पाटणे येथील देवी मंदिराचे उपयतं
पाटणे येथील देवी मंदिर वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या शतकात या मंदिराचा बऱ्यापैकी जीर्णोद्धार आणि दुरुस्ती झालेली असली तरी हे मंदिर मुळात मध्यभागी सर्व आयतनाना सामायिक असलेला एकच लंब चौकोनाकृती मंडप मंडपाच्या मागच्या बाजूस मंडपाला लागून असलेली तीन आयतने आणि मंडपाच्या दोन टोकांना एकमेकांना सन्मुख असलेली दोन आयातने आणि मंडपाच्या दोन टोकांना एकमेकांना सन्मुख असलेली दोन आयतने असा तलविण्यास असलेले पंचायतन प्रकारचे मंदिर असावे असा अंदाज करता येतो. पण आज फक्त चार आयातने शिल्लक आहेत. या मंदिराच्या आयतनांना वेगवेगळ्या प्रकारची शिखरे आहेत. एका ओळीत असलेल्या पश्चिम आयतनातील मध्यभागी असलेल्या आयतनावर फासना प्रकारची शिखर आहे. उत्तराभिमुख आयतनावर वेसर शिखर असावे असे मानण्यास जागा आहे.
सामायिक मंडपाला लागून असलेले अंतराळ व गर्भगृह यांनी युक्त असलेल्या बेसर प्रकारचे उत्तराभिमुख आयातं आज रिकामे आहे. आयताची बाह्य रेषा भिंतीचे बाह्य अंग आणि कपोताली वरील वास्तु घटक मूळचेच आहेत. कपोताली वरील शाला शिखराचे अवशेष असून त्याच्या दोन्ही कडांना विभागलेले चैत्यकमान आहे. ही विभाजित चैत्यकमान मकरमुकाने अलंकृत केलेली आहे. हा पुरावा या मंदिरावर नागज किंवा भूमीच शिखर नव्हते आणि या आयतनावरील शिखर नंतरच्या काळातील कर्नाटक मंदिरावरील शिखरांप्रमाणे होते असा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा आहे.
To reach Patnadevi, you will get ST bus from chalisgaon or opt for private jeeps. You can get jeeps at Ghatroad area.
Another way to reach Patnadevi is Pune->Aurangabad->Kannad. From Kannad you need to hire private vehicle to reach Pitalkhora caves. These caves are near to the Kalimath ashram(famous landmark). From Pitalkhora, a well-trodden route descends down to the temple of Patnadevi.
पाटणे येथील देवी मंदिर वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या शतकात या मंदिराचा बऱ्यापैकी जीर्णोद्धार आणि दुरुस्ती झालेली असली तरी हे मंदिर मुळात मध्यभागी सर्व आयतनाना सामायिक असलेला एकच लंब चौकोनाकृती मंडप मंडपाच्या मागच्या बाजूस मंडपाला लागून असलेली तीन आयतने आणि मंडपाच्या दोन टोकांना एकमेकांना सन्मुख असलेली दोन आयातने आणि मंडपाच्या दोन टोकांना एकमेकांना सन्मुख असलेली दोन आयतने असा तलविण्यास असलेले पंचायतन प्रकारचे मंदिर असावे असा अंदाज करता येतो. पण आज फक्त चार आयातने शिल्लक आहेत. या मंदिराच्या आयतनांना वेगवेगळ्या प्रकारची शिखरे आहेत. एका ओळीत असलेल्या पश्चिम आयतनातील मध्यभागी असलेल्या आयतनावर फासना प्रकारची शिखर आहे. उत्तराभिमुख आयतनावर वेसर शिखर असावे असे मानण्यास जागा आहे.
सामायिक मंडपाला लागून असलेले अंतराळ व गर्भगृह यांनी युक्त असलेल्या बेसर प्रकारचे उत्तराभिमुख आयातं आज रिकामे आहे. आयताची बाह्य रेषा भिंतीचे बाह्य अंग आणि कपोताली वरील वास्तु घटक मूळचेच आहेत. कपोताली वरील शाला शिखराचे अवशेष असून त्याच्या दोन्ही कडांना विभागलेले चैत्यकमान आहे. ही विभाजित चैत्यकमान मकरमुकाने अलंकृत केलेली आहे. हा पुरावा या मंदिरावर नागज किंवा भूमीच शिखर नव्हते आणि या आयतनावरील शिखर नंतरच्या काळातील कर्नाटक मंदिरावरील शिखरांप्रमाणे होते असा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा आहे.
पाटणे येथील पंचायतन संकुलातील विष्णू मंदिर हे प्राचीन फासना मंदिराचे एक उदाहरण आहे. आधीच वर्णन केल्याप्रमाणे हे निराळाच प्रकारचे पंचायतन आहे. आज उपलब्ध असलेल्या अवशेषावरून मध्यभागी लंब चौकोनी मंडप त्याच्या मागील बाजूस मंडपाला जोडून एका जवळ एक अशी तीन गर्भगृहे आणि मंडपाच्या दोन अरुंद बाजूला जोडून एक याप्रमाणे एकूण दोन गर्भगृहे असे या पंचायतनाचे स्वरूप असावे असे लक्षात येते. मागील तीन गर्भगृहापैकी मधले गर्भगृह विष्णूचे असून त्यावर साधे फासनाकार शिखर आहे. इतर आयतनावरही असेच शिखर होते का हा संशोधनाचा विषय आहे. हेनरी कझिन्स लिखित मेडिकल टेंपल्स ऑफ डेक्कन या ग्रंथात प्लेट क्रमांक मध्ये या पंचायतनाचा मागच्या बाजूस चा फोटो दिला आहे तो पाहून याबाबत तर्क करता येईल
पाटणे येथील पंचायतन
पाटणे
गावाच्या हद्दीत आणि सातमाळा टेकड्यांच्या पायथ्याशी नजीक नदीच्या तीरावर
हे पंचायतन आहे. हे पंचायतन आई भवानी मंदिर म्हणून ओळखले जाते. ह्या
मंदिरात यादवांचा मंडलिक असलेल्या सोयीदेवाचा शिलालेख आहे. हा सोयीदेव यादव
द्रुपतीसंगणाचा समकालीन असून त्याने चांगदेव नामक राज ज्योतिषाच्या
अधिपत्याखाली असलेल्या मठास देणगी दिल्याचा उल्लेख आहे या शिलालेखावरून सदर
मंदिर इसह तेराव्या शतकाच्या सुरुवातीस शके ११२८ 9 ऑगस्ट बाराशे सात च्या
सुमारास बांधले गेले असावे. या लेखात निकुंभ वंशातील सुईदेव व हेमाड देव व
जाधव नृपती सिंघण याचा उल्लेख आहे. लेखाचा हेतू सिंघानाचा राज ज्योतिषी
चांगदेव याचा आजार भास्कराचार्य यांनी रचलेला सिद्धांत शिरोमणी व इतर
ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी मठाची स्थापना करण्याविषयीची नोंद करणे हा
आहे.
हे मंदिर खूप लोकप्रिय असल्याने आणि दरवर्षी
येथे मोठी जत्रा भरत असल्याने मध्ययुगीन आणि ब्रिटिश काळात त्यात मोठ्या
प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सध्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर एक
सज्जा लागतो आणि या सज्जा मागे हे मंदिर आहे. चार गर्भ ग्रहणा सामायिक
असलेले लंब चौकोनाकृती खुला मंडप असे मंदिराचे सध्याचे स्वरूप आहे. यापैकी
तीन गर्भगृहे मंडपाच्या एकाच बाजूस एकाच दिशेला अभिमुख असून चौथे गर्भगृह
या तीन गर्भगृहांच्या ओळीशी काटकोनात मंडपाच्या अरुंद बाजूला लागून आहे. पण
या चौथ्या गर्भगृहासमोरील मंडपाच्या दुसऱ्या अरुंद बाजूला लागून आणखी एक
गर्भगृह होते हे सिद्ध करण्या इतका पुरावा किंवा अवशेष आजही शिल्लक आहेत.
आधी नमूद केल्याप्रमाणे या मंदिराची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती होताना
त्यात अनेक बदल झाले आहेत. काही मंदिर घटकांचे तर आकार ही बदलले असण्याचे
शक्यता आहे. परिणामी आज या मंदिराकडे पाहिले असता ते आधुनिक काळात बांधलेले
मंदिर वाटते. याआधी बेसर आणि फासना प्रकारचे शिखर असलेल्या मंदिरांचे
विवेचन करताना फासना प्रकारचे शिखर असलेल्या विष्णूच्या गर्भगृहाची आणि
दक्षिणेकडील वेसर शिखर असलेल्या गर्भगृहाचे चर्चा आपण केलेलीच आहे. ही
मंदिरे मुळात कशी असावीत याची साधारण कल्पना कधीच कृत मेडिकल टेंपल्स ऑफ द
डेक्कन या ग्रंथात दिलेल्या छायाचित्रावरून येऊ शकेल. या मंदिराच्या
वैशिष्ट्यपूर्ण तलविण्यासामुळे त्याची या प्रकरणात आवर्जून चर्चा केली आहे.
कारण सामान्यपणे मध्यभागी मुख्यमंत्री किंवा मुख्य आयतन आणि त्याच्या
चारही बाजूंना काही अंतर सोडून चार उपआययतने असे पंचायतनाचे स्वरूप असते.
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर याचा उत्तम नमुना आहे. पण येथे मात्र पाचही
आयताने लंब चौकोनापूर्ती खुल्या मंडपाच्या तीन बाजूंना जोडून आहेत
Patnadevi- An unexplored historical place : Part 1
Patnadevi
is one of the ancient, historical place in Maharashtra having many
architectural evidences proving it. Patnadevi is situated in the middle
of Gautala sanctuary. This is famous for temple of Goddess Chandika.
Devotees around nearby places visit the temple to pay obeisance. Most of
the architecture in the temple is in dilapidated condition, but still
one can sense the old age of the temple. River Dongari originates and
flows besides the temple. This temple is said to be built in 11th century during Yadav dyanasty.
There are many places to see around this sanctuary. Some of them are:
- Temple of Goddess Chandika built in 11th century
- Temple of Mahadeo built in 12th century
- Dhavaltirth waterfall
- Kedarkund waterfall
- Pitalkhora caves
- Sita caves, Nagarjun caves, Shrungar chavadi cave
- Fort Kanhergad
How to reach Patnadevi:
There
are 2 ways to reach Patnadevi. Most prominent of them is via
Chalisgaon. Distance between Patnadevi and Chalisgaon is 18km. You can
reach chalisgaon by train from Mumbai or Pune. You can also try state
transport bus.
To reach Patnadevi, you will get ST bus from chalisgaon or opt for private jeeps. You can get jeeps at Ghatroad area.
Another way to reach Patnadevi is Pune->Aurangabad->Kannad. From Kannad you need to hire private vehicle to reach Pitalkhora caves. These caves are near to the Kalimath ashram(famous landmark). From Pitalkhora, a well-trodden route descends down to the temple of Patnadevi.
![]() |
| Entrance of Gautala sanctuary |
| Patnadevi temple |
![]() |
| mythological infromation |
| Deep-maal |
![]() |
| Sight seeing information |
![]() |
| You will get information regarding animals,trees and birds present in the sanctuary |
![]() |
| statue of Bhaskaracharya |
![]() |
| Forest walk |
![]() |
| Machan...used to keep watch on wood thieves as well as wild animals |
![]() |
| Dhawaltirth waterfall |
Hemadpanthi Mahadeo temple:
This
temple is built on 8ft high platform. Temple is beautifully decorated
with many sculptures on the pillers , roof. Though many of them are not
in good shape. It is said that the temple is built in 12th century by
Nikumbh dynasty.
| scipts in the temple |
| Temple |
| पाटणदेवी मंदिर Google Earth पाटण आज एक खेडेवजा गाव आहे पण एकेकाळी ते जास्ती मोठे आणि भरभराटीचे असावे ह्याचा पुरावा म्हणजे गावात अनेक जागी दिसणारी जुनी भग्न मंदिरे आणि उद्ध्वस्त मूर्ति. पाटण हा ’पत्तन’ चा अपभ्रंश. ह्यावरूनहि असा तर्क करता येतो की आजचे हे कुग्राम एकेकाळी ’पत्तन’ पातळीचे मोठे गाव वा शहर असावे. पाटणदेवीच्या मंदिराचीहि बरीच पडझड झाली आहे तरीहि मंदिर वापरात आहे. पितळखोर्यापासून येथे यायला चारचाकीने आम्हास बराच वळसा पडला होता पण पितळखोर्याच्या दरीतील नाला दरीतून बाहेर पडल्यानंतर ह्या देवळाशेजारूनच जातो आणि दरीतून पायी उतरायचे ठरविल्यास लेण्यांपासून मंदिराचे अंतर फार नाही हेहि लक्षात येते. देवळच्या आसपास भरपूर झाडी आणि गौताळा संरक्षित वन असून मागेच सातमाळ्याची डोंगरांची रांग उभी आहे. मंदिर पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम गेलो होतो कारण ह्या जागी प्रसिद्ध गणिती द्वितीय भास्कराचार्य ह्याचा नातू चंगदेव ह्याने चालविलेली पाठशाळा होती आणि भास्कराचार्याचा सिद्धान्तशिरोमणि हा ग्रंथ आणि भास्कराचार्याच्या काही पूर्वजांचे ग्रंथ ह्यांचे अध्ययन तेथे केले जात असे. ह्या देवळातील एका शिलालेखाचे वाचन डॉ. भाऊ दाजी ह्यांनी केले आणि ते Journal of the Royal Asiatic Society, New Series, Vol. I येथे प्रकाशित केले. तेच वाचन प्रोफ़ेसर कीलहॉर्न ह्यांनी संपादित केले ते Epigraphia Indica, Vol. I येथे पान ३३८ येथे उपलब्ध आहे. ( जिज्ञासूंना हे पुस्तक DLI मध्ये मिळेल.) २६ ओळींच्या ह्या लेखात पहिल्या २१ श्लोकबद्ध संस्कृतमधे आणि उरलेल्या ५ गद्य मराठीमधे आहेत. संस्कृत श्लोकात चंगदेवाची पूर्ण वंशावळ आहे ती अशी: शाण्डिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोऽभूत्तनयोऽस्य जात:। यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा॥ १७. तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसन्निभः। प्रभाकरः सुतस्तस्मात्प्रभाकर इवापरः॥ १८. तस्मात्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः। श्रीमान्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः॥ १९. तत्सूनुः कविवृन्दवन्दितपदः सद्वेदविद्यालता- कन्दः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्यासदः। यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचि- च्छ्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः॥ २०. लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमुख्यो वेदार्थवित्तार्किकचक्रवर्ती। क्रतुक्रियाकाण्डविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत्॥ २१. सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः। जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः॥ २२. तस्मात्सुतः सिङ्घणचक्रवर्तिर्दैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेव:। श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३. भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः। तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४. ही वंशावळ (कविचक्रवर्ती) त्रिविक्रम - (भोजराजाश्रय - विद्यापति) भास्कर - गोविंद - प्रभाकर - मनोरथ - (कवीश्वर) महेश्वर - भास्कर (लीलावती इ.) - (जैत्रपालाश्रय) लक्ष्मीधर - (सिंघणाश्रय) चंगदेव मठकर्ता अशी आहे. ह्या श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला देवगिरीचा राजा जैत्रपाल ह्याने आपला प्रमुख पंडित म्हणून नेमले होते आणि स्वत: चंगदेव हा जैत्रपालाचा मुलगा सिंघण (सन १२१० - १२३३) ह्याचा ज्योतिषी होता. लेखातीलच अन्य काही माहितीवरून असेहि कळते सिंघणाचा मांडलिक निकुंभवंशीय सोइदेव आणि त्याचा भाऊ हेमाद्रि ह्यांनीहि शके ११२९ (सन १२०७) मध्ये मठाला काही नेमणूक करून दिली होती. पाटणदेवी मंदिर १ पाटणदेवी मंदिर १ अशा रीतीने भास्कराचार्याशी जवळचा संबंध असलेले ते देऊळ आणि तो शिलालेख डोळ्यांनी पाहण्याची आमची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही तेथे गेलो होतो. देऊळ पुष्कळसे भग्नावस्थेत होते आणि अनेक मूर्ति, कोरीव दगड, कलाकुसर कोरलेले अनेक दगड एका बाजूस रचून ठेवलेले होते. पुजार्याने दिलेल्या माहितीनुसार शिलालेखहि त्यांमध्येच होता पण सुरक्षिततेच्या कारणाने पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी तो पुष्कळ खाली आणि तोंड उलटे करून ठेवला होता. त्या कारणाने आम्हांस तो पाहायला मिळाला नाही ह्यामुळे हळहळ वाटली. शिलालेखाला एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखी सुरक्षित जागा मिळेपर्यंत तो आहे तसा टिकून राहो ही इच्छा! पाटणदेवी मंदिर २ पाटणदेवी मंदिर २ लेखाच्या अखेरीस चंगदेवाच्या मठाच्या निर्वाहासाठी लावून दिलेल्या देणग्यांचा तपशील जुन्या मराठीत आहे. कीलहॉर्न ह्यांचे Epigraphia Indica मधील वाचन सदोष वाटते आणि बरेच शब्द निरर्थक वाटतात पण तुळपुळे-फेल्डहाउसकृत जुन्या मराठीच्या कोषाच्या मदतीने मी बराचसा भाग सुधारून लावू शकतो तो पुढे देत आहे. ( शं.गो. तुळपुळे-संपादित ’प्राचीन मराठी कोरीव लेणी’ ह्या ग्रंथात हा लेख निश्चित असेल पण त्याची जालीय प्रत उपलब्ध नाही असे दिसते.) श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहापरैश्च। भूम्यादि सर्वं प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहु पुण्य??॥ २५. स्वस्ति श्रीशाके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावणमासे पौर्णमास्यां चंद्रग्रहणसमये श्रीसोइदेवेन सर्वजनसंनिधौ हस्तोदकपूर्व्वकं निजगुरुमठाया(?)स्थानं दत्तं॥ तद्यथा॥ सोइदेव हेमाडि आणि काही अन्य अशांनी मठाला दिलेली जमीन इत्यादि पुढील काळातील राजांनी चालू ठेवावी. श्रीशक ११२८ प्रभवसंवत्सर श्रावणपौर्णिमा चंद्रग्रहणसमयी सोइदेवाने सर्व जनांच्या समक्ष हातावरून पाणी सोडून आपल्या गुरूच्या मठास दिले ते असे: इयां पाटणी जे केणें उघटे तेहाचा जो असिआउ जो राउला होता ग्राहकापासी तो मठा दीन्हला॥ ब्राह्मणा जे विकतेयापासी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले॥ ग्राहकापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥ तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि .... (पुढील अक्षरे नीट कळत नाहीत.) (शब्दार्थ: केणे - विक्रीचा माल, उघटणे - विक्रीसाठी मांडणे, असिआउ - शासकीय हिस्सा, उत्पन्न, राउल - देऊळ, विकता - विकणारा, ब्रह्मोत्तर - ब्राह्मणाचा वाटा, वीसोवा - विसावा भाग, आसु - एक प्रकारचे सोन्याचे नाणे, गिद वा गिधवे - एक माप. वाहणे - चालू असणे, मवणे - मोजणे, मापउ/मापाउ - मोजलेले, मापहारी - माप करणारा, सूंक - कर. कामत - मालकाने स्वत:ची अवजारे आणि जनावरे देऊन मोलाने कसवलेले शेत, ) ह्या पाटणात जो माल विक्रीसाठी मांडला असेल त्यातील शासकीय हिश्श्यापैकी देवळांकडे द्यायचा भाग मठाला दिला. विक्रेत्यांनी जो ब्राह्मणांच्या साठी भाग बाजूस काढायचा आहे तो ब्राह्मणांकडून मठाला दिला. प्रति आसु नाण्याच्या व्यवहारात विक्रीचा जो विसावा भाग नगराकडे द्यायचा आहे तो नगराने मठाला दिला. (तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ - ह्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ कळत नाही.) पहिल्या घाण्याच्या तेलापैकी एक लोटी मठाला दिली. नंतर जितके घाणे होतील त्यांमधून एक एक पळी तेल (मठाला दिले.) जे मोजावयाचे ते मठाच्या मापाने मोजावे. मोजलेल्यापैकी अर्धे मठाचे आणि अर्धे मोजणार्याचे. जमिनीवरील कर आणि जमीन... पाटणदेवी मंदिर ३ पाटणदेवी मंदिर ३ भास्कराचार्यांचे मूळ स्थान कोणते असावे ह्याचा आता विचार करू. त्याविषयी भास्कराचार्य स्वत: सिद्धान्तशिरोमणि - गोलाध्याय येथे म्हणतात: आसीत्सह्यकुलाचलाश्रितपुरे त्रैविद्यविद्वज्जने नानासज्जनधाम्नि विज्जडविडे शाण्डिल्यगोत्रो द्विज:। श्रौतस्मार्तविचारसारचतुरो नि:शेषविद्यानिधि: साधूनामवधिर्महेश्वरकृती दैवज्ञचूडामणि:॥ तज्जस्तच्चरणारविन्दयुगलप्राप्तप्रसाद: सुधी- र्मुग्धोद्बोधकरं विदग्धगणकप्रीतिप्रदं प्रस्फुटम्। एतद्व्यक्तसदुक्तियुक्तिबहुलं हेलावगम्यं विदां सिद्धान्तग्रथनं कुबुद्धिमथनं चक्रे कविर्भास्कर:॥ सारांशाने अर्थ की सह्य पर्वतापाशी वसलेल्या विज्जडविड नावाच्या गावी शाण्डिल्य गोत्रातील महेश्वर दैवज्ञ राहात होता. त्याचा पुत्र भास्कर ह्याने सिद्धान्ताचे ग्रथन केले. हे विज्जडविड नावाचे गाव कोठले ह्याविषयी कोणीच काही निश्चितीने सांगू शकत नाही. बीडपासून बिदर, बिजापूरपर्यंत तर्क करण्यात आले आहेत पण ती गावे ’सह्यकुलाचलाश्रित’ अशी सह्य पर्वतानिकटची नाहीत. भास्कराचार्यांचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला जैत्रपालाने ’ह्या नगरातून’ (पुरादतः) बोलावून नेऊन आपला मुख्य पंडित बनविले असे लक्ष्मीधराचा पुत्र चंगदेव शिलालेखात म्हणतो. ह्याचा अर्थ लक्ष्मीधर पाटणातच राहात होता आणि त्याचा पुत्र चंगदेव हा तर निश्चितच तेथे राहात होता. हे गाव ’सह्यकुलाचलाश्रित’हि आहे ह्यात शंका नाही. शेजारचे चित्र तेच दर्शवीत आहे. भास्कराचार्यांचे अन्य वंशीयहि चाळिसगावच्या आसपास राहात होते ह्याला पुरावा आहे. चाळिसगावच्या उत्तरेस १० मैलांवर बहाळ नावाचे गाव आहे आणि तेथील सारजा देवीमंदिरात शके ११४४ चा एक शिलालेख कोरलेला आहे. डॉ. कीलहॉर्न-संपादित हा शिलालेख Epigraphia Indica Vol. 3 येथे पान ११० येथे उपलब्ध आहे. शिलालेख अनंतदेव नावाच्या व्यक्तीने कोरविला असून हा अनंतदेव सिंघणाच्या पदरी मुख्य दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी म्हणून होता. लेखात अनंतदेवाने आपली जी कुलपरंपरा दिली आहे ती शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर - श्रीपति - गणपति - अनंतदेव अशी आहे. वर दिलेल्या चंगदेवाच्या वंशपरंपरेमध्येहि शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर आहेत आणि तेथून भास्कर - लक्ष्मीधर - चंगदेव अशी परंपरा आहे. ह्यावरून हे उघड आहे की अनंतदेव आणि चंगदेव ह्यांची घराणी चुलत घराणी आहेत आणि भास्कर हा अनंतदेवाचा चुलत आजा दिसतो. ह्यावरून असे म्हणता येते की विज्जडविड अथवा विज्जडविडपत्तन ह्या गावी भास्कराचार्यांचा जन्म आणि निवास झाला. कालौघात विज्जडविडपत्तन ह्या लांबलचक नावातून विज्जडविड गळून पडले आणि पूर्ण विस्मृतीत गेले आणि गावाचे नाव केवळ पत्तन आणि कालौघात पाटण असे ओळखले जाऊ लागले. हे गाव एकेकाळी मोठे असावे असे वर म्हटलेच आहे कारण कुग्रामाला कोणी पाटण असे नाव देणे अशक्य वाटते. भास्कराचार्यांचे वास्तव्य आजच्या पाटणमध्येच होते आणि त्याचे विज्जलविड हे नाव मात्र कालौघात लुप्त झाले आहे असा तर्क सहजशक्य वाटतो. भास्कराचार्यांचे कुटुंब मराठीभाषिक होते त्यातून ओघानेच निघते. अशा रीतीने भास्कराचार्यांचे महाराष्ट्रीयत्व हाहि आपणास एक अभिमानाचा विषय! सुरेख संकलन. ह्या सर्व गोष्टी आम्ही मूळातून वाचायची सुतराम शक्यता नव्हती. सरांशाने मांडलित म्हणून नजरेखालून तरी घालायला मिळताहेत. आभार. .
बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि ही बाराव्या शतकातली अस्सल प्राकृत/महाराष्ट्री(किंवा आजच्या मराठीची जी कुणी गंगोत्री असेल ती) वाटते. दहावीचा मराठीचा धडा आठवला:- "नरिंद्रबासां भेंटि अनुसरण" त्यातल्या काही ओळी :- देवाचिया दादुलेपनाचा उबारा न सहावेचि साताहि सागरा | भेणें वोसरोनि राजभरा दीधलि द्वारावती || यादवांच्या पदरिच असलेल्या न्रिंद्राच्या ह्या ओळी आहेत. | ||||||||||||||||||||||||



























































No comments:
Post a Comment