शैव मत
शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.
भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.
इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.
नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.
आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.
शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..
मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना
श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.
या पंथाच्या तीन मुख्य शाखा..
१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.
१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.
शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.
शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.
प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.
पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.
२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.
३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.
पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).
अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.
I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग
I. मंत्रमार्ग
मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार
अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.
कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.
या मताचा गोषवारा असा.
१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव
स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन
प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न
झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.
काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..
काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).
ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.
मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.
मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.
असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.
कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.
कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.
अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.
II. अतिमार्ग
अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.
हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.
पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.
कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.
बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.
उपसंहार
गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.
एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.
आरंभ :
पौराणिक काळांतील देवतासंघ जरी एकेश्वर वादांचे समर्थन करीत असला तरी त्याचे मूळ आधार शिव, विष्णू व ब्रह्मदेव हे आहेत. यापैकी पुढें ब्रह्मदेवाचे महत्त्व कमी होऊन त्याची जागा शक्ती, सूर्य व गणपती यांनी घेतली व पंचदेवोपासना रूढ झाली. हे वर पाहिलेच आहे. आता आपण शिवासंबंधी विचार करू.समन्वयवादी भारतीय प्रवृत्तीची एक फार मोठी फलश्रुती म्हणून शिवाकडे बोट दाखविता येईल. आज विद्यमान असलेल्या शैव संप्रदायांत अनेक प्राचीन मतें व संप्रदायांची मिळवणी झालेली दिसते. शिव व शक्ती हे भौतिक जगताचे आधार स्तंभ होत. सृष्टीचे मूळ शिवशक्तीच्या संयोगात आहे, पण जर शक्ती शिवाकडून विनियंत्रित नसली तर मात्र ती कहर उडवून देते. पूर्ण विकसित अशा शक्तीला शांत करण्याचे सामर्थ्य शिवाचेच आहे. तो येन केन प्रकरेण हे कार्य करीत असतो. रणोन्मादाने बेफाम झालेल्या शिवारूढ कालीची मूर्ती हाच अभिप्राय दर्शविते. असें सांगतात की रणांत उन्मत्त झालेल्या कालीला आवरणें जेव्हां असंभव होऊं लागले तेव्हां ऊर्ध्वमेढ शिव स्वतः उताणा पडला व त्यानें आपल्या अंगावर बेफाम उसळणाऱ्या कालीचे पाय पडू दिले व नंतर तिला आवरले. कालीच्या मूर्तीप्रमाणेंच अर्धनारीश्वर, शाळुंकेत बसविलेली शिवाची पिंडी, हरिहर, वगैरे प्रतिमा शिव-शक्तीच्या अविच्छिन्न संबंधाच्याच द्योतक आहेत. भग व लिंग हे शक्ती व शिवाचे प्रत्यक्ष प्रतीक होय. सर्व सृष्टी याच दोन प्रतीकांभोवती फिरते आहे. या मूळ सिद्धांताला साहित्य, दर्शन, कला, वगैरे अनेक पर्यायानें प्रतिपादन करण्यांचा प्रयत्न झालेला आहे. महाभारतात उपमन्यूच्या आईनें प्रत्यक्ष योनी व भंगचिन्हांकित जगताचे उदाहरण घेऊन माहेश्वर मताची बाजू फारच सफाईदारपणे उचलून धरली आहे'; व या मताच्या प्राचीनतेकडेही संकेत केला आहे.
पिंडी किंवा शिवलिंग :
सिंधुनदीच्या खोऱ्यांत ज्या प्राचीन वसाहतीचे अवशेष सापडले आहेत. त्या वसाहतीच्या वेळेपासून लिंगपूजा या देशात चालत आली असें म्हणतां येते. श्रीपरिपूर्णानंद वर्मा यांनी अनेक पाश्चात्य लेखकांच्या मतांचा आधार घेऊन आपल्या ग्रंथांत हे दाखविण्यांचा प्रयत्न केला आहे' कीं 'जगाच्या कान्याकोपऱ्यांत वासना आणि प्रजनन या दोन कारणामुळे लिंग-पूजेचा प्रसार झाला होता.' एका दुसऱ्या लेखकाचे, कटनरचे, म्हणणें असें कीं लिंगपूजा सर्वप्रथम इजिप्त देशांत सुरू झाली व ती तेथे ख्रिस्ताच्या चौथ्या शतकापर्यंत चालू होती. श्री. वर्मा यांनी या पद्धतीविषयी जास्त विस्ताराने लिहितांना असें विधान केले आहे कीं इजिप्तमध्ये आयसिस याने सर्व प्रथम लिंग-पूजनांचा प्रारंभ केला. पुढे आयसिसची रोममधे पूजा सुरू झाली. आयसिसच्या मंदिरात अग्नी सदैव पेटत ठेवीत व तेथील पुजाऱ्यांना आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घ्यावे लागत असे. या अग्नीचे पूजन 'अक्षतयोनि' अशा कुमारिकाच करीत. या विधानांत आलेल्या काही ठळक गोष्टींना शिवाचे अग्निरूप, त्याचे 'शिखि' हे नांव, त्याचा अग्निमय तिसरा डोळा, शाश्वत प्रजजन शक्तीला दर्शविणारी त्याची ऊर्ध्वमेढू स्थिती आणि त्यानें केलेला कामदहनाचा पराक्रम, वगैरे शैव कथानकांशी ताडून पहातांना खरोखरच मौज वाटते. अध्यात्माच्या रंगात रंगलेल्या भारतात आयसिसच्या कथेला एक निराळेच वळण मिळाले. येथे शिव हा ज्ञान स्वरूप असून त्यानें कामदहन केले म्हणजे पार्वतीचे सुख हिरावून घेतले असें नाही; तर त्यानें ज्ञानाश्रीनें अविद्या किंवा अज्ञानरूपी तमांचा नाश केला. येथे शिव लिंगाचा अर्थ आहे अग्नीची ज्वाला आणि शाळुंका किंवा योनी म्हणजेयज्ञवेदी किंवा यज्ञ कुंड !
ते काहीही असले तरी मुळांत वैदिक आर्यांना बाहेरून येऊं पाहत असलेला लिंगपूजेचा प्रकार पटलेला दिसत नाहीं. त्याचें अवलंबन करणाऱ्यांना वैदिकांनी 'शिश्नदेव' असे नांव दिले व हेटाळणी केली. तरी पण इतरत्र दृढमूल झालेल्या लिंगपूजेच्या परंपरेला आपल्या परिसरांत न शिरू देणें त्यांना अशक्यप्राय झाले व तिला आपल्यात समाऊन घ्यावे लागले. हे परिवर्तन शें दोनशे वर्षांत झाले नसेल हे उघड आहे. त्याला कित्येक पिढ्या लागल्या असतील, शास्त्रार्थाचा कीस पडला असेल व अनेकांचा कंठशोष झाला असेल. ह्याची चुणूक कलेंत झालेल्या परिवर्तनांत कशी दिसते ते पहा.प्रतिमा :
शिव-पूजनाचे दुसरें प्रतीक म्हणजे शंकराची मानवाकार प्रतिमा हे होय. हिचा देखील प्रारंभ सिंधु-सभ्यतेच्या वेळेपासून झालेला असावा असें वाटतें. सिंधुच्या खोऱ्यातून मिळालेल्या एका ठशावर (रे. चि. एकोणतीस ४८) 'पशुपति' शिवाचे अंकन आहे असे मत सर्व प्रथम सर जॉन मार्शल यांनी प्रतिपादिले. पण सालेतोर, चौधरी, एच्. पी. सुलीवान, बी. प्रकाश, सौ. डोरिस श्रीनिवासन् वगैरे रे मंडळींना हे मत मान्य नाही. सौ. श्रीनिवासन् यांच्या मतें ही वृषमुख देवाची मूर्ती असून तिचा संबंध उत्पादन आणि समृद्धीशी फार जवळचा असावा. अस्तु. 'पशुपतीच्या ठश्याविषयीं मागें उल्लेख आलेला आहेच.'ऋग्वेदांत रुद्रांचे नांव येतें, तसाच तो अथर्ववेदांतही दिसतो, रुद्राचे स्वरूपांत मांगल्य व अमांगल्य यांचा विचित्र संयोग आहे. हे अर्थातच स्वकीय व परकीय धारांच्या संगामाचे फल होय. वेदांचा शिव सर्वव्यापी, परम बलवान्, शत्रूना रडविणारा (रुद्र), पर्वतांचा अधिपती (गिरीश), निळ्या गळ्याचा (नीलग्रीव), लाल रंगाचा (विलोहित), धनुष्य व बाण घेतलेला (निषंगि, इषुधिमान्), आक्रमकांना दंड देणारा, संरक्षण करणारा, उपवीत धारण करणारा, उच्चस्वराने ओरडणारा (उच्चैर्घोषायाक्रं दयते), चोरांचा अधिपती (स्तेतांना पती) रात्रीं फिरणारा (नक्तंचर), पशूत प्रवेश करणारा (शिपिविष्ट) शिरस्त्राण आणि कवच धारण करणारा (विल्मिन्, कवचिन्), अशा प्रकारचा आहे. एकादशणीं किंवा नेहमीच शंकराला अभिषेक करताना ज्या रुद्राध्यायाचे पारायण करतात, त्यांत वरील व अशाच प्रकारच्या अन्य विशेषणाचा उल्लेख आढळतो. एकूण हा शिव एकीकडे शत्रूच्या डोळ्यांतून आसवे गाळणारा संहारत प्रबल पराक्रमी योद्धा आहे, तर दुसरीकडे तो अमंगलाचा विनाश करून मांगल्याची स्थापना करणारा असून 'देवाचा प्रथम वैद्य' (प्रथमो दैवो भिषक् ) आहे.
पौराणिक काळांची मजल गाठीपर्यंत रुद्राने 'महादेव' हे नांव घेऊन वैदीक धर्मांत बरेच वरचे स्थान मिळविले, तरी पण त्याच्या परकीय स्वरूपाचे धागेदोरे लोकमानसांतून अगदीच नष्ट झाले होते असें मात्र दिसत नाही. पौराणिक वाङ्मयांत देखील शिव व त्याचा पुरस्कार करणाऱ्या काही मतांना बऱ्याच ठिकाणी याच दृष्टीनेच पाहिले गेले आहे. या विषयीं काही संकेत पहा :
१) वेदमान्य शैव संप्रदायाचे बरोबर कौल, पाशुपत, वगैरे अवैदिक मतांचे वेगळे अस्तित्व असणें.
२) शिवाला यज्ञभाग न देण्यांचा अट्टहास व तत्संबंधानें दक्ष प्रजापतीचे विस्तृत आख्यान.
३) शिवाचे द्वारा बल प्रयोगाने यज्ञ भागाची प्राप्ती करून घेणे."
४) शिवाने ब्रह्मदेवाच्या यज्ञांचा केलेला विध्वंस, यज्ञांचे मृगरूपाने पलायन व त्याच्या पाठीस लागल्यामुळे शंकराला प्राप्त झालेली 'मृगव्याध' ही संज्ञा.
५) इंद्रपदांवर बसलेल्या पांच व्यक्तींचा रुद्रांकडून पराभव व पर्वत कारागृहांत त्यांची कैद'. याच प्रकारे 'पूषण' आणि 'भग' हे दोन वैदिक देव शिवाकडून दंडित झाले होते व त्यामुळे शंकराला पूष्णोदंतविनाश', भगध्न आणि भगनेत्रांकुश" अशी अभिधानें प्राप्त झाली होती.
६) शंकराची 'ऊर्ध्वकेश', 'ऊर्ध्वमेद्र', 'महालिंग', 'तीक्ष्णदंष्ट्र', 'विरुपाक्ष', अशा प्रकारची नांवे व त्यातून दिसून पडणाऱ्या शिष्ट समाजाला असंमत अशा सवयी, उदाहरणार्थ बायकोच्या पुढे नाचणें, विषादिवस्तूंचे सेवन, स्मशानांत राहणें, चामडें नेसणें, माणसाच्या कवट्यांना अलंकार म्हणून वापरणें, वगैरे.
७) राक्षस व असुरांचा आराध्य व त्यांची कड घेणारा देव म्हणून शिवांचे बऱ्याच ठिकाणी वर्णन येते. शिवाय भुर्ते, पिशाच्चें, यक्ष ही मंडळी त्यास फार जवळची होत.
८) भृगुत्रार्षीकडून शंकराला मिळालेल्या अनेक शापांचे वर्णन जसें शिवाचे लिंग-योनी स्वरूप होणें, द्विजांकरिता अपूज्य असणें, शंकराला अर्पण केलेली फुले, अन्न, जल, आदि पदार्थ प्रसाद म्हणून देखील अस्वीकार्य समजले जाणें, शंकराच्या पायाचे तीर्थ अग्राह्य असणें, इत्यादि.
९) विशेषकरून दक्षिण भारतांत शिवाच्या प्रसादाला हेय मानले जाते. 'शिवस्व' हा शब्दच अस्वीकार्य वस्तूंच्या अर्थात आजही आपण वापरतो. शिवाचे पूजन करणारे व शिव नैवेद्य भक्षण करणारे 'गुरव' या विशिष्ट जातीच्या लोकांना ब्राह्मण आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत. यांचा मुख्य व्यवसाय मृदंग वाजविण्याचा असे.
१०) शिवाकडून ब्राह्मणांचा वेळोवेळी केला गेलेला विरोध व शेवटी स्वतःच्या श्रेष्ठत्वाची स्थापना
११) शिवाच्या रौद्र व संहारक स्वरूपांमुळेच कदाचित लोकांत असें मत मान्य झाले असावे की विष्णुव्रत सोडता येतें, पण शिवव्रत मात्र टाकता येत नाही.
शंकराचा पौराणिक धर्मांत पूर्ण रूपाने समावेश केव्हां झाला असावा हे सांगता येणें कठिण आहे, पण या विषयी रुद्र व नरनारायणांत झालेल्या युद्धाची कथा थोडी महत्त्वाची वाटते. या कथेंप्रमाणें दक्षयज्ञांचा विध्वंस केल्यावर रुद्रानें बद्रिकाश्रमांत बसलेल्या नर व नारायणांवर आक्रमण केले. प्रथम युद्धाला चांगलेच तोंड लागले पण पुढे ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीमुळे ते आवरले व दोन्ही पक्षांत समेट झाला. युद्धांत नारायणाने रुद्रांचा गळा दाबल्यामुळें रुद्राला 'शितिकण्ठ' असें नांव मिळाले, तर नारायणाने रुद्राच्या शूलाला 'श्रीवत्स' या चिह्नाच्या रूपाने स्वतःच्या वक्षस्थलांवर मिरविण्याचे कबूल केले." या कथेचा मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें परामर्श घेतल्यास दोन मुद्दे समोर येतात. एक तर असे की सुरुवातीच्या विष्णुप्रतिमांत 'श्रीवत्स' दिसत नाही, गुप्तकाळांपासून हळुहळू त्याचे दर्शन होऊ लागते. दुसरे म्हणजे शिव व विष्णूच्या संयुक्त प्रतिमा म्हणजे हरि-हर मूर्ती कुषाण कालाचे अगोदर मिळत असल्याचा पुरावा आज तरी हातांत नाही.
शिव व विष्णू यांचे घोर युद्ध व शेवटी विष्णूचे श्रेष्ठत्व" स्थापित होण्याचे वर्णन वाल्मीकिय रामायणांत देखील मिळते. उघड आहे कीं पौराणिक क्षेत्रांत मिळालेली मान्यता एका दिवसांत झालेली घटना नाही. हे होण्यास कितीतरी वर्षे लागली असतील व वादांची रणें माजली असतील. शैवाप्रमाणेंच सौर आणि शाक्तमतांच्या काही धारांचे ओघही बाहेरून आले आहेत. हे निरनिराळे प्रवाह आपल्या देशांत इसवीसनांच्या प्रथम तीन शतकांच्या अवधीत किंवा त्यापूर्वी आले असावेत. कारण गुप्तकाळांपर्यंत या सर्व धारा मूळरूपांत किंवा रूपांतरे करून ब्राह्मणधर्मात विलीन झालेल्या दिसतात. याची प्रमुख कारणें एकेश्वरवादाचा सिद्धांत आणि 'महाविलयनांची' प्रवृत्ती ही होत. वरील सर्व विवेचनाने हे स्पष्ट होते की अवैदिक शिवाने रुद्राशी एकत्व स्थापन करून वेदोत्तरकालीन देवता संघांत आपल्या पराक्रमांने प्रमुख स्थान प्राप्त करून घेतले, पण यासाठी झालेल्या प्रबल संघर्षाचे प्रतिध्वनी मात्र बरेच दिवस उमटत राहिले. आता शिव पूजनांची माध्यमें म्हणजे शिवप्रतीकें, शंकराची मूर्ती आणि शिवाची पिंडी याचे मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनें परीक्षण करू.
शिवप्रतीकें :
शिवाचे एक जुने प्रतीक वृष किंवा बैल हे आहे. (र. चित्र बावीस १,४) महाभारतांत शंकराला वृष, वृषावर्त, वृषनाथ, वृषध्वज, वृषदर्प, वृषपती, वगैरे अभिधानें प्राप्त आहेत. सिंधु वसाहतींत बऱ्याच प्रामुख्यानें दिसणाऱ्या डौलदार बैलाचा शैवमतांशी निकटतम संबंध होता असे निश्चयात्मक विधान करणें जरी शक्य नसले तरी एवढे मात्र खरे की ऐतिहासिक काळांत बैल हा शिवाचे फार जवळचे प्रतीक म्हणून गाजला. जुन्या ठोकीव फार नाण्यांवर (punch marked conis) बैल दिसतो, भारतीय शक राजांच्या नाण्यांवर दिसणारा बैल नक्कीच शैव प्रतीक आहे. एका प्रकारच्या नाण्यांवर तर बैलांबरोबरच 'उसभे' किंवा वृषभ अशी अक्षरे ही आहेत. हूण राजा मिहिरकुल याचे नाण्यांवर बैलासमोर 'जयतुवृषः' असा लेख आढळतो." हा राजा शिवोपासक होता.नाण्यांवर दिसणारे दुसरे शैवप्रतीक म्हणजे स्थल-वृक्ष व त्यासमोर असलेले शिवलिंग हे होय. औदुंबरांचे नाण्यांवर असलेला त्रिशूलपरशु शिवाचेंच प्रतीक होय." वेम, वासुदेव, वगैरे कुषाण राजांच्या नाण्यांवर त्रिशूल-परशूचे एकत्र दर्शन होते (रे.चि. नऊ-४). मात्र समकालीन पाषाण प्रतिमेत अशा प्रकारचा त्रिशूल परशु अजून मिळालेला नाही. दक्षिण भारतांत शिवाचे हातांत फक्त परशू आढळतो. त्रिशूल कचित असतो. औदुंबरांच्याच नाण्यांवर शिवाचे अन्य प्रतीक म्हणजे देवायतन किंवा मंदिर दिसते.
मातीच्या काही ठशांवर देखील शैवप्रतीके आढळतात. काही नमुन्यांवर वृक्षांच्यामधे शिवलिंग (पादपेश्वर, आम्रातकेश्वर वगैरे नावांचे ठसे) आणि मोठें वाशिंड असलेले (ककुद्मान) बैल अंकित आहेत. आरामिकेश्वर असे नांव असल्या एका गुप्तकालीन ठश्यावर त्रिशूल-परशु, मंगलघट, शक्ती आणि शिवलिंग दिसतें. भीटा (अलाहाबाद) वेधून मिळालेल्या शैव ठश्यावर नंदीपद चिन्ह पर्वतांवर ठेवलेल्या चेंडूप्रमाणें दिसणारे शिवलिंग, " अर्धचंद्राने शोभित वृष, धनुष्यबाण", वगैरे काही निराळी शैवप्रतीकें आढळतात. राजघाट (वाराणसी) येथून प्राप्त झालेल्या ठश्यांवर त्रिशूल-परशूसह यूप ही मिळतो." यूप किंवा यूपस्तंभ हे यज्ञांचे प्रतीक आहे. (उदाहरणार्थ रे. चि. बावीस-४).
वरील पैकी कित्येक प्रतीकें गुप्तोप्तर कालांतही शिवाशी आपला संबंध टिकवून राहिली.
शिवप्रतिमा :
अर्थशास्त्र आणि पतञ्जलीच्या आधारावर शिवमूर्तीची प्राचीनता मौर्यकाळांपर्यंत नेता येते. अश्वत्थाम्यानें शिवाचा 'श्वेतविग्रह' निर्माण केला होता व त्याची होम, वगैरे करून पूजा केली होती अशी नोंद महाभारतात मिळते." येथे असे ही सांगितले आहे की अश्वत्थाम्याचे पूर्वजन्मांत शिवाच्या अर्चेचे पूजन केले होते, व नरनारायणांनी लिंग-पूजा करून शिवाची आराधना केली होती. या प्रकारे अर्चापूजनांपेक्षा लिंगपूजनांचे श्रेष्ठत्व स्वीकारण्यांत आले आहे.भीटा (अलाहाबाद) येथून उत्तर मौर्यकालीन अभिलेख असलेले एक चतुर्मुख शिवलिंग मिळाले आहे. त्याच्या वरच्या भागांवर द्विभुज शिवाची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). अभिलेखाने हे उघड होते की या लिंगांची प्रतिष्ठा पूजेकरिताच केली होती. हा अलंकरणाचा नमूना नव्हता. उत्तर भारतांतील शिवप्रतिमेत हे लिंग व या वरील 'आनाभि' प्रतिमा सर्वांत जुन्या आहेत. भीटा येथूनच प्राप्त झालेल्या एका अन्य प्रतिमेची चर्चा देखील येथे आवश्यक आहे, कारण तिच्या एका भागाचे शिवमूर्तीशी बरेच साम्य आहे (चित्र ४४-४७). ही संपूर्ण प्रतिमा 'सर्वतोभद्र' पद्धतीची असून हिच्या एकाबाजूला मुगुट घातलेली व कलश घेतलेली द्विभुज प्रतिमा आहे. (चित्र-४४) हिच्या आजुबाजूच्या कडेला वर मानवमुख व खाली वराह आणि सिंह कोरलेले आहेत (चित्रे-४७,४६).
पाठीकडे असलेल्या अन्य मानवमूर्तीचा प्रस्तुत प्रसंगाशी संबंध आहे. ही प्रतिमा द्विभुज असून स्थूल बांध्याची आहे (चित्र-४५). हिनें मनगटातील कड्या व्यतिरिक्त कोणताही दागिना घातलेला नाही, केसमात्र पाठीकडे वळविले आहेत. उजवा हात देवत्वाचे चिन्ह अशा अभय मुद्रेत उचललेला आहे. डाव्यांत कदाचित कलश होता पण तो आतां खंडित आहे. नेसूच्या धोतरांशिवाय कोणतेही वस्त्र दिसत नाही. ही सर्वतोभद्र प्रतिमा उघडच यक्षप्रतिमांच्या आधारांवर पडविली गेली आहे, पण हे यक्ष मात्र नव्हेत. येथें शिव आणि विष्णूचे वराह व सिंह रूपांबरोबर अंकन असण्यांची शक्यता आहे.
इसवीसनांच्या सुरुवातीला उत्तर भारतांत कुषाण साम्राज्याचा उदय झाला. या वंशाच्या काही राजांचा कल शैव धर्माकडे होता. यावेळी शैवधर्मांच्या हालचाली उत्तर पश्चिम भारतांकडे चालल्याच होत्या, त्याचप्रमाणें खाली मथुरा हैं नगर ही त्यांचे एक केंद्र झाले होते. मथुरा व तिच्या जवळपासच्या भागांतून मिळालेल्या व्रज जनपदांतून म्हणता येईल या काळच्या हजारो कलाकृती आज आपणांस प्राप्त आहेत. त्यांत ब्राह्मण धर्माप्रमाणेंच बौद्ध व जैन प्रतिमांचा ही समावेश होतो. शैवमतापुरतेंच बोलावयाचे असल्यास असें सांगता येईल कीं मथुरेला कुषाण काळाच्या पूर्वीपासूनच शैवमतांचा पाया घातला गेला होता. येथून प्राप्त झालेल्या एका शुंगकालीन शिलापट्टांत पंख असलेल्या पशुंच्या मध्यें झाडाखाली स्थापन केलेले शिवलिंग दिसते. (म.सं.सं. ५२ ३६ २५) वाङ्मयीन प्रमाणाकडे वळल्यास हरिवंशात असा उल्लेख सापडतो कीं मथुरेचा परित्याग करून द्वारकेकडे जाण्याच्या वेळी यादवांनी विशेष करून शंकराचे पूजन केले होते.
यादव शिवपूजक होते. स्वतः श्रीकृष्णांने पुत्रप्राप्तिसाठीं शिवाराधनच केले होते. " मथुरेंहून कुषाणकाळांत तयार झालेल्या माती व पाषाणांच्या अनेक शिवमूर्ती व लिंगें मिळाली आहेत. असेंही म्हणता येईल कीं व्रजभूमींत या वेळीं शिव, विष्णू, कार्तिकेय, लक्ष्मी, वगैरे देवांशी संबंधित निरनिराळे संप्रदाय प्रचलित होते. तेथे परस्पर विद्वेष किंवा मालिन्य फारसें नसावे. येथून मिळालेल्या एका शिलापट्टावर (म.सं.सं. ३४.२५२०) एकाच ओळीत अर्धनारीश्वरविष्णु, गजलक्ष्मी व कार्तिकेय उभे असलेले दिसतात (चित्र २) त्याचप्रमाणे परस्परांच्या देवतांना अपमानित करणाऱ्या प्रतिमांचाही येथे पूर्ण अभाव आहे.
शिवप्रतिमा व त्यांचे प्रकार इकडे वळण्यांपूर्वी कुषाणकालीन किंवा त्यापूर्वीची नाणी व मातीचे ठसे यावर दिसणाऱ्या शंकराच्या मानवाकृतींचे थोडक्यात सिंहावलोकन करू.
नाण्यांवरील शिवप्रतिमा :
याबाबतीत सर्वप्रथम उज्जयिनी येथून मिळालेली नाणीं आपले लक्ष वेधून घेतात. इसवीसनांपूर्वीच्या प्रथम दोन शतकांतील या नाण्यांवर शिवाची निम्नलिखित ध्यानें मिळतातः१) दंड व कमंडलू घेऊन उभा असलेला शंकर.
२) हाच प्रकार पण त्या बरोबरच 'देववीक्षणतत्पर' असा बैल (रे.चि. बावीस १)
३) दंड- कमंडलू धारण करणारा पण त्याला तीन डोकी असणारा शिव. मुख्य मस्तकाच्या आजुबाजूला एक एक मस्तक असलेला त्रिशिर शिव उत्तरपश्चिम भारतांतील काही प्रतिमा व कुषाण नाण्यांवरही दिसतो (र.वि. बावीस २). डॉ. बॅनर्जी यानी याकडे संकेत केला आहे. पण वाङ्मयीन पुराव्याशी त्याला ताडून पहाण्यांचा तेथे प्रयत्न दिसत नाही.
महाभारतांत त्रिमुख शिवाचे उल्लेख फारच तुरळक आहेत." शंकराची द्विमुख चतुर्मुख आणि पंचमुखें लिंगें तर मिळतात, पण त्रिमुख लिंग अजून अज्ञात आहे. त्यामुळे आमची कल्पना अशी आहे की जेथें ब्रह्मा व विष्णू या बरोबर शंकराला एकत्र दाखविणें अभिप्रेत असते. तेथें त्याला त्रिशिर दाखवितात, पण अन्यत्र अशा प्रकारच्या प्रतिमांत शिवाला चतुर्मुख दाखविण्यांचा कलाकाराचा मनोदय असतो समोरून दिसू शकणारी तीन तोंडे व चौथें अर्थात् पाठीकडील तोंड अदृश्य अशी ही चार मुखें असावीत. शिवाच्या चार मुखांची कथा महाभारतांत आली आहे." देवांना प्रदक्षिणा घालणारी अप्सरा तिलोत्तमा हिचा अप्रतीम सौंदर्याला न्याहाळण्याकरिता चारी दिशांना शिवाची चार तोंडे प्रगट झाली अशी ही कथा आहे. मथुरेहून प्राप्त झालेल्या एका प्रतिमेची ओळख चतुर्मुख शिव अशा प्रकारें श्री रत्नचंद्र अग्रवाल यांनी करून दिली आहे. फरक एवढाच कीं येथे चौथे मुख पाठीकडे नसून त्या ऐवजी खांद्यावर एक अतिरिक्त प्रतिमाच दिसते. हे विवेचन करतांना त्यांनी रंगमहाल येथून मिळालेल्या एका मृत्फलकांचाही उल्लेख केलेला आहे. ज्यावर तीन मस्तकांचा शंकर दिसतो. हा फलक प्रारंभिक गुप्तकाळाचा आहे. या बाबतीत पुनः उहापोह करूच.
उज्जयिनीच्या संदर्भातच हे ही नमूद करणें योग्य होईल की प्राचीन काळापासूनच ते शैव केंद्र होते. कालिदासाचे वेळीं तेथें चंडीश्वर महाकालाचे सुंदर स्थान असल्याचे मेघदूत सांगतो."
उज्जयिनीप्रमाणेंच कुणिंदांच्या नाण्यावर त्रिशूल परशू घेतलेला शंकर दिसतो. त्याला तेथें 'छत्रेश्वर महात्मा' असे म्हटले आहे.
परदेशी राजांच्या नाण्यांपैकी गुदफर किंवा गोण्डोफर यांच्या नाण्यांवर डॉ. बॅनर्जी यांनी त्रिशूल आणि तालशाखा घेतलेला शंकर ओळखला आहे. यावर ग्रीक देव 'पोसोडॉन' यांच्या ध्यानांची छाप दिसते. गुदफराच्या नाण्यांवर राजाला 'देवव्रत' असे अभिधान आहे, जें कदाचित तो शैवमताचा असल्याचे पुष्ट करते. नाण्यांवर त्रिशूलधारी शंकर असलेला अन्य परदेशी राजा 'माऊस' हा होय. येथें कधी कधी शिव अपस्मार पुरुषांचे मर्दन करीत असतांनाही दिसतो."
सिरकप (तक्षशिला) येथून १९१४-१५ च्या सुमारें एक तांब्याचा ठसा मिळाला आहे. त्यावर त्रिशूळ व गदा घेतलेला शंकर दिसतो. येथील गदा ग्रीक देव हरक्यूलियस यांच्या गदेच्या धर्तीवर आहे. (रे.चि. बावींस ६)
परदेशी शासकांच्या या कांही नाण्या व्यतिरिक्त शंकरांचे भरपूर दर्शन कुषाण राजांच्या नाण्यांवर होते. मूर्तिविज्ञानांच्या दृष्टीनें येथें बरीच महत्त्वाची माहिती मिळते.
अगोदर कडफिश दुसरा आणि वेम यांच्या नाण्यांना पाहू. येथे शिवाची दोन रूपें मिळतात. दिगंबर शंकर एकटा उभा आहे. त्याच्या उजव्या हातांत त्रिशूल-परशू असून डाव्यात घट आहे. डाव्या हातांवर कोणत्या तरी जनांवराचे चामडे लोंबत आहे. प्रो. रोझेनफील्ड याला सिंह-चर्म समजतात व त्याचा संबंध महाभारतांतील 'सिंहचर्मोत्तरच्छिदः' या पदाशी लावतात" पण रोझेनफील्ड यांनी दिलेल्या चित्रांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास चामड्याला असणारे पशुमस्तक सिंहाचे नसून ते बैलाचे असावे असे वाटते." शैवांमध्यें बैलाचे चामडे खांद्यावर पांघरण्याची पद्धत गुप्तकालांत होती ही गोष्ट अहिच्छत्रा येथून मिळालेल्या महाभैरवाच्या मृफलकाने उघड दिसते. राजा वेम याच्या मुद्रेवरही शिवाचे हे रूप दिसते पण त्यांत शिवाच्या मस्तकावर दिसणाऱ्या अग्निज्वाला हे वैशिष्ट्य होय (रे. चित्र बावीस ३) अर्थात् या काळांत शिव व अग्नी यांचा निकट संबंध मान्य झाला होता. येथे शंकराच्या डाव्या खांद्यावर जानव्याप्रमाणें लोंबणारी माळा ही अवलोकनीय आहे. तिच्यांत काही पदकें ओवलेली आहेत. हा अलंकार समकालीन कांही गांधार मूर्तीत व गांधार कलेची छाप असलेल्या माधुरी कलाकृतींतही दिसतो आणि शंकराच्या 'उपवीती' या नांवाला सार्थकता येते (रे. चि. बावीस ७).
वेम याच्या नाण्यांवर शंकराचे जें दुसरे रूप दिसते तें पहिल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत आहे. येथे शंकर विवस्त्र, महालिंगी किंवा बैलाच्या चामड्याला धारण करणारा नसून तो बैलाला टेकून व अंमळ एकीकडे कललेला असा उभा आहे. त्याच्च्या डाव्या हातांत त्रिशूल किंवा क्वचित त्रिशूल-परशू दिसतो, त्याचप्रमाणें नेसूचे वस्त्र आणि जानव्यासारखा दागिना हे ही स्पष्टपणे दिसतात. मस्तकांवर असणाऱ्या अग्निज्वाळांचा आकार बराचसा त्रिशूलासारखा आहे. वेमाच्या नाण्यावरील अभिलेखांत जरी शंकराचे स्पष्ट असे नांव आढळत नाही तरी राजाचे 'माहेश्वर' हे अभिधान शिवाची नीट ओळख पटवून देतें.
कनिष्काच्या मुद्रेवर" चतुर्भुज शंकर दिसतो. प्रदक्षिणाक्रमानें त्याच्या हातांत अधोमुख घट आणि अंकुश, वज्र, त्रिशूळ आणि उसळी मारणारें हरण आहे. प्रत्येक नाण्यांवर अंकुश दिसत नाही तसेच मृगाच्या स्थितीतही फरक आहे. शिवाचे धोतर आणि जानव्यासारखा दागिना येथेही दिसतात. याच राजाच्या नाण्यांवर सर्वप्रथम शंकराचे प्रभामंडल आढळते.
शंकराची काही नवीन रूपें हुविष्काच्या नाण्यांवर" पाहतां येतात. प्रो. रोझेनफील्ड यांनी एका नाण्यांवर शिवाच्या मस्तकांवरील चंद्रकोर शोधण्यांचा प्रयत्न केला आहे, पण तें संदिग्ध आहे कारण इतर नाणी त्या बाबतीत मौन आहेत. शिवाय या काळांतील पाषाण मूर्तीकडे दृष्टिक्षेप केल्यास एक अपवाद वगळला तर इतरत्र शिवांचे डोक्यावर चंद्रकोर दिसत नाही.
या काळांतील दुसरें महत्त्वाचें असे ध्यान म्हणजे चार हातांचा आणि तीन तोंडाचा शंकर हे होय. येथे घट आणि अंकुश याऐवजीं चक्र शोभू लागते व शंकराची ऊर्ध्वलिंगावस्था ही नजरेंत भरते. हुविष्काच्या नाण्यांच्या तिसऱ्या प्रकारांत जटाभार असलेल्या त्रिमुख शिवांबरोबरच त्याची आयुधें म्हणून घट, प्रकीर्ण किरणांचे वज्र (?), त्रिशूल आणि गदा ही दिसूं लागतात.
कुषाण सम्राटांत वासुदेव हा शेवटला उल्लेखनीय राजा होता. त्याचा शैवधर्मांकडे चांगलाच कल होता. याच्या नाण्यावर५२ शिव मूर्तीचे खालील प्रकार पाहण्यात येतात :
क) त्रिशूल, घट किंवा तुंबी, पाश" आणि कमळ घेतलेला त्रिमुख शंकर, पाठीमागे बैल.
ख) फक्त पाश आणि त्रिशूल घेतलेला त्रिमुख शिव, पाठीमागे डावीकडे तोंड केलेला बैल. पाश सोडला तर हा शिव वेम याच्या नाण्यावरील शिवासारखा आहे. पण बैल व त्रिशूल यांत थोडा फरक आहे.
ग) तिसरा प्रकार ही वरील प्रमाणेच आहे, पण येथे शंकर जास्त सुरेख आणि एक प्रकारें गुटगुटीत आहे. उत्तर कुषाणकालीन नाण्यांच्या शिवप्रतिमा पुनः बटबटीत आणि बेडौल दिसू लागतात व गुप्त काळांपर्यंत त्यांत फरक दिसत नाही. याच वेळी शंकराच्या मस्तकांवरील चंद्रकोर स्पष्टपणें उगवते (रे. चित्र बावीस ५).
घ) वासुदेवाच्या काही नाण्यांवर शिवाचे बरोबर बैलाच्या ऐवजी हत्ती दिसतो शिवाचा सिंहाप्रमाणेंच हत्ती बरोबरही नेहमीचा संबंध नाही. कनिष्काच्या मुद्रेवर आपण शिवाच्या हातांत अंकुश बघितला होता, येथे प्रत्यक्ष हत्ती आहे. तेव्हा असें गृहीत धरावयांस हरकत नाही कीं गांधार परंपरेत कुठे तरी शिव आणि हत्ती याचा जवळचा संबंध असावा.
कुषाण नाण्यांवर शंकराला बहुतेक 'ओएशो' असें नांव दिलें आहे. या शब्दांचे प्राकृत भाषेचा 'हवेश' आणि संस्कृतांचा 'भवेश' या शब्दांशी साम्य आहे, तसेंच काही विद्वानांच्या मतें हे 'वृष' याचे रूप आहे. महाभारतांच्या शिव नामांवलीत वृष, वृषभ, वृषावर्त, वृषनाक, वृषपती, वगैरे नांवांची गणना केलेली आहे. याशिवाय 'ओएशो' नांवाची उग्रेश, ऊर्धकेश यासारख्या शब्दांबरोबर देखील संगती लावता येईल.
वरील नाण्यांशिवाय डॉ. बॅनर्जी यांनी काही इतर नाण्यांकडे ही लक्ष वेधिले आहे. कलकत्ता संग्रहालयांतील दोन सुवर्णमुद्रांविषयीं लिहिताना त्यांवर ब्राह्मी लिपींत लिहिलेल्या 'गणेश' या नांवाच्या आधारें त्यांनी तेथें मानवरूपी शिवाला ओळखण्यांचा प्रयत्न केला आहे." हुविष्काच्या एका नाण्यांवर त्यांच्या मतें हरिहराची आकृती आहे. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या एका उत्तर कुषाणकालीन सोन्याच्या नाण्यांवर 'अर्धनारीश्वर' अंकित केलेला आहे (रे. चित्र बावीस). हा या काळच्या एका अन्य मुद्रेवर ही दिसतो.
मातीच्या ठशांवरील शिवप्रतिमा :
याप्रसंगी सर्व प्रथम उल्लेखनीय असा संग्रह लखनऊ संग्रहालयांत असलेला सुमारे शंभर ठशांचा आहे. जानेवारी १९२० मध्ये डॉ. हिरानंद शास्त्री यांना संकिसा (जुनी संकाश्य नगरी) येथें खोदकामांत हा मिळाला होता. यांत शैव उसे आहेत यापैकी वर 'भद्राक्षस्य' या अक्षरांसह द्विभुज असा शंकर विद्यमान आहे. त्याच्या उजव्या हातात त्रिशूल असून डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. नेसूचे वस्त्र स्पष्ट आहे व डोक्यांवरचे केस तीन गांठींच्या रूपांत बांधलेले आहेत. ठशाच्या दुसऱ्या बाजूला बसलेला बैल असून त्याखाली 'भद्राक्षस्य' ही अक्षरें झळकतात. उरलेल्या ठशांवर शिव आणि ब्राह्मी लेख पूर्ववत् आहेत पण दुसऱ्या बाजूला मात्र काहीच दिसत नाही. हे ठसे त्यावरील लिपीला पाहिले असता प्रथम शतकांच्या जवळपासचे असावेत असा कयास बांधता येतो.
प्रारंभिक गुप्तकाळाच्या शैव ठशांकडे लक्ष पुरविल्यास ब्लॉक याला बसाढ येथून मिळालेल्या शैव सामुग्रीचा उल्लेख अगत्यानें करावा लागेल. त्यापैकी एकांवर डॉ. बॅनर्जी यांच्या म्हणण्यांप्रमाणें अर्धनारीश्वर दिसतो. शिवमूर्तीने युक्त असा दुसरा मातीचा ठसा सर जौन मार्शल यांना 'भीटा' येथून मिळाला होता. चौथ्या-पाचव्या शतकांतील या ठशावर 'भद्रेश्वर' या नांवाने ललितासनांत बसलेला शिव दिसतो. हा द्विभुज असून याच्या हातांतील वस्तू मात्र अनिश्चित आहे. याच्या डोक्यावर व खांद्यावर अग्नीच्या ज्वाला किंवा झाडाचा वरचा भाग दिसत असावा. याच काळांतील वाराणसीहून मिळालेल्या ठशांवर 'श्रीदेवस्वामि' हा लेख व चौथऱ्यावर उभा असलेला द्विभुज शिव दिसतात. त्यांच्या एका हातांत कलश व दुसऱ्यांत माळा किंवा पाश आहे. डाव्या बाजूला साप ही दिसतो.
विष्णुधर्मोत्तर, अंशुमद्भेदागम, उत्तरकामिकागम, सुप्रभेदागम, पूर्वकारणागम, शिल्परत्न, वगैरे ग्रंथात अर्धनारीश्वराचे वर्णन मिळतें. यांत उजवीकडे शंकर व डावीकडे पार्वतीचे असणें सर्वांस मान्य आहे, पण ऊर्ध्वलिंगाचा उल्लेख मात्र फक्त विष्णुधर्मोत्तरांतच सापडतो. द्विभुजांपेक्षा चतुर्भुज मूर्तीची वर्णनें जास्त मिळतात.
छ) लकुलीश :
इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. याच्या प्रतिमेची मुख्य लक्षणें म्हणजे ऊर्ध्वलिंगावस्था व हातांत सोटा. आपल्या माहितीतील लकुलीशाच्या प्रतिमांत राजस्थानच्या नांद शिवलिंगावर असलेली मूर्ती सर्वांत जुनी आहे. येथे उष्णीषधारी शिव दोन्ही पाय आसनांवर ठेऊन बसलेला दाखविला आहे (रे. चि. सत्तावीस २६).मथुरा संग्रहालयांत चंद्रगुप्त विक्रमादित्याचे वेळेचा एक अभिलिखित स्तंभ आहे. ज्यावर नग्न आणि मुक्तकेश असा दंडधारी लकुलीश दिसतो (चित्र ५१). मथुरेतूनच मिळालेली जवळजवळ याच काळची दुसरी प्रतिमा लखनऊ संग्रहालयाच्या एका शिलापट्टांवर आहे. येथें तो सोटा घेतलेला ऊर्ध्वलिंग तर आहेच पण मांडी घालून बसलेला आहे व त्याने मांडीभोवती योगपट्ट गुंडाळला आहे.
दंड व ऊर्ध्वलिंग लकुलीशाची चिन्हे होत पण सुरुवातीच्या सर्व प्रतिमात ही समानरूपाने मिळत नाहीत. लकुलीश या शब्दानें त्याच्याजवळ सोटा असणें अपरिहार्य दिसते (लकुलीश, लगुडीश = लगुडेश; लगुड = सोटा). हा सोटा म्हणजे गांधार कलेत मिळणाऱ्या शिवाला गदेचे परिवर्धित रूप असू शकत
ज) दक्षिणामूर्ती :
दक्षिणामूर्तीच्या ध्यानांतील कित्येक गोष्टी, उदाहरणार्थ व्याख्यानमुद्रा, पायाजवळ असलेली दोन हरणें, भोवतालचे चार शिष्य, वृक्षांखाली आसन असणें, इत्यादि स्पष्ट रूपानें बौद्ध प्रभावाच्या सूचक आहेत. मध्यकाळांत या प्रतिमांचे प्रकार वाढले.
झ) रावणानुग्रहमूर्ती :
गवनिं उन्मत्त झालेल्या रावणांने एकदा शिव दर्शन न मिळाल्यामुळे शिवपार्वतीसह संपूर्ण कैलासालाच उपटण्याचा अट्टहास केला. पर्वत कंपित झाल्यामुळे उमा घाबरली. शंकरानें तेव्हा तिला धीर देत पायांच्या अंगठ्यानें कैलासालाच दाबून टाकले. जेव्हां रावण चिरडला जाऊ लागला, त्याने शंकराची करुणा भाकली व शंकरही प्रसन्न झाले. " या दृश्याचे अंकन मध्यकालांत बरेंच लोकप्रिय झाले, पण त्याचा प्रारंभ मात्र गुप्तकालांपासूनच झाला होता. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका शिलाखंडावर कैलासाला उचलणाऱ्या रावणाला राक्षस रूपांत दाखविले आहे.८) गजासुरवधमूर्ती :
कूर्मपुराणांत गजासुरवधाची कथा वाराणसी येथील कृत्तिवासेश्वर लिंगाच्या प्रसंगाने येते. या लिंगांचे पूजन व ध्यान करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देण्यांकरिता हत्तीचे रूप घेऊन एक असुर आला असतां शंकरानें लिंगातून प्रगट होऊन त्याचा संहार केला व त्याचे कातडे पांघरण्यांसाठी उपयोगांत घेतले. गजासुरवधाच्या कथेची काही इतरही रूपें वाड्मयांत सापडतात. श्री शिवराममूर्ति यांच्या कथनाप्रमाणें उत्तर भारतांत गजासुरसंहार व अंधकासुरसंहार याचे सम्मिश्रण केले जाते. बंगालमधें या बरोबरच भैरवालाही स्थान देतात.अंकुश घेतलेला, किंवा हत्तीवर बसलेला शिव आपण कुषाण काळांत पाहिला आहे. शिवाचे वाहन बैल व वृषचर्माचा शिवाकडून केला जाणारा उपयोगही मार्गे उल्लेखिला गेला आहे. प्रस्तुत प्रसंगात काही अंशी तसेच साम्य आढळतें.
ठ) भैरव :
महाभारताप्रमाणे वेदज्ञ ब्राह्मणानी शंकराची 'घोर' अशी मुख्य दोन स्वरूपें मानली. ही दीन रूपेंच अनेक प्रकारानें प्रगट झाली आहेत. शिवपुराणांप्रमाणें भैरव हे शंकराचे 'पूर्णरूपे' होय. या शब्दाची व्युत्पत्ती भीषण असल्यामुळे भैरव किंवा भरण करणारा असल्यामुळे भैरव अशा दोन प्रकाराने लावतात. भैरव किंवा कालभैरव हा वाराणसीचा अधिपती मानला जातो गुप्तकालीन भैरवाच्या पाषाणमूर्ती अजून आपणास माहीत नाहीत पण शिवाचे 'घोर' किंवा काळरूप चतुर्मुखलिंगात पाहता येते (चित्र ८७) या शिवाय अहिच्छत्रा येथील महाभैरवाच्या मृफलकाचा उल्लेख मागे आलेला आहेच.
ड) नृत्य - मूर्ती :
शंकराचे नर्तन देखील फारच प्रसिद्ध आहे. शिव तांडवाचे अंकन दक्षिणेंत लोकप्रिय होतें. उत्तर भारतांत शिवाच्या नृत्य-मूर्ती कमी मिळतात, पण त्याची सुरुवात मात्र गुप्तकाळांपासून झालेली आहे. नचना कुठरा येथून नृत्य करणाऱ्या चतुर्भुज शंकराची एक खंडित प्रतिमा आपणांस मिळाली आहे.ठ) भिक्षाटनमूर्ती :
शिवाच्या भिक्षाटनांची कथा पद्मपुराणांत येते. १२५ एकदां सहस्र वर्षे चालणाऱ्या ब्रह्मदेवाच्या यज्ञांत 'पञ्चमुंड' व 'बृहत्कपाल' धारण करणारा शंकर भिक्षेसाठी गेला व त्याने अन्नाची याचना केली ब्रह्मदेवाने 'हो' म्हटल्यावर तो आपले कपाळ तेथेच ठेऊन आंघोळीकरिता म्हणून पुष्कर तीर्थावर गेला. इकडे त्या अपवित्र वस्तूला म्हणजे कपाळाला तेथून फेकून देण्यांचा ब्रह्मदेवांने प्रयत्न केला, पण तेथें एकाच्या जार्गी दुसरे कपाळ प्रगट होऊ लागले व सरतेशेवटी ब्रह्मदेवानें शिवाला पुरोडाशांतील भाग देणें स्वीकार केले. भिक्षाटन प्रतिमेचे आगमांत बरेच वर्णन मिळते. १२८ उत्तर व दक्षिण दोन्हीकडे या प्रतिमा घडविल्या जात. खालील बाबतीत त्यांचे उभयसाम्य दिसते :क) डोक्यावर जटामंडल :
ख) अंगावर दागिने
ग) बेंबीपर्यंत उचलेल्या डाव्या हातांत कपाळ किंवा भिक्षापात्र
घ) मस्तकावर असलेली तीन नरमुंडे.
विष्णूच्या मानानें शंकराचा आयुधपुरुष कमी दिसतो. महाभारतांत शंकराच्या विजय नांवाच्या त्रिशूलाचें मानवरूपांत वर्णन प्राप्त होते. त्रिशूलाव्यतिरिक्त शंकराची परशू, पिनाक पाशुपत अस्त्र किंवा बाण याचेही मनुष्यरूपांत वर्णन मिळते.
त) हरि-हर प्रतिमा :
अर्धनारीश्वरांप्रमाणेंच शिव आणि विष्णू यांची संयुक्त मूर्ती देखील सृष्टीच्या उत्पादनांकडे संकेत करते. फरक इतकाच कीं येथें उमेचे स्थान विष्णू घेतो. हरिहरांचे सुंदर वर्णन वायुपुराणांत सापडतें. *** तेथें असें वर्णन आहे कीं प्रथम बीजरूपानें आदिसर्गिक लिंग तयार झालें, नंतर विष्णुरूप योनीशी त्याच्या संयोगानें हिरण्यमय अंडे निर्माण झाले व त्याच्यापासून ब्रह्मदेव व पुढची सर्व सृष्टी तयार झाली. त्याच पुराणांत अन्यत्र विष्णू डावीकडे असतो असें सांगून'" शिवाला 'पुरुष', 'ज्ञेय', 'सत्य', 'यज्ञफल' व विष्णूला 'प्रकृति', 'ज्ञान', 'अनृत', 'यज्ञ' इत्यादि नांवानें संबोधिले आहे. पद्मपुराणांत सृष्टीचे आदि कारण अशा शिवाच्या लिंगाला ब्रह्मदेव आणि भगाला जनार्दन असें म्हटलें गेले आहे. शिवाबरोबर विष्णूनें स्त्रीरूप धारण करून फिरत राहण्यांची कथा कूर्मपुराणांत ही आहे. याच प्रसंगाने भागवतपुराणांकडेही वाचकांचे लक्ष वेधणें अयुक्तिक होणार नाही. त्या पुराणांप्रमाणें विष्णूच्या मोहिनी रूपांतील सौंदर्यावर आसक्त होऊन 'प्रमुषितेंद्रिय' अवस्थेंत शंकर त्याचे पाठी मार्गेधाऊ लागला. दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणें शिव आणि मोहिनीच्या संयोगाने जो पुत्र उत्पन्न झाला तोच मल्याळम् भागाचा संरक्षक व मल्याळी लोकांकडून पूजला जाणारा शास्ता, आर्य, अय्यनार, किंवा हरि-हर-पुत्र या नावांचा देव होय. (1हरि-हराची सुमारे चौथ्या शतकांतील मूर्ती विदिशा येथून मिळाली आहे (चित्र ५६). येथे ही अर्धनारीश्वर प्रतिमेंप्रमाणें ऊर्ध्वलिंग दिसतें, पण हात मात्र खंडित आहेत. याच्या थोड्या नंतरची हरिहराची प्रतिमा कलकत्ता येथील बिरला-अकादमी-संग्रहालयांत ठेवलेली आहे. मूर्तीला चार हात असून वरील हातांत त्रिशूल व चक्र आहे आणि खाली अक्षमाला व शंख. शिवाची जटाभार, अर्धचंद्र आणि व्याघ्रांबर ही चिन्हें असून विष्णूकडे सिंह, मुखांकित मुगुट शोभत आहे. हरिहराचे ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे.
या काळच्या हरिहराच्या इतर विशाल प्रतिमा मथुरेकर्डे असाव्यात (चित्रे ५७, ५८) कारण त्याची मोठाली दोन मस्तकें मथुरा (सं.सं. १३३; १९३६) व लखनऊच्या संग्रहालयांत ठेवलेली आहेत. काही बारकी डोकी सोडली तर गुप्तकालीन हरिहराच्या प्रतिमेचा एक नमूना प्रयाग संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र मूर्तीत पाहता येतो. येथे दोघांची मुख्य आयुर्थे त्रिशूलपुरुष व चक्रपुरुषाच्या रूपांत कोरली आहेत. (सं.सं. २९२)
धनवंतरी :
धनवंतरीची दुसरी प्रतिमा पुर्णे येथील भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. या मध्यकालीन शिल्पांत द्विभुज धनवंतरीच्या मध्यावर आधी तीन फणाचा व त्याखाली पंधरा फणाचा असे दोन नाग आहेत. डाव्या हातांतही सर्प आहे. आणि भग्नावस्थेत असलेल्या उजव्यात बटवा आहे. देव वैद्य धनवंतरी आणि सर्प यांच्या परस्पर संबंधाचे कारण विचारणीय आहे.- गो. बं. देगलूरकर. विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्, पा. ६१, चित्र
मोहिनी :
समुद्रमंथनानंतर विष्णूने अत्यंत सुंदर स्त्रीचे रुप घेऊन दैत्यांना मोहित केले आणि अमृताचा वाटा देवांना दिला. ती मोहिनी, किंवा शिवमोहिनी (पहा भामूशा. पा. १४९) ही अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. हिची शिल्पे अगदी मोजकीआहेत.
संक्षेपत :-
१) नगर संग्रहालयात शेषशायी विष्णूपटाच्या वरच्या अंगास कोरलेल्या समुद्रमंथन दृष्यांत डाव्या हातानें घटाला स्पर्श करणारी मोहिनी दिसते.
२) नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात मोहिनी अमृतघट घेऊन कासवावर उभी आहे. त्यातील अमृत ती विष्णूला देत आहे.
-गो.बं. देगलूरकर, विष्णुमूर्ते., पान ९७ - ३) रामराकुटी, धुब्री, आसाम येथे काष्ठावर कोरलेल्या दृष्यांत समुद्रमंथनाचे अंकन आहे. तेथे अमृतघट घेतलेली मोहिनी दिसते.
R.D. Chaudhary, 'Wooden Sculptures of Ramarai Kuti' Kala VI, 1997-98 Fig. 11, pp. 32-37
४) कमंडलेश्वर शिवमंदिर, पाली, तामिळनाडू येथील १२व्या शतकाच्या एका शिल्पात दर्शनी भागावर श्रीदेवी व भूदेवीसह विष्णूचे दहा अवतार आहेत व पाठीकडे विश्वमोहिनीची सुंदर प्रतिमा आहे. R.Champakalakshmi, Vaisnava Iconography of the Tamil country, 1981 New Delhi p. 277
थ) चतुर्मुख शिव :
मांढळ, तहसील उमरेड (जि. नागपूर) येथून मिळालेल्या काहीं सातवाहन-वाकाटककालीनप्रतिमा नागपूर संग्रहालयांत आहेत. त्यांत चतुर्मुखी दिसतो. चारी दिशांकडे पाहणारी चार मुखें याच्या मानेंवर असून डाव्या हातांत दण्ड असावा असें वाटतें. ऊर्ध्वलिंग नेसूच्या वस्त्रानें झाकलेले आहे. प्रतिमा लालसर दगडाची आहे.
(* या माहितीबद्दल लेखक नागपूर संग्रहालयांचे अध्यक्ष श्री पी.एम्. मुळे यांचा आभारी आहे. श्री. मुळे यांच्या सहयोगानें या प्रतिमा पाहतां आल्या. अजून या अप्रसिद्ध आहेत.)
द) अष्टमुख शिव :
याच संग्रहालयांतील मांढळची दुसरी प्रतिमा अष्टमुख शिवाची आहे. ही देखील उभयांकित असून हिला दोनच हात असावेत असें वाटते. त्यापैकी आज हयात असलेल्या डाव्या हातांत घट (तुंबी) आहे व तिच्यातून एक लांबट वस्तू निघत असावी असें भासित होतें. हिला चहूबाजूला चार तोंडे तर आहेतच, मागील मुखाला त्रिनेत्र व मिशाही आहेत. हैं अघोरमुख असावे. याशिवाय डाव्या बाहुमूलांवर (तुटलेल्या उजव्या बाहूमुलांवरही तसेंच असले पाहिजे) व दोन्हीं जघांमूलांवर प्रत्येकी एक अशी चार अतिरिक्त मुखेंही दिसतात. जंघामूलांवर दिसणाऱ्या मुखांचा व मांड्यावरील धोतराचा असा खुबीदार जोड बसविला आहे कीं धोतराचा भाग या मुखांवरील उष्णीषासारखाच वाटतो. या प्रतिमेत देखील वरील प्रमाणें वस्त्राच्छादित ऊर्ध्वलिंग आहे. शिवाच्या खांद्यावर जानवेही आहे. शिवाची ही आठ मुखें त्याच्या अष्टमूर्तित्वाकडे संकेत करतात.ध) द्वादशमुखी शिव :
नागपूर विद्यापीठानें मांढळ येथे केलेल्या उत्खननांत सातवाहन वाकाटककालीन बरेच अवशेष मिळाले आहेत. त्यांत एक द्वादशमुखी, शिवाची मूर्ती आहे. याचा दगड, घडण व डौल अष्टमुख शिवप्रतिमें प्रमाणेंच आहे. डॉ अजयमित्र शास्त्री यांनी 'महासदाशिव' म्हणून हिला ओळखले आहे. या प्रतिमेंच्या मानेंवर आठ डोकी असून ती चारचा एक थर या प्रमाणे एकांवर एक असलेल्या दोन थरांत दाखविली आहेत. खालील चार तोंडे मुख्य दिशांकडे व वरील उपदिशांकडे आहेत. या शिवाय वरील अष्टमुख प्रतिमेंप्रमाणेंच दोन बाहुमूलांवर व दोन जंघामूलांवर अशी आणखी चार मुखें आहेत. या मुखांना मिशा नाहीत. या प्रमाणें एकूण मुखांची संख्या झाली बारा !! शिवाच्या डाव्या हातांत कमंडलू असावा. त्याच्या शरीरांवर फलकहार, जानवें, कटिबंध, आणि कच्छा दिसतो. ऊर्ध्वलिंग वस्त्राच्छादितच आहे. विष्णूच्या चतुर्व्यहाप्रमाणें मूसानगरचा शिव आपण मागें पाहिला आहे. तसेच या बारामुखीं शिवांचा विष्णूंच्या बारा विभवांशी काही अर्थाअर्थी संबंध नसेल नां?
चंडिमऊ येथील शिवकथा :
प्रारंभिक कलेंत शिवकथांचे क्रमबद्ध अंकन फारसे मिळत नाही. या दृष्टीने बिहारच्या चंडिमऊ गावातून मिळालेले काही खांब फारच महत्त्वाचे आहेत. यावर गंगावतारण, शंकराकडून मानिनी पार्वतीचा अनुनय, गणांचे नृत्य, पाशुपत अस्त्र मिळविण्यांकरिता अर्जुनाची तपश्चर्या, वगैरे दृश्यें कोरलेली आहेत. येथें दिसणाऱ्या शंकराची खालील वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत -क) शिवाच्या डोक्यावर जटाजूट, अर्धचंद्र आणि एकफणेचा साप आहे. शिवाचा सर्प कदाचित या कालांपासूनच पुढे दिसूं लागतो.
ख) शंकराचें ऊर्ध्वलिंग.
ग) साधारणपणें शंकर द्विभुज आहे, पण तो जेव्हां अर्जुनांचे आराध्य म्हणून प्रगट होतो तेव्हां मात्र चतुर्भुज दिसतो, व शरीर ही थोडें सुटलेलेच आहे.
घ) काही ठिकाणीं शिवाचे जानवें दिसते, तिसरा डोळां मात्र उभा आहे.
ङ) त्रिशूल, डमरू किंवा बैल दिसत नाहीत.
शिव : भाग २ (सुमारे सातव्या शतकापासून पुढे)
गुप्तोत्तरकाळाची साधारण वैशिष्ट्ये :इतर मतांप्रमाणें गुप्तकाळानंतर शैव मतांचाही बराच विस्तार झाला व अन्य समकालीन उपासना-प्रतिकांची या संप्रदायाच्या मूर्तीवर ही छाप पडली, तसेच शैव मूर्तीच्या प्रकारांची संख्या पण वाढली. निरनिराळ्या शैवप्रतिमांकडे वळण्याचे अगोदर त्यांची काही ठळक अशी वैशिष्ट्ये पाहू.
दागिनें :
बहुसंख्यक शिवप्रतिमांचे डोळ्यांत भरण्यांसारखे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे दागिने होत. आता शिवाच्या डोक्यावरील जटाजूट सोडला तर त्याच्या वेशभूषेत वैराग्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गळा, हात, वक्षस्थल, कंबर, वगैरे भागांवर त्यानें भरपूर दागिनें घातलेले दिसतात. एवढेच काय कांही ठिकाणी तर विष्णूप्रमाणें चक्क लांब वनमाला ही त्याच्या गळ्यांत रूळतांना दिसते (चित्र ६०). वैष्णवांचा विष्णू जर 'अलंकार प्रिय' आहे तर शैवांचा शिवही तसा कां असू नये ही चुरस याच्या मुळांत असावी, त्यामुळे आतां शंकराचा जटाजूट ही व्यवस्थितपणें सावरून उंच बांधलेला जटामुकुट असतो व काही ठिकाणीं त्यावर मण्याच्या माळा ही शोभतात.
नेसूंचे वस्त्र :
काहीं थोडी ध्यानें सोडली तर शंकर आता दिगंबरावस्थेत दिसत नाही. फक्त जुजबी रूपांतच तो उर्ध्वलिंगावस्थेत दिसतो. साधारणपणें तो व्यवस्थित वस्त्र नेसलेला आढळतो (रे.चि. चोवीस १३)
आयुधे:
त्रिशूल, सर्प, खट्वांग, डमरू व घट ही शिवाची प्रमुख आयुधे होत. या शिवाय जपाची माळ, कमळ, वीणा वगैरे वस्तु ध्यानभिन्नत्वे आढळतात.
त्रिशूल हा पल्लेदार किंवा आखूड दोन्हीं रूपांत दिसतो. क्वचित त्रिशूलपुरुषांचे ही शिवाचा आयुधपुरुष म्हणून दर्शन होते. देश भिन्नत्वें त्रिशूळाच्या फाळांचा आकार बदललेला दिसतो (रे.चि. नऊ ३.६).
शंकरानें हातांत घेतलेला साप बहुतेक एक किंवा तीन फणाचा असतो व तो वेटोळी केलेला नसून लोंबताना दाखवितात. शिव नृत्य मुर्देत असतांना कचित त्यानें वरच्या दोन हाताने डोक्यांवर तोल सावरण्यांकरिता म्हणून सापाला लांबच्या लांब धरलेलें असतें. याशिवाय शंकराच्या प्रतिमेंत रूचि वैचित्र्यानें जटाजूटा भोवती गुंडाळलेला, किंवा गळ्यांत व हातांत दागिना म्हणून अथवा जानवें म्हणून ही सापाचा उपयोग आढळतो. तसाच तो त्रिशूलाला विळखा घातलेला दिसतो.
शिवांचे एक आयुध खट्वांग या नांवाने प्रसिद्ध आहे (रे. चित्र नऊ, १,६). माणसाची कवटी आणि तिला खालून बसविलेला दांडा हे खट्वांगाचे रूप होय. ही माणसाची कवटी शंकरांच्या हातांत कशी आली याबद्दल वराहपुराणांत अशी कथा आहे कीं ब्रह्मदेवाला पूर्वी पांच डोकी होती. त्यांने एकदा 'कपाली' म्हणून शिवाचा अपमान केला. त्यामुळे चिडून शंकराने त्याचे पांचवे डोकें आपल्या आंगठ्यानें खुडून टाकले. पुढें प्रायचित्त म्हणून त्याला या डोक्यांसह बारा वर्षे कापालिकांचे जीवन व्यतीत करीत भटकावे लागले. शेवटी काशीला येऊन या पापांपासून त्याला मुक्ती मिळाली. दांड्याला बसविलेल्या माणसाच्या कवटीचा या कथेशी संबंध असावा म्हणूनच हे आयुध शिवाच्या अघोर रूपांत विशेष करून दिसते. कधीकधी खट्वांगाला वेगळे न दाखवता कवटीला त्रिशूलाच्याच फाळांखाली जोडलेली दाखवितात. त्रिशूलां प्रमाणेंच खट्वांगालाही शंकराचा आयुध पुरुष (खट्वांगपुरुष) म्हणून अंकित करण्यांची पद्धत होती.
वाद्यांत शंकराला अत्यंत प्रिय वाद्य डमरू हे होय (रे.चि. सहा, १,६) व त्यामुळेच पूजनानंतर डमरूनाद करण्याची पद्धत रूढ झाली. प्रत्यक्ष डमरू जवळ नसला तर मान हालवून तोंडानेंच डमरूचा आवाज काढतात. स्वतःच्या हातून घडलेल्या ब्रह्महत्येचा उद्घोष करून तिचे प्रायश्चित करण्यांकरितां शिवाने डमरू हातांत घेतला अशी त्याची उपपत्ती आहे. शिवाय तांडवाचे वेळीं तालवाद्य म्हणून डमरूचा चांगलाच उपयोग होत असला पाहिजे.
घट आणि जपाची माळ या स्वतंत्र रूपानें शैव वस्तू म्हणून नाहीत. ही फक्त त्याच्या तपस्वी जीवनांची प्रतीकें होत.
शिवप्रतिमा व लिंगे :
स्थूलकाय किंवा बालशिव :मनसर, महाराष्ट्र येथून मिळालेली ही सुंदर मूर्ती तूर्त राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे. गुटगुटीत बाळसेदार चतुर्भुज शिव लोढाशी टेकून बसला आहे. दोन हातांत फूल आणि अक्षमाला असून तिसरा गुडघ्यावर टेकलेला आहे. त्याच्या डोक्यावरील चंद्रकोर, कानांतील चक्रकुंडलें, मोत्याचे ठळक जानवे, नेसूचे छोटेसे वस्त्र, वगैरे डोळ्यात भरण्यासारखी वैशिष्ठ्ये आहेत. बालभावही नजरेंतून सुटत नाही. (र.चि.शि. १)
C. Sivaramamurti, Satarudriya: Vibhuti of 'Siva's Iconography Delhi 1976
तिसरा नेत्र :
मध्यकाळांत शिवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या अंकनात नवा असा फरक झालेला आढळत नाही. कुषाण काळाचा आडवा त्रिनेत्र गुप्त काळांपासून उभा झाला व पुढें तो तसाच राहिला, पण अगत्याने तो सर्वत्र दाखविलाच जातो असें मात्र नाही. कुठें कुठें उभ्या त्रिनेत्राची भुवई देखील दिसते.
परिवारदेवता :
यांत शिवपत्नी पार्वती ही मुख्य होय. विष्णुप्रतिमेत लक्ष्मीची जेवढी रूपें मिळतात त्यापेक्षा शिवप्रतिमेतील पार्वतीच्या स्यांची संख्या जास्त आहे. उमासहित मूर्ती, कल्याण सुंदर प्रतिमा, लिंगारूढप्रतिमा, वगैरे कित्येक ठिकाणीं ती शंकरांबरोबर आहेच.
पार्वतीनंतर दुसरे स्थान नंदीचे आहे. तो बैलाच्या रूपांत तर दिसतोच पण काही ठिकाणी त्याने वृषमुख पुरुषाचे रूपही घेतले आहे. एवढेच नव्हे तर मिर्जापूर जिल्ह्यांच्या (उ.प्र.) अष्टभुज मंदिरांतील शिल्पांत तो स्वतंत्र रूपाने आपल्या पत्नीसह उभा असलेला पाहता येतो (चित्र १६९).
उमामहेश्वर प्रतिमेसारख्या ठिकाणी गणपती आणि कार्तिकेय हे परिवार देवतांच्या रूपांत दिसतात (चित्रे ६६, ६८, ६९). येथेच हाडांचा प्रत्यक्ष सापळा असा श्रृंगरिटी नांवाचा गणही नाचताना दिसतो. कल्याणसुंदर मूर्तीत ब्रह्मदेव, विष्णु, ग्रह व इतर देव आणि देवी यांना परिवार देवतांत स्थान मिळतें.
या व्यतिरिक्त ब्रह्मदेव, विष्णू, लकुलीश, देव, ऋषी, गंधर्व, विद्याधर, वगैरे रुचिप्रमाणें परिवार देवता म्हणून आढळतात.
शिवप्रतिमांचे वर्गीकरण :
मागील भागांत या प्रतिमांचे काही प्रकार आपण चर्चिले आहेत जे गुप्तकाळांपर्यंत रूढ होते. या काळांत त्यापैकीं बरेच चालू राहिले व काही नवे अस्तित्त्वांत आले. थोडक्यांत सर्वांचे मिळून खालील प्रकारे वर्गीकरण करतां येईल -शिवप्रतिमा
आता वरीलपैकी प्रत्येक प्रकाराचा स्वतंत्रपणे विचार करू.
सौम्यमूर्ती
केवलमूर्ती :
या प्रकारात शंकर हा एकटा असतो. त्याचे स्थानक व आसन असे दोन्हीं प्रकार आढळतात. शिवाबरोबर बैल असतोच असे नाही. साधारणपणें हा शंकर चतुर्भुज असतो. हातांत त्रिशूल, सर्प व घट हे मुख्यत्वे करून दिसतात. वरचा उजवा हात हे त्रिशूलाचे सामान्य स्थान होय (चित्र ६०). उत्तर भारतांत खजुराहो, मिर्जापूर येथील अष्टभुजा मंदिरांचे अवशेष, राजस्थानांत ओसिया, वगैरे ठिकाणीं अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिमा दिसतात. महाराष्ट्रांत भांदक येथून मिळालेल्या काही शिल्पांत (ही शिल्पे तूर्त नागपूरच्या संग्रहालयांत आहेत) केवलमूर्ती शंकराची काही उल्लेखनीय उदाहरणें मिळतात. एका शिल्पांत त्याचेजवळ तीन फणांचा नाग, त्रिशूल, पाश (?) आणि कमलाचा गुच्छ असून त्रिशूलाचा आकार विशिष्ट प्रकारचा आहे (ना.सं.सं. ए २५). एका दुसऱ्या प्रतिमेंत (ना.सं.सं.ए. २२) कार्तिकेय व गणपती परिवार देवता म्हणून आढळतात. अन्यत्र (ना.सं.सं.ए.७३) त्याच्या जवळ मान वर करून पाहणारा बैल व कमल आणि चौरी घेऊन एक सेविक उभी आहे. (रे.चि. चोवीस १३)
केवलशिवाची आसन घालून बसलेली मूर्ती इंदूरच्या संग्रहालयांत पाहतां येते (इं.सं.४० ।४५५२). येथें शिव चतुर्भुज असून बुद्धांप्रमाणे ध्यानमुद्रेत बसला आहे. त्याचे हात तुटले आहेत पण ऊर्ध्वलिंग, श्रीवत्स व यज्ञोपवीत हे स्पष्ट आहे.
लिंगोद्भवमूर्ती :
शिवमूर्तीचा हा प्रकार दक्षिणेत लोकप्रिय होताच, पण उत्तरेंतही तो चांगलाच पसरला होता. लिंगोद्भवाच्या कथेचे पडसाद स्वात (पाकिस्तानाचा उत्तरपश्चिमी कोपरा) च्या काही लोककथांत देखील मिळतात. ही कथा लिंगपुराणांच्या पूर्वार्धात विस्ताराने पाहता येते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघे स्वतःला श्रेष्ठ समजून भांडू लागले. अकस्मात त्या दोघांमध्ये विस्तवाने धगधगणारे एक लिंग प्रगट झाले, त्याच्या मुळाचा व उंचीचा मागमूस लागत नव्हता. स्वतःला श्रेष्ठ समजणारे दोघेही हा पत्ता लावण्यांस निघाले. हंसाचे रूप धारण करून ब्रह्मदेव वर गेला व वराहाच्या रूपाने विष्णूनें खालची वाट धरली. दोघेही खूप भटकले आणि शेवट तोंड आंबट करून परत आले. एकाएकी प्रणवाचा नाद उमटला, हेच शिवाचे स्वरूप होते दोघेही त्याला शरण गेले व क्रमाने उजवी व डावीकडे हात जोडून उभे राहिले.
लिंगोद्भवमूर्तीत या कथेचे अंकन करतात. या प्रकारचा मृफलक राजस्थानच्या रंगमहाल गांवी मिळाला आहे.' हा गुप्तकाळचा नमूना तूर्त तरी सगळ्यांत जुना म्हणता येईल. प्रतिहार कलेतील या प्रकाराचा एक सुंदर नमूना सिकार हून मिळाला आहे. दुसरा वाराणसी येथील भारतकला भवनांत आहे' (चित्र ५४'). वाराणसीला मधोमध ज्वालावृत लिंग असून आजुबाजूला ब्रह्मदेव व विष्णू हात जोडून उभे आहेत. त्याचप्रमाणें अगोदर शोध घेण्यासाठी निघालेले दोघेही वर आणि खाली अंकित आहेत.
दक्षिणेतील लिंगोद्भवांशी याची तुलना केल्यास एक गोष्ट ठळकपणे लक्षांत येते कीं उत्तरेंत बहुतेक नुसते लिंगच दाखवीत तर दक्षिणेत लिंगातून उद्भूत झालेला शंकरही दाखवीत असत (रे.चि. सव्वीस २०).
भिक्षाटन मूर्ती :
काशी येथील मानमंदिर घाटांवर उत्तर गुप्तकालातील ही मूर्ती एका झाडाखाली आहे. शिव चतुर्भुज असून त्याच्या खालच्या हातांत भिक्षापात्र आहे. विशेष म्हणजे शंकराच्या बाजूस एक सेविका उभी आहे. तिच्याजवळ पाण्याची झ किंवा भृंगार आहे. शंकराचा उजवा हात या स्त्रीच्या खांद्यावर आहे.
नटेश किंवा नृत्यमूर्ती :
दक्षिणेपेक्षा उत्तरभारतांत नृत्य करणाऱ्या शिवाच्या प्रतिमा कमी मिळतात. या प्रसंगी मध्यभारतांतील दोन प्रतिमांचा उल्लेख आवश्यक आहे. एक उज्जैन येथून मिळालेली व दुसरी म्वाल्हेरच्या एका गांवातून मिळालेली आहे. दोन्हीत शिव हा दशभुज असून त्याचे पायाजवळ वर मान केलेला बैल आहे. डोक्याकडे नेलेल्या दोन्ही हातांत साय, व इतरांत त्रिशूल, इम्स, खट्वांग, वगैरे आयुधं दिसतात. उज्जैन प्रतिमेत ढोलकी वाजविणारा व टाळीने ताल देणारा असे दोघेजणही अंकित आहेत
नृत्यमूर्तीचा किंचित निराळा प्रकार बंगालच्या पालकलेत मिळतो. येथे शंकर भूमीवर नाचात नसून तो बैलाच्चा पाठीवरच उभा राहून नाचत आहे. हात दहाच आहेत पण आयुधांत मात्र अंकुश खड्ग, वगैरे सारखी काही नवी आयुचे दिसतात.
वीणाधर :
हातांत वीणा घेतलेला शंकर वीणाधर या नांवाने प्रसिद्ध आहे. हा प्रकार नृत्यमूर्तीचाच प्रकार आहे. येथे तो चतुर्भुव असून त्याच्या पुढच्या हातांत लांब दांड्याची वीणा आहे. ती वाजवीत तो नाचत आहे. शिवराममूर्तीच्या मते या प्रकारची एक प्रतिमा उत्तर प्रदेशांतून मिळाली आहे. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या ऊंचगांव (जि.सीतापूर) येथील प्रतिहारकालीन शिल्पसंग्रहांत ही तो आहे. या शिवाय सप्तमातृकापट्टांत बहुतेक एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला वीणाधर शिव दिसतो (चित्र १२४).
वीणाधर शिवाची दुसरी प्रतिमा देहरादून जिल्ह्याच्या (उ.प्र.) लाखामंडल गांवातून मिळाली आहे. येथे तो चतुर्भुज असून पत्नीसह वर्तमान उभा आहे. जवळच बैलही दिसतो."
वीणा घेतलेल्या शंकराची आसनमूर्ती इंदूरच्या संग्रहालयांत आहे (इ.सं.सं.१२२/५४०९). मुळांत हिला आठ हात होते. आतां फक्त वीणा, माळा व एक फळ एवढ्याच वस्तू हातांत असलेल्या दिसतात. विशेष म्हणजे मांडी घालून बसलेला असून देखील याच्या पायात घुंघरु बांधलेले आहेत. बैल व एक ढोलके वाजविणारा हे उपस्थित आहेतच.
नचना कुठारा (पन्ना) मध्यप्रदेश येथून हाती आलेल्या गुप्तकालीन शिला पटावर शिवपार्वतीच्या दोन आसनस्थ प्रतिमा गमतीदार आहेत. एका ठिकाणी शिवाच्या हातात एका भोपळ्याची वीणा आहे व दुसऱ्या शिवाने गिटार सारखे वाद्य घेतलेले आहे. पार्वती वीणा वादन ऐकत आहे (र.चि.शि.२)
Pratapaditya Pal, The Ideal Image The Asiatic Society New York, 1978 p.37
नटराज हातांत सिंह :
सिंहासह शिवाची शिल्पें आपण मागे पाहिली आहेत. कचित मध्यकाळातही हे वैशिष्ट्य दृष्टोत्पत्तीस येते. आ. गौ राजस्थान येथे एका छोट्याशा मंदिरावर अष्टभुज नटराज आहे. चारहात खंडित आहेत. उजव्या दोन हातांत त्रिशूल आणि भिक्षापात्र व डावीकडे खड्डांग आणि छोटासा सिंह आहे. सुमारे ८व्या शतकाचे हे शिल्प अग्रवाल यांच्या मते शिवाने क्रोधरूपी सिंहाला धरल्याचे हे प्रतीक असावे. (विस्तृत चर्चेसाठी मागे पहा भामूशा. पान १४५) (रे.बि.शि. ३)-
R.C. Agrawala, A Rare Nataraja Panel from Abaneri, Rajasthan, Pragdhara, 15, 2004-05 Pl. 11, pp. 285-86
हरिहर :
उजवीकडे हर आणि डावीकडे हरि अशा हरिहराच्या समभंग स्थितींत उभ्या असलेल्या बऱ्याच मूर्ती मिळतात. राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथें मध्यप्रदेशांतून प्राप्त झालेली अठराव्या शतकांतील आलीढ मुद्रेत असलेली हरिहर प्रतिमा आहे (रा.सं. ६८.१३७). तिचे हातपाय खंडित आहेत. डॉ. बी. एन्. शर्मा यांच्या मतें हा नृत्य करणारा हरिहर आहे.
लकुलीश :
सोटा घेतलेले आसनस्थ लकुलीशांचे रूप मध्यभारतांतील कित्येक उमामहेश्वर प्रतिमांत मध्य रथिकेत किंवा तिच्याजागी आढळते. याच्या दुसऱ्या हातांत फळ असून हा ऊर्ध्वलिंगी दिसतो (इं.सं. २/१०). मध्यकाळांत शिवाच्या या बावीसाव्या अवताराचे पूजन राजस्थान, मध्यप्रदेश आणि ओडिसांत बरेच प्रचलित होते. नेपाळांत वराह क्षेत्रांजवळ धरण नांवाचे ठिकाणीं आसनस्थ लकुलीश आढळतो.'
द्विलिंगी लकुलीश :
मंदसोर, मध्यप्रदेश येथे शिवना नदीतून मिळालेली व तूर्त भोपाळ संग्रहालयात असलेली ही द्विभुज लकुलीशाची प्रतिमा बरीचशी खंडित असली तरी येथें स्पष्टपणे आढळणाऱ्या दोन ऊर्ध्वलिंगामुळे महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या अंकनाचे कारण विचारणीय आहे. हे शिल्प औलीकरांच्या वेळचे म्हणजे सुमारे ६व्या शतकाचे आहे.
K.K. Shah and K.C. Pande 'Proud Possessions of Mandsaur Museum, Ajaya Sri 2, Pl. 11.5, p. 475
दक्षिणामूर्ती :
याच्या काही प्रतिमा वाराणसीत दिसतात, पण त्या बऱ्याच आधुनिक आहेत.
अर्धनारीश्वर :
आतांपर्यंत आपण एकट्या शंकराच्या स्थानक व आसन मूर्तीचा आढावा घेतला. आतां त्याच्या सपत्नीक मूर्तीकडे वळण्यांच्या अगोदर दोन्हीं ना सांधणारा दुवा म्हणजे अर्धनारीश्वर प्रतिमांचा विचार करावयास हवा (चित्र ६१). उत्तरप्रदेशांतून मिळालेली अशी एक प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत आहे. पण ती खंडित असल्यामुळे हस्तादिकांचा विचार करता येत नाही. उत्तरप्रदेशाच्या पर्वतीय प्रदेशांत उत्तर मध्यकाळांत प्रचलित असलेल्या कत्त्यूरी कलेची एक अर्धनारीश्वर प्रतिमा यांच संग्रहालयांत आहे. (ल.सं.सं.६५.१७१) ही चतुर्भुज असून हातांत अक्षमाळा, त्रिशूल, आरसा आणि झारी या वस्तू आहेत. अर्धनारीश्वराची मूळांत फारच उत्कृष्ट असलेली स्थानक प्रतिमा बांगलादेशाच्या राजशाही संग्रहालयांत असल्याचा श्री. शिवराममूर्ति यांनी उल्लेख केला आहे." हिला मुळांत दोनच हात असावेत. मथुरेची ऊर्ध्वलिंग परंपरा येथे ही विद्यमान आहे. श्री. शिवराममूर्ति यांच्या मतांप्रमाणे ही पद्धत ओडीसापर्यंत गेली होती. पण तिने राज्याची दक्षिण सीमा ओलांडलेली दिसत नाही. दुसरी स्थानक मूर्ती राजस्थानच्या आबानेरी मंदिरावर कोरलेली आहे. या सर्वांग सुंदर प्रतिमेला प्रदक्षिणाक्रमानें फूल, त्रिशूल आणि आरसा धारण करणारे हात आहेत. चीया अर्थात् सामान्य डावा कमरेवर ठेवला आहे."
आसनस्थ अर्धनारीश्वर :
अशा प्रकारच्या दोन प्रतिमा समोर आल्या आहेत. तंजावूर जवळ कंडीयूर येथील शिवमंदिरात चोळ कालीन (सुमारे ९वे शतक) तीन हाताचा अर्धनारीश्वर बैलाला टेकून बसला आहे. शिवाचा एक उजवा हात बैलाच्या डोक्यावर आहे, आणि वरच्या हातांत परशू दिसतो. पार्वतीच्या हातांत कमळ आहे (रे.चि.शि.४).
दुसरी प्रतिमा मऊ (सोनभद्र) उत्तर प्रदेश येथे आहे. सुमारे ७व्या शतकातील हा अर्धनारीश्वर चतुर्भुज आहे. उजवीकडे अक्षमाळा व त्रिशूळ आणि डावीकडच्या एका हातांत आरसा व दुसरा गुडघ्यावर टेकलेला आहे. ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे.
P.R. Sriniwasan, 'Rase Sculptures of early Chole period', Lalitkala 5, 1959, PL XXVII, Fig. 4, p.63
- राकेश तिवारी व जी.सी. सिंग, 'मऊ क्षेत्र के संदर्भ में सोनभद्र जिले का शिल्प वैभव, प्रग्धारा २, १९९१-९२, फिगर १७, पा. १३३.
अर्धनारीश्वर आणि लक्ष्मी/तारा :
कन्नौज (उ.प्र.) संग्रहालयात असलेली ही प्रतिहार कालीन उत्कृष्ट प्रतिमा आहे. येथे दर्शनी बाजूला वर, त्रिशूळ, सर्प आणि आरसा घेतलेला अर्धनारीश्वर उभा आहे. आजूबाजूला उजवीकडे पुरुषरूपांत नंदी आणि डावीकडे स्थूलकाय गण आहे. (रे.चि.शि.५)
या शिल्पाच्या पाठीमागे एक द्विभुज देवी उभी आहे. ती उजव्या हाताने पायाजवळ बसलेल्या भक्ताला काही देत आहे; डाव्या हातांत सताल पद्म आहे. (रे.चि.शि. ५,६).
N.P. Joshi, 'Two Problematic Sculptures of Pratihara Periad' JRAS, Bombay, 56-59, 1981-84, pp. 175-79
कल्याणसुंदर :
शिव पार्वतीच्या विवाहाचे अंकन करणारी प्रतिमा कल्याणसुंदर या नावाने ओळखली जाते (चित्र ६२). विवाह संस्काराच्या निरनिराळ्या पायऱ्या प्रमाणें कल्याण सुंदर प्रतिमेचेही प्रकार बदलत जातात. उत्तर व दक्षिण भारत दोन्हींकडे या प्रकारच्या कित्येक प्रतिमा मिळतात. त्याचा अभ्यास केल्यास खालील मुद्दे ठळकपणें लक्षांत येतात -
१) बंगाल मधे सप्तपदीचे अंकन जास्त झाले आहे.
२) घारापुरी, कैलास, वगैरे ठिकाणी पाणिग्रहणांचे दृश्य दिसते. उत्तरभारतातही पाणिग्रहणच जास्त दिसते.
३) जावाकडे आशीर्वादाचे दृश्य दिसते. भारतात हे जवळ जवळ दुर्मिळ आहे.
उत्तर भारतात प्रतिहार काळातील कन्नोज कलेत काही फारच उत्कृष्ट कल्याणसुंदर प्रतिमा मिळाल्या आहेत. तसेच बंगालच्या पालकलेतही त्यांचे दर्शन घडते. याची खालील वैशिष्ट्ये लक्षांत ठेवण्यासारखी आहेत -
क) शिव हा बहुतेक उजवीकडे उभा असून पार्वती डावीकडे आहे.
ख) तो द्विभुज किंवा चतुर्भुज दोन्ही रूपांत दिसतो.
ग) लाजणारी नवरी म्हणजे पार्वती द्विभुजच आहे.
घ) पौरोहित्य करणारा ब्रह्मदेव अग्नीच्या मुखात आहूती टाकताना दिसतो. कचित अग्नीसही पुरुष रूपांत दाखवितात.
ङ) परिवार देवतांत, नवग्रह, अष्टदिग्पाल, स्कंद, गणपती इतर शिवगण आणि पार्वतीच्या सख्या कलाकाराच्या रुचिप्रमाणें दाखवितात (चित्र ६२).
च) दक्षिण भारतीय परंपरेत पार्वतीच्या बाजूला हातांत पाण्याची झारी घेऊन विष्णू उभा दाखवितात. उत्तर भारतातही तो क्वचित दिसतो (ल.सं. ५२.८२)
छ) काही शिल्पांत शिव पार्वतीचा विवाह पर्वताचे आंत अर्थात् हिमालयाचे घरी होत आहे हे ही दाखविण्याचा यत्न केलेला आहे.
कल्याणसुंदराचा दुसरा प्रकार (चित्र ६३)
झाशी येथील राणीमहाल संग्रहांत एक प्रतिमा (सं. संख्या ६३) अशी आहे जेथे उमामहेश्वर आलिंगनमूर्ती आणि कल्याणसुंदर रूप यांना एकत्र आणण्याचा यत्न केला आहे. येथे शिव एका हातानें पार्वतीचे पाणिग्रहण करीत असून दुसऱ्यानें तिच्या स्तनांला स्पर्श करीत आहे. उलटपक्षी ती शिवाला एका हातानें आलिंगन देत असून दुसरा म्हणजे उजवा तिने पतीच्या हातांत दिला आहे. शंकराच्या वरच्या दोन हातांत त्रिशूल व सर्प आहे. ब्रह्मदेव खाली अग्रींत आहूती टाकत आहे. वरवधूच्या दोन्ही बाजूला उतरंडीचे आठ घट एकावर एक ठेवलेले आहेत. खाली हत्ती असून वरच्या घटांवर छोटासा कळस आहे.
कल्याणसुंदर :
पंचमुखी पहाड (सोनभद्र) उ.प्र. येथे असलेली सुमारे १४-१५व्या शतकातील हे शिल्प समस्यामूलक आहे. येथे विवाहहोमासह शिवाकडून पार्वतीचे पाणिग्रहण आणि हनुस्पर्श आहेतच, पण त्याबरोबर खाली नमूद केलेले बिंदू अनुत्तरित प्रश्न उभे करतात. (रे.चि.शि.७).
पार्वतीच्या डोक्यावर दिसणारी पाच मानव मस्तकें.
याच क्रमांत गुडघ्यावर हात टेकलेली उत्कुटिकासनांत बसलेली बाई.
पार्वतीच्या हाताखाली असलेली स्त्री.
पार्वतीचे डोके आणि डावा कान यामध्यें दिसणारी दोरी सारखी वेणी?
पार्वतीच्या उजवीकडे उभा असलेला शिव.
Rakesh Tewari and others, 'Archeological Explorations, Pragdhara 5, 1994-95, pl. 147, pp.94-95
विवाहमूर्ती :
हा स्वतंत्र असा प्रकार नाही, कल्याण सुंदराचा उपप्रकार म्हणता येईल. शंकर डाव्या बाजूला व पार्वती उजव्या बाजूला उभी असून शिव तिला जवळ घेऊन अलगद तिच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. तो चतुर्भुज असून जवळ गणपती ही आहे. पण ब्रह्मदेवानें आहूती टाकण्यांचा प्रकार मात्र नाही. अशा प्रकारची एक प्रतिमा भारतकलाभवन, वाराणसी व दुसरी लखनऊ संग्रहालयांत आहे (चित्र ६४) (भा.क.भ.सं. १३२ ल.सं.बी. ३३७)
याच प्रकारात थोडे परिवर्तन वाराणसी येथील दशाश्वमेध घाटावरील शीतलेच्या मंदिरांत स्थापित असलेल्या एका मध्यकालीन प्रतिमेत दिसते." येथें ऊर्ध्वलिंगी शंकर चतुर्भुज आहे. त्याच्या मागच्या डाव्याहातांत त्रिशूल आहे. मागचा उजवा पार्वतीच्या डोक्यावर उचललेला दिसतो. पण त्यातील वस्तुमात्र स्पष्ट नाही. सामान्य उजवा पार्वतीच्या हनूला स्पर्श करीत आहे व डावा तिला आलिंगन देत आहे. पार्वती द्विभुजाचा आहे. तिच्या डाव्या हातांत एक शिवलिंग आहे व उजव्या हातानें ती शिवाला स्पर्श करीत आहे.
उमामहेश्वर :
उत्तरभारतांतील शिवपार्वतीच्या आसन मूर्तीत उमामहेश्वर प्रतिमेचा सर्वाधिक प्रसार झालेला दिसतो. मत्स्यपुराण", अपराजितपृच्छा" देवतामूर्तिप्रकरण, वगैरे बऱ्याच ग्रंथांत उमामहेश्वराचे वर्णन मिळते. थोडक्यात म्हणजे परस्परांना आलिंगन देत एकाच आसनांवर बसलेल्या शिवपार्वती प्रतिमेला साधारणपणे उमामहेश्वर म्हणून ओळखतात. पण येथें बरेचसे भेद प्रभेद ही आहेत. शिव आणि पार्वती याच्या पायाखाली त्यांची वाहनें दाखवितात व रुची आणि जागेप्रमाणे गणपती, स्कंद, शिवगण, हडकुळा भृगरिटी, काही सख्या, अनेक देवगण, वगैरे परिवार देवांच्या रूपानें दाखविण्यांचा प्रघात आहे. या मूर्तीप्रकाराच्या काही ठळक वैशिष्ट्यांची थोडक्यात चर्चा करू.
१) शंकर - हा बहुतेक चतुर्भुज असून याच्या हातांत त्रिशूल व साप, असतो. रुचिप्रमाणें कमळ, माळ, खप्पर, फूल, फळ, वगैरे वस्तूही देतात. हा डावी मांडी घालून ललितासनांत बसलेला असतो. तो डाव्याहातानें पार्वतीला आलिंगन देत तिच्या डाव्या स्तनांला स्पर्श करीत असतो (चित्र ६५).
२) पार्वती - ही साधारणपणें द्विभुजा असते, पण कुठेकुठे ती चतुर्भुजाही दिसते (भांदक येथील प्रतिमा, ना.सं. ए २३). हिच्या हातांत आरसा, कमळ, किंवा फळ आढळते. तिचा सामान्य उजवा हात शिवाच्या मानेभोवती टाकलेला असतो.
३) ऊर्ध्वलिंग - बंगालमधे या प्रकारांत कधी कधी शंकर ऊध्र्वलिंगी दिसतो (पटना सं.सं. औलह. ६८३७, ल.सं.सं. एच्. १३).
४) पंचलिंगें - कित्येक उमामहेश्वर प्रतिमांत अगदी वरच्या बाजूला एकाच ओळींत पांच शिवलिंगे दाखवितात (चित्र - ६९). एका ठिकाणी याची संख्या चारच आहे (चित्र ६६). या शिवलिंगाचे नेमके तात्पर्य सांगता येत नाही, शिवाच्या पंचमुख रूपाशी त्याचा काही संबंध असणें शक्य आहे.
५) परिवार देवता - पालकलेत परिवार देवतांचा पसारा कमी दिसतो, पण उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान इत्यादि ठिकाणच्या कलाकृतींत भरपूर परिवार देवता दिसतात. यामध्यें गणेश, कार्तिकेय, शिवगण, सख्या, रथिका बिंबांतील ब्रह्मदेव व विष्णू, मालाधारी विद्याधर, वगैरेची गणना करता येईल (चित्र ६६.६८).
या बाबतीत विशेष लक्षांत घेण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे अत्यंत हडकुळा असा शिवाचा श्रृंगिरिटी नावांचा गण जो बहुतेक नृत्य करतांना दिसतो आणि दुसरी म्हणजे मूर्तीच्या पाठशिळेवर मधलें रथिका बिम्ब म्हणून मध्य भारतात दिसणारा लकुलीश. हा इतरत्र दिसत नाही.
उमामहेश्वर, बाळ स्कंद मांडीवर :
कन्नौज येथील प्रतिहार कलेची एक उत्कृष्ट कृती, मूर्ती आलिंगन मुद्रेतील उमामहेश्वराची पण आईच्या मांडीवर गुटगुटीत बाळाच्या रूपात स्कंद वर्तमान स्थितीत या बाळाचा फक्त खालचा भाग उरलेला आहे.
अशाच प्रकारची पण रावणानुग्रह प्रकाराची प्रतिमा हरदोई (उ.प्र.) येथे एका मंदिरात आहे.
या शिल्पांना दक्षिणेची 'सोमास्कंद' पद्धतीची उत्तरभारतीय आवृती म्हणता येईल.
A.L.Srivastava, Uma Mahesvara, Fig. 2, p. 99
B.N.Sharma, 'Ravana lifting mount kailasa in Indian Art, EW., 23, 1-4, 1973, fig. 8,
p. 331
उमामहेश्वर, सूर्यासह :
काश्मीर कलेची (पण तूर्त बेपत्ता) सुमारे ६व्या शतकातील ही उभयोन्मुख (पाठपोट) मूर्ती फार महत्त्वाची आहे, कारण येथे सूर्य आणि शिव या दोन देवतांचे एकत्र अंकन आहे. दर्शनीभागावर (आपण याला दर्शनी म्हणू) त्रिमुखशिव आणि पार्वती द्युतक्रीडा करताना दिसतात, दुसऱ्या बाजूला वरच्या भागात रथारूढ सूर्य आणि खाली शिवलिंगाच्या पूजेचे दृष्य विद्यमान आहे. 'विरम्चिनारायण शंकरात्मने' याची साक्ष पटविणारी ही प्रतिमा आहे. हेच तत्त्व वेगळ्याप्रकारचे 'शिव-सूर्य' या संयुक्त प्रतिमेत दाखवले जाते. (र.चि.शि. ८,९).
Macaela Soar, 'Siva and Parvati at Play' The Art of Play, Ed. Andra. Topsfield, Marg Publications 58, no.2, December 6, pl. 48-49, pp. 45-46
उमामहेश्वर, उमाचतुर्भुज :
उमामहेश्वर प्रकारांत बहुतेक पार्वती द्विभुज असते, पण छत्तीसगढमध्ये मिळालेल्या काही प्रतिमा तिला चतुर्भुज दाखवतात. आलिंगनांत गुंतलेल्या हाताशिवाय साधारणपणें तिच्या इतर हातांत अंजनशलाका (काजळ घालण्याची सळई), आरसा आणि फणी असते. अशी शिल्पें बिलासपुरच्या मल्हार संग्रहालयांत आणि खैरागढच्या आय्.के.एस्. यूनिव्र्व्हसिटीच्या संग्रहालयात आहेत. (रे.चि.शि.१०)
A.L. Srivastava, Uma Mahesvara, Fig. 33, p. 112
I.K.S. University Museum, Khairagarh, nos. 55, 150, 156, 157
उमामहेश्वराच्या काही मूर्तीत पार्वती शिवाच्या उजवीकडे दिसते. काही विद्वानांच्या मते हे शिवविवाहाचे सप्तपदीच्या पूर्वीचे दृश्य आहे. कारण यावेळी पती पत्नीच्या डावीकडे असतो.
A.L. Srivastava, Uma Mahesvara Fig. 13, 34, p. 33
भंडाघाट (जबलपुर) म.प्र. येथील गौरीशंकर मंदिरात बैलावर बसलेले शिवपार्वती आहेत. येथे नव्या नवरीप्रमाणें पार्वती शिवाच्या पाठीशी आहे. या शिल्पावर असलेल्या लेखांत शिवाला 'वरेश्वर' असे संबोधन आहे. हेच नांव त्रिपुरी (जबलपुर) येथील एका अन्य अभिलिखित शिल्पांत ही आहे. खजुराहोचे 'दूल्हादेव' मंदिर ही शिवाच्याच नांवावर आहे (हिन्दी दूल्हा = नवरा)।
A.L. Srivastava, Uma Mahesvara, p. 34, f. 34
उमामहेश्वराचे काही इतर प्रकार ही उल्लेखनीय आहेत. ग्यारसपुर, मध्यप्रदेश येथील एका प्रतिमेत शिवाच्या बाजूला मकरवाहिनी गंगा आणि पार्वतीच्या बाजूला कासवावर यमुना उभी आहे. (या माहिती व चित्रासाठी लेखक डॉ. कुमुद कानिटकर, मुंबई यांचा आभारी आहे.) (रे.चि.शि.११)
दक्षिणेत उमामहेश्वर प्रतिमेत काही ठिकाणी पार्वतीचे वाहन म्हणून घोरपड (गोधा) दाखवतात. (रे.चि.शि.१२)
B. Deshmukh, Iconography of Hindu Temples in Marathawada, Jaipur, 1987, pl. 50, p. 106. Stella Kramrisch, Manifestations of Shiva, 1981, Fig. 52, 53, p. 63-64
उत्तरभारतांत हा प्रकार कचित आढळतो.
Rakesh Tewari and others 'Archeological Explorations in Robertsganj Tehsil Pragdhara 5, 1994-95, pl. 77, p. 88
कुंभेश्वर, गौरीधारा, (पाढन) नेपाळ येथील सुमारें १२व्या शतकांतील शिल्पांत उभयता चतुर्भुज असलेले शिवपार्वती पद्मासनांत बसले आहेत. दोघांच्याही साधारण हातांत कुंभ (घागरी) असून उपबाळू अभय आणि वरदमुद्रेत आहेत. इतर कोणतेही आयुध नाही (रे.चि.शि.१३)
उमामहेश्वर मूर्तीचे प्रकार :
लोकप्रियतेचा बराच वरचा दर्जा गाठल्यामुळे या प्रतिमेचे एकाधिक प्रकार सहज संभवतात. नमूने म्हणून काही खाली देतो :
क) उमामहेश्वर आलिंगन - हा सर्वसामान्य प्रकार आहे. याशिवाय प्रतिमेला उमामहेश्वर म्हणता येणार नाही. फरक एवढाच की काही ठिकाणी शिव-पार्वती दोघेही एकामेकांच्या गळ्यात हात घालतात (चित्र ६८) तर काही ठिकाणी पार्वती तसे करीत नाही. तिचा उजवा हात शंकराच्या मांडीवर असतो (चित्र ६६; अल्हा. कॅट. २४१). याचप्रमाणे पार्वतीच्या मांडीवर बसण्यात ही फरक असतो. कुठे ती पूर्णपणे शिवाच्या अंकावर असते तर कुठे ती अंमळ बाजूला असते.
ख) हनुस्पर्श - या प्रकारांत शंकर डाव्या हाताने तिला आलिंगन देत असतो आणि उजव्या हातानें तिच्या हनुवटीला स्पर्श करीत असतो (चित्र ६५ पटना, सं.सं. Arch. १५३३, Arch. ६८३७).
ग) अठरा हातांचा शंकर - उमामहेश्वराच्या कचित मिळणाऱ्या या प्रकारांत पार्वती दोन हातांची पण शंकर मात्र अठरा हातांचा आहे व त्यानें निरनिराळी आयुधे घेतली आहेत, हा जम्मा नेपाळी कलेचा असून तुर्त जर्मनीत आहे.
घ) वृक्षांखाली उमामहेश्वर या प्रकारच्या फक्त दोनच प्रतिमा आमच्या पाहण्यांत आल्या. त्यापैकी एक भरतपूर (राजस्थान) च्या संग्रहालयांत (सं. सं. २९७ चित्र ६६) व दुसरी इंदूरच्या संग्रहालयांत आहे, पण येथे शिव खंडित असून वृक्ष फक्त पार्वतीच्या बाजूला आहे. (रे.चि. चोवीस १४)
स) गंगाधर शिव-पार्वती या रूपाचें नेपाळमधें बरेच प्रकार आढळतात पण विस्तार भयांस्तव फक्त दोन मूर्तीचा विचार करतो. एक लखनऊच्या संग्रहालयांत आहे (ल.सं.४५.७८) व दुसरी लंडनच्या ब्रिटिश म्युझियममधे (ब्रि.म्यु.सं. १९७०,७-२०,१) लखनऊच्या मूर्तीत स्वर्गातून शंकराच्या डोक्यावर कोसळणारी गंगा व शंकराच्या उजव्या बाजूला पण वेगळी बसलेली अन्नपूर्णा दाखविली आहे. ब्रिटिश म्यूझियमची प्रतिमा अशीच आहे, पण तेथें कलाकाराने बऱ्याच स्वातंत्र्याचा वापर केला आहे. पार्वती शंकराच्या मांडीवर बसलेली नसून मांडीला टेकून रेलून बसली आहे. बैल खाली नसून शंकराच्या पाठीशी आहे. खालच्या बाजूला निरनिराळे पशुमुख शिवगण नृत्य करीत आहेत.
च) लिंगारूढ उमामहेश्वर हा प्रकार वाराणसी, खजुराहो यांच्या आसपास प्रचारांत असावा. येथे उमामहेश्वर आलिंगन मुद्रेत एका शिवलिंगावर असलेले दिसतात. अशा प्रकारच्या फक्त चार प्रतिमा आमच्या पाहण्यांत आल्या आहेत. त्या अनुक्रमें कलकत्ता (सं.सं. २५१२०), वाराणसी (संस्कृत विश्वविद्यालय संग्रहालय), लखनऊ (ल.सं.सं. ५६.४२०) व अलाहाबादच्या संग्रहालयांत (चित्र ६७) आहेत.
हरगौरी किंवा वृषवाहन मूर्ती :
श्री गोपीनाथराव यांनी आगमांतून दिलेल्या उद्धरणाप्रमाणें वृषवाहन मूर्तीत शिव-पार्वतीच्या पाठीमागे बैल असावयास पाहिजे." दक्षिणेंत तशा प्रतिमा मिळतात. उत्तरेत गुप्तकाळांपर्यंत तशा प्रकारच्या काही मूर्ती मथुराकलेत मिळाल्या आहेत, पण नंतरच्या काळात वृषांवर बसलेली हरगौरी मात्र भरपूर दिसते. या प्रकाराला देखील श्री राव यांनी वाङ्मयीन आधार हाती नसले तरी 'वृषभारूढमूर्ति' या सदराखाली घेतले आहे.
उत्तर भारतांत मिळणाऱ्या वृषवाहनाच्या प्रतिमेत जवळजवळ उमामहेश्वरमूर्ती प्रमाणेच शिव-पार्वती आलिंगन मुद्रेत वृषावर बसलेले दिसतात. मुख्यत्वे करून या प्रतिमा राजस्थान व मध्यभारत इतके जास्त मिळाल्या आहेत. त्यांत दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारांत बैल उभा असतो. याचा एक सुंदर नमूना म्हणून इंदूर संग्रहालयांत असलेल्या आवरा येथून मिळालेल्या सुंदर प्रतिमेकडे बोट दाखविता येईल." येथे शिव चतुर्भुज असून त्याच्या हातांत माळा व त्रिशूल अशा वस्तू आहेत. साधारण डावा स्तनस्पर्श करीत आहेत व मागचा डावा पार्वतीच्या गळ्यात दिसतो. पार्वतीचा उजवा हात खंडित असून डाव्यात फूल आहे.
वृषभारूढमूर्तीच्या दुसऱ्या प्रकारात बैल उभा नसून बसलेला असतो. हा प्रकार राजस्थानच्या मध्यकालीन शिल्पात आढळतो. येथे शिव चतुर्भुज असून स्तनस्पर्शाव्यतिरिक्त फूल, त्रिशूल व सर्प अशा वस्तू धारण करून आहे. पार्वतीच्या हातात आरसा दिसतो. बैल पाय मोडून ऐटीत बसला आहे व समोर ठेवलेल्या खांद्याला तोंड लावीत आहे. (र.चि. चोवीस १५)
इंदूर संग्रहालयांत वृषभारूढमूर्तीचे आणखी दोन नमूने आहेत (सं. सं. ९०/४५५५, २४/६९). याच संदर्भात उत्तर पश्चिम भारतांतील शाही राजवटीत घडविलेल्या एका वृषभारूढमूर्तीचा परामर्श घेणें आवश्यक आहे. ही शिवप्रतिमा सहा हाती असून तिला तीन मस्तके आहेत. हातात प्रदक्षिणा क्रमाने कमळ, त्रिशूल (?), कपाल, चक्र, माळा व गदा अशा वस्तू आहेत. पार्वती मांडीवर नसून बैलावरच पण जवळ आहे व तिच्या हातात कमळ आणि कदाचित आरसा आहे. आयुधाकडे नजर टाकल्यास ही मूर्ती शिव, ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकाच रूपानें प्रातिनिध्य करीत आहे असे दिसतें.
शिवपार्वती, सारीपाट क्रीडा :
शिव पार्वतीची सारीपाट क्रीडा व तिच्यांत पार्वतीचा विजय याचे काव्यात वर्णन मिळतें, पण भोपाळच्या बिडला संग्रहालयांत असलेली व विदिशा जिल्ह्याच्या काकपूर या स्थानांहून मिळालेली प्रतिमा या विषयाचे फारच सुंदर अंकन करते (वि.सं.सं. ६१). सुमारें दहाव्या शतकाच्या या प्रतिमेंत दोघांमधे पसरलेला पट व त्यावरील गोट्या खुबीनें दाखविल्या आहेत.
रावणानुग्रह :
मध्यकाळांत हा प्रकार बराच लोकप्रिय झाला. उत्तर भारतात मिळणाऱ्या उमामहेश्वर व रावणानुग्रह दोन्ही प्रतिमा सकृद्दर्शनी सारख्याच दिसतात, पण मुख्य फरक शंकर पार्वतीत नसून त्याच्या आसनांच्या खालील भागांत असतो. रावणानुग्रह मूर्तीत आसनासगट शिवपार्वतीला उचलण्याचा प्रयत्न करणारा रावण दिसतो. हा सर्वत्र एक सारखा आढळत नाही. याची खालील रूपें नोंद करण्यांसारखी आहेत :
क) काही ठिकाणी हा चार हातांचा दाखवितात. मुखमात्र एकच असतें. समोरच्या दोन हातांने तो वीणा वाजवताना दिसतो व मागच्या दोन हातांनी त्याने आसन उचललेले दिसते. जणु की काय त्याची मदत करण्यांकरिता इतरही काही मंडळी पाठीने टेंकू देतांना दिसतात (चित्र ६८). अल्हा. कॅट. नं. ४२६; राणी महाल, झाशी सं. ३४, ३६, २१). काही विद्वान या सर्वांनांच शिवगण समजतात, पण शिव गणांनी शंकर पार्वतीचे संपूर्ण आसन कां उचलावे हे समजत नाही.
ख) दुसऱ्या प्रकारांत वरील सारखीच स्थिती असते, पण रावणांच्या हातात वीणा नसते. त्याचे दोनच हात असतात. डाव्याने तो आसन उचलण्याचा प्रयत्न करतो व उजव्यात तलवार असते (राणी महाल झाशी. संख्या ६२)
ग) तिसऱ्या प्रकारांत तो सहा हाताचा आहे. त्यांचे वरचे दोन हात कैलास उचलण्यांत गुंतले आहेत. मधल्या दोन पैकी एका हातात ढाल असून दुसऱ्याने तो जमीनीवर पडलेल्या एका गणाची-अर्थातच विरोध करणाऱ्या शिव गणाची-तंगडी ओढत आहे. सामान्य हातापैकी उजव्यात तलवार असून डावा मांडीवर टेकला आहे. रावणाला मुख्ख मात्र एकच आहे. अशा प्रकारची एक प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत (सं.सं.जी. २२१) आहे (चित्र ७०).
घ) या प्रकारांत रावणांचे अगदीच निराळे रूप पहावयांस मिळते. येथे तो तीन तोंडाचा व चार किंवा सहा हाताचा असून वीणा आणि तलवार घेतलेला असतो. या प्रकारांचे वैशिष्ट्य म्हणजे रावणांच्या तीन डोक्यांवर दिसणारे गाढवाचे तोंड हे होय. रावणाला गर्दभमुख कां मानतात या बद्दल वाङ्मयीन पुरावा अद्यापि आमच्या हाती आलेला नाही, पण एवढं मात्र खरे की उत्तर भारतांत दस-या की जयगाचराघव्य कागदी पुतळे उभारले जातात त्यांत ही परंपरा आवर्जून पाळतात. राजस्थानी चित्रातही ही परंपरा दिसते. गाढवाचे तोंड असलेल्या रावणानुग्रह प्रतिमा लेखकांने वाराणसीला व ग्वाल्हेरच्या संग्रहालयात पाहिल्या आहेत. मूसानगर येथे फारच खंडित अशी एक प्रतिमा आहे, पण कालानुक्रमें तिला या सर्वात जुने मानावे लागेल (रे.चि. पंचवीस १६).
उग्रमूर्ती आणि संहार मूर्ती :
आता पर्यंत आपण शंकराच्या सौम्य मूर्तीचा विचार केला. शंकरानें विध्वंस करण्यासारखी कार्ये करण्याकरितां जी रूपें घेतली ती त्याच्या उग्र व संहार मूर्तीची पार्श्वभूमी होत. यांत भैरव, वीरभद्र, किरात, गजासुरसंहारमूर्ती, अंधकासुरसंहारमूर्ती, वगैरेची गणना होते. आता या प्रकारांकडे वळू.
भैरव :
शिवपुराणांप्रमाणे भैरव हे शंकरांचे पूर्ण रूप होय तो सर्व जगांचे भरण करतो व रूपाने भीषण आहे तेवढ्याकरिता त्याला भैरव हे अभिधान प्राप्त आहे. काळही त्याला वचकतो म्हणून भैरवालाच कालभैरव असे ही म्हणतात. भैरव हा वाराणसी नगरीचा अधिपती मानतात. विष्णुधर्मोत्तरपुराणाप्रमाणे ढेबर पोट, बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणाऱ्या दाढा, नर मुंडाच्या माळा, हत्तीचे चामडें, सापाचे दागिने, हांतात असलेली निरनिराळी शस्त्रे ही त्याची प्रमुख लक्षणें होत. कुत्रा हे त्याचे वाहन आहे. भैरवाची बटुक भैरवादि बरीचशी रूपें आहेत पण त्यांत 'अष्टभैरव' म्हणून ओळखली बाणारी आठ रूपेच प्रसिद्ध आहेत.
भैरवाच्या प्रतिमा उत्तर भारतांत बऱ्याच ठिकाणी मिळतात व त्यात रूपवैचित्र्य ही दिसते. खाली काहीं मुख्य प्रतिमाचा उल्लेख करतो.
१) द्विभुज भैरव आसन सारनाथच्या संग्रहालयांत (वाराणसी) (सं.सं. गॅलरी नं.२) असलेल्या या प्रतिमेच्या डाव्या हातांत भिक्षापात्र किंवा खप्पर आणि उजव्या हातांत त्रिशूल आहे. उजव्या खांद्यावर एक साप ही दिसतो.
विशेष म्हणजे याच्या कपाळांवर भालपट्टांप्रमाणे एका खास अलंकरणाचा उपयोग केलेला दिसतो. त्यांत मधोमध एक माणसाची कवटी असून आजूबाजूला दोन उभे तळहात दिसतात. हे अलंकरण या भागांत उग्र अशा शिवमूर्तीवर बरेच दिसते. सारनाथच्या या मूर्तीच्या गळ्यात असलेले एकच वाघनख ही महत्त्वपूर्ण असावे, कारण हा असाच अलंकार लखनऊ संग्रहालयांत असलेल्या गुप्तकालीन मृफलकांतील शंकराच्या गळ्यातही दिसतो (ल.सं.सं. ७१.२८). भुवनेश्वर येथेही असलेला द्विभुज भैरव आढळतो (रे.चि. पंचवीस १८).
२) द्विभुज भैरव स्थानक - काशीकडे सध्या प्रचलित असलेल्या भैरव प्रतिमेत एका हातात सोटा आणि दुसऱ्या हातात खप्पर असते. पायाखाली कुत्रा दाखवितात. चेहरा अर्थात्च उग्र असतो.
३) चतुर्भुज भैरव स्थानक याचे विकराल असें मुख असून हातांत खप्पर, त्रिशूल व डमरू ही आयुर्धे दिसतात (अल्हा. कॅट. ४०१). कधीं कीं खट्वांग ही आढळते (अल्हा. कॅट. ३१६). या प्रतिमा अलाहाबादच्या संग्रहालयांत आहेत (चित्र ७२). गुजराथच्या सोमनाथ मंदिराच्या भिंतींवर असलेल्या भैरवाच्या हातांत नरमुंड असून त्याच्याकडे उसळताना एक पशू दिसतो. कल्पना अशी कीं नुकर्तेच कापलेल्या मानव मस्तकांतून गळणाऱ्या रक्तांचे थेंब चाटण्यांकरिता कुत्र्यासारखे पशू उड्या मारीत आहे.
चांदा (महाराष्ट्र) येथून मिळालेल्या भैरवमूतींचे जरी तीन हात तुटलेले असले व साधारण डाव्यात फक्त पानपात्रच बाकी राहिले असले तरी त्याचे उभे केस, गोल सर्पकुंडलें, सापाची माळ, घंट्या लावलेली मेखला आणि पायाजवळचा कुत्रा हे दर्शनीय आहे (नागपूर सं.सं. ए २८).
४) द्वादशभुज भैरव आसन - ही प्रतिमा कलकत्त्याच्या संग्रहालयांत असून २६ स्थूलकाय व विकराल मुख असा भैरव उजवा पाय खाली सोडून बसलेला आहे त्याच्या हातांत वर, सोटा, खप्पर, खड्ग, वरील दोन हातांत साप किंवा जटा? ढाल?, मुंड, अभय, खट्वांग वगैरे आहेत.
५) द्वादशभुज भैरव स्थानक - इंदूरच्या संग्रहालयांत असलेल्या या प्रतिमेत (सं.सं.५३/१६१७) बरीच आयुधे खंडित आहेत पण वज्र किंवा त्रिशूल, डमरू, दोन्ही हातांतील जटा किंवा साप, व ढाल ही साधारणपणे ओळखता येतात. हा भैरव पूर्णपणें दिगंबर असून याच्या मिश्या, उभे केस, घंट्या असलेला, करगोटा, वगैरे वस्तू स्पष्ट आहेत.
६) सशक्तिक भैरव - राजस्थानांतील आबूच्या कलाकृतींत एका ठिकाणी शिवपार्वती प्रमाणेंच आलिंगन मुद्रेत उभा असलेला चतुर्भुज व दीर्घलिंगी भैरव पहावयास मिळतो. याच्या तीन हातांत खड्ग, डमरू आणि ढाल असून चौथ्याने तो आपल्या शक्तीला आलिंगन देत स्तनस्पर्श करीत आहे. याच्या मस्तकांवर तीन नरमुण्डे असून पायात खडावा आहेत. त्यांच्या शक्तीच्या डाव्या हातांत पाश आहे. उजवा भैरवाच्या गळ्यांत आहे. भैरवाच्या पायांजवळ वर उडी मारणारा कुत्रा दिसतो.
गजासुरसंहारमूर्ती आणि अंधकासुरसंहारमूर्ती :
कूर्मपुराणांत आलेल्या कर्थेप्रमाणें वाराणसीच्या कृत्तिवासेश्वर लिंगांचे पूजन करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देणाऱ्या हत्तीचा वेष घेतलेल्या एका असुराचा शंकरानें संहार केला व त्याचे कातडे उत्तरीय म्हणून पांघरले. गजासुरवधाच्या इतरही कथा मिळतात. दक्षिणभारतीय परंपरेप्रमाणें शंकराने या असुराचा नाश तंजावर जिल्ह्याच्या वळुवुर गावांत केला.
शैवागमांत या प्रतिमेचे बरेच वर्णन मिळते. हिची मुख्य ओळख म्हणजे शंकरानें अंगावर घेतलेले हत्तीचे कातडें ही होय. श्री शिवराममूर्ति यांचे असे मत आहे की उत्तरभारतीय परंपरेंत गजासुरसंहारमूर्ती आणि अंधकासुर-संहार-मूर्ती यांचे मिश्रण झाले आहे, व यांचे कारण असें की शिवानें वराहपुराणांप्रमाणे अंधकाचा संहार करण्यापूर्वी गजासुराल मारून त्याचे कातडे अंगावर पांघरलें होते." भुवनेश्वराच्या वेताळ मंदिरांत बसलेली गजासुरसंहारमूर्ती आहे."
याच प्रसंगाने अंधकासुराच्या कथेचाही धावता उल्लेख करणें योग्य होईल. वराह", कूर्म आणि वामन" पुराणांत या असुराचा उल्लेख मिळतो. ब्रह्मदेवाच्या वरानें उन्मत्त झालेल्या या असुरानें देवाना अतिशय त्रास दिला. ते शंकराकडे गान्हाणे घेऊन गेले असतां त्यानें शंकरांवर आक्रमण केले. त्याचवेळी नील नावाचा एक राक्षसही हत्तीचे रूप घेऊन शंकरावर चाल करणार होता. वीरभद्रानें त्याला मारले व त्याचे कातडें शंकरांस दिले. शंकरानें सर्व देवासह अंधकांवर आक्रमण करून त्याला आपल्या शूलांबर उचलून घेतले, व त्यांच्या गळणाऱ्या रक्तबिंदू पासून इतर असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून चाटून टाकण्यांकरिता आपल्या डोळ्यपासून योगेश्वरी नावाची एक मातुका उत्पन्न केली. अंधकाला शूलांबर टांगून आणि हत्तीचे कातडे पांघरून शंकर एक कोसभर धावत आणि नाचत राहिला.
उत्तरभारतीय परंपरेत हेंच चित्रण होत असते. लखनऊ संग्रहालयांत असलेली प्रतिमा (सं.सं.एच् १७, चित्र ७४) अष्टभुजी आहे. त्याच्या साधारण हातांस शूल असून त्यावर अंधकाचा देह दिसतो. शंकराच्या इतर हातांत गदा (?), खड्ङ्ग, डमरू, हत्तीचे पुढचे व पाठीमागचे पाय, ढाल आणि साप (१) दिसतात. त्याच्या मस्तकांवर नर-कपाल असून गळ्यांत मुंडमाला आहे.
ग्वाल्हेरच्या किल्ल्यांत आतील भिंतीवर फार विशाल पण अतिशय खंडित अशी गजासुरवधप्रतिमा आहे. वाराणसीच्या काही मंदिरातही अशा प्रतिमा आढळतात पण एकूण दक्षिणेंपेक्षा उत्तरेत यांची संख्या कमी आहे.
सारनाथ (वाराणसी) च्या संग्रहालयांत अंधकासुरवधाचें अंकन करणारी फारच विशाल प्रतिमा आहे. येथें शिव प्रत्यालीढ मुद्रेत उभा असून शूलांवर त्यानें आयुधांत खड्ग, खट्वांग, धनुष्य, बाण, कपाल, डमरू, ढाल व घंटा स्पष्ट आहेत. भुवनेश्वर येथील ब्रह्मेश्वर मंदिरांत आणि नेपाळच्या शिखानारायण येथील मंदिरांत सुमारे दहाव्या शतकाच्या अंधकार प्रतिमा आहेत."
त्रिपुरांतकमूर्ती :
त्रिपुरसंहाराची कथा महाभारतांत आहे. तारकासुराचे तीन मुलगे विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन किल्ल्यांचे स्वामित्व मिळविले आणि असेही वर प्राप्त करून घेतले कीं हे किल्ले त्यांच्या इच्छेप्रमाणें फिरत असावेत. हजार वर्षांत एकदा ते एका बिंदुवर यावेत आणि त्यावेळी एका बाणाने कोणी त्यांना पाडले तरच ते विनष्ट होऊ शकावेत. मयासुरानें त्यांना सोनें, चांदी व लोखंडाचे किल्ले बांधून दिले. याप्रमाणें बलवान होऊन त्यांनी देवांना अतिशय छळण्यास प्रारंभ केला. शेवटी शंकराने एक बाण ठराविक क्षणीं मारून असुरांना नाश केला व देवांची सुटका केली.
त्रिपुरांतकमूर्ती या घटनेची जाणीव करून देते. येथें शिवाचे धनुष्य बाण किंवा शरसंधान या महत्त्वाच्या गोष्टी होत. उत्तर भारतांत त्रिपुरान्तकांच्या मूर्ती जास्त मिळत नाहीत, दक्षिणेंत त्यांचा प्रचार जास्त आहे. आगम साहित्यांत या प्रतिमेचे वर्णन ही विपुल आहे. एकूण हिचे आठ प्रकार सांगितले आहेत.
इंदूरच्या संग्रहालयांत मोडी गावांतून (जिल्हा मंदसोर) मिळालेली शरसंधान करणारी शिवप्रतिमा" बऱ्याच अंशी अंशुमद्भेदागमांच्या सहाव्या प्रकाराशी साम्य बाळगून आहे. येथे शंकराला आठ हात असून सध्या सहा स्पष्ट दिसत आहेत. वरच्या दीन हातांत ढाल व धनुष असून मधल्यांत तलवार व त्रिशूल आहे. बाण सुटल्यामुळे साधारण उजव्यानें नुकतीच प्रत्यञ्चा सोडून दिलेली आहे. शंकर वर मान करून आपल्या लक्षांकडे पहात आहे. अंशुमद्भेदागमांप्रमाणें या (सहाव्या) प्रकारांत देव आठ हाताचा असून उजवीकडील हातांत बाण, परशू, खड्ग, आणि वज्र तसेच डावीकडे विस्मय, कटक, धनुष्य आणि ढाल ह्या वस्तू किंवा मुद्रा असाव्यात. मोडी प्रतिमा खंडित असल्यामुळे खालच्या भागांविषयी काहीच सांगता येत नाही.
काहीं विशिष्ट प्रतिमा :
येथे उत्तरभारतांतील काही अशा प्रतिमांचा उल्लेख करीत आहे ज्या अद्यापि निश्चित रूपानें ओळखल्या गेल्या
१) अजमुख -
राणी महाल, झाशी येथील संग्रहातील (सं.सं. ७८) ही सुमारे साडेचार फूट उंचीची चतुर्भुज स्थान मूर्ती आहे. हिचे मुख बकऱ्याचे असून हातांत सुरी (क्षुरिका), भले मोठे खट्वांग व मुंड आहे. गळ्यांत आजानुलंबिनी मुंडमाला आहे. बैलासारखा एक पशू पायाशी उभा दिसतो. देवाचे मुख थोडेसे खंडित आहे.
२) नीलकंठ -
शारदातिलकतंत्राच्या आधारावर बऱ्याच अंशी तयार केलेली नीलकंठाची प्रतिमा बंगालमधे मिळाली आहे. येथे चतुर्भुज शिवाच्या हातांत माळा, त्रिशूल, खट्वांग आणि खप्पर अशा वस्तू दिसतात".
३) अघोर -
वरील ग्रंथांप्रमाणे अघोर हे शिवांचे उग्ररूप असून त्याच्या हातांत त्रिशूल, डमरू, बाण, धनुष्य, तलवार, ढाल, खप्पर आणि परशू असावा. बंगालमधे मिळालेल्या या प्रतिमेंत परशू व्यतिरिक्त सर्व आयुधे दिसतात, परशूच्याऐवजी घंटा दिलेली आहे."
४) सदाशिव -
पांच तोंडाचा व दहा हाताचा शंकर सदाशिव या नावाने ओळखला जातो. अशा प्रकारची एक अभिलिखित मर्ती दीनाजपूर जिल्ह्यांत बनगढ येथे आहें," मूर्तीचे मागचे म्हणजे चौथे तोंड पृष्ठशिळेत भोंक करून दाखविले आहे. सदाशिव हा सेनांचा आराध्य देव ! म्हणून साहाजिकच बंगालकडे याच्या प्रतिमा जास्त. दीनाजपूर सदाशिवाचे ध्यान उत्क्ता कामिकागमाशी ताडून पाहता येण्यांसारखे आहे.
५) बालशिव
शिवाच्या बाल रूपांचे अंकन जवळजवळ नाहींच, फक्त देवीच्या एका प्रकारात तो तसा दिसतो. पण त्याचा विचार शक्तिप्रकरणांत करू.
रुद्रशिव (?)
तालागाव (बिलासपुर) छत्तीसगढ येथें सुमारे १०-११व्या शतकातील एक विशाल उभी असलेली द्विभुज प्रतिमा मिळाली आहे. ही ऊर्ध्वलिंगी असून हातांत आयुध नाही. विशेष म्हणजे देवाच्या मुख्य मुखाशिवाय छाती, पोट. माण्ड्या वगैरे अवयवांवर इतर सात मानवामुखें आहेत. गुडघ्याखाली सिंहाची दोन तोंडे दिसतात. शिवाय डोके, भुवया, कान, लिंग, यासारख्या अवयवांवर साप, पाली, मोर, मासे, खेकडे, मगर, कासव वगैरे प्राणी ही लहान मोठ्या प्रमाणांत अंकित केले आहेत. (र.चि.शि. १४)
या शिल्पाची निश्चित अशी ओळख झालेली नाही. विद्वानानी प्रतिमेला विलक्षण शिव, रुद्र, लकुलीश, अष्टतन् महाकाल भैरव, वास्तुपुरुष अशी नांवे देण्याचा प्रयत्न केला आहे. (रे.चि.........)
L.S. Nigam, The Image of Siva from Tala : Issues in Identification and Prerpretations of Symbols Heritage of India Taland Issues in Identificatonour of R.K. Sharma, Delhi, 1994, Vol. 1, pl. 39.1, pp. 229-34
विषपायी आवक्ष शिव :
अशा प्रकारच्या दोन प्रतिमा उल्लेखनीय आहेत. प्रथम पढावली, मध्यप्रदेश येथून चतुर्भुज मूर्ती, हातांत अक्षमाला, दर्पण, विषपात्र आणि घट, येथे अघोर मुख डावी असून याच मुखाने शिव परळातील विष प्राशन करीत आहे. दुसरे शिल्प पाली (ललितपुर) उ.प्र. येथील नीलकंठेश्वर मंदिरात आहे. सुमारे १२व्या शतकातील ही मूर्ती आठ हाताची आहे. हातांत अभयाक्षमाला, डमरू, विषपात्र, खड्डांग, शूल, अक्षमाला, अग्निपुंज, त्रिंशूळ अशी आयुधे आहेत. येथे विषपान करणारे अघोरमुख उजवीकडे आहे. (रे.चि.शि. १५)
Puratana, 6, colour plate pp. 178-79
- महेन्द्र वर्मा, बुन्देलखंड के नीलकंठ मंदिर, पञ्चाल, ८, कानपुर १९९५, चित्र ११ पृष्ठ ५१-५५.
शिव गांधार कला :
गांधार कलेच्या आरंभिक काळाच्या दोन प्रतिमा उल्लेखनीय आहेत. एक रोम, इटली येथील एका व्यक्तिगत संग्रहात आहे. तोंडे तीन आहेत. सिंह, मानव आणि पशू; हातांत माळा, त्रिशूळ, चक्र आणि पात्र आहे. (रे.चि.शि. १६)
दुसरी प्रतिमा बर्लिन संग्रहालयांत आहे. मुखें तशीच तीन आहेत, पण डावीकडचे हरिणाचे किंवा बैलाचे (?) वाटते. हातांत त्रिशूळ आणि पात्र आहे, दोन मात्र तुटलेले आहेत. कपाळावर आडवा तिसरा डोळा आणि ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे (रे.चि.शि. १७)
H. Hartel, A Siva Relief from Gandhara South Asian Archacology, London 1985 pp. 392-96 (Scandinarian Institute of Asian Studies, occasional papers 4)
गंगाधरमूर्ती :
मंदसोर मध्य प्रदेश येथे एका चौकोनी खांबावर सुमारे ६व्या शतकाचे हे शिल्प उत्कीर्ण आहे. चारहाताचा शंकर उभा आहे. त्याच्या मस्तकावर त्रिपथगामिनी गंगा तीन स्त्रियांच्या रूपांत बसून खाली येत आहे. (रे.चि.शि. १८)
Kiret Mankodi, A carved Pillar from Mandoore JISOA, XI 1979-80 fig. 111.1 pp. 34- 41
शिव प्रतिमेची शगत वैशिष्ट्ये :
तौलनिक दृष्टीनें अभ्यास केल्यास शिवप्रतिमा विज्ञानांच्या तीन धारा स्पष्ट दिसतात. प्रथम धारा आशिया खंडाच्या मध्यांपासून वायव्य भारतांपर्यंत आणि तशीच नेपाळकडे पसरली, दुसरीचा विस्तार मथुरा आणि व्रजक्षेत्राच्या आसपास होता, हिच्यावर पहिल्या प्रवाहांची छाप दिसते. तिसरी धारा दक्षिण भारतांत व्याप्त झाली. तिचे बऱ्याच अंशी स्वतंत्र असें अस्तित्व राहिले. प्रथम उत्तरभारतांतील प्रवाहांचा विचार करू.
वायव्य धारा -
प्राचीन काळापासून मध्य आशियापर्यंत 'शास्त्रीय धर्म' आणि 'लोक धर्म' या दोन्ही क्षेत्रांतशिव पूजनाला मान्यता प्राप्त होती. प्राचीन कापिशी (आजचे काफ्रिस्तान) येथे शिवमंदिर होतें. वंक्षु नदीच्या दक्षिणेत असलेल्या मूजवंत किंवा मूजान प्रदेशांत वेदकाळांतही रुद्रांचे अस्तित्व होतें." अथर्ववेदांत शिवाचे घर म्हणून मूजवान प्रदेशांबरोबरच महावृष प्रदेशांचेही नांव येते. महावृष देशांत महान् वृष किंवा बैल ज्यांचे लांछन आहे अशा शंकराचे पूजन होत असावे. महाभारताप्रमाणे गांधार देशांत शिवोपासना बरीच जुनी होती. गांधारीनें अगोदरच शंकराकडून शंभर मुलें होण्याचे वरदान मिळविले होतें. याच ग्रंथांत अन्यत्र शिवाचें एक अभिधान 'गांधार' असेंही दिले आहे." शतपथ ब्राह्मणांचे कथन असे आहे की शिव हा प्राच्य देशांत 'शर्व' आणि बाल्हीक देशांत 'भव' या नावानें लोकप्रिय होता." शंकराचे कैलासावर राहणें, त्याचा विचित्र वेश, गिरि-कन्येशी लग्न वगैरे गोष्टी त्याच्या पर्वतप्रदेशांतील निवासाकडे संकेत करतात.
पुरातत्वशास्त्रही या गोष्टीचा पाठपुरावा करतें कीं अखंड भारताच्या वायव्येकडे असलेल्या प्रदेशांत बौद्धांबरोबरच शैवमतांचाही प्रचार होता. प्रो. रोझेनफील्ड यांनी याविषयी असे मत मांडले आहे की, साधारण हिंदू संप्रदाय कुषाण शहराच्या पश्चिमी भागांत हळुहळू दृढ होत होते. इसवीसनांच्या तिसऱ्या शतकांपर्यंत हिंदुकुशाच्या उत्तरी क्षेत्रांत शिव असलेल्या नाण्यांचा चांगलाच प्रचार झाला होता. अफगाणिस्थानाचा काबुल जवळचा भाग आणि गांधार देश येथे हिंदू धर्माच्या बऱ्याच प्रतिमा इसवीसनांच्या चौथ्या आणि पाचव्या शतकांपर्यंत रूढ होत्या. कुषाण राजांच्या नाण्यांकडून मिळणाऱ्या माहितीला आपण पूर्वीच विचारात घेतले आहे. एतावता हें उघड आहे की इसवीसनांच्या प्रथम शतकांत इकडील भागात बौद्ध व शैव असे दोन्ही धर्म विद्यमान होते, पण बौद्धांचा पगडा जास्त असावा. सहाव्या-सातव्या शतकांचे सुमारांस हूणांच्या आक्रमणांनंतर मुख्यत्वे स्वात भागांत हीनयानी बौद्ध प्रभावहीन झाले व शैवाची शक्ती वाढली. सातवें ते नववें शतक या दरम्यान शाही राजाच्या काळांत बऱ्याच शैव प्रतिमा घडविण्यांत आल्या. त्यांची थोडक्यात मोजणी अशी करता येईल :
१) स्वात किंवा प्राचीन उड्डियान येथून मिळालेली शंकराची सहा हातांची मूर्ती." ही जरी खंडित असली तरी शिवाचे कवच स्पष्ट आहे. शंकराचा वज्राशी असलेला संबंध आपणांस कृषाणांच्या नाण्यावरही दिसला होता.
२) सओझूमा-कला येथून प्राप्त झालेला त्रिमुख शिव." काही विद्वानांच्या मतें या मूर्तीवर ग्रीक देव झियस् पोसीडॉन व हरक्यूलियस यांच्या मूर्तीचा सम्मिलित असा प्रभाव आहे. या शिव प्रतिमेत गदा (club=leontis). त्रिशूल आणि शेवफळ (Hesperides चे apple) स्पष्ट आहे. सध्या ही मूर्ती मजार-ए-शरीफ च्या संग्रहालयांत आहे.
३) बटकारा (Butkara 1) येथील शिवलिगांकित शिळा पट्ट."
४) उत्तर कुषाणकालीन ठशांवर असलेला वृषारूढ चतुर्भुज शिव (रे.चि. तेवीस ९). याच्या हातांत गदा, त्रिशूल आणि पात्रा आहेत, आणि खांद्यातून अम्मीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. (रखाचित्रांत ज्वाला दिसत नाहीत) या ज्वाला रुद्र आणि अग्नी यांना एक मानणाऱ्या परंपरेकडे संकेत करतात. "
५) तक्षशिलेच्या धर्मराजिक स्तूपांतून एक शिलापट मिळाला आहे ज्यावर बैलांसह शंकर अंकित होता.
६) सिरकप येथून हाती आलेला तांब्याचा गोल छाप, यावर नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती आहे असे विदानांचे मत आहे.
७) तेथूनच मिळालेल्या दुसऱ्या एका कुषाण कालीन ठशावर शिवरच्छितस या अक्षरांसह शिव प्रतिमा अंकित आहे. (रे. चित्र बावीस ६)
कुषाणकाळांनंतरच्या शैवप्रतिमा खालील होत -
८) डॉ. टॅडी यांच्या कथनांप्रमाणें सर ऑरेल स्टेन आणि पाकिस्तानांत कार्य करणाऱ्या इटालवी पुराशास्त्रज्ञानां काही प्रतिमा अशा मिळाल्या आहेत ज्यांत एकटा शंकर, बुद्ध अवलोकितेश्वर वज्रपाणि, वगैरे बरोबर दिसतो. या प्रतिमा अद्याप अप्रकाशित असून सैदू शरीफच्या स्वात संग्रहालयांत ठेवल्या आहेत.
९) सुपलबांदा येथील डोंगरी कातळा ज्यावर बोधिसत्त्वांसह शंकर अंकित आहे.
१०) प्राचीन पुष्कलावती किंवा आधुनिक चारसद्दा येथून हाती आलेली पेशावर संग्रहालयांतील त्रिमूर्ती. निळसर दगडाच्या या प्रतिमेंत त्रिशूल, वज्र, आणि घट ही आयुधं व खांद्यावरील यज्ञोपवीत हे स्पष्ट आहे.
११) पेशावर संग्रहांलयातील अशाच प्रकारच्या पाषाणाचे शिवलिंग, ज्यावर भैरव, महादेव आणि उमा यांची मुखें कोरली आहेत.
सुमारें सातव्या शतकानंतर या प्रदेशांत शाही राजांची राजवट सुरू झाली. या काळांत शैवांचे पुनरुत्थान झाले. त्यामुळे गांधार आणि स्वात भागांतून बऱ्याच शैवप्रतिमा समोर आल्या. त्यांची संक्षिप्त यादी खाली देत आहे :
अ) गांधार प्रांतातील वृषारूढ शिवपार्वती
आ) वृषांबरोबर शिवपार्वती
३) युसुफझाई जिल्ह्यातील आरसा घेतलेली पार्वती
ई) चारहातांचा स्कंद
3) मनिचिनार, स्वात येथील त्रिशूल, डमरू आणि कमंडलू घेतलेला चतुर्भुज शंकर
ऊ) पांढरे संगमरवरी एकमुख शिवलिंग
ए) लिंगाच्या आकाराचे मंदिर किंवा देव्हारायाचा बाह्य आकार मुखलिंगाचा असून आत मात्र शिवपार्वतीची मूर्ती कोरलेली होती. १२
वरील पैकी बऱ्याच ठिकाणी शिवाचे एक आयुध गदा आहे. त्याचप्रमाणें तो ऊर्ध्वलिंगी ही आहे. वरील सामग्रीचे सिंहावलोकन केल्यास खालील मुद्यांची वैशिष्ट्ये म्हणून नोंद करता येईल :
क) या प्रतिमांवर ग्रीक देव हरक्यूलियस आणि पोसेडॉन यांची छाप आहे.
ख) शिवाची आयुधे म्हणून गदा, पाश, वज्र, चक्र, कधीकधी अंकुश, मृग व त्रिशूल परशू दिसतात.
ग) चंद्रकोरीचा उगम इकडूनच असावा.
घ) ऊर्ध्वलिंगांचे अंकन सामान्य होय.
ङ) हात दोन किंवा चार आहेत पण संयुक्त प्रतिमांत यांची संख्या वाढते.
च) इकडे एकमुखाबरोबरच त्रिमुख शिवही लोकप्रिय होता.
छ) पाषाण प्रतिमेंत त्रिनेत्र दिसतो. नाण्यांवर त्याचा पत्ता लागणें कठिण आहे.
ज) बैल व शिव यांचे चांगलेच सान्निध्य आहे, कचित हत्तीही दिसतो.
झ) उत्तरीय म्हणून शंकराने चामड्याचा उपयोग केलेला आहे. हे चर्म सिंहाचे समजले जाते, पण ते बैलाचेही असणें शक्य आहे.
ञ) शिवाची पत्नी म्हणून उमा आणि नाण्यांवर नना दाखविली आहे.
८) उत्तर कुषाणकाळांत आरसा घेतलेली पार्वती दिसते (रे.चि. बावीस ८).
ठ) इतर शैव प्रतिमांत दुर्गा, गणपती व कार्तिकेय हे दिसतात.
उत्तरी किंवा नेपाळी धारा :
शिव सौम्य रूपांत सर्व अलंकारानी मंडित असून एक मुखी व चतुर्भुज असतो. त्याच्या हातात कमल किंवा सनात पुष्प, माळा, त्रिशूल व घट अशी आयुर्धे दिसतात. काही ठिकाणी तो ऊर्ध्वलिंगी ही आहे. त्रिनेत्र, सर्पभूषणे किंवा दिगंबरत्व हैं अनिवार्य रूपाने दिसत नाही तसेंच काही ठिकाणी बैल ही नसतो.
शिवाच्या उग्रस्वरूपांपैकी काहींचे दर्शन वाराणसीच्या नेपाळी मंदिरांत होत असे पण आता त्या प्रतिमा चोरांच्या हाती पडल्या आहेत. यापैकी एक चतुर्भुज असून तिच्या हांतात कमळ, माला, त्रिशूल परशू, आणि जलपात्र (कुंडिका) अशा वस्तू होत्या. सुंदर पुष्पयुक्त जटामुकुट, खांद्यावर रुळणाऱ्या जटा, हातांपायांतील सर्पभूषणे, रेखीव व्याघ्रांबर व ऊर्ध्वलिंगही या निळसर दगडाच्या सुंदर प्रतिमेची इतर वैशिष्ट्ये होत. याच मंदिरात असलेले शिवाचे दुसरे उग्ररूप म्हणावे महाकालाचे भैरव मुख होतें."
डॉ. ब्रजेंद्रनाथ शर्मा यांनी आपल्या एका लेखांत नेपाळमधील शिवमूर्तीचा आढावा घेतला आहे. त्याचा सारांश खाली देत आहे.
गंगाधर शिव पार्वती :
या प्रकारच्या प्रतिमा नेपाळमधे फारच लोकप्रिय होत्या. सुमारे नवव्या शतकांतील एक मूर्ती पाटन येथील कुंभेश्वर मंदिरांत आहे. काही नंतरच्या अशा मूर्ती लखनऊ संग्रहालय (सं.सं.४५.७८) आणि ब्रिटिश म्यूझियम, लंडन येथे आहेत (सं.सं. १९७०.७-२०.१).
उमामहेश्वर मूर्ती :
या प्रकारात गंगा दाखवीत नाहीत. यांची साधारण ठेवण उत्तर भारतांतील प्रतिहार कलेतील उमामहेश्वरासारखी आहे. या प्रकारची सध्या माहीत असलेली प्राचीनतम मूर्ती शके ५९३ ची असून ती ललितपुर, सिकुबाहिल येथे आहे. इतर प्रतिमा गैती (१० वे शतक), संखू बज्रयोगिनी मंदिर (१२ वे शतक) वगैरे ठिकाणी आहेत. अशा प्रकारच्या धातुमूर्तीही नेपाळांत सापडतात.
एकपाद त्रिमूर्ती :
येथे शिवाच्या खांद्यातून नमस्कार मुद्रेत असलेल्या ब्रह्मा व विष्णूचे प्राकट्य दाखवितात. शिव चतुर्भुज असून त्रिशूल, परशु, पात्र आणि वर धारण करणारा आहे ही प्रतिमा पाटनच्या सुंदरी चौकांत आहे. काठमांडूच्या संग्रहालयांत असलेल्या अशा मूर्तीत शिव हा अर्धनारीश्वर रूपांत (१७ वे शतक) आहे.
या प्रकारांत शिवाला फक्त एकच पाय दाखवतात, पण त्याच्या डाव्या बाजूतून ब्रह्मदेव आणि उजवीकडून विष्णू प्रगट होताना दिसतो. क्वचित स्वतः शिव अर्धनारीश्वर रूपात ही असतो. (रे.चि.शि. २०)
B.N. Sharma Iconographic parallels, H.K.Sherwani Felicitation Volume, Hyderabad, pp. 552-59
एकपाद त्रिमूर्ती दक्षिण भारतात ही रूढ होत्या. H. Krishna Shastri, South Indian Images of Gods and Goddesses, Madras 1955, fig. 59, p. 97
- अन्धकारि :
दहाव्या शतकांतील ही प्रतिमा शिखा नारायण येथील मंदिरांत आहे.
लकुलीश :
हा शिवाला बावीसावा अवतार वराह क्षेत्रांजवळ धारण येथे दिसतो ऊर्ध्वलिंग स्थितीत तो बसलेला असून त्याचा दंड डाव्या पायाजवळ आहे.
नटराज :
पाटना येथील सुंदरी नाचणारा पंचवदन चतुर्भुज शिव (१० वे शतक) दोन प्रतिमांत आढळतो, पैकी एकीत तर तो बैलाचे पाठीवर नाचत आहे. हा प्रकार बंगाल व आसामकडे जास्त मिळतो.
हरिहर :
या प्रकारची सुंदर आणि जुनी मूर्ती बालाजू येथे आहे (१०-११ वे शतक). येथें आजुबाजूला पार्वती आणि श्रीदेवीच्या प्रतिमा आहे. हरिहराच्या मूर्ती पाटन, पशुपतिनाथ आणि नक्सल येथे आहेत.
अर्धनारीश्वर :
कमलासनांवर समभंग स्थितीत उभी चतुर्भुज अर्धनारीश्वराची ब्राँझ मूर्ती सध्या अमेरिकेच्या हीरामानेक संग्रहांत आहे. बऱ्याच अलीकडची (१८ वे शतक) दुसरी एक राणी पोखरी, काठमांडु येथे आहे.
शिव महेश्वर महाकाल :
फतेहगढ़, बारामूला, काश्मीर येथून मिळालेले सुमारे ७-८ व्या शतकाचे हे शिल्प फार विलक्षण आहे. खालून खण्डित झालेली ही प्रतिमा उभयभागी उत्कीर्ण आहे. दर्शनी भागावर त्रिमुख शंकर आहे. त्याची अघोर, सामान्य आणि बी अशी तीन मुखें आहेत. हा उभा आहे. उजवीकडच्या हातांत माळा आणि गदा दिसते. डावीकडचा भाग भन्न आहे.
विशेष म्हणजे याच्या जटाजूटावर बुद्धाप्रमाणे वाटणारी एक लहानशी दोन हाताची मूर्ती आहे. (रे.चि.शि. २१)
शिल्पाच्या मागच्या भागवर उग्र स्वरूपाचा हातांत त्रिशूळ शिव दिसतो. येथे ही डोक्यावर हातांत कळी घेऊन बसलेली छोटीशी मानवाकृती आहे. (रे.चि.शि. २२)
फिलिस ग्रेनॉफ यांनी या शिल्पाची ओळख महेश्वर महाकाल अशी केली आहे, पण ही सर्वमान्य झालेली नाही.
Phyllis Granoff, Maheshvara Mahakala, A unique buddhist Image from Kashmir, ARAS, XLI, I 1979, pp 64-82
Gauriswar Bhattacharya Deva Caturmukha, Panchamukha, Shastri Traditions in Indian Art, Heidelberg, 1989, pp. 51-70, p.60
उमेसह त्रिमुख शिव :
बारामुल्ला काश्मीर येथे मिळालेली सुमारे ५व्या शतकातील ही मूर्ती तूर्त एस्. पी. एस्. संग्रहालय, श्रीनगर येथे आहे. चार हाताचा, त्रिमुख, ऊर्ध्वलिंग शिव माळा, +, गोलावस्तू-कदाचित चन्द्र, व घट घेऊन उभा आहे. डावीकडे द्विभुज पार्वती आहे. शिल्पाच्या पाठीकडे सहा हाताचा त्रिशूळ घेतलेला शिव दिसतो प्रतिमा बरीच खंडित आहे. (रे.चि.शि. २३)
P.K. Agrawal, Iconoplastic Beginnings of Multiheaded and Multiarmed Images at Mathura, JISOA, N.S. XV, 1985-86, pl. VII, 18, 19 р. 21
महेश्वर महावराह :
काश्मीर आणि उत्तराखंडातून आलेल्या हरिहराच्या या वेगळ्या प्रकारांत मुख्य मुख मानवाचे पण उजवीकडे शिवाचे द्योतक सिंह किंवा अघोर मुख आणि डावीकडे विष्णूचे म्हणून वराहाचे तोंड असते. सुमारे ९व्या शतकातील या प्रतिमा चतुर्भुज, किंवा क्वचित सहा हाताच्या आहेत. आयुधामध्ये अक्षमाला, त्रिशूल, गदा आणि चक्र असते. वैजनाथला असलेल्या मूर्तीत आडवे खड्ग ही आहे. उपरेवतांच्या रूपांत नंदी, गरुड, व आयुध पुरुष ही असतात. आतापर्यंत काश्मीरशिवाय उत्तराखंडातून पैठाणी, व संग्राली आणि बैजनाथ, कांगडा हि.प्र. येथून अशा प्रकारची शिल्पें मिळाली आहेत. (रे.चि.शि. २४)
काश्मीर प्रतिमा :
Stella Kramrisch, Manifestations of Siva, Philadelphia, 1981, No. 19, p. 20
- बैजनाथ, हिमाचल प्रदेश :
dSubhashine Aryan, An unpublished Hari-Hara sculpture from Kangra, Himachal Pradesh, Kala XI 2004-05, fig. 24, p. 61
पैठाणी संग्राली, उत्तराखंड :
राकेश तिवारी, जी.सी. सिंह, गढवाल हिमालय की दुर्लभ महेश्वर महावराह प्रतिमा प्राग्धारा १, १९९०-९१० फलक १,२, पृ.२७.
नटराज, सोबत गंगा व गौरी :
बंगालमध्ये मिळालेल्या अशा प्रकारच्या दोन प्रतिमा आपल्या माहितीत आहेत.
१ बल्लाळवाडी, बांगलादेश येथून मिळालेला सुमारे १०-११ व्या शतकातील दशभुज नटराज तूर्त ढाका संग्रहालयांत आहे. हातांत दंड, त्रिशूल, वज्र, ढाल, खड्डांग, सर्प, भिक्षज्ञपात्र, वगैरे दिसते. आजुबाजूला उजवीकडे मकरावर गंगा व डावीकडे सिंहावर गौरी / पार्वती उभ्या आहेत. शिवाय इतर किरकोळ आकृत्या ही दिसतात (रे.चि.शि. २५).
C. Sivaramamurti, Nataraja, fig 172 р. 300
२) रानीहाटी (ढाका) बांगलादेश (तूर्त ढाकासंग्रहालय) येथून नंदीवर नाचणारी वीणा घेतलेल्या नटराजाची बारा हाती प्रतिमा समोर आली आहे. या समकालीन प्रतिमेत शिवाच्या साधारण दोन हातांत वीणा, वरच्या दोन हातांत टाळी, इतर दोन हातांत मानवाचे मुख असलेला लांब सर्प, आणि उरलेल्या हातांत वर, अक्षमाला, त्रिशूळ, डमरू, घट आहेत. गंगा आणि गौरी वरीलप्रमाणे पण विशेष म्हणजे गंगेच्या डोक्यावर सर्पफणा आहे व शिवाबरोबर नंदीही नाचत आहे. शंकराच्या हातांतील सर्प मनुष्याच्या तोंडाचा आहे त्याचप्रमाणे पृष्ठशिळेच्या अगदी वरच्या टोकावर छोटासा सिंहही दिसतो. यावरून उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये आढळणारे शंकर आणि सिंह यांचे सान्निध्य बंगालपर्यंत गेलेले दिसते. (रे.चि.शि. २६)
C. Sivaramamurti Nataraja, Fig. 174, p. 301
नटराज सोबत गंगा व यमुना :
मनियारी (नौगाव) बांगलादेश येथून मिळालेला (तूर्त नरेंद्र रिसर्च संग्रहालय राजशाही, बांगलादेश) बारा हाताचा, बैलावर नाचणारा, समकालीन वीणाधर नटराज आपल्या हातांत वरीलप्रमाणे वीणा, टाळी, नमस्कार मुद्रेत असलेला अर्ध मानव लांब सर्प, याशिवाय डमरू, अभय, अक्षमाला, कलश, त्रिशूल आणि कपाल (?) घेऊन आहे. उजवीकडे सर्पफणा असलेली मकरारूढ गंगा आणि डावीकडे कासवावर उभी अशीच यमुना ही दिसतात.
या शिल्पावर छोटासा लेख आहे. श्री चतुः समायाः
G. Bhattacharya, EBHJI, Dhaka, pl. 26.1,2 p. 282-83
महेशमूर्ती :
अखनूर, काश्मीर येथून प्राप्त झालेली आठव्या शतकातील त्रिमुख शंकराची प्रतिमा जरी बरीच खंडित असली तरी उजवीकडील अघोर मुखाच्या अंकनामुळे आगळ्या महत्त्वाची आहे. अघोर मुखाच्या डोक्यावर उभ्या असलेल्या जटांबरोबरच तेथे अग्नीच्या ज्वाळामध्ये फक्त एक उभा हात दिसतो. कल्पना अशी की हे अंकन दक्षप्रजापतीच्या यज्ञाकुंडात आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीने स्वतःला जाळून घेतल्याच्या घटनेचा हा संकेत असावा. कारण या घटनेनंतरच शंकराने अघोररूप घेऊन यज्ञाचा विध्वंस केला होता. (रे.चि.शि. २७)
Y.B. Singh, Some reflections on an Icon of Lord Siva from Akhnur, BMA., 43-44, 1989, pl. I-IV, p 42
सदाशिव :
उत्तरकामिकागम आणि गरुडपुराणाप्रमाणे सदाशिवाला पाच तोंडे आणि दहा हात आहेत. उजवीकडील हातात अभय, वर शक्ती, त्रिशूळ आणि खट्ठांग असते. डावीकडे सर्प, अक्षमाला, डमरू, नीलोत्पल व बीजपूरक अशा वस्त् दिसतात. उत्तर बंगालमध्ये सदाशिव फार लोकप्रिय होता. आतांपर्यंत तिकडून तेरापेक्षा सदाशिव प्रतिमा आढळल्या आहेत. सेन राजाच्या ताम्रशासनपटावर राजमुद्रेच्या सदाशिव दिसतो. नरेन्द्र रिसर्च सोसायटी संग्रहालय, राजगारी, बांगलादेश येथील एका सदाशिवाच्या आजुबाजूला गंगा व यमुना उभ्या आहेत.
Gaurishankar De, 'Sadasiva in Bengal Sculptures Kala 6, 1999-2000 pp. 71-73
माधुरी किंवा मध्यभारतीय धारा :
इसवीसन आरंभ होण्यापूर्वीपासूनच मथुरेंत शैवधर्माचे केंद्र होते. हरिवंशात स्पष्ट विधान आहे कीं यादवांनी मथुरा सोडून द्वारकेकडे जातांना पिनाकिन् किंवा शंकराचे पूजन केले होते. मथुरेच्या प्राचीन शिवलिंगात गोकर्णेश्वर, भूतेश्वर, रंगेश्वर आणि पिप्पलेश्वर यांची गणना होते आणि हे देव नगराच्या उत्तरी, पश्चिमी आणि दक्षिणी सीमेचे 'क्षेत्रपाल' समजले जातात. याचे विस्तृत वर्णन पद्म, वराह, वगैरे पुराणात मिळते. ५
जेव्हां पश्चिमेकडून आलेल्या व तिकडील शैवमताने अभिभूत झालेल्या कुषाणांनी मथुरेची आपल्या राज्याचे एक महत्त्वपूर्ण नगर म्हणून निवड केली तेव्हांपासून शैवांच्या या जुन्या केंद्राची अधिक उन्नती होणे क्रमप्राप्त होते. यांचे सर्वांत मोठे प्रमाण म्हणजे मथुरेच्या कलेत मिळणाऱ्या लहान मोठ्या शैव प्रतिमा होत, ज्यांचा मागील पृष्ठांत भरपूर उपयोग केला गेला आहे.
गुप्तकाळांतही मथुरेचे तेच स्थान टिकले होते. नवीन मंदिरे बांधली जात होती व त्यांत शिवप्रतिमांची निरनिराळे रूपें प्रतिष्ठापित केली जात होती. हे विधान गुप्तकालीन अभिलेख व प्रतिमा याने पुष्ट होते. उदाहरणार्थ रंगेश्वराजवळ मिळालेला चंद्रगुप्त विक्रमादित्याचा लेख पहा ज्यांत कपिलेश्वर आणि उपमितेश्वराच्या स्थापनेचा उल्लेख आहे."
भरतपूर आणि नांद येथून मिळालेली शिवलिंगे माधुरी धारेचा राजस्थानांपर्यंत पसरलेला प्रभाव सूचित करतात. रंगमहालचे मृफलक, अहिच्छत्रेच्या मृण्मूर्ती आणि फलक, भीतरगांव (कानपूर) चे इष्टिका फलक, बस्ती (उत्तरप्रदेशांचे पूर्वी टोक) येथून मिळालेली व तूर्त लखनऊ संग्रहालयांत असलेली शिव पार्वतीची मृद्धतिमा (सं.सं. ७१-२८) त्याच प्रदेशांतून प्राप्त झालेली गणेश, कार्तिकयासह पार्वतीची विशाल प्रतिमा, वगैरे वस्तू गुप्तकालीन शैवमताची व्यापकता सिद्ध करतात. सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत प्रदर्शित असलेल्या गुप्तकालीन सर्वतोभद्र प्रतिमेत लिंगांज पुष्पदाम, अर्धनारीश्वरांचे ऊर्ध्वलिंग, वगैरे मथुरेची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात.
माधुरी धारेच्या शिवमूर्ती बारकाईने तपासल्यास त्यासंबंधी खालील मुद्दे नमूद करता येतात-
१) कुषाणकालीन शिव बहुतेक द्विभुज असतो व त्याचा उजवा हात अभयमुद्रेत दिसतो.
२) येथे एकमुखी शिवाच्याच प्रतिमा जास्त आहेत.
३) तिसरा डोळा दाखविण्यांची प्रथा बऱ्याच ठिकाणर्णी दिसते. कुषाण काळात त्याला आडवा व गुप्तकाळात उभा दाखवितात.
४) साधारणपणे शंकराच्या मस्तकांवर जटाभार आहे, पण त्याचे केस मागे सारलेले असणें किंवा पागोटे घातलेले रूपही अज्ञात नव्हते.
५) बैलास शिवाचे वाहन म्हणून मान्यता होती, पण काही ठिकाणी त्या ऐवजी सिंहही दिसतो.
६) एक मुख आणि दोन हातांबरोबर एकाच प्रतिमेत शंकराला 'चतुर्यूह' रूपांत दाखविण्याची पद्धत कुषाण काळांत अस्तित्वात आली (पहा मूसानगर शिव) व गुप्तकाळांत ही रूढ होती (रंगमहालाचा मृफलक).
७) माधुरी धारेंत शिवाच्या आयुधांचे अंकन मात्र फारच सीमित आहे. पाषाण प्रतिमांत सुरुवातीला त्रिशूल देखील दिसत नाही. फक्त अक्षमाला आणि घट दिसतात. यांचे हे कारण असू शकते की येथील शिल्प परंपरेंत देव प्रतिमांचा साधारण उजवा हात अभयमुद्रेतच दाखविण्याची पद्धत रूढ असल्यामुळे तेथें इतर आयुध देणें तितकेसे सोपे नव्हते, व त्याबरोबरच शंकराची बहुभुजमूर्ती करण्याची चाल नसल्यामुळे आयुधांकरिता फक्त एक म्हणजे डावा हातच मोकळा मिळत असे.
८) गुप्तकाळांत थोडा बदल सुरू झाला. आता शंकराचे दोन किंवा चार हात दिसू लागले व उतरत्या गुप्तकाळांत राजस्थानच्या कलाकारांनी तेथे त्रिशूल, साप, वगैरेही देणें सुरू केले. " त्याबरोबरच डोक्यावरील चंद्रकोर, नरमुंड नेसूचे व्याघ्रांबर, इत्यादि गोष्टी दिसू लागल्या, व आयुधपुरुष म्हणून त्रिशूल पुरुष ही जन्मांस आला.
९) येथे वायव्य धारेपेक्षा शिवाची रूपें मात्र जास्त दिसतात. अर्धनारीश्वर, लकुलीश, शिव-पार्वती, चतुर्व्यह शिव, वगैरे तर कुषाण काळांतच चालू होती, पण अजएकपाद, रावणानुग्रह, नटेश वगैरे कित्येक गुप्तकालांपासून आली.
१०) दागिन्यांत जानव्याचा विकास पाहण्यांसारखा आहे. कुषाण नाण्यांवर त्यांच्यात मणी आणि पदके दिसतात. पाषाण प्रतिमांत त्याचे मूल रूप दिसते पण गुप्त आणि गुप्तोत्तर काळांत ते मोत्याच्या सराव्यारूपानें मुक्तायज्ञोपवीत म्हणून मिरवते."
११) गुप्तकाळांत रत्नखचित भालपट्ट, एकावली, अगंद आणि कंकणें, कटिसूत्र, वगैरे नवे दागिनेही दिसू लागतात.
दक्षिण भारतांतील शिवप्रतिमा
दक्षिण भारतीय धारा :
वायव्य, उत्तरी किंवा नेपाळी धारा व मध्य भारतीय अथवा माथुरी धारेच्या शिवप्रतिमांचे आतापर्यंत विवेचन झाले. पण अजून आपण नर्मदा ओलांडून कृष्णा कावेरीकडे गेलेली नाही. त्याशिवाय भारतीय शैवप्रतिमाचा हा धावता आढावा पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
उत्तरेपेक्षा दक्षिण भारतीय परंपरा काही बाबतीत सैद्धांतिक रीतीने एक असून देखील भिन्न आहेत. हे भिन्नत्व देशकाल परत्वें आहे. त्यामुळे शिव प्रतिमांचे असे अनेक प्रकार आहेत जे दक्षिणेतच उगवले व तिकडेच राहिले. उत्तर भारताप्रमाणें काही प्रकार सुरुवातीला दिसतात, पण पुढें त्यांचे अस्तित्व टिकून राहिले नाही, काही मात्र अखंड रूपानें चालत आले आहेत.
दक्षिणी शिवाच्या आयुधांत परशू आणि मृगांचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामानाने त्रिशूलाचे गौण आहे. वायव्य धारेत आपण त्रिशूल-परशूचें संयुक्त रूप पाहिले होते. मध्य भारतात ते फारसे दिसत नाही, अपवाद म्हणून काही शिल्गे आहेत. उदाहरणार्थ उतरत्या गुप्तकालातील मंदसोर येथील एका प्रतिमेत तो दिसतो." दक्षिणेत मात्र अगदी सुरुवातीपासून म्हणजे गुड्डीमलम् प्रतिमेपासूनच परशु शंकराच्या हातांत दिसू लागतो." मृगाची गोष्ट अशीच आहे. कुषाण राजांच्या नाण्यांवर तो दिसतो, पण तेथून उडी मारून तो मध्यभारताला वरचेवर ओलांडत एकदम दक्षिणेचा पल्ला गाठतो. तेथे कित्येक शतकांपर्यंत परशू आणि मृगाची जोडी शंकरांबरोबर अविछिन्नरूपाने वावरते.
त्याचप्रमाणें गुड्डीमलम् प्रतिमेंत शिवाचे ऊर्ध्वलिंग असलेले व पागोटें घातलेले रूप सुरुवातीला प्रगट तर होते, पण पुढील कलेत त्यांचा विशेष पाठ पुरावा झालेला दिसत नाही.
शैवमताचा व त्याच्या काही पोटभेदांचा उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे जास्त प्रचार झाला. वीर शैव, लिंगायत वगैरे मते दक्षिणेंतच बळावली. उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूला शैव मंदिरे बांधली गेली, पण दक्षिणेतील मंदिर-शिल्पांची भव्यता उत्तरेत आलेली दिसत नाही. शिवाय उत्तरेंतील मंदिर शिल्पें आणि प्रतिमा मुसलमानांच्या आक्रमणांना दक्षिणेंपेक्षा अधिक वेळा व जास्त भयंकर रूपानें बळी पडल्या. त्यामुळे आज तरी उत्तरेपेक्षा दक्षिणेंत शैव प्रतिमांचे प्रकार व संख्या जास्त आहेत.
त्याबरोबरच हे ही लक्षांत ठेवावयास हवे की दक्षिणेतील प्रतिमांचा बहुमुखी विकास पल्लवकाळांपासून म्हणजे सुमारे सहाव्या शतकांपासून होत असतांना दिसतो. त्यापूर्वीची विशेष माहिती आपणांस मिळत नाही. या उलट उत्तरेंत या काळापर्यंत शैव प्रतिमांची स्थिती चांगली विकसित झालेली आपण पाहिलीच आहे.
रुद्र, अकरामुखें, चोवीस हात :
सुमारे ६-७व्या शतकातील ही प्रतिमा एलरुजवळ पेड्डवेगी आंध्रप्रदेश या गावाशी संबद्ध आहे. उंच जटामुकुट, त्रिनेत्र, उपवीत ग्रैवेयकादि अलंकारांनी मंडित या प्रतिमेला अकरामुखें पण चौवीस हात आहेत. हातांमध्ये आयुधे आहेत. आय्. के. शर्मा यांच्यामतें अकरामुखांची संगती एकादश रुद्राशी लागते, पण चौवीस हात म्हटले तर एक तोंड जास्त असावयास हवे. कदाचित देवाच्या डोक्यावर दिसणारा उंच मुकुट हेच अदृष्य असणारे असे बारावे ईशान मुख असावे. (रे.चि.शि. २८).
J.K. Sarma, Palyphalus Rudra from Peddavegi Puratana, 6, Bhopal, 1989, pp. 83-85
दक्षिण भारतांतील प्रमुख शैवमंदिरें" :
शैवप्रतिमा विज्ञानाचे अध्ययन करण्यांकरितां दक्षिण भारतांत इतकी खच्चून सामग्री भरलेली आहे की तिवा सहजासहजी अंदाज लागणे शक्य नाही. दक्षिणेतील एक एक शैव मंदिर म्हणजे या शास्त्राचा प्रत्यक्ष ज्ञानकोष आहे असे म्हटल्यास मुळीच वावगे होणार नाहीं. जिज्ञासूस थोडी कल्पना यावी एवढ्यांकरितां दक्षिणेतील प्रमुख शैव मंदिरांचे कालक्रमानुसार संक्षिप्त टांचण खाली देत आहे.
१) वेरूळची लेणीं (इसवीसनाचे ६-९ वे शतक) - येथील १४, १५, २९, वगैरे क्रमांकांच्या लेण्यांत शिव- तांडवादि प्रतिमा पाहता येतात.
२) बदामी (जुनें वातापिपुर, इसवी सनाचे ६-७ वें शतक) - क्रमांक ३ सारख्या लेण्यांत सुंदर शिवप्रतिमा आढळतात.
३) घारापुरी (एलिफेंटा, मुंबई, आठव्या शतकांचा उत्तरार्ध) त्रिमूर्ती महादेवाची जगप्रसिद्ध प्रतिमा व अन्य शैव मूर्ती.
४) ऐहोळे (५-७ वें शतक) येथील मंदिरांत सुरुवातीच्या शैवप्रतिमा आढळतात.
५) पंट्टडाकल (६-८ वें शतक) मल्लिकार्जुन आणि विरूपाक्ष मंदिरांत शिवासंबंधी विपुल सामग्री आहे. याशिवाय पापनाथ, गलगनाथ, काशीनाथ, वगैरे शैवमंदिरेंही प्रसिद्ध आहेत.
६) दक्षिणेतील पल्लवकालीन पर्वतशिल्पे पल्लव राजवट सुमारे सन् ५९०-९०० मधे झाली. या काळांतील अर्कोट, त्रिचनापल्ली, मंडगपडू, इत्यादि जागी असलेल्या पर्वत शिल्पांत बऱ्याच शैव प्रतिमा आढळतात. त्याचप्रमाणें मद्रास जवळील महाबलीपुरम् येथील रथ अद्वितीय आहेत. विशेषतः धर्मराजरथ हे तेथील एका शिलालेखांप्रमाणें ईश्वराचे (शिवाचे) मंदिर आहे. यावर कोरलेल्या शिवप्रतिमा मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनें महत्त्वाच्या आहेत.
७) कांचीपुरम् येथील राजसिंहेश्वर मंदिर सन्. ६७४-६९९ च्या दरम्यान राजसिंह (पल्लव) यानें कैलासनाथ या नावाने बांधलेले हे मंदिर फारच विशाल आहे. येथें शैव सामग्री खच्चून भरलेली आहे. लांगहर्स्टच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे मूर्तिविज्ञानांच्या दृष्टिने शैवप्रतिमा, शैवप्रतीकें व शैवकथांचा हा भारतांत सर्वांत मोठा आणि पूर्ण असा खजिना असून शैवमताच्या अभ्यासकांसाठी ज्ञानाची खाण आहे.
८) गुड्डीमलम् मंदिर (नवव्या शतकांची सुरुवात) रेणुगुंठ्याजवळ असलेले हे मंदिर जरी लहान व बरेच अलीकडचे असले तरी येथील लिंग आणि त्यावरील प्रतिमा फारच जुनी (सुमारे इ.पू. पहिलें शतक) असून अतिशय महत्त्वाची आहे. हिचें विस्तृत वर्णन पुढे येणार आहे.
९) बृहदीश्वर मंदिर, तंजावर (सुमारें, सन् १,०००) राजराज चोल यानें बांधलेले हे दुसरें अगडबंब मंदिर होय. साहजिकच येथील शैव सामग्री विस्तृत असणें अपरिहार्य आहे.
१०) चिदंबरम् येथील नटराजांचे मंदिर (सुमारे सन् ११३०) चोलराजा कुलोत्तुंग दुसरा यांच्या वेळी हे मंदिर उभारले गेले, पण पूर्वीपासूनच येथे मंदिरें होतीं. मद्रास कुंभकोणम् लाईनवर असलेल्या या तीर्थांचे, नटराज तीर्थांचे, शैव परंपरेंत फार महत्त्व आहे. शंकरानें येथेंच नृत्याचा आविष्कार केला अशी लोकांत मान्यता आहे. सातव्या शतकांतच या स्थानाला शैव केंद्राचे रूप आले होतें.
येथे एकाम्रेश्वरांचेही प्रसिद्ध मंदिर आहे. यांत शिवाची काही नवीन स्वरूपें पहावयास मिळतात.
११) रामेश्वर मंदिर (सुमारें १७ वें शतक) हे बरेंच अलीकडचे आहे, पण भारतातील विशालतम मंदिरांत यांची प्रामुख्याने गणना होते.
शैवप्रतिमांच्या भांडारांविषयी वरील टांचण अगदीच जुजबी स्वरूपांचे आहे. पण त्यावरून शैव पंथाविषयी या विशाल संपत्तीची थोडीशी कल्पना येईल, उघड आहे कीं प्रस्तुत ग्रंथांत या विपुल सामुग्रीचा परामर्श घेता येणें शक्य नाही, तेव्हा काही महत्त्वाच्या शैवमूर्ती पर्यंतच आपली सीमा बांधावी लागेल.
दक्षिणेंतील शैवमूर्तीचे वर्गीकरण :
आगमांदि निरनिराळ्या शैव ग्रंथांच्या आधारें श्रीराव यांनी आपल्या ग्रंथांत सौम्य, संहार, अनुग्रह, उग्र वगैरे वर्गात निरनिराळ्या शिव प्रतिमांची चर्चा केली आहे. खाली दिलेल्या तक्त्यावरून श्रीराव यांच्या वर्गीकरणाची कल्पना येईल. अर्थात् प्रत्येक प्रकारांविषयी जास्त माहितीची अपेक्षा असल्यास तोच ग्रंथ पहाणें उपयुक्त ठरेल.
|
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
८ |
|
असितांग |
रुरू |
चंड |
क्रोध |
उन्मत्त |
कपाल |
भीषण |
संहार |
|
विशालाक्ष |
क्रोडदंष्ट्र |
प्रलयांतक |
पिंगलेक्षण |
बटुकनायक |
शशिभूषण |
भयहर |
अतिरिक्तांग |
|
मार्तंड |
जटाधर |
भूमिकंप |
अभ्ररूप |
शंकर |
हस्तिचमंबिरधर |
सर्वज्ञ |
कालाग्नि |
|
मोदकप्रिय |
विश्वरूप |
नीलकंठ |
धरापाल |
भूतवेताल |
योगीश |
कालाग्नि |
प्रियंकर |
|
स्वच्छंद |
विरूपाक्ष |
विष्णू |
कुटिल |
त्रिनेत्र |
ब्रह्मराक्षस |
दक्षिण |
घोरनाद |
|
विघ्नसंतुष्ट |
नानारूपधर |
कुलपालक |
मंत्रनायक |
त्रिपुरांतक |
सर्वज्ञ |
मुखर |
विशालाक्ष |
|
खेचर |
वज्रहस्त |
मुंडपाल |
रुद्र |
वरद |
सर्वदेवेश |
अस्थिर |
योगीश |
|
सचराचर |
महाकाय |
कामपाल |
पितामह |
पर्वतवास |
सर्वभूतहृदिस्थित |
महारुद्र |
दक्षसंस्थित |
|
शिवप्रतिमा |
|||||||
|
सौम्यमूर्ती |
|
|
|
संहारमूर्ती |
उग्रमूर्ती |
नृत्तमूर्ती |
दक्षिणामूर्ती |
|
लिंगोद्भव |
चंद्रशेखर |
पाशुपत |
सुखासन
मूर्ती |
|
अघोर |
महाकाल |
|
|
|
केवल
मूर्ती |
रौद्रपाशुपत |
|
|
दशभुज |
|
|
|
|
उमासहितमूर्ती |
|
|
|
अघोर |
|
|
|
|
आलिंगनमूर्ती |
|
|
|
|
|
|
|
|
उमासहितमूर्ती |
सोमास्कंद
मूर्ती |
उमामहेश्वर
मूर्ती |
|
योग |
वीणा |
ज्ञान |
|
व्याख्यान |
|
|
|
|
|
|
|
|
अंधकारसुरवध |
गजासुर |
कामंतक |
कालारि |
त्रिपुरांतक |
शरभ |
ब्रह्मशिरच्छेदक |
भैरव |
वीरभद्र |
|
जलंधरहर |
मल्लारि |
|
|
|
|
|
|
|
|
मूर्ती |
संहारमूर्ती
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
|
|
मूर्ती |
|
|
|
|
|
(मार्कंडेयानुग्रह) मूर्ती |
|
|
|
|
|
अनुग्रह |
कंकाल |
भिक्षाटन |
गंगाधर |
अर्धनारीश्वर |
हर्यर्ध
(हरिहर) |
कल्याणसुंदर |
वृषवाहन |
|
|
विषापहरण |
|
|
|
|
|
|
|
|
|
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
|
|
चंडेशानुग्रह |
विष्णवानग्रह |
विघ्नेश्वरानुग्रह |
नंदीशानुग्रह |
किरात अर्जुनानुग्रह |
रावणानुग्रह |
|
|
|
|
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
मूर्ती |
|
|
|
शिव : भाग ३ (लिंगे)
(सुरुवातीपासून सुमारे सहाव्या शतकापर्यंत)
प्रास्ताविक :
लिंग पूजनांचे धागेदोरे एकीकडे सिंधुसभ्यतेपर्यंत पोचतात व दुसरीकडे आजपर्यंत ते आपल्या येथे अव्याहत चालू आहे. शिवाची लिंगपूजा सहजासहजी भारतीय समाजात प्रतिष्ठापित झालेली नाही, तिला येथें दांडग्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. वेद काळांतील शिश्नदेवांची चर्चा मागे झालीच आहे. पौराणिक वाङ्मयात हा विरोधी सूर ऐकू येणारी ठळक आख्याने खालील आहेत-
१) ब्रह्मदेवाच्या यज्ञांत भिक्षाटनांकरिता शंकरांचे जाणे व ब्राह्मणांकडून त्याची निंदा.'
२) उन्मत्त वेशांत शंकरांचे ब्राह्मणाच्या वसतिस्थानांवर जाणें व त्यावर ब्राह्मणांचे लाथा, बुक्या, वगैरेंनी आक्रमण.
३) दारुवनांत शंकराची लिंगच्युती व त्याला पौरुषहीन होण्यांविषयीं शाप. हे आख्यान बरेच प्रचलित असावे, कारण अनेक पुराणांत तर त्याचा उल्लेख आहेच, पण मध्यकालीन कलेत देखील त्याचे अंकन झाले आहे.'
४) भृगूचा शंकराला शाप.
-
पूर्व इतिहासांकडे बोट दाखविणाऱ्या या कथा बहुतेक आपल्या उत्तरभागांत लिंगपूजेच्या प्रतिष्ठेचे वर्णन करतात. अर्थातच आपण मागे उल्लेखिलेल्या महाविलयन पद्धतीचे हे प्रमाण होय. उदाहरणार्थ पद्मपुराणांत येणाऱ्या दारुवनांसंबंधी आख्यानांत एकीकडे सावित्रीच्या शापाने शंकराचे लिंग पडल्याचे सांगितले आहे, तर तेथेंच गायत्रीचा वर त्याच्या (पतित लिंगाच्या) पूजनाची प्रतिष्ठा ही करीत आहे." हे आख्यान कूर्मपुराणांत विस्ताराने दिले आहे तेथे लिंगोत्पाटनांविषयी सांगून झाल्यानंतर ब्रह्मदेवांकडून आग्रहपुरस्सर लिंग पूजेची स्थापना केली गेली आहे आणि भगवान् ईशाच्या लिंगाची पूजा वैदिक मंत्रानेही करावी असें सांगितले आहे.' याप्रमाणें जरी शैवमत आणि लिंगपुजेचे एक रूप वैदिक संप्रदायाने स्वीकारलें तरी शैवांच्या त्या उपशाखा शेवटपर्यंत वेदबाह्यच समजल्या गेल्या ज्यांचे रीतिरिवाज आर्य सभ्यतेच्या अगदीब प्रतिकूल होते. एवढेच नव्हें तर काही ठिकाणीं स्वतः शंकराच्या तोंडूनच त्यांना 'असेव्य' असे सांगितले गेले.'
लिंगपूजनांच्या स्थापने बरोबरच लिंगोत्पत्ती संबंधी कथा ही रूढ झाल्या, त्यापैकी काहीं खाली देत आहे :
क) लिंगोद्भवाची मार्गे दिलेली कथा व त्यामुळे लिंगाचे श्रेष्ठत्व आणि लिंगार्चेचा आरंभ."
लिंगपञ्चक :
शिवलिंग असलेली काही शिल्पें :
.jpg)
स्वहा
मनोजव
वह्नी
४ पशुपति
शिवा
स्कंद
वायु
५ भीम
दीक्षा
सर्ग
दीक्षित
६ उग्र
दिशा
संतान
ब्राह्मण
७ महादेव
रोहिणी
बुध
चंद्र
८ रुद्र
सुवर्चला शनि
सूर्य
मूर्तिलिंग किंवा विग्रहलिंग (रे. चि. सत्तावीस २५, २८, ३१)
मुखांचे ऐवजी लिंगावर किंवा लिंगाला चिकटलेली संपूर्ण शिवप्रतिमा कोरलेली असली तर तिला आपण विग्रहलिंग किंवा मूर्तिलिंग असे म्हणू, हा शब्द अर्थातच जुना नाही. या प्रकारचे मथुरेहून मिळालेले एक लिंग डॉ. कुमारस्वामी यांनी प्रकाशित केले आहे. येथे शिव चतुर्भुज असून त्याचे जवळ कोणतेही आयुध नाही. मधुरेहून मिळालेले कुषाणकाळचेच दुसरे मूर्तिलिंग सध्या अमेरिकेंत फिलाडेल्फिया येथे आहे. येथे पागोटें घातलेला शंकर द्विभुज आहे. त्याचा उजवा हात अभय मुद्रेत दिसतो, डाव्यांत घट आहे (चित्रे ९३-९४) ५. जवळ जवळ अशाच प्रकारचे एक कुषाणकालीन लाल दगडाचे शिवलिंग भरतपूर (राजस्थान) पासून ८ मैलाचे अंतरावर असलेल्या गामरी गावांत आढळल्याची श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी नोंद केली आहे. हे लिंग ४४ सें.मी. उंच व ४२ सें.मी. रुंद असून याच्या समोरच्या व मागच्या भागावर कुंभोदरगण किंवा यक्ष दिसतो. दोन्ही बाजूस अभयमुद्रेत उभा असलेला हा कोण असावा गण, यक्ष कीं स्वतः शिव? अग्रवालांनी यक्ष म्हटलेल्या मूर्तीत धोतर व उपरणें दिसतें. मुगुटाबद्दल कांहीच सांगवत नाही. भीटा येथील सर्वतोभद्रिका व फिलाडेल्फिया येथील शिवलिंगाला विचारात घेता हा शिव असण्याची शक्यता जास्त आहे.
दक्षिण भारतांकडे लक्ष दिल्यास या प्रकारचे एक फार जुनें आणि विशाल विग्रहलिंग तेथें ही आढळते. ही प्राचीनतम प्रतिमा तामिळनाडूच्या रेणुगुंठा नामक स्थानाजवळ एका मंदिरांत विद्यमान आहे. परशु रामेश्वर या नांवाने प्रसिद्ध असलेले हे पांच फूट उंचीचे लिंग असून त्याच्या दर्शनी भागांवर शिवाची द्विभुज स्थानक प्रतिमा आहे (रे.चि. सत्तावीस २५). उजव्या हातांत शिवाने खाली तोंड करून लोंबणाऱ्या मेंढ्याच्या मागच्या तंगड्या धरल्या आहेत, व डाव्यात कलश असून याच हाताने त्याने आपला खांद्यावर असलेला भला मोठा परशु सावरला आहे. शिवाच्या मस्तकांवर विशिष्ट प्रकारचें पागोटें असून गळा, हात, वगैरे भागांवर निरनिराळे दागिने घातले आहेत. नेसूचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आहे, पण ऊर्ध्वलिंग व जानवें दोन्ही नदारत आहेत."
शंकर एका राक्षसाच्या म्हणजे अपस्मार पुरुषाच्या खांद्यावर उभा आहे.
श्री. गोपीनाथराव यांच्या मते ही प्रतिमा इसवीसनापूर्वी पहिल्या शतकांतील असावी.я вклерозен
नांद व चौमा येथील शिवलिंगें :
विग्रह लिंगाच्या प्रसंगाने मध्यकाळांकडे वळण्याच्या अगोदर उत्तर भारतातील दोन जुन्या शिवलिंगांचा धावता आढावा घेणे आवश्यक आहे. ही लिंगे वरच्यापेक्षा थोडी भिन्न आहेत कारण येथे एकटा शंकरच कोरलेला नसून अन्य प्रतिमा ही उत्कीर्ण आहेत.
२४०
प्रथम म्हणजे राजस्थानाच्या नांद गावांत असलेले लिंग. पुष्कर क्षेत्रांजवळील हे र्तिमा श्री. रत्नचंद्र अग्रवाल की शोधून काढले (रे.चि. सत्तावीस २६). त्यांच्या मताप्रमाणें याच्यात विष्णु, शिव आणि ब्रह्म भागा व्यतिरिक्त एक चौर शोधही आहे. त्यांनी खालच्या भागाला विष्णू असें म्हटले आहे ज्यावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेव अंकित आहेत. त्याच्च्यावर ब्रह्मभाग आहे जेथे चारी बाजूला अभय मुडेंत असलेल्या मुकुटधारी द्विभुजमूर्ती दिसतात, याच्यास अर्थात् तिसरा भाग त्यांच्या मते सौरभाग आहे. येथे पुनः दोन हाताच्या मूर्ती आहेत ज्याच्यात एक टोकदार टोचे घातलेली व कमळ घेतलेली आहे. सर्वाच्या वर शिवभाग आहे. येथे चारी बाजूला द्विभुज लकुलीशाचे दर्शन घडते. याप्रमाणें या लिंगावर लहान मोठ्या अशा एकूण वीस प्रतिमा आहेत. हे लिंग कुषाणकालीन आहे.
दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात असलेल्या चौमा गावातील लिंग होय. चौमा हा चतुर्मुखाचा अपभ्रंश असू शकतो. या लिंगावर वरच्या बाजूला कुषाणकालीन माळा नसून एक कातडें गुंडाळल्यासारखें दिसत आहे व त्याला एका बाजूला गाठ मारली आहे (रे.चि. सत्ताविस ३०). विशेष म्हणजे लिंगाच्या पायथ्याकडे चार दिशांना चारपैकी प्रत्येकी एक पाण्याची सुरई किंवा उंचमानेचा कलश (चित्र ९५) एक यक्ष, एक बसलेला सिंह आणि एक स्त्रीचे मुख कोरलेले आहे. या चारी वस्तूंचा शंकराशी फार जवळचा संबंध आहे हे नव्याने सांगावयास नको.
सर्वतोभद्रलिंगें (चित्रं ९६, ९७, ९८) :
गुप्तोत्तर काळांपासून विग्रह लिंगाचा एक नवा प्रकारसमोर आला. हा म्हणजे वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य, शैव वगैरे निरनिराळ्या मतांच्या एकीकरणाच्या दिशेकडे टाकलेले महाविलयन पद्धतीचे पाऊल होते. या लिंगाच्या चारी बाजूला प्रतिमा असल्यामुळे यांना आपण 'सर्वतोभद्र लिंग' अशी संज्ञा देऊ.
अशी लिंगे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान वगैरे भागांत एकाधिक आढळतात. रामनगर (वाराणसी) येथील संग्रहालयांत असलेल्या लिंगावर चारी बाजूला क्रमाने सूर्य, गणपती, शिवपार्वती आणि वराह कोरलेले आहेत (चित्र ९६). म्वाल्हेरच्या संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र लिंगावर विष्णू, शिव, ब्रह्मा, आणि सूर्य दिसतात आणि दुसऱ्यावर फक्त शिव, ब्रह्मा, आणि विष्णूच आढळतात."
यंत्रलिंगें :
मध्यकाळांत शिवलिंगाचा एक नवा प्रकार रूढ झालेला दिसतो. तो म्हणजे लिंगाच्या शीर्षभागांवर श्रीयंत्रासारखी यंत्र कोरणें, हा प्रकार वाराणसीकडे जास्तआढळतो. तेथे अन्नपूर्णेच्या मंदिरात व शिंद्यांच्या बालाजी मंदिरात अशो शिवलिंगे आहेत. (र.चि. २८, ३६)
याचाच अन्य प्रकार म्हणजे शीर्षभागांवरील यंत्रांबरोबरच लिंगाच्या चारी बाजूस शिव प्रतिमा ही कोरणें. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या नेपाळी कलेच्या एक लिंगावर हा प्रकार आढळतो. येथे चारीकडे घट व माळा घेतलेल्या शंकराच्या आवक्ष प्रतिमा आहेत. (ल.सं.सं. ७०६ चित्र ९५)
स्थाणुलिंगें :
विशेष कोणतेही अलंकरण नसलेले साधेसुधे लिंग तयार करणें सर्वात सोपे असे. कुषाण काळातील विशाल खांबाच्या आकाराची लिंगे म्हणजे
या शिव किशार
२४१
आहेत" (चित्र ९९). प्राचीन लिंगाचे एक उदाहरण म्हणून मथुरेहून मिळालेल्या एक शिलापट्टाकडे बोट दाखविता येईल. ज्यावर पंख असलेले पशू शिवलिंगाचे पूजन करताना दाखविले आहेत, कुषाणकालीन लिंगांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे सांगता येतील :
१) लिंगाग्रभागावर गुंडाळलेली दुहेरी किंवा एकेरी माळ. तिला आपण मार्गे संयोजन बंध किंवा ब्रह्मसूत्रांचे प्रारंभिक रूप असे म्हटले आहे. ही निरनिराळ्या अलंकाराने सुशोभित असते. काही नमुन्यांत हिला चार मोठाली फुलें व गोंडेदार टोकें ही आहेत. (चित्र ९९)
२) काही ठिकाणी माळेच्या ऐवजी फक्त कमळाच्या पाकळ्यांची ओळ दिसते.
३) एका शिवलिंगावर एका बाजूला अष्टदल कमळ कोरलेले आहे." याचा अभिप्राय नक्की सांगवत नाही. शिवाची अष्टमूर्ती किंवा त्याने घातलेली आठफुले याचा हा प्रतीकात्मक संकेत असू शकतो.
४) काही लिंगाचा अगदी खालचा भाग विशेष लक्ष पुरविण्यासारखा असतो. एकात (म.सं.सं. १५, ६५२) या जागी कदंबपुष्प आणि पानांचे अलंकरण आहे तर दुसऱ्यात पायथ्याचा एकीकडचा दगड वरून लोंबणाऱ्या माळेने दोन भागात विभक्त केला आहे. चौमा लिंगाच्या पायथ्यावर असलेली सिंहादि अलंकरणें आपण पाहिली आहेतच तसेच पायथ्याशी दोन गण असलेल्या मुखलिंगाचा उल्लेख मागे आला आहे.
५) काही शिवलिंगावर लेख ही कोरलेले असतात. उदाहरण म्हणून मथुरेच्या जटेश्वर लिंगाचे नांव घेता येईल. गुप्तकाळांत साधारण लिंगाच्या आकारात ही बदल झाला. त्यांचे मूळ अर्थात् 'शिश्न' रूप बाजूला जाऊन त्याला छान, गुळगुळीत व गोंडस अशा खांबाचे रूप मिळाले. या काळात त्रिभागात्मक लिंगें ही बरीच तयार झाली. त्यांचे आकार लहान मोठे आहेत. करमदंडा (जिल्हा फैजाबाद, उत्तर प्रदेश) येथें गुप्तकाळाचे (सन् ४३६ चे) एक त्रिभागात्मक अभिलिखित लिंग मिळाले आहे. (ल.सं.सं.ओ. ५)
मध्यकाळांत दिसून पडणारे धारालिंगादि प्रकारांचे विवेचन वर झालेच आहे. स्मृतिलिंगें, समाधिलिंगें, वगैरे प्रकारांचा मूर्तिविज्ञानांशी सरळ संबंध नसल्यामुळे आपणास तिकडे वळण्याचे कारण नाही.
लिंगपञ्चक :
उमामहेश्वर मूर्तीच्या एका प्रकारांवर दिसणाऱ्या पांच शिवलिंगाची आपण मागें दखल घेतली आहे. काहीसा तशातलाच हा दुसरा प्रकार आहे. यांत एकामेकांना लागलेले चार गोळे व त्यांच्यावर ठेवल्या सारखा पांचवा गोळा असे हे लिंग पञ्चक एकाच पीठांवर स्थापन केलेले दिसते. विदिशेच्या (मध्यप्रदेश) संग्रहांलयांत याचे काही नमूने ठेवलेले आहेत. कदाचित पञ्चमुख लिंगाचे हे लघुसंस्करण असावे. ه و
शिवलिंग असलेली काही शिल्पें :
भारतीय कर्लेत अशी बरीच शिल्पें मिळतात ज्याचा शिवलिंगाशी प्रत्यक्ष संबंध असतो. कांही ठळक प्रकार खाली दिलेले आहेत.
१) लिंगाला मस्तकांवर धारण करणारा भक्त. भारतकला भवन, वाराणसी (सं.सं. २२३) येथे असलेली ही जुनी मूर्ती कदाचित भारशिव वंशाशी संबंधित असेल.
२४३
२) लिंगोद्भव व लिंगारूढ प्रतिमा. यांची विवेचनें मागें झाली आहेत. (रे.चि. एकोणतीस ४७)
३) लखनऊ संग्रहालयांतील एका शिलापट्टांवर (सं.सं. बी. १४१) पिंपळाच्या झाडांखाली स्थापन केलेले शिवलिंग दाखवून एक यक्षकथा चित्रित केली आहेत पण अद्यापि तिची ओळख पटलेली नाही. हा शिलापट्ट कुषाण काळातील आहे (चित्र ८४).
४) वैवाहिक मूर्तीतील एका प्रकारांत पार्वतीच्या हातांत शिवलिंग दिसते. २
५) असेच लिंग तपस्विनी पार्वतीच्या हातांत व सद्योजात मूर्तीच्या जवळही आढळते.
६) विष्णूच्या पाठशिळेवर असलेल्या दश अवतारांत काही ठिकाणी कूर्मांच्या पाठीवर मंदराचल म्हणून ब्रह्मसूत्राने शोभित असलेले शिवलिंग दिसते (र.चि. एकोणतीस ५०).
७) वाराणसीला बऱ्याच ठिकाणी अलिकडच्या शिल्पात दोन नागांच्या मध्यें किंवा नंदीच्या पाठीवर ही लिंग आढळते (रे.चि. अठ्ठावीस ४०, ४६). असेच लिंग नागपूरला टेकडीवरच्या गणेशमंदिरांत आहे.
८) दक्षिण भारतांत मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शंकर शिवलिंगातून प्रगट झालेला दिसतो.
९) महाराष्ट्रांत विठ्ठल आणि लक्ष्मी यांच्या मस्तकावर शिवलिंग आढळते.
१०) शिवलिंगाची पूजा दृश्यें ही कुषाण काळांपासून (चित्र १००) आधुनिक काळांपर्यंत मिळतात.
११) बसवेश्वरांसारख्या नंदीच्या गळ्यांतही ते दिसते.
१२) विष्णूच्या पाठशिळेवर असलेल्या दशअवतारांत काही ठिकाणी मत्स्याच्या पाठीवर शिवलिंग दिसते (रे.चि. एकोणतीस ४९).
२३१
ख) सर्वांचा ज्याच्यांत लय होतो ते लिंग या परिभाषेस मान्यता मिळून लिंगवेदीच्या (शाळुंकच्या) रूपानें महादेवी (पार्वती किंवा चित्रशक्ती) व लिंगरूपानें महेश्वराच्या पूजनाची स्थापना."
ग) सृष्टिकर्मांपासून विरक्त होऊन शिवाकडून स्वतःचे लिंग कापणे व पृथ्वीवर त्याला प्रतिष्ठित करून आपण मूंजवान पर्वतांकडे निघून जाणें.२
घ) शिवप्रतिमा व शिवलिंगाचे पूजन हे दोन्ही प्रकार जरी संपत्ति व ऐश्वर्य देणारे असले तरी लिंगपूजन हे श्रेष्ठतम होय या सिद्धांतांचे प्रतिपादन.
ज्योतिर्लिंगें :
हळुहळू समाजात लिंगपूजा दृढमूल झाली. आज भारतातील सुप्रसिद्ध शैवतीर्थांचे ठिकाणी शिवाच्या प्रतिमेचे पूजन होत नसून लिंगपूजनच होत असतें. भारतात पसरलेल्या शिवलिंगांत ज्योतिर्लिङ्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारा लिंगांना फार मोठी मान्यता प्राप्त आहे. ही लिंगे खालील होत.":
१) सोमनाथ (सौराष्ट्र, गुजराथ)
२) मल्लिकार्जुन (श्री शैल, आंध्रप्रदेश)
३) विश्वेश्वर किंवा विश्वनाथ (वाराणसी, उत्तरप्रदेश)
४) केदारेश्वर (केदारनाथ, उत्तरप्रदेश)
५) घृष्णेश्वर किंवा घृष्णेश्वर (वेरूळपासून २ मैल, महाराष्ट्र)
६) नागनाथ किंवा औंढ्या नागनाथ (जिल्हा परभणी, महाराष्ट्र)
७) भीमाशंकर (खंडाळ्याहून २५ मैल उत्तरेस भीमानदीच्या काठी लोणावळ्याजवळ, महाराष्ट्र)
८) ओंकारेश्वर (ऑकारमांधाता, मध्यप्रदेश)
९) महाकालेश्वर (उज्जयिनी, मध्यप्रदेश)
१०) त्रंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र)
११) बैद्यनाथ किंवा वैजनाथ. हे दोन आहेत- एक महाराष्ट्रांतील परळी वैजनाथ, जिल्हा बीड व दुसरा बैजनाथधाम, देवघर, बिहार.
१२) रामेश्वर (केरळ)
स्वयंभूलिंगें :
ज्योतिर्लिंगाप्रमाणेंच स्वयंभू किंवा स्वयंभूव लिंगांचे ही मोठे महत्त्व आहे." कामिकांगमांप्रमाणें जे लिंग स्वतः प्रगट झालेले आहे आणि अज्ञात काळांपासून अस्तित्वांत आहे ते स्वयंभूव म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारचे लिंग जरी कारण परत्वे थोडे भंग झाले, शत्रूच्या ताब्यात गेले किंवा त्याला अन्य अपाय झाला तरी त्याचे देवत्व नष्ट होत नाही.
२३२
त्याचा जीर्णोद्धार किंवा नव्याने स्थापना करावयाची नसते, फक्त थोडा संस्कार केला म्हणजे झाले. प्रचलित मान्यतेप्रमाणे व्यात्वांत ६८ स्वयंभू लिंगे पसरली आहेत. महाराष्ट्रात मुंबई येथील अमरेश्वर (अंबरनाथ) हे एक स्वयंभू लिंग समजतात. तांत भूलिगांप्रमाणेच गणप व आर्थ लिंग अर्थात् गणांनी किंवा त्रऋषींनी स्थापन करून पुजलेली लिग ही आदल्याच असतात. या लिंगाच्या बाबतीत त्यांचे मान, आकार, ब्रह्मसूत्रांदिकांचा अभाव वगैरे गोष्टीचा विचार करावयाचा नसतो. महाराष्ट्रांपुरते बोलावयाचे झाल्यास ग्रामीण महाराष्ट्र हा शिवोपासकांचा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. येथे अनेक ज्योतिर्लिंगे तर आहेतच पण त्याशिवाय व्याप्रेश्वर, वाडेश्वर, कालेश्वर, सर्वेश्वर, वाळुकेश्वर, कपर्दिकेश्वर, नर्मदेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर, वेळणेश्वर अशी अनेक महादेवाची मंदिरें उभी असलेली दिसतात. त्याचप्रमाणें लातूर व टोका येथील सिद्धेश्वर, अमरावती जिल्ह्यांतील सालबार्डी येथील महादेव, जालन्याचा पंचमुखी महादेव अशी अनेक जागृत शिवस्थानें महाराष्ट्रात आहेत. अस्तु.
आर्ष व गणप लिंगाव्यतिरिक्त माणसाने स्थापन केलेली लिंगें 'मानुष लिंगें' म्हणून ओळखतात. यांच्या संबंधाने मात्र बऱ्याच विस्ताराने विचार केलेला आहे."
'लिंगाचें निर्माण व सामान्य स्वरूप :
दगड, माती, काष्ठ, अष्टलोह (सोने, रूपें, तांबे, पितळ, वगैरे आठ प्रकारच्या धातू), रत्लें, मणि, इत्यादि निरनिराळ्या माध्यमांनी शिव लिंगें तयार करीत. याशिवाय अपराजितपृच्छेप्रमाणें तात्कालिक माध्यमें म्हणून कुंकु, कापूस, वगैरेचाही उपयोग करीत असत. किंचित विस्ताराने आपण हा विचार प्रथम प्रकरणांत केलेला आहे. याशिवाय नर्मदेंत मिळणारे मोठे गुळगुळीत दगड 'बाण लिंगें' म्हणून पूजले जातात.
मानुष लिंगाचे तीन भाग असतात, खालचा चौकोनी म्हणजे ब्रह्मभाग, त्यांच्यावर अष्टकोनी म्हणजे विष्णू भाग व सर्वात वरचा गोल म्हणजे शिवभाग असा त्याचा क्रम असतो (रे.चि. अठ्ठावीस ३३,३४). या भागांच्या उंचीच्या भेदाने लिंगांचे निरनिराळे प्रकार कल्पिले आहेत. सर्वच शिवलिंगे अशा प्रकारे तीन भागांत विभाजित असतात असे मात्र नाही. बरीचशी केवळ गोल खांबासारखीच असतात. येथेच शिवलिंगांवर दिसणाऱ्या आडव्या रेघेचा ही विचार करावयास हवा जिला 'ब्रह्मसूत्र' अशी संज्ञा आहे. खरे म्हणजे मुळात शिवाचे लिंग म्हणजे मानव लिंगाची प्रतिकृती आहे. सुरुवातीला कित्येक ठिकाणी ती हुबेहूब घडविलेली आहे. पुढे मात्र तिच्यात सुधारणा करण्यात आल्या. मानव लिंगाचे टोक चेतनावस्थेत थोडे फुगलेले असते. या फुगीर भागाला सुपारी असे म्हणतात. लिंगाचे टोकांवर सुपारीची सुरुवात अंकित करणारी रेषा पुढील काळांत ब्रह्मसूत्र या नावाने ओळखली जाऊ लागली व 'सिद्धांतसारावलि' सारख्या ग्रंथांनी तिला भक्कम अशी शास्त्रीय चौकट दिली. २०
शिवलिंग ज्या दगडांत स्थापित करतात तो विशिष्ट आकाराचा घडविलेला असतो. त्याला 'पीठ' किंवा 'योनी' अशी संज्ञा आहे. नेहमीच्या भाषेत आपण तिला शंकराच्या पिंडीची 'शाळुंका' असे म्हणतो (रे.चि. अठ्ठावीस, ३५), लिंग स्थापन झाल्यावर पुरता ब्रह्मभाग व पुरता किंवा अर्घा किंवा एक चतुर्थांश विष्णुभाग त्याने लपतो. त्या पीठाला एकाधिक कंगोरे असतात व निरनिराळ्या अलंकरणाने ते सुशोभित केलेले असते. या अलंकाराणांच्या फरकाने पीठाचे प्रकार कल्पिले आहेत. पीठाच्या वरच्या भागांत पिंडीवर सांडणारे पाणी वाहून जाण्याकरिता 'जलनिर्गम' किंवा खोलाद नाली केलेली असते. ही पूजेला बसताना पूजकाच्या उजव्या व लिंगाच्या डाव्या बाजूला असावी असे विधान आहे.
२३४
शिवलिंगाचें प्रकार (र.चि. अठ्ठावीस ३७-४५) :
शिवलिंगाच्या बाहेरील अलंकराला आधार मानून मानुषलिंगाचे काही प्रकार ठरविले गेले आहेत. यापैकी मुखलिंग, नियात शिवलिंगाना लिगाला सोडून बाकी मध्यकाळांतच जास्त मिळतात. त्यातल्यात्यांत उत्तरेपेक्षा दक्षिणेत यांच्या प्रघात जास्त आहे. मयमतादि ग्रंथांत सांगितलेले हे प्रकार खालील होत :
क) अष्टोत्तरशतलिंगें : यांत लिंगाच्या पूजाभागांवर म्हणजे शिवभागांवर १०८ बारकी लिंगे कोरलेली असतात. ख) सहस्रलिंगें (रे.चि. अठ्ठावीस, ३२) : वरील प्रमाणेंच येथें बारक्या लिंगाची संख्या १००० असते. असेच कोटिलिंग ही घडवितात.
ग) धारालिंगें (रे.चि. अठ्ठावीस ४३) : येथें लिंगावर उभे पैलू किंवा धारा पाडलेल्या असतात. आगमग्रंथांत मतभेदाने यांची संख्या ५ पासून २८ पर्यंत दिलेली आहे.
घ) मुखलिंगें (रे. चि. अठ्ठावीस ४२) : येथे पिंडीत शंकराचे मानव मुखही कोरलेले असते. हा प्रकार फार जुना आणि बहुप्रचलित आहे; म्हणून यावर थोडा विस्ताराने विचार करावयास हवा.
गुप्तकाळापर्यंतची उत्तर भारतीय मुख लिंगें :
मुखलिंगांची प्राचीनता इसवीसनांपूर्वी पहिल्या शतकांपर्यंत पोचते. आज माहीत असलेल्या लिंगांत सर्वात जुने असे भरतपूरच्या संग्रहालयांत असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग होय. या लिंगावर शंकराचे पागोटे घातलेले मुख आहे (चित्र ८२). मथुरेच्या एका कुषाणकालीन शिलापट्टांवर पिंपळाखाली विटांच्या चौथऱ्यावर एक मुखलिंग स्थापित केलेले दिसते (चित्र ८४ ल.सं.सं.बी. १४१). येथे लिंगाचा मुखभाग समोर असून मागचा भाग झाडाच्या बुंध्याकडे आहे. कधीकधी लिंगांचे एक दोन किंवा चार मुखांशी संयोजन करीत असत. यात दोनमुखी लिंग क्वचित मिळणारे असून त्याचा एक कुषाण कालीन नमूना मथुरेच्या संग्रहालयांत आहे. (म.सं.सं. १४.४६२). पंचमुखलिंगें नंतरची आहेत.
कुषाणकालीन मुखलिंगां संबंधी खालील गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत (चित्र ८३) :
क) मुख : भरतपूर संग्रहालयांतील लिंगाच्या मुखावर पागोटें दिसते, पण इतरत्र बहुतेक जटाभारच असतो. चतुर्मुख लिंगात पागोटें दिसते, त्याचा विचार पुढे येईलच.
ख) मुख आणि लिंगाचे संयोजन : कुषाणपूर्व काळांत मुख लिंगांपासून स्वयं उद्भूत झाल्यासारखें दिसते पण कुषाण काळांत मात्र या दोघांचे संयोजन करणारे एक किंवा दोन असे फुलांचे जाड हार आहेत. या हारांवर फुलापानांची सजावट मिळते. हे अलंकरण कुषण काळाच्या साध्या शिवलिंगांवरही दिसते. वायुपुराणांतील वर्णनाप्रमाणें शंकराच्या डोक्यावर शोभणाऱ्या कमलमालेच्या पागोट्यांकडे (पद्ममालाकृतोष्णीष) हा संकेत असणें संभवतें, अथवा ही माला म्हणजे पुढें दिसणाऱ्या 'ब्रह्मसूत्रां'चे पूर्व रूप असू शकेल.
मदतकाळांकडे मुख आणि लिंगांचे हे अनैसर्गिक संयोजन लुप्त होते व पुनः मुख लिंगातून सहज प्रगट होतांना
ग) एक (र.वि. सत्तावीस २७) किंवा दोन मुखाची लिंगे : कुषाण काळांतील एक मुखलिंगें बरीच मिळतात. देखें
२३५
आडवा त्रिनेत्र, कुरळ केस, जटामंडल, कचित पागोटे व कपाळांवर ललाटपट्ट" अशी वैशिष्ट्ये दिसतात. ही लिंगे साधारणपणे जाडीत कमी पण उंच मात्र त्या मानाने जास्त अशी असतात. काहीचा वरच्या भागांवर मानवलिंगाचा आकार दिसतो व त्याच्या थोडे खाली मालेने संयोजित मानव मुख दिसते (चित्र ८३).
एकमुखलिंगः
अकबरपुर, छाता (मथुरा) येथे मिळालेले कुषाण कालीन एकमुख लिंग (तूर्त मथुरा संग्रहालय) त्याच्या खालील भागावर असलेल्या बुढापा पण स्थूल काय गणांमुळे महत्त्वाचे आहे (रे.चि.शि. ३०)
A.K.Srivastava, Siva Linga with Ganas, A New find from Mathure, ARAS., XLI 1981- 82, p. 236
मी मथुरेला असताना पोलिसच्या ताब्यात असलेले एक कुषाणकालीन मुखलिंग पाहिले होते. त्याच्या खालच्या भागांवर दोन शिवगण कोरलेले होते (रे.चि. सत्तावीस २९). आता मात्र याचा ठाव ठिकाणा नाही. गणयुक्त हे मुखलिंग आजपर्यंत तरी अद्वितीयच आहे.
द्विमुखलिंग आतापर्यंत फक्त एकच माहीत आहे (म.सं.सं. १४.४६२). महाभारतांत एके ठिकाणी शिवास द्विवक्त्र म्हणून म्हटले आहे, त्याचा येथे संबंध लागू शकेल.
गुप्तकाळांत देखील एकमुख लिंगें बऱ्याच मोठ्या प्रमाणांत घडवीत असत (चित्र ८५).
गुप्त मुखलिंगाची वैशिष्ट्यें :
कुषाणकालीन लिंगांशी तुलना केल्यांस गुप्त काळांत मुखलिंगांची खालील वैशिष्ट्ये उघड दिसतात :
अ) त्रिनेत्र आडवा नसून उभा दिसतो.
आ) गोल बांधलेल्या (वृत्तबंध) जटांबरोबरच खांद्यांवर विखुरलेल्या जटा (उभय पार्श्वस्थ विकीर्ण जटालक) * दिसतात.
३) लिंगातून मुख स्वतः उद्भूत झालेले भासते.
ई) आतां फक्त मुखच दाखविण्याऐवजी गळा आणि तेथें घातलेली एकावली ही दिसू लागते. (चित्र ८५)
3) भूमरा (जिल्हा सतना म.प्र.) येथून मिळालेल्या मुखलिंगांप्रमाणे काही नमून्यांत" रत्नखचित भालपट्ट दिसतो व
याची सांगड महाभारतांतील 'मणिभूषित मूर्धा', नित्यमुद्वद्ध मुकुट", किरीटी, वगैरे पदांशी घालता येते.
ऊ) आता मुखलिंगांची उंची कमी होऊन त्याचा घेर वाढला, त्याचप्रमाणें लिंगाग्र लहान झाले व मुखांच्या आकारांत वाढ झाली. परिणाम असा की लिंगाचा बराच भाग मुखानें झाकला जाऊं लागला."
ए) मुखांवरील राकटपणा लुप्त होऊन तेथे 'शिवत्व' झळकू लागले.
ऐ) काही नमुनें असेही मिळू लागले जेथें मुखांबरोबरच ब्रह्म, विष्णू आणि शिव भागही दाखविले आहेत. सारनाथ (वाराणसी) येथून मिळालेल्या व तूर्त कलकत्त्याच्या संग्रहालयात असलेल्या या प्रकारच्या मुखलिंगांत
२३६
खालचा भाग चौकोन, मधला अष्टपैलू आणि वरचा गोल असून विष्णूभागाच्या ब्रह्मभाग दुप्पट आणि शिल भाग चौपट आहे." मुख शिवभागांत जवळ जवळ मधोमध आहे.
गुप्तोत्तरकाळांत एकमुख लिंगांची लोकप्रियता त्या मानाने कमी झाली. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका मध्यकालीन द्वारशाखेच्या खालच्या भागांवर एक मुखलिंग कोरलेले दिसते (म.सं.सं. १३ २९४). एक उल्लेखनीय मध्यकालीन एकमुखलिंग जंगलमहाल, चुनार जिल्हा वाराणसी येथील मंदिरांत आहे. शिवलिंगावर फक्त शिवाचे मुख दाखविले असून कान मात्र गाईच्या कानांसारखें आहेत. गोकर्णेश्वर म्हणता येण्यासारखें हे लिंग बाराव्या-तेराव्या शतकाचे असावे.
घ) त्रिमुखलिंग : पहाडपूर येथील उत्खननांत सुमारें ८व्या शतकांच्या मातीच्या एका फलकांवर योनीसह त्रिमुखलिंग मिळाले आहे. लिंगांच्या तिन्हीं मुखांवर जटाजूट असून कानांत चक्रकुंडलें आहेत. लिंग भागांका ब्रह्मसूत्राचाही काही भाग दिसतो.
ड) चतुर्मुखलिंग :
या प्रकारांत लिंगाच्या चारी बाजूला एक एक मुख कोरलेले असतें. या मुखांचे रूप व दिशा यांचा थोडक्यात विचार करू. गुप्तकाळांपर्यंत खालील चतुर्मुखलिंगें महत्त्वाची आहेत :
१) भीटा (अलाहाबाद) येथून मिळालेल्या पंचास्य लिंगातील आजूबाजूला दिसणारी चारमुखें.
२) कौशांबी (अलाहाबाद) चे चतुर्मुख लिंग (अलाहाबाद सं.सं. ६३६)
३) दिल्ली संग्रहालयातील लिंग (सं.सं. ६५ १७२)
४) मधुरेचे लिंग जे मुळांत पंचास्य होते (सं.सं. १५.५१६)
५) कौशांबीचे गुप्तकालीन लिंग (ल.सं.सं. एच्. ३, चित्र ८६-८७)
६) मध्यभारतांतील गुप्तकालीनलिंग (बिरला अकादमी संग्रहालय, कलकत्ता, सी. ९७)
साधारणपणें एकाच लिंगाच्या चारी बाजूस ही मुखें कोरीत असत, पण मथुरेच्या लिंगात मात्र चार मुखलिंगें एकत्र संयुक्त झालेली दाखविली आहेत.
लिंगावर अंकित असलेली चारमुखें शिवाच्या चार रूपांचा बोध करवितात. ती रूपें म्हणजे अघोर, उष्णीषिन्, योगी आणि स्त्री ही होत. महाभारतांतील कर्थेप्रमाणे एकदा देव मंडळाला तिलोत्तमा नावांची अत्यंत लावण्यवती अप्सरा प्रदक्षिणा करू लागली. त्यावेळी तिचे सौंदर्य स्याहाळण्यांसाठी शंकराची चार तोंडे प्रगट झाली. याच ग्रंथात अन्यत्र आपल्या मुखाची व्याख्या करताना शिवाचे असे वाक्य आहे" कीं मी पूर्वमुखानें इंद्रपदांचे शासन करतो, माझे पश्चिममुख सौम्य आहे, दक्षिण मुख संहाराकरिता आहे आणि उत्तरमुखानें भी उमेशी बोलत असतो. याची संगती अशी लावता येईल कीं इंद्रपदांशी संबंध असलेले पूर्वमुख हे पागोटें घातलेले असून संहार करणारे; दक्षिणमुख हे अघोररूप, योगीरूप किंवा मुंडित असें असते. त्याचप्रमाणें पश्चिमेकडील सौम्य असून उत्तरें कडील स्त्रीमुख असतें.
१५८
गुड्डीमलम्च्या मंदिरांत आहे (रे.चि. सत्तावीस २५). परशुरामेश्वर नांवाने प्रसिद्ध असलेले हे पांच फूट उंच शिवलिंगा असून त्याच्या दर्शनी भागांवर उभ्या शंकराची द्विभुज प्रतिमा आहे. त्याने आपल्या उजव्या हातांत अधोमुख लोंबणात एक मेंढा त्याच्या मागील पायाकडून धरला आहे व डाव्या हातात कलश असून खांद्यावर परशू टाकलेला दिसतो शंकराच्या मस्तकांवर उष्णीष असून त्यानें विविध अलंकारही धारण केले आहेत. त्याच्या पायाखाली अपस्मार पुरुष दिसतो. श्रीगोपीनाथ राव यांच्या मतें ही मूर्ती इसवीसनाच्या पूर्वी दुसऱ्या किंवा पहिल्या शतकांतील आहे.**
इसवीसनांच्या सुरुवातीला उत्तर भारतांत कुषाण साम्राज्याचा उदय झाला. या वंशाच्या काही राजांचा कल शैव धर्माकडे होता. यावेळी शैवधर्मांच्या हालचाली उत्तर पश्चिम भारतांकडे चालल्याच होत्या, त्याचप्रमाणें खाली मथुरा हैं नगर ही त्यांचे एक केंद्र झाले होते. मथुरा व तिच्या जवळपासच्या भागांतून मिळालेल्या व्रज जनपदांतून म्हणता येईल या काळच्या हजारो कलाकृती आज आपणांस प्राप्त आहेत. त्यांत ब्राह्मण धर्माप्रमाणेंच बौद्ध व जैन प्रतिमांचा ही समावेश होतो. शैवमतापुरतेंच बोलावयाचे असल्यास असें सांगता येईल कीं मथुरेला कुषाण काळाच्या पूर्वीपासूनच शैवमतांचा पाया घातला गेला होता. येथून प्राप्त झालेल्या एका शुंगकालीन शिलापट्टांत पंख असलेल्या पशुंच्या मध्यें झाडाखाली स्थापन केलेले शिवलिंग दिसते. (म.सं.सं. ५२ ३६ २५) वाङ्मयीन प्रमाणाकडे वळल्यास हरिवंशात असा उल्लेख सापडतो कीं मथुरेचा परित्याग करून द्वारकेकडे जाण्याच्या वेळी यादवांनी विशेष करून शंकराचे पूजन केले होते.
यादव शिवपूजक होते. स्वतः श्रीकृष्णांने पुत्रप्राप्तिसाठीं शिवाराधनच केले होते. " मथुरेंहून कुषाणकाळांत तयार झालेल्या माती व पाषाणांच्या अनेक शिवमूर्ती व लिंगें मिळाली आहेत. असेंही म्हणता येईल कीं व्रजभूमींत या वेळीं शिव, विष्णू, कार्तिकेय, लक्ष्मी, वगैरे देवांशी संबंधित निरनिराळे संप्रदाय प्रचलित होते. तेथे परस्पर विद्वेष किंवा मालिन्य फारसें नसावे. येथून मिळालेल्या एका शिलापट्टावर (म.सं.सं. ३४.२५२०) एकाच ओळीत अर्धनारीश्वरविष्णु, गजलक्ष्मी व कार्तिकेय उभे असलेले दिसतात (चित्र २) त्याचप्रमाणे परस्परांच्या देवतांना अपमानित करणाऱ्या प्रतिमांचाही येथे पूर्ण अभाव आहे.
शिवप्रतिमा व त्यांचे प्रकार इकडे वळण्यांपूर्वी कुषाणकालीन किंवा त्यापूर्वीची नाणी व मातीचे ठसे यावर दिसणाऱ्या शंकराच्या मानवाकृतींचे थोडक्यात सिंहावलोकन करू.
नाण्यांवरील शिवप्रतिमा :
याबाबतीत सर्वप्रथम उज्जयिनी येथून मिळालेली नाणीं आपले लक्ष वेधून घेतात. इसवीसनांपूर्वीच्या प्रथम दोन शतकांतील या नाण्यांवर शिवाची निम्नलिखित ध्यानें मिळतातः
१) दंड व कमंडलू घेऊन उभा असलेला शंकर.
२) हाच प्रकार पण त्या बरोबरच 'देववीक्षणतत्पर' असा बैल (रे.चि. बावीस १)
३) दंड- कमंडलू धारण करणारा पण त्याला तीन डोकी असणारा शिव. मुख्य मस्तकाच्या आजुबाजूला एक एक मस्तक असलेला त्रिशिर शिव उत्तरपश्चिम भारतांतील काही प्रतिमा व कुषाण नाण्यांवरही दिसतो (र.वि. बावीस २). डॉ. बॅनर्जी यानी याकडे संकेत केला आहे. पण वाङ्मयीन पुराव्याशी त्याला ताडून पहाण्यांचा तेथे प्रयत्न दिसत नाही.
२३७
महाभारतांच्या वरील उल्लेखानें या चार प्रकारच्या मुखांची दिशास्थानें ही निश्चित झालेली दिसतात. विष्णुधर्मोत्तर पुराण या दिशास्थानांचे वर्णन करते." आपण विचारात घेतलेल्या लिंगांची मुखस्थिती खालील प्रमाणे आहे :
दिशा
भीटालिंग (इ.पू. ३-२ रें श.)
कौशाम्बोलिंग (इ.पू. १ ल.श.)
दिल्लीलिंग (सु. २रें.श.)
मथुरालिंग (सु. ३ रें.श.)
कौशांबीलिंग (सु. ५वें.श.)
पूर्व
मुंडित
(खंडित)
पागोटें घातलेले
सौम्य
सौम्य
पश्चिम
स्त्री
पागोटें घातलेले
सौम्य
स्त्री
सौम्य
उत्तर
पागोटें घातलेले
स्त्री
अघोर
मुंडित
(खंडित)
स्त्री
दक्षिण
अघोर
अघोर
अघोर
अघोर
वरील तक्त्यांवरून एक गोष्ट उघड होते की कुषाणांचा काल संपेपर्यंत मुखस्थानांत एकरूपता आलेली नव्हती, पण गुप्तकालांत ती स्थिर झाली व विष्णुधर्मोत्तर पुराणाने तिला शास्त्रीय चौकट दिली. या ग्रंथांप्रमाणें अघोर (चित्र ८७) आणि स्त्री (चित्र ८६) ही दक्षिण व उत्तर अर्थात एकमेकांच्या पाठीकडे असावयास हवी. सुरुवातीच्या काही लिंगात हे दिसत नाही. दुसरें म्हणजें असें की गुप्तकालीन लिंगांत पागोटें घातलेल्या मुखांचा पूर्ण अभाव आहे, त्याचप्रमाणें मुण्डित तोंड ही आढळत नाही चौथा मुद्दा त्रिनेत्राविषयीं आहे. प्रथम तीन लिंगात कोणत्याच मुखांवर तो दिसत नाही, कुषाण काळांत तो असणें अनिवार्य नव्हतें, पण गुप्तकाळांत मात्र तो स्त्रीमुखां व्यतिरिक्त सर्वत्र दिसतो. बिरला अकादमीतील लिंगावर दिसणारे आडवे आणि उभे त्रिनेत्र त्यांना दाखविण्याच्या पद्धतीचा संक्रांतिकाल सुचवतात. अर्धचंद्रांविषयी देखील असाच प्रकार आहे. गुप्तकाळांपर्यंत शिवांचे बालेन्दुशेखर मुख फारसे दिसत नाही, पण पुढे सामान्य होते.
मध्यकालीन चतुर्मुख लिंगें :
गुप्तोत्तर काळांतील चतुर्मुख लिंगें विष्णुधर्मोत्तराच्या सामान्य आधारांवर घडविलेली दिसतात. पण त्यांत अलंकारांची बहुलता व साधारण अंकनांत रेखीवपणा जास्त दिसतो. अशा प्रकारची लिंगें उत्तरप्रदेश, राजस्थान, वगैरे भागांत आढळतात (चित्र ८८)
ङ) पञ्चमुख किंवा पञ्चास्य लिंगें :
उत्तर भारतांत पञ्चमुख लिंगाची परंपरा बरीच जुनी दिसते. इकडील सर्वांत जुनें म्हणून प्रसिद्ध असलेलें भीटा लिंग (ल.सं.सं. एच् चित्रे ८९-९२) पंचास्य पद्धतींचेच आहे. याचा काळ ईसवी सनाच्या पूर्वी तिसऱ्या ते दुसऱ्या शतकांच्या जवळपासचा आहे. उत्खननाने हे सिद्ध झाले आहे कीं इ.पू. तिसऱ्या शतकांपासून सनाच्या सहाव्या शतकांपर्यंत भीटा येथे शैबांचे एक मोठे केंद्र होते व ते बुंदेलखंडातील कालिंजर केंद्राशी संबद्ध होतें.
भीटालिंग लिंगभागांवर चतुर्मुख असून त्याच्या डोक्यावर शंकराची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). तिचा उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्यांत घट आहे. तोंडाचा भाग आता तुटला आहे पण खांद्यावर झुलणारे केस, कानांतील कुंडलें व गळ्यातील दागिना अजून सुरक्षित आहेत. तसेंच शिवाचे जानवें, हातातील कंकणें आणि ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे. खालील मुखांत एक मुंडित व दुसरे स्त्रीमुख आहे (चित्र ९१). तिसरें पागोटें घातलेले असून (चित्र ९०). चौथे अघोर किंवा भयंकर आहे. चौथ्याची दाढी, मिशा, बाहेर डोकावणाऱ्या विकराळ दाढा आणि कपाळांवरील
२३८
भारतीय मूर्तिशास्त्र
भालपट्ट नीट पाहतां येतो. शिवाची ही रूपें तत्पुरुष, वामदेव, अघोर व सद्योजात या नावांने व पांचवें ईशान या नावाने ओळखतात.
दुसरे पञ्चास्य लिंग कुषाण काळांतील असून मथुरा संग्रहालयांत (सं.सं. १५.५१६) आहे, पण आतां त्याचे पांचवे व येथेही शिव प्रतिमा असणें अगदीच असंभव नाही पूर्णपणें खंडित झाले आहे. मुख -
मध्यकाळांत पंचमुख लिंगें फारशी दिसत नाहीत. मात्र काशीकडे शंकरांच्या पिंडीवर घालण्यांची पितळी कवचें पञ्चमुखी दिसतात.
च) लिंग, अर्धनारीश्वर :
मधुरेहून मिळालेल्या या कुषाण कालीन लिंगाच्या दर्शनी भागावर उभा ऊर्ध्वलिंगी द्विभुज अर्धनारीश्वर अंकित आहे. तूर्त हे शिल्प लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्यूझियम मध्ये आहे. (रे.चि.शि. ३१).
N.P. Joshi, Early forms of Siva, Discourses, fig. 27, 28, p.57
छ) पंचलिंग :
एकाच योनिपीठावर पाच लिंगाचे एकत्र अंकन बऱ्याच ठिकाणी आढळते, पण विदिशा, मध्यप्रदेश येथे असल्या अशा शिल्पाची दोन वैशिष्ठ्यें आहेत. प्रथम म्हणजे मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे पहाणारे मानव मुख अर्थात् 'ईशान मुख' प्रत्यक्ष आहे. साधारणपणे शंकराचे हे मुख अदृश्य समजले जाते. (रे.चि. शि. ३२)
दुसरे म्हणजे चौकोनी शांळुकेच्या चारही टोकावर प्रत्येकी पांच लिंगाचा समूह दाखवला आहे. अर्थात् एकूण लिंगाची संख्या २५होते. पंचवीस लिंगाचे अंकन 'वाराणसी पटावर' ही आढळते. ही संख्या सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या २५ तत्त्वांची द्योतक होऊ शकते.
झ) अष्टमुख लिंग :
या प्रकाराचे हे एकमेव लिंग गुप्तकालीन असून मध्यभारतांत शिवना नदीच्या तटांवर मंदसोरला मिळाले व आज तेथेच पशुपतिनाथ यानांवाने पूजित होत आहे. हे लिंग सव्वा सहा फूट उंच असून याचा घेर अकरा फूट आहे. याला एकूण आठ तोंडे आहेत. चार मधोमध आणि चार त्यांच्या दीडफूट खाली. वरील चौकड्यांत एक रौद्र आणि तीन सौम्य आहेत. खालील चार थोडी अपूर्ण वाटतात.
शिवाच्या अष्टमूर्ती विषयी वाङ्मयीन पुरावे बरेच आहेत. कालिदासांने आपल्या शाकुंतलांच्या मंगल श्लोकांत अष्टमूर्तिशिवांचे स्मरण केले आहे. शैव तंत्रांप्रमाणें शिव, भैरव, श्रीकंठ, सदाशिव, ईश्वर, रुद्र, विष्णू आणि ब्रह्मा या शंकराच्या अष्टमूर्ती होत. कूर्मपुराणांत खालील प्रमाणें शिवाच्या अष्टमूर्तींची प्रतीकें व परिवार दिला आहे" :
नांव
पत्नी
पुत्र
मूर्तप्रतीक
१ भव
उमा
शुक्र
जल
२ सर्व
विकेशी लोहितांग मही
२२३
मासा खाणारा पक्षिरूपांत शिव (रे.चि. सव्वीस, २३)
कांची येथील एकांबरेश्वरनाथाच्या मंदिरांत एक खांबावर शंकरांचे हे विचित्र रूप पहावयास मिळते. येथें शिव एका विशाल पक्ष्यांच्या रूपांत दाखविला असून त्याला चार हात आहेत. मागच्या दोन हातांत परशू व हरण असून पुढचे हात वरद मुद्रेत आहेत. विलक्षण गोष्ट म्हणजे अशी की या पक्षीरूपी शिवाने आपल्या चोचर्चीत मत्स्यावतारी विष्णूस धरले आहे. पुढच्या बाजूला एक राजा किंवा भक्त हात जोडून उभा आहे.
विष्णूंच्या नरसिंह अवताराचा नाश करणारा शरभ आपणास माहित आहे पण मत्स्यावताराला चोचीत धरणारा हा पक्षी अजून तरी अज्ञात वाटतो.
दक्षिणामूर्ती :
तंजावूरच्या बालदण्डपाणी मंदिरात शके १६१७ सन् १६९५ चा बसलेला चतुर्भुज दक्षिणामूर्ती आहे. विशेष म्हणजे याच्याजवळ दोन हात असलेली एक स्त्री उभी आहे. (रे.चि.शि. २९) चंद्रकुमार यांच्यामते या वैशिष्ट्याचा उलेख 'तेवरम्' (नायन्मार चे भक्तिवाङ्मय) मध्ये आहे.
या प्रतिमेवर शके १६१७ची नोंद असलेला भोसले राजाचा मराठी लेख ही आहे.
T. Chandra Kumar, Dakshinamurti, A Rase Fusion with Female Deity; Kala I, 1994- 95, fig. 83, pp. 107-11
शिव-सूर्य-अर्धनारी :
दारासुरम् येथील ऐरावतेश्वर मंदिरात सुमारे सन् १२५०चा त्रिमुख अर्धनारीश्वर आहे. मुख्य मस्तकावर मुकुट आणि कपाळावर तिसरा डोळा आहे. आजुबाजूच्या डोक्यावर जटाजूट आहे. हात आठ आहेत. वरच्या दोन हातांत अक्षमाला, व पाश, त्याच्या खालील जोडीत खट्वांग आणि अभय, त्याच्या खाली गदा व दंड आणि साधारण हातांत पद्म व कपाल आहे. नेसूचे वस्त्र उजवीकडे फक्त मांडीपर्यंत पण डावीकडे ते गुडघ्यापर्यंत पोचलेले आहे.
त्रिमुख सूर्य चोल कलेत (१२वे शतक) बराच दिसतो. सत्यमूर्ती यांच्यामते शिवपुराण शिवमंजरीत सूर्यमंडळात अर्धनारीश्वर, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या समावेशाचा उल्लेख आहे.
T. Satyamurty, A Rase Sculpture of Siva-Surya Ardhanari, Kala VI 1999-2000 p. 23 ff.
[05/08, 1:55 pm] Swapnil Jirage: शिव
१५७
नाण्यांवर दिसणारे दुसरे शैवप्रतीक म्हणजे स्थल-वृक्ष व त्यासमोर असलेले शिवलिंग हे होय. औदुंबरांचे नाण्यांवर असलेला त्रिशूलपरशु शिवाचेंच प्रतीक होय." वेम, वासुदेव, वगैरे कुषाण राजांच्या नाण्यांवर त्रिशूल-परशूचे एकत्र दर्शन होते (रे.चि. नऊ-४). मात्र समकालीन पाषाण प्रतिमेत अशा प्रकारचा त्रिशूल परशु अजून मिळालेला नाही. दक्षिण भारतांत शिवाचे हातांत फक्त परशू आढळतो. त्रिशूल कचित असतो. औदुंबरांच्याच नाण्यांवर शिवाचे अन्य प्रतीक म्हणजे देवायतन किंवा मंदिर दिसते.
मातीच्या काही ठशांवर देखील शैवप्रतीके आढळतात. काही नमुन्यांवर वृक्षांच्यामधे शिवलिंग (पादपेश्वर, आम्रातकेश्वर वगैरे नावांचे ठसे) आणि मोठें वाशिंड असलेले (ककुद्मान) बैल अंकित आहेत. आरामिकेश्वर असे नांव असल्या एका गुप्तकालीन ठश्यावर त्रिशूल-परशु, मंगलघट, शक्ती आणि शिवलिंग दिसतें. भीटा (अलाहाबाद) वेधून मिळालेल्या शैव ठश्यावर नंदीपद चिन्ह पर्वतांवर ठेवलेल्या चेंडूप्रमाणें दिसणारे शिवलिंग, " अर्धचंद्राने शोभित वृष, धनुष्यबाण", वगैरे काही निराळी शैवप्रतीकें आढळतात. राजघाट (वाराणसी) येथून प्राप्त झालेल्या ठश्यांवर त्रिशूल-परशूसह यूप ही मिळतो." यूप किंवा यूपस्तंभ हे यज्ञांचे प्रतीक आहे. (उदाहरणार्थ रे. चि. बावीस-४).
वरील पैकी कित्येक प्रतीकें गुप्तोप्तर कालांतही शिवाशी आपला संबंध टिकवून राहिली.
शिवप्रतिमा :
अर्थशास्त्र आणि पतञ्जलीच्या आधारावर शिवमूर्तीची प्राचीनता मौर्यकाळांपर्यंत नेता येते. अश्वत्थाम्यानें शिवाचा 'श्वेतविग्रह' निर्माण केला होता व त्याची होम, वगैरे करून पूजा केली होती अशी नोंद महाभारतात मिळते." येथे असे ही सांगितले आहे की अश्वत्थाम्याचे पूर्वजन्मांत शिवाच्या अर्चेचे पूजन केले होते, व नरनारायणांनी लिंग-पूजा करून शिवाची आराधना केली होती. या प्रकारे अर्चापूजनांपेक्षा लिंगपूजनांचे श्रेष्ठत्व स्वीकारण्यांत आले आहे.
भीटा (अलाहाबाद) येथून उत्तर मौर्यकालीन अभिलेख असलेले एक चतुर्मुख शिवलिंग मिळाले आहे. त्याच्या वरच्या भागांवर द्विभुज शिवाची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). अभिलेखाने हे उघड होते की या लिंगांची प्रतिष्ठा पूजेकरिताच केली होती. हा अलंकरणाचा नमूना नव्हता. उत्तर भारतांतील शिवप्रतिमेत हे लिंग व या वरील 'आनाभि' प्रतिमा सर्वांत जुन्या आहेत. भीटा येथूनच प्राप्त झालेल्या एका अन्य प्रतिमेची चर्चा देखील येथे आवश्यक आहे, कारण तिच्या एका भागाचे शिवमूर्तीशी बरेच साम्य आहे (चित्र ४४-४७). ही संपूर्ण प्रतिमा 'सर्वतोभद्र' पद्धतीची असून हिच्या एकाबाजूला मुगुट घातलेली व कलश घेतलेली द्विभुज प्रतिमा आहे. (चित्र-४४) हिच्या आजुबाजूच्या कडेला वर मानवमुख व खाली वराह आणि सिंह कोरलेले आहेत (चित्रे-४७,४६).
पाठीकडे असलेल्या अन्य मानवमूर्तीचा प्रस्तुत प्रसंगाशी संबंध आहे. ही प्रतिमा द्विभुज असून स्थूल बांध्याची आहे (चित्र-४५). हिनें मनगटातील कड्या व्यतिरिक्त कोणताही दागिना घातलेला नाही, केसमात्र पाठीकडे वळविले आहेत. उजवा हात देवत्वाचे चिन्ह अशा अभय मुद्रेत उचललेला आहे. डाव्यांत कदाचित कलश होता पण तो आतां खंडित आहे. नेसूच्या धोतरांशिवाय कोणतेही वस्त्र दिसत नाही. ही सर्वतोभद्र प्रतिमा उघडच यक्षप्रतिमांच्या आधारांवर पडविली गेली आहे, पण हे यक्ष मात्र नव्हेत. येथें शिव आणि विष्णूचे वराह व सिंह रूपांबरोबर अंकन असण्यांची शक्यता आहे.
दक्षिण भारतांतील प्राचीनतम शिवप्रतिमा तामिळनाडू राज्यातील रेणुगुंठा नांवाच्या गावांजवळ असलेल्या
शिव : भाग ३ (लिंगे) (सुरुवातीपासून सुमारे सहाव्या शतकांपर्यंत)
प्रास्ताविक
ज्योतिर्लिंगे
स्वयंभूलिंगें
लिंगाचे निर्माण व सामान्यस्वरूप
शिवलिंगाचे प्रकार
अष्टोत्तरशत लिंगें
सहस्रलिंगें
धारालिंगें
मुखलिंगें
गुप्त काळापर्यंतची उत्तरभारतीय मुखलिंगें
मुख
मुख आणि लिंगाचे संयोजन
एक किंवा दोन मुखाची लिंगें
गुप्त मुखलिंगाची वैशिष्ट्ये
त्रिमुखलिंग
चतुर्मुखलिंग
मध्यकालीन चतुर्मुखलिंगें
पञ्चमुख किंवा पंचास्यलिंगें
मर्तिलिंग किंवा विग्रहलिंग
नांद व चौमा येथील शिवलिंगें
सर्वतोभद्रलिंगें
यंत्रलिंगें
स्थाणुलिंगें
लिंगपञ्चक
शिवलिंग असलेली काहीं शिल्पें
शिव : भाग ३ (लिंगे)
(सुरुवातीपासून सुमारे सहाव्या शतकापर्यंत)
प्रास्ताविक :
लिंग पूजनांचे धागेदोरे एकीकडे सिंधुसभ्यतेपर्यंत पोचतात व दुसरीकडे आजपर्यंत ते आपल्या येथे अव्याहत चालू आहे. शिवाची लिंगपूजा सहजासहजी भारतीय समाजात प्रतिष्ठापित झालेली नाही, तिला येथें दांडग्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. वेद काळांतील शिश्नदेवांची चर्चा मागे झालीच आहे. पौराणिक वाङ्मयात हा विरोधी सूर ऐकू येणारी ठळक आख्याने खालील आहेत-
१) ब्रह्मदेवाच्या यज्ञांत भिक्षाटनांकरिता शंकरांचे जाणे व ब्राह्मणांकडून त्याची निंदा.'
२) उन्मत्त वेशांत शंकरांचे ब्राह्मणाच्या वसतिस्थानांवर जाणें व त्यावर ब्राह्मणांचे लाथा, बुक्या, वगैरेंनी आक्रमण.
३) दारुवनांत शंकराची लिंगच्युती व त्याला पौरुषहीन होण्यांविषयीं शाप. हे आख्यान बरेच प्रचलित असावे, कारण अनेक पुराणांत तर त्याचा उल्लेख आहेच, पण मध्यकालीन कलेत देखील त्याचे अंकन झाले आहे.'
४) भृगूचा शंकराला शाप.
-
पूर्व इतिहासांकडे बोट दाखविणाऱ्या या कथा बहुतेक आपल्या उत्तरभागांत लिंगपूजेच्या प्रतिष्ठेचे वर्णन करतात. अर्थातच आपण मागे उल्लेखिलेल्या महाविलयन पद्धतीचे हे प्रमाण होय. उदाहरणार्थ पद्मपुराणांत येणाऱ्या दारुवनांसंबंधी आख्यानांत एकीकडे सावित्रीच्या शापाने शंकराचे लिंग पडल्याचे सांगितले आहे, तर तेथेंच गायत्रीचा वर त्याच्या (पतित लिंगाच्या) पूजनाची प्रतिष्ठा ही करीत आहे." हे आख्यान कूर्मपुराणांत विस्ताराने दिले आहे तेथे लिंगोत्पाटनांविषयी सांगून झाल्यानंतर ब्रह्मदेवांकडून आग्रहपुरस्सर लिंग पूजेची स्थापना केली गेली आहे आणि भगवान् ईशाच्या लिंगाची पूजा वैदिक मंत्रानेही करावी असें सांगितले आहे.' याप्रमाणें जरी शैवमत आणि लिंगपुजेचे एक रूप वैदिक संप्रदायाने स्वीकारलें तरी शैवांच्या त्या उपशाखा शेवटपर्यंत वेदबाह्यच समजल्या गेल्या ज्यांचे रीतिरिवाज आर्य सभ्यतेच्या अगदीब प्रतिकूल होते. एवढेच नव्हें तर काही ठिकाणीं स्वतः शंकराच्या तोंडूनच त्यांना 'असेव्य' असे सांगितले गेले.'
लिंगपूजनांच्या स्थापने बरोबरच लिंगोत्पत्ती संबंधी कथा ही रूढ झाल्या, त्यापैकी काहीं खाली देत आहे :
क) लिंगोद्भवाची मार्गे दिलेली कथा व त्यामुळे लिंगाचे श्रेष्ठत्व आणि लिंगार्चेचा आरंभ."
१४) किरात
अर्जुनाने पाशुपतास्त्र मिळविण्याकरितां शंकराची आराधना केली. त्याच्या शौर्याची परीक्षा पाहण्यांकरिता शंकरानें किराताचा वेष घेऊन डुकराच्या शिकारीच्या निमित्ताने त्याच्च्याशी युद्ध केले व शेवटी प्रसन्न होऊन त्याला पाशुपतास्त्र दिले. या कथेच्या पार्श्वभूमीवर शंकराची किरातमूर्ती घडवितात. शंकराची स्थानक स्थिती आणि मृग, परशू, धनुष्य आणि बाण या मूर्तीची मुख्य लक्षणे होत. जवळ अर्जुन ही असावयास हवा.
१५) रावणानुग्रहमूर्ती"
दक्षिणेत या प्रकाराची काहीं सुरेख उदाहरणें आढळतात. वेरूळ येथें तीन तोंडी व सहामुखीं रावण दिसतो, त्याच्या हाता व तोंडाची संख्याही वाढली असून त्याच्या डोक्यावर असलेल्या कैलासाची भव्यता सुबकपणें दाखविली आहे.
१६) गंगाधरमूर्ती
भगीरथांनें दीर्घ प्रयत्न करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारांकरितां स्वर्गातून गंगेला आणण्याचा उपक्रम केला व तिचा ओघ सर्व प्रथम शंकरानें आपल्या मस्तकांवर सावरला अशी गंगावतरणाची कथा आहे. याच पार्श्वभूमीवर गंगाधरमूर्ती घडविली जाते. गंगावतारणांची भव्य दृश्यें भारतीय कलेंत सापडतात, त्याचप्रमाणें एकट्या मूर्तीतही शिवाच्या डोक्यावर आलेली किंवा हातांत घेतलेली गंगा दिसते.
१७) दक्षिणामूर्ती (र.चि. पंचवीस, १७)
काहींच्या मते योग, कला, संगीत व इतर भौतिक शास्त्रे यांचा उपदेश देत असताना शंकराचें तोंड दक्षिण दिशेकडे होते. त्याचे ते रूप दक्षिणामूर्ती म्हणून प्रसिद्ध झाले. जसा नाचणारा शंकर हा आनंदाचा उद्रेक करणारा आहे तसा दक्षिणामूर्ती शांती देणारा आहे. श्रीमद्रशंकराचार्यांनी इतरांबरोबर दक्षिणांमूर्तीचेही बरेंच स्तवन केले आहे.
दक्षिणांमूर्तीचे योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान असे चार भेद कल्पिलें आहेत. साधारणपणें मंदिरांतून व्याख्यान दक्षिणामूर्तीच्या प्रतिमा जास्त असतात. बहुतेक वैष्णव आणि शैव मंदिरांच्या दक्षिणेंकडील भिंतीवर दक्षिणामूर्ती आढळतो. वृक्षांखाली अर्धपर्यकासनांत बसलेला हा देव चतुर्भुज असतो. काही ठिकाणी याचा लोंबणारा पाय अपस्मार पुरुषांच्या पाठींवर असतो, सामान्य उजवा हात ज्ञानमुद्रेत असून डावा पुस्तकांसह वरद मुद्रेत असतो. मागच्या हातांत अक्षमाळा, सर्प, अग्नि, कमल किंवा नीलोत्पल असतें. त्याच्या इतर वस्तु म्हणजे व्याघ्रांबर, यज्ञोपवीत, रुद्राक्षमाला, जटाजूट, कुंडले, वगैरे होत. दक्षिणामूर्ती बरोबर चार किंवा सात शिष्य असतात. त्याच्या आसनांखाली दोन हरणें त्याचे व्याख्यान ऐकत असतात. व्याख्यान आणि ज्ञानमूर्तीत फारसा फरक नाही, फक्त मागच्या उजव्या हातात अक्षमाला आणि डाव्यांत उत्पल असते.
योग दक्षिणामूर्ती बहुधा योगासनांत दिसतो किंवा त्यानें एकच मांडी अर्धवट घातलेली दिसते, पण दोन्हीं प्रकारांत कंबर व पाय योगपट्टानें आवळलेले असतात.
२२०
वीणा दक्षिणामूर्ती साधारणपणें व्याख्यान मूर्ती प्रमाणेच असतो पण त्याच्या हातांत वीणा असते.
१८) कल्याणसुंदरमूर्ती
शिव-पार्वती विवाह मूर्तीचा दक्षिणेंत चांगलाच प्रचार होता. वेरूळ आणि घारापुरीच्या लेण्यांपासून ही मूर्ती दिस लागते व शास्त्रांतही हिला घडविण्याविषयी बरीच बारीक सारीक माहिती मिळतें. इकडील विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणाव पार्वतीचे कन्यादान ओतण्यांकरिता झारी घेतलेला विष्णू व लक्ष्मी पार्वतीचे बाजूला उर्भे असतात. लग्नांला आलेले देख तर खूपच असतात.
१९) अर्धनारीश्वर
शिव-पार्वतीच्या या संयुक्त रूपाची आपण मागे बरीच चर्चा केली आहे. दक्षिणेंतील प्रतिमाबद्दल खालील मुद्दे लक्षांत घेतले पाहिजेत -
१) महाबलीपुरम् येथील धर्मराज रथांत अर्धनारीश्वरांचे सुरुवातीचे रूप दिसते. या व अशा प्रकारच्या इल समकालीन प्रतिमांत शिवाचे दोन व पार्वतीचा एक असें एकूण तीनच हात असतात.
२) उत्तर पल्लव काळांत अर्धनारीश्वर नंदीवर बसलेला दिसतो, पण पुढें जवळ उभा असलेल्या बैलावर तो एक हाथ ठेऊन उभा असतो.
३) दक्षिण भारतांत त्याला ऊर्ध्वलिंगावस्थेत दाखवीत नाहीत.
२०) हरीहर
उत्तरेंप्रमाणेंच दक्षिणेंत ही हर्यर्ध या नांवाने ही प्रतिमा आढळतें.
आतांपर्यंत दक्षिणभारतीय परंपरेतील शैव शास्त्रांत वर्णन केलेल्या काही महत्त्वाच्या मूर्तीचे वर्णन झाले. आता त्या सीमेच्या बाहेरील पण अस्तित्वांत असलेल्या निवडक प्रतिमांची चर्चा करून या विषयाची रजा घेऊ.
घारापुरी येथील त्रिमूर्ती किंवा महादेव
फक्त तीन तोंडे असलेली ही आवक्ष प्रतिमा ब्रह्मा, विष्णू व महेशाची संयुक्त अशी त्रिमूर्ती असावी असे मत प्रधान मांडले गेले होते. श्री. गोपीनाथराव यांनी तिला 'महेशमूर्ति' असे नांव दिले. पुढे डॉ. स्टेला क्रमरिश यांनी शंकराच्या ता बीच प्रखांना वामदेव, तत्पुरुष आणि अघोर यानांवाने ओळखसे नांव दिले. पुढे डॉ. स्टेला क्रमरिश यांनी शंबविले की येथे शिवांचे सौम्य आणि उग्र रूप व त्याबरोबरच त्याची शक्ती म्हणजे उमेचेही रूप अंकित आहे. क्रेमरिशबाईच्या विवेचनाचा आधार विष्णुधर्मोत्तरपुराण आहे.
परळ येथील सप्तमूर्ती शिव
द्या विशाल प्रतिमेचे प्रतिरूप मुंबईच्या संग्रहालयांत पाहता येते. येथे शंकराची सहा अन्य रूपें मूळ प्रतिमेच्या गर व खांद्यातून उद्भूत होतांना दाखविली आहेत.
२०९
नटराज, सोबत गंगा व गौरी :
बंगालमध्ये मिळालेल्या अशा प्रकारच्या दोन प्रतिमा आपल्या माहितीत आहेत.
१ बल्लाळवाडी, बांगलादेश येथून मिळालेला सुमारे १०-११ व्या शतकातील दशभुज नटराज तूर्त ढाका संग्रहालयांत आहे. हातांत दंड, त्रिशूल, वज्र, ढाल, खड्डांग, सर्प, भिक्षज्ञपात्र, वगैरे दिसते. आजुबाजूला उजवीकडे मकरावर गंगा व डावीकडे सिंहावर गौरी / पार्वती उभ्या आहेत. शिवाय इतर किरकोळ आकृत्या ही दिसतात (रे.चि.शि. २५).
C. Sivaramamurti, Nataraja, fig 172 р. 300
२) रानीहाटी (ढाका) बांगलादेश (तूर्त ढाकासंग्रहालय) येथून नंदीवर नाचणारी वीणा घेतलेल्या नटराजाची बारा हाती प्रतिमा समोर आली आहे. या समकालीन प्रतिमेत शिवाच्या साधारण दोन हातांत वीणा, वरच्या दोन हातांत टाळी, इतर दोन हातांत मानवाचे मुख असलेला लांब सर्प, आणि उरलेल्या हातांत वर, अक्षमाला, त्रिशूळ, डमरू, घट आहेत. गंगा आणि गौरी वरीलप्रमाणे पण विशेष म्हणजे गंगेच्या डोक्यावर सर्पफणा आहे व शिवाबरोबर नंदीही नाचत आहे. शंकराच्या हातांतील सर्प मनुष्याच्या तोंडाचा आहे त्याचप्रमाणे पृष्ठशिळेच्या अगदी वरच्या टोकावर छोटासा सिंहही दिसतो. यावरून उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये आढळणारे शंकर आणि सिंह यांचे सान्निध्य बंगालपर्यंत गेलेले दिसते. (रे.चि.शि. २६)
C. Sivaramamurti Nataraja, Fig. 174, p. 301
नटराज सोबत गंगा व यमुना :
मनियारी (नौगाव) बांगलादेश येथून मिळालेला (तूर्त नरेंद्र रिसर्च संग्रहालय राजशाही, बांगलादेश) बारा हाताचा, बैलावर नाचणारा, समकालीन वीणाधर नटराज आपल्या हातांत वरीलप्रमाणे वीणा, टाळी, नमस्कार मुद्रेत असलेला अर्ध मानव लांब सर्प, याशिवाय डमरू, अभय, अक्षमाला, कलश, त्रिशूल आणि कपाल (?) घेऊन आहे. उजवीकडे सर्पफणा असलेली मकरारूढ गंगा आणि डावीकडे कासवावर उभी अशीच यमुना ही दिसतात.
या शिल्पावर छोटासा लेख आहे. श्री चतुः समायाः
G. Bhattacharya, EBHJI, Dhaka, pl. 26.1,2 p. 282-83
महेशमूर्ती :
अखनूर, काश्मीर येथून प्राप्त झालेली आठव्या शतकातील त्रिमुख शंकराची प्रतिमा जरी बरीच खंडित असली तरी उजवीकडील अघोर मुखाच्या अंकनामुळे आगळ्या महत्त्वाची आहे. अघोर मुखाच्या डोक्यावर उभ्या असलेल्या जटांबरोबरच तेथे अग्नीच्या ज्वाळामध्ये फक्त एक उभा हात दिसतो. कल्पना अशी की हे अंकन दक्षप्रजापतीच्या यज्ञाकुंडात आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीने स्वतःला जाळून घेतल्याच्या घटनेचा हा संकेत असावा. कारण या घटनेनंतरच शंकराने अघोररूप घेऊन यज्ञाचा विध्वंस केला होता. (रे.चि.शि. २७)
Y.B. Singh, Some reflections on an Icon of Lord Siva from Akhnur, BMA., 43-44, 1989, pl. I-IV, p 42
२१०
सदाशिव :
उत्तरकामिकागम आणि गरुडपुराणाप्रमाणे सदाशिवाला पाच तोंडे आणि दहा हात आहेत. उजवीकडील हातात अभय, वर शक्ती, त्रिशूळ आणि खट्ठांग असते. डावीकडे सर्प, अक्षमाला, डमरू, नीलोत्पल व बीजपूरक अशा वस्त् दिसतात. उत्तर बंगालमध्ये सदाशिव फार लोकप्रिय होता. आतांपर्यंत तिकडून तेरापेक्षा सदाशिव प्रतिमा आढळल्या आहेत. सेन राजाच्या ताम्रशासनपटावर राजमुद्रेच्या सदाशिव दिसतो. नरेन्द्र रिसर्च सोसायटी संग्रहालय, राजगारी, बांगलादेश येथील एका सदाशिवाच्या आजुबाजूला गंगा व यमुना उभ्या आहेत.
Gaurishankar De, 'Sadasiva in Bengal Sculptures Kala 6, 1999-2000 pp. 71-73
माधुरी किंवा मध्यभारतीय धारा :
इसवीसन आरंभ होण्यापूर्वीपासूनच मथुरेंत शैवधर्माचे केंद्र होते. हरिवंशात स्पष्ट विधान आहे कीं यादवांनी मथुरा सोडून द्वारकेकडे जातांना पिनाकिन् किंवा शंकराचे पूजन केले होते. मथुरेच्या प्राचीन शिवलिंगात गोकर्णेश्वर, भूतेश्वर, रंगेश्वर आणि पिप्पलेश्वर यांची गणना होते आणि हे देव नगराच्या उत्तरी, पश्चिमी आणि दक्षिणी सीमेचे 'क्षेत्रपाल' समजले जातात. याचे विस्तृत वर्णन पद्म, वराह, वगैरे पुराणात मिळते. ५
जेव्हां पश्चिमेकडून आलेल्या व तिकडील शैवमताने अभिभूत झालेल्या कुषाणांनी मथुरेची आपल्या राज्याचे एक महत्त्वपूर्ण नगर म्हणून निवड केली तेव्हांपासून शैवांच्या या जुन्या केंद्राची अधिक उन्नती होणे क्रमप्राप्त होते. यांचे सर्वांत मोठे प्रमाण म्हणजे मथुरेच्या कलेत मिळणाऱ्या लहान मोठ्या शैव प्रतिमा होत, ज्यांचा मागील पृष्ठांत भरपूर उपयोग केला गेला आहे.
गुप्तकाळांतही मथुरेचे तेच स्थान टिकले होते. नवीन मंदिरे बांधली जात होती व त्यांत शिवप्रतिमांची निरनिराळे रूपें प्रतिष्ठापित केली जात होती. हे विधान गुप्तकालीन अभिलेख व प्रतिमा याने पुष्ट होते. उदाहरणार्थ रंगेश्वराजवळ मिळालेला चंद्रगुप्त विक्रमादित्याचा लेख पहा ज्यांत कपिलेश्वर आणि उपमितेश्वराच्या स्थापनेचा उल्लेख आहे."
भरतपूर आणि नांद येथून मिळालेली शिवलिंगे माधुरी धारेचा राजस्थानांपर्यंत पसरलेला प्रभाव सूचित करतात. रंगमहालचे मृफलक, अहिच्छत्रेच्या मृण्मूर्ती आणि फलक, भीतरगांव (कानपूर) चे इष्टिका फलक, बस्ती (उत्तरप्रदेशांचे पूर्वी टोक) येथून मिळालेली व तूर्त लखनऊ संग्रहालयांत असलेली शिव पार्वतीची मृद्धतिमा (सं.सं. ७१-२८) त्याच प्रदेशांतून प्राप्त झालेली गणेश, कार्तिकयासह पार्वतीची विशाल प्रतिमा, वगैरे वस्तू गुप्तकालीन शैवमताची व्यापकता सिद्ध करतात. सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत प्रदर्शित असलेल्या गुप्तकालीन सर्वतोभद्र प्रतिमेत लिंगांज पुष्पदाम, अर्धनारीश्वरांचे ऊर्ध्वलिंग, वगैरे मथुरेची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात.
माधुरी धारेच्या शिवमूर्ती बारकाईने तपासल्यास त्यासंबंधी खालील मुद्दे नमूद करता येतात-
१) कुषाणकालीन शिव बहुतेक द्विभुज असतो व त्याचा उजवा हात अभयमुद्रेत दिसतो.
२) येथे एकमुखी शिवाच्याच प्रतिमा जास्त आहेत.
३) तिसरा डोळा दाखविण्यांची प्रथा बऱ्याच ठिकाणर्णी दिसते. कुषाण काळात त्याला आडवा व गुप्तकाळात उभा दाखवितात.
२११
४) साधारणपणे शंकराच्या मस्तकांवर जटाभार आहे, पण त्याचे केस मागे सारलेले असणें किंवा पागोटे घातलेले रूपही अज्ञात नव्हते.
५) बैलास शिवाचे वाहन म्हणून मान्यता होती, पण काही ठिकाणी त्या ऐवजी सिंहही दिसतो.
६) एक मुख आणि दोन हातांबरोबर एकाच प्रतिमेत शंकराला 'चतुर्यूह' रूपांत दाखविण्याची पद्धत कुषाण काळांत अस्तित्वात आली (पहा मूसानगर शिव) व गुप्तकाळांत ही रूढ होती (रंगमहालाचा मृफलक).
७) माधुरी धारेंत शिवाच्या आयुधांचे अंकन मात्र फारच सीमित आहे. पाषाण प्रतिमांत सुरुवातीला त्रिशूल देखील दिसत नाही. फक्त अक्षमाला आणि घट दिसतात. यांचे हे कारण असू शकते की येथील शिल्प परंपरेंत देव प्रतिमांचा साधारण उजवा हात अभयमुद्रेतच दाखविण्याची पद्धत रूढ असल्यामुळे तेथें इतर आयुध देणें तितकेसे सोपे नव्हते, व त्याबरोबरच शंकराची बहुभुजमूर्ती करण्याची चाल नसल्यामुळे आयुधांकरिता फक्त एक म्हणजे डावा हातच मोकळा मिळत असे.
८) गुप्तकाळांत थोडा बदल सुरू झाला. आता शंकराचे दोन किंवा चार हात दिसू लागले व उतरत्या गुप्तकाळांत राजस्थानच्या कलाकारांनी तेथे त्रिशूल, साप, वगैरेही देणें सुरू केले. " त्याबरोबरच डोक्यावरील चंद्रकोर, नरमुंड नेसूचे व्याघ्रांबर, इत्यादि गोष्टी दिसू लागल्या, व आयुधपुरुष म्हणून त्रिशूल पुरुष ही जन्मांस आला.
९) येथे वायव्य धारेपेक्षा शिवाची रूपें मात्र जास्त दिसतात. अर्धनारीश्वर, लकुलीश, शिव-पार्वती, चतुर्व्यह शिव, वगैरे तर कुषाण काळांतच चालू होती, पण अजएकपाद, रावणानुग्रह, नटेश वगैरे कित्येक गुप्तकालांपासून आली.
१०) दागिन्यांत जानव्याचा विकास पाहण्यांसारखा आहे. कुषाण नाण्यांवर त्यांच्यात मणी आणि पदके दिसतात. पाषाण प्रतिमांत त्याचे मूल रूप दिसते पण गुप्त आणि गुप्तोत्तर काळांत ते मोत्याच्या सराव्यारूपानें मुक्तायज्ञोपवीत म्हणून मिरवते."
११) गुप्तकाळांत रत्नखचित भालपट्ट, एकावली, अगंद आणि कंकणें, कटिसूत्र, वगैरे नवे दागिनेही दिसू लागतात.
दक्षिण भारतांतील शिवप्रतिमा
दक्षिण भारतीय धारा :
वायव्य, उत्तरी किंवा नेपाळी धारा व मध्य भारतीय अथवा माथुरी धारेच्या शिवप्रतिमांचे आतापर्यंत विवेचन झाले. पण अजून आपण नर्मदा ओलांडून कृष्णा कावेरीकडे गेलेली नाही. त्याशिवाय भारतीय शैवप्रतिमाचा हा धावता आढावा पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
उत्तरेपेक्षा दक्षिण भारतीय परंपरा काही बाबतीत सैद्धांतिक रीतीने एक असून देखील भिन्न आहेत. हे भिन्नत्व देशकाल परत्वें आहे. त्यामुळे शिव प्रतिमांचे असे अनेक प्रकार आहेत जे दक्षिणेतच उगवले व तिकडेच राहिले. उत्तर भारताप्रमाणें काही प्रकार सुरुवातीला दिसतात, पण पुढें त्यांचे अस्तित्व टिकून राहिले नाही, काही मात्र अखंड रूपानें चालत आले आहेत.
वीणा दक्षिणामूर्ती साधारणपणें व्याख्यान मूर्ती प्रमाणेच असतो पण त्याच्या हातांत वीणा असते.
१८) कल्याणसुंदरमूर्ती
शिव-पार्वती विवाह मूर्तीचा दक्षिणेंत चांगलाच प्रचार होता. वेरूळ आणि घारापुरीच्या लेण्यांपासून ही मूर्ती दिस लागते व शास्त्रांतही हिला घडविण्याविषयी बरीच बारीक सारीक माहिती मिळतें. इकडील विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणाव पार्वतीचे कन्यादान ओतण्यांकरिता झारी घेतलेला विष्णू व लक्ष्मी पार्वतीचे बाजूला उर्भे असतात. लग्नांला आलेले देख तर खूपच असतात.
१९) अर्धनारीश्वर
शिव-पार्वतीच्या या संयुक्त रूपाची आपण मागे बरीच चर्चा केली आहे. दक्षिणेंतील प्रतिमाबद्दल खालील मुद्दे लक्षांत घेतले पाहिजेत -
१) महाबलीपुरम् येथील धर्मराज रथांत अर्धनारीश्वरांचे सुरुवातीचे रूप दिसते. या व अशा प्रकारच्या इल समकालीन प्रतिमांत शिवाचे दोन व पार्वतीचा एक असें एकूण तीनच हात असतात.
२) उत्तर पल्लव काळांत अर्धनारीश्वर नंदीवर बसलेला दिसतो, पण पुढें जवळ उभा असलेल्या बैलावर तो एक हाथ ठेऊन उभा असतो.
३) दक्षिण भारतांत त्याला ऊर्ध्वलिंगावस्थेत दाखवीत नाहीत.
२०) हरीहर
उत्तरेंप्रमाणेंच दक्षिणेंत ही हर्यर्ध या नांवाने ही प्रतिमा आढळतें.
आतांपर्यंत दक्षिणभारतीय परंपरेतील शैव शास्त्रांत वर्णन केलेल्या काही महत्त्वाच्या मूर्तीचे वर्णन झाले. आता त्या सीमेच्या बाहेरील पण अस्तित्वांत असलेल्या निवडक प्रतिमांची चर्चा करून या विषयाची रजा घेऊ.
घारापुरी येथील त्रिमूर्ती किंवा महादेव
फक्त तीन तोंडे असलेली ही आवक्ष प्रतिमा ब्रह्मा, विष्णू व महेशाची संयुक्त अशी त्रिमूर्ती असावी असे मत प्रधान मांडले गेले होते. श्री. गोपीनाथराव यांनी तिला 'महेशमूर्ति' असे नांव दिले. पुढे डॉ. स्टेला क्रमरिश यांनी शंकराच्या ता बीच प्रखांना वामदेव, तत्पुरुष आणि अघोर यानांवाने ओळखसे नांव दिले. पुढे डॉ. स्टेला क्रमरिश यांनी शंबविले की येथे शिवांचे सौम्य आणि उग्र रूप व त्याबरोबरच त्याची शक्ती म्हणजे उमेचेही रूप अंकित आहे. क्रेमरिशबाईच्या विवेचनाचा आधार विष्णुधर्मोत्तरपुराण आहे.
परळ येथील सप्तमूर्ती शिव
द्या विशाल प्रतिमेचे प्रतिरूप मुंबईच्या संग्रहालयांत पाहता येते. येथे शंकराची सहा अन्य रूपें मूळ प्रतिमेच्या गर व खांद्यातून उद्भूत होतांना दाखविली आहेत.
२०९
नटराज, सोबत गंगा व गौरी :
बंगालमध्ये मिळालेल्या अशा प्रकारच्या दोन प्रतिमा आपल्या माहितीत आहेत.
१ बल्लाळवाडी, बांगलादेश येथून मिळालेला सुमारे १०-११ व्या शतकातील दशभुज नटराज तूर्त ढाका संग्रहालयांत आहे. हातांत दंड, त्रिशूल, वज्र, ढाल, खड्डांग, सर्प, भिक्षज्ञपात्र, वगैरे दिसते. आजुबाजूला उजवीकडे मकरावर गंगा व डावीकडे सिंहावर गौरी / पार्वती उभ्या आहेत. शिवाय इतर किरकोळ आकृत्या ही दिसतात (रे.चि.शि. २५).
C. Sivaramamurti, Nataraja, fig 172 р. 300
२) रानीहाटी (ढाका) बांगलादेश (तूर्त ढाकासंग्रहालय) येथून नंदीवर नाचणारी वीणा घेतलेल्या नटराजाची बारा हाती प्रतिमा समोर आली आहे. या समकालीन प्रतिमेत शिवाच्या साधारण दोन हातांत वीणा, वरच्या दोन हातांत टाळी, इतर दोन हातांत मानवाचे मुख असलेला लांब सर्प, आणि उरलेल्या हातांत वर, अक्षमाला, त्रिशूळ, डमरू, घट आहेत. गंगा आणि गौरी वरीलप्रमाणे पण विशेष म्हणजे गंगेच्या डोक्यावर सर्पफणा आहे व शिवाबरोबर नंदीही नाचत आहे. शंकराच्या हातांतील सर्प मनुष्याच्या तोंडाचा आहे त्याचप्रमाणे पृष्ठशिळेच्या अगदी वरच्या टोकावर छोटासा सिंहही दिसतो. यावरून उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये आढळणारे शंकर आणि सिंह यांचे सान्निध्य बंगालपर्यंत गेलेले दिसते. (रे.चि.शि. २६)
C. Sivaramamurti Nataraja, Fig. 174, p. 301
नटराज सोबत गंगा व यमुना :
मनियारी (नौगाव) बांगलादेश येथून मिळालेला (तूर्त नरेंद्र रिसर्च संग्रहालय राजशाही, बांगलादेश) बारा हाताचा, बैलावर नाचणारा, समकालीन वीणाधर नटराज आपल्या हातांत वरीलप्रमाणे वीणा, टाळी, नमस्कार मुद्रेत असलेला अर्ध मानव लांब सर्प, याशिवाय डमरू, अभय, अक्षमाला, कलश, त्रिशूल आणि कपाल (?) घेऊन आहे. उजवीकडे सर्पफणा असलेली मकरारूढ गंगा आणि डावीकडे कासवावर उभी अशीच यमुना ही दिसतात.
या शिल्पावर छोटासा लेख आहे. श्री चतुः समायाः
G. Bhattacharya, EBHJI, Dhaka, pl. 26.1,2 p. 282-83
महेशमूर्ती :
अखनूर, काश्मीर येथून प्राप्त झालेली आठव्या शतकातील त्रिमुख शंकराची प्रतिमा जरी बरीच खंडित असली तरी उजवीकडील अघोर मुखाच्या अंकनामुळे आगळ्या महत्त्वाची आहे. अघोर मुखाच्या डोक्यावर उभ्या असलेल्या जटांबरोबरच तेथे अग्नीच्या ज्वाळामध्ये फक्त एक उभा हात दिसतो. कल्पना अशी की हे अंकन दक्षप्रजापतीच्या यज्ञाकुंडात आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीने स्वतःला जाळून घेतल्याच्या घटनेचा हा संकेत असावा. कारण या घटनेनंतरच शंकराने अघोररूप घेऊन यज्ञाचा विध्वंस केला होता. (रे.चि.शि. २७)
Y.B. Singh, Some reflections on an Icon of Lord Siva from Akhnur, BMA., 43-44, 1989, pl. I-IV, p 42
२१०
सदाशिव :
उत्तरकामिकागम आणि गरुडपुराणाप्रमाणे सदाशिवाला पाच तोंडे आणि दहा हात आहेत. उजवीकडील हातात अभय, वर शक्ती, त्रिशूळ आणि खट्ठांग असते. डावीकडे सर्प, अक्षमाला, डमरू, नीलोत्पल व बीजपूरक अशा वस्त् दिसतात. उत्तर बंगालमध्ये सदाशिव फार लोकप्रिय होता. आतांपर्यंत तिकडून तेरापेक्षा सदाशिव प्रतिमा आढळल्या आहेत. सेन राजाच्या ताम्रशासनपटावर राजमुद्रेच्या सदाशिव दिसतो. नरेन्द्र रिसर्च सोसायटी संग्रहालय, राजगारी, बांगलादेश येथील एका सदाशिवाच्या आजुबाजूला गंगा व यमुना उभ्या आहेत.
Gaurishankar De, 'Sadasiva in Bengal Sculptures Kala 6, 1999-2000 pp. 71-73
माधुरी किंवा मध्यभारतीय धारा :
इसवीसन आरंभ होण्यापूर्वीपासूनच मथुरेंत शैवधर्माचे केंद्र होते. हरिवंशात स्पष्ट विधान आहे कीं यादवांनी मथुरा सोडून द्वारकेकडे जातांना पिनाकिन् किंवा शंकराचे पूजन केले होते. मथुरेच्या प्राचीन शिवलिंगात गोकर्णेश्वर, भूतेश्वर, रंगेश्वर आणि पिप्पलेश्वर यांची गणना होते आणि हे देव नगराच्या उत्तरी, पश्चिमी आणि दक्षिणी सीमेचे 'क्षेत्रपाल' समजले जातात. याचे विस्तृत वर्णन पद्म, वराह, वगैरे पुराणात मिळते. ५
जेव्हां पश्चिमेकडून आलेल्या व तिकडील शैवमताने अभिभूत झालेल्या कुषाणांनी मथुरेची आपल्या राज्याचे एक महत्त्वपूर्ण नगर म्हणून निवड केली तेव्हांपासून शैवांच्या या जुन्या केंद्राची अधिक उन्नती होणे क्रमप्राप्त होते. यांचे सर्वांत मोठे प्रमाण म्हणजे मथुरेच्या कलेत मिळणाऱ्या लहान मोठ्या शैव प्रतिमा होत, ज्यांचा मागील पृष्ठांत भरपूर उपयोग केला गेला आहे.
गुप्तकाळांतही मथुरेचे तेच स्थान टिकले होते. नवीन मंदिरे बांधली जात होती व त्यांत शिवप्रतिमांची निरनिराळे रूपें प्रतिष्ठापित केली जात होती. हे विधान गुप्तकालीन अभिलेख व प्रतिमा याने पुष्ट होते. उदाहरणार्थ रंगेश्वराजवळ मिळालेला चंद्रगुप्त विक्रमादित्याचा लेख पहा ज्यांत कपिलेश्वर आणि उपमितेश्वराच्या स्थापनेचा उल्लेख आहे."
भरतपूर आणि नांद येथून मिळालेली शिवलिंगे माधुरी धारेचा राजस्थानांपर्यंत पसरलेला प्रभाव सूचित करतात. रंगमहालचे मृफलक, अहिच्छत्रेच्या मृण्मूर्ती आणि फलक, भीतरगांव (कानपूर) चे इष्टिका फलक, बस्ती (उत्तरप्रदेशांचे पूर्वी टोक) येथून मिळालेली व तूर्त लखनऊ संग्रहालयांत असलेली शिव पार्वतीची मृद्धतिमा (सं.सं. ७१-२८) त्याच प्रदेशांतून प्राप्त झालेली गणेश, कार्तिकयासह पार्वतीची विशाल प्रतिमा, वगैरे वस्तू गुप्तकालीन शैवमताची व्यापकता सिद्ध करतात. सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत प्रदर्शित असलेल्या गुप्तकालीन सर्वतोभद्र प्रतिमेत लिंगांज पुष्पदाम, अर्धनारीश्वरांचे ऊर्ध्वलिंग, वगैरे मथुरेची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात.
माधुरी धारेच्या शिवमूर्ती बारकाईने तपासल्यास त्यासंबंधी खालील मुद्दे नमूद करता येतात-
१) कुषाणकालीन शिव बहुतेक द्विभुज असतो व त्याचा उजवा हात अभयमुद्रेत दिसतो.
२) येथे एकमुखी शिवाच्याच प्रतिमा जास्त आहेत.
३) तिसरा डोळा दाखविण्यांची प्रथा बऱ्याच ठिकाणर्णी दिसते. कुषाण काळात त्याला आडवा व गुप्तकाळात उभा दाखवितात.
२११
४) साधारणपणे शंकराच्या मस्तकांवर जटाभार आहे, पण त्याचे केस मागे सारलेले असणें किंवा पागोटे घातलेले रूपही अज्ञात नव्हते.
५) बैलास शिवाचे वाहन म्हणून मान्यता होती, पण काही ठिकाणी त्या ऐवजी सिंहही दिसतो.
६) एक मुख आणि दोन हातांबरोबर एकाच प्रतिमेत शंकराला 'चतुर्यूह' रूपांत दाखविण्याची पद्धत कुषाण काळांत अस्तित्वात आली (पहा मूसानगर शिव) व गुप्तकाळांत ही रूढ होती (रंगमहालाचा मृफलक).
७) माधुरी धारेंत शिवाच्या आयुधांचे अंकन मात्र फारच सीमित आहे. पाषाण प्रतिमांत सुरुवातीला त्रिशूल देखील दिसत नाही. फक्त अक्षमाला आणि घट दिसतात. यांचे हे कारण असू शकते की येथील शिल्प परंपरेंत देव प्रतिमांचा साधारण उजवा हात अभयमुद्रेतच दाखविण्याची पद्धत रूढ असल्यामुळे तेथें इतर आयुध देणें तितकेसे सोपे नव्हते, व त्याबरोबरच शंकराची बहुभुजमूर्ती करण्याची चाल नसल्यामुळे आयुधांकरिता फक्त एक म्हणजे डावा हातच मोकळा मिळत असे.
८) गुप्तकाळांत थोडा बदल सुरू झाला. आता शंकराचे दोन किंवा चार हात दिसू लागले व उतरत्या गुप्तकाळांत राजस्थानच्या कलाकारांनी तेथे त्रिशूल, साप, वगैरेही देणें सुरू केले. " त्याबरोबरच डोक्यावरील चंद्रकोर, नरमुंड नेसूचे व्याघ्रांबर, इत्यादि गोष्टी दिसू लागल्या, व आयुधपुरुष म्हणून त्रिशूल पुरुष ही जन्मांस आला.
९) येथे वायव्य धारेपेक्षा शिवाची रूपें मात्र जास्त दिसतात. अर्धनारीश्वर, लकुलीश, शिव-पार्वती, चतुर्व्यह शिव, वगैरे तर कुषाण काळांतच चालू होती, पण अजएकपाद, रावणानुग्रह, नटेश वगैरे कित्येक गुप्तकालांपासून आली.
१०) दागिन्यांत जानव्याचा विकास पाहण्यांसारखा आहे. कुषाण नाण्यांवर त्यांच्यात मणी आणि पदके दिसतात. पाषाण प्रतिमांत त्याचे मूल रूप दिसते पण गुप्त आणि गुप्तोत्तर काळांत ते मोत्याच्या सराव्यारूपानें मुक्तायज्ञोपवीत म्हणून मिरवते."
११) गुप्तकाळांत रत्नखचित भालपट्ट, एकावली, अगंद आणि कंकणें, कटिसूत्र, वगैरे नवे दागिनेही दिसू लागतात.
दक्षिण भारतांतील शिवप्रतिमा
दक्षिण भारतीय धारा :
वायव्य, उत्तरी किंवा नेपाळी धारा व मध्य भारतीय अथवा माथुरी धारेच्या शिवप्रतिमांचे आतापर्यंत विवेचन झाले. पण अजून आपण नर्मदा ओलांडून कृष्णा कावेरीकडे गेलेली नाही. त्याशिवाय भारतीय शैवप्रतिमाचा हा धावता आढावा पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
उत्तरेपेक्षा दक्षिण भारतीय परंपरा काही बाबतीत सैद्धांतिक रीतीने एक असून देखील भिन्न आहेत. हे भिन्नत्व देशकाल परत्वें आहे. त्यामुळे शिव प्रतिमांचे असे अनेक प्रकार आहेत जे दक्षिणेतच उगवले व तिकडेच राहिले. उत्तर भारताप्रमाणें काही प्रकार सुरुवातीला दिसतात, पण पुढें त्यांचे अस्तित्व टिकून राहिले नाही, काही मात्र अखंड रूपानें चालत आले आहेत.
२१२
धारेत आपण त्रिशूल-परशूचें संयुक्त रूप पाहिले होते. मध्य भारतात ते फारसे दिसत नाही, अपवाद म्हणून काही शिल्गे आहेत. उदाहरणार्थ उतरत्या गुप्तकालातील मंदसोर येथील एका प्रतिमेत तो दिसतो." दक्षिणेत मात्र अगदी सुरुवातीपासून म्हणजे गुड्डीमलम् प्रतिमेपासूनच परशु शंकराच्या हातांत दिसू लागतो." मृगाची गोष्ट अशीच आहे. कुषाण राजांच्या नाण्यांवर तो दिसतो, पण तेथून उडी मारून तो मध्यभारताला वरचेवर ओलांडत एकदम दक्षिणेचा पल्ला गाठतो. तेथे कित्येक शतकांपर्यंत परशू आणि मृगाची जोडी शंकरांबरोबर अविछिन्नरूपाने वावरते.
दक्षिणी शिवाच्या आयुधांत परशू आणि मृगांचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामानाने त्रिशूलाचे गौण आहे. वायव्य
त्याचप्रमाणें गुड्डीमलम् प्रतिमेंत शिवाचे ऊर्ध्वलिंग असलेले व पागोटें घातलेले रूप सुरुवातीला प्रगट तर होते, पण पुढील कलेत त्यांचा विशेष पाठ पुरावा झालेला दिसत नाही.
शैवमताचा व त्याच्या काही पोटभेदांचा उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे जास्त प्रचार झाला. वीर शैव, लिंगायत वगैरे मते दक्षिणेंतच बळावली. उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूला शैव मंदिरे बांधली गेली, पण दक्षिणेतील मंदिर-शिल्पांची भव्यता उत्तरेत आलेली दिसत नाही. शिवाय उत्तरेंतील मंदिर शिल्पें आणि प्रतिमा मुसलमानांच्या आक्रमणांना दक्षिणेंपेक्षा अधिक वेळा व जास्त भयंकर रूपानें बळी पडल्या. त्यामुळे आज तरी उत्तरेपेक्षा दक्षिणेंत शैव प्रतिमांचे प्रकार व संख्या जास्त आहेत.
त्याबरोबरच हे ही लक्षांत ठेवावयास हवे की दक्षिणेतील प्रतिमांचा बहुमुखी विकास पल्लवकाळांपासून म्हणजे सुमारे सहाव्या शतकांपासून होत असतांना दिसतो. त्यापूर्वीची विशेष माहिती आपणांस मिळत नाही. या उलट उत्तरेंत या काळापर्यंत शैव प्रतिमांची स्थिती चांगली विकसित झालेली आपण पाहिलीच आहे.
रुद्र, अकरामुखें, चोवीस हात :
सुमारे ६-७व्या शतकातील ही प्रतिमा एलरुजवळ पेड्डवेगी आंध्रप्रदेश या गावाशी संबद्ध आहे. उंच जटामुकुट, त्रिनेत्र, उपवीत ग्रैवेयकादि अलंकारांनी मंडित या प्रतिमेला अकरामुखें पण चौवीस हात आहेत. हातांमध्ये आयुधे आहेत. आय्. के. शर्मा यांच्यामतें अकरामुखांची संगती एकादश रुद्राशी लागते, पण चौवीस हात म्हटले तर एक तोंड जास्त असावयास हवे. कदाचित देवाच्या डोक्यावर दिसणारा उंच मुकुट हेच अदृष्य असणारे असे बारावे ईशान मुख असावे. (रे.चि.शि. २८).
J.K. Sarma, Palyphalus Rudra from Peddavegi Puratana, 6, Bhopal, 1989, pp. 83-85
दक्षिण भारतांतील प्रमुख शैवमंदिरें" :
शैवप्रतिमा विज्ञानाचे अध्ययन करण्यांकरितां दक्षिण भारतांत इतकी खच्चून सामग्री भरलेली आहे की तिवा सहजासहजी अंदाज लागणे शक्य नाही. दक्षिणेतील एक एक शैव मंदिर म्हणजे या शास्त्राचा प्रत्यक्ष ज्ञानकोष आहे असे म्हटल्यास मुळीच वावगे होणार नाहीं. जिज्ञासूस थोडी कल्पना यावी एवढ्यांकरितां दक्षिणेतील प्रमुख शैव मंदिरांचे कालक्रमानुसार संक्षिप्त टांचण खाली देत आहे.
१) वेरूळची लेणीं (इसवीसनाचे ६-९ वे शतक) - येथील १४, १५, २९, वगैरे क्रमांकांच्या लेण्यांत शिव- तांडवादि प्रतिमा पाहता येतात.
२) बदामी (जुनें वातापिपुर, इसवी सनाचे ६-७ वें शतक) - क्रमांक ३ सारख्या लेण्यांत सुंदर शिवप्रतिमा आढळतात.
२१३
३) घारापुरी (एलिफेंटा, मुंबई, आठव्या शतकांचा उत्तरार्ध) त्रिमूर्ती महादेवाची जगप्रसिद्ध प्रतिमा व अन्य शैव मूर्ती.
४) ऐहोळे (५-७ वें शतक) येथील मंदिरांत सुरुवातीच्या शैवप्रतिमा आढळतात.
५) पंट्टडाकल (६-८ वें शतक) मल्लिकार्जुन आणि विरूपाक्ष मंदिरांत शिवासंबंधी विपुल सामग्री आहे. याशिवाय पापनाथ, गलगनाथ, काशीनाथ, वगैरे शैवमंदिरेंही प्रसिद्ध आहेत.
६) दक्षिणेतील पल्लवकालीन पर्वतशिल्पे पल्लव राजवट सुमारे सन् ५९०-९०० मधे झाली. या काळांतील अर्कोट, त्रिचनापल्ली, मंडगपडू, इत्यादि जागी असलेल्या पर्वत शिल्पांत बऱ्याच शैव प्रतिमा आढळतात. त्याचप्रमाणें मद्रास जवळील महाबलीपुरम् येथील रथ अद्वितीय आहेत. विशेषतः धर्मराजरथ हे तेथील एका शिलालेखांप्रमाणें ईश्वराचे (शिवाचे) मंदिर आहे. यावर कोरलेल्या शिवप्रतिमा मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनें महत्त्वाच्या आहेत.
७) कांचीपुरम् येथील राजसिंहेश्वर मंदिर सन्. ६७४-६९९ च्या दरम्यान राजसिंह (पल्लव) यानें कैलासनाथ या नावाने बांधलेले हे मंदिर फारच विशाल आहे. येथें शैव सामग्री खच्चून भरलेली आहे. लांगहर्स्टच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे मूर्तिविज्ञानांच्या दृष्टिने शैवप्रतिमा, शैवप्रतीकें व शैवकथांचा हा भारतांत सर्वांत मोठा आणि पूर्ण असा खजिना असून शैवमताच्या अभ्यासकांसाठी ज्ञानाची खाण आहे.
८) गुड्डीमलम् मंदिर (नवव्या शतकांची सुरुवात) रेणुगुंठ्याजवळ असलेले हे मंदिर जरी लहान व बरेच अलीकडचे असले तरी येथील लिंग आणि त्यावरील प्रतिमा फारच जुनी (सुमारे इ.पू. पहिलें शतक) असून अतिशय महत्त्वाची आहे. हिचें विस्तृत वर्णन पुढे येणार आहे.
९) बृहदीश्वर मंदिर, तंजावर (सुमारें, सन् १,०००) राजराज चोल यानें बांधलेले हे दुसरें अगडबंब मंदिर होय. साहजिकच येथील शैव सामग्री विस्तृत असणें अपरिहार्य आहे.
१०) चिदंबरम् येथील नटराजांचे मंदिर (सुमारे सन् ११३०) चोलराजा कुलोत्तुंग दुसरा यांच्या वेळी हे मंदिर उभारले गेले, पण पूर्वीपासूनच येथे मंदिरें होतीं. मद्रास कुंभकोणम् लाईनवर असलेल्या या तीर्थांचे, नटराज तीर्थांचे, शैव परंपरेंत फार महत्त्व आहे. शंकरानें येथेंच नृत्याचा आविष्कार केला अशी लोकांत मान्यता आहे. सातव्या शतकांतच या स्थानाला शैव केंद्राचे रूप आले होतें.
येथे एकाम्रेश्वरांचेही प्रसिद्ध मंदिर आहे. यांत शिवाची काही नवीन स्वरूपें पहावयास मिळतात.
११) रामेश्वर मंदिर (सुमारें १७ वें शतक) हे बरेंच अलीकडचे आहे, पण भारतातील विशालतम मंदिरांत यांची प्रामुख्याने गणना होते.
शैवप्रतिमांच्या भांडारांविषयी वरील टांचण अगदीच जुजबी स्वरूपांचे आहे. पण त्यावरून शैव पंथाविषयी या विशाल संपत्तीची थोडीशी कल्पना येईल, उघड आहे कीं प्रस्तुत ग्रंथांत या विपुल सामुग्रीचा परामर्श घेता येणें शक्य नाही, तेव्हा काही महत्त्वाच्या शैवमूर्ती पर्यंतच आपली सीमा बांधावी लागेल.
२१४
दक्षिणेंतील शैवमूर्तीचे वर्गीकरण :
भारतीय मूर्तिशास्त्र
आगमांदि निरनिराळ्या शैव ग्रंथांच्या आधारें श्रीराव यांनी आपल्या ग्रंथांत सौम्य, संहार, अनुग्रह, उग्र वगैरे वर्गात निरनिराळ्या शिव प्रतिमांची चर्चा केली आहे. खाली दिलेल्या तक्त्यावरून श्रीराव यांच्या वर्गीकरणाची कल्पना येईल. अर्थात् प्रत्येक प्रकारांविषयी जास्त माहितीची अपेक्षा असल्यास तोच ग्रंथ पहाणें उपयुक्त ठरेल.
भैरव - ६८ रूपें
P
२
३
४
५
६
७
८
असितांग
रुरू
चंड
क्रोध
उन्मत्त
कपाल
भीषण
संहार
विशालाक्ष
क्रोडदंष्ट्र
प्रलयांतक
पिंगलेक्षण
बटुकनायक
शशिभूषण
भयहर
अतिरिक्तांग
कालाग्नि
प्रियंकर
मार्तंड
जटाधर
भूमिकंप
अभ्ररूप
शंकर
हस्तिचमंबिरधर
सर्वज्ञ
कालाग्नि
मोदकप्रिय
विश्वरूप
नीलकंठ
धरापाल
भूतवेताल
योगीश
त्रिनेत्र
ब्रह्मराक्षस
स्वच्छंद
विरूपाक्ष
विष्णू
कुटिल
विघ्नसंतुष्ट
नानारूपधर
कुलपालक
मंत्रनायक
खेचर
वज्रहस्त
मुंडपाल
रुद्र
सचराचर
महाकाय
कामपाल
पितामह
त्रिपुरांतक
सर्वज्ञ
वरद
सर्वदेवेश
दक्षिण
घोरनाद
मुखर
विशालाक्ष
अस्थिर
योगीश
पर्वतवास
सर्वभूतहृदिस्थित
महारुद्र
दक्षसंस्थित
राव यांच्या वर्गीकरणांचा तक्ता
काहीं इतर रूपें
बटुक भैरव स्वर्णाकर्षणभैरव
शिवप्रतिमा
सौम्यमूर्ती
संहारमूर्ती
उग्रमूर्ती
नृत्तमूर्ती
दक्षिणामूर्ती
लिंगोद्भव
चंद्रशेखर
पाशुपत
सुखासन मूर्ती
अघोर महाकाल
केवल मूर्ती
रौद्रपाशुपत
दशभुज
उमासहितमूर्ती
अघोर
आलिंगनमूर्ती
उमासहितमूर्ती
सोमास्कंद मूर्ती उमामहेश्वर मूर्ती
योग
वीणा
ज्ञान
व्याख्यान
शिवाच्या मृण्मूर्ति :
नाणी व छाप यांचे समालोचन केल्यावर आपण लोककलेकडे वळू, लोककलेचे सोपे, उत्तम व स्वस्त माध्यम म्हणजे माती हे होय. शिवांचे निश्चयात्मक रूपाने अंकन करणाऱ्या मातीच्या कुषाणकालीन किंवा त्यापूर्वीच्या मूर्ती आपल्या माहितीत नाहीत. पण उत्तर कुषाण काळ व गुप्त काळांतील जी सामग्री हातीं आली आहे, तिचे थोडक्यात रूप असे दिसतें.
अ) रंगमहाल (राजस्थान) येथील शिव-पार्वती फलक -
मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें हा फलक फार महत्त्वाचा आहे. येथे चतुर्मुख द्विभुज व महालिंगधारी असा शंकर बैलावर बसलेला दिसतो. यांच्या मुख्य मुखांच्या आजुबाजूला एक एक मुख असून मानेंकडून एक सूर्यचंद्रघारी जटाजूट असलेली द्विभुज पुरुषांची मूर्ती उद्भूत होतांना दिसते. शिवांजवळ हिंदी पद्धतीचा घागरा नेसलेली दर्पणहस्ता पार्वती आहे. आजुबाजूला दोन मानव प्रतिमा दिसतात. हा फलक चौथ्या शतकांतील समजतात.
आ) अजएकपाद फलक
हा फलक देखील रंगमहाल येथूनच मिळालेला असून मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. अजएकपादांचे नांव अकारा रुद्राच्या यादीत आहे. महाभारतकारांच्या सांगण्याप्रमाणें हा रुद्र अहिर्बुध्न्य व कुबेर बरोबर धनांचे रक्षण करीत असतो याचे तोंड बकऱ्याचे असल्यामुळे याची अग्नीशी समानता मानली जाते. या फलकांवर अजाच्या स्थूल शरीराचे संतुलन हत्तीप्रमाणें असलेल्या एक पायांवर खुबीने साधले आहे.
इ) भीटा येथील आसनारूढ शिव-पार्वत' -
एकाच आसनावांवर द्विभुज शिव पायावर पाय ठेऊन तर पार्वती (मस्तकहीन) प्रलंब पादासनांत बसलेली दिसते. आयुधं नाहीत पण शंकराच्या पायाखाली आसनांजवळ पाय दुमडून बसलेला बैल दिसतो.
ई) नेवल (जि. उन्नाव, उत्तरप्रदेश) येथील अर्धनारीश्वर -
हा दिल्लीच्या संग्रहालयांत असलेला अर्धनारीश्वर प्रतिमेंचा वरचा भाग आहे. यात शिवाच्या बाजूला अर्धचंद्र, नरमुंड, फुलांची माळा आणि बेलपान दिसत असून डावीकडे म्हणजे पार्वतीच्या भागाला पुष्पमाला आणि मोहक केशसंभार अवलोकनीय आहे.
3) शिवलीलेचे फलक -
उत्तरप्रदेशांतील अहिच्छत्रेहून मिळालेल्या काही गुप्तकालीन फलकांवर दक्ष-यज्ञ-विध्वंस, गोडपदार्थाकडे लोभी डोळ्यांने पाहणारे शिवगण, वगैरे दृश्ये दिसतात. भीतरगांव (उ.प्र.) येथील इष्टिका-मंदिरांत देखील गणांसह सुखाने बसलेल्या शिव-पार्वतीला दाखविणारा एक फलक आहे.
ऊ) अहिच्छत्रा येथील इतर शिव प्रतिमा
वरील फलकांव्यतिरिक्त अहिच्छत्रेहून खांद्यावर बैलाचे कातडे टाकून भ्रमण करणारा महाभैरव, शिष्यासह बसलेले दक्षिणामूर्ती व शिव-पार्वतीची दोन फारच सुंदर मस्तकें हीं मिळाली आहेत.
शिवाच्या पाषाण प्रतिमा :
नाण्यांवर दिसणारा शंकर व मातीच्या शिवप्रतिमाचा आढावा घेतल्यानंतर आपण आतां पाषाण प्रतिमांचा विचार करू. गुप्तकाळापर्यंत उत्तरभारतांत खालील प्रकारच्या शिवप्रतिमा पाहण्यांत येतात. :क) एकटा शिव
ख) सिंहासह शिव
ग) चतुर्मुख शिव
घ) शिवपार्वती
च) अर्धनारीश्वर
छ) लकुलीश
ज) दक्षिणामूर्ती
झ) रावणानुग्रह मूर्ती
ट) गजासुरवध मूर्ती
ड) भैरव मूर्ती
ढ) भिक्षाटन मूर्ती
त) हरिहर मूर्ती
थ) अष्टमुख शिव
द) द्वादशमुख शिव
या शिवाय इतरही काही प्रकार आढळण्याची शक्यता आहे. पण त्याचा फारसा प्रचार नसल्यामुळे येथें त्यांचा समावेश केलेला नाही.

क) एकटा शिव :
नाणी आणि ठसे यावर एकटा शिव बराच मिळतो, पण तशा प्रकारच्या पाषाण मूर्तीची संख्या मात्र थोडी आहे. शिवाच्या लिंगगत मूर्तीची चर्चा पुढे होणार आहे. स्वतंत्र प्रतिमांकडे वळल्यानंतर प्रथम आपले लक्ष बलिया जिल्ह्यातून (उ.प्र.) मिळालेल्या एका उभ्या द्विभुजप्रतिमेंकडे जाते (चित्र ४८). हिचा उजवा हात वरदमुद्रेत असून डाव्यांत त्रिशूल आहे. नीट सावरलेले केस मधून दुभागले आहेत. उभा त्रिनेत्र, प्रभामंडल आणि सुंदर मुख या आधारांवर ही प्रतिमा प्रारंभिक गुप्तकाळाची वाटते. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका अन्य गुप्तकालीन प्रतिमेंत नेसूचे व्याघ्रांबर स्पष्ट आहे." वाङ्मयांत शिवाच्या व्याघ्रांबरांसंबंधी बरेंच उल्लेख आहेत."अ) लांब अशा जटाऐवजी येथें आखूड कुरळे केस दिसतात. अशा प्रकारच्या शंकराच्या केसांना महाभारतांत 'कृष्णकुंचित मूर्धज किंवा कुंचितमूर्धज' असे म्हटलें असावें.'"
आ) येथें शंकराच्या कपाळावर ग्रीक शासकांप्रमाणें 'डायडेम' बांधलेला दिसतो हाच शिल्परत्नांतील 'ललाटपट्ट' असावा.
इ ) डावीकडे चंद्राची कोर आहे. कुषाण शिव प्रतिमेंत चंद्र असलेलें असें हे एकमेव ज्ञात उदाहरण आहे. हे पश्चिमेचे लोण म्हणता येईल कारण उत्तरकुषाणकालीन नाण्यांवर चंद्रधर शिव दिसतो.
ई) तिसरा नेत्र आडवा नसून उभा आहे. अशा प्रकारचा नेत्र पुढें गुप्तकालांचे वैशिष्ट्य म्हणून गाजलें, पण त्याचा आरंभ उत्तरकुषाण कालांपासूनच झाला होता.
उ ) मुखांवर एकूण भारतीयता कमी असून तेथे भाव-सौंदर्यांचा अभाव वाटतो.
गुप्तकालीन शिवमस्तकांत उल्लेखनीय असे एक लंडन येथे व दुसरें मथुरा संग्रहालयांत ठेवलेले आहे. लंडनच्या नमून्यांवर कुरळ्या आणि लांब अशा बटांच्या पंक्ती दिसतात तर मथुरेच्या मस्तकांचे केस विंचरून मानेकडे नेले आहेत पण जटाभार मात्र दिसत नाही. लंडनच्या शिवमुखाची मुखाकृती जरी सौम्य असली तरी तेथे टोकदार मिशा आहेत.
याच संदर्भात गुप्तकालीन विश्वरूपाच्या प्रभामंडळाच्या बाहेरच्या बाजूला जी रुद्रमुखें आढळतात तिकडेंही एक दृष्टिक्षेप टाकणें आवश्यक आहे." अशा प्रकारच्या लखनऊ येथील प्रतिमेंत रुद्राचे केस 'भ्रमरक' पद्धतीचे आहेत आणि कानांत चक्राकार कुंडलें आहेत. दुसरीत उभ्या तृतीय नेत्रांची भैरवमुखें दिसतात. एकांवर सिंहमुख आहे.
ख) सिंहासन शिव :
शिवांचे वाहन बैल असून त्याची पत्नी पार्वती हिचे वाहन सिंह आहे ही गोष्ट सर्वांच्याच परिचयाची आहे. पण प्रारंभिक काळाच्या खालील प्रतिमांत शिवाबरोबर सिंह आढळतो :१) माट येथून मिळालेली मथुरा संग्रहालयाची मूर्ती. हिचे डोके व उजवा हात खंडित असून याच बाजूला पायांजवळच आखूड पाय व लांबपोट असलेला गण आहे. मूर्तीच्या पृष्ठ भागांवर एक मोठा बसलेला सिंह आहे. माट येथूनच एक सिंहवाहिनी पार्वतीची मूर्ती देखील मिळाली आहे (म.सं.सं. १२.२१४ ए). डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल यांनी वरील प्रतिमेंची शिव म्हणून ओळख दिलेली आहे या संदर्भात हे ही लक्षात ठेवावयांस हवे कीं कुषाण राजे शिवोपासक होते व माट येथे त्यांचे एक मोठे देवकुल होतें, ही शिवप्रतिमा त्या देवकुलात असणें शक्य आहे.
२) काही वर्षांपूर्वी कानपूर जिल्ह्याच्या (उ.प्र.) मूसानगर या गावीं असलेल्या मुक्तादेवी मंदिरांत लेखकाने एक वेदिका स्तंभ पाहिला होता. हा स्तंभ शिवमूर्तीच्या अध्ययनाच्या दृष्टीनें फारच मोलाचा आहे. याच्या फक्त आजुबाजूच्या दोन भागांवरच कोरीव काम असल्याने याला 'कोणस्तंभ' (corner pillar) म्हणावे लागेल. कलेच्या आधारांवर याचा काल इ. सनाचे पहिले शतक हा ठरतो."
स्तंभाच्या दोन्हीं बाजू तीन तीन चौकटीत विभक्त आहेत. उभयबाजूच्या दोन व तीनक्रमांकाच्या प्रेमासक्त जोडपी दाखविली आहेत. पण पहिल्या चौकटीत मात्र शंकराच्या मूर्ती आहेत.
एका बाजूच्या मूर्तीत ऊर्ध्वलिंग शिव अभय मुद्रेत उभा आहे (रे.चि. तेवीस १२) त्याच्या डाव्या हातांत घट आहे. व केस मानेकडे नेले आहेत. शिवाच्या उजवीकडे मालकांकडे वर मान करून पाहणारा सिंह उभा आहे व डाव्या हातांखाली मोठें पोट व आखुड पायाचा एक गण दिसतो. या शिवप्रतिमेत व मथुरा संग्रहालयांतील प्रतिमेत फारच साम्य आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मूसानगरची प्रतिमा ऊर्ध्वलिंग असल्यामुळे निश्चितपणें तिला 'शिव' असें नांव देता येते.
या स्तंभाच्या दुसऱ्या बाजूला असलेली शिवप्रतिमा तर याहीपेक्षा महत्त्वाची आहे. (रे.चि. तेवीस ११) येथे द्विभुज शंकर एका उंच आसनांवर सुखासनांत बसलेला आहे. वर प्रमाणेंच त्याचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्यात घट आहे, ऊध्र्वलिंग देखील दिसते, पण येथे त्याने पागोटे (उष्णीष) व इतर दागिने घातले आहेत. आसनांचे खाली आपले अंग चोरून एक सिंह बसला आहे; पण सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे बसलेल्या शिवाच्या दोन्ही खांद्यातून व मानेकडून असे एकूण तीन पुरुष प्रगट झालेले दिसतात. तिघेही द्विभुज आहेत. आजुबाजूंच्या पुरुषांच्या डोक्यावर पागोटी आहेत पण मधल्यानें मात्र जटाजूट बांधला आहे. काही बटा खांद्यावर विखुरल्या आहेत. उजवीकडील पुरुषांने आपले दोन्ही हात वर केले आहेत पण डावी कडच्याचा उजवा हात वर असून डावा मात्र त्याच खांद्याला स्पर्श करीत आहे. मधल्या पुरुषाचेही दोन्ही हात वर आहेत व त्यांत त्याने वर्तुळाकार सूर्य व अर्ध चंद्राकार चंद्र धारण केला आहे. या काळच्याच मधुरेहून मिळालेल्या वराहाच्या हातांत देखील सूर्यचंद्र आढळतात (रे.चि.तेरा ४).
या दोन्ही प्रतिमा महादेवाच्याच आहेत यांत शंका नाही पण त्याच्या खांद्यातून उद्भूत होणाऱ्या तीन पुरुष प्रतिमा व जवळ असलेला सिंह हे मात्र खोल विचार करण्यांस आव्हान देत आहेत.
प्रथम खांद्याच्या पुरुषांकडे पाहू. खांद्यातून उद्भूत होणारे अशा प्रकारचे पुरुष दाखविण्यांची पद्धत मथुरेच्या काही अन्य प्रतिमांतही दिसते, जसे चतुर्ग्यूह विष्णू (चित्र ६) व षष्ठी देवींच्या एकट्या अथवा स्कंदविशाखांसह असलेल्या मूर्ती (चित्र ११३). समकालीन गांधार कलाकारांनी देखील किंचित फरकाने बुद्धांचे रूपवैविध्य दाखविण्यांकरिता याच पद्धतीचा अवलंब केला होता. साधारणपणे मूर्तिकाराला एका मुख्य देवतेची काही रूपें किंवा त्याच्या शरीरांतून उद्भूत होणाऱ्या इतर देवता व शक्ति, त्यांना 'व्यूह' म्हणणें जास्त सयुक्तिक ठरेल, दाखविणे इष्ट असे त्यावेळी ही पद्धत उपयोजित असत.
आतां प्रश्न असा की मूसानगर शिवाचे 'व्यूह' कोणते असावेत? महाभारतात शंकराच्या उजवीकडून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, डावी कडून विष्णूंचे प्राकट्य व युगान्ताचेवेळी रुद्रांचे सृजन होत असल्याचे सांगितले आहे. " कूर्मपुराणांत शिवाच्या चतुर्व्यहाचा उल्लेख आहे व तेथे शांती, विद्या, प्रतिष्ठा व निवृत्ती यांची त्याचे व्यूह म्हणून गणना केलेली आहे. पण कूर्मपुराणांला येथे फार महत्त्व देता येत नाही, कारण एक तर हे पुराण तितके प्राचीन वाटत नाही व दुसरे तेथें सांगितलेल्या शैवी शक्ती स्त्रीलिंगी आहेत, पुल्लिंगी नव्हेत. महाभारताचा उल्लेख जुना आहे व मूसानगर प्रतिमेच्या तीन पुरुषांपैकी मधला रुद्र रूपही आहे, पण आजूबाजूच्या पुरुषांत ब्रह्मा व विष्णूंचे कोणतेही चिह्न दिसत नाही. आता दोन प्रकारची शक्यता असणें संभवते. एक तर असे की कुषाण काळांत जशी वासुदेवाची 'चतुर्यूह' प्रतिमा होती त्याच आधारांवर शैवांनीही शिवाच्या चार व्यूहांची कल्पना केली असावी व कूर्मपुराणांत रूपांतरित होऊन तिचेच पडसाद उमटत आहेत. दुसरे असे की कुषाणकाळात असंदिग्ध रूपाने शिवाची चतुर्मुखलिंगें प्रतिष्ठित झाली होती, या प्रतिमेत त्याच चतुर्मुखांचे पुरुषरूपानें अंकन झाले आहे. चतुर्मुख लिंगात एक मुख रौद्र आणि कमीतकमी एक पागोटे घातलेले असते.
आतां सिंहाकडे वळू. मथुरेच्या संग्रहालयांतील शिवप्रतिमेचा उल्लेख आलाच आहे. याच संस्थेत शिव म्हणून ओळखली जाणारी एक दुसरी ही प्रतिमा आहे (म.सं.सं. १२ २१४). हिच्या मस्तकांवरील जटाजुटाच्या भोवती गुंडाळलेल्या माळेच्या मधोमध सिंहमुख अंलकरण आहे. ही परंपरा गुप्तकाळात देखील जिवंत होती. सिंहमुखयुक्त शिवमस्तक या काळच्या एका विश्वरूप विष्णूच्या प्रतिमेत ही दिसतें. या प्रकारांचा वाङ्मयांत ही उल्लेख आढळतो अस्तु. सिंह व शिव यांचा संबंध दाखविणारे खालील वाङ्मयीन उल्लेख लक्षांत घेण्यासरखे आहेत :
अ) महाभारतात दिलेल्या शिव नामावलीत 'सिंहग' आणि 'सिंह वाहन' अशी नांवे आढळतात."
आ) वायुपुराण" असें सांगते कीं दक्षानें शिवाला यज्ञात न बोलाविल्यामुळे व यज्ञभागाचा अधिकारी न मानल्यामुळे
त्याला फार क्रोध आला व अनेक सिंहांच्या रूपात तो प्रगट झाला. पुढे सृष्टीचा नाश होऊ नये एवढ्यांसाठी शिवाने त्या सिंहांना आपल्याच घरांत साखळदंडानें जखडून ठेवले.
इ) महाभारतांत एका ठिकाणी शिवपार्वतीच्या रथाला हजार सिंह जुंपले असल्याचे वर्णन आहे.१२
हे खरें कीं या वाङ्मयीन उल्लेखाने हाती घेतलेल्या प्रश्नांवर फारसा समाधानकारक प्रकाश पडत नाही, अजून वाङ्मयाचे जास्त खोल मंथन आवश्यक आहे.
ग) चतुर्मुख शिव :
भीटा येथील सर्वतोभद्र प्रतिमेची चर्चा आपण मागें केली आहे व त्यातील स्थूलकाया दोन हातांची व केस मोकळे सोडलेली प्रतिमा शंकराची असणे शक्य आहे हे ही सांगितले आहे. या मूर्तीशी बरेंच साम्य असलेली पण सुमारे दीडशें वर्षे नंतरची एक दुसरी प्रतिमा मथुरेच्या संग्रहालयांत आहे. ही तीनफूट दहा इंच उंच मूर्ती जरी बरीच झिजलेली आणि खंडित असली तरी चहूबाजूनी कोरलेली असल्यामुळे महत्त्वाची आहे. आजच्या स्थितीत तिच्या दर्शनी भागांवर तुरेदार मुगुट घातलेला व अभयमुद्रेत उभा असलेला एक पुरुष आहे. नेसूचे वस्त्र स्पष्ट आहे, डाव्या हातांत घट ही असावा. याच्या डावीकडील भागांवर एक पुरुष मस्तक आहे, ज्याचे केस विंचरून मागे केले आहेत. पृष्ठ भागांवर आखूड पायाची व लांब पोटाची एक पुरुष मूर्ती होती, पण ती आता डोक्यांपासून उदरबंधापर्यंत नष्ट झाली आहे. हिचा डावा हात छातीवर असून उजव्यात कमंडलू असावा. मुगुटं घातलेल्या मुख्यप्रतिमेच्या उजव्या भागांवर देखील एक मुख होते पण ते आता साफ गेले आहे. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल या प्रतिमेला शिवच मानतात व पांचवे मुख असण्यांची शक्यता ही प्रतिपादन करतात. मथुरा व भीटा येथील प्रतिमांत खालील बाबतीत साम्य आहे :अ) उभय प्रतिमा सर्वतोभद्र आहेत.
आ) मुगुट घातलेला द्विभुज आणि मुक्तकेश स्थूल पुरुष हे एकमेकांच्या पाठीकडे आहेत.
इ) दोन्हींत आजुबाजूला मुखें आहेत.
महत्त्वपूर्ण फरक वराह आणि सिंहाचा आहे, जो अजून अन्वेषणीय विषय आहे. वाङ्मयांत शिवाला द्विमुख, त्रिमुख, चतुर्मुख, पंचमुख, षड्मुख आणि अनेकमुख देखील वर्णिला आहे.
घ) शिव-पार्वती :
नाण्यांवरील शिव-उमा प्रतिमांचा नामोल्लेख मागे केला आहे. समकालीन मूर्तीत ही तो प्रकार आढळतो. अशा प्रतिमांत शिव ऊर्ध्वलिंग असून आपल्या शक्तींसह आलिंगनमुद्रेत उभा असतो व त्यांच्या पाठीशी बैल दिसतो. " दोघेही द्विभुज असून त्यांच्याजवळ कोणतेही आयुध दिसत नाही (चित्र ५०). गुप्तकालीन शिवपार्वतीचा एक नमूना मथुरा संग्रहालयात आहे (म.सं.सं. ३० २०८४). दुसरी कुमारगुप्ताच्या वेळेची एक अभिलिखित प्रतिमा कौशांबी (अलाहाबाद) येथून मिळाली आहे. दागिन्यांच्या दृष्टीनें ही फार सुंदर आहे पण हिच्यांत व प्रथम प्रतिमेंत मुख्य फरक असा आहे कीं येथे हे दोघे आलिंगन मुद्रेत नसून फक्त जवळ उभे आहेत. दाढी मिशा असणाऱ्या शंकराच्या डाव्या हातांत कमंडलू असून उजवा अक्षमालेसह अभयमुद्रेत आहे. त्याची यज्ञोपवीत, ऊर्ध्वलिंग, वगैरे कुषाण कालीन चिन्हे अजून विद्यमान आहेत, तिसरा डोळा ही उभा नसून अजून आडवाच आहे. पार्वतीच्या हातांत येथे आरसा आहे.च) अर्धनारीश्वर :
एकाच प्रतिमेत (म्हणजे एकाच शरीरांत) शिव व पार्वतीचे संयुक्त रूपानें अंकन केल्यास त्या रूपाला अर्धनारीनटेश्वर किंवा अर्धनारीश्वर असें म्हणतात. ही अशा प्रकारची प्रतिमा शिवशक्ती, नरनारी, ब्रह्ममाया, वगैरे सृष्टीच्या मूळ कारणांचा संयोग दाखवितात. भारतीय विचारधारें प्रमाणें सृष्टीचा विकास एकांतून दोन व दोनांपासून अनेक असा झालेला आहे. विकासाचे स्थान आहे. योनी विकसित करणारा आहे बीजी आणि विकासाची शक्ती हे बीज आहे. याच क्रमाला लिंगपुराणांत विष्णू, शिव आणि ब्रह्मा अशा संज्ञा आहेत. शिवाचे 'बीजी' हे नांव कूर्मपुराणांत देखील आढळते. बीजाला चिरकालांपर्यंत पाहतां येत नाही, यामुळे खरे महत्त्व योनी आणि बीजी यांचेच आहे. लिंगातून उद्भूत झालेले प्रथम बीज, ज्याला आदिसर्गिक बीज असेंही म्हणतात, शिवाचेच रूप होय. आदिसर्गिक बीज आणि योनीचे नैकट्यच अर्धनारीश्वरांचे रूप आहे. हरि-हर प्रतिमेंचे ही रहस्य येथेंच दडलेले आहे, पण त्याची चर्चा आपण पुढे करू.
अर्धनारीश्वरांसंबंधी एक अन्य कथाही ऐकीवांत आहे. आपल्या मानसिक सृष्टीची वृद्धी होत नसल्यामुळे ब्रह्मदेवाने घोर तप करून भवला प्रसन्न करून घेतले. भव म्हणजे शंकराने स्वतःला त्याच्या ललाटांपासून अर्धनारीश्वराच्या रूपानें उत्पन्न करून घेतले व येथूनच सृष्टीला सुरुवात झाली.*** मार्कंडेय पुराणांत सृष्टीच्या या दोन मूळ तत्वांना 'क्षोभ्य' आणि 'क्षोभक' अशी नांवे दिली आहेत. ही मुळांत एकाचीच दोन तत्वें आहेत आणि संकोच व विकासाने ती सृष्टीला कारणीभूत होतात.
दक्षिणेंतील शैवमूर्तीचे वर्गीकरण :
भारतीय मूर्तिशास्त्र
आगमांदि निरनिराळ्या शैव ग्रंथांच्या आधारें श्रीराव यांनी आपल्या ग्रंथांत सौम्य, संहार, अनुग्रह, उग्र वगैरे वर्गात निरनिराळ्या शिव प्रतिमांची चर्चा केली आहे. खाली दिलेल्या तक्त्यावरून श्रीराव यांच्या वर्गीकरणाची कल्पना येईल. अर्थात् प्रत्येक प्रकारांविषयी जास्त माहितीची अपेक्षा असल्यास तोच ग्रंथ पहाणें उपयुक्त ठरेल.
भैरव - ६८ रूपें
P
२
३
४
५
६
७
८
असितांग
रुरू
चंड
क्रोध
उन्मत्त
कपाल
भीषण
संहार
विशालाक्ष
क्रोडदंष्ट्र
प्रलयांतक
पिंगलेक्षण
बटुकनायक
शशिभूषण
भयहर
अतिरिक्तांग
कालाग्नि
प्रियंकर
मार्तंड
जटाधर
भूमिकंप
अभ्ररूप
शंकर
हस्तिचमंबिरधर
सर्वज्ञ
कालाग्नि
मोदकप्रिय
विश्वरूप
नीलकंठ
धरापाल
भूतवेताल
योगीश
त्रिनेत्र
ब्रह्मराक्षस
स्वच्छंद
विरूपाक्ष
विष्णू
कुटिल
विघ्नसंतुष्ट
नानारूपधर
कुलपालक
मंत्रनायक
खेचर
वज्रहस्त
मुंडपाल
रुद्र
सचराचर
महाकाय
कामपाल
पितामह
त्रिपुरांतक
सर्वज्ञ
वरद
सर्वदेवेश
दक्षिण
घोरनाद
मुखर
विशालाक्ष
अस्थिर
योगीश
पर्वतवास
सर्वभूतहृदिस्थित
महारुद्र
दक्षसंस्थित
राव यांच्या वर्गीकरणांचा तक्ता
काहीं इतर रूपें
बटुक भैरव स्वर्णाकर्षणभैरव
शिवप्रतिमा
सौम्यमूर्ती
संहारमूर्ती
उग्रमूर्ती
नृत्तमूर्ती
दक्षिणामूर्ती
लिंगोद्भव
चंद्रशेखर
पाशुपत
सुखासन मूर्ती
अघोर महाकाल
केवल मूर्ती
रौद्रपाशुपत
दशभुज
उमासहितमूर्ती
अघोर
आलिंगनमूर्ती
उमासहितमूर्ती
सोमास्कंद मूर्ती उमामहेश्वर मूर्ती
योग
वीणा
ज्ञान
व्याख्यान
२१५
जलंधरहर
मल्लारि
मूर्ती
संहारमूर्ती मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
(मार्कंडेयानुग्रह)
मूर्ती
६८ रूपें, यादी मागे पहा
अनुग्रह
कंकाल
भिक्षाटन
गंगाधर
अर्धनारीश्वर
हर्यर्ध (हरिहर)
कल्याणसुंदर
वृषवाहन
विषापहरण
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
मूर्ती
चंडेशानुग्रह
विष्णवानग्रह
विघ्नेश्वरानुग्रह
नंदीशानुग्रह
मूर्ती
किरात
रावणानुग्रह
मूर्ती
अर्जुनानुग्रह
मूर्ती
मूर्ती
विशिष्ट शिवप्रतिमा :
मार्गे सांगितल्याप्रमाणें वरील वर्गीकरणांत दिलेल्या प्रतिमांपैकीं फक्त विशिष्ट शिव प्रतिमांचाच आपण येथे विचार करू.
१) नटराज किंवा नाचणारा शिव
हा प्रकार म्हणजें दक्षिण भारतीय कलेचे जागतिक कलेला दिलेले फार मोठे देणें होय. तेथील परंपरेंप्रमाणे मद्रास कुंभकोणम् लाईन वरील चिदंबरम् हे शहर शंकराच्या नृत्याचे माहेरघर होय. तेथे शिवाचे प्रथमनृत्य झाले त्याची पूर्वकथा अशी.
तारकवनांत राहणाऱ्या मीमांसामतांच्या अनुगामी ऋषींना वादात पराभूत करण्याकरिता म्हणून शंकर स्त्रीरूपांत विष्णू आणि आदिशेषाला बरोबर घेऊन तेथे पोचला. प्रथमदर्शनीच ते ऋषी क्रुद्ध होऊन त्याला पळवून लावण्यांच्या मार्गाला लागले. त्यांनी शिवावर यज्ञकुंडातून उत्पन्न करून एक वाघ सोडला. शिवानें त्याला पकडला, नखानें त्याचे कातडे काढले व स्वतः भोवती गुंडाळले. ऋषर्षीनी सोडलेल्या भयंकर सापालाही शिवाचे आभूषण व्हावे लागले. त्यानंतर शंकर नाचू लागला. ऋषींनी चिडून एक भयंकर दैत्य उत्पन्न करून त्याच्यावर सोडला शंकरानें त्याला आपल्या पायाखाली दडपून त्याची पाठ मोडली. आता निर्विघ्न रूपानें देव आणि ऋषिमंडळींच्या समोर महानटाचे चिरस्मरणीय नृत्य सुरू झाले.
जगाचा केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिदम्बरम् या स्थानांवरील हे नृत्य दक्षिण भारताच्या हजारों कलाकारांचे प्रतिभास्रोत होऊन बसले.
दक्षिणेत अशी मान्यता आहे कीं शंकराने १०८ प्रकारानें नृत्य केले व विशेष म्हणजे चिदम्बरम्च्या नटराज मंदिराच्या गोपुरांवर शिवनृत्याचे एकशे आठ प्रकार प्रतिमारूपाने व भरत नाट्यशास्त्राच्या आधारें लिहिलेल्या अभिलेखांच्या रूपानें अंकित केलेले आहेत. शिवाच्या नृत्यमूर्तीविषयीं वाङ्मयांत आणि कलेत भरपूर सामग्री आहे.
२१६
मत्स्यपुराणांत शंकराच्या नृत्यमूर्तीचे वर्णन आहे. तेथे तो दशभुज असावा असे विधान आहे, पण दक्षिण भारतीय कलेत तो बहुतेक चतुर्भुज दिसतो (चित्र ७५). अधिक हात असलेला नृत्यरत शंकर वेरूळ आणि घारापुरी येथे कोरलेला आहे. अशाच प्रकारचे सुमारे सातव्या शतकांतील एक सुंदर शिल्प आंध्र प्रदेशांत आलमपूर येथून हाती आले आहे. येथे परशू, पात्र, डमरू, त्रिशूल, सर्प, वगैरे घेतलेला शिव अपस्मार पुरुषाचे पाठीवर नाचत आहे. दोन गण मुरली आणि ढोलक्याने साथ करीत आहेत. मान्य परंपरेप्रमाणें तांडव नृत्य करतांना चतुर्भुज रूपांत शंकराचा पुढचा डावा हात गजहस्त किंवा दंडहस्त मुद्रेत असून मागच्या डाव्या हातांत अग्नी असावा. त्याचप्रमाणें समोरचा उजवा अभय मुरेत असून मागच्या उजव्यात डमरू द्यावा. शंकराचा डावा पाय वर उचललेला असून दंडहस्ताचा तिकडे संकेत होत असावा. किंचित वाकवलेला उजवा पाय खाली ओणव्या पडलेल्या राक्षसाच्या म्हणजे अपस्मार पुरुषाच्या पाठीवर असावा. नटराजमूर्तीचे हे साधारण रूप झाले. शंकराच्या पुष्पखचित जटामुकुट, तेथें असलेली गंगा, नृत्याच्या गतीप्रमाणें वाऱ्यात उडणाऱ्या जटा, मागची प्रभावळ, वगैरे हिची इतर वैशिष्ट्ये होत. या शिवाय मूर्ती घडविणाऱ्याची रूचि व सामर्थ्यांप्रमाणे किरकोळ फरक ही आढळतात.
शिवतांडवाच्या पाठीमागें असलेल्या तात्विक बैठकीची विस्तृत चर्चा श्री राव व डॉ. कुमारस्वामी यांनी आपापल्या ग्रंथात केली आहे. ती तेथेंच पाहणें योग्य ठरेल. तूर्त एवढेच सांगून हा विषय आवरता घेतो कीं शिवनृत्याच्या विचाराच्या तीन दृष्टी आहेत. पहिली म्हणजे शंकराचे नृत्य संपूर्ण विश्वाच्या गतिमान क्रियाशीलतेचे प्रतीक होय, दुसरी म्हणजे शिवनृत्य हे असंख्य जीवांना अज्ञानांच्या तमातून मुक्त करण्याकरिता आहे व तिसरे म्हणजे नटराजाचे हे नृत्य फक्त चिदम्बरम् मर्धेच होत असून मानवमात्राच्या हृदयांत होत असते.
सृष्टी, स्थिती आणि लय याकडे ही शिवनृत्याचा संबंध लावतात. डमरू हे उत्पादन, अभयहस्त हे संरक्षण आणि स्थिती, व अग्नी हे लयाचें द्योतक होय. शंकराचा उचलेला पाय हे मुक्ती किंवा अनुग्रहाचे प्रतीक असून पायाखाली पडलेला राक्षस हा तम, अंधार किंवा अज्ञानाचे रूप समजला जातो.
२) सुखासनमूर्ती
येथे एकटा शंकर भद्रपीठांवर बसलेला असतो. शिल्परत्नांप्रमाणें तो चतुर्भुज असून प्रदक्षिणाक्रमाने त्याच्या हातांत अभय, परशू, मृग आणि वर असें असतात. हा अर्धपर्यकासनांत म्हणजे उजवा पाय लोंबवून बसलेला असतो. (चित्र ७७)
३) उमासहितमूर्ती
या प्रकारांत शंकराबरोबर पार्वती ही त्याच आसनांवर व त्याच प्रभामण्डलांत बसलेली असते. पण परस्पर आलिंगनाचा मात्र प्रकार नसतो. (चित्र ७६)
४) सोमास्कंदमूर्ती
येथे उमा आणि शिव या दोघांचे मर्धे छोटासा स्कंद ही असतो. तो उभा, बसलेला, नाचतांना किंवा आईच्या मांडीवरही असू शकतो. शिवपार्वती अर्थातच बसलेले असतात. कारणांगमांच्या मता प्रबरण सोमा स्कंद मूर्तीच्या आजूबाजूला सपत्नीक ब्रह्मदेव आणि विष्णू ही असावेत.
दक्षिणेतील जवळ जवळ प्रत्येक मोठ्या शिव मंदिरात वरील तीन प्रतिमा अवश्य आढळतात.
२१७
५) उमामहेश्वरमूर्ती
या प्रकारांचा विचार मागें झालाच आहे. दक्षिणेंतील प्रारंभिक मूर्तीत ऐहोळे आणि वेरूळ येथील प्रतिमा महत्त्वाच्या आहेत.
६) कालारिमूर्ती
महादेवाची मृत्युंजय किंवा मृत्यूला जिंकणारा अशी सर्वत्र ख्याती आहे. या प्रसंगाने मार्कंडेयाच्या कथेचा वारंवार उल्लेख येतो. कालारि किंवा कालांतक मूर्ती त्याच पार्श्वभूमीवर घडविली जाते. मृकंड ऋषीला वरदानाने झालेला मार्कंडेय हा मुलगा फार गुणवान असून देखील अल्पायुषी होणार होता. बापाला मुलांपासून ही गोष्ट लपवितां आली नाही. मुलगा सोळाव्या वर्षी म्हणजे विधिलिखित आयुष्याच्या शेवटल्या वर्षी तीर्थयात्रेला निघाला. तमिळ देशाच्या तंजावर जिल्ह्यातील तिरुक्कडवूर येथें एक शिवलिंगांचे पूजन करीत असतां यम त्याला घ्यावयास आला. त्यानें शिवाची प्रार्थना केली. शंकर त्या लिंगांतून प्रगट झाला व त्यानें यमाला बलप्रयोग करून वाटे लावले आणि मार्कंडेयाला चिरंजीव केले.
कालारिमूर्तीत शंकर लिंगापासून प्रगट झालेला दिसतो व त्रिशूलाने तो यमांवर आक्रमण करीत असतो. खाली कुमार मार्कंडेय बहुतेक नमस्कार मुद्रेत दिसतो (रे. चि. सव्वीस, २२).
७-८) गजासुरवध व अंधकासुरवध मूर्ती
या संबंधी कथांची चर्चा मागेच झाली आहे. दक्षिणेंत हे दोन्ही प्रकार वेगळे वेगळे मिळतात व या प्रतिमांची संख्याही बरीच आहे. प्रथम प्रकारांत शंकर हत्तीचे चामडें पाठीकडें सभोवताल पसरून नाचत असतो. हत्तीचे डोके व चारी पाय दाखविण्यांतं मूर्तिकार आपले चातुर्य पणांस लावतो. दुसऱ्या प्रकारांत शंकराच्या त्रिशूलांवर अंधक लोंबलेला दिसतो.
वळुवुर येथील गजासुरसंहारमूर्ती आणि वेरुळ येथील कैलास मंदिरांतील अंधकासुरवधमूर्ती प्रेक्षणीय आहेत.
९) शरभ मूर्ती
हिरण्यकशिपूचा वध करून उन्मत्त झालेल्या नरसिंहाला ताळ्यावर आणण्यांकरिता शंकरानें शरभाचें रूप घेतले अशी कथा आहे. शरभ हा आतां तरी कल्पना जगतांतील पशु असून त्याला दोन डोकी, दोन सुंदर पंख, सिंहाचे आठ पाय आणि एक लांब शेपटी असते असें मानतात. श्रीतत्त्वनिधिप्रमाणें शरभाला बत्तीस हात असावेत आणि एका हातानें तो दुर्गेला आलिंगन करीत असावा. धातूच्या एका शरभमूर्तीचें चित्र श्री राव यांनी दिले आहे. साधारणतः शरभमूर्ती कमी मिळते.
१०) भैरव
दक्षिणेत भैरवांचीही बरीच प्रसिद्धी आहे. इकडें बऱ्याच ठिकाणीं भैरवांबरोबर विंचूही दिसतो (चित्र ७३). असाच विंचू चामुंडेंच्या मूर्तीतही कित्येक ठिकाणीं आढळतो. बंगलोर संग्रहालयांतील एका प्रतिमेंत (सं.सं. ४२) भैरवाच्या पायांजवळ भैरवाला चार हात असून खड्ग, त्रिशूल, डमरू आणि मुंड ही त्याची आयुधं होत. मुंडमाळा, सर्पकुंडलें, घण्ट्यां असलेला करगोटा, घुंघरु असलेले नूपुर, वगैरे ही भैरवाजवळ असतात व तो पूर्ण दिगंबर असतो. या दृष्टीनें
१५६
१०) शिवाकडून ब्राह्मणांचा वेळोवेळी केला गेलेला विरोध व शेवटी स्वतःच्या श्रेष्ठत्वाची स्थापना
११) शिवाच्या रौद्र व संहारक स्वरूपांमुळेच कदाचित लोकांत असें मत मान्य झाले असावे की विष्णुव्रत सोडता येतें, पण शिवव्रत मात्र टाकता येत नाही.
शंकराचा पौराणिक धर्मांत पूर्ण रूपाने समावेश केव्हां झाला असावा हे सांगता येणें कठिण आहे, पण या विषयी रुद्र व नरनारायणांत झालेल्या युद्धाची कथा थोडी महत्त्वाची वाटते. या कथेंप्रमाणें दक्षयज्ञांचा विध्वंस केल्यावर रुद्रानें बद्रिकाश्रमांत बसलेल्या नर व नारायणांवर आक्रमण केले. प्रथम युद्धाला चांगलेच तोंड लागले पण पुढे ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीमुळे ते आवरले व दोन्ही पक्षांत समेट झाला. युद्धांत नारायणाने रुद्रांचा गळा दाबल्यामुळें रुद्राला 'शितिकण्ठ' असें नांव मिळाले, तर नारायणाने रुद्राच्या शूलाला 'श्रीवत्स' या चिह्नाच्या रूपाने स्वतःच्या वक्षस्थलांवर मिरविण्याचे कबूल केले." या कथेचा मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें परामर्श घेतल्यास दोन मुद्दे समोर येतात. एक तर असे की सुरुवातीच्या विष्णुप्रतिमांत 'श्रीवत्स' दिसत नाही, गुप्तकाळांपासून हळुहळू त्याचे दर्शन होऊ लागते. दुसरे म्हणजे शिव व विष्णूच्या संयुक्त प्रतिमा म्हणजे हरि-हर मूर्ती कुषाण कालाचे अगोदर मिळत असल्याचा पुरावा आज तरी हातांत नाही.
शिव व विष्णू यांचे घोर युद्ध व शेवटी विष्णूचे श्रेष्ठत्व" स्थापित होण्याचे वर्णन वाल्मीकिय रामायणांत देखील मिळते. उघड आहे कीं पौराणिक क्षेत्रांत मिळालेली मान्यता एका दिवसांत झालेली घटना नाही. हे होण्यास कितीतरी वर्षे लागली असतील व वादांची रणें माजली असतील. शैवाप्रमाणेंच सौर आणि शाक्तमतांच्या काही धारांचे ओघही बाहेरून आले आहेत. हे निरनिराळे प्रवाह आपल्या देशांत इसवीसनांच्या प्रथम तीन शतकांच्या अवधीत किंवा त्यापूर्वी आले असावेत. कारण गुप्तकाळांपर्यंत या सर्व धारा मूळरूपांत किंवा रूपांतरे करून ब्राह्मणधर्मात विलीन झालेल्या दिसतात. याची प्रमुख कारणें एकेश्वरवादाचा सिद्धांत आणि 'महाविलयनांची' प्रवृत्ती ही होत. वरील सर्व विवेचनाने हे स्पष्ट होते की अवैदिक शिवाने रुद्राशी एकत्व स्थापन करून वेदोत्तरकालीन देवता संघांत आपल्या पराक्रमांने प्रमुख स्थान प्राप्त करून घेतले, पण यासाठी झालेल्या प्रबल संघर्षाचे प्रतिध्वनी मात्र बरेच दिवस उमटत राहिले. आता शिव पूजनांची माध्यमें म्हणजे शिवप्रतीकें, शंकराची मूर्ती आणि शिवाची पिंडी याचे मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनें परीक्षण करू.
शिवप्रतीकें :
शिवाचे एक जुने प्रतीक वृष किंवा बैल हे आहे. (र. चित्र बावीस १,४) महाभारतांत शंकराला वृष, वृषावर्त, वृषनाथ, वृषध्वज, वृषदर्प, वृषपती, वगैरे अभिधानें प्राप्त आहेत. सिंधु वसाहतींत बऱ्याच प्रामुख्यानें दिसणाऱ्या डौलदार बैलाचा शैवमतांशी निकटतम संबंध होता असे निश्चयात्मक विधान करणें जरी शक्य नसले तरी एवढे मात्र खरे की ऐतिहासिक काळांत बैल हा शिवाचे फार जवळचे प्रतीक म्हणून गाजला. जुन्या ठोकीव फार नाण्यांवर (punch marked conis) बैल दिसतो, भारतीय शक राजांच्या नाण्यांवर दिसणारा बैल नक्कीच शैव प्रतीक आहे. एका प्रकारच्या नाण्यांवर तर बैलांबरोबरच 'उसभे' किंवा वृषभ अशी अक्षरे ही आहेत. हूण राजा मिहिरकुल याचे नाण्यांवर बैलासमोर 'जयतुवृषः' असा लेख आढळतो." हा राजा शिवोपासक होता.
बंगलोर संग्रहालयाची होयसाळ कलाकृती (सं.सं.८) आणि मुंबई संग्रहालयांतील प्रतिमा (सं.सं. ७०) पाहण्यासारख्या आहेत. (रे.चि. पंचवीस १९)
११) वीरभद्र (चित्र ७८)
हा शंकराचा अवतार, दक्षप्रजापती हा जरी शंकराचा सासरा होता तरी शिवाचा तो द्वेष करीत असे. त्याने स्वतःच्या यज्ञांत आपल्या लेकीला म्हणजे सतीला व जावयाला निमंत्रित केले नाही तरी शंकराच्या इच्छेविरुद्ध सती माहेरी गेली, पण दक्षानें तिचा अपमान केला. त्यामुळे चिडून सतीनें अग्निकुंडांत स्वतःला जाळून टाकले. शिवांला ही बातमी समजल्यानंतर त्यानें स्वतः पासून वीरभद्राला उत्पन्न केले. वीरभद्रानें यज्ञाचा पूर्ण पाडाव केला व दक्षाचेही डोकें कापून टाकले. पुढे शंकर दक्षावर प्रसन्न झाला व बकऱ्याचे डोके लावून त्याला जिवंत केले. ही कथा थोड्याफार फरकानें कित्येक ग्रंथांत सापडते.
श्रीतत्त्वनिधि, कारणागम, वगैरे ग्रंथांत वीरभद्राची ध्यानें दिलेली आहेत. उग्र चेहरा, चार हात, ढाल, तलवार, धनुष्य, बाण किंवा गदा ही आयुधें, पायात खडावा, मुंडमाळ, वगैरे त्याची वैशिष्ट्ये होत. मैसूर विश्वविद्यालयाच्या संग्रहालयात वीरभद्राची एक सुरेख पाषाण प्रतिमा आहे. तांब्याच्या जाडपत्र्यांवर मागून ठोकून तयार केलेल्या वीरभद्र प्रतिमा बऱ्याच मोठ्या संख्येत आढळतात. हैद्राबाद संग्रहालयांत असलेल्या अशा एका प्रतिमेंत (सं.सं. ५२७) खडावा घातलेला वीरभद्र उभा असून त्याच्या पायाखाली तीन डोकी आहेत. पायाचे बाजूस बकऱ्याचे डोके असलेला दक्ष उभा
आहे. वीरभद्राच्या डोक्यावर पाच शिवलिंगे आणि चंद्रसूर्य दिसतात. याच संग्रहालयांत पेणुकोंडा येथून मिळालेली १७ व्या शतकातील चतुर्भुज वीरभद्राचे एक अन्य शिल्प आहे. त्यांच्या हातांत खड्ग, बाण, धनुष्य आणि ढाल असून मुख उग्र आहे आणि ओठांतून बाहेर डोकावणारे दांत दिसत आहेत. जटामुकुटांतील शिवलिंग आणि डोळ्यावर वेटोळी घातलेला नागही महत्त्वाचा आहे.
१२) अघोर
शंकराच्या अघोरमूर्तीचे अष्टभुज दशभुज आणि बत्तीसभुज असे तीन प्रकार आहेत. कारणागमांप्रमाणे अघोरमूर्तीचे मुख्य लक्षण म्हणजें त्याने आडवा धरलेला त्रिशूल हे होय, जणू कीं काय तो त्रिशूलानें आघात करण्यासच पुढे सरसावत आहे. ब्रह्महत्येंसारख्या पापांचा नाश आणि विजय मिळविण्यांकरिता अघोराचे पूजन करतात. अघोराच्या बऱ्याच सुरेख प्रतिमा मिळाल्या आहेत.
१३) मल्लारि (चित्रे ८०-८१)
हा आपला खंडोबा होय. मल्हारी, खंडेराय, म्हाळसाकांत, वगैरे त्याचे पर्याय आहेत. मणी आणि मल्ल या नांवाचे दोन दैत्य लोकांस फार पीडा देऊ लागले तेव्हां शंकराने एका योद्ध्याचे रूप धारण केले व सहा दिवस युद्ध करून इं शेवटी त्याचा पाडाव केला. म्हाळसा ही त्याची लग्नाची बायको असून बाणाई ही उपपत्नी आहे. हेडगे हा त्याचा प्रधान होगा जेजुरी, पाली, मंगसुळी आणि गुडगुड्डापूर (देवरड) ही खंडोबाची सुप्रसिद्ध स्थानें आहेत. मल्लारि द्विभुज असून पांढन घोड्यावर बसलेला असतो. खड्ग व डमरू त्याची आयुधे होत. त्याचप्रासिया का है। अरतात. खंडोबाचे पूजन महाराष्ट्रात बरेच आहे. त्यामुळे प्रतिमाही बऱ्याच आढळतात.
१९८
सहा हाती असून तिला तीन मस्तके आहेत. हातात प्रदक्षिणा क्रमाने कमळ, त्रिशूल (?), कपाल, चक्र, माळा व गदा अशा वस्तू आहेत. पार्वती मांडीवर नसून बैलावरच पण जवळ आहे व तिच्या हातात कमळ आणि कदाचित आरसा आहे. आयुधाकडे नजर टाकल्यास ही मूर्ती शिव, ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकाच रूपानें प्रातिनिध्य करीत आहे असे दिसतें.
शिवपार्वती, सारीपाट क्रीडा :
शिव पार्वतीची सारीपाट क्रीडा व तिच्यांत पार्वतीचा विजय याचे काव्यात वर्णन मिळतें, पण भोपाळच्या बिडला संग्रहालयांत असलेली व विदिशा जिल्ह्याच्या काकपूर या स्थानांहून मिळालेली प्रतिमा या विषयाचे फारच सुंदर अंकन करते (वि.सं.सं. ६१). सुमारें दहाव्या शतकाच्या या प्रतिमेंत दोघांमधे पसरलेला पट व त्यावरील गोट्या खुबीनें दाखविल्या आहेत.
रावणानुग्रह" :
मध्यकाळांत हा प्रकार बराच लोकप्रिय झाला. उत्तर भारतात मिळणाऱ्या उमामहेश्वर व रावणानुग्रह दोन्ही प्रतिमा सकृद्दर्शनी सारख्याच दिसतात, पण मुख्य फरक शंकर पार्वतीत नसून त्याच्या आसनांच्या खालील भागांत असतो. रावणानुग्रह मूर्तीत आसनासगट शिवपार्वतीला उचलण्याचा प्रयत्न करणारा रावण दिसतो. हा सर्वत्र एक सारखा आढळत नाही. याची खालील रूपें नोंद करण्यांसारखी आहेत :
क) काही ठिकाणी हा चार हातांचा दाखवितात. मुखमात्र एकच असतें. समोरच्या दोन हातांने तो वीणा वाजवताना दिसतो व मागच्या दोन हातांनी त्याने आसन उचललेले दिसते. जणु की काय त्याची मदत करण्यांकरिता इतरही काही मंडळी पाठीने टेंकू देतांना दिसतात (चित्र ६८). अल्हा. कॅट. नं. ४२६; राणी महाल, झाशी सं. ३४, ३६, २१). काही विद्वान या सर्वांनांच शिवगण समजतात, पण शिव गणांनी शंकर पार्वतीचे संपूर्ण आसन कां उचलावे हे समजत नाही.
ख) दुसऱ्या प्रकारांत वरील सारखीच स्थिती असते, पण रावणांच्या हातात वीणा नसते. त्याचे दोनच हात असतात. डाव्याने तो आसन उचलण्याचा प्रयत्न करतो व उजव्यात तलवार असते (राणी महाल झाशी. संख्या ६२)
ग) तिसऱ्या प्रकारांत तो सहा हाताचा आहे. त्यांचे वरचे दोन हात कैलास उचलण्यांत गुंतले आहेत. मधल्या दोन पैकी एका हातात ढाल असून दुसऱ्याने तो जमीनीवर पडलेल्या एका गणाची-अर्थातच विरोध करणाऱ्या शिव गणाची-तंगडी ओढत आहे. सामान्य हातापैकी उजव्यात तलवार असून डावा मांडीवर टेकला आहे. रावणाला मुख्ख मात्र एकच आहे. अशा प्रकारची एक प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत (सं.सं.जी. २२१) आहे (चित्र ७०).
घ) या प्रकारांत रावणांचे अगदीच निराळे रूप पहावयांस मिळते. येथे तो तीन तोंडाचा व चार किंवा सहा हाताचा असून वीणा आणि तलवार घेतलेला असतो. या प्रकारांचे वैशिष्ट्य म्हणजे रावणांच्या तीन डोक्यांवर दिसणारे गाढवाचे तोंड हे होय. रावणाला गर्दभमुख कां मानतात या बद्दल वाङ्मयीन पुरावा अद्यापि आमच्या हाती आलेला नाही, पण एवढं मात्र खरे की उत्तर भारतांत दस-या की जयगाचराघव्य कागदी पुतळे उभारले जातात त्यांत ही परंपरा आवर्जून पाळतात. राजस्थानी चित्रातही ही परंपरा दिसते. गाढवाचे तोंड असलेल्या रावणानुग्रह प्रतिमा लेखकांने वाराणसीला व ग्वाल्हेरच्या संग्रहालयात पाहिल्या आहेत. मूसानगर येथे फारच खंडित अशी एक प्रतिमा आहे, पण कालानुक्रमें तिला या सर्वात जुने मानावे लागेल (रे.चि. पंचवीस १६).
उग्रमूर्ती आणि संहार मूर्ती :
आता पर्यंत आपण शंकराच्या सौम्य मूर्तीचा विचार केला. शंकरानें विध्वंस करण्यासारखी कार्ये करण्याकरितां जी रूपें घेतली ती त्याच्या उग्र व संहार मूर्तीची पार्श्वभूमी होत. यांत भैरव, वीरभद्र, किरात, गजासुरसंहारमूर्ती, अंधकासुरसंहारमूर्ती, वगैरेची गणना होते. आता या प्रकारांकडे वळू.
भैरव :
शिवपुराणांप्रमाणे भैरव हे शंकरांचे पूर्ण रूप होय तो सर्व जगांचे भरण करतो व रूपाने भीषण आहे तेवढ्याकरिता त्याला भैरव हे अभिधान प्राप्त आहे. काळही त्याला वचकतो म्हणून भैरवालाच कालभैरव असे ही म्हणतात. भैरव हा वाराणसी नगरीचा अधिपती मानतात. विष्णुधर्मोत्तरपुराणाप्रमाणे ढेबर पोट, बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणाऱ्या दाढा, नर मुंडाच्या माळा, हत्तीचे चामडें, सापाचे दागिने, हांतात असलेली निरनिराळी शस्त्रे ही त्याची प्रमुख लक्षणें होत. कुत्रा हे त्याचे वाहन आहे. भैरवाची बटुक भैरवादि बरीचशी रूपें आहेत पण त्यांत 'अष्टभैरव' म्हणून ओळखली बाणारी आठ रूपेच प्रसिद्ध आहेत.
भैरवाच्या प्रतिमा उत्तर भारतांत बऱ्याच ठिकाणी मिळतात व त्यात रूपवैचित्र्य ही दिसते. खाली काहीं मुख्य प्रतिमाचा उल्लेख करतो.
१) द्विभुज भैरव आसन सारनाथच्या संग्रहालयांत (वाराणसी) (सं.सं. गॅलरी नं.२) असलेल्या या प्रतिमेच्या डाव्या हातांत भिक्षापात्र किंवा खप्पर आणि उजव्या हातांत त्रिशूल आहे. उजव्या खांद्यावर एक साप ही दिसतो.
विशेष म्हणजे याच्या कपाळांवर भालपट्टांप्रमाणे एका खास अलंकरणाचा उपयोग केलेला दिसतो. त्यांत मधोमध एक माणसाची कवटी असून आजूबाजूला दोन उभे तळहात दिसतात. हे अलंकरण या भागांत उग्र अशा शिवमूर्तीवर बरेच दिसते. सारनाथच्या या मूर्तीच्या गळ्यात असलेले एकच वाघनख ही महत्त्वपूर्ण असावे, कारण हा असाच अलंकार लखनऊ संग्रहालयांत असलेल्या गुप्तकालीन मृफलकांतील शंकराच्या गळ्यातही दिसतो (ल.सं.सं. ७१.२८). भुवनेश्वर येथेही असलेला द्विभुज भैरव आढळतो (रे.चि. पंचवीस १८).
२) द्विभुज भैरव स्थानक - काशीकडे सध्या प्रचलित असलेल्या भैरव प्रतिमेत एका हातात सोटा आणि दुसऱ्या हातात खप्पर असते. पायाखाली कुत्रा दाखवितात. चेहरा अर्थात्च उग्र असतो.
३) चतुर्भुज भैरव स्थानक याचे विकराल असें मुख असून हातांत खप्पर, त्रिशूल व डमरू ही आयुर्धे दिसतात (अल्हा. कॅट. ४०१). कधीं कीं खट्वांग ही आढळते (अल्हा. कॅट. ३१६). या प्रतिमा अलाहाबादच्या संग्रहालयांत आहेत (चित्र ७२). गुजराथच्या सोमनाथ मंदिराच्या भिंतींवर असलेल्या भैरवाच्या हातांत नरमुंड असून त्याच्याकडे उसळताना एक पशू दिसतो. कल्पना अशी कीं नुकर्तेच कापलेल्या मानव मस्तकांतून गळणाऱ्या रक्तांचे थेंब चाटण्यांकरिता कुत्र्यासारखे पशू उड्या मारीत आहे.
२००
चांदा (महाराष्ट्र) येथून मिळालेल्या भैरवमूतींचे जरी तीन हात तुटलेले असले व साधारण डाव्यात फक्त पानपात्रच बाकी राहिले असले तरी त्याचे उभे केस, गोल सर्पकुंडलें, सापाची माळ, घंट्या लावलेली मेखला आणि पायाजवळचा कुत्रा हे दर्शनीय आहे (नागपूर सं.सं. ए २८).
४) द्वादशभुज भैरव आसन - ही प्रतिमा कलकत्त्याच्या संग्रहालयांत असून २६ स्थूलकाय व विकराल मुख असा भैरव उजवा पाय खाली सोडून बसलेला आहे त्याच्या हातांत वर, सोटा, खप्पर, खड्ग, वरील दोन हातांत साप किंवा जटा? ढाल?, मुंड, अभय, खट्वांग वगैरे आहेत.
५) द्वादशभुज भैरव स्थानक - इंदूरच्या संग्रहालयांत असलेल्या या प्रतिमेत (सं.सं.५३/१६१७) बरीच आयुधे खंडित आहेत पण वज्र किंवा त्रिशूल, डमरू, दोन्ही हातांतील जटा किंवा साप, व ढाल ही साधारणपणे ओळखता येतात. हा भैरव पूर्णपणें दिगंबर असून याच्या मिश्या, उभे केस, घंट्या असलेला, करगोटा, वगैरे वस्तू स्पष्ट आहेत.
६) सशक्तिक भैरव - राजस्थानांतील आबूच्या कलाकृतींत एका ठिकाणी शिवपार्वती प्रमाणेंच आलिंगन मुद्रेत उभा असलेला चतुर्भुज व दीर्घलिंगी भैरव पहावयास मिळतो. याच्या तीन हातांत खड्ग, डमरू आणि ढाल असून चौथ्याने तो आपल्या शक्तीला आलिंगन देत स्तनस्पर्श करीत आहे. याच्या मस्तकांवर तीन नरमुण्डे असून पायात खडावा आहेत. त्यांच्या शक्तीच्या डाव्या हातांत पाश आहे. उजवा भैरवाच्या गळ्यांत आहे. भैरवाच्या पायांजवळ वर उडी मारणारा कुत्रा दिसतो.
गजासुरसंहारमूर्ती आणि अंधकासुरसंहारमूर्ती :
कूर्मपुराणांत आलेल्या कर्थेप्रमाणें वाराणसीच्या कृत्तिवासेश्वर लिंगांचे पूजन करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देणाऱ्या हत्तीचा वेष घेतलेल्या एका असुराचा शंकरानें संहार केला व त्याचे कातडे उत्तरीय म्हणून पांघरले. गजासुरवधाच्या इतरही कथा मिळतात. दक्षिणभारतीय परंपरेप्रमाणें शंकराने या असुराचा नाश तंजावर जिल्ह्याच्या वळुवुर गावांत केला.
शैवागमांत या प्रतिमेचे बरेच वर्णन मिळते. हिची मुख्य ओळख म्हणजे शंकरानें अंगावर घेतलेले हत्तीचे कातडें ही होय. श्री शिवराममूर्ति यांचे असे मत आहे की उत्तरभारतीय परंपरेंत गजासुरसंहारमूर्ती आणि अंधकासुर-संहार-मूर्ती यांचे मिश्रण झाले आहे, व यांचे कारण असें की शिवानें वराहपुराणांप्रमाणे अंधकाचा संहार करण्यापूर्वी गजासुराल मारून त्याचे कातडे अंगावर पांघरलें होते." भुवनेश्वराच्या वेताळ मंदिरांत बसलेली गजासुरसंहारमूर्ती आहे."
याच प्रसंगाने अंधकासुराच्या कथेचाही धावता उल्लेख करणें योग्य होईल. वराह", कूर्म आणि वामन" पुराणांत या असुराचा उल्लेख मिळतो. ब्रह्मदेवाच्या वरानें उन्मत्त झालेल्या या असुरानें देवाना अतिशय त्रास दिला. ते शंकराकडे गान्हाणे घेऊन गेले असतां त्यानें शंकरांवर आक्रमण केले. त्याचवेळी नील नावाचा एक राक्षसही हत्तीचे रूप घेऊन शंकरावर चाल करणार होता. वीरभद्रानें त्याला मारले व त्याचे कातडें शंकरांस दिले. शंकरानें सर्व देवासह अंधकांवर आक्रमण करून त्याला आपल्या शूलांबर उचलून घेतले, व त्यांच्या गळणाऱ्या रक्तबिंदू पासून इतर असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून चाटून टाकण्यांकरिता आपल्या डोळ्यपासून योगेश्वरी नावाची एक मातुका उत्पन्न केली. अंधकाला शूलांबर टांगून आणि हत्तीचे कातडे पांघरून शंकर एक कोसभर धावत आणि नाचत राहिला.
२०२
१) अजमुख -
राणी महाल, झाशी येथील संग्रहातील (सं.सं. ७८) ही सुमारे साडेचार फूट उंचीची चतुर्भुज स्थान मूर्ती आहे. हिचे मुख बकऱ्याचे असून हातांत सुरी (क्षुरिका), भले मोठे खट्वांग व मुंड आहे. गळ्यांत आजानुलंबिनी मुंडमाला आहे. बैलासारखा एक पशू पायाशी उभा दिसतो. देवाचे मुख थोडेसे खंडित आहे.
२) नीलकंठ -
शारदातिलकतंत्राच्या आधारावर बऱ्याच अंशी तयार केलेली नीलकंठाची प्रतिमा बंगालमधे मिळाली आहे. येथे चतुर्भुज शिवाच्या हातांत माळा, त्रिशूल, खट्वांग आणि खप्पर अशा वस्तू दिसतात".
३) अघोर -
वरील ग्रंथांप्रमाणे अघोर हे शिवांचे उग्ररूप असून त्याच्या हातांत त्रिशूल, डमरू, बाण, धनुष्य, तलवार, ढाल, खप्पर आणि परशू असावा. बंगालमधे मिळालेल्या या प्रतिमेंत परशू व्यतिरिक्त सर्व आयुधे दिसतात, परशूच्याऐवजी घंटा दिलेली आहे."
४) सदाशिव -
पांच तोंडाचा व दहा हाताचा शंकर सदाशिव या नावाने ओळखला जातो. अशा प्रकारची एक अभिलिखित मर्ती दीनाजपूर जिल्ह्यांत बनगढ येथे आहें," मूर्तीचे मागचे म्हणजे चौथे तोंड पृष्ठशिळेत भोंक करून दाखविले आहे. सदाशिव हा सेनांचा आराध्य देव ! म्हणून साहाजिकच बंगालकडे याच्या प्रतिमा जास्त. दीनाजपूर सदाशिवाचे ध्यान उत्क्ता कामिकागमाशी ताडून पाहता येण्यांसारखे आहे.
५) बालशिव
शिवाच्या बाल रूपांचे अंकन जवळजवळ नाहींच, फक्त देवीच्या एका प्रकारात तो तसा दिसतो. पण त्याचा विचार शक्तिप्रकरणांत करू.
रुद्रशिव (?)
तालागाव (बिलासपुर) छत्तीसगढ येथें सुमारे १०-११व्या शतकातील एक विशाल उभी असलेली द्विभुज प्रतिमा मिळाली आहे. ही ऊर्ध्वलिंगी असून हातांत आयुध नाही. विशेष म्हणजे देवाच्या मुख्य मुखाशिवाय छाती, पोट. माण्ड्या वगैरे अवयवांवर इतर सात मानवामुखें आहेत. गुडघ्याखाली सिंहाची दोन तोंडे दिसतात. शिवाय डोके, भुवया, कान, लिंग, यासारख्या अवयवांवर साप, पाली, मोर, मासे, खेकडे, मगर, कासव वगैरे प्राणी ही लहान मोठ्या प्रमाणांत अंकित केले आहेत. (र.चि.शि. १४)
या शिल्पाची निश्चित अशी ओळख झालेली नाही. विद्वानानी प्रतिमेला विलक्षण शिव, रुद्र, लकुलीश, अष्टतन् महाकाल भैरव, वास्तुपुरुष अशी नांवे देण्याचा प्रयत्न केला आहे. (रे.चि.........)
L.S. Nigam, The Image of Siva from Tala : Issues in Identification and Prerpretations of Symbols Heritage of India Taland Issues in Identificatonour of R.K. Sharma, Delhi, 1994, Vol. 1, pl. 39.1, pp. 229-34
विषपायी आवक्ष शिव :
अशा प्रकारच्या दोन प्रतिमा उल्लेखनीय आहेत. प्रथम पढावली, मध्यप्रदेश येथून चतुर्भुज मूर्ती, हातांत अक्षमाला, दर्पण, विषपात्र आणि घट, येथे अघोर मुख डावी असून याच मुखाने शिव परळातील विष प्राशन करीत आहे. दुसरे शिल्प पाली (ललितपुर) उ.प्र. येथील नीलकंठेश्वर मंदिरात आहे. सुमारे १२व्या शतकातील ही मूर्ती आठ हाताची आहे. हातांत अभयाक्षमाला, डमरू, विषपात्र, खड्डांग, शूल, अक्षमाला, अग्निपुंज, त्रिंशूळ अशी आयुधे आहेत. येथे विषपान करणारे अघोरमुख उजवीकडे आहे. (रे.चि.शि. १५)
Puratana, 6, colour plate pp. 178-79
- महेन्द्र वर्मा, बुन्देलखंड के नीलकंठ मंदिर, पञ्चाल, ८, कानपुर १९९५, चित्र ११ पृष्ठ ५१-५५.
शिव गां धार कला :
गांधार कलेच्या आरंभिक काळाच्या दोन प्रतिमा उल्लेखनीय आहेत. एक रोम, इटली येथील एका व्यक्तिगत संग्रहात आहे. तोंडे तीन आहेत. सिंह, मानव आणि पशू; हातांत माळा, त्रिशूळ, चक्र आणि पात्र आहे. (रे.चि.शि. १६)
दुसरी प्रतिमा बर्लिन संग्रहालयांत आहे. मुखें तशीच तीन आहेत, पण डावीकडचे हरिणाचे किंवा बैलाचे (?) वाटते. हातांत त्रिशूळ आणि पात्र आहे, दोन मात्र तुटलेले आहेत. कपाळावर आडवा तिसरा डोळा आणि ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे (रे.चि.शि. १७)
H. Hartel, A Siva Relief from Gandhara South Asian Archacology, London 1985 pp. 392-96 (Scandinarian Institute of Asian Studies, occasional papers 4)
गंगाधरमूर्ती :
मंदसोर मध्य प्रदेश येथे एका चौकोनी खांबावर सुमारे ६व्या शतकाचे हे शिल्प उत्कीर्ण आहे. चारहाताचा शंकर उभा आहे. त्याच्या मस्तकावर त्रिपथगामिनी गंगा तीन स्त्रियांच्या रूपांत बसून खाली येत आहे. (रे.चि.शि. १८)
Kiret Mankodi, A carved Pillar from Mandoore JISOA, XI 1979-80 fig. 111.1 pp. 34- 41
शिव प्रतिमेची शगत वैशिष्ट्ये :
तौलनिक दृष्टीनें अभ्यास केल्यास शिवप्रतिमा विज्ञानांच्या तीन धारा स्पष्ट दिसतात. प्रथम धारा आशिया खंडाच्या मध्यांपासून वायव्य भारतांपर्यंत आणि तशीच नेपाळकडे पसरली, दुसरीचा विस्तार मथुरा आणि व्रजक्षेत्राच्या आसपास होता, हिच्यावर पहिल्या प्रवाहांची छाप दिसते. तिसरी धारा दक्षिण भारतांत व्याप्त झाली. तिचे बऱ्याच अंशी स्वतंत्र असें अस्तित्व राहिले. प्रथम उत्तरभारतांतील प्रवाहांचा विचार करू.
वायव्य धारा -
प्राचीन काळापासून मध्य आशियापर्यंत 'शास्त्रीय धर्म' आणि 'लोक धर्म' या दोन्ही क्षेत्रांतशिव पूजनाला मान्यता प्राप्त होती. प्राचीन कापिशी (आजचे काफ्रिस्तान) येथे शिवमंदिर होतें. वंक्षु नदीच्या दक्षिणेत असलेल्या मूजवंत किंवा मूजान प्रदेशांत वेदकाळांतही रुद्रांचे अस्तित्व होतें." अथर्ववेदांत शिवाचे घर म्हणून मूजवान प्रदेशांबरोबरच
महावृष प्रदेशांचेही नांव येते. महावृष देशांत महान् वृष किंवा बैल ज्यांचे लांछन आहे अशा शंकराचे पूजन होत असावे. महाभारताप्रमाणे गांधार देशांत शिवोपासना बरीच जुनी होती. गांधारीनें अगोदरच शंकराकडून शंभर मुलें होण्याचे वरदान मिळविले होतें. याच ग्रंथांत अन्यत्र शिवाचें एक अभिधान 'गांधार' असेंही दिले आहे." शतपथ ब्राह्मणांचे कथन असे आहे की शिव हा प्राच्य देशांत 'शर्व' आणि बाल्हीक देशांत 'भव' या नावानें लोकप्रिय होता." शंकराचे कैलासावर राहणें, त्याचा विचित्र वेश, गिरि-कन्येशी लग्न वगैरे गोष्टी त्याच्या पर्वतप्रदेशांतील निवासाकडे संकेत करतात.
पुरातत्वशास्त्रही या गोष्टीचा पाठपुरावा करतें कीं अखंड भारताच्या वायव्येकडे असलेल्या प्रदेशांत बौद्धांबरोबरच शैवमतांचाही प्रचार होता. प्रो. रोझेनफील्ड यांनी याविषयी असे मत मांडले आहे की, साधारण हिंदू संप्रदाय कुषाण शहराच्या पश्चिमी भागांत हळुहळू दृढ होत होते. इसवीसनांच्या तिसऱ्या शतकांपर्यंत हिंदुकुशाच्या उत्तरी क्षेत्रांत शिव असलेल्या नाण्यांचा चांगलाच प्रचार झाला होता. अफगाणिस्थानाचा काबुल जवळचा भाग आणि गांधार देश येथे हिंदू धर्माच्या बऱ्याच प्रतिमा इसवीसनांच्या चौथ्या आणि पाचव्या शतकांपर्यंत रूढ होत्या. कुषाण राजांच्या नाण्यांकडून मिळणाऱ्या माहितीला आपण पूर्वीच विचारात घेतले आहे. एतावता हें उघड आहे की इसवीसनांच्या प्रथम शतकांत इकडील भागात बौद्ध व शैव असे दोन्ही धर्म विद्यमान होते, पण बौद्धांचा पगडा जास्त असावा. सहाव्या-सातव्या शतकांचे सुमारांस हूणांच्या आक्रमणांनंतर मुख्यत्वे स्वात भागांत हीनयानी बौद्ध प्रभावहीन झाले व शैवाची शक्ती वाढली. सातवें ते नववें शतक या दरम्यान शाही राजाच्या काळांत बऱ्याच शैव प्रतिमा घडविण्यांत आल्या. त्यांची थोडक्यात मोजणी अशी करता येईल :
१) स्वात किंवा प्राचीन उड्डियान येथून मिळालेली शंकराची सहा हातांची मूर्ती." ही जरी खंडित असली तरी शिवाचे कवच स्पष्ट आहे. शंकराचा वज्राशी असलेला संबंध आपणांस कृषाणांच्या नाण्यावरही दिसला होता.
२) सओझूमा-कला येथून प्राप्त झालेला त्रिमुख शिव." काही विद्वानांच्या मतें या मूर्तीवर ग्रीक देव झियस् पोसीडॉन व हरक्यूलियस यांच्या मूर्तीचा सम्मिलित असा प्रभाव आहे. या शिव प्रतिमेत गदा (club=leontis). त्रिशूल आणि शेवफळ (Hesperides चे apple) स्पष्ट आहे. सध्या ही मूर्ती मजार-ए-शरीफ च्या संग्रहालयांत आहे.
३) बटकारा (Butkara 1) येथील शिवलिगांकित शिळा पट्ट."
४) उत्तर कुषाणकालीन ठशांवर असलेला वृषारूढ चतुर्भुज शिव (रे.चि. तेवीस ९). याच्या हातांत गदा, त्रिशूल आणि पात्रा आहेत, आणि खांद्यातून अम्मीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. (रखाचित्रांत ज्वाला दिसत नाहीत) या ज्वाला रुद्र आणि अग्नी यांना एक मानणाऱ्या परंपरेकडे संकेत करतात. "
५) तक्षशिलेच्या धर्मराजिक स्तूपांतून एक शिलापट मिळाला आहे ज्यावर बैलांसह शंकर अंकित होता.
६) सिरकप येथून हाती आलेला तांब्याचा गोल छाप, यावर नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती आहे असे विदानांचे मत आहे.
२०५
७) तेथूनच मिळालेल्या दुसऱ्या एका कुषाण कालीन ठशावर शिवरच्छितस या अक्षरांसह शिव प्रतिमा अंकित आहे. (रे. चित्र बावीस ६)
कुषाणकाळांनंतरच्या शैवप्रतिमा खालील होत -
८) डॉ. टॅडी यांच्या कथनांप्रमाणें सर ऑरेल स्टेन आणि पाकिस्तानांत कार्य करणाऱ्या इटालवी पुराशास्त्रज्ञानां काही प्रतिमा अशा मिळाल्या आहेत ज्यांत एकटा शंकर, बुद्ध अवलोकितेश्वर वज्रपाणि, वगैरे बरोबर दिसतो. या प्रतिमा अद्याप अप्रकाशित असून सैदू शरीफच्या स्वात संग्रहालयांत ठेवल्या आहेत. ५५
९) सुपलबांदा येथील डोंगरी कातळा ज्यावर बोधिसत्त्वांसह शंकर अंकित आहे. ५६
१०) प्राचीन पुष्कलावती किंवा आधुनिक चारसद्दा येथून हाती आलेली पेशावर संग्रहालयांतील त्रिमूर्ती. निळसर दगडाच्या या प्रतिमेंत त्रिशूल, वज्र, आणि घट ही आयुधं व खांद्यावरील यज्ञोपवीत हे स्पष्ट आहे. ५७
११) पेशावर संग्रहांलयातील अशाच प्रकारच्या पाषाणाचे शिवलिंग, ज्यावर भैरव, महादेव आणि उमा यांची मुखें कोरली आहेत. ५८
सुमारें सातव्या शतकानंतर या प्रदेशांत शाही राजांची राजवट सुरू झाली. या काळांत शैवांचे पुनरुत्थान झाले. त्यामुळे गांधार आणि स्वात भागांतून बऱ्याच शैवप्रतिमा समोर आल्या. त्यांची संक्षिप्त यादी खाली देत आहे :
अ) गांधार प्रांतातील वृषारूढ शिवपार्वती
आ) वृषांबरोबर शिवपार्वती
३) युसुफ झाई जिल्ह्यातील आरसा घेतलेली पार्वती
ई) चारहातांचा स्कंद
3) मनिचिनार, स्वात येथील त्रिशूल, डमरू आणि कमंडलू घेतलेला चतुर्भुज शंकर
ऊ) पांढरे संगमरवरी एकमुख शिवलिंग
ए) लिंगाच्या आकाराचे मंदिर किंवा देव्हारायाचा बाह्य आकार मुखलिंगाचा असून आत मात्र शिवपार्वतीची मूर्ती कोरलेली होती. १२
वरील पैकी बऱ्याच ठिकाणी शिवाचे एक आयुध गदा आहे. त्याचप्रमाणें तो ऊर्ध्वलिंगी ही आहे. वरील सामग्रीचे सिंहावलोकन केल्यास खालील मुद्यांची वैशिष्ट्ये म्हणून नोंद करता येईल :
क) या प्रतिमांवर ग्रीक देव हरक्यूलियस आणि पोसेडॉन यांची छाप आहे.
ख) शिवाची आयुधे म्हणून गदा, पाश, वज्र, चक्र, कधीकधी अंकुश, मृग व त्रिशूल परशू दिसतात.
ग) चंद्रकोरीचा उगम इकडूनच असावा.
घ) ऊर्ध्वलिंगांचे अंकन सामान्य होय.
२०६
ङ) हात दोन किंवा चार आहेत पण संयुक्त प्रतिमांत यांची संख्या वाढते.
च) इकडे एकमुखाबरोबरच त्रिमुख शिवही लोकप्रिय होता.
छ) पाषाण प्रतिमेंत त्रिनेत्र दिसतो. नाण्यांवर त्याचा पत्ता लागणें कठिण आहे.
ज) बैल व शिव यांचे चांगलेच सान्निध्य आहे, कचित हत्तीही दिसतो.
झ) उत्तरीय म्हणून शंकराने चामड्याचा उपयोग केलेला आहे. हे चर्म सिंहाचे समजले जाते, पण ते बैलाचेही असणें शक्य आहे.
ञ) शिवाची पत्नी म्हणून उमा आणि नाण्यांवर नना दाखविली आहे.
८) उत्तर कुषाणकाळांत आरसा घेतलेली पार्वती दिसते (रे.चि. बावीस ८).
ठ) इतर शैव प्रतिमांत दुर्गा, गणपती व कार्तिकेय हे दिसतात.
उत्तरी किंवा नेपाळी धारा :
शिव सौम्य रूपांत सर्व अलंकारानी मंडित असून एक मुखी व चतुर्भुज असतो. त्याच्या हातात कमल किंवा सनात पुष्प, माळा, त्रिशूल व घट अशी आयुर्धे दिसतात. काही ठिकाणी तो ऊर्ध्वलिंगी ही आहे. त्रिनेत्र, सर्पभूषणे किंवा दिगंबरत्व हैं अनिवार्य रूपाने दिसत नाही तसेंच काही ठिकाणी बैल ही नसतो.
शिवाच्या उग्रस्वरूपांपैकी काहींचे दर्शन वाराणसीच्या नेपाळी मंदिरांत होत असे पण आता त्या प्रतिमा चोरांच्या हाती पडल्या आहेत. यापैकी एक चतुर्भुज असून तिच्या हांतात कमळ, माला, त्रिशूल परशू, आणि जलपात्र (कुंडिका) अशा वस्तू होत्या. सुंदर पुष्पयुक्त जटामुकुट, खांद्यावर रुळणाऱ्या जटा, हातांपायांतील सर्पभूषणे, रेखीव व्याघ्रांबर व ऊर्ध्वलिंगही या निळसर दगडाच्या सुंदर प्रतिमेची इतर वैशिष्ट्ये होत. याच मंदिरात असलेले शिवाचे दुसरे उग्ररूप म्हणावे महाकालाचे भैरव मुख होतें."
डॉ. ब्रजेंद्रनाथ शर्मा यांनी आपल्या एका लेखांत नेपाळमधील शिवमूर्तीचा आढावा घेतला आहे. त्याचा सारांश खाली देत आहे.
गंगाधर शिव पार्वती :
या प्रकारच्या प्रतिमा नेपाळमधे फारच लोकप्रिय होत्या. सुमारे नवव्या शतकांतील एक मूर्ती पाटन येथील कुंभेश्वर मंदिरांत आहे. काही नंतरच्या अशा मूर्ती लखनऊ संग्रहालय (सं.सं.४५.७८) आणि ब्रिटिश म्यूझियम, लंडन येथे आहेत (सं.सं. १९७०.७-२०.१).
उमामहेश्वर मूर्ती :
या प्रकारात गंगा दाखवीत नाहीत. यांची साधारण ठेवण उत्तर भारतांतील प्रतिहार कलेतील उमामहेश्वरासारखी आहे. या प्रकारची सध्या माहीत असलेली प्राचीनतम मूर्ती शके ५९३ ची असून ती ललितपुर, सिकुबाहिल येथे आहे. इतर प्रतिमा गैती (१० वे शतक), संखू बज्रयोगिनी मंदिर (१२ वे शतक) वगैरे ठिकाणी आहेत. अशा प्रकारच्या धातुमूर्तीही नेपाळांत सापडतात.
२०७
एकपाद त्रिमूर्ती :
येथे शिवाच्या खांद्यातून नमस्कार मुद्रेत असलेल्या ब्रह्मा व विष्णूचे प्राकट्य दाखवितात. शिव चतुर्भुज असून त्रिशूल, परशु, पात्र आणि वर धारण करणारा आहे ही प्रतिमा पाटनच्या सुंदरी चौकांत आहे. काठमांडूच्या संग्रहालयांत असलेल्या अशा मूर्तीत शिव हा अर्धनारीश्वर रूपांत (१७ वे शतक) आहे.
या प्रकारांत शिवाला फक्त एकच पाय दाखवतात, पण त्याच्या डाव्या बाजूतून ब्रह्मदेव आणि उजवीकडून विष्णू प्रगट होताना दिसतो. क्वचित स्वतः शिव अर्धनारीश्वर रूपात ही असतो. (रे.चि.शि. २०)
B.N. Sharma Iconographic parallels, H.K.Sherwani Felicitation Volume, Hyderabad, pp. 552-59
एकपाद त्रिमूर्ती दक्षिण भारतात ही रूढ होत्या. H. Krishna Shastri, South Indian Images of Gods and Goddesses, Madras 1955, fig. 59, p. 97
- अन्धकारि :
दहाव्या शतकांतील ही प्रतिमा शिखा नारायण येथील मंदिरांत आहे.
लकुलीश :
हा शिवाला बावीसावा अवतार वराह क्षेत्रांजवळ धारण येथे दिसतो ऊर्ध्वलिंग स्थितीत तो बसलेला असून त्याचा दंड डाव्या पायाजवळ आहे.
नटराज :
पाटना येथील सुंदरी नाचणारा पंचवदन चतुर्भुज शिव (१० वे शतक) दोन प्रतिमांत आढळतो, पैकी एकीत तर तो बैलाचे पाठीवर नाचत आहे. हा प्रकार बंगाल व आसामकडे जास्त मिळतो.
हरिहर :
या प्रकारची सुंदर आणि जुनी मूर्ती बालाजू येथे आहे (१०-११ वे शतक). येथें आजुबाजूला पार्वती आणि श्रीदेवीच्या प्रतिमा आहे. हरिहराच्या मूर्ती पाटन, पशुपतिनाथ आणि नक्सल येथे आहेत.
अर्धनारीश्वर :
कमलासनांवर समभंग स्थितीत उभी चतुर्भुज अर्धनारीश्वराची ब्राँझ मूर्ती सध्या अमेरिकेच्या हीरामानेक संग्रहांत आहे. बऱ्याच अलीकडची (१८ वे शतक) दुसरी एक राणी पोखरी, काठमांडु येथे आहे.
शिव महेश्वर महाकाल :
फतेहगढ़, बारामूला, काश्मीर येथून मिळालेले सुमारे ७-८ व्या शतकाचे हे शिल्प फार विलक्षण आहे. खालून खण्डित झालेली ही प्रतिमा उभयभागी उत्कीर्ण आहे. दर्शनी भागावर त्रिमुख शंकर आहे. त्याची अघोर, सामान्य आणि बी अशी तीन मुखें आहेत. हा उभा आहे. उजवीकडच्या हातांत माळा आणि गदा दिसते. डावीकडचा भाग भन्न आहे.
१५५
बाण घेतलेला (निषंगि, इषुधिमान्), आक्रमकांना दंड देणारा, संरक्षण करणारा, उपवीत धारण करणारा, उच्चस्वराने ओरडणारा (उच्चैर्घोषायाक्रं दयते), चोरांचा अधिपती (स्तेतांना पती) रात्रीं फिरणारा (नक्तंचर), पशूत प्रवेश करणारा (शिपिविष्ट) शिरस्त्राण आणि कवच धारण करणारा (विल्मिन्, कवचिन्), अशा प्रकारचा आहे. एकादशणीं किंवा नेहमीच शंकराला अभिषेक करताना ज्या रुद्राध्यायाचे पारायण करतात, त्यांत वरील व अशाच प्रकारच्या अन्य विशेषणाचा उल्लेख आढळतो. एकूण हा शिव एकीकडे शत्रूच्या डोळ्यांतून आसवे गाळणारा संहारत प्रबल पराक्रमी योद्धा आहे, तर दुसरीकडे तो अमंगलाचा विनाश करून मांगल्याची स्थापना करणारा असून 'देवाचा प्रथम वैद्य' (प्रथमो दैवो भिषक् ) आहे.
पौराणिक काळांची मजल गाठीपर्यंत रुद्राने 'महादेव' हे नांव घेऊन ब्राह्मण धर्मांत बरेच वरचे स्थान मिळविले, तरी पण त्याच्या परकीय स्वरूपाचे धागेदोरे लोकमानसांतून अगदीच नष्ट झाले होते असें मात्र दिसत नाही. पौराणिक वाङ्मयांत देखील शिव व त्याचा पुरस्कार करणाऱ्या काही मतांना बऱ्याच ठिकाणी हेय दृष्टीनेच पाहिले गेले आहे. या विषयीं काही संकेत पहा :
१) वेदमान्य शैव संप्रदायाचे बरोबर कौल, पाशुपत, वगैरे अवैदिक मतांचे वेगळे अस्तित्व असणें.
२) शिवाला यज्ञभाग न देण्यांचा अट्टहास व तत्संबंधानें दक्ष प्रजापतीचे विस्तृत आख्यान.
३) शिवाचे द्वारा बल प्रयोगाने यज्ञ भागाची प्राप्ती करून घेणे."
४) शिवाने ब्रह्मदेवाच्या यज्ञांचा केलेला विध्वंस, यज्ञांचे मृगरूपाने पलायन व त्याच्या पाठीस लागल्यामुळे शंकराला प्राप्त झालेली 'मृगव्याध' ही संज्ञा.
५) इंद्रपदांवर बसलेल्या पांच व्यक्तींचा रुद्रांकडून पराभव व पर्वत कारागृहांत त्यांची कैद'. याच प्रकारे 'पूषण' आणि 'भग' हे दोन वैदिक देव शिवाकडून दंडित झाले होते व त्यामुळे शंकराला पूष्णोदंतविनाश', भगध्न आणि भगनेत्रांकुश" अशी अभिधानें प्राप्त झाली होती.
६) शंकराची 'ऊर्ध्वकेश', 'ऊर्ध्वमेद्र', 'महालिंग', 'तीक्ष्णदंष्ट्र', 'विरुपाक्ष', अशा प्रकारची नांवे व त्यातून दिसून पडणाऱ्या शिष्ट समाजाला असंमत अशा सवयी, उदाहरणार्थ बायकोच्या पुढे नाचणें, विषादिवस्तूंचे सेवन, स्मशानांत राहणें, चामडें नेसणें, माणसाच्या कवट्यांना अलंकार म्हणून वापरणें, वगैरे.
७) राक्षस व असुरांचा आराध्य व त्यांची कड घेणारा देव म्हणून शिवांचे बऱ्याच ठिकाणी वर्णन येते. शिवाय भुर्ते, पिशाच्चें, यक्ष ही मंडळी त्यास फार जवळची होत.
८) भृगुत्रार्षीकडून शंकराला मिळालेल्या अनेक शापांचे वर्णन जसें शिवाचे लिंग-योनी स्वरूप होणें, द्विजांकरिता अपूज्य असणें, शंकराला अर्पण केलेली फुले, अन्न, जल, आदि पदार्थ प्रसाद म्हणून देखील अस्वीकार्य समजले जाणें, शंकराच्या पायाचे तीर्थ अग्राह्य असणें, इत्यादि.१२
९) विशेषकरून दक्षिण भारतांत शिवाच्या प्रसादाला हेय मानले जाते. 'शिवस्व' हा शब्दच अस्वीकार्य वस्तूंच्या अर्थात आजही आपण वापरतो. शिवाचे पूजन करणारे व शिव नैवेद्य भक्षण करणारे 'गुरव' या विशिष्ट जातीच्या लोकांना ब्राह्मण आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत. यांचा मुख्य व्यवसाय मृदंग वाजविण्याचा असे.
२०८
विशेष म्हणजे याच्या जटाजूटावर बुद्धाप्रमाणे वाटणारी एक लहानशी दोन हाताची मूर्ती आहे. (रे.चि.शि. २१)
शिल्पाच्या मागच्या भागवर उग्र स्वरूपाचा हातांत त्रिशूळ शिव दिसतो. येथे ही डोक्यावर हातांत कळी घेऊन बसलेली छोटीशी मानवाकृती आहे. (रे.चि.शि. २२)
फिलिस ग्रेनॉफ यांनी या शिल्पाची ओळख महेश्वर महाकाल अशी केली आहे, पण ही सर्वमान्य झालेली नाही.
Phyllis Granoff, Maheshvara Mahakala, A unique buddhist Image from Kashmir, ARAS, XLI, I 1979, pp 64-82
Gauriswar Bhattacharya Deva Caturmukha, Panchamukha, Shastri Traditions in Indian Art, Heidelberg, 1989, pp. 51-70, p.60
उमेसह त्रिमुख शिव :
बारामुल्ला काश्मीर येथे मिळालेली सुमारे ५व्या शतकातील ही मूर्ती तूर्त एस्. पी. एस्. संग्रहालय, श्रीनगर येथे आहे. चार हाताचा, त्रिमुख, ऊर्ध्वलिंग शिव माळा, +, गोलावस्तू-कदाचित चन्द्र, व घट घेऊन उभा आहे. डावीकडे द्विभुज पार्वती आहे. शिल्पाच्या पाठीकडे सहा हाताचा त्रिशूळ घेतलेला शिव दिसतो प्रतिमा बरीच खंडित आहे. (रे.चि.शि. २३)
P.K. Agrawal, Iconoplastic Beginnings of Multiheaded and Multiarmed Images at Mathura, JISOA, N.S. XV, 1985-86, pl. VII, 18, 19 р. 21
महेश्वर महावराह :
काश्मीर आणि उत्तराखंडातून आलेल्या हरिहराच्या या वेगळ्या प्रकारांत मुख्य मुख मानवाचे पण उजवीकडे शिवाचे द्योतक सिंह किंवा अघोर मुख आणि डावीकडे विष्णूचे म्हणून वराहाचे तोंड असते. सुमारे ९व्या शतकातील या प्रतिमा चतुर्भुज, किंवा क्वचित सहा हाताच्या आहेत. आयुधामध्ये अक्षमाला, त्रिशूल, गदा आणि चक्र असते. वैजनाथला असलेल्या मूर्तीत आडवे खड्ग ही आहे. उपरेवतांच्या रूपांत नंदी, गरुड, व आयुध पुरुष ही असतात. आतापर्यंत काश्मीरशिवाय उत्तराखंडातून पैठाणी, व संग्राली आणि बैजनाथ, कांगडा हि.प्र. येथून अशा प्रकारची शिल्पें मिळाली आहेत. (रे.चि.शि. २४)
काश्मीर प्रतिमा :
Stella Kramrisch, Manifestations of Siva, Philadelphia, 1981, No. 19, p. 20
- बैजनाथ, हिमाचल प्रदेश :
dSubhashine Aryan, An unpublished Hari-Hara sculpture from Kangra, Himachal Pradesh, Kala XI 2004-05, fig. 24, p. 61
पैठाणी संग्राली, उत्तराखंड :
राकेश तिवारी, जी.सी. सिंह, गढवाल हिमालय की दुर्लभ महेश्वर महावराह प्रतिमा प्राग्धारा १, १९९०-९१० फलक १,२, पृ.२७.
भाग १ (सुरुवातीपासून सुमारें सहाव्या शतकापर्यंत)
आरंभ :
पौराणिक काळांतील देवतासंघ जरी एकेश्वर वादांचे समर्थन करीत असला तरी त्याचे मूळ आधार शिव, विष्णू व ब्रह्मदेव हे आहेत. यापैकी पुढें ब्रह्मदेवाचे महत्त्व कमी होऊन त्याची जागा शक्ती, सूर्य व गणपती यांनी घेतली व पंचदेवोपासना रूढ झाली. हे वर पाहिलेच आहे. आता आपण शिवासंबंधी विचार करू.
समन्वयवादी भारतीय प्रवृत्तीची एक फार मोठी फलश्रुती म्हणून शिवाकडे बोट दाखविता येईल. आज विद्यमान असलेल्या शैव संप्रदायांत अनेक प्राचीन मतें व संप्रदायांची मिळवणी झालेली दिसते. शिव व शक्ती हे भौतिक जगताचे आधार स्तंभ होत. सृष्टीचे मूळ शिवशक्तीच्या संयोगात आहे, पण जर शक्ती शिवाकडून विनियंत्रित नसली तर मात्र ती कहर उडवून देते. पूर्ण विकसित अशा शक्तीला शांत करण्याचे सामर्थ्य शिवाचेच आहे. तो येन केन प्रकरेण हे कार्य करीत असतो. रणोन्मादाने बेफाम झालेल्या शिवारूढ कालीची मूर्ती हाच अभिप्राय दर्शविते. असें सांगतात की रणांत उन्मत्त झालेल्या कालीला आवरणें जेव्हां असंभव होऊं लागले तेव्हां ऊर्ध्वमेढ शिव स्वतः उताणा पडला व त्यानें आपल्या अंगावर बेफाम उसळणाऱ्या कालीचे पाय पडू दिले व नंतर तिला आवरले. कालीच्या मूर्तीप्रमाणेंच अर्धनारीश्वर, शाळुंकेत बसविलेली शिवाची पिंडी, हरिहर, वगैरे प्रतिमा शिव-शक्तीच्या अविच्छिन्न संबंधाच्याच द्योतक आहेत. भग व लिंग हे शक्ती व शिवाचे प्रत्यक्ष प्रतीक होय. सर्व सृष्टी याच दोन प्रतीकांभोवती फिरते आहे. या मूळ सिद्धांताला साहित्य, दर्शन, कला, वगैरे अनेक पर्यायानें प्रतिपादन करण्यांचा प्रयत्न झालेला आहे. महाभारतात उपमन्यूच्या आईनें प्रत्यक्ष योनी व भंगचिन्हांकित जगताचे उदाहरण घेऊन माहेश्वर मताची बाजू फारच सफाईदारपणे उचलून धरली आहे'; व या मताच्या प्राचीनतेकडेही संकेत केला आहे.
पिंडी किंवा शिवलिंग :
सिंधुनदीच्या खोऱ्यांत ज्या प्राचीन वसाहतीचे अवशेष सापडले आहेत. त्या वसाहतीच्या वेळेपासून लिंगपूजा या देशात चालत आली असें म्हणतां येते. श्रीपरिपूर्णानंद वर्मा यांनी अनेक पाश्चात्य लेखकांच्या मतांचा आधार घेऊन आपल्या ग्रंथांत हे दाखविण्यांचा प्रयत्न केला आहे' कीं 'जगाच्या कान्याकोपऱ्यांत वासना आणि प्रजनन या दोन कारणामुळे लिंग-पूजेचा प्रसार झाला होता.' एका दुसऱ्या लेखकाचे, कटनरचे, म्हणणें असें कीं लिंगपूजा सर्वप्रथम इजिप्त देशांत सुरू झाली व ती तेथे ख्रिस्ताच्या चौथ्या शतकापर्यंत चालू होती. श्री. वर्मा यांनी या पद्धतीविषयी जास्त
पार्वतीनंतर दुसरे स्थान नंदीचे आहे. तो बैलाच्या रूपांत तर दिसतोच पण काही ठिकाणी त्याने वृषमुख पुरुषाचे रूपही घेतले आहे. एवढेच नव्हे तर मिर्जापूर जिल्ह्यांच्या (उ.प्र.) अष्टभुज मंदिरांतील शिल्पांत तो स्वतंत्र रूपाने आपल्या पत्नीसह उभा असलेला पाहता येतो (चित्र १६९).
उमामहेश्वर प्रतिमेसारख्या ठिकाणी गणपती आणि कार्तिकेय हे परिवार देवतांच्या रूपांत दिसतात (चित्रे ६६, ६८, ६९). येथेच हाडांचा प्रत्यक्ष सापळा असा श्रृंगरिटी नांवाचा गणही नाचताना दिसतो. कल्याणसुंदर मूर्तीत ब्रह्मदेव, विष्णु, ग्रह व इतर देव आणि देवी यांना परिवार देवतांत स्थान मिळतें.
या व्यतिरिक्त ब्रह्मदेव, विष्णू, लकुलीश, देव, ऋषी, गंधर्व, विद्याधर, वगैरे रुचिप्रमाणें परिवार देवता म्हणून आढळतात.
शिवप्रतिमांचे वर्गीकरण :
मागील भागांत या प्रतिमांचे काही प्रकार आपण चर्चिले आहेत जे गुप्तकाळांपर्यंत रूढ होते. या काळांत त्यापैकीं बरेच चालू राहिले व काही नवे अस्तित्त्वांत आले. थोडक्यांत सर्वांचे मिळून खालील प्रकारे वर्गीकरण करतां येईल -
शिवप्रतिमा
केवल शिव
उमासहित मूर्ती
T अनुग्रह मूर्ती
T संहारमूर्ती
इतर प्रकार
(स्थानक)
(आसन)
रावणानुग्रह
भैरव
गजासुर वध अंधकासुर वध
केवल मूर्ती लिंगोद्भव भिक्षाटन
केवलमूर्ती दक्षिणामूर्ती लकुलीश
त्रिपुरांतक
नटेश
(स्थानक)
(आसन)
(शयन)
हरिहर
अजमुख
शिशु
वीणाधर
(आसन)
अघोर
(सद्योजात)
(स्थानक)
नीलकंठ
अर्धनारीश्वर
अर्धनारीश्वर
कल्याण सुंदर
उमामहेश्वर
वैवाहिक
हरगौरी
वीणाधर
सारीपट क्रीडा
आता वरीलपैकी प्रत्येक प्रकाराचा स्वतंत्रपणे विचार करू.
१८९
सौम्यमूर्ती
केवलमूर्ती :
या प्रकारात शंकर हा एकटा असतो. त्याचे स्थानक व आसन असे दोन्हीं प्रकार आढळतात. शिवाबरोबर बैल असतोच असे नाही. साधारणपणें हा शंकर चतुर्भुज असतो. हातांत त्रिशूल, सर्प व घट हे मुख्यत्वे करून दिसतात. वरचा उजवा हात हे त्रिशूलाचे सामान्य स्थान होय (चित्र ६०). उत्तर भारतांत खजुराहो, मिर्जापूर येथील अष्टभुजा मंदिरांचे अवशेष, राजस्थानांत ओसिया, वगैरे ठिकाणीं अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिमा दिसतात. महाराष्ट्रांत भांदक येथून मिळालेल्या काही शिल्पांत (ही शिल्पे तूर्त नागपूरच्या संग्रहालयांत आहेत) केवलमूर्ती शंकराची काही उल्लेखनीय उदाहरणें मिळतात. एका शिल्पांत त्याचेजवळ तीन फणांचा नाग, त्रिशूल, पाश (?) आणि कमलाचा गुच्छ असून त्रिशूलाचा आकार विशिष्ट प्रकारचा आहे (ना.सं.सं. ए २५). एका दुसऱ्या प्रतिमेंत (ना.सं.सं.ए. २२) कार्तिकेय व गणपती परिवार देवता म्हणून आढळतात. अन्यत्र (ना.सं.सं.ए.७३) त्याच्या जवळ मान वर करून पाहणारा बैल व कमल आणि चौरी घेऊन एक सेविक उभी आहे. (रे.चि. चोवीस १३)
केवलशिवाची आसन घालून बसलेली मूर्ती इंदूरच्या संग्रहालयांत पाहतां येते (इं.सं.४० ।४५५२). येथें शिव चतुर्भुज असून बुद्धांप्रमाणे ध्यानमुद्रेत बसला आहे. त्याचे हात तुटले आहेत पण ऊर्ध्वलिंग, श्रीवत्स व यज्ञोपवीत हे स्पष्ट आहे.
लिंगोद्भवमूर्ती :
शिवमूर्तीचा हा प्रकार दक्षिणेत लोकप्रिय होताच, पण उत्तरेंतही तो चांगलाच पसरला होता. लिंगोद्भवाच्या कथेचे पडसाद स्वात (पाकिस्तानाचा उत्तरपश्चिमी कोपरा) च्या काही लोककथांत देखील मिळतात. ही कथा लिंगपुराणांच्या पूर्वार्धात विस्ताराने पाहता येते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघे स्वतःला श्रेष्ठ समजून भांडू लागले. अकस्मात त्या दोघांमध्ये विस्तवाने धगधगणारे एक लिंग प्रगट झाले, त्याच्या मुळाचा व उंचीचा मागमूस लागत नव्हता. स्वतःला श्रेष्ठ समजणारे दोघेही हा पत्ता लावण्यांस निघाले. हंसाचे रूप धारण करून ब्रह्मदेव वर गेला व वराहाच्या रूपाने विष्णूनें खालची वाट धरली. दोघेही खूप भटकले आणि शेवट तोंड आंबट करून परत आले. एकाएकी प्रणवाचा नाद उमटला, हेच शिवाचे स्वरूप होते दोघेही त्याला शरण गेले व क्रमाने उजवी व डावीकडे हात जोडून उभे राहिले.
लिंगोद्भवमूर्तीत या कथेचे अंकन करतात. या प्रकारचा मृफलक राजस्थानच्या रंगमहाल गांवी मिळाला आहे.' हा गुप्तकाळचा नमूना तूर्त तरी सगळ्यांत जुना म्हणता येईल. प्रतिहार कलेतील या प्रकाराचा एक सुंदर नमूना सिकार हून मिळाला आहे. दुसरा वाराणसी येथील भारतकला भवनांत आहे' (चित्र ५४'). वाराणसीला मधोमध ज्वालावृत लिंग असून आजुबाजूला ब्रह्मदेव व विष्णू हात जोडून उभे आहेत. त्याचप्रमाणें अगोदर शोध घेण्यासाठी निघालेले दोघेही वर आणि खाली अंकित आहेत.
दक्षिणेतील लिंगोद्भवांशी याची तुलना केल्यास एक गोष्ट ठळकपणे लक्षांत येते कीं उत्तरेंत बहुतेक नुसते लिंगच दाखवीत तर दक्षिणेत लिंगातून उद्भूत झालेला शंकरही दाखवीत असत (रे.चि. सव्वीस २०).
भिक्षाटन मूर्ती :
काशी येथील मानमंदिर घाटांवर उत्तर गुप्तकालातील ही मूर्ती एका झाडाखाली आहे. शिव चतुर्भुज असून त्याच्या खालच्या हातांत भिक्षापात्र आहे. विशेष म्हणजे शंकराच्या बाजूस एक सेविका उभी आहे. तिच्याजवळ पाण्याची झ किंवा भृंगार आहे. शंकराचा उजवा हात या स्त्रीच्या खांद्यावर आहे.
नटेश किंवा नृत्यमूर्ती :
दक्षिणेपेक्षा उत्तरभारतांत नृत्य करणाऱ्या शिवाच्या प्रतिमा कमी मिळतात. या प्रसंगी मध्यभारतांतील दोन प्रतिमांचा उल्लेख आवश्यक आहे. एक उज्जैन येथून मिळालेली व दुसरी म्वाल्हेरच्या एका गांवातून मिळालेली आहे. दोन्हीत शिव हा दशभुज असून त्याचे पायाजवळ वर मान केलेला बैल आहे. डोक्याकडे नेलेल्या दोन्ही हातांत साय, व इतरांत त्रिशूल, इम्स, खट्वांग, वगैरे आयुधं दिसतात. उज्जैन प्रतिमेत ढोलकी वाजविणारा व टाळीने ताल देणारा असे दोघेजणही अंकित आहेत
नृत्यमूर्तीचा किंचित निराळा प्रकार बंगालच्या पालकलेत मिळतो. येथे शंकर भूमीवर नाचात नसून तो बैलाच्चा पाठीवरच उभा राहून नाचत आहे. हात दहाच आहेत पण आयुधांत मात्र अंकुश खड्ग, वगैरे सारखी काही नवी आयुचे दिसतात.
वीणाधर :
हातांत वीणा घेतलेला शंकर वीणाधर या नांवाने प्रसिद्ध आहे. हा प्रकार नृत्यमूर्तीचाच प्रकार आहे. येथे तो चतुर्भुव असून त्याच्या पुढच्या हातांत लांब दांड्याची वीणा आहे. ती वाजवीत तो नाचत आहे. शिवराममूर्तीच्या मते या प्रकारची एक प्रतिमा उत्तर प्रदेशांतून मिळाली आहे. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या ऊंचगांव (जि.सीतापूर) येथील प्रतिहारकालीन शिल्पसंग्रहांत ही तो आहे. या शिवाय सप्तमातृकापट्टांत बहुतेक एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला वीणाधर शिव दिसतो (चित्र १२४).
वीणाधर शिवाची दुसरी प्रतिमा देहरादून जिल्ह्याच्या (उ.प्र.) लाखामंडल गांवातून मिळाली आहे. येथे तो चतुर्भुज असून पत्नीसह वर्तमान उभा आहे. जवळच बैलही दिसतो."
वीणा घेतलेल्या शंकराची आसनमूर्ती इंदूरच्या संग्रहालयांत आहे (इ.सं.सं.१२२/५४०९). मुळांत हिला आठ हात होते. आतां फक्त वीणा, माळा व एक फळ एवढ्याच वस्तू हातांत असलेल्या दिसतात. विशेष म्हणजे मांडी घालून बसलेला असून देखील याच्या पायात घुंघरु बांधलेले आहेत. बैल व एक ढोलके वाजविणारा हे उपस्थित आहेतच.
नचना कुठारा (पन्ना) मध्यप्रदेश येथून हाती आलेल्या गुप्तकालीन शिला पटावर शिवपार्वतीच्या दोन आसनस्थ प्रतिमा गमतीदार आहेत. एका ठिकाणी शिवाच्या हातात एका भोपळ्याची वीणा आहे व दुसऱ्या शिवाने गिटार सारखे
वाद्य घेतलेले आहे. पार्वती वीणा वादन ऐकत आहे (र.चि.शि.२)
Pratapaditya Pal, The Ideal Image The Asiatic Society New York, 1978 p.37
नटराज हातांत सिंह :
सिंहासह शिवाची शिल्पें आपण मागे पाहिली आहेत. कचित मध्यकाळातही हे वैशिष्ट्य दृष्टोत्पत्तीस येते. आ. गौ राजस्थान येथे एका छोट्याशा मंदिरावर अष्टभुज नटराज आहे. चारहात खंडित आहेत. उजव्या दोन हातांत त्रिशूल आणि भिक्षापात्र व डावीकडे खड्डांग आणि छोटासा सिंह आहे. सुमारे ८व्या शतकाचे हे शिल्प अग्रवाल यांच्या मते शिवाने क्रोधरूपी सिंहाला धरल्याचे हे प्रतीक असावे. (विस्तृत चर्चेसाठी मागे पहा भामूशा. पान १४५) (रे.बि.शि. ३)-
१९१
R.C. Agrawala, A Rare Nataraja Panel from Abaneri, Rajasthan, Pragdhara, 15, 2004-05 Pl. 11, pp. 285-86
हरिहर :
उजवीकडे हर आणि डावीकडे हरि अशा हरिहराच्या समभंग स्थितींत उभ्या असलेल्या बऱ्याच मूर्ती मिळतात. राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथें मध्यप्रदेशांतून प्राप्त झालेली अठराव्या शतकांतील आलीढ मुद्रेत असलेली हरिहर प्रतिमा आहे (रा.सं. ६८.१३७). तिचे हातपाय खंडित आहेत. डॉ. बी. एन्. शर्मा यांच्या मतें हा नृत्य करणारा हरिहर आहे.
लकुलीश :
सोटा घेतलेले आसनस्थ लकुलीशांचे रूप मध्यभारतांतील कित्येक उमामहेश्वर प्रतिमांत मध्य रथिकेत किंवा तिच्याजागी आढळते. याच्या दुसऱ्या हातांत फळ असून हा ऊर्ध्वलिंगी दिसतो (इं.सं. २/१०). मध्यकाळांत शिवाच्या या बावीसाव्या अवताराचे पूजन राजस्थान, मध्यप्रदेश आणि ओडिसांत बरेच प्रचलित होते. नेपाळांत वराह क्षेत्रांजवळ धरण नांवाचे ठिकाणीं आसनस्थ लकुलीश आढळतो.'
द्विलिंगी लकुलीश :
मंदसोर, मध्यप्रदेश येथे शिवना नदीतून मिळालेली व तूर्त भोपाळ संग्रहालयात असलेली ही द्विभुज लकुलीशाची प्रतिमा बरीचशी खंडित असली तरी येथें स्पष्टपणे आढळणाऱ्या दोन ऊर्ध्वलिंगामुळे महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या अंकनाचे कारण विचारणीय आहे. हे शिल्प औलीकरांच्या वेळचे म्हणजे सुमारे ६व्या शतकाचे आहे.
K.K. Shah and K.C. Pande 'Proud Possessions of Mandsaur Museum, Ajaya Sri 2, Pl. 11.5, p. 475
दक्षिणामूर्ती :
याच्या काही प्रतिमा वाराणसीत दिसतात, पण त्या बऱ्याच आधुनिक आहेत.
अर्धनारीश्वर :
आतांपर्यंत आपण एकट्या शंकराच्या स्थानक व आसन मूर्तीचा आढावा घेतला. आतां त्याच्या सपत्नीक मूर्तीकडे वळण्यांच्या अगोदर दोन्हीं ना सांधणारा दुवा म्हणजे अर्धनारीश्वर प्रतिमांचा विचार करावयास हवा (चित्र ६१). उत्तरप्रदेशांतून मिळालेली अशी एक प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत आहे. पण ती खंडित असल्यामुळे हस्तादिकांचा विचार करता येत नाही. उत्तरप्रदेशाच्या पर्वतीय प्रदेशांत उत्तर मध्यकाळांत प्रचलित असलेल्या कत्त्यूरी कलेची एक अर्धनारीश्वर प्रतिमा यांच संग्रहालयांत आहे. (ल.सं.सं.६५.१७१) ही चतुर्भुज असून हातांत अक्षमाळा, त्रिशूल, आरसा आणि झारी या वस्तू आहेत. अर्धनारीश्वराची मूळांत फारच उत्कृष्ट असलेली स्थानक प्रतिमा बांगलादेशाच्या राजशाही संग्रहालयांत असल्याचा श्री. शिवराममूर्ति यांनी उल्लेख केला आहे." हिला मुळांत दोनच हात असावेत. मथुरेची ऊर्ध्वलिंग परंपरा येथे ही विद्यमान आहे. श्री. शिवराममूर्ति यांच्या मतांप्रमाणे ही पद्धत ओडीसापर्यंत गेली होती. पण तिने राज्याची दक्षिण सीमा ओलांडलेली दिसत नाही. दुसरी स्थानक मूर्ती राजस्थानच्या आबानेरी मंदिरावर
१९२
कोरलेली आहे. या सर्वांग सुंदर प्रतिमेला प्रदक्षिणाक्रमानें फूल, त्रिशूल आणि आरसा धारण करणारे हात आहेत. चीया अर्थात् सामान्य डावा कमरेवर ठेवला आहे."
आसनस्थ अर्धनारीश्वर :
अशा प्रकारच्या दोन प्रतिमा समोर आल्या आहेत. तंजावूर जवळ कंडीयूर येथील शिवमंदिरात चोळ कालीन (सुमारे ९वे शतक) तीन हाताचा अर्धनारीश्वर बैलाला टेकून बसला आहे. शिवाचा एक उजवा हात बैलाच्या डोक्यावर आहे, आणि वरच्या हातांत परशू दिसतो. पार्वतीच्या हातांत कमळ आहे (रे.चि.शि.४).
दुसरी प्रतिमा मऊ (सोनभद्र) उत्तर प्रदेश येथे आहे. सुमारे ७व्या शतकातील हा अर्धनारीश्वर चतुर्भुज आहे. उजवीकडे अक्षमाळा व त्रिशूळ आणि डावीकडच्या एका हातांत आरसा व दुसरा गुडघ्यावर टेकलेला आहे. ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे.
P.R. Sriniwasan, 'Rase Sculptures of early Chole period', Lalitkala 5, 1959, PL XXVII, Fig. 4, p.63
- राकेश तिवारी व जी.सी. सिंग, 'मऊ क्षेत्र के संदर्भ में सोनभद्र जिले का शिल्प वैभव, प्रग्धारा २, १९९१-९२, फिगर १७, पा. १३३.
अर्धनारीश्वर आणि लक्ष्मी/तारा :
कन्नौज (उ.प्र.) संग्रहालयात असलेली ही प्रतिहार कालीन उत्कृष्ट प्रतिमा आहे. येथे दर्शनी बाजूला वर, त्रिशूळ, सर्प आणि आरसा घेतलेला अर्धनारीश्वर उभा आहे. आजूबाजूला उजवीकडे पुरुषरूपांत नंदी आणि डावीकडे स्थूलकाय गण आहे. (रे.चि.शि.५)
या शिल्पाच्या पाठीमागे एक द्विभुज देवी उभी आहे. ती उजव्या हाताने पायाजवळ बसलेल्या भक्ताला काही देत आहे; डाव्या हातांत सताल पद्म आहे. (रे.चि.शि. ५,६).
N.P. Joshi, 'Two Problematic Sculptures of Pratihara Periad' JRAS, Bombay, 56-59, 1981-84, pp. 175-79
कल्याणसुंदर" :
शिव पार्वतीच्या विवाहाचे अंकन करणारी प्रतिमा कल्याणसुंदर या नावाने ओळखली जाते (चित्र ६२). विवाह संस्काराच्या निरनिराळ्या पायऱ्या प्रमाणें कल्याण सुंदर प्रतिमेचेही प्रकार बदलत जातात. उत्तर व दक्षिण भारत दोन्हींकडे या प्रकारच्या कित्येक प्रतिमा मिळतात. त्याचा अभ्यास केल्यास खालील मुद्दे ठळकपणें लक्षांत येतात -
१) बंगाल मधे सप्तपदीचे अंकन जास्त झाले आहे.
२) घारापुरी, कैलास, वगैरे ठिकाणी पाणिग्रहणांचे दृश्य दिसते. उत्तरभारतातही पाणिग्रहणच जास्त दिसते.
३) जावाकडे आशीर्वादाचे दृश्य दिसते. भारतात हे जवळ जवळ दुर्मिळ आहे.
उत्तर भारतात प्रतिहार काळातील कन्नोज कलेत काही फारच उत्कृष्ट कल्याणसुंदर प्रतिमा मिळाल्या आहेत. तसेच
१९३
बंगालच्या पालकलेतही त्यांचे दर्शन घडते. याची खालील वैशिष्ट्ये लक्षांत ठेवण्यासारखी आहेत -
क) शिव हा बहुतेक उजवीकडे उभा असून पार्वती डावीकडे आहे.
ख) तो द्विभुज किंवा चतुर्भुज दोन्ही रूपांत दिसतो.
ग) लाजणारी नवरी म्हणजे पार्वती द्विभुजच आहे.
घ) पौरोहित्य करणारा ब्रह्मदेव अग्नीच्या मुखात आहूती टाकताना दिसतो. कचित अग्नीसही पुरुष रूपांत दाखवितात.
ङ) परिवार देवतांत, नवग्रह, अष्टदिग्पाल, स्कंद, गणपती इतर शिवगण आणि पार्वतीच्या सख्या कलाकाराच्या रुचिप्रमाणें दाखवितात (चित्र ६२).
च) दक्षिण भारतीय परंपरेत पार्वतीच्या बाजूला हातांत पाण्याची झारी घेऊन विष्णू उभा दाखवितात. उत्तर भारतातही तो क्वचित दिसतो (ल.सं. ५२.८२)
छ) काही शिल्पांत शिव पार्वतीचा विवाह पर्वताचे आंत अर्थात् हिमालयाचे घरी होत आहे हे ही दाखविण्याचा यत्न केलेला आहे.
कल्याणसुंदराचा दुसरा प्रकार (चित्र ६३)
झाशी येथील राणीमहाल संग्रहांत एक प्रतिमा (सं. संख्या ६३) अशी आहे जेथे उमामहेश्वर आलिंगनमूर्ती आणि कल्याणसुंदर रूप यांना एकत्र आणण्याचा यत्न केला आहे. येथे शिव एका हातानें पार्वतीचे पाणिग्रहण करीत असून दुसऱ्यानें तिच्या स्तनांला स्पर्श करीत आहे. उलटपक्षी ती शिवाला एका हातानें आलिंगन देत असून दुसरा म्हणजे उजवा तिने पतीच्या हातांत दिला आहे. शंकराच्या वरच्या दोन हातांत त्रिशूल व सर्प आहे. ब्रह्मदेव खाली अग्रींत आहूती टाकत आहे. वरवधूच्या दोन्ही बाजूला उतरंडीचे आठ घट एकावर एक ठेवलेले आहेत. खाली हत्ती असून वरच्या घटांवर छोटासा कळस आहे.
कल्याणसुंदर :
पंचमुखी पहाड (सोनभद्र) उ.प्र. येथे असलेली सुमारे १४-१५व्या शतकातील हे शिल्प समस्यामूलक आहे. येथे विवाहहोमासह शिवाकडून पार्वतीचे पाणिग्रहण आणि हनुस्पर्श आहेतच, पण त्याबरोबर खाली नमूद केलेले बिंदू अनुत्तरित प्रश्न उभे करतात. (रे.चि.शि.७).
पार्वतीच्या डोक्यावर दिसणारी पाच मानव मस्तकें.
याच क्रमांत गुडघ्यावर हात टेकलेली उत्कुटिकासनांत बसलेली बाई.
पार्वतीच्या हाताखाली असलेली स्त्री.
पार्वतीचे डोके आणि डावा कान यामध्यें दिसणारी दोरी सारखी वेणी?
पार्वतीच्या उजवीकडे उभा असलेला शिव.
Rakesh Tewari and others, 'Archeological Explorations, Pragdhara 5, 1994-95, pl. 147, pp.94-95
१९४
विवाहमूर्ती :
हा स्वतंत्र असा प्रकार नाही, कल्याण सुंदराचा उपप्रकार म्हणता येईल. शंकर डाव्या बाजूला व पार्वती उजव्या बाजूला उभी असून शिव तिला जवळ घेऊन अलगद तिच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. तो चतुर्भुज असून जवळ गणपती ही आहे. पण ब्रह्मदेवानें आहूती टाकण्यांचा प्रकार मात्र नाही. अशा प्रकारची एक प्रतिमा भारतकलाभवन, वाराणसी व दुसरी लखनऊ संग्रहालयांत आहे (चित्र ६४) (भा.क.भ.सं. १३२ ल.सं.बी. ३३७)
याच प्रकारात थोडे परिवर्तन वाराणसी येथील दशाश्वमेध घाटावरील शीतलेच्या मंदिरांत स्थापित असलेल्या एका मध्यकालीन प्रतिमेत दिसते." येथें ऊर्ध्वलिंगी शंकर चतुर्भुज आहे. त्याच्या मागच्या डाव्याहातांत त्रिशूल आहे. मागचा उजवा पार्वतीच्या डोक्यावर उचललेला दिसतो. पण त्यातील वस्तुमात्र स्पष्ट नाही. सामान्य उजवा पार्वतीच्या हनूला स्पर्श करीत आहे व डावा तिला आलिंगन देत आहे. पार्वती द्विभुजाचा आहे. तिच्या डाव्या हातांत एक शिवलिंग आहे व उजव्या हातानें ती शिवाला स्पर्श करीत आहे.
उमामहेश्वर :
उत्तरभारतांतील शिवपार्वतीच्या आसन मूर्तीत उमामहेश्वर प्रतिमेचा सर्वाधिक प्रसार झालेला दिसतो. मत्स्यपुराण", अपराजितपृच्छा" देवतामूर्तिप्रकरण, वगैरे बऱ्याच ग्रंथांत उमामहेश्वराचे वर्णन मिळते. थोडक्यात म्हणजे परस्परांना आलिंगन देत एकाच आसनांवर बसलेल्या शिवपार्वती प्रतिमेला साधारणपणे उमामहेश्वर म्हणून ओळखतात. पण येथें बरेचसे भेद प्रभेद ही आहेत. शिव आणि पार्वती याच्या पायाखाली त्यांची वाहनें दाखवितात व रुची आणि जागेप्रमाणे गणपती, स्कंद, शिवगण, हडकुळा भृगरिटी, काही सख्या, अनेक देवगण, वगैरे परिवार देवांच्या रूपानें दाखविण्यांचा प्रघात आहे. या मूर्तीप्रकाराच्या काही ठळक वैशिष्ट्यांची थोडक्यात चर्चा करू.
१) शंकर - हा बहुतेक चतुर्भुज असून याच्या हातांत त्रिशूल व साप, असतो. रुचिप्रमाणें कमळ, माळ, खप्पर, फूल, फळ, वगैरे वस्तूही देतात. हा डावी मांडी घालून ललितासनांत बसलेला असतो. तो डाव्याहातानें पार्वतीला आलिंगन देत तिच्या डाव्या स्तनांला स्पर्श करीत असतो (चित्र ६५).
२) पार्वती - ही साधारणपणें द्विभुजा असते, पण कुठेकुठे ती चतुर्भुजाही दिसते (भांदक येथील प्रतिमा, ना.सं. ए २३). हिच्या हातांत आरसा, कमळ, किंवा फळ आढळते. तिचा सामान्य उजवा हात शिवाच्या मानेभोवती टाकलेला असतो.
३) ऊर्ध्वलिंग - बंगालमधे या प्रकारांत कधी कधी शंकर ऊध्र्वलिंगी दिसतो (पटना सं.सं. औलह. ६८३७, ल.सं.सं. एच्. १३).
४) पंचलिंगें - कित्येक उमामहेश्वर प्रतिमांत अगदी वरच्या बाजूला एकाच ओळींत पांच शिवलिंगे दाखवितात (चित्र - ६९). एका ठिकाणी याची संख्या चारच आहे (चित्र ६६). या शिवलिंगाचे नेमके तात्पर्य सांगता येत नाही, शिवाच्या पंचमुख रूपाशी त्याचा काही संबंध असणें शक्य आहे.
५) परिवार देवता - पालकलेत परिवार देवतांचा पसारा कमी दिसतो, पण उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान इत्यादि ठिकाणच्या कलाकृतींत भरपूर परिवार देवता दिसतात. यामध्यें गणेश, कार्तिकेय, शिवगण, सख्या,
१९५
रथिका बिंबांतील ब्रह्मदेव व विष्णू, मालाधारी विद्याधर, वगैरेची गणना करता येईल (चित्र ६६.६८).
या बाबतीत विशेष लक्षांत घेण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे अत्यंत हडकुळा असा शिवाचा श्रृंगिरिटी नावांचा गण जो बहुतेक नृत्य करतांना दिसतो आणि दुसरी म्हणजे मूर्तीच्या पाठशिळेवर मधलें रथिका बिम्ब म्हणून मध्य भारतात दिसणारा लकुलीश. हा इतरत्र दिसत नाही.
उमामहेश्वर, बाळ स्कंद मांडीवर :
कन्नौज येथील प्रतिहार कलेची एक उत्कृष्ट कृती, मूर्ती आलिंगन मुद्रेतील उमामहेश्वराची पण आईच्या मांडीवर गुटगुटीत बाळाच्या रूपात स्कंद वर्तमान स्थितीत या बाळाचा फक्त खालचा भाग उरलेला आहे.
अशाच प्रकारची पण रावणानुग्रह प्रकाराची प्रतिमा हरदोई (उ.प्र.) येथे एका मंदिरात आहे.
या शिल्पांना दक्षिणेची 'सोमास्कंद' पद्धतीची उत्तरभारतीय आवृती म्हणता येईल.
A.L.Srivastava, Uma Mahesvara, Fig. 2, p. 99
B.N.Sharma, 'Ravana lifting mount kailasa in Indian Art, EW., 23, 1-4, 1973, fig. 8,
p. 331
उमामहेश्वर, सूर्यासह :
काश्मीर कलेची (पण तूर्त बेपत्ता) सुमारे ६व्या शतकातील ही उभयोन्मुख (पाठपोट) मूर्ती फार महत्त्वाची आहे, कारण येथे सूर्य आणि शिव या दोन देवतांचे एकत्र अंकन आहे. दर्शनीभागावर (आपण याला दर्शनी म्हणू) त्रिमुखशिव आणि पार्वती द्युतक्रीडा करताना दिसतात, दुसऱ्या बाजूला वरच्या भागात रथारूढ सूर्य आणि खाली शिवलिंगाच्या पूजेचे दृष्य विद्यमान आहे. 'विरम्चिनारायण शंकरात्मने' याची साक्ष पटविणारी ही प्रतिमा आहे. हेच तत्त्व वेगळ्याप्रकारचे 'शिव-सूर्य' या संयुक्त प्रतिमेत दाखवले जाते. (र.चि.शि. ८,९).
Macaela Soar, 'Siva and Parvati at Play' The Art of Play, Ed. Andra. Topsfield, Marg Publications 58, no.2, December 6, pl. 48-49, pp. 45-46
उमामहेश्वर, उमाचतुर्भुज :
उमामहेश्वर प्रकारांत बहुतेक पार्वती द्विभुज असते, पण छत्तीसगढमध्ये मिळालेल्या काही प्रतिमा तिला चतुर्भुज दाखवतात. आलिंगनांत गुंतलेल्या हाताशिवाय साधारणपणें तिच्या इतर हातांत अंजनशलाका (काजळ घालण्याची सळई), आरसा आणि फणी असते. अशी शिल्पें बिलासपुरच्या मल्हार संग्रहालयांत आणि खैरागढच्या आय्.के.एस्. यूनिव्र्व्हसिटीच्या संग्रहालयात आहेत. (रे.चि.शि.१०)
A.L. Srivastava, Uma Mahesvara, Fig. 33, p. 112
I.K.S. University Museum, Khairagarh, nos. 55, 150, 156, 157
उमामहेश्वराच्या काही मूर्तीत पार्वती शिवाच्या उजवीकडे दिसते. काही विद्वानांच्या मते हे शिवविवाहाचे सप्तपदीच्या पूर्वीचे दृश्य आहे. कारण यावेळी पती पत्नीच्या डावीकडे असतो.
A.L. Srivastava, Uma Mahesvara Fig. 13, 34, p. 33
१९६
भंडाघाट (जबलपुर) म.प्र. येथील गौरीशंकर मंदिरात बैलावर बसलेले शिवपार्वती आहेत. येथे नव्या नवरीप्रमाणें पार्वती शिवाच्या पाठीशी आहे. या शिल्पावर असलेल्या लेखांत शिवाला 'वरेश्वर' असे संबोधन आहे. हेच नांव त्रिपुरी (जबलपुर) येथील एका अन्य अभिलिखित शिल्पांत ही आहे. खजुराहोचे 'दूल्हादेव' मंदिर ही शिवाच्याच नांवावर आहे (हिन्दी दूल्हा = नवरा)।
A.L. Srivastava, Uma Mahesvara, p. 34, f. 34
उमामहेश्वराचे काही इतर प्रकार ही उल्लेखनीय आहेत. ग्यारसपुर, मध्यप्रदेश येथील एका प्रतिमेत शिवाच्या बाजूला मकरवाहिनी गंगा आणि पार्वतीच्या बाजूला कासवावर यमुना उभी आहे. (या माहिती व चित्रासाठी लेखक डॉ. कुमुद कानिटकर, मुंबई यांचा आभारी आहे.) (रे.चि.शि.११)
दक्षिणेत उमामहेश्वर प्रतिमेत काही ठिकाणी पार्वतीचे वाहन म्हणून घोरपड (गोधा) दाखवतात. (रे.चि.शि.१२)
B. Deshmukh, Iconography of Hindu Temples in Marathawada, Jaipur, 1987, pl. 50, p. 106. Stella Kramrisch, Manifestations of Shiva, 1981, Fig. 52, 53, p. 63-64
उत्तरभारतांत हा प्रकार कचित आढळतो.
Rakesh Tewari and others 'Archeological Explorations in Robertsganj Tehsil Pragdhara 5, 1994-95, pl. 77, p. 88
कुंभेश्वर, गौरीधारा, (पाढन) नेपाळ येथील सुमारें १२व्या शतकांतील शिल्पांत उभयता चतुर्भुज असलेले शिवपार्वती पद्मासनांत बसले आहेत. दोघांच्याही साधारण हातांत कुंभ (घागरी) असून उपबाळू अभय आणि वरदमुद्रेत आहेत. इतर कोणतेही आयुध नाही (रे.चि.शि.१३)
उमामहेश्वरमूर्तीचे प्रकार :
लोकप्रियतेचा बराच वरचा दर्जा गाठल्यामुळे या प्रतिमेचे एकाधिक प्रकार सहज संभवतात. नमूने म्हणून काही खाली देतो :
क) उमामहेश्वर आलिंगन - हा सर्वसामान्य प्रकार आहे. याशिवाय प्रतिमेला उमामहेश्वर म्हणता येणार नाही. फरक एवढाच की काही ठिकाणी शिव-पार्वती दोघेही एकामेकांच्या गळ्यात हात घालतात (चित्र ६८) तर काही ठिकाणी पार्वती तसे करीत नाही. तिचा उजवा हात शंकराच्या मांडीवर असतो (चित्र ६६; अल्हा. कॅट. २४१). याचप्रमाणे पार्वतीच्या मांडीवर बसण्यात ही फरक असतो. कुठे ती पूर्णपणे शिवाच्या अंकावर असते तर कुठे ती अंमळ बाजूला असते.
ख) हनुस्पर्श - या प्रकारांत शंकर डाव्या हाताने तिला आलिंगन देत असतो आणि उजव्या हातानें तिच्या हनुवटीला स्पर्श करीत असतो (चित्र ६५ पटना, सं.सं. Arch. १५३३, Arch. ६८३७).
ग) अठरा हातांचा शंकर - उमामहेश्वराच्या कचित मिळणाऱ्या या प्रकारांत पार्वती दोन हातांची पण शंकर मात्र अठरा हातांचा आहे व त्यानें निरनिराळी आयुधे घेतली आहेत, हा जम्मा नेपाळी कलेचा असून तुर्त जर्मनीत आहे.
LA
१९७
घ) वृक्षांखाली उमामहेश्वर या प्रकारच्या फक्त दोनच प्रतिमा आमच्या पाहण्यांत आल्या. त्यापैकी एक भरतपूर (राजस्थान) च्या संग्रहालयांत (सं. सं. २९७ चित्र ६६) व दुसरी इंदूरच्या संग्रहालयांत आहे, पण येथे शिव खंडित असून वृक्ष फक्त पार्वतीच्या बाजूला आहे. (रे.चि. चोवीस १४)
स) गंगाधर शिव-पार्वती या रूपाचें नेपाळमधें बरेच प्रकार आढळतात पण विस्तार भयांस्तव फक्त दोन मूर्तीचा विचार करतो. एक लखनऊच्या संग्रहालयांत आहे (ल.सं.४५.७८) व दुसरी लंडनच्या ब्रिटिश म्युझियममधे (ब्रि.म्यु.सं. १९७०,७-२०,१) लखनऊच्या मूर्तीत स्वर्गातून शंकराच्या डोक्यावर कोसळणारी गंगा व शंकराच्या उजव्या बाजूला पण वेगळी बसलेली अन्नपूर्णा दाखविली आहे. ब्रिटिश म्यूझियमची प्रतिमा अशीच आहे, पण तेथें कलाकाराने बऱ्याच स्वातंत्र्याचा वापर केला आहे. पार्वती शंकराच्या मांडीवर बसलेली नसून मांडीला टेकून रेलून बसली आहे. बैल खाली नसून शंकराच्या पाठीशी आहे. खालच्या बाजूला निरनिराळे पशुमुख शिवगण नृत्य करीत आहेत.
च) लिंगारूढ उमामहेश्वर हा प्रकार वाराणसी, खजुराहो यांच्या आसपास प्रचारांत असावा. येथे उमामहेश्वर आलिंगन मुद्रेत एका शिवलिंगावर असलेले दिसतात. अशा प्रकारच्या फक्त चार प्रतिमा आमच्या पाहण्यांत आल्या आहेत. त्या अनुक्रमें कलकत्ता (सं.सं. २५१२०), वाराणसी (संस्कृत विश्वविद्यालय संग्रहालय), लखनऊ (ल.सं.सं. ५६.४२०) व अलाहाबादच्या संग्रहालयांत (चित्र ६७) आहेत.
हरगौरी किंवा वृषवाहन मूर्ती :
श्री गोपीनाथराव यांनी आगमांतून दिलेल्या उद्धरणाप्रमाणें वृषवाहन मूर्तीत शिव-पार्वतीच्या पाठीमागे बैल असावयास पाहिजे." दक्षिणेंत तशा प्रतिमा मिळतात. उत्तरेत गुप्तकाळांपर्यंत तशा प्रकारच्या काही मूर्ती मथुराकलेत मिळाल्या आहेत, पण नंतरच्या काळात वृषांवर बसलेली हरगौरी मात्र भरपूर दिसते. या प्रकाराला देखील श्री राव यांनी वाङ्मयीन आधार हाती नसले तरी 'वृषभारूढमूर्ति' या सदराखाली घेतले आहे.
उत्तर भारतांत मिळणाऱ्या वृषवाहनाच्या प्रतिमेत जवळजवळ उमामहेश्वरमूर्ती प्रमाणेच शिव-पार्वती आलिंगन मुद्रेत वृषावर बसलेले दिसतात. मुख्यत्वे करून या प्रतिमा राजस्थान व मध्यभारत इतके जास्त मिळाल्या आहेत. त्यांत दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारांत बैल उभा असतो. याचा एक सुंदर नमूना म्हणून इंदूर संग्रहालयांत असलेल्या आवरा येथून मिळालेल्या सुंदर प्रतिमेकडे बोट दाखविता येईल." येथे शिव चतुर्भुज असून त्याच्या हातांत माळा व त्रिशूल अशा वस्तू आहेत. साधारण डावा स्तनस्पर्श करीत आहेत व मागचा डावा पार्वतीच्या गळ्यात दिसतो. पार्वतीचा उजवा हात खंडित असून डाव्यात फूल आहे.
वृषभारूढमूर्तीच्या दुसऱ्या प्रकारात बैल उभा नसून बसलेला असतो. हा प्रकार राजस्थानच्या मध्यकालीन शिल्पात आढळतो. येथे शिव चतुर्भुज असून स्तनस्पर्शाव्यतिरिक्त फूल, त्रिशूल व सर्प अशा वस्तू धारण करून आहे. पार्वतीच्या हातात आरसा दिसतो. बैल पाय मोडून ऐटीत बसला आहे व समोर ठेवलेल्या खांद्याला तोंड लावीत आहे. (र.चि. चोवीस १५)
इंदूर संग्रहालयांत वृषभारूढमूर्तीचे आणखी दोन नमूने आहेत (सं. सं. ९०/४५५५, २४/६९). याच संदर्भात उत्तर पश्चिम भारतांतील शाही राजवटीत घडविलेल्या एका वृषभारूढमूर्तीचा परामर्श घेणें आवश्यक आहे. ही शिवप्रतिमा
१५४
विस्ताराने लिहितांना असें विधान केले आहे कीं इजिप्तमध्ये आयसिस याने सर्व प्रथम लिंग-पूजनांचा प्रारंभ केला. पुढे आयसिसची रोममधे पूजा सुरू झाली. आयसिसच्या मंदिरात अग्नी सदैव पेटत ठेवीत व तेथील पुजाऱ्यांना आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घ्यावे लागत असे. या अग्नीचे पूजन 'अक्षतयोनि' अशा कुमारिकाच करीत. या विधानांत आलेल्या काही ठळक गोष्टींना शिवाचे अग्निरूप, त्याचे 'शिखि' हे नांव, त्याचा अग्निमय तिसरा डोळा, शाश्वत प्रजजन शक्तीला दर्शविणारी त्याची ऊर्ध्वमेढू स्थिती आणि त्यानें केलेला कामदहनाचा पराक्रम, वगैरे शैव कथानकांशी ताडून पहातांना खरोखरच मौज वाटते. अध्यात्माच्या रंगात रंगलेल्या भारतात आयसिसच्या कथेला एक निराळेच वळण मिळाले. येथे शिव हा ज्ञान स्वरूप असून त्यानें कामदहन केले म्हणजे पार्वतीचे सुख हिरावून घेतले असें नाही; तर त्यानें ज्ञानाश्रीनें अविद्या किंवा अज्ञानरूपी तमांचा नाश केला. येथे शिव लिंगाचा अर्थ आहे अग्नीची ज्वाला आणि शाळुंका किंवा योनी म्हणजे
यज्ञवेदी किंवा यज्ञ कुंड !
ते काहीही असले तरी मुळांत वैदिक आर्यांना बाहेरून येऊं पाहत असलेला लिंगपूजेचा प्रकार पटलेला दिसत नाहीं. त्याचें अवलंबन करणाऱ्यांना वैदिकांनी 'शिश्नदेव' असे नांव दिले व हेटाळणी केली. तरी पण इतरत्र दृढमूल झालेल्या लिंगपूजेच्या परंपरेला आपल्या परिसरांत न शिरू देणें त्यांना अशक्यप्राय झाले व तिला आपल्यात समाऊन घ्यावे लागले. हे परिवर्तन शें दोनशे वर्षांत झाले नसेल हे उघड आहे. त्याला कित्येक पिढ्या लागल्या असतील, शास्त्रार्थाचा कीस पडला असेल व अनेकांचा कंठशोष झाला असेल. ह्याची चुणूक कलेंत झालेल्या परिवर्तनांत कशी दिसते ते पहा. ਇਸ ਸਭਾ
मुळांत शिवलिंग हुबेहूब मानवलिंगांसारखे घडवीत असत. पुढे त्याला सुरेख अशा खांबाचे स्वरूप मिळाले; व सुपारी किंवा लिंगाग्र भागांस दर्शविणारी रेखा पुष्पमाळेत बदलत गेली. तिला पुढें 'ब्रह्मसूत्र' असेंही म्हणू लागले. लिंगाचे आकार बदलत गेले. ते चौकोनी अष्टपैलू आणि गोल अशा तीन भागांत वाटले जाऊ लागले. त्याच्यावर कधीं तोंड, कधी आवक्ष प्रतिमा तरी कधी शंकर किंवा सूर्य, गणपती, वगैरे देवाच्या पूर्ण प्रतिमा दिसू लागल्या, व होतांकरितां मूळ मानवलिंगांपासून शिवलिंगानें अगदीच वेगळे वळण घेतले. कलेच्या क्षेत्रांत एवढी परिवर्तनें होण्यांसाठी सुमारे चौदाशें (इ.पू. दुसऱ्या शतकांपासून सु. १२ व्या शतकांपर्यंत) वर्षाचा कालावधी लागला. अर्थात् त्याचे अगोदर लिंगपूजा समाजांत मान्य होण्यास किती तरी काळ लागला असेल !!
प्रतिमा :
शिव-पूजनाचे दुसरें प्रतीक म्हणजे शंकराची मानवाकार प्रतिमा हे होय. हिचा देखील प्रारंभ सिंधु-सभ्यतेच्या वेळेपासून झालेला असावा असें वाटतें. सिंधुच्या खोऱ्यातून मिळालेल्या एका ठशावर (रे. चि. एकोणतीस ४८) 'पशुपति' शिवाचे अंकन आहे असे मत सर्व प्रथम सर जॉन मार्शल यांनी प्रतिपादिले. पण सालेतोर, चौधरी, एच्. पी. सुलीवान, बी. प्रकाश, सौ. डोरिस श्रीनिवासन् वगैरे रे मंडळींना हे मत मान्य नाही. सौ. श्रीनिवासन् यांच्या मतें ही वृषमुख देवाची मूर्ती असून तिचा संबंध उत्पादन आणि समृद्धीशी फार जवळचा असावा. अस्तु. 'पशुपतीच्या ठश्याविषयीं मागें उल्लेख
आलेला आहेच.'
ऋग्वेदांत रुद्रांचे नांव येतें, तसाच तो अथर्ववेदांतही दिसतो, रुद्राचे स्वरूपांत मांगल्य व अमांगल्य यांचा विचित्र संयोग आहे. हे अर्थातच स्वकीय व परकीय धारांच्या संगामाचे फल होय. वेदांचा शिव सर्वव्यापी, परम बलवान्, शत्रूना रडविणारा (रुद्र), पर्वतांचा अधिपती (गिरीश), निळ्या गळ्याचा (नीलग्रीव), लाल रंगाचा (विलोहित), धनुष्य व
गुप्तोत्तरकाळाची साधारण वैशिष्ट्ये :
इतर मतांप्रमाणें गुप्तकाळानंतर शैव मतांचाही बराच विस्तार झाला व अन्य समकालीन उपासना-प्रतिकांची या संप्रदायाच्या मूर्तीवर ही छाप पडली, तसेच शैव मूर्तीच्या प्रकारांची संख्या पण वाढली. निरनिराळ्या शैवप्रतिमांकडे वळण्याचे अगोदर त्यांची काही ठळक अशी वैशिष्ट्ये पाहू.
दागिनें :
बहुसंख्यक शिवप्रतिमांचे डोळ्यांत भरण्यांसारखे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे दागिने होत. आता शिवाच्या डोक्यावरील जटाजूट सोडला तर त्याच्या वेशभूषेत वैराग्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गळा, हात, वक्षस्थल, कंबर, वगैरे भागांवर त्यानें भरपूर दागिनें घातलेले दिसतात. एवढेच काय कांही ठिकाणी तर विष्णूप्रमाणें चक्क लांब वनमाला ही त्याच्या गळ्यांत रूळतांना दिसते (चित्र ६०). वैष्णवांचा विष्णू जर 'अलंकार प्रिय' आहे तर शैवांचा शिवही तसा कां असू नये ही चुरस याच्या मुळांत असावी, त्यामुळे आतां शंकराचा जटाजूट ही व्यवस्थितपणें सावरून उंच बांधलेला जटामुकुट असतो व काही ठिकाणीं त्यावर मण्याच्या माळा ही शोभतात.
नेसूंचे वस्त्र :
काहीं थोडी ध्यानें सोडली तर शंकर आता दिगंबरावस्थेत दिसत नाही. फक्त जुजबी रूपांतच तो उर्ध्वलिंगावस्थेत दिसतो. साधारणपणें तो व्यवस्थित वस्त्र नेसलेला आढळतो (रे.चि. चोवीस १३)
आयुर्वे:
Ef
त्रिशूल, सर्प, खट्वांग, डमरू व घट ही शिवाची प्रमुख आयुधे होत. या शिवाय जपाची माळ, कमळ, वीणा वगैरे वस्तु ध्यानभिन्नत्वे आढळतात.
त्रिशूल हा पल्लेदार किंवा आखूड दोन्हीं रूपांत दिसतो. क्वचित त्रिशूलपुरुषांचे ही शिवाचा आयुधपुरुष म्हणून दर्शन होते. देश भिन्नत्वें त्रिशूळाच्या फाळांचा आकार बदललेला दिसतो (रे.चि. नऊ ३.६).
शंकरानें हातांत घेतलेला साप बहुतेक एक किंवा तीन फणाचा असतो व तो वेटोळी केलेला नसून लोंबताना दाखवितात. शिव नृत्य मुर्देत असतांना कचित त्यानें वरच्या दोन हाताने डोक्यांवर तोल सावरण्यांकरिता म्हणून सापाला लांबच्या लांब
१८७
धरलेलें असतें. याशिवाय शंकराच्या प्रतिमेंत रूचि वैचित्र्यानें जटाजूटा भोवती गुंडाळलेला, किंवा गळ्यांत व हातांत दागिना म्हणून अथवा जानवें म्हणून ही सापाचा उपयोग आढळतो. तसाच तो त्रिशूलाला विळखा घातलेला दिसतो.
शिवांचे एक आयुध खट्वांग या नांवाने प्रसिद्ध आहे (रे. चित्र नऊ, १,६). माणसाची कवटी आणि तिला खालून बसविलेला दांडा हे खट्वांगाचे रूप होय. ही माणसाची कवटी शंकरांच्या हातांत कशी आली याबद्दल वराहपुराणांत अशी कथा आहे कीं ब्रह्मदेवाला पूर्वी पांच डोकी होती. त्यांने एकदा 'कपाली' म्हणून शिवाचा अपमान केला. त्यामुळे चिडून शंकराने त्याचे पांचवे डोकें आपल्या आंगठ्यानें खुडून टाकले. पुढें प्रायचित्त म्हणून त्याला या डोक्यांसह बारा वर्षे कापालिकांचे जीवन व्यतीत करीत भटकावे लागले. शेवटी काशीला येऊन या पापांपासून त्याला मुक्ती मिळाली. दांड्याला बसविलेल्या माणसाच्या कवटीचा या कथेशी संबंध असावा म्हणूनच हे आयुध शिवाच्या अघोर रूपांत विशेष करून दिसते. कधीकधी खट्वांगाला वेगळे न दाखवता कवटीला त्रिशूलाच्याच फाळांखाली जोडलेली दाखवितात. त्रिशूलां प्रमाणेंच खट्वांगालाही शंकराचा आयुध पुरुष (खट्वांगपुरुष) म्हणून अंकित करण्यांची पद्धत होती.
वाद्यांत शंकराला अत्यंत प्रिय वाद्य डमरू हे होय (रे.चि. सहा, १,६) व त्यामुळेच पूजनानंतर डमरूनाद करण्याची पद्धत रूढ झाली. प्रत्यक्ष डमरू जवळ नसला तर मान हालवून तोंडानेंच डमरूचा आवाज काढतात. स्वतःच्या हातून घडलेल्या ब्रह्महत्येचा उद्घोष करून तिचे प्रायश्चित करण्यांकरितां शिवाने डमरू हातांत घेतला अशी त्याची उपपत्ती आहे. शिवाय तांडवाचे वेळीं तालवाद्य म्हणून डमरूचा चांगलाच उपयोग होत असला पाहिजे.
घट आणि जपाची माळ या स्वतंत्र रूपानें शैव वस्तू म्हणून नाहीत. ही फक्त त्याच्या तपस्वी जीवनांची प्रतीकें होत.
शिवप्रतिमा व लिंगे :
स्थूलकाय किंवा बालशिव :
मनसर, महाराष्ट्र येथून मिळालेली ही सुंदर मूर्ती तूर्त राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे. गुटगुटीत बाळसेदार चतुर्भुज शिव लोढाशी टेकून बसला आहे. दोन हातांत फूल आणि अक्षमाला असून तिसरा गुडघ्यावर टेकलेला आहे. त्याच्या डोक्यावरील चंद्रकोर, कानांतील चक्रकुंडलें, मोत्याचे ठळक जानवे, नेसूचे छोटेसे वस्त्र, वगैरे डोळ्यात भरण्यासारखी वैशिष्ठ्ये आहेत. बालभावही नजरेंतून सुटत नाही. (र.चि.शि. १)
C. Sivaramamurti, Satarudriya: Vibhuti of 'Siva's Iconography Delhi 1976
तिसरा नेत्र :
मध्यकाळांत शिवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या अंकनात नवा असा फरक झालेला आढळत नाही. कुषाण काळाचा आडवा त्रिनेत्र गुप्त काळांपासून उभा झाला व पुढें तो तसाच राहिला, पण अगत्याने तो सर्वत्र दाखविलाच जातो असें मात्र नाही. कुठें कुठें उभ्या त्रिनेत्राची भुवई देखील दिसते.
परिवारदेवता :
यांत शिवपत्नी पार्वती ही मुख्य होय. विष्णुप्रतिमेत लक्ष्मीची जेवढी रूपें मिळतात त्यापेक्षा शिवप्रतिमेतील पार्वतीच्या स्यांची संख्या जास्त आहे. उमासहित मूर्ती, कल्याण सुंदर प्रतिमा, लिंगारूढप्रतिमा, वगैरे कित्येक ठिकाणीं ती शंकरांबरोबर आहेच.
१६९१
याच प्रसंगांत त्या कुषाणकालीन नाण्यांकडे संकेत करणें आवश्यक आहे. ज्यावर शंकराबरोबर देवी उमा आणि नना यांचे ही दर्शन घडते. याची विस्तृत चर्चा पुढे 'शक्तिप्रकरणांत' येईलच.
कुषाण नाण्यांवर शंकराला बहुतेक 'ओएशो' असें नांव दिलें आहे. या शब्दांचे प्राकृत भाषेचा 'हवेश' आणि संस्कृतांचा 'भवेश' या शब्दांशी साम्य आहे, तसेंच काही विद्वानांच्या मतें हे 'वृष' याचे रूप आहे. महाभारतांच्या शिव नामांवलीत वृष, वृषभ, वृषावर्त, वृषनाक, वृषपती, वगैरे नांवांची गणना केलेली आहे. याशिवाय 'ओएशो' नांवाची उग्रेश, ऊर्धकेश यासारख्या शब्दांबरोबर देखील संगती लावता येईल.
वरील नाण्यांशिवाय डॉ. बॅनर्जी यांनी काही इतर नाण्यांकडे ही लक्ष वेधिले आहे. कलकत्ता संग्रहालयांतील दोन सुवर्णमुद्रांविषयीं लिहिताना त्यांवर ब्राह्मी लिपींत लिहिलेल्या 'गणेश' या नांवाच्या आधारें त्यांनी तेथें मानवरूपी शिवाला ओळखण्यांचा प्रयत्न केला आहे." हुविष्काच्या एका नाण्यांवर त्यांच्या मतें हरिहराची आकृती आहे. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या एका उत्तर कुषाणकालीन सोन्याच्या नाण्यांवर 'अर्धनारीश्वर' अंकित केलेला आहे (रे. चित्र बावीस). हा या काळच्या एका अन्य मुद्रेवर ही दिसतो.
मातीच्या ठशांवरील शिवप्रतिमा :
याप्रसंगी सर्व प्रथम उल्लेखनीय असा संग्रह लखनऊ संग्रहालयांत असलेला सुमारे शंभर ठशांचा आहे. जानेवारी १९२० मध्ये डॉ. हिरानंद शास्त्री यांना संकिसा (जुनी संकाश्य नगरी) येथें खोदकामांत हा मिळाला होता. यांत ४८ शैव उसे आहेत यापैकी २२ वर 'भद्राक्षस्य' या अक्षरांसह द्विभुज असा शंकर विद्यमान आहे. त्याच्या उजव्या हातात त्रिशूल असून डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. नेसूचे वस्त्र स्पष्ट आहे व डोक्यांवरचे केस तीन गांठींच्या रूपांत बांधलेले आहेत. ठशाच्या दुसऱ्या बाजूला बसलेला बैल असून त्याखाली 'भद्राक्षस्य' ही अक्षरें झळकतात. उरलेल्या २६ ठशांवर शिव आणि ब्राह्मी लेख पूर्ववत् आहेत पण दुसऱ्या बाजूला मात्र काहीच दिसत नाही. हे ठसे त्यावरील लिपीला पाहिले असता प्रथम शतकांच्या जवळपासचे असावेत असा कयास बांधता येतो.
प्रारंभिक गुप्तकाळाच्या शैव ठशांकडे लक्ष पुरविल्यास ब्लॉक याला बसाढ येथून मिळालेल्या शैव सामुग्रीचा उल्लेख अगत्यानें करावा लागेल. त्यापैकी एकांवर डॉ. बॅनर्जी यांच्या म्हणण्यांप्रमाणें अर्धनारीश्वर दिसतो६४. शिवमूर्तीने युक्त असा दुसरा मातीचा ठसा सर जौन मार्शल यांना 'भीटा' येथून मिळाला होता. चौथ्या-पाचव्या शतकांतील या ठशावर 'भद्रेश्वर' या नांवाने ललितासनांत बसलेला शिव दिसतो. हा द्विभुज असून याच्या हातांतील वस्तू मात्र अनिश्चित आहे. याच्या डोक्यावर व खांद्यावर अग्नीच्या ज्वाला किंवा झाडाचा वरचा भाग दिसत असावा. याच काळांतील वाराणसीहून मिळालेल्या ठशांवर 'श्रीदेवस्वामि' हा लेख व चौथऱ्यावर उभा असलेला द्विभुज शिव दिसतात. त्यांच्या एका हातांत कलश व दुसऱ्यांत माळा किंवा पाश आहे. डाव्या बाजूला साप ही दिसतो. ७
शिवाच्या मृण्मूर्ति :
नाणी व छाप यांचे समालोचन केल्यावर आपण लोककलेकडे वळू, लोककलेचे सोपे, उत्तम व स्वस्त माध्यम म्हणजे माती हे होय. शिवांचे निश्चयात्मक रूपाने अंकन करणाऱ्या मातीच्या कुषाणकालीन किंवा त्यापूर्वीच्या मूर्ती आपल्या माहितीत नाहीत. पण उत्तर कुषाण काळ व गुप्त काळांतील जी सामग्री हातीं आली आहे, तिचे थोडक्यात रूप असे दिसतें.
१६२
अ) रंगमहाल (राजस्थान) येथील शिव-पार्वती फलक -
मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें हा फलक फार महत्त्वाचा आहे. येथे चतुर्मुख द्विभुज व महालिंगधारी असा शंकर बैलावर बसलेला दिसतो. यांच्या मुख्य मुखांच्या आजुबाजूला एक एक मुख असून मानेंकडून एक सूर्यचंद्रघारी जटाजूट असलेली द्विभुज पुरुषांची मूर्ती उद्भूत होतांना दिसते. शिवांजवळ हिंदी पद्धतीचा घागरा नेसलेली दर्पणहस्ता पार्वती आहे. आजुबाजूला दोन मानव प्रतिमा दिसतात. हा फलक चौथ्या शतकांतील समजतात.
आ) अजएकपाद फलक"
हा फलक देखील रंगमहाल येथूनच मिळालेला असून मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. अजएकपादांचे नांव अकारा रुद्राच्या यादीत आहे. महाभारतकारांच्या सांगण्याप्रमाणें हा रुद्र अहिर्बुध्न्य व कुबेर बरोबर धनांचे रक्षण करीत असतो याचे तोंड बकऱ्याचे असल्यामुळे याची अग्नीशी समानता मानली जाते. या फलकांवर अजाच्या स्थूल शरीराचे संतुलन हत्तीप्रमाणें असलेल्या एक पायांवर खुबीने साधले आहे.
इ) भीटा येथील आसनारूढ शिव-पार्वती' -
एकाच आसनावांवर द्विभुज शिव पायावर पाय ठेऊन तर पार्वती (मस्तकहीन) प्रलंब पादासनांत बसलेली दिसते. आयुधं नाहीत पण शंकराच्या पायाखाली आसनांजवळ पाय दुमडून बसलेला बैल दिसतो.
ई) नेवल (जि. उन्नाव, उत्तरप्रदेश) येथील अर्धनारीश्वर -
हा दिल्लीच्या संग्रहालयांत असलेला अर्धनारीश्वर प्रतिमेंचा वरचा भाग आहे. यात शिवाच्या बाजूला अर्धचंद्र, नरमुंड, फुलांची माळा आणि बेलपान दिसत असून डावीकडे म्हणजे पार्वतीच्या भागाला पुष्पमाला आणि मोहक केशसंभार अवलोकनीय आहे.
3) शिवलीलेचे फलक -
उत्तरप्रदेशांतील अहिच्छत्रेहून मिळालेल्या काही गुप्तकालीन फलकांवर दक्ष-यज्ञ-विध्वंस, गोडपदार्थाकडे लोभी डोळ्यांने पाहणारे शिवगण, वगैरे दृश्ये दिसतात. भीतरगांव (उ.प्र.) येथील इष्टिका-मंदिरांत देखील गणांसह सुखाने बसलेल्या शिव-पार्वतीला दाखविणारा एक फलक आहे.
ऊ) अहिच्छत्रा येथील इतर शिव प्रतिमा
वरील फलकांव्यतिरिक्त अहिच्छत्रेहून खांद्यावर बैलाचे कातडे टाकून भ्रमण करणारा महाभैरव, शिष्यासह बसलेले दक्षिणामूर्ती व शिव-पार्वतीची दोन फारच सुंदर मस्तकें हीं मिळाली आहेत.
शिवाच्या पाषाण प्रतिमा :
नाण्यांवर दिसणारा शंकर व मातीच्या शिवप्रतिमाचा आढावा घेतल्यानंतर आपण आतां पाषाण प्रतिमांचा विचार करू. गुप्तकाळापर्यंत उत्तरभारतांत खालील प्रकारच्या शिवप्रतिमा पाहण्यांत येतात. :
क) एकटा शिव
१६३
ख) सिंहासह शिव
ग) चतुर्मुख शिव
घ) शिवपार्वती
च) अर्धनारीश्वर
छ) लकुलीश
ज) दक्षिणामूर्ती
झ) रावणानुग्रह मूर्ती
ट) गजासुरवध मूर्ती
ड) भैरव मूर्ती
ढ) भिक्षाटन मूर्ती
त) हरिहर मूर्ती
थ) अष्टमुख शिव
द) द्वादशमुख शिव
या शिवाय इतरही काही प्रकार आढळण्याची शक्यता आहे. पण त्याचा फारसा प्रचार नसल्यामुळे येथें त्यांचा समावेश केलेला नाही.
क) एकटा शिव :
नाणी आणि ठसे यावर एकटा शिव बराच मिळतो, पण तशा प्रकारच्या पाषाण मूर्तीची संख्या मात्र थोडी आहे. शिवाच्या लिंगगत मूर्तीची चर्चा पुढे होणार आहे. स्वतंत्र प्रतिमांकडे वळल्यानंतर प्रथम आपले लक्ष बलिया जिल्ह्यातून (उ.प्र.) मिळालेल्या एका उभ्या द्विभुजप्रतिमेंकडे जाते (चित्र ४८). हिचा उजवा हात वरदमुद्रेत असून डाव्यांत त्रिशूल आहे. नीट सावरलेले केस मधून दुभागले आहेत. उभा त्रिनेत्र, प्रभामंडल आणि सुंदर मुख या आधारांवर ही प्रतिमा प्रारंभिक गुप्तकाळाची वाटते. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका अन्य गुप्तकालीन प्रतिमेंत नेसूचे व्याघ्रांबर स्पष्ट आहे." वाङ्मयांत शिवाच्या व्याघ्रांबरांसंबंधी बरेंच उल्लेख आहेत."
या प्रतिमांशिवाय काही शिव प्रतिमांची मस्तकें ही महत्त्वाची आहेत. राष्ट्रीय संग्रहालय, नवीदिल्ली येथील पाश्चात्य पद्धतीची छाप असलेलें एक शिवमस्तक आपल्या अधोलिखित वैशिष्ट्यांकरिता उल्लेखनीय आहे. (चित्र ४९) ८०
अ) लांब अशा जटाऐवजी येथें आखूड कुरळे केस दिसतात. अशा प्रकारच्या शंकराच्या केसांना महाभारतांत 'कृष्णकुंचित मूर्धज किंवा कुंचितमूर्धज' असे म्हटलें असावें.'"
आ) येथें शंकराच्या कपाळावर ग्रीक शासकांप्रमाणें 'डायडेम' बांधलेला दिसतो हाच शिल्परत्नांतील 'ललाटपट्ट' असावा.
३) डावीकडे चंद्राची कोर आहे. कुषाण शिव प्रतिमेंत चंद्र असलेलें असें हे एकमेव ज्ञात उदाहरण आहे. हे पश्चिमेचे लोण म्हणता येईल कारण उत्तरकुषाणकालीन नाण्यांवर चंद्रधर शिव दिसतो.
१६५
ई) तिसरा नेत्र आडवा नसून उभा आहे. अशा प्रकारचा नेत्र पुढें गुप्तकालांचे वैशिष्ट्य म्हणून गाजलें, पण त्याचा आरंभ उत्तरकुषाण कालांपासूनच झाला होता.
3) मुखांवर एकूण भारतीयता कमी असून तेथे भाव-सौंदर्यांचा अभाव वाटतो.
गुप्तकालीन शिवमस्तकांत उल्लेखनीय असे एक लंडन येथे व दुसरें मथुरा संग्रहालयांत ठेवलेले आहे. लंडनच्या नमून्यांवर कुरळ्या आणि लांब अशा बटांच्या पंक्ती दिसतात तर मथुरेच्या मस्तकांचे केस विंचरून मानेकडे नेले आहेत पण जटाभार मात्र दिसत नाही. लंडनच्या शिवमुखाची मुखाकृती जरी सौम्य असली तरी तेथे टोकदार मिशा आहेत.
याच संदर्भात गुप्तकालीन विश्वरूपाच्या प्रभामंडळाच्या बाहेरच्या बाजूला जी रुद्रमुखें आढळतात तिकडेंही एक दृष्टिक्षेप टाकणें आवश्यक आहे." अशा प्रकारच्या लखनऊ येथील प्रतिमेंत रुद्राचे केस 'भ्रमरक' पद्धतीचे आहेत आणि कानांत चक्राकार कुंडलें आहेत. दुसरीत उभ्या तृतीय नेत्रांची भैरवमुखें दिसतात. एकांवर सिंहमुख आहे.
ख) सिंहासन शिव :
शिवांचे वाहन बैल असून त्याची पत्नी पार्वती हिचे वाहन सिंह आहे ही गोष्ट सर्वांच्याच परिचयाची आहे. पण प्रारंभिक काळाच्या खालील प्रतिमांत शिवाबरोबर सिंह आढळतो :
१) माट येथून मिळालेली मथुरा संग्रहालयाची मूर्ती. हिचे डोके व उजवा हात खंडित असून याच बाजूला पायांजवळच आखूड पाय व लांबपोट असलेला गण आहे. मूर्तीच्या पृष्ठ भागांवर एक मोठा बसलेला सिंह आहे. माट येथूनच एक सिंहवाहिनी पार्वतीची मूर्ती देखील मिळाली आहे (म.सं.सं. १२.२१४ ए). डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल यांनी वरील प्रतिमेंची शिव म्हणून ओळख दिलेली आहे या संदर्भात हे ही लक्षात ठेवावयांस हवे कीं कुषाण राजे शिवोपासक होते व माट येथे त्यांचे एक मोठे देवकुल होतें, ही शिवप्रतिमा त्या देवकुलात असणें शक्य आहे.
२) काही वर्षांपूर्वी कानपूर जिल्ह्याच्या (उ.प्र.) मूसानगर या गावीं असलेल्या मुक्तादेवी मंदिरांत लेखकाने एक वेदिका स्तंभ पाहिला होता. हा स्तंभ शिवमूर्तीच्या अध्ययनाच्या दृष्टीनें फारच मोलाचा आहे. याच्या फक्त आजुबाजूच्या दोन भागांवरच कोरीव काम असल्याने याला 'कोणस्तंभ' (corner pillar) म्हणावे लागेल. कलेच्या आधारांवर याचा काल इ. सनाचे पहिले शतक हा ठरतो."
स्तंभाच्या दोन्हीं बाजू तीन तीन चौकटीत विभक्त आहेत. उभयबाजूच्या दोन व तीनक्रमांकाच्या प्रेमासक्त जोडपी दाखविली आहेत. पण पहिल्या चौकटीत मात्र शंकराच्या मूर्ती आहेत.
एका बाजूच्या मूर्तीत ऊर्ध्वलिंग शिव अभय मुद्रेत उभा आहे (रे.चि. तेवीस १२) त्याच्या डाव्या हातांत घट आहे. व केस मानेकडे नेले आहेत. शिवाच्या उजवीकडे मालकांकडे वर मान करून पाहणारा सिंह उभा आहे व डाव्या हातांखाली मोठें पोट व आखुड पायाचा एक गण दिसतो. या शिवप्रतिमेत व मथुरा संग्रहालयांतील प्रतिमेत फारच साम्य आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मूसानगरची प्रतिमा ऊर्ध्वलिंग असल्यामुळे निश्चितपणें तिला 'शिव' असें नांव देता येते.
या स्तंभाच्या दुसऱ्या बाजूला असलेली शिवप्रतिमा तर याहीपेक्षा महत्त्वाची आहे. (रे.चि. तेवीस ११) येथे द्विभुज शंकर एका उंच आसनांवर सुखासनांत बसलेला आहे. वर प्रमाणेंच त्याचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्यात घट आहे, ऊध्र्वलिंग देखील दिसते, पण येथे त्याने पागोटे (उष्णीष) व इतर दागिने घातले आहेत. आसनांचे खाली आपले अंग चोरून एक सिंह बसला आहे; पण सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे बसलेल्या शिवाच्या दोन्ही खांद्यातून व मानेकडून असे एकूण तीन पुरुष प्रगट झालेले दिसतात. तिघेही द्विभुज आहेत. आजुबाजूंच्या पुरुषांच्या डोक्यावर पागोटी आहेत पण मधल्यानें मात्र जटाजूट बांधला आहे. काही बटा खांद्यावर विखुरल्या आहेत. उजवीकडील पुरुषांने आपले दोन्ही हात वर केले आहेत पण डावी कडच्याचा उजवा हात वर असून डावा मात्र त्याच खांद्याला स्पर्श करीत आहे. मधल्या पुरुषाचेही दोन्ही हात वर आहेत व त्यांत त्याने वर्तुळाकार सूर्य व अर्ध चंद्राकार चंद्र धारण केला आहे. या काळच्याच मधुरेहून मिळालेल्या वराहाच्या हातांत देखील सूर्यचंद्र आढळतात (रे.चि.तेरा ४).
या दोन्ही प्रतिमा महादेवाच्याच आहेत यांत शंका नाही पण त्याच्या खांद्यातून उद्भूत होणाऱ्या तीन पुरुष प्रतिमा व जवळ असलेला सिंह हे मात्र खोल विचार करण्यांस आव्हान देत आहेत.
प्रथम खांद्याच्या पुरुषांकडे पाहू. खांद्यातून उद्भूत होणारे अशा प्रकारचे पुरुष दाखविण्यांची पद्धत मथुरेच्या काही अन्य प्रतिमांतही दिसते, जसे चतुर्ग्यूह विष्णू (चित्र ६) व षष्ठी देवींच्या एकट्या अथवा स्कंदविशाखांसह असलेल्या मूर्ती (चित्र ११३). समकालीन गांधार कलाकारांनी देखील किंचित फरकाने बुद्धांचे रूपवैविध्य दाखविण्यांकरिता याच पद्धतीचा अवलंब केला होता. साधारणपणे मूर्तिकाराला एका मुख्य देवतेची काही रूपें किंवा त्याच्या शरीरांतून उद्भूत होणाऱ्या इतर देवता व शक्ति, त्यांना 'व्यूह' म्हणणें जास्त सयुक्तिक ठरेल, दाखविणे इष्ट असे त्यावेळी ही पद्धत उपयोजित असत.
आतां प्रश्न असा की मूसानगर शिवाचे 'व्यूह' कोणते असावेत? महाभारतात शंकराच्या उजवीकडून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, डावी कडून विष्णूंचे प्राकट्य व युगान्ताचेवेळी रुद्रांचे सृजन होत असल्याचे सांगितले आहे. " कूर्मपुराणांत शिवाच्या चतुर्व्यहाचा उल्लेख आहे व तेथे शांती, विद्या, प्रतिष्ठा व निवृत्ती यांची त्याचे व्यूह म्हणून गणना केलेली आहे. पण कूर्मपुराणांला येथे फार महत्त्व देता येत नाही, कारण एक तर हे पुराण तितके प्राचीन वाटत नाही व दुसरे तेथें सांगितलेल्या शैवी शक्ती स्त्रीलिंगी आहेत, पुल्लिंगी नव्हेत. महाभारताचा उल्लेख जुना आहे व मूसानगर प्रतिमेच्या तीन पुरुषांपैकी मधला रुद्र रूपही आहे, पण आजूबाजूच्या पुरुषांत ब्रह्मा व विष्णूंचे कोणतेही चिह्न दिसत नाही. आता दोन प्रकारची शक्यता असणें संभवते. एक तर असे की कुषाण काळांत जशी वासुदेवाची 'चतुर्यूह' प्रतिमा होती त्याच आधारांवर शैवांनीही शिवाच्या चार व्यूहांची कल्पना केली असावी व कूर्मपुराणांत रूपांतरित होऊन तिचेच पडसाद उमटत आहेत. दुसरे असे की कुषाणकाळात असंदिग्ध रूपाने शिवाची चतुर्मुखलिंगें प्रतिष्ठित झाली होती, या प्रतिमेत त्याच चतुर्मुखांचे पुरुषरूपानें अंकन झाले आहे. चतुर्मुख लिंगात एक मुख रौद्र आणि कमीतकमी एक पागोटे घातलेले असते.
आतां सिंहाकडे वळू. मथुरेच्या संग्रहालयांतील शिवप्रतिमेचा उल्लेख आलाच आहे. याच संस्थेत शिव म्हणून ओळखली जाणारी एक दुसरी ही प्रतिमा आहे (म.सं.सं. १२ २१४). हिच्या मस्तकांवरील जटाजुटाच्या भोवती गुंडाळलेल्या माळेच्या मधोमध सिंहमुख अंलकरण आहे. ही परंपरा गुप्तकाळात देखील जिवंत होती. सिंहमुखयुक्त शिवमस्तक या काळच्या एका विश्वरूप विष्णूच्या प्रतिमेत ही दिसतें. या प्रकारांचा वाङ्मयांत ही उल्लेख आढळतो अस्तु. सिंह व शिव यांचा संबंध दाखविणारे खालील वाङ्मयीन उल्लेख लक्षांत घेण्यासरखे आहेत :
अ) महाभारतात दिलेल्या शिव नामावलीत 'सिंहग' आणि 'सिंह वाहन' अशी नांवे आढळतात."
आ) वायुपुराण" असें सांगते कीं दक्षानें शिवाला यज्ञात न बोलाविल्यामुळे व यज्ञभागाचा अधिकारी न मानल्यामुळे
१६७
त्याला फार क्रोध आला व अनेक सिंहांच्या रूपात तो प्रगट झाला. पुढे सृष्टीचा नाश होऊ नये एवढ्यांसाठी शिवाने त्या सिंहांना आपल्याच घरांत साखळदंडानें जखडून ठेवले.
इ) महाभारतांत एका ठिकाणी शिवपार्वतीच्या रथाला हजार सिंह जुंपले असल्याचे वर्णन आहे.१२
हे खरें कीं या वाङ्मयीन उल्लेखाने हाती घेतलेल्या प्रश्नांवर फारसा समाधानकारक प्रकाश पडत नाही, अजून वाङ्मयाचे जास्त खोल मंथन आवश्यक आहे.
ग) चतुर्मुख शिव :
भीटा येथील सर्वतोभद्र प्रतिमेची चर्चा आपण मागें केली आहे व त्यातील स्थूलकाया दोन हातांची व केस मोकळे सोडलेली प्रतिमा शंकराची असणे शक्य आहे हे ही सांगितले आहे. या मूर्तीशी बरेंच साम्य असलेली पण सुमारे दीडशें वर्षे नंतरची एक दुसरी प्रतिमा मथुरेच्या संग्रहालयांत आहे. ही तीनफूट दहा इंच उंच मूर्ती जरी बरीच झिजलेली आणि खंडित असली तरी चहूबाजूनी कोरलेली असल्यामुळे महत्त्वाची आहे. आजच्या स्थितीत तिच्या दर्शनी भागांवर तुरेदार मुगुट घातलेला व अभयमुद्रेत उभा असलेला एक पुरुष आहे. नेसूचे वस्त्र स्पष्ट आहे, डाव्या हातांत घट ही असावा. याच्या डावीकडील भागांवर एक पुरुष मस्तक आहे, ज्याचे केस विंचरून मागे केले आहेत. पृष्ठ भागांवर आखूड पायाची व लांब पोटाची एक पुरुष मूर्ती होती, पण ती आता डोक्यांपासून उदरबंधापर्यंत नष्ट झाली आहे. हिचा डावा हात छातीवर असून उजव्यात कमंडलू असावा. मुगुटं घातलेल्या मुख्यप्रतिमेच्या उजव्या भागांवर देखील एक मुख होते पण ते आता साफ गेले आहे. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल या प्रतिमेला शिवच मानतात व पांचवे मुख असण्यांची शक्यता ही प्रतिपादन करतात. मथुरा व भीटा येथील प्रतिमांत खालील बाबतीत साम्य आहे :
अ) उभय प्रतिमा सर्वतोभद्र आहेत.
आ) मुगुट घातलेला द्विभुज आणि मुक्तकेश स्थूल पुरुष हे एकमेकांच्या पाठीकडे आहेत.
इ) दोन्हींत आजुबाजूला मुखें आहेत.
महत्त्वपूर्ण फरक वराह आणि सिंहाचा आहे, जो अजून अन्वेषणीय विषय आहे. वाङ्मयांत शिवाला द्विमुख, त्रिमुख, चतुर्मुख, पंचमुख, षड्मुख आणि अनेकमुख देखील वर्णिला आहे.
घ) शिव-पार्वती :
नाण्यांवरील शिव-उमा प्रतिमांचा नामोल्लेख मागे केला आहे. समकालीन मूर्तीत ही तो प्रकार आढळतो. अशा प्रतिमांत शिव ऊर्ध्वलिंग असून आपल्या शक्तींसह आलिंगनमुद्रेत उभा असतो व त्यांच्या पाठीशी बैल दिसतो. " दोघेही द्विभुज असून त्यांच्याजवळ कोणतेही आयुध दिसत नाही (चित्र ५०). गुप्तकालीन शिवपार्वतीचा एक नमूना मथुरा संग्रहालयात आहे (म.सं.सं. ३० २०८४). दुसरी कुमारगुप्ताच्या वेळेची एक अभिलिखित प्रतिमा कौशांबी (अलाहाबाद) येथून मिळाली आहे. १०० दागिन्यांच्या दृष्टीनें ही फार सुंदर आहे पण हिच्यांत व प्रथम प्रतिमेंत मुख्य फरक असा आहे कीं येथे हे दोघे आलिंगन मुद्रेत नसून फक्त जवळ उभे आहेत. दाढी मिशा असणाऱ्या शंकराच्या डाव्या हातांत कमंडलू असून उजवा अक्षमालेसह अभयमुद्रेत आहे. त्याची यज्ञोपवीत, ऊर्ध्वलिंग, वगैरे कुषाण कालीन चिन्हे अजून विद्यमान आहेत, तिसरा डोळा ही उभा नसून अजून आडवाच आहे. पार्वतीच्या हातांत येथे आरसा आहे.
१६८
च) अर्धनारीश्वर :
एकाच प्रतिमेत (म्हणजे एकाच शरीरांत) शिव व पार्वतीचे संयुक्त रूपानें अंकन केल्यास त्या रूपाला अर्धनारीनटेश्वर किंवा अर्धनारीश्वर असें म्हणतात. ही अशा प्रकारची प्रतिमा शिवशक्ती, नरनारी, ब्रह्ममाया, वगैरे सृष्टीच्या मूळ कारणांचा संयोग दाखवितात. भारतीय विचारधारें प्रमाणें सृष्टीचा विकास एकांतून दोन व दोनांपासून अनेक असा झालेला आहे. विकासाचे स्थान आहे. योनी विकसित करणारा आहे बीजी आणि विकासाची शक्ती हे बीज आहे. याच क्रमाला लिंगपुराणांत विष्णू, शिव आणि ब्रह्मा अशा संज्ञा आहेत. १० शिवाचे 'बीजी' हे नांव कूर्मपुराणांत देखील आढळते २ बीजाला चिरकालांपर्यंत पाहतां येत नाही, यामुळे खरे महत्त्व योनी आणि बीजी यांचेच आहे. लिंगातून उद्भूत झालेले प्रथम बीज, ज्याला आदिसर्गिक बीज असेंही म्हणतात, शिवाचेच रूप होय. आदिसर्गिक बीज आणि योनीचे नैकट्यच अर्धनारीश्वरांचे रूप आहे. हरि-हर प्रतिमेंचे ही रहस्य येथेंच दडलेले आहे, पण त्याची चर्चा आपण पुढे करू.
अर्धनारीश्वरांसंबंधी एक अन्य कथाही ऐकीवांत आहे. आपल्या मानसिक सृष्टीची वृद्धी होत नसल्यामुळे ब्रह्मदेवाने घोर तप करून भवला प्रसन्न करून घेतले. भव म्हणजे शंकराने स्वतःला त्याच्या ललाटांपासून अर्धनारीश्वराच्या रूपानें उत्पन्न करून घेतले व येथूनच सृष्टीला सुरुवात झाली.*** मार्कंडेय पुराणांत सृष्टीच्या या दोन मूळ तत्वांना 'क्षोभ्य' आणि 'क्षोभक' अशी नांवे दिली आहेत. ही मुळांत एकाचीच दोन तत्वें आहेत आणि संकोच व विकासाने ती सृष्टीला कारणीभूत होतात.
प्रतिमेच्या क्षेत्रांत सर्वप्रथम अर्धनारीश्वर मथुरेच्या कुषाण कलेंत" दिसतो (र. चि. बावीस ७). मथुरा संग्रहालयांतील एका शिलापट्टावर (चित्र-२) एकाच ओळींत अर्धनारीश्वर, विष्णू, गजलक्ष्मी व कार्तिकेय कोरलेले आहेत. अर्धनारीश्वर द्विभुज असून निरायुध आहे. प्रतिमेचा उजवा भाग पुरुषाचा आणि डावा स्त्रीचा आहे, येथें ऊर्ध्वलिंग व योनी यांचे
एकत्रच अंकन आहे. कर्धीकधी अर्धनारीश्वराबरोबर बैलही दिसतो (रे. चित्र तेवीस १०). गुप्तकालीन अर्धनारीश्वराच्या दोन सुंदर प्रतिमांचे फक्त वरचे भाग मथुरेच्या संग्रहालयांत आहेत (चित्रे ५३, ५४). मथुरेचे हे लोण या काळांत वाराणसीपर्यंत पोंचले होते. वाराणसी येथील सारनाथ संग्रहालयांत एका सर्वतोभद्र प्रतिमेत चतुर्भुज अर्धनारीश्वर दिसतो. १० अशा प्रकारच्या प्रक्षतमा राजस्थानांत व मध्यप्रदेशांतही घडविल्या गेल्या.
झालवाड येथील संग्रहालयांत योनिलिंगांकित चतुर्भुज अर्धनारीश्वराची फारच सुंदर मूर्ती आहे. १०० सागर येथून बसलेला अर्धनारीश्वर मिळाला आहे.
विष्णुधर्मोत्तर, अंशुमद्भेदागम, उत्तरकामिकागम, सुप्रभेदागम, पूर्वकारणागम, शिल्परत्न, वगैरे ग्रंथात अर्धनारीश्वराचे वर्णन मिळतें. यांत उजवीकडे शंकर व डावीकडे पार्वतीचे असणें सर्वांस मान्य आहे, पण ऊर्ध्वलिंगाचा उल्लेख मात्र फक्त विष्णुधर्मोत्तरांतच सापडतो. द्विभुजांपेक्षा चतुर्भुज मूर्तीची वर्णनें जास्त मिळतात.
छ) लकुलीश :
इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. याच्या प्रतिमेची मुख्य लक्षणें म्हणजे ऊर्ध्वलिंगावस्था व हातांत सोटा. आपल्या माहितीतील लकुलीशाच्या प्रतिमांत राजस्थानच्या नांद शिवलिंगावर असलेली मूर्ती सर्वांत जुनी आहे. १० येथे उष्णीषधारी शिव दोन्ही पाय आसनांवर ठेऊन बसलेला दाखविला आहे (रे. चि. सत्तावीस २६).
१६९
मथुरा संग्रहालयांत चंद्रगुप्त विक्रमादित्याचे वेळेचा एक अभिलिखित स्तंभ आहे. ज्यावर नग्न आणि मुक्तकेश असा दंडधारी लकुलीश दिसतो (चित्र ५१). मथुरेतूनच मिळालेली जवळजवळ याच काळची दुसरी प्रतिमा लखनऊ संग्रहालयाच्या एका शिलापट्टांवर आहे. येथें तो सोटा घेतलेला ऊर्ध्वलिंग तर आहेच पण मांडी घालून बसलेला आहे व त्याने मांडीभोवती योगपट्ट गुंडाळला आहे.
दंड व ऊर्ध्वलिंग लकुलीशाची चिन्हे होत पण सुरुवातीच्या सर्व प्रतिमात ही समानरूपाने मिळत नाहीत. लकुलीश या शब्दानें त्याच्याजवळ सोटा असणें अपरिहार्य दिसते (लकुलीश, लगुडीश = लगुडेश; लगुड = सोटा). हा सोटा म्हणजे गांधार कलेत मिळणाऱ्या शिवाला गदेचे परिवर्धित रूप असू शकते.
ज) दक्षिणामूर्ती :
गुप्तकालीन लकुलीशांशी बरेच साम्य असलेली प्रतिमा दक्षिणामूर्तीची होय. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिणभारतांत विशेष रूपानें प्रचलित आहे. श्री गोपीनाथ राव यांनी या रूपांचे योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान असे चार भेद सांगितले आहेत त्यांचा पुढे विचार करू. गुप्तकाळाच्या पूर्वीचा दक्षिणामूर्ती आज तरी आपणांस माहीत नाही, या काळातील मूर्तीपैकी ठळक म्हणून फक्त तीन प्रतिमांकडे संकेत करता येईल. एक तर अहिच्छत्रा येथील मृफलकांवर अंकित वृक्ष व पात्र घेतलेला शिव, दुसरा मथुरा संग्रहालयांतील शिष्यांसह सोटा घेऊन आसनांवर बसलेला ऊर्ध्वलिंगी शिव आणि तिसरा म्हणजे अशाच प्रकारचा वाराणसी येथील तिलभांडेश्वर मंदिरांत असलेला शंकर. यापैकी वाराणसीची प्रतिमा विशेष रूपाने अवलोकनीय आहे. (चित्र ५२) एका विशाल वृक्षांचे खाली कुंचित केशधारी ऊर्ध्वलिंगी शंकर सोटा घेऊन व्याख्यानमुद्रेत बसला आहे. त्याने स्वतःच्या मांडी भोवती योग पट्ट गुंडाळला आहे. त्याच्या सभोवताल चार शिष्य बसलेले आहेत. हे चार म्हणजे कदाचित आचार्य लकुलीशाचे शिष्य कुशिक, गार्ग्य, मैत्रेय आणि करुष - दुसऱ्या शब्दांत चार मुख्यशैवाचार्य असणें शक्य आहे. पुराणें व शिलालेखांत यांचा उल्लेख येतो. १० दक्षिणामूर्ती आणि लकुलीश यांच्या प्रतिमेतील साम्य उघड आहे.
दक्षिणामूर्तीच्या ध्यानांतील कित्येक गोष्टी, उदाहरणार्थ व्याख्यानमुद्रा, पायाजवळ असलेली दोन हरणें, भोवतालचे चार शिष्य, वृक्षांखाली आसन असणें, इत्यादि स्पष्ट रूपानें बौद्ध प्रभावाच्या सूचक आहेत. मध्यकाळांत या प्रतिमांचे प्रकार वाढले.
झ) रावणानुग्रहमूर्ती :
गवनिं उन्मत्त झालेल्या रावणांने एकदा शिव दर्शन न मिळाल्यामुळे शिवपार्वतीसह संपूर्ण कैलासालाच उपटण्याचा अट्टहास केला. पर्वत कंपित झाल्यामुळे उमा घाबरली. शंकरानें तेव्हा तिला धीर देत पायांच्या अंगठ्यानें कैलासालाच दाबून टाकले. जेव्हां रावण चिरडला जाऊ लागला, त्याने शंकराची करुणा भाकली व शंकरही प्रसन्न झाले. " या दृश्याचे अंकन मध्यकालांत बरेंच लोकप्रिय झाले, पण त्याचा प्रारंभ मात्र गुप्तकालांपासूनच झाला होता. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका शिलाखंडावर कैलासाला उचलणाऱ्या रावणाला राक्षस रूपांत दाखविले आहे.
८) गजासुरवधमूर्ती :
कूर्मपुराणांत गजासुरवधाची कथा वाराणसी येथील कृत्तिवासेश्वर लिंगाच्या प्रसंगाने येते. १२० या लिंगांचे पूजन व ध्यान करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देण्यांकरिता हत्तीचे रूप घेऊन एक असुर आला असतां शंकरानें लिंगातून प्रगट होऊन
१६९
मथुरा संग्रहालयांत चंद्रगुप्त विक्रमादित्याचे वेळेचा एक अभिलिखित स्तंभ आहे. ज्यावर नग्न आणि मुक्तकेश असा दंडधारी लकुलीश दिसतो (चित्र ५१). मथुरेतूनच मिळालेली जवळजवळ याच काळची दुसरी प्रतिमा लखनऊ संग्रहालयाच्या एका शिलापट्टांवर आहे. येथें तो सोटा घेतलेला ऊर्ध्वलिंग तर आहेच पण मांडी घालून बसलेला आहे व त्याने मांडीभोवती योगपट्ट गुंडाळला आहे. दंड व ऊध्र्वलिंग लकुलीशाची चिन्हे होत पण सुरुवातीच्या सर्व प्रतिमात ही समानरूपाने मिळत नाहीत. लकुलीश या शब्दानें त्याच्याजवळ सोटा असणें अपरिहार्य दिसते (लकुलीश, लगुडीश = लगुडेश; लगुड = सोटा). हा सोटा म्हणजे गांधार कलेत मिळणाऱ्या शिवाला गदेचे परिवर्धित रूप असू शकते.
ज) दक्षिणामूर्ती :
गुप्तकालीन लकुलीशांशी बरेच साम्य असलेली प्रतिमा दक्षिणामूर्तीची होय. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिणभारतांत विशेष रूपानें प्रचलित आहे. श्री गोपीनाथ राव यांनी या रूपांचे योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान असे चार भेद सांगितले आहेत त्यांचा पुढे विचार करू. गुप्तकाळाच्या पूर्वीचा दक्षिणामूर्ती आज तरी आपणांस माहीत नाही, या काळातील मूर्तीपैकी ठळक म्हणून फक्त तीन प्रतिमांकडे संकेत करता येईल. एक तर अहिच्छत्रा येथील मृफलकांवर अंकित वृक्ष व पात्र घेतलेला शिव, दुसरा मथुरा संग्रहालयांतील शिष्यांसह सोटा घेऊन आसनांवर बसलेला ऊर्ध्वलिंगी शिव" आणि तिसरा म्हणजे अशाच प्रकारचा वाराणसी येथील तिलभांडेश्वर मंदिरांत असलेला शंकर. यापैकी वाराणसीची प्रतिमा विशेष रूपाने अवलोकनीय आहे. (चित्र ५२) एका विशाल वृक्षांचे खाली कुंचित केशधारी ऊर्ध्वलिंगी शंकर सोटा घेऊन व्याख्यानमुद्रेत बसला आहे. त्याने स्वतःच्या मांडी भोवती योग पट्ट गुंडाळला आहे. त्याच्या सभोवताल चार शिष्य बसलेले आहेत. हे चार म्हणजे कदाचित आचार्य लकुलीशाचे शिष्य कुशिक, गार्ग्य, मैत्रेय आणि करुष - दुसऱ्या शब्दांत चार मुख्यशैवाचार्य असणें शक्य आहे. पुराणें व शिलालेखांत यांचा उल्लेख येतो. दक्षिणामूर्ती आणि लकुलीश यांच्या प्रतिमेतील साम्य उघड आहे.
दक्षिणामूर्तीच्या ध्यानांतील कित्येक गोष्टी, उदाहरणार्थ व्याख्यानमुद्रा, पायाजवळ असलेली दोन हरणें, भोवतालचे चार शिष्य, वृक्षांखाली आसन असणें, इत्यादि स्पष्ट रूपानें बौद्ध प्रभावाच्या सूचक आहेत. मध्यकाळांत या प्रतिमांचे प्रकार वाढले.
झ) रावणानुग्रहमूर्ती :
गर्वानं उन्मत्त झालेल्या रावणांने एकदा शिव दर्शन न मिळाल्यामुळे शिवपार्वतीसह संपूर्ण कैलासालाच उपटण्याचा अट्टहास केला. पर्वत कंपित झाल्यामुळे उमा घाबरली. शंकरानें तेव्हा तिला धीर देत पायांच्या अंगठ्यानें कैलासालाच दाबून टाकले. जेव्हां रावण चिरडला जाऊ लागला, त्याने शंकराची करुणा भाकली व शंकरही प्रसन्न झाले." या दृश्याचे अंकन मध्यकालांत बरेंच लोकप्रिय झाले, पण त्याचा प्रारंभ मात्र गुप्तकालांपासूनच झाला होता. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका शिलाखंडावर कैलासाला उचलणाऱ्या रावणाला राक्षस रूपांत दाखविले आहे.
८) गजासुरवधमूर्ती :
कूर्मपुराणांत गजासुरवधाची कथा वाराणसी येथील कृत्तिवासेश्वर लिंगाच्या प्रसंगाने येते. १२० या लिंगांचे पूजन व ध्यान करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देण्यांकरिता हत्तीचे रूप घेऊन एक असुर आला असतां शंकरानें लिंगातून प्रगट होऊन
१६९
मथुरा संग्रहालयांत चंद्रगुप्त विक्रमादित्याचे वेळेचा एक अभिलिखित स्तंभ आहे. ज्यावर नग्न आणि मुक्तकेश असा दंडधारी लकुलीश दिसतो (चित्र ५१). मथुरेतूनच मिळालेली जवळजवळ याच काळची दुसरी प्रतिमा लखनऊ संग्रहालयाच्या एका शिलापट्टांवर आहे. येथें तो सोटा घेतलेला ऊर्ध्वलिंग तर आहेच पण मांडी घालून बसलेला आहे व त्याने मांडीभोवती योगपट्ट गुंडाळला आहे.
दंड व ऊर्ध्वलिंग लकुलीशाची चिन्हे होत पण सुरुवातीच्या सर्व प्रतिमात ही समानरूपाने मिळत नाहीत. लकुलीश या शब्दानें त्याच्याजवळ सोटा असणें अपरिहार्य दिसते (लकुलीश, लगुडीश लगुडेश; लगुड = सोटा). हा सोटा म्हणजे गांधार कलेत मिळणाऱ्या शिवाला गदेचे परिवर्धित रूप असू शकते. ११२
ज) दक्षिणामूर्ती :
गुप्तकालीन लकुलीशांशी बरेच साम्य असलेली प्रतिमा दक्षिणामूर्तीची होय. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिणभारतांत विशेष रूपानें प्रचलित आहे. श्री गोपीनाथ राव यांनी या रूपांचे योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान असे चार भेद सांगितले आहेत त्यांचा पुढे विचार करू. गुप्तकाळाच्या पूर्वीचा दक्षिणामूर्ती आज तरी आपणांस माहीत नाही, या काळातील मूर्तींपैकी ठळक म्हणून फक्त तीन प्रतिमांकडे संकेत करता येईल. एक तर अहिच्छत्रा येथील मृफलकांवर अंकित वृक्ष व पात्र घेतलेला शिव, दुसरा मथुरा संग्रहालयांतील शिष्यांसह सोटा घेऊन आसनांवर बसलेला ऊर्ध्वलिंगी शिव आणि तिसरा म्हणजे अशाच प्रकारचा वाराणसी येथील तिलभांडेश्वर मंदिरांत असलेला शंकर. यापैकी वाराणसीची प्रतिमा विशेष रूपाने अवलोकनीय आहे. (चित्र ५२) एका विशाल वृक्षांचे खाली कुंचित केशधारी ऊर्ध्वलिंगी शंकर सोटा घेऊन व्याख्यानमुद्रेत बसला आहे. त्याने स्वतःच्या मांडी भोवती योग पट्ट गुंडाळला आहे. त्याच्या सभोवताल चार शिष्य बसलेले आहेत. हे चार म्हणजे कदाचित आचार्य लकुलीशाचे शिष्य कुशिक, गार्थ, मैत्रेय आणि करुष - दुसऱ्या शब्दांत चार मुख्यशैवाचार्य असणें शक्य आहे. पुराणें व शिलालेखांत यांचा उल्लेख येतो. दक्षिणामूर्ती आणि लकुलीश यांच्या प्रतिमेतील साम्य उघड आहे.
दक्षिणामूर्तीच्या ध्यानांतील कित्येक गोष्टी, उदाहरणार्थ व्याख्यानमुद्रा, पायाजवळ असलेली दोन हरणें, भोवतालचे चार शिष्य, वृक्षांखाली आसन असणें, इत्यादि स्पष्ट रूपानें बौद्ध प्रभावाच्या सूचक आहेत. मध्यकाळांत या प्रतिमांचे प्रकार वाढले.
झ) रावणानुग्रहमूर्ती :
गवर्नि उन्मत्त झालेल्या रावणांने एकदा शिव दर्शन न मिळाल्यामुळे शिवपार्वतीसह संपूर्ण कैलासालाच उपटण्याचा अट्टहास केला. पर्वत कंपित झाल्यामुळे उमा घाबरली. शंकरानें तेव्हा तिला धीर देत पायांच्या अंगठ्यानें कैलासालाच दाबून टाकले. जेव्हां रावण चिरडला जाऊ लागला, त्याने शंकराची करुणा भाकली व शंकरही प्रसन्न झाले." या दृश्याचे अंकन मध्यकालांत बरेंच लोकप्रिय झाले, पण त्याचा प्रारंभ मात्र गुप्तकालांपासूनच झाला होता. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका शिलाखंडावर कैलासाला उचलणाऱ्या रावणाला राक्षस रूपांत दाखविले आहे. १९
८) गजासुरवधमूर्ती :
कूर्मपुराणांत गजासुरवधाची कथा वाराणसी येथील कृत्तिवासेश्वर लिंगाच्या प्रसंगाने येते. *** या लिंगांचे पूजन व ध्यान करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देण्यांकरिता हत्तीचे रूप घेऊन एक असुर आला असतां शंकरानें लिंगातून प्रगट होऊन
१७०
त्याचा संहार केला व त्याचे कातडे पांघरण्यांसाठी उपयोगांत घेतले. गजासुरवधाच्या कथेची काही इतरही रूपें वाड्मयांत सापडतात. १२९ श्री शिवराममूर्ति यांच्या कथनाप्रमाणें उत्तर भारतांत गजासुरसंहार व अंधकासुरसंहार याचे सम्मिश्रण केले जाते. १२२ बंगालमधें या बरोबरच भैरवालाही स्थान देतात.
अंकुश घेतलेला, किंवा हत्तीवर बसलेला शिव आपण कुषाण काळांत पाहिला आहे. शिवाचे वाहन बैल व वृषचर्माचा शिवाकडून केला जाणारा उपयोगही मार्गे उल्लेखिला गेला आहे. प्रस्तुत प्रसंगात काही अंशी तसेच साम्य आढळतें.
ठ) भैरव :
महाभारताप्रमाणे वेदज्ञ ब्राह्मणानी शंकराची 'घोर' अशी मुख्य दोन स्वरूपें मानली. २५ ही दीन रूपेंच अनेक प्रकारानें प्रगट झाली आहेत. शिवपुराणांप्रमाणें भैरव हे शंकराचे 'पूर्णरूपे' होय. या शब्दाची व्युत्पत्ती भीषण असल्यामुळे भैरव किंवा भरण करणारा असल्यामुळे भैरव अशा दोन प्रकाराने लावतात. भैरव किंवा कालभैरव हा वाराणसीचा अधिपती मानला जातो गुप्तकालीन भैरवाच्या पाषाणमूर्ती अजून आपणास माहीत नाहीत पण शिवाचे 'घोर' किंवा काळरूप चतुर्मुखलिंगात पाहता येते (चित्र ८७) या शिवाय अहिच्छत्रा येथील महाभैरवाच्या मृफलकाचा उल्लेख मागे आलेला आहेच.
ड) नृत्य - मूर्ती :
शंकराचे नर्तन देखील फारच प्रसिद्ध आहे. शिव तांडवाचे अंकन दक्षिणेंत लोकप्रिय होतें. उत्तर भारतांत शिवाच्या नृत्य-मूर्ती कमी मिळतात, पण त्याची सुरुवात मात्र गुप्तकाळांपासून झालेली आहे. नचना कुठरा येथून नृत्य करणाऱ्या चतुर्भुज शंकराची एक खंडित प्रतिमा आपणांस मिळाली आहे.
ठ) भिक्षाटनमूर्ती :
शिवाच्या भिक्षाटनांची कथा पद्मपुराणांत येते. १२५ एकदां सहस्र वर्षे चालणाऱ्या ब्रह्मदेवाच्या यज्ञांत 'पञ्चमुंड' व 'बृहत्कपाल' धारण करणारा शंकर भिक्षेसाठी गेला व त्याने अन्नाची याचना केली ब्रह्मदेवाने 'हो' म्हटल्यावर तो आपले कपाळ तेथेच ठेऊन आंघोळीकरिता म्हणून पुष्कर तीर्थावर गेला. इकडे त्या अपवित्र वस्तूला म्हणजे कपाळाला तेथून फेकून देण्यांचा ब्रह्मदेवांने प्रयत्न केला, पण तेथें एकाच्या जार्गी दुसरे कपाळ प्रगट होऊ लागले व सरतेशेवटी ब्रह्मदेवानें शिवाला पुरोडाशांतील भाग देणें स्वीकार केले. भिक्षाटन प्रतिमेचे आगमांत बरेच वर्णन मिळते. १२८ उत्तर व दक्षिण दोन्हीकडे या प्रतिमा घडविल्या जात. खालील बाबतीत त्यांचे उभयसाम्य दिसते :
क) डोक्यावर जटामंडल :
ख) अंगावर दागिने
ग) बेंबीपर्यंत उचलेल्या डाव्या हातांत कपाळ किंवा भिक्षापात्र
घ) मस्तकावर असलेली तीन नरमुंडे.
१७१
या प्रकाराची एक सुंदर प्रतिमा लखनऊ संग्रहालयात आहे. तेथें वरील सर्व वैशिष्ट्ये तर दिसतातच पण त्याशिवाय विशेष लक्ष पुरविण्यांसारखें म्हणजे आयुधपुरुषाच्या रूपात त्रिशूल दिसतो. (चित्र ५५)
विष्णूच्या मानानें शंकराचा आयुधपुरुष कमी दिसतो. महाभारतांत शंकराच्या विजय नांवाच्या त्रिशूलाचें मानवरूपांत वर्णन प्राप्त होते. १२९ त्रिशूलाव्यतिरिक्त शंकराची परशू, पिनाक पाशुपत अस्त्र किंवा बाण याचेही मनुष्यरूपांत वर्णन मिळते. ३०
त) हरि-हर प्रतिमा :
अर्धनारीश्वरांप्रमाणेंच शिव आणि विष्णू यांची संयुक्त मूर्ती देखील सृष्टीच्या उत्पादनांकडे संकेत करते. १३ फरक इतकाच कीं येथें उमेचे स्थान विष्णू घेतो. हरिहरांचे सुंदर वर्णन वायुपुराणांत सापडतें. *** तेथें असें वर्णन आहे कीं प्रथम बीजरूपानें आदिसर्गिक लिंग तयार झालें, नंतर विष्णुरूप योनीशी त्याच्या संयोगानें हिरण्यमय अंडे निर्माण झाले व त्याच्यापासून ब्रह्मदेव व पुढची सर्व सृष्टी तयार झाली. त्याच पुराणांत अन्यत्र विष्णू डावीकडे असतो असें सांगून'" शिवाला 'पुरुष', 'ज्ञेय', 'सत्य', 'यज्ञफल' व विष्णूला 'प्रकृति', 'ज्ञान', 'अनृत', 'यज्ञ' इत्यादि नांवानें संबोधिले आहे. पद्मपुराणांत सृष्टीचे आदि कारण अशा शिवाच्या लिंगाला ब्रह्मदेव आणि भगाला जनार्दन असें म्हटलें गेले आहे. शिवाबरोबर विष्णूनें स्त्रीरूप धारण करून फिरत राहण्यांची कथा कूर्मपुराणांत ही आहे. याच प्रसंगाने भागवतपुराणांकडेही वाचकांचे लक्ष वेधणें अयुक्तिक होणार नाही. त्या पुराणांप्रमाणें विष्णूच्या मोहिनी रूपांतील सौंदर्यावर आसक्त होऊन 'प्रमुषितेंद्रिय' अवस्थेंत शंकर त्याचे पाठी मार्गेधाऊ लागला. दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणें शिव आणि मोहिनीच्या संयोगाने जो पुत्र उत्पन्न झाला तोच मल्याळम् भागाचा संरक्षक व मल्याळी लोकांकडून पूजला जाणारा शास्ता, आर्य, अय्यनार, किंवा हरि-हर-पुत्र या नावांचा देव होय. (1
हरि-हराची सुमारे चौथ्या शतकांतील मूर्ती विदिशा येथून मिळाली आहे (चित्र ५६). येथे ही अर्धनारीश्वर प्रतिमेंप्रमाणें ऊर्ध्वलिंग दिसतें, पण हात मात्र खंडित आहेत. याच्या थोड्या नंतरची हरिहराची प्रतिमा कलकत्ता येथील बिरला-अकादमी-संग्रहालयांत ठेवलेली आहे. मूर्तीला चार हात असून वरील हातांत त्रिशूल व चक्र आहे आणि खाली अक्षमाला व शंख. शिवाची जटाभार, अर्धचंद्र आणि व्याघ्रांबर ही चिन्हें असून विष्णूकडे सिंह, मुखांकित मुगुट शोभत आहे. हरिहराचे ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे.
या काळच्या हरिहराच्या इतर विशाल प्रतिमा मथुरेकर्डे असाव्यात (चित्रे ५७, ५८) कारण त्याची मोठाली दोन मस्तकें मथुरा (सं.सं. १३३; १९३६) व लखनऊच्या संग्रहालयांत ठेवलेली आहेत. काही बारकी डोकी सोडली तर गुप्तकालीन हरिहराच्या प्रतिमेचा एक नमूना प्रयाग संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र मूर्तीत पाहता येतो. येथे दोघांची मुख्य आयुर्थे त्रिशूलपुरुष व चक्रपुरुषाच्या रूपांत कोरली आहेत. (सं.सं. २९२)
धनवंतरी :
धनवंतरीची दुसरी प्रतिमा पुर्णे येथील भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. या मध्यकालीन शिल्पांत द्विभुज धनवंतरीच्या मध्यावर आधी तीन फणाचा व त्याखाली पंधरा फणाचा असे दोन नाग आहेत. डाव्या हातांतही सर्प आहे. आणि भग्नावस्थेत असलेल्या उजव्यात बटवा आहे. देव वैद्य धनवंतरी आणि सर्प यांच्या परस्पर संबंधाचे कारण विचारणीय आहे.
- गो. बं. देगलूरकर. विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्, पा. ६१, चित्र
१७२
मोहिनी :
समुद्रमंथनानंतर विष्णूने अत्यंत सुंदर स्त्रीचे रुप घेऊन दैत्यांना मोहित केले आणि अमृताचा वाटा देवांना दिला. ती मोहिनी, किंवा शिवमोहिनी (पहा भामूशा. पा. १४९) ही अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. हिची शिल्पे अगदी मोजकीआहेत.
संक्षेपत :-
१) नगर संग्रहालयात शेषशायी विष्णूपटाच्या वरच्या अंगास कोरलेल्या समुद्रमंथन दृष्यांत डाव्या हातानें घटाला स्पर्श करणारी मोहिनी दिसते.
२) नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात मोहिनी अमृतघट घेऊन कासवावर उभी आहे. त्यातील अमृत ती विष्णूला देत आहे.
-गो.बं. देगलूरकर, विष्णुमूर्ते., पान ९७ - ३) रामराकुटी, धुब्री, आसाम येथे काष्ठावर कोरलेल्या दृष्यांत समुद्रमंथनाचे अंकन आहे. तेथे अमृतघट घेतलेली मोहिनी दिसते.
R.D. Chaudhary, 'Wooden Sculptures of Ramarai Kuti' Kala VI, 1997-98 Fig. 11, pp. 32-37
४) कमंडलेश्वर शिवमंदिर, पाली, तामिळनाडू येथील १२व्या शतकाच्या एका शिल्पात दर्शनी भागावर श्रीदेवी व भूदेवीसह विष्णूचे दहा अवतार आहेत व पाठीकडे विश्वमोहिनीची सुंदर प्रतिमा आहे. R.Champakalakshmi, Vaisnava Iconography of the Tamil country, 1981 New Delhi p. 277
थ) चतुर्मुख शिव* :
मांढळ, तहसील उमरेड (जि. नागपूर) येथून मिळालेल्या काहीं सातवाहन-वाकाटक कालीनप्रतिमा नागपूर संग्रहालयांत आहेत. त्यांत चतुर्मुखी दिसतो. चारी दिशांकडे पाहणारी चार मुखें याच्या मानेंवर असून डाव्या हातांत दण्ड असावा असें वाटतें. ऊर्ध्वलिंग नेसूच्या वस्त्रानें झाकलेले आहे. प्रतिमा लालसर दगडाची आहे.
(* या माहितीबद्दल लेखक नागपूर संग्रहालयांचे अध्यक्ष श्री पी.एम्. मुळे यांचा आभारी आहे. श्री. मुळे यांच्या सहयोगानें या प्रतिमा पाहतां आल्या. अजून या अप्रसिद्ध आहेत.)
द) अष्टमुख शिव :
याच संग्रहालयांतील मांढळची दुसरी प्रतिमा अष्टमुख शिवाची आहे. ही देखील उभयांकित असून हिला दोनच हात असावेत असें वाटते. त्यापैकी आज हयात असलेल्या डाव्या हातांत घट (तुंबी) आहे व तिच्यातून एक लांबट वस्तू निघत असावी असें भासित होतें. हिला चहूबाजूला चार तोंडे तर आहेतच, मागील मुखाला त्रिनेत्र व मिशाही आहेत. हैं अघोरमुख असावे. याशिवाय डाव्या बाहुमूलांवर (तुटलेल्या उजव्या बाहूमुलांवरही तसेंच असले पाहिजे) व दोन्हीं जघांमूलांवर प्रत्येकी एक अशी चार अतिरिक्त मुखेंही दिसतात. जंघामूलांवर दिसणाऱ्या मुखांचा व मांड्यावरील धोतराचा असा खुबीदार जोड बसविला आहे कीं धोतराचा भाग या मुखांवरील उष्णीषासारखाच वाटतो. या प्रतिमेत देखील वरील प्रमाणें वस्त्राच्छादित ऊर्ध्वलिंग आहे. शिवाच्या खांद्यावर जानवेही आहे. शिवाची ही आठ मुखें त्याच्या अष्टमूर्तित्वाकडे संकेत करतात.
१७३
ध) द्वादशमुखी शिव : १८
नागपूर विद्यापीठानें मांढळ येथे केलेल्या उत्खननांत सातवाहन वाकाटककालीन बरेच अवशेष मिळाले आहेत. त्यांत एक द्वादशमुखी, शिवाची मूर्ती आहे. याचा दगड, घडण व डौल अष्टमुख शिवप्रतिमें प्रमाणेंच आहे. डॉ अजयमित्र शास्त्री यांनी 'महासदाशिव' म्हणून हिला ओळखले आहे. या प्रतिमेंच्या मानेंवर आठ डोकी असून ती चारचा एक थर या प्रमाणे एकांवर एक असलेल्या दोन थरांत दाखविली आहेत. खालील चार तोंडे मुख्य दिशांकडे व वरील उपदिशांकडे आहेत. या शिवाय वरील अष्टमुख प्रतिमेंप्रमाणेंच दोन बाहुमूलांवर व दोन जंघामूलांवर अशी आणखी चार मुखें आहेत. या मुखांना मिशा नाहीत. या प्रमाणें एकूण मुखांची संख्या झाली बारा !! शिवाच्या डाव्या हातांत कमंडलू असावा. त्याच्या शरीरांवर फलकहार, जानवें, कटिबंध, आणि कच्छा दिसतो. ऊर्ध्वलिंग वस्त्राच्छादितच आहे. विष्णूच्या चतुर्व्यहाप्रमाणें मूसानगरचा शिव आपण मागें पाहिला आहे. तसेच या बारामुखीं शिवांचा विष्णूंच्या बारा विभवांशी काही अर्थाअर्थी संबंध नसेल नां?
चंडिमऊ येथील शिवकथा : १३९
प्रारंभिक कलेंत शिवकथांचे क्रमबद्ध अंकन फारसे मिळत नाही. या दृष्टीने बिहारच्या चंडिमऊ गावातून मिळालेले काही खांब फारच महत्त्वाचे आहेत. यावर गंगावतारण, शंकराकडून मानिनी पार्वतीचा अनुनय, गणांचे नृत्य, पाशुपत अस्त्र मिळविण्यांकरिता अर्जुनाची तपश्चर्या, वगैरे दृश्यें कोरलेली आहेत. येथें दिसणाऱ्या शंकराची खालील वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत -
क) शिवाच्या डोक्यावर जटाजूट, अर्धचंद्र आणि एकफणेचा साप आहे. शिवाचा सर्प कदाचित या कालांपासूनच पुढे दिसूं लागतो.
ख) शंकराचें ऊर्ध्वलिंग.
ग) साधारणपणें शंकर द्विभुज आहे, पण तो जेव्हां अर्जुनांचे आराध्य म्हणून प्रगट होतो तेव्हां मात्र चतुर्भुज दिसतो, व शरीर ही थोडें सुटलेलेच आहे.
घ) काही ठिकाणीं शिवाचे जानवें दिसते, तिसरा डोळां मात्र उभा आहे.
ङ) त्रिशूल, डमरू किंवा बैल दिसत नाहीत.
DAK
***
१५९
महाभारतांत त्रिमुख शिवाचे उल्लेख फारच तुरळक आहेत." शंकराची द्विमुख चतुर्मुख आणि पंचमुखें लिंगें तर मिळतात, पण त्रिमुख लिंग अजून अज्ञात आहे. त्यामुळे आमची कल्पना अशी आहे की जेथें ब्रह्मा व विष्णू या बरोबर शंकराला एकत्र दाखविणें अभिप्रेत असते. तेथें त्याला त्रिशिर दाखवितात, पण अन्यत्र अशा प्रकारच्या प्रतिमांत शिवाला चतुर्मुख दाखविण्यांचा कलाकाराचा मनोदय असतो समोरून दिसू शकणारी तीन तोंडे व चौथें अर्थात् पाठीकडील तोंड अदृश्य अशी ही चार मुखें असावीत. शिवाच्या चार मुखांची कथा महाभारतांत आली आहे." देवांना प्रदक्षिणा घालणारी अप्सरा तिलोत्तमा हिचा अप्रतीम सौंदर्याला न्याहाळण्याकरिता चारी दिशांना शिवाची चार तोंडे प्रगट झाली अशी ही कथा आहे. मथुरेहून प्राप्त झालेल्या एका प्रतिमेची ओळख चतुर्मुख शिव अशा प्रकारें श्री रत्नचंद्र अग्रवाल यांनी करून दिली आहे. फरक एवढाच कीं येथे चौथे मुख पाठीकडे नसून त्या ऐवजी खांद्यावर एक अतिरिक्त प्रतिमाच दिसते. हे विवेचन करतांना त्यांनी रंगमहाल येथून मिळालेल्या एका मृत्फलकांचाही उल्लेख केलेला आहे. ज्यावर तीन मस्तकांचा शंकर दिसतो. हा फलक प्रारंभिक गुप्तकाळाचा आहे. या बाबतीत पुनः उहापोह करूच.
उज्जयिनीच्या संदर्भातच हे ही नमूद करणें योग्य होईल की प्राचीन काळापासूनच ते शैव केंद्र होते. कालिदासाचे वेळीं तेथें चंडीश्वर महाकालाचे सुंदर स्थान असल्याचे मेघदूत सांगतो."
उज्जयिनीप्रमाणेंच कुणिंदांच्या नाण्यावर त्रिशूल परशू घेतलेला शंकर दिसतो. त्याला तेथें 'छत्रेश्वर महात्मा' असे म्हटले आहे. ४२
परदेशी राजांच्या नाण्यांपैकी गुदफर किंवा गोण्डोफर यांच्या नाण्यांवर डॉ. बॅनर्जी यांनी त्रिशूल आणि तालशाखा घेतलेला शंकर ओळखला आहे. यावर ग्रीक देव 'पोसोडॉन' यांच्या ध्यानांची छाप दिसते. गुदफराच्या नाण्यांवर राजाला 'देवव्रत' असे अभिधान आहे, जें कदाचित तो शैवमताचा असल्याचे पुष्ट करते. नाण्यांवर त्रिशूलधारी शंकर असलेला अन्य परदेशी राजा 'माऊस' हा होय. येथें कधी कधी शिव अपस्मार पुरुषांचे मर्दन करीत असतांनाही दिसतो."
सिरकप (तक्षशिला) येथून १९१४-१५ च्या सुमारें एक तांब्याचा ठसा मिळाला आहे. त्यावर त्रिशूळ व गदा घेतलेला शंकर दिसतो. येथील गदा ग्रीक देव हरक्यूलियस यांच्या गदेच्या धर्तीवर आहे. (रे.चि. बावींस ६)
परदेशी शासकांच्या या कांही नाण्या व्यतिरिक्त शंकरांचे भरपूर दर्शन कुषाण राजांच्या नाण्यांवर होते. मूर्तिविज्ञानांच्या दृष्टीनें येथें बरीच महत्त्वाची माहिती मिळते.
अगोदर कडफिश दुसरा आणि वेम यांच्या नाण्यांना पाहू. येथे शिवाची दोन रूपें मिळतात. दिगंबर शंकर एकटा उभा आहे. त्याच्या उजव्या हातांत त्रिशूल-परशू असून डाव्यात घट आहे. डाव्या हातांवर कोणत्या तरी जनांवराचे चामडे लोंबत आहे. प्रो. रोझेनफील्ड याला सिंह-चर्म समजतात व त्याचा संबंध महाभारतांतील 'सिंहचर्मोत्तरच्छिदः' या पदाशी लावतात" पण रोझेनफील्ड यांनी दिलेल्या चित्रांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास चामड्याला असणारे पशुमस्तक सिंहाचे नसून ते बैलाचे असावे असे वाटते." शैवांमध्यें बैलाचे चामडे खांद्यावर पांघरण्याची पद्धत गुप्तकालांत होती ही गोष्ट अहिच्छत्रा येथून मिळालेल्या महाभैरवाच्या मृफलकाने उघड दिसते. राजा वेम याच्या मुद्रेवरही शिवाचे हे रूप दिसते पण त्यांत शिवाच्या मस्तकावर दिसणाऱ्या अग्निज्वाला हे वैशिष्ट्य होय (रे. चित्र बावीस ३) अर्थात् या काळांत शिव व अग्नी यांचा निकट संबंध मान्य झाला होता. येथे शंकराच्या डाव्या खांद्यावर जानव्याप्रमाणें लोंबणारी माळा ही अवलोकनीय आहे. तिच्यांत काही पदकें ओवलेली आहेत. हा अलंकार समकालीन कांही गांधार मूर्तीत व गांधार कलेची छाप असलेल्या माधुरी कलाकृतींतही दिसतो आणि शंकराच्या 'उपवीती' या नांवाला सार्थकता येते (रे. चि. बावीस ७).
१६०
वेम याच्या नाण्यांवर शंकराचे जें दुसरे रूप दिसते तें पहिल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत आहे. येथे शंकर विवस्त्र, महालिंगी किंवा बैलाच्या चामड्याला धारण करणारा नसून तो बैलाला टेकून व अंमळ एकीकडे कललेला असा उभा आहे. त्याच्च्या डाव्या हातांत त्रिशूल किंवा क्वचित त्रिशूल-परशू दिसतो, त्याचप्रमाणें नेसूचे वस्त्र आणि जानव्यासारखा दागिना हे ही स्पष्टपणे दिसतात. मस्तकांवर असणाऱ्या अग्निज्वाळांचा आकार बराचसा त्रिशूलासारखा आहे. वेमाच्या नाण्यावरील अभिलेखांत जरी शंकराचे स्पष्ट असे नांव आढळत नाही तरी राजाचे 'माहेश्वर' हे अभिधान शिवाची नीट ओळख पटवून देतें.
कनिष्काच्या मुद्रेवर" चतुर्भुज शंकर दिसतो. प्रदक्षिणाक्रमानें त्याच्या हातांत अधोमुख घट आणि अंकुश, वज्र, त्रिशूळ आणि उसळी मारणारें हरण आहे. प्रत्येक नाण्यांवर अंकुश दिसत नाही तसेच मृगाच्या स्थितीतही फरक आहे. शिवाचे धोतर आणि जानव्यासारखा दागिना येथेही दिसतात. याच राजाच्या नाण्यांवर सर्वप्रथम शंकराचे प्रभामंडल आढळते.
शंकराची काही नवीन रूपें हुविष्काच्या नाण्यांवर" पाहतां येतात. प्रो. रोझेनफील्ड यांनी एका नाण्यांवर शिवाच्या मस्तकांवरील चंद्रकोर शोधण्यांचा प्रयत्न केला आहे, पण तें संदिग्ध आहे कारण इतर नाणी त्या बाबतीत मौन आहेत. शिवाय या काळांतील पाषाण मूर्तीकडे दृष्टिक्षेप केल्यास एक अपवाद वगळला तर इतरत्र शिवांचे डोक्यावर चंद्रकोर दिसत नाही.
या काळांतील दुसरें महत्त्वाचें असे ध्यान म्हणजे चार हातांचा आणि तीन तोंडाचा शंकर हे होय. येथे घट आणि अंकुश याऐवजीं चक्र शोभू लागते व शंकराची ऊर्ध्वलिंगावस्था ही नजरेंत भरते. हुविष्काच्या नाण्यांच्या तिसऱ्या प्रकारांत जटाभार असलेल्या त्रिमुख शिवांबरोबरच त्याची आयुधें म्हणून घट, प्रकीर्ण किरणांचे वज्र (?), त्रिशूल आणि गदा ही दिसूं लागतात.
कुषाण सम्राटांत वासुदेव हा शेवटला उल्लेखनीय राजा होता. त्याचा शैवधर्मांकडे चांगलाच कल होता. याच्या नाण्यावर५२ शिव मूर्तीचे खालील प्रकार पाहण्यात येतात :
क) त्रिशूल, घट किंवा तुंबी, पाश" आणि कमळ घेतलेला त्रिमुख शंकर, पाठीमागे बैल.
ख) फक्त पाश आणि त्रिशूल घेतलेला त्रिमुख शिव, पाठीमागे डावीकडे तोंड केलेला बैल. पाश सोडला तर हा शिव वेम याच्या नाण्यावरील शिवासारखा आहे. पण बैल व त्रिशूल यांत थोडा फरक आहे.
ग) तिसरा प्रकार ही वरील प्रमाणेच आहे, पण येथे शंकर जास्त सुरेख आणि एक प्रकारें गुटगुटीत आहे. उत्तर कुषाणकालीन नाण्यांच्या शिवप्रतिमा पुनः बटबटीत आणि बेडौल दिसू लागतात व गुप्त काळांपर्यंत त्यांत फरक दिसत नाही. याच वेळी शंकराच्या मस्तकांवरील चंद्रकोर स्पष्टपणें उगवते (रे. चित्र बावीस ५).
घ) वासुदेवाच्या काही नाण्यांवर शिवाचे बरोबर बैलाच्या ऐवजी हत्ती दिसतो शिवाचा सिंहाप्रमाणेंच हत्ती बरोबरही नेहमीचा संबंध नाही. कनिष्काच्या मुद्रेवर आपण शिवाच्या हातांत अंकुश बघितला होता, येथे प्रत्यक्ष हत्ती आहे. तेव्हा असें गृहीत धरावयांस हरकत नाही कीं गांधार परंपरेत कुठे तरी शिव आणि हत्ती याचा जवळचा संबंध असावा.
Shiva icons across the centuries
Let me start with the image of the delicate and graceful bronze dancing Nataraja sculpture from the 12th century Chola empire, which symbolises destruction and the new creation. Among his flowing hair, on the right side, you can see the river Ganga (Ganges). The centre of his forehead has the third eye, while a snake is wrapped around his right arm.
One of the most common representation of Shiv is as Shivling (Shivalinga).
The cult of Shiv goes back to much older period in India, during the Middle Stone Age (Middle Palaeolithic). Michael Wood, in “The story of India” has written: “The stone lingam and yoni (male and female principles) – that are found in the worship of Shiva come out of the deep past … These aspects of the indigenous culture of India are part of the givenness of the deep past, which is shared by all Indians, whatever their ancestry, language or religion.”
Among the early icons is another Chatturmukhi Shivling - it is from 2nd century CE, when Kushans from central Asia were ruling the Indus valley and parts of north India. It is less well preserved and has a rougher quality. A special feature is the chain motive sculpted on the top third, thus effectively dividing the Shivling into three parts.
I love visiting museums and I am glad that I decided to visit the National Museum in Delhi. It is a wonderful place to learn about the rich culture and traditions of India. There is so much to see.
In an article of Devdutt Pattanaik, he had written about the lack of appreciation of the temple art depicting Indic icons among modern Indians and asked, “How many parents actually take their children to museums or to temples and play the game of ‘Let us identify this god’… Our icons have been reduced to ‘property’, possessing them is more important than appreciating them.” I hope that this post will stimulate you to visit national museum and other museums.

.jpg)

.jpg)

.jpeg)

.jpg)

.jpg)

No comments:
Post a Comment