येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!
![]() |
| अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग ११८५ (हिजरी ) |
रोहीलखंडातील अफगाणांनी मराठ्यांविरोधात शुजा उद दौलाची मदत घेतली, पण त्या बदल्यातील रक्कम अदा करायला नकार दिला.
शुजा उद दौलाने इंग्रजांची मदत मागीतली, २३ एप्रील १७७४ ला मिरंपूर कत्रा च्या लढाईत इंग्रजांनी ४०,००० रोहिल्यांची फौज गारद केली. या लढाईत झालेल्या अत्याचार, लुटीवर बंगाल कौन्सीलने चौकशी कमिटी बसवली. वॉरन हेस्टीगच्या बाजूने साक्ष देणारा, गव्हर्नर जनरल च्या गळ्यातला ताईत बनला. पुढची सर्व कहाणी अवधच्या अनन्वीत लुटीची आहे. इंग्रजांच्याच शब्दात "त्याच्या छळाला कंटाळून झालेल्या बंडात १७८१ साली अवधच्या बेगमेच्या प्रेरणेने बनारसच्या राजा चैतसिंगाने ४००० ईग्रज शिपाई मारले, हान्नीला वाचवायला हेस्टीगला फौज पाठवावी लागली, हान्नी एखाद्या रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारखा प्रचंड संपत्ती घेऊन कलकत्त्यात परतला पण....
वर्षभरातच एक्केचाळीसाव्या वर्षी मरून गेला."
त्याच्या अफाट संपत्तीतील ही अंगठी,
"अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग ११८५ (हिजरी )" हा मजकूर कोरलेली.
वाचताना पर्शीयन नियमाप्रमाणे उजव्या खालच्या कोपऱ्यापासून सुरुवात करावी, नंतर वरच्या ओळीतील उजव्या बाजूने वाचावे.
फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन २- अरबी
![]() |
| अक्षराची भूमिती |
- अरबी सुलेखन - शैली
सुलेखन कलेत या लिपी इतके प्रयोग आणि वैविध्य इतरत्र क्वचितच सापडते. शंभरावर शैली प्रसिद्ध असल्या तरी त्यांचे- कुफि(कुफिक़) ही भौमितिकदृष्ट्या प्रमाणबद्ध आणि नस्ख, रुक़ा, तुलुथ आणि इतर लपेटीदार अक्षरशैली असे प्रमुख दोन प्रकार पडतात.
- कुफी
- तुलुथ
- नस्ख نسخه

- ता लिक़
तालिक़ म्हणजे टांगलेली, फारसी ने ९व्या शतकात संशोधित केलेली लिपी, यात शब्दातील अक्षरे एकमेकांना जोडली जाताना बेसलाईन पासून वर चढत जातात. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}

- दिवानी
ता’लिक़ वरून ओटोमान तुर्कांनी आपल्या दरबारी पत्रांसाठी तयार केलेली दिवानी लिपी, आपल्या गिचमीडपणात अव्वल आहे.
फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन
नेस्ख आणि तालिक़ या लिप्यांच्या संगमातून बनली ‘नेस्तालिक़’ लिपी. सुलेखन (खरं तर अक्षरचित्रे ) काढण्यासाठी हिचा फार उपयोग केला जातो. हिला अक्षरचित्रांची वधू(प्रियतमा) म्हणून लाडाने ओळखले जाते. कालौघात हिच्यात फार थोडे बदल झाल आहेत. ‘मीर अली तब्रीझी’ यांनी सातशे वर्षांपूर्वी तयार केलेले वळण इतकं संपूर्ण आहे की त्यात बदल असंभव!
![]() |
| जेम्स बालेन्टाईन यांनी स्कॉटीश नेव्हल आणि मिलिटरी अकादमी साठी केलेला चार्ट |
१००० वेळा वाचला गेलेला !
फार्सी भाषा
फार्सी लिपीचे प्रकार
भारतात पत्र लेखनासाठी वापरली जाणारी लिपी होती तालिक.
धर्म ग्रंथ लिहीण्यासाठी वापरली जाणारी ‘ नेस्ख’
पुस्तकलेखनात वापरली जाई.
फार्सी भाषा - अक्षरे आणि उच्चार
राजांचा राजा वगैरे वगैरे..
मजेशीर भाग म्हणजे जर याचे आंग्ल वाचन पाहिले तर
va-za-ra-ka \ xa-ša-a-ya-tha-i-ya \ xa-ša-a-
ya-tha-i-ya-a-na-a-ma \ xa-ša-a-ya-tha-i-ya \
da-ha-ya-u-na-a-ma \ vi-i-ša-ta-a-sa-pa-ha-ya-
a \ pa-u-ça \ ha-xa-a-ma-na-i-ša-i-ya \ ha-
ya \ i-ma-ma \ ta-ça-ra-ma \ a-ku-u-na-u-ša
vazraka xšâyathiya xšâ- वज्रक क्षायथिय क्षा-
yâthiânâm xšâyathiya यथियानाम क्षायथिय
dahyunâm Vištâspahy- दह्युनाम विष्तास्पह्य
a puça Haxâmanišiya पुश हक्ष्मनिषिय
hya imam taçaram akunauš ह्य इमम तशराम अकौनष
या भाषेचे संस्कृतशी साम्य जवळ जवळ बहिणीएवढे आहे. अखमेनियन हिला आर्यन भाषा अरिया या भागाच्या नावावरून म्हणत.
पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरथ्रुष्ट या संस्थापकांनी धर्म तत्वे याच भाषेत सांगीतली. अलेक्झांडर आणि अरबी आक्रमणातून वाचलेली तत्वे ७ व्या शतकात अवेस्तन लिपीत लिहीली गेली.
![]() |
| अवेस्तन |
अरब हल्ल्यानंतर ईस्लाम सोबत अरबी लिपी काही अक्षरांची भर घालून फार्सी ने स्विकारली.
ب बे "ब"
پ पे "प"
ت ते "त"
ث से "स्स" जिभेचे टोक पुढच्या वरच्या दातांना लावून स म्हटल्यावर हा उच्चार होतो
ج जिम "ज" जेवण मधला ज
چ चे "च" चिवडा मधला च
ح हे "ह" हा मधला ह
خ खे "ख" खाण्यातला ख
د दॉल "द"
ذ झॉल "झ"
ر रे "र"
ز झ्ये "झ्य" झक्कास मधला झ
ژ ज्ज "ज" दातांवर दात दाबून ज्य सारखा
س सीन "स"
ش शीन "श"
ص स्वाद "स"
ض झ्वाद "झ"
ط टो "ट"
ظ झो "झ"
ع ऐन "आ"
غ गैन "घ"
ف फे "फ"
ق काफ "क" हक मधला क
ک काफ "क"
گ गाफ "ग"
ل लाम "ल"
م मीम "म"
ن नून "न"
و वाव "व"
ی ये "य"
ه हे "ह"
फार्सी अक्षरे आणि उच्चार भाग दुसरा
- देवनागरी लीपीच्या उलट्या दिशेने फार्सी लिहिली वाचली जाते. म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण मराठी वाचतो पण फार्सी उजवीकडून डावीकडे लिहिली वाचली जाते. गेल्या हजारो वर्षाच्या सहवासानें मराठीत फार्सी शब्दांची रेलचेल आहे. हीच गोष्ट आपल्याला फार्सी वाचताना फार उपयोगाची पडणार आहे.
- मात्र देवनागरीत जसे काही अक्षरांचे आकार मिळतेजुळते आहेत तसेच फार्सीतही आहेत.
केवळ आकाराप्रमाणे वर्गीकरण
- क फ
- व ब
- ग म भ न
- प ष ण
- ख य
- र स श
- ट ठ ढ
- घ ध
- ङ ड इ ई ह
सुरुवातीला आपल्यालाही गोंधळात पडायला होईल पण बारकाईने लक्ष दिल्यास वाचणे सोपे होते.यातही अक्षरे शब्दाच्या सुरुवातीस वेगळी, मध्ये वेगळी, शेवटी वेगळी आहेत.
माझ्या निरीक्षणानुसार लिहिण्या आधी वाचण्याची तयारी करावी. जी सोपी आहे. गिरवून अक्षरे घटवून घेण्यापेक्षा साम्य शोधून वाचणे सोपे पडते.
फार्सी स्वरचिह्ने
| कस्र किंवा झेर ए / ई या साठी वापरतात. |
| फताः किंवा झबर आ / ऐ या साठी वापरतात |
| झम किंवा पेश ओ / उ / ऊ या साठी वापरतात |
.
फारसीत आकार उकार इकार यांच्या जागा देवनागरीच्या पेक्षा उलट्या आहेत, म्हणजे आकार डोक्यावर, उकार डोक्यावर आणि इकार पायातळी लिहिला जातो.
फार्सी अक्षरे
![]() |
| फारसी |
![]() |
| स+इ+ब= सीब |
![]() |
| गो स+फ़+न+द = गोसफंद (मेंढी) |
![]() |
| गाव(बैल) |
![]() |
| अ स+ब= अस्ब (घोडा) |
![]() |
| शुतुर |
दिवानी आणि अंक
सोपे शब्द
बाबा بابا
अ ब अ ब
मासा ماسا
खाला خالا
शॉर्टकट
या ठिकाणी प स त ब हि अक्षरें लिहिली आहेत उजवी कडून वाचल्यास ब त स प आणि बतसप
सुट्टी अक्षरे ओळखणे सोपे आहे, शब्दात मात्र उरले केवळ ठिपके.
खाली एक ठिपका म्हणजे ब ب
खाली तीन ठिपके म्हणजे प پ
वर दोन ठिपके म्हणजे त ت
वर तीन ठिपके म्हणजे स ث
د ذ ر ز ژ
या अक्षरात काहीच बदल होत नाहीत, उजवी कडून वाचल्यास द ज र झ झ्य .
ن
न हे अक्षर शब्दात वर एक ठिपका होते
س ش سش
स श वरच्या तीन ठिपक्यांनी वेगळी होतात
ض ص صض
या अक्षरात काहीच बदल होत नाहीत,
ط ظ
या अक्षरात काहीच बदल होत नाहीत,
ع غ عغ عغعغ غعغع
य/अ आणि ग -ही अक्षरे सुरुवातीस आणि शेवटी विळ्या सारखी होतात, मध्ये भरीव गाठ होतात
ف ق فق
क फ -ही अक्षरे पोकळ गाठीने ओळखता येतात.
گ ک
क ग -ही अक्षरे फारशी बदलत नाहीत.
ح خ ج چ حخجچ چجخح
च ख ज ह -ही अक्षरे बाणाचे टोक आणि ठिपक्याच्या जागेने संख्येने ओळखता येतात.
फारसी शब्द.
ओळखीचे शब्द
बहीण - ख्वाहर पेय - शरबत
पिता - पिदर आसव - शराब
माता - मादर दुध - शीर
कन्या - दुख्तर दारू - मय
संतान - फर्जंद द्राक्ष - अंगूर
माळी - बागबान फळबाग - बाग
फुलबाग - बागच्या
खुर्ची - कुर्सी टेबल - मैज
खेडे - दिह
अक्कल - अकल शहर - शहर
सेना - सिपाह सैनिक - सिपाही
सेनापती - सिपह्सालार
हवा - हवा वारा - बाद
उजवा - रास्त
वर - बाला
अश्व - अस्ब बैल - गाव
उंट - शुतूर गाढव - खर
बिबट्या - पलंग सिंह - शेर
बर्फ - बरफ
इजारः - भाडे,अंशदान (इसारा)
इजारःदार - शेतकरी
अज्यल - मृत्यूवेळ
अख्तर - नक्षत्र
अझ- पासून
इझार - पॅंट
आसामी - नावे , यादी
उस्तुरः - वस्तारा
आस्तीन - बाही
इस्तबल - तबेला
उश्तर -उंट
बानु - राजकन्या,
बावर्ची स्वयंपाकी बल्लव
बबर - सिंह
बाकी - शिल्लक
बद्फियाल - खोडकर
बराबर - एकसारखा
बास - पुरेसे
बस्तन - बांधणे
बस्तः - बांधलेला
बिर्यान -fried,
बशीर - चांगली बातमी आणणारा.
बगल - काख
बकर - बैल/ गाय
बकाल (बक्काल) - वाणी
बले - होय
बारीक
बिन- पुत्र
बिन्त -कन्या
बंदर -port
बंदी - कैदी
बंदन - घट्ट बांधणे
बेदर - जागणारा
पासंग- ठराविक वजनाची वस्तु वजन म्हणून वापरणे.
पा - पाय
पाबंद - घोड्याचे पुढचे पाय बांधायचा दोर
पापोश- स्लीपर
पालुदा - खीर फ़ालुदा
पाजामा पायजमा
पाजी -क्षुद्र माणूस, नीच
पाचक - वाळ्लेले शेण
पाय - पाय
परवानगी
परी
पुश्ती - पाठिंबा
पुश्तक - जाकीट
पिंजरा
प्यादा पदाति
पियाला -पेला
पेच स्क्रू
पिरान (कवठे पिरान मधील)- वृध्द, जुने [ दुसरा अर्थ पीराच्या दर्ग्याला दिलेले गाव]
पिर - वृद्ध, सोमवार
पेश्तर - आधी, लवकर,
तारीख
तहत च्या खाली
तहसील वसूल
तरकीब संयुगे
तराना
तिसा नऊ
तस्सु- बार्ली च्या चार दाण्या इतके वजन, अंतर
तलखी - कडवट पणा
तमाशा - दर्शकांना दाखवला जाणारा
तमाशगाह थिएटर
तंग
तमाम सर्व
जुघ(ग)- जू बैलाच्या मानेवरील
जुलूस राज्याभिषेकाची मिरवणूक
जमाबंदी जमिनीची मोजणी
जुंद -(लष्करी ) झुंड
जौहरी जवाहिरा
चाबूक
चादर
चाब्लूस स्तुतिपाठक
चपाती
चपकन कोट
चखाचख -(तलवारीन्चा ) खणखणाट
चरम कातडे
चीक पडदा
चकमक गारगोटी
चिकन - भरतकाम कशिदा
चमचा
चोब- लाकूड
चोब्दार चोपदार
चिनी - पोर्सेलीनच्या वस्तू
हबशी- निग्रो
हजामत
हिर्मान- हिरमोड
हिस्सा
हलुवा- हलवा
रोज- दिवस
दर - दरवाजा
दरगाः - प्रवेशद्वार
दोकान - दुकान
फ़र्श - गालीचा
गबाब - भाजलेला
शकर - साखर
नाजुक
फार्सी शब्द महसूली
अबोआब (अब्वाब) - जमीनी वरील कर
अब्वाब फ़ौजदारी - शुजा खानाने बसवलेला कायम स्वरूपी कर
अब्वाब तनेबदारी - बाजारातल्या दुकानांवर आकारलेला कर
अदबक - छोटे माप/ वजन
अदालत - न्यायालय
अब्दाबंदी - कर्ज परतफेडीचा काळ
अबुक अब्वाब - मुर्शीदाबाद किल्ल्याच्या चुन्यासाठी अलिवर्दी खानाने लादलेला कर
अजारब - शेत
अजारबदार - शेतकरी (सारा देणारा)
आखरी हिसाब खर्चा/
वसूल बाकी खर्चा -वर्ष आखेरीस रयतेच्या खात्याची केवळ शिल्लक
आखरी जमा वसूल बाकी
आखरी निकास -परगणा/ तरफ आणि गावकामगार, रयत यांचा तळेबंद
आबदार खाना - सरबत (बर्फात ठेवून) थंड करायची खोली
बासनी - बासरी
बाला घाट - वरचा घाट
पाईन घाट - खालचा घाट
बट्टा - रुपयाचा विनिमय दर
ब हाल - आजच्या प्रमाणे कायम करणे
बहाली सनद -(पूर्वी काढून घेतलेली) मालकी परत करणे
बजन्तरी महाल -वाजंत्री वाले आणि नर्तकांवरील कर
ब्रिन्जारा - ब्रिन्ज= तांदूळ, आरा - आणणे (वंजारी) सैन्याला रसद पुरवणारा.
गज - लांबी मोजण्याचे माप
तीन प्रकारचे गज होते, लांब मध्यम आखूड, लांब गजाने जमीन मोजत. त्याचे २४ भाग करीत, प्रत्येकाला तसू म्हणत.
नाम
- लिंगविचार:
- पुरुष - मर्द स्त्री - झन
- मुलगा - पिसर मुलगी - दुख्तर
- सिंह - शेर ए नर सिंहीण - शेर ए मादा
- बैल - गाव ए नर गाय - मादा गाव
- मेंढा - गौच मेंढी - मैष
- घोडा - नरयान घोडी - मादेयान
- कोंबडा - खुरूस कोंबडी - माकेयान
पुरुष : मर्द - मर्दान
स्त्री : झन -झनान
निर्जीवांचे अनेक वचन ‘हा’ प्रत्यय जोडून होते.
*जरी हे सर्व प्रकार प्रतिष्ठित भाषेत वापरले जात असले तरी नेहमीच्या भाषेत ‘हा’ प्रत्ययाने अनेक वचन दाखवता येते.
विषेशणे
- तर तम भाव
- हिन्द अज इन्ग्लिश्तान गरमतर
- भारत इंग्लंड हून अधिक उष्ण
- शिरीन तरीन मीवाहा अन्गूर
- सर्वात गोड फळ द्राक्ष
गम - गमगीन - दु:खद
शर्म- शर्म आगीन- लज्जास्पद
शर्म- शर्म सार - लाजलेला
औमीद - औमीद वार - आशावादी
दानश - दानश उर - ज्ञानी
खेरद - खेरद मन्द - शहाणा
जहर - जहर नाक- विषारी
खौफ़ - खौफ़ नाक - भीती दायकसा, आसा, वश, आना, शान, वार या प्रत्ययांनी सारखेपणा दाखवतात
मर्द - मर्दाना - पुरुषा सारखे
सिहर - सिहर सा - जादू सारखा
काही वेळा द्वित्व ( दोन वेळा ) वापरून मध्ये अलेफ़ लिहीतात.झन - झनाना - स्त्रीयांसाठी योग्य
लब अ लब - लबालब - काठोकाठ
सर अ सर - सरासर - पूर्ण
। प्रत्यय
आपला मान
तुझा अत
तुमचा तान
त्याचा अश
त्यांचा शन
म्हणजे बघा,
माझे घर - खाना आम
माझे पिता - पिदरम/ पिदर ए मन
आपले पिता - पिदरेमा/ पिदर ए मान
माझे स्वत:चे पुस्तक - किताब ए खुदम
त्याचे स्वत:चे पुस्तक - किताब ए खुदीश
माझा मित्र - दोस्तम
प्रश्न
काय - चे
कोठे - कोजा
कधी - केय
कोणता - कोदाम
कसा - चे तुर
का - चेरा
किती दूर - चेगादर दूर
किती जवळ - चेगादर नजदिक
किती - चेगादर
‘रा’ हा प्रत्यय ‘ला’ प्रमाणेच वापरतात.
कोणाला - केरा
का/ कशाला - चेरा
व्यक्ती साठी,
कोण - की
कोणता माणूस - कुदाम मरद
कोणता रस्ता - कुदाम राह
हर
whosoever जो कोणी - हरेक
whatsoever जी काही(वस्तू) - हरचीज
हरचेwhichsoever जो कोणता - हर कोदाम
whensoever जेंव्हा कधी - हर वक्त
जिथे कुठे - हर कजा
हर जादररोज - हररोज
दररात्री - हरशब
दोन्ही - हरदू
प्रत्येक - हर यक
प्रत्येक गोष्ट - हर चीज
प्रत्येक जण - हर कस
प्रत्येक ठिकाणी - हर जा
प्रत्येक रात्री - हर शब
कोणत्याहीप्रकारे - बहरहाल
सर्व ठीक आहे ना? - हमे चि दुरोस्त ए ?
काही अडचण नाही (नो प्रॉब्लेम) - मुश्केली निस्त
संख्या -अंक
चि दानन्द मर्दूम कि दर जामा
नवीसीन्दा दानद कि दर नामा चीस्त---------सादी(गुलिस्तां)
[माणूस कसा ओळखावा, की कपड्याच्या आत कोण आहे? लेखकालाच माहीत की पत्रात काय आहे?]
बहर सद साल दौरे गीरद अज सर
चे आं दौरां शुद आयद दौरे दीगर
बरोजे चंद बा दौरां दवीदन
च शायद दीदनो चे तवां शुनीदन ---------निजामी
[प्रत्येक शतकानंतर नवे युग सुरू होते, त्या नंतर पुढचे युग, केवळ काही दिवस पाहून काय समजणार आहे?]
होता है शब-ओ-रोज़ तमाशा, मेरे आगे
इक खेल है औरंग-ए-सुलेमां मेरे नज़दीक
इक बात है ऐजाज़-ए-मसीहा, मेरे आगे
जुज़ नाम, नहीं सूरत-ए-आ़लम मुझे मंज़ूर
जुज़ वहम, नहीं हस्ती-ए-अशया, मेरे आगे
होता है निहाँ गर्द में सहरा मेरे होते
घिसता है जबीं ख़ाक पे दरिया, मेरे आगे
मत पूछ कि क्या हाल है मेरा तेरे पीछे
तू देख कि क्या रंग है तेरा, मेरे आगे
सच कहते हो, ख़ुदबीन-ओ-ख़ुदआरा हूँ, न क्यों हूँ
बैठा है बुत-ए-आईना सीमा, मेरे आगे
फिर देखिये अन्दाज़-ए-गुलअफ़्शानी-ए-गुफ़्तार
रख दे कोई पैमाना-ए-सहबा, मेरे आगे
नफ़रत का गुमाँ गुज़रे है, मैं रश्क से गुज़रा
क्योंकर कहूँ, लो नाम न उनका मेरे आगे
ईमाँ मुझे रोके है, जो खींचे है मुझे कुफ़्र
काबा मेरे पीछे है, कलीसा मेरे आगे
आशिक़ हूँ, पे माशूक़-फ़रेबी है मेरा काम
मजनूं को बुरा कहती है लैला, मेरे आगे
ख़ुश होते हैं, पर वस्ल में, यूँ मर नहीं जाते
आई शबे-हिजराँ की तमन्ना, मेरे आगे
है मौज-ज़न इक क़ुल्ज़ुमे-ख़ूँ काश! यही हो
आता है अभी देखिये क्या-क्या, मेरे आगे
गो हाथ को जुम्बिश नहीं, आँखों में तो दम है
रहने दो अभी साग़र-ओ-मीना, मेरे आगे
हमपेशा-ओ-हमशरब-ओ-हमराज़ है मेरा
'ग़ालिब' को बुरा क्यों, कहो अच्छा, मेरे आगे .................................................................'ग़ालिब'
सबह बा वक्त ब्रीतानिया दर हझूर मिहमानान विझह व दर हाली
का मीलीवन हा नफ़र दर मरामर जहान अज तरीफ़
तल्विजिवन नझारा गर आन बूदन्द. दर कलीसा ई वस्त मिन्सतर दर
(टेलीव्हीजन पहात होते चर्च वेस्ट्मिनिस्टर )
मरकज लन्दन अन्जाम शूद.
राजपुत्र विलियम आणि केट मिडल्टन यांचा लग्नसमारंभ ब्रिटीश वेळेनुसार सकाळी ११ वाजता विशेष अतिथींसमोर लंडनच्या मध्यभागी आसणाऱ्या वेस्त्मिनिस्टर मठात संपन्न होताना जगभरातील लाखो लोकांनी टेलीव्हिजनवर पाहिला.
वारांची नावे
क्रियापदे १
- पुरुष दर्शक प्रत्यय जो मराठी तील "आहे" प्रमाणे क्रियापदाला जोडली जातो-
(मी) आहे आम आहोत ऐम
(तू) आहेस आइ आहात ऐद
(तो) आहे अस्त आहेत अंद
- क्रियापदाचा शेवट ह ने नसेल तर पुरुष दर्शक प्रत्यय जोडताना पहिल्या अक्षराचा लोप होतो, -म, इ, स्त, इम, इद, न्द
- मी आहे - मनम
- तू आहेस -तू आई
- तो आहे - औस्त
- भाववाचक नामांनाही, हे प्रत्यय लावले जातात-
- शौर्य -(दिलेर) देलीरी -मी शूर आहे = देलीरम
- मालकी दाखवताना असा उपयोग करतात.
- माझे पुस्तक किताब ए मन किताबम
- तुझे पुस्तक किताब ए शोमा किताबत
क्रियापदे १.१
- फार्सीत सहयोगी क्रियापदे वापरली जातात. ही इतर क्रियापदांसोबत जोडून वापरली जातात.
- बूदन -अस(णे)
- शुदन -हो(णे)
- दाश्तन -हवे अस(णे)
- करदन -कर(णे)
- ख्वास्तन -इच्छ(णे)
काळ आणि क्रियापदांची रूपे.
| बुदन - असणे | |||||
| वर्तमान | भूत | चालू-भूत | भविष्य | ||
| मी | हस्तम | बुदम | मिबुदम | खाहम बुद | |
| तू | हस्ती | बुदी | मिबुदी | खाही बुद | |
| तो,ती,ते | हस्त | बुद | मिबुद | खाहद बुद | |
| आम्ही | हस्तिम | बुदिम | मिबुदिम | खाहिम बुद | |
| तुम्ही | हस्तिद | बुदिद | मिबुदिद | खाहिद बुद | |
| ते | हस्तंद | बुदंद | मिबुदंद | खाहंद बुद |
| रफ्तन - जाणे | |||||
| वर्तमान | भूत | चालू-भूत | भविष्य | ||
| मी | मिरवम | रफ्तम | मिरफ्तम | खाहम रफ्त | |
| तू | मिरवी | रफ्ती | मिरफ्ती | खाही रफ्त | |
| तो,ती,ते | मिरवद | रफ्त | मिरफ्त | खाहद रफ्त | |
| आम्ही | मिरविम | रफ्तिम | मिरफ्तिम | खाहिम रफ्त | |
| तुम्ही | मिरविद | रफ्तिद | मिरफ्तिद | खाहिद रफ्त | |
| ते | मिरवंद | रफ्तंद | मिरफ्तंद | खाहंद रफ्त |
काही क्रिया
दूर होणे तर्क कर्दन
ओळखणे शिनाख्तन
जाणणे दानेश्तन
भेटणे मलागात (मुलाकात) कर्दन
बोलणे गोफ़्तन
पाहणे दिदन
थांबणे मंदन
घेणे बोरदन
समजणे फाहमिदन
- येथे ‘दन’ हा भाग ‘णे’ सारखा मागे चिकटतो, तो काढला की मूळ धातू मिळतो.
वाच णे मूळ धातू वाच = खान दन मूळ धातू खान.
- नकारार्थी क्रिया दाखवताना, ‘ना’ क्रियापदा आधी जोडतात.
विभक्ति, विभक्ति प्रत्यय.
आपण फार क्लीष्टता टाळून पुढे जाऊ.
- बस गेली. उतुबस रफ्त.
- मी शिराझ ला पाहिले. मन शिराझ रा दिदम.
- मी दिल्लीकडे(ला) गेलो. मन बे दिल्ली रफ़्तम.
- मी दिल्ली हून आलो मन अझ दिल्ली आमदन.
फार्सी शिष्टाचार
- मराठी संभाषणातील शिष्टाचाराप्रमाणेच, फार्सीत नावाने हाक मारत नाहीत. लहान मुले आणि मित्राना नावाने बोलावता येते.
- मोठ्यांना आडनावापुढे पुरुष असेल तर आगा, स्त्री असेल तर खानूम या पदव्या श्रीमान, श्रीमती प्रमाणे लावून बोलावतात. कार्यालयात हुद्द्या आधी या पदव्या लावून संबोधित करतात.
काही फार्सी हुद्दे, व्यवसाय
- वकील वकील
- न्यायाधीश काझी
- सेक्रेटरी मुन्शी
- विद्यार्थी दानेशजू
- वैज्ञानिक दानेशमंद
- बेकार बिकार
- कलाकार हुनरमंद
- व्यवसायिक ताजेर
- लोहार आहनगार
- सुतार नजार
- लेखक नविसंद
- सरकारी नोकर कारमंद ए दौलत
मी कसा आहे?
मी थकलो आहे मन खस्ते अम
मी हिंदू आहे मन हेंदू अम
मी तहानेला आहे मन तेश्ने अम
मी कुठे आहे?
च्या समोर जेलो ये
दूर दूर
जवळ नजदिक
विरुद्ध मुकाबेल
इथे इन्जा
तिथे उन्जा
उत्तर शोमाल
दक्षिण जानूब
पूर्व शर्घ
पश्चिम गर्ब
रंग
काळा - सियाह, मेश्की
निळा - आबी
नेव्ही ब्लू - सुरमेई
टॉरकॉइज - फेरुझीतपकिरी -गह्वेइ
हिरवा - सब्ज
नारंगी - नारेंजी
गुलाबी - सुरती
जांभळा - बनफ़्श
लाल - किर्मिज
पांढरा - सफेद
पिवळा - झर्द
गुणवाचक / Epithets
- नाम+धातूसाधित विशेषण /कृदन्त
- नाम+विशेषण
- नाम+नाम
- नाम+धातूसाधित विशेषण /कृदन्त
गुल अफ़्शान - फूल चिरडणारे
- नाम+विशेषण
खुश अलहान - सदवर्तन
- नाम+नाम
शीर(शेर)दिल - सिंह हृदयी
याशिवाय उपपद + नाम अशीही गुणवाचके आहेत
हम म्हणजे सह, एकत्र,
हमखाना - एकाच घरात राहणारे
हम सोहबत - सोबती
हम दम - एकत्र श्वास घेणारे
हम दर्द - एकच वेदना भोगणारे
हम मकतब - एकाच शाळेत जाणारे
हम राज - एकच गुपीत असणारे
हम बिस्तर - एकाच बिछान्यात झोपणारे
ना, कम, बे कमतरता दाखवतात,
नाअ(उ)मीद - निराश
बेअमान - निर्दयी
कमबहा - कमी किमतीचा
- ना - नाही
- बे -शिवाय
- कम - थोडे
- मालकीदर्शक झू, साहब, अमल +नाम
अहल हकमत - चातुर्याने
साहब जमाल - सुंदर
- नाम+वैपुल्य दर्शक सार, किन, मन्द, नाक, वार, वर
दानशमन्द -विद्वान
गमगीन - दुःखपूर्ण
जहरनाक - विषारी
जान वर - जीव असलेला
- नाम + इन
सीम इन - चन्देरी
जमरदीन - पाचूचा बनवलेला
- समानता दाखवणारा नाम+ सा, असा, वश
माह वश - चंद्रा सारखा
सहरसा - जादूसारखा
- रंग नाम + फ़ाम, गोन
संज्ञा / substantives( भाववाचकनाम )
- विशेषणाला ‘ई’ प्रत्यय जोडून भाववाचक नाम बनवता येते, जसे मराठीत ‘-पणा’ जोडतात.
स(/सि)याह - स(/सि)याही - काळेपणा
- ‘ه’ ‘ह’ जर शेवटी असेल तर ‘की’ जोडतात
बिकाना -नवा- बिकानकी -नाविण्य
- ‘अ’ जोडूनही करतात
- क्रियापदाला( धातूला) अर प्रत्यय जोडून
गोफ्त -बोल- गोफ्तार-भाषण
परवर- परवरश
अलाइ-अलाइश
- कर्ता, करणारा या साठी शेवटी ‘ न्दा ’ जोडतात
फ़रोश- फ़रोशन्दा- विक्रेत
- किंवा ‘बान, गर, गार’ हे प्रत्यय जोडतात.
अहन -लोह=अहनगर- लोहार
दर- द्वार=दरबान -द्वारपाल
वस्तूंच्या जागा
- वस्तूचे स्थान दाखवताना, ‘खाना, गाह, जार, दान, स्तान’ हे प्रत्यय जोडतात.
खार इ स्तान - काटेरी जागा
नमक जार
शौर इ जार - मीठाचे वाळवंट
लाल: -त्युलिप = लालहजार - त्युलिपचा वाफा
सन्जल - जेवणे (पैसे देऊन) = सन्जलगाह/ सन्जल खाना - खाणावळ
किताब - पुस्तक = किताब खाना - ग्रंथालय
बुत कदा - मुर्तीसह देऊळ
कलमदान
शमादान
कोह सार - डोंगरी प्रदेश
संग लाख - खडकाळ
दीव लाख - शापित प्रदेश
अव्यय
बाला - च्या वरपाईन - खालीजबर - वरजेर - खालीपीश - पूर्वीपेस - मागे, नंतरमियान- मध्येपहलू - बाजूसनज्द, नज्दीक -जवळबहर, बरायी - च्या कारणानेबुइरून - बाहेर (बाहेरून)अन्दरून - आत
कबल - च्या पूर्वीबआद - च्या नंतरजेअहत - च्या दिशेनेजानीब - कडेला
उभयान्वयी अव्ययेअज, ज- पासूनबर , आबर - च्या वरबे - लाबा - सहदर - च्या आतरा - कडे, चाअजबाला - वर पासूनअजफ़राज - उंचापासूनअज पाईन - खालपासून
व
हम, निज - च्या प्रमाणे
अगर, गर - किंवा
या - किंवा
मगर- तरीही
फार्सी लघुत्व दर्शक शब्द
क्रिया विशेषणे
- नामाला अना ‘ انه ’ प्रत्यय जोडला की क्रियाविशेषण तयार होते.
- किंवा बा ‘ با ’ प्रत्यय जोडला की क्रियाविशेषण तयार होते.
वाचन - सोपी वाक्ये
- उजवीकडून वाचा
माझे डोके
डोके - सर
केस - मू
कपाळ - पिशानी
भुवई - आबरू
पापणी - पलक ए चश्म
डोळा - चश्म
नाक - दमाग़
ओठ - लब
तोंड - दहान
हनुवटी - चाना
गाल - गुना
चेहरा - सुरत
कान - गुश
पापणी चे केस - मोजा
घसा - गलू
मान - गर्दन
खांदा - शाना
जीभ - ज़बान
दात - दन्दन
माझा हात
तळहात - कफ़ ए दस्त
बोटे - अंगोश्त
मनगट - मोच ए दस्त
नाडी - नब्ज
हात - दस्त
कोपर - आरंज
बाहू - बाज़ू
खांदा - शाना
एक गाणे "यारी है इमान मेरा"
फ़ार्सी शब्द
खुदा देव
बंदा भक्त
हम पियाला एकत्र पिणारा
हम निवाला एकत्र जेवणारा
हम सफ़र सहप्रवासी
हम राज़ एकमेकांची गुपीते माहीत असणारा
ता कयामत जगाच्या अंतापर्यंत
साज ए दिल हृदयाचे वाद्य
नूर
फ़िदा
सादगी
जिंदगी
बंदगी
गमगीन
गुल ए गुलज़ार
बे ज़ार
नजर
नज़ारा
चश्म ए बद - वाईट नजर
शिकार
हाल ए दिल
हंसी
जवान
ममनून - अनुगृहीत
दिलकश
कुरबान
मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे
फारसी मराठी अनुबंध
आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने.
(टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ. यु म पठाण यांच्या 'फारसी
मराठी अनुबंध' आणि प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन यांच्या 'फारसी मराठी कोष'
यामधून जशीच्या तशी घेतलेली आहे, त्यामुळे माझे श्रेय इथे फक्त संकलकाचे
आहे. मूळ संशोधन डॉ पठाण आणि पटवर्धन यांचे आहे.)
तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी
संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ.
गोष्टी इतिहासात नमूद आहेत. बाराव्या-तेराव्या शतकात त्यांची सत्ता भारतात
प्रस्थापित झाली व त्याच सुमारास अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या
रामदेवराव यादवांवर स्वारी केली, हा इतिहासही प्रसिद्ध आहेच. या वेळेपासून
मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा महाराष्ट्राशी निकट संबंध येऊ लागला,
मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने अर्थातच फार्सीचा व
मराठीचाही संबंध आला. राज्यकारभारविषयक शिष्ट व्यवहारासाठी फार्सीचा उपयोग
होऊ लागला,महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवनही काही अंशी फार्सीमय झाले.
मुसलमान राज्यकर्त्याप्रमाणे मराठ्यांनीही इतिहासलेखनास प्रोत्साहन दिले
आणि महाराष्ट्रात बखरनवीसांचा, अख्यबारनवीसांचा व पारसनिसांचा एक वर्गच
तयार झाला. अगदी एकनाथ महाराजही त्यातून सुटलेले दिसत नाहीत. खालच्या
एकनाथी भारुडातले फारसी शब्द पहा:
अर्जदास्त अर्जदार, बंदगी बंदेनवाज, अलेक सलाम साहेबांचे सेवेशी ।
बेंदे शरीराकार जिवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्ले कायापुरी ||
विशेष म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जसा मध्ययुगीन मराठी साहित्याला अरबी-फार्सीचा फ़ारसा स्पर्श होत नाही, तसाच मराठवाड्यातील मराठी भाषेलाही होत नाही. विसाव्या क्रमांकाच्या हातनूरच्या शिलालेखापर्यंतच्या (काल: शके १२२३/ इ.स. १३०१) सर्व शिलालेखांत एकाही अरबी-फार्सी शब्दाचा वापर केला गेल्याचे आढळत नाही, ही मोठी आश्चर्याची बाब होय. ज्ञानेश्वरीत व यादवकालीन महानुभावीय साहित्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके का होईना फार्सी शब्द आढळतात, पण तसे येथे होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. शके १३२० (इ.स. १३९८) मध्ये सुलतान फेरोजशहाचा या लेखांना स्पर्श होतो पण हे चौदाव्या शतकापर्यंतचे शिलालेख स्वत्वाचे एवढे अभिमानी की 'सुरतान 'व 'पेरोजसाहा 'या दोन फार्सी शब्दाव्यातिरिक्त ते कोणत्याही परकीय शब्दाचा स्वीकार करीत नाहीत. त्यानंतर मात्र फार्सी ही बहमनी राज्यकर्त्यांची राज्यकारभाराची भाषा झाल्याने आपोआपच लोकव्यहारातील मराठी भाषेवर अरबी - फार्सीचा प्रभाव पडणे अपरिहार्य होते. त्यामुळे उत्तरोत्तर मराठीत अरबी - फार्सी शब्दांचा आढळ होतो.
बहमनी,शिवकाल व पेशवेकाल यांतील फार्सी - मराठी अनुबंधाचे स्वरूप पाहता त्यात अनेक स्थित्यंतरे झाल्याचे आढळते. बहमनीकालात फार्सीची मराठीशी विलक्षण जवळीक निर्माण झाली पण तिचे रूपान्तर सावटात होऊ नये अशी चिन्ताही शिवकालात वाटू लागली. राज्यव्यवहारकोशाच्या निर्मितीमुळे मराठीच्या अस्मितेच्या रक्षणाचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला खरा पण पुन्हा पेशवेकालात उत्तर भारताशी व मोगल राजवटीशी संपर्क येऊ लागल्याने फार्सी - मराठीचे संबंध अधिक व्यापक व घनिष्ट झाले.मराठी माणसाच्या जीवनव्यवहाराशी,वाड्मयव्यवहाराशी ,भाषिक व शासकीय व्यवहाराशी असलेला फार्सी भाषेचा हा संबंध उत्तरोत्तर वाढत वाढतच गेला. अव्वल इंग्रजीत व इंग्रजी अमदांनीत,मुसलमानांची राजवट नसतानाही तो टिकून राहिला. एवढेच नव्हे तर इंग्रज हा देश सोडून गेल्यावरही गेले अर्ध शतक हा अनुबंध टिकूनच राहिला.
व्यक्तिनाम हे विशेषनाम असते पण आडनाव हे सामान्यनाम असते. आडनावाचा त्या त्या घराण्याशी संबंध येतो, त्यामुळे फार्सी शब्दयुक्त आडनावांचा मराठी माणसाने केलेला स्वीकार ही त्याच्या जीवनव्यवस्थेतील महत्त्वाची घटना होय, इस्लामी राजवट जाऊन काही शतके लोटली तरी ही आडनावे तशीच कायम आहेत त्यावरून हा प्रभाव किती दूरगामी होता,ते कळते. फार्सी शब्दयुक्त विशेषनामांप्रमाणेच यादवोत्तर कालात महाराष्ट्रात फार्सी शब्दयुक्त हुद्दे रूढ झाले व त्यांचेच पुढे आडनावात रूपान्तर झाले. त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई, त्याविषयीही इतिहासकार वि का राजवाडे यांनी या शब्दांत खंत व्यक्त केली आहे - 'सौदागर, मुश्रीफ,सराफ,चिटणीस,फडणीस पोतनीस ,हेजीबराव,दिवाण,वाकनीस ,वफ्तरदार, वगैरे फारशी आडनावेहि मराठीत रूढ झाली, 'बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?'
ही आडनावे किंवा हुद्दा / व्यवसाय दर्शविणारे फार्सी शब्द मुसलमानपूर्व महाराष्ट्रात मुळीच प्रचारात नव्हते, हे मत श्री.वा.कृ.भावे यांनी सप्रमाण नोंदविले आहे.मराठी बखरींत आढळलेली फार्सी शब्दयुक्त आडनावे देत आहे, त्यांतील बरीच आडनावे आजही रूढ असल्याचे दिसून येईल. बखरींतील या आडनावांची संख्याच साठपेक्षा अधिक आहे, त्यावरून हा प्रभाय किती मोठा होता तेही कळेल.
अंकबरनीस (फा. अख्बार नवीस् - बातमीपत्र पाठविणारा)
अमीन (अ. अमीन् = विश्वस्त )'
कानगौ (फा. कानून्गो = वहिषाटीची नोंद ठेवणारा)
कारखानीस (फा. कार्निह-नवीस् कारकून)
कारभारी (फा. कार्बारी नव्यवस्थापक,दिवाण)
*कासीद (फा. कासिंद् = पत्रे पोहोचविणारा दूत)
*किल्लेदार (फा. कलअह -दार् = दुर्गाधिपती, किल्लेकरी)
*कोतवाल (फा.कोत्वाल् किल्लेदार, दारोगा)
खासगीवाले (फा. खासगी, राजाच्या खासगीचा अधिकारी)
खासनीस (फा. खास - नवीस् )
चिटणीस (फा. नवीस ) = पत्रव्यवहार करणारा
*जकाते (अ. ज़ुकात् ) च जकात वसूल करणारा,
*जमादार (फा. टोळीचा / तुकडीचा नायक)
*जहागिरदार (फा. जागीर दार )
ठाणेदार (फा. दार )
*डबीर (फा. दबीर् = लेखक,कारकून,चिटणीस)
*तबीब (अ. तबीब् > वैद्य)
*तोफखाने (तुं. लोप् 4- फा. खानह् )तोफखानेवाला
*दप्तरवार (फा. दफ्लर् दार् कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी)
दफेदार (फा. दफूअदार् रिसाल्यातला लहान, अधिकारी)
*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)
*दिवाण (फा. दीवान् = प्रधान)
*दिवाणजी (तु. दीवान् ची = प्रधान)
नालबंद (फा. नअलबंद = नाल छोकणारा)
*पागनीस (फा. पाय्गाह नवीस् रिसाल्याकडील कारकून )
*पागे (फा.पायूगाह = रिसाल्याचा अधिकारी )
पागेदार (फा. पायूगाह दार् )
*पारसनीस (फा. फार्सीनवीस् = फार्सी पत्रव्यवहार करणारा)
*पेशवे (फा.पेश्वा = पुढारी पंतप्रधान)
पोतदार (फा. पोतहदार् = नाणेपारखी )
*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस् लिहिणारा )
*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा)
बक्षी (फा. बख्शी = सैन्यात पगार वाटणारा)
*बारगीर (फा. बार्गीर् = धन्याने दिलेला घोडा ठेवणारा शिपाई )
*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी)
बेलदार (फा. बेलदार = खणत्या)
*म॒ (मु) जुमदार (फा, मजुमूअदार् = बसुली कारकून)
*महाले (अ. महल) = महालाचा रक्षक?
"मिराशी (अ. मीशस् ) = मिराशीचा उपभोग घेणारा
*मिरासदार (फा. मीरासीवार्)
मिर्धा / धे (फा. दहा शिपायांचा नाईक)
*मोकाशी (मुक्रासा)
*रास्ते (फा.रास्त् )
*वाक(के)नीस (फा. वाकिअ नवीस् = अखबार नवीस् )
*शिकिलकर (फा. सैकल्गर् = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा )
*शिलेदार (फा. सिलह्दार् = सैन्यातील राऊत)
शेखदार (अ. शेख , फा. दार् )
*सबनीस (फा. स॒फूनवीस् र् सैन्यातील तुकड्यांतील सैनिकांची गणती करणारा )
*सरदार (फा. सरदार : बडा अधिकारी, मनसबदार)
सरंजामी (फा. सरंजामी)
*सरंजामे
*सराफ (अ. सर्राफ़ : सोनेचांदीचा व्यापारी)
*सुभेदार (फा, सूबद्ददार् प्रान्ताधिकारी)
हकीम, हकीमजी (अ, हाकिम् = आज्ञा देणारा अधिकारी)
*हजारी, हजारे (फा. हजारी, हजार सैनिक बाळगण्याची मनसब असलेला)
हरीप, हरीफ (अ. हरीफू) '
*हशमनीम, हसबनीस (फा. हशम्नवीस् = हशमाकडील कारकून)
*हधालदार (फा. हवालत् - वार्)
*हेजीब (अ. हाजिंब् = वकील)
मुळातले हुद्दे (व्यवसाय व त्यांचे स्वरूप लक्षात यावे, यासाठी येथे मूळ शब्द व त्यांचे डॉ.पटवर्धन यांनी दिलेले अर्थ वरील यादीत नौंदविले आहेत.
*या खुणेने दर्शविलेली आडनावे आजही महाराष्ट्रात प्रचलित आहेत, याशिवाय गुमास्ते (फा.गुमाश्तह),दासताने (फा. दास्तान ), पेशकार (फा.पैश् कार),शिकारखाने (फा. शिकार् गानद्),वकील॑ (अ. वकील) अशी कितीतरी आडनावेही आढळतात.
फार्शी लेखक पर्यायवाचक शब्दांचे विशेष चाहते; त्यामुळें कांही शब्दांना प्रतिशब्द अनेक आहेत, ऐक्य व सख्य यास आश्नाई, इख्लास, इतलाखी, इंतफाक,इतह्मद, इरतिंबात, इस्तियाक, एक-दिली, एक-रछ्टगी, एकी, खला-मला, ससूसीयत, तस्फिया, दिल्जमाई, दोस्ती, वसालत, मुस्ताकी, यगानगत वगेरे १८ वर प्रतिशब्द आहेत. वैर-भाण्डण या अर्थी अकस, कर्कैशा, कजिया, किलाफ, खळश, खिसा, जिकीर, जुदाई, दावा, दुस्मनगी, दुही, निफाक, पुर्कश, बर्कशी, असे १४ वर शब्द आहेत. प्रतिष्ठा याअर्थी अज, अस्करा, आब, आबताब, इज्जत, तम्मा, नक्श, नछग, नामोश, वकर, शोहरत, हुर्मत वगैरे १२ वर शब्द आहेत. कौटिल्य या अर्थी कंवाईत, केंद्, दुगा, फन्द, फरेब, मकर, हुन्नर, हरिफी, हिक्मत, वगेरे ९ वर शब्द आहेत. संशय या अर्थी अन्देशा, गर्द, गुबार, गुमान, दग्दगा, वस्वास, वहीम, शुक, शूभ वगेरे ९ वर शुब्द आहेत. समाधान या अर्थी खातर, खातरजमा, खातदारी, खातर्दास्त, तक्वा, तमानीयत, तशफ्फी, तसली, दिल्दारी, दिल्भरी, दिलासा वगेरे ११ वर शब्द आहेत. पीडा या अर्थी आजार, कसाला, जूबरी, जळाल, जाजती; जुळूम, तश्वीस, ताशसि वगैरे शब्द आहेत. शिक्षा या अर्थी तस्बी, नातिजा, नश्यत, शास्त, सजा असे पांच शब्द आहेत. परिश्रम या अर्थी कस्त, कोशीस, मशायत, मेहनत, शिकस्त, सई असे शब्द आहेत. चाल-रिवाज या अर्थी तऱ्हा, तरिका, दस्तूर, पाय-रव, मामूल, रव, रस्म, रवेश, रहा, रिवाज, शिरस्ता, सुदामत असे १२ शब्द आहेत. फार्शीनें मराठींत पर्यायवाचक शब्दांची भर किती आणि कशी केली आहे हें कळायला वरील विवेचन पुरे आहे.
लेख
फार आवडला . पठाणांचे पुस्तक अप्रतिम आहे. फार पुर्वी लोकमत मध्ये एक
छोटेखानी सदर येत असे त्यात ते एक एक शब्दाचा संबंध जोडुन दाखवत असत.
हे असे शोधुन काढणे मोठे मनोरंजक आहे. म्हणजे बघा वरील
*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी) आणि *शिलेदार (फा. सिलह्दार् = सैन्यातील राऊत) हे दोन स्वतंत्र शब्द आहेत याचवरुन बनलेला मराठीत एक खास शब्द वापरला जातो " बिनीचे शिलेदार "
*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा) पुण्यात एक पोलीस चौकी आहे " फरासखाना" नावाने म्हणजे हे पुर्वी काय असणार इथे ?
तसेच
*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस् लिहिणारा )
नाना फडणवीस म्हणजे एक आग्रह मी बघितलाय नाना फडणीस नव्हे नाना फडणवीस व
पाहीजे हा आग्रह काहीशा शुद्धतेच्या आग्रही अभिनिवेशाने धरला जातो.
तेव्हा त्याच्या शब्दाचा मुळांविषयी अनभिज्ञता हे कदाचित एक कारण असावे.
म्हणजे मुळ तर फारसी आहे मात्र आमचे व्हर्जन असे असेच असावे या
प्युरीटनीस्ट आग्रहाची मौज वाटते.
याच पुस्तकात एक शब्द दिलेला आहे "रिसाला" याचे रुट रिसालह = घोडदळाची तुकडी असे दिलेले आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दर रंगपंचमीच्या दिवशी राजा ची रिसाला मिरवणुक निघण्याची परंपरा आहे. म्हणजे राजा बहुधा कधी काळी घोडदळाच्या तुकडी सहीत निघत असावा त्याला तेथे " रिसाला " मिरवणुक असेच म्हटले जाते. तो राजा पुढे गेला की मग रंग खेळणे बंद होते अशी गाव परंपरा आहे.
गालिबच्या फारशी गझला जर देवनागरीत मिळाल्या तर या दोन ग्रंथाची मदत घेऊन आपल्याला नक्कीच काही प्रमाणात अर्थ शोधता येइल .
पण सबसे बडी दिक्कत ही आहे की मला देवनागरीत गालिब ची फारसी शायरी कुठे सापडली नाहे.
"शिकलकरी" या नावाने ओळखला जाणारा समाज माहीतीत आहे. हे साधारण शिख लोकांसारखे डोक्यावर फेटा बांधतात.
पण हा मुळ शब्द आणि यांचा असा संबंध माहीत नव्हता.
अजुन एक प्रश्न असा पडतो की कारखानीस चिटणीस मुजुमदार फडणीस पोतनीस
टिपणीस अशी बरीच नावे " चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ची आडनावे आहेत
या समाजाचा सामाजिक इतिहास हा या व्यवसायाच्या नोकरीच्या अंगाने पडताळता
येइल का ? म्हणजे मुघलांच्या सेवेत या समाजाचे प्रमाण अधिक असावे का ? कशा
स्वरुपाचे असावे ? की आडनावे इथेच या समाजात उचलली गेली इतर समाजातही असे
नोकरी करणारे असतीलच पण आडनावे नसतील लावली कदाचित
(व्यक्तीचे नाव) बिन / बिन्त* (वडिलांचे नाव) बिन (आजोबांचे नाव) अल् (घराण्याचे/ट्राईबचे नाव)
* बिन = चा मुलगा आणि बिन्त = ची मुलगी.
'ढालगज-भवानी' हा शब्द अनेक वेळा 'भोचक' वा 'पुढे पुढे मिरविणारी अशा अर्थाने वापरला जातो. मात्र या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तर जिला उद्देशून हा शब्द वापरला गेला तिला ते अभिमानास्पद वाटेल.
ढाल म्हणजे कवच, संरक्षक आवरण.
गज म्हणजे हत्ती.
भवानी म्हणजे आरंभ, आघाडी, कार्याला सुरुवात.
पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न.
यासाठी मदमस्त हत्तींना मस्तकावर कवच चढवून किल्ल्याच्या दारावर मुसंडी मारायला लावले जात असे. प्रचंड ताकदीच्या हत्तीने दिलेल्या धडकांनी दरवाजा कोलमडून अखेर किल्ल्यात प्रवेश शक्य होत असे. यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न करता स्वामीच्या आज्ञेनुसार धडका देणार्या हत्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची.
तेंव्हा ढालगजभवानी म्हणजे परिणामांची तमा न बाळगता, अडचणींची पर्वा न करता ध्येयाप्रत पोचण्यासाठी पुढे सरसावलेली पराक्रमी स्त्री असा आहे.भाषासूत्र : मराठी शब्दसंग्रहातील फारसी उपसर्ग
भाषासूत्र : मराठी शब्दसंग्रहातील फारसी उपसर्ग
लग्नविधीत नवऱ्या मुलास द्यावयाचे भोजन वगैरे पदार्थ आणि मानसन्मान म्हणजे रुखवत. फारसी रु’षमत म्हणजे देणगी!
Updated:

– डॉ. निधी पटवर्धन
विहीणी विहीणी घालतात मांडवात फुगडी’
या उखाण्यातील रुखवत शब्द फारसी ‘रुषमत्’वरून आला आहे, हे कोशात पाहिले तेव्हा गंमत वाटली. लग्नविधीत नवऱ्या मुलास द्यावयाचे भोजन वगैरे पदार्थ आणि मानसन्मान म्हणजे रुखवत. फारसी रु’षमत म्हणजे देणगी!
मराठीत कितीतरी फारसी शब्द येतात आणि उपसर्गाने तयार होणारे बरेच फारसी-अरबी शब्द आपण वापरतो. मागच्या भागात आपण काही उदाहरणे पाहिली. या भागात आणखी काही उदाहरणे पाहू- फारसी ‘रोज’ या उपसर्गावरून रोजकीर्द म्हणजे दिनचर्या, रोजगार म्हणजे धंदा, रोजगुदस्त म्हणजे कालचा दिवस आणि रोजा म्हणजे मुसलमानांचा उपवासाचा दिवस असे मराठी पर्याय उपलब्ध आहेत. ‘बिन’ म्हणजे शिवाय, खेरिज, वाचून. उदा. बिनदिक्कत, ‘बे’ म्हणजे सुद्धा विना, शिवाय. याचे सामासिक शब्द पुष्कळ आहेत.
जसे बेअब्रू, बेइज्जत, बेईमान, बेकायदा, बेगुमान, बेडर, बेढब, बेपर्वा, बेशरम, बेशिस्त. अजून एक ‘शिवाय’ अर्थाचा उपसर्ग म्हणजे ‘बेला’. त्याची उदाहरणे म्हणजे बेलाशक, बेलाकसूर. ‘ला’ उपसर्गाचे लाइलाज, लाजवाब असे शब्द आपण ऐकले आहेत. ‘ला’ उपसर्गाची लावारिस, लाचार ही उदाहरणे आपण उपयोजितो. ‘हर’ म्हणजे प्रत्येक. हररोज, हरसाल, हरहुन्नरी, हरकाम्या ही त्याची उदाहरणे. ‘दर’ या उपसर्गाचा अर्थ ‘प्रत्येक’ हा आहे. दररोज, दरमहा, दरमजल, दरसाल, दरशेकडा, दरमुक्काम हे शब्द आपल्याकडे आलेले आहेत पण मराठीमध्ये दरदिवस, दररात्री, दरमाणसी, दरदिवशी असे प्रयोग आढळतात. ‘ना’ हा अभावदर्शक आहे. नाउमेद, नापसंत, नादार नाखूश, नाराज, नाचक्की हे शब्द आपण वापरतो. ‘सर’ या उपसर्गाचा अर्थ आहे मुख्य. उदा. सरकार, सरहद्द, सरदार, सरमोकादम, सरनौबत, सरसुभा, सरपंच, सरकारकारकून. सरपेच यापासून मराठी ‘शिरपेच’ झाले आहे. सरजोर वरून ‘शिरजोर’ झाले आहे. आता आजच्या लेखातील शेवटचा उपसर्ग म्हणजे ‘हम’. हम म्हणजे समान/ पूर्ण/ सर्व. उदाहरण द्यायचे तर हमरस्ता, हमरंग, हमजात. एकूणच मराठी शब्दसंग्रहात फारसी उपसर्गानी शब्दसंग्रह वाढविला आहे.
ज़बान-ए-फ़ारसी
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त...
फारसी हा शब्द फारसी भाषेत...
21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने स्पेन आणि इराण या दोन देशांतील अनुक्रमे स्पॅनिश आणि फारसी या भाषा आणि या भाषांचे त्या-त्या देशातील स्थान या विषयी दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी स्पॅनिश भाषेची ओळख करून देणारा लेख काल प्रसिद्ध झाला. तर फारसी भाषेवरील लेख आज प्रसिद्ध करत आहोत.
फारसी ही इराण देशातील फार्स भागाची भाषा! त्या भागाचे व भाषेचे मूळ नाव पारस व पारसी. ही इंडो-युरोपिअन भाषाकुलातील इंडो-आर्यन या उपकुलातील भाषा आहे... त्यामुळे हिला आर्यभाषा असेही म्हणतात.
आत्ताची फारसी भाषा ही तीन टप्प्यांमधून पुढे संक्रमित झाली आहे. एक ओल्ड पर्शिअन ही हेकामनेशी साम्राज्याची अधिकृत भाषा होती. दुसरी मिडल पर्शिअन ही सासानी साम्राज्याची राजभाषा होती. ओल्ड पर्शिअन ही क्युनिफॉर्म लिपीमध्ये लिहिली जात असे... तर मिडल पर्शिअन ही पहलवी लिपीमध्ये लिहिली जात असे.
सातव्या शतकात पर्शियावर अरबांनी आक्रमण केले आणि सासानी साम्राज्य लयास गेले. त्यानंतरच्या कालखंडात फारसी भाषेमध्ये दोन शतकांचा अंधार किंवा निःशब्दता दिसून येते. त्यालाच ‘दु कर्न - ए - सोकूत’ असे म्हटले आहे. याचे कारण या दोन शतकांमध्ये नेमके काय घडले, भाषा व लिपी यांमध्ये काय व कसे बदल झाले याबद्दल काहीच ठोस माहिती मिळत नाही. या साम्राज्याच्या उलथापालथीनंतर फारसी भाषेवर अरबी भाषेचा प्रभाव वाढला व लिपीदेखील बदलून अरबी झाली. अरबी भाषेमध्ये प हा उच्चार नसल्याने पारसीऐवजी फारसी हे नाव रूढ झाले. त्याचबरोबरीने फारसी भाषेत असलेली ‘ग’, ‘झ्य’, ‘च’ व ‘प’ ही अक्षरे मूळच्या अरबी वर्णमालेत सामावून घेण्यात आली.
देश
फारसी ही इराणची राष्ट्रभाषा आहे. इराणव्यतिरिक्त ती अफगाणिस्तानमध्ये
(दरी), ताजिकिस्तान (ताजिकी), आणि अझरबैजान या देशांत बोलली जाते.
अफगाणिस्तानात ‘पश्तो’नंतर अधिकृत भाषा म्हणून ‘दरी’ या नावाने ओळखली
जाते. ताजिकिस्तानमध्ये राजकीय कारणांमुळे फारसी ही सीरिलिक लिपीमध्ये
लिहिली जाते. इराणव्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, अमेरिका, बांगलादेश,
अफगाणिस्तान या देशांमध्ये फारसी शिकवली जाते. अझरबैजान या देशाची राजधानी
बाकू येथील ऐतिहासिक ‘आतिश गाह’ (आगीचे स्थान) येथे संस्कृत व पारशी असा
द्वैभाषिक शिलालेख आढळतो.
फिरदौसीचा शाहनामा
दहाव्या शतकातील सुप्रसिद्ध इराणी कवी अबूल
कासीम फिरदौसी यांनी ‘शाहनामा’ (राजांची कथा) हे महाकाव्य लिहिले.
शाहनामामध्ये फिरदौसीने इराणच्या राजांचा इतिहास आणि पुराणकथा लिहिल्या
आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे याची भाषा! अरबांच्या आक्रमणानंतर मूळ
फारसी भाषेचे अस्तित्व नाहीसे होत होते. फिरदौसीने शाहनामामध्ये अत्यल्प
अरबी शब्दांचा वापर केलेला आढळतो. या ग्रंथावरून तत्कालीन फारसीचे स्वरूप
समजण्यास मदत होते.
‘शाहनामा’
हा फारसी भाषेच्या इतिहासातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. याच कारणास्तव
फिरदौसी हा इराणचा राष्ट्रीय कवी आहे व शाहनामा हा साहित्यिक
विद्वानांबरोबरच सामान्य इराणी माणसाच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे.
शाहनाम्यातील सुप्रसिद्ध कविता या ग्रंथाचे सार सांगते - "बासी रंज बोर्दम्
दार ईन साले सी, आजाम जिन्दे करदम बादीन पारसी" अर्थात तीस वर्षे कष्ट
करून मी ही पारसी जीवीत ठेवली आहे.
फारसी साहित्य, काव्य व चित्रपट
इराणी माणूस हा जगभर त्याच्या इंटलेक्चुअल क्रिएटिव्हिटीसाठी अर्थात
बौद्धिक सर्जनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख प्रेषित महंमदांच्या
वचनामध्ये - हदिसमध्येदेखील - मिळतो. फारसी भाषेमध्ये जगातील काही
सर्वोत्तम काव्यरचना आहेत. हाफिज, सादी, फिरदौसी, मौलाना रूमी, ओमर खय्याम,
अत्तार निशापुरी, साईब तबरेजी, सोहराब सेपेहेरी व निमायू सीज हे फारसीचे
प्रसिद्ध कवी आहेत. सादीची 'बनी आदम' ही प्रसिद्ध कविता संयुक्त राष्ट्र
संघाच्या मुख्यालयातील भिंतीवर कोरण्यात आली आहे. शब-ए-यल्दा या सणाला
रात्रभर हाफिजच्या ‘दिवान - ए – हाफिज’ या काव्यसंग्रहाचे वाचन आणि रसग्रहण
करण्याची परंपरा आहे.
जगभरात इराणी चित्रपटसृष्टीचे अनेक चाहते आहेत. इराणी चित्रपटांनी आपला एक ठसा उमटवला आहे. माजिद माजिदी, अब्बास कियारोस्तोमी, दारियुश मेहेर जूयी यांची नावे अत्यंत आदराने घेतली जातात. चित्रपट-साहित्य कलाकृतींसोबतच इराणी चित्रकला व स्थापत्य यांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे.
फारसी लिपी
फारसी ही अरबी लिपीमध्ये उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. भारतीय
भाषा-लिप्यांप्रमाणे यांमध्ये बाराखडी नसते... त्यामुळे डायक्रिटीक मार्क
तसेच चिन्हांच्या वापरावर उच्चार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. नस्ख़,
नस्तालिक़, शिकस्ते व शिकस्ते नस्तालीक़ या काही प्रमुख लिप्यांचा वापर
सुलेखन करण्याकरता केला जतो. कुराणातील आयत लिहिण्याकरता थुलूथ / सोल्स या
लिपीचा वापर केला जातो.

फारसी भाषेमध्ये अनेक अरबी व फ्रेंच शब्दांचा वापर केला जातो. फारसीचे व्याकरण व इतर युरोपिअन भाषांच्या व्याकरणात साम्य आहे.
फारसी व भारत
फारसी भाषेचा भारताशी प्राचीन काळापासून संबंध आहे. वैदिक संस्कृत व
अवेस्ता भाषांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. नंतर मध्ययुगात बाराव्या
शतकानंतर आलेल्या इस्लामी राजवटींची राजभाषा फारसी होती. तसेच
राज्यव्यवस्थेवर पर्शिअन राज्यव्यवस्थेचा खोलवर प्रभाव होता. तत्कालीन
इतिहासाची साधने - शिलालेख, नाणी, दरबारी दस्तऐवज, सुलतानाची व बादशहांची
फर्माने, पत्रव्यवहार हे फारसीमध्ये लिहिले अथवा कोरले होते. उत्तर
भारतातील मुघल राजवट व दक्षिण भारतातील बहमनी सल्तनत हा फारसीचा भारतातील
सुवर्णकाळच म्हणायला हरकत नाही.
तबकात - ए - नासिरी, बाबरनामा, अकबरनामा, ऐन - ए - अकबरी, तुजुक - ए - जहांगिरी, बादशाहनामा, आलमगीरनामा, मासिर - ए - आलमगिरी इत्यादी मूळ फारसीतल्या ग्रंथांमधून तत्कालीन समाजाचे चित्रण व इतिहासाचे चित्रांकन केलेले आहे. अमीर खुसरो देहलवी, बेदिल यांच्या फारसी काव्यरचना इराणमध्येही फार प्रसिद्ध आहेत. फारसीचे तत्कालीन महत्त्व अनन्यसाधारण होते... त्यामुळेच आपल्याकडे ‘हाथ कंगन को आरसी क्या और पढ़ें लिखें को फारसी क्या’ ही म्हण प्रचलित होती... म्हणजे सुशिक्षित व्यक्तीस फारसी येतच असणार...!
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राजपत्रांमधील फारसी मायना बदलून संस्कृतप्रचुर मराठी केला. ‘राज्यव्यवहार कोष’ या ग्रंथाची निर्मिती केली, ज्यामध्ये राज्यव्यवहारातील फारसी शब्दांकरता पर्यायी संस्कृत शब्दांचा संग्रह करण्यात आला.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर फारसीचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि उर्दू भाषेचा प्रभाव वाढला. अठराव्या व एकोणीसाव्या शतकात मिर्झा गालिबसारखे कवी फारसीमधून व उर्दूमधून काव्य लिहीत होते... परंतु त्यांचे उर्दू काव्य जास्त लोकप्रिय झाले. आता ‘पढ़े फारसी, बेचे तेल’ असा वाक्प्रचार सुरू झाला... म्हणजे फारसीचा अभ्यासक विद्वान आहे... परंतु उपजिविकेसाठी तेल विकतो.
पुण्याचे पेशवे व ईस्ट इंडिया कंपनी यांचा पत्रव्यवहार इंग्लीशमध्ये किंवा मराठीत नसून फारसीमध्ये आहे... यावरूनच फारसीचे महत्त्व या काळापर्यंत टिकून होते हे अधोरेखित होते. पुण्यात 1754मध्ये बांधलेल्या त्रिशुंड गणपती देवळात फारसी भाषेतील शिलालेख आहे. इंग्रज राजवटीमध्ये फारसी भाषेचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले.
आजमितीस दोनशे-चारशे वर्षांपूर्वीची फारसी कागदपत्रे व हस्तलिखिते वाचू व समजू शकतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच जाणकार आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगीत, संस्कृती, राजकारण, व्यापार तसेच सामाजिक इतिहास असा अनेक विषयांतील अप्रकाशित इतिहास या फारसी साधनांमध्ये दडलेला आहे.
मराठीवर फारसीचा प्रभाव
आज आपण जी मराठी बोलतो तिच्यात अनेक शब्द हे मूळचे फारसी-अरबी आहेत.
उदाहरणार्थ, चेहरा, चरबी, पोक, जमीन, दुकान, बाजार, कुस्ती, तालीम, उर्फ,
जोर, दस्तऐवज, खरेदी, मेवा, कायदा, फायदा इत्यादी. 1925मध्ये प्रसिद्ध
झालेल्या कवी माधव पटवर्धन उर्फ माधव ज्युलिअन यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ व यु. म. पठाण यांची ‘फारसी मराठी अनुबंध’ व ‘फारसी मराठी व्युत्पत्ती कोश’ ही अत्यंत महत्त्वाची पुस्तके आहेत. जिज्ञासूंनी ती जरूर (हा शब्दसुद्धा फारसी शब्द) वाचावीत.
- निखिल परांजपे
nikhilhparanjape@gmail.com
(लेखकाने मुंबई विद्यापीठातून फारसी भाषेचा अॅडव्हान्स्ड डिप्लोमा पूर्ण केलेला असून सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात फारसी भाषा शिकवतात.)
मराठी शब्द आणि सारखे उच्चार असणारे फारसी, अरबी, तुर्की शब्द
A list of Marathi words and similar-sounding words from Persian, Arabic and Turkish.
- This list is work in progress, and will be updated from time to time.
- The list is prepared based on similarity of words w.r.t. sound and meaning. No claims about origin and etymology are being made.
- Marathi pronunciations are written by taking into consideration the popular way of pronouncing, rather than a letter-wise transliteration.
- Farsi (Persian) pronunciations below are not in a uniform style. Two dictionaries: Hayyim and Steingass were used, hence the two different transliteration formats.
- Comments to point out errors & mistakes and to give suggestions are welcome.
Sources:
| क्र. | मराठी शब्द | उच्चार | अर्थ | फारसी | इंग्रजी लिप्यंतरण | अर्थ | अरबी | इंग्रजी लिप्यंतरण | अर्थ | तुर्की | अर्थ |
| Sr. No. | Marathi | Pronunciation | Meaning | Persian | Pronunciation | Meaning | Arabic | Pronunciation | Meaning | Turkish | Meaning |
| 1 | अंदाज | andaaz | estimate | اندازه | andazeh | size, dimension, extent | |||||
| 2 | अंमल | ammal | domination, rule, execution, carrying out | عمل | amal | act, action, deed, work | عمل | emel | function, labour, toil, work, occupation, activity | amel | action, act |
| 3 | अक्कल | akkal | intelligence, brains | عقل | aghl | intellect, reason, wisdom, mind | عقل | eqel | brain, head, intellect, intelligence, mentality, mind, reason, sense, understanding | akıl | mind |
| 4 | अखेर | akher | end | آخر | akher | end | آخر | akher | else, other, extreme, final, last, latest, terminal, ultimate, utmost | ||
| 5 | अगर | agar | or | اگر | agar | if | eğer | if, whether, provided that | |||
| 6 | अजब | ajab | strange, surprise, wonder | عجب | ajab | wonder, astonishment | عجب | ‘ejeb | wonder, surprise, marvel | acayip | strange, unusual, weird, odd |
| 7 | अजून | azun | still, yet, more | آذون | āẕūn | thus, in that manner | |||||
| 8 | अत्तर | attar | perfume, scent | عطر | etr | perfume, scent, aroma | عطر | ‘eter | perfume, essence, scent | ıtır | geranium, aroma, fragrance |
| 9 | अदब | adab | honour, respect, politeness | ادب | adab | politeness, courtesy, civility, culture of mind | أدب | adeb | literature, good manners, politeness, propriety | edeb | good manners |
| 10 | अफवा | afwaa | rumour, hearsay | افواه | afvah | mouths, rumour, hearsay | أفواه | afewah | mouths | ||
| 11 | अफू | afoo | opium | افیون | afyoon | opium | أفيون | afeywen | opium | afyon | opium, poppy |
| 12 | अभ्रा | abhraa | pillowcase, case, cover | ابرا | abrā | the outside of a garment or cap | |||||
| 13 | अर्ज | arza | application, request | ارز | arz | price, value; quantity; esteem, veneration | arz | supply, offer, submission, presentation, demonstration | |||
| 14 | असामी | asaamee | person, individual | اسامی | asamee | names, people, community, individual | |||||
| 15 | अस्मान | asmaan | sky | آسمان | asman / aseman | sky, heaven | |||||
| 16 | अस्सल | assal | authentic, real, original | اصل | asl | root, origin, extraction, principal part, original, foundation, basis, truth | أصلي | asely | native, indigenous, authentic, original, ethnic | asıl | noble, main, principal, master, original, actual, real |
| 17 | अहवाल | ahawaal | report | احوال | ahval | conditions, states, circumstances, events, biography | أحوال | ahewal | conditions, situation, circumstances | ||
| 18 | आजार | aazaar | illness, disease | آزار | āzār | trouble, disorder, affliction, sickness, disease, grief, vexation, molestation, injury, outrage; importunity; tormenting, reproaching, teasing | azar | scolding, rebuke, reprimand | |||
| 19 | आजारी | aazaaree | sick, ill | آزاری | āzārī | trouble, affliction; sick; a patient; insolent | |||||
| 20 | आराम | aaraam | rest | آرام | aram | tranquillity, rest, repose | |||||
| 21 | आवाज | aawaaz | sound, voice | آواز | avaz | voice, sound, a call | |||||
| 22 | इंग्रज | ingraz | Englishman | انگریزی | angrezī | Englishman | |||||
| 23 | इंग्रजी | ingrajee | English | انگریز | angrez, ingrez | The English | |||||
| 24 | इमारत | imaarat | building | عمارت | emarat | building, edifice, residence, mansion, palace | |||||
| 25 | इरादा | iraadaa | intention | اراده | eradeh | will, desire, inclination, intention, purpose | irade | will | |||
| 26 | इलाज | ilaaz | cure, solution | علاج | elaj | remedy, cure, resource, treatment | ilaç | medicine, drug, remedy, cure, pill | |||
| 27 | इसम | isam | person, wight | اسم | ism | name, appellation, attribute, title | isim | name, noun, title | |||
| 28 | उमेद | umed | zeal, hope | امید | ommeed / omeed | hope | ümit | hope, expectation, trust, expectancy | |||
| 29 | ऐवज | aiwaz | property | ||||||||
| 30 | ऐवजी | aiwajee | instead of | عوض | evaz | substitute, instead of, exchange, compensation, reward, return, equivalent | |||||
| 31 | औलाद | aulaad | son, child | اولاد | owlad | son, child, offspring, descendants | evlat | child, scion | |||
| 32 | कंदील | kandeel | lamp | kandil | oil lamp, candle, cresset | ||||||
| 33 | कदर | kadar | value | قدر | ghadr | value, worth, merit | kader? | destiny, fate, fortune, doom | |||
| 34 | कबुतर | kabutar | pigeon | کبوتر | kabootar | pigeon, dove | |||||
| 35 | कबूल | kabool | agree, admit | قبول | ghabool | accepting, admitting, assent, consent, compliance | kabul | acceptance, admission, receiving, approval, assent | |||
| 36 | कमाल | kamaal | surprise, awesomeness, maximum, limit | کمال | kamal | perfection, completion, utmost limit, maturity, accomplishment | kemâl | ripeness | |||
| 37 | कमी | kamee | less | کمی | kamee | fewness, paucity, meagreness, scantiness, insufficiency | |||||
| 38 | कयास | kayaas | hypothesis, inference? | قیاس | ghias | analogy, comparison, inference, conjecture | قياس | qeyas | gauging, measurement, mensuration, size | kıyas | comparison, analogy, syllogism |
| 39 | करार | karaar | agreement, accord | قرار | gharar | arrangement, agreement, accord | karar | decision, conclusion, judgement, decree, resolution | |||
| 40 | कर्ज | karza | loan | قرض | gharz | borrowing, loan, debt | |||||
| 41 | कसर | kasar | lacking, deficiency | کسر | kasr | breaking, a break, fraction, deduction, subtraction; diminution, depreciation, shortage, deficit, deficiency | kesir | fraction, broken number | |||
| 42 | काका | kaakaa | uncle, father’s brother | کاکا | kākā | an old slave; an elder brother; dry fruit; a paternal uncle; a schoolboyʼs satchel | |||||
| 43 | कागद | kaagad | paper | کاغذ | kaghaz | paper, letter | kâğıt | paper | |||
| 44 | कायदा | kaaydaa | law, rule | قاعده | ghaedah | rule, method, base, menstruation | kaide | base, pedestal, basis, principle | |||
| 45 | कायम | kaayam | always | قائم | ghaem | standing, existent, secure, perpendicular | |||||
| 46 | कारखाना | kaarkhaanaa | factory | کارخانه | karkhaneh | factory, mill, workshop | |||||
| 47 | किंमत | kimmat | price, value | قیمت | gheemat | value, price, worth | kıymet | price, value, worth, esteem, respect | |||
| 48 | किनार | kinaar | edge, hem | کنار | kanār, kinār | side, brink, coast, shore, extremity, limit, boundary, edge; separation, disunion; hem (of a garment); margin (of a book) | |||||
| 49 | किमया | kimayaa | alchemy, magic | کیمیاء | kīmiyāʼ | chemistry, alchemy; the philosopher’s stone, lead, elixir | kimya | chemistry | |||
| 50 | किमयागार | kimayaagaar | alchemist | کیمیاگر | kīmiyāgar | an alchemist; (met.) a deceiver; a lover | |||||
| 51 | किल्ला | killaa | fort | قلعه | ghal-ah | fort, castle, fortress, citadel | kale | castle, palace, rook, stronghold | |||
| 52 | किस्सा | kissaa | incident, story | قصه | ghesseh | tale, fable, story, anecdote | kıssa | story | |||
| 53 | कुवत | kuvat | capacity | قوت | ghovvat | strength, power, vigour, force | kuvvet | strength, force | |||
| 54 | कुस्ती | kustee | wrestling | کشتی | koshtee’ | wrestling | |||||
| 55 | कैद | kaid | imprisoned | قید | gheyd | fetter, shackle, tie, bond, obligation, restriction | qaid | constraint | — | ||
| 56 | कैदी | kaidee | prisoner | قیدی | gheydee | confined, fettered, prisoner | — | ||||
| 57 | कोतवाल | kotwaal | کوتوال | kootval | owner of fort, town magistrate | ||||||
| 58 | खंजीर | khanjeer | dagger | خنجر | khanjar | dagger, poniard | hançer | dagger, poniard | |||
| 59 | खजिना | khajinaa | treasure | خزانه | khezanel | treasury, treasure, magazine (of a rifle, etc.), chamber | hazine | treasure | |||
| 60 | खबर | khabar | news | خبر | khabar | information, news, notice | خبر | khebr | news, report | haber | news |
| 61 | खबरदार | khabardaar | beware | خبر دار | ḵẖabar-dār | informed, apprised, certified; aware; careful, cautious; an informer, scout, spy; take care! beware! | haberdar | informed, aware | |||
| 62 | खबरदारी | khabardaaree | care, caution, precaution | خبرداری | ḵẖabar-dārī | care; information | |||||
| 63 | खराब | kharaab | bad | خراب | kharab | destroyed, ruined, spoiled, rotten | harap | ruined, devastated, flimsy, unsound | |||
| 64 | खरेदी | kharedee | purchase | خرید | khareed | buy | |||||
| 65 | खर्च | kharCha | expenditure, spending | خرج | kharj | expense, cost | harç | school fee, mortar, tax | |||
| 66 | खलास | khalaas | finished, dead | خلاص | khalas | deliverance, riddance, redemption, salvation, released | khalas | salvation | — | ||
| 67 | खातर | khaatar | for, for the purpose of | خاطر | ḵẖāt̤ir | cogitation, thought, suggestion; memory, remembrance; mind, soul, heart; inclination, propensity; affection, favour; pleasure, will, choice; sake, account, behalf | hatır | sake, memory, mind, state, mood, condition, respect | |||
| 68 | खात्मा | khaatmaa | end, finish, kill | خاتمه | khatemeh | end, conclusion, closure | |||||
| 69 | खास | khaas | special | خاص | khass | special, peculiar, particular, proper, excellent, private | has | exceptional, special | |||
| 70 | खिसा | khisaa | کیسه | keeseh | bag, purse, sack, pouch, rubber glove | kese | bag, small sack, pouch, pocket | ||||
| 71 | खुराक | khuraak | diet, food | خوراك | khorak | food, meal, dish | |||||
| 72 | खुर्ची | khurchee | chair | کرسی | korsee | chair, throne, stool | kürsü | podium, rostrum, chair, professorship, pulipt | |||
| 73 | खुलासा | khulaasaa | clarification, revelation | خلاصه | kholaseh | purest part, gist, synopsis, summary, condensation | hulasa | summary, extract, docket | |||
| 74 | खुश/ खूष | khoosh / khooSh | happy | خوش | khosh | well, healthy, happy, good | hoş | pleasant, agreeable, adorable, charming, good-looking | |||
| 75 | खूप | khoop | very | خوب | khoob | good, nice, beautiful, well | |||||
| 76 | खैर | khair | well-being | خیر | kheyr | welfare, good, benefit, charity, goodness, blessing, enjoyment, riches | khair | good, well-being | — | ||
| 77 | गरज | garaz | need | غرض | gharaz | motive, purpose, view, intention | |||||
| 78 | गरम | garam | hot, warm | گرم | garm | warm, hot | |||||
| 79 | गरीब | gareeb | poor, humble | غریب | ghareeb | strange, uncommon; queer; rare; singular, homeless, poor, foreign | غريب | gheryeb | strange, stranger, odd, foreign | ||
| 80 | गर्दी | gardee | crowd | ||||||||
| 81 | गलबत | galbat | ship, dhow? | گلبت | galbat | a large boat or ship | |||||
| 82 | गल्लत | gallat | mistake, blunder, confusion | غلط | g̠ẖalat̤ | blundering in speaking or in calculating | |||||
| 83 | गस्त | gasta | patrol, walk | گشت | gasht | walking, strutting, looking about, patrolling, perambulation, recreation | |||||
| 84 | गाफील | gaapheel / gaafeel | careless, negligent, inattentive | غافل | ghafel | neglectful, negligent; careless, inattentive, heedless, thoughtless; unconscious, unawares; little knowing | gafil | inattentive, unwary, careless, unguarded | |||
| 85 | गुन्हा | gunhaa | crime | گناه | gonah | sin, crime, vice, fault | günah | sin, transgression, evil | |||
| 86 | गुन्हेगार | gunhegaar | criminal (n) | گناهکار | gonahkar | sinful, sinner | günahkâr | sinner, wrongdoer, transgressor | |||
| 87 | गुन्हेगारी | gunhegaaree | criminal (adj), criminality | گناهکاری | gonahkaree | sinfulness | günahkârlık | wickedness, sinfulness, depravity, guilt | |||
| 88 | गुलदस्ता | guldastaa | bouquet | گل دستۀ | bouquet, bunch of flowers | güldeste | anthology, anthology of poems | ||||
| 89 | गैर | gair | wrong, inappropriate, non- | غیر | gheyr | other, different, other than, non- | gayri | non- | |||
| 90 | घेर | gher | circumference, girth, encirclement | غر | gher | moving of the hips or of the loins in Persian dancing, coquettish or flippant gestures | |||||
| 91 | चमचा | ChamChaa | spoon | چمچه | chamcheh | ladle, skimmer, scoop | |||||
| 92 | चलाख | chalaakh | smart | چالاك | chālāk | ingenious; vigilant; quick; nimble, clever-handed; active, smart, laborious, hardworking; skittish; a lofty dwelling-place; a highwayman, a cut-throat | |||||
| 93 | चष्मा | chaShmaa | spectacles, glasses | چشم | chashm | eye, hope, amulet, eye of a needle | |||||
| 94 | चाकरी | Chaakree | service | چاکری | chākarī | servitude; apprenticeship | çağrı | invitation, vocation, calling, subpoena | |||
| 95 | चाकू | Chaakoo | knife | چاکو | chākū | clasp-knife, penknife | çakı | clasp knife, jackknife, folding knife, pocket knife, penknife | |||
| 96 | चादर | Chaadar | bedsheet, bedspread, covering | چادر | chādar | tent, pavilion; a mantle, scarf; veil; sheet; shroud, winding-sheet; table-cloth | çadır | tent | |||
| 97 | चिलखत | chilkhat | armour | چﮩل قد | chihal-qad | a sort of armour | |||||
| 98 | चेहरा | cheharaa | face | چﮩره | chehreh | face, cheek, complexion | çehre | face, countenance, visage, aspect | |||
| 99 | जखम | zakham | wound, injury | زخم | zakhm | wound, sore, ulcer, stab | |||||
| 100 | जप्त | zapta | confiscate | ضبط | zabt | keeping, holding, retention, confiscation | |||||
| 101 | जबरदस्त | zabardasta | terrific | زبردست | zebardast | superior, proficient, skilled, versed, expert, clever | |||||
| 102 | जबरदस्ती | zabardastee | coercion, compulsion, constraint, force | زبردستی | zebardastee | superiority, upper hand, skilfulness, cleverness, proficiency, oppressiveness, violence | |||||
| 103 | जबाबदार | zabaabdaar | responsible | جوابدار | javab-dar | responsible, accountable, answerable | cevap | answer, reply, response | |||
| 104 | जमीन | zameen | ground, floor | زمین | zamin | earth, land, soil, floor | zemin | floor, level, ground | |||
| 105 | जमीनदोस्त | zameendosta | demolished | ||||||||
| 106 | जरुरी | zaruree | need, necessity, requirement | ضروری | zarooree | necessary, essential, indispensable, urgent | zaruri | (absolutely) necessary, indispensable, essential, requisite | |||
| 107 | जरूर | zaroor | definitely | ضرور | zaroor | necessary, expedient, unavoidable, indispensable | |||||
| 108 | जहागिरदार | jahaagirdaar | جاگیر دار | jāgīr-dār | a holder of a jāgīr | ||||||
| 109 | जहागीर | jahaageer | property, land given as a assignment and tax collection | جا گیر | jā-gīr | holding, occupying a place; an assignment of the government share of the produce of a large tract of country to an individual; a possession in land granted either in perpetuity or for life, as a reward for services or as a fee | |||||
| 110 | जहाज | zahaaz | ship | جﮩاز | jehaz / jahaz | ship, saddle | |||||
| 111 | जागा | zaagaa | place | جایگاه | jaygah | place, station, dwelling | |||||
| 112 | जादू | jaadoo | magic | جادو | jadoo | magic, sorcery | |||||
| 113 | जामीन | zaameen | bail, surety, guarantee | ضامن | zamen | surety, bondsman, sponsor, guarantor, hostage, security | |||||
| 114 | जाहिरात | jaahiraat | advertisement | ||||||||
| 115 | जिना | jinaa | stairs | زینه | zeeneh | ladder, staircase | |||||
| 116 | जिन्नस | jinnas | item | جنس | jens | genus, species, sort, kind, gender, sex, goods, commodity, merchandise, articles | cins | genus, type, breed, gender, species, variety, race, class | |||
| 117 | जिल्हा | jilhaa | district | ||||||||
| 118 | जोर | zor | force | زور | zoor | force, power, strength, energy, pressure | zor | difficult | |||
| 119 | ज्यादा, जास्त | jyaadaa / jaasta | more, excessive, extra | زاید | zayed | superfluous, surplus, exceeding, more, additional | زيادة | increase, rise, increment, boost, a plus | |||
| 120 | टरबूज | Tarbooz | melon | خربوزه | boozeh | melon | karpuz | watermelon | |||
| 121 | डाग | Daag | stain, blemish, stigma | داغ | dāg̠ẖ | mark; scar, spot, freckle; blemish; cautery; a spot upon a garment, iron-mould | |||||
| 122 | डाव | Daaw | game, hand, ladle, malice, move, plot, scheme | داو | dāv | wheel; reel; disbursement; a stroke or move at play; the prize in archery; claim; pretention, arrogance; abuse; increasing a stake at play | |||||
| 123 | तंबी | tambee | reprimand, warning, rebuke, admonition | تنبیه | tambeeh | punishment, correction, admonition, remark, note | tembih | notice, warning, admonition, exhortation | |||
| 124 | तजवीज | tazveez | provision? | تجویز | tajveez | declaring as lawful, recommendation, permitting, approving | |||||
| 125 | तफावत | taphaawat | difference, gap | تفاوت | tafavot | difference, discrepancy, distinction, distance, remoteness | |||||
| 126 | तब्येत | tabyet | health | طبیعت | tabee-at | nature, temper, disposition, temperament, constitution | tabiat | nature, temperament, character | |||
| 127 | तयार | tayaar | ready | تیار | tiar | ready, prepared, equipped | |||||
| 128 | तराजू | taraazoo | weighing scales | ترازو | tarāzū | balance, scale, weight; comprehension, understanding; the sign Libra | terazi | scales, Libra, balance | |||
| 129 | तर्फे | tarfe | from, on behalf of, through | taraf | side, aspect, facet | ||||||
| 130 | तऱ्हा | tarhaa | manner, method, way, kind, sort | طرح | tarh | design, plan, sketch, intention, purpose, throwing | طَرْح | expulsion, rejection, repulsion, miscarriage, abortion, subtraction, deduction, discount | |||
| 131 | तलाव | talaaw | pond, pool, lake | تالاب | tālāb | pond | |||||
| 132 | तसदी | tasadee | trouble, inconvenience | تصدیع | taṣdīʻ | suffering from a violent headache; headache; worry, annoyance, vexation; toil, sorrow, trouble, care | |||||
| 133 | तहसील | tahaseel | تحصیل | tahseel | study, education, acquisition, obtaining, collection | tahsil | collection, study, charged, perception | ||||
| 134 | ताकद | taakad | power | طاقت | taghat | endurance, power, capacity, strength | takat | power, strength | |||
| 135 | ताकीद | taakeed | warning, reprimand, caution | تاٴکید | taʼkīd | strengthening, satisfying, confirming, corroborating; corroboration; stress, emphasis; order, injunction; reminder; pressure, compulsion; strict supervision | |||||
| 136 | ताजे | taaze | fresh | تازه | tazeh | fresh, new, recent, young, green, raw | taze | fresh, green, new | |||
| 137 | तारीख | taareekh | date | تاریخ | tareekh | date, era, epoch, history, calendar | tarih | date, history | |||
| 138 | ताशेरा | taasheraa | verbal attack, stricture | تشر? | tashar? | arrogant speech, browbeating, intimidation | |||||
| 139 | तुफान | tuphaan | extreme, extremely | طوفان | toofan | flood, deluge, storm, tempest, typhoon | tufan | downpour, storm, flood, deluge | |||
| 140 | तोफ | tof | cannon | توپ | toop | cannon, piece of ordnance, gun, ball, roll, bid | top | ball, globe, cannon, gun, bowl | |||
| 141 | दखल | dakhal | attention, cognizance, heed, notice | دخل | daḵẖl | entering; intrusion, interference; return, profit, advantage; income | |||||
| 142 | दम | dam | breath, strength | دم | dam | breath, air, life, instant, moment | — | ||||
| 143 | दर | dar | rate, per | در | dar | in, on, at, by, about, per | — | ||||
| 144 | दरम्यान | darmyaan | during | درمیان | darmian | in between, among | — | ||||
| 145 | दरवाजा | darwaazaa | door, gate | دروازه | darvazeh | gate, large door, football goal | — | ||||
| 146 | दरी | daree | valley | دره | darreh / dareh | valley, gape, stomach | dere | creek, brook, stream, valley | |||
| 147 | दर्जा | darjaa | quality, level | درجه | darajeh | degree, step, order, rank | derece | notch, degree, stage, rating, scale | |||
| 148 | दर्या | daryaa | sea, ocean | دریا | darya | sea, ocean | derya | sea, ocean, wave | |||
| 149 | दवाखाना | dawaakhaanaa | hospital, clinic | دواخانه | dava-khaneh | pharmacy, drugstore, apothecary’s shop; dispensary | |||||
| 150 | दस्तऐवज | dasta-aiwaz | documents | دستاویز | dastan-aveez? | document, voucher, note, pretext | — | ||||
| 151 | दहशत | dahashat | terror, fear | دهشت | dehshat | fear; terror. Bewilderment; amazement, consternation | dehşet | dread, horror, terror, scare | |||
| 152 | दाखल | daakhal | entered, admitted, arrived, filed | دخیل | daḵẖīl | interior, inner; intimate, familiar, confident; intermeddler; intruder; proselyte | |||||
| 153 | दाखला | daakhalaa | certificate, example | داخله | dāḵẖila | receipt for goods or money | — | ||||
| 154 | दाणा | daaNaa | grain, seed | دانه | dāna | grain; berry; stone of fruit, seed of grain or fruit; pimple; grain or bait scattered for catching birds; cannon-ball; knowledge, science, learning; learned | |||||
| 155 | दारू | daaroo | alcohol, liquor, gunpowder, fireworks | دارو | dārū | medicine, drug; remedy; oxymel, a preparation of vinegar and honey; spirituous liquors; gunpowder | |||||
| 156 | दालन | daalan | big room, hall | دالان | dālān | hall, vestibule; covered way; corridor | |||||
| 157 | दावा | daawaa | challenge, case, suit | دعوی | da’va; -vee | claim; pretension, law-suit; litigation, legal process | dava | case, (legal) dispute, litigation | |||
| 158 | दिलगिरी | dilgiree | regret, apology, sorrow | دلگیری | dil-gīrī | aversion, horror, indignation, affliction | |||||
| 159 | दिलगीर | dilgeer | sorry | دلگیر | dil-gīr | seizing the heart, terrifying, filling with horror or anguish; abhorring; melancholy, sad, afflicted, low-spirited, grieved; soothing, conciliating | — | ||||
| 160 | दिवाणखाना | diwaaNakhaanaa | drawing room | دیوان خانه | deevan-khaneh? | law court, tribunal, hall of audience | divan | day bed, divan, sofa, settee, couch | |||
| 161 | दुकान | dukaan | shop | دکان | dokkan | shop | |||||
| 162 | दुरुस्त | durusta | fixed, repaired | درست | dorost | right, correct, just, honest, entire | dürüst | correct, forthright, honest, upright, scrupulous, square, straight | |||
| 163 | दोस्त | dosta | friend | دوست | doost | friend | |||||
| 164 | दौरा | dauraa | tour? | دوره | dowreh | review, reviewing, recapitulation / period, time, periodicity | |||||
| 165 | दौलत | daulat | wealth, kingdom | دولت | dowlat | riches, wealth, government, state, empire | |||||
| 166 | नकाशा | nakaashaa | map | نقشه | naghshah | plan, map, drawing, design, model | |||||
| 167 | नक्की | nakkee | definitely | نقی | naqī | clean, pure, excellent, exquisite | نَقِيّ | naqiyy | pure, refined, neat | ||
| 168 | नजर | nazar | sight, look | نظر | nazar | view, sight, eye, look, glance, opinion | |||||
| 169 | नमुना | namunaa | sample | نمونه | nomooneh / namooneh | sample, model, pattern, specimen, type | |||||
| 170 | नालायक | naalaayak | incapable | نالایق | nalayegh | unworthy, unfit, incapable | |||||
| 171 | नाश्ता | naashtaa | breakfast | ناشتا | nashta | fasting, hungry | |||||
| 172 | नुकसान | nuksaan | loss | نقصان | noghsan | deficiency, loss, decrease, shortage | noksan | shortcoming, lack, deficiency, defect | |||
| 173 | नेस्तनाबूत | nestanaaboot | demolished, destroyed | ||||||||
| 174 | नोकर | nokar | servant | نوکر | nowkar | servant, employee | |||||
| 175 | नोकरी | nokaree | service, job | نوکری | nowkaree | service, occupation of a servant | |||||
| 176 | पंजा | panjaa | palm, claw, paw | پنجه | panjeh | hand, palm, claw, force | |||||
| 177 | पडदा | paDadaa | curtain, membrane | پرده | pardeh | curtain, blind, screen, mantle, veil, membrane, layer | |||||
| 178 | परवानगी | parawaanagee | permission | پروانگی | parwānagī | order, permission | — | ||||
| 179 | परवाना | parawaanaa | permit | پروانچه | parwāncha | order, licence, permit | — | ||||
| 180 | परागंदा | paraagandaa | vagrant; absconded; dispersed or scattered, captivity, captured | پراگنده | parāganda | dispersed, scattered, disbanded; dissipated; inattentive; prose | |||||
| 181 | पर्वा | parvaa | heed | پروا | parva | care, anxiety, fear, heed, respect | — | ||||
| 182 | पलंग | palang | bed, couch | پالنگ | pālang | a kind of rustic shoe made of cow’s leather; small window; bed; name of a fruit; a certain river | |||||
| 183 | पलंगपोस | palangpos | bedspread, coverlet | پالنگ پوش | pālang-posh | quilt, coverlet | |||||
| 184 | पसंत | pasanta | choice, liked | پسند | pasand | choice, selection, approbation, admiration | — | ||||
| 185 | पहारा | pahaaraa | guard duty, watch | پﮩره | pahra | guard; protection; a watch or fourth part of the night | |||||
| 186 | पहिलवान | pahilwaan | wrestler, bodybuilder | پﮩلوان | pahlavan | athlete, hero, champion, strong or brave person | pehlivan | wrestler | |||
| 187 | पाया | paayaa | foundation, base | پایه | payeh | foundation, base, pillar, pile | |||||
| 188 | पैलू | pailoo | aspect, facet | پهلو | side, flank, side by side, hand | ||||||
| 189 | पोलाद | polaad | steel | پولاد/ فولاد | poolad / foolad | steel | — | ||||
| 190 | पोशाख | poshaakh | dress/ outfit | پوشاك | clothing, garments | — | |||||
| 191 | फक्त | phakta / fakta | only | فقط | faghat | only, merely, solely, simply | فقط | feqt | just, only, merely | fakat | but, only, if |
| 192 | फरक | pharak / farak | difference | فرق | fargh | difference, distinction, discrimination, parting of hair | fark | difference | |||
| 193 | फरशी | pharshee | tiled floor, flooring, tiling | فرش | farsh | carpet, carpeting, floor, cover, paving, furnishing | |||||
| 194 | फर्मान | farmaan | order, decree | فرمان | farman | command, order, firman, charter, decree, errand | ferman | edict, decree | |||
| 195 | फाजील | phaajeel / faajeel | excess, improper | فاضل | fāẓil | abounding, excelling, exceeding; overflowing, redundant; excellent, virtuous, an accomplished person; learned, remainder, surplus | fazla | superfluous, excess, redundant, too much, residue | |||
| 196 | फायदा | faayadaa | advantage, use | فایده | fayedeh | profit, gain, advantage, avail, use, utility | fayda | benefit | |||
| 197 | फिकीर | fikeer | worry | فکر | fekr | thought, reflection, thinking, idea, care, anxiety | fikir | idea, thought | |||
| 198 | फिर्याद | firyaad | plaint, suit, information, legal action | فریاد | faryad | cry, shout, clamour, lamentation | |||||
| 199 | फुरसत | fursat | respite | فرصت | forsat | opportunity, occasion, leisure, time, chance, leave | — | ||||
| 200 | फौज | phauz / fauz | army | فوج | fowj | regiment, troop, army, crowd, band | — | ||||
| 201 | बंद | banda | closed (adj), ties / lace (noun) | بند | band | band, ligament, cord, rope, lace, fastening, fetters, chain, suspended / hanging | — | ||||
| 202 | बंदर | bandar | port, harbour | بندر | bandar | port, harbour, commercial town | |||||
| 203 | बंदोबस्त | bandobasta | provisions, arrangement | بندوبست | bandobast | collision, arrangement, settlement | — | ||||
| 204 | बक्षीस | bakshees | reward | بخشش | bakhshesh | munificence, liberality, bounty, gift, donation, pardon | bahşiş | tip | |||
| 205 | बखर | bakhar | — | ||||||||
| 206 | बदक | badak | duck | بط | batt | duck | — | ||||
| 207 | बदल | badal | change | بدل | badl | permutation, change | بَدَل | bَdَl | bedel | price, consideration, compensation, substitute, quid pro quo, equivalent | |
| 208 | बरखास्त | barakhaasta | dismiss, adjourn | برخاست | bar-khast | rising, rise, adjournment, bringing back, recall | — | ||||
| 209 | बरोबर | barobar | correct, equal | برابر | barabar | equal, on par, opposite, equally | başabaş / beraber | break even / together, with | |||
| 210 | बरोबरी | barobaree | competition, comparison | برابری | barabaree | equality, counterbalance, resistance | |||||
| 211 | बर्फ | barfa / barpha | ice, snow | برف | barf | snow | — | ||||
| 212 | बस / बास | bas / baas | enough, stop | بس | bas | enough, many, stop | |||||
| 213 | बस्तान | bastaan | |||||||||
| 214 | बहाणा | bahaaNaa | excuse | بهانه | bahaneh | pretext, pretence, excuse | bahane | excuse, pretext, cover, plea | |||
| 215 | बाई | baaee | woman | bayan | lady | ||||||
| 216 | बाकी | baakee | remaining, remainder, balance | باقی | bāqī | remaining, left, alive, permanent, fixed, immortal | baki | eternal, everlasting, perpetual | |||
| 217 | बाग | baag | garden | باغ | bagh | garden | — | ||||
| 218 | बाजार | baazaar | market | بازار | bāzār | market, market-day, bargain, usage, currency, beauty, splendour | pazar | market | |||
| 219 | बाब | baab | matter, topic | باب | bāb | a gate, a door; the chapter of a book, section, division, head, heading; an affair, business; point, matter, topic | |||||
| 220 | बाबत | baabat | regarding | بابت | bābat | an item; for, on account of; worthy of, suitable, convenient | — | ||||
| 221 | बाबा | baabaa | father | بابا | bābā | father, grandfather | baba | father | |||
| 222 | बारगीर | baarageer | trooper | بارگیرٰ | bār-gīr | bearer of loads, a beast of burden, a baggage-horse; a camel, a horse-soldier who has his horse found him | |||||
| 223 | बारीक | baareek | thin | باریک | bareek | narrow, thin, slender | — | ||||
| 224 | बिल्कुल | bilkul | absolutely | — | |||||||
| 225 | बेजबाबदार | bezabaabdaar | irresponsible | cevap | reply | ||||||
| 226 | बेदरकार | bedarkaar | defiant, uncaring | — | |||||||
| 227 | बेमालूम | bemaaloom | that may not be perceived, discovered, or detected; hard to be perceived | — | |||||||
| 228 | बोगदा | bogdaa | tunnel | — | |||||||
| 229 | मंजुरी | manzuree | permission, approval, consent | منظوری | manz̤ūrī | approval; choice; admission; consent, permission, sanction; admissibility | |||||
| 230 | मक्ता | maktaa | contract, monopoly | ||||||||
| 231 | मक्तेदारी | maktedaaree | monopoly | ||||||||
| 232 | मजकूर | mazkoor | text, written matter, content? | مذکور | maẕkūr | remembered, recorded, mentioned; expressed, related | |||||
| 233 | मजबूत | mazboot | strong | مضبوط | mazboot | confiscated, seized; possessed; noted, recorded; inscribed; secured; managed; controlled; strongthened, firm; compact; well-made; committed to memory | — | ||||
| 234 | मजला | mazlaa | storey, floor | منزلة | manzilat, manzila | house of accommodation for travellers; a step; station, a post of honour, dignity, rank, condition; storey of a house | — | ||||
| 235 | मजा | majaa | fun, joking | مزاح | mezah | joke, jest, fun; joking or jesting; jocosity | مزاح | mazah | kidding, banter, joke | — | |
| 236 | मतलब | matlab | intention, selfishness, purpose | مطلب | mat̤lab | subjectmatter, subject, question, affair, proposition, case, matter, demand, request, petition, intention, purpose, proposition, wish, desire, pursuit, motive, effect | |||||
| 237 | मदत | madat | help | مدد | madad | aid, help, assistance | — | ||||
| 238 | मनाई | manaaee | forbidden, restricted | منﮩائی | manhāʼī | forbidding, prohibition | |||||
| 239 | मर्जी | marjee | wish, will | مرضی | marẓī | agreeable, acceptable, pleasureable; laudable; will, assent, pleasure; concurrence | — | ||||
| 240 | मस्करी | maskaree | joke, teasing | مسخره | maskharah | buffoon, clown, droll, jester, laughing-stock, mockery, ridicule, derision, buffoonery, masquerade | مَسْخَرَة | maskhara | ridiculous, joke, ludicrous, laughingstock | maskara | fool, jester |
| 241 | मस्का | maskaa | butter, praise | مسکه | maska | fresh butter | |||||
| 242 | मस्त | masta | nice, awesome, fun | مست | mast | drunk(en); intoxicated, tipsy, in rut, frenzied | |||||
| 243 | माजी | maajee | former | ماضی | māẓī | passing away; past; dead; swift, fleet, expeditious; sharp, piercing (sword); the past-tense, preterite | mazi | past | |||
| 244 | मातब्बर | maatabbar | powerful, prestigious, respectable, influential | معتبر | mo’ta-bar | reputable, credible, solvent, having good standing, authentic, trustworthy, reliable | |||||
| 245 | माफ | maaf | pardoned, forgiven, exempt | معاف | mo-af | exempt(ed); free, immune; privileged | muaf | exempt | |||
| 246 | मामला | maamlaa | matter, case, affair | معاملة / معامله | muʻāmala / moameleh | trading, negotiating; bargaining with, dealing; giving hard treatment; business, trade, commerce, traffic, affair, negociation, contract, correspondence, agreement; usury, interest | muamele | treatment, transaction, dealing, procedure, proceeding, deal, doings, usage | |||
| 247 | मामा | maamaa | uncle, mother’s brother | ماٴمون | maʼmūn | rendered secure, preserved; freed from, exempted; firm, constant; a person in whom confidence is placed, to whom one trusts; an uncle by the mother’s side | |||||
| 248 | मार्फत | maarfat | through, from | معرفة | maʻrafat | knowledge, science, learning; insight in divine matters or mysteries; art, skill, craft; account, reason, means; by means of, through | |||||
| 249 | माल | maal | stuff, property, money | مال | mal | property, wealth, beast of burden, finance, revenue | |||||
| 250 | मालक | maalak | owner | مالك | malek | proprieter, landlord, owner, possessor | malik | beneficial owner | |||
| 251 | मालामाल | maalaamaal | with lots of money | مالامال | malamal | filled to the brim, brimful, heaped | |||||
| 252 | मालिश | maalish | massage | مالش | malesh | rubbing, friction, massage, shampooing, kneading | |||||
| 253 | मिळकत | miLkat | property | ملکة | milkat | property, possession, kingdom, royalty | |||||
| 254 | मुदत | mudat | time period | مدت | moddat | period, term, duration | |||||
| 255 | मुद्दा | muddaa | issue, point, matter | ماده | maddah | matter, substance, article; paragraph; a point | madde | item, matter, substance, clause, article | |||
| 256 | मुलामा | mulaamaa | plating, gilding | ملمع | mulammaʻ | bright; gilded; plated, electro-plated; a coating of gold or silver; speciousness; imposition, party coloured, poem written in different languages | |||||
| 257 | मुलाहिजा | mulahizaa | consideration, thought | ملاحظه | molahazah | consideration, regard, notice, remark | |||||
| 258 | मुलुख | mulukh | territory, area, land | ملك | molk | property, possessing, having dominion; a kingdom; royalty; power, dominion | mülk | property, estate, possessions, premises | |||
| 259 | मुश्कील | mushkil | difficult | مشگل | mushkil / moshkel | difficult, hard, painful; intricate; doubtful, obscure, ambiguous | — | ||||
| 260 | मेज | mej | table | میز | mez, mīz | stranger, a guest; preparations for entertaining a guest; a table; a chair on which people eat their dinner, writing table, desk | masa | table | |||
| 261 | मेहनत | mehnat | hard work | محنت | mehnat | suffering, trial, toil | |||||
| 262 | मेहेरबानी | meherbaanee | favour, kindness | مهربانی / مﮩربانی | mihrbānī | friendship, friendliness, kindness | — | ||||
| 263 | मैदान | maidaan | playground | میدان | meydan | square, field, ground, arena | |||||
| 264 | मोजा | mozaa | sock | موزه | mūza | boot, stocking, glove, museum | — | ||||
| 265 | मोफत | mophat / mofat | free | مفت | moft | free of cost, gratis | — | ||||
| 266 | मौज | mauz | fun, enjoyment | موج | mowj | wave, surge, undulation | |||||
| 267 | रक्कम | rakkam | amount, figure, money | رقم | raqm, raqam | notation; writing, cypher; description; arithmetic, sign, figure | |||||
| 268 | रजा | razaa | leave of absence | رضا | rezz | consent, assent, acquiescence: agreement, accord, will; pleasure | rıza | consent, assent, compliance, resignation | |||
| 269 | रद्द | radda | cancel | رد | radd | restitution, returning, rejection, disapproval, counterfeit, false, spurious, rejected, unacceptable | red | rejection | |||
| 270 | रसद | rasad | supply | رسد | rasad | a share, portion | |||||
| 271 | रस्ता | rastaa | road | راسته | rasteh | row, series of shops, road | — | ||||
| 272 | रास्त | raasta | fair?, just, reasonable | راست | rast | straight, upright, right, true, honest, just, correct | |||||
| 273 | रुमाल | rumaal | handkerchief | رمال | rumāl | handkerchief, towel, napkin | — | ||||
| 274 | रोषणाई | roShaNaaee | illumination | روشنائی | roshanāʼī | luminous, affording light; light; the marcasite or fire-stone; splendour; ink; an eye-salve | |||||
| 275 | लज्जत | lazzat | taste | لذة | laẕẕat | pleasure, delight, enjoyment, content, sweetness, deliciousness; taste, flavour, relish, savour; wine | lezzet | flavour | |||
| 276 | लवाजमा | lawaazamaa | baggage, entourage, paraphernalia | لوازم | lawāzim | necessary things, requisites, accompaniments, consequences, inevitable results; baggage; a fee, perquisite | — | ||||
| 277 | लायक | laayak | suitable, capable | لایق | layegh | worthy, fit, deserving, meritorious | — | ||||
| 278 | वकील | wakeel | advocate, lawyer | وکیل | wakīl | ambassador, agent, deputy, vicegerent, lieutenant, commissary, factor, administrator, representative; an attorney, pleader, counsellor (at law); a governor, protector, God | vekil | proxy, deputy, representative, attorney, surrogate, substitute | |||
| 279 | वगैरे | wagaire | etcetera | وغیره | va-gheyreh? | et cætera, etc., and so forth | — | ||||
| 280 | वजा | wazaa | minus, subtracted, less | — | |||||||
| 281 | वसूल | wasool | collect (payment), recover | وصول | vosool | reception, arrival, collection (e.g. taxes), recovery | |||||
| 282 | वा / व्वा | waa / wwaa | Bravo! Excellent! | به/ به به | bah / bah bah | Well done! Bravo! Excellent! | |||||
| 283 | वैराण | wairaaN | barren, dry, desolate | ویران | veeran | desolate; ruined; depopulated; abandoned | |||||
| 284 | शरम | sharam | shame | شرم | sharm | modesty, pudency, shame, bashfulness | |||||
| 285 | शहर | shahar | city | شﮩر | shahr | city, town | şehir | city | |||
| 286 | शाई | shaaee | ink | سیاهی | siyāhī | blackness; darkness; shade; nightmare; ink | — | ||||
| 287 | शान | shaan | style, point of pride | شأن | sha’n | rank, dignity, concern, affair, case, regard | şan | glory | |||
| 288 | शाबित | shaabit | proven, established | ثابت | sabet | fixed, firm, immovable, constant, steady, proved, established, confirmed, true, indisputable | sabit | constant, stationary, fixed | |||
| 289 | शाबूत | shaaboot | safe, intact, unharmed | — | |||||||
| 290 | शाब्बास | shaabbaas | kudos | شاباش | shabash | money strewn about at marriages, bravo! excellent! | — | ||||
| 291 | शाहीर | shaaheer | poet | شﮩیر | shaheer | famous, celebrated, well-known | |||||
| 292 | शिकार | shikaar | hunt, hunting | شکار | shikār | prey, game, chase, hunting; plunder, booty, pillage, rapine, spoil; perquisites; (in comp.) hunting, seizing | |||||
| 293 | शिक्का | shikkaa | stamp | سکه | sekkeh | coin, die, stamp, impression | |||||
| 294 | शिपाई | shipaaee | soldier, constable, peon | سپاهی | sipāhī | military, belonging to an army; a horseman, cavalier; a military tenant, lord, feudal chief of a town or village, sepoy | |||||
| 295 | शिफारस | shiphaaras / shifaaras | commendation, recommendation, good word | سفارش | sifārish | commission, recommendation; message, order, instruction | — | ||||
| 296 | शिलेदार | shiledaar | سلاح دار | silāḥ-dār | a sword-bearer, esquire | ||||||
| 297 | शिवाय | shivaay | besides, other than | سوای | sevayeh | except, save for | |||||
| 298 | शेरा | sheraa | comment, remark | شرح | sharh | description, comment, explanation | |||||
| 299 | संदूक | sandook | box, case | صندوق | sandoogh | box, case, safe, chest, coffer | |||||
| 300 | सक्ती | saktee | compulsion, strictness | سختی | sakhtee | difficulty, hard, strictness | |||||
| 301 | सन | san | year | سنة | sanat, sana | a year, revolution of the sun | sene | year | |||
| 302 | सनद | sanad | charter, grant, document | سند | sanad | document, deed, muniment | |||||
| 303 | सरकार | sarkaar | government, boss | سرکار | sarkar | overseer, supervisor | |||||
| 304 | सरबत | sarbat | lemonade, syrup, orangeade | شربت | sharbat | sherbet, a shrub: a beverage of fruit juice, syrup, draught, sip, drink | şerbet | sorbet | |||
| 305 | सर्दी | sardee | cold (sickness) | سردی | sardī | cold, coldness; (met.) harshness, cruelty | — | ||||
| 306 | सल्ला | sallaa | advice, suggestion | صلاح | salah | goodness, rectitude, well-being, welfare, advisable, expedient | |||||
| 307 | सही | sahee | correct, signature | صحیح | saheeh | correct, just, right, proper | sahi | ||||
| 308 | साद | saad | call, call out | — | |||||||
| 309 | साफ | saaf | clean, clear | صاف | ṣāf | pure, clear, sincere, candid; wine; wool; a cloth for straining; producing wool, lanigerous | saf | pure | |||
| 310 | साल | saal | year | سال | sal | year, age | — | ||||
| 311 | साहेब | saaheb | sir | صاحب | saheb | owner, master, sir | sahip | owner | |||
| 312 | सुस्त | susta | languid, relaxed | سست | sost | feeble, weak, languid, listless, lazy, idle, relaxed, lax, slack, gentle, slow | |||||
| 313 | सोबत | sobat | with, companionship, company | صحابت | sahabat; se- | companionship, company | sohbet | chat, talk, conversation | |||
| 314 | हंगाम | hangaam | season | هنگام | hangām | time, hour, season; assembly | |||||
| 315 | हक्क | hakka | rights | حق | ḥaqq, ḥaq | just, right; correct, truth; reality, fact; justice, rectitude, equity; law, reason; right, title, privilege, claim, due; lot, portion, proprietorship; death; duty, obligation; behalf, benefit, interest | hak | right | |||
| 316 | हजर / हाजीर | hazar / haajeer | present, existing | حاضر | hazer | ready, prepared, present, willing, prompt | |||||
| 317 | हजार | hazaar | thousand | هزار | hazar | thousand | — | ||||
| 318 | हद्द | hadda | limit, border | حد | ḥadd, ḥad | boundary, term, limit, extremity, extent; a goal for racers, a starting-post; bar, obstruction, impediment, separation, edge | had | limit | |||
| 319 | हमी | hamee | guarantee, security, surety, undertaking | حامی | ḥāmī | protector, defender; supporter, patron; a person pledging himself to the fulfilment of another’s promise | hami | protector, sponsor, shield | |||
| 320 | हयात | hayaat | alive, surviving, lifetime | حیاة | ḥayāt | life; life-time | hayat | life | |||
| 321 | हरकत | harkat | objection, protest | حركة | ḥarakat | moving; motion, movement, act, action, conduct, behaviour, procedure; misbehaviour, impropriety of conduct; fornication, adultery; agitation; disturbance; prevention; loss, damage; a short vowel | hareket | movement, motion, move, act, action, operation | |||
| 322 | हल्ला | hallaa | attack | حمله | hamleh | attack, assault, charge, agression, offence, rush | |||||
| 323 | हल्ली | hallee | nowadays | حالی | ḥālī | belonging to the present time; new, modern; current (coin); descriptive of a state | halen | currently | |||
| 324 | हवा | hawaa | air | هوا | hava | air, atmosphere, weather, hope, expectation, intention | hava | air, aerial, atmospheric | |||
| 325 | हालत | haalat | state, condition | حالت | halat | state, condition, circumstance, plight, predicament | |||||
| 326 | हिस्सा | hissaa | portion, share | حصه | hesseh | share, portion, part, quota | |||||
| 327 | हुकूम | hukoom | order | حکم | hokm | order, command, sentence, decision | hüküm | provision, verdict | |||
| 328 | हुज्जत | huzzat | argument? | — | |||||||
| 329 | हुशार | hushaar | smart | هوشیار | hosh-yār | prudent, wise, canny; sober, not intoxicated; wary, aware, cautious, vigilant | — | ||||
| 330 | हौद | haud | tank, pool | حوض | howz | tank, pool, pond, basin, dock, reservoir |
Share this:
प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून संशोधनाचे मोठे दालन उघडे होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'फारसी बीन ता बे बीनी नक्श हाये रंग रंग
बोग्जरज मजमु-ए-उर्दू के बीरंग-ए-मनस्त...'
जगप्रसिद्ध शायर, कवी मिर्झा गालिब यांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द. फारसी भाषेत लिहिलेले आणि फारसी भाषेचा गोडवा आणि महती सांगणारे... फारसी भाषा किती उत्तम आहे; हे सांगताना या ओळींत गालिब साहब म्हणतात की, लोकंहो- माझं फारसी लेखन वाचा. त्यातून तुम्हांला कळेल की, हे भाषा किती रंगीबेरंगी आणि गोडवा असलेली आहे. उर्दूपेक्षाही अधिक रंगीत अशी ही भाषा आहे... मध्ययुगीन काळाची साक्षीदार असलेली आणि गालिब यांच्यासारख्या अनेक दिग्ग्गजांच्या लेखणीतून सजलेली ही फारसी भाषा आता तुम्हांलाही शिकता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे हे सर्जनशील पाऊल उचलण्यात येत असून, यंदाच्या वर्षापासून प्रथमच प्राथमिक फारसी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे.
मध्ययुगीन काळाचा अभ्यास करायचा म्हटल्यास फारसी भाषेला डावलून चालायचे नाही. या कालखंडात मोठ्या प्रमाणावर विकसित होत गेलेल्या मोजक्या समृद्ध भाषांपैकी एक म्हणजे फारसी भाषा होय. एकेकाळी भारतातील इस्लामिक सत्तांच्या काळात आपली राजभाषा असणारी आणि पुढे अगदी मराठ्यांच्या कालखंडातही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी अशी ही भाषा मुळातून शिकता यावी, यासाठी यंदा पहिल्यांदाच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती या अभ्यासक्रमाचे शिक्षक आणि फारसी भाषेचे अभ्यासक निखील परांजपे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक तसेच फारसी भाषेत रस असणाऱ्या कुणालाही या अभ्यासक्रमाच्या वर्गांसाठी प्रवेश घेता येईल. येत्या १४ जुलैपासून फारसी भाषेचे नियमित वर्ग सुरू करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या इतिहास विभागात शनिवार आणि रविवारी हे वर्ग भरतील. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आखण्यात आला आहे. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठीची प्रवेशप्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यासाठी इतिहास विभागाच्या ०२०-२५६०१३१७ या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
.
या अभ्यासक्रमात काय ?
फारसी भाषा ज्यात लिहिली जाते; अशा 'नस्तालिक लिपी'ची ओळख यात करून दिली जाणार आहे. या भाषेचे व्याकरण, वाक्यरचना, लिहिणे-वाचणे हेही या प्राथमिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमात शिकविले जाणार आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन, शिलालेख तसेच नाणी यांचे वाचन, इस्लामिक नाण्यांची ओळख यात करून दिली जाईल. ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे यांच्यातील पत्रव्यवहार फारसी होता. त्याचाही अभ्यास करता येईल.
.
हे ठाऊक आहे काय?
मराठीत रुळलेले मूळचे फारसी शब्द :
- जरा
- चेहरा
- रुमाल
- नकाशा
- नाश्ता
- जमीन
फारसी मराठी अनुबंध
आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने.
(टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ. यु म पठाण यांच्या 'फारसी मराठी अनुबंध' आणि प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन यांच्या 'फारसी मराठी कोष' यामधून जशीच्या तशी घेतलेली आहे, त्यामुळे माझे श्रेय इथे फक्त संकलकाचे आहे. मूळ संशोधन डॉ पठाण आणि पटवर्धन यांचे आहे.)
तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत. बाराव्या-तेराव्या शतकात त्यांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली व त्याच सुमारास अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या रामदेवराव यादवांवर स्वारी केली, हा इतिहासही प्रसिद्ध आहेच. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा महाराष्ट्राशी निकट संबंध येऊ लागला, मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने अर्थातच फार्सीचा व मराठीचाही संबंध आला. राज्यकारभारविषयक शिष्ट व्यवहारासाठी फार्सीचा उपयोग होऊ लागला,महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवनही काही अंशी फार्सीमय झाले. मुसलमान राज्यकर्त्याप्रमाणे मराठ्यांनीही इतिहासलेखनास प्रोत्साहन दिले आणि महाराष्ट्रात बखरनवीसांचा, अख्यबारनवीसांचा व पारसनिसांचा एक वर्गच तयार झाला. अगदी एकनाथ महाराजही त्यातून सुटलेले दिसत नाहीत. खालच्या एकनाथी भारुडातले फारसी शब्द पहा:
अर्जदास्त अर्जदार, बंदगी बंदेनवाज, अलेक सलाम साहेबांचे सेवेशी ।
बेंदे शरीराकार जिवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्ले कायापुरी ||
विशेष म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जसा मध्ययुगीन मराठी साहित्याला अरबी-फार्सीचा फ़ारसा स्पर्श होत नाही, तसाच मराठवाड्यातील मराठी भाषेलाही होत नाही. विसाव्या क्रमांकाच्या हातनूरच्या शिलालेखापर्यंतच्या (काल: शके १२२३/ इ.स. १३०१) सर्व शिलालेखांत एकाही अरबी-फार्सी शब्दाचा वापर केला गेल्याचे आढळत नाही, ही मोठी आश्चर्याची बाब होय. ज्ञानेश्वरीत व यादवकालीन महानुभावीय साहित्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके का होईना फार्सी शब्द आढळतात, पण तसे येथे होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. शके १३२० (इ.स. १३९८) मध्ये सुलतान फेरोजशहाचा या लेखांना स्पर्श होतो पण हे चौदाव्या शतकापर्यंतचे शिलालेख स्वत्वाचे एवढे अभिमानी की 'सुरतान 'व 'पेरोजसाहा 'या दोन फार्सी शब्दाव्यातिरिक्त ते कोणत्याही परकीय शब्दाचा स्वीकार करीत नाहीत. त्यानंतर मात्र फार्सी ही बहमनी राज्यकर्त्यांची राज्यकारभाराची भाषा झाल्याने आपोआपच लोकव्यहारातील मराठी भाषेवर अरबी - फार्सीचा प्रभाव पडणे अपरिहार्य होते. त्यामुळे उत्तरोत्तर मराठीत अरबी - फार्सी शब्दांचा आढळ होतो.
बहमनी,शिवकाल व पेशवेकाल यांतील फार्सी - मराठी अनुबंधाचे स्वरूप पाहता त्यात अनेक स्थित्यंतरे झाल्याचे आढळते. बहमनीकालात फार्सीची मराठीशी विलक्षण जवळीक निर्माण झाली पण तिचे रूपान्तर सावटात होऊ नये अशी चिन्ताही शिवकालात वाटू लागली. राज्यव्यवहारकोशाच्या निर्मितीमुळे मराठीच्या अस्मितेच्या रक्षणाचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला खरा पण पुन्हा पेशवेकालात उत्तर भारताशी व मोगल राजवटीशी संपर्क येऊ लागल्याने फार्सी - मराठीचे संबंध अधिक व्यापक व घनिष्ट झाले.मराठी माणसाच्या जीवनव्यवहाराशी,वाड्मयव्यवहाराशी ,भाषिक व शासकीय व्यवहाराशी असलेला फार्सी भाषेचा हा संबंध उत्तरोत्तर वाढत वाढतच गेला. अव्वल इंग्रजीत व इंग्रजी अमदांनीत,मुसलमानांची राजवट नसतानाही तो टिकून राहिला. एवढेच नव्हे तर इंग्रज हा देश सोडून गेल्यावरही गेले अर्ध शतक हा अनुबंध टिकूनच राहिला.
व्यक्तिनाम हे विशेषनाम असते पण आडनाव हे सामान्यनाम असते. आडनावाचा त्या त्या घराण्याशी संबंध येतो, त्यामुळे फार्सी शब्दयुक्त आडनावांचा मराठी माणसाने केलेला स्वीकार ही त्याच्या जीवनव्यवस्थेतील महत्त्वाची घटना होय, इस्लामी राजवट जाऊन काही शतके लोटली तरी ही आडनावे तशीच कायम आहेत त्यावरून हा प्रभाव किती दूरगामी होता,ते कळते. फार्सी शब्दयुक्त विशेषनामांप्रमाणेच यादवोत्तर कालात महाराष्ट्रात फार्सी शब्दयुक्त हुद्दे रूढ झाले व त्यांचेच पुढे आडनावात रूपान्तर झाले. त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई, त्याविषयीही इतिहासकार वि का राजवाडे यांनी या शब्दांत खंत व्यक्त केली आहे - 'सौदागर, मुश्रीफ,सराफ,चिटणीस,फडणीस पोतनीस ,हेजीबराव,दिवाण,वाकनीस ,वफ्तरदार, वगैरे फारशी आडनावेहि मराठीत रूढ झाली, 'बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?'
ही आडनावे किंवा हुद्दा / व्यवसाय दर्शविणारे फार्सी शब्द मुसलमानपूर्व महाराष्ट्रात मुळीच प्रचारात नव्हते, हे मत श्री.वा.कृ.भावे यांनी सप्रमाण नोंदविले आहे.मराठी बखरींत आढळलेली फार्सी शब्दयुक्त आडनावे देत आहे, त्यांतील बरीच आडनावे आजही रूढ असल्याचे दिसून येईल. बखरींतील या आडनावांची संख्याच साठपेक्षा अधिक आहे, त्यावरून हा प्रभाय किती मोठा होता तेही कळेल.
अंकबरनीस (फा. अख्बार नवीस् - बातमीपत्र पाठविणारा)
अमीन (अ. अमीन् = विश्वस्त )'
कानगौ (फा. कानून्गो = वहिषाटीची नोंद ठेवणारा)
कारखानीस (फा. कार्निह-नवीस् कारकून)
कारभारी (फा. कार्बारी नव्यवस्थापक,दिवाण)
*कासीद (फा. कासिंद् = पत्रे पोहोचविणारा दूत)
*किल्लेदार (फा. कलअह -दार् = दुर्गाधिपती, किल्लेकरी)
*कोतवाल (फा.कोत्वाल् किल्लेदार, दारोगा)
खासगीवाले (फा. खासगी, राजाच्या खासगीचा अधिकारी)
खासनीस (फा. खास - नवीस् )
चिटणीस (फा. नवीस ) = पत्रव्यवहार करणारा
*जकाते (अ. ज़ुकात् ) च जकात वसूल करणारा,
*जमादार (फा. टोळीचा / तुकडीचा नायक)
*जहागिरदार (फा. जागीर दार )
ठाणेदार (फा. दार )
*डबीर (फा. दबीर् = लेखक,कारकून,चिटणीस)
*तबीब (अ. तबीब् > वैद्य)
*तोफखाने (तुं. लोप् 4- फा. खानह् )तोफखानेवाला
*दप्तरवार (फा. दफ्लर् दार् कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी)
दफेदार (फा. दफूअदार् रिसाल्यातला लहान, अधिकारी)
*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)
*दिवाण (फा. दीवान् = प्रधान)
*दिवाणजी (तु. दीवान् ची = प्रधान)
नालबंद (फा. नअलबंद = नाल छोकणारा)
*पागनीस (फा. पाय्गाह नवीस् रिसाल्याकडील कारकून )
*पागे (फा.पायूगाह = रिसाल्याचा अधिकारी )
पागेदार (फा. पायूगाह दार् )
*पारसनीस (फा. फार्सीनवीस् = फार्सी पत्रव्यवहार करणारा)
*पेशवे (फा.पेश्वा = पुढारी पंतप्रधान)
पोतदार (फा. पोतहदार् = नाणेपारखी )
*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस् लिहिणारा )
*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा)
बक्षी (फा. बख्शी = सैन्यात पगार वाटणारा)
*बारगीर (फा. बार्गीर् = धन्याने दिलेला घोडा ठेवणारा शिपाई )
*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी)
बेलदार (फा. बेलदार = खणत्या)
*म॒ (मु) जुमदार (फा, मजुमूअदार् = बसुली कारकून)
*महाले (अ. महल) = महालाचा रक्षक?
"मिराशी (अ. मीशस् ) = मिराशीचा उपभोग घेणारा
*मिरासदार (फा. मीरासीवार्)
मिर्धा / धे (फा. दहा शिपायांचा नाईक)
*मोकाशी (मुक्रासा)
*रास्ते (फा.रास्त् )
*वाक(के)नीस (फा. वाकिअ नवीस् = अखबार नवीस् )
*शिकिलकर (फा. सैकल्गर् = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा )
*शिलेदार (फा. सिलह्दार् = सैन्यातील राऊत)
शेखदार (अ. शेख , फा. दार् )
*सबनीस (फा. स॒फूनवीस् र् सैन्यातील तुकड्यांतील सैनिकांची गणती करणारा )
*सरदार (फा. सरदार : बडा अधिकारी, मनसबदार)
सरंजामी (फा. सरंजामी)
*सरंजामे
*सराफ (अ. सर्राफ़ : सोनेचांदीचा व्यापारी)
*सुभेदार (फा, सूबद्ददार् प्रान्ताधिकारी)
हकीम, हकीमजी (अ, हाकिम् = आज्ञा देणारा अधिकारी)
*हजारी, हजारे (फा. हजारी, हजार सैनिक बाळगण्याची मनसब असलेला)
हरीप, हरीफ (अ. हरीफू) '
*हशमनीम, हसबनीस (फा. हशम्नवीस् = हशमाकडील कारकून)
*हधालदार (फा. हवालत् - वार्)
*हेजीब (अ. हाजिंब् = वकील)
मुळातले हुद्दे (व्यवसाय व त्यांचे स्वरूप लक्षात यावे, यासाठी येथे मूळ शब्द व त्यांचे डॉ.पटवर्धन यांनी दिलेले अर्थ वरील यादीत नौंदविले आहेत.
*या खुणेने दर्शविलेली आडनावे आजही महाराष्ट्रात प्रचलित आहेत, याशिवाय गुमास्ते (फा.गुमाश्तह),दासताने (फा. दास्तान ), पेशकार (फा.पैश् कार),शिकारखाने (फा. शिकार् गानद्),वकील॑ (अ. वकील) अशी कितीतरी आडनावेही आढळतात.
फार्शी लेखक पर्यायवाचक शब्दांचे विशेष चाहते; त्यामुळें कांही शब्दांना प्रतिशब्द अनेक आहेत, ऐक्य व सख्य यास आश्नाई, इख्लास, इतलाखी, इंतफाक,
इतह्मद, इरतिंबात, इस्तियाक, एक-दिली, एक-रछ्टगी, एकी, खला-मला, ससूसीयत, तस्फिया, दिल्जमाई, दोस्ती, वसालत, मुस्ताकी, यगानगत वगेरे १८ वर प्रतिशब्द आहेत. वैर-भाण्डण या अर्थी अकस, कर्कैशा, कजिया, किलाफ, खळश, खिसा, जिकीर, जुदाई, दावा, दुस्मनगी, दुही, निफाक, पुर्कश, बर्कशी, असे १४ वर शब्द आहेत. प्रतिष्ठा याअर्थी अज, अस्करा, आब, आबताब, इज्जत, तम्मा, नक्श, नछग, नामोश, वकर, शोहरत, हुर्मत वगैरे १२ वर शब्द आहेत. कौटिल्य या अर्थी कंवाईत, केंद्, दुगा, फन्द, फरेब, मकर, हुन्नर, हरिफी, हिक्मत, वगेरे ९ वर शब्द आहेत. संशय या अर्थी अन्देशा, गर्द, गुबार, गुमान, दग्दगा, वस्वास, वहीम, शुक, शूभ वगेरे ९ वर शुब्द आहेत. समाधान या अर्थी खातर, खातरजमा, खातदारी, खातर्दास्त, तक्वा, तमानीयत, तशफ्फी, तसली, दिल्दारी, दिल्भरी, दिलासा वगेरे ११ वर शब्द आहेत. पीडा या अर्थी आजार, कसाला, जूबरी, जळाल, जाजती; जुळूम, तश्वीस, ताशसि वगैरे शब्द आहेत. शिक्षा या अर्थी तस्बी, नातिजा, नश्यत, शास्त, सजा असे पांच शब्द आहेत. परिश्रम या अर्थी कस्त, कोशीस, मशायत, मेहनत, शिकस्त, सई असे शब्द आहेत. चाल-रिवाज या अर्थी तऱ्हा, तरिका, दस्तूर, पाय-रव, मामूल, रव, रस्म, रवेश, रहा, रिवाज, शिरस्ता, सुदामत असे १२ शब्द आहेत. फार्शीनें मराठींत पर्यायवाचक शब्दांची भर किती आणि कशी केली आहे हें कळायला वरील विवेचन पुरे आहे.
हे असे शोधुन काढणे मोठे मनोरंजक आहे. म्हणजे बघा वरील
*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी) आणि *शिलेदार (फा. सिलह्दार् = सैन्यातील राऊत) हे दोन स्वतंत्र शब्द आहेत याचवरुन बनलेला मराठीत एक खास शब्द वापरला जातो " बिनीचे शिलेदार "
*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा) पुण्यात एक पोलीस चौकी आहे " फरासखाना" नावाने म्हणजे हे पुर्वी काय असणार इथे ?
तसेच
*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस् लिहिणारा )
नाना फडणवीस म्हणजे एक आग्रह मी बघितलाय नाना फडणीस नव्हे नाना फडणवीस व पाहीजे हा आग्रह काहीशा शुद्धतेच्या आग्रही अभिनिवेशाने धरला जातो.
तेव्हा त्याच्या शब्दाचा मुळांविषयी अनभिज्ञता हे कदाचित एक कारण असावे. म्हणजे मुळ तर फारसी आहे मात्र आमचे व्हर्जन असे असेच असावे या प्युरीटनीस्ट आग्रहाची मौज वाटते.
याच पुस्तकात एक शब्द दिलेला आहे "रिसाला" याचे रुट रिसालह = घोडदळाची तुकडी असे दिलेले आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दर रंगपंचमीच्या दिवशी राजा ची रिसाला मिरवणुक निघण्याची परंपरा आहे. म्हणजे राजा बहुधा कधी काळी घोडदळाच्या तुकडी सहीत निघत असावा त्याला तेथे " रिसाला " मिरवणुक असेच म्हटले जाते. तो राजा पुढे गेला की मग रंग खेळणे बंद होते अशी गाव परंपरा आहे.
देवनागरी कशाला, मूळ स्वरूपात वाचता येईल की. फार अवघड नाहीये.
हे एक पुस्तक आहे - चित्रे पाहून शब्द शिका, सोपे ani मजेदार आहे
http://ncertbooks.prashanthellina.com/class_1.Urdu.IbtadayeUrdu/all_in_one1.पडफ
दुसरा सोपा उपाय - फारसी शब्द कॉपी करून ईथे पेस्ट करा. हि साईट तुम्हाला ती गझल वाचून दाखवेल.
http://farsireader.com/webdemoen/
(शेवटचे वाक्य त्यांची जाहिरात आहे - आपण टाकलेला मजकूर नाही )
शिकिलकर (फा. सैकल्गर् = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा
"शिकलकरी" या नावाने ओळखला जाणारा समाज माहीतीत आहे. हे साधारण शिख लोकांसारखे डोक्यावर फेटा बांधतात.
पण हा मुळ शब्द आणि यांचा असा संबंध माहीत नव्हता.
अजुन एक प्रश्न असा पडतो की कारखानीस चिटणीस मुजुमदार फडणीस पोतनीस टिपणीस अशी बरीच नावे " चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ची आडनावे आहेत
या समाजाचा सामाजिक इतिहास हा या व्यवसायाच्या नोकरीच्या अंगाने पडताळता येइल का ? म्हणजे मुघलांच्या सेवेत या समाजाचे प्रमाण अधिक असावे का ? कशा स्वरुपाचे असावे ? की आडनावे इथेच या समाजात उचलली गेली इतर समाजातही असे नोकरी करणारे असतीलच पण आडनावे नसतील लावली कदाचित
अरबीत संपूर्ण नाव लिहिण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे...
(व्यक्तीचे नाव) बिन / बिन्त* (वडिलांचे नाव) बिन (आजोबांचे नाव) अल् (घराण्याचे/ट्राईबचे नाव)
* बिन = चा मुलगा आणि बिन्त = ची मुलगी.
एक अस्सल मराठी (?) शब्द आहे शिपाई. सिपाही हा मूळ फारसी शब्द आहे. त्यावरून मराठीत शिपाई आला. चपराशी व शिफारस हे देखील मराठीत रुळलेले मूळचे फारसी शब्द आहेत.
शेवटी त्या सुप्रसिद्ध मराठी वाक्याची आठवण होतेच : शाब्बास तुमच्या रुस्तुमीची, दिलेरीची आणि सफेजंगीची.
अमीन आडनाव ब्राह्मणात पाहिलेले आहे. खासगीवाले पण. त्यांचा उगम असा असेल असे वाटले नव्हते. दहावीला माझ्या बरोबर एक शेरखाने आडनावाचा मुलगा होता.
'ढालगज-भवानी' हा शब्द अनेक वेळा 'भोचक' वा 'पुढे पुढे मिरविणारी अशा अर्थाने वापरला जातो. मात्र या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तर जिला उद्देशून हा शब्द वापरला गेला तिला ते अभिमानास्पद वाटेल.
ढाल म्हणजे कवच, संरक्षक आवरण.
गज म्हणजे हत्ती.
भवानी म्हणजे आरंभ, आघाडी, कार्याला सुरुवात.
पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न.
यासाठी मदमस्त हत्तींना मस्तकावर कवच चढवून किल्ल्याच्या दारावर मुसंडी मारायला लावले जात असे. प्रचंड ताकदीच्या हत्तीने दिलेल्या धडकांनी दरवाजा कोलमडून अखेर किल्ल्यात प्रवेश शक्य होत असे. यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न करता स्वामीच्या आज्ञेनुसार धडका देणार्या हत्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची.
तेंव्हा ढालगजभवानी म्हणजे परिणामांची तमा न बाळगता, अडचणींची पर्वा न करता ध्येयाप्रत पोचण्यासाठी पुढे सरसावलेली पराक्रमी स्त्री असा आहे.
- सर्वसाक्षी
तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत.
याचा अर्थ असा की पर्शियन लोकांनी/राजांनी भारतावर कधीच आक्रमण केलं नाही (अपवाद फक्त नादिरशहा). भारतात फारसी भाषेचा प्रचार व प्रसार झाला तो तुर्क व मंगोल्यांमुळे. त्यांच्या स्वत:च्या भाषेत राज्यकारभाराविषयी काहीच माहिती नव्हती. युद्ध जिंकणं वेगळं आणि जिंकलेल्या प्रदेशाच्या राज्यकारभाराची घडी बसवणं वेगळं.
तर मग मराठीतले फारसी शब्द हे तुर्क व मंगोल्यांचं भाषादारिद्र्यच दर्शवीत नाही काय? अर्थात, मराठीत राजनीतीसाठी प्रतिशब्द उत्पन्न करायला हवेतंच. किंबहुना शिवाजीमहाराजांनी ते तसे केलेही आहेत. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की मराठीतले फारसी शब्द हे एका वेगळ्या तथ्याकडेही अंगुलीनिर्देश करतात. त्यामुळे मराठीच्या शुद्धतेचा आग्रह हा मराठीचं अंगभूत सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी असावा.
पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या
पर्शियन भाषेत स नाही असे नसून, संस्कृतमधल्या शब्दाच्या सुरुवातीच्या स चा पर्शियनमध्ये ह होतो.
स असलेल्या पर्शियन शब्दाचे उदाहरण म्हंजे "अस्प". तो अश्व या शब्दावरून आलेला असून, त्याचा अर्थही घोडा असाच आहे.अरबी अन फारसी या पूर्णतः वेगळ्या भाषा म्हटल्या तरी चालेल. फारसी ही इंडोयुरोपियन भाषाकुळातली , तर अरबी ही सेमेटिक भाषाकुळातली भाषा आहे. दोहोंत जे साम्य आढळते त्याचे कारण म्हंजे इराणवर अरबांच्या आक्रमणानंतर फारसी भाषेत अनेक अरबी शब्द शिरले हे होय. अन वर्णमालेत काही नवी व्यंजनेही आली. मुख्य म्हंजे फारसीची लिपी बद
लली. मूळ अरबी भाषेचीच लिपी वुइथ सम मॉडिफिकेशन्स फारसीला वापरू लागले. फारसीतून काही नवे शब्दही आले, उदा. पैगंबर. मूळ अरबी भाषेत प हा साउंडच नाहीये, अरब लोक इंग्रजीतील प चा बोलताना ब करतात बर्याचदा. बिका नाहीतर पेठकरकाका हे कन्फर्म करू शकतील. इन फॅक्ट, फा़रसी हे नावच मुळात अरबांमुळे मिळाले आहे. त्याच्या आधीचे नाव पारसी असे होते. अरबांना प उच्चारता येत नसल्याने त्यांनी त्याचा फ़ केला.
तू दिलेली उदाहरणे रोचक आहेत. पण नेटवर पाहिले तर त्यांचा मूळ अरबी उच्चारच उथ्मान आणि हादिथ असे आहेत असे दिसले.
عثمان بن عفان,= उथ्मान बिन अफान
حديث,= हदीथ
त्यामुळे हा एक वेगळा प्रकार आहे. शुद्ध ब्रिटिश्/अमेरिकन इंग्रजी उच्चारात "नॉर्थ" या शब्दातल्या थ चा उच्चार मराठीतल्या थ पेक्षा लै वेगळा असतो- ऑल्मोस्ट स वाटेल असा. इथेही तोच प्रकार आहे असे त्याच्या फोनेटिक साईनवरून वाटते. त्यामुळे मराठी कानांना ते ऐकून स वाटले असण्याचीच शक्यता जास्त.
फारसीची मूळची लिपी खरोष्टी होती का? बाकी पर्शियामध्ये पारस नावाचा एक प्रांत होता. त्यावरूनच पर्शिया असे नाव परकियांनी दिले असे माहितीय. बाकी पर्शियन लोक स्वतःला मॅगीयन म्हणवून घेत असे काहीसे होते.
मूळ अरबी उच्चारच उथ्मान आणि हादिथ असे आहेत हे रोचक आहे.
फारसीची सर्वांत जुनी लिपी क्यूनिफॉर्म होती. ५००-६०० बीसी ते २००-३०० बीसी पर्यंत चालली. खाली पहा क्यूनिफॉर्म. डरायस इ. चे शिलालेख याच लिपीत आहेत. ही डावीकडून उजवीकडे लिहिली जात असे.
नंतर पुढे मग पहलवी लिपी सुरू झाली. ती अरबी आक्रमणानंतर काही वर्षांपर्यंत सुरू राहिली. पुढे मग अरबी लिपीचा प्रसार सगळीकडे झाला. फक्त पारशांच्या धार्मिक लेखनात तेवढी ही लिपी नंतर टिकून राहिली. पहलवी लिपीचा नमुना खाली दिलेला आहे. ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे.
उलटे फाळ असलेल्या बाणांसारख्या रेषांवरून बनलेली क्यूनिफॉर्म लैच भारीय रे.
बाकी पहलवी, अरबी , फारशीबद्दल मला नेहमीच एक प्रश्न पडतो तो असा की ह्या लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात पण वाक्यरचनासुद्धा अशीच असते का? म्हणजे वाक्य लिहिणे/ वाचणे सुद्धा उजवीकडून डावीकडे असते का फक्त एकेक शब्द उलटा वाचत पुढे सरकत राहायचे?
क्यूनिफॉर्म लिपी बघायला एकदम भारी वाट्टे-सवालच नाही.
बाकी पहलवी, अरबी , फारशीबद्दल मला नेहमीच एक प्रश्न पडतो तो असा की ह्या लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात पण वाक्यरचनासुद्धा अशीच असते का? म्हणजे वाक्य लिहिणे/ वाचणे सुद्धा उजवीकडून डावीकडे असते का फक्त एकेक शब्द उलटा वाचत पुढे सरकत राहायचे?
येस्स वाक्यसुद्धा. उदा. उर्दूतले हे वाक्य बघ. मराठी वाक्य उर्दू लिपीत लिहिले आहे.
میسالپااو حیی عک ماراٹحیی وپسایٹ اھع۔
.(आहे) (वेबसाईट) (मराठी) (एक) (ही) (मिसळपाव)
अक्षरन अक्षर उजवीकडून डावीकडे लावत जायचे. आता यात एक अजून मजा अशी, की उर्दू-फारसी-अरबी लिपी लिहिताना आकडे मात्र डावीकडून उजवीकडे लिहितात- भारतीय पद्धत ढापल्यामुळे ;)
अरबी मधे अपुर्णांक कसे लिहितात ही एक शंका आहे माझ्या मनात अजुन , कारण ह्यांचे . म्हणजे ० .
अपूर्णांक म्हणजे पॉइंटवाले नंबर कसे लिहितात हे पाहिजे असेल तर ही लिंक पहावी.
डेसिमल पॉइंटसाठी एक कॉमा दिला पाहिजे असे त्यात दिलेय. म्हणजे समजा ३.५ लिहायचे असेल तर ٣.٥ असे लिहावे लागेल.
३/५ लिहायचे तर ٣/٥ असे लिहावे लागेल. सहज शोध घेता घेता ही लिंक सापडली.
मॉडर्न अरेबिक मॅथेमॅटिकल नोटेशन.
त्यात तर अगदी लिमिट, डेरिव्हेटिव्ह, सम, प्रॉडक्ट, इ. ची नेहमीची नोटेशन्स अरेबिक लिपीत कशी लिहिली जातात, हे दिलेले आहे. चिन्हे मजेशीर आहेत. साईन,कॉस, इ. ची तर विशेषतः.
डेसिमल पॉइंटसाठी एक कॉमा दिला पाहिजे असे त्यात दिलेय.
>> ओके . माझा गोंधळ ३.५ आणि ३०५ मध्ये होत होता... धन्यवाद :)
त्यात तर अगदी लिमिट, डेरिव्हेटिव्ह, सम, प्रॉडक्ट, इ. ची नेहमीची नोटेशन्स अरेबिक लिपीत कशी लिहिली जातात, हे दिलेले आहे. चिन्हे मजेशीर आहेत. साईन,कॉस, इ. ची तर विशेषतः.
लिन्क पाहिली ...फारच भयंकर चिन्हे आहेत
माझ्या निरिक्षणानुसार दशांश चिन्ह, स्वल्पविराम स्वरूपात (,) लिहीतात. पूर्णविराम (.) शून्य दर्शवितो. पोकळ वर्तूळ (अंडाकृती) म्हणजे ५.
म्हणजेच ३.५ लिहीताना ٣,٥ असे लिहावे लागेल तर ३०५ असे लिहीताना ٣.٥.
अरेबिक मध्ये 'प' चा 'ब' होतो. 'स' चा 'झ' होतो. त्यामुळ 'पेठकर'चा 'बेतकर' होतो तर 'पैसा' चा 'बैझा' होतो.
ही निरिक्षणे आहेत. अरबी व्याकरणाशी माझी तोंडओळखही नाही.
आकडे आणि विशेषतः शुन्य भारतातून अरबांकडे आणि त्यांच्यामार्फत युरोपमध्ये गेले हे आता सर्वमान्य आहे... त्यामुळेच अरबी अंकांना 'हिंदी न्युमरल्स' म्हणतात आणि इंग्लिश अंकांना 'अरेबीक न्युमरल्स' म्हणतात.
अक्षरे उजवीकडून डावीकडे लिहित असतानाही आकडे डावीकडून उजवीकडे लिहीणे हा त्याचाच एक फार मोठा पुरावा आहे.
नेटवर पाहिले असता खरोष्ठी लिपी दिसायला बरीच वेगळी दिसते या लिप्यांपेक्षा. अर्थात देवाणघेवाण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे आलेच. अॅरेमाईक लिपीशी पहलवी अन खरोष्ठी दोहोंचे साम्य आहे. फक्त डैरेक्ट देवाणघेवाण नसावी असे वाट्टे.
येस्स, त्या लिप्या सिमिलर आहेतच. अशोकाच एक शिलालेख तर ग्रीक/अॅरेमाईक असा द्वैभाषिकही आहे. त्याचे वरिजिनल मिळाले तर पाहतो, मजा येईल बघायला.
तुझे कष्ट हलके केले.
हे बघ इथे आहे ओरिजीनल आणि भा
षांतरीत.
http://www.ancient.eu.com/image/259/
बाकी ग्रीक व्हर्जनमध्ये βασι[λ]εὺς Πιοδασσης = वासिलेउस पिओदास्सेस= राजा प्रियदर्शी. जेम्स प्रिन्सेपला ग्रीक अन ब्राह्मी लिपीत लेख असलेले नाणे सापडले त्यातला ग्रीक शब्दही βασι[λ]εὺς हाच होता असे वाचल्याचे आठवतेय.
पर्शियन लोक स्वतःला मॅगिअन म्हणवून घेत असत हे रोचक आहे. इंग्लिश मधला मॅजिक हा शब्द त्या मॅगिअन वरून आलाय असे एक सीरिअस मत वाचले होते कुठेतरी. (होय, कुणी पु ना ओकांना आठवायला नको :) )
मॅगियन्स बद्दल इथे लैच रोचक माहिती आहे.
सुरुवातीलाच त्यात स्पष्ट केलेय की मॅजिकचा मॅगियन्सबरोबर काहीच संबंध नाही.
खरोष्ठी लिपीचा वापर चीनच्या अंतर्भागातही होत होता हे निय येथील उत्खननातून दिसून आले आहे. विकीवर या विषयी अनेक दुवे आहेत त्यापैकी एक : http://en.wikipedia.org/wiki/Niya_%28Tarim_Basin%29
उपक्रमावरही नियाविषयी चर्चा झाली होती.
निया ठिकाण तर चीनच्या उत्तर्पुर्वेला झिंजियांग मधे आणि सिल्क रूटवरचे आहे... मध्यपुर्वेतले व्यापारी त्या सिल्क रूटच्या उगमापर्यंत म्हणजे चीनची पहिली प्राचीन राजधानी शियानपर्यंत पोहोचले होते. त्याचे वंशज चीनमध्ये अजूनही 'हुई' म्हणून ओळखले जातात. शियानमध्ये तर त्यांची एक मोठी वस्ती आहे (जसे इतर देशात चायनाटाउन असते तसे) ! त्यामुळे चीनच्या उत्तर्पूर्वेला खरोष्ठी भाषेचे असणे सहाजीकच आहे.
'एक असीरीयन मुलगा ' म्हणजे हल्लीच्या संदर्भात कोण्या देशाचा, त्याची मातृभाषा कोणती ?
त्याचे आई वडील इराण मधुन आलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते मुसलमान नाहीत असीरीअन आहे. त्यांची भाषा वेगळी आहे. नावं ख्रिश्चन आहेत...ख्रिश्चनांचाच एक प्रकार आहे असं त्या मुलाची आई सांगत होती.
शक्य आहे... सिरियचे अरबीतले नाव "अस्सुरिया" असेच उच्चारले जाते. लिहिताना "अल् सुरिया" असे लिहितात. उच्चारताना (काही वेळेस लिहितानाही) अल् मधला ल् नंतर येणार्या व्यंजनाप्रमाणे बदलतो. जसे अल् नूर (प्रकाश) = अन्नूर, अल् दम्माम (दम्माम शहर) = अद्दमाम, इ.
आता प्रश्न असा आहे की: (१) "अल् सुरिया" मुळे ही सुरभूमी / देवभूमी मानयची की (२) "अस्सुरिया" मुळे ही असूरभूमी मानायची ?
आताचे जॉर्डन, लेबॅनॉन, सिरिया, इराक या देशांच्या भूमीवरचे इस्लामपूर्व संस्कृतीचे सर्व अवशेष, काही रोमन अवशेष वगळता, नष्ट केले गेले आहेत. मात्र याला एक फार मोठा अपवाद आहे.
जॉर्डनच्या जगप्रसिद्ध पेत्रा व्हॅलीत इस्लामपूर्व संस्कृतीचे अवशेष आहेत. त्यांत रोमनपूर्व आणि रोमन अशा दोन्ही संस्कृतींची सरमिसळ दिसते. तेथे माणसे मृत झाल्यावर त्यांचे दहन करून नंतर अस्थी /राख डोंगराच्या खडकांत कोरलेल्या थडग्यांच्या दरवाज्यावर कोरलेल्या कलशात ठेवण्याची प्रथा होती.
तसेच पेत्रा व्हॅलीच्या वेशीवर आपल्याकडे गावाच्या वेशीवर असते तशी गावाचे रक्षण करणार्या देवाची मुर्ती आहे... आणि मुख्य म्हणजे त्या देवाशेजारी त्याच्या पत्नीचीही मुर्ती कोरलेली आहे !
Persian Writing Lesson 1
This page is recommended if
you want to write in Persian. On this page you’ll find the same letters
you have just studied This week. It will also help you detect Persian
letters quite easily. Here, all you need to do is follow the arrows and
numbers carefully. Please practice them for a couple of times.

Let’s Write 1
Notes:
- As you know, Persian letters are written from right to left. Please follow the arrows.
- As you see, there are some ‘dots’ or ‘full stops’ on or under the letters. Please put the ‘dots’ in appropriate places.
- Please pronounce the letters with /e/ sound. /e/ as in bed.
- There are lines for Persian letters called ‘base lines’. When writing, you’ll have to keep an eye on the ‘base lines’.
Lesson 1
https://easypersian.com/writing/lets-write-1/








































No comments:
Post a Comment