चालुक्यांचे कारभारी राष्ट्रकूट :
राष्ट्रकूट हे पाचव्या शतकात चालुक्यांचे कारभारी होते. त्यावेळी मुुंबइ बेटे नाशिकच्या चालुक्य राजाचा अधिपात्याखाली होती. चालुक्यांवर इ.स. ७५३ मध्ये राष्ट्रकूटांनी वर्चस्व स्थापन केले आणि इ.स. ७६० मध्ये कोकणावर अधिसत्ता स्थापन केली. त्यांची राजधानी नाशिकजवळील मयूरखंड या डोंगरी किल्यावर होती. राष्ट्रकूटांचा मुुंबइशी असलेला संबंध 'कोलके' या नावात दिसून येतो. वेरूळचे कैलास लेणे राष्ट्रकूटांच्या प्रेरणेने इ.स. आठव्या शतकाच्या चतुर्थपादात खोदण्यात आले. मानपुरा (माण-माणक), येथे इ.स. पाचव्या शतकात राष्ट्रकूटानी राज्य स्थापन केले होते. आठव्या शतकाच्या चतुर्थपादापासून दहाव्या शतकाच्या प्रथम पादापर्यंत राष्ट्रकूट राजे, ध्रुव (७७९-७९३), गोविंद तिसरा (७९४-८३), अमोघ वर्ष (८१४-८७७), कृष्ण (८७८-९१४) यांनी कोकणावर राज्य केले.
राष्ट्रकूटांची राजधानी पूरी कोणती :
राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून ठाणा-कुलाबा प्रान्ताचा कारभार शिलाहार पाहात होते (इ.स. ८१०-१२६०). त्याच्या अधिपत्याखाली ठाणे-कुलाबा जिल्ह्याचा भाग असून त्यात १४०० गावे होती, असे भादान दानपत्र आणि खारेपाटण ताम्रपटावरून समजते. या प्रान्ताची राजधानी पूरी येथे होती असा उल्लेख आहे. पूरी ही मौऱ्याची राजधानी जंजिऱ्याजवळ होती. तीच ही पूरी होती काय हा प्रश्न अनिर्णीत आहे. कझेन्स यांच्या मते मुुंबइजवळील मरोळ ही पूरी असावी. ऐहोळे लेखात पूरी समुद्रवेष्टीत होती असे म्हटले आहे, ते वर्णन मरोळला जूळते. बहुतेक लेखातून आणि ताम्रपटातून स्थानक म्हणजे ठाणे याचा शिलाहारांची राजधानी म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. पूरी ही दुय्यम राजधानी असावी. शिलाहार मूळचे 'तेर' या मराठवाड्यातील गावचे. तिथे आठशे वर्षांपूवीपर्यंत कन्नड भार्षेचा प्रभाव होता. ती शिलाहारांची भाषा. त्यामुळे मुुंबइ-ठाणे-कुलाबा भागात कन्नडभाषिक शब्द उपयोगात आले असे जुन्या लेखांवरून दिसते. त्याचा उल्लेख इतरत्र आला आहे.
राष्ट्रकूट सम्राट गोविंद तिसरा, याने कपर्दी पहिला, या शिलाहार वंशस्थापकाला उत्तर कोकणचा सांमत (कारभारी) नेमले. त्यावरून उत्तर कोकणला कपर्दी द्वीप किंवा कवडी द्वीप असे नाव पडले. शिलाहारांचे महाराष्ट्री वंशज शेलार हे क्षत्रिय आहेत. ते मूळचे तगरचे, जीमूतवाहनाचे वंशज. शिलाहार नावाची व्युत्पत्ती छद्वैदेवाच्या प्रिन्स वेल्स म्युझ्यियममध्ये असलेल्या ताम्रपटात दिली आहे.
जामदग्न्यशरात्रस्त: शीलारच्छद्मना तदा सागरो रक्षिस्तश्च प्रापुस्तन्नाम पूर्वजा: ।।१९।।
याच ताम्रपटात 'वखोला' गावास जाण्याचा मार्ग आणि लवण चरिका (क्षारक्षेत्र) याचा उल्लेख दान दिलेल्या शेतांची सीमा म्हणून आला आहे. हे वखोला गाव पोयनाड जवळील कोलेति असावे असे म. म. मिराशी म्हणतात. या संदर्भात मुुंबइत आज विद्यापीठाचा नवीन परिसर असलेल्या वाकोला गावाची आठवण होते.
राष्ट्रकूटांचे मूलस्थान :
राष्ट्रकूट हे मूळ उलत्तनूरठ (मराठवाड्यातील लातूर) चे रहिवाशी असून हा मूळ कन्नड वंश असल्याचे मत डॉ. अ.स. आळतेकर यांनी आपल्या ठराष्ट्रकूट अॅण्ड देअर टाईम्सठ या ग्रंथात नोंदविले आहे. परंतु अलीकडील संशोधनावरून हे स्पष्ट झाले आहे की, इ.स. च्या नवव्या शतकाच्या मध्यास पहिल्या अमोघवर्षाच्या काळात राष्ट्रकूटांचा लातूरशी पहिल्यांदा संबंध आला. या साम्राज्याचा संस्थापक दंतिदुर्ग याचे पूर्वज इ.स. च्या सहाव्या शतकापासून औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे राहत होते. इ.स. ८०० पर्यंत वेरूळ हीच राष्ट्रकूट राज्याची राजधानी होती. ठ्यावरून हे स्पष्टपणे प्रतिदान करता येते की, महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेले वेरूळ हेच राष्ट्रकुटांचे मूळ स्थान होते. ठ
ठराष्ट्रकू तठ वंशनामाची व्युत्पत्ती: आळतेकरांच्या मते अशोकाच्या शिलालेखातील ठरटिकठ आणि सातवाहनाकालीन शिलालेखातील ठमहारठीठ या नावातून राष्ट्रकूट ठमहारठीठ हे एक पद असून विविध वंशातील व्यक्तींनी ते भूषविले होते. उदा. ठकुर महारठीठ, म्युदुकुल महारठीठ, ठकळलाय महारठीठ,
इत्यादींपैकी कोणते महारठी राष्ट्रकू टांचे पूर्वज होते हे स्पष्ट होत नाही. शिवाय महारठी हे पदनाम राष्ट्रकूट नावापेक्षा ठमहारथीठ या पदनामाशी अधिक जवळचे आहे.
काही विद्वानांच्या मते ठराष्ट्रकूटठ म्हणजे राष्ट्रविभागाचा प्रशासक. त्यामुळे राष्ट्रकूट वंशाचा मूळ पुरुष त्या पदावर असावा व त्याच्या वंशजांनी त्याचे हे पदनाम वंशनाम म्हणून रुढ केले असावे. पण हा तर्क देखील पटण्यासारखा नाही, कारण राष्ट्रकूट हे पदनाम इ.स. च्या सातव्या आठव्या शतकानंतरच्या कोरीव लेखात आढळते. उलट राष्ट्रकूट हे वंशनाम चौथ्या शतकातील होय.
रा.गो. भांडारकरांच्या मते ठराष्ट्रकूटठ वंशाच्या मूळ पुरुषाचे नाव तुंग असे होते. रट्ट नामक त्याच्या वंशजाने या वंशास राजसत्ता प्राप्त करून दिली व त्याचा लौकिक वाढविला. पुढे त्याच्या वंशजांनी जेव्हा राज्यविस्तार केला तेव्हा त्यांनी साहजिकच आपल्या राज्याचा खरा संस्थापक असलेल्या रट्टाचे नावव आपले वंशनाम म्हणून धारण केले. राष्ट्रकूट हे रट्ट या नामाचे संस्कृत रूप होय. स्वालील मुद्यांच्या आधारे भांडारकरांचे मत इतर मतांच्या तुलनेत ऐतिहासिक सत्याच्या अधिक जवळचे वाटते.
१. राष्ट्रकुटांच्या अनेक कोरीव लेखांत त्यांच्या मूळ पुरुषाचे तुंग असे नाव नमूद करण्यात आले आहे.
२. या वंशातील अनेक राजांनी ठजगतुंगठ, ठशुभ-तुंगठ, ठनृपतुंगठ अशी तुंगपदांत बिरुदे धारण केली होती. उत्तरेतील एका राष्ट्रकूट राजाचे मुख्य नावच तुंग होते. प्राचीन काळी वंशजांना पूर्वजांची नावे देण्याची जी प्रथा होती त्या प्रथेनुसार ही तुंग नावाची पुनरावती झालेली दिसते.
३. मानपूरच्या राष्ट्रकूटांचा उल्लेख देखील कदंबांच्या कोरीव लेखात उतुंगठ असा करण्यात आला आहे.
४. काही शिलालेखात रट्ट हे वंशनाम म्हणून, तर काहीमध्ये संस्थापकाचे नाव म्हणून आले आहे.
५. ठराष्ट्रट्ठ हा मुख्य घटक ज्या नावात आहे अशा नावाच्या अनेक व्यक्ती प्राचीन इतिहासात नमूद आहेत. उदा. राष्ट्रपाल, राष्ट्रमहाराज इत्यादी. अशाप्रकारे ठराष्ट्रकूटठ या वंशनामाच्या व्युत्पत्तीच्या संदर्भात इतर मतापेक्षा भांडारकरांचे मत साधार आणि तकांधिष्ठित वाटते.
प्रारंभीचे राष्ट्रकूट राजे: दुसऱ्याास कीर्तिवर्मनला पदभ्रष्ट करून चालुक्य वंशाची सार्वभौम सत्ता नष्ट करण्याचे श्रेय दतिदुर्गाकडे जात असल्यामुळे तो राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. वेरूळ येथील दशावतार लेण्यातील शिलालेखात दतिदुर्गाने आपल्या घराण्याची पूर्ण वंशावळ पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.
दतिवर्मन
इंद्र (प्रच्छकराज)
गोविंदराज
कर्क (प्रतापशील)
इंद्र
दतिदुर्गे
या वंशावळीवरुन स्पष्ट होते की, राष्ट्रकूटांच्या सार्वभौम राज्याचा संस्थापक दतिदुर्ग असला तरी त्याच्यापूर्वी एक शतकापेक्षा अधिक काळ दंतिदुर्गाच्या पूर्वजांनी राज्य केले. कर्क प्रतापशील याच्या अलीकडील काळात उपलब्ध झालेल्या भिंधोन (जिल्हा औरंगाबाद) ताम्रपटावरून महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश त्याच्या राज्यात होता हे उघडकीस आले. याच राजाच्या स्वामस्वेड (जिल्हा बुलढाणा) ताम्रपटातील ग्रामनामांच्या उल्लेखावरून कर्काचे राज्य विदर्भाच्या पश्चिम भागापर्यंत परसले होते अशी माहिती मिळते. काही वर्षापूर्वी दुर्गराज नामक राष्ट्रकुटाचे दोन ताम्रपट उपलब्ध झाले आहेत. त्यांचा काळ इ.स. ६७७ असा आहे. या ताम्रपटातील ग्रामनावावरुन या दुर्गराजाच्या अधिपत्यास्वाली जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील प्रदेश असल्याची व तो कर्मराजाचा मांडलिक असल्याची माहिती मिळते." यावरुन स्पष्ट होते की, दतिदुर्गाच्या पूर्वजांच्या राज्यात उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस गोदावरी पर्यतचा उत्तर महाराष्ट्रातील विस्तृत प्रदेश होता. कर्काने आपल्या ताम्रपटात चालुक्य अधिराजाचा उल्लेख केलेला नाही. आणस्वी एक उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण विदर्भआणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या गोदावरीच्या नेत्तर भागातील प्रदेशात वातापीच्या चालुक्यांचा एकही कोरीव लेख उपलब्ध झालेला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, दतिदुर्गाचे पूर्वज देखील स्वतंत्र रानै होते. वेरूळ येथील राष्ट्रकुटांचे राज्य नक्की केव्हा स्थापन झाले याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही. परंतु चालुक्यांच्या कोरीव लेखात वर्णिलेल्या चालुक्य जयसिंह आणि राष्ट्रकूट कृष्णाचा पुत्र इंद्र यांच्यातील संघर्षावरून प्रारंभीचे राष्ट्रकूट औरंगाबाद-वेरूळ परिसरातील चालुक्य सत्तेच्या उद्द्यापूर्वीपासून राज्य करीत होते हे स्पष्ट होते."
चालुक्य जयसिंह सहाव्या शतकाच्या सुरुवातीस होऊन गेला. राष्ट्रकूट इंद्र हा जयसिंहाचा समकालीन होता. त्यावरून इंद्राचा पिता असलेल्या राष्ट्रकूट कृष्णाचा काळ पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील होता असे मानावे लागेल. दतिदुर्गाचे पूर्वज ज्या प्रदेशात राज्य करीत होते त्याच परिसरात राष्ट्रकूट वंशावळीतील पुनरावृत्ती या संभाव्यतेस पृष्टी देते. आळतेकरांनी विदर्भातील राष्ट्रकूट हे सम्राट राष्ट्रकूटांचे पूर्वज असल्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मिरार्शीनी तशी शक्यता फेटाळून लावली आहे. उलट दतिदुर्गाच्या पूर्वजांचे वास्तव्य वेरूळ औरंगाबाद भागात होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यावरून त्यांनी या शास्वेचे ठराष्ट्रकूटांची मूलक शास्वाठ असे नामकरण केले आहे." आळतेकरांनी दतिदुर्गाच्या पूर्वजांची जी कालगणना गृहित धरली होती ती अलकडील संशोधनावरून निराधार असल्याचे पुढील घटनाक्रमांच्या वर्णनावरून स्पष्ट होते.
दतिवर्मन :
दतिवर्मनचे नाव फक्त दतिदुर्गाच्या दशावतार लेण्यातील शिलालेखातच आलेले आहे. पण त्याच्या राजकीय कर्तृत्वाविषयीचा त्यात कोणताही उल्लेख नाही." शक्यता अशी दिसते की, वर वर्णन केलेल्या चालुक्य जयसिंहाद्वारे झालेल्या राष्ट्रकूट इंद्राच्या पराभवानंतर राष्ट्रकूट घराण्याला दतिवर्मनने सावरले व त्याला परत राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पहिल्या पुलके शीने अश्वमेध यज्ञ करून चालुक्य राजवंशांच्या सार्वभौम राज्याची स्थापना केली होती. दतिवर्मनने बहुधा पुलके शीचे स्वामित्व स्वीकारून आपले राज्य वाचविले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे नाव त्याच्या पुढील पिढ्यातील अनेक राजपुत्रांना देण्यात आले असावे.
इंद्र
प्रच्छक राज: इंद्राचे नाव राष्ट्रकूट राजवंशावळीमध्ये नमूद करणारा सर्वात प्राचीन कोरीव लेख म्हणजे दतिदुर्गाचा दशावतार शिलालेख हाच होय. पहिल्या अमोघवर्षाच्या संजान ताम्रपटात त्याची नौद उपच्छक राजठ या बिरुदाद्वारे करण्यात आली आहे." विशेष म्हणजे या ताम्रपटातील वंशावळीत प्रच्छक राजाचे नाव सर्वांत प्रथम आले आहे. संजान ताम्रपट हा राष्ट्रकूट घराण्याच्या कोरीव लेखापैकी महत्त्वाचा लेख आहे. त्यात या वंशाचा मूळ पुरुष म्हणून इंद्र प्रच्छक राजाचे नाव ज्याअर्थी आले आहे त्याअर्थी या वंशातील प्रारंभीच्या राजांपैकी तोही एक महत्त्वाचा राजा असला पाहिजे. दशावतार शिलालेखात त्याचे ठविषम महीपतीठ याविशेषणाने वर्णन करण्यात आले आहे." दुस्त्या पुलकेशीने आपला भाऊ विष्णुवर्धन याला बहाल केलेल्या ठविषमसिद्धीठ या पदवीची या विशेषणावरून आठवण होते. के. व्ही. रमेश यांच्या मते ही ठविषमसिद्धीठ पट्टी जमीन आणि समुद्र अशा दोन्ही ठिकाणाच्या युद्धात विजय संपादन केलेल्या योध्या दिली जाते." विष्णुवर्धन याला पुलकेशीनेही पदवी बहाल करण्यामागे त्याची या दोन्ही प्रकारच्या युद्धातील कामगिरी होती.
वातापीचे चालुक्य आणि कोकाणचे मौर्य यांच्यातील संघर्ष पहिला कीर्तिवर्मन, मंगलेश आणि दुसरा पुलकेशी यांच्या काळात चालू होता. दतिवर्मन हा पहिल्या पुलके शीवा समकालीन होता. त्या आधारे इंद्र पच्छक राज हा कीर्तिवर्मन आणि मंगलेश यांचा समकालीन ठरतो. या दोन्ही चालुक्य राजांच्या काळात कोकणच्या मौयांविरु द्ध आरमारी मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या." इंद्र पच्छक राज याने चालुक्यांचा मांडलिक म्हणून त्यांच्या बाजूने या मोहिमांत भाग घेतला असावा आणि त्या कामगिरीवरून त्याने ठविषम महीपतीठ ही पदवी प्राप्त केली असावी असे वाटते. हे मान्य कले तर इंद्राच्या राजकीय इतिहासाविषयीचा हा ताजा पुरावा ठरेल. दशावतार लेण्यातील शिलालेखात इंद्राला ठमहाविक्रमठ आणि ठदेवराजठ या उपार्थीनी गौरविण्यात आले असून कित्येक यज्ञयाम केल्याचे श्रेयही त्याला देण्यात आले आहे.
पहिला गोविंदराज : इंद्र पच्छक राजाचा पुत्र आणि उत्तराधिकारी पहिला गोविंदराज हा दतिदुर्गाच्या पूर्वजांपैकी पहिला बलाढ्य राजा होता. राष्ट्रकूट राज्याचा संस्थापक म्हणून त्याचे नाव केवळ सम्राट राष्ट्रकुटांच्या नव्हे, तर या वंशाच्या गुजरात सारख्या इतर शास्वांच्या तसेच शिलाहारासारख्या मांडलिकांच्या राजशासनातून देखील आले आहे. सम्राट राष्ट्रकुटांच्या बहुतेक राजशासनात गोविंदाचे नाव राष्ट्रकुटांच्या वंशावळीच्या अग्रभागी आले आहे.
आपला पिता इंद्र प्रच्छकराज याच्या प्रमाणेच गोविंदानेही चातापी चालुक्यांना मोलाचे साहा ककले. त्याचे पारितोषिक म्हणून गोविंदास पंचमहाशब्दांचे अधिकार प्राप्त झाले. या अधिकारांचा उपभोग घेणारा गोविंद हा पहिला राष्ट्रकूट राजा होता.
गोविंद हा मंगलेश आणि दुसरा पुलकेशी या दोन चालुक्य राजांचा समकालीन आणि मांडलिक होता असे दिसते. मंगलेशाने महिष्मतीचे कलचुरी आणि मध्य भारतातील नलांच्या प्रदेशावर आक्रमण केले होते." गोविंदाचे राज्य या दोन्ही राज्यांच्या दक्षिणेस होते. मंगलेशाला त्याच्या या मोहिमांच्या वेळी गोविंदाचे साहा मोलाचे ठरले असावे.
मंगलेश आणि दुसरा पुलकेशी यांच्यातील यादवीच्या वेळी गोविंदाने मंगलेशाचा पक्ष घेणे स्वाभाविक होते. कारण तो गोविंदाचा अधिराज होता. मंगलेशाच्या वधानंतर त्याचा पुत्र अप्पाइक याने गोविंदाच्या राज्यात आश्रय घेतला. वातापीवर स्वामित्व प्रस्थापित करण्याच्या हेतूने गोविंद आणि अप्पाइक यांनी भीमेच्या पलीकडून पुलके शीच्या राज्यावर स्वारी केली, परंतु याच्या ऐहोळे शिलालेखातील वर्णनानुसार ती निष्फळ
ठरली. या स्वारीत अप्पाइक ठार झाला. परंतु गोविंदाचे मात्र फारसे नुकसान झाले नाही. चालुक्य राज्याची पूर्वी केलेली सेवा लक्षात घेऊन पुलके शीने गोविंदाशी समेट केला.
दुसऱ्या पुलकेशीने आपले आसन स्थिर केल्यानंतर गोविंदाने त्याचे स्वामित्व मान्य केले आणि वरूळ येथील राजधानीहून खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या प्रातांचा समावेश असलेल्या आपल्या वडिलोपार्जित राज्याचे शासन चालविले. राष्ट्रकुटांच्या कोरीव लेखात असे वर्णन आले आहे की, गोविंद हा शिवाव्यतिरिक्त कुणासमोरही नतमस्तक होत नसे. वरूळ येथील घृष्णेश्वर शिवालय भारतातील बारा ज्योतिर्लिंग पीठापैकी एक होय. राष्ट्रकुटांच्या काळी याशिवालयाचे गुहेश्वर असे नाव होते. गोविंद आणि त्याचे वंशज गुहेश्वराचे एकनिष्ठ उपासक होते. गुहेश्वर शिव हे राष्ट्रकुटांचे कुलदैवत होते.
कर्क प्रतापशील :
पहिल्या गोविंदराजचा पुत्र आणि उत्तराधिकारी कर्क प्रतापशील हा तर आपल्या पित्यापेक्षाही महाबलाढ्य होता. दतिदुर्गाच्या पूर्वजांपैकी कर्क हाच एकमेव राष्ट्रकूट राजा आहे की, ज्याच्या कारकिर्दीतील राजशासने उपलब्ध झालेली आहेत आणि विशेष बाब म्हणजे त्याच्या राजशासनात चालुक्य अधिराजांच्या नावाचा उल्लेख नाही. याउलट कर्कराजाचे जे दोन ताम्रपट उपलब्ध झाले आहेत ते दोन्ही त्याच्या मांडलिकांनी जारी केले असून त्यात कर्कावा ठपरमस्वामीठ आणि ठमांडलिकांचा अधिराजठ अशा उपाधीसहित उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, कर्काने स्वतंत्रपणे राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती.
कर्काच्या काळातील दक्षिणेतील राजकीय स्थिती राष्ट्रकुटांना अनुकूल होती. कर्क राज्यावर आला तेव्हा पुलके शीचे निधन झाले होते आणि पल्लवांनी चालुक्यांचा बराच मोठा प्रदेश व्यापल्यामुळे व पुलके शीच्या कुळातील भाऊबंदकीमुळे चालुक्यांच्या सार्वभौम सत्तेला ग्रहण लागून पुलके शीचे पुत्र वणवण भटकत होते. या संधीचा लाभ घेऊन कर्काने आपल्या राज्यात सार्वभौम सत्ताधिशाप्रमाणे शासन चालविले होते. कर्कान्या भिंधोन ताम्रपटाने स्पष्ट झाले आहे की, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्याचा परिसर त्याच्या राज्याचा भाग होता. स्वामस्वेड ताम्रपट आणि दुर्गराज राष्ट्रकुटाच्या नुकत्याच सापडलेल्या ताम्रपटावरून विदर्भाचा मराठवाड्यास लागून असलेला भाग आणि खानदेश त्याच्या राज्यात समाविष्ट होता. अशाप्रकारे पश्चिमेस नाशिक ते पूर्वेस वर्यापर्यंत व उत्रेस तापी नदीपासून दक्षिणेस गोदावरी नदीपर्यंतचा उत्तर महाराष्ट्राचा फार मोठा भाग कर्काच्या राज्यात समाविष्ट होता.
भिंधोन आणि स्वामस्वेड या दोन्ही ताम्रशासनात कर्काचे प्रतापशील असे दुसरे नाव नमूद करण्यात आले आहे. हे नाव बहुधा त्याने आपल्या राज्यारोहणाच्यावेळी धारण केले असावे. स्वामस्खेड ताम्रशासनानुसार उत्तरगण हा कर्क प्रतापशीलाचा ज्येष्ठ भ्राता होता आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील प्रदेशाचा शासक म्हणून कर्काच्या वतीने तो कारभार चालवीत होता. यावरून हे स्पष्ट होते की, कर्क हा गोविंदराजचा ज्येष्ठपुत्र नसूनही गोविंदराजने उत्तराधिकारी म्हणून त्याची निवड केली. कर्काच्या योग्यतेचे हे आणखी एक द्यातक मानावे लागेल. दतिदुर्गाच्या एलोरा ताम्रशासनातील राष्ट्रकूट राजवंशावळीत कर्क प्रतापशीलाचे नाव अग्रभागी आले आहे. त्याच्या किमान दोन वंशजांनी कर्क हे नाव धारणकेले होते. यावरून हे सिद्ध होते की, दतिदुर्गाच्या पूर्वजांपैकी कर्क प्रतापशील हा सर्वश्रेष्ठ राजा होता. सुदैवाने त्याला प्रदीर्घ कारकीर्द लाभली. सातव्या शतकाच्या संपूर्ण उत्तरार्धात तोच राष्ट्रकूट राज्याचा शासक होता. त्यामुळे त्याला विक्रमादित्य, विनयादित्य आणि विजयादित्य या तीन वातापी चालुक्य नरेशांचे समकालीनत्व लाभले.
इंद्रराज :
कर्क प्रतापशील यांच्यानंतर त्याचा इंद्रराज हा अतिशय धाडशी पुत्र राज्यावर आला. त्याच्याविषयीची फारशी माहिती उपलब्ध नाही. चालुक्य विजयादित्याच्या मृत्यूनंतर वातापीच्या चालुक्य सत्तेला उतरती कळा लागली होती. त्यामुळे राष्ट्रकुटांनी वेरूळचे आपल्या राज्याचे शासन स्वायतपणे चालविले होते. चालुक्यांची असहाय्यता आणि राष्ट्रकुटांचा वरचळपणा दाखविणारी घटना या काळात घडली. गुजरातचा चालुक्य शासक मंगलरस याची राजकन्या भवगणा हिचे स्वयंवर दक्षिण गुजरातमधील स्वेडा येथे साजरे केले जात होते. राष्ट्रकूट इंद्रराजाने अचानक स्वयंवर मंडपावर छापा घातला आणि भवगणाचे हरण करून तिव्याशी विवाह केला. यांचा पुत्र राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक दतिदुर्ग होय. राष्ट्रकुटांच्या प्रारंभिक इतिहासातील वरील घटनाक्रमावरून हे स्पष्ट होते की, चालुक्य जयसिंहाने राष्ट्रकूट कृष्णसुत इंद्राचा पराभव केल्यानंतर राष्ट्रकूटांनी काही काळ नमते धोरण स्वीकारले. परंतु गोविदराजाच्या काळापासून त्यांनी पुन्हा चालुक्य सत्तेच्या सार्वभौमत्वास आव्हान देण्यास सुरुवात केली आणि शेवटी दतिदुर्गाने चालुक्यांच्या सार्वभौम सत्तेवर शेवटचा आघात केला.
विदर्भातील राष्ट्रकूट
जेव्हा वेरुळ-औरंगाबाद परिसरात दतिदुर्गाचे पूर्वज राज्य करीत होते तेव्हा विदर्भात याच वंशाची शास्वा अधिकार पदावर होती. ही शास्वा विदर्भ राष्ट्रकूट म्हणून ओळखली जाते. या शास्वेतील नन्नराज युद्धासुर नामक राजाचे पुढील तीन ताम्रपट आजवर उपलब्ध झाले आहेत. इ.स. ७०० चा मुलताई ताम्रपट, ६३१ चा तिवरस्खेड ताम्रपट आणि ६९३ चा सांगळूद ताम्रपट.
ज्या काळात आळतेकरांनी विदर्भ राष्ट्रकूटांच्या इतिहासाचे लेखन केले त्यावेळी सांगळूद ताम्रपट उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे आळतेकरांनी मुलताई ताम्रपटास बनावट ठरवून तिवस्स्वेड ताम्रपटाच्या आधारे नन्नराज युद्धासुराचा काळ ६३१ च्या आसपासचा ठरविला व त्या आधारावर या नन्नराज युद्धासुरास दतिदुर्गाचा पूर्वज असलेल्या दतिवर्मन याचा पूर्वज ठरविले."
सांगळूद ताम्रपट सापडल्यानंतर त्याच्यातील ६९३ ही कालगणना मुलताई ताम्रपटातील ७०९ च्या जवळची असल्याच्या आधारावर मिराशींनी आळतेकरांचे मत बरोबर नसल्याचे व्यक्त केले व तिवरखेड ताम्रपटात बनावट ठरविले. सांगळूद आणि मुलताई ताम्रपटांच्या आधारे नन्नराज युद्धासुर दतिदुर्गाचा पिता इंद्रराज याचा समकालीन ठरतो. त्यामुळे ज्याअर्थी त्याच्या पाच पिढ्या त्यापूर्वी होऊन गलेल्या दतिवर्मन याचा पूर्वज नन्नराज ठरू शकत नाही." त्याअर्थी तिवरस्खेड ताम्रपटातील काळ चुकीचा नोंदण्यात आला आहे. अशाप्रकारे प्रारंभीच्या राष्ट्रकूट राजांनी कालगणना आणि त्यांचे वाशिक मूल या बाबतची आळतेकरांनी मते निराधार ठरली आहेत. विदर्भ राष्ट्रकुटांच्या वरील तिन्ही ताम्रपटात या शास्वेची वंशावळ पुढीलप्रमाणे नौदण्यात आली आहे.
दुर्गराज
गोविंदराज
स्वामिकराज
नन्नराज युद्धासुर
या वंशावळीच्या आधारावर मिराशींनी असे प्रतिपादन केले की, नन्नरान युद्धासुराच्या पूर्वी त्याचे पूर्वज निदान शंभर वर्षे तरी अगोदर महिष्मतीचे कलचुरी आणि नंतर वातापीच्या चालुक्यांचे मांडलिक म्हणून विदर्भात राज्य करीत असावेत. वास्तविक हे विधानही बरोबर नाही, कारण पहिली गोष्ट म्हणजे वरील तिन्ही ताम्रपट नन्नराज युद्धासुरावे असून त्याच्या पूर्वजांनी राज्य केल्याची त्यात कुठेली नोंद नाही. उलट आपल्या प्रशस्तीत नन्नराजाने नमूद करून ठेवले आहे की, विदर्भाचे राज्य त्याला वारसा हक्काने मिळाले नसून त्याने ते आपल्या बाहुबलावर प्राप्त केले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे खामस्वेड ताम्रपटानुसार सातव्या शतकाच्या उत्तरार्धात विदर्भाचे प्रशासन कर्क प्रतापशीलाच्यावतीने त्याचा पुतण्या व उत्तरगणाचा पुत्र राष्ट्रमूट दद्वण दुहट हा चालवीत होता. दवण द्रहट हा वेरुळच्या राष्ट्रकूटाचा मांडलिक म्हणून पर्णस्वेट (वानस्खेड, जिल्हा बुलढाणा) या राजधानीहून पश्चिम विदर्भावर राज्य करीत होता" नन्नराजाची राजधानी अचलपूर (जिल्हा अमरावती) ही होती. तोही इंद्रराजाचा मांडलिक म्हणून पूर्व विदर्भाचे शासन चालवीत असला पाहिजे. वेरूळच्या राष्ट्रकुटांनी आपल्या वंशातील व्यक्तिना इतर प्रांतात प्रशासक म्हणून नेमण्याची प्रथा सुरू केली होती. दवण दुहटाची नेमणूक त्याच प्रथेचा एक भाग होता. म्हणजे कर्क प्रतापशीलाच्या भिंधोन आणि स्वामस्वेड ताम्रपटात त्याचे सेवक आणि अधिकारी म्हणून दुर्गराज, गोविंद आणि स्वामिकराज यांची नावे आली आहेत. सांगळूद ताम्रपटानुसार हे तिथे नन्नराज युद्धासुरावे पूर्वज होते. यावरून हे स्पष्ट होते की, सातव्या शतकाच्या अस्वेरीस व आठव्या शतकाच्या सुरुवातीस वेरूळच्या राष्ट्रकूट राजवंशातील दोन शास्वा विदर्भावर राज्य करीत होत्या व त्या मुख्य शाखेच्या अधिपत्याखाली विदर्भाचे प्रशासन चालवीत होत्या.
दद्वण दुहट किंवा नन्नराज युद्धासुर या दोघांच्या पश्चात बहुधा दंतिदुर्ग किंवा राष्ट्रकूट कृष्णाने विदर्भप्रदेश मुख्य राज्यात विलीन करून घेतला असावा. कारण त्यापुढील काळातील त्यांच्या वंशजाचे कोरीव लेख विदर्भात आढळत नाहीत. उलट राष्ट्रकूट कृष्णाचा एक ताम्रपट भांदक येथे सापडला. त्यानंतर तिसया गोविंदाचे ताम्रपटही विदर्भात उपलब्ध झाले आहेत. विदर्भातील पर्णखेट शास्वेतील राष्ट्रकुटांची वंशावळ आणि त्यांना वेरूळच्या राष्ट्रकुटाशी असलेला संबंध पुढील वंशावळीवरून स्पष्ट होऊ शकेल.
खानदेशचे राष्ट्रकूट :-
अगदी अलीकडे दूर्गराज राष्ट्रकुटांचे इ.स. ६७५ मधील दोन ताम्रपट प्रसिद्ध झाले आहेत." हे ताम्रपट कोठे प्राप्त झाले त्या ठिकाणांची नोंद केलेली नाही. तसेच त्यातील स्थळनामांची निश्चिती केलली नसल्यामुळे हा दुर्गराज कोणत्या भागात राज्य करीत होता हे आजवर अज्ञात होते. परंतु प्रस्तुत लेखकाने या ताम्रपटातील बाहली विषयाची (बहाळ, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव) व त्याबरोबर आलेल्या सर्व ग्रामांची निश्चिती जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ परिसरात केली व त्यावरून राष्ट्रकूट दुर्गराज हा बहाळ-चाळीसगाव परिसरातील प्रदेशाचा प्रशासक होता हे स्पष्ट झाले. या ताम्रपटात दुर्गराजाने आपल्या पित्याचे नाव बप्प असे नमूद केले आहे. ताम्रशासनात सार्वभौम स्वामीचा उल्लेस्व नाही. तसेच दुर्गराजाने काणतेही राजपददर्शक बिरूदही धारण केलेले नाही. यावरुन दुर्गराज हा स्वतंत्र शासक नसून मांडलिक होता असे दिसते.
इ.स. ६७७ या कालगणनेवरून दुर्गराज हा वेरूळच्या कर्क प्रतापशीलाचा समकालीन होता है स्पष्ट होते. बहाळ-चाळीसगाव परिसर हा वेरूळ औरंगाबाद परिसरालगतच आहे. त्यावरून विदर्भातील पर्णस्वेटच्या दवण दुह टाप्रमाणे दुर्गराज हा कर्काच्या वतीने चाळीसगाव परिसराचे शासन चालवीत असला पाहिजे. या तर्कास पुष्टी देणारा पुरावा कर्क प्रतापशीलाच्या भिंधोन ताम्रपटात मिळतो. या ताम्रपटात ज्याने ग्रामदान दिले त्या शासकाचे नाव स्वामिराज होते. हा स्वामिराज कर्क प्रतापशीलाचा सेवक (अनुचर) आणि दुर्गराजाचा पुत्र होता अशी माहितीही त्यात नमूद करण्यात आली आहे. स्वामिराजाचा पिता दुर्गराज म्हणजे बहाळ चाळीसगाव परिसराचा प्रशासक दुर्गराज होय. उत्तरमण आणि दवण द्रुहट हे कर्काच्या वतीने पश्चिम विदर्भाचे शासन चालवीत होते आणि दुर्गराज हा स्वानदेशातील कर्क राजाचा मांडलिक होता असे दिसते. यावरून कर्क प्रतापशील हा मराठवाड्याचा उत्तर भाग आणि त्यालगतचा विदर्भ आणि स्वानदेशचा राजा होता.
प्रारंभीच्या राष्ट्रकुटांचे राज्यकाल :-
नव्याने उपलब्ध झालेल्या कोरीव लेखातील माहितीच्या आधारे पूर्वीच्या संशोधकांनी प्रारंभीच्या राष्ट्रकुटांचे सुचविलेले राज्यकाल चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे त्याबाबतीत थोडेसे विवेचन आवश्यक आहे. आळतेकरांनी तिवरस्खेड ताम्रपटातील ६३१ या कालोल्लेस्वाच्या आधारावर नन्नराज युद्धासुराचा राज्यकाल इ.स. ६३० ते ३९० असा ठरविला व तो दतिवर्मनचा पूर्वज समजून ६९० व्या पुढील अर्ध्या शतकात दतिदुर्गाच्या सर्व पूर्वजांचा राज्यकाल निश्चित केला. मुळात तिवस्स्खेड ताम्रपटातील कोलोल्लेख चुकीचा आहे हे सिद्ध झाल्यामुळे त्या आधारे आळतेकरांनी सुचविलेले प्रारंभीच्या राष्ट्रकूट राजांचे राज्यकालही आपोआपच चुकीचे ठरले.
आळतेकरांनी सुचविलेला दतिदुर्गाचा इ.स. ७४५ ते ७५६ हा राज्यकालही चुकीचा ठरला आहे. कारण एलोरा ताम्रपट दतिदुर्गाने इ.स. ७४१ मध्ये जारी केला होता. त्याने अनेक स्वाऱ्या करून ज्याअर्थी राज्यविस्तार केला त्याअर्थी त्याची कारकीर्द कमीत कमी दोन दशकांची तरी असलीच पाहिजे. त्यामुळे त्याचा राज्यकाल इ.स. ७३७ ते ७७७ असा दुरुस्त करावयास हवा. या आधारे दतिदुर्गापर्यतच्या राष्ट्रकूट राजांचे शासनकाल पुढीलप्रमाणे निश्चित करावयास हवेत.
राष्ट्रकूट कृष्ण
दतिवर्मन
इंद्र- प्रच्छकरान
पहिला गोविंदराज
(चालुक्य जयसिंहाकडून पराभूत)
इ. स. ७०० ते५३०
इंद
इ. स. ५३० ते ५६०
इ. स. ७६० ते ५९०
इ. स. ५९० ते ६१०
इ. स. ६१० ते ६५०
कर्क प्रतापशील
इ. स. ६५० ते ७१०
इंद्रराज
इ.स. ७१० ते ७३५
दतिदुर्गे
इ.स.७३५ ते ७५५
वा. वि. मिराशी यांनी दतिदुर्गाच्या एलोस ताम्रपटातील कालोल्लेख इ.स. ४६३ असा वाचला व ती नोंद तथाकथित चेदि-कलचुरी कालगणनेनुसार असावी असे प्रतिपादन केले आहे. परंतु मिराशींचे वाचन बरोबर नव्हते. कारण प्रस्तुत ताम्रपटाच्या फोटोप्रतीत व ठशात इ.स. ६६३ अशी काल नोंद स्पष्ट दिसते. मिराशींनी वरील कालगणनेच्या आधारे जो दतिदुर्गाचा राज्यकाल इ.स. ७१० ते ७७० असा सुचविला आहे तो संयुक्तिक नाही. कारण सामनगड ताम्रपटातील कालोल्लेखावरून दतिदुर्ग इ.स. ७७३ मध्ये राज्यावर होता हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे दतिदुर्गाचा राज्यकाल ४० वर्षांचा असणेव शक्य नाही. कारण त्याच्यानंतर त्याचा चुलता कृष्ण हा राज्यावर आला. यावरून दतिदुर्गाचा राज्यकाल वैविध्यपूर्ण परंतु २० वर्षापेक्षा अधिक नव्हता हे सिद्ध होते.
एलोरा ताम्रपट हा दतिदुर्गाचा सर्वात पहिला ताम्रपट होय. त्यातील कालोल्लेख ७४१ असा आहे. त्यावरून पाच-सहा वर्षे म्हणजे इ.स. ७३७ च्या सुमारास तो राज्यावर आला हे स्पष्ट होते. इ.स. ७४७ चा सामनगड ताम्रपट हा दतिदुर्गाचा शेवटचा कोरीव लेस्व होय. दतिदुर्गाचा उत्तराधिकारी असलेल्या कृष्णराजाचा पहिला कोरीव लेख इ.स. ७७८ चा होय. इ.स. ७७३ आणि इ.स. ७७८ च्या मधोमध म्हणजे इ.स. ७५५ च्या सुमारास दतिदुर्गाचे अचानक निधन होऊन त्याची कारकीर्द संपली असे सिद्ध होते.
दतिदुर्ग :
: इ.स. ७३७ च्या सुमारास दतिदुर्गाचे राज्यारोहण झाले. राष्ट्रकुटांच्या कोरीव लेखात त्याने जिंकलेल्या राज्यांच्या व प्रदेशांच्या यादीत कांची, कलिंग, श्रीशैल, कोसल, मालव, लाट, टंक आणि सिंध इत्यादींचा समावेश आहे. दतिदुर्गाच्या दिग्विजयांचा निश्चित कालक्रम ठरविणे साधनांच्या अभावी कठीण आहे. आळतेकरांच्या मते त्याने आपल्या दिग्विजयाची सुरुवात पूर्वेकडील कोसल राज्यावरील स्वारीने केली असावी." परंतु हे मत तितके से बरोबर वाटत नाही. काही इतिहासकारांनी असे मत मांडले आहे की, यातील काही स्वाया दतिदुर्गाने बदामीच्या चालुक्यांचा मांडलिक असताना त्यांच्यासाठी केल्या असणे शक्य आहे. तसे असल्यास कांची, टंक आणि सिंध या प्रदेशावरील स्वाया त्याने चालुक्यांच्या वतीने केल्या असाव्यात.
दतिदुर्गाने स्वतः साठी केलेला पहिला दिग्विजय हा लाट किंवा दक्षिण गुजरातचा असावा, ही घटना इ.स. ७४० च्या सुमारास घडली असावी. कारण यानंतरच्या काळातील गुजरातवर राज्य करणाऱ्या चालुक्यांच्या सत्तेविषयीचे कोणतेही पुरावे आढळत नाहीत. याउलट इ.स. ७४१-४२ मधील एलोरा ताम्रपटात दुतिदुर्गाने दक्षिण गुजरातमधील नवसारी येथील ब्राह्मणांना भूमिदाने दिल्याची नोंद आढळते. यावरून हे स्पष्ट होते की, इ.स. ७४१ मध्ये दतिदुर्गाने गुजरातवर स्वामित्व प्रस्थापित झाले होते. या प्रदेशाच्या प्रशासनाचे कार्य.. दतिदुर्गाने आपला दूरचा पुतण्या कर्क याच्याकडे सोपविले. इ.स. ७७७ मधील कर्काच्या अंत्रोळी-छरोळी ताम्रपटावरून इ.स. ७६० पर्यंत तो राष्ट्रकुटांचा मांडलिक म्हणून गुजरातचे शासन चालवीत होता असे दिसते.
इ.स. ७४९ मधील मनोर ताम्रपटावरून कोकण प्रदेश दंतिदुर्गाच्या राज्यात समाविष्ट झालेला होता. यावरून त्याने स्वतः केलेल्या प्रारंभीच्या स्वायांमध्ये नाशिक, स्वानदेश, कोकण आणि दक्षिण गुजरात या प्रदेशांवरील स्वायऱ्यांचा समावेश होता हे स्पष्ट होते. देतिदुर्गाच्या पूर्वजांनी या प्रदेशावर अचानक धाडी घालून तेथील चालुक्य सत्ता खिळखिळी केली होती. अरबांच्या गुजरातवरील स्वारीने अगोदरच कमकुवत बनलेल्या चालुक्य प्रशासनावर आणस्वी आघात बसला. औरंगाबाद-वेरूळ परिसरात दतिदुर्गाचे पैतृक राज्य असल्यामुळे लागूनच असलेल्या चालुक्यांच्या वरील प्रदेशावर त्याचे बारीक लक्ष होते. चालुक्य सत्तेला उघड आव्हान देण्यासाठी दतिदुर्गाने या प्रदेशाची पहिल्यांदा निवड केली. या प्रदेशावरील स्वाऱ्या दतिदुर्गाने बदामीचा चालुक्य राजा दुसरा कीर्तिवर्मन यानी सत्ता झुगारून देण्यापूर्वी केल्या होत्या असे निश्चितपणे म्हणता येईल. कारण वर उल्लेखिलेल्या एलोरा आणि मनोर त्याच्या ताम्रपटात दतिदुर्गाच्या नावाशी सार्वभौमत्वदर्शक अशी बिरुदे जोडलेली नाहीत.
दक्षिण गुजरात आणि कोकण हे प्रदेश चालुक्यांकडून जिंकून घेतल्यानंतर दतिदुर्गाने दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी केली. इ.स. ७७३ मधील सामनगड ताम्रपटाद्वारे त्याने कोल्हापूर परिसरातील ब्राह्मणांना भूमिदाने जारी केली यावरून हा प्रदेश त्याने कीर्तिवर्मनक डून जिंकला होता हे सिद्ध होते. चालुक्य सत्तेचा संपूर्ण नायनाट जरी पहिल्या कृष्णाच्या कारकिर्दीत झाला असला तरी या सत्तेचा शेवट करण्याचे मुख्य श्रेय दतिदुर्गास दिले जाते. कारण त्याने संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सत्तेस्वाली आणून उत्तर कर्नाटकाचाही काही प्रदेश जिंकला होता. कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील एका शिलालेखात त्या प्रदेशावरील दतिदुर्गाच्या स्वारीचे वर्णन आलेले आहे. त्याच स्वारीत दतिदुर्गाचा आंध्र प्रदेशातील श्रीशैल मल्लिकार्जुन येथील चालुक्यांच्या मांडलिक राजाशी संघर्ष झाला असला पाहिजे. या स्वाया इ.स. ७५० ते ७५४ या काळात झाल्या व त्यानंतर लगेच दतिदुर्गाने चालुक्य सत्तेस नमवून आपले सार्वभौमत्व घोषित केले.
पूर्वेकडील कलिंग आणि कोसल तसेच मध्य भारतातील माळव्यावरील स्वारी दतिदुर्गाने यानंतरच्या काळात केली होती. हा दिग्विजय त्याच्या कारकिर्दीच्या अस्वेरच्या काळातील होता असे दिसते. उत्तर दिग्विजयानंतर दतिदुर्गाने उज्जयिनी येथे ठहिरण्यगर्भमहादानठ समारंभ साजरा केला. त्याप्रसंगी गुर्जर नरेश त्याचा द्वारपाल झाला होता.
उज्जयिनी येथील हिरण्यगर्भमहादान समारंभ म्हणजे दतिदुर्गाच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू होता. तेथून आपली राजधानी असलेल्या वेरूळला परतल्यावर त्याने तेथील दशावतार लेण्यात शिलालेख कोरविला. त्या शिलालेखात दतिदुर्गाच्या कामगिरीची माहिती समाविष्ट आहे. यावरून दशावतार लेण्याचा कर्ता दतिदुर्ग हाच असला पाहिजे असे म्हणता येईल.
दशावतार लेण्यातील दतिदुर्गाची प्रशस्ती अपूर्ण राहिली आहे. यावरून याच काळात दंतिदुर्गाचे अकाली आणि अचानक निधन झाले असावे असा तर्क केला जातो. दंतिदुर्गास पुत्रसंतान नसल्यामुळे त्याच्या पश्चात त्याचा वयस्क चुलता कृष्णराज हा राज्यावर आला. दतिदुर्गाने अशाप्रकारे राष्ट्रकुटांचे सार्वभौम राज्य स्थापन केले. या राज्याने पुढील दोन अडीच शतके भारतातील राजकीय इतिहासावर आपला प्रभाव निर्माण केला.
पहिला कृष्णराज : इ.स. ७७६ च्या सुमारास पहिला कृष्ण राष्ट्रकूट राज्याच्या सिंहासनावर बसला. उतार क्यात त्याला राज्य प्राप्ती झाल्यामुळे तसेच दतिदुर्गाचा तो प्रत्यक्ष वंशज नसल्यामुळे त्याच्या राज्यारोहणात काही राष्ट्रकूट प्रमुखांनी अडचणी निर्माण केल्या होत्या असे दिसते. खुद्द कृष्णाच्या कोरीव लेस्वातही कोणा दायादाशी (नातेवाईक) त्याला संघर्ष करावा लागल्याची नोंद आढळते. हा दायाद कोण असावा, तसेच त्याने कृष्णास का विरोध केला याविषयी अद्यापपर्यंत निश्चित माहिती प्रकाशात आलेली नाही. बहुतेक इतिहासकार असे मानतात की, कृष्णाचा संघर्ष ज्या दायादाशी झाला तो दंतिदुर्गाने गुजरातचा प्रशासक म्हणून नेमलेला राष्ट्रकूट कर्क होय. इ.स. ७५७ मधील या कर्काच्या अंत्रोळी-छरोळी ताम्रपटात त्याच्या नावाशी सार्वभौमत्वदर्शक अशी अनेक बिरुदे लावलेली आहेत." यावरून दतिदुर्गाच्या मृत्यूनंतर या कर्काने कृष्णाविरु द्ध बंडाने निशाण फडकविले. त्यामुळे राज्याची सुत्रे हाती घेतल्यावर कृष्णाला सर्वप्रथम या बंडाचा बीमोड करावा लागला. कृष्ण आणि गुजरातचा कर्क यांच्यातील लढाईत बहुधा कर्क मारला गेला व कृष्णाने आपला धाक टा भाऊ नन्न गुणावलोक यास गुजरातचा प्रशासक नेमले. नन्नानंतर त्याचा मुलगा शंकरगण हा गुजरातचा प्रशासक झाल्याची माहिती आपणास शंकरगणाच्या दौलताबाद ताम्रपटावरून मिळते. गुजरातमधील कर्काचे किंवा त्याच्या वंशजांचे कोरीव लेख आढळत नाहीत. यावरून कृष्णाने त्याचा समूळ उच्छेद केला हे स्पष्ट होते. कृष्ण आणि कर्क (दायाद) यांच्यातील या संघर्षास तत्कालीन राजकीय परिस्थितीत विशेष महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे उत्तर कालातील राष्ट्रकूट राजांच्या दानशासनामधूनही कृष्ण-दायाद संघर्षांचा वारंवार उल्लेख आढळतो.
दतिदुर्गाचा मृत्यू व कृष्णाविरु द्ध काही प्रमुखांनी केलेली बंडाळी यांचा फायदा घेऊन बदामी चालुक्य नरेश दुसरा कीर्तिवर्मन याने राष्ट्रकूट राज्यावर आक्रमण करून आपला गेलेला प्रदेश परत मिळविण्याचा शेवटचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नास गंगावाडीच्या गंग राजाची साथ होती. परंतु कृष्णाने कीर्तिवर्मनवा पराभव करूदेव त्याची राजधानी बदामी जिंकून चालुक्य सत्ता संपूर्ण नष्ट केली. पाठोपाठ त्याने गंगवाडीवर चढाई करून गंग राजासही पराभूत केले. चालुक्य सत्तेचा शेवट करून त्याने या विजयाचे स्मारक म्हणून ठराजाधिराज परमेश्वरठ हे बिरुद धारण केले. दक्षिणेवर आता राष्ट्रकुटांची सार्वभौम सत्ता प्रस्थापित झाली.
कीर्तिवर्मनला राष्ट्रकुटांविरुद्ध मदत करणा-यांमध्ये वैगीचे चालुक्यही होते. त्यामुळे कृष्णाने आन्ध्रप्रदेशावर स्वारी करण्याचा निश्चय केला. वैगीच्या चालुक्यांनी सरहद्दीवरील काही प्रदेश बळकावला होता. वेंगीन्या मोहिमेसाठी कष्णाने आपला उत्तराधिकारी राजपत्र दसरा गोविंद याची निवड केली. त्याच्या अळस ताम्रपटावरून वैगीच्या चालुक्याविरु द्ध नेत्रदीपक यश मिळविले. त्यांनी जिंकलेला राष्ट्रकुटांचा प्रदेश गोविंदाने परत मिळवून वेगीवरही चढाई केली, वैगीवा चालुक्य राजा विष्णुवर्धन याने आपली कन्या शीलभट्टारिका हिचा विवाह कृष्णाना धाकटा राजपुत्र ध्रुव याच्याशी करून तसेच काही प्रदेश राष्ट्रकू टांना देऊन तह केला.
वैगीच्या पाठोपाठ कृष्णाने मध्यभारतातील राहप्पा नावाच्या राजाविरु द्ध मोहीम हाती घेतली. हा राहप्पा कोण होता याविषयी अद्यापपर्यंत इतिहासकारांत एकमत नाही. नर्मदेच्या प्रदेशावर कृष्णाने स्वारी केली होती याची निश्चित माहिती कृष्णान्या नुकत्याच उपलब्ध झालेल्या बार्शी ताम्रपटावरून मिळते. हा ताम्रपट कृष्णाने नर्मदेच्या काठावरील अमरकंटक येथील आपल्या विजयी शिबिरातून जारी केला होता.* अशाप्रकारे दक्षिणेत राष्ट्रकुटांच्या साम्राज्य स्थापनेचे व त्याच्या विस्तारावे दतिदुर्गाने सुरू केलेले काम कृष्णाने पूर्ण केले. बदामीच्या चालुक्य सत्तेचा संपूर्ण नायनाट ही कृष्णाने आपल्या वंशासाठी केलेली फार महत्त्वाची कामगिरी होय.
कृष्णान्या कारकिर्दीतही वेरूळ हीच राष्ट्रकुटांची राजधानी होती असे निश्चितपणे म्हणता येईल. उतारवयात राज्यावर आल्यामुळे त्याला अल्पशी कारकीर्द लाभली असली तरी त्याने आपल्या काळात केलेली संस्मरणीय कामगिरी म्हणजे प्राचीन भारतीय शिल्प व स्थापत्य कलेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट अशी कलाकृती असलेल्या वेरूळ येथील कैलास लेण्याची निर्मिती होय. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ जवळच असलेल्या पैठण येथील कोकस नावाच्या शिल्प्याकडून कृष्णाने या वास्तूचे कोरीव काम पूर्ण करून घेतले." त्यावरून कृष्णाचे वास्तव्य वेरूळ येथेच असले पाहिजे.
दुसरा मोविंद :
कृष्णाच्या मृत्यूनंतर इ.स. ७७३ च्या सुमारास त्याचा ज्येष्ठपुत्र दुसरा गोविंद हा राज्यावर आला. युवराज असतानाच त्याने एक यशस्वी योद्धा म्हणून नाव कमावले होते. वैगीच्या चालुक्याविरु द्धच्या त्याच्या यशस्वी मोहिमेचे वर्णन वर आले आहेच. परंतु राज्यारोहणानंतर मात्र त्याच्याकडून विशेष अशी कामगिरी झाली नाही. दौलताबाद ताम्रपटामध्ये त्याने पारिजात नामक राजाचा पराभव करून गावर्धनास संकटमुक्त केले असे वर्णन त्याच्या दौलताबाद ताम्रपटामध्ये आले आहे. तथापि, हा पारिजात कोण होता तसेच गोवर्धनास कोणत्या परिस्थितीत संकटमुक्त करावे लागले हे अद्याप गूढच राहिले आहे. पारिजात हे राजस्थानातील अरवली पर्वताचे प्राचीन नाव होय. बहुधा त्या प्रदेशातील राजाने राष्ट्रकुटांच्या राज्यावर आक्रमण करून गोवर्धन (गोवर्धन-गंगापूर, जिल्हा नाशिक) पर्यंत धडक मारली असताना गोविंदाने त्याचे आक्रमण परतवून गोवर्धन परत मिळविले असा त्याचा अर्थ होतो. ही घटना गोविंदाच्या राज्यारोहणाच्या नंतर घडली, की तो युवराज असताना घडली हे निश्चितपणे सांगता येत नाही. बहुधा ती कृष्णाच्या काळात घडली असणेच अधिक संभवनीय आहे. कारण कृष्णाने राहप्पा नामक राजस्थानातील राजाचा पराभव केल्याचे वर्णन वर आले आहेच. वैगीच्या चालुक्यांवरील स्वारीच्या वेळी जशी कृष्णाने गोविंदाची सेनापती म्हणून नियुक्ती केली तशीच ती या मोहिमेत केली असावी व म्हणून दौलताबाद ताम्रपटात या मोहिमेचे श्रेय गोविंदास दिले गेले असावे. राहप्पाच्या ऐवजी पारिजात असे पर्वताचे नाव नमूद करण्यामागे ताम्रशासनाच्या मजकुराची रचना करणाऱ्याचे कौशल्य असावे. गोवर्धन पर्वताच्या--नावाशी जुळण्यासाठी पारिजात या पर्वताच्या नावाचा उपयोग करण्यात आला असे दिसते. त्यावरून कृष्णाचा शत्रू राहप्पा आणि गोविंदाचा शत्रू पारिजात हे बहुधा एकच असावेत असे म्हणत येईल.
युवराज म्हणून पराक्रम गाजविणाऱ्या गोविंदाने राज्यावर आल्यावर मात्र प्रशासनाची जबाबदारी आपला धाकटा भाऊ ध्रुव यान्यावर सोपविली व स्वतः विलासात मग्न झाला. याचा फायदा घेऊन धुवाने राज्यप्रशासनावर आपली पकड घट्ट बसविली. ध्रुव डोईजड होत असलयाचे पाहून गोविंदाने त्याला आपली
जागा दास्वविण्यासाठी हालचाल सुरू केली, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दोघांत गृहयुद्ध सुरू झाले व त्यात ध्रुवानी सरशी होऊन त्याने गोविंदास पदच्युत करून सिंहासन बळकावले. ही घटना इ.स. ७७९ च्या सुमारास घडली. या संघर्षात दुसरा गोविंद ठार झाला.
ध्रुव धारावर्ष :
इ.स. ७७९ मधील धुळे ताम्रपट हा गोविंदाच्या कारकिर्दीतील शेवटचा कोरील लेख आहे. त्यावरून ध्रुवाने राज्यारोहण इ.स. ७८० च्या सुमारास झाले असावे असे मानले जाते. यावेळी ध्रुव प्रौढ होता. परंतु आपल्या तीन तरुण राजपुत्रांच्या बळावर त्याने आक्रमक धोरण यशस्वीपणे राबविले.
ध्रुवाना थोरला मुलगा कर्क हा गोविंदाच्या कारकिर्दीत नाशिक प्रांताचा प्रशासक असल्याची माहिती त्याच्या धुळे ताम्रशासनावरून मिळते. धुर्वाचा दुसरा मुलगा स्तंभ याची नियुक्ती त्याने नव्याने जिंकलेल्या गंगावडी प्रांताचा प्रशासक म्हणून केली होती. ध्रुवाचा तिसरा पुत्र गोविंद हा सर्व राजपुत्रात कर्तबगार होता. प्रशासनात व इतर प्रांतावरील स्वात्यात प्रामुख्याने त्याची धुवाला मदत होत असे. ध्रुवाचा सर्वात धाकटा पुत्र इंद्र याची नियुक्ती गुजरातचा प्रशासक म्हणून करण्यात आली. यापुढील जवळजवळ एक शतक गुजरातचे प्रशासन त्याच्या वंशजाकडे होते. ध्रुवाने राज्यावर आल्याबरोबर प्रथम अंतर्गत प्रशासनावर आपली घट्ट पकड बसविली व त्यानंतर बाहा शत्रूचा समाचार घेण्यासाठी मोहिमा हाती घेतल्या.
ध्रुव आणि दुसरा गोविंद यांच्या गृहकलहात ज्यांनी गोविंदाची साथ केली त्यांना धडा शिकविण्याचे काम ध्रुवाने प्रथम हाती घेतले. गंगावडीचा दुसरा शिवमार याने गोविंदास मदत केली होती. त्यामुळे धुवाने प्रथम मंगवाडीवर स्वारी केली. शिवमाराचे राज्य जप्त करून त्याला बंदी केले व गंगवाडीचा प्रशासक म्हणून राजपुत्र स्तंभ याची नेमणूक केली. कांचीचे पल्लव हे राष्ट्रकुटांचे पिढीजात शत्रू होते. गृहयुद्धात पल्लव राजाने गोविंदाची बाजू घेतली होती. त्यामुळे मंगवडीपाठोपाठ प्रवाने कांचीवर आक्रमण करून पल्लव राजाचा पराभव केला. तिच्या ऑविंदाच्या धमपूर ताम्रपटातील माहितीनुसार पल्लव राजाने त्यावेळी जबर किंमत मोजून युवकाशी तह केला." दक्षिणेत आले पाय घट्ट रोवल्यानंतर प्रवाने उत्तर भारतातील राजकारणाकडे लक्ष वळविले. गुर्जर प्रतिहार वंशातील कसराज हा धुवावा समकालीन असून राष्ट्रकुटांच्या गृहकलहात त्याची सहानुभूती दुसत्या गोंविंदास होती. त्यामुळे तो धुवास शत्रुस्थानी होता. त्याशिवाय वत्सराजाने उत्तर भारतात गुर्जर प्रतिहारांचे कर्वस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि कनोज हस्तगत करण्यासाठी हालचाल सुरू केली होती. त्याचा हा हान हाणून पाहण्यासाठी बंगालचा महत्वाकांक्षी पालवंशीय राजा धर्मपाल याने कनोजच्या राजकारणात हस्ताक्षेप करण्यास सुरुवात केली होती. कनोजचा नामधारी शासक इंद्रायुध यास वत्सराजाने आपल्या हातचे बाहुले बनविले होते. चक्रायुध हा इंद्रयुधाचा प्रतिस्पर्धी इंद्रायुधास हटवून कनोजची मादी बळकावण्याची खटपट करू लागला होता. धर्मपालाने चक्रायुधाला हाताशी धरले. परिणामतः इंद्रायुधव चक्रायुध यांच्यातील सत्तास्पर्धेचे रुपांतर वत्सराज आणि धर्मपाल यांच्यातील युद्धात झाले." चक्रायुधाला मदत करण्यासाठी व प्रसंगी वत्सराजशी दोन हात करून कनोजवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने धर्मपाल आपल्या सैन्यासह दुआबात दाखल झाला. वत्सराज आणि धर्मपाल यांच्यात घनघोर लबाई झाली. वत्सराजने या लढाईत धर्मपालाचा निर्णायक पराभव करून त्याची श्वेतछत्रे हस्तगत केली. त्यामुळे चक्रायुधाच्या माध्यमाने कनोजवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे स्वान धुळीस मिळाले. परिणामतः वत्सराजवी स्थिती भक्कम झाली.
ध्रुवाचे उत्तरेतील घटनांकडे लक्ष होतेव, कनोजवर वत्सराजने वर्चस्व कायम होणे राष्ट्रकुटांच्या दृष्टीनेही धोक्याचे होते. त्यामुळे प्रवाने उत्तर भारतावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिल्यास उत्तर भारतात दिग्विजय संपादन करण्याची आकांक्षा राष्ट्रकूट राज्याच्या संस्थापकापासून सर्वच राजांच्या मनात होती असे दिसून येते. दतिदुर्गाची माळव्यावरील स्वारी आणि उज्जयिनी नगरात त्याने साजरा केलेला ठहिरण्यगर्भमहादानठ समारंभ, तसेच कृष्णाने केलेला राहप्पाचा पराभव व त्यासाठी हाती घेतलेली मध्य भारतातील मोहीम या घटना त्या आकांक्षेतूनच घडल्या होत्या. गंगा-युमना नद्यांच्या दुआबापर्यंत मजल मारणारा पहिला राष्ट्रकूट राजा ध्रुव हाच होय. ध्रुवाने कनोजच्या दिशेने कूच केले. इ.स. ७८९ मध्ये वत्सराज आणि ध्रुव धारावर्ष यांच्यात दुआबात तुंबळ युद्ध झाले. ध्रुवाने वत्सराजाचा संपूर्ण पराभव केला आणि धर्मपालाकडून त्याने हस्तगत केलेली श्वेतछत्रे आपल्या ताब्यात घेतली. राष्ट्रकुटांच्या या विजयाने उत्तरेकडील राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलून गेले.
वत्सराजकडून पराभूत झालेला धर्मपाल धुवाच्या उत्तरेतील आगमनाबरोबर दुआबातून काढता पाय घेण्याच्या विचारात होता. परंतु धुवाने केलेल्या वत्सराजाच्या पराभवानंतर त्याने आपला विचार बदलला. कारण त्याचा असा समज होता की, ध्रुवाचे सैन्य उत्तर भारतात फार काळ न थांबता दक्षिणेत परत जाईल व त्यानंतर आपणास पुन्हा कनोजवर यशस्वी चढाई करता येईल. म्हणून धर्मपाल परतीना विवार सोडून दुआबातच थांबला. ही गोष्ट ध्रुवाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने आपल्या सैन्यास धर्मपालाच्या छावणीवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. या लढाईत देस्वील राष्ट्रकूट सैन्याने बंगालच्या सैन्याचा संपूर्ण पराभव केला. या विजयाची नोंद राष्ट्रकूट पहिल्या अमोघवर्षाच्या संजान ताम्रपटात तसेच गुजरातचा राष्ट्रकूट शासक कर्क सुवर्णवर्ष याच्या सुरत ताम्रपटात करण्यात आलेली आहे.
ध्रुवाने या दोन्ही विजयाद्वारे उत्तर भारतातील राजकारणास कलाटणी दिली. तसेच राष्ट्रकुटांच्या उत्तर भारतविषयक धोरणास नवे वळण दिले. राष्ट्रकुटांची सत्ता प्रामुख्याने दक्षिणेत असली तरी उत्तर भारतातील सत्तास्पर्धेत त्यानी यशस्वी भाग घेऊन आपल्या उत्तराधिकायांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला. या राजवंशातील शेवटचा महत्त्वाचा राजा तिसरा कृष्ण याच्यापर्यंत ध्रुवाच्या बहुतेक वंशजांनी त्याचे उत्तर भारतविषयक धोरण पुढे चालिवले."
यादृष्टीने राष्ट्रकुटांच्या उत्तर भारतविषयक धोरणाच्या बाबतीत यापूर्वीच्या इतिहासकारांनी व्यक्त केलेली मते पुन्हा तपासून पाहणे आवश्यक आहे. आळतेकरांसहित बहुतेक सर्व इतिहासकारांनी राष्ट्रकुटांच्या उत्तर भारतातील स्वाऱ्या म्हणजछ ठकेवळ दिग्विजयठ होत असे म्हटले आहे. कारण या विजयातून त्यांनी उत्तर भारतात प्रदेश संपादन करून आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली नाही. परंतु हे मत ग्राह्य मानता येत नाही. ध्रुवाने उत्तर भारतात फक्त धाड घातली असे नसून आपल्या विजयानंतर तेथे काही प्रदेश प्राप्त केला व त्याचा प्रशासक म्हणून आपल्या वंशातील शासकाची नियुक्ती केली. या शासकाच्या वंशजांनी पुढील कित्येक पिढ्या तेथे राज्य केले असल्याची माहिती काही नव्याने उपलब्ध झालेल्या कोरीव लेखांवरून मिळते.
बिहार राज्यातील बोधगया येथे राष्ट्रकूट वंशीय तुंग धर्मावलोक या शासकाचा शिलालेख प्राप्त झाला आहे. हा तुंग स्वतः स नन्न गुणावलोकाचा नातू आणि कीर्तिराजाचा पुत्र म्हणवितो. दौलताबाद ताम्रपटातील माहितीनुसार नन्न गुणावलोक हा ध्रुवाचा चुलता होता. त्याचा मुलगा कीर्तिराज हा ध्रुवाचा चुलतभाऊ आणि समकालीन ठरतो. या कीर्तिराजचा पुत्र तुंग हा उत्तर भारतातील प्रदेशावा शासक होता त्यावरून स्वाभाविकपणे हे राज्य कीर्तिराजाने मिळविले असावे. कीर्तिराज हा ध्रुवाच्या उत्तर भारतीय मोहिमेत सामील झालेला असल्यामुळे ध्रुवाकडून त्याला या नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचे शासनाधिकार मिळाले असावेत. अन्यथा इ.स. च्या नवव्या व दहाव्या शतकात उत्तर भारतात राष्ट्रकुटांचे राज्य कसे स्थापन होऊ शकले याच उत्तर मिळणे कठीण आहे. बोधगयछ (बुद्धगया) प्रमाणेच उत्तर प्रदेशातील व्होडमाऊत किंवा बदायुन येथेही राष्ट्रकुटांची एक शास्वा राज्य करीत असल्याची माहिती तेथील राष्ट्रकूट वंशीय शासकांकडून मिळते. हे राष्ट्रकूट शासक म्हणजे राष्ट्रकुटांनी उत्तरेत स्वायाकरून जे प्रदेश मिळविले त्यावर शासन करणारे राष्ट्रकुटांचे प्रतिनिधी होते. त्यामुळेच धुवानंतरच्या तिसरा गोविंद, तिसरा इंद्र आणि तिसरा कृष्ण या राजांना उत्तर भारतावर वारंवार स्वाऱ्या कराव्या लागल्या. यावरून राष्ट्रकुटांच्या उत्तर भारत धोरणाविषयीचा पूर्वीच्या इतिहासकारांचा दृष्टिकोण पूर्णतः स्वीकारार्ह ठरत नाही." केवळ क्षणिक विजयासाठी राष्ट्रकूट राजे आक्रमण करीत नसत. तर त्या प्रदेशात स्थिर सत्ता संपादन करण्याचा हेतू अशा हालचालींमागे असे.
उत्तर दिग्विजयानंतर ध्रुव दक्षिणेत परत आल्यावर त्याने आपला तिसरा पुत्र गोविंद याची आपला वारस म्हणून निवड केली. इ.स. ७९३ च्या अस्वेरीस त्याचे निधन झाले. ध्रुव हा राष्ट्रकूट वंशातील सर्वात कर्तबगार शासक होता. अवघ्या १३ वर्षाच्या काळात त्याने दक्षिणेत तर आपला दबदबा निर्माण केलाच, शिवाय उत्तर भारतातील राजकारणावरही आपला प्रभाव निर्माण केला. आळतेकर म्हणतात की, नऊशे वर्षापूर्वी सातवाहनांच्या रुपाने दक्षिणेतील शासकाने विंध्य पर्वतापलीकडील प्रदेश जिंकण्याचा जो विक्रम केला होता त्याची पुनरावृत्ती ध्रुवाने केली व मध्यप्रदेशात आपली सत्ता प्रस्थापित केली.
तिसरा गोविंद
: ध्रुवाने आपल्या हयातीतच आपला वारस म्हणून गोविंद याची निवड केल्यामुळे इ.स. ७९४ च्या सुरुवातीस गोविंदाचे राज्यारोहण निर्विघ्नपणे पार पडले. परंतु त्यानंतर लगेच गोविंदाला गंगवाडीतील गंगांच्या चंडाचा बीमोड करावा लागला. स्वरे म्हणजे उदार धोरणाचा अवलंब करून गोविंदाने आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी राष्ट्रकुटांच्या कारागृहात असलेल्या गंग शिवमार याची सुटका केली. परंतु गंगवाडीत पोचतात त्याने गोविंदाविरु द्ध बंडाचे निशाण फडकवले. गंगवाडीचा शासक असलेल्या स्तंभाला गोविंदाने शिवमाराची केलेली सुटका खटकली होती. आपल्याऐवजी आपल्या धाकट्या भावाची निवड राजा म्हणून झाल्याची स्वंत स्तंभाच्या मनात होतीच. शिवमारावी सुटका करून गोविंदाने आपल्याविरु द्ध आणस्वी एक आगळीक मुद्दाम केल्याची भावना स्तंभाच्या मनात बळावली. स्तंभाने गोविंदावर मात करण्यासाठी शिवमाराशी हातमिळवणी करून गोविंदाच्या शत्रूची आघाडी निर्माण केली. या आघाडीत दक्षिणेत बारा राजे सामील झाले. एवढे झाल्यानंतर त्याने गोविंदाच्या सतेस उघड आव्हान दिले. बंडखोरांना गोविंदाच्या शासन यंत्रणेतील काही मंत्री व अधिकारी यांची सहानुभूती मिळाल्यामुळे तर तो अडचणीत आला. परंतु धैर्य आणि मुत्सद्दीपणाच्या बळावर त्याने या संकटाना मुकाबला केला. तो एक उत्तम योद्धा असूनही बलप्रयोगाऐवजी त्याने समझोता आणि क्षमाशीलता यांचा अवलंब करून स्तंभाला जाऊन मिळालेल्या कित्येक मांडलिकांना परत आपल्या पक्षात आणले. इ.स. ७९८ मध्ये गोविंदाने गंगवाडीवर स्वारी करून गंग शिवमार मुत्तरसवा पराभव करून त्याला कैद केले. त्यामुळे स्तंभाने गंगराजची साथ सोडली. तेव्हा गोविंदाने स्तंभांच्या चुका माफ करून गंगवाडीचे प्रशासन परत त्याच्याकडे सोपविले. त्यानंतर गोविंदाने आपल्याविरु द्धच्या आघाडीतील एक शत्रू असलेल्या कांचीच्या पल्लवाकडे मोर्चा वळविला, पल्लवाचा पराभव करून गोविंदाने त्यास धडा शिकविला. परंतु पुढे पल्लवांनी अनेक वेळा त्याच्या विरोधी मोहिमा हाती घेतल्यामुळे आपल्या कारकिर्दीच्या अस्वैस्पर्यत गोविंदास कांचीवर अनेक वेळा स्वाऱ्या कराव्या लागल्या. यानंतर तिसया गोविंदाने वेगीच्या चालुक्याविरु द्ध मोहीम हाती घेतली. या मोहिमे मागील निश्चित कारण अज्ञात आहे. वैगीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्यात पूर्वीपासूनच शत्रुत्व होते. कारण राष्ट्रकुटांनी चालुक्य घराण्याकडून दक्षिणेतील सत्ता बळकावली असल्याची त्यांची भावना होती. पहिल्या कृष्णाने वेगीन्या चालुक्यांचा पराभव करून या दोन घराण्यात वैवाहिक संबंधाद्वारे परस्परातील वैरभाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा उललेख कर आलाच आहे. परंतु गोविंद आणि स्तंभातील गृहकलहान्या वेळी वैगीच्या चालुक्यांनी स्तंभाची बाजू घेतल्यामुळे गोविंदाचे या घराण्याशी असलेले संबंध पुन्हा बिघडले. त्यामुळे गोविंदाने वैगीवर स्वारी केली. या स्वारीत गोविंदाने चालुक्यांचा पूर्ण पराभव केला.
दक्षिणेकडील शत्रूचा पूर्ण बंदोबस्त केल्यावर गोविंदाने उत्तर भारताकडे आपले लक्ष वळविले. मध्यंतरीच्या काळात उत्तर भारतातील राजकीय संघटनांना अशी कलाटणी मिळाली होती की, गोविंदास उत्तर भारतावर स्वारी करण्याशिवाय गत्यंतर राहिले नव्हते.
ध्रुवाने उत्तर भारतातील सर्व प्रमुख प्रतिस्पर्धाचा पराभव करून या प्रदेशात आपला वचक बसविला होता. परंतु त्याच्या दक्षिणेतील आगमनानंतर बंगालच्या धर्मपालाने पुन्हा मोहीम हाती घेतली. त्याने कनोजवर स्वारी करून तेथील नामधारी राजा इंद्रायुध आणि त्याच्या संरक्षणार्थ असलेल्या गुर्जर प्रतिहारांच्या सैन्यास पिटाळून लावले व आपणास अनुकूल असलेल्या चक्रायुधास क नोजच्या सिंहासनावर बसविले. गुर्जर-प्रतिहार वत्सराजचा उत्तराधिकारी नागभट याने कनोजवर स्वारी करून धर्मपाल आणि चक्रायुधाचा पराभव केला व अपमानाचा बदला घेतला, एवढेच नव्हे तर नागभटाने राष्ट्रकुटांच्या विरुद्ध असलेल्या कोसल, कलिंग आणि वैगी येथील शासकांची आघाडी निर्माण केली व राष्ट्रकुटांच्या माळवा आणि उत्तर गुजरातेतील प्रदेशावर आक्रमण केले.
गोविंदाने उत्तरेकडील मोहीम इ.स. ७९९ मध्ये सुरू केली. यावेळी त्याने आपल्या सैन्याची दोन आघाड्यात विभागणी केली. आपला भाऊ व गुजरातचा शासक इंद्र याच्या नेतृत्वास्वाली त्याने एक तुकडी गुर्जर-प्रतिहारांच्या मुख्य प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी पश्चिम भारतात पाठविली व स्वतः दुसत्या तुकडीबरोबर कनोजवर चाल केली. दोन आघाड्यांवर लढावे लागल्यामुळे गुर्जर प्रतिहार सैन्याचा पराभव झाला व कनोज गोविंदाच्या हाती पडले. याच मोहिमेत त्याने कोसल आणि बंगालच्या सैन्यावा पराभव करून उत्तर भारतातील राजकीय स्थितीवर पुन्हा आपले वर्चस्व निर्माण केले. गोविंदाच्या या उत्तरेकडील स्वारीचे वर्णन देस्वील आळतेकरांनी 'केवळ एक दिग्विजय' असेन केले आहे. पण हा केवळ तत्कालीक विजय नसावा असे म्हणता येते. राधनपूर ताम्रपटातील माहितीनुसार गोविंदाने उत्तरेकडील मोहिमहेवरून परत येतेवेळी काही दिवस श्रीभवनचा राजा मारशर्व याचा पाहुणचार स्वीकारला. त्यावेळी मार शर्वाने अमूल्य अशा वंशपरंपरागत जतन केलेल्या वस्तुंचा गोविंदास नजराणा देऊन त्याचे आदरातिथ्य केले. इ.स. ८०० मधील पावसाळयात गोविंदाना मुक्काम श्रीभवन येथे होता. त्याचवेळी तेथे त्याच्या एकुलत्या एक असलेल्या शर्व अमोघवर्ष या पुत्राचा जन्म झाला. त्याचे नामकरण बहुधा गोविंदाने आपल्या यजमानाच्या नावावरून केले असे दिसते. आळतेकरांनी श्रीभवनव्या मारशर्वाच्या ऐतिहासिकतेविषयी जे मत मांडले आहे ते बरोबर वाटत नाही. श्रीभवन म्हणजे गुजरातमधील बडोद्याजवळील सरभोन असावे, तर मारशर्व बहुधा तेथील शासक व गुर्जर-प्रतिहार नागभटाचा मांडलिक असावा असे त्यांनी म्हटले आहे. " परंतु पुढील मुद्यावरून हा तर्क चुकीचा आहे हे सिद्ध होते.
सधनपूर ताम्रशासना श्रीभवन हे विन्ध्य पर्वताजवळ असल्याने वर्णन आले आहे. त्याआधारे त्याचा शोध गुजरात ऐवजी माळव्यात घेणे क्रमप्राप्त ठरते. बडोद्यासह दक्षिण गुजरातचा प्रदेश माविंदाचा भाऊ राष्ट्रकूट इंद याच्या अधिपत्यास्वाली गोविंदानेच ठेवला होता. त्यामुळे त्याच प्रदेशात आणी दुसरा शासक असण्याची शक्यता नव्हती. विशेष म्हणजे श्रीभवन येथे गोविंदाने संपूर्ण वर्षा ऋतू घालविला. तसेच आपल्या नवजात पुत्राचे नाव आपल्या यजमानाच्या नावावरून ठेवले. त्यामुळे मारशर्व हा गोविंदाचा जवळचा मित्र किंवा नातेवाईक असावा असे वाटते. भोपाळ जवळील पाथरी येथील शिलालेखावरून इ.स. च्या नवव्या शतकात या प्रदेशात राष्ट्रकुटांची एक शास्वा राज्य करीत असल्याची माहिती मिळते. मारशर्व बहुधा या शास्वेशी संबंधित असावा. कर्नाटकातील गुडिगेरे येथील कोरीव लेखात मार शर्व नामक शासकाचा उल्लेख आलेला. फ्लीट यांच्या मते गुडिगेरे आलेखातील मारशर्व आणि राधनपूर ताम्रपटातील श्रीभवनचा मारशर्व हे एकच असावेत. सर्वरस नामक शासकाचे नाव इ.स. च्या पाचव्या-सहाव्या शतकात होऊन गेलेल्या मानपूरच्या राष्ट्रकूट वंशातील विभुराज याच्या पांडुरंगपल्ली ताम्रपटातही नमूद केलेले आहे. इ.स. च्या सहाव्या शतकात होऊन गेलेला देज्ज महाराज व मानपूरच्या राष्ट्रकूट शास्वेतील शेवटचा शासक होता. प्रस्तुत लखेकाने हे दाखवून दिले आहे की, ज्याअर्थी पाचव्या शतकातील राष्ट्रकुटांचा पांडुरंगपल्ली ताम्रपट हा नवव्या शतकात होऊन गेलेल्या सर्बराजकडे होता, त्याअर्थी हा सर्बराज मानपूरच्या राष्ट्रकूटांचा वंशज असला पाहिजे. इ.स. च्या सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांनी सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे राष्ट्रकूट देज्ज महाराजाचे वंशज नव्या प्रदेशाच्या शोधात माळव्यात जावून स्थायिक झाले. पाथरी शिलालेखातील राष्ट्रकूट परबल आणि राधनपूर ताम्रपटातील शर्वमहाराज हे त्यांच्या वंशजापैकी असावेत. गोविंदाने शर्वांस परत कर्नाटकात प्रशासक म्हणून पाठविले. गुडिगेरे आणि पांडुरंगपल्ली ताम्रपटातील नवव्या शतकातील सर्व किंवा सर्बस्स हा अशा परिस्थितीत दक्षिणेत परत आला असावा.
गोविंद उत्तरेकडील मोहिमेत अडकल्यची संधी साधून दक्षिणेतील त्याच्या शत्रूनी उचल खाल्ली. गंग, चोल, पांड्य, पल्लव व केरल नरेशांनी राष्ट्रकुटांच्या विरु द्ध पुन्हा आघाडी स्थापन केली. दक्षिणेतील शासकांनी राष्ट्रकुटांची सत्ता नेस्तनाबूत करण्याची त्याने पूर्ण तयारी केली. यावेळी त्याने दक्षिणेतील आपल्या शत्रूवर केवळ स्वारी न करता कर्नाटकातील मयूरखंडी येथे कायमचा तळ ठोकला व तेथून दक्षिणेतील आपल्या सैन्याच्या हालचालीवर देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. आपल्या कारकिर्दीची शेवटची दहा वर्षे गोविंदाचा मुक्काम मयूरखंडी (मोरस्खंडी, जिल्हा बीदर, कर्नाटक) येथे होता हे त्याने या कालावधीत जारी केलेल्या नऊ ताम्रपटावरून स्पष्ट होते. हे सर्व ताम्रपट इ.स. ८०५ ते ८१३ या कालावधीत जारी करण्यात आले आहेत आणि त्यात राजाच्या वास्तव्याचे ठिकाण मयूरखंडी असे नमूद करण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, उत्तरेतील मोहिमेवरून परत आल्यानंतरच्या दशकात गोविंदाचे वास्तव्य वेरूळ येथे नसून मयूरस्खंडी येथे होते. दक्षिणेकडील शत्रूचे सतत होणारे उठाव हे त्यामागील मुख्य कारण होय. वेरूळहून दक्षिणेत राजधानी हलविण्याची आवश्यकता गोविंदास त्याच्या पहिल्या दक्षिण मोहिमेच्या वेळेसच जाणवली होती. परंतु उत्तरेकडील स्वारीमुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. त्यामुळे उत्तर दिग्विजयावरून परत आल्यावर पुन्हा दक्षिणेतील शत्रूनी केलेला सामूहिक उठाव बधून गोविंदाने दक्षिणेत -कायमचे वास्तव्य ठेवण्याचा निर्णय घेतला. मयूरस्खंडी हे बदामीच्या चालुक्यांच्या राजवटीत विषय विभागाचे मुख्यालय होते, शिवाय राष्ट्रकूट राज्याच्या केंद्रस्थानी ते वसलेले होते.
उत्तरेकडील मोहिमेवरुन परत आल्यावर गोविंदाने आपल्या विजय आणि पुत्रप्राप्तीस्तव वेरूळ येथे यज्ञ केला" आणि त्यानंतर दक्षिणेकडील मोहिमेच्या निमिताने मयुरस्खंडीस प्रयाण केले. दक्षिणेतील या स्वारीत गोविंदाने प्रथम गंग राजाचा पराभव केला. त्या पाठोपाठ पल्लव, पांड्य आणि केरल ही राज्ये पादाक्रांत केली. गोविंदाच्या या विजयांनी प्रभावित होऊन श्रीलंकेचा राजाही गोविंदास आपण होऊन शरण आला. दक्षिणेतील या विजयानंतर गोविंदाने नव्या मोहिमा हाती घेतल्या नाहीत. त्याऐवजी जिंकलेल्या प्रदेशातील आपली स्थिती मजबूत करणे व मयूरखंडी यथील नव्या राजधानीतील अत्यावश्यक अशा नव्या इमारतींची निर्मिती करणे यावर त्याने लक्ष केंद्रित केले. इ.स. ८१४ मध्ये गोविंदाचा मृत्यू झाला.
पहिला अमोघवर्ष :
तिसऱ्या गोविंदाच्या मृत्यूनंतर इ.स. ८१४ मध्ये त्याचा पुत्र पहिला अमोघवर्ष हा राज्यावर आला. अमोघवर्ष हा अल्पवयीन असला तरी गोविंदाचा एकुलता एक पुत्र असल्यामुळे त्याचे राज्यारोहण निर्विघ्नपणे पार पडले. अमोघवर्ष अल्पवयीन असल्यामुळे गोविंदाने आपला पुतण्या आणि गुजरातचा शासक कर्क सुवर्णवर्ष यास राजपालक म्हणून नेमले असे विधान आळतेकरांनी केले आहे. परंतु या विधानास पुष्टी देणारा पुरावा सम्राट राष्ट्रकुटांच्या किंवा गुजरातेतील राष्ट्रकुटांच्या शासनादेशात आढळत नाही. राष्ट्रकुटांच्या काही उत्तरकालीन आलेखात कर्काने अमोघवर्षास राज्य प्राप्त करून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचा उल्लेख आलेला आहे. परंतु त्यावरून कर्क हा अमोधवर्षाचा राजपालक होता हे सिद्ध होत नाही. उलट खुद्द अमोघवर्षाच्या शासनदेशात पातालमल्ल आणि बँकेय यांचे अमोघवर्षांचे रक्षणकर्ते म्हणून उल्लेख आलेले आहेत. यातील पातालमल्ल हे कर्क सुवर्णवर्षांचे बिरुद असावे असे जे मत आळतेकरांनी व्यक्त केले तेही निराधार आहे. कर्क सुवर्णवर्षाचे गुजरातेतील उत्तराधिकारी आणि अमोघवर्ष यांच्यात पुढे जो प्रदीर्घ संघर्ष झाला त्यावरूनही कर्क सुवर्णवर्ष हा अमोघवर्षाचा राजपालक होता हे मत ग्राहयच ठरत नाही.अमोघवर्षाच्या कारकिर्दीची पहिली ३-४ वर्षे सुरळीतपणे गेली. परंतु त्यानंतर मात्र त्याला अंतर्गत शत्रूनी निर्माण केलेल्या भयंकर स्थितीचा सामना करावा लागला. या बंडाळीचे स्वरूप एवढे भीषण होते की, त्यामुळे काही काळ अमोघवर्षास आपले राजपदही गमवावे लागले. या अंतर्गत शत्रूच्या बंडाळीचे निश्चित स्वरूप व त्यामागील कारणे स्पष्ट नाहीत. परंतु या संदर्भात पुढीलप्रमाणे अनुमानकेले जाऊ शकते. राज्यारोहणाच्यावेळी अमोघवर्ष हा केवळ चौदा वर्षाचा युवक असल्यामुळे प्रशासन व राजकारण या बाबतीत अनभिज्ञ आणि अननुभवी होता. त्यामुळे प्रशासनावर त्याचा वचक बसू शकला नाही. आपल्या पित्याप्रमाणे अमोघवर्षाच्या ठिकाणी आक्रमक वृत्ती नव्हती. धार्मिक आणि शांततामय कार्यात त्याला अधिक रस होता.
अमोघवर्षाच्या विरु द्ध झालेल्या बंडाळीचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिसया गोविंदाने राष्ट्रकूट राज्याच्या राजधानीचे वेरूळहून मयूरस्खंडी येथे केलेल स्थलांतर होय. त्याने दक्षिणेतील गंग, वंगीचे चालुक्य इत्यादी शत्रूकडून वारंवार होणाऱ्या उपद्रवास कायमचा पायबंद घालण्याच्या दृष्टीने हे स्थलांतर घडवून आणले होते. परंतु मयूरस्खंडीस पूर्णपणे राजधनीचे स्वरूप प्राप्त करून देण्याच्या आतच त्याचा मृत्यू झाल्यामुळे या नगरात राजघराण्यास सुरक्षितता लाभू शकली नाही. त्यामुळे अमोघवर्षास मयूरखंडीऐवजी पुढे मान्यस्वेट येथे आपली राजधानी कायम करावी लागली.
अमोघवर्धास राज्यसिंहासनावरून पदच्यूत करण्यायांचीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. बहुधा वैगीच्या चालुक्यांनी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा बंडाचे निशान उभारले व इतर शत्रूनी त्यांच्याशी संगनमत करून, मयूरखंडीवर आक्रमण करून ती ताब्यात घेतली असावी. त्यामुळे अमोघवर्षास राजसिंहासनास व राजधानीस मुकावे लागले. यापुढील अनिष्ट काळात अमोघवर्षांचे वास्तव्य बहुधा लतलूर (लातूर) येथे असावे. त्यामुळेच कदाचित त्याच्या शिरुर आणि मुळगूद येथील आलेस्वात अमोघवर्षाच्या नावाबरोबर "ग्लतनूरपुरवराधीश्वरत असे बिरुद लावण्यात आले आहे. वैगीच्या चालुक्यांनी राष्ट्रकूट राज्याचा मयूरस्खंडीपर्यतवा पूर्वेकडील प्रदेश काही काळ व्यापलेला होता या तर्कास चौथ्या गोविंदाच्या सांगली ताम्रपटातील माहितीमुळे पुष्टी मिळते." या ताम्रपटात अमोघवर्ष आणि वैगीचे चालुक्य यांच्यात विंगवल्ली येथे झालेल्या घनघोर लढाईचा उल्लेख आलेला आहे. या लढाईत अमोघवर्षाचा विजय होऊन त्यामुळे राष्ट्रकूट आणि वेगीचे चालुक्य यांच्यातील संघर्षास कलाटणी मिळाली, विंगवल्लीची स्थलनिश्चिती न झाल्यामुळे आजवर या महत्त्वाच्या पुराव्याचा उपयोग केला नाही. इतर शिलालेखातील उल्लेखावरून विंगवल्ली म्हणजे हिंगोली (जिल्हा हिंगोली) हे सिद्ध झाले आहे. यावरून परभणी व त्यास लागून असलेल्या कर्नाटकातील चीदर जिल्हयातील प्रदेशावर काही काळ वेगीन्या चालुक्यांनी आपला ताबा बसविला होता हे स्पष्ट होते.
अमोघवर्षाच्या सत्तेस लागलेले ग्रहण इ. स. ८१७ ते ८२० या कालावधी पर्यंत टिकले. इ.स. ८२० मध्ये अमोघवर्षाने आपले विश्वासू सरदार बंकेय, पातालमल्ल आणि कर्क सुवर्णवर्ष यांच्या सहाय्याने आपली गेलेली राजसत्ता परत मिळविली. यापैकी बंकेय आणि कर्क सुवर्णवर्ष यांची तत्कालीन इतिहासात नोंद आहे. पातालमल्ल कोण होता हे मात्र अद्यापपर्यंत गूढच राहिले आहे. पातालमल्ल हे गुजरातचा राष्ट्रकूट शासक कर्क सुवर्णवर्ष याचे बिरुद होते हा आळतेकरांचा तर्क बरोबर वाटत नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तसा निश्चित पुरावा उपलब्ध नाही. दुसरी आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्याकाळी व्यक्तिनाम आणि बिरुद यांच्या बाबतीत प्रत्येक राजघराण्यात विशिष्ट संकेत होते. ठमल्लठ हे उपपद तत्कालीन गंग राजवंशाच्या नामावळीत आढळते. उदा. राजमल्ल. गंग हे राष्ट्रकुटांचे पिढीजात शत्रू होते ही गोष्ट स्वरी आहे. त्याआधारे अमोघवर्षास त्याचे सिंहासन परत मिळण्याच्या कामी गंगांनी कशी मदत केली असा प्रश्न विचारला जण्याची शक्यता आहे. परंतु त्याचे उत्तर शोधणे तेवढे कठीण नाही. अमोघवर्षाची राजकन्या चंद्रवल्लभा हिचा विवाह गंग युवराज बुदुम याच्याशी झाल्याची इतिहासात नौद आहे. पिढीजात शत्रूमध्ये झालेला हा नातेसंबंध या दोघांना एक दुसऱ्याच्या जवळ आणण्यासाठी झालेला होता हे उघड आहे. त्यावरून पातालमल्ल हे बुदुग किंवा त्याच्या पित्याचे बिरुद असून गंगांनी नव्या परिस्थितीत अमोद्यवर्षास त्याचे राजपद परत मिळवून देण्यास मदत केल्याची शक्यता अवश्य आहे. या तर्कास उपोद्बलक असा आणस्वी एक पुरावा आहे. या काळातील वैगीच्या चालुक्यांच्या कोरीव लेखात त्यांनी अमोघवर्ष आणि गंग यांच्या संयुक्त सैन्याशी संघर्ष केल्याची नोंद आहे. यावरून अमोघवर्षाच्या काळात गंग आणि राष्ट्रकूट यांच्यातील पिढीजात शत्रुत्व काही काळ तरी संपले होते हे स्पष्ट होते.
अमोघवर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील बराचसा काळ वैगीच्या चालुक्यांशी लढण्यांत गेला. तिसया इंद्राच्या बागुम्रा ताम्रपटात असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे की, अमोघवर्षाने चालुक्यरुपी गहन सागरात बुडालेले राष्ट्रकुटांचे गत वैभव परत मिळविले. यावरूनही अमोघवर्षाच्या सत्ता पदच्युतीस वैगीचे चालुक्यच प्रामुख्याने जबाबदार होते हे सिद्ध होते. विजयादित्य हा वेगीचा चालुक्य राजा अमोघवर्षाचा समकालीन होता. त्याने विंगवल्ली (हिंगोली, जिल्हा हिंगोली) पर्यंतचा राष्ट्रकू टांचा प्रदेश तर जिंकलाच, शिवाय मयूरस्खंडीपर्यंत मुसंडी मारून अमोघवर्षास परांगदा केले. ही गेलेली सत्ता परत मिळविण्यासाठी अमोघवर्षास विजयादित्याशी प्रदीर्घ संघर्ष करावा लागला, राष्ट्रकूट आणि वैगीचे चालुक्य यांच्यात या कालावधीत झालेल्या अनेक लढायांच्या नोंदी अमोघवर्षांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या कोरीव लेस्वात आढळतात. चौथ्या गोविंदाच्या सांगली ताम्रपटात असे वर्णन आले आहे की, विंगवल्लीच्या रणभूमीवर अमोघवर्षाने कित्येक चालुक्य वंशीयांचा यमराजास बळी दिला व त्यास संतुष्ट केले. विंगवल्लीच्या लढाईत अमोघवर्षांविरुद्ध वैगीच्या चालुक्यांच्या मदतीस अभ्युपक वंशाचे सैन्यही आलेले होते." त्या सर्वाचा आमेघवर्षाने नायनाट केला. त्यामुळे विंगवल्ली येथील लढाई अमोघवर्षाच्या कारकिर्दीमतील सर्वात महत्त्वाची लढाई ठरली.
वैगीच्या चालुक्यांच्या आलेखात त्यांच्या सैन्याने अमोघवर्षांचा राजपुत्र दुसरा कृष्ण याचा पराभव करून किरणपुर नगर ताब्यात घेतल्याची नोंद आढळते. किरणपूर कदाचित कृष्णपूर किंवा कंधारपूर या ऐवजी चुकून लिहिले गेले असावे. कारण त्या नावाचे ठिकाण आढळत नाही. तसे असल्यास किरणपूर म्हणजे राष्ट्रकूटांची उपराजधानी असलेले नांदेड जिल्हयातील कंधारही असू शकेल. ही घटना केव्हा घडली याची नौद नाही. परंतु ती अमोघवर्षाच्या कारकिर्दीत घडली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. चालुक्यांशी चाललेल्या या प्रदीर्घ संघर्षामुळे अमोघवर्षाने बहुधा वैवाहिक संबंधाद्वारे गंग राजवंशाची मैत्री प्राप्त केली. अमोघवर्ष आणि वैगीचे चालुक्य यांच्यातील संघर्ष इ. स. ८६० पर्यंत चालू होता. शेवटी अमोघवर्षाने वैगीच्या चालुक्यांवर पूर्ण मात केली.
अमोघवर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूटांना करावा लागलेला दुसरा संघर्ष म्हणजे गुजरातच्या राष्ट्रकुटांशी केलेला संघर्ष होय. खरे म्हणजे गुजरातमधील राष्ट्रकूट राजा कर्क सुवर्णवर्ष हा अमोघवर्षाचा ज्येष्ठचुलत भाऊ असल्यामुळे संकटकाळी त्याने अमोघवर्षास साथ दिली होती. त्याचे राज्य परत मिळविण्याच्या कामी कर्काचा महत्त्वाचा वाटा होता. असे असूनही पुढे या दोन शाखांत बेबनाव का निर्माण झाला हे अद्यापही एक न उलगडलेले कोडे आहे. एक तर कर्क सुवर्णवर्षाच्या नंतरच्या राजांनी अमोघवर्षाने स्वामित्व मान्य करण्यात कुचराई केली असावी किंवा गुजरात शास्वेतील गृहकलहामुळे अमोघवर्षास त्यात हस्तक्षेप करणे भाग पडले असावे. कर्क सुवर्णवर्षानंतरच्या काळातील गुजरात शास्वेच्या इतिहासावरून दुसया पर्यायाची शक्यता अधिक वाटते. कारण काहीही असो. अमोघवर्षास गुजरात शाखेविरुद्ध इ.स. च्या नवव्या शतकाच्या उत्तरार्थात अनेक मोहिमा हाती घ्याव्या लागल्या. अमोघवर्ष विजयी होऊन काही काळ संपूर्ण दक्षिण गुजरात त्याने के दीय प्रशासनास्वाली आणला असल्याची माहिती त्याच्या तत्कालीन शासनादेशावरून मिळते. इ.स. ८५० मधील तारसदी किंवा अहमदाबाद ताम्रपट अमोघवर्षाने मान्यखेट येथून जारी केला असून त्यात त्याने गुजरातमधील गावे ब्राह्मणास दान दिल्याची नोंद आढळते." त्यानंतरचा त्याचा संजान ताम्रपटही पश्चिम किनारपट्टीवर राष्ट्रकुटांचे केंद्रीय प्रशासन प्रस्थापित झाल्याची ग्वाही देतो. परंतु पुढील काळात दोन घराण्यातील मतभेद संपुष्टात येऊन अमोघवर्षाने दक्षिण गुजरातचे शासन पुन्हा गुजरात राष्ट्रकूट शास्वेकडे सुपूर्द केले. याच सुमारास त्याने उत्तर कोकणात शिलाहार प्रमुख कपर्दिन यास मांडलिक म्हणून नेमले. पुढील चार शतके कोकणवर शिलाहारांचे राज्य अस्तित्वात होते.
अमोघवर्षाच्या शिरुर शिलालेखानुसार अंग, बंग आणि मगध इत्यादि राज्यांचे राजे अमोघवर्षाचे मांडलिक होते. आळतेकरांना हे मान्य नसून त्यांच्या मतानुसार अमोघवर्षाने उत्तर भारतावर एकही स्वारी केली नाही. उलट त्याचा समकालीन असलेला बंगालचा पालवंशीय राजा नारायणपाल याने मात्र द्रविड राजाच्या प्रदेशावर स्वारी केल्याची नोंद त्याच्या आलेस्वात आहे. अशा परिस्थितीत अमोघवर्षांचे स्वामित्व बंगालच्या मगधन्या राजांनी मानले असे गृहित धरणे चुकीचे आहे. परंतु आळतेकरांचा हा तर्क ही इतिहासाच्या कसोटीस उतरत नाही. कारण ठद्रविडठ हा उल्लेख चोल, पांड्य आणि चेर राजांच्या संदर्भातील होय. राष्ट्रकुटांना समकालीन कोरीव लेखात कर्नाट असे संबोधले आहे. शिवाय अमोघवर्ष आणि नारायणपाल हे परस्परांचे समकालीन नव्हते ही बाबही आळतेकरांनी विचारात घेतलेली दिसत नाही." अमोघवर्षाने उत्तर भारतावर स्वारी केली नाही ही गोष्ट स्क्री आहे, परंतु इतरत्र त्यांनी असे विधान केले आहे की, वैगीच्या चालुक्यांचा पराभव केल्यानंतर अमोघवर्षाने वंग प्रांतावर स्वारी केली होती. त्या आधारे शिरुर शिलालेस्वातील वर्णन अवास्तव समजण्याचे कारण नाही. तसेच नारायणपालाने द्रविड राजाच्या प्रदेशावर स्वारी केल्याची माहितीही अशा शक्यतेच्या आड येऊ शकत नाही. कारण अमोधवर्ष हा द्रविड राजा म्हणून संबोधला जात नसे. उलट समकालीन इतर प्रांतातील राजे राष्ट्रकुटांना कर्नाट म्हणून संबोधीत. द्रविड हे संबोधन चोल, पांडव व केरळ इत्यादी प्रदेशातील राजांना लागू होते.
साठ वर्षाचा प्रदीर्घ राज्यकाल अमोघवर्षाच्या वाट्यास आला. परंतु वैगीचे चालुक्य आणि गुजरातेतील राष्ट्रकूट यांच्याविरुद्ध लढण्यातच त्यापैकी बराचसा काळ गेला. शांतताप्रिय स्वभावाच्या अमोघवर्षास तेच जड गेले. अशा परिस्थितीतही सर्व शत्रूवर मात करून त्याने आपले राज्य कायम टिकविले ही त्याच्या कारकिर्दीतील एक फार मोठी जमेची बाजू मानावी लागेल. कानडी भाषेतील सर्वात प्राचीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठकविराजमार्गत या ग्रंथाचा कर्ता स्वतः अमोघवर्ष होय. तो जैन धर्माचा उपासक होता. त्यामुळे त्याने अनेक विद्वान जैन साधूंना उदार आश्रय दिलास होता. यामध्ये जिनसेन आणि भट्टारक हे प्रमुख होत. अमोघवर्षाच्या कारकिर्दीतील आणस्वी एक महत्त्वाची घटना म्हणूने त्याने मान्यस्वेट (मालस्वेड, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक) ही राष्ट्रकुटांची नवी राजधानी निर्माण केली. यापुढील दोन शतकापर्यंत ही दक्षिणेची राजधानी होती. इ.स. ८७९ मध्ये अमोघवर्षांचे निधन झाले. अमोघवर्ष प्रजेच्या उत्तरदायित्वाविषयी किती जागरूक होता हे महामारीपासून लोकांना वाचविण्यासाठी आपले बोट कापून त्याने सिद्ध केले."
दुसरा कृष्ण:
पहिल्या अमोघवर्षांच्या मृत्यूनंतर इ. स. ८८० मध्ये त्याचा पुत्र दुसरा कृष्ण गादीवर आला. त्यापूर्वीही अनेक वेळा त्याने राज्याची सूत्रे स्वतंत्रपणे सांभाळली होती. जैन धर्माचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून अमोघवर्षाने आपल्या कारकिर्दीच्या अस्वेरीस अनेक वेळा राज्यकारभारातून निवृत्ती स्वीकारली
होती. त्या काळात दुसया कृष्णाने राज्याची धुरा सांभाळल्याची माहिती तत्कालीन ताम्रशिलाशासनावरून मिळते. दुसया कृष्णाच्या कारकिर्दीतही राष्ट्रकूट आणि त्यांचे दक्षिणेतील वेंगीचे चालुक्य, गंग व नोलम्ब यांच्यासारस्वे शत्रू व उत्तरेतील गुर्जर प्रतिहार आणि गुजरातेतील राष्ट्रकूट यांच्यातील संघर्ष चालूच होता. दुसरा कृष्ण हा डहाल प्रांतातील चेदी नरेश कोकल्ल याचा जावई होता. त्यामुळे आपल्या शत्रूशी लढताना त्याला कोकल्लाची सतत मदत मिळत होती. पहिल्या अमोघवर्षाने वैगीच्या चालुक्यांचा पूर्ण बीमोड केला होता. परंतु दुसऱ्या कृष्णाचा समकालीन असलेल्या तिसरा विजयादित्य या वैगीच्या चालुक्याने राष्ट्रकुटाविरु द्ध पुन्हा कारवाया सुरू केल्या. त्यामुळे कृष्णाने आपल्या श्वसुराच्या सहाय्याने वैगीच्या चालुक्याविरु द्ध युद्ध घोषित केले. वैगीच्या चालुक यांच्या कोरीव लेखावरून या संघर्षात प्रारंभी वैगीच्या चालुक्यांची सरशी होती. त्यामुळे कृष्णाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. वैगीच्या चालुक्यांच्या आलेस्वात उल्लेखिलेला कृष्णाविरु द्धचा त्याचा किरणपूरच्या लढाईतील विजय या काळातील असावा. परंतु तिसऱ्याा विजयादित्यानंतर राज्यावर आलेल्या पहिला भीम या वैगी चालुक्य राजाच्या काळात कृष्णाने आक्रमक पवित्रा घेतला व भीमाचा संपूर्ण पराभव करून पूर्वीच्या पराभवाचा सूड घेतला.
कृष्णाने उत्तर भारतावर स्वारी केली नाही. तरीही त्याला पहिला भोज या गुर्जर प्रतिहार राजाशी संघर्ष करावा लागला. कारण भोजाने राष्ट्रकूट राज्यावर आक्रमण केले होते. भोजाने राष्ट्रकुटांचा प्रदेश जिंकण्याचा निकराचा प्रयत्न केला. परंतु कृष्णाने त्याना यशस्वीपणे प्रतिकार करुन आपल्या प्रदेशाचे रक्षण केले. भोजाविरु द्धन्या संघर्थात त्याला गुजरातचा मांडलिक कृष्णराज यानेही मदत केली. असे असूनही इ.स. ८९० च्या सुमारास कृष्णाने गुजरात पुन्हा केंद्रीय प्रशासनास्वाली आणला व त्याबरोबर गुजरातेतील राष्ट्रकूटांच्या शास्वेची राजवट संपुष्टात आली. या मागील नक्की कारण समजण्यास मार्ग नाही. बहुधा गुजरातचा शासक, राष्ट्रकूट कृष्णराव यास पुत्रसंतान नसावे व त्यामुळे कृष्णाला तो प्रदेश केंद्रीय प्रशासनास्वाली आणवा लागला असावा असे वाटते. परकीय आक्रमणावर मात करून आपले वडिलोपार्जित राज्य कृष्णाने कायम ठेवून त्यात दक्षिण गुजरातची भर घातली ही दुसया कृष्णाच्या कारकिर्दीतील एकमेव जमेची बाजू होय. आपल्या पित्याप्रमाणे दुसरा कृष्णही जैन धर्माचा अनुयायी होता. आदिपुराण या जैन ग्रंथाच्या शेवटच्या पान प्रकरणांचा कर्ता जैन मुनि गुणभद्र हा दुसया कृष्णाचा गुरू होता. जवळजवळ ३५ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. ९१४ च्या सुमारास दुसया कृष्णाचे निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय बरेच असावे. कारण त्याचा मुलगा जगतुंग हा त्याच्या हयातीतच मृत्यू पावला व त्यामुळे दुसऱ्या कृष्णानंतर त्याचा नातू व जंगतुंगाना पुत्र तिसरा इंद्र हा इ.स. ९१४ मध्ये राष्ट्रकूट सिंहासनावर विराजमान झाला.
तिसरा इंद्रः
दुसया कृष्णाचा नातू आणि उत्तराधिकारी तिसरा इंद्र याने आपला पट्टबंधोत्सव कुरूंदक येथे साजरा केल्याचे वर्णन त्याच्या अनेक ताम्रपटात आलेले आहे. राजधानी मान्यस्वेट (मालस्वेड, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक) ऐवजी कुरूंदक (कुरुंदा, तालुका बसमत, जिल्हा परभणी महाराष्टरू) या गावी इंद्राने आपला पट्टबंधोत्सव का साजरा केला हे अद्यापही गूढच आहे. कुरुंदक हे स्थलनाम राष्ट्रकूट इंद्राच्या अनेक शासनात आढळते. कारण तेथे इंद्राने आपला पट्टबंधोत्सव साजरा केला व त्यावेळी अनेक ताम्रशासन जारी केले. कुरुंदक या स्थलनामाच्या निश्चितीविषयी संशोधकात मतभेद आहेत. भांडारकर यांनी कुरूंदक याची निश्चिती गुजरातेतील कडोदा या गावाशी केली तर मिराशींनी कायगाव (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) हे राष्ट्रकूटकालीन कुरुंदक असल्याचे मत व्यक्त केले. आळतेकरांनी कोल्हापूरजवळील कुरुंदवाड म्हणजे कुरूंदक होय असे मत मांडले. तर न.शे. पोहनेरकर आणि वि.भि. कोलते यांनी कुरूंदक म्हणजे परभणी जिल्हयाच्या बसमत तालुक्यातील कुरुंदा होय असे विधान केले आहे.
वरील सर्व मतमतांतरात पोहनेरकर आणि कोलते यांनी सुचविलेली कुरुंदकाची निश्चिती अधिक संयुक्तिक व तर्कशुद्ध वाटते. कारण कडोदा आणि कायगाव व कुरूंदक यांच्यात किमान उच्चारसाम्य देस्वील नाही. त्यामुळे ते कुरुंदकांचे आजचे पर्याय होऊच शकत नाहीत. कुरुंदवाड याचा समकालीन कोरीव लेखात ठकुदलदामवाडठ असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्याचे प्राचीन नाव कुरूंदक नव्हते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कुरूंदकाची निश्चिती पोहनेरकर आणि कोलते यांनी सुचविल्याप्रमाणे कुरुंदकाशीव केवळ होऊ शकते. कारण भाषाशास्त्राच्या संकेतानुसार कुरुंदक याचे आजचे नाव कुरुंदाचे होऊ शकते. कुरुंदा हे गाव नांदेड जिल्हयातील कंधार पासून जवळच उत्तरेस आहे. कंधार ही राष्ट्रकुटांची निवासी किंवा दुय्यम राजधानी होती. उत्तरेकडील मोहिमांच्या पहिल्या टप्प्यात इंद्राची छावणी कुरुंदास पडली असताना तेथून हे ताम्रपट जारी करण्यात आले असले पाहिजेत. बहुधा दुसया कृष्णाच्या मृत्यूपाठोपाठ माळव्याचा परमार राजा उपेंद्र उर्फ कृष्णराज याने राष्ट्रकूट राज्यावर आक्रमण करून नाशिक-गोवर्धनपर्यंतचा प्रदेश व्यापला व त्याचा प्रतिकार करण्यासाठी इंद्राला ताबडतोब नाशिककडे सैन्यासह धावून जावे लागले असावे. इंद्राने केवळ आपला प्रदेशच परमाराच्या आक्रमणापासून मुक्त केले असे नव्हे, तर परमारांना राष्ट्रकुटांवे स्वामित्व मान्य करण्यास भाग पाडले. या लढाईच्यावेळी कुरूंदक येथे बहुधा इंद्राची छावणी असावी व या विजयी छावणीत इंद्राने विजयोत्सवाच्या निमिताने पट्टबंधोत्सव साजरा केला असावा. शिवाय कुरूंदक हे राष्ट्रकुटांची दुसरी राजधानी असलेल्या कंधारपुर (कंधार, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र) पासून अगदी जवळ होते.
आळतेकरांच्या मते इंद्राची कारकीर्द अल्पकालीन म्हणजे अवधी ३-४ वर्षांची होती. परंतु नव्याने प्रसिद्ध झालेल्या काही कोरीव लेखांवरून तिसरा इंद्र किमान इ.स. ९२९ पर्यंत तरी हयात होता. त्यामुळे त्याने किमान १७ वर्षे तरी राज्य केले असावे. तिसया इंद्राची कारकीर्द राष्ट्रकुटांच्या इतिहासातील एक दैदिप्यमान कालस्खंड मानला जातो. कारण परमारांसारख्या परकीय आक्रमकांना तर त्याने पायबंद तर घातलाच, शिवाय कनोजवर स्वारी करून गुर्जर प्रतिहारांवर आणस्वी एक प्रहार केला.
ध्रुव धारावर्ष आणि तिसरा गोविंद या इंद्राच्या पूर्वजांनी उत्तर भारतात स्वाऱ्या करून तेथे आपले राजकीय वर्चस्व तर निर्माण केलेच होते, शिवाय त्या भागातील काही प्रदेशही जिंकला होता त्याचे वर्णन यापूर्वी आलेले आहेच. पहिला अमोघवर्ष आणि दुसरा कृष्ण यांच्या कारकिर्दीत अंतर्गत शत्रूच्या सतत होणाऱ्या उठावांमुळे त्या दोघांना उत्तरेकडील परिस्थितीकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. त्यामुळे राष्ट्रकुटांचे उत्तरेकडील राजकारणावरील वर्चस्व तर संपलेच. त्यांच्या उत्तरेतील मांडलिकांना शत्रूनी त्रास द्यावयास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर परमारासारख्या काही शत्रूनी तर राष्ट्रकुटांच्या दक्षिणेतील प्रदेशावर आक्रमण करण्यापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे तिसया इंद्राला राज्यावर आल्याबरोबर बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही प्रकारच्या परराष्ट्र धोरणाचा अवलंब करावा लागला. तिसया इंद्राने अगोदर माळव्याच्या उपेंद्र परमाराास धडा शिकविला. त्यानंतर लगेव उत्तरेस कूच केले. यावेळी गुर्जर प्रतिहार वंशातील दुसरा भोज आणि त्याचा भाऊ महिलाप यांच्यातील यादवीमुळे कनोजवे राज्य पोस्वरून निघाले होते. भोजाच्या राज्यारोहणास महिपालाने आव्हान दिल्यामुळे त्यांच्यात यादवी सुरू झाली होती. त्यामुळे त्यांचे मांडलिक दोन गटात विभागले होते. इंद्राच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी होती. त्याने या संधीचा पुरेपूर लाभ उठविला. इंद्राच्या उत्तरेतील मोहिमेत त्याचा मातुल आणि श्वसुर असलेला डहाल प्रांताचा राजा आमणदेव याचे त्याला सैनिकी सहाय्यही मिळाले. अशा अनुकूल परिस्थितीत आणि पूर्ण तयारीनिशी इंद्र कनोजवर चालून गेला. इंद्राने कनोजवर संपूर्ण ताबा मिळविला आणि प्रतिहार राजा महिपाल यास पिटाळून लावले. त्याने बुंदेलखंडातील खजुराहो येथे जाऊन चंदेल राजाचा आश्रय घेतला. चंदेल आणि राष्ट्रकुटांचे कोरीव लेख, तसेच तत्कालीन कवी पम्प याच्या काव्यातही इंद्राच्या या पराक्रमाचे वर्णन आले आहे. राष्ट्रकूटांच्या सैन्याने गुर्जर प्रतिहार राजाचा प्रयागपर्यंत पाठलाग केला. परंतु इंद्राच्या अकाली निधनामुळे राष्ट्रकुटांना आपली मोहीम गुंडाळून दक्षिणेत परतावे लागले. त्याचा फायदा घेऊन महिपाल चंदेलांच्या संरक्षणास्वाली परत कनोजला आला व त्याने आपले राज्य आणि राजधानी परत मिळविली.
इंद्राच्या उत्तरेकडील मोहिमेचा फायदा घेऊन दक्षिणेत वैगीच्या चालुक्यांनी पुन्हा उठाव केला. परंतु इंद्राचा विश्वासू मांडलिक श्रीविजय याने त्यांचा उठाव हाणून पाडला. अशाप्रकारे इंद्राने आपल्या सर्व आघाड्यांवरील शत्रूना नामोहरम केले. त्यामुळे त्याची कारकीर्द अल्प असूनही विशेष उल्लेखनीय ठरली. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या सर्व दिशातील प्रदेशात त्याने परत राष्ट्रकुटांचा वचक निर्माण केला. इंद्र हा अतिशय सुस्वरूप होता. त्यामुळेच समकालीन कोरीव लेखात त्याचे वर्णन रट्टकंदर्प किंवा राष्ट्रकुटातील मदन म्हणून करण्यात आले आहे. इंद्राचे निधन बहुधा इ.स. ९२९ च्या सुमारास झाले असावे.
तिसया इंद्राचे उत्तराधिकारी:
इ.स. ९२९ मध्ये तिसया इंद्राच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र दुसरा अमोघवर्ष हा गादीवर आला. त्याची कारकीर्द अवध्या एका वर्षात संपुष्टात आली. इ.स. ९३० मध्ये त्याचा भाऊ आणि तिसया इंद्राचा धाकटा मुलगा चौथा गोविंद हा राज्यावर आला. तो आपल्या पित्याप्रमाणे सुस्वरूप होता. परंतु पित्याच्या अंगी असलेले सद्गुण मात्र त्याच्याजवळ नव्हते. आपला पूर्वज दुसरा गोविंद याच्याप्रमाणे तो स्त्रीलंपट होता. त्यामुळे त्याचा बहुतेक वेळ स्त्रियांच्या सहवासात आणि विलासी जीवनात व्यतित होत असे. परिणामी त्याच्या मांडलिकांनी मनमानी कारभार सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्याचा चुलता वद्दिग उर्फ तिसरा अमोघवर्ष याला बरेचसे मांडलिक जाऊन मिळाले. वद्दिगापेक्षा त्याचा पुत्र तिसरा कृष्ण हा अधिक महत्वाकांक्षी, मुत्सद्दी आणि आक्रमक वृत्तीचा होता. त्याने गोविंदाच्या बहुतेक सामंतांना आपल्या वडिलांशी अनुकूल करवून घेतले. इ.स. ९३७ मध्ये चौथ्या गोविंदास पदच्यूत करून वद्दिग तिसरा हा अमोघवर्ष हे बिरुद धारण करून राज्यावर बसला.
वद्दिग राजा झाला तरी प्रशासनावर आणि राजकीय धोरणावर त्याचा मुलगा तिसरा कृष्ण याचेन वर्चस्व होते. त्यामुळे तिसरा अमोघवर्ष हा केवळ नामधारी राजा होता. तो धार्मिक वृत्तीचा असून शिवोपासक होता. त्याचा बहुतेक वेळ धार्मिक कार्यात जात असे. त्यामुळे सैनिकी कारवाईचे नेतृत्व देखील त्याचा मुलगा कृष्ण हाच करीत असे. अमोघवर्षाच्या कारकिर्दीतील राष्ट्रकुटांची प्रमुख मोहीम गंगांच्या विरुद्ध होती. रायमल्ल हा गंग यावेळी सिंहासनावर होता. त्याने बहुधा राष्ट्रकुटांच्या गृहयुद्धात चौथ्या गोविंदाचा पक्ष घेतला असावा. गंग वंशातील राजपुत्र पेरमाडी दुसरा बुदुम हा आमोघवर्षाची कन्या रेवक निम्मडी हिचा पती होता. कृष्णाने रायमल्लास देशोधडीस लावून आपल्या महुण्यास गंगवाडीचे राज्य मिळवून दिले. दुसरी मोहीम उत्तर भारतातील होती. तिसया इंद्राच्या काळात चंदेलांनी कनोजच्या राजास आश्रय दिला होता. त्याचा बदला म्हणून कृष्णाने चंदेलांचे चित्रकूट व कलंजर किल्ले जिंकून घेतले. उत्तरेकडील या मोहिमेत राष्ट्रकुटांना चेदी सैन्याशीही लढावे लागले. वास्तविक तिसरा अमोघवर्ष हा चेदी राजाचा जावई होता. तरीही कृष्णाने आपल्या मातुलाशी युद्ध कसे केले हे एक गुढच आहे. बहुधा कलंजर आणि चित्रकूट किल्ल्यावर वेर्दीनी हक्क सांगितला असावा किंवा त्यांनी चंदेलांना राष्ट्रकुटाविरुद्ध मदत केली असावी. अमोघवर्षाच्या काळातील या दोन्ही मोहिमांचे नेतृत्व युवराज कृष्णाने केले होते. इ.स. ९४० च्या सुरुवातीस वद्दिग अमोघवर्षाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिसया कृष्णाचा राज्याभिषेक झाला.
तिसरा कृष्ण:
आपल्या पित्याच्या हयातीतच कृष्णाने एक कुशल प्रशासक आणि धडाडीचा सेनानी म्हणूनख्याती प्राप्त केलेली असल्यामुळे पित्याच्या मृत्यूनंतर गादीवरील त्याच्या अधिकारास कुणी आव्हान देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे इ.स. ९३९-९४० च्या सुरुवातीस त्याचे निर्विघ्नपणे राज्यारोहण झाले. राज्यावर आल्यानंतरची पहिली तीन वर्षे कृष्णाने प्रशासनावरील आपली पकड घट्ट करण्याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे या काळात मोहिमा हाती घेतल्या नाहीत.
इ.स. ९४२-४३ मध्ये तिसया कृष्णाने दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली. कृष्णाचा समकालीन असलेला चोल राजा परांतक हा त्याच्याप्रमाणेच महत्त्वकांक्षी होता. त्याने शेजारच्या गंग आणि बाण राजांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात्केली. गंग व बाण हे कृष्णाचे नातेवाईक असल्यामुळे कृष्णाला चोल राजाच्या हस्तक्षपाचा समाचार घेणे भाग पडले. त्यामुळे त्याने चोलाविरु द्ध मोहीम हाती घेतली. त्याने कांची आणि तंजावरपर्यंत धडक मारून ही दोन्ही नगरे आणि आसपासचा प्रदेश जिंकला. चोलांच्या कोरीव लेस्वात देस्वील कृष्णाने हा प्रदेश जिंकल्याची नोंद आढळते. चोल परांतकाने आपला प्रदेश परत मिळविण्याची पराकाष्ठा केली. त्यामुळे कृष्णाची ही दक्षिण मोहीम प्रदीर्घ काळ चालली.
या मोहिमेतील सर्वात घनघोर मानली जाणारी टक्कोलम येथील लढाई इ.स. ९४९ मध्ये लढली गेली. या लढाईत चोल सैन्याचे नेतृत्व युवराज राजादित्याकडे होते. तर राष्ट्रकूट सैन्याचा सेनापती गंग राजा दुसरा बुदुम हा होता. लढाईच्या सुरुवातीस राजादित्याची सरशी झाली तरी शेवटी राष्ट्रकुटांवा विजय होऊन चोल युवराज राजादित्य धारातीर्थी पडला. कृष्णाने या विजयापाठोपाठ दक्षिणेतील रामेश्वरापर्यंतचा मुलूख पादाक्रांत केला. त्याने पांड्य आणि चेर राजांचा पराभव करुन लंकेच्या राजालाही स्वंडणी देण्यास भाग पाडले. चोलांने संपूर्ण राज्य खालसा करून तेथील प्रशासनासाठी त्याने आपले अधिकारी प्रशासक म्हणून नेमले. त्याचा मेहुणा गंग बुदुग याचा या दिग्विजयात महत्त्वाचा वाटा होता. त्याचा मोबदला म्हणून कृष्णाने बुदुगास गंगवाडीशिवाय बनवासी बेलव्होल, पुरिठोरे, किसुकाड आणि बागेनाड हे प्रदेश बहाल केले.
दक्षिणेत राष्ट्रकुटांचे सैन्य अडकल्याची संधी साधून इ.स. ९७३ मध्ये उत्तरेत चंदेलांनी चित्रकूट आणि कलंजरवर परत आपला ताना प्रस्थापित केला. तसेच माळव्याच्या परमार सियकाने राष्ट्रकुटांच्या प्रदेशावर हल्ले सुरू केले. त्यामुळे यापुढील काळात कृष्णास पुन्हा आपले लक्ष उत्तरेकडे वळवावे लागले. त्याने माळव्यावर आपला मांडलिक मारसिंह याच्या नेतृत्जस्वाली आपले सैन्य पाठविले व सियकाचा पूर्ण पराभाव केला." ज्युरा येथील शिलालेखानुसार कृष्णाने स्वतः बुंदेलखंडावर चाल करून चित्रकूट आणि कलंजर परत जिंकून घेतले. त्यानंतर त्याने वैगीच्या चालुक्याविरुद्ध मोहीम हाती घेतली.
इ.स. ९६८ मध्ये कृष्णाचे निधन झाले. त्याच्या काळात उत्तरेकडील काही प्रदेश गमवावा लागला तरी दक्षिणेस रामेश्वरपर्यतचा प्रदेश राष्ट्रकुटांना मिळाला. दक्षिणेतील संपूर्ण द्वीपकल्प आपल्या प्रभावाखाली आणणारा तिसरा कृष्ण हा एकमेव राष्ट्रकूट राजा आहे. उत्तरेकडे मोहिमा हाती घेणाराही तो शेवटचा राष्ट्रकूट राजा होता. त्याच्यानंतर राष्ट्रकूट साम्राज्याचा हास सुरू झाला.
कर्नाटकातील मालवेड ही जरी राष्ट्रकूट राज्याची राजधानी असली तरी तिसया कृष्णाचे वास्तव्य बयाच वेळा मराठवाड्याच्या नांदेड जिल्हयातील कंधार येथे असे. कारण ही राष्ट्रकुटांची उत्तरेकडील उपराजधानी होती. कृष्णाच्या काळात कोरविला गेलेला एक शिलालेख कंधार येथे उपलब्ध झाला असून त्यात कंधार पुरातील उपनगरे, बाजारपेठ, मंदिरे, राजप्रासाद आणि जलाशयाचे सविस्तर वर्णन आले आहे. तत्कालीन नगर रचनेचा आदर्श वस्तुपाठच या लेखात नांदविला आहे." नगराचे एवढे सविस्तर वर्णन करणारा, किंबहुना नगर प्रशस्ती म्हणून कोरविला गेलेला हा शिलालेख अद्वितीय होय. विशेष म्हणजे प्रस्तुत शिलालेखात ज्या इमारतींचे वर्णन करण्यात आले आहे, त्यापैकी बहुतेकांचा शोध श्रीमती शोभना गोखले यांनी कंधार शहराच्या विविध भागात लावला आहे." पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्व विभागाने सन १९८४ मध्ये कंधार येथे उत्खनन केले. या उत्खननात २३ मीटर लांबीच्या क्षेत्रपाल मूर्तीचे आणि ती ज्या ओट्यावर निजलेल्या स्थितीत ठेवण्यात आली होती त्याचे अवशेष आढळले. हे अवशेष कंधार जवळील मानसपुरी या गावी सापडले."" मध्य आशियातील सर्वात मोठा मूर्तिशिल्पावशेष म्हणून याची नोंद करण्यात आली. याच काळात कृष्ण तिसरा याने आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेल्या जगतांग समुद्र या जलाशयाचा शोध घेऊन त्याची स्थलनिश्चिती अ.शं. पाठक यांनी केली आहे. वर उल्लेखिलेला कृष्णाचा शिलालेख कंधारच्या बहाद्दरपुरा या उपनगरात सापडला. यावरून कंधार शहराचा विस्तार राष्ट्रकुटांच्या काळात किती होता याची कल्पना येते. कंधार येथील बऱ्याचशा इमारती कृष्णाच्या काळात बांधण्यात आल्या. उत्तरेकडील मोहिमांच्या दृष्टीने सोयीचे म्हणून कृष्णाने या उपराजधानीत आपले वास्तव्य ठेवले असावे. कृष्ण आणि कंधारपुर यांच्यातील घनिष्ट संबंध सौदत्तीच्या रट्टांच्या कोरीव लेखातील कृष्णाला लावलेल्या ठकंधारपुरवराधीश्वरठ" या विरुदावरूनही सिद्ध होतात.
राष्ट्रकूट साम्राज्याचे पतन
तिसया कृष्णाला किमान एक तरी पुत्र होता. त्याचे नाव काय होते हे कळण्यास मार्ग नाही. परंतु कृष्णाचा नातू म्हणविणाऱ्या इंद्र नामक प्रमुखाचा उल्लेख उत्तरकालीन शिलालेखात आलेला आहे. यावरून कृष्णाचा हा पुत्र त्याच्या हयातीतच मृत्यू पावला असावा व नातू चौथा इंद्र अल्पवयीन असल्यामुळे कृष्णाच्या अनेक भावांपैकी एक स्वोट्टिग हा चौथा अमोघवर्ष हे बिरुद धारण करून कृष्णाचा उत्तराधिकारी बनला असावा असे इतिहासकार मानतात. तो इ.स. ९६८ च्या सुमारास राज्यावर आला.
स्वोट्टिमाच्या कारकिर्दीपासून राष्ट्रकूट साम्राज्याचा हास सुरू झाला. राष्ट्रकुटांच्या वैभवावर जबरदस्त आधात करणारी घटना स्वोट्टिगाच्या राज्यारोहणानंतर अवघ्या तीन वर्षात घडली. ज्या मान्यखेट नगरीत उत्तरेस गंगा-यमुना दुआबापर्यंत व दक्षिणेस कन्याकुमारी-रामेश्वरापर्यतचे मुलूख पादाक्रांत करण्याच्या मोहिमा आखल्या गेल्या ती ही राष्ट्रकुटांची राजधानी लुटण्यापर्यंत शत्रूची मजल गेली. माळव्याचा परमार राजा सियक उर्फ श्रीहर्ष याने स्वोट्टिमाच्या राज्यावर आक्रमण करून त्याचा पूर्ण पराभव तर केलाच, पण तेवढ्यावर न थांबता त्याने मालस्वेड लुटून नेले. समकालीन कोरीव लेस्वात तसेच वाङ्मयीन साधनातही या घटनेचा उल्लेख आलेला आहे. राष्ट्रकुटांच्या आलेखागारातील ताम्रशासनेही परमारांनी लुटून नेली व त्यातील कोया फ्यांवर आपले शासनादेश कोरविले. आवरून या लुटीचे स्वरूप किती भयंकर होते हे स्पष्ट होते. परमारांच्या या हल्ल्याच्या वेळी बहुधा स्वोट्टिग मारला गेला असावा.
स्वोट्टिग बहुधा निपुत्रिक असल्यामुळे त्याचा व तिसऱ्या कृष्णाना भाऊ बसलेल्या निरुपमाचा मुलगा दुसरा कर्क हा या ढासळत्या साम्राज्याचा वारस बनला. स्वर्डा ताम्रपटानुसार या कर्काने पांड्य, गुर्जर, चोल आणि हुण इत्यादी शत्रूवर मात केल्याचे वर्णन आहे." ते अतिशयोक्त मानण्याचे कारण नाही. तिसऱ्या कृष्णाच्या कारकिर्दीतील ते कर्काने प्राप्त केलेले विजय असू शकतात. परंतु कर्काच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट साम्राज्याचा मनोरा ढासळू लागला होता हे मात्र निश्चित. याला कारणेही अनेक होती. पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे सियक परमाराने केलेले राष्ट्रकुल राज्यावरील आक्रमण आणि राजधानी मालखेडची लुटालूट. या लुटालुटीत राष्ट्रकुटांची आर्थिक हानी किती झाली याची माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांचा जो राजकीय दबदबा तिसया कृष्णाच्या काळापर्यंत होता तो नष्ट झाला. यामुळे त्यांच्या बाहुच शत्रूनी तर डोके वर काढलेच. शिवाय मांडलिकांची निष्ठाही डळमळीत झाली.
दुसरे कारण म्हणजे कृष्णाचा नातू चौथा गोविंद हा वयात आला असतानाही त्याला सिंहासनावर न बसवता कर्क हा कृष्णाना पुतण्या राजा झाला होता. चौथ्या गोविंदाची आई गंग राजवंशातील होती. त्यामुळे गंगांनी कर्काने राज्यारोहण मान्य केले नाही व त्याच्याविरु द्ध कारवाया चालू ठेवल्या. त्रिपुरीच्या कलचुरींचे आणि राष्ट्रकुटांचे आप्त संबंध असूनही कलंजर प्रश्नावरून या दोन राजघराण्यात कृष्णाच्या काळापासूनच वितुष्ट आले होते. त्यामुळे संकटकाळी त्यांची मदत मिळणे तर दूरच, उलट त्यांचे शत्रूत्व मात्र राष्ट्रकुटांनी पत्करले होते.
कृष्णाच्या उत्तरेडील मोहिमांचा ताण राष्ट्रकूट साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडला होता आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रकूट सत्तेची धुरा कर्कासारख्या दुर्बल शासकाकडे होती. यामुळे मांडलिकांनी ककांविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. या बंडस्वोर मांडलिकांचा अग्रणी होता चालुक्य तैलप. हा वातापीच्या चालुक्यांचा वंशज व राष्ट्रकूट प्रशासनात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याच्या बागेबाडी क्षेत्राचा शासकही होता. परमारांच्या हल्ल्याच्या वेळची राष्ट्रकूटांची गलितगात्र अवस्था हेरून त्याने चालुक्य सत्तेच्या पुनर्स्थापनेचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने यादव भिल्लम याची आणि कलचुरींची मदत मिळविली. तैलपाची आई राष्ट्रकूट वंशातील होती. या आधारावर त्याने राज्यावर हक्क प्राप्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. इ.स. ९७३ मध्ये तैलपाने कर्काचा पराभव करून मान्यस्वेट जिंकले व आपल्या चालुक्य वंशाच्या सार्वभौम राज्याची स्थापना केली.
इ. स. ६४७ ला प्राचीन भारतातील केंद्रीय सत्तेचा अस्त झाला. हर्षाच्या मृत्यूने केंद्रीय साम्राज्य नष्ट झाले. प्रांतीय सत्तांचा उदय झाला. इ. स. च्या ७ व्या शतकात वर्धन सत्तेच्या हासानंतर प्रांतीय सत्तांचा उदय झाला. प्रांतीय सत्तांत केंद्रीय सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष झाला. तीन सत्ता ह्या संषर्घात प्रमुख होत्या. उत्तर भारतात प्रतिहार, दक्षिण भारतात राष्ट्रकूट तर पूर्व भारतात पाल ह्या तीन सत्तांत केंद्रीय सत्तासाठी त्रिपक्षीय संघर्ष झाला. दक्षिण भारतात प्रबळ सत्ताधिश राष्ट्रकूट होते. राष्ट्रकूटांची राजधानी मान्यखेट होती. म्हणून मान्यखेटचे राष्ट्रकूट असा उल्लेख राष्ट्रकूटाचा येतो. राष्ट्रकूटांनी एकूण २२५ वर्षे राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्याच्या जागी राष्ट्रकूटांच्या सत्तेचा उदय झाला. प्रशासन आणि धार्मिक श्रेष्ठत्वाप्रमाणेच राष्ट्रकूटांच्या काळात अजरामर कलाकृती निर्माण झाल्या. अजिंठा आणि वेरुळची निर्मिती राष्ट्रकूटांच्याच काळात झाली.
1. राष्ट्रकूटांच्या अभ्यासांची साधने :
राष्ट्रकूटाच्या वंशात एकूण १३ राजे झाले. १३ राजांची वंशावळ व नावे वेरुळच्या दशावतार लेण्यातील शिलालेखातून मिळतात. राष्ट्रकूटांच्या अभ्यासाचे मुख्य साधन-ताम्रपट आणि शिलालेख हेच आहेत. राष्ट्रकूटांच्या साम्राज्यात तेलगू-कन्नड मराठी भाषीक प्रदेश होता. त्यामुळे त्यांचे शिलालेख बहुतांश कन्नड भाषेतच आहेत. राष्ट्रकूटांच्याच काळात वेरुळचे शिल्प साकारले. वेरुळचे शिल्प आणि अभिलेख राष्ट्रकूटांबद्दल माहिती देणारे समकालीन साधन होय. करहर, देवली, तिवरखेट इ. चे ताम्रपट, समनगढचा ताम्रपट, दशावतार मंदिरातील शिलालेख, दौलताबादचा शिलालेख, ताम्रपट आणि शिलालेखातून राष्ट्रकूटाबद्दलची माहिती मिळते. वेरुळ, वर्धा, दिंडोरी, सांगली, मयुरखंडी, तळेगाव, संजाना, ढमढेरे, भादक, पिंपरी, खानदेश, कुरुरवाड, खारेपाटण, सामनगढ, कंधार, लातूर येथील अनेक शिलालेख राष्ट्रकूटांबद्दल माहिती देतात. पुराभिलेखीय साधनात शाक्टायन द्वारा लिखीत 'अमोघवृत्ती', हलायुध निर्मित 'कवि-रहस्य', पम्प द्वारानिर्मित 'विक्रमार्जुनविजय' इ. साधनांतून राष्ट्रकूटांबद्दल माहिती मिळते.
II. राष्ट्रकूट कोण ?
प्रस्तावना : राष्ट्रकूटांच्या उत्पत्तीबद्दल आणि त्यांच्या मूळ निवासस्थानाबद्दल
इतिहासकारांत मतभेद आहेत. राष्ट्रकूटांच्या सोलापूर, अचलपूर, मान्यखेट, कंधार, वेरुळ या शाखा होत्या. राष्ट्रकूटांचा वंश कोणता ? ह्याबाबत मतभेद आहेत. राष्ट्रकूट हे तेलगूवासी होते. आंध्रप्रदेशातील रेड्डी जातीचे राष्ट्रकूट होते असे मत इतिहासकार बरनेलने मांडले. डॉ. ए. एस. अल्तेकरांनी 'राष्ट्रकूट नृपती आणि त्यांचा काळ' ह्या ग्रंथात बरनेलच्या मताचे खंडन केले आहे. डॉ. अल्तेकरांच्या मते राष्ट्रकूट हे रेड्डी, त्यांची भाषा तेलगू असती तर त्यांचे निवासस्थान आंध्रप्रदेशात असले असते. राष्ट्रकूटांचे साम्राज्य आंध्रप्रदेशात नव्हते. एवढेच नाही तर राष्ट्रकूट क्षात्रवृत्तीचे होते. रेड्डी लोक हे कधी ही क्षात्रवृत्तीचे नाहीत. रेड्डी लोकांची वैश्यवृत्ती आहे. राष्ट्रकूटांची भाषा ही कन्नड होती, तेलगू नाही. म्हणून राष्ट्रकूट हे रेड्डी नाहीत असे मत अल्तेकरांनी मांडले. त्याचप्रमाणे राष्ट्रकूट हे यदुवंशी होते असे एकमत आहे. राष्ट्रकूट राजा गोविंद तृ. (इ.स. ७९३-८१४) नंतरच्या काळातील राष्ट्रकूटांच्या शिलालेखात राष्ट्रकूटांचा उल्लेख यदुवंशीय असा येतो. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर यदुवंशीयांचा उध्दार झाला त्याप्रमाणे गोविंद तृ. च्या नंतर राष्ट्रकूटांच्या साम्राज्याचा विकास झाला.
रा. गो. भांडारकरांनी राष्ट्रकूटांना तुंगनामक राजाचे वारस मानले आहे. तुंग राजाचा पुत्र रट्टवरुन राष्ट्रकूट हे नांव पडले. राष्ट्रकूट राजागोविंद तृ. ला रट्ट राजाचा वारसदार असे देवली ताम्रपटात मानले आहे. भांडारकराप्रमाणे डॉ. प्लीट यांनी ही राठौडपासून राष्ट्रकूट हा शब्द तयार झाला असे मानतात. राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात स्वाऱ्या केल्या. राष्ट्रकूटांच्या पराक्रमामुळे त्यांचा उल्लेख डॉ. प्लीट राठौड असा करतात. सी. वी. वैद्य यांनी राष्ट्रकूटांना मराठ्यांचे पूर्वज मानले आहे. तर डॉ. ए. एस. अल्तेकर यांच्यामते राष्ट्रकूट हे रठिंकांची अथवा राष्ट्रिकांचे वारसदार असावेत. अशोकाच्या शिलालेखात महारठी, नानाघाट शिलालेखात व खारवेलच्या खण्डगिरी शिलालेखात रठिक जातिचा उल्लेख येतो.
III. राष्ट्रकूटांचे निवासस्थान :
राष्ट्रकूटांच्या उत्पत्तीबद्दल मतभेद आहेत. त्याप्रमाणेच राष्ट्रकूटांच्या मूळ निवासस्थानाबद्दलही मतभेद आहेत. राष्ट्रकूटांचा मूळ प्रदेश कोणता ? ह्याबाबत अनेक विचार प्रवाह आहेत. वेरुळ-सोलापूर-कंधार आचलपूर-मान्यखेट येथे राष्ट्रकूटांच्या शाखा होत्या. रा. गो. भांडारकर, सी. वी. वैद्य यांच्या मते राष्ट्रकूट हे महाराष्ट्रीयन होत तर डॉ. तअल्तेकरांच्या मते राष्ट्रकूट हे कन्नडभाषीक असल्याने त्यांचे निवासस्थान कर्नाटकात असावे. डॉ. फ्लीट राष्ट्रकूट हे छत्तीसगडमधील रतनपूर जिल्ह्यातील लट्टल येथील मानतात. रट्टनुरु, रट्टरुरु, लत्तलूर, असा अपभ्रंश होवून लत्तनुर, लत्तलूर-लातूर असे नांमाभिकरण झाले. राष्ट्रकूट हे लातूरचे होते. हा प्रदेश पूर्वी बिदर जिल्ह्यात होता. कन्नड भाषा ह्या प्रदेशात त आजही बोलली जाते. चालुक्यांच्या काळात राष्ट्रकूट हे प्रांताधिकारी होते. रट्टलोकांच्या गटापासून म्हणजेच कूटचा मिळून राष्ट्रकूट हा शब्द तयार झाला. राष्ट्रकूटांच्या प्रदेशात रट्टवाडीचा समावेश होता. रट्टवाडीची राजधानी मयूरखंडी जि. नाशिक होती. रट्टलोकांच्या - संख्येवरुन रट्टवाडी हे नाव पडले व त्यांचा समुह राष्ट्रकूट नावाने ओळखला गेला. अनंत सदाशिव अल्तेकरांनी राष्ट्रकूट हे कर्नाटकीय होते असे मत मांडले. राष्ट्रकूटांची राजधानी तागुलबर्याजवळ कोयना-वैण्णीतोरा नद्यांच्या संगमावरील मान्यखेट होती. हा कन्नडभाषीक प्रदेश आहे. राष्ट्रकूटांनी साम्राज्य विस्तार केला पण ते आपल्या मूलस्थानाला विसरले नाहीत. राष्ट्रकूट राजांनी आपल्या शिलालेखात प्रारंभी 'लत्तलूरपुश्वराधिश्वर', 'लत्तलूरपूरवेश्वर', 'लत्तलूरपरमेश्वर' अशी बिरुदे धारण केली आहेत. कोल्हापूर व कोकणातील शिलाहारांनी आपल्या मूळ निवासस्थानावरुन 'तगरपूराधिश्वर', गोव्याच्या कदंबांनी 'वनवासापूरव चतराधिश्वर', कल्याणीच्या कलचूरींनी 'कालजपुराधीश्वर' अशा उपाध्या धारण करुन मूळ च्या निवासस्थानाबद्दल अभिमान बाळगला. त्याचप्रमाणे लातूर ह्या आपल्या मूळ नावांची बिरुदे चा राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष, राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा कर्क-II च्या शिलालेखात लातूरचा उल्लेख येतो. सिताबर्डीच्या शिलालेखात राष्ट्रकूट राजा अडिभडंग याने 'लत्तलौरविनिर्गत' वा असे स्वतःला विशेषण लावले आहे. 'लत्तलौरविनिर्गत' याचा अर्थ लातूरहून स्थलांतरीत असे झालेले असा आहे. राष्ट्रकूटांनी लातूर हे आपले कन्नडभाषीक स्थान सोडले व ते अन्यत्र हा स्थलांतरीत झाले. आपल्या मूळ निवासस्थानाला राष्ट्रकूट विसरले नाहीत.
IV. राष्ट्रकूटांची मान्यखेट शाखा :
◇ इंद्र-1 : मान्यखेट शाखेतील पहिला राजा इंद्र-1 होय. ध्रुव, कृष्ण, नन्नराज, इंद्र -1 ह्या चार भावांमध्ये इंद्र-1 हा महत्वाकांक्षी होता. गुर्जर चालुक्यांच्या अधिन राहून ट राज्यकारभार इंद्र- I ने केला. गुर्जर चालुक्यांची मुलगी भवनागाशी राक्षसविवाह इंद्र-1 ने केला. इंद्र-1 चा मुलगा दंतीदुर्ग हा इ. स. ७३५ ला सत्तेवर आला.
◇ दंतीदुर्ग- इ.स. ७३५-५८ : इ. स. च्या ८ व्या शतकात चालुक्य आणि पल्लव यांच्यात संघर्ष चालू होता. चालुक्यांच्या अधिन मांडलिक म्हणून राष्ट्रकूट राजे वराज्य करत होते. दंतीदुर्गने वडिलांचे भाऊ ध्रुव आणि कृष्ण यांना प्रांताधिकारी म्हणून नियुक्त केले. दंतीदुर्गचा चुलतभाऊ कर्क-II ह्यासही प्रांताधिकारी म्हणून नियुक्त केले. इ.स. ७३५-४५ काळात दंतिदुर्गने चालुक्यांचे मांडलिक म्हणून राज्य केले. इ. स. ७४५ ला चालुक्य राजा विक्रमादित्य-II चा मृत्यू झाला. दंतीदुर्गने राष्ट्रकूट सत्ता स्वतंत्र म्हणून घोषीत केली. म्हणून राष्ट्रकूट सत्तेचा संस्थापक दंतीदुर्ग होय.
सिंध प्रांतातील अरबांनी गुजरातवर आक्रमण केले. आक्रमकांच्या विरोधात दंतीदुर्गने चालुक्य राजा पुलकेशीला मदत केली. अरबांचा पराभव केला म्हणून चालुक्य राजा पुलकेशीने दंतीदुर्गला 'पृथ्वीवल्लभ' ही उपाधी दिली. कोशल राजाचा पराभव दंतीदुर्गने पल्लव राजांच्या सेनेच्या मदतीने केला. पल्लव राजा नंदिवर्मा आणि दंतीदुर्ग यांच्या संयुक्त फौजेने दुसरा विजय बालाघाट प्रदेशातील शैलवंशावर मिळविला. कांचीचे पल्लव राजाविरूध्द दंतीदुर्गने मोहीम काढली आणि पल्लव राजा परमेश्वर वर्माचा पराभव केला व पल्लव राजा नंदिवर्माला साह्यता दिली.
दंतीदुर्गने उत्तरभारतात चालुक्यांची सत्ता अरबांच्या आक्रमणामुळे दुबळी होताच चालुक्यांच्या साम्राज्यावर आक्रमण केले. प्रदेश जिंकला. अरबांच्या आक्रमणाला चालुक्य साम्राज्य बळी पडले. अगोदरच दंतीदुर्गने साम्राज्य जिंकले. महाराष्ट्राचा भाग दंतीदुर्गने त्यानंतर जिंकला. गुर्जर प्रतिहारांचे उज्जैन दंतिदुर्गने जिंकून घेतले.
राष्ट्रकूट राजे
इंद्र-1
दंतीदुर्ग
: इ. स. ७३५-५८
कृष्ण - I : इ. स. ७५८-७३
: इ. स. ७७३-८० गोविंद-II
ध्रुव : इ. स. ७८०-९३
गोविंद तृ. : इ. स. ७९३-८१४
अमोघवर्ष-Ⅰ: इ. स. ८१४-७८
कृष्ण-II: इ. स. ८७८-९१४
इंद्र तृ.
: इ. स. ९१४-९२२
अमोषवर्ष-II
कृष्ण तृ.
इ. स. ९३९-६८
खोट्टींग
: इ. स. ९६८-७२
कर्क-II
: इ. स. ९७२-७३
दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट सत्तेचा संस्थापक होता. दंतीदुर्ग हा ब्राह्मणधर्मावलंबी होता. राष्ट्रकूटांच्या सत्तेची स्थापना व चालुक्य, गुर्जर, पल्लव शैल यांचा पराभव दंतीदुर्गने केला. महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक ह्या उपाध्या दंतीदुर्गने धारण केल्या. इ. स. ७५८ ला दंतीदुर्गचा मृत्यू झाला.
◇ कृष्ण-I: इ.स. ७५८-७३ : दंतीदुर्गचा मृत्यु इ.स. ७५८ ला झाला. दंतीदुर्गला वारसदार नव्हता. त्यामुळे दंतीदुर्गच्या वडिलांचा भाऊ कृष्ण-1 (दंतीदुर्ग काका) सत्तेवर आला. कृष्ण-1 याने दंतीदुर्गच्या काळात प्रांताधिकारी म्हणून कार्य केले होते. दंतीदुर्गला वारसदार नसल्यामुळे कृष्ण-1 ला सत्ता हस्तगत करतांना संघर्ष करावा लागला. चालुक्य राजा किर्तीवर्माच्या साम्राज्याचा भाग दंतीदुर्गने जिंकला होता. दंतीदुर्गचा मृत्यू होताच किर्तीवर्माने राष्ट्रकूटांच्या प्रदेशावर आक्रमण केले. कृष्ण-1 ने किर्तीवर्माचा पराभव केला.
चालुक्यांचा पराभव केल्यानंतर कृष्णने गंगराजाचा पराभव केला. गंगराजाची राजधानी मण्णे जिंकली. कृष्णचा मुलगा गोविंदने वेंगीच्या चालुक्याचा पराभव केला. द. कोकणचा अधिकारी सणफुल्लचा पराभव कृष्णने करुन कोकण विजय मिळविला. कृष्ण-। ने राष्ट्रकूटांचे साम्राज्य वाढवले. साम्राज्याचा विस्तार केल्यामुळे राजधानी विदर्भात अचलपूर येथे स्थापन केली. दंतीदुर्गच्या काळातील साम्राज्यापेक्षा तीनपट साम्राज्य कृष्ण - I ने निर्माण केले. साम्राज्याचा केवळ विस्तार नाही तर कृष्ण-1 ने वेरुळचे कैलास मंदिराची निर्मिती केली. जगातील श्रेष्ठ स्थापत्यापैकी एक स्थापत्य म्हणून कैलास मंदिराचा उल्लेख केल जातो. इ. स. ७७३ ला कृष्ण-1 चा मृत्यू झाला.
◇ गोविंद-II इ.स. ७७३-८०: कृष्ण-1 च्या मृत्यूनंतर जेष्ठपुत्र गोविंद-II सत्तेवि आला. कृष्ण-I च्याच काळात गोविंद-II ने वेंगीच्या चालुक्याचा पराभव केला होता गोविंद-II ने सत्ता स्वीकारल्यानंतर खानदेश-नाशिकचा अधिकारी म्हणून लहान बंधू ध्रुवल नियुक्त केले. ध्रुव हा पराक्रमी, महात्वाकांक्षी असल्यामुळे सर्व सत्ता ध्रुवाच्या हातात केंद्रीय झाली. ध्रुवने उत्तम प्रशासन केले. परिणाम गोविंद हा आळशी व विलासी बनला. सर सत्ताधिशांनी गोविंदच्या विरोधात विद्रोह करताच ध्रुवने विद्रोही शासकांच्या मदतीने सत्तद्विप हस्तगत केली. इ.स. ७८० ला ध्रुव राजा बनला.
◇ ध्रुव-इ.स.७८०-९३: कृष्ण-I चा लहान पुत्र ध्रुव इ. स. ७८० ला भाऊ गोविंद-II चा पराभव करुन राजा बनला. गोविंद-II च्या विश्वासकांनी ध्रुव विरूध्द युध्द घोषीत केले. गंगवाडीच्या राजाचा सर्वप्रथम पराभव ध्रुवने केला.
ध्रुव राजाचे समकालीन शासक पाल राजा धर्मपाल आणि प्रतिहार राजा वत्सराज है होते. पाल आणि प्रतिहार राजात उत्तर भारतातील वर्चस्वासाठी संघर्ष होता. दक्षिण भारतात यावेळी राष्ट्रकूटांची सत्ता प्रबळ होती. राष्ट्रकूट राजा ध्रुवने उत्तर भारतात वर्चस्व प्राप्तीसाठी आक्रमणे केली. प्रतिहार-पालांशी राष्ट्रकूटांशी संघर्ष दिला त्यामुळे संघर्ष त्रिपक्षीय बनला
पाल आणि प्रतिहार यांच्यातील युध्दात राष्ट्रकूट ध्रुवने सहभाग घेतला. प्रतिहारमा राजा वत्सराजने ध्रुवच्या विरोधात गोविंदला सहकार्य दिले होते. ह्या कारणाने ध्रुवने वत्सराजका स्वारी केली व विजय मिळवला. प्रतिहारांचा पराभव केल्याने उत्तर भारतात वर्चस्वासाठी ध्रुवचा प्रतिस्पर्धक केवळ धर्मपाल होता. गंगा-यमुना नदीच्या दुआब प्रदेशात ध्रुवने धर्मपालाचा पराभव केला व उत्तर भारतात निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.
केवळ १० वर्षाच्या काळात गोविंदच्या काळातील अस्थिरता दूर करुन साम्राज्य स्थिर केले. प्रतिहार व पालांचा पराभव केला. ध्रुव ह्यास राष्ट्रकूटांच्या वंशातील श्रेष्ठ राजा मानतात. इ. स. ७९३ ला ध्रुवचा मृत्यू झाला.
◇ गोविंद तृ.-इ. स. ७९३-८१४ : ध्रुवचा मृत्यु होण्यापूर्वीच गोविंद तू. ला वारसदार नियुक्त केले. गोविंद त. हा ध्रुवचा कनिष्ठ पुत्र होता. जेष्ठ पुत्र स्तम्भ हा होता स्तम्भ हा गंगवाडीचा शासक होता. गोविंद तृ. ने सत्ता हातात घेतल्यानंतर काही काळाने ध्रुवचा मृत्यू झाला. ध्रुवच्या मृत्युनंतर गोविंद तु. च्या विरोधात १२ राजाचा संघ स्तम्भने बनवला व गोविंद त. वर आक्रमण केले गंगावाडीचा राजा शिवमारने स्तम्भला साह्यता दिली. ध्रुवने गंगवाडीच्या शिवमारचा पराभव केला होता. गंगवाडीचा अधिकारी स्तम्भ होता. कतृत्व आणि प्रशासनाचा अनुभव स्तम्भला असल्यामुळे गोविंद तृ. शी स्तम्भने युध्द केले तरी युध्दात गोविंद तृतीय विजयी झाला. कांचीच्या पल्लवाचा, वेंगीच्या चालुक्याचा गोविंद तृतीय ने पराभव केला. त्रिपक्षीय संघर्षात गोविंद तृतीयने वडिलांप्रमाणे भाग घेवून प्रतिहार आणि पाल राजाचा पराभव केला. उत्तर भारतात राष्ट्रकूटांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
उत्तर भारतात विजय अभियानात गोविंद तृ. असतांना दक्षिणी राजांनी गोविंद तृ. साविरोधात आक्रमण केले. गोविंद तृ. ने दक्षिणी राजांचा पराभव केला. उत्तर भारतातील नत्रिपक्षीय संघर्षात गोविंद तृ. ने विजय मिळवल्याने हिमालयापासून ते दक्षिण भारतात कन्याकुमारीपर्यंत विजय मिळविला. इ.स. ८१४ ला गोविंद तृ. चा मृत्यू झाला.
◇ अमोघवर्ष-इ.स. ८१४-७८: अमोघवर्ष हा गोविंद तृ. चा पुत्र होता.
अमोघवर्षाचा जन्म इ.स. ८०८ ला झाला, गोविंद तृ. ने अमोघवर्षाचे पालकत्व कर्ककडे दिले होते. अल्पवयस्क अमोघवर्ष राष्ट्रकूट राजा बनल्याने चालुक्य राजांनी आक्रमण केले. आक्रमणामुळे राष्ट्रकूटांच्या प्रदेशात चालुक्यांचे वर्चस्व निर्माण झाले. कर्कच्या कर्तृत्वामुळे चालुक्यांचा पराभव अमोघवर्षाला करता आला. चालुक्य राजा विजयादित्याच्या मृत्युमुळे अमोघवर्ष गमावलेला प्रदेश पुन्हा जिंकू शकला. गंगराजाने ही राष्ट्रकूटांच्या विरोधात बंड केले. गंगवाडी स्वतंत्र झाले. माळवा प्रतिहारांनी जिंकला. अमोघवर्षाच्या काळात राष्ट्रकूट साम्राज्य स्पर्धकांनी जिंकले.
ना न -
अमोघवर्षने कर्कच्या मदतीने राज्य केले. अमोघवर्ष हा पराक्रमी शासक नसला तरी विद्याविभूषीत आणि विद्वान होता. अमोघवर्षाने कन्नड भाषेत 'कविराज मार्ग' हा ग्रंथ लिहिला. अमोघवर्षाच्या दरबारात अनेक विद्वानांना आश्रय होता. महाविराचार्यांना अमोघ वर्षाच्या दरबारात आश्रय होता. महाविराचार्यांनी अमोघवर्षाच्या दरबारात 'गणित सार संग्रह' तर शंकटायनने 'अमोघवृत्ती'ची रचना केली. अमोघवर्ष हा धर्मसहिष्णू वृत्तीचा होता. जैन आणि ब्राह्मणधर्मावलंबी अमोघवर्षाने आपल्या हाताची करंगळी बळी दिली होती.
अमोघवर्षाने कोयना आणि वैण्णीतोरा नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी मान्यखेट ही राजधानी बनवली. मान्यखेट हे गुलबर्गापासून २२ मैल अंतरावर आहे. इ. स. ८७८ ला वयाच्या ५२ व्या वर्षी अमोघवर्षाचा मृत्यु झाला.
◇ कृष्ण- II-इ.स. ८७८-९१४ : अमोघवर्षाचा मुलगा कृष्ण-II होता. चेदी घराण्याच्या राजकुमारीशी कृष्ण-II ने विवाह केला होता. चालुक्य राजांशी झालेल्या युध्दात कृष्ण-II चा पराभव झाला. प्रतिहारांकडूनही पराभव झाला. कृष्ण-II च्या काळात
मान्यखेटच्या अधिन असणारी राष्ट्रकुटांची विदर्भातील शाखा स्वतंत्र बनली. उत्तर भारताती मोहिमेमध्ये मात्र कृष्ण-II ला विजय मिळाला. इ. स. ९१४ ला कृष्ण-II चा मृत्यू झाला
◇ इंद्र- III-इ.स. ९१४-२२ : कृष्ण-II चा नातू इ. स. ९१४ ला राजा बनला कृष्ण-III चा मुलगा जगतुंग हा कृष्ण-III च्याच काळात मृत्यू पावला होता. इंद्र-III राष्ट्रकूट राजांच्या अखेरीच्या काळातील प्रबळ शासकापैकी एक होता. आठ वर्षाच कार्यकाळात इंद्र-III ने परमार, कन्नौजवर विजय मिळवले. दक्षिण भारतात विजय मोही संपन्न केली. उत्तर भारतात राष्ट्रकूटांच्या गमवलेली प्रतिष्ठा इंद्र-III ने परत मिळवली.
◇ अमोघवर्ष - II आणि गोविंद IV : इंद्र-III च्या मृत्युनंतर जेष्ठ मुलग अमोघवर्ष-II व त्याच्यानंतर कनिष्ठ पुत्र गोविंद-IV सत्तेवर आले. प्रतिहार, कन्नौज आणि अरबांनी या काळात राष्ट्रकूटांच्या साम्राज्यावर स्वाऱ्या केल्या. जतिंगचा मुलगा अमोघवर्ष III ने गोविंद-IV चा पराभव करुन सत्ता प्राप्त केली. अमोघवर्ष-III हा गोविंदचा काक होता.
◇ अमोघवर्ष - III: अमोघवर्षाने गंगराजाशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करुन गंगवाडीवर ताबा निर्माण केला. उत्तर भारतात आक्रमण केले. प्रतिहारांवर अंकूश ठेवला प्रतिहार-पालांशी संघर्ष केला.
◇ कृष्ण- III - इ.स. ९३९-६८ : राष्ट्रकूट वंशातील शेवटचा पराक्रमी सम्राट
कृष्ण-III होय. अमोघवर्षाच्या कार्यकाळातच कृष्ण-III ने प्रांताधिकारी म्हणून कार्य केले होते. चोल सत्ता ही दक्षिण भारतात श्रेष्ठ सत्ता होती. चोल राजा परांतकशी कृष्ण-II चा संघर्ष होवून परांतककडून पराभव झाला. चोलांच्या दक्षिण भारतातील वर्चस्वाचे चिन्ह होते. कृष्ण-III ने चोलराजाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. चोलावरील विजयाच्या प्रीत्यर्थ 'वीरचोल' ही पदवी धारण कली. पांण्डय आणि श्रीलंकेच्या शासकावरही राष्ट्रकूट राजा कृष्ण-III ने विजय मिळविला.
कलचुरीचा पराभव कृष्णने केला. परमार आणि चालुक्यांचा पराभव केला. डॉ. अनंत सदाशिव अल्तेकरांच्या मते राष्ट्रकूट घराण्यातील शेवटचा पराक्रमी राजा कृष्ण-III होता.
◇ खोटिंग- इ.स. १६८-७२: राष्ट्रकूटांच्या घराण्यातील शेवटचा पराक्रमी राजा कृष्ण-III च्या मृत्यूनतर कृष्ण-III चा भाऊ खोडिंग सत्तेवर आला. अधिन शासक खोटिंगच्या काळात स्वतंत्र झाले. राजधानी मान्यखेट राष्ट्रकूटांच्या शत्रूनी लुटली.
◇ कर्क-II इ.स. ९७२-७३ : कृष्ण-III चा मुलगा इ. स. ९७२ ला सत्तेवर आला. पांण्डय, हुण, अरब, चोल, गुर्जर यांच्याशी कर्क-II ला युध्द करावी लागली. हे राष्ट्रकूटांच्या प्रांतातील अधिकारी स्वतंत्र झाले. राष्ट्रकूटांच्या साम्राज्यातील अधिकारी तैलप
II हा प्रबळ बनला. सैनिकी गुण आणि महत्वकांक्षी तैलप II ने इ. स. ९७३ ला कर्क-II चा पराभव केला. तैलप-II ने कल्याणीच्या परवर्ती चालुक्य वंशाची स्थापना केली. राष्ट्रकूट वंशाचा अस्त झाला.
दंतीदुर्गने स्थापन केलेले (इ. स. ७३५) राष्ट्रकूट साम्राज्य इ. स. ९७३ ला नष्ट झाले. राष्ट्रकूटांच्या मान्यखेट शाखेने एकूण २३८ वर्षे राज्य केले. राष्ट्रकूटांच्या शाखा महाराष्ट्र म आणि विदर्भाच्या परिसरात कार्यरत होत्या.
दक्षिण भारतात चोल हे प्रशासनासाठी प्रसिध्द होत. त्याचप्रमाणे राष्ट्रकूटांचे प्रशासन ही श्रेष्ठ होते. केंद्र ते प्रांत पातळीवर प्रशासक विभक्त होते. समाज संपन्न होता. आर्थिक दृष्टया समृध्दता होती. राष्ट्रकूटांच्याच काळात वेरुळ, एलिफंटा कलाकृती साकारल्या. अनेकांना अग्रहार राष्ट्रकूटांनी दिले. राष्ट्रकूट राजे आणि समाज धार्मिकदृष्टया सहिष्णू होता. - राष्ट्रकूट राजे ब्राह्मण-जैन धर्मावलंबी असले तरी त्यांनी बौध्द धर्म आणि विहारांना साह्यता केली. एक संपन्न राजवट म्हणून राष्ट्रकूट सत्तेचे वर्णन केले जाते.
दंतीदुर्ग राष्ट्रकूटांनी इ. स. ७३५ ला बदामीच्या पूर्वकालीन चालुक्यांचा पराभव 1. करुन सत्ता स्थापन केली होती तर चालुक्यांच्याच कल्याणी शाखेच्या शासकांनी राष्ट्रकूटांचा अस्त करुन चालुक्य सत्ता स्थापन केली.
सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०–७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे. ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत. विदर्भाचे वाकाटक आणि कुंतलचे राष्ट्रकूट यांची राज्ये एकमेकांना लागून असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार कटकटीचे प्रसंग उद्भवत. मानांकाने विदर्भाला त्रस्त केले होते, असे राष्ट्रकूटांच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात म्हटले आहे तर वत्सगुल्म (वाशीम) च्या विंध्यसेन वाकाटकाने कुंतलेशाचा पराजय केल्याचा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. मानांकाचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासाने कुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही पण त्यातील काही उतारे राजशेखर व भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत. मानपूर येथे हे घराणे बादामीच्या दुसऱ्या पुलकेशीच्या (कार. ६११-४२) काळापर्यंत टिकले. पुलकेशीने त्यांचा पराभव करून त्यांचा प्रदेश खालसा केला.
दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्याचे काही ताम्रपट रामटेकजवळ नंदिवर्धन, अकोला व मुलताई येथे सापडले आहेत. कलचुरींच्या उच्छेदानंतर त्यांनी बादामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले आणि पुढे ते राष्ट्रकूटांचे मांडलिक झाले. त्यांची राजधानी प्रथम नंदिवर्धन, नंतर भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर (पद्मनगर) आणि शेवटी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होती. हे घराणे दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले.
या दोन्हींपेक्षा अत्यंत कीर्तिमान असे तिसरे राष्ट्रकूट घराणे औरंगाबाद जिल्ह्यात उदयास आले. त्याची आरंभीची राजधानी अद्यापि अनिश्चित आहे. नंतर तिसऱ्या गोविंदाच्या काळात ती मयूरखंडी येथे होती पण तिचेही ठिकाण निश्चित नाही. ⇨पहिल्या अमोघवर्षा ने नवव्या शतकात ती मान्यखेट (मालखेड) येथे नेली. तेथे ही घराणे शेवटपर्यंत राज्य करीत होते.
या घराण्याचा पहिला विख्यात राजा दंतिदुर्ग (कार. ७१३– ५८) हा होय. हा प्रथम बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक होता पण पुढे त्याने त्यांचे जूं झुगारून दिले. याने सु. ४५ वर्षे राज्य केले. याने लाट (दक्षिण गुजरात), महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. नंतर त्याने मालव, कोसल (छत्तीसगड), कलिंग (ओरिसा), श्रीशैलम् वगैरे दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या पण त्यांपासून त्याच्या राज्याचा विस्तार झालेला दिसत नाही. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा ७५३ च्या सुमारास पराभव केला.
दंतिदुर्गानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण (सु. कार. ७५६–७३) याने चालुक्य सम्राट दुसरा कीर्तिवर्मा याचा पुन्हा पराभव करून चालुक्य राजवटीचा अंत केला. नंतर त्याने गंगवाडीच्या गंगांचा आणि वेंगीच्या पूर्वचालुक्यांचा पराभव केला. अशा रीतीने राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया घातला. त्याच्या काळी ⇨वेरूळ येथील कैलास लेणे खोदण्यात आले. कृष्ण सु. ७७३ मध्ये निधन पावला असावा.
कृष्णानंतर त्याचा मुलगा दुसरा गोविंद (कार. ७७३–८०) गादीवर आला. पण त्याच्या काळी सर्व सत्ता त्याचा धाकटा भाऊ ध्रुव याच्या हाती होती. शेवटी ध्रुवाने त्याला पदच्युत करून सु. ७८० मध्ये गादी बळकावली.
नंतर ध्रुवाने गोविंदाच्या पक्षाचे गंग आणि पल्लव राजे यांचा पराभव करून गंग राजपुत्र शिवमार याला बंदिवान केले आणि गंगवाडी खालसा केली. पुढे त्याने उत्तर भारतात स्वारी करून दोआबापर्यंत आक्रमण केले. गुर्जर प्रतीहार नृपती वत्सराज याला राजपुतान्यात पिटाळून लावले आणि बंगालच्या पालनृपती धर्मपाल याचा दोआबात पराभव केला. तेव्हापासून गंगा व यमुना नद्यांची चिन्हे राष्ट्रकुटांच्या ध्वजावर झळकू लागली.
ध्रुवानंतर ⇨तिसरा गोविंद (सु. कार. ७९३–८१४) हा गादीवर आला. हा आपल्या पित्यापेक्षा जास्त पराक्रमी निघाला. त्याने आपल्या स्तंभ नामक वडील भावाचा आणि त्याच्या पक्षाच्या व बंदीतून मुक्त झाल्यावर उलटलेल्या गंग राजाचा पराभव केला. गंगाला पुन्हा बंदीत टाकले, पण स्तंभाला पुन्हा गंगवाडीचा अधिपती नेमले. नंतर त्याने आपल्या पित्याप्रमाणे उत्तर भारतात स्वारी केली. तीत त्याने वत्सराजाचा पुत्र द्वितीय नागभट याचा पराजय केला. पालनृपती धर्मपाल आपला हस्तक कनौजचा अधिपती चक्रायुध याच्यासह त्याला शरण आला. नंतर गोविंदाने हिमालयापर्यंत स्वारी केली.
परत नर्मदातीरी आल्यावर त्याने तिच्या काठाने जाऊन मालक. डाहल (चेदि), ओड्रक (ओरिसा) इ. देश जिंकून पावसाळ्यात श्रीभवन (गुजरातेतील सारमोण) येथे मुक्काम केला. तेथे त्याचा मुलगा ⇨पहिला अमोघवर्ष इ.स. ७९९ मध्ये जन्मला. गोविंद नंतर मयूरखंडीला परत आला. तेथे काही काळ राहून त्याने दक्षिणच्या दिग्विजयाची तयारी केली आणि तुंगभद्रेच्या तीरी हेलापूर येथे तळ दिला. तेथून त्याने गंग, पल्लव, पांड्य आणि केरळ देशांवर स्वाऱ्या करून तेथील राजांचा पराभव केला. त्यांना आपले स्वामित्व स्वीकारावयास भाग पाडले. त्याने वेंगीचा पूर्वचालुक्य दुसरा विजयादित्य याचा पराभव करून त्याचा धाकटा भाऊ भीम याला गादीवर बसविले. अशा रीतीने हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आपले साम्राज्य विस्तारले.
तिसऱ्या गोविंदानंतर त्याचा पुत्र पहिला अमोघवर्ष (कार. ८१४–८०) गादीवर आला. त्यावेळी तो पंधरा-सोळा वर्षांचा होता. अमोघवर्षाच्या कारकीर्दीत अनेक बंडे झाली. पूर्वचालुक्य विजयादित्याने आपली गादी परत मिळविली. गंगांनी राष्ट्रकुटांना गंगवाडीतून हाकलून लावले. गुजरातेत तिसऱ्या गोविंदाने स्थापिलेल्या राष्ट्रकूट शाखेनेही स्वातंत्र्य पुकारले. अमोघवर्षाने शेवटी यांपैकी बहुतेकांना काबूत आणले पण या बंडाळ्यांमुळे त्याच्या राज्याला शांतता लाभू शकली नाही.
अमोघवर्षाच्या काळी विद्येला उत्तेजन मिळाले. त्याने स्वतः कविराजमार्ग नामक साहित्यशास्त्रीय ग्रंथ कन्नड भाषेत लिहिला. त्या भाषेतील आद्य ग्रंथांत त्याची गणना होते. त्याचा प्रश्नोत्तरमालिका नामक दुसऱ्या ग्रंथावरून तसेच कोरीव लेखांतील उल्लेखावरून तो मधून मधून आपल्या युवराजावर राज्यकारभार सोपवून धार्मिक चिंतनाकरिता मठात जाऊन राहत असे, असे दिसते. त्याने एकदा मोठ्या साथीच्या निवारणाकरिता आपल्या हाताचे बोट कापून ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीस अर्पण केल्याचा कोरीव लेखात उल्लेख आहे. तसेच त्याच्या दरबारी अनेक जैन कवींनी आपले ग्रंथ रचल्याचे उल्लेख आहेत. जिनसेनाचे आदिपुराण, महावीराचार्याचे गणित-सारसंग्रह वगैरे ग्रंथ त्याच्या कारकीर्दीत रचले होते.
पहिल्या अमोघवर्षानंतर त्याचा पुत्र दुसरा कृष्ण (सु. कार. ८८०—९१४) गादीवर आला. काहींच्या मते पहिला अमोघवर्ष इ. स. ८७८ मध्ये मरण पावला. त्रिपुरीचा कलचुरी नृपती पहिला कोकल्ल याने त्याला आपली मुलगी दिली होती. त्याच्या युद्धात साहाय्य करण्याकरिता त्याने आपला पुत्र शंकरगण यास पाठविले होते. या दोघांचे पूर्वचालुक्य नृपती तिसरा विजयादित्य याच्याशी दीर्घकाल युद्ध चालले. विजयादित्याने पश्चिमेस आक्रमण करून छत्तीसगढातील किरणपूर जाळले पण शेवटी कृष्णाने त्याच्या नंतरच्या भीम राजाचा पराभव करून त्याला बंदीवान केले. पुढे त्याने राष्ट्रकुटांचे स्वामित्व स्वीकारल्यावर त्याला वेंगीचे राज्य परत देण्यात आले. कृष्णाने आपल्या कारकीर्दीच्या शेवटी उत्तर अर्काट जिल्ह्यातील बाण नृपती दुसरा विजयादित्य प्रभुमेरू याचा पराभव केला, या स्वारीत त्याचा नातू तिसरा इंद्र याने पराक्रम गाजविला होता. कृष्णाला उत्तर भारतातील माळवा व काठेवाड हे प्रांत गुर्जर प्रतीहार पहिला भोज याला द्यावे लागले. त्याच्या कारकीर्दीत गुजरातेतील राष्ट्रकूट शाखेचा अस्त झाला.
कृष्णाचा पुत्र जगतुंग हा त्याच्या हयातीत निधन पावल्यामुळे त्याच्या नंतर त्याचा पौत्र ⇨तिसरा इंद्र (कार. सु. ९१४–२७) हा गादीवर आला. त्याने आपल्या प्रतापी पूर्वजांचे अनुकरण करून उत्तरेत गुर्जर प्रतीहारांच्या कान्यकुब्ज राजधानीवर स्वारी करून ते नगर उद्ध्वस्त केले. प्रतीहार नृपती महीपाल याला राजधानी सोडून चंदेल्लांच्या आश्रयास जावे लागले. या स्वारीत त्रिपुरीच्या कलचुरींचे इंद्राला साहाय्य झाले. त्यानंतर कनौज दरबारी असलेला राजशेखर कवी कलचुरिनृपती पहिला युवराजदेव याच्या आश्रयाकरिता त्रिपुरीस आला.
इंद्र सु. इ. स. ९२७ मध्ये निधन पावला. त्यानंतर त्याचा पुत्र दुसरा अमोघवर्ष हा गादीवर आला पण तो एक वर्षातच निधन पावल्यावर त्याचा भाऊ चौथा गोविंद (सु. कार. ९२८–३६) याला गादी मिळाली. याच्या काळी अनेक सामंतांनी बंड करून मान्यखेटवर चाल केली. कलचुरी युवराजदेवाने आपला जामात तिसरा अमोघवर्ष याचा पक्ष घेऊन उत्तरेकडून राष्ट्रकूट प्रदेशावर सैन्य पाठवले. त्या सैन्याचे राष्ट्रकूटांच्या अचलपूर येथील सामंताच्या सैन्याशी पयोष्णीच्या (पूर्णेच्या) काठी घनघोर युद्ध झाले. त्यात कलचुरी सैन्याला विजय मिळून त्याने अमोघवर्षाला पुढे घालून मान्यखेटवर चाल केली. दक्षिणेकडून अमोघवर्षाचे साहाय्यक आले होतेच. या धुमश्चक्रीत चौथा गोविंद मारला गेला आणि तिसरा अमोघवर्ष गादीवर आला. ही घटना ९३६ मध्ये घडली असावी. कलचुरींच्या विजयोत्सवात त्रिपुरी येथे राजशेखराचे विद्धशालभंजिका हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले.
गादीवर आला तेव्हा तिसरा अमोघवर्ष वृद्ध झाला होता. तो स्वतः शांत वृत्तीचा होता, म्हणून त्याचा पुत्र तिसरा कृष्ण हाच सर्व राज्यकारभार पाहात होता. त्याने आपल्या पित्याच्या कारकीर्दीत काही विजय मिळविले आणि तीन वर्षांनी त्याच्या निधनानंतर तो गादीवर आला.
तिसरा कृष्ण (सु. कार. ९३९–६७) हा महाप्रतापी होता. त्याने आपला मेहुणा बूतुग याला गंगवाडीच्या गादीवर बसविले, उत्तरेत स्वाऱ्या करून कालंजर व चित्रकूट येते राष्ट्रकूटांची ठाणी बसविली आणि नंतर दक्षिणेत परत येऊन कांची आणि तंजावर ही स्थळे काबीज केली. पुढे सहा वर्षांनंतर तक्कोलम् येथे झालेल्या घनघोर लढाईत चोल युवराज राजादित्य याला गंग सामंत बूतुगाने ठार केले. नंतर कृष्णाने रामेश्वरपर्यंत चाल करून तेथे आपला जयस्तंभ उभारला. पुढे चोलांनी आपला काही प्रदेश जिंकून परत घेतला पण त्यांचा तोंडइमंडल (अर्काट, चिंगलपुट आणि वेल्लोर जिल्ह्यांचा) प्रदेश राष्ट्रकूटांच्या हाती राहिला.
कृष्णाने पुन्हा ९६३ मध्ये उत्तरेत स्वारी केली. त्याने माळवा काबीज करून बुंदेलखंडवर आक्रमण केले. या स्वारीत कोरलेला त्याचा शिलालेख मेहर रेल्वे स्टेशनजवळ जूरा येथे सापडला आहे. त्यात चोलवंशाचे उन्मूलन केल्याचा उल्लेख आहे.
कृष्णानंतर त्याचा धाकटा भाऊ खोट्टिग (सु. कार. ९६७–७२) गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत माळव्याच्या परमार सीयकाने मान्यखेटवर इ. स. ९७२ मध्ये स्वारी करून ते नगर लुटले.
त्यानंतर खोट्टिगाचा पुतण्या दुसरा कर्क (सु. कार. ९७२–७३) गादीवर आला, पण तो दुर्वर्तनी निघाला. त्यामुळे राज्यात बेबंदशाही माजली. तिचा फायदा घेऊन तरदवाडी (बेळगाव जिल्हा) येथे राज्य करणारा राष्ट्रकूटांचा मांडलिक तैलप याने बंड करून ९७३ मध्ये कर्काचा पराभव केला आणि मान्यखेट काबीज केले. कर्क पुढे म्हैसूर प्रदेशात जाऊन सु. नऊ वर्षे लहानशा प्रदेशावर राज्य करीत होता, पण त्याला आपले पूर्वीचे राज्य परत मिळविता आले नाही. गंग नृपती मारसिंह याने तिसऱ्या कृष्णाचा नातू इंद्र याला राष्ट्रकूटांचे राज्य मिळवून देण्याचा ९७४ मध्ये प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.
इतर भारतीय राजांप्रमाणे राष्ट्रकूटांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिला. राष्ट्रकूटांच्या काळी बहुधा सर्वत्र बौद्ध धर्माची पीछेहाट झाली होती तरी त्यांच्या साम्राज्यात एक-दोन ठिकाणी बौद्ध विहार असल्याचे उल्लेख आढळतात. कृष्णगिरी (कोकणातील कान्हेरी) येथील बौद्ध संघाला पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत शिलाहारांच्या अमात्याने काही द्रम्मांच्या देणग्या दिल्या होत्या. गुजरातेतील

राष्ट्रकूटांचा विद्वानांना आश्रय असे. आद्य चम्पू ग्रंथ नलचम्पू याचा कर्ता त्रिविक्रम भट्ट हा मूळचा विदर्भातला. त्याला तृतीय इंद्राच्या दरबारी आश्रय मिळाला होता. हालयुधाने मट्टिकाव्याच्याधर्तीवर रचलेल्या कवि रहस्यातील श्लोकात राष्ट्रकूट नृपती तिसऱ्या कृष्णाची स्तुती आहे. पहिला अमोघवर्ष व दुसरा कृष्ण यांचा जैन धर्माकडे ओढा असल्याने त्यांच्या दरबारी अनेक जैन पंडित होते. अकलंकदेवाची अष्टशती टीका, जिनसेनाचा हरिवंश, आदिपुराण व पार्श्वाभ्युदय, शाकटायनाची अमोघवृत्ती, वीराचार्याचा गणितसारसंग्रह इ. ग्रंथ राष्ट्रकूटांच्या आश्रयाखाली रचण्यात आले होते. त्यांच्या कर्नाटकातील सामंतांनी कन्नड कवींना उदार आश्रय दिला होता.
मिराशी, वा.वि.
वास्तुशिल्पकला : राष्ट्रकूट राजांनी विद्वानांना आश्रय दिला आणि अनेक साहित्यकृती निर्माण केल्या, तद्वतच त्यांच्या काळात स्थापत्य आणि शिल्प या कलांनाही उत्तेजन मिळाले. राष्ट्रकूटांनी आपल्या राज्यात अनेक मंदिर–वास्तू बांधल्या. त्या शिल्पांनी सुशोभित केल्या आणि मंदिरांना पूजा-अर्चेसाठी देणग्या दिल्या. राष्ट्रकूटकालीन मंदिरे भारतातील विविध प्रदेशांत विखुरलेली आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे राष्ट्रकूट राजे परम भक्त होते. दुष्काळाचे निवारण होण्यासाठी पहिल्या अमोघवर्षाने आपली करंगळी कापून ती महालक्ष्मीस अर्पण केली होती. राष्ट्रकूटांच्या मंदिरांपैकी बहुसंख्य मंदिरांची कालौघात पडझड झाली असून फारच थोडी अवशिष्ट आहेत आणि तीही विच्छिन्न अवस्थेत कशीबशी तग धरून आहेत. या मंदिरांमध्ये मान्यखेट, मार्कंडादेव (मार्कण्डा), रामेश्वरम् इ. ठिकाणची मंदिरे सुस्थितीत असून वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिर-वास्तूंप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्रात कान्हेरी, घारापुरी व वेरूळ या ठिकाणी गुंफा खोदल्या व त्या शिल्पाकृतींनी सुशोभित केल्या.
सामान्यतः राष्ट्रकूट राजे हिंदू असून शिवोपासक होते. कृष्णराजाचे कृष्णेश्वर हे कैलासलेणे हे एक शिवमंदिरच आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत याशिवाय इतरही अनेक शिवमंदिरे राष्ट्रकूट राजांनी बांधलेली होती. त्यांच्या मंदिरांपैकी पहिल्या अमोघवर्षाने वसविलेल्या मान्यखेट राजधानीजवळ कागना व वेण्णीतोरा या नद्यांच्या संगमाजवळ राष्ट्रकूट काळातील एका दगडी दुर्गाचे अवशेष आढळले. आता गावही ओसाड झाला आहे. त्यात एक महादेवाचे व दुसरे जैन मंदिर आहे. जैन मंदिरात पार्श्वनाथ, महावीर आदी तीर्थंकरांच्या त्यांच्या लांछनांसह प्रमाणबद्ध मूर्ती आहेत. तिसरा कृष्ण (कार. ९३९-६७) या राजाने रामेश्वरम्पर्यंत प्रदेश पादाक्रांत करून तिथे आपला विजयस्तंभ उभारला. रामेश्वरम्जवळ त्याने कृष्णेश्वर आणि गंडमार्तंडा ही दोन आणि कांची येथे कालप्रियाचे मंदिर बांधण्यासाठी गावे दान दिली. मार्कंडादेव येथील मार्कंडी अथवा मार्कंडेश्वर हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरील एक प्रसिद्ध शिवालय असून त्यावरच्या सुंदर शिल्पांमुळे ते विशेष उल्लेखनीय ठरले आहे. सांप्रत हे श्रीमार्कंडेश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ते विस्तृत अशा आयताकार प्राकारामध्ये नागरशैलीत बांधले आहे. या प्रकारातील मंदिर समूहात पूर्वी २४ मंदिरे होती परंतु सद्यःस्थितीत फक्त १८ मंदिरांचेच अवशेष असून त्यांपैकी मार्कंडेय ऋषी, यमधर्म, मृकंड ऋषी आणि महादेव ही अद्यापि सुस्थितीत आहेत. मार्कंडेश्वर मंदिरावर विपुल शिल्पांकन आहे. यांतील अर्ध्याहून अधिक मूर्ती शैव संप्रदायातील आहेत. त्यात शिव-पार्वतीसह श्रीगणेश, कार्तिकेय, भैरव इ. देव-देवता असून विष्णु-लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, विष्णुचे अवतार आणि रामायण-महाभारतातील प्रसंगांचेही शिल्पांकन आहे. याशिवाय नृत्यांगना-सुरसुंदरी तसेच दर्पणधारी, पुत्रवल्लभा, वृक्षी, शालभंजिका आणि पत्रलेखन किंवा केशरचना यांत तल्लीन असलेली अप्सरा यांचीही शिल्पे आहेत. मूर्तिसंभारात ज्यांना कामशिल्पे म्हणता येतील, अशी प्रणयी युगुले वा दंपती शिल्पे आणि नग्निका यांच्या मूर्ती आहेत. एकूण स्त्री-प्रतिमांत गतिमानता असून त्या मोहक आणि प्रमाणबद्ध आहेत. केवळ मार्कंडेश्वर मंदिराच्या मंडोवरावर तीन रांगांत सु. चारशे स्वतंत्र शिल्पे आहेत. येथील मंदिरांच्या काळाविषयी भिन्न मते असली तरी राष्ट्रकूटांची राजधानी मयुरखंडी म्हणजेच मार्कंडी असण्याचा संभव वा. वि. मिराशी व्यक्त करतात आणि राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद (कार. ७९४–८१४) याच्या कारकीर्दीत ही मंदिरे बांधली गेली असावीत, असे मत व्यक्त करतात. शिलालेखांच्या अक्षरवटिकेवरून व मूर्तीच्या किंचित स्थूल शरीरयष्टीवरून या मतास पुष्टी मिळते.
या मंदिरांव्यतिरिक्त राष्ट्रकूटांची स्थापत्य – शिल्पशैली त्यांनी खोदलेल्या वा खोदून घेतलेल्या बहुविध गुंफांतून दिसते. महाराष्ट्रात त्यांनी कान्हेरी, घारापुरी (मुंबईजवळ) आणि वेरूळ या तीन स्थळी लेणी खोदली. कान्हेरी येथील बौद्ध लेणी आणि वेरूळ येथील हिंदू व जैन लेणी प्रसिद्ध आहेत. यांतून त्यांचे काही शिलालेख उपलब्ध झाले असून ते तत्कालीन राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकतात. या लेण्यांतील वेरूळ हे राष्ट्रकूलीन स्थापत्य व शिल्पकला यांचे जगप्रसिद्ध सुंदर प्रतीक आहे. राष्ट्रकूटांच्या लेण्यांना दर्शनी कमान नाही. लेण्यांतील स्तंभ सामान्यतः चौकोनी असून त्यांचा माथा गिरदीसारखा 3दिसतो.
कान्हेरी येथे सु. ११२ लहानमोठी लेणी खोदलेली असून या बौद्ध लेण्यांतील ७८ व्या गुंफेत राष्ट्रकूटांचे मांडलिक शिलाहार यांचा एक शिलालेख आहे. त्यावरून अमोघवर्षाच्या कारकीर्दीत या गुहेचे खोदकाम पूर्ण झाले असावे, असा तज्ञांचा कयास आहे. त्यातील बोधिसत्वादिकांच्या मूर्ती या काळातच खोदण्यात आल्या असाव्यात.
मुंबईजवळील घारापुरी येथे पाच लेण्यांचा समूह आहे. अग्रहारपुरीवरून घारापुरी हे नाव रूढ झाले असावे. ते एलेफंटा केव्हज् या नावानेही प्रसिद्ध आहे. शिल्पाकृती, त्यांची घडण, शैलीकरण आणि एकूण तत्कालीन पेहराव यांवरून जेम्स बर्जेस, जेम्स फर्ग्युसन, भगवानलाल इंद्रजी इ. पुरातत्त्वज्ञांनी ही लेणी आठव्या-नवव्या शतकांत खोदली गेली असावीत आणि ती राष्ट्रकूटांची असावीत, असे अनुमान काढले आहे. येथील बहुतेक सर्व शिल्पे शैव संप्रदायातील असून त्यातून शिवाच्या जीवनाशी निगडित कथा आढळतात. मुख्य शिल्प ५·२३ मी. उंचीच्या त्रिमूर्तीचे असून ब्रह्मा, रुद्र व विष्णू यांचे अनुक्रमे शांत, रौद्र व उदात्त भाव तीत व्यक्त होतात. याशिवाय अर्धनारी नटेश्वर, गंगावतरण, कल्याणसुंदरमूर्ती, अंधकारसूरवधमूर्ती, उमामहेश्वर, तांडवनृत्य, रावणानुग्रह इ. प्रमुख शिल्पे प्रमाणबद्धता, जोष आणि भाव रेखाटन या दृष्टींनी उल्लेखनीय आहेत. चतुर्भुज द्वारपाल, गणेश, कार्त्तिकेय, ब्रह्मा, विष्णू, वगैरेंच्या अन्य काही मूर्तीही विलक्षण वेधक आहेत. शिल्पांशिवाय भिंतींवर-छतांवर चित्रे व रंगीत नक्षीकाम असावे, असा काही तज्ञांचा कयास आहे. येथील काही शिल्पे प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत. त्यांपैकी ब्रह्मदेव, शिवाच्या एक-दोन भग्नमूर्ती आणि पार्वती व तिचे सेवक, नटराजाची कबंध मूर्ती, महिषासूरमर्दिनी इ. काही शिल्पे लक्षणीय आहेत.

त्यानंतरच्या १२ ते ३४ पर्यंतच्या हिंदू (ले. क्र. १३–२९) आणि जैन (ले. क्र. ३०–३४) लेण्यांत रामेश्वर (सीता की नहाणी), दशावतार, कैलास, धुमार, इंद्रसभा इ. नावांनी प्रसिद्ध असलेल्या कलात्मक लेण्यांचा अंतर्भाव होतो. यातील कैलास लेणे ही केवळ एक स्तिमित करणारी अलौकिक कलाकृती आहे. वेरूळ येतील सर्वांत मोठे आणि सुरेख शैलमंदिर म्हणून कैलास लेण्याचा उल्लेख करतात. ते संपूर्ण शिवमंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवऱ्यांसह खोदून काढलेले आहे. ते दोन मजली असून दोन्ही मजल्यांवर राष्ट्रकूट शैलीचे प्रचंड स्तंभ आहेत आणि दुसऱ्या मजल्याच्या द्वारापाशी भव्य द्वारपाल आहेत. यातील काही भागांवर चित्रकाम केलेले असून पूर्वी हे मंदिर अंतर्बाह्य रंगविलेले असावे. हे आश्चर्यकारक लेणे खोदून पूर्ण झाल्यावर ते कार्य आपल्या हातून पार पडले, याच्याबद्दल त्याच्या शिल्पीलाच आश्चर्य वाटले, असे एका कोरीव लेखात म्हटले आहे. तो असा, ‘एतन्मया कथमहो कृतमित्यकस्यात कर्तापि यस्य खलु विस्मयमापशिल्पी’. कैलासला पूर्वी कृष्णेश्वर म्हणत. दंतिदुर्गाच्या वेळी याचे काम चालू झाले आणि पहिल्या कृष्णाने ते पूर्ण केले. नंतरही सरिता, लंकेश्वर, मातृका इ. मंदिरे तेथे खोदण्यात आली. शैलमंदिर या संकल्पनेची परिणत व्यवस्था येथे स्पष्ट उमटली आहे. पट्टदकल येथील विरूपाक्ष आणि कांचीपूरम् येथील कैलासनाथ या दोन मंदिर-वास्तूंचा आदर्श या शैलमंदिरात दिसून येतो आणि आलंकरणात पल्लव व चालुक्य शैलींची संमिश्र छटा स्पष्ट दिसते. स्तंभ, कोनाडे, छप्पर, विमान, शिखर आदी वास्तू-विशेषांवरून या शैलमंदिराची द्रविडशैली जाणवते. तिला सुशोभनासाठी मूर्तिकामाचा साज चढविलेला असून गोपूराच्या दोन्ही बाजूला भिंतींवर त्रिपुरांतक, गरुडारूढ नारायण, अर्जुन-सुभद्रा विवाह अशांसारख्या मूर्ती आहेत. आतील बाजूस गजमूर्ती असून ध्वजस्तंभ आहेत. जोत्यावर रामायण, महाभारत, विष्णुपुराण यांतील कथा-दृश्ये कोरली आहेत. इतर शिल्पांत कमलाधिष्ठित लक्ष्मी, कैलासपर्वत हलविणारा रावण, शिवाला दशमुखे अर्पण करणारा दशानन, गंगा, यमुना आणि सरस्वती यांची शिल्पे उल्लेखनीय आहेत. यांतील प्रत्येक मूर्ती आपले स्वतंत्र अस्तित्व दर्शविते. या प्रतिमांव्यतिरिक्त आलिंगन चुंबनादी अवस्थांतील काही लक्षवेधक कामशिल्पे असून त्यांतील मिथुन मूर्तीतील ढंग, हावभाव व मुद्रा यांतून अभिजात कलेचा आविष्कार दिसतो.
दशावतार, रामेश्वर, धुमार, रावण की खाई इ. लेण्यांमधूनही विपुल शिल्पांकन आहे. दशावतार लेणे दंतिदुर्गाने खोदवून घेतले, असे तेथील शिलालेखांवरून स्पष्ट झाले आहे. शैव व वैष्णव संप्रदायांची शिल्पे आहेत. हे लेणे दुमजली असून खालच्या मजल्यावरील सभामंडपास १४ स्तंभ आहेत तर दुसऱ्या मजल्यावर ५४ स्तंभ आहेत. हे सर्व अत्यंत साधे कलाकुसर विरहित आहेत. स्तंभांच्या पुढे दर्शनी भागात दोन भव्य द्वारपाल उभे आहेत. रावण की खाई आणि रामेश्वर या गुंफा दशावतार लेण्याच्या आधी निर्माण झालेल्या असाव्यात. धुमार लेणे व घारापुरीचे लेणे यांत बरेच साम्य आहे. त्यांतही द्वारपालांच्या भव्य मूर्ती आहेत तर रामेश्वर लेण्यात गंगा-यमुनांच्या सुरेख मूर्ती आढळतात. या लेण्यांत नरसिंह, अंधकासुरवध, शिवतांडव, महिषासुरमर्दिनी, द्वारपाल इत्यादींच्या काही मूर्ती लक्षणीय आहेत. वेरूळ येथील जैन लेणी पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत खोदली असावीत. तीर्थंकार, चक्रेश्वरी यक्षिणी, उभे पार्श्वनाथ, गोमटेश्वर, अलंकारयुक्त गंधर्व-युग्म आणि नर्तक-नर्तिका यांच्या सुबक मूर्ती, हे या जैन लेण्यांचे वैशिष्ट्य. यांतील इंद्रसभा व जगन्नाथसभा या दोन गुंफा त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहेत. इंद्रसभेत इंद्र, इंद्राणी, शांतिनाथ व पार्श्वनाथ यांच्या भव्य मूर्ती आहेत. जगन्नाथसभेत महावीराची मूर्ती आहे. राष्ट्रकूटकालीन मूर्तिसंभारात विशेषतः वेरूळ येथील मूर्तीत भव्यतेची छटा सर्वत्र प्रकर्षाने जाणवते. येथील प्रत्येक मूर्ती सचेतन व जिवंत वाटते. तिच्या कलात्मक आविष्कारात कृतीचा भाव स्पष्ट दिसतो. त्यामुळे अगदी कथात्मक शिल्पांतही वास्तवता आली आहे. राष्ट्रकूटांची कीर्ती धर्म, विद्या, साहित्य आणि कला यांना त्यांनी दिलेल्या आश्रयामुळे अजरामर झाली आहे.
पहा : कान्हेरी कैलास लेणे घारापुरी मार्कंडादेव वेरूळ.
संदर्भ : 1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.
2. Ganguli, O. C. Goswami, A. The Art of the Rashtrakutas, Bombay, 1958.
3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1970.
5. Yazdani, Gulam, Ed. The Early History of the Deccan, Two Vols., London, 1960.
६. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.
देशपांडे, सु. र.
No comments:
Post a Comment