वांद्रा किल्ल्याची नवी ओळख बांद्रा बॅण्डस्टॅण्ड अशी आहे असे म्हटले तर नवल वाटायला नको. कारण तिथे किल्ला आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. बॅण्डस्टॅण्ड येथे असलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलला लागून जो रस्ता जातो, तो रस्ता थेट आपल्याला किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातो.
आज जो किल्ल्याचा भाग आपल्याला दिसतो, त्या भागाला किल्ला किती म्हणायचे हा मोठा प्रश्न आहे. पण पेशवे दप्तरामध्ये “वेसाव्याचा किल्ला हा माहीम व वांद्रे येथील किल्ल्यांइतका मोठा आहे” असा उल्लेख आहे. म्हणजे पेशवेकाळात हा किल्ला आत्तापेक्षा भरपूर मोठा होता. किल्ला ज्या टेकडावर बांधलेला आहे त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी खडकाळ समुद्रकिनारा आहे. किल्ल्यांची पश्चिम आणि दक्षिण बाजू तीव्र कड्याची असून पूर्व व उत्तर दिशेची बाजू कमी उताराची आहे.

जिथे रस्ता संपतो, तिथेच किल्ल्याचा ईशान्यभिमुख दरवाजा आहे. ह्या दरवाज्यावर पोर्तुगीज भाषेतील लेख आहे. लेखानुसार १६४० साली किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर दरवाज्याच्यावर शिलालेख असलेला चौकोनी दगड बसवलेला असेल. मुख्य दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे खोलीचे अवशेष दिसतात. ह्या खोलीचे प्रयोजन काय असावे हे कळून येत नाही. मुख्य प्रवेशद्वार ते दुसरे दक्षिणाभिमुख दरवाज्यापर्यंत जमीन समतल असून ह्या भागात तटबंदी आहे. समुद्राच्या बाजूकडील तटबंदी आतल्या बाजूने फक्त कमरेइतकीच उंच आहे. आतल्या बाजूने तटबंदी कमी उंचीची असली तरी समुद्राच्या बाजूने ही भिंत चढून येणे कठीण आहे. ह्याच भागात किल्ल्याचा दुसरा तटबंदीयुक्त दक्षिणाभिमुखी दरवाजा आहे. ह्या दरवाज्याच्या वर बेहरामजी जीजीभॉय यांनी शिलालेख बसवला आहे. तो लेख पुढीलप्रमाणे:
BYRAMJEE JEEJEEBHOY POINT
THE LAND FORMING THIS POINT AND THE PATHWAY LEADING TO IT WAS PRESENTED TO THE PUBLIC BY BYRAMJEE JEEJEEBHOY ESQ RE C.S.I. WHO ALSO CONTRIBUTED A LARGE PORTION OF THE EXPENSES OF CONSTRUCTING THE SEA SIDE ROAD. AND IT IS THEREFORE ALSO CALLED AFTER HIM THE BYRAMJEE JEEJEEBHOY ROAD.
ह्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर नैसर्गिक दगडांनी बनलेला चढ आहे. ह्या ठिकाणी नंतरच्या काळात पायऱ्या बांधलेल्या आहेत. ह्या भागातील तटबंदी पूर्णपणे पडून गेली आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी येतो. ह्या ठिकाणावरून माहीम खाडी, अरबी समुद्र आणि वरळी-बांद्रा सीलिंकचे उत्तम दर्शन होते. किल्ल्यावर इतर कोणतेही अवशेष नाही आहेत.

किल्ल्याचे दरवाजे ज्या भिंतीत बांधले आहेत त्या भिंती दगडी असल्या तरी दरवाज्याच्या वरचा भाग विटांनी बांधलेला आहे हे येथील दरवाज्यांचे वैशिष्ट्य.
आज आपल्याला जो वांद्रे किल्ल्याचा भाग दिसतो ते किल्ल्याचे पश्चिम बाजूकडील टोक आहे कारण बाकी किल्ला ब्रिटीशांच्या सल्ल्यानुसार १७३९ साली पोर्तुगिजांनीच पाडून टाकला होता.
माहीम खाडीवर लष्करी ठाणे उभारणे पोर्तुगीजांना आवश्यक वाटले असावे म्हणून हा किल्ला बांधला असावा. १६व्या शतकातील नोंदीत “या खाडीत कोणत्याही आकाराची नौका यातून पुढे जाऊ शकणार नाही इतकी ही खाडी खडकाळ आहे” असा उल्लेख आढळतो. मुंबई बेट ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यानंतर सरहद्दीवरील महत्वाचा किल्ला बनला. मराठ्यांनी साष्टी बेट जिंकल्यानंतरसुध्दा ह्या किल्ल्याचे महत्त्व कमी झाले नव्हते.
१५३४ साली गुजरातचा सुलतान बहादूर शाह याचा पराभव केल्यानंतर पोर्तुगीजांनी ह्या भागात आपला तळ उभारला. ह्याच काळात पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर अनेक सागरी किल्ल्यांची उभारणी केली. त्यापैकीच मोक्याच्या जागी बांधलेला बांद्रा किल्ला. पोर्तुगीजांनी १६४० साली माहीमची खाडी, अरबी समुद्र आणि माहीम बेटांचे संरक्षण करण्यासाठी साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला बांधला. बांद्र्याच्या दक्षिणेला असलेली मुंबईची सात बेटे पोर्तुगीजांनी इंग्रजांना भेट दिल्यानंतर ह्या किल्ल्याचे महत्त्व फार वाढले. हा किल्ला दक्षिणेला असलेल्या माहीम खाडी, माहीम शहर आणि वरळी बेट, तसेच पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रावर लक्ष ठेवतो. तसेच मुंबई बंदरात उत्तरेकडून येणाऱ्या समुद्र मार्गाचे सरंक्षण करतो. पोर्तुगीज काळात ह्या किल्ल्यावर संरक्षणासाठी सात तोफा होत्या.
१७३७ साली मराठ्यांनी खंडोजी माणकरांच्या नेतृत्वाखाली किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण हा हल्ला फसला व ते वेढा घालून बसले. मराठ्यांनी बहुतांश साष्टी परिसर जिंकलेला असला तरी त्यांना वेसावे आणि वांद्रे हे दोन्ही किल्ले जिंकता आले नाही. ७ फेब्रुवारी १७३९ रोजी वेसावे किल्ला मराठ्यांनी जिंकल्यानंतर, तसेच ब्रिटीशांनी सुध्दा मराठ्यांचे वाढलेले बळ पाहून आम्हाला आता मदत करता येणार नाही असे पोर्तुगीजांना कळवून टाकले. वांद्रे किल्ला जर मराठ्यांच्या ताब्यात गेला तर मराठे त्याचा उपयोग आपल्याविरुध्द करतील असे ब्रिटिशांना वाटल्यामुळे त्यांनी पोर्तुगिजांना किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार १५ मार्च – २५ मार्च १७३९ या काळात पोर्तुगिजांनीच हा किल्ला पाडून टाकला. १८१८ सालानंतर भारताच्या बहुतांश भागावर ब्रिटीशांची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्यामुळे किल्ल्यांचे महत्त्व ओसरू लागले. १८५० साली बायरामजी जीजीभॉय यांनी किल्ल्याची जागा विकत घेतली आणि तिथे पर्यटनस्थळ बनवले.
आज ह्या किल्ल्याची ओळख फक्त बांद्रा बॅण्डस्टॅण्ड अशी राहिलेली आहे. एकेकाळी ज्या किल्ल्याने पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज ह्या सत्ता आपल्या अंगाखांद्यावर खेळवल्या, आज त्याच किल्ल्याच्या अंगाखांद्यावर खेळतात लैलामजनू व प्रेमवीर. बहुधा काळाचा महिमा म्हणतात तो हाच. कालाय तस्मै नमः.
सूचना
ओहोटीच्या वेळेस समुद्रातील खडकावर जाणे टाळावे. भरतीचे पाणी वाढत असल्याचे लक्षात न आल्यामुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना ह्या परिसरात घडलेल्या आहेत, त्यामुळे समुद्रात आणि दगडावर बसण्याचा मोह टाळावा.
CASTELLA de AGUADA (Or BANDRA FORT)
Location: Bandra
Significance: A watchtower located around a freshwater spring.
Popularly known as the Bandra Fort, Castella de Aguada was built by the
Portuguese in 1640 as a watchtower overlooking Mahim Bay to the south,
the Arabian Sea to the West and southern islands of Mahim. Also meant to
the guard the northern sea route into Mumbai Harbour during the
Portuguese rule, the fortifications used to be armed with seven cannons
and smaller guns. Translated, Castella de Aguada means ‘Fort of
the Waterpoint,’ which is apt considering that there is a freshwater
spring in the vicinity that supplied potable water to the
ships cruising the coasts.
At the beginning of the 18th
century, following the defeat of the Portuguese, the Marathas were
emerging as strong political powers and all British properties in India
were under threat. So the British did the one thing they could to
ensure that they wouldn’t lose control over their properties
and demolished a part of the ‘killa’ so that the Marathas wouldn’t be
able to capture and use it to their advantage against the British army.
Despite
the precautions that had been taken, the Marathas captured the island
in 1739 and reigned over it until they lost it to the British in the
First Anglo-Maratha War in 1774. Afterwards, in 1830, the British
donated various portions of Salsette Island including Land’s End (where
Castella de Aguada is located) to
a Parsi philanthropist, Byramjee Jeejeebhoy. He established his
residence here and ultimately, the region was
renamed to Byramjee Jeejeebhoy Point.
Did you know? It
is believed that “Castella” is really a misspelling for Portuguese word
“Castelo” meaning castle This means the intention might have been to
name it Castelo de Aguada.
If you are a true history lover and if you respect our historical monuments, try to get here as early as possible around 6 am to 7 am. After that slowly this area will turn into a lover spot. You will notice the couples on each corner of this majestic monument. I don't understand, why they need corners to express their love?
The 15-20 stairs take us to a dead end, The fort is in demolished condition. The small garden on the top of the hill is now maintained by Bandra Band Stand Residents’ Trust. This area could be a part of the fort at those time. The view of Bandra-Worli Sea-link from fort was simply awesome.
वांद्र्याचा किल्ला
वांद्र्याचा प्रसिद्ध बँडस्टँड ओलांडून पुढे गेलं की ताजच्या पंचतारांकित
हॉटेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला. अगदी समुद्रकिनारी
वसलेला असल्यानं इथे येणं हा छान अनुभव असतो. किंबहुना म्हणूनच प्रेमी
युगुलांनी हा किल्ला कायम भरलेला असतो. वरळीच्या किल्ल्यातून दिसणाऱ्या सी
लिंकच्या बरोबर दुसऱ्या टोकाला हा किल्ला आहे. १६४०च्या सुमारास
पोर्तुगीजांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. किल्ल्याच्या
प्रवेशद्वारावरचा पोर्तुगीज भाषेतला शिलालेख अगदी ठळकपणे नजरेत भरतो.
केस्टेला डी अग्वादा हे या किल्ल्याचं पोर्तुगीजकालीन नाव आहे.



1) Mahim Fort – https://goo.gl/maps/FsUXR9ATwdA2
2) Bandra Fort – https://goo.gl/maps/SzT1byHiRC42
1) Mahim Fort – 19°02’31.6″N 72°50’16.4″E
2) Bandra Fort – 19°02’30.8″N 72°49’06.1″E
1) Mahim Fort – Old walls, sea view, escape route
2) Bandra Fort – Old wall and arch, Sea link view




















No comments:
Post a Comment