गावामध्ये मुख्य रस्त्याने आल्यावर आपण गावाच्या मध्यभागी असलेल्या चौकात पोहोचतो. पुण्याहून सोलापूर महामार्गाने चौफुला – सुपा – लोणी भापकर या मार्गानेही आपण या ठिकाणी येऊ शकतो. तसेच पुण्याहून जेजुरी मार्गे बारामतीला येताना मोरगाव पासून पुढे सात आठ किमी अंतरावर लोणी पाटी म्हणून थांबा आहे. उजवीकडे वळून सरळ पाच सहा किमी अंतरावर ऐतिहासिक लोणी भापकर गाव वसलेले आहे. लोणी भापकर गावात शिरता शिरताच डावीकडे अनेक समाध्या लक्ष्य वेधून घेतात. लगेचच आपण एका मंदिरापाशी पोहोचतो. ते गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथाचे मंदिर. हे मंदिर दक्षिणमुखी आहे.. भैरवनाथाची बरीचशी मंदिरे पुर्वाभिमुख असतात.गावाच्या चौकात पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास सहजरित्या आपणास मंदिराचे शिखर नजरेत भरेल. गावचे कालभैरवनाथ हे ग्राम दैवत. सरदार भापकर यांच्या काळातच हे मंदिर बांधले असल्याचे म्हटले जाते.
. मंदिराला तीन प्रवेशद्वारे असून मुख्य द्वार म्हणजे प्रशस्त नगारखाना असून दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शरभाचे शिल्प कोरलेले आहे.मंदिराच्या समोर दगडी बांधकाम केलेल्या दोन दीपमाळ, तसेच उजव्या दीपमाळेच्या शेजारी असलेली बारवही बघण्यासारखी आहे. मंदिराच्या चहुबाजूंनीं चार पाच फूट रुंद अन अडीज तीन पुरुष उंच अशी भर भक्कम तटबंदी त्या काळातील मजबूत बांधकामाची साक्ष देतात. अन आजही आपल्या आधुनिक प्रगत तंत्रज्ञान असलेल्या २१ व्या शतकात आपली ओळख टिकवून दिमाखात उभी आहे.



मंदिराच्या आतील कोरीव स्तंभ















मल्लिकार्जुन मंदिर
मल्लिकार्जुन मंदिर हे बहुधा इथले सर्वात प्राचीन मंदिर असावे. संपूर्ण यादवकालीन बांधणीचे हे मंदिर, कोरीव प्रवेशद्वारे, सभामंडपात कोरलेले नक्षीदार स्तंभ आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पुढ्यात पुष्करीणी अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. हेही मंदिर यादवकालीनच.!

सुदैवाने या मंदिराचा फक्त दर्शनी भागच तैलरंगात रंगवलेला आहे आणि उर्वरीत मंदिर अजूनतरी काळ्या पाषाणातच आहे त्यामुळे हे मंदिर सर्वाधिक देखणे दिसते. मंदिराचे प्रवेशद्वार व्याल, नक्षीदार वेलबुट्टट्या आणि काही मूर्ती कोरलेल्या आहेत, जाळीदार खिडक्या आहेत. तळातील द्वारपालांची परवानगी घेत प्रवेशद्वार बघून सभामंडपात प्रवेश करावा. सभामंडप कोरीव नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. आतमध्ये आल्यावर एखाद्या लेणीमध्ये आल्यासारखे वाटते. काही ठिकाणी कामशास्त्रातील कामशिल्पेही कोरलेली आपण पाहू शकतो. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूलाही देवी देवतांची शिल्पे, स्तंभ, रत्न, निसर्ग शिल्पे कोरलेली आहेत.


भारवाहक यक्षिणी

कानावर हात असलेली यक्षी



स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती



स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती


छतावरील नक्षीदार फुलांचे कोरीव काम




श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या मंदिराच्या समोरच भलीमोठी पुष्करिणी खोदलेली आहे. हि पुष्करणी देखील पुर्णपणे अलंकारिक आहे. चारही बाजूंनी बांधीव असे मोठे कुंड, आत उतरण्यासाठी एका बाजुला पायऱ्या व कोरीव मंडप, भिंतीत जागोजागी देवतांसाठी २८ देवकोष्टके आणि मध्यभागी पाणी अशी या पुष्करणीची रचना आहे. चतुष्कोनी अशा ह्या पुष्करणीतील देवकोष्टकावर मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केली आहे. पूर्वी ह्या कोनाड्यांत मूर्ती असाव्यात. सध्या यातील एकाही कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही. 
नंदीमंडप व मूळच्या शिवमंदिराचे दत्तमंदिरात रूपांतरीत झालेले मंदिर

नंदीमंडप जवळून


नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

मातृदेवता
शिल्पांमध्ये धनुर्धारी राम, लक्ष्मण, गदाधारी भीम, हनुमान आदी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर दोन बाजूंना मैथुनशिल्पेही आढळतात. नंदीमंडपांचे छतही फुलाफुलांच्या अतिशय देखण्या नक्षीकामाने सजलेले आहे. आज येथे नंदीची मूर्ती नाही व नंदीमंडपाच्या पुढ्यातल्या मंदिरात दत्तमूर्ती स्थापन झालेली आहे. पण पूर्वी हे शंकराचे मंदिर असावे हे निश्चित. तशा अनेक खाणाखुणा येथे दिसतातच.

मंडपाचे नक्षीदार छत
सध्याच्या दत्तमंदिरात शिवपिंडीची जागा तसेच त्याची शाळुंकाही अगदी स्पष्टपणे नजरेस येतात. शिवाय दत्तसंप्रदाय तस अलीकडच्या काळातला. मूळचे शिवलिंग इस्लामी आक्रमकांच्या काळात भग्न झालेले असावे किंवा दुसरीकडे लपवून ठेवलेले असावे. पेशवेकाळात किंवा त्यानंतरही (मागच्या १००/१५० वर्षांत) त्याचे दत्तमंदिरात रूपांतर झालेले असावे शिवाय दत्तमूर्ती संगमरवरी आहे तेव्हा ती अलीकडचीच यात काहीच वाद नाही पण मंदिराचे एकूण हेमाडपंथी पद्धतीचे स्तंभ, किर्तीमुखे, समोरचा नंदीमंडप हे मूळचे शिवमंदिरच असल्याचे सिद्ध करतात.
दत्तविषयक सर्वात जुना उल्लेख महाभारतात सापडतो. महाभारतातल्या परशुराम उपाख्यानात दत्तात्रेयाच्या आशीवार्दाने कार्तवीर्याला सहस्त्र हात प्राप्त झाले असा आणि इतकाच उल्लेख आहे आणि तो प्रक्षिप्त आहे हे उघड आहे. महाभारतावर गुप्त काळापर्यंत शेवटचे संस्करण होत होते म्हणजेच तो उल्लेख साधारण ५ व्या/ ६ व्या शतकातला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. पण तेव्हा दत्तसंप्रदाय नसावा, हा अर्थातच तर्क.
शिलाहार आणि यादवकाळात दत्तमंदिर अथवा दत्तसंप्रदायाचे उल्लेख नाहीत. आंतरजालावरील माहितीनुसार नृसिंहसरस्वतींचा काळ १३७८ ते १४५८ म्हणजे यादवकाळानंतरचा, तेव्हा तत्पूर्वी दत्तसंप्रदाय नसावा किंवा असला तरी त्याचे अस्तित्व नाममात्रच असावे.
श्रीदत्ताच्यापादुकांची स्थापना शके १८३० चैत्र शुद्ध, गुरुवार रोजी सन १९०८ या दिवसाच्या समुहूर्तावर पहाटे ब्रह्मीभूत सद्गुरू दत्तानंदसरस्वतीस्वामी महाराज यांनी केली. या देवळाची (शिखराची) उंची सुमारे ३० फूट असून औरसचौरस घेर २५ x २५ फूट आहे. त्यामध्येच देवास प्रदक्षिणा घालण्याकरता व्यवस्था आहे. तसेच त्यांच्यामागे तीन ओवऱ्या बांधल्या असून देवळाच्या मागे बरोबर मध्यावर औदुंबर (कल्पवृक्ष) आहे. ओवऱ्यांचा उपयोग श्रीगुरुचरित्रपारायणाकरता व सेवेकऱ्यास रहाण्यास करतात.
श्रीमंदिराचे पूर्वद्वार पूर्वेकडे असून मंदिराच्या आतील भागी मध्यावर श्रीदत्तपादुकांची स्थापना केलेली आहे. पादुकांच्या मागे सुमारे ४ फुटांवर उत्तम प्रकारच्या दगडी सिंहासनावर मध्यभागी श्रीदत्तमूर्ती बसविल्या आहेत. तिची प्राणप्रतिष्ठा शके १८५० मार्गशीर्ष १५ रोजी गुरुवार सन १९२८ या शुभदिनी सूर्योदयाबरोबर झाली. पूर्वेस दगडी मंडप तीनही बाजूंस आहेत. श्रीदत्ताची मूर्ती २॥ फूट उंचीची मोहक असून प्रत्येक हातात आयुधे दिलेली आहेत. मूर्ती संगमरवरी दगडाची जयपुराहून आणली आहे.
या दत्तस्थानाशी श्रीदत्तानंदसरस्वतींचा संबंध आहे. श्रीदत्त-नृसिंहसरस्वती-पूर्णानंद-कृष्णानंद अशी त्यांची परंपरा सांगितली जाते. मल्लिकार्जुनमंदिर सद्गुरू येण्यापूर्वी ओसाड व अत्यंत भयानक होते. देवाचे दर्शनास भीतीमुळे कोणीही जात नव्हते. देवालयाचे भोवताली फारच उंचउंच निवडुंग, सर्प व दाट झाडी होती. अशा त्या निवांत स्थळी सद्गुरूंनी येऊन मुक्काम ठोकला. ही बातमी गावात पसरताच सर्व लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले.
दशभुजा दत्तमूर्ती हि क्वचितच आढळते पण तशी दत्तमूर्ती येथे आढळते. सादर मंदिर पुरातत्व विभागा मार्फत जतन केले जाते. हे स्थान अत्यंत जागृत असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भक्त येथे येऊन गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन सेवा अर्पण करतात. श्री दत्तानंद स्वामी महाराजांनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले. त्यांचा चरित्राची ७ अध्यायाची प्रासादिक पोथी आहे अनेक भक्त ती नियमित वाचतात. या मंदिरात एक देवीचे स्थान आहे. अनेक भक्त येथे नवस बोलतात व ते पूर्ण होतात.पुष्कर्णीच्या आतील सभामंडपासमोर दशभुजा दत्ताचे मंदिर आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. श्री दत्ताचे सहा आणि कालिकेचे चार असे मिळून मूर्तीला दहा हात आहेत. महाराष्ट्रामध्ये दहा हात असलेली दत्ताची एकमेव मूर्ती या मंदिरामध्ये आहे. तेथील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुर्धर रोगांनी पीडित आणि दुःखी लोकांचे गाऱ्हाणे या देवतेला साकडं घातल्याने वा नवस बोलण्याने पूर्ण होतात.
श्रीदत्तानंदसरस्वती यांचे जन्मगाव, राहण्याचे ठिकाण वगैरे काहीही माहिती मिळत नाही. इंग्रजांच्या राज्यात डांग देशातील बंडाळीचा बंदोबस्त करण्याकरिता, त्यांना एक मोठा सैन्यावरील अधिकारी म्हणून पाठविले. त्याच समयी श्रीअक्कलकोटच्या स्वामींची व त्यांची भेट झाली व लगेच उपदेशही मिळाला. अत्यंत नास्तिक असूनही स्वामींची व त्यांची दृष्टादृष्ट होताच त्यांचा सर्व नास्तिकपणा नाहीसा झाला.
ते शरीराने चांगले धष्टपुष्ट, उंच व गौरवर्णाचे आणि अत्यंत करारी होते. लहान मुलांबरोबर खेळणे त्यांस फार आवडे. वानप्रस्थ स्विकारल्यानंतर नेपाळ प्रांतातून फिरत फिरत ते दक्षिण भागात म्हणजे पुण्यास उतरले. त्यावेळी त्यांचे समवेत श्रीनृसिंहसरस्वती आळंदीचे, जंगलीमहाराज भांबूर्डा असे होते. सोमयाचे करंजे येथे ते आले व तेथून लोणीस प्रकट झाले व शके १८३८ फाल्गुन व॥ त्रयोदशी इ. स. १९१६ या वर्षी बुधवारी सकाळी ६ वाजणेचे सुमारास त्यांनी समाधी घेतली



शेपटीत अडकलवेली पृथ्वी.
शरीरावरील विष्णूमूर्तींची झूल
पणदरे (ता. बारामती) गाव ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जाते. गावातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, शिलालेख हे इतिहासाची साक्ष देतात. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी नुकतेच केले. त्यामुळे गावच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिलालेखानिमित्त पणदरे व येथील जगताप घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.
पणदरेत मुख्य गावठाणात श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख कोरला आहे. तो उठाव स्वरूपाचा असून, सात ओळींचा शुद्ध मराठी भाषेत मजकूर आहे. शिलालेखाची अक्षरे ठळक असून, सुस्पष्टपणे वाचता येतात.
त्यावर रविवार, १३ मार्च १७७४ या दिवशी श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा घुमट बांधला, असा उल्लेख आहे. जानराव पाटील यांचा हा घुमट (समाधी) आहे. पण हा समाधी घुमट नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही. घुमट बांधल्याची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तो कोरला आहे.
जगताप घराण्याचा ऐतिहासिक वारसा
सुपे परगण्यात मोकदम पाटील महादजी यांच्याकडे पणदरेची पाटीलकी असल्याचेही यावरून स्पष्ट होते. हे घराणे शिवपूर्वकालापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी चिंचवडचे मोरया गोसावी यांना पणदरे गाव इनाम दिल्याचे १६४९ चे पत्र उपलब्ध आहे. पुरंदरच्या लढाईत किल्ल्याच्या पायथ्याशी जी लढाई झाली त्यात मुसेखान गोदाजी जगताप यांच्याकडून ठार झाला, तर फत्तेखान बेलसरकडे पळून गेला. त्या लढाईत नंदाजी जगताप शिवरायांकडून लढले असा उल्लेख आहे.
सुप्याच्या पाटीलकीच्या वादाबद्दल शिवाजी महाराजांनी जगतापांची कानउघडणी केली ते ६ मार्च १६७६ पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजेश्री रामोजी जगताप व खंडोजी जगताप यांचे नाव आलेले आहे. येथील कोकरे (धनगर) व जगताप (मराठा) यांच्याकडे छत्रपती शाहू व पेशवाईत निमपाटीलकी राहिली. शहाजीराजे यांच्या जहांगिरीतील सासवडमधील १० गावांची देशमुखी जगतापांकडे होती. त्यात बारामती परिसरातील होळ, मुरूम, वाकी, वाणेवाडी, पणदरे आदींचा उल्लेख आहे.
निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे येथील त्यांचा.. "राजवाडा"
सरदार रणनवरे यांचे राख कर्यात सासवड हे मुख्य गाव आहे. निंभोरे, जिंती व निमसाखर व इतर गाव आहेत. फलटण निंभोरे ऐतिहासिक संदर्भ आहेत यांचा खर्डा पानिपत कोकण मोहीम अशा अनेक ठिकाणी मोठे उल्लेख सापडतात.. सातारा छत्रपती यांचे निष्ठावंत म्हणुन यांची ख्याती होती.सुलतानजी, आप्पाजी, सेट्याजी इ. रणनवरे मंडळींचे इनाम व वतन उल्लेख आहे. हा वाडा पाहिल्यावर याची भव्यता आपल्याला लक्षात येते. जवळपास ४ एकर मधे पडिक अवस्थेत असलेला हा रणनवरे सरदारांचा वाडा आज शेवटची घटका मोजत आहे. याची विषेशता म्हणजे...
वाड्याला भव्य असे प्रवेशद्वार तटबंदी असून, या वाड्याला एकूण ६ बुरूंज पडिक अवस्थेत आहेत. तसेच वाड्याच्या आतमध्ये एक भुयारी मार्ग व बारवा होत्या, परंतु आज त्या पहायला मिळत नाहीत. कारण वाड्यामधे सद्ध्या गावचा अठावडे बाजार भरत असल्याने आतील पुर्ण भाग हा सपाट केलेला पहायला मिळतो आहे.तसेच वाड्याच्या बाजूला सरदार जिवाजीराव सुभानजीराव रणनवरे सहपत्नीक अशा शिवकालीन समाध्या आहेत. असा हा भव्यदिव्य स्वरूपात असणारा सरदार रणनवरे घराण्याचा "राजवाडा" नक्कीच पहावा.
( क्रमांक ६८ )
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) एका दिबसाच्या सहली ! परिसरात पुण्याच्या- प्र.के.घाणेकर
३) श्री. सागर बोरकर, सुरेश निंबाळकर यांचे लिखाण
४) http://sagarshivade07.blogspot.com
५) https://backpackersnovel.in
१६.
सभामंडपाचे छत तर अगदी निरखून बघण्यासारखेच. फुलाफुलांचे अतिशय सुंदर कोरीवकाम इथल्या छतावर केले आहे. छताच्या चौकटीच्या भागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. हे बहुधा कृष्णाच्या जीवनातले प्रसंग असावेत. अंधार आणि उंचीमुळे ते नीटसे पाहता येत नाहीत. पण गोपगोपी आणि गाईगुरांसह असलेला कृष्ण नजरेत भरतोच. युद्धातील काही प्रसंगही येथे कोरलेले आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वारही कोरीव खांब,विविध मूर्ती आणि व्यालमुखांनी नटलेले आहे. गर्भगृह अगदी भुलेश्वर मंदिराचीच आठवण करून देते. आतमध्ये मात्र दोन शिवलिंगे आहेत मल्लिकार्जुन म्हणजे शिव-पार्वती यांचे हे प्रतिक.
२१.
श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या समोरच भलीमोठी पुष्करिणी खोदलेली आहे. चतुष्कोनी अशा ह्या पुषरिणीत ठिकठिकाणी कोनाडे खोदलेले असून त्यावर लहानसे कळस उभारलेले आहेत. पूर्वी ह्या कोनाड्यांत मूर्ती असाव्यात. पुष्करणीच्या एका बाजूलाच भव्य असा नंदिमंडप आहे आणि त्याच्या चारही बाजूंना विविध शिल्पे कोरलेली आहेत.शिल्पांमध्ये धनुर्धारी राम, लक्ष्मण, गदाधारी भीम, हनुमान आदी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर दोन बाजूंना मैथुनशिल्पेही आढळतात. नंदीमंडपांचे छतही फुलाफुलांच्या अतिशय देखण्या नक्षीकामाने सजलेले आहे. आज येथे नंदीची मूर्ती नाही व नंदीमंडपाच्या पुढ्यातल्या मंदिरात दत्तमूर्ती स्थापन झालेली आहे. पण पूर्वी हे शंकराचे मंदिर असावे हे निश्चित. तशा अनेक खाणाखुणा येथे दिसतातच.
२३.
२४.
आता आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या इथले सर्वाधिक चर्चित शिल्प बघायला निघालो. किंबहुना याच कारणासाठी येथे येण्याचा अट्टाहास केला होता. हे शिल्प आहे यज्ञवराहाचे. हे पूर्वी मंदिराच्या जवळच असणार्या एका शेतात पडिक अवस्थेत होते, ते हल्लीच मंदिराच्या आवारात नेऊन ठेवलेले दिसते.
यज्ञवराह म्हणजे वराहमूर्ती., विष्णूच्या वराहवताराचे हे प्रतिक. वराहवताराचे कार्य संपुष्टात आल्यानंतर विष्णूने वराह शरीराचा त्याग केला व त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगे बनली असे म्हणून हा यज्ञवराह अशी विष्णूपुराणातली आख्यायिका आहे.
हे शिल्प अतिशय देखणे आणि भव्य. वराहाच्या शरीरावर त्याने दगडाचीच झूल पांघरलेली असून त्यावर छोट्या छोट्या चौकोनांत असंख्य विष्णूमूर्ती कोरलेल्या आहेत. त्या झूलीवर त्याने शिवलिंगे धारण केली आहेत. वराहाच्या चारही पायांवरही विष्णूमूर्ती कोरलेल्या असून पायातळी विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधेही कोरलेली आहेत. वराहाची शेपटी गुंडाळालेल्या अवस्थेत असून त्यात त्याने पृथ्वी धरून ठेविली आहे. वराहाच्या शरीराखाली एक नमस्कार करणार्या अवस्थेतली एक मानवी धड असलेलीमूर्ती असून तीचे शरीर लांबलचक निमुळते दाखवले आहे. एकंदर ठेवणीवरून ही शेषनागाची मूर्ती दिसते. मूर्तीभंजकांनी याचे मस्तक तोडलेले आहे. खुद्द यज्ञवराहाचे मुखसुद्धा मूर्तीभंजकांच्या तडाख्यातून सुटलेले नाही. तरीही त्याचे देखणेपण मात्र वादातीत आहे.
यज्ञवराहाचे असे शिल्प इतरत्र कुठेही आढळात आलेले नाही.
२९.
३०.
३१.
३३. श्री मल्लिकार्जुन मंदिर
मंदिराच्या ह्या देखणेपणाचा पुरेपुर आस्वाद घेऊन आम्ही तिथून निघालो ते मोरगांवच्या जवळच असलेल्या अजून एका शिल्पसमृद्ध मंदिराकडे, पांडेश्वराकडे. त्याविषयी पुढच्या भागात.
या स्थळाबद्दल अधिक ऐतिहासिक माहिती देता येईल काय?(कदाचित ही मंदिरे राष्ट्रकूटांच्या काळातली असावीत असा अंदाज व्यक्त करतो.)
ही सारी शिल्पांनी नटलेली मंदिरे पाहून या 'लोणी भापकर' स्थळाला मुस्लिम राजवटीपूर्वी विशेष महत्त्व असावे असे दिसते.
यज्ञवराहाचे शिल्प तर अप्रतिम (महाराष्ट्रातील एकमेव?) आहे. इतक्या बारकाईने कोरलेले हे शिल्प नक्कीच एखाद्या मंदिराच्या गर्भगृहात असणार. यज्ञवराहाच्या शिल्पांबद्दल येथे काही माहिती सापडली. यानुसार गुर्जर-प्रतिहारांच्या काळात यज्ञवराहाची मूर्ती विशेष प्रचलित झालेली दिसते.
दुव्यांबद्दल धन्यवाद विसुनाना.
मंदिरे राष्ट्रकूटकालीन असावीत का नाही ते सांगता येणार नाही. पण एकंदर आतील शिल्पांवरून मल्लिकार्जुन मंदिर मात्र यादवकालाच्याही आधीचे असावे असे वाटते. याचा आणि भुलेश्वर मंदिराचा काल जवळपास सारखाच असावा.
पेशवेकालात भापकर हे सरदार होतेच. इथल्या वीरगळांच्या प्रचंड संख्येवरून इथे बर्याच लढाया झालेल्या दिसतात.
यज्ञवराहाचे इथले शिल्प हे महाराष्ट्रातील एकमेवच आहे का याची मात्र कसलीही माहिती मजपाशी नाही.
या लेखामुळे विष्णुच्या 'वराह' अवताराबद्दल कुतुहल चाळवले आणि त्यानिमित्ताने अगदी थोडे वाचन झाले.
वेदात महत्त्व असलेल्या इंद्र आणि वरुण इ. देवता मागे पडून वेदातली एक दुय्यम देवता 'विष्णू'ला महत्त्व प्राप्त झाले तो काळ म्हणजे इ.स. पू. ३००. मध्यप्रदेशातील विदिशा - बेसनगर येथील गरुडध्वज त्याची साक्ष देतो. मात्र 'भगवान' विष्णूचे दशावतार नक्की केव्हा निर्माण झाले (किंवा या अवतार शृंखलेला धार्मिक वाङ्मयात कधी स्थान मिळाले?) ते मात्र कळत नाही. अशातच वेदांतील रुद्र देवतेपासून उत्पन्न झालेले 'शिव' हे दैवतही तितक्याच (किंबहुना अधिक) महत्त्वाला पोचले. (वेद -> श्वेताश्वतार उपनिषद -> शिवपुराण). उपनिषदातील ब्रह्म संकल्पना 'ब्रह्मा' नामक दैवतात रूपांतरित झाली.इ.स्.पू. २०० ते इ.स. ६०० या ८०० वर्षांच्या (शुंग + गुप्त साम्राज्य) काळात ब्रह्मा-सरस्वती, विष्णू-लक्ष्मी आणि शिव-पार्वती अशी दैवत युगुले त्यांच्या कार्यासह (अनुक्रमे उत्पत्ती-स्थिती-लय) पुराणांतरी प्रस्थापित झालेली आहेत. याच काळात कधीतरी विष्णूदेवतेचे कूर्म-मत्स्य-वराह हे अमानवी अवतार, नृसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा माणूस असा अवतार आणि त्यानंतर रामकृष्णबुद्धादि मानवावतार पृथ्वीचे पालनहार म्हणून प्रसिद्ध झाले. भागवत धर्म/पंथ प्रामुख्याने भारताच्या उत्तरेत मध्य प्रदेशा-ओरिसापर्यंत पसरलेला होता. मध्य प्रदेशातील राजवटींनी त्याला उदार आश्रय दिला होता आणि स्वतः राज्यकर्तेही त्याचे पालन करीत. उदयगिरी(मप्र) येथे गुप्त वंशाची तात्पुरती राजधानी असताना तेथील गुहांमध्ये वराह अवताराचे एक भव्य शिल्प कोरले गेले. या नंतर गुजरात-मप्र भागात सत्तेवर आलेल्या गुर्जर-प्रतिहार राज्यकर्त्यांना विष्णूच्या वराह-अवताराचे विशेष महत्त्व होते असे दिसते.त्यांनी वराह अवताराची नाणी पाडलेली आहेत. तसेच मध्य प्रदेशात अनेक यज्ञ वराह शिल्पे सापडलेली आहेत.
खजुराहो येथेही एक सुस्थितीतील यज्ञवराहाचे शिल्प आहे.
( वराहावताराच्या मूर्तीचेही भूवराह,आदिवराह,नृवराह,यज्ञवराह आणि प्रलयवराह असे प्रकार आहेत.)
डॉ. भांडारकरांच्या मताप्रमाणे याच लढाऊ वंशातून पुढे दक्षिणेकडे कर्नाटक- महाराष्ट्र भागात चालुक्य राजवटीचा उदय झाला. (बदामी). या चालुक्यांच्या राजवटीचे तर 'वराह अवतार' हे राजचिन्ह (एम्ब्लेम) होते. या चालुक्य काळात/नंतरच दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वराह अवताराची अनेक मंदिरे निर्माण झाली असावीत.
चालुक्यांनी प्रथमतः बांधलेल्या (इ.स. ६००?) कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीच्या मूर्तीबरोबरच वराह-अवताराची प्रतिमा पूजली जात असावी. इ.स्.च्या आठव्या शतकात झालेल्या भूकंपात हे मंदिर क्षतिग्रस्त झाले आणि त्याकाळच्या तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनी (कोल्हापुर पाती शिलाहारांनी) त्याचे पुनर्निर्माण केले. त्यावेळी फक्त महालक्ष्मीचीच प्रतिमा गाभार्यात स्थापन झाली. तरीही मूळ लक्ष्मी-वराहाच्या मूर्ती मंदिराच्या आतील भागात एका जिन्याच्या दोन्ही बाजूंना आजही पहायला मिळतात.
योगायोग असा की वल्ली यांच्या या लेखात दिसणारी सारीच मंदिरे बदामी चालुक्य शैलीची आठवण करून देतात. किंबहुना मल्लिकार्जुन मंदिरातले खांब तर कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांच्या प्रतिकृतीच वाटतात.
म्हणून लोणी भापकरची ही मंदिरे चालुक्य राजवटीत अथवा थोडी पुढेमागे (इ.स. ७०० ते इ.स. १०००) बांधली गेली असावीत असा कयास बांधता येतो.
या माहितीत कोणी अधिक भर घातल्यास वा मतांचे खंडन-मंडन केल्यास स्वागत आहे.
माहितीपूर्ण आणि सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.
चालुक्यांचे राज्य महाराष्ट्रभरही पसरले असल्याने ही मंदिरे त्यांनी बांधलेली असणेही शक्य आहे.
पण हे चालुक्य हे मुख्यतः वैष्णव होते ना? अर्थात काही शिवालयेपण त्यांनी बांधलेली आहेत. पण लोणी भापकरमध्ये फक्त शिवमंदिरेच दिसतात.
आणि शिवमंदिरापुढे यज्ञवराहाचे नेमके स्थान काय असावे किंवा त्याकाळच्या यज्ञयागांमध्ये वराहमूर्ती बनवली जात असे का?
चालुक्यांच्या (आणि तद्नंतरच्या इतर मूर्तीपूजक राजवटींच्या) अस्तानंतर ते शहाजी राजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्रातील अनेक देवळे नष्ट झाली. त्यातच ही देवळेही र्हास पावली असावीत. अस्तित्वात असलेल्या पण पडझड झालेल्या जुन्या मंदिरांच्या रिकाम्या गाभार्यात उत्तरकालीन राजवटींनी/ सरदारांनी नवे देव स्थापन केले असावेत. (जसे शिवलिंगाच्या जागी दत्तगुरू..माझ्यामते काळभैरवाचे देवालय मुळात यज्ञवराहाचे असू शकेल. किंवा कुठेतरी इतरत्र एखादे मंदिर नामशेष झाले असेल आणि त्याच्यातली मूर्ती शेतात फेकली गेली असेल.)
(तसेही शिव आणि विष्णू एकाच देवालय समूहात एकत्र आलेले बर्याच ठिकाणी दिसतात. उदा. चालुक्यांचा पराभव करून गादीवर आलेल्या राष्ट्रकूटांनी खोदलेल्या वेरूळच्या कैलास लेण्यात प्रवेशद्वारावरच लक्ष्मीचे भव्य शिल्प आहे आणि आत रामायण कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस शैव देवता तर उजवीकडे वैष्णव देवता आहेत.)
दत्त मंदिर हे मुळ शंकराचे मंदिर होते हे मात्र पटले नाही.... खुप जुन्या साला पासुन येथे दत्त मंदिराबद्द्लच्या अख्यायिका ऐकण्यास मिळतात. अगदी माझ्या आज्जीच्या काळापासुन च्या कथा ऐकायला मिळतात.. आज्जी लहान असतानाच्या गोश्टी पण त्यात आहेत..
दरवर्षी नेहमी प्रमाणे यात्रा भरते तेथे.. मामाचेच गाव असल्याने बर्याच जुन्या कथा माहिती आहेत..
तुम्ही जो भापकराचा वाडा ( ज्याचे बुरुज आता ढासळले आहेत ) म्हणता तेथे काही वर्षांपुर्वी पर्यंत बंदुक धारी शिपाई ( स्व मालकीचे) गस्त घालत. संपुर्ण दरारा होता.
शिवाय मल्लिकार्जुन मंदिर आणि परिसर दत्त मंदिर म्हणुनच नावारुपास आहे, सेपरेट मलिक्कार्जुन मंदिर कोणी तेथे म्हणत नाही.. मुख्य मंदिर हे दत्त मंदिर आहे, समोरील पुष्करणी ही दत्त मंदिराचीच आहे.. परंतु दत्त मंदिर खुप लहान असल्याने बर्याच जनांना तसे वाटत नाही..
दत्त मंदिरा पासुन निघुन कर्हा नदिकडे थोडे गेल्यावर 'तामखडा' म्हणुन एक पौरानिक जागा आहे ( कुंड टाईप) मी तुम्हाला सांगायचे विसरलो. तेथे जायला हवे होते आणखिन .. मी खुप लहान असताना जात होतो ( लहान असताना, मामाच्या बैलगाडीतुन मी, मामा मावश्या आणि इतर वस्तीवरील माणसे दर अष्टमीला जायचो तामख्यड्याला, अष्टमी ला भैरवनाथाची यात्रा असते... आता पुन्हा जाईन. )
आणखिन एक वेगळी गोष्ट म्हणजे, लोणी भापकर ची भेळ खुप प्रसिद्ध होती. तेथील तिखट चुरमुर्याची भेळ खुप आवडीची माझ्या.. मामा बरोबर बाजारातुन येताना एक सेपरेट पुढा रस्त्यात मध्येच आम्ही फस्त करत असु..
जवळच एक बारव आहे.. जुन्या पद्धतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
ग्रामदैवत भैरवनाथाचे मदिर अलिकडेच कलर्ड केले आहे, आधीची शान त्यामुळे झाकली गेली आहे.
हे मंदिर दक्षिणमुखी आहे.. भैरवनाथाची बरीचशी मंदिरे पुर्वाभिमुख असतात.
तुमच्या मंदिराच्या आवडीला सलाम, यज्ञवराह मात्र मी कधी पाहिलेला नव्हता, आता आवर्जुन पाहिन..
बाकी लोणी भापकर हे पेशवे काळापेक्षा ही शहाजीराजे यांच्या काळापासुन महत्वाचे गाव आहे, शहाजीराजेंच्या पहिल्या जहागीरी - सुपे परगण्याजवळील हे अत्यंत महत्वाचे गाव..
डीसेंबर महिन्यात दत्त जयंतीला या आमच्या मामाच्या गावाला.
---------------
आनखिन अशी जुनी मंदिरे जी जास्त परिचयाची नाहित ती पहा
'म्हसवड ' या गावाबद्दल माहित नसेल तर मी सांगने, तेथील सिद्धनाथ - जोगेश्वरी चे मंदिर खुपच जबरदस्त आहे.. सिद्धनाथाच्या मुर्तीवरुन तर नजर हाटत नाही.. गाभार्यातील भव्य हत्ती एकमेव. शिवाय आनखिन जुने प्राचीन मंदिर १०-१२ किमी वर डोंगरावर आहे भोजलींग म्हणुन.
आत्ताच सर्व गोष्टी सांगत नाही. कदाचीत ५० फक्त यांना हे मंदिर माहित असेन, सोलापुर वरुन जवळ आहे.
दत्त मंदिर हे मुळ शंकराचे मंदिर होते हे मात्र पटले नाही..
मूळात मंदिराच्या समोर जो आहे तो नंदीमंडप. सध्या तेथे जरी नंदी नसला तरी पूर्वी तेथे नंदी असलेल्या खुणा स्पष्टपणे दिसतात.
सध्याच्या दत्तमंदिरात शिवपिंडीची जागा तसेच त्याची शाळुंकाही अगदी स्पष्टपणे नजरेस येतात. शिवाय दत्तसंप्रदाय तस अलीकडच्या काळातला. मूळचे शिवलिंग इस्लामी आक्रमकांच्या काळात भग्न झालेले असावे किंवा दुसरीकडे लपवून ठेवलेले असावे. पेशवेकाळात किंवा त्यानंतरही (मागच्या १००/१५० वर्षांत) त्याचे दत्तमंदिरात रूपांतर झालेले असावे तेव्हा तुमच्या आजीकडे दत्ताच्याच हकीकती असल्यास त्यात नवल ते काय? शिवाय दत्तमूर्ती संगमरवरी आहे तेव्हा ती अलीकडचीच यात काहीच वाद नाही पण मंदिराचे एकूण हेमाडपंथी पद्धतीचे स्तंभ, किर्तीमुखे, समोरचा नंदीमंडप हे मूळचे शिवमंदिरच असल्याचे सिद्ध करतात.
दत्तविषयक सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तरी महाभारतात सापडतो.
महाभारतातल्या परशुराम उपाख्यानात दत्तात्रेयाच्या आशीवार्दाने कार्तवीर्याला सहस्त्र हात प्राप्त झाले असा आणि इतकाच उल्लेख आहे आणि तो प्रक्षिप्त आहे हे उघड आहे. महाभारतावर गुप्त काळापर्यंत शेवटचे संस्करण होत होते म्हणजेच तो उल्लेख साधारण ५ व्या/ ६ व्या शतकातला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. पण तेव्हा दत्तसंप्रदाय नसावाच(हा माझा तर्क).
शिलाहार आणि यादवकाळात दत्तमंदिर अथवा दत्तसंप्रदायाचे उल्लेख माझ्या माहितीत तरी नाहीत. आंतरजालावरील माहितीनुसार नृसिंहसरस्वतींचा काळ १३७८ ते १४५८ म्हणजे यादवकाळानंतरचा, तेव्हा तत्पूर्वी दत्तसंप्रदाय नसावा किंवा असला तरी त्याचे अस्तित्व नाममात्रच असावे.
तरी दत्तसंप्रदायाबद्दल अधिक माहिती मूकवाचक किंवा मदनबाण देऊ शकतील.
मल्लिकार्जुन मंदिर :
शिवाच्या पायाशी डोक टेकवून आपण बाहेर पडतो तोच समोर दिसते विस्तीर्ण अशी पुष्करणी.
यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!
"त्या काळचे ते मुसलमान म्हणजे" अश्या हरीतात्यांच्या आवेशात जात असतानाच यज्ञ वराहाच्या देखणेपणाने मला इहलोकी आणले.
अडीच फुट उंचीच्या या वराहाच्या शिल्पाचे तोंड फोडलेले आहे पण त्याच्या पाठीवरील असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या पाहून कारागिराच्या नाजूक हाताची कल्पना येते. पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे.
या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहे.
पायाखाली दबलेली गदा आणि दोन पायांमध्ये हात जोडून असलेले मानवी मुख असलेली शेष-रुपी शिल्प , वाराहाने शेषावर मिळवलेल्या अधिपत्त्याची जाणीव करून देतो.
वराहाच्या शेपटीत पृथ्वी गुंढाळलेली आहे असे एका लेखात वाचलेले होते.
बरेच फोटोसेशन झाले. नाऊ टाईम टू गो होम !!
मी निघत असलेले बघताच सावलीत झोपलेले आजोबा पुन्हा प्रकटले आणी त्यांनी "काही" मदत करा म्हणताच माहितीचे प्रयोजन कळले. त्यांना यथाशक्ती मदत करून, तेथीलच एका मोठ्ठ्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडून घेतल्या भाच्चीसाठी.
आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
http://sagarshivade07.blogspot.com/2016/01/blog-post_9.html
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस
Mallikarjun Temple: The most surprising thing we found was, locals were totally unaware of the importance of Hero stones, their history and what was their meaning. The Varaha sculpture placed outside the Mallikarjun temple was another example of local apathy.
We had totally surrounded the Varaha – The Boar Sculpture trying to click from every angle and wondering in amazement.

Mallikarjun Temple is another marvelous example of Bhumij style architecture. This temple was built during Yadava Dynasty in the 14th Century. The Boar has been very beautifully sculpted with minute detailing. It was sad to see the current state of the Sculpture.

The temple has a Pushkarni with carvings in the niches on the wall. The temple was garishly painted in some areas, thus hiding the original stone.
We reached Mumbai late night!
https://backpackersnovel.in/2019/06/16/3018/
Mallikarjun Temple – Loni Bhapkar
The Mallikarjun Temple in the sleepy village of Loni Bhapkar has been on my radar for nearly a decade. Situated on the right bank of the river Karha, a tributary of the river Nira about 80 km south-east of Pune, I was finally able to visit the site earlier this year.
There are in fact three separate sites of interest in the village, all of which are well worth exploring. The Mallikarjun temple is perhaps be most well known, although there are scant references to it on the internet and none of my reference books bother to make any mention of it at all. In my experience, the absence of such reference materials can often result in the greatest of surprises, and the monuments of Loni Bhapkar are certainly no exception.
The other two sites of note are the Someshwar Temple in the heart of the village, with an impressive set of Hero Stones that have been collected from the vicinity, and the Bhairavnath Temple located at the eastern extent of the village. Both of these sites will feature in subsequent blog posts.
The temple complex here consists of three primary structures, the Mallikarjuna Temple presently dedicated to Shiva, the Sri Datta Maharaj Mandir dedicated to Dattatreya (a form of Vishnu), both facing a elegant small step-well known locally as Puskarni.
The Puskarni is beautifully proportioned and extremely clean, surrounded by a stone wall with 24 niches (devkoshatas) facing the tank. Each one of these niches probably once contained one of 24 images of Vyuhantara Vishnus. It’s wonderfully peaceful here, the sort of place you could just sit and be alone for many hours. I was at this temple complex for well over an hour and didn’t see a single soul.
The symmetry of the Puskarni is amplified by the a wonderfully carved pavillion directly in front of the white Sri Datta Maharaj Mandir, which may be contemporary with the adjacent Mallikarjun temple. There is evidence to suggest that an additional pillared pavilion once existed on the south side of the Puskarni that protruded into the stepped section.
The carvings on this pavilion warrant a much closer inspection, there is a vast array of imagery on display here.
Here can be seen ten incarnations of Vishnu, and carvings depicting other deities such as Shiva, Arjuna, Krishna and Balrama, in addition to dancing women and musicians playing a number of instruments.
There is also a depiction of a woman giving birth (Matrushilpa), and a surprising number of erotic scenes as well.
All of this is just the start of what is quite a special little temple complex literally in the middle of nowhere. Currently located near the roadside and likely to be very close to where you park the car is an isolated Varaha (Yadnyavaraha) statue, sadly now missing his nose.
Below the legs of the boar are a conch (shankh), lotus (padma), mace (gada) and disk (chakra), all items associated with Vishnu. Lying beneath appears to be a demon begging for mercy, but this part of the carving is also quite badly damaged now.
Covering the body of the Varaha are repetitive images of Lord Vishnu, a local told me in the village that there are over 140 instances of his image on the boar, although I confess I didn’t attempt to count them. It’s a such striking image, and one I have seen a few times but on a much larger scale at sites like Eran and of course the famous Varaha temple at Khajuraho.
This carving was discovered in a field behind the Dattatreya temple in 1999. News of the discovery caused sudden interest in the temple complex, prior to this the site had escaped the attention of most scholars.
I was fully expecting to have to explore the surrounding fields to find this Yadnyavaraha, but it was in fact the very first thing I saw as I stepped out of the car. So recently it must have been moved to its present location, although it is a little concerning that it still stands in relative isolation, somewhat detached from the rest of the temple structures, and precariously close to the roadside.
So much of India’s heritage can be considered “at risk” from a number of factors, be it encroachment from development, accidental damage, or in many cases theft. As the considerable effort has been made to move this Varaha closer to the temple complex, I wish it has been deposited a little further away from the roadside.
A number of Nandi carvings face the Mallikarjun Temple, in front of which appears to be the footprint of a Varahamandap which has since disappeared. You can just make out the outline of the structure in the following photo. It is thought that this was originally where the Varaha carving we’ve just seen was placed.
The front facade of the Mallikarjun Temple is probably one of the more colourful examples I have come across in Maharashtra for an ancient temple. Every inch of this facade has been painted, usually a practice I am not a great fan of, but here for some reason it appears less out of place.
The temple construction, and potentially some of the associated structures, are believed to date back to the 13th century and attributed to Hemadpant (also known as Hemādri Paṇḍit). As well as a scholar, theologian, poet and architect, Hemdapant was prime minister from 1259 to 1274 A.D. during the reigns of King Mahādev (1259–1271) and King Ramachandra (1271–1309), both of the Seuna Yādav Dynasty of Devagiri who ruled over western and southern India.
During Hemadpant’s time as Prime Minister the Yadav dynasty reached its zenith, and he was also responsible for introducing the use of Modi script for Marāthi in government correspondence.
Hemadpant is attributed with the invention of constructing dry stone temples, using interlocking masonry without the need for any mortar. He is thought to have been directly involved in the construction of several temples in and around Maharashtra, although the term “Hemadpant architecture” today merely refers to the building style rather than constructions that he personally instigated.
The Yadav’s completely embraced the bhumija style of temple architecture, the example here clearly shows motifs that have been borrowed from the Gujarat region, with Jalis (perforated stone or latticed screens) at the front, but here there is a significant change of form.
The front elevation of the temple is tripartite, divided into three parts separated by columns. This three bay configuration facilitates the placement of diagonal beams, forming octagons that underpin the building of the corbelled central dome above the sabhamandapa.
Also note the four small turrets (or finials) on the corners of the sabhamandapa. Here they are quite subtle, but it is an architectural feature which has been borrowed from the early Sultanates, and would go on to be widely embraced by the Marathas. A good example of this is at the Bhairavnath Temple, also in Loni Bhapkar.
Another interesting feature is the difference in construction materials. The lower part of the temple has been built from stone, whereas the upper part and the shikhara have been built from brick. Perhaps by using brick it was easier to achieve some of the smaller decorative elements and architectural details compared to carving them out from solid rock ? I suspect originally this upper part of the temple would have been plastered to render a smooth and fine finish which was already present in the lower stone built portion of the temple.
Inside the temple are some nicely carved pillars crowned with yakshas. Panels on the columns depict a number of varied carved scenes, including musicians playing various instruments, an elephant being chased by a beast, dancing apsaras, a woman dressing up with a mirror and helped by her attendants, plus many more.
Above the four central pillars is unquestionably the highlight of this temple, but in the dim light it can be hard to make out, let alone photograph. On square beams supported by these columns are narrative panels, artistically carved in bold relief.
The scenes depict important incidents from the childhood of Krishna, the narration begins on the north-facing panel and continues in sequence on the west-facing, south-facing and east-facing panels.
These scenes are well described in texts like the Bhagavata Purana and the Harivamsha Purana, but these carved panels in the Mallikarjun temple the have only been documented by scholars in the last couple of decades.
For those wishing to understand in detail the scenes depicted here, I suggest you read an excellent write up on these carvings – Tracing the Inspiration of Sculptural Narratives of Krishna Lila at Loni Bhapkar: Observations and Analysis, by Gopal Joge, Shantanu Vaidya and Shrikant Ganvir.
I wish I had found this article prior to my visit here, I highly recommend you take a printed copy if you decide to see the temple for yourself. My rather poor photographs were all taken hand-holding the camera, and only scratch the surface of the complex scenes that are depicted in these carvings.
The central ceiling is also a wonderfully carved specimen, if you can ignore the covering of cobwebs through the incredibly dim light.
In the sanctum are two Shiva Lingas, probably signifying the presence of both Shiva and Parvati. “Mallika” is another name for the Godess Parvati, and “Arjun” for Shiva. A local legend says that Shiva and Parvati once came to the village and stayed for a few days at the temple complex.
Although this is now Shiva temple, there is plenty of evidence to suggest that Mallikarjun was originally dedicated to Vishnu. The existence of that finely carved Yadnyavaraha seemingly discarded from the temple complex, the dismantled Varahamandap, and the 24 niches for Vyuhantara Vishnus surrounding the tank are supporting evidence to the known fact that the Yadavas themselves worshiped Vishnu.
Mallikarjun probably switched to a Shiva temple to align with the family deity of the Bhapkar family, whose ancestral home is Loni Bhapkar. The Bhapkar family belong to the 96 Kuli Maratha clan and were themselves employed by the Yadavas in their army. Many people in the village today have the surname Baravkar which literally translates to ‘Barav (or pushkarni) makers’. The Bhapkar family were Sardars (officers) in the army of Shahji Bhosle, father of Chatrapati Shivaji Maharaj.
After the decline of the Yadav dynasty, the local Bhapkar family patronised many temples in the region, extensively renovating and revamping temples such as Bhairavnath in the village. They almost certainly had an influence in substituting the main god in the temple to align with the Shaivism wave during the Maratha era.
Back outside, the white painted Sri Datta Maharaj Mandir was unfortunately locked when I visited, so I was only able to peer in through the gate grill. It is much smaller and less elaborate than the adjacent Mallikarjun temple, and may also have been subjected to later renovations. Although I am no expert, it feels as though this temple is a slightly later addition to the complex but may be on the site of an earlier temple.
Between the Mallikarjun and Sri Datta Maharaj Mandir is another more recently constructed temple/shrine. During my visit I wrongly thought this was Sai Baba, a spiritual master who is has a huge following by both Hindus and Muslims, particularly in Maharastra.
This is in fact the shrine to Swami Dattanand Saraswati. He was a well educated IAS (Indian Administrative Service) officer in the 1900s who became a devotee of Dattaraya and was elevated to saint/swami. Whilst on official duty at Ganagapur in Karnataka, a village noted for its temple to Lord Dattatreya and a kshetra (place of pilgrimage), he had a dream (‘drishtant’ in Marathi). The contents of the dream I do not have the details of, but it resulted in him renouncing material desires and becoming an ascetic. He moved to Loni Bhapkar and settled in the village to conduct his simple spiritual life. The village is well known among other ‘nath panti’ devotees, a sect that worships Dattaraya.
Somewhere in or near to this shrine is a hole in the ground where his bones can be seen. This is usually covered, but the cavity is opened for viewing every year during Datta Jayanti, which celebrates the birth date of the Hindu god Dattatreya during December/January.
Swami Dattanand Saraswati is associated with a number of miracles in the village. In the south-west corner of the Mallikarjun temple complex is an old dilapidated structure that is never opened and nobody ever goes close to. It is said it contains an evil spirit (‘khaiis’ in Marathi) that was trapped by the Swami.
That concludes a virtual tour of Mallikarjun temple at Loni Bhapkar. A site that stands in relative obscurity and yet is easily reachable as a day out from Pune. This tiny village has so much more to offer as well, which I hope to cast some light on in my next couple of blog posts.
References
My warmest thanks to Harshad Bhapkar, who upon reading my initial blog was able to add much more detail concerning his home village.
Please ‘Like’ or add a comment if you enjoyed this blog post. If you’d like to be notified of any new content, just sign up by clicking the ‘Follow’ button. If you have enjoyed this or any other of my posts, please consider buying me a coffee. There’s a facility to do so on the righthand side of this website for desktop users, and just above the comment section for mobile users. Thank you !
If you’re interested in using any of my photography or articles please get in touch. I’m also available for any freelance work worldwide, my duffel bag is always packed ready to go…
KevinStandage1@gmail.com
kevinstandagephotography.wordpress.com
बारामती : शिलालेखामुळे पणदरेच्या इतिहासाला उजाळा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : पणदरे (ता. बारामती) गाव ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जाते. गावातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, शिलालेख हे इतिहासाची साक्ष देतात. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी नुकतेच केले. त्यामुळे गावच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिलालेखानिमित्त पणदरे व येथील जगताप घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.
शिलालेख वाचनासाठी दुधाने यांना बारामती परिसराचा इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणार्या विनोद खटके व मनोज कुंभार या विद्या प्रतिष्ठानच्या दोन शिक्षकांचे सहकार्य मिळाले. याशिवाय राम वाघोले ,अनिकेत राजपूत, राहुल भोईटे यांचीही मदत झाली. पणदरेत मुख्य गावठाणात श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख कोरला आहे. तो उठाव स्वरूपाचा असून, सात ओळींचा शुद्ध मराठी भाषेत मजकूर आहे. शिलालेखाची अक्षरे ठळक असून, सुस्पष्टपणे वाचता येतात.
त्यावर रविवार, 13 मार्च 1774 या दिवशी श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा घुमट बांधला, असा उल्लेख आहे. जानराव पाटील यांचा हा घुमट (समाधी) आहे. पण हा समाधी घुमट नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही. घुमट बांधल्याची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तो कोरला आहे.
जगताप घराण्याचा ऐतिहासिक वारसा
सुपे परगण्यात मोकदम पाटील महादजी यांच्याकडे पणदरेची पाटीलकी असल्याचेही यावरून स्पष्ट होते. हे घराणे शिवपूर्वकालापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी चिंचवडचे मोरया गोसावी यांना पणदरे गाव इनाम दिल्याचे 1649 चे पत्र उपलब्ध आहे. पुरंदरच्या लढाईत किल्ल्याच्या पायथ्याशी जी लढाई झाली त्यात मुसेखान गोदाजी जगताप यांच्याकडून ठार झाला, तर फत्तेखान बेलसरकडे पळून गेला. त्या लढाईत नंदाजी जगताप शिवरायांकडून लढले असा उल्लेख आहे.
सुप्याच्या पाटीलकीच्या वादाबद्दल शिवाजी महाराजांनी जगतापांची कानउघडणी केली ते 6 मार्च 1676 पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजेश्री रामोजी जगताप व खंडोजी जगताप यांचे नाव आलेले आहे. येथील कोकरे (धनगर) व जगताप (मराठा) यांच्याकडे छत्रपती शाहू व पेशवाईत निमपाटीलकी राहिली. शहाजीराजे यांच्या जहांगिरीतील सासवडमधील 10 गावांची देशमुखी जगतापांकडे होती. त्यात बारामती परिसरातील होळ, मुरूम, वाकी, वाणेवाडी, पणदरे आदींचा उल्लेख आहे.
https://pudhari.news/maharashtra/pune/456494/illuminate-the-history-of-panadare-with-inscriptions/ar
ऐतिहासिक लोणी भापकर –
बारामती तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं लोणी भापकर हे एक गाव. पेशव्यांचे सरदार सोनजी भापकर यांचे हे इनाम गांव. बारामती जेजुरी मार्गाने जाताना २५ -२६ किमी अंतरावर काऱ्हाटी पाटीच्या पुढे पाच सात किमी लोणी पाटी म्हणून एक थांबा आहे. एक चौक आहे म्हणा हवं तर. उजवीकडे सुपा मार्गे शिरूर ला तर डावीकडे लोणी भापकर गावामध्ये जाता येतं. गावामध्ये मुख्य रस्त्याने आल्यावर आपण गावाच्या मध्यभागी असलेल्या चौकात पोहोचतो. पुण्याहून सोलापूर महामार्गाने चौफुला – सुपा – लोणी भापकर या मार्गानेही आपण या ठिकाणी येऊ शकतो. तसेच पुण्याहून जेजुरी मार्गे बारामतीला येताना मोरगाव पासून पुढे सात आठ किमी अंतरावर लोणी पाटी म्हणून थांबा आहे. उजवीकडे वळून सरळ पाच सहा किमी अंतरावर ऐतिहासिक लोणी भापकर गाव वसलेले आहे.
गावातील मध्य रस्त्यावरून करंजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा किमी अंतरावर सरदार भापकर यांचा भव्य असा गढी / वाडा आहे. गावाच्या चौकात पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास सहजरित्या आपणास मंदिराचे शिखर नजरेत भरेल. गावचे कालभैरवनाथ हे ग्राम दैवत. सरदार भापकर यांच्या काळातच हे मंदिर बांधले असल्याचे म्हटले जाते. शिवाय, मंदिराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला उंच मनोऱ्यावर एक घंटा लटकवलेली दिसते. सरदार भापकरांनी पेशवाईच्या काळामध्ये पोर्तुगिजांचा पराभव करून ती घंटा हस्तगत केली आणि मंदिराला अर्पण केली असे म्हणतात. मंदिराच्या समोर दगडी बांधकाम केलेल्या दोन दीपमाळ, तसेच उजव्या दीपमाळेच्या शेजारी असलेली बारवही बघण्यासारखी आहे. मंदिराच्या चहुबाजूंनीं चार पाच फूट रुंद अन अडीज तीन पुरुष उंच अशी भर भक्कम तटबंदी त्या काळातील मजबूत बांधकामाची साक्ष देतात. अन आजही आपल्या आधुनिक प्रगत तंत्रज्ञान असलेल्या २१ व्या शतकात आपली ओळख टिकवून दिमाखात उभी आहे.
मंदिरातील काळभैरव अन जोगेश्वरीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. सरदार भापकरांनीच या मूर्ती मंदिरामध्ये स्थापन केलेल्या आहेत. मंदिरातील आणि बाहेरील बहुतांशी भाग रंगवल्यामुळे मूळ दगडातील कोरीव नक्षीकाम रंगांखाली गेले असले तरी आपले अस्तित्व टिकवून आहेत. आतमध्ये पेशवे काळातील चित्रे, प्राण्यांची शिकार करतानाचे शिल्प, वादक, शिपाई अन नर्तक यांची शिल्पे बघायला मिळतात. तसेच दगडामध्ये केलेली विविध नक्षीकाम, कमल फुले, महिरप यांचे नाजूक कोरीव कामही पाहण्याजोगे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना डाव्या अन उजव्या बाजूला थोडं खाली देवी, देवतांची अन नर्तकी यांची नक्षीकाम केलेली शिल्पे दिसतात. मंदिरावर विविध देवदेवतांची, संतांची, प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपावर एकूण चार मिनार / कळस आहेत. त्यावरही देवदेवतांची शिल्पे रंगवलेली आहेत. मंदिराच्या मुख्य कळसाभोवती सुद्धा एकूण चार मिनार आहेत. कुतुब मिनार किंवा ताजमहालला ज्याप्रमाणे चार मिनार आहेत अगदी त्याप्रमाणेच यांची रचना आहे. शिवाय मंदिराचे घुमटाकार कळसही स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच.
त्यानंतर आपण जर करंजे गावाला जाणाऱ्या रस्त्याने गावातुन थोडस पुढे गेलो तर उजव्या बाजूला शिव शुंभुचे सोमेश्वर मंदिर नजरेस पडते. भैरवनाथ मंदीरासारखी नक्षीदार कलाकुसर या मंदिराला नाही. मंदिराचे सभागृह चौकोनी आकाराच्या एखाद्या खोलीसारखे आहे तर मुख्य गाभारा अनेक उभे स्तंभ एकत्र करून केल्या सारखा भासतो. मंदिराचा कळस घुमटाकार आहे. मंदिराच्या समोर असलेला चौथरा अन त्याचे मंडपही दगडी बांधकामात केलेले आहे. गाभाऱ्यातील शिवलिंग अन मंदिराच्या बाहेर असलेली वीरगळेही पाहण्यासारखी आहेत. त्यावर शूरवीरांच्या लढाईचे प्रसंग कोरलेले आहेत. अजून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बाभळीच्या काटेरी झाडाझुडपांमध्ये सरदार भापकर यांची गढी नजरेस पडते. चार बुरुंजान्नी युक्त आणि आतमध्ये असलेला वाडा अजूनही सुस्थितीमध्ये आहे. गढीचे बुरुंज आता ढासळलेले आहेत. बाहेरच्या भिंतींचीही बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. पण आतील मुख्य राहण्यासाठीचा वाडा आजही सुस्थितीत आहे. त्या काळात बनवलेले वाड्याचे लाकडी प्रवेशद्वार आजही चांगल्या स्तिथीत आहे. भापकर यांचे वंशज आजही या वाड्यामध्ये राहतात.
मुख्य रस्त्याने पुन्हा थोडस पुढे गेलो कि उजव्या बाजूला एक रस्ता जातो, त्या दिशेने थोडस अंतर पुढे गेलो कि डाव्या बाजूला आपणास एक पुरातन मंदिर नजरेस पडेल. हेच मल्लिकार्जुन मंदिर. शिव शंकर अन पार्वती यांची दोन शिवलिंगे या मंदिरामध्ये पाहावयास मिळतात. तेथील पुजाऱ्यांच्या माहितीनुसार हे मंदिर पांडवकालीन आहे. मंदिराच्या रचनेकडे पाहिल्यास १४व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंती स्थापत्य कलेचा त्यावर पगडा असलेला जाणवतो. अशाच प्रकारचे शंकराचे श्री सिद्धेश्वर मंदिर आपण कोऱ्हाळे बुद्रुक या गावी पाहू शकतो. मंदिराच्या शिखराचा भाग आणि सभामंडपाच्या वरच्या भागाची पडझड झाली असल्याने त्याची डागडुजी केली आहे. मंदिराच्या अन सभामंडपाच्या भिंतींचा भाग हा दगडी बांधकामात तर शिखराचा भाग नागर शैलीतील मातीच्या व चुना मिश्रीत विटांचा बनवलेला आहे. त्या काळातील कारागिरांची कलाकुसर अन नाजूक कोरीव काम आपण या मंदिरामध्ये पाहू शकतो. मंदिराच्या आतमध्ये नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ अन त्यावरील देवी देवता, नर्तकी, अप्सरा, प्राणी, शूरवीरांची, कृष्णाची, शिव पार्वतीची शिल्पे डोळे दिपवून टाकतात. सभामंडपाच्या छतावरील दगडी झुंबर म्हणजे आजकालच्या जमान्यातील चमत्कारच म्हणावा लागेल असे नाजूक कोरीव काम केलेले आहे.
आतमध्ये आल्यावर एखाद्या लेणीमध्ये आल्यासारखे वाटते. काही ठिकाणी कामशास्त्रातील कामशिल्पेही कोरलेली आपण पाहू शकतो. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूलाही देवी देवतांची शिल्पे, स्तंभ, रत्न, निसर्ग शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरच्या समोर नंदीचे शिल्प आहे आणि समोरच दिसते ती भव्यदिव्य आणि स्थापत्यकलेतील अनमोल देणगी लाभलेले आकर्षक जलकुंभ किंवा पुष्करणी. रस्त्यावरून सहजासहजी न दिसणारी ही पुष्करणी पूर्णपणे दगडी बांधकाम असलेली आहे. प्रत्येक दगडावर काही अंक कोरलेले आहेत आणि उतरायला चहूबाजूंनी खालीपर्यंत दगडी पायऱ्या आहेत. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही पुष्करणीही पांडवकालीन आहे, पांडवांची कला आहे. पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेले हे जलकुंभ पाहण्याची मजा काय औरच. खाली आल्यावर खालच्या कठड्यावरून आपण चहूबाजूंनी फिरून पुष्करणी पाहू शकतो. प्रत्येक ठिकाणी लहान लहान मंदिरांचा आकार असलेल्या जागा कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी त्यामध्ये देवी देवतांची शिल्पे असावीत पण आता आतमध्ये काहीच नाहीये. पश्चिम बाजूला एक चौथरा अन त्यावरचे मंडपही नजरेत भरते. याला बहुदा वराहमंडप असे म्हणतात.
पुष्करणीतील मंडपाच्या पायथ्याला हत्तीच्या तोंडाच्या भागाची शिल्पे कोरलेली आहेत. जणू या सभामंडपाचा सगळा भार या हत्तींनी पेलला आहे. त्यावरच्या भागात विष्णूच्या अवतारांची शिल्पे तर त्याच्या थोडं वरच्या भागात काही पुराणातील देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. त्याच्या वरच्या भागात चहूबाजूंनी कामशास्त्रातील विविध प्रसंगांची कामशिल्पे कोरलेली आहेत. पूर्वी या सभामंडपात महावराची मूर्ती स्थित असण्याची शक्यता असावी, सध्या हा सभामंडप रिकामाच आहे. कारण अगदी समोरच दशभुजा दत्ताचे मंदिर आहे. मंदिरासमोर महावराची मूर्ती नको म्हणून कदाचित तिथून बाहेर काढली असावी. आता महावराची भग्न अवस्थेतली मूर्ती जलकुंभाच्या पूर्व बाजूस बाहेर जमिनीवर ठेवलेली आहे. त्यावर विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्याची शेपटी सर्पाप्रमाणे वेटोळे केलेली आहे. तर समोर खाली एक मूर्ती हात जोडलेल्या स्थितीत आहे. तसेच खाली शंख, चक्र, गदा ही प्रतीकेही कोरलेली आहेत.
पुष्कर्णीच्या आतील सभामंडपासमोर दशभुजा दत्ताचे मंदिर आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. श्री दत्ताचे सहा आणि कालिकेचे चार असे मिळून मूर्तीला दहा हात आहेत. महाराष्ट्रामध्ये दहा हात असलेली दत्ताची एकमेव मूर्ती या मंदिरामध्ये आहे. तेथील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुर्धर रोगांनी पीडित आणि दुःखी लोकांचे गाऱ्हाणे या देवतेला साकडं घातल्याने वा नवस बोलण्याने पूर्ण होतात.
ऐतिहासिक लोणी भापकर एवढे चांगले ऐतिहासिक वास्तू वैभव लाभूनही दुर्लक्षितच असलेले मल्लिकार्जुन मंदिर, ओसाड पडलेली पुष्करणी, त्यामधील मोकळा सभामंडप, अन दुर्लक्षित महावराची मूर्ती मनाला कुठेतरी सल देऊन जातात. आपण नुसतेच म्हणतो कि, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तरीही बहुतांशी गड, किल्ले, वाडे – राजवाडे, शिल्पे, मंदिरे, लेण्या जतन करायचे सोडाच त्याची निगराणी वा डागडुजीही वेळोवेळी होत नाही. शेवटी आपला ऐतिहासिक वारसा असाच शेवटच्या घटका मोजत राहणार कि काय? असा नेहमी प्रश्न पडतो.
लेख संपवायच्या आधी एक आवर्जून सांगावसं वाटतं, हे असच चालू राहिलं तर, “छत्रपती शिवरायांच्या, संभाजीराजांच्या, मराठ्यांच्या पराक्रमाची अन दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारे गड – किल्ले, मंदिरे असेच जमीन-दोस्त होणार आणि तिकडे दूर अरबी समुद्रामध्ये काही हजार करोडो रुपयांची स्मारकं होत राहणार.”
Shinde Sunil
https://www.discovermh.com/historical-loni-bhapkar/
श्री दशभुजा दत्तमंदिर, लोणी भापकर
स्थान: लोणी भापकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
सत्पुरूष: श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज.
विशेष: दशभुजा दत्तमूर्ती, पुरातत्व विभागाकडून संरक्षित वस्तू, दगडी मंदिर.
“श्री दशभुजा दत्तमंदिर” हे स्थान लोणीभापकर, तालुका बारामती, जि. पुणे या गावाच्या पश्चिमेस सुमारे ३ फर्लांगावर, अतिशय प्राचीन श्रीशैल्यमल्लिकार्जुन देवालयाच्या सन्मुख लगतच्या भव्य मोठ्या दगडी बांधलेल्या मंदिराच्या आतील पश्चिमभागी आहे. श्रीदत्ताच्यापादुकांची स्थापना शके १८३० चैत्र शुद्ध, गुरुवार रोजी सन १९०८ या दिवसाच्या समुहूर्तावर पहाटे ब्रह्मीभूत सद्गुरू दत्तानंदसरस्वतीस्वामी महाराज यांनी केली. या देवळाची (शिखराची) उंची सुमारे ३० फूट असून औरसचौरस घेर २५ x २५ फूट आहे. त्यामध्येच देवास प्रदक्षिणा घालण्याकरता व्यवस्था आहे. तसेच त्यांच्यामागे तीन ओवऱ्या बांधल्या असून देवळाच्या मागे बरोबर मध्यावर औदुंबर (कल्पवृक्ष) आहे. ओवऱ्यांचा उपयोग श्रीगुरुचरित्रपारायणाकरता व सेवेकऱ्यास रहाण्यास करतात.
श्रीमंदिराचे पूर्वद्वार पूर्वेकडे असून मंदिराच्या आतील भागी मध्यावर श्रीदत्तपादुकांची स्थापना केलेली आहे. पादुकांच्या मागे सुमारे ४ फुटांवर उत्तम प्रकारच्या दगडी सिंहासनावर मध्यभागी श्रीदत्तमूर्ती बसविल्या आहेत. तिची प्राणप्रतिष्ठा शके १८५० मार्गशीर्ष १५ रोजी गुरुवार सन १९२८ या शुभदिनी सूर्योदयाबरोबर झाली. पूर्वेस दगडी मंडप तीनही बाजूंस आहेत. श्रीदत्ताची मूर्ती २॥ फूट उंचीची मोहक असून प्रत्येक हातात आयुधे दिलेली आहेत. मूर्ती संगमरवरी दगडाची जयपुराहून आणली आहे.
या दत्तस्थानाशी श्रीदत्तानंदसरस्वतींचा संबंध आहे. श्रीदत्त-नृसिंहसरस्वती-पूर्णानंद-कृष्णानंद अशी त्यांची परंपरा सांगितली जाते. मल्लिकार्जुनमंदिर सद्गुरू येण्यापूर्वी ओसाड व अत्यंत भयानक होते. देवाचे दर्शनास भीतीमुळे कोणीही जात नव्हते. देवालयाचे भोवताली फारच उंचउंच निवडुंग, सर्प व दाट झाडी होती. अशा त्या निवांत स्थळी सद्गुरूंनी येऊन मुक्काम ठोकला. ही बातमी गावात पसरताच सर्व लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले.
दशभुजा दत्तमूर्ती हि क्वचितच आढळते पण तशी दत्तमूर्ती येथे आढळते. सादर मंदिर पुरातत्व विभागा मार्फत जतन केले जाते. हे स्थान अत्यंत जागृत असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भक्त येथे येऊन गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन सेवा अर्पण करतात. श्री दत्तानंद स्वामी महाराजांनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले. त्यांचा चरित्राची ७ अध्यायाची प्रासादिक पोथी आहे अनेक भक्त ती नियमित वाचतात. या मंदिरात एक देवीचे स्थान आहे. अनेक भक्त येथे नवस बोलतात व ते पूर्ण होतात.
श्रीदत्तानंदसरस्वती यांचे जन्मगाव, राहण्याचे ठिकाण वगैरे काहीही माहिती मिळत नाही. इंग्रजांच्या राज्यात डांग देशातील बंडाळीचा बंदोबस्त करण्याकरिता, त्यांना एक मोठा सैन्यावरील अधिकारी म्हणून पाठविले. त्याच समयी श्रीअक्कलकोटच्या स्वामींची व त्यांची भेट झाली व लगेच उपदेशही मिळाला. अत्यंत नास्तिक असूनही स्वामींची व त्यांची दृष्टादृष्ट होताच त्यांचा सर्व नास्तिकपणा नाहीसा झाला.
ते शरीराने चांगले धष्टपुष्ट, उंच व गौरवर्णाचे आणि अत्यंत करारी होते. लहान मुलांबरोबर खेळणे त्यांस फार आवडे. वानप्रस्थ स्विकारल्यानंतर नेपाळ प्रांतातून फिरत फिरत ते दक्षिण भागात म्हणजे पुण्यास उतरले. त्यावेळी त्यांचे समवेत श्रीनृसिंहसरस्वती आळंदीचे, जंगलीमहाराज भांबूर्डा असे होते. सोमयाचे करंजे येथे ते आले व तेथून लोणीस प्रकट झाले व शके १८३८ फाल्गुन व॥ त्रयोदशी इ. स. १९१६ या वर्षी बुधवारी सकाळी ६ वाजणेचे सुमारास त्यांनी समाधी घेतली.
http://www.dattamaharaj.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0




































































































