प्रकार : भुईकोट
जिल्हा : नागपुर
श्रेणी : सोपी
किल्ल्यात प्रवेश
केल्यावर डावीकडील बाजूस फांजीवरून दरवाजाच्या शेजारी असलेल्या बुरुजावर
जाण्यासाठी पायऱ्या आहेत पण आता या बुरुजाचीच पडझड झालेली आहे. दरवाजा समोर
काही अंतरावर हजरत लष्करशहा शहीद रहमतुल्ला यांची कबर असुन या कबरी
भोवताली इतर काही लहान लहान कबरी आहेत. किल्ल्याच्या चार टोकावर असलेल्या
चार गोलाकार बुरुजावर नव्याने बांधलेल्या कबरी असुन किल्ल्यातील थोडीफार
मोकळी जागा वगळता संपुर्ण किल्ल्याचे कब्रस्तान करण्यात आहे. किल्ल्यात छत
नसलेली एक जुनी इमारत असुन ती वास्तु म्हणजे मस्जिद असल्याचे स्थानिक
सांगतात. किल्ल्याची एका बाजूस असलेली तटबंदी तोडुन त्यातुन किल्ल्यात
येण्यासाठी दरवाजा व पायऱ्या बांधलेल्या आहेत. या व्यतिरिक्त किल्ल्यात
नव्याने बांधलेल्या काही धार्मीक वास्तु आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर
असलेले मोठे झरोके पहाता तेथे कधीकाळी तोफा असण्याची शक्यता आहे. याशिवाय
संपुर्ण तटबंदीमध्ये व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या
पहायला मिळतात. किल्ल्यात असलेल्या स्थानिकांशी बोलणे झाले असता ते हा
किल्ला असल्याचे सांगतात पण किल्ल्याचा इतिहास विचारला असता ते संदर्भ
नसलेल्या बाबांच्या कथा सांगायला सुरवात करतात. त्यामुळे किल्ल्याचा काळ व
इतिहास कळून येत नाही. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता हा किल्ला साधारण १८
व्या शतकात म्हणजे रघूजीराजे भोसले यांच्या काळात बांधला गेला असावा असे
वाटते. कदाचित हा किल्ला नसुन एखादी गढी असण्याची जास्त शक्यता आहे.
संपुर्ण किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो व आपण परतीच्या मार्गाला
लागतो.














No comments:
Post a Comment