तपोवन


ऋषीमुनी हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करत असत. हा परिसर दाट झाडांनी व्यापला आहे. यात अनेक भव्य झाडं असून इथं अनेक औषधी वनस्पती आहेत. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. तपोवन या नावातच तप आणि वन आल्यानं देशभरातून येणारे साधू, महंतांच्या राहण्याची सोय तपोवन भागात केली जाते.


या मंदिराची आख्यायिका अशी की शूर्पणखा ही लंकेचा राजा रावणाची बहीण होती. अनेक राक्षसांचा वध करून संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या रावणाने आपली बहीण शूर्पणखा हिच्या पतीचाही वध केला होता. त्यानंतर रावणाने शूर्पणखाला आपला भाऊ खर, याच्याकडे राहायला पाठवले होते. त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीता यांचा वनवास काळ सुरू होता. त्यासाठी ते या परिसरात आले होते. तेथे रामाला पाहून शूर्पणखा त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली. शूर्पणखा ही मागील जन्मात स्वर्गातील अप्सरा होती. तिचे नाव नयनतारा होते. ती एका ऋषींच्या शापाने राक्षसी झाली होती. तिने नयनताराचे सुंदर रूप घेतले आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, असे रामाला सांगितले.







हे शिल्प सुमारे ७० फूट उंच आहे. या शिल्पाचे बांधकाम फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर या आधुनिक साहित्याचा वापर करून करण्यात आले आहे, ज्यामुळे ते टिकाऊ आणि हवामान प्रतिरोधक आहे. शिल्पाची रचना पारंपरिक भारतीय स्थापत्यशैलीत असून, त्यावर कोरीव काम केलेले आहे. शिल्पात प्रभू श्रीराम धनुष्यबाणासह उभे आहेत, ज्यामुळे त्यांची वीरता आणि करुणा यांचे प्रतीकत्व दर्शविले जाते. शिल्पाच्या सभोवतालचा परिसर सुंदर उद्यानाने सजवलेला आहे. या परिसरात रामायणातील विविध प्रसंगांचे चित्रण करणारे भित्तिचित्रे आणि शिल्पेही आहेत.

श्री लांबे हनुमान मंदिर

तपोवन नाशिक
तपोवनातील अज्ञात लेणीसमूह
तपोवनातील गोदावरीच्या पलीकडील काठावर महापालिकने राम, सिता व लक्ष्मणाची प्रतिमा उभी केली आहे. ती पाहण्यासाठी भाविक हमखास तेथे जातात. मात्र, या प्रतिमेच्या समोरच गोदापात्रातील खडकात खोदलेल्या नऊ व एक अपूर्ण अशा दहा लेणीच्या रांगेकडे आतापर्यंत कोणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे या गुहा 'लेणी' असाव्यात का, कोणी बांधल्या असाव्यात, त्यांचा कालखंड कोणता हे अजूनही अज्ञात आहे. गोदा-कपिला संगमावरील लाकडी पुलाखालून नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताच्या २० फूट उंच खडकात या दहा लेणी खोदलेल्या पहायला मिळतात. पहिल्यांचा खडकावर लेणी कोरण्यासाठी आणखी केलेली दिसते. मात्र, हे काम अर्धवट आहे. त्यानंतरच्या नऊ लेणीच्या समोरचा भाग आयताकृती कोरला असून, या लेणींमध्ये कोणतेही नक्षीकाम अथवा मूर्ती नाही. दोन लेणींमध्ये सभामंडप व गर्भगृह अशी रचना दिसते. तर एका लेणी बाहेर ब्राह्मी अक्षरे कोरल्याचे दिसते; मात्र, ही अक्षरे खराब झाली आहेत. क्रमांक ९ मध्ये हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तर शेवटच्या दहाव्या क्रमांकाच्या लेणीचे एका साधूने दोन भाग केले असून, एकात ते राहतात तर दुसऱ्या भागात शिवलिंग आहे. सर्वसाधारणपणे बौद्ध अथवा जैन लेणी या उंच टेकडीवर पहायला मिळतात. तर हिंदू पंथांच्या उपासकांचे स्थळे ही नदी काठावर असतात. तपोवनातील या गुहा सिंहस्थात येणाऱ्या साधूंसाठी त्यांच्या उपासणेसाठी खोदल्या गेल्या असाव्यात. नाशिकमध्ये गोदापात्रात आतापर्यंत गोवर्धन व तपोवनातील संगमावर सातवाहन नाणी मिळाली आहेत. जेथे ही नाणी मिळाली आहेत त्या भागाचा सातवाहनांशी संबंध आलेला दिसतो. त्यामुळे या लेणी सातवाहनकालिन असाव्यात असे वाटते. या लेणी खोदण्याची पद्धत पांडवलेणीशी मिळती जुळती आहे. तर काही अभ्यासकांच्या मते तपोवनातील लेणींची रचना चामर लेणीशी मिळती जुळती आहे. काही लेणींमध्ये गर्भगृह आहे. त्यामुळे या जैन लेणी असाव्यात, असे वाटते. नाशिक परिसरात जैन लेणी संख्येने अधिक आहेत. तर काही अभ्यासक अस मत मांडतात कि बौद्ध लेणींच्या प्राथमिक अवस्थेसारखी ही लेणी दिसत असून, यात सापडलेल्या धम्मालिपीतील अर्धवट शिलालेख तसेच छंनी हतोड्याचे घाव हे त्रिरश्मीवरील बुद्ध लेणींसारखेच दिसत असल्याने ही लेणी सातवाहन काळातील असल्याचे सूचित करते. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू लेण्या आहते. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. नाशिकच्या इतिहासासाठी या लेणी महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या कालखंडात बांधल्या गेल्या हा अभ्यासाचा विषय आहे.
गोदावरी घाट – ‘दक्षिणेची गंगा’
नाशिक शहरात गोदावरीचे पात्र २०० मीटरचे आहे. गोदावरीचा गाळा वाहून जमा झालेल्या टेकड्यांवरचे ठिकाण हे मूळ नाशिक आहे. त्यामध्ये बुधवार पेठ, म्हसरुळ टेक, चित्रघंटा हे मूळ नाशिक आहे. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम लोक राहत आले आहेत. पेशव्यांच्या सरदारांनी रामकुंड परिसरात मंदिरे बांधली. मंदिरांमुळे गावठाण तयार झाले. काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, कपालेश्वर मंदिर, नीळकंठश्वर मंदिर, नारोशंकर मंदिरांमुळे नाशिकचे सौंदर्य टिकून आहे. मात्र, सुंदर नारायण मंदिराची दुरवस्था झाली आहे. २५० वर्षांपूर्वी रामकुंड बांधण्यात आला. या ठिकाणी गांधी ज्योत साकारण्यात आली.नाशिकमध्ये पहिल्यांदा १७२३ मध्ये कपालेश्वर मंदिर उंचावर साकारण्यात आले. त्यानंतर २५ वर्षांनी गोदावरीच्या नदीपात्रात सुंदर नारायण मंदिर साकारण्यात आले. १८५७ मध्ये राणी व्हिक्टोरिया पूल म्हणजे अहिल्यादेवी पुलामुळे सुंदर नारायण मंदिराच्या पायर्या झाकल्या गेल्या. सुंदर नारायण मंदिर हे स्थापत्य कलेचा चमत्कार आहे. सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीवर दक्षिणायन आणि उत्तरायनातील पहिली सूर्यकिरणे पडतात. कपालेश्वर आणि सुंदर नारायण मंदिरे १८० अंशामध्ये साकारण्यात आली आहेत. या दोन्ही मंदिरांच्या गाभार्यात लावलेले दिवे भाविकांना कोणत्याही एका मंदिरातून पाहता येतात. त्यामुळे दिवाळीत नाशिककर दिवे बघण्यासाठी गर्दी करतात,
१९६९ मध्ये नव्याने यशवंत महाराज मंदिर साकारण्यात आले. तर शंभर वर्षांपूर्वी दुतोंड्या मारुतीची छत नसलेली मूर्ती साकारण्यात आली. ही मूर्ती पुढे पूररेषा म्हणून ओळखली जाऊ लागली. रामकुंडावर अस्थी विसर्जन होवू लागले. त्यामुळे नाशिकचे पर्यटन वाढू लागले. १८६५ मध्ये रेल्वे स्टेशन तयार झाले. त्यामुळे मुंबईचे पर्यटक नाशिकला येऊ लागले. १८९७ मध्ये मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. तो मुंबई नाका, अशोकस्तंभ, व्हिक्टोरिया पूलमागे जुना आडगाव नाका येथून पुढे धुळे, आग्रा, दिल्लीकडे गेला. परिणामी, उत्तर भारतीय भाविक मोठ्या संख्येने नाशिकला येऊ लागले.
पंचवटी
प्राचीन काळापासूनच पंचवटीचा भाग अत्यंत पवित्र मानला गेला आहे. येथे पाच वटवृक्षांचा समूह आहे. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड. त्यामुळे या परिसराला ‘पंचवटी’ असे म्हटले जाते. काळाराम मंदिर, सीता गुंफा, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, दुतोंड्या मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काट्यामारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे ही रामकुंडाच्या परिसरात गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. याशिवाय सीताकुंड, लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड, शारंगपाणीकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड आणि निळकंठेश्वर व गोराराम मंदिराच्या समोर सर्वांत मोठे दशाश्वमेघकुंड आहे.
याबाबत अख्यायिका अशी की समुद्रमंथनातून देवांना अमृतकलश प्राप्त झाला व तो राक्षसांनी पळविला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून तो राक्षसांकडून परत मिळविला. विष्णूरुपी मोहिनी अमतृकलश घेऊन परतत असताना त्यातील चार थेंब पृथ्वीवर पडले. ही चार ठिकाणे म्हणजे प्रयाग, हरिद्वार, नाशिक व उज्जैन. नाशिकमध्ये ज्या ठिकाणावर अमृतकलशातील थेंब पडले ते ठिकाण म्हणजे रामकुंड, असे सांगितले जाते. त्यामुळे या कुंडात स्नान करणे पवित्र मानले जाते.
श्रीराम हे लक्ष्मण आणि सीता यांच्यासमवेत वनवासकाळात नाशिकमधील पंचवटीत गौतमी तीरावर (गोदावरी) आले होते. इथे विधिपूर्वक स्नान करून वडील दशरथ राजा यांचा श्राद्धविधी त्यांनी केला. त्यावेळेपासून हे ठिकाण ‘रामकुंड’ नावाने ओळखले जाते. या तीर्थावर स्नान केल्याने ब्रह्महत्या आदी पापांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशी आख्यायिका आहे की, ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तीसाठी महादेवांनीही या रामकुंडात स्नान करून येथेच वास्तव्य केले होते.
वाल्मिकी रामायण, अरण्यकांडमध्ये पंचवटीचे रंजक वर्णन
1 वनवासाच्या काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पंचवटी क्षेत्रात पर्णकुटी बनवून राहू लागले. पंचवटी नाशिकजवळ गोदावरीच्या काठावर आहे. लक्ष्मणने इथेच एक पर्णकुटी किंवा पर्णपाती बांधली होती. या ठिकाणी राम, सीता, लक्ष्मण झोपडी बनवून राहिले होते. इथूनच रावणाने माता सीतेचे हरण केले होते.
2 दंडकारण्यात मुनींच्या आश्रमात राहिल्यावर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेले. हे आश्रम देखील दंडकवनात होते. हे नाशिकच्या पंचवटी क्षेत्रात गोदावरीच्या काठी वसलेले आहे.
3 ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाची नाक कापले होते. कदाचित म्हणून ह्या जागेला नंतर नाशिक म्हटले जाऊ लागले.
4 ह्याच ठिकाणी राम-लक्ष्मणाने खरं आणि दूषण सह युद्ध केले.
5 गिद्धराज जटायू आणि प्रभू श्रीरामाची मैत्री देखील इथेच झाली . पंचवटीला जाताना रामाला जटायू नावाचे गिधाड भेटले, जे राजा दशरथजींचे मित्र होते.
6 मारीच चे वधदेखील पंचवटीजवळ मृगव्याधेश्वर येथे झाले.
7 येथे श्रीरामाने बनविलेले एक मंदिर
आजदेखील भग्नावशेष रूपात आहेत.
8 पंचवटीमध्ये पांच वडाचे झाड आहे जे जवळपास आहे. या मुळे ह्याचे नाव पंचवटी देण्यात आले. नाशिकच्या पंचवटी क्षेत्रात सीता मातांच्या गुहेजवळ पाच प्राचीन झाडे आहेत ज्यांना पंचवटी नावाने ओळखतात. वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीताने काही काळ येथे घालवला. या झाडांचे धार्मिक
महत्त्वदेखील आहे.
सितागुंफा

गंगा गोदावरी मंदीर

सुंदरनारायण मंदिर

हे मंदिर औरंगजेबाने उद्ध्वस्त करून याच ठिकाणी थडगे बांधले होते. मात्र, पेशव्यांनी हे थडगे काढून त्याच ठिकाणी पेशव्यांचे सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये तब्ब्ल १० लाख रुपये खर्च करून बांधले होते. त्यामुळेच या मंदिराची रचना मिश्र दिसते. दगडात केलेले कोरीव काम आणि दगडी बांधीव काम, असे एकत्रित दिसते. मंदिरावर मुघल वास्तुकलेचीही छाप पाहायला मिळते. मंदिराचा गोल घुमट याची साक्ष देतो.मंदिराची काहीशी पडझड झाली असली तरी जो भाग उभा आहे त्यातून त्याची रचना किती सुंदर असावी याची कल्पना येते.

सुंदरनारायण मंदिर नागर शैलीत बांधले गेले आहे आणि त्याची रचना अतिशय सुंदर व आकर्षक आहे. हे मंदिर दगडी चौथऱ्यावर बांधण्यात आले असून, मंदिराचे शिखर दुरूनही दिसते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या बांधकामाची अचूक तारीख देणारा शिलालेखही येथे आहे. काळ्या पाषणातील या मंदिरासाठी कुठेकुठे दगड, चुना, नवसागर, शिसे यांचा वापर करण्यात आल्याचेही दिसते.


कपालेश्वर आणि सुंदरनारायण ही मंदिरे अशा पद्धतीने समोरासमोर बांधली आहेत की एका मंदिरातून दुसर्या मंदिरातल्या देवाचे दर्शन घेता येते. या मंदिरावर सुंदर कोरीव नक्षी आहे. दिशासाधन करुन हे मंदिर बांधण्यात आले असल्यामुळे विषुवदिनाच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण सुंदरनारायणाच्या पायाशी पडतात.
या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याची किरणे भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडतात. दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला येथे ‘हरिहर भेट’ साजरी केली जाते. यावेळी कपालेश्वर मंदिराचे पुजारी मध्यरात्री सवाद्य येत कपालेश्वराचा बेलाचा हार स्वामी नारायण म्हणजेच विष्णूंना अर्पण करतात, तर सुंदरनारायण मंदिराचे पुजारी तुळशीचा हार कपालेश्वर मंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात. हा सोहळा पाहण्यासाठी नाशिक शहर व परिसरातील भाविक येथे आवर्जून येतात.

कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. त्यासाठी मंदिराच्या भिंतींत पेटते दिवे ठेवण्याची खास सोय आहे. दिव्यांची ही आरास करण्याची परंपरा पेशवे काळापासून अखंड सुरू आहे. दिव्यांच्या मंद प्रकाशात मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. सुंदर नारायण मंदिरासमोर कपालेश्वराचे मंदिर आहे. नाशिकला दर्शनाला येणारे भाविक या दोन्ही मंदिरांना आवर्जून भेट देतात. येथील एक खास वैशिष्ट्य म्हणजे एका मंदिराच्या गाभाऱ्यात उजळलेले दिवे दुसऱ्या मंदिरातून अगदी सहजपणे दिसावेत, अशी रचना ही दोन्ही मंदिरे उभारताना करण्यात आली आहे.

सुंदरनारायण मंदिरात विविध धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. यामध्ये विशेषतः:
रामनवमी – या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि भजन आयोजित केले जातात.
कृष्ण जन्माष्टमी – भगवान विष्णूच्या अवताराच्या सन्मानार्थ मोठा उत्सव होतो.
एकादशी – विशेषतः कार्तिकी आणि आषाढी एकादशीला येथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात.
होळी व धुलीवंदन – या दिवशी होणारे सूर्यप्रकाशाचे दर्शन हा एक विशेष धार्मिक प्रसंग असतो.
कपालेश्वर महादेव मंदिर.

रामकुंड

रामकुंडाजवळ असलेल्या गोदावरी माता मंदिराच्या बाजूला अरुणा, वरुणा आणि गोदावरीचा संगम होतो, असे सांगतात. याचेच प्रतीक म्हणून या ठिकाणी एका चौथऱ्यावर तीन गोमुखे असून त्यातून तीनही नद्यांचे पाणी सतत वाहत असते. ते पाणी रामकुंडात येते. या ठिकाणी दीपदानही केले जाते.
दक्षिणवाहिनी गोदावरीमधील तीर्थस्नानाचे अन् सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या नाशिकमधील ‘रामकुंड’ असा उल्लेख १६९६ पासून सुरू झालाय. मात्र प्रत्यक्षात हे रामकुंड नव्हे, तर रामतीर्थ आहे. हजारो वर्षांपूर्वीच ब्रह्मपुराण, आनंद रामायणमध्ये त्यासंबंधीचा उल्लेख अधोरेखित झाला आहे.
ब्रह्मपुराणातील सहाव्या अध्यायातील १४ वा श्लोक
षष्ठी र्वर्ष सहस्त्राणी भागिरथ्यवगाहमनम्।
सकृत्गोदावरी स्नानं सिंहस्थेच बृहस्पतो।।
अर्थात, साठ हजार वर्षे भागिरथीमध्ये स्नान करण्यातून जे पुण्य मिळते, ते पुण्य सिंहस्थ कुंभमेळ्यात श्री गोदावरीमधील एका स्नानातून मिळते. गुरू आणि सूर्य हे सिंह राशीत येतात, तेंव्हा सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाळ असतो. बारा वर्षांनी हा पर्वकाळ येतो. आता २०२७-२८ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात हा पर्वकाळ येणार आहे. ब्रह्मपुराणातील सहाव्या अध्यायातील १५ वा श्लोक असा : विशेषात् रामचरण प्रदानात् तीर्थसंश्रयात्। अर्थात, प्रभूरामचंद्र यांच्या वास्तव्याने पवित्र असलेले हे तीर्थक्षेत्र होय. स्मार्त चूडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना आजपर्यंत अप्रकाशित असलेली ही माहिती दिली.
परमपावन रामतीर्थ
रामतीर्थं रामकृतं सीतालक्ष्मणसंस्कृते।
तीर्थें यत्र तु गौतम्यां दृश्यतेsद्यापि मानवै :।
रामतीर्थमितिख्यातं ब्रह्महत्याविनाशनम् ।
तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै : प्रमुख्यते।।
आनंद रामायणमधील हा उल्लेख आहे. अर्थात, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे लक्ष्मण आणि श्री जानकीदेवी सीता यांच्यासमवेत वनवासासाठी नाशिकमधील पंचवटीत गौतमी तीरावर आले होते. इथे विधिपूर्वक स्नान करून वडील दशरथ राजा यांच्या श्राद्ध दानादि विधी त्यांनी केला. त्यावेळेपासून हे ठिकाण रामतीर्थ नावाने ओळखले जाऊ लागले. हे तीर्थ ब्रह्महत्या आदी पापांचा विनाश करते. त्याच्या केवळ स्मरणाने पापांचा विनाश होतो, असे वर्णन प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले आहे.
नाशिकच्या दंडकारण्यात राक्षसांचे वास्तव्य होते. दंडक राजाला शाप मिळाला होता. हा भूप्रदेश अरण्य झाले आणि त्याला दंडकारण्य असे म्हटले जाऊ लागले. प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षांच्या वनवासाच्या कालखंडात १३ वर्षे दंडकारण्यात वास्तव्यास होते. आताच्या काळाराम मंदिराच्या परिसरातील पर्णकुटीत प्रभू श्रीरामचंद्र निवासी होते.
अयोध्या-चित्रकूटमार्गे प्रभू श्रीरामचंद्र यांना दंडकारण्यात पोचण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला.
त्या वेळी सिंहस्थ कुंभमेळा होता. शिवाय सीतामाईला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र गेले असताना त्या वेळीही दुसरा सिंहस्थ कुंभमेळा होता. प्रभू श्रीरामचंद्र आले असताना गोदावरी मातेला अत्यानंद झाला. प्रभू श्रीरामचंद्र यांची दोन, लक्ष्मणाची दोन, सीतामाईची दोन अशा सहा पावलांचा स्पर्श झाल्याने राक्षसांच्या पातकांनी ग्रस्त झालेल्या गोदावरी मातेने मी पापमुक्त झाल्याचे म्हटले. तेव्हा देवदेवतांनाही आनंद झाला आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवाय हेच तीर्थक्षेत्र जगाच्या अंतापर्यंत ‘रामतीर्थ' म्हणून विख्यात होईल, अशी आकाशवाणी झाल्याचा उल्लेख आनंद रामायणमध्ये ‘रामतीर्थम् इति ख्यातम्’ अशा श्लोकात आढळतो.
सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये रामतीर्थ परिसरात कुंडाचे बांधकाम केल्याचा दस्तऐवज सरकार दप्तरी उपलब्ध आहे. तसेच श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या आई गोपिकाबाई यांनी या कुंडाची दुरुस्ती केल्याची नोंद सरकार दप्तरी आहे. त्यापासून रामतीर्थाचा उल्लेख रामकुंड असा होऊ लागल्याचे धर्म अभ्यासकांचे मानणे आहे. आता मात्र रामकुंड अशा संबोधनाऐवजी ‘रामतीर्थ’ असेच या संपूर्ण पात्राला म्हटले जावे, यासाठी नाशिककर आग्रही आहेत.
"कलियुगात २४ ऋषींनी माणसांच्या आचार-विचारांच्या नियमांची संहिता केली आहे. काही पातकांसाठी उपाय सांगितले आहेत. रामतीर्थात स्नान, दान, मुंडण, उपवास, श्राद्ध आदी विधी केले असता, पापमुक्त होऊन जीवनाच्या मूळ प्रवाहात येता येते. त्रेतायुगात देवदेवतांनी दक्षिणवाहिनी गोदावरीचा ‘रामतीर्थ' असा उल्लेख केला असल्याने आताच्या समाजाने, प्रशासनाने आणि सरकारने ‘रामतीर्थ’ असे संबोधून आपली उत्तुंग परंपरा, शास्त्र-पुराण यांचा आदर करायला हवा."
"पौराणिक, प्राचीन ग्रंथ, पुराण यामधून ‘रामतीर्थ’ असा उल्लेख अधोरेखित झाल्याने ‘रामतीर्थ’ असा शब्द भाविकांप्रमाणे सरकार आणि प्रशासनाने आपल्या दप्तरी नोंदवून पुढे प्रचलित ठेवणे आवश्यक आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिर, पंचवटी, नाशिक
नाशिकच्या पंचवटी परिसरात वसलेले घारपुरे घाटाजवळ, रामवाडी पुलाच्या कोपऱ्यावर श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.श्री सिद्धेश्वर मंदिराची स्थापना नेमकी केव्हा झाली याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही, परंतु स्थानिक समजुतीनुसार हे मंदिर अनेक शतकांपूर्वी बांधले गेले आहे. पंचवटी हे रामायण काळातील एक महत्त्वाचे स्थान असून, भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात येथे वास्तव्य केले होते. या परिसरातील अनेक मंदिरे त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत.
नीळकंठेश्वर महादेव मंदिर
गोदावरीच्या तीरावर वसलेल्या पंचवटी भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, आणि त्यातच एक विशेष महत्त्व असलेले मंदिर म्हणजे नीळकंठेश्वर महादेव मंदिर. भगवान शंकराच्या विविध रूपांपैकी “नीळकंठ” हे अत्यंत पूजनीय रूप आहे. नाशिकमधील या मंदिरात भगवान शंकर हे नीळकंठेश्वर रूपात विराजमान आहेत आणि हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहेत.इतिहासकारांच्या मते हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असून, याची निर्मिती पेशवा काळात किंवा त्याही आधी झाली असावी. पंचवटी हा भाग रामायणकाळाशी संबंधित असल्यामुळे येथे असलेली ही मंदिरे विशेष पवित्र मानली जातात. नीळकंठेश्वर हे भगवान शंकराचे विषपान करणारे रूप आहे. समुद्रमंथनाच्या वेळी निघालेलं कालकूट विष जेव्हा त्रिभुवनाला संकटात टाकणारं ठरत होतं, तेव्हा भगवान शिवाने ते विष प्राशन केलं. ते त्यांच्या गळ्यात अडकून राहिलं आणि त्याचा गळा निळसर पडला. म्हणून त्यांना ‘नीळकंठ’ असं नाव पडलं. या महान त्यागाचे प्रतीक म्हणजे नीळकंठेश्वर. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात, रामकुंड व गंगाघाटाच्या अगदी जवळ स्थित आहे. स्थानिक नागरिक तसेच देशभरातून येणारे भाविक, पंचवटी दर्शन करताना नीळकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येथे नित्यनेमाने येतात.
प्रत्येक दिवस मंदिरात मंगलारती, दुपारी मध्यान्ह पूजन व संध्याकाळी महाआरती यांसारख्या विधी पार पडतात. विशेषतः सोमवारी, मंदिरात मोठी भक्तांची गर्दी असते. श्रावण महिना, महाशिवरात्री, प्रदोष, शिवरात्री अमावस्या, कार्तिक पौर्णिमा, हे सर्व सण येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी रुद्राभिषेक, पंचामृत अभिषेक, आणि विशेष पूजा केली जाते. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येथे दर्शन घेऊन बेलपत्र, दूध, जल अर्पण करतात.
नीळकंठेश्वर मंदिर हे नवसाला पावणारे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आरोग्याच्या समस्या, नोकरी-व्यवसायातील अडथळे, मानसिक चिंता, कौटुंबिक प्रश्न यावर उपाय म्हणून अनेक भक्त येथे दर्शन घेऊन शिवलिंगावर अभिषेक करतात. अनेक जोडपी अपत्यप्राप्तीसाठी, विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी, तसेच जीवनात सकारात्मक परिवर्तनासाठी येथे नवस करतात आणि शिवकृपा अनुभवतात.
नाशिक परिसरातील दत्त मंदीरे :-
श्री एकमुखी दत्त मंदिर, पंचवटी, नाशिक

पंचमुखी हनुमान मंदिर, पंचवटी, नाशिक
पंचमुखी हनुमान – एक अद्वितीय रूप
‘पंचमुखी’ म्हणजेच पाच मुख असलेले हनुमानाचे रूप. हनुमानजींनी पंचमुखी रूप धारण करून अहिरावणाचा वध केला, असे रामायण व पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे. या पंच मुखांचे प्रतीकात्मक अर्थ आहेत:
पूर्वमुख – वानर मुख (स्वतः हनुमान) – शक्ती, भक्ती व संरक्षण
दक्षिणमुख – नरसिंह मुख – शत्रुनाशक शक्ती
पश्चिममुख – गरुड मुख – सर्प बाधेपासून संरक्षण
उत्तरमुख – वराह मुख – संकटमोचन, पृथ्वीवरील समृद्धी
ऊर्ध्वमुख – हयग्रीव मुख – ज्ञान, बुद्धी आणि विद्या
या रूपात हनुमानजी संपूर्ण दिशा आणि भक्तांचे जीवन रक्षण करतात. पंचमुखी हनुमानाचे दर्शन घेणं म्हणजे संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणं, अशी श्रद्धा आहे.
श्री काशी-विश्वेश्वर महादेव मंदिर , नाशिक
नाशिक शहराच्या पंचवटी भागातील गोदाघाटावर वसलेलं श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे एक अत्यंत महत्त्वाचं व श्रद्धास्थान मानलं जातं. भगवान शंकराच्या ‘काशी’ स्वरूपात असलेल्या या मंदिराचं महत्त्व फार पूर्वीपासून मानलं जातं. भगवान शिव हे त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, सोमनाथ यांसारख्या अनेक रूपांत भक्तांच्या समोर प्रकट होतात. त्यापैकी “काशी विश्वेश्वर” हे रूप वाराणसीतील प्रमुख शिवलिंगाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, काशीतील विश्वनाथ मंदिराचे पुण्यस्मरण करण्यासाठी, नाशिकमधील या मंदिरात दर्शन केल्याने काशीतील दर्शनाचे पुण्य लाभते.श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक मानलं जातं. याचा नेमका स्थापत्य कालावधी ज्ञात नाही, पण मंदिराची रचना, दगडी भिंती, शिल्पकला पाहता हे मंदिर पेशवे किंवा नंतरच्या काळात बांधले गेलं असावं. हे मंदिर पंचवटी परिसरात गोदाघाटावर वसलेलं आहे. रामकुंड, कालाराम मंदिर, सीता गुंफा, कपिल तीर्थ या सर्व धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ हे मंदिर आहे. भाविक पंचवटीतील संपूर्ण दर्शन करताना काशी विश्वेश्वर महादेवाचं दर्शन घेणं आवश्यक समजतात.गाभाऱ्यात असलेलं शिवलिंग काळ्या पाषाणात कोरलेलं असून त्यावर नेहमी जलाभिषेक सुरू असतो. मंदिराच्या भिंतींवर आणि परिसरात काही पौराणिक शिल्पे व शिलालेखही आहेत.
संत श्री देवमामलेदार यशवंत महाराज समाधी मंदिर, नाशिक
संत यशवंत महाराज हे नाशिक जिल्ह्याच्या आध्यात्मिक परंपरेतील एक थोर संत होते. त्यांच्या जीवनात भक्ती, सेवा, सत्य, आणि प्रामाणिकपणा या गुणांचे अधिष्ठान होते. विशेष म्हणजे, त्यांचा जीवनकाल “मामलेदार” या प्रशासकीय पदावर असताना घडलेला असूनही, त्यांनी लोकसेवा, न्यायप्रियता आणि भक्तीपर जीवन जगले. त्यामुळेच त्यांना “देवमामलेदार” ही उपाधी मिळाली. त्यांनी समाजातील दु:खी, गरिब, उपेक्षित व्यक्तींना आधार दिला. त्यांनी रामनामाचा प्रचार केला आणि समाजात नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना केली. त्यांचे जीवन म्हणजे एक प्रकारचं संयम, साधना, आणि समाजसेवेचं प्रतीक होतं.
श्री यशवंत महाराजांचा जन्म एका दत्तभक्त कुटुंबात १३ सप्टेंबर १८१५ ला पुण्यात ओंकार वाड्यात झाला. त्यांचे मूळ गाव भोसे पंढरपूर, तालुका जिल्हा सोलापूर. त्यांचा जन्म अश्वलायन शाखेच्या कश्यप गोत्री ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती. ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करीत असत प. पू. देव मामलेदार १८ व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात.
सन १८५३ साली त्यांना मामलेदार म्हणून बढती मिळाली. सध्या महसुली व्यवस्थेत असणारं तहसिलदार पद म्हणजेच मामलेदार हे पद होय. या पदावर नियुक्त होताच ते लोकांच्या भल्यासाठी झटू लागले. चाळीसगाव इथून त्यांनी आपल्या मामलेदार पदाच्या नोकरीस सुरवात केली, येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मामलेदार म्हणून ते काम करु लागले. ब्रिटीश व्यवस्थेत इतर अधिकाऱ्यांप्रमाणे गळचेपी धोरण न राबवता ते लोकांच्या बाजूने उभा राहू लागले.
सन १८६९ साली इंग्रजांनी नाशिक जिल्ह्यात बागलाण नावाचा नवा तालुका निर्माण केला. या तालुक्याचे महसुली केंद्र सटाणा ठेवण्यात आले. याच नव्या तालुक्याची मामलेदार म्हणून जबाबदारी यशवंत महाराज यांच्याकडे सोपवण्यात आली. अवघ्या काही दिवसातच एक परोपरकारी मामलेदार म्हणून आपली ओळख त्यांनी बागलाण प्रांतात निर्माण केली. बागलाण प्रांतातले शेतकरी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेवून येवू लागले. इथेच त्यांच्याकडे अडचणीतून मार्ग काढणारे मामलेदार म्हणून ओळखले जावू लागले. सन १८७० साली बागलाण प्रांतात मोठ्ठा दुष्काळ पडला. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्याच काळात सटाणा-बागलाण प्रांतातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. दूष्काळावर मात करण्यासाठी लोकांना मदत मिळावी अशी याचना करण्यात आली, पण नाशिकच्या कलेक्टर यांनी हि मदत पोहचवली नाही. माणसे व जनावरे अन्नांन्न करून मृत्युमुखी पडत होती. श्री यशवंत महाराज त्यावेळी बागलाणं तालुक्यात तहसीलदार होते. गरीब व वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व सर्व रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली. पण दुष्काळ स्थिती पाहता हि रक्कम अगदीच कमी होती. हे देव मामालेदारांना जाणवले, ते तालुका तहसीलदार होते. त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरिबांमध्ये वाटून टाकली. हि रक्कम थोडी नव्हती, ती होती १२७००० त्याकाळी. हि वार्ता त्यांचे वारिष्टाना कळली व ते सरकारी खजिन्याच्या तपासणीस आले. आणि काय अभिनव घडले? तपासणीत सर्व रक्कम ट्रेझरितच मिळाली. एक पैशाचाही फरक मिळाला नाही. या ठिकाणी भगवंताने चमत्कार तर केलाच पण भगवान महाविष्णूनी यशवंत महाराजांना साक्षात दर्शन दिले. बागलाणं तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसीलदाराला देवत्व बहाल केले व तेव्हापासून यशवंत महाराज देव मामलेदार याच नावाने ओळखले जाऊ लागले.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनंत लीला केल्या. हजारो लोकांना मदत केली व त्यांचे जीवन उद्धरून टाकले. श्री देव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांचे चरित्रात आढळतो. श्री देव मामलेदार यांनी हा मर्त्यदेह २७-१२-१८८७ रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला. या महान दत्तभक्ताचा समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण ११. त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे. येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त या विदेही दत्तभक्तांचे समाधी दर्शनास येतात. हा सोहळा १५ दिवस चालतो. यशवंत महाराजांचे कृपेने त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. सटाणा हे देव मामालेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळेच त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे. भक्तांनी या स्थानी जाऊन श्रींचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा हि विनंती.
नाशिककरांनी गोदावरी तटी रामकुंडा समोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले. तर सटाणा येथे आरमनदीच्या काठी त्यांचे स्मारक आणि मंदिर बांधण्यात आले. त्याआधी काही दिवस ते वैशंपायन वाड्यात रहायचे..तेथे त्यांचे देवघर , रंगनाथाची मुर्ती आहे. त्यानंतर मंदिराच्या यात्रेत्सवाची सुरवात करण्यात आली जी आजही चालू आहे. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तगण या मंदिरास भेट देत असतात. पुर्ण भारतात सरकारी अधिकारी असूनही मंदिर असणारे देव मामलेदार हे एकमेव उदाहरण आहे.
काळाराम मंदिर,
काळाराम मंदिर नाशिकच्या पवित्र भूमीत उभे असलेले एक अद्वितीय धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. काळ्या दगडात कोरलेल्या भव्य श्रीरामाच्या मूर्तीमुळे याला “काळाराम” हे नाव मिळाले. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून,भारतातील सामाजिक सुधारणा चळवळींचे साक्षीदारही राहिले आहे. या मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पावर नजर टाकताच त्याची अप्रतिम रचना मंत्रमुग्ध करते. उंच भव्य खांब, सुबक कोरीवकाम आणि काळ्या दगडांची मजबुती यामुळे मंदिराला एक वेगळेच तेज प्राप्त झाले आहे. पवित्र गोदावरी नदीच्या सान्निध्यात वसलेले हे स्थान भक्तांसाठी अपार श्रद्धेचे केंद्र आहे. नाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच आहे.
_202411302146238789_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)



गोराराम / गोरेराम मंदिर :-



अहिल्याराम मंदिर

कोदंडधारी श्रीराम

भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात कोदंडधारी श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात तरुण कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती स्थापित केलेली आहे. देशात अशा प्रकारची ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते, कारण मंदिरामध्ये फ़क्त रामाचीच मूर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या काडतूसाच्या धातुतून ही मुर्ती बनवली असल्याने तिची चकाकी कायम असते व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्ती ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनवली आहे.
नाशिकमधील प्राचीन गणेश स्थाने :-
महोत्कट गणपती -
मोदकेश्वराच्या मागील गल्लीतच महोत्कट गणेशाचे स्थान आहे. शंकराच्या शापामुळे उद्विग्न झालेल्या मदनाने उ:शापासाठी गणेशाची कठोर उपासना सुरू केली तेव्हा रतीने जिथे मोदकांची बठक करून त्यावर गणेशाची स्थापना केली, तो महोत्कट गणेश, असे वर्णन गणेशपुराणातील उपासना खंडात आले आहे. तसा महोत्कट गणेश नाशिकमध्ये िहगणेंच्या वाडय़ात आहे. पेशव्यांचे उपाध्याय असणाऱ्या िहगणे घराण्याचे हे खासगी देवस्थान. िहगणेंच्या वाडय़ात असणारे सध्याचे देवस्थान पूर्वी वाडय़ाच्या बाहेर होते. तेथील शिलालेख आजही आहे. सोळाव्या शतकात होणाऱ्या परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी िहगणेंच्या पूर्वजांनी गणपतीची मूर्ती पाठीवर उचलून आत्ताच्या ठिकाणी स्थापन केली. म्हणून पाठीवरून खाली ठेवल्यावर जसे आसन असते तशाच स्थितीत ही गणेशमूर्ती आहे, असे सांगतात. अनेक वर्षांपासून या मूर्तीस शेंदूर विलेपन होत असल्याने गणेशाचे रूप पालटले होते. अलीकडेच हा शेंदुराचा लेप अचानक निघाल्याने गणपतीचे मूळ स्वरूप समोर आले आहे. साडेचार फूट उंचीच्या दोन खांबी मंडपात अत्यंत सुबक चेहऱ्याची महोत्कट गणेशमूर्ती विराजमान आहे. दहा हातांत विविध आयुधे घेऊन तेजस्वी बालकाप्रमाणे हा आसनस्थ आहे. गणेशाचे मुकुट, माळा, साखळ्या, दुर्वाचा हार हे अलंकारही पेशवाईला साजेसे असे आहेत. उत्सवाच्या वेळी मूर्तीस सर्व दागिने चढवतात त्यावेळचा त्याचा थाट पाहण्यासारखा असतो.
तिळा गणपती -
लोथेंचा गणेश –
जुन्या नाशकातील गोदावरी नदीच्या तीरावर नाव दरवाजा जवळील हिंगणे वाडयात ४०० वर्षांपूर्वीच्या मदनमदोत्कट गणेशाचे मंदिर हे पुरातन सिद्ध स्थान आहे.
गणेश पुराणांतील उपासना खंडात या मदनमदोत्कट गणेशाचे वर्णन आहे. अतिशय प्रसन्न रूप असलेला हा मदन मदोत्कट हा नवसाला पावणारा देव असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.
हिंगणे हे पेशव्यांचे उपाध्याय म्हणजेच पुरोहित होते. पेशव्यांचे उपाध्याय असलेल्या हिंगणेच्या स्वप्नात येऊन गणपती बाप्पानी आपल्या घरात माझी प्राण प्रतिष्ठापना करावी अशी आज्ञा केली मग ही गणरायाची मूर्ती गोदावरी नदीच्या तीरावरून हिंगणेच्या वाड्यात पाठीवर बालक बसून जसे नेतात त्या पद्धतीने नेण्यात आले आणि त्याच स्वरूपात पाठीवरून गणराय उतरत आहे अश्या पद्धतीने मूर्तीचे रूप आजही आहे.
या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना माधवराव पेशव्यांच्या सांगण्यावरून त्याचे नाशिक मधील उपाध्याय विष्णुपंत हिंगणेच्या वाड्यातच करण्यात आली आहे. मदनमदोत्कट गणेशाच्या स्थापनेसाठी दगडी गाभारा बांधण्यात आला आलेला आहे. या मूर्तीचा उल्लेख असणारा पुरातन शिलालेख हिंगणे वाड्याच्या भिंतीवर दिसतो. त्यावर कोरलेली अक्षरे प्राचिनतेची साक्ष देतात.
एकदा भगवान शंकर कैलास पर्वतावर तपश्चर्येला बसले असताना त्यांची तपश्चर्या मदनाने भंग केली. भगवान शंकरानी क्रोधीत होऊन तिसरा डोळा उघडला व मदनाला जाळून भस्म केले. मदनाची पत्नी रती हिने भगवान शंकराची विनवणी करून उ:शाप मागितला. श्री शंकरांनी मदनाला शाप दिल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी गणेशोपासना सुचविली. त्यानुसार रतीने २१ चतुर्थीचे व्रत केले. श्री गणेशाची कठोर उपासना केली.देवी रतीने प्रार्थना केल्यावर प्रसन्न झालेल्या गणेशांनी मदनाला अनंग स्वरूप प्रदान केले. अर्थात शरीर विरहित अवस्थेतच तो त्याची सर्व कामे करतो. पूर्ण रूपात तो रतीला सशरीर मिळेल असा आशीर्वाद मिळाल्यानंतर रती आणि मदन यांनी भगवान गणेशांची आराधना केली. हेच ते मदनाने आराधना केलेले 'कामवरद' महोत्कट क्षेत्र होय.
चतुर्थीला उद्यापनाच्या वेळेला रतीने मोदकांचा पार बांधून आराधना केली. त्यानंतर भगवान शंकराने साक्षात्कार दिला. आणि ह्या मोदकांच्या पारातून स्वयंभू श्री गणपती प्रकट झाले म्हणून ह्या गणपतीला मदनमदोत्कट असे नाव पडले अशी आख्यायिका व संदर्भ सापडतात. आजही मोदकाच्या आकाराचे शिलारुप मोदक मदनमदोत्कट गणपती जवळ सापडतात.
सततच्या शेंदूर लेपणामुळे गणपतीवर शेंदरी कवच निर्माण होऊन मूळ स्वरूप झाकले गेले होते. दिनांक ३० एप्रिल २००६ रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी मंदिरातील व्यवस्था पाहणारे व नित्य पूजा अर्चा करणाऱ्या हिंगणे परिवाराकडून शेंदरी थराचे पडणारे पापुद्रे दूर केल्यावर मूळ दशभुजा गणेशाचे रुप समोर आले. (फोटो मध्ये दिसणारे रूप)
हे शेंदराचे थर काढून टाकल्यावर अंत्यत सुबक चेहरा, दहा हात, व एखाद्या तेजस्वी बालकांप्रमाणे आसनस्थ मूर्तीचे स्वरूप आकर्षित करणारे ठरले.
ही गणेशाची मूर्ती बाल स्वरूपातील आहे. पाय खाली सोडून व हात गुढघ्यावर ठेवलेले दिसतात. हा मदन मदोत्कट गणेश डाव्या सोंडेचा आहे. मंदिरात प्राचीन अश्या दोन पितळाच्या मोठ्या समई गणेशा जवळ दिसतात.
हिंगणे वाड्यात अलीकडच्या काळापर्यंत मोदकाच्या आकाराचे दगड सापडत होते. भक्तगण ते गणरायाचा प्रसाद म्हणून भक्तिभावाने घरी नेत व देवघरात ठेवत. मदन मदोत्कट गणपती हा हिंगणे घराण्याचा कुलदैवत आहे. मूर्तीला शुद्ध तुपातून शेंदूर लावण्याची येथे परंपरा आहे. हिंगणेच्या वाड्यात असल्यामुळे मदन मदोत्कट गणपती हिंगणेचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
मदनमदोत्कट गणपतीचे दर्शन करण्यासाठी गोदावरी नदीच्या तीरावर रोकडोबा मारूती जवळून किंवा मोदकेश्वर गणपती मंदिराच्या मागील गल्लीतुन हिंगणे वाड्यात जाता येईल.स्थानिक भाषेत त्याला हिंगण्यांचा गणपती असे म्हणतात.
दशभुजा गणपती :-

श्री साक्षीविनायक गणेश, नाशिक
चांदीचा गणपती :-
पगडी गणेश :-

तपस्वी गणेश मंदिर’ :-

ढोल्या गणपती :-
गणेश भक्त मंडळ श्री गणपती मंदिर :-
श्री सोमेश्वर मंदीर


मुरलीधर मंदिर :-
व्यंकटेशाचा विमानोत्सव
भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान) :-
'भद्रं करोति इति भद्रकाली | 'भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी|
याचा अर्थ जी नेहमीच कल्याण करते ती भद्रकाली. प्रत्येक गावाचे म्हणून एक ग्रामदैवत असते. तसेच नाशिकचेही आहे. ती आहे ग्रामदेवता भद्रकाली. याचा अर्थ जी नेहमीच कल्याण करते ती भद्रकाली. पूर्वी इस्लामी राज्यकर्त्यांच्या राजवटीत हिंदू धर्मियांच्या मंदिरातील देवदेवतांच्या मुर्तींची विटंबना होत होती. नाशिकमध्ये भद्रकाली मातेचे मंदिर बुधवार पेठेत पाटील गल्लीमध्ये होते. मुघल अंमलात या मंदिराला आक्रमकांचा उपद्रव होऊन मुर्तीची विटंबना, मोडतोड किंवा ती भंग होऊ नये म्हणून गावांतील स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन त्यावेळचे सरदार चिमाजी पटवर्धन यांना मंदिरासाठी जागा द्यावी म्हणून विनंती केली. सरदारांनी तिवंधा चौकाजवळील आपली जागा मंदिरासाठी दिली व सदर जागेवर सरदार पटवर्धन व सरदार गणपतराव दीक्षित यांनी भद्रकालीचे मंदिर बांधले. सदर मंदिराचे बांधकाम सन १७९० मध्ये पूर्ण झाले. भद्रकाली देवीचे मंदिर मोठे प्रशस्त असून वरती दोन मजले बांधलेले आहेत पण मंदिरावर कळस नाही. वरकरणी इथे मंदिर आहे हे आक्रमकांना कळू नये व मंदिराची व देवतांची विटंबना टळावी म्हणूनच मंदिरावर कळस नाही. मंदिराचे बाह्य स्वरूपाचे बांधकाम एखाद्या राहत्या वाड्याप्रमाणे केलेले आहे. आतमध्ये मात्र संपूर्ण काम लाकडात केलेले आहे.पुर्वी या मंदिरात वेदांचे अध्ययन होत असे.आसपासच्या ब्राम्हण घरातील मुले उपनयन संस्कारानंतर येथे राहून वेदांचे शिक्षण घेत.त्याकाळी मंदिराला भद्रकाली मठ असे संबोधले जाई.
देवीची मुर्ती पंचधातुत घडवलेली असून ती अठरा भुजांची आहे. साधारणतः १५”पंधरा इंच उंचीची आहे. मूर्ती अष्टादशभुजा अर्थात १८ हातांची आहे. त्या प्रत्येक हातात शस्त्र व अस्त्रे आहेत. शुल, चक्र, शंख, शक्ती, धनुष्य, बाण, घंटा, दंड, पाश, कमंडलू, त्रिशुल, माळा, तलवार, तेज, ढाल, चाप इत्यादि आयुधांनी शस्त्रसज्ज आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे तिचा प्रत्येक हातात शस्त्र आहे. मुर्तीच्या चेहर्यावर असलेले भाव अत्यंत विलोभनीय आहे. या गाभाऱ्यात पंचधातूच्या नवदुर्गांच्याही मुर्ती आहेत.
मंदिरामागे राहणाऱ्या गायधनी कुटुंबाकडून येथे पुराण कथन केले जाते. ही परंपरा गेली दोनशे वर्ष अव्याहतपणे सुरु आहे. सध्या या कुटुंबातील विनायक गायधनी ही परंपरा पुढे चालवत आहे.गुढीपाडवा ते रामनवमी यांनी काळात ते रामायणाचे कथन करतात.. तर भाद्रपद महिन्यात भागवत पुराणाचे कथन करतात.
गेल्या ७०-८० वर्षापासून येथे रोज संध्याकाळी किर्तनाचा कार्यक्रम केला जातो. भद्रकाली किर्तन संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात महिना अखेरीस म्हणजे अमावस्येला गोपालकाल्याच्या प्रसादाचे वाटप होते.
नवरात्रात तर देवीची रुप अधिकच तेजस्वी दिसते. संध्याकाळी मंदिरात भारतीय बैठक अंथरली जाते. परीसरातील ब्रम्हव्रुंद यजुर्वेदाच्या संहितेचे सामुहिक पठण करतात.अष्टमीला पुजार्यांतर्फे आणि कोजागिरी पौर्णिमेला विश्वस्त मंडळातर्फे नवचंडी यागाचे आयोजन केले जाते.गल्ल्या.. वाडे सोडून गेलेली स्थानिक नाशिककर मंडळी दर्शनासाठी येतात.गावाच्या पारावर जशी पुर्वी गावकरी मंडळी जमायची..तशी येथे जमतात.. गाठीभेटी होतात..ख्यालीखुशाली विचारतात.आणि मग तेव्हा समजते..नाशिककरांच्या ह्रदयातील ग्रामदेवतेचे स्थान.
सतीने सांगितले,
'यो निन्दति महादेवं निन्द्यमानं शॄणोति वा | तावुभौ नरकं यातो यावच्चंद्रदिवाकरौ ||'
जो शंकराची निंदा करतो वा ऐकतो तो जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत नरकात रहातो.
पतीची निंदा श्रवण स्वतःच्या पित्याकडून श्रवण करावी लागल्यामुळे सतीने आपल्या देहाचे यज्ञकुंडात समर्पण केले. त्यावेळी शिवगणांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरूवात केली. तेव्हा भॄगुमुनीने 'अपहता असुरा| रक्षांसि वेदिषदा|' ही आहुति दिल्याने अनेक ऋभु नामक प्रबलवीर प्रकट झाले. त्यांचे व शिवगणांचे युध्द झाले.
भगवान शंकर शोकविव्हळ होऊन यज्ञकुंडातील सतीचे निष्प्राण कलेवर खांद्यावर घेवून ब्रह्माण्डात भ्रमण करू लागले. यामुळे बाकी सर्व देव मुनी ऋषी घाबरले. त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली की आता शंकरांना शांत आपणच करू शकता. भगवान विष्णुंनी आपले सुदर्शन चक्र सोडले व त्या चक्राने सतीच्या देहाचे अनेक तुकडे झाले व ते सर्व भाग या भूमंडलावर पडले. त्यापैकी हनुवटीचा भाग हा गोदावरीच्या काठावर नाशिक येथे पडला.
'चिबुके भ्रामरी देवी विकृताक्ष जनस्थले।' (- तंत्र चुडामणी )
अर्थात जनस्थल अथवा जनस्थान या ठिकाणी 'चिबुक' हे भ्रामरी शक्तिरूपात प्रकट झाले व या शक्तिपीठाचा रक्षक भैरव आहे विकृताक्ष.
संस्कृत भाषेत हनुवटीला ‘चिबुक’ म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला ‘चिबुकस्थान’ असेही म्हणत असत. सतीच्या हनुवटीचा बाग जेथे पडला तेच स्थान भद्रकाली शक्तीपीठ होय. या शक्तिपीठाची शक्ती आहे भ्रामरी तर भैरव आहे विकृताक्ष. विकृताक्ष भैरवाची मूर्ती असलेले स्थान सध्याच्या मंदिराच्या जागेपासून साधारणपणे ३५० मीटरवर आहे. त्यामुळे मूळ भद्रकाली मंदिरही या जागेवरच असावे असा कयास करावा लागतो.
नाशिकचे अधुनिक ग्रामदैवत कालिका मंदिर :-
कालिका देवीला अधुनिक ग्रामदैवत अशासाठी म्हंटले आहे की नाशिकचे पुरातन ग्रामदैवत माता भद्रकाली मंदिर आहे. आधीच्या काळात नाशिक हे शहर.वेदोक्त आणि धर्मशास्त्रावर आधारित मंत्रोच्चाराच्या संस्कारामधे वावरत होते..नाही म्हणायला नाशिककर हे आधीपासूनच अधुनिकतेची कास धरणारे आणि नवीन विचार रुजवून घेणारे सर्वसमावेशक शहर होतेच. या मुळेच अनेक क्रांतिकारक: साहित्य संस्कृतीचा मेळ इथे छान जुळला गेला..तो कायमचाच.पुर्वी हिला गावाबाहेरची देवी म्हणून संबोधले जायचे.नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्याच लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता.

मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.
स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.
पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. मंदिराच्या आवारातील उद्यानात कालिका मातेचे परमभक्त असलेले रामकृष्ण परमहंस व त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत.
नवरात्रोत्सव काळातील कालिकेची यात्रा एक अविभाज्य घटक आहे. पहाटेपासूनच पायी देवीला अनवाणी पायाने नित्यनेमाने जाणारे लोक हे यात्रेचे वैशिष्ट्य. या मंदिराच्या बाजुला एक बाग होती. या बागेत आवळीची अनेक झाडे होती.. तिथे घरून डबे आणून आवळीभोजने व्हायची.. ही प्रथा नेमकी कधी बंद झाली माहीत नाही पण बहुधा नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि नाशिकचे रुपडे बदलले .कालिकामातेचे मंदीर ट्रस्ट आणि लोकसंग्रहातून उभे राहिले.
मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर.
पिंपळपार . नेहरूचौक नाशिक.
या चौकात पुर्वी पाण्याची टाकी होती..अन त्या बाजुलाच एका टेकाडावर पडीक जागेत गोंधळी लोक रहायचे.. तिथे त्यांची टाकासारखी केशरी दगडातली देवी होती..स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक :-
ब्रिटिशांच्या दास्यातून भारतमातेची मुक्तता या अनिवार ध्यासातूनच सावरकरांना ’स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हा महन्मंगल मंत्र स्फुरला. या मंत्राच्या सिध्दीसाठी त्यांनी ’अभिनव भारत’ या क्रांति-संघटनेची संस्थापना केली. सावरकर लंडनला गेले, तेही त्यासाठीच. हि कथा आहे सावरकरांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मीची व अभिनव भारत संस्थेची.सावरकर कुटूंबीय आधी तिळभांडेश्वर गल्ली पलिकडच्या गल्लीतील पेठेवाड्यात राहात.नंतर ते गोरेवाड्याशेजारील दातारांच्या वाड्यात राहायला आले. सावरकरांच्या क्रांतिकारी उद्योगांचा संशय ब्रिटीश सरकारला आलाच होता त्यामुळे त्यांच्यावर गुप्त हेरांची नजर असेच. दातार वाड्याच्या बाहेरच्या पायरीवर एक म्हातारी तांदूळ निवडित बसलेली असे. वाड्याबाहेर हेरांच्या संशयित हालचाली दिसल्या कि ती सुनेला हाक मारून सांगत असे, "तांदूळ निवडून झाले ग!" हा इशारा मिळाला कि अभिनव भारताचे सदस्य मागच्या भागातून निसटू्न जायचे. हेराच्या हाती काहीच लागायचे नाही.
"रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले " या गाजलेल्या काव्याचे जनक आणि सावरकरांचे बालमित्र "स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद [दरेकर]" यांच्याबद्दल गोरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोरे यांच्याच वाड्यात वरच्या मजल्यावर कवी गोविंद यांना राहाण्यास एक खोली दिलेली होती. आत शिरल्यावर डाव्या बाजूस त्या खोलीत जायला एक लाकडी जिना आहे .
‘मित्रमेळा‘च्या सदस्यांची संख्या व शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. याचवेळी वयाच्या १८व्या वर्षी एप्रिल महिन्यात १९०१ मध्ये तात्यारावांचं लग्न जव्हारच्या रामचंद्र त्र्यंबक अर्थात भाऊराव चिपळूणकरांची मुलगी यमुनाशी झालं. लग्नानंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी वीर सावरकर पुण्यात दाखल झाले. मॅट्रिकची परीक्षा देऊन १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेही समविचारी तरुणांना संघटित केले. १९०४ मध्ये सावरकरांनी नाशिकमध्ये देशस्वातंत्र्याची शपथ घेतलेल्या ‘मित्रमेळ्या‘च्या २०० सदस्यांचा मेळावा भरवला. या मेळाव्यातच गुप्त क्रांतिकारक संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आले. इटलीचा जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. हळूहळू ‘अभिनव भारत‘च्या शाखांचे जाळे भारतभरच नव्हे, तर देशभर पसरले.
१९०४ मध्ये वीर सावरकर ‘एलएलबी’च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९०५ मध्ये त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली आणि अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर अवघ्या देशाने या कृतीचे कौतुक व समर्थन केले. यानंतर भारताला स्वातंत्र्य हवे आहे, हे आपल्यावर राज्य करणार्या ब्रिटिशांना कळावं, सार्या जगाला कळावं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. लंडनमध्ये येणार्या इतर देशांच्या क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं, शस्त्रे जमवायची होती, बॉम्ब तयार करायची कृती मिळवायची होती व पुढेही शस्त्रे व हे बॉम्ब बनवायची कला भारतातील आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणूनच ते लंडनला गेले.
दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन आला होता. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांनी जॅक्सनचा वध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व नियोजित कट करून अनंत कान्हेरे या १७ वर्षीय युवकाने जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. नाशिकच्या अनेक तरुणांना या काळात अटक करण्यात आली व अत्यंत जुलूम-जबरदस्ती करून त्यांना कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. अनंत कान्हेरेला दिलेले पिस्तुल हे लंडन येथून सावरकरांनीच पाठवले आहे, असा आरोप इंग्रजांनी केला व सावरकरांना अटक झाली.
तत्पूर्वी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता केवळ छापली म्हणून बाबाराव सावरकरांना ‘अभिनव भारत‘ मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथून नाशिकच्या सेंट्रल जेलपर्यंत अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हातापायात बेड्या, तोंडाला काळे फासून बाबाराव सावरकर यांची धींड काढण्यात आली होती. नाशिकमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून अनेक तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या सर्वांचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला होता. यानंतर सावरकरांना अटक झाली. पुढे अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ११ वर्षे अंदमानात शिक्षा भोगल्यानंतर पुढे सावरकर बंधूंची सुटका झाली व त्यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
दि. १० ते १२ मे, १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेचा सांगता समारंभ पुण्याच्या एसपी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १० मे, १९५३ या दिवशी वीर सावरकरांनी नाशिकला ‘अभिनव भारत मंदिरा‘ची स्थापना केली. या दरम्यान नाशिकच्या सावरकरप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जंगी मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, गुलालाच्या उधळणीत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ या घोषणांनी अवघे नाशिक दुमदूमून गेले. मिरवणूक ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत आली.
सावरकर व सर्व नाशिककर जनतेने येथे प्रवेश केला. नगरपालिकेच्यावतीने आयोजित समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर नाशिकच्या ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली होती. या देवीच्या चारही हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवीच्या या स्वरूपाचं पूजन, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक भारतीयाने करावं, असे सावरकर यावेळेस म्हणाले होते.
अभिनव भारत मंदिराच्या रुपात १८५७ ते १९४७ पर्यंतच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणुन अभिनव भारत मंदिर संस्था स्थापन करण्याची कल्पना सावरकरांनी १९४१मध्ये मांडली. त्यासाठी द्रव्यसहाय्य द्यावे म्हणून त्यांनी लोकांना आवाहन तर केलेच पण व्याख्यानांद्वारे त्यांनी त्यासाठी उल्लेखनीय अर्थसहाय्यदेखील केले. त्यांचे जुने सहकारी चक्रपाणी, तिवारी,महाबळ व वर्तक यांनी त्यासाठी ज्या वाड्यांमध्ये अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांचे गुप्त कार्य चाले आणि जेथे कवी गिविंद राहात तो तिळभांडेश्वर गल्लीतील धोंडभट विश्वामित्र यांचा वाडा विकत घेतला. शिवाय त्याशेजारचा गोरे यांचा वाडादेखील. हे गोरे देखील अभिनव भारतचे कार्यकर्ते. त्या वाड्यातच अभिनव भारत मंदिर उभे केलेले आहे (१०मे १९५३).
त्याचप्रमाणे याच वास्तूमध्ये १८५७च्या समरात ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं अशा क्रांतिकारकांच्या आत्म्यांना शांती मिळावी व त्यांचे स्मरण कायम नवीन पिढीला व्हावे, या हेतूने सावरकरांनी एका तुळशी वृंदावनाची स्थापना केली. सावरकरांनी दि. ११ मे, १९५३ ला आपल्या जन्मगाव भगूर येथे आपल्या अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मघराचे दर्शन घेतलं आणि तिथे भव्य व विराट अशी सभा झाली. यानंतर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणे नाशिक व भगूर येथे कधी झाले नाही.
समोर अंगण व त्यामागची छोटीशी दुमजली वास्तु या मंदिराचा भाग आहे. अंगणाच्या उजव्या बाजूस एका कोनाड्यात एक लहान पण अतिशय सुबक अशी शंखचक्रगदाखड्गधारी स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती आहे.तळमजल्यावरील एका खोलीवर हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष असे नाम फलक आहेत. वरच्या मजल्यावर "बाबाराव (गणेश) सावरकर सभागृह" आहे.
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा कान्हेरे यांनी वध केला. त्या योजनेतील सहभागाबद्दल कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना फाशी दिली गेली. त्या शिवाय गणेश व विनायक सावरकरांना अंदमानात जन्मठेप आणि सर्वात धाकटा भाऊ नारायण सावरकर यास सक्तमजुरी अशा शिक्षा दिल्या गेल्या. त्याशिवाय अनेकांना लहानमोठ्या शिक्षा दिल्या गेल्या. या वास्तू आणि सभोवतालचा परिसर , "नाशिक कॉन्स्पिरसी"मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या सर्व त्यागमूर्ती देशभक्तांच्या वावरण्यामुळे पवित्र झालेला!
खंडोबा मंदीर

खंडोबाची टेकडी चा इतिहास हा खुप पुरातनकाली असा आसुन, हे मंदिर भगवान शंकराला अर्पण आहे आशी देखील एक आख्यायिका सांगण्यात येते. अख्यायिका नुसार हे मंदिर ५०० वर्षे जुने आसुन, भगवान शंकराने खंडोबाच्या रुपाने या ठिकाणी अवतार घेतला होता.मल्लदैत्य आणि मनिदैत्य या दोन भावांनी भगवान शिव ची आराधना करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून वरदान घेतले कि धरती वर कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही.असे वरदान प्राप्त होताच या दैत्य भावांनी धरती वरती साधुसंत व मणुष्य जातीवर अत्याचार करणे, कष्ट देणे,सुरू केले. हि गोष्ट जेव्हा भगवान शंकराला कळाली तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन स्वंय खंडोबाचा अवतार घेतला व या दैत्याचा नाश केला. व या टेकडीवर विश्राम केला. तेव्हा पासून या टेकडीला खंडोबाची टेकडी किंवा विश्राम टेकडी देखील म्हणतात.
देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.
मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...
..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.
गाभार्यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.
अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...
खंडोबाची टेकडी हे नाशिक शहरातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. नाशिक शहराच्या जवळ देवळाली, या भारतीय सैन्याची छावनी परिसरात एका छोट्याशा टेकडी वरती वसलेले आहे.
बालाजी मंदीर

जुन्या नाशिक शहरात गोदावरी नदी काठी जुने बालाजी मंदीर तर गंगापुर रोड जवळ सोमेश्वर मंदीरा जवळ नवीन बालाजी मंदीर आहे.श्री बालाजींच्या कृपेने प्रतिकुल ग्रहदशेत सरंक्षण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
नाशिकमधील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पुरातन मंदिर :-
दुतोंड्या मारुती :-
गोदाकाठावरील ऐतिहासिक कपूरथळा छत्री :-
नारोशंकर मंदिर

विठ्ठल मंदीर, नाशिक :-
श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, जुने नाशिक
जुने नाशिक परिसरातील संत नामदेव पथवर असलेल्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिराचा
इतिहास पाहता किमान १५० वर्षे मागे जावे लागेल. १९व्या शतकाच्या शेवटच्या
कालखंडात या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराची
देखभाल नामदेव शिंपी समाजाकडे होती.
श्री कार्तिकस्वामीं मंदिर, पंचवटी, नाशिक :-

तांबट आणि नाशिक :-
वाकडीबारव :-
नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय :-
नाशिकचा रंजक इतिहास
• मुंबई आग्रारोड भारत आणि रोम यांच्यातील व्यापार मार्ग,
• राघोबादादांच्या काळात नाशिकमध्ये मराठा चित्रशैली अस्तित्वात आली.
• इंग्रजांनी तत्कालीन महाराष्ट्र जिंकला परंतु नाशिक जिंकण्यास एक महिना विलंब झाला.
• वरी, पिवळा , वासुदेव, सहदेव –भाडळी या नाशिकच्या परंपरा आहे.
• ज्योतिष्यशास्त्राची देखील नाशिककरांना समृध्द परंपरा आहे
• तेलीगल्ली, पगडबंद लन ही बलुतदर पध्दतीमुळे पडलेली नावे.
• गोवर्धनगाव होते धागा निर्मितीचे ठिकाण.
• अंजेनेरीगाव होते एका राजधानीचे ठिकाण .
संग्रहालयाची वैशिष्ट्ये
ऐतिहासिक माहिती जाणून घेणा-या इतिहास प्रेमींना या संग्राहालयाचा मोठया प्रमाणात फायदा होवून इतिहास प्रेमींना ही उत्तम मेजवानी आहे. तेव्हा इतिहास प्रेमींना नागरीकांनी आवश्यक या संग्रहालयास भेट दयावीच .
नाशिकचे वाडे :-
नाशिकचा पाटीलवाडा :-
नाशिकची रहाड :-


नाशिक आणि चलन :-

नवश्या गणपती, नाशिक

६ जानेवारी २०१३
नवश्या गणपती, नाशिक
जवळच्या नातेवाइकाच्या लग्नाच्या निमित्ताने मला नाशिकला जायचा योग आला,
सोबत बायको होती,म्हटले चला जाऊया गणपतीच्या दर्शनाला. माझा मित्र निलेश
त्याची पत्नी प्रियांका आणि आम्ही दोघे असे कार्यक्रम आटपून दर्शनाला
निघालो.
इंदिरा नगर नंतर अंबड सोडून पुढे नाशिक MIDC आतल्या रस्त्याने
आम्ही नवश्या गणपतीच्या दर्शनाला आलो. रात्री पारा बराच खाली उतरला होता
जवळ जवळ १० degree होता आणि रात्रीचे ९ वाजले होते.
मंदिराजवळ खूप
शांतता होती बाहेरच गाडी उभी करून आम्ही दर्शनाला निघालो. नवश्या गणपतीचे
नाव खूप ऐकले होते पण जाण्याचा योग काही येत नव्हता तो आज आला तो पण
जोडीने.
मंदिरा बद्दल जी माहिती मिळाली ती अशी.. आणि थोडी फार माहिती इंटरनेट वरून मिळाली.
पेशवे
कालीन ऐतीहासिक नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत असे
देवस्थान आहे. नवश्या गणपती हा नवसाला पावतो असा अनुभव हजारो भाविकांना
आलेला आहे. ह्या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे.
इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे गाव आजोळ होते व त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई ह्या देखिल नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या.
राघोबा दादा व आनंदीबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झला व त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. ह्या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडस गावाचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. ह्याच दरम्यान नवश्या गणपतीच्या मंदिराची उभारणी सुरु झाली. गोदावरीच्या तीरी पुर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशाची मुर्ती आहे.
मुर्तीचे डोळे अतीशय सजीव असून मुर्ती आकर्षक आहे. ह्या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फूल आहे व चौथा हात आशीर्वाद दर्शविणारा आहे. प्रत्येक हातात कडे आहे. मूळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे.
राघोबा दादांनी आनंदवल्ली येथे राजवाडाही बांधला होता, राजवाड्यात
पश्विमेस उभे राहिल्यावर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. १८१८ साली
इंग्रजांनी पेशवाई बुडवली व राजवाडा जाळून टाकला. मात्र परीसरातील मंदिरे
शाबूत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या करकिर्दीची साक्ष
देत आजही दिमाखाने उभे आहे.
मंदिराचा पत्ता: श्री नवश्या गणपती मंदीर, गंगापूर रोड, आनंदवल्ली, नाशिक
असे म्हणतात कि आपला नवस बाप्पाच्या कृपेने पूर्ण झाल्यास मंदिरात घण्टा बांधतात. अश्या अनेक घंटा मंदिरात आपल्याला दिसतात. मंदिराचे काढलेले काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहे.
![]() |
| नवश्या गणपती |
प्रत्येकाने नक्की भेट द्या मंदिराला. बाप्पाच्या कृपेने माझ्या सर्व
वाचकांनासुद्धा मंदिरात घंटा बांधण्याचा योग यावा अशी नम्र प्रार्थना करून
आपला निरोप घेतो.
धन्यवाद…
निशांत पोतदार
नाशिक शहरातील काझी गढी धोकादायक अवस्थेत, मनपाचा कानाडोळा, मोठ्या दुर्घटनेची भीती
नाशिक: महाराष्ट्रात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. राज्यात दरडीच्या घटना घडत असतानाच नाशिक शहरातील प्राचीन काझी गढी देखील धोकादायक झालीये. मात्र, याकडे अद्यापही मनपा प्रशासनाचा काना डोळा दिसून येतोय. दरवर्षी प्रमाणे येथील नागरिकांना स्थलांतरांच्या नोटीसा देण्यापलीकडे मनपा प्रशासन काहीच ठोस उपाययोजना करीत नसल्याने याठिकाणी देखील मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जातीय.
मनपा दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का?
मनपा प्रशासन अशीच दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय.काझी गढी परिसरातील रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहे. या नागरिकांना राजकारणी आणि मनपा प्रशासनाकडून आश्वासनांव्यतिरिक्त कुठलीच ठोस उपाययोजना करून दिली जात नसल्याने येथील रहिवाशी दहशतीखाली आले आहेत.
दरवर्षी गोदावरी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी या काझी गढीची अर्धी भींत आपल्या कवेत घेत असते. त्यामुळे येथील मातीचा मोठा भराव वाहून गेल्याने गढीवरील अनेक घरे अधांतरी असलेली दिसत आहे. मात्र,पावसाच्या पाण्याने मातीचा भराव कधी कोसळेल याचा कुठलाच भरवसा नाहीये. त्यासाठी मनपा प्रशासनाने या नागरिकांचे वेळीच स्थलांतर करणे गरजेचे झाले असून वेळीच योग्य पाऊले उचलली गेली नाहीतर मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार यात शंका नाही, नाशिक मनपा गटनेते शाह खैरे म्हणाले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला- भगूर] हा ११ डिसेंबर २०१२ ला मायबोलीवर प्रकाशित केला होता. त्याची लिंक :-
http://www.maayboli.com/node/39583
आता देतो आहे त्याचा उरलेला दुसरा भाग.
भगूरहून जायचे होते नाशिकला! "अभिनव भारत मंदिरा"च्या दर्शनाला!
या मंदिराविषयीच्या माहितीचा मला मिळालेला एकमेव स्त्रोत होता :-
स्वातंत्र्यवीर
सावरकर दर्शन प्रतिष्ठान प्रकाशित विशेषांक
लेख- नासिकचे अभिनव भारत मंदिर-
लेखक : परिचित
मे १९०४ मध्ये अभिनव भारत ही सावरकरनिर्मित स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याच्या उद्देशाने उभी केलेली गुप्त क्रांतिकारी संघटना कि जी त्यांनी स्वतःच स्वातंत्र्य प्राप्तिनंतर १० मे १९५२ ला विसर्जित केली. स्वातंत्र्यलढ्यातील तिचे ऐतिहासिक कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज जर या नावाने एकादी संघटना असेल तर तिचा सावरकरांच्या मूळच्या संघटनेशी कोणताही संबंध नाही.
अभिनव भारत मंदिराच्या रुपात १८५७ ते १९४७ पर्यंतच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणुन अभिनव भारत मंदिर संस्था स्थापन करण्याची कल्पना सावरकरांनी १९४१मध्ये मांडली. त्यासाठी द्रव्यसहाय्य द्यावे म्हणून त्यांनी लोकांना आवाहन तर केलेच पण व्याख्यानांद्वारे त्यांनी त्यासाठी उल्लेखनीय अर्थसहाय्यदेखील केले. त्यांचे जुने सहकारी चक्रपाणी, तिवारी,महाबळ व वर्तक यांनी त्यासाठी ज्या वाड्यांमध्ये अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांचे गुप्त कार्य चाले आणि जेथे कवी गिविंद राहात तो तिळभांडेश्वर गल्लीतील धोंडभट विश्वामित्र यांचा वाडा विकत घेतला. शिवाय त्याशेजारचा गोरे यांचा वाडादेखील. हे गोरे देखील अभिनव भारतचे कार्यकर्ते. त्या वाड्यातच अभिनव भारत मंदिर उभे केलेले आहे (१०मे १९५३).
भगूरला सावरकरांच्या जन्मस्थानाचे ६ डिसेंबरला दर्शन घेऊन आम्ही नाशिकला विवाहसमारंभात सामील झालो. ७ डिसेंबर १२ ला अक्षता टाकल्या; नि कार्यालयाबाहेरील एका वयस्क रिक्षावाल्याला तिळभांडेश्वर गल्लीतील अभिनव भारत मंदिर माहीत आहे काय? असे विचारले.
तिळभांडेश्वर गल्लीत नेतो. तेथे कोठेतरी नाव वाचल्यासारखे वाटते असे तो म्हणाला. त्याला म्हटले चल तेथे जाऊन शोधू. परत कार्यालयात आणून सोडण्याच्या बोलीवर रिक्षा ठरवून निघालो. जुन्या नाशिक भागातील अतिशय अरुंद गल्ल्यांमधील फूल मार्केट मधून सराफाबाजारातून त्याने रिक्षा शेवटी एका अतिशय अरूंद गल्लीतून जराशा रुंद गल्लीत आणून उभी केली आणि म्हणाला, "ही आहे तिळभांडेश्वर गल्ली. विचारा इथे!"
बाजुने एक तरूण जात होता त्याला विचारले. तो म्हणाला, "ही काय समोरच पाटी दिसतेय!"
त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले. तेथूनच निघणाऱ्या दुसऱ्या अगदी अरुंद गल्लीच्या डेड एन्डला ठळक अक्षरे दिसली : अभिनव भारत मंदीर.
मंदिराशी कसलेही साम्य नसलेली वास्तू! पोचलो तर शेवटी इथे! असे वाटण्याचे कारण म्हणजे माझ्या आसपास राहाणारे कांही जण अनेकदा नाशीकला जातात आणि तेथे कित्येक दिवस नातेवाईकांकडे राहातात देखील. त्यांच्याकडून या अभिनव भारत मंदिराला जाण्याच्या मार्गाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न सफल झाला नाही. त्यांना नाशिक मध्ये अशी माहिती असणारा कोणी भेटला नाही म्हणे. मायबोलीवर नाशिक नामक गप्पाटप्पांचा धागा आहे. त्यावरही मी आवाहन करून पाहिले होते. पण कोणाही नाशिककराचा प्रतिसाद आला नाही. त्यामुळे समोरच्या घरावरील ती अक्षरे पाहून एका बाजूला सुखावलो पण त्याच वेळी त्या गल्लीची नि प्रवेशद्वाराची अवस्था पाहून मन खिन्नही झाले.
माझ्या कल्पनेतील मंदिर आणि प्रत्यक्ष वास्तू यामध्ये कमालीचे अंतर होते. असे असले तरी त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्व आणि पावित्र्य तिळमात्रही कमी होत नाही. आपली अनास्था मात्र अधोरेखित होते हेच खरे.
हा आहे गोरे यांचा वाडा. १६१६, तिळभांडेश्वर गल्ली, सराफ बाजाराजवळ, नाशिक - ४२२००१. या वाड्यात अभिनव भारत मंदीर हे स्मारक स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांच्या प्रेरणेने निर्माण झाले. त्याला कारणही तसेच आहे. अभिनव भारत संघटनेचे सदस्य या गोरे वाड्यात नि शेजारच्या धॊंडभट विश्वामित्र यांचे वाड्यात जमून सर्व योजना गुप्तपणे आखायचे आणि पार पाडण्य़ासाठीची तयारी येथुनच करायचे! त्या सर्व घटनांची साक्षीदार अशी ही वास्तू!
समोर अंगण व त्यामागची छोटीशी दुमजली वास्तु या मंदिराचा भाग आहे. अंगणाच्या उजव्या बाजूस एका कोनाड्यात एक लहान पण अतिशय सुबक अशी शंखचक्रगदाखड्गधारी स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती आहे.
तळमजल्यावरील एका खोलीवर हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष असे नाम फलक आहेत. वरच्या मजल्यावर "बाबाराव (गणेश) सावरकर सभागृह" आहे.
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा कान्हेरे यांनी वध केला. त्या योजनेतील सहभागाबद्दल कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना फाशी दिली गेली. त्या शिवाय गणेश व विनायक सावरकरांना अंदमानात जन्मठेप आणि सर्वात धाकटा भाऊ नारायण सावरकर यास सक्तमजुरी अशा शिक्षा दिल्या गेल्या. त्याशिवाय अनेकांना लहानमोठ्या शिक्षा दिल्या गेल्या. या वास्तू आणि सभोवतालचा परिसर , "नाशिक कॉन्स्पिरसी"मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या सर्व त्यागमूर्ती देशभक्तांच्या वावरण्यामुळे पवित्र झालेला! त्याचे दर्शन समाधान देऊन गेले.
सध्या वाड्याच्या डाव्या भागात श्री संजय माधव गोरे राहातात. आम्ही पोचलो तेव्हा श्री गोरे बाहेर जाण्याच्या गडबडीत होते. मी आमचे येण्याचे कारण सांगितल्यावर ते थांबले आणि त्यांनी वेळात वेळ काढून कांही अधिक माहिती दिली, ती येथे देत आहे. माहिती देणारा दुसरा कोणि उपलब्ध नसल्याने आणि मला उपलब्ध वेळ थोडा असल्याने आणखी माहिती मिळ्वता आली नाही.
" सावरकर कुटूंबीय आधी तिळभांडेश्वर गल्ली पलिकडच्या गल्लीतील पेठेवाड्यात राहात. तेथील वास्तव्यात सावरकरांनी घरातील अष्टभुजा देवीसमोर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांची ती सुप्रसिद्ध " देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मी सशस्त्र झुंजेन" ही शपथ घेतली. नंतर ते गोरेवाड्याशेजारील दातारांच्या वाड्यात राहायला आले. सावरकरांच्या क्रांतिकारी उद्योगांचा संशय ब्रिटीश सरकारला आलाच होता त्यामुळे त्यांच्यावर गुप्त हेरांची नजर असेच. दातार वाड्याच्या बाहेरच्या पायरीवर एक म्हातारी तांदूळ निवडित बसलेली असे. वाड्याबाहेर हेरांच्या संशयित हालचाली दिसल्या कि ती सुनेला हाक मारून सांगत असे, "तांदूळ निवडून झाले ग!" हा इशारा मिळाला कि अभिनव भारताचे सदस्य मागच्या भागातून निसटू्न जायचे. हेराच्या हाती काहीच लागायचे नाही.
"रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले " या गाजलेल्या काव्याचे जनक आणि सावरकरांचे बालमित्र "स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद [दरेकर]" यांच्याबद्दल गोरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोरे यांच्याच वाड्यात वरच्या मजल्यावर कवी गोविंद यांना राहाण्यास एक खोली दिलेली होती. आत शिरल्यावर डाव्या बाजूस त्या खोलीत जायला एक लाकडी जिना आहे . ती खोली गोरे यांनी दाखवली.
या मंदिरात जतन केलेल्या सर्व वस्तू, ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके, फोटो इ. सर्व, डागडुजी / रंगरंगोटी साठी तात्पुरती इतरत्र हालवली होती त्यामुळे आम्हाला पाहता आली नाहीत. त्यासाठी पुन्हा कधितरी नीट सवड काढून जायचे आहे. पण जी वास्तू आणि परिसर भारतमातेच्या या सुपुत्रांनी स्वकर्तृत्वाने आणि त्यागाने गाजवला त्याचे दर्शन लाभले हेही समाधान मोठेच होते.
आम्हाला ही गल्ली आणि अभिनव भारत मंदिर तेथेच आसपास असल्याचे माहित असणारा रिक्षावाला भेटला याचे गोरे यांना आश्चर्य वाटले. "तुम्ही फार सुदैवी आहात " असे म्हणून त्यांनी ते व्यक्त केले. या मंदिराच्या व्यवस्थेसाठी एक संस्था आहे असे कळले. पण जनतेची अनास्था, कार्यकर्त्यांचा आणि पैशांचा अभाव यामुळे या मंदिराची एकंदर परिस्थिती पाहून फार वाईट वाटले. तरीही आहे त्या परिस्थितीत कांहीजण जमेल तितकी चांगली व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत हेही आशादायक!
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाशिक च असलेलं भौगोलिक स्थान. नाशिक च हवामान हे नेहमीच थंड राहील आहे. यात खूप जास्त अचानक फरक पडत नाही. इंग्रजांचा मुख्यत्वे व्यापार हा कोलकता मुंबई मद्रास येथून चालत असे परंतु हे तिन्ही ठिकाणी दमट व अस्थिर हवामानाची होती. पाऊस आणि वादळे यांचा धोका सतत असे.
कोलकत्या येथून राजधानी दिल्ली ला आली तोपर्यंत वापरत असलेले चलन हे इंग्लड वरून च येत असे. 1925 च्या दरम्यान भारतात औद्योगिकरण वाढलेले होते त्यामुळे चलन तुटवडा भासू लागला होता. म्हणून मग भारतात छापखाना सुरु करण्या साठी हालचाली सुरु केल्या.
मग 1928 ला पहिला छापखाना आला नाशिक मध्येच. राजधानी दिल्ली ला असल्या मुळे आता मुंबई दिल्ली मार्ग नाशिक वरून जात होता. त्यात आधीच इंग्रजांनी नाशिक मध्ये सैन्य छावणी म्हणजेच देवळाली कॅम उभा केला होता. सोबत हवामान देखील छापखान्यासाठी उपयुक्त असे होते.
नाशिकरोड रेल्वे स्थानक मुळे भारतात पोहचणे सोपे होते तर कधी आणीबाणी ची परिस्थिती झालीच तर सैन्य आधीच मदतीला असणार होते. सुरवातीला फक्त पोस्टाची तिकिटे बॉण्ड्स मग नंतर नोटा सुरु झाल्या.
आज ही मुख्यत्वे बॉण्ड अँड securities च छापल्या जातात. नोटा मागणी नुसार 10 ते 500 पर्यंत छापतात.
नाशिक च महत्व लष्करीदृष्ट्या आणि औदयोगिक दृष्ट्या खूप जास्त आहे.
लष्करी छावणी,प्रिंटिंग प्रेस , HAL मिग विमानाचा कारखाना बोरगड येथे असलेले लष्कराचे रडार स्टेशन. तर अनेकांना माहित नसलेले DRDO चे गेस्ट हाऊस म्हणजेच एक डोंगराच्या आत दडलेली छुपी प्रयोगशाळा.
चलनी नोट छापण्याचा कारखाना १९२८ साली इंग्रजी राजवटीत नाशिकमध्ये सुरू झाला. जस - जशी नाणे आणि चलणी नोटांचा इतिहास आपण पहात जाऊ, तसं - तसे याच्या रहसमय कारणांची उकल आपल्या होत जाईल.
इतिहास पाहिला तर पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते.
चित्रस्रोत : गुगल
बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.
१७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे.
१७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच परिचयाचे असल्याने रयतेच्या सोईसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यावर 'गुलशनाबाद उर्फ ना' असा उल्लेख सापडतो. हे ना म्हणजे नाशिक.
चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो. १६६५च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता. पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ चांदवड शहरात आली. त्या वर्षी दहा तासात या टांकसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची.
सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली.
चित्रस्रोत : गुगल
१८३० साली मुंबईत जॉन हॉकिन्स नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधली आणि जेम्स फारीश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली. तोपर्यंत टांकसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बडवूनच नाणी केली जायची. पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती.
सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या. पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४०नंतर व्हीकटोरीया राणीचे चित्र असे.
१८३० साली इंग्लंड मध्ये जी क्रांती झाली, तिचे प्रयोगिकरन मुंबईत झाले. मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर, मुंबईच्या नव्या टांकसाळीत जेम्स साहेबाने तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली. आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची. आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांकसाळीत पडू लागली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपया बरोबर इंग्रज साहेबाने त्यांना इंग्लंडात लागणारी त्यांची नाणीपण इथे लाखांच्या संख्येने इथे छापुन तिकडे नेली. पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली.
चित्रस्रोत : गुगल
इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या. पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती. पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या.
रंगून, कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपुर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती. नाशिक एकतर मुंबईच्या जवळ. हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान. साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली रेल्वे हे ही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले. शेजारीच देवळाली होते. पूर्वीपासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे. त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती.
एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची. विसाव्या शतका पर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती. अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि १९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला.
उद्योगांच्या बदलेल्या व्याख्ये नुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्या मध्ये एका छताखाली हजारो लोकांना इथे नोकरी मिळाली. आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे. नोटांबरोबर स्टॅम्पपेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई इथे आज होते. नोटप्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारण पणे पाच हजार लोक इथे आज काम करतात.
स्रोत :-
पैसे छापण्याची सुरुवात नाशिकलाच का झाली ? इंग्रजांना का घातली होती नाशिकने भुरळ…..?
हे चित्र गुगल इमेजेस वरून घेतले आहे….
प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.
लक्ष्मणाने
रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका
म्हणजे नाक, तेथेच तलवारीने छाटून टाकले. म्हणून त्या स्थानाला ‘नासिक’ म्हणू लागले, अशी एक उपपत्ती आहे. दुसरी उपपत्ती अशी आहे, की ते गाव गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर वसले, म्हणून ते ‘नवशिख’. पुढे, त्याचा अपभ्रंश ‘नाशिक’
असा झाला. त्या नऊ टेकड्या नासिक शहरात पाहण्यास मिळतात - 1. जुनी गढी, 2.
नवी गढी, 3. जोगवाडा टेक, 4. पठाणपुरा टेक, 5. म्हसरूळ टेक, 6. डिंगरआळी
टेक, 7. सोनार अळी टेक, 8. गणपती डोंगर, 9. चित्रघंटा टेक.
कृतेत पद्मनगरं त्रेतयांतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंपंचदीपा इमे भुवि |
हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील ‘नासिक’च्या नावाची माहिती त्यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्या पूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.
‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनां’ची सत्ता उदयास आली. त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहीत होते. नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा इसवी सनपूर्व पाचव्या-चौथ्या शतकात निर्माण झालेल्या वाङ्मयातून आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिक’चा उल्लेख हा ‘नासिक्य’ असाच केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तिकांत’ या ग्रंथात इसवी सनपूर्व 250 मध्ये ‘नासिक्य’ हाच उल्लेख येतो.
नासिक आणि बौद्ध धर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष(सुंदर तरुण देवता) असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच कालखंडामध्ये ‘नासिक’ येथे संपूर्ण नासिकमध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ कोरली गेली. तिला लोक ‘पांडव लेणी’ संबोधतात. प्रसिद्ध खगोलतत्त्ववेत्ता टॉलेमी याने इसवी सन 150 मध्ये ‘नासिक’ शहराची नोंद ही ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे.
‘नासिक’ 1347 पर्यंत यादवांच्या अधिपत्याखाली होते. ‘बहामनी’ सत्तेने तेथे 1490 सालापर्यंत वर्चस्व राखले. गावाचा उल्लेख तेव्हादेखील ‘नासिक’ असाच सापडतो. बहामनी सत्तेची शकले 1490 सालानंतर उडाली त्यानंतर ‘नासिक’ हे शहर अहमदनगरचे निजामशहा याच्या ताब्यात1636 पर्यंत होते.
समर्थ रामदास पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये (1644) नासिकचा उल्लेख हा ‘जनस्थान’ असा करतात. तो श्लोक पुढीलप्रमाणे:-
जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी || येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||
दक्षिणेची काशी असलेल्या ‘नासिक’ शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने ‘गुलशनाबाद’ असे केले. ‘नासिक’ हाच मूळ उल्लेख तेथे मराठ्यांच्या राज्यात 1760 ते 1818 पर्यंत मिळतो. इंग्रजांचा अंमल ‘नासिक’ शहरावर 1818 नंतर सुरू झाला तेव्हा देखील ‘नासिक’ हाच उल्लेख मिळतो. इंग्रजांनी ‘नासिक’ शहराला 1870 साली जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅझेटीयर काढले त्याचे नावदेखील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रिक्ट गॅझेटीयर’ असे आहे. लेखक श्री अनुराग वैद्य यांनी लिहिलेला हा विस्तृत लेख संदर्भित केलेला आहे.
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच परिचयाचे असल्याने रयतेच्या सोईसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यावर 'गुलशनाबाद उर्फ ना' असा उल्लेख सापडतो. हे ना म्हणजे नाशिक, चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो. १६६५च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता. पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ चांदवड शहरात आली. त्या वर्षी दहा तासात या टांकसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची. सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली. सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या._
_पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४० नंतर व्हीकटोरीया राणीचे चित्र १८३० साली मुंबईत जॉन हॉकिन्स नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधली आणि जेम्स फारीश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली. तोपर्यंत टांकसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बडवूनच नाणी केली जायची. पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती ती मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर, मुंबईच्या नव्या टांकसाळीत जेम्स साहेबाने तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली. आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची. आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांकसाळीत पडू लागली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपया बरोबर इंग्रज साहेबाने त्यांना इंग्लंडात लागणारी त्यांची नाणीपण इथे लाखांच्या संख्येने इथे छापुन तिकडे नेली. पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या, पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती. पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या. आणि रंगून, कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपुर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती. नाशिक एकतर मुंबईच्या जवळ._
_हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान. साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली रेल्वे हे ही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले. शेजारीच देवळाली होते. पूर्वीपासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे. त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती. एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची. विसाव्या शतकापर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती आणि नाही. अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि १९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला. उद्योगांच्या बदलेल्या व्याख्ये नुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्या मध्ये एका छताखाली हजारो लोकांना इथे नोकरी मिळाली आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे. नोटांबरोबर स्टॅम्पपेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई इथे आज होते. नोटप्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारण पणे पाच हजार लोक इथे आज काम करतात._
पैसा कुठे आणि कसा छापला जातो?
पैसा कुठे आणि कसा छापला जातो?
पडघम -
अर्थकारण
प्रकाश बुरटे
- नाशिकमधील करन्सी नोट प्रेसचं संग्रहित छायाचित्र
- Mon , 19 December 2016
- नोटाछपाई Currency Note Press अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee नरेंद्र मोदी Narendra Modi निश्चलनीकरण Demonetisation
भारतीय अर्थखातं आणि रिझर्व्ह बँक यांचा अखत्यारित असणारे चार शासकीय छपाई कारखाने, नाणी पाडणाऱ्या चार टांकसाळी आणि नोटाछपाईचा कागद पुरवणारा होशंगाबाद इथला एक कारखाना एकत्र करून २००६ या वर्षी ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिन्टिंग कॉर्पोरेशन इंडिया लि.’ ही कंपनी (SPMCIL) गठीत झाली. नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेस (CNP) उभारून नोटाछपाईला १९२८ साली सुरुवात झाली. त्यानंतर मध्यप्रदेशातल्या देवास इथे बँक नोट प्रेस (BNP) उभारली गेली. ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लि.’ ही प्रेस कर्नाटकातल्या मैसुरू इथं उभारली गेली. तिथंच सध्या रु. २०००च्या नोटांची छपाई चालू आहे. या तीन ठिकाणी भारतीय नोटांची छपाई होते. ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक’ आणि ‘सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैद्राबाद’ इथे स्टॅम्प पेपर, पोस्टाची तिकिटं यांसारख्या शासकीय दस्तावेजांची छपाई करणारी युनिट्स आहेत.
स्वतःच्या नोटा स्वतः छापण्यासाठी एवढी व्यवस्था जर भारतासाठी अपुरी असेल, तर बाहेरून नोटा छापून घेणं भाग आहे. विदेशी यंत्रणेवर आपलं नियंत्रण कमी असतं. परिणामी, त्या यंत्रणेनं सांगितल्यापेक्षा जास्त नोटा छापून वेगवेगळ्या मार्गांनी त्या चलनात आणल्या किंवा नोटाछपाईतली सुरक्षा-व्यवस्था शत्रूदेशाला पुरवली किंवा खोट्या नोटा छापायला आडमार्गाने मदत केली किंवा नोटा-छपाईत प्रचंड दिरंगाई करून अर्थव्यवस्था संकटात ढकलली तर देश मोठ्याच संकटात सापडू शकतो. किमान त्याची किंमत शासनाची पारदर्शकता कमी करून मोजावी लागते. म्हणूनच स्वतःचं चलन स्वतः छापावं, असं भारतासह प्रत्येक देशाला वाटतं, परंतु वास्तव या इच्छेशी अनेकदा सुसंगत नसतं. त्याचा पुरावा देण्यासाठी वर्तमानपत्रांमधल्या मोजक्या लेखांची बोलकी शीर्षकंदेखील पुरेशी आहेत:
१. करन्सी प्रिंटिंग प्रेसेस रनिंग अॅट फुल कपॅसिटी - आर.बी.आय.
२. युवर न्यू करन्सी इज नॉट १०० परसेंट ‘मेड इन इंडिया’
३. प्रिंटिंग करन्सी नोट्स अब्रॉड इन १९९६-९८ फ्लेयेड.
४. ऑउटसोर्सिंग करन्सी प्रिंटिंग : कंट्रीज आर कोर्टिंग रिस्क
५. नोटाबंदीवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारताना विचारलं आहे, ‘हा निर्णय भावनेच्या भरात झाला आहे काय?’
मोदींच्या ८ नोव्हेंबरच्या घोषणेनं रुपये ५०० आणि रुपये १०००च्या नोटांच्या रूपातलं ८६ टक्के चलन एका फटक्यात बाद ठरलं. या गोष्टीला नुकताच एक महिना उलटला आहे. अजूनही नोटाछपाई कारखान्यांमधली छपाईयंत्रं तिन्ही पाळ्यांमध्ये अविश्रांत चालू आहेत. तरीही नोटांची चणचण कायम आहे. ‘असतील नोटा, तर मिळेल पैसा’ या ‘ATM तत्त्वावर’ सध्या चलनानं चालायचं थांबवलंय. त्यामुळे काहीही करून नोटांचा पुरवठा पूर्ववत करण्याची सरकारला एकच घाई झाली आहे. सरकार नोटांसाठी विदेशी कागद आयात करतं आहे आणि विदेशी कंपन्यांकडून काही प्रमाणात नोटादेखील छापून घेतं आहे. त्यात धोका असल्याचं माहीत असलं आणि तसे इशारे पूर्वी भारतीय माध्यमांमधून प्रसिद्ध झाले असले, तरीही सरकारच्या सध्याच्या नियोजन दुष्काळामुळे अशी मदत घेणं भाग पडतं आहे.
नोटाछपाई करणाऱ्या कंपनीसाठी भारताला स्वतःची पारदर्शकता कशी कमी करावी लागली, त्याचं एक उदाहरण अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत घडलं होतं. तेव्हा जसवंत सिंह परराष्ट्रमंत्री होते. त्या वेळी भारतीय हद्दीतून एका विमानाचं अपहरण झाल्याचं आणि नंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी जसवंत सिंहांनी तीन दहशतवादी तरुणांना जातीनं तालिबानी नेत्यांकडे सुखरूप सुपूर्द केल्याचं आपल्यापैकी काही जणांना नक्की आठवत असेल.

या विमानाच्या प्रवाशांमध्ये एक अति अति महत्त्वाची, अनेक देशांच्या प्रमुखांपेक्षादेखील जास्त महत्त्वाची व्यक्ती होती. ती म्हणजे जगातल्या सर्वांत जुन्या आणि सर्वांत महत्त्वाच्या दि ला रुये गियोरी (De la Rue Giyori) या नोटाछपाई कंपनीचा मालक रोबर्टो गियोरी (Roberto Giori). ते स्वित्झर्लंड आणि इटली या दोन्ही देशांचे नागरिक आहेत. त्यांची कंपनी जगातल्या सुमारे १५० देशांच्या नोटा छापते. त्या वेळी प्रवाशांमध्ये गियोरी असल्याची चर्चा तेव्हापासून आजतागायत भारतीय माध्यमांमधून झाली नाही; पण दिल्लीस्थित ‘टाईम’ या साप्ताहिकाच्या वार्ताहरानं जानेवारीमध्ये ती बातमी दिली होती. त्याचप्रमाणे ‘द हिंदू’च्या पॅरिसस्थित वार्ताहरानं ही बातमी प्रसिद्ध केली होती. स्वित्झर्लंडनं गियोरी यांच्या सुरक्षित सुटकेचा प्रयत्न करणं अपेक्षितच होतं. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्वित्झर्लंडनं हॅन्स स्टॅलडर (Hans Stalder) यांना कंदाहारला पाठवलं असल्याचं आणि गियोरी यांच्या झटपट सुटकेसाठी भारतावर दबाव टाकला असल्याचंही वर उल्लेख केलेल्या द हिंदूमधल्या बातमीनं स्विस आणि काही इतर युरोपीय देशांमधल्या वृत्तपत्रांचा हवाला देत म्हटलं होतं. सुरुवातीला दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करायला विरोध करणाऱ्या जसवंत सिंह आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचा विरोध चार-आठ दिवसांमध्ये कसा काय मावळला, या प्रश्नाचं उत्तर स्विस दबावाशी निगडित नव्हतं की होतं, हे कळणं दुरापास्त आहे.
विदेशातून नोटाछपाई करण्यातल्या धोक्यांचा इशारा देणारी आणखीन एक घटना वर उल्लेख केलेल्या विमानअपहरणानंतर काँग्रेसच्या सत्ताकाळात घडली होती. भारत-नेपाळ सीमेवरच्या वेगवेगळ्या बँकांच्या सुमारे ७० शाखांवर सीबीआयनं २००९-२०१०च्या दरम्यान धाडी टाकल्या होत्या. बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून खोट्या नोटा मिळाल्याचं सीबीआयला चौकशीमधून कळालं होतं. हा धागा पकडून सीबीआयने रिझर्व्ह बँकेच्या व्हॉल्टसवर धाडी टाकल्या, तेव्हा तिथं सीबीआयला खोट्या भारतीय नोटांचं (रु.५०० आणि रु. १०००) घबाड मिळालं. ते घबाड आयएसआय या पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सीकडून भारतात आल्याचं कळालं.
त्यानंतर अमेरिकन बँकनोट कंपनी (अमेरिका), थॉमस दि ला रुए (ब्रिटन) आणि जर्मनीतली गीइसेक अँड डेव्रीएन्ट या नोटाछपाई करणाऱ्या तीन कंपन्यांकडून भारत सरकारनं १ लाख कोटी रुपयांच्या नोटा लोकसभेला अंधारात ठेवून छापून घेतल्या असल्याचं २०१० या वर्षातच कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्जला धक्कादायकरित्या आढळलं. नोटाछपाईसाठी लागणाऱ्या कागदापैकी ९५ टक्के कागद (सुमारे २००० टन) रिझर्व्ह बँक आयात करत असल्याचं आणि एकूण आयातीचा तिसरा हिस्सा थॉमस दि ला रुए (ब्रिटन) या एकट्या कंपनीकडून आयात होत असल्याचं वर उल्लेख केलेली भानगड उघड झाल्यावर ब्रिटिश नोटाछपाई कंपनीत पाठवलेल्या गेलेल्या फॅक्ट फायंडिंग समितीला आढळलं. नोटा छापण्यासाठी लागणारा कागद पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांनी अयोग्य कागद पुरवल्याचंही या वेळी लक्षात आलं. केंद्रीय अर्थखातं आणि रिझर्व्ह बँक यांच्या मोजक्या वजनदार अधिकाऱ्यांच्या संगनमतानं असे अनेक घोटाळे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोट्या नोटा शिताफीनं व्यवहारात आणणारी टोळी किंवा यंत्रणा उजेडात आणली गेली, त्या वेळी माध्यमांना फारसा गाजावाजा न करू देता चाकं फिरली आणि थॉमस दि ला रुए (ब्रिटन) कंपनीचं कागद आयात करण्याचं आणि नोटाछपाईचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं गेलं. परिणामी, ती बलाढ्य कंपनी आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेली आणि तिला काळ्या यादीत टाकलं गेलं. त्या सरकारनं सीबीआयच्या मदतीनं खोट्या नोटांचा स्रोत शोधला आणि संबंधित कंपन्यांपैकी सर्वांत महत्त्वाच्या कंपनीला चांगलाच धडा शिकवला होता. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचीदेखील पारदर्शकता या घटनेत घटली होती, असा याचा एक अर्थ होतो.
आता आपण भारताच्या दुसऱ्या नोटबंदीकडे वळू. चलनातल्या दर दहा लाख नोटांमध्ये २५० खोट्या नोटा आढळतात आणि एकूण चलनात कोणत्याही वेळी ४०० कोटी रुपयांच्या (सुमारे ०.०२८टक्के) खोट्या नोटा आढळत असल्याचं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचा हवाला देऊन ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने २०१६ सालच्या मे महिन्यात म्हटलं आहे. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे आणि तेवढा आधार दहशतवादी गटांना पुरणं केवळ अशक्य आहे. खोट्या नोटांचा तो आधार महत्त्वाचा नसून त्यापायी अनेकदा शासनाची पारदर्शकता धुळीस मिळते, हा धोका मोठा आहे.

कोत्या नियोजनानिशी सरकारने नोटबंदी केलेली असल्याने एक महिन्यानंतरही नोटांचा गंभीर तुटवडा सध्या सर्व पातळीवर जाणवतो आहे. त्यापायी सरकारला जनतेचा रोष ओढवून घ्यायचा नाही. परिणामी, सरकारला नोटा छापण्याची भलतीच घाई झाली आहे. अशा काळात ‘सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं विदेशी कंपन्यांकडून नोटा छपून घ्याव्यात’, असा सल्ला ख्यातनाम उद्योगपती आदि गोदरेज यांनी दिल्याचं ‘इंडिया टुडे’नं चार डिसेंबरच्या अंकात म्हटलं आहे. हा लेख पुढे सांगतो की, होशंगाबादमधल्या फॅक्टरीमधून नोटांसाठी जेवढा कागद उपलब्ध होतो, सुमारे तेवढाच कागद विदेशांतून आयात करावा लागतो. नोटांच्या सुरक्षेसाठी लागणारा विशेष सुरक्षा दोरादेखील इटली, ब्रिटन आणि युक्रेन इथल्या कंपन्यांकडून आयात करावा लागतो आहे. याचा अर्थ, भारतीय नोटा मुळातच १०० टक्के भारतीय नाहीत. त्याच सुरात सूर मिळवून ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ म्हणतो की, रु. २०००च्या नव्या नोटांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात कागद आयात करावा लागतो आहे आणि या नोटाछपाईचं काम मैसुरूच्या प्रेसमध्ये ऑगस्ट २०१६पासून सुरू आहे. त्याही पलीकडे जाऊन कोलकात्याचं ‘टेलिग्राफ’ हे वृत्तपत्र सांगतं की, रिझर्व्ह बँकेनं तीन प्रकारच्या प्लास्टिकच्या किंवा अर्ध-प्लास्टिकच्या दहा रुपयांच्या नोटा पुरवण्याचं काम ऑस्ट्रेलियातल्या इनोविया, जर्मनीतल्या गीइसेक अँड डेव्रीएन्ट, लँडक्वार्ट या स्विस आणि काळ्या यादीत टाकलेल्या ब्रिटनच्या दि ला रुये या कंपन्यांना दिलं आहे. वास्तविक, जुन्या इतिहासापासून नवं सरकार काही शिकलं असतं, तर त्याने नोटबंदी लागू करण्याआधी देशाला नोटाछपाईबाबत स्वावलंबी बनवलं असतं आणि ब्रिटनच्या दि ला रुये या काळ्या यादीतल्या कंपनीला नोटछपाईचं काम दिलं नसतं; पण तसं व्हायचं नव्हतं. कोणता धडा कोणाला शिकवायचा, याची पुरेशी तयारी करून न आलेल्या शिक्षकानं ‘शेंगा खाऊन वर्गात टरफलं टाकल्याबद्दल निर्दोष पोरांनाच ‘स्टँड इन क्यू’ची कडक शिक्षा’ काही महिन्यांसाठी फर्मावली आहे. त्यामुळे जनतेला पुन्हा एकदा नव्यानं लोकशाही आणि लोकशाहीव्यवस्था टिकवण्याचा निर्धार करावा लागणार आहे.
लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.
नाशिक : नोटप्रेसतर्फे बुधवारपासून दुर्मीळ नोटांचे प्रदर्शन

Published on:
Updated on:
नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा
वृत्तपत्र सदस्यता
भारतात ब्रिटिशांनी 1925 मध्ये नोटांचा कारखाना सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत छापण्यात आलेल्या जुन्या व नव्या नोटांचे प्रदर्शन जेलरोड येथील नोट प्रेससमोरील रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इमारतीत 8 जूनला भरणार आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. खासदार हेमंत गोडसे, नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष उद्घाटन करतील. नोटप्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, जयराम कोठुळे, संतोष कटाळे, राजाभाऊ जगताप, अविनाश देखरुकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. नोटप्रेस चालू झाल्यापासून आजपर्यंत छापलेल्या नोटांच्या या प्रदर्शनात आहेत. त्यात एक रुपयाच्या नोटेपासून एक हजार, पाच हजार, दहा हजारांपर्यंतच्या नोटा बघण्यास मिळतील. नाशिकरोडची नोटप्रेस 1962 मध्ये सुरू झाली. नोटप्रेसचा इतिहास, मशीनरी, नोटा छापण्याची प्रक्रिया याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
तांबे-पितळाने घडविले नाशिक
pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT
अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे जाताना कानांवर टक-टक आवाज पडायचा. या आवाजातही एक लय असायची. जी आपसूकच मठारकाम करणाऱ्या बांधवांकडे लक्ष वेधायची. गरिबाचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील तांबे पितळाच्या भांड्यांनी कधीकाळी देशभरातील ग्राहकांची पसंती मिळवित नाशिकला वेगळी ओळख मिळवून दिली. द्राक्ष अन् चिवड्यासाठी प्रसिद्ध नाशिक तांबे पितळाच्या भांड्यांसाठीही प्रसिद्ध करण्याचे काम केले तांबट अर्थात कन्सारा समाजबांधवांनी. नाशिकच्या जडण-घडणीच्या सुमारे साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाचा हा समाज साक्षीदार आहे.
कन्सारा म्हणजे कांस्यकार. कांस्य म्हणजे तांबे. कांस्य काम करणारा तो कन्सारा. हा समाज मूळचा गुजरातचा. बडोद्याजवळील चंपानेर प्रांतातला. पावागड हे यांचे देवस्थान. हा समाज काळ्या पाषाणातील कालिका मातेचा भक्त. इ. स. १४८४ मध्ये महंमद बेगडा याने चंपानेरवर स्वारी केली. यामध्ये पावागड परिसर उद्ध्वस्त झाला. त्यामुळे कन्सारा समाज तेथून विखूरला. सुरत, उंबरेज, नडीयाद यासारख्या ठिकाणी जाऊन स्थिरावला. काही समाजबांधव सुरत-निझर-सोनगीरमार्गे नाशिकमधील ओझर येथे येऊन स्थायिक झाले. भांडी बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करू लागले. आताचे ओझर मिग तेव्हा ओझर तांबट म्हणून ओळखले जात होते. काही समाजबांधव तेथून नाशिकमध्ये आले. भद्रकाली परिसरात जुनी तांबट लेन वसली. भांडे बनविण्याचा आवाज मोठा असायचा. इतरांची शांतता भंग होऊ नये म्हणून काही कुटुंबांना रविवार कारंजा ते अशोकस्तंभ दरम्यानच्या मल्हार दरवाजा परिसरात भांडी घडविण्यास परवानगी देण्यात आली. तेथे नवीन तांबट लेन वसली. पूर्वी गावाच्या वेशीवर असलेला हा परिसर आता हार्ट ऑफ द सिटी झाला आहे. त्याकाळी हा महामार्ग होता. येथून दुतर्फा ट्रक व तत्सम मोठी वाहने जात असत. विशेष म्हणजे ओट्यावर बसून तांबट काम करणाऱ्या बांधवांना या वाहनांचा केवळ वरचा भाग दिसत असे. इतका हा रस्ता खाली होता. ओझर, जुनी तांबट लेन, नवीन तांबट आळी अशा तीनही ठिकाणी कालिका देवीचे मंदिर असून, शके १८८६ मध्ये मुंबईतील नारायण गुजराथी यांनी तेथे घंटा अर्पण केली. सुमारे ३५० वर्षांपासून हा समाज नाशिकच्या बदलत्या रूपाचा साक्षीदार आहे. अशोकस्तंभ ते रविवारकारंजा या मार्गावर दुतर्फा तांबट कुटुंबांची घरे आहेत. तेथे ओट्यावर बसून हे लोक भांडी घडवित असत. घरामध्येच भट्टी पेटविली जात असे. महिलाही या कामी खांद्याला खांदा लावून मदत करीत. ओरफणे, साणसी, कातर, हाथोडी (मठाणू), रेखामणी, सालकरणी, खोलमणे, घण, तराजू, वजन, गुण्या, कंपास, मूस, पंखो, ऐरण, खरवई, उभाळा, मेख, खोडू, ऱ्हेतोडो यांसारखी हत्यारे आणि उपकरणांची याकामी मदत होत असे. भांडी बनविणे कष्टाचे काम. त्यासाठी शरीरसौष्ठव आवश्यक होते. म्हणूनच नवीन तांबट आळीत देवी मंदिराच्या बाजूलाच तालिम सुरू केली होती. प्रत्येकाचे घरात गायी, वासरं होती. भांडी घडविल्यानंतर हे बांधव आताच्या घारपुरे घाटावर भांडी उजळविण्यासाठी जात असत. त्यामुळे या घाटाला तांबट घाट म्हणूनही ओळखले जायचे.
...
स्वातंत्र्यपूर्व चळवळीत योगदान
स्वातंत्रपूर्व चळवळीत या समाजाचे मोठे योगदान राहिले. भारत छोडो आंदोलनात भूमिगत कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. रात्रीतून 'भारत छोडो'ची पत्रके चिकटविण्याचे काम त्यांनी केले. कंचनलाल कन्सारा, इच्छाराम कन्सारा, दामोदर कन्सारा यांनी १५ दिवसांचा कारावास भोगला. सरकारने स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचा सन्मान केला. ऑगस्ट २०१५ मध्ये कंचनलाल यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला. रविवारकारंजा गणेशोत्सव मित्र मंडळाने १९४० मध्ये लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांना फाशी दिल्याचा देखावा साकारला होता. भारतमाता हे कुतूहलाने पहात असून, ब्रिटिशांना जेलमध्ये घातल्याचे त्यामध्ये दाखविण्यात आले. हा देखावा साकारण्यात तांबट समाजाचे मोठे योगदान होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या देखाव्यावर बंदी घातली होती.
...
तांबट बांधवांनी केले नाशिकचे नेतृत्व
तांबट समाजबांधवांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व केले आहे. शंकर भिकाराम तांबट (१९३६), शंकर गणपत तांबट अर्थात छकुले वस्ताद (१९६४) दामोदर परशराम कन्सारा (१९७३) यांनी नाशिक नगरपालिकेचे नेतृत्व केले. ओझरमध्ये पोर्णिमा शशिकांत कन्सारा यांनीही ग्रामपंचायतीचे नेतृत्व केले आहे. रमाकांत छगनभाई तांबट हे महापालिकेतून उपायुक्त (प्रशासन) म्हणून निवृत्त झाले आहेत. नाशिक येथील राजा तांबट या पोलिस अधिकाऱ्याने उत्कृष्ट काम केल्याने त्यांना विविध सन्मानांनी सन्मानित केले गेले आहे.
...
कलाप्रेमाची चुणूक
तांबट समाज कलाप्रेमी आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या समवेत चित्रपट निर्मितीत त्यांनी योगदान दिले आहे. गणपतराव तांबटांनी रामशास्त्री या बोलपटासह अनेक चित्रपटांत काम केले. आर. एम तांबट, नारायण तांबट यांचेही चित्रपट निर्मितीत योगदान राहिले. तांबट बांधवांचा संदर्भ दादासाहेब फाळके स्मारकातही आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात रतनलाल माधवभाई गणेशाच्या मूर्ती बनवित. नाशिकमध्ये मूर्तिकार तांबट बंधू म्हणूनही काही कुटुंब प्रचलित आहेत. रविवार पेठेत शनीजयंती निमित्त भरणाऱ्या यात्रेत गिरीधरभाई तांबट हेडंबाचे सोंग नाचवित. ओझरच्या यात्रेत कडवाभाई तांबटांना बारा गाड्या ओढण्याचा मान होता. २६ जानेवारी १९५० रोजी या बांधवांनी नवीन तांबट अळीतील कालिका माता मंदिराला तांब्याच्या भांड्यांची आरास करून प्रजासत्ताकदिन साजरा केला होता. अशोकस्तंभाच्या निर्मितीतही आर. एम. तांबट यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बाबूभाई तांबट यानी व्यक्तिचित्रात, नानालाल तांबट यांनी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून तर दयाराम तांबट यांनी मूर्तिकामातून नाशिकमध्ये योगदान दिले आहे.
...
सातपूरमध्ये उद्योगाची स्थापना
सनव १९४० मध्ये समाजबांधवांनी पुढाकार घेऊन सरकारकडून तांबे व पितळाचा कोटा मंजूर करवून घेतला. त्यापासून हांडे, पंचपात्री, कळशी, घंगाळे, बंब बनवू लागले. सन १९४८ मध्ये सरकारी कोटा बंद झाला. त्यामुळे कांचनभाई तांबट यांच्या पुढाकाराने १९५८ मध्ये कन्सारा कारागिर सहकारी संघाची स्थापना झाली. सन १९६५ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीत कच्चा माल तयार करण्याचा कारखाना सुरू केला. यामुळे कारागिरांना रोजगार मिळाला. सन १९७८ नंतर स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे तांबे पितळाची भांडी निर्मितीला उतरती कळा लागली. काही बांधव चांदीच्या व्यवसायाकडे वळले. समाजातील तरुणाई उच्चशिक्षित झाली. त्यामुळे भांडी बनविण्याचा व्यवसाय जवळपास बंदच झाला. शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कुटुंब हा व्यवसाय करतात. पूर्वीच्या दैनंदिन वापराच्या या भांड्यांनी आता छोट्या आकारात इंटेरियरमधील शो पीस म्हणून जागा घेतली आहे. तांबे पितळाच्या भांड्यांच्या निर्मितीची कला जतन केली जावी, अशी तळमळ हे बांधव व्यक्त करतात.
ऐतिहासिक कालखंडात मुस्लिम राजवटीत मुस्लिम वस्ती विशेषत: नाशिकच्या दक्षिणेकडील भागात स्थिरावली. नाशिकला खर्या अर्थाने मोठेपणा, सौंदर्य, सुबत्ता मिळाली ती पेशवे (मराठा) काळात, हे सत्य नाकारता येणार नाही. जुन्या नाशिकचा उल्लेख मुस्लीम नाशिक व मराठा नाशिक अशा नावाने सापडतो. मुळात नाशिक सांज टेकडीवर बसलेले गाव. या टेकडीचे निसर्गत: नऊ टेक (शिखरे) म्हणून नवशिख असा पूर्वी उल्लेख होत असे. जुनी गढी, नवी गढी, जोगवाडा किंवा जोगीडोंगर, पठाणपुरा किंवा कोकणीटेक, म्हसरूळ टेक, डिंगरआळी किंवा टेक, महालक्ष्मी (सोनार) टेक, गणपती टेक आणि चित्रघंटा टेक या नावाने नऊ टेकांची ओळख होती. गावाला तटबंदी नव्हती. परंतु, गावात प्रवेश करण्यासाठी भगूर वेस, दरबार-परवाजा, काझीपुरा वेस, त्र्यंंबक दरवाजा, आसराची वेस, केतकी वेस जुन्या वस्तीत, तर नव्या वसाहतीत हत्ती वेस, मल्हार दरवाजा, सती वेस या वेशी व दरवाजे होते.
वाकडी बारव, राजवाडा नाशिक गावाच्या चतु:सीमेवरील दक्षिणेकडचा भाग. या बारवेपासून काही अंतरावर हद्द संपत असे. दक्षिणेकडून गावात प्रवेश करताना पुणे-मुंबई येण्या-जाण्याचे दोन मुख्य रस्ते आताच्या द्वारका सर्कलपासून समोर महालक्ष्मी चाळ, दादाजी महाल येथून वाकडी बारवेकडून दुसरा रस्ता विकसित झाला. तो रेणुका बागेसमोरून जियाउद्दीन मिलवरून वाकडी बारवेजवळ मूळ रस्त्यास मिळत असे. निसर्गत: या रस्त्याच्या संगमावर जिवंत पाण्याचा प्रवाह असलेली विहीर होती. या भागातील रहिवासी तिचा वापर करत. कालांतराने विहिरीचे दगडी बांधकाम करण्यात आले. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या बांधण्यात आल्या. विहीर ‘वाकडी बारव’ या नावाने ओळखली जावू लागली. आजतागायत हेच नाव कायम आहे, हेदेखील विशेष.
या बारवशेजारी प्रशस्त व्यासपीठासारख्या दगडी ओट्याचे बांधकाम होते. आजूबाजूस भाजीपाला, धान्य विक्री या भागातील शेतकरी मंडळी करत असत. बारवेवरून पाणी नेताना महिलांना उपद्रव करणार्यांना चोप देण्यासाठी तरुण मंडळी ठाण मांडून बसत. अपभ्रंश म्हणून या चौकास (चोप देणारी मंडळी वा चौक) असा करत. निवृत्तीराव वझरे यांनी पुढाकार घेऊन नाशिकचे देशभक्त वसंतराव नाईक यांच्या हस्ते चौक मंडई हे नामांतर केले. तेदेखील आज कायम आहे.
टिळक-परांजपे यांच्यापासून प्रेरणा घेऊन परकीय सत्तेविरूध्द लढण्यासाठी काही तरूणांनी राष्ट्रभक्त समूह ही संस्था १८९९ मध्ये स्थापन केली. मात्र, संस्था गुप्त ठेवली तर लोकांना सहभागी कसे करून घेणार यास्तव व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रेरणेमुळे १ जानेवारी १९०० ला स्वातंत्र्य आंदोलनात तरूण मंडळींनी सैनिक बनून सक्रिय व्हावे, या उदात्त हेतूने या संस्थेचे रूपांतर मित्रमेळा नावाने केले. यातूनच क्रांतिकारी विचारासाठी मित्रसमाज स्थापन झाला. १९०१ मध्ये पुण्याप्रमाणे नाशिक येथे अनुकरण करून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली. शिवजयंतीदेखील उत्साहात साजरी करण्यात येऊ लागली. युवकांच्या उत्साहाला उधाण आले. गणेशोत्सव धार्मिक म्हणून तर होताच आणि शिवजयंती महान व्यक्तीचे पुण्यस्मरण होतेच परंतु, देशभक्तीचे धडे देण्याच्या उद्देशाने उत्सव मुख्यत्वे साजरे होऊ लागले. तो इतिहास पुढे येईलच. पूर्वी शिवजयंतीची मिरवणूक १४ मे १९०७ ला पंचवटीतील मुठे पागेजवळून निघून व विजयानंद नाट्यगृहात येत असे.
१९२५ मध्ये प्रथम स्वातंत्र्यसैनिक देशभक्त दादासाहेब गद्रे यांच्या पुढाकाराने नाशिकमधील सर्व गणेशोत्सव मंडळींची एकत्रित मिरवणुकीची प्रथा सुरू झाली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, शाह छत्रपती बोर्डिंग व मेहतर समाजाच्या गणपतींनादेखील सहभागी करून घेतले गेले. मिरवणुकीच्या प्रारंभाचे स्थळ म्हणून वाकडी बारव (चौक मंडई) या ठिकाणाची निवड करण्यात आली. आजही ही प्रथा सुरू आहे. नाशिकमधील सर्वधर्मियांच्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ येथूनच होतो. जुन्या नाशिकमधून रंग भरलेल्या टोपांच्या गाड्यांची मिरवणूक जुन्या नाशिकमधून अनेक वर्षे नागरिकांवर विविध रंगांचा वर्षाव, गुलालाची उधळण करत जात असे ती याच भागातून. आता ही पद्धत बंद झाली आहे. परंतु, जुन्याकाळी अनेक आबालवृद्ध आनंदाने सहभागी होत असत.
नाशिकच्या बहुजन समाजाच्या जीवनात १९२५ चा काळ अतिशय मंतरलेला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामुळे बहुजन समाजाला नवे बळ मिळाले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाद्वारे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. १९३३-३४ मध्ये माळी-क्षत्रिय परिषद नाशिकला झाली. या परिषदेचे धुरिणीत्व जगन्नाथ मेहेर, पार्वताबाई बोरावके, फरांदे यांनी केले. या चौकमंडई विभागातील मुरलीधर भरवीरकर, लक्ष्मीबाई गायकवाड, चंद्रसेन गायकवाड यांनी व त्यांच्या सहकार्यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी अथक प्रयत्न केले.
श्रावण महिन्यात त्रिरश्मी (पांडव) लेणे येथे तिसर्या सोमवारी यात्रा भरते. लक्ष्मी व रेणुकेचे दर्शन घेऊन या चौकातील बुरुड मंडळी सवाद्य मिरवणुकीने या यात्रेसाठी जात असत व दांडपट्टे, भाले, लाठी, बलाठी या खेळांबरोबरच रात्री बोहाड्याचा कार्यक्रम होत असे. या कार्यक्रमासाठी अलोट गर्दी जमत असे. या मंडळाचे नाव आहे ‘बिरबान आखाडा’. आजदेखील बिरबान आखाड्यात माळी व इतर समाजाची मंडळी ही परंपरा पाळत आहे. नाशिकच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचे ते आकर्षण आहे. वझरे, मोरे, दफ्तरे, हिरवे, दराडे, कमोद परिवार इतर सर्व समाजाला सामावून घेऊन या चौकात भव्य गणेशोत्सव साजरा करतात. नाथांचा जुना मठ या चौकात होता. तेथील जागेशेजारी दक्षिणमुखी मारूतीस भाविकांची गर्दी असते!
(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)
नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय – Marathisrushti Articles
प्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिसर्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास मिळणार आहे.. महापालिका , केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून जून्या पंपिंग स्टेशनच्या जागेत संग्रहालयाची उभारणी करण्यात आली असून नुकतेच नाशिकच्या इतिहास संग्रहालयाचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांची हस्ते संपन्न झाले.
अश्मयुगातील रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पौराणिक नाशिक, सातवाहन काळापासून मोगल, ब्रिटीशांच्या काळातील नाशिक ते आज प्रगतीकडे झेप घेणारे नाशिक शहर आणि जिल्हयाचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न साकार होत असून अशा प्रकारचे एका शहराचा समग्र इतिहास दाखविणारे हे देशातील पहिले संग्रहालय आहे.
नाशिकच्या अस्तिवात प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत कार्यरत आहे. संग्रहालयाकरिता नाशिकच्या इतिहासाचे उत्खनन करुन अनेक काळातील नाशिकचा शोध घेण्यात आले आहे.दोन लाख वर्षापासूनचा त्रोटक इतिहास असला तरी येथे त्याचा त्रोटक संदर्भ घेवून प्रत्यक्षात ६० हजार वर्षापूर्वीचे पुरावे देखील प्रतिकात्मक स्वरुपात मांडण्यात आले आहे.
या सा-यांचा इतिहास संग्रहालयात आढळेल. या शिवाय ६० आसनी छोटा रंगमंच असून तेथे नाशिकच्या इतिहासाची माहिती देणारे अर्धातासाचे चार लघुपट दाखविण्याची व्यवस्था आहे. श्री व्यास रिसर्च सेंटरच्या वतीने हे संशोधन, संकलन करुन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती दिनेश वैदय , देवेंद्र कापडणीस, अनिता जोशी यांनी दिली. १ कोटी ६७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात पोस्टर्स, प्रतिकृती, पोथ्या, हस्तिलिखिते, छायाचित्रे, भांडी, शस्त्रे , म्युरल्स या माध्ययमातून हा इतिहास साकारण्यात येत आहे.
नाशिकचा रंजक इतिहास
• मुंबई आग्रारोड भारत आणि रोम यांच्यातील व्यापार मार्ग,
• राघोबादादांच्या काळात नाशिकमध्ये मराठा चित्रशैली अस्तित्वात आली.
• इंग्रजांनी तत्कालीन महाराष्ट्र जिंकला परंतु नाशिक जिंकण्यास एक महिना विलंब झाला.
• वरी, पिवळा , वासुदेव, सहदेव –भाडळी या नाशिकच्या परंपरा आहे.
• ज्योतिष्यशास्त्राची देखील नाशिककरांना समृध्द परंपरा आहे
• तेलीगल्ली, पगडबंद लन ही बलुतदर पध्दतीमुळे पडलेली नावे.
• गोवर्धनगाव होते धागा निर्मितीचे ठिकाण.
• अंजेनेरीगाव होते एका राजधानीचे ठिकाण .
संग्रहालयाची वैशिष्ट्ये
या संग्रहालयात ६० हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडण्यात येत आहे. आदिवासीचे वादय, पोशाख, वासुदेव, नंदी, वीर, पिंगळा यांची मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात येत आहे. नाशिक मधील हस्तलिखित भांडार, गणितापासून ते धर्मशास्त्रापर्यंतचे विषय, सात कालखंडात नाशिकचे बदलत गेलेली नावे. नाशिकचे रस्ते व त्यासंबंधीची बलुतेदारी, गल्ल्यांची नावे, प्रदर्शित करण्यात येत आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून नाशिकचा इतिहास सादर करण्यात येत आहे.
या संग्रहालयात १२७ पिच्चर्स फ्रेम ,३५ मूर्ती, १७६ माहिती फ्रेम ,१८० नाणी, तलवार तसेच १४ पेटींग्ज लावण्यात आल्या आहेत.
ऐतिहासिक माहिती जाणून घेणा-या इतिहास प्रेमींना या संग्राहालयाचा मोठया प्रमाणात फायदा होवून इतिहास प्रेमींना ही उत्तम मेजवानी आहे. तेव्हा इतिहास प्रेमींना नागरीकांनी आवश्यक या संग्रहालयास भेट दयावीच ….
— अशोक साळी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक
मंगळवार, ५ जुन, २०१२
(‘महान्यूज’ मधून साभार)
नाशिकचे वाडे सांस्कृतिक संचित
पुणे म्हटलं की शनिवारवाडा जसा डोळ्यापुढे उभा राहतो, तसेच नाशिक म्हटलं की सरकारवाडा सामोरा येतो. नाशिकचे वाडे या काही केवळ वास्तू नसून इतिहास पुढे घेऊन जाणारी एक अनोखी संस्कृती आहे. येथील वाड्यांचा प्रवास शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनातील उलाढालीच्या झंझावाताचा एक 'अल्बम'च आहे.
...
रमेश पडवळ
ramesh.padwal@timesgroup.com
Twit :
नाशिकची वाडासंस्कृती शेकडो वर्षांपासून शहराचा चेहरा बनली आहे. आज वाडा संस्कृतीकडून फ्लॅट संस्कृतीकडे वेगाने प्रवास होत आहे. त्यामुळे या संस्कृतीच्या केवळ पाऊलखुणा आठवणींच्या रूपानं मनामनांत कायम आहेत. नाशिकमध्ये किती वाडे होते? या प्रश्नाचं उत्तर मिळतं हे शहरच वाड्यांनी बहरलेलं होतं. आजही पंचवटी, मेनरोड, भद्रकाली, जुनं नाशिक या परिसराचा फेरफटका मारला तरी वाडा संस्कृतीच्या भव्यतेची प्रचीती येते. नाशिकमध्ये वाडा संस्कृतीचं बीजं सातवाहनकाळापासूनच रूजली असणार. कारण, गोवर्धनच्या बाजारपेठेचे युरोपशी व्यापारसंबंध दृढ झाल्याचे पुरावे मिळतात. तेव्हा व्यापारी निवासाबरोबरच संरक्षण, सत्तेची ताकद अन् आर्थिक सुबत्तेच्या जोरावर वाडे उभारत. त्या वाड्यांतून त्यांचा रूबाब, जीवनशैली अन् कार्यपद्धतीही लक्षात यावी इतके बोलके वाडे मराठा कालखंडापर्यंत साकारले गेल्याचे पहायला मिळतात. दोन हजार वर्षांपूर्वीच्या वाड्यांच्या पाऊलखुणा शहरीकरणाच्या वादळात नामशेष झाल्या, ही शोकांतिका आहे.
द्रढप्रहार या नाशिकच्या यादव घराण्याच्या संस्थापकानं सातव्या शतकात चंद्रादित्यपूर (चांदवड) मध्ये आपली पहिली राजधानी वसवली. त्याच्या वाड्याचे अवशेष आजही चांदवडमध्ये रेणुका मातामंदिराच्या डोंगराच्या खालील बाजूला सापडतात. द्रढप्रहाराचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम) नेही राज्यविस्तार केला अन् यादवांची राजधानी चंद्रादित्यपुराहून सिंदीनेर म्हणजे सिन्नरमध्ये आणली. सिन्नरमधील चौदाचौकी वाडा यादवकाळाचाच प्रतीक होता. आज जे वाडे काही प्रमाणात टिकून आहेत ते मराठा कालखंडातील म्हणजे पंधराव्या शतकानंतरच्या काळातील आहेत. निजामाने शहाजीराजांकडे नाशिक विभागाची जबाबदारी सोपवली तेव्हा राजांचा तळ होता नाशिकच्या काझीगढीवर. या गढीवरील एका वाड्यात शहाजीराजांनी पाच वर्षे (१६३२ ते १६३६) कारभार केला. जवळच्याच कोठावळेंच्या वाड्यात शहाजीराजे राहत. पेशव्यांच्या काळात नाशिकचा कायापालट झाला. नाशिकची गंगथडी मंदिरांनी आणि धर्मशाळांनी गजबजली. तेथील पेठा आकार घेऊ लागल्या. सन १७४७ च्या सुमारास सरदारांचे वाडे साकारले जाऊ लागले. अनेक मराठे सरदार नाशिकला घरे बांधू लागली. यात सावकार, व्यापारीमंडळींचा भरणा होता. सन १७५१ मध्ये गुलशनाबाद पुन्हा नाशिक झाले. त्यावेळी गोदेच्या पश्चिम काठावर आजच्या नाशिकचा पत्ताच नव्हता. हे आजचे नाशिक पेशव्यांनी १७५३ मध्ये वसवले अन् याच काळात नाशिकमध्ये वाडा संस्कृती बहरली. मल्हारराव होळकर यांनी चांदवडमध्ये साडेतीन एकर जागेवर तीन मजली आकर्षक रंगमहाल १७५० ते १७६५ दरम्यान बांधला.
नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने अनेकांसाठी ते आकर्षणाचं केंद्र होऊ लागलं. श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई अन् त्यांचे मामा त्र्यंबकराव पेठे नाशकात कायमचे राहू लागले. पेठे वाडा असला तरी गोपिकाबाईंसाठी नाशिक व गंगापूरमध्ये स्वतंत्र वाडे बांधण्यात आले. सन १७६० ते १७८० दरम्यान थोरल्या माधवराव पेशव्यांनी राज्यकारभारासाठी सरकारवाडा बांधला. दुसऱ्या बाजीरावांच्या मेहुणीच्या लग्नासाठी हा वाडा सजला तेव्हा हा वाडा इतका सुंदर दिसत होता, की एका ब्रिटिश चित्रकारानं वाड्याचं रेखाटलेलं रेखाचित्र १५ जानेवारी १८५९ मध्ये इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या पत्रात नानासाहेबांचा वाडा या नावानं प्रसिद्ध झालं आहे. यावरून त्याकाळी नाशिकच्या वाड्याची चर्चा सातासमुद्रापार होत असल्याचे लक्षात येतं. राघोबादादांनी पत्नी आनंदीबाईंसाठी गंगापूरजवळील चौधस (आताचे आनंदवल्ली) येथे मोठा वाडा बांधला. हा वाडा आनंदीबाईची गढी म्हणून नंतर प्रसिद्ध झाला.
नाशिक परिसरात पेशव्यांपेक्षा त्यांच्या सरदारांनी बांधलेले अनेक वाडे आहेत. येथे फक्त सरदारांचे अन् श्रीमंतांचेच वाडे होते असे नाही, तर बुद्धिवंतांचेही वाडे होते. यात पंडित, ज्योतिषशास्त्री, आयुर्वेदाचार्य आदींचेही वाडे होते. गणेशशास्त्री गायधनी व शंकरशास्त्री गर्गे या संस्कृत पंडितांचे वाडे आजही पहायला मिळतात. गायधनी वाडा, पेठे व गर्गे वाडा आजही सुस्थितीत आहेत. जुन्या नाशिकमधील नावदरवाजा भागातील अरुंद गल्ल्यांमधून हिंडताना लाकडाचे सुबक कोरीव काम असलेला पवार बंधूंचा वाडा लक्ष वेधून घेतो. याचबरोबर पंचवटी, सोमवार पेठ, काझीपुरा, पगडबंद लेन, चौकमंडई, चांदवडकर लेन, सराफ बाजार परिसरातील वाड्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. नाशिकची वाडा संस्कृती कायम आठवणींत जाण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. सरकारवाड्याच्या रूपाने या आठवणी भविष्यात ताज्या राहतील एवढीच काय ती समाधानाची बाब!
...
परवानगी वाड्याची, बांधला किल्ला
प्रत्येक वाड्यामागे काही ना काही इतिहास आहे. असाच इतिहास आहे मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला. हा नारोशंकर राजेबहाद्दर या सरदारानं मालेगावात मोसम नदीकाठी बांधला. त्यांनी पेशव्यांकडे वाडा बांधण्याची परवानगी मागितली अन् किल्ला बांधला. दिंडोरीतील आंबे गावात तलवार बहाद्दर म्हणून ओळखले गेलेल्या राजेबहाद्दरांचा वाड्याच्या आज केवळ खाणाखुना पहायला मिळतात. सिन्नरमधील चौदाचौकांचा वाडा मात्र आता जमीनदोस्त झाला आहे. विंचूर, लासलगाव, निफाड येथील होळकर, विंचूरकरांचे वाडे निपचित पडून आहेत. कौळाणे गावात महाराजा सयाजीराव गायकवाडांचा राजवाडा मात्र दिमाखात उभा आहे. असेच अनेक वाडे नाशिकसह सिन्नर, येवला, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड, बागलाण परिसरात उभे आहेत. त्र्यंबकेश्वरमधील वाडे आवर्जून पाहण्यासारखे आहेत.
...
इतिहासात हरवल्या वास्तू
नाशिकच्या गड-किल्ल्यांवरील वाडे तर केव्हाच हरवले आहेत. हतगड, वाघेरा किल्ल्यावरील वाडा, गाळणा किल्ल्यासह जिल्ह्यातील ६०-७० किल्ल्यांवर ही स्थिती आहे. पेठ संस्थानचे दोन वाडे पूर्णपणे कोसळले असून, त्या जागेवर आता फक्त चौकोनी पाया पहायला मिळतो. इंदोरेतील नामशेष झालेला झुल्फीकार अली भुत्तो यांचा वाडा, निफाडमधील करंजगावातील डांगेंचा वाडा, ब्राह्मणवाडाचा इतिहासही कोणाला माहिती नाही. अशीच स्थिती भेंडाळीतील मूळच्या महाजनपूरच्या महाजन वाड्याची आहे. सिन्नरमधील नायगाव येथील चिपळूणकर वाडा, राजे क्षीरसागरांच्या वाड्याने आता देह ठेवला असून, थोडा चेहरा अन् बुरुज रूपातील गुडघा तेवढा उभा आहे. हरणगावातील वाडा, तळेगाव दिंडोरीतील वाडे, मोहाडीतील सोमवंशी वाडा, सरदार रंगराव ओढेकरांचा ओढा गावातील राजमहाल, नस्तनपूरमधील गढी, चांदोरीतील टर्ले-जगताप व हिंगमिरे यांचे वाडे इतिहास हरवू लागले आहेत. पहिल्या महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांचा जलालपूरमधील वाडाही आता हरवला आहे.
...
हृदयाशी जपली वाडे संस्कृती
लाखलगावातील सरदार अमृतराव वैद्यांचा वाडा, दिंडोरीतील देशमुख वाडा, डुबेरे, रामाचे पिपंळस, कोठूरे येथील बरवे यांचा वाडा आजही त्यांचे वंशज हा वारसा हृदयाशी कवटाळून आहेत. डुबेरेचा वाडा बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थळ असल्यानं आपलं वैभव घेऊन उभा आहे. भगूरचा सावरकर वाडा व अभिनव भारत मंदिराची वाडारूपी इमारत आजही सशस्त्र क्रांतीची आठवण करून देताना दिसते. शहरातील गायधनींचे वाडे, वैद्य वाडा, पेठे यांचे दोन वाडे असे अजूनही २०-३० वाडे पहावेत असेच आहेत.
नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असा इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास या पुस्तकातील लेखांद्वारे प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून प्रसिद्ध करत आहोत...
नाशिकच्या इतिहासाचा पुरावा इसवीसनपूर्व दोनशे वर्षे म्हणजे २६०० वर्षांपासूनचा आढळतो. इसवीसनपूर्व साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी टॉलेमी इजिप्शियन प्रवाशाने नाशिक शहरास भेट दिली. त्याने आपल्या प्रवास वर्णनात नाशिकचा धार्मिक पीठ असलेले गाव असा उल्लेख केला आहे. तसेच, जीन प्रभुसुरीजी यांच्या ग्रंथात जैन धर्माचे आठवे तीर्थंकार चंद्रप्रभस्वामी हे नाशिक येथे राहत असल्याचा उल्लेख केलेला आहे.
पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट या दोन संस्थांनी संयुक्तपणे १९५० मध्ये जुन्या गढीच्या जागेत उत्खनन केले. त्यात प्राचीन काळी या गढीच्या जागेत पक्की वसाहत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच खोदकामात खोलवर घरांच्या पक्क्या बांधणीच्या विटांच्या भिंती, वाळू व करड्या रंगाची चिखल मिश्रणाच्या घरांसाठी तयार केलेल्या जमिनीचा भाग उत्कृष्ट स्थितीतील आढळला. मातीची भांडी व काही लोखंडी शस्त्रेही सापडली. सांडपाण्याचे कूप, पाटे-वरवंटे, जनावरांची हाडे थरांत सापडली. काही भागात तांबड्या रंगाची रोमन बनावटीची पात्रे, काचेचे मणी आढळले. यातील मातीची खापरे व तत्सम वस्तू नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अलीकडील अद्ययावत अशा वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. यावरून नाशिकचे अश्मयुगीन वस्तीचे पुरावे उपलब्ध होतात. सातवाहनकालीन कौलेही सापडली. याच काळातील चंबुही सापडला. यावरून इसवी सन पूर्वीच्या ४०० वर्षे आधीच्या वस्तीचा भाग म्हणून संशोधनपूर्व निष्कर्ष काढण्यात आला.
ऐतिहासिक कालखंडात १३१८ पर्यंत नाशिकवर यादवांचे अधिराज्य होते. कला व साहित्य यांना या काळात आश्रय मिळून भरभराट झाली व बहुसंख्य देवदेवतांच्या मंदिरांची निर्मिती याच काळात वेगाने झाली. चौदाव्या शतकाच्या प्रारंभापासून अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर आणि २०-२५ वर्षांच्या त्यांच्या राजवटीनंतर बहामनी राजवट १३४७ ते १४९० पर्यंत नाशिक शहरावर होती आणि १४९० ते १६३६ पर्यंत निजाम सुलतानाच्या अधिपत्याखाली नाशिक होते. नाशिकच्या दक्षिण भागात त्यांनी नव्या गढीच्या जागेत राज्य व्यवस्थेसाठी प्रशासकीय वाडे बांधले. गाडगे महाराज धर्मशाळेच्या शिखरावर असलेल्या (टेकावर) वाड्यात शहाजीराजे राहत होते. तेव्हा छत्रपती शिवराय राजमाता जिजाबाईंसह वास्तव्यास आले होते, असा उल्लेख इतिहासकार भीमसेन सक्सेना यांनी केला आहे. श्रीमंत शहाजीराजे हे निजामाचे सरदार म्हणून सेवेत होते. मुघल अतिक्रमणाचा त्यांनी धैर्याने प्रतिकार केला आणि प्रशासकीय अंमल याच नव्या गढीवरील वाड्यातून त्यांनी आपल्या देखरेखीखाली केला.
हा वाडा पाटीलवाडा या नावाने आजही सुमारे ४५० वर्षांची परंपरा सांभाळीत उभा आहे. या वाड्यात नाशिकचे परंपरागत पाटील व मराठा, ब्रिटीश कालखंडातही पोलीस पाटीलकीचा मान असलेले कोठावळे-पाटील परिवार राहत आहे. कालिका मंदिराचे विश्वस्त व माजी नगरसेवक विनायकराव व आजच्या पिढीचे बाळासाहेब कोठावळे पाटीलकीची परंपरा आजही सांभाळत आहेत. या पाटील वाड्याच्या अगदी समोर नाशिकचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. १६२७ मध्ये नगरच्या निजामशाहीचा शेवट झाला. शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या सेवेत रूजू झाले व नाशिक विभाग १६३८ मध्ये मुगल राजवटीच्या नियंत्रणाखाली आला. त्यावेळी नाशिक हा संगमनेर प्रांताचा एक भाग होता. मुघलांनी नाशिक बळकावले. तथापि, येथील वनश्री व आल्हाददायक हवा व विशेषत: गुलाबाच्या फुलांची बहरलेली फुलझाडे या बाबींमुळे प्रभावित होऊन नाशिकचे नाव गुलशनाबाद असे नामांतरित केले. पाटील वाड्याच्या अंगणातून उत्तरेकडे जर दृष्टिक्षेप टाकला, तर गोदावरी नदीतील रामकुंडाचा परिसर स्पष्टपणे दृष्टिक्षेपात येतो. अलीकडील रात्रीच्या झगमगाटात आणि रोषणाई पाहिली तर मलबार हिलवरून चौपाटीचे जे दृश्य दिसते, त्याचप्रमाणे गोदाकाठचा विशाल परिसर दिसतो.
संभाजीराजे यांच्या आश्रयाला औरंगजेबाचा पुत्र अकबर हा नाशिक येथे १८६२ मध्ये या भागात वास्तव्यास होता. नागझरी प्रवाहाच्या अगदी समोर पठाणपुरा टोकाच्या लगत दरबार दरवाजा असल्याने अद्याप या रस्त्यास दरबार दरवाजा असे नाव आहे. नागझरी हा जिवंत पाण्याचा झरा होता. त्याचे आज नाला म्हणून रूपांतर झालेले आहे. अमरधामपासून वरच्या टोकाच्या नागझरीपर्यंत प्रवाहात अळूची पाने लावली जात असत. नाशिकच्या अनेक भोजनावळी संपन्न करणार्या नागझरीची अळूची पाने ही आजही प्रसिध्द आहेत. नाशिक नगरपालिकेचा टाकळी जकात नाका याच विभागात होता. नाशिक गावाची हद्द येथे संपत असे. यापासून एका मैलावर ज्याठिकाणी सध्या रंगूबाई जुन्नरे हायस्कूल आहे व सुंदर उद्यान आहे, तो द्वारका ते कन्नमवार पुलाचा विकसित भाग हा पूर्वी नाशिक शहरातील कचरा, मलमूत्र यांचा डेपो होता, हे सांगितले तर नव्या पिढीस आश्चर्य वाटेल. मलमूत्रापासून खत करण्यासाठी सुमारे पाच एकर जागेत सुमारे तीस फूट चौरस विभागाचे खड्डे करून त्यातील तीन विभागात गावातील केरकचरा जमा करून तो जाळला जात असे. त्याच्या राखेचा चार ते पाच इंच थर इतर प्रशस्त जागेत साठविलेल्या मलमूत्रावर पसरविला जात असे. पहाटे चार ते नऊपर्यंत याकामी पाच सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. मिश्रणानंतर वाळून तयार झालेल्या खतांचे ढिगारे उभारले जाऊन शेतकर्यांना ते विकले जात असत. त्याकाळी शेतकर्यांमध्ये या खताला मोठी मागणी होती. १८७२ मध्ये एक सफाई कर्मचारी अपघाताने मैलाच्या साठ्यात सापडला व मृत्युमुखी पडला. त्याच्या विधवेस व मुलास शंभर रूपये नगरपालिकेने ठरावान्वये दिले, असाही नगरपालिका दप्तरात उल्लेख आहे.
पूर्वापार चैत्र शुद्ध एकादशीस निघणार्या श्रीराम रथाच्या पुढे पालखी वाहणारे भगवान कहार यांचे कुटुंबिय आजही याच कथडा विभागात राहत आहेत. महादू दुर्गाजी क्षीरसागर, इंदूमती कहार, गो. द. गोडे, शेख नसीर सुलतान ही मंडळी या भागात समाजसेवक म्हणून प्रसिध्द होती. कथड्यासमोरील बाग म्हणजे भोई गल्ली, नाशिकच्या जुन्या उत्सवाप्रसंगी, मिरवणुकीप्रसंगी विशेषत: कलगीतुरा यासाठी हा भाग नावाजलेला होता. सुप्रसिध्द विडी कारखानदार शंकर गोविंद कांबळे, भारत मार्केटिंगचे फकीरराव सोपे, स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मा स्मारक समितीचे झुंजार अध्वर्दू कचरू मामा झिंटे, नगरसेवक नामदेव सोपे, नगरपालिकेचे झिटे, शिंपी समाजाचे अग्रणी मंडप सजावटीचे कंत्राटदार डी. वारे गणोरे, कलगीतुर्याचे कलावंत फकीरराव सोपे, भगूर दरवाजा विभागातील शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव माधव काठे, सुप्रसिध्द अकाउंटंट मोतीरामजी क्षीरसागर, चपला बुटांचे नाशिकमधील प्रसिध्द व्यापारी म्हसूजी आहेर, डॉ. कानडे यांचे बालपण व वास्तव्य याच परिसरात आहे.
सुप्रसिध्द राजकीय -सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक मागास वर्गाचे नेते व इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रभावळीतील दिग्गज हिरामण चतरू मोहेकर, उपाख्य बाबूजी यांचे वास्तव्य याच पठाणपुरा भागात आहे. अली मामू तांगेवाले हे व्यवसायाने टांगा हाकणार्या कार्यकर्त्यास आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देणारे सर्व समाजाचे मतदार म्हणूनदेखील या विभागाने आपला विक्रम नोंदविला आहे. या जुन्या नाशिकमधील बहुसंख्य मुस्लीम वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चव्हाटा या भागात माळीसाळी आणि तत्सम समाजाची मुख्य वस्ती होती.
Tapovana Lakshmi Narayan Temple-Nashik | Details
Sri Lakshmi Narayan Temple
It is located near the Swaminarayan bridge of Nashik in the area of Tapovana. Tapovana is a place of penance and meditation where great sages used to practice austerities. A pastime of primary significance associated with Dandakaranya is the story of the sages of Dandakaranya, who desired to experience the rasa of conjugal love with the Lord. In days gone by there were many sages in Dandakaranya. Dandakaranya is the name of the forest where Lord Ramachandra lived after being banished by His father for 14 years. At that time there were many advanced sages who were captivated by the beauty of Lord Ramachandra and who desired to become women in order to embrace the Lord. Later on, these sages appeared in Vrindavana when Krishna advented Himself there, and they were born as gopis, or girlfriends of Krishna. In this way they attained the perfection of spiritual life.
Temple photo books
Discover more
Hotel booking platform
Holy water gangajal bottles
Near temples guide

Distance to Reach Temple:
By Train: 8.1 Kms from Nashik Railways Station.
By Bus: 4.5 kms from Nashik CBS Bus Stand.
By Flight: 18.8 kms from Nashik Airport.
Read more about Nashik Yatra
Shri Laxmi Narayan Mandir: नासिक के तपोवन में स्थित श्री लक्ष्मीनारायण मंदिर, 12 साल में लगने वाले कुंभ का केन्द्र है ये मंदिर
हर बारह वर्षों में आयोजित होने वाला नासिक कुंभ मेला इस मंदिर को विशेष दर्जा प्रदान करता है। प्रशासन द्वारा संतों, महंतों और महामंडलेश्वरों की ठहरने की प्राथमिक व्यवस्था यहीं की जाती है। यही नहीं, दो महीनों तक चलने वाले कुंभ के दौरान हजारों श्रद्धालुओं को यहां निःशुल्क भोजन भी उपलब्ध कराया जाता है। यह सेवा मंदिर द्वारा वर्षों से बिना किसी भेदभाव के की जा रही है।
इतिहास और स्थापत्य
इस मंदिर की स्थापना लगभग सन् 1700 के आसपास मानी जाती है। मंदिर के मूल में विराजमान भगवान लक्ष्मीनारायण की मूर्ति पूर्व महंत श्री राम रतन दासजी महाराज द्वारा स्थापित की गई थी। मंदिर परिसर में धार्मिक संतुलन और आध्यात्मिक विविधता का सुंदर समावेश देखने को मिलता है। दाहिनी ओर श्रीराम, लक्ष्मण और सीता जी, तो बाईं ओर श्री द्वारकाधीश की मूर्तियाँ हैं। इनके सामने क्रमशः हनुमान जी और गरुड़ जी की प्रतिमाएं प्रतिष्ठित हैं।
मंदिर में 11 जुलाई 2015 को भगवान शिव सह-परिवार की स्थापना की गई थी, जो इसे और भी विशेष बनाती है। इसके अतिरिक्त, परिसर के समीप पूर्व महंत जनों की चरण पादुकाएं भी स्थापित हैं, जो परंपरा और श्रद्धा का प्रतीक हैं।
सेवाएं और सामाजिक योगदान
मंदिर को संचालित करने वाला ट्रस्ट 9 फरवरी 1955 को पंजीकृत हुआ था। मंदिर के पूर्व और दक्षिणी भाग में लगभग 1.5 एकड़ में फैली गौशाला है, जिसमें 80 से 90 गाएं हैं। इसके साथ-साथ मंदिर परिसर में संत निवास, औषधालय और एक विद्यालय भी संचालित होते हैं, जो समाजसेवा के प्रति मंदिर की प्रतिबद्धता को दर्शाते हैं।
मंदिर तक कैसे पहुंचें
श्री लक्ष्मीनारायण मंदिर, नासिक के पंचवटी क्षेत्र में स्थित तपोवन में है, जो शहर का एक प्रमुख धार्मिक और ऐतिहासिक इलाका है।
- सड़क मार्ग से: नासिक शहर से टैक्सी, ऑटो रिक्शा या लोकल बस के जरिए आसानी से तपोवन पहुंचा जा सकता है। शहर का मुख्य बस स्टैंड (CBS) मंदिर से लगभग 6 किलोमीटर की दूरी पर है।
- रेल मार्ग से: नासिक रोड रेलवे स्टेशन मंदिर का निकटतम बड़ा स्टेशन है, जो लगभग 10 किलोमीटर दूर स्थित है। स्टेशन से टैक्सी या ऑटो लेकर मंदिर तक पहुँचना सुविधाजनक होता है।
- हवाई मार्ग से: निकटतम हवाई अड्डा छत्रपति शिवाजी इंटरनेशनल एयरपोर्ट, मुंबई है, जो नासिक से लगभग 170 किलोमीटर दूर है। मुंबई से नासिक के लिए नियमित बस और ट्रेन सेवाएं उपलब्ध हैं। इसके अलावा, ओझर एयरपोर्ट भी एक विकल्प है, जो घरेलू उड़ानों के लिए नजदीकी हवाई अड्डा है।
दर्शन व्यवस्था और विशेष जानकारी
- सुबह की आरती का समय: 7 बजे
- शाम की आरती का समय: 8 बजे
- फोटोग्राफी: हाँ, लेकिन पूजा में लगे श्रद्धालुओं की निजता का ध्यान रखें
- प्रवेश: पूर्णतः निःशुल्क
नाशिकमधील ५ अवश्य भेट देणारी महादेव मंदिरे
१. त्र्यंबकेश्वर मंदिर
2. श्री कपालेश्वर महादेव मंदिर
३. नारोशंकर मंदिर
4. श्री तिळभंडेश्वर महादेव मंदिर
5. श्री सोमेश्वर महादेव मंदिर
नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरे
६. काळाराम मंदिर
७. इस्कॉन श्री श्री राधा मदन गोपाळ मंदिर
८. धर्मचक्र तीर्थ गोशाळा
9. श्री नवश्या गणपती मंदिर
10. BAPS श्री स्वामीनारायण मंदिर, नाशिक
११. सीता गुफा
१२. भद्रकाली देवी मंदिर
13. श्री गोमय हनुमान मंदिर
14. श्री लक्ष्मणजी शेषावतार मंदिर
१५. सिद्ध हनुमान मंदिर
१६. सुंदर नारायण मंदिर
१७. मुक्तिधाम मंदिर
18. श्रीगुरु गांगेश्वर वेद मंदिर
19. श्री व्यंकटेश बालाजी मंदिर
लपलेली स्थानिक मंदिरे
ही १० नाशिकमधील कमी प्रसिद्ध मंदिरे आहेत जी शहराच्या समृद्ध धार्मिक संस्कृतीत योगदान देतात.
२०) मोडकेश्वर मंदिर : हे मंदिर भगवान गणेशाच्या स्वयंभूला समर्पित आहे. ते पवित्र गोदावरी नदीच्या काठावर आहे. गणपतीची मूर्ती 'मोदकासारखी' आहे, म्हणूनच त्याला मोडकेश्वर असे नाव पडले.
२१) बाली महाराज मंदिर : हे २०० वर्षे जुने मंदिर भगवान विष्णूचे महान भक्त राजा बाली यांना समर्पित आहे. देव-देवतांच्या मंदिरांचे दर्शन घेताना, राक्षसांच्या राजाच्या या मंदिरालाही भेट द्या.
२२) कालिका माता मंदिर : माँ कालिका यांना समर्पित हे मंदिर मराठा राजवटीत बांधले गेले. हे ३०० वर्ष जुने मंदिर नवरात्रोत्सवात हजारो भाविकांना आकर्षित करते.
२३) श्री लक्ष्मी नारायण मंदिर : हे रंगीबेरंगी लक्ष्मी-नारायण मंदिर पंचवटीतील एक महत्त्वाचे मंदिर आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात या मंदिरात संत आणि गुरुंचे आश्रयस्थान असते.
२४) श्री ढोल्या गणपती मंदिर : पेशव्यांनी बांधलेले हे २५० वर्षे जुने मंदिर आहे, जे भगवान गणेशाला समर्पित आहे. बाप्पाच्या मूर्तीच्या विशाल स्वरूपावरून हे नाव पडले आहे.
२५) भक्तीधाम : हे नाशिकमधील तुलनेने नवीन मंदिर आहे, जे सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. येथे अनेक हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर त्याच्या शांत वातावरणासाठी देखील ओळखले जाते. ध्यान आणि प्रार्थनेसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
२६) श्री दुतोंड्या मारुती मंदिर : हे हनुमान मंदिर पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर आहे. हे नाशिक मंदिर एकाच दगडात आहे ज्याच्या दोन्ही बाजूंना भगवान हनुमान (मारुती) कोरलेले आहेत. म्हणूनच त्याला दुतोंड्या (दोन तोंडे) असे नाव पडले.
२७) नीलकंटेश्वर महादेव मंदिर : हे मंदिर पवित्र गोदावरीच्या काठावर असलेले महादेवाचे ३०० वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिराचे वय लक्षात घेता, भेट देणाऱ्या भाविकांकडून त्याच्या स्थापत्यकलेची प्रशंसा केली जाते.
२८) श्री अय्यप्पा मंदिर : हे सुंदर मंदिर दक्षिण भारतात प्रामुख्याने पूज्य असलेल्या देवता श्री अय्यप्पाला समर्पित आहे. येथे दक्षिण भारतीय, विशेषतः मल्याळी भक्तांना आकर्षित केले जाते.
२९) जगन्नाथ मंदिर : भगवान जगन्नाथाचे हे मंदिर त्याच्या शांत परिसरासाठी ओळखले जाते. 'रथयात्रा' उत्सवात या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भावंडे बलभद्र आणि सुभद्रा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक येतात.
9 Ancient Nashik Temples | How Many Have You Visited?
मी नाशिकमधील अनेक मंदिरांना भेट दिली आहे. तुम्हाला कदाचित त्र्यंबकेश्वरमधील प्रसिद्ध नाशिक मंदिराबद्दल आधीच माहिती असेल. नाशिकमधील माझ्या अनुभवामुळे, ही मार्गदर्शक तुम्हाला इतर मंदिरांची ओळख करून देते.
जर तुम्ही या मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर काही दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत:
- पारंपारिक पद्धतीने (परंपरागत) कपडे घाला. लोक कोणत्याही क्लब किंवा बारचा ड्रेस कोड पाळतात, कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. आमच्या मंदिरांसाठी तुम्हीही असेच करावे अशी माझी अपेक्षा आहे.
- कोणताही फोटो क्लिक करण्यापूर्वी फोटोग्राफीचे नियम तपासा.
खाली सूचीबद्ध केलेल्या २९ नाशिक मंदिरांची ठिकाणे दर्शविणारा हा एक परस्परसंवादी नकाशा आहे.
९. मुक्तिधाम.
हे प्रसिद्ध मंदिर नाशिक रेल्वे स्टेशनवर आहे. संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे आणि ते अगदी स्वच्छ आणि छान ठिकाणी आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या भिंतींवर गीतेचे १८ अध्याय लिहिलेले आहेत. या मंदिराला भेट देणे हे पवित्र धाम किंवा पवित्र केंद्रांना भेट देण्यासारखे मानले जाते.
मुक्तिधाम – नाशिकमधील १५ धार्मिक स्थळे, नाशिकमधील मंदिरे
या ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्यासाठी चांगल्या सोयी आहेत आणि ते स्वस्त दरात उपलब्ध आहेत. मंदिराभोवती एक मोठा परिसर आहे आणि अनेक दुकाने आहेत. जवळजवळ प्रत्येक पर्यटक या ठिकाणी नेहमीच भेट देतो.
मुख्य नाशिक शहरातील, पंचवटी भागातील व आजूबाजूची सर्व ठिकाणे
1} श्री काळाराम मंदिर संस्थान, पंचवटी
2} श्री गोरेराम मंदिर, पंचवटी
3} सिता गुंफा, पंचवटी
4} श्री नरोशंकर मंदिर, पंचवटी
5} श्री सुंदर नारायण मंदिर, रविवार पेठ, रविवार कारंजा, पंचवटी
6} श्री एकमुखी दत्त मंदिर, रविवार पेठ, सराफ बाझार, पंचवटी
7} चांदीचा गणपती मंदिर, खरेवाडा, रविवार कारंजा, पंचवटी
8} श्री गुरु गंगेश्वर वेद मंदिर, त्र्यंबकेश्वर रोड, मातोश्री नगर
9} श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान, रामकुंड, पंचवटी
10} श्री सिद्ध हनुमान मंदिर व साई किरण धाम, झुलेलाल, रामकुंड, पंचवटी
11} रामकुंड पंचवटी, रामकुंड, पंचवटी
12} गंगा घाट, रामकुंड, पंचवटी
13} पंचवटी कारंजा, पंचवटी
14} श्री भद्रकाली देवी मंदिर, नाईकवाडी, कोकणीपुरा, राजेंद्र वावरे चौक
15} BAPS श्री स्वामी नारायण मंदिर, मुंबई - आग्रा हायवे जवळ, केडीवण, पंचवटी
16} पांडव लेणी (त्रिरश्मी लेणी), बुद्ध विहार, पाथर्डी फाटा, मुंबई - आग्रा हायवेला लागून
17} श्री धर्मचक्र प्रभाव जैन श्वेतांबर तीर्थ मंदिर, विल्होळी, मुंबई - आग्रा हायवेला लागून
18} दादासाहेब फाळके स्मारक, बुद्ध विहार, पाथर्डी फाटा, मुंबई - आग्रा हायवेला लागून
19} बटरफ्लाय पार्क व बोटॅनिकल गार्डन, बुद्ध विहार, पाथर्डी फाटा, मुंबई - आग्रा हायवेला लागून
20} इस्कॉन मंदिर, विद्यानगर, द्वारका
21} मुक्तीधाम (बीटको) मंदिर, MG रोड, गायखे कॉलनी, नाशिक रोड
22} श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम मंदिर, नाणेकर मळा, विहितगाव, देवळाली
23} श्री सोमेश्वर मंदिर, आंबेडकर नगर, गंगापूर रोड
24} श्री बालाजी मंदिर, गंगापूर रोड
25} गंगापूर धरण, गंगापूर
26} श्री बळी महाराज मंदिर, पंचवटी, अयोध्या नगरी, मुंबई - आग्रा हायवेला लागून
27} श्री नवश्या गणपती मंदिर, पावशे कॉलनी, आनंदवल्ली, गंगापूर रोड
28} श्री दिगंबर जैन श्वेतांबर मंदिर, दिंडोरी रोड, म्हसरूळ
29} नाशिक बर्ड पार्क, सार्थना जकात नाका, दिंडोरी रोड, म्हसरूळ गाव
30} सुला वाईनयार्ड्स (द्राक्षवाटिका), गोवर्धन व्हिलेज, गंगापूर - सावरगाव रोड
31} चांभार (चामर) लेणी, पेठ रोड
32} भक्तीधाम, पेठ रस्ता, राजपाल कॉलनी, पंचवटी
33} श्री कार्तिक स्वामी मंदिर, सुकेणकर लेन, पंचवटी
34} श्री काळभैरव मंदिर, पंचवटी
35} श्री कालिका देवी मंदिर, जुना गडकरी चौक, मातोश्री नगर, मुंबई नाका
36} श्री लक्ष्मणरेखा मंदिर, आडगाव नाका, पंचवटी
37} आर्टिलरी म्युझियम तोफखाना विभाग संग्रहालय, औते नगर, गांधीनगर विमानतळ एरिया, देवळाली गाव
38} श्री लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवन
• आता नाशिक शहराच्या हद्दी बाहेरील पण जवळपास असणाऱ्या ठिकाणांची यादी पुढीलप्रमाणे :
1} श्री वक्रतुंड गणपती मंदिर, दिंडोरी
नाशिकमध्ये २६२ वर्षांपूर्वीचे प्राचीन विठ्ठल मंदिर
प्रचलित नसल्याने अनेक प्राचीन ठेव्यांपासून मनुष्य वंचित राहतो. एखादी मौल्यवान बाब त्याच्या आसपास असूनदेखील केवळ त्याविषयी ज्ञान नसल्याने तो पारखा झाल्याची अनेक उदाहरणे घडतात. त्याचप्रमाणे नाशिकचे एक अतिप्राचीन विठ्ठल मंदिर भाविकांना पारखे झाले असून, प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या आधीपासून असलेले हे मंदिर आजही भाविकांच्या प्रतीक्षेत आहे. आषाढीला भक्तांना विठूमाऊलीच्या चरणांची आस लागलेली असते. मात्र, येथे साक्षात विठ्ठल भगवंतालाच भक्तांच्या पायरवाची आस लागली आहे.
१७५४ मध्ये या मंदिराची स्थापना झालेली असून, विश्वनाथ पंचभैये यांनी हे मंदिर उभे केले असल्याचे पुरावे सापडतात. अरुणा संगमाजवळ (आताचे रामकुंड) असलेल्या चतु:संप्रदाय आखाड्यात हे विठ्ठलाचे मंदिर असून, काळ्या पाषाणात असलेली ही मूर्ती स्वयंभू व मोठी लोभस आहे. समवेत डाव्या बाजूला रखुमाई असून, उजव्या हाताला भक्त विश्वनाथाची मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम दगडातील असून, आत मानवी स्वरूपातील गरुडाचीही मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर पेशव्यांची पगडी असल्याने त्या विलक्षण भासतात. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर प्रथमदर्शनी ही काळारामाचीच मूर्ती असल्याचा भास होतो हे वैशिष्ट्य.
‘भगवंतासोबत भक्त’ असा दुर्मिळ योग
भक्तासाठी भगवंत कृपानिधान असतो. त्याच्या चरणाजवळ जागा मिळावी अशी भक्ताची इच्छा. मात्र, या अतिप्राचीन विठ्ठल मंदिरात भक्त विश्वनाथ ब्राह्मण भगवंतासमवेत विराजमान आहेत. विठ्ठलासोबतच त्यांचीही षोडषोपचारे पूजा केली जाते. भक्तीची परिसीमा गाठल्याने आपल्याबरोबर भक्ताला स्थान देऊन परमेश्वराने दोघांमधली दरीच मिटवून टाकली आहे.
अशी आहे आख्यायिका...!
विठोबा मंदिराची आख्यायिका प्रसिद्ध आहे. गोदावरीचे पावित्र्य जाणून विश्वनाथ नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण स्नानासाठी आलेला होता. त्याने कपालेश्वराजवळ पूजा केली व अरुणा संगमाजवळ (आताचे रामकुंड) असलेल्या गालव ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे त्याला गालव ऋषींनी भीमातीरी असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लावली. आषाढी एकादशीस मोठा उत्सव असल्याने दर्शनाला चल म्हणाल्यावर त्याने पंढरपूरला येण्याचा मानस प्रकट केला. मात्र, विश्वनाथ जराजर्जर असल्याने गालव ऋषी त्यांना न घेताच गेल्याने इकडे नाशिकला त्यांनी विठ्ठलाचे दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. महिनाभरानंतरही दर्शन होईना म्हटल्यावर ब्राह्मण व्याकुळ झाले. परीक्षा पाहण्याच्या हेतूने विठ्ठल पंचपक्वान्नाचे ताट घेऊन आले. मात्र, ब्राह्मण बधेना! अनेक युक्त्या केल्यानंतरही विश्वनाथ ब्राह्मणाने तोंड उष्टावले नाही म्हणून विठ्ठल प्रसन्न झाले व याच ठिकाणी राहण्याचे वचन दिले.
आम्ही विश्वनाथ पंचभैये यांचे वंशज असून, या मंदिराचे पुजारी आहोत. या पांडुरंगाच्या मूर्तीसोबत त्यांच्या परमभक्ताची मूर्तीदेखील प्रतिष्ठित असल्याने हे मंदिर वेगळे मानले जाते. आषाढी एकादशीला येथे प्रत्यक्ष पांडुरंगाचा वास असतो.
- अतुल पंचभैये, मंदिराचे पुजारी
विठ्ठलाचे हे मंदिर अतिप्राचीन असून, त्याकडे भक्तांचे लक्ष वळावे. नाशिकमध्ये अशी अनेक मंदिरे असून, त्याची माहिती नाशिककरांना होणे गरजेचे आहे. या स्थानालाही पंढरपुराइतकेच महत्त्व असून, ब्रह्मपुराणात त्याचा उल्लेख आढळतो.
- देवेन्द्रनाथ पंड्या, ‘आपले नाशिक’चे संकलक
सप्तशृंगीमातेची थोरली बहीण जगदंबा माता
Updated on:
आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगीमातेचे मूळ रूप व थोरली बहीण म्हणून वणी गावातील जगदंबा मातेस संबोधले जाते. महिषासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या भक्तांना या राक्षसापासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबेने सप्तशृंगीचे रूप घेतले.
या रूपात सप्तशृंगीने महीषासुराचा वध केला. दुष्टशक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे वणीच्या जगदंबा मातेला सप्तशृंगीचेच मूळ रूप मानतात.
वणीच्या जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे. पेशवाईत व अहिल्याबाईंच्या काळात परिसरात सुंदर हेमाडपंती मंदिर व कुंडे बांधली आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
१९१३ मध्ये देशमुख व थोरात कुटुंबीयांनी पंचांच्या मदतीने लगद्यापासून मूर्ती स्थापन केली. त्या वेळी गावावर येणाऱ्या संकटाचे रक्षण व्हावे, यासाठी नवरात्रात देवीसमोरील होमात रेड्याचा बळी देण्याची प्रथा सुरू झाली.
संपतराव देशमुख हे स्वत: बळी देत. १९३२ मध्ये संपतरावांना स्वामी अवघडानंद महाराजांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रेड्याचा बळी देण्याची प्रथा बंद करून त्याऐवजी कोहळ्याला बळी देण्याची प्रथा सुरू केली. दरम्यानच्या काळात मूर्ती झिजल्याने १९२८ मध्ये पुन्हा कागदी लगद्याची मूर्ती बसविली; परंतु तीही जीर्ण झाल्याने १९५१ मध्ये तांब्याच्या धातूपासून बनविलेली तेजस्वी, आकर्षक व मनोहारी पूर्वाभिमुख देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
जगदंबा देवीच्या मूर्तीखाली १० ते १२ फूट खोलीवर स्वयंभू चार चिरंजीव आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश व नारायण हे देवीचे चार पुत्र समजले जातात. या खोलीत त्यांच्या शीळा असून, ही खोली हळद-कुंकू, गुलाल व भंडाऱ्याच्या जाड थराने भरण्यात आली आहे. त्यावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. माहूरच्या रेणुका देवीप्रमाणे जगदंबेची फक्त शीराची मूर्ती येथे आहे.
असे म्हटले जाते, की देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा, विष्णू, महेश व ऋषिसंतांनी तर्पणविधी केला होता. त्यामुळे या परिसराला आगळेवेगळे महत्त्व आहे. देवीच्या मूर्तीची उंची सहा फूट असून, डोक्यावर चांदीचा मुकुट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडलेल्या सोन्याची नथ, गळ्यात मंगळसूत्र असा साजशृंगार असून, देवीला पूर्ण नऊवार पातळ लागते.
वणी गडावरील सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच वणी गावातही यात्रा भरते. या यात्रेसाठी राज्यातील तसेच गुजरातमधील हजारो भाविक पदयात्रेने दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवात देवी मंदिर परिसरात हजारो महिला भाविक घटी बसतात. घटी बसलेल्या महिलांसाठी मंदिर व्यवस्थापन पाहणारे श्री सप्तशृंगीदेवी ट्रस्ट (वणी)तर्फे मोफत निवास सुविधा, मोफत फराळ व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
गडावर सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेतल्यावर वणी गावातील जगदंबादेवीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण दर्शन व नवसपूर्ती पूर्ण होत नसल्याचा समज भाविकांमध्ये असल्याने परंपरेनुसार गडावर येणारे भाविक येथील जगदंबादेवीचे दर्शन घेतल्यावर मार्गस्थ होतात. तसेच, नवसपूर्तीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने अशा भाविकांचे नवसपूर्ती कार्यक्रम कायम सुरू असतात. त्यामुळे सप्तशृंगगडाप्रमाणेच येथेही भाविकांची सतत वर्दळ असते.
त्यांच्यासाठी येथे श्री सप्तशृंगी (जगदंबा) देवी ट्रस्टतर्फे भव्य भक्तनिवास बांधण्यात आलेला असून, निवास आणि धार्मिक विधी यांची अल्पदरात व्यवस्था केली जाते. दररोज सकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत भाविकांना श्री जगदंबेचे दर्शन घेता येते. नवरात्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले असते. दररोज सकाळी सातला पंचामृत महापूजा व नऊला आरती, दुपारी बाराला माध्यान्ह आरती व सायंकाळी साडेसातला सांज आरती होते.
(शब्दांकन : दिगंबर पाटोळे, वणी, ता. दिंडोरी)
ठळक वैशिष्ट्ये
वणीजवळील तीर्थक्षेत्रे व शहरे
@ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड : २३ किलोमीटर
@ श्रीक्षेत्र शंखेश्वर पार्श्वनाथ (वणी) : १ किलोमीटर
@ सापुतारा : ३५ किलोमीटर
@ मार्कंडेय पर्वत : ८ किलोमीटर
@ पाराशरी आश्रम (पारेगाव) : १५ किलोमीटर
@ ओझरखेड धरण : ५ किलोमीटर
@ करंजी देवस्थान : ८ किलोमीटर
@ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक प्रधान केंद्र (दिंडोरी) : १७ किलोमीटर
@ मार्कंडेय पिंप्री देवस्थान : २५ किलोमीटर
@ नाशिक येथून जुन्या मध्यवर्ती बसस्थानकातून दर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने बस
@ खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
@ भक्त निवासाची उत्तम सुविधा
@ संपर्क : देवस्थान ट्रस्ट : ७०२०६६८९६३, ९५५२३७३१०१
@ मंदिर लोकेशन : https://g.co/kgs/uSNrTL
Heritage of Nashik: Sundar Narayan Temple - Deshdoot
नासिक: गोदावरी नदी के तट पर स्थित सुंदर नारायण मंदिर, मंदिर वास्तुकला का सबसे महत्वपूर्ण और जीवंत उदाहरण है। वास्तुकला के अध्ययन के दृष्टिकोण से, नासिक का यह मंदिर वास्तुकला के प्रत्येक छात्र के लिए अत्यंत महत्वपूर्ण है।
यह मंदिर नागर शैली या सिविल शैली की वास्तुकला की विशेषताओं को दर्शाता है और गुजरात क्षेत्र के मंदिरों के डिजाइनों से समानता रखता है। पुरातत्व विभाग ने बताया कि यह मंदिर 18वीं शताब्दी की हिंदू और मुस्लिम वास्तुकला का मिश्रण है।
- विज्ञापन -
आणखी शोधा
धुळे-नंदुरबार स्थानिक बातम्या
देश-विदेश बातम्या
NMC
यादव युग या हेमाडपंथी मंदिर वास्तुकला में मंदिर ज्यादातर क्षेत्र में उपलब्ध काले पत्थर से बनाए जाते थे, लेकिन पेशवा काल में उन्होंने सीमेंट, चूना पत्थर और ईंटों का उपयोग करना शुरू कर दिया।
नासिक के रविवार पेठ में स्थित यह मंदिर नासिक शहर में पेशवा मंदिर वास्तुकला का सर्वश्रेष्ठ नमूना है। यह मंदिर निस्संदेह नासिक जिले के त्र्यंबकेश्वर तालुका और कस्बे में स्थित त्र्यंबकेश्वर मंदिर से विकसित हुआ है।
यह मंदिर गोदावरी घाट की ओर पूर्व दिशा में स्थित है। मंदिर का निर्माण इस प्रकार किया गया है कि प्रत्येक वर्ष 20 और 21 मार्च को सूर्य की किरणें नारायण के चरणों पर पड़ती हैं, जिन्हें घाट के दूसरी ओर स्थित कपलेश्वर मंदिर से देखा जा सकता है। इसे हरि-हर भेंट के नाम से जाना जाता है।
पूर्वी द्वार के चौखट पर लगी संगमरमर की पट्टिका में लिखा है कि इस मंदिर का निर्माण पेशवा सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड़ ने शक काल 1678 में, यानी 1756 ईस्वी में, 10 लाख रुपये की लागत से करवाया था। मंदिर का मुख पूर्व दिशा की ओर है और इस पर निर्माण की सटीक तिथि अंकित है।
यह मंदिर नासिक शहर के रविवार पेठ क्षेत्र में स्थित है। यह मध्ययुग के उत्तरार्ध और विशेष रूप से पेशवा काल की नागर वास्तुकला के उत्कृष्ट उदाहरणों में से एक है। मंदिर में मुखमंडप, दो पार्श्व मंडप, अंतराला और अंत में गर्भगृह है।
पूर्वी बरामदे के शीर्ष भाग पर स्थित मुख मंडप के ऊपरी भाग पर मंदिर के निर्माण की तिथि और काल अंकित है। इसमें एक सुंदर नागर मीनार है जो त्र्यंबकेश्वर मंदिर की मीनार जितनी ही खूबसूरत है।
स्मारक के स्थान, धार्मिक और सौंदर्य संबंधी महत्व को देखते हुए, यह कार्यालय अनुशंसा करता है कि स्मारक को इस विभाग के "ए" श्रेणी के स्मारक के रूप में माना जाना चाहिए।
Sunder Narayan Mandir Panchvati, Nashik City, Dist. Nashik - Pilgrim Data Services
सुंदर नारायण मंदिर
पंचवटी नाशिक शहर, जि. नाशिक
नाशिकमध्ये ऐतिहासिक व पौराणिक वारसा सांगणाऱ्या अनेक वास्तू आणि मंदिरे
आहेत. त्यातील एक अतिशय प्राचीन मंदिर आहे सुंदर नारायण मंदिर! नाशिकच्या
मुख्य बस स्थानकापासून जवळच असलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या
अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. भाविकांसाठीही ते भक्तिभावाचे स्थान
आहे, कारण देवी लक्ष्मी आणि तुलसी यांच्यासोबत भगवान विष्णू यांचे हे एकमेव
मंदिर असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या उभारणीत १८व्या शतकातील हिंदू
आणि मुस्लिम वास्तुकलेचे मिश्रण आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की भगवान विष्णूंना जालंदर पत्नी वृंदा
हिच्या शापाने कृष्णवर्णरूप प्राप्त झाले होते. तेव्हा विष्णूंनी गोदावरी
येथील तीर्थावर स्नान करून आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले. शापमुक्त
झाल्यानंतर भगवान विष्णूंनी याच ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली. मग
त्याच ठिकाणी मंदिर बांधले गेले हे सुंदर नारायणाचे मंदिर!
गोदावरीच्या काठावर होळकर पुलाजवळ असलेले हे मंदिर पेशव्यांचे सरदार गंगाधर
यशवंत चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये तब्ब्ल १० लाख रुपये खर्च करून बांधले
होते. मंदिराची काहीशी पडझड झाली असली तरी जो भाग उभा आहे त्यातून त्याची
रचना किती सुंदर असावी याची कल्पना येते. या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे २० व
२१ मार्च रोजी सूर्याची किरणे भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडतात.
दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला येथे ‘हरिहर भेट’ साजरी केली जाते. यावेळी
कपालेश्वर मंदिराचे पुजारी मध्यरात्री सवाद्य येत कपालेश्वराचा बेलाचा हार
स्वामी नारायण म्हणजेच विष्णूंना अर्पण करतात, तर सुंदरनारायण मंदिराचे
पुजारी तुळशीचा हार कपालेश्वर मंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात. हा सोहळा
पाहण्यासाठी नाशिक शहर व परिसरातील भाविक येथे आवर्जून येतात.
हे मंदिर औरंगजेबाने उद्ध्वस्त करून याच ठिकाणी थडगे बांधले होते. मात्र, पेशव्यांनी हे थडगे काढून त्याच ठिकाणी या मंदिराची स्थापना केली. त्यामुळेच या मंदिराची रचना मिश्र दिसते. दगडात केलेले कोरीव काम आणि दगडी बांधीव काम, असे एकत्रित दिसते. मंदिरावर मुघल वास्तुकलेचीही छाप पाहायला मिळते. मंदिराचा गोल घुमट याची साक्ष देतो. हे मंदिर दगडी चौथऱ्यावर बांधण्यात आले असून, मंदिराचे शिखर दुरूनही दिसते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या बांधकामाची अचूक तारीख देणारा शिलालेखही येथे आहे. काळ्या पाषणातील या मंदिरासाठी कुठेकुठे दगड, चुना, नवसागर, शिसे यांचा वापर करण्यात आल्याचेही दिसते.
मंदिरात अनेक ठिकाणी कलाकुसर दिसते, जी अतिशय रेखीव आणि आखीव आहे. मंदिरात हनुमान, नारायण या मूर्तींसह काळ्या पाषणातील अनेक मूर्ती दिसतात. मंदिराची खांबांवरील कलाकुसर उत्तम पद्धतीने केलेली पाहायला मिळते.
मंदिराच्या गर्भगृहात सरस्वती, लक्ष्मीसोबत तुलसी आणि स्वामी नारायण यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो उभ्या आणि आडव्या रेषांनी सजवण्यात आला आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तिन्ही बाजूला छत्र्या असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे.
कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. त्यासाठी मंदिराच्या भिंतींत पेटते दिवे ठेवण्याची खास सोय आहे. दिव्यांची ही आरास करण्याची परंपरा पेशवे काळापासून अखंड सुरू आहे. दिव्यांच्या मंद प्रकाशात मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. सुंदर नारायण मंदिरासमोर कपालेश्वराचे मंदिर आहे. नाशिकला दर्शनाला येणारे भाविक या दोन्ही मंदिरांना आवर्जून भेट देतात. येथील एक खास वैशिष्ट्य म्हणजे एका मंदिराच्या गाभाऱ्यात उजळलेले दिवे दुसऱ्या मंदिरातून अगदी सहजपणे दिसावेत, अशी रचना ही दोन्ही मंदिरे उभारताना करण्यात आली आहे.
उपयुक्त माहिती:
- नाशिकमधील पंचवटी परिसरातील मंदिर
- नाशिक एसटी स्थानकापासून २.५ किलोमीटरवर
- राज्यातील अनेक भागांतून नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वे उपलब्ध
- खासगी वाहने मंदिर परिसरात येऊ शकतात
- निवास व न्याहरीसाठी शहरात अनेक पर्याय
गोदावरी नदीच्या काठी असलेल्या नाशिक नगरीत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. ह्या गोदाकाठच्या वैभवाचा शिरपेच म्हणजे श्री सुंदर नारायण मंदिर! 1756 मध्ये गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पवित्र गोदावरी नदीच्या पश्चिमेस, रविवार कारंजा, नाशिक जवळ, हे काळ्या दगडांनी बांधलेले प्राचीन मंदिर आहे. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वतीच्या मूर्ती आहेत.
पूर्वीच्या मंदिराची औरंगजेबाच्या कारकिर्दीत बरीच नासधूस करण्यात आली होती. पण 1750 मधे बाळाजी विश्वनाथ, म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी या जागेचे शुद्धिकरण केले व परिसर पुनः एकदा मंदिर बांधण्याजोगा केला.
मंदिरातील पूर्व दरवाजावर देवनागरी लिपीत नमूद आहे की, सदर मंदिर गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी 1756 मध्ये 10 लाखात बांधले.
'सुंदर नारायण' या नावाचा संबंध एका प्राचीन कथेशी आहे ज्यामध्ये वृंदा देवीने भगवान विष्णूला एकदा शाप दिला होता. शापाचा प्रभाव म्हणून भगवान विष्णूच्या त्वचेचा रंग काळा झाला होता. त्यानंतर त्यांनी शापातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने पवित्र गोदावरी नदीत स्नान केले. डुबकीनंतर तो सुंदर झाला, म्हणजे शब्दशः सुंदर, पुन्हा….म्हणून, सूंदर नारायण!
वास्तुकला:
मंदिराचे स्थापत्य हे भारतातील मंदिर कला संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना आणि उत्तम नमुना आहे. पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराला बाल्कनी बसण्याची व्यवस्था आणि गोलाकार घुमटांसह तीन पोर्च आहेत. काही स्थापत्य कलाकृतींमध्ये मुघल वास्तुकलेच्या छटाही आहेत. मंदिराचा सर्वात लक्षवेधक पैलू म्हणजे तो उभारलेला कोन. बारीक नक्षीकाम केलेले दगडी मंदिर अशा प्रकारे उभारले आहे की २१ मार्च रोजी सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतील. या भव्यतेचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. मंदिराचे खांब विविध कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहेत आणि त्यात दोन मंडप आणि एक सुशोभित कॉरिडॉर देखील आहे. मंदिरात एक तलाव असून मंदिराचा प्रत्येक कोपरा चित्रकला आणि शिल्पकामाने सजलेला आहे. नाशिकमधील हे मंदिर पाहुण्यांना आनंद देणारे आहे आणि ते ठिकाण जरूर पहावे.
मंदिर काळ्या बेसाल्ट खडकांनी बनलेले आहे. दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झाल्यामुळे दख्खनचे पठार हे बेसॉल्टपासून बनलेले आहे. त्यामुळे, या भागातील बांधकामात सर्वाधिक वापरलेला खडक बेसाल्ट आहे. हा सर्वात मजबूत खडकांपैकी एक आहे, बेसाल्टपासून बांधलेली मंदिरे आणि गुहा आजही उभ्या आहेत.
मात्र सर्वात मजबूत खडक असूनही, इतर खडकांच्या तुलनेत बेसाल्ट खडकाचे घर्षण तुलनेने जलद होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुंदर नारायण मंदिराचा एक भाग वाहून गेला. मंदिरात दगड पडणे, दगडाची पूड पडणे, दगडांना भेगा पडण्याच्या घटना निदर्शनास आल्या. हवामान, गोदावरी नदी, भूगर्भातील पाणी आणि वनस्पती अशा विविध कारणांमुळे हे घडले आहे.
नूतनीकरण :
नाशिक महापालिकेने आपल्या 'स्मार्ट सिटी' प्रस्तावात सुधारणा करताना पर्यटनासाठी सांस्कृतिक वारसा विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी जुन्या वास्तूचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार, सुंदर नारायण मंदिर, सरकारवाडा इत्यादी उप-प्रकल्पांसह हेरिटेज संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला.
राज्याच्या पुरातत्व विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येक दगडावर खूण करून दस्तऐवजीकरण करण्यात आले. मंदिराच्या दगडात भेगा पडल्याने आणि गवत, तण इत्यादी मोठ्या प्रमाणात झाडे उगवली होती.
केवळ आजूबाजूच्या वनस्पती काढून टाकणे आणि रासायनिक संवर्धन करणे पुरेसे नव्हते कारण दगडांमध्ये भेगा पडल्या होत्या.
नवीन बेसाल्ट खडकाचे लेसर कटिंग करून, त्यांना चुन्याच्या मोर्टारने फिक्स करून संरचनात्मक संवर्धन केले गेले.
संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते. राज्य संरक्षित स्मारक असलेल्या येथील श्री सुंदरनारायण मंदिराचे काम वेगवेगळ्या कारणामुळे काही वर्षांपासून रखडत सुरु होते. आता काम पूर्ण झाले असून मंदिराचा कळस चढविण्यात आला आहे.
नमोस्तुते!

भारतीय समाजव्यवस्थेत आध्यात्मिक अधिष्ठानाचे अपरंपार महत्त्व आहे. हे आध्यात्मिक अधिष्ठान वृद्धिंगत करण्यासाठी तसेच भारताचा हा अनमोल ठेवा जतन व्हावा, यासाठी विविध मंदिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. नाशिकनगरी ही एक तीर्थक्षेत्र असून येथे असणाऱ्या मंदिरांना स्वतःचा एक इतिहास आहे. त्याचबरोबर शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश मंदिरे ही पुराणकालीन आहेत. त्यामुळे अशा मंदिरांची देखभाल होणे, त्यांची वेळोवेळी डागडुजी होणे आणि हे सर्व करत असताना मंदिराचे पुरातनसौंदर्य तसेच अबाधित राहावे, अशी भाविक व नागरिक यांची अपेक्षा असते. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि भरवस्तीत असणारे रविवार कारंजा परिसरातील ‘सुंदर नारायण मंदिर’देखील त्यातीलच एक. जवळपास सतराव्या शतकात हे मंदिर स्थापित झाल्याचे समजते, तर काही नागरिकांच्या मते, हे मंदिर त्याकाळी उत्खननात सापडल्याचेदेखील सांगितले जाते. एवढ्या मोठ्या कालखंडात बदलणारे पर्यावरणीय वातावरण, विविध प्रकारची नागरी स्थित्यंतरे यामुळे या मंदिराचे भक्कमीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपूर्वी या मंदिराचे पुरातन दगड बदलण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. मात्र, हे काम अखंडितपणे सुरू असल्याचे दिसून येत नाही. कंत्राटदार आणि नागरिक यांच्यातील अनुक्रमे ठरलेले काम आणि अपेक्षा यावरून मतभेत होत असल्याने या कामात वारंवार खंड पडत आहेत. मात्र, असे असले तरी, ‘सुंदर नारायण मंदिर’ ही नाशिकच्या अनेक प्रमुख ओळखींपैकी एक महत्त्वपूर्ण अशी ओळख आहे. त्यामुळे या मंदिराच्या कामाबाबत तातडीने असा कायमस्वरूपी तोडगा काढून काम व्हावे हीच अपेक्षा नाशिककरांची आहे. नुकतेच येथे ‘हरिहर भेट महोत्सव’ पार पडला. अत्यंत चैतन्यमय असणारा हा महोत्सव मंदिराच्या अर्धवट कामाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच मन विषण्ण करणारा असाच वाटला. ‘सुंदर नारायणा’चे सुंदर मंदिर आणि त्या पार्श्वभूमीवर ‘हरिहर भेट’सारख्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन होत असे. हे चित्र आता नाशिककर नागरिकांना नेमके कधी पाहवयास मिळणार याचीच आस लागलेली आहे.
बोलक्या इतिहासाचा सप्ताह
‘इतिहास म्हणजे सत्याचा प्रकाश’ असा सुविचार प्रचलित आहे. वर्तमानातील घटनांवर प्रकाश टाकत त्याला इतिहासाची जोड दिल्यास भविष्याचा अचूक वेध घेणे शक्य होत असते. त्यामुळे आपला इतिहास हा आपला गौरव असतो. असा समृद्ध इतिहास देशाच्या भावी पिढीला समजावा, नव्हे तो प्रत्यक्ष अनुभवता यावा, पाहता यावा आणि त्या इतिहासतील सामग्रीशी मानसिक जाणिवांच्या स्तरावर संवाद साधता यावा यासाठी नाशिकमध्ये प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाच्यावतीने ‘जागतिक वारसा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा सप्ताह नाशिककर नागरिकांसाठी ‘बोलक्या इतिहासाचा सप्ताह’ ठरला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारवाडा येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककर नागरिकांना शिवाजी महाराज यांच्या काळातील वापरण्यात आलेले होण, शिवरायांनी विविध युद्ध प्रसंगी वापरलेली शस्त्रास्त्रे यांचा दुर्मीळ खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रदर्शनाची विशेषत: ही आहे की, या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे कोणाकडून शिवरायांचे चरित्र, त्यांचे जीवन, त्यांच्या काळातील विविध सामुग्री यांची माहिती घेण्याऐवजी या प्रदर्शनाच्या माधमातून शिवरायांसंबंधी असणारा गौरवशाली इतिहास या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आला आहे. त्यामुळे भावी पिढीचा इतिहासाशी थेट संवाद होण्याचे व्यासपीठ म्हणून हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरत आहे. पुरातत्त्व खात्यामार्फत आयोजित असल्याने प्रदर्शनातील मांडण्यात आलेल्या सामुग्रीची शाश्वातता नक्कीच आहे. या सप्ताहानिमित्त एरवी पुस्तकातच बघावयास मिळणारी नाणी, होन, शिल्प, उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तूंचे प्रदर्शन प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण नाण्याने अभिषेक करण्यात आला होता. ते ‘होन’ नाणेदेखील या प्रदर्शनाचे प्रमुख ठरत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून येथे विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. प्राचीन नाणे अन् शस्त्र याची माहिती घेत असताना विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धनीती अन् त्यात वापरले जाणारे शस्त्र याची माहिती करून घेतली. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रदर्शनांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणारा इतिहास हा निश्चितच बोलका असून अशा प्रयत्नांची गरज आगामी काळ नक्कीच प्रतिपादित करीत आहे.
५. सुंदर नारायण मंदिर.
गंगा घाटाजवळील हे सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये हे मंदिर बांधले. मुख्य देवता भगवान विष्णू उर्फ नारायण, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती आहेत. या मंदिराला "सुंदर नारायण (भगवान विष्णू)" असे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे, एकदा जालंदरची (दुष्ट राक्षसी) पत्नी वृंदा हिच्या शापामुळे भगवान विष्णू कुरूप झाले. शापामुळे भगवान विष्णू काळे आणि कुरूप झाले. गोदावरीमध्ये स्नान केल्यानंतर भगवान विष्णू शापातून मुक्त झाले. म्हणून भगवान विष्णूंना येथे श्री सुंदर नारायण असे म्हणतात.
सुंदर नारायण मंदिर – नाशिकमधील १५ धार्मिक स्थळे, नाशिकमधील मंदिरे
मंदिराच्या दगडांवर सुरेख नक्षीकाम केलेले आहे. सुंदर नारायण मंदिर हे मुघल शिल्पकलेचे ठसे असलेले स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. मंदिर अशा कोनात बांधले आहे की २१ मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे सुंदरनारायण मूर्तीवर पडतात.
नाशिकचे सुंदरनारायण मंदिर
किर्ती मोहरील
रामाचा 14 वर्षे वनवास आठवला की,
महाराष्ट्रीयन लोकांना सर्वप्रथम आठवते ते नाशिक. रामाने वनवासाची काही
वर्षे इथल्या तपोभूमीमध्ये घालवली असे म्हणतात. त्यामुळे नाशिकचे महत्त्व
आपल्याला काशी एवढेच!
नाशिक शहराला
मंदिरांचे शहरही म्हटले जाते. येथे प्रसिद्ध मंदिरं आहेत. यापैकीच एक
म्हणजे सुंदरनारायण मंदिर. गोदावरी तीरावर वसलेले सुंदरनारायण मंदिर
स्थापत्यशैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. सुंदरनारायण मंदिरासमोरच
कपालेश्वर मंदिर आहे. या परिसरात असं सांगितलं जातं की नाशिकला येणार्या
यात्रेकरुंनी कपालेश्वराचे दर्शन घेतलेच पाहिजे. त्यामुळे नाशिकला येणारा
प्रत्येक माणूस कपालेश्वराचे दर्शन घेतोच आणि तसाच तो वळतो सुंदरनारायण
मंदिराकडे.
सुंदरनारायण मंदिर हे 1756
साली सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले.
पुरातन सुंदरनारायणाचे मंदिर मुस्लीम राजवटीत नष्ट झाले होते. त्यानंतर
1756 साली पेशव्यांच्या सहकार्याने याचे बांधकाम करण्यात आले.
सुंदरनारायण
मंदिर पुर्वाभिमुख आहे. चौथर्यावर हे मंदिर वसले आहे. 20 मीटर उंचीवर
वसलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष वेधून घेते. या शिखराचे वैशिष्ट्य
म्हणजे मुख्य कलशाच्या खालच्या बाजूला अनेक उपशिखरं उतरत्या क्रमाने रचली
आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. उभ्या आणि आडव्या रेषांनी
सजवलेला हा घुमट आकर्षक दिसतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे
सभामंडपाच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत तिन्ही बाजूंना ह्या छत्र्या
आहेत. ह्या छत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिरामध्ये विष्णूची
मुर्ती मध्यभागी असून त्याच्या आजूबाजूला वृंदा आणि लक्ष्मी यांच्या मुर्ती
आहेत. या मंदिराविषयी कथा सांगितली जाते की वृंदा ही जालंधर नावाच्या
दैत्याची पतिव्रता पत्नी होती. वृंदेच्या पतिव्रत्येमुळे जालंधर दैत्य
अजिंक्य झाला होता. विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी वृंदेचे पतिव्रत्य
भंग केले. जेव्हा हे तिला कळले तेव्हा तिने विष्णूला मन:शांती नष्ट
होण्याचा शाप दिला. या शापातून नष्ट होण्यासाठी श्री विष्णू नाशिकला
बद्रिकाश्रमात आले. तिथल्या तीर्थावर स्नान करुन शापमुक्त झाले. त्याच
ठिकाणी हे सुंदरनारायणाचे मंदिर बांधण्यात आले.
कपालेश्वर
आणि सुंदरनारायण ही मंदिरे अशा पद्धतीने समोरासमोर बांधली आहेत की एका
मंदिरातून दुसर्या मंदिरातल्या देवाचे दर्शन घेता येते. या मंदिरावर सुंदर
कोरीव नक्षी आहे. दिशासाधन करुन हे मंदिर बांधण्यात आले असल्यामुळे
विषुवदिनाच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण सुंदरनारायणाच्या पायाशी
पडतात.
कार्तिक पौर्णिमेला मंदिरात
दिव्यांची आरास करण्यात येते. नदीकडे उतरणार्या पायर्या आणि मंदिरावर
लुकलुकणारे असंख्य दिवे बघतांना मन हरखून जाते. दिव्यांची ही आरास
पेशव्यांच्या काळापासून अखंडपणे सुरु आहे. स्थापत्यशैलीचा आणि नक्षीकामाचा
उत्कृष्ट नमुना असलेले सुंदरनारायण मंदिर नाशिकला भेट दिली तर आवर्जून
बघितले पाहिजे असेच आहे!
कपालेश्वर मंदिर, नाशिक
कपालेश्वर मंदिर हे शंकराचे एकमेव मंदिर आहे जिथे शंकराच्या पिंडीसमोर नंदी नाही.
यामागे पुराणात असे सांगीतले आहे की तय काळात ब्रह्मदेवाला ५ मुखे होती. चार मुख वेदोचारण करायचे आणि पाचवे मुख निंदा. या निंदा करणारया मुखावर नाराज़ होवुन भगवान शंकरानी ते मुख धडावेगळे केले. यामुळे लागलेल्या ब्रम्हहत्येचे पाप मिटवण्यासाठी शंकराना सोमेश्वराच्या काठावर एका बछड्याकडुन पापमुक्तिचा उपाय सांगीतला गेला. तो बछड़ा हा वास्तविकपणे नंदी होता. या नंदिच्या सांगण्यावरुन भगवान शंकरानी रामकुंडावर अंघोळ करुन आपले पापक्षालन केले आणि रामकुंडावर शिवलिंगाच्या रूपात वास्तव्य केले. परंतु या नंदिला महादेवाने गुरु मानल्यामुळे त्यानी नंदिला आपल्या मंदिरात समोर स्थापीत होण्यासाठी नकार दिला आणि या कारणामुळे शंकराच्या पिंडीसमोर नंदी नसलेले हे कदाचित एकमेव मंदिर आहे
याव्यतिरिक्त कपालेश्वर मंदिरासमोर असलेली गोदावरी नदी पार करुन अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. येथे प्रत्येक वर्षी हरीहर भेटीचे आयोजन केले जाते. कपालेश्वर आणि सुंदर नारायण म्हणजे भगवान विष्णु यांची भेंट घडवली जाते. या एकमेव दिवशी भगवान विष्णु यांना बेलपत्र आणि भगवान शंकर यांना तुळशी पत्र अर्पण केले जाते।
कपालेश्वर मंदिर
पंचवटी नाशिक, जि. नाशिक
नाशिकमध्ये महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांत कपालेश्वर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरासमोर नंदी नाही, हे येथील वैशिष्ट्य. महाकालेश्वराचे रूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कपालेश्वराच्या दर्शनाने बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य लाभते, असे मानले जाते.
या मंदिरात नंदी नाही याविषयी आख्यायिका अशी की एकदा इंद्रसभा भरली होती. सभेस सर्व देव उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव आणि महादेव यांच्यात वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या महादेवांनी ब्रह्मदेवांचे पाचपैकी एक शिर उडवले. त्यामुळे महादेवाला ब्रह्महत्येचे पातक लागले. नारदाच्या सांगण्यानुसार या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महादेव नाशिकजवळील सोमेश्वर येथे आले. तेव्हा एका ब्राह्मणाच्या घरासमोर बांधलेल्या गाय आणि वासरू (नंदी) यांच्यातील संवाद महादेवांनी ऐकला त्यांच्या संवादात नंदी म्हणाला की ‘मी नाकात वेसण घालणार नाही. उद्या तो ब्राह्मण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार’. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, ‘तू हे जर केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल’. त्यावर तो नंदी म्हणाला, ‘मला त्यावरचा उपाय माहीत आहे.’ दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीस वेसण घालायला आला असता, नंदीच्या हल्ल्यात त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आणि नंदीचे शरीर काळे पडले. आता पुढे काय होतेय हे उत्सुकतेने पाहत महादेव त्या नंदीच्या मागे जाऊ लागले. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रात (रामकुंडात) स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर ब्रह्महत्येच्या पातकातून महादेवांची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात महादेव जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर महादेव म्हणाले, ‘तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू माझ्यासमोर बसू नकोस. तू मला गुरुसमान आहेस.’ त्यामुळे या मंदिरात नंदी नाही. मात्र, हा नंदी रामकुंडात विसावला आहे असेही मानले जाते.
मंदिराच्या कळसाजवळ ‘श्री गणेशाय नम: श्री कपालेश्वर’ असा देवनागरीतील शिलालेख आहे. त्यावरील अक्षरांवरून तो प्राचीन वाटतो. इ. स. ११०० मध्ये तत्कालीन गवळी राजाने पाच हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यानंतर इ.स. १७३८ मध्ये कोळीराजाने या मंदिरात अधिक सुधारणा करीत बांधकाम केले. याच कोळीराजाने कपालेश्वर मंदिराच्या व्यवस्थेसाठी व पूजा विधीसाठी शैव-गुरवांची नेमणूक केल्याचा उल्लेख काही संशोधनपर पुस्तकांत आहे. इ.स. १७६३ मध्ये मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार या भाविकाने बांधून दिल्या, तर मंदिराचा मूळ सभामंडप जगजीवनराव पवार या भाविकाने इ.स. १७६३ मध्येच बांधून दिल्याचा उल्लेखही काही दस्ताऐवजांत आढळतो. पेशव्यांच्या राजवटीत या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी मोठी मदत झाल्याचेही सांगण्यात येते.
गोदावरी नदीच्या काठी आणि रामकुंडाच्या समोरच लहानशा टेकडीवर हे मंदिर आहे. स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. महादेव आणि नंदी यांचे नाते अतुट, पण या ठिकाणी महादेवाने नंदीला गुरू मानल्याने तो मंदिरासमोर दिसत नाही. ही धार्मिक बाब येथील अनोखे वैशिष्ट्य म्हणून गणली जाते. आवारात विष्णू आणि हनुमान यांच्या मंदिरांसह तांब्याच्या आवरणातील महादेवाची सुबक पिंडही आहे.
मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी असून त्यावर नक्षीकाम आहे. मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप प्रशस्त असून गाभारा चांदीने मढवलेला आहे. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर महादेवाची प्रतिमा आहे, तर गाभाऱ्यातील शिवलिंगावर चांदीचा मुखवटा आहे. बाजूलाच चांदीचे शेषनाग आहेत.
मंदिरात श्रावणातल्या सोमवारी व शनिवारी महादेवाची पालखी काढली जाते. मुख्य उत्सव असलेल्या महाशिवरात्रीला भाविकांची येथे अलोट गर्दी असते. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप येते. अनेक भाविक या दिवशी त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नवस करतात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांचीही येथे गर्दी असते.
देव दिवाळीनिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी ‘हरिहर भेट’ सोहळा प्रसिद्ध आहे. या दिवशी भगवान विष्णू व महादेवाचे पूजन, नवग्रह स्थापना करण्यात येते. महाविष्णू याग करण्यात येतो. मंदिर परिसरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येते. कपालेश्वर मंदिर आणि मंदिराच्या समोर गोदावरी नदीच्या पलीकडे असलेल्या सुंदर नारायण मंदिरामधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. त्यावेळी या दोन देवांची भेट घडविली जाते. त्यानंतर गोदावरीत स्नान केले जाते. यावेळी शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले असते.
कपालेश्वर मंदिरात पहाटे ५ ते रात्री ११ दरम्यान भाविकांना दर्शन घेता येते. पहाटे ५ वाजता मंदिर उघडल्यानंतर पूजा-अभिषेकानंतर आरती होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पुन्हा आरती होते.
उपयुक्त माहिती:
- नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील मंदिर
- एसटी तसेच महापालिका परिवहन बसची सुविधा
- राज्यातील अनेक भागांतून एसटी, रेल्वे सेवा
- खासगी वाहनाने मंदिरापर्यंत जाता येते
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
नाशिक ही धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते. पण नाशिक शहरात एक असे शिवमंदिर आहे, ज्याचे एक वेगळेपण आहे. नंदी हे महादेवाचे वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडीसमोरचं स्थान असतं. मात्र, या मंदिरात शिवाचे आवडते वाहन नंदी त्याच्यासोबत नाही. लोक या मंदिराला कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखतात.
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. नंदी नसलेल्या एकमेव शिवालय असलेल्या श्री कपालेश्वर महादेवाचे लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण याठिकाणी महादेवाने नंदीला आपले गुरु मानले आहे. मग, नेमकं असं काय झालं की या ठिकाणी महादेवाने नंदीला आपलं गुरु मानलं आहे. याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.
अशी आहे या मागची आख्यायिका…
एकदा इंद्र सभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रम्हदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असलेल्या ब्रम्हदेवाची चार तोंडे वेध म्हणत तर एक तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रम्हदेवाचे पाचवे तोंड (निंदणारे) तोंड उडविले. ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… या पातकापासून आपली कशी सुटका करुन घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती.
ब्रम्हहत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडविली. अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रम्हहत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय. अशी आख्यायिका आहे.
मग नंदी गेला कुठे ?
कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. महादेवाचं हे असं मंदिर आहे, जिथे नंदीच नाही. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो.
जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!
नाशिक : जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर असतोच. नंदी हा जरी महादेवांचे वाहन समजला जात असला, तरी नाशिकच्या एका मंदिरात मात्र महादेवांच्या पिंडीसमोर नंदीच नाही असं काय झालं की, महादेवांनी याठिकाणी नंदीला आपला गुरु मानलं…चला तर, जाणून घेऊया नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिराची महती…(Mahashivratri 2021 special story of kapaleshwar temple nashik Where there is no Nandi in front of Mahadev)
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही.
अशी आहे या मागची आख्यायिका…
जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील महादेव मंदिरात गेलात, तर शंकराच्या पिंडीजवळ तुम्हाला नंदी विराजमान दिसेलच. नंदी हा महादेवांच वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडीसमोरचं स्थान असतं. मात्र, नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे. महादेवांचं हे एकमेव मंदिर आहे, ज्याठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच, नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय.

कपालेश्वर मंदिर
बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य
एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसंच, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी धारणा आहे (Mahashivratri 2021 special story of kapaleshwar temple nashik Where there is no Nandi in front of Mahadev).
महादेवाचा उत्सव
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री याव्यतिरिक्त इतर दिवशी देखील या महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिव उपासक दूध, दही, मध, फळांचे रस याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. संकटनाशक, इच्छा पूर्ण करणारे, महा पापांचा नाश करणारे आणि आपल्या भक्तांना गंभीर संकटातूनसुद्धा लीलया बाहेर काढणारे कपालेश्वर महादेव म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.
रामकुंडाचे दर्शन
नाशिकमधल्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांमध्ये या कपालेश्वर मंदिराची गणना होते. कपालेश्वर मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. पेशव्यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आले की गोदावरी नदी आहे. तसेच जवळच रामकुंडही आहे. या रामकुंडात प्रभू रामचंद्रांनी दशरथाचे श्राद्ध केले होते अशी श्रद्धा आहे. कपालेश्वर मंदिराच्या समोर आणि गोदावरी नदीच्या पलिकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिरही आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर आणि सुंदरनारायण मंदिरांमधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात आणि त्यांची भेट घडवली जाते. श्रावणी सोमवारी आणि इतर सोमवारीही या कपालेश्वर मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते.
6. कपालेश्वर महादेव मंदिर.
भगवान कपालेश्वर महादेव मंदिर हे नाशिकमधील गंगा घाटाजवळील एक प्रमुख जुने मंदिर आहे, जे १७६९ मध्ये जजीवनराम पवार यांनी बांधले होते. हे एक शांत आणि भव्य बांधणीचे मंदिर आहे. असे म्हटले जाते की एकदा भगवान शिव यांनी चुकून गाय मारली होती. म्हणून, त्यांचे पाप धुण्यासाठी नंदीने त्यांना पवित्र रामकुंडात डुबकी मारण्याचा सल्ला दिला. म्हणून भगवान शिव नाशिकमध्ये आले आणि त्यांनी रामकुंडात डुबकी मारली आणि काही काळ ध्यान केले. हे मंदिर भगवान शिव यांनी ध्यान केलेल्या ठिकाणी आहे.
कपालेश्वर महादेव मंदिर – नाशिकमधील १५ धार्मिक स्थळे, नाशिकमधील मंदिरे
या मंदिरात भगवान शिवाच्या मुख्य देवतेच्या समोर नंदी नाही हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. सामान्यतः शिवलिंगासमोर नंदी ठेवला जातो पण या मंदिरात हा अपवाद आहे. एका स्थानिकाने आम्हाला समजावून सांगितले की भगवान शिव नंदीला गुरु (शिक्षक) मानत होते जे त्याला पापे धुण्यासाठी पवित्र रामकुंडात स्नान करण्याचा सल्ला देतात आणि म्हणूनच, कपालेश्वर मंदिराचे रक्षण करण्यासाठी नंदी नाही. नाशिकमधील हे मंदिर अवश्य पहावे.

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.
तीर्थ रामकुंड
पंचवटी,नाशिक जि. नाशिक
भारतातील ‘पश्चिम काशी’ म्हणून ओळखले जाणारे नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या ठिकाणी लहान-मोठी २०० हून अधिक मंदिरे आहेत. त्याखेरीज आध्यात्मिक महत्त्व असलेली तीर्थस्थानेही आहेत. यातील पंचवटीमधील रामकुंड हे तीर्थ अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
प्राचीन
काळापासूनच पंचवटीचा भाग अत्यंत पवित्र मानला गेला आहे. येथे पाच
वटवृक्षांचा समूह आहे. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड.
त्यामुळे या परिसराला ‘पंचवटी’ असे म्हटले जाते. काळाराम मंदिर, सीता
गुंफा, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर,
टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर,
तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठल मंदिर,
पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, दुतोंड्या मारुती, कार्तिकस्वामी मंदिर,
काट्यामारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर,
कपुरथळा
स्मारक अशी अनेक मंदिरे ही रामकुंडाच्या परिसरात गोदावरी नदीच्या दोन्ही
तीरांवर आहेत. याशिवाय सीताकुंड, लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड,
शारंगपाणीकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड आणि निळकंठेश्वर व गोराराम मंदिराच्या
समोर सर्वांत मोठे दशाश्वमेघकुंड आहे.
याबाबत अख्यायिका अशी की समुद्रमंथनातून देवांना अमृतकलश प्राप्त झाला व तो राक्षसांनी पळविला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून तो राक्षसांकडून परत मिळविला. विष्णूरुपी मोहिनी अमतृकलश घेऊन परतत असताना त्यातील चार थेंब पृथ्वीवर पडले. ही चार ठिकाणे म्हणजे प्रयाग, हरिद्वार, नाशिक व उज्जैन. नाशिकमध्ये ज्या ठिकाणावर अमृतकलशातील थेंब पडले ते ठिकाण म्हणजे रामकुंड, असे सांगितले जाते. त्यामुळे या कुंडात स्नान करणे पवित्र मानले जाते.
श्रीराम
हे लक्ष्मण आणि सीता यांच्यासमवेत वनवासकाळात नाशिकमधील पंचवटीत गौतमी
तीरावर (गोदावरी) आले होते. इथे विधिपूर्वक स्नान करून वडील दशरथ राजा
यांचा श्राद्धविधी त्यांनी केला. त्यावेळेपासून हे ठिकाण ‘रामकुंड’ नावाने
ओळखले जाते. या तीर्थावर स्नान केल्याने ब्रह्महत्या आदी पापांचा नाश होतो,
अशी भाविकांची श्रद्धा आहे.
अशी आख्यायिका आहे की, ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तीसाठी महादेवांनीही या रामकुंडात स्नान करून येथेच वास्तव्य केले होते.
ज्या ठिकाणी श्रीरामाने आपले वडील दशरथ यांचे श्राद्धविधी केले होते, त्याला आता ‘अस्थिविलय तीर्थ’ असेही म्हणतात. आजही भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थींचे अस्थिविलयकुंडात विसर्जन करतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आदी अनेक नेत्यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या आहेत. या रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये केले. त्यानंतर श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.
रामकुंडाजवळ असलेल्या गोदावरी माता मंदिराच्या बाजूला अरुणा, वरुणा आणि गोदावरीचा संगम होतो, असे सांगतात. याचेच प्रतीक म्हणून या ठिकाणी एका चौथऱ्यावर तीन गोमुखे असून त्यातून तीनही नद्यांचे पाणी सतत वाहत असते. ते पाणी रामकुंडात येते. या ठिकाणी दीपदानही केले जाते.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतो. हा कुंभमेळा येथे दर बारा वर्षांनी होतो. गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि ज्या दिवशी आमावस्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. मात्र, यावेळी साधूंचे शाहीस्नान हे दोन ठिकाणी होते. त्यापैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि दुसरे म्हणजे रामकुंड. हे स्नान दोन ठिकाणी का होते, याचीही एक कथा आहे. नाशिकमधीलच कपिलाधारा तीर्थ येथे सत्ययुगापासून कुंभमेळा सुरू होता. असे सांगितले जाते की १७५५ मध्ये पहिल्या स्नानावरून शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये वाद झाला व तो विकोपाला गेला. त्यामुळे माधवराव पेशव्यांच्या काळात या कुंभमेळ्याचे दोन भाग करण्यात आले. त्यापैकी शंकराचे उपासक असलेल्या शैवपंथींना त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर स्नानासाठी जागा देण्यात आली, तर श्रीरामाचे उपासक म्हणजेच वैष्णवपंथींना रामकुंडावर पाठवण्यात आले. त्यामुळे कुंभमेळ्याच्या दृष्टीनेही रामकुंडाचे विशेष महत्त्व आहे.
उपयुक्त माहिती:
- नाशिक एसटी बस स्थानकापासून ३ किमी, तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून १० किमी अंतरावर
- नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- रामकुंडावर येण्यासाठी नाशिक महापालिका बसची सुविधा
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- खासगी वाहने रामकुंडाशेजारी गोदावरीच्या तीरावर येऊ शकतात
रामकुंड आणि गोदावरी घाट नाशिक – पवित्र तीर्थस्थान आणि पर्यटन

प्रस्तावना:
नाशिक हे महाराष्ट्रातील एक पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेले शहर आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर अनेक ऋषीमुनींच्या तपश्चर्येने, मंदिरांच्या उपस्थितीने आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. याच शहरात स्थित असलेले रामकुंड आणि गोदावरी घाट हे नाशिकच्या आध्यात्मिक ओळखीचे मुख्य केंद्र आहेत. येथे दररोज हजारो भक्त स्नानासाठी आणि धार्मिक विधीसाठी येतात. या ठिकाणांचे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व हे आजही अभूतपूर्व आहे.
रामकुंड – पवित्र स्नानकुंड
इतिहास
रामकुंड हे नाशिकच्या पंचवटी भागात स्थित असून याचे नाव श्रीरामाच्या वास्तव्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना याच ठिकाणी काही काळ राहिले होते. त्यांनी याच ठिकाणी स्नान केले होते आणि म्हणून या कुंडास ‘रामकुंड’ असे नाव देण्यात आले. इतिहासकारांच्या मते रामायण काळापासून या ठिकाणाचे महत्त्व टिकून आहे.
धार्मिक महत्त्व
रामकुंड हे एक अत्यंत पवित्र स्नानकुंड मानले जाते. इथे पिंडदान, श्राद्धकर्म आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने पापमुक्ती मिळते आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. नाशिकला जेव्हा कुंभमेळा आयोजित होतो तेव्हा लाखो भाविक रामकुंडात स्नानासाठी येतात.
धार्मिक विधी आणि उत्सव
- पिंडदान आणि श्राद्ध विधी: पितृपक्षात विशेषतः येथे पिंडदान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
- कुंभमेळा: दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा हा नाशिकच्या धार्मिक जीवनाचा सर्वात मोठा सोहळा असतो. यात रामकुंडाची केंद्रभूमिका असते.
- रामनवमी आणि हनुमान जयंती: या सणांदरम्यान रामकुंड परिसरात विशेष पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
Updated on:
नाशिक : दक्षिणवाहिनी गोदावरीमधील तीर्थस्नानाचे अन् सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या नाशिकमधील ‘रामकुंड’ असा उल्लेख १६९६ पासून सुरू झालाय. मात्र प्रत्यक्षात हे रामकुंड नव्हे, तर रामतीर्थ आहे. हजारो वर्षांपूर्वीच ब्रह्मपुराण, आनंद रामायणमध्ये त्यासंबंधीचा उल्लेख अधोरेखित झालेय, म्हणूनच नाशिककर आता ‘रामतीर्थ'साठी आग्रही झाले आहेत. ( references thousands of years ago in Brahmapurana Ananda Ramayana about Ramkund Nashik Latest Marathi News)
ब्रह्मपुराणातील सहाव्या अध्यायातील १४ वा श्लोक
षष्ठी र्वर्ष सहस्त्राणी भागिरथ्यवगाहमनम्।
सकृत्गोदावरी स्नानं सिंहस्थेच बृहस्पतो।।
अर्थात, साठ हजार वर्षे भागिरथीमध्ये स्नान करण्यातून जे पुण्य मिळते, ते पुण्य सिंहस्थ कुंभमेळ्यात श्री गोदावरीमधील एका स्नानातून मिळते. गुरू आणि सूर्य हे सिंह राशीत येतात, तेंव्हा सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाळ असतो. बारा वर्षांनी हा पर्वकाळ येतो. आता २०२७-२८ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात हा पर्वकाळ येणार आहे. ब्रह्मपुराणातील सहाव्या अध्यायातील १५ वा श्लोक असा : विशेषात् रामचरण प्रदानात् तीर्थसंश्रयात्। अर्थात, प्रभूरामचंद्र यांच्या वास्तव्याने पवित्र असलेले हे तीर्थक्षेत्र होय. स्मार्त चूडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना आजपर्यंत अप्रकाशित असलेली ही माहिती दिली.
परमपावन रामतीर्थ
रामतीर्थं रामकृतं सीतालक्ष्मणसंस्कृते।
तीर्थें यत्र तु गौतम्यां दृश्यतेsद्यापि मानवै :।
रामतीर्थमितिख्यातं ब्रह्महत्याविनाशनम् ।
तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै : प्रमुख्यते।।
आनंद रामायणमधील हा उल्लेख आहे. अर्थात, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे लक्ष्मण आणि श्री जानकीदेवी सीता यांच्यासमवेत वनवासासाठी नाशिकमधील पंचवटीत गौतमी तीरावर आले होते. इथे विधिपूर्वक स्नान करून वडील दशरथ राजा यांच्या श्राद्ध दानादि विधी त्यांनी केला. त्यावेळेपासून हे ठिकाण रामतीर्थ नावाने ओळखले जाऊ लागले. हे तीर्थ ब्रह्महत्या आदी पापांचा विनाश करते. त्याच्या केवळ स्मरणाने पापांचा विनाश होतो, असे वर्णन प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचे १३ वर्षे वास्तव्य
नाशिकच्या दंडकारण्यात राक्षसांचे वास्तव्य होते. दंडक राजाला शाप मिळाला होता. हा भूप्रदेश अरण्य झाले आणि त्याला दंडकारण्य असे म्हटले जाऊ लागले. प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षांच्या वनवासाच्या कालखंडात १३ वर्षे दंडकारण्यात वास्तव्यास होते. आताच्या काळाराम मंदिराच्या परिसरातील पर्णकुटीत प्रभू श्रीरामचंद्र निवासी होते. ब्रह्मपुराणातील हा दाखला विस्तृतपणे सांगताना श्री. भानोसे म्हणाले, की अयोध्या-चित्रकूटमार्गे प्रभू श्रीरामचंद्र यांना दंडकारण्यात पोचण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला.
त्या वेळी सिंहस्थ कुंभमेळा होता. शिवाय सीतामाईला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र गेले असताना त्या वेळीही दुसरा सिंहस्थ कुंभमेळा होता. प्रभू श्रीरामचंद्र आले असताना गोदावरी मातेला अत्यानंद झाला. प्रभू श्रीरामचंद्र यांची दोन, लक्ष्मणाची दोन, सीतामाईची दोन अशा सहा पावलांचा स्पर्श झाल्याने राक्षसांच्या पातकांनी ग्रस्त झालेल्या गोदावरी मातेने मी पापमुक्त झाल्याचे म्हटले. तेव्हा देवदेवतांनाही आनंद झाला आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवाय हेच तीर्थक्षेत्र जगाच्या अंतापर्यंत ‘रामतीर्थ' म्हणून विख्यात होईल, अशी आकाशवाणी झाल्याचा उल्लेख आनंद रामायणमध्ये ‘रामतीर्थम् इति ख्यातम्’ अशा श्लोकात आढळतो. (क्रमशः)
रामतीर्थाचे रामकुंड कसे झाले?
सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये रामतीर्थ परिसरात कुंडाचे बांधकाम केल्याचा दस्तऐवज सरकार दप्तरी उपलब्ध आहे. तसेच श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या आई गोपिकाबाई यांनी या कुंडाची दुरुस्ती केल्याची नोंद सरकार दप्तरी आहे. त्यापासून रामतीर्थाचा उल्लेख रामकुंड असा होऊ लागल्याचे धर्म अभ्यासकांचे मानणे आहे. आता मात्र रामकुंड अशा संबोधनाऐवजी ‘रामतीर्थ’ असेच या संपूर्ण पात्राला म्हटले जावे, यासाठी नाशिककर आग्रही आहेत.
"कलियुगात २४ ऋषींनी माणसांच्या आचार-विचारांच्या नियमांची संहिता केली आहे. काही पातकांसाठी उपाय सांगितले आहेत. रामतीर्थात स्नान, दान, मुंडण, उपवास, श्राद्ध आदी विधी केले असता, पापमुक्त होऊन जीवनाच्या मूळ प्रवाहात येता येते. त्रेतायुगात देवदेवतांनी दक्षिणवाहिनी गोदावरीचा ‘रामतीर्थ' असा उल्लेख केला असल्याने आताच्या समाजाने, प्रशासनाने आणि सरकारने ‘रामतीर्थ’ असे संबोधून आपली उत्तुंग परंपरा, शास्त्र-पुराण यांचा आदर करायला हवा." - शांतारामशास्त्री भानोसे (स्मार्त चूडामणि, नाशिक)
"पौराणिक, प्राचीन ग्रंथ, पुराण यामधून ‘रामतीर्थ’ असा उल्लेख अधोरेखित झाल्याने ‘रामतीर्थ’ असा शब्द भाविकांप्रमाणे सरकार आणि प्रशासनाने आपल्या दप्तरी नोंदवून पुढे प्रचलित ठेवणे आवश्यक आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाचा ‘रामतीर्थ' असा उल्लेख केला जावा, यासाठीचा आग्रह राहणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हे त्यासाठीचे औचित्य आहे. त्यादृष्टीने पुरोहित संघ प्रयत्नशील राहणार आहे."
- सतीश शुक्ल
Triveni Sangam, Nasik
In Hindu tradition, Triveni Sangam is the “confluence” of three rivers. Sangama is the Sanskrit word for confluence. The point of confluence is a sacred place for Hindus. A bath here is said to flush away all of one’s sins and free one from the cycle of rebirth.
Nasikana Dharmik Gramstanam meaning Nashik.
It is venerated as the town of Lord Rama, the hero of the epic Ramayana, who spent some time of his exile here. Great poets of yore like Rishi Valmiki, Mahakavi Kalidas, and Bhavabhooti have praised this holy city in many of their works. River Godavari flows through the city of Nashik.
It is believed that Lord Ram had taken a bath at the Ramkund Ghat here. Many famous sages like Chaitanya Mahaprabhu have bathed in her waters as an act of worship.
The important temples here are Kapaleshwar Mandir, Gore Ram Mandir, and Kale Ram Mandir.
The name Panchavati was due to the presence of five banyan trees. These trees are marked even today. There is a cave nearby called Sita Guha where Rama, Sita, and Lakshmana prayed to Lord Shiva.
Numerous small temples and pilgrimage places dot the banks of the river. The main temple on the ghats is the Ganga Godavari temple.
Kalaram Mandir Sansthan, Nasik | One of the famous place in India divine foot touch of lord Shree Rama
मंदिरातील माहिती प्राचिन इतिहास
श्रीरामरक्षेतील वरील श्र्लोका प्रमाणे गर्भगृहात मध्यभागी श्री प्रभुराम त्यांच्या उजव्या बाजुस लक्ष्मण व डाव्या बाजुस सिता ह्यांच्या मुर्ती असून समोरील सभामंडपात दास मारूती 'श्री राम जय राम जय जय राम' असा जप करीत हात जोडून प्रभू सेवेसाठी उभा आहे. ह्या सभामंडपातील मारूतीची मूर्तीची दृष्टी साध्यता प्रभुरामचंद्रांच्या चरणांशी खीळलेली आहे.
मंदिरातील मूर्ती प्राचीन असून कमीत कमी दहाव्या शतकाच्या पूर्वीच्या असाव्यात मूर्तीच्या प्राचिनत्वाचा शोध घ्यायचा झाल्यास
१) श्रीचक्रधरस्वामी तेराव्या शतकात पंचवटीतील राममंदिरात येवून गेल्याचा उल्लेख लिला चरित्रात सापडतो.
गोसावी नाशिकासि बीजे केले पंचवटीये अवस्थान आले दीस दोनचारी ( एकीवासना ) रामाच्या देऊळी उद्येचिये देउळी उद्येयाचिये वेळी चौकी आसन जाल्हे
- संदर्भ लीलाचरित्र लीला क्र २३६, पा क्र १२५ संपादन प्रा श्री पुरूषोत्तम नागपुरे
२) संत एकनाथ महाराज (१५९९) काळाराम मंदिरात श्रीराम प्रभुच्या दर्शनाला आले होते. त्या संदर्भात काव्य या श्री प्रभुरामांचे साक्षीने लिहीले.
श्री गुरूदत्तात्रे यांच्या सगुन सात्काराने एकनाथांना सिध्दावस्था प्राप्त झाली. श्री जनार्दनस्वामिंनी त्यांना तिर्थाट करन्याचा सल्ला दिला तिर्थाटन करून परत आल्यावर नाथांनी सदगुरूंचे दर्शन घेतले तदनंतर नाशिक येथे पंचवटीत जाऊन प्रभु श्रीरामचंद्राचे दर्शन घ्यावे अशी उत्कठ इच्छा निर्माण झाल्याने गुरूशिष्याची जोडी नाशिकला निघाली वाटेत चंद्रभट नामक एका विद्वान ब्राम्हणाच्याघरी त्यांनी मुक्काम केला. वे. शा. स. चंद्रभट उत्तम प्रवचनकार होते. त्यांनी त्या रात्री चतुश्र्लोकी भागवतावर भावपूर्ण शब्दात निरूपण केले गुरूशिष्याने तन्मयतेने ते श्रवण केले. पुढे नाशिक येथील प्रभु श्रीरामांच्या साक्षीणे स्वामिनी नाथांना चतुश्र्लोकी भागवतावर प्राकृत भाषेत टीका लिहीण्याची आज्ञा केली. गुरूआज्ञा शिरोधार्थ मानून नाथांनी चतुश्र्लोकी भागवतावर प्राकृत भाषेत ओविबध्द टिका लिहीली. सदगुरू जनार्दनस्वामिंच्या आदेशानुसार नाथांनी लिहीलेला हा पहिला ग्रंथ. त्रंबकेश्वर येथे महा. सदगुरूंच्या सानिध्यात पूर्णत्वास गेला (श्रीराम भागवत पुरानातील संदर्भानुसार भगवंतानी ब्रम्हदेवास प्रथमतः चतुश्र्लोकी भागवत सांगीतले)
३) श्री समर्थ रामदास स्वामींना याच श्रीराम प्रभुंच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला. त्या संदर्भात...
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आधीदैवत श्री समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर असिम श्रध्दा श्री समर्थांनी लग्नमंडपात सावधान हा शब्दऐकल्यावर आपले गाव जांब येथून पलायन केले व नाशिकला आले. पंचवटीत आले याच श्री प्रभुंच्या मंदिरात आले. त्यावेळीपण ह्याच श्रीराम लक्ष्मण सीता व समोर हनुमान या मुर्ती होत्या मंदिर लाकडी होते पण भव्य होते. मंदिरात प्रवेश करताच त्यांचे सर्वांग रोमांचीत झाले. अःतकरणाच्या पात्रातून अष्टसात्वि भावांची गोदावरी भरभरून वाहू लागली इथेच त्यांना रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन झाले. महाविर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले त्याचीच एक झलक रामदास स्वामींना या काळाराम मंदिरात अनुभवली नाशिक पंचवटीत काळाराम मंदिरात समर्थांना श्रीराम प्रभुंना साक्षात्कार झाला व त्यांच्या नवजिवनाचा भावपूर्ण शुभारंभ झाला.
२) संदर्भः संपादकीय विद्या वाचस्पती डॉ. अरून शंकर वाडेकर श्री संत एकनाथ महाराज लिखीत श्री भावार्थ रामायण
३) संदर्भः चिंता करीतो विश्र्वाची लेखक समर्थ प्रेमी स्पनिल चिंचोळकर
श्री समर्थ पंचवटीपासून जवळच अंदाजे ३ कि. मी. अंतरावर असलेल्या टाकळी या गावी मुक्कामास होते. टाकळीत रात्री मुक्काम करावा सकाळी उठून नंदिनी नदिच्या तीरावर स्नान संध्या करावी दररोज बाराशे सुर्यनमस्कार घालावे त्यानंतर पाण्यात उभे राहून दोन तास गायत्री मंत्राचा जप करावा. साडेबारा वाजेपर्यंत रामनामाचा जप करावा दुपारी मधुकरीसाठी पंचवटीत यावे नंतर काळाराम मंदिरात प्रवचने ऐकावीत. नाशकातील विद्वान मंडळीच्यां संग्रहातील ग्रंथाचा धांडोळा घ्यावा आणि रात्री पुन्हा टाकळीला परतावे असा त्यांचा दिनक्रम असे त्याकाळी बारा महिने चालणार्याथ किर्तन प्रवचनांसाठी काळाराम मंदिर प्रसिध्द होते. श्री समर्थ रामदास स्वामिंचा हा काळ इ. सन १६२० ते इ. सन. १६३२ असा आहे.
श्री समर्थ इ.सन १६४४ मध्ये कृष्णातिरी आल्यानंतर दोन चार वर्षातच त्यांनी पंचवटीच्या रामउपासकांना पत्र लिहीले आहे. या पत्रात समर्थांची अत्यंत मधुरभक्ती कोमल वाणीने प्रकट झाली आहे. जेथे पडाली कृपादृष्टी रघुत्तमरायाची यावरून श्रीरामांच्या साक्षात्काराचे हे पुण्यस्थळ श्री काळाराम मंदिर समर्थांना परमप्रिय वाटत आहे. या पत्रात समर्थ म्हणतात....
जतनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी |
जेथे पडली कृपादृष्टी | रघूत्तमरायाची ||१ ||
प्रत्यकी माझा नमस्कार | देवासी करावा निरंतर |
मजकारणे शरीर | इतुके कष्टवावे ||९ ||
४) संतश्रेष्ट श्री गजानन महाराज (शेगाव) श्री काळाराम मंदिरात येऊन गेले व त्यांना श्री रामप्रभुंचा साक्षात्कार झाला. त्यासंदर्भात....
संतश्रष्ट श्री गजानन महाराज ( शेगाव) २३ फब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारूण्य दशेत शेगावी दिसले व ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधिस्त झाले.
श्री गजानन विजयः अध्याय ११ वा
श्री गजानन महाराज काळाराम मंदिरात आले व येथे त्यांचे परम मित्र श्री नृसिंह महाराज (गोपाळदास महाराज यांना भेटले) त्या संदर्भात श्री गजानन विजय या ग्रंथात अध्याय क्रमांक ११ मध्ये खालील प्रमाणे उल्लेख आहे.......
मग ती मंडळी निघाली | शेगावहिणी भली |
शिवरात्रीस येती झाली | त्रंबकेश्र्वरी कारणे ||८२ ||
कुशावर्ती केले स्नान | घेतले तयाचे दर्शन |
गंगाव्दार जाऊन | पुजन केले गौतमीचे ||८३||
वंदिली माय निलांबिका | तेवी गहणी निवृत्तीनाथ देखा
तेथून आपले नाशिका | गोपाल दासास भेटावया || ८४||
हा गोपालदास महंत | काळाराम मंदिरात |
धुनी लाऊन व्दारात | पंचवटीच्या बसलासे||८५ ||
राम मंदिरासमोर | एक पिंपळाचा होता पार |
शिष्यासहित साधुवर | तेथे जाऊन बैसले||८६||
गोपालदास आनंदि झाले | बोलले जवळच्या मंडळीस |
उत्तम माझा बंधू आला | वर्हा डातून गजानन ||८७||
जाहया त्याचे दर्शन | अनन्यभावे करून |
माझी ही भेट म्हणून | नारळ साखर त्याशी द्या ||८८||
हा घर आला कंठात | तो मी एक साक्षात |
देह भिन्न म्हणून | नारळ साखर त्याशी द्या ||८९
शिष्यांनी तैसेच केले | दर्शन घ्याया अवघे आले
केठा माजी घातिले | दिलेल्या पुष्पहाराला ||९०||
नारळ आणि खडीसाखर | ढोविली स्वामिसमोर |
ती पाहुन गुरूवर | ऐसे बोलले भास्कराला ||९१||
हा प्रसाद अवघ्याशी वाटी | परी म होऊ देई दाटी |
माझ्या बंधूनची झाली भेटी | आज या पंचवटीत ||९२||
याच वेळी श्री गजानन महाराज श्री प्रभुरामचंद्राचे दिव्य दर्शन साक्षात्कार झाल्याचा उल्लेखही आढळतो.
काळाराम - Department of Tourism Maharashtra
काळाराम
काळाराम मंदिर नाशिकच्या पवित्र भूमीत उभे असलेले एक अद्वितीय धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. काळ्या दगडात कोरलेल्या भव्य श्रीरामाच्या मूर्तीमुळे याला “काळाराम” हे नाव मिळाले. केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, हे मंदिर भारतातील सामाजिक सुधारणा चळवळींचे साक्षीदारही राहिले आहे. या मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पावर नजर टाकताच त्याची अप्रतिम रचना मंत्रमुग्ध करते. उंच भव्य खांब, सुबक कोरीवकाम आणि काळ्या दगडांची मजबुती यामुळे मंदिराला एक वेगळेच तेज प्राप्त झाले आहे. पवित्र गोदावरी नदीच्या सान्निध्यात वसलेले हे स्थान भक्तांसाठी अपार श्रद्धेचे केंद्र आहे.
इतिहासप्रेमींना आणि भक्तांना येथे एका वेगळ्याच आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो. सामाजिक सुधारकांनी येथे अनेक चळवळी घडवल्या, ज्यांनी भारतीय समाजाला नवा दिशा दिला. अशा या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणी भेट देणे म्हणजेच श्रद्धा, परंपरा आणि इतिहास यांचा एक अद्वितीय मिलाफ अनुभवणे.
इतिहास
काळाराम मंदिराचा इतिहास १८व्या शतकापर्यंत मागे जातो. लोककथेनुसार, मराठा साम्राज्यातील सरदार रंगराव ओढेकर यांना एका दैवी दृष्टांतात श्रीरामाची काळ्या दगडातील भव्य मूर्ती गोदावरी नदीत विलीन झालेली दिसली. या दृष्टांताने प्रेरित होऊन त्यांनी त्या मूर्तीचा शोध घ्यायचे ठरवले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी ती मूर्ती बरोबर त्याच ठिकाणी सापडली जिथे त्यांनी स्वप्नात पाहिली होती. या अद्भुत घटनेनंतर, १७८८ साली त्यांनी या भव्य मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली, आणि १७९२ मध्ये मंदिर पूर्ण झाले.
मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर भारतीय इतिहासातही त्याला विशेष स्थान आहे. १९३० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. दलितांना मंदिरात प्रवेश आणि पूजा करण्याचा हक्क मिळावा, या मागणीसाठी त्यांनी मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केले. या घटनेमुळे जातीय विषमतेविरोधातील संघर्षाला नवीन दिशा मिळाली आणि सामाजिक सुधारणा चळवळीला गती मिळाली. आजही हे मंदिर श्रद्धा आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते आणि भाविकांसाठी तसेच समाजसुधारकांसाठीही प्रेरणादायी ठरते.
मंदिर संकुल
काळाराम मंदिर हेमाडपंथी वास्तुशैलीचे एक भव्य उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर काळ्या बेसाल्ट दगडातून कोरलेले असून, त्याच्या बांधकामात असलेले अप्रतिम शिल्पकौशल्य आणि भक्तीभाव थक्क करणारा आहे. प्रत्येक दगड सुबक कोरला गेला असून, शतकानुशतके टिकणारी ही भव्य रचना आजही तितकीच भव्य आणि भक्कम उभी आहे.
मंदिराचा मुख्य कळस तब्बल ७० फूट उंच असून, त्यावर सोन्याच्या पत्र्याने मढवलेला मुकुट सूर्यप्रकाशात लखलखतो. मंदिराच्या भोवती १७ फूट उंच भक्कम तटबंदी असून, संपूर्ण मंदिर संकुल सुमारे ७०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. मंदिराच्या चारही दिशांना उत्तरेस, दक्षिणेस, पूर्वेस आणि पश्चिमेस असलेल्या भव्य प्रवेशद्वारांमधून सर्व भक्तांना मुक्त प्रवेश मिळतो, हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे.
मंदिराच्या गर्भगृहात काळ्या दगडातून कोरलेल्या भगवान श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्यांचे तेजस्वी स्वरूप भक्तांना मंत्रमुग्ध करते. प्रवेशद्वाराजवळ विराजमान भगवान हनुमानाची भव्य मूर्ती श्रीरामाच्या दिशेने अनंत भक्तिभावाने नतमस्तक आहे. मंदिराचा प्रत्येक कोपरा दैवी कलाकुसरीचे दर्शन घडवतो. भक्ती, इतिहास आणि वास्तुशास्त्र यांचे अनोखे मिश्रण असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वाधिक पवित्र आणि उन्नत स्थळांपैकी एक मानले जाते.
धार्मिक विधी आणि उत्सव
काळाराम मंदिर विविध हिंदू सणांच्या काळात भक्तिभावाने गजबजून जाते. संपूर्ण भारतातून हजारो भक्त येथे एकत्र येतात. सर्वात भव्य सोहळ्यांपैकी एक म्हणजे रामनवमी. मार्च-एप्रिलमध्ये साजरा होणारा हा उत्सव भगवान श्रीरामाच्या जन्मदिनानिमित्त अतिशय भव्य प्रमाणात पार पडतो. या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक होतात. भक्तांच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारांच्या गजरात श्रीरामाची भव्य रथयात्रा नाशिक शहराच्या मुख्य रस्त्यांवर काढली जाते. या दिवशी मंदिरात भक्ती आणि आध्यात्मिकतेचे अद्भुत वातावरण असते.
दसरा हा आणखी एक महत्त्वाचा सण येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीरामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून मंदिरात विशेष पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक विधी पार पडतात. या वेळी मंदिरात असंख्य भाविकांची गर्दी होते आणि संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषाने दुमदुमतो.
चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा मराठी नववर्षदिन मंदिरात मोठ्या आनंदाने साजरा होतो. या दिवशी मंदिरात विशेष आरती, पूजा आणि विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भक्तगण नवीन वर्षाची सुरुवात श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून करतात. या सर्व सणांमुळे काळाराम मंदिर भक्ती, आनंद आणि दिव्यतेने भारलेले असते, जे प्रत्येक भक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
भेट देण्यासाठी योग्य काळ
काळाराम मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते, पण मंदिराची खरी दिव्यता अनुभवायची असेल तर ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात हवामान आल्हाददायक असते, ज्यामुळे मंदिराच्या सुंदर वास्तूशिल्पाचा शांतपणे आस्वाद घेता येतो. या महिन्यांत मंदिराच्या पवित्र आणि शांत वातावरणात भक्तीभावाने दर्शन घेतल्यास मनाला विशेष समाधान लाभते.
ज्यांना अधिक भक्तिमय आणि भव्य सोहळ्याचा अनुभव घ्यायचा असेल, त्यांनी रामनवमी किंवा दसऱ्याच्या काळात येथे अवश्य भेट द्यावी. या सणांदरम्यान मंदिर भक्तीने गजबजून जाते. मंत्रोच्चार, भजन, आरत्या आणि विशाल मिरवणुकींनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. दीपमाळांनी उजळलेले मंदिर, रंगीबेरंगी सजावट आणि हजारो भक्तांची उपस्थिती हा एक अविस्मरणीय सोहळा बनतो.
शांत, समाधानी दर्शन असो किंवा जल्लोषपूर्ण उत्सवांचा अनुभव, काळाराम मंदिर प्रत्येक भक्ताला अध्यात्मिकतेचा आणि भक्तीचा अमूल्य आनंद देणारे ठिकाण आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला शांती, सकारात्मकता आणि भगवंताच्या उपस्थितीची जाणीव होते.
कसे पोहोचाल?
काळाराम मंदिरा पर्यंत पोहोचणे अतिशय सोपे आहे, कारण नाशिक उत्कृष्ट वाहतूक सुविधांनी जोडलेले आहे. येथील सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे नाशिक विमानतळ, जे फक्त २४ किमी अंतरावर आहे. मुंबई आणि पुण्याहून नियमित विमानसेवा उपलब्ध आहे. विमानतळावरून सहज टॅक्सी, रिक्षा किंवा बसद्वारे मंदिरात पोहोचता येते.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नाशिक रोड रेल्वे स्थानक सर्वात जवळचे आहे, जे मंदिरापासून फक्त १० किमी दूर आहे. हे स्थानक भारतातील प्रमुख शहरांशी उत्तमरीत्या जोडलेले आहे, त्यामुळे यात्रेकरूंना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. स्थानकावरून टॅक्सी, रिक्षा आणि स्थानिक बस सहज उपलब्ध असतात, ज्यामुळे मंदिर गाठणे सोपे होते.
रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी नाशिक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून सुमारे १७० किमी आणि पुण्यापासून २१० किमी अंतरावर असलेल्या नाशिकला राज्य परिवहनच्या बससेवा तसेच खाजगी टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. एकदा नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक बस आणि रिक्षांद्वारे मंदिरात आरामात पोहोचता येते. अशा सोयीसुविधांमुळे भाविकांना सहज, सोयीस्कर आणि सुखद यात्रा अनुभवता येते.
आसपासची पर्यटन स्थळे
नाशिकची यात्रा केवळ काळाराम मंदिरावर थांबत नाही. ही प्राचीन नगरी पौराणिक कथा, ऐतिहासिक स्थळे आणि आध्यात्मिक शांततेने भरलेली आहे. मंदिराच्या अगदी जवळ, सीता गुंफा एक अद्भुत ठिकाण आहे. येथेच रावणाने सीतेचे अपहरण केल्याची आख्यायिका आहे. गुहेत प्रवेश करताच मंद प्रकाश आणि भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती भक्तांना मंत्रमुग्ध करतात.
थोड्याच अंतरावर, गोदावरीच्या पवित्र तीरावर रामकुंड आहे. या घाटावर श्रद्धाळू स्नान करतात, असे मानले जाते की येथे स्नान केल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. हिंदू परंपरेनुसार, अनेक जण आपल्या पूर्वजांच्या अस्थी येथे विसर्जित करतात. रामकुंडाच्या आसपासच पंचवटी हे पवित्र स्थळ आहे. याच ठिकाणी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील काही काळ व्यतीत केला होता अशी आख्यायिका आहे. घनदाट वृक्ष, जुनी मंदिरे आणि शांत वाहणारी गोदावरी नदी या परिसराला अधिक पवित्र आणि भव्य बनवतात.
काळाराम मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटरवर सुंदरनारायण मंदिर आहे. भगवान विष्णूंचे हे मंदिर अप्रतिम कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रभूंच्या मूर्तीवर पडणारा प्रकाश अतिशय मोहक दिसतो. त्याचप्रमाणे, केवळ १.८ किलोमीटर अंतरावर कपालेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराचे हे मंदिर नंदीशिवाय आहे, जे शिवमंदिरांसाठी दुर्मीळ आहे. या मंदिराची पौराणिकता आणि त्याचे रहस्य भक्तांना अधिक आकर्षित करते.
नाशिकमध्ये धार्मिक स्थळांशिवाय ऐतिहासिक वारसाही समृद्ध आहे. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेली पांडवलेणी लेणी ही बौद्ध वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नाशिकपासून अवघ्या ३० किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शिवभक्तांसाठी हे मंदिर नक्कीच एक अविस्मरणीय स्थान आहे.
नाशिकच्या प्रत्येक गल्लीबोळात इतिहास आणि आध्यात्मिकता दडलेली आहे. भक्ती, निसर्ग आणि प्राचीन परंपरांचा अनोखा मिलाफ येथे अनुभवता येतो. ही यात्रा एकदा केली की मन पुन्हा-पुन्हा याठिकाणी यावे असे वाटल्याशिवाय राहत नाही.
श्रद्धा आणि भक्तीचा प्रवास
काळाराम मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ दर्शन नाही, तर एक अद्भुत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे. नाशिकच्या पवित्र भूमीत वसलेले हे मंदिर भक्ती, वास्तुकला आणि इतिहास यांचे अनोखे संगमस्थान आहे. काळ्या दगडात कोरलेली अप्रतिम रचना, भव्य शिखर आणि शतकानुशतके टिकून राहिलेली भव्यता यामुळे हे मंदिर महाराष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे.
या मंदिराचे पौराणिक महत्त्व अपार आहे. प्रभू रामचंद्रांची काळ्या दगडातील मोहक मूर्ती भक्तांना मंत्रमुग्ध करते. संपूर्ण मंदिरातील शांतता आणि दिव्यता मनाला अपूर्व समाधान देते. येथील वातावरणात एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा जाणवते, जी प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करते. इतिहासप्रेमींनीही येथे जरूर यावे. पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिर नाशिकच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केलेल्या सत्याग्रहाने इतिहास घडवला. त्या पवित्र जागेवर उभे राहण्याचा अनुभवच अद्वितीय आहे.
या मंदिराची यात्रा एक अविस्मरणीय क्षण देऊन जाते. भक्तिभावाने नतमस्तक व्हा, भव्य वास्तुकलेचे सौंदर्य अनुभव करा आणि नाशिकच्या या ऐतिहासिक मंदिराच्या दिव्य वातावरणात स्वतःला हरवून टाका. एकदा नक्की भेट द्या आणि प्रभू रामाच्या कृपेचा अनमोल अनुभव घ्या!
काळाराम मंदीर सत्याग्रह: जेव्हा राम मंदिरात प्रवेशासाठी बाबासाहेबांनी दगडांचा वर्षाव सहन केला - BBC News मराठी
काळाराम मंदीर सत्याग्रह: जेव्हा राम मंदिरात प्रवेशासाठी बाबासाहेबांनी दगडांचा वर्षाव सहन केला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वाचन वेळ: 5 मिनिटे
(हा लेख पहिल्यांदा एप्रिल 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
तो रामनवमीचा दिवस होता. प्रभू श्रीरामाचा रथ ओढण्यासाठी आतूर झालेले तरुण रथाची वाट पाहत उभे होते. तेव्हाच हलकल्लोळ उडाला. काही लोकांनी तो रथ पळवला. वाट पाहणारे तरुण त्या रथामागे धावले. तितक्यात त्या तरुणांवर आणि त्यांच्या नेत्यावर दगडधोंड्यांचा वर्षाव सुरू झाला.
या प्रसंगाला आता 92 वर्षं उलटली. हा रथ होता नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिरातल्या रामाचा आणि हा नेता म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे. फक्त सनातनी हिंदूंनाच जागं करण्यासाठी नव्हे तर त्यावेळचे सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 ला सुरू झाला आणि पुढं पाच वर्षं चालला.
गोदाकाठी वसलेलं नाशिक हा सनातनी हिंदूंचा गड समजला जायचा. त्याच नाशिकातल्या काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला. डॉ. आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉ. आंबेडकरांनी केला."
तो काळ होता इंग्रजांच्या गुलामगिरीचा. इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती. तर धर्ममार्तंडशाहीविरोधात डॉ. आंबेडकरांनी दंड थोपटले होते. कीर पुढे लिहितात, "आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."
अभूतपूर्व मिरवणूक
नाशिक शहराने यापूर्वी कधीही पाहिली नसेल अशी मिरवणूक त्या दिवशी पाहिली. 2 मार्च रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये परिषद भरली. त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती आणि त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
'श्रीराम जयराम'च्या जयघोषात ही मिरवणूक निघाली होती, असं कीर सांगतात. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथं एक भव्य सभा झाली.

फोटो स्रोत, Godong/getty
दुसऱ्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत 125 पुरुष आणि 25 स्त्रिया जातील, असं ठरलं. मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता.
पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग 9 एप्रिल 1930 अर्थात रामनवमीचा दिवस उजाडला. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असं ठरलं की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले.
पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता.
अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. आंबेडकरांवर दगडं पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पण त्यांना जखम झाली होती. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता. नंतर त्याचा मृत्यू झाल्याचं डॉ. आंबेडकरांनी पत्रात लिहिलं आहे.
"सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असं धनंजय कीर यांनी लिहिलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावं लागलं. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरं खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.
या लढ्याने काय साध्य केलं?
आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केलं? असं विचारलं असता अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं.
आंबेडकरांचा हा लढा फक्त नाशिक पुरताच मर्यादित नव्हता तर त्या आधी अमरावती येथे देखील मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न करण्यात आला होते. जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न विचारला जात होता.
या प्रश्नाचं उत्तर डॉ. आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिलं आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या 'संघर्ष महामानवाचा' या पुस्तकात डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा अंश देण्यात आला आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
पुढे डॉ. आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."
आंबेडकरांच्या सत्याग्रहाचं एक वैशिष्ट्यं होतं म्हणजे सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलनं अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर त्यांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असं ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचं आंदोलन स्थगित केलं.
सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे सांगतात.
'हा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही'
शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. 1933 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती. यावेळी गांधी यांनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.
(संदर्भ- डॉ. आंबेडकरांची भाषणे आणि पत्रे, प्रकाशक भारतीय परराष्ट्र खाते)
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. आंबेडकरांनी महात्मा गांधी यांना आपली मंदिर प्रवेशाबाबतची भूमिका सांगितली होती. ते गांधीजींना म्हणाले होते, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणं महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचं निर्दालन होणं आवश्यक आहे. जातीव्यवस्थेचं समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."
'हिंदू हे शोषितांना मानव म्हणून स्वीकारतील का?'
काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी सवर्णांना केलेलं एक आवाहन होतं. 2 मार्च 1930 रोजी त्यांनी जे भाषण केलं होतं ते केवळ त्यांच्या अनुयायांसाठीच नव्हतं तर सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारं होतं. हे भाषण डॉ. आंबेडकर यांची भाषणं आणि पत्रं (प्रकाशक- परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, भाग 17) मध्ये आजही वाचायला मिळतं.
ते म्हणाले होते, "आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत.
"काळाराम मंदिरात प्रवेश करणं म्हणजे हिंदू मनाला केलेलं आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवलं. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."
Kalaram Mandir Nasik : ऐतिहासीक आहे नाशिकचे काळाराम मंदिर, श्रीरामाशी आहे जवळचा संबंध
नाशिक : 22 जानेवारीला अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. अभिषेकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, पीएम मोदींनी अभिषेक करण्यापूर्वी 11 दिवस चालणाऱ्या विधीला सुरुवात केली आहे. नाशिकच्या पंचवटीपासून या विधीला सुरुवात झाली आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिराला (Kalaram Mandir) भेट दिली होती. आज आम्ही तुम्हाला प्रभू रामाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे काळाराम मंदिराविषयी सांगणार आहोत.
असे आहे या मंदिराचे वैशिष्ट्य
काळाराम मंदिर हे भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांना समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे नाशिक पंचवटीजवळ आहे. हे मंदिर 1782 मध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर सुरुवातीला लाकडाचे होते आणि त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 12 वर्षे लागली. या मंदिराभोवती 17 फूट उंच भिंती असून संपूर्ण मंदिर परिसर 245 फूट लांब आणि 105 फूट रुंद आहे. हे मंदिर भगवान श्री रामाच्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे.
श्रीरामांनी त्यांचा बहुतांश काळ या भागात वनवासात घालवला
असे मानले जाते की वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी त्यांचा बहुतेक वेळ पंचवटीत माता सीता आणि लक्ष्मणासोबत घालवला होता. या ठिकाणच्या अनेक पौराणिक कथा आहेत. चला जाणून घेऊया काळाराम मंदिराशी संबंधित कथा.
काळाराम मंदिराशी संबंधित कथा
धार्मिक कथांनुसार, प्रभू श्रीराम वनवासात पंचवटीत राहिले तेव्हा ऋषीमुनींनी त्यांना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. श्रीरामांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि कृष्णरूप धारण करून ऋषीमुनींना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त केले. काळाराम मंदिरात श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांची काळ्या पाषाणापासून बनलेली उभी मूर्ती आहे.
Kalaram Mandir - 5 Unique Tales, Mandir Satyagraha & More | That's In India
ड्रेस कोड
रूढीवादी, पारंपारिक
Note
Check rules before clicking any photographs.
Best Time to Visit
Any time is good to visit, but winter (September – February) is preferable.
Shree Kalaram Mandir Sansthan
2Q4W+JXJ, Nirman upavan C-3, Sita Gufaa Rd, opposite Kalaram Temple East door, Panchavati, Nashik, Maharashtra 422003
१२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराला भेट दिली. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी त्या दिवशी ११ दिवसांचे उपवासही सुरू केले. शिवाय, काळाराम मंदिर हा यूपीएससी परीक्षेतील एक विषय आहे.
हे आपल्याला हिंदू धर्मात आणि भारतीय इतिहासात काळाराम मंदिराचे विशेष महत्त्व सांगते. आणि हे मार्गदर्शक ते का आहे ते अधोरेखित करण्याचा उद्देश आहे.
अनुक्रमणिका
मंदिराचा आढावा
हे मंदिर स्वतःच एक चमत्कार आहे. पण मंदिराचे पंडितजी (पुजारी) यांच्या मते, काळाराम मंदिराचे दोन अद्वितीय पैलू आहेत:
- मंदिराची थीम काळ्या रंगाची आहे . हिंदू मंदिरांमध्ये हे सहसा दिसून येत नाही. भगवान राम, लक्ष्मण, माता सीता आणि अगदी महावीर हनुमानजी यांच्या मूर्ती काळ्या रंगात आहेत. मूर्तींव्यतिरिक्त, मंदिर देखील काळ्या दगडांनी बनलेले आहे.
- भगवान रामाची मूर्ती अभयमुद्रा मुद्रेत आहे. इतर मंदिरांमध्ये भगवान रामाची मूर्ती हातात 'धनुष्य' घेऊन आहे. परंतु काळाराम मंदिरात भगवान रामाचा उजवा हात अभयमुद्रा मुद्रेत त्यांच्या छातीवर आहे.
काळाराम मंदिराच्या आख्यायिका आणि महत्त्व
- मंदिरात ८४ कलात्मक कोरलेले खांब आहेत. हे खांब एका आत्म्याला मानव म्हणून पुनर्जन्म घेण्यापूर्वी ज्या ८४ लाख प्रजातींमधून जावे लागते त्या चक्राचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते.
- मुख्य मंदिरात जाण्यासाठी १४ पायऱ्या आहेत. या पायऱ्या भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतिनिधित्व करतात.
- दंडकारण्य वनात राक्षसांना मारण्यासाठी भगवान रामाने 'काल' (काळा) रूप (अवतार) घेतला होता अशी स्थानिक आख्यायिका आहे. म्हणूनच त्याला 'कालराम' हे नाव पडले.
- महावीर हनुमान हे भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त आहेत. वास्तुविशारदांनी मंदिराची रचना अशा प्रकारे करून कशी दाखवली आहे की हनुमानाच्या मूर्तीतून भगवान रामाची मूर्ती दिसू शकेल हे मला खूप आवडले.
- मंदिरात एक खूप जुने झाड आहे. मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर असा दावा आहे की या झाडाच्या दगडाखाली भगवान दत्तात्रेयांच्या पावलांचे ठसे आहेत. दत्तात्रेय हे तिन्ही त्रिदेवांचे अवतार असल्याचे मानले जाते.
काळाराम मंदिराची स्थापत्य रचना
काळाराम मंदिरात काळ्या दगडापासून बनलेला ७० फूट उंच मनोरा आहे. संपूर्ण मंदिर १७ फूट उंच काळ्या दगडाच्या भिंतीने वेढलेले आहे. भिंतींच्या आत, मंदिर परिसर सुमारे ७०,००० चौरस फूट व्यापतो .
आणि संकुलाच्या आत, एक स्वतंत्र असेंब्ली हॉल आहे जिथे भाविक एकत्र येतात. यामुळे दररोज येणाऱ्या शेकडो आणि हजारो भाविकांसाठी पुरेशी जागा मिळते.
काळाराम मंदिर नागर शैलीत बांधले गेले आहे. या इमारतीवर ३२ टन सोन्याचा मुलामा चढवला आहे . त्यावर रामायण सारख्या प्राचीन 'कथांमधील' (महाकाव्ये) दृश्ये दर्शविणारी तपशीलवार कोरीवकाम देखील आहे.
परिसरात भगवान राम, लक्ष्मण, माता सीता आणि महावीर हनुमान यांची मूर्ती आहे. या सर्व मूर्ती काळ्या रंगात आहेत. मंदिराबाहेर विविध देवतांची विविध छोटी मंदिरे देखील आहेत. याशिवाय मंदिराच्या बांधकामामागील व्यक्ती स्वर्गीय सरदार रंगराव ओढेकर यांची मूर्ती आहे.
आज, भगवान रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी दररोज लाखो भाविक येथे येतात.
काळाराम मंदिराचा उगम आणि इतिहास
असे मानले जाते की भगवान रामाची काळी मूर्ती सुमारे २००० वर्षे जुनी आहे . तुर्की आक्रमणादरम्यान, ब्राह्मणांनी ती मूर्ती वाचवण्यासाठी गोदावरी नदीत बुडवली. तेव्हापासून, एका लहान मंदिरात, जिथे आज काळाराम मंदिर आहे, एका अज्ञात देवतेची (देवाची) मूर्ती होती.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, सरदार रंगराव ओढेकर यांना काळ्या मूर्तीच्या स्थानाबद्दल एक दिव्य स्वप्न पडले. आणि चमत्कारिकरित्या, त्यांना गोदावरी नदीत भगवान रामाची मूर्ती सापडली. ज्या ठिकाणी मूर्ती सापडली त्या जागेला आता राम कुंड म्हणतात.
या शोधामुळे १७८० मध्ये काळाराम मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सरदार रंगराव ओढेकर यांच्या निधीतून हे बांधकाम सुमारे १२ वर्षे चालले. मंदिर बांधण्यासाठी सुमारे २००० कामगार आणि २३ लाख रुपये लागले. तसेच, बांधकामात वापरलेले दगड रामशेज (नाशिकपासून १० किमी) येथून आणण्यात आले होते.
ही आकडेवारी कदाचित गोष्टींचे पूर्ण मूल्य दर्शवू शकणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही विचार करता की या घटना १७ व्या शतकात घडल्या, तेव्हा तुम्हाला आपल्या निर्मात्यावर लोकांचा किती खोल विश्वास होता हे दिसून येते.
काळाराम मंदिर सत्याग्रह
प्राचीन भारतात दलितांसारख्या खालच्या जातीच्या लोकांविरुद्ध मोठा भेदभाव होता. अनेक गोष्टींबरोबरच, दलितांना मंदिरात प्रवेश नाकारला जात असे. अशा अनेक गोष्टींमुळे भारतात जातिविरोधी चळवळ उभी राहिली. या चळवळीत काळाराम मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली.
२ मार्च १९३० रोजी डॉ. बी.आर. आंबेडकरांनी काळाराम मंदिरात एक निदर्शने आयोजित केली. या शांततापूर्ण निदर्शनाचा उद्देश दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा या मागणीसाठी होता. सुमारे पाच हजार दलितांनी यात भाग घेतला, त्यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्याच्या त्यांच्या हक्काची मागणी करण्यासाठी गाणी गायली आणि युद्धाचे नारे दिले.
७ एप्रिल १९३० रोजी काळाराम मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या रामनवमीपर्यंत हा निषेध शांततेत होता. त्या दिवशी उच्चवर्णीय आणि निम्नवर्णीय लोकांमध्ये संघर्ष झाला. तथापि, डॉ. आंबेडकरांच्या मागणीनुसार दलित शांत राहिले.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह तीन वर्षे चालला . शेवटी दलितांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात तो यशस्वी झाला नाही. डॉ. बी.आर. आंबेडकरांनी अखेर चळवळ सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला.
जरी सत्याग्रह दलितांसाठी दरवाजे उघडण्यात यशस्वी झाला नाही, तरीही तो एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. त्यामुळे लोकांमध्ये आणि विशेषतः दलितांमध्ये जागरूकता निर्माण झाली. काळाराम मंदिर सत्याग्रह हा दलितांच्या सामाजिक आणि राजकीय जागृतीतील एक महत्त्वाचा टप्पा होता .
काळाराम मंदिराच्या तुमच्या सहलीचे नियोजन करा
रामनवमी हा एक आनंददायी कार्यक्रम आहे, विशेषतः काळाराम मंदिराची रथयात्रा . हजारो भाविकांनी आणि सकारात्मकतेने भरलेला हा कार्यक्रम आवर्जून पाहावा असा आहे.
मंदिर वेळापत्रक
- सकाळी 5:30 ते 6:30 - काकड आरती
- सकाळी 7:00 ते 8:00 - सनई वादन आणि भूपाळी
- सकाळी ८:०० ते १०:०० - भगवान रामाची मंगल आरती
- सकाळी 10:30 ते दुपारी 1:00 - भगवान रामाची महान्यास पूजा आणि महाआरती
- दुपारी 3:00 ते 5:00 PM - विविध भजनी मंडळ भजने सादर करते
- संध्याकाळी 7:00 ते 8:00 - भगवान रामाची शेज आरती
- रात्री ८:०० ते रात्री १०:०० - कीर्तन
भेट देण्यापूर्वी नवीनतम माहिती तपासा, कारण कार्यक्रम किंवा देखभालीमुळे वेळ बदलू शकतो. पर्यटन मंडळाशी संपर्क साधून किंवा अधिकृत वेबसाइट तपासून पुष्टी करा.
काळाराम मंदीर
काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
Goraram/ Goreram Temple, Panchvati, Nashik, Dist. Nashik - Pilgrim Data Services
गोराराम / गोरेराम मंदिर,
पंचवटी, नाशिक शहर, जि. नाशिक
श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्रीरामांची अनेक मंदिरे आहेत. त्यातील काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे. काळारामप्रमाणेच येथे गोराराम, आणि गोरेराम ही मंदिरेही आहेत. यातील गोराराम मंदिर गोदावरीकाठी तर गोरेराम मंदिर काळाराम मंदिरापासून अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर आहे. ते ‘मुठे यांचे गोरेराम मंदिर’ म्हणून बहुश्रुत आहे. याशिवाय येथील सीतागुंफेजवळ गोरेराम (पर्णकुटी) मंदिर आहे.
गोराराम आणि गोरेराम मंदिर यांतील साम्य असे की ही दोन्ही मंदिरे पेशवाईत उभारली गेली. माधवराव पेशवे यांचे सरदार माधवराव हिंगणे यांनी १७८२ मध्ये गोराराम मंदिर, तर पेशवाईतील सरदार श्रीमंत मुठे यांनी गोरेराम मंदिर बांधले, अशा नोंदी आहेत. गोदावरीच्या तीरावरील निलकंठेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या प्राचीन गोराराम मंदिरात जाण्यासाठी ३५ ते ४० पायऱ्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून गोदावरीचा घाट व तेथील अनेक मंदिरे नजरेच्या टप्प्यात येतात. लाकडी बनावटीच्या या मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सभामंडपात मारुतीची मूर्ती असून गर्भगृहात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील या मूर्ती शुभ्र संगमरवराच्या असल्यामुळे या मंदिराला गोराराम असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
गोराराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर रामायणाचा सार असलेला श्लोक लावण्यात आला आहे, तो असा –
आदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणम्।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्।।
(अर्थ : आपल्या वनवास काळात श्रीराम तपोवनात (नाशिक) आले आणि त्यांनी सुवर्णमृगाचा पाठलाग करून त्याचा वध केला. याच काळात सीतेचे रावणाने हरण केले, सीतेला त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी जटायुला प्राण गमवावे लागले. श्रीरामांची येथेच सुग्रीवाशी मैत्री झाली व त्यांनी त्याचा भाऊ बाली याचा वध केला. समुद्रावर पूल तयार करून लंकाधीश रावण आणि कुंभकर्णाचा श्रीरामांनी वध केला.) हा एक श्लोक पठण केल्यावर संपूर्ण रामायण पठण केल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गोराराम मंदिराच्या सभामंडपासमोरील प्रांगणात बसून अनेक भाविक या ‘एक श्लोकी रामायणा’चे पठण करत असतात.
पंचवटीतील सीता गुंफेपासून काळाराम मंदिराच्या रस्त्यावर पेशव्यांचे सरदार श्रीमंत मुठे यांचे गोरेराम मंदिर आहे. पेशवाईच्या कालखंडात अनेक सरदारांनी गोदाघाटावर त्यांच्या घराण्यांची मंदिरे बांधली. त्यातील श्रीमंत मुठे यांच्या घराण्याचे हे मंदिर होय. हे मंदिर म्हणजे रस्त्यास लागून असलेला भव्य दुमजली वाडा आहे. दगडी पाया, सागवानी लाकूड, गेरू रंगाच्या भिंती, उंच खिडक्या, भिंतीस असलेले कोनाडे, आतील भिंतींवरील लाकडी खुंट्या, भक्कम सागवानी प्रवेशद्वार, असा हा वाडा पाहताक्षणीच त्याच्या पेशवेकालीनत्वाची साक्ष देतो.
मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहानसे फरसबंदीचे प्रांगण आहे. त्यात हनुमानाचे छोटेसे मंदिर व साधूंच्या तीन समाध्या आहेत. येथून काहीसे उंचावर गोरेराम मंदिर आहे. सभामंडपात भक्कम लाकडी खांब, त्या खांबांमध्ये काष्ठशिल्पांनी सजलेल्या लाकडी कमानी व खांबांवरील तुळ्या, हे सारे प्राचीन वास्तुरचनेच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेच्या खालील बाजूस कीर्तिमुख कोरलेला असून आत प्राचीन शिवलिंग आणि त्यासमोर श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी शुभ्र मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या डाव्या बाजूस श्रीविष्णूंचे मंदिर आहे. मंदिर-वाड्यातच प्रदक्षिणा मार्ग असून त्याच्या उत्तरेला बाह्य भागात मकरमुख आहे. गाभाऱ्याच्या मागच्या बाजूस माडीवर जाण्यासाठी जिना आहे.
या मंदिरात गोरेरामाच्या दर्शनासाठी शेगावचे संत गजानन महाराज येऊन गेले होते, अशी नोंद श्री ‘गजानन विजय’ या ग्रंथात आहे. सिंहस्थाच्या काळात येथे साधू-संतांचा, भाविकांचा मोठा राबता असतो. रामनवमी हा येथील प्रमुख उत्सव आहे. या दिवशी भजन, कीर्तन असे कार्यक्रम येथे होतात. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगतो. त्रिपुरारी पौर्णिमेस मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येते. स्वाध्याय परिवाराच्यावतीनेही येथे विशेष कार्यक्रम होतात. मंदिरात सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान भाविकांना दर्शन घेता येते. सकाळी ६ वाजता अभिषेक, पूजा सुरू होते.
उपयुक्त माहिती:
- नाशिक एसटी बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून एसटी व रेल्वे सुविधा
- पंचवटीसाठी नाशिक महापालिका बसची सुविधा
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- खासगी वाहने गोदावरीच्या घाटापर्यंत येऊ शकतात
Goraram Mandir
आढावा
गोराराम आणि गोरेराम मंदिरे ही नाशिकमधील महत्त्वाच्या राम मंदिरांपैकी एक आहेत, जी पंचवटी परिसरात आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. ही मंदिरे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित आहेत आणि त्यांच्या शांत नदीकाठची परिस्थिती, पारंपारिक वास्तुकला आणि मजबूत सांस्कृतिक उपस्थितीसाठी ओळखली जातात. गोराराम मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे, तर गोरेराम मंदिर प्रसिद्ध काळाराम मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे.
इतिहास आणि महत्त्व
दोन्ही मंदिरे पेशवे काळातील आहेत आणि त्यांना वारसा वास्तू मानले जाते.
गोराराम मंदिर
१७८२ मध्ये माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सेनापती माधवराव हिंगणे यांनी बांधले होते. हे मंदिर पवित्र गोदावरी नदीकाठी आणि प्राचीन नीलकंठेश्वर मंदिराजवळ आहे. या मंदिरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या शुद्ध पांढऱ्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराचे लाकडी सभामंडप आणि गर्भगृह पारंपारिक पेशवेकालीन कारागिरीचे प्रतिबिंबित करते.गोरेराम मंदिर हे
पेशवेकालीन श्रीमंत मुठे कुटुंबाने बांधलेले आहे. हे मंदिर एका मजबूत दुमजली वाड्यासारखे दिसते. दगडी पाया, सागवान लाकडाच्या रचना, गेरू रंगाच्या भिंती आणि उंच खिडक्या यामुळे, वास्तुकला त्याच्या ऐतिहासिक वारशावर स्पष्टपणे प्रकाश टाकते. आत, हॉलमध्ये लाकडी खांब, लाकडी कोरीव कामाच्या गुंतागुंतीच्या कमानी आणि सजावटीच्या तुळया आहेत. गर्भगृहात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती तसेच एक प्राचीन शिवलिंग आहे. ऐतिहासिक संदर्भ सांगतात की संत गजानन महाराजांनी देखील या मंदिराला भेट दिली होती.
दोन्ही मंदिरे विशेषत: राम नवमी , त्रिपुरारी पौर्णिमा आणि कुंभमेळा (सिंहस्थ) यासारख्या शुभ कार्यक्रमांमध्ये भाविकांना आकर्षित करतात .
कसे पोहोचायचे
दोन्ही मंदिरे नाशिकमधील पंचवटी येथे आहेत आणि शहराच्या कोणत्याही भागातून सहज प्रवेश करता येतो.
रस्त्याने: ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि सिटी बसेस सहज उपलब्ध आहेत.
सीबीएस बस स्टँडपासून: अंदाजे ३-४ किमी.
नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून: सुमारे १०-१२ किमी.
चालण्याचे अंतर: गोरेराम मंदिर काळाराम मंदिरापासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर आहे आणि गोराराम मंदिर गोदावरी घाटाजवळ आहे.
वेळा आणि प्रवेश शुल्क
मंदिराच्या वेळा: सकाळी ६:०० ते रात्री १०:००
दैनिक विधी: सकाळी अभिषेक आणि पूजा सकाळी ६:०० वाजता सुरू होते.
प्रवेश शुल्क: प्रवेश शुल्क नाही; सर्व भाविकांसाठी मोफत
विशेष कार्यक्रम: रामनवमी आणि इतर उत्सवांमध्ये भजन, कीर्तन आणि भक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
मंदिरांना वर्षभर भेट देता येते; तथापि, हा अनुभव सर्वोत्तम असतो जेव्हा:
हिवाळा ऋतू (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): पंचवटीत फिरण्यासाठी आल्हाददायक हवामान.
सण: रामनवमी आणि त्रिपुरारी पौर्णिमा विशेष सजावट, भक्ती कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन येतात.
सिंहस्थ (कुंभमेळा) कालावधी: संत आणि भक्तांची उच्च पदस्थापना.













































































































































































































































































No comments:
Post a Comment