#नारळीपोफळीतलाहिंदू - भाग १२ (S E A S O N 2)
काळोख्या ओटीवर आजोबांनी एखादा मंद तेवणारा जुना कंदिल आणून ठेवावा, नि ओटीपडवीची ती मोजकी पण माणसाने भरलेला जागा उजळून जावी तसा इथे पोहोचताक्षणी इथल्या निरलस शांततेने मनातला प्रत्येक कोपरा उजळून निघतो. अक्षरशः ताबा घेतं मौन. काही काही बोलावसं वाटत नाही. डोळे अधाशासारखे लहानशा जागेत उभ्या या वास्तूचं वेगळेपण टिपत राहतात.
रत्नागिरीकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याने हातखंबा, निवळी, वांद्री, आंबेड, ओझरखोल, संगमेश्वर, धामणी, तुरळ, आरवली, खेर्शेत, असुर्डे, आगवे अशी पनवेल-कोची-कन्याकुमारी हायवेला म्हणजेच मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा लागणारी गावं पार करत एश्टी वहाळ फाट्याला पोहोचते. कोकणात फिरायचं म्हणजे एक तर तुमची स्वतःची कार किंवा जगात भारी लाल परी. वहाळ फाट्यापासून असणारं आबिटगाव पार केलं की येतं शिरंबं.
शिरंबे गावात रेल्वे स्टेशन नाही, थेट राष्ट्रीय-राज्य-जिल्हा महामार्गाशी गावचा संबंध नाही, गावात बँकेचं एकही एटीएम् मशीन नाही, कुठलीही कार्यकारी-सहकारी सोसायटी नाही, गावात कुठलाही आठवडी बाजार भरत नाही पण अवघ्या हजारभर लोकसंख्येच्या शिरंब्यात स्वतः श्री देव मल्लिकार्जुन ध्यानस्थ बसले आहेत.
शिरंब्यातलं हे मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे शतकांपूर्वीच्या स्थापत्यकौशल्याचं सुरेख उदाहरण. देवळाच्या चारही बाजू़ंना पाणी आहे. चारही बाजूंनी केलेल्या खंदकासारख्या रचनेच्या मधोमध उभ्या शिवपिंडीचा गाभारा आणि मोजकी पण ऐसपैस जागा या देवळाचं वेगळेपण आहे. साधारण किती वर्षांपूर्वीचं देऊळ आहे हे निश्चितपणे सांगणारं कुणी भेटलं नाही आणि माहिती नसताना तसा दावाही करु नये म्हणून नेमका निर्मिती काळ नमूद करता येणं कठीण आहे पण एकंदरीत रचना पाहता तीन चार शतकांपासून हे दगड तिथे उभे असावेत. इथल्या खंदकांमधलं पाणी दर तीन वर्षांनी पूर्णपणे उपसून साफ केलं जातं. पण त्या पाण्यात तळाकडून फुटलेले झरेही येऊन मिळतात. गावकरी सांगतात वाट्टेल तेवढा पाऊस आला तरी या पाण्याची पातळी वाढत नाही आणि अगदी गावातल्या सगळ्या विहिरी आटतील एवढा कडक उन्हाळा अवतरला तरीही त्यातलं पाणी आटत नाही.
१९७३ साली मंदिराचा जिर्णोध्दार झाला तेव्हा लाकूड काम बदललं गेलं असावं. कठड्यावर उभ्या १६ खांबांनी देवळाच्या छताचा भार तोलून धरला आहे. त्याव्यतिरिक्त चार स्तंभांमधल्या रंगमंडपाची रचना देवांसमोर उभी दिसते.
याची नेमकी शैली कुठली हे सांगता येण्याइतका अभ्यास अजून झाला नाही पण ज्यांचं कुठे पुस्तक नाही ना कोणतं शास्त्र त्यांच्या तळापर्यंत पोहोचू शकत अशा मानवी भावनांना मात्र हे मंदिर अगदी आर्त हाक देतं. जी हाक दगडवाळूच्या देहाचं, नव्या रंगकामाने नटलेलं मंदिरही नाही देऊ शकत. त्या हाकेमागे शतकांच्या कालौघाचा जड आवाज असतो.
या गाभाऱ्यातील शिवपिंडी बारा महिने अठरा काळ पाण्यात असते. काय देवाची माया हो...सगळं नैसर्गिक, कुठुनही कृत्रिम पुरवठा नाही. पण आपलं अस्तित्त्व सदैव पाण्याच्या शीतल स्पर्शाने भिजलेलं राखण्यात तो यशस्वी.
देवांसमोरचा नंदी पाहून देऊळ किती जुनं असावं याचा अंदाज येतो. मूळ गाभाऱ्याबाहेर काही शकतं जुनी गणेशमूर्तीही आहे. देवांच्या नित्यपूजेचे अधिकार स्थानिक गुरवांकडे आहेत. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्यापैकी एकजण आवर्जून तिथं आले. आम्ही कुतुहलापोटी विचारलेल्या प्रश्नांची अगदी आपुलकीने त्यांना जमतील तशी उत्तरंही दिली. बदल्यात काही मागावं हा विचारही त्यांच्या मनाला शिवलेला दिसला नाही. त्यांच्या बोलण्यातनं त्यांना वाटणारं मल्लिकार्जुनाबद्दलचं अप्रुप अगदी वाक्या-वाक्यातून ऐकू येत होतं.
मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंगापैकी एक रुप मूळचं श्रीशैल पर्वतावरचं. गणपती बाप्पा नि कार्तिकेयांची पृथ्वीप्रदक्षिणेची स्पर्धा म्हणे जेव्हा कार्तिकेय हरले तेव्हा ते फार फार हिरमुसले. आई बाबांवर रुसून बसले. म्हणाले, " मी एवढा अवघ्या विश्वाची प्रदक्षिणा करुन आलो तरी तुम्हाला त्याचं कौतुक नाही नि हा मोदक हाणीत बसलेला गणपती इथे तुमच्याभोवती बागडून परतला तरीही तो जिंकला म्हणता ?" निघून गेले ना हो कैलासाहून आपला मोर घेऊन. ते आले श्रीशैल पर्वतावर. मग करता काय अहो ? साक्षात देवाधिदेव महादेव नि तेजस्वरुप पार्वती देवी सृष्टीचे चालक मालक असले तरीही शेवटी आईबापच हो. आणि बालहट्टासमोर जगातले कुठले आई-बाप विरघळले नाहीत सांगा! मग काय मल्लिका रुपात पार्वतीदेवी आणि अर्जुनस्वरुपात स्वतः श्री भवानीशंकर आले श्रीशैल पर्वतावर फुरंगटून बसलेल्या कार्तिकेयांच्या मागे. त्याच दैवी रुपाचं हे चक्क कोकणात वसलेलं स्थान.
इथली स्थानिक आख्यायिका अशी की, पुरे या इथल्या गावात पायलीने नाचणी मोजणाऱ्या एका शेतकऱ्याच्या धान्याची रास एक दिवस काही केल्याने संपेच ना. मोजून मोजून कंटाळला बिचारा, पण नाचणीचा ढीग कमी होईना. शेवटी रागाने त्याने हातातली दगडी पायली जमिनीवर आपटली ज्याचे तीन तुकडे झाले. एक उडाला नारडिव्याकडे, एक उडाला बुरंबाडात आणि एक आला इथे ज्याचं स्थान म्हणजे हे मंदिर. मग कोकणातल्या अनेक गावांतील शिवमंदिरांशी निगडीत पुढची आख्यायिका जशीच्या तशीच. गाय घरी दूध देईना झाली, चरायला सोडल्यावर एका शिळेवर जाऊन पान्हा सोडायला लागली. मालकाच्या लक्षात आल्यावर येऊन पाहिल्यावर कळलं की ती शिळा म्हणजे स्वच्छ ओळखता येईल अशी सुस्थितीतली शिवपिंडी. असं हे शिरंबे गावातलं स्वयंभू देवस्थान.
मन भाबड्या आख्यायिकांच्या विश्वात रमण्याइतकं नितळ राहिलं नाही नि सामान्यज्ञानाची दाटी भावनांच्या कुंपणाबाहेरपर्यंत वाढली त्यामुळे काही वेळा या गोष्टींवर विश्वास बसत नाही खरा कुणाकुणाचा पण पिढ्यानुपिढ्या वेगाने प्रगतीपथावर धावणाऱ्या जगापासून लांबच्या एका वेगळ्या जगात आजन्म नारळीपोफळीत राहिलेल्या, रमलेल्या या लोकांची श्रद्धा मला माझ्या बुद्धीपेक्षा जास्त महत्त्वाची वाटते.
इथे बाजूलाच गावच्या चंडिकाई आणि वरदानी देवींची मंदिरं आहे. आवार चौशीकडून झाडांनी वेढलेला आहे. जवळच खळाळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज इथल्या शांततेच्या सुरांमागचा तानपुरा वाटावा इतका गोड आहे. इथल्या परिसरावर निसर्गाचं राज्य आहे आणि रोज इथल्या राईत न्यायनिवाड्याचा दरबार भरत असावा मल्लिकार्जुनासमोर असं वाटतं.
जवळ जवळ तीन तासांपेक्षा अधिक काळ सोबतच्या मित्रमंडळींबरोबर मी इथे रेंगाळलो. शहराच्या गजबजाटात हरवलेली शांत एकोशी वातावरणाची सुश्राव्य चाल कानात प्राण आणून ऐकली. डोळ्यांनी पाहून घेतला निर्मनुष्य भवतालाचा प्रत्येक रंग. घडीभर देवासमोर उभं राहून त्याच्याशी बोललो. म्हटलं, "जिथे मी कधी येण्या-जाण्याची सुतराम शक्यताही नव्हती गेल्या वर्षभरापर्यंत...अशा ठिकाणी मला बोलवून नेलंस. तुझी शिवालयं, श्री विष्णुंची देवळं, देवींची मंदिरं दाखवून आणलीस. का मला ठाऊक नाही. इथेही आलो तसाच पुढल्याही गावी जाईन. फक्त लेकराच्या पायातलं हे बळ आणि मनातलं हे खुळ असंच कायम राख. बुद्धीची पुटं चढलेलं जीणं माझ्या भाबड्या श्रद्धाळू जिवाला कधीही दाखवू नकोस. आपल्या तर्कापलीकडचंही जग अस्तित्त्वात आहे याचा कधी विसर पडू देऊ नकोस. "
योजनेचा काळ सरल्यावर घरी आलो. परतीच्या वाटेवर पाऊस लागला. हिरवा सोडून कुठेही दुसरा कुठलाही रंग दिसत नव्हता अशा भागातल्या डांबरी सडकेवरनं घराकडे धावणारी गाडी कितीही वेगात पुढे जात असली तरी मन शिरंब्यात रेंगाळत होतं. तिथल्या फिक्कट निळ्या खांबांचं पाण्यात दिसणारं हलतं प्रतिबिंब आठवत होतं.
आडवाटेला उभ्या असलेल्या या आणखी एका देवळाची उराउरी भेट घेऊन घरी आलो तेव्हा देह दमला होता खरा पण वाटेत ओशियाने पॅसिफिक हॉटेलला मिळालेलं उत्तम जेवण, घराच्यासारख्या आपुलकीने करुन दिलेल्या गरम पोळ्या, आम्ही म्हणू ती हौस पुरी करायची तयारी चालणारा स्टाफ, वर दोनदा घेतली इतकी आवडलेली कॉफी या सगळ्यानी बहार आणली.
रात्री प्रथमेशकडे आरवलीतच रमलो नि सकाळी रत्नागिरी गाठली. प्रथमेशच्या Prathamesh Laghate Official या YouTube चॅनेलवर "शिवश्रावणी" या सिरीजच्या दुसऱ्या सिझनचा पहिला एपिसोड याच शिरंबे गावच्या मल्लिकार्जुन मंदिराविषयी आहे. माझ्या वर्णनातनं अनुभवलेलं सुख तिथे जाऊन डोळ्यांनीही जरुर पाहा. त्यात प्रथमेश सुरेख गायलायसुद्धा चक्क मल्लिकार्जुनांसमोर बसून.
पुढच्या भागातही अशाच एका आडवाटेच्या, नारळीपोफळीतल्या देवस्थानाचं अप्रुप घेऊन पुन्हा भेटूया!
तोवर श्रावणाच्या या दिमाखाची, सणांच्या पायरवाची, गोडाधोडाच्या-व्रतवैकल्याच्या जेवणावळींची, फुलांच्या-धुपाच्या दरवळाची गोडी देहात न विसरता भरुन घ्या. आपली सगळ्यांत पहिली ओळख लक्षात ठेवा, आपण हिंदू आहोत. आणि मग बघा हळूहळू आपोआप सगळ्या सगळ्याचा ताळमेळ साधेल, कारण "हिंदू असणं म्हणजे आनंदी असणं!"
© कौस्तुभ अरुण आठल्ये, रत्नागिरी.
०१ ऑगस्ट २०२२
https://www.facebook.com/kathalyepune
#रंजकरामायण - १३ (१)
"मोहशोकविनाशाय सीताशोकविनाशिने"
- पहिला भाग
अशोक वनातल्या एका झाडाखाली सीतामाई शोक करीत बसल्या होत्या. खूप काळ लोटला होता. श्रीरामांच्या विरहाने देह आणि मन दोन्ही गोष्टी अगदीं त्रासल्या होत्या. पण मनात अपराधी भावना होती की मीच या सगळ्याचं कारण आहे. मनात अपार शोक करीत सीतामाई म्हणत होत्या,
आणि कां भोगितें दुःखावस्था ।
वृथा लक्ष्मणाभिशापता ।
तेणें पापें लंकेशा आतुडलें ॥
लक्ष्मणाची मर्यादारेखा ।
म्यां उल्लंघिता देखा ।
अंतरोनी श्रीरामसखा ।
त्या दशमुखा आतुडलें ॥
माझीच पापं आहेत ही सारी. मी लक्ष्मणासारख्या सिद्ध राम भक्तावर नसते संशय घेतले. काय हवं नको ते बोलले. त्यानेच ही दुरावस्था ओढवली ना ? रामांच्या भक्ताला त्रास देणाऱ्या कुणालाही नियती शिक्षेविना सोडील काय ?
काय तो सुवर्ण मृगाचा मोह ? मोहसुद्धा नव्हे माझा काळच तो. मृगापाठी रामांना धाडलं तर धाडलंच वर लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी मागे थांबला त्याच्यावर नको तो आळ घेतला. काय झालं असेल त्याचं माझे ते शब्द ऐकून ?
किती किती वाईट साईट बोलले मी त्याला...
करंटी बुद्धि बाणली कैसी । लक्ष्मण रक्षण सत्वराशी ।
रामें ठेविला मजपाशीं । म्यां छळूनि त्यासी दवडिलें ॥
लक्ष्मण न मानी अल्प छळणासी । माझी पापबुद्धी कैसी ।
एकला राहतोसी मजपासीं । रामपत्नीसी भोगावया ॥
धांवण्या न जासी रामापाशीं । स्वयें भोगावया सीतेसी ।
तूं काय येथें राहतोसी । ऐशा वक्रोक्तीसीं छळियेलें ॥
या शोकाच्या आवेगाने रडून रडून त्या पूर्ण म्लान झाल्या. म्हणू लागल्या...
घन बरसत बरसत अधीर करती रात्र रात्रभर नाथा
क्षण सरत सरत मन गडद विकल या झणि रघुराया आता
चुकलेच अनावर मोह दाटला कांचनमृग दिसताच
घटकाभर लोभ प्रसवला ज्याची प्रखर जाहली आच
हे 'अशोकवन' भोवती उभे पण 'शोकमग्न' वैदेही...
डोळ्यांत अयोध्या, श्वास श्वास आठवे स्पर्श तुमचाच
ही विरहभारली पुढे वाचवेना जन्माची गाथा...
क्षण सरत सरत मन गडद विकल या झणि रघुराया आता
वर हनुमंत झाडावर बसून हे सगळं पाहात होते. त्यांना आईची ही अवस्था पाहवेना. त्यांनी एक युक्ती केली. श्रीराम मुद्रिका म्हणून नेलेली रामांची अंगठी मारुतीरायांनी हळूच झाडावरून सीतामाईंसमोर टाकली. त्यांनी ती पाहिलीही. पण त्यांना कळेना की हा काय चमत्कार ?
त्यांनी पुढच्या क्षणी अचंबित होत ती अंगठी उचलली. ओळखली.
"अरे ? ही माझ्या रामांची अंगठी ? हो हो. त्यांचीच. माझ्या प्राणप्रिय श्रीरामांची अंगठी!"
सगळ्यांत आधी हात जोडून नमस्कार केला मुद्रिकेला. आणि लगेच उचलून हृदयाशी धरली हो घट्ट. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. मुके घेतले चक्क त्या अंगठीचे. कुणी म्हणेल हे काय भलतंच ? त्यांना आवर्जून सांगतो की हे मी नाही माझ्या मनाला येईल ते सांगत, तर एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणातील वर्णन असं की...
सावध होतांचि देखा । पुढें देखिली अंगोळिका ।
ओळखोनि श्रीराममुद्रिका । प्रेमोन्मुखा जानकी ॥
पहिली वंदिली निढळीं । मग आलिंगिली ह्रदयकमळीं ।
स्वानंदें चुंबी जनकबाळी । सुखें वेल्हाळी आलीसी ॥
त्या अंगठीशी मैत्रिणीशी बोलल्याप्रमाणे बोलू लागल्या सीतामाई....म्हणाल्या,
"बैस गो ! फार श्रम झाले का गं ? थकली असशील. पर्वत ओलांडून, समुद्र लांघुन मजपर्यंत आलीस. शेज लावते. विश्रांती घे हो."
हे प्रेम होतं हो !
कुणावरचं ?
त्या सोन्याच्या तुकड्यात का जीव अडकला होता सीतेचा ?
नाही हो नाही...
ती अंगठी माझ्या श्रीरामांच्या बोटांतील आहे या गोष्टीमुळे तिच्यावर प्रेम करीत होती सीता. चैतन्य नसलेली एखादी गोष्ट...पण ती माझ्या परमचैतन्य रामाची आहे एवढीच जाणीव पुरेशी होती त्यासाठी. इतकं निखळ प्रेम होतं दोघांच्यात.
त्यांचं हे प्रेम पाहून हनुमंत अक्षरशः हुंदके देऊन रडले. अचेतन सचेतन कसलाही भेद न बाळगता आपल्यालाही रामांवर इतकं प्रेम करता आलं पाहिजे असं वाटून गेलं त्यांना.
आता सीतामाई त्या अंगठीशी आणखी बोलू लागल्या.
विचारू लागल्या,
"माझे श्रीराम कसे आहेत गं ? भ्राता लक्ष्मण आहे ना त्यांच्या सोबत ? दोघं सुखरूप आहेत तर मला का गं आणायला आले नाहीत अजून ? का सोडवत नाहीत गं मला या राक्षसाच्या लंकेतून ? इतके महाप्रतापी माझे राम ? त्यांचा एक बाण हा अवघा समुद्र शोषुन टाकील. या रावणाचा संपूर्ण कुळानिशी नाश करून माझी सोडवणूक का गं करत नाहीत अजून कौसल्यापुत्र ?"
पुढे म्हणतात की,
"बोलत का नाहीस गं ? काही दुःख वार्ता आहे म्हणून का मौन झाली आहेस ? माझ्या श्रीरामांचं काही बरं वाईट ? नाही ना गं ? माझे राम परलोकी गेले म्हणून तू आली नाहीस ना माझ्याकडे ? तसं काही झालं असेल तर या क्षणी सीतेचे प्राणही या सृष्टीतून निमावेत गं. बोल गं सखे बोल ना...
हा रावण मला घेऊन आला इकडे त्यानंतर काय घडलं तिकडे ? काही वाईट घडलं का ? मी पर्णकुटीत नाही हे पाहून कड्यावरून झेपावले का दोघे रघुवंशी ? का आपल्याच शस्त्रांनी अपराधी भावनेने आपलाच घात करुन घेतला ? काय केलं त्यांनी ? सांग ना गं ? आणि काही अघटित घडलं नसेल तर अजून का आले नाहीत ते इकडे ?"
मनातल्या वाईट साईट कल्पनांनी शोक अनावर होत चालला होता. सीतामाई ढसाढसा रडत होत्या.
"काय झालं गं तिकडे पर्णकुटीत ? लोक काय म्हणतील या कल्पनेने विषप्राशन केलं का त्यांनी ? की मूर्च्छा येऊन तिथेच गतप्राण झाले माझ्या विरहाने माझे राम ? सीता सीता आक्रंदुन माझ्या दुःखापायी अन्न पाण्याचा त्याग केला होता का गं ? का पर्वतीच्या प्रचंड धोंड्यापुढे शीर घातलं आणि निमाले दोघे ?"
काहीही केलं तरी सीतामाईंच्या मनातले आवेग ओसरेनात हो. आणखी आणखी वाईट विचार करू लागल्या त्या. अंगठीला म्हणू लागल्या,
"बोलत का नाहीस गं ? बेशुद्ध झाले का ते दोघं माझ्या दुःखाने ? आणि चित्त शुद्धीवर नसताना वाघ सिंह तरस वगैरे कुणाला सापडले का वनातच ?
नाही नाही. महापराक्रमी आहेत ते ! सिंहसुध्दा त्यांच्या पुढे उभा ठाकणार नाही. मग गो ? रावणाने त्यांना झोपेत असताना मारलं का गं ? नाही नाही. रावणाची काय बिशाद ? एका बाणात संपेल तो रामाच्या हे त्यालाही ठाऊक आहे ?
दुसऱ्या कुणी त्यांना काही करणे अशक्य आहे...पण माझ्या दुःखाने त्यांनी स्वतःहून प्राण सोडले असावेत अन्यथा अजून ते इकडे आले कसे नाहीत गं ?
कसे गं आले नाहीत माझे राम ?
चौदा सहस्त्र राक्षस मारणारे माझे राम...अर्धा क्षण पुरेल त्यांना या मायावी रावणाचा प्राण घ्यायला.
मग गो काय झालं ?
माझ्या विरहाने शस्त्र टाकून संन्यासी झाले का गं ?
का माझं हरण झालं हे कळताक्षणी समाधी घेतली रामांनी ?"
आता अगदी दरडावू लागल्या अंगठीला.
"मुद्रिके... खरं काय ते सांग... समाधिस्थ झाले ? संन्यास घेतला ? का गतप्राण झाले ? खरं काय ते सांग आता ?"
ती अंगठी कशी हो बोलेल ?
तरी यांना शोकापुढे, दुःखापुढे काही उमगेना, तिला म्हणू लागल्या,
"या मौनाचा काय अर्थ ? अगो मी तरी शेवटी वामांगी, तूच रामाच्या दक्षिणांगी, तुला का त्यांच्याविषयी माहिती नाही ?"
आता आवेग अनावर झाला. अचेतन अंगठीशी वेगेवेगे बोलू लागल्या, "कशी गो आलीस वाटांवरून एकटीच चालत ? किती कठीण घाटमाथे लागले असतील वाटेत ते कसे गो पार केलेस ? कसा तो एवढं भलाथोरला समुद्र ओलांडून आलीस इकडे ? तुला श्रीरामांनी धाडली ना माझ्याकडे ? पण ते केव्हा येणार ? माझे राम केव्हा येणार ? केव्हा येणार माझे राम ?"
असा म्हणत म्हणतच सात्विक पण शोकमग्न सीतामाई बेशुद्ध पडल्या.
आपण झाडावरून उडी मारून अजून समोर प्रगटलो नाही तरी माता बेशुद्ध पडल्या हे पाहून मारुतीराया पण अचानक कावरेबावरे झाले. आता करायचं हो काय ? साक्षात रामरायांची अर्धांगिनी सापडली आहे खरी पण आपल्या या अशा वागण्यामुळे त्यांना केव्हढा शोक झाला आणि आता तर चक्क शुद्ध हरपली ? या अपराधी भावनेने अगदी कसेनुसे झाले हनुमंत. महाबली असले तरी आईला असा त्रास होतो, तोही आपल्यामुळे होतो या जाणिवेने त्यांना काय करायचं समजेना. अतिशय आदराने, मृदू आवाजात बोलत बोलत कसं बसं त्यांनी सीतामाईंना शुद्धीवर आणायचे प्रयत्न सुरू केले. पण काहीकेल्या ते जमेना.
हनुमंत महारुद्राचा अवतार होते खरे पण आता अगदी हळवे झाले हो. मनात विचार करू लागले, "की आता काय करू ? श्रीराम प्रभूंच्या विरहाने आधीच माई इतक्या म्लान झालेल्या... त्यात हे अघटित काहीतरी. प्राण सोडले तर यांनी आता ? प्रभू काय म्हणतील ? सुग्रीव महाराज काय म्हणतील मला ? सवाल करतील की कुणी शहाणपणा करायला सांगितला होता तुला समुद्र लांघून लंकेत जायचा ? श्रीरामाचा दास म्हणवतो मी स्वतःला पण त्यांच्या सर्वांत मोठ्या दुःखाचं मीच कारण ठरणार की काय ? नाही नाही. हे घडू देणे नाही. काय करावं ? स्वामी सोडून कुणाचा धावा करणार ?"
हात जोडले. डोळे पाण्याने डबडबले होते ते तसेच मिटले.
मनात म्हणतात,
"प्रभू ही काय लीला करता हो ? नका ना परीक्षा पाहू लेकराची. काय चुकलं ? माईंना शोधायला म्हणूनच आलो. माझ्या घरचं काही काम करतोय का ? तुमचाच आदेश पाळतो आहे ना ? तरी आधी बरंच काही बोललो बरं का झाडावरून खाली उडी मारण्यापूर्वी. पण समोर येण्याआधीच माई कोसळल्या हो. काय करावं ? मार्ग दाखवा देवा!"
काही क्षण तसेच गेले पण शेवटी "बुद्धिमतां वरिष्ठं" असल्याने मार्ग उमगला. राम कथन करायला सुरुवात केली थेट. सगळया संकटांवरचा एकमेव हमखास लागू पडणारा उपाय.....श्रीराम कथन !
कौसल्या गर्भीं गर्भीतीत । दाशरथि श्रीरघुनाथ ।
परब्रह्म मूर्तिमंत । सूर्यवंशीं अवतरला ॥
श्रीराम परब्रह्म सीता प्रकृती । श्रीराम चैतन्य सीता चिच्छक्ती ।
श्रीराम धैर्य सीता धृती । श्रीराम अनन्यगती अवतारू ॥
एक एक करत अगदी मृगमोहाच्या प्रसंगापासून ते जटायू रावण युद्ध ते अगदी आता मी इथवर कसा आलो इथपर्यंत सगळी कथा हनुमंतानी तिथे कथन केली. रामाच्या कथेचा वृत्तांत ऐकून माई शुद्धीवर येत येत उठून बसल्या. क्षणात शांत झाल्या. आणि म्हणाल्या,
वृक्षासी पुसे करोनि नमन । कोण करितो श्रीरामकीर्तन ।
त्याचे पाहीन मी वदन । लोटांगण त्यासी माझे ॥
ज्यासी श्रीरामकथेची शैली । त्याच्या चरणींची धुळी ।
मी वंदीन सुखसमेळीं । मुख मजजवळी दावावें ॥
ज्याचे मुखीं श्रीरामकीर्तन । त्याचें मज देखतां वदन ।
परम सुखसमाधान । कृपा करोन भेटावें ॥
सीता सप्रेम निजचित्ते । परमोत्कंठ अति भावार्थे ।
जेणें खूणमुद्रा आणिली येथें । कृपावंतें भेटावें ॥
आईची आज्ञा आणि लेक ऐकणार नाही असं होईल ?
मग काय, गदा टाकली खांद्यावर आणि दाणकन उडी घेतली समोर. गदा खाली ठेवली. दोन्ही हात जोडले. नजर माईंच्या चरणांपाशी स्थिरावली. आणि मग ?
आनंदून गेले. पुन्हा पुन्हा येऊन पाया पडू लागले. आनंदाश्रुंनी छाती भिजली हनुमानाची. शेपटी उंचावू लागले. उड्या मारू लागले माई सापडल्या या आनंदाने. स्वामींनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यात मला यश आलं या आनंदने नाचू लागले चक्क.
पण परिस्थिती अशी होती त्या अशोकवनात की विश्वास तरी कुणावर आणि कसा ठेवणार हो ? त्या पाताळयंत्री रावणाचा काय भरवसा ? ही पण काहीतरी मायावी चाल कशावरून नसेल त्याची ? सीतामाईंचा काही मारुतीरायावर विश्वास बसेना.
त्या म्हणाल्या,
"कशावरून तू माझ्या अयोध्यानरेश रामांचाच दूत ? हा खुणेचा दागिना, ते तुझं बोलणं खरं कशावरून ? मला नाही माहिती रामांना कुणी वानर कुठे भेटलेले वनात."
मारुतीराया म्हणाले, "माई विश्वास ठेवा. मी किष्किंधा नगरीच्या वानरराज सुग्रीवांचा सेनानायक हनुमंत. रामांचा दास. त्यांनीच तुम्हाला शोधायला चारही दिशांना वानरसेना धाडली आहे अहो. मी दक्षिणेकडे आलो होतो."
"असा नुसता एवढ्या गोष्टीवर विश्वास ठेवता यायचा नाही. तू मी विचारते त्या गोष्टी मला सांग मग पाहू. सांग श्रीरामांची कथा..."
इथून पुढे ते रामदूत आहेत याची सितामाईंना खात्री पटावी यासाठी हनुमंत महाराजांनी जे सांगितलं ते म्हणजे अमृत आहे अगदी.... एकनाथ महाराज त्याविषयी म्हणतात...
एकाजनार्दना शरण । सीतामारूतीसंभाषण ।
हें गोड रामायणीं रामायण । श्रोतीं अवधान मज द्दावें ॥
बाकी मुख्य सीता - हनुमंत संवाद उद्याच्या भागात, शनिवारच्या मुहूर्तावर...पण जाता जाता श्रीरामकथा भक्तिभावे श्रवण केल्याचं फळ काय हे एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे तेवढं नक्की सांगतो,
श्रद्धें श्रीरामकथाश्रवण । ऐकती त्यांचें निजमहिमान ।
मननें मन होय उन्मन । अहं विरोन होय सोहम् ॥
चित्त तें होय चैतन्य । बुद्धि समसाम्य समाधान ।
कर्मचि होय ब्रह्म पूर्ण । इंद्रियाचरण चिन्मात्र ॥
संदर्भ:
एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण -
सुंदरकांड अध्याय अकरा आणि बारा
#रंजकरामायण - १३ (१)
"मोहशोकविनाशाय सीताशोकविनाशिने"
- पहिला भाग
"म्हणे मज नाहीं पापकर्मपरता ।

#रंजकरामायण - १३ (२)
"मोहशोकविनाशाय सीताशोकविनाशिने" 
सीतामाई म्हणू लागल्या,
"मी श्रीरामांसोबत होते तेव्हा रे कुठे होतास तू ? कुठे होते कोण ते तुझे वानरराज सुग्रीव ? कुठे भेटले तुला माझे राघव ? काय काय केलं त्यांनी पुढे ? तू कसा बरं आलास इथवर ? आणि त्यांनी तुला पाठवलं म्हणतोस तर तेच स्वतः का नाही आले त्यांच्या सीतेपाशी ? कसे आहेत ते ? आता कसे दिसतात ? अंगकाठी अगदीच बदलली आहे का रे ? आबाळ झाली असेल अगदी माझ्याविना ? लक्ष्मण कसा आहे ? तो तरी किती किती म्हणून करील म्हणा भावाचं ? सगळा इतिवृत्तांत सांग बघू मला!"
हनुमंतांनी माईंची आज्ञा प्रमाण मानली आणि आजवरची सगळी गोष्ट सविस्तर सांगायला पुन्हा एकदा सरसावून तयार झाले. आणखी मोठं भाग्य ते काय असायचं स्वामीच्या त्या दासासाठी ? स्वामींच्या पत्नी, साक्षात लक्ष्मीस्वरुप सीतामाईंना श्रीरामांच्याच गोष्टी सांगायचा योग नशिबी हो ! मनात सीतामाईंना शोधल्याचं समाधान होतंच पण स्वामींनी तत्क्षणी इनाम बहाल केल्यासारखे आनंदून गेले रामांची कथा सांगायची म्हटल्यावर.
आणि आता मारुतीराया...
माईंच्या सूचनेनुसार श्रीराम कसे दिसतात आता, त्यांची तब्येत ठीक आहे ना इथपासून ते लक्ष्मणाच्या सोबतीपर्यंत सगळं काही सांगू लागले एकामागोमाग एक !
कसे दिसतात रामराया ?
रुप म्हणजे काय सांगावं अहो ? याहून देखणं कुणीही नसावं या विश्वात असं रूप. पण हो...केवळ बाह्य रुप नव्हे बरं...त्यांच्याइतकं सुंदर निर्मळ चित्तदेखील शोधून सापडायचं नाही कुठेही.
त्यांचे डोळे ?
अजूनही होते तसेच आकर्ण डोळे आहेत हो. कमळासारखे. उगीच का राजीवलोचन म्हणतात माझ्या स्वामींना.
नाही म्हणायला अश्रूंनी भिजून भिजून थकले असावेत... "माझ्या सीतेला पाहिलंत का रे कुठे ?" हा एकच प्रश्न विचारीत असतात भेटेल त्या प्रत्येकाला श्रीराम.
नरांना - वानरांना, पशूंना - पक्षांना, झाडांना - वेलींना, नद्यांना - घाटांना, पर्वतांना - देवतांना, वाटांना - बेटांना, रानांना - पानांना, वाऱ्याला - झऱ्याला, गायींना - वासरांना, सगळ्या. . . . . सगळ्यांना !
कानांत कुंडलं आहेत देखणी. कुणी म्हणतं मकराकार आहेत ती. मी त्यांच्या चरणांशीच इतका गुंतलेला की इतक्या सगळ्या अचेतन गोष्टींचा आकार उकारांकडे माझं लक्षच गेलं नाही कधी आई. पण आहेत कानी कुंडलं.
रामांची नासिका म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीच्या प्राणांची स्थिती त्यामुळे कायम आहे अशी जागा. विश्वातल्या अगणित जीवांच्या श्वासांत वसलेल्या श्रीरामांचे श्वास ज्या वाटेने आत - बाहेर करीत असतात ती वाट म्हणजेच या जगताची निजसुखस्थिती नव्हे काय ?
चेहरा ?
निव्वळ निष्कलंक नितळ अवर्णनीय मुखचंद्र !
साक्षात ब्रह्मादि देवांनाही ज्याच्या दर्शनाची आस असाच आहे चेहरा अजूनही.
दंतपंक्ती ? जणू ओंकारश्रुती !
ललाटी ? प्रासादिक पिवळ्या रंगाचा केशर टिळा.
शंखासारख्या आकाराचा कंठ ? वेदशास्त्रवचनांची ये-जा करण्याची सवयीची वाट आहे ती.
पिवळा पितांबर नेसला आहेच पण नीट पाहिलं की जाणवेल की देवांनी जे नेसलं आहे त्याला चिदंबर म्हटलं पाहिजे खरं तर !
आणखी काय सांगू माई ?"
मारुतीरायांनी भानावर येत विचारलं.
"लक्ष्मण ? बरा आहे ना तो ? मी फार बोललो होते त्याला !"
"हो हो. भ्राता लक्ष्मण म्हणजे रामप्रभूंचा खराखुरा निजसखा ! आहेच की तोही त्यांच्यासोबत. पण खरं सांगू का माई ? तुम्हाविण अगदी दुःखी कष्टी झालेत सारे. पण आता फार वेळ नाही. रामरायांची नि तुमची भेट आता फार दूर नाही."
एकनाथ महाराज लिहितात की मारुतरायांचं ते वाक्य ऐकून माईंनी हनुमंतांना अगदी आपल्याच लेकरासारखं, पोटच्या पुत्रासारखं जवळ घेतलं आहे थेट.
हर्ष न माये पोटीं । संतोषाचिया कोटी ।
तेणें सुखें सीता गोरटी । घातली मिठी हनुमंता ॥
वानर वदे मनुष्यवाणी । श्रीरामकथा त्याचे वदनीं ।
जिये कथेच्या श्रवणीं । भवबंधनीं निर्मुक्त ॥
ऐकतां वानराच्या गोष्टी । सत्य श्रीरामासी जाहली भेटी ।
निरसोनियां दुःखकोटी । ओतिली सृष्टी सुखरूपें ॥
हर्षाचिया लवलाह्या । स्वानंदें पसरोनि बाह्या ।
आलिंगिलें कपिराया । जिंवी कां माया प्रियपुत्रा ॥
माझे रामराया नि भ्राता लक्ष्मण दोघंही सुखरुप आहेत, बल - धैर्य - शौर्य आणि वीरता अंगी राखून आपल्या शोधांत इकडे येत आहेत हे ऐकून सीतामाई आनंदून गेल्या अगदी. हनुमंतांना म्हणाल्या,
"जीव अगदी निवला हो आज. किती किती कसे कसे वाईट साईट विचार मनी येत राहात आजवर...काय काय सांगू रे ! पण आज तुझ्याकडून माझ्या रामांची ख्यालीखुशाली ऐकली आणि निश्चिंत झाले अगदी. काय रे देऊ तुला ?"
दास आणि भक्त यातला फरक म्हणजे काय तर मारुतीरायांचं हे उत्तर.
"स्वामींचं काम करण्याच्या बदल्यात दासांनी काही मागायचं नसतं पण तरीही सांगतो की काहीही निराळं नको आई...फक्त पुन्हा पुन्हा श्रीरामांची आणि आपली सेवा करायची संधी नि पुन्हा पुन्हा श्रीरामकथा, श्रीरामनाम ऐकायचं भाग्य देऊ करा बरं."
पुढच्या क्षणी सीतामाई म्हणाल्या,
"हनुमंता होई चिरंजीवी । तें ही जीवित्व ज्ञानानुभवी ।
नित्य नवे सुखसंभवीं । श्रीरामपदवीवैभवें ॥
चिरंजीव सुखानुभवी । बळ प्रज्ञा आणि यशस्वी ।
याहून तुझी अधिक पदवी । देवीं दानवीं देखिजे ॥"
इतकं सीतमाई बोलल्या मात्र तद्नंतर फार भावुक झाल्या.
"शतयोजन सिंधु लांघून इथवर आलास, लंकाधिपती रावणाच्या अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील असा पराक्रम तूच गाजवू शकतोस. मारुती...माझ्या रामांना इथे घेऊन ये रे मारुती...माझ्या रामांनी इथे घेऊन ये...ताबडतोब...शक्य तितक्या लवकर. जन्मभर तुझी ऋणी राहिन, तू रामांचा दास ना रे तशी तुझी दासी मी होईन, तुझे हे चरण या केशसंभाराने झाडेन हवं तर पण माझ्या रामांना इथे घेऊन ये रे..."
असं म्हणत म्हणत त्या हनुमंतांच्या चरणी कोसळल्या.
आईचं रडू लेकराला का हो उमगणार नाही ?
त्यांनी हळूवारपणे सीतामाईंना सावरलं आणि स्फुरण चढल्यासारखे तयार झाले. म्हणाले,
"आई ? का व्यर्थ रडता आता ? हा तुमचा पुत्र असताना ? ऐका माझं... असं करा...तुम्हीही खुणेसाठी काहीतरी द्या माझ्यापाशी. रामांची मुद्रिका पाहून आपण माझ्यासारख्या वानराच्या शब्दावर विश्वास ठेवलात ना ? तशीच खात्री रामांचीही पटायला हवी की मी खरंच आपल्याला भेटून त्यांच्याकडे परतलो आहे."
तितक्यात त्यांना अचानक काहीतरी आठवतं नि म्हणतात,
"किंवा आई आई...असं करता का ? कशाला ही खूण आणि ते सगळे खटाटोप ? आपणच माझ्या पाठीवर बसून चला बरं थेट प्रभूंपाशी. प्रश्नच मिटतील सगळे. हो हो...असंच करु आपण आई ! एवढा मोठा धोका पत्करायलाचा नको आणखी. हे राक्षस सगळे उलट्या काळजाचे. कधी काय करतील सांगता येतं काय ? रावण मनी कपट बाळगून आहे म्हणून तसा थेट आपल्या जीवाला हानी करायचा नाही, पण ती शूर्पणखा ? तिचा केवढा राग आहे रामांवर नि लक्ष्मणावर ? तिने काही केलं म्हणजे हो तुम्हाला ? आता असं तुम्हाला सोडून मी जायचोच नाही. चला चला. निघूया त्वरित. एका उड्डाणात पैलावर नेतो आणि तिथून पुढे थेट श्रीरामांकडे. आणि मुळीच घाबरू नका...इंद्रजित, कुंभकर्ण कुणीही आडवे येऊ द्या, अगदी तो रावण स्वतः आला तरी त्याला चांगला उभा आडवा आपटून काढीन नि तुम्हाला सुखरुप रामांपर्यंत घेऊन जाईन नक्की."
सीतामाईंना काय करावं कळेना. पण एकंदर समोर दिसणारं हे बलदंड प्रकरण नि त्याची साधारण भाषा ऐकून बकुळीसारख्या नाजूक नि त्यातही पतीविरहाने त्रासलेल्या जानकीमाता अगदीच घाबरल्याच हो. म्हणाल्या, "नको रे बाळा ! तुझ्या वेगापुढे माझी शाश्वती नाही काही. आणि मधूनच राक्षस उभे ठाकले मग ? तू लढशीलच पण मी त्या कचाट्यात अडकेन. नाही नाही. हे असं काही नको करायला बाळा."
मारुतीराया म्हणतात, "आई ? अगं फक्त या शेपटीच्या माऱ्याने कोटी राक्षस ठार करील हा हनुमंत. अरबोंनी राक्षस अवतरले ना समोर तरी केवळ या शेपटाच्या प्रतपाने सगळ्यांना संपवू शकेल तुझा पुत्र."
पुढे रामायणाच्या संदर्भानुसार तुझी शेपटी ती रे केवढी अशी या सीतमाईंच्या प्रश्नावर मारुतीरायांनी त्यांच्या शेपटीच्या पराक्रमानं मांडलेल्या आजवरच्या उद्योगांविषयी थोडक्यात वर्णनं सांगितली सीतामाईंना.
हा मारुती काही ऐकत नाही आपलं हे जाणून त्यांनी आता शेवटचं कारण सांगितलं. "पुत्रा, श्रीरामांव्यतिरिक्त इतर कुणीही म्हणजे परपुरुष. परपुरुष आरोहण म्हणजे पतीव्रतेच्या जीवनातील सर्वांत घोर पाप. ते का करू रे मी ?"
इथे यही हनुमंत सीतामाईंना विनवण्यासाठी बरंच काही सांगतात पण शेवटी सीतामाई एक अगदी सरळ प्रश्न विचारतात आणि मारुतीरायांना पुढे काहीही बोलता येत नाही. सीतामाई म्हणाल्या,
"मला सांग हनुमंता...श्रीरामांची आज्ञा काय ?
सीता शोधावी की सीता शोधुनी आणावी ?"
मारुतीरायांच्या डोळ्यांत पाणी तरळून गेलं क्षणार्धात.
"भावनेच्या भरात स्वामींच्या आज्ञा हेच दासाचं सर्वोच्च प्रमाण हे मी विसरलो खरा, पण आईनं तारलं !"
शेवटी निरोपाचा क्षण येतो. डोईचा चुडामणी सीतमाई हनुमानाच्या तळहाती ठेवतात. मारुतीराया म्हणतात, "असेच तुमचे दागिने सांडले होते विमानमार्गे किष्किंधेवरनं रावण गेला तेव्हा. रामांनी पाहिले तेव्हा ओक्साबोक्शी रडू लागले होते स्वामी. आता काय होईल त्यांचं ? सुखावतील ना ?"
"हो हनुमंता हो...आता उशीर करु नको. स्वामींना निरोप दे की झणि झणि या. आणि लक्ष्मणाला म्हणावं की तुझी माफी मागते आहे ही अयोध्यापती श्रीरामांची पत्नी सीता. तुझ्याशी मी जे काही वागले त्या क्षणी, तुला जे काही बोलले त्याची परिणिती काय झाली तरी ही...राम आणि सीतेच्या मध्ये मैलांचं अंतर, सिंधूसागर आणि कितीतरी पर्वतांचा अडथळा. माफ कर रे मला लक्ष्मणा माफ कर!"
या सगळ्या संवादानंतर मारुतीराया निमूटपणे परत येतील तर ते मारुतीराया कसले हो ! लग्गेच त्यांनी आईकडे हट्ट धरली की या रावणाची चांगली जिरवून जातो. पण पुढच्या परिणामांच्या कल्पनेनं सीतामाईंनी त्यांना बजावलं की काहीतरी वेडेपणा करू नको रे बाळा. शेवटी वाटिकेतली फळं खायची तेवढी परवानगी मिळवायला मारुतीरायांनी प्रयत्न सुरु केले. तरीही सीतामाई म्हणाल्या की,
जंव होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाईं संपूर्ण ।
घालितें श्रीरामाची आण । फळें तोडोन न खावीं ॥
एवढं ऐकलं मात्र आणि दाणकन् उड्डाण करून मारुतीराया उंच जागी जाऊन बसले. पुढच्या कामासाठी सगळ्या परिसराची टेहळणी करीत.
शोकात बुडालेल्या सीतामाईंच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. एक निराळं तेज परतू लागलं होतं. आता माझे नाथ येणार या विचाराने सगळा शोक, सगळे वाईट विचार दूर झाले. मारुतीने जे केलं ते स्वतः राम अवतरल्याविना इतर कुणालाही शक्य नव्हतं.
आता या भागांच्या शीर्षकाचा अर्थ उमगला असेल ना ?
म्हणून मारुतीराया म्हणजे...
"मोहशोकविनाशाय सीताशोकविनाशिने"
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती अर्थात् श्री टेंबे स्वामीकृत मारुती स्तोत्रात आलेलं हे मारुतीरायांचं दोन शब्दांचं वर्णन. पण त्या मागे ही एवढी सगळी गुंतागुंतीची गोष्ट.
संदर्भ -
एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण -
सुंदरकांड अध्याय बारावा आणि तेरावा
#रंजकरामायण - ५
"नव पञ्च च वर्षाणि रामो भवतु तापस:" 
विवाहपश्चात भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या पत्नी मांडवी आणि श्रुतीकिर्तीसह त्यांच्या आजोळी म्हणजेच कैकयीच्या माहेरी, अश्वपती राजाच्या कैकय राज्यात गेले. पुढची बरीच वर्षं तिकडे राहिले. मोठा तपस्वी, तत्वनिष्ठ राजा होता अश्वपती. राज्यही तसंच होतं. त्यांच्या राज्यात म्हणे एकही घर अग्निहोत्रहीन नव्हतं. कुणीही चोऱ्यामाऱ्या करीत नसे. तत्वांचं तेज दारोदारी होतं.
इकडे अयोध्येत एके दिवशी दशरथ राजांना वाटलं, 'आता आपलं वय बरंच झालं तेव्हा चार पुत्रांपैकी एकाकडे राज्याचा कारभार सोपवावा, युवाराज्याभिषेक करावा.'
साहाजिकच रामांशिवाय दुसरं कोण ?
रामच का या प्रश्नाची एक दोन नाही तर कितीतरी उत्तरं होती हो!
साक्षात नारायणाचा अवतार, पोटी जन्माला येऊन आईबापालाच धन्य करणारे, राजाला साजेसं रुपही आहे त्यांच्यापाशी.
आणखी ? शिवशंकरांचं धनुष्य वाकवण्याइतकं बाहुबल बाळगून आहेत, पराक्रमी आहेत. एकमेवाद्वितीय आहेत, या सम हाच, याच्यासारखा दुसरा नाहीच. कुणी आपल्याशी बोलायला येईल याची वाट बघत न राहता स्वतः पुढाकार घेऊन, आग्रहानं, निरहंकार वाणीने आणि अगदी मृदू बोलतात. निगर्वी आहेत. अनाथांचे नाथ आहेत, जो सगळ्यांत जास्त पीडेत असेल त्याला नक्की पोटाशी धरणारच. असत्याला त्याची जागा दाखवताना कचरत नाही. शासनप्रिय असले तरी त्यातही परिवर्तनाच्या हेतूनेच कार्य करतात. वडिलधाऱ्यांचा आदर करतात. किती किती काय काय सांगायचं ?
जनतेला विचारलं, मंत्र्यांना विचारलं...त्यांनाही रामच प्रिय!
मग काय ? ठरलं तर...उद्याच सकाळी युवराज्याभिषेक.
पण नियतीचं म्हणणं देवांनाही ऐकावंच लागतं ना हो !
मंथरेच्या मनातल्या कुबुद्धीच्या लाटा राणीच्या विवेकाला फोडत तिच्या मनाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आणि दशराथ राजा अक्षरशः दुःखात बुडाले कैकयीची मागणी ऐकून. चिक्कार विनवण्या केल्या. हात जोडले.
"नको गं असं करू कैकयी ? अगं तूच ना कौसल्येला म्हणायचीस हा राम माझा नि भरत तुमचा ? मग आता का असं म्हणतेस ? तू म्हणतेस तर रामाला राजगादीचा अधिकार देत नाही...भरताला बोलवून घेऊ नि त्याला युवराज करु. पण चौदा वर्षांचा वनवास ? पुत्रवियोगाचं हे दुःख का गं माझ्या पदरी टाकतेस ? का म्हणतेस असं की माझ्या रामाला मी वनात पाठवावं ?"
राणी ऐकत नाहीच. रात्र तशीच सरते.
प्रहराचा एक एक क्षण दशरथांना मृत्युच्या दरवाजाकडे नेत राहतो.
उगवतीच्याही आधी युवराज्याभिषेकाच्या नियोजनानुसार सुरु झालेल्या यज्ञविधीत बसलेले श्रीराम...त्यांना तसूभर कल्पनाही नाही हो आपल्या पित्याच्या काळजात घोंघावणाऱ्या जीवघेण्या वादळाची.
छान मोरपंखी रंगाचं सोवळं लावून बसलेत. कपाळाला चंदन आहे, अंगावर सुरेख काठाचं उपर्णं घेतलंय, सुगंधी अत्तरानं देह दरवळतोय, अग्निज्वाळांच्या किंचित दाहाने चुरचुरत असले तरी पाणीदार दिसतायंत डोळे. मुखावर सूर्याला उगवायला भाग पाडील असं प्रसन्न हास्य आहे. लक्ष देऊन मंत्रोच्चार ऐकतायंत. अधिकारी ब्रह्मवृंदाच्या म्हणण्यानुसार एकेक आहुती सोडतायंत अग्नीत.
तितक्यात सुमंत्र स्वतः निरोप घेऊन आले...
"पिताश्रींची तब्येत नाजूक आहे,
त्वरित कैकयी देवींच्या कक्षाकडे चला."
यज्ञ, राजगादी, युवराज्याभिषेक, सोवळ्याचं पथ्य सगळं सगळं विसरुन अक्षरशः धावले हो राम...काय झालं असेल माझ्या बाबांना या विचारानं कासाविस होऊन धावले!
पोहोचताक्षणी सगळा प्रकार कळला.
'एवढंच ना' म्हणत हसतमुखाने स्विकारला.
कैकयीला म्हणतायंत,
"आई...अगं भरतच अधिक पात्र आहे माझ्याहून या राजगादीवर बसण्याच्या. मी आपला विश्वामित्रांनी आणि वसिष्ठांनी वर्णनात सांगितलं होतं तशा रम्य वनातच जातो आता. तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींकडून आणखी ज्ञानार्जन करीन, रयतेला त्रास देणाऱ्या असुरांना धनुष्यानं पाणी पाजीन...सुखात राहीन. त्याहीपेक्षा मोठा आनंद म्हणजे माझा सगळ्यांत लाडका भाऊ...भरत राजा होईल ना ? पिताश्रींची आज्ञाही आहे, तुझी इच्छाही आहे. सारंच मला अनुकुल आहे की. मग या परिस्थितीतही मी जर वनात जायला नकार दिला तर लोक मूर्खांच्या यादीत माझं नाव सर्वांत वर लिहितील. म्हणतील...कल्पतरु सोडून बाभळीचे काटे रुजवणारा होता राम, अमृताचे कुंभ सोडून विषाची कुपी का निवडतं कुणी ? तेव्हा तू म्हणतेस तसंच करु आई!"
मकरंदबुवा रामदासी त्यांच्या कथेत श्रीरामांचे गुण आणि आदर्श याविषयी बोलताना वर्णन करतात त्याप्रमाणे...
'नित्यप्रशांत' होते श्रीराम.
बहुतेकवेळा शांत, बरेचदा शांत, शक्यतो शांत, अधिकतः शांत, अमुक अमुक वेळ येईपर्यंत शांत असलं काही नाही...
'नित्य' प्रशांत!
शब्दांकन : #कौस्तुभअरुण
© कौस्तुभ अरुण आठल्ये, रत्नागिरी.
#रंजकरामायण - १
"मिटण्या झाले अधीर लोचन" 
एक पंख छाटला गेला होता हो...
राम आले.
किलकिल्या डोळ्यांना फक्त इतकंच कळलं की माझे राम आले. उरल्या सुरल्या ताकदीनिशी फडफड केली. मोठ्या कष्टानं त्राणहीन पायांवर देहाचा भार तोलायचा खटाटोप मांडला. पण जमलं नाही. तसेच पुन्हा मातीत कोसळले.
रामांनी धनुष्यबाण खाली ठेवले. चट्दिशी गुडघे दुमडुन शेजारी बसले. हळूवार स्पर्श करत जटायुंचं मुख आपल्या मांडीवर घेतलं. लक्ष्मण पात्रात पाणी घेऊन उभा राहिला. स्वतः रामांनी अतिशय हळूवारपणे आपल्या हातांनी त्यांची ती जखम धुवून पुसून काढली.
जटायु महाराजांचे डोळे सताड उघडले गेले होते एव्हाना.
ज्या क्षणासाठी इतकी इतकी शतकं जगलो, उडत राहिलो कडे कपाऱ्यांमधून, पोटाची भूक भागवण्यासाठी अगणित जिवांचं भक्षण केलं तो क्षण आला. अवतरला डोळ्यांदेखत.
बराच वेळ काहीच बोलले नाहीत. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहात होतं. समोर साक्षात रघुकुलदीपक प्रभू श्रीराम दिसतायंत म्हटल्यावर काय होणार हो दुसरं...
आषाढाचा पाऊस पोटाशी घेऊन हिंडणाऱ्या आभाळासारखा नीलश्यामलवर्ण, स्वतः लक्ष्मीदेवींनी आंजारुन गोंजारुन फुलवली असावीत अशा कमळांसारखे डोळे, लांबसडक वाढलेला केशसंभार, पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रभेसारखा चेहरा, दीर्घ ठेवणीचं नाक, अगदी सारख्या आकाराचे किंचित मोठे वाटावेत असे कान, चारही वेदांचं ज्ञान अंगठ्याच्या कोपऱ्यावर सामावू शकणारे मृदू हात, समचरण, कानात कुंडलं, कमेरेला साधंसंच अधोवस्त्र, गळ्यात एकावली आणि अपार करुणेने भरलेली दृष्टी!
रामांनी विचारलं, "जटायु, का हो आपण इतके कष्ट घेतलेत या अभाग्यासाठी ? प्राण गमावेपर्यंत लढलात ?"
जटायु महाराज म्हणतायंत, "जटायु रामाला आणखी काय देणार ? सेवा सोडून दुसरं काहीच करण्यासारखं नाही आपल्यासाठी. तीच आमची योग्य जागा. तेच आमचं परम् कर्तव्य."
राम म्हणाले, "अपहरणाक्षणीच उडत उडत मला शोधत का नाही आलात ? या जुन्याजीर्ण पंखांनी विमानात स्वार, शस्त्र अस्त्रांनी सज्ज, बलाढ्य राक्षसाला आव्हान दिलंत ? मला शोधत यायचं होतं. मी लढलो असतो त्याच्याशी."
इतक्या हळव्या क्षणीही जटायुंच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. लक्ष्मणाला कळेना की दादा काहीतरी विचारतोय यांना, प्राण यांचे कधीही जातील नि हे अशावेळी हसतात का ?
रामांनी पुन्हा विचारलं, "काय झालं ? हे स्मित कशासाठी ? सांगा...कशासाठी असे जीवावर उदार होऊन लढलात ? का नाही शोधलंत मला ?"
जटायु महाराजांनी आदराने मान लवली आणि म्हणाले,
"देवा...हजारो वर्षं जगल्यानंतरही जटायु नावाच्या कुण्या पक्षाला देवांना शोधत हिंडावं लागलं हे तुमच्या कीर्तीला रुचणारं नाही. भक्तांनी देवाला शोधायचं नसतं, निरपेक्ष मनाने अगदी गतप्राण व्हायची वेळ आली तरी केवळ सेवा याच गोष्टीवर निष्ठा ठेवून पुढे जायचं असतं हेच खरं ना ? आता जगाला सदैव लक्षात राहिल की त्यांच्या लाडक्या सीतामाईंनाही शोधण्यापूर्वी देवांनी त्यांच्या भक्ताला शोधून काढलं. साक्षात पित्याचे अंतिम संस्कार करायला हजर राहता आलं नाही त्यांना त्यांच्याच योजनेच्या रेट्यापुढे पण मन लावून त्यांची सेवा करणाऱ्या भक्ताच्या अंतिम संस्कारांना मात्र स्वतः आले. हीच तुमची कीर्ती आचंद्रसूर्य त्रिभुवनात गाजायला हवी. तीच आमचीही कीर्ती!"
इतका वेळ केवळ जटायुंच्या डोळ्यांतून ओघळणारं पाणी एव्हाना रामांच्याही डोळ्यांतून सांडू लागलं होतं.
© कौस्तुभ अरुण आठल्ये, रत्नागिरी.
#रंजकरामायण - १२
"कुठे शुभांगी क्षमा - कन्यका ?" 
सीताविरहाचा प्रचंड शोक आणि करुणाद्र चित्त घेऊन अहोरात्र वेदना सोसणारे प्रभू राम आणि आपल्या दैवी भावाला दुःखात होरपळताना पाहून व्यथित असणारा लक्ष्मण सर्वदूर हिंडतायंत नुसते.
भावार्थ रामायणात नाथ महाराज या प्रसंगाचं वर्णन करताना म्हणतात,
पूर्णिमेची रात्री शोभयमान । तृणशेजे रघुनंदन ।
करिता जाला सूखें शयन । करीं पादसंवाहन सौमित्र ॥
मंद गार वारं सुटलंय. झाडं वेलींशीही बोलू जावं, प्राण्यांनाही विचारावं की "माझी सीता कुठे दिसली का हो ?" इतके अगतिक झालेले श्रीराम दिवसभराच्या कष्टाने थकलेत अगदी. ज्या तान्हुल्या पायांनी दशरथ - कौसल्येच्या घरादारात भगवंताच्या सहवासाचं भाग्य आणलं ते पाय आता काट्याकुट्यांनी भरलेत. तापलेल्या जमिनीवर चालून चालून पोळलेत. "सावळा गं रामचंद्र, माझ्या मांडीवर न्हातो" सारखी गोड गोड स्वरांतली गाणी म्हणीत आयाबायांनी ज्या देहाला न्हाऊ माखु घातलं एकेकाळी मायेने, तो सावळा सुकुमार देह आता आरमळला आहे अगदी.
समर्पण म्हणजे काय याचं सर्वोत्तम उदाहरण असणारा भाऊ, लक्ष्मण, दादाचे पाय चेपतो आहे हळूहळू. अयोध्येचा राजा वनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात गवताच्या अंथरुणावर पहुडलाय. दुःखात बुडालेला. मिटलेल्या डोळ्यांवर ग्लानीने अगदी पूर्ण ताबा घेतला आहे आता जणू. चंद्रासामोरा आलेला किंचित आडोसा सरला नि रामांच्या शिरावर चांदण्याचा अभिषेक करण्याचा मोह चंद्रालाही आवरला नाही. गंगेच्या पवित्र जलधारांनी जशी महादेवांच्या सर्वांगाची लाही शमवावी तशीच आपणही या थकल्या देहावर फुंकर घालू म्हणून चंद्राची किरणं रामांच्या अंगाखांद्यावरून ओघळू लागली मात्र...
अचानक त्रासून उठले प्रभू राम.
पायांपाशी बसलेल्या लक्ष्मणाला म्हणाले,
"ही सूर्याची प्रखर तेजस्वी किरणं सोसत नाहीत रे. चल आपण एखाद्या झाडाखाली छायेत बसू."
लक्ष्मण बुचकळ्यात पडला. तो म्हणाला, " दादा अहो रात्री कुठला सूर्य, कुठली किरणं नि कसली प्रखरता ? हा बघा आभाळात कसा चंद्र लखलखतोय. त्याचं हे शीतल चांदणं पाहा. काय नितळ असायचं हो याहून ? अमृतच पाघळतंय जणू आभाळातून. नाही का ?"
राम किंचित हसले. म्हणाले, "हे आभाळातलं प्रतिबिंब दाखवून मला सांगतोयंस की याहून शीतल काय असेल ? अरे माझं बिंब काय निराळं आहे का ? रामचंद्र माझं नाव. पण या प्रतिबिंबाचं ते काय कौतुक. त्यावरचं मृगचिन्ह पाहून मला सीता आठवते. कुठे आहे रे माझी सीता ? तिच्याविना ही रात्र का उगवते ? का येतो हा चंद्र आभाळात ? सीतेविना एकट्या पडलेल्या या रामाला त्याची किरणं नाही रे सोसत."
लक्ष्मणाला एव्हाना या सगळ्याशी कितीही ओळख झाली असली तरी तोही क्षणभर बावरलाच.
प्रभू म्हणतायंत, "लक्ष्मणा...माझे शब्द नीट लक्ष देऊन ऐक. दडवून टाक हा चंद्र. नाहीतर माझा संताप अनावर होईल बरं. घात होईल चंद्राचा."
लक्ष्मण शक्य तितक्या संयमाने हळूवारपणे रामांना वारा घालीत म्हणतो आहे, "की दादा असं चंद्राशीच का हो द्वंद्व मांडता ?"
रामांना अगदी सुगंधी फुलांचा शेजार असलेल्या जागी निजवायचा प्रयत्न केला तरी म्हणू लागले की सर्वांगाला काटे बोचतात रे सौमित्रा. चंदन लावावं अंगाला तरी म्हणतात काय रे भावाच्याच देहाला आगीत लोटतोस. अगदी पुरते पुरते अगतिक झाले. वृक्षांना कवटाळून हणू लागले "माझी सीता माझी सीता", पाषाणांना छातीशी घेऊन म्हणू लागले "माझा सीता माझी सीता".
किती ते धारदार दुःख असेल हो ? किती जीव असेल सीतेवर ? कल्पना करा...साक्षात भगवंताचा अवतार, मानवी देहाची फक्त सोय, पण त्यातही पत्नीवर किती ते प्रेम !
लक्ष्मणाला म्हणतायंत प्रभू राम, " रच सोमित्र सरण रच. माझा मृत्यु अटळ आहे आता."
हे सगळं घडत असताना भगवान शंकर आणि देवी उमा कैलासावरून सारं पाहात होते. रामांची ही अवस्था पाहून देवी विचारतायंत की, "का हो देवा ? पूर्णब्रह्म पूर्ण का काय म्हणता ना तुम्ही रामांना ? हे असे श्रीराम ? यांच्या नावाचा जप करीत असता तिन्ही त्रिकाळ ? विषयासक्त, स्त्रीकामार्थी, तीव्र आकांक्षांना शरण जाणारे, रडणारे, तडफडणारे हे तुमचे राम म्हणे पूर्णब्रह्म ?"
भगवान शंकर अगदी शांतपणे स्मितहास्य करीत म्हणतायंत, "हो. हेच पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ. यांच्याच नावाची या सांबालाही आसक्ती. यांच्याच नामाचा मलाही मोह!"
पार्वती देवी आता मात्र चिडल्या. उपहासाने जे काही बोलल्या रामांना त्यानंतरही महादेवांचं शांत उत्तर ऐकून म्हणाल्या, "मी या रामांचं खरं रूप दावू तुम्हाला ? मग कराल मान्य ? की काही पूर्णब्रह्म वगैरे नाहीत राम ? तुमची परवानगी असेल तर क्षणात एक खेळ दावते."
महादेव म्हणाले, "तुझा हट्टच आहे तर हरकत नाही, पण सावधपणे बरं ! अवघ्या विश्वाचा पालनहार आहे तो. त्याचा संताप होईल, त्यास आणखी दुःख होईल असं काही करू नको."
पुढच्या क्षणी उमादेवींनी सीतेचं रूप धारण केलं ना हो...
आणि रामांच्या "सीते सीते" अशा करुण हाकांना ओ देत समोरच प्रगटल्या रामांच्या.
रामांनी एकदा त्यांच्याकडे पाहिलं मात्र...
दुसऱ्या क्षणी पाठ फिरवून पुन्हा सीता सीता हाका देऊ लागले. जितक्या वेळा देवी सीतारुपात त्यांच्या समोर आल्या तितक्या वेळा त्याच्यापासून तोंड फिरवून प्रभूराम सीतमाईंना हाका देत राहिले. लक्ष्मण सारं काही शेजारीच उभं राहून पाहात होता.
तो रामांना म्हणतोय, " देवा...अहो त्या पाषाणांना कवटाळून माझी सीता माझी सीता म्हणीत होतात इतका वेळ. आता माई साक्षात सामोऱ्या आहेत, सापडल्या आहेत तरी असं तोंड का फिरवता ?"
प्रभू रामांनी लक्ष्मणालाही ही त्याची वहिनी वाटावी यावरनं त्याला खडे बोल सुनावले. तरीही लक्ष्मण बोलतच होता. "का असं करता देवा ? अहो समोर उभ्या आहेत सीतामाई!" मग रामांनी धनुष्यबाणच उचलला. आता मात्र लक्ष्मण पूर्ण मौन झाला. मुखातून एक शब्दही आला तरी आता आपली खैर नाही याची जाणीव अगदी व्यवस्थित झाली त्यास.
हे सारं दृश्य पाहणारे स्वर्गलोकांतील देवही बुचकळ्यात पडले. अशोकवनीच्या पहाऱ्यातून सुटून जानकी वनात कशी बरं आली असेल ? सगळ्यांनाच प्रश्न पडला.
प्रभूराम काही आपल्याला दाद लागू देत नाहीत हे पाहून आता उमादेवींनी आणखी खटाटोप मांडला. म्हणाल्या, "अहो काय हे तुमचं वागणं ? स्वतःच्याच भावाला मारायला धावाल ? पूर्णब्रह्म राम ना तुम्ही ? स्वतःच्या भक्त, सखा, बंधु असलेल्या व्यक्तीच्या विनवण्याही कळत नाही तुम्हास ? स्त्रीविरहाने असे रडता पडता ? क्रोधित होता ? विवेक विसरता ? मी दडूनच बसले होते मुळी. तुम्ही कसे वागता माझ्या अनुपस्थितीत ते पाहायला. तुमची ही अवस्था मात्र पाहवेना म्हणून झणि झणि धावत आले. पुरे झाले आता. चला पंचवटीत परत जाऊ. फार काळ उरला नाही आता. उरलेल्या वनवासाचे दिवसही सरतील. मी आहे ना सोबत. चला."
रामांनी हे सारं शांतपणे ऐकून घेतलं. एकदा अगदी करुण डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं मात्र आणि हात जोडले. प्रभूराम म्हणाले...
"आई जगदंबे...का गं लेकराला फसवतेस ? किती गं मी दीन अवस्थेत आहे आज. तरीही का गं असं करतेस ? आई तुकाई ? मी का ओळखली नाही तुला ? शिवांच्या शेजारी कैलासावर विराजमान होऊन सारं पाहते आहेस ना ? का गं माझ्या सीतेचं रुप धारण करुन माझी परीक्षा पाहतेस ?"
रामांचे हे बोल ऐकून स्वतः लक्ष्मण, स्वर्गलोकातील सुरवर आणि सारे अंतर्यामी ऋषिश्वर अचंबित झाले. हे काय बोलतात श्रीराम ? आई तुकाई ? साक्षात देवी जगदंबा ?
इतकं ऐकलं मात्र...
पुढच्या क्षणी देवींनी सीतारुपाचा त्याग केला. मू़ळ रुपात प्रगटल्या. म्हणाल्या, "माफ करा रामा. हो मीच शिवांची शक्ती. तुमचा विरहाचा त्रागा पाहून शिवांना म्हणाले हे कसले पूर्णब्रह्म रघुनाथ. पण देवादिकांनाही जे ओळखलं नाही ते तुम्ही घटकाभरात जाणलंत."
तरीही रामांच्या या विरहाने व्यथित अगतिकतेचा उलगडा न झाल्यानं देवी विचारतायंत, "की प्रभू रामा...आपण तर पूर्णब्रह्मस्वरुप...मग हे का हो असं वागता ? या वृक्षांना कवटाळता ? पाषाणांना छातीशी धरता ? यातलं खरं काय हो ? सांगा मला. सत्याच्या ज्ञानापासून असं वंचित ठेवून जायला सांगू नका."
नेहमीप्रमाणे स्मितहास्य करीत राजीवलोचन श्रीराम म्हणतात, "ते तुम्हाला स्वतः महादेव सांगतील की. ते सारं जाणतात. माझ्या प्रत्येक स्वरुपाचं ज्ञान त्यांना आहे. तेही पूर्णज्ञानी आहेत."
हे रामांचं बोलणं ऐकून ते काय सांगू पाहतायंत ते देवींनी जाणलं. म्हणाल्या, "हो. गुरुवचनाप्रमाणे असणारं पतिवचन दुर्लक्षित करून ज्ञानाभिमानानं पछाडून गेले नि तुमची परीक्षा पाहण्यास आले. माफ करा मला."
पुढे पुन्हा म्हणाल्या देवी की,
"तुमच्या दर्शनाने सारा अहंकार निमाला. सारे पाश तुटले. आता नाही राहिला दुराभिमान. मला सांगा ना हो या सगळ्यामागची योजना."
रामांनी पुन्हा तसंच स्मितहास्य केलं आणि म्हणाले,
"अभिमान या शब्दाचा अंशही नसलेले भक्त पाहायचे आहेत देवी ? हे पाषाण पाहा. हे गवत पाहा. ही झाडं पाहा. अहो यांनी युगं युगं माझ्या कृपेसाठी उपासना केल्या आहेत. पण विश्वाच्या रामरगाड्यात यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो म्हणून आता चक्क माझ्या वाटेवर, माझ्या पायातळी येऊन बसले आहेत हे. पूर्वजन्मीचे ऋषिश्वर आहेत, उपासनेने भगवंताच्या प्रेमाची पखरण अनुभवण्यासाठी आसुसलेले सज्जन आहेत किती किती. कुणी वृक्ष होऊन उभा आहे इथे गेली किती तरी वर्षं की रामअवतारात मी इथवर येऊन त्यास भेटेन म्हणून. कुणी माझा देह जमिनीवर निजवू नये म्हणून तृणाच्या रुपानं मातीत लोळतोय. कुणी पर्वत होऊन उभा ठाकलाय अंगाखाद्यांवर वनराजींचा भार घेऊन. त्या माझ्या निस्वार्थी परमभक्तांना आलिंगन देताना जगाला मी वेडापिसा झालेलाच दिसणार. पण हे पाषाण नाहीत गं. माझ्यावर अपार प्रेम करणारे माझे भक्त आहेत कधीकाळचे. त्यांना पुढची वाट दाखवायला नको ? किती काळ ताटकळत ठेवू त्यांना ? आणि मग भक्तांच्या कल्याणासाठी रडण्या पडण्याची, रानावनांत हिंडायची, डोंगरदऱ्यांतून धावायची कशाला गं लाज बाळगू आई ?"
पुढे श्रीराम सांगतायंत की,
"जगदंबे...सदैव हे जाण की माझं एकही पाऊल व्यर्थ पडत नाही. सगळ्यामागे एक योजना आहे. साक्षात शिवसमर्थ हे जाणतात. पण सगळ्यांनाच योजनेचा आवाका उमगत नाही. आज तो डोळ्यांना दिसत नाही. माझं हे रुप म्हणजे मी नाही. माझा फक्त हा अवतार म्हणजे मी नाही. मी कोण सर्वांठायी आहे आई !"
हे ऐकून स्वतः देवी उमा, लक्ष्मण, सुरवर, ऋषिश्वर सगळ्यांचे पूर्ण समाधान झाले. सगळ्या वेड्यापिशा वागण्यामागचा हिशोब उमगला. विशाल विश्वाच्या पालनकर्त्याच्या करुण, भक्तप्रिय ह्रदयाची व्याप्ती आपणासारख्या पामरांना उमगणे कदापि शक्य नाही याची अनेकांना एकाचवेळी पूर्ण जाणीव झाली.
सारा दाह निमाला आणि शांतशीतल चांदण्यानं पुन्हा चराचराचा ताबा घेतला. रामचंद्र आणि महादेव आपापल्या जागी मंदस्मितहास्य करीत होते.
नाथांच्या भावार्थ रामायणातून एक एक गोष्ट टिपून मी हे माझ्या शब्दांत लिहित होतो तेव्हा रामराया असेच हसत असतील फक्त. तुम्ही हे वाचत होता तेव्हा तुमच्याही पाठीवरनं फिरला असेल ना त्यांचा हात ?
कारण अहो,
सगळ्यामागे एक योजना आहे. 
संदर्भ :
भावार्थ रामायण, अरण्यकांड अध्याय २०
Disclaimer -
This is an interpretation of Scripts written by Marathi saint, developed with only intention of "Prachar Prasar" of greatness of Shriram. The original scripts and its interpretation may vary from this particular write up as this is personal piece of linguistic art distributed among readers for above mentioned purpose.

No comments:
Post a Comment