Saturday, June 25, 2022

अकोले तालुका परिसर

 अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.
प्रमुख आकर्षणे
   रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड ( पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.
      अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते . या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.
धरणे
      प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.
      रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे.
४) बलठण धरण :
      अकोले तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील बलठण धरण हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणुन नव्याने ओळखले जाणारे प्रेक्षणीय स्थळ आहे . बलठण व पुरुषवाडी यां गावांच्या स्थिरावरील कुरकुंडी नदी आता बलठण धरण नावाने ओळखली जाते , माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कारकीर्दित बांधण्यात आलेले हे बलठण धरण असुन येथील देखावा पाहण्यासाठी पावसाळ्यात गिर्यारोहकांची भ्रमंती बघायला मिळते.
अकोले तालुक्यातील गावे
    देवगाव (अकोले)
    अगस्तीनगर
    अंबिकानगर
    अंबित
    अंभोळ
    आगार
    आंबड
    आबीतखिंड
    आंबेवंगन
    इंदोरी
    उंचखडक खुर्द
    उंचखडक बुद्रुक
    उडदावणे
    उंबरेवाडी
    एकदरे
    औरंगपूर
    करंडी
    कळंब
    कळस खुर्द
    कळस बु्द्रुक
    कातळापूर
    काळेवाडी
    कुंभेफळ
    कुमशेत
    केळी
    केळी ओतुर
    केळी कोतुळ
    केळी रुम्हणवाडी
    केळूंगण
    कोकणवाडी
    कोतूळ
    कोथळे
    कोदनी
    कोंभाळणे
    कोलटेंभे
    कोहंडी
    कोहणे
    कौठ वाडी
    खडकी खुर्द
    खडकी बुद्रुक
    खानापूर
    खिरविरे
    खुंटेवाडी
    खेतेवाडी
    गणोरे
    गर्दणी
    गारवाडी
    गुहिरे
    गोडेवाडी
    गोदोंशी
    घाटघर
    चास
    चिचोंडी
    चितळवेढे
    चिंचवणे
    जाचकवाडी
    जामगांव
    जायनावाडी
    जांभळे
    टिटवी
    डोंगरगाव
    ढगेवाडी
    देवठाण
    धामणगाव
    धामणवन
    धुमाळवाडी
    नवलेवाडी
    निरगुडेवाडी
    पाडाळणे
    पानसरवाडी
    पिपळगाव
    पिंपळगाव निपाणी
    बहिरवाडी
    बारी
    भंडारदरा
    रतनवाडी
    रंधा खुर्द
    रधा बुद्रुक
    राजूर
    रुंभोडी
    लहित खुर्द
    लाडगाव
    लिंगदेव
    वाघापूर
    विठे
    वारंघुशी
    वीरगाव
    शेरणखेल
    वाकी
    शेंडी
    समशेरपूर
    सावरगाव पाट
    सांगवी
    सुगाव
    हिवरगाव
    बेलापूर
    बदगी
    म्हाळुंगी
    पाडोशी
    पेढेवाडी
 
कोतुळ Kotul
       कोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.
    कोतुळ जवळ फोकसंडी हे गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. [ संदर्भ हवा ]थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते.
अकोल्यापासून चे अंतर : 20.4 कि.मी.
       कोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.
      श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान हे कोतूळ गावाचे ग्रामदैवत आहे. अकोले शहरापासून १९ कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात, वनराईत वसलेले आणि ऐतिहासिक व पौराणिक परंपरा असेलेले हे एक देवस्थान आहे.
     व्यास लिखित महाभारतातील “जैमिनी अश्वमेध” या ग्रंथात कोतुळेश्वर तथा कुन्तलेश्वर देवस्थानाचा उल्लेख आढळतो. भागवत भक्त चंद्र्हास्य या दानशूर राजाची कोतूल किंवा कुंतलपूर नगरी पुढे शब्द अपभ्रंशाने कोतूळ तथा कोतुळेश्वर या नावाने ओळखली जाऊ लागली. येथेच पांडवांचा विश्वविजयी अश्व अडविला गेल्याची कथा आहे. ऐतिहासिक काळात पेशव्यांच्या सेवेत असणा-या साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर परशुरामी याच गावातले.
   महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. तीन ते चार लाख भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विविध धार्मिक विधी, उत्सव, हरिनाम सप्ताह असे उपक्रम दरवर्षी देवस्थान कमिटीद्वारे आयोजित केले जातात.
       अकोले तालुक्यातील कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. एका ठिकाणी छोटीशी गुहा बनून तिच्यात लवणस्तंभ तयार झालेले दिसले… स्थानिक लोक याला लवणस्तंभ म्हणत असले तरी भूगर्भात पाण्याच्या संचयन कार्यामुळं तयार झालेला हा भूआकार म्हणावा लागेल. भूगर्भतज्ज्ञाच्या मते दगडातून झिरपलेले ‘कॅल्शियम काबरेनेटयुक्त’ क्षार विरघळतात आणि ते तळाशी खडकांच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यांच्या संचयन क्रियेतून स्तंभासारखे आकार बनू लागतात. जाणकारांच्या मते, अशी भूरूप वैशिष्टय़े ग्रेट ब्रिटन, युगोस्लोव्हाकिया, अंदमान बेटांवर आणि भारतात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आहेत.

 
ताम्र धातूची नाणी आणि प्राचीन ठेवा, नगरमध्ये उत्खननात सापडले 2 हजार वर्षांपूर्वीचे अवशेष
      अहमदनगर, 20 एप्रिल :  अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यातील अकोले (akole) तालुक्यात उत्खननात दोन हजार वर्षापूर्वीचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी गेल्या 8 दिवसांपासून कोतूळ गावात उत्खनन करत असून आणखी संशोधन समोर येण्याची शक्यता आहे.
        कळसुबाई पर्वत रांगेत वसलेल्या अकोले तालुक्यातील कोतुळ गावात पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी गेल्या 8 दिवसांपासून ऐतिहासिक शोध घेत आहेत. मुळा नदीच्या किनारी असणाऱ्या या गावात आदी काळात पुरातन वसाहत असावी असा कयास होता. त्यानुसार, गेल्या 11 एप्रिलपासून डेक्कन महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासाचा भाग म्हणून उत्खनन करत आहेत.
       उत्खननात लाल काळया रंगाच्या छटा असलेली कापरे, पहिल्या शतकातील पाण्याची विहीर, धान्याचा रांजण, विश्रांतीचा ओटा, चूल, जनावरांची हाडे, सिलीकेट धातूचा काच सदृश्य निळा मणी, ताम्र धातूचे पहिल्या व दुसऱ्या शतकातील चलनी नाणे सापडले असल्याने आता कोतूळच्या उत्खननाचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा म्हणजे सातवाहन काळात जाऊन पोहचला आहे.  अशी माहिती   डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्व विभाग प्रमुख डॉ.पी. डी. साबळे यांनी दिली.
खास आकर्षण-
लवणस्तंभाची भौगोलिक रचना
अकोले तालुक्यातील कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. एका ठिकाणी छोटीशी गुहा बनून तिच्यात लवणस्तंभ तयार झालेले दिसले… स्थानिक लोक याला लवणस्तंभ म्हणत असले तरी भूगर्भात पाण्याच्या संचयन कार्यामुळं तयार झालेला हा भूआकार म्हणावा लागेल. भूगर्भतज्ज्ञाच्या मते दगडातून झिरपलेले ‘कॅल्शियम काबरेनेटयुक्त’ क्षार विरघळतात आणि ते तळाशी खडकांच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यांच्या संचयन क्रियेतून स्तंभासारखे आकार बनू लागतात. जाणकारांच्या मते, अशी भूरूप वैशिष्टय़े ग्रेट ब्रिटन, युगोस्लोव्हाकिया, अंदमान बेटांवर आणि भारतात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आहेत.
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992 
https://www.akolemaza.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3-kotul/

आमची फोफसंडी ,,,,,,,,,,,,,,,,,,, अहमदनगर जिल्हयातील मॉरिशस, अकोले तालुक्यातील काश्मिर, .,,,,,,,, चला जाणून घेऊ ,,, साधारण १२०० ते १५०० लोकवस्तीचे फोफसंडी गाव अहमदनगर  जिल्यातील अकोले तालुक्यातील गाव, अहमदनगर, ठाणे, पुणे जिल्हयाच्या सरहद्दीवरील गाव,,,,, अनेक वाडया,,,, १ ) पिचडवाडी २ ) घोडेवाडी ३ )कोंडारवाडी ४ ) मुठेवाडी ५ ) भगतवाडी ६ ) जांभळेवाडी ७ ) मेमाणे वस्ती ८ ) गभाले वस्ती  ,,,,, असा परीसर ,,,,,,,, रंजक कथा,,, फोफसंडी नाव,,, साधारण १९२५ ला ब्रिटीश राजवटीत संगमनेर प्रांताचा अधिकारी मपोपफ हा घोडयावरून जंगल सफरी करत असतांना त्याला येथे काही आदिवासी वस्त्या नजरेस पडल्या तो आश्चर्यचकीत झाला, त्याला येथील अफाट निसर्गसंपदा,कडे, कपारी, डोंगररांग खुप आवडली त्याने येथे मांडवी नदीच्या तीरावर रेस्ट हाऊस बांधले दर रविवारी येथे येऊन राऊ लागला. त्याचे अवशेष आजही येथे आहे, पुढे या गावाला मपोपसंडीफ म्हणू लागले, कालांतराने अपभ्रंशाने फोफसंडी नाव पडले, त्यापुर्वीचे नाव माहित नाही,,, तेच आताचे फोफसंडी,,,,,,, का पहावे निसर्गाने नटलेले आमचे फोफसंडी,,,,,,,,,,, धबधबे,,,,, १ ) घारीचा धबधबा,,, आश्चर्य मिश्रीत धबधबा, निसर्गाचा अदभुत चमत्कार, मनमुराद आनंदा लुटणारा धबधबा,,,,, उंची अंदाजे ३५० फुट,,, उंची मोजण्याची गरज २ ) भदभद्याचा धबधबा ३ ) कावडयाचा धबधबा ४ ) चोहडीचा धबधबा व असे अनेक धबधबे,,,, डोंगर,,, १ ) निखळीचा डोंगर २) बाळुबाईचा डोंगर ३ ) रांजण्याचा डोंगर, मानखंदा, गाय दरा,सानदरी,टकोरीची खिंड,,,, अनेक कडे, कपारी,,, वारल्याचा कडा, उंबारले, केमसावण्याचे पाणी,,,,, गडदी,,,, १ ) घोडगडद २ ) दोंड्याची गडद ३ ) चारण गडद अशा अनेक गडदी,,, त्यात गाय , वासरे, बैल, म्हैस मुक्कामाला असतात, मंदीर,,,, १ ) कळमजाई मंदीर २ ) दर्या बाई मंदीर ३ ) बर्डीनाथ मंदीर ४ ) राणुबाई मंदीर ५ ) मारूती मंदीर असे मंदीरे आहेत, तसेच गड,,,,,, कुंजीर गड , कोंबड किल्ला,,, साधारण १६७० मध्ये सुरतच्या हल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कुंजीर गडावर एक दिवस मुक्कामस होते असे म्हणतात,,,, येथील एका गृहेतुन ८ जन एकापाठोपाठ एक पलीकडे जाऊ शकतात,, तेथुन तळे, विहीर, शिंदे, पिंपरी, खडकी, गोंदोशी या गावांना जाऊ शकतो अशी रचना आहे,,,, येथून मालशेज घाट अगदी १o कि मी अंतरावर आहे. फोफसंडी अहमदनगर,  पुणे, ठाणे या जिल्हयांच्या सरहद्दीवरील गाव, काजवा महोत्सव , यात्रा, सन उत्सव, आदिवासी लोककला, नृत्य, सप्ताह आयोजन,,,,,, फोफसंडी हे संगमनेर येथुन ६० कि मी अंतरावर, अकोले येथुन ४० कि मी अंतरावर व मध्य ठिकाण कोतुळ पासुन २१ कि मी अंतरावर तर भैरवनाथ मंदीर पळसुंदे येथन पावने १३ कि मी अंतरावर आहे, मॉरिशस, काश्मिर नंदनवन म्हणजे फोफसंडी ,,,,, या गावात पूर्वी पाऊसामुळे  ४ महिणे पुरेल इतके धान्य शासनाकडून पोहच केले जायचे,  रांजण्याच्या डोंगरावर काही काळ पांडवांचे वास्तव्य होते, औषधी वनस्पती,,रगत रोडा, हडी चंदन, आवळा, हिरडा, जांभळे, अर्जुनसादडा,,,, तर रानभाज्या,,चावा, कारवा भाजी, कोरडू, अळू इत्यादी तर रानमेवा,,, करवंद, आंबे हळद,हमन, वृक्ष,,,कारवी,करांबो, म्हळवा,सादडा, उंबर, हिरडा, आंबा, राम्याठा, आशींद, आळवा, सेंद्री, काटेरी,,,टामटा, करवंद, पिके,,, भात मुख्य पिक त्यात दप्तरी १२५ , नऊ नंबर, रायभोग, इंद्रायणी,वरंगळ, पुणम, तांबुकडाई, २४८ हे वाण करतात तर वरई, सावा, वाल, खुरसनी, नाचणी ,,, हिवाळ्यात थोडया प्रमाणात गहू,हरबरा, उन्हाळ्यात वटाणा, फरशी ही पिके,,, पुणे जिल्हातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, मांदारणे ही गावे ओतुर बाजारपेट जवळ,,,, दत्तात्रय हनुमंता मुठे नावाचा तरुण १९९७ साली पुणे येथून गावी आला, तेथुन खरी कायापालटास सुरुवात  झाली ह्या ध्येयवेड्याने तरुणाने अनेक वेळा मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्रालय, मंत्री पातळीवर पत्रव्यवहार केला, साधारण २००५ मध्ये गावात आदरणीय पिचड साहेबांच्या प्रयत्नाने गावात लाईट आली, २०१o पासून गावात एसटी धावू लागली,, तुषार दत्तात्रय मुठे हा सातवीचा मुलगा विरगाव येथे इंग्लीश मिडीयमला इयत्ता सातवीत शिक्षण घेतो, गावात रेंज नसल्यामुळे दोन ते तीन किमी अंतरावर एका मोरीत रेंज यायची तेथेच त्याची शाळा सुरू व्हायची, त्याने चक्क भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना पत्र पाठवले, मला कलेक्टर व्हायचे आहे रेंज नाही,,,, कसा होवू, पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली जीवो, आयडीया, व्होडाफोन कंपन्यांनी ईमेल, फोन करून तसेच जीवो कंपनीच्या चेन्नई येथील अधिकारी यांनी तुषारचे वडील दत्ता मुठे यांच्याशी संपर्क साधला, लवकरच गावात टॉवर होईल,, सध्या ओतुरकडून गावात रेंज आलेली आहे, दत्ता मुठे ह्या तरुणाने तेथे सह्याद्री दर्शन पथिकालय ( हॉटेल ) पिचडवाडी येथे सुरु केले आहे, तेथे दोन वेळ जेवण, चहा, नाष्टा, अंघोळीची सोय, राहण्याची सोय, फॅमील सह राहण्याची व्यवस्था, शुध्द शाकाहारी जेवण, नॉनव्हेज जेवण सर्व ऑर्डर प्रमाणे भेटते संपर्क,7218327435...8007825438 हा व्हाटस अप नंबर आहे,,, नाव दत्तात्रय मुठे रेंजमुळे अगोदर संपर्क साधा,,,, एकदा नक्की आमच्या फोफसंडीला भेट दया , आमची इतर ठिकाणे, भंडारदरा धरण, कळसुबाई, हरिश्चंद्र गड, सांदन दरी, रतनगड, अगस्ती आश्रम, कोतुळेश्वर, कोलटेंभा धबधबा, रंधा फॉल, निळवंडे धरण, कोहणा धबधबा, पट्टा किल्ला ,धारेराव, देवठाणचा तवा धबधबा, यांसह अनेक ठिकाणे,,, आमच्या काश्मिरला , नंदनवनाला एकदा भेट दया,,,,

*शब्दांकण,*

 *श्री. कोंडाजी देशमुख ,प्राथमिक शिक्षक कोतुळ,ता.अकोले.जि. अहमदनगर,*

तातोबा आश्रम कोदनी Tatoba Asram Kodhni

tatoba ashram
अकोल्यापासून चे अंतर : 
तातोबा डोंगर हा अकोले तालुक्यातील सर्वांचे श्रध्दास्थान आहे. वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने हा भाग पावन झाला आहे. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा या स्थळाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगाने विकास येथे झाला आहे. अगदी शांत निसर्गरम्य ठिकाण म्हणुन प्रसिद्ध आहे.  नदीचा किनारा शांत जागा असल्याने  येथे सर्वात जास्त पक्षांचे आवाज ऐकायला भेटतात. पक्षीप्रेमींना खास वेगवेगळ्याप्रकारचे पक्षी पाहण्यासाठीच मी आमंत्रित करतो आहे तर मग कधी येताय तातोबाला आश्रमाला भेट द्यायला मी वाट बघतोय..

Tatoba Ashram

Tatoba hill is the homage of all in Akole taluka. This area is sanctified by the Valmiki sages. This place, which is religiously and touristically important, has been developed in a holistic way. Well-known for its quiet, scenic location. Since the river is a quiet place, most of the birds are heard here. I invite the bird lovers to see the different types of birds, so I am waiting for Tatoba to visit the Ashram whenever he comes.

गाईड संपर्क:8390-607-203

लवणस्तंभ कोतूळ, अकोले Stalagmite Akole, Kotul

Stalagmite Akole

अकोल्यापासून चे अंतर: 20 km 

 अकोले तालुक्यातील कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. बाळेश्वराच्या डोंगररांगेत कोतूळपासून आंभोऱ्यापर्यंत चुनखडीचा एक मोठा पट्टाच आहे. पावसळ्यात पावसाचे पाणी वरून खाली झिरपले की, चुनखडीमधील क्षार खाली येतात. क्षार खाली येताना पाणी ठिपकतं. तिथे क्षार साचतात. हजारो वर्षे अशी क्रिया सुरु राहिल्याने लवणस्तंभ तयार होतात. लवण म्हणजे क्षार. हे स्तंभ वरून खाली चिंचोळे होत येतात. आणि खालून वर जाताना चिंचोळे होत जातात. लवणस्तंभातून पूर्वी पाणी वाहायचे म्हणून त्याला ‘सहस्रधारा’ असेही म्हटले जायचे. एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना म्हणून येथील लवणस्तंभ अभ्यासकांना खुणावत आले आहते.

गाईड संपर्क:8390-607-203

Stalagmite

The geological composition of salinity is very unique in Kotul in Akole taluka. There is a large belt of limestone from Kotul to Ambhore in the hills of Balashwara. As the rain water flows downward in the monsoon, the salts in the limestone come down. Water drops below the alkali. The salts are stored there. Thousands of years of such activity continue to form the pillars. Salt is the alkali. These columns come from top to bottom. And when the bottom goes up, there are screaming. It was also known as ‘Sahasradhara’ for flowing water from salt pavilions. As a typical geographical structure, the saline pillar here has been fascinated by the study.

Contact:8390607203








Wednesday, June 22, 2022

नाणेघाट

  महाराष्ट्राचा इतिहास मौर्य सम्राट अशोकापासून सुरु झालेला दिसतो. त्याविषयी तात्कालीन पुराव्याबरोबत लिखीत पुरावे देखील सापडतात.सोपारा येथे मौर्यकालीन बौध्द स्तुपाच्या अवशेषाबरोबरच अशोकाचे शिलालेख देखील सापडले आणि महाराष्ट्राचा इतिहासकाळ इ.स.पुर्व २३०० वर्षापर्यंत मागे गेला. यानंतर महाराष्ट्राचे ज्ञात आद्य राजघराणे म्हणाजे सातवाहन घराणे ! इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.
येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.
       सातवाहनांना आंध्रभृत्य असे मानले जाते. त्यांत आंध्र मावळचा जो उल्लेख केला आहे ते म्हणजे मावळातील आंध्रा नदीचे खोरे.(सध्याचे आंदर मावळ) पण या उपपत्तीला कसलाही पुरातत्विय पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. पण हे आंध्रप्रदेशातील खचितच नव्हेत. कारण सातवाहनांचे आजवर जे जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत ते सर्व ब्राह्मी प्राकृतात आहे (अगदी आंध्र प्रदेशातले सुद्धा) त्यातला एकही अपवादात्मकरित्याही तेलगूत (द्राविडी भाषांमध्ये) नाही.
       या घराण्यातील अनेक राजांचे पुरावे नाणी,शिलालेख्,पुराणे ,प्राचीन साहित्य यामधून मिळते.परंतु या घराण्यातील राजांची राज्यवर्षे कोणती, या घराण्यात नक्की किती राजे होउन गेले याविषयी संशोधकात एकमत नाही. उपलब्ध पुराव्यानुसार केवळ सुरवातीचे आणि नंतरचे राजे असा क्रम लावता येतो.परंतु काही सातवाहन राजे सोडता इतर काही राजांचा इतिहास आणि वंशावळ अंदाजे मांडावी लागते,
   सिमुख ( श्रीमुख ) हा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा. सिमुकाचा काळ इ,स.पुर्व दुसरे शतक मानला जातो. याने पश्चिम आणि दक्षिण विदर्भात सातवाहनांची सत्ता स्थापन केली होती. सिमुखाची जी नाणी सापडली आहेत्,त्यात त्याचे नाव 'वासिठिपुत्त छिमुख ( वाशिष्ठीपुत्र सिमुक) असा येतो.नंतरच्या काळात लिहीलेल्या ग्रंथातून सिमुख सातवाहनाचा उल्लेख शिशुक असा होतो.श्रीसातकर्णि हा सिमुखाचा मुलगा तर नागनिका हि त्याची सुन होती.इ.स.पुर्व पहिले शतक हा या दोघांचा काळ मानतात.श्रीसातकर्णीने केलेला सिमुखाच्या राज्याचा विस्तार बघीतला तर त्यात अनेक महत्वाची शहरे होती असे लक्षात येते. महाराष्ट्रातील नाशिक्,जुन्नर्,प्रकाशे,नेवासे, पैठण्,अडम तसेच मध्यप्रदेशातील महेश्वर ,माळवा,विदीशा, त्रिपुरी इत्यादी शहरे त्याच्या अधिपत्याखाली होती. याशिवाय उत्तर कर्नाटकातही त्याचा विस्तार झाला असावा. श्रीसातकर्णीच्या आनंद नावाच्या मुकादमाने सांची येथील स्तुपासमोरच्या तोरण दान दिले होते हे सांची येथील लेखावरुन समजते.श्रीसातकर्णीने छपन्न वर्षे राज्य केले होते असे पुराणे सांगतात.याच्या राज्यवर्षाचा उल्लेख सांची अथवा नाणेघाट येथील लेखात येत नाही.परंतु २००७ साली चंद्रपुर येथे सापडलेल्या एका मातीच्या मुर्तीच्या मुद्रेवरील लेखात श्रीसातकर्णीच्या तिसाव्या राज्यवर्षाचा उल्लेख आहे.या मुद्रेवरील लेखात गावातील कापसावरील कराचा उल्लेख आहे.दोन हजार वर्षापुर्वी भारतातून रोमबरोबर चालणार्‍या व्यापारात महाराष्ट्रातून सुती कापड निर्यात केले जात असे.त्यादृष्टीने सातवाहनकालीन मुद्रेत नमुद केलेल्या कापसाच्या कराला महत्व आहे.
       श्रीसातकर्णीनंत वेदीसिरी,सतिसिरी,दुसरा सिमुक असे सातवाहन राजे होउन गेले. हे राजे मध्य प्रदेश्,महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही भागात राज्य करत असावेत. कोटीलिंगला आणि विदर्भातील काही नाणी हि दुसर्‍या सिमुख सातवाहनाची असावीत असा अंदाज आहे. 
  पुढे सिमुख सातवाहनानंतर त्याचा मुलगा सातकर्णीने राज्यशकट सांभाळला. सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वेदश्री हा सत्तेवर आला, मात्र तो अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनिका हीच राज्यकारभार बघत होती असे दिसते. नागनिका हि अतिशय मुत्सदी आणि कर्तबगार होती. तीने [पतीच्या मृत्युमंतर अल्पवयीन मुलाचे संगोपन करुन सातवाहनांचे साम्राज्य राखले. यावरुन त्याकाळी समाजकारणात आणि राजकारणात देखील महत्वाचे स्थ्यान होते.अगदी सातवाहन राजे आपल्या आईचे नाव आधी लावत होते.सातकर्णी प्रमाणेच नागनिका सुद्धा धार्मिक वृत्तीची होती. ती स्वतःहा यज्ञदीक्षादिकात निष्णात असून तिने आपल्या पती सोबत अश्वमेध, राजसूय, गवामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसामन, अंगिरसातिरात्र, शततिरात्र अश्या अनेक यज्ञांमध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला होता. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीचे व नागनिकेचे जोड नाणे चलनात होते. त्याच्या एकाबाजूला ' रजो सिरी सतकनिस ' तर दुसऱ्या बाजूला ‘नागनिका’ अशी नावे स्पष्ट कोरलेली आहेत. तिचा पुत्र वेदश्री राज्यकारभार करण्यालायक झाल्यावर तिने आपले आयुष्य व्रतवैकाल्यांना वाहून घेतल्याचे व एका तपस्वीनी सारखे जीवन जगल्याचे दिसते. तिला पतीनिधनासमावेत पुत्र निधनाचे दुःख सुद्धा सहन करावे लागले. कारण तिचा जेष्ठपुत्र भायल व कनिष्ठ पुत्र सातवाहन हे अल्पयीन असतानाच मरण पावले होते.
           नाणेघाट येथील लेणे हे नागनिका हिनेच कोरलेले आहे.यासंदर्भात लेण्यामध्ये शिलालेख ही कोरुन घेतला आहे. त्यात कोरलेल्या लेखात नागनिका ही सातकर्णी राजाची भार्या असून, स्कंदश्री याची माता होती, अंगिकुलवर्धन वंशातील महारथी त्रणकयिरा याची कन्या होती, असे नमूद केले आहे. तिला 'नागवरदायिनी ', ' मासोपवासिनी’, ‘गृहतापसी’, ‘चरितब्रह्मचर्या’, अशी विशेषणे लावलेली आहेत. यावरून तिचा दिनक्रम हा वैराग्यपूर्ण होता असे दिसते. सम्राज्ञी नागनिकेने केलेले कृत्य डोळ्यासमोर रहावे म्हणून नाणेघाटासारख्या व्यापारी मार्गावर हा शिलालेख कोरला असावा. 
    नागनिका ही अत्यंत जिद्दीची व मानी स्त्री असल्याचे तिच्या नाणेघाटातील लेखावरून दिसते. फक्त शिलालेख नव्हे तर या लेण्यात सातवाहन घराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमाही कोरुन घेतल्या होत्या. या पुतळ्यांमध्ये सातकर्णीच्या प्रतिमेच्या आधी नागनिकेची प्रतिमा कोरण्यात आलेली दिसते. सातवाहन घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा राजा सिमुक याच्या नंतर खोदलेली आहे. याच लेण्यात तिच्या दोन पुत्रांच्या प्रतीमांनंतर तिच्या पित्याची प्रतिमा कोरलेली आहे. सातवाहन कुळात आपल्या पित्याची प्रतिमा कोरणारी ही इतिहासातील बहुदा पहिलीच राणी असावी. पित्याच्या प्रतीमेखाली ‘अंगियकुलवर्धन सागरवलयांकित पृथ्वीवरील श्रेष्ठ वीर’ असे बिरूद ही कोरलेले आहे. यावरून तिचा दराराही स्पष्ट होण्यास मदत होते. 
             या सातवाहन कुलाचे कौतुक 'त्रिसमुद्रतोयपीत वाहन' असे केले आहे.याचा अर्थ तीन समुद्रांचे तोय म्हणजे पाणी पिणारे असा होतो. 
     सच्च भण गोदावरि पुव्वसमुद्देण सहिआसंती सालाहणकुलसरिसं जइ ते कुले कुल अत्थि ||'
 गाथा सप्तशतीमधील हा कवी विचारतो, 'गोदामाई तु पश्चिम पर्वतात उगम पावून पुर्वसागरापर्यंत वाहत जातेस.पण खर सांग तुझ्या या दोन सागराच्या पल्ल्यात सातवाहनांसारखे एक तरी यशस्वी घराणे आहे का ?'
     सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. प्राचीन काळी सुपारक म्हणजेच सोपारा आणि कल्याण ही पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची बंदरे होती. केवळ देशांतर्गत नव्हे तर परदेशाशी व्यापार येथुन होत असे. कल्याण-नाणेघाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. त्या काळी जगभरातील व्यापारी सोपारा-कल्याण बंदरावर आपला माल घेऊन येत असत. हा माल घोडे-खेचर अथवा बैलावर लादुन सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई.तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. व्यापार्‍यांच्या तांड्यांना सार्थवाह म्हणत.आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. सह्याद्रीच्या प्रचंड भिंती त्यांच्या वाटा अडवत.  सह्याद्री लंघून पुढे जाण्यासाठी ठिकठिकाणी या दुर्गम भिंतींतून घाट खोदण्यात आले. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. महाराष्ट्रात सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात. तत्कालीन राजांनी व्यापारासाठी हे घाटरस्ते तयार केल्याचे दिसून येते. यापैकी नाणेघाट, माळशेज, अहुपे, गायधारा हे घाट व्यापारी वाहतुकीसाठी दगडांनी बांधण्यात आले होते. सध्या या घाटांपैकी बहुतेक घाट कोसळले आहेत तर काही बंद आहेत. आजही सह्याद्रीच्या पायथ्याजवळील स्थानिक लोक या घाटवाटांचा वापर करतात. यापैकी सर्वात महत्वाचा तो नाणेघाट. कारण हा घाट जोडतो तो सातवाहनाची उपराजधानी असलेल्या जुण्णनगर उर्फ जुन्नरला व त्यापुढे तो थेट पोहोचतो ते त्यांच्या वैभवशाली राजधानीला. प्रतिष्ठानला. आताच्या पैठणला. साहजिकच हा घाट सह्याद्रीच्या इतर सर्व घाटांपेक्षाही जास्त वहिवाटीचा त्यामुळेच सर्वोत्तम  बांधणीचा. पाण्याची विपुल टाकी असलेला. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. रस्ते-रेल्वे-विमाने यांच्या आधुनिक काळात नाणेघाटाचं महत्त्व कदाचित समजणार नाही; पण सव्वादोन हजार वर्षांपेक्षा कित्येक राजवटी, व्यापारी, सत्तांतरे, व्यापारी, देशोविदेशांचे वाटसरू, गुरेढोरे, सुखदुःखे आणि संस्कृती अनुभवलेली ही घळी.

  सोपारा ते प्रतिष्ठाण असा चालणार्‍या या व्यापार्‍यावर नियंत्रण मिळवून कररुपी महसुल मिळवायचा तर जुन्नरवर ताबा मिळवणे सातवाहनांना गरजेचे होते. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश करून जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जुन्नरचा उल्लेख एका शिलालेखात जुन्नीनगर असा केलेला आहे,गेल्या काही वर्षात जुन्नरमध्ये झालेल्या उत्खननात सातवाहनकालीन घरांचे अवशेष, खापरे, शंखापासून बनवलेल्या बांगड्या मिळालेल्या आहेत.
     या सातवाहन राजांनी इ.स.पुर्व २५०ते इ.स.२५० या कालखंडात सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी जुन्नरजवळ  सह्याद्रीचा उभ्या कड्यातील एक घळ फोडून हा घाट तयार केला गेला. छिन्नी, हातोडा या साधनांनी इथल्या भिंती तासल्या गेल्या त्यांच्या खुणा येथे आजही स्पष्ट दिसतात. तेच दगड इकडे पायर्‍यांसारखे रचले गेले. वळणावळणांवर दगडांचेच बुरुज रचले गेले. तहानलेल्या वाटसरूंसाठी ठिकठिकाणी पाण्याची टाकी  खोदण्यात आली. दगडी रांजण उभारण्यात आला. घाटावर चौकीची ठिकाणे निर्माण करण्यात आली. एव्हढा महत्वाचा घाट असल्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले उभारण्यात आले. यात कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी किल्यांची निर्मिती केली. जीवधन सगळ्यात जवळचा साथीदार. सार्थवाह, बौद्ध भिक्षू यांच्या विश्रांतीसाठी इथले अनेक डोंगर कोरून लेणी बनवण्यात आल्या. जुन्नर परिसरात महाराष्ट्रातील सर्वाधिक लेण्या आहेत. तर असा हा प्राचीन अत्यंत वर्दळीचा घाटमार्ग.








नाणेघाटाची विवीध रुपे

    हा घाट मुरबाडच्या पूर्वेस ३० कि.मी. कल्याणपासून ६४ कि.मी. तर जुन्नरपासून ३० कि.मी. अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे येतात.नाणेघाटाची लांबी सुमारे ३ मैल आहे व घाटाची नळी सुमारे २५० फुट लांब व ८ फुट रुंद आहे. नाणेघाटाच्या पायथ्याला वैशाखरे, प्रधानपाडा व पुलू सोनाळे ही गावे आहेत.पुलू सोनाळे या गावाजवळून कणिकेर नावाची नदी वाहते आणि याच परिसरात लेण्यांचा आणखी एक समुह आहे.
    वैशाखरे गावाची व्युत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह (व्यापारी गृह) अशी दिलेली आहे. ते गाव व्यापाऱ्यांचा, लमाणांचा, बौद्धभिक्षूंचा व इतरेजनांचाही घाट चढण्याआधीचा पडाव असावा. घाट चढल्यावर घाटघर लागते. घाटाची चढण प्रधान पाड्यापासून वैशाखऱ्याजवळ सुरू होते. ती घनदाट वनस्पतींच्या भागातून सुमारे साडेचार किलोमीटर अंतर कापून घाटघरजवळ शिंगरू पठारावर येऊन संपते. चढणीच्या शेवटच्या टप्प्यात एकशेतीस फूट लांबीची प्रस्तर घळ असून तिला 'घाटाची नळी' असे म्हटले जाते. तो सबंध प्रस्तर खोदून त्यातून वाट काढण्यात आली आहे. ते अभियांत्रिकीतील त्या वेळचे अवघड आव्हान असावे. सातवाहनांनी तो घाट वैशाखरेपासून घाटघर व पुढे जुन्नरपर्यंत कातळ फोडून, त्यात पायर्‍यांची सोय करून बांधलेला होता. त्या पायर्‍यांचे अवशेष पाहण्यास मिळतात.
        घाटात अनेक सोयी पुरवण्यात आल्याचे दिसून येते. शिंगरू पठार व पुलु सोनाळ्याजवळ गणेशथाळ येथे दगडात रांजण खोदलेले आहेत. स्थानिक लोक त्या रांजणांना 'जकातीचे रांजण' असे म्हणतात. लमाण व्यापार्‍यांकडून घाटाचा वापर केल्याबद्दलचे शुल्क किंवा कर आकारण्यात येत असावा.हा कर नाणेघाटाच्या तोंडाशी असलेल्या दगडी रांजणात गोळा केला जाई असा एक समज आहे. घाटघर व आजुबाजूचे रांजण हे नेहमीप्रमाणे उभट गोलाकार आहेत. मात्र गणेशथाळजवळील रांजण आकाराने चौकोनी आहे. ते सर्व रांजण जकातीसाठी वापरण्यात येत असतील असे वाटत नाही. ती व्यवस्था पांथस्थांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणूनही असेल. घाटघरजवळ छोटे तलावही खोदलेले आहेत. त्याचाच अर्थ प्रवासी, लमाणांचे तांडे व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा करण्याचीही सोय असावी.
 
 नाणेघाट - 44 वर्षांपूर्वी    फोटो - बलवंत सांगळे
 
    नाणेघाट सध्या दुरवस्थेत असला तरी त्याची पद्धतशीर आखणी व रचना करण्यात आली असावी हे तेथील अवशेषांवरून स्पष्ट होते. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे ते काम अभियांत्रिकी क्षेत्रात निपुण असलेल्या नाना व गुणा या दोन तज्ज्ञांकडे देण्यात आले होते. त्यांपैकी जो प्रथम घाट बांधेल त्याचे नाव घाटास द्यावे असे ठरले. दोघांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले, घाट बांधणीस सुरुवात झाली. कोकणाकडे तोंड असलेल्या सह्याद्रीच्या उभ्या कड्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे 'नानाचा अंगठा' असे म्हणतात. घाटाच्या निर्मितीस त्या ठिकाणाहून सुरुवात झाली असावी. अंगठ्याच्या दक्षिण भागाकडील काम गुणाला तर उत्तरेकडील भागाचे काम नानाला देण्यात आले. नानाला दिलेला मार्ग गुणापेक्षा अवघड असला तरी त्याने तो वर्ष संपण्याआधी पूर्ण केला. साहजिकच, नानाचे नाव त्या घाटाला पडले. दोन घाट बाजूबाजूलाच बांधण्याचे सातवाहनांचे काही प्रयोजन असावे. त्या काळातील वाहतुक आणि लष्करी हालचाली यांसाठी एकमेकांस समांतर घाट असणे आवश्यक ठरले असावे. सातवाहनांचे शक क्षत्रपांबरोबर संघर्ष सतत सुरू असत. सातवाहनांनी घाटाच्या सुरक्षिततेसाठी उपाय केलेले असावेत हे निकटच्या किल्ल्यांवरून लक्षात येते. जुन्नरपासून सोळा किलोमीटरवर चावंडचा किल्ला, बारा किलोमीटरवर हडसरचा किल्ला व त्यापुढे बहिरव व जीवधन हे किल्ले आहेत. त्याचाच अर्थ त्या व्यापारी मार्गांना संरक्षण मजबूत तटबंदीच्या माध्यमातून देण्याची गरज भासली असावी.
      काही रांजणांवरील कोरीव लेख महत्त्वपूर्ण माहिती देतात. शिंगरू पठारावरील रांजण दोन तोंडांचा असून त्यावर प्राकृत भाषेत ‘हा रांजण कामवन येथील व्यापारी दामघोष याने वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्यकालाच्या  तेराव्या वर्षांत कोरला’ असे म्हटले आहे.( सोपारयकस गोविन्ददासस धम्मदायपोढी ) तेथेच, थोड्या बाजूला तलावाच्या कडेला दगडात कोरलेले बाक आहे. तो तलाव सोपारा येथील व्यापारी गोविंददास याने खोदला अशी माहिती त्या बाकावर मिळते.हा गोविंददास सोपार्‍याचा म्हणजे सध्याच्या नालासोपार्‍याचा रहिवासी होता.गेल्या दोन हजार वर्षात कल्याण्,नाल्यासोपार्याकडून जुन्नरकडे जाणारे वाटसरु नाणेघाट चढून त्या टाकीचे पाणी पित असतील आणि त्या असंख्य लोकांचे दुवे त्या गोविंददासाला मिळाले असतील.
      सातवाहन काळ ते पेशवाईपर्यंत या घाटात राबता होता.  या घाटाची महत्त्वपूर्ण माहिती सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी टॉलेमी या भू - इतिहास विशेषज्ञाने दिली आहे. तो 'नागुना' किंवा 'नानागुना' नदी असा घाटाचा स्पष्ट उल्लेख करतो. टॉलेमी भारतात आला नव्हता. त्याने इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून नाणेघाटाचे वर्णन केले आहे. त्यामुळे तो डोंगरी भाग आहे की ती वाहती नदी आहे असा संभ्रम त्याच्यासमोर पडला व त्याने नाणेघाट ही व्यापारउदिमाची नदी आहे असा समज करून घेतला.तसेच नाणेघाटातून चालणार्‍या व्यापाराचा उल्लेख रशियन प्रवासी अफनासियस निकीतान यानेदेखील केला आहे.  सातवाहन काळातील नाही,पण सतराव्या शतकातील नाणेघाटातल रहदारीचा उल्लेख आपल्याला सापडतो. इ.स.१६७३ मध्ये ब्रिटीश प्रवासी व डॉक्टर फ्रायर नाणेघाट उतरुन कल्याणमार्गे मुंबईला गेला होता.जुन्नरवरुन निघाल्यावर दुपारी बारा वाजता तो नाणेघाटाच्या तोंडाशी पोहचला.तेव्हा कोकणातून मीठ घेउन येणारा तीनशे बैलांचा तांडा वर येत होता.खाली उतरायला रस्ता नसल्यामुळे तासभर फ्रायर वाट पहात तिथेच थांबला. नंतर संध्याकाळी नाणेघाट उतरुन फ्रायर पायथ्याशी पोहचला. ब्रिटीशकाळात या घाटास नानाघाट किंवा नानापास (nanapaas) असेही म्हणत असत. घाटास प्राचीन काळी महत्त्व असल्याने परिसरात अनेक सातवाहन काळातील लेण्या आहेत मात्र आता या लेण्याची पडझड झाली आहेमुंबई-पुणे व मुंबई-नाशिक हे महामार्ग इंग्रजांच्या काळात बांधल्याने नाणेघाटाचे महत्त्व कमी झाले. नाणेघाट हे प्राचीन व्यापारी घाटवाटेचे उत्तम उदाहरण आहे. 

हेही वाचा: महापालिकेकडून पैशाचा अपव्यय; चांगल्या रस्त्यावर लाखोंची उधळपट्टी

महारठी म्हणजेच महाराष्ट्र असा उल्लेख असलेला शब्द.

अंदाजे २२२७ वर्षांपूर्वी राणी नागणिकेने नाणेघाटची निर्मिती केली. या शिलालेखात आपल्याला महारठीनो हा शब्द वाचायला मिळतो ते वाक्य पुढील प्रमाणे..

महारठीनो अंगीय कुल वधनस सगरगिरीवलयाय पथविय पथम विरस वस य महतो मह

अर्थ - महारठी अंगीय कुलातील गिरीसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील विरश्रेष्ठ असा पुरुष.

गेली अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असुन नाणेघाटातील हाच दोन हजार वर्षांपूर्वीचा पुरावा त्यासाठी ग्राह्य धरला जात आहे. यात महारठ्ठी भाषा बोलणारे लोक व ते ज्या प्रदेशात राहतात तो प्रदेश म्हणजेच महारठी प्रदेश म्हणजेच आजचा महाराष्ट्र होय. त्याच प्रमाणे सातवाहन कुलातील राजा हाल याने प्राकृत भाषेत गाथासप्तशती हा ग्रंथ लिहला असुन हा ग्रंथ महाराष्ट्राचा आद्य ग्रंथ मानला जातो व त्यावेळच्या महाराष्ट्राचे जनजीवन तसेच विविध रूपे आपल्याला या काव्य ग्रंथात आपणास वाचायला मिळतात.

 

















































मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...