इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे सिंदोळा किल्ला. मुंबई- पुण्याहून जवळ असलेला माळशेज घाट व हरिश्चंद्रगड यामुळे या भागात पर्यटक तसेच गिरिमित्रांची सतत वर्दळ असते. हरिश्चंद्रगडाला मिळालेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे सिंदोळा गडाचे अस्तित्व झाकोळले गेले असुन गिरीमित्रांचे पाय देखील येथे सहजपणे वळत नाही. सतत उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती किल्ल्यांची माहीती देणाऱ्या संकेतस्थळावर देखील सहजतेने सापडत नाही.

जावे कसे :-
पुण्याच्या उत्तरेस असलेल्या जुन्नर तालुक्याच्या वायव्येस सिंदोळा किल्ला वसलेला आहे.
सिंदोळावर येण्यासाठी चार पर्याय आहेत.
मुंबईवरुन :-
१) करंजाळे फाटा :- करंजाळे फाटा हा कल्याण-आळेफाटा रस्त्यावर आहे.जर आपण एस.टी.बसने येणार असाल तर हा पर्याय चांगला आहे/
कल्याण ते करंजाळे फाटा साधारण ९०ते ९५ किमी अंतर बसने पोहचायला ३ तास लागतात.या रस्त्यावर माळशेज घाट लागतो. माळशेज घाटाततून सह्याद्रीची सुंदर रांग दिसते. एका बाजूला मोरोशीचा भैरवगड, नाणेघाट तर दुसरीकडे घाटातून गाडी वर जाताच हरिशचंद्र गड दिसतो. घाट संपताच पहिला खुबी फाटा लागतो त्याचा पुढे १ ते १. ३० किमी अंतरावर करंजाळे फाटा लागतो. मात्र बर्याचदा एस.टी.बसच्या कंडक्टरना करंजाळे फाटा माहिती नसतो.ते खुबी फाट्याला उतरायला लावतात. इथून सिंदोळाचा पायथा दिड कि.मी.वर आहे.
पुणेवरुन :-
पुणे-नारायणगाव-जुन्नर-गणेश खिंड-पारगाव फाटा-वेळखिंड-करंजाळे फाटा
२) पारगाव :-जर स्वतःचे वाहन असेल तर हा पर्याय सोयीचा ठरतो.पारगाव हे कल्याण-माळशेज-आळेफाटा मार्गावर वसलेले आहे.पारगाव फाट्यावरुन पारगाव हे अंतर २ कि.मी. आहे.पारगावला पोहचल्यावर बागडवाडीला जायचे.हे अंतर अर्धा कि,मी.आहे.या रत्स्यावर उजव्या बाजुला एक बैलगाडी रस्ता जातो.इथे तीन-चार घरांची एक वस्ती आहे. इथे आपले वाहन पार्क करुन आपण सिंदोळा गडाकडे जाउ शकतो.
पुण्यावरुन या मार्गाने यायचे असल्यास पुणे-नारायणगाव-जुन्नर-गणेश खिंड-पारगाव फाटा-( डावीकडे वळा ) पारगाव
मुंबईवरुन यायचे असल्यास कल्याण-माळशेज-खुबी फाटा-वेळखिंड- पारगाव फाटा ( उजवीकडे वळा ) पारगाव
३) बगाडवाडी मार्गे :- हा मार्गही स्वतःचे वाहन असेल तरच सोयीस्कर आहे. वरील मार्गाने पारगावमार्गे बगाडवाडीला यावे.इथून वाट थेट सिंदोळा गडाकडे जाते.
४) वेळखिंड मार्गे :- हा मार्गही स्वतःचे वाहन असेल तरच सोयीस्कर आहे. मात्र हा लांबचा रस्ता असल्यामुळे सोयीचा नाही.वेळ खिंड कल्याण-माळशेज-आळेफाटा मार्गावर खुबी फाटा ते पारगाव फाटा दरम्यान आहे.पारगाव फाट्यापासून वेळ खिंडीचे अंतर २ कि.मी. आहे.माळशेजच्या बाजुला इथेच एक दत्तमंदीर आहे.या दत्तमंदीराच्या मागून एक वाट सिंदोळा गडाकडे जाते.

वरील मार्गाने पारगावमार्गे बगाडवाडीला यावे.इथून वाट थेट सिंदोळा गडाकडे जाते.
पुण्यावरुन या मार्गाने यायचे असल्यास पुणे-नारायणगाव-जुन्नर-गणेश खिंड-पारगाव फाटा-वेळखिंड
मुंबईवरुन यायचे असल्यास कल्याण-माळशेज-खुबी फाटा-वेळखिंड-
साधारण सिंदोळागडाला वर्षभरात केव्हाही भेट देउ शकतो.मात्र गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध होइल असे नाही हि गोष्ट लक्षात ठेवावी.तसेच गडावर मुक्कामाची सोय नाही व करता येण्यासारखी जागा नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :-
करंजाळे फाट्यापासून - दोन ते अडीच तास
पारगावपासून - दोन तास
बगाडवाडीमधून - अडीच तास
वेळखिंडमार्गे - तीन तास
आपण करंजाळे मार्गे गडाची सफर करुया. मुंबई-ठाणे येथुन नगरकडे जाताना माळशेज घाट पार केल्यावर हरिश्चंद्रगडाकडे जाणारा खुबी फाटा आहे. या फाट्याच्या पुढे साधारण १.५ कि.मी. अंतरावर करजाळे गाव आहे. खुबीफाटा ओलांडल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुस दिसणारा डोंगर म्हणजेच सिंदोळा किल्ला.
बगाडवाडीतून दिसणारा सिंदोळा
करजाळे गावाकडे जाणाऱ्या फाट्याच्या अलीकडे माउली हॉटेल असुन या हॉटेलच्या मागील बाजुस करजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडून सिंदोळा किल्ल्याला जोडलेल्या डोंगरसोंडेवर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून खाली आलेल्या डोंगरधारेखालील पठारावर पोहोचतो. या पठारावर मढ-पारगाव गावातुन आलेली बैलगाडीची वाट आहे.
![]() |
| चित्रात दाखवलेली लाल रेष खालचा पठारावरून वरचा पहिल्या सोंडेवर येण्याची वाट ( चित्रात अंदाजे रेष दाखवली आहे, पण तिकडूनच वाट येते ) |


या वाटेवरुन उत्तर दिशेला असलेले पिंपळगाव जोगा धरण दिसते


या वाटेवर अलिकडेच कोणीतरी बाण लावले आहेत.याचा नक्कीच उपयोग होतो.

थोडे अंतर आपण चाललो कि बगाडवाडी आणि पारगाववरुन सिंदोळयावर येणार्या वाटेच्या फाट्यावर येतो.इथे एक कृत्रिम तळे आणि जवळ एक छोटी झोपडी आहे.

इथुनच आपल्याला पायथ्याशी असलेली बगाडवाडी आणि पारगाव हि गाव दिसतात.
या वाटेने कोठेही न वळता सिंदोळा किल्ल्याच्या डोंगराच्या दिशेने निघावे. या वाटेने साधारण १० मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे सोंडेच्या खाली एक पायवाट झाडीत शिरताना दिसते. खुणेसाठी या ठिकाणी दगड रचलेले असुन त्यावर चुना फासलेला आहे. तसेच वाटेवर काही ठिकाणी दिशादर्शक बाण आहेत. झाडीतुन जाणाऱ्या या वाटेने ५-१० मिनीटात आपण किल्ल्याखाली असलेल्या डोंगरसोंडेवर पोहोचतो.


पुण्याहुन जुन्नरमार्गे आल्यास मढ-पारगाव गावातुन येणारी वाट याच डोंगर सोंडेवर येते. या वाटेने ५ मिनीटात आपण किल्ल्याच्या अलीकडे असलेल्या कातळटप्प्यावर येतो. या ठिकाणी वाट बनविताना दगड दरवाजाच्या आकारात खोदलेले असुन उजवीकडील दगडात झेंडा रोवण्यासाठी खळगा कोरलेला आहे.


हा कातळटप्पा पार करून पुढे आल्यावर आपण सिंदोळा किल्ल्याच्या डोंगराला भिडतो.पावसाळ्यात या पठारावर खुप गवत माजलेले असते.सिंदोळ्यावर गावकरी किंवा दुर्गारोही यांची फारशी वर्दळ नसल्यामुळे वाटा बरेचदा मोडलेल्या नसतात. तेव्हा गावातून वाटाड्या घेउन आल्यास सोयीस्कर ठरते.
पावसाळा सोडून गडावर आल्यास याच वाटा सोप्या असतात
पावसाळा सोडून गडावर आल्यास याच वाटा सोप्या असतात
किल्ल्यावर जाणारी वाट किल्ल्याचा डोंगर उजव्या बाजुस तर दरी डाव्या बाजुस ठेवत पुढे सरकते.


या वाटेने थोडे पुढे आल्यावर माथ्यावरुन आलेली घळ दिसते.

या घळीच्या तळाशी कातळात कोरलेली चौकोनी गुहा असुन जवळच पाण्याचा झरा आहे.

गडावर पिण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय असुन हे पाणी साधारण मार्चपर्यंत वहात असते. ही घळ पार करून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या पश्चिम बाजुस येतो. पावसाळ्यात हि वाट काहीशी अवघड होत असावी.
खडकांच्या दरवाज्याकडे जाणारी वाट


या वाटेने जाताना काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या लागतात. पश्चिमेकडील बाजुस डोंगरावरून येणारी दुसरी घळ असुन या घळीतुनच गडावर जाणारा मार्ग आहे. या घळीत असलेल्या बांधीव पायऱ्या तुटलेल्या असुन कातळात कोरलेल्या पायऱ्या मात्र शिल्लक आहेत. या पायर्या तोडण्याचे श्रेय अर्थातच इंग्रजांचे.

या वाटेने वर आल्यावर समोरच कातळात कोरलेले गणपतीचे शिल्प आहे.


या शिल्पाच्या डावीकडे काही अंतरावर मारुतीचे भग्न शिल्प पडलेले आहे. हि दोन्ही शिल्प बहुधा शिवकालीन असावीत. त्याचाच बाजूला म्हणजेच प्रवेशदारा समोर एक कोसळलेली भिंत आहे. त्याचा एका दगडावर एकदम लहानसा वर्तुळाकार आकार आहे त्यावरून असा अंदाज लावता येतो, येथे बहुतेक काही तरी नक्षी किंवा चिन्ह असाव.
घळीच्या तोंडाशी असलेल्या कातळातील खुणा,पडलेले दगड व झीज झालेली गुहा
पहाता कधीकाळी या घळीच्या तोंडावर देखील दरवाजा असण्याची शक्यता आहे.

घळीच्या डावीकडील कड्यावर किल्ल्याची तटबंदी असुन उजवीकडे कडा व बुरुजाच्या आधारे बांधलेला किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचा चौथरा व शेजारील बुरुज मात्र शिल्लक आहे. दरवाजाने आत शिरल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला वळसा घालुन गडाच्या माथ्यावर नेते. गडावर फारसा वावर नसल्याने या वाटेवर खुप मोठ्या प्रमाणात रानटी गवत वाढलेले असुन त्यातुन सावधगिरी बाळगत फिरावे लागते.
या वाटेने जाताना गडाची घडीव दगडात बांधलेली तटबंदी व त्यातील बुरुज नजरेस पडतात.


हे एकत्रित कोरलेली टाकी बघता याच परिसरातील अलंगगड्,चावंड्,नारायणगड आणि हा बहुधा एकाच कालखंडात निर्माण केले असावेत.



गडाच्या उत्तर टोकावर एकाशेजारी एक कातळात कोरलेली पाण्याची एकुण सात टाकी आहेत. यात पाच टाक्यांचा समूह असुन दोन टाकी वेगळी कोरलेली आहेत. या दोन टाक्यातील एक टाके कोरडे पडलेले आहे. यातील कोणत्याही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही.


टाकी पाहुन पुढे जाताना वाटेवर काही घरांचे अवशेष दिसुन येतात. या शिवाय वाटेच्या डाव्या बाजुस उघड्यावरच एक मंदिर आहे. येथे एका खडकावर काही त्रिशुळ उभे केलेले आहेत.


येथुन पुढे आल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचतो. गडाचा निमुळता माथा समुद्रसपाटीपासून ३६९५ फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला आहे.



गडमाथ्यावर अलिकडेच लावलेला सौरदिवा
एन पावसाळ्यात आल्यास गडमाथा टोपली कारवीने फुलून गेलेला असतो.
सिंदोळ्यावरुन दिसणारा हरिश्चंद्रगड
कल्याण-आळेफाटा मार्गे ‘मढ’कडे जाणार्या रस्त्यावरील पूल
गड माथ्यावरुन हडसर, चावंड, शिवनेरी, हरिश्चंद्रगड, निमगिरी,हनुमंतगड हे किल्ले तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश नजरेस पडतो. गडाचा माथा फारच लहान असल्याने संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. आल्यावाटेने खाली उतरून कोरलेल्या गणेश मुर्तीजवळ पोहोचल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. बर्याच ट्रेकर्सना इथे मधमाशांचा त्रास झालेला आहे.तेव्हा गडमाथ्यावर वावरताना जपून राहीले पाहिजे.सिंदोळा किल्ल्याची भटकंती अंगातील रग जिरवणारी असुन आपल्याला एक दुर्लक्षीत किल्ला पाहिल्याचे समाधान देउन जाते.
सिंदोळा किल्ल्याचा इतिहासातील ओळख बुजलेली असुन मराठयांनी इ.स.१६७३ दरम्यान चावंड,हडसर, जिवधन या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील ताब्यात घेतला असावा.१५ जून इ.स.१६७३ ला मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.कोणा मातब्बराने ही मोहिम फत्ते केली ?ते काही समजायला मार्ग नाही.इतिहास मुका आहे, तिथे तर्कही लंगडा पडतो.सामान्य माणसाने घडविलेला असामान्य इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास लिहून ठेवायची आमच्यात पद्धत नव्हती. पराक्रम करायचा आणि मोकळे व्हायचे. त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात मोगलांच्या ताब्यात गेलेला हा गड त्यांच्या वतीने जव्हार संस्थानाच्या ताब्यात होता. पेशवेकाळात इ.स.१७४४-४५ दरम्यान मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला.
संदर्भ :-







.jpg)



























No comments:
Post a Comment