Saturday, August 1, 2026

वाकाटक मालिका ( अंतिम )

 विदर्भाचा वाकाटक पुर्व इतिहास ::-
  वाकाटक राजघराण्याची माहिती घेण्यापुर्वि विदर्भाचा थोडक्यात इतिहास समजून घेउया. इतिहासपूर्व (प्रोटोहिस्टोरिक) काळात म्हणजे प्रागैतिहास कळात पुरातत्त्वाच्या परिभाषेत या ठिकाणी इसवी सन पूर्व १३००-१४०० च्या काळात ताम्र पाषाणयुगीन संस्कृती होती. आणि त्यानंतरच्या काळात पूर्व विदर्भात बृहदश्मयुगीन (मेगालिथिक) संस्कृती होती.भंडारा जिल्ह्यातील सलेकसा येथील कचारगडाच्या गुफेत प्रागैतिहासिक मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे (दगडी हत्यारे) सापडले आहेत. ती गुफा अतिशय भव्य आहे व संपूर्ण आशिया खंडात तशी दुसरी गुफा नाही उत्खननातील पुराव्यांवरुन ५०,००० वर्षापूर्वी मानव सनूह तेथे निवासत असला पाहिजे हे स्पष्ट होते. विदर्भातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष वन्हाडात आणि पूर्व विदर्भातही मिळतात. येथील समाजपद्धती आर्थिक आणि धार्मिक जीवन हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपेक्षा फार वेगळे होते असे म्हणता येणार नाही. पण ते विदर्भातले आद्य शेतकरी असून ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा प्रवेश लगतचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग, मध्य प्रदेशचा भाग यांच्या प्रभावातून झाला असावा. धार्मिक जीवनाबद्दल बोलावयाचे झाल्यास, माळवा, सावळदा व जोर्वे यांच्या माध्यमातून ताम्रपाषाणयुगीन संस्कृती, वहऱ्हाडात व पूर्व विभागाच्या काही भागांत शिरली असावी हे स्पष्ट आहे. त्याचे दुसरे कारण असेही आहे, की पूर्व-विदर्भात, बृहदश्मयुगीन संस्कृतीचा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंतसुद्धा प्रभाव टिकून होता असे दिसते, तर पूर्व विदर्भात बृहदश्मयुगाच्या अगोदर एकदम नवाश्मयुगच दिसते. या दोघांच्या मध्ये एरवी दिसणाऱ्या ताम्रपाषाण युगाच्या खुणा झाडी मंडळात दिसत नाहीत. आजही या भागात, तो अरण्यप्राय असल्याने आदिवासीची वस्तीच जास्त आढळते. त्या दृष्टीने बृहदश्मयुगाच्या धार्मिक परंपरा ठळकपणे वेगळ्या असल्याचे दिसून येते. मुख्यत्वे या संस्कृतीत प्रचलित असलेली अश्मवर्तुळे ही दफनेच आहेत. बृहदश्मयुगीन समाज हाच विदर्भातील आद्य शेतकरी म्हणूनच उल्लेख केला जातो. निरनिराळ्या धान्यांची ते पिकं घेत असत. अश्मवर्तुळांच्या ठिकाणांपेक्षा कायम वस्तीची किंवा गावांची ठिकाणं कमी असल्यामुळे विद्वानांत मतभेदही होते. ते असे, की हे लोक गावात स्थायी वस्ती करून राहात होते की भटके जीवन जगत होते याचा त्यांना अंदाज येत नव्हता.  अगदी साधा फरक सांगायचा झाल्यास पुराश्मयुगापासून ते अगदी ताम्राश्मयुगापर्यंत मानव मृताचे दफन घरापासून जवळच किंवा अगदी घरातसुद्धा करत असे. त्याला मृताची भीती वाटत होती, पण ती फार नव्हती. कारण पश्चिम महाराष्ट्रात मृताचे पाय तोडून दफन करण्याची प्रथा होती. याउलट बृहदश्मयुगामध्ये स्मशान हे वेगळे असते ही कल्पना अस्तित्वात आली.विदर्भातील बृहद्रमयुगीन समाज तांत्रिकदृष्ट्या बराच प्रगत होता. तांत्रिकदृष्ट्या खनिजापासून तांब वितळवून ओतणे हे लोखंडाच्या प्रक्रियेपेक्षा सोपे आहे. १४०० सेंटिग्रेड इतके तापमान निर्माण करणे ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत गोष्ट समजली जाते. विदर्भातील प्राचीन तंत्रज्ञान उत्कृष्ट प्रकारचे होते. तेव्हा ९६ ते ९९ टक्के इतके शुद्ध लोखंड तयार केले जात असे. उत्खननात मिळालेले तांब्याचे घोड्यांना घालावयाचे अलंकार, काश्याचे हरिणाकृती मूठ असलेले कलश, तांब्याची मूठ असलेल्या लोखंडी तलवारी, लोखंडी रिकिब आणि लगाम यावरून हे उत्तम कासार आणि कारागीर होते हे सहज लक्षात येईल. गावातील मुखियाचे दफन क्वचित प्रसंगी त्याच्या पत्नीसमवेत आणि बऱ्याच वेळा त्याच्या घोड्याबरोबर केले जात असे. त्यांची काही शेतीची अवजारेसुद्धा मिळाली आहेत. असे दिसते की समाजात लढवय्यांचा काही एक वर्ग असला पाहिजे, त्यामुळे हे भटके पशुपालन करणारे की शेतकरी या वादावर पडदा टाकून असे म्हणता येईल की या समाजातील काही भाग ग्रामजीवनात स्थिर होता, तर काही कारागिरांचा वर्ग हा नव्या खनिजांच्या शोधात आणि अवजारे विकण्यासाठी भटकत होता. मरणोपरांत उपयोग व्हावा म्हणून लढवय्याबरोबर त्याची शस्त्रास्त्रे त्याच्याबरोबर दफन करत असत आणि त्याचा घोडाही. काही वेळा ही दफने उकरून त्यात नवी दफने केली जात असत. चूल-तवा (क्रॉमलेक) यांचा आजही पूजास्थाने म्हणून उपयोग केला जातो. त्यावरून पितरांच्या पूजेचादेखील त्यात समावेश होता हे स्पष्ट दिसते. कदाचित शेतकरी, कारागीर यांच्यासारखा दुसरा लक्षणीय वर्ग म्हणजे त्यांच्या पुरोहित म्हणजे भगत लोकांचा असावा. आजच्या अदिवासी जमातीचा विचार केला तर असे लक्षात येते की अगरिया हे कारागीर, गोड हे शेतकरी आणि लढवय्ये आणि बैगा हे त्यांचे पुरोहित. त्यापैकी बैगा आणि अगरिया हे भटके असतात, तर गोड हे ग्राम जीवनात स्थिर झालेले असतात. या त्रिकुटाच्या साहाय्याने विदर्भातील बृहद्रद्मयुगातील समाज कसा असेल याची सहज कल्पना करता येते.
बृहदश्मयुगीन काळात गुंफांमधूनसुद्धा दफन करण्याची पद्धती होती.मूलतः दफनासाठी असलेल्या काही गुंफा नंतरच्या काळात शैव गुंफा म्हणून वापरात होत्या हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे.
    वैदिक वाङ्‌मयातला विदर्भासंबंधीचा पहिला उल्लेख वैदीक ग्रंथात (इस पूर्व ८०० ते १०००) आढळतो. ह्या प्रदेशाचा सर्वात प्राचीन उल्लेख कौटिल्याचे अर्थशास्त्रात निळतो. हा प्रदेश भोज किंवा सभाराष्ट्र ह्या नावाने ओळखला जात होता.   वैदर्भी कौण्डिण्य या व्यक्तीच्या नावावरून या प्रांताला विदर्भ म्हणावयास सुरुवात झाली. विदर्भ या राजाचे मूळ गंगा खोऱ्यातील राजवंशाशी आहे. ऐतरेय ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे तत्कालीन आर्यावर्ताच्या पूर्वेकडील राजांना सम्राट तर दक्षिणेकडील राजांना भोज, पश्चिमेकडील स्वराज्, तर उत्तरेकडील राजांना विराज असे बिरुद होते. विदर्भ नामक राजाने ह्या प्रदेशात आर्याच्या वसाहती करुन प्रदेश भरभराटीस आणला न्हणून त्याला विदर्भ असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. मात्र विदर्भ राजाच्या पूर्वीही अगत्स्य नावाच्या ऋषीने दक्षिणेत आर्य संस्कृतीचा प्रसार केला होता. अशी आख्यायिका आहे. ते विदर्भ कन्या लोपामुद्रा हिच्याशी विवाहबद्ध झाले होते. लोपामुद्रेने अगस्ती ऋषीना कार्यप्रवृत्त केले त्यांच्या हातात नांगर दिले असा उल्लेख येतो. विदर्भ राजास दोन पुत्र होते. एक भीम व दुसरा क्रथकैशिक, 'भीमाय वैदर्भीय असा उल्लेखही ऐतरेय ग्रंथात सापडतो (३५,८, ऐतरेय ब्राह्मण) ह्या भीमराजाचीच कन्या दमयंती होती. विदर्भास पर्यायी नाव क्रथकैशिकाचा उल्लेख महाभारतात निळतो. महाभारतात भिष्मकाने क्रथकैशिक प्रदेश जिंकल्याचा उल्लेख मिळतो. त्यात वरदा नदीचा उल्लेख येतो, जी मालविकाग्निमित्र नध्ये विदर्भाच्या दोन विभागाची सीमारेषा न्हणून उल्लेखित आहे. भगवान श्रीकृष्णाची पट्टराणी रुख्मिणी, निषादराज नळाची दमयती तसेच रघुवंशातील अजराजाची राणी (दशरथाची आजी) इदूमती ह्या सर्व विदर्भकन्या होत.  विदर्भाची राजधानी कुण्डिनापूर ही महाभारत रामायणात प्रसिद्ध असून भारतीय प्रथेप्रमाणे जनपदातील लोक आणि तेथील राजा एकाच नावाने ओळखले जात असत. द्वारका म्हणजे काठेवाडातील श्रीकृष्ण आणि विदर्भराजकन्या रुक्मिणी तसेच निषधराज नल आणि विदर्भ राजकन्या दमयंती, तसेच रघुवंशातील राजा अज आणि विदर्भ राजकन्या इंदुमती यांच्या जोड्या प्राचीन वाङ्‌मयात प्रसिद्ध आहेत. नल-दमयंतीच्या महाभारतातील आख्यानावरून गंगा खोरे आणि विदर्भ यांच्यातील दळणवळणाच्या मार्गाचासुद्धा मागोवा घेता येतो. तीच बाब अयोध्येत राज्य करणारा अज आणि विदर्भ राजकन्या इंदुमती किंवा सौराष्ट्रातील श्रीकृष्ण आणि विदर्भ राजकन्या रुक्मिणी यांच्या उदाहरणावरूनसुद्धा लक्षात घेता येईल. विदर्भातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ही उत्तरेकडल्या आणि पश्चिमेकडल्या प्रदेशांशी कशी जोडली गेलेली होती याची उकल या कथांच्या माध्यमांतून करता येते.आडम (जि. नागपूर) येथे अलीकडे झालेल्या उत्खनानात आडम येथील नागरी वस्ती कमीत कमी इस पूर्व सातवे शतक इतकी जुनी आहे असा जो निष्कर्ष काढला गेला त्याचा खुलासाही या महाभारत रामायण आणि ब्राह्मण ग्रंथ यांच्या कथांतून मिळतो. वेगळ्या शब्दांत विदर्भातील इतिहास पूर्वकालीन संस्कृतीचे विश्लेषण या प्राचीन ग्रंथातील उल्लेखावरून होईल असे वाटते. आणि त्याचबरोबर या भागात तुरळकपणे का होईना उत्तर वैदिक संस्कृतीचा प्रवेश झाला हे स्पष्ट आहे. विदर्भातील पवनी (जि. भंडारा) आणि भोन (जि. बुलढाणा) दोन स्तूपांवरून गंगा खोऱ्यातील नागरीकरणाची प्रक्रिया व्यापाराच्या माध्यमातून विदर्भ आणि दंडकारण्य ओलांडून दक्षिणेत आंध्रात कशी गेली हे आपल्याला सांगता येते. पवनी येथील स्तूपाचे मूळ डॉ. शां. भा. देव आणि जगतपती जोशी या उत्खनकांच्या मते अशोकाच्या काळापर्यंत जाते. अशोकाच्या अभिलेखात उल्लेखित भोज आणि खारवेलच्या हाथी गुफालेखात वर्णनीत 'भोजक' यावरुनही या प्रदेशाची प्राचीनता लक्षात येते. इ.स.पूर्व ६ व्या शतकात हा प्रदेशचे चेदी राष्ट्रात नोडत होता. वैनगंगा नदीच्या तटवर्ती प्रदेश वेण्णा/भेण्णाकट आणि वैनगंगा नदीच्या सीनावर्ती प्रदेश नहिसक रह नावाने प्रसिद्ध होता. त्यानंतर ह्या प्रदेशाचा सनावेश विदर्भात झाला. चेदि जनपदानंतर नंद व नौर्यानी राज्य केले.
        बौद्ध धर्माचा प्रसार दख्खनमध्ये कसा झाला याचे स्पष्टीकरण देताना दख्खनमधील खनिज संपत्ती (उदा. वैरागड व गोवळकोड्याजवळच्या रत्नांच्या खाणी ज्यांचा उल्लेख वज्राकार असा येतो.) आणि रोमन व ग्रीक खलाशांच्या मार्फत अरबी समुद्रातून होणारा व्यापार आणि त्यातून आलेली समृद्धी यांच्याद्वारे केले जाते. मुनी बावरीचे शिष्य हे गोदावरीच्या किनाऱ्यावरून पैठण, अहमदनगर, खानदेश, माळवा या मार्गाने प्रयागला जाऊन पुढे श्रावस्तीला गेले आणि बुद्धांना भेटले या कथेतूनसुद्धा अशा प्रकारचे व्यापारी मार्ग होते हेच स्पष्ट झाले आहे. किंबहुना व्यापारी आणि त्यांच्याबरोबर गेलेले भिक्षु यांनी गंगा खोऱ्यातील आधुनिक शेतीचे तंत्र दख्खनमध्ये आणले, आणि त्यातून झपाट्याने दख्खनचे नागरीकरण झाले असे या पुरातत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेतले म्हणजे कोकणचा किनारा आणि आतील पैठण, तेर व अडमसारखी व्यापारी ठिकाणे एकमेकांशी जोडली गेलेली होती ती रोमन साम्राज्याशी असलेल्या व्यापारी संबंधांमुळेच हेही अधोरेखित होते. आडम येथे रोमन सम्राटांची सोन्याची १२ नाणी सापडली आहेत. आणि या संपर्कामुळे सार्थवाह, व्यापारी आणि प्रजा मोठ्या प्रमाणावर थेरवादी बुद्धाचे अनुयायी झाले. परिणामस्वरूप या व्यापारी मार्गावर शेकड्यांनी बौद्ध गुंफा कोरल्या गेल्या. भारतातील जवळजवळ हजार गुंफांच्यापैकी ६५० गुंफा दख्खनमध्ये आहेत, आणि त्यातल्या बहुतांश बौद्ध आहेत. यावरून इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सनाच्या ५०० वर्षांपर्यंत महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा किती मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असावा हे लक्षात येते. वैदिक धर्माचे मनापासून पालन करणारे सातकर्णी आणि त्याची पत्नी नागरिका यांनी केलेल्या वाजपेयादी अनेक मोठ्या यज्ञांचा उल्लेख त्यांच्या अभिलेखातून व नाण्यांवरून सहज मिळतो. ते वैदिक धर्माचे अनुयायी असून सुद्धा नाशिक, कान्हेरी येथील त्यांच्या शिलालेखावरून व सातवाहनांचे प्रतिस्पर्धी असलेल्या क्षहरात नहपानाच्या शिलालेखांवरूनसुद्धा हे बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणावर आश्रय देत होते हे स्पष्ट होते. वेगळ्या शब्दांत अगदी पुष्करपासून ते गोदावरीच्या खो-यापर्यंतच्या भागात वैदिक आणि बौद्ध धर्म हे परस्पर सामंजस्याने वृद्धिगत होत होते. मौर्यांच्या पाठोपाठ राज्य करणाऱ्या वैदिक शृंग राजांच्या आश्रयाखाली भारहूत व सांची (मध्य प्रदेश) येथे बौद्ध कलेची प्रसिद्ध केंद्रे उदयाला आली. आणि त्यांचा प्रभाव विदर्भात किती होता हे मालविकाग्निमित्र या नाटकातील विदर्भ युवराजांच्या कलहाच्या उल्लेखावरून कळून येतो. 






 
   या पार्श्वभूमीवर वाकाटकांच्या राज्यकाळातील म्हणजे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापासून ते पाचव्या शतकाच्या शेवटापर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण काय होते, त्यात बदल कसे घडले हे जाणून घेणे अत्यंत मनोरंजक ठरणार आहे. वाकाटकांचा आदिपुरुष विंध्यशक्ती (इसवी सन सुमारे २५० ते २७०) याने अशाच प्रकारच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात सातवाहनांच्या नंतर विदर्भामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली असावी. त्याचा उत्तराधिकारी प्रवरसेन प्रथम (इसवी सन सुमारे २७० ते ३००) याने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. पुराणातील उल्लेखानुसार या राजवंशाची पहिली राजधानी सातपुड्यातील पुरिका या नगरात असून, त्याच्या चार पुत्रांनी आपापली स्वतंत्र राज्ये त्याच्या साम्राज्यातून निर्माण केली. इतिहासाला वाकाटक वंशाच्या दोनच शाखा माहीत आहेत. वाकाटकांच्या शिलालेखावरून आणि ताम्रपटांवरून असे दिसते की, प्रवरसेनाचा नातू प्रथम रुद्रसेन याने नंदिवर्धन, (हल्लीचे नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळचे नगरधन) येथे आपली शाखा प्रस्थापित केली, तर त्याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने वत्सगुल्म (म्हणजे वन्हाडातील आजचे जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम) येथे दुसरी शाखा प्रस्थापित केली. ज्ञात असलेल्या शिलालेखांवरून असे म्हणता येईल की इ.स. सुमारे २५० ते ५०० या अडीचशे वर्षांच्या काळात वाकाटकांच्या दोन शाखांतील नऊ पिढ्यांनी वन्हाड (पश्चिम विदर्भ) व पूर्व विदर्भात राज्य केले. यापूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे इसवी सन ३५० ते पाचशेपर्यंतचा काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ समजला जातो. असा समज होता की, गुप्त वंशाची कारकीर्द म्हणजे भारताचा सुवर्णकाळ. परंतु वाकाटक वंशातील राजांनी राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा म्हणजे स्थापत्य, शिल्प, चित्रकला व धर्म व त्यातील विविध परंपरा यांच केलेल्या योगदानामुळे आज हा सुवर्णकाळ गुप्त- वाकाटक काळ म्हणून ओळखला जातो.

   मौर्यकालीन विदर्भ (इ.स.पूर्व ३२२-२३०)

         विदर्भातील प्राचीन जनपदांनतरचा ज्ञात इतिहास हा अशोकाच्या काळापासून सुरु होतो. मौर्य-शुंग काळात हीनयान बौद्ध धर्माचाप्रसार विदर्भात विशेषतः भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रनाणात झाला. मौर्य-शुंग काळातील एका स्तूपाचे अवशेष भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आढळले आहेत. हा स्तूप ३८ मीटर व्यासाचा असून स्तूपाचे वजन वाढू नये न्हणून पोकळ पेटीकांची (Empty Boxes) ची रचना केली गेली होती हा इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील भव्य स्तूप होय. सम्राट अशोकाच्या  महामात्राने कोरविलेला शिलालेख चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे मिळालेला आहे. त्यात प्राण्यांचे बंधन किंवा हिंसा करणाऱ्यास शासन करण्याची एक स्वामीची (राजाची) आज्ञा कोरली होती. हाच विदर्भातील अडीच हजार वर्षापूर्वीचा आद्य शिलालेख होय. यावरुन ह्या प्रदेशावर मौर्य राजवंशाचे साम्राज्य होते असे म्हणता येईल.

शुंग काळ :-

    इ.स.पूर्व १८४ च्या सुमारास मौर्य शासक बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने ब्रहद्रथाची हत्या करुन गादी बळकावली. त्याचा पूत्र अग्निमित्राने विदर्भावर आक्रमण केले. येथील राजा यज्ञसेन हा बृहद्रथ मौर्याचा मेहुणा होता. अज्ञसेन व त्याचा चुलत भाऊ माधवसेन यांच्यात गादीकरीता भांडण उद्भवले तेव्हा यज्ञसेनाने माधवसेनास कैद केले. माधवसेन अधिमित्राची मदत मिळविण्याचा प्रयत्न करु लागला या भाऊबंदकीच्या कलहाचा अग्निमित्राने फायदा घेऊन विदर्भावर आक्रमण करुन यज्ञसेनास पराभूत केले आणि त्यानंतर हे राज्य या दोन भावंडात वाटून दिले. वर्धा नदीच्या ह्या दोन्ही राज्याची विभाजन रेषा होती. अशारितीने दोघांनाही शुंगाचे अधिपत्य स्वीकारले. अप्रिमित्राने विदर्भाची राजकन्या मालविका हिचे पाणीग्रहण केले.

      सातवाहनकालीन विदर्भ (इ.स.पूर्व २३० ते इ.स.२३०) :-

          शुंगानंतर सातवाहनांचा उदय झाला. सातवाहनांच्या नाण्याचा एक मोठा संग्रह अकोला जिल्ह्यातील तन्हाळा येथे सापडला त्यात गौतनीपुत्र सातकर्णी ते पुळूवामी (शेवटचा) सातकर्णी पर्यतची अनेक नाणी मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरी तालुक्यातही इ.स. १८८८ नध्ये सातवाहन राजाच्या १४३ नाण्यांचा संच सापडला. या पुराव्यावरुन सातवाहनाचे राज्य ह्या प्रदेशावर अगदी अखेरपर्यंत (इ.स. २५० पर्यंत) होते असे म्हणता येते. सातवाहनाच्या काळी कालिंग सम्राट महामेधवाहन कालिंगधिपती खारवेल याने त्यांच्या राज्य कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी सातवाहन राजाच्या विरोधास न जुमानता पश्चिमेस कहवेन्ना नदीपर्यंत चालून गेला होता व असिकनगरचा विध्वंस केला होता असे भुवनेश्वर जवळच्या हाथीगुफा येथील शिलालेखातील उल्लेखावरुन कळते. असिकनगर हे आजचे अड्म होय. आणि कन्हवेण्णा ही नागपूरजवळची कहान नदी होय असे. डॉ. मिराशी व डॉ. चन्द्रशेखर गुप्त यांचे मत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक येथील प्रसिद्ध विजासन लेणी याच सातवाहन काळातील देण होय. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे महाक्षत्रप रुपिअन्नचा ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकातील छाया स्तंभ मिळाला आहे. त्यावर ब्राह्मी लिपीत महाक्षत्रप रुपीअन्न याचा स्मृतिस्तभ असे लिहिले आहे. महाक्षत्रप रुपीअन्न हा शकवशीय असून कुशानानी विदर्भावर नेमलेला प्राताधिकारी होता. ह्या छायास्तंभानुळे कुषाणाची काही काळ विदर्भावर सत्ता होती. हे ज्ञात झाले.

         मुंड वंश :-

     विदर्भात इ.स.२३० नध्ये सातवाहन राजवटीचा अस्त होऊन मुंड नावाचे नवीन घराणे सत्तेवर आले. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जवळच्या मल्हारागावी सापडलेल्या पेटिका शीर्षक लिपीत आणि संस्कृत भाषेत लिहिलेल्या आदित्यराज याच्या ताम्रपटाच्या आधारे वा.वि. मिराशी हे सातवाहन राजवटीच्या अस्तानंतर आणि वाकाटकांच्या उदयापूर्वी काही काळ विदर्भावर मुंडवंशानी राज्य केले असे मानतात. मुंड वंशामध्ये सोन नामक पुरुष होऊन गेला. त्यानतर त्याचा पुत्र वर्धन व नातू हे त्याच्यासारखेच विद्वान व सत्शिल होते. या तिघांनीही राजपदाचा उपभोग घेतल्याचा ताम्रपटात उल्लेख नाही. परंतु त्यानंतरच्या मुण्डपुत्र राष्ट्रनहाराजाने आपल्या गुणाने राजपद मिळविल्याचा उल्लेख आहे. शेवटचा राजा आदित्यराज याने आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी या ताम्रपटाने काही गावे ब्राह्मणांना दान दिल्याचा उल्लेख मिळतो. ताम्रपटात उल्लेखित गावे अकोला व अमराक्ती जिल्ह्यात सापडतात, आदित्य राज याने अल्पकाळ राज्य केले. कारण त्यानंतर वाकाटक वंशातील प्रथम विन्ध्यशक्तिचा पुत्र प्रथम प्रवरसेन याने विदर्भावर स्वारी करुन मुंड वंशाचा पराभव केला आणि आपले राज्य विदर्भात स्थापन केले.

         वाकाटक (इ.स.२५० ते ५५०) :-

महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला राजवंश म्हणजे सातवाहन राजवंश तर या सातवाहन राजवंशाच्या ४५० वर्षाच्या प्रदीर्घ राज्यकाळानंतर जेव्हा सातवाहनांची शक्ती कमी व्हायला लागली तेव्हा सातवाहनांचे अधिपथ्य झुगारून महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात उदय झाला वाकाटक राजवंशाचा ! 
      इ.स. तिसऱ्या शतकाच्या मध्यकाळात मध्य भारत व गंगा-यमुना दोआब या प्रदेशांमध्ये तीन राजसत्ताचा उदय झाला. यापैकी प्रयागराज ( अलाहाबाद ), अयोध्या प्रदेशावर गुप्त वंशाचे राज्य होते, तर मथुरा, ग्वाल्हेर, विदिशा विभाग नाग वंशाच्या सत्तेखाली आणि बुंदेलखंड (बघेलखंड) प्रदेश समकालीन वाकाटक राजवंशाच्या अधिपत्यास्वाली होता. त्याच्या दीर्घ अमदानीच्या कालखंडात या सर्व वंशाचे एकमेकांशी संबंध आले. प्राचीन महाराष्ट्रात जी अत्यंत बलाढ्य व सुसमृद्ध अशी साम्राज्ये झाली त्यात वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. इ.स. २५० ते जवळपास इ.स. ५५० पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या तीनशे वर्षांच्या कालावधीत वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरा पर्यंत पसरवली. नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या मालव, मेकल व चेदी या देशांनीही त्याचे मांडलिकत्व काही काळासाठी पत्करलेले होते. 


     वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत या दोनही भाषांतील कवींना उदार आश्रय दिला होता. विदर्भातील वाङ्मय निर्मितीमुळे तेथील वैदर्भी रीतींना प्राधान्य प्राप्त झालेले दिसते. कलिदासासरख्या कवीने देखील यावर काव्ये केलेली आहेत. त्याने आपल्या मेघदूत या महाकाव्यात विर्दभाचे वर्णन केलेले आहे. नागार्जुन नामक एक संस्कृत ग्रंथकार याच कालात होऊन गेला.
  वाकाटकांच्या काळात भारतीय समाजात अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये वाकाटकांचा मोठा हात होता.वाकाटक काली वैदिक ,जैन ,बौद्ध व् त्यांच्या अनेक शाखा अस्तिवात होत्या.  त्यांच्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कुशाण कारकीर्दीत सनातन धर्मास जी उतरती कळा लागली होती ती या गुप्त व वाकाटक काळात संपून सनातन धर्म पुन्हा उभारी धरू लागला. याच काळात संस्कृत भाषेच्या व वांगमयाच्या अभीवृद्धीची चळवळ सुरू झाली. यामुळेच गुप्त नृपतींनी सुद्धा संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. संस्कृतभाषे सोबतच शिल्पकला व चित्रकला यांचे पुनरुज्जीवन सुद्धा वाकाटकांच्या काळात झाले. त्याचे पूरावे त्यांच्या राज्यात असणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसते.
 वाकाटक राजांनी केवळ विद्वानांना वा कवींना आश्रयच नव्हता दिला तर ते स्वतः सुद्धा उत्तम काव्ये व सुभाषिते रचत. वाकाटक राजांनी रचलेली हरिविजय, सेतुबंध अथवा रावणवहो ही काव्ये तर अनेक सुभाषितांचे उल्लेख आजही अनेक ठिकाणी सापडतात. वाकाटकांनी स्वतः जी काव्ये रचली त्याची प्रशंसा बाण व दण्डी या सारख्या कवींनी केलेली आहेत. दिवाकर सेन रचित काही श्लोक हे सुदुक्ति/कर्नामृत नामक श्रीधरदास रचीत ग्रंथात आहेत. प्राकृत: सर्वसेनाचा हरिविजय,प्रवरसेन २ सेतुबंध असे ग्रंथ रचल्या गेले.
त्यांच्याच काळात अजिंठातील काही लेण्या कोरल्या गेल्या. ज्यातील विहार, चैत्य, शिल्प, चित्र यांची प्रशंसा आजही जगभरात होते आहे.
अजिंठ्यातील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी ही वाकाटक कालीन असून ती लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी इतर लेण्यांपेक्षा उत्कृष्ठ आहेत.
एकंदरीतच त्या काळातील संस्कृत भाषा, कला, वाङ्मय या सर्वांच्या पुनरुज्जीवनाचे सारे श्रेय जरी गुप्त राजांना दिले गेले असले तरी खऱ्या अर्थाने ते श्रेय वाकाटकांचेच आहे. 




  अभिलेखान्वरुन असे दिसते की या काली दूध,दही,लोणी,तूप,तांदुळ,मग,उडीद,गहू,तीळ,साखर,हरभरा,मोहरी ,कारले,गुळ,विभिन्न फळ यांच्या वापर होई.तांदुळ,गहू+जवस खिरी,तांदुलाचा भात असे पदार्थ प्रचलित होते.काही लोक (कोण हे सांगता येणार नाही पण बहुधा सैनिक व् समाजातील इतर लोक हे मांस भक्षण पण करत)
   बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या नंदीवर्धन ( नगरधन - रामगिरी) (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते.त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे.
पुढे या राज्याची विभागणी झाली तेव्हा दुसरी राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे वसविण्यात आली.
       असे हे सामर्थ्यशाली घराणे इतिहासाला १८३६ पर्यंत अज्ञात होते. इ.स. १८३६ मध्ये सिवनी येथे वाकाटक राजा द्वितीय प्रवरसेन याचा ताम्रपट सापडला व हे राजघराणे इतिहासाला ज्ञात झाले. पुराणांमध्ये मात्र वाकाटकांबद्दल काहीच लिहिलेलं नाही. त्यांचा पहिला राजा विंध्यशक्ती याचा मात्र उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. गेल्या दशकात लागलेल्या नवीन शोधान्च्या आधारे असे दिसुन येते की वाकाटक वंशाच्या ४ शाखा होत्या: प्रवर पुर-नंदिवर्धन,वत्सगुल्म,एक अमरावती जिल्ह्यात ,एक अजुन आहे (ह्या शेवटच्या दोन्ही शाखांची माहिती अजुन तेवढी समोर आलेली नाही)
 वाकाटक साम्राज्याच्या कार्यकाळात जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या अनेक लेण्यांची निर्मिती झाली त्यामध्ये त्यांची वंशावळ देखली आहे तिला #वाकाटक_वंशकेतू म्हटले जाते ती पुढे देत आहे. 
●विन्ध्यशक्ति
●प्रवरसेन प्रथम
●रुद्रसेन प्रथम
●पृथ्वीसेन प्रथम 
●रुद्रसेन द्वितीय
●प्रभावतीगुप्त
●दिवाकरसेन
●दामोदरसेन
●नरेन्द्रसेन
●पृथ्वीसेण द्वितीय 
●सर्वसेन तृतीय
●विन्ध्यसेन (विन्ध्यशक्ति द्वितीय)
●प्रवरसेन द्वितीय
●देवसेन 
●हरिसेण





 

 
  प्रवरपुर-नंदिवर्धन: वाकाटक मुळ पुरुष हा विन्ध्यशक्ति १. अजंता येथील गुफा क्र १६ येथे वाकाटक देवसेन चा लेख आहे त्यात पूर्ण वंशावळ आहे.ह्या लेखावरुन असे प्रतीत होते की वाकाटक हे "द्विज" ,विश्नुवृद्ध गोत्राचे होते. विन्ध्यशक्ति १ नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन १ हा राजा झाला .यास ४ पुत्र : रुद्रसेन(नंदिवर्धन)सर्वसेन(वत्सगुल्म). बाकी २ पुत्र व त्याचे राज्य कुठवर होते हे आज पुराव्या अभावी स्पष्ट नाही.रुद्रसेन १ हा प्रवरसेन चा नातू व् गौतमीपुत्र चा मुलगा होता. रुद्रसेन १>पृथ्वी सेन १>रुद्रसेन २(याचा विवाह चन्द्रगुप्त २ कन्या प्रभावती शी झाला). यास किती पुत्र होते यावर मतभेद आहेत. मिराशी ह्यानी दामोदर सेनला प्रवरसेन २असे म्हटलेले आहे. काहींच्या मते दिवाकर,दामोदर,प्रवरसेन अशी ३ मुले होती. प्रवरसेन २ हा सर्वात बलाढ्य राजा होता,सर्वात जास्त ताम्रपट व् लेख याचेच आहेत. प्रवरसेन २>नरेंद्र सेन>पृथ्वी सेन अशी ही पुढील वंशावली.
 वत्सगुल्म::- सर्वसेन>विन्ध्यशक्ति २>?>?>देवसेन>हरिषेण>?. हरिषेण ह्याने आंध्रातिल सालंकायन वंशी राजास पदच्युत करून ते गोविंदवर्मा ह्यास दिले.ह्याचा पुत्र माधववर्मा १ चा विवाह एका वाकाटक राजकन्येशी झाला होता.
  आता या वाकाटक वंशातील एक एक राजांची माहिती करुन घेउया.

 विंध्यशक्ती ( पहिला ) (इ.स. २५० ते २७०)  :-

        प्रथम विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा होय. याचे नाव पुराणांत तसेच अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यांमधील लेखात आलेले आहे. त्या लेखात विंध्यशक्तीचा हा द्विज म्हणजे ब्राह्मण असून त्याचे गोत्र विष्णूवृद्ध आहे असा उल्लेख आलेला आहे. त्यात विंध्यशक्तीचा
' वाकाटकवंशकेतुः ' म्हणजे वाकाटक वंशाचे मानचिन्ह असा केलेला आहे. त्याची राजधानी ही पुरातन नगरी चनका ही होती.तो मूळचा कुठला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण, विंध्य पर्वताशी संलग्न नावावरून तो मूळचा मध्य भारतातील असावा.  विन्ध्यशक्तीचा कोणत्याही धार्मिक पद्धतीनुसार राज्याभिषेक झाला नव्हता त्यामुळे तो अभिषिक्त राजा नव्हता तर केवळ सामंत होता असे काही तज्ज्ञाचे मत आहे.
विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राजवटीमध्ये मोठ्या अधिकारावर असावा व त्यामुळेच त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असे वाटते.सातवाहनांची सत्ता क्षीण झाल्यानंतर त्याने विदर्भात स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे, असे म. म. मिराशींचे अनुमान आहे. पुराणातील वर्णनावरून तो विदिशेचा असावा, असेही अनुमान निघते. पण मिराशींच्या मते ते बरोबर नाही. काही विद्वानांच्या मते, त्याचे खरे नाव वेगळेच असून विंध्यपर्वतापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केल्यानंतर त्याचे द्योतक म्हणून त्याने 'विंध्यशक्ती' हे बिरूद धारण केले होते. पण पुराणातील वर्णनावरून हा विस्तार त्याच्या पुत्राच्या वेळी झाला, असे दिसते. वाकाटकांच्या दानपत्रात विंध्यशक्तीचे नाव नाही. त्यातील वंशावळ प्रथम प्रवरसेनापासून सुरू होते, कारण तोच साम्राज्य संस्थापक होता.
काही पुराणांमध्ये विन्ध्यशक्तीच्या संबंधात ९६ वर्षाचा उल्लेख आहे. हा उल्लेख जर बरोबर असेल तर त्यावरून त्याच्या दीर्घायुष्याचा बोध होतो. त्याने इ.स. १५०-२७५७ या कालखंडात राज्य केले असावे. तो महत्वाकांक्षी राजा होता. त्याने वाकाटक सत्तेची बळकट पायावर प्रतिष्ठापना केली आणि त्याच्या समर्थ वारसांनी त्या सत्तेचे साम्राज्यात रुपांतर केले.

वाकाटक नावाचा सर्वात जुना उल्लेख अमरावती येथील एका स्तंभाच्या तुकड्यावर सापडलेल्या शिलालेखात आढळतो ज्यामध्ये गृहपती (गृहस्थ) वाकाटक आणि त्याच्या दोन पत्नींच्या भेटीची नोंद आहे . हा गृहपती बहुधा विद्याशक्तीचा पूर्वज होता. पुराणांमधून असे दिसून येते की विंध्यशक्ती हा विदिशा (सध्याच्या मध्य प्रदेश राज्यात) चा शासक होता परंतु ते बरोबर मानले जात नाही.
समुद्र गुप्ताच्या अलाहाबाद स्तंभ शिलालेखात रुद्र देवाची म्हणजे वाकाटक राजा रुद्र सेना ( प्रथम ) असल्याचे चुक सिध्द झाले, कारण वाकाटकांची उत्तर भारतात नाणी सापडली नाहीत आणि विंध्यवासाच्या उत्तरेला त्यांचे कोणतेही शिलालेख नाहीत. 
अजिंठ्याच्या लेखात विंध्यशक्तीची मोठी स्तुती केलेली आहे. अजिंठा येथील लेखात विंध्यशक्तीच्या पराक्रमाचे खूप वर्णन केलेले असून त्याला 'वाकाटकवंशकेतू' म्हटले आहे' अजिंठाच्या गुहेच्या सोळाव्या शिलालेखात त्यांचे वर्णन वाकाटक घराण्याचा ध्वज आणि द्विज असे करण्यात आले आहे अजंठा शिलालेखामध्ये विन्ध्यशक्तीचे ब्राह्मण म्हणून वर्णन असून त्याने काही धार्मिक कृत्ये केल्याचाही उल्लेख आहे.. या शिलालेखात असे म्हटले आहे की 
त्याने मोठ्या मोठ्या लढायांत विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला तर प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी उडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्या पुढे विनम्र होत’.  त्यांनी मोठ्या लढाया लढून आपल्या शक्तीत भर घातली आणि त्यांच्याकडे मोठा घोडदळ होता. परंतु या शिलालेखात त्यांच्या नावापुढे कोणताही राजेशाही उपाधी लावलेला नाही.
एकंदरीतच विंध्याशक्ती हा एक प्रबळ राजा होता. त्याचा पराक्रमाची तुलना प्रत्यक्ष इंद्र व विष्णूशी केलेली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत चार अश्वमेध आणि आप्तोर्यांम, बृहस्पतिसव, ज्योतिष्टोम, वाजपेयादी यज्ञ केल्याचे दिसते.
     अजंठा शिलालेख हा.आतापर्यंत विन्ध्यशक्तिसंबंधी माहिती पुरविणारा हा एकच लेख उपलब्ध होता. हा लेख अतिशय  स्वराब अवस्थेत आहे. याशिवाय याची रचना पद्यात्मक आहे आणि इतर राजांच्या नावामागे कोणत्याही पदवीचा उल्लेख यामध्ये आलेला नाही. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या देक्सेना" च्या बीदर ताम्रपटात आणि त्याचा पुत्र व वारस हरिषेण" याच्या थाळनेर ताम्रपटात विन्ध्यशक्तीला वाकाटकांचा पहिला (आदि) धर्ममहाराज म्हटले आहे. (वाकाटकानामृ आदिर धर्म महाराज) यावरून तो अभिषिक्त (ण्दनुहुँदर) राजा होता व त्याने राजसत्ता निदर्शक पदव्याही धारण केल्या होत्या याबद्दल शंका राहत नाही. अजंठा शिलालेस्वामध्ये त्याच्या सैनिकी यशाचे अगदी स्पष्ट पण अनुषंगिक रीतीने वर्णन दिलेले आहे. त्याने मोठमाठ्या युद्धांमध्ये जय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते (महाविमर्देष्व-अभिवृद्ध-शक्तिः), संतापला तर देवानासुद्धा त्याला आवरणे शक्य नव्हते (कृद्धस-सुरैर-अध्य-अनिवार्य वीर्यः), युद्धामध्ये त्याच्या घोड्याच्या स्खुरांमुळे उधळलेल्या धुळीच्या लोटांनी सूर्यही झाकोळला जातो (रणेषु हर्य-उद्धव, रेणू-जाल-सछादित-आर्क:) त्याने आपल्या बाहु सामर्थ्यांने सर्व जगावर विजय मिळविला (स्व-बाहु-वीर्य-आर्जित-सर्व लोकः) त्याच्या ऐश्वर्याची तुलना पुरंदर व उपेंद्र यांवेशी करता येईल (पुरन्दर-ओपेन्द्र-सम-प्रभावः), त्याने शत्रुचा नाश केला होता (विनिवारित-आरि:)." असे त्याचे लेखामध्ये वर्णन दिले आहे. परंतु ही सर्व स्तुती संदिग्ध आणि दुर्दैवाने त्याने पराभूत केलेल्या शत्रुची माहिती देणारा काहीही पुरावा नाही. परंतु यावरून असे दिसते की, राज्य निर्माण करणे व त्यावा विस्तार करण्यासाठी सतत सैनिकी कारवायांमध्ये तो व्यस्त होता. यास दृष्टीने विचार करता राज्य निर्माण करण्याकरिता त्याला सैनिकी सामध्यापेक्षा व्यवहार चातुर्याचा जास्त उपयोग झाला.  या विजयी स्वार्यांमुळे त्याला विन्ध्य विभागातील काही प्रदेशावर सत्ता स्थापन करता आली. वर्हाडपासून प्रारंभ करून त्याने बैतूल, इटारसी आणि होशंगाबाद हे मध्यप्रदेशातील जिल्हे जिंकले व आपल्या राज्याला जोडले. जरी विन्ध्यशक्तीने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेकडे केला असला तरी त्याने चनका या ठिकाणाहूनवच राज्य केले असावे. हे चनका शहर मध्य प्रदेशात असावे.मात्र त्याचे मूळ राज्य विन्ध्य प्रदेशात होते व त्याने दक्षिणेकडे आपल्या राज्याचा विस्तार केला होता. परंतु माहितीव्या अभावी त्यांचे मूलस्थान निश्चित सांगता येत नाही. त्याने दक्षिणेकडे राज्यविस्तार केला हे निश्चित, 
विंध्यशक्तीच्या माघारी त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला. वाकाटक घराण्यातील हा सर्वात महत्त्वाचा राजा होय.
 
 प्रवरसेन पहिला   
 
   विन्ध्यशक्तीनंतर त्याचा पुत्र प्रवीर उर्फ प्रवरसेन ( प्रथम ) हा सिंहासनावर आला. पुराणांत त्याचा उल्लेस्व प्रवीर म्हणून तर इ.स. १७७ च्या कोरीव लेखांमध्ये प्रवरसेन म्हणून उल्लेख आहे. पुराणांमध्यें वर्णिल्याप्रमाणे त्याने ६० वर्षे (इ.स. २६०-३३०) राज्य केले. त्याच्या महत्त्वपूर्ण कारकिर्दीचा शेवट इ.स. ३३७ च्या सुमारास झाला. तो फार महत्वाकांक्षी होता. साम्राज्यविस्तार करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्यही  त्याच्याकडे होते. परंतु उत्तरेकडे गुप्त व नाग वंशाच्या उदयामुळे त्याच्या साम्राज्य विस्ताराला वाव नव्हता. परिणामतः त्याला सातवाहन शाखेचे राज्य असलेल्या विदर्भाकडे वळावे लागले. या सातवाहन शाखेचे एक सातकर्णि, कुंभ सातकर्णि व कर्ण (किंवा कृष्ण) सातकर्णि हे तीन राजे फक्त तर्हाळा (अकोला जिल्हा) नाणे संचयानुसार ज्ञात आहेत. त्यांनी सुमारे इ.स. ३०० पर्यंत राज्य केले. खात्रीलायक पुराव्यांच्या अभावी प्रवरसेनाने इ.स. तिसऱ्या शतकाच्या शेवटी कोणत्या सातवाहन राजाचा पराभव केला हे सांगता येत नाही. परंतु वाकाटक आणि विदर्भ प्रदेश या दोहोच्याही दृष्टीने ही फार महत्त्वपूर्ण घटना होती. कारण यावेळेपासून वाकाटक व विदर्भ यांचे एकमेकांबरोबर अतूट संबंध राहिले आहेत. जरी आपल्याला अद्यापपर्यंत त्याने आणखी काही प्रदेशांवर आपली सत्ता स्थापन केली होती किंवा नाही याबद्दल माहिती उपलब्ध नसली तरी त्याने आणस्खी काही प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणून आपल्या राज्याला जोडले असावेत. प्रारंभीच्या इतिहासकारानी काही तर्क केले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते वाकाटक सत्तेच्या अस्तापर्यंत जे प्रदेश त्यांच्या सत्तेस्वाली होते ते सर्व प्रवरसेन ( प्रथम ) याने वाकाटक राज्याला जोडले होते. नंतरच्या इतर काही राजानी राज्याला काही प्रदेश जोडल्याबद्द‌लवा पुरावा उपलब्ध नाही. श्री शैल-स्थल-माहात्म्या मधील परंपरेनुसार चंद्रगुप्ताच्या चंद्रावती नामक कन्येने श्री शैल येथील भगवान मल्लिकार्जुनाला रोज जुईच्या फुलांची माला वाहिली. हि चंद्रावती म्हणजे बहुतेक प्रभावतीगुप्ता असावी असा अंदाज आहे आणि त्याच्या आधारे असा निष्कर्ष काढला आहे की, या तीर्थाचा (श्री शैल) अंतर्भाव वाकाटक राज्यात होते होता. कर्नुल जिल्ह्यापर्यतचा प्रदेश वाकाटकांच्या प्रत्यक्ष शासनारवाली नव्हता, परंतु प्रभावास्वाली होता. पण या पुराव्याला जेवढे खात्रीलायक समजले जाते तेवढा तो अधिकृत नाही. याचे प्रमुख कारण असे आहे की, शैल मल्लिकार्जुन येथील प्रतिमा शिवाची आहे आणि प्रभावती गुप्ता ही गुप्त नृपर्तीप्रमाणेच कट्टर वैष्णव होती. प्रवरसेन प्रथम याच्या पश्चिमेकडील राज्यविस्ताराच्या संबंधाने असलेल्या त्यांच्या मताबद्दलही असेच म्हणावे लागेल. प्रवरसेन प्रथम याने पश्चिमी क्षत्रपांच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळे भर्तृदामनच्या नंतर चष्टन वंशाचा अस्त झाला. तसेच स्वामी जीवदामन याचा पुत्र रुद्रसिंह दुसरा याचे झालेले सिंहासनारोहण आणि तो व त्याचा पुत्र व वारस यशोदामन दुसरा यांनी राजसतानिदर्शक महाक्षत्रप ही पदवी धारण न करणे या गोष्टी घडून आल्या. असा एक मतप्रवाह आहे की, प्रवरसेन प्रथम याने रुद्रसिंह दुसरा याला वाकाटकांचे सार्वभौमत्व मान्य करावे या अटीवर त्यावेळी राज्य करीत असलेल्या भर्तृदामन विरुद्ध उठविले आणि याच कारणामुळे रुद्रसिंह दुसरा व त्याचा पुत्र यशोदामन दुसरा यांनी राजसतानिदर्शक महाक्षत्रप पदवी धारण केली नसावी. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात सोनपूर येथे मिळालेली त्यांची नाणी समाविष्ट असलेल्या नाणेसंचयावरून असे दिसते की, ते वाकाटकांना खंडणीही देत असावेत. परंतु हा सिद्धांत पूर्वीच्या सिद्धान्ताप्रमाणेच स्वीकारार्ह नाही. भर्तृदामन यांच्यानंतर चष्टन वंशाला मुलगा नसल्यामुळे या वंशाचा अस्त झाला. रुद्रसिंह दुसरा याच्या मिळालेल्या नाण्यांवरून असे दिसते की, नाणे पाडण्याची व त्यावर नावे देण्याची पद्धत अव्याहत चालूच होती. महाक्षत्रप पद‌वी धारण न करण्यामागे बहुतेक ससानियन लोकांचे आक्रमण असावे. कारण या सुमारास ससानियनांनी सिंध प्रांत हस्तगत केला होता आणि त्यांनी या दोन क्षत्रपांना महाक्षत्रप ही श्रेष्ठ पदवी धारण करण्यास हरकत घेतली असावी. प्रवरसेन प्रथम याने निर्माण केलेले राज्य दक्षिणेत तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते हा तज्ज्ञाचा मुद्दा पूर्णपणे मान्य करता येत नाही. प्रवरसेन प्रथम याच्या साम्राज्याचे स्वरूप अखिल भारतीय (ईड व्हर्डीह) असे होते. असे काही अभ्यासक मानतात. त्याने कुषाणांना पंजाबातून अफगाणिस्थानापर्यंत हुसकावून लावले. परंतु याविषयी स्पष्ट पुरावा उपलब्ध नाही. विंध्यशक्तीच्या साम्राज्यात नर्मदा नदीच्या उत्तरेला असलेल्या विन्ध्य विभागाचा अंतर्भाव होत होता, परंतु इतर प्रदेशाच्या समावेशाबद्दल पुरावा उपलब्ध नाही. त्याचा पुत्र प्रवरमेव प्रथम याने सामान्यात्न्या दक्षीणेकडे विस्तार केला विदर्भ आणि दक्षिण भारतातील त्याला लागून असलेला प्रदेशही त्याने बहुतेक ताब्यात घेतला असावा, त्याच्या मुलांनी त्याच्या अधिपत्याखाली थोडे फार विजय प्राप्त केले असण्याची शक्यता आहे. शिवाय मध्यप्रदेशाला लागून असलेला दक्षिण कोसल किंवा छत्तीसगड प्रदेशही त्याच्या प्रभावास्वाली आला असावा, परंतु आजपर्यंत त्यावर त्याची सत्ता होती, असा पुरावा उपलब्ध नाही. तरी सुद्धा आपण असे स्वात्रीपूर्वक म्हणू शकतो की, त्याच्या कालखंडात वाकाटक साम्राज्यात मध्यप्रदेशाच्या बुंदेलर्खंड (बघेलखंड) या विभागापासून महाराष्ट्रातील विदर्भापर्यतच्या प्रदेशाचा समावेश होत होता. विदर्भाव्यतिरिक्त, दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटकपर्यंत, दक्षिण कोसल व आंध्रापर्यंत ते पसरले असावे,
त्यांनी उत्तर महाराष्ट्र, गुजरात किंवा कोकणात विजय मिळवला असण्याची शक्यता कमी आहे. परंतु, त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसह उत्तर कुंतलाचा काही भाग जिंकला असावा . पूर्वेला, त्यांनी दक्षिण कोसल, कलिंग आणि आंध्र येथे शस्त्रे वाहून नेली असावीत.
परंतु याविषयी कोठलाही ऐतिहासिक ठोस पुरावा देणे कठीण आहे. परंतु ज्या अर्थी त्याचे राज्य त्याच्या चार मुलीनी स्वतंत्र शाखा प्रतिष्ठित केल्या स्थावरून बरेच मोठे असावे असे म्हणण्यास हरकत नाही आणि विदर्भातील नंदिवर्धन (हल्लीचे रामटेकजवळील नगरधन) आणि वत्सगुल्म (वन्हाडातील जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम) या दोन ठिकाणांवरून राज्य करणाथा वाकाटकांच्या दोन शाखांचा इतिहास आपणास चांगलाच परिचित आहे.पुराणांनुसार त्याची राजधानी मध्यप्रदेशाच्या सतना जिल्ह्यात नचना गावाशी तादात्म्य केलेल्या कांचनका या शहरी होती. काही विद्वानांचे मत मान्य करावयाचे असेल, तर त्याने नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर सापतुडा किंवा ऋक्षवत पर्वताच्या उतरणीवर पुरिका अथवा ‘प्रवरपूर’ येथे दुसरी राजधानी स्थापन केली असावी असे म्हणावे लागेल. परंतु या स्थानाची अजून समाधानकारकरित्या निश्चिती करता आलेली नाही. हे गाव म्हणजे आजचे वर्धा जिल्ह्यातील ‘पवनार’ (विनोबा भावे यांचा आश्रम जिथे आहे ते) आहे, असे संशोधक मानतात.
  दक्षिण भारतात आपले सम्राटपद घोषित केल्यानंतर प्रवरसेनाने आपल्या उत्तर भारतातील सत्तेला बळकटी आणण्यासाठी तेथील भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडले. भारशिव हे नागवंशी असून मूळचे विदर्भातील असावेत. त्यांनी कुशाणांकडून हिंदूंना पवित्र असणारी प्रयाग व काशी ही दोन्ही धर्मक्षेत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. प्रवरसेन प्रथम याने मध्यभारतात अतिशय बलशाही असलेल्या भारशिव नाग घराण्याबरोबर वैवाहिक संबंध स्थापन केले होते. त्यामुळे वाकाटक साम्राज्याला सामर्थ्य व महत्त्व प्राप्त झाले असावे. नन्दिवर्धन शाखेच्या सर्व लेखांमध्ये यासंबंधीचा उल्लेख केलेला आहे. त्याचा पुत्र गौतमीपुत्र याचा विवाह नाग नृपती भवनाग याच्या कन्येबरोबर झाला होता. या भवनागने आपल्या स्वांद्यावर शिवलिंग धारण केल्यामुळे संतुष्ट होऊन भगवान शंकराने भारशिव हा वंश उत्पन्न केला होता. भारशिवांनी स्वसामर्थ्याने प्राप्त केलेल्या भागीरथीच्या जलाने स्वतःस मूर्धाभिषेक करवून घेतला होता आणि दहा अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पवित्र स्नान केले होते. वाकाटकांचे सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने हा विवाहसंबंध फारच महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या गुप्त राजवंशाबरोबर अशाच प्रकारच्या असलेल्या संबंधामुळे नन्दिवर्धन शास्वेच्या सर्व कोरीव लेस्वांमध्ये त्याचा अभिमानाने उल्लेख केलेला आहे.
  सामर्थ्य, सत्ता व श्रद्धा याने युक्त असलेल्या प्रवरसेन प्रथम याने असंख्य श्रौत यज्ञ केले. या यज्ञांची वर्णने वाकाटकांचे कोरीव लेख व पुराणे या दोन्हींमध्येही मिळतात. पुराणांमधील नोंदीप्रमाणे त्याने असंख्य वाजपेय किंवा वाजिमेध केले व विपुल दानेही दिली. कोरीव लेखांवरून असे दिसते की, त्याने अग्निष्टोम, आपतोर्याम, उक्थ्य, पौडशीन, अतिरात्र, वाजपेय, तसेच बृहस्पतिसव, साद्यस्क्र आणि चार अश्वमेध" हे सर्व यज्ञ (सप्त-सोम संस्था) केले. यापैकी बृहस्पतिसव हा यज्ञ फक्त ब्राह्मणच करू शकतात. चार अश्वमेध हे विन्ध्यशक्तीने पेरलेल्या बीजाला अंकुर येऊन त्याचे विशाल व सामर्थ्यशाली साम्राज्यवृक्षात रुपांतर करणाऱ्याा विजयी मोहिमाच्या आनंदाप्रीत्यर्थ केले होते हे स्पष्ट आहे. हे याग केल्यानंतर, विशेषतः वाजपेय याग केल्यानंतर त्याने राजसत्ता निदर्शक "सम्राटह ही पद‌वी धारण केली. ही पट्टी वाकाटक नृपतींमध्ये फक्त त्याच्याचसाठी वापरली आहे आणि नंतरच्या राजांपैकी फक्त यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन यानेच ही पदवी धारण केलेली आहे.
 वत्स्गुल्म शास्वेच्या काही कोरीव लेखांमध्ये प्रवरसेनाचे वर्णन "धर्ममहाराजह्न असे केले आहे. परंतु या पद‌वीचा उपयोग येथे दक्षिण भारतीय परंपरेच्या प्रभावामुळे केला असावा. त्याने प्रत्यक्षात ही पद्वी धारण केली होती असे दाखविणारा पुरावा उपलब्ध नाही. पुराणानुसार वाजपेय यज्ञाच्या वेळी त्यांनी ब्राह्मणांना भरपूर दान केले. त्यांनी स्वतःला हरितीपुत्र म्हणून संबोधले . त्यांचे पंतप्रधान देव हे अतिशय धार्मिक आणि विद्वान ब्राह्मण होते.
प्रवरसेनाने आपल्या यशाने किर्ती प्राप्त केली होती. वाकाटकांचे तीन कोरीव लेख सोडून बाकीच्या सर्व लेखामध्ये वाकाटक वंशावळ त्याच्यापासून प्रारंभ होते. त्याने जिंकलेल्या प्रदेशांचे एकत्रीकरण करून वाकाटक साम्राज्य सत्तेच्या तोडीचा दर्जा किंवा स्थान प्राप्त करून दिले. या वाकाटक साम्राज्याची, यशस्वी वाटचाल त्याच्या सत्तेच्या हासाला प्रारंभ होण्यापूर्वी दीडशे वर्षापर्यंत निर्वेधपणे चालू होती. पुराणांतील वर्णनाप्रमाणे प्रवीर प्रवरसेन प्रथम याला चार पुत्र होते व ते सर्व राजे झाले. त्याच्या एका पुत्राचे नाव गौतमीपुत्र होते. तसेच विन्ध्यशक्ति प्रथम याच्या वाशीम ताम्रपटाद्वारे प्रवरसेनाचा पुत्र व वत्सगुल्म शास्वेचा संस्थापक सर्वसेन याची नोंद आहे. त्यामुळे पुराणातील माहितीमध्ये काही सत्यांश आहे हे मान्य करावे लागेल. वाकाटकांच्या नन्दिवर्धन व वत्सगुल्म" या फक्त दोन शास्वा ज्ञात आहेत.बाकीच्या दोन शास्वांबद्दल अजून काही माहिती उपलब्ध नाही.
    प्रवरसेन प्रथम याने आपले राज्य आपल्या हयातीतच तीन मुलांमध्ये वादून दिले असावे आणि त्याच्या मुलांपैकी गौतमीपुत्र हा अल्पवयीन असल्यामुळे त्याने राज्याचा काही भाग स्वतःकडे ठेवला असावा. गौतमीपुत्र आणि त्याचे वंशज हे वाकाटकांच्या मुख्य किंवा ज्येष्ठशाखेचे प्रतिनिधित्व करतात असा जो ग्रह सध्या प्रचलित आहे त्याच्या समर्थनार्थ पुरावा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या परिस्थितीत ज्ञात असलेल्या दोन वाकाटक शाखांचा उल्लेख त्यांच्या राजधानीच्या ठिकाणांच्या नावाने म्हणजे पद्मपूर-नन्दिवर्धन-प्रक्रपूर शास्वा व वत्सगुल्म शास्वा असा करणेच योग्य ठरेल.  प्रवरसेनाचा मुलगा गौतमीपुत्र आधीच मरण पावल्याने त्याचा पुत्र रुद्रसेन हा गादीवर आला. त्याने उत्तर विदर्भावर पुरिका वा नंदिवर्धन ( सध्याचे नगरधन ) येथून राज्य केले. प्रवर्सनाचा दुसरा मुलगा असणाऱ्या सर्वसेन याने वत्सगुल्म ( आत्ताचे वाशिम, जी.अकोला ) येथून दक्षिण विदर्भावर राज्य केले.  उर्वरित दोन पुत्र कुठे राज्य करत असावेत हे नक्की सांगता येत नसले तरी त्यापैकी एक छत्तीसगढात आणि दुसरा कृष्णा नदीच्या खोऱ्यात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात)  उत्तर कुंतलवर राज्य करत असावा. मात्र १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे या दोनही शाखांचे राज्य लवकर संपुष्टात आल्याने त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही.त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत..ही दोन राज्ये शोधून काढण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले आहेत. तथापि राज्यांच्या स्थान निश्चितीसाठी भविष्यात स्वात्रीलायक संशोधन होणे आवश्यक आहे.

नंदीवर्धन शाखा :

 नागपूरजवळच्या रामटेकजवळ असलेले हे गाव. प्रवरसेन-१चा मुलगा ‘गौतमीपुत्र’ हा अल्पायुषी ठरला. त्यामुळे त्याचा मुलगा, प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन- १ याने आपले वेगळे राज्य स्थापन केले. या वंशाची राजधानी नंदीवर्धन येथे होती. ती नंतर पुन्हा प्रवरपूर (पवनार) ला हलवली होती.
     रुद्रसेनाचा नातू, रुद्रसेन- २ हा एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. त्याचा विवाह गुप्तसम्राट चंद्रगुप्त-२ अर्थात, विक्रमादित्य याची मुलगी ‘प्रभावतीगुप्त’ हिच्याशी झाला होता. त्याचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात प्रभावतीगुप्ताने आपल्या अल्पवयीन मुलांतर्फे प्रतिनिधी म्हणून सुमारे २० वर्षे राज्य केले.
      या काळात (इ. स. ३८५ ते ४०५) नंदीवर्धन वाकाटक हे जवळजवळ गुप्तांच्या अंकित होते. अनेक इतिहासकार या काळाला ‘वाकाटक-गुप्त काळ’ असेच म्हणतात. प्रभावतीची मुले दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन-२ अशी होती. ही मुले लहान असतानाच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी आजोबा चंद्रगुप्ताने आपल्या दरबारातील एका विद्वान मंत्र्याला विदर्भात पाठवले होते. तो काही काळ रामटेकला राहिला होता. इथेच त्याने एक अजरामर संस्कृत खंडकाव्य लिहिले- ते म्हणजे ‘मेघदूत!’ त्या विद्वानाचे नाव महाकवी कालिदास!
      या तीन राजपुत्रांपैकी दिवाकरचा लहान असतानाच मृत्यू झाला. दामोदर मात्र पुढे गादीवर आला. त्याच्यानंतर प्रवरसेन-२ (या शाखेतील) इ. स. ४२० च्या सुमारास राजा बनला. वाकाटक काळातील सगळ्यात जास्त ताम्रपट (सुमारे १७) याच्याच काळातील आहेत. कालिदासाच्या तालमीत तयार झालेल्या प्रवरसेनाने ‘सेतूबंध’ नावाचे मोठे काव्यही लिहिले. ज्याची स्तुती पुढे बाणभट्टाने केली. या वंशातला अखेरचा राजा पृथ्वीषेण होता. त्याच्या मृत्यूनंतर नंदीवर्धन शाखा हरिषेणाने वत्सगुल्म शाखेत विलीन केली. वत्सगुल्म शाखेचा राजा हरिषेण त्याच्या राजकीय विजयांपेक्षा वेगळ्या कारणाने अजरामर झाला आहे.

 रुद्रसेन पहिला :-

        प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र हा पित्याच्या हयातीतच कालवश झाला होता. म्हणून सन ३३० च्या सुमारास प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू प्रथम रुद्रसेन हा गादीवर आला. ही वाकाटकांची ज्येष्ठ शाखा होय. नागपूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या रामटेक टेकडीजवळील नंदीवर्धन येथून राज्य करत होता. रुद्रसेन हा भगवान शंकराने दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याकरिता उत्पन्न केलेल्या महाभैरवाचा भक्त होता.
  गौतमीपुत्राने भारशिव नागराजा भवनाग याच्या मुलीशी विवाह केला. या नागराजाला बहुतेक पुत्र नव्हता म्हणून त्याच्या मुलीला गौतमीपुत्रापासून झालेला मुलगा रुद्रसेन प्रथम याला वाकाटक राज्यातील त्यान्या स्वतःच्या हिश्श्याबरोबरच पद्मावतीचेही राज्य मिळणार होते. गौतमीपुत्र हा आपला पिता प्रवरसेन प्रथम याच्या कारकिर्दीतच मृत्यू पावला. परिणामतः प्रवरसेन पहिल्या नंतर त्याचा नातु रुद्रसेन प्रथम हा गादीवर आला. रुद्रसेन प्रथम याच्या वारसांच्या सर्व लेखांमध्ये त्याचे भवनाग-दौहित्र असे वर्णन आले आहे. त्यावरून रुद्रसेन प्रथम हा आईच्या वडिलांच्या राज्याचाही वारस होणार होता असे दिसते.
दौहित्र हा शब्द येथे पारिभाषिक संज्ञेप्रमाणे वापरला आहे. लिच्छविगुप्त या संयुक्त राज्याचा वारस असणाऱ्या गुप्तसम्राट समुद्रगुप्ताचे वर्णन लिच्छवि दौहित्र असे केले आहे. लिच्छवि राज्य मिळाल्यामुळे गुप्त सामर्थ्य व राज्य या दोहेची बरीच वृद्धी झाली. भवनाग याच्या नाण्यांवरून त्याने अधिराज व महाराज या पदव्या धारण केल्या होत्या असे समजते. बहुतेक इतर नातेवाईकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे नाग-वाकाटक यांचे संयुक्त राज्य निर्माण होऊन त्याचे सामर्थ्यशाली साम्राज्यात रुपांतर होऊ शकले नाही. प्राप्त झालेली नाग राजांची नाणी व अलाहाबाद कोरीव लेखांत समुद्रगुप्ताने पराभूत केलेल्या राजांच्या यादीत आलेली नाग राजांची नावे यावरून असे दिसते की, पद्मावतीवर नागसेन व गणपतिनाग यांच्यासह इतर नाग राजांनी राज्य केले.
      या राजाचा फक्त एकच शिलालेख आज पर्यंत सापडलेला आहे.आर्यावर्तच्या इतर शासकांसह अलाहाबाद स्तंभ शिलालेखात रुद्रदेवाचा उल्लेख आहे. 'प्राण्यांचे बंधन व हिंसा कोणीही करू नये ' अशी आज्ञा असणारा अशोकाचा शिलालेख रूद्रसेनाने वरून छिलून त्यावर आपला लेख कोरलेला आहे. लेखाचा उद्देश त्या ठिकाणी राजा रुद्रसेनाचे धर्मस्थान होते हे जाहीर करणे हा होता. मात्र अनेक विद्वान रुद्रदेव हा रुद्रसेन पहिला आहे यावर सहमत नाहीत, कारण जर समुद्रगुप्ताने रुद्रसेन पहिलाचा नाश केला असता, तर त्याचा मुलगा पृथ्वीशेण पहिला गुप्त राजकुमारी ( प्रभावतीगुप्त ) हिला त्याची सून म्हणून स्वीकारेल अशी शक्यता फारच कमी आहे . दुसरे म्हणजे, नर्मदेच्या उत्तरेला रुद्रसेन पहिलाचा कोणताही शिलालेख सापडलेला नाही. उत्तर भारतामध्ये या काळात सामर्थ्यशाली गुप्तसम्राट समुद्रगुप्त दुरवरचे प्रदेश जिंकून आपली विजयी कारकीर्द गाजवत होता. त्यामुळे रुद्रसेन प्रथम याच्या कारकीर्दीत उत्तर भारतामध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घटना व स्थित्यंतरे झाली. काही विद्वानांच्या मते रुद्रसेन प्रथम याचा समुद्रगुप्ताने पराभव केला होता आणि त्याने आर्यावर्ताच्या (उत्तर भारत) पराभूत केलेल्या राजांच्या यादीमध्ये त्याचा उल्लेख रुद्रदेव या नावाने केला आहे. परंतु जरी मध्यप्रदेशातील विध्यविभागाचा अंतर्भाव त्याच्या राज्यात होत असला तरी त्याचे (रुद्रसेन प्रथम) मुख्य राज्य नर्मदा नदीच्या दक्षिणेला होते. त्यामुळे त्याला आर्यावर्ताचा राजा म्हणता येणार नाही. या शिवाय ज्याठिकाणी वाकाटकांच्या मांडलिकांचे दोन लेख प्राप्त झाले ती सतना जिल्ह्यातील नवना व गज ही ठिकाणे दक्षिण भारतामध्ये अंतर्भूत नव्हती असे निश्चितपणे म्हणता येत नाही. तसेच समुद्रगुप्ताने आर्यावर्तातील पराभूत राजांची राज्ये नष्ट केली, परंतु रुद्रसेनाचा राजवंश त्याच्यानंतर जवळ जवळ दीड शतकापर्यंत राज्य करीत होता. त्याचा पुत्र व वारस पृथिवीपेण प्रथम याचे मांडलिक नचना व गंज येथे सापडलेल्या दोन--लेखांद्वारे ज्ञात आहेत. यामुळे असे म्हणता येते की, समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद स्तंभ लेस्वातील रुद्रदेव यावे रुद्रसेन प्रथम यावेशी समीकरण करणे शक्य नाही. काही विद्वानांचे असे मत आहे की, याबरोबरच इतर शास्वांनी रुद्रसेनाव्या" राज्यरोहणाला विरोध केला. त्यामुळे प्रवरसेनाने स्वतःच त्याच्या चार मुलांमध्ये केलेल्या राज्याच्या विभागणीमुळे कमजोर झालेली राजसत्ता जास्तच क्षीण झाली. राजसत्ता दुर्बल झाल्यामुळे प्रवरसेनानंतर कोणत्याही राजाने सम्राट पदवी धारण न करणे स्वाभाविकच ठरते. काही वेळा असे म्हटले जाते की, प्रवरसेनाने वाजपेय याग केला होता म्हणून त्याने सम्राट ही पद‌वी धारण केली होती. इतर वाकाटक राजांनी हा याग केला नव्हता वय ही पद‌वीही धारण केली नव्हती. शतपथ ब्राह्राणाच्या ज्या उताऱ्यात वाजपेय यज्ञ केल्याने सम्राट ही पदवी धारण करता येते असे विधान केले आहे त्याच उतार्यात राजसूय यज्ञ केल्यास राजन ही पदवी धारण करता येते असे प्रतिपादन केले आहे. भारतावर राज्य करणारे क्षहरात आणि कार्दमक यांच्यासारख्या परक्या राजांसह सर्व राजे तसेच जैन व बौद्धया सारख्या अब्राह्मणीय धर्माचे अनुयायी असलेले राजे यांनी साधारणपणे राजसूय याग करणे अपेक्षित नव्हते, तरी पण त्यांनी राजन ही पदवी धारण केली होती. ज्याने काही थोडी कामे केली  त्या औलिकर वंशीय यशोधर्मन-विष्णुवर्धन राजाने ज्याचा मंदसोर शिलालेस्वात  फुटकळ कार्याचे सविस्तर वर्णन दिलेले आहे, परंतु त्याने वाजपेय याग केल्याचा उल्लेख नाही, तरीही राजसत्ता निदर्शक सम्राट ही प‌दवी धारण केली होती. आणि या प्रमाणे बरेच राजे राजसूय याग न करताही राजन ही पट्टी आपल्या नावामागे लावू शकले असते. जर यशोधर्मन वाजपेय याग न करता सम्राट ही पद‌वी धारण करू शकतो तर त्याच नियमाने प्रवरसेन प्रथमचे वारस जर पुरेसे बलशाली असते तर केवळ परंपरेने पालन करण्यासाठी धारण केली जाणारी ही पदवी त्यांनी धारण करण्यात काहीच प्रत्यवाय नव्हता. यावरून असे दिसते की, ज्यांनी पूर्वीच मध्यभारतातील नागसत्ता चिरडून टाकली होती त्या बलशाली गुप्त सम्राट समुद्रगुप्ताच्या उपस्थितीत सम्राट ही पदवी धारण करण्याइतका रुद्रसेन प्रथम हा सामर्थ्यशाली नव्हता.
      रुद्रसेन पहिलाच्या कारकिर्दीचा आतापर्यंत सापडलेला एकमेव शिलालेख सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडला आहे , म्हणून त्याची तुलना अलाहाबाद स्तंभ शिलालेखातील रुद्रदेवाशी करता येत नाही, जो आर्यावर्तचा होता.  या लेखामध्ये रुद्रसेनाने चिकंबुरि (देवटेकचें प्राचीन नाव) या ठिकाणी बांधलेल्या धर्मस्थळाचा उल्लेख आहे. जर हा लेख खरोखरच त्याचा असेल तर उल्लेखित धर्मस्थळ म्हणजे ज्या स्वामी महाभैरवाचा तो परमभक्त होता त्याचे मंदीर असावे. त्याचे राज्य उत्तरेस मध्यप्रदेशातील विन्ध्यविभागापर्यंत पसरले होते. त्याच्या राज्याच्या पश्चिमेस खानदेश, पूर्वेस कोसल व दक्षिणेस विदर्भ हे प्रदेश होते. याखेरीज त्याच्या राज्यविस्ताराबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. तो त्याच्या आजोबाप्रमाणेच राजधानीच्या ठिकाणाहून राज्य करीत असण्याची शक्यता आहे.
            त्याकाळी नर्मदेच्या उत्तरेस अनेक राज्ये होती. त्यातील अनेक राज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेऊन आपल्या राज्यात जोडली. समुद्रगूप्ताने ज्या राज्यांचा समूळ उच्छेद केला त्यामध्ये नागदत्त, गणपती नाग व नागसेन हे नाग राजे देखील होते. त्यातील गणपती नाग हा भारशिव नृपती भवनागाचा उत्तरअधिकरी असावा. भवनाग हा रूद्रसेनाचा मातुल घराण्यातील आजोबा. समुद्रगूप्ताने या सर्व नागवंशीय राजांचे समूळ उच्चाटन केल्याने रुद्रसेनाला उत्तरेतील या राजांच्या पाठबळाला मुकावे लागले आणि त्याचे सामर्थ्य कमी झाले.
      उत्तर भारत जिंकून घेतल्यावर समुद्रगूप्त दक्षिण दिग्विजय करण्यास निघाला. त्याने दक्षिणेतील कोसल देशाचा राजा असणाऱ्या महेंद्र याचा पराभव केला. समुद्रगुप्ताच्या या विजयाने वाकाटकांच्या सामर्थ्यास मोठाच धक्का बसला. महाकांतारचा व्याघ्रराज, कुराळचा मण्टराज, पिष्टपूरचा महेंद्रगिरी या राजांनी वाकाटकांचे वर्चस्व झुगारून देऊन गुप्तांचे स्वामित्व कबूल केले. त्यामुळे वाकाटकांच्या या ज्येष्ठ शाखेचे राज्य नर्मदा नदी आणि विंध्याद्री पर्वतराजी यापूरतेच मर्यादित झाले. रुद्रसनाचे राज्य छोटे झाले असले तरी त्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले आणि बलाढ्य समुद्रगूप्तापुढे मान तुकवली नाही. रुद्रसेन प्रथम याला समुद्रगुप्ताचे वर्चस्व मान्य करून त्याला त्याच्या दक्षिणापथाव्या" विजयी आक्रमणासाठी आपल्या राज्यातून मार्ग द्यावा लागला. तात्पर्य समुद्रगुप्ताने रुद्रसिंहाचा प्रत्यक्ष पाडाव केला नसला तरी रुद्रसेन प्रथम याला समुद्रगुप्ताच्या दुय्यम मित्राप्रमाणे वागावे लागत असावे. रुद्रसेन प्रथम याने अंदाजे इ.स. ३७७ पर्यंत राज्य केले. त्याच्या मागून त्याचा मुलगा पृथिवीषेण हा गादीवर आला.

 

 

 

 

 

    पृथिवीषेण पहिला :
       प्रत्यक्ष पृथिवीषेणाचे लेख उपलब्ध नाहीत. परंतु त्याचा पुत्रव वारस रुद्रसेन" द्वितीय याच्या वेळेपासून पुढे आलेल्या सर्व वारस राजांच्या लेखांमध्ये त्याची स्तुती केलेली आहे. या पुराव्याचे अवलोकन केल्यास असे दिसून येते की, या वेळेपर्यंत वाकाटकांच्या सरकारी (दट्टट्टगर्मीत) सनदांच्या मसुद्याचे स्वरूप निश्चित झालेले होते. हे स्वरूप शवेटपर्यंत कायम राहिले. या वर्णनाप्रमाणे तो परम शिवभक्त होता. त्याला महेश्वर भक्त (अत्यंत माहेश्वर) म्हटले आहे. त्याचप्रमाणे तो सत्यवादित्व, ऋजुत्व, कारुण्य, शौर्य, विक्रम, नीतिनैपुण्य, विनय, माहात्म्य (थोरपणा), बुद्धिमत्ता, सकल जनाविषयी आदर, धर्मविजयित्व, विनय माहात्म्य (थोरपणा), बुद्धिमत्ता, सकल जनाविषयी आदर, धर्मविजयित्व, मनौधैर्य इत्यादि गुणांनी युक्त होता. त्याचे वर्तन युधिष्ठिरासारखे होते. त्याला पुत्र आणि पौत्र होते, त्याचे सैन्य सामर्थ्य व कोष यामध्ये शंभर वर्षापासून" सतत वृद्धि होत होती. याप्रकारचे हे वर्णन निश्चितच महात्वाकांक्षी नृपतीचे वाटत नाही तर एखाद्या धर्मात्म्याचे वाटते. त्याचा समकालीन गुप्त सम्राट समुद्रगुप्त हा विजयी मोहिमांमध्ये व्यस्त होता आणि रुद्रसेन प्रथम याने पूर्वीच आपल्या या परोपकारी दोस्ताची सता मान्य केली होती. पृथिवीषेण प्रथम याने आपल्या पित्याने धोरण पुढे चालू ठेवले होते असे दिसते.
      मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात नचना की तलाई व गंज येथे प्राप्त झालेल्या वाकाटक महाराज पृथिवीषेण याचा सेवक असलेल्या व्याघ्रदेवाच्या दोन शिलालेखांवरून असे दिसते की, विन्ध्य विभागावर --त्याची नाममात्र सत्ता अद्याप टिकून होती. वाकाटक वंशाचे पृथिवीषेण या नावाने दोन राजे होते. पृथिवीषेन प्रथम व पृथिवीषेण दुसरा. यापैकी पहिला हा रुद्रसेन प्रथम याचा पुत्र होता. त्यामुळे संबंधित शिलालेखांमध्ये उल्लेखिलेल्या पृथिवीषेण हा कोणता होता याबद्दल विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. काही इतिहासकार त्याचे तादात्म्य या नावाच्या पहिल्या राजाशी करतात, तर जे. दुबइल रमेशचंद्र मजुमदार, का. ना. दीक्षित आणि वा. वि. मिराशी इत्यादिंचा या नावाच्या दुसया राजाशी तादात्म्य करण्याकडे कल आहे. नंतरचा पृथिवीषेण राजा इ.स. च्या पाचव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकांत उ‌द्याला आला. संबंधित शिलालेस्वांत तिथी नमूद केलेली नाही. आणि दुसया मताचा पुरस्कार करणाऱ्या एकाही विद्वानाने हा लेख पहिल्या पृथिवीषेणाचा नाही हे सिद्ध करण्याकरिता निर्विवाद असा अक्षस्वटिकाविषयक किंवा दुसरा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. मिराशींच्या मते या लेखांमध्ये उल्लेखिलेला महाराज व्याघ्र हा उच्चकल्प वंशाच्या लेखांमध्ये उल्लेखिलेला उच्चकल्प महाराज जयनाथचा पिता असावा. त्याच्या ज्ञात वंशावळीनुसार हा पृथिवीषेण द्वितीयच्या अगदी समकालीन राज्य करीत होता. असे दिसते. पण हे मत केवळ नामसादृष्यावर आधारित आहे.
     नचना आणि गंज येथील लेखांमध्ये मांडलिकाचे नाव व्याघ्रदेव असे दिलेले आहे. तर उच्चकल्प वंशाच्या लेखांमध्ये मुख्य व्यक्तीचे नाव फक्त व्याघ्र असे दिलेले आहे. या नावाच्या मागे महाराज ही राजसता निदेर्शक पद‌वीही आहे. परंतु ही पदवी संबंधित लेखांमध्ये त्याच्या नावामागे आढळत नाही. या गोष्टी लक्षात घेता वाकाटक मांडलिक व्याघ्रदेवचे उच्चकल्प महाराजाशी समीकरण स्वीकारता येणार नाही. एच.सी रायचौधरी यांच्या अवलोक नाप्रमाणे नचना व गंज या ठिकाणांसहीत बुंदेलखंड (बघेलखंड) प्रदेश सामर्थ्यशाली गुप्त सम्राट समुद्रगुप्त याच्या वेळेपासून गुप्तांच्या सत्तेस्वाली होता आणि वाकाटकांची त्या प्रदेशांवर कमीत कमी इ.स. ५२८ पर्यंत सत्ता नव्हती. समुद्रगुप्ताच्या एरण शिलालेखावरून असे दिसते की, दक्षिणेकडे कमीत कमी सागरपर्यंतचा प्रदेश त्याच्या प्रत्यक्ष अंमलाखाली होती. उच्चकल्प राज्याच्या पश्चिमेकडे असलेल्या प्रदेशावर परिव्राजक महाराजाची सत्ता होती व त्याने गुप्त वंशाची सर्वश्रेष्ठ सत्ता मान्य केली होती. उच्चकल्प वंशीय महाराजाने जरी त्याच्या लेखांमध्ये असे स्पष्ट केलेले नसले तरी भौगोलिक राजनितीनुसार गुप्तांची सत्ता मान्य केली असावी. याशिवाय अलीकडेच प्राप्त झालेल्या महाराज हरिवर्मनच्या गुप्त संवत १६८ च्या मध्यप्रदेशात सिंधी जिल्ह्यात मिळालेल्या शंकरपूर सनदेनुसार गंज व हरिवर्मनच्या गुप्त संवत १६८ च्या मध्यप्रदेशात सिंधी जिल्ह्यात मिळालेल्या शंकरपूर सनदेनुसार गंज व नचना या ठिकाणांचा अंतर्भाव असणाऱ्या बघेलखंड भागात इ.स. ४८७-८८१०० मध्ये राज्य करणाया गुप्त सम्राट बुधगुप्ताच्या मांडलिक हरिवर्मन राज्य करीत होता. या सनदेमध्ये हरिवर्मनच्या आधीच्या दोन पिढ्यांचा उल्लेख आहे. त्यावरून असे दिसते की, संबंधित प्रदेश बयाच वर्षापासून गुप्त साम्राज्यात मोडत असावा. त्यामुळे आपण स्वात्रीपूर्वक असे म्हणू शकतो की, नचना व गंज येथे प्राप्त झालेले संबंधित लेख हे पृथिवीषेण प्रथमच्या सत्ता काळातील आहेत. यावरून हे सिद्ध होते की मध्यपेशातील बुंदेलखंड (बघेलखंड) प्रदेशातील आपल्या वडिलोपार्जित राज्यावर पुथिवीषेण प्रथम याच्या आमदानीच्या प्रारंभापर्यंत वाकाटकांची सत्ता होती. वर उल्लेख केल्याप्रमाणे समुद्रगुप्ताने या सत्तेचा शेवट केला. त्याच्या अलाहाबाद स्तंभलेखामध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे किंवा नाही किंवा हा व्याघ्रदेव आर्यावर्ताच्या लहान राजांपैकी अप्रत्यक्षपणे इतर राजांबरोबर सुचित केलेला एक राजा होता की नाही हे ठरिवणे कठीण आहे. समुद्रगुप्ताने पराभूत करून पुन्हा सिंहासनावर स्थापन केलेल्या दक्षिणापथाच्या (डेक्कन अॅड साऊथ) राजांपैकी एक म्हणजे महाकातारचा व्याघ्रदेव यांचेशी त्याचे तादात्म्य करणे शक्य आहे. परंतु व्याघ्रराजा हा दक्षिणेचा राजा होता असा उल्लेख आहे, तर व्याघ्रदेव हा उत्तरेकडे विन्ध्यविभागात राज्य करीत होता असा आक्षेप घेतला जातो. या आक्षेपाचे निराकरण करणे शक्य आहे. वराहमिहीर सारखे प्राचीन भारतीय लेखक अलाहाबादच्या पश्चिम दक्षिण दिशेला ६७ मैलांवर बांदा जिल्ह्यात असलेल्या चित्रकूट टेकड्यांचा सुद्धा अंतर्भाव दक्षिण विभागात" करतात. याच न्यायाने मध्यप्रदेशातील जबलपूर ते उत्तर प्रदेशातील मिर्झापूरपर्यंत पसरलेल्या अरण्याचा किंवा अरबी विभागाचा महाकांतार या शब्दाने बोध होत असावा किंवा या विभागाला महाकांतार या नावाने संबोधित असावेत, आणि जरी दक्षिणेतील इतर राजांप्रमाणे समुद्रगुप्ताने त्याला त्याचे राज्य परत केले असले तरी गुप्त साम्राज्य सत्तेच्या प्रभावामुळे मालव, यौधेय यासारख्या इतर राज्यांप्रमाणे त्याची सत्ता संपुष्टात आली असे म्हणावे लागेल. पुढे पृथिवीषेण प्रथम याने समुद्रगुप्ताच्या दक्षिणेकडील आक्रमणामध्ये भाग घेतला असे त्याने धारण केलेल्या ठधर्म-विजयीनठ (जो शत्रुचा पराभव करतो आणि त्यांचे प्रदेश घेत नाही तर त्यांचे यश हिरावून घेतो असा पवित्र विजेता). या पद्वीवरून दिसते. त्याने स्वतः कोणताही विजय प्राप्त केलेला दिसत नाही. परंतु विदर्भावर आपली सत्ता मात्र कायम टिकवली. भारतीय उपखंडात त्यावेळी बलशाली दोन राजवंशातील मैत्री, वैवाहिक संबंध स्थापून दृढ केली होती. पृथिवीषेण प्रथम याच्या अमदानीचा शेवट होण्याच्या थोडा काळ आधी (इ.स. ३८०) त्याचा मुलगा रुद्रसेन द्वितीय याचा विवाह समुद्रगुप्ताची नाग राजकन्या कुबेरनागा हिच्यापासून झालेला मुलगा चंद्रगुप्त दुसरा याची कन्या प्रभावती गुप्ता हिच्याशी झाला होता. ही महत्त्वपूर्ण घटना वाकाटकांच्या" नंतर दिलेल्या सर्व सनदांमध्ये अभिमानाने सांगितली आहे.
      आपल्याला पृथिवीषेण याच्या राजधानीबद्दल काहीच माहिती नाही. त्याच्या अमदानीत राजधानी नन्दिवर्धनला आणली गेली" असे मिराशी सांगतात. पण तरीही याचा पुत्र रुद्रसेन द्वितीय याची राजधानी येथे होती असे दिसते. त्याने त्याच्या वडिलांचा मांडलिक व्याघ्रदेव याला ताब्यात देऊन स्वतःची राजधानी पद्मपूर येथे स्थापन केली. याशिवाय पद्मपूरहून दिलेला एक अपूर्ण एकपत्री ताम्रपट" त्याचा असण्याचीही शक्यता आहे.

 

 

   नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.   रुद्रसेन पहिला नंतर त्याचा मुलगा पृथ्वीशेण पहिला (३५५-३८०) गादीवर आला
वाकाटक राजा प्रथम पृथ्वीसेनने दक्षिणेतील कुंतल प्रांत जिंकला व वाकटक साम्राज्यात सामील करून घेतला कुंतल म्हणजेच आजचा #कोल्हापूर जिल्हा होय.
सन ३५० च्या सुमारास प्रथम रुद्रसेनाचा पुत्र पृथ्वीषेण हा राज्यावर आला. हा देखील आपल्या वडिलांप्रमाणे शिव भक्त होता. त्याचा एकही लेख सापडलेला नाही असे असले तरी त्याचे उल्लेख त्याच्या वंशजांच्या लेखात आलेले आहेत. त्यात तो सत्य, ऋजुत्व, कारुण्य, शौर्य, विक्रम, बुद्धिमत्व, मनोनैर्मल्य इत्यादी गुणांविषयी त्याची ख्याती होती असे समजते. त्याची तुलना अजातशत्रू धर्मराजा सोबत केलेली आहे. त्यावरून त्याने कधीही परराज्यपहरणाकरिता युद्ध केले नव्हते असे म्हणता येईल. त्याने राज्य प्रसारापेक्षा आपल्या प्रजेकडे जास्त लक्ष दिले. त्याच्या काळात समुद्रगूप्ताने उत्तरेतील क्षत्रप राजांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यावेळी दक्षिणेतील वाकाटकांनी सुद्धा त्याला मदत केली. गुप्त-वाकाटक युती मुळे क्षत्रपांचा सहज पाडाव झाला आणि उत्तर भारतातील गुप्तांचे राज्य निष्कंटक झाले. या प्रसंगी वाकाटकांशी घडून आलेल्या मैत्रीला चिरठायी बनवण्यासाठी चंद्रगुप्ताने आपली पुत्री प्रभावतीगुप्ता पृथ्वीषेणाचा पुत्र द्वितीय रुद्रसेन याला दिली.
या घटनेपूर्वी पाच शतके आधी देखील शूंग काळात असाच माळवा आणि विदर्भ यांवर राज्यकरणार्या राजवंशात विवाहसंबंध आलेले होते. या पुरातन घटनेवर आधारलेले कविकुलगुरू कालिदासाचे 'मालविकाग्नीमित्र ' हे नाटक सुध्दा याच काळातील आहे.

 

 

 

 



वाकाटक राजा द्वितीय रुद्रसेन (इ.स. ४०० ते ४०५) हा गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीयचा (विक्रमादित्य) जावई होता. रुद्रसेन द्वितीयचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याची दिवाकरसेन व दामोदरसेन ही दोन्ही मुले अल्पवयीन होती. न्हणून दिवाकरसेनच्या वतीने त्याची मातोश्री प्रभाक्ती गुप्तने सुनारे १३ वर्षे राज्यकारभार सांभाळला.'



रुद्रसेम द्वितीय : 
     पृथिवीषेण प्रथम नंतर इ.स. ३८७ च्या सुमारास त्याचा पुत्र रुद्रसेन द्वितीय गादीवर आला. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याने गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याची कन्या प्रभावतीगुप्ता हिच्याशी विवाह केला. प्रभावतीगुप्ता आपल्या पित्याप्रमाणेच प्रभावशाली असावी आणि बहुधा त्याच्या प्रभावामुळे रुद्रसेन दुसरा हा परम वैष्णव बनला. आपली राजसता चक्रपाणी विष्णूच्या"" कृपेने स्थापन झाली असा त्याचा दृढ विश्वास होता. त्याच्या पाचव्या शासनवर्षी दिलेला ताम्रपट नागपूर जिल्ह्यांत"" मांढळ येथे प्राप्त झाला आहे. यामध्ये त्याने विविध गोत्री ब्राह्मणांना व वैदिक चारणांना काही स्वेडी दान दिल्याची नोंद केली आहे. दान दिलेली स्वेडी पद्मपूरच्या पूर्वेस असलेल्या शासन विभागात (मार्ग) वसलेली होती. ताम्रपटात नमूद केल्याप्रमाणे या दान दिलेल्या स्वेड्यातील पूर्वी दोन मठांना दान दिलेली जमीन वगळून हे दान दिलेले होते. यावरून असे दिसते की, आधीचे हे दान त्याने वत्सगुल्महून आलेल्या सात्वत चारणांच्या मठांना दिले असावे. हा ताम्रपट राजाने नुकत्याच स्वीकारलेल्या वैष्णव तत्त्वांना अनुसरून भगवान मोदस्वामिन्न्या आदेशानुसार दिलेला आहे. ताम्रपटातील वर्णनानुसार भगवान मौदस्वामिन् म्हणजे चतुर्भुज क्षिरसागरात अनंत नागावर शेषशयन विष्णु निद्रा घेत आहे. त्याच्या तीन हातांमध्ये प्रत्येकी शंख, चक्र, स्वङ्ग ही आयुधे आहेत. चौथा हात त्याच्या डोक्यास्वाली आहे.
     याच्या शासन कालामध्ये पमपूरला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते असे दिसते आणि या घराण्याची राजधानी जेव्हा प्रवरपूर येथे स्थापन झाली तेव्हा सुद्धा हे महत्त्वाचे शासन विभाग केंद्र होते असे प्रक्रसेन द्वितीय याच्या मासोद ताम्रपटावरून दिसते. या ताम्रपटानुसार प्रवरसेन द्वितीय याने पद्मपूर (अपर मार्ग) या नावाने ज्ञात असलेल्या शासन विभागातील गावे दान दिली होती. या ठिकाणी दान दिलेल्या स्थाननिश्चितीनुसार पमपूरचा शोध नागपूर, वर्धा जिल्ह्यांत घेतला पाहिजे. हे पद्मपूर म्हणने हाच उच्चार असलेल्या ज्या ठिकाणाहून अपूर्ण दुर्ग ताम्रपट दिला होता तेच ठिकाण असले पाहिजे. रुद्रसेन दुसरा याच्या शासनकालात ही वाकाटकांची राजधानी होती असे दिसते. संबंधित ताम्रपट देणायाचे नाव ज्ञात नसल्यामुळे फक्त अक्षरवटिकेच्या आधारे तो कोणत्या राजाचा आहे हे समजून येईल. मिराशी हा ताम्रपट नरेंद्रसेनाच्या काळातील आहे असे म्हणतात. तथापि हा ताम्रपट पृथिवीषेण प्रथम याच्या काळातील असावा, पद्मपूर ही त्याची राजधानी होती. रुद्रसेन दुसरा याचे पाचवे शासन वर्ष हीच एक ज्ञात तिथी आहे आणि त्याच्या कारकिर्दीचा शेवट इ.स. ३९७ च्या आसपास असू शकेल. युवराज दिवाकरसेम आणि राजप्रतिनिधी प्रभावतीगुप्ता : रुद्रसेन दुसरा याचे अकाली निधन झाले तेव्हा त्याचे तीनही पुत्र दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन हे वयाने लहान होते. असे म्हणतात की, पृथिवीषेण प्रथम याला तो हयात असतानाच पुत्रद्धपौत्र झाले होते. यावरून हे स्पष्ट होते की, त्याच्या नातवांपैकी सर्वात मोठा दिवाकरसेन याचा जन्म त्याच्या कारकिर्दीच्या अस्तापूर्वी झाला होता. याप्रमाणे पित्याच्या मृत्युसमयी दिवाकरसेनाचे क्य दहा वर्षापेक्षा जास्त असावे आणि इतर ज्यांचा जन्म त्यांच्या आजोबांच्या मृत्यूनंतर झाला असावा, ते फार लहान असावेत. त्यांच्यापैकी कोणीही सज्ञान आणि सिंहासनावर येण्याच्या क्षमतेचा नसल्यामुळे त्यांनी माता प्रभावतीगुप्ता हिला तिचा ज्येष्ठपुत्र युक्राज दिवाकरसेन याच्या वतीने राज्यकारभार पहावा लागला. सध्या उपलब्ध असलेल्या माहिती आधारे रुद्रसेन द्वितीय याला धाकटा भाऊ होता का ? असल्यास त्याचा सिंहासनावरील हक्क दिवाकरसेन याच्यासाठी त्याच्या मातेच्या वडिलांच्या मद‌तीने डावलण्यात आला का याविषयी निश्चित काहीही सांगता येत नाही. प्रभावतीगुप्ताला स्वतःचा व आपल्या पितृवंशजत्वाचा साहजिकच फार अभिमान होता याबद्दल शंका नाही. तिच्या अडचणीच्या काळात तिला पित्याकडून तसेच भावाकडून स्वाभाविकच भक्कम सहाय्य मिळाले असावे. तिने आपल्या पित्याच्या वंशाचे गौत्र (धारण) कायम ठेवले. तिच्या दोन्ही लेखांमध्ये इतर ताम्रपटांप्रमाणे वाकाटकांची वंशावळ न देता तिच्या पित्याच्या वंशाची वंशावळ दिली आहे.
        प्रभावतीगुप्ताचा पुणे ताम्रपट तिच्या राजप्रतिनिधित्वाच्या" तेराव्या वर्षी दिलेला आहे त्यावरून दिवाकरसेन हा कमीत कमी तेरा वर्षे युवराज होता असे दिसते. तो आणस्वी किती वर्षे युवराज राहिला हे ठरविणे सध्या कठीण आहे. परंतु तो फार काळ नसावा, कारण पुणे ताम्रपट दिला त्या आधी त्याचे वय तेवीस वर्षापेक्षा कमी नव्हते. श्रीधरदासाने एकत्रित केलेल्या सदुक्तिकर्णामृत" काव्यसंग्रहामध्ये दिवाकरसेनाने रचलेला श्लोक आहे. श्रीधरदास रचनाकाराचा उल्लेख युवराज म्हणून करतो. यावरून दिवाकरसेनाचे युवराज म्हणूनच निधन झाले. याबद्दल शंका राहत नाही. यारून त्यान्या युवराजपदाचा शेवट इ.स. ४१० च्या सुमारास झाला असावा. पुणे ताम्रपट नन्दिवर्धनहून दिलेला आहे. या नन्दिवर्धनचे नागपूर जवळ सुमारे २८ मैलांवर असलेल्या नन्दरधन किंवा नगरधन या गावाशी तादात्म्य केलेले आहे. यावरून यावेळी वाकाटक राज्याची राजधानी पद्मपूरहून येथे हलविण्यात आली होती हे स्पष्ट होते. त्याचा निश्चित काळ मात्र सांगता येत नाही.



विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.
 वाकाटक राजा #दुसरा_रुद्रसेन चा विवाह त्या वेळचे उत्तर भारतातील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे #गुप्त_साम्राज्य तर या गुप्त साम्राज्याचा राजा #चंद्रगुप्त_प्रथम ची कन्या #प्रभावतीदेवी शी झाला. आणि या वैवाहिक संबंधामुळे वाकाटक साम्राज्याची ताकद खूप  वाढली गुप्त राजांनी नंतर जो दक्षिण दिग्विजय केला त्यामध्ये दक्षिणेतील ज्या राज्यांना जिंकल्याचा उल्लेख मिळतो त्यामध्ये वाकाटक साम्राज्याचे नाव येत नाही गुप्त राजांनी दक्षिणेतील वाकाटक साम्राज्य सोडून बाकी सर्व राज्य जिंकून घेतले होते.
   दुसऱ्या रुद्रसेनाचा प्रभावती देवीशी विवाह झाल्यानंतर फक्त 5 वर्षात मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे 15 वर्षे वाकाटक साम्राज्याचा सर्व कारभार प्रभावती देवीने सांभाळला आणि यामध्ये दुसऱ्या चंद्रगुप्ताने तिची मदत केली.
  वाकाटक राजा #हरिसेन च्या काळात त्याचा #वराहदेव नावाचा ब्राह्मण मंत्री होता. त्याने वेरूळच्या लेण्यांमध्ये अनेक मुर्त्या व भित्तीचित्र बनवले व अनेक लेण्यांचे निर्माण केले.
   वाकाटक राजा #दुसरा_रुद्रसेन ने महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये #सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिला. याच #प्राकृत_महाराष्ट्री भाषेचे रूपांतर नंतर मराठी भाषेमध्ये झाले. प्रसिद्ध संस्कृत #कवी_कालिदास याच दुसरा रुद्रसेनच्या दरबारात होते येथेच त्यांनी #मेघदूत नामक काव्य लिहिले.

रुद्रसेन दुसरा (३८०-३८५) याने गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा (३७५-४१३/१५) याची मुलगी प्रभावतीगुप्ताशी लग्न केले असे म्हटले जाते . रामटेकच्या केवल-नरसिंह शिलालेखांवरून आता याची पुष्टी होते, जिथे असे घोषित केले आहे की राणी प्रभावतीगुप्ताची मुलगी (चा)मुंडा हिचा विवाह राजकुमार घटोत्कचगुप्त (जो कदाचित चंद्रगुप्त दुसराचा मुलगा होता) यांच्याशी झाला होता. [ 9 ]

३८५ मध्ये अतिशय कमी काळ राज्य केल्यानंतर रुद्रसेन दुसरा याने अपघाताने मृत्यू पावला, त्यानंतर प्रभावतीगुप्त (३८५-४०५) यांनी तिचे दोन पुत्र, दिवाकरसेन आणि दामोदरसेन (प्रवरसेन दुसरा) यांच्या वतीने २० वर्षे राज्यपाल म्हणून राज्य केले. या काळात वाकाटक राज्य जवळजवळ गुप्त साम्राज्याचा एक भाग होते . अनेक इतिहासकार या काळाला वाकाटक-गुप्त युग म्हणून संबोधतात. ३० वर्षांहून अधिक काळापूर्वी हे सर्वमान्य झाले असले तरी, या युक्तिवादाचा कोणताही योग्य पुरावा नाही. प्रभावती गुप्ताच्या शिलालेखात एका "देव गुप्त" चा उल्लेख आहे जो तिचे वडील आहेत आणि इतिहासकारांनी त्यांची तुलना चंद्र गुप्त दुसरा यांच्याशी केली आहे. तथापि, देव गुप्त खरोखरच चंद्र गुप्त दुसरा आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरा कोणताही स्रोत नाही
































 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 














































 
          वाकाटक काळ विदर्भाकरिता सुवर्णकाळ होता. प्राचीन काळातील ते एक बलाढ्य व समृद्धराज्य होते. वाकाटकाचे साम्राज्य नर्मदापासून तुंगभद्रा नदीपर्यत्त आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेले होते." वाकाटक घराण्याचा संस्थापक विध्यशक्ति होता. त्याने सुमारे वीस वर्षे (इ.स.२५०-२७०) राज्य केले. त्याचा मुलगा प्रथम प्रवरसेन हा महापराक्रनी होता त्याने सुमारे साठ वर्षे राज्य केले (इ.स. २६०-३३०) प्रवरसेनाच्या मृत्युनंतर त्याच्या साम्राज्याची वाटणी त्याच्या चार पुत्रात झाली. ज्येष्ठ शाखेची राजधानी रामटेक जवळचे नदिवर्धन किंवा नगरधन हे गाव होते. दुसरी शाखा वत्सगुल्न (वाशीम ) येथे राज्य करीत होती. बाकीच्या दोन शाखांबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. जेष्ठ नदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेलेत. त्याच्या राज्यात उत्तर व पूर्व विदर्भाचा समावेश होता. वाकाटक राजा द्वितीय रुद्रसेन (इ.स. ४०० ते ४०५) हा गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीयचा (विक्रमादित्य) जावई होता. रुद्रसेन द्वितीयचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याची दिवाकरसेन व दामोदरसेन ही दोन्ही मुले अल्पवयीन होती. न्हणून दिवाकरसेनच्या वतीने त्याची मातोश्री प्रभाक्ती गुप्तने सुनारे १३ वर्षे राज्यकारभार सांभाळला.' *दिवाकरसेनही अल्पायुषी ठरला. (इ. स. ४०५-४२०) त्यानतर त्याचा धाकटा बंधू दामोदरसेन उर्फ द्वितीय प्रवरसेन गादीवर बसला. त्याने तीस वर्षे राज्य केले. (इ.स. ४२० ते ४५०) त्याचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. प्रवरसेनाच्या शासन काळाच्या ११ वे वर्ष ते अठराव्या वर्षाच्या दरन्यान केव्हातरी त्याने नदीवर्धनवरुन राजधानीचे ठिकाण प्रवरपूर येथे स्थलांतरित केले हे प्रवरपूर न्हणजे वर्ध्याजवळचे पवनार होय. त्याने लिहिलेले 'सेतूबंध' हे काव्य प्रसिद्ध आहे. द्वितीय प्रवरसेनानंतर त्याचा पुत्र नरेद्रसेन हा गादीवर आला. (इ.स. ४५० ते ४७०) त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी नलनृपती भागदत्त वर्मा याने वाकाटकांच्या मुलुखावर स्वारी करुन राजधानी नदीवर्धनसह बराचसा प्रदेश काबीज केला होता. नरेद्रसेनानतर त्याचा मुलगा पृथ्वीसेन गादीवर आला. त्याने इ.स.४७० ते ४९० पर्यंत राज्य केले. त्याने ( इ.स.४७०-७५ च्या दरन्यान) भवदत्त वर्माच्या ताब्यात गेलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेतला व नळवंशीयांचे राज्यावर आलेले सकट लक्षात घेऊन प्रवरपुरहून आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पदनपूर (ता. आनगाव) येथे स्थलांतरीत केली. असे मिराशी याचे मत आहे. पण त्याच्यानंतर जेष्ठ शाखेचा इ.स. ४९०  सुमारास अस्त झाला. ज्येष्ठ शाखेने १६० वर्षे राज्य केले. प्रथम प्रवरसेनाचा दुसरा मुलगा सर्वसेन हा वत्सगुलन (वाशीन) शाखेचा संस्थापक होता. हरिषेण (सुमारे इ.स. ४७५) हा या शाखेचा शेवटचा राजा होता. त्याचे राज्य विस्ताराने फार नोठे होते. असा हा प्रसिद्ध राजवश इ.स.५५० च्या सुमारास अस्त पावला.










 

 
 
 
 
 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वाकाटकांची स्थापत्य व शिल्पशैली विदर्भात जागोजागी आढळून आली आहे. नगरधन, पवनार, रामटेक, मनसर, वाशीम या जागांवर ती अधिक प्रमाणात दिसतेच; पण इतरही अनेक ठिकाणी वाकाटकांच्या खाणाखुणा आपल्याला दिसून येतात. नागपूरजवळ मनसर येथे मोठ्या प्रमाणात प्रवरेश्वर शिवमंदिराचे अवशेष आहेत. रामटेकचे ‘केवल नरसिंह मंदिर’ ही तर वाकाटक संस्कृतीची मोठी खूण मानली जाते. केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर झाले आहेत. (saptarang latest article on Vakataka dynasty)

वाकाटक वंशाचे मराठी मुलखाशी जवळचे नाते आहे. ते सातवाहनांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी म्हणावे लागतील. वाकाटक वंशाचा कालखंड इ. स. २५० ते ५२५ असा आहे. या वंशाचा आद्यपुरुष ‘विंध्यशक्ती’ हा होता. तो मूळचा कुठला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण, विंध्य पर्वताशी संलग्न नावावरून तो मूळचा मध्य भारतातील असावा.

त्याचे राज्य नोंद घेण्याइतके मोठे नव्हते. कालखंडही इ. स. २५० ते २७० एवढाच होता. त्याचा मुलगा प्रवरसेन-१ याने मात्र बराच मोठा भूप्रदेश ताब्यात घेतला आणि राज्य दक्षिणेकडे विस्तारले. त्याने अनेक प्रकारचे यज्ञ केले. त्याने अश्वमेध यज्ञ चारवेळा केला, असा उल्लेख सापडतो. त्याची राजधानी ‘पुरिका’ अथवा ‘प्रवरपूर’ येथे होती.

हे गाव म्हणजे आजचे वर्धा जिल्ह्यातील ‘पवनार’ (विनोबा भावे यांचा आश्रम जिथे आहे ते) आहे, असे संशोधक मानतात. प्रवरसेनाने ६० वर्षे राज्य केले. प्रवरसेनाला चार मुले होती. त्यांच्यापैकी दोघांनी स्वतंत्र वंशशाखा स्थापन केल्या. त्यामुळे इ. स. ३३० पासून पुढल्या काळात वाकाटक राजवंश हा दोन स्वतंत्र नावांनी ओळखला गेला.

वत्सगुल्म शाखा :

वत्सगुल्म म्हणजेच आजचे वाशीम! प्रवरसेनाचा एक मुलगा सर्वसेन-१ याने आपला स्वतंत्र राज्यकारभार वाशीम येथून सुरू केला. सर्वसेन विद्या व कलेचा मोठा आश्रयदाता होता. स्वत: विद्वान होता. ‘हरिविजय’ या मूळ प्राकृत ग्रंथाचाही तो कर्ता होता. सातवाहनकालीन ‘गाथा सत्तसई’मध्ये काही गाथांची भर त्याने टाकली, असेही म्हणतात.

या वंशात पुढे विंध्यसेन, प्रवरसेन-२, सर्वसेन, देवसेन आणि हरिसेन तथा हरिषेण असे राजे होऊन गेले. हरिषेण हा या वंशातील सगळ्यात प्रसिद्ध राजा झाला. त्यानंतर आणखी दोन राजे अल्पकाळ होते. पण त्यांची नावे इतिहासाला निश्चित माहिती नाहीत. 


अजिंठा आणि वाकाटक :

वाकाटकांची स्थापत्य व शिल्पशैली विदर्भात जागोजागी आढळून आली आहे. नगरधन, पवनार, रामटेक, मनसर, वाशीम या जागांवर ती अधिक प्रमाणात दिसतेच; पण इतरही अनेक ठिकाणी वाकाटकांच्या खाणाखुणा दिसतात. नागपूरजवळ मनसर येथे प्रचंड मोठ्या प्रवरेश्वर शिवमंदिराचे अवशेष आहेत.

रामटेकचे ‘केवल नरसिंह मंदिर’ ही तर वाकाटक संस्कृतीची मोठी खूण मानली जाते. ‘केवल नरसिंह’ हे वाकाटकांचे आराध्य दैवत आहेच. पण, अलीकडच्या संशोधनात उघडकीला आलेली एक मोठी गोष्ट म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमधले वाकाटकांचे योगदान. याचे मोठे श्रेय तपस्वी अमेरिकन संशोधक वॉल्टर स्पिंक यांना जाते.

कित्येक वर्षे ‘अजिंठा’ या एकाच विषयाला त्यांनी वाहून घेतले होते. त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले आहे, की अजिंठा लेण्या खोदायला सातवाहन काळात सुरवात झाली असली, तरी गुंफा क्र. ९, १०, १२, १३ आणि १५-अ या सातवाहन कालीन आहेत, तर उर्वरित २५ गुंफा दुसऱ्या टप्प्यातील वाकाटक कालीन आहेत.

स्पिंक यांनी हे सिद्ध केले, की ‘शेकडो वर्षे ही लेणी खोदणे सुरू होते...’ हा गैरसमज आहे. वाकाटक नृपती हरिषेण याच्या एकट्याच्या आश्रयाखाली, त्याच्या कारकीर्दीत सुमारे इ. स. ४६० ते ४८० या वीस वर्षांमधेच दुसऱ्या टप्प्यातील २५ लेणी खोदली गेली. त्याचा महामंत्री वराहदेव याने लेणे क्र. १६ खोदून घेतले आहे.

तसा तेथील शिलालेखात उल्लेख आहे. हरिषेण इ. स. ४७७ मध्ये मरण पावला. पण लेण्यांचे काम नंतर दोन ते तीन वर्षे सुरू होते. बाकी काही विचारात घेतले नाही, तरी केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर आहेत.

  
 
 
 

   या पाश्र्वभूमीवर वाकाटकांचा आदिपुरुष विंध्यशक्ती (इसवी सन सुमारे २५० ते २७०) याने अशाच प्रकारच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात सातवाहनांच्या नंतर विदर्भामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली असावी. त्याचा उत्तराधिकारी प्रवरसेन प्रथम (इसवी सन सुमारे २७० ते ३००) याने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. पुराणातील उल्लेखानुसार या राजवंशाची पहिली राजधानी सातपुड्यातील पुरिका या नगरात असून, त्याच्या चार पुत्रांनी आपापली स्वतंत्र राज्ये त्याच्या साम्राज्यातून निर्माण केली. इतिहासाला वाकाटक वंशाच्या दोनच शाखा माहीत आहेत. वाकाटकांच्या शिलालेखावरून आणि ताम्रपटांवरून असे दिसते की, प्रवरसेनाचा नातू प्रथम रुद्रसेन याने नंदिवर्धन, (हल्लीचे नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळचे नगरधन) येथे आपली शाखा प्रस्थापित केली, तर त्याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने वत्सगुल्म (म्हणजे वन्हाडातील आजचे जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम) येथे दुसरी शाखा प्रस्थापित केली. ज्ञात असलेल्या शिलालेखांवरून असे म्हणता येईल की इ.स. सुमारे २५० ते ५०० या अडीचशे वर्षांच्या काळात वाकाटकांच्या दोन शाखांतील नऊ पिढ्यांनी वन्हाड (पश्चिम विदर्भ) व पूर्व विदर्भात राज्य केले. यापूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे इसवी सन ३५० ते पाचशेपर्यंतचा काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ समजला जातो. असा समज होता की, गुप्त वंशाची कारकीर्द म्हणजे भारताचा सुवर्णकाळ. परंतु वाकाटक वंशातील राजांनी राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा म्हणजे स्थापत्य, शिल्प, चित्रकला व धर्म व त्यातील विविध परंपरा यांच केलेल्या योगदानामुळे आज हा सुवर्णकाळ गुप्त- वाकाटक काळ म्हणून ओळखला जातो. यापुढील लेखामध्ये या घराण्यांतील दोन शाखांच्या राजांचा इतर समकालीन राजवंशांशी कसा संबंध आला, तो कशा प्रकारचा होता आणि त्यातून वाकाटक वंशाने केलेले सांस्कृतिक योगदान हे किती महत्त्वाचे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कोण होते वाकाटक ?

महाकवी कालिदास महाराष्ट्रात आला आणि त्याने रामटेक येथे मेघदूत हे  खंडकाव्य लिहिले एवढीच माहिती आपल्याला असते. पण तो महाराष्ट्रात नेमका कशासाठी आला होता, हे फारच थोड्या लोकांना ठावूक आहे. गुप्त राजवंशाचा सम्राट चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याने त्याच्या नातवांना शिक्षण देण्यासाठी त्याला उज्जयिनीहून विदर्भाच्या जंगलात पाठवले होते. चंद्रगुप्त दुसरा याचे ते नातू म्हणजेच वाकाटक राजवेशाचे नांतर झालेले राजे प्रक्स्सेन दुसरा, दिवाकरसेन आणि दामोदरसेन होय. त्यांची आई प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याची कन्या होती. शकांचा निष्पात करणारा म्हणून चंद्रगुप्त दुसरा याला विक्रमादित्य उपाधी प्राप्त झाली. कालिदासाच्या तालमीत तयार झालेल्या या प्रवरसेन दुसरा याने नंतर सेतूबंध नावाचे काव्य लिहिले. त्याची स्तुती करताना बाणभट्ट म्हणतो, कीर्तीः प्रवस्सेनस्य प्रयाता कुमुदोज्वला सागरस्य परमपारम कपिसेनेव सेतूनः म्हणजेच ज्याप्रमाणे (रामाची) कपिसेना सेतूच्या सहाय्याने सागराच्या दुसऱ्या तीरावर गेली त्याचप्रमाणे कुमदाप्रमाणे उज्वल असलेली प्रवस्सेनाची कीर्ती सेतुबंध काव्याच्या माध्यमातून सागरापलीकडे गेली आहे... वाकाटक राजवंशाच्या नगरधन आणि वत्सगुल्म म्हणजेच आताचे
वाशीम अशा दोन पाती अर्थात शाखा होत्या. याच राजवंशाच्या कालखंडात आज जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे अजिंठा अस्तित्त्वात आले. ज्यांच्या कालखंडामध्ये जगातील ही सर्वोत्कृष्ट कलाकृती साकारली गेली, त्यांचा कालखंड समजून घेणे म्हणूनच क्रमप्राप्त ठरते.

 वाकाटक राजवंशाचा कार्यकाळ इसवी सन सुमारे २५० ते ५२५ असा मानला जातो, त्यांच्या राज्यशासनाच्या स्पष्ट खुणा इसवी सनच्या चौथ्या शतकाच्या पहिल्या चतुर्थकापासून स्पष्ट दिसू लागतात. वाकाटकांच्या राज्याच्या समृद्धीची कल्पना त्यांच्या काळात झालेल्या कलाविष्कारातून दिसून येते पहिल्यांदा त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले ते अजिता येथील बौद्ध गुफाचे आश्रयदाते कोण होते त्याच्या शोधातून, वाकाटक राजांचा प्रधान अभात्य वहारदेव आणि मांडलिक राजा यांनी अजिंठाचे लेणे क्रमांक १६, १७ ते २१ पर्यंत लेणी खोदवून घेतल्या. हे दोघेही वाकाटक राजा हरिषेणाच्या दरबारातील होते. (४६२ ते पुढील १७ वर्षे स्थिक थिअरी) पूर्वउदधी बंगालच्या उपसागरापासून दख्खनमध्ये पश्चिमोदधीपर्यंत आणि माळव्यापासून ते कुंतल म्हणजेच धारवाडपर्यंत राज्याचा विस्तार असलेला हरिषेण हा वत्सगुल्म (वाशीम) येथील वाकाटक पातीचा राजा किंवा सम्राट असला तर प्रवरसेन हा नदिवर्धन (आताचे नगरधन) येथील मोठ्या पातीचा वंशज होता. जगातील एका बलाढ्य साम्राज्याचा पालनकर्ता होता. प्रसिद्ध गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय अथवा विक्रमादित्य हा त्याचा आजोबा होता.
 

मांडळ येथे १९७४-७६ च्या दरम्यान, केलेल्या उत्खननामध्ये अजितयाहूनही प्राचीन अशा वाकाटकांच्या कलाविष्काराचा, मूर्तीचा मोठा साठा आणि वाकाटकांचे तीन ताम्रपट सापडले. त्यामुळे अनेक गोष्टींना नंतर पुष्टी मिळाली. त्यातून पुढे रामटेक येथील सहा मंदिरे, ही याच राज्याच्या काळात बांधली गेली असावीत, असे लक्षात आले. मणसर येथील प्रचंड शिवमंदिरही त्याच काव्ळयातील आहे, असे लक्षात येत होते.
या शोधांच्या मध्ये प्राथमिकरित्या अभिजात कलेतिहासाला वेगळेच वळण मिळाले. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील अजिता येथील कला आणि गुप्तांची मथुरा, प्रधान आणि सारनाथ येथील बौद्ध कला यांच्यामधल्या दुव्याचा मांडळ रामटेक आणि मणसर येथील कलेमुळे शोध लागला.
    या सर्व कलाविष्काराच्या इतिहासाचा अभ्यास हा सौदर्य मीमांसेपर्यंतच सीमित न राहाता ही सर्व कला धार्मिक स्वरूपाची असल्यामुळे किंवा तिला धर्माचे अधिष्ठान असल्यामुळे, अभिजात काळातील इझमपरंपरेमध्ये घडून आलेले बदल हे का व कसे घडले याचासुद्धा मागोवा या संपन्न कलाविष्कारातून घेता येतो. अजिता येथील स्थापत्य शिल्प आणि चित्रकला हे बौद्ध कलेतील परमोच्चबिंदू आहेत. पण त्यानंतर मात्र बौद्ध कलेचा हास झाला. बौद्ध धर्माचा आश्रय कमी होत गेला. 
 तर पूर्व विदर्भातील शैव आणि वैष्ण आगमाधिष्ठित कला तिचा झपाट्याने पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात व पुढे त्याच बरोबर तमिळनाडूमध्येही झपाट्याने प्रसार झाला, हे नमूद करण्यासारखे आहे. वाकाटकांच्या कलेचा त्यांच्या काळात प्रसार पावणाऱ्या धर्म संप्रदायांचा, त्यांच्या राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करणे हे या मालिकेचे प्रमुख ध्येय आहे.
हिंदू धर्मीय आपल्या धर्माचं मूळ वेदात पाहतात. वेदाच्या शेवटी आलेली उपनिषद ही चारही वेदांच्या संहितेत वर्णिलेल्या प्रवृत्तीपर धमपिक्षा वेगळी असून उपनिषदंही संसारापासून निवृत्तीचा मार्ग सांगतात. शूक इत्यादी ब्रह्मचान्यांच्या प्रमाणे लहान वयातच निवृत्तीचा मार्ग स्वीकारणारे थोडेच असतात व्यासांनाही ते जमाल नाही म्हणून हिंदू धर्मात धर्म हा धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ ब्रह्मचर्य, गृहस्थास्थम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमातून मिळवावेत असा उपदेश करतो. म्हणजेच हा मार्ग प्रवृत्ती आणि नंतर निवृत्तीचा मार्ग झाला.
संसारापासून निवृत्त झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा सामान्य माणसासाठी प्रवृत्तीतून निवृत्तीपर असा वारकरी धर्म सांगितला वैष्णव, शैव आगम यांनीही इसवी सनाच्या सुरुवातीस अनुक्रमे विष्णू आणि शिव या दोन उपास्य देवतांच्या माध्यमातून हाच मार्ग सांगितला. त्यांनाच आगमग्रंथ म्हणतात. म्हणूनच वेदांना निगम तर पांचरात्र संहिता, सातवत संहिता किंवा पाशुपत संहिता हे वैष्णव व शैव आगमाचे मुख्य ग्रंथ मानले जातात, या आगम कालखंडाचा वाकाटकांच्या कालखंडातही मोठा प्रभाव महाराष्ट्रात पाहायला मिळतो.
उत्तर हिंदुस्थानात कुशाणांच्या काळात बौद्ध व जैन धर्माचा प्रभाव होता. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व तिसन्या शतकापर्यंन ८० टक्के लोक बौद्ध होते. मध्य आशियातून शक, क्षत्रप, कुशाण आले. त्यांच्यासोबत नाणीही इथे आली. कुशाणांच्या काळात तांबे व सोन्याची नाणी प्रसिद्ध होती. समाज समृद्ध समाज होता. हिंदू समाजाचं पुनरुत्थान, त्यांच्या मूल्यांच पुनरुत्थान हे नंतर गुप्त सम्राटांच्या रूपाने झाले. नथनज्योत लाहिरी यांनी म्हटले की, अशोकाचे सर्व शिलालेख प्राकृतमध्ये आहेत. गिरनार व रुद्रदामनचे वाङ्‌मयीन मूल्य असलेलं संस्कृतमध्ये आहेत. हे अचानक कसं घडतं? संस्कृतला असे अचानक महत्त्व कसे प्राप्त होते, याचा अभ्यास करताना आपल्याला त्यावेळची सामाजिक स्थिती, राजे, सम्राट त्यांनी विविध धर्म, उपासनापद्धतीना उदारहस्ते दिलेला आश्रय आणि व्यापाराने आलेली समृद्धी यांचा अतिनिकटचा संबंध आहे, हे लक्षात येते.
वाकाटकांचा कालखंड मोठा मनोरंजक व कुतूहलजन्य आहे. एका बाजूला वैदिक धर्मामध्ये बदल घडून येत आहेत, पुराणे घडत आहेत. पाचव्या शतकामध्ये त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेले दिसते. तिसऱ्या शतकापर्यंत रामायण महाभारत यांची रचना पूर्ण झाली आहे. त्यातून नव्या प्रकारच्या हिंदू धर्माचे हुंकार पुढे येताना दिसतात, त्यात आगमाधिष्ठीत व्यवस्था महत्वाची ठरताना दिसते. आगमांनी होम हवनातील बळी नाकारले आणि त्या ऐवजी धान्य, दूध व तूप यांचा वापर केला, त्याच प्रमाणे त्यांना जात बाजूला सारून दीक्षा महत्त्वाची मानली.
 महाभारतात नारायणी उपाख्यान आहे. त्यात पांचरात्र - सातवत धर्म याबद्दल माहिती येते. सातवत हे यादवांशी संबंधित आहेत. आगम धर्माच विवेचन शेश्वर उपनिषदामध्ये येतं. तर मांडुक्य, मुंडक आणि केन यामध्ये त्याची चाहूल पाहायला मिळते.
 पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये याच काळात भक्ती तर उपनिषदांमध्ये प्रसाद हा शब्द येतो, या दोन्ही वेगळ्या कल्पना एक बाजूस विकसित होताना दिसतात, तर दुसरीकडे वेदांमध्ये नवखे समजले गेलेले शिव आणि विष्णू या दोन देवांना महत्त्व प्राप्त होऊन त्यांची तुलना ब्रह्माशी होताना दिसते, उपनिषदांच्या काळात वैदिक कर्मकांडीपासून सुरू झालेला प्रवास सातवत आणि पांचरात्र आगमांनपर्यंत पोहोचलेला दिसतो. याच विवेचन मोक्ष आणि शांती पर्वामध्ये येते. कुशाणांच्या नाण्यांवर बुद्धाबरोबर नंतर शिव व विष्णूही लोकप्रिय झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर वाकाटकांचा उदय झालेला दिसतो.

नागवंशीय राजवटीशी संबंध

वाकाटकांच्या समकालीन राजवटींमध्ये नागवंशाचे महत्त्व बरेच आहे. या नागराजांबद्दलचे काही महत्त्वाचे उल्लेख प्रवरसेनाच्या ताम्रपटातदेखील आढळतात. त्यामुळेच या नागवंशाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वाकाट कोध्या इतिहासाची मूळ साधने मिळणे ही अगदी १८३६ मध्ये द्वितीय प्रवरसेनाचा सिवनी ताम्रपट सापडला तेव्हापासून ते मागल्या वर्षी मन्सर येथील उत्खननात डेक्कन कॉलेजच्या उत्खनन चमूस प्रवरसेनाची माता प्रभावती गुप्ता हिची राजमुद्रा सापडली तेथपर्यंत घडत आला आहे. हे लक्षात घेता वाकाटकांच्या इतिहासाची साधने यापुढेही मिळत राहतील अशी खात्री वाटते. नागपूरपासून ७५ मैलांवर असलेल्या आडम या पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन करताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिक्षण पुरातत्त्वविद् श्री. अमरेंद्रनाथ यांनाही अशीच एक नाममुद्रा सापडली. ती सातवाहनांच्या सेनापतीची होती. त्याचे वर्णन 'तो महरठी' म्हणजे मुलकी प्रशासनातील मोठा अधिकारी असेही आढळते. त्याचे नाव गौतमीपुत्र विध्यशक्ती असे असून तो कदाचित वाकाटकांचा आद्यपुरुष विध्यशक्ती असावा असे अमरेंद्रनाथ यांचे मत झाले आहे. विदर्भामध्ये वाकाटककालीन अनेक वस्तिस्थळे सापडली असून त्यांच्या उत्खननातून व गक्षेणातून (एक्सप्लोरेशेन) वाकाटकांच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे पैलू नव्याने जास्त उजेडात येण्याची शक्यता आहे. वाकाटक वेशातील राजे व त्यांचे प्रधान यांचे मिळून
आजवर जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त लेख, ताम्रपट उपलब्ध आहेत. अजिंठ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील गुंफामधील २५ पेक्षा जास्त गुफांतील चित्रांसोबत रंगवलेले लेख लक्षात घेतले तर ही संख्या शंभराहून अधिक होईल. वाशिम येथील उत्खननात वाकाटकोची काही नाणीही सापडली व गेल्या काही वर्षांत नाण्यांचा खासगी संग्रह करणान्या हौशी लोकांकडेही ही सापडल्याचे वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या व त्यावर वाचलेल्या शोधनिबंधांतून सहज लक्षात येते.

 शिलालेख, ताम्रपट, मातीच्या राजमुद्रा त्यांचे ठसे, नाणी असा इतिहास साधनांचा मोठा संचय अभ्यासकांना उपलब्ध झालेला आहे. यापुढील लेखातून वाकाटक राजघराण्याशी संबंधित असलेली समकालीन इतर राजघराणी, त्यांच्याविषयी माहिती असलेली उत्खननातून अथवा ताम्रपद शिलालेखांतून मिळालेली इतिहासाची साधने यांच्या साहाय्याने त्या त्या राजघराण्यांशी वाकाटकांच्या दोन शाखांतील राजांचा संबंध कसा आला, उत्खननात किंवा संशोधनात मिळालेल्या वास्तू, शिल्प, नाणी यांच्या साहाय्याने तत्कालीन अभिजात कलांचा उदय व विकास कसा झाला, समकालीन धार्मिक व सामाजिक परिस्थितीचा त्यावरून अंदाज बांधता येतो का? हे आपण पाहणार आहोत.
    वाकाटकांच्या वंशातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे आद्यपुरुष विध्यशक्ती याचा मुलगा प्रकरसेन (प्रथम) याने अग्निष्टोम, आप्तो र्याम, वाजपेय इ. अनेक सोमयाग केलेले असून त्याने चार अश्वमेध यज्ञसुद्धा केले होते, असे मोठ्या अभिमानाने केलेला उल्लेख आढळतो. त्याचा गौरवाने सम्राट म्हणून उल्लेख येतो. त्याची राजधानी पुरिका येथे म्हणजे सातपुड्यातील (ऋक्षवंत पर्वत) भारात होती. त्याने साठ वर्षे राज्य केले. विध्यशक्तीनंतर त्याने वाकाटकांच्या राज्याचा विस्तार बराच मोठा केलेला असावा. पुराणकार सांगतात त्याप्रमाणे त्याला चार पुत्र होते ज्यांनी वेगळ्या शाखा आणि राज्ये प्रस्थापित केली. महामहोपाध्याय मिराशी यांच्या मते स्थाचे साम्राज्य विस्तृत असावे. विदर्भाव्यतिरिक्त, दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटकपर्यंत, दक्षिण कोसल व आंध्रापर्यंत ते पसरले असावे, परंतु याविषयी कोठलाही ऐतिहासिक ठोस पुरावा देणे कठीण आहे. परंतु ज्या अर्थी त्याचे राज्य त्याच्या चार मुलीनी स्वतंत्र शाखा प्रतिष्ठित केल्या स्थावरून बरेच मोठे असावे असे म्हणण्यास हरकत नाही आणि विदर्भातील नंदिवर्धन (हल्लीचे रामटेकजवळील नगरधन) आणि वत्सगुल्म (वन्हाडातील जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम) या दोन ठिकाणांवरून राज्य करणाथा वाकाटकांच्या दोन शाखांचा इतिहास आपणास चांगलाच परिचित आहे.
 
 पुराणे म्हणतात त्याप्रमाणे प्रवरसेनास चार पुत्र होते. वाशिम शाखेच्या विध्यसेन ऊर्फ द्वितीय विध्यशक्ती (इ.स. ३५५ ते ४००) याच्या ताम्रपटातील वंशावळीवरून त्याचा पिता सर्वसेन (इसवीसन सुमारे ३३० ते ३५५) हा प्रवरसेनाचा पुत्र होता. नंदिवर्धन शाखेच्या द्वितीय प्रवरसेनाच्या ताम्रपटात दिलेल्या बंशावळीवरून प्रवरसेनाचा गौतमीपुत्र नावाचा दुसरा मुलगा होता. हा पित्याच्या मानाने अल्पायुषी असल्यामुळे त्याचा मुलगा रुद्रसेन (प्रथम) हा राज्यावर आला. गौतमीपुत्राने राज्य केले नसावे, कारण बंशातील इतर राजांप्रमाणे महाराज असे बिरुद त्याच्या नावाअगोदर किंवा नंतर जोडलेले नाही, पण मोठ्या गौरवाने महाराज श्री भवनाग या नागर्दशीय राजाचा तो नातू म्हणजे मुलीचा मुलगा (दौहित्र) असा उल्लेख करण्यात आला आहे. या राजवंशाशी घडून आलेला वैवाहिक संबंध वाकाटकांच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने बराच महत्त्वाचा असावा, कारण या श्री भवनागाचे प्रकरसेनाच्या ताम्रपटात अगोदरच्या तीन ओळींमध्ये मोठे तपशीलवार वर्णन आलेले आहे. हे नागवंशीय राजघराणे शिवभक्त असून त्यातील आध्पुरुषाने आपल्या खांद्यावर शिवलिंग वाहून नेण्याचे व्रत सतत केल्याने भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि त्यामुळे तो राज्य निर्माण करू शकला अशी त्यांची धारणा होती. त्याने शंकराच्या कृपेने राज्य निर्माण केले असले तरी या कृपेला पराक्रमाचीसुद्धा जोड होती हे दुसऱ्या विशेषणावरून सहज लक्षात येते. आपले सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी या आद्यपुरुषाने दहा अश्वमेध यज्ञ केले होते. यज्ञाशेवटी केलेल्या स्नानामुळे (अवभृथ) जशी त्यांची काया पवित्र झालेली होती, तसेच अभिषेकाच्या वेळी भागीरथी नदीतून आणलेल्या जलाने त्यांचा राज्याभिषेक केला होता असेही वर्णन आढळते. यावरून गंगा नदीकाठचा प्रदेशसुद्धा त्यांच्या राज्यात मोडत असावा असा विद्वानांचा कयास आहे.
       नाणे आणि शिलालेखांच्या अभ्यासावरून उत्तर भारतातील कुशाणांची सत्ता गंगेच्या दुआबात संपुष्टात आणण्यामध्ये नागवंशीय राजे कारणीभूत होते असे दिसते. त्यांचे नाव दर्शवते त्याप्रमाणे हे निश्चितच इक्ष्वाकु किंवा सोमवंशीय नसावेत आणि त्यांचा विस्तार गंगेच्या दुआबाच्या पलीकडे अगदी विदर्भातही झालेला होता हे भवदत्त नावाच्या भारनृपतीच्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील पौनी (जिल्हा भंडारा) येथील शिलालेखावरून स्पष्ट दिसते. गौतमीपुत्राचा आजा भवनाग याच्या तांब्याच्या नाण्यांवरून तो भारशिवांचा प्रमुख (अधिराज) होता है लक्षात येते. नाग वंशातील नऊ राजांची नाणी मध्य भारतात आणि मथुरेभोवतीच्या प्रदेशात मोठ्या संख्येने सापडली असून इसवीसनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकोत पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य भारतातील ग्वाल्हेर प्रांत यावर या नागराजांचा अंमल होता. त्यांची पश्चिमेतील राजधानी मधुरा असून दुसरी राजधानी पद्मावती (आताचे पद्मपवाया) या ठिकाणी होती. पुराणांमध्ये या राजवंशांचा उल्लेख असून मथुरा शाखेतील सात राजांच्या आणि पद्मावती शाखेतील नऊ राजांचा उल्लेख येतो. सुरुवातीच्या काळात हे कुशाण सम्राटांचे सामंत असावेत. पद्मावती येथून राज्य करणारे नाग हेच भारशिव नागवंशीय राजे होत. पद्मावती आणि आसपास सापडलेल्या भारशिव राजांच्या नाण्यांच्या अभ्यासावरून दहा राजांची नाचे लक्षात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे- भीमन्नाग, विभुनार, प्रभाकरनार, स्कंदनाग, बृहस्पतिनार, व्याधनाग, कसुनाग, देवनाग, भवनाग आणि गणपतिनाग, हे नाग राजे सुरुवातीच्या काळात जरी कुशाणांचे सामंत असले तरी यौधधांनी कुशाणांचे साम्राज्य खिळखिळे केल्यानंतर मथुरा आणि पद्मावती येथील नागवंशीय राजांनी आपले स्वातंत्र्य उद्‌द्घोषित केले असावे. वाकाटकांच्या ताम्रपटात आपल्या पूर्वजांनी दहा अश्वमेध केल्याचा जो अभिमानपूर्वक उल्लेख भवनागाच्या संदर्भात येतो, तो याच स्वातंत्र्याची घोषणा सूचित करणारा असावा.
         भवनाग हा प्रथम प्रवरसेनाचा (इसवीसन सुमारे २७० ते ३३०) समकालीन असून त्याने इसवीसन सुमारे ३०५ ते ३४० या काळात पद्मावती येथे राज्य केले असारे. त्याने प्रवरसेनाचा मुलगा गौतमीपुत्र याला आपली मुलगी विवाहात दिली, याचा यापूर्वी उल्लेख आलेलाच आहे. या संदर्भात पुराणांनी विदिशा (सांचीजवळील) येथून राज्य करणाऱ्या राजवंशांचे व राजांचे वर्णन केले आहे. त्यात विरोधी राजांची शहरे काबीज करणारा (परपुरंजय) भोगी नावाचा नागराज शेषाचा मुलगा राज्य करील, अशी भविष्यवाणी केली आहे. त्यापाठोपाठ चंद्रवंशीध सदाचंद्र इत्यादी पाच राजे राज्य करतील, असे वर्णन करून त्यानंतर तीन राजे होतील, असे म्हटले आहे. याच संदर्भात विध्यशक्तीचा मुलगा प्रवीर म्हणजे प्रवरसेन प्रथम हा पुरी आणि कांचनका या ठिकाणी राज्य करील आणि त्याचे चार मुलगे पुढे नराधिम म्हणजे सिंहासनावर बसतील, अशीही भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे प्रवरसेनाचा पुत्र गौतमीपुत्र हा राज्यावर बसलेला नसला तरी तो भवनागाचा दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा असे जे वर्णन आहे ते सूचक असावे. समुद्रगुप्त गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त प्रथम याचा मुलगा हा त्याच्या दिग्विजयांमुळे हिमालयापासून ते दक्षिणेतल्या दिग्विजयांमुळे प्रसिद्ध होता. त्यामुळेच प्राचीन भारतातील इतिहासातील जाते, परंतु त्याचा पिता चंद्रगुप्ताने लिच्छवीची (सध्याच्या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बसाड) राजकुमारी कुमारदेवी हिच्याशी विवाह केल्यामुळे आणि पर्यायाने वैशाली येथील लिच्छवीशी विवाहसंबंध आल्यामुळे प्रबळ झाला आणि राज्यविस्तार करू शकला, असे जाणकार म्हणतात. चंद्रगुप्ताला आणि त्याचा मुलगा समुद्रगुप्त याला लिच्छवीच्या राज्याचा काही भारही बारसा म्हणून मिळाला असावा आणि म्हणूनच समुद्रगुप्तसुद्धा आपल्या नाण्यांवर लिच्छव्यः' असे बिरुद लावतो. प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन हा स्वतःचे 'भवनाग-दौहित्र' म्हणजे भवनागाचा नातू हे जे बिरुद लावतो ते कदाचित अशाच कारणांमुळे असावे. सम्राट समुद्रगुप्ताने तीन टप्प्यांत आपले साम्राज्य स्थापन केले, गंगा दुआबातील अनेक प्रतिष्ठित राजघराण्यांचा त्याने समूळ उच्छेद केला. त्यात नागसेन इत्यादी नागराजांचाही उल्लेख आहे. दुआबात आपली सत्ता बळकट केल्यानंतर त्याने विध्य बनातील अठरा जंगलांतील (आटविक) राजांना शरण आणले आणि विध्यापलीकडे जाऊन पल्लवांच्या राज्यापर्यंत टक्कर दिली. त्याचा परिणाम असा झाला की, सिंहल (हल्लीचे श्रीलंका) द्वीपातील राजानेही मोठ्या आदराने त्याला नजराणे पाठवले, असा त्याच्या प्रशस्तीत उल्लेख येतो. या झंझावाती दिग्विजयात सातपुडा आणि विदर्भात राज्य करणाऱ्या वाकाटकांची नेमकी काय भूमिका होती याविषयी काही निश्चित पुरावा नसला तरी समुद्रगुप्ताचे आणि वाकाटकांचे संबंध तिढ्याचे नसून सलोख्याचेच असावेत असे दिसते. याचे कारण असे की, वाकाटकोच्या वंशावळीत रुद्रसेन (प्रथम) याचा महाराज म्हणून उल्लेख येतो. समुद्रगुप्ताचा मुलगा आणि उत्तराधिकारी चंद्रगुप्त द्वितीयाने वाकाटकर्वशीय पृथ्वीषेणाशी वैवाहिक संबंध जोडले. चंद्रगुप्तने कुबेर नागा नावाच्या नागवंशीय राणीची मुलगी प्रभावती गुप्ता हिचा पृथ्वीषेणाचा (सुमारे इसवीसन ३५० ते ३८५) मुलगा रुद्रसेन द्वितीय (इसवीसन ३८५ ते ३९०) याच्याशी विवाह लावून दिला
     वरील विवेचनावरून असे स्पष्ट होते की, समुद्रगुप्ताने नागवंशीय राजांचा निःपात करण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रति या भागांत नागवंशीय राजे हे प्रभावी होते. त्यातील पद्मावती म्हणजे हल्लीचे ग्वाल्हेरजवळील पद्मपवाया येथे राज्य करणाऱ्या भवनागांशी सातपुडा आणि विदर्भातील वाकाटक वंशीय राजांशी संबंध आले. प्रसिद्ध वैदभौय संस्कृत कवी भवभूती (इसवी सन सातवे शतक) याच्या 'मालती माधव' नावाच्या नाटकावरूनही विदर्भातील कुण्डिनपूर (हल्लीचे अमरावती जिल्ल्यातील कौण्डीन्यपूर) व नागराजांची राजधानी पद्मावती या दोन शहरांमध्ये चांगले दळणवळण होते असे दिसते. नाटकाचा नायक माधव हा पारा आणि सिंधू या नद्यांच्या संगमावर वसलेल्या पद्मावती येथे शिक्षणासाठी येतो. तेथील प्रधानाच्या मालती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी विवाह करतो असे कथानक आहे. नाटकात पद्मावती आणि आसपासच्या चामुण्डादेवीचे मंदिर (कराला) व शिवदेवालय आणि मधुमती व इतर उपनद्या यांचे हृदयंगम वर्णन आलेले आहे.
     ग्वाल्हेर संस्थानातील पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन संचालक श्री. गर्दे यांनी प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक सर जॉन मार्शल यांच्या सल्ल्याने पद्मावती येथे १९१५-१६, १९२४-२५ व १९४०-४१ या सालामध्ये मोठे उत्खनन केले. या उत्खननामध्ये अनेक मूर्ती, दगडी शिल्ये, मातीची खेळणी, मणी व नाणी
 
 
 
 
 

 

 

 

नागपूर व त्याच्यावरच्या भागात एक प्रबळ राज्यसत्ता होती व त्या सत्तेचे मांडलिकही बर्‍यापैकी प्रबळ होते. अर्थात या मतालाही बराच विरोध झाला. उदा. कार्ल खंडालवाला, ब्रह्मानंद देशपांडे, शिला वाईनर इत्यादींनी यात ऐतिहासिक व भौगोलिक सत्य काहीही नसून याला फक्त कादंबरीचेच महत्त्व द्यावे असे आग्रहाने प्रतिपादन केले. विरोध करणारे मातबर अभ्यासक होते, त्यामुळे त्यांच्या मतांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. पण महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी श्री. कॉलिनचे म्हणणे उचलून धरले आणि त्याला पुष्टी मिळाली अजिंठ्याचे अभ्यासक श्री. स्पिंक यांच्या अभ्यासाने. या सगळ्या अभ्यासकांचे म्हणणे होते की या आठव्या भागात वाकाटकांच्या उतरत्या काळाचे वर्णन मोठ्या खुबीने केले आहे. अर्थात तसे असावे असे आता बर्‍याच अभ्यासकांना वाटते. महामहोपाध्याय मिराशींचे मत जर ग्राह्य धरले, तर या ग्रंथावरून त्या काळातील बरीच माहिती गोळा करता येते व त्या काळातील समाजजीवनावर थोडाफार प्रकाश आपल्याला टाकता येतो. तो प्रयत्न आपण करणार आहोत, पण त्या अगोदर आचार्य दंडी कोण होते, ते एवढे प्रसिद्ध का झाले, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आचार्य दंडींनी हा ग्रंथ पल्लवांचा आत्मसंतुष्ट राजा नरसिंहवर्मन दुसरा याला शहाणपणाचे दोन शब्द सुनविण्यासाठी रचला असावा. यथा राजा तथा प्रजा या नियमानुसार प्रजेतही बेबंदशाही माजली असावी.
त्या काळात सहाव्या किंवा सातव्या शतकात आचार्य दंडी हे पल्लवांच्या दरबारी राजकवी होते. हे पद त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आले होते. हे घराणे मूळचे विदर्भाचे. त्यांचे गोत्र होते कौशिक. हे घराणे मूळचे गुजरातमधील आनंदपूर येथील. त्यांच्या कुठल्यातरी पूर्वजांनी नाशिक्यमधील अचलापुउर येथे स्थलांतर केले. याच घराण्यात आचार्य दंडींच्या आजोबांनी - ज्यांचे नाव दामोदर होते त्यांनी - जन्म घेतला. कवी भारावी यांच्यामुळे राजा विष्णुवर्धन यांच्याशी दामोदर यांची मैत्री झाली. एकदा दामोदर राजाबरोबर जंगलात शिकारीला गेले असता, त्यांना भुकेपोटी मांसभक्षण करावे लागले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. त्या तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी गंगा घराण्यातील एका राजाच्या दरबारी राजकवीची नोकरी पत्करली. काव्यावरील त्यांचे प्रभुत्व पाहून त्यांना त्या दरबारातून पल्लवांचा राजा सिंहविष्णूने त्याच्या दरबारी आमंत्रण दिले. या वेळी त्यांचे वय असेल अंदाजे वीस. श्री. दामोदरांना अनेक मुलींनंतर एक मुलगा झाला, त्याचे नाव होते वीरदत्त. हा वीरदत्त व त्याची पत्नी गौरी यांच्या पोटी श्री. दंडींनी जन्म घेतला. वयाच्या सातव्या वर्षीच दंडीचे शिक्षण सुरू झाले. दुर्दैवाने चालुक्यांनी पल्लवांवर केलेल्या आक्रमणाच्या राजकीय रणधुमाळीमुळे आचार्यांना कांची सोडणे भाग पडले. त्याच काळात त्याच्या मातापित्यांचाही मृत्यू झाला असावा. पुढील बारा वर्षे तरुण दंडीला चालुक्यांनी व्यापलेल्या स्वत:च्या देशात अज्ञातवासात काढावी लागली. त्याचे हे नष्टचर्य संपले, जेव्हा परमेश्वरवर्मन पहिला याने चालुक्यांचा राजा विक्रमादित्याचा पराभव केला तेव्हा. कांचीमध्ये पल्लवांची सत्ता परत प्रस्थापित झाल्यावर आचार्य दंडींना राजकवीचे पद परत उपभोगण्यास मिळाले व ते त्यांनी परमेश्रवरवर्मन-१ व त्याचा मुलगा नरसिंहवर्मन-२ यांच्या कारकिर्दीत उपभोगले.


श्री. मिराशी या बाबतीत काय लिहितात ते पाहू या. (कंसातील मते प्रस्तुत लेखकाची आहेत.) -
तिसर्‍या शतकाच्या शेवटास वाकाटकांचे साम्राज्य दख्खमध्ये चांगलेच प्रस्थापित झाले होते. वाकाटकांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणता येईल अशा प्रवरसेन-१ने चार अश्वमेध व इतर प्रकारचे अनेक यज्ञ केले होत. पुराणातील उल्लेखानुसार त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार मुलांत वाटले गेले. थोरल्या घराण्याची सत्ता विदर्भात प्रस्थापित झाली. यांनी प्रथम रामटेकजवळील नंदीवर्धन येथे राजधानी केली होती व नंतर प्रवरपूर येथे. श्री. मिराशींनी जेव्हा हा लेख लिहिला, तेव्हा त्यांनी त्यात असे म्हटले होते की प्रवरपूर कोठे आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. (परंतु आता ते सिद्ध झाले आहे. जवळच असलेले मनसर हेच प्रवरपूर आहे, हे तेथे झालेल्या उत्खननातून समजले आहे.) दुसर्‍या म्हणजे वास्तुगुल्म शाखेने वाशिम येथून राज्य केले, तर उरलेल्या शाखांची कुठलीच माहिती उपलब्ध नाही. याच घराण्यातील पृथ्वीसेनाच्या कारकिर्दित वाकाटकांचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपर्यंत पसरले होते. या शाखेच्या नंतरच्या राजांची माहिती सध्यातरी उपलब्ध नाही.
नाव घेण्यासारखे अनेक राजे थोरल्या शाखेत होऊन गेले, पण त्यातील सगळ्यात पराक्रमी होता प्रवरसेन दुसरा. याची आई गुप्त घराण्यातील होती व यानेच प्रसिद्ध 'सेतुबंध' नावाचा ग्रंथ प्राकृत भाषेत रचला. अजिंठ्याच्या अनेक शिलालेखांतून वास्तुगुल्म शाखेतही अनेक पराक्रमी राजे होऊन गेले हे सहज समजते. यांच्यातील शेवटचा होता हरीसेन (अंदाजे ४७५-५००) हा एक पराक्रमी व आक्रमक राजा असावा. पृथ्वीसेनानंतर त्याने उत्तर विदर्भावर स्वारी करून तो प्रदेश त्याच्या राज्याला जोडला; एवढेच नाही, तर कुंतल, अवंती, कलिंग, कोसाला, त्रिकूट, लाट व आंध्र या देशांतूनही महसूल गोळा करण्यास सुरुवात केली होती. याच राजाच्या काळात अजिंठ्यातील सर्वात सुंदर अशा तीन लेण्यांची (१६, १७, व १९) व त्याच डोंगररांगेत असणार्‍या घटोत्कच लेण्यांची निर्मिती झाली. अजिंठ्यातील शिलालेखातून याचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपलीकडे, तर दक्षिणेकडे कृष्णा नदीपलीकडे पसरले होते. पूर्वेला अरबी समुद्रापर्यंत व पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. हरीसेनानंतर बहुधा ही सत्ता मोडकळीस आली असावी, कारण त्यानंतर कुठल्याही शिलालेखात वाकाटकांच्या राजांची वंशावळ उपलब्ध नाही. हे असे का झाले असावे, याची पुराणात किंवा इतिहासात काहीही माहिती उपलब्ध नाही. परंतु दशकुमारचरितमच्या आठव्या उच्छवासाचा त्या दृष्टीकोनातून अभ्यास केला, तर काय झाले असावी याची थोडीफार कल्पना येऊ शकते.
दशकुमारचरितममध्ये विदर्भाचे राजे म्हणून पुण्यवर्मन व त्याचा मुलगा अनंतवर्मन यांचा उल्लेख आला आहे, तसेच महिस्मतीचा राजा म्हणून मित्रवर्मन याचा उल्लेख आला आहे. या प्रदेशात वर्मन या नावाचा वंश राज्य करत होता, असा कुठलाही पुसटचा उल्लेखही आपल्याला पुराणात किंवा इतर साहित्यात आढळत नाही. हे वाकाटक राजेच असले पाहिजेत. (अर्थात त्यांची नावे आचार्य दंडी यांनी का बदलली? हा संशोधनाचा विषय आहे. श्री. दंडी यांनी हा ग्रंथ लिहिला, त्या वेळी वाकाटकांचा अस्त होत आला होता. कदाचित त्या वेळच्या राजाला हे रुचले नसते, म्हणून त्यांनी तसे केले असावे. कारण आठव्या प्रकरणात वर्णन केलेले वातावरण असेच काहीसे होते.)
दशकुमारचरितममध्ये अनंतवर्मनच्या अनेक मांडलिकांचा उल्लेख आला आहे. अर्थात हे त्याच्या वडिलांचेही - म्हणजे पुण्यवर्मन याचेही मांडलिक असणार. हा पुण्यवर्मन म्हणजेच प्रत्यक्षातील हरीसेन असावा. या मांडलिकांपैकी कोण होते व प्रत्यक्षात ते कोण असावेत, याचा अंदाज खालीलप्रमाणे -
१. अश्मकांचा राजा वसंतभानू : अश्मकांचे राज्य हे सातमाळ व गोदावरी नदीच्या मध्ये पसरले होते. पांडारंगपल्ली येथे सापडलेल्या ताम्रपटावर यांचा व राष्ट्रकूट मानांक यांचा उल्लेख आढळतो. अजिंठा येथील २५ क्रमांकाच्या लेण्यामध्ये एका शिलालेखात अश्मकांच्या दोन मंत्र्यांचा उल्लेख सापडतो.
२. कुंतलदेशाचा राजा अवंतिदेव : श्री. मिराशींनी अन्यत्र म्हटले आहे की हे राजे वाकाटकांच्या समकालीन होते व यांचे राज्य कृष्णा खोर्‍याच्या वरच्या बाजूला होते. श्री. मिराशींच्या मते सातारा जिल्ह्यातील माणगंगेच्या किनारी मानपूर येथे त्यांची राजधानी होती. विदर्भ व कुंतल यांच्या सीमा एकमेकांस भिडलेल्या असल्यामुळे वाकाटकांच्या वास्तुगुल्म शाखेच्या राजांशी कायम चकमकी उडत. अजिंठामधील लेणी क्र. १६मध्ये एका शिलालेखात वाकाटकांनी कुंतलावर मिळवलेल्या दोन विजयांचा उल्लेख आहे. कुंतलाचे राजे वाकाटकांचे मांडलिकत्व झुगारून देण्याची संधी शोधत असणार, जी त्यांना हरीसेनानंतर मिळाली.
३. ऋशिकाचा राजा एकविरा : हे खानदेशाचे प्राचीन नाव आहे. श्री. मिराशींनी इतरत्र असे म्हटले आहे की खानदेशात सापडलेल्या काही ताम्रपटांवरून त्या काळी तेथे मनसबदार राज्य करीत होते. सध्याच्या चाळीसगावच्या आसपास त्यांची राजधानी होती असे मानण्यास जागा आहे. अजिंठामधील लेणे क्रमांक १७मध्ये, अत्यंत खराब झालेल्या एका शिलालेखात राजांची लांबलचक वंशावळ दिली आहे, ती बहुधा या वंशाची असावी. या लेखात हरीसेनाचा उल्लेख 'राजपुत्रांमधील चंद्र' असा करण्यात आला आहे, त्यावरून हे वाकाटकांचेच एक प्रबळ सरदार असावेत असे वाटते.
४. नाशिक्यचा नागपाल : त्या काळात सध्याच्या नाशिकच्या प्रदेशात राज्य करीत असलेल्या त्रैकुटकांच्या घराण्यातील हा राजा असावा. यांच्या राज्याची उत्तर सीमा दक्षिण गुजरातच्या सीमेला भिडली होती. सुरुवातीला हे अभिरांचे मांडलिक होते, पण नंतर स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यापैकी एका राजाने अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आढळतो. व्याघ्रसेन नावाच्या यांच्या एका राजाचा हरीसेनाने पराभव केला असावा. ज्या पर्वतावरून या राजघराण्याने आपले नाव घेतले होते, तो पर्वत नाशिकच्या पश्चिमेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. काही काळापूर्वी सापडलेल्या अंजनेरी ताम्रपटात पूर्व-त्रिकूट विषय असा उल्लेख आढळतो; म्हणजे त्या काळी तेथे त्रिकूट नावाचा प्रदेश असावा, हे स्पष्ट होते व त्या पर्वताने या त्रिकूटाचे दोन भाग केले आहेत.
५. कोकणचा राजा कुमारगुप्त : कोकणचा प्राचीन इतिहास आपल्याला जरासा अनभिज्ञ आहे, कारण कोणत्याच शिलालेखात त्याचा व त्यावर राज्य करणार्‍या राजांचा स्पष्ट उल्लेख नाही. कोकणावर शकांचे व सातवाहनांचे राज्य होते. पण त्यांच्या र्‍हासानंतर त्या प्रदेशावर कोण राज्य करीत होते, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण कान्हेरीच्या स्तुपात सापडलेल्या एका ताम्रपटात ४९४ साली तेथे त्रैकूटकांचे राज्य होते असा उल्लेख आढळतो. कदाचित असे झाले असेल की कोकणाचे राज्यकर्ते आधी त्रैकूटकांचे मांडलिक असावेत आणि वाकाटकांनी त्रैकूटकांचा पराभव केल्यावर ते त्यांचे मांडलिक झाले. ही एक शक्यता आहे.
६. मुरलाचा राजा वीरसेन : हा देश कुठे असावा याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही. पण तो गोदावरीच्या किनारी कोठेतरी असावा असे मानण्यास जागा आहे.
वाकाटकांचे हे सर्व मांडलिक विदर्भाच्या पश्चिमेकडे व दक्षिणेकडे राज्य करीत होते. हरीसेनाने पूर्वेचे कलिंग, कोसला व आंध्र हे देश जिंकले होते. पण दशकुमारचरितममध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. या राजांनी वसंतभानूच्या कारस्थानात भाग घेतला नाही, हे यामागचे कारण असावे. यातील दोन तर वाकाटकांचे नातेवाईक होते. दशकुमारचरितममध्ये असा उल्लेख आला आहे की अनंतवर्मनची माता कोसलाची राजकन्या होती. कोसला म्हणजे दक्षिण कोसला किंवा छत्तीसगड. पृथ्वीसेनाच्या बालाघाट ताम्रपटात कोसलांनी वाकाटकांचे मांडलिकत्व स्वीकारले होते असा उल्लेख आहे. त्या वेळी बहुधा कोसलावर शरभपूर घराण्याचा राजा राज्य करत असावा. आंध्रावर त्या वेळी विष्णुकुंडीन घराण्याचे राज्य होते आणि तेही वाकाटकांशी एका विवाहाने जोडले गेले होते. वाकाटकांच्या एका राजकन्येशी या राज्याचा संस्थापकाचा विवाह झाला होता व ती हरीसेनाचीच वंशज होती.
या मांडलिक सरदारांच्या राज्याशिवाय दशकुमारचरितममध्ये आणखी तीन राज्यांचा उल्लेख आढळतो. उत्तरेकडे महिस्मती आणि माळवा, तर दक्षिणेकडे वनवासी. महिस्मतीबद्दलही कमी माहिती उपलब्ध आहे, पण बरवानी आणि ग्वाल्हेर येथे सापडलेल्या ताम्रपटांत 'येथे पाचव्या शतकात सुबंधू नावाचा राजा राज्य करीत होता' हे कळते. त्याच्या एका दानपत्रात कलचुरीच्या कालगणनेतील वर्ष १६७ असे दिले आहे, म्हणजे ४१६-१७ साल. हा काही वाकाटकांच्या कुळातील नव्हता. कदाचित वाकाटकांनी नंतरच्या काळात हे राज्य त्यांच्या राज्यास जोडले असावे.
माळव्याचा चंडवर्मन : माळव्यावर त्या काळी एक अत्यंत शक्तिमान राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते मंदसोरचा यशोधर्मन. यानेच हूण राजा किहिरकुलाचा पराभव केला होता. मंदसोरच्या विजयस्तंभावरील लेखात याचे राज्य हिमालयापासून दक्षिणेकडे महेंद्र पर्वतापर्यंत पसरले होते असा उल्लेख आहे.
वनवासीचा भानुवर्मन : वनवासी म्हणजे आत्ताचे कर्नाटकातील बनवासी. याचे पूर्वीचे नाव वैजयंतीही होते. ही कदंबांची राजधानी होती. कदंबांची खातरीशीर वंशावळ अजूनही उपलब्ध नाही, पण पाचव्या व सहाव्या शतकात कदंबांचे एक शक्तिमान राज्य तेथे होते हे निश्चित. या घराण्याचा शेवटचा राजा हरीवर्मन याच्या सांगोली येथे सापडलेल्या ताम्रपटाच्या आधारे याचा काळ ५२६ किंवा ५४५ असावा असे वाटते. याच्या वडिलांचे नाव होते रविवर्मन, जो दशकुमारचरितममधील भानुवर्मन असावा.
दशकुमारचरितममध्ये दख्खनमध्ये वाकाटकांच्या काळात जी परिस्थिती होती, याचे सविस्तर वर्णन आले आहे. तसेच हरीसेनानंतर कमकुवत, दुर्व्यसनी वारसाच्या काळात वाकाटकांच्या र्‍हासास सुरुवात झाली व मांडलिकांनी बंडखोरीस सुरुवात केली, याचेही वर्णन आले आहे. वाकाटकांच्या राज्यात अनागोंदी माजल्यावर अश्मकांनी भरीस घातल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी वाकाटकांच्या राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली व काही मांडलिकांनी विश्वासघाताने शत्रूशी कशी हातमिळवणी केली व वाकाटकांच्या राजास ठार मारले, हा पुढील इतिहास आहे.

 


वाकाटक घराणे

महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.

पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.

दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.

नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.

विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.

द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.

नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.

वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.

सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.

प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.

वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.

 

 

 

वाकाटक राजघराणे
प्राचीन महाराष्ट्रात जी अत्यंत बलाढ्य व सुसमृद्ध अशी साम्राज्ये झाली त्यात वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. इ.स. २५० ते जवळपास इ.स. ५५० पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या तीनशे वर्षांच्या कालावधीत वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरा पर्यंत पसरवली. नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या मालव, मेकल व चेदी या देशांनीही त्याचे मांडलिकत्व काही काळासाठी पत्करलेले होते. 
असे हे सामर्थ्यशाली घराणे इतिहासाला १८३६ पर्यंत अज्ञात होते. इ.स. १८३६ मध्ये सिवनी येथे वाकाटक राजा द्वितीय प्रवरसेन याचा ताम्रपट सापडला व हे राजघराणे इतिहासाला ज्ञात झाले. पुराणांमध्ये मात्र वाकाटकांबद्दल काहीच लिहिलेलं नाही. त्यांचा पहिला राजा विंध्यशक्ती याचा मात्र उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. 
वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती पहिला याने केली. त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन हा त्याच्या नंतर राजा झाला. प्रवरसेनाच्या माघारी वाकाटकांच्या दोन शाखा महाराष्ट्रावर राज्य करू लागल्या. त्यांना ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्म शाखा असे म्हणतात.
  वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत या दोनही भाषांतील कवींना उदार आश्रय दिला होता. विदर्भातील वाङ्मय निर्मितीमुळे तेथील वैदर्भी रीतींना प्राधान्य प्राप्त झालेले दिसते. कलिदासासरख्या कवीने देखील यावर काव्ये केलेली आहेत. त्याने आपल्या मेघदूत या महाकाव्यात विर्दभाचे वर्णन केलेले आहे.
   वाकाटकांच्या काळात भारतीय समाजात अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये वाकाटकांचा मोठा हात होता. त्यांच्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कुशाण कारकीर्दीत सनातन धर्मास जी उतरती कळा लागली होती ती या गुप्त व वाकाटक काळात संपून सनातन धर्म पुन्हा उभारी धरू लागला. याच काळात संस्कृत भाषेच्या व वांगमयाच्या अभीवृद्धीची चळवळ सुरू झाली. यामुळेच गुप्त नृपतींनी सुद्धा संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. संस्कृतभाषे सोबतच शिल्पकला व चित्रकला यांचे पुनरुज्जीवन सुद्धा वाकाटकांच्या काळात झाले. त्याचे पूरावे त्यांच्या राज्यात असणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसते. 
  वाकाटक राजांनी केवळ विद्वानांना वा कवींना आश्रयच नव्हता दिला तर ते स्वतः सुद्धा उत्तम काव्ये व सुभाषिते रचत. वाकाटक राजांनी रचलेली हरिविजय, सेतुबंध अथवा रावणवहो ही काव्ये तर अनेक सुभाषितांचे उल्लेख आजही अनेक ठिकाणी सापडतात. वाकाटकांनी स्वतः जी काव्ये रचली त्याची प्रशंसा बाण व दण्डी या सारख्या कवींनी केलेली आहेत.
त्यांच्याच काळात अजिंठातील काही लेण्या कोरल्या गेल्या. ज्यातील विहार, चैत्य, शिल्प, चित्र यांची प्रशंसा आजही जगभरात होते आहे.
 अजिंठ्यातील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी ही वाकाटक कालीन असून ती लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी इतर लेण्यांपेक्षा उत्कृष्ठ आहेत. 
एकंदरीतच त्या काळातील संस्कृत भाषा, कला, वाङ्मय या सर्वांच्या पुनरुज्जीवनाचे सारे श्रेय जरी गुप्त राजांना दिले गेले असले तरी खऱ्या अर्थाने ते श्रेय वाकाटकांचेच आहे. 
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
विंध्यशक्ती पहिला
प्रथम विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा होय. याचे नाव पुराणांत तसेच अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यांमधील लेखात आलेले आहे. त्या लेखात विंध्यशक्तीचा हा द्विज म्हणजे ब्राह्मण असून त्याचे गोत्र विष्णूवृद्ध आहे असा उल्लेख आलेला आहे. त्यात विंध्यशक्ती चा 
' वाकाटकवंशकेतुः ' म्हणजे वाकाटक वंशाचे मानचिन्ह असा केलेला आहे. त्याची राजधानी ही पुरातन नगरी चनका ही होती. 
विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राजवटीमध्ये मोठ्या अधिकारावर असावा व त्यामुळेच त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असे वाटते. त्याने इ.स २५० ते २७० असे राज्य केले असावे असे अनुमान आहे. पुराणांमध्ये आलेली त्याची ९६ ही कालगणना त्याच्या कारकिर्दीची नसून त्याच्या वयोमानाची असावी असे वाटते.
पुराणांच्या मते वाकाटकांचा पहिला प्रसिद्ध राजा विंध्यशक्ती होय. त्याने आपले राज्य विदिशेच्या आसपास पसरवले व वाढत वाढत साम्राज्याच्या दर्जाला पोहचवले.
अजिंठ्याच्या लेखात विंध्यशक्तीची मोठी स्तुती केलेली आहे. ' त्याने मोठ्या मोठ्या लढायांत विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला तर प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी उडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्या पुढे विनम्र होत’. एकंदरीतच विंध्याशक्ती हा एक प्रबळ राजा होता. त्याचा पराक्रमाची तुलना प्रत्यक्ष इंद्र व विष्णूशी केलेली आहे.
त्याने आपल्या कारकीर्दीत चार अश्वमेध आणि आप्तोर्यांम, बृहस्पतिसव, ज्योतिष्टोम, वाजपेयादी यज्ञ केल्याचे दिसते. 
विंध्यशक्तीच्या माघारी त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला. वाकाटक घराण्यातील हा सर्वात महत्त्वाचा राजा होय.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास भाग 3

#क्षत्रिय_मराठा_वाकाटक_राजवंश
-----------------------------------------------
महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश म्हणजे सातवाहन राजवंश तर या सातवाहन राजवंशाच्या 450 वर्षाच्या प्रदीर्घ राज्यकाळानंतर जेव्हा सातवाहनांची शक्ती कमी व्हायला लागली तेव्हा सातवाहनांचे अधिपथ्य झुगारून महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात उदय झाला क्षत्रिय मराठा वाकाटक राजवंशाचा. वाकाटक हळूहळू आपला राज्य विस्तार वाढवू लागले व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या आसपासच्या प्रदेशावर आपले अधिपत्य स्थापित केले.
  वाकाटक राजवंशाचा संस्थापक
#राजा_विंध्यशक्ती आहे. राजा विध्यशक्तीनेच वाकाटक साम्राज्याचा पाया रोवला वाकाटक साम्राज्याचा कार्यकाळ इसवी सन 250 ते इसवी सन 500 पर्यंत होता म्हणजे 250 वर्ष वाकाटक राजांनी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य केले. वाकाटक साम्राज्याची मुख्य राजधानी #नंदीवर्धन होती आजच्या महाराष्ट्रातील #नागपूर जिल्ह्यातील जे #नगरधन गाव आहे हीच वाकाटक साम्राज्याची मुख्य राजधानी होती. नंतर वाकाटक राजा #प्रवरसेन_प्रथम ने राजधानीला नंदीवर्धन वरून #वत्स्यगुल्म ला स्थानांतरित केले वत्स्यगुल्म म्हणजेच आजचा #वाशिम जिल्हा.
   वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम ने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला व स्वतःला महाराज आणि सम्राट या उपाध्या धारण केल्या. प्रवरसेन प्रथम ने आपल्या कार्यकाळात 4 अश्वमेध यज्ञ व 1 वाजपेय यज्ञ केला होता.
  वाकाटक राजा #प्रथम_पृथ्वीसेन ने दक्षिणेतील #कुंतल प्रांत जिंकला व वाकटक साम्राज्यात सामील करून घेतला कुंतल म्हणजेच आजचा #कोल्हापूर जिल्हा होय. 
    वाकाटक राजा #दुसरा_रुद्रसेन चा विवाह त्या वेळचे उत्तर भारतातील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे #गुप्त_साम्राज्य तर या गुप्त साम्राज्याचा राजा #चंद्रगुप्त_प्रथम ची कन्या #प्रभावतीदेवी शी झाला. आणि या वैवाहिक संबंधामुळे वाकाटक साम्राज्याची ताकद खूप  वाढली गुप्त राजांनी नंतर जो दक्षिण दिग्विजय केला त्यामध्ये दक्षिणेतील ज्या राज्यांना जिंकल्याचा उल्लेख मिळतो त्यामध्ये वाकाटक साम्राज्याचे नाव येत नाही गुप्त राजांनी दक्षिणेतील वाकाटक साम्राज्य सोडून बाकी सर्व राज्य जिंकून घेतले होते.
   दुसऱ्या रुद्रसेनाचा प्रभावती देवीशी विवाह झाल्यानंतर फक्त 5 वर्षात मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे 15 वर्षे वाकाटक साम्राज्याचा सर्व कारभार प्रभावती देवीने सांभाळला आणि यामध्ये दुसऱ्या चंद्रगुप्ताने तिची मदत केली.
  वाकाटक राजा #हरिसेन च्या काळात त्याचा #वराहदेव नावाचा ब्राह्मण मंत्री होता. त्याने वेरूळच्या लेण्यांमध्ये अनेक मुर्त्या व भित्तीचित्र बनवले व अनेक लेण्यांचे निर्माण केले.
   वाकाटक राजा #दुसरा_रुद्रसेन ने महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये #सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिला. याच #प्राकृत_महाराष्ट्री भाषेचे रूपांतर नंतर मराठी भाषेमध्ये झाले. प्रसिद्ध संस्कृत #कवी_कालिदास याच दुसरा रुद्रसेनच्या दरबारात होते येथेच त्यांनी #मेघदूत नामक काव्य लिहिले.
  वाकाटक साम्राज्याच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. वाकटक राजांनी संस्कृत व प्राकृत महाराष्ट्री कवींना राजाश्रय दिला होता व त्यांना उत्तेजित केले होते. वाकाटक काळखंडातील काव्य आणि वांग्मय निर्मितीमध्ये #महाराष्ट्री_वैदर्भी आणि #वच्छोमी पद्धतीला प्राधान्य मिळाले. वाकटक राजांनी शिल्पकलेला देखील उत्तेजन दिले जे आज आपण अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये बघत आहोत.
  वाकाटक साम्राज्याच्या कार्यकाळात जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या अनेक लेण्यांची निर्मिती झाली त्यामध्ये त्यांची वंशावळ देखली आहे तिला #वाकाटक_वंशकेतू म्हटले जाते ती पुढे देत आहे. 
●विन्ध्यशक्ति
●प्रवरसेन प्रथम
●रुद्रसेन प्रथम
●पृथ्वीसेन प्रथम 
●रुद्रसेन द्वितीय
●प्रभावतीगुप्त
●दिवाकरसेन
●दामोदरसेन
●नरेन्द्रसेन
●पृथ्वीसेण द्वितीय 
●सर्वसेन तृतीय
●विन्ध्यसेन (विन्ध्यशक्ति द्वितीय)
●प्रवरसेन द्वितीय
●देवसेन 
●हरिसेण
   काहींनी वाकाटक राज्यांना विष्णूवृद्धी गोत्रीय ब्राह्मण घोषित केले. पण त्याचा कुठलाही समकाली पुरावा नाही आणि विष्णुवृद्ध नावाचे कुठले गोत्रही अस्तित्वात नाही. वैदिक सनातन हिंदू धर्मानुसार राजा हा फक्त क्षत्रिय असतो आणि वाकाटक भगवान श्रीकृष्णांची पत्नी विदर्भाची राजकन्या श्रीरुक्मिणी मातेच्या वंशातील होते आणि श्रीरुक्मिणी माता ही क्षत्रिय राजकन्या होती त्यामुळे वाकाटक हे क्षत्रिय मराठाच होते. आजच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळामध्ये #वकटे किंवा #वक्ते आडनावाचे लोक वाकाटकांचे वंशज आहेत.
लेखक :- आशिष इंगळे पाटील.
(राज्य इतिहास व साहित्य विभाग प्रमुख मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान)


राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १३

वाकाटक राजघराणे
प्राचीन महाराष्ट्रात जी अत्यंत बलाढ्य व सुसमृद्ध अशी साम्राज्ये झाली त्यात वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. इ.स. २५० ते जवळपास इ.स. ५५० पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या तीनशे वर्षांच्या कालावधीत वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरा पर्यंत पसरवली. नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या मालव, मेकल व चेदी या देशांनीही त्याचे मांडलिकत्व काही काळासाठी पत्करलेले होते. 
असे हे सामर्थ्यशाली घराणे इतिहासाला १८३६ पर्यंत अज्ञात होते. इ.स. १८३६ मध्ये सिवनी येथे वाकाटक राजा द्वितीय प्रवरसेन याचा ताम्रपट सापडला व हे राजघराणे इतिहासाला ज्ञात झाले. पुराणांमध्ये मात्र वाकाटकांबद्दल काहीच लिहिलेलं नाही. त्यांचा पहिला राजा विंध्यशक्ती याचा मात्र उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. 
वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती पहिला याने केली. त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन हा त्याच्या नंतर राजा झाला. प्रवरसेनाच्या माघारी वाकाटकांच्या दोन शाखा महाराष्ट्रावर राज्य करू लागल्या. त्यांना ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्म शाखा असे म्हणतात.
वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत या दोनही भाषांतील कवींना उदार आश्रय दिला होता. विदर्भातील वाङ्मय निर्मितीमुळे तेथील वैदर्भी रीतींना प्राधान्य प्राप्त झालेले दिसते. कलिदासासरख्या कवीने देखील यावर काव्ये केलेली आहेत. त्याने आपल्या मेघदूत या महाकाव्यात विर्दभाचे वर्णन केलेले आहे.
वाकाटकांच्या काळात भारतीय समाजात अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये वाकाटकांचा मोठा हात होता. त्यांच्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कुशाण कारकीर्दीत सनातन धर्मास जी उतरती कळा लागली होती ती या गुप्त व वाकाटक काळात संपून सनातन धर्म पुन्हा उभारी धरू लागला. याच काळात संस्कृत भाषेच्या व वांगमयाच्या अभीवृद्धीची चळवळ सुरू झाली. यामुळेच गुप्त नृपतींनी सुद्धा संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. संस्कृतभाषे सोबतच शिल्पकला व चित्रकला यांचे पुनरुज्जीवन सुद्धा वाकाटकांच्या काळात झाले. त्याचे पूरावे त्यांच्या राज्यात असणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसते. 
वाकाटक राजांनी केवळ विद्वानांना वा कवींना आश्रयच नव्हता दिला तर ते स्वतः सुद्धा उत्तम काव्ये व सुभाषिते रचत. वाकाटक राजांनी रचलेली हरिविजय, सेतुबंध अथवा रावणवहो ही काव्ये तर अनेक सुभाषितांचे उल्लेख आजही अनेक ठिकाणी सापडतात. वाकाटकांनी स्वतः जी काव्ये रचली त्याची प्रशंसा बाण व दण्डी या सारख्या कवींनी केलेली आहेत.
त्यांच्याच काळात अजिंठातील काही लेण्या कोरल्या गेल्या. ज्यातील विहार, चैत्य, शिल्प, चित्र यांची प्रशंसा आजही जगभरात होते आहे.
अजिंठ्यातील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी ही वाकाटक कालीन असून ती लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी इतर लेण्यांपेक्षा उत्कृष्ठ आहेत. 
एकंदरीतच त्या काळातील संस्कृत भाषा, कला, वाङ्मय या सर्वांच्या पुनरुज्जीवनाचे सारे श्रेय जरी गुप्त राजांना दिले गेले असले तरी खऱ्या अर्थाने ते श्रेय वाकाटकांचेच आहे. 
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर


प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १४

विंध्यशक्ती पहिला
प्रथम विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा होय. याचे नाव पुराणांत तसेच अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यांमधील लेखात आलेले आहे. त्या लेखात विंध्यशक्तीचा हा द्विज म्हणजे ब्राह्मण असून त्याचे गोत्र विष्णूवृद्ध आहे असा उल्लेख आलेला आहे. त्यात विंध्यशक्ती चा 
' वाकाटकवंशकेतुः ' म्हणजे वाकाटक वंशाचे मानचिन्ह असा केलेला आहे. त्याची राजधानी ही पुरातन नगरी चनका ही होती. 
विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राजवटीमध्ये मोठ्या अधिकारावर असावा व त्यामुळेच त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असे वाटते. त्याने इ.स २५० ते २७० असे राज्य केले असावे असे अनुमान आहे. पुराणांमध्ये आलेली त्याची ९६ ही कालगणना त्याच्या कारकिर्दीची नसून त्याच्या वयोमानाची असावी असे वाटते.
पुराणांच्या मते वाकाटकांचा पहिला प्रसिद्ध राजा विंध्यशक्ती होय. त्याने आपले राज्य विदिशेच्या आसपास पसरवले व वाढत वाढत साम्राज्याच्या दर्जाला पोहचवले.
अजिंठ्याच्या लेखात विंध्यशक्तीची मोठी स्तुती केलेली आहे. ' त्याने मोठ्या मोठ्या लढायांत विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला तर प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी उडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्या पुढे विनम्र होत’. एकंदरीतच विंध्याशक्ती हा एक प्रबळ राजा होता. त्याचा पराक्रमाची तुलना प्रत्यक्ष इंद्र व विष्णूशी केलेली आहे.
त्याने आपल्या कारकीर्दीत चार अश्वमेध आणि आप्तोर्यांम, बृहस्पतिसव, ज्योतिष्टोम, वाजपेयादी यज्ञ केल्याचे दिसते. 
विंध्यशक्तीच्या माघारी त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला. वाकाटक घराण्यातील हा सर्वात महत्त्वाचा राजा होय.
- प्राजक्ता देगांवकर
 

संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १५

प्रथम प्रवरसेन

विंध्यशक्ती नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन हा राजगादी वर बसला. हा वाकाटक वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होय. त्याने आपले राज्य सर्व दिशात पसरवले होते. प्रवरसेनाने उत्तरेत नर्मदेपर्यंत स्वारी करून पुरीका नगरी जी नागराजा दौहीत्र शिशुक याच्या ताब्यात होती ती जिंकून घेतली व तिथे आपली राजधानी वसवली. दक्षिणेत उत्तर कुंतलातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर हा भाग ही त्याच्या ताब्यात असावा तर पूर्वेस दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र येथील राजांनी त्याचे वर्चस्व मान्य केले असावे. मात्र निश्चित पुराव्याअभावी प्रवरसेनाच्या साम्राज्याच्या सीमा सांगणे कठीण आहे. 
प्रवरसेन हा देखील आपल्या वडिलांनप्रमाणे वैदिकधर्माभिमानी होता. त्याने अनेक श्रौत याग केले. त्याच्या वंशजांच्या अनेक ताम्रपटात त्याने केलेल्या चार अशमेघ यज्ञांचा व सप्तसोम ( अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, व आप्तोर्याम ) यज्ञांचा उल्लेख आलेला आहे. पुराणांमध्ये त्याच्या वाजपेय यज्ञांचा व त्यात त्याने दिलेल्या बहुमूल्य दक्षिणांचा मुद्दाम निर्देश केलेला दिसतो. या वाजपेय यज्ञाच्या अनुष्ठानानंतर त्याने सम्राट ही अत्यंत मानार्ह पदवी धारण केली. दक्षिण भारतातील इतर कोणत्याही प्राचीन राजाने ही पदवी धारण केल्याचे इतिहासात नमूद नाही. 
त्याने आपल्या धर्मविजयत्वाची निदर्शक म्हणून ' धर्ममहाराज ' अशी उपाधीही धारण केली आपल्याला दिसते.
दक्षिण भारतात आपले सम्राटपद घोषित केल्यानंतर प्रवरसेनाने आपल्या उत्तर भारतातील सत्तेला बळकटी आणण्यासाठी तेथील भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडले. भारशिव हे नागवंशी असून मूळचे विदर्भातील असावेत. त्यांनी कुशाणांकडून हिंदूंना पवित्र असणारी प्रयाग व काशी ही दोन्ही धर्मक्षेत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. भारशिव नृपती भवनाग याने आपली पुत्री प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र यास दिली होती. या वैवाहिक संबंधाने उत्तर भारतातील प्रबळ अश्या राजसत्तेचे पाठबळ वाकाटकांना मिळाले व त्यांची राज्यसत्ता दृढमूल होण्यास मदत झाली. 
पूराणांनूसार प्रवरसेनांने साठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर वाकाटक राज्याची चार शकले पडली. वर उल्लेखिलेला गौतमीपुत्र आधीच मरण पावल्याने त्याचा पुत्र रुद्रसेन हा गादीवर आला. त्याने उत्तर विदर्भावर पुरिका वा नंदिवर्धन ( सध्याचे नगरधन ) येथून राज्य केले. प्रवर्सनाचा दुसरा मुलगा असणाऱ्या सर्वसेन याने वत्सगुल्म ( आत्ताचे वाशिम, जी.अकोला ) येथून दक्षिण विदर्भावर राज्य केले. उर्वरित दोन पुत्र कुठे राज्य करत असावेत हे नक्की सांगता येत नसले तरी त्यापैकी एक कृष्णा नदीच्या खोऱ्यात उत्तर कुंतलवर तर दुसरा दक्षिण कुंतलवर राज्य करत असावा. मात्र या दोनही शाखांचे राज्य लवकर संपुष्टात आल्याने त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही. 
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १६

प्रथम रुद्रसेन

प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र सातकर्णी हा पित्याच्या हयातीतच कालवश झाला होता. म्हणून सन ३३० च्या सुमारास प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू प्रथम रुद्रसेन हा गादीवर आला. ही वाकाटकांची ज्येष्ठ शाखा होय. हा चक्रवर्ती गुप्त सम्राट समुद्रगूप्ताचा समकालीन होता. भारशिव वंशाच्या भवनाग राजाचा हा नातू असल्यामुळे त्याला भारशिवांचे खूप मोठे सहाय्य लाभलेले होते. त्याच्या वंशजांच्या लेखात याचे वर्णन ' भारशिव महाराज भवनाग याचा दौहित्र ' असा येतो. 
या राजाचा फक्त एकच शिलालेख आज पर्यंत सापडलेला आहे. 'प्राण्यांचे बंधन व हिंसा कोणीही करू नये ' अशी आज्ञा असणारा अशोकाचा शिलालेख रूद्रसेनाने वरून छिलून त्यावर आपला लेख कोरलेला आहे. लेखाचा उद्देश त्या ठिकाणी राजा रुद्रसेनाचे धर्मस्थान होते हे जाहीर करणे हा होता. रुद्रसेन हा भगवान शंकराने दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याकरिता उत्पन्न केलेल्या महाभैरवाचा भक्त होता. 
त्याकाळी नर्मदेच्या उत्तरेस अनेक राज्ये होती. त्यातील अनेक राज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेऊन आपल्या राज्यात जोडली. समुद्रगूप्ताने ज्या राज्यांचा समूळ उच्छेद केला त्यामध्ये नागदत्त, गणपती नाग व नागसेन हे नाग राजे देखील होते. त्यातील गणपती नाग हा भारशिव नृपती भवनागाचा उत्तरअधिकरी असावा. भवनाग हा रूद्रसेनाचा मातुल घराण्यातील आजोबा. समुद्रगूप्ताने या सर्व नागवंशीय राजांचे समूळ उच्चाटन केल्याने रुद्रसेनाला उत्तरेतील या राजांच्या पाठबळाला मुकावे लागले आणि त्याचे सामर्थ्य कमी झाले. 
उत्तर भारत जिंकून घेतल्यावर समुद्रगूप्त दक्षिण दिग्विजय करण्यास निघाला. त्याने दक्षिणेतील कोसल देशाचा राजा असणाऱ्या महेंद्र याचा पराभव केला. समुद्रगुप्ताच्या या विजयाने वाकाटकांच्या सामर्थ्यास मोठाच धक्का बसला. महाकांतारचा व्याघ्रराज, कुराळचा मण्टराज, पिष्टपूरचा महेंद्रगिरी या राजांनी वाकाटकांचे वर्चस्व झुगारून देऊन गुप्तांचे स्वामित्व कबूल केले. त्यामुळे वाकाटकांच्या या ज्येष्ठ शाखेचे राज्य नर्मदा नदी आणि विंध्याद्री पर्वतराजी यापूरतेच मर्यादित झाले. 
रुद्रसनाचे राज्य छोटे झाले असले तरी त्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले आणि बलाढ्य समुद्रगूप्तापुढे मान तुकवली नाही. 
सन ३५० च्या सुमारास प्रथम रुद्रसेनाचा पुत्र पृथ्वीषेण हा राज्यावर आला. हा देखील आपल्या वडिलांप्रमाणे शिव भक्त होता. त्याचा एकही लेख सापडलेला नाही असे असले तरी त्याचे उल्लेख त्याच्या वंशजांच्या लेखात आलेले आहेत. त्यात तो सत्य, ऋजुत्व, कारुण्य, शौर्य, विक्रम, बुद्धिमत्व, मनोनैर्मल्य इत्यादी गुणांविषयी त्याची ख्याती होती असे समजते. त्याची तुलना अजातशत्रू धर्मराजा सोबत केलेली आहे. त्यावरून त्याने कधीही परराज्यपहरणाकरिता युद्ध केले नव्हते असे म्हणता येईल. त्याने राज्य प्रसारापेक्षा आपल्या प्रजेकडे जास्त लक्ष दिले. त्याच्या काळात समुद्रगूप्ताने उत्तरेतील क्षत्रप राजांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यावेळी दक्षिणेतील वाकाटकांनी सुद्धा त्याला मदत केली. गुप्त-वाकाटक युती मुळे क्षत्रपांचा सहज पाडाव झाला आणि उत्तर भारतातील गुप्तांचे राज्य निष्कंटक झाले. या प्रसंगी वाकाटकांशी घडून आलेल्या मैत्रीला चिरठायी बनवण्यासाठी चंद्रगुप्ताने आपली पुत्री प्रभावतीगुप्ता पृथ्वीषेणाचा पुत्र द्वितीय रुद्रसेन याला दिली. 
या घटनेपूर्वी पाच शतके आधी देखील शूंग काळात असाच माळवा आणि विदर्भ यांवर राज्यकरणार्या राजवंशात विवाहसंबंध आलेले होते. या पुरातन घटनेवर आधारलेले कविकुलगुरू कालिदासाचे 'मालविकाग्नीमित्र ' हे नाटक सुध्दा याच काळातील आहे. 
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १७

द्वितीय प्रवरसेन

प्रथम पृथ्वीसेना नंतर त्याचा पुत्र द्वितीय रूद्रसेन राज्य करू लागला. त्याचा पिता व पितामह हे शिवोपासक होते, पण हा स्वतः मात्र चक्रपाणीचा ( विष्णू ) भक्त होता व त्याच्याच उपासनेमुळे आपल्याला राज्य प्राप्ती झाली अशी त्याची श्रद्धा होती. याचे कारण त्याची अग्रमहिषी ( पट्टराणी ) प्रभावतीगुप्ता ही विष्णू उपासक असून तिचा प्रभाव द्वितीय रुद्रसेनावर पडला असावा. तिने रामटेकच्या टेकडीवरील आपले दोन्ही ताम्रपट हे प्रबोधिनी एकादशीस उपवास करून पारण्याच्या प्रसंगी दिलेले आहेत. राज्यारोहणानंतर लगेचच द्वितीय रूद्रसेनाचा मृत्यू झाला. त्याचे दोन्ही पुत्र हे अल्पवयीन असल्याने प्रभावतीगुप्ता हीच आपला वडील पुत्र दिवाकरसेन याच्या नावाने राज्यशकट चालवत होती. तिला राज्यकारभारात मदत करण्यासाठी तिचे वडिल असणार्या समुद्रगुप्ताने अनेक कारभारी आणि मुत्सद्दी पाठवले होते, त्यामध्येच कवी कुलगुरू कालिदास ही असावा. विदर्भात असताना त्याने आपले प्रसिद्ध खंडकाव्य मेघदूत हे रचले. यातील शापित यक्ष रामगिरि जवळच्या ( आजचे रामटेक ) आश्रमात राहत होता असे वर्णन आहे. दुर्दैवाने दिवकरसेनही अल्पायुषी ठरला. त्याच्या अकाली निधनानंतर त्याचा छोटा भाऊ दामोदरसेन हा गादीवर आला. राज्यारोहणाप्रसंगी त्याने आपला सुविख्यात पूर्वज प्रवरसेन याचे नाव धारण केले. त्याने जवळपास तीस वर्षे राज्यकारभार केला. त्याच्या काळात नंदिवर्धन ही काही काळासाठी राजधानी होती मात्र नंतर त्याने प्रवरपुर हे नविन शहर वसवून या नवीन वसवलेल्या नगरीत आपली राजधानी स्थापन केली. 
द्वितीय प्रवरसेन हा शिव उपासक होता. मात्र आपल्या वैष्णव उपासक मातेच्या प्रभावतीगुप्तेच्या आज्ञेवरून त्याने भगवान रामचंद्रांच्या चरित्रावर ‘सेतुबंध’ हे काव्य रचण्यास सुरुवात केली. मात्र त्यात खूपच अडचणी येऊ लागल्या, चुका होऊ लागल्या हे त्याने स्वतः सांगितले आहे. या वेळी त्याने कालिदासाची मदत घेतली असावी. या कारणाने ते काव्य प्रवरसेनाच्या नावावर मोडत असेल तरी ते समुद्रगूप्ताच्या आज्ञेवरून कालिदासाने लिहिले असावे अशी समजूत प्रचलित झाली. तिचा उल्लेख या काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या अखेरीस आढळतो. 
याच्या कारकिर्दीच्या शेवटी प्रभावतीगुप्ताचा मृत्यू झाला असावा. तिच्या स्मरणार्थ प्रवरसेन व त्याच्या बहिणीने रामटेक येथे ' प्रभावती स्वामिन ' या नावाने विष्णू ( नरसिंह) मंदिर बांधले, आणि सुदर्शन नावाचा तलाव ही खोदला. 
दुसऱ्या प्रवरसेनाच्या मृत्यू नंतर त्याचा पुत्र नरेंद्रसेन हा गादीवर आला.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १८

नरेंद्रसेन

द्वितीय प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन हा सन ४३० च्या सुमारास गादीवर आला. त्यावेळी त्याचे वय बरेच जास्त असावे कारण त्याचा पिता असणाऱ्या द्वितीय प्रवरसेनाने दीर्घकाळ राज्य केले होते. नरेंद्रसेनाचा एकही लेख आजपर्यंत सापडलेला नाही. मात्र त्याचा पुत्र व मांडलिक राजे यांच्या लेखात त्याचे उल्लेख आलेले आहेत.
नरेंद्रसेनाने आपल्या राज्याच्या पूर्व व उत्तर दिशेस आक्रमक धोरण अवलंबिलेले दिसते. त्याचा मुलगा पृथ्वीषेण याच्या बालाघाट ताम्रपटात नरेंद्रसेनाने शौर्याने आपल्या कोसला, मेकला आणि मालव या शत्रूंचा पराभव केला होता, व या देशांचे अधिपती त्याच्या आज्ञा शिरसावंद्य मानत होते, असे वर्णन आलेले आहे. त्या काळात उत्तरेतील गुप्त राजवट ही निर्बल झाली असल्याने  त्यांची या भागांवरील पकड सैल झाली होती, याचाच फायदा नरेंद्रसेनाने घेतला व आपला राज्यविस्तार केला.
नरेंद्रसेनाचे लग्न हे कुंतल नरेशाची कन्या अज्झितभट्टरिका हीचाशी झाला होता. यावरून नरेंद्रसेनाने राज्यविस्तारासोबतच इतर राज्यांशी वैवाहिक संबंधही जोडलेले दिसतात. 
नरेंद्रसेनाच्या अखेरच्या काळात वाकाटक राज्यसत्तेवर नल राजा भगदत्तवर्मा याने प्रचंड मोठी स्वारी करून वाकाटकांचा बराचसा भाग जिंकून घेतला. त्या काळात वाकाटकांच्या घराण्याला वाईट दिवस आल्याचे स्वतः वाकाटक मान्य करतात. कारण द्वितीय पृथ्वीषेणाचा उल्लेख बालाघाट ताम्रपटात 'निमग्न वंशाचा उद्धर्ता ' असा आलेला आहे. 
नरेंद्रसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा द्वितीय पृथ्वीषेण हा गादीवर आला. त्याने प्रतिकूल परिस्थिती पाहून आपली राजधानी प्रवरपुराहून हलवून ती भंडारा जिल्ह्यातील आमगाव जवळ पद्मपुरी येथे नेली. तिथे आपले लष्करी सामर्थ्य वाढवून त्याने नल राजांवर आक्रमण केले आणि त्यांचे विदर्भातून संपूर्ण उच्चाटन केले. एवढेच नाही तर त्यांची राजधानी असणारी पुष्करी ही नगरी सुद्धा त्याने उध्वस्त केली.
द्वितीय पृथ्वीषेणाने पूर्वे सोबतच उत्तरेत ही आपली सत्ता दृढ केली. त्याने मेकला देशाच्या उत्तरेस असलेल्या चेदी देशापर्यंत आपले राज्य वाढवले. हे राजे आधी गुप्तांचे मांडलिक होते मात्र नंतर त्यांनी वाकाटकांचे स्वामित्व स्वीकारल्याचे दिसते. 
वाकाटक राजे हे शिवोपासक होते. याला दोनच अपवाद आहेत ते म्हणजे द्वितीय रूद्रसेन आणि हा शेवटचा राजा द्वितीय पृथ्वीषेण होय. द्वितीय पृथ्वीषेण हा स्वतः ला ' परमभागवत ' ( विष्णूचा निस्सीम भक्त) म्हणवून घेत असे. त्याचा अंत सन ४९० च्या सुमारास झाला असावा. यानंतर ज्येष्ठ शाखेचा प्रदेश वत्सगुल्म शाखेच्या हरिषेण या नृपतीच्या साम्राज्यात विलीन झाला. 
याप्रमाणे जवळपास सन ३३० ते ४९० अश्या १६० वर्षांच्या शासनानंतर वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेचा अस्त झाला. या शाखेतील राजे शुर, राज्यशासनकुशल, दानशील, वैदिकधर्माभिमानी, साहित्य आणि शिल्पादी कलांचे भोक्ते व आश्रयदाते होते. त्यांनी बांधलेली देवालये आज अस्तित्वात नसली तरी रामटेक व पवनार येथील अवशेषांवरून त्यांची भव्यता व शिल्पांची सुबकता यांची कल्पना येते. त्यांच्या काळात अनेक काव्ये निर्माण होऊन वैदर्भी रीतीला सर्वत्र मान्यता मिळाली. त्यातील कवी कुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे संस्कृत महाकाव्य तर द्वितीय प्रवरसेनाचे महाराष्ट्री प्राकृतातील सेतूबंध किंवा रावणहो या काव्यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे वाकाटकांच्या जेष्ठ शाखेतील राजे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे शासनकर्ते ठरले.

संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १९

राजा सर्वसेन

आत्तापर्यंत आपण वाकाटकांची ज्येष्ठ वा नंदिवर्धन ही शाखा बघितली, आता वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेतील काही महत्त्वाचे राजे पुढील भागात पाहू.
वत्सगूल्म शाखेची माहिती इतिहासाला तब्बल एकोणिसाव्या शतकापर्यंत नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठ्याच्या सोळा नंबरच्या लेण्यांमध्ये आहेत मात्र तो लेख अत्यंत खराब झाल्याने ती नावे बरोबर वाचता येत नव्हती. इ.स. १९३९ मध्ये वाशिम येथे ताम्रपट सापडला आणि या सर्व राजांची नावे वाचता आली. सोबतच या ताम्रपटावरून विंद्याध्री पर्वताच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी महत्त्वाची शाखा राज्य करत होती हे देखील सिद्ध झाले. 
या शाखेचा संस्थापक हा प्रथम प्रवरसेनाचा पुत्र सर्वसेन हा होता. याचे नाव अजिंठ्याच्या लेखात आणि वाशिम ताम्रपटात सुद्धा आले आहे. हा प्रवरसेनाचा धाकटा पुत्र असावा. त्याचा अंमल हा उत्तरेतील विंध्याद्री पासून, दक्षिणेत गोदावरी पर्यंत पसरलेला होता. या प्रदेशावर आपले स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी त्याला सोम नामक ब्राह्मणाचा पुत्र असणाऱ्या रवी या सचिवाने मदत केली होती. या रवीचे वंशज नंतर वत्सगूल्मच्या वाकाटकांचे कित्येक पिढ्यांपर्यंत मुख्य प्रधान झाले व त्यांची त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली. 
सर्वसेनाने आपल्या राजधानीसाठी वत्सगूल्म या प्राचीन पुण्यक्षेत्राची निवड केली. हे वत्सगुल्म म्हणजे आत्ताचे वाशिम होय. ‘ वत्सगुल्ममाहात्म्या’त म्हटले आहे की वत्स नामक ऋषींनी आपल्या आश्रमाजवळ देवांच्या गुल्मांची ( समुहांची) वस्ती करवली होती म्हणून त्याला वत्सगुल्म हे नाव पडले. वाकाटकांच्या राजवटीमध्ये वत्सगुल्म राजधानीची विद्या व संस्कृती यांचे प्रमुख केंद्र म्हणून मोठी ख्याती झाली सोबतच तेथील उत्कृष्ट प्राकृत काव्यामुळे ' वच्छोमी ' रीती सर्वत्र मान्यता पावली. 
सर्वसेनाने आपल्या वडिलांप्रमाणेच 'धर्ममहाराज ' ही पदवी धारण केलेली दिसते. त्याने ‘हरिविजय’ हे काव्य महाराष्ट्री प्राकृतात रचले होते. त्या काव्याची स्तुती संस्कृत कवी व अलंकारिक यांनी मुक्तकंठाने केलेली आहे. सर्वसेनाने सुमारे सन ३३० ते ३५५ अशी २५ वर्षे राज्य केले.  
त्याच्या माघारी विंध्यसेन हा राजगादी वर आला. याने चढाईचे धोरण स्वीकारले असावे. कारण त्याने कुंतलेशाचा पराभव केला असा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. 
याच राजाने दिलेला वाशिम ताम्रपट हा वाकाटकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा पुरावा आहे. विंध्यसेनाने वाशिम ताम्रपट हा आपल्या कारकिर्दीच्या ३७ व्या वर्षी वत्सगुल्म राजधानी मधून दिला होता. या ताम्रपटात नंदिकोट जिल्ह्यातील एक गाव दान दिल्याचा निर्देश आहे. हे नंदिकोट म्हणजे हैद्राबाद संस्थानातील सध्याचे नांदेड होय. 
या ताम्रपटातील लेखाच्या सुरुवातीचा भाग हा राजवंशप्रशस्तीपर असून तो संस्कृत मध्ये आहे तर दानविषयक भाग हा प्राकृत मध्ये आहे. या आधील काही ताम्रपट मात्र संपूर्ण प्राकृत भाषेमध्ये कोरले गेलेले दिसतात. यावरून वाकाटक राजदरबारात संस्कृत भाषा हळू हळू मान्यता पावू लागल्याचे दिसते. 
विंध्यसेनाने आपल्या दोन्ही पूर्वजांप्रमाणे 'धर्ममहाराज ' ही पदवी धारण केली होती. विंध्यसेन हा नंदिवर्धनच्या प्रथम पृथ्वीषेणाचा समकालिन होता.

- प्राजक्ता देगांवकर

संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 


 




 
 
 
 

विदर्भाचा प्राचीन इतिहास

 https://vidarbha-darshan.blogspot.com/2017/02/blog-post_28.html

Unknown

विदर्भाचा प्राचीन इतिहास :-

विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती.

गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात.

सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश होता. सातवाहन राज्यात व्यापार होता. 'गाथा सप्तशती'हा ग्रंथ त्याच काळातला. गुणाढ्या ची 'बृहत्कथा' हि देखील त्या काळातली.

वाकाटक वंशाने प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे तीनशे वर्ष  विदर्भावर राज्य केले.ते गुप्तांचे समकालीन समजले जातात. वत्सगुल्म ( वाशीम) हि वाकाटकांची राजधानी.

त्या काळातील विदर्भाच्या भौगोलिक सीमा ह्या उत्तरेस माळवा , पूर्वेला छत्तीसगड, ओरिसाचा काही भाग  व आंध्र, पश्चिमेस मध्य व दक्षिण गुजरात राज्य व महाराष्ट्रात नाशिक  पर्यंत आणि दक्षिणेस कुंतल म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या होत्या. हेरेशनाची सत्ता तर अरबी समुद्रापर्यंत पसरली होती.

विदर्भाने सहिष्णुतेचा संस्कार जपलेला आहे. कालिदासाचे 'मेघदूत' सर्वसेनाचा 'हरिविजय' हे ग्रंथ विदर्भातच निर्मिले गेले.

मराठी भाषेला भूषणा वह ठरलेल्या महानुभावांच्या परंपरेतील गोविन्द्प्रभू हे विदर्भाचे. त्यांची अमरावती जिल्ह्यातील रुद्धीपूर, रिद्धपूर हि कर्मभूमी. ती महानुभावांची काशी समजली जाते. ते महानुभाव पंथाचे उगमस्थान. खुद्द चक्रधर स्वामींचे वास्तव्य विदर्भात रामटेक, मेहकर,लोणार, रुद्धीपूर, सालबर्डी व अमरावती सारख्या  यासारख्या ठिकाणी राहिले आहे.

शुक्राचार्य,दमन, मृदगल , जमदग्नी, मार्कांद्देय या ऋषींची स्थळे विदर्भात पयोष्णी म्हणजेच पूर्णा नदी काठची. वरदा, वसिष्ठा, विदर्भ म्हणजे वर्धा, वेणा अर्थात वैनगंगा आणि प्रणिता अर्थात पेनगंगा ह्या विदर्भातील नद्यांचे उल्लेख महाभारतापासून सापडतात.

उल्कापातामुळे तयार झालेले जागतिक ख्यातीचे लोणार सरोवर विदर्भातले. अमरावती हे मुळातले ' उमरावती' . यादवच्या पैठण आणि उमरावती या दोन  राजधाण्यापैकी एक. गणेशपुराणात वर्णन असलेले कळंब हे यवतमाळ जिल्ह्यातले.

जैनांचे पवित्र स्थान 'मुक्तागीरी' हे एलीचपूर च्या जवळ आहे. एलीचपूर हे तर 'ईल ' या जैन राजाने वसवल्याची कथा प्रचलित आहे. 'शिरपूर' हे जैनांचे पवित्र स्थानही विदर्भात आहे.

शिवाजीराजांचा तीन दिवस मुक्काम लाभलेले व त्यावेळी त्यांनी कस्तुरींचे उंट विकत घेऊन  ती कस्तुरी ज्या  मातीत टाकण्याची कथा
सांगितली जाते, ती माती विदर्भाच्या कारंजाची. मुळात ते दत्ताचे ठाणे. सिंदखेडराजा  हे  तर जीजामातेचे माहेरघर!

अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या स्वारीहून परततांना एलीचपूर चा ताबा घेऊन आपला अधिकारी तेथे नेमला होता. पुढे, तो रामचंद्र देवाकडे गेला. त्याला खंडणी मात्र खिलजीकडे पाठवावी लागत होती. खिलजीचा विदर्भावर अंमल १३१८ पासून सुरु झाला.एलीचपूर हे मुसलमान शासनाचे महत्वाचे केंद्र बनले ते इंग्रजी राजवटी पर्यंत. पुढे, तुघलक घराण्याचा प्रतिनिधी उमाद उल-मुल्क हा वर्हाडात नेमला होता. ( क्रमशः )

Source - प्रदीप धामणकर, पांढरकवड़ा जि. यवतमाळ

 
 वाकाटक राजवंश हा एक प्राचीन भारतीय राजवंश होता ज्याने 3ऱ्या ते 5 व्या शतक या काळात सध्याच्या मध्य आणि पश्चिम भारताच्या काही भागांवर राज्य केले. ते कला, वास्तुकला आणि साहित्य यांच्या संरक्षणासाठी ओळखले जात होते आणि त्यांनी त्यांच्या काळात या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

वाकाटक घराण्याची इतिहास दस्तऐवजीकरण केलेला नाही, परंतु त्यांनी दख्खन प्रदेशातून राज्यविस्तार केला असे मानले जाते. राजवंशाचा संस्थापक विंध्यशक्ती होता, ज्याचा उल्लेख विविध शिलालेख मध्ये आढळतो. त्याने वत्सगुल्मा (सध्याचे महाराष्ट्रातील वाशीम) येथे राजधानीसह विदर्भात आपले राज्य स्थापन केले. विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा मानला जातो, जरी काही इतिहासकार या दाव्यावर वाद घालतात.

विंध्यशक्तीचा मुलगा प्रवरसेन पहिला (इ. स. २७०-३३०) याच्या काळात वाकाटक घराण्याला महत्त्व प्राप्त झाले. प्रवरसेन I ने राज्याचा विस्तार केला आणि इतर समकालीन शक्तींशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. ते संस्कृत साहित्य आणि काव्याच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी स्वतः "प्रवरसेनविलास" नावाचे प्रसिद्ध संस्कृत नाटक रचले.

वाकाटक घराण्याचा सर्वात प्रतिष्ठित शासक प्रवरसेन दुसरा (सी. ३८५-४१५) होता. त्याने राज्याच्या सीमांचा आणखी विस्तार केला आणि एक शक्तिशाली साम्राज्य स्थापन केले ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या भागांचा समावेश होता. प्रवरसेन II च्या कारकिर्दीत मोठ्या समृद्धीचा आणि सांस्कृतिक भरभराटीचा काळ होता. तो कला आणि साहित्याचे संरक्षक होताआणि त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध विद्वान आणि कवी आकर्षित झाले.

वाकाटक राजघराण्यातील एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांचे वास्तुशास्त्रीय योगदान. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा येथील खडक कापलेल्या बौद्ध लेण्या त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झाल्या या लेण्या बौद्ध कला आणि पौराणिक कथांचे विविध पैलू दर्शविणाऱ्या त्यांच्या उत्कृष्ट भित्तिचित्र आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत.

द्वितीय प्रवरसेनच्या मृत्यूनंतर वाकाटक राजवंशाचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला. अंतर्गत संघर्ष, प्रादेशिक विद्रोह आणि बाह्य आक्रमणांनी त्यांची शक्ती कमकुवत केली. 5 व्या शतकाच्या मध्यापर्यंत, वाकाटक राज्य मोठ्या प्रमाणावर या प्रदेशातील उदयोन्मुख शक्तींनी ग्रासित केले होते, जसे की चालुक्य आणि गुप्त.

वाकाटक राजवंशाचा इतिहास प्रामुख्याने शिलालेख, नाणी आणि तत्कालीन साहित्यकृतींद्वारे ओळखला जातो. त्यांचा वारसा, विशेषत: कला आणि वास्तुकला क्षेत्रातील, आजही भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदान म्हणून प्रशंसा आणि अभ्यास केला जातो

वाकाटक हा एक राजवंश होता ज्याने 3 ते 6 व्या शतकापर्यंत मध्य आणि पश्चिम भारताच्या काही भागांवर राज्य केले. त्यांची स्थापना विंध्यशक्तीने केली, ज्यांनी 250 ते 270 CE पर्यंत राज्य केले. वाकाटक हे मुळात सातवाहनांचे वंशज होते, पण ते कालांतराने स्वतंत्र झाले.

प्रवरसेन पहिला (३५५-३८०) आणि त्याचा मुलगा रुद्रसेन दुसरा (३८०-४०० सी.ई.) यांच्या राजवटीत वाकाटकांनी शिखर गाठले. त्यांच्या कारकिर्दीत, वाकाटकांनी आधुनिक काळातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील काही भागांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रदेशावर नियंत्रण ठेवले. ते कला आणि साहित्याचे संरक्षक होते आणि त्यांनी अनेक मंदिरे आणि इतर इमारतींचे काम केले.

इ.स. 5 व्या शतकात वाकाटकांचा नाश झाला आणि ते अखेरीस गुप्तांनी जिंकले. तथापि, त्यांनी एक चिरस्थायी वारसा सोडला आणि त्यांच्या कला आणि वास्तुकलेचा नंतरच्या राजवंशांवर प्रभाव पडला.


प्राचीन काळात भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यामध्ये 'वाकाटक' साम्राज्याचा अंतर्भाव करावा लागेल. वाकाटक राज्य 'विंध्यशक्ती' याने स्थापन केले आणि त्याचा मुलगा 'प्रवरसेन' याने ते राज्य सांभाळले आणि वाढवले सुद्धा!

या राजघराण्याचा मूळ पुरुष 'वाकाटक' हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख पूर्वीच्या आंध्रप्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे.

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात देखील या घराण्यातील पहिला राजपुरुष 'विंध्यशक्ती' याला ‘द्विज’ म्हटले आहे. त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते, असे दिसते.

मूलस्थान-

वाकाटक घराणे मूळचे उत्तर भारतातील होते, असे काही पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात 'बागाट' नावाचे एक गाव आहे. त्याचे मूळ नाव 'वाकाट' असावे आणि तेच वाकाटकांचे मूलस्थान असावे, असे अनुमान डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांनी केले आहे. पण ते सिद्ध करण्याजोगा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. शिवाय वाकाटकांचा एकही शिलालेख विंध्य पर्वताच्या उत्तरेला सापडलेला नाही.

कंकाली देवी मंदिर, तिगावा (जि. जबलपूर) 👇

वऱ्हांड्यातील छतावरील दंपती शिल्प, गुहा क्र. १६, अजिंठा 👇

वाकाटककांचे बहुतेक सर्व ताम्रपट विदर्भात सापडले आहेत. डॉ. वा. वि. मिराशी यांच्या मते वाकाटक घराणे मूळचे दक्षिण भारतातील होते. वाकाटक हे नाव असलेला सर्वात प्राचीन शिलालेख अमरावती जवळ असलेल्या एका स्तंभावर कोरलेला आहे. या लेखातील वाकाटक हे 'वंशनाम' नसून 'व्यक्तीनाम' आहे. त्यावरून आणि आणखी काही प्रमाणे देऊन हे घराणे दाक्षिणात्य होते, असे डॉ. मिराशी यांनी म्हटले आहे.

तथापि वाकाटकांचे मूळ स्थान कोणते हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे. पण डॉ. पु. ग. सहस्त्रबुध्दे यांच्या मते, वाकाटक राजांची कर्मभूमी कोणती होती व ते कोणत्या प्रदेशांना साम्राज्याचे भाग मानीत, या गोष्टींना अधिक महत्व आहे आणि तेच खरे निकष आहेत.

शिलालेख आणि ताम्रपटांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की, वाकाटकांच्या राज्याची स्थापना सर्वप्रथम विदर्भात झाली.

रामटेक जवळची 'नंदीवर्धन' ही त्यांची पहिली राजधानी होती तर 'वत्सगुल्म' व 'प्रवरपूर' (पवनार) ह्या नंतरच्या राजधान्या होत्या.

वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुंतल, अश्मक व मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशांवर होते आणि त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र ह्या प्रदेशांवर होते.

वाकाटकांचे बहुतेक कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या राजवटीतील लेण्या महाराष्ट्रातच आहेत. त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी होती. यावरून हे घराणे महाराष्ट्रीय होते, हे दिसून येते.

विंध्यशक्ती पहिला (इ.स. २५० ते २७०)-

'वाकाटक' वंशातला हा पहिला राजा सातवाहनांचा मोठा अधिकारी असावा आणि सातवाहनांची सत्ता क्षीण झाल्यानंतर त्याने विदर्भात स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे, असे म. म. मिराशींचे अनुमान आहे. पुराणातील वर्णनावरून तो विदिशेचा असावा, असेही अनुमान निघते. पण मिराशींच्या मते ते बरोबर नाही.

अजिंठा येथील लेखात विंध्यशक्तीच्या पराक्रमाचे खूप वर्णन केलेले असून त्याला 'वाकाटकवंशकेतू' म्हटले आहे.

काही विद्वानांच्या मते, त्याचे खरे नाव वेगळेच असून विंध्यपर्वतापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केल्यानंतर त्याचे द्योतक म्हणून त्याने 'विंध्यशक्ती' हे बिरूद धारण केले होते. पण पुराणातील वर्णनावरून हा विस्तार त्याच्या पुत्राच्या वेळी झाला, असे दिसते. वाकाटकांच्या दानपत्रात विंध्यशक्तीचे नाव नाही. त्यातील वंशावळ प्रथम प्रवरसेनापासून सुरू होते, कारण तोच साम्राज्य संस्थापक होता.

प्रवरसेन पहिला (इ स २७० ते ३३०)-

विंध्यशक्तीच्या नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन गादीवर बसला. पुराणात त्याला 'प्रवीर' म्हटले आहे. तो या वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होता. त्याने नर्मदेपर्यंत स्वारी करून 'पुरिका' ही नगरी जिंकली. ही नगरी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी होती, असे हरिवंशात म्हटले आहे. पूर्वेकडील दक्षिण कोसल, कलिंग, आंध्र आणि दक्षिणेकडील उत्तर कुंतल या प्रदेशांतील लहान-लहान राज्यांनी प्रवरसेनाचे वर्चस्व मान्य केले असावे. 'पुरिका' ही त्याची राजधानी होती.

प्रवरसेन हा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याच्या वंशजांच्या बहुतेक सर्व ताम्रपटात त्याने केलेल्या चार अश्वमेधांचा व सात सोम यागांचा उल्लेख आढळतो. त्याने 'धर्म महाराज' व 'सम्राट' या पदव्या धारण केल्या होत्या.

आपल्या साम्राज्याला बळकटी आणण्यासाठी प्रवरसेनाने नागवंशी भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडला. भारशिव नृपती भगनाग याने आपली कन्या प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र याला दिली.

प्रवरसेनाला चार पुत्र होते. ते सर्व राजे झाले. वाशीम येथील ताम्रपटात सर्वसेन याचा उल्लेख आलेला आहे. गौतमीपुत्र अगोदरच निधन पावला होता. त्याचा पुत्र रूद्रसेन हा प्रवरसेनानंतर गादीवर बसला. तो कदाचित 'पुरिका' येथून राज्य करीत असावा किंवा त्याने आपली राजधानी नंदीवर्धन (नगरधन) येथे नेली असावी. त्याची सत्ता उत्तर विदर्भावर होती. दुसरा पुत्र सर्वसेन याचे राज्य दक्षिण विदर्भावर होते. त्याची राजधानी वत्सगुल्म (वाशीम) होती. इतर दोन पुत्रांची माहिती उपलब्ध नाही.

'हरिषेण' हा वत्सगुल्म शाखेचा शेवटचा ज्ञात राजा होय. त्याच्यानंतर एक-दोन राजे होऊन गेले असावे, पण त्यांची नावे माहीत नाहीत. इ स ५५० च्या सुमारास माहीष्मतीच्या 'कलचुरी' राजाने विदर्भात राज्य स्थापन केले, असे दिसते. त्यावरून हरिषेणानंतर लवकरच वाकाटकांचे राज्य नाश पावले असावे.


'वाकाटक' हे अत्यंत शांतता प्रिय राजे होते. वाकाटकांच्या काळात विदर्भाची अत्यंत भरभराट झाली होती.

त्यांचे साम्राज्य उत्तरेत माळव्यापासून दक्षिणेत तुंगभद्रेच्या खोऱ्यापर्यंत आणि पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते.

त्यांचे राज्यशासन कार्यक्षम होतेच शिवाय राज्यात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि समृद्धी नांदत होती. त्यांनी न्यायाने राज्यकारभार चालवला आणि विदर्भाचे नाव उज्ज्वल केले! म्हणून त्या काळाला विदर्भाच्या प्राचीन इतिहासातील सुवर्णयुग म्हणता येईल.

त्याकाळात विदर्भात संस्कृत आणि प्राकृत वाङ्मय, कला कौशल्य व व्यापार यांना उत्तेजन मिळून विदर्भाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. (उदा. कालिदास लिखित 'मेघदूत')

वाकाटक राजांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिल्यामुळे त्यांचा अभूतपूर्व विकास झाला. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. तसेच अनेक यज्ञ केले आणि पौराणिक धर्माचाही पुरस्कार केला.

विविध प्राण्यांचा शिल्पपट्ट, गुहा क्र. १७, अजिंठा 👇

'वाकाटक' घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घराण्यातील राजे, महाराजे यांनी केलेल्या कामांचे अनेक शिलालेख आणि ताम्रपट बनवले. विदर्भातच नव्हे तर विदर्भाच्या बाहेरही शेतात माती खोदताना किंवा घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना वाकाटकांचे ताम्रपट नागरिकांना सापडले आहेत. अजिंठ्याच्या लेण्यांमधील शिलालेखातही वाकाटकांची बरीच माहिती आहे. त्यामुळे वाकाटकांचा बराच इतिहास समोर आला आहे.

चित्रस्त्रोत: मराठी विश्वकोश

संदर्भ व माहितीस्रोत:

१. भारतीय संस्कृतिकोश खंड ८

२. मराठी विश्वकोश

 ·
फॉलो करा

वाकाटक घराणे :-

वाकाटक म्हणजे महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश…!.

या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

राज्य संस्थापक - विंध्यशक्ती

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.

वाकाटक राज वैभव

वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या नंदीवर्धन ( नगरधन - रामगिरी) (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते.

त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे.

पुढे या राज्याची विभागणी झाली तेव्हा दुसरी राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे वसविण्यात आली.

स्रोत :

 ·
फॉलो करा

वाकाटक राजा प्रवरसेन (दुसरा) ह्याने ५व्या शतकात महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत रावणवहो नामक काव्याची रचना केली असे मानले जाते. रावणवहोचा मराठीत अर्थ 'रावणवध' असा होतो. ह्या काव्यरचनेस सेतुबंध असेही नाव आहे.

वत्सगुल्म (आजचे वाशिम) ही वाकाटकांची राजधानी होय. नागपूरच्या रामटेक तालुक्यात मानसर येथे उत्खननात सापडलेले ५व्या शतकातील प्राचीन प्रवरेश्वर शिव मंदिरही प्रवरसेन दुसरा ह्याने बांधलेले मानले जाते.

मानसर येथील मंदिराचे अवशेष

प्रवरेश्वर शिवलिंग


वाकाटक
----------------
सातवाहन कालानंतर उदयास आलेला हा एक बलाढ्य राजवंश.विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र(थोडासा भाग) तसेच म प्र मधील विदर्भाशी लागुन असलेला भाग यात या वंशातील राजांचे ताम्रपट,शिलालेख ई अनेक वस्तु सापडल्या. सातपुडा खालील मोठ्या भुभागावर राज्य जवळपास २७५ वर्ष अस्तित्वात होते.
१) गेल्या दशकात लागलेल्या नवीन शोधान्च्या आधारे असे दिसुन येते की वाकाटक वंशाच्या ४ शाखा होत्या: प्रवर पुर-नंदिवर्धन,वत्सगुल्म,एक अमरावती जिल्ह्यात ,एक अजुन आहे (ह्या शेवटच्या दोन्ही शाखांची माहिती अजुन तेवढी समोर आलेली नाही)
२) प्रवरपुर-नंदिवर्धन: वाकाटक मुळ पुरुष हा विन्ध्यशक्ति १. अजंता येथील गुफा क्र १६ येथे वाकाटक देवसेन चा लेख आहे त्यात पूर्ण वंशावळ आहे.ह्या लेखावरुन असे प्रतीत होते की वाकाटक हे "द्विज" ,विश्नुवृद्ध गोत्राचे होते. विन्ध्यशक्ति १ नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन १ हा राजा झाला .यास ४ पुत्र : रुद्रसेन(नंदिवर्धन)सर्वसेन(वत्सगुल्म). बाकी २ पुत्र व त्याचे राज्य कुठवर होते हे आज पुराव्या अभावी स्पष्ट नाही.रुद्रसेन १ हा प्रवरसेन चा नातू व् गौतमीपुत्र चा मुलगा होता. रुद्रसेन १>पृथ्वी सेन १>रुद्रसेन २(याचा विवाह चन्द्रगुप्त २ कन्या प्रभावती शी झाला). यास किती पुत्र होते यावर मतभेद आहेत. मिराशी ह्यानी दामोदर सेन ला प्रवरसेन २असे म्हटलेले आहे. काहींच्या मते दिवाकर,दामोदर,प्रवरसेन अशी ३ मुले होती. प्रवरसेन २ हा सर्वात बलाढ्य राजा होता,सर्वात जास्त ताम्रपट व् लेख याचेच आहेत. प्रवरसेन २>नरेंद्र सेन>पृथ्वी सेन अशी ही पुढील वंशावली.
३) वत्सगुल्म: सर्वसेन>विन्ध्यशक्ति २>?>?>देवसेन>हरिषेण>?. हरिषेण ह्याने आंध्रातिल सालंकायन वंशी राजास पदच्युत करून ते गोविंदवर्मा ह्यास दिले.ह्याचा पुत्र माधववर्मा १ चा विवाह एका वाकाटक राजकन्येशी झाला होता.
४) धर्मं: वाकाटक काली वैदिक ,जैन ,बौद्ध व् त्यांच्या अनेक शाखा अस्तिवात होत्या. आहार: लेखान्वरुन असे दिसते की या काली दूध,दही,लोणी,तूप,तांदुळ,मग,उडीद,गहू,तीळ,साखर,हरभरा,मोहरी ,कारले,गुळ,विभिन्न फळ यांच्या वापर होई.तांदुळ,गहू+जवस खिरी,तांदुलाचा भात असे पदार्थ प्रचलित होते.काही लोक (कोण हे सांगता येणार नाही पण बहुधा सैनिक व् समाजातील इतर लोक हे मांस भक्षण पण करत)
५) साहीत्य: नागार्जुन नामक एक संस्कृत ग्रंथकार याच कालात होऊन गेला. दिवाकर सेन रचित काही श्लोक हे सुदुक्ति/कर्नामृत नामक श्रीधरदास रचीत ग्रंथात आहेत. प्राकृत: सर्वसेनाचा हरिविजय,प्रवरसेन २ सेतुबंध असे ग्रंथ रचल्या गेले.

-संदर्भ: वाकाटक नृपती व् त्यांचा काल - वा वि मिराशी
 
 
 
 
 
 
 

वाकाटक राजवंश

वाकाटक राजवंश ( IAST : Vākāṭaka ) हा एक प्राचीन भारतीय राजवंश होता जो इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यात दख्खनमधून उदयास आला. त्यांचे राज्य उत्तरेकडील मालवा आणि गुजरातच्या दक्षिणेकडील कडांपासून दक्षिणेकडील तुंगभद्रा नदीपर्यंत तसेच पश्चिमेकडील अरबी समुद्रापासून पूर्वेकडील छत्तीसगडच्या काठापर्यंत पसरलेले असल्याचे मानले जाते. ते दख्खनमधील सातवाहनांचे सर्वात महत्वाचे उत्तराधिकारी होते आणि उत्तर भारतातील गुप्तांच्या समकालीन होते .

वाकाटक राजवंश
सुमारे  २५० - सुमारे  ५१०
भांडवलवत्सगुल्मा (आता वाशिम )
सामान्य भाषामहाराष्ट्री प्राकृत [ 2 ]
संस्कृत
धर्म
हिंदू धर्म
बौद्ध धर्म
जैन धर्म
सरकारराजेशाही
महाराजा [ 3 ] 

• २५०-२७०
विंध्यशक्ती
• २७०–३३०
प्रवरसेन पहिला
• ४८०–५१०
हरीशेना
ऐतिहासिक काळशास्त्रीय भारत

• स्थापना
सुमारे  २५०
• निष्क्रिय
इ.स.  ५१०
त्यांच्या आधी
यांच्यानंतर
पश्चिम क्षत्रप
सातवाहन राजवंश
अभिरा राजवंश
महिष्मतीच्या कालाचुरी
विष्णुकुंडिना
चालुक्य राजवंश
राजर्सितुल्यकुला
आजचा भागभारत

या घराण्याचे संस्थापक विंध्यशक्ती ( इ.स.  २५०-२७० ) यांच्याबद्दल फारसे माहिती नाही . त्यांचा मुलगा प्रवरसेन पहिला याच्या कारकिर्दीत प्रादेशिक विस्तार सुरू झाला . सामान्यतः असे मानले जाते की वाकाटक राजवंश प्रवरसेन पहिला नंतर चार शाखांमध्ये विभागला गेला. दोन शाखा ज्ञात आहेत आणि दोन अज्ञात आहेत. ज्ञात शाखा म्हणजे प्रवरपुर-नंदीवर्धन शाखा आणि वत्सगुल्म शाखा. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याने आपल्या मुलीचे लग्न वाकाटक राजघराण्याशी केले आणि त्यांच्या पाठिंब्याने चौथ्या शतकात शक क्षत्रपांकडून गुजरात जिंकला वाकाटकांनी सोडलेली शक्तीची पोकळी दख्खन प्रदेशातील बदामीच्या चालुक्यांनी भरून काढली  ] वाकाटक कला , वास्तुकला आणि साहित्याचे संरक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सार्वजनिक कामे केली आणि त्यांची स्मारके एक दृश्यमान वारसा आहेत. अजिंठा लेण्यांमधील ( युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ ) दगडात कोरलेले बौद्ध विहार आणि चैत्य वाकाटक राजा हरिषेण यांच्या संरक्षणाखाली बांधले गेले .

विंध्यशक्ती

या राजवंशाचे संस्थापक विंध्यशक्ती ( इ.स.  २५०-२७० ) होते, ज्यांचे नाव विंध्यवासिनी देवीच्या नावावरून पडले आहे . या राजवंशाची उत्पत्ती कदाचित येथून झाली असावी. वाकाटकांच्या संस्थापक विंध्यशक्तीबद्दल जवळजवळ काहीही माहिती नाही. अजिंठाच्या गुहेच्या सोळाव्या शिलालेखात त्यांचे वर्णन वाकाटक घराण्याचा ध्वज आणि द्विज असे करण्यात आले आहे . या शिलालेखात असे म्हटले आहे की त्यांनी मोठ्या लढाया लढून आपल्या शक्तीत भर घातली आणि त्यांच्याकडे मोठा घोडदळ होता. परंतु या शिलालेखात त्यांच्या नावापुढे कोणताही राजेशाही उपाधी लावलेला नाही. पुराणात असे म्हटले आहे की त्यांनी ९६ वर्षे राज्य केले. त्यांना दक्षिण दख्खन, मध्य प्रदेश आणि माळवा येथे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. के.पी. जयस्वाल झाशी जिल्ह्यातील बागट हे गाव वाकाटकांचे घर असल्याचे मानतात. परंतु वाकाटकांच्या उत्तरेकडील घराण्याबद्दलच्या सिद्धांताचे खंडन केल्यानंतर, व्ही.व्ही. मिराशी असे नमूद करतात की वाकाटक नावाचा सर्वात जुना उल्लेख अमरावती येथील एका स्तंभाच्या तुकड्यावर सापडलेल्या शिलालेखात आढळतो ज्यामध्ये गृहपती (गृहस्थ) वाकाटक आणि त्याच्या दोन पत्नींच्या भेटीची नोंद आहे . हा गृहपती बहुधा विद्याशक्तीचा पूर्वज होता. पुराणांमधून असे दिसून येते की विंध्यशक्ती हा विदिशा (सध्याच्या मध्य प्रदेश राज्यात) चा शासक होता परंतु ते बरोबर मानले जात नाही. [ 5 ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

समुद्र गुप्ताच्या अलाहाबाद स्तंभ शिलालेखात रुद्र देवाची ओळख रुद्र सेना प्रथमशी असल्याचे नाकारणारे डॉ. मिराशी यांच्या मते. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले आहे की वाकाटकांची नाणी नाहीत आणि विंध्यवासाच्या उत्तरेला त्यांचे कोणतेही शिलालेख नाहीत. म्हणूनच, वाकाटकांचे दक्षिणेकडील घर योग्य आहे. तथापि, हे खरे आहे की त्यांनी यापैकी काही ठिकाणी राज्य केले आहे, कारण शिलालेख मध्य प्रदेशात उपलब्ध होते. उद्धरण आवश्यक ]

प्रवरसेन पहिला

पुढचा शासक प्रवरसेन पहिला (२७०-३३०) होता, ज्याने राज्याला एक महान शक्ती म्हणून राखले, तो पहिला वाकाटक शासक होता, ज्याने स्वतःला सम्राट (सार्वत्रिक शासक) म्हटले आणि नागा राजांशी युद्धे केली . तो स्वतः एक सम्राट बनला आहे, कदाचित राजवंशातील एकमेव सम्राट, ज्याच्या राज्याने उत्तर भारताचा आणि संपूर्ण दख्खनचा बराचसा भाग व्यापला होता. त्याने उत्तरेकडील नर्मदेपर्यंत आपले शस्त्र वाहून नेले आणि शिसुका नावाच्या राजाद्वारे राज्य केले जाणारे पुरिका राज्य आपल्या ताब्यात घेतले. काहीही असो, त्याने उत्तरेकडील बुंदेलखंडपासून (जरी डॉ. मिराशी हे मान्य करत नाहीत की तो नर्मदा ओलांडला आहे) दक्षिणेकडील सध्याच्या आंध्र प्रदेशापर्यंत निश्चितच राज्य केले. पुराणांमध्ये त्याला ६० वर्षांचे राज्य दिले आहे.

व्ही.व्ही. मिराशी यांच्या मते, त्यांनी उत्तर महाराष्ट्र, गुजरात किंवा कोकणात विजय मिळवला असण्याची शक्यता कमी आहे. परंतु, त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसह उत्तर कुंतलाचा काही भाग जिंकला असावा . पूर्वेला, त्यांनी दक्षिण कोसल, कलिंग आणि आंध्र येथे शस्त्रे वाहून नेली असावीत. ते वैदिक धर्माचे अनुयायी होते आणि त्यांनी अग्निष्टोम, आप्त्योर्यमा, उक्थ्य, षोडशीं, अतिरात्र, वाजपेय, बृहस्पतिसव, सद्यस्क्र आणि चार अश्वमेध यासह अनेक यज्ञ (यज्ञ) केले. पुराणानुसार वाजपेय यज्ञाच्या वेळी त्यांनी ब्राह्मणांना भरपूर दान केले. सम्राटाव्यतिरिक्त त्यांनी धर्ममहाराज ही पदवी देखील धारण केली. त्यांनी स्वतःला हरितीपुत्र म्हणून संबोधले . त्यांचे पंतप्रधान देव हे अतिशय धार्मिक आणि विद्वान ब्राह्मण होते. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की प्रवरसेन पहिला यांना चार पुत्र होते. त्याने आपल्या मुलाचे गौतमीपुत्राचे लग्न शक्तिशाली भारशिव घराण्यातील राजा भावनागच्या मुलीशी केले , जे कदाचित उपयुक्त ठरले असेल. तथापि, गौतमीपुत्र त्याच्या आधी निधन पावले आणि त्याच्यानंतर त्याचा नातू , गौतमीपुत्राचा मुलगा रुद्रसेन पहिला , गादीवर आला. त्याचा दुसरा मुलगा, सर्वसेन याने वत्सगुल्म (सध्याचे वाशिम ) येथे आपली राजधानी स्थापन केली. इतर दोन मुलांनी स्थापन केलेल्या राजवंशांबद्दल काहीही माहिती नाही. [ 6 [ 7 ]

वाकाटक राजवंशाच्या शाखा

सामान्यतः असे मानले जाते की प्रवरसेन पहिला नंतर वाकाटक राजघराणे चार शाखांमध्ये विभागले गेले. दोन शाखा ज्ञात आहेत आणि दोन अज्ञात आहेत. ज्ञात शाखा म्हणजे प्रवरपुर-नंदीवर्धन शाखा आणि वत्सगुल्म शाखा.

प्रवरपुरा-नंदीवर्धन शाखा

नंदीवर्धन किल्ल्याचे अवशेष

प्रवरापुरा-नंदीवर्धन शाखेने वर्धा जिल्ह्यातील प्रवरापुरा (पौनार) आणि नागपूर जिल्ह्यातील मानसर आणि नंदीवर्धन (नागर्धन) अशा विविध ठिकाणांवरून राज्य केले . या शाखेने शाही गुप्तांशी वैवाहिक संबंध ठेवले.

रुद्रसेन पहिला

नागपूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या रामटेक टेकडीजवळील नंदीवर्धन येथून राज्य करणारा गौतमीपुत्राचा मुलगा रुद्रसेन पहिला याबद्दल फारशी माहिती नाही . आर्यावर्तच्या इतर शासकांसह अलाहाबाद स्तंभ शिलालेखात रुद्रदेवाचा उल्लेख आहे. ए.एस. अल्तेकर सारखे अनेक विद्वान रुद्रदेव हा रुद्रसेन पहिला आहे यावर सहमत नाहीत, कारण जर समुद्रगुप्ताने रुद्रसेन पहिलाचा नाश केला असता, तर त्याचा मुलगा पृथ्वीशेण पहिला गुप्त राजकुमारी ( प्रभावतीगुप्त ) हिला त्याची सून म्हणून स्वीकारेल अशी शक्यता फारच कमी आहे . दुसरे म्हणजे, नर्मदेच्या उत्तरेला रुद्रसेन पहिलाचा कोणताही शिलालेख सापडलेला नाही. रुद्रसेन पहिलाच्या कारकिर्दीचा आतापर्यंत सापडलेला एकमेव शिलालेख सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडला आहे , म्हणून त्याची तुलना अलाहाबाद स्तंभ शिलालेखातील रुद्रदेवाशी करता येत नाही, जो आर्यावर्तचा होता. [ 8 ]

पृथ्वीशेण पहिला

रुद्रसेन पहिला नंतर त्याचा मुलगा पृथ्वीशेण पहिला (३५५-३८०) गादीवर आला आणि पृथ्वीशेण पहिला नंतर त्याचा मुलगा रुद्रसेन दुसरा गादीवर आला.

रुद्रसेन दुसरा, दिवाकरसेन आणि प्रवरसेन दुसरा

मनसर येथे प्रवरसेना द्वितीयने बांधलेल्या प्रवरेश्वर शिव मंदिराचे अवशेष

रुद्रसेन दुसरा (३८०-३८५) याने गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा (३७५-४१३/१५) याची मुलगी प्रभावतीगुप्ताशी लग्न केले असे म्हटले जाते . रामटेकच्या केवल-नरसिंह शिलालेखांवरून आता याची पुष्टी होते, जिथे असे घोषित केले आहे की राणी प्रभावतीगुप्ताची मुलगी (चा)मुंडा हिचा विवाह राजकुमार घटोत्कचगुप्त (जो कदाचित चंद्रगुप्त दुसराचा मुलगा होता) यांच्याशी झाला होता. [ 9 ]

३८५ मध्ये अतिशय कमी काळ राज्य केल्यानंतर रुद्रसेन दुसरा याने अपघाताने मृत्यू पावला, त्यानंतर प्रभावतीगुप्त (३८५-४०५) यांनी तिचे दोन पुत्र, दिवाकरसेन आणि दामोदरसेन (प्रवरसेन दुसरा) यांच्या वतीने २० वर्षे राज्यपाल म्हणून राज्य केले. या काळात वाकाटक राज्य जवळजवळ गुप्त साम्राज्याचा एक भाग होते . अनेक इतिहासकार या काळाला वाकाटक-गुप्त युग म्हणून संबोधतात. ३० वर्षांहून अधिक काळापूर्वी हे सर्वमान्य झाले असले तरी, या युक्तिवादाचा कोणताही योग्य पुरावा नाही. प्रभावती गुप्ताच्या शिलालेखात एका "देव गुप्त" चा उल्लेख आहे जो तिचे वडील आहेत आणि इतिहासकारांनी त्यांची तुलना चंद्र गुप्त दुसरा यांच्याशी केली आहे. तथापि, देव गुप्त खरोखरच चंद्र गुप्त दुसरा आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरा कोणताही स्रोत नाही. प्रवरसेन दुसरा यांनी महाराष्ट्री प्राकृतमध्ये सेतुबंध रचला . गह सत्तसाईतील काही श्लोक देखील त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी नंदीवर्धनहून राजधानी प्रवरपुरात हलवली, जी त्यांनी स्थापन केलेली एक नवीन शहर होती. त्याने त्याच्या नवीन राजधानीत रामाला समर्पित एक मंदिर बांधले . [ 10 ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

वाकाटक राजवंशातील आतापर्यंत सापडलेल्या ताम्रपटांपैकी सर्वाधिक (सातशे) शिलालेख प्रवरसेन II चे आहेत. तो कदाचित अशोक द ग्रेट नंतर प्राचीन भारतातील सर्वात जास्त नोंदवलेला शासक आहे . पहा: श्रीनंद एल. बापट, वाकाटक शासक प्रवरसेन II चे दुसरे जांब (खांडवी) ताम्रपट अनुदान (श्रावण शुद्ध १३, राजेशाही वर्ष २१), भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अॅनल्स, खंड ९१, पृष्ठे १-३१

नरेंद्रसेना आणि पृथ्वीविशेन II

प्रवरसेन दुसरा नंतर नरेंद्रसेन (४४०-४६०) गादीवर आला, ज्यांच्या काळात वाकाटकांचा प्रभाव काही मध्य भारतीय राज्यांमध्ये पसरला. पृथ्वीशेण दुसरा, जो या वंशाचा शेवटचा ज्ञात राजा होता, त्याने सुमारे  ४६० मध्ये त्याचे वडील नरेंद्रसेन गादीवर घेतले. विष्णुकुंडिन राजा माधव वर्मा दुसरा याने त्याचा पराभव केला . ४८० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर, त्याचे राज्य कदाचित वत्सगुल्म शाखेच्या हरिषेनाने आपल्या ताब्यात घेतले.

वत्सगुल्मा शाखा

अजिंठा लेणी
वाकाटक शासकांच्या वत्सगुल्म शाखेच्या संरक्षणाखाली बांधलेल्या अजिंठा लेण्या .
अजिंठा लेण्यांचे पक्ष्यांच्या नजरेतून दृश्य.
गुहा क्रमांक ९ चे प्रवेशद्वार.
अजिंठा येथील भगवान बुद्ध मूर्ती.

वत्सगुल्म शाखेची स्थापना प्रवरसेन पहिला याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने त्याच्या मृत्यूनंतर केली. राजा सर्वसेनने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील सध्याच्या वाशिम येथील वत्सगुल्म हे राज्य आपली राजधानी बनवले. [ 11 ] [ अविश्वसनीय स्रोत? ] या शाखेचे राज्य असलेला प्रदेश सह्री पर्वतरांगा आणि गोदावरी नदीच्या दरम्यान होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले .

सर्वसेना

सर्वसेन (सुमारे ३३०-३५५) यांनी धर्ममहाराज ही पदवी धारण केली . त्यांना प्राकृतमध्ये 'हरिविजय' या कादंबरीचे लेखक म्हणूनही ओळखले जाते, जे कृष्णाने स्वर्गातून पारिजात वृक्ष आणल्याच्या कथेवर आधारित आहे. नंतरच्या लेखकांनी प्रशंसा केलेले हे काम हरवले आहे. त्यांना प्राकृत ' गह सत्तासाई' या अनेक श्लोकांचे लेखक म्हणूनही ओळखले जाते . त्यांच्या एका मंत्र्याचे नाव रवी होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा विंध्यसेन गादीवर आला. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] [ १२ ]

विंध्यसेन

विंध्यसेन (सुमारे ३५५-४००) यांना विंध्यशक्ती दुसरा म्हणूनही ओळखले जात असे. त्यांच्या ३७ व्या कारकिर्दीत नंदिकट (सध्या नांदेड ) च्या उत्तर मार्गात (उपविभाग) वसलेल्या एका गावाच्या देणगीची नोंद असलेल्या वाशिमच्या प्रसिद्ध पाट्यांवरून त्यांची ओळख पटते . देणगीचा वंशावळ भाग संस्कृतमध्ये आणि औपचारिक भाग प्राकृतमध्ये लिहिलेला आहे. कोणत्याही वाकाटक शासकाने दिलेला हा पहिला ज्ञात भूदान आहे. त्यांनी धर्ममहाराज ही पदवी देखील धारण केली . [ १३ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] विंध्यसेनाने त्यांच्या दक्षिणेकडील शेजारी असलेल्या कुंतलाच्या शासकाचा पराभव केला. त्यांच्या एका मंत्र्याचे नाव प्रवर होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवरसेन दुसरा गादीवर आला. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

प्रवरसेन दुसरा

प्रवरसेन दुसरा ( सुमारे  ४००-४१५ ) हा पुढचा शासक होता ज्याच्याबद्दल फार कमी माहिती आहे, फक्त अजंठाच्या गुहेतील सोळाव्या शिलालेखात , ज्यामध्ये असे म्हटले आहे की तो त्याच्या उत्कृष्ट, शक्तिशाली आणि उदारमतवादी राजवटीने उदात्त झाला. तो खूप कमी काळ राज्य केल्यानंतर मरण पावला आणि त्याच्या जागी त्याचा अल्पवयीन मुलगा आला, जो त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी फक्त ८ वर्षांचा होता. गुहेतील सोळाव्या शिलालेखातून या शासकाचे नाव हरवले आहे. [ 13 ]

देवसेना

वाकाटक प्रदेशाचा अंदाजे विस्तार आणि शेजारील राज्यांचे स्थान सुमारे  ४८० इ.स. , वाकाटक राजवटीच्या शेवटी, राजा हरिषेनाच्या कारकिर्दीत , जेव्हा अजिंठ्याच्या बहुतेक लेण्या (लाल ठिपके) बांधल्या गेल्या होत्या. [ 14 ]

या अज्ञात शासकानंतर त्याचा मुलगा देवसेन ( सुमारे  ४५०-४७५ ) गादीवर आला . त्याचे प्रशासन प्रत्यक्षात त्याचे मंत्री हस्तीभोज चालवत होते. ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] त्याच्या कारकिर्दीत, त्याच्या एका सेवकाने  ४५८-४५९ मध्ये वाशिमजवळ सुदर्शन नावाचा तलाव खोदला [ १३ ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

हरीशेना

हरिषेण (सुमारे ४७५-५००) हे त्यांचे वडील देवसेन यांच्यानंतर गादीवर आले. ते बौद्ध वास्तुकला, कला आणि संस्कृतीचे एक महान संरक्षक होते. जागतिक वारसा स्मारक अजिंठा लेणी हे त्यांच्या कामांचे जिवंत उदाहरण आहे. अजिंठाच्या दगडी कोरीव वास्तुशिल्पाच्या कोश-१६ शिलालेखात असे म्हटले आहे की त्यांनी उत्तरेला अवंती ( मालवा ), पूर्वेला कोसला ( छत्तीसगड ), कलिंग आणि आंध्र, पश्चिमेला लता (मध्य आणि दक्षिण गुजरात ) आणि त्रिकुट ( नाशिक जिल्हा ) आणि दक्षिणेला कुंतला (दक्षिण महाराष्ट्र) जिंकले. [ १३ [ १५ ] हरिषेणाचे मंत्री आणि हस्तीभोजाचे पुत्र वराहदेव यांनी अजिंठाच्या गुहेच्या सोळाव्या गुहेतील दगडी कोरीव विहाराचे उत्खनन केले. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] अजिंठा येथील तीन बौद्ध लेणी, दोन विहार - लेणी XVI आणि XVII आणि एक चैत्य - लेणी XIX हरिषेनाच्या कारकिर्दीत उत्खनन करून चित्रकला आणि शिल्पांनी सजवण्यात आली. [ 13 ] कला इतिहासकार वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, लेणी क्रमांक 9,10,12,13 आणि 15A (संदर्भ: पृष्ठ क्रमांक 4, अजिंठा-एक संक्षिप्त इतिहास आणि मार्गदर्शक - वॉल्टर एम. स्पिंक) वगळता अजिंठ्यातील सर्व दगडात कोरलेली स्मारके हरिषेनाच्या कारकिर्दीत बांधली गेली. [ 16 ]

हरिषेणानंतर दोन शासक गादीवर आले ज्यांची नावे माहित नाहीत. राजवंशाचा शेवट अज्ञात आहे. त्यांचा कदाचित महिष्मतीच्या कलचुरीने पराभव केला असेल. [ 11 ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

वंशावळ

राजवंशाच्या ऱ्हासाचे पर्यायी स्रोत

अजंता लेण्यांमध्ये गुहा १ च्या छतावर, पर्शियन पोशाखात परदेशी मान्यवर वाइन पिताना , एकतर पुलकेसिन II (६१०-६४२ इ.स.) मधील ससानियन दूतावासाचे चित्रण करते, किंवा जर ४६०-४८० इ.स. डेटिंग कायम ठेवली तर वाकाटक राजवंशातील एक शैलीचे दृश्य (छायाचित्र आणि रेखाचित्र). [ 17 ]

वाकाटक राजवंशाच्या पतनानंतर सुमारे १२५ वर्षांनी लिहिलेल्या दंडिनच्या दशकुमारचरिताच्या आठव्या उच्चवासानुसार , हरिषेणाचा मुलगा, जरी सर्व कलांमध्ये बुद्धिमान आणि पारंगत असला तरी, त्याने दंडनीती (राजनीतिक शास्त्र) चा अभ्यास दुर्लक्षित केला आणि स्वतःला सुखांच्या उपभोगासाठी समर्पित केले आणि सर्व प्रकारच्या दुर्गुणांमध्ये गुंतले. त्याची प्रजा देखील त्याच्या मागे गेली आणि एक दुष्ट आणि विकृत जीवन जगली. ही एक योग्य संधी शोधून, शेजारच्या अश्मकाच्या शासकाने त्याच्या मंत्र्याच्या मुलाला वाकाटकांच्या दरबारात पाठवले. नंतरच्याने राजाशी स्वतःला संतुष्ट केले आणि त्याच्या विकृत जीवनात त्याला भडकवले. त्याने विविध मार्गांनी त्याच्या सैन्याचा नाश केला. शेवटी, जेव्हा देश पूर्णपणे अव्यवस्थित झाला, तेव्हा अश्मकाच्या शासकाने वनवासीच्या ( उत्तर कणर जिल्ह्यातील ) कदंब शासकाला वाकाटक प्रदेशावर आक्रमण करण्यास प्रवृत्त केले. राजाने आपल्या सर्व सामंतांना बोलावले आणि वरद (वर्धा) नदीच्या काठावर शत्रूशी लढण्याचा निर्णय घेतला. शत्रूच्या सैन्याशी लढत असताना, त्याच्याच काही सामंतांनी त्याच्या मागून विश्वासघाताने हल्ला केला आणि त्याला ठार मारले. वाकाटक राजवंशाचा अंत त्याच्या मृत्यूने झाला. [ 13 ] या वस्तुस्थितीला पुष्टी देणारे कदंब राजा रविवर्मा यांच्या ५१९ च्या दावणगेरे नोंदीतील तीन ताम्रपटांचा संच देखील आहे. इतिहासकार डीसी सिरकर यांच्या मते , राजाचे अधिपत्य संपूर्ण दक्षिण भारतात उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडील तलकड (तत्कालीन पश्चिम गंगा राजधानी) जवळील कावेरी नदीपर्यंत पसरले होते आणि या भूमीतील लोक त्याचे संरक्षण शोधत होते. याचा अर्थ असा की कदंबांनी रविवर्माच्या राजवटीत (४८५-५१९ इ.स.) कदाचित ५०० नंतर कधीतरी संपूर्ण वाकाटक राज्य जिंकले आणि ते त्यांच्या प्रदेशात समाविष्ट केले. [ 18 [ 19 ]

 
 
 
 
 
 
 
 

राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग २०

राजा हरिषेण

विंध्यसेनानंतर त्याचा पुत्र द्वितीय प्रवरसेन हा गादीवर आला. याच्या कारकिर्दीची फारशी माहिती मिळत नाही. अजिंठ्याच्या लेखात म्हटले आहे की हा आपल्या उत्कृष्ट व उदार राज्यशासनाने किर्तीमान झाला. त्याने सुमारे ४०० ते ४१५ पर्यंत, १५ वर्षे राज्य केले. हा निधन पावला तेव्हा याचा मुलगा केवळ आठ वर्षांचा होता. या बालराजाचे नाव अजिंठ्याच्या लेण्यातील लेखात नष्ट झाले आहे. मात्र त्याने उत्तम रीतीने राज्यकारभार केला असा उल्लेख पुढे आलेला आहे. याच्या माघारी पुत्र देवसेन हा सन ४५० च्या आसपास गादीवर आला. याचा एकच अपूर्ण ताम्रपट विदर्भात सापडलेला आहे आणि तो आज लंडनच्या ब्रिटिश म्यूझीयम मध्ये आहे. देवसेनाचा हस्तीभोज नामक अत्यंत दक्ष, विनीत आणि गुणी असा सचिव होता. देवसेनाने त्याच्यावर कारभार सोपवून स्वतः ऐशोआरामात काळ घालविला. अजिंठा आणि घटोत्कच या दोन्ही लेण्यातील लेखांमध्ये या हस्तिभोजाचे उल्लेख आलेले आहेत. तो प्रजेला अत्यंत प्रिय होता. त्याच्याकडे जाण्यास सर्वांना मुक्तद्वार असे, असे वर्णन अजिंठ्याच्या लेखात आले आहे. सन ४५० च्या सुमारास देवसेनानंतर त्याचा पुत्र हरिषेण हा गादीवर आला. हा या शाखेचा अंतिम ज्ञात राजा होय. हा शुर व महत्वकांक्षी असून त्याने आपल्या राज्याच्या सर्व दिशांस विजय प्राप्त केले. त्याच्या विजयाचे वर्णन अजिंठ्याच्या लेखात १४-१५ ओळीत आले आहे मात्र दुर्दैवाने त्याचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. उरलेल्या भागात विदर्भाच्या चारही दिशांस असलेल्या भागांचे उल्लेख येतात. ते पूढील प्रमाणे, उत्तरेस अवंती (माळवा); पूर्वेस कोसला ( छत्तीसगड), कलिंग ( ओरिसा ) व आंध्र; पश्चिमेस लाट ( मध्य व दक्षिण गुजरात ) व त्रिकुट ( नाशिक ); दक्षिणेस कुंतल ( दक्षिण महाराष्ट्र ). यावरून उत्तरेतील माळवा ते दक्षिणेस कुंतल तर पश्चिमेस अरबी समुद्रापासून ते पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत हरिषेणाची सत्ता अबाधितपणे चालत होती. हा विस्तृत प्रदेश त्याच्या अंमलाखाली होता असे दिसत नाही, परंपरे अनुसार त्या राज्यांना जिंकून त्यांना वार्षिक कारभार देण्याच्या अटीवर हरिषेणाने त्यांची राज्ये परत केली असावी. ज्येष्ठ शाखेचा प्रदेश देखील त्याने आपल्या राज्यास जोडून घेतला होता. हरिषेणाचा वराहदेव नामक सचिव होता जो हस्तिभोजाचा पुत्र होता. तोही आपल्या वडीलांप्रमाणे अत्यंत धार्मिक, उदार आणि दक्ष होता. त्यानेच अजिंठ्यातील सोळा क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. त्यात त्याने कोरलेल्या लेखात वत्सगुल्म शाखेची बरीचशी माहिती मिळते. हरिषेण हा या शाखेचा अंतिम ज्ञात राजा होय. त्याच्या नंतर एक-दोन राजे झाले मात्र त्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत. हरिषेणानंतर लवकरच त्याच्या विस्तृत साम्राज्याचा विनाश झाला, मात्र तो कसा झाला याचे उल्लेख इतिहासांत मिळत नाहीत. वाकाटकांच्या अस्तानंतर शंभर वर्षांनी दंण्डी याने लिहिलेल्या ‘दशकुमारचरीता’त एका विदर्भाच्या नृपतीची कथा आलेली आहे तीत वर्णिलेली राजकीय परिस्थिती ही वाकाटकांच्या अंतिम काळातील दिसते. मात्र ज्या भागात ही गोष्ट आलेली आहे तो उच्छवास अपूर्ण असल्याने सुद्धा संपूर्ण माहिती मिळत नाही. मात्र काही गोष्टी स्पष्ट होतात, जसे उत्तरेस नर्मदे पासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत पसरलेले विशाल वाकाटक साम्राज्य हरिषेणाच्या पुत्राच्या नादानीमुळे आणि मांडलीकांच्या फितुरीमुळे कोलमडून पडले. अखेर सन ५५० च्या सुमारास माहिष्मतीच्या कलचुरी घराण्यातील राजा कृष्णराज याने विदर्भ व उत्तर महाराष्ट्र जिंकून घेतला, पूर्वेकडील कोसल, कलिंग व आंध्र यांनीही आपले स्वातंत्र्य घोषित केले तर दक्षिणेत कुंतलाधिपती राष्ट्रकूट ही हळू हळू प्रबळ होऊ लागले. अशा रीतीने सुमारे तीनशे वर्षांच्या उज्ज्वल शासनानंतर सन ५५० च्या सुमारास वाकाटकांचा वंश नामशेष झाला - प्राजक्ता देगांवकर संदर्भ १)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी २) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर ३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

 
 
 
 
 
 
 
 
 

इतिहास प्राचीन खंडी - वाकाटक

पुराणांमध्ये वाकाटक किंवा विन्ध्यक असा उल्लेख केलेल्या या राजवंशाची इ.स. तिसऱ्या शतकाच्या शेवटी आन्ध्रसातवाहन सत्तेचा -हास झाल्यानंतर विदर्भ प्रांतामध्ये सत्ता स्थापन झाली. यांचे मूळ सत्ता केंद्र नर्मदा नदीच्या उत्तरेस मध्यप्रदेशातील विन्ध्य प्रदेशात होते. तेथून ते दक्षिणेकडे विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर प्रदेश, आन्ध्रप्रदेश आणि कर्नाटकाकडे आले. त्यांनी दक्षिण भारताचा बराच मोठा भाग आपल्या सत्तेच्या प्रभावाखाली आणला त्यांचे गुप्त राजवंश, कर्नाटकाचा कदंब राजवंश व आन्ध्रप्रदेशाचा विष्णुकुंडिन राजवंश यांच्याबरोबर वैवाहिक संबंध होते. त्यांची सत्ता इ.स. च्या तिसया शतकाच्या मध्यमापासून ते इ.स. च्या सहाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत म्हणजे साधारणपणे २५० वर्षे टिकली. या कालावधीत प्रस्थापित झालेली शांतता व सुबत्तास यामुळे साहित्य आणि इतर कलांना बहर आला. ही शांतता व सुबत्ता प्राकृत साहित्याच्या पंगतीचे विविध टप्पे व सुवर्ण युग ठरलेल्या या कालखंडातील अजंठा व गुलवाडा येथील महायान कलेच्या विकासाचीही साक्षीदार ठरली.
   परंतु खात्रीलायक पुराव्याच्या अभावी व वाकाटकांचे मूलस्थान व कालक्रम या सारख्या महत्त्वाच्या व मुलभूत प्रश्नांवर संशोधकांचे एकमत नाही. आता मांढळ येथे मिळालेले अनुक्रमे रुद्रसेन दुसरा व प्रवरसेन दुसरा यांचे प्रत्येकी एक व पृथिवीषेण दुसरा यावे दोन असे एकूण चार ताम्रपट प्रभावती गुप्ताचा मिरेगाव ताम्रपट, पृथिवीषेण दूसरा याचा माहूरझरी ताम्रपट, प्रभावती गुप्ताच्या स्मरणार्थ दिलेला रामटेक
मिरेगाव ताम्रपट, पृथिवीषेण दुसरा यावा माहूरझरी ताम्रपट, प्रभावती गुप्ताच्या स्मरणार्थ दिलेला रामटेक ताम्रपट, देवसेनाची बीदर सनद व हिस्सेबोराळा शिलालेख, हरिषणाचा थाळनेर ताम्रपट' आणि कदंब राजा सिहवर्मन याचा मुडिगेर ताम्रपट यामुळे या विषयाबाबत पूर्वीच्या संशोधकापेक्षा वर्तमान अभ्यासकांकडे अधिक पुरावे उपलब्ध आहेत.

मूलस्थान

या राजवंशाने आपल्या राजकीय जीवनाचा प्रांरभ कोणत्या प्रदेशात केला याबाबत वाद असून त्याचे अद्यापही निश्चित उत्तर मिळालेले नाही. पुराणातील स्पष्ट उल्लेस्वानुसार त्यांचे मूलस्थान मध्यभारतात असले पाहिजे. तथापि ते दक्षिण भारतात असावे असा सिद्धांत मांडला गेला. हा सिद्धांत प्रथम आर.पी.           चंदा यांनी मांडला. नंतर वा.वि. मिराशी आणि अ.स. आळतेकर यांनी तो विस्तारपूर्वक मांडला.
          दक्षिण भारतीय मूलस्थानाची कल्पना आन्ध्रप्रदेशात गुंदूर जिल्ह्यातील प्रमुख बौद्ध स्थान अमरावती येथील अष्टकोनी स्तंभावर अक्षरवटिकेच्या आधारे साधारणपणे ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकाचा मध्य ते तिसऱ्या शतकाचा मध्य या कालखंडातील एका अपूर्ण लेखात उल्लेखिलेल्या वाकाटक नामक गृहपतिया नावावरून स्फुरली. या लेखाचा उद्देश वाकाटक याने त्याचे ज्ञातिजन आणि मित्र यांचे आयुष्य वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने केलेल्या पुण्यकृत्याची नोंद करणे हा आहे. कदाचित हे पुण्यकर्म म्हणजे या स्तंभाची स्थापना करणे हेही असू शकेल. या लेखाचे संपादन करताना आर. पी. चंदा यांनी याच ठिकाणी मिळालेल्या ख्रिस्तपूर्व दुसया शतकाच्या मध्यकालात दिलेल्या दुसया एका लहान लेस्वात उल्लेखिलेल्या ठपाकोटकठ या नावाचे अमरावती लेखातील वाकाटक या नावाशी तादात्म केलेले आहे. त्यांची कल्पना अशी होती की, यामुळे वाकाटकांचे वास्तव्य जास्तीत जास्त ख्रिस्तपूर्व १५० मध्ये दक्षिणेत होते असे सिद्ध करता येईल.
         परंतु त्यांना वाकाटक हे व्यक्तिनाम आहे की, वंशनाम" आहे याबद्दल खात्री नव्हती. मिराशीच्या मते हे नाव वाकाटक वंशाची स्थापना करण्याचे श्रेय असलेल्या व्यक्तीचे आहे. या लेखात उल्लेखिलेला गृहपति वाकाटक दक्षिण भारतात कोठेतरी राहत असावा. परंतु हे मत पूर्णपणे ग्राहच वाटत नाही. कारण एकतर या लेखामध्ये वाकाटकाचा उल्लेख फक्त ठगृहपतिठ म्हणून केलेला असून त्याच्या नावामागे कोणतीही राजसतानिदर्शक पदवी नाही. दुसरे असे की, भारहुत व सांची प्रमाणे अमरावती हेही प्रसिध्द यात्रा स्थान झाले होते. त्यामुळे या ठिकाणी दूरदूरच्या प्रदेशातून बौद्ध यात्रेकरू येत असत. प्रत्यक्ष अमरावती येथे मिळालेल्या कोरिव लेखामध्येच निरनिराळया प्रदेशातुन येणाऱ्या यात्रेकरूंच्या दानकुत्यांची नोंद केलेली मिळते. काही यात्रेकरू तर पाटलिपुत्र, राजगृह यासारख्या दूरवरच्या ठिकाणांहून आलेले आहेत." त्यामुळे या सिद्धान्ताच्या समर्थकांच्या म्हणण्याप्रमाणे या लेखात उल्लेखिलेला वाकाटक जवळपासच्या प्रदेशातून आला होता असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. दूरवरच्या प्रदेशातून आलेल्या इतर काही दात्यांप्रमाणे तो आन्ध्रप्रदेशाहून दूर असलेल्या ठिकाणाहून आला असावा. याशिवाय वाकाटक हा धर्मशील भक्तिपरायण बौद्ध आहे. याउलट वाकाटक राजे हे वैदिक पौराणिक हिंदू धर्माचे अनुयायी होते त्यामुळे वरील मत संयुक्तिक वाटत नाही. जर अमरावती कोरीव लेखातील गृहपति वाकाटक हा वाकाटक राजवंशाचा संस्थापक होता असे म्हणायचे झाले तर या लेखामध्ये गृहित असलेल्या सांप्रदायिक गोफ निकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे लागेल. म्हणून केवळ नामसाधर्म्य आहे यापेक्षा जास्त काही म्हणता येत नाही. नामसाधर्म्य असणे हा केवळ योगायोग आहे. मिराशीनी पुढे वाकाटक नृपति विन्ध्यशक्ति दुसरा याचा वारीम लेख आणि पल्लव राजा शिवस्कंदवर्मन याच्या हीरहडगळ्‌ळी व मयिद‌वोळू लेख यामध्ये आढळणाऱ्या काही तांत्रिक संज्ञांमधील साम्याकडेही लक्ष वेधले आहे. याविषयी एवढेच म्हणता येईल की, या लेखामध्ये दानाची नौद करणारा भाग प्राकृतमध्ये आहे आणि दक्षिण भारतातील एकमेकास लागून असलेल्या दोन प्रदेशांवर राज्य करणाऱ्या भिन्न राजवंशाच्या कोरीव लेखामध्ये समान महसुली संज्ञा येणे स्वाभाविकच आहे. अशा प्रकारच्या समान संज्ञा या वंशाच्या फक्त दक्षिण (वाशीम) शाखेच्या लेखामध्येच आढळतात. त्या उत्तर (नदिवर्धन-पद्मपूर-प्रवरपूर) शास्वेच्या कोरीव लेखांमध्ये आढळत नाहीत. जर वाकाटक दक्षिण भारतीय असते तर या शास्वेच्या सुद्धा अशा प्रकारच्या संज्ञा असायला पाहिजे. तेव्हा केवळ प्रादेशिक जवळीक किंवा निकटता व गरज यानुसार तांत्रिक संज्ञांमध्ये असलेले साम्य ही बाब पूर्णपणे मान्य करता येत नाही.
        मिराशींच्या मते द्वितीय विन्ध्यशक्तीच्या" वाशीम ताम्रपटात वाकाटक नृपति प्रक्रसेन प्रथम याच्या नावामागे लावलेली हारितीपूत्र ही पदवी आणि वत्सगुल्म शास्वेचा संस्थापक सर्वसेन प्रथम आणि त्याचा पुत्र व वारस विन्ध्यशक्ति दुसरा यांच्या नावामागे लावलेली धर्मराज ही पदवी या दोन्हीही पद्व्या वाकाटक मुळचे दक्षिण भारतीय होते असे दर्शवितात. कारण या पदव्या फक्त पल्लव, कदंब, बदामीचे चालुक्य यासारख्या दक्षिण भारतीय राजवंशाच्या कोरीव लेखांमध्ये मिळतात. उत्तर भारतीय राजवंशाच्या लेखांमध्ये त्या उपयोगात आणलेल्या दिसत नाहीत. वर उल्लेखिलेल्या महसूल संज्ञांप्रमाणेच या पद्व्यांचा उपयोग दक्षिण भारतातील राजवंशाच्या काही सभासदांनी केलेला होता याची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यांचा स्वीकार वाकाटकांच्या फक्त वत्सगुल्म शास्वेच्या काही नृपतींनी आपल्या दानपत्रांत केलेला आहे. अशा पद्व्या वाकाटक वंशामध्ये मूलतः अस्तित्वात असत्या तर त्यांच्या प‌द्मपूर-नदिवर्धन-प्रवरपूर शास्वांच्या राजांनीही आपल्या नावामागे त्या धारण केल्या असत्या. या वंशाच्या प्रवरसेन प्रथम पासूनन्या वंशावळ देणाऱ्या दानपत्रांमध्ये त्यांची नोंद आढळत नाही. या पदव्या वल्सगुल्म शास्वेने त्यांचे दक्षिण भारतीय शेजारी वनवासी कदंव राजवंश याच्याकडून त्यांच्या सान्निध्यामुळे घेतल्या होत्या. कदंब राजवंश अशा पद्व्यांच्या उपरोगाकरिता प्रसिद्धच आहे. परिणामतः या पदव्यांचा वापर हा पुरावा म्हणून या राजवंशाचे मूलस्थान ठरविण्याचे दृष्टीने उपयुक्त ठरत नाही.
            या दृष्टीने शेवटचा परंतु महत्त्वाचा पुरावा म्हणून अजंठा येथील, क्रमांक १६ व्या लेण्यांतील" वाकाटकांच्या सचिव कुलांनी दिलेल्या कोरीव लेस्वाकडे व वत्सगुल्म शाखेचा शेवटचा ज्ञात नृपति हरिषेण याच्या घटोत्कच लेण्यातील लेस्वाकडे लक्ष जाते." संबंधित सचिव कुल वल्लुर या नावाने ज्ञात होते. कदाचित हे नाव हे घराणे किंवा कुल ज्या गावाहून आले होते त्या गावाच्या नावावरून पडले असावे. मिरार्शीनी या गावाचे आन्ध्रप्रदेशात" हैदराबादच्या उत्तर-पूर्वेस ४० मैलावर असलेल्या वेल्लूर ह्या वर्तमान गावाशी तादात्म्य सुचविलेले आहे. या कुलाच्या वाकाटकांबरोबर असलेल्या संबंधाचा वाकाटकांच्या दक्षिण भारतीय मूलस्थानाच्या सिद्धान्ताला बळकटी आणण्याच्या दृष्टीने उपयोग केलेला आहे. परंतु जरी जवळपासच्या प्रदेशांतील व्यक्तींना मंत्री किंवा अधिकारी पदावर नियुक्त करण्याची पद्धत सामान्यपणे अस्तित्वात असली तरी दूरवरच्या प्रदेशातून आलेल्या व्यक्तींची मंत्री म्हणून नेमणूक केल्याची उदाहरणेही मिळतात. ह्याशिवाय वराहदेवाचा अजंठा शिलालेख या कुलातील शेवटच्या दोन म्हणजे हस्तिभोज व प्रत्यक्ष वराहदेव यांच्या वत्समुल्म शास्वेचे शेवटचे दोन नृपति अनुक्रमें" देवसेन व हरिषेण यांने मंत्री म्हणून उल्लेख करतो. वराहदेवाच्या घटोत्कच लेण्यातील लेखामध्ये नंबर दोनवा सचिव देव हा फार कर्तबगार, विद्वान, नीतिनिपुण व क्रियाशील राजनीतिज्ञ होता व त्याच्या प्रभावामुळे राजासह सर्व राज्य धार्मिक कृत्यें उत्तामरित्या पार पाडीत होते असे वर्णन आहे. या ठिकाणी संबंधित राजाचे नाव स्पष्टपणे दिले नसल्यामुळे तो वाकाटक नृपति असेल असे स्वात्रीपूर्वक म्हणता येत नाही. हे केवळ अनुमान आहे. याशिवाय या घराण्यातील आठवा सभासद हस्तिभोज याचे पूर्वज हे केवळ ब्राह्मणीय गुणसंपति किंवा ज्ञान यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना वाकाटकांच्या वत्सगुल्म शास्वेचा केवळ राजाश्रय लाभला असण्याचीही शक्यता आहे. प्रवरसेन प्रथम याने सुद्धा या घराण्यातील व्यक्तीला मंत्री पदावर किंवा सचिव पदावर नियुक्त केले होते असे दास्वविणारा पुरावा उपलब्ध नाही.
      यावरून असे दिसून येते की, वाकाटक हे मूळचे दक्षिण भारतीय" होते असे सिद्ध करणारा स्पष्ट पुरावा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे कोरीव लेखांनी पुरविलेली माहिती पडताळून घेणे उचित ठरते.
       वायु, ब्रह्माण्ड, विष्णु आणि भागवत पुराणांची काही हस्तलिखिते साधारपणपणे सातवाहनोत्तर काळात उ‌द्याला आलेल्या विदिशा" येथील राजांचे वर्णन करताना शुंग वंशाच्या शेवटी उद्याला आलेल्या शिशुनन्दिन व त्याचा भाऊ नन्दियशस यांचा उल्लेख करतात. पुढे असे म्हटले आहे की, नन्दियशसच्या मुलीचा (दौहित्र) मुलगा होता. तो पुरिका येथून राज्य करीत होता. येथे दुसरा उल्लेख विन्ध्यशक्तीचा मुलगा प्रवीर याचा आहे. या ठिकाणी नन्दियशसच्या घराण्यात तीन राजे झाले या विधानानंतर लगेचच शिशुक, विन्ध्यशक्ति व प्रवीर यांच्या उल्लेखावरून प्रवीर व विन्ध्यशक्ति यांचा दुसया राजांशी काही संबंध होता असे सूचित करतात. पौराणिक वृत्तांतातील या विधानामुळे याबाबत निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. काहीही असले तरी या ठिकाणी असलेल्या वर्णनावरून विन्ध्यशक्ति व प्रवीर हे कोरीव लेस्वांद्वारे ज्ञात असलेले वाकाटक वंशाचे पहिले दोन राजे आहेत याबद्दल संशय राहत नाही. फरक एवढाच आहे की, येथे विन्ध्यशक्तिचा मुलगा प्रवरसेन प्रथम याचा उल्लेख प्रवीर असा केलेला आहे. प्रवीर याचे हे वैयक्तिक नाव असावे अथवा त्याने केलेल्या पराक्क्रमामुळे प्राप्त झालेला भूभाग व केलेले अनेक श्रौतयज्ञ यातून त्याने हे स्वतः ला लावलेले किंवा त्याला दिलेले हे गुणविशेषण असावे." पार्जिटरच्या मते या व आधी दिलेल्या इतर राजांचा याठिकाणी उल्लेख करताना वापरलेल्या वैर्देशि या शब्दाचा अर्थ विदिशेचा असा होता. परंतु हे सर्व राजे विदिशा" येथून किंवा विदिशावर राज्य करीत होते असे दिसत नाही. यास्तव या शब्दाचा अर्थ निरनिराळ्या प्रदेशाचे असा घेणे जास्त योग्य होईल. हाच त्याचा गृहीत अर्थ आहे हे नंतर वाकाटक राजा विन्ध्यशक्ति याचे विन्ध्यकाज म्हणजे विन्ध्य भागाने अशा केलेल्या वर्णनावरून वाटते.
       पुराणात सातवाहनांचे आन्ध्र किंवा आन्ध्रजातीय असे वर्णन आहे. त्यामुळे सातवाहनांच्या मूलस्थानाबद्द‌लही वाद निर्माण झाला होता. पुराणात केलेले वाकाटकांचे वर्णन व सातवाहनाचे वर्णन यामध्ये निकटचे साम्य आहे. याप्रमाणे वाकाटकांचे मूलस्थान विन्ध्य विभागात होते. तरीही साहित्यिक परंपरा व वर्तमान भूगोल तज्ञ हे विन्ध्य तसेच जवळच असलेला ऋक्षवत पर्वत यांची स्थाननिश्चिती ठामपणे देऊ शकत नाहीत. विशाल अर्थाने उपयोग केल्यास विन्ध्य या नावाने साधारणपणे उत्तरप्रदेशातील मिर्झापूर शहरापासून ते गुजरातच्या बाजूस असलेल्या अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या पर्वत रांगांचा बोध होतो आणि त्यामध्ये कुलपर्यंत म्हणून वर्णिलेल्या या दोन्ही पर्वतांचा अंतर्भाव होतो. परंतु या दोघांना एकमेकांपासून जेव्हा वेगळे संबोधले जाते तेव्हा या दोघांमधून नर्मदा नदी वाहते. या एका मुद्याबद्दल फक्त मतैक्य होते. भारतीय विद्वानांमध्ये नर्मदा नदीच्या उत्तरेला व दक्षिणेला असलेल्या पर्वताच्या नामाभिधानाबद्दल प्राचीन परंपरांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते मयादित अर्थाने ऋक्षवत व सातपुडा या नावांनी नर्मदा नदीच्या अनुक्रमे उत्तरेस व दक्षिणेस असलेल्या पर्वतांच्या रांगांचा बोध होतो. तरीही, हे मत मान्य करता येत नाही. कारण एक तर हे हरिवंशाचा मध्ययुगीन भाष्यकार नीलकंठ याच्या विधानावर व पुराणांतील भुवनकोश विभागातील विधानावर आधारित आहे आणि दुसरे म्हणजे हे मत बनवताना नर्मदा नदीच्या उत्तरेकडील पर्वताचे नाव विन्ध्य व तिव्या दक्षिणेकडील पर्वताचे नाव ऋक्षवत आहे हे ज्या महत्त्वाच्या मुद्यामुळे सिद्ध होऊ शकते, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्राचीन साहित्यिक परंपरा व कोरीव लेखांतील परंपरा ही बाब स्पष्ट करतात. विन्ध्य हे नाव आता या अर्थानेच उपयोगात आणले जाते. ऋक्षवत हे नाव सामान्यतः सातपुडा म्हणून ख्यात असलेल्या पर्वताचे प्राचीन नाव आहे. सातपुडा हे नाव ऋक्षवत नावापासूनच निघालेले किंवा या नावावे साधित रूप आहे, वासिष्ठीपूत्र पुळुमावि याच्या एकोणीसाव्या वर्षीच्या नाशिक शिलालेखामध्ये त्याचा पिता गौतमीपुत्र सातकर्णि याचे तो बयाच पर्वतांचा स्वामी असल्याचे वर्णन आलेले आहे. त्या पर्वतांच्या नावाच्या सूचीमध्ये ऋक्षवत पर्वताचेही नाव आहे. या नावाचे ठिकाणी ठछवतठ" असे प्राकृत रूप दिलेले आहे. हे नाव ऋक्षवत या नावाने सात असे रुपांतर होण्याच्या प्रक्रियेतील मधली अवस्था दर्शविते. हे रुपांतर होताना व या अक्षरातील उकार व ठछठ या अक्षरातील अकार यांचा संयोग होऊन त्याचा आ होईल, मधल्या व चा लोप होईल व त्यामुळे स्वाभाविकपणेच छवत चे रुप छात असे होईल. दक्षिण भारतीय कोरीव लेख, नाणी व साहित्यि पुराव्यांवरून असे दिसते की, दक्षिण भारतीय प्राकृत भाषेतील उष्मवर्ण व च आणि छ यांची अदलाबदल होते. याप्रमाणे छिमुक वे रूप सिमुक" शान्तचे चान्त सातकर्णि चे चातकर्णि आणि वासिष्ठी चे वाचिट्टि अशी रूपे होतात. त्याचप्रमाणे छात चे ठसातठ असा बदल होऊ शकतो आणि अस्वेरचा ठपुडाठ हा शब्द नंतरच्या काळामध्ये पर्वताचे थर दर्शविण्यासाठी जोडला असावा. दुसरे असे की, बाणभट्टाच्या हर्षचरितामध्ये (उच्छवास ७ आणि ८) हर्षवर्धनाने राजश्रीचा शोध घेण्याच्या वर्णनात विन्ध्य पर्वत व विन्ध्यारण्याचा (विन्ध्य-आटवि) उल्लेख आहे. हा उल्लेख नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असलेल्या पर्वत रांगांचा नाही. तिसरी गोष्ट अशी की, उत्तर भारतामध्ये विन्ध्य पर्वताबरोबर विन्ध्यासल, विन्ध्यवासिनी यासारखी बरीच नावे गुंफलेली आढळतात. परंतु नर्मदेच्या दक्षिणेस असे एकही नाव आढळत नाही. यावरून हे स्पष्ट होते की, नीलकंगच्या अहेतुकपणे केलेल्या चुकीच्या विधानाच्या आधारे एच.सी. रायचौधरी व डी. सी. सरकार यांनी मांडलेला या पर्वताच्या स्थान निश्चिततीचा सिद्धात योग्य वाटत नाही. हा मुद्दा शेवटी शाकटायन" च्या (२, २.७७) व्याकरणावरील उत्तरो विन्ध्यात पारियात्रा: या उदाहरणाने निकालात काढला. पारियात्र हा पर्वत विन्ध्यपर्वताच्या उत्तरेला आहे. विन्ध्य व पारियात्र या पर्वतांच्या मध्ये जर ऋक्षवत पर्वताचे स्थान निश्चित केले तर पारियात्र विन्ध्य पर्वताच्या उत्तरेला आहे या विधानाला काही अर्थ उरत नाही. प्रवीर किंवा प्रवरसेन प्रथम याच्या संबंधात पुराणातील पुनरचित श्लोक असा आहे.
विन्ध्यशक्तिसुतश्चापि प्रवीरो नाम वीर्यवान ।
भोक्ष्यते च समाः षष्टिं पुरीं कात्र्वमकां च वै ।।"
        याचा अर्थ विन्ध्यशक्तीचा, प्रवीर नामक वीर पुत्र कांञ्चनका नगरीवर ६० वर्षे राज्य करील असा होईल. हा अर्थ पार्जिटरच्या मताशी जुळतो. के. पी. जयस्वाल संबंधित ओळीचे वाचन 'पुरिकां चनकां च वै' असे करतात आणि प्रवीराने (म्हणजे प्रवसेन प्रथम) पुरिका व चनका" ह्या दोन जुळ्या शहरांवर राज्य केले अशी दुरुस्ती सुचवितात. मिराशी यावर असे मत व्यक्त करतात की पार्जिटरच्या वाचनामुळे ठचठ हे निरर्थक ठरेल व ते ओळीत केवळ श्लोक पूर्तीसाठी (पाद-पूरण) * घातले आहे. असे समजावे लागेल. या संदर्भात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पार्जिटरने विचारात घेतलेल्या एकाही हस्तलिखितामध्ये पुरिकाचा या संदर्भात उल्लेख केलेला नाही आणि पुराणांतील मूळ लेखांच्या व्याकरणशुद्ध रचनेची एका मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा करणे योग्य नाही. कारण पुराणरचनाकारांनी हि, तू, च आणि वै यासारख्या शब्दांचा उपयोग श्लोक पुतींसाठी केला आहे. या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त ठरत नाही. म्हणून प्रवरसेनने काञ्चनका येथून राज्य केले असे पार्जिटरचे वाचन जास्त योग्य वाटते. काञ्चनका ही प्रवरसेन प्रथम याची राजधानी होती हे स्पष्टच आहे.
        जर याबाबतचे सुधारित वाचन स्वीकारावयाचे असेल तर प्रथम पुरिका व चनका यांची स्थाने निश्चित केली पाहिजेत. कारण वाकाटकांचे मूलस्थान निश्चित करण्याच्या प्रश्नाशी त्याचा अगदी निकटचा संबंध आहे. हरिवंशातील (विष्णुपर्वन ३८.२२) वर्णनाप्रमाणे पुरिका हे ऋक्षवत पर्वताच्या पायथ्याशी बसले होते. वर उल्लेखिल्याप्रमाणे ऋक्षवत हे नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या सातपुडा पर्वत रांगांचे प्राचीन नाव आहे. सातपुडा हे नाव ऋक्षवत या नावापासूनच निघालेले आहे. यामुळे पुरिका हे ठिकाण सातपुडा पर्वताच्या उतरणीवर असले पाहिजे आणि ते नर्मदा नदीच्या दक्षिण तीराच्या जवळपास शोधले पाहिजे. या ठिकाणी वराहमिहिराने बृहत्संहितेमध्ये पुरिका हे स्थान भारत वर्षाच्या दक्षिण-पूर्व भागात ठेवले आहे आणि ते या
वर्णनाशी जुळते हे नमूद करणे आवश्यक आहे.
    वास्तविक आधी दास्वविल्याप्रमाणे पुरिका शहराचा प्रत्यक्ष उल्लेख प्रक्रसेन प्रथम याच्या संदर्भात केलेला नाही. पुरिकाचा अशा प्रकारे उल्लेख के. पी. जायस्वाल यांच्या पुराणातील उतायऱ्यांमुळे आणि वा.वि. मिराशी यांनी याला दिलेल्या दुजोयातून व्यक्त झाला. या संदर्भात पुराणात फक्त काञ्चनका या गावाचाच उल्लेख आहे. या शहराचे (किंवा सुधारित वाचन मान्स केल्यास चनका) तादात्म्य मध्यप्रदेशातील बुंदेलखंड विभागात सतना जिल्ह्यातील नचना किंवा नचनेकी तलाई या नावाने ज्ञात असलेल्या खेड्याशी फार पूर्वीच केलेले आहे. हे तादात्म्य उपलब्ध असलेल्या इतर पुराव्याच्या आधारेही समाधानकारक आहे असे म्हणता येईल. या ठिकाणी गुप्त-वाकाटक काळातील असलेले मंदीर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाकाटकांचे दोन शिलालेस्वही प्राप्त झालेले आहेत. या प्रमाणे विन्ध्यप्रदेशातील बुंदेलखंड व बघेलखंड विभागाच्या क्याच मोठ्या प्रदेशाचा अंतर्भाव प्रवरसेन प्रथम याच्या अमदानीत वाकाटक राज्यात होत होता आणि तो पुढे बयाच काळापर्यंत त्यांच्या अंमलास्वाली राहिला हे पुढे दास्वविले आहे. प्रारंभी विन्ध्यविभाग वाकाटक राज्याच्या प्रमुख भाग होता हे इतर पुराव्यावरून स्पष्ट दिसते. या वंशाच्या संस्थापकाने धारण -केलेले विन्ध्यशक्ति हे नाव त्याचे विन्ध्यविभागात राज्य स्थापन केले आणि विन्ध्य पर्वताला आपल्या शक्तीचा स्त्रोत मानले होते याचे निदर्शक आहे. त्याने बहुतेक कांज्चनका (किंवा चनका) हया शहराची स्थापना केली होती.
        त्याचा पुत्र व वारस प्रवीर उर्फ प्रवरसेन प्रथम हा फार बलशाली होता. ज्याने वैदिक यज्ञ केले होते व त्यासाठी मोठा दानधर्म केलेला होता. तसेच सम्राट ही पदवी धारण केली होती. तो विन्ध्यविभागातील लहानश्या राज्यावर संतुष्ट रहाणे शक्य नव्हते. त्याने मोठमोठे विजय संपादन करून नवीन प्रदेश आपल्या राज्याला जोडले. दक्षिणेकडे विदर्भापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला आणि पुराणांत वर्णिल्याप्रमाणे आपल्या चार पुत्रांमध्ये वादून देण्याइतके पुरेसे मोठे राज्य निर्माण केले. जायस्वालने सुचवल्याप्रमाणे त्याच्या या राज्याची उत्तर भागात असलेली रचना (प्राचीन चनका) ही राजधानी बनविणे सोयीस्कर झाले नसते म्हणून प्रवरसेन प्रथम याने नर्मदा नदीच्या दक्षिणेला पुरिका येथे दुसरी राजधानी स्थापन केली असावी असे दिसते. वाकाटकांच्या विन्ध्य पर्वताशी असलेला अतूट संबंध पुराणामध्ये या वंशाला प्रवरसेन प्रथम व त्याने चार पुत्र यांच्या वर्णनानंतर लगेचच दिलेल्या विन्ध्यक (विन्ध्यन) या नावामुळे सिद्ध होतो. या प्रमाणे असा निष्कर्ष काढता येतो की, वाकाटकांचे मूलस्थान वर्तमान मध्यप्रदेशातील विन्ध्यविभागात होते आणि ते वाकाटकांच्या बयाच पिढ्यापर्यंत तेथेच राहिले.
       पुराणांमध्ये या वंशाला विन्ध्यक असे म्हटले आहे. परंतु कोरीव लेखांमध्ये या वंशाचा उल्लेख फक्त वाकाटक असाच येतो. काही अंशी असाच प्रकार सातवाहन वंशाच्या बाबतीतही दिसून येतो. सातवाहनांप्रमाणे वाकाटक हे वंश किंवा घराण्याचे नाव होते. अन्ध्र किंवा अन्ध्रजातीयप्रमाणे विन्ध्यक है नाव त्याच्या राजकीय सत्तेचे मूळ केन्द्र असलेल्या प्रदेशाचे निर्देश करते. सातवाहन प्रमाणे वाकाटक है नावही याठिकाणी ज्याने आपले नाव आपल्या वंशाला दिले, त्याचा (जरी असे स्वात्रीपूर्वक म्हणता येत नसले तरी) अप्रत्यक्ष निर्देश करते. विन्ध्यशक्ति हे या वंशाच्या पहिल्या राजाचे उपनाव किंवा पद‌वी असावी. वाकाटक हे त्याचे वैयक्तिक नाव असावे असे स्वात्रीपूर्वक म्हणता येत नसले तरी तशी शक्यता नाकारता येत नाही किंवा असेही म्हणता येईल की, हे वंशनाम वाकाटकांना घनिष्ट संबंध असलेल्या प्रदेशाच्या नावापासून प्राप्त झाले असावे. या दृष्टीने जायस्वाल उत्तरप्रदेशात झांशी जिल्हयातील चिरगांवच्या पूर्वेस पूर्वीच्या ओरछा संस्थानात अति उत्तरेकडच्या भागात असलेल्या वर्तमान बागट या नावाच्या स्वेडवाकडे आपले लक्ष वेधतात. त्यांच्या मतेया वंशाला हे नाव या गावाच्या नावामुळे प्राप्त झाले असावे. त्यांना असेही वाटते की, विन्ध्यशक्तीने स्वतः या शहराचे नाव त्याच्या वंशाची पदवी म्हणून स्वीकारली असावे. परंतु या दोन नामांमधील साम्य हा निव्वळ योगायोग असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या प्रदेशाचे नाव या वंशाला प्राप्त होण्यापेक्षा या प्रदेशालाच वाकाटकांचे नाव प्राप्त झाले असावे. अशी काही नावे विदर्भामध्येही आहेत. एस. व्ही. सोहनी असे सुचवितात की, वाकाटकांच्या लेस्वातील ग्वाकाटक नामठ या शब्दसमुहाचे भाषांतर वाकाटक लोकांचा" असे करण्याऐवजी वाकाटक प्रदेशाचा असे करावे. हे वंशनाव कशाही प्रकारे प्राप्त झाले असले तरी वाकाटक लेस्वात वाकाटकनाम या नावाचा उपयोग वंशाच्या संदर्भातच केला आहे. ठवाकाटकनामठ हा शब्दसमूह ठवाकाटकांचेठ या अर्थानेच घ्यावा लागेल, वाकाटक प्रदेशाची या अर्थाने नक्कीच घेता येणार नाही. कारण या शब्दाचा येथे अनेक वचनी उपयोग केलेला आहे. जर हा शब्द प्रदेशाच्या निर्देशासाठी वापरला असता तर तो एकवचनी असता, किंवा त्यासाठी वाकाटकः राज्यस्य इत्यादीसारखे शब्दप्रयोग आले असते. वाकाटक लेखांमध्ये आलेल्या या शब्दसमुहाची पल्लव, कदंब आणि शेवटवा सातवाहन राजा पुलुमावि यांच्या लेखांमध्ये मिळणाऱ्या अशाच प्रकारच्या आणि त्याच अर्थाने वापरलेल्या शब्दसमूहाची तुलना करता येईल. वाकाटक या शब्दाला राजवंशीय हा गर्भित अर्थ जरी प्रथमच पृथ्वीषेण प्रथम याच्या अमदानीतील नचना व गंज येथील कोरीव लेखांमध्ये व विन्ध्यशक्ति दुसरा याच्या वाशीम लेखामध्ये आला असला तरी तो विन्ध्यशक्तीनंतर काही दिवसांतच प्राप्त झाला असावा. नुकत्याच प्राप्त झालेल्या देवसेनाच्या" बीदर ताम्रपटात व वत्सगुल्म शास्वेच्या हरिषेण याच्या थाळनेर ताम्रपटात हा शब्द प्रत्यक्ष विन्ध्यशक्ति प्रथम यांच्या संबंधातन वापरला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटते की या वंशातील पहिल्याच व्यक्तीने स्वतःला वाकाटकांचा राजा असे म्हणवून घेतले होते. हे लेस्ख या शब्दाला राजवंशीय हा अर्थ पूर्णपणे प्राप्त झाल्यानंतर बयाच नंरतच्या काळातील आहेत. ज्या काळात हे लेख दिले गेले त्या काळातील स्थिती प्रतिबिंबीत करतात.
 वाकाटक हे विष्णुवृद्ध गोत्री ब्राह्मण होते आणि वैदिक यज्ञ व विविध पौराणिक धर्मकृत्ये करून त्यांनी वैदिक पौराणिक धर्माचे पालन केले. ज्या वाकाटक नृपतीनी आपल्याला समर्पक अशी महिती उपलब्ध आहे ते बहुतेक राजे एकनिष्ठ शिवभक्त होते आणि नदिवर्धन शास्वेचे फक्त दोनच राजे वैष्णव होते. याचे काही सेवक व मंत्र्यांसह काही अधिकारी हे महायान बौद्धधर्मीय होते आणि त्यांनी त्यांच्या मालकाच्या प्रोत्साहनाने अजंठा व घेटात्कच लेण्यांतील बौद्ध संस्थांना उदार आश्रय दिला होता.
कालक्रम
     काही विद्वानांच्या मते वाकाटकांनी एस्वाद्या संवताची स्थापना केली असावी. के. पी. जायस्वाल यांनी यापूर्वी असे सुचविले आहे की, इ.स. २४८-४९ मध्ये सुरू होणाऱ्या कलचुरि-चैदि संवताची स्थापना विन्ध्यशक्ति प्रथम याने केली होती. परंतु वाकाटकांचे असंख्य लेख राजांच्या वैयक्तिक राज्य वर्षी दिलेले आहेत. त्यामध्ये कोणत्याही संवताचा उपयोग केलेला नाही. त्यामुळे हे मत योग्य नाही. बी. एन. मुखर्जी यांनी असे सुचविले आहे की, वत्सगुल्म शास्वेचा पांचवा राजा देवसेन याच्या शक ३८० च्या हिस्सेबोराळा लेखावरून असे दिसते की, शक ३८० पूर्वी (इ.स. ४५७-४५८) २२० वर्षे वाकाटक वंशाची स्थापना झाली. तेव्हा त्यांनी या वर्षापासून कालगणना करण्याच्या पद्धतीचा खाजगीरित्या अवलंब केला होता. परंतु पूर्वीच्या इतर वाकाटक लेस्वांमध्ये अशा प्रकारच्या कालगणना पध्दतीचे अस्तित्व दिसत नाही या मताप्रमाणेच हे मत स्वीकारार्ह नाही. शिवाय या लेखातील संबंधित भागाचे वाचन अतिशय अनिश्चित आहे.
असे असले तरी पण वाकाटकांना कालक्रम साधारणपणे निश्चित करता येईल असा साधारण पुरावा उपलब्ध आहे. पुराण ग्रंथामध्ये या वंशाचा संस्थापक विन्ध्यशक्ति याचा राजा म्हणून इ.स. च्या तिसया शतकात उदय झाला असा उल्लेख आहे. परंतु पुराणांतील कालगणंनाविषयक माहिती ही अतिशय
अनिश्चित व वादग्रस्त आहे. वाकाटकांचा साधारण कालक्रम निश्चित करण्याचा मुख्य आधार म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य (राज्यारोहण इ.स. ३७६) याची कन्या प्रभावती-गुप्ता हिचा वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा याच्याबरोबर झालेला विवाह हा होय. या पुराव्यावरून असे दिसते की, रुद्रसेन प्रथम यावे पूर्वज चंद्रगुप्त दुसरा याच्या पूर्वीच्या काळात उद्यास आले. या विधानाला वाकाटक वंशाच्या नन्दिवर्धन शास्वेच्या बयान ताम्रपट सनदांमधील ठ्या राजघराण्याचा विन्ध्यशक्तीपासून पांचवा राजा पृथिवीषेण प्रथम गादीवर आला त्याच्या आधी शंभर वर्षे वाकाटक स्वजिना व बळ वाढत होतेठ या माहिमुळे दुजोरा मिळतो. या माहितीनुसार विन्ध्यशक्ति प्रथम याने पृथिवीषेण प्रथम याव्या राज्यारोहणान्या १०० वर्षे पूर्वी वाकाटक राज्यसत्ज्ञता स्थापन केली होती असे दिसते. कालक्रमाविषयी याहीपेक्षा जास्त असंदिग्ध माहिती वाकाटक वंशाचा संस्थापक विध्यंशक्ति प्रथम याच्यापासून सातवा व वत्सगुल्म शोस्वचा पाचवा राजा देवसेन याच्या हिस्सेबोराळा शिलालेखातून मिळते. चांगल्या ज्ञात असलेल्या कालगणना पद्धतीनुसार तिथी असलेला हा एकच लेख आहे वया लेखात असे नमूद केले आहे की, राजाचा अधिकारी स्वामिल्लदेव याने शक ३८० (इ.स. ४७७-७८) मध्ये सुदर्शन नामक सरोवरावे खोदकाम केले. दुर्दैवाने या लेखात या तिथीस जुळणाया राज्यवर्षाचा उल्लेख नाही. परंतु यावरूनही विन्ध्यशक्ति प्रथम हा ख्रिस्तोत्तर तिसया शतकाच्या" मध्यकालात उद्यास आला असावा असाच साधारणपणे निष्कर्ष निघतो.
        वाकाटक सतेच्या अस्तासंबंधी निश्चितपणे सांगता येते. विष्णुकुंडिन राजा विक्र मैद्रवर्मन प्रथम याने आपल्या जन्मामुळे विष्णुकुंडिन व वाकाटक या दोन्ही घराण्यांना भूषविले. विष्णुकुंडिन वंशाचा शेवटचा ज्ञात राजा विक्रमेद्रवर्मन दुसरा याच्या शक ४८८ म्हणजेच इ. स. १६६-६७ व्या तुम्मलगुडे या त्याच्या अकराव्या शासनवीं दिलेल्या ताम्रपटावरून असे दिसते की, त्याने कमीत कमी २७ वर्षे राज्य केले.
परिणामतः त्याचे राज्य राज्यरोहण इ.स. ५२८-२९ नंतर झाले असणे शक्य नाही. आतापर्यंत त्याना पिता विक्रमेद्र वर्मन प्रथम याचा एकही लेख प्राप्त झालेला नाही. परंतु त्याने धारण केलेल्या राजन आणि महाराज या राजसत्तानिदर्शक पद्व्यांवरून तो राज्यावर आला होता हे निश्चित आहे. त्याला जर दहा वर्षाचा छोटासा शासनकाल दिला तर तो इ.स. ५१८-१९ नंतर राज्यावर येणे शक्य नाही आणि त्याना पिता माधववर्मन दुसरा जनाश्रय, जयाने ४० ते ४८ वर्षे" असे दीर्घकाळ राज्य केले. तो इ.स. ४७८-७९ नंतर सतेवर येणे शक्य नाही. इ.स. ५१८-१९ मध्ये त्याची सत्ता संपुष्टात आली असावी. तो फार बलशाली नृपती होता आणि त्याच्या पोलमुख ताम्रपटानुसार त्याने रेवा किंवा नर्मदा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकला होता. अशी धारणा आहे आणि ती कदाचित स्वरीही असेल की, तो स्वतःला वाकाटकांचा न्याय्य उत्तराधिकारी समजत होता. बहुतेक त्याने महाराष्ट्राचा बराच मोठा प्रदेश आपल्या सत्तेस्खाली आणला होता. या प्रमाणे वाकाटक सत्तेवा अस्त कदाचित इ.स. ५०० च्या फार नंतर ठेवता येणार नाही.
तात्पर्य असे की, वाकाटक राजसत्तेचा कालखंड इ.स. च्या तिसया शतकाच्या मध्य ते इ.स. ५०० चा शेवट यामध्ये ठेवावा लागेल.

ऐतिहासिक रुपरेषा

वर दिलेल्या पार्श्वभूमीवर विन्ध्यक वाकाटकांच्या कारकिर्दीचा पुढीलप्रमाणे आढावा घेता येईल. विन्ध्यशक्ति: अ.स. आळतेकर यांचे मत आहे की, विन्ध्यशक्तीचा कोणत्याही धार्मिक पद्धतीनुसार राज्याभिषेक झाला नव्हता त्यामुळे तो अभिषिक्त राजा नव्हता तर केवळ सामंत होता. आळतेकरांचे हे मत हरिघेणाच्या अजंठा शिलालेस्वामध्ये त्याच्या नावामागे राजसत्ता निदर्शक पदवी नाही या माहितीवर आधारित आहे. आतापर्यंत त्याच्यासंबंधी माहिती पुरविणारा हा एकच लेख उपलब्ध होता. हा लेख अतिशय  स्वराब अवस्थेत आहे. याशिवाय याची रचना पद्यात्मक आहे आणि इतर राजांच्या नावामागे कोणत्याही पट्टीचा उल्लेख यामध्ये आलेला नाही. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या देक्सेना" च्या बीदर ताम्रपटात आणि त्याचा पुत्र व वारस हरिषेण" याच्या थाळनेर ताम्रपटात विन्ध्यशक्तीला वाकाटकांचा पहिला (आदि) धर्ममहाराज म्हटले आहे. (वाकाटकानामृ आदिर धर्म महाराज) यावरून तो अभिषिक्त (ण्दनुहुँदर) राजा होता व त्याने राजसत्ता निदर्शक पदव्याही धारण केल्या होत्या याबद्दल शंका राहत नाही. अजंठा शिलालेस्वामध्ये त्याच्या सैनिकी यशाचे अगदी स्पष्ट पण अनुषंगिक रीतीने वर्णन दिलेले आहे. त्याने मोठमाठ्या युद्धांमध्ये जय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते (महाविमर्देष्व-अभिवृद्ध-शक्तिः), संतापला तर देवानासुद्धा त्याला आवरणे शक्य नव्हते (कृद्धस-सुरैर-अध्य-अनिवार्य वीर्यः), युद्धामध्ये त्याच्या घोड्याच्या स्खुरांमुळे उधळलेल्या धुळीच्या लोटांनी सूर्यही झाकोळला जातो (रणेषु हर्य-उद्धव, रेणू-जाल-सछादित-आर्क:) त्याने आपल्या बाहु सामर्थ्यांने सर्व जगावर विजय मिळविला (स्व-बाहु-वीर्य-आर्जित-सर्व लोकः) त्याच्या ऐश्वर्याची तुलना पुरंदर व उपेंद्र यांवेशी करता येईल (पुरन्दर-ओपेन्द्र-सम-प्रभावः), त्याने शत्रुचा नाश केला होता (विनिवारित-आरि:)." असे त्याचे लेखामध्ये वर्णन दिले आहे. परंतु ही सर्व स्तुती संदिग्ध आणि दुर्दैवाने त्याने पराभूत केलेल्या शत्रुची माहिती देणारा काहीही पुरावा नाही. परंतु यावरून असे दिसते की, राज्य निर्माण करणे व त्यावा विस्तार करण्यासाठी सतत सैनिकी कारवायांमध्ये तो व्यस्त होता. यास दृष्टीने विचार करता राज्य निर्माण करण्याकरिता त्याला सैनिकी सामध्यापेक्षा व्यवहार चातुर्याचा जास्त उपयोग झाला हे आळतेकरांचे मत संपूर्ण सत्य मानता येत नाही. व्यवहार चातुर्य व सैनिकी सामर्थ्य हे परस्परांना पूरक होते असे दिसते. मिराशी व अळतेकर यांच्या मताप्रमाणे वाकाटक दक्षिण भारतीय होते. म्हणून ते असे प्रतिपादन करतात की, त्याच्या सैनिकी मोहिमांमुळे वाकाटकांच्या राज्याचा उत्तेकडे विस्तार झाला. आळतेकर म्हणतात की, या विजयी स्वायांमुळे त्याला विन्ध्य विभागाती काही प्रदेशावर सत्ता स्थापन करता आली. क्हाडपासून प्रारंभ करून त्याने बैतूल, इटारसी आणि होशंगाबाद हे मध्यप्रदेशातील जिल्हे जिंकले व आपल्या राज्याला जोडले. मिरार्शीच्या मते जरी विन्ध्यशक्तीने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेकडे केला असला तरी त्याने चनका या ठिकाणाहूनवच राज्य केले असावे. हे चनका शहर त्यांच्या मते मध्य प्रदेशात असावे. तथापि पूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे त्याचे मूळ राज्य विन्ध्य प्रदेशात होते व त्याने दक्षिणेकडे आपल्या राज्याचा विस्तार केला होता. परंतु माहितीव्या अभावी त्यांचे मूलस्थान निश्चित सांगता येत नाही. त्याने दक्षिणेकडे राज्यविस्तार केला हे निश्चित, कारण त्याचा पुत्र प्रवरसेन प्रथम याच्या वेळेपर्यंत वाकाटक राज्यविस्तार विर्भापर्यंत झाला होता.
    ख्रिस्तोत्तर तिसऱ्या शतकाच्या मध्यकाळात मध्य भारत व गंगा-यमुना दोआब या प्रदेशांमध्ये तीन राजसत्ताचा उदय झाला. यापैकी अलाहाबाद, अयोध्या प्रदेशावर गुप्त वंशाचे राज्य होते, तर मथुरा, ग्वाल्हेर, विदिशा विभाग नाग वंशाच्या सत्तेखाली आणि बुंदेलखंड (बघेलखंड) प्रदेश समकालीन वाकाटक राजवंशाच्या अधिपत्यास्वाली होता. त्याच्या दीर्घ अमदानीच्या कालखंडात या सर्व वंशाचे एकमेकांशी संबंध आले. वर उल्लेखिलेल्या अजंठा शिलालेखामध्ये विन्ध्यशक्तीचे ब्राह्मण म्हणून वर्णन असून त्याने काही धार्मिक कृत्ये केल्याचाही उल्लेख आहे. काही पुराणांमध्ये विन्ध्यशक्तीच्या संबंधात ९६ वर्षाचा उल्लेख आहे. हा उल्लेख जर बरोबर असेल तर त्यावरून त्याच्या दीर्घायुष्याचा बोध होतो. त्याने इ.स. १५०-२७५७ या कालखंडात राज्य केले असावे. तो महत्वाकांक्षी राजा होता. त्याने वाकाटक सत्तेची बळकट पायावर प्रतिष्ठापना केली आणि त्याच्या समर्थ वारसांनी त्या सत्तेचे साम्राज्यात रुपांतर केले.
      प्रवीर उर्फ प्रवरसेन प्रथम विन्ध्यशक्तीनंतर त्याचा पुत्र प्रवीर उर्फ प्रवरसेन प्रथम हा गादीवर आला. पुराणांत त्याचा उल्लेस्व प्रवीर म्हणून तर इ.स. १७७ च्या कोरीव लेखांमध्ये प्रवरसेन म्हणून उल्लेख आहे. पुराणांमध्यें वर्णिल्याप्रमाणे त्याने ६० वर्षे राज्य केले. त्याच्या महत्त्वपूर्ण कारकिर्दीचा शेवट इ.स. ३३७ च्या सुमारास झाला. तो फार महत्वाकांक्षी होता. साम्राज्यविस्तार करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्यही  त्याच्याकडे होते. परंतु उत्तरेकडे गुप्त व नाग वंशाच्या उद्यामुळे त्याच्या साम्राज्य विस्ताराला वाव नव्हता. परिणामतः त्याला सातवाहन शास्वेचे राज्य असलेल्या विदर्भाकडे वळावे लागले. या सातवाहन शास्वेचे एक सातकर्णि, कुंभ सातकर्णि व कर्ण (किंवा कृष्ण) सातकर्णि हे तीन राजे फक्त तन्हाळा (अकोला जिल्हा) नाणेद्ध संचयानुसार ज्ञात आहेत. त्यांनी सुमारे इ.स. ३०० पर्यंत राज्य केले. खात्रीलायक पुराव्यांच्या अभावी प्रक्र सेनाने इ.स. तिसऱ्या शतकाच्या शेवटी कोणत्या सातवाहन राजाचा पराभव केला हे सांगता येत नाही. परंतु वाकाटक आणि विदर्भ प्रदेश या दोहोच्याही दृष्टीने ही फार महत्त्वपूर्ण घटना होती. कारण यावेळेपासून वाकाटक व विदर्भ यांचे एकमेकांबरोबर अतूट संबंध राहिले आहेत. जरी आपल्याला अद्यापपर्यंत त्याने आणखी काही प्रदेशांवर आपली सत्ता स्थापन केली होती किंवा नाही याबद्दल माहिती उपलब्ध नसली तरी त्याने आणस्वी काही प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणून आपल्या राज्याला जोडले असावेत. प्रारंभीच्या इतिहासकारानी काही तर्क केले आहेत. अळतेकर यांच्या मते वाकाटक सत्तेच्या अस्तापर्यंत जे प्रदेश त्यांच्या सत्तेस्वाली होते ते सर्व प्रवरसेन प्रथम याने कवाकाटक राज्याला जोडले होते. नंतरच्या इतर काही राजानी राज्याला काही प्रदेश जोडल्याबद्द‌लवा पुरावा उपलब्ध नाही. श्री शैल-स्थल-माहात्म्या मधील परंपरेनुसार चंद्रगुप्ताच्या चंद्रावती नामक कन्येने श्री शैल येथील भगवान मल्लिकार्जुनाला रोज जुईच्या फुलांची माला वाहिली. आळतेकर या चंद्रावतीचे तादात्म्य प्रभावतीगुप्ताशी करतात आणि त्याच्या आधारे त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, या तीर्थाचा (श्री शैल) अंतर्भाव वाकाटक राज्यात होते होता. कर्नुल जिल्ह्यापर्यतचा प्रदेश वाकाटकांच्या प्रत्यक्ष शासनारवाली नव्हता, परंतु प्रभावास्वाली होता. पण या पुराव्याला जेवढे स्वात्रीलायक समजले जाते तेवढा तो स्वात्रीलायक नाही. याचे प्रमुख कारण असे आहे की, शैल मल्लिकार्जुन येथील प्रतिमा शिवाची आहे आणि प्रभावती गुप्ता ही गुप्त नृपर्तीप्रमाणेच कट्टर
वैष्णव होती. प्रवरसेन प्रथम याच्या पश्चिमेकडील राज्यविस्ताराच्या संबंधाने असलेल्या त्यांच्या मताबद्दलही असेच म्हणावे लागेल. प्रवरसेन प्रथम याने पश्चिमी क्षत्रपांच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळे भर्तृदामनच्या नंतर चष्टन वंशाचा अस्त झाला. तसेच स्वामी जीवदामन याचा पुत्र रुद्रसिंह दुसरा याचे झालेले सिंहासनारोहण आणि तो व त्याचा पुत्र व वारस यशोदामन दुसरा यांनी राजसतानिदर्शक महाक्षत्रप ही पदवी धारण न करणे या गोष्टी घडून आल्या. असा एक मतप्रवाह आहे की, प्रवरसेन प्रथम याने रुद्रसिंह दुसरा याला वाकाटकांचे सार्वभौमत्व मान्य करावे या अटीवर त्यावेळी राज्य करीत असलेल्या भर्तृदामन विरु द्ध उठविले आणि याच कारणामुळे रुद्रसिंह दुसरा व त्याचा पुत्र यशोदामन दुसरा यांनी राजसतानिदर्शक महाक्षत्रप पदवी धारण केली नसावी. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात सोनपूर येथे मिळालेली त्यांची नाणी समाविष्ट असलेल्या नाणेसंचयावरून असे दिसते की, ते वाकाटकांना स्वंडणीही देत असावेत. परंतु हा सिद्धांत पूर्वीच्या सिद्धान्ताप्रमाणेच स्वीकारार्ह नाही. भर्तृदामन यांच्यानंतर चष्टन वंशाला मुलगा नसल्यामुळे या वंशाचा अस्त झाला. रुद्रसिंह दुसरा यान्या प्राप्त झालेल्या नाण्यांवरून असे दिसते की, नाणे पाडण्याची व त्यावर नावे देण्याची पद्धत अव्याहत चालूच होती. महाक्षत्रप पद‌वी धारण न करण्यामागे बहुतेक ससानियन लोकांचे आक्रमण असावे. कारण या सुमारास ससानियनांनी सिंध प्रांत हस्तगत केला होता आणि त्यांनी या दोन क्षत्रपांना महाक्षत्रप ही श्रेष्ठ पदवी धारण करण्यास हरकत घेतली असावी. प्रवरसेन प्रथम याने निर्माण केलेले राज्य दक्षिणेत तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते हा मिराशींचा मुद्दा पूर्णपणे मान्य करता येत नाही. पवरसेन प्रथम याच्या साम्राज्याच्या बाबतीत अतिशयोक्तिपूर्ण विधान जायस्वाल यांनी केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, त्याच्या साम्राज्याचे स्वरूप अखिल भारतीय (ईड व्हर्डीह) असे होते. त्याने कुषाणांना पंजाबातून अफगाणिस्थानापर्यंत हुसकावून लावले. पल्लव ही पल्लवाची शास्वा होती. परंतु याविषयी स्पष्ट पुरावा उपलब्ध नाही. वर नमूद केल्याप्रमाणे विकध्यशक्तीच्या साम्राज्यात नर्मदा नदीच्या उत्तरेला असलेल्या विन्ध्य विभागाचा अंतर्भाव होत होता, परंतु इतर प्रदेशाच्या समावेशाबद्दल पुरावा उपलब्ध नाही. त्याचा पुत्र प्रवरमेव प्रथम याने सामान्यात्न्या दक्षीणेकडे विस्तार केला विदर्भ आणि दक्षिण भारतातील त्याला लागून असलेला प्रदेशही त्याने बहुतेक ताब्यात घेतला असावा, त्याच्या मुलांनी त्याच्या अधिपत्याखाली थोडे फार विजय प्राप्त केले असण्याची शक्यता आहे. शिवाय मध्यप्रदेशातील लागून असलेला दक्षिण कोसल किंवा छत्तीसगड प्रदेशही त्याच्या प्रभावास्वाली आला असावा, परंतु आजपावतो त्यावर त्याची सत्ता होती." असा पुरावा उपलब्ध नाही. तरी सुद्धा आपण असे स्वात्रीपूर्वक म्हणू शकतो की, त्याच्या अमदानीत वाकाटक साम्राज्यात मध्यप्रदेशाच्या बुंदेलखंड (बघेलखंड) या विभागापासून महाराष्ट्रातील विदर्भापर्यतच्या प्रदेशाचा समावेश होत होता. पुराणांनुसार त्याची राजधानी मध्यप्रदेशाच्या सतना जिल्ह्यात नचना गावाशी तादात्म्य केलेल्या कांचनका या शहरी होती. जायस्वालांनी सुचविले सधारित वाचन मान्य करावयाचे असेल, तर त्याने नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर सापतुडा किंवा ऋक्षवत पर्वताच्या उतरणीवर पुरिका येथे दुसरी राजधानी स्थापन केली असावी असे म्हणावे लागेल. परंतु या स्थानाची अजून समाधानकारकरित्या निश्चिती करता आलेली नाही.
     प्रवरसेन प्रथम याने मध्यभारतात अतिशय बलशाही असलेल्या भारशिव नाग घराण्याबरोबर वैवाहिक संबंध स्थापन केले होते. त्यामुळे वाकाटक साम्राज्याला सामर्थ्य व महत्त्व प्राप्त झाले असावे. नन्दिवर्धन शास्वेच्या सर्व लेखांमध्ये यासंबंधीचा उल्लेख केलेला आहे. त्याचा पुत्र गौतमीपुत्र याचा विवाह नाग नृपती भवनाग याच्या कन्येबरोबर झाला होता. या भवनागने आपल्या स्वांद्यावर शिवलिंग धारण केल्यामुळे संतुष्ट होऊन भगवान शंकराने भारशिव हा वंश उत्पन्न केला होता. भारशिवांनी स्वसामर्थ्याने प्राप्त केलेल्या भागीरथीच्या जलाने स्वतः स मूर्धाभिषेक करवून घेतला होता आणि दहा अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पवित्र स्नान केले होते. वाकाटकांचे सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने हा विवाहसंबंध फारच महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या गुप्त राजवंशाबरोबर अशाच प्रकारच्या असलेल्या संबंधामुळे नन्दिवर्धन शास्वेच्या सर्व कोरीव लेस्वांमध्ये त्याचा अभिमानाने उल्लेख केलेला आहे.
    सामर्थ्य, सत्ता व श्रद्धा याने युक्त असलेल्या प्रवरसेन प्रथम याने असंख्य श्रौत यज्ञ केले. या यज्ञांची वर्णने वाकाटकांचे कोरीव लेख व पुराणे या दोन्हींमध्येही मिळतात. पुराणांमधील नोंदीप्रमाणे त्याने असंख्य वाजपेय किंवा वाजिमेध केले व विपुल दानेही दिली. कोरीव लेखांवरून असे दिसते की, त्याने अग्निष्टोम, आपतोर्याम, उक्थ्य, पौडशीन, अतिरात्र, वाजपेय, तसेच बृहस्पतिसव, साद्यस्क्र आणि चार अश्वमेध" हे सर्व यज्ञ (सप्त-सोम संस्था) केले. यापैकी बृहस्पतिसव हा यज्ञ फक्त ब्राह्मणच करू शकतात. चार अश्वमेध हे विन्ध्यशक्तीने पेरलेल्या बीजाला अंकुर येऊन त्याचे विशाल व सामर्थ्यशाली साम्राज्यवृक्षात रुपांतर करणाऱ्याा विजयी मोहिमाच्या आनंदाप्रीत्यर्थ केले होते हे स्पष्ट आहे. हे याग केल्यानंतर, विशेषतः वाजपेय याग केल्यानंतर त्याने राजसत्ता निदर्शक "सम्राटह ही पद‌वी धारण केली. ही पट्टी वाकाटक नृपतींमध्ये फक्त त्याच्याचसाठी वापरली आहे आणि नंतरच्या राजांपैकी फक्त यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन यानेच ही पदवी धारण केलेली आहे.
   वत्स्गुल्म शास्वेच्या काही कोरीव लेखांमध्ये प्रवरसेनाचे वर्णन "धर्ममहाराजह्न असे केले आहे. परंतु या पद‌वीचा उपयोग येथे दक्षिण भारतीय परंपरेच्या प्रभावामुळे केला असावा. त्याने प्रत्यक्षात ही पद्वी धारण केली होती असे दास्वविणारा पुरावा उपलब्ध नाही.
प्रवरसेनाने आपल्या यशाने किर्ती प्राप्त केली होती. वाकाटकांचे तीन कोरीव लेख सोडून बाकीच्या सर्व लेस्वांमध्ये वाकाटक वंशावळ त्याच्यापासून प्रारंभ होते. त्याने जिंकलेल्या प्रदेशांचे एकत्रीकरण करून वाकाटक साम्राज्य सत्तेच्या तोडीचा दर्जा किंवा स्थान प्राप्त करून दिले. या वाकाटक साम्राज्याची, यशस्वी वाटचाल त्याच्या सत्तेच्या हासाला प्रारंभ होण्यापूर्वी दीडशे वर्षापर्यंत निर्वेधपणे चालू होती. पुराणांतील
वर्णनाप्रमाणे प्रवीर प्रवरसेन प्रथम याला चार पुत्र होते व ते सर्व राजे झाले. त्याच्या एका पुत्राचे नाव गौतमीपुत्र होते. तसेच विन्ध्यशक्ति प्रथम याच्या वाशीम ताम्रपटाद्वारे प्रवरसेनाचा पुत्र व वत्सगुल्म शास्वेचा संस्थापक सर्वसेन याची नोंद आहे. त्यामुळे पुराणातील माहितीमध्ये काही सत्यांश आहे हे मान्य करावे लागेल. वाकाटकांच्या नन्दिवर्धन व वत्सगुल्म" या फक्त दोन शास्वा ज्ञात आहेत. बाकीच्या दोन शास्वांबद्दल अजून काही माहिती उपलब्ध नाही. ही दोन राज्ये शोधून काढण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले आहेत. तथापि राज्यांच्या स्थान निश्चितीसाठी भविष्यात स्वात्रीलायक संशोधन होणे आवश्यक आहे.

प्रक्रसेन प्रथम याने आपले राज्य आपल्या हयातीतच तीन मुलांमध्ये वादून दिले असावे आणि त्याच्या मुलांपैकी गौतमीपुत्र हा अल्पवयीन असल्यामुळे त्याने राज्याचा काही भाग स्वतःकडे ठेवला असावा. गौतमीपुत्र आणि त्याचे वंशज हे वाकाटकांच्या मुख्य किंवा ज्येष्ठशाखेचे प्रतिनिधित्व करतात असा जो ग्रह सध्या प्रचलित आहे त्याच्या समर्थनार्थ पुरावा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या परिस्थितीत ज्ञात असलेल्या दोन वाकाटक शास्वांचा उल्लेख त्यांच्या राजधानीच्या ठिकाणांच्या नावाने म्हणजे पद्मपूर-नन्दिवर्धन-प्रक्रपूर शास्वा व वत्सगुल्म शास्वा असा करणेच योग्य ठरेल.

नन्दिवर्धन शास्वा

प्रवरसेन पहिला : गौतमीपुत्राने भारशिव नागराजा भवनाग याच्या मुलीशी विवाह केला. या नागराजाला बहुतेक पुत्र नव्हता म्हणून त्याच्या मुलीला गौतमीपुत्रापासून झालेला मुलगा रुद्रसेन प्रथम याला वाकाटक राज्यातील त्यान्या स्वतःच्या हिश्श्याबरोबरच पद्मावतीचेही राज्य मिळणार होते. गौतमीपुत्र हा आपला पिता प्रक्र सेन प्रथम याच्या कारकिर्दीतच मृत्यू पावला. परिणामतः प्रक्रसेन पहिल्या नंतर त्याचा नातु रुद्रसेन प्रथम हा गादीवर आला. रुद्रसेन प्रथम याच्या वारसांच्या सर्व लेखांमध्ये त्याचे भवनाग-दौहित्र असे वर्णन आले आहे. त्यावरून रुद्रसेन प्रथम हा आईच्या वडिलांच्या राज्याचाही वारस होणार होता असे दिसते.
दौहित्र हा शब्द येथे पारिभाषिक संज्ञेप्रमाणे वापरला आहे. लिच्छविगुप्त या संयुक्त राज्याचा वारस असणाऱ्या गुप्तसम्राट समुद्रगुप्ताचे वर्णन लिच्छवि दौहित्र असे केले आहे. लिच्छवि राज्य मिळाल्यामुळे गुप्त सामर्थ्य व राज्य या दोहेची बरीच वृद्धी झाली. भवनाग याच्या नाण्यांवरून त्याने अधिराज व महाराज या पदव्या धारण केल्या होत्या असे समजते. बहुतेक इतर नातेवाईकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे नाग-वाकाटक यांचे संयुक्त राज्य निर्माण होऊन त्याचे सामर्थ्यशाली साम्राज्यात रुपांतर होऊ शकले नाही. प्राप्त झालेली नाग राजांची नाणी व अलाहाबाद कोरीव लेखांत समुद्रगुप्ताने पराभूत केलेल्या राजांच्या यादीत आलेली नाग राजांची नावे यावरून असे दिसते की, पद्मावतीवर नागसेन व गणपतिनाग यांच्यासह इतर नाग राजांनी राज्य केले.
रुद्रसेन पहिला हा इ.स. ३३७ मध्ये गादीवर आला. पुराणांमध्ये प्रवरसेन प्रथम याचे चारही पुत्र राजे होतील असे वर्णन आहे. परंतु गौतमीपुत्र हा आपल्या वडिलांच्या हयातीतच मृत्यू पावल्यामुळे त्याचा मुलगा रुद्रसेन प्रथम हा गादीवर आला. त्यामुळे पुराणातील वर्णन प्रत्यक्षात रुद्रसेनाच्या संदर्भात घ्यावे लागेल. त्याच्यानंतर येणाऱ्या राजांच्या कोरीव लेस्वांमध्ये त्याचे (रुद्रसेनाचे) स्वामि-महाभैरवाचा परमभक्त असे (अत्यंत स्वामि-महाभैरव-भक्त) वर्णन मिळते. हे शिवाचे उग्र रूप आहे. याबाबतीत त्याचेवर प्रेम करणाऱ्या व त्याला आपला वारस" करू इच्छिणाया त्याच्या आजोबांचा (आईचे वडील) प्रभाव त्याचेवर पडला असावा. काही विद्वान त्याला देवटेक येथे प्राप्त झालेल्या अपूर्ण लेखाचा कर्ता समजतात. या लेखामध्ये रुद्रसेनाने चिकंबुरि (देवटेकचें प्राचीन नाव) या ठिकाणी चांधलेल्या धर्मस्थळाचा उल्लेख आहे. जर हा लेख स्वरोस्वरच त्याचा असेल तर उल्लेखित धर्मस्थळ म्हणजे ज्या स्वामी महाभैरवाचा तो परमभक्त होता लस्व स्वरास्खरच त्याचा असेल तर उल्लास्वत धमस्थळ म्हणज ज्या स्वामा महाभरवाचा ता परमभक्त होता त्याचे मंदीर असावे. त्याचे राज्य उत्तरेस मध्यप्रदेशातील विन्ध्यविभागापर्यंत पसरले होते. त्याच्या राज्याच्या पश्चिमेस खानदेश, पूर्वेस कोसल व दक्षिणेस विदर्भ हे प्रदेश होते. याखेरीज त्याच्या राज्यविस्ताराबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. तो त्याच्या आजोबाप्रमाणेच राजधानीच्या ठिकाणाहून राज्य करीत असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये या काळात सामर्थ्यशाली गुप्तसम्राट समुद्रगुप्त दुरवरचे प्रदेश जिंकून आपली विजयी कारकीर्द गाजवत होता. त्यामुळे रुद्रसेन प्रथम याच्या अमदानीत उत्तर भारतामध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घटना व स्थित्यंतरे झाली. के. पी. जायस्वाल व एस. के. अयांगार" यासारखे प्रांरभीचे इतिहासकार व एस. आर. गोयल यासारखे वर्तमान इतिहासतज्ञ यांची अशी धारणा आहे की, रुद्रसेन प्रथम याचा समुद्रगुप्ताने पराभव केला होता आणि त्याने आर्यावर्ताच्या (उत्तर भारत) पराभूत केलेल्या राजांच्या यादीमध्ये त्याचा उल्लेख रुद्रदेव या नावाने केला आहे. परंतु जरी मध्यप्रदेशातील विध्यविभागाचा अंतर्भाव त्याच्या राज्यात होत असला तरी त्याचे (रुद्रसेन प्रथम) मुख्य राज्य नर्मदा नदीच्या दक्षिणेला होते. त्यामुळे त्याला आर्यावर्ताचा राजा म्हणता येणार नाही. या शिवाय ज्याठिकाणी वाकाटकांच्या मांडलिकांचे दोन लेख प्राप्त झाले ती सतना जिल्ह्यातील नवना व गज ही ठिकाणे दक्षिण भारतामध्ये अंतर्भूत नव्हती असे निश्चितपणे म्हणता येत नाही. तसेच समुद्रगुप्ताने आर्यावर्तातील पराभूत राजांची राज्ये नष्ट केली, परंतु रुद्रसेनाचा राजवंश त्याच्यानंतर जवळ जवळ दीड शतकापर्यंत राज्य करीत होता. त्याचा पुत्र व वारस पृथिवीपेण प्रथम याचे मांडलिक नचना व गंज येथे सापडलेल्या दोन--लेखांद्वारे ज्ञात आहेत. यामुळे असे म्हणता येते की, समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद स्तंभ लेस्वातील रुद्रदेव यावे रुद्रसेन प्रथम यावेशी समीकरण करणे शक्य नाही. काही विद्वानांचे असे मत आहे की, याबरोबरच इतर शास्वांनी रुद्रसेनाव्या" राज्यरोहणाला विरोध केला. त्यामुळे प्रवरसेनाने स्वतःच त्याच्या चार मुलांमध्ये केलेल्या राज्याच्या विभागणीमुळे कमजोर झालेली राजसत्ता जास्तच क्षीण झाली. राजसत्ता दुर्बल झाल्यामुळे प्रवरसेनानंतर कोणत्याही राजाने सम्राट पदवी धारण न करणे स्वाभाविकच ठरते. काही वेळा असे म्हटले जाते की, प्रवरसेनाने वाजपेय याग केला होता म्हणून त्याने ठसम्राटठ ही पद‌वी धारण केली होती. इतर वाकाटक राजांनी हा याग केला नव्हता वय ही पद‌वीही धारण केली नव्हती. शतपथ ब्राह्राणाच्या ज्या उताऱ्यात वाजपेय यज्ञ केल्याने ठसम्राटठ ही पट्टी धारण करता येते असे विधान केले आहे त्याच उतायात राजसूय यज्ञ केल्यास ठराजनठ ही पदवी धारण करता येते असे प्रतिपादन केले आहे. भारतावर राज्य करणारे क्षहरात आणि कार्दमक यांच्यासारख्या परक्या राजांसह सर्व राजे तसेच जैन व बौद्धया सारख्या अब्राह्मणीय धर्माचे अनुयायी असलेले राजे यांनी साधारणपणे राजसूय याग करणे अपेक्षित नव्हते, तरी पण त्यांनी राजन ही पदवी धारण केली होती. मंदसोर शिलालेस्वात ज्याच्या फुटकळ कार्याचे सविस्तर वर्णन दिलेले आहे, परंतु त्याने वाजपेय याग केल्याचा उल्लेख नाही. त्या औलिकर वंशीय यशोधर्मन-विष्णुवर्धन राजाने राजसत्ता निदर्शक ठसम्राटठ ही प‌ट्टी धारण केली होती. आणि या प्रमाणे बरेच राजे राजसूय याग न करताही राजन ही पट्टी आपल्या नावामागे लावू शकले असते. जर यशोधर्मन वाजपेय याग न करता सम्राट ही पद‌वी धारण करू शकतो तर त्याच नियमाने प्रवरसेन प्रथम चे वारस जर पुरेसे बलशाली असते तर केवळ परंपरेने पालन करण्यासाठी धारण केली जाणारी ही पदवी त्यांनी धारण करण्यात काहीच प्रत्यवाय नव्हता. यावरून असे दिसते की, ज्यांनी पूर्वीच मध्यभारतातील नागसत्ता चिरडून टाकली होती त्या बलशाली गुप्त सम्राट समुद्रगुप्ताच्या उपस्थितीत सम्राट ही पदवी धारण करण्याइतका रुद्रसेन प्रथम हा सामर्थ्यशाली नव्हता. मिराशींनी सुद्धा म्हटले आहे की, रुद्रसेन प्रथम याला समुद्रगुप्ताचे वर्चस्व मान्य करून त्याला त्याच्या दक्षिणापथाव्या" विजयी आक्रमणासाठी आपल्या राज्यातून मार्ग द्यावा लागला. तात्पर्य समुद्रगुप्ताने रुद्रसिंहाचा प्रत्यक्ष पाडाव केला नसला तरी रुद्रसेन प्रथम याला समुद्रगुप्ताच्या दुय्यम मित्राप्रमाणे वागावे लागत असावे. रुद्रसेन प्रथम याने अंदाजे इ.स. ३७७पर्यंत राज्य केले. त्याच्या मागून त्याचा मुलगा पृथिवीषेण हा गादीवर आला.
पृथिवीषेण पहिला : 
       प्रत्यक्ष पृथिवीषेणाचे लेख उपलब्ध नाहीत. परंतु त्याचा पुत्रव वारस रुद्रसेन" द्वितीय याच्या वेळेपासून पुढे आलेल्या सर्व वारस राजांच्या लेखांमध्ये त्याची स्तुती केलेली आहे. या पुराव्याचे अवलोकन केल्यास असे दिसून येते की, या वेळेपर्यंत वाकाटकांच्या सरकारी (दट्टट्टगर्मीत) सनदांच्या मसुद्याचे स्वरूप निश्चित झालेले होते. हे स्वरूप शवेटपर्यंत कायम राहिले. या वर्णनाप्रमाणे तो परम शिवभक्त होता. त्याला महेश्वर भक्त (अत्यंत माहेश्वर) म्हटले आहे. त्याचप्रमाणे तो सत्यवादित्व, ऋजुत्व, कारुण्य, शौर्य, विक्रम, नीतिनैपुण्य, विनय, माहात्म्य (थोरपणा), बुद्धिमत्ता, सकल जनाविषयी आदर, धर्मविजयित्व, विनय माहात्म्य (थोरपणा), बुद्धिमत्ता, सकल जनाविषयी आदर, धर्मविजयित्व, मनौधैर्य इत्यादि गुणांनी युक्त होता. त्याचे वर्तन युधिष्ठिरासारखे होते. त्याला पुत्र आणि पौत्र होते, त्याचे सैन्य सामर्थ्य व कोष यामध्ये शंभर वर्षापासून" सतत वृद्धि होत होती. याप्रकारचे हे वर्णन निश्चितच महात्वाकांक्षी नृपतीचे वाटत नाही तर एखाद्या धर्मात्म्याचे वाटते. त्याचा समकालीन गुप्त सम्राट समुद्रगुप्त हा विजयी मोहिमांमध्ये व्यस्त होता आणि रुद्रसेन प्रथम याने पूर्वीच आपल्या या परोपकारी दोस्ताची सता मान्य केली होती. पृथिवीषेण प्रथम याने आपल्या पित्याने धोरण पुढे चालू ठेवले होते असे दिसते.
      मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात नचना की तलाई व गंज येथे प्राप्त झालेल्या वाकाटक महाराज पृथिवीषेण याचा सेवक असलेल्या व्याघ्रदेवाच्या दोन शिलालेखांवरून असे दिसते की, विन्ध्य विभागावर --त्याची नाममात्र सत्ता अद्याप टिकून होती. वाकाटक वंशाचे पृथिवीषेण या नावाने दोन राजे होते. पृथिवीषेन प्रथम व पृथिवीषेण दुसरा. यापैकी पहिला हा रुद्रसेन प्रथम याचा पुत्र होता. त्यामुळे संबंधित शिलालेखांमध्ये उल्लेखिलेल्या पृथिवीषेण हा कोणता होता याबद्दल विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. काही इतिहासकार त्याचे तादात्म्य या नावाच्या पहिल्या राजाशी करतात, तर जे. दुबइल रमेशचंद्र मजुमदार, का. ना. दीक्षित आणि वा. वि. मिराशी इत्यादिंचा या नावाच्या दुसया राजाशी तादात्म्य करण्याकडे कल आहे. नंतरचा पृथिवीषेण राजा इ.स. च्या पाचव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकांत उ‌द्याला आला. संबंधित शिलालेस्वांत तिथी नमूद केलेली नाही. आणि दुसया मताचा पुरस्कार करणाऱ्या एकाही विद्वानाने हा लेख पहिल्या पृथिवीषेणाचा नाही हे सिद्ध करण्याकरिता निर्विवाद असा अक्षस्वटिकाविषयक किंवा दुसरा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. मिराशींच्या मते या लेखांमध्ये उल्लेखिलेला महाराज व्याघ्र हा उच्चकल्प वंशाच्या लेखांमध्ये उल्लेखिलेला उच्चकल्प महाराज जयनाथचा पिता असावा. त्याच्या ज्ञात वंशावळीनुसार हा पृथिवीषेण द्वितीयच्या अगदी समकालीन राज्य करीत होता. असे दिसते. पण हे मत केवळ नामसादृष्यावर आधारित आहे.
     नचना आणि गंज येथील लेखांमध्ये मांडलिकाचे नाव व्याघ्रदेव असे दिलेले आहे. तर उच्चकल्प वंशाच्या लेखांमध्ये मुख्य व्यक्तीचे नाव फक्त व्याघ्र असे दिलेले आहे. या नावाच्या मागे महाराज ही राजसता निदेर्शक पद‌वीही आहे. परंतु ही पदवी संबंधित लेखांमध्ये त्याच्या नावामागे आढळत नाही. या गोष्टी लक्षात घेता वाकाटक मांडलिक व्याघ्रदेवचे उच्चकल्प महाराजाशी समीकरण स्वीकारता येणार नाही. एच.सी रायचौधरी यांच्या अवलोक नाप्रमाणे नचना व गंज या ठिकाणांसहीत बुंदेलखंड (बघेलखंड) प्रदेश सामर्थ्यशाली गुप्त सम्राट समुद्रगुप्त याच्या वेळेपासून गुप्तांच्या सत्तेस्वाली होता आणि वाकाटकांची त्या प्रदेशांवर कमीत कमी इ.स. ५२८ पर्यंत सत्ता नव्हती. समुद्रगुप्ताच्या एरण शिलालेखावरून असे दिसते की, दक्षिणेकडे कमीत कमी सागरपर्यंतचा प्रदेश त्याच्या प्रत्यक्ष अंमलाखाली होती. उच्चकल्प राज्याच्या पश्चिमेकडे असलेल्या प्रदेशावर परिव्राजक महाराजाची सत्ता होती व त्याने गुप्त वंशाची सर्वश्रेष्ठ सत्ता मान्य केली होती. उच्चकल्प वंशीय महाराजाने जरी त्याच्या लेखांमध्ये असे स्पष्ट केलेले नसले तरी भौगोलिक राजनितीनुसार गुप्तांची सत्ता मान्य केली असावी. याशिवाय अलीकडेच प्राप्त झालेल्या महाराज हरिवर्मनच्या गुप्त संवत १६८ च्या मध्यप्रदेशात सिंधी जिल्ह्यात मिळालेल्या शंकरपूर सनदेनुसार गंज व हरिवर्मनच्या गुप्त संवत १६८ च्या मध्यप्रदेशात सिंधी जिल्ह्यात मिळालेल्या शंकरपूर सनदेनुसार गंज व नचना या ठिकाणांचा अंतर्भाव असणाऱ्या बघेलखंड भागात इ.स. ४८७-८८१०० मध्ये राज्य करणाया गुप्त सम्राट बुधगुप्ताच्या मांडलिक हरिवर्मन राज्य करीत होता. या सनदेमध्ये हरिवर्मनच्या आधीच्या दोन पिढ्यांचा उल्लेख आहे. त्यावरून असे दिसते की, संबंधित प्रदेश बयाच वर्षापासून गुप्त साम्राज्यात मोडत असावा. त्यामुळे आपण स्वात्रीपूर्वक असे म्हणू शकतो की, नचना व गंज येथे प्राप्त झालेले संबंधित लेख हे पृथिवीषेण प्रथमच्या सत्ता काळातील आहेत. यावरून हे सिद्ध होते की मध्यपेशातील बुंदेलखंड (बघेलखंड) प्रदेशातील आपल्या वडिलोपार्जित राज्यावर पुथिवीषेण प्रथम याच्या आमदानीच्या प्रारंभापर्यंत वाकाटकांची सत्ता होती. वर उल्लेख केल्याप्रमाणे समुद्रगुप्ताने या सत्तेचा शेवट केला. त्याच्या अलाहाबाद स्तंभलेखामध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे किंवा नाही किंवा हा व्याघ्रदेव आर्यावर्ताच्या लहान राजांपैकी अप्रत्यक्षपणे इतर राजांबरोबर सुचित केलेला एक राजा होता की नाही हे ठरिवणे कठीण आहे. समुद्रगुप्ताने पराभूत करून पुन्हा सिंहासनावर स्थापन केलेल्या दक्षिणापथाच्या (डेक्कन अॅड साऊथ) राजांपैकी एक म्हणजे महाकातारचा व्याघ्रदेव यांचेशी त्याचे तादात्म्य करणे शक्य आहे. परंतु व्याघ्रराजा हा दक्षिणेचा राजा होता असा उल्लेख आहे, तर व्याघ्रदेव हा उत्तरेकडे विन्ध्यविभागात राज्य करीत होता असा आक्षेप घेतला जातो. या आक्षेपाचे निराकरण करणे शक्य आहे. वराहमिहीर सारखे प्राचीन भारतीय लेखक अलाहाबादच्या पश्चिम दक्षिण दिशेला ६७ मैलांवर बांदा जिल्ह्यात असलेल्या चित्रकूट टेकड्यांचा सुद्धा अंतर्भाव दक्षिण विभागात" करतात. याच न्यायाने मध्यप्रदेशातील जबलपूर ते उत्तर प्रदेशातील मिर्झापूरपर्यंत पसरलेल्या अरण्याचा किंवा अरबी विभागाचा महाकांतार या शब्दाने बोध होत असावा किंवा या विभागाला महाकांतार या नावाने संबोधित असावेत, आणि जरी दक्षिणेतील इतर राजांप्रमाणे समुद्रगुप्ताने त्याला त्याचे राज्य परत केले असले तरी गुप्त साम्राज्य सत्तेच्या प्रभावामुळे मालव, यौधेय यासारख्या इतर राज्यांप्रमाणे त्याची सत्ता संपुष्टात आली असे म्हणावे लागेल. पुढे पृथिवीषेण प्रथम याने समुद्रगुप्ताच्या दक्षिणेकडील आक्रमणामध्ये भाग घेतला असे त्याने धारण केलेल्या ठधर्म-विजयीनठ (जो शत्रुचा पराभव करतो आणि त्यांचे प्रदेश घेत नाही तर त्यांचे यश हिरावून घेतो असा पवित्र विजेता). या पद्वीवरून दिसते. त्याने स्वतः कोणताही विजय प्राप्त केलेला दिसत नाही. परंतु विदर्भावर आपली सत्ता मात्र कायम टिकवली. भारतीय उपखंडात त्यावेळी बलशाली दोन राजवंशातील मैत्री, वैवाहिक संबंध स्थापून दृढ केली होती. पृथिवीषेण प्रथम याच्या अमदानीचा शेवट होण्याच्या थोडा काळ आधी (इ.स. ३८०) त्याचा मुलगा रुद्रसेन द्वितीय याचा विवाह समुद्रगुप्ताची नाग राजकन्या कुबेरनागा हिच्यापासून झालेला मुलगा चंद्रगुप्त दुसरा याची कन्या प्रभावती गुप्ता हिच्याशी झाला होता. ही महत्त्वपूर्ण घटना वाकाटकांच्या" नंतर दिलेल्या सर्व सनदांमध्ये अभिमानाने सांगितली आहे.
      आपल्याला पृथिवीषेण याच्या राजधानीबद्दल काहीच माहिती नाही. त्याच्या अमदानीत राजधानी नन्दिवर्धनला आणली गेली" असे मिराशी सांगतात. पण तरीही याचा पुत्र रुद्रसेन द्वितीय याची राजधानी येथे होती असे दिसते. त्याने त्याच्या वडिलांचा मांडलिक व्याघ्रदेव याला ताब्यात देऊन स्वतःची राजधानी पद्मपूर येथे स्थापन केली. याशिवाय पद्मपूरहून दिलेला एक अपूर्ण एकपत्री ताम्रपट" त्याचा असण्याचीही शक्यता आहे.

रुद्रसेम द्वितीय : 
     पृथिवीषेण प्रथम नंतर इ.स. ३८७ च्या सुमारास त्याचा पुत्र रुद्रसेन द्वितीय गादीवर आला. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याने गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याची कन्या प्रभावतीगुप्ता हिच्याशी विवाह केला. प्रभावतीगुप्ता आपल्या पित्याप्रमाणेच प्रभावशाली असावी आणि बहुधा त्याच्या प्रभावामुळे रुद्रसेन दुसरा हा परम वैष्णव बनला. आपली राजसता चक्रपाणी विष्णूच्या"" कृपेने स्थापन झाली असा त्याचा दृढ विश्वास होता. त्याच्या पाचव्या शासनवर्षी दिलेला ताम्रपट नागपूर जिल्ह्यांत"" मांढळ येथे प्राप्त झाला आहे. यामध्ये त्याने विविध गोत्री ब्राह्मणांना व वैदिक चारणांना काही स्वेडी दान दिल्याची नोंद केली आहे. दान दिलेली स्वेडी पद्मपूरच्या पूर्वेस असलेल्या शासन विभागात (मार्ग) वसलेली होती. ताम्रपटात नमूद केल्याप्रमाणे या दान दिलेल्या स्वेड्यातील पूर्वी दोन मठांना दान दिलेली जमीन वगळून हे दान दिलेले होते. यावरून असे दिसते की, आधीचे हे दान त्याने वत्सगुल्महून आलेल्या सात्वत चारणांच्या मठांना दिले असावे. हा ताम्रपट राजाने नुकत्याच स्वीकारलेल्या वैष्णव तत्त्वांना अनुसरून भगवान मोदस्वामिन्न्या आदेशानुसार दिलेला आहे. ताम्रपटातील वर्णनानुसार भगवान मौदस्वामिन् म्हणजे चतुर्भुज क्षिरसागरात अनंत नागावर शेषशयन विष्णु निद्रा घेत आहे. त्याच्या तीन हातांमध्ये प्रत्येकी शंख, चक्र, स्वङ्ग ही आयुधे आहेत. चौथा हात त्याच्या डोक्यास्वाली आहे.
     याच्या शासन कालामध्ये पमपूरला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते असे दिसते आणि या घराण्याची राजधानी जेव्हा प्रवरपूर येथे स्थापन झाली तेव्हा सुद्धा हे महत्त्वाचे शासन विभाग केंद्र होते असे प्रक्रसेन द्वितीय याच्या मासोद ताम्रपटावरून दिसते. या ताम्रपटानुसार प्रवरसेन द्वितीय याने पद्मपूर (अपर मार्ग) या नावाने ज्ञात असलेल्या शासन विभागातील गावे दान दिली होती. या ठिकाणी दान दिलेल्या स्थाननिश्चितीनुसार पमपूरचा शोध नागपूर, वर्धा जिल्ह्यांत घेतला पाहिजे. हे पद्मपूर म्हणने हाच उच्चार असलेल्या ज्या ठिकाणाहून अपूर्ण दुर्ग ताम्रपट दिला होता तेच ठिकाण असले पाहिजे. रुद्रसेन दुसरा याच्या शासनकालात ही वाकाटकांची राजधानी होती असे दिसते. संबंधित ताम्रपट देणायाचे नाव ज्ञात नसल्यामुळे फक्त अक्षरवटिकेच्या आधारे तो कोणत्या राजाचा आहे हे समजून येईल. मिराशी हा ताम्रपट नरेंद्रसेनाच्या काळातील आहे असे म्हणतात. तथापि हा ताम्रपट पृथिवीषेण प्रथम याच्या काळातील असावा, पद्मपूर ही त्याची राजधानी होती. रुद्रसेन दुसरा याचे पाचवे शासन वर्ष हीच एक ज्ञात तिथी आहे आणि त्याच्या कारकिर्दीचा शेवट इ.स. ३९७ च्या आसपास असू शकेल. युवराज दिवाकरसेम आणि राजप्रतिनिधी प्रभावतीगुप्ता : रुद्रसेन दुसरा याचे अकाली निधन झाले तेव्हा त्याचे तीनही पुत्र दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन हे वयाने लहान होते. असे म्हणतात की, पृथिवीषेण प्रथम याला तो हयात असतानाच पुत्रद्धपौत्र झाले होते. यावरून हे स्पष्ट होते की, त्याच्या नातवांपैकी सर्वात मोठा दिवाकरसेन याचा जन्म त्याच्या कारकिर्दीच्या अस्तापूर्वी झाला होता. याप्रमाणे पित्याच्या मृत्युसमयी दिवाकरसेनाचे क्य दहा वर्षापेक्षा जास्त असावे आणि इतर ज्यांचा जन्म त्यांच्या आजोबांच्या मृत्यूनंतर झाला असावा, ते फार लहान असावेत. त्यांच्यापैकी कोणीही सज्ञान आणि सिंहासनावर येण्याच्या क्षमतेचा नसल्यामुळे त्यांनी माता प्रभावतीगुप्ता हिला तिचा ज्येष्ठपुत्र युक्राज दिवाकरसेन याच्या वतीने राज्यकारभार पहावा लागला. सध्या उपलब्ध असलेल्या माहिती आधारे रुद्रसेन द्वितीय याला धाकटा भाऊ होता का ? असल्यास त्याचा सिंहासनावरील हक्क दिवाकरसेन याच्यासाठी त्याच्या मातेच्या वडिलांच्या मद‌तीने डावलण्यात आला का याविषयी निश्चित काहीही सांगता येत नाही. प्रभावतीगुप्ताला स्वतःचा व आपल्या पितृवंशजत्वाचा साहजिकच फार अभिमान होता याबद्दल शंका नाही. तिच्या अडचणीच्या काळात तिला पित्याकडून तसेच भावाकडून स्वाभाविकच भक्कम सहाय्य मिळाले असावे. तिने आपल्या पित्याच्या वंशाचे गौत्र (धारण) कायम ठेवले. तिच्या दोन्ही लेखांमध्ये इतर ताम्रपटांप्रमाणे वाकाटकांची वंशावळ न देता तिच्या पित्याच्या वंशाची वंशावळ दिली आहे.
        प्रभावतीगुप्ताचा पुणे ताम्रपट तिच्या राजप्रतिनिधित्वाच्या" तेराव्या वर्षी दिलेला आहे त्यावरून दिवाकरसेन हा कमीत कमी तेरा वर्षे युवराज होता असे दिसते. तो आणस्वी किती वर्षे युवराज राहिला हे ठरविणे सध्या कठीण आहे. परंतु तो फार काळ नसावा, कारण पुणे ताम्रपट दिला त्या आधी त्याचे वय तेवीस वर्षापेक्षा कमी नव्हते. श्रीधरदासाने एकत्रित केलेल्या सदुक्तिकर्णामृत" काव्यसंग्रहामध्ये दिवाकरसेनाने रचलेला श्लोक आहे. श्रीधरदास रचनाकाराचा उल्लेख युवराज म्हणून करतो. यावरून दिवाकरसेनाचे युवराज म्हणूनच निधन झाले. याबद्दल शंका राहत नाही. यारून त्यान्या युवराजपदाचा शेवट इ.स. ४१० च्या सुमारास झाला असावा. पुणे ताम्रपट नन्दिवर्धनहून दिलेला आहे. या नन्दिवर्धनचे नागपूर जवळ सुमारे २८ मैलांवर असलेल्या नन्दरधन किंवा नगरधन या गावाशी तादात्म्य केलेले आहे. यावरून यावेळी वाकाटक राज्याची राजधानी पद्मपूरहून येथे हलविण्यात आली होती हे स्पष्ट होते. त्याचा निश्चित काळ मात्र सांगता येत नाही.

दामोदरसेन :

        दिवाकरसेन नंतर त्याचा भाऊ दामोदरसेन हा इ.स. ४१० च्या सुमारास गादीवर आला. काही काळपर्यंत प्रभावतीगुप्ता त्याच्यासाठीही राजप्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पहात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो त्याचा भाऊ प्रवरसेन दुसरा हा एकच व्यक्ती नसून ते दोघेही राजसिंहासनाधिष्ठित स्वतंत्र राजे होते याबद्दल शंका नाही. आतापर्यंत या मुद्याबद्दल मतभेद होते. काही विद्वानांचा असा विश्वास होता की, दामोदरसेन व प्रवरसेन दुसरा या वेगवेगळया व्यक्ती नव्हत्या तर दामोदरसेनानेव (प्रवरसेन द्वितीय हे नाव) समान नाव असलेल्या त्याच्या पूर्वजाचे (प्रवरसेन प्रथम) प्रवरसेन हे नाव धारण केले होते. प्रभावतीगुप्ताच्या ऋद्धपूर ताम्रपटात तिचे दामोदरसेन व पवरसेनानी माता असे वर्णन आहे. (महाराज-श्री-दामोदरसेन-प्रवरसेन जननी) परंतु याठिकाणी ठमहाराजठ ही राजसत्ता निदर्शक पदवी व ठश्रीठ सन्मानदर्शक पदवी ह्या दोन्ही पदव्या फक्त एकदाच वापरल्या आहेत आणि हा ताम्रपट प्रवरसेन द्वितीय याच्या कारकिर्दीत दिलेला आहे. यामुळे दामोदर सेन व प्रक्रसेन या दोन्ही व्यक्ती एकच होत्या अशी समजूत आहे. या व्यतिरिक्त राज्य करणाऱ्या राजाच्या नावामागे सत्तनिदर्शक व  सन्मानदर्शक पद्वीच्या अभावाचे दुसरे समर्थन करणे शक्य नाही. हल्ली प्राप्त झालेल्या प्रभावतीगुप्ताच्या मिरेगाव (ता. साकोली, जि. भंडारा) ताम्रपटाच्या मुद्रेवर प्रभावतीगुप्ताचे दोन राजांची माता असे स्पष्ट वर्णन आहे. या वर्णनामुळे या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या व दोघेही सिंहासनाधिष्ठित राजे होते ही गोष्ट सिद्ध झाली आहे. दामोदरसेनान्या कारकिर्दीबद्दल फारशी माहिती नाही. साधारणपणे त्याने दहा वर्षाची कारकीर्द उपभोगली असे मानले तर त्याचा अस्त इ.स. ४२० मध्ये झाला असे म्हणता येईल.

प्रवरसेम द्वितीय :

 दामोदरसेन नंतर त्याचा धाकटा भाऊ प्रवरसेन दुसरा गादीवर आला. त्याच्या काळातील ताम्रपट" तसेच शिलालेख बयाच मोठ्या संख्येत उपलब्ध आहेत. त्याचा शेवटचा ताम्रपट (पौनी ताम्रपट) हा त्याच्या बत्तीसाव्या शासन वर्षीचा आहे. यावरून त्याने सुमारे पस्तीस वर्षे राज्य केले असावे असे दिसते. हा आपल्या आईवडिलांप्रमाणे वैष्णव नसून शिवोपासक होता. भगवान शंभूच्या कृपाप्रसादाने आपणास कृतयुग स्थापन करता आले असा त्याचा दृढविश्वास होता (शम्भोः प्रसादधृतकार्तयुगस्य), त्याची त्याच्या शासनाच्या दुसया वर्षापासून ते अकराव्या शासन वर्षापर्यंत दानपत्रे नन्दिवर्धनाहून दिलेली आहेत. म्हणजे कमीत कमी अकराव्या शासन वर्षापर्यंत तरी त्याची राजधानी नन्दिवर्धन येथे होती आणि अकरावे ते सोळावे शासनवर्ष यामधील काळात ती केव्हातरी प्रक्रपूर येथे हलविण्यात आली. या प्रवरपूरचे तादात्म्य सामान्यपणे हल्लीच्या पवनार (वर्धा जिल्हा) या गावाशी केले जाते.
    याचे इतर वाकाटक राजापेक्षा जास्त लेख उपलब्ध आहेत. परंतु त्याच्या राजकीय जीवनाबद्दल ते लेख आपल्याला काहीच माहिती देत नाहीत. त्याचा नातू पृथिवीषेण दुसरा याच्या दानपत्रातील वर्णनाप्रमाणे त्याने आधीच्या राजांच्या आचरणाचे अनुकरण केले व उत्कृष्ट व्यवहारचातुर्य, सामर्थ्य व पराक्रम यांच्या योगे सर्व शत्रुचा नाश केला. हाच सारांश स्वतः प्रवरसेन द्वितीय याने दिलेल्या सिवनी दानपत्रातही आढळतो. हे दानपत्र त्याच्या अठराव्या शासनवीं" दिले होते. परंतु त्याच वर्षी काही महिने आधी दिलेल्या चम्मक दानपत्रात मात्र हा सारांश आढळत नाही. जर या संदर्भाना काही ऐतिहासिक महत्त्व असेल तर हे विजय त्याने त्याच्या अठराव्या शासन वर्षी ज्येष्ठते फाल्गुन या कालावधीत संपादन केले असावेत. त्याची दानपत्रे प्राप्त झालेली ठिकाणे आणि दानपत्रांमध्ये दिलेल्या खेडयांच्या नावांवरून असे दिसते की, त्याने आपल्या वाडवडिलांकडून प्राप्त केलेलें राज्य कायम राखले होते. त्याचा २३ व्या शासन वर्षाना इंदोर ताम्रपट ठत्रिपुरीवार सकाठ तून दिला आहे. मिराशींच्या मते प्रवरसेन द्वितीय याने त्याच्या आईकडील नातलगांशी (कुमारगुप्त पहिला) संबंध बिघडले होते म्हणून त्याने डाहल (बघेलखंड) प्रदेशावर आक्रमण केले आणि हे दानपत्र नर्मदेच्या उत्तरेला असलेल्या त्रिपुरी (हल्लीचे तेवर, जबलपुर जिल्हा) येथील लष्करी छावणीतून दिले. परंतु असे अनुमान काढण्याचे कारणच नाही. कारण उपरोक्त त्रिपुरीवासकामधील वासक हा शब्द लष्करी छावणीचा बोध न करता केवळ तात्पुरत्या राहण्याच्या ठिकाणाचा निर्देश करतो आणि याच अर्थाने तो प्रवरसेन दुसरा याच्या पंचविसाव्या वर्षीच्या वडगांव ताम्रपटात वापरलेला आहे. हा ताम्रपट हिरण्या नदीवर असलेल्या (हिरण्या-नदी वासकात) वासकातून दिलेला आहे. हे ठिकाण त्याच्याच राज्यात होतें हे स्वात्रीने माहीत आहे. तेव्हा येथे त्याच आक्रमणांना किंवा त्याचा लष्करी तळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरे असे की, प्रवरसेन दुसरा याला त्याच्या आईबद्दल फार आदर होता. कारण तिने जन्मभर वाकाटक शासनामध्ये अधिकार माजविला होता. तसेच वाकाटक राज्यकारभारांतील ती एक चांगलेच प्रस्थ होते. प्रक्रसेनाच्या एकोणीसाव्या शासन वर्षी तिने आपल्या अधिकारात ऋद्धपुर व मिरेगाव ताम्रपट दिले आणि राजाने स्वतः त्याच्या तेंविसाव्या शासन वर्षी तिच्या पुण्योपार्जनासाठी तिरोडी ताम्रपट दानपत्र दिले. संबंधित इंदोर ताम्रपटही याच सुमारास दिलेला आहे. त्याच्या मातेच्या मृत्यूनंतर व त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी दिलेल्या रामटेक शिलालेखामध्ये फक्त त्याच्या मातेच्या पित्याचीच नव्हे तर कुमारगुप्त प्रथम व घटोत्कच गुप्त" या त्याच्या पुत्रांचीही भरपूर स्तुती केलेली आहे, तसेच कोरीव लेखांमध्ये रुद्रसेन द्वितीय व प्रभावतीगुप्ता यांच्या विवाहाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करण्याच्या पध्दतीचे या शोस्वेचा शेवटचा सज्ञान राजा पृथिवीषेण दुसरा याच्या लेखांमध्ये अस्तित्व राहणे यावरून गुप्त व वाकाटक राजवंशांमध्ये वाकाटकांच्या या शास्वेच्या अस्तापर्यंत टिकून होते असे अनुमान करता येते. हे सर्व पुरावे असतानाही असे वाटू शकते की, या दानपत्रांतील दान दिलेल्या गावांचे जर बघेलखंड विभागातील गावांशी तादात्म्य करता आले तर हे अनुमान स्वीकारता येईल. त्यामुळे प्रवरसेन दुसरा हा त्रिपुरी येथे बहुतेक यात्रेसाठी गेला असण्याची शक्यता जास्त आहे असे वाटते. त्याने तेथे कदाचित नर्मदा नदीत स्नान केल्यानंतर आपल्या स्वतःच्या राज्यातील जमिनीचे दान करणारे दानपत्र दिले असावे किंवा त्रिपुरी हे महत्त्वपूर्ण ठिकाण असल्यामुळे त्याने तेथे थोडासा मुक्काम करून मामाच्या अतिथ्याचा समाचार घेतला असावा.
        प्रभावतीगुप्ताचा मृत्यू ही प्रवरसेन द्वितीय याच्या कारकिर्दीच्या शेवटी घडलेली महत्वपूर्ण घटना आहे. प्रभावतीगुप्ताने तिचा पती रुद्रसेन दुसरा याच्या अकाली निधनानंतर वाकाटकांने राज्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने इतकी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती की, त्यामुळे तिच्यात कोणतेही महत्त्वपूर्ण आव्हान स्वीकारण्याची क्षमता उत्पन्न झाली होती. ती विष्णूची परम भक्त होती. तिची तीनही दानपत्रे वैष्णव धर्मिय --आहेत. तिचा पुणे ताम्रपटाचा प्रारंभ ठजितंभगवताठ या प्रसिद्ध वैष्णव सूत्राने होता. या दानपत्रानुसार तिने हे दान कार्तिक शुद्ध द्वादशीस पारण्याच्या प्रसंगी वैष्णव (भगवत भक्त) भक्तास दिले. तिने प्रथम हे दान भगवंताच्या पादमूलास (पादुकांस) अर्पण करून नंतर ते उपनिर्दिष्ट व्यक्तीला दिले, ऋद्धपूर ताम्रपटही याच वैष्णव सूत्राने सुरू होतो. तो अशा प्रसंगी प्रसिद्ध रामगिरी (नागपूर जिल्ह्यातील रामटेक) येथील भगवंताच्या पादुकांजवळ दिलेला आहे. अशा प्रकारचे तेजस्वी आयुष्य व्यतित केल्यानंतर तिला वयाच्या ८७व्या वर्षी ऐश्वर्यात मृत्यू आला. तिच्या स्मरणार्थ तिची अनामिक कन्या व पुत्र प्रवरसेन दुसरा यांनी प्रभावती स्वामीन या योग्य नावाने विष्णू (नरसिंह) मंदिर बांधले व सुदर्शन" नामक तलाव खोदला.
         प्रवरसेन दुसरा याला वाङ्‌मयाची आवड होती. तो प्राकृत रचना करणारा कवीही होता. रामाचे लंकेला जाणे व रावणाचा वध करणे या विषयांवर त्याने प्राकृतमध्ये ठसेतुबंधठ किंवा ठरावण वहोठ हे काव्य रचले होते असे काही विद्वान मानतात. हे काव्स दण्डिन, बाणभट्ट, आनंदवर्धन इत्यादि ललितकलातज्ञ विद्वानांमध्ये फार प्रसिद्ध होते. परंतु विद्वानात याबाबत मतैक्य नसल्यामुळे हे काव्य वाकाटक प्रवरसेन द्वितीय याने रचने होते असे स्वात्रीपूर्वक म्हणता येत नाही. कारण काश्मीरमध्येही प्रवरसेन नावाचे राने होते. काश्मीर हे ही वाङ्‌मयाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. काही विद्वानांच्या मते या काव्याची रचना या प्रवर सेनांपैकी एकाने केली असावी. या काव्याचा नंतरच्या काळातील टिकाकार रामदास (इ.स. १८७७) याच्या मते है काव्य कालिदासाने महाराज प्रवरसेनाकरिता महाराजाधिराज विक्रमादित्याच्या आज्ञेनुसासर रचले. या काव्यान्या प्रत्येक आश्वासाच्या (कडवे) शेवटी प्रवरसेनाने हे काव्य रचले (विरचित) व कालिदासाने हे काव्य केले (कृत) असा कविनामोल्लेख येतो. या पुराव्यावरून असे वाटते की, कालिदासाने वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा याच्यावतीने आपला आश्रयदाता व विक्रमादित्य हे बिरुद धारण करणारा चद्रगुप्त दुसरा याच्या आज्ञेने हे काव्य केले असावे. पंरतु कालिदासाच्या नावावर हे काव्य ठेवणेही बरोबर वाटत नाही. कारण एकतर चंद्रगुप्त दुसरा हा एक टाव विक्रमादित्या म्हणून ख्यात नव्हता. जुन्या परंपरेनुसार मूळ विक्रमादित्या इ. स. पूर्वी पहिल्या शतकात होऊन गेला. दुसरे असे की, प्रत्यक्ष कालिदासाची तिथी निश्चित नाही. कित्येक विद्वान त्याला इ.स. च्या पूर्वी ठेवतात आणि तिसरे म्हणजे रामदासाने नमूद केलेली परंपरा नवीनच आहे. त्यामुळे तिच्या विश्वसनीयतेबद्दल शंका आहे. तरीही प्रवरसेनाच्या काव्यगुणांबद्दल  शंका घेण्याची गरज नाही. कारण सातवाहन राजा हाल याने रचलेल्या गाथा सप्तशती मध्ये त्याच्या काही गाथा दिलेल्या आहेत.

नरेन्द्रसेन :

      इ.स. ४७५७ च्या सुमारास प्रवरसेन दुसरा याचा मुलगा नरेन्द्रसेन गादीवर आला. प्रवरसेन दुसरा याच्या नुकत्याच मांढळ येथे प्राप्त झालेल्या ताम्रपटात उल्लेखिलेला आज्नाकभट्टारिका रिहर्वदर्द दुर्ग) हिचा पुत्र नरिन्द्रराज म्हणजे हा नरेन्द्रसेन असावा. त्याचा एकही लेख मिळालेला नाही. त्याच्याबद्दलची सर्व माहिती त्याचा पुत्र व वारस पृथिवीषेण द्वितीय याच्या चार दानपत्रांद्वारे प्राप्त होते. या ताम्रपटात नरेन्द्रसेनाचे वर्णन करताना फार मनोरंजक शब्द‌समूह वापरलेला आहे. आतापर्यंत त्याने वाचन पूर्व-अधिगत-गुण-विश्वासाद-अपहृतवंश-श्रियः असे करीत असत आणि त्याचे स्पष्टीकरण सामान्यपणे "त्याने पूर्वीच संपादन केलेल्या गुणांच्या योगे राजलक्ष्मी प्राप्त केलीह असे करीत." परंतु पृथिवीषेण द्वितीय याच्या दहाव्या वर्षीचा नुकत्याच प्राप्त झालेल्या मांढळ ताम्रपटामुळे या वाक्याचे वाचन पूर्व-अधिगत-गुणवद-दायाद-अपहृत-वंश-श्रियः असे करणे शक्य झाले आहे. याचा अर्थ असा आहे की, नरेन्द्रसेनाने प्रथम राजलक्ष्मी प्राप्त केली होती. परंतु त्याची पात्रता असून सुद्धा कनिष्ठ (श्न्हदठ्ठ) नातलगांनी तिचे अपहरण केले. यावरून असे दितसे की, प्रवर सेन द्वितीय याच्या मृत्यूनंतर वारसासंबंधी भांडणे झाली आणि नरेन्द्रसेन हा प्रथम स्वतः साठी सिंहासन मिळविण्यात यशस्वी ठरला. परंतु नंतर त्याच्या नातलगांनी जे त्याचे भाऊ असू शकतात त्याच्याकडून सिंहासन हिरावून घेतले. जर गुणवद हा शब्द गौण या शब्दाचा समनार्थक असा घेतला, तर कदावित है भांडण वत्सगुल्म शाखेबरोबरचेही असू शकेल. असे असले तरी प्रारंभी मिळालेल्या यशानंतर नरेन्द्रसेनाच्या राज्याच्या बराच मोठा भाग त्याच्या नातलगांनी हिरावून घेतला होता याबद्दल शंका नाही. नरेन्द्रसेनाने आपल्या पराक्रमाने पराभूत केलेल्या शत्रुंना नियंत्रणात ठेवले (प्रताप-प्रणत-अरि-शासनस्य) हे त्याच्या मुलांचे लेखातील वर्णन बहुतेक करून त्याच्या ज्या शत्रुनी प्रारंभी त्याच्या सिंहासनावर येण्याच्या मार्गात अयशस्वीपणे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्यांच्यावर प्राप्त केलेल्या विजयासंबंधी असावे. नंतरच्या आयुष्यात नरेन्द्रसेनाची सत्ता इतकी डळमळीत होती की, त्याच्या आज्ञा कोसला, मेकला आणि मालव या देशाचे अधिपती आद्राने पाळत होते या वर्णनामध्ये फारसे तथ्य दिसत नाही. नरेन्द्रसेनाची मेकला प्रदेशावर (मध्य प्रदेशातील अमरकंटक विभाग) सत्ता होती किंवा मेकला देशाचा राजा त्याची आज्ञा पाळत होता या विधानाचे स्पष्टीकरण आतापर्यंत असे करीत असत की, ब्राह्मणी ताम्रपटात नरेन्द्रसेनावा अप्रत्यक्ष उल्लेख आहे व ताम्रपट मेकला देशाचा पांडव वंशी राजा भरतबल, जो नरेन्द्रसेनाचा"" मांडलिक होता अशी समजूत होती, त्याने दिलेला आहे परंतु अलीकडेच प्राप्त झालेल्या मल्लार ताम्रपटावरून असे दिसून येते की, या दोन्ही अनुमानांना काहीच आधार नाही. इतरत्र" दास्वविल्याप्रमाणे ही दोन्हीही दानपत्रे नरेन्द्रसेनानंतर उद्याला आलेल्या शुरबल उदीर्णवर याने दिलेली आहेत आणि त्याने नरेन्द्रसेनाची अधिसत्ता" स्वीकारण्याचा प्रश्नच उ‌द्भवत नाही. हे शक्य आहे की, त्याने या विभागात गुंप्तांची सता पुन्हा स्थापन करण्यासाठी झालेल्या काही मोहिमांमध्ये भाग घेतला असावा. या मोहिमांना स्कंद‌गुप्त व बुधगुप्त यांच्या कारकिर्दीत बंडावे स्वरूप प्राप्त झाले असावे आणि या बंडामध्ये त्याने शासकाविरुद्ध (ल्ल दृछ) विजय प्राप्त केला असावा. सार्वभौम गुप्तांची सत्ता जेव्हा विस्कळीत झाली त्या वेळी या विभागात त्याने छोटे-मोठे हल्लेही केले असण्याची शक्यता आहे.
      नरेन्द्रसेनाचा विवाह कुंतल राजकन्या अज्झितभट्टारिका हिच्याशी झाला. अन्झितभट्टारिकाने नंतर राजा झालेल्या पृथिवीधेणाला जन्म दिला. कुंतल हे उत्तर कर्नाटकाचे प्राचीन नाव होते. कुंतल राजकन्या ही वनवासीचा (कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हा) कदंब राजा काकुस्थवर्मनची बहुधा मुलगी किंवा नात असावी. कदंब राजांनी आपल्या मुलींचे विवाह गुप्त आणि इतर राजवंशांशी करून दिले होते. तसेच
संबंधित संपूर्ण कालखंडात गुप्त आणि वाकाटक यांच्यामधील असेलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेऊन त्यांनी आपल्या मुली वाकाटक राजांना दिल्या असाव्यात.""आतापर्यंत वाकाटकांची नाणी प्राप्त झाली नव्हती परंतु अलीकडेच पवनार येथे वाकाटकांनी काही नाणी प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये नरेन्द्रसेनाची म्हणता येतील अशी दोन नाणी आहेत. ही दोन्हीही नाणी तांब्याची असून त्यापैकी एकाच्या दर्शनी भागावर पेटिका शीर्षक लिपीमध्ये ठरेन्द्रठ असा लेख असून पृष्ठभागावर उथीठ हे अक्षर आहे. दुसया नाण्याच्या दर्शनी भागावर मोठ्या आकारात न हा शब्द आहे आणि पृष्ठभागावर अंशतः कोरलेले शंख चिन्ह आहे. दर्शनी भागावरील न हे अक्षर नरेन्द्रसेनाकरिता असावे. ही नाणी दैनदिन व्यवहारासाठी उपयोगात असावीत.

पृथिवीषेण द्वितीय :

     नरेन्द्रसेनानंतर इ.स. ४८० च्या सुमारास त्याचा पुत्र पृथिवीषेण दुसरा गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीची माहिती देणारे त्याचे वर्ष २ आणि १० असे दोन मांढळ ताम्रपट. १७ व्या वर्षीना माहुरइस्री ताम्रपट व अपूर्ण बालाघाट ताम्रपट असे एकूण चार ताम्रपट उपलब्ध आहेत, त्याचा पणजा रुद्रसेन द्वितीय प्रमाणे तो परम वैष्णव होता आणि अत्यंतद्धभागवत असे वर्णन मिळते. हा राज्यावर आला तेव्हा त्याचे वडिलोपार्जित राज्य किंवा राज्यांचा बराच मोठा भाग त्याच्या कनिष्ठ (स्म्हदन्छु) नातेवाईकांच्या ताब्यात असल्यामुळे त्याला स्वरोस्वरच अतिदुष्कर असे आव्हान होते. परंतु त्याने आव्हान समर्थपणे स्वीकारले आणि आपल्या राजवंशावी गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त केली (मग्न-वंश औद्धर्तुः) असा उल्लेख त्याचा दहाव्या वर्षीच्या मांढळ व सतराव्या वर्षीत्या माहुरझरी ताम्रपटात मिळतो. नंतर दिलेल्या बालाघाट ताम्रपटामध्ये त्याने संकटात असलेल्या आपल्या राजवंशाच्या भाग्याची दोन वेळा सुटका केली असे वर्णन आहे (द्वि-मग्न-वंशस्य-ओद्ध-तुः) हे दुसरे संकट बहुतेक मध्यप्रदेशातील बस्तर विभागावर व लागून असलेल्या प्रदेशाच्या भागावर राज्य करणारा नलराजा भवदत्तवर्मन याने वाकाटक राज्यावर केलेल्या आक्क्रमणामुळे उपस्थित झाले असावे. भवदत्तवर्मनचा अमरावती जिल्हयात ऋद्धपुर येथे सापडलेला ताम्रपट वाकाटकांनी पूर्वीची राजधानी नन्दिवर्धन येथून दिलेला आहे. त्यामध्ये भवदत्तवर्मनने यवतमाळ जिल्हातील कदंबगिरीग्राम दान दिल्याचा उल्लेख आहे. यावरून असे स्पष्ट दिसते की, वाकाटक राज्याचा बराच मोठा भाग नल वंशाच्या विशेषतः त्यांचा राजा भवदत्तवर्मन याच्या ताब्यात गेला असावा. हा प्रसंग पृथिवीषेण दुसरा याच्या सतराव्या शासन वर्षानंतर केव्हातरी घडला असावा, कारण त्याच्या त्यावर्षी दिलेल्या माडुस्झरी ताम्रपटामध्ये फक्त एकाच संकटाचा उल्लेख आहे. (मग्न-वंश-ओल्द्ध-र्तुः) रामगिरी (रामटेक) ६२ जवळून दिलेल्या त्याच्या दुसया शासन वर्षीच्या मांढळ ताम्रपटानुसार त्याच्या कारकिर्दीच्या दुसया वर्षापर्यंत नन्दिवर्धन प्रदेश नक्कीच त्याच्या राज्यात अंतर्भूत होता. हा प्रदेश भवदत्तवर्मनकडे पृथिवीषेण दुसरा याच्या सतराच्या शासनवर्षानंतर गेलेला दिसतो. परंतु पूर्ण वाकाटक राज्य भवदत्तवर्मनाने जिंकले होते असे पृथिवीषेण दुसरा याने त्याच्या वेम्बार येथील तात्पुरत्या निवासस्थानाहून दिलेल्या अपूर्ण बालाघाट ताम्रपटावरून दिसत नाही. बेम्वार या स्थळावे चंद्रपुरच्या पूर्वेस अट्ठावीस मैलांवर असलेल्या वेम्बाल या गावाशी तादात्म्य केलेले आहे. त्याने वीस किंवा पंचवीस वर्षे राज्य केले असावे. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीचा अस्त इ.स. ५००-५०५ च्या सुमारास ठेवता येईल. नुकतेच पवनार येथे पृथिवीषेणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण नाणे प्राप्त झाले आहे. हा बहुतेक पृथिवीषेण दुसरा असावा, याच्या दर्शनी भागावर पेटिका शीर्षक लिपिमध्ये श्री महाराज पृथिवी असा गोलाकार लिहिलेला लेख आहे आणि पृष्ठभागावर कडेने मण्यांची नक्षी व मध्ये कागदाच्या गुंडाळीसारखी नक्षी आहे. वाकाटकांच्या प्रवरपूर शास्वेचा पृथिवीषेण दुसरा हा शेवटचा ज्ञात राजा आहे. या शाखेचा शेवट बहुतेक या वंशाच्या वत्सगुल्म शाखेचा महत्त्वाकांक्षी नलराजा अर्थपति किंवा त्याचा पिता भवदत्तवर्मन, यांनी हे राज्य जिंकल्यामुळे झाला असावा किंवा अन्य कारणांमुळे झाला असावा. याचे निश्चित उत्तर भविष्यातील संशोधनच देऊ शकेल.

देवसेन :
      सर्वसेन नंतर इ.स. ४७५ ते ४७८ च्या दरम्यान देवसेन राजा झाला. त्याच्याबद्दल माहिती देणारे जे तीन लेख उपलब्ध आहेत ते म्हणजे त्याच्या अधिकारी स्वामिल्लदेव याने दिलेला हिस्सेबोराळा शिलालेख, लंडनच्या इंडिया ऑफीसमध्ये ठेवलेला अपूर्ण ताम्रपट आणि त्याच्या पाचव्या शासनवर्षी दिलेला बीदर ताम्रपट हे होत. बीदर ताम्रपटाची लोखंडाची प्रतिकृती सध्या हैद्राबादच्या बिर्ला आर्किऑलॉजिकल अॅड कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ठेवलेली आहे. यापैकी इंडिया ऑफीस ताम्रपट वाकाटक राजा देवसेन याने वत्स्यगुल्महून (वत्सगुल्म) दिला होता. त्याद्वारे आपणास देवसेनाबद्दल माहिती मिळत नाही. कारण त्यामध्ये फक्त एक गाव दान दिल्याची नोंद केलेली आहे. बाकीच्या लेखांना त्यांचे स्वतंत्र महत्व आहे व त्यामधून त्यांच्या विषयी माहिती मिळते. बीदर ताम्रपटावरून त्याने ठधर्ममहाराजठ पदवी धारण केली होती असे समजते. थाळनेर ताम्रपटात त्याचा हरिषेणाचा पिता म्हणून उल्लेख आहे व त्याच्या नावामागे फक्त महाराज" हीच पदवी आहे. परंतु अजंठा (लेणे क्र. १६) आणि घटोत्कच लेण्यातील हरिषेणाचा मंत्री वराहदेव याच्या लेखानुसार वराहदेवाच्या पित्याचे नाव हस्तिभोज होते. हा हस्तिभोज वेल्लुरच्या ब्राह्मण घराण्यातील असून हरिषेणाचा मंत्री किंवा प्रधान होता. त्याच्यावर राज्यकारभाराची सर्व जबाबदारी सोपवून देवसेन विषयोपभोगात" आपला वेळ घालवीत असे. पण या विधानाचा शब्दशः अर्थ घेण्याची जरुरी नाही. कारण वराहदेव ज्या प्रधान घराण्यातील होता त्या घराण्याचे महत्व वाढविण्यासाठी केवळ हे विधान केलेले आहे.
        हिस्सेबोराळा शिलालेख देवसेनाचा अधिकारी (आज्ञाकार) स्वामिल्लदेव याने खोदलेल्या तलावाची माहिती होती. हा लेख शक ३८००० किंवा इ.स. ४७७-७८ अशी तिथी देतो. हा तिथी उल्लेख फक्त देक्सेन आणि त्याची वत्सगुल्म शास्वा यांच्या दृष्टीनेच महत्त्वपूर्ण आहे असे नव्हे, तर पूर्ण वाकाटक राजवंशाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. कारण वाकाटकांच्या संबंधात ज्ञात असलेली ही एकच निश्चित तिथी आहे. जर या तिथीबरोबर त्यासंबंधित शासन वर्ष दिले असते तर त्याच्या राज्यरोहणाची तिथी निश्चित करता आली असती. तेव्हा हे वर्ष देवसेनाच्या शासनकालात येते, इतकेच म्हणता येईल.
     बीदर ताम्रपटानुसार याने चार वेदांमध्ये निष्णात असलेल्या (चातुवेज्जू चातुर्विद्या) रद्दोच्च याला यज्ञीय हवन (एम्कुम्हर्मीत दट्टा म्हञ्च्छ) करण्याकरिता वेल्पकोण्ड गाव दान दिले होते. हे दानपत्र तयार करणारा स्वामिल्लदेव व वरील लेस्वात उल्लेखिलेला स्वामिल्लदेव या एकच व्यक्ती असाव्यात. हे दानपत्र त्याच्या पाचव्या शासन वर्षी दिलेले होते व हे शासन वर्ष शक ३८० नंतर लगेचच आले असावे. सदर लेखाचे प्राप्तिस्थान जर बरोबर दिले असेल तर ऐतिहासिकदृष्ट्या तो फार महत्त्वपूर्ण आहे. जर हा ताम्रपट मूलतः बीदर येथे मिळाला असेल, तर वाकाटकांच्या वत्सगुल्म शास्वेची सत्ता उत्तर कर्नाटकात पसरली होती असे दिसते. या ताम्रपटात उल्लेखिलेली स्थनामे विशेषतः दान दिलेल्या गावाचे नाव या अनुमानास पुष्टी देतात. 'कोण्ड' या शब्दानी शेवट होणारी स्थलनामे साधारणपणे कर्नाटकात आढळतात. विन्ध्यशक्ति द्वितीयव्या वेळेसच नांदेड (नान्दीकड) प्रदेश वाकाटकांच्या राज्याचा भाग होता आणि अजंग शिलालेस्वानुसार त्याने कुंतल किंवा उत्तर कर्नाटकाचा भाग जिंकला होता. यापुर्वी उल्लेख केल्याप्रमाणे कदंब नृपती सिंहवर्मन याला मुडिगेरे दानपत्रात वर्णिल्याप्रमाणे महाराज सर्वसेनाने सिंहासनावर बसविले होते आणि सर्वसेन हे नाव धारण कलेला राजा देवसेनाचा पिता होता. कदंब राजवंशाच्या अंतर्गत कारभारात केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम म्हणून वाकाटकांनी निदान उत्तर कर्नाटकाचा काही भाग आपल्या सैन्यान्या अमलारवाली आणला असावा. बीदर ताम्रपट प्राप्त झाल्यामुळे बीदर सभोवतालचा प्रदेश व बीदर आणि आन्ध्रप्रदेश याव्यामधील प्रदेश देवसेनाच्या पाचव्या शासन वर्षापर्यंत वाकाटक राज्याला जोडला गेला होता याबद्दल संशय राहत नाही. वत्सगुल्म शास्वेचा हा निःसंशय महत्त्वपूर्ण विजय होता.
       देवसेन हा वाकाटकांच्या दुसया शास्वेचा राजा नरेन्द्रसेन याचा समकालीन होता. त्याचे कदंब राजवंश आणि दुसया शास्वेच्या त्याच्या चुलत भावाबरोबरचे संबंध यांचा परस्परांशी संबंध असणे शक्य आहे. नरेन्द्रसेन याचा कदंब राजकन्येबरोबर विवाह झाला होता. ही कदंब राजकन्या कदाचित काकुस्थवर्मनची मुलगी किंवा नात असेल. यामुळे देवसेन नाराज झाला असावा आणि त्याने त्याचा बराच प्रदेश काबीज केला असावा. या घटना नक्की कशा घडल्या असतील यावर भविष्यकालातील संशोधनच प्रकाश टाकू शकेल. कदाचित नरेन्द्रसेन व कदंब राजवंश यांच्याविरु द्ध मदत मिळविण्यासाठी देवसेनाने आपल्या मुलीचा विवाह अतिशय बलशाली असा विष्णुकुण्डिन नृपती माधववर्मन द्वितीय जनाश्रय याच्या बरोबर करून दिला असावा. असे म्हणतात की, माधववर्मनवा पुत्र विक्रमेन्द्रवर्मन प्रथम याने आपल्या जन्माने विष्णुकुण्डिन व वाकाटक या दोन्ही राजवंशांना गौरव प्राप्त करून दिला. वाकाटक सत्तेवा हास झाल्यानंतर या नातेसबंधी जास्त महत्त्व प्राप्त झाले.
      सुदर्शन तलाव स्वोद‌णे ही त्याच्या काळातील अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. वाकाटक राजे प्रजाहितदक्ष होते. प्रजेला पिण्यास पाणी पुरविणे व पाटबंधारे काढणे वगैरे दृष्टीने मदत करण्यास ते तत्पर होते हे यावरून स्पष्ट होते. या तलावाचे सुदर्शन हे नाव आपणास चंद्रगुप्त मौर्य याव्या शासन कालात त्याच्या हुकुमाने स्वोदल्या गेलेल्या सुदर्शन तलावयाची आठवण करून देते. उत्तर-दक्षिण भारतामध्ये तलांवाकरिता सुदर्शन हे नाव फारच प्रिय झाले होते. रामटेक येथील केवल नरसिंह मंदिरातील शिलालेखावरून असे यावरून स्पष्ट होते. या तलावाचे सुदर्शन हे नाव आपणास चंद्रगुप्त मौर्य याव्या शासन कालात त्याच्या हुकुमाने स्वोदल्या गेलेल्या सुदर्शन तलावयाची आठवण करून देते. उत्तर-दक्षिण भारतामध्ये तलांवाकरिता सुदर्शन हे नाव फारच प्रिय झाले होते. रामटेक येथील केवल नरसिंह मंदिरातील शिलालेखावरून असे कळते की, वाकाटक नृपती रुद्रसेन द्वितीय याची अग्रमहिषी प्रभावतीगुप्ता हिच्या स्मरणार्थ स्खोदलेला तलावही सुदर्शन या नावाने ख्यात होता. हिस्सेबोराळा शिलालेखामध्ये आर्य स्वामिल्लदेव याने तलाव स्वोदल्याचा उल्लेख आहे. हा स्वामिल्लदेव सौराष्ट्रातून म्हणजे ज्या भागात मूळ सुदर्शन तलाव खोदलेला होता त्या प्रदेशातून आला होता. वाकाटकांचा हा एकच लेख शक संवताची तिथी असलेला असा आहे. त्यांचे सर्व लेख राज्य करीत असलेल्या नृपतीच्या वैयक्तिक शासन वर्षीच्या तिथी असलेले आहेत. हा शिलालेख प्राचीन तलावाच्या अवशेषांमध्ये प्राप्त झाला.

   हरिषेण : 
    देवसेनानंतर इ.स. ४८० मध्ये त्याचा पुत्र हरिषेण हा गादीवर आला. याच्या राज्यकालाविषयी माहिती पुरविणारे चार लेख उपलब्ध आहेत. वाकाटक राजवशांच्या या शास्वेच्या इतर कोणत्याही राजाचे इतक्या मोठ्या संख्येने लेख प्राप्त झाले नाहीत. या लेखांपैकी एक त्याने दिलेला ताम्रपट आहे व बाकीचे अजंग येथील लेणे क्र. १६ व १७ आणि जवळच असलेल्या घटात्कच लेण्यांत असलेले शिलालेख आहेत. त्याच्या तिसया शासनवर्थी दिलेला थाळनेर ताम्रपट (प्राचीन स्थालकनगर, जिल्हा धुळे) हा एकच फक्त अधिकृतरित्या (दट्टट्टर्मीट) दिलेला लेख आहे. बाकीच्या लेखांपैकी अजंठा लेणे क्र. १६ व घटोत्कच--लेण्यातील शिलालेख हे वल्लुरच्या ब्राह्मण घराण्यातील शेवटचा ज्ञात सभासद वराहदेव या त्याच्या मंत्र्याने दिलेले आणि अजंठा लेणें क्र. १७ मधील शिलालेख हरिघेणाच्या मांडलिकाने दिलेला आहे. या लेखांद्वारे आपल्याला वाकाटकांच्या वत्सगुल्म शास्वेच्या ज्ञात असलेल्या शेवटच्या राजाविषयी चांगलीच माहिती मिळते. हरिषेणाने त्याच्या काही पूर्वजांप्रमाणे धर्ममहाराज ही पट्टी धारण केली नव्हती असे त्याच्या थाळनेर ताम्रपटावरून दिसते. ज्याच्या पूर्वपरवानगीने हा ताम्रपट दिला होता तो गोमिकराज (गोमिक राज-आनुज्ञातम) हा या घराण्यातील" क्योवृद्ध सभासद असावा. पण हरिघेणाने स्थालक नगरच्या (हल्लीचे थाळनेर) विजयानंतर धुळे प्रदेश जिंकला होता. पराभूत राजा गौमिक याला मांडलिक म्हणून या प्रदेशावर राज्य करण्याची परवानगी दिली होती व या नुकत्यातच मांडलिकत्व पत्करलेल्या राजाची त्याच्या प्रदेशात दान देण्याची परवानगी घेतली होती असा दास्वविणारा पुरावा नाही. स्वरे म्हणजे हा प्रदेश त्याने नव्याने जिंकला असे म्हणता येत नाही. कारण हा विभाग आधीपासूनच त्याला वारसाहक्काने मिळालेल्या राज्यामध्ये अंतर्भूत होता. त्याचप्रमाणे त्याने जळगावचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला असे दर्शविणारा पुरावा नाही. हा ही भाग त्याने प्राप्त केलेल्या राज्यामध्ये समाविष्ट असला पाहिजे.
      हरिषेणव्या मंत्र्याचे नाव क्सहदेव होते. हा वराहदेव देवसेनाचा मंत्री हस्तिभोज याचा पुत्र होता. वराहदेवाने अजंठा लेणे क्र. १६ व गुळवाडा येथील घटोत्कच ही लेणी निर्माण केली व तेथे आपले लेख कोरविले. घटोत्कच लेण्यातील त्याच्या लेखांमध्ये त्यांच्या वंशाची आरंभापासून माहिती दिली आहे. त्याने स्वतःचा हरिषेणाचा मंत्री म्हणून उल्लेख केला आहे. तसेच आपला पिता देवराज म्हणजेच देवसेन याचा मंत्री होता हेही नमूद केले आहे. अजंठा येथील लेख वाकाटकांच्या वत्सगुल्म शास्वेच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये या शास्वेच्या प्रारंभापासून म्हणजे या शास्वेच्या संस्थापकाच्या आधीचे दोन राजे विन्ध्यशक्ति प्रथम व प्रक्रसेन प्रथम यांच्या वेळेपासून झालेल्या स्थित्यंतरांची नोंद केली आहे. त्या लेखाना बरावसा भाग स्वराब झाल्याने बरीच महत्त्वाची माहिती नष्ट झाली आहे. हरिषेणच्या संदर्भात (श्लोक १८) हा लेख असे सांगतो की, त्याने कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकूट, लाट आणि आंध्र हे प्रदेश जिंकले होते. बहुतकरून अपरांतवा समावेशही जिंकलेल्या प्रदेशांच्या यादीत होता. या प्रदशांपैकी कुंतलवर यावेळी कदंब वंशाची सत्ता होती आणि त्यांच्या अंतर्गत कारभारात सर्वसेनाने हस्तक्षेप केला होता. देवसेनाने उत्तर कर्नाटकाच्या काही भागावर आपली सत्ता स्थापन केली होती है आपणास ज्ञात आहेच.
हरिषेण याने या प्रदेशावरच्या मोहिमेत त्याच्या वडिलांना मदत केली असावी. इतर प्रदेशांच्या बाबतीतही, जरी प्रशस्तीमध्ये तसा स्पष्ट उल्लेख नसला तरी, असेच घडले असावे. अवंती प्रदेश गुप्तांच्या हातून गेला होता आणि बुधगुप्तानंतर दशपुरच्या औलिकर वंशाने अवतिवर आपली सत्ता स्थापन केली होती.
      वलभीच्या मैत्रक वंशालाही आपल्या सत्तेखाली आणले होते. हरिषेणने या प्रदेशावर आक्रमण केले असण्याची शक्यता आहे. कलिंग या संज्ञेने अंदाजे ओरिसामधील पुरी-गंजम विभाग व आन्ध्रप्रदेशातील विशास्वापट्टनम व श्रीकाकुलम या भागाचा बोध होतो. मिराशींच्या मते कलिंगमध्ये गंग राजवंशाच्या स्थापनेत हरिषेणाची महत्त्वाची भूमिका असावी. त्याच्या मदतीनेच इ.स. ४९८ मध्ये कलिंग देशात गंगाच्या राज्यस्थापनेवा निदर्शक असा गंग संवत् सुरू झाला असावा. मध्यप्रदेशातील छत्तीसगड विभाग म्हणजे प्राचीन कोसल होय. हरिषेणाने शरभपुरी याच्या राज्य कालांत कोसलवर आक्रमण केले असण्याची शक्यता आहे. त्रिकूट म्हणजे उत्तर कोकणातील त्रैकूटक राज्य हे स्पष्टच आहे आणि ज्ञात असलेला शेवटचा त्रैकूटक राजा व्याघ्रसेन याने इ.स. ४९२ पर्यंत राज्य केले. हरिषेणाने येथील अनिश्चित राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन येथे आपली सत्ता स्थापन केली असणे अशक्य नाही. गुजरातमधील नवसारी-भडोच प्रदेश प्राचीन काळी लाट या नावाने ख्यात होता. हरिपेणाने त्याच्या अंमलाखाली आधीपासूनच असलेल्या स्वानदेश प्रदेशातून लाट देशावर विजयी आक्रमण केले असावे. आन्ध्रप्रदेशामध्ये त्याचा शालक विष्णुकुण्डिन राजा माधववर्मन दुसरा जनाश्रय हा राज्य करीत होता. याने इ.स. ४७०-७१ किंवा इ.स. ४७८-७९ पासून राज्य केले असावे. तो हरिषेणानंतर राज्य करीत होता. आपल्या विजयी मोहिमांमध्ये तो रेवा नदीपर्यतच्या प्रदेशावर चाल करून गेला होता आणि त्रिकूट व मलय पर्वतांचा स्वामी झाला होता. काही विद्वानांवे असे मत आहे की, हरिषेणाने आंध्रप्रदेशावर आक्रमण करून तेथे राज्य करीत असलेल्या शालंकायन राजवंशाची सत्ता नष्ट केली व त्याजागी विष्णुकुण्डिन राजा माधववर्मन याची स्थापना करून तेथे मोठीच राज्यक्रांती घडवून आणली. वर उल्लेखिलेल्या काही सत्य घटना आणि विष्णुकुण्डिन हा इ.स. पाचव्या शतकाच्या आरंभी राज्यावर आला ही गोष्ट लक्षात घेता असे घडणे सर्वस्वी अशक्य आहे हे एकच उदाहरण या सर्व गोष्टीविरु द्ध जाण्यास पुरेसे आहे. त्याने काही प्रदेशांवर धावती आक्रमणे केली असण्याची शक्यता आहे. पण प्रशस्तीकारांनी या आक्रमणांना पूर्ण यशस्वी मोहिमांचे स्वरूप देऊन त्याने या प्रदेशांवर तसेच ज्या प्रदेशांवर त्याचे नातलग राज्य करीत होते किंवा ज्या प्रदेशावर लष्करी चढाई करण्याची गरज नव्हती तेही प्रदेश त्याच्या सत्तेखाली आणले असे दर्शविले आहे. त्यामुळे हरिषेणाची सत्ता उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेत कुंतल प्रदेशापर्यंत आणि पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यत"" पूर्ण दक्षिण भारतावर पसरली होती किंवा तो इ.स. ५ व्या शतकाच्या उत्तरार्धात राज्य करणारा सर्व जगात श्रेष्ठ असा राजा होता अशी दरबारी कर्वीची वर्णने अन्य सबळ पुराव्याच्या अभावी मान्य करणे चुकीचे होईल. तथापि एवढेच म्हणता येईल की, त्याच्या पित्याने वाकाटकांच्या दुसया शास्वेच्या राज्यावर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी चालू केलेली प्रक्रिया समर्थपणे शेवटास नेली. यासाठी त्याने त्या शाखेचा शेवटचा ज्ञात राजा पृथिवीषेण द्वितीय किंवा त्याच्या वारसाचा पराभव केला असावा किंवा वारसाच्या अभावी फारसा प्रतिकार न होता आपोआपच हा प्रदेश त्याच्या सत्तेस्खाली आला असावा. असेही म्हणता येईल की, त्याने जरी थोडा काळ राज्य केले तरी त्या काळात त्याच्या सैनिकी सामर्थ्यामुळे तसेच त्याच्या अंगच्या गुणांमुळे तत्कालीन राजवंशांमध्ये त्याला मानाचे स्थान होते. हरिषेण हा कलेचा आश्रयदाता होता. त्याचा मंत्री वराहदेव व बहुतेक त्या भागातील त्याचा सामंत यांनी अजंठा येथे बरीच बौद्ध लेणी तयार करून तो शिल्पाकृती व चित्रकलेनी सुशोभित केली. त्यांना या कामी त्यांच्या सुसंस्कृत राजाकडून" प्रोत्साहन मिळाले असावे. हरिषेणाच्या सामंताचे या लेस्वातील नाव नष्ट झाले आहे. हरिघेणाचा स्वतःचा बौद्ध धर्माकडे चांगलाच ओढा असावा. त्याच्या प्राप्त झालेल्या दानपत्रानुसार त्याने काही ब्राह्मणांना गावे दान दिली होती हे ही स्पष्ट होते.
        वाकाटक राजवंशाच्या वत्सगुल्म शाखेचा हरिषेण हा शेवटचा ज्ञात राजा आहे. वाकाटकांच्या दुसया शास्वेचा पृथिवीषेण द्वितीय जसा शेवटचा राजा होता, त्याप्रमाणे हा वत्सगुल्म शाखेचा शेवटचा राजा होता. त्याची सत्ता इ.स. ११० च्या सुमारास संपुष्टात आली. याप्रमाणे या दोनही शाखांचा थोड्या अंतराने अस्त झाला.
    सद्यःस्थितीत वाकाटक सत्तेचा आकस्मिक अस्त होण्यामागील निश्चित कारणे सांगणे शक्य नाही. मार्क कोलीन्सच्या मते दण्डीनच्या दर्श-कुमार-चरित च्या विश्श्रुत चरितामध्ये (आठवा उच्छवास) विदर्भातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे प्रत्यक्ष वर्णन आहे. वा. वि. मिराशीच्या निष्कर्षानुसार हे वर्णन म्हणने हरिषेणान्या मृत्यूनंतर झालेल्या वाकाटकाच्या अंताचा प्रत्यक्ष धावता वृत्तांत आहे. त्यांनी या वर्णनानुसार सत्ता अस्ताला नेणाया" घटना कशा कशा घडल्या असतील हे नमूद केले आहे. आणि त्यांचे हे मत सर्वमान्य झालेले आहे. तथापि असेही म्हणता येते की, शेवटच्या उच्छवासाप्रमाणेच आधीच्या भागांमध्ये मगधच्या सिंहासनावरू दूर केलेला पौराणिक (शब्दार्मेंट) राजा राजहंसचा पौराणिक पुत्र राजवाहन याचा पाठलाग करून त्याच्यावर विजय मिळविलेल्या तर राजकुमारांचे वर्णन आहे. तेव्हा फक्त या आठव्या भागालाच इतर प्रकरणांपासून वेगळा काढून त्यातील माहिती विषयी वेगळा विचार करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात दिलेली कथा ही इतर कथे प्रमाणेच दण्डीन यानेच लिहिलेली आहे. म्हणून या कथेच्या आधारावर वाकाटकांच्या अंताला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांची सास्वळी तयार करणे परिपूर्ण ठरत नाही. यासाठी उपलब्ध पुराव्याच्या मदतीने वाकाटकांच्या अंताची कारणे शोधावी लागतील.
पूर्वी नमूद केल्याप्रमाणे देवसेनाने आपल्या एका मुलीचा विवाह महत्वाकांक्षी विष्णुकुण्डिन राजा माधववर्मन दुसरा जनाश्रय याच्याशी करून दिला होता. या विष्णुकुण्डिन राजाने इ.स. ५१८ पर्यंत राज्य केले. त्याचा एक लेख स्वानापूर येथे प्राप्त झाला. विष्णुकुण्डिन नाणी मोठ्या संख्येने वाकाटक राज्यात तसेच महाराष्ट्रातही मिळालेली आहेत. यावरून असे दिसते की, विष्णुकुण्डिन राजे बहुतेक स्वतःला वाकाटक राज्याचे वारस समजत होते. त्या प्रदेशात ते राहत होते आणि त्यावर त्यांनी काही काळ राज्यही केले.
    ज्या नलवंशानी नदिवर्धन शास्वेच्या राज्यावर आक्रमण केले त्या वंशाचे राज बलशाली होते. त्यांचे सामर्थ्य बदामीच्या चालुक्य वंशाचा राजा कीर्तिवर्मन (इ.स. ५६६-६७ ते ७९७-९८) याने नष्ट करेपर्यंत तसेच कायम होते. कीर्तिवर्मनला नलांची काळ रात्री (काळरात्र) असे म्हटले आहे. नलांनी वाकाटक राज्याचा बराच भाग व्यापला असावा.
      कुंतल देशाच्या कदंब राज्याचे आधी वर्णन केल्याप्रमाणे वाकाटकांशी शत्रुत्वाचे संबंध होते. हरिषेणाने त्यांच्या राज्यावर आक्रमण करून त्यांना नाराज कले होते. पुलकेशी द्वितीय याच्या ऐहोळे शिलालेखात कीर्तिवर्मनला कदंबाची काळरात्र म्हटलेले आहे. यावरून कदंब बयाच काळपर्यंत इतरांना जाणीव देण्याइतपत बलशाली राहिले असे म्हणावे लागेल. कदंबांनी हरिषेणानंतर आलेल्या राजाच्या दुबळेपणावा.. किंवा वारसाच्या अभावाचा फायदा घेऊन निदान वत्सगुल्म शास्वेच्या राज्याचा भाग जिंकला असावा.
        याशिवाय मुंडपुत्रांनी आणि कुंभकर्ण सरदारांनी वाकाटकांच्या दोन्ही शास्वांव्या राज्याचा काही भाग जिंकला होता असे दाखविणारा पुरावा उपलब्ध आहे. मुंडपुत्र राजा आदित्यराज याच्या मल्हारा (तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती) ताम्रपटामुळे एका ब्राह्मण घराण्याची माहिती मिळाली आहे. या घराण्याचे राष्ट्र‌महाराज, राजकुल महाराज आणि आदित्यराज हे शेवटचे तीन राजे फार सामर्थ्यशाली होते. त्यांनी आपल्या विजयापत्यर्थ अश्वमेध यज्ञ (एक किंवा जास्त) केले होते. या ताम्रपटावर कोणत्याही संवताची तिथी नाही. परंतु काही विशिष्ट गोष्टींमुळे हा वाकाटकोत्तर कालखंडातील आहे असे म्हणता येते. या घराण्याचे प्रारंभीचे काही सभासद वाकाटकांचे नोकर असावेत. त्यांच्या अस्तानंतर या लोकांनी राजकीय सत्ता धारण केली आणि पद्मपूर-नंदिवर्धन-प्रवरपूर शाखेच्या राज्याचा बराचसा प्रदेश काबीज केला. कुंभकर्ण घराण्याचा शेवटचा राजा भानुषेण याच्या थाळनेर ताम्रपटाच्या प्राप्तीमुळे या घराण्याच्या पाच पिढ्यांची माहिती मिळाली. भानुषेण याने त्याच्या आधी होऊन गेलेल्या तीन शासकांप्रमाणे महाराज ही पद‌वी धारण केली होती. या घराण्याचा पहिला राजा जयराज याचा उल्लेख पहिला महाराज (आदि-महाराज) असा आहे. हा वाकाटकांच्या सत्तेच्या अंतानंतर स्वानदेश भागात राज्यावर आला. हे घराणे बदामीच्या चालुक्य वंशाने नष्ट केले.
       अस्वेरीस इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास पद्मपूर-नदिवर्धन-प्रवरपूर शाखेच्या सत्तेखाली असलेला प्रदेश माहिष्मतीच्या प्रारंभीच्या कलचुरि वंशाचा पहिला ज्ञात राजा कृष्णराज याने जिंकला व येथील कारभार त्याच्या मांडलिकाकडे सोपविला असे कलचुरि-वेदि संवताच्या तीनशे बावीसाव्या वर्षीच्या म्हणजेच इ.स. १७३ मध्ये दिलेल्या स्वामिराज याच्या नगरधन ताम्रपटावरून दिसते. त्यांनी मुंडपुत्रांच्या सत्तेचा समूळ उच्छेद केला किंवा वाकाटक राज्याचा काही भाग त्यांच्याकडेच ठेवला हे स्वात्रीपूर्वक सांगता येत नाही. कलचुरि कृष्णराजाची समकालीन राजवंशांमध्ये ठकृष्णराज-रुपकठ म्हणून ख्यात असलेली नाणी वाकाटकांच्या या शास्वेच्या राज्यामध्ये सर्वत्र मिळाली आहेत.
         अशा रीतीने विन्ध्यशक्ति प्रथम याने स्थापन केलेल्या आणि त्याच्या कार्यक्षम वारसांनी भरभराटीस आणलेल्या प्रभावी वाकाटक राज्याचा अंत झाला.

 

 

 

  

 

वाकटक राजवटीतील स्त्रियाचा  प्रेरणादायी सहभाग

प्रस्तावनाः-
        प्राचिन भारताच्या इतिहासतील गुप्त घराण्याचे संपुर्ण भारतावर वर्चस्व होते, ज्यामध्ये दक्षिण भारतामधील लहान राज्यांनी गुप्ताचे मांडलिकत्व पत्कारून अप्रत्यक्षरित्या गुप्त राजनितीला हातभार लावला होता. आपली राजकिय शक्ती वाढविण्यामध्ये गुप्त सम्राटांना मोठे यश लाभले होते. वाकाटक ही दक्षिणेतील महत्वपुर्ण सत्ता लक्षात घेवुन चंद्रगुप्त दुसरा याने मैत्री संबंध प्रस्तापित करण्यासाठी व्दितीय रूद्रसेनाशी आपल्या मुलीचा म्हणजेच प्रभवतीगुप्ताचा विवाह घडवुन आणला होता. यातुन वाकाटकांच्या राजकिय संरचनेत बदल झाला आणि स्त्रियाना वाव मिळाला.
       वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हीने अल्पवयात 25 व्या वर्षी आलेले वैधव्य स्विकारून मोठ्या धाडसाने परिस्थितीशी समोर जात मुलगा दिवाकर सेनच्या नावे प्रत्यक्ष कारभार चालविला होता व अनेक महत्वपुर्ण कार्य सिध्दिस नेले. माता-पित्यांनी तीचे सांत्वन केले आणि लष्करी व प्रशासनिक मदत देण्याचे वचन दिले. यातुन वाकाटक दरबारी चंद्रगुप्ताचे प्रशासनिक मुत्सद्याचे एक शिष्ट मंडळ दाखल झाले त्यामध्ये आपल्या नातवंडांना संस्कार वृत्ती देण्यासाठी शिक्षक व राजदुत म्हणुन कुलगुरू कालीदास याला ही पाठविले. पुढे कालीदासाच्या रूपाने विदर्भात 'मेघदुत' काव्याचा जन्म घडुन आला.
        इ.स.420 मध्ये पुत्र दिवाकर सेनाचे निधन झाले व विधवा व्रता बरोबरच पुत्र विरहाचे दुःख सुध्दा तीच्या वाट्याला आले. मात्र कुठेच खचुन न जाता पित्याच्या मदतीने तीने राज्य स्थिर स्थावर केले. प्रसंगी पित्यालाही लष्करी सहकार्य देण्यात विलंब केला नाही. दरबारात ब्राम्हण विद्वानांच्या नियुक्त्या केल्या वैदीक धर्माचे पालन करून ब्राम्हणांना प्रचंड दानधर्म केला. रामगिरी स्वामीची म्हणजे तथागत बुध्दाची पुजा ही केली. बौध्द संस्कृतीचे संवर्धन ही घठवुन आणले.
     या प्रमाणेच नरेंद्रसेनाची पत्नी राणी अज्झीतभ‌ट्टारीका हीने ही वाकाटक राजनितीला सहकार्य केले. वाकाटक व राष्ट्रकुट यांचेतील वैरभाव संपविण्यासाठी चंद्रगुप्त दुसऱ्याने अज्झीतभ‌ट्टारीका हीचा विवाह वाकाटक घराण्यात केला व मैत्रीचे, शांततेचे वातावरण निर्माण केले. वाकाटकांचा मांडलिक भरतबल याची राणी लोकप्रकाशा हीने 'महादेवी' ही पदवी धारण केली व प्रशासनात प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिध्द केले. लोकप्रकाशा हीने परधर्म सहिष्णुता जोपासली, ज्यामुळे विदर्भात बौध्द धर्म संस्कृती भरभराटीला पोहचली. वाकाटक सत्तेच्या सांस्कृतीक विकासाला लोकप्रकाशा राणीने हातभारच लावला होता. राष्ट्रकुटांची राणी महादेवी शावलंगी हीने तत्कालीन कायदशीर नियमांचे पालन करून विमुराजाच्या संमतीने दान धर्म विधी करून ताम्रपट कोरला हीच्याच कारकिर्दीत विदर्भातील अचलपुर (जि. अमरावती) येथे राष्ट्रकुटाची एक शाखा विकसीत झाली. वैदिकधर्माचा पुरस्कार करून शिवाची उपासना केली व त्याचबरोबर सांस्कृतीकविकासासाठी प्रचंड योगदान दिले त्याचा मागोवा घेत वाकाटक घराण्यातील स्त्रियांचा राजकिय जीवनातील सहभाग भविष्यकाळातील स्त्रियासाठी प्रेरणादायी ठरावा

3.3 अ) प्रभावती गुप्ता :-
     प्रभावती गुप्ता ही गुप्त घराण्याचा राजा चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी असल्याने तीला लहानपणापासुनच उत्तम शिक्षणाचे धडे मिळाले होते व्यवहारशास्त्र, राजनितीशास्त्र, अर्थ इत्यादी प्रकारचे शिक्षण तीला लाभले होते. मुजुमदार नुसार, राजघराण्यातील स्त्रीया व उच्च कुलीन स्त्रीया यांच्या शिकविण्याकरीता प्रसादातच शिक्षणची व्यवस्था केली जात होती. तसेच त्यांच्या साठी विशेष शिक्षकांची व्यवस्था होती  अनविता आनंद नुसार, कालीदासाच्या अभिज्ञान शाकुतलम नाटयामधील शकुंतला आपला प्रियकर दुशंतलातमल पत्रावर पत्र लिहीते  यावरून गुप्त काळात स्त्रीयांना शिक्षणाचे स्वातंत्र होते असे निदर्शनास येते. राजकुळातील स्त्रीयाना तर सार्वजनिक शिक्षणाबरोबरच राजकिय शिक्षणाचे उत्तम घडे दिल्या जात असावे असे लक्षात येते.
      प्रभावतिला राजनितीशास्त्रावरील दिलेल्या शिक्षणामुळेच प्रभावतीनेच वाकाटक घराण्याशी सबंध जोडण्यात काहीही हरकत घेतली नव्हती. व वाकाटक नृपती पृथ्वीसेनाचा पुत्र व्दितीय रूद्रसेनशी विवाह केला आणि गुप्त व वाकाटक घराण्याचे राजनितीक संबंध सलोख्याचे प्रस्थापीत झाले. या विवाहामुळे गुप्ताच्या राजकिय सामर्थ्यामध्ये ताद चाली तसेच दक्षिणे कडील वाकाटक सत्तेकडे लक्ष देण्याचे कार्यही उस्ले नाही वाढ झाली, तसेच दक्षिणेकडील वाकाटक सत्तेकडे लक्ष देण्याचे कार्यही उरले नाही.
  प्रभावती व रूद्रसेन व्दितीय यांच्या विवाहातुन गुप्तांची राजकिय खेळी यशस्वी झाली असली, तसेच वाकाटकांनी सहजपणे स्विकारली असली तरी खरे राजकिय कौषल्य हे प्रभावतीचे पणाला लागले होते व त्यात प्रभावतीने विवाहास स्विकार देवून दोन्ही सत्ताधिशांचे राजकिय हेतु सिध्दीस नेले यात शंका घेता येत नाही. वरील कृत्यातुन प्रभावती गुप्ताच्या राजकिय योगदानाची भुमीका स्पष्ट होते. वाकाटक राजसत्तेची रूद्रसेन दुसऱ्याने सत्ता हाती घेतल्यानंतर त्याच्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी प्रभावती गुप्ताचे अप्रत्यक्ष समर्थन होते. अर्थात प्रभावती गुप्ता त्याच्या बरोबर होती.पती रूद्रसेनाला साम्राज्याच्या विकासा करीता प्रशासकिय अंदाजपत्रक तयार करतांना प्रभावती त्याला मदत करीत होती विकासात्मक योजनांच्या चर्चेत सहभागी होती. अर्थात तत्कालीन काळात हस्तक्षेपासाठी वाव नव्हता तरीही प्रभावतीने स्त्रिसामर्थ रूजविले होते.
   प्रभावतीचे राजनैतिक कौशल्य पणाला लागले ते म्हणजे तीच्या पतीच्या निधनानतर, कारण लग्न होवून जेमतेमच वर्ष झाली होती, आणि मुलेही लहानच होती, तसेच तीचे वयही पंचविसच्या आसपासच होते. म्हणजेच अगदी तारूण्यात तीच्यावर संसाराचे प्रचंड ओझे पडले होते व वैधत्व तीच्या वाट्याला आले होते.
    प्रभावतीचा वाकाटक घराण्यात इतका प्रभाव होता की, तीला महान प्रतापी व माननिय महीला म्हणुन तीचा गौरव केला जात असे. त्यामुळे सहाजीकच पतीच्या निधनानंतर राज्यकारभार साभाळण्याची जबाबदारी प्रभावती गुप्ताकडेच आली आणि प्रभावतीनेही अगदी समर्थपणे सन 390 ते 410 इतक्या प्रदिर्घ कालखडापर्यत
अभिभावकाच्या रूपात समर्थपणे सांभाळली. 
      प्रभावतीने वाकाटक सत्तेच्या नावाने राज्यकारभार सुरू केला, प्रभावती गुप्ताला राजकिय वारसा असल्याने तीचा कारभार हा गुप्त साम्राज्याचा एक भाग बनला होता अर्थात गुप्तांनी आपल्या मुलीला राज्यकारभारात पाहीजे ती मदत दिली व प्रभावतीने वाकाटकांची राजकिय अस्थिरता लक्षात घेवून भारतात प्रभावी असलेल्या गुप्त साम्राज्याची मदत घेवून वाकाटकांचे साम्राज्य टिकवून ठेवले. तसेच गुप्तानाही प्रभावतीच्या प्रशासनाची अडचणीच्या वेळी प्रामुख्याने मदत मिळाली.
    पुढे प्रभावती गुप्तांच्या माध्यमातुन चंद्रगुप्ताला शक विरोधी युध्द मोहीमेत आता कोणतीही अडचण राहीली नाही, कारण वाकाटकांची लष्करी मदत चंद्रगुप्ताला मिळणारी होती, किंवा ते मैत्रीकारणातुन ही तटस्थ राहणार होती. वास्तविक गुप्तसम्राट आपल्या मातांच्या नावाचा उल्लेख करीत असले तरी स्त्रिया प्रशासनात कोणताही परिणामकारक भाग घेत नसत. दुसऱ्या चंद्रगुप्तांची मुलगी प्रभावती गुप्ता ही वाकाटक राज्यात काळजीवाहु प्रमुख म्हणुन कारभार पाहत असे. परंतु गुप्त साम्राज्यात अशी उदाहरणे नाहीत. मात्र प्रभावतीने आपला अज्ञान मुलगा दिवाकरसेन याच्या नावे 13 वर्ष राज्यकारभार पाहीला. पुढे प्रभावतीची समर्थता पणाला लागली ती दिवाकरसेनच्या मृत्युच्या काळी अर्थात दुर्दैवाने दिवाकर सेनची राजवट अल्पकालीन ठरली, कारण सन 420 मध्ये त्याचे अकाली निधन झाले तेव्हा प्रभावती गुप्ता पुत्र निधनाने फार खचुन गेली होती. मात्र तीने अधिक सामजस्य राखुन आपला धाकटापुत्र दामोदरसेन याला गादीवर बसविले वाकाटकाची संरक्षक म्हणुन राज्यकारभार पाहीला प्रभावतीच्या सल्ल्याने पुना ताम्रपट व ऋध्दपुर ताम्रपटामध्ये तीने आपली माता कुबेरनागा हीला 'महादेवी पदवीने सन्मानित केले व एक आदर्श मातृभक्त राजकन्या' म्हणुन मान्यता मिळविली. तसेच सासरचा उल्लेख न करता आपल्या पितृ गोत्राचा दान पत्रामध्ये सार्थ अभिमानपुर्वक उल्लेख केला. तसेच कालीदासाच्या रूपाने विदर्भात मेघदुत काव्याचा जन्म घडवून आणला. पुढे व्दितीय प्रवरसेनाच्या तीरोडी ताम्रपटामध्ये त्याने आपल्या दिवंगत पित्याचा उल्लेख न करता केवळ माता प्रभावतीचा उल्लेख केला आहे. तसेच नरतंगवारी तिर्थाला प्रभावती व प्रवरसेन दुसरा हेच सोबत गेले होते.? तसेच व्दितीय प्रवरसेनने आपल्या मातेला विश्वासात घेवून आपली राजधानी प्रवरपुरला नेली होती. प्रभावतीने प्रशासनातील अधिकारी पदे ही ब्राम्हणांना दिली होती 
     विदर्भातील वाशिम शाखेचा शासक विध्यशक्ती व्दितीय शक्तीशाली झाला होता. वाकाटक वषात प्रभावतीला जेष्ठता लाभल्यामुळे व तीने अल्पवयीन राजपुत्राच्या माध्यमातुन शासन भार स्विकारल्यामुळे विध्यशक्ती नाराज झाला होता. मात्र प्रभावतीच्या पाठीवर चंद्रगुप्ताचा मदतीचा हात असल्यामुळे विव्यशक्तीने शांतता ग्रहन केली होती. यातुनच वाकाटक आणि वाशिम यांच्यात शांतता पूर्व संबंध निर्माण झाले.
      दरम्यानच्या काळात आपला पिता चंद्रगुप्त याला हया विधवा राणीचा गुजरात काठीयावाड मोहीमेत भरपुर सहाय्य केले होते. आपल्या असे निदर्शनास येईल की, वाकाटक किंवा गुप्त घराण्यात राजाच्या राणीने किंवा राजकुमारीका यांनी प्रशासनात खुप सक्रीय सहभाग घेतलेला नाही. राणी कुमारदेवी, राणीवृवदेवी, इक्ष्वांकु घराण्यातील राजराण्या राजकुमारी कोसलची राणी पल्लव वशातील युवराज्ञी चारूदेवी यांनी आपला पती किंवा सासरे यांच्या मदतीवर प्रशासनात सहभाग घेतला होता. मात्र येथे एकमेव प्रभावती गुप्ता हीने वाकाटक राज्याअंतर्गत प्रत्यक्ष शासन सुत्रे आपल्या हाती घेतले होते. 10 तत्कालीन राण्याच्या तुलनेत प्रभावती गुप्ता हीचे राजनैतिक दृष्टया बहुमुल्य योगदान ठरते.

3.3 ब) अज्झितमट्टरीकाः-
     व्दितीय प्रवरसेनानतर सन 450 च्या सुमारास त्याचा मुलगा नरेंद्रसेन हा वाकाटकांच्या गादीवर आला. मनपुरच्या राष्ट्रकुट नृपती राजकन्या अज्झितभट्टीका हीच्यादित्याचा विवाह झाला." तत्कालीन राजनैतिक परिस्थिती प्रमाणे गुप्ताच्या नंतर वाकाटक सत्तेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता वाकाटक वंशासोबत चालु असणाऱ्या वैर संबंधाना हया विवाहामुळे पुर्ण विराम मिळाला 12 नरेंद्रसेनाचे वडिल प्रवरसेन व्दितीय हे राजनैतिक दृष्ट्या दुरदृष्टीकोनाचे होते त्यांनी शाततेच्या धोरणाचा स्विकार करून राजवृध्दी करण्याच्या निमीत्ताने गुप्त घराण्याशी स्नेह राखला. यावेळी कुंतल प्रदेशाची राजधानी मानपुर होती.
     अज्झितमट्टीका व नरेंद्रसेन यांचा विवाह गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा यांच्या मदतीने घडुन आला, आणि राष्ट्रकुट व वाकाटक या राजघराण्यातील मागील वितुष्ट नाहीसे होवुन त्यांच्यात वैवाहीक संबंध प्रस्तापित झाले. 13 राष्ट्रकुट बरेच प्रबळ असुन त्यांचे राज्य वत्सगुल्मच्या वाकाटक शाखेच्या राज्याला लागुन असल्यामुळे त्याचे वाकाटक राजांशी अनेकदा खटके उडाले होते. ही माहीती दोन्ही राजवंशाच्या कोरीव लेखात आढळते.
    हया विवाहामुळे नरेंद्रसेनाला माळव्यात यश मिळविण्यासाठी राष्ट्रकुटांची बरीच मदत झाली होती. अशाप्रकारे अज्झितभट्टीका हिच्या विवाह संबंधामुळे दक्षिणेतील हे दोन राजघराणे एकत्रित आल्याने आल्याने वाकाटक राजा नरेंद्र सेनाचे दक्षिणेतील राजनैतिक क्षेत्रात वजन वाढले येथुनच गुप्ताचे अनेक मांडलिक राजे वाकाटकाच्या आश्रयाखाली येण्यास सुरूवात झाली ज्यामध्ये मेकला राजा, कोसल राजा भिमसेन, मालव राजा अनुपेष्वर इत्यादीनी नरेंद्र सेनाचे वर्चस्व स्वतः हुन स्विकारले. 14 यावरून अज्झितमट्टरीकाचे राजकिय वर्चस्व सिध्द होते.
     गुप्ताच्या दानपत्रात व ताम्रपटाच्या मुद्रावरील लेखात त्यांच्या राण्यांना निर्देश आढळतो. तसा वाकाटकांच्या दानपत्रात आढळत नाही. याला अपवाद फक्त दोनच राण्यांचे आहेत, व्दितीय रूद्रसेनाची अग्रमहीषी प्रभावती गुप्ता व नरेंद्रसेनाची राणी अज्झितभट्टीका अज्झितभट्टारीका हिने नरेंद्रसेनाला प्रशासनिक कामकाजात अप्रत्यक्षपणे निश्चितच सहकार्य दिले होते. मात्र प्रत्यक्षरित्या तिने प्रभावती गुप्ताप्रमाणे प्रशासनिक सुत्रे हाती न घेतल्यामुळे तिला राज्यकारभारात अप्रत्यक्ष स्वरूप मिळाले. नरेंद्रसेनाला अज्झितम‌ट्टारीकाच्या कदंब येथील परिवाराने सक्रिय सहाय्य केले होते. या मदतीमधुनच नरेंद्रसेनाला आपली किर्ती, समृध्दी, प्रतिष्ठा निर्माण करण्यात यश मिळाले होते. 15 म्हणजेच ज्याप्रमाणे गुप्तराणी कुमारदेवी, धृवदेवी, आआंध्रमधील इक्ष्वाकु घराण्यातील राण्या राजकुमारीका, कोसल राणी, पल्लव वषाची युवराज्ञी चारूदेवी यांनी जसे आपल्या राजाना युवराजपुत्राना, सासऱ्यांना प्रशासनिक सहाय्य दिले तसेच अज्झितभट्टारीका हिने वाकाटक शासनात सहाय्य दिले होते. अज्झितभट्टारीका राणीचा प्रशासनातील सहभाग आपणास नरेद्रसेनाच्या दान पत्रामधील मजकुरा मध्ये दिसुन येतो.
   थोडक्यात अज्झितभट्टारीकाचा पती राजा नरेंद्रसेन याची कारकिर्द 20 वर्षे चालु सन 470 च्या सुमारास समाप्त झाली. ज्यावेळी नलवंशी राजा भवदत्ता वर्मा व राजपुत्र अर्थपती यानी विदर्भावर आक्रमण केले. त्यावेळी नरेंद्रसेनाचा इ. स. 470 मध्ये मृत्यु झाला व येथेच राणी अज्झितभट्टारीका हीची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली 

3.3 क) लोकप्रकाशा :-
    गुप्त घराण्यामध्ये जसे सामंताचे महत्व वाढले त्याच प्रमाणे वाकाटकांच्या काळात सुध्दा दक्षिणेत सामंताचे अस्तित्व निर्माण झाले होते. 17 वाकाटकाच्या जेष्ठ शाखेचा मांडलिक मरतबल यांचा ब्रम्हणी ताम्रपट रीवा संस्थानमध्ये ब्रम्हणी गावात सापडला.
   डॉ. बहादुरचंद्र छावडा यांनी तो वाचुन एपिग्राफिया इडियामध्ये प्रकाशित केला त्याचप्रमाणे भरतबल नृपती याचा विवाह कोसल देशाची राजकन्या लोकप्रकाशा हिच्याशी झाला. लोकप्रकाशा ही देवकुलातील कन्या होती.ब्रम्हणी ताम्रपटात भरतबलाच्या वंशाची वंशावळ आहे.  भरतबलाचे पुर्वज जयबल व वत्सराज यांनी महाराज ही पदवी लावली नाही, परंतु येथे महाराज ही पदवी नागबल व भरतल यांनी लावली होती व राणी लोकप्रकाशा हीने महाराणी या पदवीचा स्विकार केला होता. ज्याप्रमाणे गुप्तकाळात राजपद पितृसत्ताक वंशपरंपरेने चालत आले तसेच सामंत वर्गामध्ये सुध्दा हयाच पध्दतीचा अवलंब झाल्याचे निदर्शनास येते.
   बालाघाट ताम्रपटातील माहीती प्रमाणे मेकल देशावर राज्य करणारे पांडव वंशी नृपती वाकाटक नरेंद्रसेन याचे मांडलिक होते. पांडव वषी भरतबल याने आपल्या ब्रम्हणी ताम्रपटात नरेंद्रसेनाची प्रच्छन्न स्तुती केली. यावरून त्याने त्याचे स्वामीत्व कबुल केले होते हेच निदर्शनास येते. वाकाटक राजवटीला सहाय्यक असे कार्य
     भरतबल याने केले. तसेच त्यांच्यात दृढ मैत्री व सामजस्य प्रस्थापित झाले. 19 बालाघाट ताम्रपटावरून असे स्पष्ट होते की, वाकाटक नरेश नरेंद्रसेनाच्या आज्ञा कोसला, मेकला व मालव देशाच्या अधिपतींनी शिरसावद्य मानल्या होत्या म्हणजेच नरेंद्रसेनाच्या आज्ञेत राजकुमारी लोकाप्रकाशा हीचे वडिल वागत असुन ते कोसल देशाचा कारभार पाहत होते.आरंग ताम्रपटात सुध्दा असेच दिसुन येते की, कोसल व वाकाटक राजे यांचे स्नेहाचे संबंध होते. गुप्ताच्याच राजवटीत मेकला देशाचा कारभार चालत होता. त्याच देशाचा राजा भरतबल हयाच्याशी लोकप्रकाशाचा हीचा विवाह झाला होता, येथे महत्वाचे असे की, लोकप्रकाशाचे माहेर व सासर हे दोन्हीही घराणे वाकाटकांचे सामंत म्हणुन राजवटी चालवित होते. या विवाहामधुन सामंतशाहीला महत्व लामले व दोन घराण्यातीन स्नेहमाव अधिक वृध्दीगत झाला असे आपणास निदर्शनास येते यातुनच गुप्तांचे राजकीय वर्चस्व वाकाटक व त्याच्या सामत राज्यावरही होते हे सिध्द होते 
       राजदरबारामध्ये वावरणाऱ्या दास-दासी, अधिकारी वर्गासोबत राणी लोकप्रकाशा हीने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न राखता आपलेपणा दर्शविला यातुन सहिष्णुतावर्धीत होण्यास हातभार लावला होता. 
साराशः-
      वरील विवेचनावरून वाकाटक काळात प्रभावतीच्या राजकिय प्रभावाची विषेशत्वाने जाणीव होते. तीने मोठ्या घाडसाने विवाहास संमत्ती दर्शवून दोन सत्ताधिशामध्ये परस्पर सामजस्य घडवून आणण्यात फार मोठया राजकिय कसोटीतुन प्रभावतीला जावे लागले होत, तसेच प्रभावतीने अल्प काळातच पतीच्या निधनानंतर आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने समर्थपणे राज्यकारभार सांभाळला व गुप्ताचे सहकार्य घेवून अस्थिरता माजु दिली नाही. प्रभावतीवर अनेक संकट आलीत पण तीने मोठ्या घिराने प्रत्येक संकट परतुन लावले व त्यातुन मार्ग काढला व वाकाटकांची सत्ता टिकवून ठेवली प्रभावतीच्या काळात वाशिम शाखेच्या विद्यशक्ती व्दितीय प्रभावतीच्या वर्चस्वाने अत्यंत नाराज झाला होता. परंतु हा प्रसंगही तीने मोठया चातुर्याने सोडविला व शांतता पुर्ण संबंध प्रस्थापीत केले. एकंदरीत प्रभावतीने राजनितीला अनुसरून राजकिय समर्थता सांभाळत वाकाटक सत्तेमध्ये स्थैर्य निर्माण केले त्याचबरोबर अज्झितभ‌ट्टारीका हीने वाकाटक घराण्याची वैवाहीक संबंधास मान्यता देवून वाकाटकांशी चालु असलेले वैर संबंध समाप्त केले. हे फार मोठे अज्झितमट्टारीकाचे राजकिय धाडस मानावें लागते ती प्रभावती गुप्ताप्रमाणे प्रत्यक्ष राज्यकारभाराचे कार्य करीत नसली तरीही, पती नरेंद्रसेनाच्या खांदयाशी खांदा लावून होती व नरेद्रसेनाचे राजकिय सामर्थ वाढविले होते. तसेच भरतबलाची राणी लोकप्रकाशा हीचा अप्रत्यक्ष आपल्या पतीला पाठिबा असुन प्रत्येक कार्यात ती पतीच्या पाठीशी होती. लोकप्रकाशाच्या मदतीने कोसलच्या पांडवांशी स्नेहाचे संबंध प्रस्थापीत झाले. हा राजकिय क्षेत्रातील योगदानाचा लोकप्रकाशाचा सहभाग होता लोकप्रकाशाने दरबारातील अधिकारी व स्त्रीयांना तसेच दास दासीना कोणत्याही प्रकारची दुय्यम वागणुक दिली नाही, यावरून राजकारणातील तीची सहिष्णु वृत्ती दिसुन येते. एकंदरीत वाकाटक राजघराण्यातील स्त्रीयाचा राजकारणातील सहभाग आधुनिक काळातील स्त्रीयासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतो.

 

वाकटक राजवटीतील स्त्रिया

प्रस्तावनाः-

प्राचिन भारताच्या इतिहासतील गुप्त घराण्याचे संपुर्ण भारतावर वर्चस्व होते, ज्यामध्ये दक्षिण भारतामधील लहान राज्यांनी गुप्ताचे मांडलिकत्व पत्कारून अप्रत्यक्षरित्या गुप्त राजनितीला हातभार लावला होता. आपली राजकिय शक्ती वाढविण्यामध्ये गुप्त सम्राटांना मोठे यश लाभले होते. वाकाटक ही दक्षिणेतील महत्वपुर्ण सत्ता लक्षात घेवुन चंद्रगुप्त दुसरा याने मैत्री संबंध प्रस्तापित करण्यासाठी व्दितीय रूद्रसेनाशी आपल्या मुलीचा म्हणजेच प्रभवतीगुप्ताचा विवाह घडवुन आणला होता. यातुन वाकाटकांच्या राजकिय संरचनेत बदल झाला आणि स्त्रियांना वाव मिळाला
    वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हीने अल्पवयात 25 व्या वर्षी आलेले वैधव्य स्विकारून मोठ्या धाडसाने परिस्थितीशी समोर जात मुलगा दिवाकर सेनच्या नावे प्रत्यक्ष कारभार चालविला होता व अनेक महत्वपुर्ण कार्य सिध्दिस नेले. माता-पित्यानी तीचे सात्वन केले आणि लष्करी व प्रशासनिक मदत देण्याचे वचन दिले. यातुन वाकाटक दरबारी चंद्रगुप्ताचे प्रशासनिक मुत्सद्याचे एक शिष्ट मंडळ दाखल झाले त्यामध्ये आपल्या नातवंडांना सस्कार वृत्ती देण्यासाठी शिक्षक व राजदुत म्हणुन कुलगुरू कालीदास याला ही पाठविले. पुढे कालीदासाच्या रूपाने विदर्भात 'मेघदुत' काव्याचा जन्म घडुन आला.
       इ.स.420 मध्ये पुत्र दिवाकर सेनाचे निधन झाले व विधवा व्रता बरोबरच पुत्र विरहाचे दुःख सुध्दा तीच्या वाटयाला आले. मात्र कुठेच खचून न जाता पित्याच्या मदतीने तीने राज्य स्थिर स्थावर केले. प्रसंगी पित्यालाही लष्करी सहकार्य देण्यात विलंब केला नाही दरबारात ब्राम्हण विद्वानाच्या नियुक्त्या केल्या. वैदीक धर्माचे पालन करून ब्राम्हणांना प्रचंड दानधर्म केला रामगिरी स्वामीची म्हणजे तथागत बुध्दाची पुजा ही केली. बौध्द संस्कृतीचे संवर्धन ही घडवुन आणले. या प्रमाणेच नरेंदसेनाची पत्नी राणी अज्झीतभट्टारीका हीने ही वाकाटक राजनितीला सहकार्य केले वाकाटक व राष्ट्रकुट यांचेतील वैरभाव सपविण्यासाठी चंद्रगुप्त दुसन्याने अज्झीतमट्टारीका हीचा विवाह वाकाटक घराण्यात केला व मैत्रीचे, शांततेचे वातावरण निर्माण केले. वाकाटकांचा मांडलिक भरतबल याची राणी लोकप्रकाशा हीने 'महादेवी ही पदवी धारण केली व प्रशासनात प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिध्द केले. लोकप्रकाशा हीने परधर्म सहिष्णुता जोपासली, ज्यामुळे विदर्भात बौध्द धर्म संस्कृती भरभराटीला पोहचली. वाकाटक सत्तेच्या सांस्कृतीक विकासाला लोकप्रकाशा राणीने हातभारच लावला होता. राष्ट्रकुटांची राणी महादेवी शावलंगी हीने तत्कालीन कायदशीर नियमांचे पालन करून विभुराजाच्या समतीने दान धर्म विधी करून ताम्रपट कोरला हीच्याच कारकिर्दीत विदर्भातील अचलपुर (जि. अमरावती) येथे राष्ट्रकुटांची एक शाखा विकसीत झाली. वैदिकधर्माचा पुरस्कार करून शिवाची उपासना केली व त्याचबरोबर सांस्कृतीकविकासासाठी प्रचंड योगदान दिले त्याचा मागोवा घेत वाकाटक घराण्यातील स्त्रियांचा राजकिय जीवनातील सहभाग भविष्यकाळातील स्त्रियासाठी प्रेरणादायी ठरावा

3.3 अ) प्रभावती गुप्ता
   प्रभावती गुप्ता ही गुप्त घराण्याचा राजा चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी असल्याने तीला लहानपणापासुनच उत्तम शिक्षणाचे धडे मिळाले होते. व्यवहारशास्त्र, राजनितीशास्त्र, अर्थ इत्यादी प्रकारचे शिक्षण तीला लाभले होते. मुजुमदार नुसार, राजघराण्यातील स्त्रीया व उच्च कुलीन स्त्रीया यांच्या शिकविण्याकरीता प्रसादातच शिक्षणची व्यवस्था केली जात होती, तसेच त्यांच्या साठी विशेष शिक्षकांची व्यवस्था होती. अनविता आनंद नुसार, कालीदासाच्या अभिज्ञान शाकुतलम नाटयामधील शकुंतला आपला प्रियकर दुशंतला तमल पत्रावर पत्र लिहीते 
    यावरून गुप्त काळात स्त्रीयांना शिक्षणाचे स्वातंत्र होते असे निदर्शनास येते राजकुळातील स्त्रीयांना तर सार्वजनिक शिक्षणाबरोबरच राजकिय शिक्षणाचे उत्तम घडे दिल्या जात असावे असे लक्षात येते.
      प्रभावतिला राजनितीशास्त्रावरील दिलेल्या शिक्षणामुळेच प्रभावतीनेच वाकाटक घराण्याशी संबंध जोडण्यात काहीही हरकत घेतली नव्हती व वाकाटक नृपती पृथ्वीसेनाचा पुत्र व्दितीय रूद्रसेनशी विवाह केला आणि गुप्त व वाकाटक घराण्याचे राजनितीक संबंध सलोख्याचे प्रस्थापीत झाले. या विवाहामुळे गुप्ताच्या राजकिय सामर्थ्यामध्ये वाढ झाली, तसेच दक्षिणेकडील वाकाटक सत्तेकडे लक्ष देण्याचे कार्यही उरले नाही. वाकाटक घराण्याचे राजनितीक संबंध सलोख्याचे प्रस्थापीत झाले. या विवाहामुळे गुप्ताच्या राजकिय सामर्थ्यामध्ये वाढ झाली, तसेच दक्षिणेकडील वाकाटक सत्तेकडे लक्ष देण्याचे कार्यही उरले नाही.
      प्रभावती व रूद्रसेन व्दितीय यांच्या विवाहातुन गुप्तांची राजकिय खेळी यशस्वी झाली असली, तसेच वाकाटकांनी सहजपणे स्विकारली असली तरी खरे राजकिय कौषल्य हे प्रभावतीचे पणाला लागले होते व त्यात प्रभावतीने विवाहास स्विकार देवून दोन्ही सत्ताधिशाचे राजकिय हेतु सिध्दीस नेले यात शंका घेता येत नाही. वरील कृत्यातुन प्रभावती गुप्ताच्या राजकिय योगदानाची भुमीका स्पष्ट होते. वाकाटक राजसत्तेची रूद्रसेन दुसऱ्याने सत्ता हाती घेतल्यानंतर त्याच्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी प्रभावती गुप्ताचे अप्रत्यक्ष समर्थन होते. अर्थात प्रभावती गुप्ता त्याच्या बरोबर होती. पती रूद्रसेनाला साम्राज्याच्या विकासा करीता प्रशासकिय अंदाजपत्रक तयार करतांना प्रभावती त्याला मदत करीत होती. विकासात्मक योजनांच्या चर्चेत सहभागी होती. अर्थात तत्कालीन काळात हस्तक्षेपासाठी वाव नव्हता तरीही प्रभावतीने स्त्रिसामर्थ रूजविले होते.
     प्रभावतीचे राजनैतिक कौशल्य पणाला लागले ते म्हणजे तीच्या पतीच्या निधनानंतर, कारण लग्न होवून जेमतेमच वर्ष झाली होती, आणि मुलेही लहानच होती, तसेच तीचे वयही पंचविसच्या आसपासच होते. म्हणजेच अगदी तारुण्यात तीच्यावर संसाराचे प्रचंड ओझे पडले होते व वैधत्व तीच्या वाटयाला आले होते. प्रभावतीचा वाकाटक घराण्यात इतका प्रभाव होता की, तीला महान प्रतापी व माननिय महीला म्हणुन तीचा गौरव केला जात असे. त्यामुळे सहाजीकच पतीच्या निधनानंतर राज्यकारभार सांभाळण्याची जबाबदारी प्रभावती गुप्ताकडेच आली आणि प्रभावतीनेही अगदी समर्थपणे सन 390 ते 410 इतक्या प्रदिर्घ कालखंडापर्यंत अभिभावकाच्या रूपात समर्थपणे सांभाळली 
     प्रभावतीने वाकाटक सत्तेच्या नावाने रराज्यकारभार सुरू केला, प्रभावती गुप्ताला राजकिय वारसा असल्याने तीचा कारभार हा गुप्त साम्राज्याचा एक भाग बनला होता. अर्थात गुप्तांनी आपल्या मुलीला राज्यकारभारात पाहीजे ती मदत दिली व प्रभावतीने वाकाटकांची राजकिय अस्थिरता लक्षात घेवून भारतात प्रभावी असलेल्या गुप्त साम्राज्याची मदत घेवून वाकाटकांचे साम्राज्य टिकवून ठेवले. तसेच गुप्तांनाही प्रभावतीच्या प्रशासनाची अडचणीच्या वेळी प्रामुख्याने मदत मिळाली
     पुढे प्रभावती गुप्तांच्या माध्यमातुन चंद्रगुप्ताला शक विरोधी युध्द मोहीमेत आता कोणतीही अडचण राहीली नाही, कारण वाकाटकांची लष्करी मदत चंद्रगुप्ताला मिळणारी होती, किवा ते मैत्रीकारणातुन ही तटस्थ राहणार होती. वास्तविक गुप्तसम्राट आपल्या मातांच्या नावाचा उल्लेख करीत असले तरी स्त्रिया प्रशासनात कोणताही परिणामकारक भाग घेत नसत. दुसऱ्या चंद्रगुप्तांची मुलगी प्रभावती गुप्ता ही वाकाटक राज्यात काळजीवाहु प्रमुख म्हणुन कारभार पाहत असे. परंतु गुप्त साम्राज्यात अशी उदाहरणे नाहीत. मात्र प्रभावतीने आपला अज्ञान मुलगा दिवाकरसेन याच्या नावे 13 वर्ष राज्यकारभार पाहीला.
     पुढे प्रभावतीची समर्थता पणाला लागली ती दिवाकरसेनच्या मृत्युच्या काळी अर्थात दुर्दैवाने दिवाकर सेनची राजवट अल्पकालीन ठरली, कारण सन 420 मध्ये त्याचे अकाली निधन झाले तेव्हा प्रभावती गुप्ता पुत्र निधनाने फार खचुन गेली होती. मात्र तीने अधिक सामजस्य राखुन आपला धाकटापुत्र दामोदरसेन याला गादीवर बसविले वाकाटकांची संख्क्षक म्हणुन राज्यकारभार पाहीला प्रभावतीच्या सल्ल्याने पुना ताम्रपट व ऋध्दपुर ताम्रपटामध्ये तीने आपली माता कुबेरनागा हीला 'महादेवी' पदवीने सन्मानित केले व एक आदर्श 'मातृभक्त राजकन्या म्हणुन मान्यता मिळविली. तसेच सासरचा उल्लेख न करता आपल्या पितृ गोत्राचा दान पत्रामध्ये सार्थ अभिमानपुर्वक उल्लेख केला. तसेच कालीदासाच्या रूपाने विदर्भात मेघदुत काव्याचा जन्म घडवून आणला. पुढे व्दितीय प्रवरसेनाच्या तीरोडी ताम्रपटामध्ये त्याने आपल्या दिवंगत पित्याचा उल्लेख न करता केवळ माता प्रभावतीचा उल्लेख केला आहे. तसेच नरतंगवारी तिर्थाला प्रभावती व प्रवरसेन दुसरा हेच सोबत गेले होते? तसेच व्दितीय प्रवरसेनने आपल्या मातेला विश्वासात घेवून आपली राजधानी प्रवरपुरला नेली होती प्रभावतीने प्रशासनातील अधिकारी पदे ही ब्राम्हणांना दिली होती 
    विदर्भातील वाशिम शाखेचा शासक विध्यशक्ती व्दितीय शक्तीशाली झाला होता. वाकाटक वषात प्रभावतीला जेष्ठता लाभल्यामुळे व तीने अल्पवयीन राजपुत्राच्या माध्यमातुन शासन भार स्विकारल्यामुळे विध्यशक्ती नाराज झाला होता. मात्र प्रभावतीच्या पाठीवर चंद्रगुप्ताचा मदतीचा हात असल्यामुळे विध्यशक्तीने शांतता ग्रहन केली होती. यातुनच वाकाटक आणि वाशिम यांच्यात शांतता पूर्व सबंध निर्माण झाले.
     दरम्यानच्या काळात आपला पिता चंद्रगुप्त याला हया विधवा राणीचा गुजरात काठीयावाद मोहीमेत भरपुर सहाय्य केले होते आपल्या असे निदर्शनास येईल की. वाकाटक किंवा गुप्त घराण्यात राजाच्या राणीने किवा केली होती. यातुनच वाकाटक आणि वाशिम यांच्यात शांतता पुर्व संबंध निर्माण झाले.
    दरम्यानच्या काळात आपला पिता चंद्रगुप्त याला हया विधवा राणीचा गुजरात काठीयावाड मोहीमेत भरपुर सहाय्य केले होते. आपल्या असे निदर्शनास येईल की, वाकाटक किंवा गुप्त घराण्यात राजाच्या राणीने किंवा राजकुमारीका यांनी प्रशासनात खुप सक्रीय सहभाग घेतलेला नाही. राणी कुमारदेवी, राणीधृवदेवी, इक्ष्वांकु घराण्यातील राजराण्या राजकुमारी कोसलची राणी पल्लव वंशातील युवराज्ञी चारूदेवी यांनी आपला पती किंवा सासरे यांच्या मदतीवर प्रशासनात सहभाग घेतला होता. मात्र येथे एकमेव प्रभावती गुप्ता हीने वाकाटक राज्याअंतर्गत प्रत्यक्ष शासन सुत्रे आपल्या हाती घेतले होते. 10 तत्कालीन राण्याच्या तुलनेत प्रभावती गुप्ता हीचे राजनैतिक दृष्टया बहुमुल्य योगदान ठरते

3.3 ब) अज्झितमट्टरीकाः-

व्दितीय प्रवरसेनानंतर सन 450 च्या सुमारास त्याचा मुलगा नरेंद्रसेन हा वाकाटकांच्या गादीवर आला. मनपुरच्या राष्ट्रकुट नृपती राजकन्या अज्झितभट्टीका हीच्याशी त्याचा विवाह झाला." तत्कालीन राजनैतिक परिस्थिती प्रमाणे गुप्ताच्या नंतर वाकाटक सत्तेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. वाकाटक वंशासोबत चालु असणाऱ्या वैर संबंधाना हया विवाहामुळे पुर्ण विराम मिळाला 12 नरेद्रसेनाचे वडिल प्रवरसेन व्दितीय हे राजनैतिक दृष्ट्या दुरदृष्टीकोनाचे होते. त्यांनी शांततेच्या धोरणांचा स्विकार करून राजवृद्ध्दी करण्याच्या निमीत्ताने गुप्त घराण्याशी स्नेह राखला. यावेळी कुंतल प्रदेशाची राजधानी मानपुर होती.
     अज्झितभट्टीका व नरेंद्रसेन यांचा विवाह गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा यांच्या मदतीने घडुन आला, आणि राष्ट्रकुट व वाकाटक या राजघराण्यातील मागील वितुष्ट नाहीसे होवुन त्यांच्यात वैवाहीक संबंध प्रस्तापित झाले. 13 राष्ट्रकुट बरेच प्रबळ असुन त्यांचे राज्य वत्सगुल्मच्या वाकाटक शाखेच्या राज्याला लागुन असल्यामुळे त्यांचे वाकाटक राजांशी अनेकदा खटके उडाले होते ही माहीती दोन्ही राजवंशाच्या कोरीव लेखात आढळते हया विवाहामुळे नरेंद्रसेनाला माळव्यात यश मिळविण्यासाठी राष्ट्रकुटांची बरीच मदत झाली होती. अशाप्रकारे अज्झितभट्टीका हिच्या विवाह संबंधामुळे दक्षिणेतील हे दोन राजघराणे एकत्रित आल्याने आल्याने वाकाटक राजा नरेद्र सेनाचे दक्षिणेतील राजनैतिक क्षेत्रात वजन वाढले येथुनच गुप्तांचे अनेक मांडलिक राजे वाकाटकांच्या आश्रयाखाली येण्यास सुरूवात झाली. ज्यामध्ये मेकला राजा, कोसल राजा भिमसेन, मालव राजा अनुपेष्वर इत्यादीनी नरेंद्र सेनाचे वर्चस्व स्वतःहुन स्विकारले. 14 यावरून अज्झितभट्टीकाचे राजकिय वर्चस्व सिध्द होते. गुप्तांच्या दानपत्रात व ताम्रपटांच्या मुद्रावरील लेखात त्यांच्या राण्यांना निर्देश आढळतो तसा वाकाटकांच्या दानपत्रात आढळत नाही. याला अपवाद फक्त दोनच राण्यांचे आहेत, व्दितीय रूद्रसेनाची अग्रमहीषी प्रभावती गुप्ता व नरेंद्रसेनाची राणी अज्झितभट्टीका अज्झितभट्टारीका हिने नरेद्रसेनाला प्रशासनिक कामकाजात अप्रत्यक्षपणे निश्चितच सहकार्य दिले होते. मात्र प्रत्यक्षरित्या तिने प्रभावती गुप्ताप्रमाणे प्रशासनिक सुत्रे हाती न घेतल्यामुळे तिला राज्यकारभारात अप्रत्यक्ष स्वरूप मिळाले. नरेंद्रसेनाला अज्झितम‌ट्टारीकाच्या कदंब येथील परिवाराने सक्रिय सहाय्य केले होते. या मदतीमधुनच नरेंद्रसेनाला आपली किर्ती, समृध्दी, प्रतिष्ठा निर्माण करण्यात यश मिळाले होते 15 म्हणजेच ज्याप्रमाणे गुप्तराणी कुमारदेवी, धृवदेवी, आधमधील इक्ष्वांकु घराण्यातील राण्या राजकुमारीका, कोसल राणी, पल्लव वषाची युवराज्ञी चारूदेवी यानी जसे आपल्या राजांना युवराजपुत्रांना, सासऱ्याऱ्यांना प्रशासनिक सहाय्य दिले तसेच अञ्जितम‌ट्टारीका हिने वाकाटक शासनात सहाय्य दिले होते. अज्झितभट्टारीका राणीचा प्रशासनातील सहभाग आपणास नरेंद्रसेनाच्या दान पत्रामधील मजकुरा मध्ये दिसुन येतो.
         थोडक्यात अज्झितभट्टारीकाचा पती राजा नरेद्रसेन याची कारकिर्द 20 वर्षे चालु सन 470 च्या सुमारास समाप्त झाली. ज्यावेळी नलवशी राजा भवदत्ता वर्मा व राजपुत्र अर्थपती यांनी विदर्भावर आक्रमण केले. त्यावेळी नरेंद्रसेनाचा इ. स. 470 मध्ये मृत्यु झाला व येथेच राणी अज्झितभ‌ट्टारीका हीची राजकीय कारकिर्द संपुष्टांत आली 16
3.3 क) लोकप्रकाशा-
      गुप्त घराण्यामध्ये जसे सामंताचे महत्व वाढले त्याच प्रमाणे वाकाटकांच्या काळात सुध्दा दक्षिणेत सामंताचे अस्तित्व निर्माण झाले होते. 17 वाकाटकाच्या जेष्ठ शाखेचा मांडलिक भरतबल यांचा ब्रम्हणी ताम्रपट रीवा संस्थानमध्ये ब्रम्हणी गावात सापडला. डॉ. बहादुरचंद्र छावठा यांनी तो वाचुन एपिग्राफिया इंडियामध्ये प्रकाशित केला. त्याचप्रमाणे भरतबल नृपती याचा विवाह कोसल देशाची राजकन्या लोकप्रकाशा हिच्याशी झाला. लोकप्रकाशा ही देवकुलातील कन्या होती ब्रम्हणी ताम्रपटात भरतबलाच्या वंशाची वंशावळ आहे 
  भरतबलाचे पुर्वज जयबल व वत्सराज यांनी महाराज ही पदवी लावली नाही, परंतु येथे महाराज ही पदवी नागबल व भरतल यांनी लावली होती व राणी लोकप्रकाशा हीने महाराणी या पदवीचा स्विकार केला होता. ज्याप्रमाणे गुप्तकाळात राजपद पितृसत्ताक वंशपरंपरेने चालत आले तसेच सामत वर्गामध्ये सुध्दा हयाच पध्दतीचा अवलंब झाल्याचे निदर्शनास येते.
  बालाघाट ताम्रपटातील माहीती प्रमाणे मेकल देशावर राज्य करणारे पांडव वंशी नृपती वाकाटक नरेंद्रसेन याचे मांडलिक होते. पांडव वषी भरतबल याने आपल्या ब्रम्हणी ताम्रपटात नरेद्रसेनाची प्रच्छन्न स्तुती केली, यावरून त्याने त्याचे स्वामीत्व कबुल केले होते हेच निदर्शनास येते. वाकाटक राजवटीला सहाय्यक असे कार्य भरतबल याने केले, तसेच त्यांच्यात दृढ मैत्री व सामजस्य प्रस्थापित झाले. 19 बालाघाट ताम्रपटावरून असे स्पष्ट होते की, वाकाटक नरेश नरेंद्रसेनाच्या आज्ञा कोसला, मेकला व माक्षव देशाच्या अधिपतींनी शिरसावध मानल्या होत्या म्हणजेच नरेंद्रसेनाच्या आज्ञेत राजकुमारी लोकाप्रकाशा हीचे वडिल वागत असुन ते कोसल देशाचा कारभार पाहत होते आरंग ताम्रपटात सुध्दा असेच दिसुन येते की, कोसल व वाकाटक राजे यांचे स्नेहाचे संबंध होते, गुप्तांच्याच राजवटीत मेकला देशाचा कारभार चालत होता त्याच देशाचा राजा भरतबल हयाच्याशी लोकप्रकाशाचा हीचा विवाह झाला होता, येथे महत्वाचे असे की, लोकप्रकाशाचे माहेर व सासर हे दोन्हीही घराणे वाकाटकांचे सामंत म्हणुन राजवटी चालवित होते. या विवाहामधुन सामंतशाहीला महत्व लामले व दोन घराण्यातीन स्नेहमाव अधिक वृध्दीगत झाला असे आपणास निदर्शनास येते यातुनच गुप्ताचे राजकीय वर्चस्व वाकाटक व त्याच्या सामंत राज्यावरही होते हे सिध्द होते. 
   राजदरबारामध्ये वावरणाऱ्या दास दासी, अधिकारी वर्गासोबत राणी लोकप्रकाशा हीने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न राखता आपलेपणा दर्शविला यातुन सहिष्णुतावर्धीत होण्यास हातभार लावला होता. 21

साराशः-
         वरील विवेचनावरून वाकाटक काळात प्रभावतीच्या राजकिय प्रभावाची विषेशत्वाने जाणीव होते. तीने मोठ्या धाडसाने विवाहास संमत्ती दर्शवून दोन सत्ताधिशामध्ये परस्पर सामजस्य घडवून आणण्यात फार मोठया राजकिय कसोटीतुन प्रभावतीला जावे लागले होत, तसेच प्रभावतीने अल्प काळातच पतीच्या निधनानंतर आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने समर्थपणे राज्यकारभार सांभाळला व गुप्ताचे सहकार्य घेवून अस्थिरता माजु दिली नाही प्रभावतीवर अनेक संकट आलीत पण तीने मोठ्या घिराने प्रत्येक संकट परतुन लावले व त्यातुन मार्ग काढला व वाकाटकांची सत्ता टिकवून ठेवली प्रभावतीच्या काळात वाशिम शाखेच्या विहाशक्ती व्दितीय प्रभावतीच्या वर्चस्वाने अत्यत नाराज झाला होता. परंतु हा प्रसंगही तीने मोठया चातुर्याने सोडविला व शांतता पूर्ण सबंध प्रस्थापीत केले एकंदरीत प्रभावतीने राजनितीला अनुसरून राजकिय समर्थता सांभाळत वाकाटक सत्तेमध्ये स्थैर्य निर्माण केले. त्याचबरोबर अज्झितभ‌ट्टारीका हीने वाकाटक घराण्याची वैवाहीक संबंधास मान्यता देवून वाकाटकांशी चालु असलेले वैर संबंध समाप्त केले. हे फार मोठे अज्झितभ‌ट्टारीकाचे राजकिय धाडस मानावे लागते.ती प्रभावती गुप्ताप्रमाणे प्रत्यक्ष राज्यकारभाराचे कार्य करीत नसली तरीही, पती नरेद्रसेनाच्या खादयाशी खादा लावून होती व नरेंद्रसेनाचे राजकिय सामर्थ वाढविले होते. तसेच भरतबलाची राणी लोकप्रकाशा हीचा अप्रत्यक्ष आपल्या पतीला पाठिंबा असुन प्रत्येक कार्यात ती पतीच्या पाठीशी होती लोकप्रकाशाच्या मदतीने कोसलच्या पांडवाशी स्नेहाचे संबंध प्रस्थापीत झाले. हा राजकिय क्षेत्रातील योगदानाचा लोकप्रकाशाचा सहभाग होता लोकप्रकाशाने दरबारातील अधिकारी व स्त्रीयांना तसेच दास दासीना कोणत्याही प्रकारची दुय्यम वागणुक दिली नाही, यावरून राजकारणातील तीची सहिष्णु वृत्ती दिसुन येते. एकदरीत वाकाटक राजघराण्यातील स्त्रीयांचा राजकारणातील सहभाग आधनिक काळातील स्त्रीयासाठी निश्चितच प्रेरणादायी तस्तो

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...