे कसे भयानक क्रोधाने खोबणीतून पार बाहेर आलेले आहेत.
कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील अंधकासुरवधाचे अजून एक शिल्प
सारनाथ (वाराणसी) वस्तुसंग्रहालयात अंधकासुरवधाची एक विशाल प्रतिमा आहे. प्रत्यालीढासनात उभ्या (उजवा पाय पुढे व डावा मागे अशा स्थितीत उभे राहणे.) शिवाला दहा हात आहेत. त्याने खड्ग, खटवांग, धनुष्य, बाण, कपाल, डमरू, ढाल, घंटा ही आयुधे धारण केली आहेत. त्याने अंधकाला त्रिशुळाच्या टोकावर उचलून घेतले आहे. मुंबईतील घारापुरी लेण्यात अंधकासुरमर्दनाचे एक अतिशय उत्कृष्ट शिल्प आहे. येथे अष्टभुज शिव आलीढासनात उभा आहे. दोन्ही बाजूच्या एकेका हातांनी मिळून एक लांब त्रिशूळ पेलला आहे व त्याच्या फाळावर अंधकासुर दर्शविला आहे. याशिवाय इतर हातांमध्ये घंटा, कपाल, खड्ग, डमरू ही आयुधे दिसतात. शिवाचे मागचे दोन हात भग्न आहेत, त्यात गजचर्म धरले असावे असे वाटते. पायाखाली हत्तीचे डोके दिसते. ही प्रतिमा बरीच भग्न झाली आहे, तरीही शिवाच्या वेगवान हालचाली आणि चेहऱ्यावरील कृद्ध भाव पाहून त्याच्या संहारक रूपाचे प्रत्यंतर येते.
गजासुरवध :-
गजासुरवधमूर्ती किंवा गजहामूर्ती ही सर्वांत प्राचीन संहारप्रतिमा समजली जाते. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नामक दैत्याचा शिवाने कसा नाश केला त्याची कथा ‘कूर्मपुराणा’त येते. ‘वराहपुराणा’तील कथेनुसार असुरांचा राजा ‘अंधक’ हा पार्वतीवर मोहित झाला. त्याचवेळी त्याचा साहाय्यक नीलासुर याने हत्तीचे रूप घेऊन शिवाला मारण्याचे ठरवले. नंदीने हे वृत्त वीरभद्राला सांगितले तेव्हा त्याने तत्काळ नीलासुराचा वध केला आणि त्याचे कातडे शिवाला अर्पण केले. ते शंकराने उत्तरीय म्हणून पांघरले. यानंतर शिवाने अंधकासुराचाही वध केला.
कूर्मपुराणांत गजासुरवधाची कथा वाराणसी येथील कृत्तिवासेश्वर लिंगाच्या प्रसंगाने येते. या लिंगांचे पूजन व ध्यान करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देण्यांकरिता हत्तीचे रूप घेऊन एक असुर आला असतां शंकरानें लिंगातून प्रगट होऊन त्याचा संहार केला व त्याचे कातडे पांघरण्यांसाठी उपयोगांत घेतले. गजासुरवधाच्या कथेची काही इतरही रूपें वाड्मयांत सापडतात. श्री शिवराममूर्ति यांच्या कथनाप्रमाणें उत्तर भारतांत गजासुरसंहार व अंधकासुरसंहार याचे सम्मिश्रण केले जाते. बंगालमधें या बरोबरच भैरवालाही स्थान देतात.गजासुराच्या इतरही कथा आहेत. अंकुश घेतलेला, किंवा हत्तीवर बसलेला शिव आपण कुषाण काळांत पाहिला आहे. शिवाचे वाहन बैल व वृषचर्माचा शिवाकडून केला जाणारा उपयोगही मार्गे उल्लेखिला गेला आहे. प्रस्तुत प्रसंगात काही अंशी तसेच साम्य आढळतें.
दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणे शंकराने या
आसुरांचा नाश तंजावर जिल्ह्याच्या बळूवूल गावात केला. (जोशी: १९७९,
पृ.२००),
गजासुरवधमूर्ती, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडु, कर्नाटक.
गजासुरवधमूर्तीची वर्णने ‘अभिलषितार्थचिंतामणी’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘शिल्परत्न’ व इतर शैवागमात आढळतात. ‘अभिलषितार्थचिंतामणी’नुसार शिवाला दहा हात असावेत, तर ‘अंशुमद्भेदागम’ त्याला चार किंवा आठ हात असावेत असे सुचवते. चारच हात असल्यास मागच्या दोन हातात गजचर्म असून पुढच्या उजव्या हातात पाश आणि डाव्या हातात गजदंत असावा. आठ हात असल्यास उजवीकडील तीन हातांनी त्रिशूळ, डमरू व पाश धारण केलेले असावेत. आणि उरलेल्या एका उजव्या हाताने एका डाव्या हातासह मिळून गजचर्म धारण केलेले असावे. उर्वरित तीन डाव्या हातांत कपाल, गजदंत व विस्मयमुद्रा असावी. शिवाचा डावा पाय भक्कमपणे हत्तीच्या डोक्यावर ठेवलेला असावा आणि उजवा पाय थोडा वाकवलेला असावा. शिवाच्या मागल्या दोन हातांत धरलेले गजचर्म प्रभावळीसारखे दिसेल असे शिल्पांकित करावे. शिवप्रतिमा सर्व प्रकारच्या आभूषणांनी सजलेली असावी व रेशमी वस्त्रे तसेच व्याघ्रचर्म ल्यालेली असावी. त्याच्या उजवीकडे लहानग्या स्कंदासह उभ्या पार्वतीची प्रतिमाही असावी असे वर्णन आहे. विशेष म्हणजे बरीच लोकप्रिय असूनही अंधकासुरवधमूर्तीची वर्णने मात्र कोणत्याही ग्रंथात आढळत नाहीत.
साधारणतः गजासुरवधमूर्ती व अंधकासुरवधमूर्ती या एकत्र शिल्पांकित केलेल्या दिसतात. या मिश्र प्रतिमा इ. स. सातव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंतच्या काळातील आहेत. ‘वराहपुराणा’तील कथेप्रमाणे प्रथम शिवाने गजासुराचा वध केला आणि नंतर अंधकासुराचा; त्यानुसार त्या मिश्र मूर्तीत शिवाच्या वरच्या दोन हातांत गजचर्म दाखवलेले असते. गजासुरवधाच्या प्रतिमा फार लोकप्रिय आहेत. अनेक मध्ययुगीन मंदिरांवर त्या आढळतात. वेरूळच्या तसेच घारापुरी लेण्यांमध्ये अंधकासुरवधप्रतिमा दिसतात. कर्नाटकातील अमृतपुरा (जि. चिकमंगळुरू) येथील अमृतेश्वर मंदिरात एक गजासुरवधाची प्रतिमा आहे. होयसळ कालखंडातील या मंदिराच्या महानासिकेवर (दर्शनी भागावर) ही अतिशय अलंकारिक प्रतिमा कोरलेली आहे. शिवाला सोळा हात असून त्यांपैकी अनेक भग्न झाले आहेत; मात्र उर्वरित अवशेषांवरून पाश, दंत, त्रिशूळ, अक्षमाला आणि कपाल अशा आयुधांची कल्पना येते. मागच्या दोन हातांनी गजचर्म धरले आहे, त्याची जणू प्रभावळच शिवाच्या मस्तकामागे दिसते. या गजचर्मरूपी प्रभावळीच्या भोवती अष्टदिक्पालांच्या मूर्ती कोरल्या आहेत. शिवाच्या पायांखाली गजासुराचे डोके आहे. शिवाने जटामुकुट, रुंडमाळा व इतर आभूषणे धारण केली आहेत. त्याच्या उजवीकडे ब्रह्मा व डावीकडे विष्णू आहेत. लखनौ संग्रहालयात असलेली प्रतिमा अष्टभुज आहे. येथे शिवाच्या दोन हातात त्रिशूळ असून इतर हातांत खड्ग, डमरू, ढाल व सर्प धारण केलेले दिसतात, तर दोन हातांनी हत्तीचे पुढचे व मागचे पाय धरले आहेत. त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आहे.
गजासुरवध वेरुळ :-
कैलास मंदिरात हे शिल्प महायोगी शिवाच्या बरोबर समोरच्या बाजूला कोरलेले
आहे. भगवान शिवाचे एक आक्रमक रूप कोरलेले दिसून येते. नीलासुर हा राक्षस
मातला आणि देवलोकांना त्रस्त करून सोडले. तेव्हा सर्व देवलोक श्रीशंकराकडे
आले. शंकराने सर्व देवांकडे मागणी केली की या युद्धामध्ये तुम्ही सर्वांनी
आपापल्या परीने साहाय्य करावे. तेव्हा देवतांनी आपापल्या शक्ती त्याच्या
मदतीला पाठवून दिल्या. त्या शक्ती शिल्पांमध्ये शंकराच्या पायाशी बसलेल्या
मातृकांच्या रूपाने दिसतात. शिवाने डमरूचा भयंकर नाद करत गजासुरावर आक्रमण
केले. प्रथम त्याचा दात तोडला. शिल्पामधील शिवाच्या वळलेल्या मुठीतील दात
हे त्याच्या निग्रहाचे प्रतीक आहे. तर गजासुराचे चामडे सोलून ते सूर्याजवळ
धरले आणि जाळून टाकले. अशा त-हेने गजासुराला मारले. युद्ध पाहण्यासाठी
पार्वती पण आली होती. शिवाचे ते अक्राळविक्राळ रूप, आकाशपर्यंत पसरलेल जटा,
विस्फारलेले नेत्र, गळ्यात नररूडांची माळ आणि त्याचा युद्धोन्माद पाहून
पार्वती हळूच तेथून सटकण्याच्या तयारीत आहे. शिवाच्या हे लक्षात आल्यावर
त्याने त्याही स्थितीमध्ये तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. एका
हाताने तिची हनुवटी हळुवारपणे धरून तो जणू तिला सांगायचा प्रयत्न करतो आहे
की माझा हा आवेश गजासुरासाठी आहे. तुझ्यासाठी मात्र प्रिये, मी भोळासांबच
आहे. कथेतील हा भाग शिल्पकाराने या शिल्पात हुबेहूब साकारलेला आहे.
गजासुरवध, कैलास मंदिर, वेरूळ
गहासुरसंहारक मुर्ती, श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदीर
गजहा - शिवाची रौद्र आणि संहारक रूपातली मूर्ती. :-
ब्रम्हा विष्णू आणि महेश यापैकी महेश म्हणजेच शंकर ही विनाशाची देवता मानली जाते. शिव हा काही नुसतेच तत्परतेने जाऊन दैत्यांचा तावडीतून आपल्या भक्तांना सोडवतो असे नाही, तर तो मृत्यूची देवता 'यम' व प्रेमाची देवता 'मदन' यांना सुद्धा वेळप्रसंगी निष्प्रभ करतो व त्यांच्यावर विजय मिळवतो. तसेच आचरणात काही आगळीक केली म्हणून तो ब्रह्मदेवालाही धडा शिकवतो. तसेच त्रासदायक ठरू लागल्यावर तो नरसिंहालाही क्षमा करत नाही. त्यामुळेच शिव हा संहारक तर आहेच पण तो भयावह सुद्धा आहे.त्यांचे हे रूप गजरी (गज + अरि म्हणजे शत्रू), संहारी, गजासुरचामरधारी, गजंतक इत्यादी नावांनी ओळखले जाते. कामदेवाला मारल्याबद्दल कामारी/कामांकारी, काळाला मारल्याबद्दल कालारी/कालांतकारी आणि गजासुर मारल्याबद्दल गजारी/ गजासुरसंहारी.
गजहा :-
सर्वांत प्राचीन संहारक मूर्ती ही गजहामूर्ती असून ती इसवीच्या ६व्या शतकातील आहे. कूर्मपुराणामध्ये विस्ताराने सांगितली आहे. लिंगपूजा व तपश्चर्या करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नावाच्या दैत्याचा शिवाने कसा नाश केला. याची ही कथा आहे. असे सांगितले जाते की ही घटना वाराणसी येथे घडली. होती. शिवाने या हत्तीरूपी दानवाचा वध केला आणि त्याचे चामडे स्वतः पांघरले व वाराणसी इथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना या दैत्याच्या त्रासातून मुक्त केले. याच घटनेचे दुसरे पण काहीसे निराळे वर्णन हे वराहपुराणामध्ये येते. ते असे की, असुरांचा राजा अंधक हा पार्वतीच्या रूपावर मोहित झाला. त्याचवेळी त्याचा सहाय्यक नीलासुर हा हत्तीचे रूप घेऊन शिवाला मारण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. ज्या वेळी नंदीला या नीलासुराच्या पापी कृत्याचे वृत्त समजते तेव्हा तो हे सर्व वीरभद्राला जाऊन सांगतो. त्याबरोबर तत्काळ वीरभद्र तिथे येऊन हत्तीच्या रूपातील नीलासुराचा वध करतो व त्याचे कातडे शिवाला अर्पण करतो. शेवटी शिवाच्या हातून अंधकासुराचाही वध होतो.
हळेबीडू कर्नाटक येथील गजहा मूर्ती.
कर्नाटकातल्या हासन जिल्ह्यात हळेबीडू येथे होयसळेश्वर मंदिर आहे. त्यात आतमध्ये शिव लिंग आहे आणि शिवाचे पूजन केले जाते. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर गजहा मूर्तींचे दर्शन घडते.
पहिल्या मूर्तिच्या चेहर्यावरील भाव
हळेबिडूच्या मंदिरातच या गजासुरसंहारी शिवाच्या दोन कोरीव मूर्ती आहेत
पहिल्या शिल्पामध्ये हत्तीचा चामर, शिवाच्या हातांची मांडणी, तांडव मुद्रा, शरीराची त्रिभंग अवस्था,चारही बाजुला दाखवलेले हत्तीचे पाय; उपलब्ध जागांमध्ये या घटनेचे संपुर्ण वर्णन आणि शिवाची शस्त्रे आणि लयबद्ध हालचाली दाखवली आहे. या प्रसंगातील धडपडणारा गजासुर आणि नरसंहारानंतर तांडव करणारा शिव, यांचे अतिशय सुंदर आणि पूर्ण रूपात शिल्प कोरले आहे. पहिल्या मुर्तीच्या चेहऱ्यावरील उग्रता, त्याच्या दातांमध्ये आणि डोळ्यांमध्ये दिसून येते.
येथे शिवाला आठ हातांचा दाखवलेला आहे. त्यापैकी वरचे दोन हात हत्तीचे चामडे डोक्यावर उचलून धरताना दिसतात. शिवाभोवती गजचर्माची प्रभावळ दिसते. चारही टोकांना हातीचे चार पाय दिसतात. शंकराचा उजवा पाय हत्तीच्या डोक्यावर दिसतो. सर्वात वरच्या भागात हत्तीचे शेपूट दिसते. हत्तीच्या गंडस्थळावर, मानेवर सोंडेवर आणि पायात उत्तम अलंकार दिसतात.
शिवाची मूर्ती त्रिभंग मुद्रेत दाखवलेली आहे.त्रिभंग मुद्रा म्हणजे पाय धड आणि चेहरा हे तिन्ही एका रेषेत न दाखवता तिघांनाही वेगवेगळ्या अक्षांमध्ये दाखवलं जातं. भरतनाट्यम नृत्य प्रकारात अशा मुद्रा आवर्जून बघायला मिळतात. सदर हत्ती रुपी दैत्याचा विनाश केल्याने शिव अत्यानंदाने नृत्य करताना दिसत आहे.
पहिल्या मुर्तीचे हातात कोरलेले बारकावे
समोरील दोन हात नृत्य करताना आवश्यक असणारा तोल सांभाळताना दिसत आहे. तर उरलेल्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू दिसतात. एका हातातलं आयुध अस्पष्ट आहे तर उरलेल्या हातात मानवी मुंडकं शिवाने धारण केलेले दिसते.
पहिले शिल्प जर सूक्ष्मपणे पाहिले तर पहिले त्याचे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. शिवाच्या वरच्या डाव्या हाताकडे नीट नजर टाकली तर बोटांच्या आणि नाकाच्या बारीक आणि नेमक्या कलाकुसरीमध्ये कलाकाराच्या हाताची जादू दिसून येते. त्यात अंगठीच्या खिळ्याने गजासुराची त्वचा फाडली आहे. म्हणजेच शिवाने गजासुराला फाडून मारून त्याचे कातडे दान केले आहे, हे अतिशय कलात्मक आणि स्पष्टपणे दाखविण्यात यश आले आहे. शिवाच्या हातात भुजंग-वलय (सापाचे कंकण) देखील परिधान केले ले दाखवले आहे. भुजंग कंकणामध्ये, जिथे सापाची शेपटी शरीराला पुन्हा स्पर्श करते, तिथे त्याचा फणा दाखवणे आवश्यक आहे. पहिल्या मूर्तीच्या कलाकारीत मुकुट, डमरू, त्रिशूळ, मस्तक, नंदी आणि दागिन्यांमधील खुप सुक्ष्म तपशील दाखवले आहेत.
शिल्पातलं शंकराचं मुख त्रिनेत्र आणि अलंकार
मुर्तीच्या मागच्या बाजुला असलेले कातडे, शेपटी आणि पाय
मुर्तीच्या पायातील तोडे आणि इतर अलंकार
शिवाने उत्कृष्ट अलंकार धारण केलेले दिसतत. कवट्या असलेला मुकुट, हातातल्या अंगठ्या, बाजूबंध, डाव्या दंडावर किर्तीमुख, कंबरपट्टा, पायातले तोडे निरखून पाहावेत असे आहेत. संहारक मूर्ती असल्यामुळे शंकराचा तिसरा डोळा ही दाखवलेला आहे. त्याच सोबत दोन सुळे तोंडातून बाहेर येताना दाखवले आहेत. शिवाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच गळ्यातला सर्प आणि त्यांचं वाहन नंदी हे सुद्धा शिल्पामध्ये कोरलेले दिसतात .पहिल्या मुर्ती कोरायला शिल्पकाराला अधिक मेहनत घ्यावी लागली असेल.
गजसमहारी शिव-२, हळेबिडू, कर्नाटक :-
या दुसर्या शिल्पात शिवाचे पाय वाकलेले आहेत, मात्र शरीर स्थिर आहे आणि हात अशा स्थितीत दाखवले आहेत कि त्यातून हालचाल दिसत नाही. त्यामुळे मुर्ती तांडव स्वरूपाची वाटत नाही. दुसऱ्या मूर्तीमध्ये चेहर्यावरील उग्रता जाणवत नाही.
शिवाच्या शिल्पकलेचे नियम - शिवाची मूर्तीशास्त्र
शिवाला अनेक हात आहेत असे सहसा दाखवले जात नाही. पण त्याच्या संहारमूर्तीच्या रूपात, जे त्याचे रौद्र रूप आहे, त्रिपुरारी, यमारी/कलांतकारी, गजसंहारी यांसारख्या प्रकारात त्याचा बहुभुज स्वरूपात समावेश अनेक शस्त्रे बाळगतो.
शिवाच्या या गजरी स्वरूपाच्या मूर्तीची कोरताना काय करता येईल याचे नियम शैव आगमांमध्ये लिहिलेले आहेत. यानुसार गजाची शेपटी शिवाच्या डोक्याच्या मागे असावी, शिवाचा डावा पाय गजाच्या डोक्यावर असावा आणि उजवा पाय उत्कुटिकासनाच्या स्वरूपात वर करून वाढवावा, जेणेकरून नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवता येईल. शिव चतुर्भुज किंवा अष्टभुज किंवा दशभुज स्वरूपात आहे. गज चमर हे शिवाच्या प्रभावाचे क्षेत्र म्हणून तयार केले गेले. अर्थात काही शिल्पकारांनी त्यात स्वतःच्या कल्पना आणल्या आहेत.अशाच प्रकारच्या गजहा मूर्ती भारतभर आढळतात. काही ठिकाणी हात कमी जास्त आहेत आणि आयुधांमध्ये फरक दिसून येतो.
शिवाचे हे रूप उत्तर भारतात दुर्मिळ उदाहरण आहे. बुरा चोला आणि नागालँड या राज्यांमध्ये ते खूप प्रचलित होते. तर, तामिळनाडूच्या वाझुवूर गावातील वृत्तांतेश्वर मंदिराची प्रमुख देवता गजसंहारी शिव हि आहेत.
ब्रम्हशिरस्छेद मुर्ती :-
भारतीय वेदपुराणात अनेक प्रकारच्या देव-देवतांचे उल्लेख असून प्रत्येक देवतेकडे एका विशिष्ट बाबींच्या पालकत्वाची जबाबदारी असते. पुराणानुसार ब्रह्मा, विष्णू व महेश या प्रमुख देवता आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मा सृष्टीचे रचेता, विष्णू पालनकर्ता, तर महादेवाकडे वाईटाच्या विनाशाची जबाबदारी आहे. या तीनही देवता आपापले कार्य सक्षमपणे पार पाडत असल्यामुळे सृष्टीचा कारभार सुरळीतपणे चालू असतो.
सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेवाला पाच शीर असल्याचा उल्लेख शिवपुराण व वामनपुराणात आहे. नंतर मात्र ब्रह्मदेवाला चारच शीर असल्याचे दर्शविले जाते. या पाचव्या शिराचे पुढे काय झाले याबद्दलची आख्यायिका शिवपुराण आणि वामनपुराण व पद्मपुराणात सांगितली आहे.
शिवपुराणानुसार भगवान विष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांनी खाली येऊन विष्णूला मी आल्यावरही आपण का उठला नाहीत, असे विचारले. त्यावर विष्णू म्हणाले सर्वसृष्टी माझ्यात आहे आपण माझ्या नाभीतूनच उत्पन्न झाल्याने माझे पूत्र आहात, त्यामुळे माझ्या उठण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून या दोघांचा वाद होऊन वाद विकोपाला गेला व दोघात घनघोर युद्ध सुरू झाले. अखेर महादेव एका तेजाचे रूपात दोघांमध्ये आले व एका मोठ्या लिंगाचे रूपात बदलले व दोघांनाही लिंगाचा अंत शोधण्यास सांगितले. तेव्हा विष्णू व ब्रह्मदेव आपापल्या वाहनावर बसून विष्णू पातळाकडे तर ब्रह्मदेव वरच्या दिशेने शोधासाठी निघाले; परंतु लिंगाच्या अंताचा शोध लागला नाही. विष्णुनी परत येऊन आपल्याला शोध लागला नाही हे मान्य केले. मात्र वरच्या बाजूला गेलेल्या ब्रह्मदेवाला वर केतकीचे झाड दिसले. त्यांनी तेथूनच परत येऊन मला टोक दिसले, वाटल्यास केतकीच्या झाडाला विचारा असे म्हणाले. तेव्हा महादेवाला ह्याचा राग आला. त्यांनी तिसऱ्या नेत्रातून भैरवाला उत्पन्न केले व भैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शीर कापून टाकले. केतकीच्या खोटेपणामुळे तिचा त्याग केला. तेव्हापासून पांढरे असूनही शंकराला केतकीचे फूल वाहत नाही. चुकूनही कोणी वाहल्यास त्याला अडचणीचा सामना करावा लागतो.
वामन पुराणानुसार महादेव आणि ब्रह्मदेवाचा एकदा श्रेष्ठत्वासाठी वाद झाला, वादाचे रूपांतर लढाईत झाले. या लढाईत शिवाचा पराभव झाला. त्यामुळे ब्रह्माच पाचवे मस्तक हसले व त्याने शिवाची टिंगल केली. याचा राग येऊन महादेवाने ब्रह्मदेवाचे हे पाचवे मस्तक कापले. तेव्हा ब्रह्मदेवाने एक शक्तिमान असुर निर्माण करून शिवाला मारण्यासाठी पाठविला. शिवाने विष्णूच्या मदतीने एक योद्धा निर्माण केला. दोघांचेही घनघोर युद्ध झाले. युग संपूनही युद्धाचा शेवट झाला नाही. तेव्हा विष्णूने ब्रह्मा व शिवाला थांबवून आता पुढील युगात पुन्हा लढा म्हणून सांगितले. पुढे ब्रह्माने निर्माण केलेला असूर कर्ण म्हणून व शिव आणी विष्णूचा योद्धा अर्जुन म्हणून जन्माला आले.
या शिल्पात भगवान शिवांचा तिसरा डोळा दाखवला असतो. तसेच चार हात, डोक्यावर जटामुकुट धारण केलेला असतो. तसेच डाव्या कानात मकरकुंडल, आणि उजव्या कानात पत्रककुंडल धारण केले असते.एका डाव्या हातात त्रिशुल, दुसर्या डाव्या हातात ब्रम्हदेवाचे शिर, तर एका उजव्या हातात वज्र आणि दुसर्या हातात परशु धारण केलेला आहे.
कामांतक शिव :
प्रेमाची देवता, काम/मदन याचा अंत शिवाच्या हातून कसा झाला याची कथा ‘लिंगपुराणा’त येते. तारकासुर हा उन्मत्त होऊन देवांना त्रास देऊ लागला. त्याचा वध केवळ शिवपुत्र कार्तिकेयाच्या हातूनच होऊ शकणार होता. यावेळी शिवाची प्रथमपत्नी सती हिच्या अग्निप्रवेशामुळे शिव विरक्त होऊन हिमालयात तपश्चर्या करत होता. मात्र हिमवानाची मुलगी पार्वती शिवप्राप्तीसाठी तप करत होती. त्यामुळे सर्व देवांनी एकत्र येऊन शिवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाची नियुक्ती केली. कामाने आपले पुष्पांकित धनुष्य सज्ज केले आणि मदनबाण शिवाच्या दिशेने सोडला. साधना भंग झाल्यामुळे शिव आत्यंतिक क्रोधायमान झाला आणि त्याने आपला तृतीय नेत्र उघडून तत्काळ कामदेवाला भस्मसात केले. जिथे मदनाचे भस्म झालेले शरीर पृय्वीवर ज्या ठिकाणी पडले त्या प्रदेशाला 'अंग देश' असे नाव पडले. याच अंग देशाचा राजा म्हणून दुर्योधनाने कर्णाची नियुक्ती केली. पण त्याचवेळी त्याचे लक्ष पार्वतीकडे गेले आणि मदनबाणाच्या प्रभावामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होऊन त्याची परिणती विवाहात झाली. कालांतराने त्यांना कार्तिकेय हा पुत्र झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला. इकडे कामपत्नी रतीच्या विनंतीवरून शिवाने त्याला पुनः जिवंत केले. जरी शिवशंकरांनी मदनाला जिंवत केले तरी त्याचे शरीर नष्ट झाले आणि फक्त मुख शिल्लक राहीले, म्हणून त्याला 'अनंग' असे नाव पडले.
‘उत्तरकामिकागम’, ‘सुप्रभेदागम’, ‘पूर्वकारणागम’ या ग्रंथांत दिलेल्या वर्णनाप्रमाणे शिव हा योगदक्षिणामूर्तीमध्ये असावा, काम अथवा मदन हा त्याच्यासमोर कोसळलेला असून त्याची उंची शिवाच्या उंचीच्या एक सप्तमांश किंवा एक दशांश एवढीच असली पाहिजे. त्याचा वर्ण सोनेरी पिवळसर आणि आभूषणे सोनेरी असावीत, त्याच्या उजव्या हातात उसाचे धनुष्य आणि फुलांनी शृंगारलेले पाच बाण असावेत, किंवा एक बाण असावा. ‘पूर्वकारणागमा’तील माहितीनुसार शिवाला तीन नेत्र, चार हात असावेत. मागील दोन हातात सर्प व अक्षमाला तर पुढच्या उजव्या हातात पताका/पताकामुद्रा आणि डावा हात सूची मुद्रेत असावा. मदनाची उंची शिवाच्या निम्मी असावी. तो पीठावर किंवा रथावर उभा असून त्याच्या ध्वजावर माशाचे चिन्ह असावे.
वेरूळ येथील कैलास लेण्यात दर्शनी भिंतीसमोर आणि मागे अशा दोन ठिकाणी कामांतक शिवप्रतिमा दिसतात, मात्र त्या अतिशय झिजून गेल्या आहेत. गंगैकोंडचोलपुरम् (तमिळनाडू) येथील बृहदीश्वर मंदिरात एक सुस्थितीतील प्रतिमा आढळते. ही मूर्ती चोल शिल्पकलेच्या पद्धतीनुसार तीन खणांमध्ये शिल्पांकित केली आहे. मधल्या खणात शिव ललितक्षेप मुद्रेत बसला आहे, कारण मदनामुळे त्याचा ध्यानभंग झाला आहे. डाव्या खणात मदन व रती दिसत आहेत, उजवीकडे पार्वती सेविकेसह दाखवली आहे. अशीच एक सुंदर प्रतिमा कंबोडिया येथील बांटीस्राय मंदिरात आहे.
शरभेष :
शैव आणि वैष्णव पंथांतील वैर आणि शैव अनुयायांनी आपल्या पंथाला सर्वश्रेष्ठ ठरविण्याचा केलेला प्रयत्न शरभेष मूर्तीतून दिसतो. त्याची कथा पुढीलप्रमाणे आहे : विष्णूने नरसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला; मात्र त्याचा राग शांत न होता वाढतच गेला व सर्वांना त्याचा त्रास होऊ लागला. तेव्हा उन्मत्त विष्णूला ताळ्यावर आणण्यासाठी शिवाने एक विलक्षण रूप धारण केले. तोच हा शरभ. त्याला दोन डोकी, आठ पाय, सिंहासारखे तीक्ष्ण नख्या असलेले पंजे, लांब शेपूट व दोन शुभ्र पंखही होते. भीतीदायक गर्जना करत हा शरभ नरसिंहाला सामोरा गेला, त्याने नरसिंहावर प्रभुत्व मिळवले व त्याची चिरफाड करून त्याला ठार मारले. नंतर नरसिंहाच्या डोक्याने आपला जटामुकुट सुशोभित केला व त्याचे कातडे पांघरले. विष्णू भानावर आला आणि शिवाची स्तुती करत आपल्या निजधामी परतला.
‘कामिकागमा’त शरभेष मूर्तीचे वर्णन असे आहे की, शरभेषाच्या शरीरावर पक्षाप्रमाणे सोनेरी झळाळी असावी. त्याचे डोळे लाल व दोन पसरलेले पंख असावेत. सिंहासारख्या आठ पायांपैकी चार जमिनीवर ठेवलेले असून बाकीचे चार वर उचललेले असावेत. शरीराचा वरचा भाग मानवी असावा. तोंड सिंहाचे असून दोन्ही बाजूंनी सुळे बाहेर आलेले दिसावेत. डोक्यावर किरीटमुकुट असावा आणि त्याने आपल्या दोन पायांत नरसिंहाला घट्ट धरलेले असावे. ‘उत्तरकामिकागम’ ग्रंथानुसार शिवाला सूर्य, चंद्र आणि अग्नी असे तीन नेत्र असावेत. त्याची जीभ म्हणजे वडवानल असते. त्याचे दोन पंख म्हणजे काली व दुर्गा असतात, तर त्याच्या नख्या म्हणजे इंद्र, उदर म्हणजे काळाग्नी, मांड्या म्हणजे काळ आणि त्याची ताकद म्हणजे महावायू होत. ‘श्रीतत्त्वनिधी’ तर शरभेषाला ३२ हात आहेत असे सुचवते. त्याने वज्र, मुष्टी, चक्र, शक्ती, दंड, अंकुश, खड्ग, खट्वांग, परशू, अक्षमाला, हाड, धनुष्य, मुसळ, अग्नी आणि अभयमुद्रा हे उजव्या हातात; तर पाश, गदा, बाण, ध्वज, वेगळे खड्ग, साप, पद्म, कपाल, पुस्तक, हल, मुदगल, वरदमुद्रा हे डाव्या हातात धारण केलेले असून एका हाताने दुर्गेला आलिंगन दिलेले असते.
शरभेष मुर्ती, श्री एरावतेश्वर मंदीर, दारासुरम
शरभेष प्रतिमा दुर्मीळ आहेत. भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. गोपीनाथ राव (१८७२-१९१९) यांनी तमिळनाडूतील त्रिभुवनम् (जि. तंजावर) येथील मंदिरात असलेल्या एका कांस्यमूर्तीचा उल्लेख केला आहे. येथे शरभाला आठऐवजी तीनच पाय व चार मानवी हात आहेत. शरीर व तोंड सिंहाचे आहे. शेपूट आहे. मागील दोन हातांत परशू व मृग, तर पुढील दोन हातात पाश आणि अग्नी. त्याने नरसिंहाला पुढील पायांमध्ये घट्ट आवळले आहे. नरसिंह आपल्या आठही पायांनी सुटण्याची धडपड करतो आहे, असे हे शिल्प आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांवर व काही उत्तर मध्ययुगीन मंदिरांवर चार पाय व तीक्ष्ण नख्या, सिंहासारखे विक्राळ तोंड, दोन पंख व लांब शेपटी असे प्राणिशिल्प पाहावयास मिळते, तो शरभ होय. या शरभाने आपल्या पंजात किंवा पायाखाली एक वा अनेक हत्तींना धरून ठेवलेले दिसते.
जालंधरवधमूर्ती :
‘शिवपुराण’ जालंधर या असुराची कथा विस्तृतपणे सांगते. त्रिपुरनाशनाच्या वेळी शिवाच्या कपाळातून उत्पन्न होणारी आग आणि सिंधु नदी यांच्या संगमातून जालंधराचा जन्म झाला. लवकरच तो एक शक्तिशाली राजा बनला. देवांवर स्वारी करून त्याने विष्णूंचाही पराभव केला. तेव्हा देवांनी शिवाची प्रार्थना केली. नारदांनी जालंधराला भेटून त्याच्यासमोर पार्वतीच्या सौंदर्याचे गुणगान केले, त्यामुळे त्याच्या मनात पार्वतीविषयी अभिलाषा निर्माण झाली. त्यातून त्याचे व शिवाचे युद्ध उद्भवले आणि शेवटी शिवाच्या हातून त्याचा वध झाला.
जालंधरवध मुर्ती, श्रीकांतेश्वर स्वामी म्म्दीर, नान्जनगुडी
या प्रकारच्या मूर्तीत शिव द्विभुज, रक्तवर्णी दाखवावा, त्याने छत्र व कमंडलू धारण केलेले असावेत, पायात खडावा आणि जटांमध्ये गंगा व चंद्रकोर असावी. जालंधरही द्विभुज असून अंजलीमुद्रेत असावा, त्याची तलवार मनगटाखाली ठेवलेली असावी आणि त्याच्या हातावर सुदर्शन चक्र असावे असे सांगितले आहे. मात्र अशा प्रकारच्या मूर्तीची अद्याप नोंद नाही.
वीरभद्र :
एका कथेनुसार एकदा यज्ञस्थळी सर्व देव आणि ऋषीमुनी जमले होते. दक्ष प्रजापती तेथे पोहोचला, त्याने ब्रह्मदेवाला वंदन केले व त्याच्याच आज्ञेने तो स्थानापन्न झाला. यावेळी शिव वगळता सर्वांशी त्याचे वागणे आदराचे होते. शिवाची मात्र तो यथेच्छ निंदानालस्ती करू लागला. शिवाचे स्मशानात राहणे, त्याचे जटा, नाग, व्याघ्रचर्म धारण करणे, नंदी-भृंगी आदी अनुयायी यांवर त्याने तोंडसुख घेतले आणि यज्ञासारख्या पवित्र ठिकाणी शिवाला स्थान मिळू नये अशीही मागणी केली, तेव्हा महादेव तेथून निघून गेला. काही काळाने दक्षाने स्वतःच एक यज्ञ आरंभला, त्यास शिव वगळता सर्व देवांना आमंत्रण होते. सर्व देव आपापल्या पत्नींसह तिकडे निघालेले पाहून शिवपत्नी सतीनेही यज्ञाला जाण्याचा आग्रह धरला. महादेवाने तिला पूर्वीच्या अपमानाची आठवण करून दिली आणि तिथे न जाण्याचा सल्ला दिला. पण प्रत्यक्ष पित्याच्याच घरी यज्ञ असल्याने सती हट्टाने गेली आणि यज्ञस्थळी दक्षाने तिचा व शिवाचा पाणउतारा केला. विलक्षण अपमानित व संतप्त झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात आत्मार्पण केले. हे वृत्त समजताच शिवाच्या क्रोधाला पारावार उरला नाही. त्याने आपली एक जटा तोडून तिच्यातून वीरभद्र नावाची एक भयंकर आकृती निर्माण केली आणि त्याच्याकरवी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करवला. नंतर वीरभद्राने दक्षाचाही शिरच्छेद केला. त्याच्या संहारामुळे दक्षाचे गर्वहरण झाले व तो शिवास शरण आला, तेव्हा शिवाने बकऱ्याचे डोके त्याच्या धडावर बसवले व त्याला जीवनदान दिले. ‘महाभारत’ व ‘भागवता’त आलेल्या या कथेमुळे शिव हा मूलतः वेद व यज्ञसंस्थाबाह्य होता हे कळून येते. शिवाय वीरशैव संप्रदाय हाही वैदिक संस्था आणि वर्णव्यवस्था न मानणारा असावा हे स्पष्ट होते. त्यामुळेच त्यांना वीरभद्र अतिशय पूज्य आहे. वीरभद्राच्या मूर्तींची वर्णने इतर शैवप्रतिमांसोबत येतात, तसेच सप्तमातृकांसोबतही येतात. ‘अग्निपुराण’, ‘मत्स्यपुराण’, ‘श्रीतत्त्वनिधी’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘कारणागम’, ‘अभिलषितार्थचिंतामणि’, ‘चतुर्वर्गचिंतामणि’, ‘शिल्परत्न’ अशा नऊ ग्रंथांमध्ये वीरभद्राची ११ प्रकारची मूर्तीवर्णने आहेत. ‘श्रीतत्त्वनिधी’मध्ये दिलेल्या वर्णनानुसार तो त्रिनेत्र व चतुर्भुज असावा, त्याने आपल्या हातात खड्ग, बाण, धनुष्य व गदा धारण केलेले असावेत, त्याचे स्वरूप रौद्र असून भयंकर दाढा व गळ्यात रुंडमाळा असाव्यात. त्याच्या डावीकडे भद्रकाली तर उजवीकडे बकऱ्याचे डोके असलेला दक्ष अंजलीमुद्रेत असावा. ‘अंशुमद्भेदागमा’त वीरभद्र नंदीसमवेत असावा असे सांगितले आहे. तो त्रिनेत्र व चतुर्भुज असून त्याने शूल, गदा धारण केलेले असावेत, एक हात अभयमुद्रेत तर दुसरा वरदमुद्रेत असावा. ‘चतुर्वर्गचिंतामणि’मध्येही सोबत नंदी असावा, चार हात त्रिशूळ, वीणा धारण करणारे व कट्यावलंबित असे असावेत असे सांगितले आहे. ‘शिल्परत्ना’त वेगवेगळी वर्णने आहेत: एका वर्णनानुसार वीरभद्र गौरवर्ण असून वेताळावर बसलेला असावा, तो उग्र, पिंगट वर्णाचा, व्याघ्राजिन, चंद्रकोर व सर्प ल्यालेला, हातात खड्ग, शूल, परशू, डमरू, खेटक, कपाल असून एक हात अभयमुद्रेत तर दुसरा वरदमुद्रेत असावा (हातांची संख्या नीट कळत नाही.). सभोवती गण असावेत. दुसऱ्या वर्णनाप्रमाणे वीरभद्र गौरवर्णाचा, पांढऱ्या कमळावर बसलेला, दिगंबर व लहान बालकासारखा असावा. तर तिसरे वर्णन सांगते त्याप्रमाणे तो नंदीवर बसलेला, वरद व अभयमुद्रेत तर मृग व टंक धारण केलेला गौरवर्णीय असावा. त्याने नागाचे यज्ञोपवीत धारण केलेले असावे.
पंचमुख वीरभद्र मुर्ती, कुरुगोडू
दक्षिण भारतात वीरभद्राचे मोठ्या प्रमाणावर पूजन केले जाते, साहजिकच त्याच्या मूर्ती जास्त सापडतात. चेन्नईच्या शासकीय वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे मद्रास वस्तुसंग्रहालय) एक कांस्यप्रतिमा आहे. गोलाकार पीठावर त्रिभंगावस्थेत उभी असलेली ही प्रतिमा बहुधा अष्टभुज असावी, मात्र पुढील दोन हात भग्न झाले आहेत. इतर हातांतील आयुधेही नीट समजत नाहीत. पायात पादुका आणि कपाळावर उभा त्रिनेत्र आहे. वटारलेले डोळे आणि ओठांबाहेर डोकावणारे सुळे त्याचे संहारक रूप स्पष्ट करतात. तेनकाशी (तमिळनाडू) येथील शिवमंदिरात एका खांबावर वीरभद्राची १५ व्या शतकातील एक प्रतिमा आहे. ही मूर्ती दहा हातांची असून उजवीकडच्या तीन हातांत बाण, परशू व खड्ग धारण केले आहेत; उर्वरित दोन हातांपैकी एक भात्यातून बाण काढत आहे तर एका हातात लांब तलवार (आता काहीशी भग्न झालेली) असून ती दक्षाच्या मानेत घुसविली आहे. डाव्या हातांमध्ये धनुष्य, मुसळ, पाश, एक गोल ढाल व एक आयताकृती ढाल अशी आयुधे आहेत. डोक्यावर जटामुकुट असून त्यातून ज्वाळा निघत आहेत. हा वीरभद्र जमिनीवर पडलेल्या दक्षाच्या शरीरावर उभा आहे. हैदराबाद येथील सालारजंग वस्तुसंग्रहालयात वीरभद्राची एक प्रतिमा आहे. तिने पायात पादुका घातलेल्या असून त्याखाली तीन डोकी दाखविली आहेत. त्याच्या डोक्यावर पाच शिवलिंगे असून सूर्य व चंद्रदेखील आहेत. जवळच बकऱ्याचे डोके असलेला दक्षही आहे. जेव्हा वीरभद्र सप्तमातृकामसमवेत शिल्पांकित केलेला असतो तेव्हा तो त्यांच्यासह बसलेला दाखवतात, त्याचे स्वरूप सौम्य असते. वेरूळ येथील लेण्यात अशा काही प्रतिमा आहेत.
या मूर्तीतील आयुध हे ढाल तलवार त्रिशूळ दिसत आहेत मूर्तीस मिषा आहेत एकूणच हे वीरभद्र आहे भैरवनाथ असते तर त्यांचे वाहन कुत्रा शेजारी दिसला असता, वीरभद्र यांचे मुर्ती आहे..
मल्लारी :
मल्लारी किंवा मल्हारी अर्थात खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाडके दैवत आहे. खंडोबा हे मराठी समाजाच्या सर्वच स्तरांतील असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. शिवाने खंडोबा या रूपाने मणि आणि मल्ल या दोन राक्षसांचा सहा दिवस चाललेल्या घनघोर युद्धात पराभव केला आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्या त्रासापासून वाचविले. मल्लारीची महाराष्ट्र व कर्नाटकात मिळून अकरा स्थाने प्रसिद्ध आहेत, मात्र कडे-कऱ्हेपठार जेजुरी (जि. पुणे) हे खंडोबाचे आद्य स्थान समजले जाते. तो द्विभुज असून खड्ग आणि डमरू धारण करतो व पांढऱ्या घोड्यावर स्वार होतो. त्याच्यासह घोड्यावर त्याच्या दोन पत्नी म्हाळसा व बाणाई यादेखील असतात. सोबत त्याचे कुत्रे असतात.
‘मल्लारी माहात्म्य’ या ग्रंथात शिवाच्या या रूपाचे प्रतिमावर्णन आहे. शिव हा सोनेरी वर्णाचा, द्विभुज असावा, हातात डमरू व खड्ग असावे. जटांमध्ये चंद्रकोर व अंगावर आभूषणे असावीत तसेच सापाचे वस्त्र असावे. तो पांढऱ्या घोड्यावर स्वार असून सोबत सात कुत्री असावीत, असे सांगितले आहे. मल्हारीच्या ज्या मूर्ती उपलब्ध आहेत त्या उत्तर मध्ययुगीन आहेत. बहुतांशी पंचधातूच्या प्रतिमा आढळतात. त्यांत तो एकटा किंवा दोन पत्नींसह घोड्यावर बसलेला आढळतो. पाषाणप्रतिमा असतील तर तो बसलेला असून द्विभुज किंवा चतुर्भुज असतो. दोन हात असल्यास त्यांत डमरू व त्रिशूळ असतो तर चार हातांची प्रतिमा असल्यास डमरू, त्रिशूळ, खड्ग व खेटक धारण केलेले असते. जेजुरी येथील मुख्य मंदिरात खंडोबा व म्हाळसा यांच्या उभ्या मूर्तींच्या तीन जोड्या आहेत; मात्र त्यांची घडण एकसारखीच आहे. खंडोबाच्या हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरू, परळ या वस्तू आहेत, तर म्हाळसेच्या उजव्या हातात अनुक्रमे उत्पल, कमलकलिका अशा वस्तू आहेत. डावे हात गजहस्त मुद्रेत आहेत. खंडोबाच्या कानात मकरकुंडले आहेत, तर म्हाळसेनेही आभूषणे घातली आहेत. साधारणतः अशाच प्रकारच्या मूर्ती पाली (जि. सातारा), अणदूर (जि. उस्मानाबाद), मंगसुळी (जि. बेळगावी, कर्नाटक), मैलार (जि. बीदर, कर्नाटक) इ. ठिकाणी पाहायला मिळतात.
भैरव :
ब्रह्मा,विष्णू आणि महेश या तिन्ही दैवतांपैकी (त्रिदेव) शिव/शंकर हे दैवत जरा उग्र,बलशाली आणि संहारक आहे पण त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे आणि तितकेच संयमी ही आहेत.ते लवकर प्रसन्न होतात.काळभैरवांच्या उत्पत्तीमागची कथा पुढीलप्रमाणे.....
एकदा भगवान श्रीविष्णू आणि श्रीब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठत्वावरुन वाद झाला.सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मदेव श्रेष्ठ? कि पालन करणारे श्रीविष्णू श्रेष्ठ? हा वाद घेऊन दोघे वेदांकडे गेले.वेदांनी न्यायनिवाडा करताना सांगितले की तुमच्या दोघांपेक्षाही सृष्टीचे संहार करणारे श्रीशिवशंकर शंभू महादेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत.कारण ते संहार करतात, अशुभाचा-पापांचा-वाईट गोष्टींचा नाश करतात व नाशातूनच,संहारातूनच नवनिर्मिती आणि सृजन होते त्यामुळे तेच श्रेष्ठ आहेत.वेदांचा हा न्यायनिवाडा भगवान श्रीविष्णूंना मान्य झाला पण श्रीब्रह्मदेवांचे पाचवे मुख मात्र भगवान शिवशंभुंच्या नावाने शिव्याशाप व अपशब्दांचा उच्चार करुन निषेध नोंदवू लागले.भगवान शिवशंकर शांत होते पण त्यांच्या शरीरातून एक अक्राळविक्राळ, महाभयंकर शक्तीरुपी पुरुष बाहेर पडला...तेच काळभैरव महाराज होय. त्यांच्या हाती खड्ग (तलवार) दंड आणि भिक्षापात्र व त्रिशुल होते. ब्रह्मदेवांवर काळभैरवांनी चाल केली पण भगवान श्रीविष्णू व शिवशंभु मध्ये पडले पण तोपर्यंत काळभैरवांनी आपल्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक तोडून टाकले होते.मगच ते शांत झाले.पण ब्रह्महत्येचे पातक काळभैरवांच्या कपाळी आले.त्यापापाची खूण म्हणून ते तुटलेले मस्तक त्यांच्या तळव्याला चिकटून राहिले. भगवान शंकरांच्या आज्ञेने ब्रह्महत्येचे पातक नाहिसे व्हावे म्हणून त्यांनी त्रिभुवनांतील सर्व तीर्थक्षेत्रे पालथी घातली पण उपयोग झाला नाही...शेवटी कंटाळूण ते श्रीविष्णूलोकी गेले व श्रीलक्ष्मीनारायणांसमोर ते नतमस्तक झाले. तेव्हा श्रीलक्ष्मीमातेने त्यांना "मनोरथसिध्दी" प्रदान केली (तुझ्या चरणी येऊन जे उपासना प्रार्थना करतील त्यांची मनोरथं तु पूर्ण कर) आणि श्रीविष्णूंनी त्यांना काशीक्षेत्री जाण्याची आज्ञा केली.....
काशीक्षेत्री येताक्षणी ते मस्तक काळभैरवांच्या तळव्यावरुन निघून पडले व ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले (त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात) नंतर भगवान शंकरांच्या आज्ञेने काळभैरव महाराज काशीक्षेत्री स्थित होऊन त्यांना काशीचे कोतवालपद बहाल करण्यात आले. आज ही श्री क्षेत्र काशी येथे काळभैरवांच्या दर्शनाशिवाय काशीविश्वेश्वर दर्शन पुण्य आणि काशीयात्रेचे साफल्य मिळत नाही असे म्हणतात.
अशीच कथा ‘कूर्मपुराणा’ व ‘वराहपुराणा’त येते. ‘वराहपुराणा’तील कथेनुसार, ब्रह्माने रुद्राला ‘कपाली’ असे हिणवल्यामुळे रुद्र फार क्रोधित झाला आणि त्याने आपल्या डाव्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापून टाकले. मात्र ते रुद्राच्या अंगठ्याला तसेच चिकटून लोंबकळत राहिले. काही केल्या ते सुटेना तेव्हा शेवटी रुद्राने ब्रह्मदेवालाच यावरील उपाय विचारला. ब्रह्माने त्याला बारा वर्षांपर्यंत कापालिक जीवनपद्धती अंगिकारण्यास सांगितले. त्याप्रमाणे रुद्राने केसांपासून बनवलेले यज्ञोपवीत, हाडांच्या मण्यांचा हार आणि कवट्यांनी बांधलेल्या जटा असा वेष केला आणि तो तीर्थयात्रेला निघाला. बारा वर्षांनी फिरत फिरत तो वाराणसीला आला आणि तिथेच शेवटी सिमचरीच्या अनुयायांनी ब्रह्माचे ते मस्तक रुद्राच्या अंगठ्यापासून वेगळे केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या जागेला आता ‘कपाल-मोचन’ टेकडी असे नाव आहे. ‘कूर्मपुराणा’तील कथा काहीशी वेगळी आहे. त्यानुसार ब्रह्माने स्वतःला सृष्टीचा निर्माता म्हणून घोषित केले, मात्र या गोष्टीला शिवाने आव्हान दिले. वेदांनीही शिवाला पाठिंबा दिला. तरीही त्यातून काही मार्ग निघेना, तेव्हा शिवाने भैरवाला आज्ञा केली की, त्याने ब्रह्माचे एक मस्तक धडावेगळे करावे. या दोन्ही कथांमधून शिवाचे श्रेष्ठत्व जाणवते, तसेच कापालिक संप्रदायाची महतीही कळते.
हीच कथा ब्रह्मशिरच्छेद शिव, कंकालमूर्ती या सदराखालीही येते. ब्रह्मदेवाला मूलतः पाच शिरे होती. त्यांपैकी एक कसे गळून पडले हे या कथेतून स्पष्ट होते. ‘श्रीतत्त्वनिधी’ या ग्रंथात ब्रह्मशिरच्छेदमूर्तीचे वर्णन आहे. श्वेतवर्णीय शिवाच्या उजव्या कानात पत्रकुंडल व डाव्या कानात नक्रकुंडल असावे. त्याने उजव्या हातांत वज्र व परशू तर डाव्या हातात सुळा आणि ब्रह्माचे मुंडके धारण केलेले असावे. अंगाभोवती व्याघ्रचर्म गुंडाळलेले असावे. मात्र या वर्णनाप्रमाणे घडविलेली एकही मूर्ती आढळत नाही. केवळ चतुर्भुज भैरवाच्या खालच्या उजव्या हातात ब्रह्माचे मुंडके असते, ती प्रतिमा ब्रह्मशिरच्छेदमूर्तीच्या काहीशी जवळची वाटते.
महाभारताप्रमाणे वेदज्ञ ब्राह्मणानी शंकराची 'घोर' अशी मुख्य दोन स्वरूपें मानली. ही दीन रूपेंच अनेक प्रकारानें प्रगट झाली आहेत. भैरव म्हणजे भरण करणारा किंवा भीषण. शिवपुराणांप्रमाणें भैरव हे शंकराचे 'पूर्णरूपे' होय. या शब्दाची व्युत्पत्ती भीषण असल्यामुळे भैरव किंवा भरण करणारा असल्यामुळे भैरव अशा दोन प्रकाराने लावतात. भैरव किंवा कालभैरव हा वाराणसीचा अधिपती मानला जातो गुप्तकालीन भैरवाच्या पाषाणमूर्ती अजून आपणास माहीत नाहीत पण शिवाचे 'घोर' किंवा काळरूप चतुर्मुखलिंगात पाहता येते (चित्र ८७) या शिवाय अहिच्छत्रा येथील महाभैरवाच्या मृफलकाचा उल्लेख मागे आलेला आहेच.आपल्याकडे गावागावांमध्ये दिसणारा भैरोबा, काळभैरव, भैरव, क्षेत्रपाल ही सगळी त्याचीच नावं आहेत. आपल्याला असलेले दुःख कमी व्हावे, गावांच्या वेशी सुरक्षित राहाव्यात, इत्यादी कारणांसाठी भक्त याच्याकडे धाव घेतात. भैरवाची संकल्पना महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पसरलेली आपल्याला दिसते. काळभैरव महाराज हे अत्यंत पराक्रमी,श्रेष्ठ,शूर, दैदिप्यमान आणि मनोरथसिध्दी असणारे आहेत. त्यांची उपासना ही हमखास लाभदायक ठरते यात शंकाच नाही.कळीकाळावर विजय मिळविणारे, शत्रूंचा संहार करणारे, भयमुक्त करणारे (भय+रव =भैरव) असे हे दैवत आहे. त्यांचा अंमल काळावर आहे काळभैरव एक तांत्रिक देवता आहे ; हिंदूंचे एक कुलदैवत आहे.हा शंकराचा अवतार असून काळभैरव,काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ,बहिरीनाथ, भैरी(नाथ),मल्हारी,भैरोबा,खंडोबा,खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत.महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत.काळभैरव-जोगेश्वरी,भैरी-भवानी,भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते,असे सांगितले जाते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल.भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते.मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पायऱ्याअकरा भैरवाच्या प्रतीक आहेत. १) प्रमुख - श्री काळभैरव २) उपप्रमुख - बटुकभैरव ३) समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव ४) अष्टभैरव - स्मशानभैरव ५) नग्नभैरव ६) मार्तण्डभैरव ७) कपालभैरव ८) चंडभैरव ९) सन्हारभैरव १०) क्रोधभैरव ११) रुरुभैरव
भैरवाच्या मूर्ती दोन प्रकारच्या असतात : १) सामान्य क्षेत्रपाल, चंड, बटुक, स्वच्छंद व स्वर्णाकर्षण भैरव येतात. २) चौसष्ट भैरव. भैरवाची एकूण ६८ रूपे आहेत. त्या सर्वांची वेगवेगळी नावे आहेत. याशिवाय बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव अशीही रूपे आढळतात.
यांची नावे व वर्णने ‘अभिलषितार्थचिंतामणी’, ‘श्रीतत्त्वनिधी’, ‘मत्स्यपुराण’ इ. ग्रंथांत दिली आहेत. भैरवाच्या उग्र स्वरूपातील मूर्तीच अधिक आहेत. वाऱ्यावर उडणारे केस, बटबटीत डोळे, बाहेर आलेले सुळे, डोक्यावर गळ्यात आणि दंडावर साप, कानांत सर्पकुंडले, डाव्या हातात केसांनी धरलेले मुंडके, त्यातून गळणाऱ्या रक्ताचे थेंब चाटणारे कुत्रे अशी भैरवाची मूर्ती दाखवतात. भैरवाची प्रतिमा बऱ्याच वेळा द्विपाद आणि नग्न असते. क्वचित पायाखाली प्रेत दाखवलेले असते. हातांची संख्या ४, ८, १२, १८ अशी असू शकते. भैरवाच्या मूर्ती उत्तर व दक्षिण भारतात सर्वत्र आढळतात. विशेषतः मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्य भिंतीवर) देवकोष्ठात त्या असतात. कोलकाता येथील आशुतोष संग्रहालयात एक भैरवाची मूर्ती आहे, तिला एक पाय व दोन हात आहेत. राजस्थानात किराड/किराडू (जि. बाडमेर) येथे इ. स. १४५९ मधील त्रिपाद भैरवाची मूर्ती आहे. तिला आठ हात असून त्यांत तलवार, डमरू, क्षुरिका, कपाल इ. आयुधे धारण केली आहेत. पायात लाकडी खडावा आहेत. गळ्यात व मस्तकावर नाग धारण केला आहे व गळ्यात लांब रुंडमाळा आहे.
भैरव, रानी की बाव, पाटण
भैरवाचे एक अत्यंत सुरेख शिल्प हे राणी की वाव-पाटण येथे आहे. या मूर्तीला अठरा हात असून हातांची जणू एक महिरपच त्याच्या भोवती झालेली दिसते. चेहऱ्यावर उग्र भाव दाखविण्यासाठी केवळ त्याचे डोळे वटारलेले आहेत. परंतु त्याची परिणामकारकता दाखविण्यासाठी कलाकाराने चांगलीच कल्पकता दाखवलेली आहे. शंकराच्या पायाखाली एक राक्षस कोरला असून त्याचा एक हात त्याने कापून टाकला आणि मुंडके उडवले असे दाखवले आहे. तोडलेले मुंडके शंकराच्या खालच्या डाव्या हातात केसाने धरलेले असून त्याच्या खाली एक श्वान आहे जो त्याच्या मानेतून टपकणाऱ्या रक्ताचे थेंब चाटताना दाखवले आहे. शंकराच्या उजव्या पायाजवळ त्याचा एक अस्थिपंजर परंतु जटाधारी गण आहे जो त्या दैत्याचा तुटलेला हात चावून खायचा प्रयत्न करतो आहे. (बीभत्स रस हा दाखवू नये असा संकेत असला तरी कलाकाराने या शिल्पात तो अत्यंत सूचकतेने दाखवला आहे.)
इसवी सन १४ व्या शतकात गोवा राज्यातील उसगाव, पोंडा, येथे सापडलेली ही मार्तंड भैरवाच्या मुर्ती, या भैरवाला माणसांसारखे दोनच हात आहेत
गोवा आणि कोकणात शिवगणांमधे वेताळ आणि अन्य स्थानिक राखणदार समजले गेलेल्या देवांचा समावेश होतो.
हा लोलये येथील बेताळ.
वेरूळ येथील लेणी क्र. २१ येथील असितांग भैरव.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली भैरवमूर्ती.
खिद्रापूर येथीलच गजारूढ भैरव
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील भैरवमूर्ती
भुलेश्वर मंदिर, पुणे येथील उजवीकडील दोन भैरवमूर्ती
पूरच्या कुकडेश्वर मंदिरावरील भैरव प्रतिमा
रांजणगावाजवळील पिंपरी दुमाला येथील दुर्लक्षित मंदिराच्या बाह्यभागावरील ही भैरव प्रतिमा
पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील भैरव मूर्ती
वरील फोटोतील "भैरव" नेपाळमध्ये आहे. या भैरवाला दारूचा नैवेद्य आवडतो. "नैवेद्य" मूर्तिवर दिसत असलेल्या छिद्रात टाकायचा असतो
महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात भैरव वा काळभैरवाच्या मूर्ती आढळतात. त्याला भैरोबा, क्षेत्रपाल असेही म्हटले जाते.कणात आढळणार्या वेताळ मूर्ती म्हणजे असितांग भैरवाचाच एक प्रकार.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात १२ व्या शतकातील भैरवाची एक सुंदर चतुर्भुज प्रतिमा आहे. त्रिभंगावस्थेत उभ्या भैरवाच्या मागील दोन हातात त्रिशूळ, डमरू व पुढील उजव्या हातात तलवार व डाव्या हातात कपाल आहे, त्याच हाताने नरमुंडाचे केस धरले आहेत. नग्न मूर्तीच्या गळ्यात रुंडमाळा व इतर आभूषणे आहेत, कानात चक्राकार कुंडले, पायात वलये आणि पादुका आहेत. मस्तकाभोवती, गळ्यात, मांड्यांभोवती नागाची वेटोळी असून पायांजवळ गण आणि एक कुत्रा दिसतो; तो वर लोंबकळणाऱ्या मस्तकातून गळणारे रक्त चाटत आहे. पार्श्वभूमीवर अलंकारिक मकरतोरण आहे. मार्कंडी (जि. गडचिरोली) येथील मार्कंडऋषी मंदिराच्या बाह्यभिंतीवर भैरवाच्या दोन प्रतिमा असून त्यांपैकी एक चतुर्भुज तर दुसरी अष्टभुज आहे. अष्टभुज भैरवाच्या उजवीकडील हातात खटवांग, कपाल, नरमुंड आणि कर्तरी आहे; तर डावीकडील हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग आहे. ही प्रतिमा नग्न असून तिला दाढी-मिशा आहेत. त्याच्या कटिसूत्राला दोन घंटा बांधलेल्या आहेत व गळ्यात पाच मुंडक्यांचा लंबहार आहे. त्याच्या पायांमागे तीन कुत्री आहेत. येथील चतुर्भुज प्रतिमाही अशीच उग्र आहे. त्याच्या उजव्या हातांत खड्ग व गजदंत तर डाव्या हातांत खेटक व नरमुंड दिसते. त्याने आपला उजवा पाय खाली पडलेल्या प्रेताच्या पायावर रोवला आहे.
नृत्य भैरव होट्टल :- शैव मंदिरांवर भैरवाच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. या मूर्तीचे हात खंडीत आहेत. या हातात त्रिशुळ, डमरू अशी आयुधे सहसा असतात. शिवाय एका हातात नरमुंड ही असते. मूर्तीच्या डाव्या बाजूला खाली श्वान दाखवले आहे वर मान केलेले. ते नरमुंडातून ठिबकणारे रक्त चाटत असते. भैरवाच्या अंगावर वस्त्र नाहीत. पायावर नरमुंडमाला लोंबत आहे. डोक्यावर मागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडल आहे. कपाळावर पट्टा आहे. पाठशिळेच्या वरच्या भागात किर्तीमुख आहे. सहसा भैरवाचे डोळे बटबटीत, चेहरा भयानक दाखवला जातो. पण इथे चेहरा सौम्य आहे. मांडीवर साप गुंडाळलेला आहे. कमरेच्या मेखलेची माळ मांडीवर रूळत आहे. त्याच्या खालच्या टोकाला घंटा आहेत. पायात नुपुर आहेत. पायाचा कमरेपर्यंतचा भाग एका रेषेत, कमरेपासून मानेपर्यंत दूसर्या कोन रेषेत. आणि मानेपासून वरती परत वेगळ्या रेषेत अशी ही त्रिभंग मूद्रा आहे. नृत्यमुद्रेत हीची गणना होत असल्याने नृत्य भैरव असा याचा विचार करावा लागेल. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणचे पादत्राणे. उंच टाचेच्या सँडल्स असतात त्या प्रकारचे वेगळे असे हे पादत्राण आहे. हे अशा पद्धतीनं कुठे दिसत नाही. होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या बाह्य भागावर ही भैरवमूर्ती आहे. याच्या आजूबाजूला सुरसुंदरींची शिल्पे आहेत. या मूर्तीला मिळालेले स्थान तिला देवता मानल्याचे सुचित करते.
भैरव मूर्ती - वालूर :- वालूर (ता. सेलू जि. परभणी) येथे वाल्मिकेश्वर मंदिर आहे. मंदिर आता नव्याने बांधलेले आहे पण हा परिसर प्राचीन अवशेषांनी भरलेला आहे. शेषशायी विष्णु, हात जोडलेला गरूड, आसनस्थ शिव पार्वती, विष्णुच्या हातातील चक्र, रिद्धी सिद्धीसह गणेश असे कैक अवशेष या परिसरात विखुरलेले मंदिरा समोरच्या वडा खाली आढळून येतात. एक प्राचीन बारव आहे जी आता जवळपास बुजली आहे. मंदिराच्या भिंतीला टेकून ही भैरवाची मूर्ती ठेवलेली आहे. याच्या वरच्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू आहे. डोक्यावरचे केस मुंड माळेने बांधलेले आहेत. मस्तकामागे ज्वालेप्रमाणे गोलाकार प्रभा मंडळ आहे. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात नरमुंड आहे. डाव्या बाजूला खाली या नरमुंडातून टपकणारे रक्त चाटणारा कुत्रा आहे. नग्न भैरवाच्या कमरेला साखळी असून मांड्यांवर घंटा लोंबत आहेत. डाव्या बाजूला गण आहे. उजव्या बाजूस भुतनाथ आहे. गुडघ्यावरून खाली मुंडमाला लोंबते आहेत. ललित मुद्रेत भैरव उभा आहे. एरव्ही उग्र दाखवला जाणारा हा भैरव इथ शांत चेहर्याचा दाखवलेला आहे. या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.
भैरव मूर्ती - निलंगा :- निळकंठेश्वर मंदिर (ता. निलंगा जि. लातूर) येथील अप्रतिम मूर्ती भैरवाची आहे. मुर्तीच्या उजव्या वरच्या हातात डमरू आहे. खालचा हात भग्न आहे. डाव्या हातात त्रिशुळ असून खालच्या हातात नरमुंड आहे. त्यातून टपकणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा जिभ चाटत दोन पायांवर उभा आहे. भैरवाच्या पायावर मुंडमाळ लोंबत आहे. भैरवमूर्ती नग्न दाखवली जाते तशीच ती इथेही आहे. भैरवाच्या डोक्यामागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडळ आहे. कपाळावर पट्ट आहे, कानात कुंडले, गळ्यात हार, कटिसूत्र, मांडीवरील साखळ्यांना घंटा आहेत. दंडांवर बाजूबंद आहेत. पायात तोडे आहेत. डाव्या बाजूला कुत्रा असून उजव्या बाजूला भुतनाथ आहे. भैरवाच्या चेहर्यावरचे भाव उग्र असतात पण हा भैरव शांत चेहर्याचा दर्शवलेला आहे.
वडनेर भैरव ( नाशिक ) :-
त्रेतायुगात वडनेर भैरव येथे नदीकिनारी (नेत्रावती) एका विहीरीतुन साक्षात कालभैरव रूप भैरवनाथ प्रकट झाले, ही आख्यायिका नाही, हकिकत आहे..तेथे चंडकेशर नावाचा एक राक्षस जोगेश्वरी देवींना त्रास देऊ पाहत होता,जोगेश्वरी देवींनी महादेवाचा धावा केला.साक्षात काशी विश्वेश्वराने आपल्या रुपातील अष्टभैरवांपैकी एका रुपाला जोगेश्वरी देवींची रक्षा करण्यासाठी वडनेर भैरव येथील त्या नदीकिनारी असलेल्या विहीरीतुन प्रकट होण्याची आज्ञा केली कालभैरव प्रकट होऊन चंडकेशर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणि त्या खोल विहीरीत त्या चंडकेशर राक्षसास कैद केले वरुन ती विहीर मोठ्या दगडाने झाकुन टाकली,(त्या विहीरीत आजही आवाज ऐकू येतो मला वर काढा.) नंतर जोगेश्वरी देवीने भैरवनाथ यांना वरले त्या ठिकाणी आजही चैत्र महिन्यात भैरवनाथ जोगेश्वरी यांचा विवाह होतो, रथ यात्रा निघते त्या विहिरीजवळ जे जोगेश्वरी मातेचे घर होते तेथे जानोसघर म्हणुन आजही वर्षातून एकदा लाखोंचा संख्येत लग्न होते भैरवनाथ जोगेश्वरी मातेचे.मुर्ती त्रेतायुगापासुन तीच आहे,संपुर्ण शृगांर सोनेचांदीचा आहे,देवाला कपडे दागिने,पाच दिवस हळद समारंभ होतो,जागृत देवस्थान आहे
भुबनेश्वर स्टेट म्युझियम, ओडिशा येथील भैरव मुर्ती :-
आता आपण जे शिल्पं बघणार आहोत ते भुबनेश्वर येथील संग्रहालयात असलेला भैरव आहे. डावीकडून शिल्पाचे निरीक्षण करूयात.
भैरव हा बहुतांशी वेळेला नग्न दाखवला जातो. पायाशी त्याचे गण किंवा सेवक कोरलेले आहेत. खडावा (हाय हिल्स) घालून तो उभा आहे. चतुरहस्त - चार हातांचे शिल्पं आणि हातामध्ये खड्ग - तलवार, त्रिशूळ, डमरू आणि माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. त्या मुंडक्यातून येणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी खाली असलेला कुत्रा वर बघतो आहे (इथे कुत्र्याचे तोंड तुटले आहे). वरून पायाकडे जाताना मुकुटमध्ये मध्य भागी कोरलेला नागाचा फणा आणि खाली नरमुंड, कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा, भुवया वर खचलेल्या, डोळे वटारलेले, ओठांमधून बाहेर आलेले सुळे, या उग्र रुपात कोरलेले सुंदर दागिने, कमरेचा बाक अत्यंत सुंदर कोरला आहे, संपूर्ण नग्न शिल्पं, कमरेपासून खाली नरमुंड माळा आणि गुडघ्यांवर वेटोळा मारून बसलेला नाग. उग्र रूप म्हणजे नक्की काय हे या शिल्पावरून आपल्याला कळतं. अनेक रसांपैकी एक बीभत्स रस तो या शिल्पात आपल्याला दिसतो.
कुकडेश्वराचं प्राचीन मंदिर हे मंदिर बहुधा शिलाहारांनी बांधलेलं असावं. इथला शिलालेख नष्ट झालेला असल्याने ह्या मंदिराचा निर्माता आजही अज्ञात आहे. पुर्वी हे मंदीर भग्नावस्थेत होतं. खांब, छत आणि भिंतीवरील काही मोजक्या मूर्ती फक्त अस्तित्वात होत्या. मंदिराचे अवशेष आवारात विखुरलेले होते. ते तसे आजही विखुरलेले आहेत. आता मंदिराचा बर्यापैकी जीर्णोद्धार झालाय. बरेचसे विखुरलेले अवशेष मंदिरावर पुन्हा स्थापित करण्यात आले आहेत. मात्र मंदिराच्या पुढ्यातील एका लहानशा घुमटीत असलेल्या वेताळांच्या मूर्ती तेव्हा जशा होत्या तशाच आजही आहेत.
हे वेताळ म्हणजेच शिवगण. शंकराचं मूळचं अनार्यत्व अधोरेखित करणारं. फार पूर्वी - म्हणजे जेव्हा दहाव्या-बाराव्या शतकात हे मंदिर निर्मिलं गेलं, तेव्हा ह्यांचं स्थान कदाचित मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावं, पण कालौघात जशी जशी मंदिराची दुरवस्था होत गेली, तेव्हा त्यांचं स्थान कदाचित ह्या घुमटीत आलं असावं. तसं ह्यांना वेताळ म्हणणंही फारसं योग्य होणार नाही. हे शंकराचे भूतगण. निम्न देवता. डोक्यावर शिरोभूषण, कानांत गोलाकार आणि लांबुळकी कर्णभूषणं, बटबटीत डोळे, हाडांचा संपूर्ण सापळा, हाती धरलेला खंजीर अशी ह्यांची रचना. हे मंदिराचे रक्षक. दुष्प्रवृत्तींना मंदिरात येऊ न देणं हे ह्यांचं काम. केवळ ह्या वेताळमूर्ती इथे असल्यामुळेच हे मंदिर बहुधा शिलाहारांची निर्मिती असावी असं वाटतं. शिलाहार कोकण, कोल्हापूर ह्या प्रांतांचं. कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा वेताळांची पूजा आजही चालत असते. देशावर सहसा अशा मूर्ती दिसत नाहीत. दिसतात त्या भैरव, चामुंडा अशा देवतारूपातच. अर्थात ह्याला अपवाददेखील आहेत. रांजणगावजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरात अशी वेताळ किंवा शिवगण मूर्ती मी पाहिलेली आहे. मात्र हे मंदिर यादवकालीन आहे. शिलाहारांनी निर्मिलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात मात्र भूतगण आहेत.
कुकडेश्वर येथील वेताळ
पिंपरी दुमाला येथील वेताळ किंवा भूतगण
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील भूतगण
गोव्यातील वेताळ :-
गोव्यातील वेताळ मात्र वेगळे. तिथे ते गावचे राखणदार किंवा संरक्षक लोकदैवत म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. कदंब, शिलाहार राजवटीत गावोगावी ही ग्रामदैवतं स्थापित केली गेली. त्यांची मंदिरं अशी नव्हती. ह्या मूर्ती गावच्या वेशीवर उभ्या असत. कालांतराने हळूहळू ह्या मूर्तींसाठी मंदिरं बांधली गेली. वेताळदेव, बेताल, वेतोबा अशी त्यांची स्थानिक नावं. श्री. राजन पर्रिकर ह्यांनी गोव्यातील कित्येक वेताळ मंदिरांना भेटी देऊन त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. गोव्यातील वेताळांबाबत पर्रिकर काय म्हणतात, ते पाहा.
"The ancient deity of Vetal, its iconography and associated rituals, are important elements of, and unique to, Goa‘s Hindu tradition. The deity was most likely worshipped by the Austric Gauda tribe, Goa‘s earliest settlers, and later embraced by the Nath Panthis between the 10th & 13th C. Eventually it came to be absorbed into the larger Hindu pantheon.
A mere 50 or so out of the hundreds of ancient Vetal sites in Goa survived the iconoclasm by the Portuguese. Every single site in the Bardez and Tiswadi talukas was destroyed.
Traditionally the images of Vetal were cast out in the open with provision for a simple roof overhead. After all, as the village protector, he was expected to be out on his nightly patrol. To this day, offerings of footwear are made at his temples. Buffalo sacrifice was once common but is now far less so. Fowl and goat are still routinely offered."
जुन्या गोव्यातील चर्चेसच्या संकुलाच्या (चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी - बॅसिलिका ऑफ बॉम जीझसच्या समोर) एका इमारतीतच गोवा पुरातत्त्व खात्याचं एक संग्रहालय आहे. गोव्यातील कित्येक प्राचीन अवशेषांबरोबरच तिथे वेताळाच्या काही भग्न मूर्तीदेखील आहेत. त्यातील एक प्रमुख आहे ती वेताळभाटीच्या वेताळाची. मूळच्या जवळपास आठ फूट उंच असलेल्या ह्या मूर्तीचे हात-पाय नष्ट झालेले असून सध्या फक्त मस्तक आणि धडाचा भाग शिल्लक आहे. शिरोभूषण, मोठे बटबटीत डोळे, अस्थिपंजर, पोटातील विंचू अशी वैशिष्ट्यं आजदेखील बघता येतात. गोव्याला कधी गेलात तर हे संग्रहालय आणि त्यातल्या ह्या मूर्ती आवर्जून बघण्यासारखंच.
दक्षिण गोव्यात लोलये गावात आजही एका वेताळाची भव्य, नेत्रदीपक अशी मूर्ती आहे जवळच असलेल्या पैंगीण गावात वेताळाचं एक मंदिरही आहे जे आवर्जून बघायला हवे. दक्षिण गोव्यातील हा भाग अतिशय सुंदर, नेत्रावलीच्या घनदाट अरण्याच्या आजूबाजूने जाणारा रस्ता अतिशय देखणा. अतिशय शांत भाग. खरं गोवा अनुभवायचं असेल तर ते इथेच. काणकोण तालुक्याचा हा भाग संपताच कारवार लागतं.
पैंगीण गावातलं वेताळ मंदिर शोधणं तसं अवघड नाही. मडगाव-कारवार महामार्गावरून पैंगीण गावात उजवीकडच्या एका रस्त्याने साधारण दोनेक किलोमीटर गेल्यास हे मंदिर रस्त्यालगतच दिसतं. रस्त्यालगतच असलेलं आदिपुरुष मंदिर आणि तिथूनच खोलवणात असलेलं वेताळ मंदिर. कोकणात किंवा गोव्यात आदिपुरुष, ब्रह्मपुरुष, सातेरी अशा लोकदैवतांची मंदिरं विपुल प्रमाणात आढळतात. पैंगीणच्या आदिपुरुषाचं मंदिरही अगदी साधंसं पण सुंदर. आदिपुरुषाची मूर्ती नसून मूर्तीच्या जागी एक स्तंभ उभा आहे.
आदिपुरुष मंदिरातून बाहेर आल्यावर काही पायर्या उतरून वेताळ मंदिराच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो.
वेताळ मंदिर
कोकणातील अथवा गोव्यातील मंदिरांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काष्ठमंडप.
पैंगीणच्या वेताळदेव मंदिरातील काष्ठमंडप अतिशय नाजूक अशा कलाकारीने सजलेला आहे. स्तंभांवर, छतावर नक्षीकाम, काही पौराणिक प्रसंग, देवतांच्या मूर्ती, पशुपक्ष्यांच्या आकृती कमालीच्या नजाकतीने कोरलेल्या आहेत.
वेताळदेव मंदिरातील काष्ठमंडप
मंदिरातील लाकडी स्तंभ
छतावरील नक्षीकाम
गर्भगृहातील वेताळाची मूर्ती भयप्रद आहे. उभट चेहरा, बटबटीत डोळे, कपाळी मुकुट, मुकुटावर कीर्तिमुख, नागाकृती कर्णभूषणं, पिंजरलेल्या मिशा, विकराळ दाढा आणि त्यातूनच बाहेर काढलेली जीभ, अस्थिपंज शरीर, बाहूंना नागबंधनं आणि एका हाती कपाल असलेली मूर्ती भयप्रद असूनही कमालीची देखणी वाटते. वेताळाच्या कमरेला धोतर नेसवलेलं असल्याने खालचा भाग नीट ध्यानी येत नाही, मात्र इतर वेताळमूर्तींप्रमाणेच ही मूर्तीदेखील नग्न असावी असा कयास बांधता येतो.
पैंगीणचा वेताळ
वेताळ ही संरक्षक ग्रामदेवता. दुष्प्रवृत्तींपासून गावाचं संरक्षण करण्यासाठी रात्रीचा तो बाहेर पडतो, रानावनात, काट्याकुट्यांतून तो अपरात्री फिरत असल्याने त्याच्या वहाणा झिजतात, म्हणूनच वेताळाला वहाणा अर्पण करायची प्रथा आहे. ह्या मंदिरातदेखील ती दिसते ती भाविकांनी अर्पण केलेल्या वहाणांमुळे. येथील मंदिरात अगदी सामान्य आकाराच्या वहाणांपासून दीडेक फूट लांब असलेल्या वहाणांचा एक भलामोठा ढीगच आहे. ह्याच जोडीला भाविकांनी वेताळदेवाला अर्पण केलेली त्रिशूळ, तलवार अशी शस्त्रास्त्रंदेखील आहेत.
वेताळाला अर्पण केलेली शस्त्रास्त्रं
वेताळदेवाचा नैवेद्य, त्याला अर्पण करण्यात येणार्या इतर वस्तूदेखील रोचक. त्याचा एक फलकच येथे लावलेला आहे.
पैंगीणचं हे वेताळ मंदिर बघून आता वेध लागलेतात ते लोलयेच्या वेताळाचे.
वेरूळच्या कैलास लेण्याबद्दल बर्जेस म्हणतो,
"It is by far the the most extensive and elaborate rock-cut temple in India, and the most interesting as well as the most magnificent of all the architectural objects which that country possess."
अगदी अशीच काहीशी भावना लोलयेचा वेताळ बघताना होते. गोव्यातील ही वेताळमूर्ती सर्वात भव्य, सर्वाधिक रौद्र, सर्वाधिक सुबक आणि सर्वाधिक प्राचीन, मूर्तिशास्त्रातील एक अद्भुत आविष्कारच जणू.
मात्र हा लोलयेतील वेताळ शोधणं सोपं काम अजिबात नाही. इकडील लोकांना हा वेताळ फारसा परिचित नाही. बर्याच ठिकाणी विचारल्यावर नकारघंटाच ऐकू येते. लोलये गाव झाडीत लपून गेलेलं आहे. लहान लहान घरांच्या समुदायाच्या स्वरूपात, उंचसखल अशा बर्याच जागी विखुरलेलं गाव. बर्याच ठिकाणी घरं बंद. कुणी कामानिमित्त बाहेर पडलेले, कुणी घरातच आळसावलेले असे. विचारायलादेखील असं कुणी मिळेल असे नाही. श्री आर्यादुर्गा मंदिरामागच्या रानात ही वेताळ मूर्ती आहे . कुणाला इथल्या वेताळाचा शोध घ्यायचा असेल, तर हे आर्यादुर्गा मंदिर हीच सर्वात मोठी खूण आहे. हे मंदिर रस्त्यालगत असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ह्या आर्यादुर्गा मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर एका ब्राह्मणाचं सुरेख घर आहे. आर्यादुर्गा मंदिर ही त्यांची खाजगी मिळकत आहे. घराच्या अंगणातूनच मागच्या वाडीत जायला पायवाट आहे. आर्यादुर्गा मंदिराची कमान. उजवीकडे आर्यादुर्गा मंदिर तर डावीकडे मंदिराच्या पुजार्यांचं घर, मधल्या बेचक्यातून वेताळमूर्तीकडे जाण्याची वाट आहे. घरासमोरच्याच पायवाटेने आपला वाडीत प्रवेश होतो. रानातच वेताळदेवाला जायला एक लहानशी कमान आहे. गच्च रान माजलेलं, पोफळीही अगदी विपुल. त्या बंबाळ्या रानात भर दुपारीही अंधार पसरल्याचा भास होतोय. पायवाटेने पुढेपुढे जात असतानाच अवचित ती भव्य मूर्ती समोर येतेय, काळीकभिन्न. असं वाटतंय जणू काही वेताळदेव दुष्ट शक्तींना हाकलण्यासाठी सज्ज होऊन उभा आहे.
वेताळदेवाला जाण्यासाठी वाडीतली लहानशी कमान
ह्या अशा रानातच वेताळदेव प्रतिष्ठित आहे
लोलयेचा वेताळ अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही गोव्यातील ज्ञात असलेली वेताळाची सर्वात प्राचीन मूर्ती, नवव्या-दहाव्या शतकातली. सर्वात उंच, अदमासे सातेक फुटाची, सर्वाधिक देखणी - अर्थात हे देखणेपण रौद्र आहे. त्रिभंग मुद्रेतील ह्या वेताळाचं असितांग भैरवाशी कमालीचं साम्य आहे.
ह्या वेताळाच्या मूर्तीला छत नाही, गाभारा नाही, मंडप नाही, कुठलाही आडोसा नाही. शेकडो उन्हाळे-पावसाळे झेलत ह्या रानात तो आजही उभा आहे. तसं बघायला गेलं, तर वेताळाच्या किंवा राखणदाराच्या मूर्ती ह्या उघड्यावरच असतात. गोव्यातील इतर वेताळ आता मंदिरांमध्ये स्थापित झालेले आहेत, पण लोलयेचा वेताळ आजही रानात उभा राहून गावाची राखण करतो आहे.
ह्या वेताळाची मूर्तीदेखील मोठी वैशिष्ट्यपूर्ण. ह्याच्या मस्तकी प्रभावळ आहे. मस्तकी शिरोभूषण असून त्यावर नागबंधन आहे. त्याने लांबुळकी कर्णभूषणं परिधान केली आहेत. त्याचे डोळे खोबणीतून पूर्णपणे बाहेर आलेले असून कपाळी तिसरा डोळा किंवा उभं गंध आहे. त्याच्या नाकपुड्या फेंदारलेल्या असून त्याच्या कराल दाढा तोंडातून बाहेर आलेल्या आहेत.
अस्थिपंजर अशा ह्या वेताळाने नरमुंडमाला धारण केलेली आहे. गळ्यातील हारात एक नक्षीदार पदक आहे. त्याच्या एका हातात खड्ग आहे, जे आता भंग पावलेलं आहे तर दुसर्या हाताने त्याने कपाल धारण केलेलं आहे. ज्या हातावर कपाल आहे, त्याच हाताच्या एका अनामिकेवर त्याने बकर्याचं मुंडकं अडकवलेलं आहे.
वेताळाला नक्षीदार कंबरपट्टा असून त्याजवर त्याने घंटांची मालाच धारण केलेली आहे. पूर्णपणे नग्न अशा त्याच्या देहावर ही माला विलक्षण खुलून दिसतेय. वेताळाच्या दोन्ही पायांत कंकणं असून पैंजणदेखील आहेत. त्याच्या उजव्या पायाशेजारी एक स्त्री सेविका असून डाव्या पायाजवळ एक खड्गधारी सेवक आहे.
वेताळाची ही सर्वात देखणी मूर्ती, अत्यंत भयप्रद, रौद्र. ह्या मूर्तीला कोणी शस्त्रं अर्पण केली नाहीत, कुणी वहाणा अर्पण केल्या नाहीत, कुणी बळी अर्पण केलेला नाही. त्याच्या गळ्यात मात्र कुण्या भाविकाने घातलेले काही पूर्ण सुकलेले तर काही कालपरवाचे असे झेंडूच्या फुलांचे हार आहेत. इतक्या दूरच्या रानात येऊन पोर्तुगीज मूर्तिभंजकापासून ह्या वेताळाने स्वतःचा संपूर्ण बचाव केलेला आहे.
लोलयेतील हा वेताळ एक अद्भुत अनुभूती देतो. केवळ ह्या मूर्तीसाठी इतक्या दूरवर आल्याचं सार्थक होतं. अक्षरशः झपाटून टाकणारी ही वेताळमूर्ती. यासम हीच. आजही लोलयेचा राखणदार म्हणून हा वेताळ उभा आहे .
त्रिपुरान्तकमूर्ती :
प्राचीन संहिता, पुराणकथा आणि त्यामध्ये गुंफलेल्या काही संकल्पना या मूर्त रुपाला जन्म देत असतात. रुद्र हातामध्ये धनुष्य धारण करून रथात आरूढ होणारा त्रिपुरान्तक शिव या संहारक रूपातून व्यक्त होताना दिसतो. तैत्तिरीय संहिता आणि शतपथ ब्राह्मणासारखे काही प्राचीन ग्रंथ आणि महाभारत, लिंगपुराण आणि शिवपुराणांतून आलेल्या रोचक कथा शिल्पकारांना ही तितीक्याच आव्हानात्मक ठरलेल्या दिसतात. या पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे.ही कथा ‘तैत्तिरीय संहिता’, ‘ऐतरेय ब्राह्मण’, ‘शतपथ ब्राह्मण’ व ‘महाभारता’त येते.
शिवपुत्र कार्त्तिकेय, दैत्यासुर तारकाचा वध करतो आणि सुरु होते कथा त्रिपुर निर्माणाची.तारकासुराला तीन मुलगे विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष होते. एकदा या तीन भावांमध्ये चर्चा सुरु झाली कि 'हे जीवन नश्वर आहे आणि एक दिवस आपल्याला तसाही मृत्यु येणारच आहे तर मग आपण अमर होण्यासाठी प्रयत्न करुया', त्यांनी ठरविले कि युध्दाशिवाय मृत्यु स्विकारायचा नाही आणि वरदान मिळावे यासाठी त्यांनी ब्रम्हदेवाकडून वर प्राप्ती व्हावी म्हणून उग्र तपश्चर्या आरंभली. सुरवातीला त्यांनी एका पायावर तप केले, त्यानंतर अन्नाचे भक्षण करणे सोडून दिले, त्यानंतर खुप काळ ते शीर्षासनात तप करु लागले. इतक्या कठोर तपश्चर्येमुळे ब्रम्हदेवांना त्यांच्या समोर प्रगट होणे भाग होते. तिन्ही भावांनी वर मागितला कि त्यांना अमर करा. मात्र त्याला ब्रम्हदेवांनी नकार दिला आणि सांगितले कि मी कोणालाही अमर करु शकत नाही, त्यामुळे तुम्ही दुसरा वर मागावा, त्यावर त्या तिन भावांनी विचारविमर्श करुन सांगितले कि त्यांना तीन महाल मिळावेत ज्यातील एक पृथ्वीवर , एक स्वर्गात आणि एक अंतरीक्षात असेल आणि हि तिन्ही शहरे सतत भ्रमण करत असतील आणि हजार वर्षात एकदाच एका रेषेत येतील. जेव्हा हि तिन्ही नगरे एका रेषेत येतील आणि त्यांना एका बाणात नष्ट केले जाईल, तेव्हाच आमचा मृत्यु होईल. त्याप्रमाणे मयासुराने त्यांना स्वर्ग, अंतरिक्ष आणि पृथ्वी येथे एक सोन्याचे, एक चांदीचे व एक लोहाचे अशी तीन पुरे बांधून दिली. सुवर्णाचे पूर स्वर्गात बनवून तारकाक्ष त्या दुर्गाचा स्वामी होतो. कमलाक्षचे चांदीचे पूर अंतरिक्षात प्रस्थापित होते. विद्युन्मालीचे पूर भूमीवर निर्माण होते जे लोहाचे असते. तिघे पुत्र तेथे राहून देवांना त्रास देऊ लागले. ( याची आणखी एक उपपत्ती आहे.या तीन असुर भावांचा त्रास असह्य झाला म्हणून देवतांनी उपसदा नावाचा एक वैदिक यज्ञ केला, यज्ञातून त्यांना खूप शक्तिशाली शस्त्र मिळाले, परंतु देवांना ते वापरता आले नाही आणि म्हणून ते शस्त्र सोडण्यासाठी रुद्राकडे गेले. रुद्राने त्यांना पशु बनण्यास सांगितले पशु बनून पशुपतीची उपासना केल्याने ते पशुत्व म्हणजेच त्यांच्या देव म्हणून मर्यादा ओलांडतील आणि त्यांच्या सहनशक्तीची कमाल मर्यादा गाठतील त्यामुळे असुरांचा नाश करण्याची ताकद त्यांना प्राप्त होइल.देवतांनी स्वेच्छेने पशुपतीला आपला नेता म्हणून स्वीकारले आणि त्याला राक्षसांना शिक्षा करण्याची शक्ती दिली. पशुपती व्रत पाळून देवतांनी पशुपतीची लिंगाच्या रूपात पूजा केली. आता त्यानी शिवाला राक्षसांचा नाश करण्याची विनंती केली. ) सतत देवांना होणार्या त्रासाला कंटाळून इंद्रदेव चिंतीत झाले आणि त्यानी भगवान शिवांकडे त्याची तक्रार केली. मात्र तिन्ही भाउ शिवभक्त होते आणि शिवांच्या मते ते धार्मिकपणे राज्य चालवत आहेत आणि शिवांच्या हस्तक्षेपाची गरज नाही. त्यानंतर इंद्रदेव ब्रम्हदेवांकडे गेले, मात्र ब्रम्ह्देवांनी सांगितले कि मी त्या तिघांना वरदान दिले असल्यामुळे मी त्यांच्या विरुध्द काहीही करु शकणार नाही. अखेरीस हतबल इंद्र भगवान विष्णुंकडे गेले. मात्र विष्णू म्हणाले कि त्या तिघा असुर भावांना फक्त शिवशंकरच मारु शकतील. त्यावर इंद्रांनी सांगितले कि विष्णूंकडे येण्याआधी ते शिवाकडे गेले होते, त्यावर हसून विष्णु म्हणाले कि 'तिघे भाउ धार्मिक मार्गाने चालले आहेत तोपर्यंत शिव हस्तक्षेप करणार नाही, मात्र जर ते धर्मभ्रष्ट झाले तर शिव त्यांना नक्की शिक्षा देतील. यावरुन इंद्राने एक योजना आखली. त्याने एका योगीला डोक्याचे मुंडण करुन चेहरा कपड्याने झाकून आणि हातात जलकुंभ घेउन एका नव्या धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले, इंद्रानी त्या योग्याला सांगितले कि ' हा धर्म वेदांच्या विरुध्द असेल, या धर्माची तत्वे स्वर्ग आणि नरकाच्या विरुध्द असतील, तसेच या धर्माच्या अनुयायांना सांगा कि स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच अस्तित्वात आहे. योग्याने या धर्माचा मोठ्याप्रमाणात प्रसार केला. इतका कि नारद मुनी त्याच्या दर्शनाला गेले. नारदमुनींनी योग्याचा ओळख तिघा असुर भावांशी करुन दिली. तिघे भाउ त्या साधुशी सहमत झाली आणि त्यांनी या धर्माचा पालन करण्याचे ठरवले आणि त्यांनी भगवान शिवांची पुजा आणि वेदांचे पालन बंद केली. याठिकाणी या कथेत दोन कथानके सांगितली जातात.एका कथेनुसार यामुळे शिव या तिघांवर नाराज झाले. तर दुसर्या मान्यतेनुसार सत्तेमुळे ते तिघे भाउ धर्मभ्रष्ट झाले. याचवेळी ती तिन्ही नगरे एका रेषेत येण्याची वेळ झाली. सहाजिकच इंद्र पुन्हा शिवशंकराकडे गेले. यावेळी मात्र शिव त्या तिघा भावांचा वध करण्यासाठी तयार झाले. . मात्र शंकराने त्यासाठी देवांच्या अर्ध्या शक्तीची मागणी केली. ती त्यांनी आनंदाने पुरविली. त्यामुळे शिव प्रचंड शक्तीशाली झाला आणि त्याला ‘महादेव’ ही उपाधी प्राप्त झाली. ( या कथेचे आणखी एक रुप आहे,त्यामध्ये त्रिपुराच्या मुलांचा वध करण्यासाठी भगवान शिवांनी देवांच्या शक्तीची मदत घेतल्यामुळे देवांना असे वाटु लागले कि भगवान शिवांची शक्ती मर्यादीत आहे आणि देवांच्या मदतीशिवाय हे कार्य होउ शकले नाही. भगवान शिवांना देवाण्च्या या भ्रमाची जाणीव झाली, जेव्हा प्रत्यक्ष युध्द सुरु झाले तेव्हा शिव फक्त हसले आणि तिन्ही नगरांचे भस्म झाले. तामिळ ग्रंथात या घटनेला "पुन्नगैथु पुरामेरिता पेरुमन" असे नाव दिले आहे. यामुळे देवांना जाणीव झाली कि फक्त देवांना महत्व दिले असे वाटावे म्हणूनच महादेवांनी देवांची मदत घेतली. हे लक्षात आल्यामुळे देवांचा अहंकार नष्ट झाला.हंपीच्या विरुपाक्ष मंदीराच्या छतावर सर्व देव महादेवांची मदत करतानाचे चित्र रंगवले आहे. याच प्रसंगाची एक कथा लिंग पुराणात आहे. जेव्हा सर्व देव शिवांकडे त्रिपुरासुराच्या मुलांचा वध करण्याची विनंती करण्यासाठी आले तेव्हा पार्वतीने भगवान शिवांना बोलावले आणि त्यांना त्यांचा प्रिय पुत्र सुब्रमण्यम म्हणजेच कार्तिकेय नृत्य करत आहे. स्कंदाचे हे नृत्य बघून माता- पिता दोघांना आनंद झाला. हेच ते सोमास्कंद रुप होय. )
विश्वकर्मा या कार्यात शिवासाठी पृथ्वीपासून महादिव्य सुवर्णाच्या रथाचा निर्माण करतात. मंदार पर्वताचा अक्ष करून या रथाचे उजवे चाक हे सूर्य बनतो. ज्याचे बारा आरे म्हणजे बारा आदित्य असतात. डावे चाक चंद्रमा बनतो. ज्याला सोळा आरे म्हणजे चंद्राच्या सोळा कला असतात. सत्तावीस नक्षत्र या दोनही चाकांची शोभा वाढवत असतात. संवत्सर रथाचा वेग बनतो. रथाचे उपचक्र म्हणून पर्वतराज हिमालय आणि विद्याद्री यांची व्यवस्था केली गेली. सप्तऋषींना चाकावर गोलाकार बसविण्यात आले. गंगा, सरस्वती आणि सिंधू या नद्यांना चाकाच्या अक्षाच्या खिट्या किंवा पाचर बनविण्यात आले.कला त्या रथाचे खिळे बनतात. द्युलोक त्या रथाचे छत बनते. स्वर्ग आणि मोक्ष त्याचा ध्वज बनतो. वेदांग, पुराण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र त्या रथाचे अलंकार होतात. पुष्कर सारखी तीर्थे रत्नजडित सुवर्णमयी पताका बनतात. चार समुद्र रथाचे आच्छादन वस्त्र बनते. सप्तवायू सुवर्णमयी उत्तम सोपान बनतात.
साक्षात सृष्टीकरता ब्रह्मदेव या रथाचे सारथी होतात आणि प्रणवाकार ओम चाबूक बनतो. चार वेद रथाचे चार घोडे होतात. नागराज कालपृष्ठ, नहुष, करकोटक आणि धनंजय हे अश्वाना बांधून ठेवणारे पट्ट झाले. यासोबतच कृती, सत्य, वैराग्य आणि ऐश्वर्य यांना घोड्याचे लगाम बनविले गेले. शैलराज हिमालय धनुष्य बनून रुद्राच्या हातामध्ये स्थिरावते. शेषनाग त्या धनुष्याची प्रत्येंचा बनतात. श्रुतीरूपिणी सरस्वती देवी त्या धनुष्याची घंटा बनते. जगत्पालक विष्णू त्या दिव्य शक्तिशाली धनुष्याचा महातेजस्वी बाण बनतात. त्या बाणाचे अग्र अग्नी आणि यम त्याची पिसे बनतो. हा सज्ज झालेला दिव्य रथ साक्षात रुद्राच्या स्पर्शाने डगमगतो तेव्हा नंदी त्याच्या बळाचे सहाय्य त्या रथाला देतो. ब्रह्मदेव रथाचा लगाम सावरून रथ त्रिपुरांवर चाल करण्यास सज्ज करतात. ही तीन दिव्य पुरे अनेक वर्षांनी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा रुद्र त्याच्या दिव्य तेजस्वी बाणाने त्यांच्या भेद घेतो. त्या पुरांचा त्या तीनही दैत्यांसकट सर्वनाश होतो. या कथेच्या तपशिलाबद्दल संहिता, ब्राह्मण्ये व ‘महाभारत’ यांत वैविध्य आढळते.
या कथेतील गुढ अर्थ असा मानला जातो कि असुरांनी ज्या तीन नगरावर ताबा मिळवला ती म्हणजे गर्व, क्रोध आणि भ्रम आहेत. असुरांना नष्ट करण्यासाठी जो बाण वापरला, त्यात अग्नी आहे, जो यज्ञ आणि अनुष्ठाणात वापरल्या जाणार्या अग्नीचे प्रतिनिधीत्व करतो. भगवान शिवांनी जेव्हा असुरांचा वध केला तेव्हा पृथ्वी, वायु आणि आकाशामधून असुरी शक्ती नाश पावल्या असा त्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक दृष्टीने भगवान शिवांनी असुरी शक्तींचा नाश करुन जणू विश्वाचे शुध्दीकरण केले आहे. अर्थात तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी देवांना आणि ऋषी, मुनींना त्रास देण्याचे चुकीचे काम केले असले तरी ते सुरवातीला भगवान शिवांचे भक्त होते. त्यामुळे जेव्हा त्यांनी आपल्या चुकांसाठी पश्चाताप व्यक्त केला, तेव्हा शिवांनी त्याला क्षमा करुन आपल्या गणांत समावेश करुन घेतला आणि त्यांना चामराने वारा घालण्याच्या सेवेची जबाबदारी दिली.
कथेचा सांराश :- हि कथा आपल्याला जीवनातील चुकीच्या गोष्टी आणि त्यावर केली जाणारी मात याचे मार्गदर्शन करते. या कथेत सांगितलेली तीन पुरे म्हणजे मानवी इच्छेचे प्रतिक ज्यामुळे मनुष्य प्रगतीचे रस्ते शोधतो. मात्र जेव्हा या कामना, आकांक्षा पुर्ण होत नाहीत, तेव्हा तो क्रोधीत होतो. मात्र एखादी इच्छा पुर्ण झाली कि तो संतुष्ट न होता आणखी जास्त मिळावे यासाठी प्रयत्न करु लागतो. यातून लालच वाढत जाते. मिळालेल्या यशामुळे मानव अहंकारी होतो. त्याचबरोबर उपभोगाची आसक्ती वाढत जाते. वासना, क्रोध आणि लालसा या मानवी जीवनातील तीन मोठे दुर्गुण आहेत, जे त्या तीन असुर बंधूच्या स्वरुपात दाखवले आहेत. मात्र हे दुर्गुण सोडून मनुष्य धर्माच्या योग्य मार्गावर चालु लागतो, तेव्हा मिळणार्या ज्ञान किंवा प्रेमाच्या बाणाने या तिन्ही दुर्गुणांना नष्ट केले जाते. थोडक्यात आपण कोणता मार्ग स्विकारतो यावर काय होणार हे अवलंबून आहे. अर्थात या युध्दात जसा मयासुर वाचून पळून गेला आणि पुन्हा या तीन पुरांचे निमिती करतो. याचा अर्थ मानवाला सदैव सावध राहीले पाहीजे आणि आपल्या आयुष्यात पुन्हा मायेच्या रुपात येणारी ही तीन पुर म्हणजे वासना, क्रोध आणि लालसा यांच्यापासून दूर राहीले पाहीजे,.
त्रिपुरांतक मुर्तीचे शास्त्र :- त्रिपुरांतक मुर्तीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उजव्या हातात असलेला परशु आणि काळवीट दाखवले असते. जर या अवताराच्या शिल्पात भगवान शिवांना चार हात दाखवले असतील तर खालच्या हातात धनुष्य आणि बाण तर वरच्या हातात परशु आणि काळवीट दाखवले असते. शिवांनी मस्तकावर जटामुकुट धारण केलेला असतो. कपाळावर तिसरा डोळा तसेच कानात मकर कुंडले दाखवली असतात. त्यांनी लाल रंगाचे दागिने परिधान केलेले असतात. या रुपात शिवांनी राक्षसांच्या तीन शहरांचा म्हणजे पुरांचा नाश केला म्हणून याला त्रिपुरांतक शिव म्हणले जाते. आध्यात्मात हि तीन पुरे म्हणजे मनुष्याची तीन शहरे मानली जातात, यामध्ये स्थुल शरीर - बाह्य अवतार, सुक्ष्म शरीर- बौध्दीक कोष आणि कारण शरीर किंवा आत्मा. भगवान शिव या तिन्ही पुरांना नष्ट करतात म्हणजे मनुष्याला आवश्यक असणार्या तिन्ही घटकांना सर्वोच्च रुपात विलीन करुन घेतात. शिवशंकराचे हे पौरुष आणि वीरतेचे रुप असल्यामुळे कधी कधी त्यांच्या सोबर त्रिपुरसुंदरी हे स्त्री रुप दाखवले असते. चोल काळात सोमस्कंद, नटराज आणि चंद्रशेखर शिव यांच्या मोठ्या प्रमाणात कास्य शिल्पे निर्माण केली गेली,तसेच त्रिपुरांतक शिवाच्या मुर्ती ही निर्माण केल्या गेल्या.ज्यातील काही आजही वस्तु संग्रहालयात बघायला मिळतात. त्रिपुरांतक मूर्तींना त्रिपुरा-संहार-मूर्ती, त्रिपुरा-सुंदर, त्रिपुरा-विजय, पुरारी आणि इतर नावे आहेत.मुर्तीशास्त्राच्या ग्रंथांनुसार, मूर्तींना २,४,८ किंवा १० हात असू शकतात. काही ग्रंथांमध्ये आठ प्रकारच्या त्रिपुरांतक मूर्ती आहेत, त्यांच्यातील मुख्य फरक पायाच्या मुद्रा आणि हातांच्या मुद्रांमध्ये आहे. काही प्रकरणांमध्ये उजवा पाय घट्टपणे रोवलेला दाखवला असतो आणि डावा थोडा वाकलेला किंवा त्याउलट असु शकते. काहीं मुर्ती जमीनीवर तर काहींच्या पायाखाली पीठ दाखवले असते. प्रमुख हातात धनुष्यबाण धारण केलेले असतात, त्यांची स्थिती ग्रंथांमध्ये तपशीलवार दिली आहे. सामान्यत: धनुष्य धरणारा पुढचा डावा हात खांद्याच्या वर किंवा बगलेच्या पातळीवर किंवा छातीच्या पातळीवर असू शकतो. जेव्हा मुर्तीला चार हात असतात तेव्हा मागच्याच्या उजव्या हातात कुऱ्हाड आणि डाव्या हातात हरण असते. जेव्हा धनुष्य धरलेला हात खांद्याच्या वर असतो, तेव्हा तोल साधण्यासाठी हरण धरलेला मागचा हात खाली आणला जातो. बहुतेक ग्रंथांमध्ये काही वैशिष्ट्यांचा वारंवार उल्लेख केला आहे. त्रिपुरांतकाच्या रूपात असलेल्या शिवाने सदैव पत्नी गौरी उमासोबत रहावे. पायांपैकी, फक्त डावा पाय जमीनीवर ठेवावा. त्यांना प्रतीकात्मक तसेच खोल धार्मिक अर्थ आहे.
चोल काळातील १२ व्या शतकातील त्रिपुरांतक शिव मुर्ती, दारासुरम
तंजावर येथून मिळालेली दहाव्या शतकातील त्रिपुरंतक शिवाची कांस्य मुर्ती
चिदंबरमच्या नटराज मंदिरात, घोडे जुंपलेल्या रथावर पार्वतीसह उभ्या असलेल्या त्रिपुरांतकाच्या मुर्ती चारही गोपुरांवर दाखवल्या आहेत. या मुर्ती स्पष्टपणे त्रिपुरांतक शिवाच्या आहेत हे समजते. मात्र त्या सर्व गोपुराच्या दुसर्या मजल्यावर तशीच शिल्पे आहेत. इथे भगवान शिवांनी हातात धनुष्य बाण धारण केलेला आहे, मात्र सोबत पार्वती नाही. अर्थात गोपुरावर असलेल्या मुर्ती ओळखणे अवघड जात नाही, मात्र कस्य शिल्प असतील तर मात्र त्रिपुरांतक मुर्ती ओळखणे जाते. कारण मोठ्या आकाराची मुर्ती असेल तर ती बहुतेक वेळा रथारुढ असते, मात्र छोट्या आकाराची कास्य मुर्ती असेल तर ती एखाद्या पीठावर उभी असते तसेच बर्याचदा पार्वती सोबत असते आणि वेगळ्या पीठावर बसलेली दाखवलेली असते. वस्तुसंग्रहालयात हि शिल्पे मांडताना, ओळख पटवूनच त्याना नाव दिलेले असते, मात्र याच मुर्ती बाहेर मंदीरात किंवा इतरत्र असतील तर बर्याचदा त्यांना चुकीच्या नावाने ओळखले जाते.
या स्वरुपाच्या मुर्तीला कांस्य त्रिपुरा-सुंदर किंवा अधिक योग्य त्रिपुरा-विजय म्हणले जाते, याचा उल्लेख चोल राणी सेम्बियन महादेवीने तिच्या शिलालेखांमध्ये त्रिपुरांतकाऐवजी त्रिपुरा विजय असा केला आहे. त्रिपुरा-विजय कास्य मुर्तीत दोन किंवा चार हात दाखवले असतात. चार पेक्षा जास्त हात असलेली कोणतेही शिल्प अद्याप आढळलेली नाही. निरनिराळ्या मुर्तीत पायांची स्थिती वेगळी असते, परंतु जेव्हा मुर्ती जमीनीवर उभी असते तेव्हा फक्त डावा पाय खाली असतो, उजवा नाही. कोनेरीराजापुरम किंवा कोडुमुडी सारख्या ज्या मंदिरांमध्ये त्रिपुरा-विजय त्याच्या पत्नीसह आढळतो. तेथे सर्व त्रिपुरा-विजय कांस्यां मुर्तीमध्ये सोबतची पत्नी दाखवली आहे आणि जिथे सोबत त्रिपुर सुंदरी दिसत नाही तिथे ती मूळ अस्तित्वात होती, पण आता नष्ट झाली आहे.
बृहदीश्वर मंदिर, तंजावर येथील त्रिपुरांतक शिवाचे भित्तीचित्र
शिवाने भयंकर क्रोधाने तीन शहरे नष्ट केली, ज्याला साहित्यात अनेकदा संहार म्हटले जाते. त्याच्या शिल्पांमध्ये चेहऱ्यावरचा राग दिसायला हवा. भारताच्या नाट्यशास्त्रात चेहऱ्यावर व्यक्त होणाऱ्या उग्र भावनांना 'रौद्र दृष्टी' म्हणतात. या कठोर भावना दर्शवतात, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या , उग्र आणि लाल असाव्यात. भुवया उंचावल्या पाहिजेत. चित्रकलेतील त्रिपुरांतक म्हणून शिवाचे उत्कृष्ट चित्रण तंजावरच्या मंदिरातून आहे जेथे देवाला मोठ्या रागाने भुवया उंचावलेल्या, मोठे आणि बाहेर आलेले डोळ्याच्या बाहुल्या या स्वरुपात दाखवले आहे. या चित्रामधील चेहरा नाट्यशास्त्राशी सुसंगत आहे. हा राग आजवर दिसलेल्या एकाही कांस्य मुर्तीमध्ये दाखवता आला नाही. साराबाई कलेक्शन, तंजावरर आर्ट गॅलरी इत्यादी मधील प्रसिद्ध कास्य मुर्तीमध्ये स्पष्टपणे चेहर्यावर राग दाखवता आलेला नाही तर मुर्तीच्या चेहर्यावरील भाव काहीसे करुण वाटतात. ज्या मुर्तीच्या चेहर्यावर पुन्हा काही बदल केले गेले नाहीत त्या कांस्य शिल्पाचा विचार केला तर शिल्पकाराचा मूळ हेतू कळू शकतो. कांस्य मूर्ती मिरवणुकीत आशीर्वाद देण्यासाठी आणलेल्या देवतांच्या असल्याने, शिल्पकामासाठी निवडलेला क्षण हा त्रिपुराच्या विनाशानंतरचा आहे, जेव्हा शिवाने तीन पराभूत असुरांना वरदान दिले होते. म्हणून हे त्रिपुरा-विजय शिल्प आहे, ज्याचा उल्लेख सेम्बियन-महादेवीने योग्यरित्या केलेला आहे,
प्रत्येक दैवी घटना हि अनेक छोट्या, छोट्या प्रसंगाची मालिका असते, तेव्हा शिल्प कोरण्यासाठी नेमका कोणता प्रसंग निवडायचा याचा निर्णय शिल्पकार त्याच्या समजुतीनुसार घेत असतो. याच कारणाने कास्य मुर्ती घडवताना शिल्पकारांनी भगवान शिवाचे उग्र रुप न निवडता त्याने तीन असुर बंधुवर विजय मिळवला , तो क्षण निवडला, म्हणूनच या मुर्तींना त्रिपुरांतक न म्हणता त्रिपुर विजय म्हणले आहे. आतापर्यंत सापडलेल्या कांस्य मुर्तीतील सर्वात जुना त्रिपुरा-विजय शिल्प तंजावर जिल्ह्यातील कुलप्पाडूच्या मंदिरात पूजेसाठी ठेवण्यात आले आहे आणि हि मुर्ती आठव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. ही एक चतुर्भुज मूर्ती आहे ज्याचा डावा पाय जमीनीवर आहे. दुर्दैवाने त्याच्या डोळ्याच्या जवळचा भग्न झालेला आहे. या पल्लव काळातील कास्य मुर्तीमध्ये पुढच्या उजव्या हाताव्यतिरिक्त मागील दोन्ही हातांमध्ये बाण आहेत, ज्याचा उल्लेख ग्रंथात नाही. उत्कृष्ट कारागिरी असलेली दुसरी पल्लव कास्य मूर्ती साराबाईंच्या संग्रहातील आहे. हि मुर्ती कदाचित सर्वात उंच आहे आणि हीचे निर्माण इ.स. ८७५ मध्ये झाले आहे. अशा प्रकारे त्रिपुरा विजयाच्या मुर्ती पल्लव काळात केल्या गेल्या, त्यातीलच हि एक.चोल राजे हे त्रिपुरा-विजय रूपाचे मोठा भक्त होते. या स्वरूपातील बहुतेक सर्वोत्कृष्ट कलाकृती १० व्या ते १३ व्या शतकादरम्यान चोल काळात तयार केल्या गेल्या. कोनेरीराजापुरम येथे सेम्बियन महादेवी यांनी स्थापित केलेली मूर्ती निःसंशयपणे सर्वात मोहक आहे. चोल काळातील पुष्कळ कांस्य मूर्ती आता मंदिरे, संग्रहालये आणि खाजगी संग्रहात आहेत. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की १४ व्या शतकानंतर त्रिपुरा-विजय कास्य मुर्ती बनवण्याचे प्रमाण कमी झाले कारण नंतरच्या काळात फारशा मुर्ती सापडत नाहीत. हे बहुधा नटराजाच्या मूर्तींना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे असावे. त्रिपुरा-संहार ही संकल्पना नटराजाच्या संकल्पनेत विलीन झाली.
चोल काळातील नवव्या शतकातील त्रिपुरांतक शिव मुर्ती , राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली
ब्रह्मोत्सवम नावाचा मोठा वार्षिक उत्सव शिवाच्या सर्व मंदिरांमध्ये अनेक दिवस साजरा केला जातो जो सहसा नऊ दिवस चालतो. यामध्ये भगवान शिवाची एक किंवा अधिक रूपांत मिरवणुक काढली जातात. अघोर-शिवाचार्य-पद्धती या प्रभावशाली ग्रंथात असे म्हटले आहे की वार्षिक उत्सवाच्या सहाव्या दिवशी त्रिपुरांतका मुर्तीची मिरवणुक काढली पाहिजे. सर्व वार्षिक उत्सवांमध्ये कर उत्सव, रथयात्रा यांचा समावेश होतो. ग्रंथांमध्ये आम्हाला कारचे सविस्तर वर्णन, आमंत्रण आणि उपासना दिली आहे. मंदिराच्या रथात सर्व आगम आणि पुराणात वर्णन केलेल्या त्रिपुरासुरांच्या मुर्तीची स्थापना केली जाते. काहीवेळा रथात बसवलेला मुर्ती नटराजाची असते आणि ती एक प्रकारे शिवाच्या विजय नृत्याचे प्रतिनिधित्व करतो. प्राचीन काळापासून तामिळनाडूत साजरी केले जाणारे सण म्हणजे शिवाचे नृत्य आणि त्रिपुराचे दहन हे त्याच घटनेचा भाग आहेत. पूर्णानुरु आणि कालिटोकाई यांसारख्या संगम ग्रंथात या प्रकारांचा संदर्भ आहे. तीन शहरांचा नाश केल्यानंतर शिवाच्या नृत्याचे कवितेमध्ये सिलप्पाधिकारम् आकर्षक वर्णन करतात. या नृत्याला कोडुकोटी म्हणतात आणि शिवाने आपल्या रथाच्या आसनावर ते नृत्य केले होते.पार्वतीने ( जिचा उल्लेख भारती असा केला आहे ) देखील यावेळी शिवासोबत नृत्य केले आणि तिला पंडारंगा म्हणतात. तीन शहरांच्या विध्वंसाची कथेची लोकप्रियता तामिळनाडूमध्ये इ.स. पहिल्या शतकाच्या सुरुवातीपासूनची आहे.९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेल्या प्रसिद्ध कोडुंबलूर मुवरकोइलमध्ये शिव धनुष्य धरून उत्स्फुर्तपणे नाचत असल्याचे विलोभनीय दगडी शिल्प आहे. १३ व्या शतकाच्या अखेरीस नटराजाची लोकप्रियता वाढल्यामुळे नंतरच्या शतकांमध्ये त्रिपुर विजयाच्या कांस्य मूर्तींच्या निर्मितीत घट झाली असावी
त्रिपुरांतक मुर्तीच्या आकलनाबाबतीत असलेल्या समस्या :- त्रिपुरांतक कांस्य मुर्ती ओळखण्यासाठी पुरेशी साहित्य उपलब्ध असले तरी, त्या मुर्ती ओळखण्यासाठी अजूनही समस्या आहेत. जेथे त्रिपुरा-विजय प्रतिमेचा संदर्भ देणारे जुने शिलालेख आहेत आणि मंदिरात त्या काळातील कांस्य मुर्ती ( कोनेरीराजापुरममधील कास्य मुर्तीप्रमाणे ) आहे, तेथे या मुर्ती ओळखण्याबद्दल काही शंका नाही. मंदिराच्या परंपरा देखील मुर्ती ओळखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. साधारणपणे जिथे शिव आपल्या पत्नीसोबत धनुष्यबाणांसह दिसतो तिथे ओळखण्यास अडचण येत नाही. कळीचा मुद्दा म्हणजे समोरच्या डाव्या हाताने धनुष्य (सिंह-कर्ण मुद्रा) धारण केलेली मुद्रा जी मुर्ती ओळखण्यासाठी एक मुख्य संकेत आहे. मात्र एखादी मुर्तीमध्ये शिव त्याच्या पत्नीसोबत असताना गोंधळ उडतो, उदा. क्लीव्हलँड म्युझियममधील शिव मुर्ती हि प्रख्यात मुर्ती तज्ञ्ज क्रॅम्रिश यांनी चंद्रशेखर शिवाची मुर्ती म्हणून मानली आहे जी प्रत्यक्षात त्रिपुरांतक आहे.
त्रिपुरांतक की विणाधर ? :- त्रिपुरांतक कांस्य मुर्तीला बर्याचदा विनाधारा दक्षिणामूर्ती समजले जाते. मात्र मुर्ती नेमकी ओळखण्यासाठी मुख्य मुद्दा म्हणजे समोरच्या डाव्या हाताची हाताची मुद्रा महत्वाची ठरते. त्रिपुरांतक या मुर्तीत डाव्या हातात धनुष्य धरले असते. वाकलेली बोटे धनुष्याला उभ्या स्थितीत पकडतात आणि या आसनाला धनुर-मुष्टी (धनुष्य चालवणे) म्हणतात. तर विणाधर शिव मुर्तीच्या बाबतीत, डाव्या हाताने वीणा वाद्य छाती जवळ धरले असते आणि बोटे तार वाजवण्यासाठी वळवलेली असतात. यास्थितीत हाताची मुद्रा पंचेचाळीस अंशात तिरकी किंवा क्षितिज संमातर असते आणि तांत्रिकदृष्ट्या त्याला कटक-मुद्रा म्हणतात. जर अशा मुद्रा स्पष्टपणे ओळखल्या गेल्या तर मुर्तीची ओळख सहजपणे करता येते परंतु जिथे हाताची स्थिती जर या दोन्ही मुद्रेच्या मध्येच असेल तिथे गोंधळ उडतो.
त्रिपुरांतक की किरात? :-
किरात आणि त्रिपुरांतक कास्य मुर्तींच्या बाबतीतही असाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही मूर्तींमध्ये शिवाने डाव्या हातात धनुष्य धरले आहे. दोन्ही पुतळ्यांमधील हातांची मुद्रा सारखीच आहे, त्यामुळे कोणती मुर्ती आहे याची ओळख पटवणे अवघड जाते. अनेक चोल काळातील शिल्पांमध्ये आणि कांस्य मुर्तीमध्ये ( मेलाप्परमपल्लम मुर्ती ) किरात हा शिकारी म्हणून दाखवला आहे, त्याचे शरीर सुदृढ , दाढी आणि कानात कुंडले आहे.त्याचे केस त्रिपुरारी रूपात दिसणाऱ्या जटा-मकुटाऐवजी अंबाडासारख्या गाठीत बांधलेले असतील (याला उष्णीष म्हणतात ). मुर्ती ओळखण्यामध्ये जो गोंधळ होतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध तिरुवेत्कलम (चिदंबरम जवळ) मुर्ती, ज्याची ओळख किरात म्हणून केली जाते.
त्रिपुरांतक, बृहदीश्वर मंदिर, तंजावर
त्रिपुरांतक रूप, कांची कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
त्रिपुरांतक शिव, कांची कैलासनाथर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
आठव्या शतकातील पश्चिमी चालुक्यकालीन त्रिपुरांतक शिव, आयहोळ
१२-१३ व्या शतकातील त्रिपुरांतक शिव मुर्ती, मयिलादुथराई
हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपातील त्रिपुरांतक शिवाचे भित्ति चित्र
हंपीतील विरुपाक्ष मंदीरातील छतावरील भित्तीचित्रात त्रिपुरांतक शिवाचे चित्रण केले आहे. यामध्ये चतुर्भुज शिव दाखवले आहेत, त्यांनी उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे उचललेला दाखवला आहे. डाव्या हातात धनुष्य घेउन उजव्या हाताने बाण ताणला आहे. भगवान शिवांनी निळ्या रंगाचे धोतर आणि नरमुंडाची माळ् घातली आहे. मागच्या बाजुला नागिण दाखवली आहे, तसेच मागे वरच्या बाजुला एक किन्नर घंटा वाजवताना दाखविला आहे. चंद्र आणि सुर्य रथाची चाके दाखवली आहेत. तीन वर्तुळात तीन शहरे दाखवली आहेत्, यातील तीन वर्तुळात दोन राक्षस दाखवली आहेत तर एका वर्तुळात सोन्याचे शहर नष्ट झालेले दाखवले आहे. या कथेत अशी एक मान्यता आहे कि जेव्हा महादेवांसमवेत सगळे देवांचे सैन्य निघाले तेव्हा त्यांच्या वजनाने रथाचे चाक वाळुत फसले, ते भगवान शिवांनी बाहेर काढले. त्यासाठी विष्णुंनी एका वेलीचे रुप धारण केले असे चित्रात दाखवले आहे. जेव्हा रथ बाहेर आला तेव्हा विष्णू पुन्हा आपल्या मुळ जागी म्हणजे बाणात जाउन बसले. अर्थात शिवांनी त्या तिन्ही भावांना पुर्ण नष्ट केले नाही, त्याचे असे मत होते कि ते तिघेही अहंकार आणि भ्रम झाल्यामुळे चुकीच्या मार्गाला लागले. जेव्हा त्या तिन्ही शहरांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी बाण सोडला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्या तीन नगरांपैकी एकात मय राक्षस रहात होता, जो मात्र धर्माच्या वाटेवर चालत होता. या बाणामुळे तो देखील नष्ट होईल हे लक्षात आल्यावर शिवांना वाईट वाटले, शिव उदास पाहून नंदीने त्यांना त्याचे कारण विचारले. त्याचे कारण लक्षात आल्यावर नंदीने चटकम मयासुराला सावधान केले आणि त्या नगरातून पळून जाउन जीव वाचवण्याचा सल्ला दिला. हि तीन पुरे नष्ट केल्यावर भगवान शिवांनी आपल्या कपाळावर भस्माचे तीन पट्टे ओढले असे मानले जाते. हे तीन भस्म पट्टे शैव पंथाचे प्रतीक आहेत. या घटनेनंतर शिवशंकरांना त्रिपुरांतक हि उपाधी मिळाली.
या कथेत एक विशेष गोष्ट आपल्याला पहायला मिळते. यापुर्वी त्रिपुरासुराचा वध भगवान शिवांचा पुत्र कार्तिकेयाने केला तर त्रिपुरासुराच्या मुलांचा वध कार्तिकेयाच्या पित्याने म्हणजे शिवशंकरांनी केला. वडील आणि मुलांच्या एकमेकांच्या शत्रुत्वाचे हे अनोखे उदाहरण म्हणावे लागेल.
त्रिपुरांतकमूर्ती, कैलास मंदिर, वेरुळ
या कथेतील बारकावे शिल्पांत उतरवताना त्या प्रतिमेमागच्या आव्हानांची कल्पना आपल्याला येते. एखादे कथानक शिल्पबद्ध करताना अतिशय मर्यादित जागेत शिल्पांतील बारकावे दाखवावे लागतात. त्यामुळे अश्या मूर्तीमध्ये शिल्पकार त्याचे विशेष कौशल्य, त्याच्या कल्पकतेने मांडत असतो. अनेक शिल्पग्रंथांमध्ये अश्या मूर्तींच्या निर्माण विधीचाही उल्लेख येतो. वेरूळ येथील दशावतार लेणीतील त्रिपुरान्तक मूर्तीत सारथी साक्षात ब्रह्मदेव आणि घोडे रथ ओढताना शिल्पांकित केले आहेत. वेरूळच्या कैलास लेणीमध्ये त्रिपुरांतक शिवाचे अतिशय सुंदर शिल्प कोरलेले आहे. दक्षिण भारतामध्ये असे शिल्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध असले तरी, वेरूळच्या कैलास लेणीतील त्रिपुरांतक मूर्ती ही वेगवान हालचाल करीत असलेली, अचूक शरसंधान, रथाची गतिमानता या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून शिल्पकाराने हे शिल्प घडविले आहे. प्रस्तुत शिल्पात शिवाने दोन्ही पायात अंतर ठेवून रथावर उभे असून स्वतःचा तोल सांभाळीत असल्याचे सहज जाणवते. शिवाची उभी राहण्याची ढब, आकर्ण खेचलेली धनुष्याची दोरी, शिवाच्या हाती कोरलेले आयुधे सारे काही उत्कृष्टपणे कोरली आहेत. शरसंधान करीत असताना शिल्पात बाण दाखविलेला नाही. याचा अर्थ धनुष्यातून बाण निघालेला आहे. शिल्पातील घटनाक्रम पाहता बाणाने आपले काम अचूक केले असल्याचे जाणवते. धनुष्य ओढून नुकताच बाण सोडला आहे. ज्यामुळे तीन पैकी एक पूर उध्वस्त झाल्याचं शिल्पात दाखवताना धनुष्याच्या खाली आकाशातून एक व्यक्ती पडताना कोरलेला असून हा पहिला पूर, असुर किंवा किल्ला आहे. रथातील गतिमानता स्पष्ट करण्यासाठी घोडे आणि रथ हे काटकोनात असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात कोरून कलाकाराने हवे ते दृश्य साकार करण्यात यश मिळविले आहे.
बौद्ध धर्मातील मान्यतेनुसार, कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाचा एक शिष्य धम्म सेनापती सरीपुत्राचे परीनिर्वाण झाले होते. त्यामुळे बौद्ध उपासक आणि उपासिका अष्टशिलांचे पालन व उपवास तसेच बुध्द वंदना करतात. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते.कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात शिव गुडघ्यावर बसून वरच्या दिशेने त्याच्या धनुष्याची प्रत्येंचा ताणलेला शिल्पित केला आहे. याशिवाय मध्य भारतामधील एका शिल्पांत शिवाचा पाय एका वाकलेल्या पुरुषावर स्थित आहे. म्हैसूर येथील त्रिपुरान्तक शिव पंचमुखी, गंगा डोक्यावर धारण केलेला दाखवलेला आहे. तीन दुर्ग आणि त्यातले दैत्य स्पष्ट दिसतायेत. बाणावर विष्णूचे अंकन आहे. चंद्र-सूर्य चाके असलेल्या रथाला चार घोडे आहेत ज्यांचा लगाम ब्रह्मदेवाच्या हातात आहे. शिवाय विनायक म्हणून गणेशही आहे असे दिसते. नंदी रथाला आधार देतो आहे. शेषनागरूपी प्रत्येंचा ताणून धरली आहे. एकूणच संपूर्ण सृष्टी आणि सर्व देवता या त्रिपुरांचा विनाश करण्याच्या कार्यात रुद्र शिवाला सहाय्य करताना अंकित केले आहेत. रुद्र आणि दैत्य यांच्यातील युद्धाचा साक्षात्कार या शिल्पातून अनुभवता येतो. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा तो एक क्षण त्या शिल्पांमध्ये गोठवला आहे. शिवाचे रुद्र रूप, त्याची पुरांवर स्थिरावलेली एकाग्र नजर आणि त्यातून त्या शिल्पांत निर्माण झालेल्या एका प्रचंड नाट्याची कल्पना आपल्याला येते. एकूणच त्या त्रिपुरारीच्या अद्भुत शक्तीची अनुभूती या शिल्पातून साकार होते आणि स्वाभाविक भक्ताच्या मनात त्रिपुरान्तकाय नमः च्या लहरी उत्पन्न होतात.
पण कथा इथेच संपत नाही. खरं तर हे फक्त एक उदाहरण आहे. शेवटी ब्रह्मदेव स्वतःच इतर देवांना सांगतात. "राक्षसांनी लिंगाची पूजा करणे बंद केले आणि त्यांना शिक्षा झाली. विष्णू, मी आणि तुम्ही सर्वांनी पाशुपत व्रताचे पालन केले आणि लिंगाची पूजा केली आणि त्यामुळे आम्ही दुःखांपासून मुक्त झालो. सर्व प्राणिमात्रांनी पाशुपत व्रताचे पालन केले पाहिजे, लिंगाची पूजा केली पाहिजे आणि मुक्ती मिळवली पाहिजे." त्रिपुरांतक कथेचा मुख्य उद्देश पाशुपत पंथाची महानता आणि लिंगाच्या रूपात शिवाची पूजा करण्याचा प्रचार करणे हे आहे. लिंगमूर्तीची पूजा कशी करावी? याचे वर्णन ब्रह्माजींनीच शेवटी केले आहे. "पशुपत व्रत म्हणजे एखाद्याने आपले मन आणि कृती आणि विचारात (कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यांना शिस्त लावणे) शुद्ध केले पाहिजे. जी व्यक्ती आपल्या शरीरावर पवित्र भस्म लावते आणि मनाने पशुपतीशी एकरूप होण्यास तयार असेल तर त्याला पाशुपत योग म्हणतात. यामुळे भाविकांना रुद्राची प्राप्ती होईल, शिवाची उपासना करणे आणि शिव बनणे, हीच खरी उपासना.
त्रिपुरांतक मंदीरे :-
त्रिपुरांतक मुर्ती आणि मंदीरे भारतात काही ठिकाणी आहेत. चिंदबरमजवळ
तिरुवाटीकाईमध्ये असलेल्या वीरत्तेश्वर मंदीर. हे मंदीर आठ वीर स्थळामध्ये
गणले जाते. वीर स्थळामध्ये शिव वाईट शक्तीचे विनाशक मानले जातात. याशिवाय
चेन्नईजवळ तिरुविरकोलम इथेही त्रिपुरांतक मुर्ती आहे.
त्रिपुरांतक मंदीर , शिवमोगा :-
कर्नाटकातील शिवमोगा येथे इ.स. १०७० मधील पश्चिमी चालुक्य घराण्याचा राजा विष्णुवर्धन याने निर्माण केलेले त्रिपुरांतक मंदीर आहे. या काळात चालुक्य राजवट एन भरात होती. पश्चिमी चालुक्य हे घराणे शिवभक्त होते. त्यांनी भगवान शिवशंकरांची अनेक मंदीरे बांधली. त्यापैकी एक म्हणजे त्रिपुरांतक मंदीर.
शिवमोगा येथील त्रिपुरांतक मंदीरातील शिव मुर्ती
या मंदीराच्या प्रवेशद्वारावरच विष्णु आणि ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. हे पुर्ण मंदीर पश्चिमी चालुक्य शैलीत बनवले गेले आहे. या शैलीचा प्रभाव मंदीराच्या आतील आणि बाह्यभागावर स्पष्ट दिसतो. मुख्य मंदीराच्या समोर आणखी दोन उप मंदीर बांधली आहेत. मंदीराच्या मंडोवरावर कामशिल्प आहेत, जे चालुक्य शैलीचे वैशिष्ट्य आहे. मंदीराच्या खिडक्या किंवा जाल वातायने विशेष लक्षवेधी आहेत. याचे कोरीवकाम अत्यंत नाजुक पध्दतीने केलेले आहे. मंदीरतील कोरीव स्तंभ, द्दरवाज्याच्या चौकटी या हळेबिडू आणि बेलुर येथील मंदीराची आठवण करुन देतात. मंदीरावर मोठ्या प्रमाणात शिल्पपट आहेत. त्यात नागशिल्प विशेष लक्षवेधी आहेत.
नाजुक कलाकुसर केलेले त्रिपुरांतक मंदीराची जालवातायने ( खिडक्या )
मंदीराच्या दरवाज्यावर कोरलेल्या द्वारपालांच्या मुर्ती या मंदीराच्या मुख्य देवतेच्या रक्षक असतात, असे मानले जातात. मंदीराच्या प्रवेशद्वारावरच शिव आणि गजासुरवधाच्या अनेक मुर्ती दिसून येतात. उजवीकडे ब्रम्हदेव, गणेश आणि कार्तिकेयाच्या मुर्ती आहेत. होयसाळ वंंशाशी संबधीत खुप मुर्ती येथे पहायला मिळतात. उत्तम उदाहरण म्हणजे होयसाळ राजाने सिंहाची केलेली शिकार. याच शिकारीचे वर्णन करणारे अनेक शिलालेख मंदीराच्या परिसरात बघायला मिळतात.
मस्य संहारक मुर्ती :- भगवान शिवांचे हे एक अगळे रुप मानायला हवे. या अवतारात भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मस्त्य अवताराला शांत करण्यासाठी शिवाने हा मस्त्य संहारक अवतार धारण केला. प्राचीन काळी सोमुगासुर नावाचा राक्षस तपश्चर्या करत होता. त्याला ताकदवान होण्यासाठी भगवान शिवांकडून वरदान हवे होते. तिन्ही लोकांमध्ये कोणाकडूनही मृत्यु न होण्याचे वरदान सोमुगासुराका भगवान शंकराकडून मिळाले. आता आपण अवध्य झालो या कल्पनेने त्याला अहंकार निर्माण झाला आणि तो ब्रह्मदेवाच्या जवळ गेला आणि त्यांच्याकडून चारही वेद हिसकावून समुद्रात गायब झाला. यामुळे ब्रह्मदेवाना चिंता निर्माण झाली आणि यातून मार्ग काढण्यासाठी ते भगवान विष्णुंकडे म्हणजे तिरुमल (विष्णू) यांच्याकडे जाउन झाला प्रकार सांगितला. सोमुगासुराचा वध करुन पुन्हा वेद प्राप्त करण्यासाठी तिरुमलनी एका मोठ्या माशाचे रूप धारण केले. मस्त्य रुपात खोल समुद्राच्या आत गेले आणि सोमुगासुराच्या शोधात समुद्रमंथन केले. मग समुद्रात लपलेल्या असुरांला शोधून काढले आणि त्याच्याशी युध्द करून त्याला ठार मारला. विष्णूंनी त्याने ब्रम्हदेवांकडून हिसकावलेले सर्व वेद त्याच्याकडून परत घेतले आणि ब्रह्मदेवाना परत दिले. मात्र सोमुगासुरांच्या शरीरातून बाहेर पडलेल्या रक्ताने संपूर्ण समुद्र लाल झाला. विष्णुंचे अवतार घेण्याचे कार्य संपल्यावर त्यांनी मत्स्यावतार संपवणे अपेक्षित होते. मात्र सोमुगासुर वधानंतर ही एखाद्या पर्वताच्या आकाराच्या मस्त्याने आपले शरीर समुद्राच्या चारही बाजूंनी पसरून समुद्रातच पोहत राहिला. त्याने समुद्रात उरलेले सर्व मासे नष्ट करून मारले. त्याने समुद्रात राहणारा एकही प्राणी सोडला नाही. यामुळे त्रिलोकात खळबळ उडाली आणि ही बातमी भगवान शंकराच्या कानावर पोहोचली. भगवान शिवांनी यावर उपाय म्हणुन मच्छिमाराचे रूप धारण केले आणि मासेमारीचे जाळे घेऊन समुद्रात गेले. त्यानीही त्या मोठ्या माशासारखा मोठा आकार घेतला. मासेमारीचे जाळे समुद्रात टाकून त्यांनी तो मोठा मासा पकडला. मग त्यांनी त्याचा डोळा उपटून आपल्या अंगठीत बसवला. डोळे गमावल्यानंतर, मोठ्या माशाचे रूप धारण करणाऱ्या तिरुमलांनी भगवान शिवांना त्याचे मूळ रूप परत देण्याची विनंती केली .मोठ्या माशांचे रुप धारण करणार्या भगवान विष्णुंच्या विनंतीवरून भगवान शिवानी मच्छ संहारमूर्तीचे रूप घेतले आणि विष्णुंना त्यांचे मुळ रुप परत दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला. कांचीपुरम येथील मंदिरात या मूर्तीची पूजा केली जाते. तेथील एका खांबावर हे रूप कोरले आहे. शिवांच्या या रुपाची पुजा बेलाच्या पानांने केली जाते, नैवेद्य म्हणून चिंच- भात (पुलियोदराई) अर्पण केला जातो. दर मंगळवारी तिळाच्या तेलाने दिवा लावला जातो. या रुपाची आराधना केल्यामुळे व्यवसायात अधिक सुधारणा होते आणि नवीन उपक्रम सुरू करताना फायदा होतो.
या कथेचे आणखी एक रुप म्हणजे मत्स्यावतारात भगवान विष्णूनी कार्य संपल्यावर भुलोक हा मृत्युलोक असल्यामुळे मत्स्य अवताराचा शेवट करणे आवश्यक असताना अवतार न संपवल्याने या अवताराचा शेवट करण्यासाठी मत्स्य संहारक अवतार धारण करण्याचे ठरवले. माशाचा नाश करायचा तर त्याचा शत्रु म्हणून बगळ्याचा रुप घेतले आणि चोचीत मत्स्य अवतार धारण केलेल्या विष्णूंना पकडले आणि त्यावर विष्णुंना आपली चुक समजली आणि त्यांनी भगवान शिवांची स्तुती केली. हेच रुप वरील शिल्पात कोरले आहे. इथे एक देव दुसऱ्या देवाला शांत करण्यासाठी आवश्यक ते रुप घेतो आहे, ही कल्पना फारच थक्क करणारी आहे. असाच प्रसंग रामायणात बघायला मिळते. रामायणात असा प्रसंग आहे की सीतास्वयंवर प्रसंगी श्रीरामांनी शिवाचे धनुष्य तोडले होते म्हणुन परशुराम रागावले होते आणि रामाचा सामना करण्यासाठी विवाहस्थळी आले होते, मात्र नंतर त्यांना श्रीरामांनी स्वतः शांत केले होते, विशेष म्हणजे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. दुसऱ्या कथेत, माँ कालीने असुराचा वध केल्यावर कोपिष्ट झाली होती, तीला शांत करण्यासाठी भगवान शिव तिच्यासमोर एखाद्या शवासारखे झोपून राहीले. दोन्ही कथांमध्ये, जरी दोन वेगळे अवतार असले तरी हि दोन्ही रुपे एकाच देवाचे अस्तित्वाचे मूर्त स्वरूप आहे असे दिसते (राम आणि परशुराम एकच आहेत, कारण ते एकाच देवाचे म्हणजे विष्णूचे अवतार आहेत, किंवा शिव आणि शक्ती एकच परमेश्वराची रुपे आहेत ). अर्थात या कथेत समस्या ही आहे की यामध्ये दोन वेगळ्या देवांचा आणि पर्यायाने पंथीयांचा संदर्भ आहे तो म्हणजे हर आणि हरी म्हणजेच शैव आणि वैष्णव आणि इथे असा प्रश्न पडतो की, "हे शैव आणि वैष्णव यांच्यातील आंतर-पंथीय वादापैकी एक आहे का?" याचे उत्तर हो किंवा नाही असे असेलही. परंतु, जर आपण "शिवस्य हृदयम् विष्णुहु, विष्णोर हृदयम् शिवा" या तत्वाचा किंवा "त्वं ब्रह्म त्वम् विष्णु त्वम् रुद्र त्वम् प्रजापतिही" या तत्वाचा विचार केला तर दोन्ही विधानांचा अर्थ असा होतो की, आपण एकाच देवा देवाची अनेक रुपे पहात आहोत. अशीच कथा भगवान विष्णुंच्या नरसिंह अवतारासंदर्भात येते. जेव्हा नरसिंहाने हिरण्यकश्यपुचा वध केल्यावर संतापाने नरसिंह अनावर झाला आणि तिन्ही लोक त्यामुळे भयभीत झाले. कोणीतरी नरसिंहाला आवरणे आवश्यक होते. नरसिंह कसे शांत झाले याच्या काही शक्यता सांगितल्या जातात. १) हिरण्यकश्यपुच्या वधानंतर प्रल्हादाची विनंती ऐकून नरसिंह स्वतःहून शांत झाला. २) नरसिंहाला भगवान शिवांनी निर्माण केलेल्या शरभाने शांत केले. ३) नरसिंहाला शरभाने निर्माण केलेल्या प्रत्यांगिरा देवीने शांत केले. वरील तीन शक्यतेपैकी पहिल्या शक्यतेमध्ये भगवान विष्णुंनी स्वतःच स्वतःला शांत केले आहे. दुसर्या आणि तिसर्या शक्यतेमध्ये मात्र इतर शक्तीने विष्णुंना शांत केले असे सांगितले आहे. इथे प्रश्न असा निर्माण होतो कि विष्णुना शांत होण्यासाठी शिवांची का आवश्यकता पडली ? कारण इतर अवतारात विष्णुंनी आपले पृथ्वीवरचे कार्य संपल्यावर स्वतःच आपला अवतार संपवलेला दिसतो. अर्थात या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे.
कुर्म संहारक मुर्ती :-
एकेकाळी देव आणि दानव यांचे एकमेकांशी सतत युध्द होत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंचे नुकसान झाले आणि बरीच जीवितहानी झाली आहे. म्हणून देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना सुचवले की क्षीरसागराचे मंथन करून जे अमृत बाहेर पडेल त्याचे प्राशन करुन ते दीर्घायुषी होऊ शकतात. भगवान ब्रह्मदेवाने हे महाविष्णूंना सांगितले आणि त्यांच्या मदतीने क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले. मात्र सागराचे मंथन करण्यासाठी वापरलेला मंदार पर्वत स्थिर न राहू शकल्याने अतिशय जोराने हलू लागला. म्हणून भगवान विष्णु पर्वताच्या तळाशी गेले, आणि त्यांनी कासवाचे रूप धारण केले आणि पर्वताला तोलून धरले.त्यामुळे समुद्र मंथन करणे शक्य झाले. मंथनाच्या सुरवातीलाच क्षीरसागरातून हलाहल विष बाहेर पडले आणि भगवान शिवांनी ते विष प्राशन केले. इथपर्यंतची ही कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. हलाहल विषाच्या उत्पत्तीचे कारण म्हणजे या मंथानाच्या वेळी भगवान शंकराची उपेक्षा करणे आणि त्यांची पूजा न करणे. म्हणून सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली. आता महाविष्णूनी पुन्हा एकदा कुर्म म्हणजे कासवाच्या रुपात पर्वत तोलून धरला. क्षीरसागरातून अनेक दुर्मिळ वस्तू बाहेर आल्या. सरते शेवटी जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा अमृताचा कुंभ ताब्यात घेण्यावरुन देव आणि दानवात वाद सुरु झाला.मग विष्णुंनी मोहिनी नावाच्या मोहक स्त्रीचे रूप धारण केले आणि राक्षसांना फसवून ते अमृत फक्त देवांना दिले. मात्र हि फसवणुक दोन राक्षसांनी समजली,त्यांनी देवांचे रूप धारण केले आणि अमृत प्याले. या दोन राक्षसांचे हे कृत्य पाहणाऱ्या सूर्य आणि चंद्राने ही बाब विष्णुंना कळवली. रागावलेल्या विष्णूंनी त्यांच्या हातात असलेल्या खडगाच्या सहाय्याने या दोन्ही राक्षसांचे म्हणजे राहु व केतुचे दोन तुकडे केले.मात्र राहु, केतु यांनी जे अमृत प्यायले त्यामुळे ते मरण पावले नाहीत. या दोघांनी शिवपूजा केली आणि राहू आणि केतु हे ग्रह म्हणून अमर झाले. आजपर्यंत ते त्यांचे शत्रू असलेल्या सूर्य आणि चंद्राला त्रास देत आहेत. मात्र हे मंथन संपले आणि कासवाच्या रूपात मंदार पर्वताला धारण करुन उभे राहिलेल्या विष्णुंनी सर्व सात समुद्र एकत्र केले आणि या सात महासागरांच्या पाण्याच्या प्रवाहाने जगाला हलवून सोडले. मग कुर्म अवताराने समुद्रात सापडलेल्या सर्व सजीवांना खाल्ले. तरीही त्याची भूक संपली नाही. त्यामुळे ते समुद्राचे पाणी प्यायले. यामुळे सूर्य आणि चंद्र घाबरले आणि त्यांनी महासागरात अदृश्य होण्यास नकार दिला आणि स्वतःला कोठेतरी लपवले. संपूर्ण जग अंधकारमय झाले. या अपरीस्थितीतून वाचण्यासाठी देवांसह संपूर्ण मानवजातीने भगवान शिवाजवळ जाऊन त्यांचे संरक्षण मागितले. त्यांना कुर्म अवतार संपवण्यास सांगितले. तत्काळ भगवान शिवाने आपल्या त्रिशूळाच्या साहाय्याने त्याचे शरीर फाडले आणि त्यातून संपूर्ण मांस बाहेर काढले. त्यांनी विष्णुच्या इच्छेनुसार (कुर्म अवताराला ) गळ्यातील (भगवान ब्रह्मदेवाच्या मस्तकापासून बनविलेल्या ) माळेत मध्यभागी कवच रत्न म्हणून घातले. या सर्व घटनेमुळे विष्णुंना वाईट वाटले आणि त्याने भगवान शिवाची क्षमा मागितली. कासवाचा वध केल्याने भगवान शिवाला कूर्म संहारमूर्ती हे नाव पडले.
चेन्नईतील पॅरी भागात असलेल्या कच्छलीश्वर मंदिरात या घटनेचे चित्र रंगवले आहे. त्या मंदिरात अनेक शिवमूर्तींची चित्रे पाहायला मिळतात. दर सोमवारी इथे बिल्व अर्चना आणि सरकाराय पोंगल नैवेद्यम् अर्पण केले जातात.जर अश्या प्रकारे पुजा एखाद्या व्यक्तीने केली तर त्याला पाण्याने कोणताही धोका रहात नाही किंवा आयुष्यातील संकट आणि भीती दूर होते असे मानले जाते. तसेच एखाद्या जोडप्याने हि आराधना केल्यास ते सदैव एकत्र राहतील अशी मान्यता आहे.
वराह संहार मूर्ति: - प्राचीन काळी हिरण्यक्षण नावाचा राक्षस ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्याला मागितलेले सर्व वरदान दिले. मात्र त्यामुळे उन्मत्त होउन हिरण्याक्षाने पृथ्वी ताब्यात घेतली आणि तो समुद्रात अदृष्य झाला. यामुळे सर्वत्र हाहाकार पसरला. सर्व देव चिंतीत झाले. ते सर्व तिरुमल (विष्णू) यांच्याकडे गेले आणि त्यांना यापरिस्थितीत मार्ग काढण्याचे आवाहन केले. सर्वांच्या आग्रहाने भगवान विष्णुनी हिरण्याक्षापासून पृथ्वी मुक्त करण्याचे ठरवले आणि गरुडावर स्वार होउन त्यांनी वैकुंठातून प्रस्थान केले. वैकुंठ ओलांडल्यानंतर त्यानी वराहाचे (डुकराचे) रूप धारण केले. वराहाची उंची मेरु पर्वता पेक्षा जास्त होती, त्याच्या प्रत्येक चार पायांमधील अंतर कित्येक योजना होते, शेपटीची हालचाल अशी होती कि ती आठही दिशांना स्पर्श करत होती आणि त्याने श्वास सोडलेल्या उच्छ्वासाने संपूर्ण विश्व उष्ण होत होते. असे भयंकर रुप धारण करुन त्यांनी समुद्राला घुसळून हिरण्याक्ष राक्षस कोठे लपला आहे ते शोधले. वरहरुपी विष्णूंनी हिरण्याक्षाला आपल्या सुळ्यांनी ठार केले आणि पृत्वीला आपल्या सुळ्यावर धारण करुन पुन्हा तीच्या कक्षेत प्रस्थापित केले. तिन्ही लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र वराह अवताराचे कार्य संपले तरी विष्णुंनी वराह देह सोडला नाही. त्यातच राक्षसाला ठार मारताना जी उत्तेजना निर्माण झाली होती, त्यामुळे वराह बेभान झाला. त्याने वाटेत आलेल्या सर्व प्राण्यांना मारले. त्याचा छळ वाढतच चालला आणि असह्य होत गेल्याने, देवांनी भगवान शिवाजवळ जाऊन प्रार्थना केली आणि त्याला वराहापासून मुक्ती देण्याचे आवाहन केले. त्यांचे दुःख दूर करण्याचे मान्य करून, भगवान शिवानी शिकार्याचे रूप धारण केले आणि आपल्या त्रिशूळाने वराहावर वार केला. त्यानी त्याचा सुळा तोडला आणि आपल्या माळेत रत्न म्हणून घातला. या कृत्यामुळे वराह्मचा अहंकार नाहीसा झाला आणि त्याने भगवान शिवाची क्षमा मागितली. त्याच्या दोन सुळ्यापैकी एक सुळा तुटलेला होता. नंतर भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्यांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त झाले आणि वराह पुराणाचे कथन करून ते वैकुंठाला पोहोचले. देवांचे दुख दूर करण्यासाठी, वराह्माचा वध करण्यासाठी भगवान शिवाने घेतलेल्या अवताराला वराह संहार मूर्ति म्हणतात. या मुर्ती काशीमध्ये आणि तामिळनाडूमधील पज्जमलाई मंदिरात बघता येतात. या मुर्तींना बुधवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावून आणि नैवेद्य म्हणून स्वत्व तांदूळ अर्पण केल्याने व्यवसायात भरभराट होते अशी समजुत आहे.
कांचीपुरमच्या कांची-कामाक्षी मंदिरातील एका खांबावरील दक्षिणामुर्ती शिवांची शिल्पमुद्रेचा फोटो काढला होता तो सादर.
दक्षिण
भारतात शिवाच्या रुपात ते विविध कला व ज्ञानाचे गुरू मानले जातात. त्यांचे
तोंड दक्षिण (यम) दिशेला असून वडाच्या झाडाखाली ते एक पाय मांडीवर घेऊन
आसनस्थ आहेत. त्यांच्या सोबत अनेक विषयाचे विचारक व साधक ज्ञान
प्राप्तीसाठी दाटीने मिळेल त्या दगडाधोंड्यांवर बसून विचारविनिमय करताना
दिसतात. कधी कधी नंदी बाजूला ते निरखनाता दिसतो. उजव्यापायांच्या खाली एका
बुटक्या अपस्मार नावाच्या दैत्याला शिवांनी त्याने अज्ञान, संशय व
दुर्मतीला पायाने दाबून धरलेले आहे असे मानले जाते. या रूपात शिव चार
हाताचे असून एका मागच्या हातात धगधगता अग्नी वा मशाल तर दुसऱ्या हाती
जपमाला तर कधी ताडपत्रांची चवड, धरलेली दिसते. काही ठिकाणी ते वीणावादन
करताना किंवा वीणा बाजून ठेवलेली असे दिसतात. उजवा हात इथे त्यांनी आपल्या
हृदयाला उजव्या बाजूला असल्याचा संकेत करताना दिसतो.
या
चित्रात उजवा खालचा हात कर्तरिमुद्रेत तर डावा वरदमुद्रेत दिसतो. कर्तरी
मुद्रा ज्ञान मुद्रेसमान असावी. पैकी तीन उघडलेली बोटे गर्व, दुष्कृत्य व
स्वतः बद्दलची भ्रामक वा आभासी समजूत यांच्यापासून दूर अंगठा म्हणजे
शिवतत्व आणि तर्जनी म्हणजे जीव तत्व यांचे एकत्र येणे असे मानले जाते.
श्री शिव मंदिरातील मुख्य विभाग
शिव मंदिरांबद्दल माहितीस्वरूप मराठी भाषेतील लेखमालेतील मागच्या अंकामध्ये आपण मंदिरांचं दर्शन घेण्याचं महत्व काय ह्यावर विचार केला. आता ह्या अंकामध्ये आपण श्री शिव मंदिरातील मुख्य विभागांबद्दल माहिती करून घेऊया.
राजगोपुर, गोपुर आणि विमान:
शिव मंदिरातील सर्वात पहिला विभाग म्हणजे अर्थातच प्रवेशद्वार. काही मंदिरांना चार प्रवेशद्वारं असतात तर काहींना दोन तर काहींना एक. पण ह्या सगळ्यांमध्ये जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्यावर असलेल्या शिखराला राजगोपुर असं म्हणतात. राजगोपुर हे साधारणतः तीन, पांच, सात किंवा अगदी तेरा स्तरांचे पण असतात. मुख्य प्रवेशद्वार सोडून बाकीच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या शिखरांना गोपुर असं म्हणतात. ही गोपुरं पण तीन किंवा पांच स्तरांची असतात. राजगोपुर आणि गोपुर ह्यांच्या प्रत्येक स्तरावर विविध देवांच्या मुर्त्या असतात. प्रत्येक गोपुराच्या वरती अजून एक शिखर असतं आणि त्यावर एक किंवा तीन किंवा पांच किंवा सात कळस असतात. सहसा शिव मंदिरांच्या प्रवेशद्वारावर द्वारपालक किंवा श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या असतात.
गाभाऱ्याच्या वरती जे शिखर असतं त्याला विमान म्हणतात.
ध्वजस्तंभ:
प्रवेशद्वारातून आत मध्ये गेलं कि दुसरा विभाग म्हणजे ध्वजस्तंभ. दक्षिण भारतातल्या मंदिरांमध्ये प्रत्यक्ष देवांच्या मूर्त्यांना नमस्कार करण्याचा अधिकार कोणाला नसतो. नमस्कार करण्यासाठी ध्वजस्तंभ असतो. जर मंदिराची दिशा पूर्व-पश्चिम अशी असेल तर ध्वजस्तंभाला उत्तरेकडे मुख करून नमस्कार करावा, आणि जर मंदिराची दिशा उत्तर-दक्षिण असेल तर पूर्वेकडे मुख करून नमस्कार करावा. स्त्रियांनी आपले हात, गुढगे आणि डोकं जमिनीला टेकवून नमस्कार करावा. पुरुषांनी साष्टांग नमस्कार घालायचा असतो. काही मंदिरांमध्ये नमस्कार करण्याच्या जागा चिन्हांकित केलेल्या (आखलेल्या) दिसतात ज्यामुळे नमस्कार करण्याची जागा शोधणं सोपं होतं.
ध्वजस्तंभाचं अजून एक महत्व म्हणजे कुठल्याही उत्सवाची सुरुवात ध्वजारोहण करून होते आणि उत्सवाच्या शेवटी ध्वजाचे अवरोहण केले जाते.
सहसा ध्वजस्तंभाच्या खाली श्री गणेशांची मुर्ती दिसते. ह्या मूर्तीला श्री ध्वजस्तंभ गणेश असं म्हणतात.
बलीपीठ:
ध्वजस्तंभाच्या बाजूला सहसा बलीपीठ असतं. बलीपीठ म्हणजे जिथे बळी देतात ती जागा. पण इथे बळीचा अर्थ आहे आपल्या काम आणि क्रोधाचा बळी. म्हणजे मंदिरामध्ये मुख्य देवांचं दर्शन घेण्याआधी आपले चित्त शुद्ध करून मग दर्शन घ्यावं असा अर्थ आहे. म्हणून दर्शन घेण्याआधी बलीपीठाला नमस्कार करून त्याला काही अर्पण करावं. बलीपिठाला मीठ (कामाचं प्रतीक) आणि काळी मिरी (क्रोधाचं प्रतीक) हे अर्पण करण्याची प्रथा आहे.
परिक्रमा किंवा प्रकारं:
प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गाला परिक्रमा किंवा प्रकार असं पण म्हणतात. प्रदक्षिणा घालताना आपल्याला कोष्ठ मूर्तींचं दर्शन होतं. शिवलिंगाच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर बाहेरील बाजूवर ज्या मुर्त्या असतात त्यांना कोष्ठ मूर्ती म्हणतात. गाभाऱ्याच्या दक्षिणेला सहसा दक्षिणे कडे मुख असणारी श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती असते. पाठच्या बाजूला श्री ब्रम्हा, श्री विष्णू आणि श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या किंवा छोटी देवळं असतात. उजव्या बाजूच्या भिंतीवर श्री चंडिकेश्वर व श्री दुर्गा देवी ह्यांची छोटी देवळं असतात. ह्याशिवाय श्री अर्धनारीश्वर, श्री नर्तन गणपती ह्यांच्या मुर्त्या असतात.
अर्थमंडप, महामंडप आणि नंदीमंडप:
राजगोपुर आणि मंदिराची प्रथम परिक्रमा ह्यांच्यामधला जो भाग असतो त्याला अर्थमंडप असं म्हणतात. प्रथम परिक्रमा आणि गाभारा ह्यांमधला जो भाग असतो त्याला महामंडप म्हणतात. कधी कधी महामंडप आणि गाभारा ह्यांमध्ये नंदीचा स्वतंत्र मंडप असला तर त्याला नंदीमंडप असं म्हणतात.
गाभारा:
गाभारा म्हणजेच कोष्ठ. गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या मुख्य देवतेची मूर्ती असते. म्हणजेच शिव मंदिरामधल्या गाभाऱ्यात शिव लिंग असतं. गाभारा म्हणजेच मंदिराचं मुख्य स्थान. इंग्लिश मध्ये ह्याला सॅन्क्टम सँक्टोरं (Sanctum Sanctorum) म्हणतात. म्हणून त्याचं पावित्र्य राखण्यासाठी तिथे पुजाऱ्यांशिवाय बाकीच्यांना प्रवेश निषिद्ध असतो.
कोष्ठ मूर्ती:
गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर किंवा भिंतींच्या बाजूला ज्या मुर्त्या किंवा छोटी देवळे असतात त्यांना कोष्ठ मूर्ती म्हणतात. आणि ह्या सर्व देवतांना परिवार देवतां म्हणतात. म्हणजे भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचा परिवार.
उत्सव मूर्ती:
सहसा मंदिरातील उत्सवांमध्ये मंदिराभोवतीच्या चार रस्त्यांवरून रथयात्रा आयोजित होतात. ह्या रथयात्रांमध्ये ज्या मुर्त्या रथामध्ये किंवा पालखीमध्ये ठेवल्या जातात त्यांना उत्सव मूर्ती म्हणतात. ह्या उत्सव मूर्ती पंचधातूच्या असतात. मुख्य मूर्तीच्या तुलनेमध्ये ह्या मुर्त्या छोट्या असतात.
मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये पण छोट्या उत्सव मुर्त्या असतात. सहसा वारंवार होणाऱ्या अभिषेकासाठी उत्सव मुर्त्या वापरतात. मुख्य मूर्त्यांवर सहसा पुजा, अर्चना आणि अलंकार केले जातात.
शयनगृह:
काही मंदिरांमध्ये शयनगृह असतं जिथे देव शयन करतात असा समज असतो.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग १
मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या मुख्य मुर्त्यांची माहिती करून घेतली. आता या अंकापासून आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्यांची माहिती करून घेऊया. या अंकामध्ये श्री रुद्र आणि एकादश रुद्र ह्यांची माहिती करून घेऊया.
श्री रुद्र
हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये दोन महत्वपूर्ण काळ नजरेस येतात आणि ते म्हणजे वैदिक काळ आणि पौराणिक काळ. देवांची प्रतीके किंवा देव मानण्याच्या समजुतींमध्ये ह्या दोन काळांमध्ये फरक दिसतो. वैदिक काळामध्ये निसर्गाचे घटक आणि नैसर्गिक भावना ह्यांच्याशी देवांची प्रतीके आणि समजुती निगडित होत्या. उदाहरणार्थ रुद्र ही वैदिक काळातील देवता आहे. रुद्र मध्ये रु म्हणजे भीती उत्पन्न करणारा आणि द्र म्हणजे खूप मोठा, प्रचंड शक्ती असलेला असा अर्थ होतो.
निसर्ग हा क्रमबद्ध आहे. निसर्गातल्या प्रत्येक क्रियेला एक क्रम आहे. ज्याला धर्म असं म्हणतात. म्हणजेच निसर्ग आपला धर्म व्यवस्थित पाळतो. उदाहरणार्थ मानवीशरीरामध्ये पचनक्रियेची एक क्रमबद्धता आहे. शरीराला तुम्ही काहीही खायला द्या पण पचन संस्था हि आपल्या धर्माप्रमाणे क्रमबद्ध कार्य करून ते अन्न पचवते आणि त्यातील प्रथिने शरीराच्या विविध भागांमध्ये पोचविण्याचे काम करते. पचनसंस्था हे बघत नाही की अन्न योग्य आहे का अयोग्य. त्या पचनसंस्थेला काय योग्य आणि अयोग्य पुरवावं हे ठरवणे मानवाचं काम आहे. त्याने अयोग्य अन्न पचनसंस्थेला दिलं तर त्याचं फळ पण अयोग्यच मिळणार. तसेच पर्जन्य योग्य प्रमाणात पडावा म्हणून त्यासाठी पोषक स्थिती निर्माण होण्यामध्ये एक क्रमबद्धता आहे. नैसर्गिक प्रक्रिया मधून आपल्याला अनुकूलता प्राप्त करायची असेल तर आपल्याला तशी कर्मे करायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपल्या शरीरामध्ये संतुलन राखायचं असेल तर आपण पचनसंस्थेला योग्य अन्न देणं अपेक्षित आहे. तसेच आपल्याला पर्जन्याची अनुकूलता मिळविण्यास म्हणजेच तो योग्य प्रमाणात पडावा अशी इच्छा असल्यास आपल्याला योग्य प्रमाणात झाडे लावणे आवश्यक आहे. पण जेव्हा मानव अनैसर्गिक किंवा अधर्मी कर्मे करतो तेव्हा त्यांचा परिणाम म्हणून निसर्ग प्रतिकूल फळे देतो. उदाहरणार्थ पर्जन्य अयोग्य प्रमाणात घडून वादळ, चक्रीवादळ, तुफान निर्माण होतात किंवा आरोग्यमय आहाराचं असंतुलन घडून महामारी सारख्या घटना निर्माण होऊन जीवन विस्कळीत होतं. ह्या सर्व नैसर्गिक क्रियांमधल्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या भीतीदायक घटना घडवून भीती निर्माण करणारी देवता म्हणजेच रुद्र. म्हणूनच आपण “निर्सगाने रौद्र रूप धारण केले आहे” अशासारखे वाक्प्रचार बघतो. ह्या सर्व भीतींमधून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल म्हणजेच आपल्याला निसर्गाची अनुकूलता प्राप्त करावयाची असेल तर ह्या रुद्र शक्तीला प्रसन्न करणं आणि प्रसन्न ठेवणं आवश्यक आहे.
ह्या देवांना प्रसन्न करण्यामध्ये दोन गोष्टी कामाला येतात. त्या म्हणजे धर्माला अनुसरून केलेलं कर्म आणि योग्य ध्वनींचा उच्चार. ध्वनींच्या योग्य उच्चारामुळे नैसर्गिक संतुलन प्राप्त होण्यास मदत होते. आणि हाच वेदांमध्ये सांगितलेल्या यज्ञादी कर्मांचा पाया आहे. वेदांमधले देव म्हणजे सर्व निसर्गाचे घटक - आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. आणि ह्या घटकांची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी म्हणून वेदांमध्ये ह्या घटकांच्या अधिष्ठान देवतांच्या स्तुतीपर सूक्त आहेत. स म्हणजे चांगले किंवा शुभ आणि उक्त म्हणजे उच्चार. यज्ञांमध्ये अग्नि प्रज्वलित करून देवांच्या स्तुतीपर सूक्त म्हणून त्या देवतांना आवाहन केले जाते आणि परत सुक्तांच्या घोषामध्ये अग्निमध्ये आज्य म्हणजे तूप अर्पण करून त्यांना प्रसन्न केले जाते. ह्या सूक्तांच्या शास्त्रबद्ध उच्चारांमुळे ह्या देवता प्रसन्न होऊन अनुकूलता प्रदान करतात असा समज आहे.
वेदांमधला रुद्र देव म्हणजेच पुराणांमधले भगवान शिव. ब्रम्हा, विष्णू, महेश, देवी हे सगळे पौराणिक देव म्हणून प्रसिद्ध आहेत. पौराणिक देवांना सहसा पुराणांमधली त्यांच्या स्तुतीपर स्तोत्रे म्हणून प्रसन्न केले जाते. पण ह्या देवांचा अभिषेक करताना किंवा मंत्रपुष्पांजली वाहताना वेदांमधली सूक्ते पण म्हणतात.
रुद्र देवाला म्हणजेच भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी वेदांमध्ये रुद्रस्तुतीपर सूक्त आणि मंत्र आहेत. ह्या सर्व रुद्र स्तुतीपर सूक्तांना आणि मंत्रांना एकत्रित शतरुद्रियं असं नाव आहे. ह्यापैकी रुद्र नमक आणि रुद्र चमक ही सूक्ते प्रसिद्ध आहेत. सर्व शिव मंदिरात विशषतः सोमवारी रुद्र नमक आणि रुद्र चमक ह्यांच्या घोषामध्ये शिव लिंगावर अभिषेक केला जातो.
श्री एकादश रुद्र
विष्णू पुराणानुसार ब्रह्मदेवाच्या क्रोधातून रुद्राचा जन्म झाला. रुद्राचं रूप अर्धनारीश्वर रूप होतं म्हणजेच अर्ध पुरुष आणि अर्ध नारी.
ह्यातील पुरुष रूपाचं विभाजन होऊन त्यातून अकरा रुद्र निर्माण झाले. त्यातील काही श्वेतवर्णीय आणि मृदूभावी होते तर काही श्यामवर्णीय आणि क्रूरभावी होते. त्यांची नावे १) मन्यु २) मनू ३) म्हामस ४) महान ५) शिव ६) ऋतुध्वज ७) उग्ररेतस ८) भाव ९) काम १०) वामदेव ११) धृतव्रत
रुद्राच्या स्त्री रूपाचं पण विभाजन होऊन त्यातून अकरा रुद्राणी निर्माण झाल्या. त्यांची नावे* - १) धी २) वृत्ती ३) उसान ४) उर्ण ५) नियुत ६) सर्पिस ७) इला ८) अंबिका ९) इरावती १०) सुधा ११) दीक्षा
* ही नावे वरील रुद्रांच्या नावाच्या क्रमांशी जुळलेली नाहीत.
पुराणानुसार रुद्रर हे रुद्राचे परिचर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे - १) अज २) एकपाद ३) अहिर्बुध्न्य ४) त्वस्त ५) रुद्र ६) हर ७) शंभू ८) त्र्यम्बक ९) अपराजित १०) ईशान ११) त्रिभुवन. महाभारतानुसार हे रुद्रर म्हणजे श्री इंद्रदेवाचे सहचर दर्शवले आहेत तर श्री शिव आणि श्री स्कंद यांचे परिचर दर्शवले आहेत. मत्स्य पुराणामध्ये रुद्ररांची वेगळी नावे आहेत आणि असा समज आहे कि ते क्रूरभावी होते आणि त्यांनी श्री विष्णूंना त्यांच्या राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये साहाय्य केलं. त्या रुद्ररांची नावे - १) कपाली २) पिंगल ३) भीम ४) विरुपाक्ष ५) विलोहित ६) अजेश ७) शासन ८) शास्त ९) शंभू १०) चंड ११) दुर्व.
श्री शिव मंदिरातल्या मुख्य मुर्त्या
मागच्या अंकात आपण मंदिरामध्ये दर्शन कसं घ्यायचं ह्याच्यावर विचार केला. आता ह्या अंकामध्ये आपण शिव मंदिरामध्ये मुख्य मुर्त्या कोणत्या असतात ते जाणून घेऊया.
मुलवर आणि देवी:
मंदिरातील सर्वात मुख्य देवतेला मुलवर असं म्हणतात. अर्थात शिव मंदिरामध्ये मुलवर म्हणजे शिवलिंग असतं आणि त्या बरोबर श्री पार्वती देवींची मूर्ती असते. साधारणतः ह्या शिव लिंगाला त्या त्या स्थळपुराणानुसार नाव प्राप्त होतं. उदाहरणार्थ श्री वैथिश्वरन कोविल जे मंगळ ग्रहाचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे तेथल्या स्थळ पुराणानुसार श्री मुरुगन आणि राक्षस सुरपद्मन ह्यांच्यात झालेल्या युद्धात जे देव जखमी झाले त्यांची शुश्रूषा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्या दोघांनी वैद्याची भूमिका निभावून केली. श्री शंकरांनी वैद्याची भूमिका निभावली तर श्री पार्वतीदेवींनी रुग्णांना तेल लावण्याचं काम केलं. म्हणून येथील शिव लिंगाला श्री वैद्यनाथ (श्री वैदिश्वरन किंवा श्री वैथिश्वरन) असं नाव आहे तर श्री पार्वती देवींचं श्री तैलनायकी असं नाव आहे.
कुठल्याही मंदिरात भगवान शिवांची मूर्ती कधी नसते. भगवान शिवांची पूजा ही नेहमी शिवलिंगाची पूजा करूनच केली जाते. भगवान शिवांच्या इतर रूपांच्या मुर्त्या असतात आणि त्यांची पूजा केली जाते. ह्या मुर्त्यांची माहिती आपण पुढल्या अंकात वाचू.
श्री गणेश आणि श्री मुरुगन:
पुराणांनुसार भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि त्यांचे दोन पुत्र श्री गणपती आणि श्री मुरुगन असा शिव परिवार आहे. त्यामुळे प्रत्येक शिव मंदिरांमध्ये ह्या सर्वांच्या मुर्त्या असतातच. शिव मंदिरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला श्री गणपती आणि श्री मुरुगन ह्यांच्या वेगवेगळ्या रूपाच्या मुर्त्या बघायला मिळतात. पण मुख्यत्वेकरून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला ह्यांच्या मुर्त्या बघायला मिळतात.
साधारणतः श्री गणपतीच्या विविध मुर्त्या असतात त्यांची नावे अशी
श्री सेल्व गणपती:
श्री गणपतींची ही मूर्ती त्यांच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी ह्यांच्याबरोबर असते म्हणून त्या मूर्तीला सेल्व गणपती असं नाव आहे.
श्री कर्पग गणपती:
तामिळमध्ये कल्पतरूला कर्पग असं नाव आहे. भक्तांनी केलेल्या इच्छांची जो पूर्ती करतो त्याला कर्पग गणपती म्हणतात. आपल्या भक्तांना हा गणपती सर्व प्रकारचे ऐश्वर्य देतो.
श्री वरद गणपती:
वर देणारा गणपती म्हणून ह्या गणपतीला श्री वरद गणपती असं म्हणतात.
श्री नर्दन गणपती:
नृत्य (नर्दन) करणारा गणपती म्हणून ह्या मूर्तीला श्री नर्दन गणपती असं नाव आहे.
श्री बाल गणपती:
गणपतीच्या बाल स्वरूपातली ही मूर्ती आहे म्हणून ह्याला श्री बाल गणपती म्हणतात.
श्री कन्यामुल गणपती:
तामिळ मध्ये कोपऱ्याला मूल असं म्हणतात आणि नैऋत्य दिशेला कन्या म्हणतात. म्हणजेच नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ज्याची मूर्ती असते म्हणून त्याला कन्यामूल गणपती म्हणतात.
साधारणतः श्री मुरुगन ह्यांच्या पण विविध मुर्त्या असतात त्यांची नावे अशी
श्री मुरुगन:
ज्यांचं मुख एवढं सुंदर आहे कि त्या मुखाकडे बघितल्यावर राग द्वेष सगळे विरघळून जातात म्हणून त्यांना मुरुगन म्हणतात.
श्री कार्तिकेय:
बाल स्वरूपामध्ये असताना श्री मुरुगन ह्यांना सहा कृत्तिका कन्यांनी वाढवलं म्हणून त्यांना श्री कार्तिकेय असं नाव प्राप्त झालं.
श्री षण्मुख:
श्री कार्तिकेयांना सहा कृत्तिका कन्यकांनी वाढवले त्यामुळे त्यांना सहा मुखं होती. देवी पार्वतीने हि सगळी मुखं एकत्र केली. सहा मुखं असल्यामुळे त्यांना षण्मुख असं नाव प्राप्त झालं. ह्या रूपामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन पत्न्या श्री वल्ली आणि श्री दैवनै पण असतात. ह्या रूपामध्ये ते मोरावर आरूढ असतात, त्यांच्या झेंड्यावर कोंबडा असतो आणि पायाजवळ नाग असतो आणि सुरपद्म असुराला मारत आहेत असं रूप असतं.
श्री मुरुगन ह्यांना श्री दंडपाणी असं पण नाव आहे. दंडपाणी म्हणजे ज्यांनी हातामध्ये दंड धारण केला आहे.
श्री बालसुब्रमण्यम:
श्री मुरुगन ह्यांचे बाल स्वरूप
श्री बाल मुरुगन:
श्री मुरुगन ह्यांचे बाल स्वरूप
श्री कुमारस्वामी:
कुमार वयात असताना श्री मुरुगन ह्यांनी आपल्या पित्याला म्हणजेच भगवान शिवांना प्रणव मंत्राचा उपदेश केला म्हणून त्यांना कुमारस्वामी असं म्हणतात.
श्री वेलन् किंवा श्री वेलमुरूगन
म्हणजे हातात भाला घेतलेले (भाल्याला वेल असं पण म्हणतात)
श्री सिंगारवेलन्:
श्री मुरुगन ह्यांची भाला म्हणजेच वेल धारण केलेली सुंदर मूर्ती
श्री सुब्रमण्यम:
ह्या मूर्तीमध्ये श्री मुरुगन ह्यांच्या बरोबर त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै असतात
श्री स्कंदर:
ह्या मूर्तीमध्येपण श्री मुरुगन ह्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै असतात
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग २
मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग १ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवाच्या श्री रुद्र आणि श्री एकादश रुद्र ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवाच्या पांच अवतार किंवा त्यांना एकत्र पंचशिव किंवा पंचब्रह्म असं पण म्हणतात त्याबद्दल माहिती करून घेऊया.
ह्या सृष्टीमध्ये पांच कर्म ही कायमस्वरूपी म्हणजेच सनातन आहेत. त्यांना पंचकृत्य असं म्हणतात. ती कृत्ये म्हणजे - सृष्टीची निर्मिती (उप्तत्ती), सृष्टीचं पालनपोषण (स्थिती), सृष्टीचा संहार (लय). ही तीन प्रसिद्ध कर्म आहेत. ह्याशिवाय अजून दोन कर्मे आहेत ती म्हणजे - तिरोधान आणि अनुग्रह. ह्या प्रत्येक कर्माला एक अधिष्ठान देवता आहे. ह्या देवता म्हणजे शिव-शक्तींचीच रूपे आहेत. शिव आणि शक्ती हे एकत्रच वेगवेगळ्या रूपात ही पांच कर्मे करत असतात. ह्या भगवान शिवाच्या पांच रूपांना पंचब्रह्म किंवा पंचशिव किंवा पंचानन असं म्हणतात. भगवान शंकरांच्या मराठी आरतीमध्ये पंचानन हे नाव येतं.
पांच कर्मे दर्शविणाऱ्या भगवान शिवांच्या पांच रूपांची किंवा पांच मुखांची माहिती आम्ही इथे थोडक्यात देत आहोत.
श्री सद्योजातमूर्ती:
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टी निर्माण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. ह्या रूपाच्या मूर्तीमध्ये भगवान शिव ध्यानावस्थेत दाखवतात. हे पश्चिमाभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री लिंगोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर, श्री हरिहर, श्री सुखासन, श्री उमामहेश्वर
श्री वामदेवमूर्ती:
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टीचं पालनपोषण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. हे त्यांचं उत्तराभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री कंकाळ मूर्ती (ह्याला गंगाळ मूर्ती असं पण म्हणतात), श्री चक्रधर मूर्ती, श्री चंडिकेश्वरर मूर्ती, श्री गजांतीक मूर्ती, श्री एकपाद मूर्ती
श्री अघोरमूर्ती:
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टीचा संहार करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. हे त्यांचं दक्षिणाभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री गजसंहार मूर्ती, श्री वीरभद्र मूर्ती, श्री दक्षिणामूर्ती, श्री किराट मूर्ती, श्री नीलकंठ मूर्ती.
श्री तत्पुरुषमूर्ती:
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या तिरोधान किंवा तिरोभाव शक्तीचं रूप आहे. संस्कृत मध्ये तिरो भवती म्हणजेच एखाद्यापासून एखादी गोष्ट किंवा माहिती गुप्त ठेवणे. जिवाच्या विकासासाठी जेवढं ज्ञान असणं आवश्यक आहे तेवढंच काही ज्ञान नसणं हे पण सहाय्यक ठरतं. सगळेच जीव आपल्या भूत भविष्याचं ज्ञान पचवू शकत नाहीत आणि म्हणून हे ज्ञान सगळ्यांना उपलब्ध नसतं. प्रत्येक जीवाला त्याच्या वर्तमान स्थितीला अयोग्य असणारं ज्ञान गुप्त ठेवण्याच्या ह्या भगवान शिवांच्या शक्तीला तिरोधान असं म्हणतात. भगवान शिवांचं हे रूप पूर्वाभिमुख आहे. त्यांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री भिक्षाटनर मूर्ती, श्री कामदहन मूर्ती, श्री कालसंहार मूर्ती (ह्या रूपामध्ये त्यांनी मार्कंडेयाचं मृत्त्यूपासून रक्षण केलं), श्री जालंधरसंहार मूर्ती, श्री त्रिपुरारी मूर्ती.
श्री इशानमूर्ती:
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या अनुग्रह शक्तीचं रूप आहे. तिरोधानाच्या विरुद्ध अनुग्रह. तिरोधान शक्ती ज्ञान लपवते तर अनुग्रह शक्ती ज्ञान देते. जीव जसजसा विकास साधतो तसतसं जीवाची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढते. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जेव्हा एखादा जीव तपश्चर्येने म्हणा किंवा निरंतर भक्तीने आत्मज्ञानासाठी योग्य स्थिती प्राप्त करतो तेव्हा भगवान शिवांच्या अनुग्रह शक्तीमुळे त्या जीवास आत्मज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शिवांचं हे रूप ऊर्ध्वमुख आहे. त्यांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री सोमस्कंदर मूर्ती, श्री नटराज मूर्ती, श्री वृषभारूढ मूर्ती, श्री चंद्रशेखर मूर्ती, श्री कल्याणसुंदर मूर्ती.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ३
मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग २ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांची पांच मुखें, ज्याला पंचशिव म्हणतात, त्यांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर आणि श्री भैरवर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया.
श्री सोमस्कंदर:
ह्या रूपामध्ये भगवान शिव हे गृहस्थाच्या रूपात दाखवले आहेत. सोम (म्हणजे श्री पार्वती देवी म्हणजेच उमा समवेत भगवान शिव) आणि त्यांच्या समवेत त्यांच्या मध्यभागी त्यांचा पुत्र श्री कार्थिकेय (स्कंद) अशी मूर्ती असते त्या एकत्र मूर्तीला श्री सोमस्कंदर (सोम-सह-स्कंद) असं नाव आहे. पुराणांनुसार श्री विष्णूंनी अपत्यप्राप्तीसाठी भगवान शिवांची आराधना केली तेव्हा त्यांना मन्मथ नावाचा पुत्र झाला. पण श्री पार्वती देवींना हे आवडलं नाही कारण श्री विष्णूंनी त्यांना आराधना करताना वगळलं होतं. म्हणून त्यांनी श्री विष्णूंना शाप दिला कि भगवान शिवांकडून त्यांचा पुत्र चिताभस्म होईल. श्री विष्णूंना आपली चूक लक्षात आली म्हणून त्यांनी भगवान शिव आणि त्यांच्या समवेत श्री पार्वती देवी आणि त्यांचा पुत्र कार्थिकेय अशी मूर्ती बनवून त्याची आराधना केली. त्या आराधनेवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींनी श्री विष्णूंना वरदान दिलं की भगवान शिवांनी चिताभस्म केलेला मन्मथ (काम) पुन्हा पुनरुज्जीवित होईल आणि त्याची पत्नी रतीदेवी समवेत तो स्त्री पुरुषांमध्ये आकर्षण निर्माण करण्यास कारणीभूत होईल जेणेकरून मनुष्य जात जीवित राहील.
श्री भैरवर:
श्री भैरवर भगवान शिवांचं एक रूप आहे. भैरवर ह्यांच्याकडे काळाच्या (टाइम) व्यवस्थापनेचं काम आहे. म्हणून त्यांना काळभैरव असं पण म्हणतात. त्यांना क्षेत्रपाल असं पण म्हणतात कारण ते भगवान शिवांच्या मंदिराची देखभाल करतात. दक्षिण मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे कि दिवसाकाठी जेव्हां मंदिर बंद करण्याची वेळ येते त्यावेळी औपचारिकतेने मंदिराच्या किल्ल्या श्री भैरवर ह्यांच्याकडे सोपवल्या जातात आणि परत जेव्हां दिवसाच्या सुरुवातीला मंदिर उघडण्याची वेळ येते त्यावेळी औपचारिकतेने किल्ल्या श्री भैरवरांकडून घेतल्या जातात. कारण श्री भैरवर काळाचे व्यवस्थापक आहेत, ज्या भक्तांना आध्यात्मिक उपासनेमध्ये वेळेचं योग्य नियंत्रण करायचं असतं ते उपासनेच्या आरंभी श्री काळभैरवांना प्रार्थना करतात. श्री काळ भैरवांचं वाहन कुत्रा आहे. म्हणून पुराणांमध्ये कुत्र्याला भरवणे हे दैवी कर्म मानलं जातं. श्री भैरवर ह्यांना प्रवाशांचे रक्षणकर्ते असं पण म्हणतात. म्हणून सिद्ध मुनींच्या (शैव मुनी) मते प्रवास चालू करण्यापूर्वी, मुख्यतः रात्रीचा प्रवास चालू करण्यापूर्वी, श्री भैरवरांसमोर दिवा लावून मग प्रवास चालू करावा. श्री भैरवांची आठ रूपे आहेत. ही आठ रूपे आठ दिशांचं पालन करतात. ह्यांना अष्टभैरव असं म्हणतात. त्यांची नावे अशी - असिथान्गभैरव, रुरुभैरव, चंडभैरव, क्रोधन भैरव, उन्मथभैरव, कपालभैरव, भीषणभैरव, संहारभैरव.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ४
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ३ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर आणि श्री भैरवर ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया.
श्री वीरभद्रर:
श्री वीरभद्रर हे भगवान शिवांच्या गणांपैकी एक आहेत. भूतगण आणि शिवगण हे सहसा दफन आणि स्मशान भूमीमध्ये वास करतात असा समज आहे. भगवान शिवांचे ते परिचर आहेत आणि ते कैलास पर्वतावर पण त्यांची सेवा करतात.
जेव्हा राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये दक्षपुत्री श्री सती म्हणजेच भगवान शिवांची पत्नी ह्यांनी आपल्या पतीचा आपल्या पित्याने केलेला अपमान सहन न होऊन यज्ञकुंडामध्ये आत्मसमर्पण केलं तेव्हा भगवान शिवांना अति क्रोध आला आणि त्यांनी क्रोधाने आपल्या जटांमधील एक केस जमिनीवर आपटला तेव्हा त्यातून श्री वीरभद्रर निर्माण झाले. भगवान शिवांनी त्यांना सेनापतीपद प्रदान केलं आणि दक्ष यज्ञ उध्वस्त करण्याचा आदेश दिला. त्यांच्या बरोबर रुद्रकाली देवी पण निर्माण झाल्या आणि त्यांनी भद्रकालीचं रूप घेऊन श्री वीरभद्ररांना दक्ष यज्ञ उध्वस्त करण्यास मदत केली. म्हणूनच श्री वीरभद्ररांना भगवान शिवांच्या क्रोधाचं मनुष्य रूप असं समजलं जातं. श्री वीरभद्ररांना वीरभद्रर स्वामि असं पण संबोधलं जातं कारण ते शिवगणांचे नायक आहेत.
असा समज आहे की दक्ष यज्ञ घटना उत्तर केरळ मधील कोट्टियूर ह्या स्थानात घडली. हे स्थान अतिशय निसर्गरम्य आहे. इथे दक्ष यज्ञामध्ये श्री सती देवींनी केलेल्याआत्म समर्पणास्मृत्यर्थ २७ दिवसांची मोठी पूजा आयोजित केली जाते. ह्या पूजेची रूपरेखा ही श्री आदि शंकराचार्यांनी आखून दिली आहे असा समज आहे.
तामिळनाडूमधील व कर्नाटकामधील पंच आचार्य आणि लिंगायत व वीरशैव ह्या समाजातील लोकं श्री वीरभद्ररांची आराधना करतात. श्री वीरभद्ररांचं मुख्य स्वतंत्र मंदिर उत्तर काशीमधल्या हृषीकेश मध्ये आहे. काही नामांकित स्थळे जिथे श्री वीरभद्रांची मूर्ती बघावयास मिळते ती अशी - १) महाराष्ट्रामध्ये जेजुरी २) तामिळनाडू मधील पुडुकोट्टाई जिल्ह्यातील वेत्तनविधूथी ३) तामिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यामध्ये मित्तुर गावातील विलंगुप्पम ४) तामिळनाडूमधील चेंगलपेठ जिल्ह्यातील हनुमंथपुरम येथील श्री अघोर वीरभद्रर स्वामी मंदिर ५) तामिळनाडू मधील थिरुवेंगाडू येथील श्री श्वेथारण्येश्वरर मंदिर (नवग्रह स्थळांपैकी हे श्री बुध ग्रहाचे स्थान आहे). ६) तामिळनाडूमधील पेरंबलूर जिल्ह्यातील पसुमबलूर
सिलोन आणि मलेशिया देशात पण श्री वीरभद्ररांची मंदिरे आहेत.
श्री चंडिकेश्वरर:
श्रेष्ठ शिव भक्त मानल्या जाणाऱ्या ६३ नायनमारां मधले पहिले नायनमार म्हणजेच श्री चंडिकेश्वरर. श्री चंडिकेश्वरर हे बालपणापासूनच शिव भक्त होते. त्यांचं बालपणाचं नाव विचारशर्मन असं होतं. त्यांनी एकदा बघितलं कि एक गोप गाईंना चरायला नेताना गाईंना मारत होता. विचारशर्मनला हे बघवलं नाही. त्यांनी त्या गोपाला दरडावून समजावलं की गाय ही खूप पवित्र प्राणी आहे जी यज्ञासाठी लागणाऱ्या वस्तू देते. तिला मारणं म्हणजे महापाप आहे. त्यांनी गोपांकडून गायी हाकण्याचं काम स्वतः घेतलं. त्यांनी हाकण्याचं काम घेतल्यापासून गायी विचारशर्मन वर खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी नेहमीपेक्षा अधिक दूध द्यायला चालू केलं. विचारशर्मन रोज एक मातीचं शिव लिंग तयार करायचे आणि त्यावर दुधाचा अभिषेक करायचे. गायी विचारशर्मन ह्यांच्या शिवाभिषेकासाठी पण दूध द्यायच्या आणि त्याशिवाय त्यांच्या मालकांसाठी पण त्यांच्या कामासाठी पुरून उरेल एवढं दूध द्यायच्या. एकदा एका गावकऱ्याने विचारशर्मन दूध मातीवर ओतत आहेत हे पाहून गावात तक्रार केली कि विचारशर्मन हे दुधाचा अपव्यय करत आहेत. हे जेव्हा विचारशर्मन ह्यांच्या पित्यांना कळलं तेव्हा खरी गोष्ट काय आहे हे पाहण्यासाठी ते विचारशर्मन चा पाठलाग करत आले. जेव्हा त्यांनी पाहिलं कि विचारशर्मन मातीच्या लिंगावर दूध ओतत आहेत त्यांनी रागाने त्या लिंगाला लाथ मारली. भक्ती मध्ये तल्लीन असलेल्या विचारशर्मनला समोर फक्त शिव लिंग दिसत होतं आणि शिव लिंगाच्या अभिषेकामध्ये कोणीतरी व्यत्यय आणला आहे एवढंच त्यांना जाणवलं आणि त्यांनी क्रोधामध्ये आपल्या बाजूला असलेली एक काठी भिरकावली. ती काठी त्यांच्या पित्यांच्या पायाला एका कोयत्याच्या स्वरूपात लागली आणि त्यामुळे त्यांचे पाय कापले गेले. हे ऐकून त्यांची माता त्वरित तेथे आली आणि आपल्या पुत्राचं क्रोधीत रूप बघून घाबरली आणि तिने तिच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिव श्री पार्वती देवींसमवेत तेथे प्रकट झाले आणि विचारशर्मनच्या भक्तीची तल्लीनता पाहून त्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला कवेत घेतलं. विचारशर्मन ह्यांच्या पित्याचे पाय भगवान शिवांनी पूर्ववत केले. भगवान शिवांनी विचारशर्मन ह्यांना शिव मंदिराच्या खजिनदाराची पूर्ण जबाबदारी कायमस्वरूपी दिली आणि त्याच बरोबर त्यांना ईश्वरपद पण प्रदान केलं. आणि त्यांचं चंडिकेश्वर हे नाव प्रसिद्ध झालं. चंडिकेश्वर हे फक्त मंदिराच्या खजिन्याचंच नव्हे तर भगवान शिवांचं पण पालन करतात असा समज आहे. दक्षिण भारतातील सर्व शिव मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे कि, प्रत्येक भक्त मंदिराचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर निघण्याच्या आधी श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्तीसमोर आपले हात झटकून त्यांना हे दर्शवून देतात कि मंदिरातून त्यांनी प्रसादाशिवाय इतर कुठलीही गोष्ट घेतलेली नाही.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ५
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ४ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री दक्षिणामूर्ती ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
गुरुपरंपरेमध्ये भगवान शिवांना आदिगुरू असं समजलं जातं. आणि त्यांच्या आदिगुरुरूपाला श्री दक्षिणामूर्ती असं नाव आहे. ह्या रूपात ते वटवृक्षाखाली मृगाजिनावर दक्षिणाभिमुख बसलेले आहेत, त्यांचा एक पाय घडी घातलेल्या स्थितीत आहे तर एक पाय अज्ञान दर्शविणाऱ्या अपस्मार नावाच्या राक्षसावर ठेवलेला आहे आणि आपले प्रथम शिष्य सनकादि मुनी (सनक, सनन्दन, सनातन व सनत्कुमार) हे त्यांच्या समोर बसून ते आपल्या गुरूंकडून उपदेश घेत आहेत असं त्यांचं रूपदर्शन प्रसिद्ध आहे.
पुराणांनुसार ज्यांना कोणाला गुरु प्राप्त झालेले नाहीत ते श्री दक्षिणामूर्तींना आपला गुरु मानू शकतात आणि त्यांची गुरुभक्ती जर योग्य असेल तर पुढे जाऊन त्यांना आत्मज्ञानी गुरूंची प्राप्ती होईल.
शिव मंदिरामध्ये श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती हि साधारणतः गाभाऱ्याभोवतीच्या दक्षिण दिशेच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर दक्षिणाभिमुख असते. दक्षिण दिशा हि मृत्यूची किंवा परिवर्तनाची दिशा मानली जाते. म्हणजेच श्री दक्षिणामूर्ती हे त्यांच्या शिष्यांना, जे उत्तरेकडे म्हणजेच श्री दक्षिणामूर्तींकडे मुख करून बसले आहेत, त्यांना मृत्यूकडून अमृताकडे, परिवर्तनशील जगतातून अपरिवर्तनशील म्हणजेच सत्याकडे नेतात.
सप्ताहामधला पांचवा दिवस हा गुरु ग्रहाचा दिवस समजला जातो. आणि म्हणून दर गुरुवारी सर्व शिव मंदिरामंध्ये श्री दक्षिणामूर्तींची विशेष पूजा केली जाते.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ६
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ५ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री दक्षिणामूर्ती ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री लिंगोद्भवर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
पुराणांनुसार एकदा श्री विष्णू आणि श्री ब्रह्मा ह्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे ह्याबद्दल वाद निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी भगवान शिव एका ज्योतीच्या स्तंभात प्रकट झाले. आणि त्यांनी श्री विष्णू आणि श्री ब्रम्हांना ह्या स्तंभाचा उगम शोधायला सांगितलं. श्री विष्णू आणि श्री ब्रम्हा स्तंभाचा उगम शोधण्यासाठी दोन विरुद्ध दिशांना गेले. दोघांनाही शोध लागला नाही पण श्री ब्रम्हांनी खोटच कबुल केलं कि त्यांना शोध लागला पण श्री विष्णूंनी मात्र कबुल केलं कि त्यांना उगम मिळाला नाही. भगवान शिवांनी श्री ब्रम्हांना शाप दिला कि त्यांची कुठेही पूजा होणार नाही आणि श्री विष्णूंना वरदान दिलं कि त्यांची सर्व ठिकाणी पूजा होईल. भगवान शिवांच्या ह्या ज्योतिरूपाला ज्योतिर्लिंग म्हणतात आणि तेच त्यांचं लिंगोद्भवर रूप.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ७
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ६ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री लिंगोद्भवर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री अर्धनारीश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
शिव आणि शक्ती म्हणजेच भगवान शिव आणि श्री पार्वती देवी हे वेगळे नाहीत, एकच आहेत हे दर्शविण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी आपल्या शरीराचा अर्धा भाग श्री पार्वतीदेवींना दिला. ह्या रुपाला श्री अर्धनारीश्वरर असं म्हणतात.
पुराणांनुसार एकदा सर्व ऋषीमुनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांना नमस्कार करण्यासाठी कैलास पर्वतावर आले. फक्त भगवान शिवांचीच उपासना करण्याचा निश्चय केलेल्या भृंगी ऋषींनी श्री पार्वती देवींकडे दुर्लक्ष केलं. ह्यावर श्री पार्वती देवींना खूप राग आला आणि त्यांनी भृंगी ऋषींना शाप दिला कि त्यांच्या शरीरातले सर्व मांस आणि रक्त निघून जाऊन फक्त सापळा शिल्लक राहील. भृंगी ऋषींची ही दयनीय परिस्थीती पाहून भगवान शिवांना त्यांची दया आली आणि त्यांनी भृंगी ऋषींना अजून एक पाय प्रदान केला ज्यामुळे ते व्यवस्थित उभे राहू शकतील. ह्या घटनेमुळे श्री पार्वती देवींना आपला पराभव झाला असे वाटले आणि म्हणून त्यांनी तीव्र तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींना त्यांच्या मध्ये विलीन होण्याचं वरदान दिलं ज्यामुळे भृंगी ऋषींना अर्धनारीश्वरर रूपाची म्हणजेच भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची एकत्र उपासना करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण भृंगी ऋषींनी एका भ्रमराचं रूप घेऊन अर्धनारीश्वर रूपाच्या मूर्तीला मधून छिद्र पडून फक्त भगवान शिवांनाच प्रदक्षिणा घातली. भृंगी ऋषींची हि भगवान शिवांबद्दलची विलक्षण भक्ती पाहून श्री पार्वती देवी अचंबित झाल्या आणि प्रसन्न पण झाल्या आणि त्यांनी भृंगी ऋषींवर कृपा केली.
कालिका पुराणानुसार एकदा श्री गौरी देवी म्हणजेच पार्वती देवींनी भगवान शिवांच्या हृदयामध्ये आपल्या सारख्याच स्त्रीचं प्रतिबिंब पाहून भगवान शिवांवर व्यभिचाराचा आरोप केला. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पण तो लगेच मिटला. श्री गौरी देवींना इच्छा झाली कि आपण भगवान शिवांमध्ये विलीन व्हावं आणि भगवान शिवांनी ती मान्य केली आणि त्यातूनच अर्धनारीश्वरर हे त्यांचं रूप निर्माण झालं. शिव पुराणानुसार ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्यासाठी प्रजापती उत्पन्न केले पण ते सर्व स्त्रीरहित पुरुष असल्यामुळे ते सृष्टी निर्माण करण्यास असमर्थ होते. ब्रह्मदेवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शिव अर्धनारीश्वर (अर्ध स्त्री आणि अर्ध पुरुष) रूपात प्रगट झाले आणि त्या रूपातून बऱ्याच स्त्रिया निर्माण होऊन सृष्टीनिर्माण कार्यात मदत झाली.
दक्षिण भारतातील आणि आशिया खंडाच्या आग्नेय भागातील सर्व शिव मंदिरांमध्ये आपल्याला श्री अर्धनारीश्वर ह्यांची मूर्ती दिसते. तामिळनाडूमधल्या नमक्कल जिल्ह्यातील थिरुचेंगोड मध्ये आणि कल्लकुरीची या गावाच्या जवळ असलेल्या ऋषीवंदिअम ह्या स्थानी श्री अर्धनारीश्वर ह्यांची स्वतंत्र मंदिरे पाहायला मिळतात.
पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ८
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ७ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री अर्धनारीश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
श्री नंदी हे खूप महत्वाचं दैवत आहे. किंबहुना असा समज आहे शिव आणि शक्ती मधून जेव्हां विश्व निर्माण होतं त्या घटनेचे श्री नंदी हे एकमेव साक्षी आहेत. आणि म्हणूनच श्री नंदींची आराधना केल्यामुळे आपल्याला सर्व आध्यात्मिक लाभ होतात आणि आपली ईश्वरकृपेची ग्रहणक्षमता वाढते. दक्षिण भारतातल्या शिव मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे की पुढे दिलेला श्री नंदीश्वरांचा श्लोक म्हणून त्यांची अनुज्ञा घेऊन मगच श्री शिव आणि श्री पार्वती देवींची आराधना करता येते. तो श्लोक असा आहे.
श्री नंदी हे अंतर्ज्ञान आणि अंतःप्रेरणा ह्यांचे मूर्त स्वरूप आहेत. आणि म्हणूनच भगवान शिवाच्या लिंगाचं दर्शन हे श्री नंदींच्या दोन शिंगांच्या मधून घेण्याची प्रथा आहे. त्याचा अर्थ असा आहे कि श्री नंदींचं ध्यान करून आपली अंतर्ज्ञान आणि अंतःप्रेरणा ह्यांची क्षमता वाढली की आपोआपच आपली भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्याची तसंच ती जाणण्याची क्षमता पण वाढते. काही ठिकाणी अशी पण प्रथा आहे की भक्त हे आपल्या इच्छा श्री नंदीच्या कानात सांगतात ह्या विश्वासाने कि श्री नंदी आपल्या प्रामाणिक आणि न्याय्य प्रार्थना भगवान शिवांपर्यंत पोचवतील.
सर्व शिव मंदिरांमध्ये श्री नंदींची मूर्ती ही साधारणतः शिव लिंगाच्या समोर आढळते. हि रचना हे दर्शवते कि जिव म्हणजेच नंदी आणि जिवाने सतत एकांतामध्ये शिवाच्या ध्यानात असावं. श्री नंदी हे भगवान शिवाचे वाहन आहेत, सर्व शिव गणांमध्ये प्रथम आहेत आणि भगवान शिवांच्या देवालयाचे ते द्वारपाल पण आहेत. नंदी ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आनंदी व्यक्ती असा आहे. सहसा श्री नंदींचं रूप हे वृषभ रूपच असतं पण कधी कधी मानवी शरीर आणि वृषभाचे शिर असं पण रूप असतं. भारतामध्ये श्री नंदीदेवांची स्वतंत्र मंदिरे आहेत.
शैव पंथातल्या समजुतीनुसार श्री नंदी १८ सिद्ध मुनींपैकी मुख्य गुरु मानले जातात.
पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ९
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ८ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री भिक्षाटनर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
पुराणांनुसार एकदा श्री पार्वती देवींनी श्री ब्रम्हांना भगवान शिव समजून त्यांची पाद्यपूजा केली. भगवान शिवांना हे श्री ब्रम्हांचं वर्तन आवडलं नाही. त्यांच्या मते श्री ब्रम्हांनी श्री पार्वती देवींना फसवलं आणि म्हणून क्रोधामध्ये त्यांनी श्री ब्रम्हांचं एक शिर छेदलं. पण ह्यामुळे भगवान शिवांना ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला. ह्या दोषांचं निवारण करण्यासाठी भगवान शिवांनी एका भिक्षाटनर (भिक्षा मागणारा तपस्वी) रूपात थिरुकरम्बूर येथे श्री विष्णूंची आराधना केली. ह्या आराधनेमुळे त्यांना ह्या शापापासून थोड्या प्रमाणामध्ये मुक्ती मिळाली. पुढे त्यांनी जेव्हां कमलपुष्करिणी ह्या तीर्थात स्नान करून परत श्री विष्णूंची आराधना केली तेव्हा त्यांना ह्या शापापासून पूर्ण मुक्ती मिळाली. म्हणून येथे भगवान शिवांनी श्री विष्णूंचं मंदिर बांधलं. इथे श्री विष्णूंचं श्री हर-शाप-विमोचन असा नाव आहे.
अशी पण आख्यायिका आहे कि भगवान शिवांनी ब्रह्महत्या दोषाचं निवारण करण्यासाठी भिक्षा मागणाऱ्या तपस्वीचं रूप धारण केलं. आणि त्यांनी जेव्हा वाराणसी मधे श्री अन्नपूर्णी (श्री पार्वती देवींचं एक रूप) कडे भिक्षा मागितली तेव्हा त्यांच्या ब्रह्महत्या दोषाचं निवारण झालं.
अजून एक आख्यायिका आहे कि त्यानंतर भिक्षाटनर रूपात त्यांनी दारुकवनात जाऊन तेथील ऋषींच्या गर्वाचा नाश केला.
पुढच्या अंकात आपण सनातन कुरवर (गुरुवर) ह्यांच्या बद्दल माहिती करून घेऊ या.
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग १०
मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ९ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री भिक्षाटनर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात सनातन गुरूवर ज्यांना तामिळ मध्ये सनातन कुरवर असं म्हणतात त्यांची माहिती करून घेऊ या.
तामिळ मध्ये गुरुवरांना कुरवर असं म्हणतात. ह्यां कुरवरांनी शैव सिद्धांताची तत्वे सर्व विश्वात प्रचारित करण्याचं काम केलं. असं म्हणतात कि ह्या कुरवरांना साक्षात भगवान शिवांनी त्यांच्या श्री दक्षिणामूर्ती रूपामध्ये हि ह्या तत्वांचं ज्ञान दिलं. आणि त्यांना गुरुपद पण दिलं . त्यांना सनातन गुरूवर असं म्हणतात. सनातन गुरुवरांचे दोन वर्ग आहेत.
आगम सनातन गुरूवर: हे चार गुरु होते. ह्यांना मानवी रूप नव्हतं. त्यांचं मुख्य स्थान हे कैलास पर्वत आहे. ते चार गुरूवर म्हणजे
थिरु श्री नंदीदेव
श्री संतन कुमार
श्री सत्यज्ञानदर्शी
श्री परंज्योती ऋषी
असा समज आहे कि श्री दक्षिणामूर्तींपासून गुरुपरंपरा चालू झाली आणि ह्या चार गुरूवरांच्या क्रमाने ती पुढे चालू राहिली.
पूर सनातन गुरूवर: श्री परमज्योती ऋषींपासून शैव सिद्धांताचा प्रचार करण्याचं काम पुढील चार गुरुवरांनी केलं
श्री मेयकंदर
श्री अरुल नंदी शिवम
श्री मरैज्ञान सम्बन्धर
श्री उमापती शिवाचारीयार
हे मानवी रुपातले गुरुवर तामिळनाडू मध्ये स्थित होते. त्यांच्या शिष्यांनी शैव सिद्धांत प्रचाराचं काम पुढे चालू ठेवलं आणि त्याकरता त्यांनी दोन मठ बांधले. एक थिरुवडुदुराई मध्ये आणि एक धर्मपूरम मध्ये. ह्या दोन मठांना कैलास परंपरा असं म्हणतात.
हीच परंपरा ज्या महान चार संतांनी सातव्या ते बाराव्या शतकांमध्ये चालू ठेवली त्यांना समयशैवगुरूवर असं नाव आहे. त्यांना नालवर असं पण म्हणतात. त्यांची नावे अशी
थिरुज्ञानसम्बन्धर
थिरूनावुक्करसर
श्री सुंदर मूर्ती नायनार
श्री माणिक्कवाचकर
चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये बुद्ध आणि जैन धर्मांचा प्रसार खूप वेगाने वाढत होता आणि तेथील बऱ्याच राजांनी ह्या धर्मांचं अनुसरण करायला चालू केलं. ह्यामुळे धार्मिक विधींचं आचरण खूप कमी झालं किंवा जवळजवळ थांबलंच. सातव्या शतकात शैव संतांच्या आगमनाने आणि त्यांच्या मोठ्या प्रयत्नाने ह्या स्थितीमध्ये बदल व्हायला चालू झाला आणि शैव सिद्धांताच्या आचरणाला परत चांगले दिवस आले आणि त्यामुळे बुद्ध आणि जैन धर्मांतरित झालेले राजे परत शैव सिद्धांताचं आचरण करायला लागले.
सातव्या ते बाराव्या शतकामध्ये वरील चार संतांबरोबरच जवळजवळ ५९ शैव संतांनी आपल्या भक्तीने शैव सिद्धांताचा प्रचार केला. ह्या एकूण ६३ शैव संतांनां नायनमार असा संबोधलं जातं.
ह्या नायनमारांनी जी शिवभक्तीपर भजने गायली त्या सगळ्यांना एकत्रित थिरूमुराई असं संबोधलं जातं. ह्याचे एकूण १२ खंड आहेत. आणि ज्या २७६ शिव मंदिरांची स्तुती ह्या भजनांमध्ये गायली गेली त्या शिव मंदिरांना एकत्रित पाडल पेथ्र स्थळं असं म्हणतात.
शिवलिंग :-
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या वरून रुद्राच्या ऊर्ध्व लिंगाची कल्पना केली गेली असावी. शिवलिंगाला ज्योतिर्लिंग म्हणतात त्याचे रहस्य हेच आहे. अग्नि वेदीवर जळत आणि तापत राहतो; म्हणून शिवरूपात त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकी अभिषेकाची संततधार धरावी लागते. शिव किंवा शिवभक्त आपल्या शरीरावर भस्मचर्चन करतात त्यातही रुद्राचे अग्नीशी तादात्म्य सूचित होते. रुद्राच्या घोर व अघोर अशा दोन तनु मांडलेल्या आहेत. यजुर्वेद आणि अथर्ववेदात रुद्राला मारक असे म्हटले आहे. तर यजुर्वेदात त्यास अघोर म्हणजे सौम्य रूप विशद केला आहे. भव आणि शर्व ही शिवाची दोन प्रसिद्ध नावे आहेत. या दोन्ही मुळात भिन्न देवता होत्या. शिवमहात्म्य वाढल्यावर या दोन्ही देवता शिवाच्या भूपती आणि पशुपती या स्वरूपात विलीन झाल्या. अशाप्रकारे अनेक देवतांना आपल्यात समाविष्ट करून शिव हा महादेव बनला.
शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या. या महादेवाची पुजा लिंगरूपात करावी असे पुराणांनी सांगितलेले आहे. ही लिंग पूजा फार प्राचीन असून तिचे अवशेष सर्व जगामध्ये आढळतात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात ह्या गोष्टीचा पुरावा मिळालेला आहे. तिथे सापडलेल्या एका खापरावर एक त्रिमुख पूर्णाकृती उमटवलेली असून ती ऊर्ध्वमेंढर (उत्थित लिंग ) दाखवलेली आहे. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा हा उपास्यदेव असावा आणि त्याची पूजा लिंगरूपात करीत असावेत हे तिथल्या अवशेषावरून कळून येते. आताचे शिवाचे स्वरूप हे आर्यांचा रुद्र आणि द्रविडांचा लिंगरूप शिव यांचे एकत्रिकरण असावे असेच दिसते. त्यामुळेच शिवाची उपासना सर्वात व्यापक प्रदेशात होते. नेपाळातील पशुपतीनाथापासून ते थेट रामेश्वरपर्यंत.
शाळुंका आणि त्यावर ऊर्ध्व लिंग आकृती ही दोन्ही मिळून लिंग प्रतिक बनते. शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते. शाळुंका कशी निर्माण करावी? शाळुंकेच्या घेराचे ३ प्रकारे आहेत. लिंगाच्या घेराच्या तिप्पट तो अधम, दीडपट तो मध्यम तर चौपट तो उत्तम. शाळुंकेची उंची विष्णुभागाइतकी असावी, तिचा आकार चतुष्कोण, द्वादशकोण, षोडषकोण किंवा गोल असावा. अभिषेक हा शिवलिंगाचा मुख्य उपचार असल्याने शाळुंकेला पन्हळ ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग शाळुंकेत स्थापन करताना त्याचे ब्रह्मभाग व विष्णुभाग हे भूमीत जायला हवेत. रुद्रभाग तेवढाच वर असावा." आणखी एका मतानुसार शाळुंका हे योनी प्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण हे लिंगप्रतीक समजावे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारी स्त्री-पुरुषांची ही जननेंद्रिय सिंधू संस्कृतीच्या लोकांनी तसेच इतरही अनेक आदिम जमातींनी शिवलिंग स्वरूपात उपास्य बनवली. लिंगा बद्दल लिंगपुराणात सयोनी लिंगाचे वर्णन दिलेले आहे. लिंग वेदी अर्थात शाळुंका म्हणजे पार्वती व लिंग म्हणजे साक्षात महेश्वर होय. त्या दोघांच्या पूजनाने शिवपार्वतीची पूजा केल्यासारखे होते. शिवलिंग निर्मिती कशी करावी याविषयी तपशील सुप्रभेदागम मध्ये दिलेला आहे. लिंगे ही आदिम काळापासून भारतात दिसून येतात, जी नंतर शिवलिंगा सोबत जोडली गेली. श्रीपरीपूर्णानंद वर्मा म्हणतात की, जगाच्या कानाकोपऱ्यात वासना आणि प्रजनन या दोन कारणांमुळे लिंग पूजेचा प्रसार झाला होता. कटनर असे म्हणतात की, लिंग पूजा सर्वप्रथम इजिप्त देशात सुरू झाली. जी चौथ्या शतकापर्यंत टिकून होती. आयसीस याने लिंग पूजेचा प्रारंभ केला होता. आयसीसीच्या मंदिरातही अग्नि पेटत ठेवत असत. या अग्नीचे पूजन "अक्षतयोनि" कुमारिकाच करीत असत. यातही शिव संकल्पनेचे आदिम रूप आम्ही पाहू शकतो. शिवाचा आणि अग्नीचा असलेला सहसंबंध, त्याचे शिखी हे नाव, त्याचा अग्नीमुळे तिसरा नेत्र, शाश्वत प्रजनन शक्ती दर्शविणारा त्याचे ऊर्ध्व लिंग, काम दहनाचा केलेला पराक्रम. तसेच शिव ज्ञानस्वरूप असून काम दहन केले म्हणजे पार्वतीचे लैंगिक सुख हिरावून घेतले असे मात्र नाही. आपल्या ज्ञानाग्नीने अविद्या आणि अज्ञानरूपी तमांचा नाश केला असे म्हणता येईल.
शिवाने वैदिक परंपरेला असंख्य कथा दिल्या. रुद्र आणि योगिनी हे शिवाशी संबंधित आहेत. शिव हा योगापासून भोगा पर्यंत, सर्व शाखांचा उद्गाता, विषा पासून गांजा पर्यंत, कामापासून वैराग्य पर्यंत पुरुषोत्तमाचे सर्व बिंदू शिवा मध्ये आहेत.
वात्सायनाने कामसूत्र लिहीत असताना त्याचे सर्व श्रेय शिवाला दिलेले आहे. पहिल्यांदा काम कलाही शिवाने पार्वतीला सांगितली, ती नंदीने ऐकली. त्यावर नंदीने अनेक खंडाचा ग्रंथ लिहिला तो सामान्यांना वाचणे शक्य नसल्यामुळे त्याचे लघुरूप मी मांडत आहे असे मुनी वात्सायन म्हणतात. कालिदासाच्या कुमारसंभवात शिवपार्वतीच्या समागमाचे सविस्तर वर्णन मांडलेले दिसून येते. शिव म्हणजे मंगल, रौद्र, सौम्य, संहारक, नवसर्जन, सुखनिधान, भयंकर, आशुतोष अशा रूपात आढळतो. सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. अमरकोशात शिवाची ४८ नावे आहेत. या नावात त्याच्या रूपाची, लंच्छनाची, कार्याची माहिती देणारी आहेत. ऋग्वेद मधील रुद्र पुढे शिव झाले. हे शिवरूप लिंग पूजेच्या माध्यमातून समाजात स्थापित झाले. पुढे यातूनच काळामुख, लकुलिश, कपालिक, वीरशैव असे पंथ निर्माण झाले. यास तत्वज्ञानाची जोड होतीच. शिव दर्शनिक आणि लोकप्रचलित अशी दोन रूपे ही पहावयास मिळतात. तो योग्याचा परमपुरुष असून स्वतः ही महायोगी आहे. शिवपुरानातील अद्भुत आणि अलौकिक कथा त्याच्या संहारक आणि उपकारक कामाची माहिती देतात. वेदांमध्ये शिवलिंगाचे वर्णन कुठे येत असल्याचे मला ठाऊक नाही पण रूद्राचे वर्णन मात्र येते. हा रूद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आजही कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरूप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रूपांमध्ये दिसून येते. ह्या रूद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले. ऋग्वेदात रूद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे येते. ऋग्वेद मंडळ १, सूक्त ४३
सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो. हा देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे. हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो
नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं. तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तर्हेतर्हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तू घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही.
ऋग्वेद मंडळ ७ सूक्त ४६
मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य आ नः भज बर्हिषि जीव:शंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥
आम्हाला मारू नको आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकू नकोस. अथवा आमचा पराभव करू नकोस. तुझ्या क्रोधरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविचा स्वीकार कर. तुम्ही सदा सुवचनांनी आमचा प्रतिपाळ करा. नमुन्यादाखल दिलेल्या वरील सूक्तांमध्ये रूद्राचे मूळचे अनार्य स्वरूप त्याच्या क्रोधरूपाने प्रकट होत्सेते दिसते. रूद्राचे जसे भयानक म्हणून वर्णन आले आहे त्याच प्रमाणे तो भयनाशक अथवा कल्याणकारक असल्याचेही वर्णन ऋग्वेदांत आलेले आहे. जलाषभेषज अथवा जलौषधींचा प्रभू असे रूद्राला मानले गेले आहे. रूद्राला शिवाचे स्वरूप कधी आले ते नेमके सांगता येत नाही मात्र हा बदल वेदोत्तर काळात घडला आणि गुप्तकाळापासून (इ.स.३५०-५००) शिवाला आजचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही. लिंगस्वरूप शिव. शिव-आराधनेत मूर्ती व लिंग या दोन्हींनाही महत्त्व आहे. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. शिवमूर्तींचा अभ्यास हा लिंगस्वरूप शिवाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. लिंग पूजनांचे धागेदोरे एकीकडे सिंधुसभ्यतेपर्यंत पोचतात व दुसरीकडे आजपर्यंत ते आपल्या येथे अव्याहत चालू आहे. शिवाची लिंगपूजा सहजासहजी भारतीय समाजात प्रतिष्ठापित झालेली नाही, तिला येथें मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. पौराणिक वाङ्मयात हा विरोधी सूर ऐकू येणारी ठळक आख्याने खालील आहेत- १) ब्रह्मदेवाच्या यज्ञांत भिक्षाटनांकरिता शंकरांचे जाणे व वैदीकांकडून त्याची निंदा.' २) उन्मत्त वेशांत शंकरांचे वैदीकाच्या वसतिस्थानांवर जाणें व त्यावर ब्राह्मणांचे लाथा, बुक्या, वगैरेंनी आक्रमण. ३) दारुवनांत शंकराची लिंगच्युती व त्याला पौरुषहीन होण्यांविषयीं शाप. हे आख्यान बरेच प्रचलित असावे, कारण अनेक पुराणांत तर त्याचा उल्लेख आहेच, पण मध्यकालीन कलेत देखील त्याचे अंकन झाले आहे.' ४) भृगूचा शंकराला शाप. पूर्व इतिहासांकडे बोट दाखविणाऱ्या या कथा बहुतेक आपल्या उत्तरभागांत लिंगपूजेच्या प्रतिष्ठेचे वर्णन करतात. महाविलयन पद्धतीचे हे प्रमाण होय. उदाहरणार्थ पद्मपुराणांत येणाऱ्या दारुवनांसंबंधी आख्यानांत एकीकडे सावित्रीच्या शापाने शंकराचे लिंग पडल्याचे सांगितले आहे, तर तेथेंच गायत्रीचा वर त्याच्या (पतित लिंगाच्या) पूजनाची प्रतिष्ठा ही करीत आहे." हे आख्यान कूर्मपुराणांत विस्ताराने दिले आहे तेथे लिंगोत्पाटनांविषयी सांगून झाल्यानंतर ब्रह्मदेवांकडून आग्रहपुरस्सर लिंग पूजेची स्थापना केली गेली आहे आणि भगवान् ईशाच्या लिंगाची पूजा वैदिक मंत्रानेही करावी असें सांगितले आहे.' याप्रमाणें जरी शैवमत आणि लिंगपुजेचे एक रूप वैदिक संप्रदायाने स्वीकारलें तरी शैवांच्या त्या उपशाखा शेवटपर्यंत वेदबाह्यच समजल्या गेल्या ज्यांचे रीतिरिवाज आर्य सभ्यतेच्या अगदीब प्रतिकूल होते. एवढेच नव्हें तर काही ठिकाणीं स्वतः शंकराच्या तोंडूनच त्यांना 'असेव्य' असे सांगितले गेले.' लिंगपूजनांच्या स्थापने बरोबरच लिंगोत्पत्ती संबंधी कथा ही रूढ झाल्या, त्यापैकी काहीं खाली देत आहे : क) लिंगोद्भवाची मार्गे दिलेली कथा व त्यामुळे लिंगाचे श्रेष्ठत्व आणि लिंगार्चेचा आरंभ." ख) सर्वांचा ज्याच्यांत लय होतो ते लिंग या परिभाषेस मान्यता मिळून लिंगवेदीच्या (शाळुंकच्या) रूपानें महादेवी (पार्वती किंवा चित्रशक्ती) व लिंगरूपानें महेश्वराच्या पूजनाची स्थापना." ग) सृष्टिकर्मांपासून विरक्त होऊन शिवाकडून स्वतःचे लिंग कापणे व पृथ्वीवर त्याला प्रतिष्ठित करून आपण मूंजवान पर्वतांकडे निघून जाणें. घ) शिवप्रतिमा व शिवलिंगाचे पूजन हे दोन्ही प्रकार जरी संपत्ति व ऐश्वर्य देणारे असले तरी लिंगपूजन हे श्रेष्ठतम होय या सिद्धांतांचे प्रतिपादन. लिंगाचें निर्माण व सामान्य स्वरूप : लिंगपूजा ही फार प्राचीन काळापासून जगाच्या अनेक भागांत अस्तित्वात आहे. मात्र वैदिक संस्कृतीने काही शतके उलटल्यानंतर ती स्वीकारली. शिवलिंगे दोन प्रकारची असतात : स्वयंभू (निसर्गनिर्मित) आणि कृत्रिम (मानवनिर्मित). जे लिंग स्वतः प्रकट झाले आहे, ते स्वयंभू लिंग म्हणून ओळखले जाते. ते काही कारणाने थोडे झिजले तरी त्याचे देवत्व नष्ट होत नाही, अर्थात त्याचा जीर्णोद्धारही होऊ शकत नाही. भारतात अशी सुमारे ७० स्वयंभू शिवलिंगे आहेत. स्वयंभू लिंगे ही अनियमित स्वरूप व आकाराची असतात. मानवनिर्मित लिंगे ही दगड, वाळू, लाकूड, धातू ,(सोने, रूपें, तांबे, पितळ, वगैरे आठ प्रकारच्या धातू), स्फटिक, रत्ने इत्यादींची घडविली जातात. याशिवाय अपराजितपृच्छेप्रमाणें तात्कालिक माध्यमें म्हणून कुंकु, कापूस, वगैरेचाही उपयोग करीत असत. याशिवाय नर्मदेंत मिळणारे मोठे गुळगुळीत दगड 'बाण लिंगें' म्हणून पूजले जातात. त्यांचे स्वरूप, आकार यात स्थान, साधनपरत्वे पुष्कळ फरक असू शकतो. भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. ए. गोपीनाथ राव (१८७२-१९१९) यांनी शिवलिंगांचे चल व अचल असे वर्गीकरण केले आहे. ज्याची गाभाऱ्यात स्थापना केली जाते, ते अचल लिंग होय.
मानुष लिंगाचे तीन भाग असतात, खालचा चौकोनी म्हणजे ब्रह्मभाग, त्यांच्यावर अष्टकोनी म्हणजे विष्णू भाग व सर्वात वरचा गोल म्हणजे शिवभाग असा त्याचा क्रम असतो (रे.चि. अठ्ठावीस ३३,३४). या भागांच्या उंचीच्या भेदाने लिंगांचे निरनिराळे प्रकार कल्पिले आहेत. सर्वच शिवलिंगे अशा प्रकारे तीन भागांत विभाजित असतात असे मात्र नाही. बरीचशी केवळ गोल खांबासारखीच असतात. सध्या ज्यास शिवलिंग समजले जाते त्याचे साधारणतः शाळुंका आणि ऊर्ध्व पाषाण असे दोन भाग पडतात. येथेच शिवलिंगांवर दिसणाऱ्या आडव्या रेघेचा ही विचार करावयास हवा जिला 'ब्रह्मसूत्र' अशी संज्ञा आहे. खरे म्हणजे मुळात शिवाचे लिंग म्हणजे मानव लिंगाची प्रतिकृती आहे.
सुरुवातीला कित्येक ठिकाणी ती हुबेहूब घडविलेली आहे. पुढे मात्र तिच्यात सुधारणा करण्यात आल्या. मानव लिंगाचे टोक चेतनावस्थेत थोडे फुगलेले असते. या फुगीर भागाला सुपारी असे म्हणतात. लिंगाचे टोकांवर सुपारीची सुरुवात अंकित करणारी रेषा पुढील काळांत ब्रह्मसूत्र या नावाने ओळखली जाऊ लागली व 'सिद्धांतसारावलि' सारख्या ग्रंथांनी तिला भक्कम अशी शास्त्रीय चौकट दिली.
शिवलिंग ज्या दगडांत स्थापित करतात तो विशिष्ट आकाराचा घडविलेला असतो. त्याला 'पीठ' किंवा 'योनी' अशी संज्ञा आहे. नेहमीच्या भाषेत आपण तिला शंकराच्या पिंडीची 'शाळुंका' असे म्हणतो (रे.चि. अठ्ठावीस, ३५), लिंग स्थापन झाल्यावर पुरता ब्रह्मभाग व पुरता किंवा अर्घा किंवा एक चतुर्थांश विष्णुभाग त्याने लपतो. त्या पीठाला एकाधिक कंगोरे असतात व निरनिराळ्या अलंकरणाने ते सुशोभित केलेले असते. या अलंकाराणांच्या फरकाने पीठाचे प्रकार कल्पिले आहेत. पीठाच्या वरच्या भागांत पिंडीवर सांडणारे पाणी वाहून जाण्याकरिता 'जलनिर्गम' किंवा खोलाद नाली केलेली असते. ही पूजेला बसताना पूजकाच्या उजव्या व लिंगाच्या डाव्या बाजूला असावी असे विधान आहे. प्रारंभी घडीव शिवलिंग हे हुबेहूब पुरुषाचे शिस्न वाटावे अशा प्रकारे त्याच्या अग्रभागी ब्रह्मसूत्राच्या रेषा काढल्या जात. मात्र स्वयंभू लिंगावर अशा रेघा असतीलच असे नाही. कालांतराने हे ब्रह्मसूत्र आणि वरील मणिभाग नाहीसे होऊन सरळसोट शिवलिंगे अस्तित्वात आली. लिंगावर शिवमुख, प्रतिमा दिसू लागल्या. प्रारंभिक लिंगे ही स्तंभस्वरूप होती, हळूहळू त्यांत बदल होत एकमुख, द्विमुख, चतुर्मुख लिंगे प्रचलित झाली; अर्थात हे स्थित्यंतर शेकडो वर्षांच्या काळात झाले. मुखलिंगे इ. स. पू. पहिल्या शतकापासून प्रचलित आहेत. सध्या ज्ञात असलेल्या मुखलिंगांमध्ये भरतपूरच्या संग्रहालयात असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग सर्वाधिक प्राचीन समजले जाते. त्यावर शंकराचे पागोटे घातलेले मुख आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुषाणकालीन शिवलिंगाखाली विटांचा ओटा किंवा लेण्यात कोरून काढलेले असल्यास त्याखाली चौथरा अशी रचना दिसते. अभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठी त्यात प्रणालकाचीही व्यवस्था असते. कुषाण काळातील एकमुखलिंगे अनेकदा सापडतात, त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे आडवा त्रिनेत्र, कुरळे केस, जटाभार, क्वचित पागोटे, कपाळावर ललाटपट्ट ही होत.
ज्योतिर्लिंगें : - हळुहळू समाजात लिंगपूजा दृढमूल झाली. आज भारतातील सुप्रसिद्ध शैवतीर्थांचे ठिकाणी शिवाच्या प्रतिमेचे पूजन होत नसून लिंगपूजनच होत असतें. भारतात पसरलेल्या शिवलिंगांत ज्योतिर्लिङ्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारा लिंगांना फार मोठी मान्यता प्राप्त आहे. ही लिंगे खालील होत.": १) सोमनाथ (सौराष्ट्र, गुजराथ) २) मल्लिकार्जुन (श्री शैल, आंध्रप्रदेश) ३) विश्वेश्वर किंवा विश्वनाथ (वाराणसी, उत्तरप्रदेश) ४) केदारेश्वर (केदारनाथ, उत्तरप्रदेश) ५) घृष्णेश्वर किंवा घृष्णेश्वर (वेरूळपासून २ मैल, महाराष्ट्र) ६) नागनाथ किंवा औंढ्या नागनाथ (जिल्हा परभणी, महाराष्ट्र) ७) भीमाशंकर (खंडाळ्याहून २५ मैल उत्तरेस भीमानदीच्या काठी लोणावळ्याजवळ, महाराष्ट्र) ८) ओंकारेश्वर (ऑकारमांधाता, मध्यप्रदेश) ९) महाकालेश्वर (उज्जयिनी, मध्यप्रदेश) १०) त्रंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र) ११) बैद्यनाथ किंवा वैजनाथ. हे दोन आहेत- एक महाराष्ट्रांतील परळी वैजनाथ, जिल्हा बीड व दुसरा बैजनाथधाम, देवघर, बिहार. १२) रामेश्वर (केरळ) स्वयंभूलिंगें : ज्योतिर्लिंगाप्रमाणेंच स्वयंभू किंवा स्वयंभूव लिंगांचे ही मोठे महत्त्व आहे." कामिकांगमांप्रमाणें जे लिंग स्वतः प्रगट झालेले आहे आणि अज्ञात काळांपासून अस्तित्वांत आहे ते स्वयंभूव म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारचे लिंग जरी कारण परत्वे थोडे भंग झाले, शत्रूच्या ताब्यात गेले किंवा त्याला अन्य अपाय झाला तरी त्याचे देवत्व नष्ट होत नाही. त्याचा जीर्णोद्धार किंवा नव्याने स्थापना करावयाची नसते, फक्त थोडा संस्कार केला म्हणजे झाले. प्रचलित मान्यतेप्रमाणे व्यात्वांत ६८ स्वयंभू लिंगे पसरली आहेत. महाराष्ट्रात मुंबई येथील अमरेश्वर (अंबरनाथ) हे एक स्वयंभू लिंग समजतात. तांत भूलिगांप्रमाणेच गणप व आर्थ लिंग अर्थात् गणांनी किंवा त्रऋषींनी स्थापन करून पुजलेली लिग ही आदल्याच असतात. या लिंगाच्या बाबतीत त्यांचे मान, आकार, ब्रह्मसूत्रांदिकांचा अभाव वगैरे गोष्टीचा विचार करावयाचा नसतो. महाराष्ट्रांपुरते बोलावयाचे झाल्यास ग्रामीण महाराष्ट्र हा शिवोपासकांचा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. येथे अनेक ज्योतिर्लिंगे तर आहेतच पण त्याशिवाय व्याप्रेश्वर, वाडेश्वर, कालेश्वर, सर्वेश्वर, वाळुकेश्वर, कपर्दिकेश्वर, नर्मदेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर, वेळणेश्वर अशी अनेक महादेवाची मंदिरें उभी असलेली दिसतात. त्याचप्रमाणें लातूर व टोका येथील सिद्धेश्वर, अमरावती जिल्ह्यांतील सालबार्डी येथील महादेव, जालन्याचा पंचमुखी महादेव अशी अनेक जागृत शिवस्थानें महाराष्ट्रात आहेत. आर्ष व गणप लिंगाव्यतिरिक्त माणसाने स्थापन केलेली लिंगें 'मानुष लिंगें' म्हणून ओळखतात.
शिवलिंगाचें प्रकार (र.चि. अठ्ठावीस ३७-४५) : शिवलिंगाच्या बाहेरील अलंकराला आधार मानून मानुषलिंगाचे काही प्रकार ठरविले गेले आहेत. यापैकी मुखलिंग, नियात शिवलिंगाना लिगाला सोडून बाकी मध्यकाळांतच जास्त मिळतात. त्यातल्यात्यांत उत्तरेपेक्षा दक्षिणेत यांच्या प्रघात जास्त आहे. मयमतादि ग्रंथांत सांगितलेले हे प्रकार खालील होत : क) अष्टोत्तरशतलिंगें : यांत लिंगाच्या पूजाभागांवर म्हणजे शिवभागांवर १०८ छोटी लिंगे कोरलेली असतात. ख) सहस्रलिंगें (रे.चि. अठ्ठावीस, ३२) : वरील प्रमाणेंच येथें छोट्या लिंगाची संख्या १००० असते. असेच कोटिलिंग ही घडवितात. ग) धारालिंगें (रे.चि. अठ्ठावीस ४३) : येथें लिंगावर उभे पैलू किंवा धारा पाडलेल्या असतात. आगमग्रंथांत मतभेदाने यांची संख्या ५ पासून २८ पर्यंत दिलेली आहे. घ) मुखलिंगें (रे. चि. अठ्ठावीस ४२) : येथे पिंडीत शंकराचे मानव मुखही कोरलेले असते. हा प्रकार फार जुना आणि बहुप्रचलित आहे; म्हणून यावर थोडा विस्ताराने विचार करावयास हवा.
गुप्तकाळापर्यंतची उत्तर भारतीय मुख लिंगें : मुखलिंगांची प्राचीनता इसवीसनांपूर्वी पहिल्या शतकांपर्यंत पोचते. आज माहीत असलेल्या लिंगांत सर्वात जुने असे भरतपूरच्या संग्रहालयांत असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग होय. या लिंगावर शंकराचे पागोटे घातलेले मुख आहे (चित्र ८२). मथुरेच्या एका कुषाणकालीन शिलापट्टांवर पिंपळाखाली विटांच्या चौथऱ्यावर एक मुखलिंग स्थापित केलेले दिसते (चित्र ८४ ल.सं.सं.बी. १४१). येथे लिंगाचा मुखभाग समोर असून मागचा भाग झाडाच्या बुंध्याकडे आहे. कधीकधी लिंगांचे एक दोन किंवा चार मुखांशी संयोजन करीत असत. यात दोनमुखी लिंग क्वचित मिळणारे असून त्याचा एक कुषाण कालीन नमूना मथुरेच्या संग्रहालयांत आहे. (म.सं.सं. १४.४६२). पंचमुखलिंगें नंतरची आहेत. कुषाणकालीन मुखलिंगां संबंधी खालील गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत (चित्र ८३) : क) मुख : भरतपूर संग्रहालयांतील लिंगाच्या मुखावर पागोटें दिसते, पण इतरत्र बहुतेक जटाभारच असतो. चतुर्मुख लिंगात पागोटें दिसते, त्याचा विचार पुढे येईलच. ख) मुख आणि लिंगाचे संयोजन : कुषाणपूर्व काळांत मुख लिंगांपासून स्वयं उद्भूत झाल्यासारखें दिसते पण कुषाण काळांत मात्र या दोघांचे संयोजन करणारे एक किंवा दोन असे फुलांचे जाड हार आहेत. या हारांवर फुलापानांची सजावट मिळते. हे अलंकरण कुषण काळाच्या साध्या शिवलिंगांवरही दिसते. वायुपुराणांतील वर्णनाप्रमाणें शंकराच्या डोक्यावर शोभणाऱ्या कमलमालेच्या पागोट्यांकडे (पद्ममालाकृतोष्णीष) हा संकेत असणें संभवतें, अथवा ही माला म्हणजे पुढें दिसणाऱ्या 'ब्रह्मसूत्रां'चे पूर्व रूप असू शकेल. मदतकाळांकडे मुख आणि लिंगांचे हे अनैसर्गिक संयोजन लुप्त होते व पुनः मुख लिंगातून सहज प्रगट होतांना ग) एक (र.वि. सत्तावीस २७) किंवा दोन मुखाची लिंगे : कुषाण काळांतील एक मुखलिंगें बरीच मिळतात. येथे आडवा त्रिनेत्र, कुरळ केस, जटामंडल, कचित पागोटे व कपाळांवर ललाटपट्ट" अशी वैशिष्ट्ये दिसतात. ही लिंगे साधारणपणे जाडीत कमी पण उंच मात्र त्या मानाने जास्त अशी असतात. काहीचा वरच्या भागांवर मानवलिंगाचा आकार दिसतो व त्याच्या थोडे खाली मालेने संयोजित मानव मुख दिसते (चित्र ८३). कुषाणकालीन लिंगांशी तुलना केल्यांस गुप्त काळांत मुखलिंगांची खालील वैशिष्ट्ये उघड दिसतात : अ) त्रिनेत्र आडवा नसून उभा दिसतो. आ) गोल बांधलेल्या (वृत्तबंध) जटांबरोबरच खांद्यांवर विखुरलेल्या जटा (उभय पार्श्वस्थ विकीर्ण जटालक) * दिसतात. ३) लिंगातून मुख स्वतः उद्भूत झालेले भासते. ई) आतां फक्त मुखच दाखविण्याऐवजी गळा आणि तेथें घातलेली एकावली ही दिसू लागते. (चित्र ८५) 3) भूमरा (जिल्हा सतना म.प्र.) येथून मिळालेल्या मुखलिंगांप्रमाणे काही नमून्यांत" रत्नखचित भालपट्ट दिसतो व याची सांगड महाभारतांतील 'मणिभूषित मूर्धा', नित्यमुद्वद्ध मुकुट", किरीटी, वगैरे पदांशी घालता येते. ऊ) आता मुखलिंगांची उंची कमी होऊन त्याचा घेर वाढला, त्याचप्रमाणें लिंगाग्र लहान झाले व मुखांच्या आकारांत वाढ झाली. परिणाम असा की लिंगाचा बराच भाग मुखानें झाकला जाऊं लागला." ए) मुखांवरील राकटपणा लुप्त होऊन तेथे 'शिवत्व' झळकू लागले. ऐ) काही नमुनें असेही मिळू लागले जेथें मुखांबरोबरच ब्रह्म, विष्णू आणि शिव भागही दाखविले आहेत. सारनाथ (वाराणसी) येथून मिळालेल्या व तूर्त कलकत्त्याच्या संग्रहालयात असलेल्या या प्रकारच्या मुखलिंगांत खालचा भाग चौकोन, मधला अष्टपैलू आणि वरचा गोल असून विष्णूभागाच्या ब्रह्मभाग दुप्पट आणि शिल भाग चौपट आहे." मुख शिवभागांत जवळ जवळ मधोमध आहे. एकमुखलिंगः
अकबरपुर, छाता (मथुरा) येथे मिळालेले कुषाण कालीन एकमुख लिंग (तूर्त मथुरा संग्रहालय) त्याच्या खालील भागावर असलेल्या बुढापा पण स्थूल काय गणांमुळे महत्त्वाचे आहे (रे.चि.शि. ३०) A.K.Srivastava, Siva Linga with Ganas, A New find from Mathure, ARAS., XLI 1981- 82, p. 236 गुप्तकाळातही मुखलिंगे निर्माण होत होती, मात्र त्यांत काही बदल झाले; त्रिनेत्र उभा झाला, मुखासोबत गळा व त्यात घातलेली ‘एकावली’ देखील दिसू लागली. डोक्यावर बांधलेल्या जटांसह खांद्यावर विखुरलेल्या जटाही दिसतात. मुखलिंगाची उंची कमी होऊन त्यांचा घेर वाढला, लिंगाचा बराच भाग मुखाने झाकला जाऊ लागला. मध्य प्रदेशातील खोह या गावी एक गुप्तकालीन सुरेख एकमुख लिंग आहे. ते लिंगाच्या खालच्या एकतृतीयांश भागात कोरलेले असून डोक्यावर जटामुकुट, चंद्रकोर तसेच कपाळावर त्रिनेत्र आहेत. गळ्यावरील वळ्या व त्याखाली एकावलीही दिसते. गुप्तोत्तर काळात एकमुख लिंगांची लोकप्रियता कमी झाली. गुप्तकाळांत देखील एकमुख लिंगें बऱ्याच मोठ्या प्रमाणांत घडवीत असत (चित्र ८५).
एकमुख शिवलिंग, खोह (मध्य प्रदेश).
पाटेश्वर येथे अशा प्रकारचे एक शिवलिंग आहे. ह्या एकमुखलिंगाभोवती लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.
पाटेश्वर येथील एकमुखलिंग
द्विमुखलिंग आतापर्यंत फक्त एकच माहीत आहे (म.सं.सं. १४.४६२). महाभारतांत एके ठिकाणी शिवास द्विवक्त्र म्हणून म्हटले आहे, त्याचा येथे संबंध लागू शकेल. द्विमुखलिंग दुर्मीळ असून मथुरा संग्रहालयात एक द्विमुखलिंग आहे. पहाडपूर (बांगला देश) येथील उत्खननात इ. स. आठव्या शतकातील मृत्तिकाफलकावर त्रिमुख शिवलिंग सापडले. योनीसह असलेल्या या लिंगावरील तिन्ही मुखांच्या कानात चक्रकुंडले व मस्तकावर जटाजूट आढळतात.
गुप्त मुखलिंगाची वैशिष्ट्यें : - गुप्तोत्तरकाळांत एकमुख लिंगांची लोकप्रियता त्या मानाने कमी झाली. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका मध्यकालीन द्वारशाखेच्या खालच्या भागांवर एक मुखलिंग कोरलेले दिसते (म.सं.सं. १३ २९४). एक उल्लेखनीय मध्यकालीन एकमुखलिंग जंगलमहाल, चुनार जिल्हा वाराणसी येथील मंदिरांत आहे. शिवलिंगावर फक्त शिवाचे मुख दाखविले असून कान मात्र गाईच्या कानांसारखें आहेत. गोकर्णेश्वर म्हणता येण्यासारखें हे लिंग बाराव्या-तेराव्या शतकाचे असावे. घ) त्रिमुखलिंग : पहाडपूर येथील उत्खननांत सुमारें ८व्या शतकांच्या मातीच्या एका फलकांवर योनीसह त्रिमुखलिंग मिळाले आहे. लिंगांच्या तिन्हीं मुखांवर जटाजूट असून कानांत चक्रकुंडलें आहेत. लिंग भागांका ब्रह्मसूत्राचाही काही भाग दिसतो.
ड) चतुर्मुखलिंग : शिवलिंगाच्या चारही बाजूस एक-एक मुख कोरलेले असते तेव्हा त्यास चतुर्मुख लिंग म्हणतात. ही शिवाची चार रूपे आहेत असे मानले जाते. ‘महाभारता’तील कथेप्रमाणे एकदा तिलोत्तमा नावाची स्वरूपसुंदर अप्सरा देवमंडळाला प्रदक्षिणा घालू लागली, तेव्हा तिला न्याहाळण्यासाठी शंकराची चार तोंडे उत्पन्न झाली. ही चार तोंडे म्हणजे अघोर, उष्णीषिन्, योगी आणि स्त्री ही होत. ही मुखे कोणकोणत्या दिशांना असावीत, हे कुषाणकालपर्यंत निश्चित नव्हते, ते गुप्तकाळात झाले. विष्णुधर्मोत्तर पुराणात त्यांची माहिती अशी येते की, पूर्वेकडील मुख हे इंद्रपदांचे शासन करणारे व पागोटे घातलेले ‘उष्णीषिन्’, पश्चिमेस योगीस्वरूप आणि मुंडन केलेले ‘योगी’, दक्षिणेकडील मुख हे संहार करणारे ‘अघोर’, तर उत्तरेकडे स्त्रीमुख असते. स्त्रीमुखाव्यतिरिक्त इतर मुखांवर त्रिनेत्र असतो. ‘रूपमंडन’ या ग्रंथात लिंगाच्या सभोवार घडवावयाची ही मुखे दिशानुक्रमे तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव आणि ईशान या पंचब्रह्मांची असावीत असे वर्णन केले आहे. एकच मुख घडवल्यास, ते पूर्वेकडे असावे. दोन असल्यास ती पूर्व व पश्चिम या दिशांना, तीन मुखे असल्यास, ती पूर्व, दक्षिण आणि उत्तरेस असावीत. चार किंवा पाच मुखे असल्यास चार दिशांना चार तसेच एक ऊर्ध्व दिशेस घडवावे असे सांगितले आहे.
चतुर्मुख शिवलिंग, पाटेश्वर (महाराष्ट्र).
पाटेश्वर येतीलच चतुर्मुखलिंग.
याच ग्रंथात अन्यत्र आपल्या मुखाची व्याख्या करताना शिवाचे असे वाक्य आहे" कीं मी पूर्वमुखानें इंद्रपदांचे शासन करतो, माझे पश्चिममुख सौम्य आहे, दक्षिण मुख संहाराकरिता आहे आणि उत्तरमुखानें भी उमेशी बोलत असतो. याची संगती अशी लावता येईल कीं इंद्रपदांशी संबंध असलेले पूर्वमुख हे पागोटें घातलेले असून संहार करणारे; दक्षिणमुख हे अघोररूप, योगीरूप किंवा मुंडित असें असते. त्याचप्रमाणें पश्चिमेकडील सौम्य असून उत्तरें कडील स्त्रीमुख असतें. महाभारतांच्या वरील उल्लेखानें या चार प्रकारच्या मुखांची दिशास्थानें ही निश्चित झालेली दिसतात. विष्णुधर्मोत्तर पुराण या दिशास्थानांचे वर्णन करते." आपण विचारात घेतलेल्या लिंगांची मुखस्थिती खालील प्रमाणे आहे :
दिशा
भीटालिंग (इ.पू.
३-२रेंश.)
कौशाम्बोलिंग (इ.पू.
१ल.श.)
दिल्लीलिंग (सु.
२रें.श.)
मथुरालिंग (सु.
३रें.श.)
कौशांबीलिंग (सु.
५वें.श.)
पूर्व
मुंडित
(खंडित)
पागोटेंघातलेले
सौम्य
सौम्य
पश्चिम
स्त्री
पागोटेंघातलेले
सौम्य
स्त्री
सौम्य
उत्तर
पागोटेंघातलेले
स्त्री
मुंडित
(खंडित)
स्त्री
दक्षिण
अघोर
अघोर
अघोर
अघोर
अघोर
वरील तक्त्यांवरून एक गोष्ट उघड होते की कुषाणांचा काल संपेपर्यंत मुखस्थानांत एकरूपता आलेली नव्हती, पण गुप्तकालांत ती स्थिर झाली व विष्णुधर्मोत्तर पुराणाने तिला शास्त्रीय चौकट दिली. या ग्रंथांप्रमाणें अघोर (चित्र ८७) आणि स्त्री (चित्र ८६) ही दक्षिण व उत्तर अर्थात एकमेकांच्या पाठीकडे असावयास हवी. सुरुवातीच्या काही लिंगात हे दिसत नाही. दुसरें म्हणजें असें की गुप्तकालीन लिंगांत पागोटें घातलेल्या मुखांचा पूर्ण अभाव आहे, त्याचप्रमाणें मुण्डित तोंड ही आढळत नाही चौथा मुद्दा त्रिनेत्राविषयीं आहे. प्रथम तीन लिंगात कोणत्याच मुखांवर तो दिसत नाही, कुषाण काळांत तो असणें अनिवार्य नव्हतें, पण गुप्तकाळांत मात्र तो स्त्रीमुखां व्यतिरिक्त सर्वत्र दिसतो. बिरला अकादमीतील लिंगावर दिसणारे आडवे आणि उभे त्रिनेत्र त्यांना दाखविण्याच्या पद्धतीचा संक्रांतिकाल सुचवतात. अर्धचंद्रांविषयी देखील असाच प्रकार आहे. गुप्तकाळांपर्यंत शिवांचे बालेन्दुशेखर मुख फारसे दिसत नाही, पण पुढे सामान्य होते. गुप्तकाळांपर्यंत खालील चतुर्मुखलिंगें महत्त्वाची आहेत : १) भीटा (अलाहाबाद) येथून मिळालेल्या पंचास्य लिंगातील आजूबाजूला दिसणारी चारमुखें. २) कौशांबी (अलाहाबाद) चे चतुर्मुख लिंग (अलाहाबाद सं.सं. ६३६) ३) दिल्ली संग्रहालयातील लिंग (सं.सं. ६५ १७२) ४) मधुरेचे लिंग जे मुळांत पंचास्य होते (सं.सं. १५.५१६) ५) कौशांबीचे गुप्तकालीन लिंग (ल.सं.सं. एच्. ३, चित्र ८६-८७) ६) मध्यभारतांतील गुप्तकालीनलिंग (बिरला अकादमी संग्रहालय, कलकत्ता, सी. ९७) साधारणपणें एकाच लिंगाच्या चारी बाजूस ही मुखें कोरीत असत, पण मथुरेच्या लिंगात मात्र चार मुखलिंगें एकत्र संयुक्त झालेली दाखविली आहेत. मध्यकालीन चतुर्मुख लिंगें : गुप्तोत्तर काळांतील चतुर्मुख लिंगें विष्णुधर्मोत्तराच्या सामान्य आधारांवर घडविलेली दिसतात. पण त्यांत अलंकारांची बहुलता व साधारण अंकनांत रेखीवपणा जास्त दिसतो. अशा प्रकारची लिंगें उत्तरप्रदेश, राजस्थान, वगैरे भागांत आढळतात (चित्र ८८)
ङ) पंचमुख किंवा पंचास्य लिंगें : उत्तर भारतांत पंचमुख लिंगाची परंपरा बरीच जुनी दिसते. इकडील सर्वांत जुनें म्हणून प्रसिद्ध असलेलें भीटा लिंग (ल.सं.सं. एच् चित्रे ८९-९२) पंचास्य पद्धतींचेच आहे. याचा काळ ईसवी सनाच्या पूर्वी तिसऱ्या ते दुसऱ्या शतकांच्या जवळपासचा आहे. उत्खननाने हे सिद्ध झाले आहे कीं इ.पू. तिसऱ्या शतकांपासून सनाच्या सहाव्या शतकांपर्यंत भीटा येथे शैबांचे एक मोठे केंद्र होते व ते बुंदेलखंडातील कालिंजर केंद्राशी संबद्ध होतें. भीटालिंग लिंगभागांवर चतुर्मुख असून त्याच्या डोक्यावर शंकराची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). तिचा उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्यांत घट आहे. तोंडाचा भाग आता तुटला आहे पण खांद्यावर झुलणारे केस, कानांतील कुंडलें व गळ्यातील दागिना अजून सुरक्षित आहेत. तसेंच शिवाचे जानवें, हातातील कंकणें आणि ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे. खालील मुखांत एक मुंडित व दुसरे स्त्रीमुख आहे (चित्र ९१). तिसरें पागोटें घातलेले असून (चित्र ९०). चौथे अघोर किंवा भयंकर आहे. चौथ्याची दाढी, मिशा, बाहेर डोकावणाऱ्या विकराळ दाढा आणि कपाळांवरील भालपट्ट नीट पाहतां येतो. शिवाची ही रूपें तत्पुरुष, वामदेव, अघोर व सद्योजात या नावांने व पांचवें ईशान या नावाने ओळखतात.
च) लिंग, अर्धनारीश्वर : मधुरेहून मिळालेल्या या कुषाण कालीन लिंगाच्या दर्शनी भागावर उभा ऊर्ध्वलिंगी द्विभुज अर्धनारीश्वर अंकित आहे. तूर्त हे शिल्प लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्यूझियम मध्ये आहे. (रे.चि.शि. ३१). N.P. Joshi, Early forms of Siva, Discourses, fig. 27, 28, p.57
छ) पंचलिंग : एकाच योनिपीठावर पाच लिंगाचे एकत्र अंकन बऱ्याच ठिकाणी आढळते, पण विदिशा, मध्यप्रदेश येथे असल्या अशा शिल्पाची दोन वैशिष्ठ्यें आहेत. प्रथम म्हणजे मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे पहाणारे मानव मुख अर्थात् 'ईशान मुख' प्रत्यक्ष आहे. साधारणपणे शंकराचे हे मुख अदृश्य समजले जाते. (रे.चि. शि. ३२)
दुसरे म्हणजे चौकोनी शांळुकेच्या चारही टोकावर प्रत्येकी पांच लिंगाचा समूह दाखवला आहे. अर्थात् एकूण लिंगाची संख्या २५ होते. पंचवीस लिंगाचे अंकन 'वाराणसी पटावर' ही आढळते. ही संख्या सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या २५ तत्त्वांची द्योतक होऊ शकते. दुसरे पञ्चास्य लिंग कुषाण काळांतील असून मथुरा संग्रहालयांत (सं.सं. १५.५१६) आहे, पण आतां त्याचे पांचवे व येथेही शिव प्रतिमा असणें अगदीच असंभव नाही पूर्णपणें खंडित झाले आहे. मध्यकाळांत पंचमुख लिंगें फारशी दिसत नाहीत. मात्र काशीकडे शंकरांच्या पिंडीवर घालण्यांची पितळी कवचें पंचमुखी दिसतात. विदिशा आणि खजुराहो येथे एकाच योनिपीठावर पाच लिंगांचा समूह असलेली पंचमुख लिंगे पाहावयास मिळतात. विदिशा येथे तर मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे तोंड करून शिवाचे ‘ईशान्’ हे मुख आहे.
झ) अष्टमुख लिंग : या प्रकाराचे हे एकमेव लिंग गुप्तकालीन असून मध्यभारतांत शिवना नदीच्या तटांवर मंदसोरला मिळाले व आज तेथेच पशुपतिनाथ या नांवाने पूजित होत आहे. हे लिंग सव्वा सहा फूट उंच असून याचा घेर अकरा फूट आहे. याला एकूण आठ तोंडे आहेत. चार मधोमध आणि चार त्यांच्या दीडफूट खाली. वरील चौकड्यांत एक रौद्र आणि तीन सौम्य आहेत. खालील चार थोडी अपूर्ण वाटतात.
शिवाच्या अष्टमूर्ती विषयी वाङ्मयीन पुरावे बरेच आहेत. कालिदासांने आपल्या शाकुंतलांच्या मंगल श्लोकांत अष्टमूर्तिशिवांचे स्मरण केले आहे. शैव तंत्रांप्रमाणें शिव, भैरव, श्रीकंठ, सदाशिव, ईश्वर, रुद्र, विष्णू आणि ब्रह्मा या शंकराच्या अष्टमूर्ती होत. कूर्मपुराणांत खालील प्रमाणें शिवाच्या अष्टमूर्तींची प्रतीकें व परिवार दिला आहे" : ‘कूर्मपुराण’ व ‘शिवतंत्र’ यांत त्यांची नावे सापडतात; पण त्यांत एकवाक्यता नाही. पेजेंग (इंडोनेशिया) येथेही एक अष्टमुखलिंग आहे.
अष्टोत्तरशत लिंग.
अष्टोत्तरशतलिंगामध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १०८ अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.
पाटेश्वर येथील अष्टोत्तरशत लिंग
सहस्त्रलिंग
सहत्रलिंगांमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १००० अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.
पाटेश्वर येथीलच अजून एक सहस्त्रलिंग
कोटीलिंग
हा प्रकार पण सहस्त्रलिंगासारखाच पण यातील अयोनीज लिंगांची संख्या हजारापेक्षाही अधिक असते तेव्हा त्याला कोटीलिंग म्हणतात.
पाटेश्वर येथील कोटीलिंग
शिवलिंगांचे ढोबळमानाने काही प्रमुख प्रकार आपण बघितलेच. पाटेश्वरला यापेक्षाही अधिक प्रकारची लिंगे आहेत पण ती याधीही लेखात येऊन गेलेलीच आहेत आणि त्यातील बरीचशी तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत
दिक्पालरूपी शिवलिंग.
हे ही शिवलिंग पाटेश्वर येथीलच आहे. यात शाळुंकेवरील शिवलिंगाभोवती चक्र, चांदणी, बदाम यांच्या आकृत्या आहेत. एकूण दहा चिन्हे यावर कोरलेली आहेत. यातील आठ चिन्हे म्हणजे अष्टदिक्पालांचे प्रतिक असावे तर उरलेली दोन सूर्य आणि विष्णूची प्रतिके असावीत.
मूर्तिलिंग किंवा विग्रहलिंग (रे. चि. सत्तावीस २५, २८, ३१)
मुखांचे ऐवजी लिंगावर किंवा लिंगाला चिकटलेली संपूर्ण शिवप्रतिमा कोरलेली असली तर तिला आपण विग्रहलिंग किंवा मूर्तिलिंग असे म्हणू, हा शब्द अर्थातच जुना नाही. या प्रकारचे मथुरेहून मिळालेले एक लिंग डॉ. कुमारस्वामी यांनी प्रकाशित केले आहे. येथे शिव चतुर्भुज असून त्याचे जवळ कोणतेही आयुध नाही. मधुरेहून मिळालेले कुषाणकाळचेच दुसरे मूर्तिलिंग सध्या अमेरिकेंत फिलाडेल्फिया येथे आहे. येथे पागोटें घातलेला शंकर द्विभुज आहे. त्याचा उजवा हात अभय मुद्रेत दिसतो, डाव्यांत घट आहे (चित्रे ९३-९४) जवळ जवळ अशाच प्रकारचे एक कुषाणकालीन लाल दगडाचे शिवलिंग भरतपूर (राजस्थान) पासून ८ मैलाचे अंतरावर असलेल्या गामरी गावांत आढळल्याची श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी नोंद केली आहे. हे लिंग ४४ सें.मी. उंच व ४२ सें.मी. रुंद असून याच्या समोरच्या व मागच्या भागावर कुंभोदरगण किंवा यक्ष दिसतो. दोन्ही बाजूस अभयमुद्रेत उभा असलेला हा कोण असावा गण, यक्ष कीं स्वतः शिव? अग्रवालांनी यक्ष म्हटलेल्या मूर्तीत धोतर व उपरणें दिसतें. मुगुटाबद्दल कांहीच सांगवत नाही. भीटा येथील सर्वतोभद्रिका व फिलाडेल्फिया येथील शिवलिंगाला विचारात घेता हा शिव असण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण भारतांकडे लक्ष दिल्यास या प्रकारचे एक फार जुनें आणि विशाल विग्रहलिंग तेथें ही आढळते. ही प्राचीनतम प्रतिमा तामिळनाडूच्या रेणुगुंठा नामक स्थानाजवळ एका मंदिरांत विद्यमान आहे. परशु रामेश्वर या नांवाने प्रसिद्ध असलेले हे पांच फूट उंचीचे लिंग असून त्याच्या दर्शनी भागांवर शिवाची द्विभुज स्थानक प्रतिमा आहे (रे.चि. सत्तावीस २५). उजव्या हातांत शिवाने खाली तोंड करून लोंबणाऱ्या मेंढ्याच्या मागच्या तंगड्या धरल्या आहेत, व डाव्यात कलश असून याच हाताने त्याने आपला खांद्यावर असलेला भला मोठा परशु सावरला आहे. शिवाच्या मस्तकांवर विशिष्ट प्रकारचें पागोटें असून गळा, हात, वगैरे भागांवर निरनिराळे दागिने घातले आहेत. नेसूचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आहे, पण ऊर्ध्वलिंग व जानवें दोन्ही नदारत आहेत." शंकर एका राक्षसाच्या म्हणजे अपस्मार पुरुषाच्या खांद्यावर उभा आहे. श्री. गोपीनाथराव यांच्या मते ही प्रतिमा इसवीसनापूर्वी पहिल्या शतकांतील असावी
नांद व चौमा येथील शिवलिंगें : विग्रह लिंगाच्या प्रसंगाने मध्यकाळांकडे वळण्याच्या अगोदर उत्तर भारतातील दोन जुन्या शिवलिंगांचा धावता आढावा घेणे आवश्यक आहे. ही लिंगे वरच्यापेक्षा थोडी भिन्न आहेत कारण येथे एकटा शंकरच कोरलेला नसून अन्य प्रतिमा ही उत्कीर्ण आहेत. प्रथम म्हणजे राजस्थानाच्या नांद गावांत असलेले लिंग. पुष्कर क्षेत्रांजवळील हे र्तिमा श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी शोधून काढले (रे.चि. सत्तावीस २६). त्यांच्या मताप्रमाणें याच्यात विष्णु, शिव आणि ब्रह्म भागा व्यतिरिक्त एक चौर शोधही आहे. त्यांनी खालच्या भागाला विष्णू असें म्हटले आहे ज्यावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेव अंकित आहेत. त्याच्च्यावर ब्रह्मभाग आहे जेथे चारी बाजूला अभय मुडेंत असलेल्या मुकुटधारी द्विभुजमूर्ती दिसतात, याच्यास अर्थात् तिसरा भाग त्यांच्या मते सौरभाग आहे. येथे पुनः दोन हाताच्या मूर्ती आहेत ज्याच्यात एक टोकदार टोचे घातलेली व कमळ घेतलेली आहे. सर्वाच्या वर शिवभाग आहे. येथे चारी बाजूला द्विभुज लकुलीशाचे दर्शन घडते. याप्रमाणें या लिंगावर लहान मोठ्या अशा एकूण वीस प्रतिमा आहेत. हे लिंग कुषाणकालीन आहे. दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात असलेल्या चौमा गावातील लिंग होय. चौमा हा चतुर्मुखाचा अपभ्रंश असू शकतो. या लिंगावर वरच्या बाजूला कुषाणकालीन माळा नसून एक कातडें गुंडाळल्यासारखें दिसत आहे व त्याला एका बाजूला गाठ मारली आहे (रे.चि. सत्ताविस ३०). विशेष म्हणजे लिंगाच्या पायथ्याकडे चार दिशांना चारपैकी प्रत्येकी एक पाण्याची सुरई किंवा उंचमानेचा कलश (चित्र ९५) एक यक्ष, एक बसलेला सिंह आणि एक स्त्रीचे मुख कोरलेले आहे. या चारी वस्तूंचा शंकराशी फार जवळचा संबंध आहे हे नव्याने सांगावयास नको.
कायलिंग, परशु रामेश्वर मंदिर, गुडीमल्लम (आंध्र प्रदेश).
गुडीमल्लमच्या परशुरामेश्वर मंदिरात एक सुंदर कायलिंग आहे. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील ही मूर्ती असून पुरुष लिंग अकरातील देशातील पहिली मूर्ती आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही मूर्ती आहे. स्थान महात्म्य नुसार परशु रामाने आई रेणुकेला मारल्या नंतर तो प्रायश्चित करण्यासाठी तिथे गेला होता. प्रायश्चित करीत असताना परशुराम रोज एक दैवी फुल शिवलिंगावर अर्पण करीत असे. या दैवी फुलाचे रक्षण करण्यासाठी चित्रसेन नावाचा यक्ष सोबत ठेवलेला होता. या यक्षास रोज एक प्राणी आणि भांडे भर ताडी द्यावयाचे कबूल करण्यात आले होते. कारण रोज एकच दैवी फुल उगवत असे. ते फूल परशुराम लिंगावर अर्पण करीत असे. एक दिवस यक्ष चित्रसेनलाही भक्ती करावीशी वाटली. ते दैवी फुल त्याने शिवाला अर्पण केल्याने दोघात घनघोर युद्ध झाले. शेवटी शिव प्रसन्न होऊन दोघांनाही आपल्यात सामावून घेतले. जवळपास पाच फूट उंचीच्या शिवलिंगाच्या तीन चतुर्थांश भागात अपस्मार पुरुषावर उभी द्विभुज शिवप्रतिमा आहे. तिच्या उजव्या हातात बकऱ्याचे (किंवा मेंढ्याचे) मागचे दोन पाय व डाव्या हातात कलश व परशू आहेत. डोक्यावर मोठे पागोटे आहे व हार, मेखला इ. अलंकार दिसतात. या शिवलिंगाच्या वरील भागास मानवी शिस्नमण्याचा आकार दिलेला स्पष्टपणे दिसतो. टी. गोपीनाथ राव यांच्या मते, हे कायलिंग इ. स. पहिल्या शतकातील असावे, मात्र इतर विद्वानांच्या मते त्याचा काळ आठवे-नववे शतक इतका पुढचा आहे. स्थानिक भाषेमध्ये पल्लव म्हणजे युद्धभूमी तर गुड्डी म्हणजे मंदिर होय. या प्रदेशावर पल्लव, गंगपल्लव, बना, चोल यांच्या राजवटी होत्या. मंदिराच्या बाह्य अंगावर यासंदर्भात शिलालेखही कोरलेले आहेत. अगदी असेच एक शिल्पपट कुशान काळातील इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असून ते मथुरा संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. प्रस्तुत मूर्तीत शिवलिंग, परशुराम आणि यक्ष चित्र सेन दिसून येतात.
लेण्यातील शिवलिंग :-
हरवळे (साखळी, गोवा) येथील गुहांतील वैशिष्ट्यपूर्ण आकाराची शिवलिंगे. बघायला मिळतात. कदाचित ती तांत्रिक पूजेशी संबंधित असू शकतील असे वाटते. गुहेतील शिवलिंगे अगदी आदिम काळातील म्हणजे दिसतात. ह्यांचा काळ नक्की कोणता ते समजत नाही. पण काही अभासकांच्या मते ही लिंगे तांत्रिक पंथातील वाटत नाही. ही शिवलिंगांच्या प्राथमिक अवस्थेतील दिसतात. पुरुष शिश्नाचा आकार असलेली. बहुधा २००० वर्षे जुनी.
हरवाळ्याची लेणी ही जांभा दगडाच्या एका लहानशा टेकडीत कोरलेली आहेत. ह्या लेण्यांमध्ये तीन प्रार्थना कक्ष आहेत. तिन्ही कक्षांमध्ये शिवलिंग सदृश्य लिंग आढळून येते. लिंगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर सहाव्या - सातव्या शतकातला शिलालेख आढळतो.
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील पहिलं लिंग
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील दुसरं लिंग
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील तिसरं लिंग
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील चौथं लिंग
फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे लेण्यांमधील तिन्ही कक्षांमध्ये प्रार्थनेसाठी लिंग आहेत. मूर्ती पूजेमध्ये लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला आपल्या आराध्य देवतेची अचूक मूर्ती घडवता येत नसेल तर तिला लिंग स्वरूपात पूजलं जातं. मूर्तिशास्त्राचं हे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्राचीन काळी अनेक देवळांमध्ये तांदळा स्वरूपामध्ये बऱ्याचशा देवांचे पूजन केलं जातं.
ह्या लिंगांचं नीट निरीक्षण केल्यास असं आढळून येतं की ही लिंग तिथे आढळणाऱ्याच दगडांमध्ये घडवली गेली नाहीयेत. लिंगांसाठी लागणारा दगड हा दुसरीकडून आणून वैशिष्ट्यपूर्णरित्या घडवला आहे. चित्र क्रमांक चार मध्ये लिंगाच्या मध्यभागी पडणारा प्रकाश हा व्यवस्थित परावर्तित होताना दिसतो. यावरून लिंगाच्या दगडाची आणि त्याला घासून गुळगुळीत केलेल्या पोताची ( texture ) कल्पना यावी.
जावा (इंडोनेशिया) येथे सहाव्या-सातव्या शतकातील एक चतु:कायलिंग सापडले. मध्यभागी लिंग असून त्याच्या चारही बाजूंस ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य या चार देवता आहेत. या सर्व प्रतिमा चतुर्भुज आहेत. ब्रह्मदेव त्रिमुखी असून एका हातात कमंडलू आहे. विष्णूच्या हातात पृथ्वी आणि शंख आहेत. शंकर त्रिनेत्र, जटामुकुटधारी असून त्याचा हात वरदमुद्रेत आहे, तर सूर्याच्या मागच्या दोन हातात कमळे असून पायात बूट आहेत.
राजस्थानातील पुष्करजवळ नांद या गावी इ. स. सु. तिसऱ्या शतकातील एक कुषाणकालीन कायलिंग आहे. त्यावर वरपासून खालपर्यंत कोरलेल्या प्रतिमांमुळे ते वेगळे व अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यावर ब्रह्म, विष्णू व शिव भागासह एक सौर भागदेखील आहे. विष्णू भागावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेवाचे अंकन आहे. ब्रह्मभागाच्या चारही बाजूस मुकुटधारी द्विभुज प्रतिमा आहेत. त्याच्यावर सौरभाग असून तेथे टोपी घातलेली व हातात कमळ घेतलेली प्रतिमा दिसते. त्याच्यावर शिवभाग आहे तेथे द्विभुज लकुलिशाची प्रतिमा कोरली आहे. अशा एकूण वीस लहानमोठ्या प्रतिमा आहेत.
मथुरा (उत्तर प्रदेश), भरतपूर (राजस्थान), गुडीमल्लम (जि. तिरुपती, आंध्र प्रदेश), जावा (इंडोनेशिया) इ. ठिकाणी अशी कायलिंगे मिळाली आहेत. लखनौ वस्तुसंग्रहालयात इ. स. पू. सु. पहिल्या शतकातील एक मूर्तिलिंग आहे, मात्र ते बरेच भग्न झाले आहे. त्याच्या माथ्यावर मानवी ऊर्ध्वांग दिसते. त्याच्या डाव्या हातात घट असून उजवा हात अभयमुद्रेत आहे. खांद्यावर वस्त्र आणि कानात कुंडले आहेत. या प्रतिमेच्या खालच्या भागात, चार उपदिशांना चार मुखे आहेत. इतिहास संशोधक ग. ह. खरे (१९०१-१९८५) यांच्या मते ती स्त्रीमुखे असावीत. त्याखाली एक शिलालेख आहे.
सर्वतोभद्रलिंगें (चित्रं ९६, ९७, ९८) :
गुप्तोत्तर
काळांपासून विग्रह लिंगाचा एक नवा प्रकारसमोर आला. हा म्हणजे वैष्णव,
शाक्त, सौर, गाणपत्य, शैव वगैरे निरनिराळ्या मतांच्या एकीकरणाच्या दिशेकडे
टाकलेले महाविलयन पद्धतीचे पाऊल होते. या लिंगाच्या चारी बाजूला प्रतिमा
असल्यामुळे यांना आपण 'सर्वतोभद्र लिंग' अशी संज्ञा देऊ.
अशी
लिंगे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान वगैरे भागांत एकाधिक आढळतात.
रामनगर (वाराणसी) येथील संग्रहालयांत असलेल्या लिंगावर चारी बाजूला क्रमाने
सूर्य, गणपती, शिवपार्वती आणि वराह कोरलेले आहेत (चित्र ९६).
म्वाल्हेरच्या संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र लिंगावर विष्णू, शिव,
ब्रह्मा, आणि सूर्य दिसतात आणि दुसऱ्यावर फक्त शिव, ब्रह्मा, आणि विष्णूच
आढळतात."
यंत्रलिंगें :
मध्यकाळांत
शिवलिंगाचा एक नवा प्रकार रूढ झालेला दिसतो. तो म्हणजे लिंगाच्या
शीर्षभागांवर श्रीयंत्रासारखी यंत्र कोरणें, हा प्रकार वाराणसीकडे
जास्तआढळतो. तेथे अन्नपूर्णेच्या मंदिरात व शिंद्यांच्या बालाजी मंदिरात
अशो शिवलिंगे आहेत. (र.चि. २८, ३६)
याचाच अन्य प्रकार म्हणजे
शीर्षभागांवरील यंत्रांबरोबरच लिंगाच्या चारी बाजूस शिव प्रतिमा ही कोरणें.
लखनऊ संग्रहालयांत असलेल्या नेपाळी कलेच्या एक लिंगावर हा प्रकार आढळतो.
येथे चारीकडे घट व माळा घेतलेल्या शंकराच्या आवक्ष प्रतिमा आहेत. (ल.सं.सं.
७०६ चित्र ९५)
स्थाणुलिंगें :
विशेष
कोणतेही अलंकरण नसलेले साधेसुधे लिंग तयार करणें सर्वात सोपे असे. कुषाण
काळातील विशाल खांबाच्या आकाराची लिंगे म्हणजे खर्या अर्थाने शिवाची
स्थाणुरुपे होत. या प्रकारची बरीच लिंगे आपल्या माहितीत आहेत. (चित्र ९९).
प्राचीन लिंगाचे एक उदाहरण म्हणून मथुरेहून मिळालेल्या एक शिलापट्टाकडे
बोट दाखविता येईल. ज्यावर पंख असलेले पशू शिवलिंगाचे पूजन करताना दाखविले
आहेत, कुषाणकालीन लिंगांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे सांगता येतील :
मांतगेश्वर मंदीर
१)
लिंगाग्रभागावर गुंडाळलेली दुहेरी किंवा एकेरी माळ. तिला आपण मार्गे
संयोजन बंध किंवा ब्रह्मसूत्रांचे प्रारंभिक रूप असे म्हटले आहे. ही
निरनिराळ्या अलंकाराने सुशोभित असते. काही नमुन्यांत हिला चार मोठाली फुलें
व गोंडेदार टोकें ही आहेत. (चित्र ९९)
२) काही ठिकाणी माळेच्या ऐवजी फक्त कमळाच्या पाकळ्यांची ओळ दिसते.
३)
एका शिवलिंगावर एका बाजूला अष्टदल कमळ कोरलेले आहे." याचा अभिप्राय नक्की
सांगवत नाही. शिवाची अष्टमूर्ती किंवा त्याने घातलेली आठफुले याचा हा
प्रतीकात्मक संकेत असू शकतो.
४) काही लिंगाचा अगदी खालचा भाग
विशेष लक्ष पुरविण्यासारखा असतो. एकात (म.सं.सं. १५, ६५२) या जागी
कदंबपुष्प आणि पानांचे अलंकरण आहे तर दुसऱ्यात पायथ्याचा एकीकडचा दगड वरून
लोंबणाऱ्या माळेने दोन भागात विभक्त केला आहे. चौमा लिंगाच्या पायथ्यावर
असलेली सिंहादि अलंकरणें आपण पाहिली आहेतच तसेच पायथ्याशी दोन गण असलेल्या
मुखलिंगाचा उल्लेख मागे आला आहे.
५) काही शिवलिंगावर लेख ही
कोरलेले असतात. उदाहरण म्हणून मथुरेच्या जटेश्वर लिंगाचे नांव घेता येईल.
गुप्तकाळांत साधारण लिंगाच्या आकारात ही बदल झाला. त्यांचे मूळ अर्थात्
'शिश्न' रूप बाजूला जाऊन त्याला छान, गुळगुळीत व गोंडस अशा खांबाचे रूप
मिळाले. या काळात त्रिभागात्मक लिंगें ही बरीच तयार झाली. त्यांचे आकार
लहान मोठे आहेत. करमदंडा (जिल्हा फैजाबाद, उत्तर प्रदेश) येथें गुप्तकाळाचे
(सन् ४३६ चे) एक त्रिभागात्मक अभिलिखित लिंग मिळाले आहे. (ल.सं.सं.ओ. ५)
मध्यकाळांत
दिसून पडणारे धारालिंगादि प्रकारांचे विवेचन वर झालेच आहे. स्मृतिलिंगें,
समाधिलिंगें, वगैरे प्रकारांचा मूर्तिविज्ञानांशी सरळ संबंध नसल्यामुळे
आपणास तिकडे वळण्याचे कारण नाही.
लिंगपंचक : उमामहेश्वर मूर्तीच्या एका प्रकारांवर दिसणाऱ्या पांच शिवलिंगाची आपण मागें बघीतली आहे. काहीसा तशातलाच हा दुसरा प्रकार आहे. यांत एकामेकांना लागलेले चार गोळे व त्यांच्यावर ठेवल्या सारखा पांचवा गोळा असे हे लिंग पञ्चक एकाच पीठांवर स्थापन केलेले दिसते. विदिशेच्या (मध्यप्रदेश) संग्रहांलयांत याचे काही नमूने ठेवलेले आहेत. कदाचित पंचमुख लिंगाचे हे लघुसंस्करण असावे.
इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार
पाटेश्वर येथील तांत्रिक पंथाची शिवलिंगे
शिवलिंग असलेली काही शिल्पें : भारतीय कर्लेत अशी बरीच शिल्पें मिळतात ज्याचा शिवलिंगाशी प्रत्यक्ष संबंध असतो. कांही ठळक प्रकार खाली दिलेले आहेत. १) लिंगाला मस्तकांवर धारण करणारा भक्त. भारतकला भवन, वाराणसी (सं.सं. २२३) येथे असलेली ही जुनी मूर्ती कदाचित भारशिव वंशाशी संबंधित असेल. २) लिंगोद्भव व लिंगारूढ प्रतिमा. यांची विवेचनें मागें झाली आहेत. (रे.चि. एकोणतीस ४७) ३) लखनऊ संग्रहालयांतील एका शिलापट्टांवर (सं.सं. बी. १४१) पिंपळाच्या झाडांखाली स्थापन केलेले शिवलिंग दाखवून एक यक्षकथा चित्रित केली आहेत पण अद्यापि तिची ओळख पटलेली नाही. हा शिलापट्ट कुषाण काळातील आहे (चित्र ८४). ४) वैवाहिक मूर्तीतील एका प्रकारांत पार्वतीच्या हातांत शिवलिंग दिसते. २ ५) असेच लिंग तपस्विनी पार्वतीच्या हातांत व सद्योजात मूर्तीच्या जवळही आढळते. ६) विष्णूच्या पाठशिळेवर असलेल्या दश अवतारांत काही ठिकाणी कूर्मांच्या पाठीवर मंदराचल म्हणून ब्रह्मसूत्राने शोभित असलेले शिवलिंग दिसते (र.चि. एकोणतीस ५०). ७) वाराणसीला बऱ्याच ठिकाणी अलिकडच्या शिल्पात दोन नागांच्या मध्यें किंवा नंदीच्या पाठीवर ही लिंग आढळते (रे.चि. अठ्ठावीस ४०, ४६). असेच लिंग नागपूरला टेकडीवरच्या गणेशमंदिरांत आहे. ८) दक्षिण भारतांत मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शंकर शिवलिंगातून प्रगट झालेला दिसतो. ९) महाराष्ट्रांत विठ्ठल आणि लक्ष्मी यांच्या मस्तकावर शिवलिंग आढळते. १०) शिवलिंगाची पूजा दृश्यें ही कुषाण काळांपासून (चित्र १००) आधुनिक काळांपर्यंत मिळतात. ११) बसवेश्वरांसारख्या नंदीच्या गळ्यांतही ते दिसते. १२) विष्णूच्या पाठशिळेवर असलेल्या दशअवतारांत काही ठिकाणी मत्स्याच्या पाठीवर शिवलिंग दिसते (रे.चि. एकोणतीस ४९).
लंकेचा
राजा रावण याने हे रचलेले शिव तांडव स्त्रोत्रम. रावण एक उत्तम राजकारणी
होता. तो संस्कृतचा प्रकांड पंडित होता तसेच तो संगीताचा रसिक होता,
उत्कृष्ट वीणा वादक होता व आयुर्वेद, व्यापार राज्यशास्त्र यात तो पारंगत
होता. शिव तांडव स्तोत्रम हे काव्य अनुप्रास अलंकाराने सजलेले आहे. शिव
तांडव स्त्रोत्र कधी रचले याविषयीची कथा रावणानुग्रह या मूर्ती प्रकारच्या
कथेत ऐकायला मिळते.
मराठी
अर्थ - जटांच्या जंगलातून वाहणा-या गंगेच्या प्रवाहाने विशुद्ध झालेल्या
ठिकाणी, गळ्यात लोंबणारी सापांची जाडजूड माळ अडकवून डमरूतून डमड्डमड्डमड्डम
असा आवाज काढणारा व महाभयंकर तांडव करणारा शंकर आमचे कल्याण करो.
मराठी-
ज्याच्या मस्तकावरील जटांच्या विस्तीर्ण डोहात गोंधळून फिरतांना अस्थिर
चंचल लाटांची वेलबुट्टी करणारी गंगा आरूढ झाली आहे, ज्याच्या कपाळपट्टीवरील
अग्नी धगधगत आहे, ज्याच्या मस्तकावर चंद्रकोर आहे अशा (शंकरा) बद्दल मला
नेहेमी प्रेम वाटते.
मराठी
अर्थ - पृथ्वीवरील श्रेष्ठ पर्वतराजाच्या कन्येच्या क्रीडेचा नित्य
साथीदार असणा-या, तिच्या चंचल नेत्रांच्या कोप-यातून येणा-या कटाक्षांनी
मनाला आनंद होणा-या, कृपापूर्ण दृष्टिक्षेपांमधून अवघड संकटांना दूर
ठेवणा-या, कधीकधी दिगंबरावस्थेत असणा-या शंकरात माझे मन रमो.
मराठी
अर्थ - सहस्र डोळे असलेला इंद्र व इतर झाडून सगळ्या देवांच्या किरीटातील
फुलांमधील परागांमुळे ज्याचे पायदान धुळकट झाले आहे, सर्पश्रेष्ठाच्या
माळेने ज्याच्या जटांची गाठ बांधली आहे, असा चकोराचा मित्र म्हणजेच चंद्र
ज्याच्या शिरावर आहे असा चंद्रशेखर अखंड संपदेला कारणीभूत होवो.
मराठी
अर्थ - कपाळाच्या चौथ-यावर धगधगणा-या अग्नीने ज्याने मदनाला वैराण करून
टाकले, ज्याला देवांचा नेता इंद्र वंदन करतो, ज्यातून जणू अमृतकिरणच
स्रवतात असा चंद्र मस्तकी धारण करणारा व हाती मोठे भिक्षापात्र घेतलेला शिव
आमचा होवो.
मराठी
अर्थ - प्रचंड कपाळपट्टीवर धगधगीत जळणा-या विक्राळ अग्नीच्या प्राशनासाठी
ज्याने पाच बाण ज्याचे शस्त्र आहेत अशा मदनाला दाखल केले, पर्वतश्रेष्ठ
हिमालयाच्या कन्येच्या स्तनाग्रांवर शोभिवंत रेषांची नक्षी काढणारा एकमेव
चित्रकार असणा-या त्रिनेत्र शंकराचे ठायी माझी बुद्धी एकवटो
मराठी
अर्थ - अमावास्येच्या रात्री रोखून धरलेल्या काळ्याकभिन्न नवीन ढगांच्या
माळांमुळे दिसणा-या अंधारासारखी ज्याची मान तेजस्वी दिसते, ज्याने आपल्या
शिरावर देवांची नदी गंगा धारण केली आहे, ज्याने हत्तीचे कातडे पांघरले आहे,
जो सर्व कलांचे एकत्रित स्थान आहे, जो सर्व जगाचा भार वाहतो, असा शंकर
आमची सुखे वृद्धिंगत करो.
मराठी
अर्थ - ज्याची पूर्ण उमललेल्या कृष्णकमळाच्या, विश्वाच्या समान, काळ्या
रंगाची ग्रीवा मानेवर लोंबणा-या कानशीलांच्या सौंदर्याशी निगडीत झाली आहे,
ज्याने मदनाचा, तीन नगरांचा, जगताच्या बंधनांचा, यज्ञाचा, हत्तीचा,
अंधकासुराचा नाश केला आहे, त्या यमावर नियंत्रण ठेवणा-या शंकराची मी उपासना
करतो.
मराठी
अर्थ - महत्त्वपूर्ण, सर्वांसाठी कल्याणमय कलारूपी कदंबाच्या मोहोरातील
मधुर रसाचा विरंगुळा असलेल्या भ्रमराची, ज्याने मदनाचा, तीन नगरांचा,
जगताच्या बंधनांचा, यज्ञाचा, हत्तीचा, अंधकासुराचा नाश केला आहे, त्या
यमावर नियंत्रण ठेवणा-या
जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वस- -द्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवाट् | धिमिद्धिमिद्धिमिध्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डवः शिवः || ११
मराठी
अर्थ - प्रचंड तीव्रतेने फिरणा-या सर्पाच्या बाहेर पडणा-या निश्वासातून
कपाळी धगधगणारा वन्ही पसरताना, धिमिद धिमिद असा मृदंगाचा मंगलमय उच्च आवाज
चढत जाताना क्रमाक्रमाने उग्र तांडव करणारा शंकर विजयी होवो.
मराठी
अर्थ - विभिन्न प्रकारच्या शय्या, गळ्यातील सर्पमाला किंवा मोत्यांची माळ,
श्रेष्ठ रत्न किंवा मातीचे ढेकूळ, मित्र किंवा विरोधक, गवत किंवा
कमळासारखे नेत्र, सामान्य जन वा पृथ्वीचा राजा, सर्वांना सारखेपणाने
वागवणा-या शंकराचे मी केव्हां पूजन करू शकेन.
कदा निलिम्पनिर्झरीनिकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमञ्जलिं वहन् | विमुक्तलोललोचनो ललाटभाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् सदा सुखी भवाम्यहम् || १३
मराठी
अर्थ - गंगाकाठी कुटीरात राहून, वाईट विचारांपासून सुटका झालेला, नित्य
डोक्यावर जोडलेले हात धरून, स्त्रीच्या चंचल नेत्रांपासून मुक्तता मिळवून,
शिवाच्या कपाळीच्या तेजाचा बंधक मी, 'शिव शिव' असा मंत्र जपत केव्हां सुखी
होईन ?
इमं हि नित्यमेवमुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन्स्मरन्ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततम् | हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोचनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् || १४
मराठी
अर्थ - अशा या सांगितलेल्या अतीव उत्कृष्ट स्तवनाचे जो स्मरण करतो, वाचतो,
उच्चारतो तो कायमचा पवित्र होतो. अन्य कोणत्याही मार्गाने न जाता तो
श्रेष्ठ शंकराचा भक्त होतो. शंकराच्या केवळ चिन्तनाने जीवाला मुक्तता
मिळते.
मराठी
अर्थ - जो हे शंकराचे स्तवनपर रावणाचे गीत सायंकाळी पूजेच्या वेळी पठन
करतो, महादेव त्याला नित्य रथ, श्रेष्ठ हत्ती, घोडे यांच्यासह सुंदर स्थायी
लक्ष्मी दान करतो.
वृष म्हणजे बैल किंवा इथ आपण नंदी म्हणू. शिवाला प्रिय असणारा हा नंदी
त्याचे वाहन आहे. वृष वाहन शिव प्रतिमेत महादेव नंदीला टेकून उभा असतो
किंवा त्यावर बसलेला असतो तर कधी पार्वती पण बरोबर दाखवलेली असते. यालाच
हरगौरी देखील बोलतात. सदर लेखात तिन्ही प्रकारच्या मूर्ती घेतल्या आहेत व
तिन्ही वेगवेगळ्या ठिकणांहून आहेत.
पहिली प्रतिमा हळेबिडू येथील असून
महादेव नंदी वर बसलेले आहेत तर पार्वती महादेवाच्या मांडीवर आहे. दोघेही
सुखासनात बसले आहेत. महादेव चतुर्भुज असून त्याच्या डाव्या वरच्या हातात
डमरू दिसते पण मूर्तीची तोडफोड झाली असल्याने इतर हातातील वस्तू ओळखू येत
नाहीत. महादेव व पार्वती दोघेही दागदागिन्यांनी अलंकृत आहेत. पार्वती-
महादेव दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. नंदी धृष्टपुष्ट असून गळ्यात
गोंड्यांची माळ, पायात झांजऱ्या आणि अंगावर विविध दागिने आहेत.
Image source: Onkar Todkar
खालील व्हिडिओ मध्ये तुम्ही नंदीची सुंदर मूर्ती पाहू शकता.
दुसरे
शिल्प ऐहोळे मधील दुर्गादेवी मंदिरातील आहे. आठ हात असणारे भगवान शिव
नंदीला रेलून उभे उभे आहेत. डावीकडील हातात अक्षमाळा, फळ,डमरू व वस्त्र आहे
तर उजवीकडील दोन हात नंदीच्या वशिंडावर असून तिसऱ्या हातात साप असावा असं
वाटतं. निरीक्षण करण्याची एक गोष्ट म्हणजे महादेवाच्या अंगावर व्याघ्रचर्म
असून वाघाचे तोंड महादेवाच्या उजव्या मांडीवर दिसते तसेच त्याची गाठ पण
मारलेली आपण पाहू शकतो. अंगावरील वस्त्र पाहून ते धोतर असावे असे वाटते.
डोक्याच्या मागे प्रभामंडळ असून डोक्यावर चंद्र धारण केलेले जटामुकुट आहे.
महादेवाशेजारी गण उभा आहे जो नंदीच्या शेपटी शी खेळत आहे.
Image source: Onkar Todkar
तिसरे
शिल्प संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील कर्णेश्वर मंदिरातील आहे. हे
शिल्प वितानाच्या खाली असणाऱ्या वर्तुळात आहे. गळ्यात गोंड्याची माळा
घातलेल्या नंदिवर भगवान शिव विराजमान आहेत. महादेवाचे खालील दोन हात तुटले
असून वरील दोन हातात त्रिशूळ आणि डमरू आहे. महादेवाच्या डोक्यावर
किर्तीमुखाने छत्र धरले आहे. दोन्ही बाजूला दोन मकर आहेत.
महादेवाच्या
मंदिरात किंवा जिथे महादेव असतील तिथं नंदी बहुधा असतोच. प्राचीन
काळापासून नंदीची पूजा केली जाते ती फक्त भारतातच नव्हे तर इतर देशात
देखील. मोहंजोडदो च्या उत्खननात देखील ५००० वर्षापूर्वीची नंदीची शिल्प
मिळाली आहेत.
बेबिलोनिया, सीरिया, मिस्त्र देशात देखील नंदीची पूजा
केल्याचे दिसते. नंदीला इतका मान आहे की काही काही मंदिरात जसं की हळेबिडू,
म्हैसूर येथील मंदिराच्या बाहेर १५-२० फुटांचे नंदी आहेत हे एकच दगडात
कोरले आहेत. त्यासाठी स्वतंत्र मंडप देखील आहे.
लिंगायत समाजात महादेव हे सर्वस्व मानलं जातं पण तरी महादेवाची कमी आणि नंदीची जास्त पूजा करतात.
शिवलिंग - संसार, विषय, प्राणी व सृष्टी ज्यात लय पावतात व त्यातूनच पुन्हा सृष्टी निर्माण होते म्हणून त्यास लिंग म्हणतात
Historicano
3–4 minutes
संसार, विषय, प्राणी व सृष्टी ज्यात लय पावतात व त्यातूनच पुन्हा सृष्टी निर्माण होते म्हणून त्यास लिंग म्हणतात.
Image source: Onkar Todkar
सृष्टी
जन्माच्या वेळी शांती तत्वाचा उद्भव झाला , त्याच्या पासून शक्ती व शक्ती
पासून नाद जन्मला व त्यातून बिंदू. ईश्वर, महेश्वर, नाद आणि बिंदू यांच्या
मिश्रणाला शिव म्हणतात.
शिवलिंग म्हटलं की नजरेसमोर येत ते एक पीठ (पूजेचे पाणी जाण्यासाठी असणारी सोय) आणि त्यावर उभट गोल शाळूंका.
पण शिवलिंग घडवण्यासाठी काही नियम आहेत. मग तो दगड निवडण्या पासून ते पूजा कशी करावी इथ पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पहाव्या लागतात.
शिवलिंगाचा आकार
प्रथमदर्शनी आपणाला शिवलिंग फक्त उभट गोलाकार दिसते पण त्याखाली अजून दोन भाग असतात.
ब्रम्हांश श्चतुरस्त्रोधो मध्ये श्टस्त्रस्तू वैष्णव।
पुजाभाग सुवृत्तः स्यात पिठोर्धव शंकरास्य च।।
फोटोत
दाखवल्याप्रमाणे शिवलिंगाचा सर्वात खालचा भाग चौकोनी असतो त्याला
ब्रम्हभाग म्हणतात. मधला भाग अष्टकोनी असतो त्याला विष्णूचा अंश म्हणतात.
सर्वात वरचा भाग वर्तुळाकार असतो ज्याला शंकराचा अंश म्हणतात. आणि हाच भाग
आपणाला दिसतो बाकी दोन भाग पिठात असतात.
Image source: Onkar Todkar
आता या भागांची मापे पण ठरलेली आहेत त्याचा उहापोह नंतर करू.
शिवलिंगाचे स्वरूप
धातु लिंग
सोने, चांदी, तांबे, कासा, पितळ, कलई, शिसे आणि लोखंड या आठ धातु पासून शिवलिंग बनवलं जातं. अशा लिंगाला चल लिंग पण म्हणतात.
मनोहर,श्रीमुख,
रुद्रतेज, महोत्सव, आनंद, सुवस्त्राश्य, स्त्रीपुंज, नंदिवर्धन अशी धातु
लिंगाची आठ नावे आहेत. मिश्र धातूचे लिंग कधीच बनवीत नाहीत म्हणजेच लिंग
सोन्याचे बनविले तर पीठ पण सोन्याचे च बनवावे.
काष्ठ लिंग ( लाकडापासून बनवलेले लिंग)
शिसव,अशोक,शिरीष,खैर,अर्जुन, चंदन,कडुनिंब,रक्तचंदन,देवदार,पारिजातक अशा झाडांपासून लिंग बनवतात.
मकरेंद,मांगल्य, पुष्प, सिध्दार्थक, दंड,प्रौरव, काम्य,पुष्पक, फलोदभव अशी काष्ठ लिंगाची नऊ नावे आहेत.
बाळ, युवती, वृद्धा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी असे पाषाणाचे प्रकार त्याच्यावर आघात केल्यानंतर होणाऱ्या नादातून ठरतात.
बारीक आवाज असणारी शिळा बाळ असते तर, घंटे प्रमाणे आवाज असंती शिळा युवती असते.
बद्द असा आवाज होणारी शिळा वृद्धा तर खणखणीत आवाज असणारी पुल्लिंगी शिळा असते.
मंजुळ आवाज असणारी स्त्रीलिंगी, खरखरीत, रुक्ष, हिन स्वर असणारी नपुसंक लिंगी.
मुखलिंग:-
मुखलिंग हे एकमुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी किंवा पंचमुखी असतात.
एकमुखी
लिंगात मुख हे समोर असते तर त्रिमुखी लिंगात तीन बाजूला मुख असते तर
पाठीमागील बाजूस मुख दाखवत नाहीत. या प्रकारच्या काही शिवलिंगात ब्रम्हा
आणि विष्णूचा पण चेहरा दाखवितात.
Image source: Onkar Todkar
चतुर्मुख लिंगावर चारही बाजूला मुख कोरलेले असते. या चारही मुखांना खालील प्रमाणे नावे आहेत.
सद्यो वामं तथा घोर पुरुष च चतुर्थकम ।
अर्थ:
पहिलं नाव सद्य, दुसरं वाम तिसरं नाव घोर तर चौथ नाव तत्पुरूष.
पंचमुखलिंग
सदरचे लिंग हे सातारा जिल्ह्यातील परळी गावात आहे. गावाच्या बाहेर पुरातन महादेव मंदिरासमोर हे लिंग असून त्यावर पाच मुख कोरली आहेत.
Image source: Onkar Todkar
शिवपुराणात
महादेवाला पाच मुख असल्याचे म्हटले आहे. सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष,
ईशान अशी या पाच मुखांची नावे आहेत. महादेव म्हणतात की ओंकार 'ॐ' ही
त्यांची उत्पत्ती आहे. त्यांच्या उत्तर मुखातून अकार, पश्चिम मुखातून उकार,
दक्षिण मुखातून मकार, पुर्व मुखातून बिंदु आणि मध्य मुखातून नाद प्रकट
झाला. अशा पाच अवयवांपासून 'ॐ' ची निर्मिती झाली.
वायुपुराणातील मतानुसार हा शिवाचा अठ्ठावीसावा अवतार समजला जातो तसेच हा
श्रीकृष्णाचा समकालीन होता अस देखील म्हटलं जातं. शिवाच्या प्रतिमा
रूपातील हा अवतार असून त्याने पाशुपत मताची स्थापना केली. एका मान्यतेनुसार
विश्वरचेता ब्रम्हा ते सूक्ष्म जीव हे सर्व प्राणी आहेत व त्यांना शिवाचे
पशू म्हटलं जातं. या सर्व पशुंचा पती असल्याने भगवान शंकरांना पशुपती
म्हटलं आहे.
याचे मुख्य लक्षण म्हणजे हातात असणारा लाकडी सोटा आणि याचे उर्ध्व लिंग म्हणजेच याचे लिंग वरच्या दिशेला असते.
सर्वच ठिकाणी हा आसन अवस्थेत म्हणजे बसलेला असावा अशी कल्पना केली आहे पण
काळाच्या ओघात याच्या स्थानक मूर्ती देखील घडवलेल्या पाहू शकतो.
विश्वकर्मावतारवास्तुशास्त्र मध्ये आलेल्या उल्लेखानुसार हा पद्मासनात
असतो तसेच हातात म्हाळुंग आणि सोटा असून उर्ध्वलिंगी असतो असा संकेत आहे.
मुळात लकुलिश ध्यानाच्या अवस्थेत असल्याने तो स्थानक असतो.
उदाहरणादाखल घेतलेल्या दोन्ही मूर्ती या बदामी जवळ असणाऱ्या महकुटा मंदिर समूहातील आहेत.
वरील सर्व संकेतांना फाटा देत या दोन्ही मूर्ती बनविल्या आहेत. दोन्ही मूर्तींच्या हातात परशू असून जटाभार आहे. जटा आणि उर्ध्व लिंग यावरून हा लकुलिश आहे हे आपण सांगू शकतो. एकाच्या हातात कमंडलू आहे तर दुसऱ्याचा हात वरदमुद्रेत आहे.
श्रशिवमहापुराणात शिवाच्या अठ्ठावीस अवतारांचा उल्लेख आहे तो खालील प्रमाणे.
श्वेतः सुतारो मदनः सुहोत्रः कङ्क एव च ।
लौगाक्षिश्च महामायो जैगीषव्यस्तथैव च ॥
दधिवाहश्च ऋषभो मुनिरुग्रोऽत्रिरेव च ।
सुपालको गौतमश्च तथा वेदशिरा मुनिः ॥
गोकर्णश्च गुहावासी शिखण्डी चापरः स्मृतः ।
जटामाली चाट्टहासो दारुको लागुली तथा ॥
महाकालश्च शूली च दण्डी मुण्डीश एव च।
सहिष्णुः सोमशर्मा च लकुलीश्वर एव च ॥
एते वाराहकल्पेऽस्मिन् सप्तमस्यान्तरे मनोः ।
अष्टाविंशतिसंख्याता योगाचार्या युगक्रमात् ॥
अर्थात,
श्वेत, सुतार, मदन, सुहोत्र, कंक, लौगाक्षि, महामायावी जैगीषव्य, दधिवाह,
ऋषभ मुनि, उग्र, अत्रि, सुपालक, गौतम, वेदशिरा, मुनि, गोकर्ण, गुहावासी,
शिखण्डी, जटामाली, अट्टहास, दारुक, लांगुली, महाकाल, शूली, दण्डी,
मुण्डीरा, सहिष्णु, सोमशर्मा और नकुलीश्वर असे हे क्रमाने अठ्ठावीस अवतार
होतात.
पैकी नकुलिश हा शेवटचा अवतार कायावरोहण या तीर्थस्थळी झाला. ज्या पाशुपत
संप्रदायाचा पुरस्कार लकुलिश ने केला त्यांची साधना देखील तितकी कठीण असते.
साधकांसाठी खालील संकेत गणकरिका नामक मिळतात ते असे
वासचर्या जपध्यानं सदारुद्रस्मृतिस्तथा ।
प्रसादश्चैव लाभानामुपाया: पंच निश्चिता।।
म्हणजेच
निवसाच्या स्थानाची काळजी घ्यावी, जप, ध्यान करावे. सदैव एकलिंगाचे ध्यान आणि स्मरण करावे.
असा हा एक शिवाचा अपरिचित अवतार.
गंडकी नदीतल्या काळ्या शाळीग्रामाचा वापर थोडा नंतर सुरू झाल्यावर काही ठिकाणची लिंगे नंतर बदलण्यात आली असावीत .
परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)
परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)
सहमत.
आज जिथे लिंग दिसत नाही ती बहुतांश मूर्तीभञ्जकांनी भग्न केलेली आहेत.
काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या
जागी बसवली गेलेली.
असेच
एक सासवडच्या चांगावटेश्वर मंदिरातील भग्न शिवलिंग. धडधडीतपणे फोडून
काढल्याचे दिसत असूनही हे शिवलिंग गुप्त आहे असे तिथल्याच एका फलकावर
लिहिलेले आहे.
आताचे
शिवाचे स्वरूप हे आर्यांचा रुद्र आणि द्रविडांचा लिंगरूप शिव यांचे
एकत्रिकरण असावे असेच दिसते. त्यामुळेच शिवाची उपासना सर्वात व्यापक
प्रदेशात होते. नेपाळातील पशुपतीनाथापासून ते थेट रामेश्वरपर्यंत.
सिंधु संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींमधे पशुपतीस्वरूप त्रिमुखी देवतेचे शिल्प आणि लिंगसदृश शिल्प आहे.
इथे
त्यांची छायाचित्रे पाहता येतील. अर्थात हा आताच्या स्वरूपातील शिव नाही
तर अगदी प्राथमिक काळातील शिवसदृश देवता (पशुपती) आणि आदिम रहिवाशांची
लिंगपूजा असावी.
शिवमूर्तींबाबत
पं महादेवशास्त्री जोशी यांच्या 'भारताची मूर्तीकला' या पुस्तकात रुद्र हा
अग्नितत्त्वापासून उत्पन्न झाला असे वेदातील उल्लेख आणि सिंधुसंस्कृतीतील
पशुपती आणि लिंग या शिल्पांबद्दल उल्लेख देऊन पुढे या दोन्हीचे एकत्रित रूप
म्हणजे आजचे शिवाचे स्वरूप यबद्दल विस्ताराने लिहिले आहे. या पुस्तकात
शिवाच्या मूर्तीबद्दल पं. जोशी म्हणतात, " शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर
शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा
केल्यासारखे होते. शाळुंका कशी निर्माण करावी? शाळुंकेच्या घेराचे ३
प्रकारे आहेत. लिंगाच्या घेराच्या तिप्पट तो अधम, दीडपट तो मध्यम तर चौपट
तो उत्तम. शाळुंकेची उंची विष्णुभागाइतकी असावी, तिचा आकार चतुष्कोण,
द्वादशकोण, षोडषकोण किंवा गोल असावा. अभिषेक हा शिवलिंगाचा मुख्य उपचार
असल्याने शाळुंकेला पन्हळ ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग शाळुंकेत स्थापन
करताना त्याचे ब्रह्मभाग व विष्णुभाग हे भूमीत जायला हवेत. रुद्रभाग तेवढाच
वर असावा."
मूर्तींच्या
प्रकारात पं जोशी दक्षिणामूर्ती असा एक प्रकार देतात. तो बुद्धी देणारा
आणि सामान्य मानवरूपात दाखवला जातो. आणखी एक प्रकार म्हणजे अर्धनारीश्वर.
मूळ लिंग आणि शाळुंका या स्वरूपातील शिवाची मूर्ती बनवायला सुरुवात झाली
तेव्हाचे रूप म्हणजे एकाच मूर्तीत सामावलेले शिव आणि पार्वेती.
चित्र
क्र ३, ४ आणि ५ मध्ये दाखवल्या प्रमाणे लेण्यांमधील तिन्ही कक्षांमध्ये
प्रार्थनेसाठी लिंग आहेत. मूर्ती पूजेमध्ये लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व
आहे. जेव्हा आपल्याला आपल्या आराध्य देवतेची अचूक मूर्ती घडवता येत नसेल तर
तिला लिंग स्वरूपात पूजलं जातं. मूर्तिशास्त्राचं हे सर्वात ठळक वैशिष्ट्य
म्हणावं लागेल. प्राचीन काळी अनेक देवळांमध्ये तांदळा ( तांदूळ नव्हे )
स्वरूपामध्ये बऱ्याचशा देवांचे पूजन केलं जातं. अगदी सत्यनारायणाच्या
पूजेतही आपण गणपती म्हणून सुपारीच मांडतो की !
गुप्तोत्तर काळांतील चतुर्मुख लिंगें विष्णुधर्मोत्तराच्या सामान्य आधारांवर घडविलेली दिसतात. पण त्यांत अलंकारांची बहुलता व साधारण अंकनांत रेखीवपणा जास्त दिसतो. अशा प्रकारची लिंगें उत्तरप्रदेश, राजस्थान, वगैरे भागांत आढळतात (चित्र ८८)
ङ) पञ्चमुख किंवा पञ्चास्य लिंगें :
उत्तर भारतांत पञ्चमुख लिंगाची परंपरा बरीच जुनी दिसते. इकडील सर्वांत जुनें म्हणून प्रसिद्ध असलेलें भीटा लिंग (ल.सं.सं. एच् चित्रे ८९-९२) पंचास्य पद्धतींचेच आहे. याचा काळ ईसवी सनाच्या पूर्वी तिसऱ्या ते दुसऱ्या शतकांच्या जवळपासचा आहे. उत्खननाने हे सिद्ध झाले आहे कीं इ.पू. तिसऱ्या शतकांपासून सनाच्या सहाव्या शतकांपर्यंत भीटा येथे शैबांचे एक मोठे केंद्र होते व ते बुंदेलखंडातील कालिंजर केंद्राशी संबद्ध होतें.
भीटालिंग लिंगभागांवर चतुर्मुख असून त्याच्या डोक्यावर शंकराची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). तिचा उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्यांत घट आहे. तोंडाचा भाग आता तुटला आहे पण खांद्यावर झुलणारे केस, कानांतील कुंडलें व गळ्यातील दागिना अजून सुरक्षित आहेत. तसेंच शिवाचे जानवें, हातातील कंकणें आणि ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे. खालील मुखांत एक मुंडित व दुसरे स्त्रीमुख आहे (चित्र ९१). तिसरें पागोटें घातलेले असून (चित्र ९०). चौथे अघोर किंवा भयंकर आहे. चौथ्याची दाढी, मिशा, बाहेर डोकावणाऱ्या विकराळ दाढा आणि कपाळांवरील भालपट्ट नीट पाहतां येतो. शिवाची ही रूपें तत्पुरुष, वामदेव, अघोर व सद्योजात या नावांने व पांचवें ईशान या नावाने ओळखतात.
दुसरे पञ्चास्य लिंग कुषाण काळांतील असून मथुरा संग्रहालयांत (सं.सं. १५.५१६) आहे, पण आतां त्याचे पांचवे व येथेही शिव प्रतिमा असणें अगदीच असंभव नाही पूर्णपणें खंडित झाले आहे. मुख -
मध्यकाळांत पंचमुख लिंगें फारशी दिसत नाहीत. मात्र काशीकडे शंकरांच्या पिंडीवर घालण्यांची पितळी कवचें पञ्चमुखी दिसतात.
च) लिंग, अर्धनारीश्वर :
मधुरेहून मिळालेल्या या कुषाण कालीन लिंगाच्या दर्शनी भागावर उभा ऊर्ध्वलिंगी द्विभुज अर्धनारीश्वर अंकित आहे. तूर्त हे शिल्प लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्यूझियम मध्ये आहे. (रे.चि.शि. ३१).
N.P. Joshi, Early forms of Siva, Discourses, fig. 27, 28, p.57
छ) पंचलिंग :
एकाच योनिपीठावर पाच लिंगाचे एकत्र अंकन बऱ्याच ठिकाणी आढळते, पण विदिशा, मध्यप्रदेश येथे असल्या अशा शिल्पाची दोन वैशिष्ठ्यें आहेत. प्रथम म्हणजे मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे पहाणारे मानव मुख अर्थात् 'ईशान मुख' प्रत्यक्ष आहे. साधारणपणे शंकराचे हे मुख अदृश्य समजले जाते. (रे.चि. शि. ३२)
दुसरे म्हणजे चौकोनी शांळुकेच्या चारही टोकावर प्रत्येकी पांच लिंगाचा समूह दाखवला आहे. अर्थात् एकूण लिंगाची संख्या २५होते. पंचवीस लिंगाचे अंकन 'वाराणसी पटावर' ही आढळते. ही संख्या सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या २५ तत्त्वांची द्योतक होऊ शकते.
झ) अष्टमुख लिंग :
या प्रकाराचे हे एकमेव लिंग गुप्तकालीन असून मध्यभारतांत शिवना नदीच्या तटांवर मंदसोरला मिळाले व आज तेथेच पशुपतिनाथ यानांवाने पूजित होत आहे. हे लिंग सव्वा सहा फूट उंच असून याचा घेर अकरा फूट आहे. याला एकूण आठ तोंडे आहेत. चार मधोमध आणि चार त्यांच्या दीडफूट खाली. वरील चौकड्यांत एक रौद्र आणि तीन सौम्य आहेत. खालील चार थोडी अपूर्ण वाटतात.
शिवाच्या अष्टमूर्ती विषयी वाङ्मयीन पुरावे बरेच आहेत. कालिदासांने आपल्या शाकुंतलांच्या मंगल श्लोकांत अष्टमूर्तिशिवांचे स्मरण केले आहे. शैव तंत्रांप्रमाणें शिव, भैरव, श्रीकंठ, सदाशिव, ईश्वर, रुद्र, विष्णू आणि ब्रह्मा या शंकराच्या अष्टमूर्ती होत. कूर्मपुराणांत खालील प्रमाणें शिवाच्या अष्टमूर्तींची प्रतीकें व परिवार दिला आहे" :
नांव
पत्नी
पुत्र
मूर्तप्रतीक
१ भव
उमा
शुक्र
जल
२ सर्व
विकेशी लोहितांग मही
३ ईशान
स्वहा
मनोजव
वह्नी
४ पशुपति
शिवा
स्कंद
वायु
५ भीम
दीक्षा
सर्ग
दीक्षित
६ उग्र
दिशा
संतान
ब्राह्मण
७ महादेव
रोहिणी
बुध
चंद्र
८ रुद्र
सुवर्चला शनि
सूर्य
मूर्तिलिंग किंवा विग्रहलिंग (रे. चि. सत्तावीस २५, २८, ३१)
मुखांचे ऐवजी लिंगावर किंवा लिंगाला चिकटलेली संपूर्ण शिवप्रतिमा कोरलेली असली तर तिला आपण विग्रहलिंग किंवा मूर्तिलिंग असे म्हणू, हा शब्द अर्थातच जुना नाही. या प्रकारचे मथुरेहून मिळालेले एक लिंग डॉ. कुमारस्वामी यांनी प्रकाशित केले आहे. येथे शिव चतुर्भुज असून त्याचे जवळ कोणतेही आयुध नाही. मधुरेहून मिळालेले कुषाणकाळचेच दुसरे मूर्तिलिंग सध्या अमेरिकेंत फिलाडेल्फिया येथे आहे. येथे पागोटें घातलेला शंकर द्विभुज आहे. त्याचा उजवा हात अभय मुद्रेत दिसतो, डाव्यांत घट आहे (चित्रे ९३-९४) ५. जवळ जवळ अशाच प्रकारचे एक कुषाणकालीन लाल दगडाचे शिवलिंग भरतपूर (राजस्थान) पासून ८ मैलाचे अंतरावर असलेल्या गामरी गावांत आढळल्याची श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी नोंद केली आहे. हे लिंग ४४ सें.मी. उंच व ४२ सें.मी. रुंद असून याच्या समोरच्या व मागच्या भागावर कुंभोदरगण किंवा यक्ष दिसतो. दोन्ही बाजूस अभयमुद्रेत उभा असलेला हा कोण असावा गण, यक्ष कीं स्वतः शिव? अग्रवालांनी यक्ष म्हटलेल्या मूर्तीत धोतर व उपरणें दिसतें. मुगुटाबद्दल कांहीच सांगवत नाही. भीटा येथील सर्वतोभद्रिका व फिलाडेल्फिया येथील शिवलिंगाला विचारात घेता हा शिव असण्याची शक्यता जास्त आहे.
दक्षिण भारतांकडे लक्ष दिल्यास या प्रकारचे एक फार जुनें आणि विशाल विग्रहलिंग तेथें ही आढळते. ही प्राचीनतम प्रतिमा तामिळनाडूच्या रेणुगुंठा नामक स्थानाजवळ एका मंदिरांत विद्यमान आहे. परशु रामेश्वर या नांवाने प्रसिद्ध असलेले हे पांच फूट उंचीचे लिंग असून त्याच्या दर्शनी भागांवर शिवाची द्विभुज स्थानक प्रतिमा आहे (रे.चि. सत्तावीस २५). उजव्या हातांत शिवाने खाली तोंड करून लोंबणाऱ्या मेंढ्याच्या मागच्या तंगड्या धरल्या आहेत, व डाव्यात कलश असून याच हाताने त्याने आपला खांद्यावर असलेला भला मोठा परशु सावरला आहे. शिवाच्या मस्तकांवर विशिष्ट प्रकारचें पागोटें असून गळा, हात, वगैरे भागांवर निरनिराळे दागिने घातले आहेत. नेसूचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आहे, पण ऊर्ध्वलिंग व जानवें दोन्ही नदारत आहेत."
शंकर एका राक्षसाच्या म्हणजे अपस्मार पुरुषाच्या खांद्यावर उभा आहे.
श्री. गोपीनाथराव यांच्या मते ही प्रतिमा इसवीसनापूर्वी पहिल्या शतकांतील असावी.я вклерозен
नांद व चौमा येथील शिवलिंगें :
विग्रह लिंगाच्या प्रसंगाने मध्यकाळांकडे वळण्याच्या अगोदर उत्तर भारतातील दोन जुन्या शिवलिंगांचा धावता आढावा घेणे आवश्यक आहे. ही लिंगे वरच्यापेक्षा थोडी भिन्न आहेत कारण येथे एकटा शंकरच कोरलेला नसून अन्य प्रतिमा ही उत्कीर्ण आहेत.
प्रथम म्हणजे राजस्थानाच्या नांद गावांत असलेले लिंग. पुष्कर क्षेत्रांजवळील हे र्तिमा श्री. रत्नचंद्र अग्रवाल की शोधून काढले (रे.चि. सत्तावीस २६). त्यांच्या मताप्रमाणें याच्यात विष्णु, शिव आणि ब्रह्म भागा व्यतिरिक्त एक चौर शोधही आहे. त्यांनी खालच्या भागाला विष्णू असें म्हटले आहे ज्यावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेव अंकित आहेत. त्याच्च्यावर ब्रह्मभाग आहे जेथे चारी बाजूला अभय मुडेंत असलेल्या मुकुटधारी द्विभुजमूर्ती दिसतात, याच्यास अर्थात् तिसरा भाग त्यांच्या मते सौरभाग आहे. येथे पुनः दोन हाताच्या मूर्ती आहेत ज्याच्यात एक टोकदार टोचे घातलेली व कमळ घेतलेली आहे. सर्वाच्या वर शिवभाग आहे. येथे चारी बाजूला द्विभुज लकुलीशाचे दर्शन घडते. याप्रमाणें या लिंगावर लहान मोठ्या अशा एकूण वीस प्रतिमा आहेत. हे लिंग कुषाणकालीन आहे.
दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात असलेल्या चौमा गावातील लिंग होय. चौमा हा चतुर्मुखाचा अपभ्रंश असू शकतो. या लिंगावर वरच्या बाजूला कुषाणकालीन माळा नसून एक कातडें गुंडाळल्यासारखें दिसत आहे व त्याला एका बाजूला गाठ मारली आहे (रे.चि. सत्ताविस ३०). विशेष म्हणजे लिंगाच्या पायथ्याकडे चार दिशांना चारपैकी प्रत्येकी एक पाण्याची सुरई किंवा उंचमानेचा कलश (चित्र ९५) एक यक्ष, एक बसलेला सिंह आणि एक स्त्रीचे मुख कोरलेले आहे. या चारी वस्तूंचा शंकराशी फार जवळचा संबंध आहे हे नव्याने सांगावयास नको.
Manur-Nagnath,
a village located in the Beed district of Maharashtra, is an
archaeologically important site. It is situated at a distance of 52 km
from Beed and 70 km from Ahmednagar on a ‘Mankarana’ riverbank. There
are several legends about the site, some of which are linked to the
Mahābhārata period. Remains of medieval temples, monasteries, and wells
are found in this archaeological site. Manur is well-known for its
‘Jahagirdar Matha’ (monastery) which belongs to the Vīraśaiva-Liṅgāyata
sect. The monastery is said to be associated with the great 16th-century
Vīraśaiva saint, Manmatha Swami. Records of land grants donated to this
monastery can still be seen today. This monastery has a charter donated
by Shivaji Maharaj’s grandson, Chhatrapati Shahu Maharaj.1
Apart from the Vīraśaiva monastery, the archaeological site of
Manur village has a 13th-century Siddheśvara temple (discussed below), a
Nāganātha temple of unknown date that contains Marathi inscriptions
from the 17th-century as well as several tombs of ascetics, a medieval
fortress, and scattered remains of sculptures and hero stones. There is
also a monastery-like structure dating to the 13th-14th centuries, found
at a short distance from the Siddheshwar temple. A Gadhegal (ass-curse
stele) having devanāgarī characters can be found at the monastery, which
also has two subsidiary shrines and a hall of several pillars. The
pillars themselves are not ornate but the doorframes of the monastery
are beautifully decorated.
Door frame of the 13th-14th century matha near Nagnath TempleA gadhegal with devanāgarī inscription
Although several archaeological remains are scattered in Manur, the
site has not received due scholarly attention. An inscription from the
13th century CE has been read and studied by Brahmanand Deshpande.2
Apart from this, no other special research has been carried out on the
site. This article highlights, for the first time, some important
archaeological remains at Manur and explains their significance. It will
show the influence of the Pāśupata-Kālāmukha sect in Manur around the
12th-13th centuries and the subsequent takeover of this site as a
Vīraśaiva-Liṅgāyata centre.
Siddheśvara Temple at Manur
A view of Siddheśvar temple
There is a 13th-century temple of Siddheśvara on the bank of the
Mankarana, a seasonal river, to the west of Manur village. This temple—a
very important centre in terms of the religious and cultural history of
medieval southern Marathwada (as we will see below)—is of tridala type
(temples that have three shrines). Since the sphere has completely
collapsed, it is not possible to say in what style it was built.
Currently, the temple is in a dilapidated state due to rainwater seeping
into the walls. Although much of the Nandīmaṇḍapa has collapsed, a
magnificent Nandi survives on a raised square platform. Apart from this,
some samādhis (tombs), sculptures, satī stones, and hero stones can be
seen scattered throughout the temple site. The ground plan consists of
garbagṛha (sanctum santorum), antarāla (vestibule), gūḍhamanḍapa (closed
hall), and two sub-shrines.
Remains of a Śaiva monasteryPresent condition of Siddheśvara temple
The interior construction of the temple has fallen into disrepair and
the thick coat of paint on the temple walls makes it difficult to
identify some of the sculptures. A Śivaliṅgā appears to have been
installed in the centre of the garbhagṛha. Several mouldings have been
carved on the exterior of the temple. Three sanctums of the temple had
nine devakoṣṭhas (niches for divinities) on the maṇḍovara (exterior wall
of the temple), three of which are in better condition. There
are ardhastaṃbhas having mañjarī (mouldings) on all four sides of
the maṇḍovara. This type of ornamentation is commonly seen on temples in
South India.
Rare Sculpture of Lakulīśa
There are several different sculptures on
the Siddheśvara temple, most of them broken or destroyed. Among these,
images of Cāmuṇḍā, Śiva Naṭeśa, Lakulīśa, Keśava, Gaṇeśa, Sarasvatī,
Pāśupata-Kālāmukha yogis, and various heavenly damsels (Surasundarīs)
are visible. A beautiful āliṅgana
mūrti of Umā-Maheśvara and Gaja-Lakṣmī can also be seen.
Āliṅgana mūrti of Umā-Maheśvara
The presence of the image of Lakulīśa (a form of Śiva) in the
Siddheśvara temple is significant and it indicates the influence of the
Pāśupata-Kālāmukha sect. This rare image is placed in the southern niche
of the outer wall of the main shrine. Another small image of Lakulīśa
with a laguḍa (a club) is carved on the uttarāṅga portion of the main
garbhagṛha. The first image of Lakulīśa is in the padmāsana and is
depicted with uṣṇīṣa, yajñopavīta (sacred thread), and four arms, the
upper arms of which are completely broken. Most of the portion of the
front hands is also broken from the elbow. It seems that both front
hands should be placed on the knees. He is shown ithyphallic and sits on
a beautiful padmapītha. He is also depicted with his four disciples
Kauśika, Gārgya, Mitra, and Kāuruśya. Two of them on either side of
Lakulīśa are shown in the namaskāra mudrā. The other two disciples are
shown seated on knees on either side of the padmapītha. These two images
are badly mutilated.
Lakulīśa with his four disciplesOther small image of Lakulīśa
Icons of Lakulīśa are rarely observed in Maharashtra. The oldest
image of Lakulīśa in Maharashtra is at Mandhal in the Vidarbha region,
dating back to the 4th-5th century CE. Apart from this, there is a
standalone image of the later period at Bhadravati in the Chandrapur
district.3 Among the images on the structural temples, four images from the Khidreśvara temple at Khidrapur4
and the image from the Saṅgameśvara temple at Sangameshvar in Ratnagiri
district can be mentioned. A possible image of Lakulīśa is also
depicted in one of the niches of the Śiva temple at Umarga in Osmanabad
district— however, scholars are not unanimously agreed on its
identification. The image of Lakulīśa from Manur is the only known and
well-identified image from the structural temples of Maharashtra to be
depicted on devakoṣṭha, as one of the important deities.
The Historical Importance of the Site
From the archaeological remains at Manur, it appears that the site
was a famous Śaiva centre in the medieval period. A devanāgarī
inscription of 1248 CE found at Manur mentions that the Yādava prince,
Kanhardeva, was appointed as Mahāmaṇḍaleśvara of this region. It also
mentions the construction of an unknown temple,5
which may likely be the Siddheśvara temple. Several sources suggest
that some Yādava rulers were followers of the Pāśupata-Kālāmukha sects
and gave grants to them. Yādava king, Seuṇacandra II, a follower of the
Pāśupata sect, received grace from a Pāśupatācārya named Sarvadevācārya.
In the year 1191 CE, Bhillama V, the founder of the Yādava dynasty, had
also given a village as a grant to a Kālāmukha ascetic, ‘Siddhant
Chandrabhushan Pandit’.6
Inscriptions related to the Pāśupata-Kālāmukha have been found at
multiple sites in South Marathwada during this period: Tirtha,
Bhandarkavathe, Mardi, Darphal (Solapur district), Ganeshwadi, Kolhapur,
Hottal, Ardhapur, Tadkhel, Kardkhed, and Sagaroli.7 All this shows that the Pāśupata and related sub-sects were deeply rooted in South Marathwada.
However, after the rise of the Vīraśaiva sect in Northern Karnataka,
the sects of Pāśupata-Kālāmukha merged into the new-born sect. Several
Pāśupata monasteries in Karnataka and South Marathwada came under the
control of the Vīraśaivas. This transition seems to have been organic,
as the Vīraśaivas accepted the Guru traditions of the erstwhile
Pāśupata-Kālāmukha as their own.8 The
same change is likely to have taken place in Manur as well. The
transition from the Pāśupata- Kālāmukha sects to the Vīraśaiva-Liṅgāyata
sects can be seen in the archaeological remains and the ongoing
religious traditions of Manur. Archaeological evidence suggests that the
Vīraśaiva-Liṅgāyata sect flourished in South Maharashtra from the
13-14th century onward, and Manur must have been an important centre of
Vīraśaiva-Liṅgāyata, as it still is.9
Kapildhar, another site in the Beed district, also emerged as an
important centre for the Vīraśaiva-Liṅgāyata sect. There is also
evidence of an independent Śaiva sect called ‘Nāganātha’ or ‘Nagesh’ in
Manur during the 17th century CE.
Tombs of Vīraśaiva-Liṅgāyata ascetics
Overall, the Siddheśvara temple and the surrounding remains of the
Manur-Nagnath village are very important from cultural, historical, and
archaeological points of view. They constitute a valuable archaeological
record of the journey from Pāśupata-Kālāmukha to Vīraśaiva-Liṅgāyata.
Unfortunately, all this evidence is on the verge of extinction. The
ruins of the Siddheśvara temple and other sculptures need to be
preserved as soon as possible.
Drunken Peacocks: A Lineage of Saiva Rajagurus and Yogis
Saiva sages who wove the threads that tied India into a common idiom and religion of Saivism
रहस्य महादेवाच्या पिंडीचे
By पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)
4-5 minutes
भगवान महादेवाचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात. पूजेसाठी पिंडी कशी असावी, पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते वापरू नये याला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक भक्तांना तर याविषयी काही माहीत नसते. आपण आज याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
देवघरातील पिंडी
-घरातील देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी, मूर्ती नको.
-देवघरातील पिंडीवर नाग नसावा.
-पिंडी साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी.
-देवघरातील पिंडी तीन इंचांपेक्षा मोठी असू नये, ती तीन इंचांपेक्षा छोटी असावी.
भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच, आणि इतरही अनेक योनीजीव महादेवास भजतात. जेथे महादेवाची मूर्ती/चित्र असते तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.
जोतिर्लिंगांच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात, तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते, ते ओलांडून गेल्याचे पातक लागते.
महादेवाची मूर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवाची मूर्ती नसावी. मानवाला पिंडीपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाच्या मुख्य शक्तिपीठांवर महादेवाची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते.
बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंडीरूपाने आहेत, यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवाला नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवाला जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते.
गुरुचरित्रात म्हटले आहे, की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.
श्रीमद्भागवतात म्हटले आहे, की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुखसमृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.
भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
खालील सात वस्तू भगवान शंकराला कधीही अर्पण करू नका. का? तर जाणून घ्या.
१. शंख ः शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद-कुंकू ः भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूला अर्पण केल्या जातात.
३. तुळशीपत्र ः असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळपाणी ः नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला
जातो. पण, भगवान शंकराला अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध ः उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल ः भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता.
७. कुंकू किंवा शेंदूर ः कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.
।।ॐ नमः शिवाय।।
(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
I found the answer to my question today on google search.
To Upsydowny: Merely having curiosity to know an information does not tantamount to 'denigrating' any devata. Infact, suppressing someone from knowing an available information on the grounds that it is tantamount to 'denigration' is so 'Abrahamic like'!!
BTW: It seems there is a sculpture of Sri Kurma Samhara murthy carved in a pillar in Chennai, Kachaleeswarar Temple, TN, India. It seems when done Naivedyam of Vilwa leaves and Sugar pongal on Mondays to this form of Lord Shiva, bestows all goodness.
64 Forms of Lord Shiva. Maheswara Murtham – 64 Avatars of Lord Shiva in Hinduism. Lord Shiva is one of the principal deities of Hinduism. He is the Supreme being within Shaivism tradition of Hinduism. Lord Shiva is the “destroyer and transformer” within the Trimurti, the Hindu trinity that includes Brahma and Vishnu. In Shaivism tradition, Shiva is the Supreme being who creates, protects and transforms the universe.
The Maheshwara Murtham is the list of all the 64 forms of Lord Shiva. Below is the name of all the 64 forms of Lord Shiva:
1. Linga Murthy – God Shiva’s shapeless form
2. LinGodbhava Murthy – God Shiva emerging from shapeless form
3. Mukhalingam- Lord Shiva with five faces
4. SadaShiva Murthy- The secondary form of Lord Shiva with five faces
5. Maha sadaShiva Murthy- Lord Shiva with twenty five faces
6. Umamaheshvara Murthy- Lord Shiva with Goddess Uma {Devi Parvati}
7. Sukasana Murthy – Lord Shiva with his wife Goddess Uma in a pleasant mood
8. Umesha Murthy – Lord Shiva with his wife Goddess Uma and in a Varadana pose
9. Somaskandha Murthi- Lord Shiva with his wife Goddess Uma and Lord Skanda
10. Vrishabhantika Murthy- Lord Shiva with his mount Nandi bull
11. Chandrashekara Murthy- Lord Shiva with with Moon in crescent form
12. Bhujanga Lalita Murthy – Lord Shiva with Moon and Snake
13. Sada Nritta Murthy – Lord Shiva dancing in the form of Natraj
14. Gangavisarjana Murthy – Lord Shiva releasing Devi Ganga from his head
15. Ardanarishvara Murthy – Lord Shiva with his wife Goddess Uma in a Ardhanarishwara form – half Lord Shiva and half Goddess Parvati
16. Vrishabharudar – Lord Shiva with sitting on Nandi Bull
17. Bhujanga Trasa Murthy – Lord Shiva with a sanke in one hand and fire in the other hand
18. Chandathandava Murthy – Lord Shiva standing on a demon in a fierce form
19. Tripurantaka Murthy – Lord Shiva with his wife Goddess Uma, riding a chariot driven by four horses
20. Gajasura Samhara Murthy – Lord Shiva battling an elephant demon
21. Sandhya Nritta Murthy – Lord Shiva with his wife Goddess Uma, with a damroo in his hand
22. Gangadhara Murthy – Lord Shiva with the Devi Ganga falling into matted locks
23. Kalyanasundhara Murthy – Lord Shiva getting married to Goddess Uma
24. Jvarabhagna Murthy – Lord Shiva with three faces and three legs
25. Shardhula Hara Murthy – Lord Shiva sitting on a tiger skin
26. Keshavartha Murthy – Shankaranarayana form of Lord Shiva. Lord Shiva with damroo in one hand and chakra in the other
27. Chandisha Anugraha Murthy – Lord Shiva gifting the Kamdhenu Cow to a Sage
In the VISHWAROOPA KALPA, ISHAN was manifested from LORD SHIVA. Ishan, one of the five faces of Lord Shiva, signifies the subtle and ethereal form of Shiva that represents transcendental knowledge. It also represents Power of Revelation, one of five powers of Lord Shiva namely Power of Creation, Power of Sustenance, Power of Dissolution, Power of Concealment and Power of Revelation. Also, the direction Ishanya (North-East) represents prosperity and knowledge. The following murtis are considered to be originated from Ishana.
(a) SOMASKANDA MURTI:
This murti represents the state of Sat-Chit-Anand. In this state, Shiva represents 'Sat', Lord Skanda represents 'Chit' and Parvati represents 'Ananda'. This indicates that the three states are united together. It is a family representation of LORD SHIVA. This idol is found in almost all the SHIVALAYAS in southern India, the most important place being THIRUVARUR in Tamil Nadu.
*A Depiction of Somaskanda with a dancing Skanda (Lord Murugan) in the middle of Uma and Shiva. *Photo Source: https://en.wikipedia.org/wiki/Somaskanda
(b) NATARAJA MURTI:
This manifestation of Lord Shiva clearly explains the PANCHAKSHARI MANTRA and PANCHAKRITIS (a set of 5 KRITIS in CARNATIC music). Idols of this manifestation are found in SHIVA Temples in Ananda Tandava form. The most important idol of NATARAJA is at CHIDAMBARAM in Tamil Nadu. This place (CHIDAMBARAM) is one of the Five Stages (Sabha) where LORD SHIVA performed Nritya (Tandava).
*A 10th century Chola dynasty bronze sculpture of Shiva, the Lord of the Dance at the Los Angeles County Museum of Art. *Photo Source: https://en.wikipedia.org/wiki/Nataraja#/media/File:Shiva_as_the_Lord_of_Dance_LACMA_edit.jpg (https://en.wikipedia.org/wiki/Nataraja)
(c) RISHABHA ARUDH MURTI:
After Samudra Manthan when LORD VISHNU went to Patala Loka he was infatuated by a beautiful woman. From her, he had many sons who were cruel and monstrous. LORD SIVA took form of an Ox and killed them. In this manifestation, LORD SHIVA is depicted as sitting on an Ox.
*Ancient Khmer sculpture of the Hindu god Lord Shiva riding a bull. Pediment at Banteay Samre Temple, part of the Angkor complex, Siem Reap, Cambodia. Ancient sculpture, hundreds of years old. *Photo Source: http://www.featurepics.com/online/Shiva-Sculpture-2255126.aspx
(d) CHANDRASHEKAR MURTI:
This form represents the manifestation in which LORD SHIVA absolved the curse of CHANDRA (MOON). LORD SHIVA gave a boon so that the MOON can wax and wane alternately for 15 days resulting in Full-MOON and New-MOON.
This is also known as PANIGRAHA MURTI. It depicts the marriage of LORD SHIVA with HIS consort PARVATI. It shows LORD VISHNU along with HIS consort LAXMI giving away the bride. LORD BRAHMA is depicted as the official priest. This temple is at THIRUMANANCHERI.
त्रिपुरान्तकमूर्ती, कैलास लेणे, वेरूळ, महाराष्ट्र : Rao, T. A. G.,
‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass
Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
गजासुरवधमूर्ती, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडु, कर्नाटक : तनश्री रेडीज.
भैरव, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, महाराष्ट्र : प्रणीता हरड.
________
चयनित ग्रंथ सूची
बालासुब्रमण्यम.एसआर(1979), बाद के चोल मंदिर, मद्रास, पृ. 118.125, पृ.99.111
बालासुब्रमण्यम.एसआर, (1971), प्रारंभिक चोल मंदिर, दिल्ली
मेविसेन. गेर्ड जे.आर. (1997), दारासुरम में पत्थर का रथ
और शिव त्रिपुरानाटक का मिथक, दक्षिण इतिहास और संस्कृति में अध्ययन -
वी.आर. रामचंद्र दीक्षितार शताब्दी खंड, चेन्नई, पृ. 290
गोपीनाथ राव.टी.ए.,(1985) एलिमेंट्स ऑफ हिंदू आइकॉनोग्राफी, खंड II भाग I और II, पुनर्मुद्रण, दिल्ली
नागास्वामी आर.,(1980) तमिलनाडु की कला और संस्कृति, दिल्ली, पृ. 96.98 पृष्ठ 41
नागास्वामी.आर, () दक्षिण भारतीय कांस्य, "भारतीय कांस्य मास्टरपीस" नई दिल्ली एफ.18 और एफ.21 में
नागास्वामी.आर, (1961), कोंगु देश से दुर्लभ कांस्य, 'ललित कला' एफ.1 में
नागास्वामी,आर (1980)'स्प्लेंडर्स ऑफ तमिलनाड' में तमिल पेंटिंग्स मार्ग प्रकाशन
त्रिपुरान्तकमूर्ती, कैलास लेणे, वेरूळ, महाराष्ट्र : Rao, T. A. G.,
‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass
Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
गजासुरवधमूर्ती, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडु, कर्नाटक : तनश्री रेडीज.
भैरव, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, महाराष्ट्र : प्रणीता हरड.
संदर्भ :
Banerjea, J. N., Development of Hindu Iconography, University of Calcutta, Calcutta, 1941.
Kramrisch, S., Manifestations of Shiva, Philadelphia Museum of Art, 1981.
Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol., II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1997.
खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३.
एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे
स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. शिवासह नंदी असतोच असे नाही. साधारणत:
अशी मूर्ती चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, सर्प व घट हे प्रामुख्याने
दिसतात. नाणी व मुद्रा यांवर केवल शिवाचे अंकन मोठ्या प्रमाणात आढळते.
मात्र पाषाणमूर्तींची संख्या तुलनेने कमी आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या
शतकात उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या कुषाण वंशातील काही राजे शैव होते;
साहजिकच त्यांच्या अधिपत्याखालील मथुरा व आसपासच्या प्रदेशांतून अनेक
शिवमूर्ती प्राप्त झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून
मिळालेली एक द्विभुज शिवप्रतिमा उल्लेखनीय आहे. तिचा उजवा हात वरदमुद्रेत
असून डाव्या हातात त्रिशूळ आहे. डोक्यामागे प्रभावळ आहे. ही प्रतिमा
प्रारंभिक गुप्तकाळाची वाटते. उत्तर भारतात खजुराहो, राजस्थानात ओसिया इ.
ठिकाणी अशा अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातील भांदक येथे काही
उल्लेखनीय केवल शिवमूर्ती मिळाल्या आहेत. एका शिल्पात त्याच्याजवळ तीन
फण्यांचा नाग, त्रिशूळ, पाश व कमळपुष्प आढळतात. आणखी एका प्रतिमेत शिवासह
बैल आणि एक चवरीधारी सेविका आहे. केवल शिवाची एक आसनमूर्ती इंदूरच्या
संग्रहालयात आहे.
केवल शिव प्रकारातील काही मूर्ती सिंहासह आहेत. माट येथून मिळालेली एक
मूर्ती सध्या मथुरा संग्रहालयात आहे. हिचे डोके व उजवा हात भग्नावस्थेत
असून शेजारी आखूड पायाचा व मोठ्या पोटाचा शिवगण आहे. प्रा. वासुदेवशरण
अग्रवाल यांच्या मते, ही शिवप्रतिमा आहे. माट येथे शिवोपासक कुषाण राजांचे
देवकुल होते, ही गोष्ट या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी आहे. तेथूनच एक
सिंहवाहिनी पार्वतीची मूर्तीही मिळाली आहे. डॉ. नी. पु. जोशी यांनी मूसानगर
(जि. कानपूर, उत्तर प्रदेश) येथील एका वेदिकास्तंभावर कोरलेल्या दोन
शिवप्रतिमांचा उल्लेख केला आहे. त्या मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने
महत्त्वाच्या आहेत. या स्तंभाच्या दोन बाजूंस असलेल्या कोरीव चौकटींपैकी
प्रत्येकी पहिल्या चौकटीत शंकराच्या मूर्ती आहेत. एका बाजूच्या मूर्तीत शिव
ऊर्ध्वलिंग असून अभयमुद्रेत आहे. त्याचे केस मानेपर्यंत लांब असून डाव्या
हातात घट आहे. उजवीकडे, वर मान करून पाहणारा सिंह व डावीकडे आखूड पायांचा
ढेरपोट्या गण आहे. ही प्रतिमा मथुरा संग्रहालयातील प्रतिमेशी मिळतीजुळती
आहे. याच स्तंभाच्या दुसऱ्या बाजूस शिवाची आसनमूर्ती आहे. येथे द्विभुज
शिवाचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्या हातात घट आहे. येथेही शिव
ऊर्ध्वलिंगी आहे; त्याने पागोटे व दागिने घातले आहेत. आसनाखाली सिंह बसलेला
आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवाच्या दोन्ही खांद्यांतून दोन व
मानेकडून एक असे एकूण तीन द्विभुज पुरुष प्रकट झालेले दिसतात. साधारणत:
मुख्य देवतेची काही रूपे किंवा शक्ती सूचित करण्यासाठी अशा प्रकारच्या
प्रतिमा दर्शविण्याची ही पद्धत मथुरा व समकालीन गांधार प्रतिमांमध्येही
आढळते. या खांद्यातून उद्भूत होणाऱ्या देवता वा शक्तींना ‘व्यूह’ असे
म्हटले जाते. डॉ. नी. पु. जोशी यांच्या मते, या मूसानगरच्या प्रतिमेत
कुषाणकालीन वासुदेवाच्या ‘चतुर्व्यूह’ प्रतिमेचे शैव रूपांतर असावे किंवा
याच काळात प्रचलित होऊ पाहणाऱ्या ‘चतुर्मुखलिंग’ संकल्पनेचे हे पुरुषरूप
अंकन असावे.
दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातील पाश्चात्त्य छाप असलेले एक उत्तर
कुषाणकालीन शिवशीर्ष विशेष उल्लेखनीय आहे. या शिवाच्या डोक्यावर जटाजूट वा
जटामुकुटाऐवजी कुरळे केस दर्शविलेले आहेत; तसेच डावीकडे चंद्रकोर आहे.
कपाळावर ग्रीक शासकांप्रमाणे ‘डायडेम’ बांधलेला दिसतो. त्याला शिल्परत्नात
‘ललाटपट्ट’ असे नाव आहे. कपाळावर तिसरा नेत्र उभा अंकित केला आहे; वास्तविक
हे वैशिष्ट्य गुप्तकालीन मूर्तींचे आहे; पण त्याचा प्रारंभ कुषाणकाळाच्या
शेवटी झाला असावा.
संदर्भ :
खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३.
एकमुख शिवलिंग, खोह (मध्य प्रदेश) : खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
लिंगोद्भव शिव, वेरूळ (महाराष्ट्र) : Rao, T. A. G., ‘Elements of
Hindu Iconography’, Vol. II Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt.
Ltd., Delhi, 1914; 1997.
Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol., II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1997. खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२. जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३. देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम.., स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.
संदर्भ:
Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part II, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
देगलूरकर, गो. बं., ‘घारापुरी दर्शन (जोगेश्वरी व मंडपेश्वर लेणींसह), स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१३.
मार्कंडेयानुग्रह, वेरूळ (महाराष्ट्र) : Burgess, James., ‘Report on the Elura Cave Temples and The Brahmanical and Jain Caves in Western India’, Trubner & Co., London, 1883.
चंडेशानुग्रह, बृहदीश्वर मंदिर, गंगैकोंड चोलपुरम् (तमिळनाडू) : https://commons.wikimedia.org/wiki/File:Chandeshanugraha.jpeg
विष्णवानुग्रह, मीनाक्षी सुंदरेश्वर स्वामी मंदिर, मदुराई (तमिळनाडू) : Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
रावणानुग्रह, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडू (कर्नाटक) : तनश्री रेडीज.
मानवस्वरूप नंदी (सपत्नीक), संस्कृत विश्वविद्यालय संग्रह : जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
Forms of Lord Shiva, The Great Destroyer - Samharamurtis
"Samharamurtis"
are
one among the five classes of representation of Lord Shiva’s various aspects,
the others being the Anugraha-murtis (or boon-conferring aspects), the
Nritta-murtis (or dancing aspects), the Dakshina-murtis (or the yogic, musical
and philosophic aspects), and other minor aspects. Samharamurtis portray the
destructive or terrific aspects of Lord Shiva. Each form or image of Lord Shiva under
this aspect is indicative of the destruction of a particular maleficent and
troublesome being. The various forms comprised in Samharamurtis are
Kamantakamurti, Gajasuramsamharamurti, Kalarimurti, Tripurantakamurti,
Sarabhesamurti, Brahmasiraschchhedakamurti, Veerabhadramurti, Jalandharavadhamurti,
Mallarishivamurti, Andhakasuravadhamurti, Aghoramurti, and Mahakala.
The ‘Gajasurasamharamurti’ depicts the destruction of the
elephant demon Gajasura by Lord Shiva, who is depicted in a terrific form
dancing vigorously on the elephant’s head with the animal’s hide arranged behind
him like a prabhamandala (aureole). The right leg of Lord Shiva is planted firmly on
the elephant's head while the left is bent and lifted up towards
the knee of the other leg. He may hold a tusk, club,
dhatura flowers, alms-bowl, bell, drum, sword, skull-topped staff, antelope,
snake and spear.
Gajasurasamharamurti - Sri Hoysaleshwara Temple, Halebeedu
The ‘Kalarimurti’ depicts the legend of Lord Shiva
punishing the god of death, Kala/Yama for attempting to kill Markandeya who was
a great devotee of Lord Shiva. Lord Shiva is seen as four armed, issuing from the
linga in front of which is the boy Markandeya kneeling with his arms folded on
his bent knees. One of the right and left hands of Lord Shiva grasp a stout handled
sharp trident aimed at Yama’s abdomen. The other right hand rests on the hip
(katyalambita hasta) and the left hand is held in vismaya pose. The right leg
of Shiva is buried up to the knee in the linga and the left leg is represented
as kicking Kala. Kalari’s emblems are a skull-cap, sword, shield,
antelope, axe, snake, noose, trident and vajra.
Kalarimurti - Dasavatara Cave, Ellora
The ‘Tripurantakamurti’
depicts Lord Shiva destroying the
three asuras (demons) Vidyunmlali, Tarakaksha and Kamalaksha (sons of
demon
Tarakasura) who dwelt in three forts constructed of metals and caused
great
damage to the suras and the rishis (sages). Lord Shiva stands in a
chariot with his left leg kept forward and the right one behind; the
body of Shiva is turned
away form the objects aimed at, but his face and arms are turned in the
direction of the three castles which he is about to destroy. He seems to
have
had ten arms; those that still remain unbroken are seen carrying the
sword,
shield, arrow string in the bow-string and a bent bow. Lord Brahma is
driving the
chariot which is yoked to two horses.
The ‘Andhakasuravadhamurti’ depicts the destruction of the demon Andhakasura by Lord Shiva. He carries a trishula (trident) at the
end of which is pinned the body of Andhakasura and from it blood drops down
into a cup held by the goddess Yogeshwari (Kali). In the below picture, he is
seen with 14 arms with Lord Nandi on his right. He may hold a drum, rosary, chisel,
trident, spear, staff with a pierced head, bow, arrow, noose, and a
thunderbolt.
Andhakasuravadhamurti - Sri Hoysaleshwara Temple, Halebeedu
References:
1. Elements
of Hindu Iconography Vol II Part I – T.A.Gopinath
2. The Illustrated dictionary
of Hindu Iconography – Margaret Stutley
This is the most popular 3rd manifestation of Lord Shiva in the 21st Kalpa known as Peetvasa. Tatpurusha, one of the five faces of Shiva, represents Power of Concealment
which limits individual jiva's awareness about its true nature, its
past and future, and thus allowing jiva to evolve itself. The following murtis are considered to be originated from Tatpurusha.
a) Bhikshatana Murti:
Lord Shiva, in order to teach a lesson to the sages in
Darukhvanam takes this manifestation. He appears as a nude lunatic with
the Brahma Kapal in his hand and enchants the wives of the sages and
ladies of the Darukhvanam.
This manifestation of Lord Shiva took place after the death of
his consort Parvati. In this manifestation, He gives Upadesha to
Sanakadi Munis. Then, He sits in deep meditation. Then Manmatha
(Kamadeva) tried to disturb His meditation. Lord Shiva opened His 3rd
eye and burned Manmatha. The place where this event is supposed to have
taken place is known as Thirukurukkavur in Tamil Nadu.
In this manifestation, Lord Shiva rescued the boy Markandeya
from death (Yama). Markandeya was an ardent devotee of Lord Shiva. When
Yama came to take away his life, Markandeya clutched the Shiva Linga in a
bid to escape death. It is believed that Lord Shiva manifested and
killed Yama to save Markandeya. In different Puranas, this event is
supposed to have taken place in different places. Some believe that it
took place at Thirukadaiyur near Karikal in Tamil Nadu.
In this manifestation, Lord Shiva slays the demon Jalandhhar
(Salandhara) with the help of Lord Vishnu. The demon was supposed to
have manifested from Lord Shiva’s sweat. When the demon tried to remove
from Lord Shiva’s feet the Sudarshan Chakra given to Lord Shiva by Lord
Vishnu (for slaying the demon), he was slayed by Him. The place where
this Samhara took place is Verkudi near Thiruvarur in Tamil Nadu. Lord Vishnu transformed Jalandhara’s wife Brindha (very staunch
devotee of Lord Vishnu) into Tulsi at this place. Hence Lord Vishnu got a
curse which was the cause of Lord Vishnu's Rama avataar.
This manifestation of Lord Shiva was to annihilate the three
demon sons of Tarakasur. They represent the Ego, the Karma and the Maya.
This manifestation implies that it is necessary to overcome these three
impurities in life. The temple town of Banrutti in Cuddalore district
(Tamil Nadu) celebrates the slaying of Tripuras by Lord Shiva.
We had listed 64 manifestations (MURTHAMS) of LORD SHIVA in our Forms (Murtis) of Lord Shiva article. It is stated in SHIVA PURANA, that 25 of them are most significant. According
to scriptures, these manifestations have originated from 5 different
faces of LORD SHIVA. They are (1) ISHAN, (2) TATPURUSHA, (3) AGHORESH,
(4) VAMADEVA and (5) SADJYOT.
*1
Five-faced Mukhalinga, Himachal Pradesh;
currently in LACMA
*2
The 10th century five headed Shiva, Sadashiva, Cambodia.
According
to Vishnu Purana, Rudra (Shiva) was born from the anger of the creator,
Brahma. Rudra was in the ArdhaNari (half male and half female) form.
The male half form split into eleven forms forming eleven Rudrars. Some
of them had white complexion and were gentle. The others were dark in
complexion and were fierce. These Rudrars were named as:
Manyu
Manu
Mahmasa
Mahan
Siva
Rtudhvaja
Ugraretas
Bhava
Kama
Vamadeva
Dhrtavrata
From
the female half form, Rudranis were formed and they became the consorts
of Rudrars. Their names (may not be in the 1:1 order of Rudrars) are:
Dhi
Vrtti
Usana
Urna
Niyuta
Sarpis
Ila
Ambika
Iravati
Sudha
Diksa
According to other Puranas, the Rudrars are named as:
Aja
Ekapada
Ahirbudhnya
Tvasta
Rudra
Hara
Shambhu
Tryambaka
Aparajita
Isana
Tribhuvana
In
Vedic mythology, Rudrars are considered as attendants of Rudra (Shiva).
Mahabharata describes Rudrars as companions of Indra and also as
servants of Shiva and Skanda. In Matsya Purana, Kapali, Pingala, Bhima,
Virupaksa, Vilohita, Ajesha, Shasana, Shasta, Shambu, Chanda and Durva
are mentioned as the ferocious Rudrars who aid Lord Vishnu in his fight
against demons.
Indian Art – an Expression of the Divine
It may be confidently said that the
greatness of Indian art is the greatness of all Indian thought and
achievement, particularly the following ideals, as pointed out by Sri
Aurobindo:
recognition of the persistent within the transient,
recognition of the domination of matter by spirit,
the subordination of the insistent
appearances of Nature (Prakriti) to the inner reality which, the Mighty
Mother of All Creation veils in a thousand ways even while she suggests.
It
was the highest vision of the Vedic seers, the vision of the Infinite
that is revealed and yet hidden in all the finite forms of the
existence, which materialised in the later periods in the wonderful
forms of all Indian art, including painting, sculpture and music.
Sri Aurobindo speaks of the theory behind all great Indian art in these words:
“Its highest business is to
disclose something of the Self, the Infinite, the Divine to the regard
of the soul, the Self through its expressions, the Infinite through its
living finite symbols, the Divine through his powers. Or the Godheads
are to be revealed, luminously interpreted, or in some way suggested to
the soul’s understanding or to its devotion, or at the very least to a
spiritually or religiously aesthetic emotion.” (CWSA, Vol. 20, p. 267)
Padmapani, at Ajanta
The highest Indian art is identical in
its spiritual aim and principle with the rest of Indian culture, says
Sri Aurobindo. He adds further:
“The first and lowest use of
Art is the purely aesthetic, the second is the intellectual or
educative, the third and highest the spiritual. By speaking of the
aesthetic use as the lowest, we do not wish to imply that it is not of
immense value to humanity, but simply to assign to it its comparative
value in relation to the higher uses. The aesthetic is of immense
importance and until it has done its work, mankind is not really fitted
to make full use of Art on the higher planes of human development”
(CWSA, Vol. 1, p. 439).
Pashupati, Kalibangan SealChaturbhujnath Nala Rock Painting
This spiritual aim of art is not
forgotten even on the level of material world, the outer life of man and
the things of external Nature. In
most good works of Indian art, there is always something more in which
the material presentation of life floats as in an immaterial atmosphere. Life
is seen in some suggestion of the infinite or of something beyond or
there is at least a touch and influence of these which helps to shape the
presentation.