पावसाळा सुरू होताच वेड लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद भटकंती करण्याचे, पावसाच्या धारेत ओले चिंब होत गडकिल्यांवरील सोसाट्याचा वारा अंगी झेलण्याचे. ट्रेक करताना वाटेत लागणाऱ्या धबधब्यात आणि नदीतील डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी अलिबाग जवळील सागरगड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मुंबई, पुणे किंवा रायगड यांसारख्या कोणत्याही ठिकाणांहून सागरगड आणि अलिबागचे समुद्रकिनारे यांचा वन-डे विकेंड डेस्टिनेशन म्हणून विचार करता येईल. मुंबईपासून अवघ्या ३० कि. मी. वर दाट वृक्षराजीचा बुरखा घेऊन दडलेला किल्ला म्हणजे सागरगड. ह्यालाच खेडदुर्ग म्हणूनही ओळखतात.
सागरगडाचा नकाशा
सागरगडाच्या टेकड्या अलिबाग तालुक्याच्या साधारणतः मध्यावर आहेत. ४०० मीटर उंचीच्या माथ्याच्या टेकडीवरचा हा किल्ला ३ कि.मी. लांब व एक कि.मी. रुंद आहे. चहूअंगाला दाट आंबराया, बरीचशी काजू व सागाची झाडे यांमुळे हिरव्यागार झाडीतून येताना ऐन उन्हाळ्यातदेखील त्रास होत नाही. अलिबागहून पूर्वेच्या मार्गाने म्हणजे धरमतरहून आंबेपूरमार्गे किंवा पोयनाडहून वाघोलीमार्गे सागरगडावर जाता येते किंवा अलिबागहून पश्चिमेकडील मार्गाने म्हणजे अलिबागहून धरमतरकडे जाताना खंडाळा गावातून जाता येते. याशिवाय आंदरजोड खिंडीतून म्हणजे नैऋत्येकडून व वडवली गावातून म्हणजे आग्नेयेकडून गडावर जाता येते.

गडावर जाण्यापुर्वी आपण आधी आपण या सागरगडाचा इतिहास जाणून घेउया.
सागरगड किल्ल्यावरील खांबटाके आणि भुयारे यांवरून याची पायाभरणी शिलाहार कालीन (इ.स. ९ वे ते १३ वे शतक) असावी. शिलाहार घराण्यांचा उत्तर कोकणचा पहिला राजा कपर्दी याची राजधानी सागरगडाच्या समोरच्या बाजूस असलेली चौल येथील दंडाराजपुरी होय. त्यामुळे पहाऱ्यासाठी सागरगडाचा वापर त्याकाळात नक्कीच झाला असेल.
हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. सागरगड उर्फ खेडदुर्ग या गडावर टेहळणी करताना महाराजांना अलिबाग जवळ समुद्रात दोन बेटं दिसून आली. त्याचं बेटांवर खांदेरी आणि उंदेरी किल्यांची बांधणी झाली. स्वतंत्र आरमार स्थापन केल्यानंतर अलिबाग पट्यातील रेवदंडा, कुलाबा, सर्जेकोट, खांदेरी आणि उंदेरी यांसारख्या किल्यांवर सागरी तटांच्या रक्षणाची भिस्त येईपर्यंत सगळा कारभार हा सागरगडावरूनच होत असे.
इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यानंतर माणकोजी सूर्यवंशीने सागरगड ठाणे सोडून प्रबलगडावर आश्रय घेतला. संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.
छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला.
इ.स. १७४० सालीं बाजीरावाचें सैन्य नासिरजंगाशीं लढण्यांत गुंतलें आहे अशी संधी साधून संभाजी आंगरे यानें एकाएकीं अलीबागेंत उतरून हिराकोट, थलचाकोट, राजगड, सागरगड व चौलचा कोट हीं स्थळें घेतलीं व अलीबागेंत कुलाब्याचें पाणी बंद केलें, तेव्हां मानाजीनें, ताबडतोब येऊन आपलें रक्षण करावें अशी पेशव्यांस विनंति केली. पेशव्यांनीं मानाजीच्या कुमकेस जाण्याविषयीं इंग्रजांकडे पत्रें रवाना केलीं व बाळाजी बाजीराव व चिमाजी आप्पा हें स्वतः संभाजीवर चाल करून गेले.
येसाजीचा मुलगा बाबुराव आंगरे कुलाब्याचा सरखेल असताना त्याने शिंदेच्या सेनेच्या मदतीने मानाजीचा भाऊ जयसिंगाचा पराभव करून त्यास कैद केले व १८०० मध्ये त्याचा सागरगडावरून कडेलोट केला. त्यानंतर जयसिंगाचा मुलगा मुरारने उठाव केला पण तो फसला. रामजी अंगरेने मुरारला मदत केली होती. त्यामुळे बाबुरावने रामजीस पकडून त्याचा १८०७ मध्ये सागरगडावरून कडेलोट केला.
इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्यांनी येथे विश्रामधामे बांधली होती. किल्ल्याच्या आसपास चित्ते, रानडुकर, भेकरी व क्वचित वाघ ही पारधीची जनावरे आहेत व त्यांची पारध करण्याकरता दर वर्षी पुष्कळ युरोपियन लोक तेथे जातात असा कुलाबा गॅझेटीयरमध्ये उल्लेख आहे.
गडावर जाण्यासाठी निरनिराळ्या वाटा असल्या तरी मुख्य वर्दळीचा रस्ता म्हणजे अलिबाग ते वडखळ यामार्गे गडावर कसे जायचे याची माहिती घेउया. सागरगडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई-अलिबाग रस्त्यावरील खंडाले गावातून आहे. मुंबई-पुण्यातून येताना वडखळ-पेझरी-कार्ले खिंड-खंडाले असा प्रवास करून खंडाले गावातून सागरगड फाटा पकडावा. पावसाळ्याच्या दिवसांत एका फार्महाऊस शेजारून ओढ्याजवळ गाडीरस्ता जातो. या वाटेने गडावर जायला अडीच तासांचा कालावधी लागतो. पावसात याच वाटेने धोंदाणे धबधब्याचा आंनद लुटता येईल.
सागरगडावर पेझारी गावातूनही जाता येते. पेझारी गावातूनच नागझिरा गावात पोहचून गावाच्या शेवटी असलेल्या क्रिशिवन फार्म शेजारून गडावर वाट जाते. या वाटेने दीड तासांचा वेळ लागतो. वाटेवर काही प्रमाणात मार्किंग केलेली दिसून येते.अलिबाग ते खंडाळा हा प्रवास एस.टी.ने करता येतो. तसेच या मार्गावर खाजगी वहातुकही चालते.
![]() |
| खंडाळा गावाचा फलक |
रस्त्याच्या कडेला खंडाळा गावाचा फलक आहे. इथून आत खंडाळा गाव आहे. कच्चा डांबरी रस्ता काही अंतर आहे. स्वतःचे वाहन असेल खंडाळा गावापर्यंत नेउन तिथून गडावर जाता येते यात वेळ आणि चालण्याचे अंतर वाचते.
| खंडाळा गावाकडे जाणारा कच्चा रस्ता |
पावसाळ्यात इथे आल्यास पाण्यान भरलेली भात खाचर आणि त्यात भात लावणीसाठी चाललेली शेतकरयांची लगबग बघायला मिळते. थोड पुढ गेल्यावर डावीकडचा रस्ता सोडून धबधब्याच्या कडून येणारा एक ओढा ओलांडून सिद्धेश्वर मंदीराकडे जाणारी जंगलात घुसणारी पायवाट पकडयाची. गावातून चालायला सुरवात केली कि साधारण वीस मिनीटात दगडी पायर्या लागतात. पायरयांसोबत डोंगरधार चढायला सुरूवात करायची. तेथून वर चढू लागले म्हणजे गडाच्या नैऋत्य बाजूस असणारी एक मोठी गुहा उजव्या हातास दिसते. सप्तर्षीचे जागृत स्थान येथे आहे, असे म्हणतात. येथे पांडवांनी काही दिवस वास्तव्य केले होते, असे मानतात. ३२ मीटर लांब, १२ मीटर खोल व ४ मीटर उंच अशी ही गुहा आहे. त्याला सप्तर्षीचे लेणे किंवा सिद्धेश्वराचे लेणे म्हणतात. लेण्यात अर्धवट खोदकाम करून सोडून दिलेले दिसते. हे लेणे शेजारच्या रामधरणे लेण्यांच्या समकालीन असावे. गडाच्या नैऋत्येस असणाऱ्या सप्तर्षी गुहेत दरवर्षी चैत्री पौर्णिमेस यात्रा भरते. तेथून सिंधुसागर व त्यात असणारे खांदेरी उंदेरी हे किल्ले व्यवस्थित दिसू शकतात.
सागरगडाकडे जाणारी पायवाट
जवळच अदमासे १०० मीटर उंचीचा अरुंद धबधबा आहे. भाद्रपद अश्विनात त्या ठिकाणचे अवर्णनीय सौंदर्य पर्यटकांना खरोखरच भुरळ पाडील. हा आहे धोधाणे धबधबा. पायर्या चढायला सुरवात केली कि सिमेंटचा रस्ता लागतो. इथे उजव्या बाजुला एक फाटा लागतो. हिच वाट धोधाणे धबधब्याकडे जाते. अर्थात धबधब्याच्या पायथ्याशी पोहचायला जवळपास २० मिनीटे चालावे लागते. इथून साधारण एक तासात आपण सिध्धेश्वर मंदीराच्या फाट्यापाशी पोहचतो. डावीकडे जाणारी वाट सिध्देश्वर मंदीराकडे तर उजवॉकडे जाणारी वाट सागरमाची गावाकडे जाते.
धबधबा कोसळतो त्या ऊगमापाशी सिद्धेश्वराचे मंदीर व मठ आहे माकडांच्या गदारोळात मंदिराचा परिसर नेहमीच गजबजून गेलेला असतो. मंदिराच्या खालच्या बाजूस एक विहीर व मठ दिसून येतो.
| सिध्देश्वर मंदीराच्या बाजुने वहाणारा ओढा |
बाजूनेच वाहणाऱ्या ओढ्याचे जलप्रपात स्वतःला झोकून देतात तोच हा धोंदाणे धबधबा. मंदिरामुळे ह्यास सिद्धेश्वर धबधबा म्हणुनही ओळखतात. कौलारू छप्पर,आधाराला लाकडी खांब, गाभाऱ्यात शिवलिंग आणि समोरच्या बाजूस नंदी अशी मंदिराची रचना आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात. इथे जेवण करायला थांबता येईल.तसेच मंदीराया सभामंडपात मुक्काम करावयास चांगली जागा आहे. मात्र पुढीला वाटचाल करण्यापुर्वी आश्रमात असलेल्या विहीरीतून न चुकता पाणी भरुन घ्यायचे , कारण पुढे गडमाथ्यापर्यंत पाणी नाही. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन सागरगडाकडे निघायचे.यापुढचा टप्पा चढावा असून तो आंबा व सागाच्या झाडीतून गेला आहे.
| सागरमाची गावाकडे जाणारी सपाट वाट |
पठारावरची सामान्य चाल करून अर्ध्या तासातच आपण पंधरा वीस घरांची वस्ती असलेल्या सागरगड माचीवर पोहचतो. सपाटीमुळे माचीवर मोठया प्रमाणात वस्ती दिसून येते. माचीवर चढताना मागच्या बाजूस पश्चिमेस खांदेरी आणि उंदेरी जलदुर्ग दिसून येतात.
| सागरमाची गावाच्या अलिकडे असणारी विहीर |
| सागरमाची गावाजवळ असणारी शाळा |
माची गावाच्या अलिकडे विहीर आहे, विहीरीतून उन्हाळा सोडला तर पाणी मिळू शकते. सागरगड माचीवरील गावात गावकऱ्यांची परवानगी घेऊन दत्त मंदिरात राहायची सोय होऊ शकते. गावातील घरांमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे पण त्याची कल्पना त्यांना आधीचं द्यावी. (शिवसमर्थ किराणा स्टोअर - संदीप पाटील - ७८७५०२३६५८, ९२७३१६८५५४, ९१६८१४९२६४) माची ओलांडून छोटी टेकडी ओलांडली की आपण सागरगडाच्या घेरयात पोहचतो.तिथे एक वनदेवतांचे ठाणे ऊनपाऊस झेलत वसलेले आहे.सागरगड व माचीवर पावसाळा वगळता बाकी दिवसांत गाडीरस्त्याने सगरगडाच्या दरवाजा पर्यंत जाता येऊ शकते.
| सागरमाची गावाच्या बाहेरुन गडाकडे जाणारी वाट |
| गडाच्या अलीकडे वाट दाट झाडीतून जाते |
माचीवरून तासाभरात आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहचतो. वाट मळलेली असून जागोजागी वाटेवर मार्किंग केलेली दिसून येते. गडाच्या वाटेवरच डावीकडे शेंदूर फासलेला कातळ आहे, तर उजवीकडील बाजूस गडाचे सरळसोट कातळकडे, वानरटोक आणि रेवदंडा खाडीचा परिसर दृष्टीक्षेपात येतो.
गडाच्या डाव्या बाजूस भग्न अवस्थेत असलेला महादरवाजा आहे. येथील तटबंदी सुद्धा मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. शिवाय काही जांभ्या दगडात (Laterite Stone) बांधलेली आहे. कोकणात ईतक्या उंचीवर जांभ्या दगडात बांधलेला हा एकमेव किल्ला असावा. जवळपास चिऱ्याची खाण नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चिरा कोठून व का आणला असेल हाच पहिला प्रश्न उद्भवतो. महादरवाजाच्या डाव्या बाजूस एक वाट कातळात कोरलेल्या भुयाराकडे जाते. पावसाळ्यात या वाटेने जाताचं येत नाही. माचीवरून तासाभरात आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहचतो. वाट मळलेली असून जागोजागी वाटेवर मार्किंग केलेली दिसून येते. गडाच्या वाटेवरच डावीकडे शेंदूर फासलेला कातळ आहे, तर उजवीकडील बाजूस गडाचे सरळसोट कातळकडे, वानरटोक आणि रेवदंडा खाडीचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. गडाच्या डाव्या बाजूस भग्न अवस्थेत असलेला महादरवाजा आहे. येथील तटबंदी सुद्धा मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. शिवाय काही जांभ्या दगडात (Laterite Stone) बांधलेली आहे. कोकणात ईतक्या उंचीवर जांभ्या दगडात बांधलेला हा एकमेव किल्ला असावा. जवळपास चिऱ्याची खाण नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चिरा कोठून व का आणला असेल हाच पहिला प्रश्न उद्भवतो.
महादरवाजाच्या डाव्या बाजूस एक वाट कातळात कोरलेल्या भुयाराकडे जाते. पावसाळ्यात या वाटेने जाताचं येत नाही. ( त्या भुयारची माहिती व काही फोटोस आम्हाला माझा पेझारी मधील मित्र रोहित पाटील यांच्याकडून मिळाली.) उजव्या बाजूची वाट गडाच्या चार मीटर उंच तटबंदीकडे जाते. याच भागात एक भक्कम बांधणीचा बुरुज नजरेस पडतो. मधील जागेत घोडे ठेवण्याची जागा होती. गडाला महादरवाजा पासून २०९.७६ मीटर लांब तटबंदी आहे. कधीकाळी तटबंदीच्या लगतच खंदक खोदलेला होता पण आता तो पूर्णपणे बुजलेला आहे.
तटबंदीवरूनसुद्धा झाडाच्या आधारे गडावर प्रवेश करता येतो. याच तटबंदी मध्ये एक छोटेखानी खिडकी वजा दरवाजा दिसून येतो त्यास गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणून ओळखतात. उजव्या बाजूची वाट गडाच्या चार मीटर उंच तटबंदीकडे जाते. याच भागात एक भक्कम बांधणीचा बुरुज नजरेस पडतो. मधील जागेत हत्ती, घोडे ठेवण्याची जागा होती. गडाला महादरवाजा पासून २०९.७६ मीटर लांब तटबंदी आहे. कधीकाळी तटबंदीच्या लगतच खंदक खोदलेला होता पण आता तो पूर्णपणे बुजलेला आहे. तटबंदीवरूनसुद्धा झाडाच्या आधारे गडावर प्रवेश करता येतो. याच तटबंदी मध्ये एक छोटेखानी खिडकी वजा दरवाजा दिसून येतो त्यास गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणून ओळखतात.
याच गडावर संवर्धनाचे कार्य झाले, त्यात साखळीच्या विहीरचे अखेर पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे. सागरगडाची उभारणी करताना नैसर्गिक जलस्त्रोचा अभ्यास करुन या साखळीच्या विहिरीची निर्मीती करण्यात आली. विहिरीतील गाळ आणि माती उपसून ती पुन्हा वापरायोग्य बनवण्यात आली असून, गडावर पाण्याचा प्राचिन स्त्रोत नव्याने उपलब्ध झाला आहे. साखळीची विहीर म्हणून ओळख असलेली ही विहीर त्रिकोणी असून स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. विहिरीची खोली सुमारे ९ फूट असून, यात उतरण्यासाठी उत्तरेच्या बाजूने घडीव सहा पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.

| Muddy Water Pond on Sagargad Top |
b) Ruins of the British Quarters
सागरगड
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस १९ मैल, अलिबागेच्या पूर्वेस ६ मैल व धरमतरीच्या पश्चिमेस ६ मैल, अलिबाग तालुक्यात एका १३५७ फूट उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्यावर जाण्याचे मुख्य रस्ते दोन आहेत. एक पूर्वेस आहे व दुसरा पश्चिमेस आहे; शिवाय नैर्ऋत्य दिशेस अंदरजोड नावाच्या दऱ्यातून एक व आग्नेयेस वडवली गावातून एक असे दोन आडवळणी मार्ग आहेत. किल्ल्याचा दरवाजा उत्तराभिमुख आहे व त्याच्या दोन्ही बाजूला दोन बुरूज आहेत. दरवाजाच्या आत फरसबंदी रस्ता आहे. उजव्या बाजूस तंबू ठोकण्याकरिता नवीन फरसबंदी केलेली आहे. किल्ल्याची बाहेरची भिंत व आतील भिंत यांच्यामध्ये २३० यार्गांचे अंतर आहे. आत दुसरा दरवाजा आहे. टेकडीच्या माथ्यावर एक बंगला आहे. येथून पुढे गेले म्हणजे बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. बालेकिल्ला २४० फूट लांब व १२० फूट रुंद आहे. पश्चिमेच्या बाजूस एक-एक मजली घर आहे व काही फुलझाडे आहेत. बालेकिल्ल्याच्या पलीकडे दक्षिणेच्या बाजूस एक लहानसे वाटोळे तळे आहे.
किल्ल्यावर दोन युरोपियन लोकांचे बंगले आहेत. शिवाय दोन पडक्या जागा आहेत तेथे पूर्वी जनरल फुलर व लेसटॉक रीड म्हणून कोणी मोठे इंग्रज कामगार होते, त्यांचे बंगले होते म्हणून सांगतात. शिवाय मुंजोबा, गणपती, खरजाबाई व वेताळ यांची चार देवळे आहेत व एक मुसलमानाचे पिराचे स्थान आहे. माथ्यावरील बंगल्याशेजारी नांदुखींच्या झाडाखाली एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. किल्ल्यातील बंगल्यांची दुरुस्ती ठेवण्याकरता किल्ल्यावर एक कायमचा नोकर ठेवलेला आहे. आत पाण्याची तीन टाकी आहेत. किल्ल्याच्या आसपास चित्ते, रानडुकर, भेकरी व क्वचित वाघ ही पारधीची जनावरे आहेत व त्यांची पारध करण्याकरता दर वर्षी पुष्कळ युरोपियन लोक तेथे जातात. आंग्यांच्या अमलाखाली हा किल्ला होता, तेव्हा त्याची चांगली भरभराट होती. इ.स. १७१३ मध्ये शाहू महाराजांनी जे १३ किल्ले कान्होजी आंग्यास दिले, त्यांमध्ये हा एक होता. इ.स. १७४० मध्ये संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे यांच्यात कलह सुरू होऊन संभाजीने हा किल्ला घेतला. पेशव्यांच्या कारकिर्दीत ज्याला कडेलोटाची शिक्षा होत असे, त्याला या किल्ल्यावर वानरटोक म्हणून एक जागा आहे, तेथून गोणट्यात त्या मनुष्याची मोट बांधून खालील भयंकर कड्यात ढकलून देत असत.
. किल्ले खेडदुर्ग (सागरगड) :
रायगड जिल्ह्याचा तोंडवळा बदलणाऱ्या व बऱ्याच गाजलेल्या थळ - वायशेत खतप्रकल्पाच्या अगदी जवळ म्हणजे मुंबईपासून अवघ्या ३० कि. मी. वर दाट वृक्षराजीचा बुरखा घेऊन दडलेला किल्ला म्हणजे सागरगड. ह्यालाच खेडदुर्ग म्हणूनही ओळखतात.
इ.स. १६५५ मध्ये शिवरायांना जयसिंगांच्या स्वारीत नमते घेऊन मोगलांच्या हवाली २३ किल्ले करावे लागले. ह्या 'पुरंदरच्या तहात' सागरगडाचा समावेश मोगलांकडे दिलेल्या २३ किल्ल्यांत होता.
सागरगडाच्या टेकड्या अलिबाग तालुक्याच्या साधारणतः मध्यावर आहेत. ४०० मीटर उंचीच्या माथ्याच्या टेकडीवरचा हा किल्ला ३ कि.मी. लांब व एक कि.मी. रुंद आहे. चहूअंगाला दाट आंबराया, बरीचशी काजू व सागाची झाडे यांमुळे हिरव्यागार झाडीतून येताना ऐन उन्हाळ्यातदेखील त्रास होत नाही. अलिबागहून पूर्वेच्या मार्गाने म्हणजे धरमतरहून आंबेपूरमार्गे किंवा पोयनाडहून वाघोलीमार्गे सागरगडावर जाता येते किंवा अलिबागहून पश्चिमेकडील मार्गाने म्हणजे अलिबागहून धरमतरकडे जाताना खंडाळा गावातून जाता येते. याशिवाय आंदरजोड खिंडीतून म्हणजे नैऋत्येकडून व वडवली गावातून म्हणजे आग्नेयेकडून गडावर जाता येते.
अलिबाग ते खंडाळा हा प्रवास एस.टी.ने करता येतो. तेथून वर चढू लागले म्हणजे गडाच्या नैऋत्य बाजूस असणारी एक मोठी गुहा उजव्या हातास दिसते. सप्तर्षीचे जागृत स्थान येथे आहे, असे म्हणतात. येथे पांडवांनी काही दिवस वास्तव्य केले होते, असे मानतात. ३२ मीटर लांब, १२ मीटर खोल व ४ मीटर उंच अशी ही गुहा आहे. जवळच अदमासे १०० मीटर उंचीचा अरुंद धबधबा आहे. भाद्रपद अश्विनात त्या ठिकाणचे अवर्णनीय सौंदर्य पर्यटकांना खरोखरच भुरळ पाडील. याच्या जवळच जरा वरच्या बाजूस बऱ्या बांधणीचे एक मंदिर आहे. त्याच्या सभामंडपात मुक्काम करावयास चांगली जागा आहे. हा धबधबा धोंडाणे धबधबा म्हणून ओळखला जातो. यापुढचा टप्पा चढावा असून तो आंबा व सागाच्या झाडीतून गेला आहे. १॥२ कि.मी. चालले म्हणजे किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा येतो. त्याच्या दोन्ही बाजूंस भक्कम बांधणीचे बुरूज आहेत. दरवाज्याच्या बांधणीत लाल व काळे दगड वापरल्याचे दिसते. मात्र येथे खूप पडझड झालेली आहे. आत जाताच देवड्या व पाण्याचा हौद (जरा बाजूला) आहेत. गडाचे दक्षिण टोक म्हणजे 'सतीचा माळ' म्हणून ओळखली जाणारी जागा आहे. जंजीरनदी, धरमतरची खाडी व पूल, भातशेती, नागोठणा खाडी, करंजा बेट, माथेरानचे पठार, प्रबळगड हा सारा देखावा येथून दिसतो. शिवाय पश्चिमेकडील चौलची खाडी, जंजिऱ्याजवळील टेकड्या, सिंधुसागर, कनकेश्वरचा डोंगर असा बराच परिसर दृष्टीपथात येथूनच येतो.
किल्ल्यातील उंचवट्याला ४ मीटर उंचीच्या व ५ बुरूजांनी युक्त अशा तटबंदीने अधिक संरक्षक व बंदिस्त रूप देऊन बुलंद बालेकिल्ला बनविला आहे. ८० मीटर लांब ही दक्षिणोत्तर आहे, तर ४० मीटर पूर्वपश्चिम रूंदी आहे. बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस एक गोलाकार तळे. आहे. पण आता त्यात खूप गाळ साठला आहे. त्या तलावाजवळच एक छोटेसे मंदिर व दीपमाळा आहेत. जवळची दुसरी इमारत म्हणजे दारूकोठार असावे.
इ.स. १८१८ मध्ये महाराष्ट्रातील सर्व किल्ले इंग्लिशांनी जिंकून घेतले. बरेच इंग्लिश अशा किल्ल्यांवर जाऊन आले. काही जणांना त्यांपैकी काही किल्ले अतिशय आवडले म्हणून त्यावर हवा खायची जागा म्हणून त्यांनी आपली विश्रामधामे बांधली, सागरगडावर जनरल फुलर, श्री.ले स्टॉक रीड - मुंबई सिव्हील सर्व्हिसमधील एक अधिकारी अशांनी विश्रामधामे बांधली. आता त्यांचे पायेच काय ते आढळतात. वानरटोकाजवळील सतीच्या माळावर नऊ थडग्यांचा समूह, सतीशिळा, पादुका इ. अवशेष आहेत. गडावर पश्चिमेस गणपती आणि मुंजोबा, नैऋत्येस खेरजाबाई आणि वेताळ अशी स्थाने आहेत. तसेच गडावर एक देवी महिषासुरमर्दिनीची मूर्तीही आहे. गडाच्या नैऋत्येस असणाऱ्या सप्तर्षी गुहेत दरवर्षी चैत्री पौर्णिमेस यात्रा भरते. तेथून सिंधुसागर व त्यात असणारे खांदेरी उंदेरी हे किल्ले व्यवस्थित दिसू शकतात.
इ.स. १७१३ साली बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कोकणातले १६ किल्ले आंग्यांकडे राखून कान्होजी आंग्रे व छत्रपती शाहूमहाराज यांचे सख्य घडवून आणले होते. त्या सोळा किल्ल्यांत सागरगड ऊर्फ खेडदुर्गाचा समावेश होता. पुढे कान्होजी आंग्रे मराठी राज्याचे दर्यासारंग बनले.
थळ - वायशेत हा आता चांगला गजबजलेला भाग होतो आहे. रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग, कोकणरेल्वे अशा अनेक गोष्टींमुळे ह्या भागात अनेक ठिकाणचे लोक येणार. त्यांना चार क्षण निवांतपणे काढण्यासाठी आतापासूनच काही केंद्रे विकसित करायला हवीत. अलिबागचा कुलाबा किल्ला, खांदेरी - उंदेरी हे आवळे - जावळे जंजीरे, जंजिरा मुरूड, चौल रेवदंडा, कनकेश्वर, सागरगड ही ठिकाणं निवडून त्यांचा पर्यटन विकास व्हायला हवा. पण हे सारं करताना तिथली झाडी, तिथला निसर्ग, त्या रहाळातली माणसं व त्यांचं लोकजीवन यांचा तोल ढळणार नाही, त्यात उलथापालथ होणार नाही याची काळजी
घ्यायला हवी. अशा ठिकाणांची माहिती पुस्तके, व्हयूकार्डस, स्लाईडस् इ. गोष्टी लोकांना सहज उपलब्ध व्हायला हव्यात. आणि हे सारं करताना झाडीभरले रुंद रस्तेही निर्माण करायला हवेत.
धागा काढायचा राहून गेला होता. ह्या काही प्रचि खूपच उशिराने टाकतोय...
१. गावातून निघालो तेंव्हा... लक्ष्य होते सिद्धेश्वर आश्रम...
२. जरा वरच्या अंगाला गेलो की धबधबा असा जवळून दिसतो...
३. सिद्धेश्वर आश्रम...
४.
५. सागरगड माची गाव...
६.
७. एके ठिकाणी बुरुज समोर उभा ठाकला तेंव्हा लक्ष्यात आले की आपण किल्ल्याच्या आत आलेलो आहोत. कारण असे बुरुज सागरगडाच्या बालेकिल्ल्याला आहेत...
८. जेवून घेतले तो पर्यंत धुके गायब झाले. मग फोटोगिरी सुरू झाली. हा मगासचाच बुरुज. आता अधिक स्पष्ट झाला होता.
९. बालेकिल्ल्याच्या तटबंदीची बरीच पडझड झालेली आहे. सर्वत्र झाडे आणि त्यांची मुळे यांचेच राज्य..
१०.
११. बालेकिल्ल्याच्या आतील शिवमंदिर...
१२. धुके हटले आणि अखेर जरा पुढून वानरटोक सुळका दिसू लागला.
१३. पठारावर वस्तीच्या खुणा आहेत. काहींची जोते देखील फारशी उरलेली नाहीत... एक सदर सदृश्य बांधकाम शिल्लक आहे. त्या बांधकामाची पश्चिमेकडील भिंत इतिहासाच्या खुणा जागवत अजूनही तग धरून उभी आहे.
१४. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक टेकडी आहे... तिथे आत्ता कुठे हिरवळीचे साम्राज्य सुरू होत होते.
१५. वानरटोक सुळका - सुळक्याच्या पायथ्यापासून उंची फक्त १२० फुट असून चढाई सोप्या श्रेणीत मोडते. सागरगडाच्या ह्या टोकाच्या डाव्या बाजूने खाली उतरून सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोचता येते. कोणाला चढाई करायची असल्यास १०० फुटी २ दोर, २ मेख आणि पाचारी घेऊन जाणे. चढाईला ३-४ तास पुरे होतात.
१६. परतीच्या मार्गावर धुके नसल्याने खूप खालून आणि दुरून पुन्हा एकदा सुळक्याने दर्शन दिले...

१७. गडावर जाताना धुक्यामुळे बघायचे हुकलेले गडाचे मुख्यद्वार. द्वार पडले असले तरी बुरुज अजून उभे आहेत... पण कधीपर्यंत!!!
ऊत्तर शिवकालात प्रामुख्याने हा किल्ला आंग्र्यांच्या अधिपत्याखाली होता आणी किल्याच्या दक्षीणेकडचे (वानरटोक) हे कडेलोट टोक म्हणून ओळखले जायचे..
ऐतिहासिक सागरगडावरील साखळी विहिरीचे पुनरुज्जीवन; ’दुर्गरक्षक’च्या शिलेदारांच्या चार महिन्यांच्या प्रयत्नांना यश
जयंत धुळप
रायगड: अलिबाग जवळच्या ऐतिहासिक सागरगडाच्या संवर्धनात महत्त्वाची बाब समोर आली आहे. दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या शिलेदारांच्या चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एक प्राचीन, ऐतिहासिक साखळीच्या विहीरचे अखेर पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे. विहिरीतील गाळ आणि माती उपसून ती पुन्हा वापरायोग्य बनवण्यात आली असून, गडावर पाण्याचा प्राचिन स्त्रोत नव्याने उपलब्ध झाला आहे.
साखळीची विहीर म्हणून ओळख असलेली ही विहीर त्रिकोणी असून स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. विहिरीची खोली सुमारे 9 फूट असून, यात उतरण्यासाठी उत्तरेच्या बाजूने घडीव सहा पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
गेल्या 4 महिन्यांपासून दुर्गरक्षक संस्थेचे धारकरी या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी झटत होते. विहिरीत वर्षानुवर्षे साठलेली माती आणि दगड-धोंडे पूर्णपणे बाहेर काढून विहीर मोकळी करण्यात आली.
गडाच्या सपाटीवरील माती पुन्हा विहिरीत वाहून जाऊ नये, यासाठी तिथे एक मजबूत जलरोधक भिंत उभारण्यात आली. विहिरीच्या भिंतीचा एक भाग पूर्णपणे ढासळला होता. दुर्गरक्षकच्या शिलेदारांनी विहिरीच्या पोटात पडलेले ऐतिहासिक घडीव दगड शोधून, ती भिंत पुन्हा पूर्ववत बांधून काढली.
विहिरीच्या पुनरुज्जीवनाच्या या मोहिमेत दुर्गरक्षकसंस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ नाईक यांच्या नेतृत्वाखाली वरद पवार, श्रद्धा जुईकर, सागर पाटील, वेद पवार, सिद्धार्थ नाईक , सागर पाटील, तेजस पवार, अविनाश पिंगळे, प्रसाद मुळुस्कर, कल्याण जुईकर, विक्रांत पाटील हे शिलेदार सहभागी झाले होते.
दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या सर्व शिलेदारांचे कौतुक करायला हवे. 400 वर्षांपूर्वी सामरीक स्थान विचारात घेवून, सागरगडाची उभारणी करताना नैसर्गिक जलस्त्रोचा अभ्यास करुन या साखळीच्या विहिरीची निर्मीती करण्यात आली. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंवर्धनाची पायाभरणी केली. कालओघात बुजलेली ही विहिर जिवंत करण्याचे मोठे काम या तरुणांनी केले आहे.
- रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज
खंडाळे गावाकडून जाताना आश्रमाच्या जवळ असण्यार्या धोंदाणे धबधब्याच्या (वरच्या प्रची १, २ मधील) पाठीमागील जराश्या कठीण वाटेने पुढे गेल्यावर एक लेणे आहे...त्याला सप्तर्षीचे लेणे किंवा सिद्धेश्वराचे लेणे म्हणतात. लेण्यात अर्धवट खोदकाम करून सोडून दिलेले दिसते... माझ्या मते हे लेणे शेजारच्या रामधरणे लेण्यांच्या समकालीन असावे.
सागरगड ऊर्फ खेडदुर्ग -मागोवा एक अज्ञाताचा!
रविवारच्या पिकनीकसाठी आलेल्या तुरळक लोकांची धबधब्याखाली मौज चालली होती.पण लोक बिनधास्त थेट धबधब्याखाली आणि कड्याच्या टोकावर बघितले तर काही मद्यप्राशन करत होते.कितीही जीव गेले तरी जोपर्यंत स्वत: पर्यंत काही येत नाही तोपर्यंतची ही बेफिकीर वृत्ती मनाला अस्वस्थ करून गेली.
पठारावरची सामान्य चाल करून अर्ध्या तासात सागरगडमाची गाठली.पंधरा वीस घरांची वस्ती!
एव्हाना दोन वाजत आले होते मग लगबगीने परत फिरलो.पावसाचीही लक्षण दिसायला लागली.ऊंचवट्यावर मंदीराच्याही वर वाड्यासारखे मोठे अवशेष आहेत व ध्वजस्तंभ आहे.तिथे खाली एक तलावही आहे
परतीच्या वाटेला तटबंदी शेवटच्या टोकापर्यंत चिखल तुडवत चाचपून आलो.सागरगडमाचीपर्यंत त्याच वाटेने झपझप ऊतरलो.तिथे कातकरयांची पोर विहीरीत पोहत होती त्यांनाही प्रशांतने पोझ म्हणून वरून ऊडी मारायला लावली.तिथून मग सिद्धेश्वर मठाकडे न जाता कच्च्या रस्त्यान खाली जिथ जंगलात ओढ्यापाशी धबधब्याकड वळलो होतो तिथ अर्ध्या पाऊण तासात पोहचलो.तिथून गाडीपर्यंत जाईस्तोवर पाच वाजले होते.मग शूज बदलून मुख्य रस्त्याला कोकणकट्टा नामक हॉटेलात सुरमई थाळी सोलकडी पोट फुगेस्तोवर हाणली ( कॅलरीज बॅलन्स करायला) आणि तशा सह्याद्रीच्या डोंगररांगेपासून बाजूला सागराजवळील एका कमी माहीती असलेल्या पण कधीकाळी नक्कीच महत्वाची भूमिका बजावलेल्या गडाचा निरोप घेतला.आजचा दिवस एका अनामिक समाधानाने भरलेला होता.
ऊंची : 1357 मीटर्स
पायथ्याचे गाव: अलिबागच्या 4 कि मी आधी खंडाळा, जि.रायगड
अंतर: पुण्यातून खोपोली पेणमार्गे साधारण 150 कि मी.
ऊपयोग: अलिबाग व धरमतर खाडीवर नजर ठेवण्यासाठी
ईतीहास:
1660 : आदिलशहाकडून स्वराज्यात.
1665 : पुरंदर तहात महाराजांनी दिलेल्या 23 गडांपैकी एक!
महाराजांच्या आग्रा सुटकेनंतर परत स्वराज्यात दाखल.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सिद्धीने जिंकला.
1698 सरखेल कान्होजी आंग्रेंनी परत ताबा घेतला.
1713 सरखेल कान्होजी आंग्रेंना जहागिरी दिलेल्या 16 गडांपैकी एक.
1818 ईंग्रजांच्या ताब्यात.
स्थळ विशेष:
1.धोंदाणे धबधबा
4.तटबंदी व पाच बुरूज असलेला बालेकिल्ला
5.गोमुख असलेले कुंड
6.वाड्यांच्या बांधकामाचे अनेक अवशेष
7.समाधी ( अनामिक)
ALIBAG" - The moment you utter this word to a mumbaikar, his mind will explode with excitement conjuring images of Sea, beaches, seafood,boats,horse-cart,water-sport etc and you can almost hear him humming Lets party all night !!!
However there is another interesting facet to Alibag. This laid back town of Alibag boasts of some of the finest Sea forts like Korlai Fort, Kulaba Fort, twin Fort of Undheri and Khanderi,Revdanda fort Little ahead of Alibag at Murud is the famous Jhangira Fort and last but not the least Sagargad fort which incidentally we are going to trek this Sunday.
![]() |
| Sagargad Fort and the Vanartok Pinnacle |
This fort is believed to be in existence since ancient times i.e. during the Satvahan dynasty. However if we try to find any reference in history about this fort,then one can find it's mention in Treaty of Purander (1655 AD)under which Shivaji handed over 33 forts to Moghuls. It is also believed to have been handed over to Angre, naval chief of maratha at latter stage of history so that he don't part with his support to Shahu Chhatrapati of Satara and remain loyal to them.Later this fort was lost to British in the Mid 19th century, during that period some British Officers built retreat homes on the fort.
| Dil toh pagal hai |
It's been more than a month since I had trekked, reason being my aching heels.However when I got this invitation from my friends to do trek to Sagargad " toh mai khud ko rok na paya'.....Dil toh pagal hai , dil deewana hai.. ( I wanted to say this to the doctor who had suggested bed rest to me).The weekend wanderer spirit of mine was now in forefront "aur majal hai kisi ki ,agar koi usse rok paye" so off I was on my way to Sagargad.
There is many a slip between a cup and a lip:
I was all set to leave my house when my mobile rang and I was informed that my partner with whom I was supposed to ride pillion on the bike has backed out.For a second I was stunned ! I could see my trek plans jumping out of the window, Tick Tick ..... the mind clock was hammering hard. 'Ab kya karu " I was desperate to go, but the question was How ? , "Triple seat bike par jana bhi possible nahi" , as it is a long drive.I was adamant that I am not going to cancel my program what may come, so I informed my friends that I will meet them at the base village bike or no bike.
Journey from Panvel to Base Village Khandale:
I took 6.16 pm Panvel Local train from Andheri station and reached Panvel station at 8.00pm. I soon dashed from the station to the Panvel ST stand which is hardly 5 minutes away from the station to catch bus going to Khandale Village (Base Village for Sagargad Trek).Though I was told that the frequency of buses going to Alibag is good, yet here I was waiting for more than 30 minutes at the ST stand for the bus to come aur jab bus aayi toh dil bola oouch!! because the bus which had just arrived was fully packed already as it was coming from Borivali.I was in two minds that should I wait for the bus starting from Panvel or just get into it. Lekin bus aur ladki ka kya bhrosa, kab phir doosri aaye, ab jo mil rahi hai usi ke sath ho lo mere bhai :P
and when the bus stopped I realised that half the mumbai wants to get into that bus " Arre bhai Sachin Tendulkar nahi ja raha use bus me " Somehow I managed to get into the bus. This bus journey was really a big pain for me "Ek toh mai akela upar se murge ki tarah ek tang per Khada ", yes with hardly a toe to keep on the floor of the bus I was dangling, I mean literally dangling with the rod, hardly able to breathe (Kyo ki saans liya nahi puri mumbai ke paseene ki khushboo mujhe behosh kar deti )
imagine to travel like this for 2.5 hrs and upon that my still paining heels.Sach me Dil toh pagal hai.
![]() |
| Khandale Village signboard, take left from the board |
It was 11.00 at night when I reached Khandale Village. Most buses going to Alibag stop here but you will have to inform the conducter.One cannot miss the bus stop because there is a signboard.If you are coming from Panvel or Pen via Vadkhal naka then take left turn from this signboard to start your trek.This is a motor-able road which goes through the Khandale village and it could be somewhere around 3-4 kms till the end of the village.So if you are coming by ST bus then you may have to walk this road or can take an autoriksha if available.(because raat me jab mai utara tha toh goan ke kutto ko chodkar aur koi nahi tha). Another option to reach Khandale Village is that one can come to gateway of India take a early morning 6.30 launch to Mandwa Jetty and from there the launch service have a connecting bus service which will drop you to Alibag. One can hire a auto till the end of Khandale village and can also negotiate with them for the return journey.I was lucky that my biker friends were there at the Khandale bus stop and with them triple seated I reached the end of the village where we parked our bikes at a village house.
| Bullock cart / Dirt road begins |
| Open Clearing |
| The stone stairs from where the actually climb starts |
Climbing only few steps you will notice that there is a small diversion on right side just after the cemented steps. This diversion takes you to Dhondana Waterfall.
| Just ahead of this cemented steps diversion on right side for waterfall |
The water from behind the Siddheshwar temple is kind of feeder to this waterfall.
![]() |
| Sagargad waterfall (Dhondana Waterfall) |
| Uneven Stone stairs |
| Siddheshwar Temple |
| Left from here takes you to Sagargad and straight towards Siddheshwar Temple |
| Side view of Siddeshwar Temple |
| Stream behind the Ashram |
| Plain walk |
| Well before the Sagargad machi |
| Anganwadi/school |
| Dirt road at the end of the village |
Little walk from here will bring you to a large a large clearing, keep walking straight further, there is full possibility that you may get confused here because from the clearing you may not find any route further but straight walking will bring you to the point where you will see large vegetation growth but enter into it ( this entry point is kind of almost hidden due to bushy growth).
| Trail hidden by bushy growth |
| While traversing you can see Sagargad Fort on right side |
| Fort Wall |
| View of the entry gate of the Sagargad Fort |
| Walking through the forest |
| Shiva Temple on Sagargad Top |
| Nandi Idol |
| Water Tank |
| British quarters ruins |
| Sleeping under the sky ( Life ho toh aise ) |
Next morning we got up at 6.00 am with sun coming out from the horizon the skyline bathed in orange.
| Orange sky line |
Its time to explore the top Plateau of Sagargad now.
What to see on the Sagargad Top.
1. Vanartok: Its on the southern side of the fort.This Pinnacle is independent of the sagargad plateau.Professional climbers climb it.The only problem of climbing this pinnacle is that it is not bolted therefore the lead climber has to risk his life to climb and anchor. In-fact our group members scaled this pinnacle today.
| Vanartok |
3.Water Pond : On the sagargad Top one finds a big pond.The water is very muddy. Don't try to take a dip in the pond because we were informed by local villager that there are snakes in it.
| Muddy Water Pond on Sagargad Top |
a) Not much fortification is left most of it has been destroyed except the walls on the northern side. However one can notice overgrowth of vegetation along the walls of the fort.
| Walls of the fort. |
| Ruins |
After completion of fort exploration and Pinnacle climb we made our way back to the base.
| Pinnacle Climb |
I have to again struggle to get the bus back to Panvel,but managed to get a seat this time , so shut my eyes and had a good nap till Panvel . Another fantastic trek comes to end and lets get ready for the next weekend wandering.
BASE VILLAGE : Khandale , Tal.Alibag, Dist. Raigad
TYPE: Hill Fort
ALTITUDE : 415 Mtrs
RAIL HEAD: Panvel or Pen
ROAD HEAD: Panvel, Pen
TREK ITINERARY : One day trek
BEST SEASON : Monsoon ( because one can enjoy Dhodhane water fall ) and winter
ALTERNATE TREK ROUTES:
1) Sagargad Trek can also be done from Bamangoan Route.
2) Second route is from Waghote Village but both these routes less frequented.
सागरगड ऊर्फ खेडदुर्ग -मागोवा एक अज्ञाताचा!
रविवारच्या पिकनीकसाठी आलेल्या तुरळक लोकांची धबधब्याखाली मौज चालली होती.पण लोक बिनधास्त थेट धबधब्याखाली आणि कड्याच्या टोकावर बघितले तर काही मद्यप्राशन करत होते.कितीही जीव गेले तरी जोपर्यंत स्वत: पर्यंत काही येत नाही तोपर्यंतची ही बेफिकीर वृत्ती मनाला अस्वस्थ करून गेली.
पठारावरची सामान्य चाल करून अर्ध्या तासात सागरगडमाची गाठली.पंधरा वीस घरांची वस्ती!
एव्हाना दोन वाजत आले होते मग लगबगीने परत फिरलो.पावसाचीही लक्षण दिसायला लागली.ऊंचवट्यावर मंदीराच्याही वर वाड्यासारखे मोठे अवशेष आहेत व ध्वजस्तंभ आहे.तिथे खाली एक तलावही आहे
परतीच्या वाटेला तटबंदी शेवटच्या टोकापर्यंत चिखल तुडवत चाचपून आलो.सागरगडमाचीपर्यंत त्याच वाटेने झपझप ऊतरलो.तिथे कातकरयांची पोर विहीरीत पोहत होती त्यांनाही प्रशांतने पोझ म्हणून वरून ऊडी मारायला लावली.तिथून मग सिद्धेश्वर मठाकडे न जाता कच्च्या रस्त्यान खाली जिथ जंगलात ओढ्यापाशी धबधब्याकड वळलो होतो तिथ अर्ध्या पाऊण तासात पोहचलो.तिथून गाडीपर्यंत जाईस्तोवर पाच वाजले होते.मग शूज बदलून मुख्य रस्त्याला कोकणकट्टा नामक हॉटेलात सुरमई थाळी सोलकडी पोट फुगेस्तोवर हाणली ( कॅलरीज बॅलन्स करायला) आणि तशा सह्याद्रीच्या डोंगररांगेपासून बाजूला सागराजवळील एका कमी माहीती असलेल्या पण कधीकाळी नक्कीच महत्वाची भूमिका बजावलेल्या गडाचा निरोप घेतला.आजचा दिवस एका अनामिक समाधानाने भरलेला होता.
ऊंची : 1357 मीटर्स
पायथ्याचे गाव: अलिबागच्या 4 कि मी आधी खंडाळा, जि.रायगड
अंतर: पुण्यातून खोपोली पेणमार्गे साधारण 150 कि मी.
ऊपयोग: अलिबाग व धरमतर खाडीवर नजर ठेवण्यासाठी
ईतीहास:
1660 : आदिलशहाकडून स्वराज्यात.
1665 : पुरंदर तहात महाराजांनी दिलेल्या 23 गडांपैकी एक!
महाराजांच्या आग्रा सुटकेनंतर परत स्वराज्यात दाखल.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सिद्धीने जिंकला.
1698 सरखेल कान्होजी आंग्रेंनी परत ताबा घेतला.
1713 सरखेल कान्होजी आंग्रेंना जहागिरी दिलेल्या 16 गडांपैकी एक.
1818 ईंग्रजांच्या ताब्यात.
स्थळ विशेष:
1.धोंदाणे धबधबा
4.तटबंदी व पाच बुरूज असलेला बालेकिल्ला
5.गोमुख असलेले कुंड
6.वाड्यांच्या बांधकामाचे अनेक अवशेष
7.समाधी ( अनामिक)
अलिबागच्या अथांग सागरावर नजर हेरून असलेला गिरिदुर्ग - सागरगड
पावसाळा सुरू होताच वेड लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद भटकंती करण्याचे, पावसाच्या धारेत ओले चिंब होत गडकिल्यांवरील सोसाट्याचा वारा अंगी झेलण्याचे. ट्रेक करताना वाटेत लागणाऱ्या धबधब्यात आणि नदीतील डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी अलिबाग जवळील सागरगड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मुंबई, पुणे किंवा रायगड यांसारख्या कोणत्याही ठिकाणांहून सागरगड आणि अलिबागचे समुद्रकिनारे यांचा वन-डे विकेंड डेस्टिनेशन म्हणून विचार करता येईल. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातचं आम्ही सागरगड आणि कनकेश्वरचा प्लॅन बनवला. माझा अलिबाग मधील मित्र भोप्या (रोशन भोपी) आणि त्याचा भाऊ असे तिघेही भल्या पहाटेच त्याच्या बेलोशी गावातून सागरगडाकडे मार्गस्थ झालो. अलिबागजवळील धरमतर खाडी ते रेवदंडा खाडी पर्यंतच्या परिसरावर वचक ठेवण्यासाठी सागरगड किल्ल्याची उभारणी केली गेली. सागरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असला तरी सागरापासून ८ किलोमीटर लांब आणि १८°४२' उ., ७३°२०' पू., ४१४ मीटर उंच असलेल्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे.
● सागरगडाचा इतिहास :-१) सागरगड किल्ल्यावरील खांबटाके आणि भुयारे यांवरून याची पायाभरणी शिलाहार कालीन (इ.स. ९ वे ते १३ वे शतक) असावी. शिलाहार घराण्यांचा उत्तर कोकणचा पहिला राजा कपर्दी याची राजधानी सागरगडाच्या समोरच्या बाजूस असलेली चौल येथील दंडाराजपुरी होय. त्यामुळे पहाऱ्यासाठी सागरगडाचा वापर त्याकाळात नक्कीच झाला असेल.२) हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. सागरगड उर्फ खेडदुर्ग या गडावर टेहळणी करताना महाराजांना अलिबाग जवळ समुद्रात दोन बेटं दिसून आली. त्याचं बेटांवर खांदेरी आणि उंदेरी किल्यांची बांधणी झाली. स्वतंत्र आरमार स्थापन केल्यानंतर अलिबाग पट्यातील रेवदंडा, कुलाबा, सर्जेकोट, खांदेरी आणि उंदेरी यांसारख्या किल्यांवर सागरी तटांच्या रक्षणाची भिस्त येईपर्यंत सगळा कारभार हा सागरगडावरूनच होत असे.३) इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
४) संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यानंतर माणकोजी सूर्यवंशीने सागरगड ठाणे सोडून प्रबलगडावर आश्रय घेतला. संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.
५) छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला.
६) १७४० सालीं बाजीरावाचें सैन्य नासिरजंगाशीं लढण्यांत गुंतलें आहे अशी संधी साधून संभाजी आंगरे यानें एकाएकीं अलीबागेंत उतरून हिराकोट, थलचाकोट, राजगड, सागरगड व चौलचा कोट हीं स्थळें घेतलीं व अलीबागेंत कुलाब्याचें पाणी बंद केलें, तेव्हां मानाजीनें, ताबडतोब येऊन आपलें रक्षण करावें अशी पेशव्यांस विनंति केली. पेशव्यांनीं मानाजीच्या कुमकेस जाण्याविषयीं इंग्रजांकडे पत्रें रवाना केलीं व बाळाजी बाजीराव व चिमाजी आप्पा हें स्वतः संभाजीवर चाल करून गेले.
७) येसाजीचा मुलगा बाबुराव आंगरे कुलाब्याचा सरखेल असताना त्याने शिंदेच्या सेनेच्या मदतीने मानाजीचा भाऊ जयसिंगाचा पराभव करून त्यास कैद केले व १८०० मध्ये त्याचा सागरगडावरून कडेलोट केला. त्यानंतर जयसिंगाचा मुलगा मुरारने उठाव केला पण तो फसला. रामजी अंगरेने मुरारला मदत केली होती. त्यामुळे बाबुरावने रामजीस पकडून त्याचा १८०७ मध्ये सागरगडावरून कडेलोट केला.
८) इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.
● पोहचण्याच्या वाटा :-
१) सागरगडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई-अलिबाग रस्त्यावरील खंडाले गावातून आहे. मुंबई-पुण्यातून येताना वडखळ-पेझरी-कार्ले खिंड-खंडाले असा प्रवास करून खंडाले गावातून सागरगड फाटा पकडावा. पावसाळ्याच्या दिवसांत एका फार्महाऊस शेजारून ओढ्याजवळ गाडीरस्ता जातो. या वाटेने गडावर जायला अडीच तासांचा कालावधी लागतो. पावसात याच वाटेने धोंदाणे धबधब्याचा आंनद लुटता येईल.
२) सागरगडावर पेझारी गावातूनही जाता येते. पेझारी गावातूनच नागझिरा गावात पोहचून गावाच्या शेवटी असलेल्या क्रिशिवन फार्म शेजारून गडावर वाट जाते. या वाटेने दीड तासांचा वेळ लागतो. वाटेवर काही प्रमाणात मार्किंग केलेली दिसून येते.
अलिबाग शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या खंडाले गावातून आम्ही गावाच्या शेवटी असलेल्या ओढ्या जवळ पोहचलो. ओढा पार करताच दगड रचून तयार केलेल्या पायऱ्यांच्या वाटेला आम्ही लागलो. काही वेळातच टेकडीवर पोहचलो. येथून एक वाट माचीवर जाते तर दुसरी धोंदाणे धबधब्याकडे. माचीवरच्या वाटेने मोकळ्या जागेत पोहचल्यावर दोन टाप्यांत कोसळणाऱ्या धोंदाणे धबधब्याचे जलप्रपात त्याच्या एकसुरी आवाजने आपलं लक्ष वेधून घेतो. वीस मिनिटांची चढाई करून आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दाखल झालो. माकडांच्या गदारोळात मंदिराचा परिसर नेहमीच गजबजून गेलेला असतो. मंदिराच्या खालच्या बाजूस एक विहीर व मठ दिसून येतो. बाजूनेच वाहणाऱ्या ओढ्याचे जलप्रपात स्वतःला झोकून देतात तोच हा धोंदाणे धबधबा. मंदिरामुळे ह्यास सिद्धेश्वर धबधबा म्हणुनही ओळखतात. कौलारू छप्पर,आधाराला लाकडी खांब, गाभाऱ्यात शिवलिंग आणि समोरच्या बाजूस नंदी अशी मंदिराची रचना आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन अर्ध्या तासातच आम्ही माचीवर पोहचलो. माचीवर चढताना मागच्या बाजूस पश्चिमेस खांदेरी आणि उंदेरी जलदुर्ग दिसून येतात.
सपाटीमुळे माचीवर मोठया प्रमाणात वस्ती दिसून येते. सागरगड व माचीवर पावसाळा वगळता बाकी दिवसांत गाडीरस्त्याने सगरगडाच्या दरवाजा पर्यंत जाता येऊ शकते. माचीवरील घरांमध्ये जेवण्याची सोय होऊ शकते, पण त्याची कल्पना त्यांना आधीच द्यावी. माचीवरून तासाभरात आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहचतो. वाट मळलेली असून जागोजागी वाटेवर मार्किंग केलेली दिसून येते. गडाच्या वाटेवरच डावीकडे शेंदूर फासलेला कातळ आहे, तर उजवीकडील बाजूस गडाचे सरळसोट कातळकडे, वानरटोक आणि रेवदंडा खाडीचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. गडाच्या डाव्या बाजूस भग्न अवस्थेत असलेला महादरवाजा आहे. येथील तटबंदी सुद्धा मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. शिवाय काही जांभ्या दगडात (Laterite Stone) बांधलेली आहे. कोकणात ईतक्या उंचीवर जांभ्या दगडात बांधलेला हा एकमेव किल्ला असावा. जवळपास चिऱ्याची खान नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चिरा कोठून व का आणला असेल हाच पहिला प्रश्न उद्भवतो. महादरवाजा च्या डाव्या बाजूस एक वाट कातळात कोरलेल्या भुयाराकडे जाते. पावसाळ्यात या वाटेने जाताचं येत नाही. त्या भुयारची माहिती व काही फोटोस आम्हाला माझा पेझारी मधील मित्र रोहित पाटील यांच्याकडून मिळाली. उजव्या बाजूची वाट गडाच्या चार मीटर उंच तटबंदीकडे जाते. याच भागात एक भक्कम बांधणीचा बुरुज नजरेस पडतो. मधील जागेत हत्ती, घोडे ठेवण्याची जागा होती. गडाला महादरवाजा पासून २०९.७६ मीटर लांब तटबंदी आहे. कधीकाळी तटबंदीच्या लगतच खंदक खोदलेला होता पण आता तो पूर्णपणे बुजलेला आहे. तटबंदीवरूनसुद्धा झाडाच्या आधारे गडावर प्रवेश करता येतो. याच तटबंदी मध्ये एक छोटेखानी खिडकी वजा दरवाजा दिसून येतो त्यास गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणून ओळखतात.
गडाच्या आत प्रवेश करताच वाटेवर उजव्या बाजूस झाडाखाली नंदी ठेवलेला आहे. त्याबाजूलाच एक भग्न अवस्थेतील गोमुख टाक आहे. पाण्याची गळती होत असल्याने ह्यात पाणी साठत नाही. त्यापुढेच आणखी एक पाण्याचा झरा दिसून येतो, पण हा फक्त पावसाळ्यातचं वाहता असावा. हीच वाट आपल्याला बालेकिल्ल्याच्या आवारातील शिवमंदिरात घेऊन जाते. शिवमंदिरचा हल्लीच जीर्णोद्धार झालेला दिसून येतो. मंदिरात शिवलिंग, नंदी, गणपतीची मूर्ती, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आणि बाहेरच्या बाजूस एका अज्ञात विराची मूर्ती आहे. बालेकिल्ल्याचा बराचसा भाग हा दाट मोठ्या झाडांनी व्यापलेल्या आहे. याच परिसरात काही बांधकामाचे अवशेष, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आणि भग्न अवस्थेतील तोफ आढळून येते. बालेकिल्ल्यात पश्चिमेला उंचवट्यावर महाराजांचं स्मारक आहे. त्याशेजारीच तीन लहान तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा पश्चिमेकडील परिसर येथून न्याहाळता येतो. शिवमंदिरच्या खालच्या बाजूच एक बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके बांधलेलं आहे. यालाच स्थानिक लोकं पांडवकुंड या नावाने देखील संबोधतात. एका दगडी गोमुखातून खळखळत कोसळणारी पाण्याची संततधार येणाजणाऱ्यांची तहान भागवते. याशिवाय गडावर मूजांबा, खेरजाबाई व वेतळाची देवळे होती.
गडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या सतीच्या माळावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. येथे एक भग्न अवस्थेत समाधी आणि दीपमाळ देखील आहे. पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या सरळसोट कड्यामुळे या बाजूस तटबंदी दिसून येत नाही. डावीकडील सोंड लांबवर गेलेली असून त्याच्या सुरवातीस एक तलाव दिसून येतो. या सोंडेलाच टकमक टोक किंवा मंकी पॉईंट देखील म्हणतात. येथील शेवटच्या बाजूस असलेला वानरटोक नावाचा गडापासून विलग झालेला सुकला हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच भागात तासंतास बसून पश्चिमेकडून येणाऱ्या गार वाऱ्याचे झोत अनुभवण्याची मजा काही औरचं. येथून धरमतर खाडी, सर्जेकोट, खांदेरी, उंदेरी,कुलाबा, रेवदंडा किल्ला, कोर्लई किल्ला, रेवदंडा खाडी आणि अलिबागचा समुद्रकिनारा दृष्टीक्षेपात येतो. याच सोंडेवर असलेल्या तलावाच्या बाजूनेच पेझारी गावात उतरणारी वाट आहे. वाटेच्या मध्यावर कातळात कोरलेली खांब टाकी दिसून येतात. यांना सोनेरी कुंड या नावाने देखील ओळखतात. बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडे भक्कम बांधणीचा बुरुज आहे. या भागातून कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, सांकशी किल्ला, मिरागड, तैलबैला यांसारखे किल्ले निरभ्र आकाशात पाहता येतात. गडाचा सर्व परिसर पाहण्यास तासभर वेळ पुरेसा ठरतो. गडफेरी पूर्ण करून परतीच्या प्रवासात धोंदाणे धबधब्याचे जलप्रपात अंगी झेलताना, पावसाळ्यात हा एक भन्नाट ट्रेक असल्याची ग्वाही आम्हाला झाली. त्यातील काही आठवणी मनात आणि कॅमेरात कैद करून आम्ही कनकेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले.
● महत्वाच्या सूचना :-
१) सागरगड माचीवरील गावात गावकऱ्यांची परवानगी घेऊन दत्त मंदिरात राहायची सोय होऊ शकते. गावातील घरांमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे पण त्याची कल्पना त्यांना आधीचं द्यावी. (शिवसमर्थ किराणा स्टोअर - संदीप पाटील - ७८७५०२३६५८, ९२७३१६८५५४, ९१६८१४९२६४)
२) स्वतःचे वाहन असल्यास सागरगड किल्ल्यासोबतचं कुलाबा, रामदरने किल्ला, कनकेश्वर मंदिर, अलिबागचा समुद्रकिनारा यांपैकी एक अशी दोन ठिकाणे एकाच दिवशी करता येऊ शकतात.
३) गडावर पांडवकुंडात बारमाही पिण्याचे पाणी असते. पण नेहमी सोबत आपली पाणी बॉटल बाळगलेली केव्हाही उत्तमचं.
४) सागरगडाला पावसाळा वगळता बाईक वरून गडाच्या तटबंदी पर्यंत जाता येते.
५) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे
पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना
खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे.
● संदर्भ ग्रंथ :-
१) कुलाबा गॅझेटिअर
२) भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र. के. घाणेकर
३) मराठी रियासत मध्यविभाग २ पृ. १



































































































No comments:
Post a Comment