Thursday, December 10, 2020

सायन / शीवचा किल्ला आणि रिवा किल्ला

 माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्ला, रिवा किल्ला व सायनचा किल्ला, हे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली. वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आले.
पहाण्याची ठिकाणे :
सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे झाडीत २ तोफा पडलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायर्‍यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो. शीवच्या किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.
पोहोचण्याच्या वाटा :
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या पूर्व बाजूस उतरुन डाव्या हाताच्या फूटपाथने ३ मिनिटे चालल्यावर पूर्वद्रुतगती महामार्ग येतो. हा महामार्ग ओलांडल्यावर दुतर्फा पुरातन वृक्ष उभे असलेला रस्ता लागतो. ह्या रस्त्याने २ मिनिटातच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.

 Fort : Sion (also known as Shiv cha Killa)
Location: Sion (west - Mumbai)
Type: Land fort





It was built by the British Governor of Bombay Gerard Aungier atop a conical hillock. The fort was built between 1669 and 1677 (source : Wikipedia). To get to this fort one has to goto Sion (west) (near Sion Circle - Mumbai) cross Sion circle and go towards Dadar. Turn left after the first signal and ask for Jawaharlal Nehru Park (udyan). The way to the fort goes via this park. It is a small fort in dilapidated condition and nothing much to see on top. However the view of the surrounding areas gives an idea behind the strategy of building this fort.

 आम्ही निघालो होतो “सायन उर्फ शिवच्या” किल्ल्याकडे. पण वाटेतचं आम्हाला दिसला तो सायन मधीलच आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बागेतील “रिवा किल्ला”. येथील एकुलता एक बुरुज आता भग्न इतिहासाची साक्ष देत उभा आहे. बुरुजा पर्यंत पोहोचण्यास औषधी वनस्पतीच्या बागेतून एकमेव मार्ग आहे. दसरा-दिवाळी वगळता येथे कोणी येत नाही ह्याची चिन्हे येथे असलेल्या गचपणावरून आम्हाला आली. झाडोऱ्यातून मार्ग शोधत आम्ही पोहोचलो होतो ह्या एकाकी बुरुजपाशी. एकमेकांची विचारपूस करून झाल्यावर आम्ही आता निघालो होतो सायनच्या किल्ल्याकडे.
स्थळ दर्शक माहिती : 19.047287, 72.864729 (19°02'50.2"N 72°51'53.0"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : सायन उर्फ शिव (सेंट्रल मार्गिका )
रिवा किल्ल्याचा एकुलता एक बुरुज
Riwa.jpeg
मुंबईतील कदाचित सर्वात उंच असलेला हा किल्ला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या प्रवेश द्वारातून आत गेल्यावर थोडी उंची गाठली असता किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसू लागते. प्रेमी युगल, प्रोफाईल फोटोग्राफर ह्यांची मांदियाळी येथे दिसून येते आणि किल्ल्याची झालेली वाताहत सुद्धा.
तसे किल्ल्यावर अवशेषही आहेत, पण त्याचे सोयरेसुतक ह्या इकडे नेहमी येणाऱ्या मंडळींना नाही. त्यांना हवा असतो तो एखादा कोपरा काही क्षणासाठी किंवा हवी असते एखादी भिंत कुठल्याश्या फोटो साठी. आम्ही तर ह्या वातावरणात परग्रहवासी आहोत असे भासत होते आणि हेच आमच्याकडे बघण्याऱ्या नजरा आम्हाला खुणावून सांगत होत्या. त्यांच्या कडे कानाडोळा करत आम्ही इतिहासाचा मागोवा घेत होतो आणि आम्हाला इकडे दिसली एक धुळ खात पहुडलेली तोफ, एक दगड मातीने भरलेले टाके आणि टवके उडालेल्या भिंती.
स्थळ दर्शक माहिती : 19.046838, 72.867615 (19°02'48.6"N 72°52'03.4"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : सायन उर्फ शिव (सेंट्रल मार्गिका)
सायन किल्ला
Sion - 2.jpegसायन किल्ला
Sion - 1.jpeg

SION HILLOCK FORT
Location: Sion
Significance: Used as a watchtower by the British.
The Sion Hillock Fort was built atop a conical knoll for defense purposes, under the regime of the English East India Company, between 1669 and 1677 so it could keep a watch out for an attack from three sides-- the Siddis from South Mumbai, Portuguese from the North and Marathas from the East.
After 34 years, the Marathas and Peshwa dynasty declined and Salsette came under the British control while citadel was completely ignored, which is reflected in its current condition. The entire structure is broken down and in ruins. After Independence, it became the responsibility of the Archaeology Survey of India Authority but very little has been done. In 2009, efforts for its restoration began but was stopped midway due to lack of funds.
Did you know? At the base of the hill is a garden--the Pandit Jawaharlal Nehru Udyan-- through which you reach the fort. This garden used to be a firing range, once upon a time.
XI. RIWA FORT (Or Kala Killa)
Location: Dharavi
Significance: Used as watchtower to guard against the Portuguese and Marathas.
Hidden between the slums of Dharavi, we will find the Riwa Fort that was built by the Portuguese at the beginning of the 17th century, which remained in their control until 1665 when the British gained control over it. Because it was made using black stone, the locals commonly refer to Riwa Fort as the Kala Killa (Black Fort). In 1739, the island of Salsette was ceded to the Marathas and their power became obvious to everyone, including the British. They realized the importance of the Riwa Fort in helping them beat the Marathas and began to use it as a watchtower.
For many years, the fortress was fully functioning but with the change of war techniques, it began to lose importance. Sadly enough,the structure is currently in a broken down state and is still holding on thanks to the efforts of some locals around the area.


Did you know? There are three citadels in a stretch--on the Eastern Express Highway, on the Sion railway lines and the third behind the bus depot at Dharavi--making the exact location of this fortress a mystery even today.

शीव अर्थात सायनचा किल्ला
मुंबईमध्ये असलेल्या किल्ल्यांमधला हा एकमेव असा किल्ला जिथे पायऱ्या चढून जावं लागतं. डोंगरावरचा किल्ला म्हणजेच गिरिदुर्ग. सायन बस स्थानकाच्या अगदी समोरच असलेल्या छोट्याशा टेकडीवर बांधलेला हा किल्ला आहे. सायनच्या सरकारी उद्यानातून थोडं पुढे गेलं की अगदी खडकातच कोरलेल्या साधारण पस्तीस-चाळीस मजबूत दगडी पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून वर गेल्यावर किल्ल्याचे काही भग्नावशेष आजही आपल्याला त्याच्या भक्कमतेची जाणीव करून देतात. किल्ल्यावरून सभोवार नजर टाकली की सिमेंट-क्राँक्रीटचं अवाढव्य जंगल नजरेत भरतं. साधारण १६६९ साली इंग्रजांनी हा किल्ला बांधल्याची नोंद सापडते. सायक हिललॉक फोर्ट हे या किल्ल्याचं आणखी एक नाव.

(१) शीवचा किल्ला : प्रवेशद्वार - गूगलवरून साभार
(१) शीवचा किल्ला : प्रवेशद्वार – गूगलवरून साभार
शीवचा किल्ला :- मुंबई व साष्टी बेटांची सरहद्द म्हणजे शीवचा भाग. पोर्तुगीजांनी १५३४ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडून मुंबई बेटं ताब्यात आल्यानंतर  हा किल्ला बांधला.  पुढे मुंबई बेटांच्या हस्तांतरणाच्या वेळी हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. १७४० मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांचं साष्टी बेटांतून उच्चाटन करेपर्यंत हा शीवचा किल्ला ब्रिटिश व पोर्तुगीज यांच्या प्रदेशांच्या सरहद्दीवर अतिशय मोक्याचा किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. मुंबई बेटांमध्ये  माजगावच्या किल्ल्याच्या जोडीने हा किल्लाही उंच असल्यामुळे पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील सर्व किल्ल्यांना धोक्याचे इशारे देण्यासाठीही हा किल्ला महत्वाचा होता.  एक काळ असा होता की शीवच्या या किल्ल्यावरून नुसता माजगावचा किल्ला  नव्हे तर इतर किल्ले पहाता येत होते.

 आज या किल्ल्यावर चढून गेलं की उत्तम बाग केली आहे ती पाहून मन प्रसन्न होतं. किल्ल्यावरून जवळपासच्या मुंबई महानगराचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. उंच उंच वाढलेल्या गगनचुंबी इमारतींपुढे या किल्ल्याची उंची कमी वाटू लागली आहे.

 *"माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला.*

इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्ला, रिवा किल्ला व सायनचा किल्ला, हे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली. वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आले.

सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे झाडीत २ तोफा पडलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायर्‍यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो. शीवच्या किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.


सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्याना जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या दारातूनच पायर्यां चा रस्ता किल्ल्याकडे जात असल्याने आम्ही तेथुनच निघालो तर रखवालदाराने अडवले तेथील रखवालदार जरा खडूसच होता. म्हणे चार वाजेपर्यंत किल्यावर जाता येत नाही. म्हणे अख्या महाराष्ट्रातील किल्यांचे कार्यालय हेच आहे असे ठणकावून सांगु लागला पण दुसऱ्याच बाजूने रस्ता आहे हे सांगायचे कष्ट त्याने घेतले नाहीत. शीवच्या किल्ल्यावर तटबुरुजब्रिटीश कार्यालयाचे अवशेषदारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे दृश्य तसेच नवीन अद्यावत यंत्रणानी सजलेली देशातील पहिली मोनोरेल येथून दिसली. उपलब्ध माहितीनुसार ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्याश जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा.
 माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी हा शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्लारिवा किल्ला व सायनचा किल्लाहे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली होती . वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्या नंतर ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आले होते.

टोलेजंग इमारतीनी वेढलेल्या आणि वाढलेल्या मुंबईत सायन किल्लापण यांना किल्ला म्हणावे का असा प्रश्न पडेल अशी त्याची सध्याची अवस्था आहे ज्या 
किल्यानी एके काळी इथल्या भूमीचे रक्षण केले त्याच किल्ल्यांचे रक्षण करण्याची आज वेळ आली आहे .किल्ले म्हणजे पुरातन वैभवइतिहासाच्या पाऊलखुणा आणि ज्वलंत इतिहासाचे साक्षिदार हि वैशिष्टे ह्या किल्यांला लावता येणार नाही. सायन किल्ला दुर्दशा आणि दुर्दैव यांच्या कात्रीत सापडला आहे. तटबंदी वगळता किल्ला म्हणावा असे अवशेष तेथे उरलेले नाहीत . जेथे अवशेष उरले आहेत त्याभोवती कचऱ्याचा वळखा आहे . पडझडीमुळे दुर्दशा ओढवली आहे तर टवाळ पोरेअस्वच्छता आणि सगळ्यात भयंकर म्हणजे प्रेमाच्या उपरतीसाठी केला जाणारा वापर या दुर्दैवाच्या फेऱ्यात हे पुरातन वैभव शेवटच्या घटका मोजत आहे. एकीकडे गगनचुंबी इमारतीनी आकाशाला भिडणाऱ्या मुंबईतलं जिमनीवरचं हे वैभव पायदळी तुडवलं जात
असल्याची सरकारला कल्पनाही नाही. तरीही सायनचा किल्ला उद्यानात रुपांतरीत झाल्यामुळे थोडाफार बऱ्या अवस्थेत आहे . सागरी हालचाली वर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची बांधणी झाली होती असे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्याचे काम या किल्यांनी शेकडो वर्षांपूर्वी केले आहे त्याकाळी ज्या उद्देशाने हे किल्ले किनाऱ्यावर बांधण्यात आले होते तो उद्देश आजच्या ह्या परीस्थितीलाही लागू पडतो आहे हे सरकारच्या ध्यानात कधी येणारसागरी सुरक्षा हा आज पुन्हा एकदा कळीचा मुद्दा बनला आहे .
 
इ.स. १६७२ साली जंजिर्‍याच्या सिध्दीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी जे नविन किल्ले बांधले त्यात सायनच्या टेकडीवर असणार्‍या रिवा किल्ल्याचा समावेश होतो. माहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणार्‍या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरे कडून होणार्‍या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला.
पहाण्याची ठिकाणे :
रिवा किल्ल्याचा एकमेव अवशेष म्हणजे काळ्या पाषाणात उभा असलेला बुरुज.
पोहोचण्याच्या वाटा :
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरुन पूर्वेकडील डाव्या हाताच्या फुटपाथने चालत गेल्यावर २ मिनिटात आपण शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ पोहोचतो. ह्या महाविद्यालयाच्या परिसरात टेकडीच्या उतारावर आयुर्वेदिक वनस्पतींची बाग केलेली आहे. ह्या बागेतच रिवा किल्ल्याचा साक्षीदार असलेला एकमेव बुरुज उभा आहे.

 

शीवचा किल्ला

20171102_124255

मुंबईचा डॉन कोण? हा प्रश्न भिकू म्हात्रेने इतिहासकारांना किंवा पुरातत्व अभ्यासकांना सतराव्या शतकात विचारला असता तर कदाचित त्यांनी जेराल्ड ऑंजिअरचं नाव घेतलं असतं. आणि या डॉनची गंमत अशी की यानेच मुंबईच्या पोलीस दलाची स्थापना केली असं म्हणता येईल. मुंबईचे जुने रहिवासी भंडारी समाजाचे लोक … त्यांच्यापैकी ६०० जणांना प्रशिक्षित करून स्थापलेलं दल भंडारी मिलिशिया … ज्याचं रूपांतर पुढे मुंबई पोलिसमध्ये झालं. या दलाची स्थापना झाली तेव्हा त्यांचं प्रशिक्षण मुंबईत कुठं बरं झालं असेल? नोव्हेंबर अर्धा संपला आहे आणि मुंबईत हळूहळू थंडी पडायला लागली आहे तेव्हा एखादी सकाळ टाइम मशीनच्या प्रवासाला काढायला हरकत नाही. मुंबई किल्ल्यांचं शहर आहे तेव्हा आजची दर्याफिरस्ती करूया सायनच्या दुर्गात …

20171102_124252

मुंबई बंदर राखणाऱ्या इंग्लिशांनी या शहराचं आजचं स्वरूप घडवण्यात मोठा हातभार लावला … तसं करणं ही तेव्हाच्या इंग्लिश राष्ट्राची गरजही होतीच. एके काळी शिलाहार राजांनी वसवलेल्या या शहराची परिस्थिती पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत बिघडत गेली होती. पुढे जरी मुंबई बंदर जागतिक व्यापाराचं एक केंद्र बनलं, सुबत्ता आणि ब्रिटिश सत्ता इथं कालांतराने नांदू लागल्या तरीही ऑंजिअरच्या आधी इथला कंपनीचा कारभार बजबजपुरीचा होता. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आणि खाजणाचा प्रदेश त्यामुळे इथं नेमणूक होणं या गोष्टीला ब्रिटिश अधिकारी शिक्षाच समजत असत. ऑंजिअर इथं १६६२ CE मध्ये प्रथम आला असावा असं जेम्स डग्लस मानतो. हे बेट पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रागांझाच्या विवाहात ब्रिटिशांना आंदण मिळाले होते … ब्रिटिशांना साष्टी व मुंबईचा ताबा हवा होता पण पोर्तुगीज तयार होत नव्हते. पुढं मुंबई बेटाचा ताबा हंफ्री कुकने घेतला आणि हळूहळू शीव, धारावी, माहीम परिसरही ब्रिटिशांच्या ताब्यात आला. आजच्या दक्षिण मुंबईत बॉंबे कॅसलचे काम जोमाने सुरु झाले. १६६४ CE मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतची दैना ब्रिटिशांनी पाहिली होती त्यामुळे त्यांना आता सुरतपेक्षा सुरक्षित व्यापारी ठाणे हवेच होते.

bombay castle

The British Fort of Bombay – painting by Philippus Baldeus (1632-72)

ऑंजिअरने इथं बाजारपेठा, उद्योगधंदे यांना प्रोत्साहन देऊन धनाढ्य व्यापारी लोकांना बोलावून घेतलं. मुंबई बेटाची लोकसंख्या आता दहा हजारांवरून तब्बल साठ हजारावर जाऊन पोहोचली. भीमजी पारेख नावाच्या माणसाने इथं छापखाना सुरु केला (छत्रपती शिवाजी महाराजांनी याच माणसाच्या मदतीने स्वराज्यातही छापखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नसावा असं दिसतं) मुस्लिम, हिंदू आणि पारशी अशा तीन भिन्न समाजांना एकत्र आणायचे कसे याचा अगदी सोपा उपाय ऑंजिरअरने इथल्याच संस्कृतीतून घेतला … तो म्हणजे पंचायतींना मान्यता देण्याचा …

British Mumbai

पुढे १६७२ मध्ये सिद्दी याकूतखानाने मुंबई बेटावर धाड घातली … लूटमार.. जाळपोळ केली त्याचा धसका घेऊन आणि भविष्यात मराठ्यांच्या आक्रमणाची शक्यता घेऊन इंग्लिशांनी सगळ्या खाड्या आणि बंदरांवर कोटांची तटबंदी बांधायला सुरुवात केली. परळच्या बेटावरून पोर्तुगीजांच्या सीमेवर आणि साष्टी बेटावर लक्ष ठेवण्यासाठी सायनच्या किल्ल्याची जागा योग्य होती आणि अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांनी सायनचा किल्ला बांधायला घेतला. डॉ मिलिंद पराडकर या दुर्ग अभ्यासकांच्या मते या किल्ल्याच्या बांधणीत स्थानिक मूल्यांवर युरोपियन शैलीचा प्रभाव दिसतो.

20171102_124915

सायन रेल्वे स्टेशनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी नेहरू उद्यान आहे. तिथूनच बांधलेल्या दगडी पायऱ्यांच्या रस्त्यावरून आपल्याला माथा गाठता येतो. परिसर स्वच्छ आहे पण भिंतींवर नावं कोरणे, तोडफोड करणे असल्या गोष्टींमुळे झपाट्याने या वास्तूची पडझड होते आहे. माथ्यावर पोहोचले की दरवाजाच्या जवळ पाण्याच्या टाक्याप्रमाणे बांधलेला खंदक दिसतो.

20171102_12450520171102_124453

किल्ल्याचे भग्नावशेष त्याच्या जुन्या रचनेची काहीशी कल्पना देतात. आज साष्टी आणि मुंबईचे परळ बेट यांच्यामध्ये अंतर उरलेले नाही. परंतु सतराव्या शतकात खाडीत आणि खाडीपलीकडे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवायला हे ठिकाण उत्तम होते.

20171102_12485720171102_12472520171102_12495920171102_12484920171102_124647

ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर मिलिंद पराडकरांनी मुंबईतील किल्ल्यांबद्दल लिहिताना शिवाजी महाराजांचे आकलन कसे होते याचा दाखला देणारा रामचंद्रपंत अमात्याने नोंदलेला आज्ञापत्रातील उतारा शेयर केला आहे तो वाचण्याजोगा आहे … काय म्हणतात छत्रपती शिवाजीमहाराज ते पाहू …

सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, वलंदेज, फरासीस, डिंगमारादी टोपीकर हे ही लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड साहुकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करितात. त्यांचे हुकमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती साहुकारीस येतात. राज्य करणारास स्थळलोभ नाही असे काय घडो पाहाते? तथापि टोपीकरांचा या प्रान्ते प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी हा पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. त्याहीवरी ही हट्टी जात. हाती आले स्थळ मेलियाने सोडावयाचे नव्हेत. यांची आमदरफ्ती आले गेले ऐसीच असो द्यावी… वखारीस जागा देणे झाले तरी खाडीचे सेजारी समुद्रतीरी न द्यावा. तैसे ठायी जागा दिधल्यावरी आपले मर्यादेने आहेत तो आहेत, नाही ते समयी आरमार, दारूगोळी हेच यांचे बळ. आरमार पाठीशी देऊन त्याचे बळे त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेंव्हा तितके स्थळ राज्यातून गेलेच. याकरिता यांस जागा देणेच, तरी खाडी लांब, गांव दोन गांव राजापुरासारखी असेल तेथे द्यावी… इमारतीचे घर यांस बांधो देऊ नये. याप्रकारे राहिले तर बरे नाही तर त्याविणे प्रयोजन नाही…

Mahim Puget

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात जुन्या मुंबईची अनेक सुंदर चित्रे आहेत …. त्यातील मला खूपच भावलेलं चित्र म्हणजे मेजर पूजेने रेखाटलेले माहीमच्या किनाऱ्याचे चित्र. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...