स्वरमध्यस्थ ड व ढ यांचे ळ व ळह होतात.
|
बुद्ध |
भिक्खु |
|||
|
एकवचन |
अनेकवचन |
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
बुद्धो |
बुद्धा |
भिक्खु |
भिक्खू, भिक्खवो |
|
द्वि. |
बुद्धं |
बुद्धे |
भिक्खुं |
भिक्खू, भिक्खवो |
|
तृ. |
बुद्धेन, बुद्धा |
बुद्धेहि |
भिक्खुना |
भिक्खूमि, भिक्खूहि |
|
च. |
बुद्धस्स |
बुद्धानं |
भिक्खुस्स, भिक्खुनो |
भिक्खूनं |
|
पं. |
बुद्धा, बुद्धस्मा, बुद्धम्हा |
बुद्धेहि |
भिक्खुना, भिक्खुस्मा, भिक्खुम्हा |
भिक्खूभि, भिक्खूहि |
|
ष. |
बुद्धस्स |
बुद्धानं |
भिक्खुस्स, भिक्खुनो |
भिक्खूनं |
|
स. |
बुद्धे, बुद्धस्मिं, बुद्धम्हि |
बुद्धेसु |
भिक्खुस्मिं, भिक्खुम्हि |
भिक्खूसु, भिक्खूसु |
|
सं. |
बुद्ध |
बुद्धा |
भिक्खु |
भिक्खू, भिक्खवो |
अम्ह
|
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
अह |
मयं, अम्हे, नो |
|
द्वि. |
मं, ममं |
अम्हे, अम्हाकं, नो |
|
तृ. |
मया, मे |
अम्हेभि, अम्हेहि, नो |
|
च. |
मय्हं, मम, अम्हं, ममं, मे |
अम्हाकं, अस्माकं, नो |
|
पं. |
मयो, मे |
अम्हेभि, अम्हेहि, नो |
|
ष. |
मय्हं, मम, अम्हं, ममं, मे |
अम्हाकं, अस्माकं, नो |
|
स. |
मयि |
अम्हेसु |
तुम्ह
|
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
त्वं, तुवं |
तुम्हे, वो |
|
द्वि. |
त्वं, तुवं, तं, तवं |
तुम्हे, वो |
|
तृ. |
तया, त्वया, ते |
तुम्हेभि, तुम्हेहि, वो |
|
च. |
तव, तुय्हं, तुम्हं, ते |
तुम्हाकं, वो |
|
पं. |
तया, त्वया, ते |
तुम्हेभि, तुम्हेहि, वो |
|
ष. |
तव, तुय्हं, तुम्हं, ते |
तुम्हाकं, वो |
|
स. |
तयि, त्वयि |
तुम्हेसु |
त
|
पुल्लिंग |
स्त्रीलिंग |
नपुंसकलिंग |
|
|
प्र. |
सो |
सा |
तं, नं |
|
द्वि. |
तं, नं |
तं, नं |
तं, नं |
|
तृ. |
तेन, नेन |
ताय, नाय |
तेन, नेन |
|
च. |
तस्स, नस्स |
ताय, नाय, तिस्सा, तिस्साय, तस्सा, तस्साय |
तस्स, नस्स |
|
पं. |
तस्मा, तम्हा, नस्मा, नम्हा |
ताय, नाय |
तस्मा, तम्हा, नस्मा, नम्हा |
|
ष. |
तस्स, नस्स |
ताय, नाय, तिस्सा, तिस्साय, तस्सा, तस्साय |
तस्स, नस्स |
|
स. |
तस्मिं, तम्हि, नस्मिं, नम्हि |
ताय, नायं, तिस्सं, तस्सं, नस्सं |
तस्मिं, तम्हि, तस्मिं, नम्हि |
अनेकवचन
|
प्र. |
ते, ने |
ता, तायो, ना, नायो |
ते, ने, तानि, नानि |
|
द्वि. |
ते, ने |
ता, तायो, ना, नायो |
ते, ने, तानि, नानि |
|
तृ. |
तेभि, तेहि, नेभि, नेहि |
ताभि, ताहि, नाभि, नाहि |
तेभि, तेहि, नेभि, नेहि |
|
च. |
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं |
तासं, तासानं, नासं, नासानं |
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं |
|
पं. |
तेभि, तेहि, नेभि, नेहि |
ताभि, ताहि, नाभि, नाहि |
तेभि, तेहि, नेभि, नेहि |
|
ष. |
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं |
तासं, तासानं, नासं, नासानं |
तेसं, तेसानं, नेसं, नेसानं |
|
स. |
तेसु, नेसु |
तासु, नासु |
तेसु, नेसु |
विशेषण : विशेषण ज्या नामाशी संबंधित असते त्या नामाचे लिंग, वचन व विभक्ती ते घेते. अकारान्त विशेषणांचे स्त्रीलिंग अ ऐवजी आ ठेवून होते. कधी कधी ई ही अ ची जागा घेते. विशेषणाचे मूळ रूप नामापूर्वी जोडून समासही बनवता येतो.
संख्यावाचक शब्दांचा वापर बराच गुंतागुंतीचा आहे. १ ते १८ या संख्या विशेषणाप्रमाणे चालतात. आकारान्त दर्शक शब्द (उदा., वीसा ‘वीस’) स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. पण एकंदरीत ही गुंतागुंत थोडक्या सामान्य नियमांच्या पलीकडची आहे.
वर्तमान
|
अस |
हु |
|||
|
एकवचन |
अनेकवचन |
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
अस्मि, अम्हि |
अस्म, अम्ह |
होमि |
होम |
|
द्वि. |
असि |
अत्थ |
होसि |
होथ |
|
तृ. |
अत्थि |
सन्ति |
होति |
होन्ति |
भर
|
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
भरामिं |
भराम |
|
द्वि. |
भरसि |
भरथ |
|
तृ. |
भरति |
भरन्ति |
भविष्य
अस धातूला भविष्यकाळाची रूपावली नाही.
हु
|
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
हेस्सामि, हेस्सं, हेहिभि, होहिमि |
हेस्साम, हेहिम, होहिम |
|
द्वि. |
हेस्ससि, हेहिसि, होहिसि |
हेस्सथ, हेहिथ, होहिथ |
|
तृ. |
हेस्सति, हेहिति, होहिति |
हेस्सन्ति, हेहिन्ति, होहिन्ति |
भर
|
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
भरिस्सामि, भरिस्सं |
भरिस्साम |
|
द्वि. |
भरिस्ससि |
भरिस्सथ |
|
तृ. |
भरिस्सति |
भरिस्सन्ति |
संकतार्थ
अस धातूला संकेतार्थाची रूपावली नाही.
|
हु |
भर |
|||
|
एकवचन |
अनेकवचन |
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
अहुविस्सं |
अहुविस्सम्ह |
(अ) भरिस्सं |
(अ) भरिस्सम्ह |
|
द्वि. |
अहुविस्से, अहुविस्ससे |
अहुविस्सथ |
(अ) भरिस्स |
(अ) भरिस्सथ |
|
तृ. |
अहुविस्स |
अहुविस्संसु |
(अ) भरिस्स |
(अ) भरिस्संसु |
भूतकाळ
|
अस |
हु |
|||
|
एकवचन |
अनेकवचन |
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
आसिं |
आसिम्ह |
अहोसिं |
अहोसिम्ह |
|
द्वि. |
आसि |
आसित्थ |
अहोसि |
अहोसित्थ |
|
तृ. |
आसि |
आसिंसु, आसुं |
अहोसि, अहुवा, अहु |
अहेसुं |
भर
|
एकवचन |
अनेकवचन |
|
|
प्र. |
अभरिं |
अभरिम्ह |
|
द्वि. |
अभरि |
अभरित्थ |
|
तृ. |
अभरि |
अभरिंसु |
आज्ञार्थाचे प्रत्यय प्र. पु. मी-म द्वि. पु. हि-थ आणि तृ.पु. तु-अन्तु हे आहेत.
याशिवाय वर्तमान, भूत, भविष्य,विध्यर्थ, इ. दर्शक धातुसाधिते आहेत. वर्तमान धातुसाधिताचे अन्त व मान हे प्रत्यय आहेत. भूतकाळाचा प्रत्यय त किंवा इत आहे. पण बरीचशी धातुसाधिते संस्कृतमधून सरळ आल्यामुळे या नियमाला अपवाद आहेत. भविष्यका ळाचे धातुसाधित धातूला इस्स हा प्रत्यय लावून पुढे अन्त हा प्रत्यय जोडून होते. विघ्यर्थवाचक धातुसाधित धातूला तब्ब, इतब्ब, अनीय किंवा य हे प्रत्यय लावल्याने मिळते.
हेत्वर्थक अव्यय धातूला तुं प्रत्यय लावून आणि भूतकाळवाचक अव्यय त्वा व कधीकधी य हा प्रत्यय लावून सिद्ध होते. त्वाच्या अर्थी कवितेत त्वान व तून ही रूपेही आढळतात.
पालीत समासाची लांबी प्रमाणशीर असते. उगीच शब्दाला शब्द जोडून लांबलचक साखळी बनवण्याची पंडिती वृत्ती इथे नाही. म्हणूनच दोनांपेक्षा अधिक शब्दांचा समासही खटकत नाही. एकंदरीतच लेखनाचा डौल टाळून संभाषणात्मक किंवा निवेदनात्मक राहण्याकडे भाषेची प्रवृत्ती आहे : मरणभयतज्जितो भिगो दारुदकतेलतन्दुलादीनि गंगातीरवासी व वत्थूनि.
ओ किंवा ए नंतर येणारा अ लोप पावतो : देवो+ अम्हि= देवो Sम्हि. शब्दानंतर येणाऱ्या इतिमधील आद्य इ नाहीशी होऊन त्याआधीचा स्वर दीर्घ होतो : गच्छाम+इति+गच्छामा S ति साधु+इति= साधूति.
अथ नं सो सकुणो गोचरपसुतो दिस्वा साखाय निलीनो ‘किन्ते सम्म दुक्खतीति’ पुच्छि. सो तमत्थं. आचिखि ‘अहन्ते सम्म एतं अट्ठि अपनेय्यं, भयेन ते मुखं पविसितुं न विसहामि, खादेय्यासि पिमन्ति’. ‘मा भायि सम्म, नाहन्तं खादामि, जीवितं मे देहीति’.
तेव्हा त्याला खाण्यासाठी (भुकेने) व्याकुळ झालेला पाहून फांदीवर बसलेल्या पक्ष्याने विचारले, ‘मित्रा, तुला काय दुःख होतं आहे?’ त्याने ती परिस्थिती सांगितली. ‘मित्रा, मी तुझं ते हाड काढलं असतं, (पण) भीतीमुळे तुझ्या तोंडात शिरायला मी धजत नाही. तू मला खाशीलसुद्धा म्हणून’. ‘भिऊ नकोस मित्रा, मी तुला खात नाही. मला प्राणदान दे’. जवसकुणजातके.
'या' भाषेच्या लिपिवरून वादंगाची शक्यता...समर्थक आणि विरोधक आमने सामने
Updated on:
नाशिक / विखरणी : भारतातील सर्वात प्राचीन लिपिला पालि भाषेच्या 12 वीच्या अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे आभार धम्मलिपी अभ्यासकांनी ह्या समितीस पत्रव्यवहार करून मानले आहेत. तर धम्मलिपीला ब्राम्ही लिपि नाव देण्याची मागणी काही मंडळींनी पाठ्यपुस्तक समितीला पत्रव्यवहार करून केली आहे. धम्मलिपी अभ्यासकांनी यास विरोध करून पत्रव्यवहार करून तसे न करण्यास पाठ्यपुस्तक समितीस विनंती केली आहे. तसेच सम्राट अशोकाच्या लिपिला धम्म लिपी हे नाव का असावे यासाठी काही संदर्भच समितीस पाठवले आहेत. यामुळे पाली भाषेला कोणत्या लिपीचे नाव द्यावे यासाठी दोन गट आमने - सामने आल्याने मोठा वादंग उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
असा आहे इतिहास
1836 साली सर्वात पहिल्यांदा सम्राट अशोकाच्या शिलालेखांचे लिप्यांतर आणि
भाषांतर करण्यात आले. प्रिन्सेपने या लिपिला "इंडिक स्क्रिप्ट' असे म्हटले
आणि नंतर जेव्हा त्यांना खात्री पटली कि हे सर्व शिलालेख सम्राट अशोकांनी
लिहिले आहेत. तेव्हा प्रिन्सेपने या प्राचीन लिपिला "अशोकन स्क्रिप्ट' असे
नाव दिले. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अशोकाच्या लिपिलाच "ब्राह्मी' हे
नाव काही संशोधकांनी सुचविले. मात्र या नावाला काहीही पुरावे दिले नाहीत.
ज्या ग्रंथांचा आधार घेण्यात आला ते "ललितविस्तार' आणि "सामवायंग सूत्र'
त्या ग्रंथांमध्ये कुठेही सम्राट अशोकांच्या लिपिला ब्राह्मी म्हटले नाही.
त्यामुळे ब्राह्मी या शब्दाला ग्रंथीय आधार आहे हे वाक्य दिशाभूल करणारे
असल्याचा दावा धम्म लिपी समर्थकांनी केला आहे.
पुरावाच नाही
ललितविस्तार आणि सामवायंग सूत्र या ग्रंथांमध्ये अनुक्रमे 64 आणि 16
लिपींची नावे आहेत. मात्र त्यापैकी ब्राह्मी हे नाव अशोकांच्या लिपिसाठी
कसे योग्य असू शकते व अशोकाच्या शिलालेखांचे हीच लिपि आहे याचा काहीही
पुरावा नाही, कुठल्याच हस्तलिखित अथवा शिलालेखात ब्राह्मी हा शब्द आढळत
नसल्याचाही दावा आहे. सम्राट अशोकाच्या काळी ब्राह्मी लिपि अस्तित्वात असती
आणि समजा त्यांना या लिपिला ब्राह्मी म्हणायचे असते तर त्यांनी आपल्या
शिलालेखांची सुरुवात - "इयं ब्राह्मीलिपी देवानं पियदस्सी' अशी केली नसती
का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
ओढून ताणून लादलेला शब्द
अशोकाच्या एकूण 36 शिलालेखांत 40 ठिकाणी या लिपीचा उल्लेख "धम्मलिपी'
म्हणूनच जसा आढळतो. तसा "ब्राह्मी लिपी' म्हणून उल्लेख एकाही शिलालेखात
आढळून येत नाही, किंवा ब्राह्मी लिपीमधील एखादे प्राचीन हस्तलिखितही आढळून
येत नाही. भारताच्या सर्वात प्राचीन लिपिसाठी विनाकारण, विनाप्रमाण ओढून
ताणून लादलेला शब्द आहे. ब्राह्मी या शब्दाला कुठलाही ग्रंथीय, शिलालेखीय,
ऐतिहासिक अथवा पुरातत्त्वीय संदर्भ नाही. त्यामुळे धम्मलिपी शब्द ह्या
पुस्तकात आहे तसाच राहू देण्याची विनंती धम्मलिपी अभ्यासकांकडून करण्यात
आली आहे.
असे आहेत दावे
"ब्राह्मी' हे नाव परंपरेतून पुढे आले आहे. धम्मलिपी हे नाव सम्राट
अशोकाच्या अनेक शिलालेखांत असले तरी ते लिपीचे नाव असू शकत नाही. अनेक
बौद्ध, जैन ग्रंथांत "ब्राह्मी' हे नाव आलेले असल्याने तेच राहू द्यावे.
दुसरे नाव देण्यास हरकत नाही. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद
व्हायला नको, असे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मंजिरी भालेराव
यांनी म्हटले आहे. तर पूर्वीच्या संशोधकांनी ज्या साधनांच्या आधारे
अशोकांच्या लिपीला चुकीने "ब्राह्मी' असे म्हटले आहे. याचा अर्थ आपण ती चूक
न सुधारता तशीच राहू द्यावी का? आजचे संशोधन "धम्मलिपी' या शब्दाचे सर्व
संदर्भ देत असेल आणि ब्राह्मी या शब्दाचे तसे कुठलेच संदर्भ मिळत नसतील, तर
मग "धम्मलिपी' हा शब्दच स्वीकारणे योग्य असल्याचे बौद्ध संस्कृती, प्राचीन
भाषा, लिपी व पुरातत्त्व अभ्यासक अतुल भोसेकर यांनी म्हटले आहे.
संस्कृत भाषा पाली भाषेतून निर्माण झाली (शोध क्रमांक १)
"धम्म" नावाची लिपी आहे (शोध क्रमांक २)
धम्म लिपी वरून देवनागरी लिपी निर्माण झाली (शोध क्रमांक ३)
संस्कृत भाषेची लिपी देवनागरी आहे (शोध क्रमांक ४)
आता हे चार शोध ज्या महानुभावांनी लावले त्यांनाच विचारा की ही प्रक्रिया किती हजार वर्षं चालू होती. तेच तुम्हाला सांगू शकतील.
माझ्याकडं
अल्प माहिती असते. माझे गुरू डॉक्टर सदा डोकेदुखे अमेरिकेच्या हार्वर्ड
युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहेत. त्यांनी बहुजनांचा इतिहास सगळ्यांना
कळावा म्हणून एक गाजलेला ग्रंथ लिहिला आहे. त्यांनाही तुमच्या ह्या "धम्म
लिपी" बद्दल माहित नाही. ज्याला तुम्ही धम्म लिपी म्हणताय त्या लिपीला
तुम्ही सोडून बाकी सगळं जग "ब्राह्मी" या नावानं ओळखतं.
असो,
संस्कृत ही भाषा अशोकाच्या लिपीत लिहिली गेली आहे (जिला तुम्ही धम्म लिपी
म्हणताय ना त्याच लिपीत). संस्कृत तमिळ ग्रंथ लिपीत सुद्धा लिहिली गेली
आहे. शारदा लिपीत सुद्धा संस्कृत लिहिलेली सापडली आहे. दक्षिणेत संस्कृत
शिकवताना हल्ली इंग्लिश लिपीत शिकवतात त्यामुळं त्या लिपीत सुद्धा संस्कृत
लिहिली गेली आहे.
ह्यावरून
हेच सिद्ध होतं की कोंकणी आणि तुळू प्रमाणे संस्कृत भाषेलाही लिपी नाही.
तरी सुद्धा ज्या व्यक्तीनं वर दिलेले चार शोध लावले आहेत, त्या शोधांच्या
आधारावर तुम्ही जर प्रश्न विचारणार तर त्याचं उत्तर तेच देऊ शकतील.
ता क :
ब्रूस
ट्रिगर त्यांच्या पुस्तकात "रायटिंग सिस्टिम्स" सांगतात की ब्राह्मी लिपी
अशोकाच्या आधीपासूनची आहे. तुम्ही म्हणता अशोकानं बनविली.
तुम्ही
एका ठिकाणी म्हटलंय की अशोक राजा स्वतःच्या लीपिला धम्म लिपी म्हणतो पण ते
चुकीचं आहे. सारनाथ मध्ये अशोक राजा लिहिलेल्या भाषेच्या लिपीला फक्त
"लिपी" इतकंच म्हणतो.

(हा शब्द "लिपी" आहे, "धम्म" नाही. "धम्म" शब्द इतर ठिकाणी वापरला आहे, तुम्ही स्वतः तपासून बघू शकता)
त्या
शिवाय, अशोक राजा खरोष्ठी, ग्रीक आणि अरमैक लिप्या सुद्धा वापरतो. फक्त
ब्राह्मी (ज्याला तुम्ही धम्म लिपी म्हणताय) तिचा प्रयोग नाही केलेला.
तुम्ही
तुमचे स्रोत तपासून बघा असा सल्ला द्यावासा वाटतो. कुणीतरी काहीतरी म्हणतं
(कितीही मोठा माणूस असला तरी) म्हणून त्याचं ऐकू नका. स्वतः वेगवेगळ्या
स्रोतांमधून तपासा. नाहीतर काही कळायचं नाही.
संस्कृत भाषा पाली भाषेतून निर्माण झाली (शोध क्रमांक १)
"धम्म" नावाची लिपी आहे (शोध क्रमांक २)
धम्म लिपी वरून देवनागरी लिपी निर्माण झाली (शोध क्रमांक ३)
संस्कृत भाषेची लिपी देवनागरी आहे (शोध क्रमांक ४)
आता हे चार शोध ज्या महानुभावांनी लावले त्यांनाच विचारा की ही प्रक्रिया किती हजार वर्षं चालू होती. तेच तुम्हाला सांगू शकतील.
माझ्याकडं अल्प माहिती असते. माझे गुरू डॉक्टर सदा डोकेदुखे अमेरिकेच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहेत. त्यांनी बहुजनांचा इतिहास सगळ्यांना कळावा म्हणून एक गाजलेला ग्रंथ लिहिला आहे. त्यांनाही तुमच्या ह्या "धम्म लिपी" बद्दल माहित नाही. ज्याला तुम्ही धम्म लिपी म्हणताय त्या लिपीला तुम्ही सोडून बाकी सगळं जग "ब्राह्मी" या नावानं ओळखतं.
असो, संस्कृत ही भाषा अशोकाच्या लिपीत लिहिली गेली आहे (जिला तुम्ही धम्म लिपी म्हणताय ना त्याच लिपीत). संस्कृत तमिळ ग्रंथ लिपीत सुद्धा लिहिली गेली आहे. शारदा लिपीत सुद्धा संस्कृत लिहिलेली सापडली आहे. दक्षिणेत संस्कृत शिकवताना हल्ली इंग्लिश लिपीत शिकवतात त्यामुळं त्या लिपीत सुद्धा संस्कृत लिहिली गेली आहे.
ह्यावरून हेच सिद्ध होतं की कोंकणी आणि तुळू प्रमाणे संस्कृत भाषेलाही लिपी नाही. तरी सुद्धा ज्या व्यक्तीनं वर दिलेले चार शोध लावले आहेत, त्या शोधांच्या आधारावर तुम्ही जर प्रश्न विचारणार तर त्याचं उत्तर तेच देऊ शकतील.
ता क :
ब्रूस ट्रिगर त्यांच्या पुस्तकात "रायटिंग सिस्टिम्स" सांगतात की ब्राह्मी लिपी अशोकाच्या आधीपासूनची आहे. तुम्ही म्हणता अशोकानं बनविली.
तुम्ही एका ठिकाणी म्हटलंय की अशोक राजा स्वतःच्या लीपिला धम्म लिपी म्हणतो पण ते चुकीचं आहे. सारनाथ मध्ये अशोक राजा लिहिलेल्या भाषेच्या लिपीला फक्त "लिपी" इतकंच म्हणतो.
(हा शब्द "लिपी" आहे, "धम्म" नाही. "धम्म" शब्द इतर ठिकाणी वापरला आहे, तुम्ही स्वतः तपासून बघू शकता)
त्या शिवाय, अशोक राजा खरोष्ठी, ग्रीक आणि अरमैक लिप्या सुद्धा वापरतो. फक्त ब्राह्मी (ज्याला तुम्ही धम्म लिपी म्हणताय) तिचा प्रयोग नाही केलेला.
तुम्ही तुमचे स्रोत तपासून बघा असा सल्ला द्यावासा वाटतो. कुणीतरी काहीतरी म्हणतं (कितीही मोठा माणूस असला तरी) म्हणून त्याचं ऐकू नका. स्वतः वेगवेगळ्या स्रोतांमधून तपासा. नाहीतर काही कळायचं नाही.
Learn Pali ‘पालि शिका, धम्म जाणा’
देवनागरी लिपी ही पहिल्या शतकातील नागरी लिपीपासून विकसित झाली आहे. नागरी लिपीपासून देवनागरी, गुजराती, मोडी, कैथी व नंदिनागरी या लिप्या विकसित झाल्या आहेत. नागरी लिपी संस्कृत आणि प्राकृत लिहायला वापरायचे.
नागरी लिपी ही सिद्धम लिपीपासून विकसित झाली. सिद्धम लिपीपासून नागरी, बंगाली-आसामी, ओडिया आणि विविध नेपाळी लिप्या विकसित झाल्या. ही लिपी संस्कृत लिहायला वापरायचे. बौद्ध धर्मासोबत ही लिपी पूर्व आशियामध्येसुद्धा पसरली होती. आजही जपानमधील काही बौद्ध लोक मंत्र आणि सूत्र लिहायला आणि वाचायला या लिपिचा वापर करतात.
सिद्धम लिपी ही गुप्त लिपीपासून विकसित झाली. ही लिपी प्रामुख्याने गुप्त साम्राज्याच्या काळात वापरात होती. या लिपीपासून सिद्धम, शारदा, तिबेटी, कलिंग आणि भैक्षुकी या लिप्या विकसित झाल्या. गुप्त लिपी संस्कृत लिहायला वापरायचे.
शेवटी गुप्त लिपी ही ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली. ही लिपी ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात वापरात होती. दक्षिण आणि आग्नेय आशियातील बर्याच लेखन प्रणाली ब्राह्मी लिपीपासून विकसित झाल्या आहेत. ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या लिप्यांचे दोन गट आहेत, उत्तर ब्राह्मी व दक्षिण ब्राह्मी. देवनागरी उत्तर ब्राह्मी गटात मोडते. ब्राह्मी लिपी संस्कृत, पाली, प्राकृत, तमिळ, साका आणि टोचारियन शाखेतील भाषा लिहायला वापरायचे.
ब्राह्मी लिपी पश्चिम आशियातील प्राचीन आरमेइक लिपीपासून विकसित झाली असे मानले जाते. आरमेइक लिपी ही फोनिशियन लिपीपासून विकसित झाली, फोनिशियन ही प्रोटो-सिनायटिकपासून, आणि प्रोटो-सिनायटिक ही इजिप्शियन चित्रलिपीपासून.
खरोष्ठी लिपि

खरोष्ठी लिपि : खरोष्ठी लिपीचे नाव अन्वर्थक आहे. गाढवाच्या ओठासारखी लपेटी असलेली ही लिपी, नॉर्थ सेमिटिक लिपीतून उत्पन्न झालेल्या ⇨ ॲरेमाइक लिपीपासून उत्पन्न झाली, असे ब्यूलर इ. विद्वानांचे मत आहे. कनिंगहॅम व इतर काही तज्ञांच्या मते खरोष्ठो हे नाव फा-वान-शु-लिन (६६८) या चिनी कोशात आणि इ. स. पू. तिसऱ्या शतकातील ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात उल्लेखिलेले आहे. सेस्तान, कंदाहार, अफगाणिस्तान, स्वात, लडाख, चिनी तुर्कस्तान, तक्षशिला या भागांत खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेला मात्र या लिपीचा प्रसार झालेला दिसून येत नाही. तिच्या या मर्यादित क्षेत्रामुळे संशोधकांनी तिला निरनिराळी नावे दिली आहेत. सी. लासेन (१८००-७६) याने ‘काबुली लिपी’, विल्सन याने ‘ॲरिॲनियन लिपी’ आणि ए. कनिंगहॅम याने ‘गांधार लिपी’ असे तिचे नामकरण केले. खरोष्ठी लिपीतील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे ‘बॅक्ट्रा-पाली’ किंवा ‘ॲरिॲनो-पाली’ ही नावेसुद्धा तिला मिळाली आहेत. बॅक्ट्रियन-ग्रीक राजांच्या नाण्यांवर ही लिपी आढळून आल्यामुळे तिला ‘बॅक्ट्रियन लिपी’, ‘इंडो-बॅक्ट्रियन लिपी’ अशीही नावे मिळाली आहेत. फ्रेंच प्रवासी द्यूत्र्य द रॅन्स (१८४६-९४) तसेच सर आउरेल स्टाइन (१८६२-१९४३) आणि स्टेन कॉनॉव्ह (१८६७-१९४८) यांना खरोष्ठी लिपीतील लेख सापडले. स्टेन कॉनॉव्ह याने खरोष्ठीतील लेख कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम (खंड दुसरा, भाग पहिला, १९२९) या ग्रंथात प्रसिद्ध केले. पश्चिम पाकिस्तानमधील हझार जिल्ह्यातील मानसेहरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाझगढी येथे अशोकाचे खरोष्ठीमधील लेख सापडले असून हे लेख सर्वांत जुने (इ. स. पू. तिसरे शतक) आहेत. कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाइक अशा दोन लिपींत असलेला अशोकाचा लेख सापडला आहे. कुशाणांच्या राजवटीतील खरोष्ठी-लेख मथुरेला सापडले आहेत. खरोष्ठी लिपी क्षत्रपांच्या नाण्यांवर तसेच शहरात राजांच्या नाण्यांवर आढळून येते. हूणांच्या स्वाऱ्यांनंतर (इ.स. पाचवे शतक) मात्र खरोष्ठीचा भारतात मागमूसही उरला नाही.
ब्राह्मीप्रमाणेच खरोष्ठीचे लेख प्रस्तर, धातूचे पत्रे, नाणी, उंटाचे कातडे, भूर्जपत्र यांवर सापडतात. खोतान येथे दुसऱ्या शतकातील खरोष्ठी लिपीत लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडले आहे. कोरणे आणि लेखणीने उंटाच्या कातड्यावर अगर भूर्जपत्रावर लिहिणे, अशा खरोष्ठी लेखनाच्या दोन पद्धती आहेत. खरोष्ठी लिपीच्या अभ्यासावरून असे दिसते, की तीत एक प्रकारचा साचेबंदपणा आहे. एकच ठरीव साच्याची अक्षरवटिका खरोष्ठीमध्ये असली, तरी कोणत्याही भाषेतील उच्चारवैचित्र्य अक्षरांकित करण्याचे सामर्थ्य या लिपीत आहे. या लिपीतील उच्चारचिन्हांमुळे कोणत्याही शब्दातील ध्वनीची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य तिच्यात असल्याचे दिसून येते. ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाई. धातूमध्ये फरक पडला, तर अक्षरवटिकेत थोडाफार फरक आढळतो परंतु एकदा एखाद्या धातूवर लिहिण्याची पद्धत पडून गेली, तर तीच पद्धत कसोशीने पाळली जाई. त्यामुळे खरोष्ठी लेखांची कालानुरूप परंपरा लावणे कठीण आहे. ब्यूलरच्या मते खरोष्ठी लिपी ब्राह्मी लिपीपेक्षाही अधिक लोकप्रिय होती. ती तत्कालीन ग्रांथिक लिपी होती. १८३३ मध्ये जनरल व्हेंटुरा यांनी माणिक्याल स्तूपाचे उत्खनन केले. त्यात खरोष्ठी आणि ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली. ती ई. नॉरिस, कर्नल मॅसन, कनिंगहॅम व जेम्स प्रिन्सेप यांनी वाचली आणि अशा तऱ्हेने खरोष्ठी लिपी वाचण्याची गुरुकिल्ली इंडो-ग्रीक राजांच्या द्वैभाषिक नाण्यांमुळे उपलब्ध झाली.
संदर्भ : 1. Buhler, George, Indian Palaeography, Calcutta, 1962.
2. Dani, A. H. Indian Palaeography, Oxford, 1963.
3. Dasgupta, C. C. Development of the Kharosthi Script, Calcutta, 1958.
4. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
गोखले, शोभना ल.
http://rahulek.blogspot.com/2017/03/blog-post_3.html
पाली भाषा – तोंडओळख
पा
|
संस्कृत
|
पाली
|
मराठी
|
हिंदी
|
चक्र
|
चक्क
|
चाक
|
चक्का
|
कर्म
|
कम्म
|
काम
|
कर्म/काम
|
मृत्तिका
|
मत्तिका
|
माती
|
मट्टी/मिट्टी
|
वृद्ध
|
वुड्ढ
|
वृद्ध
|
बुड्ढा
|
उष्ण
|
उण्ह
|
उन्ह/उन
|
-----
|
मस्तक
|
मत्थक
|
माथे
|
माथा/मथ्था
|
पाली
|
मराठी
|
अहं बुद्धं नमामि।
|
मी बुद्धांना नमस्कार करतो.
|
मनुस्सो धम्मं अनुसरति।
|
मनुष्य/लोक धर्माला अनुसरतात.
|
अहं सच्चं ब्रवीमि।
|
मी सत्य बोलतो.
|
अम्हे पाणं न हनाम, मुसावादं
न वदाम, मज्जं न पिवाम।
|
आम्ही प्राण हरत नाही (प्राणहत्या
करत नाही), खोटे बोलत नाही, मद्य पित नाही.
|
No comments:
Post a Comment