भारतात सुमारे १५०० लेण्या असून सर्वाधिक लेण्या या महाराष्ट्रात
आहेत. महाराष्ट्राला लेण्या साकारण्यासाठी पोषक पठार लाभल्याने येथे सर्वाधिक
लेण्या आढळतात. सुमारे १२०० लेण्या महाराष्ट्रात असून त्यापैकी १ हजार लेण्या या
बौद्ध लेण्या आहेत. महारा
ष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक लेण्या
कोरल्याचे आढळते. त्यापैकीच एक लेणी सांगली जिल्ह्यात आढळते. कवठेमहांकाळ
तालुक्यातील कुकटोळी येथे गिरिलिंग म्हणून येथे लेणी ओळखली जाते. दक्षिण पूर्व
दिशेला ही लेणी आहे. वज्रयान काळातील ही लेणी असल्यामुळे येथे कोरीव काम दिसून येत
नाही.
पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी वज्रयान बुद्धिझमचे चांगल प्रस्त
होते. येथे मोठ्या प्रमाणावर वज्रयान बुद्धिझमचे अनुयायी होते. वज्रयान
बुद्धिझममध्ये स्तुपाचा आकार बदलून छोटा झालेला होता. कर्जत तालुक्यातील कोंडाणे लेणी
ही साधारण दुसऱ्या शतकामध्ये साकारलेली होती. यामध्ये स्तुपाची विभाजनी मेदी,
अण्ड, हर्मिका, छत्री अशा भागात आहे. तर सांगलीतील गिरिलिंग लेणी ही सातव्या
शतकामध्ये कोरली गेली असल्याचे त्याच्या वास्तुकलेवरून स्पष्ट होते. भारतात
सातव्या शतकामध्ये वज्रयान बुद्धिझमचा प्रभाव होता. त्यामुळे ही वज्रयान बुद्धिझमचे
प्रतिनिधित्व करणारी लेणी आहे. येथे
स्तुपाचा आकार तुलनेत छोटा आहे. याला वोटीव स्तुप असे म्हणतात. बहुतांशी अभ्यासक
वोटीव स्तुप हे शिवलिंग असल्याची गल्लत करतात, परंतु, ते तसे नाही. वज्रयान
बुद्धिझमचे हे एक प्रतिक आहे. दिसण्यास सामर्ध्य असले तरीही दोन्हीमधील
वास्तुरचनेतील तफावत हे सिद्ध करते की हे वोटीव स्तुप आहे. चीन, तिबेट, भुतान या
इस्ट एशियामध्ये वज्रयान बुद्धिझमला फॉलो करणारे अनुयायी आजही आहेत. वोटीव स्तुप
घारापूरी लेणीमध्येही आढळते. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या सिरपूरमध्ये झालेल्या उत्खनानातूनही
वोटीव स्तुप सापडले आहे. आज हे स्तुप छत्तीसगड पर्यटन विभागाने संरक्षित केले आहे.
परंतु, याला वोटीव स्तुप आहे, अशी मान्यता मात्र दिलेली नाही.
सांगलीतील ही लेणी वज्रयान
बुद्धिझमच्या काळातील आहे. दक्षिण
पूर्वच्या दिशेने ही लेणी आहे. येथे फ्लोअरवर भुसभुशीत माती आढळते.
सर्वसाधारणपणे
लेण्याच्या फ्लोअरवर दगड सापडतो, पण येथे भुसभुशीत माती दिसून येते. फारस
पद्धतीचा
दगड येथे आढळत असल्यामुळे येथे दगडाची झिज होऊन ही माती झाली असावी बहुतेक.
या
लेणीमधील दगडाचीही प्रत तशी हलकीच आहे. तसेच लेणी बांधताना लाकडाचा वापर
झाल्याचे
दिसून येते. दगडाची प्रत हलकी असल्यामुळे येथे अतिरिक्त कामे झाल्याचे
दिसून येत नाही. कालांतराने या लेणीचा विकास मागे पडला असावा. या लेणीमध्ये
एक ‘कोटक’ (विपस्सना
करण्यासाठीची छोटी खोली) दिसून येते. तर आणखी एक कोटक बांधण्याचा प्रयत्न
झाल्याचे
दिसून येते. पण दगडाची प्रत चांगली न लागल्यामुळे दुसरे कोटक कोरण्यात आले
नाही. सर्वसाधारणपणे
लेण्यांमध्ये पोदी आणि कोदी आढळतात. पोदी म्हणजे पिण्यासाठी पाणी साठवणूक
करण्याची
जागा आणि कोदी म्हणजे वापरण्यास योग्य पाण्याची साठवणूक करण्याची जागा.
येथे या
दोन्ही गोष्टी आढळत नाहीत. त्यामुळे येथे भिक्खुंचे चिरकाळ वास्तव्य राहिले
असेल
की नाही, हे प्रश्नांकीत आहे. या लेणीमध्ये पिलास्टर देखील आहे. पिलास्टर
म्हणजे
असा खांबा जो लेणीशी संलग्न असतो. अर्थात लेणीच्या अगदी जोडून असणाऱ्या
खांबाला
पिलास्टर म्हणतात. प्रत्येक खांबाची रुंदी ही २.५ इंच असून कोटकची आहे. तर
लेणीचा
आकारमान २०.७ फुट रुंदी आणि २७ फुट लांबी असा आहे. चेत्यगृहासमान हे
बांधकाम असून
परंतु, याला चैत्यगृह म्हटले जात नाही. कारण येथे चैत्य किंवा मूर्ती दिसत
नाही.
अशाच पद्धतीचे वास्तुशिल्प गुजरातमध्येही काही ठिकाणी आढहळे. या लेणीवरून
महाराष्ट्रात बौद्धधम्म चांगल्या प्रकारे वाढलेला, विस्तारलेला आणि विकसित
झाल्याचे समजून येते.
पालिभाषा : पाली ही जातकांची, तसेच धम्मपद दीघनिकाय
इ. बौद्ध धर्मग्रंथांची भाषा आहे. पाली याचा मूळ अर्थ ओळ किंवा पंक्ती असा
आहे. एखाद्या धर्मग्रंथातील वचन किंवा उतारा, असाही अर्थ नंतर त्याला
लक्षणेने आला आहे.
पाली ही मगधाची भाषा असून बुद्धाने त्या भाषेत धर्मप्रचार
केला, असा समज बराच काळ प्रचलित होता पण तो बरोबर नाही. भाषिक अभ्यासावरून
असे दिसते, की मगधाच्या भाषेची म्हणजे मागधीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये
पालीला लागू पडत नाहीत. उदा., मागधीत श हा एकमेव घर्षक आहे, र हा वर्ण
कुठेही नाही, त्याच्या जागी सर्वत्र ल च आढळतो आणि अकारान्त पुल्लिंगी
नामांचे प्रथमेचे एकवचन एकारान्त असते. पालीत स हा एकमेव घर्षक आहे, र व ल
हे दोन्ही द्रववर्ण आहेत आणि अकारान्त पुल्लिंगी नामांचे प्रथमेचे एकवचन
ओकारान्त असते. या व इतर काही कारणांमुळे पालीला मागधी किंवा मागधीची
पूर्वावस्था म्हणणे चुकीचे ठरते.
अशोकाच्या शिलालेखांची भाषा पाहिली, तर पालीचे साम्य
पूर्वेकडील संस्कृतोत्तर भाषांपेक्षा पश्चिमेकडील भाषांशी अधिक असल्याचे
दिसून येते. भाषिक अवस्थेकडे पाहिले, तर ती शौरसेनीपूर्वीची प्राकृत अवस्था
आहे, असे स्पष्ट दिसते. तसेच एकंदर बौद्ध वाङ्मय बुद्धानंतर काही शतकांनी
पुरे झालेले आहे, ही गोष्टही संशाधकांना मान्य आहे. तेव्हा पाली ही
बुद्धाची मातृभाषा किंवा बुद्धसमकालीन अशी बोली होती, हा समज ग्राह्य मानता
येत नाही.
संस्कृतच्या तुलनेने पालीची वैशिष्ट्ये : पाली
ही संस्कृतची सर्वांत उत्तरावस्था असल्यामुळे त्या दृष्टीने तिची
वैशिष्ट्ये समजून घेणे उद्बोधधक ठरते. म्हणून तिकडे आधी लक्ष देऊया.
वर्णव्यवस्था : संस्कृतमधील अ, आ, इ, ई, उ, ऊ हे स्वर पालीत तसेच राहतात. ऐ व औ यांचे ए व ओ होतात. ऋ व ॠ यांचे अ, इ किंवा उ होतात. लृ चा उ होतो. संयुक्त व्यंजनापूर्वी दीर्घ स्वर असल्यास तो ऱ्हस्व होतो, अ चा नंतर येणाऱ्या विसर्गासह ओ होतो. इतर स्वरानंतर येणाऱ्या विसर्गाचा लोप होतो. श, ष, स यांच्या जागी पालीत फक्त स हा एकच घर्षक आढळतो.
स्वरमध्यस्थ ड व ढ यांचे ळ व ळह होतात. इतर सर्व व्यंजने तशीच राहतात. मात्र शौरसेनी व माहाराष्ट्री या नंतर येणाऱ्या प्राकृत अवस्थांची पूर्वचिन्हे पालीत आढळतात.
संयुक्त व्यंजनांत होणारी महत्त्वाची परिवर्तने पुढीलप्रमाणे : कोणत्याही
व्यंजनाबरोबर र आधी किंवा नंतर आला, तर त्याचा लोप होतो व त्याच्या जागी
जवळचे व्यंजन येते (मार्ग-मग्ग अग्र-अग्ग). शब्दारंभी मात्र एकच व्यंजन
येते (ग्राम-गाम). म, न, य, व हे अंत्यस्थानी असल्यास त्यांच्या जागी त्यांच्या आधीचे व्यंजन येते. दोन स्फोटकांचा संयोग असल्यास त्यांतला पहिला नाहीसा होऊन त्याच्या जागी दुसरा येतो (भक्त-भत्त सप्त-सत्त).
स्फोटकापूर्वी किंवा नंतर स, ष किंवा श आल्यास त्याचे द्वित्व होऊन दुसरा
स्फोटक महाप्राण बनतो (मस्तक-मत्थअ अक्षर-अक्खर). शब्दारंभी मात्र फक्त
महाप्राण स्फोटकच उरतो (स्खल-खल). त्स चा च्छ होतो (वत्स-वच्छ). त्य, थ्य, द्य, ध्य यांचे अनुक्रमे च्च, च्छ, ज्ज, ज्झ होतात (सत्य-सच्च रथ्या –रच्छा अद्य-अज्ज द्यूत-जूत सन्ध्या-संझा). न्य, ज्ञ यांचा ञ्ञ होतो. बाह्य संपर्क आणि इतर कारणांनी काही अपवाद झाल्यासारखे दिसतात.
व्याकरण : नामात तीन लिंगे, दोन वचने व संबोधन धरून आठ विभक्त्या आहेत. नामांच्या रूपावलीत लिंगाप्रमाणे अंत्य वर्णालाही महत्त्व आहे.
पालीत संस्कृतप्रमाणे परस्मैपद व आत्मनेपद हे प्रकार आहेत पण
कोणताही धातू यांतील कोणत्याही पदाप्रमाणे चालू शकतो. पण परस्मैपद हेच अधिक
वापरात आहे. आत्मनेपदाचा उपयोग कर्मणिप्रयोगापुरता मर्यादित आहे. यावरून
संस्कृतच्या दृष्टीने पालीचा वेगळेपणा लक्षात यायला मदत होईल.
ध्वनिविचार :पालीची वर्णव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :
व्याकरण : नाम : नामात तीन लिंगे, दोन वचने
आणि आठ विभक्त्या आहेत. नामाच्या अंत्य वर्णानुसार प्रत्यय लागताना त्यात
थोडाफार फरक होतो. काही रूपे संस्कृतानुसारी आहेत – उदा., राजन्चे
प्रथमेचे एकवचन राजा होते – तर बरीचशी रूपे परिवर्तनाने वेगळी झालेली आहेत.
उदा., राजन्चे तृतीयेचे एकवचन रज्जा = सं. राज्ञा, तसेच राजिना =
राजिन+ आ. संस्कृतचे अवशेष अशा प्रकारे काही रूपांत आढळले, तरी एकंदर
रूपावली सोपी आणि स्पष्ट आहे. उदा., बुद्ध व भिक्खु हे शब्द घेऊ :
बुद्ध
भिक्खु
एकवचन
अनेकवचन
एकवचन
अनेकवचन
प्र.
बुद्धो
बुद्धा
भिक्खु
भिक्खू, भिक्खवो
द्वि.
बुद्धं
बुद्धे
भिक्खुं
भिक्खू, भिक्खवो
तृ.
बुद्धेन, बुद्धा
बुद्धेहि
भिक्खुना
भिक्खूमि, भिक्खूहि
च.
बुद्धस्स
बुद्धानं
भिक्खुस्स,
भिक्खुनो
भिक्खूनं
पं.
बुद्धा,
बुद्धस्मा,
बुद्धम्हा
बुद्धेहि
भिक्खुना,
भिक्खुस्मा,
भिक्खुम्हा
भिक्खूभि, भिक्खूहि
ष.
बुद्धस्स
बुद्धानं
भिक्खुस्स,
भिक्खुनो
भिक्खूनं
स.
बुद्धे,
बुद्धस्मिं, बुद्धम्हि
बुद्धेसु
भिक्खुस्मिं,
भिक्खुम्हि
भिक्खूसु,
भिक्खूसु
सं.
बुद्ध
बुद्धा
भिक्खु
भिक्खू, भिक्खवो
सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामे अम्ह, तुम्ह, व सो स्त्रीवाचक सा ही आहेत. त्यांची रूपावली अशी :
अम्ह
एकवचन
अनेकवचन
प्र.
अह
मयं, अम्हे, नो
द्वि.
मं, ममं
अम्हे, अम्हाकं, नो
तृ.
मया, मे
अम्हेभि, अम्हेहि, नो
च.
मय्हं, मम, अम्हं, ममं, मे
अम्हाकं, अस्माकं, नो
पं.
मयो, मे
अम्हेभि, अम्हेहि, नो
ष.
मय्हं, मम, अम्हं, ममं, मे
अम्हाकं, अस्माकं, नो
स.
मयि
अम्हेसु
तुम्ह
एकवचन
अनेकवचन
प्र.
त्वं, तुवं
तुम्हे, वो
द्वि.
त्वं, तुवं, तं, तवं
तुम्हे, वो
तृ.
तया, त्वया, ते
तुम्हेभि, तुम्हेहि, वो
च.
तव, तुय्हं, तुम्हं, ते
तुम्हाकं, वो
पं.
तया, त्वया, ते
तुम्हेभि, तुम्हेहि, वो
ष.
तव, तुय्हं, तुम्हं, ते
तुम्हाकं, वो
स.
तयि, त्वयि
तुम्हेसु
त
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
प्र.
सो
सा
तं, नं
द्वि.
तं, नं
तं, नं
तं, नं
तृ.
तेन, नेन
ताय, नाय
तेन, नेन
च.
तस्स, नस्स
ताय, नाय, तिस्सा, तिस्साय, तस्सा, तस्साय
तस्स, नस्स
पं.
तस्मा, तम्हा, नस्मा, नम्हा
ताय, नाय
तस्मा, तम्हा, नस्मा, नम्हा
ष.
तस्स, नस्स
ताय, नाय, तिस्सा, तिस्साय, तस्सा, तस्साय
तस्स, नस्स
स.
तस्मिं, तम्हि, नस्मिं, नम्हि
ताय, नायं, तिस्सं, तस्सं, नस्सं
तस्मिं, तम्हि, तस्मिं, नम्हि
अनेकवचन
प्र.
ते, ने
ता, तायो, ना, नायो
ते, ने, तानि, नानि
द्वि.
ते, ने
ता, तायो, ना, नायो
ते, ने, तानि, नानि
तृ.
तेभि, तेहि, नेभि, नेहि
ताभि, ताहि, नाभि, नाहि
तेभि, तेहि, नेभि, नेहि
च.
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं
तासं, तासानं, नासं, नासानं
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं
पं.
तेभि, तेहि, नेभि, नेहि
ताभि, ताहि, नाभि, नाहि
तेभि, तेहि, नेभि, नेहि
ष.
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं
तासं, तासानं, नासं, नासानं
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं
स.
तेसु, नेसु
तासु, नासु
तेसु, नेसु
विशेषण : विशेषण ज्या नामाशी संबंधित असते त्या नामाचे
लिंग, वचन व विभक्ती ते घेते. अकारान्त विशेषणांचे स्त्रीलिंग अ ऐवजी आ
ठेवून होते. कधी कधी ई ही अ ची जागा घेते. विशेषणाचे मूळ रूप नामापूर्वी
जोडून समासही बनवता येतो.
संख्यावाचक शब्दांचा वापर बराच गुंतागुंतीचा आहे. १ ते १८ या संख्या
विशेषणाप्रमाणे चालतात. आकारान्त दर्शक शब्द (उदा., वीसा ‘वीस’)
स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. पण एकंदरीत ही गुंतागुंत थोडक्या सामान्य
नियमांच्या पलीकडची आहे.
क्रियापद : क्रियापदाची रूपे, पुरुष, वचन
आणि काळ दर्शवतात. कर्मणी रूपवाचक प्रत्ययही कर्तरीसारखेच आहेत. संस्कृतचा
पूर्णभूतकाळ नष्ट झाला आहे. अनद्यतन व अपूर्णभूत स्पष्टपणे भिन्न राहिलेले
नाहीत, संकेतार्थ मात्र चालू आहे. धातुसाधितांचा सहायक क्रियापदांबरोबर
उपयोग करून नवी कालदर्शक रचना कित्येकदा साधण्यात येते. ही क्रियापदे
प्रामुख्याने अस व हु ही आहेत. वर्तमानकाळात अकारान्त प्रत्ययपूर्व रूपे
फार मोठ्या प्रमाणात असून त्याचा परिणाम एकंदर क्रियापदावर झाला आहे. काही
प्रत्ययपूर्व एकारान्त रूपेही आहेत. कालवाचक रूपे व इतर साधित शब्द
वर्तमानकाळाच्या रूपावरून बनवले जातात. संस्कृतात ते धातूवरून बनवले जात.
एकंदरीत क्रियापदांची रूपावली संस्कृतच्या मानाने बरीच सोपी झाली आहे.
खाली अस, हु आणि भर यांची रूपावली नमुन्यादाखल दिली आहे.
वर्तमान
अस
हु
एकवचन
अनेकवचन
एकवचन
अनेकवचन
प्र.
अस्मि, अम्हि
अस्म, अम्ह
होमि
होम
द्वि.
असि
अत्थ
होसि
होथ
तृ.
अत्थि
सन्ति
होति
होन्ति
भर
एकवचन
अनेकवचन
प्र.
भरामिं
भराम
द्वि.
भरसि
भरथ
तृ.
भरति
भरन्ति
भविष्य
अस धातूला भविष्यकाळाची रूपावली नाही.
हु
एकवचन
अनेकवचन
प्र.
हेस्सामि, हेस्सं, हेहिभि, होहिमि
हेस्साम, हेहिम, होहिम
द्वि.
हेस्ससि, हेहिसि, होहिसि
हेस्सथ, हेहिथ, होहिथ
तृ.
हेस्सति, हेहिति, होहिति
हेस्सन्ति, हेहिन्ति, होहिन्ति
भर
एकवचन
अनेकवचन
प्र.
भरिस्सामि, भरिस्सं
भरिस्साम
द्वि.
भरिस्ससि
भरिस्सथ
तृ.
भरिस्सति
भरिस्सन्ति
संकतार्थ
अस धातूला संकेतार्थाची रूपावली नाही.
हु
भर
एकवचन
अनेकवचन
एकवचन
अनेकवचन
प्र.
अहुविस्सं
अहुविस्सम्ह
(अ) भरिस्सं
(अ) भरिस्सम्ह
द्वि.
अहुविस्से, अहुविस्ससे
अहुविस्सथ
(अ) भरिस्स
(अ) भरिस्सथ
तृ.
अहुविस्स
अहुविस्संसु
(अ) भरिस्स
(अ) भरिस्संसु
भूतकाळ
अस
हु
एकवचन
अनेकवचन
एकवचन
अनेकवचन
प्र.
आसिं
आसिम्ह
अहोसिं
अहोसिम्ह
द्वि.
आसि
आसित्थ
अहोसि
अहोसित्थ
तृ.
आसि
आसिंसु, आसुं
अहोसि, अहुवा, अहु
अहेसुं
भर
एकवचन
अनेकवचन
प्र.
अभरिं
अभरिम्ह
द्वि.
अभरि
अभरित्थ
तृ.
अभरि
अभरिंसु
आज्ञार्थाचे प्रत्यय प्र. पु. मी-म द्वि. पु. हि-थ आणि तृ.पु. तु-अन्तु हे आहेत.
याशिवाय वर्तमान, भूत, भविष्य,विध्यर्थ, इ. दर्शक धातुसाधिते आहेत.
वर्तमान धातुसाधिताचे अन्त व मान हे प्रत्यय आहेत. भूतकाळाचा प्रत्यय त
किंवा इत आहे. पण बरीचशी धातुसाधिते संस्कृतमधून सरळ आल्यामुळे या नियमाला
अपवाद आहेत. भविष्यका ळाचे धातुसाधित धातूला इस्स हा प्रत्यय लावून पुढे
अन्त हा प्रत्यय जोडून होते. विघ्यर्थवाचक धातुसाधित धातूला तब्ब, इतब्ब,
अनीय किंवा य हे प्रत्यय लावल्याने मिळते.
हेत्वर्थक अव्यय धातूला तुं प्रत्यय लावून आणि भूतकाळवाचक अव्यय त्वा व
कधीकधी य हा प्रत्यय लावून सिद्ध होते. त्वाच्या अर्थी कवितेत त्वान व तून
ही रूपेही आढळतात.
समास: संस्कृतप्रमाणेच पालीमध्ये समास आहेत
आणि त्यांची नावेही संस्कृतवरूनच आलेली आहेत. ते असे : द्वन्द, समाहार,
द्वन्द, कम्मधारय, द्विगु, तप्पुरिस (दुतिया-, ततिया-, चतुत्थी, पज्जमी-,
छट्टी-, सप्तमी-, तप्पुरिस), अलुत्त तप्पुरिस, उपपदतप्पुरिस, बहुब्बीही,
मज्झिमपदलोपी, अव्ययीभाव.
पालीत समासाची लांबी प्रमाणशीर असते. उगीच शब्दाला शब्द जोडून लांबलचक
साखळी बनवण्याची पंडिती वृत्ती इथे नाही. म्हणूनच दोनांपेक्षा अधिक
शब्दांचा समासही खटकत नाही. एकंदरीतच लेखनाचा डौल टाळून संभाषणात्मक किंवा
निवेदनात्मक राहण्याकडे भाषेची प्रवृत्ती आहे : मरणभयतज्जितो भिगो
दारुदकतेलतन्दुलादीनि गंगातीरवासी व वत्थूनि.
संधी : पालीचे संधिनियम संस्कृतसारखे कडक
नाहीत. आधीच्या शब्दाच्या शेवटी असणारा स्वर नंतर येणाऱ्या शब्दाच्या
प्रारंभीच्या स्वराशी सांधला जाईलच असे नाही. अशा परिस्थितीत कधी दोन
स्वरांचा संधी होतो, कधी त्यातला आधीचा स्वर जाऊन नंतरचा शिल्लक राहतो, तर
कधी त्यातला आधीचा राहून नंतर येणारा लोप पावतो : न +अहोसि= नाहोसि च
+अपि=चापि न+अत्थि= नत्थि अथ+ एको= अथेको एकेन+ उपायेन= एकेनुपायेन.
ओ किंवा ए नंतर येणारा अ लोप पावतो : देवो+ अम्हि= देवो Sम्हि.
शब्दानंतर येणाऱ्या इतिमधील आद्य इ नाहीशी होऊन त्याआधीचा स्वर दीर्घ होतो :
गच्छाम+इति+गच्छामा S ति साधु+इति= साधूति.
इ, ई, उ, ऊ, ए व ओ यांच्यामागून भिन्न प्रकारचे स्वर आल्यास
त्यांच्या जागी अनुक्रमे य्, य्, व्, व्, अय्, व अव् येतात. मात्र ए व ओ हे
मूळ संस्कृतातले ऐ व औ असले, तर त्यांच्या जागी आय् व आव् येतात.
इ, उ, ए व ओ यांच्या जागी विकल्पाने अनुक्रमे यि, वु, ये व वो येतात.
अनुस्वारानंतर य किंवा ह आल्यास तो विकल्याने ञ होतो : तं येव
= तं येव किंवा तञ्ञेच. नंतर स्फोटक आल्यास अनुस्वार विकल्पाने त्या
वर्गातील अनुनासिक बनतो : चंपक=चम्पक गंध= गन्ध.
पालीचा अभ्यास : पालीच्या अभ्यासाचे महत्त्व
भारतीयांना पटवून देण्याचे कार्य पाश्चात्त्य विद्वानांनी केले. या
शतकाच्या प्रारंभी बौद्ध धर्माबद्दल तीव्र कुतूहल उत्पन्न झाल्याने
त्याच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याचे खडतर व्रत धर्मानंद कोसंबी यांनी
पतकरले आणि पाली व बौद्ध धर्मग्रंथ यांचा मराठी वाचकांना परिचय करून
देण्याचे काम मुख्यतः त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गात डॉ. पु.वि.बापट,
प्रा. चिं.वि. जोशी, प्रा.चिं.वै. राजवाडे इत्यादींचा समावेश होतो. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार
केल्यामुळे पाली व बौद्ध वाङ्म य यांच्या अभ्यासाला थोडी चालना मिळाली आहे
पण ती म्हणावी तितकी जोरदार नाही. पालीच्या अभ्यासाने भारतीय
नव-आर्यभाषांच्या ऐतिहासिक संशोधनाला निश्चितच मदत होणार आहे.
अथ नं सो सकुणो गोचरपसुतो दिस्वा साखाय निलीनो ‘किन्ते सम्म दुक्खतीति’
पुच्छि. सो तमत्थं. आचिखि ‘अहन्ते सम्म एतं अट्ठि अपनेय्यं, भयेन ते मुखं
पविसितुं न विसहामि, खादेय्यासि पिमन्ति’. ‘मा भायि सम्म, नाहन्तं खादामि,
जीवितं मे देहीति’.
भाषांतर : प्राचीन काळी वाराणशीत ब्रह्मदत्त
राज्य करत असता, बोधिसत्त हिमवंतप्रदेशात सुतारपक्षी होऊन पुन्हा जन्माला
आला. आता मास खात असता एका सिंहाच्या घशात हाड अडकले, घसा सुजला, अन्न खाता
येईना, तीव्र वेदना व्हायला लागल्या.
तेव्हा त्याला खाण्यासाठी (भुकेने) व्याकुळ झालेला पाहून फांदीवर
बसलेल्या पक्ष्याने विचारले, ‘मित्रा, तुला काय दुःख होतं आहे?’ त्याने ती
परिस्थिती सांगितली. ‘मित्रा, मी तुझं ते हाड काढलं असतं, (पण) भीतीमुळे
तुझ्या तोंडात शिरायला मी धजत नाही. तू मला खाशीलसुद्धा म्हणून’. ‘भिऊ नकोस
मित्रा, मी तुला खात नाही. मला प्राणदान दे’. जवसकुणजातके.
संदर्भ : 1. Geiger, Wilhelm, Trans, Ghosha, Batakrishna, Pali Literature and Language, Calcutta, 1956. 2. y3wuohi, C.V. A Manual of Pali, Poona, 1936.
कालेलकर, ना.गो.
'या' भाषेच्या लिपिवरून वादंगाची शक्यता...समर्थक आणि विरोधक आमने सामने
सकाळवृत्तसेवा
4–5 minutes
Updated on:
नाशिक / विखरणी : भारतातील
सर्वात प्राचीन लिपिला पालि भाषेच्या 12 वीच्या अभ्यासक्रमात स्थान
देण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे आभार
धम्मलिपी अभ्यासकांनी ह्या समितीस पत्रव्यवहार करून मानले आहेत. तर
धम्मलिपीला ब्राम्ही लिपि नाव देण्याची मागणी काही मंडळींनी पाठ्यपुस्तक
समितीला पत्रव्यवहार करून केली आहे. धम्मलिपी अभ्यासकांनी यास विरोध करून
पत्रव्यवहार करून तसे न करण्यास पाठ्यपुस्तक समितीस विनंती केली आहे. तसेच
सम्राट अशोकाच्या लिपिला धम्म लिपी हे नाव का असावे यासाठी काही संदर्भच
समितीस पाठवले आहेत. यामुळे पाली भाषेला कोणत्या लिपीचे नाव द्यावे यासाठी
दोन गट आमने - सामने आल्याने मोठा वादंग उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत
आहे.
असा आहे इतिहास
1836 साली सर्वात पहिल्यांदा सम्राट अशोकाच्या शिलालेखांचे लिप्यांतर आणि
भाषांतर करण्यात आले. प्रिन्सेपने या लिपिला "इंडिक स्क्रिप्ट' असे म्हटले
आणि नंतर जेव्हा त्यांना खात्री पटली कि हे सर्व शिलालेख सम्राट अशोकांनी
लिहिले आहेत. तेव्हा प्रिन्सेपने या प्राचीन लिपिला "अशोकन स्क्रिप्ट' असे
नाव दिले. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अशोकाच्या लिपिलाच "ब्राह्मी' हे
नाव काही संशोधकांनी सुचविले. मात्र या नावाला काहीही पुरावे दिले नाहीत.
ज्या ग्रंथांचा आधार घेण्यात आला ते "ललितविस्तार' आणि "सामवायंग सूत्र'
त्या ग्रंथांमध्ये कुठेही सम्राट अशोकांच्या लिपिला ब्राह्मी म्हटले नाही.
त्यामुळे ब्राह्मी या शब्दाला ग्रंथीय आधार आहे हे वाक्य दिशाभूल करणारे
असल्याचा दावा धम्म लिपी समर्थकांनी केला आहे.
पुरावाच नाही
ललितविस्तार आणि सामवायंग सूत्र या ग्रंथांमध्ये अनुक्रमे 64 आणि 16
लिपींची नावे आहेत. मात्र त्यापैकी ब्राह्मी हे नाव अशोकांच्या लिपिसाठी
कसे योग्य असू शकते व अशोकाच्या शिलालेखांचे हीच लिपि आहे याचा काहीही
पुरावा नाही, कुठल्याच हस्तलिखित अथवा शिलालेखात ब्राह्मी हा शब्द आढळत
नसल्याचाही दावा आहे. सम्राट अशोकाच्या काळी ब्राह्मी लिपि अस्तित्वात असती
आणि समजा त्यांना या लिपिला ब्राह्मी म्हणायचे असते तर त्यांनी आपल्या
शिलालेखांची सुरुवात - "इयं ब्राह्मीलिपी देवानं पियदस्सी' अशी केली नसती
का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
ओढून ताणून लादलेला शब्द
अशोकाच्या एकूण 36 शिलालेखांत 40 ठिकाणी या लिपीचा उल्लेख "धम्मलिपी'
म्हणूनच जसा आढळतो. तसा "ब्राह्मी लिपी' म्हणून उल्लेख एकाही शिलालेखात
आढळून येत नाही, किंवा ब्राह्मी लिपीमधील एखादे प्राचीन हस्तलिखितही आढळून
येत नाही. भारताच्या सर्वात प्राचीन लिपिसाठी विनाकारण, विनाप्रमाण ओढून
ताणून लादलेला शब्द आहे. ब्राह्मी या शब्दाला कुठलाही ग्रंथीय, शिलालेखीय,
ऐतिहासिक अथवा पुरातत्त्वीय संदर्भ नाही. त्यामुळे धम्मलिपी शब्द ह्या
पुस्तकात आहे तसाच राहू देण्याची विनंती धम्मलिपी अभ्यासकांकडून करण्यात
आली आहे.
असे आहेत दावे
"ब्राह्मी' हे नाव परंपरेतून पुढे आले आहे. धम्मलिपी हे नाव सम्राट
अशोकाच्या अनेक शिलालेखांत असले तरी ते लिपीचे नाव असू शकत नाही. अनेक
बौद्ध, जैन ग्रंथांत "ब्राह्मी' हे नाव आलेले असल्याने तेच राहू द्यावे.
दुसरे नाव देण्यास हरकत नाही. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद
व्हायला नको, असे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मंजिरी भालेराव
यांनी म्हटले आहे. तर पूर्वीच्या संशोधकांनी ज्या साधनांच्या आधारे
अशोकांच्या लिपीला चुकीने "ब्राह्मी' असे म्हटले आहे. याचा अर्थ आपण ती चूक
न सुधारता तशीच राहू द्यावी का? आजचे संशोधन "धम्मलिपी' या शब्दाचे सर्व
संदर्भ देत असेल आणि ब्राह्मी या शब्दाचे तसे कुठलेच संदर्भ मिळत नसतील, तर
मग "धम्मलिपी' हा शब्दच स्वीकारणे योग्य असल्याचे बौद्ध संस्कृती, प्राचीन
भाषा, लिपी व पुरातत्त्व अभ्यासक अतुल भोसेकर यांनी म्हटले आहे.
संस्कृत भाषा पाली भाषेतून निर्माण झाली (शोध क्रमांक १)
"धम्म" नावाची लिपी आहे (शोध क्रमांक २)
धम्म लिपी वरून देवनागरी लिपी निर्माण झाली (शोध क्रमांक ३)
संस्कृत भाषेची लिपी देवनागरी आहे (शोध क्रमांक ४)
आता हे चार शोध ज्या महानुभावांनी लावले त्यांनाच विचारा की ही प्रक्रिया किती हजार वर्षं चालू होती. तेच तुम्हाला सांगू शकतील.
माझ्याकडं
अल्प माहिती असते. माझे गुरू डॉक्टर सदा डोकेदुखे अमेरिकेच्या हार्वर्ड
युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहेत. त्यांनी बहुजनांचा इतिहास सगळ्यांना
कळावा म्हणून एक गाजलेला ग्रंथ लिहिला आहे. त्यांनाही तुमच्या ह्या "धम्म
लिपी" बद्दल माहित नाही. ज्याला तुम्ही धम्म लिपी म्हणताय त्या लिपीला
तुम्ही सोडून बाकी सगळं जग "ब्राह्मी" या नावानं ओळखतं.
असो,
संस्कृत ही भाषा अशोकाच्या लिपीत लिहिली गेली आहे (जिला तुम्ही धम्म लिपी
म्हणताय ना त्याच लिपीत). संस्कृत तमिळ ग्रंथ लिपीत सुद्धा लिहिली गेली
आहे. शारदा लिपीत सुद्धा संस्कृत लिहिलेली सापडली आहे. दक्षिणेत संस्कृत
शिकवताना हल्ली इंग्लिश लिपीत शिकवतात त्यामुळं त्या लिपीत सुद्धा संस्कृत
लिहिली गेली आहे.
ह्यावरून
हेच सिद्ध होतं की कोंकणी आणि तुळू प्रमाणे संस्कृत भाषेलाही लिपी नाही.
तरी सुद्धा ज्या व्यक्तीनं वर दिलेले चार शोध लावले आहेत, त्या शोधांच्या
आधारावर तुम्ही जर प्रश्न विचारणार तर त्याचं उत्तर तेच देऊ शकतील.
ता क :
ब्रूस
ट्रिगर त्यांच्या पुस्तकात "रायटिंग सिस्टिम्स" सांगतात की ब्राह्मी लिपी
अशोकाच्या आधीपासूनची आहे. तुम्ही म्हणता अशोकानं बनविली.
तुम्ही
एका ठिकाणी म्हटलंय की अशोक राजा स्वतःच्या लीपिला धम्म लिपी म्हणतो पण ते
चुकीचं आहे. सारनाथ मध्ये अशोक राजा लिहिलेल्या भाषेच्या लिपीला फक्त
"लिपी" इतकंच म्हणतो.
(हा शब्द "लिपी" आहे, "धम्म" नाही. "धम्म" शब्द इतर ठिकाणी वापरला आहे, तुम्ही स्वतः तपासून बघू शकता)
त्या
शिवाय, अशोक राजा खरोष्ठी, ग्रीक आणि अरमैक लिप्या सुद्धा वापरतो. फक्त
ब्राह्मी (ज्याला तुम्ही धम्म लिपी म्हणताय) तिचा प्रयोग नाही केलेला.
तुम्ही
तुमचे स्रोत तपासून बघा असा सल्ला द्यावासा वाटतो. कुणीतरी काहीतरी म्हणतं
(कितीही मोठा माणूस असला तरी) म्हणून त्याचं ऐकू नका. स्वतः वेगवेगळ्या
स्रोतांमधून तपासा. नाहीतर काही कळायचं नाही.
Learn Pali ‘पालि शिका, धम्म जाणा’
‘धम्म
हवे रक्खन्ति धम्मचारि’ अर्थात जो धम्माचे आचरण करतो, त्याचे धम्म रक्षण
करत असतो. पण धम्माचे आचारण करणे म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर
बुद्धांनी अनेक सुत्तांमधून दिले आहे. या जगात प्रत्येकाला काही ना काही
दुक्ख आहे, आणि प्रत्येकाच्या दुक्खाचे निवारण करण्याचा मार्ग बुद्धांकडे
आहे. पण बुद्धांपर्यंत पोहचायचे कसे? तर त्याचे सोपे उत्तर आहे, बुद्धांनी
दिलेल्या उपदेशांमधून होय. बुद्धांचे सर्व उपदेश हे पालि भाषेमध्ये आहेत.
त्यामुळे हे उत्तर शोधणे तितके सोपे नाही. कारण ही भाषा आज वापरात नाही.
त्यामुळे धम्म जाणून घ्यायचा असले, तर प्रत्येकाला पालि भाषा येणे गरजेचे
आहे.
बुद्धांचा
धम्म जाणून घ्यायचा असेल तर पालि भाषा येणे तितके गरजेचे आहे का? कारण
अनेक विद्वानांनी बुद्धांनी दिलेले काही सुत्त मराठी, हिंदी, इंग्रजी आणि
इतर भाषांमध्ये भाषांतर केलेले आहेत. पण भाषांतर झालेल्या उपदेशांना
परिपूर्ण म्हणावे का? तर उत्तर आहे नाही, कारण पालि भाषेच्या तोडीस जगाच्या
पाठिवर अशी कोणतीच भाषा नाही, जी बुद्धवचनाला न्याय देऊ शकेल. कारण
बुद्धांनी पालि भाषेत दिलेली सुत्त तंतोतंत भाषांतर करणे कठिण काम आहे.
उदा, ‘मेत्ता’ शब्दाचे जेव्हा मराठीत भाषांतर होते, तेव्हा सर्रास त्याला
मैत्री संबोधले जाते. पण मराठीमध्ये मैत्री म्हणजे व्यक्तींव्यक्तींमधील
आनंदपूर्ण व्यवहार होय. येथे एकमेकांमप्रती आसक्ती अभिप्रेत असते. परंतु,
मेत्ता म्हणजे पृथ्वीतलावरील सर्व जीवमात्रांचे मंगल व्हावे, ही भावना
मनामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवता बाळगणे. त्यामुळे जेव्हा पालिचे इतर
भाषेमध्ये भाषांतर होत असते, तेव्हा त्यातील मर्म निघून जातो.
अस्सद्धो अकतञ्ञू च, सन्धिच्छेदो च यो नरो।
हतावकासो वन्तासो, स वे उत्तमपोरिसो॥
धम्मपदातील
अरहंतवग्गामधील ही गाथ आहे. येथे बुद्ध जो अश्रद्धावान आहे, त्याला उत्तम
पुरुष म्हणत असल्याचे म्हटले आहे. परंतु, येथे अश्रद्धावान म्हणजे चिकित्सक
वृत्तीचा अर्थ अभिप्रेत आहे. ही गाथा बुद्धांनी सारिपुत्तच्या संदर्भात
म्हटली असून येथे ‘वन्तासो’ हा शब्द अरहंतसाठी समानार्थी शब्दप्रयोग आला
आहे. सन्धिच्छेदो अर्थात त्यांनी आता पुन्हा जन्म घेण्याचा छेद केला आहे.
असे जे बारकावे आहेत, ते पालि शिकल्याशिवाय येत नाहीत.
मग
ही भाषा कोठे शिकायला मिळणार? हा देखील एक प्रश्नच आहे. कारण आपल्याकडे
अशी संस्था किंवा संघटना नाहीच की जे पालिचे ज्ञान देऊ शकेल. पण असे नाही.
मुंबई विद्यापीठातील पालि विभाग यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
मुंबई
विद्यापीठात पालि विभागाची स्थापना होऊन आज १२ वर्षे झाली आहेत आणि या
विभागाच्या माध्यमातून पालिचे सर्वांगिण ज्ञान देण्याचे अविरत कार्य सुरु
आहे. विशेष म्हणजे पालि विभागात विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व ऑक्स्फर्ड
विद्यापीठाकडून प्रशिक्षित झालेले शिक्षकवर्ग आहेत. पालि विभागाच्या
वाचनालयात सुमारे २ हजारांहून अधिक पुस्तकांचा भरणा आहे. विपस्सना रिसर्च
इन्स्टि्युट आवृत्तीचे संपूर्ण तिपिटक, नालंदा आवृत्तीचे तिपिटक, मूळ पालि
आणि हिंदी भाषांतर, मूळ पालि आणि मराठी भाषांतर तसेच मूळ पालि आणि इंग्रजी
भाषांतर उपलब्ध आहेत. विविध शब्दकोष, पुरातत्व विभागाचे अहवाल,
ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने केलेल्या अहवालांची प्रत आणि असे बरेच काही
पालि विभागाकडे संग्रहित असून अभ्यासू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पालि
विभाग म्हणजे ज्ञानाचा भंडारच आहे.
पालि
विभागात केवळ अॅकॅडमीक शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांकडून
अनेक उपक्रमही करूवून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या
कक्षा रुंदावतात. विभागामध्ये प्रत्येक पोर्णिमेला धातूपूजा घेतली जाते. या
धातुपूजेवळी एक वेगळेच वलय निर्माण होत असते. सुमारे दीड तास चालणाऱ्या
पूजादरम्यान विपस्सना करतानाचाही अनुभव निराळाच असतो, जो शब्दांमध्ये माडणे
शक्य नाही.
सामाजिक
बांधिलकीचेही उपक्रम पालि विभागाच्या विद्यार्थ्यांकडून होत असतात. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सलग १२ तास अभ्यासिका राबवून खऱ्या अर्थाने
पालि विभागात बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते. तर बाबासाहेबांच्या
महापरिनिब्बाणादिवशी देखील चैत्यभूमीवर पालि विभागाचे विद्यार्थी येथे
येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी तत्पर असतात. आजपर्यंत कोणत्याही संस्था
अथवा संघटनेने काम केले नाही, असे काम पालि विभागाचे विद्यार्थी येथे करत
असतात. येथील येणाऱ्या प्रत्येकाकडून एक सर्व्हे फॉर्म भरवून घेतला जातो.
या फॉर्मच्या माध्यमातून समाजामध्ये किती जनजागृती झाली आहे, शिक्षणाचा
दर्जा कुठे आहे इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होते आणि येथे येणाऱ्यांना पालि
भाषा शिकवण्यासाठी प्रेरित केले जाते.
पालि
विभागातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी किंबहुना वर्षातून दोन वेळा
अभ्यासदौरा आयोजित केला जातो. बौद्धकालीन ऐतिकासिक स्थळांना भेटी देऊन त्या
स्थळांची इतंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. या स्थळांचा अभ्यास
कसा करायचा? एखाद्या लेणीवर अथवा बौद्धकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट
दिल्यानंतर नेमके काय पाहायचे, याचे ज्ञान या अभ्यासदौऱ्यातून होत असते.
१४
ऑक्टोबर, धम्मदिक्षा दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईटींग अॅण्ड
स्पिचेस या गंथ्रावर आधारित दोन दिवसीय पोस्टर सादरीकरण कार्यक्रम आखला
जातो. बाबासाहेबांच्या लिखाणाचा संदर्भ घेत कलात्मक पोस्टर प्रदर्शन आणि
सादरीकरण या दिवशी होत असते. मुंबईत अशी कोठेच साजरी होत नाही, इतकी
भव्यदिव्य बुद्धपोर्णिमा पालि विभागात साजरी केली जाते. तीन ते चार दिवसीय
विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आशियाई बौद्ध राष्ट्रांमध्ये
ज्याप्रमाणे बुद्ध पोर्णिमा साजरी होते, त्या तोडीस येथे समारंभ आयोजित
केला जातो आणि कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठाचा परिसर असंख्य दिव्यांनी
खुलून दिसतो. विद्यार्थ्यांद्वारे येथे दिवे लावले जातात आणि बुद्ध
पोर्णिमा कार्यक्रमाचा समारोप होतो.
त्याचप्रमाणे
विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळावी, विद्यार्थ्यांना
शोधनिबंध सादर करण्याची वेळोवेळी संधी दिली जाते. वर्षभरामध्ये असे अनेक
उपक्रम हाती घेतले जातात, जे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वृद्धिगत करतात.
सध्या
पालि विभागामध्ये दहावी, बारावीनंतर बी.ए., तर पदवीनंतर एम. ए., तसेच
पोस्ट ग्रॅज्युएट अॅडव्हान्स डिप्लोमा, एम.फिल, पीएचडी इत्यादी उच्च
शिक्षणाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोईस्कर
पडले, अशी वेळरचना करण्यात आलेली आहे. सोबतच ज्यांची दहावी झाली आहे किंवा
बारावी झाली आहे, त्यांच्यासाठी एक वर्षीय प्रमाणपत्र आणि डिप्लोमा
अभ्यासक्रम आहे. यामध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडिज,
विपस्सना थेरी अॅण्ड प्रॅक्टिस, परियत्ती अॅण्ड पतिपत्ती असे विविध कोर्सेस
उपलब्ध आहे. ज्यांची कलेमध्ये आवड आहे, त्यांच्यासाठीही आर्ट अॅण्ड कल्चर
डिप्लोमा कोर्स उपलब्घ आहे. दरवर्षी दोन दिवसीय ब्राम्ही लिपी कार्यशाळा
होत असते. त्यामुळे येथे केवळ पालिचेच ज्ञान मिळत नाही, तर सर्वांगिण ज्ञान
मिळत असते. त्यामुळे शुद्ध स्वरुपात धम्म जाणून घ्यायचा असेल, तर मुंबई
विद्यापीठ,पालि विभाग एक उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत पालि भाषा अवगत होणार
नाही, तापर्यंत धम्म समजणे अवघडच आहे. डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते भारत
बौद्धमय करण्याचे, पण हे स्वप्न पालि शिकण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
म्हणून वेळ न दवडता ज्यांना बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी
पालि विभागामध्ये आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा आणि आत्म कल्याणासह
इतरांच्या कल्याण साधण्यास पुढाकार घ्यावा. ज्यांना ज्ञानाच्या कक्षा
रुंदावयाच्या आहेत, त्यांचे पालि विभागातर्फे नेहमीच स्वागत आहे.
देवनागरी
लिपी ही पहिल्या शतकातील नागरी लिपीपासून विकसित झाली आहे. नागरी
लिपीपासून देवनागरी, गुजराती, मोडी, कैथी व नंदिनागरी या लिप्या विकसित
झाल्या आहेत. नागरी लिपी संस्कृत आणि प्राकृत लिहायला वापरायचे.
नागरी
लिपी ही सिद्धम लिपीपासून विकसित झाली. सिद्धम लिपीपासून नागरी,
बंगाली-आसामी, ओडिया आणि विविध नेपाळी लिप्या विकसित झाल्या. ही लिपी
संस्कृत लिहायला वापरायचे. बौद्ध धर्मासोबत ही लिपी पूर्व आशियामध्येसुद्धा
पसरली होती. आजही जपानमधील काही बौद्ध लोक मंत्र आणि सूत्र लिहायला आणि
वाचायला या लिपिचा वापर करतात.
सिद्धम
लिपी ही गुप्त लिपीपासून विकसित झाली. ही लिपी प्रामुख्याने गुप्त
साम्राज्याच्या काळात वापरात होती. या लिपीपासून सिद्धम, शारदा, तिबेटी,
कलिंग आणि भैक्षुकी या लिप्या विकसित झाल्या. गुप्त लिपी संस्कृत लिहायला
वापरायचे.
शेवटी
गुप्त लिपी ही ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली. ही लिपी ख्रिस्तपूर्व
तिसर्या शतकात वापरात होती. दक्षिण आणि आग्नेय आशियातील बर्याच लेखन
प्रणाली ब्राह्मी लिपीपासून विकसित झाल्या आहेत. ब्राह्मी लिपीपासून विकसित
झालेल्या लिप्यांचे दोन गट आहेत, उत्तर ब्राह्मी व दक्षिण ब्राह्मी.
देवनागरी उत्तर ब्राह्मी गटात मोडते. ब्राह्मी लिपी संस्कृत, पाली,
प्राकृत, तमिळ, साका आणि टोचारियन शाखेतील भाषा लिहायला वापरायचे.
ब्राह्मी
लिपी पश्चिम आशियातील प्राचीन आरमेइक लिपीपासून विकसित झाली असे मानले
जाते. आरमेइक लिपी ही फोनिशियन लिपीपासून विकसित झाली, फोनिशियन ही
प्रोटो-सिनायटिकपासून, आणि प्रोटो-सिनायटिक ही इजिप्शियन चित्रलिपीपासून.
खरोष्ठी लिपि
तक्षशिला येथे सापडलेल्या एका रौप्यपत्रातील खरोष्ठी वर्ण, इ. स. दुसरे शतक.
खरोष्ठी लिपि : खरोष्ठी लिपीचे नाव अन्वर्थक आहे. गाढवाच्या ओठासारखी लपेटी असलेली ही लिपी, नॉर्थ सेमिटिक लिपीतून उत्पन्न झालेल्या ⇨ ॲरेमाइक लिपीपासून उत्पन्न झाली, असे ब्यूलर इ. विद्वानांचे मत आहे. कनिंगहॅम व इतर काही तज्ञांच्या मते खरोष्ठो हे नाव फा-वान-शु-लिन (६६८) या चिनी कोशात आणि इ. स. पू. तिसऱ्या शतकातील ललितविस्तार
या बौद्ध ग्रंथात उल्लेखिलेले आहे. सेस्तान, कंदाहार, अफगाणिस्तान, स्वात,
लडाख, चिनी तुर्कस्तान, तक्षशिला या भागांत खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात.
हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेला मात्र या लिपीचा प्रसार झालेला दिसून येत
नाही. तिच्या या मर्यादित क्षेत्रामुळे संशोधकांनी तिला निरनिराळी नावे
दिली आहेत. सी. लासेन (१८००-७६) याने ‘काबुली लिपी’, विल्सन याने ‘ॲरिॲनियन
लिपी’ आणि ए. कनिंगहॅम याने ‘गांधार लिपी’ असे तिचे नामकरण केले. खरोष्ठी
लिपीतील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे ‘बॅक्ट्रा-पाली’ किंवा ‘ॲरिॲनो-पाली’
ही नावेसुद्धा तिला मिळाली आहेत. बॅक्ट्रियन-ग्रीक राजांच्या नाण्यांवर ही
लिपी आढळून आल्यामुळे तिला ‘बॅक्ट्रियन लिपी’, ‘इंडो-बॅक्ट्रियन लिपी’
अशीही नावे मिळाली आहेत. फ्रेंच प्रवासी द्यूत्र्य द रॅन्स (१८४६-९४) तसेच
सर आउरेल स्टाइन (१८६२-१९४३) आणि स्टेन कॉनॉव्ह (१८६७-१९४८) यांना खरोष्ठी
लिपीतील लेख सापडले. स्टेन कॉनॉव्ह याने खरोष्ठीतील लेख कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम
(खंड दुसरा, भाग पहिला, १९२९) या ग्रंथात प्रसिद्ध केले. पश्चिम
पाकिस्तानमधील हझार जिल्ह्यातील मानसेहरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाझगढी
येथे अशोकाचे खरोष्ठीमधील लेख सापडले असून हे लेख सर्वांत जुने (इ. स.
पू. तिसरे शतक) आहेत. कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाइक अशा दोन लिपींत
असलेला अशोकाचा लेख सापडला आहे. कुशाणांच्या राजवटीतील खरोष्ठी-लेख मथुरेला
सापडले आहेत. खरोष्ठी लिपी क्षत्रपांच्या नाण्यांवर तसेच शहरात राजांच्या
नाण्यांवर आढळून येते. हूणांच्या स्वाऱ्यांनंतर (इ.स. पाचवे शतक) मात्र
खरोष्ठीचा भारतात मागमूसही उरला नाही.
ब्राह्मीप्रमाणेच खरोष्ठीचे लेख प्रस्तर, धातूचे पत्रे, नाणी, उंटाचे
कातडे, भूर्जपत्र यांवर सापडतात. खोतान येथे दुसऱ्या शतकातील खरोष्ठी लिपीत
लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडले आहे. कोरणे आणि लेखणीने
उंटाच्या कातड्यावर अगर भूर्जपत्रावर लिहिणे, अशा खरोष्ठी लेखनाच्या दोन
पद्धती आहेत. खरोष्ठी लिपीच्या अभ्यासावरून असे दिसते, की तीत एक प्रकारचा
साचेबंदपणा आहे. एकच ठरीव साच्याची अक्षरवटिका खरोष्ठीमध्ये असली, तरी
कोणत्याही भाषेतील उच्चारवैचित्र्य अक्षरांकित करण्याचे सामर्थ्य या लिपीत
आहे. या लिपीतील उच्चारचिन्हांमुळे कोणत्याही शब्दातील ध्वनीची अभिव्यक्ती
करण्याचे सामर्थ्य तिच्यात असल्याचे दिसून येते. ती उजवीकडून डावीकडे
लिहिली जाई. धातूमध्ये फरक पडला, तर अक्षरवटिकेत थोडाफार फरक आढळतो परंतु
एकदा एखाद्या धातूवर लिहिण्याची पद्धत पडून गेली, तर तीच पद्धत कसोशीने
पाळली जाई. त्यामुळे खरोष्ठी लेखांची कालानुरूप परंपरा लावणे कठीण आहे.
ब्यूलरच्या मते खरोष्ठी लिपी ब्राह्मी लिपीपेक्षाही अधिक लोकप्रिय होती. ती
तत्कालीन ग्रांथिक लिपी होती. १८३३ मध्ये जनरल व्हेंटुरा यांनी माणिक्याल
स्तूपाचे उत्खनन केले. त्यात खरोष्ठी आणि ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे
असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली. ती ई. नॉरिस, कर्नल मॅसन, कनिंगहॅम
व जेम्स प्रिन्सेप यांनी वाचली आणि अशा तऱ्हेने खरोष्ठी लिपी वाचण्याची
गुरुकिल्ली इंडो-ग्रीक राजांच्या द्वैभाषिक नाण्यांमुळे उपलब्ध झाली.
संदर्भ : 1. Buhler, George, Indian Palaeography, Calcutta, 1962.
2. Dani, A. H. Indian Palaeography, Oxford, 1963.
3. Dasgupta, C. C. Development of the Kharosthi Script, Calcutta, 1958.
4. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
ली
भाषेविषयीच्या चर्चेमध्ये मला अनेक वेळा - "अहो, पाली आणि मोडी एकच ना?"
हा किंवा असा मथितार्थ असलेले प्रश्न विचारले जातात. ह्या 'तोंडओळख' लेखाद्वारे पाली
भाषेविषयीची थोडीशी माहिती जिज्ञासूंसमोर मांडावी अशी इच्छा आहे. अर्थातच, ही एक प्राथमिक
स्वरूपाची माहिती आहे हे सर्वप्रथम नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर असेही वाचकांच्या निदर्शनास
आणावेसे वाटते की, ह्यामागील माझा उद्देश हा साधारणपणे आपल्या भारतीय संस्कृतीची थोडी
माहिती इतर जिज्ञासूंसमोर आणावी असा असून कुठल्या एका धर्माचे गुण किंवा दोष अथवा कुठल्याही
धर्म आणि पंथाचा प्रसार ह्यातून व्हावा असे ह्या लेखाचे उद्दिष्ट नाही.
आता मूळ विषयाकडे वळूयात. सर्वप्रथम
भाषा आणि लिपी ह्यांतील भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. भाषा हे बोली माध्यम असून त्याद्वारे
विचारांचे आदानप्रदान केले जाते. त्याउलट लिपी हे लिहिण्याच्या माध्यमातून प्रकट केलेले
विचार होत. एका भाषेतील वाक्य कितीही लिपींमध्ये लिहिले जाऊ शकते. हे समजल्यावर हे कळणे सोपे आहे की, पाली ही एक प्राचीन
भाषा आहे तर मोडी ही एक अलिकडील काळातील लिपी आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जसे
इंग्लिश भाषा लिहिताना आपणे रोमन लिपी वापरतो आणि तीच लिपी आपण धावती (रनिंग) लिपी
म्हणूनसुद्धा वापरतो. तसेच, मोडी लिपीचा उपयोग वेगाने मराठी
लिहिण्यासाठी जुन्या मध्ययुगीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये केलेला दिसतो. असो.
भाषा आणि लिपीचा प्रश्न निकाली
काढल्यावर पाली भाषा म्हणजे नक्की काय, कुठली, कधी बोलली जायची ह्या प्रश्नांकडे वळूयात.
साधारणपणे अडीच हजार वर्षांपूर्वी मगध प्रांतात बोलली जाणारी प्राकृत भाषा म्हणजे पाली
असे विद्वान मंडळींचे मत आहे. अर्थातच बरेच वेगळे मतप्रवाहही आहेत पण ह्या तोंडओळखीसाठी
ही मागधी भाषा होती असे समजायला काही हरकत नसावी. अडीच हजार वर्षांपूर्वीचा मगध प्रांत
म्हणजे आजचा आपला बिहार प्रांत. बिंबिसार आणि त्यानंतर राज्यावर आलेल्या अजातशत्रूच्या
अधिपत्याखाली हा संपन्न असा प्रदेश होता. भगवान बुद्धांचा कालखण्डही हाच समजला जातो.
अशा प्रदेशातील एक सर्वसामान्यांची भाषा म्हणून त्याला ‘मागधी’ अशी संज्ञा दिली जाते.
हिचे पाली हे नाव बरेच अलीकडील असे असून ते काहीशे वर्षांपूर्वीचे नामकरण आहे असे पण
तज्ञांचे मत आहे. ह्या भाषेमध्ये संपूर्ण बौद्ध वाङ्गमय आज उपलब्ध आहे. ह्या वाङ्गमयामुळे
अभ्यासकाला तत्कालीन समाजरचना, सांस्कृतिक चालीरिती, राजकीय परिस्थिती इ. गोष्टींचा
सांगोपांग अभ्यास करता येऊ शकतो. गंमतीचा भाग म्हणजे पाली म्हणजे जीभ बोटाने धरून बोबडे
बोलणे असे पण बरेच लोक समजतात. ह्यात थोडे तथ्यही आहे पण भारताचा एक सांस्कृतिक वारसा
म्हणून पाली ही एक अतिशय महत्वाची भाषा आहे असे समजायला हरकत नसावी.
भाषाशास्त्रज्ञांच्या मते पाली
भाषा हा संस्कृत आणि भारतातल्या आज प्रचलित असलेल्या काही बोली भाषांमधील एक महत्वाचा
दुवा समजला जातो. उदाहरणार्थ, खालील तक्ता बघा (पं. ना. वा. तुंगार ह्यांच्या पाली
भाषा-प्रवेश पुस्तकातून अंशत: आणि काही बदलांसहित)
संस्कृत
पाली
मराठी
हिंदी
चक्र
चक्क
चाक
चक्का
कर्म
कम्म
काम
कर्म/काम
मृत्तिका
मत्तिका
माती
मट्टी/मिट्टी
वृद्ध
वुड्ढ
वृद्ध
बुड्ढा
उष्ण
उण्ह
उन्ह/उन
-----
मस्तक
मत्थक
माथे
माथा/मथ्था
ह्या
तक्त्यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की, भाषा म्हणून आपली मराठी आणि देशभाषा हिन्दी
ह्या पाली भाषेशी किती जवळ आहेत.
आज पालीचा वापर बोली म्हणून
किंवा इतर माध्यमांमध्ये दिसत नाही परंतु संपूर्ण बौद्ध तत्वज्ञान आणि वाङ्गमय हे आजही
पालीमध्ये उपलब्ध आहे. इ.स. पूर्व पहिल्या शतकामध्ये बौद्ध त्रिपिटक (पाली - तिपिटक)
श्रीलंकेमध्ये सर्वप्रथम सिंहल लिपीमध्ये लिपीबद्ध झाले. तोपर्यन्तचा त्रिपिटकाचा प्रवास
हा मौखिक असाच होता. ह्या संपूर्ण त्रिपिटकाचा आणि त्या अनुषंगाने बौद्ध धर्माचा अभ्यास
आज भारतापेक्षा श्रीलंका, म्यानमार, थायलंड आणि युरोप-अमेरिकेमध्ये जोरावर आहे. पाली
भाषेच्या अभ्यासामुळे भारताच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय इ. अनेक बाबींवर
मोठाच प्रकाश पडतो. म्हणूनच ह्या भाषेच्या सखोल अभ्यासाची आपल्या देशात गरज आहे.
भारतातून १२ व्या -१३ व्या शतकात
बौद्ध धर्माचे प्राबल्य क्षीण झाल्यावर तो धर्म आणि त्या अनुषंगाने पाली भाषा भारतातून
जरी लुप्त झाली तरीही दक्षिण आशियातील श्रीलंका, म्यानमार, थायलंड ह्या देशांमध्ये
जिवंत राहिली व आजही हे देश बौद्ध म्हणूनच समजले जातात. ह्या देशांमध्ये देखील पाली
ही बोली भाषा नसली तरीही ती एक धार्मिक भाषा म्हणून शाळांमध्ये शिकवली जाते आणि तिचे
महत्व ह्या देशांमध्ये टिकून आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून पालीकडे परत
विद्वानांची दृष्टी वळली आहे आणि भाषेच्या अभ्यासासाठी अनेक शालेय, महाविद्यालयीन आणि
विश्वविद्यालयांमधून ओढा सुरु झाला आहे. तरीहि अजून पालीचे विद्वान भारतात बोटांवर
मोजता येतील इतकेच आहेत.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला
पुणे, मुंबई, कोलकाता, वाराणसी आणि नंतर दिल्ली मध्ये विविध महाविद्यालये आणि विश्वविद्यालयांमध्ये
पाली विभागांची स्थापना झाली परंतु स्वातंत्र्योत्तर काळात बरेच विभाग पुरेश्या विद्यार्थ्यांअभावी
बंद झाले. त्यावेळेच्या पाली दिग्गजांमध्ये पी.व्ही. बापट, धर्मानंद
कोसंबी इ. पण्डितांनी पाली भाषा शिक्षणाची धुरा वाहिली. पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या,
फर्ग्युसन इ. ठिकाणी संशोधन आणि शिक्षण असे बरेच काम पालीसाठी झाले. मराठीतील प्रख्यात
विनोदी लेखक चिं. वि. जोशी हे पण पाली विद्वान होते हे जाता जाता नमूद करणे गरजेचे
आहे.
आज पाली भाषेसाठी उत्तम अशी
शैक्षणिक केन्द्रे भारतात बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहेत. शिक्षणाच्या एकंदर बट्ट्याबोळात
आणि धार्मिक संकुचितपणामुळे आपल्या सांस्कृतिक वारशांचा आपल्याला विसर पडत चालला आहे
ही एक खेदकारक बाब आहे. पाली भाषा आणि त्यातून व्यक्त झालेले बौद्ध तत्वज्ञान हे आपलेच
सांस्कृतिक वारसे आहेत. जितके जास्त लोक पाली शिकतील तितकाच हे वारसे जपायला हातभार
लागणार आहे. बहुतांशी कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी मराठीसारखीच वाक्यरचना असलेली काही
पालीमधील वाक्ये सरतेशेवटी देत आहे. त्यावरून ह्या भाषेबद्दल अजून थोडीशी कल्पना वाचकांस
येईल. (पं. ना. वा. तुंगार ह्यांच्या पाली भाषा-प्रवेश पुस्तकातून उदाहरणार्थ)
पाली
मराठी
अहं बुद्धं नमामि।
मी बुद्धांना नमस्कार करतो.
मनुस्सो धम्मं अनुसरति।
मनुष्य/लोक धर्माला अनुसरतात.
अहं सच्चं ब्रवीमि।
मी सत्य बोलतो.
अम्हे पाणं न हनाम, मुसावादं
न वदाम, मज्जं न पिवाम।
आम्ही प्राण हरत नाही (प्राणहत्या
करत नाही), खोटे बोलत नाही, मद्य पित नाही.