Monday, March 8, 2021

सातारा जिल्ह्याची भटकंती

 कटगुण : 

थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचे हे मूळ गाव. त्यांचे मूळचे आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे वाडवडील पुण्यात स्थायिक झाले होते व ते फुलांचा व्यवसाय करीत. त्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले. त्यांच्या पत्नीचे माहेर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील. हे गाव शिरवळच्या पश्चिमेला असून, त्यांचे तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. कटगुणचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील एक विद्वान चार पीठांपैकी एका पीठाच्या शंकराचार्य पदावर जाऊन पोहोचले होते. गावकऱ्यांना या दोन्ही गोष्टींचा अभिमान आहे. जवळ असलेल्या खातगुण गावात पीर राजेसाहेब बागर यांचा दर्गा असून, तेथे दर वर्षी मोठा उरूस भरतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खातगुण उरसाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात.

भूषणगड
भूषणगड : 
सिंधणदेव यादवानेच भूषणगडाची निर्मिती साधरण इ. स. १२१० ते १२४८ यादरम्यान केली. त्यानंतर हा किल्ला बहामनी राज्यात गेला. त्यानंतर विजापूर आदिलशाही, मराठे, संभाजी महाराज, औरंजेब यांच्यानंतर हा किल्ला पुन्हा शाहू महाराजांच्या ताब्यात आला आणि अखेरीस ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला २९५० फूट उंचीवर आहे. वडूजच्या दक्षिणेस पुसेसावळी मार्गावर हा किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या भूषणगड गावापर्यंत गाडीरस्ता आहे. तेथून ३० ते ३५ मिनिटांत गड चढून जाता येतो. या किल्ल्यावरून बऱ्याच लांबचा पल्ला दिसतो. हा किल्ला टेहळणीसाठी महत्त्वाचा असावा. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. भक्तांच्या अर्थसाह्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे. दोन बुरुजांमध्ये दरवाजा आहे. त्याची कमान पडली आहे. तटबंदी बऱ्यापैकी दिसून येते.

कातरखटाव - 
   खटाव तालुक्‍यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्‍वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्‍त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्‍तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्‍ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्‍त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्‍या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.

शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्‍ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्‍ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले.

कात्रेश्वरातील कन्नड शिलालेख
      कातरखटाव येथील कात्रेश्वराची रचना देखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे. हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणाºया विरगळी, नंद, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघड्यावर विखरून पडल्या आहेत.
  गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :-
  मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत.
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.
 
सोमेश्वर मंदीर गुरसाळे  -

वडूज-कराड मार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी.
त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी. हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी ही शिवकालीन पुष्करणी किंवा बारव आहे.
महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते.
या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलंय. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.
हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच..
माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेश महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्‍यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.
   जलसाठे करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर 11व्या आणि 13व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली.
    बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्‍या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर काय होईल?
   पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्‍या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलदान आणि जलसंरक्षण हे पुण्य कार्य आहे.
   गेल्या अनेक दशकांपासून ज्या बारवांनी आपली तहान भागवली त्या बारवांकडेच आपण दुर्लक्ष केले. बारवांची निगा राखण्यासाठी आपण निधी नाही म्हणतो आणि दुष्काळात 20 रुपये लिटरने पाणी विकत घेण्यास मात्र आपण तयार होतो. आपण आजवर ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची आता वेळ आली आहे. बारवांचे स्थापत्य सौंदर्य न्याहाळात त्यातील स्वच्छ पाणी औंजळीने पिण्याचे स्वप्न पूर्ण करूया. लोकसहभाग आणि जलसंवर्धनासाठी दान देत अखंड महाराष्ट्रात बारव संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात करूया.
  खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.
        जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताºयातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्ट्यपूर्ण
      गुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.
गुरसाळे मंदिर












सोमेश्वर मंदीर गुरसाळे  -

भावलिंग - गुरसाळे
सरसेनापती धनाजीराव जाधव वाडा- मांडवे*
                 सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असलेल्या मांडवे गावात सरसेनापती धनाजीराव जाधव ह्यांचा वाडा आहे. वाडा तसा साधारण परिस्थितीत उभा आहे. वाड्यात जाधवराव घराण्याची वंशावळ आहे. गावात धनाजींचे पुत्र संताजी जाधव ह्यांची समाधी आहे. समाधीभोवती झाडाने विळखा घातला आहे. धनाजीराव हे राजे लखुजीराव जाधव यांचे द्वितिय पुञ राजेअचलोजी यांचे पणतु होते. त्यांचा जन्म इ.स. १६४९ मध्ये झाला. त्यांचा मृत्यू २७ जून १७१० रोजी झाला.







         इ स १६७२ मध्ये प्रतापराव गुजर यांचा पराभव झाल्यावर तेव्हा  धनाजीराव यांनी पराभुत सैन्यास धिर देऊन धनाजीराव ,संताजी घोरपडे व हंसाजी मोहिते यांनी बहलोलखानावर हल्ला चढवुन  त्याचा पराभव केला.
तेव्हा धनाजीराव यांना सरदारकी दिली व हंसाजी मोहिते यांना "हंबीरराव" किताब शिवरायांनी दिला. 
इ स १६७४ मध्ये मोगल व आदिलशहा यांनी एकञ येऊन स्वराज्य बुडवण्याचा कट केला.तेव्हा शिवरायांनी त्यांच्या प्रत्येक सरदारांना सैन्यासह पाठवून पराभव केला.यात धनाजीराव यांनी पराक्रम केला.
धनाजीराव यांनी बंडखोर बेरड नाईक समाजाला स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले होते. 
             औरंगजेबाने मरतेवेळी धनाजीराव व मराठे यांच्या विषयी  उद्गार काढले," आपण स्वतः दक्षिणेत येऊन २५ वर्षे युद्ध चालविले ही आपली फार मोठी चुक जाहली.धनसिँग जाधवराव ये कुछ इन्सान नही है,सैतान है.हमारे सायप्याज खाके आजतक लडता है और हमारी पातशाही यह छीन लेगा ऐसा हमे मालुम पडा है." असे बोलुन प्राण सोडला. धनाजीराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज व शाहु महाराज या प्रत्येक छञपतींच्या अधिकाराखाली अतुलनीय पराक्रम केला होता.

 सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा, भोसरे…

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे गावात शूर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भव्य वाडा आहे. भोसरे गाव कोरेगाव रहिमतपूर पासून जवळ आहे. साताऱ्यापासून साधारण ४० किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावात असलेला वाडा सद्यस्थितीत खूप चांगल्या अवस्थेत नाही. वाड्यामध्ये छोट्या घरात प्रतापराव गुजर यांचे वंशज राहतात. तेथेच प्रतापरावांचा अर्धपुतळा व स्मारक आहे. जवळच प्रताप सृष्टीचे काम सुरू आहे. गुजरांची अजून एक शाखा नागपूरला आहे.

प्रतापराव यांचा जन्म घरंदाज पाटील घराण्यात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव “कुडतोजी” असे ठेवले होते. लहानपणापासूनच त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती यांची आवड होती. धिप्पाड शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, हुशारी या गुणांमुळे महाराजांनी त्यांना स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले. जेव्हा महाराज आग्रा मध्ये अडकले होते त्यावेळी प्रतापरावांनी सरदार अष्टप्रधान या सर्वांच्या बैठका घेऊन स्वराज्य सावरले होते व संपत्ती गोळा केली होती या सर्वांमुळे कुडतोजी यांना महाराजांनी “प्रतापराव”  ही पदवी दिली.

इ.स. २४ एप्रिल १६६० रोजी शाहिस्तेखानाला जाऊन मिळालेल्या मराठा सरदार संभाजी कावजी यांना प्रतापरावांनी ठार मारले. इ.स. १६६३ मध्ये सिंहगड व मावळ प्रांतात हैदोस घालणाऱ्या मोगली सैन्याचा बंदोबस्त केला. सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिस्तेखानाची नाचक्की केली व तो पुण्यात येऊन बसला. इ.स. ३० सप्टे १६६४ रोजी मिर्झाराजे जयसिंग याच्या खुनाचा प्रयत्न प्रतापरावांनी केला पण तो असफल ठरला. इ.स. १७ ऑक्टोबर १६७० रोजी नाशिक दिंडोरी जवळ मोगली सैन्याचा पराभव केला. क्रूर मोगल सरदार दाऊद खान व इकलासखान यांना ठार मारले.

 


बहलोलखान जेव्हा पन्हाळगडावर चालून आला तेव्हा महाराजांनी विजापूर वर स्वारी करण्यासाठी प्रतापरावांना धाडले. तेव्हा खवासखान हा घाबरून गेला व त्याने बहलोलखानाला पुन्हा विजापूरला बोलावून घेतले. तो विजापूरला परतत असताना प्रतापरावांनी उमराणी जवळ त्याच्या सैन्यावर हल्ला चढविला व त्याला जेरीस आणले. अखेरीस त्याने जिवाची पर्वा करत हिरे, सोने, संपत्ती सर्व प्रतापरावांना घेऊन आपली सुटका केली. शत्रूला असेच सोडून दिले म्हणून महाराज प्रतापरावांवर रागवले तेव्हा त्यांनी शपथ घेतली की बहलोलखानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवायचं नाही. आणि तो असामान्य शौर्याचा दिवस उजाडला इ.स. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव आपले सहकारी विठोजी शिंदे, विठ्ठल अत्रे, दिवाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर, विसोजी बल्लाळ यांच्यासह गडहिंग्लजजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानावर तुटून पडले. पण बहलोलखानाच्या सैन्यापुढे या सर्वांना वीरमरण प्राप्त झाले. पुढे कवी कुसुमाग्रज यांनी “वेडात मराठी वीर दौडले सात” ही अजरामर काव्यरचना केली.

प्रतापरावांची दोन मुले जगजीवन व खंडोजी हे शंभुराजे सोबत होते. जेव्हा क्रूर औरंगजेबाने संभाजी राजेंना धर्मांतर करायला लावले तेव्हा आपल्या राजाचं धर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून या दोघांनी आपले धर्मांतर केले. खंडोजी बनले अब्दुल रहीम व जगजीवन बनले अब्दुल रहमान. अशा या पराक्रमी गुजर कुटुंबीयांना शत शत नमन.

कलेढोण :
 या गावाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री व एक कुलगुरू दिला. माजी मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले व त्यांचे बंधू विद्यावाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे हे जन्मठिकाण आहे.

मायणी गाेलघुमट -

मायणी पक्षी अभयारण्य
मायणी इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य : 
  दुष्काळी भागातील शेतीला पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने या ठिकाणी ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी तलाव बांधला. वन खात्यामार्फत या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढवून या परिसराचे पक्षी अभयारण्यात रूपांतर करण्यात आले आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे दोन मनोरे उभारले आहेत. या ठिकाणी पक्ष्यांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवाऱ्यासाठी झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशतील नाना प्रकारचे पक्षीही येथे हिवाळ्यात येतात. सायबेरियातील फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येतात. गरुड, ससाणा, विविध जातीची बदके, पाण्यावरून पळत जाणारे नाम्यापक्षी, सारस (करकोचे), पाण्यात बुड्या मारणारे पाणबुडे इत्यादी पक्षी हंगामानुसार पाहायला मिळतात. चांद नदीच्या काठावर वसलेले मायणी हे गाव या भागातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. या गावामध्ये यशवंतबाबा व सिद्धनाथाची यात्रा भरते. गावात इसवी सनाच्या १३व्या शतकात यादवकालीन राजा सिंधण याने बांधलेले महादेवाचे हेमाडपंती प्राचीन मंदिर आहे. तसेच येथील मातोश्री सरुताईंचा मठ प्रसिद्ध आहे.


सिद्धेश्वर मंदीर - कुरोली
कुरोली सिद्धेश्वर : 
   खटाव, येरळा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पिंडीवर अभिषेकाची धार धरल्यावर शिट्टीसारखा शिवनाद निघतो. त्याला सिंहनाद म्हणतात. भारतातील शिवस्थानांपैकी शिवनाद करणारे हे एकमेव स्थान आहे. सुप्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचे हे जन्मगाव.
सापचा एतिहासिक वाडा
गावाचं नाव साप कसं पडलं? तर ' पूर्वी चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होतं. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होतं. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. तिथे एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळालं. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.  
थोडक्यात इतिहास असा, पूर्वी शाहू महाराजांच्या काळी इंद्रोजी कदम म्हणून एक पराक्रमी आणि तालेवार असा सरदार होऊन गेला. तो गावातल्या कदम घराण्याचा प्रसिद्ध असा पूर्वज. लिखित नोंद अशी की इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीरावाने झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.". यावेळी इंद्रोजी कदम हे शिंद्यांच्या दळातील एक मातब्बर सरदार होते. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत हे इंद्रोजीहि होते (जानेवारी १७५०). तर या कदम सरदारांनी आपल्या गावी बांधलेला हा त्यांचा वाडा. काहींच्या मते इंद्रोजी आणि खंडोजी (की कंठोजी) कदम यांनी त्याकाळी बांधलेला हा वाडा आहे. बांधणीनुसार तो पुढे-मागे नंतरच्या काळात अजून वाढवलेला असावा असं वाटतं.

सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे.

पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. MainGate1

MainGate2

सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.

buruj

main gate design

महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतायत. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून  आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो (ही ऐकीव माहिती).

InsideMainVada

इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.. :) ). डाव्या हाताला हत्तीच्या अंघोळीचा हौद आणि मोठी विहिर दिसते. हत्तींचा हौद आता बर्‍यापैकी दुरवस्थेत आहे. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत.

vihir

मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथेच आपण खुश होऊन जातो. वाडा बर्‍यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी जोत्यासह प्रशस्त ओसरी असलेला आहे.
इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्‍यांच्या कोपर्‍यावर पुरुषभर उंचीचे रांजण आहेत.

chausopi rachana

इथून आम्ही ओसरीच्या एका कोपर्‍यावर असलेल्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावरच्या दरबार सदरेच्या ठिकाणी गेलो.darbar 1

darbar2

ही दरबाराची जागा. इथली दोन्ही बाजूची कवाडे आणि नक्षीदार खांबांची रचना खरंच खूप सुंदर आहे. इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा भरायची. आता चित्रीकरणाच्या निमित्ताने का होईना पण या जागेची डागडुजी आणि निगा राखलेली दिसतेय. हे एक छानच.darbar pillar design

पहिल्या मजल्यावर बाकी भाग मात्र तसाच रिकामा थोडासा अडगळीसारखा दिसला. वेगवेगळ्या हेतूने बांधलेल्या जागा अजून साफ होऊन समोर यायच्या आहेत असं दिसतं.

इथे या फोटोमध्ये कोपर्‍यातले रांजण आणि दगडी चौरंग दिसतायत बघा.

chaurang

परत दुसर्‍या बाजूने ओसरीवर यावे. तिथून आतल्या बाजूस जाण्यासाठी नक्षीदार सागवानी दरवाजा होता.

inside door design

आतल्या खोल्या रिकाम्या असल्याने (तिथेच आसपास माजघर वगैरे असावे बहुतेक) तिथे न थांबता मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात आलो. तिथे बर्‍यापैकी जीर्णोध्दाराचे काम चाललेले होते. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा रिनोवेट केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं. खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटलं. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल.

tulas

खरं तर बरेचशा बंद दरवाजांच्या भागात तसेच मागच्या नव्याने नीट केलेल्या बागेत वगैरे जाऊन यायची इच्छा होती पण वेळेअभावी शक्य नाही झाले.

पण जेवढे पहायला मिळाले त्यानेही खूप छान वाटलं. सध्या तरी चित्रीकरणातच वाडा व्यस्त आहे पण मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने का होईना पण नजरेच्या समोरचाच तरीही दुर्लक्षित असा ऐतिहासिक वारसा जपला जातोय आणि पहायलाही मिळतोय हे ही नसे थोडके. आता तर कदम-इनामदारांच्या सध्याच्या वंशजांनी वाड्याचे पुरातन सौंदर्य जपून नुतनीकरण करायचे मनावर घेतलेले दिसतेय तेव्हा पुढे मागे ही सुंदर वास्तू पर्यटकांसाठीही खुली झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 अंभेरीचे कार्तिकेय मंदिर

 काíतकेय या देवतेबद्दल आपल्याकडे महाराष्ट्रात काहीशी नकारात्मक भावनाच दिसते. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा. एक तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या दंतकथा आणि काíतकेय या देवतेविषयी फारशी माहिती नसणे, अशी ती दोन कारणे दिसतात. स्त्रियांनी काíतकेयाचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते ही भावना तर एवढी खोलवर रुजली आहे की, काíतकेय या नावाचा उच्चारसुद्धा टाळला जातो. त्याचबरोबर काíतकेयाला पार्वतीने दिलेला शाप आणि त्याबद्दलची अजून एक दंतकथासुद्धा जनमानसात रुजलेली दिसते. त्यामुळे फक्त काíतकी पौर्णिमा सोडली तर स्त्रिया काíतकेयाचे दर्शन अजिबात घेत नाहीत आणि एकूणच या देवतेविषयी उदासीनताच सर्वत्र जाणवते.   


 परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कार्तिकेयाचे महत्त्व भारतभर जोपासलं गेलं आहे. त्याबद्दल अनेक महत्त्वाच्या कथा पुराणांमध्येही सापडतात. तो देवांचा सेनापती होता, योद्धा होता त्यामुळे विविध ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आदरयुक्त उल्लेखही पुष्कळ मिळतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा कार्तिकेयाच्या मूर्ती खूपच प्राचीन काळापासून आढळून येतात आणि त्यात वैविध्यसुद्धा आढळते. कार्तिकेय या देवतेचा उल्लेख अथवा आढळ हा अगदी कुषाण काळापासून म्हणजेच इ.स.च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून सापडतो. कुषाण राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर स्कंद, कुमार, विशाख असे वेगवेगळे देव आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर येणाऱ्या यौधेयांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेवाचे अर्थात कार्तिकस्वामीचे दर्शन घडते. कार्तिकेय आणि अग्नी यांचा संबंध पाहून काहींनी थेट ऋग्वेदाशी त्याचा दुवा जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. उत्तर वैदिक काळात त्याचे स्कंद हे नाव पुढे आले आणि त्यानंतर सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र अशी एक नाम शृंखलाच पाहायला मिळते. स्कंद हा धूर्त आणि चोर लोकांचाही देव समजला जातो. त्याचा एक संदर्भ मृच्छकटिक या नाटकात सापडतो. चारुदत्ताच्या घरी चोरी करणारा शर्वलिक हा प्रत्येक वेळी कार्तिकेयाचे स्मरण करून कामाला सुरुवात करतो असे उल्लेख आहेत.

कार्तिकेयाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्याच्या जन्मासंबंधीसुद्धा अनेक कथा निगडित आहेत. तो शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे असे मानले असले तरी तो पार्वतीचा अंगज पुत्र नसून, विभावसू अग्नीचा पुत्र होता. कार्तिकेय हा उमा, गंगा व कृत्तिकेचा पुत्रदेखील मानला गेला आहे. जन्मानंतर त्याच्यावर संस्कार करण्यास कोणी येईना म्हणून विश्वामित्राने त्यावर योग्य ते संस्कार केले होते अशा असंख्य कथा आहेत. एक गोष्ट मात्र खरी की कार्तिकेय ही शक्तीची देवता आहे. कदाचित काही टोळ्यांचे नेतृत्व त्याकडे होते. स्थानिक लोकदेवतांमधून या देवतेचा उगम झालेला दिसतो. भारतभर सर्वत्र सेनापती म्हणूनच ही देवता लोकप्रिय आहे. विविध राजसत्तांच्या नाण्यांवर असलेले कार्तिकेयाचे अंकन तसेच गांधार कलेतील त्याच्या उपलब्ध असलेल्या प्रतिमा हे त्या देवतेच्या लोकप्रियतेचेच गमक होय. कोंबडा हे चिन्ह काíतकेयाच्या बरोबर कायमच दिसते.
   उत्तर भारतात लोकप्रिय असलेला कार्तिकेय नंतर नंतर दक्षिण भारताकडे गेलेला दिसतो. आणि तिथे तो षण्मुगम, सुब्रह्मण्यम, आणि मुरुग्गन या नावांनी प्रचंड प्रसिद्ध पावला आहे. खरं तर आता उत्तरेकडे कार्तिकेयाची पूजा जवळपास बंद झालेली असताना दक्षिणेत मात्र त्याची लोकप्रियता अबाधित आहे. गावोगावी कार्तिकेयाची मंदिरे आहेत आणि उपासकही आहेत. इथले खास वैशिष्टय़ म्हणजे दक्षिणेत त्याला दोन पत्नी दिसतात. देवसेना आणि महावल्ली ही त्यांची नावे. खरं तर देवसेना ही त्याची पत्नी नसून त्याची शक्ती आहे. तारकासुर वधाच्या वेळी तो देवांच्या सेनेचा प्रमुख झाला होता, त्यामुळे देवसेना ही त्याची शक्ती होते तर महावल्ली ही त्याची पत्नी होय.



   या संपूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडील कार्तिकेयाच्या प्रवासात महाराष्ट्रात मात्र त्याचे अस्तित्व अगदी नगण्य जाणवते. वेरुळच्या लेणींमध्ये कार्तिकेयाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, पण इथे तो शिवपरिवारातील देवता म्हणून दिसतो. तसेच औंढय़ा नागनाथ मंदिरावर पण सुबक अशी कार्तिकेयाची प्रतिमा दिसते. पण उपास्यदेवता म्हणून वेगळे मंदिर अगदी अपवादानेच आढळते. (पुण्याला पर्वतीवरील मंदिर). कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.

      या सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे कार्तिकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज रस्त्यावर अंभेरी या गावी कार्तिकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे. वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे. जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट) काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. कार्तिकेयाला इथे एकच मुख असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. अंदाजे अशासाठी की वर्षांनुवष्रे तेल वाहिल्यामुळे त्या हातांवर एकप्रकारचे किटण तयार झालेले दिसते. आणि त्या थरात ते हात झाकून गेले आहेत. उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात कमरेवर ठेवलेला स्पष्ट दिसतो. देवाच्या उजव्या बाजूला खाली मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे. दोन्ही हातांच्या खाली त्रिकोणी बोकडाच्या चेहेऱ्यासारखे अंकन आढळते. मूíततज्ज्ञ डॉ. देगलूरकर सरांच्या मते ते छगवक्त्र आणि नगमेष आहेत. कार्तिकेयाचा अग्नीशी असलेला संबंध इथे नगमेषाच्या रूपात दाखवला आहे. अग्नीनेच आपल्या मुलाला म्हणजेच कार्तिकेयाला खेळवण्यासाठी मेषाचे रूप घेतले होते अशी कथा पुराणात येते, त्याचाच हा पुरावा म्हणा किंवा त्यानुसार केलेले हे अंकन इथे दिसते. या सर्व बारकाव्यांवरून ही मूर्ती अंदाजे बारा-तेराव्या शतकातील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या कार्तिकेय प्रतिमेच्या गळ्यात एक घट्टसर दागिना व त्याखाली त्रिकोणी असणारा ग्रैवेयक हा दागिना दिसतो. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती) इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक कार्तिकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन संगमरवराची एकाच तोंडाची कार्तिकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले आढळतात.
इतक्या निर्मनुष्य ठिकाणाचे हे नितांतसुंदर देवस्थान मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. सुप्रसिद्ध औंध संस्थानापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण आहे. कार्तिकेयाची उपासना महाराष्ट्रात जरी आढळत नसली तरी शक्तीचे प्रतीक असलेले हे दैवत भारतभर प्रसिद्ध होते आणि दक्षिणेकडे तर हे दैवत प्रचंड लोकप्रिय आहे. तारकासुराच्या वधासाठी देवांनी कुमार वयातच कार्तिकेयाला सेनापतीपद बहाल केलं आणि त्याने मग दैत्याचे निर्दालन केलं, असं सांगितलं जातं. सर्व सेनानीमध्ये तो अग्रणी आहे. गीतेमध्ये विभूती योगात भगवान म्हणतात की,
पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम
सेनानीनामहं स्कंद: सरसामस्मि सागर:
        म्हणजेच पुरोहितांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये स्कंद तर जलाशयांमध्ये मी समुद्र आहे. शक्ती, सेना, सामथ्र्य या सर्वाचं प्रतीक असलेला हा स्कंद, कार्तिकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे आणि त्याहीपेक्षा त्या कार्तिकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे.
आशुतोष बापट

कसे जाल खटाव भागात?
फलटण-आटपाडी रस्ता, चिपळूण-कराड-पंढरपूर रस्ता, तसेच सातारा-पंढरपूर रस्ता या मार्गांनी खटाव भागात जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन कोरेगाव. मार्च ते मेअखेर उन्हाळा जास्त असतो. राहण्याची, जेवणाची व्यवस्था कोरेगाव व सातारा येथे होऊ शकते.  


राजेमहाडीक वाडा, तारळे

      महाराष्ट्र ! म्हणजे असे राष्ट्र की, विश्ववंदनीय छ. शिवाजी महाराज याच भूमीतील सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या अमलाखाली होता. येथील रयत आक्रमकांच्या जुलमाने त्रासली होती, पण तिचे रक्षण करणारा कोणीही त्राता नव्हता. आया बहिणींची भरदिवसा ढवळ्या अब्रू लुटली जात होती तर देव व मंदिरे उद्ध्वस्त करून धर्म बुडवून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक हिंदूद्वेष्ठ्या आक्रमक सत्तेकडून होत होता. येथे अनेक कर्तृत्ववान, महापराक्रमी योद्धे होते पण ते आक्रमक सत्तेच्या पदरी नामजाद सरदार म्हणून नोकरीस होते. पराक्रम करायचा तो आपल्या बादशाहाच्या तिजोरीत जास्तीतजास्त नकद व मुलूख पडावा म्हणूनच. अशावेळी वेरुळच्या भोसले घराण्याचा एक धोरणी, पराक्रमी शूर योद्धा शाहजीराजे हे विजापूच्या अदिलशाहा बादशाहाच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर येथे कारभार पाहत होते. त्यांना महाराष्ट्रातील स्वकियांची काळजी वाटत होती. स्वराज्य संकल्पक शाहजी राजांनी एकदा मराठी रयतेसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयोग केला होता. अशावेळी त्यांनी आपल्या पुण्याच्या जाहगिरीवर छ. शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ सह मोकासदार म्हणून पाठविले. जे आदिलशाहाच्या सेवेत राहून त्यांना करता येणार नाही ते मुलाकडून व्हावे हीच अपेक्षा व तशी खात्री देखील होती.

   छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय. या घराण्याचा उल्लेख कविंद्र परमानंद नेवासकर यांच्या ' शिवभारत ' मधे येतो तो असा,

        " महाडिक परशुराम दुजे सत्याकुली नव || "

           महामानी महाडिके फत्ते खानास गांठू दे ||"

      हे घराणे मूळचे कोकणातील होय. त्यांच्या पूर्वजांकडे महाड बंदराचे वतन व देशमुखी तसेच, खेड बंदराची मोकादमी मिळाल्यामुळे त्यांना ' महाडिक ' हे उपनाम मिळाले. त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीत मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही १६५० ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत होते. परसोजीराजें कर्तृत्व व निष्ठा शाहजीशी एकरुप झाली होती. कानोजीराजे महाडिकांचे शौर्य, मुत्सदीपणा परसोजींच्या रक्तात पित्याप्रमाणे होता. परसोजींच्या मृत्यूनंतर हरजीराजे हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले. शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दिल्या होत्या

 शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले.

   छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराज गादीवर आले. छ. संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे, शामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर, दादाजी काकडे हे सैन्यासह कर्नाटकात १६८१ गेले. स्वतः कर्नाटकात लक्ष घालावयास छ. संभाजी राजांना वेळ नसल्यामुळे त्यांनी हरजींना कर्नाटकाचे सर्वाधिकार आणि कर्नाटकातील सर्व गडकोटांचा अधिकार सोपविला होता. म्हैसूरचा सेनापति कुमारय्या याचा हरजींनी पराभव करून मदुरैच्या नायकाचा भरासाच भाग स्वराज्यात दाखल केला. पुढे मराठी सैन्याने त्रिचनापल्ली जिंकून घेतल्याने हरजींची सत्ता पूर्व कर्नाटकात इतकी वाढली की ते सर्वसत्ताधिश झाले. जिंजी, अर्काट  आणि भोवतालचा प्रदेश मराठ्यांचा ताब्यात होता.इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्काटपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला . हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग,

   मुघलांनी छ. संभाजी राजांना पकडल्याची बातमी ऐकताच ९ - ३ - १६८९ रोजी केशव त्रिमल यांस त्रिणामली येथे हरजींने कैद केले. हरजीराजे व केशव त्रिमल यांच्यामधे कर्नाटकातील प्रमुखपदासाठी संघर्ष असला तरी दोघेही छ. संभाजी महाराजांशी अतिशय प्रामाणिक होते. हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.

   औरंगजेबाचा १७०७ मध्ये अहमदनगर जवळील भिंगार येथे मृत्यू झाल्यानंतर छ. संभाजी पुत्र शिवाजी उर्फ शाहू यांना काही अटीवर मोगलांनी मुक्त केले. छ. शाहू महाराजांनी सातारा येथे आपली राजधानी निर्माण  केली. छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला.भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इ. स. १६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या ‘शृंगारपूर’ येथील वाड्यात झाला. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या! छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वांत धाकट्या कन्या. साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली. तसेच ७२ वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली.शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या.

     १७०९ साली छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती. अशा वेळी हनगोजी काटे- देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजेंनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी बसविली.शंकराजीराजे महाडिक यांनी स्वराज्याची सेवा करीत असताना १७२८ मध्ये देह ठेवला. त्यावेळी तारळे गावच्या तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीराणी सती गेल्या. भवानीराणी व शंकराजी यांना दुर्गोजी व अंबाजी असे दोन पुत्र होते. दुर्गोजी हे कोल्हापूर येथील स्वराज्याच्या दुसऱ्या गादीच्या संभाजींच्या चाकरीत होते तर, धाकटे अंबाजी हे सातारा छत्रपति यांच्या सेवेत होते. याच घराण्यातील भवानजी हे छत्रपति प्रतापसिंहांच्या काळात सातारा गादीच्या सेवेत होते.     

राजेमहाडीक वाडा, तारळे

   सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. त्यातील ३-४ वाड्यात त्यांचे वंशज राहतात. एका वाड्यात शाळा आणि वसतीगृह आहे. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव  पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे

      तारळे गावाच्या नावाला प्राचीन इतिहास आहे. तारकासुर राक्षसाच्या संकटातून तारले म्हणून तारळे हे नाव मिळाले असावे. या गावामुळे आजूबाजूच्या इतर खेडेगावांचे मिळून तारळे खोरे हे संबोधन प्राप्त झाले आहे. परिसरातील कडवे येथे पांडव लेणी व रामघळ आहे, खवाळवाडीच्या डोंगरावर विंध्यवासिनीदेवीचे मंदिर आहे. तारळे गावाच्या पूर्वेला असलेल्या पाल येथे भक्तांचे दुःख हरण करणारा खंडोबा देवस्थान, दक्षिणेस चाफळ गावी प्रभू श्रीराम मंदिर तर उत्तरेस समर्थ रामदासस्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे. या आठ वाड्यांचे प्रवेशद्वार वेगवेगळ्या दिशेला असून मात्र या सर्व वाड्यांचे परसदार एकाच चौकात होते. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. काळ बदलला असला तरी आपला गौरवशाली इतिहास सांभाळणा-या श्री.विजयसिंह काकासाहेब राजेमहाडिक, धैर्यशिल राजेमहाडिक व इतर वंशजांनी खूप मेहनत घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.

   हरजीराजे महाडिकांचे स्वराज्यासाठी दिलेले योगदान फार मोलाचे असून त्यांच्या वारसदारांचे छ. शाहू राजांच्या काळातील योगदान तितकेच मोलाचे आहे त्याचा गौरवशाली वारसा तारळे येथे दिसून येतो. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या राजेमहाडिकांशी छत्रपति घराण्याने दोन वेळा आपल्या मुलींचा विवाह केला ते त्या गुणवत्तेचे असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. धन्य हरजीराजे, ज्यांनी सलग स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या सेवेत राहून आपल्या असामान्य कर्तृत्वाने स्नेह, प्रेम व विश्वास मिळविला.

शंभु कन्या -- भवानीबाई  राजेमहाडिक यांची समाधी तारळे  जि.सातारा

प्रा. डी. डी. चव्हाण, पाटण  (d2chavan@gmail.com)

         मराठा साम्राज्याचे सर सेनापती हरजीराजे राजेमहाडिक यांनी स्वतःचे प्राण तळहातावर घेवून स्वराज्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.त्यांची शुर वीरता पाहूनच छ.शिवरायांनी १६६८ मध्ये आपली कन्या अंबिकाबाई हीचा विवाह हरजीराज्यांशी लावून दिला. शिवरायांनी दक्षिण मोहीम जिंकल्या वर तेथील जबाबदारी हरजीराजांवर सोपवली .शिवरायांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी दक्षिणेतील जबाबदारी हरजीराजांकडेच ठेवली.



  छ. संभाजी महाराज व येसूबाईसाहेब यांची कन्या भवानीबाई यांचा विवाह हरजीराजे यांचे पुत्र शंकराजीराजे यांचेशी झाला. छ. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला असताना हरजीराजे व शंकराजीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्यासाठी मोठा पराक्रम केला.त्यामुळे छ.शाहू महाराजांनी आपले मेहुणे शंकराजीराजे यांना चार हजारी मनसबदार केले. आपल्या भगिनी भवानीबाई यांना  तारळे महाला अंतर्गत २४ गावे , ७२ वाड्या व पाचही वतनाची सनद करून दिली.सनदे नुसार  शंकराजीराजे आणि भवानीबाई तारळ्यास आले.त्या अगोदर मोंगलानी तारळे महालाची वाताहत केली होती.त्या वेळी शंकराजीराजे आणि भवानीबाई यांनी तारळे महालावर आपला अंमल बसवून विस्कटलेली घडी पुन्हा बसवली .

         पुढे शंकराजीराजे यांचे १७२८ मध्ये निधन झाले.त्यावेळी त्यांच्या बरोबर भवानीबाई सती गेल्या. तारळे येथील महाडिक यांच्या खासगी स्मशान भूमीत तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीबाई यांची समाधी आहे. ती पहाण्यासाठी इतिहासप्रेमी आजही येतात.या समाधीवर छप्पर बांधण्याचा त्यांच्या वंशजांचा मनोदय आहे.

कडवेतील प्राचीन शिवमंदिर

एरवीच्या वहिवाटीच्या, मळलेल्या वाटा सोडून गवसत जाणाऱ्या अनवट, अपरिचित वाटा मनाला विलक्षण आनंद देतात. त्यादृष्टीनं खेडोपाडी, डोंगराच्या अवतीभवती, शांत, निवांत अन् रम्य ठिकाणी कितीतरी स्थळं दडलेली दिसतात. पाटण तालुक्यातील कडवे बुद्रूक इथलं  प्राचीन महादेव मंदिर हे त्यापैकीच एक.

नागठाण्यातून तारळेला जाताना अलीकडंच कडवेला जाणारा फाटा फुटतो. कोंजवडेतून सरळ पुढं जाणारा रस्ता मुरुडच्या तारळी धरणाकडं जातो. आपण मात्र काटेवाडीतून उजव्या हाताला वळायचं. काही अंतरावरच भुडकेवाडी लागते. रस्त्यालगतच भव्य हुतात्मा स्मारक आहे. पुढची सरळ वाट आपल्याला कडवे गावात घेऊन जाते. गावाला डोंगराची, पवनचक्क्यांची सोबत लाभली आहे. इथलं ग्रामदैवत पावणाई देवीचं मंदिरही भव्य आहे. तिथूनच काही अंतरावर महादेव मंदिर आहे. ते अत्यंत प्राचीन, पुरातन आहे.अखंड पाषाणात कोरलेल्या या मंदिराविषयी विविध आख्यायिका ऐकावयास मिळतात. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची आख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात.

     मुख्य गाभाऱ्यासह दोन ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहेत.मंदिरालगत पाषाणात कोरलेल्या गुहा आहेत. त्यातही विविध देवदेवतांच्या  कोरीव मूर्ती आहेत. सभामंडपातील दगडी खांब लक्षवेधक आहेत. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. सभामंडपाच्या पूर्वेला सूर्यदेवतेची अन् पश्चिमेला विष्णूच्या मूर्तीवर सुर्यकिरण पडण्यासाठी मंदिरावर छिद्र ठेवण्यात आले आहे.  मंदिराच्या मागे दगडातच विहीर अवशेष नजरेस पडतात. हे मंदिर ओढ्याच्या काठावर आहे. थोरला ओढा या नावानं तो ओळखला जातो. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळं, सभोवतालच्या वनराईमुळं परिसराच्या सोैंदर्यात भर पडते. निर्जन परिसरामुळं शांततेची अनुभूती लाभते.मंदिर परिसरात भुयार असल्याची शक्यताही ग्रामस्थ व्यक्त करतात. शिवकाळात इथं छुपा मार्ग असावा, असंही सांगितलं जातं. शिवरात्रीला मंदिरात धार्मिक उत्सव असतात.

     परिसरात आणखीही मनाला भुरळ घालणारी स्थानं आहेत. तारळी धरण, तोंडोशीची रामघळ, जळवचं मंदिर अन् खिंड, तारळेतील ऐतिहासिक वाडे, खंडोबाची पाली ही त्यापैकीच. पवनचक्क्यांच्या ‘जंगला’तून सडा वाघापूरमार्गे पाटणला जाणारा रस्ता आहे. ठोसेघर, चाळकेवाडीकडं घेऊन जाणारे विविध घाटमार्गही आहेत. एक दिवसाची ही अगदी अल्पखर्चिक छोटी सहल मनाला नक्कीच आनंद देणारी ठरते.

खंडोबाची पाली:-

तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा

संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ( खंडोबा ) पाली हे ठिकाण महाराष्ट्र्रातील सातारा या जिल्यात आहे . शंकराचे अवतार असणारा पाल खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात. तारळी नदीच्या दोन्ही काठांवर पाल गाव वसले आहे. येथे जाण्यासाठी सातारा व कराडहून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची सोय आहे. याचे मूळ नाव राजापूर होते, पण खंडोबाची निष्ठावान सेविका पालाई गवळण हिच्या नावावरून या गावाचे नाव पालाई-पाली-पाल असे झाले असावे.मराठी अंमलात पाल हे बाजारपेठेचे प्रसिद्ध ठिकाण होते. 
  पौष शुद्ध त्रयोदशीपासून (जानेवारी महिन्यात ) येथे ४-५ दिवस यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील भाविक लोक मोठ्या संख्येने येतात. त्यांत मुख्यतः मुंबईचे कोळी लोक व मांग-रामोशी असतात. यात्रेच्या वेळी खंडोबा व म्हाळसा यांचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या वेळी भाविक लोक लंगर तोडणे, जागरण, नैमित्तिक वाघ्यामुरळी बनणे, पशू बळी देणे व भंडारखोबरे उधळणे इ. विधी करतात.
     खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे .पुण्यापासून १३५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी २ तासाचा वेळ लागतो .
खंडोबाच्या लग्नकथा

एक वाघ्या – खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात

सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे –
      खंडोबा हे दैवत बहुपत्‍नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्‍नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्‍नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्‍नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवले, तीच म्हाळसा. तिने नेवाश्याच्या तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले.स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
         दुसरी पत्‍नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणार्‍यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
म्हाळसा व महाळसाकांत पालीहून गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येह्ते देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून, यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात.
पाली खंडोबा मूर्ती

      रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने
महाराष्ट्र :
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा 
४) माळेगाव
५) सातारे (औरंगाबाद) 
६) शेंगूड (अहमदनगर)
७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद) 
८) वाटंबरे

पालीच्या खंडोबाची यात्रा
तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा
खंडोबाचे सिहासन

       येथील खंडोबाचे मंदिर आबा पाढोदे नावाच्या वाण्याने सु. ५०० वर्षा पूर्वी बांधले. pali khandoba gate

पाली हे गाव सातारा जिल्ह्यात सातारा शहरा पासून तीस किमी अंतरावर आहे सातारा – कराड मार्गावरील अतीत व काशीळ या गावावरून येथे जाता येते गाडी रस्ता थेट मंदिराचे दक्षिण द्वारात पोहोचतो,
हे दक्षिणद्वार यमाजी शिवदेव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण मंदिराचे बाह्य कोटात पोहोचतो .दक्षिणद्वाराचे पुर्व बाजूस नगारखाना असून शेजारीच हत्तीखाना आहे. येथील हत्ती वरून देवाचे लग्न वेळेस मिरवणूक निघते.येथील बाह्य आवार दगडी आहे.

pali temple gate
या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते,
या दक्षिण द्वारातून आत गेले की लगेच पुर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे. तर द्वाराचे पश्चिम ओवरीत हनुमान प्रतिमा आहे. ओवारीच्या एका खांबावर गणेश खंडो व महीपत खंडो पारगावकर यांचा ईस १७७२ चा शिलालेख आहे, हे बांधकाम या काळी झाले असे दिसते.
मंदिराचा संपूर्ण कोट चहुबाजूंनी ओवऱ्यानी युक्त असून त्याची उंची सुमारे २० फुट आहे कोटाची पुर्व पश्चिम लांबी सुमारे १४० फुट व दक्षिण उत्तर लांबी ८० फुट आहे .कोटास दक्षिण, पुर्व, उत्तर असे दरवाजे आहेत. या कोटाचे बांधकाम जाधव. घोरपडे, इत्यादी सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे.

pali temple east gate
कोटाचे पुर्व बाजूस दरवाजा आहे हा जुना मुख्य दरवाजा या दरवाजाचे बाह्य बाजूस दक्षिणेकडे एका चोथऱ्या वर पादुका आहेत. पुर्व दरवाज्या अलीकडे अलीकडे खंडोबाचे अश्वारूढ शिल्प बसवले आहे. या दरवाज्यातून प्रवेश केला की

pali nandi

उत्तर बाजूस एका मेघडम्बरीत पश्चिमाभिमुख नंदी प्रतिमा दिसते

pali khanderao

या नंदी मंडपीच्या पुढे शेजारी एक खंडोबाचे मंदिर आहे, यती मूर्ती बैठी व चतुर्मुख आहे .

pali temple entarance

या पुढे दिसतो तो पूर्वाभिमुख मंदिराचा सोळाखांबी मंडप या मंडपाचे सर्व खांब पितळी पत्र्याने मढवलेले आहेत, त्यावर काही चित्रे काढलेली आहेत, येथी फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख आहे .

pali temple mandap

मंडपाचे पश्चिमेस मुख मंडप असून या मंडपात दक्षिण बाजूस गणेश प्रतिमा आहे. तर उत्तर बाजूस एक छोटा दरवाजा आहे. मध्यभागी गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. येथील फरशीवर पडलोजी आबा बिन बावसेठी करदोई असा लेख आहे.

pali palai

गर्भगृहाच्या दरवाज्याचे उंबऱ्यावर एक स्त्री मुखवटा असून हा पालाई गवळणीचा आहे हिच्या मुळेच देव येथे आले तिचे हे स्मारक

pali khandoba

मंदिराच्या गाभाऱ्याच्या मध्यभागी ०.०९ चौ.मी. मेघडंबरी असून तीमधील शाळुंकेवर खंडोबा व म्हाळसा यांची दोन प्रेक्षणीय स्वयंभू लिंगे आहेत. या लिंगा पुढे तिवई च्या आधारे गादीवर मुखवटे ठेऊन सजावट केलेली दिसते या योनी मागे महिरप ठेवलेली आहे. तिचे पाठी मागे एक पितळी घोडेस्वाराची पत्नीसह मूर्ती आहे ही खंडोबा म्हाळसा यांची असावी पण ती हेगाडीची असल्याचे सांगतात.मेघडंबरीच्या उजव्या हाताला  म्हणजे योनीच्या दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळीत बाणाई या खंडोबाच्या द्वितीय भार्येची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. 

pali khandoba temple

. गाभाऱ्यापुढे धनाजी जाधव याने ६ चौरस मीटरचा सोळाखांबी मंडप बांधला. या मंडपाच्या डाव्या कोपऱ्यात गणपती व उजव्या कोपऱ्यात विंध्यवासिनी यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराचे मुख्य शिखर जमिनीपासून सु. १५.५ मी. उंच आहे. यांची शिखरे मातीच्या विटांची असून त्यांवरील देवदेवतांच्या मूर्ती चे अलंकरण चुनेगच्चीत आढळते. या मंदिराच्या पूर्व दारासमोर खंडोबाचे एक लहानसे मंदिर आहे. त्यातील चतुर्भुज मूर्ती बैठी असून तिच्या हातांत खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपात्र ही आयुधे आहेत. मूर्तीच्या मांड्यांखाली मणी व मल्ल यांची मस्तके आहेत. या मंदिराच्या बांधकाम शैली वरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे.

pali panchlinga

मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिरास खेटून एक मंडपी असून त्या मध्ये पंचलिंगाची स्थापना केलेली आहे.

pali adoji

कोटाचे आत मध्ये नेरुत्या बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून आत मध्ये एक उभ्या पुरुष्याची प्रतिमा आहे हिचे उजव्या अंगास अडोजी बिन कृष्णाजी सावंत असा लेख आहे. ही प्रतिमा ह्या व्यक्तीने स्थापन केली असावी.
मंदिराच्या पाठभिंतीस एक पश्चिमाभिमुख मेघडम्बरी असून त्या मध्ये भवानीची स्थापना केलेली आहे. हिला सिद्धवासिनी असेही म्हणतात.
मुख्य मंदिराचे वायव्य बाजूस कोटाचे आतील बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून ती मध्ये ओंकारेश्वर शिवलिंग आहे. या मागे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत.
मुख्य मंदिराचे उत्तर बाजूस दरवाजा असून तो आकाराने लहान आहे या दरवाज्यातून बाहेरील बाजूस एक वापी आहे

pali hawaldar
.
उत्तरतटाचे पुर्व बाजूस तटाला खेटून हवालदाराची स्थापना केलेली आहे

tarali nadi

मंदिराचे कोटा पासून थोड्या अंतरावरून तारळी नदी वाहते यात्रा उत्सवाचे वेळी नदीचा परिसर दुकाने यात्रेकरू व वाघ्या मुरुळीच्या गायन वादनाने दुमदुमून जातो.

खंडोबा म्हाळसा विवाह यात्रा

pali khandoba lagna
पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो, तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांचे गर्दीने भरून जातो अनेक वऱ्हाडी लग्नासाठी पालीस येतात मध्यान्हा दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरा मधून विवाह साठी प्रस्थान होते हत्ती वरून देव लग्नासाठी पाली गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराचे उधळनीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हळदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचे लोभस दृष केवळ अवर्णनीय. गावाचे पेठेतून मिरवून हा सोहळा तारळी नदी पार करून जावू लागतो मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समुह केवळ सुवर्णच
नदीच्य पलीकडे कायम स्वरूपी दगडी बाहुले लग्नासाठी उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो या मंडपात मिरवणूक पोहचते आणि खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो रात्री देवाची वरात निघते ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहचते. लग्नाचे पाचव्या दिवशी पाखाळनी करण्यात येते. या वेळेस भरणारी यात्रा सुमारे १५ दिवस चालते .

       सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो. त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो. गावाची वस्ती २,५०० असून तेथील महादेवांस उमा-महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा भाक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो. सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री. चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई (तामिळनाडू) हे करीत आहे. सदा देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून श्री. लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत.भाविकांनी दिलेल्या देगणीतून ४ लाख ५१ हजार रुपये किंमतीची ११ किलो चांदी, १ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७७ हजार रुपये किंमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे सात लाख रुपये किंमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे.

निसर्गरम्य जळव!

  सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भरभरुन लाभलेलं निसर्गाचं वरदान. समृद्ध अन् संपन्न हिरवाई. अर्थात असं असूनही भटकंतीच्या वाटा शोधताना कास- ठोसेघरच्या पलिकडं आपल्या नजरा फारशा पोहचत नाहीत. त्यामुळं अशी कितीतरी निसर्गरम्य स्थळं आपल्या नजरेआडच राहतात.

   पाटण तालुक्यातलं जळवचा परिसर असाच काहीसा प्रसिद्धीच्या पटापलिकडं राहिलेला.जळव हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ. तिथलं जोतिबाचं देवस्थान हजारों भाविकांचं श्रद्धास्थान.प्रथम महामार्गावरील नागठाणे. तिथून पश्चिमेस तारळे. शिवकालीन इतिहासाच्या स्मृती या गावात बद्ध आहेत. तारळेतून पुढं विविध रस्ते आहेत. ढोरोशी- मरळोशीतून पुढं जळवला जाता येतं.‘बालभारती’चे संचालक मा. सुनील मगर हे ढोरोशी गावचेच कर्तबगार, कर्तृत्ववान सुपुत्र. ‘संस्कारदीप’च्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेले 

     ढोरोशीतून पुढं घाटरस्ता. अवघड वळणं, सरळ चढ अन् येताना तीव्र उतार. त्यामुळं घाट आपली नक्कीच परीक्षा पाहतो. घाटातून वर जाता जाता ‘टिपीकल कोकणा’चं दर्शन घडतं. आंबा, फणस, जांभूळाची इथं असंख्य झाडं आहेत. करवंदाच्या जाळ्या तर अमाप.
        वरच्या सपाटीला जळव येतं. समोरच भव्य मंदिर. आरंभीचं दगडी बांधकाम भक्कम आहे. अलिकडंच त्याला नवं रुप लाभलं आहे. भाविकांची सदैव वर्दळ दिसते. मंदिरामागं जाणारा एक रस्ता पाटणला जातो अन् दुसरा कळंबेला. पठारावर हजारों पवनचक्क्यांची पाती अहोरात्र भिरभिरत असतात. वारा अखंड वेगात वाहतो. भोवताल हिरवागर्द भासतो.
      कळंबेत गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. इथं कळंबेत दिनेशगिरी महाराज मठाधिपती आहेत. कळंबेतून जांभे, चिखली, चाळकेवाडी करुन ठोसेघरला जाता येतं. जळवमधून पाटणलाही जाणारी डांबरी सडक आहे. तोंडोशीची प्रसिद्ध रामघळ अन् मुरुडचं तारळी धरण नजीकच आहे. हल्ली जिथं- तिथं रस्ते झाले आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगाही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळं या पावसाळ्यात अंगावर पाऊस झेलायचा असेल, शरीर हलवणारा वारा अनुभवायचा असेल तर जळव परिसराचं स्थळ आतापासूनच मनात अवश्य पक्कं करा !
 सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा

निसर्गरम्य जळव खिंड

      

 सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाची नानाविध रुपं पहावयास मिळतात. सृष्टीसोैंदर्याच्या पलीकडं असलेल्या अदभूततेची प्रचिती येते. ही आगळी, विलक्षण रुपं पाहताना मन थक्क होतं. इतिहासप्रसिद्ध तारळे गावातून पश्चिमेस जाणारी वळणावळणाची घाटातली वाट थेट डोंगरमाथ्यावर जाते. तिथंच जोतिबा जळव हे प्रसिद्ध देवस्थान आहे. मग काही अंतरावरच जळवची खिंड. अलीकडच्या काळात या खिंडीमुळं पाटण हे तालुक्याचं ठिकाण गाठणं अगदीच सुकर बनलं आहे.

    या खिंडीच्या डाव्या बाजूनं डोंगराच्या सड्यावर अर्थात पठारावर जाणारी वाट आहे. डोंगराला पडलेली प्रचंड भेग म्हणजे ही वाट. सुमारे 40 ते 50 फूट लांबीची ही भेग. वर जाण्यासाठी जागोजागी दगडी पायऱ्यांची रचना आहे. तिथं उभं राहून प्रचंड वेगानं येणारं वारं अंगावर घेणं हा सुखद क्षण असतो. जेमतेम एक माणूस ये-जा करु शकेल अशी ही भेग. तिथून पठारावर गेल्यावर शेकडो पवनचक्क्या आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात. दूरवर सदाहरित जंगल दिसतं.

     जळव खिंड ओलांडून पलीकडं गेल्यानंतर आणखीही रम्य ठिकाणं गवसतात. गगनगिरी महाराजांचं मणदुरे हे गाव नजीकच आहे. त्यांच्या वाड्याचे अवशेष गावात आहेत. जानाईदेवीचं माहात्म्य लाभलेलं निवकणे याच परिसरात. निसर्गपूजेसाठी प्रसिद्ध असलेलं काऊदरा हे ठिकाण इथलंच. म्हारवंड, भारसाखळे, चाफोली यासारखी निसर्गसंपन्न गावं कोकणाची आठवण करून देतात. सुंदरगड किल्ला, धारेश्वरचं मंदिर, पवनचक्क्यांचं वनकुसवडे याकडं जाणारे मार्गदेखील आपल्याला खुणावत राहतात. खिंडीच्या अलीकडं असलेल्या कळंबे गावातही गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. पुढं चाळकेवाडी, ठोसेघरकडं जाणारी डांबरी सडक आहे. काही अंतरावर तोंडोशीची रामघळ अन् तारळी धरणाचा विहंगम परिसर आहे.

सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा
मोबाईल । 98224 54630

टोळेवाडीचा नाकिंदाचा बोगदा :-

    सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात नागठाण्याजवळच्या टोळेवाडीजवळ असणारा नाकिंदाचा बोगदा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल.इथे डोंगरामध्ये नेढे तयार झालेले आहे.महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यावर डोंगराला आरपार पडलेली छिद्र उर्फ नेढी बघायला मिळतात.किल्ल्यावर दुर्गप्रेमी आणि पर्यटकांची वर्दळ असल्याने हि नेढी सुपरिचित असतात.मात्र टोळेवाडी गावाच्या हद्दीत असणारा हा नाकिंदाचा बोगदा मात्र अप्रसिध्द आहे. 
सातारा जिल्ह्यात एका दिवसाच्या भटकंतीसाठी आदर्श अशी अनेक ठिकाणे आहेत्,त्यात समावेश होउ शकणार्‍या या ठिकाणाविषयी कोणाला फार माहिती नाही,नागठाण्यावरुन निनाम, कुसवडे मार्गे आसनगाव व तिथून परमाळे घाट चढून गेले कि पठार लागते.या पठारावरुन वेडीवाकडी वळणे घेत रस्ता डोंगरझाडीतून टोळेवाडीत पोहचतो.टोळेवाडीपासून दोन कि.मी.ची दमछाक करणारी चढण आहे.या मार्गे आपण बोगद्याजवळ पोहचतो.लांब पसरलेल्या पठाराच्या टोकाला हे नेढ आहे.साधारण साठ फुट रुंदीचे हे नेढ लाव्हा रस शांत होताना झालेल्या घडामोडीतून तयार झाले आहे,
   स्थानिकांच्या समजुतीनुसार मात्र भीमाच्या प्रचंड ताकदीतून हा बोगदा तयार झाला अशी मान्यता आहे.या नेढ्याजवळ काही अंतरावर भैरवनाथाचे मंदीर आहे.दरवर्षी इथे यात्रा भरते.बहुधा हे निसर्ग नवल सामान्य लोकांनी बघावे म्हणून कदाचित आपल्या पुर्वजांनी अश्या जत्रा,यात्रांची योजना केली असावी. 
   या नेढ्यात उभारले कि तनमनाला विलक्षण थंडावा जाणवतो. एका बाजुला तारळे ,मुरुडचा पाटण तालुक्यातील परिसर तर उत्तर बाजुला अजिंक्यतारा,शेंद्रे कारखाना हा परिसर दिसतो.इथे जाण्यासाठी डांबरी रस्त्याची सोय झाली आहे. इथून थेट चाळकेवाडी,ठोसेघरकडे जाता येते.या नेढ्याच्या परिसरात पवनचक्क्या,परमाळेतील नैसर्गिक पाण्याचे झरे,कांजाईदेवी ( कोंदणी) वाघजाईदेवी ( परमा़ळे ) माकडजाई ( मानेवाडी ) अशी देवस्थाने परिसरात आहेत. 
   एकंदरीत ज्यांना अनवट ठिकाणे बघायची आहेत्,त्यांनी जरुर या नाकिंद्याला भेट द्या.इथे येण्यासाठी जसा नागठाण्याकडून रस्ता आहे तसाच शेंद्रे,वेचले,कुमठे किंवा सातार्‍याकडून बोगदा मार्गे सोनगाव,कुमठे,परमाळे असे ३० ते ४० कि.मी.अंतर आहे.

चाफळचे श्रीराम मंदिर

सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.
_Cafalche_ShreeRamMandir_1.jpg
समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. त्यानंतर चाफळ गाव समर्थ संप्रदायाच्या मठाचे मुख्य स्थान होऊन गेले. अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापना करण्यात आली. अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावक-यांनी ती मूर्ती जागची हलवता येईना. गावक-यांनी समर्थांकडे स्वत:ची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.त्या उत्सवात अंगापुरच्या गावक-यांना सासन काठ्यांचा मान देण्यात आला आहे.
_Cafalche_ShreeRamMandir_4.jpg
   समर्थांनी बांधलेले मंदिर त्यांच्या पश्चात मोडकळीस आले. त्या मंदिरास डिसेंबर 1967 मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या.  मुंबईचे उद्योगपती अरविंद मफतलाल भूकंपग्रस्त भागाच्या पाहणी पथकासोबत चाफळला मार्च 1968मध्ये आले. त्यांनी त्या मंदिराची बिकट अवस्था पहिली आणि त्याचा जोर्णोद्धार केला. नव्या मंदीराचे बांधकाम 1972 साली पूर्ण झाले. मंदिराच्या बांधकामात त्याची जुन्या पद्धतीची बांधणी कायम ठेवण्यात आली.
_Cafalche_ShreeRamMandir_5.jpg
चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामांपैकी महाद्वार आणि पाय-या हे भाग शाबूत आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे. त्या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंड वापरलेले नाही. मंदिराच्या पाय-या चढून आत जाताना विष्णूच्या दशवतारांची शिल्पे नजरेस पडतात. मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूंस दोन खांब दिसतात. त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह या अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. तर डाव्या खांबावर वामन, परशुराम, बौद्ध, व कलंकी यांच्या मूर्ती आहेत. उर्वरीत दोन दोन अवतार मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात.
_Cafalche_ShreeRamMandir_2.jpg

मंदिराच्या गाभा-यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. ती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरत्र रामाची मूर्ती धनुर्धारी अवस्थेत असते. चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाची फुले आहे. मूळ मूर्तीच्या शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोनाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आढळतात.
_Cafalche_ShreeRamMandir_6.jpg
समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून क-हाडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. चाफळच्या राममंदिरासमोर त्या अकरा मारुतींपैकी एक 'दास मारुती'चे मंदिर आहे. त्या हनुमान मूर्तीची उंची सहा फूट आहे. मूर्तीच्या चेह-यावर विनम्र भाव आहेत. त्या मारूतीसाठी बांधलेले मंदिर सुस्थितीत आहे. गावात आलेल्या 1968 सालच्या भूकंपातदेखील हे मंदिर सुरक्षीत राहिले. राममंदिराच्या मागे उंचवट्यावर 'प्रताप मारुती'चे मंदिर आहे. त्यास भीममारूती किंवा वीरमारूती अशा नावांनी ओळखले जाते. त्या मंदिराचे शिखर पन्नास फूट उंच आहे. शिखराचे शिल्पकाम आकर्षक आहे. त्या मारूतीची उंची सात ते आठ फूट असावी. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत. ती मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. रामदास समर्थांनी 'भीमरूपी महारूद्रा' या स्तोत्रात त्या मूर्तीचे वर्णन केले आहे.
_Cafalche_ShreeRamMandir_3.jpg
मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. त्याच्या आवारात समर्थांची ध्यानगुंफा आणि समर्थांचे अस्थीवृंदावन आहे. मंदिर परिसरात सभागृह, समर्थांची पंचधातूची मूर्ती, उत्तर व दक्षिण बाजूला विस्तीर्ण तट, म्हसोबा मंदिर, नरसोबा मंदिर, रामरथ मंदिर व महारुद्र स्वामी समाधी मंदिर या वास्तूदेखील आहेत.
_Cafalche_ShreeRamMandir_7.jpg
चाफळच्या राममंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर एक घळी आहे. त्या घळीत समर्थ रामदास यांचे वास्तव्य होते. ती घळ 'रामघळ' या नावाने ओळखली जाते. त्या घळीतून राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे, की...

    "दास डोंगरी राहतो,
    यात्रा रामाची पाहतो।
    देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे।।''

चाफळचे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या मंदिरांची देखरेख 'श्रीराम देवस्थान ट्रस्ट'मार्फत केली जाते. ट्रस्टकडून भाविकांसाठी तसेच मुलांवर संस्कार घडवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांची जवळच असलेल्या मठामध्ये राहण्याची व्यवस्था होते.

चाफळ गावापासून जवळच शिंगणवाडी येथे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट घडली होती. त्या ऐतिहासिक घटनेप्रित्यर्थ तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. चाफळ गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते बडोदा संस्थानाचे राजकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांचे जन्मस्थान आहे. पेंढरकर यांना गौरवाने 'महाराष्ट्रकवी' असे म्हटले जाई. पेंढरकर यांच्या नावाचा उल्लेख 'रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन यांच्यासोबत अग्रक्रमाने केला जात असे.
- संतोष अशोक तुपे

चाफळचा वीर मारुती
Akra Maruti1
सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो. उंब्रजवरून जेमतेम ११ किमी वर चाफळ आहे. शके १५५९ म्हणजेच इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थानी चाफळ इथे एक सुंदर मंदिर बांधून केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना इस १६४९मध्ये समर्थानी केली. प्रभू रामचंद्रांच्या समोर नम्रभावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. जणू काही प्रभूरामाच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते.
प्रताप मारुती/भीम मारुती/वीर मारुती
Akra Maruti2
चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे १०० मीटर चालत जावे. तिथे रामदासस्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आजही शाबूत आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. पुच्छ ते मुरडिले माथा, कमरेला सोन्याची कासोटी, त्याला घंटा किणकिणताहेत, नेटका, सडपातळ, डोळ्यातून जणू अग्नीवर्षांव होतो आहे अशा रौद्र मुद्रेत आहेत. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे.
दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळेच कदाचित समर्थानी इथे दोन मारुतींची स्थापना केलेली दिसते.
माजगावचा मारुती
Akra Maruti3
चाफळपासून फक्त तीन किमी अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्टय़ आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोडय़ाच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थानी शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० मध्ये याच धोंडय़ावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. अंदाजे १०० चौरस फूट लांबी-रुंदीचे, कौलारू, माती-विटांचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार केल्यावर अगदी वेगळे दिसते. जमिनीला फरशा, मंदिराशेजारी ध्वज, सुबक असा दरवाजा, रंगकाम असे हे आताचे स्वरूप आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे. सध्या या मंदिरात एक शाळा भरते.
शिंगणवाडीचा मारुती
Akra Maruti4
यालाच खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते. चाफळपासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थाची ध्यान करण्याची जागा असलेली रामघळ आहे. याच ठिकाणी शके १५७१ अर्थात इ.स. १६५० मध्ये समर्थानी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेल्या हनुमंताच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. उजवा हात चपेटदान मुद्रेत म्हणजे उगारलेल्या स्थितीत आहे.
Akra Maruti5
सहा फूट लांबी-रुंदी असलेले हे मंदिर ११ मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. या मंदिराला सभामंडप नाही परंतु आजूबाजूला दाट वृक्ष मात्र आहेत. टेकडीच्या पश्चिमेला एक ओढा असून त्याच्या काठीसुद्धा वृक्षांची दाटी आहे. उंचावर असलेल्या या मंदिराचा कळस तांबडय़ा रंगाने रंगवलेला असल्याने लांबूनसुद्धा दृष्टीस पडतो. चाफळच्या आधी समर्थाचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. या टेकडीवर जाण्यासाठी चारचाकी वाहन जाईल ईतका रस्ता केला आहे. मात्र रस्ता विलक्षण कच्चा असल्याने स्वतःचे कारसारखे वाहन असेल न नेणेच योग्य होईल.
Akra Maruti6

Akra Maruti7
एखाद्या स्थानाशी निगडित कुठली तरी कथा असेल तर त्या स्थानाचे महत्त्व अजून वाढते. त्याचे आकर्षण निर्माण होते. शिंगणवाडीबद्दलसुद्धा काहीसे असेच आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगतात. जवळच सडा दाढोली गावाजवळ रामघळ आहे. हि शिवसमर्थ भेटीच्या ठिकाणापासून साधारण पंधरा कि.मी वर डोंगरात आहे. ईथे जाण्याचा रस्ता कच्चा आहे हे ध्यानी घेउन त्याप्रमाणे नियोजन करावे.याच रामघळीजवळ शिवरायांची तहान भागवण्यासाठी इथे समर्थानी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता केला, त्यामुळे या ठिकाणाला ‘कुबडीतीर्थ’ असे नाव मिळालेय.

सडा दाढोली :- 
श्रावणसरी झेलताना संस्मरणीय ठरणारं, सदैव लक्षात राहणारं आणखी एक ठिकाण. उल्लेखनीय म्हणजे इतिहासाचा स्पर्श झालेलं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, हिरवाईची सोबत ल्यालेलं. तांबड्या मातीनं नटलेलं. संगतीला घाटातली वाट, खळाळतं पाणी, भाताची शेतं वगैरे!






कुबडीतीर्थ हे त्याचं नाव. तिथल्या रामघळीमुळं ते प्रसिद्ध झालं आहे. ते आहे सडा दाढोली (ता. पाटण) म्हणजेच समर्थनगर गावच्या कुशीत. साता-यातून सुमारे पाऊणशे किलोमीटर अंतर. 
माझ्या भटकंतीचं तंत्र म्हणजे, ज्या मार्गानं जायचं, त्या मार्गानं पुन्हा यायचं नाही. नवनवे आसमंत धुंडाळता यावेत, नवनवे मार्ग कळावेत, नवनवी गावं टिपता यावीत हेच त्याचं प्रयोजन. त्याच हिशोबी सांगायचं तर, जाताना ‘हायवे’नं उंब्रज. तिथून उजव्या हातानं चाफळची वाट.  पुन्हा परतीच्या वेळी सडा वाघापूर, तारळे, नागठाणेमार्गे ‘हायवे’ला येत साता-याची वाट धरायची. 








चाफळ हे राज्यातलं प्रसिद्ध तीर्थ. तिथून पश्चिमेची डांबरी सडक धरायची. लगेचच शिंगणवाडीत ‘खडीचा मारुती’ मंदिर. काही अंतरावर उत्तर मांड प्रकल्प. निळंशार पाणी. बाजूला हिरवा डोंगर. अर्थात त्याच्या अलिकडंच गमेवाडी हे गाव येतं. तिथून भातशेतीची खाचरं न्याहाळत, नजरेत साठवत एक मोठं तीव्र वळण येतं. मग दाढोली!
दाढोलीतून पुढं सगळा घाट. चढण उंच जात राहणारी. हा रस्ता सडा वाघापूरकडं जातो. त्याचं एक टोक पाटणकडं तर दुसरं तारळेत जाऊन संपतं. आपण मध्ये येणाऱ्या कच्च्या रस्त्याची निवड करायची. तो थेट पठारावर जातो. जागोजागी आपली परीक्षा पाहतो. सारं शरीर हलवायला लावतो. आताच्या पावसात तर रस्त्याची आणखी त्रेधातिरपीट झालेली.
अर्थात पठारावर गेलं, की देहभान हरपतं. हिरवळीनं सजलेलं पठार पाहून मन हरखतं. तिथं शेकडो पवनचक्क्या स्वागतासाठी उभ्या दिसतात. मध्येच कुबडीतीर्थचं प्रवेशद्वार आहे. तिथूनच घळीत उतरायला दगडी पाय-या आहेत. शिवराय अन् रामदास यांच्या भेटीच्या स्मृती इथं प्रतिमेच्या रुपानं पहावयास मिळतात. परिसर आकर्षक आहे. तिथून खूप मोठं अवकाश नजरेत सामावतं.
पुन्हा खाली जायला पाय-या. ज्या भव्य शिळा आहेत, त्यांची नैसर्गिक रचना मोठी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. पुढं विस्तीर्ण प्रांगण. आणखी घळी. रामदास, जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या ध्यानगुंफा आहेत. 
कुबडीतीर्थची भटकंती एक दिवसात पुरी होते.परिसरात फार सोयीसुविधा नाहीत. अर्थात त्याच्या अलिकडं माजगाव (ता. पाटण) इथं श्री.संतोष काटकर यांचं ‘समृध्दी’ नावाचं हाॅटेल आहे. तिथंला पाहुणचार आटोपून मग पुढं प्रवासाला निघता येतं.
भीम-कुंती भेटीचा सोहळा
 प्रत्येक एतिहासिक गावात आपल्याला काहीतरी वैशिष्ट्यपुर्ण बघायला मिळते मग ते एखादी वास्तु असेल, परंपरा असेल किंवा एखादा उत्सव.पुणे बेंगळूरू अशियाई महामार्गावर वसलेल्या उंब्रजमध्ये अशीच एक वैशिष्ट्यपुर्ण प्रथा आहे जी इतरत्र पहायला मिळत नाही.हि प्रथा म्हणजे भीम-कुंती महोत्सव.थेट महाभारताशी नाते सांगणारी हि प्रथा नेमकी उंब्रजलाच का सुरु झाली ? फक्त भीम आणि कुंती यांचीच भेट का ? यात इतर पांडव का नाहीत ? या प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत, मात्र हा उत्सव कुतुहल जागवतो हे नक्कीच.बेंदरापासून  उत्सव सुरू होतो.  या उत्सवाची सुरुवात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला भीमाच्या मूर्तीसाठीची लागणारी काळी माती आणण्याने होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी (सरता सोमवार) या उत्सवाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी होणारी भीम-कुंती या मायलेकरांची भेट हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. यासाठी  भिमसेन मंडळ ग्रामस्थांनी स्थापन केले आहे. मातीच्या बनवलेल्या कुंती व भीमाच्या मुर्ती रथात घालून गावातून मिरवल्या जातात. रथाचा मान मिळणे हे भाग्याचे मानले जाते, त्यासाठी बोली लावली जाते.'भिमसेन महाराज की जय'  'कुंती माता की जय'  जयघोषणांनी उंब्रज परिसर दुमदुमुन जातो.
उंब्रजचा मारुती/ मठातील मारुती
Akra Maruti8
चाफळचे दोन आणि माजगावचा मारुती पाहून आपण पुन्हा उंब्रज इथे येतो. इथेच जवळ आता तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. इथल्या मारुतीमंदिराशी आणि उंब्रजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. आपल्याकडे कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले की कोणती ना कोणती कथा जोडलेली असते. त्या कथेमुळे त्या स्थानालासुद्धा रंजकता येते. तिथे गेले आणि ती विशिष्ट कथा आठवली की एक वेगळाच आनंद मिळतो. समर्थ चाफळवरून रोज उंब्रज इथे स्नानासाठी येत असत. एकदा इथल्या नदीत ते बुडायला लागल्यावर मेलो मेलो असे जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा खुद्द हनुमंताने त्यांना तिथून बाहेर काढले असे सांगितले जाते. त्याच्या पावलाचा एक ठसा तिथे दगडावर उमटल्याचेही दाखवले जायचे. आता तो दगड मात्र वाळूत बुजून गेला आहे. अशी इथली एक आख्यायिका.
समर्थ रामदासांना उंब्रज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० साली समर्थानी इथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंचीची ही मूर्ती मोठी देखणी आहे. सध्या मात्र या मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदासस्वामींनी कीर्तन गेले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.

हा मारुती उंब्रज गावात पुर्वबाजुला बाजारपेठेत आहे. पुण्याच्या दिशेने तोंड असेल तर उजव्या हाताला उंब्रज गावाची मुख्य बाजारपेठ आहे. इथेच समर्थ स्थापित हनुमानाचे मंदिर आहे. इथे जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने शक्यतो चारचाकी वाहन असेल तर हायवे शेजारी पार्क करुन चालत जाणे बरे पडेल.   

मसूरचा मारुती
Akra Maruti9
उंब्रजपासून जेमतेम दहा किमी वर असलेल्या मसूर इथे समर्थानी मारुतीची स्थापना केली आहे. मसूर या गावाशी निगडित एक कथा आहे. आणि ती कथा आहे कल्याणस्वामी या समर्थाच्या पट्टशिष्याशी संबंधित. कल्याण या शिष्याची प्राप्ती समर्थाना मसूर इथल्या उत्सवात झाली आणि पुढे तो समर्थाचा अत्यंत लाडका शिष्य झाला. कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी. चार वर्षे मसूर इथे समर्थानी रामनवमीचा उत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्रीरामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती. तेव्हा समर्थानी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंडय़ावर बसून कुऱ्हाडीने बुंध्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले! अंबाजीने काहीही न विचारता तसे केले. फांदी तुटली आणि अंबाजी त्या फांदीसकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, ‘अंबाजी कल्याण आहे ना?’ विहिरीतून प्रत्युत्तर आले, ‘सर्व कल्याण आहे स्वामी.’ तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले.
पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी. शके १५६८ अर्थात इ.स. १६४६ साली याची स्थापना समर्थानी केली. अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट असून, गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. हाताची बोटे तसेच लंगोटाचे काठ मोठे आकर्षकरीत्या रंगवलेले दिसतात. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थाचे चित्र काढलेले आहे. गाभाऱ्याच्या एका भिंतीवर याच गाभाऱ्याचे चित्र काढलेले दिसते. मंदिराचा सभामंडप १३ फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत तोलून धरले आहे. देवळाच्या शेजारीच नारायणमहाराजांचा एक मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे आहे.
या ठिकाणाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पहिलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. समर्थानी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला. मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मनी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थानी इथेच यथेच्छ बदडून काढले होते, असे सांगितले जाते.
शहापूरचा मारुती
Akra Maruti 10
कराड-मसूर रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर आणि मसूरपासून तीन कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. इथून फक्त एक कि.मी.वर रस्त्यापासून आत हे मारुती मंदिर आहे. समर्थानी स्थापिलेल्या ११ मारुतींमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. शके १५६६ म्हणजेच इ.स. १६४५ साली समर्थानी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे सात फूट उंची असलेली हे मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी गोंडय़ाची टोपी आहे. इथेच पुढे छोटीशी पितळी उत्सव मूर्ती ठेवलेली दिसते. शहापूरचे अजून एक महत्त्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयेला दोन कि.मी.वर रांजणखिंड आहे. इथे दोन मोठे दगडी रांजण दिसतात. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थाचे वास्तव्य असायचे.
शहापूर.. समर्थ.. बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा इथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूरजवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तिथून भिक्षा मागायला शहापूर गावात नेहमी जात असत. गावात बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला.. असे चिडून बडबडत असे आणि भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा घरात दु:खी वातावरण दिसले. चौकशी करता असे समजले की बाळाजीपंतांवर फसवणुकीचा आरोप ठेवून पकडून विजापूरला घेऊन गेले होते.

आजपासून पाच दिवसांनी बाजीपंत परत घरी येतील असा दिलासा समर्थानी सईबाईंना दिला. दासोपंत (म्हणजे समर्थच) विजापुरी जाऊन हिशेब मिटवून दिले व बाजीपंतांसह शहापुरी परत आले!! त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती-पत्नींनी तीन दिवस कडकडीत उपास केले. चौथ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एक व्रतच घेतले, ते म्हणजे समर्थदर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर आठ दिवस उपास घडला. त्यावेळी हे दांपत्य समर्थाना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थाना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थानी सईबाईला निक्षून बजावले होते. तरीही अनवधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय.. त्यांचे डोळेच दिपले. समर्थाच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे समर्थानी इथे चुन्याच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ आजही इथे अत्यंत मनोभावे सेवा करीत आहेत. मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे.      

सडा वाघापुर उलट धबधबा :-
     तुम्ही सरळ वाहणारे धबधबे खुप पाहिजे असतील, व त्याखाली मनमुराद भिजून ओलेचिंब होऊन आनंद घेतला असेल, पण तुम्ही उलटा वाहणारा धबधबा पाहिलाय का?  पाटण शहरापासून अवघ्या बारा किलोमीटरवर सडावाघापूर गावच्या  डोंगरपठारावर सह्याद्रीच्या कड्यावरून  पावसाचे वाहणारे पाणी वार्‍याच्या प्रचंड दाबाने उलटे पडून धबधबा तयार झाला आहे. रिव्हर्स पॉइंट म्हणून हा वैशिष्टयपूर्ण  धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पहायला राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. पवनचक्कीमुळे ओळखला जाणारा हा सडावाघापूरचा विस्तीर्ण डोंगर पठार आता रिव्हर्स पॉइंट म्हणून नावारूपाला येत आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा धबधबा प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. 
    तारळे- पाटण मार्गावर सुमारे १४ किलोमीटरवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दर वर्षी पावसाला सुरवात झाली, की पर्यटकांना या उलट्या धबधब्याचे वेध लागतात. जुलै व ऑगस्ट महिने सडावाघापूर पठारावर स्वर्ग अवतरल्याचा भास निर्माण करणारे ठरत असतात. त्यामुळे पठारावर दर वर्षी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी शेकडो पर्यटक याठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कड्यावरून शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते; परंतु वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे त्यातील निम्म्याहून अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. कड्यावरून खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे शंभर फुटापर्यंत उलटे पठारावर फेकले जाते.  पावसाचा जोर व हवेचा दाब असल्यास त्यांना उलट्या धबधब्याचे डोळ्याचे पारणे फेडणारे मनमोहक दृश्‍य अनुभवयास मिळते. अन्यथा धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटे- मोठे धबधबे यावरच समाधान मानावे लागते.

कसे जाल आणि काय काळजी घ्याल... 
साताऱ्याकडून आल्यास सातारा- नागठाणे- तारळे- सडावाघापूर, तर कऱ्हाडकडून कऱ्हाड- पाटण- सडावाघापूर किंवा उंब्रजकडून उंब्रज- चाफळ- दाढोली- सडावाघापूर. तारळेपासून १४ किलोमीटर अंतर आहे. तारळे- पाटण बस आहे; पण स्वतःचे वाहन असल्यास उत्तम. येथे हॉटेलची सोय नाही, तसेच पॉइंटकडे जाण्यासाठी दिशादर्शक नसल्याने गोंधळ उडतो. कड्याच्या बाजूस कोणतीही सुरक्षिततेचे साधन नसल्याने अती कड्याजवळ जाणे धोक्‍याचे ठरू शकते.
निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करणार पाटण तालुक्यातील सडावाघापुरचं पठार
आभाळाला साद घालणाऱ्या पणवचक्या आणि सुंदर निसर्ग तसेच निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या पाटण तालुक्यातील सडावाघापुरच्या पठारावर सुंदर फुल आली आहेत. मनमोहित करणार निसर्ग सौंदर्य येथे पहायला मिळत आहे. वीकएन्डसाठी फिरायला हे ठिकाण खूप मस्त आहे.
●सडावाघापुर,
पाटण तालुक्यामधील त‍ारळे गावाच्या दक्षिणेकडील पठार.
उलटा धबधबा,पवनचक्क्या , सपाट पठार अाणि विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे.
सडावाघापुर ( सडा ) पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची खाण असलेलं हे ठिकाण प्रयत्नपासून थोडं लांबच राहील आहे.  
सड्याच्या या पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी झाले असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यासव मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो. सडा पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते प्रसिध्द सड‍ापठार आहे. 
सडा पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे.
लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे सडा पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो.
या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे. महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. 
हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात.


बहुलेश्वर
  बहुलेश्वर मंदिर आणि परिसर:-
कराड पाटण राज्यमार्गावर निसरे फाट्यापासून दक्षिणेस ९ किमी अंतरावर,निसरे गावापासून ५ कि.मी,, डोंगराच्या पायथ्याशी बहुले हे गाव वसले आहे.या गावचे वैशीष्ट म्हणजे शिवसागर जलाशयातून कोयना नदीपात्रात प्रवाही अस णाऱ्या पाण्याचा एक थेंबही न घेता विहीरीच्या पाण्यावर बागायत असणारे पाटण तालुक्यातील एकमेव गाव.या गावाच्या प्रारंभीच बहुलेश्वराचे अतिप्राचीन असे शिवमंदीर आहे.बहुलेश्वरांनी एका गुराख्याला दर्शन देऊन येथे लिगाची स्थापना करण्याची प्रेरणा दिली अशी आख्यायिका आहे.
    सन ११८५ मध्ये श्रीकृष्णाचे वंशज समजल्या जाणाऱ्या यादव घराण्यातील रामदेवराय शंकरदेव सिंधणराजा यांनी त्याकाळी अनेक शिवमंदीरे उभारली व त्यांना परीस्थितीनुसार अनुकुल नावे दिली त्यापैकी हे एक मंदीर. हेमाडपंथीय बांधकामाचा एक अजब नमुनाआहे.संपूर्ण बांधकाम दगडातून केले आहे.मंदिर दगडी फरसबंधी चौथरयावर असून हा चौथरा जमिनीपासून १.२२ मीटर उंचीवर आहे. मंदिराचे मुख पूर्वेला असून सभोवताली दाट वटवृक्ष आहेत. मंदिराचे शिखर आधुनिक बांधणीचे असून दोनशे वर्षापूर्वी निगडीचे सावकार परशुराम नारायण अनगळ यांनी केले आहे.
    मंदिराच्या गाभर्यातील भिंतीची जाडी ८० सेमी असून , गाभार २.४4 x २.४4 मीटर लांबीचा आहे. गाभार्‍यात मध्यभागी बहुलेश्वरचे लिंग आहे. यावर उत्तरेकडून सतत पाण्याची धार पडत असते. लिंगावर पडणारे पाणी गोमुखाद्वारे गाभार्‍याच्या बाहेर सोडले आहे. मंदिराचा सभामंडप पूर्व पश्चिम ५.४९ मीटर लांब आणि उत्तर दक्षिण ५.३४ मीटर रुंद आहे. मंडपाच्या छताची उंची २.३३ मीटर आहे. छताची बऱ्याच ठिकाणी दुरूस्ती झाल्याचे आढळते. मंदिराच्या मंडपात १६ स्तंभ आहेत त्यावर कोणतेही कोरीव काम नाही.दिर्घीकेच्या भिंतीत उत्तर व दक्षीणेला देवकोष्ठ आहेत. त्यात उत्तरेला मारुती तर दक्षीणेला गणपती आहे.
    दगडातूनच शिवमुर्ती उत्तरमुर्ती स्तंभ द्वार शिखर सभामंडप चौकोनी षटकोनी अष्टकोनी आकाराचे नमुने तयार केले आहेत दगडी बांधकामात पाण्याची कुंडे मुर्ती नंदी पाण्याचा हौद दिपमाळा व तुळशीवृदामलन तयार केले आहे.हे पुर्वाभिमुखी मंदीर आहे.ठराविक काळात शिवपिंडीवर सुर्यकिरणे विशीष्ट पध्दतीने पडतात. शिवलिंगाशेजारी पार्वतीची मुर्ती आहे सुमारे २०० वर्षापुर्वी निगडी येथील सावकार श्री परशुराम नारायण अनगळ यांनी श्रध्देपोटी याशिखराचे बांधकाम केले आहे.प्रत्येक सोमवारी भावीक दर्शनासाठी येतात.फाल्गुन महीन्यात तुकाराम बिजेनिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या भक्तीभावाने पार पडतो.श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते. महाराष्ट्र शासनाने पर्यटनाचा क दर्जा दिला आहे. तरी या पवित्र तिर्थक्षेत्राचा लाभ जरूर घ्यावा  
ता.पाटण जि. सातारा.








काळसड्याची विहीर :-
प्रा. डी. डी. चव्हाण, पाटण (d2chavan@gmail.com)
कोकीसरे तालुका पाटण या गावच्या डोंगर माथ्यावर नितळ खडकाचे पठार आहे. या पठारावर गवळी नगर ,( गवळी वाडा ,) ही वस्ती आहे. या वस्ती पासून सुमारे ६०० ते ७०० मिटर अंतरावर खडकात कोरलेली पांडवकालीन विहीर आहे.या विहिरीला “ काळसड्याची विहीर “ असे म्हणतात.या विहिरीची खोली अंदाजे ६० ते ७० फूट असून व्यास सुमारे १० ते १२ फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी ऐसपैस अशा ६० पायऱ्या. आहेत.ही विहीर १९८० सालापर्यंत वापरात होती असे सांगितले जाते.

पाटण येथून कोकणात जाणे साठी पाटण , कोकीसरे , मळे , पाचगणी , संगमेश्वर असा पूर्वी मार्ग होता. देश व कोकण यांना जोडणारा हा मार्ग शिवकाला पासून सुरु होता.जेव्हा संभाजी महाराजांना मोंगल सेनेने संगमेश्वर ला पकडले तेव्हा त्यांना वरील मार्गानेच कराडला नेण्यात आले होते अशी इतिहासात नोंद आहे.
पूर्वी कोकणात मालाची ने आण करतांना लोकं या विहिरीतील पाण्याचा वापर करत असत. गवळी नगर चे लोक सुद्धा या विहिरीतील पाण्याचा वापर शेती साठी आणि पिण्यासाठी करत होते असे जाणकार लोकं सांगतात.परिसरातील शाळांच्या वनभोजन सहली सुद्धा या ठिकाणी होत असत.
सद्यस्थितीस या विहिरीत पाणी नाही. परंतू खोदकाम केल्यास पाणी साठा होऊ शकतो.या पांडव कालीन पुरातन विहिरीचा वारसा गवळी नगर ग्रामस्थांनी जपून ठेवला आहे. पुरातत्व विभागाने या विहिरीची देखभाल व डागडूजी करावी अशी ग्रामस्थ आणि पर्यटकांची माफक अपेक्षा आहे.




शिवलेणे रुद्रेश्र्वर -
प्रा. डी. डी. चव्हाण, पाटण (d2chavan@gmail.com)
कराड चिपळूण रस्त्यावर येराडवाडी पासून उत्तरेला डोंगराच्या मध्यावर शिवलेणे रुद्रेश्र्वर मंदिर आहे.पांडवांनी एका रात्रीत पहाटेचा कोंबडा आरवे पर्यंत हे मंदिर उभारले अशी आख्यायिका सांगितली जाते.
या मंदिरात मध्यभागी शंभू महादेवाची पिंड आहे. या पिंडीच्या भोवती खांब असून बसण्यासाठी जागा आहे.मंदिराशेजारी भंडारा घर असून पूर्वेच्या बाजूस पाण्याचे कुंड आहे.पावसाळ्यात मंदिरावरील धबधबा खूप आकर्षक दिसतो.






रुद्रेश्र्वरचा भंडारा उत्सव श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी असतो.परिसरातील हजारो भाविक या उत्सवाच्या साठी येतात. रुद्रेशवर देवस्थानचे वतीने नाम सप्ताह ,पारायण सोहळा , महा अभिषेक , होमहवन , महाप्रसाद , भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दर सोमवारी ही दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते.
येराडवाडी ग्रामस्थांच्या वतीने येराडवाडी ते मंदिर अशी लाईट व्यवस्था केलेली आहे. डॉ. माने यांच्या आर्थिक सहकार्याने काही पायऱ्या बांधल्या आहेत.ट्रस्टचे माध्यमातून श्रमदानातून २०१२ मध्ये उर्वरित पायऱ्या बांधल्या आहेत.मोहन कदम यांच्या आर्थिक मदतीतून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाचे वतीने या देवस्थानला ,' क ' वर्ग दर्जा मिळाला आहे. ट्रस्ट चे वतीने भक्त निवास , उद्यान या सुविधा करण्याचा मनोदय आहे.
दिवशी धारेश्वर
पाटणच्या वायव्येस ११ कि.मी.वर असलेल्या नागोजीराव पाटणकरांच्या इनाम असलेल्या गावापासून दोन कि.मी.वर डोंगरात २१३ मीटर उंचीवर ६१ मीटर लांब , ११ मीटर रुंद व दोन ते अडीच मीटर उंच अशी भव्य गुहा आहे.यात धारेश्वर मंदिर आहे.या स्थानासंबंधी अशी आख्यायिका सांगितली जाते कि एका गुराख्याची गाय या ठिकाणी चोरुन दुध घालत असे.काही दिवसांनी या ठिकाणी एक स्वंयभु लिंग प्रगट झाले.यावरुन या स्थानास धारेश्वर नाव पडले.धारेश्वरच्या वाटेवर काही अंतरावर चार नंदी आहेत. गुहेत उत्तरेकडे मठ आहे.मठाच्या दक्षिणेस धारेश्वरचे स्वंयभु लिंग असून त्याच्या सभोवती तीन भिंती घालून छोटेसे मंदिर तयार केलेले आहे.त्यात शंकर्,पार्वती व वीरभद्राच्या मुर्ती आहेत.मंदिर पुर्वाभिमुख आहे. मंदीराच्य दक्षिणेस राम्,सिता व लक्ष्मण यांच्या मुर्ती दगडी सिंहासनावर आहेत.सीतेची मुर्ती संगमरवरी आहे.या मुर्तीच्या दक्षीणेस तोंड असलेले दोन नण्दी आहेत.रामाच्या मुर्तीजवळ पाच पांडवाच्या रेखीव मुर्ती आहेत. जवळ यात्रेकरुंसाठी खोल्या बांधल्या आहेत.राम,लक्ष्मणाच्या मुर्तीसमोर गुरुगादी आहे.त्या गादीबरोबर पुजार्‍याचे लग्न लागते. याचे पुजारी हे बहुसंख्येने जंगम आणि लिगायत असून अविवाहित असतात. तसेच येथे गुंफा व एक झरा आहे.  पिडीभोवती चांदीचा मुखवटा आहे. दसरा व चौत्र पंचमीला येथे यात्रा भरते.गुहेच्या समोर पाण्याची धार पडत असल्याने वातावरण थंड असते,इथे बरेच आधुनिक बांधकाम केलेले असून वीजेची सोय आहे,
पाटणकर घराण्याचे धारेश्वर कुलदैवत असून त्यांच्या पुर्वजांनी इथेले दगडी सिंहासन केलेले आहे.त्यावर यशवंतराव बीन हिराजीराव पाटणकर व धारबाराव बीन हिरोजीराव पाटणकर हि व्यक्तीनामे कोरली आहेत.गुहेत एक भुयार आहे.




सुंदरगड ( घेरादातेगड )
   महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गडांशी सातवाहनांपासून छत्रपती शिवाजीमहाराजांपर्यंत अनेकांचं नातं आहे. ज्या गडकिल्ल्यांचा इतिहास इतिहासकारांनी मांडला ते किल्ले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. मात्र इतिहासामध्ये महत्त्वाची कामगिरी करूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक किल्ले प्रसिद्धीपासून वंचित राहिले. चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.

◆इतिहास :

पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करुन हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती.अफ़जलखानाच्या वधानंतर छ. शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला.

इसवीसन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवीसन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विषेश सांगन्याची बाब ज्यानी तिन्ही छत्रपतीचा काळ पाहीलेले रामचंद्र आमात्य बावडेकर याचे यागड़ावर तीन महिने वास्तव्य होते. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. याला दुसरे नाव गंतगिरी असेही म्हटले जाते.दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.



 ◆ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

 किल्ल्यावर जाण्यासाठी जाईचीवाडी वनकुसवडे मार्गे वाहनाने १४ कि.मी. अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते . किल्ल्याच्या पायथ्यालाच निसर्गरम्य परिसरात पाटणचे ग्रामदैवत भैरीदेवीचे मंदिर आहे. गडाच्या पश्चिचम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. या गडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. ती इतिहासकालीन शिल्प कलेची चुणूक दाखवते. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर किल्ल्याच्या दक्षिणेला आहे. अखंड खडकात विहिरीत उतरण्यासाठी ४१ पायऱ्या आहेत. त्यापैकी काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. या पायऱ्या उतरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेवाचे मंदिर खोदले आहे. त्याचा आकार सुमारे आठ फूट लांब, सात फूट रुंद सहा फूट उंच आहे. या मंदिरावरूनच या तलवार विहिरीची भव्यता जाणून येते. मंदिरात शिवलिंग आहे. मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे.तलवार विहिरीची खोली किती हे सांगता येत नाही. मात्र वरून पाण्यात दगड टाकला की विशिष्ट आवाज येतो. हे ऐकून माहीत झाल्याने गडावर येणारा प्रत्येक माणूस विहिरीत दगड टाकून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि विहीर दगडाने भरून काढण्यास हातभार लावतो.तलवार विहिरीपासून जवळच गडावर प्रवेश केल्याबरोबर अखंड खडकात खोदलेले गणपती मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात उतरण्यासाठी २९ पायऱ्या उतराव्या लागतात. या मंदिरावर कोणतेही आच्छादन नाही. चौकोनी आकाराच्या खोदकामात उत्तर भिंतीवर दक्षिणाभिमुख गणपती व पूर्व भिंतीवर पश्चिमाभिमुख मारुती अशा मूर्ती आहेत. मारुतीच्या समोरच्या बाजूस दगडात कोरलेली कमान आणि भुयारी मार्ग आहे. मंदिराचे एक वैशिष्ट असं, की सूयोर्दय होत असताना सूर्यकिरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्यकिरण मारुतीच्या मूर्तीवर येतात. अशा रचनेत खोदलेलं हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्प कलाकारांची बौद्धिकता जाणवून देतं. या व्यतिरिक्त गडावर आणखी काही इतिहासातील अवशेष आहेत. गडाच्या समोरच्या एक उंच टेकडी आहे. या टेकडीवरून गडाच्या आजू बाजूना पसरलेल्या निसर्गाचे विहंगम दृश्य पर्यटकांना न्याहाळता येतं. या टेकडीचा पूर्वी टेहळणी टेकडी म्हणून उपभोग केला जात होता. इथून कोयनेचा नागमोडी प्रवाह, पाटण शहर, पवनचक्की प्रकल्प, सह्यादीच्या अफाट पसरलेल्या रांगा पर्यटकांना आकर्षित करतात. या गडाचं दुसरं नाव आहे सुंदरगड, आपलं नाव सर्वार्थाने सिद्ध करणारा हा किल्ला पर्यटकांना खुणावतोय




◆गडावर जाण्याच्या वाटा :

दातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत आवश्यक आहे. अन्यथा भरकटण्याची शक्‍यता आहे

टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला परत एक लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायर्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचता येते. आधी वर्णन केलेल्या दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात.

गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्‍टर आहे. गडाच्या पश्‍चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा १९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात कोसळल्याचे समजते. त्या बाजूस जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायर्‍या आहेत


कोयनानगर परिसराचे पर्यटन

ब्रिटीशांनी विकसित केलेले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सध्या खुपच लोकप्रिय झाले. मुंबई, पुणे येथून येणे सोयीचे असल्याने महाबळेश्वर गर्दीने ओसंडून जाउ लागले आणि अर्थातच ईथल्या सर्व सोयींचे दर गगनाला भिडले आणि महाबळेश्वर सर्वसामान्यांना आवाक्यात राहीले नाही. शिवाय पर्यावरणाच्या र्‍हासाने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने नवे महाबळेश्वर वसविण्याची संकल्पना पुढे आली. आणि कोयनानगर हे नाव आणि परिसर यासाठी आदर्श असल्याचे लक्षात आले. जे कोयनानगर एकेकाळी फक्त कोयना धरणामुळे आणि १९६७ ला झालेल्या भुकंपामुळे सर्वाना ओळखीचे होते, ते आता नव्याने कात टाकून पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे. या कोयनानगर परिसराची आज भटकंती करायची आहे.







    कसे याल?
१) पुण्यावरुन यायचे असल्यास, पुणे-सातारा- उंब्रज- पाट्णमार्गे  १८२ कि.मी.
२) मुंबई-चिपळूण-कोयनानगर  288 KM
पुणे-मुंबईवरुन कोयनानगरला जर पुणे-बेंगळूरु महामार्गाने येत असाल, तर वाटेत थांबण्यासारखी ठिकाणे
१)  जोशी वाडेवाले (एनएच 4) ->  कात्रज बोगला पार केल्यावरआपल्या उजव्या बाजूला दिसते. वडापाव, मिसळपाव, चहा / कॉफी, वडा सांबार इत्यादी चवदार खाद्यपदार्थ.
२)  हॉटेल नटराज (एनएच 4)) -> खेड शिवापूरजवळ (सातार्‍याकडे जाताना डावीकडे). दक्षिण भारतीय नाश्त्यासाठी चांगली जागा. उडपी व्यवस्थापन.
३)  विठ्ठल कामथ रेस्टॉरंट (एनएच 4)) - शिरवळच्या आधी किकवी गावात आपल्या डावीकडे “कंपनी ऑपरेट एचपी पेट्रोल पंप” च्या आवारात. चांगले अन्न, भरपूर जागा आणि स्वच्छ शौचालये. आपल्याला फक्त शुद्ध व्हेज मिळेल. दक्षिण भारतीय / पंजाबी / चीनी खाद्य. पेट्रोलही पुणे शहरापेक्षा स्वस्त.
४) माईलस्टोन फूड प्लाझा (एनएच 4) - सातारा आणि उंब्रज दरम्यान (सातारा / कराडच्या दिशेने जाताना डावीकडे). हे पुणे - नगर रोडवरील स्माईलस्टोन फूड प्लाझासारखेच आहे.
५) नवमी फूड प्लाझा (एनएच 4) - उंब्रजला पोहोचण्यापूर्वी (सातार्‍यात जाताना डावीकडे). उडपी व्यवस्थापन.
मुंबईवरून मुंबई-गोवा महामार्गाने चिपळूणकडे येताना-
 १) संगमेश्वर जवळ एनटेल ड्राईव्ह इन (एनएच 17)
२)  गोवा महामार्गावर तुम्हाला विठ्ठल कामथ रेस्टॉरंट प्रत्येक 100 किमी नंतर दिसेल.
कोयनानगर मधील पर्यटन स्थळ.......
१. कोयना धरण
२. नेहरू उद्यान
३. ओझरडे धबधबा
४. जंगली जयगड
५. पॅगोडा, हुंबरळी
६. प.पु. गगनगिरी महाराज आश्रम, ढाणकल
७. विट्ठल रुक्मिणी मंदिर, नवजा
८. राम घळ
९. बोटिंग (जलाशयातिल नौकाविहार)
१०. घाटमाथा
११. भैरवगड
१२. वासोटा किल्ला
 कोयनानगर परिसराच्या पर्यटन स्थळांचा नकाशा
कोयना धरणाविषयी महत्त्वाचे
     निसर्गसौंदर्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोयना नदीचे उगमस्थान महाबळेश्वरपासून ६४ किलोमीटर अंतरावर कोयानानदीवर देशमुखवाडी येथे कोयना धरण बांधण्यात आले. सन १९१० ते १९१५ या काळात ब्रिटीश सरकारची संकल्पना असलेले कोयना धरण स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली १९६२ साली पूर्णत्वास आले . याच कोयना धरणातील अफाट जलसाठ्यावर चार टप्प्यात भव्य वीजनिर्मिती साकारून २००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली.

महाराष्ट्रातील “कोयना धरण” हे मोठ्या व महत्वाच्या धरणांपैकी एक धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्वर येथुन उगम पावणाऱ्या कोयना नदीवर सन १९५४ ते १९६४ या कालावधीमध्ये हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी तसेच सिंचनासाठी वापरण्यात येत असून जलविद्युत प्रकल्पाची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे. धरणातून होणाऱ्या उर्जा निर्मितीमुळे आपल्या राज्यामध्ये औद्योगिक विकास होण्यास हातभार लागला आहे. त्यामुळेच या धरणाला “महाराष्ट्राची भाग्यरेषा” असे म्हटले जाते.
“केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळ” (Central Board Of Irrigation And Power ) या संस्थेने सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार दि. १४ डिसेंबर २०१८ रोजी कोयना धरणास जाहीर केला आहे. या संस्थेमार्फत १९२७ पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना / संस्थांना गौरविण्यात येत आहे. 
कोयना धरणाची लांबी ८०७ मीटर असून उंची १०३ मीटर आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता २९८१ दलघमी (१०५ टीएमसी) एवढी आहे. या धरणामुळे ८९२ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला जलाशय निर्माण झाला असून त्याला “शिवाजीसागर” या नावाने ओळखले जाते. धरणातून पूराचे पाणी सोडण्यासाठी ६ वक्राकार दरवाजे बसविण्यात आले असून या धरणामुळे पूरनियंत्रण होण्यास हातभार लागला आहे. 
दि. १० डिसेंवर १९६७ रोजी कोयनानगर येथे ६.३ रिक्टर क्षमतेचा भुकंप झाल्यामुळे कोयना धरणाला तडे गेले होते. तेव्हापासून  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर “जलाशय प्रेरित भूकंप” (Reservoir Induced Seismicity) वर संशोधनास सुरुवात झाली आहे. सन १९६८ मध्ये धरणास पडलेल्या भेगा ग्राऊटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन १९७३ मध्ये या धरणाचा अपरिवाह (non-overflow) भागाचे तर सन २००६ मध्ये परिवाह (overflow) भागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. अशा प्रकारे धरण पुर्णपणे भुकंपरोधीत करण्यात आले आहे. धरणाचे बांधकाम होऊन आता ५५ वर्ष झाले आहेत तर कोयना भुकंपाला देखील ५० वर्ष झाले आहेत. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या ५० वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने (Best Maintained functional Project for more than 50 years) देण्यात आला आहे. 
या धरणाचा इतिहास शोधला असता, असे आढळून येते की, १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या धरणाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली होती. १९१८ नंतर पहिले जागतिक महायुध्द संपल्यानंतर टाटा कंपनीने कोयना प्रकल्प बांधण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. मात्र त्यानंतर १९२८ च्या जागतिक मंदीमुळे हा प्रकल्प रेंगाळला. १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी सन १९५१ मद्ये कोयना धरण विभाग सुरु करण्यात आला. सन १९५३ मध्ये प्रकल्पास मान्यता मिळाली आणि सन १९५४ मध्ये बांधकामास सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम १९६४ मध्ये पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी कोयना धरण आणि कोळकेवाडी धरण ही दोन मोठी धरणे आहेत. कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युतनिर्मिती केंद्रांद्वारे उर्जा निर्मिती करण्यात येते. त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविदुत केंद्रामध्ये आणले जाते. या तीनही टप्प्यातून जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसऱ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात उर्जा निर्मिती करिता वापरले जाते. त्यानंतर हे पाणी  वशिष्टी नदीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते. 
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरण्यासाठी दोन वेळा (सन २००२ मध्ये व सन २०१५ मध्ये) लेक टॅपिंग करण्यात आले व हा देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता व दोन्ही लेक टॅप यशस्वी झाले आहेत.


     हि वीज महाराष्ट्रासह शेजारील राज्यात वापरली जाते. त्याचबरोबर कोयना धरणातील पाण्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यातील शेतजमीन सिंचनाखाली आणून शेती सुजलाम-सुफलाम करण्यात आली आहे. म्हणूनच कोयना धरणाला महाराष्ट्राचे भूषण व भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. 
कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प १९६२ मध्ये पूर्णत्वास आला. १०५ टीएमसी पाणीसाठा क्षमता व १९२० मेगावॅट वीजनिर्मितीबरोबर सिंचनाची जबाबदारी आहे. कोयना नदीवर कोयनानगर येथे हे धरण उभारलेले आहे. त्या भागातील सरासरी वार्षिक पाऊस ५,००० मिलिमीटरचा आहे. धरणाची लांबी ८०७.७२ मीटर आहे. उंची १०३.०२ मीटर आहे. त्याचे बांधकाम १९५४ ते १९६७ या कालावधीत झाले आहे. सुमारे हजारो हेक्‍टरचे क्षेत्र ओलिताखाली आहे. कोयनेच्या जलाशयाला शिवसागर जलाशय नावाने संबोधले जाते. कोयनानगर ही कोयना धरणाच्या कामासाठी असणा-या अधिकारी, कर्मचारी यांना राहण्यासाठी तयार झालेली  एक वसाहत  आहे.
 नेहरू उद्यानाबद्दल थोड........
     कोयना धरणाच्या भूमी पुजनासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ज्या भूमीला पाय लागले त्याचीच आठवण जपण्यासाठी कोयनानगर येथे भव्य नेहरू उद्यान उभारण्यात आले आहे. कोयनानगर पासून साधारण ३ कि. मी. च्या अंतरावर नवजाच्या दिशेला हे उद्यान बनविण्यात आले आहे. यामध्ये पंडितजींच्या पंचतत्वांची जाणीव करून देणारा पंचधारा घुमट देखील आहे. या उद्यानात विविध प्रकारची झाडे, वेली आणि मनमोहक फुले पर्यटकांच आकर्षण आहेत.लहान मुलाना खेळण्याकारिता येथे अद्यावत खेळणी देखिल आहेत, ज्यावर दिवसभर मुले रमून जातात. या उद्यानातुन कोयना धरणाची मागची बाजु पहावयास मिळते. नेहरू उद्यानात कोयना धरण, कोयना वीजनिर्मिती  प्रकल्पाची माहिती देणारी एक छानशी चित्रफीत सुद्धा दाखवन्यात येते त्यासाठी यशोगाथा केंद्र बनवलेले आहे. दरवर्षी बाल जयंतीच्या निमित्ताने येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रद्धांजली  वाहन्यात येते.

    अलिकडेच या उद्यानाजवळ एका नवीन आकर्षणाची भर पडली आहे.उद्यानाच्या शेजारी असणार्‍या डोंगरामध्ये शिल्पमुद्रा तयार झाली असून ती पंडित नेहरू यांच्या चेहर्‍याशी मिळती जुळती आहे
 नेमका नेहरु उद्यानाजवळच निसर्गाचाही हा चमत्कार दिसावा हे सर्वांसाठी आश्‍चर्य व उत्सुकतेचा विषय ठरला आहे. आजवर कोयनेला धरण, वीज निर्मिती प्रकल्प, नेहरू गार्डन, पॅगोडा, पावसाळ्यातील ओझर्डेसह अन्य धबधबे यामुळे पर्यटक येत असतात. आता डोंगरातील शिल्प मुद्रा हे येथील नवे आकर्षण आहे.

ओझर्डे धबधबा

 पावसाळ्यात कोयना पर्यटन म्हटलं की, पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो सुमारे ३५० मीटर उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा. खरेतर सध्या सह््याद्रीच्या कुशीत वसलेला कोयनानगरचा परिसर हिरवीगार शाल पांघरू लागला आहे. कोयनेतून केवळ १० किलोमीटरचे अंतर कापत असताना गर्द हिरवीगार झाडी, मोठमोठे वृक्ष, वळणावळणाचे रस्ते, शेजारीज पसरलेला शिवसागर जलाशय, जमिनीपर्यंत टेकलेल्या छपरांची घरे, भर पावसात शेतामध्ये भाताच्या रोपांची लागण करत असणाºया महिलांचा समूह, बाजूलाच वाहणारी मातीच्या रंगाची कोयना नदी, छोटीछोटी दुकाने पाहत-पाहत आपण ओझर्डे धबधब्याशेजारी पोहोचतो.  पाबळनाला धबधबा पाहिल्यानंतर थेट ओझर्डे धबधब्याकडे आपण प्रवास करतो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोठमोठ्या दगडी शिळा पाण्याच्या तडाख्याने गुळगुळीत झालेल्या निदर्शनास येतात. तसेच प्रवेशद्वारापासून कोसळणारा अन् फेसाळणारा धबधबा पाहिल्यानंतर पर्यटक वेगाने पायºया चढायला लागतो. जंगलातून चढ चढत असताना एका बाजूला फेसाळणारे पाणी, त्याचा विशिष्ठ आवाज, झाडांच्या खोडांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि त्यावर आलेली हिरवीगार शेवाळे, जाडजूड वेली, मध्येच लोखंडी कड्ड्यावर चिंब भिजल्यामुळे कुडकुडत असणारा माकडांच्या समूह, मोठ्या धबधब्याला येऊन मिळणारे छोटेछोटे झरे, त्यातून पारदर्शक पाण्यातून दिसणारा गुळगुळीत खडक, झाडांच्या पानांवरून ओघळणारे पावसाचे थेंब, पाहत-पाहत जवळपास ४०० पायºया चढून आपण कधी धबधब्याजवळ पोहोचलो लक्षात येत नाही. जेव्हा विशालकाय धबधब्यातून जवळपास ९०० फूटावरून कोसळणारे पाणी पाहताच वाटायला लागते की, निसर्ग अफलातून आहे. कारण, पाण्याचा वेग, बाजूला पाऊस नसतानाही केवळ धबधब्याच्या पाण्याने उडणारे तुषार पर्यटकांनी चिंब भिजवून टाकतात. पूर्ण परिसर पाण्याच्या तुषारांनी भरलेला असतो. अर्थात ईथे येताना थोडी काळजी घेतली पाहीजे. पाण्याचा जोर असेल तेव्हा थेट प्रवाहात न उतरणे, पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात जळवा असतात, तेव्हा जवळ आगपेटी बाळगून जळवा लागल्या तर चटका देता येईल किंवा हळद हा देखील उपाय आहे. शिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात सरिसृप आहेत, याचेसुध्दा भान ठेवायला हवे. या धबधब्याच्या पाण्याचा सुध्दा वीज निर्मिताला उपयोग करुन पाचवा टप्पा निर्माण करणे, प्रस्तावित आहे.

नवे महाबळेश्वर :- 

कोयना धरणाचा शिवसागर जलाशय व कांदाटी खोर्‍यातील घनदाट जंगलांच्या परिसरात नवे महाबळेश्वर अर्थात जलारण्य प्रकल्प हा खास पर्यावरण दृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित होत आहे.

कुंभार्ली घाट
कुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. कोकण व घाटांना जोडणारा या कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व निसर्गरम्य असे ठिकाण आहे.
जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते. गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.
 घाटमाथा येथील हॉटेल सुस्वाद
     प्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.

चांदोली व कोयना अभयारण्य:-

     जागतिक नैसर्गिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या क्षेत्राला सर्वांगसुंदर निसर्ग लाभला आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदिर, जंगली भ्रमंती वाटा या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येत आहेत. पर्यटकांसह निसर्गप्रेमींसाठी व्याघ्र प्रकल्पातील सुविधा त्या भागातील नैसर्गिक सुविधांचा आनंद लुटण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री म्हणजे पर्वतरांगांचा प्रदेश. तेथेच कोयना राष्ट्रीय व चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दोन्हीमध्ये सह्यादी व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्यादी व्याघ्र प्रकल्प अशी रचना झाली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा या भागात ओघ वाढला आहे. चांदोली आणि कोयनाचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाल्यामुळे अधिक संरक्षित आहे. सह्याद्री म्हणजे विदर्भाबाहेरील मान्यता मिळालेला राज्यातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट, ताडोबा, अंधारी-पेंच प्रकल्पांनंतरचा सह्याद्री चौथा प्रकल्प आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे ७५० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होतो आहे. या भागातील वाघांची संख्या लक्षात घेऊन तेथे व्याघ्र प्रकल्प झाला आहे. त्यासाठी शेजारील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विस्तारलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरालाही सामावून घेतले आहे. वाघांबरोबरच तेथे असणाऱ्या गवा, चितळ, सांबर व हरिण प्राण्यांनाही संरक्षण मिळाले आहे. २००७ च्या वन्यप्राण्यांच्या गणनेत कोल्हापूर विभागातील कोयनेत दोन, चांदोलीत तीन, तर राधानगरी परिसरात चार असे एकूण नऊ वाघ आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या चाळीसवर होती, ती आता वाढत जाऊन ७५ पर्यंत पोचल्याची नोंद आहे. जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्न साखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम होते. त्यामुळे येथे पर्यटनासही चांगला वाव मिळाला आहे. पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच निरोगी श्वासही मिळतो. व्याघ्र प्रकल्पात मोठी जैवविविधता आहे. दुर्गम, उतार असलेले डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल असे व्याघ्र प्रकल्पाचे स्वरूप आहे. जंगलात जवळपास ४५०० प्रजातींच्या वनस्पती असल्याचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणलोट क्षेत्र आहेत. झरे, धबधबे आहेत. नद्यांचा उगम येथूनच आहे. नद्यांवर धरणाची निर्मिती याच भागात आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौरस किलोमीटर व कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौरस किलोमीटरचे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित आहे. वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरिण, बिबटे प्राणीही येथे आहेत. त्यातील अनेक प्राणी दिसतातही. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरीच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये दुर्मीळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. कोयना प्रकल्पासह आठ मध्यम पाटबंधारे प्रकल्प, आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनऊर्जा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटणच्या पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाबरोबरच पवनऊर्जा प्रकल्पाने पाटण तालुक्‍याला जगाच्या नकाशावर नेले. वनकुसवडे, सडावाघापूर व वाल्मीक पठारावर जेथे कुसळही उगवत नव्हते अशा जांभ्या पठारावर देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी कोट्यावधींची गुंतवणूक करून एक हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रकल्पाने दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे पोचले व ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळाली. त्याचाही पर्यटनासाठी विशेष उपयोग झाला आहे.
    व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर बाजूला प्रतापगड व दक्षिण टोकाला आंबा म्हणजेच विशाळगड आहे. दोन्ही ऐतिहासिक किल्ल्यांच्या मधे साकारणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला निसर्गाची मोठी देणगीच मिळालेली आहे. त्याचा विचार करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्या भागाची जागतिक वारसास्थळ म्हणून घोषणा झाल्यामुळे या भागातील पर्यटन विकासाला गती आली. व्याघ्र प्रकल्पातील धबधब्यापासून किल्ल्यांवरील पर्यटनास चालना देणाऱ्या अनेक गोष्टी येथे विकसित होत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील डोंगरावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अभ्यासकांची गर्दी असते. पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तेथे नेहमीच येतात. इतर वेळी मृतप्राय झालेली पठारे पावसाळ्यात जिवंत होतात, हेच भागाचे वैशिष्ट्य आहे. पवनचक्‍क्‍यांचा तालुका म्हणूनही परिसराची ख्याती सर्वदूर आहे. त्यामुळे पवनचक्‍क्‍यांचे स्थळ असलेल्या वनकुसवडे पठारावरही पर्यटकांची विशेष गर्दी असते. तो भागही पर्यटनाच्या सुविधेत आणला गेला आहे. त्याशिवाय खासगी कंपन्यांकडूनही येथे सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाणेल येथे टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था खासगी संस्थेकडून केली आहे.
      मणदूर-जाधववाडी येथे चांदोलीचे रिसॉर्ट आहेत. व्याघ्र प्रकल्पात कोयना शिवसागर जलाशय व चांदोली, वसंत सागर महत्त्वाची दोन धरण आहेत. त्याच्या जलाशयात बोटिंगची सुविधा करणार आहेत. ते काम सुरत यंत्रणेच्या परवानगीनंतर सुरू होणार आहे.
    व्याघ्र प्रकल्पात काय पहाल
किल्ले : महिमागड (रघुवीर घाटात), वासोटा, पालीचा किल्ला, जंगली जयगड, भैरवगड, प्रचितीगड.
डोंगरावरील मंदिरे : उत्तरेश्वर, पर्वत, चकदेव, नागेश्वर, उदगीर
धबधबे : ओझर्डे धबधबा, कंदार डोह
जंगल भ्रमंती वाटा : मेट इंदोली ते वासोटा, नवजा ते जंगली जयगड, कोठावळे ते भैरवनगड, पानेरी ते पांढरपाणी, झोळंबीचा सडा, खुंदलापूर ते झोळंबी, चांदोली ते धरण निवळे.

आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प

पाटण तालुका म्हंटल कि निसर्ग सौंदर्याचे नवे दालनच पर्यटकांना डोळ्यासमोर दिसू लागले आहे. अफाट पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा भव्य पवनऊर्जा प्रकल्प निसर्गाच्या उंच शिखरावर डोलाने आपली पाती फिरवत उभा आहे. कोणतेही पिक अथवा गवत न उगवणाऱ्या पठारावरील सरासरी १ हजार एकर जमिनीमध्ये २ हजार पवनचक्कीची पाती , १२५० कि.व‌ॅट क्षमतेच्या वाऱ्याच्या जोरावर फिरत असून यापासून १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे . या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी सहभाग घेतला असून हजारो हेक्टर परिसरातील डोंगर कपारीत आदिवाशी जीवन जगणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. पवनऊर्जा कंपनीच्या माध्यमातून येथे दळणवळणाच्या सोयीसह येथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा मोफत पुरवली जाते. पाटणमधून सहज नजरेस पडणारा पवनऊर्जा प्रकल्प पाटणपासून काही अंतरावर आहे. एकदा या प्रकल्पाच्या सानिध्यात गेले कि पाचगणीच्या टेबललँडलाही मागे टाकणाऱ्या या वनकुसवडे पठारावरून सह्याद्री पर्वताच्या अफार पसरलेल्या पर्वतरांगांसह शिवसागर जलाशयाचा नजराना पर्यटकांच्या नजरेस येतो . तर पवनचक्कीच्या पात्याआड सूर्योदय व सूर्यास्त पाहताना खरोखरच नवीन काही तरी पाहिल्याचा आनंद येथे जाणवतो .प्रदूषण मुक्त असणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पाने जागतिक पर्यावरणामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.
 सडावाघापूर आणि वनकुसवडे 
पाटण तालुक्यातील दोन महत्त्वाचे आणि आशिया खंडात प्रसिद्ध असणारे विज प्रकल्प आहेत. एक आहे कोयनेचा भूमिगत विज प्रकल्प आणि दुसरा आहे वनकुसवडेचा पवनऊर्जा प्रकल्प. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या पश्चिम-उत्तर सह््याद्री पर्वताच्या वनकुसवडे पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर सडावाघापूर येथेही पवनचक्कीचे जाळे मोठ्या प्रमाणाच विणले आहे. पवनचक्की भलेमोठे फिरणारे पाते जवळून पाहताना काळजात धस्स होते. १ हजार एकरमध्ये दोन हजार पवनचक्कीची पाती १२५० कि.वॅटच्या क्षमतेने वाºयाच्या जोरावर फिरतात. यापासून १००० मेगावॅट विजनिर्मिती होत आहे. पठारावर उंच पण, जमिनीला टेकतील अशा छपरांची घरे आपल्याला पाहयला मिळतात. दुरून ही घरे छोटी आणि खुजी दिसत असली तरी एखाद्याा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घराचा आवाका आतून खूप मोठा असल्याचे लक्षात येते. घरामध्ये सुमारे १० जनावरे बांधली जातील इतका मोठा गोठा, त्याच्या सहा-सात खोल्या असतात. तसेच धान्य ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची जमिनीमध्ये जागा तयार केलेली असते. पवनऊर्जा प्रकल्पामुळे या गावांमध्ये हळुहळु विकास होत आहे. या दोन्ही डोंगरावरून समोर पाहिले असता पाटण शहराचे विहंगम चित्र डोळ्यांसमोर दिसते. वळवळणाचे मार्ग कापत वाहत जाणाºया केरा व कोयना या नद्याा, तसेच त्यांचा संगम, चोहो बाजूंनी पसरलेला सह््याद्री, अवघड असणारा घाटरस्ता, वेगाने वाहणारे वारे, परिसरात पसलेली लाल माती, छोटीछोटी काटेरी करवंदांची झाडे, प्रचंड मोठी दरी, दरीमध्ये वसलेली गावे आदी ठिकाणी सुखावून जाणारी आहेत. पवनचक्कीच्या पात्याआड सुर्योय किंवा सुर्यास्त पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. तसेच पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी आणि डोंगरमाथ्यावर प्रचंड वेगात वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी उलटे धबधबे पाहायला मिळतात.
 के.टू.पाँईट ( काठी अवसरी )
हिमालय पर्वतासारखे पसरलेले काठी अवसरी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगा , यामधून वाकडे-तिकडे साद घालणारे कोयना धरण , शिवसागर जलाशयातील अथांग पसरलेले पाणी , या पाण्यात सह्याद्री पर्वतावर हिरवेगार डोलणारे कोयना अभयारण्याचे प्रतिबिंब म्हणजे हिमालय पर्वतातील काश्मिरच होय. काठी अवसरी के.टू. पाँईटकडे जाताना सह्याद्री पर्वतावर पसरलेला आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्पाच्या पंख्यांचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष घोंगावणारा वारा येथे अनुभवता येतो .


 के.टू. पाँईटवरून शिवसागर जालाशयाबरोबर दिसणारा हिरव्यागार घनदाट जंगलातील निसर्गरम्य परिसरातील डोंगरामागे सायंकाळच्या वेळेला लपणारा सूर्य पाहताना स्वर्गाहूनही सुंदर हि भूमी वाटल्याशिवाय राहणार नाही. या के.टू. पाँईटवरून शिवसागर जलाशयापर्यंत पर्यटकांना उतरण्यासाठी रोपवे साकारण्याची संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आहे. येथून पर्यटकांना शिवसागर जलाशयातून लाँचने तापोळावरून महाबळेश्वरला जाता येणार आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस बांधण्यात आले असून के.टू. पाँईट पाटणपासून ३० कि.मी. अंतरावर तर कोयनानगरपासून लाँचने १२ कि.मी. अंतरावर येते . 

हुंबरळी पॅगोडा

कोयनानगरपासून केवळ २ कि.मी.अंतरावर उंच ठिकाणी हुंबरळी येथे हा पॅगोडा आहे .पॅगोडापासून कोयना धरणाचा विलोभणीय ठेवा पर्यटकांना नजरेस येतो .
.त्यातच आजुबाजूच्या हिरव्या घनदाट जंगलांनी कोयना धरणाचे दृश्य आणखीनच विलोभनीय झाले आहे. प्यागोडाजवळच महाराष्ट्र टूरिझमचे कोयना लेक रिसोर्ट ,विन्डशाली रिसोर्ट, खास पर्यटकांसाठीच आहेत . 

रामबाण तीर्थक्षेत्र

निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यात पुण्यातीर्थ लाभलेली आहेत . हे पर्यटकांचे भाग्याच म्हणावे लागेल . ओझर्डे धबधब्यापासून केवळ अडीच ते तीन कि.मी. अंतरावर रामबाण तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी श्रीराम , सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी भटकंती करत होते. त्यावेळी ते नवजा जंगलात पोहचले . चालून-चालून थकलेल्या सीतेला वाटेत तहान लागली . यावेळी सीतेने श्रीरामांकडे पाणी पिण्यासाठी हट्ट धरला . या घनदाट जंगलात कोठे पाण्याचा माग लागत नव्हता . अशावेळी श्रीरामांनी जंगलातील एका मोठ्या दगडावर बाणाचा प्रहार केला . त्यावेळी त्या दगडातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला . सीता आणि लक्ष्मणाने प्रसन्न होऊन या पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि तेथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात केली . अशी रामायण काळातील दंतकथा रामबाण तीर्थाविषयी सांगितली जाते. आजही हा रामबाण तीर्थ असणारा पवित्र दगड नवजाच्या जंगलात पर्यटकांना पहावयास मिळतो. याठिकाणी रामनवमीला गावकरी उत्सव साजरा करतात.या उंच दगडात बाणाच्या प्रहराप्रमाणे आकार असून या बाणातून सहज ग्लासने पाणी काढता येते . येथील वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या अवतीभोवती कोणताही पाण्यासाठी पाझर नाही , अथवा पाण्याच्या समांतर रेषेवर जमिनीचा आधार नाही. उभ्या असलेल्या दगडावर जमिनीपासून ६ फुटाच्या अंतरावर या दगडात बारा महिने थंडगार पाणी असते . हे पाणी येथे येणारे पर्यटक व रामभक्त भक्तिभावाने रामबाण तीर्थ म्हणून प्राशन करतात. 



अगदी किर्रर्र अश्या जंगलात असलेली ही ऐतिहासिक शिळा जिचा संदर्भ रामायणशी जोडला जातो...
@कोयनेच्या_जंगलातून
https://www.facebook.com/aaplapatan/

हेळवाकची रामघळ :-

हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
Bhairavgad 7
एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
Bhairavgad 8
या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. रामघळीच्या माथ्यावरुन पावसाळी धबधबा पडतो.
Bhairavgad 9
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
Bhairavgad 10
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
 कोयनानगर येथे रहाण्याची सोयः-
१) कोयना लेक रिसॉर्ट:-  कराड शहरापासून सुमारे  55 कि.मी. अंतरावर असलेल्या आणि ज्यांना नियमित रीतीच्या कामापासून रगाड्यापासून दूर होउन रीफ्रेश व्हायचे आहे त्याना कोयना लेक रिसॉर्ट हा उत्तम पर्याय आहे . कोयना लेक रिसॉर्टमध्ये तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक वातावरण मिळेल. कोयना लेक रिसॉर्टमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवण उपलब्ध आहे. कुटूंबासाठी योग्य सूट मिळेल. आपले मनोरंजन करण्याच्या बर्‍याच गोष्टी आहेत. आपण शेतात फिरू शकता आणि त्यांची लागवड होणारी पिके पाहू शकता, गोफणीने दगड फेकू शकता किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकत बसू शकता. कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प हे मुख्य आकर्षण आहे. कोयना लेक रिसॉर्ट हूंबर्ली (कोयनानगर) च्या टेकडीवर आहे आणि ती जागा समुद्रसपाटीपासून 3200 फूट आहे आणि सर्व ऋतूंमध्ये हवामान थंड,आणि सुखद असते. विशेषत: पौर्णिमेची रात्र असताना आपण या ठिकाणी भेट दिली पाहिजे.
    यात 1 बंगला, 2 फॅमिली स्वीट्स आणि सुमारे 20 कॉटेज (एसी किंवा नॉन एसी) आहेत आणि दर रू. - ९०० - २०००/-. हा पूर्वीचा एमटीडीसी रिसॉर्ट होता, आता तो सांगली येथील साठे एंटरप्रायजेसच्या खासगी फर्मकडून चालविला जातो.
कोयना लेक रिसॉर्टकोयनागर. (जि. सातारा)
एच.ओ. साठे एंटरप्रायजेस, सांगली
फोनः - 0233-2374668 / 2381610
फॅक्स: - 0233-2322957 / 2381610
मोबाईल: - 9922112803
मोबाईल: - 9850573452
बुकिंगसाठी, भेट द्या - http://koynalakeresort.com/
२) गुरसाळे रिसॉर्ट
कोयना नगर हिल स्टेशन, हुब्राली, ता .: पाटण
दूरध्वनी: 02372 284501
बुकिंग कॉन्टॅक्टसाठी
दूरध्वनी: 02164 226007, 226207, मॉब: 94220 39646, 94224 01907
३) हॉटेल श्रुती लेक व्ह्यू - 9421212933
४) निसर्ग यात्री, हुंबर्ली, कोयनागर (रमेश देसाई) मोबाइल: - 9420631366/9420462366/9423319066 

Accommodation -

Koyna Lake Resort 

Located about 55kms away from City of Karad Spread over 6.5 acres and very scenic location, Koyana lake Resort provides a perfect family getaway for those who want refreshing holidays, away from their routine work. At Koyana lake Resort, you will find typical natural environment. Koyana lake Resort specializes itself in Vegetarian and non-vegetarian Food. Suites perfect for all family sizes. There are lots of things to entertain you. You can roam around on the farm and look at the crops that they grow, relax in hammocks or just sit listening to chirping music of birds. The major attraction is koyna dam & hydroelectric project. Koyana Lake Resort is situated on the hill top of Humabarli ( Koyananagar) and the site is 3200ft.above sea level and the weather is cool, misty and pleasant in all seasons. Especially, you should visit this place when there is full moon night.
It has 1 Bungalow, 2 Family suites and around 20 cottages (AC or Non AC) and tariff is between Rs. 900 - 2000. It was erstwhile MTDC Resort, now managed by a Private Firm - Sathe Enterprises from Sangli.
Koyna Lake ResortKoyna nagar. (Dist. Satara)
H.O. Sathe Enterprises, Sangli
Ph:- 0233-2374668 / 2381610
Fax :- 0233-2322957 / 2381610
Mob:- 9922112803
Mob:- 9850573452
For booking, visit - http://koynalakeresort.com/
There are other small resorts/home stays available for stay enroute Koyna Nagar - Humbarli with decent accommodation and excellent views. 
Gursale Resort
Koyana Nagar Hill Station, Hubrali,  Tal : Patan
Tel : 02372 284501
For Booking Contact
Tel : 02164 226007, 226207, Mob : 94220 39646, 94224 01907
Hotel Shrushti Lake view - 9421212933
NISARG YATRI RESORT HUNBARALI KOYNANAGAR (RAMESH DESAI) MOBILE:- 9420631366/9420462366/9423319066 
वाल्मिकी पठार ढेबेवाडी
ढेबेवाडीनजिक पाटण तालुक्यातला वाल्मिकी पठाराचा हा परिसर. कराडहून वाल्मिकी ५० किमी आहे. कराड, ढेबेवाडी, सणबुर, पाणेरी, वाल्मिकी असा गाडी रस्ता आहे. सणबुरच्या पुढे प्रसिद्ध नाईकबा देवस्थान आहे. चांदोली अभयारण्याच्या बफर झोनमध्ये हा भाग येतो. वाल्मिकी विस्तीर्ण पठारावर आहे. त्याच्यावर अजून १०० मीटर चढाई केली की विस्तीर्ण सडे नि पवनचक्क्यांच जाळं पाहायला मिळत. आता तर पवनचक्या, सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या चेकपोस्ट जवळ आपल्या स्वागताला उभ्या आहेत. 
सह्याद्रीच्या कुशीत वाल्मिक पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. वाल्मिक ऋषींची तपोभूमी वांग नदीचे उगमस्थान असून जवळच नाईकबाबा हे धार्मिक ठिकाण आहे. याठिकाणी प्रत्येकवर्षी मोठी यात्रा भरते.  याशिवाय एक आठवडाभर रामनाम जप, हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.  याचठिकाणी वाल्या कोळ्याने जप करून वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले, अशी आख्यायिका आहे.  तसेच वांग नदीचा उगमही येथे झाला आहे. हे सर्व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक ठिकाणचे पर्यटक येथे मोठी गर्दी करतात.कराड ढेबेवाडी मार्गे या ठिकाणी जाता येते तसेच मोरगिरी-पाचगणी मार्गे ही जाऊ शकतो. 




नाईकबा
निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेला सातारा जिल्ह्यातील. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कडेकपारीत वसलेला पाटण तालुका.डोंगराच्या माथ्याव, मध्याव आणि  पायथ्याशी गर्द हिरव्यागार जंगलझाडीत विखुरलेली गावे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना आणि तिच्या उपनद्यांच्या दुतर्फा काठांवर वसलेली गांव.कोयना धरण परिसर , अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवज  पावसाचे आगर ,ओझर्डे धबधबा, रिव्हर्स धबधबा अशी अनेकाविध प्रेक्षणिक पर्यटनस्थळे  पाटण तालुक्यात आहेत.त्यापैकीच वाल्मिक पठार, दिवशी घाट,वांगमराठवाडी व महिंद धरणं, भोसगांव फुलपाखरु निसर्ग पर्यटन केंद्र आणि ढेेेवाडी वन विभागातील  ओहळ ओढे, धबधबे,  पशुपक्षी, वृक्षसंपदा आणि पठारावरील रानफुलांचा रंगिबेरंगी फुलोत्सव अशा सौंदर्य स्थळांनी समृद्ध असलेला ढेबेवाडी परिसर...याच भागात महाराष्ट्र व कर्नाटकातील समस्त जनांचे लाखो कुटूंबियांचे श्रध्दास्थान  शक्ती भक्तीचे कुलदैवत असणारे श्री नाईकबा देवस्थान वांग नदीच्या परिसरात डोंगरावर आहे.श्री नाईकबा देवाचे मंदिर बनपुरी गावातील डोंगरावर असून घाटरस्त्याचा मार्ग आहे.असून जानुगडेवाडी येथूनही मंदिराकडे पायी चालत जाता येते.
यात्रेच्या वेळी लाखो भाविक श्री नाईकबाच्या देवदर्शनाला मनोभावे येतात.सगळे भाविक गुलाल-खोबऱ्याचं उधळण केल्याने अवघे पठार गुलालाने माखते. भाविक गुलाल खोबरे व नैवेद्य देवाला वाहतात.एकमेकांना आनंदाने कपाळी आनंद गुलाल लावतात.सजवलेल्या सासनकाठ्या नाचवत गावोगावीचे भाविक येतात.हलगीघुमक्याचा आवाज निनादत असतो .श्री नाईकबाच्या नावानं चांगभलं असा गजर , नामस्मरण सुरू असतं.घराला समृद्धी लाभावी.सगळ्यांना सुखसमाधान लाभावे.घरात आनंदी आनंद नांदावा म्हणून भक्तीचा सागर देवदर्शनाला येतो...
       नाईकबाकडे घाटरस्त्याने आपण पठारावर येतो.. अवाढव्य पवनचक्क्यां नजर वेधतात.पायथ्यावरुन इवल्याशा दिसणाऱ्या पवनचक्क्या प्रत्यक्ष बघताना अजस्त्र आकारात दिसतात.त्यांचा टॉवर आणि वाऱ्याच्या वेगानं फिरणारी पाती जवळून पाहु शकतो.दुचाकी आणि चारचाकी गाड्या जागी पार्क करण्यासाठी व्यवस्था आहे. देवदर्शनाला निघालो कि देवाच्या अगाध लीलांची अवीट गोडवा गाणारी गाणी ऐकायला मिळतात. दुतर्फा अनेकविध दुकाने आहेत..प्रसाद,खाऊ घेण्याची आरोळी ऐकायला येतात.नवीन प्रशस्त मंदिराचे बांधकाम सध्या सुरु आहे.मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत.डोंगराचा राजा नाईकबा असं भारदस्त तेजःपुंज मुर्तीच मुखवट्याचे  रुप  दिसतं.नाईकबा भगवान शंकराचा अवतार मानला जातो.

 तळबीड : 
शिवाजीराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे हे जन्मगाव आहे. या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे स्मारक झाले आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे. हे ठिकाण पुणे- कोल्हापूर रस्त्याच्या पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर आहे. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी सोयराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. छत्रपती राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाई या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. ताराराणीबाईसाहेबांनी संताजी-धनाजी यांच्या साहाय्याने औरंगजेबाशी जो लढा दिला, त्याला इतिहासात तोड नाही.
हम्बीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.
हम्बीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी साम्भाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील सम्भाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. सम्भाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.
   स्वराज्याच्या स्थापनेवेळी सम्भाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे सम्भाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.
  यातील सम्भाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हम्बीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हम्बिरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हम्बीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
   महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हम्बीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हम्बीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.
  ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हम्बीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हम्बीररावांचे मोठे योगदान आहे.
   छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हम्बीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हम्बीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हम्बीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मन्दिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हम्बीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हम्बीरराव मोहित्यांची नसून हम्बीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परन्तु जनमानसात असा समज आहे की ती तलवार 'सरसेनापती हम्बीरराव मोहिते' यांची आहे.)
   हुसेनखानाला कैद  करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हम्बीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानन्तर महाराजांना आपले बन्धू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले सम्बन्ध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हम्बीरराव मात्र नन्तर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानन्तर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हम्बीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.
    मोहिते घराण्याच्या इतिहासाला ज्ञात असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते .
शम्भूराजेंच्या पाठीशी खम्बीर मामा हम्बीरमामा :-
   शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर सम्भाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच सम्भाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हम्बीररावांनाही मिळाले होते. हम्बीररावांनी सम्भाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
     सम्भाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हम्बीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचण्ड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हम्बीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हम्बीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हम्बीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे सम्भाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हम्बीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हम्बीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हम्बीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हम्बीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु हम्बीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.
    या हम्बीरराव मोहिते यांची समाधी कऱ्हाड तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.


याच एतिहासिक तळबीड गावात अलीकडेच एक नवीन आकर्षण निर्माण झाले आहे, ते म्हणजे श्रीराम मंदीर.सोनेरी कळस आणि संगमरवरी फरश्या, सभोवताली सुंदर बगीचा यामुळे अतिशय आकर्षक असलेले हे श्रीराम मंदीर तळबीड भेटीत आवर्जुन बघावे.तळबीड गावाच्या पार्श्वभुमीवर एखाद्या पाठीराख्यासारखा वसंतगड उभा आहे.तर तळबीड गावात प्रवेश करताना मुख्य चौकात एका बाजुला सरसेनापती हंबीरराव मोहीतेंची समाधी तर एका बाजुला श्रीराम मंदीर आहे.

वसंतगड
   या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने ११व्या शतकात केली. इ. स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड ताब्यात घेतला. किल्ला त्या वेळी मसूरचे आदिलशहाचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांच्या ताब्यात होता. याच महादजीला आठ-दहा वर्षांचा मुलगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या मुलाला आपल्यापाशी सांभाळले होते. पुढे जिंजीहून परत येताना छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इ. स. १७००मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले; पण इ. स. १७०८मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांच्या तोफांच्या भडिमाराने भग्न झाले आहे. गडावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. गडाच्या मध्यभागी चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बांधणीचे आहे. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. कोयना तळे व कृष्णा तळे अशी दोन तळी येथे आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारही बाजूंना चार बुरुज आहेत. पुणे-कोल्हापूर हमरस्त्यावरून हा किल्ला पश्चिमेला दिसतो. किल्ल्याच्या पूर्वेस तळबीड आहे.

सदाशिवगड
    कराड शहराच्या पूर्वेला सहा किलोमीटरवर हा किल्ला आहे. गडावर असलेल्या शिवशंभू महादेवाच्या मंदिरामुळे या गडालासुद्धा सदाशिवगड असे नाव पडले. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर व गणेश यांच्या मिश्र धातूंच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असून, याचे क्षेत्रफळ २३ एकर एवढे आहे. वाट बांधीव पायऱ्यांची असून, सुमारे एक हजार पायऱ्या आहेत. हा किल्ला अफझलखानाच्या वधानंतर (१० नोव्हेंबर १६५९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. कराडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटाकडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी महाराजांनी याचा उपयोग केला. किल्ल्याचे क्षेत्र मोठे असले, तरी आता कोणतेही अवशेष नाहीत. येथे महादेवाचे मंदिर आहे.


कराड : 

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेले कराड हे शहर कृष्णा व कोयना या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. कराडचा उल्लेख सातवाहन काळापासून विविध राजसत्तांच्या कालखंडात आलेला आहे. 
ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे .दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहामनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.    
      महाभारतातिल उल्लेखानुसार कराड ही युधिष्टीराच्या राजसुय यद्याच्या वेळी दक्षिण दिग्विजयात सहदेवाने जिंकलेले एक नगर होते .
तिमिड्गल स च नृपं वशे कृतवा महामति : 
एकपादाश्च पुरुषान्केरलान्धन् वासीन् : !!७१!!
नगरी स जयन्तो च पाषण्ड करहाटकाम्
दूतैरेव वशे चक्रे करं चैनान्दपायत् !!७२!!
( महाभारत सभापर्व ३१.७० )
अर्थ– त्या बुद्धिमान सहदेवाने तिमिड्गल यास वश् करून ?एकपाद केरल, वनवासी ही लोक नगरी संजायन्ती व ज्यात पाखण्डवादी लोक आहेत असे करहाटक (कश्व्हाड) ही (आपल्या) दूतांकडूनच ताब्यात आणले व त्याजकडून कर वसूल केला.
    या स्थानाला अनेक पौराणिक संदर्भ लाभले आहेत. स्थानमाहात्म्य या उपलब्ध ग्रंथात या परिसरातील तीर्थक्षेत्राचे वर्णन केले आहे . या स्थानाच्या नावाबाबत करहटक , करहाकड , करहाट असे अनेक उल्लेख मिळतात. ल्युडर्स यांच्या मते यापैकी “करहकट” हे प्राचीनतम नाव असून उत्तरकालीन सर्व नावे त्याचीच अपभ्रष्ट रुपे आहेत
 (सिद्धेश्वर शास्त्री चित्राव , प्राचीन भारतीय स्थळकोश, पृ.३७५) 
या नावाची व्यत्पत्ती देताना कराह (कऱ्हा) + आहार = कऱ्हा नदीच्या काठचा आहार म्हणजे प्रांत अशी सांभाव्यता मानणाराही एक मतप्रवाह आहे
( एम.ए.डिसळकर, सदविचार वर्ष ६ ,३ डिसेंबर १९२७ पृ. क्र. १४१)
     कराडचे प्राचीन उल्लेख थेट सातवाहन कालापासूनचे आहेत. आज कराड शहरात असलेला भुईकोटाच्या सर्वात खालच्या थरात सातवाहनकालीन अवशेष मिळत आलेले आहेत.जेव्हा जेव्हा कोयना नदीला पुर येई तेव्हा भुईकोटाच्या टेकडीखालचा थर उघडा पडून सातवाहन कालीन दागिने,मुर्ती वहात आलेल्या सापडल्या आहेत. 
राष्ट्रकुट, चालुक्य आणि शिलाहार या राजसत्तांच्या अमलाखाली कराड राहिले होते. आक्रमक आदिलशाहीच्या कालखंडात काहीकाळ कराडचे नाव ' कलहराबाद ' असे असल्याचे उल्लेख मिळतात. शिवपूर्वकाळात 'पुणे प्रांत' व 'क-हाड प्रांत' हे दोन्ही विभाग शाहजीराजें यांच्या जहागीरीचा प्रदेश होता. इ. स. १६३८ - ३९ मधे शाहजी महाराजांनी आदिलशाहीतील सरदार रणदुल्लाखानासोबत केलेल्या पराक्रमासाठी कराड प्रांतातील २२ गावांची जहागीरी आदिलशाहने दिली होती. या प्रांतामधील मसूरचे जगदाळे व यादव यांच्या मधे अधिकाराचा संघर्ष इतिहासाने पाहिला आहे. छ. शिवाजी महाराजांनी इ. स. १६५९ च्या प्रतापगड रणसंग्रामानंतर पन्हाळ्यापर्यंतचे किल्ले व मुलूख स्वराज्यात दाखल केला. कराड परिसरातील वसंतगड, सदाशिवगड इत्यादी किल्ले देखील परकीय अमलातून मुक्त होऊन स्वराज्याचा भाग झाल्याने रयतेने आणि सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी मोकळा श्वास घेतला.
    कराड हे चिपळूण-पंढरपूर-विजापूर या नवीन जाहीर झालेल्या महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे.शिक्षण संस्थांचा विचार केला तर इथे काय नाही ? वैद्यकीय, अभियांत्रिकी, कॉमर्स, व्यवस्थापन इत्यादी शिक्षणाची सोय आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत १९५४ साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्थापन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च् शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हे महाविद्यालय सुरु करण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविध्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय्,शासकीय कृषी महाविद्यालय आहेतच्,पण अभियांत्रिकी ज्ञान देणार्‍या खाजगी संस्थाही आहेत.
  कराड परिसरात औद्योगिक वसाहतही आहेत. तसेच व्यापाराच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे ठिकाण आहे. किल्ले सदाशिवगडाच्या पायथ्याला भुकंप संशोधक केंद्र उभारले जात.भुकंपावर जागतिक दर्जाचे संशोधन इथे केले जाईल.
      कराड येथेही कृष्णबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. कराडला लागूनच ‘मलकापूर’ नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. कृष्णा मेडिकल चॅरिटेबल ही संस्था मेडिकल कॉलेज व आधुनिक पद्धतीचे उपचार यांसाठी या भागात प्रसिद्ध आहे. कराड येथे छोटा विमानतळही बांधण्यात आला आहे. तो प्रवासी वाहतुकीला उपलब्ध नाही.त्याठिकाणी विमानाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
२०१३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे आहेत.
महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे सुमारे २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
कराड दक्षिणचे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे भूषवली आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाबाई यांनी महत्त्वाची राजकीय पदे भूषवली आहेत.
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराडचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
कराड राजकीय , सांस्कृतिक , आर्थिक, ऐतिहासिक , औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत आहे. तसेच येथील लोकांना कृष्णाकाठचे लोक म्हणूनही संबोधले वा ओळखले जाते. कराड ला लाभलेल्या सुंदर वारस्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कराड नावाजलेले व प्रगत आहे. कृष्णाकाठची माणस प्रेमळ व सुस्वभावी आहेत. तसेच येथील कर्तबगार थोर व्यक्तिमत्वांमुळे कराड कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दिसून येते.कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभला आहे. 
        कराड, कोरेगाव, सातारा, रहिमतपूर ही ठिकाणे रेल्वे व रस्त्याने जोडलेली आहेत.सध्या पुणे-मिरज-बेंगळुरु लोहमार्ग कराडवरुन जातो.कराड-चिपळूण-जयगड व कराड-इचलकरंजी-बेळगाव हे प्रस्तावित लोहमार्ग आहेत.
भारताचे माजी उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तबगारीने कृष्णाकाठ गाजला.. कराडच्या प्रितीसंगमाने जगाला संवेदनशील भक्तीचा संदेश दिला.. कराड ही मानवतेची कार्यशाळा आहे.. कराड विठ्ठलभक्त जरुर आहे.. त्याचबरोबर कराड ही माणुसकीचा गहीवर आहे.. इथे श्रमाला प्रतिष्ठा आहे.. या कराडने सदा भारतीय संविधानाचा सन्मान केला आहे.. कराड सहिष्णू आहे.. सह्याद्रीच्या शिरपेचातील कराड हा मानाचा तुरा आहे.. इथल्या शिक्षण संस्था.. शाळा काॅलेजीस.. कारखाने.. शेती.. उद्योग धंदे.. इथली धर्मनिरपेक्ष विचारसरणी.. याच सुपिक मातीने छ. शिवबांच्या कृष्णा घोडीच्या टापांचा आवाज ऐकला.. सह्याद्रीच्या कडेकपारीत सामान्य घरात जन्मास आलेल्या राकट कणखर तरुणांनी स्वातंत्र्य चळवळ गाजवली.. लष्करात कराडच्या सुपुत्रांनी पराक्रम केला.. याच कराडने हिमालयाचे रक्षण केले.. सह्याद्रीची शान वाढविले.. यशवंतराव आणि वेणूताईच्या रुपात कराडने दिल्ली दरबाराचे वैभव वाढविले...पृथ्वीराजनी महाराष्ट्राच्या नकाशावर कराडला मानाचे स्थान मिळवून दिले.. सिक्कीमच्या राजभवनात विराजमान झालेले कराड.. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाटीवर कलेक्टर म्हणून मिरवलेले कराड... पांडुरंगाच्या चरणी लीन होणारे कराड.. स्वाभिमान जपणारे कराड.. चव्हाण आणि पाटलांचा कराड.. बारा बलुतेदार अठरा पगड जाती जमातीला एकत्र गुण्यागोविंदाने नांदवणारे कराड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे वैभव आहे.



कराडची खाद्यभ्रमंती :-
    पुणे-बेंगळुरु अशियाइ महामार्ग, गुहागर, विजापुर राष्ट्रीय महामार्ग , कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग यावर कराड शहर वसलेले असल्यामुळे कराड परिसरात मोठ्या प्रमाणात ढाबे,हॉटेल्स आहेत.सातारा जिल्ह्यात महामार्गावर सातारा हे प्रमुख शहर आणि याशिवाय शिरवळ्,उंब्रज,भुइं़,पाचवड अशी गाव असली तरी उत्कृष्ट जेवणाची चव घ्यायची असेल तर कराडला पर्याय नाही.
    तर आपण माहिती घेउया कराड शहर आणि परिसरातील खादाडीच्या ठिकाणांची. 
शाकाहारी पदार्थः-
   खादाडीसाठी प्रसिध्द असलेल्या प्रत्येक गावाची स्वताची अशी स्पेशालिटी असते.जसे कोल्हापुर मिसळ्,पांढरा,ताबंडा रस्सा, पुणे बाकरवडी,पॅटीस्,मुंबई बटाटेवडा वगैरे.कराडचे आदरातिथ्य पुर्ण होते ते आख्खा मसुर खाउनच.वास्तविक हा पदार्थ महाराष्ट्रात इतरत्रही मिळतो.पण इथल्या जमीनीची आणि कृष्णा,कोयनेच्या पाण्याची चव मिसळल्यावर अप्रतिम आख्खा मसुर तयार होतो तो फक्त कराडला.तर मंडळी हा आख्खा मसुर कराड परिसरात बहुतेक ठिकाणी चांगला मिळत असला तरी ऑथेंटीक आख्खा मसुर खायचा असेल तर कराड-चिपळूण रस्त्यावरील पाटण तिकाटण्याजवळच्या शिवराज ढाब्याला पर्याय नाही.आख्खा मसुर बरोबर इथे काजु करी, बैंगण मसाला आणि मडक्यातील दही उत्तम मिळते.शिवराज ढाब्याने आता कराड शहरात आणि इतर शहरातही पार्सल देणारी फ्रँचायजी सुरु केल्या आहेत.
    कराडमधून पुण्याच्या दिशेने निघाले कि तासवडे टोलनाका लागतो.इथे हॉटेल राउ आहे.इथेली स्पेशालिटी म्हणजे मिसळ, झुणका भाकरी . राऊ हाॅटेल वहागावला आहे.राऊ हाॅटेल मध्ये थालीपीठ मिळतात.घाटावर चुलांगण मध्ये भाकरी, पिठलं असे जेवण छान मिळते.इथून काही अंतर पुण्याच्या दिशेने गेल्यास उजवीकडे मसुरमार्गे पंढरपुरला जाणारा फाटा लागतो.याच बाजुला गणेश ढाबा आहे.लक्षात त्या परिसरात अनेक गणेश ढाबे असले तरी कोल्हापुर बाजुच्या रस्त्यावर तोच खरा गणेश ढाबा.इथे काजू करी, कांदा फ्राय, आलू पराठा याची चव नक्कीच घेउन बघा.
कराड शहराच्या बाहेर हॉटेल पंकज हे आपले स्वागत करते.इथेही शाकाहारी थाळी,पंजाबी,मांसाहारी जेवण उत्तम मिळते.शिवाय चेरी ऑन द केक म्हणजे पंकजच्या बाहेर मिळणारे पान. 
   याशिवाय पुणे -बेंगळूरू महामार्गाला लागून हॉटेल सागर्,वारणा, गंधर्व पॅलेस, शाही,तृप्ती अशी आणखी हॉटेल्स आहेत.इथेही उत्तम खाणे मिळते.कोल्हापुर नाक्यावर डॉमिनोजचे आउटलेट आहे.
  आता आपण जीभेची हौस पुरवणार आहोत ती कराड शहरातील भटकंतीत. 
  दत्त चौकात मिसळहाऊस  मिसळीच्या व्हरायटी मस्तच आहेत.दत्त चौकात असलेल्या गजानन रेस्टॉरंटने वर्षानुवर्षे खवय्यांची रसना शमवली आहे.मिसळ आणि साबुदाणा खिचडी हि इथली खासीयत. वडा,पाव तसा कोठेही छान मिळत असला तरी बस स्टँडच्या बाहेर मिळणारा साईनाथ वडा विशेष उत्कृष्ट आहे.गाड्यावर सुरु केलेला हा व्यवसाय आता समोरच दुकानात सुरु झाला आहे.याशिवाय कन्या शाळेसमोर वरद वडापाव,दत्त चौकात साईबाबा मंदिराच्या कोपऱ्यावरचा वडा उत्तम,
 सावळाराम गोल भजी, सुर्याज् चिकन तंदूर, काॅर्नर ढाबा सर्वसाधारण चुलीवरचे जेवण, मंगळवार पेठेतील ज्योतिबा मंदिराजवळ कोल्हापुरी मध्ये कच्ची दाबेलीच्या खूप व्हरायटी आहेत. बॉम्बे (मुंबई)हॉटेल चावडी चौक अंबोळी. कन्या शाळेजवळ गेल्यास आवर्जून खावा असा पदार्थ म्हणजे दावणगिरी लोणी डोसा. हॉटेल मथुरा , शाहू चौक ,बेस मेन्ट ,कराड-- कांदाभजी चटणी (भजी ठीक पण चटणी एकदम सुंदर), अन्नपूर्णा हाॅटेल पनीरचे निरनिराळ्या प्रकारच्या डिशेस, एस. जी. एम समोर तंदूर चहा मस्तच मिळते.   सिंडीकेत बँकेच्या कॉर्नरवर बासुंदी चहा, गुरुवार पेठेत मेन रोडवर कमानी मारुती शेजारी बासुंदी चहा मस्तच मिळतो.
    बहुतेक ठिकाणी असा अनुभव येतो कि बस स्टँडसमोरच्या हॉटेलमध्ये पदार्थाची चव आणि दर्जा यथातथाच असतो.मला स्वतःला तरी फक्त दोन गाव अपवाद मिळाली आहेत.कोल्हापुर आणि कराड.थेट बस स्टँडबाहेर अलंकार हे लॉजिंग आणि बोर्डींग आहे.इथे पंजाबी जेवण उत्तम मिळतेच पण त्यांच्याच आर्यामध्ये गुजराती थाळी देखील छान मिळते.जवळच असलेल्या भाग्यश्री व तृप्तीमध्ये ही जेवण चांगलया चवीचे मिळते. याशिवाय कृष्णा नाक्यावरचे सुर्या हॉटेल, शुक्रवार पेठेतील स्थालीपाक इथेही चांगले जेवण मिळते.
   कराडच्या खाडादीविषयी बोलायचे आणि एका ठिकाणाचा उल्लेख करायचा नाही असे होणार नाही. ते ठिकाण म्हणजे कृष्णा घाट.अर्थात कराडकर त्याचा उल्लेख फक्त घाट असाच करतात.जसे इंदोर त्याच्या खाउगल्लीसाठी प्रसिध्द आहे, तसेच कराडची हि खाउ गल्लीच म्हणावी लागेल.कृष्णा घाट हा दगडी पायर्‍यांचा प्राचीन घाट आहे.जवळच कृष्णाबाई हे नदीला मुर्तीस्वरुपात पुजल जाणारे मंदीर आहे.जवळच श्रीकृष्ण मंदीर, कार्तिकेय मंदीर, काशीविश्वेश्वर मंदीर अशी बरीच मंदीर आहेत.या परिसरात रस्त्याचा जो मोकळा भाग आहे, इथे खाण्याच्या पदार्थाचे गाडे कायमस्वरुपी लावलेले असतात. पाणीपुरी,भेळ्,पावभाजी,आईस्क्रीम, डोस्याचे विवीध प्रकार्,आंबोळी,उकडलेली कणस, सँडविच, कॉफी ते अगदी आईसगोळा असे सर्व पदार्थांचा फन्ना उडवायचा हा कराडकरांचा नित्यक्रम्,दिवसा इथे तुरळक गर्दी असली तरी संध्याकाळ झाली कि हा परिसर गर्दीने फुलून जातो.कृष्णा घाटाच्या पायर्‍यावर बसून नदीवरुन येणार्‍या,सुखावणार्‍या वार्‍याचा झोत घेत हे खाद्यपदार्थ खाणे हा अनेकांचा विरंगुळा आहे.नवख्यांना इथे रोज कोणती जत्रा भरते असा स्वाभाविक प्रश्न पडतो.पण कराडच्या भेटी संध्याकाळी न चुकता भेट द्यावी असे हे ठिकाण.
मासाहारी पदार्थ :-
    कराडला जितकी शाकाहारी पदार्थाची व्हरायटी मिळते तितकेच वैविध्य मासाहारीप्रेमींच्या जीभेचे चोचले पुरवणारी हॉटेल राखून आहेत.  उत्कृष्ट मटण, मटण, कडक भाकरी व यात्रा स्पेशल रस्सा ,अनलिमिटेड, फाइव स्टार ढाबा विमानतळा समोर कराड, भारत ढाबा पातळ भाकरी आणि रस्सा, दख्खन ढाबा खर्डा मटन काळे मटन कलेजा फ्राय, सन्मान हाॅटेल मच्छिचे निरनिराळे प्रकार, पाटिल वस्ताद सुके मटन चिकन, हाॅटेल ग्रीनलँड बार्बेक्यु पदार्थ चिकन मटन निरनिराळ्या प्रकारचे मासे,हाॅटेल रायगड पाचवड फाट्याजवळ सुके मटन रस्सा. खुशबू ढाबा इथे अंडा करी, भाकरी, आवटे आणि सुतार ब्रदर्स, सुके मटण चिकन रस्सा चपाती भाकरी बी राईस मटण चिकन बिर्याणी दम बिर्याणी सर्व उत्कृष्ट मिळते. हॉटेल शिव नॉनव्हेज साठी, रविवार पेठ, कुंभार गल्लीतील आमणे यांचे घरगुती जेवण, मटण ताट.सुनिल पद्माळे, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड. सुके मटण, रस्सा, बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी.


कृष्णा घाट
कृष्णा घाट :-

   या शहराच्या उत्तरेकडे पवित्र अशा कृष्णा-कोयनेचा संगम झाला आहे. यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या उद्यानात एका बाजुला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे तसेच अनेक नवनवीन खेळ बसविण्यात आले आहेत. या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश मिळतो. सर्वात जुने मंदिर रत्नेश्वराचे याच घाटावर आहे. या मंदिरावर मुस्लिम शिल्पकलेप्रमाणे ४ मनोरे व हिदू कलेप्रमाणे कळस या मंदिरावर बघायला मिळतो. कृष्णामाईच्या देवीची यात्रा चैत्र वद्य १ व शेवटच्या श्रावणी सोमवारी भरते.

   प्रीतिसंगम हे उद्यान साडेपाच एकर जागेत आहे. उद्यानाच्या सर्व बाजूंनी भक्कम असे कंपाऊंड करण्यात आलेले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडून समाधीकडे जाण्यासाठी पंधरा फूट रुंदीचा रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा पाच फूट रुंदीचे ‘फ्लॉवर बेड’ तयार करण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंस सिल्व्हर ओकची झाडे लावलेली आहे. रस्त्याच्या दक्षिणेस विस्तीर्ण पटांगणामध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विशिष्ट आकार असणारे गोलाकार, नागमोडी वळणे असलेले रस्ते आहेत. बाकीच्या भागामध्ये विस्तीर्ण अशी हिरवळ तयार करण्यात आली आहे. तेथे झाडे लावताना ती विशिष्ट आकार व विशिष्ट ॠतूत फुलांचा बहार असणारी अशी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरीष, कांचन, बहावा, कौशिया, बॉटल, ब्रश, गुलमोहर, पांगारा, सिंगापूर चेरी, चिचकारी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे आहेत.

उद्यानामध्ये विद्युत प्रकाशाची योजना विशिष्ट प्रकारची करण्यात आली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूला पंतकोटाच्या तिरक्या भागावर निलगिरीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे तो भाग हिरवी भिंत असल्यासारखा भासतो. उतार संपल्यानंतर रिटेनिंग वॉल व उतारामध्ये विविध फुलांची लहान लहान रोपे लावण्यात आली आहेत. बागेच्या विस्तीर्ण जागेमध्ये काही ठिकाणी विशिष्ट आकाराच्या झगमगत्या कांरज्यांची योजना केलेली आहे.

_Pritisangam_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांची समाधी :-

कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. या समाधिस्थानाजवळ एक सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे, तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक जनतेबरोबरच पर्यटक व राजकीय नेतेमंडळींचीही वर्दळ वाढली आहे. 

प्रीतिसंगम

कराड  येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते.    
    शिवछत्रपती महाराजांनी अफजल खानाला ठार मारल्यानंतर विश्रांती न घेत २१ दिवसात १८ किल्ले जिंकले...तेव्हा वाटेल कराडजवळ याच कृष्ण कोयनेच्या संगमावर शिवरायांच्या शिवगंगेने आपली रक्ताने माखलेली हत्यारे धुतली असा इतिहास आहे...!
तेव्हा पासून हा आमचा संगम केवळ संगम न राहता कृष्ण कोयना आणि शिवाजी ( महाराज ) असा त्रिवेणी प्रीती संगम झाला आहे...!
    कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे.उत्तरेहून वाहत येणरी कृष्णा आणि दक्षिणेहून येणरी कोयना.दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातले नाही.पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद आहे असे म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच. महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान आहे.
    पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद. तसं म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच की..महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फ़रक!!  थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वागणारी. ही लहान मुलीसारखी डोंगर-दऱ्यांमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती लवकर पठारावर यायची. तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजे-तवाने करण्याची. 
    तर धाकटी बहिण कोयना म्हणजे महा खोडकर….. डोंगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे…प्रतापगड, मकरंदगड आणि वासोटा. जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण. पण धाकटी असली तरी अंगात जोर फार…अर्ध्या महाराष्ट्राला वीज पुरवते म्हणे ही!
   तर अशा या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी….जबाबदारीने वागणारी कृष्णा तर डांबरट कोयना, ऊसशेती समृध्द करणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना, वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडावरच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना. पण कराडला आल्यावर दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात.
     विशेष म्हणजे या दोन्ही नद्या महाबळेश्वरला एकाच ठिकाणी उगम पावतात्,कृष्णा पुर्वेकडे धावत सुटते, तर कोयना जावळी खोर्‍यात झेप घेउन प्रतापगडाला चरणस्पर्श करीत, पारच्या एतिहासिक पुलाखालून वहात वासोटा, मधुमकरंदगडाची शिखर न्याहाळत, कोयनेच्या धरणात स्वताला बंदीस्त करुन घेते.दोन्ही काठावर घनदाट अभयारण्य फुलवित आणि वन्य प्राण्यांची तहान भागवत स्वताला नवजाजवळ एका अरुंद छिद्रात लोटून देते आणि सह्याद्रीच्या गर्भात उभारलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पाची पाती फिरवत महाराष्ट्रासाठी वीजेची भाग्यलक्ष्मी होते.महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांची तहान व शेताच्या सिंचनाची काळजी लागून ती कोयनानगरला थांबत नाही तर आपली बहीण कृष्णेच्या ओढीने कराडनगरीकडे धावत सुटते.इकडे कृष्णा बलकवडी,धोम अशी धरणात स्वताला बंदीस्त करुन घेते. मात्र पुर्व समुद्राची तीची ओढ गती थांबवत नाही.वाई,माहुली,लिंब अशी तिर्थक्षेत्र पावन करीत ती कराडला पोहचते आणि आपल्या दुरावलेल्या बहिणीशी थेट समोरासमोर गळाभेट घेते आणि अस्तित्वात येतो तो जगातील एकमेवाद्वितीय प्रितीसंगम. विशेष म्हणजे या दोन्ही नद्या महाबळेश्वर ते कराड अगदी सारखे अंतर पार करुन एकमेकीला मिळतात.इथे दोन्ही नद्या मिळताना त्यांच्या पाण्याचा रंग वेगळा दिसतो, मात्र कोयनेचे तुलनेने निळसर पाणी नावाप्रमाणे काळसर असणार्‍या कृष्णेच्या पाण्यात मिसळून जाते आणि पुढे कृष्णा निघते ती टेंभुच्या जलाशयाकडे दुष्काळी भागाची तहान मिटवायला. इथे कॄष्णा कराडनगरीला दक्षिणेकडून पुर्ण वळसा घालून जणु प्रदक्षिणा पुर्ण करते आणि औदुंबर,सांगलीकडे वाहु लागते.दोन्ही नद्यांच्या या प्रवाहामुळे कराडभोवती नद्यांचा ओम सारखा आकार तयार झाला आहे.गुगल मॅपवर हे बघून खात्री करता येईल.

    उत्तर भारतात जे स्थान गंगा-यमुनेला तेच महाराष्ट्रात कृष्ण-कोयनेला… आणि कराड म्हणजे इथले ‘प्रयाग‘. कृष्णेचा किंवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणुस सहसा करत नाही. आपण नेहमी “कृष्ण- कोयना” असेच म्हणतो. उदारणार्थ हे महाराष्ट्रगीत..
   रेवा वरदा, कृष्ण-कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.
किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता..
कशासाठी पोटासाठी
देशासाठी देशासाठी
गंगा आणि गोदेसाठी
कृष्ण-कोयना यांच्यासाठी…
    कराडचा प्रितीसंगम इतका सुंदर आहे की उत्तरालक्ष्मी पासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सगळेच जण याच्या सौंदर्याला भुलले. त्यामुळेच या संगमावर जसे उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे तसेच यशवंतराव चव्हाणांची समाधी पण आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी “राजा शिवछत्रपती” मध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे फार सुरेख वर्णन केले आहे.कृष्णा-कोयनेचा संगम हा पवित्र मानला जातो. प्रीतिसंगमाच्या जवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. तेथील वातावरण शांत असल्यामुळे तेथे संध्याकाळच्या वेळी लोक गर्दी करतात. ते कराडचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.
     या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात याचे शांत आणि कोमल रुप दिसते तर पावसाळ्यात याने खवळलेल्या समुद्रासारखे रौद्र रुप घेतलेले असते.  कधी कराडजवळ आला तर इथले पाणी डोळ्याला लावा.. जीवन सार्थक झाल्याचे समाधान मिळेल.
कराड येथील पंतप्रतिनिधी चा भुईकोट

कराड येथील पंतप्रतिनिधीचा भुईकोट –

    सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर वसलेले पौराणिक इतिहास लाभलेले कऱ्हाड या गावी बहामनी राजवटीत एक प्रचंड मोठा भुईकोट बांधला गेला. कराड येथील भुईकोट किल्ला एकेकाळी कऱ्हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या साधारण वायव्य दिशेकडे सुमारे८४ चौरस मीटर क्षेत्रावर उंच जागी या किल्ल्याचे काही अवशेष(नाममात्र) पहावयास मिळतात. पुढे हा किल्ला थोरल्या शाहु महाराजांच्या काळात प्रतिनिधींच्या ताब्यात आला.
   आज किल्ल्याचे दोन बुरुज कसे तरी आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. तटबंदीचे अवशेष चोहो बाजूला भग्नावस्थेत पहावयास मिळतात किल्ल्यातील प्रतिनिधी वाद पूर्णपणे उध्वस्त झालेला दिसतो
   १९९९ साली प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्हा गॅझेटमध्ये त्याचे स्थूल मानाने वर्णन लिहलेले दिसते.त्यावेळी मुख्य प्रवेशद्वार आणि त्यास घट्ट पकडून ठेवणाऱ्या दोन बुरुजांचे अवशेष बऱ्यापैकी शिल्लक आहे. चौरस आकाराचा हा किल्ला ईशान्यकडे थोडासा पुढे आलेला होता.किल्ल्याला १८ बुरुज होते.दगडमातीच्या प्रचंड तटबंदीला जंग्या होत्या. भोवताली सुमारे २ मीटर खोलीचा खंदक होता.कोयना नदीच्या पात्रापासून १४ ते ३० मीटर उंचीवर हा किल्ला एके काळी भुईकोटांचा जणू राजा दिसावा या थाटात कऱ्हाडचा भूमीवर राज्य करणारा चालुक्य,राष्ट्रकूट, शिलाहार यांच्या वैभवाचे दर्शन घडवीत होता.
    थोरल्या शाहू महाराज यांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला. किल्ल्यातील प्रतिनिधी वाडा म्हणजे मराठकालीन वास्तुशैलीचे एक अप्रतिम उदाहरण होते.वाड्याच्या दक्षिणेस २५×९|| मी.लांब रुंद व ४ मी.उंच असा दरबार हॉल होता.त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानी देवीची छत्री होती.आजही आपणांस ते मंदिर पहावयास मिळते. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे १३ व्या शतकातील असावे असे मानले जाते. दरबाराचा तक्तपोशिवर जाळीदार नक्षीकाम होते.असे म्हटले जाते की,सण १८०० च्या सुमारास परशुराम श्रीनिवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.
  आज किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरेच घरे झालेली दिसतात. त्यामुळे कालांतराने किल्ला येथेच होता का हा प्रश्न अभ्यासकांच्या पुढे उभा राहील.कोयना पात्रालगतची तटबंदी१८७५ च्या महापुरात नष्ट झाली असावी.

नकट्या रावळाची विहीर :- 

किल्ल्यातील बारव-किल्ल्यात एक अप्रतिम अशी पाय विहीर आहे. कराडचा ऐतिहासिक वारसा याच नकट्या रावळाची विहिरीमुळे सोमवार पेठेतील पंताच्या कोट परिसरात टिकून असल्याचे पाहण्यास मिळते. तेथील भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी ती पायविहीर आहे. तिला नकट्या रावळ्याची विहीर असे म्हणतात. बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधलेली ती विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रात असून सुमारे पंचाहत्तर फूट उंचीवर आहे.

 ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला असून विहिरीची लांबी १२०×९० फूट लांबी रुंदीच्या पायऱ्यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो.११×११ चौरस मीटर मुख्य विहीर असून तिच्या ईशान्य बाजूला थोडा गोलाकार भाग दिसतो. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. एकूण८२ पायऱ्या असून प्रत्येक २० पायऱ्या संपल्यावर मोठी पायरी (Landing) थांबण्याची जागा आढळते. पायऱ्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते.विहिरीचे पूर्ण बांधकाम रेखीव अशा चिऱ्यांचे असून ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा ठेवल्या दिसतात. ही विहीर केंद्रीय पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून ठरवली आहे. या विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडत असावेत.कारण तिची खोली कोयनेच्या पात्रा इतकी असावी.अनेक मजल्यांच्या विहिरींचा उपयोग पाणीपुरवठा किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावे असे सातारा जिल्हा गॅझेटिअर म्हणते.

_Pritisangam_2.jpg

विहिरीतील घडीव दगडांच्या प्रशस्त पायर्‍या संपल्यानंतर दोन मोठे दगडी स्तंभ असून त्यावर कमान आहे. कमानीत दोन उपमार्ग आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विहिरीची देखभाल; तसेच, तिची डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला होता. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना 2005 नंतर करत त्या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे त्या परिसरात झाली आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर तिच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर विहिरीसभोवताली भिंती घालण्यात आल्या असून प्रवेशव्दाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे. नकट्या रावळाची विहीर हे नाव तेथील राजाच्या नावावरून पडले असावे असे म्हटले जाते.

ऐतिहासिक मनोरे

भुईकोट किल्ला, पायर्‍याची विहीर हे मध्ययुगीन अवशेष तर आगाशिवची लेणी या प्राचीन कालखंडाच्या खुणा असा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कराडच्या मध्यवर्ती भागात बहामनी कालखंडाची एक खुण आहे.या मनोरे मशिदीबद्दल आता माहिती घेउया.

ऐतिहासिक मनोरे, कराड

कराडची ही मशीद मनोऱ्याची मशीद म्हणून प्रसिद्ध आहे. याला कारण असे की मशिदीच्या तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ दगडी चौथऱ्यावर दोन्ही बाजूस जवळ जवळ 32 मीटर उंचीचे मिनार उभारलेले आहेत.


कराड मधील एक प्रेक्षणीय स्थळ मनोरे. मनोरे म्हणजे एक जुनी दगडी मशीद आहे. कराड शहरात मुस्लिम बांधवाची संख्या मोठी आहे. या मशिदीत रोज अनेक लोक नमाज पढण्यासाठी येतात. हि मशीद विजापूरचा सुलतान अली आदिलशहा पहिला याच्या १५५७ च्या काळात इब्राहिमखान याने उभारली.मशिदीचे बांधकाम दगडी आहे. छताजवळ बाहेरच्या चारही बाजूंना कोरीव नक्षीकाम आहे. मशिदीच्या आतमध्ये दगडी शिल्लालेखावर उर्दू भाषेत कोरलेला काही मजकूर आहे. या मशिदीत असलेल्या शिलालेखांवरून असे समजते की वास्तू हिजरी ९८० (इसवी सन १५७२|७३) ते हिजरी ९८३ (इसवी सन १५७५|७६) या काळात बांधून पूर्ण झाली. ज्या शिलालेखात याच काल उल्लेख आला आहे तो शिलालेख दक्षिणेच्या खांबावर उत्तर बाजूस जमिनीपासून सुमारे ५ फुटांवर आहे. ज्याची लांबीरुंदी १’६ व १’२ आहे या लेखाभोवती नक्षीदार कमान केली आहे. ४ओळींचा असलेला हा फारसी शिलालेखातून अशी माहिती मिळते की ही, इमारत(मशीद) बांधण्याचे काम ‘पहिलवान अली बिन मुहम्मद इसफहानिस  तीरेअंदाज खान’ याकडे सोपवले आहे. त्यांनतर इमारत बांधणीचे वर्ष हिजरी ९८० ते ९८३ असे दिलेले आहे.
   या व्यतिरिक्त मशिदीत अजून फारसी शिलालेख आहेत त्यातील एकावर शहा अली आदिलशाह याचा उल्लेख आला आहे. आणि त्याच्या कारकिर्दीत या इमारतीचा पाया रचला गेला अशीही माहिती आली आहे. याशिवाय इतर जे शिलालेख आहेत त्यात कुराणातील वचने खोदलेली आहेत. येथे लहानमोठे असे एकूण 9 शिलालेख मिळाले आहेत.
   मशिदीच्या आवारात हमामखाना (स्नानगृह) आणि खानिका (सुफीच्या राहण्याची जागा) आहे. मशिदीच्या पुढे नव्याने उभारण्यात आलेल्या मंडपामुळे दर्शनी भाग झाकला गेला आहे. या मशिदीच्या मागे लाकडे महाव्दार असून त्याच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी १०६ फूट उंचीचे दोन गोलाकार मनोरे बांधण्यात आले आहेत. मनोर्‍यांच्या शिखरांवर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जीने बांधण्यात आले आहेत. मनोर्‍यांच्या शिखरावरुन कराडच्या भोवतालचा लांबवरचा परिसर दिसतो. 
संदर्भ
 ऐतिहासिक फारसी साहित्य खंड,१
सातारा गॅझेटिअर
संत सखु मंदीर :-
संत सखूबाईच्या विठ्ठल भक्तीने कृष्णा काठावर विठू नामाचा गजर झाला. एका ब्राह्मण कुटुंबाची सून.. सदानकदा विठ्ठलांच्या ओढीने जीव कासावीस होत असे.. असेच एकदा आषाढी एकादशीला कृष्णा नदीवर सखू पाणी भरायला आली तेवढ्यात विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी जाताना सखूने पाहिले.. दिवस भर राबराब राबून घरकाम करणाऱ्या सखूला कधी एकदा पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेईन असे झाले होते. घरात किंमत नव्हती... शिव्याशाप, मारझोड हे तिच्या पाचवीला पुजलेले... दिंडीत सहभागी झाली.. घरच्यांना कळले.. तिला ओढत फरफटत घरी आणण्यात आले.. दोरीने बांधून घातले.. मारझोड झाली.. उपाशी ठेवण्यात आले.. पण विठ्ठल नामाचा गजर सुरुच ठेवला.. शेवटी साक्षात भगवानाने स्त्री रुप धारण करून सखूची सुटका केली व स्वतः दोरीने बांधून घेतली.. सखू पंढरीत पोहचली.. भजन किर्तनात दंग होऊन तिने तेथेच देह ठेवला.. अंत्यसंस्कार करण्यात आले.. साक्षात भगवंतानी पुन्हा तिच्यात प्राण भरुन तिला जिवंत केले.. घरच्यांना पश्चाताप झाला.. भक्तीचे महात्म्य कळाले.. त्यांचे मतपरिवर्तन झाले.. आणि कराडच्या भूमीने संत मालिकेत संत सखूची भर घातली.. ही घटना कराडमध्ये घडल्याचा इतिहास आहे.. खरी भक्ती आणि त्याची ताकद काय असते हे कराडने जगाला दाखवून दिले..प्रख्यात लेखक प्रा. के. अत्रे यांनी संत सखू हा चित्रपट प्रदर्शित करुन कराडची विठ्ठल भक्ती जगासमोर आणली आहे. संत सखूबाई समाधी व मंदीर हे केवळ कराडचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. 
पि.डी.पाटील उद्यान, यशवंतराव स्मृती सदन (टाउन हॉल ) व वेणुताई स्मृती सदन :-



यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांचे निधन १ जुन १९८३ रोजी झाल्यानंतर चार महिन्यानी यशवंतराव यांनी एक इच्छापत्र लिहीले.त्यात ते म्हणतात 'माझ्या पत्नी कै.सौ.वेणुताई हिच्या स्मरणार्थ मी एक सार्वजनिक न्यास ( पब्लिक ट्रस्ट ) स्थापन करणार आहे.तीने मला खाजगी आणि सार्वजनिक जीवनात साथ दिली आहे.त्यासाठी तिची आठवणं जागती ठेवणे हा माझ्या जीवनातील उरलेला एकच आनंद आहे.त्यादृष्टीने माझ्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. माझ्या गावी कराड येथे जमीन विकत घेउन त्यावर एखादी वास्तु बांधावी व त्या वास्तुत माझ्या स्वताच्या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत.तसेच माझ्या जीवनात अनेक व्यक्तीनी व संस्थानी अनेक वस्तु प्रेमाने भेट म्हणुन दिलेल्या आहेत.त्याचेही संरक्षण व्हावे व वस्तु संग्रहाच्या रुपाने जतन व्हावे अशी माझी इच्छा आहे.आणि हे ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय हे माझ्या पत्नीची स्मृती म्हणुन दैनंदिन जपणुकीची आणि वाढीची योजना करावी.असा संकल्प आहे'.( ७-१०-१९८३)यानंतर वेणुताई प्रतिष्ठाणच्या वतीने वस्तुसंग्रहालयाला आदर्श ठरावी अशी वास्तु उभारण्यात आली व त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी जमा केलेली संपुर्ण ग्रंथसंपदा तसेच त्यांना वेळोवेळी भेट देण्यात आलेल्या मौल्यवान कलावस्तुंचा संग्रह ठेवण्यात आला आहे.या वास्तुची उभारणी आणि आतील वास्तुची मांडणी चांगल्या पध्दतीने करण्यात आलेली आहे.दि.२५ नोव्हेंबर १९९२ रोजी या स्मारक् भवनाचे उदघाटन त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.सुब्रमण्यम यांच्या हस्ते झाले.
         आज कराडचे वैभव ठराव्यात अश्या काही वास्तु नगराध्यक्ष शश्री.पि.डी.पाटील यांच्या प्रयत्नातून उभा राहील्या आहेत.त्यात यशवंतराव स्मृती सदनाचा उल्लेख करावा लागेल.नगरपरिषेदाच्या या सभागृहात ग्रंथालय,९२८ आसनांचे प्रशस्त नाट्यगृह व कलादालन असून यशवंतरावांचा पुतळा उभा करण्यात आलेला आहे.कराडमधील इतर वास्तुमध्ये नगरपरिषेदीची इमारत व विवीध सुविधांचे क्रीडा संकुल याचा समावेश करता येईल.

कसे जाल?

पुण्याहुन कराडला जाण्यासाठी, सातारा मार्गे जावे लागते. कराड रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात. कराड -सातारा अंतर-५२ कि.मी. कराड- कोल्हापूर अंतर- ७५ कि.मी.

कराडमधील शिवकालीन श्री पावकेश्वर मंदिर

20210309_144506.jpg

अल्पसा इतिहास...
17 व्या शतकात छत्रपती शाहू महाराज (सातारा) म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव यांच्याकडून इनाम मिळाल्याचे म्हटले जाते तसेच कराड प्रांताचे असणारे पंतप्रतिनिधी घराण्याचे हे श्रद्धास्थान होते. त्यांनी इथं दिवाबत्तीची सोय केली होती. मंदिराचा परिसर हा 20 गुंठे एवढे क्षेत्रफळ आहे. 17 व्या शतकापर्यंत या गावाला शिवापूर म्हणूनच ओळख जायचं नंतर आदिलशाह च्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे ही बदलेली होती त्यावेळी शिवापूरची ओळख पुसून सय्यदपूर करण्यात आले होते त्यानंतर अपभ्रंश होत सैदापूर झाला. याच गावच्या पवित्र भूमीत कृष्णामाईच्या तीरावर पुर्वाभिमुखी असे पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
20210309_145129.jpg
काय आहे मंदिरात...
    पावकेश्‍वर मंदिराचे बांधकाम हे साधारण सतराव्या शतकात झालेले असून मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेने बांधणी केलेले आहे. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे की, शिवलिंगावर ओतलेल पाणी (अभिषेक पाणी) हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते. पण श्री पावकेश्वराच्या ठिकाणी मात्र अपवाद आहे. इथं गोमुखाऐवजी मकरमुखातून (मगरीचे तोंड)बाहेर जाते. मगर ही गंगेची कन्या मानली जाते. अशा पवित्र गंगेच्या मुखातून पवित्र असे गंगाजल मिळावे असा समज असे. हे शिल्प फार कमी मंदिरात पहावयास मिळते. साधारण असे 13 व्या शतकातील मंदिरावर असे शिल्प दिसून येतात. मंदिराच्या आवारात एक प्राचीन विहीर होती परंतु ती कालांतराने मूजविण्यात आली पण त्या विहिरीचे अजूनही चौथेरे दिसून येतात. एकूणच श्री पावकेश्वराचे मंदिर प्राचीन व पवित्र असे शिवलिंग मंदिर आहे. मंदिरास दोन दरवाजे असून एक दरवाजा पूर्वेला आणि दुसरा दरवाजा उत्तरेस आहे. पूर्वेच्या दरवाजा बाहेर उंच अशी एक दीपमाळ आहे. ही दीपमाळ 13 व्या शतकातील असावी. मंदिराचा परिसर पूर्णपणे तटबंदी वजा शैलीमध्ये बंदिस्त आहे. तटाच्या आतील उत्तर बाजूस राहण्यासाठीची सोय दिसते. परकीय आक्रमणाच्या काळात या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले. तशा खुणा स्पष्टच मंदिरावर दिसून येतात.

20210309_145350.jpg
मंदिराच्या समोरील नंदी आणि त्याची एकूण रचना पहाता हा नंदी प्राचीन असल्याचे साक्ष देतो. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या शिवलिंगाची आकारावरून हे शिवलिंग 13 व्या शतकातील असावे असे सांगता येते. मंदिराच्या आतील बाजूची रचना पाहिल्यास पूर्णपणे दगडी जोत्यावर एकावर एक अशाप्रकारे रचून हे मंदिर बांधण्यात आले. बेलपत्र, शरभशिल्प, गजमुख, कीर्तीमुख, मकरमुख, कमळपुष्प, वेलीबुटी या सारखे रचनात्मक शिल्पवैशिष्ट्ये येथे ठळकपणे दिसून येतात. मंदिराचा शिखराचा भाग हा नंतरच्या काळातील म्हणजे शिवकाळात पुन्हा बांधला असावा, असे मानायला जागा आहे.

कराड पंचक्रोशीत 12 ज्योतिर्लिग आहेत
1. संगमेश्वर अर्थात गरूडतीर्थ - प्रितीसंगमजवळ
2. कमळेश्वर - मंगळवार पेठेतील करडे पीराजवळ
3. गोळेश्वर - गोळेश्वर गाव
4. कपिलेश्वर - कापिल गाव
5. निळकंठेश्वर - आगाशिव डोंगराव
6. वरूणेश्वर - वारुंजी गाव
7. धर्मेश्वर - वनवासमाची
8. कोटेश्वर - खोडशी गाव
9. निळेश्वर - वडोली निळेश्वर गाव
10. आनंदेश्वर - गोटे गाव
11. हटकेश्वर - कराड
12. रत्नेश्वर - कृष्णाकाठी भटांच्या बागेत
त्यापैकी श्री पावकेश्वर हे सर्वात प्राचीन मंदिर होय.

कृष्णा-कोयनेच्या परमपवित्र अशा तीरावर वसलेल्या मौजे सैदापूर गावातील श्री पावकेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार तातडीने होणे गरजेचे असून, वेळेत हा जिर्णोद्धार न केल्यास गर्भगृहाच्या कललेल्या भिंती कोसळू शकतात. मूळचे 13 व्या शतकातील असलेले आणि शिवकाळामध्ये नावारुपाला आलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सैदापूर ग्रामस्थ आणि देवस्थान समिती प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने लोकप्रतिनिधी अथवा पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे जुने सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
20210309_150739.jpg
जायचे कसे?
पुणेहून 165 किमी दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर कराड हे सातारा जिल्ह्यातील तालुक्‍याचे ठिकाण आहे. कराड शहरातून मसूर गावाकडे जाताना नगर परिषदेच्या हद्दीला लागून विद्यानगर अर्थात सैदापूर गाव आहे. कराडपासून सैदापूरचे अंतर अवघे सहा किमी आहे. या सैदापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत. पावकेश्‍वर मंदिराकडे जाण्यासाठी कराड आयटीआयचा रस्ता घ्यावा आणि सैदापूर गावात जावे. या गावाच्या कृष्णानदीच्या तीरावरच पावकेश्‍वर मंदिर आहे. कोल्हापूर-कराड अंतर 70 किमी आहे.

आगाशिव लेणी : 
   कराड मध्ये आगाशिव नगर ,जखिण वाडी आणि नांदलापुर ह्या भागात बौद्ध विप्पस्नना केंद्र म्हणजे बुद्धकालीन लेणी आहेत .कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. त्यांना जखीणवाडीची लेणी असेही म्हणतात. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या पावसाळ्यातील मुक्कामासाठी खोदली असावीत. कराडपासून दोन किलोमीटर अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी आगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांना ‘आगाशिवची लेणी’ असे म्हटले जाते. आस्ट्रेलियन आर्किओलोजीस्ट आपल्या The hidden ancient history of india ह्या पुस्तकात पुस्तकाचा संदर्भ देऊन सांगतो की कराड परिसरात एकुण 108 बौद्ध लेणी आहेत . खरं तर आगाशिवचा डोंगर पुर्ण बुद्ध लेण्यांनी भरलेला दिसून येतो.मात्र सध्याच्या अवस्थेत या परिसरात एकूण १०१ लेणी असावीत. त्यापैकी ६४ लेणी बघण्यासारखी आहेत. येथे लेण्यांचे तीन समूह आहेत. पहिल्या समूहात २६ लेणी असून, यापैकी लेणी क्रमांक ६, ७, १२ आणि १७ या चार लेण्यांत चैत्यगृहे असून, त्यामध्ये स्तूप आहेत. सहा क्रमांकाच्या लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नक्षीकाम असलेले धम्मचक्र, तर उजव्या बाजूला एक सिंहस्तंभ आहे. बाकी २२ लेणी विहार प्रकारातील आहेत. २२व्या क्रमांकाचे लेणे सगळ्यात मोठे असून, विहार प्रकारात आहे.
   डोंगराच्या दोन रांगांमधील दरीत दुसरा लेणीसमूह असून, यास भैरवदरा लेणी (Bhairav Caves) असे संबोधले जाते. येथे १२ लेणी असून, फक्त चारच दिसून येतात. यात तीन विहार व एक चैत्य लेणे दिसून येते. पाण्याचे एक खोदलेले टाकेही दिसून येते. 


जखीणवाडीची लेणी

  या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्रात रस असलेले अनेक लोक येतात व लेण्यांविषयी माहिती मिळवतात.देशातील बौद्ध लेण्यांकडे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. सरकारने अतिक्रमणे हटवून या लेण्यांना संरक्षण द्यावे. बौद्ध लेण्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यानंतर या परिसरात पायाभूत सुविधा देण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
    जखीनवाडी येथे सध्या एकूण ६३ लेण्या आहेत . काही अभ्यासकांच्या मते तेथे एकूण 108 लेण्या होत्या.परंतु आता केवळ 63 किंवा 64 लेण्यांच अस्तित्वात आहेत. बाकीच्या लेण्या या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. एकाच डोंगरांमध्ये एवढया मोठ्या संख्येने बौद्ध लेण्या असण्याचे मुंबई जवळील कण्हेरी नंतर हे महाराष्ट्रातील दुसरे ठिकाण आहे. या सर्व लेण्या हीनयान पंथीय असून त्याचे खोदकाम पहिल्या ते चौथ्या शतकातील आहे .या ६३ लेण्या तीन समूहामध्ये विभागलेल्या आहेत. पहिला समूह हा आगाशिव डोंगराच्या दक्षिणेला असून त्यामध्ये २६ लेण्या आहेत .
   या लेणीसामुहाकडे जाण्यासाठी जखीनवाडी गावातून जावे लागते. जखीनवाडी गावातून लेणीकडे जाण्यासाठी पुरातत्व विभागाने नुकत्याच पायरया बसविलेल्या आहेत .
   पायऱ्यांनी अंदाजे २० ते ३० मिनिटे चढाई केल्यानंतर समोर लेण्या दिसतात . या लेणीसमुहामधील २६ लेण्यांपैकी लेणी क्रमांक ६, ७, १२ आणि १७ या चार लेण्या या चैत्यगृहे असून त्यामध्ये स्तूप आहेत तर बाकीच्या २२ लेण्या विहारे आहेत .
   ६ क्रमाकाच्या लेणी बाहेर प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला धम्म चक्र तर उजव्या बाजूला एक सिंहस्तंभ आहे आहे . सिंहस्तंभ आणि धम्मचक्रावरील नक्षीकाम अप्रतिम आहे . २२ क्रमांकाची लेणी हि सर्वात मोठी आहे.
   दुसरा लेणीसमुह हा आगाशिव डोंगराच्या दोन रांगांमधील दरीत आहे. त्या दरीस भैरवदरा ( Bhairav Caves) असे स्थानिक नाव आहे. पहिला समूह पाहिल्यावर डोंगराच्या पश्चिमेकडे पाहिल्यास एक छोटे देऊळ दिसते त्या देवळाच्या दिशेने अंदाजे २० ते ३० मिनिटे चालत गेल्यास एक विहीर आणि एक मठ दिसतो . डोंगरावरील देऊळ आणि मठ हे आताचे बांधकाम आहे. मठाच्या उत्तरेकडून झाडांमधून एक छोटीशी पायवाट भैरव दर्यातील लेणीमध्ये उतरते.
  अंदाजे १० ते १५ मिनिटे पायवाटेने उतरल्यास समोरच पुरातत्व खात्याचे निळ्या रंगाचे पत्र्याचे शेड दिसते . व डाव्या बाजूला चार लेणी दिसतात . त्यातील एक लेणी हे चैत्यगृह आहे. तर बाकीच्या लेण्या या विहारे आहेत . काही अभ्यासकांच्या मते येथे १२ लेण्या आहेत परंतु मी भेट दिल्यावर येथे फक्त चारच लेण्या दिसल्या . त्यातील दोन लेण्या या झुडूपामध्ये लपलेल्या होत्या . बाकीच्या लेन्या ही कदाचित झुडूपामध्ये लपलेल्या असण्याची शक्यता आहे . येथील चैत्यागृहाच्या बाहेर पाण्याचे टाके असून त्यातील पाणी अत्यंत स्वच्छ आणि गोड आहे .

तिसरा लेणीसमूह ( Agashivnagar Caves) हा आगाशिव डोंगराच्या उत्तरेला आहे . भैरव दर्यातील लेण्या बघून परत मठाकडे आल्यानंतर डोंगराच्या पश्चिमेला असलेल्या छोट्या देवळाकडे गेल्यास आणखी एक पायवाट दिसते . ती पायवाट डोंगराच्या माथ्या वरून पश्चिमेकडून पूर्वेकडे सरळ सरळ या तिसर्या लेणीसमुहाकडे जाते . अंदाजे ३० ते ४० मिनटे डोंगर सपाटी वरून चालल्यानंतर डोंगराच्या उत्तरेला हा तिसरा लेणी समुह आहे . या लेणी समूहाकडे जाण्यासाठी कराड ढेबेवाडी रोडवरील आगाशिव नगर मधून हि पायर्या आहेत. परंतु तीनही लेणी समूह एकत्र पहायचे असतील तर प्रथम जखीनवाडी गावातून पहिला लेणी समूह नंतर भैरव दर्यातील लेणी समूह व नंतर तसेच चालत चालत आगाशिव नगर मधील लेणी समूह हा ट्रेक जास्त सोयीस्कर आहे.

आगाशिव नगर लेणी समूहामध्ये १४ लेण्या असून त्यामध्ये दोन चैत्यगृहे आहेत. आणि बाकीची विहारे आहेत . आगाशिव नगर लेण्या पाहून १० ते १५ मिनिटामध्ये पायर्यांनी तुम्ही आगाशिव नगर मध्ये उतरू शकता . परंतु स्वताचे वाहन घेऊन जाणार असाल तर जखीनवाडी गावातून पहिला लेणी समूह आणि भैरव दर्यातील लेणी समूह पाहिल्यानंतर,वाहन चालकास परत पाठवून त्यास आगाशिवनगर मध्ये उरलेल्या लोकांना घ्यायला बोलविल्यास सर्वात जास्त सोयीस्कर आहे . नाहीतर आगाशिवनगर लेणी पाहून परत मठ पहिला लेणी समूह आणि जखीनवाडी असा उलटा ट्रेक करावा लागेल .
    कराड ढेबेवाडी रोडवरच आगाशिवनगर पासून ३ किलोमीटर वर चचेगाव हे गाव आहे या गावातून आगाशिव डोंगराकडे गेल्यास आणखी एक चार लेण्याचा समूह आहे . त्यामध्ये एक चैत्यगृह आहे तर बाकी तीन विहारे आहेत.
आगाशिवनगर येथील लेणी क्रमांक ४७ मध्ये सापडलेला लेख त्याचे मराठी मध्ये भाषांतर ===> " गोपाल याचा मुलगा संघमित्र याने लेण्यांचे धम्म दान दिले " .आता हा गोपाळ व्यापारी असू शकतो कदाचित राजा सुद्धा असू शकतो . 

फोटो सौजन्य :मनोज ओव्हाळ पुणे, आणि महेश अशोक शिंदे, कराडकर



https://www.goibibo.com/hotels/hotels-in-karad-ct/

कापीलचा गोलघुमट :- 

कापील येथे मलकापूरनजीक गोलघुमट ही अतिप्राचीन वास्तू आहे. आदिलशाहीच्या राजवटीत कऱ्हाडनजीक सैनिकांचे तळ असताना आदिलशहाच्या राज्यातील प्रमुखांनी सैन्याबरोबरचा कुटुंबकबिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी मलिकापूर म्हणजेच आताच्या मलकापूरनजीक वस्ती केली होती. कापीलच्या हद्दीत सैन्याच्या कुटुंबीयांची व्यवस्था करण्यासाठी निवासाची व पाण्याची सोय करण्यात आली. त्यामधीलच गोलघुमट ही वास्तू आहे. तेथून काही अंतरावर चौकोनी पाण्याची विहीर आहे. प्राचीन काळातील अद्‌भुत कलाकृतीच्या नमुनेदार अशा दोन्हीही वास्तू आहेत. गोलघुमट व विहिरीची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. घुमट परिसरात मोठी झाडे वाढली आहेत, तर विहिरीची पडझड सुरू आहे. 






संदर्भः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) दै. सकाळ्,लोकमत्,लोकसत्ता यातील लेख
३) श्री. आशुतोष बापट,सुनील शेडगे,सागर बोरकर यांचे लिखाण
४) मराठी विश्वकोष वेबसाईट
५) सापच्या वाड्याची माहिती मिसळपाव या वेबसाईटवरुन
६)  माधव विद्वांस  ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

 





मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...