वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहीमचा किल्ला व बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी ‘यू‘ या अक्षरा सारखा आकार तयार होतो. ह्या ठिकाणी नैसर्गिक अंतर्वक्र भूशिरामुळे येथे समुद्र नेहमीच शांत असतो. त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वहातूक होत असे. ह्या जलवहातूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला.
वरळीच्या टेकडीवर असलेल्या ह्या किल्ल्याची नुकतीच डागडुजी पुरातत्व खात्याने केली आहे. त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. छोट्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्या दरवाज्याच्या माथ्यावर घंटा बांधायचा छोटा टॉवर आहे. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजुला अलिकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जीना बांधलेला आहे. ह्या जिन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन बांद्रा, माहीम पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. १७ व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांचा वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहाता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
दादरहून वरळी कोळीवाड्यात जाणार्या (१६९;५६) बेस्ट बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन मच्छिमार वसाहतीतून १० मिनीटे चालत गेल्यावर आपण ह्या किल्ल्याजवळ पोहोचतो. किल्ला छोटा व आटोपशिर असल्यामुळे अर्ध्यातासात पाहून होतो.
वरळीचा किल्ला
साधारण १६७५ साली बांधलेला हा किल्ला अगदी दुरूनही सहज नजरेत भरतो. मात्र
किल्ल्यावर जायचं तर वरळी कोळीवाड्यातल्या शेकडो घरांची रांग ओलांडावी
लागते. कुठे चुकत चुकत, तर कुठे किल्ल्यावर जायचा रस्ता विचारात आपण थेट
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशीच येऊन थबकतो. मुंबईमध्ये असलेल्या
किल्ल्यांपैकी सर्वात सुस्थितीत असलेला हा किल्ला आहे. आजुबाजूच्या
परिसरातले रहिवासी किल्ल्याची आणि किल्ल्यात असलेल्या मंदिराच्या
स्वच्छतेची अगदी नीट काळजी घेतात. किल्ल्यावरून समोरच्या वांद्रे-वरळी सी
लिंकचा अगदी अप्रतिम नजारा दिसतो.
वरळी - प्रभादेवी च्या रस्त्याने पुढे जात आम्ही
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टी वर असलेल्या वरळी किल्ल्यावर आलो.
कोळीवाड्यात असल्याने किल्ल्याकडे जाताना दिसले ते कामात मग्न असलेले कोळी
मित्र. कोळीवाड्यातील शेवटच्या बस स्टॉप वरून साधारण १५ मिनिटे चाल करून
किल्ल्याच्या प्रवेश द्वाराशी आम्ही पोहोचलो होतो पण आता दिवसभराच्या
दगदगीने थकवा जाणवायला लागला होता पण किल्ल्यात प्रवेश करताच बांद्रा -
वरळी सी लिंक च्या विहंगम दृष्याने आमचा थकवा पूर्णपणे नाहीशा झाला.
किल्ल्यात हनुमानाचे एक छोटेखानी मंदिर आहे आणि एक छोटीशी व्यायामशाळा
सुद्धा आहे. मुंबईतील सकाळपासून बघितलेल्या किल्ल्यापैकी हा किल्ला सगळ्यात
स्वछ असा किल्ला होता. किल्ल्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा होत
असल्यामुळे सुद्धा स्वच्छता असावी.
स्थळ दर्शक माहिती : 19.023675, 72.816998 (19°01’25.2″N 72°49’01.2″E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : एल्फिस्टन मार्ग (पश्चिम मार्गिका)
वरळी किल्ला
प्रभादेवीच्या टोलेजंग इमारती
बांद्रा - वरळी समुद्री पुल

आता संध्याकाळ आपले पंख पसरवायला लागली होती आणि नभात रंगाची उधळण होत
होती. एका बाजूला सुंदर असा समुद्री पुल आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या
प्रभादेवीच्या टोलेजंग इमारती ह्या रंगसंगती मधे तर फारच आकर्षक दिसत
होत्या. त्यांची छबी टिपण्याचा केलेला हा एक प्रयत्न
Fort: Worli
Type: Sea fort
Location: Worli (south Mumbai)
This
fort was built in 1675 by the British to keep a watch over the sea and
to ward off enemies and pirates from the sea. It now houses a gym inside
the fort. The above pictures seem to be of a facelifted fort done by
some NGO and is not the actual fort. The actual fort lies just behind
this one and is razed to the ground.











Location: Worli
Significance: One of the watchtowers of Mumbai
If you were to head down to the Worli Fort, the unmistakable smell of
fish is likely to take over your senses thanks to its location in the
middle of the Worli fishing village. But there is more to this place
than just the tiny bylanes filled with fisherfolk that lead us to it. A
magnificent structure that stands on the Arabian Sea that was built by
the British around 1675 as a precaution against invasions, you might
find it hard to believe now but the importance of this structure lies in
its strategic location.
If not for this fortress, Bombay would
have remained open to outsiders for attack. It was strategically
located in such a way that it overlooked the Mahim Bay at the time, and
from here, the British could keep a lookout for enemy ships.
It is
quite unfortunate that our Government has made no efforts to protect
this heritage site and it is because of the British architectural
brilliance that the ancient watchtower has managed to retain its old
glory.
Did you know? Many wrongly assume that the
fort was constructed by the Portuguese around the 16th century but in
reality, it was built much after the Portuguese left the country.

No comments:
Post a Comment