प्राचीन काळात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या त्रैकुटकां बद्दल कमीच बोलल्या जातं . आता काही दिवसां पहिले जागतीक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोरबंदर भागात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या नव्या उत्खननात दोन दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. यातील एक ताम्रपट त्रैकूटक घराण्यातील राजाचा असून, या शोधामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे. या ताम्रपटावर त्रैकूटक वंशाचा राजा 'महाराज इंद्रसेन' याचे नाव कोरलेले आहे. या राजवंशाचा यापूर्वी फक्त एकच ताम्रपट १८६४ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांना कन्हेरी गुफेत सापडला होता. त्यानंतर सापडलेला हा दुसराच अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे.
त्रैकुटकांचा इतिहास अगदी त्रोटक संदर्भा वरुन उभा करता येतो. त्रैकुटकांनी सुमारे १५० वर्षे आधुनिक गुजरात मधील सुरतपासून ते महाराष्ट्रातील थेट कोकण किनारपट्टीपर्यंत राज्य केले. त्यांच्यातील राज्य करणारे ५ प्रमुख राजे (इंद्रदत्त, दहरसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन) मानले जातात किंबहुना या राजांचीच नावे आपल्याला उपलब्ध पुराव्यांवरुन प्राप्त झाली आहेत. त्यांचे मूळ स्थान नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसर असावे असे काहींचे मत आहे. त्रैकुटकांनी त्यांच्या लेखांमध्ये कोणत्याही विशिष्ट 'शकाचा' किंवा संवत्सराचा उघड उल्लेख केला नव्हता. काही संशोधकांच्या मते त्रैकुटकांनी त्यांच्या पूर्वी राज्य करणाऱ्या कार्दमक शकाचाच उपयोग केला असावा. कन्हेरी गुंफेतील बौद्ध स्तूप आणि ताम्रपटांवर असलेल्या ब्राह्मी लिपीच्या अभ्यासावरून हा राजवंश साधारणपणे ५ व्या शतकातील होता हे स्पष्ट होते.
अशा या त्रैकुटकांचा इतिहास त्यांच्या समकालीन असलेल्या सर्वात शक्तिशाली वाकाटक साम्राज्याशी कमालीचा जोडलेला आहे. त्रैकुटक घराण्यातील प्रसिद्ध राजा दहरसेन याने स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी 'अश्वमेध यज्ञ' केला होता. त्याच्या 'पार्डी ताम्रपटावरून' (४५६-५७ ई.स.) त्रैकुटक साम्राज्य किती समृद्ध होते हे समजते. मात्र, त्यांची ही वाढती ताकद पराक्रमी वाकाटक सम्राट हरिषेण याला सहन झाली नसावी. वाकाटकांच्या धाकट्या पातीतिल हरिषेन हा वाकाटक घराण्याच्या उत्तर काळातील अत्यंत पराक्रमी राजा झाला. याचा लेख अजिंठा लेणीत कोरलेला आढळतो. अजिंठा गुंफा क्र. १६ मधील वाकाटकांच्या शिलालेखात सम्राट हरिषेण 'अपरांत' (कोकण) जिंकल्याचा आणि "त्रिकुट" (त्रैकुटक) साम्राज्याचा पराभव केल्याचा स्पष्ट उल्लेख करतो.
इतिहासकारांच्या मते, राजा दहरसेन आणि त्याचा उत्तराधिकारी व्याघ्रसेन यांच्या नोंदींमध्ये तब्बल ३० वर्षांचे अंतर आहे. हा काळ म्हणजे वाकाटकांनी त्रैकुटकांना पराभूत करून त्यांचे राज्य आपल्या साम्राज्यात जोडल्याचा काळ होता. या काळात त्रैकुटकांची शक्ति बरीच कमकुवत झाली असावी.
परंतु वाकाटकांचे हे वर्चस्व फार काळ टिकले नाही. सम्राट हरिषेणाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्य अंतर्गत कलहामुळे पत्त्यासारखे कोसळले, ज्याचे वर्णन 'दशकुमारचरित' या ग्रंथातही आढळते.
या राजकीय पोकळीचा फायदा घेऊन त्रैकुटक राजा व्याघ्रसेन याने आपले साम्राज्य पुन्हा उभे केले! त्याच्या 'सुरत ताम्रपटात' (४९०-९१ ई.स.) तो स्वतःचा उल्लेख अत्यंत अभिमानाने "अपरांताचा स्वामी" असा करतो आणि त्याचे पाय अनेक राजांच्या मुकुटांनी पूजले जातात असे सांगतो. वाकाटकांच्या पतनानंतर त्रैकुटक हे पश्चिम भारतातील सर्वोच्च सत्ता बनून पुनः नावारूपास आले असे दिसते.
घारापुरीमध्ये झालेल्या उत्त्खननामुळे त्रैकुटकांचा बराच नवा इतिहास पुढे आलेला आहे. उत्त्खननामुळे अशा प्रकारे प्राचीन इतिहासातील बरीच भरीव माहिती पुढे येऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या या दुर्लक्षित घराण्याकडे या ताम्रपटाने लक्ष वेधून घेतले आहे.
©पृथ्वीराज धवड
त्रैकूटक राजवंश अणि तत्कालीन कला
आ पण गुप्तकला किंवा सातवाहनकला यांचा विचार करतो, तेव्हा फक्त त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या स्थापत्य, शिल्प व चित्रकलेचाच विचार करीत नाही, त्यात त्यांचे सरदार-दरकदार यांच्या आश्रयाने निर्माण झालेल्या कलावस्तूंचा, त्यांच्या कारकीर्दीत व त्यांचा अंमल असलेल्या प्रदेशात निर्माण झालेल्या सर्व दृश्यकलांचाही विचार करतो. गुप्त साम्राज्य किंवा सातवाहन साम्राज्य यांचा विस्तारही अवाच्या संवा होता, त्यात प्रादेशिक केंद्रे उदयास येणे अपरिहार्य होते, तसेच सम्राटाच्या वर्चस्वाखालील जनपदांतसुद्धा राजधानीतील कलाप्रवाहांचा, चोखंदळपणाचा परिणाम होणे अपरिहार्थ होते. त्यामुळे मथुरा, कौशांबी व सारनाथ ही कलाकेंद्रे गुप्तशैलीत स्वतःचे बारकावे जपत असली तरी त्यांतील एकजिनसीपणा जाणवतोच. गुप्तराजांचा गंगा-यमुनाखोथातील, साम्राज्याचा गाभ्याचा भाग वगळला तर भोवतालच्या सामंतांच्या प्रदेशांतील जनपदांत, ठळक प्रादेशिक वैशिष्ट्ये आढळली तरी, गुप्तकलेचा प्रभाव दिसतोच. त्रैकूटकांचे राजघराणे आजपासून दीडेकशे वर्षांपासून संशोधकांना माहीत असले तरी काही राजांचे योगायोगाने उघडकीस आलेले नाण्यांचे निधी (treasuretroves) आणि पाच ताम्रपट वगळता राजकीयदृष्ट्या महत्वाची इतर माहिती न मिळाल्याने भारताच्या राजकीय इतिहासांतसुद्धा त्या देशाची फारशी दखल घेण्यात आली नाही.

कान्हेरीच्या गुंफाचे महत्व लक्षात आले परंतु प्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद डॉ. बर्ड यांनाही आपल्या प्रयत्नामुळे या राजवंशाच्या इतिहासास वेगळेच वळण लागणार याची त्या वेळेस कल्पना आली नाही. बर्ड यांना होते आणि त्यामुळे लेख अथवा नाण्यांच्या स्वरूपात एखादा ठोस पुरावा मिळाल्यास त्याच्या ते शोधात होते. त्यांना तसा तो मिळाला, एका ताम्रपटाच्या रूपाने, त्यांनी उत्सुकतेपोटी खणलेल्या (इ.स. १८३९) दगड व विठतांत बांधलेल्या एका स्तूपात. या स्तूपात अपेक्षिल्याप्रमाणे एका दगडी करड्यात हिरेमाणकांसकट रक्षा व अवशेष आणि अनपेक्षितपणे एका तांब्याच्या करंड्यांत दोन पत्रे असलेला एक ताम्रपट व दुसऱ्यात एका पायावर जुन्या अक्षरात लिहिलेली धर्मलिपी मिळाली या धर्मलिपीवरून स्पष्ट झाले की तो स्तूप विधिवत प्रतिष्ठित झालेला असून, तो आता धर्मकाय म्हणून समजला जाईल. सापडलेला स्तूप, त्यातील ताम्रपट व ताम्रपत्र, त्यावरील अभिलेख या सर्वांवर बर्ड यांनी आपला लेख एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या जर्नल (१८४१, पृ. ९४-९६) मध्ये छापला. हा ताम्रपट एखाद्या राजाने दिला नसून, सिधू विषयातील कानकग्रामाच्या बुद्धरुची नावाच्या उपासकाने सर्वश्रेष्ठ श्रावक आर्य शाद्धतीपुत्राच्या स्मरणार्थ हा दैत्य पाषाण व विटांनी बांधला. हा स्तूप सागर मेरुपर्वत, सूर्य-चचंद्र आहेत तोपर्यंत शाबूत राहो. आणि देव, यक्ष, सिद्ध व विद्याधरगण, माणिभद्र, पूर्णभद्र व पाचिक हे यक्ष, आणि आर्य वज्रपाणि, वाङ्कणक आदी हा दैत्य सुखरूप राहील हे पाहोत, व प्राप्त झालेली कीर्ती मुलगा पुष्य यास मिळो, अशी इच्छाही प्रकट केली. हे कार्य त्याने त्रैकूठकांच्या भरभराटीच्या राज्यात २४५ व्या वर्षी पूर्ण केले.

डॉ. भाऊ दाजी लाड, म. म. मिराशी, दिनेशचन्द्र सरकार, डॉ. शोभना गोखले यांपासून ते अमितेश्वर झा व दिलीप राजगोर या अलीकडल्या विद्वानांपर्यंत सर्वांनी त्रैकूटकांचा २४५ हा संवत् शालिवाहन शके की कलचुरि-चेदि संवतात आहे, याचा खल केला आहे, व त्यांचे दोन गट पडले आहेत. शकसंवत् धरला तर या राजवंशाची कारकीर्द इ.स. २८५-३६४ या काळात झाली असे मानावयास लागेल, तर कलचुरी संवत् धरल्यास इ. स. ४५७-५३३ असे मानावे लागेल, म्हणजे जवळजवळ १७० वर्षांचा फरक पडतो, पण ज्या स्तूपात तो ताम्रपट सापडला त्याच्या रचनाशैलीवरून तो इ. स. ३२३ मध्ये की इ.स. ४९४ बांधला याविषयीही खातरजमा होऊ शकते हे लक्षात घेणे आवश्यक होते. तो विचार डॉ. मेरिलीन लीज या मिशिगन विद्यापीठातील संशोधिकेने केला. पण त्याचा ऊहापोह करण्याअगोदर कलेतिहासज्ञांनी महाराष्ट्रातील बौद्ध गुफा, त्यातील स्थापत्य व शिल्प, आणि मूर्तिविज्ञान यांच्या इतिहासाची गुंफण कशी केली हे जाणून घेणे आवश्यक आहे. फर्ग्यूसन व बर्गिस हे गुफाविषयक अभ्यासाचे आद्य प्रवर्तक, त्यांनी अभ्यासाच्या, कालक्रमाच्या सोयीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील बौद्ध गुफांचे, अगोदरच्या हीनयान व नंतरच्या महायान असे वर्गीकरण केले आणि त्यांना अवगत झालेल्या बौद्ध धर्माच्या ज्ञानाच्या आधारे, गाभाऱ्यात स्तूप असेल तर ती गुफा हीनयानपंथीय व बुद्धमूर्ती असेल तर महायानापंथीय असा ठोकताळा मांडला. (वास्तविक सांप्रतच्या काळात संशोधनात वा सामान्य लेखनाही हीनयान हा शब्द वापरत नाहीत, कारण तो श्रावकयानीय थेरवादींना उद्देशून तुच्छतेने महायानी वापरत असत.) फर्ग्यूसन यांच्या आकलनाप्रमाणे, अजिता येथील गुफा क्र. ९, १०, ११, १२, १३ व ५ अ वगळता, सर्व गुफा या महायानपंथीय आणि सर्वात जुन्या. ते कुठल्याही महाराष्ट्रातील गुंफेचा वज्रयानी म्हणून उल्लेख करीत नाही. सर्वप्रथम प्रा. गुप्ते यांनी ते विशेषण वेरूळ येथील बौद्ध गुफांबाबत वापरले, त्यानंतर म. न. देशपांडे यांनी पन्हाळे-काजी येथील गुफांना उद्देशून सार्थ रीतीने वापरले. नंतरच्या पिढीतील, म्हणजे विद्या दहेजिया व नागराजू यांनी श्रावकथानीय गुफांचा खोलात जाऊन अभ्यास केला. जितका लाकडी घटकोचा वापर जास्त तितकी गुफा जुनी या ठोकताळ्यापलीकडे जाऊन, नवे निकष उपयोगात आणले. त्यांनी स्थापत्याचे घटक असलेल्या, विशेषतः स्तूप, स्तंभ यांच्या ठेवणीबरोबरच, शिल्पशैली व अक्षरांच्या वळणात होत जाणाऱ्या बदलांचाही मागोवा घेऊन गुंफांचा कालक्रम अधिक पक्का केला. त्यावरून असे लक्षात आले की, पूर्वी समजले जात होते त्याप्रमाणे सातवाहन काळानंतर गुंफा कोरण्याच्या कामात मोता खंड पडला नव्हता, कामात थोडे मोटा आले होते. हीनयान गुफांमधील या शेवटच्या गुंफा महायान गुंफांचा दुवा ठरू शकतील हे ढवळीकरांच्या 'लेट हीनयान केव्हज्' या प्रबंधामुळे, तसेच सुरेश जाधव यांच्या जुन्नर येथील गुंफांच्या अभ्यासामुळेही लक्षात आलेच होते. या सर्व प्रपंचाला प्रा. शिलगलॉफ यांच्या अजिता येथील कथनात्मक चित्रांच्या विश्लेषणामुळे आणखी एक कलाटणी मिळाली. या अगोदर, बैद्ध धर्मातील जातककथीचा उलगडा करावयाचा झाल्यास पाली आगमातील जातके स्रोत म्हणून वापरण्यात विद्वानांना संकोच वाटत नसे. एकीकडे त्या गुंफा महायान पंथाच्या म्हणून वर्गीकरण करावयाचे व त्यातील चित्रणांचे पाली ग्रंथांतून स्पष्टीकरण द्यावयाचे यांत काही 'वदतोव्याध्यात' आहे, हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. खरे तर तारा देवतेचे एक-दौन ठिकाणीच चित्रण, अवलोकितेश्वराचे, विशेषतः त्याच्या अष्टमहाभयत्राण रूपाचे विशेष चित्रण, काही चित्रणांसोबत स्गात लिहिलेले आर्य शूस्सेनाच्या जातकमालेतील श्लोक यांवरून या गुफा परिपक्व महाश्थान पंथाच्या नाहीत हे स्पष्ट होते. मुनीशचंद्र जोशींनी या गुफा सर्वास्तिवादी (हीनथानातीलच एक उपपंथ) निकायाध्या असल्याविषयी निर्वाळा दिलेलाच होता, शिलगलॉफ यांच्या अनेक वर्षांच्या साधनेमुळे जातकमालेव्यतिरिक्त सद्धर्भपुण्डरिक, दिव्यावदान इत्यादी मिश्र-संस्कृतभाषेत - म्हणजे खरे तर गांधारीत लिहिलेल्या अनेक सर्वास्तिवादी आगमधथांच्या साहाय्यानेच अजिता येथे चितारलेले प्रसंग समजू शकले. व दख्खनमधील चौथ्या ते सहाव्या शङकांतील बैद्ध धर्मविषयक संशोधनाला नवी दिशा मिळाली.
१९७३ साली वॉल्टर स्पिक थांना वीसेक वर्षांच्या संशोधनानंतर हे लक्षात आले की मिराशींनी हरिषेणास बहाल केलेला कार्यकाळ बराच ऐसपैस आहे, तसेच अजिंठ्यासारख्या उच्च कोटीच्या कलेचा आजूबाजूच्या मुलखातील झालेल्या परिणामाचे योग्य मूल्यमापनही करणे आवश्यक होते. त्यांनी, ऋषिकराज उपेन्द्रगुप्त, सम्राटाचा मंत्री वराहदेव, श्रेष्ठी माथुरक व विशेष म्हणजे मांडलिक अश्मकराज या हरिषेणाच्या सरदार- दरकदारांचे परस्परसंबंध, काही अपूर्ण राहिलेल्या गुफा, त्या पूर्ण झाल्या तरी यजमानाची प्रशस्ति नसलेले लेख, घाईघाईने मधेच कोबलेल्या, मिथूनी कौरविलेल्या मूर्ती या बाबी लक्षात घेऊन असा निष्कर्ष काढला की इ.स. ४७८ मध्ये हरिषेणाचा मृत्यू झाला असावा व आज दिसते तेवढे कोरीव काम पूर्ण झाले असावे. त्याचा मुलगा, सर्वसेन तिसरा यानेही आठेक वर्षे कसबसे राज्य केल्यानंतर इ.स. ४८४ पर्यंत वाकाटक साम्राज्य अचानक कोसळले असावे. त्यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे हरिषेणाचे सामंत म्हणून उल्लेखिलेल्या राजांनी आपला वेगळा कारभार मांडण्यास वाकाटक साम्राज्याच्या अश अचानक विलयाच्या वेळेसच सुरुवात केली, हे स्पष्टपणे दिसते. उदा. कोसल, मेकल, मालव, आंध या प्रदेशात एकतर गुप्तांनी आपले बस्तान परत मांडले किवा नवीन राजवंश उदयाला आला. तीच गोष्ट त्रैकूटकांच्या बाबतीत घडली. दहसेनाचा मुलगा व्याधसेन याने आपले स्वातंत्र्य घोषित केले.
हरिषेणाच्या साम्राज्याचे विस्तारवर्णन करताना त्याचा अमात्य वराहदेव कुंतल, अवंती, कलिंग, कोसल त्रिकूट, लाट आणि आंध येथील राजे त्याचे सामंत होते असे म्हणतो. त्यापैकी त्रिकूट येथील राजे त्रैकूटक हे हरिषेणाचे सामंत होते. त्यापैकी आदिपुरुष इन्द्रदत्ताचा मुलगा दहसेन याचा राज्यकाळ इ. स. ४३८ ते ४८०, व्याघ्रसेनाचा ४८० ते ४९४, असा असावा. याचा अर्थ ज्या वेळी सुबन्धुने महिष्मती येथे कलचुरी राज्याची स्थापना केली, याच सुमारास व्याधसेनाने स्वातंत्र्य पुकारले असावे. डॉ. शोभना गोखले त्यांना कोकणात माटवण येथे सापडलेल्या व्याघ्रसेनाच्या वारसीच्या ताम्रपटावरून मध्यमसेन हा सहाव्या शतकाच्या पहिल्या दशकात राज्य करीत होता. तर त्यापुढील विक्रमसेन याची कारकीर्द चौथ्या दशकात आणि नेमकेपणाने सांगावयाचे झाल्यास ५३३ पर्यंत चालू होती असे दिसते. याचा अर्थ इंद्रदत्ताची कारकीर्द लक्षात घेतल्यास ५३३ पर्यंत त्रैकूटक राजे अपरान्तावर निर्वेधपणे राज्य करीत होते, याला अपवाद फक्त हरिषेणाने दहसेनाला ४७० च्या सुमारास आपले मांडलिकत्व घेणे भाग पाडले. तेव्हापासून ते व्याघ्रसेनाने आपले स्वातंत्र्य पुकारले तेपर्यंतचा दहाएक वर्षांचा हा काळ, वराहदेवाच्या गुफा क्र. १६ मधील शिलालेखाव्यतिरिक्त याला काही दुसरा पुरावा आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्यास, 'आहे' असे म्हणता येईल, कान्हेरी येथील दुसऱ्या कालखंडातील (इ. स. पाचवे सहावे शतक) गुंफांच्या स्थापत्यावर आणि शिल्पावर अजिंठा येथील कलेची दाट सावली पडल्याचे दिसते. दाराच्या चौकटी, त्यावर मध्यभागी असलेले अर्धस्तंभ (पिलास्टर) गुंफा क्र. ८९, ९० मधील वहांड्यातील आणि सभागृहातील शिल्पांची धारणी आणि त्यामागील हावभाव वाकाटकांच्या सांस्कृतिक प्रभावाचा दुसरा पुरावा शोभना गोखाले यांनी मोठ्या हिरिरीने मांडला. कान्हेरी येथील गुंफा क्र. ८७येथील स्तूपरूपी बौद्ध समाधींचा त्यांनी खोलात जाऊन अभ्यास केला. कान्हेरी येथील केअरटेकर के. एम. वाणी यांच्या साहाय्याने त्यांनी तीसापेक्षा जास्त शिलालेख हुडकून काढले व संपादित केले. गोखलेबाईंनी विशेष करून लक्षात आणून दिलेली गोष्ट म्हणजे, त्यातील बरेच लेख पेटिकाशीर्ष (बॉक्स हेडेड) वळणाच्या ब्राह्मी लिपीत लिहिले आहे. वाकाटकांचे जवळजवळ सर्व शिलालेख या लिपीतच कोरलेले आहेत. त्रैकूटकांवर हरिषेणाचे वर्चस्व होते, हे अधोरेखित करण्यासाठी आणखी एक मुद्दा विशद केला "सकुन्तलावन्ति कलिङ्ग कोसल त्रिकूटलारान्ध... जानिमान/ अशा श्लोकांमध्ये अस्पष्ट झालेली तीन अक्षरे 'परान्त' म्हणजे 'अपरान्त' अशी असावीत, असे सुचविले आहे. त्रैकूटक राजे हे अपरान्ताचे म्हणजे पूर्व दक्षिण- उत्तर कोकणाचे स्वामी असल्याचा त्यांच्या अभिलेखातून उल्लेख येतो. त्रिकूटाबरोबर अपरान्ताचा उल्लेख केल्यामुळे कोकण व सख्याद्री रांगेला लागून असलेला नाशिक अथवा कोल्हापूरसारखा पठाराचा भागही त्यांना अभिप्रेत असावा असे दिसते.
या सर्व पार्श्वभूमीवर वॉल्टर स्पिंक यांच्या शिष्या डॉ. भेरिलिन लीज यांनी कान्हेरी येथील पाचव्या-सहाव्या शतकातील गुंफांचा विशेष अभ्यास करून प्रबंध सादर केला. "एन्सायक्लोपिडिया ऑफ इंडियन आर्किटेक्चर" या ग्रंथमालिकाचे एक सन्मान्य सहसंपादक डॉ. मधुसूदन ढाकी यांनीही आपल्या लेखनात त्रैकूटक कलेचा परामर्श घेताना या बाबींचा विचार केला आणि डॉ. सूरज पंडित हे कान्हेरी येथील गुंफांवर प्रबंध लिहीत आहेत, हे कळल्यावरून तेथील त्रैकूटक स्थापत्य व शिल्पकलेचा विशेष अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.

डॉ. पंडित यांनी कान्हेरी येथीलच पाचव्या-सहाव्या शतकातील गुंफीचा विचार केला नाही, तर त्यांच्या प्रबंधात अपेक्षित असल्याप्रमाणे साष्टी बेट आणि भोवतालच्या गुफांमध्ये पाचव्या सहाव्या शतकातील बौद्ध वास्तूंचा आणि शिल्पकलेचासुद्धा विचार केला, त्यात लोणाड, महाकाली आणि भारठाणे येथील अवशेष महत्त्वाचे आहेत. याही पलीकडे जाऊन त्रैकूटक हे अपरान्ताचे स्वामी असल्यामुळे कुलाबा म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ल्यातील बौद्ध गुंफांचा विशेष करून महाडजवळील गांधारपाले आणि कुडा येथील गुंफांचा, त्यातल्या त्यात शिल्पांचा परामर्श घेतला. कोकणबरोबरच सह्याद्रीला लागून असलेल्या नाशिकसारख्या पठारावरील ठिकाणांचा त्यांना विचार करावा लागला कारण त्रिकूट हा पर्वत किंवा त्यावरील अनिरुद्धपुरी ही त्यांची राजधानी नेमकी कुठे होती, याविषयी अभ्यासकांत मतभेद असले तरी राजधानी कदाचित धारापुरी येथेच असल्याची शक्यता असल्याने त्रिकूट पर्वत हा नाशिकच्या आसपास कुठे तरी असावा अशी शक्यता असल्यामुळे त्यांनी कोकण साष्टीबेटे व धारापुरी, नाशिक आणि बोरघाटातील गुंफांवर आपले लक्ष केंद्रित केले. वास्तूच्या दृष्टीने कान्हेरी, महाकाली, लोणाड, महाड, नाशिक व कार्ले या स्थळांचा आणि शिल्पमूर्तीविशेषांच्या दृष्टीने मागठाणे आणि कुडा यांचा विचार केला. त्यांच्या मते कान्हेरी येथील शंभरापैकी पंचवीस गुफा त्रैकूटक कालखंडातील असून त्यातील वीस गुंफांचेच त्यांनी आपल्या ग्रंथात वर्णन केले आहे. त्रैकूटक काळातील कान्हेरी येथील गुफांची स्थापत्यवैशिष्ट्ये त्यांच्या निरीक्षणात आली, ती येणेप्रमाणे -
१) गुफेसमोर प्रशस्त अंगण व त्यावर लाकडी मंडप
२) अंगणात मितीलगत एक बाक
३) भितीलगत परंतु किंचित आत वर छप्पर
४) गुफेत बाहेर व्हरांडा व आतमध्ये सभागृह आणि गाभारा.
५) गुंफेच्या व्हरांड्याकडे चढून जाण्यासाठी पायऱ्या व याआधी चंद्राशिळा.
वरील उल्लेखिलेल्या २५ गुफांमधील चारांच्या नोंदी (क. ९०, ८९, ३१,४१) त्याकाळचे शिल्पस्थापत्य जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
त्यातील पाहिल्या तीन व्याघ्रसेन, दहसेन यांच्या काळातल्या (म्हणजे इ. स. ४७५ ते ५००) असून ४१ क्र. ची गुंफा इ. स. ६१० पर्यंत पूर्ण झाली असावी. गुफा क. ९० ही एक स्थापत्य तसंच मूर्तिपूजेच्या उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाची गुफा आहे. स्थापत्यदृष्ट्या ही एक पूर्वीच्या काळातल्यासारखी विहारगुंफा आहे. सभागृहाच्या पुढे मूर्तीसाठीचा गाभारा नाही. पाठीमागच्या भिंतीलगतच जवळजवळ पाच फूट उंच असलेली बैठी, बहुतकरून लाकडाची चलमूर्ती बसविण्यासाठी खोबण करण्यात आली आहे. या संदर्भात येथीलच श्रावकयानीय गुंफा क्र. ३ मधील एका वैशिष्ट्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. कार्ले येथील चैत्यगृहाखमाणे प्रशस्त आणि सुंदर अशा या चैत्यगृहात पारंपरिक पद्धतीने स्तूपाची पूजा करण्यात येत असे. परंतु संशोधकांनी नोंद केल्याप्रमाणे पूजा पद्धतीत तिथे काही फरक घडून येत होते व त्याची सुरुवात येथील ध्वजस्तंभावर ठळकपणे कोरलेल्या बैठ्या व उभ्या अशा दोन बुद्धमूर्तीवरून येते, स्तूपाऐवजी बुद्धमूर्तीच्या पूजेची ही नांदी म्हणावयास हरकत नाही. हा बदल ठळकपणे बाध (जिल्हा धार, मध्य प्रदेश) आणि अजिंठा या ठिकाणी झाल्याचा उल्लेख यापूर्वी केलेलाच आहे. अजिंठा येथील गुंफा क्र.
अकराच्या गाभाऱ्यात प्रदक्षिणा घालता येतील असा स्तूप कोरण्यात आला होता, परंतु नंतर बुद्धमूर्ती कोरण्यात आली तरी पाठच्या भागात स्तूपाचा गोलाकार कायम राहिलेला होता. चैत्यगृह क्र. १९ मध्ये तसेच २६ मध्येही स्तूपाच्या समोर स्थानक बुद्ध मूर्ती स्वतंत्रपणे कोरण्यात आली आहे. कान्हेरी येथे अशा बदलांची चाहूल इ. स. च्या दुसन्या शक्कात लागली असली, तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र पाचवे शतक उजाडावे लागले. वर वर्णिल्याप्रमाणे सभागृहाच्या पाठीच्या भिंतीवरच खोबण तयार करून लाकडी मूर्ती बसविण्यात आली असावी. दुसरा महत्वाचा विशेष म्हणजे अश प्रकारच्या पूजागारांत आगमग्रंथांचे पठण सद्धर्मपुण्डरिक हा सर्वास्तिवादी (म्हणजे पंथदृष्ट्या हीनयानी) पण महायान परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेला ग्रंथ चाळल्यास मूर्तिपूजा आणि धर्मग्रंथपठण यांना आचारविधीमध्ये महत्त्वाचे स्थान होते असे दिसते. कान्हेरी येथील त्रैकूटक गुफातील दर्शनी व्हरांड्याला लागून एक कक्ष (सेल) कोरलेला असे त्यातील कोनाड्यात ग्रंथ ठेवण्याची सोय असावी, असा सूरज पंडितांनी केलेला कयास बरोबरच आहे. कारण याच काळातील एक महत्वाची दुसरी गुफा म्हणजे दरबार लेणे (क.११) जेथे सांधिकरीत्या पठण करण्यासाठी दोन लांबलचक ओटे बांधले होते, असे दिसते व ही परंपरा वेरुळ येथील गुफा क्र. ५ मधील, तशाच प्रकारच्या वास्तुरचनेवरू नही मूलकजन्मदातसुद्धा प्रचलित होती, हे स्पष्ट दिसते. क. ९० मधील गुफेतील बुद्धमूर्ती काष्ठाची आणि चल (सुटी) होती, हा योगायोग नाही. कारण सद्धर्मपुण्डरिकाचाच आधार देऊन सूरज पंडित असा तर्क करतात, की विशेष उत्सवप्रसंगी या मूर्तीची मिरवणूकही काढण्यात येत असे. इ. स. सातव्या शतकातले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे राजा श्रीहर्ष अशा उत्सवप्रसंगी भगवान बुद्धाच्या मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक काढीत असे, आणि बोधिसत्त्वाच्या जागी चवरी ढाळण्यासाठी स्वतः उभा राहत असे. भारतीय परंपरेतील रथयात्रेच्या प्रघाताच्या मुळाशी अशीच कल्पना आहे. आजही महालक्ष्मी आणि जे जुरीच्या संस्थानात विशेषप्रसंगी देवळाच्या आवारातच चलमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. या चलमूर्ती व्यतिरिक्त सभागृहाच्या तीनही भितीवर अवलोकितेश्वर, श्रावस्ती येथील महाप्रतिहार्य (श्रावस्ती मिरॅकल) भगवान बुद्ध व दोन बाजूस परिचारक असलेले बेोधिसत्त्व अशा त्रिकूटाची प्रतिमा आणि जॉन हेटिंग्टन यांनी ज्याचे वर्णन 'पञ्चजिनमण्डल' असे केले आहे, असे शिल्पपट भरगच्चपणे कोरलेले आहेत. नंतरच्या म्हणजे वजयान काळातही हे बुद्ध मंदिर तितकेच महत्त्वाचे राहिले असावे. कारण या गुंफेच्या माथ्यावर एक चौकोनी खोबण असून त्यामध्ये काम्यस्तूप (वोटिव्ह स्तूप) उभारण्याची पद्धत होती. असे काम्यस्तूप महाकाली आणि पन्हाळेकाजी येथे उभारल्याचा पुरावा आहे.
यानंतरच्या महत्वाच्या गुंफत्र क. ८९ आणि ८१ यांचा तलविन्यास सारखाच आहे. परंतु व्हरांड्यात उजव्या बाजूला असलेला कक्ष लेणी क. ८९ मध्ये मात्र नाही, मात्र भिंतीवर श्रवस्तिमहाप्रातियाथांचे विपुल प्रमाणात चित्रण असून गुंफा क. ३१ मध्ये मूर्तीऐवजी पूजेसाठी स्तूप आहे. या सर्व गुफा पीडित यांच्या मते पाच्या शतकाच्या उत्तरार्धात दह सेना व व्याधसेन यांच्या काळात कोरल्या असाव्यात. इ. स. च्या सहाब्या शतकाच्या पहिल्या दशकात कोरलेली एक महत्वाची गुफा क्र. ४१ ही होय. गुंफेचा तलविन्यास या आधी वर्णन केलेल्या गुंफांच्या सारखाच म्हणजे मोकळे अंगण, मुखभडप, आतमध्ये सभागृह आणि गाभारा असा आहे. परंतु सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे उजव्या हाताला अंगणाच्या सुरुवातीसच एक कक्ष असून त्यात बोधिसत्त्वासहित असलेली बुद्धाची त्रिमूर्ती आहे. सर्वात लक्षणीय म्हणजे एकादशमुख अवलोकितेश्वराचीही प्रतिमा आहे. अवलोकितेश्वर म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर करुणेने नजर ठेवणारा बोधिसत्त्व होय, आपण अशीही कल्पना करू शकतो की त्याची ही दृष्टी दशदिशांत व्यापून राहिलेली आहे आणि त्यासाठीच दहा शिरांची कल्पना करण्यात आली आहे. एकादशमुख अवलोकितेश्वराचा एक स्वतंत्र संप्रदायच मध्य आशिया आणि चीनमध्ये लोकप्रिय झाला होता. अशा अवलोकितेश्वराकडून अभय प्राप्त करून घेण्यासाठी 'एकादशमुख अवलोकितेश्वर दय' अशा नावाचा धारणीमंत्रही ग्रंथीतरी आढळतो. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या अवलोकितेश्वराची जगातील ही प्राचीन प्रतिमा आहे. या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, आज कान्हेरी म्हणून ओळखला जाणारा तत्कालीन कृष्णागिरी महाविहार हा त्या काळी बौद्ध धर्मात होणाऱ्या संक्रमणाचा व त्यातून उद्भवलेल्या नवीन आचारविधी आणि प्रतिभालक्षणे यांचा मूलखोत होता.

कान्हेरीपासून थोडे दूर पण कल्याणच्या मार्गावरील लोणाड या गावाच्या शिवारात लहानशा टेकडीवर एक गुफा आहे. समोरील अंगण ओलांडून गेल्यानंतर दोन खांब आणि अर्धस्तंभाकृती तौललेला हरांडा या मागे तीन द्वारातून प्रवेश करता येईल, असा बंदिस्त मंडप (Closed hall) आणि पलीकडे गाभाथाची योजना असावी. परंतु टेकडीच्या शिळीमध्ये असलेल्या भेगांमुळे मंडप कोरला गेला नाही. ही गुफा महत्त्वाची यासाठी की अंगणात एका बाजूला पाण्याचे टाके आणि दुसऱ्या बाजूला छज्ज्याखाली एक मोठे सुंदर शिल्प आहे. शिल्याचा विषय चटकन लक्षात येत नाही. परंतु व्हरांड्याच्या खांबावरील असलेल्या शिल्पषट्टिकेवर विश्वंतर जातकाच्या कथेतील प्रसंग लक्षात घेतले म्हणजे विश्वंतराला वनवासाला पाठविण्याचा राजाने घेतलेला निर्णय, हा या शिल्पाचा विषय असावा हे स्पष्ट होते.
विश्वंतर जातकातील या प्रसंगाबरोबरच त्याकाळच्या संकेतानुसार हरिती आणि पाञ्यिक या मूर्ती येथे कोरलेल्या दिसतात. मंडपात जाण्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या तळाशी डोक्धावर कुंभ धारण करणारे गण दाखविलेले आहेत. कुंभ धारण करणारे गण, हरिती व पाञ्यिक आणि विश्वंतर जातकाचे चित्र, त्याचप्रमाणे शिल्पशैली ही हुबेहूब अजिंठ्याप्रमाणे आहे. त्यामुळे ही गुफा पाचव्या शतकाच्या शेवटी शेवटी कोरण्यात आली असावी. महाकाली येथील पहिल्या तीन गुंफाही त्रैकूटक काळातच कोरण्यात आल्या असाव्यात व पलीकडच्या चैत्यगृहातील भितीवरील बोधिसत्त्व शिल्पेही त्याच काळातील असावीत. या संदर्भात साष्टिबाहेरील त्रैकूटक स्थळे म्हणजे कुडा येथील चैत्यगृहात कोरलेल्या श्रवस्ती प्रतिहार्याच्या प्रतिमा आणि महाडजवळील गांधारपाले येथील पहिली गुंफाष्टी विहाराच्या स्वरूपात असून मध्यभागी स्तुपासाठी असलेल्या चौकोनी शिलाखंडाच्या समोरच्या पार्श्वभूमीवर बुद्ध प्रतिमा कोरण्यात आली आहे. बाजूच्या दोन भितींवर चवन्ऱ्या ढाळणारे बोधिसत्त्व कोरण्याचा प्रयत्न केला आहे. ही दोन्ही स्थळे त्रैकूटक काळात श्रवकयानातून बौद्ध धर्माचे बोधिसत्त्व यानात होणारे संक्रमण दाखवितात.
स्वतः त्रैकूटक राजे हे बौद्धममनुयायी नव्हते. परंतु याआधी उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहन/अभिरानंतरच्या आर्थिक पडत्या काळात सागराची किनारपट्टी त्यात अध्याह्नत बंदरे आणि दुर्ग यावर बळकट शिबंदीची व्यवस्था करून त्यांनी व्यापार उदिमाला अभय दिले होते. सारिपुत्ताच्या स्तूपात सापडलेल्या ताम्रपटात उल्लेखिल्याप्रमाणे सिंध प्रांतातील भक्तगण तसेच सार्थवाह साष्टी बेटामध्ये येऊन स्तूप आणि इतर धार्मिक स्थापत्य घडवीत होते. त्यामुळे बौद्ध धर्माला त्यांनी प्रत्यक्ष आश्रय दिला, असा एकही अभिलेख नसला तरी वाकाटक राजा हरिषेण याच्याप्रमाणेच त्यांचे प्रोत्साहन होते असे स्पष्ट दिसते. ते स्वतः परम वैष्णव होते आणि दहसेनाने अश्वमेध याग केल्याचाही उल्लेख येतो. सर्व त्रकूटक राजाच्या शिलालेखातून ब्राह्मणांना चरुबली, वैश्वदेव यासाठी सूरतेच्या आसपासच्या भागात व कोकणात भूमिदान केल्याचे उल्लेख येतात. आज रत्नागिरीच्या संग्रहात प्रदर्शित केलेली, पनवेलजवळ सापडलेली चतुर्भुज विष्णुमूर्ती या संदर्भात महत्वाची आहे. चक्र, गदा आणि शंख धारण करणारी ही लाञ्छनांच्या आणि मूर्ती घडविण्याच्या शैलीच्या दृष्टीने पश्चिमेकडील मिनमान (राजस्थान) व इतरत्र आढळणाऱ्या प्राचीन स्थानकमूर्तीशरी साम्य दाखविते. ही पाचया शतकातील म्हणजे त्रैकूटक काळातील हे निश्चित, याहूनही अधिक स्तिमित करणारी मूर्तिशिल्पे रत्नागिरीजवळ लॉजा येथे टेकाडात कोरलेली आढळतात. त्यामध्ये स्थानक चतुर्भुज विष्णु, नदीवर आरूढ झालेले उभा व शंकर आणि चक्रपाणी आणि विशेष म्हणजे द्विभुज चक्रपाणी केवलनरसिंहाची प्रतिमाही आहे. याआधी आपण पाहिल्याप्रमाणे रामटेक (जि. नागपूर), भादक व भटाळा (जिल्हा चंद्रपूर) आणि पवनार (जिल्हा वर्धा) या विदर्भातील स्थळाव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेर चौथ्या पाचव्या शतकात अशा केवलनरसिंहाच्या प्रतिमा उत्तर कर्नाटकात (हल्लीचे धारवाड व मंगलौर हे जिल्हे) म्हणजे प्राचीन कुंतलाधिपती यांच्या राज्यातच सापडल्याची माहिती होती. हे राजेही स्वतःस परमभागवत आणि वैष्णव म्हणावत असत. वाकाटक राजाप्रमाणेच ते सात्वत धर्मानुयायी होते, याचा यापूर्वीच्या लेखात उल्लेख आला आहेच, परंतु लांजा येथील त्रैकूटककालीन केवल नरसिंहाच्या शोधामुळे हरिषेणाच्या काळात सात्त्वतधर्म हा कोकणातही पोहोचला होता हे सिद्ध होते. पळसांबे (जिल्हा-कोल्हापूर) येथील एका नाल्यात मोठमोठ्या शिलाखंडामध्ये एकार मक पद्धतीने कोरलेल्या तीन मंदिरांचा आणि काही शिवलिंगांचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही, असे आम्हांस वाटते. एकूण स्थापत्य पद्धतीवरून आणि विशेषतः खांबांच्या रचनेवरून आम्ही या निष्कर्षाप्रत आलो आहोत की या गुफा त्रैकूटकालीनच असाव्यात, याविषयी पूर्वी लेख लिहिला, त्या वेळी पळसांबे येथील गुंफा चालुक्यापूर्वकालीन आहेत, असा निर्णय घेऊन कालविषयक चर्चा तेवढ्यात आटोपती घेतली, परंतु त्रैकूटककालीन कलेचा सूरज पंडित यांनी केलेला ऊहापोह लक्षात घेता आम्ही आता बरील निष्कर्ष काढला आहे.
वेंगीचे विष्णुकुंडी
आणखी एक राजघराणे म्हणजे वाकाटकांशी घनिष्ठ संबंध असणारे वेगीचे विष्णुकुंडी होत. काही विद्वानांच्या मते अगदी प्रवरसेन प्रथम (इ.स. २७०-३३०) याच्या काळापासून अंध राजांचा आणि वाकाटकांचा संबंध आला असावा. वाशीमच्या वाकाटकांनी द्वितीय विन्ध्यशक्तीच्या काळात (इ.स. ३५५ - ४००) आंध्रातील आपले वर्चस्व कायम ठेवले असावे. पण त्यांच्या संबंधाचा अगदी स्पष्टपणाने पुरावा विष्णुकुंडी विक्रमेद्रवर्मन् द्वितीय याच्या चिक्कुल्ल ताम्रपटामधील 'माधववर्मणः प्रियप्रणप्ता विष्णुकुंडिवाकाटकवंशद्व-यालङ्कृतजन्मनः' या उल्लेखावरून मिळतो. विक्रमेद्रवर्मन् याने कंदुलपले येथून चौदाव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटात, श्रीमाधववर्मा याचा तो आवडता मुलगा असून विष्णुकुंडी आणि वाकाटक वंश यांना आपल्या जन्माने त्याने अलंकृत केल्याचा उल्लेख येतो. विक्रमेद्रवर्मा यानेच आपल्या तुंबलगुडे येथून अकराव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटात महाराज श्रीविक्रमेंद्र हा श्रीमाधववर्त्याचा प्रिय पुत्र असून त्याची आई वाकाटक कुळातील होती असा स्पष्ट उल्लेख येतो. यांनी विक्रमेद्रवर्मन् हा माधववर्मा याचा मुलगा ही गोष्ट लक्षात घेऊन तो माधववर्मा प्रथम याचा मुलगा असावा असे मत मांडले होते. परंतु चिक्कुल्ल ताम्रपटातील स्पष्ट उल्लेखामुळे तो माधववर्याचा पणतू होता हेही लक्षात आले. डॉ. एस नारायण यांनी आपल्या १९७७ साली लिहिलेल्या 'विष्णुकुंडी व त्यांचा काळ' या ग्रंथात विष्णुकुंडी घराण्याच्या सर्व ताम्रपटांचा सखोल मानत होते अभ्यास करून असे दाखवून दिले की म. म. मिराशी त्याप्रमाणे विष्णुकुंडीवंशामध्ये माधववर्मा या नावाचे दोनच राजे नसून चार राजे झाले असावेत. तसेच विक्रमेद्रवर्मा या नावाचेसुद्धा दोन राजे होऊन गेले असावेत.
▲ शिऊर येथील गुंफांमध्ये कोरलेले पूतनावधाचे शिल्प
त्यातील माधववर्मा द्वितीय याने ३७ वर्षापेक्षा जास्त राज्य केले असावे (इ.स. सुमारे ४६३-५०२). विक्रमेंद्रवर्मन् प्रथम (इ.स. सुमारे ५०२-५२७) हा मुलगा त्याला वाकाटक राजकन्येपासून झाला असावा. आणि त्यामुळेच एके ठिकाणी तो माधववर्त्याचा मुलगा आणि दुसऱ्या ठिकाणी तो माधववर्त्याचा पणतू अशा प्रकारचे उल्लेख येतात. स्वतः विक्रमेंद्रवर्मन् प्रथम याने दिलेले ताम्रपट अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. वाकाटकमहादेवीचा किंवा विष्णुकुंडी आणि वाकाटक या वंशद्वयाचा उल्लेख असलेले सर्व ताम्रपट हे विक्रमेंद्र द्वितीय याने दिलेले आहेत हे स्पष्ट आहे. त्याच्या राज्य शासनाच्या दहाव्या वर्षी चिक्कुल्ल येथून दिलेल्या ताम्रपटातून तो ताम्रपट शक ४८८ मध्ये दिलेला असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे त्याचा काल इ.स. सुमारे ५५५ ते ५७२ असावा असे ठरवताना फारसे प्रयास झाले नाहीत.
म. म. मिराशी यांनी माधववर्त्यांचा पश्चिम महाराष्ट्राशी संबंध असावा हे मांडले, त्यालाही एक वेगळी पार्श्वभूमी होती. सातारा जिल्ह्यातील खानापूर या तालुक्याच्या ठिकाणी माधववर्मा या राजाने दिलेल्या ताम्रपटसंचातील दोन पत्रे मिळाले. त्यावर त्यांनी व य. रा. गुप्ते यांनी मिळून (एपिग्राफिया इंडिका खंड २७पृष्ठे ३१६-३१७) एक लेख प्रसिद्ध केला. या ताम्रपटसंचात मूळ तीन पत्रे असावेत. त्यातील पहिला पत्रा सुरुवातीपासूनच गहाळ असल्याने व दुसऱ्या पत्र्याचा वरचा आणि खालचा भाग तुटलेला असल्याने त्यातील दोन्ही बाजूंवरील सुरुवातीचा आणि शेवटचा मजकूर खंडित झाला होता. त्यामुळे दान देणारा महाराज श्रीमाधववर्मा हा कुठल्या घराण्यातील राजा असाही सुरुवातीस प्रश्न पडला होता. परंतु दुसऱ्या पत्र्यावरील दुसऱ्या ओळीत पुंडरीक बहुसुवर्ण आणि अकरा यज्ञ केल्याचा, तसेच तो सार्वभौम होता, सूर्याप्रमाणे तेजस्वी, ऐश्वर्याने इंद्रासारखा व चातुर्वर्ण्य आणि चतुराश्रम धर्माचा तो रक्षणकर्ता होता असेही त्याचे वर्णन आले आहे. त्यातील 'पुंडरीक बहुसुवर्ण' या वेगळ्या प्रकारच्या यज्ञ प्रकारामुळे तसेच त्याने अकरा म्हणजे अकरा अश्वमेध याग केले होते, हे लक्षात आल्यामुळे तो विष्णुकुंडी वंशातील माधववर्मा असावा असा कयास म. म. मिराशी यांनी प्रदर्शित केला व त्यावेळी विष्णुकुंडीच्या इतिहासासाठी उपलब्ध असलेल्या लेखसामग्रीवरून त्यांनी विष्णुकुंडी वंशातील राजांची वंशावळसुद्धा तयार केली व त्यात वंशातील आद्य माधववर्मा याने खानापूरचा ताम्रपट दिला असावा असे मत प्रकट केले. मिराशी यांना उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे विष्णुकुडी वंशात दोनच माधववर्मा नावाचे राजे झाले असावेत असे त्यांना वाटले. माधववर्मा प्रथम हा आंध्र प्रदेश येथील वेगी अथवा इंद्रपूर येथून राज्य करीत असताना दान दिलेल्या गावाच्या चारही बाजूस असलेल्या आजच्या सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक (रेडूरकग्राम) व मलखेड (मलखेटक) यांचा उल्लेख करताना तो वाकाटकांच्या
▲ शिऊर येथील गुंफांमधील त्रिविक्रमाची मूर्ती
वाशीम शाखेतील हरिषेणाचा समकालीन असावा (त्यांच्या मते इस ४७५ ते ५००) आणि हरिषेणाच्या मृत्यूनंतर माधववर्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार साताऱ्यापर्यंत केला असावा असा कयास बांधला.
आपल्या वरील मताला पुष्टी देण्यासाठी त्रिकुटमलय पर्वतावर माधववर्त्याची सत्ता होती असाही विष्णुकुंडी ताम्रपटांत उल्लेख असल्यामुळे तो त्रिकूटपर्वत म्हणजे अंजनेरी ताम्रपटांत उल्लेख केलेला
▲ शिऊर येथील या गुंफा विष्णुकुंडी यांच्या काळात कोरल्या गेल्या असाव्यात
▲ शिऊर येथील गुंफांमधील वराहाची मूर्ती
सह्यह्याद्री पर्वताचा भाग असलेला नाशिकजवळील त्रिकूटपर्वत असावा असेही अनुमान त्यांनी केले. आणि त्यामुळे पश्चिमेत नाशिकपासून साताऱ्यापर्यंत इतक्या दूरवर त्याचे साम्राज्य पसरले असावे, अशी अटकळ त्यांनी बांधली. तसेच अंध, कलिंग, त्रिकूट, लाट, कोसल, मालव, कुंतल, एवढ्या प्रदेशावर सार्वभौमत्व गाजवणाऱ्या हरिषेणाचा माधववर्मा प्रथम हा मांडलिक असावा, एवढेच नसून आपली मुलगी देऊन माधववर्याशी हरिषेणाने आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले असावेत असेही मत मांडले.
वर उल्लेख केल्याप्रमाणे विष्णुकुंडी व त्यांचे मांडलिक यांच्या अठरा ताम्रपट व शिलालेखांचा चिकित्सक अभ्यास करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या म्हैसूर येथील प्रमुख पुराभिलेखज्ञ या कार्यालयात पुराभिलेखज्ञ या हुद्यावर काम करणाऱ्या अलमेलू श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी विष्णुकुंडी आणि त्यांचा काळ हा प्रबंध १९७७ साली प्रकाशित केला. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे विष्णुकुंडी राजवंशात इ. स. ३७५ ते इ. स. ६१२ या जवळ जवळ २५० वर्षाच्या कालखंडात आठ राजांनी राज्य केल्याचे प्रतिपादिले आहे. त्यात दोन विक्रमेद्रवर्मा, दोन गोविंदवर्मा, दोन इंद्र, व चार माधववर्मा नावाचे राजे होऊन गेल्याचे ते प्रतिपादितात.
विष्णुकुंडी यांचे राज्य हे उत्तरेत नर्मदा, पश्चिमेस सातारा आणि दक्षिणेत पल्लवांच्या राज्यापर्यंत भिडलेले असल्यामुळे व तुलनेने या काळातील इतिहास हा बराचसा अज्ञात आणि गुंतागुंतीचा असल्याने इतिहासाची जुळवाजुळव करताना त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत असे सहज लक्षात येते. पण त्यामुळे वाकाटकवंश आणि विष्णुकुंडी यांच्या परस्पर संबंधांवर त्यांनी नव्याने प्रकाश टाकला आहे. उदा. नंदिवर्धन शाखेतील नरेन्द्रसेन व पृथ्वीषेण द्वितीय यांच्याशी, यापूर्वी उल्लेख केलेल्या मानपूर येथील राष्ट्रकूट राजांशी, वनवासी येथील कदंबांशी व वाशीम शाखेतील विन्ध्यशक्ती व्दितीय, देवसेन व त्याचा पुत्र सम्राट् हरिषेण यांच्याशी कशा प्रकारचे संबंध होते याचाही त्यांनी चिकित्सकपणे खोलवर विचार केला आहे.
श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी नव्याने मांडलेल्या विष्णुकुंडी यांच्या राजवंशावळीत माधववर्मा द्वितीय (इ.स. सुमारे ४२२-४६६) हा वाकाटक वंशाच्या दोन शाखांतील प्रवरसेन द्वितीय (नंदिवर्धन शाखा इ.स. ४१०-४४०) व हरिषेण (इ. स. सुमारे ४६२ - ४७८ डॉ. स्पिक यांनी मांडलेल्या नवीन कालक्रमाप्रमाणेही) या दोघानाही समकालीन होता. तो कदाचित नरेद्रसेन (इ.स. सुमारे ४४० ४५५) आणि पृथ्वीषेण द्वितीय (इ. स. सुमारे ४५५ - ४७०) यांनाही समकालीन असावा. प्रो. स्पिक यांनी अजिंठा येथील व बाघ (मध्यप्रदेश) येथील गुंफांच्या संबंधात वाकाटकांच्या भोवतालच्या प्रदेशात राज्य करणाऱ्या अथवा त्यांच्या संबंधात असलेल्या राजांच्या कारकिर्दीचा विचार करून हरिषेणाचा कार्यकाल एरवी समजले जाते, त्यापेक्षा कमी कालावधीचा असावा असे मत मांडले. प्रो. स्पिक यांच्या असे लक्षात आले की हरिषेणाचे साम्राज्य कदाचित आकस्मिक रीतीने संपुष्टात आले असावे. त्याच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशाचा आणि त्यावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचा कार्यकाळ लक्षात घेतला, तसेच जुन्या राज्यावर नव्याने प्रस्थापित झालेले राजवंश लक्षात घेतले तर असाच अंदाज करावा लागतो. उदा. नर्मदेच्या पलीकडील माळव्यावर राज्य करणारे राजे त्याला अनुकूल होते. बाघ (मध्यप्रदेश) येथील गुंफांच्या संगोपनासाठी सुबंधु नावाच्या माळव्यात नव्याने उदयाला आलेल्या राजाने ताम्रपट दिल्याचे लक्षात आले. सुबंधु याचा बरवानी येथील ताम्रपट त्याने १६७ व्या संवत्सरात (+ गुप्त शकाची ३२० वर्षे = इ. स. ४८७) दिला. या ताम्रपटातील गुप्त शकातील वर्षानुसार हरिषेणाचा काल इ.स. सुमारे ४८५ च्या आसपास संपला होता असे मानावे लागते. त्रैकूटक हा दुसरा राजवंश, त्यांनीसुद्धा वाकाटकांचे वर्चस्व झुगारून त्याच सुमारासच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. (४९० मधील सूरत ताम्रपट) तसेच बाघ येथील गुंफा, म. म. मिराशी मानतात त्याप्रमाणे पाचव्या शतकातील सुरुवातीच्या काळातील नसून, अजिंठ्याच्या समकालातच निर्माण केल्या असाव्यात, हे तेथील स्थापत्य व शिल्पकलेची धाटणी लक्षात घेतल्यावर दिसून येते, हे वाल्टर स्पिक यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. तिसरा मुद्दा असा की, नंदिवर्धन शाखेचा लय हा कदाचित हरिषेणाच्या आक्रमक धोरणामुळे झाला असावा. पुणे येथील प्रभावतीगुप्ता हिच्या ताम्रपटाचा हरिहर ठोसर यांनी नव्याने विचार करून हे दाखवून दिले आहे की त्यातील सुप्रतिष्ठानविषय व दानपत्रात वर्णन केलेली गावे ही पैठणच्या आसपासच सापडतात. त्याचा सहज व सरळ अर्थ असा होतो की प्रवरसेनाने वन्हाडात राज्य करणाऱ्या वाशीम शाखेतील प्रदेशापलीकडे सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे प्रवरसेन द्वितीय याच्या काळामध्ये वत्सगुल्मशाखेतील एक अगदी कोवळ्या वयातील राजा अथवा त्यापाठोपाठ राज्यावर आलेला देवसेन हा दुर्बळ राजा असावा असे दिसते.
▲ शिऊर येथील गुंफांमधील मागील हातात शंख आणि चक्र घेतलेली विष्णूची मूर्ती
श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन वाकाटक वंशाच्या दोन शाखांतील परस्परसंबंध कसे होते याविषयी काही नव्याने विचार मांडले आहेत. त्यांच्या मते विक्रमेद्रवर्मन् (प्रथम) याची आई, म्हणजे द्वितीय माधववर्याची पत्नी, जिचा लेखात वाकाटक महादेवी म्हणून उल्लेख केला आहे, ती नंदिवर्धन शाखेच्या प्रवरसेन द्वितीय याची मुलगी असावी. श्रीनिवास शंकरनारायणन् यांच्या मते हरिषेण याचा पिता देवसेन हा अत्यंत दुबळा राजा असून नामधारी राजा असावा. आणि त्यामुळेच नंदिवर्धन शाखेचा प्रवरसेनच विदर्भाचा खरा राजा असावा. त्याने पराक्रमी माधववर्याला आपली मुलगी देऊन संबंध बळकट केले असावेत. प्रवरसेन द्वितीय याची सून कुंतल राजकन्या अज्झितभट्टारिका ही मानपूरच्या राष्ट्रकूट वंशातील किंवा कदंब वंशातील असली, तरी ही राज्ये वाशीम शाखेच्या राज्याच्या सीमारेषेवर असल्यामुळे नंदिवर्धन शाखेचीही प्रतिस्पर्धी अथवा शत्रू होती. कुंतलांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून प्रवरसेनाने आपली आग्नेयेकडील बाजूदेखील पक्की केली होती.
प्रवरसेनाचा मुलगा नरेंद्रसेन आणि नातू पृथ्वीषेण द्वितीय यांच्याविषयी ताम्रपटांतून आलेली बिरुदे दोन शाखांतील नाजूक संबंधांच्या दृष्टीने अतिशय सूचक आहेत असे दिसते. नरेंद्रसेनाचे वर्णन, त्याच्या राजप्रतिष्ठेचा कोसल (हल्लीचा छत्तीसगढचा भाग) मेकला (म्हणजे नर्मदा नदीच्या उगमाजवळील अमरकंटकचा प्रदेश व मालव (म्हणजे माळवा) यावर राज्य करणारे राजे आदर करीत असत, (मेकला-कोसला-मालवाभ्यर्चितशासनः) असे आले आहे. परंतु त्याचबरोबर त्याच्या राज्यलक्ष्मीचा एका बलाढ्य नातेवाईकाने अपहार केला (गुणवद्दायादापहृतवंशश्रियः) होता असा उल्लेख त्याचा वारस पृथ्वीषेण द्वितीय याच्या ताम्रपटातून येतो. आपण घराण्याच्या सत्तेवर आलेली संकटे दोनदा बाजूला सारली (द्विमग्नवंशस्योद्धर्तुः). नरेंद्रसेनाने स्वतः दिलेले ताम्रपट अथवा शिलालेख अजून तरी मिळालेला नाही. या दोन्ही राजांच्या वर्णनावरून असे दिसते की, नंदिवर्धन शाखेच्या राज्यावर परचक्र किंवा बंडाळी यांसारखी संकटे दोनदा आली होती. त्यातील एक संकट तर जवळच्या नातेवाईकामुळे ओढवले होते. ते हरिषेणामुळे आलेले असावे. आपण वर पाहिले त्याप्रमाणे देवसेन आणि त्याचा पिता यांच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन सर्व विदर्भावर द्वितीय प्रवरसेनाने आपला अधिकार प्रस्थापित केला असावा. त्यामुळे इ. स. ४६२च्या सुमारास राज्यावर आल्यानंतर हरिषेणाने खानदेशासारखा भाग आपल्या ताब्यात घेऊन (हरिषेणाचा थाळणेर ताम्रपट पहा) आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या परिस्थितीत कुंतालाधिपतीनी आणि त्यांच्याशी सख्य असलेल्या विष्णुकुंडी माधववर्त्याने आपल्या मेव्हण्याला मदत केली असावी. त्याच्या मदतीने राजपुत्र पृथ्वीषेणाने हरिषेणाचे संकट टाळले असावे. नरेंद्रसेनाने माळव्यावर आपल्या सत्तेचा दरारा बसवला होता त्यावेळेच्या संघर्षातसुद्धा माधववर्त्याने त्याला व पृथ्वीषेणाला मदत केली असावी. आपल्या ताम्रपटातून माधववर्मा आपल्या राज्याची सीमा उत्तरेत नर्मदेपर्यंत पसरली आहे असे मोठ्या अभिमानाने सांगतो. असे असूनसुद्धा नरेंद्रसेनाच्या मृत्यूनंतर पृथ्वीषेण फार काळ टिकाव धरू शकला नसेल असे ताम्रपटात उल्लेखलेल्या त्रिकूट, लाट, कुंतल, कोसल, कलिंग आणि अवंति या प्रदेशांवरील सार्वभौमत्वावरून लक्षात येते.
वाकाटक घराण्यातील माधववर्त्यांची पत्नी ही प्रवरसेन द्वितीयाची मुलगी असावी याला श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी उधृत केलेल्या श्रीशैल स्थलमाहात्म्यातील एका कथेवरून लक्षात येते. त्या माहात्म्यात असे म्हटले आहे की चंद्रगुप्त राजाची कन्या चंद्रावती ही दररोज एक मोगऱ्याचा हार श्रीशैलस्वामीला वाहून आपली भक्ती प्रकट करत असे. राजकन्यांचा उल्लेख त्यांच्या राजघराण्यावरून करण्याचा प्रघात भारतात आहेच, यासंदर्भात विच्या पित्यावरून तिचे नाव चंद्रावती ठेवले असावे. महात्म्यकाराला येथे चंद्रगुप्त द्वितीयाची मुलगी आणि रुद्रसेन द्वितीयाची महाराणी प्रभावतीगुप्ताच अपेक्षित असावी. नंदिवर्धन आणि वाशीम शाखांमधील विसंवाद आणि त्यातून उत्त्पन्न झालेली स्पर्धा हीसुद्धा एका अर्थाने वाकाटक वंशाच्या लयाला कारणीभूत होती, असे वरील पुराव्यावरून लक्षात येते. श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी केलेली ही उकल लक्षात घेतली म्हणजे हरिषेणाच्या मृत्यूनंतर मिळालेली संधी घेऊन माधववर्त्याने आपले राज्य काही काळपर्यंत तरी साताऱ्यापर्यंत वाढवले असावे, हे खानापूरच्या ताम्रपटाच्या पुराव्यावरून पटते. आणि त्या घटनेचासुद्धा समाधानकारकपणे खुलासा करता येतो.
▲ शिऊर येथील गुंफांमधील महिषासुरमर्दिनीची मूर्ती
विष्णुकुंडी आणि वाकाटक वंशातील गुंतागुंतीच्या संबंधावर औरंगाबाद जिल्ह्यह्यातील भोकरदन येथील वैष्णव गुंफा आणि आंध्रप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या नांदेड जिल्ह्यातील शिऊर येथील वैष्णव गुंफांतील पुराव्यामुळे कसा प्रकाश पडतो, हे लक्षात येते. भोकरदन येथील सहाव्या/सातव्या शतकातील वैष्णव गुंफा ही एका लहानशा टेकाडाच्या एका बाजूस कोरलेली असून पुढे अंगण, दर्शनी भागात सहा स्तंभ, उत्तर व दक्षिण बाजूस एकेक अर्धस्तंभ, या स्तंभावलीच्या पश्चिमेस तशीच सहा स्तंभांची रांग आणि दोन अर्धस्तंभ, त्याच्या पाठीमागील बाजूस सात कक्ष असा या गुंफेचा विन्यास आहे. मधोमध असलेल्या कक्षाचा वापर गर्भगृह म्हणून होत होता, हे दरवाज्याच्या चौकटीच्या तळाशी असलेल्या द्वारापालांवरून आणि आतल्या भिंतीला लागून असलेल्या मूर्तिपीठावरून सहज लक्षात येते. गुंफा कोरण्यासाठी वापरण्यात आलेला दगड हा काही उत्तम प्रतीचा नाही; त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेकडील भिंतीवर कोरलेली शिल्पे फारशा चांगल्या अवस्थेत नाहीत. पण त्यावर कोरलेल्या ब्रह्मा आणि दुर्गा महिषमर्दिनी यांच्या बरोबरच शेषशायीविष्णु, बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिमा सहज ओळखता येतात. त्यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती ही विष्णूची असावी याविषयी तिळमात्र शंका राहत नाही. खांबांची ठेवण त्यावरील नक्षी तसेच शिल्पाची धाटणी लक्षात घेता ही गुंफा कोरणाऱ्या स्थपतीची शैली ही आंध्रप्रदेशातील पूर्वी चालुक्यांच्या स्थापत्यशिल्पाशी मिळतीजुळती आहे, असे निरीक्षण के. व्ही. सौदरराजन यांनी आपल्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ द डेक्कन' या प्रबंधात मांडले आहे. या गुहेमध्ये एके ठिकाणी 'उत्पातिपिडुगु' अशी अक्षरे असलेला एक लेख कोरलेला आढळतो. असा आशय असलेले लेख आंध्र प्रदेशातील पूर्वी चालुक्यांच्या सतनीकोटा, मोगलराजपुरम, अक्कण्णा-मदण्णा येथील गुंफांतून सापडले असून या लेखांतील वळणही कन्नड-तेलुगु धाटणीचे आहे.
▲ पवनार येथे सापडलेली विष्णुकुंडी राजघराण्याचे तांब्याचे नाणे
विद्वानांच्या मते हे एका शैव महंताचे बिरुद असून, अशा प्रकारे प्रवासी महंत आपली नावे यात्रेच्या दरम्यान कोरून ठेवत असत. अशाच एका शैव महान्ताने आपले बिरुद भोकरदनच्या गुहेत कोरून ठेवले असावेत.
या संदर्भात शिऊर (जिल्हा नांदेड) येथील गुंफांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. शिऊर येथे चार गुंफा असून, त्या अपूर्ण अवस्थेत आहेत. या शिल्पांची शैली पूर्णपणे संस्कारित नाही, तर ओबडधोबड आहे. स्थपतीने गुहा कोरताना शिल्पे भिंतीऐवजी खांबांवर कोरली आहेत. शिल्पे वैष्णव असून शिल्पांची मांडणी एक विशिष्ट क्रम मनात ठेवून केलेली नाही. आत एके ठिकाणी एक शिवलिंग आणून बसवले असले तरी ते गुंफांच्या इतके जुने नक्कीच नाही. कोण्या शिवभक्ताने काही वर्षांपूर्वी ते बसवले असावे हे शिल्पांचे विषय पाहिला म्हणजे लक्षात येते. ठळकपणे नजरेत भरणारी शिल्पे आहेत ती अशी; महिषासुरमर्दिनी, लिंगोन्द्भवमूर्ती, विदरणनरसिंह, वराह व पूतनावध. विष्णूच्या तीन-चार स्थानक मूर्ती असून त्यातील हातात घेतलेल्या लक्षणांच्या क्रमावरून त्या सातव्या परिसंवादात या गुंफांचा काळ आणि त्या कुठल्या संप्रदायाशी संबंधित आहेत, याविषयी चर्चा करताना डॉ. वैशाली वेलणकर यांनी असे मत व्यक्त केले की विष्णुकुंडीचा अंमल असताना त्या कोरल्या गेल्या असाव्यात. विष्णुकुंडी हे श्रीशैलस्वामीचे परमउपासक होते हेही आपण या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे.
महाराष्ट्रातील काही गुंफावर विष्णुकुंडींच्या स्थापत्य व शिल्पशैलीचा काही प्रभाव असावा या मताला पोषक असा आणखी एक पुरावा म्हणजे सिंहमुद्रांकित तांब्याची नाणी. प्राध्यापक शां. बा. देव व प्राध्यापक म. के. ढवळीकर यांनी पवनार येथे १९६५-६६ साली उत्खनन करून तेथील वाकाटककालीन वस्तीचा आणि अवशेषांचा विशेषकरून अभ्यास केला. नागपूर विद्यापीठाचे त्यावेळचे उपकुलगुरू डॉ. वि. भि. कोलते, म. म. वा. वि. मिराशी यांनी केलेल्या तर्काला देव आणि ढवळीकर यांनी उत्खननानंतर दुजोरा दिला. त्यांच्या मते नन्दिवर्धन शाखेच्या वाकाटकांची प्रवरपूर ही सुप्रसिद्ध राजधानी पवनार येथेच असावी. पवनार येथे एका धातुपात्रात ठेवलेला तांब्याच्या नाण्यांचा निधीही आढळला. प्रा. अजय मित्र शास्त्री यांनी या नाणेनिधीचा अभ्यास केला आणि त्यांच्या मते ती विष्णुकुंडी यांची नाणी होती. माधववर्याचा खानापूर येथील ताम्रपट, भोकरदन येथील वैष्णव गुंफा व तेथील कानडी तेलुगु लिपीतील महंताच्या बिरुदाचे नामांकन, शिऊर येथील गुंफा यांचासुद्धा वाकाटक-विष्णुकुंडी यांचे संबंध व सहाव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास यांचा अभ्यास करताना विचार केला पाहिजे हे वरील आढावा घेतल्यानंतर सहज लक्षात येते.
शतकाच्या अगोदरच्या आहेत हे लक्षात येते. वरच्या किंवा पाठीमागील हातात चक्र आणि गदा असून पुढील डाव्या हातात शंख आहे. असा क्रम इ. स. पाचव्या शतकातील मूर्तीत आढळतो. गुंफांच्या एकूणच ठेवणीवरून तसेच प्रतिमालक्षणावरून त्या वाकाटककालीन असाव्यात, असे नांदेडचे सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ प्रभाकर देव यांचे मत झाले आहे. या सर्व गुंफा त्यातील दगडाच्या घडणीमुळे काही चांगल्या अवस्थेत नाहीत. बऱ्याच मूर्तीमधून एक आडवा किंवा तिरपा ठिसूळ थर असा आहे की त्यामुळे मूर्तीना छेद गेलेला आहे. कदाचित या कारणामुळेच काम अर्धवट राहिले असावे. एके ठिकाणी लिंगोद्भवमूर्ती असल्यामुळे चारपैकी एक गुंफा शैवसुद्धा असण्याची शक्यता आहे. विष्णूच्या प्रतिमांमधील लक्षणांच्या क्रमामुळे त्या सहाव्या शतकातील आहेत, असे मानावयास काही हरकत नाही. डेक्कन कॉलेजमधील उत्खनन चमूने एका वर्षी या ठिकाणी चाचणीचे उत्खननही केले. कारण गुंफेसमोरील शेतात त्यांना समकालीन खापरे आणि इतर पुरावशेषसुद्धा सापडले होते. एका









No comments:
Post a Comment