कुडाळ परिसरातील गड्,कोट म्हणले कि बहुतेकांना थोडाफार रांगणा उर्फ प्रसिध्दगडाची ओळख असते.वास्तविक रांगणा हा भौगोलिक दृष्ट्या कोल्हापुर जिल्ह्यात येतो.मात्र या बलदंड किल्ल्याला दक्षिण बाजुला मनोहर आणि मनसंतोषगड हे दोन तर उत्तर बाजुला सोनगड व भैरवगड असे दोन पहारेकरी आहेत.हि दुर्गचौकडी मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडते.यातील सोनगड उर्फ नरसिंहगडाची आज आपण ओळख करुन घेणार आहोत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल २३ किल्ले आहेत्,यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण बहुतेकांना सागरी दुर्ग माहिती असतात.सिंधुदुर्गला तर पर्यटकांची जत्रा असते.मात्र याच जिल्ह्याची पुर्व सीमा सह्याद्रीच्या द्क्षिण-उत्तर दिशेने धावणार्या रांगेने आखली आहे.या सह्याद्रीच्या मुख्य रांगेत भैरवगड,सोनगड्,मनोहरगड्,मनसंतोषगड्,महादेवगड्,नारायणगड आणि हनुमानगड आहेत. या बहुतेक दुर्गांना फार एतिहासिक संदर्भ नाहीत. सोनगडाचे थोडे एतिहासिक संदर्भ समजून घेउया आणि मग प्रत्यक्ष गडफेरी करुया.
या गडाची उभारणी नेमकी कोणी केली याबध्दल इतिहास मुग्ध आहे. शिवकाळात या गडाचा उल्लेख येत नसला तरी परिसरातील नरडवे व घोटगे घाट पहाता या घाटांच्या टेहळणीसाठी हा दुर्ग पुर्वीपासून अस्तित्वात असावा. फोंड सावंत (१७०९-३८ ) हा किल्ला बांधल्याचे सांगीतले जाते पण त्याला कागदोपत्री आधार नसुन त्यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली असावी. ५ ऑगस्ट १७०० मधील एका नोंदीनुसार पाटगावचे जनार्दन भट यांना घोटगे घाटातून होणाऱ्या माल वाहतुकीवर जकातीचे काही अधिकार देण्यात आले होते. याचा अर्थ हा घाट आधीपासुनच वापरात होता. १८ व्या शतकात छत्रपतींचे सरदार सावंतवाडीकरांच्या ताब्यात सोनगड होता.पण त्याकाळच्या पत्रात या गडाचा उल्लेख नरसिंहगड असाच येतो.सावंताना छत्रपतींचे अधिपत्य मान्य नव्हते. करवीरकर व सावंतवाडीकर यांच्या सततच्या कुरबुरीत सावंत नेहमी भैरवगड व सोनगड या किल्ल्यास उपद्रव करत पण एप्रिल १७८२ मध्ये रांगण्याचा वेढा उठवल्यावर सावंतानी या किल्ल्यास उपद्रव होणार नाही असे वचन दिले. सन १७८७ मध्ये वाडीकर सावंतानी बादशहाकडून स्वतःसाठी मोर्चेल आणले. करवीरकरांना हे मान्य झाले नाही व त्यांचे नेसरीचे सरदार नरसिंहराव शिंदे व यशवंतराव सहीने यांनी सावंताच्या ताब्यातील सोनगडावर हल्ला करून तो ताब्यात घेतला याच उल्लेख २ जानेवारी १७८८ मधील एका पत्रात येतो. "स्वारी पालेच्या हुड्यावर राहून नरसिंहगड किल्ला सावंताच्या यासी मोर्चे लागू केले". पुढे सावंत व करवीरकर यांच्यात समेट झाला व ५ नोव्हेंबर १७९३ रोजी गड सावंतांना परत करण्यात आला. एप्रिल १७९५ मध्ये सावंतानी धोंडो लेले यास किल्लेदार नेमले. तो उल्लेख असा "राजे खेम सावंत भोसलेंनी किले नरसिंहगडची किल्लेदारी धोंडो लक्ष्मण लेले यांस सांगोन किलेस रवाना केले आहेत.तर मशारनिलेस पन्नास लोकांनिशी व शागीर्द पेक्षा व कारकुन आसामी दहा येकून आसामी साठ किलेस येउन किलेचा पेक्षा व कारकुन आसामी दहा येकून आसामी साठ किलेत घेउन किलेचा बंदोबस्त चौकीपहारेचा करणे व मारबिलेही करतील व किलेत परवानगी रसवानगी लेले मशारनिले याची त्यास त्याचे रजेतलबेत वर्तणुक करणे".
सावंतांच्या गृहकलहात सन १८०५ मध्ये फोंड सावंताच्या विनंतीवरुन करवीरकरांनी सावंताच्या मुलुखावर स्वारी केली. रांगण्याचा किल्लेदार राणोजी निंबाळकर यांनी करवीरकरांच्या वतीने सोनगड किल्ल्याचा ताबा घेतला व सखाराम जाधव यांस किल्लेदार नेमले. मात्र करवीरकरांनी फितुरीने किल्ला ताब्यात घेउन जागोजागी चौक्या बसवून लुटालुट करु लागले, असा आरोप सावंतानी केला.यानंतर किल्ला करवीरकरांच्याच ताब्यात राहिला.
९ नोव्हेंबर १८१७ मधील एका पत्रात किल्लेदार सखाराम जाधव सावंत व पोर्तुगीज यांच्या लष्करी हालचालीबद्दल लिहीताना अमात्यांना किल्ल्याचा बंदोबस्त चोख असल्याचे कळवतात. या सर्व कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख नरसिंहगड या नावाने येतो. २४ मे १८०८ रोजी नारायणराव पाटणकर सरलष्कर यांना केलेल्या आज्ञेनुसार सोनगड येथे सखाराम शंकर यास १०० रुपये दर सालीना वेतनवर ठेवले होते.सन १८१७ मध्ये सावंत व पोर्तुगीज यांच्या वाढत्या लष्करी हालचाली संबधी बावड्याच्या आमात्यांना माहिती देताना किल्लेदार सखाराम जाधवांनी ९ नोव्हेंबर १८१७ रोजी असे लिहीले "किल्ल्याचे वर्तमान व्यवस्थित असे चौकी पहारेची व घाट वाटेचा बंदोबस्त करुन लोक पाळी गैरपाळीचे गडकरी व नामजद जमउन रात्रंदिवस हुशारीने आहो".
सन १८१८ मध्ये इंग्रजांचा वरवंटा पुर्ण सह्याद्रीत फिरला.त्यात इंग्रजांनी नुसते गड घेतले नाहीत तर या गडांचा उपयोग करुन बंड होउ नये म्हणून त्यांची नासधुस केली,तिथे जाणार्या वाटा मोडल्या.मात्र करवीर संस्थानाने आधीच ईंग्रजांचे वर्चस्व मान्य केल्याने इंग्रजांनी करवीरकर संस्थानातील गड ताब्यात घेतले तरी त्यांची नासधूस केली नाही. सोनगड उर्फ नरसिंहगडावर १८१८ नंतरही राबता होता.

सोनगड्,रांगणा व भैरवगडाच्या माणगाव व नारुर तर्फात ५३ गावांच्या वसुलीवरुन सावंत व करवीरकर यांच्यात तंटा होता. हा वाद ईंग्रजांपुढे नेण्यात आला. सन १८२० मध्ये करवीरकर त्यावर मांडलेले मत असे, "किले सोनगडाच्या तनखेत वाडीकर उपद्रव करितात.त्यास ताकीद होउन सावंत याचा उपद्रव न होता किलेचा तनखा किलेकडे चालावा". गावातून गोळा होणार्या सार्यावर सोनगड व रांगण्याच्या शिबंदीचा व इतर खर्च चालतो. त्यामुळे हा महसुल मिळावा हि दोन्ही पक्षांची मागणी होती. सावंतांचा दावा होता कि हा प्रदेश पुर्वापार त्यांच्या जहागिरीचा असल्यामुळे हा महसुल त्यांनाच मिळाला पाहीजे. या वसुलीच्या भांडणात सन १८२२ मध्ये सोनगड व भैरवगड या किल्ल्यांचा तनख्याचा निकाल ब्रिटीश सरकारच्या वतीने रत्नागिरीचा कलेक्टर रिड याने दोघांची बाजु एकून करवीरकरांच्या बाजूने दिला. यामुळे दरसाल सावंताना करवीरकरांना ७८२४ रुपये द्यावे लागले.
डिसेंबर १६३४ च्या पत्रानुसार सोनगड्,मनोहरगडाचे गडकरी करवीर छत्रपतींसमोर आपली कैफीयत मांडायला आले होते "सोनगड गडाकरी लोक बंद तंटा चालविले होते.अलीकडे तेथील मामलेदार बाबासाहेब सरनौबत याचे मार्फतीने गडकरी लोकांचे बोलणे चालणे होउन गडकरी लोक कोल्हापुरास महाराज साहेबापासी आले आहेत. महाराजांनी त्यांचे समाधान केले".इ.स.१८४२ मध्ये केसो आबाजी गडाचे सबनीस होते. सन १८४४ मधील करवीर मधील गडकऱ्यांच्या उठावानंतर इंग्रजांनी करवीर इलाख्यातील गडांची पाडापाडी केली.मात्र १८५० पर्यंत नरसिंहगड नांदत होता, कारण १८५० मध्ये इंग्रज सरकारमधून गडाच्या तनख्याच्या थैल्या हुजूर आल्याचे उल्लेख येतात.
अत्यंत अनवट आणि अस्सल दुर्गभटक्यांच्या यादीत नसलेल्या या गडाची आता ओळख करुन घेउया. सोनगड हा कुडाळ तालुक्यात येत असला तरी ईथे जाणे कणकवलीकडून सोयीचे आहे.
या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) फोंडाघाट-कणकवली-हलावल-पिंपळवाडी-जांभवडे-सोनवडे-घोटगे-दुर्गानगर-पवारवाडी. सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी ‘दुर्गानगर’ ,त्याच्या ‘पवारवाडी’ वस्तीतून सोनगडावर जाण्यासाठी थेट वाट आहे. मात्र सध्या ‘गड’ नदीवर नव्यानेच धरण बांधण्याचे काम सुरु असल्याने नरडवे गावानंतर पवारवाडी पर्यंत ७ किमीचा कच्चा मातीचा रस्ता आहे.
२) कणकवली – वागदे – कसाल – घोटगे – सोनवडेमार्गे गडपायथ्याची पवारवाडी गाठायची. या पर्यायी मार्गाने गडपायथ्याच्या अगदी पवारवाडी पर्यंत डांबरी रस्ता असून हा पक्का डांबरी रस्ता जिथे संपतो तिथूनच सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते.

सोनगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात येणारा गिरिदुर्ग. याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ११५०
फुट इतकी आहे. गडपायथ्याच्या पवारवाडीतून 'सोनगड' किल्ल्याचा दक्षिणोत्तर
पसरलेला आयताकृती डोंगर नजरेस पडतो. कुडाळ किंवा घोटगे-सोनवडेमार्गे एक
डांबरी रस्ता पवारवाडीत येऊन थांबतो. ज्या ठिकाणी डांबरी रस्ता संपतो आणि
कच्च्या रस्त्याला सुरवात होते तिथेच उजव्या हाताला एक ठळक पायवाट डोंगरवर
चढताना दिसते. हीच वाट आपल्याला सोनगड किल्ल्यावर घेऊन जाते. किल्ल्याची एक
डोंगरधार बराच वळसा घालून खाली पवारवाडीपर्यंत उतरलेली आहे. ही डोंगरधार
चढून दोन डोंगरामधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचणे हे आपले पहिले लक्ष असते. इथंपर्यंत जाणारी साधारण अर्ध्या तासाची पायवाट करवंद आणि जांभळाच्या दाट झाडीतून वर चढत राहते.
![]() |
| करवंदाच्या दाट झाडीतून सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट |
साधारण अर्ध्या तासाची खडी आणि दमवणारी वाट चढून आपण दोन डोंगरांमध्ये असणाऱ्या थोड्या सपाटीवर येऊन पोहोचतो. सपाटीवर पोहोचल्यावर किल्ला समोर दिसायला लागतो पण किल्ल्याचा माथा गाठण्यासाठी मात्र वाटेतले आणखी दोन-तीन डोंगरटप्पे पार करावे लागतात. आता इथून पायवाट सरळसोट एका धारेवरून किल्ल्याच्या दिशेने चढू लागते. खडी चढण आणि विरळ होत जाणारी झाडी यामधून मार्गक्रमण करत पुढच्या पाऊण तासात आपण किल्ल्यासमोर असणाऱ्या शेवटच्या डोंगरावर येऊन पोहोचतो. आता आपण उभे असलेला डोंगर थोडासा उतरायचा आणि समोर दिसणाऱ्या किल्ल्याच्या मुख्य डोंगराचा थोडका चढ चढून डावीकडे किल्ल्यावर जाणारी पायवाट धरायची. या पायवाटेने मार्गक्रमण करत असताना उजवीकडे पाहिले असता किल्ल्याचे अनेक मोठाले दगड खाली कोसळून एक नैसर्गिक खिडकी तयार झालेली दिसते. स्थानिक लोक या नेढ्याला “भीमाची आकडी” अश्या चमत्कारिक नावाने ओळखतात. या नेढ्याच्या आजूबाजूला दाट काटेरी झुडपांचे साम्राज्य असल्याने लांबूनच हे नेढे आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचे आणि पुढच्या दहा मिनिटात किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख उध्वस्त दरवाज्यात दाखल व्हायचे.
![]() |
| अर्ध्या तासाच्या चढणीनंतर आपण थोड्या सपाटीवर येतो. तिथून दिसणारा सोनगड किल्ला |
![]() |
| किल्ल्याची वाट चढताना असे दोन-तीन डोंगरटप्पे पार करावे लागतात |
![]() |
| सोनगड किल्ल्याचा माथा |
![]() |
| किल्ल्यासमोर असणारा शेवटचा डोंगर चढून गेल्यावर समोर दिसणारा सोनगड |
| "भीमाची आकडी" नावाचे नैसर्गिक खिडकी/नेढे |
![]() |
| "भीमाची आकडी" |
किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झालेला असून दरवाज्यासमोर असणाऱ्या दहा-बारा दगडी पायऱ्या आणि उजव्या बाजूला तग धरून उभा असलेला एक पडका बुरुज इतिहासकाळात येथे एक दरवाजा असावा याची साक्ष देतो.ईथेच एक शिवलिंग आहे.अर्थात मंदिर नष्ट झाले आहे. भग्न दरवाज्यातून आत प्रवेश करताच किल्ल्याचा माथा आणखी १०० फुट उंचावलेला दिसतो. येथून उजव्या हाताने दरवाज्याच्या बाजूला असलेल्या तटबंदीवरून चालत जात पुढच्या १० मिनिटात आपण गडमाथ्यावर दाखल होतो. गडपायथ्याच्या पवारवाडीतून इथंपर्यंत पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात.
![]() |
| किल्ल्याचा उध्वस्त दरवाजा आणि पायऱ्या |
गडाचा मधला भाग खोलगट आकाराचा आहे.तटबंदी अर्थातच नष्ट झाली आहे.मानवी वावर फारसा नसल्याने गडमाथ्यावर सर्वत्र झाडी माजली आहे.या झाडीत काही चौथरे आहेत.
गडमाथ्यावर पोहोचताच समोर पिंपळ वृक्षाच्या छायेत एक झोपडीवजा घरटे दिसते. हे झोपडे म्हणजे गडपायथ्याच्या ग्रामस्थांनी उभारलेले भैरवनाथाचे मंदिर होय. या छप्पर उडून गेलेल्या झोपडीवजा मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. मात्र झोपडीत काही भांडी मांडून ठेवलेली दिसतात. या मंदिरातील देव म्हणजेच भैरवाची मूर्ती मंदिराच्या मागे असणाऱ्या एका जोत्यावर पिंपळवृक्षाच्या छायेत ठेवलेली आहे. या जोत्याच्या जवळच अजून एक अगदी तशीच दिसणारी पण थोडी अधिक जीर्ण झालेली दुसरी भैरवाची मूर्ती देखील आहे.

| किल्ल्यावरील सोनदेव उर्फ भैरवनाथाने झोपडीवजा मंदिर |
![]() |
| गडावरील सोनदेव उर्फ भैरवाची नवी व जुनी मूर्ती |
मंदिरासमोरच ५ ते ६ फुट उंचीची दगडांवर दगड रचून तयार केलेली एक भक्कम भिंत आपले लक्ष वेधून घेते. ही आहे गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे राजवाडा किंवा किल्लेदाराचा वाडा. या वाड्याचे अवशेष पाहून तसेच मागे किल्ल्याच्या टोकाकडे चालत जाताच दोन बुरुज आपल्याला दिसतात. या दोन्ही बुरुजांवर मातीचे अनेक थर साचले असून या दोन्ही बुरुजातून किल्ल्याखाली उतरणारी एक अवघड वाट दिसते.या वाटेने खाली उतरल्यास एक मोठी गुहा दिसते.या गुहेत बारमाही पाणी आहे.मात्र हि वाट निसरडी व अवघड आहे.बरोबर वाटाड्य असेल तरच गुहेपर्यंत जाता येईल.
येथे बुरूजाजवळ एक कातळात खोदलेले
पण पूर्णपणे कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. हे अवशेष पाहून पुन्हा
गडप्रवेश केलेल्या दरवाज्यात परत येत असताना गडाच्या एका टोकाला हिरव्यागार
झाडांनी भरलेला एक भला मोठा खड्डा दिसतो. हा खड्डा म्हणजे गडावरील एक
कोरडा पडलेला तलाव होय. हे सर्व अवशेष पाहून आपली साधारण तासाभराची गडफेरी
पूर्ण होते.
![]() |
| गडावरील राजवाडा किंवा वाड्याचे अवशेष |
![]() |
| दोन शेजारी शेजारी असणारे उध्वस्त बुरुज. दोन्ही मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजले आहेत |
![]() |
| कातळात खोदलेले पण सध्या कोरडे पडलेले पाण्याचे टाके |
सोनगड किल्ला व्यवस्थित पाहून पवारवाडीत परतण्यासाठी साधारण ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने गडप्रेमींनी गड पायथ्याच्या पवारवाडीतूनच पाण्याच्या बाटल्या भरून न्याव्यात.
संदर्भग्रंथः-
१) गड,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) https://durgwedh.blogspot.com हा ब्लॉग
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे१) गड,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) https://durgwedh.blogspot.com हा ब्लॉग
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवाटेवरील दुर्लक्षित गिरिदुर्ग सोनगड
सिंधुदुर्ग! नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक
वारसा असा अनोखा संगम लाभलेला जिल्हा. अथांग पसरलेला निळाशार समुद्रकिनारा,
रुपेरी वाळू, हिरवीगार दाट वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या
असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला. महाराष्ट्रातील
पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा
शिवलंका सिंधूदुर्ग आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे पण त्याचबरोबर या
जिल्ह्यात आणखी तब्बल २३ किल्ले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.
या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची तालुकावार यादी खालील प्रमाणे:
१) तालुका देवगड - विजयदुर्ग, देवगड, सदानंदगड, कोटकामते
२) तालुका मालवण - रामगड, भगवंतगड, भरतगड, सिद्धगड, वेताळगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग
३) तालुका वेंगुर्ला - निवती, यशवंतगड
४) तालुका कणकवली - खारेपाटण, भैरवगड
५) तालुका कुडाळ - सोनगड, मनोहरगड, मनसंतोषगड
६) तालुका सावंतवाडी - नारायणगड, महादेवगड
७) तालुका दोडामार्ग - हनुमंतगड, बांदा
वरील सर्व किल्ल्यांची वर्गवारी ढोबळपणे जलदुर्ग, किनारीदुर्ग,
गिरीदुर्ग आणि वनदुर्ग अश्या चार प्रकारात करता येईल. पुणे किंवा मुंबई
येथून शुक्रवारी रात्री निघायचं आणि भल्या पहाटे सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या
सीमेवर डेरेदाखल व्हायचं. मग दोन दिवसांत तुम्ही या जिल्ह्यातील किमान चार
गिरिदुर्ग निवांत बघून तुमचा विकेंड सार्थकी लावू शकता. त्यात जर का फक्त
जलदुर्गच बघायचे ठरवले तर दोन दिवसात सात-आठ किल्ले तरी आरामात बघून होतात.
बस फक्त थोडे आडवाटेवरचे आणि अवशेष कमी असले तरी किल्ले पाहण्याचा ध्यास
हवा.
घाटमाथ्यावर राहणाऱ्या माणसाला उन्हाळ्यात कोकणात नुसतं फिरायला
जायचं म्हणजे सुद्धा सजा वाटते. डोक्यावर टळटळीत ऊन आणि फुंकर मारली तरी
पान देखील हलणार नाही असं दमट वातावरण. आमची या वेळेची सिंधूदुर्ग
जिल्ह्यातील गिरिदुर्गांची भटकंती पण अशीच भर वैशाखातल्या उन्हातली. पण मनी
ध्यास होता तो काही अल्पपरिचित, आडवाटेवरील आणि उपेक्षित गिरिदुर्गांची
भटकंती करण्याचा. त्यात या ट्रेकला सोबत यायला माझ्यासारखाच किल्लेप्रेमी
आणि नेहमीचा हक्काचा ट्रेकर मित्र प्रसाद परदेशी आणि त्याची बायको नेहा
येणार म्हणल्यावर माझ्या गाडीतल्या पाच पैकी तीन जागा आधीच फिक्स झाल्या.
आता फक्त अजून दोन जागा भरणे शिल्लक होते. मग ट्रेक संबंधी सगळ्या
व्हाट्सअँप ग्रुपवर या ट्रेकबद्दलची माहिती टाकून कोणी येतंय
का त्याची वाट पाहत बसलो. पहिले दोन दिवस कुठल्याच ग्रुपमधून काही
प्रतिसाद आला नाही. येणार तरी कसा म्हणा, उन्हाळा आणि त्यात सिंधूदुर्ग
जिल्ह्यातले गिरिदुर्ग करणार म्हणल्यावर सगळ्यांनी मला मनातल्या मनात का होईना पण वेड्यात काढलं असणार हे मात्र नक्की.
आम्ही तिघांनी का होईना पण हा ट्रेक करायचाच असे ठरवले. तेवढ्यात
ट्रेकला निघण्याच्या दोन दिवस आधी एका ट्रेकसंबंधी व्हाट्सअँप ग्रुपमुळे
परिचयाच्या झालेल्या अॅड. विंदा महाजन यांचा फोन आला. त्या आणि त्यांची एक
मैत्रीण सुनिता या ट्रेकला येण्यासाठी इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले.
या दोघी माझ्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेकला येणार असल्याने त्यांना
ट्रेकबद्दल व्यवस्थित माहिती दिली. एक तर भर उन्हाळा, त्यात मी दीड-दोन तास
एखादा डोंगर चढवणार आणि वर जाऊन यांना दाखवणार काय तर थोडीफार कुठंतरी शिल्लक
असलेली तटबंदी, एक-दोन कोरडी पाण्याची टाकी आणि काही उध्वस्त अवशेष. त्यात
हा ट्रेक अल्पपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्यांचा, त्यामुळे यावर नेमके
कोणते अवशेष आहेत ते मलाच फारसे माहित नव्हते. पण या दोघींनी सगळं नीट
समजावून घेतलं आणि जेवढे जमतील तेवढे किल्ले चढू नाहीतर किल्ल्याच्या
पायथ्याच्या गावात भटकू अशी संमती दर्शवली. मग काय माझी गाडी आणि पाच
ट्रेकर निघालो सिंधूदुर्ग जिल्ह्यात गड-किल्ले भटकायला!
माझी निलपरी (TATA TIAGO) आणि मी शुक्रवार दिनांक, १३ एप्रिल २०१८
च्या रात्री ८.३० वाजता चिंचवडवरून निघालो आणि चांदणी चौक, नवले ब्रिज,
आंबेगाव असे पिकअप करत ९.३० च्या सुमारास नवीन कात्रज बोगद्यातून सातारा
रस्त्याला लागलो. पुणे – कोल्हापूर – राधानगरी – फोंडाघाट – कनेडी असा
रस्ता धरला आणि मोजून फक्त दोन ठिकाणी पाच-दहा मिनिटांचे थांबे घेत
मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास तब्बल ३७० किलोमीटरचा प्रवास करून
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नरडवे गावात पोहोचलो. पहाटे लवकर उठून घोटग्याचा ‘सोनगड’ आणि थोडं ऊन उतरल्यावर दुपारच्या सत्रात नरडव्याचा ‘भैरवगड’ असे दोन गिरीदुर्ग पहिल्या दिवशी पहायचे आणि ‘वेताळगड’, ‘सिद्धगड’ आणि ‘सदानंदगड’ असे
इतर तीन छोटे गिरिदुर्ग दुसऱ्या दिवशी पाहून साधारण दुपारी ४.३० च्या
सुमारास पुण्याकडे प्रस्थान करायचे असा सुटसुटीत प्लान बनवला होता. ज्यांची
पुस्तके वाचून आम्हा किल्ले प्रेमींना अल्पपरिचित किल्ल्यांची माहिती
मिळते असे दुर्गअभ्यासक ‘भगवान चिले’ सर यांच्या ‘दुर्गम दुर्ग’ या
पुस्तकानुसार ‘सोनगड’ हा किल्ला चढायला जरा
जास्त वेळ खाणारा होता. त्यामुळे शनिवारी पहाटे कितीही उशीर झाला तरी सोनगड
या किल्ल्याच्या पायथ्याशीच जाऊन झोपायचे असे ठरवले होते. पण चिले सरांनी
त्यांच्या पुस्तकात नमूद केलेले ‘दुर्गवाडी’ हे गाव काही केल्या गुगल मॅप वर
सापडत नव्हते. पण हे गाव नरडवे ते घोटगे या दोन मोठ्या गावांच्या दरम्यान
कुठे तरी नक्की असणार असा अंदाज आलेला असल्याने मध्यरात्री नरडवे गाव
ओलांडून तसेच पुढे जाऊ लागलो. पण नरडवे गाव ओलांडताच आत्तापर्यंत डांबरी
असणारा रस्ता एकदम कच्च्या मातीच्या रस्त्यात रुपांतरीत झाला. आता मात्र
आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकली.
त्यात एवढ्या मध्यरात्री रस्ता सांगायला कोणीही भेटणार नसल्याने यू-टर्न घेतला आणि पुन्हा मागे फिरून नरडवे गावाच्या थोडे अलीकडे असणाऱ्या एका मंदिरात सकाळ होईपर्यंत विश्रांती घेण्याचे ठरवले.
![]() |
| नरडवे गावाजवळ असणारे "श्री विठ्ठलादेवी मंदिर". येथे शनिवारी पहाटे मुक्काम केला |
सकाळी सहाच्या सुमारास आकाशात झुंजूमुंजू व्हायला लागलं तसं जाग आली ती रस्त्यावर जोरजोरात बोलत चाललेल्या काही माणसांमुळे. जवळच्याच नरडवे गावातली काही उत्साही मंडळी फिरायला म्हणून बाहेर पडलेली होती. त्यांनाच मग सोनगड किल्ल्याविषयी माहिती विचारली तसे त्यांनी उभारल्या जागेवरूनच लांब कुठेतरी एका डोंगरधारेकडे बोट दाखवत ‘सोनगड’ किल्ला त्या तिकडे पलीकडे आहे असं सांगितलं. आता माझ्यासाठी त्या लोकांना ‘सोनगड’ किल्ला माहित असणे हिच एक मोठी आणि आनंदाची गोष्ट होती. कारण आजकाल बऱ्याच दुर्लक्षित आणि आडवाटेवरच्या किल्ल्याबाबत त्या किल्ल्याच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांनाच माहिती नसते. पण इथं मात्र परिस्थिती आशाजनक होती. या लोकांना त्यांच्या गावजवळच्या ‘भैरवगड’ या किल्ल्याबरोबरच सोनगड किल्ल्याची देखील व्यवस्थित माहिती होती. त्यांच्याकडून कळले की सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी ‘दुर्गानगर’ नावाचे गाव असून त्याच्या ‘पवारवाडी’ या छोट्या वस्तीतून किल्ल्यावर जाणारी एक वाट आहे. पण नरडवे गावानंतर ‘गड’ नदीवर नव्यानेच धरण बांधण्याचे काम सुरु असल्याने नरडवे गावानंतर पवारवाडी पर्यंत ७ किमीचा कच्चा मातीचा रस्ता पार करावा लागेल. या कच्च्या रस्त्याला पर्याय म्हणजे फोंडा घाट उतरल्यानंतर थेट कणकवली गाठायची आणि कनेडी – कणकवली – वागदे – कसाल – घोटगे – सोनवडेमार्गे गडपायथ्याची पवारवाडी गाठायची. या पर्यायी मार्गाने गडपायथ्याच्या अगदी पवारवाडी पर्यंत डांबरी रस्ता असून हा पक्का डांबरी रस्ता जिथे संपतो तिथूनच सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते. पण आम्ही फोंडा घाट उतरून बऱ्यापैकी पुढे नरडवे गावापर्यंत पोहोचलेलो असल्यामुळे परत उलटे जाऊन जवळपास ३० किमीचा अधिकचा फेरा वाढवण्यापेक्षा कच्च्या रस्त्यानेच गडपायथा गाठण्याचा निर्णय घेतला.
सकाळची आन्हिके पार पाडून मुक्कामाची जागा सोडेपर्यंत सात वाजत आले
होते. त्यात भर उन्हाळा आणि एप्रिलचा महिना त्यामुळे, सूर्यराव सकाळी जरा
लवकरच ड्युटीवर हजर झालेले. खरंतर ज्यावेळेपर्यंत आम्ही अर्धाअधिक किल्ला
चढून जाणे अपेक्षित होते त्यावेळी आत्ता कुठे आम्ही मुक्कामाची जागा सोडत
होतो. त्यामुळे आता किल्ला चढताना उन्हाचा चांगलाच त्रास होणार यात
तिळमात्र शंका नव्हती. त्यात नरडवे गावानंतरचा कच्चा रस्ता पार करताना
गाडीचा वेग देखील मंदावला. हळू हळू गाडी चालवत पवारवाडी गाठेपर्यंत सकाळचे
पावणेआठ झाले. गावातून किल्ल्यावर वाट दाखवण्यासाठी कोणी येईल का याची
शोधाशोध करण्यात पुन्हा १५ मिनिटे खर्ची पडली. गावात भेटलेला प्रत्येकजण
आमच्याकडे बघून “तुम्ही किल्ला चढणार का?”, “पाणी मुबलक घेतलं आहे का?” असे
प्रश्न विचारू लागला. बहुदा त्यांना देखील आम्ही एवढ्या भर उन्हाळयात हा
डोंगरी किल्ला चढून जाऊ की नाही अशी काळजी वजा शंका वाटत असावी. खूपच
विनवणी केल्यानंतर एक वयस्कर मामा किल्ल्यावर यायला तयार झाले. गाडी
रस्त्याकडेला व्यवस्थित उभी करून प्रत्येकी किमान ३ लिटर पाणी बरोबर घेतले आहे याची खात्री केली आणि सकाळी सव्वाआठ वाजता ‘सोनगडा’च्या डोंगर चढाईला भिडलो.
आता जरा गडाच्या इतिहासात डोकावून पाहू. ऐतिहासिक
कागदपत्रात सोनगड किल्ल्याचा उल्लेख नरसिंहगड किंवा नृसिंहगड असा देखील आला
आहे. इतिहासकाळात मालवण बंदरात येणारा माल घोटगे घाटातून घाटमाथ्यावरील
आजरा किंवा पाटगाव मार्गे कोल्हापुरास जात असे. या घोटगे घाटावर लक्ष
ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी. या घाटमार्गाच्या मुखाशी
घाटमाथ्यावर रांगणा हा एक इतिहासप्रसिद्ध आणि मोठा किल्ला आहे. सोनगड उर्फ
नरसिंहगडाचे रांगणा किल्ल्याशी असणारे निकटत्व पाहता सोनगड हा रांगणा
किल्ल्याच्या प्रभावळीतील येणारा एक महत्वाचा किल्ला असू शकेल. हा किल्ला
बांधण्याचे श्रेय खेम सावंत यांना जाते. त्यांनी इ.स. १७०९ ते १७३८ दरम्यान
सोनगडाची दुरुस्ती केली. इ.स. १७८८ मधे करवीर सत्तेने घोटगे घाटाने उतरून
किल्ल्यास मोर्चे लावले आणि गड ताब्यात घेतला. पण इ.स. १७९३ मधे झालेल्या समेटानंतर गड पुन्हा सावंतांकडे आला. त्यावेळी
गडावर धोंडो लक्ष्मण लेले यांना किल्लेदार नेमण्यात आले. पुढे १८०५ मधे
सावंतांच्या गृहकलहात हस्तक्षेप करून रांगण्याचे राणोजी निंबाळकर यांनी गड
ताब्यात घेतला. पण १८१८ मधे जेव्हा इंग्रजांनी महाराष्ट्रातील जवळपास
सगळ्या किल्ल्यांचा ताबा घेतला तेव्हा हा किल्ला मात्र करवीरकरांकडे ठेवला
जो शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. (ऐतिहासिक संदर्भ: डोंगरयात्रेत
दिसलेल्या दुर्गवास्तू)
![]() |
| किल्ल्याला लाभलेली नैसर्गिक कातळकोरीव तटबंदी |
![]() |
| समोर घाटमाथ्यावर कुठे तरी रांगणा किल्ला असावा का? |
![]() |
| किल्ल्याच्या पायथ्याला वाहणाऱ्या गड नदीचे कोरडे पात्र आणि आजूबाजूचा डोंगररांगांनी वेढलेला परिसर |
आम्ही सोनगड किल्ला पाहून गावात उतरलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. भर दुपारचं ते जीवघेणं ऊन आता सगळ्यांनाच नकोस झालेलं होतं. त्यात तहान लागल्यामुळे घश्याला कोरड पडलेली. पाठीवरच्या सॅकमधे अजूनही एक बाटली पाणी शिल्लक होते पण ते इतकं गरम झालेलं की ते पिण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. कधी एकदा वाटाड्या म्हणून सोबत आलेल्या मामांच्या कौलारू घरात सावली खाली बसतोय आणि थंड पाणी पिऊन तापलेलं शरीर थंड करतोय असं वाटत होतं. गड उतरून डांबरी रस्त्याला लागलो तसे सगळ्यांनी मामांच्या घराकडे धूम ठोकली. मलाही अगदी तेच करायचं होतं. पण खाली येऊन पाहतोय तर काय गाडी भर उन्हात तापत होती. ती पटकन सावलीत लावण खूप गरजेच होतं. कारण एकदा का मी सावलीत जाऊन बसलो तर लगेच बाहेर येणं मुश्कील आणि सावलीत थंड झालेल्या शरीराला पुन्हा गरम झालेल्या गाडीत कोंबण तर त्याहूनही मुश्कील. त्यामुळे नाईलाजाने का होईना मी गाडीजवळ गेलो. गाडीपासून फक्त १०० मीटर अंतरावर आंब्याचं एक मस्त डेरेदार झाड होतं. ट्रेकर टीम मधल्या बाकी कोणालाही ड्रायविंग येत नसल्यामुळे त्या तापलेल्या गाडीत बसून ती सावलीत नेण्याचा भीम पराक्रम मलाच पार पाडावा लागणार होता. आधीच भर उन्हात गड उतरल्यामुळे पूर्ण शरीरातून गरम वाफा निघत होत्या आणि त्यात आता या तापलेल्या गाडीत बसायचं होतं. गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलो तसा "कौन बनेगा करोडपती"च्या हॉट सीटवर बसल्याचा फील आला. स्टेरिंग, गियर, सिटकव्हर असं ज्याला हात लावेल ते सगळं भयंकर तापलेलं. गाडीच्या काचा खाली करून कशी तरी गाडी चालू केली आणि समोर दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली आणली. त्यानंतर मात्र अक्षरशः गाडीतून बाहेर उडी टाकली. या दोन तीन मिनिटात खालून-वरून, मागून-पुढून सगळीकडून चटके बसले होते. हुश्श! गड चढण्या-उतरण्यापेक्षाही हे एक भयंकर अवघड काम पार पाडल्यासारख वाटून गेलं.
वाटाडया मामांच्या घरात गेलो तसं जमिनीवर अक्षरशः अंग झोकून दिलं आणि
थोड्यावेळ शांत पडून राहिलो. थोड्याच वेळात मामांकडून सगळ्यांना जेवणाचा
आग्रह झाला. बहुदा आम्ही किल्ल्यावर जातानाच त्यांनी माणसं मोजली होती आणि
आम्ही किल्ला पाहून परत येईपर्यंत जेवण तयार करून ठेवलं होत. खूप आग्रह
झाल्यावर मग मामांच्या त्या सुंदर कौलारू घरात पंख्याची थंड हवा घेत जेवण
उरकलं. आता सगळ्यांच तापलेलं शरीर देखील नॉर्मल व्हायला लागलं होतं. साधारण
दुपारी २.०० पर्यंत जेवणाचा कार्यक्रम उरकला तसा हळूच पुढच्या किल्ल्याचा
विषय काढला. पण कुणालाच त्या भर उन्हात पुन्हा बाहेर पडून दुसरा किल्ला
करण्याची इच्छा दिसत नव्हती. तसेही दुपारी २.३० वाजता पवारवाडीतून निघून
पुन्हा आलेल्याच कच्च्या रस्त्याने नरडवे गाव गाठायचे आणि मग तिथून
भैरवगडाच्या पायथ्याच्या भेर्देवाडीत पोहोचायला कमीत कमी ३.३० वाजणार होते.
त्यामुळे अंधार पडायच्या आत भैरवगड पाहून गावात परत येणे थोडे कठीण वाटत
होते. त्यामुळे पुढचे प्लानिंग नंतर बघू असे म्हणत सर्वांनी तिथेच
मामांच्या घरात पंख्याची थंड हवा घेत विश्रांती घेण्याचा ठरावा पास झाला.
आदल्या रात्री अपुरी झोप झाल्यामुळे पुढच्या फक्त पाचच मिनिटात सगळ्यांच्या
घोरण्याचे आवाज सुरु झाले.
साधारण तासाभराच्या गाढ झोपेनंतर जाग आली तेव्हा दुपारचे सव्वातीन
वाजलेले. तोंड धुऊन सगळे फ्रेश झालो तसा न मागताच कोरा फक्कड चहा मामांनी
समोर आणून ठेवला. मग चहा घेता घेताच पुढचा नवीन प्लान तयार केला. नरडवेचा
भैरवगड आज करणे आता अशक्य आहे तर मग त्याऐवजी दुसऱ्या दिवशी करायचा
'वेताळगड' हा छोटा डोंगरी किल्ला आज करूया आणि रात्री जरा लवकरच
भैरवगडाच्या पायथ्याच्या भेर्देवाडीत मुक्कामाला जाऊया असा नवीन प्लान तयार
झाला. या नवीन प्लानमुळे कमीतकमी ५० किलोमीटरचा जास्तीचा फेरा पडणार होता
खरा पण ठरवलेले पाचही किल्ले करता येणे शक्य असल्याने सगळ्यांनीच नवीन
प्लानला लगेच संमती दिली. ट्रेकला कमी लोक बरोबर असण्याचा हा एक फायदा
असतो. अश्यामुळे कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यासाठी फार वेळ लागत
नाही. मामांना त्यांची योग्य ती बिदागी देऊन त्यांचा निरोप
घेतला. कुडाळ रस्त्याला गाडी लागली तेव्हा दुपारचे पावणेचार वाजले होते.
पवारवाडी ते वेताळगडाच्या पायथ्याची गावडेवाडी हे जवळपास ५० किलोमीटरचे
अंतर आणि वेताळगड किल्ला पाहणे हे सर्व आता पुढच्या तीन तासात व्हायला हवे
होते. पण गाडीचे सारथ्य माझ्या विश्वासू हातात असल्यामुळे ठरवलेलं सगळं
वेळेत होणार याची बाकीच्या ट्रेकर भिडूंना शाश्वती होती आणि झालं देखील
तसंच.
पण आता या अल्पपरिचित वेताळगडाची भ्रमंती एका नवीन ब्लॉगद्वारे करू. तोपर्यंत येथेच लेखणी थांबवतो. धन्यवाद!
ट्रेक दिनांक: शनिवार, १४ एप्रिल २०१८
ट्रेकर मंडळ: विनीत दाते, प्रसाद परदेशी, नेहा परदेशी, अॅड. विंदा महाजन आणि सुनिता राजे-निंबाळकर
किल्ल्याचे नाव: सोनगड किल्ल्याची उंची: ३५० मीटर
जिल्हा : सिंधुदुर्ग, तालुका : कुडाळ
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग, चढाई श्रेणी: सोपी
पाण्याची सोय: किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. पावसाळ्यात किल्ल्यावरील तलावात पाणी साठते जे जानेवारी अखेरपर्यंत राहते मात्र पिण्यायोग्य नाही
राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. गडपायथ्याच्या वाडीतील मंदिरात मुक्काम करता येईल.
किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास साधारण २ तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: मार्च ते मे हा उन्हाळ्याचा कालावधी सोडून वर्षभर कधीही. पावसाळ्यानंतर गेल्यास उत्तम
भटकंतीचा कालावधी: मुंबई/पुणे येथून दोन दिवस
प्रवासाचा मार्ग: पुणे-कोल्हापूर-राधानगरी-
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
उंची : २०५० फुट
श्रेणी : मध्यम
कोकणच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पुणे,सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांच्या सीमा येतात. सह्याद्रीच्या या पर्वतरांगेत कोकणात उतरणाऱ्या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर व घाटाखाली किल्ल्यांची साखळी निर्माण करत लहानमोठे असे अनेक किल्ले बांधले गेले. दुर्गप्रेमीना आजही अपरीचीत असलेले नरडवे व घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले भैरवगड व सोनगड हे त्यापैकीच. यातील घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला सोनगड कागदोपत्री नरसिंहगड म्हणुन ओळखला जातो. या भागातुन वाहणाऱ्या गड नदीने तालुक्याचे दोन भाग केले असुन जवळजवळ असूनही भैरवगड कणकवली तालुक्यात तर सोनगड कुडाळ तालुक्यात येतो. खाजगी वाहन सोबत असेल तर बरीचशी पायपीट वाचते व एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात अन्यथा दोन दिवस हाताशी हवेत. सोनगड किल्ल्यास जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याचे सोनवडे गाव गाठावे लागते. ... कुडाळहुन घोटगेमार्गे सोनवडे हे अंतर ४३ कि.मी. असुन कणकवली ते सोनवडे हे अंतर २५ कि.मी.आहे. सोनगड व भैरवगड एकत्र पहायचा असल्यास नरडवे ते सोनवडे हे अंतर पक्क्या रस्त्याने १.५ कि.मी. असुन नरडवे जुने स्थानक येथुन चालत फक्त २० मिनिटांचे आहे. त्यामुळे नरडवे येथे उतरून सोनवडे येथे जाणे जास्त सोयीचे आहे. हा रस्ता गुगल नकाशावर दिसत नाही. सोनगड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गावातुन गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत. यातील एक वाट डोंगराच्या दक्षिण सोंडेवरून गडावर चढते तर उर्वरीत दोन वाटा डोंगराच्या उत्तर सोंडेवरून गडावर जातात. घोटगे येथुन सोनवडे गावात येताना नदी पार केल्यावर उजव्या बाजुस सोनवडे घाटरस्त्याचे काम सुरू आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास चालण्याचे बरेच अंतर कमी होऊन या रस्त्याने आपण गडाच्या अर्ध्या उंचीवर पोहोचतो. येथुन मळलेली पायवाट डोंगराच्या दक्षिण सोंडेवरून गडाच्या उध्वस्त तटबंदी मधुन गडावर प्रवेश करते. दुसरी वाट सोनवडे गावातील लिंगेश्वर मंदिराजवळ असलेल्या शाळेकडून मुख्य वाडीतुन गडाच्या उत्तर सोंडेवर जाते. या वाडीच्या टोकाला सध्या सहकार कृषी पर्यटन केंद्राची उभारणी केली जात आहे. या वाटेवर खाडी चढण असुन वाट मळलेली असली तरी वाटेला असंख्य ढोरवाटा असुन मुख्य वाटेचा मागोवा घेतच वर चढावे लागते. तिसऱ्या वाटेने सोनवडे गावातुन नरडवे गावाकडे जाताना मुख्य रस्ता उजवीकडे गडाच्या उत्तर सोंडेकडे वळतो. या रस्त्याने साधारण ३ कि. मी.पुढे आपण सोनवडे गावाच्या विरुद्ध बाजुस उत्तरेकडील डोंगरधारेखाली येतो. येथील एका मोठ्या वळणावरून या धारेवर जाता येते. मागील दोन वाटांनी गडाच्या दोन बुरुजामध्ये असलेल्या उध्वस्त दरवाजा मधून आपला गडावर प्रवेश होतो. पहिल्या व तिसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी पाउण तास लागतो पण त्यासाठी सोबत वाहन असणे गरजेचे आहे. सोनवडे गावामधील पायवाटेने गडावर जाण्यासाठी दीड तास लागतो. डोंगराच्या उत्तरेकडील धारेवरून आपण गडाच्या उत्तर बाजुस असलेल्या नेढ्याखाली पोहोचतो. स्थानिक लोकात हे नेढे चांगलेच प्रसिद्ध असुन ते या लंबगोलाकृती नेढ्यास भीमाची आकडी म्हणुन ओळखतात. या नेढ्याखालुन गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. यातील उजवीकडील वाट दक्षिणेकडील सोंडेवरून येणाऱ्या वाटेला मिळते. आपण मात्र डावीकडील वाटेने गडाकडे निघायचे. येथुन ५ मिनिटात ओबडधोबड पायऱ्यांच्या वाटेने आपण घळीत असलेल्या दोन बुरुजामधील पश्चिमाभिमुख उध्वस्त दरवाजातुन गडावर प्रवेश करतो. हा दरवाजा खालच्या टप्प्यात असुन येथुन गडाचा माथा साधारण ७० ते ८० फुट उंचावर आहे. या भागात मोठया प्रमाणात कारवीचे रान व गवत वाढलेले आहे. येथुन उजवीकडील बाजुने तटबंदीच्या काठाने वर चढत जाऊन आपण गडफेरीस सुरवात करायची. या वाटेने आपण सर्वप्रथम नेढ्याच्या वरील भागात असलेल्या बुरुजावर येतो. या बुरुजावरून डोंगराच्या उत्तर धारेवरून गडावर येणाऱ्या संपुर्ण वाटेवर लक्ष ठेवता येते. या ठिकाणी कारवीची दाट झाडी वाढली असुन एक चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे निघाल्यावर हि तटबंदी खालील बाजुस उतरत गेलेली असुन या तटाला लागुनच काही वास्तुचे अवशेष आहेत. बांधकामासाठी कोणतेही मिश्रण न वापरता ओबडधोबड दगडात रचलेल्या या तटबंदीचे काही ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. गडाच्या दक्षिण धारेवरून येणारी पायवाट या उतारावरील तटबंदीतुन गडात प्रवेश करते. या ठिकाणी तटावर एक कोरीव दगड असुन हा दगड शिवलिंग असल्याचे वाचनात येते पण हे शिवलिंग नसुन न्हाणीचा दगड आहे. या उतारावर तटाच्या आतील बाजुस एक मोठा खोल तलाव आहे पण त्यात प्रचंड प्रमाणात जंगल वाढल्याने आत पाणी आहे कि नाही हे कळण्यास मार्ग नाही. तलावाचे पाणी अडविण्यासाठी या ठिकाणी तटाची रुंदी जास्त ठेवण्यात आली आहे. या तलावाच्या काठावर तटबंदीत घडीव दगडात देवडी बांधलेली आहे. येथुन पुढे निघाल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावरील घडीव दगडात बांधलेल्या भल्यामोठ्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून गडाच्या दक्षिण धारेवरून गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेस पडते. दक्षिणेच्या या तटबंदीखाली एक मोठी गुहा असुन त्यात वर्षभर पाणी असल्याचे सांगीतले जाते पण आम्हाला हि गुहा शोधुनही सापडली नाही. बुरुजावरून तटबंदीला वळसा घालत एक बुरुज पार करून आपण गडाच्या पुर्व भागात येतो. गडावर असलेली थोडीफार सपाटी याच भागात आहे. या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली उध्वस्त चौथऱ्यावर भैरवनाथाची मुर्ती ठेवलेली असुन मूर्तीच्या मागील बाजुस भैरवाची भग्न झालेली दुसरी मुर्ती आहे. गावकरी या भैरवाची सोनदेव म्हणुन पूजन करतात. मुर्ती शेजारी छप्पर उडालेली झोपडी असुन या झोपडीत जेवण करण्यासाठी भांडी ठेवलेली आहेत. गावकरी येथे नेहमी दोन कळशी पाणी भरून ठेवतात. मंदिराच्या आवारात कोरडे पडलेले लहान तळे असुन एक उध्वस्त चौथरा आहे. मंदिरासमोरील उंचवट्यावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष असुन या वाडयाच्या ३-४ फुट उंचीच्या भिंती आजही शिल्लक आहेत. या वाडयाला आतील बाजुस अनेक दालने आहेत. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटी पासुन उंची २०६० फुट असुन गडाचा परिसर साधारण २५ एकरमध्ये सामावला आहे. गडाची पुर्व बाजू वगळता गडावर फारशी सपाटी नाही. वाडा पाहुन पुन्हा तटबंदीच्या कडेने आपल्या गडदर्शनास सुरवात करावी. वाडयाच्या पुढील भागात तटबंदीच्या काठावर कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहुन पुढे आल्यावर दोन बुरुजात असलेला गडाचा पूर्वाभिमुख दिसतो. या दोन्ही बुरुजाचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झालेले आहे. या बुरुजात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन या दरवाजातून खाली उतरत जाणाऱ्या काही पायऱ्या शिल्लक आहेत. गडाखालील हा भाग एका चिंचोळी सोंडेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी जोडला गेला आहे. या पायऱ्यांनी सावधगिरीने खाली उतरून दोन बुरुज,त्यातील दरवाजा व घडीव दगडात बांधलेली शेजारची तटबंदी पहाता येते. गडाचा हा भाग पाहुन तटबंदीवरून आपण उत्तर दिशेला वळतो. येथुन भैरवगड व दूरवर पसरलेले गड नदीचे पात्र नजरेस पडते. या भागात मोठ्या प्रमाणात असलेले वास्तुचे अवशेष पाहता गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी. या ठिकाणी मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन सर्व अवशेष त्यात लपलेले आहेत. येथुन पुढे आल्यावर खोलगट भागात मातीने भरलेला एक मोठा तलाव नजरेस पडतो पण पावसाळा वगळता यात पाणी रहात नाही. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर कातळात कोरलेले एक लहान टाके नजरेस पडते. येथुन पुढे दाट झाडी व उतार असुन या झाडीतुन मार्ग काढत गेल्यास आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. संपुर्ण गडफेरीस दीड तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

No comments:
Post a Comment