Thursday, December 10, 2020

शिवडी किल्ला

 सात बेटांचा समुह असलेल्या मुंबई बेटांवर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबई बेटांचा प्रथम लिखित उल्लेख इजिप्शियन भूगोलतज्ञ टॉलमी याने इ.स. १५० मध्ये केला. सातवाहनांच्या काळात मुंबई बेटांवरुन परदेशांशी व्यापार चालत असे. इ. सनाच्या ५ व्या व ६ व्या शतकात या भागावर मौर्य कुळाचे राज्य होते व त्यांची राजधानी होती ‘पुरी‘ म्हणजेच आजचे एलिफंटा बेट. मौर्यांनंतर चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव ह्या राजघराण्यांनी मुंबईवर राज्य केले. इ.स. ११४० मध्ये गुजरातच्या प्रतापबिंबाने शिलाहारांचा पराभव करुन महिकावती उर्फ माहीम येथे आपली राजधानी वसवली. इ.स. १३२० मध्ये गुजरातचा सुलतान मुबारक शहाने मुंबई जिंकली पोर्तुगिज व गुजरातचा शेवटचा सुलतान बहादूरशहा यांच्यात १५३४ मध्ये झालेल्या तहात मुंबई ,साष्टी व वसई बेटांचा ताबा पोर्तुगिजांकडे आला. १६६२ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगिज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी झाले; त्यात ‘‘मुंबईबेट’’ आंदण म्हणून इंग्रजांना मिळाली.

मुंबई बेटावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले बांद्रा, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज व बॉम्बे फोर्ट ह्यापैकी बॉम्बे फोर्ट, माझगाव व डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत.
इतिहास :
मुंबई बेटांच्या पूर्व किनार्‍यांचे रक्षण करण्यासाठी सेंटजॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ साली जंजिर्‍याच्या सिध्दीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनार्‍यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नुतनीकरण/मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले.

इ.स. १६८९ मध्ये जंजिर्‍याच्या सिध्दी याकूत खानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी, माझगाव, माहीम हे किल्ले जिंकले. त्यावेळी शिवडी किल्ल्यावर ५० शिपाई, १ सुभेदार व १० तोफा असल्याची नोंद सापडते.


इंग्रजांनी एत्तद्देशीयांचा बिमोड केल्यावर ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून केला. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून ह्याचा उपयोग झाला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे, घारापूरीचा डोंगर ह्या परिसरात होणार्‍या व्यापारावर, जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचा उपयोग होत असे.
पहाण्याची ठिकाणे :
मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व खात्याने केले आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी गर्द झाडीतून जाणारा पायर्‍यांचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणार्‍या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला. किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या तटात बांधलेल्या प्रशस्त जिन्याने तटावर जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
हार्बर रेल्वेमार्गावरील शिवडी स्थानकाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. शिवडी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरुन बाहेर पडून ‘‘कोलगेट पामोलिव्ह‘‘ कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता पकडावा. ह्या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण शिवडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे ‘शिवडीची दलदल‘ हे ‘‘फ्लेमिंगो‘‘ पक्षांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान ‘‘फ्लेमिंगो‘‘ हजारोंच्या संख्येने इथे येतात.

मुंबईचा राखणदार – शिवडीचा किल्ला

मुंबई बेटावर वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, सेंट जॉर्ज फोर्ट, बॉम्बे फोर्ट असे एकूण अकरा किल्ले बांधण्यात आले आहेत. पैकी बॉम्बे,फोर्ट, माझगाव आणि डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत. मात्र, मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणारे वरळी, सायन, धारावी, माहीम आणि वांद्र्याचा किल्ला आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. एकेकाळी मुंबईची राखण करणारा शिवडीचा किल्लाही त्याला अपवाद नाही.

हार्बर लाइनवरचे शिवडी स्थानक. पश्चिमेला उतरलात की, सुक्या मासळीचा वास नाकात भरतो. शिवडीच्या पश्चिमेलाच तशी माणसांची वस्ती. पूर्वेकडचा भाग तसा ओसाडच म्हणावा लागेल. कारण माणसांची अगदीच तुरळक वस्ती आणि बाकी सगळं घासलेट बंदर म्हणूनच परिचित. याच ठिकाणी जानेवारी ते एप्रिल महिन्यात फ्लेमिंगो बघायला गर्दी होते. एरव्ही या परिसरात फारसं कोणी फिरकतच नसावं. दिवसाढवळ्याही या ठिकाणी माणसं तशी फारच कमी दिसतात. सुरुवातीची एक-दोन टपरीवजा दुकानं सोडली तर बाकी सगळा परिसर ओसाडच म्हणावा लागेल. असं जरी असलं तरी हा परिसर दुतर्फा झाडांचा. या रस्त्याच्या टोकाशी आलं की, समोरच दग्र्याचं नाव लिहिलेली हिरवी पाटी दिसते. त्या कमानीपासून पुढे लांब लांब पाय-या दिसतात. या पाय-या किल्ल्याच्या आहेत याची पुसटशी कल्पनाही कोणाला येणार नाही. या पाय-या चढून वर गेलं की, प्रथम नजरेत भरतो तो पांढरा, हिरा आणि गुलाबी रंगातला सैयद जलाल शाह सैयद मुराद शाह यांचा दर्गा दिसतो. दर्ग्याच्या बाजूला शिवडीच्या खाडीचा नयनरम्य परिसर नजरेत भरतो. पायऱ्या चढून आल्याचा शीण कुठल्या कुठे निघून जातो. या खाडीचं आणखी एक वैशिटय़ म्हणजे या खाडीतून समोरच चेंबुरचे अणुशक्तीनगरही दिसतं. या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेऊन जरासे वळलात की. बाजूलाच असलेली तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. हाच तो शिवडीचा किल्ला.

या किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे. मध्यंतरी किल्ल्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. मुख्य रस्त्यापासून जरा लांब असल्याने गोंगाटाचा लवलेशही नाही. त्यात भक्कम तटबंदी त्यामुळे शिरकाव करताना मन जरा साशंक होतं. इतकंच काय इथे कोणाला काही झालं तरी कित्येक दिवस कोणाला कळणारच नाही. पण एकदा का किल्ल्यात शिरकाव केला की, आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही. मजबूत तटबंदीत असलेली मोकळी जागा, मध्येच असणा-या पाय-या यामुळे आसपासची मुलं येथे अभ्यास करायला येतात.

मुंबई बेटाच्या पूर्व किना-याचे रक्षण करण्यासाठी सेंट जॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. बॉम्बे फोर्टवर होणारे थेट हल्ले या बालेकिल्ल्यांमुळे रोखता यावे, हा याचा मुख्य हेतू होता. शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ मध्ये जंजि-याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किना-यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नूतनीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये केले. १६८९ मध्ये जंजि-याच्या सिद्धी याकूत खानने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात त्याने शिवडी, माहीम आणि माझगाव हे किल्ले जिंकले. त्यावेळी शिवडी किल्ल्यावर ५० शिपाई, एक सुभेदार आणि १० तोफा असल्याची नोंद ऐतिहासिक पुस्तकात सापडते. इंग्रजांनी देशांतर्गत शस्त्रूंचा बिमोड केल्यावर या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात होता. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून याचा उपयोग झाला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे घारापुरीचा डोंगर या परिसरात होणा-या व्यापारावर, जहाजांवर, लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.

असा हा शिवडीचा किल्ला. इतर किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्याची परिस्थिती तशी उत्तमच आहे, असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य नसलं तरी गर्दुल्ले, भिकारी यांचा विळखा पडला आहे. रात्रीच्या काळोखात या ठिकाणी गैरवर्तनही होत असल्याची माहिती किल्ल्याची देखभाल करणारे अब्दुल रहीम मुजावर यांनी दिली. गेली ४०० वर्षे मुजावर यांचं कुटुंब किल्ल्याच्या शेजारी असलेल्या दग्र्याची आणि किल्ल्याची देखभाल करत आहेत. ते म्हणतात, ‘आमच्या परीने जेवढं शक्य होतं तितकी देखभाल आम्ही करतो. पण प्रत्येकाला थोपवणं आम्हाला शक्य होत नाही.’

मुंबईच्या इतिहासात शिवडी किल्ल्याचे स्थान महत्त्वपूर्ण होते. सत्ता संपादनासाठी पूर्वी गडकिल्ल्यांचे महत्त्व होते. मात्र, आता सत्ता संपादनासाठी किल्ल्यांची गरज उरली नसल्यामुळे हा किल्लाही अडगळीत पडला आहे. मुंबईचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या इतिहासाच्या साक्षीदाराचा उल्लेख करण्यावाचून गत्यंतर नसेल.
 Fort: Sewree fort
Location : Sewree (E) - Mumbai
Type: Sea fort.

Route: Dadar (TT) -> Khodadad Circle -> Wadala (E) -> Godrej Foods -> Hindustan Petroleum (Sewree) -> turn right in front of Railway Gate -> ask for Colgate Company -> Fort is near a Dargah.

Some type of inscription describing when the fort was built
One of the room type structures inside the fort

The expanse of the Sewree fort
Old entrance to the fort
This fort was built in 1680 by the British to ward off attacks by the Siddhis of Janjira. This was basically used as a watchtower. Structures inside the fort have been renovated recently and hence we can see many intact things.
येथून आम्ही मोर्चा वळविला तो शिवडीच्या किल्ल्याकडे. मुंबईच्या पुर्व तटावर लक्ष ठेवण्याचे काम हा किल्ला अजूनही दक्षतेने पार पाडत आहे. किल्ल्या शेजारीच जलाल शाह मुराद शाह बाबांचा दर्गाह आहे. किल्ला आणि दर्ग्याच्या परिसरातील डेरेदार वृक्ष पांथस्थाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातात. बऱ्यापैकी सुस्थित असलेल्या ह्या किल्ल्यात आपल्याला दिसतात त्या मोठ्या खोल्या, काही जिणे, कोठार, तटबंदी, बुरुज आणि इतर काही अवशेष. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा तास पुरेसा आहे.
स्थळ दर्शक माहिती : 18.999475, 72.859996 (18°59'58.1"N 72°51'36.0"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : शिवडी (हार्बर मार्गिका)
शिवडी किल्ल्याचे प्रवेशद्वार
Shivadi - 3.jpegशिवडी किल्ल्यातील अवशेष
Shivadi -1.jpegशिवडी किल्ल्यातील अवशेष
Shivadi - 2.jpeg
  
Location: Sewri
Significance: Watchtower
The East India Company and the Mughals were constantly at war with each other because of their interest in India. The Siddis, an ethnic group of African descent had allied themselves with the Mughals and were constantly attacking the British. Unable to deal with the relentless attacks, the British constructed several fortifications around Mumbai, including the Sewri Fort. The British went all out to create a fortress that would protect them and so it was protected by an army of 50 sepoys under a subedar. In 1689, the Siddi general, Yadi Sakat, with an army of 20,000 men, invaded Mumbai and captured the Sewri fort, the Mazagon Fort, and went on to sack the town of Mahim.
Once the regional powers fell, the building came to be used to house prisoners and subsequently became a Bombay Port Trust store. At present, the fort is owned by Maharashtra State’s Department of Archaeology and Museums.
Did you know? It is rumoured that the army stationed here were equipped with around 8-10 cannons and it is because of these cannons that they were able to repel a Portuguese attack in 1772.
 
 
 
 
 शिवडीचा किल्ला
शिवडीची खाडी आता फ्लेमिंगो आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण याच खाडीजवळ असलेला हा शिवडीचा किल्ला मात्र तेवढा उपेक्षित राहिला आहे. वडाळ्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचं हॉस्पिटल ओलांडून शिवडीकडे जाताना बीपीसीएल कॉम्प्लेक्सच्या जवळच या किल्ल्यात जाण्याचा रस्ता आहे. मुख्य रस्त्यापासून किल्ल्याचं प्रवेशद्वार थोडं आतल्या बाजूला असल्याने बाहेरून, इथं किल्ला आहे असं लक्षात येत नाही. साधारण १६८०च्या आसपास बांधलेल्या या किल्ल्यात पायऱ्यांचे जिने असलेलं जुनं बांधकाम भक्कमपणे उभं असलेलं आजही पाहायला मिळतं.
शिवडीचा किल्ला :- १६६५ साली मुंबई बेट ताब्यात मिळाल्यानंतरही शिवडीचा किल्ला बांधायला १६८० साल उजाडावे लागले. १६८९ मध्ये जंजि-याच्या सिद्दीने मुंबईवर स्वारी करून शिवडी व माजगाव हे दोन्ही किल्ले जाळून नष्ट केले. मात्र औरंगजेबाच्या मध्यस्थीनंतर ते पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतरची डागडुजी १७६८ मध्ये करण्यात आली कारण १७३९ मध्ये मराठ्यांनी साष्टीतून पोर्तुगीजांना हुसकावून लावले होते व त्यामुळे मराठ्यांच्या राज्याची हद्द ब्रिटिशांच्या उंब-यापर्यंत येऊन ठेपली होती. यामुळेच बहुधा या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली असावी. १७८९ पासून या दुर्गाचा उपयोग प्रथम तुरूंग व नंतर गोदामे असा केला जाऊ लागला.
शिवडीच्या किल्ल्यात रंगलेला क्रिकेटचा खेळ : छाया. मंगेश नाबर
 
शिवडीचा किल्ला* 🗡️

*"मुंबई बेटांच्या पूर्व किनार्‍यांचे रक्षण करण्यासाठी सेंटजॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला.*

१५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ साली जंजिर्‍याच्या सिध्दीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनार्‍यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नुतनीकरण/मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले.

इ.स. १६८९ मध्ये जंजिर्‍याच्या सिध्दी याकूत खानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी, माझगाव, माहीम हे किल्ले जिंकले. त्यावेळी शिवडी किल्ल्यावर ५० शिपाई, १ सुभेदार व १० तोफा असल्याची नोंद सापडते.

इंग्रजांनी एत्तद्देशीयांचा बिमोड केल्यावर ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून केला. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून ह्याचा उपयोग झाला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे, घारापूरीचा डोंगर ह्या परिसरात होणार्‍या व्यापारावर, जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचा उपयोग होत असे.

मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व खात्याने केले आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी गर्द झाडीतून जाणारा पायर्‍यांचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणार्‍या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला. किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या तटात बांधलेल्या प्रशस्त जिन्याने तटावर जाता येते.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...