Wednesday, August 7, 2024

शक्ती मुर्तीशास्त्र

 

महिषासुरमर्दिनी

लेख ५

आपण काही देवतांचा परिचय या आधी करून घेतला, आता भारतातल्या काही निराळ्या शिल्पांची माहिती यापुढे घेणार आहोत. महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि अमरत्व मागितले, ते नाही मिळाले पण फक्त स्त्री कडूनच मृत्यू येईल अशी एक पळवाट मिळाली. स्त्री ही अबलाच असते असं गृहीत धरून त्याने सगळीकडे उच्छाद मांडयला सुरुवात केली. स्त्री ही अबलाच असते हे गृहीत धरणे हीच त्याची सर्वात मोठी चूक. 

महिषासुर राक्षसाचा त्रास मोठ्या प्रमाणत वाढला आणि मग विष्णू, शंकर, ब्रम्हदेव आणि इतर देवगण यांनी आपापल्या शक्तीचा वापर करून एकत्रित ताकद घडवली - हीच शक्ती म्हणजे दुर्गा. दुर्गेला हिमालयाकडून सिंह मिळाला जो अनेक शिल्पांमध्ये तिच्या बरोबर दिसतो. त्याच प्रमाणे दुर्गेला इतर देवतांकडून देखील अनेक आयुधे मिळाली. 

या लेखामध्ये उल्लेख केलेले शिल्पं हे गुजरात मध्ये पाटण जवळ राणी की वाव नावाची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेली हेरिटेज साईट आहे तिथे आहे. मुळात राणी की वाव, हे वेगळ्या पद्धतीचे विष्णू मंदिर शिल्पांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी नंदनवन आहे. 

शिल्पनिरिक्षण - सर्वात खाली महिष (रेडा), त्याची पाठ जबड्याने पकडलेला दुर्गेचा सिंह, देवीने आपल्या पायाने दाबलेली त्या रेड्याची पाठ आणि असुराचे केस धरून रेड्याच्या मानेतून त्याला खेचून बाहेर काढलेले आहे. एका बाजूला त्रिशूळ, वज्र, बाण, भाला, डमरू, आणि मानेच्या पाठीमागे पकडलेली तलवार. तर दुसऱ्या हातात ढाल, नाग, पाश, घंटा, इत्यादी आयुधे. दुर्गेच्या डोक्यावर असलेल्या मुकुटापासून ते गळ्यातल्या माळा, मेखला, पायातील पैंजण या आणि अशा सर्वच गोष्टी परिपूर्ण असाव्यात अशाच इच्छेने कोरलेल्या आहेत. एवढे प्रचंड युद्ध होईन देखील देवीच्या चेहऱ्यावर असणारे स्मितहास्य तिच्या ताकदीची आणि पराक्रमाची चुणूक दाखवून जाते.

त्री देवता (शक्ती) आणि त्यांच्या मूर्ती

चित्र क्र. ९४ : तपस्विनी पार्वती, रानी की वाव, पाटण

स्त्री देवता :-

   सर्व आदिम समाजामध्ये शक्तीच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान होते. तसेच इराण, मेसोपोटेमिय तुर्कस्थान, इजिप्त, आदी संस्कृतींपासून तर सिंधू-सरस्वती संस्कृती पर्यंत यांच्या पूजनाचे पुरावे सापडतात. भारतामध्ये इ.स.पू. २५०० ते इ.स.पू. ३ऱ्या शतकापर्यंत मातीच्या मातृका मूर्ती सापडतात. या मूर्तींचे आकार फार सुडौल नसून अलंकरणयुक्त परंतु वस्त्रहीन अशाच मूर्ती मिळतात. मूर्तिशास्त्राचा विकास झाल्यानंतर या मातृकामूर्तीऐवजी स्त्री देवतांचे पूजन आणि शिल्पांकन झालेले दिसते. गुप्त काळाच्या आधीच्या शिल्पांमध्ये स्त्री देवतांच्या शिल्पांकनांचे महत्त्व होते. परंतु त्याची नावे वसुधारा, एकानंशा अशा प्रकारची होती, ज्यामधून लक्ष्मीचा उगम झाला. या लक्ष्मी बरोबरच सप्तमातृका आणि चौसष्ठ योगिनींचाही उगम झालेला दिसतो आणि त्यांच्याही शिल्पांकनाची सुरुवात गुप्त काळामध्ये (इ.स. ४ थे ते ६ वे शतक) झालेली दिसते. पुढे यामध्ये भर पडून दर्गा, महिषासुरमर्दिनी, पार्वती आणि गंगा, यमुना आणि सरस्वती या नदी देवतांच्या प्रतिमा मंदिरातल्या शिल्पांवर मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या. लक्ष्मी साधारणतः लक्ष्मीच्या शिल्पात कमळावर बसलेली किंवा उभी असलेली स्त्री मूर्ती दिसते आणि शेजारी हत्ती दाखवले जातात. 

चित्र क्र. ९५ : महिषासुरमर्दिनी,उदयगिरी लेणे, विदिशा
 
   वेरुळ (क्र. १६) कैलासमंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर गजांतलक्ष्मीचे मोठे शिल्प दिसते. ती कमळावर बसलेली आहे. कमळाचे शिल्पांकन हे हिंदू मंदिरामध्यान वैशिष्ट्यांपैकी एक आहे. कमळ पाण्यात असूनही अलिप्त असते. त्याच्या पानांवर पडलेले पाणीसुद्धा ओघळून जाते. जीवन हे क्षणभंगुर आहे हे जरी खरे असले तरी त्यातील प्रत्येक क्षण सौंदर्याने भारलेला आहे याचेच हे निदर्शक आहे. जीवनाचे प्राथमिक प्रतिक म्हणजे जल, त्यातून प्रकटणारे सदाबहार जीवनाचे प्रतिक म्हणजे कमळ. जन्मदात्री, नवजीवन देणारी, प्रजनन करणारी ही माताच असू शकते म्हणून निसर्ग देवता ही सौष्ठवपूर्ण स्त्रीरूपानेच समर्पकपणे दाखवता येते. शिल्पकारानेही ती तशीच कोरलेली आहे. निर्मितीचा आनंद जणू शिशुला स्तनपान करताना होणाऱ्या समाधानासारखा तिच्या चेहर्यावर आहे. गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूला दोन दोन हत्ती जलाने कलश भरताना कोरले आहेत. पाणी भरताना कळशी पाण्यात बुडविल्यावर थोडी हाताने पाण्याखाली दाबावी लागते हे कलाकाराच्या सूक्ष्म निरीक्षणात होते म्हणून शिल्पामधील हत्ती कळशी भरण्यासाठी त्याची तोंडं सोंडेत धरून ती पायाने पाण्याखाली दाबताना दाखवायचे तो विसरला नाही. त्या हत्तीच्या थोड्या बाच्या अंगास दुसरे दोन मोठे हत्ती आहेत. ते भरलेले जलकुंभ घेऊन त्याचा तक्ष्मीच्या डोक्यावर अभिषेक करीत आहेत. येथे हत्ती हे मेघाचे प्रतिक आहेत तर अभिषेक म्हणजे पर्जन्य. बहरून बेगारी सृष्टी म्हणजे लक्ष्मी. हे चक्र अव्याहतपणे सतत चालू आहे हे सूचित करण्यासाठी हत्तींच्या पाठीवरील झुलीतून लटकणाऱ्या घंटा हिंदोळ्याने मागे गेलेल्या आहेत. ही त्या शिल्पीची कल्पकता विलोभनीय आहे.

चित्र क्र. ९६ : अभिषेक लक्ष्मी, कैलास मंदिर, वेरूळ

  दुर्गा :-

   दुर्गेचे पुजन प्राचीन काळापासून होत होते असे ग्रंथांमधल्या पुराव्यावरून दिसते. तैत्तरीय आरण्यक, केनोपनिषद, बात अविका आणि हैमवती अशी शिवाच्या पत्नीची, उमेची नावे दिसतात. तसेच महाभारतात विराट आणि भीष्म पर्वात दुर्गेची दोन मोठी स्तोत्रे आहेत. देवळामधील शिल्पात ती सिंहवाहिनी, सिंहावर आरूढ किया सिहाशेजारी दाखवली जाते. बेरुळमध्ये लेणे क्र.१६ कैलास लेण्यातील यज्ञशाला येथे याचे प्रभावी शिल्पांकन आढळते. दुर्गेची आयुधे म्हणून वज्र, तलवार, ढाल, शूल, त्रिशूळ, अंकुश, धनुष्य, बाण, चक्र, डमरू, अक्षमाला, शंख, पद्म, घंटा, परशु वगैरे वस्तू निरनिराळ्या प्रतिमांतून दिसतात. तिच्या हाताच्या संख्येप्रमाणे तिची वेगवेगळी नावे असतात. चार हातांच्या शिल्पांमध्ये नवदुर्गा येतात. त्याचे नावे महालक्ष्मी, नंदा, क्षेमांकाली, शिवदूती, महाचंडा, भ्रामरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धों हे आहेत. दहा हाताची असल्यास कात्यायनी, अठरा हातांची असल्यास भद्रकाली, सोळा किंवा अठरा हातांची दुर्गा अशा प्रतिमा दिसतात. याशिवाय चार किंवा आठ हातांची चामुंडाही असते. (जोशी १९७९,१.२९३)

चित्र क्र. ९७ : दुर्गा, लेणे क्र. १४, वेरूळ

महिषासुरमर्दिनी :-

   सर्व देवांच्या शक्तीपासून तयार झालेली ही देवी महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्याल जन्माला आली अशी तिची कथा आहे. हे दुर्गेचेच एक रूप आहे. विदिशा जवळील उदयगिरी लेण्यामध्ये (इ.स.५ वे शतक) जे शिल्प आढळते यामध्ये तिची केशरचना अत्यंत विशेष असून महिषाच्या मागच्या पायाने तिने धरलेले असून त्याचे डोके पायाखाली घेतलेले शिल्प आहे.या शिल्पामध्ये दुर्गेप्रमाणेच तिच्या हाताच्या संख्येत वाढ झालेली दिसते आणि ११ व्या शतकाप अठरा हातांची शिल्ये आपल्याला आढळून येतात.
   साधारणतः ७ व्या शतकापर्यंत महिषासुर हा रेड्याच्या रूपातच दाखविला जात असे. वेरुळ मधल्या रामेश्वर लेण्यात ( क्र.२१) आणि रावण की खाई (क्र.१४) आणि कैलास मंदिर (क्र.१६) यामध्ये हिची विराट शिल्पे आहेत. रामेश्वर लेण्यातील शिल्पात एका प्रचंड रेड्याचे तोंड चार हातांच्या देवीने तिच्या खालच्या डाव्या हाताने धरलेले असून तिच्या उचललेल्या डाव्या हातात चक्र आहे. तिच्या खालच्या उजव्या हातात उगारलेली तलवार असून तिचा वरचा उजवा हात रेड्यावर वार करायला उगारला आहे. तिने उजवा पाय महिषाच्या पाठीवर ठेवला असून त्या सहज क्रियेने देखील त्या विशाल महिषाचे गुडघे मुडपल्याचे दाखवून शिल्पकाराने देवीच्या अगाध शक्तीचे दर्शन घडवले आहे. कैलास मंदिरातील अशा शिल्पामध्ये ती अष्टभुजा सिंहारूढ आहे. इथे तिचा बांधा अधिकच सुडौल आहे. महिषाचे मुंडके तिने उडविल्यावर महिषाच्या पटातून असुर उसळी मारून बाहेर पडलेला दाखवला आहे. तो मानवी रूपात परंतु डोक्यावर शिंग असलेला दिसतो. देवीने त्याच्या छातीत त्रिशूल खुपसलेला आहे.

चित्र क्र. ९८ : महिषासुरमर्दिनी, रानी की वाव, पाटण

आठव्या शतकानंतर महिषासुराच्या शिल्पाचे मुंडके अर्धे कापलेले दाखविलेले जाते आणि आतून कमरेपासून डोक्यापर्यंत एक शिंगधारी मनुष्य बाहेर पडताना दिसत असे. देवीने मारल्यानंतर महिषासुर आपले खरे रूप प्रगट करताना दाखवले जायचे. दहाव्या शतकानंतर संपूर्णपणे मानव रूपाचा असले तरी या शिल्पांकनाला सर्वसाधारण नियम असे म्हणता येणार नाही. उदयपूर (राजस्थान) जवळ जगत येथील दहाव्या शतकात बांधलेल्या देवीच्या मंदिरात महिषासुरमर्दिनीची ही तिन्ही रूपे येथे घोषासुर म्हणजे शिंगधारी माणसाच्या छातीत त्रिशूळ भोसकून बध करताना दाखविले जायचे. असे शिल्पात दिसतात. पाटण येथील राणी की वाव (११ वे शतक) येथे अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीचे सातील सर्वोत्कृष्ट शिल्पांपैकी एक आहे.

पार्वती :-

शिव पार्वती असे हिचे शिवा बरोबरचे शिल्पांकन सर्वत्र दिसते. परंतु पार्वतीचे स्वतंत्र शिल्पांकनही अनेक ठिकाणी असते. तिच्या हातांमध्ये त्रिशूळ, अंकुश, पार्श किंवा शिवलिंग अशी आयुधे असतात. तिचे वाहन घोरपड असते. वेरुळ मध्ये २२ क्रमांकाच्या लेण्यात आणि खजुराहोच्या संग्रहालयात असलेल्या शिल्पात असे शिल्पांकन आहे. तिचा शिवाशी विवाह होण्यासाठी तिने तप केले होते. विवाहपूर्वीच्या पार्वतीला गौरी म्हणतात. काही वेळेला तिच्या शेजारी सिंह किंवा हरिण ही वाहनेही असतात. रानी की वाव, पाटण येथे तप करण्याऱ्या पार्वतीची बारा शिल्पे आहेत. यातील एका शिल्पात ती चतुर्भुज असून एका पायावर उभे राहून तप करतानाचे शिल्पांकन आहे. तिच्या वरच्या उजव्या हातात अक्षमाळा असून तिचा खालचा उजवा हात सरळ खाली सोडलेला असून तो तिच्या दुमडलेल्या उजव्या पायावरून (वृक्षासनात जसा एक पाय दुमडलेला असतो तसा) खाली भूमी स्पर्श मुद्रेप्रमाणे दाखविलेला आहे. तिच्या वरच्या डाव्या हातात दंड असून खाली सोडलेल्या डाव्या हातात कमंडलू आहे. तिचे हे तपस्विनीचे रूप अधिक ठळक करण्याकरता कलाकाराने तिच्या गळ्यात यज्ञोपवीत आणि कमरेला लंगोट दाखवलेला आहे.  रानी की बाब सेवेत अपघात एका शिल्पात तिच्या पायाखालील घोरपड स्पष्ट दिसते. वेरुळ येथील रामेश्वर लेणे (क्र.२१) आतील शिल्यपटावर तप करणाऱ्या पार्वतीचे शिल्प आहे. येथे तिच्या पायाखाली घोरपड नाही. परंतु तिच्या भोवती चार ज्वाळा पेटलेल्या दाखविल्या आहेत. या चार ज्वाळा आणि डोक्यावरील तळपणारा सूर्य अशा पाच अग्नींमध्ये बारा वर्षे उभे राहून तिने शंकरच पती मिळावा म्हणून तप केले. या तपाली 'पंचाग्नी तप' असे म्हणतात.

चित्र क्र. ९९: पार्वती, रानी की वाव, पाटण

    गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे मानवीकरण या शिल्पांद्वारे करण्यात आले. शृंग काळामध्ये (इ.स.पू २ ते १ शतक) याच्या भोवती असणाऱ्या तोरणाखाली शालभंजिकांचे शिल्पांकन आढळते. झाडाच्या फांदीला एका हाताने धरून देहुड्यापावली उभ्या असणाऱ्या शालभंजिकांची त्या काळची अनेक शिल्पे दिसतात. गुप्त काळामध्ये या शालभंजिकां- प्रमाणे गंगा आणि यमुना यांचे शिल्पाकंन इाले. उदयगिरी (म.प्र.) मधील लेण्याच्या गृहाबाहेरील द्वारशाखेवर या तुळईच्या बहेरील कोपऱ्याशेजारी या दोन्ही कोरलेल्या दिसतात. त्याच लेणीमध्ये बाहेरच्या भिंतीवर असणाऱ्या वराहाच्या भव्य शिल्पाशेजारी न्टपणे दिसतात. यामध्ये यांची वाहनेही दाखवलेली आहेत. गंगेचे वाहन मकर आणि यमुनेचे वाहन कासव असते. ते यांच्या पायाखाली कोरलेले आहे. कालांतराने सातव्या शतकानंतर या द्वारशाखेवरच परंतु खालच्या बाजूला कोरल्या जाऊ लागल्या. मंदिरात प्रवेश करताना आपल्या डावीकडे असते ती मकर बाहिनी गंगा आणि उजवीकडे असते ती कच्छपवाहिनी यमुना. वेरुळमध्ये एवं अप्रतिम शिल्पांकन पाहायला मिळते. रामेश्वर लेणे (लेणी क्र. २१) याच्या बाहेर असलेली यमुना आज भग्न अवस्थेत आहेत. परंतु तेथील गंगेचे शिल्प हे भारतातील सर्वश्रेष्ठ शिल्पापैकी एक म्हणावे लागेल.. कवी कालिदासाच्या मेघदूतातील केलेल्या कल्पनेतील स्त्रीसौंदर्याची व्याख्या इथे प्रत्यक्षात साकारलेली आहे. 
      'उन्दी श्यामा शिखरिदशना पक्कबिंबाधरोष्ठि ।
       मध्ये शामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्ननाभिः ||
       श्रोणीभादलसगमना स्तोकनमा स्तनाभ्याम् ।
        या तत्र स्याद्यवतिविषये सुष्टिराद्येव धातुः ।।' (मेघदूत: २.२२)

चित्र क्र. १०० : गंगा, रामेश्वर लेणे, वेरूळ

  मानवी शरीराच्या बाह्यरेखा उठावदारपणे आणि सौष्ठवपूर्ण दिसण्यासाठी स्त्री शिल्पे ही त्रिभंग अवस्थेत कोरली जातात. त्रिभंग म्हणजे पाय, घड आणि डोके सरळ रेषेत न येता ते तीन वेगळ्या कोनांमध्ये काढले जातात त्यामुळे शरीराला एका लाटेप्रमाणे बाक येऊन स्त्री देहाचे सौष्ठव अधिक उठावदार आणि भारदस्त दाखवले जाते. गंगेचे वाहन मकर. इथे मकराला हत्तीचे तोंड आणि सिंहाचे पाय दाखवले आहेत. तरीही एका जलचर प्राण्याचाच भास मूर्तीवरील खवल्यांमुळे होतो. मकरावर उभ्या असलेल्या गंगेच्या डोक्यावर किरीट आहे. त्यातून कपाळावर ओघळलेला चूडामणी, कानामध्ये ताटंक चक्र, गळ्यामध्ये कंठी, माला आणि हार, दंडावर केयूर, मनगटात कंकण, कमरेत मेखला, पायात नुपूर इतके अलंकार तिने धारण केलेले दाखवले आहेत. नदी असल्यामुळे तिचे तलम वस्त्र ओले आहे हे दाखविण्यासाठी वस्त्रातून उमटणाऱ्या डाव्या गुढग्याची वाटीची बाहह्यरेखा सुस्पष्ट करून कलाकाराने अपूर्व कल्पकता दाखविली आहे. आधारासाठी तिने एक गणाच्या डोक्यावर हात ठेवला आहे. गणाच्या थोड्याशा बेढब मूर्तींमुळे गंगेचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तिच्या चेहऱ्यावरील मंद स्मित हे तृप्त, संतुष्ट आणि एका मोक्षदायिनीच्या उदात्त भावांचे मुख मीलन आहे. गंगेच्या शिल्पासमोरच कासवावर उभ्या असलेल्या यमुनेचे शिल्प रामेश्वर तोपान कोरलेले आहे.

चित्र क्र. १०१ : गंगा, कैलास मंदिर, वेरूळा

याशिवाय वेरुळ येथील कैलास लेणीमधील सरिता मंदिरात गंगा, यमुना यांच्या जोडील सरस्वतीचेही शिल्प कोरलेले आहे. राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत प्रयागचा संगमही त्याच्या राज्य सीमेत सामावलेला होता. त्याचे हे शिल्परूपी स्मरण, मधोमध मकरावर उभी गंगा आहे, उजवीकडे कासवावर उभी असलेली यमुना आहे आणि डावीकडे कमळावर उभी असलेली सरस्वती आहे. 
    सरस्वती आणि यमुना या अनुक्रमे उजवीकडे आणि डावीकडे वाकून त्रिभंगात उभ्या आहेत. गंगा मात्र सरळ उभी ठेवावी लागली कारण कुठल्याही एका बाजूला ती वाकल्याप्त संपूर्ण शिल्पपटाचे संतुलन ढळले असते. त्रिभंगासारखे न वाकवता शिल्पाच्या सौष्ठवाला कायम ठेवणे हे एक अवघड आव्हान होते. शिल्पकाराने ते कल्पकतेने पेलले आहे. गंगेच्या दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर दिलेले असल्यामुळे तिच्या कमरेचा बाक उठावदार होऊनही अनैसर्गिक वाटत नाही. सरस्वतीच्या शिल्पाला त्याने उभ्या तीन प्रतलातही वळविले आहे. त्यामुळे तिच्या कमरेला अत्यंत रेखीव असा बाक आला आहे. गंगा हे शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतिक. दोन नद्यांचा संगम झाल्यावर पुढील प्रवाहास मोठ्या नदीचे नाव देतात. परंतु यमुना मोठी नदी असूनही गंगा-यमुनेच्या संगमानंतर पुढील प्रवाहास गंगेचेच नाव दिले गेले आहे. संगमानंतर यमुना स्वतःला गंगेत विलीन करते म्हणून ती भक्तीचे एक श्रेष्ठ प्रतिक ठरते. शुद्धता, पावित्र्य आणि भक्ती याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. साम्यती ज्ञानाचे प्रतिक असल्यामुळे इथे मात्र कलाकारांनी तिन्ही नद्यांना मूर्त रूपात कोरले आहे.

चित्र क्र. १०२ : सरस्वती, कैलास मंदिर, वेरूळ
वाकाटक काळातील (इ.स.५-६वे शतक) मंदिरे आणि शिल्पे नष्ट झाली. त्यातील काही मंदिरे रामटेक मध्ये होती तेथील नरसिंहाची शिल्पे विशेष आहेत. पवनारचा आश्रम बांधत असताना तेथे काही शिल्ये मिळाली जी आचार्य विनोबा भावे यांनी अत्यंत काळजीपूर्वक उचलून सुरक्षित ठेवली.त्यातील गंगेचे शिल्प हे उभे करताना त्याला भिंतीचा आधार दिला. परंतु त्या शिल्पाचा मागील भाग अत्यंत भिंतीलगत आहे. त्यात गवंड्याने चुना आणि सिमेंट भरल्याने ते गवंड्याने भिंतीत चिणून टाकल्यासारखे दिसते. गंगेची ही पूर्णाकृती मूर्ती असून तिच्या उजव्या पायाच्या शेजारी ब्राह्मी लिपीमध्ये 'भगवती गंगा' असे लिहिले आहे. अतिशय तलम वस्त्र नेसलेल्या आणि त्यात नखशिखांत पाण्यात भिजलेल्या श्रीच्या रूपातील गंगेचे हे एक अप्रतिम शिल्प आहे.

 सप्तमातृका :-

    सप्तमातृका म्हणजे सात माता ! या निरनिराळ्या देवांच्या शक्ती किंवा त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धी होत. साधारणपणे जरी 'सप्त' मातृका असा उल्लेख केला गेला तरी त्यांची संख्या आठ किंवा त्याहूनही अधिक असू शकते. मातृकांची पूजा प्राचीन काळापासून प्रचलित होती. सप्तमातृकांच्या व्युत्पत्तीचा इतिहास थेट सरस्वती-सिंधू संस्कृतीच्या मातृदेवता पूजनाशी जोडत येतो. तेथील उत्खननामध्ये अशी एक मुद्रा सापडली आहे की ज्यात एका झाडाभोवती सात स्त्रीया नाचताना दिसतात. सप्त-मातृकांचा हा सर्वात जुना पुरावा आहे. यावरून हे नक्की सिद्ध होते की इसवी सन पूर्व काळापासून मातृकापूजन देशात सर्वत्र केले जात असे. ऋग्वेदात सप्तमातृकांचा उल्लेख येतो. 
     जज्ञानं सप्त मातरो बेधामशासत श्रिये। अयं ध्रुवो रयीणां चिकेत यत् ।। (ऋ. ९, १०२, ४).
       याचप्रमाणे अनेक पुराणात आणि अन्य ग्रंथांमध्येही यांचा उल्लेख आढळतो. स्कंद पुराणात (काशी खंड, ८-३३ उत्तरार्ध), देवी पुराणात (अध्याय ८७) आणि ब्रह्मवैवर्त पुराणात (६४, ८७-८८) यांची संख्या आठहूनही अधिक आहे. तर देवी भागवत (२, ११५७-५८), वामकेस्वरतंत्र नित्यसोडदासिकार्णव, प्रपंचसार तंत्र (अध्याय ३) आणि लिंग पुराणात (८२-९६) यांची संख्या आठच सांगितलेली आहे. (मिश्राः १९८९, पृ. १).

चित्र क्र. १०३ : सप्तमातृका, रामेश्वर लेणे, वेरूळ
      सप्तमातृकांची कथा महाभारतात येते. अंधक नावाच्या असुराला दैत्यांचे प्रमुखपद मिळाले. त्यारे घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून अनेक वर मागून घेतले. त्यामुळे तो अखंड शातिशाली आणि पर्यायाने उन्मत्तही झाला. त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून सर्व देव कैलासावर तप करत असलेल्या शिवाला शरण गेले आणि या दैत्यापासून मुक्ती देण्याची श्रीशंकराला विनंती करू लागले. याच वेळेस देवांच्या पाठोपाठ अंधकही तिथे धडकला. पार्वतीला पाहून तो मोहित झाला आणि त्याने तिलाच पळवायचा प्रयत्न केला. त्याचे हे धारिष्ट्य पाहून शिवाला क्रोध आता त्याने वासुकी नागाचा कंबरपट्टा केला, तक्षक आणि धनंजय या दोन नागांची क़कणे धारण केली आहे. तो तात्काळ त्याच्याशी युद्ध करायला सज्ज झाला. अंधकासुर शिवाकडे गेल्याचे कळताच नील नावाव एक असुर हत्तीचे रूप घेऊन तिथे आला. त्यालाही शिवाला मारायचे होते. परंतु नंदीने त्याला ओळखले आणि चीरभद्राला हे सांगितले. वीरभद्रने सिंहाचे रूप घेतले आणि तो नीलासुरावर चालून गेला. त्याने हत्तीच्या रूपातील नीलासुराला तर मारलेच परंतु त्याचे चामडे सोलून काढून शिवाला आणून दिले. शिवाने उत्तरीय म्हणून ते धारण केले आणि त्रिशूल सरसावून आपल्या गणांच्या सैन्यासह अंधकासुराशी लढायला निघाला. विष्णू आदी देवांनी त्याला साहाय्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या रणकंदनातून त्यांनाही पळ काढावा लागला. भयंकर संग्रामानंतर शिवाने आपले धनुष्य काढले आणि बाण मारून अंधकासुराला घायाळ केले. त्याच्या झालेल्या जखमांमधून प्रचंड रक्तस्रावामुळे आणि जमीनीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक नवीन अंधकासुर तयार होऊ लागला. शिवाने मुळचे अंधकासुराला मग त्रिशूळाने भोसकून मारले आणि दूर अंतराळात भिरकावून दिले. अधकासुराच्या अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या रक्तांच्या थेंबांना झेलण्यासाठी शिवाने आपल्या मुखातून अग्नि ज्वाळा काढल्या आणि त्यातून योगेश्वरी नावाची शक्ती उत्पन्न केली. तिच्या मदतीला इंद्र आणि अन्य देवांनी आपापल्या शक्ती पाठवल्या. सात देवांच्या सात शक्ती अशा या सप्तमातृका उत्पन्न झाल्या आणि त्यांनी त्या असुराच्या नाशासाठी शिवाला साहाय्य केले. (मणीः १९९५, पृ. १९).
  या मातृकांची नावे माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, वाराही आणि चामुंडा अशी असतात, ज्या क्रमशः महेश्वर, विष्णू, ब्रह्मा, कुमार (कार्तिकेय), इंद्र, वराह (विष्णूचा अवतार) आणि यम या देवांच्या शक्ती होत.
  गुप्तपूर्व कुषाण काळात (इ.स. १-२ रे शतक) सप्तमातृकांचे शिल्प आढळते. यामध्ये त्यांची वाहने किंवा आयुधे दिसत नाहीत तसेच त्यांच्याबरोबर शिव किंवा स्कदाचे शिल्पांकन दिसते.
     गुप्त काळामध्ये मात्र यांचे प्रमाणिकीकरण झालेले दिसते, जे पुढे समान पद्धतीने चाललेले आढळते. यांच्या शिल्पपटामध्ये डावीकडून पाहताना पहिला वीणाधर शिव त्यानंतर ब्राह्मी किंवा ब्रम्हाणी त्यानंतर माहेश्वरी, वैष्णवी, कौमारी, ऐन्द्री, वाराही, चामुंडा आणि शेजारी गणपती असे दिसते. शिवाय माहेन्द्री, नारसिंही, गणेशी किंवा वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, योगेश्वरी, काली, शिवदुती, वरुणी इत्यादींचेही शिल्पांकन आढळते. या मातृकांखाली त्यांची वाहनेही दिसतात, जी अनुक्रमे हंस, वृष, गरुड, मोर, गज, वराह आणि प्रेत असतात. सप्तमातृकांची संख्या सुरुवातीला सात आणि काही ठिकाणी आठ अशी होती. पुढे ती सोळा, बत्तीस, चौसष्ट अशी झाली. गुतकाळातील  सप्तमातृकांचे शिल्पांकन उदयगिरी (म.प्र.) येथे दिसते. परंतु ओळखण्यापलीकडे त्याची अवस्था गेली आहे. 
      वेरुळमध्ये रावण की खाई (लेणे क्र. १४), यज्ञशाळा (क्र. १६) आणि रामेश्वर (क्र. २१) येथे यांचे सुरेख शिल्यांकनआहे. लेणी क्र. १४ तील शिल्पांकन अंधाऱ्या जागेत असल्यामुळे ते सहज दिसत नाही. कैलास मंदिरातील यज्ञशालेमध्ये असलेल्या शिल्पांकनात बहुतेक मातृकांची मस्तके तोडण्यात आली असून तेथे मातृकांबरोबरच माणिकावती राणीचेही शिल्पांकन केलेले दिसते. या राणीच्या हट्टामुळे  (कैलास) मंदिराची निर्मिती झाली असे म्हणतात. याच शिल्पपटातील काली ही कालाला टेकून बसली असून दोन प्रेतांवर आरूढ असलेल्या कालाचे शिल्पांकन आहे.

 चित्र क्र. १०४ : काल आणि काली, यज्ञशाला,    कैलास मंदिर, वेरूळ

      कालाच्याखालील मानवी शरीरे ही प्रेतेच आहेत आणि डोळे बंद करून झोपलेली माणसे नाहीत हे दाखविण्यासाठी कलाकाराने त्याचे कसब पणाला लावलेले दिसते. त्याने या दोन्ही देहांचे डोळे मिटलेले दाखवले असून त्यांना पूर्ण नम्न कोरले आहे आणि एवढेच नाही तर त्यातील एका प्रेताच्या मांडीचा लचका तोडताना एका लांडग्याचे तोंडही अत्यंत कल्पकतेने कोरलेले आहे. रामेश्वर लेणे (क्र. २१) मधील नटराजाच्या शिल्पाशेजारी गणपती आणि वीरभद्र यामध्ये बसलेल्या सप्तमातृका कोरल्या आहेत. डावीकडून अनुक्रमे ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णचं, चाराही, इंद्राणी आणि चामुंडा या असून प्रत्येकीच्या मांडीवर एक मूल आहे. एका मातेने (वाराहीने) मात्र त्याला खाली उतरवले आहे. चकित झालेले मूल आईकडे पाहते आहे. आई मात्र सुटकेच्चा निःश्वासाने केस सावरते आहे. तिने मानेला दिलेला झटका कलाकाराने हुबेहूब कोरला आहे. असामान्य कला प्रतिभेचे ते द्योतक आहे. तिच्या डोळ्यातील तिला असणारी सौंदर्याची मग्रुरी काळीज छेदणारी आहे. या सवं मातृका अत्यंत सुडौल आणि सौष्ठवपूर्ण कोरल्या आहेत
    ऐहोळे (कर्नाटक) येथील रावण पहाडी या मंदिरात आणि महाबलीपुरम् (तामिळनाडू) येथील लेणी मंदिशा या मातृका उभ्या असलेल्या कोरल्या आहेत. यातील बाराही या मातृकेला चक्क वराहाचेच तोंड असल्याचे दाखविले आहे.प्रत्येकीची केशरचना, दागिने व वस्त्रं वेगवेगळी आहेत.

चित्र क्र. १०५ : बाराही, रामेश्वर लेणे, वेरूळ

चौसष्ट योगिनी :-

     अग्नि पुराणात यांचा 'आकाश मातृका' असा उद्देश येतो, ज्यामध्ये या केवळ सही रूप घेऊनच नाही तर पशुपक्षी किंवा कीटकांच्या रूपानेही त्या सर्वत्र संचार करतात. काही मातृका या रौद्र असतात, तर काही सौम्य असतात. यांची उपासना तांत्रिक पंथांतर्गत येते, ज्याचा हेतू शत्रूवर विजय, अस्मानी संकटापासून रक्षण, पुत्रप्राप्ती तसेच अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी असतो. हीरापूरच्या (ओडिशा) मंदिरात आजही जारण मारण, करणी करणे यासारखे विधी सुरू असतात.
       चौसष्ट योगिनींची नावे - १. बहुरूपा २. तारा ३. नर्मदा ४. यमुना ५. शांती ६. वारुणी ७. क्षेमकारी ८. ऐन्द्री ९. वाराही १०. रणवीरा ११. वानरमुखी १२. वैष्णवी १३. कालरात्री १४. वैद्यरूपा १५. चर्चिका १६. बेताली १७. छिन्नमस्तिका १८. वृषभवाहना १९. ज्वालाकामिनी २०. घटवरा २१. करकाली २२. सरस्वती २३. विरूपा २४. कावेरी २५. भालुका २६. नारसिंही २७. विराजा २८. विकटन्ना २९. महालक्ष्मी ३०. कौमारी ३१. महामाया ३२. रती ३३. करकरी ३४. सर्पाश्या ३५. यक्षिणी ३६. विनायकी ३७. विद्यबालिनी ३८. वीराकुमारी माहेश्वरी ४०. अंबिका ४१. कामायनी १२. पातवारी ४३. स्तुती ४४. काली ४५. उमा १६. नारायणी ४७. समुद्रा ४८. ब्रह्माणी १. ज्वालामुखी ५०. आग्नेयी ५१. अदिती १२. चंद्रकांती ५३. वायुवेगा ५४. चामुंडा * मुराति ५६. गंगा ५७. धूमावती ५८. गांधारी ११. सर्वमंगला ६०. अजिता ६१. सूर्यपुत्री १२. वायुवीणा ६३. अघोरा ६४. भद्रकाली. नवंतराय: २००८,५.४९-११३).

चित्र क्र. १०६ : वाराही, चौसष्ठ योगिनी मंदिर, हीरापुर

चित्र क्र. १०७ : योगिनी, रानी की वाव, पाटण
 
बौसष्ट योगिनींची शिल्पे ही चौसष्ट योगिनींच्या मंदीरात आढळतात. ही मंदिरे भारतामध्ये संख्येने थोडी असून सर्व मूर्ती जागेवर आणि उत्तम स्थितीत असणारे ओडीशामधील हीरापूर येथील एकमेव मंदिर आहे. याशिवाय रीखीया आणि लोखारी (बांदा जिल्हा), दूधही (दलीपूर, उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर जवळ मिताली आणि नरेसार, जबलपूरजवळ भेडाघार, शाहडोलजवळ त्रिपुरी, रीबाजवळ गुर्गी आणि खजुराहो (सर्व मध्य प्रदेश) येथे ही मंदिरे आहेत.
      याशिवाय योगिनींची स्वतंत्र शिल्पे अनेक मंदिरांमध्ये आढळतात. तपस्विनींच्या रूपामध्ये या कोरलेल्या असतात आणि त्यांच्या हातामध्ये खटवांग नावाचे आयुध असते. एका छोट्या काठीवर मानवी कवटी असे हे आयुध असते. योगिनीप्रमाणेच अनेक मंदिरांमध्ये विषकन्यांचीही शिल्पे दिसतात या मूर्तीमध्ये मांडी भोवती, कमरेभोवती, दंडाभोवती किंवा गळ्याभोवती नाग गुंडाळलेले असतात. तसेच एका किंवा दोन्ही हातात सर्प धरलेली किंवा सर्पाशी खेळणाऱ्या स्त्रीमूर्तीची शिल्प असतात. बहुतांशी शिल्पांमध्ये या विषकन्या पूर्णपणे विवस्त्र दाखविलेल्या असतात. धर्मापुरी (जिल्हा बौड) येथील ११ व्या शतकातील मंदिरात केवळ अलंकारणाने वस्त्रांकन असणाऱ्या विषकन्येचे अत्यंत सुरेख शिल्प आहे. खिद्रापूर (जिल्हा कोल्हापूर) येथल्या कोपेश्वर मंदिरात विषकन्यांबरोबरच भैरवीचेही शिल्प दिसते. येथील एक विषकन्या देहुड्या पाउली उभी असून दोन्ही हात तिने डोक्यावर घेतले असून गळ्यातल्या माळा एवढेच तिचे वस्त्र असून तिच्या मांडीला नागाने विळखा घातला आहे. खिद्रापूर येथील विषकन्यांच्या शिल्पांमध्ये एक किंवा अधिक नागांचा अंगाभोवती विळखा असलेल्या नग्न युवतींचे शिल्पांकन दिसते.

नागकन्यांची उल्लेखनीय शिल्पे

पानगाव (जिल्हा लातूर) :-
   येथील विठ्ठल मंदिरात (इ.स. ११वे शतक) एका नागकन्येने तिच्या उजव्या हातामध्ये एका प्रचंड नागाला अलगद पकडलेले आहे, तिचा डाव हात डोक्यावरती असून त्यावर एक मुंगुस बसले आहे. मुंगुस आणि साप हे परस्परांचे जन्मजात शत्रू. त्या दोघांनाही तिने एकाच वेळेस लीलया ताब्यात ठेवले आहे. तो मुंगुस अशा पद्धतीने दबा धरून बसलेला आहे की कधी तिचे लक्ष उडते आणि तो सापावर झेपावतो. तर तो नाग तिच्या दोन बोटांच्या चिमटीतून सुटण्यासाठी तोंड उघडून सळसळतो आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या नजरेतून स्पष्ट दिसतो आहे.

चित्र क्र. १०८ : नागकन्या विठ्ठल मंदिर, पानगाव

 नागकन्यांच्या मालिकेतील सर्वोत्तम शिल्प हे राणी की बाव, पाटण येथे आहे. पूर्णाकृती असलेल्या ह्या शिल्पामध्ये तिच्या दंडावर आणि मनगटावर रुद्राक्षाच्या दोन बांगड्या आणि गळ्यात रुद्राक्षांचीच एक कंठी एवढेच तिच्या अंगावर आहेत. तिच्या उजव्या हातात एक वाटी असून त्यात एक मासा आहे, ज्याचे प्रलोभन ती एका महाभयंकर सर्पाला देते आहे. ज्याचे तोंड त्या वाटीजवळ असून त्या सपनि तिच्या मागून त्याच्या शेपटीचे वेटोळे तिच्या डाव्या मांडी भोवती गुंडाळलेले आहे. तिचा डावा हात तिने त्याच्यावर उगारलेला आहे. तिच्या पायामध्ये एक मोर आहे. इथेही या दोन जन्मजात शत्रूना लीलया नियंत्रणात ठेवणाऱ्या या विषकन्येचे हे अप्रतिम असे शिल्पांकन आहे. तिच्या ओटीपोटावर दोन आडव्या वळ्या आहेत, ती कुमारिका नसल्याचे ते लक्षण आहे. तिच्या डोक्यावर अशुभदर्शक तीन घुबडे कोरलेली आहेत. शरीर शास्त्राच्या दृष्टीने आणि तिच्या हालचालींना पोषक असे शरीराच्या अंगोपांगाचे बारकावे थक्क करणारे आहेत. या उन्मुक्त आणि अनावृत अशा रूपाच्या प्रथमदर्शी मोहात जरी कोणी पडले तरी त्याने ती एक विषकन्या आहे याचे स्मरण ठेवावे.

चित्र क्र. १०९ : नागकन्या, रानी की वाव, पाटण

 *शक्ती रुपे*


भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

    रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .

१)महालक्ष्मी


सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .


२)नंदा

ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.


३)क्षेमकरी

चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.


४) शिवदुती

ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .


५)महाचंडी

ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .


६)भ्रामरी

ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.


७)सर्वमंगला

चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .


८)रेवती

दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .


९) हरिरिध्द

ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.

अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .

सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे  एका श्लोकामधे सांगितली आहे .


प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।

तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥

पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।

साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥

नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।

उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥


वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'


माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'


व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'


व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'


सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'


सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'


गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '


नंदी वाहन असलेली 'महागौरी '


कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'


ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा

ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.

भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.

संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून

सप्तमातृका

 आशुतोष बापट

आपल्या पुराणांमध्ये  कथांच्या माध्यमातून वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. वराहपुराणदेखील सप्तमातृकांच्या माध्यमातून असेच मोठे तत्त्वज्ञान मांडते.

एखादे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहजगत्या समजावे म्हणून विविध पुराणांमधून कथा रचल्या गेल्या. त्या कथा एखाद्या देवतेच्या जन्माच्या किंवा एखाद्या देवतेने एखाद्या राक्षसावर मिळवलेल्या विजयाच्या असतात. बरीचशी पुराणे ही त्या त्या देवतेच्या सामर्थ्यांची वर्णने करतात. पुराणांतून काही सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. सप्तमातृका ही संकल्पना मातृका, मातृदेवता इथपासून ते महादेवाला अंधकासुरवधाच्या वेळी मदत करण्यासाठी विविध देवांनी आपल्यापासून निर्माण केलेल्या शक्ती इथपर्यंत विस्तृतपणे वर्णिलेल्या दिसतात. वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांबद्दल कथा सांगतात. त्यात बरीचशी सुसंगती असली तरी काही ठिकाणी विपर्यास किंवा काहीशी वेगळी कथा सांगितलेली दिसते. या सर्व पुराणांत वराहपुराण सप्तमातृकांची कथा सविस्तर सांगते. ती पुढीलप्रमाणे-

कश्यपाला दितीपासून दोन पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपु. त्या दोन्ही असुरांना विष्णूने अनुक्रमे वराह अवतार घेऊन आणि नरसिंह अवतार घेऊन ठार मारले. हिरण्यकशिपुचा मुलगा प्रल्हाद हा तर महान विष्णुभक्त होताच. प्रल्हादाने हिरण्यकशिपु नंतर उत्तम राज्यकारभार केला आणि नंतर सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेतला. त्यानंतर असुरांचा राजा झालेला अंधकासुर यानेही कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून विविध वर प्राप्त करून घेतले आणि त्यामुळे तो शक्तिशाली बनला. अर्थातच तो उन्मत्त झाला आणि सर्व देवांना त्रास देऊ लागला. देवांनी मदतीसाठी कैलासावर महादेवाकडे धाव घेतली. शंकर भगवान या सर्व देवांची तक्रार ऐकत असतानाच प्रत्यक्ष स्वत: अंधकासुर, पार्वतीचे अपहरण करण्याच्या हेतूने कैलासावर दाखल झाला. शिव तत्काळ अंधकासुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी लगोलग वासुकी, तक्षक, आणि धनंजय या तीन नागांचा बंध आपल्या कमरेभोवती बांधला. त्याच वेळी नील नावाचा अजून एक राक्षस महादेवाला मारण्यासाठी हत्तीच्या रूपात तिथे येऊन ठेपला. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला हे समजले आणि त्याने शिवाचाच अंश असलेल्या वीरभद्राला याची कल्पना दिली. वीरभद्राने सिंहाचे रूप घेतले आणि त्याने हत्तीच्या रूपातील नील राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्याने हत्तीचे कातडे शिवाला भेट दिले. शिवाने ते कातडे अंगावर पांघरले आणि तो अंधकासुराशी युद्ध करण्यास सज्ज झाला. अंगावर हत्तीचे कातडे पांघरलेले, सर्पाची आभूषणे अंगावर ल्यालेली, हातात त्रिशूळ धारण करून शिव आपल्या गणांसमवेत अंधकासुराशी युद्ध करू लागला. विष्णू आणि इतर देवगण शिवाच्या साहाय्याला धावून आले. परंतु घनघोर युद्ध सुरू झाले आणि इतर देवांना तिथून पळून जावे लागले. शेवटी शिवाने आपला त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आणि त्याला उंच उचलून घेतले.

परंतु अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे थेंब गळू लागले. ते थेंब जमिनीवर पडताच त्यातून एकेक अंधकासुराच्या रूपातील राक्षस निर्माण होऊ लागला. अशा रीतीने हजारो अंधकासुर तिथे निर्माण झाले. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने हे इतर मायावी अंधकासुरांना ठार मारले. अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे आणखी थेंब जमिनीवर पडू नयेत म्हणून शिवाने आपल्या तोंडातून ज्वाळा निर्माण केल्या आणि त्या ज्वाळेतून योगेश्वरी नावाची एक शक्ती निर्माण केली. त्याबरोबर इंद्र आणि इतर देवतांनीही आपापली शक्ती निर्माण करून ती शिवाच्या मदतीला तिथे पाठवली. ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची शक्ती इंद्राणी/ऐन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, आणि यमाची शक्ती चामुंडा अशा या सात शक्ती देवता तिथे उत्पन्न झाल्या. त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. त्या शिव आणि अंधकासुर यांच्या युद्धात मध्ये आल्या आणि त्यांनी अंधकासुराच्या अंगातून होणारा रक्तस्राव आपल्या शक्तीने थांबवला. या लढाईत शेवटी अंधकासुराची शक्ती संपत आली आणि शिवाने त्याचा पराभव केला. अशा रीतीने या सप्तमातृकांचा उदय झाला. या मातृकांच्या हातात त्या त्या देवाची आयुधे होती. तसेच त्या मातृका त्या त्या देवतांच्या वाहनांवर बसून आलेल्या होत्या.

वराहपुराणात विस्तृतपणे मांडलेली ही आहे सप्तमातृकांची कथा. विविध पुराणांमधून मातृका, त्यांचा उगम, त्यांचे कार्य याबद्दल कथा वाचायला मिळतात. त्यात वराह, विष्णू, मत्स्य, कूर्म आणि देवीपुराणाचा समावेश होतो. तसेच शिल्पशास्त्रावर आधारित असलेल्या ‘सुप्रभेदागम’ या ग्रंथातही मातृकांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वराहपुराणात वर उल्लेख केलेली अगदी विस्तृत कथा पाहायला मिळते. शिवाय इतर सर्व पुराणांत या मातृकांची संख्या सात सांगितलेली असताना वराहपुराण मात्र ही संख्या आठ असल्याचे सांगते. सर्वात आधी उल्लेखिलेली योगेश्वरी ही देखील एक मातृका आहे असे वराहपुराणात म्हटलेले आहे.

अंधकासुराशी साम्य दाखवणारी अशीच एक कथा मरकडेयपुराणात येते. त्यानुसार शुंभ नावाच्या राक्षसाशी अंबिकेचे युद्ध झाले. त्या युद्धात अंबिकेला या मातृकांनी मदत केली. कारण शुंभ दैत्याला वर मिळालेला होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यातून अजून एक असुर निर्माण होईल. त्याच्या रक्ताचे थेंब या मातृकांनी वरच्यावर धरून ठेवले आणि शुंभाचा निपात केला. असुराचा मोठय़ा प्रमाणावर रक्तपात झाला आणि त्यामुळे तो हतबल होऊन पराभूत झाला. अगदी शिव-अंधकासुर युद्धासारखीच ही कथा आहे. अंधकासुराची कथा पुढे वाढवली आहे ती कूर्मपुराणाने. अंधकासुराच्या वधानंतर शिवाने भरव आणि या मातृकांना पाताळलोकात जाऊन वास्तव्य करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी पाताळलोकात प्रयाण केले. परंतु भरव जो शिवाचाच अंश होता तो शिवामध्ये विलीन झाला. मातृकांना आता कोणताही आधार राहिला नाही आणि त्या विध्वंसक बनल्या. त्यांनी सर्वत्र विध्वंस करायला सुरुवात केली. शेवटी भरवाने नरसिंहाला पाचारण केले आणि त्या मातृकांना शांत करण्यास सांगितले. नरसिंहाने त्या मातृकांना शांत केले आणि तेव्हापासून त्यांचे स्वरूप हे उपकारक बनले. अशा विविध पुराणांतून या सप्तमातृकांचे आगळेवेगळे पलू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वत्र एक मुख्य धागा समान दिसतो की कोणा दैत्याच्या निर्मूलनासाठी विविध सात देवतांनी आपल्या शक्ती महादेवाच्या मदतीसाठी निर्माण केल्या, आणि त्या पुढे सप्तमातृका म्हणून प्रसिद्ध झाल्या. अनेक अभ्यासकांनी मातृकांचा अभ्यास करताना त्यांचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून मिळतात असेही प्रतिपादन केलेले आहे. त्यावर मतमतांतरेदेखील आहेत. पण या सप्तमातृका पुढे मूर्तीरूपात आल्या आणि त्या प्रसिद्ध झाल्या. बदामीचे चालुक्य आणि त्यांच्या नंतरचे कल्याणी चालुक्य या सप्तमातृकांचे उपासक होते. त्यांच्या मंदिरस्थापत्यात सप्तमातृका पट्ट प्रकर्षांने पाहायला मिळतात. या मातृकांची संख्या सात असली तरी काही ठिकाणी ती आठ, १६, ३२ झालेली दिसते. या सातमातृकांच्या शिवाय माहेन्द्री, नारसिंही, वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, काली, योगेश्वरी यांचे शिल्पांकनदेखील पाहायला मिळते.

शक्ती हा शब्द लिहिताना ‘ती शक्ती’ या उद्देशाने वापरला असल्यामुळे, हा शब्द स्त्रीिलगी आहे हे वाचल्यावर लगेच समजते. परंतु मूर्ती घडवताना मात्र त्यांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी त्या मूर्ती स्त्रीरूपात घडवल्या जातात. आकर्षक आणि नेमक्या सप्तमातृकांच्या मूर्ती विविध मंदिरांमधून दिसतात. त्या मूर्ती कशा तयार कराव्यात याचे काही एक शास्त्र आहे. शिल्पशास्त्राची माहिती देणाऱ्या विविध आगम ग्रंथांमधून या सप्तमातृकांच्या मूर्ती, त्यांची ठेवण, त्यांची वाहने यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यानुसार ब्रह्माणी ही ब्रह्मदेवासारखी, वैष्णवी ही विष्णूसारखी अशा रीतीने त्या त्या देवाच्या शक्ती या त्या त्या देवतेनुसार शिल्पांकित केल्या गेल्या पाहिजेत. ब्रह्माणी म्हटले की तिचे वाहन आणि तिची आयुधे हे ब्रह्मदेवासारखी असायला हवीत. मग ब्रह्माणी शिल्पांकित करताना स्त्रीप्रतिमा जी बसलेल्या स्थितीत आहे. जिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. जिच्या वरच्या पाठीमागील हातात सुळा आणि अक्षमाला असून, तिचा उजवा हात अभय मुद्रेत तर दावा हात वरद मुद्रेत असावा. तिचे वाहन हंस दाखवलेले असावे आणि तिच्या मस्तकी जटामुकुट दाखवावा. हे असे पाहिले म्हणजे ही प्रतिमा ब्रह्माच्या शक्तीची आहे असे समजते. या सर्व मातृकांचा उजवा हात हे अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत दाखवलेला असतो. पाठेमागे असलेल्या दोन हातात आयुधे असतात. आणि पायाशी त्या त्या देवतेची वाहने असतात. वैष्णवी असेल तर पाठीमागच्या हातात शंख आणि चक्र तर पायाशी गरुड, डोक्यावर किरीट मुकुट. इंद्राणीच्या वरच्या हातात वज्र आणि शक्ती तर पायाशी वाहन हत्ती. तिचा रंग लाल तर डोक्यावर किरीट. विष्णूधर्मोत्तरपुराणानुसार तिला सहस्त्र नेत्र आणि तिचा रंग सोनेरी असावा.

चामुंडा शिल्पित करताना अत्यंत भयावह अशी दाखवलेली असते. केस अस्ताव्यस्त पिंजारलेले, शरीरावर मांस नाही. सगळ्या बरगडय़ा दिसताहेत, पायाचे स्नायू दिसतात. तिने मुंडक्यांचा मुकुट परिधान केलेला आहे. एका हातात मुंडके आणि दुसऱ्या हातात कपाल धरलेले. तिचे सुळे बाहेर आलेले दिसतात. कधी कधी तिच्या पोटावर विंचू शिल्पित केलेला असतो. मानवी शव हे तिचे वाहन असून ती त्यावर उभी दाखवतात. पूर्वकरणागम या ग्रंथानुसार तिचे तोंड उघडे दाखवतात आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर दाखवतात. तिचे वाहन घुबड असते तर तिच्या ध्वजावर गरुड असतो. माहेश्वरी शिल्पांकित करताना तिच्या वरच्या दोन हातांत शूल आणि अक्षमाला असते, तिचा मुकुट हा जटामुकुट असतो तर तिचे वाहन नंदी असतो. विष्णुधर्मोत्तरपुराणानुसार तिला पाच तोंडे दाखवलेली असतात, त्या प्रत्येकाला तीन डोळे दाखवलेले असतात. तिचा रंग पांढरा असून तिच्या सहा हातात सूत्र, डमरू, शूल आणि घंटा तर पुढचे दोन हात वरद आणि अभय मुद्रेत दाखवलेले असतात. कुमार म्हणजेच कार्तिकेयाची शक्ती कौमारी शिल्पांकित करताना तिच्या दोन हातांत शक्ती आणि कोंबडा दाखवतात. उर्वरित हात अर्थातच अभय आणि वरद मुद्रेत असतात. वाराही दाखवताना तिचे तोंड वराहाचे असते. तिच्या दोन हातांत हल आणि शक्ती असते तर तिच्या मस्तकी करंडमुकुट असतो. विष्णुधर्मोत्तरपुराण या तपशिलात काही गोष्टींची भर घालते. त्यानुसार तिला सहा हात असून त्यात दंड, खड्ग, खेटक आणि पाश असतात. उर्वरित दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. पूर्वकरणागमानुसार तिच्या हातात शारंग धनुष्य दाखवलेले असते. तसेच अनेक ठिकाणी या सप्तमातृकांच्या शेजारी असलेला वीरभद्र हा वीणावादन करताना दाखवलेला असतो.

सप्तमातृकांची वाहने, आयुधे त्याचे मुकुट यांची माहिती असल्यावर आपल्याला विविध मंदिरांमधून शिल्पांकित केलेले सप्तमातृकापट्ट पाहताना त्यांची तपशीलवार माहिती होते. कर्नाटकात विविध मंदिरांमधून हे पट्ट पाहायला मिळतात. सागर या गावाजवळ असलेल्या केळदी या गावी असलेल्या मंदिरात सुंदर असा सप्तमातृका पट्ट दिसतो. महाराष्ट्रातसुद्धा मुख्यत्वे मराठवाडय़ात हे असे सुंदर आणि देखणे सप्तमातृकापट्ट मंदिरांतून पाहायला मिळतात. लातूर इथल्या मंदिरात असाच सुंदर सप्तमातृका पट्ट आहे. तसेच धर्मापुरी इथे असलेल्या किल्ल्यात पूर्वी एखादे मंदिर असावे. त्या मंदिरांचे अवशेष त्या किल्ल्यात तटबंदीमध्ये वापरलेले दिसतात. त्या अवशेषातच एक सुंदर सप्तमातृकापट्ट पाहायला मिळतो. सप्तमातृकांच्या शेजारी एका बाजूला वीरभद्र तर दुसऱ्या बाजूला गणपती कोरलेला असतो. गणपती हा गणांचा अधिपती असल्यामुळे या सप्तमातृकांच्या बाजूला त्याचे शिल्पांकन केलेले असते. सप्तमातृकांची सर्वात भव्य आणि मोठी शिल्पे आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये पाहायला मिळतात. वेरूळच्या कैलास लेणीत यज्ञशाळा म्हणून ठिकाण आहे. तिथे भव्य आकाराच्या सप्तमातृका कोरलेल्या पाहायला मिळतात. पण त्या खूपच भग्न झालेल्या आहेत. इथे त्या सप्तमातृकांसोबत राणी माणकावतीचे शिल्पसुद्धा आहे. इथल्या रामेश्वर लेणीत (लेणी क्रमांक २१) सप्तमातृकांचे भव्य शिल्प पाहायला मिळते. अतिशय देखण्या, डौलदार सप्तमातृका या लेणीमध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात. मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे. काही शिल्पे भग्न झालेली दिसतात तरीसुद्धा त्यांचे सौंदर्य काही कमी होत नाही. इथे सप्तमातृकांच्या मधोमध गणपती शिल्पित केलेला आहे. खूप सुंदर अशा या मातृकांच्या पायाशी त्यांची वाहने आणि हातात विविध आयुधे दाखवलेली आहेत.

शेजारी बसलेल्या सप्तमातृका  हे सगळीकडे दिसतेच, परंतु महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्य़ात मुखेड गावी दाशरथेश्वर मंदिराच्या बाह्य़िभतींवर नृत्य करणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर कल्याणी चालुक्यांच्या राजवटीमधले आहे. अतिशय सुंदर अशा या मातृका काहीशा भग्न झालेल्या आहेत. मात्र त्यांचा आवेश, नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव निव्वळ देखणे आहेत. सप्तमातृकांचे अगदी निराळे  या ठिकाणी पाहायला मिळते.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात त्या म्हणजे एखादे गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसांना सांगायचे असेल तर ते विविध कथांद्वारे सांगितले जाते. पुराणेसुद्धा आपल्याला अनेक देवदेवता, राक्षस यांच्या कथा सांगतात मात्र त्या पाठीमागे काही ना काही तत्त्वज्ञान सांगायचे असते. सप्तमातृकांच्याद्वारे वराहपुराण असेच एक मोठे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडू पाहते आहे. त्यानुसार शिव, अंधकासुर किंवा या मातृका ही सगळी रूपके आहेत. ती आपल्या मनाच्या विविध अवस्थांची प्रतीके म्हणून पाहायला हवीत. शिव आणि अंधकासुराचे युद्ध म्हणजे आत्मविद्या किंवा आत्मज्ञान आणि अज्ञानरूपी अंधकार यांचे युद्ध समजले गेलेले आहे. तसेच हे पुराण पुढे असेही सांगते की या सात मातृका म्हणजे मानवी स्वभावाचे दोष सांगितलेले आहेत. योगेश्वरी हे काम अथवा इच्छा, महेश्वरी हे राग-क्रोध, वैष्णवी हे लोभ, ब्रह्माणी मद, कौमारी मोह, इंद्राणी मत्सर, वाराही असूया आणि चामुंडा हे पशुत्व याचे प्रतीक आहेत. ज्ञानरूपी शिवाने हे सगळे दोष आपल्या काबूत ठेवले आणि त्यामुळे त्याला अज्ञानरूपी अंधकासुरावर विजय मिळवता आला. मनाचे हे सगळे कंगोरे जरी असले तरी ते काबूत ठेवून योग्य दिशेने त्यांचा वापर केला तर अज्ञानरूपी अंधकाररूपी अंधकासुराचा नायनाट करणे सर्वसामान्य व्यक्तीलादेखी सहज शक्य असते. गहन तत्त्वज्ञान सरळ सोप्या गोष्टींमधून लोकांसमोर मांडायचे पुराणांचे हे कसब म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे.

(संदर्भ : एलिमेंट ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी- टी. ए. गोपीनाथ राव)

देवी विशेष
जय पाटील – response.lokprabha@expressindia.com

देवदेवतांच्या आपल्या मनातील कल्पना कशा तयार झाल्या, याचा मागोवा घेताना आपण विविध चित्रे, मूर्ती, शिल्पांपर्यंत पोहोचतो. देशाच्या निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या पारंपरिक कलाप्रकारांत शक्तीची अर्थात देवीची विविध रूपे प्रतिविंबित झालेली दिसतात. स्थल-कालानुसार त्यात बदलही होत गेल्याचे दिसते.

देवी कधी एखाद्या गुंफेत रेखाटलेल्या प्राचीन चित्रांतून दर्शन देते, कधी एखाद्या पुरातन मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेली दिसते, कधी एखादे पट्टचित्र व्यापून उरते, कधी लघुचित्रांमधील नजाकतदार आकृतींतून लक्ष वेधून घेते, कधी ती धातूच्या डौलदार मूर्तीतून प्रकट होते, कधी सांकेतिक यंत्राच्या रूपात तर कधी एखाद्या नवचित्रकाराच्या कुंचल्यातून उमटते. शक्तिरूपाविषयीच्या मानवी संकल्पना कशा विकसित होत गेल्या असाव्यात, याचा अजमास बांधण्यासाठी ही चित्र-शिल्पे आपल्याला साहाय्य करतात.

देवीविषयीच्या श्रद्धा-परंपरांवर ‘मरकडेय पुराणा’तील ‘देवीमाहात्म्या’चा प्रभाव सर्वाधिक दिसतो. देवीच्या सध्या उपलब्ध असलेल्या अनेक चित्र-शिल्पांतून याच माहात्म्यातील कथा कथन केलेल्या दिसतात. सृष्टीच्या तीन अवस्थांचे वर्णन करणाऱ्या देवीमाहात्म्याच्या पहिल्या भागात सृष्टीचा रचनाकार ब्रह्माचा वध करण्यासाठी मधु आणि कैतभ हे दोन दैत्य निघालेले असतात. ब्रह्मा विष्णूला रक्षणाची विनंती करतो. मात्र महामायेच्या प्रभावामुळे विष्णू निद्रिस्त असतो. महामायेने आपला प्रभाव दूर करावा, यासाठी ब्रह्मा तिची आराधना करतो. विष्णू निद्रेतून जागा होतो आणि दैत्यांना पराभूत करतो. दुसऱ्या भागात पाशवी शक्तींच्या रूपात महिषासुर दाखवण्यात आला आहे. त्याचा अडथळा दूर करण्यासाठी देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात अवतीर्ण होते. तिच्या विकट हास्याने धरणी हादरते. त्यामुळे चिडलेला महिषासुर वाघ, हत्ती आणि म्हशीचे रूप घेऊन देवीवर आक्रमण करतो. तरीही देवी त्याचा वध करते. तिसरा भाग आहे शुंभ निशुंभाच्या पराभवाचा. यात असुरांनी सर्व रत्नांवर ताबा मिळवलेला असतो, मात्र सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे देवी, हे त्यांच्या लक्षात येते. असुरांना देवी मिळावी, म्हणून ते प्रयत्न सुरू करतात. युद्धात जो माझा पराभव करील, त्याला मी प्राप्त होईन, असे आवाहन देवी करते. तिला आणण्यासाठी चंड आणि मुंड या दैत्यांना पाठवण्यात येते. मात्र देवी कालीचे उग्र रूप धारण करते. तिच्या हाती छाटलेले मुंडके आणि तलवार असते. गळ्यात मानवी मुंडक्यांची माळ असते. तिची त्वचा काळसर झालेली असते. देवी त्यांना पराभूत करून अजिंक्य राहते. चंड-मुंडाला पराभूत केल्यामुळे ती चामुंडा म्हणूनही ओळखली जाते.

या कथा कधी लघुचित्रांच्या तर कधी शिल्पांच्या रूपात समोर येतात. यातील महिषासुरमर्दिनीचे रूप अनेक चित्र-शिल्पांत दिसते. सहाव्या शतकातील महिषासुरमर्दिनीचे शिल्प महाराष्ट्रातील घारापुरी येथे आढळले आहे. बेसाल्ट खडकातील हे शिल्प भग्नावस्थेत आहे. मध्य प्रदेशात आढळलेले नवव्या शतकातील शिल्प मात्र उत्तम स्थितीत आहे. वालुकाश्मात कोरलेल्या या शिल्पातील देवीला चार भुजा आहेत, त्यापैकी एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात तलवार आहे. ती महिषासुरावर आरूढ झाली असून आकाशातून देव हे दृश्य पाहात आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील गुलेर शैलीतील एका चित्रात देवी महिषासुराचा वध करताना दिसते. यात अष्टभुजा देवी वाघावर आरूढ होऊन महिषासुरावर त्रिशूळ उगारलेल्या स्थितीत दिसते. तिचा वाघ बैलाच्या पाठीवर उभा आहे आणि त्या बैलाचे तिने छाटलेले मुंडके बाजूलाच पडलेले आहे. तिच्या हातांत आसुड, तलवार, ढाल, त्रिशूळ, गदा, घंटा, धनुष्य अशी विविध अस्त्रे आहेत. ही सर्व अस्त्रे तिने महिषासुरावर रोखलेली आहेत. सर्व देव आकाशातून हे दृश्य पाहताना दिसतात. १७७० ते १७८० दरम्यानच्या एका चित्रातही हे दृश्य आहे. बंगालमध्ये आढळलेल्या एका शिल्पात महिषासुराचा वध अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आला आहे.

कर्नाटकात आढळलेल्या १०व्या शतकातील शिल्पात दुर्गा आसनस्थ दिसते. तिला चार भुजा असून त्यांपैकी एका हातात तलवार आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील एका चित्रात दुर्गेने शुंभ, निशुंभाशी केलेल्या युद्धाचे दृश्य चितारण्यात आले आहे. यातही दुर्गा अष्टभुजा रूपात असून वाघावर स्वार झाली आहे. युद्धातील तीन प्रसंग एकाच चित्रात दर्शवण्यात आले आहेत. महिषासुरवधाच्या चित्रात आणि या चित्रात देवीच्या हाती असलेली अस्त्रे जवळपास सारखीच आहेत. फक्त यात एका चित्रात देवी शंख फुंकताना दिसते. हे चित्र पंजाब हिल्स शैलीतील आहे.

याच ‘र्मकडेय पुराणा’त असलेल्या ‘भद्रकाली माहात्म्य’ किंवा ‘दारिका वधम्’ या भागात दारिकासुराचा वध करण्यासाठी देवीने भद्रकालीचे रूप घेतल्याची कथा आहे. त्यावर आधारित चित्रात देवी दारिकासुराचा वध करून त्याच्या पाठीवर उभी राहिलेली दिसते आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिचे गुणगान करताना दिसतात. १६६०-७०च्या दरम्यानचे हे चित्र बासोहली शैलीतील आहे.

अष्टलक्ष्मींपैकी एक असलेली गजलक्ष्मी देशात विविध शिल्पांत आणि चित्रांत पाहायला मिळते. तंजावर शैलीतील चित्रांत ती कमळावर पद्मासनात बसलेली दिसते. चार भुजा असलेल्या या देवीच्या वरच्या दोन हातांत कमळाची फुले आहेत. दोन्ही बाजूंना हत्ती आहेत. औरंगाबादमधील पितळखोरा येथे आढळलेल्या दुसऱ्या शतकातील शिल्पात गजलक्ष्मी कमळावर आसनस्थ दिसते. तिच्या दोन्ही बाजूंना हत्ती उभे असून ते जलाभिषेक करताना दिसतात. गुजरातमध्ये आढळलेल्या बाराव्या शतकातील शिल्पात मात्र तिने वरील दोन हातांमध्येच हत्ती पेललेले दिसतात. तिसऱ्या शतकातील नाण्यावर आढळलेली गजलक्ष्मीची प्रतिमा सध्या उपलब्ध असलेल्या प्रतिमांपैकी सर्वात जुनी प्रतिमा आहे. कोकण आणि गोव्यात ही देवी गजान्तलक्ष्मी, भाऊका, केळबाई या नावांनी ओळखली जाते. ही समृद्धीची देवता आहे. तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हत्तींच्या सोंडेतून जलाभिषेक होताना दिसतो. त्यामुळे काही भागांत तिची पर्जन्यदेवता म्हणूनही आराधना केली जाते.

काळाच्या विविध टप्प्यांत मौखिक परंपरा, लिखित साहित्यातून देवीची विविध रूपे भक्तांसमोर येत राहिली. संपत्ती, समृद्धी, विद्या, वंशवृद्धी, पर्जन्य, दुष्ट शक्तींपासून रक्षण अशा विविध उद्देशांनी कित्येक शतके शक्तीच्या या रूपांची पूजा केली गेली. त्याचे प्रतिबिंब विविध कलांतून उमटत राहिले. देवीची रूपे कलात्मक स्वरूपात मांडून अनेक अनामिक कलाकारांनी कलेचा इतिहास समृद्ध केला आहे.

हे

शोध महिषासुरमर्दनीचा!

भारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते. महिषासुरमर्दनिी, भवानी, कात्यायनी इत्यादी नावांनी लोकप्रिय असलेल्या या देवतेच्या मूर्तीच्या उगमाचा आणि विकासाचा पुरातत्त्वीय पुरावे, प्राचीन साहित्य, नाणी, शिलालेख आणि मूर्तीशास्त्र यांच्या आधारे घेतलेला हा वेध.

प्रागतिहासिक काळापासून मानव विविध रूपातील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची, स्त्रीरूपातील देवतांची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक येथे सापडलेल्या मातीच्या व दगडी प्रतिमा तीस ते अठ्ठावीस हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रतिमांना आता व्हीनस म्हणून ओळखले जाते. शताल हुउक (तुर्कस्थान), टेपे सरब (इराण), टेपे गवरा (इराक), मुंडिगाक (अफगाणिस्तान) इत्यादी ठिकाणांबरोबरच भारत व विद्यमान पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्ये मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. या मूर्ती साधारणपणे आठ ते चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. अर्थातच या मूर्ती वरील प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जात होत्या हे सांगणे शक्य नाही. पण संशोधक त्यांना मातृदेवता असे संबोधतात. दक्षिण भारतात आदिचन्नलूर येथे लोहयुग संस्कृतीतील मातृदेवतेची तांब्याची मूर्ती सापडली आहे. पुणे जिल्ह्यतील इनामगाव येथे झालेल्या उत्खननात एका मातीच्या छोटय़ा पेटीसारख्या आवरणात ठेवलेली स्त्रीदेवतेची मूर्ती सापडली होती. सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या मातृदेवतांच्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मौर्य, शुंग, कुशाण राजांच्या काळात इसवी सनापूर्वी तिसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक विविध अलंकारांनी सजलेल्या अशा देखण्या बनवल्या जाऊ लागल्या. याच काळातील स्थानिक स्त्रीदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या यक्षींच्या दगडी मूर्ती विदिशा, बारहूत, मथुरा, सांची येथे आढळल्या आहेत.

02-devi-lp

भारतात कुशाण राजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देवतांच्या पाषाणाच्या प्रतिमा निर्माण होऊ लागल्या होत्या. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या ब्रह्मा, विष्णू, आणि महेशाशी संबंधित देवतांच्या प्राचीन प्रतिमा उत्तरभारतात सर्वत्र आढळतात. विशेषत शैव आणि शाक्त पंथाशी संबंधित दुर्गा या देवीच्या अनेकविध प्रतिमा सापडतात. आगमग्रंथांनुसार तिची नऊ रूपे आहेत. त्याव्यतिरिक्त देवीचे महिषासुरमर्दनिी हे रूप भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीचा उदय आणि आतापर्यंत झालेला प्रवास जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

प्राचीन संस्कृत साहित्यातील संदर्भ

या दुर्गादेवीचे लिखित पुराव्यातील प्राचीनत्व शोधण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन वैदिक साहित्याचा संदर्भ तपासावा लागतो. ऋग्वेद व अथर्ववेद संहितांतील देवतांमध्ये इंद्र, मित्र, वरुण, अग्नि इत्यादी पुरुषदेवतांचे प्राबल्य आहे. याशिवाय अदिती, पृथ्वी, वाक्, श्री, यमी, उषा इत्यादी स्त्रीदेवता वेदांमध्ये आढळतात. परंतु कात्यायनी, पार्वती, उमा याची नावे या वेदांमध्ये येत नाहीत. कृष्ण यजुर्वेदाच्या तत्तिरीय आरण्यकात रुद्राच्या पत्नी म्हणून अंबिका आणि उमा यांचा उल्लेख येतो. याच तत्तिरीय आरण्यकात कात्यायनी, कन्याकुमारी, दुर्गी यांना एकाच देवीची नावे म्हणून संबोधले आहे. तसेच वरदा, वेदमाता इत्यादी स्त्रीदेवतांचाही उल्लेख केला आहे. परंतु या स्त्रीदेवतांचे महत्त्व काय होते हे सांगता येत नाही.

केनोपनिषदात रुद्रपत्नी उमेचा उल्लेख हैमवती म्हणजे हिमवत पर्वतातील मुलगी असा आढळतो. रुद्र या पर्वताशी संबंधित देव असल्यामुळे त्याची पत्नी हिमवत पर्वताशी संबंधित असणे साहजिकच आहे. उत्तर वैद्री काळातील हिरण्यकेशी गृह्य़सूत्र या ग्रंथामध्ये भवानी, दुर्गा, भद्रकाली या देवींची नावे येतात. तर बौधायन गृह्य़सुत्रात दुर्गाकल्पच आढळते. पारस्कर गृह्य़सूत्रातील ‘शूलगव’ यज्ञाच्या विधीत आहुती देताना शर्वाणी, भवानी इत्यादी देवशक्तींना आहुती द्यावी, असे वर्णन आढळते.

इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी याने रचलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात भवानी, शर्वाणी, रुद्राणी आणि मृडाणी यांचा उल्लेख आहे. शिवाच्या भव, शर्व, रुद्र आणि मृड या चार रूपांच्या शक्ती म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात या काळात त्यांचे किती महत्त्व होते ते मात्र कळत नाही.

03-devi-lp

इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नगराच्या मध्यभागी इतर देवतांबरोबरच मदिरा नावाच्या देवीचे मंदिर उभारावे असे सांगितले आहे. काही संशोधकांच्या मते मदिरा ही कृषीदेवता होती, तर काहींच्या मते ही दुर्गा असावी. या अर्थशास्त्र ग्रंथातच एके ठिकाणी तळघरांच्या दाराच्या चौकटीवर देवी प्रतिमा काढावी असे सांगितले आहे.

रामायणामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमेच्या काही उल्लेखांव्यतिरिक्त शक्तीपूजनाचे संदर्भ आढळत नाहीत. महाभारताच्या विराट आणि भीष्म पर्वात देवीचे स्तवन सापडते. महाभारतात ती विन्ध्यवासिनीच्या स्वरूपात येते.

भास या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराच्या नाटकांत कात्यायनी, दुर्गा इत्यादी देवींचे उल्लेख येतात. ‘स्वप्नवासवदत्त’ या भासाच्या प्रसिद्ध संस्कृत नाटकात पाटलीपुत्र येथे कात्यायनीचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. तसेच कात्यायनीने शुंभ, निशुंभ, महिष यांचा वध केल्याचे वर्णन येते. शुद्रकाने लिहिलेल्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायक चारुदत्त याला मारणाऱ्या चांडाळाची कुलदेवता म्हणून दुग्रेचा उल्लेख आहे. दन्डीने लिहिलेल्या ‘दशकुमारचरित’ या संस्कृत ग्रंथात दुग्रेचा उल्लेख ‘विन्ध्यवासिनी दुर्गा’  म्हणून अनेकदा येतो. तिच्या आशीर्वादाने एका राजाला अपत्यप्राप्ती झाल्याचा उल्लेख आहे तसेच तिचे मंदिर असल्याचाही उल्लेख या ग्रंथात येतो.

‘हर्षचरित’ या बाणाभट्ट लिखित गद्यपद्यमिश्रित संस्कृत काव्यात हर्षांच्या दरबारात जाताना वाटेतील एका मल्लकूट गावाच्या बाहेर ‘चंडी कानन’ म्हणजे चंडीचे अरण्य असल्याचा उल्लेख येतो. या अरण्यातील झाडांवर कात्यायनी देवीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या व वाटसरू या प्रतिमांना वंदन करत असे वर्णन बाणाभट्ट याने केले आहे. बाण याने लिहिलेल्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथात एक चंडीचे देऊळ असल्याचा व तेथे एक द्रविड पुजारी असल्याचा उल्लेख आहे. याच ग्रंथात राणी अपत्यप्राप्तीसाठी चंडिकेची उपासतापास करून आराधना करते असे दर्शविले आहे.

याशिवाय विविध पुराणातून दुग्रेची तसेच महिषासुरमर्दनिीची महती वर्णिलेली आहे. वामन पुराणात महिषासुराची वधाची कथा येते. या कथेनुसार महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. पण या कथेचे शुंभनिशुंभ वधकथेशी खूप साम्य आहे. त्यावरून पुराणनिर्मितीच्या काळात शुंभनिशुंभांचा वध करणारी विंध्यवासिनी कौशिकी देवी आणि महिषासुर मर्दनिी यांचे एकीकरण करण्यात आले असावे कारण त्यानंतर महिषासुरमर्दिनीला देखील विन्ध्यवासिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्राचीन साहित्यिक उल्लेखांवरून दुर्गा महिषासुरमर्दिनीचा नुसता उल्लेख ते तिच्या पराक्रम कथा यांचा आलेख मिळतो.

प्राचीन कोरीव लेखांमधील दुर्गा

भारतात सापडणाऱ्या कोरीव लेखांतून विविध प्रकारची तत्कालीन माहिती आपल्याला मिळते. अर्थातच त्यातून भारताच्या वेगवेगळ्या भागातील धार्मिक माहितीदेखील मिळते. देवीपुजेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या काही शिलालेखांचा उल्लेख इथे केला पाहिजे राजस्थानातील ‘होटी सादडी’ या गावातील भवरमाता मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक शिलालेख आहे. त्यात आरंभी तीक्ष्ण शूल हातात घेऊन असुराचा वध करणाऱ्या देवीला नमन केले आहे. ही देवी उग्र सिंहांच्या रथात बसलेली असून ती भक्तांचे कल्याण करते, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. येथे देवीचे वर्णन करताना ती शिवाची अर्धागी असल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वर्णनावरून येथे सिंहवाहिनी दुर्गा अपेक्षित असावी यात शंकाच नाही. या शिलालेखाचा उद्देश राजाने देवीचा उत्तम प्रासाद (मंदिर) बांधला होता हे नोंदवण्याचा होता.

04-devi-lp

याशिवाय बिहारमधील नागार्जुनी टेकडय़ांमधील सहाव्या शतकातील अनंतवर्मन राजाच्या दोन लेखांमध्ये देवीचा उल्लेख आहे. यातील एका लेखात भूतपती आणि देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केली होती असा उल्लेख आहे. भूतपती हे शिवाचेच एक नाव आहे, त्यामुळे ही देवी शिवशक्ती दुर्गा असावी. तर दुसऱ्या शिलालेखात महिषासुराच्या शिरावर देवीने ठेवलेल्या पायाला भक्तीभावाने नमन करून राजाने ‘अद्भुत विन्ध्य भूधर गुहे’मध्ये कात्यायनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली असे नमूद केले आहे. याच शिलालेखात भवानी देवीसाठी राजाने एक गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. गुहेत स्थापन केलेल्या कात्यायनी देवीच्या पूजेअच्रेसाठी या गावातील उत्पन्नाचा वापर व्हावा हे उद्दिष्ट होते. महिषासुरमर्दनिी, कात्यायनी व भवानी या देवीच्या तीनही रूपांचा उल्लेख हे या शिलालेखाचे वैशिष्टय़ आहे.

बसंतगढ (राजस्थान) येथील खिमेलमाता मंदिरापाशी सापडलेला इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलालेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाच्या आरंभी दुर्गा आणि क्षेमकरी क्षेमार्या यांना आवाहन केले आहे. तसेच या लेखात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. त्यात श्रीमातेच्या एका गणिकेचे नावही नमूद केले आहे. विविध आगमग्रंथानुसार नवदुर्गामध्ये गणले जाणारे क्षेमंकरी हे दुग्रेचेच कल्याणकारी रूप आहे. येथील देवीचे सध्याचे खिमेलमाता हे नाव क्षेमार्या या संस्कृत नावाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे.

भरमोर (हिमाचल प्रदेश) येथील इसवीसनाच्या सातव्या शतकातील लक्षणा देवीच्या पितळी मूर्तीच्या पीठावर एक कोरीव लेख आहे. या लेखात राजाने पुण्यप्राप्तीकरिता लक्षणा देवीची स्थापना केली तसेच गुग्ग याने देवीची ही प्रतिमा घडवली असा उल्लेख केला आहे. प्रस्तुत लक्षणादेवीची मूर्ती महिषासुरमर्दनिीचीच आहे.

प्रतापगढ (राजस्थान) येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील दानलेखाच्या आरंभी महिषासुराला मारणाऱ्या दुग्रेचे स्तवन केले आहे. याच लेखात कात्यायनी देवीचाही उल्लेख येतो.

या सर्व पुराव्यान्संदर्भात अमरकोश या संस्कृत कोशात येणारी दुग्रेची नावे बघणे आवश्यक ठरते. अमरकोशात तिची खालील नावे दिलेली आहेत.

उमा कात्यायनी गौरी काली हैमवतीश्वरी॥

शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमंगला।

अपर्णा पार्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका॥

आर्या दाक्षायणी चव गिरिजा मेनकात्मजा।

आत्तापर्यंत आपण बघितलेली विविध ग्रंथातील व कोरीव लेखांतील नावे म्हणजे शैव अगर शाक्त पंथातील दुग्रेची विविध रूपे मानली जात होती हे अमरकोशातील या नोंदीवरून स्पष्ट होते.

प्राचीन नाण्यांवरील सिंहवाहिनी देवी

प्राचीन अफगाणिस्तानात नना या नावाची इराणी देवता प्रसिद्ध होती. कुशाण राजांच्या नाण्यावर ती आपल्याला दिसते. ही नना सिंहावर बसलेली दाखवली जाते. कुशाण राजांच्या कंदाहार ते पटनापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात त्यांनी अनेक स्थानिक देवदेवतांना नाण्यावर स्थान दिले होते. अफगाणिस्तानातील रोबाटक या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील कुशाण राजांच्या अधिकाऱ्याच्या शिलालेखात इतर देवतांबरोबर याच नना आणि उमा यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा हुविष्क याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी नना व सिंहवाहिनी उमादेखील दिसते. हेच ननाचे व उमेचे सिंहवाहिनी रूप नंतर दुग्रेला प्राप्त होते.

या कुशाण राजांच्या नंतर उत्तर भारतात आलेल्या गुप्त राजांनी देखील अत्यंत सुंदर नाणी पाडली होती. चंद्रगुप्त या गुप्त घराण्यातील राजाच्या नाण्यावर एक सिंहवाहिनी देवी आहे. तिच्या एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात निधीश्रुंग घेतलेले आहे. काही संशोधक या देवीला सिंहवाहिनी दुर्गा मानतात. अशा प्रकारे सिंह हे वाहन दुग्रेच्या प्रतिमेत येते.

प्राचीन शिल्पातील दुर्गा महिषासुरमर्दनी

तामलुक (पश्चिम बंगाल) येथे सापडलेली शुंग काळातील एक छोटय़ा उठावातील मृण्मूर्ती उल्लेखनीय आहे. ही स्त्री मूर्ती सालंकृत असून तिचा केशसंभारही फार मोठा दाखवलेला आहे. तिच्या केशसंभारात पाच छोटी आयुधे दागिन्यांसारखी दाखवण्यात आलेली आहेत. ही आयुधे म्हणजे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज ही आयुधे नंतरच्या काळात देवीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे काही संशोधक या मृण्मूर्तीला दुग्रेची आद्य प्रतिमा मानतात अर्थातच ही आयुधे शौर्य आणि राजवैभव दर्शवत असल्यामुळे ही स्त्रीदेवता महत्त्वाची असणार हे नक्की.

कुशाण काळात (इसवीसनाचे पहिले ते तिसरे शतक) या काळातील काही महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. ही चतुर्भुज देवीची मूर्ती दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे. अशा आविर्भावातील आहे. देवीचे मागचे दोन्ही हात आता दिसत नाहीत. तिने कानात जड कुंडले घातली आहेत. कुशाण काळातील अशा काही मूर्ती उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सापडल्या आहेत.

गुप्तकालात (इसवीसनाचे चौथे ते पाचवे शतक) ज्याप्रमाणे अनेक देवीदेवतांच्या मूर्तीची मानके बनली तशीच ती दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीचीही बनली. उदयगिरी मध्य प्रदेश येथील लेण्यामध्ये गुप्त काळातील एक सुंदर द्वादशभुजांची महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतले आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.

बदामीच्या चालुक्यांच्या काळात (सहावे ते आठवे शतक) निर्माण झालेल्या ऐहोळे येथील दुग्रेच्या प्रतिमेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ऐहोळे येथील दुर्गामंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या मंदिराच्या बाहय़भागावर एक महिषासुरमर्दनिीची अत्यंत मनमोहक मूर्ती आहे.

वर उल्लेख केलेल्या भारमोर हिमाचल प्रदेश येथील शिलालेखात उल्लेखलेली लक्षणादेवी ही देखील महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. जवजवळ चार फूट उंचीची ही पितळी मूर्ती सातव्या शतकातील आहे. या चतुर्भुजी देवीच्या हातात त्रिशूळ खड्ग आणि घंटा आहे. एका हाताने तिने जमिनीवर पडलेल्या महिषाची शेपटी पकडली आहे आणि हातातील त्रिशुळाने ती महिषाचा वध करीत आहे.

महाराष्ट्रात वेरुळ येथील लेण्यामधेही महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. वेरुळ येथील कैलास मंदिरात सिंहावर आरूढ झालेली देवी महिषासुराचा वध करते आहे असे चित्रण केले आहे. पल्लवराजांच्या काळात निर्माण झालेल्या महाबलीपुरम येथील एका रथमंदिरात सिंहावर आरूढ झालेल्या देवीचे अंकन आहे. येथे देवी तिच्या सेनेसह महिषासुराशी युद्ध करताना दाखवली आहे. इथे महिषासुर मानवी रूपात दाखवलेला असून त्याचे मुख मात्र महिषाचे आहे.

पाल राजांच्या काळात बंगाल, ओरिसा या प्रदेशात दुग्रेच्या उपासनेचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेला होता. या भागात अनेक भुजांच्या महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. या प्रतिमांचा अभ्यास करताना असे दिसून येते की सुरुवातीला सिंह हा फक्त देवीचे लांच्छन म्हणून मूर्तीमध्ये येतो, पण नंतर तो देवीला महिषासुराला मारण्यात मदत करताना दाखवला जातो. तसेच इसवीसनाच्या सातव्या शतकांनंतरच्या मूर्तीत महिषाच्या कापलेल्या मानेतून असुर बाहेर येतांना दाखवण्यात येऊ लागला.

भारताबाहेरील दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा

भारताबाहेरही अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जावा, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती सापडतात. अफगाणिस्तानातील गझनी येथील टेपे सरदार या ठिकाणी एक महिषासुरमर्दिनीची भंगलेली भव्य मूर्ती मिळाली आहे ती काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती.

कंबोडिया येथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीमध्ये चोल मंदिरातील मूर्तीचा प्रभाव पडलेला आहे. या महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीच्या पीठावर महिषमुखाचे रेखाचित्र कोरलेले असते त्यावरून या प्रतिमेची ओळख आपल्याला पटते.

अवघ्या भारतभर आणि अफगाणिस्तानपासून ते इंडोनेशियापर्यंत आढळणाऱ्या या दुर्गा महिषासुरमर्दनिीचे आपल्या महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपकी एक असलेल्या जगदंबा तुळजाभवानीची प्रतिमा महिषासुरमर्दनिी या स्वरूपातीलच आहे. पंधराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महिकावतीची बखर’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गद्यपद्यमिश्रित बखरीत श्रीदेवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्राधर्मरक्षिका असा तिचा उल्लेख येतो. तर सोळाव्या शतकातील सुलतानशाहीने गांजलेल्या अवस्थेत संत एकनाथांनी

नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तूं साकार

घेऊनि दहा अवतार, करिसी दुष्टांचा संहार

दार उघड, बया दार उघड

अशा आळवणीनंतर म्लेंच्छांचा संहार करण्यासाठी तिची प्रार्थना केली होती.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करून अलौकिक असा इतिहास रचला. तसेच तिची नित्य पूजा व्हावी म्हणून प्रतापगडावर भवानी देवीची प्रतिष्ठापना करून तिचे मंदिरही बांधले होते.

एकोणिसाव्या शतकात बंगालमधील दुर्गापूजनाचा प्रभाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ या गीतावर पडलेला दिसून येतो. इंग्रजांच्या पारतंत्र्यात अडकलेल्या भारतमातेला आदिशक्तीच्या रूपात कल्पून तिचा महिमा त्यांनी पुढील ओळींत वर्णन केला आहे.

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनी

नमानि त्वां

नमामि कमलां अमलां अतुलां

सुजलाम् सुफलाम् मातरम्॥

अशा रीतीने आदिशक्तीच्या दशभुजा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही रूपांत मातृभूमीचे वर्णन करून बंकिमचन्द्रांनी प्राचीन भारतीय परंपरेशी आपली नाळ जोडली.

अशा या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या विविध प्रतिमांचा, तिच्या संदर्भातील पुरातत्वीय पुराव्यांचा, शिलालेखांचा व तिच्या उपासनेच्या मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी व शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची वीरांकडून केली जाणारी आराधना. प्राचीन काळापासून देवीच्या इतर रूपांपेक्षा दुर्गा महिषासुरमर्दनिी रूपात देवीची आराधना विशेषत वीरपुरुषांनी का केली असावी याचा बोध दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेल्या ‘महिषान्तकरी येन पूजिता स जगत्प्रभु’ (ज्याने महिषासुरमर्दनिीला पूजिले तो जगाचा स्वामी होतो) या वाक्यावरून होतो.
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

बदलती शिल्पे, बदलता समाज

 बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते...

आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता. प्रत्येक टीव्हीत एका व्यक्तीचा क्लोजअप, आणि कानाला हेडफोन लावून ऐकू येत असलेले गाणे म्हणत असल्याचे चित्रीकरण दिसत होते. बाथरूममध्ये कोणी गात असताना जसे कोणी ऐकत नाही म्हणून निर्धास्त असतो तसे मन लावून गाणे म्हणत स्वतःत गुंगून गेलेल्या त्या सर्व लोकांना पाहून थोडी गंमत वाटली. पं. भीमसेन जोशी, लता, अशा अनेक गायकांचे "मिले सूर मेरा तुम्हारा" ज्यांना परिचित आहे त्यांना यात फारसे वेगळेपण वाटणार नाही. फरक फक्त एकच होता की सर्वजण एकच गाणे एकाच वेळी म्हणताना दिसत होते, त्या सर्वांचे मिळून एकच एक जोडलेले चित्र तयार झाले होते. त्यांच्याकडे बघताना असे वाटले की येत्या काळाची ही झलक आहे. खरे तर म्युझियममधील वस्तूंना "हात लावू नये" ही सूचना आपण बरेचजण पाळत असतो, पण तरी मनात आणल्यास वस्तू इथे समोरच आहे, मनात आणल्यास तिला स्पर्श करता येऊ शकतो ह्याची मनात जाणीव असते, खोलीतले गंध, दगडी शिल्पाचा थंडगारपणा, ह्या गोष्टी हा अनुभव घडवत असतात. पण कोणी सांगावे कदाचित पुढच्या काळात कलेचे आविष्कार बघण्याच्या पद्धती कदाचित स्पर्शरहित असू शकतील?!

खरे तर यापुढे अधिक फिरण्याचे मनात नव्हते. पण मागे एकदा येथे आलेले असताना म्युझियममधील भारतीय उपखंडाच्या दालनात खास राजस्थानी मिनिएचर (लहान) चित्रे बघून तशी चित्रे काढण्याच्या आणि रंगवण्याच्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला होता. त्याची आठवण आली आणि म्हटले जाण्याआधी परत एकदा तिथे जाऊ या.
या दालनाकडे जायला एक मोठी खोली ओलांडून जावे लागले. मिनिमलिस्ट (कमीतकमी) अशा सामानात विमानतळांवर असतात तशा काँप्युटरांच्या पुढे बसलेले म्युझियमचे कर्मचारी पाहून म्युझियमची वाटचाल स्पर्शरहित होण्याकडे चालली आहे असा संशय अशामुळे जरा दाटच झाला!

पण एकदा का या भारतीय दालनात आले की परत त्या कधीच्या काळी घडवलेल्या दगडा-मातीच्या वस्तू आपल्यापासून हाताच्या अंतरावर असतात. हडप्पा/मोहेंजोदारो येथील लहानलहान मातीच्या रांजणांपासून ते बौद्ध, जैन, हिंदू शिल्पकला, आणि काही मुस्लिम प्रभावाखालची चित्रे येथे ठेवलेली आहेत. यातील वस्तू इजिप्तमधील वस्तूंइतक्या भव्य नाहीत, काही तर दहा एक शतके इतक्याच जुन्या, म्हणजे खरे तर बर्‍यापैकी अलिकडच्या काळातील आहेत, त्यामुळे या वस्तूंना इजिप्तसारखे वलय नाही. शिवाय इजिप्तमधील प्रदर्शनाची जाहिरात कितीही भरभक्कम केली असली तरीही या दालनात आल्यावर एक प्रकारचा आपलेपणा वाटतो. तरी इथल्या भारतीय हॉटेलांमध्ये गेलो, की तिथे भिंतीवर लावलेले गणपती, राधा-कॄष्ण, फारतर लामणदिवे, किंवा उंच पितळी समया, आग्रा शैलीतली चित्रे, नक्षीकाम केलेली लाकडी पार्टिशने अशा सवयीच्या झालेल्या शोभेच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून आपल्या टेबलाकडे जाण्याचा एक प्रकारचा कोडगेपणा देखील आलेला असतो. त्यामुळे परत जेव्हा कुठेतरी खणून काढलेल्या ह्या वस्तू दिसतात त्यावेळी त्यांच्याकडे हॉटेलमधील शोभेच्या वस्तूंकडे पाहतो त्यापेक्षा वेगळ्या नजरेने पाहिले पाहिजे हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागते. मग त्या नुसता वस्तू न राहता त्यात मागील संस्कृतीच्या खुणा, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, तत्कालिन व्यापार-उदीमाची व्यापकता असे थोडे थोडे लक्षात येत जाते. थोडा का होईना इतिहास वाचलेला असला, की ह्या म्युझियमांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते हेही खरे. शिवाय एखाद्या समाजाच्या आशा-आकांक्षांमध्ये काळाप्रमाणे होणारे बदलही जाणवू शकतात. म्युझियममध्ये आम्ही बरेच काही पाहिले, बरेच फोटो काढले. फोटो काढताना लक्षात आले नाही, पण नंतर असे वाटले की यात स्त्रियांच्या शिल्पांमध्ये काळानुरूप होत गेलेले बदल आपोआप थोडेफार टिपले गेले असे वाटते. शिल्पे करण्याच्या माध्यमात, तंत्रात आणि सादरीकरणातही खूपच फरक पडल्याचे दिसते.

ख्रिस्तपूर्व काळात स्त्रियांना देवतेचा दर्जा (मातृदेवता) दिला असावा अशी समजूत आहे. यापैकी पहिल्या मूर्तींची डोळे दाखवण्याची पद्धत अतिशय सोपी, लहान मुलांनाही करता येईल अशी दिसते. स्त्री असूनही मूर्तीच्या डोक्यावर एक प्रकारची पगडी दिसते आहे. पहिली मूर्ती करणे विशेष अवघड नाही. दुसर्‍या मूर्तीवर मात्र श्रम घेतले आहेत हे स्पष्ट आहे. ह्या स्त्रीने घातलेल्या विशिष्ट दागिन्याला छन्नविरा म्हणतात असे कळले. हा दागिना त्याकाळात बराच लोकप्रिय असावा. ह्या नटलेल्या मूर्तीवरून ती देवता असावी असे दिसत नाही. एखादी नर्तकी, आकर्षक स्त्री असावी तशी दिसते.

डोळे दाखवण्याची पद्धत आता खालच्या मथुरा येथील प्रतिमेमध्ये वेगळी, जरा सुधारलेली दिसते. शिवाय ही प्रतिमा भट्टीतून भाजून काढलेली आहे.
कान झाकून जातील इतकी मोठी कर्णभूषणे दिसतात. एवढे मोठे कानातले घातले तर कान ओघळतील असे आम्हाला सांगत, तसे त्यांना लहानपणी कोणी सांगितले नसावे! डोक्यावर बांधलेली तीन गोलाकार आभुषणे नक्की कशासाठी आहेत समजत नाही.

नंतरच्या स्त्रीप्रतिमांमध्ये आकार, लय, प्रमाणबद्धपणा, मोकळेपणा अधिक जाणवू लागतो. सांचीच्या प्रसिद्ध स्तूपाच्या एका तोरणावरील यक्षीचे अवशेष (इ. स. पहिले शतक).


या यक्षीला "फर्टिलिटी गॉडेस" म्हटले आहे. बुद्धानंतरच्या काही शतकांत अनेक स्तूप, लेणी बांधली गेली.

broken image

बुद्धाने तर करीत असलेला संसार सोडून दिला. त्याच्या गोष्टीत "मार" नावाचा राक्षस येतो, खरे तर मार म्हणजे बुद्धाला निर्वाणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारा मोह. अमरावतीच्या स्तूपावरील ह्या चित्रात मार आपल्या मुलींना बुद्धाचे लक्ष त्यांच्याकडे जावे म्हणून पाठवतो. पण अशा सर्व मोहांवर विजय मिळवल्यानंतर बुद्धाला निर्वाण प्राप्त होतेच. वरील शिल्पातून दिसते ती बौद्ध शिल्पकलेची जुनी परंपरा आहे, या परंपरेने बुद्धाचे मनुष्यस्वरूपात चित्रण केले जात नाही, तर चित्रात बुद्ध असल्याचे त्याच्या पादुका, सिंहासन (कारण तो राजपुत्र होता) आणि बोधीवृक्ष यावरून दाखवले जाते. या शिल्पात स्त्रिया आहेतच, पण दुर्लक्षित आहेत.

मग येतात "हिंदू" देव-देवता. यात दोन्ही देव आणि देवता यांना महत्त्वाची स्थाने मिळालेली दिसतात. त्यांचे चेहरे आधीच्या शिल्पकलेहून अधिक आकर्षक, आणि नाजूक दिसतात. देव जरा कुटुंबवत्सलही झालेले दिसतात! सुंदर चेहरे, दागदागिने, दोनांहून अधिक हात असे या शिल्पांचे स्वरूप दिसू लागते. शंकर, पार्वती यांचे कुटुंब म्युझियममध्ये आहेच. गणपतीदेखील आपल्या दोन्ही पत्नींसह आहे. हरीहर (शंकर आणि विष्णू यांच्या संगमाने तयार झालेला - काही संशोधकांच्या मताने शैव आणि वैष्णव यांच्या "समन्वय" काळातील ) गोतावळ्यासह येथे आहे. तशीच महिषासुरमर्दिनी दुर्गा आहे. जावा येथील महिषासुरमर्दिनीचे हे नवव्या-दहाव्या शतकातले शिल्प. या दुर्गेचा चेहरा अगदी भारतीय म्हणावा असा नाही, त्यावर जावा येथील कारागिरांचीच छाप आहे. पण बाकी शिल्प मात्र भारतातील दुर्गेप्रमाणेच आहे.

broken image

रामायणातील सीताहरणाच्या दृष्याचे इंडोनेशियातील अकराव्या शतकातील शिल्प दिसते -म्हणजे या काळात रामायण इंडोनेशियापर्यंत पोचले होते.

तेराव्या शतकापर्यंत स्त्रियांचे प्रेमिक म्हणून मोकळेपणाने चित्रीकरण झालेले दिसते. हे हस्तिदंतामध्ये कोरलेले ओरिसामधले एक शिल्प. इथले कोरीवकाम अधिक वाढलेले दिसते, दागदागिने, आकार, विषय सर्वच दृष्टींनी कला विकसित झाल्याचे दिसते.

माती, दगड, हस्तिदंत, लाकूड अशा विविध माध्यमांमधून तयार केलेली ही शिल्पे बदलती सामाजिक स्थिती दाखवत असावीत असे वाटले. जरी एका दालनातील काही चार-दोन शिल्पांवरून तत्कालिन समाजाचे यथार्थ चित्र उभे करणे शक्य नसले तरी कळते की या शिल्पांमध्ये वैविध्य आहे, वस्तू तयार करण्याची तंत्रे हळूहळू पण खात्रीने विकसित होत गेली आहेत, त्या शिल्पांचे विषय बदलत गेले आहेत, याचाच अर्थ समाज गतिशील होता, भरभराटीस येत होता. भारताला स्वतःचा इतिहास नाही असे म्हणणार्‍या मार्क्सच्या लिखाणाचा प्रसिद्ध संशोधक डी. डी. कोसंबी यांनी कठोर समाचार घेतला आहेच, पण ही अशी शिल्पेही हे दाखवून देण्यास ठोस पुरावा ठरावी.


कला सरस्वती
प्राचीन काळातील मूर्ती अविष्कार समोर ठेवत असताना आधुनिक काळातला शिल्पाविष्कार नोंद केला पाहिजे असे जाणवले. सरस्वतीची ही आधुनिक काळातील मूर्ती औरंगाबादच्या महागामी गुरूकुलात वटवृक्षाच्या छायेत विराजमान आहे. सरस्वती मूर्तीत वीणा दूय्यम स्वरूपाची किंवा लहान दाखवलेली असते. ही सरस्वती ठळकपणे लक्षात रहाते ती जवळपास सरस्वतीच्याच आकारातील उभ्या वीणे मुळे. सरस्वती विद्येची देवता तर आहेच. पण वीणावादनामुळे तीचं नातं संगीताशी अतिशय उत्कट असं आहे. या सरस्वतीच्या डाव्या खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा वरचा हात वरदमूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. उजव्या खालच्या हातात पद्म आहे. डावा वरचा हात वीणेवर आहे. या वीणेच्या भोपळ्यावरही अप्रतिम अशी कलाकुसर आहे. महागामी नृत्यगुरूकुल असल्याने असेल कदाचित पण ही वीणाही कुशल नर्तकीसारखी डौलदार जाणवते. वीणेचा वरचा भाग मयुरमुखाच्या आकारात कोरलेला आहे. सरस्वतीच्या पायाशी मोर असून त्याची डौलदार मानही नृत्यमुद्रा सुचवते. ही सरस्वती कमळासनावर उभी आहे.
ही मूर्ती तब्बल साडेपाच फुट उंच आहे. शिल्पकला आधुनिक काळात जपणे, तिला प्रोत्साहन देणे यासाठी महागामी ला विशेष धन्यवाद.
Mahagami Gurukul
. या सरस्वतीला मी "कला सरस्वती" असे ठेवले आहे.

 

मूर्ती मालिका -९


नर्तकाची देखणी मूर्ती

अजिंठ्याच्या जवळ अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथे उत्तर चालूक्य कालीन मंदिर आहे. या मंदिवरील विष्णु शक्तीच्या मूर्तींमुळे अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले. याच मंदिरावर प्रदक्षिणा पथावर उजव्या बाजूला ही नर्तकाची मूर्ती मला आढळून आली. या पूर्वी तीन चार वेळा मंदिर बघितले पण ही मूर्ती लक्षात आली नव्हती. नर्तकी, अप्सरा, सुरसुंदरी या नावाने ओळखल्या जाणार्या स्त्री शिल्पांची माहिती होती. अशी भरपुरं शिल्प मंदिराच्या बाह्य भागावर आढळून येतात. पण या तूलनेत मोठ्या आकारातील (शिल्पाची उंची दीड फुट) नृत्य पुरूष (नर्तक) शिल्पांची संख्या फारच कमी आहे.
या नर्तकाचे कानातले, गळ्यातले, दंडावरचे ठळक ढोबळ वाटणारे दागिने वेगळेपण सांगतात. स्त्रीयांचे दागिने नाजूक कोरलेले असतात. कमरेला असलेली मेखला जाड माळेसारखी दाखवलेली आहे. स्त्रीयांच्या मेखलेचा नाजूकपणा इथे नाही. नर्तकी-नर्तकांचे डोळे काजळाने अधोरेखीत केले असल्याने ठसठशीत दिसून येतात. या नर्तकाचे डोळे तसेच आहेत. ओडीसी नृत्यात यासारखी मुद्रा असलेले गुरू केलूचरण महापात्रा यांचे छायाचित्र प्रसिद्ध आहे. कथ्थक मध्येही याला साधर्म्य साधणारी मुद्रा आढळते. लेणी आणि मंदिरांवर आढळून येणार्या नृत्यमुद्रांवरूनच नंतरच्या काळातील नृत्य प्रकार समृद्ध होत गेले असं अभ्यासक सांगतात.
या मंदिर सभामंडपात भव्य अशी वर्तुळाकार रंगशीळा आहे. भोवती आसन कक्ष आहेत. म्हणजे देवतेच्या समोर नृत्य सादर केले जायचे व ते पाहण्यासाठी लोक आसनांवर बसून असायचे. मंदिरांचा मुख्य मंडप हा कलाविष्काराचे केंद्र होता.
Mahagami Gurukul
तूमच्याकडे अशा शिल्पांवर अभ्यास झालेला असेल तर जरूर माहिती सांगा.
(छायाचित्र सौजन्य संदिप देशमुख कौठेककर)

 

मूर्ती मालिका -१०

पारशिवनीची महालक्ष्मी
महालक्ष्मी म्हणजे कोल्लापुर इतकेच आपल्याला माहित असते पण कोल्हापुरच्या मूर्ती सारखीच अप्रतिम मूर्ती नागपुरपासून उत्तरेला रामटेकच्या दिशेने पारशिवनी गावात स्थित आहे. एक मिटर उंचीची ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीच्या उजव्या हातात बीजपुरक आहे, वरच्या हातात गदा आहे. डाव्या वरच्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे तर डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी पण अगदी अशाच आयुधांनी युक्त आहे. हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे. मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही "तारा शक्ती अगम्य" अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर "नीज धर्माचारी" असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
(फोटो व माहिती सौजन्य प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली)


चामूंडा : भयानक व बिभत्स रसाचे दर्शन
आपल्या परंपरेत मानवी भावभावनेतील सर्व रसांचा विचार केला गेला आहे. काही गोष्टी नकोशा वाटतात पण त्यांचे अस्तित्व मात्र असते. असे दोन रस भयानक आणि बिभत्स यांचे दर्शन चामुंडा मूर्तीत दाखलेले आहे. ही मूर्ती नीलकंठेश्वर मंदिर निलंगा (जि. लातुर) मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांतील आहे.
उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशुळ, डाव्या वरच्या हातात खट्वांग (मानवी कवटीपासून केलेले हत्यार), डावा मधला हात तोंडात असून त्याची नखं ती दाताने कुरतडत आहे, खालच्या हातात कपाल व नरमुंड आहे. एक हात खंडित आहे. ही सहा हाताची चामूंडा आहे.
पोटावर विंचू आहे. सर्प बंध आभुषण म्हणून स्तनाभोवती कमरेला दाखवलेले आहेत. जांघेत घंटा दिसून येते आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे.
तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच्च नाच करत आहे. डाव्या बाजूला कुत्रे आहे. वर मान करून नरमुंडातील रक्त ते चाटत आहे. देवीची हाडे स्पष्ट दिसतात. हाडं आणि कातडी असे मांसरहित रूप चामुंडेचे ग्रंथात वर्णीलेले आहे. स्तन शुष्क असून खाली लोंबत आहेत. (उन्नत उभारलेले स्तन समृद्धतेचे मातृत्वाचे प्रतिक समजले जाते)
भयानक व बिभत्स रसाचे दर्शन या मूर्तीत शिल्पकाराने घडवले आहे. नउ रसांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी कविता आहे
'अद्भुत' वाटे 'भयानका'चे
'बिभत्स' दर्शन होता जगाचे
मनात 'करूणा' दाटून येते
'रौद्रा'तूनी जन्म 'वीरा'स देते
'हास्या'त 'शृंगार' शोभे विहंगम
सगळ्या रसाचा 'शांतीत' संगम
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. या मातृकांची संख्या आठ, नऊ पण सांगितली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सप्तमातृका आढळून येतात.
(फोटो सौजन्य दत्ता दगडगावे, लातूर. चामुंडा रूप विवरण डाॅ. माया पाटील (शहापुरकर) यांच्या ग्रंथाच्या आधाराने)



आळतं सुंदरी
प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्यभागावर) सुरसुंदरींची शिल्पे हे एक वैशिष्ट्य आढळून येतं. १२ व्या शतकातील प्राचीन अशा गुप्तेश्वर मंदिर (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे "आळतं सुंदरी"चे हे शिल्प कोरलेलं आहे. मंदिराच्या उत्तर भागात विष्णुचे पद्मनाभ रूपातील शिल्प देवकोष्टकात आहे. त्याच्या बाजूला हे शिल्प आहे. मंगल कार्य घरात असेल तेंव्हा उखळा जात्याचा मुहूर्त केला जातो. उखळ जात्याची पूजा करून पाच स्त्रीया त्यावर ठेवलेले विडे उचलून उखाणे घेतात. यावेळी वधु, करवली, तिची आई किंवा वरमाय यांना न्हाउ घातलं जातं. व नंतर त्यांच्या पायावर ओल्या कुंकवाचे पट्टे रेखतात. स्वस्तीक काढलं जातं. याला "आळतं" म्हणतात.
या शिल्पात ही नववधु वेलीला टेकुन उभी आहे. तिच्या तळपायावर दूसरी स्री आळतं भरत आहे. हे खोड वेलीचं आहे कारण याच परिसरांत जात्यावरच्या ओव्यांत एक गोड असा संदर्भ आलेला आहे
दारी मांडव ग घाला ।
फुला सगट जाईचा ।
छंद मुलाच्या आईचा ।।
दारात वेल आहे आणि त्या फुलांचा सुगंध सर्व परिसरात भरून राहिला आहे. शिल्पाच्या वरच्या भागात वेलीचा पर्णविस्तार नक्षीच्या माध्यमातून दाखवला आहे. या शिल्पातील स्त्रीचा जो केसांचा मोठा अंबाडा दाखवला आहे त्यावर गजरा माळलेला आहे.
काही शिल्पं "सुरसुंदरी" या शब्दांत बसत नाहीत. पत्र सुंदरी, शत्रु मर्दिनी, पुत्र वल्लभा अशी शिल्पं ज्यांच्यावर याच सदरात लिहिलं आहे ती स्त्री स्वभावाचे विविध पैलू दाखवतात. ती केवळ शृंगारापुरती मर्यादीत नाही हे स्पष्ट करतात. ही आळतं सुंदरी पण अशीच वेगळी आहे. या परिसरांतील रिती रिवाज परंपरा यांचे प्रतिबिंब यात उमटले आहे. अभ्यासक डाॅ. ए.डि. शिंदे सर यांनी आळतं सुंदरी हे नाव या शिल्पाला दिलं. मला हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प वाटलं. या मंदिराला जरूर भेट द्या.
(फोटो सौजन्य अरविंद शहाणे, परभणी. swaraj infotain या u tube वाहिनीवर या मंदिवर बनवलेले दोन माहितीपट उपलब्ध आहेत त्याची link इथे देतोय https://youtu.be/CaPlMqklJmI )
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -११

सुरसुंदरी
मंदिराच्या बाह्यांगावर अतिशय आकर्षक, डौलदार, सौष्ठवपूर्ण अशी स्त्री शिल्पे आढळून येतात. त्यांना सुरसुंदरी असे म्हणतात. इथे उदाहरणादाखल होट्टल (ता. देगलूर, जि. नांदेड) च्या मंदिरावरील ३ सुरसुंदरींचे छायाचित्र घेतले आहे. सगळ्यात डावीकडची आहे ती तंतू वाद्य वाजविणारी "तंत मर्दला". आज स्त्रीया गाताना नृत्य करताना आढळतात. पण त्या मानाने वाद्य वादन करताना फारशा आढळून येत नाहीत. पण प्राचीन मंदिरांवरील शिल्पात वादक स्त्रीया दर्शविलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात स्त्रीया संगीताच्या क्षेत्रात सर्वच अंगांनी आपले योगदान देत होत्या.
मधली आहे तिच्या हातात देवी देवतांच्या हातात असते तसे बीजपुरक आहे व दूसरा हात अक्षमालेसह वरद मूद्रेत आहे. स्त्रीला देवते इतके महत्व आम्ही देतो हे सामान्य स्त्रीचेच शिल्प कोरून सिद्ध केले आहे. ही सुरसुंदरी त्या दृष्टीने वेगळी आणि महत्वाची ठरते.
सगळ्यात उजवीकडची आहे ती "दर्पणा". सौंदर्याचा एक सुंदर अविष्कार यातून समोर येतो. दूसर्यावर प्रेम करायच्या आधी आरशात पाहून आपण आपल्याच प्रेमात पडायचे ते वय असते. नेमका हाच क्षण शिल्पात पकडला आहे. राजेंद्रकृष्ण यांनी शब्दबद्ध केलेले सी. रामचंद्र यांचे सुंदर गाणे आहे (अमरदीप, १९५८, देव आनंद, वैजयंतीमाला).
झुलेसे घबराके उतरा जो बचपन
भुलेसे एक दिन देखा जो दर्पण
लागी अपनी नजरीया कटार बनके
कोई दिल मे समा न जाये प्यार बनके
तशी ही दर्पणा.
सुरसुंदरी केवळ स्त्रीच्या बाह्य सौंदर्याचा अविष्कार प्रकट करतात असे नव्हे. एकुणच स्त्रीचे जे विविधअंगी विविधपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचा आविष्कार प्रकट करतात. ही शिल्पे होट्टल, माणकेश्वर, गुप्तेश्वर मंदिर धारासुर, धर्मापुरी, निलंगा येथील मंदिरांवर मोठ्या सख्येने आणि आकर्षक पद्धतीनं आढळून येतात.

 

मूर्ती मालिका -१३

लोभस पुत्रवल्लभा
गुप्तेश्वर मंदिर धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) मंदिरावरील हे अतिशय लोभस असे शिल्प. कडेवर मुल असलेले जे सुरसुंदरी चे शिल्प असते त्याला "पुत्रवल्लभा" असे नाव आहे. यातही विविध पद्धतीनं आई आणि बाळाचे नाते दाखवले आहे. बाळाला ती खुळखुळा वाजवुन खेळवते आहे, नुसतेच कडेवर घेतले आहे, स्तनपान करतानाची अप्रतिम शिल्पे आहेत. पण हे जरा हटके आहे. यात हे बाळच आईचा मुका घेते आहे. आईने डाव्या हाताने त्याची कंबर सावरून धरली आहे. उजवा हात बाळाच्या मानेला सांभाळत आहे. या स्वर्गसुखाने दोघांनीही डोळे मिटून घेतले आहेत.
बाळाच्या पायातला वाळा विशेष उल्लेखनीय आहे. हे बाळ नुकतेच चालायला लागले असावे. म्हणून हा चांदीचा वाळा पायात आहे.
प्रेमचंद यांची एक सुंदर लघुकथा आहे. आईच्या बोटाला धरून जत्रेत फिरणारे मुल खेळणी, मिठाई, रहाटपाळणा असे विविध गोष्टींसाठी हट्ट करते आहे. पण गरिब आई त्याला फारसे काही घेवून देवू शकत नाही. पोराचा हट्ट वाढत जातो. तो हात झटकतो आणि मिठाईच्या आकर्षणाने कुठेतरी ओढला जातो. पोर जत्रेत हरवते. आई बाजूला नाही हे ध्यानात येताच त्याला रडू फुटते. आजूबाजूचे लोक त्याला समजावू लागतात. खेळणी देतात, मिठाई देतात, फुगे देवू करतात,रहाटपाळण्याचे आमिष दाखवतात. पण आता पोराला फक्त आईच हवी असते.. बाकी काहीच नको असते. फ.मुं. शिंदे यांनी आपल्या कवितेत लिहिल्या प्रमाणे
आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेले गाव असते
केवळ गावच नाही तर लहानपणी आई म्हणजे बाळाचे सर्व विश्वच असते. आसा गोड मतितार्थ या शिल्पात अनामिक कलाकाराने १००० वर्षांपूर्वी कोरून ठेवला आहे. मराठवाडा हा मातृसत्ताक प्रदेश असल्याचे भरपुर ऐतिहासिक पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे. गौतमीपूत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी अशी चांदिची नाणीच सापडलेली आहेत. शिळालेखही आहेत.
मातृशक्तीचा हा एक लोभस आविष्कार, "पुत्रवल्लभा". मला एक शंका आहे. हे शिल्प निर्माण करणारी स्त्रीच असली पाहिजे. इतका नेमका क्षण पुरूषाला पकडता नसता आला. पण दूसरीकडून दासू वैद्य च्या कवितेप्रमाणे पण शक्य आहे
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी
त्याची आई एक कविता असते
हे शिल्प जर पुरूषाने घडवले असेल तर त्याची भावना दासूच्या कवितेसारखीच राहिली असेल.

 

 

मूर्ती मालिका - १५

 

येरगी येथील काळम्मा

सरस्वतीची एक अतिशय सूंदर मूर्ती होट्टल पासून जवळच असलेल्या येरगी (ता. देगलूर जि. नांदेड) येथे आहे. स्थानिक लोक "काळम्मा" या नावाने तीची पूजा करतात.
ही मूर्ती आसनस्थ आहे. सरस्वती ओळखु येते कारण डाव्या वरच्या हातात आपण ज्याला एकतारी म्हणून ओळखतो तशी एकतंत्री वीणा आहे. त्याच बाजूला खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा खालचा हात नीट दिसत नाही त्या हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात अंकुश आहे. हळेबीडू येथील नृत्त मूद्रेतील सहा हातांच्या सरस्वतीच्या एका हातात अंकुश दाखवलेला आहे. तसा तो येथे आढळून येतो. कधी अंकुशाच्या ऐवजी पाश दाखवलेवा असतो. वीणा आणि पुस्तक जास्त आढळून येतात. त्यावरूनच ढोबळमानाने ही मूर्ती ओळखता येते.
मूर्तीच्या अंगावरील दागिने विशेषत: गळ्यातील हार अप्रतिम आहे. असे चौरसाकृती "नेकलेस" अगदी आजही फॅशनच्या नावाने लोकप्रिय आहे. त्याची पाळंमुळं या आठशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीमध्ये सापडतात. होयसळ शैलीतले हे शिल्पांकन आहे.
पाठीमागे सहा देवतांच्या मूर्ती आहेत. अजून एक मूर्ती जी छायाचित्रात दिसत नाही ती असावी म्हणजे या सप्त मातृका असतील. पायाशी हंस कोरलेला आहे. पण खंडित असल्याने त्याची ओळख नीट पटत नाही.
Ainoddin Warsi
या मित्राने मूर्तीचा फोटो पाठवला.
Rajesh Kulkarni
यांनी या ठिकाणाची माहिती पुरवली. अभ्यासकांनी या सरस्वती मूर्तीवर अजून प्रकाश टाकावा. सरस्वती मंदिर म्हणून या ठिकाणाचा विकास झाला पाहिजे.
(आपणा सगळ्यांच्या प्रेमानं मी खरंच अवघडून गेलोय. नवनविन मूर्तींची माहिती आपण पाठवत अहात. हे मूर्ती व्रत आता माझे एकट्याचे उरले नसून सर्वांचेच झाले आहे. तूम्ही पाठवत असलेल्या फोटोंचे माहितीचे मन:पूर्वक स्वागत. मी माझ्या कुवतीप्रमाणे याला न्याय देत राहिन. परत धन्यवाद. रोज शक्य नाही पण शक्य तसे लिहित राहिन.)

 

 

मूर्ती मालिका -२०


 द्राक्ष सुंदरी
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) मंदिरावरची सुरसुंदरींची शिल्पे मोठी आकर्षक सौष्ठवपूर्ण सौंदर्यपूर्ण अशी आहेत. चित्रातील सुरसुंदरीला नेमकं काय नाव आहे मला माहित नाही. तिच्या डाव्या हातात द्राक्षाचा घोस दिसतो आहे म्हणून मी तीला "द्राक्ष सुंदरी" असं नाव ठेवलं. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.
हीच्या गळ्यातील दागिना जरा वेगळा दिसतो आहे. शिवाय जानव्या सारखी एक साखळी डाव्या खांद्यावरून दोन वक्षां मधून खाली कमरेकडे आली आहे. हा प्रकारही वेगळा वाटतोय. उजवा हात जो खाली सोडलेला आहे त्यावरचे एक कंकण खाली झुकलेलं आहे. केसांची रचना पण मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाठीमागे मानेखाली उतरलेला हा केसांचा शेपटा वेगळा आकार ल्यालेला आढळतो. किंवा तो पातळ कापडात गुंडाळलेला आहे की काय असे वाटते. डावा पाय हा जमिनीला टेकला नसून भिंतीला टेकवलेला दिसतो आहे. दोन पायांच्या मधून सोडलेला कटीवस्त्राचा शेव लयबद्ध असा डावीकडे वळलेला आहे. या सुंदरीचे स्तन अतिशय प्रमाणबद्ध दाखवलेले आहेत. उन्नत दाखवण्याच्या नादात काही शिल्पात एकुण शरिर रचनेचा तोलच बिघडतो.
ठाम सरळ रेषेतील उजवा पाय वगळता डावा पाय व दोन्ही हात यांची रचना लयबद्ध अशी मोहक केलेली आहे. चेहरा नेमका उजवे पाउल जिकडे आहे त्याच्या विरूद्ध वळलेला आहे. "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" असा भाव जाणवतो. पाउल तर तिकडे वळले आहे पण "आम्ही नाही जा" अशी स्त्री सुलभ भावना आहे.

 

मूर्ती मालिका - २३



लोभस बाळं व सप्तमातृका
वेरूळ (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) मधील कैलास लेणं वगळलं तर इतर लेण्याकडं पर्यटकांचे पाउल वळत नाही. "रावण की खाई" नावाने ओळखले जाणार्या १४ व्या क्रमांकाच्या लेण्यातील या सप्त मातृका. बसलेल्या सात स्त्रीया आणि त्यांच्या भोवती बागडणारी मुलं असा हा सुंदर लोभस शिल्पपट आहे. मुल आईच्या पायाशी घोटाळत असून मांडीवर घेण्याचं आर्जव करत आहे, कुठे मांडीवर बसून स्तनांना तोंडात घेवू पहात आहै, कुठे मांडीवर उभं राहून आईच्या कानातल्यां आभुषणाशी खेळत आहे, या सातही मातृका अलंकाराने नटलेल्या आहेत. पुत्रवल्लभेचं एक अतीव समाधान या मूर्तींच्या चेहर्यावर आहे. स्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणतात हे तंतोतंत सिद्ध करणारं हे शिल्प. ही बाळं नग्न आहेत. यातूनही परत एक निर्व्याजता दाखवली आहे. बोरकरांच्या पाणी कवितेत एक ओळ अशी आलेली आहे
खोल काळ्या बावडीचे
पारदर्शी मग्न पाणी
कोकरूसे नाचणारे
खेळणारे नग्न पाणी
तशी ही बाळं आई भोवती नागव्याने बागडत आहेत. देवदेवतांची शिल्पं पाहताना त्यातील स्वाभावीक मानवी भाव भावनांचे जे दर्शन होते त्याकडे आपले दूर्लक्ष होते. सप्तमातृका खुप ठिकाणी कोरलेल्या आढळून येतात. पण अशी लोभसता कुठे नाही. या शिल्पाचा कुणी फारसा उल्लेख करत नाही याची खंत वाटते. "वेरूळ लेणी" याच नावाने मधुसूदन नरहर देशपांडे यांचे सुंदर पुस्तक अपरांत प्रकाशनाने प्रकाशीत केले आहे. त्यात यावर लिहिले आहे. वेरूळ लेणी पाहायला येणार्यांनी या पुस्तकाचा वापर जरूर करावा.

 द!




चामुण्डा - गुप्तेश्वर मंदिर
गुप्तेश्वर (धारासुर ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील मंदिर वास्तुशास्त्र, शिल्पसौंदर्य यांच्या दृष्टीने अप्रतिम असा नमुना आहे. या मंदिरावरील चामुण्डेचे हे शिल्प. हीचे वर्णन उग्र देवता म्हणून केले जाते.
हीच्या उजव्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात भंगलेला आहे. डाव्या हातात खट्वांग आहे. डाव्या खालच्या हाताची नखं ती कुरतडत आहे. पोट खपाटीला गेलेले. पोटावर विंचु कोरलेला पण तो स्पष्ट दिसत नाही. शुष्क स्तन लोंबत आहेत. मांस नसलेले कातडीत गुंडाळलेली अस्थीपंजर असे तिचे वर्णन आहे. तसेच पाय दाखवलेले आहेत. मुंडमाळा पायावर रूळत आहे. स्तनांच्यावर नागबंध आहे. कमरेलाही नागबंध आहे.
बिभत्स रसाचे दर्शन शिल्पकाराने दाखवले आहे. चेहर्यावरचे भावही तसेच आहेत. द्वीभंग अशी ही चामुण्डा नृत्यमुद्रेत आहे.
(चामुण्डा आणि भैरवी यांतील फरक तज्ज्ञांनी स्पष्ट करावा.)

 

 pic.




भैरवी - जाम मंदिर
जाम (ता.जि. परभणी) येथील मंदिराच्या बाह्यांगावर इतर सुरसुंदरीच्या सोबत ही मूर्ती आहे. हीच्या डाव्या हातात खट्वांग आहे. पायाशी मुंडमाळ लोंबत आहे. या दोन खुणांवरून ही शैव उग्र देवता असल्याचे मानता येते. उजवा हात खंडित आहे. त्यावर कोणते शस्त्र आहे दिसत नाही. बाकी देहावरचे अलंकरण अतिशय व्यवस्थित सुंदर आहे. ग्रीविका आहे, हार लोंबतो आहे छातीवर, कमरेला मेखला आहे. मांड्यांवर मोत्याच्या माळा लोंबत आहेत. पायात तोडे आहेत. चेहरा जरा उग्र आहै.
या मंदिराचा जिर्णोद्धार करतान हे सिमेंटचे ओघळ मूर्तीवर आलेत. अतिशय देखण्या अप्रतिम शिल्पाची आपणच अशी वाट लावतो. भंजकांनी मूर्ती फोडल्या यावर आपला संताप उसळतो. मग हे स्वातंत्र्या नंतरचे विकृतीकरण करणारे कोण समजायचे?

 

 

मातृका

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||

ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्‍या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.

मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे

ब्राह्मी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरुड
वाराही- वराह, घुबड
इंद्राणी - हत्ती
चामुंडा- प्रेत

आता काही सप्तमातृकापट पाहू या.

वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट

कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.

a

वेरुळ येथील लेणी क्रमांक १४ येथील सप्तमातृकापट (येथे चामुंडेचे वाहन घुबड हे आहे)

a

वेरुळ येथील कैलास लेणीच्या डावीकडील लहानशा लेणीतील उभ्या स्थितीत असलेल्या सप्तमातृकांचा पट

a

टाकळी ढोकेश्वर येथील सप्तमातृकापट

लेणीतील प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरुड), वाराही (वराह), ऐंद्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते, इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.

a

ह्याशिवाय खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातदेखील दोन सप्तमातृकापट आहेत.

a

a

आता मातृकांची काही एकल रूपातील शिल्पे पाहू या. (सर्व शिल्पे कायगाव टोके मंदिरातील)

माहेश्वरी - डमरू, खड्ग, नाग, वाहन- बैल

a

कौमारी -कमंडलू, पुस्तक, बीजापूरक आणि पंखा, वाहन - मोर

a

वैष्णवी - शंख, चक्र, कमळ, वाहन - गरुड

a

ऐंद्राणी - पाश, अंकुश, वाहन - हत्ती

a

वराहमुखी वाराही - वाहन - महिष

a

याशिवाय चामुंडेची स्वतंत्र शिल्पे तर पुष्कळ दिसतात, चामुंडा ओळखणे तर अगदी सोपे. मातृकापटांतील चामुंडेचे वाहन प्रेत, शृगाल, घुबड अशा भिन्न रूपांत दाखवलेले असले, तरी एकल चामुंडा मूर्तीत प्रेत हे वाहन असते. चामुंडेच्या पोटात विंचू असतो, जो तिच्या भुकेचे प्रतीक आहे. हातपायांचा अस्थिपंजर असून स्तन लोंबते असतात. रूप कराल असून दाढा विचकलेल्या असतात. भयप्रद स्वरूपाची चामुंडा बर्‍याच वेळा शीळ घालण्यार्‍या मुद्रेत असलेल्या दिसून येते.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा

a

पिंपरी दुमाला येथील चामुंडा मूर्ती

a

सर्वात शेवटी भुलेश्वर येथील सर्वांगसुंदर चामुंडा पाहू.

a

अष्टदिक्पाल आणि मातृका आपण वरील लेखात विस्ताराने पाहिले. आणखीही माहिती देता आली असती, मात्र ती तांत्रिक आणि किचकट झाली असती - उदा., पुराणांत वर्णन केल्याप्रमाणे असलेले त्यांचे रंग, त्यांच्या वाहनांचे विस्तारपूर्वक वर्णन, शिल्पशास्त्रात असलेली त्यांची संस्कृत वर्णने. येथे मी त्यांची सर्वसाधारण माहिती येथील मंदिरांच्या अनुषंगाने आणि ह्या मूर्ती सहजी ओळखता येईल अशा प्रकारे मांडली. काही शिल्पे भग्न झाल्यामुळे त्यात कदाचित काही त्रुटी असण्याचा संभव आहे - उदाहरणार्थ, खिद्रापूर मंदिरातील निर्ऋती आणि कुबेर यांच्या मूर्तीत गल्लत झाली असण्याचा संभव आहे. घोडा असलेली मूर्ती कदाचित कल्कीची असू शकते आणि नरवाहन असलेला निर्ऋती हा कदाचित कुबेर असू शकतो. मूर्ती उंचावर असल्याने आणि छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद.
 
http://www.misalpav.com/node/50642

 

नवदुर्गा - प्रतिमा शास्त्रीय लक्षण

ओळख मूर्तीशास्त्राची

पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी 

कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक शिल्प आहेत. ज्या मध्ये स्कंद कार्तिकेय देवीच्या मांडीवर बसलेला कोरलेला आहे. गुप्त काळानंतर सिंह वहिनी दुर्गा प्रतिमा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसतात. देवी महात्म्य, मत्स्यपुराण, रूपमंडन या ग्रंथात देवीस कात्यायनी म्हटलेले आहे. 

निरनिराळी रूपें घेऊन आदिशक्तीने चण्ड, मुण्ड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुरांचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असें म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणें त्याला अमरत्व तर मिळाले नाही पण एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स्त्री ही अबला असल्यामुळे आपणास कोणतीही भीती असणार नाही, असे समजून महिषाने पराक्रम गाजविण्यास सुरवात केली आणि देवांना सगळी- कडून हुसकवून लावले. इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरून इत्यादी देवतांचे अधिकार स्वतः उपभोगू लागला. स्वर्गावर नियंत्रण प्रस्थापित केले. ब्रम्हा, विष्णु व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या सम्मिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. (शिव तेजाने देवीचे मुख, यमाच्या तेजाने केश, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्रमाच्या तेजाने वक्ष:स्थल, इंद्राच्या तेजाने कटीप्रदेश, वरूनाच्या तेजाने जंघा आणि मांड्या, पृथ्वीच्या तेजाने नितंब निर्माण झाले. अशाच प्रकारे ब्रम्हाच्या तेजाने चरण तथा सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, कुबेराच्या तेजाने नासिका, प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने तीन नेत्र, संध्याच्या तेजाने बाहू तथा वायूच्या तेजाने कान निर्माण झाले. अशा प्रकारे प्रसन्न देवतांनी आपले आयुधे देवीस दिले.) हीच महाशक्ति होय. हिचेच निरनिराळ्या रूपाने वर्णन मिळते. याच देवीने पुढे महिषासुराचा वध केला व पुनश्च दैवी संपत्ति आणि समृद्धीची स्थापना केली. तिचे वाहन अर्थात् सिंह हा तिला हिमालयाकडून मिळाला होता. त्याचप्रमाणें निरनिराळी आयुधें ही वेगवेगळ्या देवांकडून मिळाली. आज देशांत साधारणपणे ज्या दुर्गेची आराधना चालू आहे ती महिषासुरमर्दिनी दुर्गा होय. तिचे बाहू, आयुधे, रूप वगैरेचा विस्तार फार मोठा आहे. पण ढोबळमानाने नवदुर्गा म्हणून हिची नऊ रूपें - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चित्रघंटा, कूष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदा प्रसिद्ध आहेत. ही नांवे काशीकडे आहेत. इतरत्र नावात भिन्नता आहे. देवीच्या या रुपास विशेष रूप किंवा विशेष अवतार असे म्हणता येईल. देवीचे रूप हे शक्ती समुच्चयाचे प्रतीक असल्याने कदाचित याच मुळे सर्वाधिक दुर्गा देवीच्या मूर्ती निर्माण केल्या असाव्यात.

शिव-शक्ती दुर्गा (दुर्गा-वैरोचनी) चा सर्वात प्राचीन संदर्भ तैत्तिरीय अरण्यकमध्ये उपलब्ध आहे. येथे रुद्राचे वर्णन दुर्गा वैरोचनी असे केले आहे, जे त्याच्या पत्नी अंबिकेच्या अनेक नावांपैकी एक आहे. बौधायन गृह्य सूत्रात दुर्गेच्या उपासनेच्या पद्धतीचे वर्णन केले आहे, परंतु पौराणिक कालखंडात आढळणारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आजपर्यंत समोर आले नव्हते. उदाहरणार्थ, या काळात दुर्गेशी संबंधित सिंहाची कल्पना अजून आली नव्हती. गृह्यसूत्रांच्या काळापर्यंत सिंहाच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाची कल्पना जन्माला आली होती. महाभारतातील दुर्गास्तोत्रानेही याची पुष्टी केली आहे.

पौराणिक कालखंडात दुर्गेच्या अनेक पैलूंची तपशीलवार कल्पना केलेली दिसते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामध्ये संध्या, सरस्वती, चंडिका, गौरी, महालक्ष्मी, ललिता इत्यादी दुर्गेची अनेक नावे काल्पनिक वयाच्या आधारे देण्यात आली आहेत. एक वर्षाची मुलगी संध्या, दोन वर्षांची सरस्वती, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊवर्षाची दुर्गा, दहा वर्षांची गौरी, तेरा वर्षांची महालक्ष्मी आणि सोळा वर्षांची ललिता अशी त्यांची नावे आहेत. 

दुर्गेस गृह्यसूत्रांमध्ये एक महत्त्वाची देवी म्हणून वर्णन केले आहे आणि महाभारतातील सर्वोच्च अस्तित्व म्हणून स्वीकारले गेले आहे. पुराण आणि आगम साहित्यात नऊ प्रकारच्या दुर्गा (नवदुर्गा) सांगितल्या आहेत. या नवदुर्गा मूर्तींची नावे मार्कंडेयपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण आणि आगमामध्येही उपलब्ध आहेत. पुराण आणि आगमाच्या वरील वर्णनांप्रमाणेच, इतर वास्तुशास्त्रातही दुर्गा (नवदुर्गा) च्या नऊ मूर्तींचे वर्णन केले आहे, परंतु वरील शास्त्रांच्या नवदुर्गा-सूचीचे कोणत्याही सूचीशी पूर्ण साम्य नाही, फक्त क्षेमंकरी आणि हरसिद्धी हे दोन नाव आगमाच्या यादीतून घेतलेले दिसतात. अपराजितपृच्छ आणि देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सर्व नऊ मूर्तींचे वर्णन आहे आणि रूपमंडनमध्ये फक्त तीन मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छात नमूद केलेल्या नव दुर्गा मूर्ती म्हणजे महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी. देवमूर्तीप्रकरणातही याच दुर्गेच्या मूर्तींचे वर्णन आहे, फक्त दोन नावांमध्ये काही बदल झाले आहेत. येथे शिवदूतीला सर्वती आणि भ्रमरीला भ्रमणी असे म्हणतात. रूपमंडनमध्ये महालक्ष्मी, क्षेमांकरी आणि हरसिद्धी या तीन दुर्गा मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छ आणि रूपमंडनमध्ये या दुर्गा मूर्तींचे वाहन सिंह असे वर्णन केले आहे. इतर प्राचीन धर्मग्रंथांपैकी अग्निपुराण आणि गरुडपुराणातही दुर्गेच्या सिंह वाहनाचे वर्णन आढळते. उल्लेख केलेल्या सर्व दुर्गा मूर्ती चतुर्भुज आहेत. त्यांचे वेगवेगळे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.

मार्कंडेयपुराणामध्ये वर्णन केलेल्या नवदुर्गा मूर्ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता कात्यायनी, कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा सांगितल्या आहेत. तर अग्निपुराण नुसार रूद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतीचंडा आणि उग्रचंडा ही नावे येतात तर आगम ग्रंथानुसार नीलकंठी, क्षेमंकरी, हरसिद्धी, रुद्राक्षदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, विद्यावासिनी आणि रिपुमर्दिनीदुर्गा सांगितले आहे. तसेच अपराजितपृच्छा नुसार महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी असे वर्णन उपलब्ध होते. दुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मंडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गांचा उल्लेख आहे.

प्रतिमा शास्त्रानुसार देवीच्या हातांच्या संख्येचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. 

महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महाचंडा, भ्रमरी सर्वमंगला, रेवती, हरसिद्धी या चतुर्भुज तर कात्यायनी दशभुजा, भद्रकाली अष्टादशभुजा (१८), दुर्गा षोडशभुजा किंवा अष्टादशभुजा (१६/१८), चामुंडा चतुर्भुज किंवा अष्टभुजा (४/८) असाव्यात. 

देवी शिल्पात विविध भुजाधारिनी कोरलेली पहावयास मिळते. देवीच्या मूर्तीतील वरील हातात कधी कधी एखादी दोर किंवा साप सदृश्य वस्तू दाखविण्यात येते. त्यास काही अभ्यासक केसांच्या जटा किंवा केसात माळण्यासाठी असलेली माला संबोधतात. परंतु वामन पुराणानुसार, 'रुरू नावांच्या असुराने कालीवर आक्रमण केले. तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे काढून त्याने आपल्या जटा बांधल्या. एक अवखळ जटा बांधली जात नाही असे पाहून तिने तिला उपटून जमिनीवर रागाने आपटले. भूमिवर पडलेल्या त्या जटेपासून चण्डमारीची उत्पत्ति झाली.' अशी कथा येते. याच कथेवर आधारित एक मूर्ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिरावरील बाह्यांगवर पहायला मिळते. (प्रस्तुत मूर्ती आमच्या मूर्ती शास्त्र अभ्यास सहलीत अनेक चर्चेअंती काली असल्याचे शिक्का मोर्तब झाले. परंतु दैत्य कोण हे लक्षात येत नव्हते. बऱ्याच ग्रंथात धुंडोळा घेतल्या नंतर मी आणि श्री लक्ष्मीकांत सोनवटकरांनी ही रुरू या दैत्याला मारणारी वामन पुराणातील काली असल्याचे मराठवाडा इतिहास परिषदेत सिध्द केले.)


 नवदुर्गा हिचे मूर्ती शास्त्रीय लांच्छने या अनुषंगाने आपण देविरुप पुढील प्रमाणे पहाणार आहोत.

धार्मिक ग्रंथानुसार आजचे रुप क्षेमंकरी असले तरी प्रतिमा लक्षणानुसार पहिले रूप हे महालक्ष्मी आहे. (अपराजितपृच्छ, रूपमंडन, देवतामूर्तीप्रकरण) 

महालक्ष्मी - 

या दुर्गेच्या मूर्तीचे वर्णन तिन्ही शास्त्रांमध्ये आहे. या शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या निळ्या गळ्यात नाग धारण केलेला असावा आणि तिचा एक हात वरद मुद्रेमध्ये आणि उरलेले तीन हात त्रिशूल, खेटक आणि पानपात्र सोबत असावेत. शिल्पकलेतील दुर्गेच्या महालक्ष्मी-स्वरूपाचे चित्रण दुर्मिळ आहे. वर सांगितलेली शास्त्रवर्णनाशी तंतोतंत जुळणारे महालक्ष्मीचे एकमेव शिल्प चित्तौडगड-विजय स्तंभवरील 'नवदुर्गा समूहा'मध्ये आढळते.

नंदा: 

या मूर्तीचे वर्णन केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात केले आहे, रूपमंडन मध्ये उपलब्ध नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणावरून असे ज्ञात होते की, देवी नंदाच्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, खड्ग, खेटक आणि पानपात्र असावे.

क्षेमंकरी- 

क्षेमंकरीची प्रतिमा-लक्षणे तिन्ही शास्त्रांमध्ये आहेत, परंतु यातील रूपमंडनाचे वर्णन इतर दोन ग्रंथांतील वर्णनांपेक्षा काहीसे वेगळे आहे. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणानुसार क्षेमंकरीचा एक हात वरद मुद्रेमध्ये असावा आणि उरलेल्या तीन हातात अनुक्रमे त्रिशूळ, कमळ आणि  पानपात्र असावे. रूपमंडनमध्ये क्षेमंकरीच्या हातात अनुक्रमे वरद मुद्रा, त्रिशूल, खेटक आणि पानपात्र असे वर्णन केले आहे. त्यामुळे देवीच्या तिसर्‍या हातातील कमळाऐवजी खेटकाचा उल्लेख बदलून महालक्ष्मी व क्षेमंकरी यांच्या हातातील शस्त्रे एकच असल्याचे सांगितले जाते.

शिवदूती किंवा सर्वती- 

दुर्गेच्या चौथ्या मूर्तीला अपराजितपृच्छा मध्ये शिवदूती आणि देवतामूर्तीप्रकरणात सर्वती असे म्हटले जाते, परंतु दोन्ही शास्त्रात उपलब्ध या मूर्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. रूपमंडन मध्ये या मूर्तीचा उल्लेख नाही. इतर दोन शास्त्रांनुसार, दुर्गेची ही मूर्ती कमंडलू, चक्र, खेटक आणि पानपात्राने सुसज्ज असावी. शिल्पकलेमध्ये महालक्ष्मी आणि नंदाप्रमाणे दुर्गेच्या शिवदुती किंवा सर्वती स्वरूपाचे दुर्मिळ चित्रण आढळते.

महारंडा – 

महारंडाचा उल्लेख रूपमंडनमध्ये नाही आणि या मूर्तीची वैशिष्ट्ये इतर दोन शास्त्रांमध्ये काही वेगळ्या प्रकारे दिली आहेत. अपराजितपृच्छा नुसार महारंडाची मूर्ती खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि खेटक यांनी सज्ज असावी, तर देवतामूर्तीप्रकरणात महारंडा अनुक्रमे खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि पानपात्र या लांच्छणाने सुसज्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देवतामूर्तीप्रकरणात देवीच्या शेवटच्या हातातील पात्राचा उल्लेख खेटकाऐवजी बदलला आहे. शिल्पकलेमध्ये क्षेमंकारीप्रमाणेच महारंडाचे सामूहिक आणि स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात चित्रण करण्यात आले होते. 

भ्रमरी किंवा भ्रमणी- महारांडाप्रमाणेच या दुर्गेच्या मूर्तीचा उल्लेखही रूपमंडनमध्ये नाही आणि इतर दोन ग्रंथांमध्येही देवीचे नाव आणि तिच्या शेवटच्या हातातील शस्त्र बदलले आहे. अपराजितपृच्छात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीला भ्रमरी असे म्हणतात आणि तिच्या हातात अनुक्रमे खड्ग, डमरू, खेटक आणि पानपात्र असल्याचे वर्णन केले आहे, तर देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीचे नाव भ्रमणी आणि शेवटच्या हातात पानपात्र ऐवजी पाश असल्याचा उल्लेख आहे आणि इतर तीन हातांची शस्त्रे निश्चितपणे खड्ग, डमरू आणि खेटक आहेत. शिल्पकले मध्ये भ्रमरी किंवा भ्रमणी यांच्या वरील वर्णनांशी साधर्म्य असलेली मूर्ती दुर्मिळ आहेत. 

सर्वमंगला- 

सर्वमंगलाचा उल्लेख केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात आहे, रूपमंडनमध्ये नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरण नुसार, सर्वमंगला आपल्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, वज्र, घंटा आणि पात्र धारण करते.

रेवती- 

सर्वमंगलाप्रमाणे रेवतीचा उल्लेख रूपमंडन मध्ये नाही आणि इतर दोन शास्त्रांमध्ये वर्णन केलेली या देवीची हातातील शस्त्रे सारखीच आहेत. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरण या दोन शास्त्रांनुसार, रेवतीच्या हातात अनुक्रमे दंड, त्रिशूळ, खटवांग आणि पानपात्र असले पाहिजेत.

हरसिद्धी- 

हरसिद्धीचे मूर्ती लक्षण तीनही शास्त्रांमध्ये आढळते. या शास्त्रानुसार हरसिद्धीने आपल्या हातात अनुक्रमे कमंडलू, खड्ग, डमरू आणि पानपात्र धारण केले पाहिजे.

सामुहिक चित्रणांमध्ये वरील प्रमाणे उल्लेखित मूर्ती या केवळ चित्तोडगड-विजय स्तंभाच्या नवदुर्गा-समूहात कोरलेल्या आढळून येतात.

संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार 

🙏🏻

धारासुर येथील दुर्गा प्रतिमा (फोटो - श्री जयराम कदम यांच्या कडून साभार)

पट्टदकल येथील दुर्गा देवीच्या मूर्तीचे विविध अंगाने घेतलेले फोटो (फोटो - श्री अमर रेड्डी यांच्या कडून साभार)

 https://olakhmurtishatrachi.blogspot.com/2023/10/blog-post.html

पाल शिल्प कलेतील मातृ भावना...


पाल कालखंडात दहाव्या शतकात निर्माण झालेली साधारणतः लांबी 35" (89 सेमी) असलेली ही मूर्ती आहे. एका ऋषीची पत्नी सुचिस्मती हिला स्वतः शिवासारखा मुलगा हवा होता. तिची इच्छा लक्षात घेऊन तिच्या पतीने वाराणसी (बनारस) येथे एका लिंगाची पूजा केली आणि शिवाने स्वत:ला सुचिस्मतीचा मुलगा म्हणून जन्म घेतला, ज्याचे नाव गृहपती होते. ऋषी पत्नीच्या इच्छेसाठी, शिवाने हे नाव आणि रूप धारण केले, तर गृहापती हे नाव अग्निशी संबंधित असून शिव व अग्नी यांचा सहसंबंध ही पौराणिक कथेत सापडतो. ही आख्यायिका पाल राजवंशात शिल्पांमध्ये वारंवार दर्शविली जाते, ज्यामध्ये आई आणि मूल एका भव्य पलंगावर झोपलेले दर्शवितात. शिल्पपटाच्या मध्यभागी आई आणि मुल दाखविले जाते. प्रस्तुत शिल्पात सुचिस्मतीच्या पायाची मालिश करणारी एक महिला परिचारक कोरलेली असते; तर दुसरी हाती पंखा घेतलेली परिचारिका ही डोक्याजवळ असते. शिल्पाच्या वरील बाजूस लिंग आणि कमलस्थित गणेश असतो. त्या सोबतच नऊ ग्रह कोरलेले असतात. खालील बाजूस म्हणजे पलंगाच्या समोर, उपासकांच्या लघु आकृती आणि विविध धार्मिक वस्तू दाखवतात. आई सुंदर पोशाख घातलेली असून तिचे खांदे आणि डावा हात एका मोठ्या उशीवर टेकवलेले आहेत. तिने तिचा उजवा हात वर केलेला असून ती कमळ धारिनी आहे, ती तिच्या शेजारी झोपलेल्या बाळाच्या संदर्भाने विचार करते आहे, असे वाटते. प्रस्तुत शिल्प सुव्यवस्थित, भव्य रचनेसह निर्माण करण्यात कलाकार यशस्वी झालेला आहे. हे शिल्प केवळ पाल शिल्पकलेलाच नव्हे तर भारतीय शिल्पकलेला समृद्ध करते, जिथे पाल कलेतील आई आणि मुलाची कथा शिल्पित आहे, जी एका दैवी जन्माचा संदर्भ देते. असे असले तरी सुलभ मातृ भाव स्पष्ट होण्यास भारतीय शिल्प कला धर्म आणि धर्माच्या माध्यमाने मानवी भावना समृध्द करते असेच म्हणावे लागेल.
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार 🙏
मातृदिनाच्या शिल्प शुभेच्छा 
 

माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी




कल नुमाइश में फिर गीत मेरे बिके
और मैं क़ीमतें ले के घर आ गया,
कल सलीबों पे फिर प्रीत मेरी चढ़ी
मेरी आँखों पे स्वर्णिम धुआँ छा गया।

नुकतीच ही गजल वाचण्यात आली. कोण्या अनामिकाने हे लिहलेले वाचून मन खिन्न झाले. नुकतेच माणकेश्वर (तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद) येथील माणकेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिर आणि गावाचे नाव एकच असल्याने शोधणे अवघड नाही. (गुगल बाबा आहेतच) अतिशय भव्य असे त्रिदल मंदिर, सुंदर रेखीव काम केलेल्या द्वारशाखा, बाह्यांगावर भग्न सुरसुंदरी यांची रेलचेल, रिकामी देवकोष्ट सारे काही मन उदास करणारे असले तरी, जे शिल्लक आहे; ते नसे तोकडे असे म्हणून गोड करून घ्यायचे ठरविले आणि निघालो एक एक शिल्प पाहत. त्यातील प्रत्येक शिल्पाचे वेगळेपण हळूहळू जाणवायला लागले. केश रचना, अलंकार, मेखला, वस्त्रालंकार, उभे राहण्याची ढब. त्यातील दर्पणा, शुकसारिका, विन्यासा, केतकीभरणा, चामरा, पद्मगंधा, तोरणा, मुग्धा, अलसा असे एक एक शिल्प न्याहाळताना अचानक एके ठिकाणी थबकलो. असे शिल्प पहिले नव्हते, असे नाही. पण यातील सौंदर्य काही वेगळेच भासत होते. ही आहे 'कर्पुरमंजिरी' म्हणजे जी, 'न्हाऊन झाल्यावर केसातून पाणी पिळून काढत असलेली'  शिल्पांकित केली जाते. स्नान केल्या नंतर स्त्री अधिक प्रसन्न, उल्हासित आणि कामुक भासते. क्षिरार्णव या ग्रंथात 'नग्नभावे कृतस्नाना नम्ना कर्पुरमंजिरी' असे वर्णन येते. चितोड येथील कीर्ती स्तंभावर हिच्या शिल्पासह कर्पूरमंजिरी असे नाव कोरलेले आढळते. तिच्या मऊ मुलायम केसातून निथळणारे थेंब हंस किंवा चातक आसुसले पणाने पित असताना दाखविले जाते. बहुतांश ठिकाणी केवळ कल्पना करावी लागते. कारण चातक किंवा हंस यांची उपस्थित नसते. प्रस्तुत शिल्पात त्रिभंग अवस्थेत ही ' ललना ' उभी असून अंगप्रत्यांगाने ती नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली नवयौवना आहे अशी भासते. गळ्यामध्ये ग्रैवैयक, स्तनहार, बाजूबंद, कंकण, मेखला, तोडे, पदजालक हे तिच्या कमनीय देहावर शोभून दिसतील असे मोजकेच अलंकार तिने परिधान केलेले आहेत. कदाचित तिरप्या चेहऱ्यावर सुंदर असे शिरोभूषण असावे. तसेच धनुष्याकृती भुवया, धारदार नासिका, पातळ नाजूक ओठ, आंब्याच्या कोई सारखी हनुवटी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालीत असावेत. आज आपण केवळ कल्पना मात्र करू शकतो. 
बांधेसूद शरीर, हाताच्या पंजाने मोजता येईल अशी नाजूक कटी, डाव्या पायावर सर्व शरीराचा भार असल्याने अगदी गोलाईयुक्त नाजूक डावा कमरेचा भाग, देहूडा पाऊली उभी असलेली ही सूरसुंदरी तिच्या कमनीय देहाचा प्रत्येक अवयव तारुण्याची उधाण ल्यालेला दाखवण्यात कलाकाराला विलक्षण यश लाभलेले आहे. तिचे गोलाकार स्तन मंडळे दाखविण्यात कलाकाराचे कसब पणाला लागलेले आहे. अत्यंत रेखीव अवयवाची ही सूरसुंदरी आपल्या उजव्या हाताने केस सांभार सांभाळत; असलेले घनदाट केस हळुवार पिळत असताना तिच्या केसातून ठिबकणारे थेंब जणू काही मोती आहेत. असे समजून हंस पक्षी ते मोती टिपण्याच्या तयारीत आहे. सदरील शिल्पात कोरलेला हंस आपली चोंच उघडून प्रत्येक थेंब अधाशासारखा पिण्यास व्याकुळ झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रस्तुत शिल्प केवळ एक बाय तीन फूट एवढ्या जागेत कोरलेले आहे. 
( हंस हा तसा शाकाहारी प्राणी असून क्वचित प्रसंगी पाण्यातील किडे खातो. त्याचे पाणी आणि दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य असते. हंस मोती खातो अशी धारणा प्राचीन काळापासून साहित्यात दिसून येते. परंतु यात कवी कल्पनेच्या पलीकडे वास्तवाशी संबंध नाही. )
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार.
IRS & I-SARC


शोध - शीतला देवीचा'



आज शीतला सप्तमी निमित्ताने.....

ठिकाण - मुखेड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर वसलेले तालुक्याचे गाव.

स्थळ - दशरथेश्वेर मंदिर, मुखेड.


माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.


जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व याचे मुख्य कारण असू शकते. मातेच्या रूपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही गोष्टी स्त्रीकडे असल्यामुळे मातृ उपासना जगामध्ये सुरू झाली असावी. भारतात आणि भारताबाहेर कित्येक ठिकाणी मातृ देवतेच्या मूर्ती आढळून येतात. बलुचिस्थान, इराण, मेसोपोटेमिया, तुर्कस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त येथेही स्त्री अथवा मातृ देवतेच्या मूर्ती आढळून आलेले आहेत. निरनिराळ्या मूर्तीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, शक्तीची उपासना तीन प्रकारे केल्या जाते. एक म्हणजे दिगंबर रूपा मध्ये, दुसरे रूप म्हणजे लहान मुलासह आणि तिसरा भाग म्हणजे दिग्वसना स्त्री दाखवितात पण मुखाच्या ठिकाणी कमलासारखी फुले, पशु किंवा पक्षाचे तोंड असते. नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे दशरथेश्वर मंदिर असून हे शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पांकन असून त्यात नृत्य मग्न सप्तमातृका ही आहेत. जे की इतर कुठल्याही मंदिरावर आढळून येत नाहीत. याच बाह्य भागावरील मूर्तीत उत्तरेकडील शिल्पपटात पश्चिमाभिमुख एक मूर्ती असून ही मूर्ती शितला देवीची आहे. या मूर्तीस अनेक अभ्यासकांनी ज्येष्ठा देवी असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये ही मूर्ती असून ही देवी स्थानक आणि चतुर्भुज आहे. तिने उजव्या खालील हातात सुरा, उजव्या वरील हातात केरसुनी, डाव्या वरील हातात सूप आणि डाव्या खालील हातात कपाल पत्र घेतले आहे. ही सारी लक्षणे मूर्ती शास्त्रा नुसार शितला देवीची ठरतात. परंतु काही अभ्यासक ही मूर्ती लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असल्याचे प्रतिपादन केले आहे. देवीने डोक्यावर मुकुट घातला असून त्यावर एक असुर मुंड आहे. कानात कुंडले आणि डाव्या खांद्यावरून मुंडमाला धारण केलेली आहे. देवीची प्रतिमा नग्न असून पादपिठावर तिचे वाहन गाढव कोरण्यात आलेले आहे. स्कन्द पुराणातील शितलाष्टकानुसार सदर देवीचे वर्णन पाहता ही मूर्ती शितला देवीची मूर्ती ठरावी. या अनुषंगाने आपण काही बाबींचा मागोवा घेऊयात. 


स्कन्द पुराणातील भगवान शिव रचित शितलाष्टका नुसार, "गाढवावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू अथवा कलश धरण करणारी, सुप अलंकृत मस्तकवाली, भगवती शितलास मी वंदन करतो." असे पहिल्या चरणात म्हटले आहे. सदर मूर्ती ही दिगंबरा असून हाती झाडू, सूप, कपाळ पात्र आणि सुरा आहे. स्कन्द पुराणातील वर्णना प्रमाणे हाती कलश नसून सुरा दाखवण्यात आलेला आहे. कारण ही मूर्ती संहार मूर्ती असून ती ज्वरासूर अर्थात ज्वर दैत्याचा अंत करीत आहे. बाकी सारी लक्षणे शीतला देवींचीच आहेत. त्यासोबतच गळ्यात असलेली मुंड माला ही लक्षणे ही शिवाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे किरीट मुकुटावर ही एक मुंड कोरण्यात आलेला आहे. देवीच्या बाजूला तिचे गण वेताळ आणि पिशाच्य दाखविलेली आहेत. सदरील मूर्ती आकाराने 106 cm बाय 52 cm आहे. मूर्तीतील प्रत्येक आयुधांचा आपण प्रथमतः विचार करु. सुरा अथवा छुरीका हे संहार शास्त्र आहे. या मूर्ती मध्ये कलश नसून ती ज्वर दैत्याचा नाश करीत असल्याने सुरा दाखविलेला आहे. तर झाडू हे स्वच्छता दर्शक लक्षण आहे. तर सूप हे थंड हवा देण्यासाठी वापरण्यात येते. कपाल पात्र हे दैत्य रक्त प्राशन करण्यासाठी उपयोगात आणले जाते. ही देवी वैज्ञानिक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. दाहज्वर, पीतज्वर, कांजण्या, दुर्गंधी युक्त फोडे, नेत्र विकार हे रोग दूर करणारी देवता म्हणून शितला देवी ओळखली जाते. सदरील देवी जवळ लिंबाचे डहाले ठेवली जातात कारण त्या मुळे शीतलता निर्माण होते. हाती असलेला झाडू हे स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास प्रेरणा देणारे आहे. ऋतू परिवर्तनाणे वातावरणात अनेक बदल होतात. त्या साठी सफाई वर भर दिला गेला पाहिजे. कांजण्या झाल्यावर शरीर दाह कमी करण्यासाठी सुपाने वारे देऊन रोग्याला आराम मिळून देता येते. तर गाढव हे वाहन दाखविण्यामागे ही वैज्ञानिक करणे आहे. गाढवाची लिद रोग्याच्या अंगास लावल्याने त्याचा शरीरा वरील फोडचे डाग कमी होतात. कांजण्या झाल्यामुळे अंगावरील फोडे फोडण्याचे काम झाडूने अथवा फडा घेऊन करता येते. लिंबाची पाने ही फोडे सडू नयेत किंवा त्याचे संक्रमण होऊ नये यासाठी उपयोगी येतात. अशा रोग्यांना थंड पाणी प्यावे असे वाटत असल्याने, शितला देवीच्या हाती कलश दाखविला जातो. कांजण्या हा आजार खूप जुना असून ग्रीक मध्ये इसवी सन पूर्व बाराशे मधील एका ममीचा मृत्यू कांजण्या आजाराने झाल्याचे मानले जाते.



सदरील मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवीत प्रमाणे डाव्या खांद्यावरून रुळणारी मुंडमाला ज्यामध्ये एकूण 18 मुंडांची माळ स्पष्ट दिसून येते. ही मुंड माला पाहता शिव परिवारातील देवता शितलादेवी असल्याचेच सिद्ध होते. ज्येष्ठा ही विष्णू परिवारातील देवता असल्याने तिच्या गळ्यात मुंड माला येणे आणि कपाल पात्र धारण करणे कदापी ही शक्य नाही. पूर्वाश्रमीच्या अभ्यासकांकडे असलेली अपुरी साधने, संशोधकांची मर्यादा आणि ही शीतला माता असू शकते असे कदाचित वाटलीच नसावे. त्यामुळे या शीतला देवीच्या मूर्तीस अनावधानाने अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असे संबोधले असावे. असेही पौराणिक कथेनुसार अलक्ष्मी ही संहार रूपात दाखविली जात नाही. म्हणूनच मुखेड स्थित दशरथेश्वर मंदिरावरील मूर्ती ही ज्येष्ठा किंवा अलक्ष्मी ची नसून ती शीतला मातेची मूर्ती असल्याचे ठामपणे म्हणता येईल. माता शितलादेवी स्वच्छतेची जाणीव करून देते. देवी शीतला ही संक्रमना पासून बचाव करण्याची शिकवण देणारी वैज्ञानिक देवी आहे.

 

धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध





भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे मोहिनीचे शिल्प नसून कालीचे शिल्प आहे.

 गावाजवळच एका खडकाळ शेतात चालुक्यकालीन कलेचा अप्रतिम अविष्कार असलेले केदारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे धर्मापुरीतील जतन केलेले असे एकमेव मंदिर होय. नुकतेच या मंदिराचा पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धार करण्यात आला. अर्ध मंडप, मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे केदारेश्वर मंदिर चालुक्य  राजा विक्रमादित्य सहावा याने बांधल्याची नोंद आढळून येते. मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या जंघा भागावर आकाराने पुष्ट असलेल्या शैव-वैष्णव तसेच शक्तांची मिळून एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यातील मंदिराच्या पश्चिम पूर्व कोपऱ्यात अर्थात अग्नेय दिशेला पूर्वेकडे तोंड करून दक्षिण दिशेकडून अनुक्रमे आठव्या क्रमांकाची सुमारे 102 सेंटिमीटर उंच आणि 46 सेंटिमीटर रुंद अशी कालीची संहार मूर्ती आहे. या मूर्तीस अभ्यासकांनी भस्मासुराला मारणारी मोहिनी आहे असे म्हटले असले तरी, मूळच्या मोहिनी आणि भस्मासुराच्या कथेशी ही कथा जुळत नाही. मूळच्या मोहिनी रूपातील विष्णूची कथा अशी आहे की, भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने अतिशय आकर्षक असे स्त्री रूप घेतले होते. भस्मासुरास शिवाने दिलेले वरदान असे होते की, " तो ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल." मिळालेल्या वरदानाच्या प्रचीती साठी भस्मासूर शिवाच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी मागे लागला. तेव्हा शिवाचे रक्षण करण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेऊन भस्मासुरा समोर आली असता; तिच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून भस्मासुराने मोहिनी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्या वेळी "मी एक नर्तकी असून मला नृत्यात प्रवीण असलेल्या व्यक्ती सोबतच लग्न करावयाचे आहे." असे मोहिनीने म्हटल्यामुळे भस्मासुराने मोहिनीस नृत्य शिकवावे अशी विनंती केली. त्याच्या विनंतीस होकार देत मोहिनी भस्मासुरास नृत्य शिकवू लागली. अशा पद्धतीने मोहिनी रूपातील श्रीविष्णूने भस्मासुरास नृत्यास भाग पाडले. नृत्याच्या विविध मुद्रेत मोहिनीने (विष्णूने) स्वतःच्या मस्तकावर अचानक हात ठेवला व मिळालेल्या वरदानास विसरून तसेच कृत्य भस्मासुरा कडून झाले आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवताच भस्मासुर जागीच भस्म झाला. हे विश्लेषण पाहता प्रस्तुत मूर्ती मोहिनीची असावी अशी यत्किंचित ही शक्यता नाही. केदारेश्वर मंदिरावरील सदरील मूर्तीचे अवलोकन केले असता. श्यामा रहस्य या ग्रंथातील कालिच्या वर्णनाप्रमाणे चतुर्भुज, मुंड माला विभूषित, घोर दंतावली, पुष्ट आणि उन्नत स्तना असलेली, असे वर्णन सांगितलेले आहे. प्रस्तुत शिल्पात स्त्रीरूपी देवता राक्षसाच्या मुखवरील त्वचा सोलून काढीत असल्याने ती मोहिनी रूप होऊ शकत नाही. तर या शिल्पातील स्त्री देवता अलिढासनातील स्थानक मूर्तीत चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने उजवा हात चेहऱ्यावरील कातडी सोलून काढीत आहे. तर उजव्या वरच्या हातात त्रिशूल किंवा खट्वांग प्रमाणे तुटलेले शस्त्र दिसते आहे. डाव्या वरच्या हाताने राक्षसाने मारलेल्या खडगास वरच्यावर रोखून धरलेला असून खालच्या डाव्या हाताने राक्षसाचे केस गच्च धरलेले आहेत. देवीची शरीररचना प्रमाणबद्ध सुंदर असली तरी, बाहेर आलेले सुळे दात, त्रिशूल किंवा खट्वांग, शरीरावर रेंगाळणारी मुंड माला या लक्षणांवरून ती काली असून मोहिनी ठरत नाही. वामन पुराणात रूरू नावाच्या असुराने काली वर आक्रमण केले असता तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व त्या असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे सोलून काढून त्या कातड्याच्या वादी बनविल्या आणि त्याने आपल्या जटा बांधल्या. असा उल्लेख आलेला आहे. या कथानकावरून ही मूर्ती कालीची आहे, हे स्पष्ट होते. वामन पुराणातील या कथानकाप्रमाणे मूर्तीतील देवीने डाव्या हाताने राक्षसाचे किंवा दैत्याचे केस धरून उजव्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे सोलून काढलेली आहे. त्यामुळे राक्षसाची कवटी दिसत असून डोळे कवटीच्या खोबणीतून बाहेर आलेली आहेत. तसेच नाकाचे हाड ही स्पष्ट दिसते  आहे. ओढून काढलेली त्वचा गळ्याजवळ एकत्र जमलेली असून त्वचेचा नाकावरील भाग, डोळ्यांची बुबुळे असलेली पोकळ जागा तसेच ओठ ही कोरलेले दिसतात.

 शिल्पकलेच्या दृष्टीने प्रस्तुत शिल्प निर्माण करणे ही कलाकाराच्या कलेची कसोटी होती असे म्हणावे लागेल. कारण या शिल्पात चेहऱ्यावरून सोलून काढली त्वचा दाखविण्याचे कसब सामान्य शिल्पीचे नक्कीच नाही. धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरास भेट दिल्यास नक्कीच हे शिल्प आपले लक्ष वेधून घेणारे असणार आहे हे निश्चित. नेहमी देवतेच्या रूपा वरून राक्षस शोधत असतो पण इथे राक्षसा वरून देवतेची ओळख पटली हे विशेष आहे. रुरू सिद्ध झाल्या वरच काली पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.

 टीप :- या शिल्पा संबंधी मराठवाडा इतिहास परिषदेच्या 40 व्या अंकात शोधनिबंध सादर करण्यात आला आहे. अभ्यासूंनी मूळ शोधनिबंध पहावा.

 

पाचवीला पुजलेली सटी

 

सटीचा लेखाजोखा

      आतल्या खोलीतून नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाहेरच्या बाजूला मात्र काही साहित्याची जमवाजमव चाललीय. ‘मालटा’ नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू,  पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व जमवाजमव चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने होत असलेला हा विधी पश्चिम किनारपट्टीवरील रायगड परिसरातही होताना दिसतो.
    या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मानले जाते. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पाच विडे मांडून त्या विड्यांवर सुपारी,बदाम, खारीक,अक्रोड,हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात. या दिवशी घुगऱ्या ,उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. बाळंतिणीच्या खाटेच्या चार पायांजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवतात.
    जिल्ह्याच्या उत्तर भागातील विधीमध्ये नाममात्र फरक असतो. इथे पाट्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्याला टेकून ठेवतात .पानाच्या टोकांना शेंदूर लावतात. काजळाची दोन बोटे प्रत्येक पानाला दोन डोळे म्हणून लावतात. काही ठिकाणी रुईच्या पानांवर ‘सटी व लाठा’ अशी दोन चित्रे काढली जातात. समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपऱ्यांना चार पीठाचे दिवे लावतात. प्राचीन परंपरेची जपणूक करणारा मालटा हा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात. नंतर पूजन करून नैवैद्य दाखवला जातो.

    याच विधीला ‘सटी’ असेही म्हटले जाते. ही सटी म्हणजे ‘सटवाई’ किंवा ‘सटवी’ या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत ‘षष्ठी’ या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री ‘सटवी’ देवीची शांती करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ, कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वत: येऊन त्या मुलाच्या कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच ‘ब्रम्हलिखित’ असे म्हटले जाते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते.

 सटवी, सटुआई, सटी,षष्ठी,रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?
या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय’ म्हणतात. स्कंद म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय. काश्यपसंहितेप्रमाणे षष्ठी ही स्कंदाची बहिण आहे. स्कंद व विशाख हे तिचे दोन भाऊ. तर याऊलट ‘देवी भागवत पुराण’ व महाभारतानुसार ती स्कंदाची पत्नी आहे. इथे ती देवमेना या आणखी एका उपनावाने ओळखली जाते. सुश्रुतसंहिता षष्ठीला ‘रेवती’ हे आणखी एक नाव देते.  कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. कुषाणकाळानंतर शिल्प क्षेत्रांत हा प्रकार लुप्त झाला. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. याच काळात षष्ठीदेवीच्या नावाला धरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत होती. सन ५३२ मध्ये मध्यप्रदेशातील मंदसोर येथे कोरलेल्या यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन याच्या लेखांत ‘षष्ठीदत्त’ नावाची व्यक्ती आढळते, तसेच द्रोणसिंहाच्या भामोद्रामोहता ताम्रपटाचा क्षत्रक नावाचा लेखक ‘षष्ठीदत्तां’चा मुलगा होता. बंगाली लोकांत षष्ठीचरण हे नाव आज ही आढळते.
   प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी  पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला’ असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी’ या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते. परंतु कालांतराने जसे दगडी दिव्याची जागा धातूच्या दिव्याने घेतली, तसेच या ‘लेडीज स्पेशल’च्या कार्यक्रमात पुरूषांनीही शिरकाव केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ‘मांस-मद्या’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला अर्वाचीन पद्धतीने साजरा करतोय. ‘अर्थ समस्या’ नावाची गोष्ट पाचवीलाच पुजलेल्या मुलींच्या पालकांसाठी ही नवी प्रथा अनर्थाकडे नेत आहे. यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मुलीकडील लोकांना हा ‘जादाचा भुर्दंड’ बसतो. अर्थात संस्कृतीत घडणारे नवे बदल स्विकारायला हवेतच, पण हे बदल असंस्कृत नसतील याची काळजी घ्यायला हवी. या नव्या प्रथांना आवर घालायलाच हवा. देवी सटवाईच या नव्या प्रथाकारांच्या भाळी सद्बुद्धी लिहो, ही सदीच्छा!

                          - तुषार म्हात्रे , पिरकोन (उरण)

 नवरात्रोत्सव⛳⛳

नवरात्र हा सण देवी दुर्गेचा!! महिषासूर नावाच्या म्हशीच्या तोंडासारख्या  राक्षसावरील मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 


आख्यायिकानुसार

राक्षसांच्या वाढत्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी समस्त देवतांनी दुर्गेची निर्मिती केली. ह्या आगाऊ

महिषासुराने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दुर्गेने लग्न करण्याआधी एका युद्धामध्ये स्वतःला हरवण्याची अट महिषासुराला घातली.  इथेच फसला तो.... हे युद्ध ९ दिवस आणि ९ रात्र चालले होते. दहाव्या दिवशी दुर्गा देवीचा विजय झाला! 


 तेव्हापासूनच 

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेंपर्यँत देवी सामर्थ्य व शौर्याचप्रतीकच  झालेली दिसते!

महिषातकरी येन पूजिता स जगतप्रभूं.... अर्थात ज्याने महिषासुरमर्दिनी ला पूजिले तो जगाचा स्वामी होतो...! हे ही रूढ झाले असेल... बऱ्याचदा पूजेअंती/ युद्धविजयप्राप्ती करिता तत्कालीन वीरराजे महाराजे महिषासुरमर्दिनीला म्हशीं/रेड्याचाच बळीसुद्धा देत!!!


 याचे काल्पनिक का असेना पण उदाहरण म्हणून अगदी अलीकडील बिग बजेट असलेल्या बाहुबली चित्रपटाचे देता येईल😎 यात भल्लाळदेव युद्धाच्याप्रारंभी एक घाव दोन तुकडे करत महाकाय रेड्याचा कार्यक्रम करतो....

तर त्यांचाच भाऊ बाहुबली आधुनिकप्रगल्भते चा दाखला देतांना प्राणिप्रेम व्यक्त करत अवघ five ml blood sample देत रेड्याला जीवदान देतो!🤣🤣😂😂(हे पाहून त काही जणांनी बाहुबली ला देशद्रोही, सेक्युलर,पुरोगामी ही ठरविले असेल🙉🙊🙈) 


असो...

थोडक्यात सांगायचे झालं तर राज्य,राजवट कुठलीही असो...

चौल-चालुक्य असो की होयसळ...

चंदेल असो की परमार...

राष्ट्रकूट असो की यादव....


देवीचं महिषासुरमर्दिनी स्वरूप हे प्रचंड लोकप्रिय होतं...

म्हणूनच आजही त्या त्या राजवटीच्या अस्तित्वातच्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी च देखणं रूप शिल्प/मूर्ती रुपात आपल्याला दर्शन देते म्हणजे देतेच! आपल्या देशातलं कुठलंही म्युझियम महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती शिवाय अपूर्णच म्हणावं लागेल! तर काही ठिकाणी पूर्णपणे झीज झालेल्या मूर्ती ही दिसतील, बरं ह्या ओळखन ही अगदी सोपं आहे ४ ते १० हात, प्रत्येक हातात काहींना काही शस्त्र आहेच,

पायथ्याशी चिरफाड झालेला महिषासुर त्याच्या बाजूला दुर्गेच वाहन आक्राळ विक्राळ सिंह.... बस ऐवढंच,.... 

शेवटी जाता-जाता...बरं त्या सर्वच हातात शस्त्रच आहे...ऐकाही हातात ती दांडिया ची टिपरी नाहीये त्यामुळे ते हल्ली आडमाप मेकअप करून दांडियाचा धांगडधिंगा कुठून आला माहिती नाही!!

🤦🏽‍♂️🙈🙊🙉


नवरात्रोत्सवाच्या मनस्वी शुभेच्छा....

 

नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं.

सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून.

लज्जागौरी

लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले.

१. ही पेडगावच्या भैरवनाथ मंदिरातील लज्जागौरीची प्रतिमा. इ.स. साधारण १३ वे शतक. यादव राजवट.
हिच्या योनीतून दोन सर्प बाहेर आले असून ते पुरुष शक्तीचे प्रतिक आहेत.
a

२. ही वेरूळमधली रामेश्वर लेण्यातील (लेणी. क्र. २१ ) येथील नंदीपीठाच्या मागील बाजूस कोरलेली आहे. इ.स. ७ / ८ शतक.

a

सप्तमातृका

ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमातरः॥

सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. सृजनशक्तीची ही प्रतिकं. यातल्या ब्राह्मी, कौमारी, ऐन्द्राणी आणि वैष्णवी ह्या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, वाराही, चामुंडा ह्या मूळच्या अवैदिक अर्थात अनार्य अंशाच्या. काही वेळा सात मातृकांबरोबरच आठवी नारसिंहीही दिसते.
सप्तमातृका ह्या नेहमी पट ह्या स्वरूपात दिसतात. म्हणजे सुरुवातीला वीरभद्र आणि शेवटी गणेश आणि मध्ये सात मातृका त्यांच्या बाळांसह. मातृका ओळखणे तसे फार सोपे. मातृकांखालीच प्रत्येकीची वाहने कोरलेली असतात.

ब्राह्मणी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरूड
वाराही - वराह किंवा महिष. ही काही वेळा वराहमुखी पण दाखवली जाते.
ऐन्द्राणी - हत्ती
चामुंडा - प्रेत, शृगाल, कुत्रा किंवा घुबड

यातली चामुंडा सर्वात सुप्रसिद्ध. कदाचित चालुक्यांची ती कुलदेवता असल्याने तीला मानाचे स्थान मिळालेय. कंकालस्वरूप शरीर, लोंबलेले स्तन, पोटात असलेला विंचू (हे तिच्या सतत जागृत असलेल्या भुकेचे प्रतिक) आणि पायांतळी प्रेत ही तिची सर्वसाधारण लक्षणे. सप्तमातृकापटांसह ही एकच मातृका स्वतंत्ररीत्या कोरलेलीही बर्‍याच वेळा आढळते.

वेरूळच्या 'रावण की खाई' (लेणी क्र. १५) मधील सप्तमातृका पट

३. ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी अनुक्रमे हंस, बैल, मोर आणि गरूड ह्या वाहनांसह

a

४. वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा अनुक्रमे वराह, हत्ती आणि घुबड ह्या वाहनांसह
a

वेरूळ येथील कैलास एकाश्ममंदिरातील यज्ञशाळेतील सप्तमातृका

५. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (हंस) आणि माहेश्वरी (बैल)
a

६. कौमारी आणि वैष्णवी अनुक्रमे मोर आणि गरुडासह
a

७. वाराही (महिष), ऐन्द्राणी (हत्ती) आणि चामुंडा (शृगाल अथवा कुत्रा)
a

८. सप्तमातृकापट कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

a

९. पूर्णपणे उभ्या स्थितीतील सप्तमातृकापट, वेरूळ

a

१०. चामुंडा, सोमेश्वर मंदिर, पिंपरी दुमाला (१३ वे शतक)
a

११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)

a

१२. चामुंडा, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (११-१२ वे शतक)

a

१३. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातीलच अजून एक देखणी चामुंडा

a

सप्तमातृकांसोबतच नंतरच्या काळात गणेशाचे स्त्रीरूपसुद्धा तंत्र पंथात समाविष्ट झाले. विनायकी अथवा गणेशिनी ह्या नावाने हे रूप ओळखले जाते.

१४. पाटेश्वर येथील विनायकी, साधारण १४ वे शतक
a

१५. भुलेश्वर येथील विनायकी

a

सरिता देवता

भारतात नद्यांनासुद्धा देवता मानले जाते. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन प्रमुख सरिता देवता. ह्या आपल्याला वेरूळ येथे कोरलेल्या दिसतात. गंगेचे वाहन मकर, यमुनेचे कूर्म तर सरस्वतीचे कमळ

१६. मकरारूढ गंगा
a

१७. कूर्मारूढ यमुना
a

१८. कमलारूढ सरस्वती
a

१९. वेरूळ येथील रामेश्वर लेणीतील (क्र. २१) गंगेचे अप्रतिम शिल्प
a

२०. यमुना, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ

a

पार्वती
बहुतेक वेळा पार्वतीची मूर्ती ही उमा-माहेश्वर अशा स्वरूपात आढळते. स्वतंत्रपणे कोरलेल्या तीच्या अगदी मोजक्या मूर्ती आढळतात. पार्वतीचे वाहन गोधा अर्थात घोरपड, पार्वतीच्या भोवती पाच अग्नी दाखवतात. ४ यज्ञकुंडातले अग्नी आणि पाचवा सूर्य. शंकर हा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीने पंचाग्नीसाधन करून कठोर तप केले अशी पौराणिक कथा.

२१. वेरूळ येथील लंकेश्वर लेणीतील पार्वती. लक्षपूर्वक पाहिल्यास पार्वतीच्या एका हाती गणेश तर दुसर्‍या हाती शिवपिंडी दिसेल. भोवती अग्नी धगधगत असलेले दिसतील, वाहन गोधा

a

२२. पार्वती, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ

a

अन्नपूर्णा
हे ही देवीचेच एक स्वरूप. पार्वतीचा अवतार. आपल्या घरी अन्नपूर्णा सौख्य आणि समृद्धी घेऊन येते अशी समजूत. तिची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे एका हातात पळी तर दुसर्‍या हाती कणीस, तर कधी कमंडलू. खिद्रापूरच्या मंदिरात अंतराळाच्या भिंतीत अन्नपूर्णेची पळी हातात घेतलेली एक सुरेख मूर्ती आहे. दुर्दैवाने माझ्याकडील ते छायाचित्र खराब झाले.

२३. वेरूळच्या कैलास एकाश्ममंदिरातील प्रदक्षिणापथाच्या भिंतीत कोरलेली अन्नपूर्णा
a

लक्ष्मी

लक्ष्मी म्हणजे धनाची देवता. हिंदू धर्मात ती कोठून आली हे विवाद्य आहे. काही जण ती जैन तर काही जण ती बौद्ध धर्मातून आली असे मानतात तर बरेच जण ती मूळची हिंदू धर्मातीलच असे मानतात. माझ्यापुरते मी ती सप्तमातृकांतील वैष्णवीतून उत्क्रांत झाली असावी असे मानतो.

लक्ष्मीचे सर्वपरिचीत स्वरूप हणजे गजान्तलक्ष्मी.
सरोवरातील कमळपुष्पावर आरूढ लक्ष्मीला दोन गजांकडून जलाभिषेक होत आहे हे तिचे स्वरूप.

२४. गजान्तलक्ष्मीचे सर्वात सुंदर रूप वेरूळ येथे शिल्पांकित केलेले आहे.
a

२५. गजान्तलक्ष्मी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
a

२६. गजलक्ष्मी, रावण की खाई (लेणी क्र. १५)
a

२७. लक्ष्मी, यज्ञशाळा, कैलास लेणे, वेरूळ

a

दुर्गा

हे शक्तीचे सर्वात सुप्रसिद्ध स्वरूप. हिचे वाहन सिंह. आदिशक्तीने निरनिराळी रूपे घेऊन राक्षसांचा संहार केला. पैकी महिषासुराचा वध करणारी ती दुर्गा अथवा महिषासुरमर्दिनी. हिला ८, १०, १६ किंवा १८ हात दाखवतात. हिची आयुधे म्हणजे ढाल, तलवार, त्रिशूळ, धनुष्य, अंकुश, बाण, मुंड, अक्षमाळा, दंड, शंख, पद्म, चक्र, परशु. पैकी चक्र हे विष्णूकडून तर त्रिशूळ हे शंकराकडून तिला मिळाले असे मानतात. दुर्गेची रूपे केवल दुर्गा व महिषासुरमर्दिनी अशा दोन्ही स्वरूपात दिसतात. केवल दुर्गा म्हणजे सिंहारूढ असणारी दुर्गा तर महिषासुरमर्दिनी ह्या रूपात ती महिषाचा संहार करताना दाखवली जाते.

आता दुर्गा व महिषासुरमर्दिनीची विविध रूपे पाहूयात.

२८. दुर्गा, यज्ञशाळा, वेरूळ
a

२९. दुर्गा, रावण की खाई (लेणी क्र. १५) वेरूळ
a

३०. दुर्गा, सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोके (१८ वे शतक)
a

३१. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे वेरूळ, येथे महिष राक्षस स्वरूपात दाखवलाय तर त्याचे महिष असणे हे डोक्यावरील दोन शिंगांद्वारे सूचित केलेय.

a

३२. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे, वेरूळ
a

३३. महिषासुरमर्दिनी, रामेश्वर लेणे, लेणी क्र. २१, वेरूळ
a

३४. महिषासुरमर्दिनी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
a

३५. महिषासुरमर्दिनी, भुलेश्वर मंदिर, यवत
a

३६. महिषासुरमर्दिनी, चांगावटेश्वर मंदिर, सासवड, १३ वे शतक
a

आतापर्यंत ढोबळमानाने आपण काही रूपे अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिली. भैरवी, सरस्वती, हरिती, ज्येष्ठा गौरी, अंबिका अशी अजूनही काही रूपे आहेत त्यावर परत कधीतरी.

छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे.

१) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे

*विवीध गौरी आणि त्यांची व्रते:

**ज्येष्ठा गौरी
**करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा
**जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी
**स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी
**चैत्र गौरी - अधिक माहिती हवी
**सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी
**मंगळा गौरी - अधिक माहिती हवी
**केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी
**ललिता गौरी - अधिक माहिती हवी
**लज्जा गौरी -

१ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते;

१ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ?

१ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत

१ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ?

लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे.

लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल.

बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना
ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना
ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

लज्जागौरी प्रतिमेतिल सर्प पुरुष शक्तीचे प्रतिक कसे ?

लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :)

म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

 अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही

 

लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे.

http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे.
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात.

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः ||

असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे.

या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात.

प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.

स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.

विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार.

अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

 

अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल

तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.

अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?

तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नायिका भेद

मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते.

खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो. येथे जवळपास सर्वच प्रकारच्या नायिकांची शिल्पे शिल्पकारांनी मोठ्या विलक्षण नजाकतीने कोरलेली आहेत. अर्थात खजुराहो मी अजून पाहिलेले नाही. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील काही प्राचीन मंदिरे धुंडाळतांना विविध प्रकारच्या नायिकामूर्ती पाहण्यात आल्या त्यापैकीच काही येथे मांडत आहे. यांतील बहुतेक सर्वच मूर्ती त्रिभंग प्रकारातल्या आहेत.

१. पुत्रवल्लभा.

ह्या नायिका म्हणजे वात्सल्याच्या मूर्तीच. ह्यांचा हातात अथवा कडेवर ह्यांचा पुत्र दाखवलेला असतो व ह्या ममतेने त्याचे लाड करत असतात.

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पुत्रवल्लभा. हिने आपल्या तळहातावर पुत्राला तोलून धरले आहे.

a

सिन्नरच्याच गोंदेश्वर मंदिरातील ही अजून एक पुत्रवल्लभा. हीने आपल्या पुत्राला एका हातावर घेतले असून दुसरा हात आधारासाठी चौकटीवर ठेविला आहे.

a

ही रांजणगावजवळील पिंपरी दुमाला नावाच्या लहानशा गावातील सोमेश्वर मंदिराच्या भिंतीवर असलेली पुत्रवल्लभा. हीने दोन्ही हातांनी पुत्राला तोलून धरले असून त्याचे मस्तकाचे ती अवघ्राण करीत आहे.

a

२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.

a

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातीलच अजून ही एक पत्रलेखिका. ही मात्र आपल्याला हीचा चेहरा दाखवतेय.

a

कोपेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही एक अजून पत्रलेखिका.

a

३. आलस्यसुंदरी.

ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील ही आलस्यसुंदरी पहा.

a

४. कर्पूरसुंदरी

ह्या नायिका आपला प्रचंड केशसंभार खांद्यावरून शरीराच्या पुढच्या भागावर घेऊन त्याची वेणी घालायचा प्रयत्न करीत असतात.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही कर्पूरसुंदरी

a

खिद्रापूरच्याच जैन मंदिरातील ही अजून एक कर्पूरसुंदरी.

a

५. दर्पणसुंदरी अथवा दर्पणा.
मध्ययुगीन मंदिरात या नायिकांचे प्रकार बहुधा सर्वात जास्त दिसत असावेत. ह्यांच्या हातात बहिर्वक्र आरसा असतो. तत्कालिन कालखंडात काचेचे आरसे नसल्याने शिसे गुळगुळीत दगड घासून घासून गुळगुळीत केले जात आणि जास्तीत जास्त दृश्य दिसावे म्हणून हे आरसे बहिर्वक्र केले जात. ह्या नायिका आरशात बघून त्या भांग पाडणे, शृंगार करणे, कुंकूम रेखाटणे इत्यादी क्रिया करीत असतात.

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ही दर्पण सुंदरी
आरशात बघून आपल्या डोईवरचे केस ही नीट निरखून सजविते आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.

a

गोंदेश्वरातीलच अजून ही एक दर्पणा.

a

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही अजून एक दर्पणसुंदरी.

a

भुलेश्वरातील ही एक दर्पणा

a

हे शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचे. किती निगुतीने ही आपले सौंदर्यप्रसाधन करीत आहे. हे ही शिल्प भुलेश्वर मंदिरातलेच.

a

६.
ह्या प्रकाराला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही. पण ही शिल्पे फार मजेशीर आहेत. आपला साजशृंगार आटोपून आपल्या प्रियकराची वाट बघणार्‍या अथवा त्याच्या भेटीसाठी निघालेल्या ह्या सुंदरी. ह्या नखशिखांत आवरून तयार असतानाच एखादे चावट मर्कट ह्यांचे वस्त्र अलगद वर उचलून अथवा ओढून ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नायिका पणे सलज्जतेने त्यांना चापट मारतांना आढळतात. मनुष्याचा चावटपणाच ह्या मर्कटांच्या रूपाने येथे चित्रित केलाय की काय न कळे.

पिंपरी दुमाला येथील ही नायिका. एक मर्कट तिला त्रास देत असून ती एका हाताने माकडाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असून दुसरा हात चापट देण्याच्या आविर्भावात तिने वर उचलला आहे.

a

ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.

a

ही खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. दोहींचेही वस्त्र मर्कटाने उचलले असून सुंदरी चपेटदान आविर्भावात आहेत.

a--a

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील सुंदरी. हिला दोन्ही बाजूंनी दोन मर्कटे छळत आहेत.

a

७.
हा अजून एक वेगळा प्रकार.
हा स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारा. हीने आपल्या एका हातात मुंगूस तर दुसर्‍या हातात साप धरीला असून त्या दोघांनाही ही झुंजवत आहे. जणू माझी तुमच्यावर पूर्ण हुकूमत आहे असेच ती दर्शवीत आहे.

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही तशा प्रकारची प्रतिमा.

a

८.
हा सुद्धा एक वेगळाच प्रकार.
ह्या नायिकेच्या पायात रूतलेला काटा हीची बुटकी सखी दूर करीत आहे किंवा हीचे पैंजण ती नीट बांधत आहे.
पेडगावच्या मंदिरातील हे शिल्प

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील अशाच प्रकारची ही एक नायिका.

a

९. शुकसारिका.

हा शिल्पाचा प्रकार अतिशय दुर्मिळ. हा मला फक्त पेडगावच्या मंदिरात बघायला मिळाला. भुलेश्वर मंदिरात शुकसारिका नक्कीच असावी मात्र तिकडील शिल्पे मूर्तीभंजकांच्या तडाख्यात सापडून प्रचंड प्रमाणात भग्न झालेली असल्याने ओळखू येत नाहीत.
ह्या प्रकारच्या शिल्पात नायिकेने एका हातात आंबे असलेली डहाळी पकडली असते तर दुसर्‍या हातात पोपट असतो.

पेडगावच्या मंदिरातील ही शुकसारिका बघा.
हीने आपल्या डाव्या हातात आंब्याची डहाळी पकडलेली असून उजव्या हातात पोपट आहे. तो पोपट तिच्या भरीव उरोजालाच आंबे समजून त्यांना आपल्या चोचीने स्पर्श करू पाहात आहे. अर्थात मूर्तीभंजकांच्या हल्ल्यांमुळे हीचा उजवा हात त्यावरील शुकासह भग्न झालेला असून आपल्याला केवळ तिच्या हातातील आंब्याच्या डहाळीमुळे व उजव्या हाताच्या स्थितीवरून ही शुकसारिका असल्याची कल्पना येते.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका

a

१०. विषकन्या.

तत्कालीन कालखंडात शत्रूला संपवण्यासाठी विषकन्यांचा सर्रास वापर होईल. शत्रूला आपल्या सौंदर्याने भुलवून विषप्रयोगाद्वारे ह्या त्याचा मृत्यू घडवून आणत.

शिल्पांमधले ह्यांचे चित्रण सहजी ओळखता येते. अतिशय सुंदर, सुडौल, पूर्णतया नग्न, मस्तकी अथवा गुढघ्यावर सर्पांचा वेढा ही यांची प्रमुख लक्षणे. काही वेळा ह्यांच्या पायांत पादत्राणे सुद्धा आढळून येतात.

पिंपरी दुमाला मधील ही विषकन्या. हिने आपल्या मस्तकी काहीतरी धरीले असून पायांत सर्पांचा वेढा आहे.

a

भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही विषकन्या. हीने आपल्या खांद्यावरून सर्प धारण केला असून ही आपले विभ्रम दाखवीत आहे. हिच्या पायांकडे पहा. चक्क चपला/ सॅन्डल्स दिसत आहेत.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातल्या बाह्य भिंतीवरची ही अत्यंत सौष्ठवपूर्ण विषकन्यका. हीने आपल्या कमरेवरून सर्प गुंडाळलेला असून ती आपले नानाविध विभ्रम दाखवीत आहे. हिने सुद्धा पादत्राणे परिधान केलेली आहेत.

a

अत्यंत सुंदर मूर्ती व त्यांचे फोटो. 'त्रिभंग' म्हणजे नेमके काय? 'तीन ठिकाणातून वळवलेले शरीर' (उदा. कंबर, खांदे व मान) असा त्याचा अर्थ आहे का? तसेच 'नायिका' ची व्याख्या काय आहे?

'नायिकाभेद' शीर्षक वाचून भरतमुनींच्या 'अष्टनायिका' अर्थात 'वासकसज्जा' 'विरहोत्कंठिता' 'स्वाधीनभर्तृका' 'कलहांतरिता' 'खंडिता' 'विप्रलब्धा' 'प्रोषितभर्तृका' आणि 'अभिसारिका' नायिकांबद्दल हा लेख असेल, असे वाटले होते.
अन्य ग्रंथात बारा, सोळा, नायिका असल्याचेही वाचनात आले त्यापैकी एक 'प्रवत्स्यत्वल्लभा' आहे. अन्य नावे अजून सापडली नाहीत.
तुम्ही इथे दिलेली नावे कोणत्या ग्रंथात नोंदलेली आहेत? ही पण अगदी वेगळी, आणि खास शिल्पांसाठी योजलेली वाटतात.
भरतमुनिंच्या 'अष्टनायिकां'च्या मूर्ती आहेत का? (चित्रे बरीच आढळतात). पूर्वी चित्रकार दीनानाथ दलाल यांनी या अष्टनायिकांची सुंदर चित्रे काढली होती.
या विषयावर अत्यंत सुंदर धागा काढलात, हे थोरच.

धन्यवाद.

त्रिभंग म्हणजे तीन कोनांतून वळवलेले शरीर. शरीराला उठाव देण्यासाठी त्रिभंग मुद्रा शक्यतो वापरली जाते. शीर, धड आणि कंबर किंवा गुढघा.

ह्याच मुद्रांचे अबंग, समभंग, अतिभंग असेही प्रकार आहेत.

चित्र आंतरजालावरून.
a

भरतमुनींच्या अष्टनायिका पाहिल्या नाहीत कधी. पण हे सर्वच प्रकार खजुराहोतल्या मंदिरांवर मोठ्या नजाकतीने कोरलेले दिसतील.
बाकी मी लिहिलेल्या लेखांतील नावे ही मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञांकदून माहित झालेली आहेत. पुस्तकांत बहुधा मी तरी वाचली नाहीत कुठे.


वरील त्रिभंगाच्या इथे दिलेल्या चित्रातील सर्व आकृतींचे चेहरे, छाती आणि कंबर समोरच्या बाजूनेच दिसते आहे (Front view) माझ्या माहितीप्रमाणे सबंध शरीर उभा पीळ दिल्यासारखे तीन ठिकाणातून वळलेले असते, त्याला 'त्रिभंग' म्हणतात. उदाहरणार्थ क्रमांक १० विषकन्या, आणि खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. शिल्पकलेच्या दृष्टीने अशी शिल्पे जास्त प्रगत होत. ही जास्त सुंदर, रमणीय, कमनीय वाटतात.
उदाहरणार्थ खालील शिल्पे: डावीकडील इजिप्शियन शिल्प ठोकळेबाज वाटते, तर उजवीकडील ग्रीक शिल्प (आणि त्याखालील फ्रेंच शिल्प) त्यामानाने खूपच खर्‍यासारखे, जिवंत वाटते.

m...

....



.
Odalisque - Sculpture by French Artist James Pradier 1841


मी दिलेल्या चित्रातील शेवटची आकृती फक्त त्रिभंगाची. डावीकडून अभंग, समभंग, अतिभंग आणि शेवटी त्रिभंग असे प्रकार आहेत.
इजिप्शियन शिल्पे बरीचशी अभंग आणि समभंग यामध्ये मोडली जातात.

यातल्या माकडे ज्याना सतावत आहेत त्या अभिसारिका आहेत. प्रियकराला भेटायला जाताना कोणतेही संकट आले तरी न भिणार्‍या. साजशृंगार करणार्‍या वासकसज्जा. तर पायात पैंजण घालणार्‍या/आळिता लावणार्‍या स्वाधीनभर्तृका. (त्यांच्या पायाशी बसलेल्या आकृत्या सखीच्या नाही तर प्रियकराच्या असाव्यात.)

शुकाबरोबर असलेल्या नायिका प्रोषितभर्तृका, म्हणजे त्यांचे नायक दूरदेशी गेले आहेत आणि त्याला ही नायिका संदेश पाठवत आहे.

या नायिकांशी संबंधित राग रागिण्याही सांगितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल चौरा आणि चित्रगुप्त यानी विस्ताराने लिहावे ही विनंती.


भरतमुनिंच्या अष्टनायिकांखेरीज अन्य ग्रंथातील नायिकांची ही जंत्री:

स्वकीया, परकीया, पुनर्भू, सामान्या, मुग्धा, मध्या, प्रगल्भा, धीरा, धीराधीरा, अधीरा, ज्येष्ठा, कनिष्ठा, ऊढा, अनूढा, अन्य-संभोगदु:खिता, वक्रोक्तिगर्विता, प्रेमगर्विता, सौंदर्यगर्विता, मानवती, ज्ञातयौवना, अज्ञातयौवना, नवोढा, विश्रब्धनवोढा, गुप्ता, विदग्धा, वाग्विदग्धा, क्रियाविदग्धा, लक्षिता, कुलटा, अनुशयना, मुदिता, प्रोष्यत्पतिका, प्रवत्स्यत्पतिका, ज्योत्स्नाभिसारिका, शुक्लाभिसारिका, तमिस्त्राभिसारिका, कृष्णाभिसारिका, दिवसाभिसारिका, रक्ता, विरक्ता, निजतानुरागिनी, व्यंग्याविदग्धा, मर्मपीड़िता, अद्भुता, उद्भूदिता, आसाध्या, सुखसाध्या, कामवती, अनुरागिनी, प्रेमअशक्ता ...

याशिवाय वयाच्या दृष्टीने केलेले नायिकांचे वर्गिकरणः
देवी (वयवर्षे ७ पर्यंत)
देवगंधर्वी (वयवर्षे ७ - १४)
गंधर्वी (वयवर्षे १४ - २१)
गंधर्वमानुषी (वयवर्षे २१ - २८)
मानुषी (वयवर्षे २८ - ३५)

गूगल शोध घेतला असता येथे बरीच शिल्पे मिळतात. खजुराहो मैथुनशिल्पांमुळे उगा बदनाम झालेले आहे. वास्तविक पाहता अशी शिल्पे १० ते १५% च्या वर नाहीत. तरीही शोधात हीच शिल्पे समोर येतात. यातूनच चाळणी लावून नायिकांची काही शिल्पे मिळतीलच.

नायिका कश्याला म्हणायचे? हे राहूनच गेले.
बालिका, किशोरी, प्रौढा, स्त्री, नारी, अबला, यापेक्षा वेगळा खास शब्द 'नायिका' असल्याने त्याचा विशिष्ट अर्थ असणार. ('नायकीण' म्हटले, की आणखी वेगळी अर्थछटा प्राप्त होते).
नायिकांप्रमाणेच भरतमुनिंनी 'नायक' चार प्रकारचे सांगितले आहेतः
धीरललित, धीरप्रशान्त, धीरोदात्त, आणि धीरोद्धत.
अग्निपुराणात नायकांचे आणखी चार प्रकार सांगितलेतः अनुकूल, दर्क्षिण, शठ, आणि धृष्ठ.
(हे सर्व गूगलबाबाने सांगितले, पण यामुळे अग्निपुराण वगैरे वाचले पाहिजे, असे वाटते)

आताच माझ्या संग्रहातील फोटो धुंडाळता धुंडाळता खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका दिसली.
वर धाग्यातही अद्यतन केले आहेच. इथेही शुक मूर्तीभंजकांनी भग्न केलाय.

a


१) कुठे ही जाताना शिल्पे घाई घाईत पाहू नका.
२) त्या त्या काळची एकादी रीतभात शिल्पातून व्यक्त होउ शकते. उदा बेलूर ला उंच टाचेची चप्प्ल घालतेली बाई ( शिल्पातली )पाहिल्याचे आठवते.
३)एखादा प्रसंग चित्रित ( शिल्पित )केला असेल तर पात्रांचे भाव पहा !
४)दागदागिने , केशरचना, निरखून पहा.
५)शिल्पासाठी वापरलेल्या दगडाची बलस्थाने वा मर्यादा यांची माहिती शिल्पाद्द्लचे मत बनविताना जरूर घ्या
६)काही पुन्हा पुन्हा दिसणार्‍या मुद्रा उदा. सिंह मुख , ड्रॅगन सद्द्र्श राक्षस मुदा ई चा अभ्यास करा.

वरील नायिका या मुख्य नायिकाभेदातील उपभेद असाव्यात…

अ) धर्मानुसार भेद:
१) स्वीया अथवा स्वकीया: स्वत:ची पत्नी वा स्त्री
२) अन्या अथवा परकीया: दुसऱ्याची स्त्री
दोन प्रकार १) ऊढा- लग्न झालेली २) अनूढा लग्न न झालेली
३) साधारण- गणिका, वेश्या, पैश्यासाठी प्रेम करणारी

ब) वयोमानानुसार अथवा दशानुसार भेद:
१) मुग्धा: जिच्या अंग प्रत्यंगात नुकतेच यौवानाकुर फुलू लागले आहेत व जी कामक्रीडे विषयी संपूर्णपणे उनभिज्ञ आहे
दोन भेद: १) अज्ञात यौवाना: यौवानाची जाणीव नसलेली, २)ज्ञात यौवाना: यौवानाची नुकतीच जाणीव होवू लागलेली
२) मध्या: लज्जा व काम जिच्यात समप्रमाणात आहेत. ( जिला कामक्रीडा माहित आहे, आवड आहे, परंतु प्रचंड लाजाळू स्त्री )
३) प्रौढा: किंचित लज्जा व कामाचे परिपूर्ण आणि संपूर्ण कामकलेमध्ये प्रविण असलेल्या स्त्रिया. अथवा प्रगल्भा.

क) अवस्थानुसार भेद:
१) वासक सज्जा: प्रियकर घरी येणार म्हणून साजश्रुंगार करत नटणारी व त्यातच दंग असणारी स्त्री.
२) वीरहोत्कांठीता: प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेली स्त्री.
३) स्वाधीनपतीका: पती जिच्या संपूर्ण अधीन आहे अशी स्त्री
४) कलहांतरिता: प्रथम प्रियकराशी भांडण उकरून काढणारी व तो रागावून निघून गेल्यावर भांडण मिटवण्यास उत्सुक असणारी पश्यातापदग्ध स्त्री
५) खंडिता: प्रियकराच्या अंगावर रतीचिन्हे पाहून रागावणारी, दु:ख,व्यक्त करणारी स्त्री
६) विप्रलब्धा: प्रियकराने सांगितलेल्या संकेतस्थळी येवून तो तेथे न आल्याने दु:खित झालेली स्त्री
७) प्रोषितपतिका: जिचा पती परदेशात गेला आहे अशी स्त्री
८) अभिसारिका: कामार्त होऊन कशाचीही लाजलज्जा न बाळगता प्रियकराला भेटण्यासाठी धावत सुटलेली स्त्री

ड) वर्णानुसार भेद:
१) दिव्या: देवांच्या ( ब्राह्मणांच्या ) स्त्रिया
२) आदिव्य: मानव स्त्रिया
३) दिव्या दिव्या: भूतलावर जन्म घेतलेल्या देव स्त्रिया. उदा. सीता

ई) प्रकृत्यानुसार भेद:
१) उत्तमा: पतीच्या सुखात आपले सुख मानणारी. तो कितीही हरामखोर असला तरी न रागावता स्वतः सदाचरण करणारी
२) मध्यमा: पतीचे दोष-गुण पाहून राग-लोभ-प्रेम व्यक्त करणारी
३) अधमा: पती कितीही चांगला वागला तरी दुराचरण करणारी

फ) स्वभावानुसार भेद:
१) अन्यसुरत दु:खिता: दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर आपल्या पतीची रतीचिन्हे पाहून दु:ख करणारी स्त्री
२) मानवती: पतीचा अपराध त्याच्या लक्ष्यात आणून देणारी मानीपणा करणारी स्त्री
३) गर्विता:
प्रेमगर्विता: पतीच्या स्वतःवरील प्रेमाचा गर्व करणारी
रुपगर्विता: स्वतःच्या रूपाचा गर्व करणारी
गुणगर्विता: स्वतःच्या गुणाचा गर्व असणारी

नवदुर्गा ९ दिवस ९ मूर्ती


महालक्ष्मीची ही अप्रतिम मुर्ती माझ्याकडे आहे. २५ वर्षांपूर्वी बी. रघुनाथ प्रकल्पासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेंव्हा माझ्या मित्रांनी कौतूकाने ही मुर्ती दिली. पुस्तकाला पुरस्कार मिळाला तेंव्हा सरस्वती दिली असती तर संयुक्तीक ठरले असते. पण माझ्या मित्रांना वाटले याने "लक्ष्मी"ची उपासना करावी. ती मला नाही जमली. जूनी मंदिरं मुर्ती यांच्या जिर्णोद्धाराचा प्रकल्प हाती घेतला आहे. तेंव्हा स्वत:जवळची ही सुंदर मुर्ती घासून पुसून पुजावी नित्य स्मरावी जेणे करून आपल्या कामाचे नित्य स्मरण होत राहील. आज घटस्थापना. देवीच्या सर्व रूपातील प्रतिमांचे स्मरण.


काल मी महालक्ष्मीच्या माझ्या जवळ असलेल्या मुर्तीचा फोटो टाकला होता. आजचा हा फोटो आहे माझ्या सासुरवाडीच्या (सखारामपंत डांगे) घराण्याच्या देवीचा. कुंभारी, ता.जि. परभणी येथील ही देवी. हे मंदिर २ वर्षांपूर्वी पर्यंत अगदी साधं छोटं होतं. शेंदूर फासलेला दगड इतकंच देवीचं रूप होतं. गावकर्
यांची मोठं मंदिर बांधलं. माझ्या चारही मेहूण्यांनी मिळून हा सुंदर तांदळा मंदिरात बसवला. मोठ्या वहिनी सौ. विंदा डांगे यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचा ध्यासच घेतला होता. स्वत: चकरा मारून काम करवून घेतले. देवीला दागिने घडवले. मुकूट बसवला. मंदिराला कळस चढवला. आता मंदिराला आणि तांदळ्याला सौंदर्य प्राप्त झाले. बहुतांश ठिकाणी अगदी बेढव असे शेंदूर फासलेले दगड देवी म्हणून पुजले जातात. त्या ठिकाणी चांगल्या मुर्ती अथवा तांदळे बसवायला काय हरकत आहे? याला शास्त्रात आधारही आहे. आक्रमणांच्या काळात मुर्ती नष्ट झाल्या त्यांचा विध्वंस झाला. आता ते सारं विसरून नव्याने काही का केल्या जावू नये? तशीही आपल्याकडे बदलाची मोठी परंपरा आहे.

तूळजापुरची भवानी माझ्या घराण्याची कुलदैवता आहे. आमच्या नित्यपुजेत देवीचा टाक आहे पण मुर्ती नव्हती. जय संतोषी माता चित्रपटामुळे सिंहावर बसलेली देवीची प्रतिमाच सगळ्यांच्या मनात ठसली आहे. प्रत्यक्षात महिषासुर मर्दिनी रूपातील अष्टभुजा देवीची मुर्ती सहसा आढळत नाही. मला ही मुर्ती तूळजापुरात एका दूकानात दिसली आणि पाय खिळूनच राहिले. एक तर मुर्ती मुळच्या देवी रूपातील, दूसरं म्हणजे महिषासुराला मारतानाचा सगळा आवेश मुर्तीत उतरलेला. सगळ्याच मुर्तीला एक अप्रतिम अशी लय आहे. या मुर्तीची मागची नागप्रतिमा असलेली प्रभावळ, त्यावरचे किर्तीमुख सगळंच मोहक वाटले. २० वर्षांपासून ही मुर्ती माझ्या जवळ आहे. मागच्या प्रभावळीत लहान छिद्र आहेत. त्यात फुलांचे देठ अडकवून छान आरास करता येते. खालचे चौकोनी जड आसन वेगळे करता येते. मागची प्रभावळही वेगळी होते. त्रिशुळपण वेगळा करता येतो. जमिनीशी बरोबर ४५ अंशाचा कोन साधणारी त्रिशुळाची रचना गणित तत्वाशी जुळते. या मुर्तीने मला मोहित केले. प्रथेप्रमाणे मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. पण खरी प्राण प्रतिष्ठा माझ्या मनातच झाली. डाव्या हातात महिषासुराचे शीर आहे आणि उजव्या हातातील त्रिशुळ त्याच्या मानेवर रूतवला आहे. बाकी सहाही हातात शस्त्र आहेत. देवीच्या अष्टकातील विष्णुदासांचे पद या मुर्तीला पाहून मला नेहमी आठवते
अष्टादंड भुजा प्रचंड सरळा
विक्राळ दाढा सुळा
रक्त श्रीबुबूळा प्रताप आगळा
ब्रम्हांड माळा गळा
जिव्हा ऊर स्थळा रूळे लळलळा
कालांत कल्पांतके
साष्टांगे करीतो प्रणाम तुजला
जय जय महाकालीके



देवी विविध रूपात पूजली जाते. करमाळा येथे कमला भवानी या नावाने भवानीची पुजा होते. ही महिषासूरमर्दिनी या रूपातील भवानी नसून कमळात बसलेली अशी आहे. रावराजे निंबाळकर यांनी हे मंदिर उभारले व देवीची प्राणप्रतिष्ठा केली. सैराट चित्रपटातील मंदिर ते हेच. येथील कमला भवानीची पितळी मुर्ती आमच्या घराण्यात माझ्या मोठ्या चुलत भावाकडे पुजली जाते. महालक्ष्म्या अतिशय आकर्षक व जिवंत भासणार्या ज्यांच्याकडे मांडल्या जातात ते हेच घर. माझा पुतण्या सखाराम उमरीकर या देवीची रोज आकर्षक सजावट करतो. ही कमलाभवानी महिषासुरमर्दीनी सारखी उग्र रूपातील नसून प्रसन्न अशी आहे.


ही अतिशय वेगळी अशी स्त्री रूपातील मूर्ती अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावरची आहे. आता महादेव मंदिर म्हणून ओळखलं जात असलेलं हे मुळचं विष्णु मंदिर. शंख चक्र गदा पद्म यांचे चारी हातातील स्थान पाहून विविध नावे विष्णुला दिली जातात. अशी २४ नावं विष्णुची आहेत. त्यातील वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात शंख, खालच्या उजव्या हाती पद्म आणि खालच्या डाव्या हातात गदा असेल तर त्याला जनार्दन असे नाव आहे. दू:ख हरण करणारा असा हा जनार्दन. या विष्णुची शक्ती म्हणून जिचे वर्णन केले जाते ती म्हणजे उमा. ही त्या उमा शक्तीची मुर्ती आहे. ही विष्णुची पत्नी लक्ष्मी नव्हे. कुठल्याही देवतेच्या उजव्या बाजूला जी स्त्री प्रतिमा कोरली जाते ती त्याची शक्ती असते. (आई, मुलगी, बहिण, सुन या नात्यातील सर्व स्त्रीयांची जागा उजव्या बाजूस असते) डाव्या बाजूला असते ती पत्नी (वामांगी).
या अभ्यासामुळे अन्वा मंदिरांवरील विष्णुच्या शक्तींचा दृश्य पुरावा समोर आला. या मंदिरात मी बर्याचदा गेलो आहे. नुकताच गेलो होतो तेंव्हा हा फोटो काढून आणला. डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात यावर विस्तृत विवरण आहे. विष्णुची २४ नावं आणि त्यांच्या शक्ती सांगितल्या आहेत.
नवरात्रीत पुरूषाची शक्ती असलेली अशी स्त्री तिचीही मनोमन पुजा झाली पाहिजे.



लोभस पुत्रवल्लभा
स्त्रीला माता म्हणून आपण संबोधतो तिचा गौरव करतो पण मातृरूपात तिची प्रतिमा फारशी आढळत नाही. होट्टल (ता, देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावरील या शिल्पाने माझे लक्ष्य वेधून घेतले. लहान मुल कडेवर घेतले आहे. एरव्ही स्त्रीयांच्या स्तनांचा उपयोग वासने संदर्भातच येतो. इथे त्या लहान बाळाचा हात स्तनांवर दाखवून मातृत्व सुचीत केले आहे. एकुणच हे शिल्प लोभस आहे. ही स्त्री काही कामात व्यग्र आहे आणि जबाबदारी म्हणून लेकरू काखोटीला मारले असेही नाही. उजव्या हातातील खेळण्याने ती त्याला खेळवते आहे, लाड करते आहे. ते मुलही मान उंचावून तिकडे पाहते आहे. स्त्रीच्या चूहर्यावर तृप्तीचे भाव आहेत. अशा मुर्तीला पुत्रवल्लभा या गोड नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात उत्तर चालूक्य कालीन (११ वे ते १३ वे शतक) मंदिरांवर सुरसुंदरींची अतिशय देखणी कमनीय अशी शिल्पे आढळून. त्यातील हे एकदम वेगळे लोभस शिल्प "पुत्र वल्लभा" . आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातृदेवता नमोनम: (जानेवारी महिन्यात होट्टल महोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राने टिपलेले हे छायाचित्र)



केवळ पत्रसुंदरी नव्हे तर ज्ञानमार्गीणी
पत्रसुंदरीचे हे देखणे शिल्प धारासूर (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील गुप्तेश्वर मंदिरावरचे आहे. शिखर शाबुत असलेले ९०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. मुळचे हे विष्णु मंदिर. या मंदिरावर सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. काल होट्टल येथील ज्या पुत्रवल्लभेचे छायाचित्र टाकले होते तसेल याही मंदिरावर आहे. मध्ययुगीन कालखंडात स्त्रीयांना ज्ञानाचा अधिकार नाकारला गेला होता. पण पूर्वीच्या कालखंडातील स्त्रीया ज्ञानाच्या बाबतीत सक्षम होत्या याचा ठोस पुरावा या शिल्पातून मिळतो. या शिल्पाला "विरह कंठिता" असेही संबोधले जाते. पण त्यातून प्रेयसी किंवा विरहिणी इतकाच मर्यादीत अर्थ निघतो. खरं तर हीला लेखीका किंवा ज्ञानमार्गीणी असे संबोधन द्यायला हवे. कारण ती लिहीत आहे त्या कागदाच्या दोन्ही बाजूला उभे दंड आहेत. म्हणजे पोथीसारखी रचना सुचीत होते. हे केवळ पत्र उरत नाही. शिवाय तिच्या चेहर्यावरचे भाव विरहणीचे नाहीत.
सुरसुंदरी या शब्दांतून स्त्रीचे शारिरीक सौंदर्य जास्त सुचीत होते. पण कालची पुत्रवल्लभा, आजची ही लेखीका आणि उद्या जिच्यावर लिहीतोय ती शत्रु मर्दिनी या शिल्पांचा "सुंदरी" इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. स्त्री व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास दर्शविणारी ही शिल्पे आहेत. यातून एक सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची स्त्री सुचित होते. "अबला" हे तीचे मध्ययुगीन कालखंडातले निर्माण झालेले चित्र मागे पडते. आज सप्तमी, सातवी माळ. त्या निमित्ताने बुद्धीमान स्त्रीचे हे शिल्प अवलोकनार्थ.
(छायाचित्र अरविंद शहाणे या परभणीच्या मित्राने आठच दिवसांपूर्वी काढलेले आहे. या मंदिरावर सविस्तर व्हिडियो त्याने व मल्हारीकांत देशमुख या मित्राने तयार केलाय. त्याचा पहिला भाग u tube वर आहे. जरूर बघा.)



रणझूंझार शत्रुमर्दिनी
आज अष्टमी. नवरात्रीच्या आरतीत "अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो" अशी ओळ आलेली आहे. महिषासुराचा वध करणार्या देवीची उग्र प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. पण अशी लढव्वयी शत्रुचा शिरच्छेद करणारी योद्धा स्त्री प्रतिमा मात्र कधी डोळ्यासमोर येत नाही. होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावर अशा स्त्रीचे शिल्प कोरलेले आहे. हीला "शत्रु मर्दिनी" या नावाने संबोधले जाते. हीच्या डाव्या हातात नरमुंड आहे आणि उजव्या हातात खङग आहे. संस्कृत ग्रंथ "क्षीरार्णव" यात शत्रुमर्दिनी रूपाचे वर्णन आले आहे. या वर्णनाचा दृश्य पुरावा होट्टलच्या मंदिरावर आहे.
अशी शिल्पं मराठवाड्यात धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) धर्मापुरी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथेही आहेत. या शिवाय लढाउ स्त्रीयांची छोटी शिल्पेही मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर आढळून आलेली आहेत.
हा परिसर नेमका मातृदेवतांचा आहे. दक्षिणेतील मात्ृसत्ताक समाज व्यवस्थेचे पुरावे आपल्याकडे स्पष्ट दिसून येतात. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे (गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी इ.इ.). मामाची मुलगी बायको केली जाते याचाही संदर्भ मातृकुळाशी नातं घट्ट जोडण्याचा आहे.
आपल्याकडे सार्वजनिक संबोधन "ओ मामा, ओ मावशी" असंच आहे. उत्तरेकडच्या पुरूषसत्ताक प्रदेशात हेच संबोधन "ओ चाचा, ओ चाची" असं आहे. दक्षिणेत स्त्रीया केवळ "सुरसुंदरी" नसून आपल्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंनी झळाळून दिसतात. ही अतिशय वेगळी स्त्री प्रतिमा. अष्टमीला सामान्य स्त्रीच्या रूपातीला झुंजार अष्टभुजेला नमन. (छायाचित्र सौजन्य
Vincent Pasmo
)



विद्या कलेची अधिष्ठाती सरस्वती
एखादा खजिना अचानक सापडावा तशी सरस्वतीची ही अप्रतिम मुर्ती अनपेक्षीत जागी दृष्टीस पडली. औंढा नागनाथ जवळ राजापुर नावाच्या छोट्या गावी साध्या चौथर्यावर ही मुर्ती ठेवलेली आहे. गणेश चाकुरकर हा इंजिनिअरिंगचा मित्र औंढ्याला नौकरीला होता. त्याच्याकडे गेलो असताना त्याने या गावी नेले. या परिसरात तीन मुर्ती लोकांना सापडल्या. योग नरसिंहाची सिद्धासनातील मुर्ती, अर्धनारेश्वर मुर्ती आणि तिसरी ही सरस्वतीची उभी मुर्ती.
अशा मुर्तीला स्थानक मुर्ती असे संबोधतात. (बसलेल्या मुर्तीला आसनस्थ मुर्ती म्हणतात) हीच्या वरील उजव्या हातात फासा आहे, खालील उजव्या हातात अक्षयमाला असून हा हात वरदमुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात एकतारी वीणा आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तीच्या गळ्यातील हातातील कमरेवरील दागीन्यांचा मणी न मणी मोजता यावा इतके हे कोरीवकाम अप्रतिम आहे. डाव्या बाजूला खाली मोत्याची माळ तोंडात घेतलेला हंस आहे. खाली अंजली मुद्रेतील भक्त/सेवक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला चामरधारीणी दिसते आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या मुर्तीचा गौरव डाॅ. देगलुरकरांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अशा मुर्ती घडवण्यासाठी गंडकी म्हणजेच नर्मदा नदितील शिळांचा वापर केला जातो.
ही मुर्ती कुठल्या भव्य सुप्रसिद्ध मंदिरातील नाही. एका साध्या गावात गावकर्यांनी निष्ठेने या मुर्ती छोट्या जागेत जतन करून ठेवल्या आहेत. खरं तर या सुंदर मुर्तीसाठी मोठं शिल्पकामयुक्त दगडी मंदिर उभं करायला पाहिजे.
गेली ९ दिवस विविध मुर्तींवर लिहीलं. या मालिकेतील हे शेवटचं टिपण. स्त्री रूपातील या विविध शक्तींना मनोमन नमन. (छायाचित्र सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर)

लज्जागौरी - स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन !

॥ श्री गणेशाय नमः ॥


धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चतुसूत्री आपल्या शास्त्रात प्राचीन काळापासून सांगितली आहे. भारतातली आणि भारताबाहेरील काही निवडक मंदिरं पाहताना तुम्हाला ही चतुसूत्री आवर्जून पाहायला मिळेल. देवळांच्या बाह्य भिंती म्हणजेच मंडोवरावर धर्म, अर्थ आणि काम ह्या संदर्भात अनेक शिल्प आढळतात. धर्म सांगण्यासाठी रामायण महाभारत आणि पुराणातल्या इतर अनेक कथांचा वापर करून विविध शिल्प घडवलेली दिसतात. तर पूर्वीच्या काळात अर्थकारण कसं चालायचं याचा दृष्टांत म्हणून शेतीकाम, पशुपालन इत्यादी अनेक शिल्प बाह्य भिंतीवर आढळतात( जी लोकांनी हेतू पुरस्करपणे नेहमी दुर्लक्षित ठेवली). काम शिल्प ही केवळ खजूराहो मंदिरात आहेत असा अनेकांचा गैरसमज आहे मात्र ते तसे नसून काम शिल्प बऱ्याचशा मंदिरांच्या मंडोवरावर आढळतात. मुळातच, एखाद्या गोष्टीचा मूळ हेतू ज्ञात नसल्यास त्याबद्दल वावड्या उठणं अत्यंत स्वाभाविक ! धर्म, अर्थ, काम हे बाहेर बाह्य भिंतींवर कारण मोक्ष मिळण्याआधी हे सर्व करणे गरजेचे असे शास्त्रकारांनी सांगितले. आधी प्रपंच करावा नेटका ! हे सर्व जगून देवळाबाहेरच ठेवून देवळाच्या आत मोक्ष मिळावा म्हणून प्रवेश करावा ही इतकी साधी सोपी शास्त्रकारांची योजना !

काम शिल्पांसोबतच त्याच धाटणीतली परंतु एक आगळी वेगळी मूर्ती मंदिरांच्या बाह्य भिंतीवर आढळते ती म्हणजे लज्जागौरी ! लज्जागौरी म्हणजेच स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन. आपल्याला ज्या स्त्रीने जन्म दिला ती स्त्री म्हणजे निसर्गाची एक किमयाच ! अगदी पूर्वापार मनुष्य प्राण्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा जेव्हा जेव्हा तो त्या गोष्टीला पूर्णतः वश करू शकला नाही तेव्हा तेव्हा त्याने त्या गोष्टीचं पूजन केलं. उदाहरणादाखल पर्जन्य, अग्नी, वायू आकाशातले तारे जसे की सूर्य, चंद्र इत्यादी गोष्टी एक तर भयामुळे किंवा मनुष्याची त्यांच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेमुळे पूजनीय झाल्या. तसंच मातृत्व ही सुद्धा इतक्या सहस्त्र वर्षांनंतरही अनाकलनीय आणि अचाट संकल्पना आहे ! म्हणूनच लज्जा गौरीच्या मातीच्या , काष्ठ म्हणजे लाकडावर कोरलेल्या आणि दगडात कोरलेल्या मूर्ती अगदी मोहेंजोदारो काळापासून आढळतात.

आता लज्जा गौरीची प्रतिमा ओळखायची कशी ? सर्वप्रथम लज्जा गौरी म्हणजे स्त्रीची नग्न प्रतिमा ! इथेच सर्वसामान्य मनुष्य गोंधळून जातो की पूजनच करायचं तर नग्न प्रतिमेचे कारणच काय ? आता हे समजून घ्या की मातृत्वाचे पूजन म्हणजे जन्म होण्यापूर्वी योनीद्वारे गर्भधारणा,  गर्भात असताना आपण आईशी नाळेने जोडलेलो असतो म्हणून बेंबी, योनी द्वारे स्त्री प्रसूती करते म्हणून पुन्हा योनी, आणि जन्मानंतर अपत्याचे स्तनांद्वारे पालनपोषण आई करते म्हणून हे अवयव अतिशय महत्वाचे ! त्यामुळे हे सर्व अवयव ठसठसशीत पणे दिसावेत म्हणूनच नग्न प्रतिमेची योजना, अन्य दुसरे कारण नाही. त्यातही योनीचा भाग जास्त ठळकपणे दिसावा म्हणून मांड्यांची रचना इंग्रजी अक्षर ( M ) प्रमाणे केलेली दिसते. 


चित्र क्र. १ भिवंडी येथील लोणाडच्या शिवमंदिरातील लज्जागौरी


चित्र क्र. २ मोढेरा येथील सूर्य मंदिरातील मुख्य मंदिराच्या बाह्य भिंतीवरील राणीच्या प्रसुतीचे शिल्प पट


चित्र क्र. ३ मोढेरा येथील सूर्य मंदिराच्या नृत्य मंडपाच्या बाह्य भिंतीवरील लज्जा गौरीचे शिल्प.


 चित्र क्र ४ अंबेजोगाई येथील शिवमंदिराच्या बाह्य भिंतीवरील लज्जा गौरी शिल्प.

लज्जा गौरीच्या अनेक मूर्ती भारतभर आढळतात त्यात तीन वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आढळून येतात. पहिला प्रकार म्हणजेच या मूर्तीला स्त्रीचा चेहरा आढळून येतोआणि त्यासोबतच वर उल्लेख केल्याप्रमाणे मातृत्व निर्देशक अवयव ठळकपणे दर्शवलेले असतात. ह्या मधला दुसरा आणि तिसरा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण ह ह्यासाठी की शास्त्रकारांनी हे वेळेवरच जाणले की लज्जा गौरीचे नग्न शिल्प जर चेहऱ्यासकट दर्शवलं तर मनुष्य चेहऱ्याकडे आकर्षित होऊ शकतो आणि मातृत्व पूजन होण्याऐवजी वासनेची निर्मिती होऊ शकते. हे टाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी एकतर चेहऱ्याऐवजी कमळ दर्शवलं आहे किंवा धडाखालचा भागच शिल्पांकित केला गेला. अशा पद्धतीने मूळ हेतुला फाटा न देता मातृत्व पूजनावर शास्त्रकारांनी भर दिला. लज्जा गौरीचं स्वतंत्र शिल्प असलेली देवळही आढळतात आणि त्यांचे पूजनही केलं जातं आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरांच्या बाह्य भिंतीवरही लज्जा गौरी आढळते मात्र ती शोधावी लागते.

आज आपण भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे असं जरी म्हणत असलो तरीसुद्धा जन्म हा स्त्रीच देऊ शकते पुरुष केवळ निमित्त मात्र ! जुन्या काळामध्ये ही वीर पुरुष हे स्वतःच्या आईच्या नावाने किंवा आईच्या कुळाने ओळखले. देवकीनंदन कृष्ण, कौशल्या पुत्र राम हे पुराणातले संदर्भ, तर थोडंसं मागे गेलो तर 2200 वर्षांपूर्वी असलेल्या सातवाहन सत्तेत गौतमीपुत्र सातकर्णी हा बलाढ्य राजा स्वतःच्या आईचे नाव लावत असे. शहाजीराजांचे पुत्र असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे ओळखले जातात जिजाऊ मातेमुळेच ! पण असो कालाय तस्मै नमः ।

लज्जा गौरी या शिल्पाला इतरही अनेक पैलू आहेत जे सर्व समावेशक लेखांमध्ये देता येत नाही त्यामुळे त्यांचा संक्षेप देतो. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा. 

संदर्भ: - लज्जागौरी, रा. चिं. ढेरे.

सप्तमातृका
पंकज समेळ,
प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.
भुलेश्वर मंदिरातील मातृका ( फोटो )
सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.
वेरूळ लेण्यातील सप्तमातृका ( फोटो )
सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.
पाटेश्वर लेण्यातील अष्टमातृकापट ( फोटो )
भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील सप्तमातृका शिल्प ( फोटो )
सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात.
शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.
राजा दिनकर केळकर संग्रहालयातील सप्तमातृकापट
मातृकांचे वर्णन
ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस
वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड
इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती
माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल
कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर
वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष
चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव
वैनायकी, पाटेश्वर लेणी
वैनायकी, भुलेश्वर मंदिर
वैनायकी, भुलेश्वर मंदिर
वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.
घारापुरी लेण्यातील सप्तमातृका
महाराष्ट्रातील काही सप्तमातृका शिल्प
घारापुरी लेणी
वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका आणि मंदिरात वैनायकीची स्वतंत्र प्रतिमा)
धर्मापुरीचा किल्ला (अंबेजोगाईपासून साधारणपणे २५ किमी)
औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
टाकळी ढोकेश्वरची लेणी
श्री योगेश्वरी मंदिर, अंबाजोगाई (कळशावर असलेली वैनायकी)
संदर्भ
भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
Iconography of the Saptamatrikas, O. P. Misra
Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao

सप्तमातृका

 

प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.

सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.

सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.

भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.

सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात. शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.

ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस

वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड

इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती

माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल

कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर

वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष

चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव

वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.

 

  • घारापुरी लेणी
  • वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
  • वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
  • भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
  • पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका)
  • धर्मापुरीचा किल्ला, धर्मापुरी
  • औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
  • दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
  • छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
  • जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
  • राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
  • टाकळी ढोकेश्वरची लेणी

संदर्भ:

  1. भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
  2. भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी

– स्नेहल आपटे

मातृदेवता मानवी संस्कृतीत आद्यशक्ती मानली जाते. भुमीला माता मानणाऱ्या भारतीय संस्कृतीत तीला सर्वत्र स्थान आहे. आपल्या प्राचीन ऋग्वेदाचे ऋचा मधील अदिती पासुन ते आजच्या लोकगीतातून तीचा महिमा वर्णन केला आहे.
हजारो वर्षापुर्वीच्या सिंधुसंस्कृती मधील मृण्मयमुर्ती पासुन, शिरोविहीन उत्तानपाद लज्जागौरी ते गावागावा मधील अनघड तांदळा रूपातील ग्रामदेवता, कलाकारांनी घडविलेल्या अनेक भुजांनी, आयुधांनी, वाहनांनी नटलेल्या, अशा विविध रुपात ती सर्वत्र नांदत आहे.
अदिती
aditi - prakruti
अदिती हि सर्व देवतांची माता मानली जाते. साध्या डोळ्यांनी पृथ्वी, आकाश, अगर त्या पलीकडचे आपण जे काही पाहू शकतो ते सर्वकष म्हणजे अदिती, अदिती स्वर्ग आहे, अदिती अंतरीक्ष आहे, जगन्माता, पिता. पुत्र, देव, पंचमहाभुते म्हणजेच अदिती होय. भूमी प्रकृती सर्वांचे पालन पोषण करते व तीच सर्वांची जन्मदात्री अशी हि आदि व अंत अशी शाश्वत माता, आदिशक्ती. अत्यंत विस्तीर्ण अनेक शुभकार्य करणारी, यज्ञ, पालक, अनेक संकटातुन पार करणारी कधी वार्धक्य न पावणारी, अत्यंत गमनशील, जगातील प्राणीमात्रांची जन्मदात्री आश्रयदात्री असे अदितीचे वर्णन शुक्ल यजुर्वेदात केले आहे.
वैदिक देवता
वेदकाळा मधे यज्ञयागाना महत्वाचे स्थान होते, वेदकाळा मधे शक्ती देवतांची स्थान अल्प प्रमाणात जाणवते, वेदामधून अनेक आदिशक्ती देवतांचे उल्लेख आढळतात तर काही देवतांची सूक्ते हि आढळतात, वैदिक काळात या मातृदेवतांचा उल्लेख विविध ठिकाणी आढळतो
१) अदिती, २) अपोदेवी ३) ईडा ४) उषा ५) गायत्री ६) निष्ट्रीगी ७) पृथ्वी ८) योगमाया ९) भगवती १०) लक्ष्मी ११) वेदवती १२) सरस्वती १३) संध्या १४) इंद्राणी १५) उर्वशी १६) श्री १७) गोधा १८) घोषा १९) जुहू २०) दिती २१) दक्षिणा २२) मेधा २३) यमी २४) रोमषा २५) शत्री २६) लक्ष्या २७) लोपामुद्रा २८) विश्ववारा २९) वाक ३०) नारी ३१) शाश्वती ३२) सरमा ३३) श्रद्धा ३४) सर्वराज्ञानीं ३५) सूर्या ३६) सावित्री
सिंधुसंस्कृती
sindhu sanskruti
सिंधुनदीच्या खोर्या मधील उत्खननात सापडलेल्या संस्कृतीचा काळ साधारण पणे ईसवी सन पुर्व ३००० ते २५०० वर्षांचा धरला जातो. या उत्खननात अनेक अवशेष सापडले आणि एक प्राचीन समृद्ध संस्कृती उजेडात आली, या ठिकाणी अनेक मातृदेवताच्या मातीच्या प्रतिमा सापडल्या आहेत या वरून त्या काळी हि शक्ती पुजा अस्तित्वात होती. या प्रतिमा जीर्णावस्थेत असल्या तरी या शक्ती देवता आहेत हे निश्चित
लज्जागौरी
लज्जागौरी हे देवीचे विचित्र नाव वाटते त्याच पद्धतीने तिच्या प्रतिमा हि विचित्रच वाटतात, भारताच्या विविधभागातील मंदिरातून तर काही ठिकाणी स्वतंत्र मंदिरातून या प्रतिमा विराजमान आहेत, उत्खननामधुन मिळालेल्या तिच्या काही दगडी व मातीच्या मुर्ती विविध संग्रहलया मधुन ठेवल्या आहेत, या मुर्ती नग्न व उताण्या निजलेल्या अवस्थेतील आहेत, यांच्या हातात कमळ असुन काही प्रतिमा शिरोविहीन आहेत, तर काही प्रतिमा मधे शिराचे जागी कमळ पुष्प आहे, देवी विषयक धार्मिक प्रतिष्टित ग्रंथात याचा उल्लेख आढळत नाही, देवता विषयी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचे मते या प्रतिमा वैदिकदेवी अदितीच्या आहेत, ज्या मंदिरामध्ये या पुजेत आहेत त्या ठिकाणी त्यांना भूदेवी, रेणुका म्हणुन संबोधले जाते
योगिनी ( मातृका )
shiv sati
ब्रह्माड निर्मितीसाठी महेशांनी लघुरूपाने आदिशक्तीचे शरीरात प्रवेश केला व तीने ब्रह्मानंदाची प्राप्ती करणारे भव्य रूप प्रगट केले या रूपाचे तेजोमंडळातुन काही आनंदी हास्यकरणाऱ्या व गर्जनां करणाऱ्या अनेक नारी प्रगट झाल्या त्याच या विश्वनिर्माण करणाऱ्या योगिनी होय अशी कथा योगिनी तंत्रामधे आहे आदिशक्ती निर्माण झालेल्या या शक्ती ची संख्या विविध ग्रंथा मधुन भिन्न आढळते व त्यांच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या कथा हि अस्तित्वात आहेत
सप्तमातृका
sapta matruka
मातृकांची संख्या भिन्न सांगितली जात असली तरी विविध शिल्पपट व विविध लिखाणातून सात मातृका प्रमुख मानल्या जातात. या प्रमुख मातृकांचे नावांमध्येही भिन्नता दिसते, त्यातील या काही प्रमुख मातृका
चौसष्ट योगिनी ( मातृका )
Chusashta yogini
योगिनीच्या संख्येचा विचार केल्यास तीचा बराचसा विस्तार झालेला दिसतो. या विस्तारा मुळे त्यांची संख्या अमर्याद झालेली दिसते. पण त्यांची संख्या हि चौसष्ट मानली जाते. अस्तित्वात असणाऱ्या योगिनी मंदिरात चौसष्ट मातृका प्रतिमाच आढळून येतात. आपल्या कडे श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या दिवशी चौसष्ट मातृकांचे पुजन केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नावात पाठभेद आढळुन येतो. चौसष्ट योनी व चौसष्ट कलांच्या या जन्मदात्री मानल्या जातात. मंदिरा मधील मातृकांच्या नावातही व काही ठिकाणी त्यांचे मुर्ती व नावामध्ये फरक जाणवतो आपल्या कडील पिठोरी अमावस्या व्रतात या मातृकांचा नाम उल्लेख आढळतो
१) दिव्ययोगी २) महायोगी ३) सिद्धयोगी ४) गणेश्वरी ५) प्रेमाक्षी ६) डाकिनी ७) काली ८) कालरात्री ९) निशाचरी १०) झंकारी ११) रौद्रवताली १२) भूतली १३) भुतडांबरी १४) ऊर्ध्वकेशी १५) विरूपाक्षी १६) शुष्कांगी १७) नरभोजणी १८) भट्टारी १९) वीरभद्रा २०) धुम्राक्षी २१) कलहप्रिया २२) राक्षसी २३) घोररक्ताक्षी २४) विश्वरूपा २५) भयंकरी २६) चंडिका २७) कौमारी २८) वाराही २९) मुंडधारिणी ३०) सासुरी ३१) रौद्रा ३२) भीषणा ३३) त्रिपुरान्तिका ३४) भैरध्वसीनी ३५) क्रोधी ३६) दुर्मुखी ३७) प्रेतवाहिनी ३८) खट्वांगी ३९) दीर्घलंबोष्टी ४०) मालिनी ४१) मंत्रयोगिनी ४२) चक्री ४३) कालाग्नी ४४) ग्रहणी ४५) कंकाळी ४६) भुवनेश्वरी ४७) कटकी ४८) किटीनी ४९) रौद्री ५०) यमदूती ५१) कारालिनी ५२) घोराक्षी ५३ ) कार्मुकी ५४) काकदृष्टी ५५) अधोमुखी ५६) मुंडाग्रधारिणी ५७) व्याघ्री ५८) किंकिणी ५९) कालभाषिणी ६०) कामाख्या ६१) उष्ट्रानी ६२) योगपिठीका ६३) महालक्ष्मी ६४) एकविरा
पौराणिक देवता
वेदकाळा नंतर पौराणिक पुराणांच्या रचनांचा काळ सुरु झाला. यज्ञ यागाबरोबर देवतांची मंदिरे निर्माण होवू लागली, मंदिरामधुन मुर्ती पुजा होवू लागल्या त्यांची पुराणे निर्माण झाली, अशा विविध पुराणामधुन या शक्तीदेवतांचा उल्लेख विविध ठिकाणी आढळतो
१) श्रीदेवी २) अंबिका ३) अभ्यंबा ४) अलक्ष्मी ५) आनंदनायकी ६) उनाई ७) उमा ८) काळरात्री ९) कुंडिका १०) कुलकुल्या ११) कौशिकी १२) कंकाळी १३) गजांतलक्ष्मी १६) गौरी १७) चंद्रवदनी १८) चंद्रघन्टा १९) कुष्माडीनी २०) ब्रह्माचारिणी २१) महागौरी २२) सिद्धीदात्री २३) स्कंदमाता २४) शैल्यपुत्री २५) चक्रपदी २६) जगदात्री २७) दुर्गा २८) निलसरस्वती २९) पद्मावती ३०) प्रांत्यगीरा ३१) पार्वती ३२) चंपावती ३३) बगलामुखी ३४) बळातिबळा ३५) भुवनेश्वरी ३६) महिषासुरमर्दिनी ३७) महाकाली ३८) महासरस्वती ३९) माखानदेवी ४०) मुकांबिका ४१) योगेश्वरी ४२) रासईदेवी ४३) वृंदा ४४) विद्यादेवी ४५) वैष्णवी ४६) शताक्षी ४७) वत्स्तलादेवी ४८) शिवदूती ४९) सहस्त्रकाळमाया ५०) संज्ञा ५१) हुंकारेश्वरी
मातृशक्ती
devi aditi with her child barhma vishnu mahesh (Copy) (Copy)
विश्वनिर्मिती नंतर प्रथम मातृशक्तीची निर्मिती झाली, त्या शक्तीने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना निर्माण केले. या मातृशक्तीच्या धडापासून सरस्वती, शिरापासून लक्ष्मी व पाया पासुन महेशी निर्माण झाली. व त्या ब्रह्मा, विष्णु, महेश, यांच्या पत्नी झाल्या अशा आशयाची कथा देवी भागवतात आहे. श्री देव्याथर्वशीर्षम मधे हि आदिशक्ती मी ब्रह्मस्वरूप आहे, माझ्या प्रकृती पासुन परुषात्मक सत असत उत्पन झाले, ब्रह्म, वेद, रूद्र, वसु, पूषा, विष्णु सर्व मीच आहे, मी ब्रह्मशक्ती सरस्वती रूपाने निर्मिती करते, विष्णुशक्ती लक्ष्मी रूपाने पालन करते व रूद्रशक्ती रूपाने संहार करते असे तिचे रूप ती देवतांना सांगत आहे. अशी हि सर्व व्यापक मातृशक्ती या जीवित विश्वाची आद्यमातृशक्ती होय,
saraswati parvati laxmi
आज सर्वत्र पुजनीय सर्व देवता या तीन देवतांची विविध रूपे मानली जातात

h)


पार्वती मंदिर, अचलपूर, अमरावती
अचलपूर येथील वतनदार देशपांडे यांच्या वाड्यात पार्वती देवीचे मंदिर आहे. तेथे पार्वती गौरी रूपात आहे. मंदिर देशपांडे यांची खाजगी मालमत्ता असली तरीही अचलपूर येथील स्थानिक भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. मूर्ती शास्त्रानुसार देवीच्या शिल्पाला पार्वती गौरी असे म्हणतात. मूर्ती तीन-साडेतीन फूट असावी. ती कोरीव नक्षीकाम केलेली देखणी अशी आहे. गौरी रूपातील पार्वती चतुर्भुज आहे. ती प्रदक्षिणा क्रमाने स्थानक अवस्थेत समपाद चरणात उभी आहे. मूर्तीच्या दोन उजव्या हातांपैकी एका खालील हातात अक्षमाला आहे तर दुसऱ्या वरच्या हातात दांडी धरलेल्या गोल फलकात शिवपिंड आहे. डाव्या खालील हातात कमंडलू धरलेला आहे तर वरील हातात दांडीवरील गोल फलकात गणपती प्रतिमा आहे. पार्वती गौरीला जटा मुकुट आहे. ती संपूर्ण अलंकृत आहे. तिच्या गळ्यात फलक हार, एकावली, वैकक्षक माला तर दंडात अंगद, केयुर व मनगटावर बांगड्या आहेत. तसेच, कमरेवर मेखला, पायात पादवलय, नुपूर, जोडवी असे सर्व अलंकार सजलेले आहेत. कमनीय बांधा असलेली पार्वती त्यामुळे अधिकच खुलून दिसते. मूर्तीच्या पायाशी इतर दासीगण व नंदी कोरलेले आहेत. संपूर्ण शिल्पपटात महिरप कोरलेली आहे. त्यामुळे त्या मूर्तीची उत्कृष्ट व दुर्मीळ शिल्पाचा नमुना म्हणून गणना होते.
(माहिती आणि फोटो - अनुपमा खवसे, थिंक-महाराष्ट्र)

कालंका माता मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
टंकावती नगरी बार्शीटाकळी. विदर्भातील प्राचीन शहरांपैकी एक असा बार्शीटाकळी शहराचा उल्लेख करावा लागेल. इसवी सन चौथ्या शतकातील सातवाहन काळापासून येथे मानवी वस्ती होती. त्या काळी या शहराला विशेष महत्व होते व येथे बाजारपेठ होती. संपूर्ण शहरात गल्लोगल्लीत प्राचीन काळातील बांधकामाचे अवशेष सापडतात. गावात एक किल्लाही होता. येथे भुयारांची श्रृंखलाच आहे. अनेक ठिकाणी भुयार आहेत. त्यामुळे याला भुयारी शहर म्हणूनही संबोधल्या जाते. शहरात भरपूर तळघरे आहेत. प्रत्येक गल्लीत दोन ते तीन तळघरं असल्याचे आजही दिसतात. बार्शी टाकळी येथे पूर्वी बारा वेशी होत्या व या गावाचे पूर्वीचे नाव टंकावती होते. टंकावतीचा अपभ्रंश होवून टाकळी असे झाले तर बारा वेशी असल्यामुळे बारशी. त्यामुळे गावाचे नाव बार्शी टाकळी पडले. या ठिकाणी पूर्वी सातवाहनांची एक शाखा होती. येथील कालंका देवीच्या मंदिरात असलेल्या शिलालेखात भिल्लम, टेकल्ली असा उल्लेख आहे. भिल्लम हा सातवाहनांचा एक राजा होता. येथे मुस्लीम, हिंदू, जैन धर्मियांचे मंदिरे व मशिदी आहेत. यावरून या ठिकाणी सर्वधर्मिय लोक नांदत होते, असे निदर्शनास येते.

ता।।


चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे. आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप ज्ञात आहे. परंतु नेर तालुक्यातील ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे. म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे.
नेर तालुक्यात प्राचीन गणेशाचे स्थान असूनही ते उजेडात आलेच नाही. तालुक्याला मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जवळगाव येथे आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, ती यासाठी वेगळी आहे की, एकाच पाषाणात चार गणपती प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. अशा प्रतिमेला प्रतिमाशास्त्रात 'सर्वतोभद्र' असे म्हणत असून, जवळगावची प्रतिमा याच प्रकाराची आहे. ती प्रतिमा उत्तमस्थितीत असून, पूर्वी उघड्यावर असलेली ही प्रतिमा ग्रामस्थांनी लहान मंदिरात स्थानापन्न केली आहे. काळ्या पाषाणात उत्कीर्ण केलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन आहे. चारही प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यकासनात बसलेली आहेत. हातात हस्तिदंत, परशु, अंकुश, मोदक धारण केलेले दाखविले आहे. या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे चारही प्रतिमांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेला भव्य व सुंदर मुकुट आहे. या मुकुटामुळे दुरून बघितल्यास ही गणेशाची सर्वतोभद्र प्रतिमा छोट्या मंदिराची प्रतिकृती वाटते.
गणपतीच्या इतर अलंकारात अतिशय ठळक दिसणारा अलंकार म्हणजे 'सर्प उदरबंध'. हाताला केयूर व बाजूबंध आहेत, अशी ही सर्वतोभद्र प्रकारातली प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जेथे चार वाटा मिळतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणजे वाटसरूंना चार दिशा दाखविण्यासाठीही अशा प्रतिमांचा प्राचीन काळात शुद्ध व्यावहारिक उपयोग होत असावा. याला पूरक असा संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत 'चतुष्पथीचे गणपती' म्हणून जो उल्लेख येतो, तो अशा प्रतिमांसंदर्भात असावा, असे सांगतात.
या मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय आहे. बाजूलाच पूर्वी श्री विष्णूचेही मंदिर होते. सोबतच गणपतीचेही मंदिर होते. परंतु, आता विष्णू व गणपतीच्या मंदिराचे केवळ अवशेष आहेत. परंतु, श्रीविष्णू व गणपतीच्या मूर्ती सुस्थितीत आहेत. गावाच्या पश्चिमेस आणखी एक हेमाडपंथी मंदिर असून, त्यात श्रीविष्णूची व गरुडाची मूर्ती स्थानांतरित केली आहे. दोन्ही हेमाडपंथी मंदिर गावचा ऐतिहासिक वारसा जपून आहे. गावात एक गढी असून, त्याचाही मोठा इतिहास आहे. गावात एक भवानी मातेचे अर्धपीठ असून, जेठसिंगच्या वंशजांनी ते तुळजापूरवरून आणल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे व ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी सांगितले. नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता या चौमुखी गणेशाची प्रतिमा मिळाल्याने याचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविक लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करीत आहेत.

वी.
 




दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला
अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते. काय आहे ही अनोखी प्रथा?
विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..
रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..
त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.
सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.
या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.
सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात. गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले.
त्या मूर्तीकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.
शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. दहा तोंडांची, अहंकारी भाव दर्शवणारी युद्ध पोशाखातील शस्त्राधारी मूर्ती असल्याने गावकऱ्यांनी रावणाची मूर्ती म्हणून या मूर्तीवर शिक्कामोर्तब केले. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे रावण जरी दुष्ट, कपटी, अहंकारी असला तरी सांगोळ्यात या रावणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.. दसऱ्याला संध्याकाळी रावणाची विशेष पूजा गावकऱ्यांद्वारे केली जाते.. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात. या गावातील रहिवासी व निवृत्त शिक्षक दिनकर पोरे याविषयी सांगतात की, दसऱ्याला ठिकठिकाणी रावणाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातो. पण या निषेधात उन्मादच जास्त दिसतो..
रावण जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो एक प्रचंड ज्ञानी पंडित होता असं म्हटलं जातं, हे आपण सोयीस्कर विसरतो.. रावणाने साक्षात शंकरांना प्रसन्न करत अजेय वरदाने मिळवली होती, असं मानलं जातं. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही.. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही. इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते.
गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात.. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात; किंबहुना सातपुडय़ाच्या पायथ्याचा भाग हा अतिदुर्गम तथा डोंगराळ, घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याच पर्वतरांगांमध्ये मेळघाट वसलेलं आहे.
कोरकू हे रावणाला देव मानतात. कोरकू आदिवासींमध्ये असे मानले जाते की, महादेव त्यांचे पिता आहेत, शिवाय त्यांच्या उत्पत्तीसाठी रावणाने भगवान शिवाजवळ प्रार्थना केली आणी रावणाच्या भक्तिभावाने प्रसन्न होत महादेवाने कोरकूंची सृष्टी निर्माण केली. यासाठीच कोरकू हे दसरा तथा होळीला रावणाची पूजा करतात.
आदिवासी कोरकू फक्त रावणालाच नव्हे तर त्याचा पुत्र इंद्रजीत मेघनाद यालासुद्धा मनोभावे पूजतात. आदिवासी कोरकूंची अशी धारणा आहे की एकदा मेघनादने युद्धात कोरकूंचे रक्षण केले होते. यासाठीच कोरकू हे मेघनादपूजक म्हणूनपण ओळखले जातात. आदिवासी कोरकूंच्या गावात पूजेसाठी भलेमोठे दोन लाकडी उंच खांब रोवलेले असतात. मेघनाद खांब म्हणूनच ते ओळखले जातात.
पोस्ट - संतोष विनके

























































































































































१८. सुरसुंदरी (भाग १)


क्र. १४४: डालमालिका, खजुराहो

     प्राचीन मंदिरात आपल्याला देवातांच्याच एव्हढ्या संख्येनी आणि त्याच आकारमानाची अनेक शिल्पेही दिसतात. त्यामध्ये सप्तमातृकांव्यतिरिक्त योगिनी, कंदुक क्रीडा करणाऱ्या, सापाशी खेळणार्या किंवा सापाच्या वेटोळे अंगावर असणाऱ्या, माकड, मुंगुस, पोपट, मोर इत्यादी प्राणी किंवा पक्षी यांच्यासह असणाऱ्या, तसेच विविध भावमुद्रांमध्ये उभ्या असलेल्या स्त्रियांची अनेक शिल्पे आतात. या पैकी वादन करणाऱ्या स्त्रीशिल्पांना मर्दला असे म्हणतात. नृत्यमग्न शिल्पे नर्तकींची असून अनेकदा मरतमुनीच्या नाट्यशास्त्रात ज्यांना 'करण' म्हणतात त्या नृत्यमुद्रांमध्ये त्या कोरलेल्या असतात.  (दाते: २०१०,३९) याशिवाय ज्या आणखी एक प्रकारच्या स्त्रीयांचे शिल्यांकन आढळते ज्यांना सुरसुंदरी म्हटले जाते.
  सुरसुंदरी म्हणजे अप्सरा किंवा पऱ्या असा समज आहे. शिल्पशास्त्राच्या ग्रंथांमध्येही यांच्यावर थोडे लिखाण झाल्याचे आढळते. शिल्पप्रकाश, क्षीरार्णव अशा ग्रंथात यांचे अनुक्रमे १६ आणि ३२ प्रकार सांगिलते आहेत. आपल्यातील विकार नाहीसे व्हावेत, त्यांचे दमन व्हावे, जीवनदृष्टी निर्मल व्हावी तसेच आपल्या तत्त्वज्ञानातल्या काही गोष्टी सूचकपणे सांगण्याच्या उद्देशाने यांचे शिल्पांकन केलेले असते. ( देगलूरकरः २००४, पृ. ५-६) सगळ्याच मंदिरातील शिल्पांमध्ये त्या असतात असे नाही. वेरुळमध्ये तर त्यापैकी एकही आढळत नाही तर खजुराहो येथील मंदिरात त्या शेकड्याने कोरलेल्या आहेत. परंतु सर्वसाधारणपणे दहाव्या शतकानंतर बांधलेल्या मंदिरात त्या ठळकपणे दिसतात. काही वैशिष्ट्यपूर्ण सुरसुंदरींचे प्रकार आणि सामान्यतः अनेक मंदिरात दिसणारी त्यांची शिल्पे खालीलप्रमाणे आहेत.

      शुभगामिनी- 

डाव्या पायावर तोल सावरत उजवा पाय समोरच्या बाजूला उचलून त्याच्या तळव्यातील काटा काढणाऱ्या तरुणीचे हे शिल्प असते. मंदिरामध्ये आपण आलो आहोत हे अंततोगत्वा त्या गर्भगृहातील देवाशी एकरूप होण्यासाठी म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. इथे एकदा येऊन चालत नाही तर पुन्हा पुन्हा यावे लागते. ही साधना अखंड चालू ठेवावी लागते. स्वाभाविकपणे यात अनेक अडचणी येतात कारण हा साधनेचा मार्ग आहे. या मार्गावर असंख्य काटे पसरलेले असतात. या सुरसुंदरीला सुचवायचे हे असते की हा मार्ग जरी कंटकांनी भरलेला असला तरी, हे काटे अलगदपणे काढून टाकत साधकाने मार्गक्रमण चालूच ठेवायचे असते. या सुरसुंदरीला 'शुभगामिनी' असे म्हणतात.
 
चित्र क्र. १४५ : शुभगामिनी, खजुराहो

 जया, पद्मगंधा आणि डालमलिका - 

  मंदिराच्या द्वारशाखेशेजारी असणारी ही शिल्पे आहेत. देवळात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असे त्या सुचवितात. झाडाची पाने, फुले, फळे किंवा पाणी यापैकी काहीही मला वाहिलेले चालते असे भगवंताने म्हटलेले आहे.
         पत्रं पुष्यं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
         तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥   (भगवद्‌गीता ९-२६)
       मंदिरात जाताना देवासाठी काहीतरी घेऊन गेले पाहिजे. धन किंवा अन्य नैवैद्य नसेल तर फळे किंवा फुलेसुद्धा चालतात याची आठवण करून देणारी सुरसुंदरी  म्हणजे डालमलिका.

चित्र क्र. १४६ : डालमलिका, खजुराहो
 उजवा हात उचलून ती झाडावरून पाने तोडताना किंवा फुले काढताना शिल्पात दिसते. ज्या सुरसुंदरीच्या हातामध्ये कमळाचे फूल किंवा कळी असते तिला 'पद्मगंधा' म्हणतात आणि जिच्या हातात पोटाजवळ किया एका हाताने खांद्याजवळ घरलेला कलश असतो तिला 'जया' असे म्हणतात.

क्र. १४७ : आलसकन्या, खजुराहो

आलसिका किंवा आलस कन्या- 

     सकाळी उठल्यावर आळस झटकण्यासाठी डोक्यावर दोन्ही हात धरून त्यावर ताण देऊन संपूर्ण शरीराला आळोखेपिळोखे देणाऱ्या युवतीचे हे शिल्प असते. अनेक मंदिरावर हे ठळकपणे दिसते. पुढून, मागून, बाजूने, अर्धवट वळलेले, पूर्ण वळलेले अशा अनेक वेगवेगळ्या स्थिर्तीमध्ये याचे शिल्पांकन दिसते. या शिल्पांकनामध्ये विशेषतः आधीच कमनीय असलेल्या स्त्री देहाच्या पुर्ण आणि उठावदार असणाऱ्या बाह्य रेषांचे मनोहारी दर्शन होते. मंदीरावर हे कोरण्याचा हेतू असा की देवकार्यासाठी सदैव आळस सोडून तत्पर असले पाहिजे.

चित्र क्र. १४८: मरीचिका, खिद्रापूर

       मरीचिका-

     हातात धनुष्य बाण घेतलेल्या स्त्रीचे हे शिल्पांकन असते. खिद्रापूरच्या मंदिरामध्ये मरीचिकेचे सर्वोत्तम शिल्प आहे. डावा हात डोक्यावर सरळ उचललेला असून त्यात तिने धनुष्य धरले आहे, उजवा हात कोपरात वाकला असून प्रत्यंचेच्या खाली आहे. नुकताच तीने बाण सोडल्याचे ते निदर्शक आहे. त्वेषाने बाण सोडल्याच्या या कृतीनंतर तोल सावरायला क्षणभर तिने तिचा उजवा पाय डाव्या पायाच्या उचलून धरलेला दिसतो. या शिल्पांकनामध्ये तिचा डावा दिसत असून एका बाजूला तिचा चेहरा आणि बाण सोडलेल्या गेलाच्या धक्क्याने उसळलेल्या तिच्या वक्षाची गोलाई एकीकडे तर दुसरीकडे यालाच अनुरूप तिची पाठ आणि नितंबाचा गोलाकार दाखवून कलाकाराने अप्रतिम संतुलन साधले आहे. डॉ. देगलूरकरांच्या मते तिला जणूकाही तिच्या बाणाने अज्ञान अंध:काराचा नाश करायचा आहे. (देगलूरकर: २०१३, पृ.५८).

चित्र क्र. १४९ : पुत्रवल्लभा, खजुराहो

     पुत्रवल्लभा - 

   लेकुरवाळ्या स्त्रियांचे शिल्पांकन हेही अनेक ठिकाणी दिसते. एक, दोन, किंवा तीन मुलेही असणारी त्यापैकी एखादे मूल कडेवर घेतलेले असेही शिल्प असते. कडेवरच्या मुलाशी खेळताना दिसते किंवा मुलाला कमरेत धरून दोन्ही हात डोक्याचा सरळ धरून तिने बाळाला वर धरलेले असते.

      माकड आणि स्त्री- 

    माकड आणि स्त्री हा विषयसुद्धा अनेक देवळातील शिल्पांमध्ये दिसतो. या शिल्पांत पुरुषाचे मन सदैव चंचल असते हे दाखविण्यासाठी माकड हे रूपक वापरले आहे. देवळात गेल्यावरही मनाच्या मर्कटचेष्टा सुरूच असतात. त्यामुळे अशा शिल्पांमध्ये अनेक वेळा त्या माकडावर हात उगारून त्याला ती स्त्री गप्प राहायला सांगत असताना दिसते. या मुद्रेला 'चपेटदान मुद्रा' असे म्हणतात. हे मनाचे माकड असे स्वस्थ बसत नाही तर देवळात आपल्याशिवाय आणखी कोणकोण आले आहे ते न्याहाळायची एक मनोवृत्ती असते. तसेच पुरुषांची नजर वाईट (कावळ्यासारखी) असे म्हणतात. बहुतांश शिल्पांमध्ये ते माकड स्त्रीच्या मांडीवर चढलेले असते आणि तिचे वस्त्र ओढत असते. अनेक शिल्पांमध्ये ते वस्त्र ओढत ते गुडघ्याचाही खाली ओढले गेलेले असते. यामुळे या शिल्पामध्ये स्त्री विवस्त्र अवस्थेत दिसते. खिद्रापूर, खजुराहो, रानी की वाव, पानगाव, धर्मापुरी, ओडिशा येथील अनेक मंदिरांमध्ये हे शिल्प अनेक ठिकाणी दिसते. पुरुषाच्या मनासाठी माकडाचा रूपक म्हणून वापर करणे ही तर कलाकारांची प्रतिभा असतेच परंतु एका मोठ्या विकाराचे, विशेषतः पुरुषांमध्ये असणाऱ्या विकाराचे दर्शन यातून घडते. पानगावच्या (जि. लातूर) मंदिरातील एक तिने हात माकडावर उगारलेला असून वस्त्र घसरू नये म्हणून उजवा पाय उचललेला आहे. मनावर सतत नियंत्रण ठेवावे यासाठी याहून सूचक असे शिल्प ते काय असणार.

चित्र क्र. १५०: माकड आणि सी, रानी की बाव, पाटन

  या मालिकेतील अत्यंत कल्पक शिल्प खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरात पाहायला मिळते. एका पुरुषाच्या हातात एक काठी आहे, जिचे समोरचे टोक आकड्यासारखे वाकलेले आहे. त्याच्या कुटील मनाचे ते सूचक आहे. त्या वाकड्या टोकाला प्रलोभन समजून त्याच्याशी ते माकड खेळते आहे. माकडाला घाबरून एक तरुणी त्याच्या जवळ आली आहे. ती थोड्या भीतियुक्त कुतूहलाने माकडाकडे पाहाते आहे. आयत्या हातात आलेल्या संधीचा फायदा घेत त्या पुरुषाने डाव्या हाताने तिच्या कमरेला विळखा घातला आहे. हे शठ नायकाचे शिल्पांकन असून कलाकाराने त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर अत्यंत , मिस्कील भाव दाखवलेले आहेत.

चित्र क्र. १५१ : माकड आणि पुरुष खजुराहो

 १९. नायिका


चित्र क्र. १५२ : दर्पणा, खजुराहो

      मंदिरावरील शिल्पांमध्ये ज्ञान, विज्ञान (इथे विज्ञानाची व्याप्ती ही ब्रह्मांडशास्त्र या विषयापुरतीच निगडीत आहे), तत्त्वज्ञान यावर आधारित शिल्पांमधून आपल्या देशातील श्रेष्ठ ज्ञान परंपरेचे जतन कसे केले गेले हे आपल्याला कळते तसेच त्या ज्ञानाची व्याप्ती आणि प्रगल्भताही कलाकारांच्या तपश्चर्येतून साकार झालेली दिसते.
   ज्ञानशाखांइतकीच साहित्याची देखील एक अत्यंत समृद्ध परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे, ज्यामध्ये कथा, काव्य आणि नाट्य यांचे देखील विपुल लेखन झालेले दिसते.
  या समृद्ध साहित्य परंपरेचे शिल्पांकन मंदिरावरील सर्वस्पर्शी शिल्पकलेत न दिसते तरच नवल वाटले असते. अगदी प्राचीन लोकसाहित्यापासून ते संस्कृतमधील अभिजात साहित्यात प्रेम, बिरह आणि पुनर्मीलन हे कथानकाचे आधारभूत स्तंभ राहिले आहेत. याशिवाय यामध्ये खलनायक, विदूषक, दूत किंवा दूती अशा पात्रांचाही भरणा असतो. यामध्ये नायक जरी कथेचा केंद्रबिंदू असता तरी नायिकेच्या भावभावनांना अधिक महत्त्व दिलेले दिसते. नायिकांप्रमाणे नायकांच्याही प्रकारांचे वर्णन केलेले आढळते. वात्स्यायनाने नायकाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये शश, वृष आणि अश्व यांचा समावेश होतो. परंतु हे त्यांच्या स्वभाव विशेषांप्रमाणे नसावे असे वाटते, नागरिक था अर्थाने नायक असल्यास त्याचे तीन प्रकार सांगितले आहेत. उत्तम, मध्यम आणि नीच. त्यांच्या गुणांप्रमाणे त्यांचे त्याने वर्गीकरण केलेले आहे आणि त्यातील उत्तम नायक म्हणजे जो कुशल, विद्वान तसाच सदव्यवहारी आहे. त्याला ६४ कलांचे ज्ञान आहे आणि ज्याच्या गुणामुळे त्याच्यावर स्त्रिया भाळतात. पुढील साहित्यात हरिहर याच्या मते भद्र, दत्त, चुमार आणि पांचाल हे नायकांचे चार प्रकार सांगितले आहेत. या वर्णनामुळे कथेमधील नायक हा बरेच वेळेला धीरगंभीर किंवा धीरउदात असाच रंगवला जाई. परंतु याशिवाय स्त्रीला वश करण्यासाठी अनेक खोट्यानाट्या युक्त्या किंवा प्रसंगी थोडे कपटही करणाऱ्या नायकाला शठ नायक म्हणत. (वाकड्या काठीने माकडाशी चाळे करणारा) नायकांच्या प्रकारांमध्ये पती, उपत्ती, वैषिक हे प्रकार दिसतात, तर त्यांच्या स्वभावानुसार दक्षिण, भ्रष्टा (धूर्त), शठ (प्रच्छन्न, प्रकाश), मानिन, चतुर (वाकःचातुर, क्रियाचातुर) असे नायकांचे प्रकार आढळतात. याशिवाय त्यांच्या काही अवस्थांचे वर्णन केले आहे. त्या म्हणजे प्रोषित, आमिलीत, विरहीन इ. नायकांबरोबरच त्यांच्या साहाय्यकांचेही वर्णन दिसते. कथेमध्ये आणि रंगमंचावर ही पात्रे सूत्रधार, विदूषक किंवा सेवक अशा भूमिकांमध्ये वावरतात. तर अनेक वेळा प्रमुख शिल्पाच्या खालील आकृतीत हे साहाय्यक म्हणून दिसतात. ह्यांचे पीठमर्द, विट, चेट आणि विदूषक असे चार प्रकार सांगितले आहेत. तसेच नायकांच्या मानसिकतेप्रमाणे एक वर्गीकरण दिसते ज्याचे चार प्रकार श्रावणानुरागी, दर्शनानुरागी, चित्रानुरागी आणि स्वप्नानुरागी हे होत (राय: १९८३).
  यातील अनेक नायक त्यांच्या ह्या वैशिष्ट्यांसह शिल्पांमध्ये दिसतात. परंतु कथा कादंबऱ्यांमध्ये शब्दात वर्णन केले असल्यामुळे ते पात्र आपल्या डोळ्यासमोर सहज उभे राहते. शिल्पकलेत मात्र हे सर्व ज्ञात असले तरी दर्शकांना शिल्पातील नायक किंवा नायिका कुठल्या भावमुद्रेत किंवा भूमिकेत आहेत हे हुडकून काढावे लागते.
   स्वभावाप्रमाणे वात्स्यायनाने नायिकांचे तीन भेद सांगितले आहेत. ज्यामध्ये मृगी, बडवा आणि हस्तिनी यांचा समावेश आहे. मृगी ही अत्यंत भावनाप्रधान असते, ती प्रेमकुशल असून मत्सराला भिणारी असते. बडवा ही गोड आवाजाची, सहानुभूत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची असते. मत्सराचे भय तिलाही असते. हस्तिनी ही बडबडी, रागीट आणि अत्यंत आतल्या गाठीची असते. वात्स्यायनाने त्यांच्या शरीर भेदाप्रमाणेही वर्गीकरण केलेले आहे. ज्यामध्ये पद्मिनी, चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी यांचा समावेश होतो. परंतु ही वर्णने त्यांच्या शारीरिक अवस्थांची वाटतात. कथेमधील भूमिके अनुसार किंवा विशिष्ट प्रसंगी होणाऱ्या मानसिक अवस्थेप्रमाणे जो स्त्री मनाचा वेध घेतला गेलेला आहे, त्या वर्गीकरणाला अष्टनायिका असे सर्व साधारणपणे संबोधले जाते. यांचाही उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये दिसतो. वात्स्यायनाचे कामसूत्र, अनंगरंग, नगरसर्वस्व, रतिमंजरी, रतिरत्न, प्रदीपिका, रतिरहस्य, समर दीपिका हे सगळे कामशास्त्रावरील ग्रंथ असले तरीही त्यातही नाविकांची वर्णने आणि नायिकाभेद सविस्तरपणे दिलेले आढळतात. शृंगाररसप्रबंध दीपिका तसेच कालिदासाचे रघुवंश, मेघदूत आणि  शाकुंतल यामध्ये या नायिकांची नावे. त्यांचे प्रकार आणि उपप्रकारांची तपशीलवार वर्णने आढळतात.
    आठ प्रमुख नायिका, दोन उपनायिका आणि त्यांचे विविध प्रकार यातून या नायिकांचे पाचशे अधिक प्रकार होऊ शकतात.

नायिका आणि त्यांचे भेद :-

   साधारणतः अष्टनायिका म्हणजे नायिकांचे आठ प्रकार हे सर्वांना परिचित किंवा ऐकून माहिले असतात. प्राचीन साहित्यात मात्र त्यांचे फारच खोलात जाऊन वर्गीकरण केले गेले होते असे आढळते राम कुमार राय यांनी नायिकांचे ९ प्रमुख प्रकार सांगितले असून त्यांनी त्यांचे तपशिलात पृथक्करण करून त्यांचे विस्तृत वर्गीकरणही केले आहे. यांच्या मते ते वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
प्रमुख प्रकार                 उप प्रकार
१. स्वाधीनपतिका :     १. दूतीवंचिका २. भाविशंकिता
२. वासकसज्जिका :    १. अवसितप्रवासपतिका
३. विरहोत्कंठिता:       १. कार्यविलंबिता (५ प्रकार) दर्शन अनुतापिता, श्रवण-अनुतापिता, चित्र- अनुतापिता, स्वप्न अनुतापिता आणि
                               अनुत्पन्न -  संभोग
४. विप्रलब्धा :           १. नायकवंचिता २. सखीवंचिता
५. खंडिता :               १. मानावती (३ प्रकार) गुरुमाना, मध्यमाना, लघुमाना २. धीरा ३. अधारा ४, धीराधीरा ५ अन्यसंभोगदुःखिता (४
                                 प्रकार) दूतीसंभोगदुःखिता, दूतीसमासक्तिदुःखिता, इतररतिश्रुतिखिन्ना, ईर्ष्यागर्विता
६. कलहान्तरिता :      १. ईर्ष्याकलहान्तरिता २. प्रणयकलहान्तरिता
७. वक्रोक्तिगर्विता :     १. प्रेमगर्विता २. सौंदर्यगर्विता (४ प्रकार) स्मितगर्विता, यौवनगर्विता, सौकुमार्यगर्विता, विलासगर्विता ३.  
                                सौभाग्यगर्विता, ४. नैपुण्यगर्विता
८. प्रोषितभर्तृका :     १. प्रवस्थपतिका (१ प्रकार) विगलितप्रस्थानपतिका २. प्रवसतपतिका ३. प्रोषितापतिका (१ प्रकार) सख्यनुतापिता
९. अभिसारिका : १. ज्योत्स्ना अभिसारिका २. तमो अभिसारिका ३. दिवा अभिसारिका ४. गर्व अभिसारिका ५. काम अभिसारिका ६. प्रेमवाक्य अभिसारिका

         वरील सर्व प्रकारच्या नायिकांचे त्यांच्या वर्तणुकीनुसार उत्तमा, मध्यमा आणि अधमा असे ३ प्रकार असतात. उत्तमा म्हणजे शालीन, मध्यमा म्हणजे थोडी मोकळी आणि अधमा म्हणजे उत्तान आणि उच्छृंखल अशी नायिका. तसेच या नायिकात, स्वीया, परकीया आणि सामान्या असे ३ उपप्रकार असतात, स्वीया ही पत्नीच असते तर परकीया ही प्रेयसी किंवा अन्य कुणाची पत्नी असु शकते. सामान्या म्हणजे गाव भवानी. या उपप्रकारच्या नायिकांचेही वर्गीकरण केले गेले हैं खालीलप्रमाणेः

स्वीया नायिका (३ प्रकार) १. मुग्धा, २. मध्या आणि ३. प्रगल्भा. त्याशिवाय या सर्वांचे ज्येष्ठा आणि कनिष्ठा है दोन प्रकार असतात.
मुग्धा नायिका (२ प्रकार) १. ज्ञातयौवना २. अज्ञातयौवना (२ प्रकार नवोढा आणि विश्रब्धा)
 मध्या नायिका : (२ प्रकार) १. प्रच्छन्नमध्या २. प्रकाशमध्या यांचे धीरा, अधीरा आणि धीराधीरा असे उप प्रकार असतात.
प्रगल्भा नायिका (३ प्रकार) १. स्वीया (हिचे २ प्रकार रतिप्रीतिमति आणि रत्यानंदप्रवषा) २. परकीया ३. प्रगल्भा यांचेही धीरा, अधीरा आणि धीराधीरा असे उप प्रकार असतात.

• परकीया नायिका      : (२ प्रकार) १. कन्या २. परोधा
परोधा नायिका           : (२ प्रकार) उद्धा आणि उद्बोधिता
उदुद्धा नायिका          : (३ प्रकार) गुप्ता, निपुणा (स्वयं दूती) आणि लक्षिता
गुप्ता नायिका             : (३ प्रकार) वृत्त सुरत गोपन, वर्तिष्यमान सुरत गोपन आणि वृत्त- वर्तिष्यमान सुरत गोपन
निपुणा नायिका          : (३ प्रकार) वाण निपुणा, क्रिया निपुणा आणि रतिवंचना निपुणा
लक्षिता नायिका          : (२ प्रकार) प्रच्छन्न लक्षिता आणि प्रकाश लक्षिता
प्रकाश लक्षिता             : (४ प्रकार) कुलटा, मुदिता, अनुशयाना आणि साहसिका
अनुशयाना नायिका      : (३ प्रकार) विघटितसंकेता, अप्राप्तभाविसंकेता आणि शंकितसंकेता- जारागमना

३. सामान्या नायिका : (४ प्रकार) १. स्वतंत्रा २. जनन्यधीना ३. नियमिता ४. कल्पितानुरागा (राय: १९८३)
       स्वाधीनपतिका, वासकसज्जिका, विरहोत्कंठिका, विप्रलब्धा, खंडिता, कलहान्तरिता, प्रोषितभर्तृका आणि अभिसारिका या आठ प्रमुख नायिका आपल्याला परिचित असतात. वक्रोक्तीगर्विता ही नववी नायिका गणली जाते. याशिवाय विशेषतः शिल्पांमध्ये दहावी मुग्धा ही एक उपनायिका तिच्या तरल भावदर्शनामुळे अत्यंत लोकप्रिय आहे.
   नायिकांच्या या प्रकारांचे अधिक वर्गीकरण केले गेले आहे. त्यात सामान्या, स्वीया आणि परकीया हे प्रमुख प्रकार, यातील स्वीया प्रकारची  नायकी हि नायकाची पत्नी असते. परकीया हि प्रेयसी किंवा अन्य स्त्री असते. क्वचित प्रसंगी दुसऱ्याची पत्नी किंवा परस्त्री सुद्धा असू शकते तर सामान्या नायिका हि गणिका किंवा वरांगणा असते. ( उदा. वसंतसेना ) या भेदाशिवाय नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्या उत्तमा, मध्यमा, अधमा अशाही असतात. याशिवाय नायिकांच्या वयोगटाप्रमाणे सुध्दा त्यांचे वर्गीकरण असून, बाला, तरुणी, प्रौढा, वृद्धा (प्रगल्भा) असेही त्यांचे चार प्रकारचे वर्गीकरण केलेले आढळते. त्यामुळे या सर्वांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या त्यांच्या शेकडो छटा मंदिरातून दिसतात.

स्वाधीनपतिका-

     सुरतातिरसेर्बद्धो यस्याः पार्श्वे तु नायकः ।
      सान्द्रामोद्गुणप्राप्ता भवेत् स्वाधीनभर्तुका ।। (नाट्य शास्त्र २४ पा. २१४)
  नायक जिच्या अधीन आहे अशी ही नायिका, स्वाधीनभर्तुका. उच्चारामध्ये चुकून भर्तृका असे म्हटले जाते. शिल्पांमध्ये नायक हा तिला प्रसन्न करण्यासाठी काही उपहार देतो, पाय चेपून तिची सेवा करताना किंवा प्रसंगी तिच्या ओठांना मद्याचा प्याला आपल्या हातांनी लावताना दिसतो. बरेच वेळा ही शिल्पे स्तंभावरील कोनाड्यांमध्ये किंवा द्वारशाखांवर दिसतात. काही शिल्पांमध्ये पुरुषा समोर स्त्री उभी असते आणि मागून तिला पुरुषाने आलिंगन दिले असून ती मागे मान वाकवून त्याला चुंबन देताना दिसते. हे स्वाधिनपतिकेचे शिल्प. याचा वेगळेपणा असा आहे की त्याने तिला वळून डोळे मिटायला सांगितले असते, नंतर तो हळूच तिच्या गळ्यात त्याने आणलेला सुवर्णालंकार घालतो. तेव्हा ती त्या मिटलेल्या डोळ्यांनी आणि आहे त्या स्थितीतच आपले दोनही हात त्यांच्या मानेभोवती घालून त्याला जवळ ओढून प्रेमळ कृतज्ञता व्यक्त करते. खजुराहोमधील एका शिल्पात कलाकाराने असामान्य शक्कल लढविलेली दिसते. नायकानी तिला कानातले एक अलंकृत कडे दिले असते. ते कडे पाहून नायिकेच्या स्मृती जाग्या झाल्यामुळे ती आरशात बघून त्या कड्याशी खेळत असते. ह्या शिल्पात त्या कड्याच्या बाहेरील नक्षीकाम देखील कलाकाराने कोरले असून तिच्या नक्की कुठल्या स्मृती जागृत होत आहेत हे दाखविण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर लालीयुक्त हास्य तर दाखवलेच आहे परंतु याशिवाय त्या कानातील कड्यात तिने आपले मधले बोट अडकवले आहे. हे शिल्प खजुराहोमधील जवारी मंदिरावर आहे.

चित्र क्र. १५३ : स्वाधीनपतिका, खजुराहो

  उचिते वासके या तु रतिसम्भोगलालसा ।
  मण्डनं कुरुते द्रष्टा सा वै वासकसज्जिता ।।
(नाट्यशास्त्र २४ पा. २१२)

          नायकाच्या आगमनाची वार्ता कळल्याने साजशृंगार करून अत्यंत अधीरतेने नायकाची प्रतीक्षा करणारी, रतीक्रीडेसाठी उत्सुक असलेल्या नायिकेस 'वासकसज्जीका' असे म्हणतात.
    ही नायिका पूर्ण नट्टापट्टा करून घरीच प्रियकराची वाट पाहत असते. शिल्पांमध्ये ती उभी कोरलेली असून तिच्या हातातला आरसा तिने तीच्या खाली सोडलेल्या सरळ हातात धरलेला असतो. साजशृंगार नुकताच पूर्ण झाल्याचे ते लक्षण असते. खजुराहोमधील खंडारिया महादेव मंदीरावरील शिल्पात तिने डाव्या हातातला आरसा खाली धरला असून उजवा हात भुवयांवर ठेवून दूरवर नजर लावलेली आहे. भुवयांमधील आठीमुळे तिची उत्कंठाही स्पष्ट दिसते. (पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, बायकांचा मेकअप पूर्ण होईपर्यंत कोणी आपल्याला पाहू नये असे त्यांना वाटते, मग त्याला कितीही वेळ लागो. परंतु तो पूर्ण झाल्याबरोबर लगेचच सगळ्यांनी आणि विशेषतः 'ह्यांनी' पाहून कौतुक करावे ही अपेक्षा असते.) अन्य काही शिल्पांमध्ये घराच्या सज्जावर उभी असलेली दूरवर नजर लावून बसलेली आणि कानातील डुलांशी किंवा गळ्यातील माळेशी चाळा करताना ती शिल्पांमध्ये दिसते.

चित्र क्र. १५४: वासकसजिका, खजुराहो

विरहोत्कंठिता-

 अनेककार्यव्यास‌ङ्गाद्यस्या नागच्छति प्रियः ।
तद्भागतदुःखार्ता विरहोत्कंठिता तु सा ।। (नाट्य शास्त्र २४ षा. २१३)
     जिच्यापासून प्रियतम लांब गेला असल्यामुळे त्याची ती आतुरतेने वाट बघत असे. अनेक शिल्पांमध्ये ही नायिका थोडी उदास असते.

चित्र क्र. १५५ :दिशोत्कंठिता, खजुराहो
   खजुराहोमधल्या जैन मंदिरावर ह्याचे एक उत्कृष्ट स्पष्ट शिल्प आहे. या शिल्पामध्ये प्रियकराचे तिला पत्र आले असून तो येणार असल्याची वार्ता कळल्यामुळे एका हातामध्ये पत्र आणि दुसरा हात तिने छातीवर ठेवला असून चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद स्पष्टपणे दिसतो.

विप्रलब्धा-

  यस्या दूर्ती प्रियः दत्वा संकेतमेव वा ।
 नागतः कारणेनेह विप्रलब्धा तु सा भवेत् ।।
(नाट्य शास्त्र २४ पा. २१७)
    ही नायिका संकेत स्थळाला आधी पोचते परंतु तिथे तिचा प्रियकर मात्र पोचलेला नसतो. ती त्याची वाट पाहत असते. या नायिकेच्या अनेक छटा आपल्याला शिल्पांमध्ये दिसतात. गतभेटीच्या स्मृतीत हरखून जाऊन मंद स्मित करीत असताना ती दिसते तर कुठे दूतीने पत्र दिले असेल का? या विचाराने शंकित असणारी, तर एका ठिकाणी वाट पाहून कंटाळा आल्यामुळे हाताने आळस देत चिडलेली अशीही दिसते. (पानगाव, जि. लातूर) येथील विठ्ठल मंदिरात (११ वे शतक) चिडलेल्या नायिकेचे उत्कृष्ट शिल्प आहे. जगत (राजस्थान) येथील देवी मंदिरातील (१० वे शतक) एका शिल्पात ती आपल्या सखी बरोबर संकेत स्थळाला पोचलेली दाखवलेली असून तिने प्रियकरासाठी एक मोठे फूल आणलेले असते. तो न आल्यामुळे चिडून जाऊन ती फुलाच्या पाकळ्या खुडताना दाखविले आहे.

चित्र क्र. १५६ : विप्रलब्धा, राजारानी मंदिर, ओडिशा

खंडिता-
     व्यासङ्‌ङ्गादुचिते यस्या वासके नागतः प्रियः ।
      तदनागमदुःखार्ता खण्डिता सा प्रकीर्तिता ।।
       (नाट्य शास्त्र २४ पा. २१६)

चित्र क्र. १५७ : खंडिता, रानी की वाव, पाटण
       प्रियकराची आपल्याच घरी किंवा अन्यत्र कुठेही वाट पाहून ती आल्यामुळे निराश झालेली नायिका. खंडित नायिकेचे बारा प्रकार सांगितले आहेत. त्यातला सर्वात दुःखदायक प्रकार म्हणजे तिच्याऐवजी अन्य दुसऱ्या स्त्रीकडे नायक गेल्यामुळे तिचा विश्वासघात झाल्यामुळे दु:खी झालेली नायिका. शिल्पांमध्ये याचे अनेक प्रकार कल्पकतेने कोरलेले दिसतात. नायकाची वाट पाहाणार्या नायिकेला त्याचे पत्र येते. ज्यात त्याने लिहिले असते की तो आज येऊ शकत नाही. एका हातात पत्र आणि दुसऱ्या हाताच्या तर्जनीने ती डोळ्याच्या कडा पुसताना दाखवलेली दिसते. पत्रामध्ये असे लिहिले असेल की तो कधीही येणार नाही तर ती दोन किंवा अधिक बोटांनी डोळे पुसताना दाखलेली असते. हाताची सर्व बोटे वापरून अश्रू पुसताना दाखविलेल्या शिल्पांत तिचा चेहरा झाकला जाईल म्हणून असे दाखवले जाते. खजुराहोमधील मंदिरात हे दोन्ही प्रकार दिसतात. रानी की वाव, पाटण (११ वे शतक, गुजरात) मध्ये हिच्या उचललेल्या डाव्या हातामध्ये प्रियकराचे पत्र असून त्यातील मजकूर केवळ तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला समजू शकतो. मूर्तिमंत कारुण्य तिथे प्रकटले आहे. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू टपटप पडत असल्याचा भास होतो.

    कलहांतरिता-

     नायकाशी भांडण झाल्यामुळे त्याच्यापासून दुरावलेली असलेली नाविका. शिल्पांमध्ये हा प्रकार थोडा अल्पसा दिसतो. परंतु याचे सर्वात उत्कृष्ट शिल्पांकन वेरुळ मधील कैलास लेण्यातील रावणानुग्रह शिल्पात दिसते. भांडण झाल्यामुळे शिव आणि पार्वती एकमेकांपासून लांब बसले होते. परंतु रावणाने कैलास हालवल्यामुळे त्याही स्थितीत तिने शंकराकडेच आधारासाठी झेप घेतली. या शिल्पात तिने त्याचा दंड धरलेला असून भीतीने त्याला बिलगलेली दिसते. या शिल्पातील पार्वतीची भूमिका कलहातरिता नायिकेच्या सारखी भासते.
चित्र क्र. १५८ : कलहांतरिता, कैलास मंदिर, वेरूळ

   प्रोषितभर्तृका :-

  अनेक दिवस अनेक वर्ष दूर देशी गेलेल्या नायकाचे अचानक आगमन झाल्यामुळे होणाऱ्या आनंदाने मुर्च्छा यावी अशी उत्कंठा आणि हुर्हुर यांचे वर्णन प्राचीन साहित्यात नेहमी दिसते.
         वेरुळमधील दशावतार लेणी (क्र.१५) मध्ये असणाऱ्या रंगमंडपावरील हे शिल्प थोडे जीर्ण झाले असले तरी, त्यातील उत्कटता मात्र लक्ष वेधून घेते. नायकाच्या अंगावर तिने धाव घेतली आणि त्याच्या आलिंगनातच तिला मूर्च्छा आल्यामुळे ती खाली कोसळत आहे आणि नायक अत्यंत धीराने तिला हळुवारपणे सावरून घेतो आहे असे हे प्रोषितभ्रर्तृकेचे एक दुर्मिळ शिल्प आहे.
     अभिसारिका - हित्वा लज्जान्तु या श्लिष्टा मदेन मदेनन च अभिसारयते कान्तं सा भवेद्भिसारिका ।।
(नाट्य शास्त्र २४, पा. २१९)
   मदनावेगाने वश होऊन लोकलज्जा आणि भय असूनही संकेतस्थानाकडे नायकाच्या आकर्षणाने निघालेली नायिका.

चित्र क्र. १५९ : प्रोषितभर्तृका, दशावतार लेणे, वेरूळ

   हिचे सहा प्रकार सांगितलेले आहेत. ज्योत्स्नाभिसारिका, तमोभिसारिका (रात्र अभिसारिका), दिवाभिसारिका, गर्वाभिसारिका, कामाभिसारिका आणि प्रेमवाक्याभिसारिका. शिल्पांकनामध्ये मागे वळून तळपायातला काटा काढताना ही दिसते. जवळजवळ सर्व मंदिरांमध्ये हे शिल्प दिसते. यातल्या काही छटा अत्यंत मनोहारी आहेत. रात्रअभिसारिका आहे दाखविण्यासाठी तारंगा (गुजरात ) येथील जैन मंदिरात भुजंग त्रासित अभिसारिकेचे शिल्पांकन दिसते. अंधारात निघालेली असताना सापाची सळसळ ऐकू येते. क्षणभर थांबून डावा पाय उचलून त्यावेळी वस्त्र ती एका हाताने घट्ट धरीत असून सळसळ जेथून ऐकू आली त्या दिशेला भयभीत होऊन पाहतानाचे हे शिल्प आहे. प्रियकराला भेटायला निघालेल्या अभिसारिकेची अनेकविध रूपे वेरुळ मध्येही दिसतात. दिवसाढवळ्या बाहेर पडलेली ती दिवाभिसारिका आहे. त्यामुळे लोकलज्जेचे भय अधिक, परंतु अचानक वाटेतील एकांतस्थळी त्याने तिला गाठले आणि पटकन चुंबन घेऊन तो चालता झाला, तर रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडायची रक्त चोरी, परंतु संकेतस्थळाला पोहोचल्यानंतर अत्यंत निर्धास्तपणे गाढालिंगन देणारी रात्राभिसारिका. या दोघींचेही शिल्पांकन वाखाणण्याजोगे आहे. वेरुळमध्ये कैलासमंदिराच्या प्रदक्षिणापथावर ही दोन आलिंगन शिल्पे दिसतात. त्यातील पहिल्या शिल्पात ती दिवाभिसारिका आणि दुसऱ्या शिल्पात राजाभिसारिका दाखवली आहे. या प्रकारांमध्ये घरातून बहाणा करून बाहेर पडलेल्या देवळात जायच्या निमित्ताने किंवा नदीवरून पाणी आणायच्या निमित्ताने निघालेल्या अभिसारिकांना गुप्ताभिसारिकाही म्हणतात, म्हणजे दाखवायचे निमित्त एक पण अंतस्थ हेतू मात्र दुसराच.

चित्र क्र. १६०: अभिसारिका, खजुराहो

 चित्र क्र. १६१: दिवभिसारिका, कैलास मंदिर, वेरूळ

चित्र क्र. १६२ : रात्राभिसारिका, कैलास मंदिर, वेरूळ

   वक्रोक्तगर्विता -

     वक्रोक्तगर्विता नायिकेचे प्रेमगर्विता, सौभाग्यगर्विता, नैपुण्यगर्विता, सौंदर्यगर्विता असे चार रकार सांगितले आहेत.या नायिकेचे  स्मितगर्विता, यौवनमर्विवा मौकुमार्यागर्विता आणि विलासगर्विता हे हि प्रकार सांगितले आहेत. परंतु शिल्पकलेमध्ये याचे नेमकेपण ओळखणे थोडे अवघड जाते. सौदर्यगर्विता यामध्ये शुकभासिका आणि  कर्पूरमंजिरी या सुरसुंदरीचा समावेश होउ शकतो, कारण आपल्या सौंदर्याच्या बळावर त्या प्राण्यांना वश करताना दिसतात.

नैपुण्यगर्विता-

   वक्रोक्तगर्वितांपैकी नैपुण्यगर्विता नायिकेचे शिल्पांकन अनेक ठिकाणी आढळते. काही असामान्य गुणांची प्राप्ती झाल्यामुळे त्याचा अहंकार आलेला असतो. पानगाव (जि. लातूर) येथील विठ्ठल मंदिरात (११ वे शतक) सर्पाशी खेळणाऱ्या युवतीचे शिल्प आहे. केवळ रूपाचाच नाही तर कर्तृत्वाचा सुद्धा अहंकार येऊ शकतो हे दाखवणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प इथे दिसते. या सुंदरीने तिच्या उजव्या हातामध्ये एका नागाला अलगद पकडलेले आहे, तिचा डावा हात डोक्यावर धरलेला असून त्यावर एका मुंगसाला तिने ठेवले आहे. मुंगुस आणि साप हे परस्परांचे जन्मजात शत्रू. त्या दोघांनाही तिने एकाच वेळेस लीलया ताब्यात ठेवले आहे.

चित्र क्र. १६३ : नैपुण्यगर्विता, केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

या शिल्पाची सुधारित आवृत्ती आपल्याला धर्मापुरी (जि. बीड) येथील केदारेश्वर मंदिरातील (११वे शतक) शिल्पांमध्ये दिसतात. त्यातील एका शिल्पामध्ये त्या मुंगुसाने तिच्या हातावरून उडी मारली आणि आता आपण थेट त्या भुजंगाच्या तोंडात जाणार हे लक्षात आल्यावर त्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. त्याच्या पायाच्या हालचालीने त्या युवतीचे उडलेले केस कलाकाराने दाखवले आहेत. धारासुर (जि. परभणी) येथील मंदिरात (११वे शतक) एका हातात विंचू आणि एका हातात कासव धरलेल्या नैपुण्यगर्वितेचे अनाकलनीय शिल्प आढळते. या दोन प्राण्यांवरती नियंत्रण मिळविण्याचा तिचा हेतू स्पष्ट होत नाही.

चित्र क्र. १६४: मुग्धा नायिका, खजुराहो

मुग्धा-

      स्वाधीनपतिका नायिकेतील एका प्रकारची ही नायिका, खरे पाहता ती एक उपनायिका असते. परंतु मंदिरामध्ये या प्रकारचे विपुल शिल्पांकन पाहायला मिळते. ही नायिका नायकाची पत्नीच (स्वीया) असते. शयनगृहात त्याची वाट पाहत असताना त्याला विलंब लागतो आहे हे लक्षात आल्यावर ती वस्त्रे बदलावयाला सुरुवात करते आणि अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता धाडकन तो प्रवेशतो. यातून तिची होणारी तारांबळ दाखवणारे हे शिल्पांकन असते. या मुग्धेचेही काही प्रकार असून त्यात अज्ञात यौवना, ज्ञात यौवना, ज्यात प्रौढा आणि प्रगल्भा असे दोन प्रकार असतात. त्याचप्रमाणे शिल्पांकनामध्ये अर्थावृत आणि अनावृत असे दोन प्रकारही दिसतात. अज्ञात यौवना म्हणजे नववधू, खजुराहो मधील शिल्पात तिचे कमरेवरील शरीर उघडे असून तिने लाजून झटकन वळून हाताने तोंड झाकलेले दिसते. त्या धांदलीमध्ये आपले शरीर उघडे पडले आहे याचेही तिला भान राहत नाही. काव्यात याचे असे वर्णन येते की, तोंडावर हात ठेवून तर ती वळते परंतु पुढे समईची मोठी ज्योत तेवत असते, तोंड झाकले तरी नायक आपल्याला न्याहाळत असेल या कल्पनेने ती दुसरा हात समईवर मारून ज्योत विझवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू तिला हात कशाने भाजला असे विचारते. रंगमंचावर "केहो कारण हात जलाई?" या काव्यावर आधारित नृत्य रचनेतून मुग्धेचे दर्शन नृत्यातून आजही होते. परंतु हीच नवयौवना नववधू काही दिवसांनी ज्ञातयौवना होते. बाहेर उगाच मित्रांच्या गराड्यात अडकलेल्या नवऱ्याचे आत लक्ष वेधण्यासाठी केवळ त्यालाच दिसेल अशा पद्धतीने अंगावरचा पदर ढळू देते. तो सावरण्याचा कुठलाही प्रयत्न न करता लाजल्यासारखे दाखविण्यासाठी हाताने तोंड झाकते आणि तर्जनी आणि अन्य बोटे यांच्यात किंचित अंतर करून त्या फटीतून तो नक्की आतच येत असल्याची खात्री वेगवेगळ्या छटा दाखवणारी अनेक शिल्पे आहेत. औंढ्या नागनाथ येथील मंदिरात तर मुग्धा पूर्ण विवस्त्र असून अर्धवट वळून तिने असाहाय्यपणे दोन्ही हात डोक्यावर धरलेले दिसतात.

चित्र क्र. १६५ : मुग्धा नायिका, खजुराहो
    रानी की बाव,(पाटण, गुजरात) मध्ये तर तिची उडालेली तारांबळ ही कल्पनातीत दाखवलेली आहे. पूर्ण विवस्त्र अवस्थेत असताना तो अचानक समोरूनच आल्यामुळे तिने एका हाताने आपले तोंड झाकले असून दुसरा हात तिने कमरेपाशी धरून तिची अगतिकता व्यक्त केली आहे. जीवनातल्या ह्या अत्यंत तरल परंतु पूर्णपणे खाजगी अशा क्षणाचे शिल्पांकनही करून दाखविणारे शिल्पी हे जगावेगळेच म्हणावयास पाहिजेत.
    मुग्धा नायिकेचे शिल्पांकन हे अतिशय कठीण असते. जीवनातला तो प्रसंग चित्रपटामध्ये 'सुहाग रात' म्हणून अतिशय तरलतेने दाखविला जातो. त्याचे शिल्पांकन करणे म्हणजे खरोखरच एक दिव्य आहे. खजुराहोमध्ये नायिका लाजेने पटकन वळली आहे आणि तिचे वस्त्र ढळले आहे असे अज्ञातयौवना नायिकेचे शिल्प आढळते, तर लटकेच लाजल्याचे नाटक करून हाताने चेहरा तर झाकल्यासारखा करते, परंतु दोन बोटांच्या फटीतून आता तरी नायक नक्की शयनगृहात येतो आहे ना याची खात्री करणारी ज्ञातयौवना किंवा प्रगल्भा मुग्धा नायिकेचे शिल्पही दिसते.

चित्र क्र. १६६ : मुग्धा नायिका, रानी की वाव, पाटण

चित्र क्र. १६७: सुरसुंदरी, दर्पणा, खजुराहो

       आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेल्या गोष्टींचे अत्यंत सूचकतेने दर्शन घडविण्यासाठी सुरसुंदरींच्या शिल्पांची रचना केलेली दिसते. गीतेच्या १३ व्या अध्यायामध्ये (ग्लोक ४ आणि ५) भगवंताने मानवी शरीराला क्षेत्र असे म्हटले आहे. हे मूलतःच विकार युक्त असते. त्यामुळे यातील एक अर्थ असाही निघतो की ज्ञानेंद्रियेही विकारात्मक होऊ शकतात. कारण ती जशी ज्ञानाची प्रवेशद्वारे असतात तशी ती विकारांचीही होऊ शकतात. त्यामध्ये गुणांचे वर्णन करताना एक सावधगिरीचा इशारापण दिला आहे. त्याच्यावर ज्ञानदेवांनी स्पष्ट निरूपण केले आहे. (ज्ञा.१३ ओवी क्र. ११७ ते १२४) शरीराची पाच ज्ञानेंद्रिये ही जशी ज्ञानाची प्रवेशद्वारे असतात तशीच ती विकारांचीही प्रवेशद्वारे ठरू शकतात. शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ही माध्यमे विकारांनाही कारणीभूत ठरू शकतात. या विकारांपासून सावध राहण्याचा इशारा देणाऱ्या काही स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी असे संबोधतात, आरशात स्वतःचे रूप पाहणाऱ्या, अत्तराची कुपी उघडून वासाने धुंद होणाऱ्या, अतिरेकी मद्यपान करून विंगणाऱ्या किंवा प्रियकराला चोरून पत्र लिहिणाऱ्या स्त्रियांची शिल्पेही रूपविकार, गंधविकार, अविकार, शब्दविकार आणि स्पर्शविकार दर्शवितात. परंतु ही ज्ञानेंद्रिये कामविकाराने ग्रासली गेल्यास ज्ञानांऐवजी विकारांचेच दर्शन घडवतात (भगवद्‌गीता: अ.१३, श्लोक ५-६), (शानेश्वरी अ. १३. ओबी क्र. ११७-१२४).
      या विकारांवर विजय मिळविण्यासाठी मनाचे संयमन करणे आवश्यक असते. व्यवहारामध्ये हे कितीही खरे असले तरीही कोणालाही सांगायला गेल्यास त्याला ते रुचत नाही. सरळ सांगितले (स्पष्टोक्ती) तर त्याला राग येतो. उपहासाने सांगितले (वक्रोक्ती) तर अपमान वाटून तो दुखावला जातो. परंतु जर सूचकतेने सांगितले (अन्योक्ती) तर ते समजून ग्रहण करण्याची शक्यता पण असते. गीतेतील या प्रबोधनाचे शिल्पांकन कलाकारांनी काही सुरसुंदरींच्या शिल्पांद्वारे केलेले आहे. इतक्या रूक्ष विषयाचे इतके मनोहारी शिल्पांकन प्रशंसनीय तर आहेच, परंतु पिढ्यापिढ्यांमध्ये यातील अनेक छटा प्रकट करणारी आणि त्यातील विविधता दर्शवणारी कलाकारांची वैचारिक प्रगल्भता थक्क करणारी आहे.

चित्र क्र. १६८ : सुरसुंदरी, दर्पणा, खजुराहो

रूपविकार-

    हातात आरसा घेऊन त्यामध्ये आपले रूप असते की त्यात दुसऱ्या कोणाच्या रूपावर भाळायची न्याहाळणारी नवयौवना ही जवळजवळ सगळ्या मंदिरांमध्ये दिसते. ती आपलेच रूप न्याहाळताना इतकी गढून गेलेली शक्यताही नसते. या सुरसुंदरीला 'दर्पणा' असे म्हणतात. काही शिल्पांमध्ये ती आपले असे (चोरून) रूप न्याहाळत असताना दुसरे कोणी आपल्याला पाहत नाही ना? याचाही ती एका डोळ्यानी वेध घेताना दिसते. इतकेच नाही तर काही दर्पणांच्या शिल्पात तिच्या हातात अर्धगोल आरसा धरलेला असतो. या आरशातील वरच्या गोलार्धात तिला आपले रूप दिसत असते. तर निम्न गोलार्धात ती आपलेच यौवन न्याहाळत असते.
   सौंदर्य केवळ रूपाचेच नसते, तर यौवनाचेही असते. एवढेच नाही तर त्याचा रूपाप्रमाणेचेच त्याचाही अहंकार असतो. एका हातामध्ये पिकलेले आंबे आणि तिच्या दुसऱ्या हातावर एक पोपट दाखवलेला असतो हिला 'शुकसारिका' असे म्हणतात. शिल्पामधील ही सुंदरी तिच्या एका हातातल्या पोपटाला ती तिच्या दुसऱ्या हातात धरलेल्या आंब्यांबरोबर तिच्या यौवनाचेही प्रलोभन देते.
   कर्पूरमंजरी या नावाने ओळखली जाणारी सुरसुंदरी नुकतेच स्नान करून आपले लांब सडक केस पिळताना दिसते. हिच्या शेजारी एक किंवा दोन पक्षीही दिसतात. ह्यामध्ये दोन कल्पना आहेत. तिचे घनदाट काळे केस त्या चातक पक्षाला ढगासारखे भासतात आणि त्यातून पडणारे पाणी पावसाचे थेंब समजून तो चोच वर करून पिताना दिसतो. अन्य शिल्पात तिच्या खाली हंस असतो. हा पक्षी मोती खातो असा समज आहे. तिच्या अंगावरून पडणारे थेंब सकाळच्या सूर्याच्या किरणांमध्ये मोत्यासारखा चमकताना दिसतात. त्यांना मोती समजून ते खायचा प्रयत्न तो हंस करतो आहे असे दिसते. टपटप पडणारे पाण्याचे थेंब हे स्थिर शिल्पामध्ये कोरण्याची अफाट किमया या कलाकारांनी केलेली आहे. खजुराहो येथील लक्ष्मण मंदिरावर असलेल्या कर्पूरमंजिरीच्या शिल्पात तिच्या खाली दोन्ही पक्षी एकत्रित दाखवलेले आहेत. एकाच वेळेस दोन पक्ष्यांना आपल्या सौंदर्यान मोहित केल्याचा अहंकार तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. रूपाचा हा विकारच असा आहे की तो मनुष्याला आत्मकेंद्रित आणि संकुचित करून टाकतो. त्यामुळे क्षणभंगुर अस्तित्वाच्या देह सौंदर्याच्या मर्यादा ओळखून सावध राहिले पाहिजे असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न असतो.

चित्र क्र. १६९ : कर्पूरमंजिरी, खजुराहो

रसविकार-

    हे शिल्प तसे थोडे दुर्मिळच म्हणावे लागेल.मनुष्यमात्राला रोज भोजन घेता यावे आणि ते रुचकरही असावे यासाठी तोंड आणि जिव्हा ही इंद्रिये दिली आहेत. परंतु भोजना- बरोबरच किंवा त्या आधी 'रसपान' ही करण्याची काहींना आवश्यकता भासते. या विकारापासून सावध करण्यासाठी या सुंदरीचे शिल्प कोरलेले असते. खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरावर (१० वे शतक) आणि खंडारिया महादेव मंदिरावर (११वे शतक) मद्यपान करून झिंगणाऱ्या युगलाचे शिल्प आहे. त्यांच्या पायाशी तीन रिकामे कुंभ पडले असून हातात घरलेल्या रिकाम्या कुंभातील शेवटचा थेंब घेण्यासाठी ते दोघे धडपडताना दिसतात, मद्याचा अंमल चढला असल्यामुळे त्यांचे डोळे जवळजवळ मिटलेले असून गाल सुजलेले दिसतात. देवळाच्या बाहेरील भिंतीवर हे शिल्प मुद्दाम लावलेले आहे. भक्तांसाठी इशारा असा आहे की जर यावर विजय मिळवता येत नसेल तर मंदिरात आत जाण्याची आवश्यकता नाही. अशा भक्तांना परमेश्वराचे दर्शन कदापि होणे शक्य नाही.

चित्र क्र. १७०: रसविकार, खजुराहो

गंधविकार -

    श्वसनक्रिया ही स्वाभाविक आणि नैसर्गिक  आवश्यकता असते. शरीराला प्राणवायूची आवश्यकता असले त्यातून रक्तशुद्धी होत असते. परंतु याचबरोबर नाकाचा उपयोग घ्राणेंद्रिय म्हणूनही होऊ शकतो. एक अमुकच वास आवडतो इतपत समजता येणे शक्य आहे. परंतु तो सदैव उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा अर्क असलेले द्रव्य आपल्या जवळील कुर्यात बाळगावयाचे आणि अहोरात्र त्याचा सुवास घ्यायचा हो विकारच ठरतो. खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिरावर असलेल्या सुरसुंदरीच्या डाव्या हातात अत्तराची कुपी धरली असून उजव्या हाताने तिने त्याचे टोपण काढलेले असून ती डोळे मिटून मोठ्ठा श्वास घेऊन त्याच्या सुवासाचा आनंद घेताना दिसते.

चित्र क्र. १७१: गंधविकार, खजुराहो

    शब्दविकार आद्याक्षरे शिकून त्याचे लेखन वाचन करता आले म्हणजे साक्षर झाले असे मानले जाते. याद्वारे कधी कधी परमेश्वराचे नामस्मरण किंवा ज्ञानमूलक लेखन करता यावे अशीही अपेक्षा असते. परंतु लिहितावाचता यायला लागल्यावर सगळे चांगलेच लिहिले जाईल अशी प्रेरणा बुद्धीला होणे कठीण असते. पत्रलेखिका या नावाची सुरसुंदरी या विकाराचे दर्शन घडविण्याकरता शिल्पात दिसते. खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरात लेखणी घेऊन कुणाला दिसू नये म्हणून एका बाजूला वळून, लपून हातातील कागदावर काहीतरी लिहिताना ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न हास्य दिसते, कारण ती प्रेमपत्र लिहीत असते. खिद्रापूर आणि धर्मापुरी या ठिकाणच्या सुरसुंदरी वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहावे तशा एका मोठ्या कागदावर डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात अत्यंत नाजूकपणे लेखणी धरून पाठमोऱ्या पत्र लिहिताना दिसतात. कलाकाराने त्या कागदावर पाच सहा ओळींचा मजकूरही लिहून टाकला आहे.

स्पर्शविकार-

      स्पर्शविकार हा मानवी मर्यादांची स्पष्टपणे जाणीव करणारा विकार आहे. महंत, ऋषी, मुनी इतकेच काय इंद्रादी देवही त्यापासून बाचू शकले नाहीत. हा त्वचा या इंद्रियाचा विकार आहे
चित्र क्र. १७२ : शब्दविकार खजुराहो

गंधविकार -
      श्वसनक्रिया ही स्वाभाविक आणि नैसर्गिक आवश्यकता असते. शरीराला प्राणवायूची आवश्यकता असले त्यातून रक्तशुद्धी होत असते. परंतु याचबरोबर नाकाचा उपयोग घ्राणेंद्रिय म्हणूनही होऊ शकतो. एक अमुकच वास आवडतो इतपत समजता येणे शक्य आहे. परंतु तो सदैव उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा अर्क असलेले द्रव्य आपल्या जवळील कुर्यात बाळगावयाचे आणि अहोरात्र त्याचा सुवास घ्यायचा हो विकारच ठरतो. खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिरावर असलेल्या सुरसुंदरीच्या डाव्या हातात अत्तराची कुपी धरली असून उजव्या हाताने तिने त्याचे टोपण काढलेले असून ती डोळे मिटून मोठ्ठा श्वास घेऊन त्याच्या सुवासाचा आनंद घेताना दिसते.

चित्र क्र. १७१: गंधविकार, खजुराहो

       शब्दविकार आद्याक्षरे शिकून त्याचे लेखन वाचन करता आले म्हणजे साक्षर झाले असे मानले जाते. याद्वारे कधी कधी परमेश्वराचे नामस्मरण किंवा ज्ञानमूलक लेखन करता यावे अशीही अपेक्षा असते. परंतु लिहितावाचता यायला लागल्यावर सगळे चांगलेच लिहिले जाईल अशी प्रेरणा बुद्धीला होणे कठीण असते. पत्रलेखिका या नावाची सुरसुंदरी या विकाराचे दर्शन घडविण्याकरता शिल्पात दिसते. खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरात लेखणी घेऊन कुणाला दिसू नये म्हणून एका बाजूला वळून, लपून हातातील कागदावर काहीतरी लिहिताना ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न हास्य दिसते, कारण ती प्रेमपत्र लिहीत असते. खिद्रापूर आणि धर्मापुरी या ठिकाणच्या सुरसुंदरी वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहावे तशा एका मोठ्या कागदावर डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात अत्यंत नाजूकपणे लेखणी धरून पाठमोऱ्या पत्र लिहिताना दिसतात. कलाकाराने त्या कागदावर पाच सहा ओळींचा मजकूरही लिहून टाकला आहे.
 स्पर्शविकार- स्पर्शविकार हा मानवी मर्यादांची स्पष्टपणे जाणीव करणारा विकार आहे. महंत, ऋषी, मुनी इतकेच काय इंद्रादी देवही त्यापासून बाचू शकले नाहीत. हा त्वचा या इंद्रियाचा विकार आहे १७८ / प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे

चित्र क्र. १७२ : शब्दविकार खजुराहो

चित्र क्र. १७३ : स्पर्शविकार, विंचू आणि स्त्री, खजुराहो

   आणि मानवी देहाचे हे सर्वात मोठे इंद्रिय आहे. हा विकार क्षणात उत्पन्न होऊ शकतो. कामदेवाला दिलेल्या शापाप्रमाणे तो वायुरूपाने तर संचार करतोच, परंतु कुठेही आणि कधीही जाऊन तो त्याचा परिणाम साधू शकतो. याचे शिल्पांकन करताना कलाकाराने वापरलेल्या कल्पकतेतून जगातील असामान्य आणि अद्भुत अशा कलाकृती निर्माण केल्या गेल्या. यातील सर्वात ठळकपणे दिसणाऱ्या सुरसुंदरीचे शिल्प म्हणजे दर्शकाकडे तोंड करून मांडीवर विंचू कोरलेली तरुणी. अंगावर विंचू चढत असल्यामुळे त्याला हाताने झटकून टाकण्याऐवजी दोन्ही हातांनी कमरेजवळील निऱ्या सैल करून अंगावरील वस्त्रच झटकून टाकताना ती दिसते. हा अंगावर चढणारा विंचू काल्पनिक असतो. अनेक ठिकाणी त्याला गोमेसारखे असंख्य पाय काढलेले असतात. त्याच्या पुढील नांग्या खेकड्याप्रमाणे आणि त्याचे शेपूट त्याच्या टोकावरील असणाऱ्या विषकुपी सहित कोरलेले असते. हा विंचू म्हणजे एकनाथ महाराजांच्या 'विंचू चावला, विंचू चावला' या भारुडामधील विंचू आहे. तो कामविकाराचा विंचू आहे. त्याने एकदा डंख मारला की त्याचे विष सर्वांगात भिनते आणि अंगांगाची लाही लाही होते. अंगावरची वस्त्रेही नकोशी होतात. शिल्पामधील सुरसुंदरी अशीच बेभान होऊन अत्यंत निर्लज्जपणे निर्वस्त्र व्हायला जराही संकोच करताना दिसत नाही. अशा सुरसुंदरीचे शिल्प पानगाव, पाटण , खजुराहो, खिद्रापूर यांसह अनेक देवळांमध्ये दिसते.
   या शिल्पांकनाचे एक कल्पक, मनोहारी परंतु थोडेसे उत्तान शिल्पांकनही बघावयास मिळते. आलसकन्यांसारखे हे शिल्प असते. उन्मादाच्या आवेगात तिच्या प्रियकारानी तिच्या पाठीवर नखाचे ओरखडे काढले तरी तिच्या ती लक्षात आले नाही. कालांतराने वेदना कशाची म्हणून ती आपल्या उजव्या हातांच्या बोटांनी पाठ चाचपडताना दिसते. खजुराहोमधील या शिल्पात तिच्या उघड्या पाठीवरील उमटलेले नखांचे ओरखडेही स्पष्टपणे दिसतात. याला नखःछेद असेही म्हणतात. या विकारांचे अधिक सूक्ष्म दर्शनही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते.

चित्र क्र. १७४: स्पर्शविकार, खजुराहो

 

 

 

 

 आहे.








































































































































































































१८. सुरसुंदरी (भाग १)

 

 

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्रातील विवीध देवी मंदीरे आणि त्यांच्या कथा

 https://realtourist.blogspot.com/2020/03/#.ZFpgU9dBw2w
 
 महाराष्ट्रातील विवीध देवी मंदीरे आणि त्यांच्या कथा
सरस्वती शारदादेवीची मंदिरे

तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता या देवींची मंदिरं आपल्याला माहीत असतात.


तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता या देवींची मंदिरं आपल्याला माहीत असतात. पण याबरोबर आपल्या देशात काही ठिकाणी सरस्वतीची मंदिरेही होती, आहेत. त्यांचा आढावा

सरस्वतीचा स्वतंत्र असा संप्रदाय नाही आणि ही देवी कुणाचीही कुलदैवत वा परंपरागत आराध्य दैवत असल्याचे ऐकिवात नाही. अश्विनी नवरात्र, कार्तिक शुक्ल पंचमी (ज्ञानपंचमी) व माघ शुक्ल पंचमी (वसंत पंचमी) असे वर्षांतील काही निवडक दिवस सरस्वतीच्या वाटणीला आलेले आहेत. या तिथीला तिची पूजा करतात. त्या निमित्ताने पाटीपूजन, पुस्तकांची पूजा होते आणि मुलांना शाळेत घालण्याचा समारंभही पार पडतो; पण वर्षांतील या तिथी सोडता, देवीची नित्य पूजा इतर देवांप्रमाणे फारशी प्रचलित नाही. त्यामुळे साहजिकच सरस्वतीला धार्मिक वा लौकिकदृष्टय़ा फारशी लोकप्रियता लाभली नाही. परिणामत: तिची प्रतिष्ठापना मंदिरात मर्यादित स्वरूपात झाली आणि सरस्वती ही मुख्य वा प्रधान देवता असलेली फार थोडी स्वतंत्र मंदिरे बांधली गेली. त्यांपैकी आजमितीस हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीसुद्धा मंदिरे अवशिष्ट नाहीत. अलीकडे विसाव्या शतकात काही सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे बांधण्यात आली आहेत.


आज अवशिष्ट असलेल्या मंदिरांत आद्य शंकराचार्य (इ. स. ७८८-८२०) यांनी स्थापन केलेल्या सरस्वतीच्या – शारदेच्या शृंगेरी येथील मंदिराविषयी एक आख्यायिका आहे. शारदा पूर्वजन्मी ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती होती. तिला दुर्वास ऋ षींच्या शापामुळे भूलोकी जन्म घ्यावा लागला. तिचा विवाह मंडनमिश्र या विद्वान पंडिताशी झाला. शंकराचा अवतार शंकराचार्य यांचे दर्शन झाल्यामुळे ती शापमुक्त झाली आणि निजधामी जाण्यास निघाली. तेव्हा शंकराचार्यानी तिला विनंती केली की, तिने शृंगेरी इथे वास्तव्य करून भक्तजनांची सेवा घ्यावी. तिने ती विनंती मानली आणि शृंगेरीला जाऊन तुंगा नदीत जलसमाधी घेतली. तिचा आत्मा सत्यलोकी गेला आणि पार्थिव देह तिथेच शिलारूपात राहिला. शंकराचार्यानी त्या शिळेवर चक्र कोरले आणि शारदेची चंदनमूर्ती बनवून तिची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. तिला शारदांबा म्हणतात. ती शृंगेरीच्या शारदा मठाची उपास्य देवता आहे. पुढे विद्यारण्यांनी शारदा मंदिर बांधले. त्या वेळी त्यांनी शारदेच्या काष्ठमूर्तीच्या जागी पंचलोह विग्रह धातूची मूर्ती प्रतिष्ठित केली. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह, सभामंडप (महामंडप) आणि प्राकार  आहे. हे मंदिर द्राविड वास्तुशैलीचा उत्तम नमुना असून त्याला तीन दरवाजे आहेत. थोडय़ा उंचीवर बांधलेला महामंडप भव्य असून त्याचे छत दोन स्तंभ रांगांवर आधारित आहे. त्या स्तंभांवर देव-देवतांच्या मूर्तीचे नक्षीकाम आहे. प्राकारातील  देवळांत गणपती आणि भुवनेश्वरी यांच्या सुबक मूर्ती आहेत. मंदिरात अनेक धार्मिक समारंभ संपन्न होतात. त्यांपैकी आश्विन महिन्यातील शारदोत्सव धूमधडाक्याने साजरा करण्यात येतो. मंदिरात अभिषेक, पूजाअर्चा आणि धूपदीपनैवेद्यादी धार्मिक विधी व उपचार नियमित चालू असतात.

22-lp-devi
कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हय़ात धारवाडच्या पूर्वेस सुमारे ६७ कि.मी.वर गदग हे व्यापारी शहर वसले आहे. या शहराचा प्राचीन कन्नड व संस्कृत साहित्यांतून तसेच काही शिलालेखांतून क्रतुक, क्रतुपूर, कर्डुगू, गलडुगू, गडुगू इत्यादी भिन्न नावांनी उल्लेख आढळतो. शहरात वीरनारायण, सोमेश्वर, त्रिकुटेश्वर आणि सरस्वती ही चार प्रमुख व प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी त्रिकुटेश्वर व सरस्वती ही दोन मंदिरे गदगच्या दक्षिण भागात एकाच प्रांगणात बांधलेली आहेत. सरस्वतीचे मंदिर त्रिकुटेश्वर मंदिरापेक्षा आकाराने लहान असून ते त्रिकुटेश्वराच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख बांधले आहे; तथापि आकाराने लहान असूनसुद्धा कलाकुसरीचा नाजूकपणा आणि अलंकरण यांमुळे ते उठून दिसते. मंदिराचे वास्तुविधान चतुरस्र असून उघडा मुखमंडप अणि गर्भगृह एवढाच मंदिराचा भाग अवशिष्ट आहे व शिखर पडले आहे. प्रांगणात सापडलेल्या पश्चिम चालुक्य राजा दुसरा आहवमल्लदेव  (कार, १०६८- १०७६) याच्या कोरीव लेखत सरस्वती मंदिराच्या देखभालीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे, त्यावरून हे मंदिर तत्पूर्वी केव्हा तरी चालुक्य राजांनी बहुधा आहवमल्लदेवाचे पिताजी सोमेश्वर आहवमल्ल यांनी बांधले असावे. मुखमंडपातील अठरा स्तंभांवर नाजूक अलंकरण असून चालुक्य शिल्पकलेचा आविष्कार त्यांतून दिसतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले दोन स्तंभ विशेष कलात्मक आहेत. स्तंभांवरील अलंकरणात लहान देवळ्या, छोटे स्तंभ, देवदेवतांच्या छोटय़ा प्रतिमा, त्यांचे सेवक, सिंह, शरभादी व्याल व इतर भौमितिक आकृतिबंध आहेत. हे शिल्पांकन उठावात असून यांतील देवदेवतांनी विविध प्रकारची आभूषणे घातली आहेत. मुखमंडपाचे आयताकार छत साधे असून त्याच्या मध्यभागी कमळकलिकात उत्फुल्ल कमळ कोरले आहे. सरस्वतीच्या अवशिष्ट प्राचीन मंदिरांत सुस्थितीत असलेले कदाचित हे एकमेव मंदिर असावे.

या मंदिराच्या गर्भगृहात उंच पीठावर मोरावर कमळात अर्धपर्याक आसनात विराजमान झालेली सरस्वतीची मानवी आकाराची (सु. पाच फूट चार इंच) पूर्णाकार मूर्ती आहे. या ठिकाणी देवी चतुर्भुज असून तिचे चारही हात कोपरापासून तुटलेले आहेत; परंतु तिची घडण अत्यंत नाजूक व सफाईदार आहे. तिने सुरेख तलम वस्त्र परिधान केले असून तिचे कुरळे केस करंड मुकुटातून बाहेर आलेले दिसतात. तिच्या अंगावर बाजुबंद, कुंडले आणि गळ्यात रत्नाहार व माळा आहेत. तिची मेखला नक्षीदार असून तीत रत्ने आहेत.


चोल वंशातील विक्रम चोल (कार. १११८-११३५) राजाच्या पदरी ओत्तकुठर नावाचा एक विद्वान कवी होता. तो सरस्वतीचा मोठा भक्त; त्याला आपली प्रतिभा व बुद्धी ही सरस्वतीची कृपा व देणगी आहे, असे मनोमन वाटे, तो ‘वरकवी’ (श्रेष्ठकवी) म्हणून दरबारात ख्यातनाम होता. त्याने राजाचा मुलगा दुसरा कुलोत्तुंग (कार. ११३३-११५०) आणि त्याचा मुलगा दुसरा राजराजा यांना शिकविले होते. अशा प्रकारे तीन पिढय़ांचा तो राजगुरू होता. सरस्वतीची निरंतर सेवा घडावी म्हणून त्याने अरसिलर नदीकाठी सरस्वतीचे मंदिर बांधण्याची इच्छा चोल राजाकडे केली. चोल राजाने त्याच्या विनंतीचा मान राखून सरस्वतीचे एक मंदिर तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम- करईक्कल रस्त्यावरील मथिलदुथुरई गावाजवळ कुथनूर या ठिकाणी अरसिलर नदीकाठी बांधले. कुथनूरला अम्बपुरी असेही म्हणतात. चोल राजांच्या बाराव्या शतकातील एका शिलालेखात ओत्तकुठरने मंदिर बांधल्याचा उल्लेख असून ओत्तकुठरला त्याच्या सेवेसाठी अग्रहार दिल्याची नोंद त्यात आहे. त्याच्या ‘तक्कयगपरणी’ या तमिळ भाषेतील काव्यात सरस्वतीचा उल्लेख त्याने पुढील शब्दांत ‘अयंगरई सोल किलयी’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला असून त्याचा भावार्थ ‘जी नदीकाठी वास करते’ असा आहे. यावरून कुथनूरच्या मंदिरासंबंधीच तो बोलत असावा हे निश्चित. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील इ. स. १४९२ च्या कोरीव लेखात कोणा पुरुषोत्तम नावाच्या सधन गृहस्थाने मंदिराची डागडुजी व जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

या मंदिराचे बांधकाम चोल वास्तुशैलीत इ. स. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असावे, हे नक्कीच!  या भव्य मंदिराचे गर्भगृह, अर्धमंडप, सभामंडप, वाहनमंडप, योगशाळा असे भाग असून सभोवती प्राकार  आहे. आणि मुख्य प्रवेशद्वारावर गोपूर बांधलेले आहे. गर्भगृहात सरस्वतीची अप्रतिम चतुर्भुज पाषाणमूर्ती असून देवी उत्फुल्ल कमलासनात बसलेली आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत (उजवा- डावा) अनुक्रमे अक्षमाला व देठासह कमळ आहे आणि खालच्या दोन हातांपैकी उजवा अभय मुद्रेत असून डाव्या हातात पोथी आहे. देवीचे वाहन हंस वा मयूर कोठेच दिसत नाही;  मात्र मुखाच्या मागे भिंतीवर कमळ खोदलेले आहे. आश्विन महिन्यातील विजयादशमीला ‘सरस्वती पूजा’ हा समारंभ मोठय़ा थाटाने केला जातो. त्या दिवशी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना मूळाक्षरांची दीक्षा मंदिरात दिली जाते. म्हणून ही सरस्वती या ठिकाणी ‘ज्ञान सरस्वती’ या नावाने पुजली जाते. या ठिकाणी भक्तांना स्वत: पूजा करण्याची मुभा असून देवीच्या पायापासून अर्धमंडपापर्यंत फुलांचा सडा त्या वेळी घातलेला दिसतो.


सरस्वतीचा उल्लेख नंतरच्या वेदोत्तर साहित्यातून अनेक वेळा ‘शारदा’ असा केलेला आढळतो. बाराव्या शतकातील कल्हण (बारावे शतक) या काश्मिरी ग्रंथकाराच्या मते शारदादेवीची पूजाअर्चा काश्मीरमध्ये नित्यनेमाने हेत होती. तिचे मंदिर श्रीनगरच्या आग्नेयेस तख्त- इ- सुलेमान पर्वतश्रेणीच्या समेटाजवळच्या उंच अशा एका आयताकार पठारावर बांधलेले होते. आणि त्याला ६४ पायऱ्या होत्या. त्या चौसष्ट कलांच्या द्योतक होत. ‘राजतरंगणी’त कल्हण हे मंदिर गोपादित्य राजाने बांधल्याचे सांगतो आणि शारदेच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त मधुमती व सरस्वती नदीचे दर्शन घेतात व ज्यांची कवींनी शब्दपूजा बांधली आहे, त्यांना वंदन करतात. काश्मीर हा प्रदेश प्राचीन काळापासून सरस्वतीच्या भक्तांचा प्रदेश असल्यामुळेच, या मंदिरास शारदापीठ किंवा शारदामंडळी असेही म्हणत. अल्-बीरुनी (इ. स. ९७३-१०४८) हा प्रवासी सिंधूच्या उत्तरेकडील खोऱ्यातील गिलगीट आणि लडाख या जम्मू- काश्मीर प्रदेशातील शारदेच्या अवशिष्ट मंदिराविषयीचा उल्लेख आपल्या वृत्तांतात (अल्- बीरुनीज इंडिया- सचाऊ) करतो. बिल्हण (अकरावे शतक) या काश्मिरी कवीने आपल्या ‘विक्रमांकदेवचरिता’त येथील शारदेविषयी लिहिले आहे. तो शारदेच्या हंस या वाहनाची तुलना मधुमतीच्या चकाकणाऱ्या सुवर्ण मुकुटाशी करतो. आद्य शंकराचार्यानी या शारदेचे दर्शन घेतले होते, अशी कथा आहे. विद्यमान मंदिरास शंकराचार्य मंदिर म्हणतात. त्या ठिकाणी आज शिवलिंग आहे, मात्र सरस्वती वा शारदेची मूर्ती आढळत नाही. किंवा तशा पुरातत्त्वीय खुणाही दिसत नाहीत. जोनराज या इतिहासकाराच्या मते मुसलमान नबाब झैन- उलू- अबिदिन (इ. स. १४२०-१४७०) याने एकदा शारदा मंदिराला भेट दिली होती आणि तेथील पावित्र्य नष्ट केले. सोळाव्या शतकातील अकबराच्या दरबारी असलेल्या अबुल – फज्ल (इ. स. १५५१-१६०२) या इतिहासकाराने ‘आईन – इ – अकबरी’ या त्याच्या ‘अकबरनामा’ ग्रंथाच्या तिसऱ्या भागात या ‘शारदा’ मंदिराचा उल्लेख केला आहे. त्यावरून हे मंदिर सोळाव्या शतकाअखेर अवशिष्ट वा अस्तित्वात असावे, हे निश्चित!


लंडन (इंग्लंड) मधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात धार (धारानगरी, मध्य प्रदेश) येथील परमार भोज (इ. स. १०००-१०५५) याने घडवून घेतलेली अभिलिखित वाग्देवी सरस्वतीची एक सुरेख मूर्ती आहे. भोज राजाने धारानगरीत अनेक मंदिरे बांधली. त्यांपैकी विद्यादेवी सरस्वतीचे मंदिर आणि भोजनशाळा (विद्यामंदिर)प्रसिद्ध होते. यातील सरस्वतीच्या मूर्तीच्या पादपीठावर पुढील मजकूर खोदला होता –

‘‘श्रीमद् भोज नरेन्दचन्द्रनगरी विद्याधरी..

वाग्देवी प्रतिमाम् विधाय जननी यस्या जितानाम् त्रयी..

फलाधिकाम् धरसरिन् मूर्ती सुभां निर्ममे इति शुभं..

सूमधार सहिर सुत मनथलेन घटितं विटिक शिवदेवेन लिखितं इति संवत १०९१’’

त्याचा थोडक्यात अर्थ असा – भोजाच्या धारानगरीत, कामना पूर्ण करणारी फलाधिकाम अशा वाग्देवीची पवित्र मूर्ती सहिर या प्रसिद्ध शिल्पीचा मुलगा मनथल याने घडविली असून त्या मूर्तीच्या पादपीठावरील लेख शिवदेव याने संवत १०९१ मध्ये कोरला आहे. म्हणजे ही मूर्ती इ. स. १०३५ मध्ये भोज राजाच्या कारकिर्दीत घडविली आहे. ही वाग्देवी चतुर्भुज असून पादपीठावर त्रिभंग आसनात ती उभी आहे. तिचे वरचे हात सुस्थितीत असून खालचे कोपरापासून तुटले आहेत. तिच्या करंडमुकुटाच्या दोन्ही बाजूंस आकाशगामी विद्याधारांच्या मूर्ती असून पायाजवळ एक सेवकाची मूर्ती आहे; तसेच एक कुंभधारी बटूची मूर्ती आहे. तिने मोजकेच अलंकार घातले असून तिच्या कानातील झुमक्याप्रमाणे लोंबणारी नाजूक कुंडले तिच्या भरगच्च अंबाडय़ाच्या पाश्र्वभूमीवर खुलून दिसतात. तिच्या गळ्यात कंठा, मोत्याचा हार दोन्ही स्तनांमधून खाली बेंबीवर आला आहे. तिचे अधोवस्त्र नक्षीदार तीन साखळ्यांच्या कमरपट्टय़ाने बांधले आहे. आणि कमरपट्टय़ाच्या अन्य साखळ्या तिच्या भरदार पुष्ट मांडय़ांवर रुळल्या आहेत. तिने पायात चार तोडे व मासळ्या घातल्या आहेत. तिच्या मुखावर शांत भाव दिसत असून विद्वत्तेचे तेज आहे. या ठिकाणी सिंह हे तिचे वाहन आहे. सांप्रत या मंदिराचे फक्त पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. आणि मूर्ती तर लंडनमधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे. मूर्तीच्या पादपीठावरील शिलालेखामुळे या मध्यमयुगीन वाग्देवी मंदिराची स्मृती जागृत आहे.


नित्यनियमाने पूजाअर्चा होत असलेले एक सरस्वती वा ज्ञान सरस्वतीचे मंदिर आदिलाबाद जिल्ह्यात (आंध्र प्रदेश) महाराष्ट्र आंध्र प्रदेशच्या सीमेवर बासर या लहान खेडय़ात आहे. या मंदिरामुळे बासर हे तीर्थक्षेत्र व यात्रास्थान झाले आहे. ते गोदावरी नदीकाठी वसले असून श्रीमद् व्यासमुनीनी या ठिकाणी सरस्वती देवीची स्थापना केली, अशी कथा स्थानिक लोक व भक्तगण साग्ांतात. गावातील वडिलधाऱ्या मंडळींच्या मते हे मंदिर शिवकाळानंतरचे पण पेशवाईपूर्व असावे. या ठिकाणी देवीची महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी ही तीन रूपे असून गर्भगृहात सरस्वतीची स्वतंत्र पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाव्यतिरिक्त एक सभामंडप आहे. त्यात सरस्वतीच्या पादुका आणि लहान पाषाणमूर्ती आहे. तीच मूर्ती लौकिकदृष्टय़ा सर्वाना पूजेसाठी खुली असते. पादुकांसमोर प्रसंगोपात विशेषत: विजयादशमीला (दसरा) पाटी- पेन्सिलची पूजा करून ती देवाला अर्पण करण्याची अभिनव प्रथा आहे. नंतर मुलांना प्रथम विद्यालयात धाडण्याचा परंपरागत परिपाठ आहे. मंदिराच्या आठ दिशानां इंद्र, व्यास, सूर्य, वाल्मीकी, विष्णू, गणेश, शिव आदी नावांची आठ तीर्थे आहेत. बासरला व्यासपुरी असेही म्हणतात व तेथील सरस्वतीला ‘ज्ञान सरस्वती’ देवी म्हणतात. गाभाऱ्यातील मूळ मूर्ती वालुकाश्मातील असून चतुर्भुज बैठी आहे. तिच्या हातांत अनुक्रमे पुढचा उजवा व मागील डावा वीणा धरली असून मागील उजव्या हातात पात्र व माला आहे. या देवी व स्थानाविषयी कोदुमगुळ्ळे परांकुशाचार्य यांनी लिहिलेल्या ‘श्री बासर ज्ञान सरस्वती माहात्म्य’ (१९९१) या पुस्तकात त्यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे.

राजस्थानात पुष्कर (अजमीर जिल्हा) या क्षेत्री ब्रह्मदेवाने कार्तिक शुद्ध ११ ला यज्ञ केला होता, असे ‘पद्मपुराणा’तील कथेतून आढळते. पुष्कर तीर्थ अजमीरच्या वायव्येस  सुमारे ११ किमीवर असून एकमेव ब्रह्मावतार ठिकाण आहे. येथे जुन्या मंदिराच्या ठिकाणी इ. स. १८०२ मध्ये नवीन मंदिर बांधल्याचे कर्नल जेम्स टॉड याने आपल्या राजस्थानवरील ‘अ‍ॅनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान’ (annals and antiquities of rajasthan) या ग्रंथात लिहिले आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराजवळ गायत्री व सावित्री या त्याच्या पत्नींची गर्भगृहवजा दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. याशिवाय या ठिकाणी आणखी सरस्वती, बद्रीनारायण व वराह यांची मंदिरे आहेत. ही सरस्वतीची स्वतंत्र मंदिराव्यतिरिक्त छोटी गर्भगृहसदृश मंदिरे होत.


उत्तर प्रदेशातील मथुरा हे कृष्णजन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी द्वाराकाधीशाचे भव्य मंदिर असून यमुना नदीकाठी अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांतली देव – देवतांचे दर्शन- प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा होय. या मंदिरसमूहात पश्चिमेस एक टेकाड आहे. त्यावर सरस्वतीचे एक छोटे मंदिर आहे. त्याच्या पायथ्याला एक लहान ओढा वाहतो. त्याला सरस्वती नाला म्हणतात. आणि तेथील कुंडालाही  सरस्वती कुंड म्हणतात. याशिवाय याच भागात ‘हरे राम हरे कृष्ण’ पंथाचे संस्थापक गुरुवर्य श्री प्रभुपाद यांनी बांधलेले श्रीकृष्ण – राधा यांचे भव्य मंदिर आहे.  ते इस्कॉन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या आधुनिक मंदिरात हिंदू संप्रदायातील अनेक देवदेवतांच्या देवडय़ा आहेत. त्यांतली एका देवडीत सरस्वती देवीची एक संगमरवरी सुंदर मूर्ती आहे.

सिक्कीम येथे एक रुमटेक मठ आहे. त्या मठातील सरस्वतीच्या अप्रतिम शिल्पामुळे तो सरस्वती मठ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी देवी उत्फुल्ल कमळावर वीरासनात बसली असून कमळाची द्विदल पाकळ्यांची नक्षी फारच छान आहे. सरस्वतीची प्रभावळ कलात्मक असून त्यांतील कमळांची वर्तुळे व त्यांवरील अधरेन्मिलित कमळकलिकांचा रचनाबंध व त्या मधोमध खोदलेले कीर्तिमुख इत्यादी सर्व कलाकारी नजर रोखून धरते. देवी द्विभुज असून तिने डाव्या हातात कमळकलिका (त्याचा देठ तिच्या हातात आहे.) व उजवा अभयमुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे. तिने मोजके अलंकार ल्याले असून त्यांतील कंकणे, मोत्यांचा कंठा व कर्णफुले स्पष्ट दिसतात. तिचा पद्ममुकुट व त्याच्या मोत्यांच्या माळा दोन्ही बाजूला कानावर पडल्या आहेत आणि माथ्यावर मधोमध कमळ आहे. तिने साडी नेसलेली असून तिच्या डाव्या स्तनावरून डाव्या बाहूवर लपेटलेला पदर इत्यादींतून साडीच्या चुण्या स्पष्ट दिसतात. तिच्या दोन्ही बाजूला सेवक आहेत. त्यांच्या माथ्यावर  पगडीसदृश शिरस्त्राण आहे. परस्पराकडे चोची केलेले दोन हंस तिच्या मांडीखाली खोदले आहेत. देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून स्मितहास्य आहे. तिचे डोळेसुद्धा या ठिकाणी बोलके वाटतात. कपाळावर मध्यभागी कुंकवाचा टिळा आहे. इ. स. १६ व्या शतकातील हे एक अत्यंत प्रमाणबद्ध, सडपातळ बांध्याचे लोभस शिल्प आहे.

तमिळनाडूतील तंजावर येथे दुसरा सरफोजी भोसले (इ. स.  कार. १७९८-१८३२) या कलाभिज्ञ व ग्रंथप्रेमी राजांनी ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ स्थापन केले. ते सरस्वती मंदिरसम असून यातील चित्रसंग्रहात सरस्वतीचे एक अप्रतिम रंगीत चित्र आहे. या ठिकाणी सरस्वती उत्फुल्ल पद्मासनावर सव्य ललितासनात उजवा पाय खाली सोडून डावी मांडी घालून लोडाला टेकून बसली आहे. ती चतुर्भुज असून वरचा उजवा हात ज्ञानमुद्रेत अभय देत आहे. आणि खालचा उजवा वीणेच्या तारा छेडण्यात मग्न आहे. वरचा उजवा सुरांचा ताल नियंत्रित करण्यासाठी वीणेच्या दुसऱ्या टोकास खांद्याच्या वर आहे. खालच्या डाव्या हातात पोथी आहे. या ठिकाणी तिचे वाहन कोठेच नाही. तिने करंडमुकुट घातला असून तिच्या अंगावर दागिन्यांची रेलचेल आहे. तिच्या कानात कर्णफुले, गळ्यात मोत्यांचा कंठा, चंद्राहार, हातात दोन दोन तोडे, पायात तोडे व पैंजण इत्यादी अलंकार आहेत. तिच्या गळ्यातील फुलांचा हार दोन्ही स्तनांच्या बाजूने खाली लोंबताना दिसतो. देवीने नऊवारी साडी नेसली असून तांबडे पोलके घातले आहे. कपाळावर उभे कुंकू आहे. देवीच्या मागे प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख आणि वरच्या बाजूच्या दोन कोपऱ्यांत आलीढ आसनातील गरुडांच्या प्रतिमा आहेत. ही तंजावर मराठा चित्रशैलीतील १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील सुमारे इ. स. १८२८ मधील एक अप्रतिम कलाकृती होय.

तंजावर जिल्ह्यत अचलेश्वर म्हणून एक छोटे गाव आहे. तिथे सरस्वतीचे एक चोलकालीन सरस्वती मंदिर असल्याचे ‘विद्यादेवी सरस्वती’ या  प्र. रा. आहिरराव यांच्या पुस्तकात म्हटले आहे. हे साधे पण सुंदर बांधकाम असलेले मंदिर आहे, असे ते लिहितात.

महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यत काटोळ या गावी एका जुन्या किल्ल्याचे अवशेष असून त्यात सरस्वती व चंडिका अशा दोन मध्ययुगीन शक्तिदेवतांची मंदिरे आहेत. मात्र अन्य शिवमंदिर यादवकालीन आहे. काटोळ चेन्नई- दिल्ली मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. ते नागपूरपासून पश्चिमेस सुमारे ५७ किमीवर वसले आहे. येथील सरस्वती स्थानिक लोकांत शारदा या नावाने प्रसिद्ध असून या शारदा मंदिराच्या गर्भगृहात तांदळाच्या रूपातील दोन ओबडधोबड प्रतिमा आहेत. अलीकडे तिथे संगमरवरी पाषाणात घडविलेली सुबक देवीची मूर्ती प्रतिष्ठित केली असून मंदिराचे आधुनिक पद्धतीने बांधकाम केले आहे. माघ शुक्ल पंचमीस (वसंत पंचमी) येथे शारदोत्सव होतो.

ठाणे जिल्ह्यत भिवंडीच्या उत्तरेस वडवली नावाचे एक गाव आहे. तेथील वज्राबाई किंवा वज्रेश्वरी देवीच्या नावावरून त्यास वज्रेश्वरी नाव पडले आहे. वज्रेश्वरी मंदिर व जवळील गरम पाण्याचे झरे यांमुळे हे गाव प्रसिद्धीस आले आहे. तानसा नदीकाठावरील  एका टेकडीवर हे मंदिर आहे.  ते पूर्वाभिमुख असून त्याभोवती कोट आहे. पेशवाईपूर्वी हे मंदिर अगदी छोटे होते.  वसईचा किल्ला चिमाजी आप्पांनी काबीज (१७३९) केल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले वा विस्तारित केले. त्याचा सभामंडप बडोद्याचे संस्थानिक खंडेराव यांनी तर पायऱ्या व दीपमाळा नासिकचे सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. प्रमुख गर्भगृहात पाच बाजूला सावित्री- सरस्वतीच्या मूर्ती आहेत.

देवी सरस्वती म्हणजे विद्येची अधिष्ठात्री हे आपल्याला माहीत असतं. सरस्वतीचा दुसरा संदर्भ आहे लुप्त झालेल्या नदीचा. याशिवाय देवी सरस्वतीबद्दल प्राचीन साहित्यात कोणकोणते संदर्भ आले आहेत, याची चर्चा-

अप्रशस्ता इव स्मसि

प्रशस्तिमम्ब नस्कृधि।

आम्ही अज्ञात आहोत,

आम्हास विख्यात कर हे सरस्वति!

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला..’ या प्रार्थनेचे सूर प्रत्येक भारतीयाला परिचित असतात. अगदी लहानपणापासून सरस्वतीचे रूप सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असते. राजा रविवर्मा या प्रख्यात चित्रकाराने रेखाटलेली, हाती वीणा घेतलेली, शुभ्रधवल हंसावर आरूढ, शुभ्रवसना, सात्त्विक वदनाची ही देवी भारतीय परंपरेत विद्यादायिनी व कलोपासकांना मार्गदर्शन करणारी देवी म्हणून सुपरिचित आहे. गणपती विसर्जनानंतर आता नवरात्राची धामधूम सुरू होईल. नऊ दिवसांत मातृशक्तीचा उदो उदो होईल, महालक्ष्मी, दुर्गा, काली यांच्या बरोबरीने महासरस्वतीचाही जागर होईल; म्हणून सरस्वती प्राचीन काळापासून याच रूपात होती का, विश्वातील प्राचीनतम ग्रंथात ऋग्वेदातही ही अशीच होती का, तिचे पूजन कसे करतात, या नावाची एक नदीही होती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यांची उत्तरे शोधण्याचा हा स्वल्प प्रयास! सरस्वतीची त्रिविध रूपे ऋग्वेदापासून दिसतात; महानदी, वाग्देवी आणि देवी. या तीनही रूपांचा परामर्श घेऊ.

महानदी सरस्वती

सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यातच वैदिक भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला. ऋग्वेदात सरस्वती नदीवर तीन संपूर्ण सूक्ते आहेत (ऋग्वेद. ६.६१, ७.९५, ७.९६), शिवाय तिचे उल्लेख इतरत्र आहेतच. ‘महो अर्ण: सरस्वती’ असे म्हणत तिच्या प्रचंड जलसंचयाचे व घनगंभीर प्रवाहाचे वर्णन वेदांत येते. मार्गात येणाऱ्या पर्वतशिखरांना रोंरावणाऱ्या लाटांनी नेस्तनाबूत करीत ही डौलाने वाहते. गृत्समद ऋषी तिचे आवाहन ‘नदीतमे, अंबितमे, देवितमे’ असे करतात (२.४१.१६,१७). महाभारतकाळापासून ती हळूहळू लुप्त होऊ लागली व विसाव्या शतकापर्यंत ती लुप्तच मानण्यात आली. तिचा एक पूर्ववाही प्रवाह प्रयागक्षेत्री गंगा यमुनेला गुप्त रूपात मिळतो व त्रिवेणी संगम होतो अशी भारतीयांची श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. याचा शोध घेतला असता, भूगर्भात खरोखरीच असे अनेक प्रवाह आढळले व सरस्वतीच्या शोधमोहिमेला आरंभ झाला. अलीकडे पुण्याच्या डेक्कन विद्यापीठाने हरयाणा राज्यातील राखीगढ इथे उत्खनन केले तेव्हा शुष्क नदीपात्रात अनेक प्रागतिहासिक वस्तू, मानवी सांगाडे सापडले, ज्यांचा काळ इ.स. पूर्व पाच ते आठ हजार वर्षे इतका मागे जातो. एकेकाळी समृद्ध वैदिक संस्कृती इथे नांदत होती हे यावरून सिद्ध होते. सरस्वती शोध संस्थानच्या मतानुसार यमुना सरस्वती क्षेत्र, सरस्वती साबरमती क्षेत्र व राजस्थान साबरमती विभागात उत्खनन केल्यास १३०० कि.मी लांबीची सरस्वती नदी पुन्हा प्रवाहीत होऊ शकते. कुरुक्षेत्र हा प्रदेश पृथ्वीची नाभी होती. सरस्वती ही अत्यंत वेगवती नदी असून सप्त नद्यांची भगिनी होती असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दृषद्वती, शुतुद्री (सतलज), चन्द्रभागा (चिनाब), विपाट् (व्यास- बियास), इरावती (रावी) या नद्यांनी व अशा अनेक लहानमोठय़ा प्रवाहांनी हीस समृद्ध केले. खरोखरीच ही ‘सिन्धुमाता’ होती. हिच्या तीरावर वेदांतील पंचजनांचा विकास व उत्कर्ष झाला. ऋग्वेदकालीन राज्यकत्रे- मग ते भरतवंशीय असोत, कुरुवंशीय, मत्स्यवंशीय, पांचाल असोत अथवा ययातीचे पुत्र, सर्वानी हिच्या तीरावर यज्ञयाग केले, देवांसाठी आहुती दिल्या व आपले राज्य सुस्थिर केले. भरतकुळाचे आधीचे उपाध्याय होते, ख्यातकीर्त ऋषी विश्वामित्र. नंतर वसिष्ठांनी हे पद भूषवले व दहा राजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सुदासाला इंद्र व वरुणांच्या मदतीने युद्धात विजय मिळवून दिला. तत्कालीन शासक होते दिवोदास व सुदासासारखे लढवय्ये राजे. या भरतवंशीय राजांमुळेच हिला भारती हे नाव पडले. सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशात प्राचीन वैदिक संस्कृती बहरू लागली. मग जमिनीच्या कसाच्या जोडीने मानवी सुफलनाशीही सरस्वतीचे नाते जोडले गेले. गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रसूतीसाठी सरस्वतीची प्रार्थना केली आहे (ऋ. १०.१८४.२) पíशयन संस्कृतीतही सरस्वती अनाहिता या नावाने आढळते. आबान यश्त या जलदेवतेच्या स्तुतीत अनाहिता ही गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रजननासाठी उपास्य असल्याचे सांगितले आहे. मुळात निरंतर वाहणारा नदीचा प्रवाह हाच वंशसातत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच प्राचीन संस्कृतीत नद्या या जीवनदायिनी, पुत्रसंदायिनी मानल्या जातात. सरस्वतीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाभारतात युद्धाच्या समयी बलरामाने सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा केली त्याचे वर्णन आहे. दक्षाच्या शापाने चंद्राचा क्षय होऊ लागला तेव्हा त्याने सरस्वतीक्षेत्री स्नान केले व तो रोगमुक्त झाला, तसेच शंकराने ब्रह्महत्येचे पाप नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्री स्नान केले असे अनेकविध प्रसंग पुराणात क्षेत्रमाहात्म्य विशद करताना आले आहेत.

14-sarsvati-lp
सरस्वती नदी काही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली असली तरी पुराणांत विविध कथांमधून या लुप्त होण्याची कारणमीमांसा केलेली दिसते. पद्मपुराणात अशी कथा आहे की जेव्हा और्व ऋषीने निर्माण केलेला अग्नी सर्व विश्व ग्रासू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून सरस्वतीने नदीरूप घेतले व एका कलशात तो वडवाग्नी ठेवून ती पश्चिम समुद्राकडे निघाली, पापी जनांचा स्पर्श टाळण्यासाठी ती जमिनीखालून वाहू लागली, अग्नीचा ताप अस झाला की भूपृष्ठावर येऊ लागली. वामनपुराणात जरा वेगळ्या ढंगाने हा कथाभाग येतो. उत्तंक ऋषीच्या आश्रमाजवळ प्लक्ष वृक्षापासून सरस्वती उत्पन्न झाली. कुठे जायचे हे न कळल्यामुळे ती कुंठित झाली, तेव्हा मरकडेय ऋषींच्या मागोमाग जात ती प्रथम कुरुक्षेत्री गेली व नंतर दक्षिण दिशेस वाहत गेली. सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या मधील भूभागाला मध्यदेश म्हणजेच कुरुक्षेत्र अथवा ब्रह्मावर्त असे संबोधतात. समुद्रात तो वडवानल विसर्जति करताना ती हारिणी, कपिला, नंदा, अशा विविध प्रवाहांनी वाहिली असेही आढळ्ते. या सरस्वतीच्या उपनद्या असाव्यात. महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी. या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल.

वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.

वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

15-sarsvati-lp
बृहदारण्यकोपनिषदात वाणी धेनूच्या रूपात येते. स्वाहा, स्वधा, वषट् व हन्त हे तिचे चार स्तन आहेत. पकी स्वाहा व वषट् यांचे दोहन देव करतात, स्वधेचे पितर आणि हन्तचे मनुष्यमात्र! सरस्वती वाग्देवीच्या रूपात चतुर्वधि आहे, ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’; परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. शब्दाची भागवतातील व्याख्या आहे, अर्थाश्रयत्वंशब्दस्य द्र.ष्टुìलगत्वमेव च। तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु-आकाशाचा सूक्ष्म अंश घेऊन अर्थ व्यक्त करणारी वाणी वक्त्याचा, चतन्याचा निर्देश करते. वैखरी मुखावाटे प्रसृत होते, स्वर व्यंजनांचे लेणे लेवून येते. शांतिपर्वातील वृत्तानुसार एकदा याज्ञवल्क्यांनी चिंतन केले तेव्हा स्वरव्यंजनांचे दागिने घालून ओंकारध्वनी करीत सरस्वती अवतरली. वैखरी हे वाणीचे प्रकटरूप आहे, हेच रूप सर्वाना ठाऊक आहे, इतर तीन रूपे गुप्त असतात व तपचिंतनानेच साध्य होतात. मानवाच्या स्थूल, सूक्ष्म, कारणशरीराशी वैखरी क्रियाशक्ती, मध्यमा ज्ञानशक्ती तर पश्यन्ती (पाहणारी, द्रष्टी) इच्छाशक्ती या दृष्टीने संबंधित आहेत. परावाणी केवळ योगीजनगम्य आहे व तिथे शब्द आणि अर्थ अविभक्त असतात. शिवपार्वतीचे अद्वैत ‘वागर्थाविव संपृक्तौ’ असे कालिदास म्हणतो, तेव्हा हेच अभिप्रेत आहे. स्कंदपुराणात अंबुवाची राजाची कथा आहे. हा मूक होता, याने हाटकेश्वरी सरस्वतीत स्नान केले, तत्क्षणी त्यास वाचा प्राप्त झाली. मग त्याने तीरावरील माती घेऊन तिची पाíथव मूर्ती केली. तीर्थमाहात्म्य, वाचाप्राप्ती व देवीस्वरूप ही तिन्ही रूपे इथे दिसतात.

सरस्वती देवी

अंबुवाची राजाने सरस्वतीची चतुर्हस्त मूर्ती केली. तिचे चार हात सर्वव्यापित्व दर्शवितात. दोन उजव्या हातांत कमळ व अक्षमाला, तर दोन वामहस्तात पुस्तक व कमंडलू अशी मूर्ती सजली. कमळ हे सृजनाचे प्रतीक, अक्षमाला एकाग्रतेचे सूक्ष्म प्रतीक, पुस्तक हे ज्ञानप्राप्तीचे स्थूल साधन तर कमंडलू हे ज्ञानामृताचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गणपतीप्रमाणे सरस्वती ज्ञानासोबत कलांची अधिष्ठात्री मानली जाऊ लागली, तेव्हा तिच्या हाती वीणा आली, व ती संगीताचे, कलांचे प्रतीक झाली. अश्वतर राजा या सरस्वतीच्या पूजनाने संगीतात पारंगत झाला असे मरकडेय पुराणात आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र हंस तिचे वाहन समजले जाते. कलांची देवी म्हणून मयूर वाहन आहे तर सर्जकशक्ती म्हणून ती कमलासना आहे. द्विभुजा सरस्वती विष्णुपत्नी, विष्णुमाया म्हणून प्राचीन काळापासून विख्यात होती. विष्णूने प्रकृतिमुखर (स्वभावत: अत्यंत बडबडी) सरस्वती व चंचल लक्ष्मीला कंटाळून लाकडात प्रवेश केला (दारुभूतो मुरारि:) असे एक मजेदार सुभाषित आहे. मध्ययुगात ती चतुर्हस्ता झाली. मुळात ती ब्रह्मदेवाची कन्या. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता तिच्यावर भाळला व त्याने तिचा पत्नीत्वाने स्वीकार केला. सर्जनाच्या प्रक्रियेत नात्यांचा असा गुंता सर्व पुराकथांचा एक अविभाज्य घटक आहे. ब्रह्मदेव, विष्णू व शिवाचे एकत्रित तेज म्हणजे सरस्वती होय. म्हणूनच तिला त्रिकला असे म्हणतात. उत्तरेत विद्याप्रदा शारदा आणि दक्षिणेत शिवशक्तीच्या रूपात तिचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रातील शेवटचे तीन दिवस, सप्तमी ते नवमी महासरस्वतीचे मानले जातात. देवीभागवत आणि मरकडेय पुराणात देवीमाहात्म्यात तिला नीलसरस्वती असे म्हणून तिचे कालीशी तादात्म्य सांगितले आहे. बौद्धांनीही तारा देवीचे रौद्ररूप म्हणून नीलसरस्वतीचे वर्णन केले आहे. या रूपात ती दैत्यसंहार करते. दुष्टांचे निर्दालन व सुष्टांचे रक्षण हे दुग्रेप्रमाणेच तिचे कर्तव्य आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महेश्वरी म्हणून पहिले तीन दिवस सर्जकशक्तीचे आवाहन, नंतरचे तीन दिवस सौंदर्य व संपत्तीचे प्रतीक महालक्ष्मीचे स्तवन आणि शेवटचे तीन दिवस परम गुह्य़ज्ञानस्वरूप ब्रह्मविद्य्ोचे सरस्वतीचे ध्यान असा उपासनाविधी आहे. देवांच्या त्रिमूर्तीप्रमाणे देवीची त्रिमूर्ती अशा प्रकारे सिद्ध झाली. वैश्विक मातृशक्तीचे हे त्रिविध आविष्कार खूप लोभस आहेत. मत्स्यपुराणात सरस्वती, सावित्री व गायत्री या तिघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असे सांगून त्यांचे ऐक्य प्रतिपादित केले आहे. ब्रह्मदेवाच्या शुद्ध सत्त्वगुणापासून हिची निर्मिती झाली म्हणून् ही विमलेन्दुधवला आहे. दुर्गासप्तशतीत हिची विविध नावे येतात, महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती। आर्या ब्राह्मी कामधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी । माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंतपंचमीला हिचे विधिवत् पूजन करून विद्यारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात घरोघरी काढली जाणारी आकडय़ांची सरस्वती हे एक यंत्र आहे. त्यातून उद्भवणारे त्रिकोण श्रीयंत्राप्रमाणे चतन्याचे, ऊर्जेचे व गुह्य़ज्ञानाचे गाभारे आहेत. ही रांगोळी अमूर्ताकडे नेणारी सोपी व मूर्त पायवाट म्हणता येईल. यंत्राच्या जोडीने तंत्रशास्त्रही विकसित झाले व बीजमंत्रांनी ध्यान होऊ लागले.

बौद्ध परंपरेत ही वज्रवीणा, आर्यसरस्वती, वज्रसरस्वती या नावांनी तर जैन परंपरेत श्रुतदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबाहेर, आशियाई देशांत सरस्वतीची विविध रूपे व मूर्ती आढळतात. बहुतेक मूर्तीत सरस्वती वीणाधारिणी दाखवली जाते. बुद्धीची ग्रीक देवता अथेना किंवा रोमन मिनव्‍‌र्हा सरस्वतीचीच पाश्चात्त्य रूपे म्हणता येतील, कारण याही विद्या, वाणी व कलादायिनी मानल्या जातात. बुद्धिप्रदा शारदा हे सरस्वतीचे सर्वमान्य विशेषण! शरद् ऋतूशी संबंधित, काश्मीरमधील शारदापीठाशी संलग्न म्हणून शारदा. शिवाय ही सार+दा, श्रुतींचे सार देणारी आहे. ही केवळ सरस्+ वती, जलाशयांनी युक्त नाही, तर सार+स्व+ वती म्हणजे आत्मज्ञानाचे सारसर्वस्व देणारी चिद्घनचपला आत्मशक्ती आहे. ही ‘अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थकलाकामिनी विश्वमोहिनी’ आहे यात काय संशय!

Vajreshwari and Hingula Devi story in Marathi

वज्रेश्वरी आणि हिंगुळा
हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले.


हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.

वज्रेश्वरी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची देवी. या देवीचे स्थान पालघर जिल्ह्य़ामधील वसई येथील वडवली या गावात आहे. हा परिसर वज्रेश्वरी या नावानेच प्रसिद्ध आहे. देवीचे मंदिर उल्हास नदीच्या तीरावरच्या टेकडीवर आहे. या देवतेस वज्रेश्वरी नाव कसे प्राप्त झाले यासंबंधी कथा दिगंबर स्वामी रचित ‘वज्रेश्वरी माहात्म्य’ या पोथीत सापडते.
पोथीनुसार प्राचीनकाळी वज्रेश्वरी भागात घनदाट जंगल होते. त्या वेळी तानसा नदीच्या भागात उग्रसुर नावे एक दैत्य राज्य करीत होता. या दैत्यास सिंहमार आणि कलिकाळ हे पराक्रमी पुत्र होते. शक्तीने धुंद झालेले हे असुर सर्वत्र धुमाकूळ घालू लागले आणि त्यामुळे ऋषीमुनींच्या यज्ञयागादी कर्मात त्यांचा त्रास होऊ लागला. वारंवार विघ्न आणणाऱ्या या दैत्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी या ऋषीमुनींनी देवीची कृपा संपादन करण्याचे ठरवले. त्यांनी यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचे ऋत्विज वशिष्ठमुनी होते. यज्ञ समारंभात विविध देव-देवतांचे मंत्रोच्चारांनी आवाहन करण्यात आले. सर्व देवतांना हविर्भाग मिळाला. मात्र इंद्रास आवाहन करण्याचे राहून गेले. वशिष्ठांनी हे हेतुत: परस्पर केले असे समजून क्रोधित झालेल्या इंद्राने त्यांच्यावर वज्र प्रहार केला.
इंद्र झाला कोपायमान
मम नामें का न दिले हवन?
आतां निश्चये मी विंध्वसीन
हा त्रिचांडी याग
वसिष्ठावरी सोडिता वज्र
पार्वतीने गिळिले समग्र
म्हणोनि वज्रेश्वरी नाम
पार्वतीही पावली

वसिष्ठांवर फेकलेले वज्र पार्वतीने गिळले म्हणून तीस ‘वज्रेश्वरी’ हे नाम प्राप्त झाले. वज्रेश्वरीचे सांप्रत असलेले मंदिर पेशवेकालीन असून पोर्तुगीजांवर जय मिळवल्यावर चिमाजी अप्पा यांनी सुभेदार शंकराजी केशव यांच्यातर्फे जीर्णोद्धार केला. वरील माहात्म्यामधील कथा पाहिल्यावर मुंबादेवी माहात्म्याची आठवण होते. येथे ही देवी दैत्याचा नाश करण्याच्या हेतूने पृथ्वीतलावर येते आणि त्याचा नाश करते. वज्रेश्वरीमाहात्म्य हे पेशवेकाळात वसईच्या मोहिमेनंतर कधीतरी लिहिले गेले असावे. वज्रेश्वरी ही दैवज्ञ ब्राह्मण (सोनार), पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, सूर्यवंशी क्षत्रिय इत्यादी ज्ञातींची कुलस्वामिनी आहे.
नवनाथांच्या पोथीमधील आठव्या अध्यायात वज्रेश्वरी आणि हिंगुळजा या देवींचे उल्लेख आढळतात. या पोथीनुसार गोरक्षनाथ आणि या दोन्ही देवींमध्ये युद्ध झालेले दिसते. या युद्धात गोरक्षनाथांचा जय होतो आणि हरलेल्या या दोन्ही देवींना गोरक्षनाथ येथेच कायम राहण्याचा आदेश देतत. हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. येथील देवी अष्टभुजा असावी, असे अनुमान अनेक संशोधक आणि तज्ज्ञांचा आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.
हिंगुळा पुराणात या देवीची माहिती दिली आहे. रावणावर विजय मिळवून आल्यावर तो या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्या वेळी देवीच्या दूतांबरोबर रामाचे युद्ध झाले व त्यास माघार घ्यावी लागली. मग त्याने देवीची प्रार्थना केली आणि मग देवीने त्यास दर्शन दिले. राम ज्या मार्गाने या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला, त्या मार्गावर अनेक तीर्थे उत्पन्न झाली. या देवीचे भारतात बरेच भक्त आहेत. मुसलमान बंधू हिला नानीबिबी म्हणून भजतात.
चौल येथील हिंगुळा देवी ही बौद्ध विहारात पाहायला मिळते. बौद्ध विहारात एका हिंदू देवतेचे स्थान कसे असू शकते? कोणत्याही धर्माचे पवित्र ठिकाण असो, त्या ठिकाणी इतर दैवतांची स्थापना केल्याने त्या दैवताचे पावित्र्य काही कमी होत नाही. ते ठिकाण सदैव पवित्र असते. याचे उदाहरण म्हणजे कार्ले येथील एकवीरा देवी होय. कार्ले येथे बौद्ध विहार व भारतामधील सर्वात मोठा चैत्य आहे. या लेणींसमोर या देवीचे एक लहानसे मंदिर पाहावयास मिळते. सह्य़ाद्रीखंडानुसार अदितीने तप केल्यावर शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन तुझा अवतार भूतलावर इश्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल असे म्हटले. तसेच तुझे मूळ नाव रेणुका असे असेल व तू भूतलावर एकवीरा या नावाने प्रसिद्ध होऊन तुला पाच पुत्र होतील, हेदेखील सांगितले. दुसऱ्या एका समजुतीप्रमाणे रेणुकेच्या पोटी परशुराम हा एकच वीरपुत्र जन्म पावला म्हणून तिला एकवीरा म्हणतात. ही देवी कोळी, कासार, पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, इत्यादी ज्ञातीमात्रांची देवी आहे.
या देवीचा अग्रपूजेचा मान कोळी समाजाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक रामोशी कोळी यांनी आपले मूळ गाव सोडले आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी येथे येऊन हातभार लावला. या कोळी समाजाच्या स्थलांतरामुळे या देवीचेही स्थलांतर झाले असावे.

Amaravatichi Ambadevi story in marathi

महती देवीची : अमरावतीची अंबादेवी

येथील अंबादेवी मंदिराला पुरातन इतिहास आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणी हरणाशी जोडला जातो. राज्यातीलच नव्हे तर, इतर प्रांतातील भक्तांची मांदियाळी नवरात्रोत्सवात पहायला मिळते. या मंदिराजवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांना आता नवा साज चढला आहे.
या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीचे असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे  इतिहासात नमूद आहे. अंबामातेचे प्राचीन मंदिराचा कळस उंचावर होता तेव्हा तो स्पष्ट दिसायचा.  हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.
मोगलांनी १५०० च्या कालखंडात वऱ्हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदू मंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यात अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
अनेक वर्षे हे मंदिर लहानशा ओटय़ावर चार लाकडी खांबाचा आधार घेऊन उभे होते. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहल्यादेवी होळकरांनीही या मंदिराच्या उभारणीत योगदान दिल्याचे पुरावे मिळतात. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मुर्तीवर सुवर्णखचित दागिने चढवले जातात. मुखवटा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगडय़ा आदींचा साज चढतो.  दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात.
अंबादेवी मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा अलीकडेच विस्तार आणि सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मंदिराचा कळस सुवर्णाचा असून शिखरही कलाकुसरीचे अप्रतिम दर्शन घडवते. एकवीरादेवीचे मंदिर जनार्दनस्वामी यांनी उभारल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.  एकवीरा देवीच्या गाभारा कोरीव व दगडाने बांधलेला आहे. पुरातन नमुना यात स्पष्ट दिसून येतो. देवालय लाकडी चौकटीवर बांधलेले आहे. एकवीरा व अंबादेवीच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मंदिरात जाऊन सहज दर्शन घेता येते.   

Vidarbhateel devichi Mandire

महाराष्ट्रात असलेली देवीची साडेतीन पीठे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापलीकडेही देवीची विविध स्थाने असून लोकमानसात त्यांना महत्त्व आहे. विदर्भातील अशा काही स्थानांची माहिती-

आताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.

अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.

श्री अंबादेवी संस्थान

अमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.

श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५  मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.

श्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.

श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे.  मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.

श्री एकवीरा देवी, अमरावती

श्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी

नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो.  अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.

श्री महाकाली देवी, चंद्रपूर

कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.

या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.

इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।

त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच

कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥

भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.

त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७  मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.

चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.

श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.

गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.

श्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.

हे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर  १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.

या मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.

गोरजाई मंदिर, वैरागड

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.

गोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.

श्री रेणुकामाता मंदिर, चिखली

चिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर  प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर  बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.

पारशिवनीची महालक्ष्मी

येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-

‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती

नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’

हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.

नेरिपगळाई देवी (अमरावती)

सतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे

Navegavachi Gangadevi story in Marathi

महती देवीची : नवेगावची गंगादेवी

नागपूरपासून आंभोरा मार्गावर मांढळपासून तीन किमी दूर असलेल्या नवेगावातील गंगादेवी मंदिर जागृत स्थान  समजले असून या मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास आहे. चैत्र आणि आश्विन महिन्यात होणाऱ्या देवीच्या नवरात्रात या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिराच्या इतिहासाबाबत बोलताना मंदिराचे प्रमुख कृष्णा कढव यांनी सांगितले, ज्या ठिकाणी मंदिर आहे तो पूर्वी भोसलेकालीन परिसर होता. तेथे फक्त देवीची मूर्ती होती. मूर्तीवर कुठलेही शेड नव्हते. मात्र, ७५ वर्षांपूवी त्या भागात पडझड झाली होती त्यामुळे त्या भागातील घरे आणि मंदिर उध्वस्त झाली मंदिर जसेच्या तसे राहिले. नंतर मंदिराची डागडुजी करून भाविकांसाठी सोय करण्यात आली. श्रीमंत राजे भोसले या मंदिरात येत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ब्रिटीशांच्या काळात भिवानी भगत देवीच्या मंदिराची पूजा व तेथील व्यवस्था पहात होते. भिवानी भगत हे सिद्ध पुरूष होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. रातोरात दैवीशक्तीने उमरेडच्या जेलमधून ते बाहेर आले आणि देवीच्या मंदिरात जाऊन बसले, अशी आख्यायिका आहे. मध्यंतरीच्या काळात मंदिरात पडझड झाली होती. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचे प्रकार या भागात मोठय़ा प्रमाणात वाढू लागले होते.
१२ ऑक्टोबर १९९५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे. गंगादेवीची मूर्ती स्वयंभू आहे की त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली याचा उल्लेख मात्र कुठेच नाही. चारशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास या देवी मंदिराला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला त्यावेळी कोणाकडून आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम होत गेले आणि आज या ठिकाणी प्रशस्त असे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर कलश आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी महालक्ष्मी याग आयोजित करण्यात आला होता. मंदिरात गेल्या तीन वर्षांपासून देवी भागवत सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, जिल्ह्य़ातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथे २००८ मध्ये शतचंडी याग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील ५० हजारापेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. नवरात्र उत्सवात मंदिरात दररोज भजन कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. सकाळी ७ वाजेपासून कुही, मांढळ, आंभोरा या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात गेल्या अकरा वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मंदिरात बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण भागातील एक हजारावर त्याचा लाभ घेतला आहे. ह.भ.प. बारई महाराज या मंदिरात विविध उपक्रम राबवत असतात. या शिवाय अमृत दिवाण गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले जातात. नुकतेच गो-ग्राम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात येणाऱ्या काळात धर्मशाळा, गो शाळा आणि संस्कार शिबिरासाठी सभागृह बांधण्याचा मानस असल्याचे कृष्णा कढव यांनी सांगितले.

Ganojachi Mahalakshmi story in marathi

महती देवीची : गणोजाची महालक्ष्मी

गणोजा येथील महालक्ष्मी स्वयंभू असून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दुसरे रूप असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोजा (देवी) येथील महालक्ष्मीच्या मंदिराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. गणोजा येथील गणू भट हे महाराष्ट्रातील शक्तीपीठ कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेले. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्रात गणू भट कोल्हापूरला अनवाणी जात असत. दर्शनात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. वृध्दावस्थेला आल्यानंतर गणू भट यांनी देवीला विनवणी केली की, यापुढे मी तुझ्या दर्शनाकरिता कोल्हापूरला येऊ शकरणार नाही. त्यावेळी महालक्ष्मीने गणू यांना दर्शन देऊन सांगितले की, आता मीच तुझ्या गावी येणार आहे. तू येथून निघाल्यावर मागे वळून पाहू नको, असे म्हणून देवी अदृष्य झाली. गणू  गावी पोहोचत असताना त्यांनी गणोजानजीकच्या नदीजवळ मागे वळून बघितले. त्याचवेळी चमत्कार झाला आणि मागे येणारी महालक्ष्मी त्या नदीच्या काठावर अंतर्धान पावली, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या गावाला सुद्धा गणोजा देवी नाव पडले.
पाचशे वर्षांपीर्वी नदीपात्राच्या उत्खननात काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, असे सांगितले जाते. या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले असून नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणे शक्य नसले तरी गणोजा येथे गेल्यास महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे समाधान होते, असे भक्त सांगतात.
गणोजा येथील या मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अडीच फूट उंचीची ही मूर्ती चतूर्भूज आणि सिंहासनावर विराजमान आहे. देवीच्या एका हाती त्रिशूल आहे. दुसऱ्या हाती ढाल, तिसऱ्या हाती गदा आणि चौथ्या हाती पद्म आहे. डोक्यावर मुकूट आहे.
पेढी नदीच्या किनाऱ्यावरच पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिरातच राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.
यात्रेच्या काळात या ठिकाणी तीर्थस्थापना, अखंड वीणा वादन, षोडशोपचार पूजा, अभिषेक, कीर्तन, हरीपाठ, भारूड, भागवत कथा, दहीहांडी, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. नवरात्रात देवीचा सोन्याचा मुखवटा विलोभनीय दिसतो. दागिन्यांनी सजलेले देवीचे रूप भक्तांना वेगळीच अनुभूती देत असते. संस्थानचे अध्यक्ष रा.ना. गणोरकर, उपाध्यक्ष प्र.ग. केवले व त्यांचे सहकारी मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.   

Mohadichi Maa Chaundeshwari story in Marathi

महती देवीची : मोहाडीची माँ चौंडेश्वरी


भंडारा जिल्ह्य़ात भंडारा-तुमसर राजमार्गावरील मोहाडी या तालुक्याच्या गावी माँ चौंडेश्वरीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असल्याची लोकश्रद्धा आहे. मोहाडी परिसराचे हे आराध्यदैवत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे नवरात्र महोत्सव होत असून केवळ विदर्भच नाही तर, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील भाविक महोत्सवात माँ चौंडेश्वरीच्या दर्शनाला येतात. मुख्य घटाव्यतिरिक्त मंदिर परिसरात यावर्षी ९३२ घटांची स्थापना झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ७७८ होती. विजयादशमीला महाप्रसाद होतो. परिसरातील ३०-३५ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. व्यवस्थापन मंदिर-समिती तसेच, नवदुर्गा विद्यार्थी युवक मंडळाकडे असते. नवरात्रात येथे यात्रेचे स्वरूप येते.  यात्रेत चांगलाच बाजार भरतो. मोहाडीच्या पश्चिमेला माँ चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या परिसराला टेकडी म्हटले जाते. टेकडी परिसराला तीर्थक्षेत्र गायमुखवरून निघालेल्या गायमुख नंदीने विळखा घातला असून परिसर वनराईसदृश्य झाडाझुडुपांनी निसर्गरम्य केला आहे. नवरात्रीतील रोषणाईने तो आणखीच उजळून दिसतो.
प्राचीन काळी गायमुख नदी व दाट वनराई असलेल्या या तपोवनात महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञाच्या आवर्तनासाठी दूरदुरून ऋणीमुनी आले होते. यज्ञसामुग्री संपली. ठराविक मंत्रोच्चारही संपले. ऋणीमुनींनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. चारही वेदांनी केलेले स्तवन ऐकून हवनकुंडातून गर्जना करत महाचंडीचा चेहरा बाहेर आला. साधना करणाऱ्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वचन तिने दिले. चारही वेदांनी केलेल्या स्तवनाने देवी प्रसन्न झाली म्हणून तिला ‘चौवेदेश्वरी’ हे नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन ते ‘चौंडेश्वरी’ झाले. याच कथेचे अन्य कथानक म्हणजे, यज्ञसाहित्य संपल्यामुळे ऋषिमुनींनी बाजूला ठेवलेल्या ग्रंथरूपातील ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्व वेदाताचे एकेक पान हवनकुंडात टाकले आणि प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली.
कनोज प्रदेशातील रेणू राजाची कामेष्टीय यज्ञाच्या अग्नीतून निघालेली कन्या रेणुका हिने जसे अपत्य वात्सल्यातून भूगर्भातून मस्तक वर काढून पुत्र परशुरामाला दर्शन दिले अशाच शक्तीरूप देवता महाराष्ट्रात डोंगर पहाडावर प्रकटल्या. त्यांना कुठे रेणुका, कुठे योगेश्वरी, कुठे महालक्ष्मी, कुठे दुर्गा नाव मिळाले. अशीच कथा माँ चौंडेश्वरीची आहे. माँ चौंडेश्वरीचा फक्त भव्य चेहरा जमिनीवर आहे. तिचे डोळे, नाक, कान, मुख दिसते.
टेकडी परिसरात माँ चौंडेश्वरीची मूर्ती उघडय़ावर होती. संत नारायण स्वामी नावाचे भक्त पूजाअर्चा करत. पुढे स्वामी कुटुंबात कोणी उरले नाही. ब्रिटीश काळात लहानसे मंदिर उभारले गेले. त्यानंतर आधुनिक काळात भक्तांनी देवस्थान मोठे केले. उत्पन्न येत गेले. देवस्थानाचा विस्तार होत गेला. सुंदर बगीचा, धर्मशाळा, सभोवताल भिंत, उंच जागेचे सपाटीकरण झाले. देवदेवतांचे विस्तारीकरणही झाले. सोबतीला शिरडीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, शंकर भोलेनाथ, गणेशाची स्थापना झाली. एका लहान मंदिरात नारायण स्वामींच्या पादुका ठेवण्यात आल्या. विविध स्पर्धानाही आता प्रारंभ झाला आहे. मंदिराच्या उत्पन्नातून धर्मार्थ दवाखाना, अ‍ॅम्ब्युलन्स, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, असे विविध सामाजिक उपक्रमही पुढे राबवले जाऊ शकतात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे आदिमाया किंवा जगदंबा. तिचेच एक रूप म्हणजे माँ चौंडेश्वरी. अलंकारांनी मढवलेल्या देवीचे आकर्षक डोळे नागपूर शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला तज्ज्ञ तसेच, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सन्मानित प्रा. प्रमोद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार             करण्यात आले. त्यामुळे माँ चौंडेश्वरीचे गोजरे विलोभनीय रूप अधिक आकर्षक झाले आहे.

Paradichi Bhavani Devi story in Marathi

पारडीची भवानी देवी

विदर्भात जागृत शक्तीस्थानांमध्ये जी काही देवीची स्थान आहे त्यात पारडीतील भवानी मंदिराचे नाव घेतले जाते. नागपूर जिल्ह्य़ात भंडारा मार्गावर असलेल्या पारडी परिसरातील भवानी देवीच्या मंदिराला अडिचशे वर्षांचा इतिहास असून देवीची मूर्ती स्वयंभू असल्याने हे मंदिर जागृत असल्याचे या भागातील नागरिक सांगतात.

भार्गव परशुरामपिता ऋषी जमदग्नी यांची कामधेनू नृपती कार्मविर्य सहस्त्रार्जुनाने (महिष्पती महेश्वर इ.स. पूर्व १९६०) पळविली. त्यांच्या सेनापतीने जमदग्नीचा वध केला. माता रेणुका पतीच्या शवाबरोबर सती गेली. महातेजस्वी परशुरामांना हे कळले पण तुर्त त्यांनी राग आवळला. माता पित्याच्या देहाला कावडीमध्ये ठेवून ते माहुरक्षेत्री आले. पुढे शोकाकुल परशुरामांना रेणुका मातेने पृथ्वीच्या गर्भातून केवळ मानेपर्यंत वर येऊन दर्शन दिले तेव्हा अशा मुखवटय़ांना तांदळादेवी म्हटल्या जात होते. महाराष्ट्रात असा प्रकारच्या प्रतिमा अंबेजागाई, माहुर , पारडी अमरावती, बाळापूर व सोलापूर याथे आढलेल्या आहेत असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. भंडारा मार्गावर असलेले पारडी हे गाव पूर्वी गाव असले तरी आज ते शहारत समाविष्ट करण्यात आले. पारडी परिसरातील पुनापूर छोटय़ा गावातील शेतात ही देवीची मूर्ती आढळली असल्याचा उल्लेख आहे.

भवानी मातेच्या मूर्तीला २५० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. ही मूर्ती भोसलेकालिन असावी असे पुरातत्व विभागाचे मत असल्याची माहिती मंडळाचे सहसचिव दिवाकर धोपटे यांनी दिली. ही मूर्ती जमिनीतून फक्त मानेपर्यंत वर आली असून  स्वयंभू असल्याचे बोलले जाते. त्यावेळी मुन्ना महाराज नावाचे एक गृहस्थ भवानी मातेची पूजा करीत असत. एकदा माता त्यांच्या स्वप्नात आली आणि वर काढ मला असा तिने आवाज दिला. हे ऐकून मुन्ना घाबरले पण त्यांनी हिंमत करून परिसरातील पाच सहा जणांना ही गोष्ट सांगितली. त्यामुळे सगळ्यांनी त्या भागात खोदकाम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खोदकाम सुरू असताना मातेचा मुखवटा दिसून आला. मानेपासून वर मुखवटा असलेली २ ते अडीच फुटाची असलेली करंड पद्धतीचा मुकूट धारण केलेला मुखवटा दिसून आला अशी या देवीची कथा आहे. माहुरच्या देवीची प्रतिकृती मानल्या जाणाऱ्या भवानी मातेच्या अतिशय देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पारडी भागातील पुनापूरमध्ये छोटय़ाशा जागेत असलेल्या या मंदिराचे लालचंद मालू या भाविकांच्या मदतीने जिर्णोद्धरा करण्यात आला असून त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याक आले आहे. २००६ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यानंतर भवानी मता सेवा समिती स्थापन करून ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या भागात भव्य उभारण्यात आले असून मंदिराच्या परिसरात भक्तासाठी सभागृह आणि खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

नवरात्र उत्सवात कोराडीप्रमाणे भवानी देवीच्या दर्शनाला नागपूरातील नाही तर विदर्भ , छत्तीसगड, मध्यप्रदेशमधील भाविक मोठय़ा प्रमाणात येत असतात. मंदिराच्या आजूहाजूचा परिसराचे शुशोभिकरण करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात सात आठ आठ लोक दर्शनासाठी येत असतात. सकाळी ५ वाजता भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागतात. मंदिर परिसरात हॉस्पिटल बांधण्यात आले असून त्यामध्ये गोरगरीब लोकांना विविध सुविधा दिल्या जातात. येणाऱ्या काळात १०० बेडचे अत्याधुनिक साधन असलेले हॉस्पिटल बांधण्याचा मंदिर व्यवस्थापनाचा विचार आहे. परिसरात धर्मशाळा असून अनेक कार्यक्रम त्यात होत असतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय मंदिरातर्फे केली जाते. नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवात होमहवन, जागरण आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. महाप्रसादाचा लाभ एक ते दीड लाख भाविक घेत असतात.   

Sahastrachandi Devi story in Marathi Ayachit Mandir Nagpur





Chandrapur Mahakali story in Marathi

Chandrapur Mahakali Photo

chandrapur cha itihas marathi
chandrapur history in hindi
chandrapur mahakali story in telugu
mahakali temple chandrapur
chandrapur gond raja history in marathi
chandrapur chi mahakali mandir
chandrapur mahakali story in english
chandrapur mahakali mandir history in telugu

Mahalaxmi Devi story in Marathi

Mahalaxmi Devi story in Marathi



mahalaxmi story in marathi
mahalaxmi chi mahiti marathi madhe
mahalaxmi chi katha marathi
margashirsha mahalaxmi vrat katha in marathi
mahalaxmi vrat katha in marathi mp3 free download
mahalakshmi vrat katha in marathi pdf download
mahalaxmi mahatmya book
mahalaxmi chi kahani marathi

Saptashrungi Devi story in Marathi language

Saptashrungi Devi Photo

saptashrungi devi story in marathi language

saptashrungi chi katha marathi
saptashrungi devi story in hindi language
saptashrungi devi images
saptashrungi devi real story
saptashrungi devi upasana
saptashrungi stotra in marathi
saptashrungi train
saptashrungi devi temple website

Bhavani mata story in Marathi

Tulja Bhavani photo



tulja bhavani
tulja bhavani chi katha marathi
tuljapur
tulja bhavani pooja vidhi in marathi
tulja bhavani image
tuljapur tulja bhavani information in marathi
tulja bhavani temple official website
tulja bhavani marathi picture

tulja bhavani mantra
bhavani name love
bhavani name in telugu
bhavni meaning

tulja bhavani photo
bhavani temple

 

 

नवरस आणि देवी शिल्पे : एक अनुभव - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनम् 

त्रैलोक्यातील समस्त भावांचे प्रस्तुतीकरण किंवा अनुकीर्तन म्हणजे नाट्य. भरतमुनींच्या रससिद्धांतानुसार नाट्य म्हणजेच काव्य. या सूत्रामधून खरंतर या लेखमालेचा जन्म झाला, असे म्हणता येईल.
शिल्पकलेचा अभ्यास करताना मला कायम असे वाटते, शिल्प म्हणजे खरेतर काव्यच आहे. शब्दरूपा पेक्षा साक्षात साकार रूपातील एक काव्य. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर जेव्हा परमोच्च भाव प्रकट होतो, तेव्हा त्याच्या प्रस्तुतीकरणाची यथार्थ अभिव्यक्ती म्हणजे शिल्प. कलेची अभिव्यक्ती ही दोन पद्धतीने होत असते. नृत्य, नाट्य आणि संगीत हे कला प्रकार सादरीकरणाच्या आधारे रसिकांपर्येंत पोहोचवले जातात. दृश्यकला या माध्यमात चित्र, शिल्प किंवा हस्तकलेच्या सहाय्याने कलाकार त्याची कला सदर करतो. या दोनही पद्धतींमध्ये माध्यम आणि त्यांना उपलब्ध मंच म्हणजे साधने ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृतीही भिन्न असतात आणि त्यातून रसग्रहण ही भिन्न होते. तरीही भारतीय कलाशास्त्राने सर्व कलांचा एकमेकांशी असलेला संबंध स्वीकार केला आहे. यथा नृत्ते तथा चित्रे त्रैलोक्यानुकृतिःस्मृता त्यामुळेच विष्णुधर्मोत्तर पुराण नृत्य-नाट्य, चित्र- आलेख्य आणि प्रतिमा यांना समर्पित आहे. शिल्पकलेतून होणाऱ्या या रसभाव दर्शनामुळे शिल्पांचे अर्थ अनेकदा आपल्याला समजतात, त्यामुळे या लेखांच्या माध्यमातून हा विचार पुढे मांडण्याचा माझा प्रयास होता.

  • नवरस आणि देवी शिल्पे 

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही बिंदुना स्पर्श करणारे सौंदर्यमूलक सूत्र म्हणजे प्राचीन भारतीय कला. कला ही एक अशी अभिव्यक्ती आहे जिच्या माध्यमातून कलाकार त्याचे आत्मज्ञान, चिंतन आणि कौशल्य यांच्या आधारे संकल्पनांना यथार्थ रूपामध्ये साकार करत असतो. ही कलाकृती म्हणजे कलाकाराची भावप्रेरीत सृजनात्मक कल्पना असते. भारतीय समाज हा बौद्धिक, सौंदर्यमूलक, अध्यात्मिक मूल्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे देवी शिल्पातून साकार झालेले हे कलाविश्व नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत प्रस्तुत केले आहे.

  • शृंगार रस – उमा महेश्वर आलिंगन मूर्ती

रस म्हणजे केवळ ज्ञानेंद्रियांना होणारी अनुभूती आहे, पण कवी, शिल्पकार, कलाकार ती साक्षात साकार करतात हे अनुभवणे रसिकाला आत्मिक आनंद प्रदान करतो. उमा महेश्वर या दम्पातींच्या अद्वितीय प्रेम आणि दिव्य शृंगार रसतील त्याची अभिव्यक्ती शिल्पकारांनी साक्षात साकार केली आहे.

  • हास्य रस – सप्तमातृका

शिल्पकारांची कल्पकता आणि त्यातून निर्माण होणारा हास्य रस कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका शिल्पपटातून दिसतो.

  • करुण रस – त्रिपुरा

देवीचे स्वरूप म्हणजे प्रथम ती माता आहे, जगतजननी आहे. त्यामुळे आईच्या ठायी करुण भाव हा असतोच. वाईट शक्ती आणि अज्ञान यांचा नाश करून देवी भक्ताला सुरक्षा, शांती आणि अभय प्रदान करते. देवीच्या हृदयात भक्तासाठी असलेला दयाभाव तिच्या करुणामयी रूपचे दर्शन घडवतो.

  • रौद्र रस – काली

क्रोधातून उत्पन्न होणारा हा रौद्र रस देवी कालीच्या विविध शिल्पामधून आपल्याला दिसतो.

  • वीर रस – महिषासुरमर्दिनी

महिषासुरमर्दिनीच्या या शिल्पात देवीचा दृढनिश्चय, अविचल भाव, स्थिरता, धैर्य, शौर्य, चातुर्य या सर्वांचा मिलाफ दिसतो. या युद्ध वीर रसातील महिषासुरमर्दिनीचे देवी शिल्प म्हणजे स्त्री शक्तीचे साकार दर्शन घडवते. 

  • भयानक रस – करालवदना

भयानक रसाची निर्मिती करताना दुष्ट किंवा वाईट दिसणारे, क्षय किंवा लुप्त होणारे, प्राणघातक असे भय उत्पन्न करणारे करणारे दर्शन म्हणजे देवी करालवदना.

  • बीभत्स रस – चामुण्डा

देवी शिल्पांमधील अत्यंत महत्त्वाचा विग्रह; शाक्त पंथातील अतिशय उग्र, संहारक आणि भयानक स्वरूपाची देवता म्हणजे चामुण्डा. बीभत्स स्वरूपाचे दर्शन देणारी चामुण्डा, माता स्वरूपिणी कशी हे या लेखामध्ये मांडले आहे.

  • अद्भुत रस – अर्धनारीश्वर

पुरुष-प्रकृती तत्त्वातील सामरस्य दाखवणारे हे अर्धनारीश्वर शिल्प दिव्य अद्भुत रसाची अनुभूती देते. अर्धनारीश्वर स्वरूपातील अद्भुत रसाचा परामर्श या लेखामध्ये घेतला आहे.

  • शांत रस – सर्वमंगला

रससिद्धांतातील आणि नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हा शेवटचा, नववा रस.. शांत रस.
सर्वमंगला देवीच्या शिल्पातील शांत रसाच्या अभिव्यक्तीने मोक्षप्राप्तीचा राजमार्ग कसा समृद्ध झाला आहे हे या लेखातूनच समजेल.

 

शांत रस - सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमुनींच्या मते सर्व रसांची परिणीती अखेर शांत रसातच होते. त्यामुळेच आचार्य अभिनवगुप्तही शांत रसाला सर्वश्रेष्ठ मानतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसुत्रीतील अंतिम चरण म्हणजे मोक्ष साधन. त्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षप्राप्ती, तेच शांत रसाचे लक्ष्य आहे. त्यामुळे शांत रसाचे महत्त्व अधिक वाढते.

न यत्र दुःखं न सुखं न चिन्ता न द्वेषरोगौ न च काचिदिच्छा|
रसः स शान्तः कथितो मुनीन्द्रैः सर्वेषु भावेषु समप्रमाणः||

ज्या ठिकाणी सर्व भाव-भावनांचे समत्व साध्य झाले आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी सुख, दुःख, चिंता, राग, द्वेष, इच्छा असे काहीही शिल्लक राहिले नाही त्याला शांत रस म्हणतात. 

शमस्थायिभावात्मको मोक्षप्रवर्तकः|

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात शम हा शांत रसाचा स्थायीभाव म्हटले आहे. त्यामुळे स्वाभाविकच शांत रसाची उत्पत्ती तप आणि योगीसंपर्क, वैराग्य, चित्तशुद्धी यांसारख्या विभवातून होते.

मोक्षाध्यात्मसमुत्थस्तत्त्वज्ञानार्थहेतुसंयुक्तः |
नैःश्रेयसोपदिष्टः शान्तरसो नाम सम्भवति ||

मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असते ते अध्यात्मिक ज्ञान. या अध्यात्मिक ज्ञानातून शांत रस उत्पन्न होतो. तत्त्वज्ञानामध्ये असलेला सहेतूक अर्थ म्हणजेच निर्वेद आणि मोक्षज्ञानासाठी सांगितलेली वचने या सर्वांमध्ये शांत रसाचा अंतर्भाव असतो. त्यामुळे इतर आचार्यांच्या मते निर्वेद, शांत रसाचा स्थायीभाव मानला आहे. तर काही आचार्यांनी जुगुप्सा, उत्साह, धृती यांना शांत रसाचा स्थायीभाव मानले आहे.

विष्णूधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्र, शांत रसाची व्याख्या पुढीलप्रमाणे करते – 

यद्दत्सौम्याकृतिध्यानधारणासनबन्धनम् |
तपस्विजनभूयिष्ठं तत्तु शान्तरसे भवेत् ||

कृतींमधून सौम्यता, ध्यान धारण करण्याची योगिक स्थिती, तपस्वी लोकांप्रमाणे चेहऱ्यावरील शांत आणि सौम्य भाव, शांत रस अभिव्यक्त करतात.

भारतीय परंपरेतील अनेक शिल्पे, शांत रसानुभूत देणारी आहेत. बुद्ध, जैन तीर्थंकर, विष्णू-शिव यांसारख्या हिंदू देवतांचे योग साधनेतील अनेक विग्रह या शांत रसाचे परिचारक आहेत. देवी शिल्पांमध्येही सरस्वती, ब्राह्मी, ललिता यांसारख्या अनेक देवी विग्रहातून शांत रसाचे ग्रहण करता येते. पण आपण बघणार आहोत ते देवीचे सर्वमंगला हे स्वरूप.   

सर्वमंगला 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ||

सर्वांचे मंगल करणारी मांगल्या, जी स्वतः मंगलमयी आहे, जी तिच्या भक्तांचे साध्य सफल करते, अश्या त्या नारायणीला माझा नमस्कार असो. दुर्गा सप्तशतीतील हा श्लोक, देवीच्या मंगलकारी स्वरूपाचे स्मरण करणारा आहे.

देवीचे सर्वमंगला हे स्वरूप अत्यंत सौम्य आणि मंगलकारी आहे. सर्वमंगला देवीचा उल्लेख विष्णुधर्मोत्तरपुराण आणि शरभ तंत्रामध्ये येतो. तिची कांती सुवर्णमयी असावी असा उल्लेख आहे. दिव्य आणि उज्ज्वल अलंकारांनी देवीला सजवलेले असावे. चतुर्भुज देवीच्या उजव्या हातामध्ये अक्षमाला असावी तर डाव्या हातामध्ये शक्ती किंवा पाण्याचा कलश असावा, असे वर्णन येते. शरभ तंत्रानुसार सर्वमंगला देवी तिच्या भक्तांना धन-संपत्ती प्रदान करणारी आहे. इथे मात्र तिच्या दोन हातांपैकी एका हाताची अभय किंवा वरद मुद्रा असावी आणि दुसऱ्या हातामध्ये मातुलिंग असावे असा उल्लेख येतो. ती सिंहावर बसलेली दाखवतात. क्वचित सुंदर अश्या कमळावर ती बसलेली दाखवतात. वास्तूविद्या दीपार्णव या ग्रंथामध्ये सर्वमंगला देवीला, सरस्वती देवीच्या स्वरूपापैकी एक मानले आहे. त्यामुळे सरस्वती देवीप्रमाणे तिचे वर्णन येते.
वस्त्रालंकार संयुक्ता सुरूपा म्हणजेच वस्त्र आणि अलंकारांनी जिचे स्वरूप अतिशय सुंदर दिसत आहे. सुप्रसन्न्ना म्हणजेच जी स्वतः प्रसन्न वदना आहे.  सुतेजाक्षा म्हणजे जी स्वतः तेजाने परिपूर्ण आहे ,अशी ती देवी म्हणजे सर्वमंगला.

Goddess Sarvamangala, Odisha, 12th century AD
ओडिशा मध्ये इ.स. 12 शतकातील या देवी शिल्पामध्ये सर्वमंगला देवी ललितासनात म्हणजे एक पाय खाली सोडून आणि दुसरा दुमडून, कमळावर बसलेली आहे. तिच्या पीठाखाली सिंह शिल्पांकित केला आहे. देवीच्या मागच्या हातामध्ये अक्षमाला आणि कमळ आहे. पुढचा एक हात भक्तांना अभय प्रदान करणारा आहे, तर दुसऱ्या हातामध्ये छोटा पाण्याचा गडू किंवा कमंडलू आहे. तलम, अशी रेशमीवस्त्रे तिने धारण केली आहेत. सर्व उज्ज्वल असे अलंकार तिने धारण केले आहेत. डोक्यावर जटामुकुट आहे. मस्तकावर त्रिनेत्र आहे. सर्वमंगला देवीच्या या शिल्पात तिचा मुखावर हलके स्मित आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील सौम्य भाव सहज दिसतोय. तिचे अर्धोन्मीलित म्हणजे अर्धे झाकलेले डोळे शांत रसाची अनुभूती देत आहेत. सर्वमंगला देवीच्या शिल्पातील शांत रसाच्या अभिव्यक्तीने मोक्षप्राप्तीचा राजमार्ग समृद्ध केला आहे, गरज आहे ती फक्त योग्य दृष्टीची, जी ही अभिव्यक्ती समजावून देऊ शकेल.

 

अद्भुत रस - अर्धनारीश्वर : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

दिव्यश्चानन्दजश्चैव द्विधा ख्यातोऽद्भुतो रसः |

रससिद्धांतामधील शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक आणि बीभत्स यानंतर येतो तो रस म्हणजे अद्भुत रस. भरतमुनींचे नाट्यशास्त्र अद्भुत रसाचे दोन भेद स्पष्ट करते. अद्भुत रसाचा पहिला भेद म्हणजे दिव्यअद्भुत, ज्यामध्ये दिव्यत्त्वाची प्रचीती येते. अद्भुत रसाचा दुसरा भेद म्हणजे आनन्दज अद्भुत, ज्यामध्ये या प्रकारच्या रस निष्पत्तीने आनंदाची अनुभूती येते. अमरकोशात अद्भुत रसाची व्याख्या विस्मयोद्भुतमाश्चर्य चित्रम् अश्या प्रकारे आली आहे. अमरकोशातील उल्लेखाप्रमाणेच विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभव आहे.

विस्मयस्य सम्यक् समृद्धिः अद्भुतः|
सर्वेन्द्रियाणां ताटस्थ्यं वा | 
– रसतरंगिणी

म्हणजेच विस्मयाची चांगल्या प्रकारे समृद्धी किंवा सगळ्या इंद्रियांना तटस्थता किंवा स्तंभ प्राप्त होणे याला अद्भुत रस म्हणतात. अद्भुत रसामध्ये सर्व इंद्रिये अभिभावित होतात आणि काही काळ निचेष्ट बनतात. जिज्ञासेतून अद्भुत रसाची प्रवृत्ति दाखवली जाते. रूप परिवर्तन सारख्या कला म्हणजे साक्षात माया. असंभवची संभवात झालेली अभिव्यक्ती विस्मय निर्माण करते आणि त्यातूनच अद्भुत रस निष्पत्ती होते.

देवी शिल्पामधील असाच विस्मय निर्माण करून दिव्य अद्भुत रसाचे दर्शन घडवणारा विग्रह म्हणजे पार्वती परमेश्वर यांचे अर्धनारीश्वर स्वरूप. 

अर्धनारीश्वर

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ । 

कवीकुलगुरू कालीदास रचित रघुवंश या महाकाव्याच्या प्रारंभीच अर्धनारीश्वर रूपाला नमस्कार केला आहे. वरील श्लोकामध्ये कालिदास असे म्हणतात की, शब्द व त्याचा अर्थ यांचे सम्यक ज्ञान व्हावे अश्या पद्धतीने एकमेकांशी निगडीत झालेल्या वाणी आणि अर्थ यांच्याप्रमाणे एकमेकांत मिळून गेलेल्या जगताचे मायबाप अश्या पार्वती-परमेश्वरांना मी वंदन करतो. 

अर्धनारीश्वर हे स्वरूप विस्मय निर्माण करणारे आहे. पुरुष-प्रकृती तत्त्वातील सामरस्य या शिल्पामधून समजून घेता येते. शिवशक्तीची नित्य समरसता म्हणजे अद्वैत असे मानले आहे. या दोनही तत्त्वांच्या सामरस्याची सुरुवात दिसते ती उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमध्ये. पार्वती परमेश्वर या दम्पतींच्या शृंगार रसाचे दर्शन आलिंगन शिल्पातून अभिव्यक्त होते. या दिव्य, मुग्ध प्रेमातून शिव स्वरूपाला झालेला स्वयं साक्षात्कारामुळे हे ऐक्य साध्य होते. प्रकृती स्वरूप पार्वतीच्या दिव्यत्त्वाची प्रचीती येऊन शिव-पार्वती, अर्धनारीश्वर रूपाने संपूर्ण सृष्टीला दिव्य अद्भुत रसाचा साक्षात्कार घडवतात. शिव पार्वतीच्या शृंगार रसाचा परमोच्च बिंदू म्हणजे अद्भुत रसाच्या रूपात साकार होणारे हे अर्धनारीश्वर स्वरूप. शिवागामातील अद्वैतांत शक्तीचा म्हणजे मायेचा त्याग केलेला नसून ब्रह्मशक्ती म्हणजे तिचा संग्रहच केला आहे. माया ही प्रकृतीस्वरूपा असून महेश्वर तिचा धरणकर्ता आहे. स्वात्मपरिचयातून निर्माण होणारी जिज्ञासा विस्मय निर्माण करते जी या शिल्पांमधून शिल्पकारांनी साकारली आहे.

अर्धनारीश्वरचे स्वरूप हे शिल्पकारांसाठीही आकर्षक विषय ठरला असणार हे भारतभर आढळणाऱ्या वेगवेगळ्या शिल्पांमधून स्वाभाविकच दिसते. 

Ardhanarishvara, National Museum Delhi.

अंशुमदभेदागम, कामिकागम, सुप्रभेदागम, कारणागम या आगम ग्रंथात तसेच शिल्परत्न, बृहत्संहिता, विष्णुधर्मोत्तर पुराण आदि ग्रंथांमधून अर्धनारीश्वर विग्रहाचे स्वरुप-वर्णन बघायला मिळते. अर्धे शरीर पुरुषाचे आणि अर्धे नारीचे म्हटल्यावर दोनही शरीरांची ठेवण, त्यांचा बांधा, लवचिकता, नाजूकता या सर्वच गोष्टींचा प्रतेक्ष मूर्ती साकारताना अतिशय बाराकाईने विचार केला गेला आहे. उजवे अर्धे शरीर हे पुरुषाचे म्हणजे शिवाचे आणि वामंग म्हणजे डावे अर्धे शरीर हे स्त्रीचे म्हणजेच पार्वतीचे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आणि त्यावर चंद्रकोर असते. तर पार्वतीची, धम्मिल्ल प्रकारची केशसज्ज असते. शिवाच्या मस्तकावर अर्धा त्रिनेत्र असतो तर पार्वतीच्या मस्तकावर उभा अर्धा तिलक असतो. दोघांच्या शरीरावर असलेली आभूषणे आणि वस्त्रेही वेगवेगळी दाखवली जातात. शिवाच्या कानांमध्ये नक्रकुंडले, सर्पकुंडले असतात तर पार्वतीच्या डाव्या कानांमध्ये कुंडले असतात. दंडावरील केयूर , हातामधील कंकणे आणि पायामधील वलये यांमध्ये फरक असतो. पार्वतीची आभूषणे नाजूक आणि अधिक कोरीव दाखवतात. शिवाच्या कमरेपासून गुडघ्यापर्येंत नेसलेले व्याघ्र वस्त्र असते तर पार्वतीच्या कमरेपासून ते पायापर्येंत सुंदर असे नक्षीयुक्त मुलायम, तलम रेशमी वस्त्र दाखवले जाते. अर्धनारीश्वर मूर्तीमध्ये दोन, तीन किंवा चार हात दाखवतात. चतुर्भुज मूर्ती असेल तर शिवाकडे त्रिशूळ, परशु, अंकुश, अक्षमाला, टंक, अभय किंवा कराव अश्या मुद्रा शिल्पांकित करतात. पार्वतीच्या डाव्या हातामध्ये नीलोत्पल, दर्पण, पोपट किंवा कधी कधी तिच्या हात कट्यावलंबित अवस्थेमध्ये तिच्या मांडीवर स्थिरावलेला दाखवतात. शिव नंदीच्या डोक्यावर हात ठेऊन शरीराचा भार किंचितसा झुकवल्याने पार्वतीच्या शरीराला आपोआपच सुडौल अशी अवस्था प्राप्त होते.

इ.स 6- 7 व्या शतकातील घारापुरी या लेणीमध्ये शिव-पार्वतीचे भव्य असे अर्धानिश्वर हे स्वरूप बघण्यासाठी देव-देवता, ऋषिगण, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, समस्त दिशापाल, संपूर्ण देवलोकच या शिल्पपटामध्ये अवतरीत झाला आहे. हा दिव्य अद्भुत रसाने व्याप्त सोहळा शिल्पकारांनी साक्षात शिल्पामधून साकार करून या अद्भुत रसाची अनुभूती अनंत काळापर्यंत डोळ्यात साठवून घेण्यासाठी ठेऊन गेले आहेत.

Ardhanarishvara, Elephanta Caves 6-7 century AD.

 

बीभत्स रस - चामुण्डा : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi


नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत आत्तापर्यंत शृंगार रस, हास्य रस, करूण रस, रौद्र रस, वीर रस आणि भयानक रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार आहोत.

देवी विग्रहातून व्यक्त होणाऱ्या नवरसांमधील आणखीन एक रस म्हणजे बीभत्स रस. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये बीभत्स या रसाचे दोन भेद सांगितले आहेत. बीभत्स रस हा क्षोभण म्हणजे शुद्ध आणि उद्वेगी म्हणजे अशुद्ध या दोनही स्वरूपात अभिव्यक्त होतो. बीभत्स रसाचा स्थायीभाव जुगुप्सा आहे. अप्रिय, अनिष्ट पदार्थाचे किंवा अवस्थेचे अवलोकन होणे किंवा करणे यात बीभत्स रस निष्पत्ती होते.  

बीभत्स रसासाठी चित्रसूत्रही अश्याच प्रकारची व्याख्या देते – 

श्मशान गर्हिता घात करणं स्थानदारूणम् |
यच्चित्रं चित्तविक्षेप्तृ तद्वीभत्सरसोद्भवम् ||

स्मशान, घृणित, घात करणारे किंवा विकट अश्या पद्धतीच्या चित्रणातून बीभत्स रस उत्पन्न होतो.

देवी शिल्पांमध्ये बीभत्स रस दर्शवणारी काही शिल्पे येतात. त्यात अलक्ष्मी, चामुण्डा आणि तिचे विविध विग्रह, योगिनी अश्या शिल्पांमधून बीभत्स रसाचे दर्शन होते.

चामुण्डा

Goddess Chamunda, Odisha State Museum 8th century AD.

देवी शिल्पांमधील अत्यंत महत्त्वाचा विग्रह; शाक्त पंथातील अतिशय उग्र, संहारक आणि भयानक स्वरूपाची देवता म्हणजे चामुण्डा. देवी-माहात्म्यातील काली देवी, शत्रू सैन्यावर त्वेषाने तुटून पडते, तेव्हा तिचे स्वरूप अधिकच विक्राळ बनते. देवी काली चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांचा संहार करून चामुण्डा हे नावं धारण करते. चामुण्डेला मातांमधील श्रेष्ठ माता म्हणून मातृकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे.  चामुण्डेचा प्रथम उल्लेख हा मत्स्य पुराणामध्ये अंधकासूर वध या प्रकरणामध्ये येतो. जेथे अंधाकासुराचे रक्त प्राशन करण्यसाठी स्वतः शिव काही मातृकांची निर्मिती करतो त्यापैकी एक म्हणजे चामुण्डा. पुढे अग्नीपुराण, मार्कंडेय पुराणातील देवी-माहात्म्यातून चामुण्डेच्या उद्भव, स्वरूप आणि तिच्या पराक्रमाचे वर्णन येते.

विचित्रखट्वाङ्गधरा नरमालाविभूषणा ।।
द्वीपिचर्मपरीधाना शुष्कमांसातिभैरवा ।
अतिविस्तारवदना जिह्वाललनभीषणा ।।
निमग्नारक्तनयना नादापूरितदिङ्मुखा । 

चामुण्डा म्हणजे भयानक, अक्राळ कृष्ण मुख असलेली, जी हातामध्ये तलवार आणि पाश घेऊनच ती शत्रुंसमोर येते. विचित्र खट्वांगं धारण करणारी, जिच्या गळ्यात नरमुण्डमाला आहे. वाघ किंवा चित्याचे चर्म कमरेला गुंडलेले आहे. शरीरावरील मांस सुकलेले, केवळ हाडांचा सापळ्याप्रमाणे तिचे रूप दिसत आहे. प्रचंड मोठे मुख आणि त्यातून बाहेर आलेली जीभ यांमुळे तिची भयावहता, उग्रता अजूनच वाढली आहे. तिचे डोळे आत गेलेले आणि क्रोधाने लाल झालेले आहेत. 

चामुण्डेच्या स्वरूपाची कल्पना विष्णूधर्मोत्तर पुराणातील पुढील श्लोकातून होते. 

लम्बोदरी तू कर्तव्या रक्ताम्बरपयोधरा |
शूलहस्ता महाभागा भूजप्रहरणा तथा || 
बृहद्रथा च कर्तव्या बहुबहुस्तथैव सा |
चामुण्डा कथिता सैव सर्वसत्ववशङ्करी ||
तथैवान्त्रमुखी शुष्का शुष्का कार्या विशेषतः |
बहुबाहूयुता देवी भुजंगैःपरिवेष्टिता ||
कपालमालिनी भीमा तथा खट्वांगंधारिणी ||

मनुष्य आणि सर्व प्राणीमात्रांना जी ताब्यात करण्याची ताकद ठेवते ती म्हणजे चामुण्डा. जिचे उदर ओघळून खाली आले आहे आणि जिचे स्तन हे लाल वस्त्राने झाकलेले आहेत. हातामध्ये शूल धारण करणारी ही विज्ञाता (विख्याता) जिचे बाहूच धारधार शस्त्राप्रमाणे आहेत. ती एका मोठ्या रथात (?) बसलेली आणि अनेक हात असलेली अशी अंकित करावी. ती आतडी भक्षण करताना दाखवावी, तरी ती क्षीण किंवा शुष्क देह असलेली असावी. तिच्या गळ्यामध्ये मुण्डमाला असावी आणि तिच्या भोवती सर्प अंकित करावेत. खट्वांगं धारण करणारी आणि अतिशय भयावह अशा तिचा निर्माण करावा. 


Goddess Chamunda Line Drawing, Odisha State Museum 8th century AD.

भारतच्या उत्तरेला म्हणजे बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आणि राजस्थान भागात चामुण्डेचे अंकन हे उभे केस असलेली, लम्बस्तनी, हाडांचा सापळा झालेली देहयष्टी, मुण्डमाळा धारण केलेली अंगावर साप आणि पोटावर विंचू असलेली अंकित केलेली आढळते. चामुण्डा स्थानक, त्रिभंग अवस्थेत नाचताना किंवा ललीतासनात बसलेली दाखवतात. चार, आठ, बारा किंवा सोळा भुजा असलेली तिची शिल्पे भारतभर अनेक ठिकाणी बघायला मिळतात. तिच्या हातामंध्ये त्रिशूल, ढाल, खड्ग, धनुष्य, पाश, अंकुश, बाण, कुऱ्हाड, दर्पण, घंटा, वज्र, दंड, वरद, मुण्ड, कपाल, खेटक अश्यी विविध आयुधे असतात. क्वचित मागच्या दोन हातांमध्ये तिने हत्तीचे कातडे धरलेले दिसते.

ती प्रेतावर आरूढ असलेली दाखवावी. त्रिनेत्र धारण करणारी आणि डोळे खोल आत गेलेले असावेत. तिच्या भोवती अमंगल, अप्रिय वाटणारे घुबड, जंबुक, सर्प, विंचू तसेच स्मशानवासी म्हणजे तिचे साधक किंवा सेवक यांचे अंकन असते.

देवी चामुण्डेचे शिल्प बघताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की तिचा विग्रह हा बीभत्स स्वरूपाचे दर्शन घडवणारा असला तरी, ती भक्तावर अनुग्रह करणारी ही देवी माता स्वरूपिणी आहे. तिच्या उग्र, भयानक स्वरूपाची धडकी ही अनैतिक कर्म करणाऱ्यांच्या मनात सदैव रहावी यासाठी आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे संहारानंतर सृजन हे चक्र सुरु असते, त्याप्रमाणेच चामुण्डेचे हे रूप समजून घेणे आवश्यक आहे. तिचे हे भयावह स्वरूप वाईट शक्तीचा संपूर्ण नाश करून नवनिर्मितीसाठी पूरक असल्याने जवळपास सर्वच मध्ययुगीन मंदिरांवर देवी चामुण्डेची स्वतंत्र शिल्पे शिल्पकारांनी कोरली आहेत. हा शुद्ध बीभत्स रस अमंगळ संपवून मंगलता प्रदान करणारा मानावा. काळावर असलेले तिचे आधिपत्य स्वीकारून नतमस्तक होणाऱ्या भक्ताला चामुण्डा अभय देणारीच आहे. 

 

भयानक रस - करालवदना : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस शृंगार जो उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून आपण अनुभवला. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये हास्य रस बघितला. देवीच्या त्रिपुरा या रूपातून करूण रसाची अनुभूती घेतली. क्रोधाने रौद्र रूप धारण केलेल्या कालीचे स्वरूप बघितले. महिषासुरमर्दिनीच्या रूपात वीर रसातील उत्साह अनुभवला. या लेखामध्ये देवीच्या काली स्वरूपातील दुसऱ्या शिल्पातून व्यक्त होणारा भयानक रस आपण बघणार आहोत.

रससिद्धांतामधील सहावा रस आहे भयानक रस, ज्याचा भय हा स्थायीभाव. त्यामुळे थरथर कापणे, तोंडाला कोरड पडणे, चिंता, चक्कर येणे, पळून जाणे हे या रासामधून उद्भवणारे अनुभाव आहेत.

गात्रमुखदृष्टिभेदैरुरुस्तम्भाभिवीक्षणोद्वेगैः 

म्हणजेच चेहरा आणि डोळ्यांमधील भाव, रंग आणि स्थितीमध्ये होणारा बदल हे भयाचे लक्षण आहे. अभिविक्षण म्हणजे भय दाटल्यामुळे होणारी डोळ्यांची हालचाल. उद्वेग म्हणजे मन विचलित होणे. दैन्य, सम्भ्रम, चिंता, सम्मोह, त्रास हे भयानक रसाचे संचारी भाव आहेत. 

विष्णुधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्र पुढील श्लोकात भयानक रसाचे वर्णन करते –

दुष्टदुर्दशनोच्छुष्कहिंस्त्रव्यापादकादि यत् |
तत्स्याभ्दयानकरसे प्रयोगे चित्रकर्मणः ||

चित्रामध्ये भयानक रसाची निर्मिती करताना दुष्ट किंवा वाईट दिसणारे, क्षय किंवा लुप्त होणारे, प्राणघातक असे भय उत्पन्न करणारे चित्रण करावे.

करालवदना काली

Goddess Karalvadana Kali, Madhya Pradesh, 7-8 century AD

देवी शिल्पामध्ये भय रसाचा उद्भव देवीच्या काली विग्रहातून निर्माण होतो. कालीचे स्वरूप रौद्र रस बघताना जाणून घेतलेच आहे. त्यामुळे तिच्या शिल्पातील भयानक रसाचे रसग्रहण करू. इ.स. सातव्या – आठव्या शतकातील ही मूर्ती सध्या दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात आहे. मध्यप्रदेश येथून ही मूर्ती सापडलेली आहे.

चतुर्भुजा करालवदना देवी समपाद स्थानक म्हणाजे तिच्या दोनही पायांवर समान भार देऊन उभी आहे. तिची देहयष्टी स्थूल आहे. चेहऱ्यावर उग्र भाव आहेत. मिटलेले मोठे डोळे, प्रमाणापेक्षा जाड ओठ आणि मोठे नाक यांमुळे तिच्या रूपामध्ये भयानकता वाढली आहे. केशरचना बघितली तर जटांचा केशसंभार कवट्यांनी सुशोभित केला आहे. तिच्या गळ्यामध्ये एखाद्या पुष्पमाळेप्रमाणे रुळावा तसा नाग रुळत आहे. या फणा काढलेल्या नागाचे तोंड तिने तिच्या उजव्या हातामध्ये पकडले आहे. या फणा काढलेल्या नागाचे तोंड तिने तिच्या उजव्या हातामध्ये पकडले आहे. तिच्या पुढच्या दोनही हातांमध्ये मानवाची मुंडकी आहेत. मागच्या उजव्या हाताने सर्प पकडला आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे. या दोनही हातांच्या खोबणीत उजवीकडे त्रिशूळ आहे आणि डावीकडे दण्ड. देवीच्या हातातील नरमुंडाचे रक्त प्यायला जंबुक दोन पायावर उभे आहेत. देवीच्या पायाशी दोनही बाजूला वाघ सदृश्य प्राण्यांचे अंकन केले आहे. एकूणच ह्या शिल्पामधून देवीच्या भयप्रद मूर्तीचे दर्शन होत आहे.

 

वीर रस - महिषासुरमर्दिनी : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

बलपराक्रमशक्तीप्रतापप्रभावादीभिर्विभावैरुत्पद्यते

बल, पराक्रम, शक्ती, प्रताप आणि प्रभाव या विभावांमुळे ज्या रसाचा उद्भव होतो, तो म्हणजे वीर रस. उत्साह हा वीर रसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे याला सात्विकता लाभली आहे. दया-वीर, दान-वीर, धर्म-वीर आणि युद्ध-वीर असे वीर रसातील विविध भाव व्यक्त होतात. याशिवाय असुर वीर आणि लोभ वीर या संकल्पनाही वीर रसाशी निगडीत आहेत.

अर्थात देवीचे युद्ध वीर स्वरूपातील रणरागिणीचे रूप शिल्पकारांनी महिषासुरमर्दिनीच्या शिल्पांमधून अभिव्यक्त केले आहे. नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत पूर्वी प्रस्तुत झालेल्या देवीच्या शृंगार, हास्य, करुण आणि रौद्र रसापेक्षा वीर रसातील महिषासुरमर्दिनी स्वरूपाची लोकप्रियता भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून दिसते. त्यामुळे प्राचीन नाण्यांवर, मंदिराच्या बाह्य भिंतींवर, स्वतंत्र शिल्प रूपामध्ये किंवा चित्र रूपामध्ये दुर्गेचे दर्शन होते.

महिषासुरमर्दिनी

देवी दुर्गेचा उद्भव महिषासुराचा विनाश करण्यासाठीच झाला होता. देवी दुर्गेच्या मूर्तीचा विचार केला तर, इ.स. पहिल्या शतकापासून तिच्या विविध रूपांचे अंकन झाल्याचे भौतिक पुरावे सापडतात. कुषाण काळातील टेराकोट्टा फलकांवर दुर्गेचे मूर्त रूप साकार झालले दिसते. गुप्त काळामध्येही ती जनसामान्यांमधील लोकप्रिय आणि पूजनीय देवता होती. याशिवाय तंत्र साहित्य, आगम आणि शिल्प ग्रंथही दुर्गेच्या महिषासुरमर्दिनी स्वरूपाचे वर्णन करतात. शिल्परत्न या ग्रंथामध्ये देवी कात्यायनी म्हणजेच महिषासुरमर्दिनी स्वरूप आहे असा उल्लेख येतो.

महिषासुरमर्दिनी या विरांगनेचा उद्भव आणि स्वरूप समजून घेण्यासाठी मात्र मार्कंडेयपुराण, वामन पुराण, वराह पुराण, शिव पुराण, स्कन्द पुराण, देवी भागवत, कलिकापुराण अश्या पुराणांचा आधार घ्यावा लागतो. रम्भ या दैत्याचा पुत्र म्हणजे महिषासूर. तपोबलाच्या जोरावर महिषासुर ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करतो की, त्याला कोणत्याही पुरुष देवांकडून मृत्यू येणार नाही. त्यामुळे देवतांना हरवून महिषासुर स्वर्गावर त्याचे आधिपत्य स्थापन करतो. इंद्र आणि इतर देव ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवांच्या संगण्यावरून विष्णू आणि शिव यांना सर्व देव शरण जातात, आणि झाला प्रकार कथन करतात. महिषासुराच्या उदामपणाचा संताप येऊन भगवान विष्णूच्या मुखातून तेजाग्नी बाहेर येतो, तसेच दिव्य तेज शंकरातून उत्पन्न होते. अश्याच प्रकारे सर्व देवतांमधून तेज प्रकट होऊन ते एकत्रित होते. या दिव्य तेजातून स्त्री उत्पन्न होते, ती देवी कात्यायनी.

प्रत्येक देवांच्या तेजाने देवीच्या सर्वांगाचा उद्भव होऊन साक्षात असुरमर्दिनी प्रकट होते. भगवान शंकराच्या तेजापासून देवीचे मुख तयार होते. यमाच्या तेजाने तिचे लांब सडक काळेभोर केस तयार होतात. विष्णूच्या तेजाने संपन्न अश्या तिच्या अठरा भुजा तयार होतात. चंद्रमाच्या तेजाने देवीचे स्तनमंडल तयार होतात. देवेंद्राच्या तेजाने कटीप्रदेश तर वरुण देवाच्या तेजाने तिच्या मांड्या आणि पाय तयार होतात. भूमीदेवीच्या तेजाने नितंब, ब्रह्मदेवाच्या  तेजाने पावले आणि घोटा, सूर्यदेवाच्या तेजाने हाताची बोटे आणि वसू देवतांच्या तेजाने पायाची बोटे तयार होतात. यक्षराज कुबेराच्या तेजाने नासिका उत्पन्न होते. दक्ष प्रजापतीच्या तेजाने दंतपंक्ती तर वायू देवाच्या तेजाने तिचे कान बनतात. अग्नी देवाच्या तेजाने तिसरा नेत्र देवी धारण करते. संध्या देवीच्या तेजाने तिच्या भुवया तर अरुण देवाच्या तेजाने तिचे ओठ तयार होतात. 

समस्तदेवानां तेजोराशिसमुद्भवाम्

समस्त देवतांच्या तेजाने उद्भवलेल्या दुर्गा देवीचे स्वरूप अतिशय मोहक, निश्चल असे असते. सर्व देवता दुर्गेला महिषासुराच्या वधासाठी त्याची अस्त्रे आणि शस्त्रे अर्पण करतात.

शिवाकडून देवीला त्रिशूळ आणि विष्णूकडून चक्र प्राप्त होते. वरुणाकडून शंख आणि पाश, अग्नीकडून शक्ती, यमाकडून काल-दण्ड. वायू धनुष्य तर सूर्य तेजस्वी बाण प्रदान करतो. इंद्र त्याचे वज्र आणि ऐरावताच्या गळ्यातील घंटा देतो. कुबेराकडून महाशक्तिशाली गदा आणि त्याचे दिव्या मधुपात्र देतो. ब्रम्हाकडून कमण्डलु, कालाकडून धारधार असे खड्ग आणि संरक्षक अशी ढाल प्राप्त होते. विश्वकर्माकडून तेजस्वी असा परशु आणि अनेक प्रकारचे अस्त्र, अभेद्य कवच देवीला प्राप्त होते. समुद्रदेव देवीला उज्ज्वल असा पुष्पहार देतात. दिव्य चूडामणी, जटामुकुटाची शोभा वाढविण्यासाठी अर्धचंद्र, कानांमध्ये दोन कुंडले, दंडामध्ये केयूर, पायांत रुळणारी नाजूक नुपूरे, गळ्यात कंठाहार, हातांमध्ये दिव्य कंकण, बोटांमध्ये  विवध रत्नजडित अंगठ्या, ही सर्व आभूषणे प्रदान करतात. हिमालय पर्वत देवीला सिंह हे वाहन अर्पण करतो.

अनंत सूर्याचे तेज जिच्यामध्ये एकवटले आहे, अश्या त्या देवी दुर्गेच्या आवेशपूर्ण गर्जनेने समस्त आकाश, पृथ्वी हादरून जातात. त्या दिव्य गर्जनेचे प्रतीध्वनी असुर सेनेच्या मनात कंप निर्माण करतात. असुर सेनेशी अविश्रान्तपणे देवी युद्ध करताना तिच्या चेहऱ्यावर परिश्रम, थकवा यांचा तिळमात्रही लवलेश नव्हता.

Goddess Mahishasuramardini, Pala 12th century AD.

अश्याच स्वरूपात ती शिल्पातून साकार झालेली दिसते. हे महिषासुरमर्दिनीचे शिल्प इ.स 12 शतकातील पाल शैलीतील आहे. अतिशय मोहक देह असलेली परंतु तिच्या देहबोलीतून आवेग, उत्साह सळसळताना दिसतो आहे. त्रिभंग अवस्थेमध्ये ती उभी असलेली दाखवतात. तिचा उजवा पाय सिंहावर आणि डावा पाय महिषाला पायाने दाबताना दाखवतात. त्यामुळे डावा पाय थोडा उचललेला म्हणजे अलिढ आसनात दिसतो. देवीच्या सोळा हातांमध्ये डावीकडून असुराच्या छातीत घुसवलेला त्रिशूळ, चक्र, अंकुश, वज्र, हातोडी, शक्ती, खड्ग आणि बाण ही आयुधे आहेत. उजव्या हातामध्ये ढाल, धनुष्य, घंटा, दर्पण, सूची मुद्रा, ध्वज आणि पाश ही आयुधे आहेत तर एका हाताने असुराचे केस पकडलेले आहेत. कमळावर वीर रसपूर्ण देवी विग्रह, असुराचे निर्दालन करताना शिल्पांकित केला आहे.

महिषासुरमर्दिनीच्या या शिल्पातून  दृढनिश्चय, अविचल भाव, स्थिरता, धैर्य, शौर्य, चातुर्य या सर्वांचा मिलाफ दिसतो आहे. या युद्ध वीर रसातील महिषासुरमर्दिनीचे देवी शिल्प म्हणजे स्त्री शक्तीचे साकार दर्शन घडवणारे आहे.

 

रौद्र रस - काली : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये रौद्र रसाची कर्मे म्हणजे या रसामुळे काय काय होते हे पुढील श्लोकातून व्यक्त करतात – 

ताडनपाटनपीडनच्छेदनप्रहरणशस्त्र – सम्पातसम्प्रहाररुधिराकर्षणाद्यानि कर्माणि

ताडन म्हणजे शरीरावर प्रहार करून मारणे, पाटन म्हणजे तुकडे तुकडे करणे, पीडन म्हणजे दाबणे, छेदन म्हणजे एकमेकांपासून वेगळे करणे या सर्व कर्मांमध्ये रौद्र रसाचा अंतर्भाव आहे.

देवी शिल्पामध्ये अश्याच क्रोधात्मक रौद्ररूपाचे दर्शन होते, ते तिच्या काली या स्वरूपात. देवीचे काली स्वरूपातील शिल्प आणि त्यातील रौद्र रस अनुभवण्यापूर्वी तिचे स्वरूप आणि उद्भव बघणे अधिक संयुक्तिक ठरेल. देवी कालीचे स्वरूप मार्कंडेय पुराण, लिंगपुराण, देवी भागवत यांसारख्या पुराणांमधून तर तंत्र साहित्यातून अधिक स्पष्ट होते. पार्वतीचे उग्र स्वरूप म्हणजे काली. काळावर तिचे अधिराज्य आहे म्हणून तिला काली म्हणतात. 

कालसङ्कलनात् काली सर्वेषामादि रूपिणी |
कालत्वादादिभूतत्वादाद्या कालीति गीयते ||

म्हणजेच काली देवी, तिच्या ठायी काळाचे संकलन करते. तिच अंत आणि तीच आरंभ स्वरूपिणी आहे. कालत्व अर्थात ज्या गुणांचा स्वीकार करून काल उत्पन्न होतो, तो गुण तिच म्हणजे काली. काळाचा प्रारंभही तिच्यापासून होतो त्यामुळे तिला आद्या असेही म्हणतात.

काली उत्पत्तीच्या विविध कथा आहेत. देवीचे दशम महाविद्या स्वरूपात ही पूजन होते. परंतु देवी कालीचा रौद्र हा स्थायीभाव, मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात वर्णिला आहे. 

ततः कोपं चकारोच्चैरम्बिका तानरीन्प्रति |
कोपेन चास्या वदनं मषीवर्णमभूत्तदा ||
भृकुटीकुटिलात्तस्या ललाटफलकाद्द्रुतम् |
काली कराल वदना विनिष्कानतासिपाशिनी ||

चण्ड-मुण्ड यांच्या असुरी सेना देवीवर धनुष्य ताणून उभी आहे, हे बघून अंबिकेचा चेहरा रागाने काळा पडतो, तिच्या भुवया क्रोधाने चढतात आणि त्यातून साक्षात कालीचा उद्भव होतो. तिचा चेहरा काळा आणि हातामध्ये खड्ग आणि खट्वांगं धारण केलेले असे उग्र रूपात ती असुरांपुढे येते.

Goddess Kali, Hoysaleshwar Temple, Halebid 12th century AD.

शिल्पकाराने देवी कालीची अनेक रौद्र रूपे शिल्पांमधून अभिव्यक्त केली आहेत. युद्धभूमीवर तिच्या रौद्र रूपाने थैमान घातले आहे. त्यामुळे तिचा युद्धभूमीवरील हा रौद्र तांडव नृत्यशिल्पांतून अभिव्यक्त होतो. कर्नाटक, हळेबिड येथील होयसाळेश्वर मंदिरावर रौद्ररुपिणी कालीचे शिल्प बघायला मिळते. हे शैव मंदिर इ.स. 12 शतकात होयसळ राजवंशातील विष्णूवर्धन याने बांधले आहे. होयसळ शैलीतील या शिल्पामध्ये षड्भुजा काली नृत्य करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला तिचे सेवक, गण आहेत. खड्ग, सर्प, डमरू, त्रिशूळ, कपाल आणि नरमुण्ड तिच्या हातांमध्ये तिने धारण केले आहे. सालंकृत कालीच्या गळ्यातील रुण्डमाळा रुळत आहे. क्रोधाने तिचे डोळे विस्फारलेले आहेत. एकूणच चेहऱ्यावरील रौद्र भाव सहज टिपता येत आहे. त्यामुळे रौद्र रसातील तिच्या या शिल्पातून उत्साह, आवेग, चपळता, उग्रता यांचे दर्शन होत आहे.

 

करुण रस - त्रिपुरा : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra

Dhanalaxmi

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत आत्तापर्यंत आपण, उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून शृंगार रस आणि मागच्या लेखातून सप्तमातृका पटातील हास्य रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्प आणि करुण रस याची माहिती घेऊया. 

करुण रसाचा स्थायीभाव शोक आहे. नाट्यशास्त्रामध्ये या रसाची व्याख्या करताना शाप, क्लेश, पतन, वियोग, हानी, मृत्य अश्या विभावांमुळे करुण रस उत्पत्ती होते असे सांगितले आहे. आचार्य श्रीशंकुक यांच्या मते दयायुक्त हृदयाचा भाव करुण मानला आहे. अर्थात हे मत नाट्यशास्त्रदृष्टीने तितकेसे मान्य नाही. परंतु शिल्पशास्त्र आणि रसभाव यांचा एकत्रित विचार करता देवी शिल्पांमध्ये करूण रसासाठी आचार्यांचे मत समर्पक ठरु शकते. देवी शिल्पाच्या तत्त्वातून, दयाभावातून निर्माण होणारी करुणा अधिक योग्य पद्धतीने समजू शकते.

चित्रसूत्रात करुण रसाला पुढीलप्रमाणे श्लोकबद्ध केले आहे – 

याञ्चाविरहसंत्यागविक्रियाव्यासनादिषु |
अनुकम्पितकं यत्स्याल्लिखेत्तेत्करुणे रसे ||

म्हणजेच चित्रामध्ये करुण रस दाखवताना याचना, वियोग, त्याग, विपदा किंवा आपत्ती अश्या पद्धतीची परिस्थिती दाखवावी.  वरील श्लोकाचा आधार घेत देवी शिल्पामधील करुण भाव समजून घेऊ.

प्राचीन काळापासून भारतीय परंपरेत स्त्री-देवता हा एक महत्त्वाचा भाग होता आणि आजही तो आहे. जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये देवीची माता या स्वरूपात पूजा होत आली आहे. मातृदेवतांची पूजा आणि त्यांचे प्राबल्य पूर्वीपासूनच दिसते. देवीच्या जगन्माता स्वरूपात मनुष्याने सृजन, भरण, पोषण, क्षमा, शांती, दया, ममत्व कल्पून तिची कृपा आणि तिचा वरदहस्त प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. देवीच्या सौम्य, रौद्र आणि भयानक अश्या सर्वच रूपांमध्ये ती करुणामयी असल्याचे पुरावे पुराणकथांमधील तिच्या वर्णनावरून मिळतात.

कारुण्यरूपा त्रिपुरा

Goddess Tripura

देवीच्या माता स्वरूपांमध्ये स्थायीभाव हा करुणा आहे. त्यामुळे वाईट शक्ती आणि अज्ञान यांचा नाश करून भक्ताला सुरक्षा, शांती प्रदान करते. शिल्पांमध्ये देवीची अनेक स्वरूपे ही करुण रसाची उदाहरणे म्हणून घेता येतील. Elements of Hindu Iconography मध्ये गोपीनाथ राव यांनी त्रिपुरा या देवीचा उल्लेख केला आहे. गौरीचे एक स्वरूप म्हणजे त्रिपुरा. चतुर्भुजा देवीच्या मागच्या दोन हातामध्ये अंकुश आणि पाश ही दोन आयुधे आहेत. तिचे पुढील दोन हात हे अभय आणि वरद प्रदान करणारे शिल्पांकित केलेले असतात. भद्रपीठावर पद्मासनात त्रिपुरा बसलेली शिल्पांकित केली आहे. डोक्यावर जटामुकुट आणि त्रिनेत्र असे तिचे स्वरूप आहे. वर म्हटल्याप्रमाणे देवीच्या हृदयात भक्तासाठी दयाभाव उत्पन्न झाला तर करुण रस म्हणता येईल. देवीचे अभय आणि वरद हस्त तिच्या करुणामयी भावाचे दर्शन या शिल्पातून घडवत आहेत. अभय हस्ताच्या रूपात भक्तांना अभय देणारी आणि वरद हस्ताच्या रूपात या औदार्याच्या बदल्यात काहीही न मागता सर्वांवर दयादृष्टी हा भाव देवीच्या मूर्तीमधून प्रतीत होत आहे.

भक्ताला अभय देणारे देवी शिल्प महाबलीपुरम येथील वराह गुंफेमध्येही बघायला मिळते. या शिल्पामध्ये चतुर्भुजा देवी स्थानक म्हणजे उभी आहे. तिच्या मागच्या हातामध्ये चक्र आणि शंख आहे, डोक्यावर छत्र आहे. एक हात कटावलंबित म्हणजे मांडीवर स्थिरावला आहे, तर दुसऱ्या हाताने ती भक्ताला अभय देत आहे. या शिल्पपटात तिच्या पायाशी असलेला भक्त स्वतःचे शीर देवीला अर्पण करीत आहे. येथे चित्रसूत्रात सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या त्याग भावनेतून करुण रस उद्भवलेला दिसतो, ज्यामुळे देवी त्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाली आहे.

 


https://tusharki.blogspot.com/2023/10/blog-post.html

शीतलादेवी!


शीतलादेवी!


     महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारख्या देवता सर्वत्रच आहेत. या देवतांपैकीच एक वैशिष्टयपूर्ण देवता म्हणजे ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’.




उरण शहरात देवीची काही मंदिरे आहेत. यामध्ये जरीमरी देवीचा समावेश असला तरी ‘उरणावती, शितळादेवी, गावदेवी’ अशी तीन नावे धारण केलेली एकच देवी देऊळवाडीत विराजमान आहे. हे या देवीचे एक पुरातन मंदिर आहे. याच तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे.



दिघोडे-पनवेल रस्त्यानजिक असणारे हे लहानसे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये शीतलादेवीसह इतर भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या आधारे हे स्थान पुरातन असल्याचे लक्षात येते. नविन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे.

रायगड जिल्ह्यातील शितलादेवीचे सुप्रसिद्ध स्थान कोणते?

अलिबाग जवळील चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शीतलादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून, त्याकाळापासून प्रसिद्ध आहे. शीतलादेवीचे हे जागृतस्थान समजले जाते. खरंतर हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ बांधले होते. परंतु कालांतराने ही खाडी गाळ व भरावाने व्यापून जमिनीचा भाग वाढला आहे. यापूर्वी एकदा मंदिराचा जीर्णोद्धार १७५९ मध्ये झाला होता. आंगरे घराण्याची या देवतेवर दृढ भक्ती होती. सध्या पूर्वीचे  लाकडी व कौलारू मंदिर पाडले असून त्याच जागेवर १९९० साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे मंदिर बांधण्यास सुरूवात झाली. जीर्णोद्धार करताना गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीची मूळ जागा तीच ठेवण्यात आली आहे. शीतलादेवीच्या दर्शनासाठी रायगडसह सातारा, पुणे, रत्नागिरीहूनही बरेच भाविक दर्शनासाठी येतात.

     या मंदिरांबरोबरच पालघर जिल्ह्यातील केळवे  येथे स्थानापन्न असलेली शीतलादेवी खूप प्रसिद्ध आहे.



यापैकी बऱ्याच ठिकाणी साधारण कोरीव दगड ही शितळा म्हणून पुजली जाते. शीतलादेवीच्या जुन्या काळातील कोरीव प्रतिमाही आढळल्या आहेत. सर्वसामान्यपणे देवीच्या चतुर्भूज मूर्ती आढळतात. परंतु काही ठिकाणी सहा, आठ, दहा आणि  बारा हात असलेल्या प्रतिमाही मिळाल्या आहेत. स्कन्द पुराणात शीतलाष्टक नावाने देवीचे स्तोत्र दिले आहे. स्वत: भगवान शंकराने ही रचना केल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर शीतला देवीची आराधना करण्यासाठी पुढील मंत्र म्हटला जातो.

“वन्देऽहंशीतलांदेवीं रासभस्थांदिगम्बराम्।।

मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्।।

    अर्थात, गाढवावर विराजमान, दिगम्बरा, हातात झाडू आणि कलश धारण करणारी, मस्तकावर सूपाचे अलंकार घालणाऱ्या शीतला देवीला मी वंदन करत आहे.

 उत्तरप्रदेशात चैत्र महिन्याच्या कृष्णाष्टमीपासून शीतळादेवीच्या पूजेस प्रारंभ होतो. साधारणपणे आषाढ महिन्यापर्यंत येणारी प्रत्येक कृष्णाष्टमी देवीचा पूजा दिवस असतो. या दिवशी शीतला देवीची पूजा आणि बासोडा म्हणजेच शीळे जेवण करण्याची पद्धत आहे. देवीचे प्रमुख आयुध खूर आणि वाहन गाढव आहे. काही ठिकाणी अक्षमाला, कलश, धनुष्य, बाण, ढाल, त्रिशूल, डमरू, केरसुणी यांसारखी आयुधेही पहायला मिळतात. यांतील गाढव हे वाहन व हाती केरसुणी ही  रचना अक्कादेवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठा या देवतेशी साम्य दर्शवणारी आहे. गोवर, कांजिण्या, देवी वगैरे रोगांशी संबंधित असलेल्या या देवता. या रोगांचा संसर्ग झाल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी शीतलादेवीची पूजा करण्याची व देवीची गाणी म्हणजेच बायांची गाणी म्हणण्याची प्रथा अजूनही काही भागांत आहे. या सर्व कृतीतून रोग बरा होण्याची भावना या श्रद्धाळूंमध्ये असते.

     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे प्रतिसाद देणे हे तसे सर्व सजीवांचे वैशिष्ट्य. या सजीवांपैकीच एक असणाऱ्या मनुष्यप्राण्याचा इतिहास लाखो वर्षांचा. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे आपल्या एका पुस्तकात म्हणतात, “एखादा गूढ आवाज आला तरी तो कुठून आला हे कल्पनेने शोधण्याच्या प्रयत्नात मनुष्याने अदृश्य प्राणी निर्माण केले. नाना तर्क करून त्याने  भुते, यक्ष, देव, दानव, अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच इत्यादी बाबी कल्पिल्या; नंतर त्यांच्या राहण्याच्या जागा, स्थळे, प्रदेश व लोक निर्माण केले, आणि शेवटी त्यांच्या गुणाप्रमाणे रूपे निर्माण केली. इतकेच करून मनुष्य थांबला नाही, तर हे अदृश्य प्राणी रागावले तर पूजा, नैवेद्य व बळी देऊन त्यांची मर्जी संपादण्याचे मार्ग ठरवले. माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना यातून भूताची कल्पना केली. सुष्ट व दुष्ट भुते निर्माण झाली. वीज पडून मनुष्य मेला म्हणजे इंद्राने आपल्या वज्राने मारिला व पटकीने मेला म्हणजे मरीदेवीने मारला अशी भ्रांत समज असायची.”

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील भयंकर रोगांच्या साथी व हतबल झालेले लोक पाहता, जुन्या काळातील रोगांच्या साथींना तत्कालीन समाजाने दैवी प्रकोप मानणे स्वाभाविकच होते. 

    काळ बदलला असला तरी भाविकांची आपल्या श्रद्धेयाप्रती असणारी भावना कालातीत आहे. शीतलादेवी ही स्वच्छतेचे अधिष्ठान असलेली देवता आहे. तिच्या हातात असलेली केरसुणी व माथ्यावरील सूप स्वच्छतेचे आवाहन करणारी आहे. या देवतेला प्रसन्न करणे म्हणजेच आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखणे हाच अर्थ सद्य:काळात उपयुक्त ठरणारा आहे.


- तुषार म्हात्रे (tusharki)

 कार्ला आणि व्यापारी मार्गावरील मातृदेवता

      पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्या नजिकच्या एकविरा आईच्या दर्शनाला जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. इथले वातावरण, भाविकांच्या भावना आणि तरूणाईचा जोश या सर्वांच्या परिपाकातून इथली गर्दी निरंतरच असते. 

          आई एकविरेचे सुप्रसिद्ध मंदिर वेहेरगांव जवळील कार्ले डोंगरात वसले आहे. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत आईची तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. या देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे.

                                                            

 मंदिरावरील एका शिलालेखात इ.स. १७८८ साली मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने जिर्णोध्दार केला असल्याचा पुरावा मिळतो. पेशवे काळात १८१८ पर्यंत पेशव्यांच्या वतीने देवीसाठी मंदिरासमोरच नगार झडत होता. पेशव्यांनी एकविरा देवीच्या दिवाबत्तीची पुजेची सोय केली होती. जनार्दन स्वामी प्रित्यर्थ असा शीलालेख या नगार खान्यात आहे. तसेच मंदिर प्रवेशव्दाराच्या लोखंडी कमानीवर एका घंटेवर इ.स. १८५७ साल असल्याचे दिसते. ही अक्षरे इंग्रजीत कोरलेली आहेत. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. थोडक्यात उपलब्ध माहितीवरून हे मंदिर किमान उत्तर-मध्ययुगीन असल्याचे सांगता येईल.

        आता येथील सुंदर लेण्यांबद्दल बोलूया. कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यात एक अप्रतिम चैत्यगृह व इतर विहार आहेत. इसवी सना पूर्वीचे पहिले शतक ते इसवी सन पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेली आहेत. म्हणजे या बौद्ध लेणी बराच काळ आधी खोदल्या गेल्या असल्याचे आपण म्हणू शकतो. आता थोडे आणखी समजून घेऊया.  बौद्ध धर्माची मूळ स्थापना झाली ती भारतात व तो नंतर इतरत्र पसरला. पुढे आठव्या-नवव्या शतकात त्यास उतरती कळा लागली आणि १३ व्या शतकात त्याचा ऱ्हास झाला. तथागतांच्या सम्यक विचारांवर उभा राहीलेला हा धर्म जवळपास ७००-८०० वर्षे अस्तित्वात राहिला आणि आपल्या दुर्दैवाने हा धर्म ज्या भूमीत जन्मला तिथेच लोप पावला. बौद्ध धर्माच्या लोपानंतर बऱ्याचशा लेणी ओसाड पडल्या. अशा ठिकाणी काहीशे वर्षांनी मंदिर उभे राहीले. लेणी-मंदिर यांतील संबंधाचे ससंदर्भ मूळ जाणून घ्यायचे असल्यास बौद्ध धर्मावर अधिकारवाणीने बोलू शकणारे सुप्रसिद्ध संशोधक/लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या पुस्तकातील काही अंश पाहूया. ‘मातृदेवतांच्या पुजास्थानांचा अभ्यास’ या प्रकरणातील ‘प्रत्यक्ष क्षेत्र संशोधनातील माहिती’,  ‘व्यापारी मार्ग’ या मुद्द्यांतर्गत ते म्हणतात... “मातृदेवता असंख्य आहेत, कित्येकींना नाव देखील नसून त्यांचा उल्लेख नेहमी गटानेच होतो. यापैकी मावळाया या जलदेवता प्रसिद्ध आहेत. या शब्दाचा अर्थ ‘लहान आया’ असा  होतो. हे नाव या भागात दोन हजार वर्षांहून जास्त काळ परिचित आहे. कारण ‘मामाल-हार’ आणि ‘मामाळे’ ही नावे कार्ले येथील चैत्याच्या दर्शनी भागावर सातवाहन शिलालेखात खोदलेली आहेत, यावरून या भागाला ‘मावळ’ हे नाव खरे पाहता याच पंथावरून मिळाले आहे, असे म्हणता येईल.
                                    
 क्षैत्रिक संशोधनातून अनपेक्षितपणे असे दिसून आले की, अशा देवस्थानांपैकी अनेक देवस्थाने टेकड्यांच्या लहान उतारांवर आणि माथ्यापेक्षा खोऱ्याच्या जास्त जवळ, परंतु सध्याची वस्ती किंवा पाणवठा यापासून बऱ्याच अंतरावर असतात. कृषिपूर्व काळातील लोकांची स्थिर देवस्थाने त्यांचे नेहमीचे रस्ते एकमेकांस छेदत असत, तेथे तेथे देवाण-घेवाणीपूर्वीच्या मालाच्या अदलाबदलीसाठी,  तत्संबंधित समारंभ आणि सामाजिक विधीसाठी, अथवा जेथे अनेक गट आपले नैमित्तिक सुफलतेचे विधी एकत्र साजरे करत, अशाच ठिकाणी असणे आवश्यक होते. यासाठीच मातृदेवतांची मूळ देवस्थाने चौरस्त्यावरच असणे तर्कदृष्ट्या क्रमप्राप्त आहेत. या रस्त्यांचे व्यापारी मार्गात रुपांतर होणे तर्कशुद्ध मानता येईल. अहिंसा आणि शांततापूर्ण सामाजिक व्यवहार यांचा प्रचार करण्यासाठी या  प्रदेशांत दूरवर गेलेल्या बौद्ध भिक्षूंनीही सुरूवातीला हेच मार्ग वापरले असणे साहजिक आहे. त्यांच्या धर्माज्ञेनुसार रक्तबळींचा वापर थांबविणे आवश्यक होते आणि त्या प्रचारासाठी ही देवस्थाने याच सर्वात महत्त्वाच्या जागा होत्या. म्हणून ही देवस्थाने आणि उघडपणे मोठ्या व्यापारी मार्गाच्या छेदनबिंदजवळ असणारी महत्त्वाची बौद्ध लेणी यांचा काही दृश्य संबंध असणे आवश्यक आहे व अन्नोत्पादन सर्रास होऊ लागल्यानंतर झालेल्या मार्गातील बदलानंतरही तो संबंध पूर्णपणे नष्ट होत नाही. बौद्ध धर्माला,  सुरूवातीच्या काळात वैदिक पशुबळींच्या वाढत्या प्रचंड संख्येविरूद्ध केलेल्या निषेधामुळेच, आर्थिक यश मिळाले होते. 
                    बुद्ध लेणी ओसाड पडल्यानंतर त्यात प्राचीन दैवतांची पुन्हा स्थापना झाली. तथापि, बौद्धधर्माच्या खुणा पूर्णपणे बुजलेल्या नाहीत. कार्ले येथे यमाईच्या ‘प्रतिनिधी’ देवतेला पशुबळी फक्त दाखवला जातो. परंतु त्याचा वध बऱ्याच दूर अंतरावर करावा लागतो.”
 प्रथा, परंपरा कोणत्याही असोत. काळाप्रमाणे त्यात बदल होणे अपेक्षितच असते. संस्कृती आणि कला यांचा आदर राखून या परंपरा जतन करणे इष्ट ठरेल.


 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...