Monday, March 13, 2023

आयेश्वराच्या अंगणी

  सिन्नरला गोंदेश्वर मंदिर हल्ली बऱ्याच लोकांना माहिती आहे पण नाशिक शिर्डी  मार्गावर सरस्वती नदीच्या किनारी आयेश्वराच एक प्राचीन मंदिर आहे ते फारसं कोणाला माहिती नाही आणि त्या मंदिराबद्दल फारशी माहिती सुद्धा उपलब्ध नाही. हे महाराष्ट्रात बांधलेलं द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं एक सुंदर मंदिर आहे पण दुर्वैवाने मंदिराची पडझड दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे. मंदिर सुदैवाने राष्ट्रीय सुरक्षित स्मारकच्या यादीत मोडतं त्यामुळे मंदिरा भवतीचा परिसर अतिक्रमाणापासून सुरक्षित आणि मोकळा आहे आणि मंदिर परिसराला रीतसर कंपाउंड ही घातलेलं आहे. आयेश्वर मंदिर गावातील एका ओढ्याजवळ तीरावर आहे. मंदिर पुर्वाभिमुख आहे. मंदीराभोवती पुर्वी दगडी सीमाभिंतही असावी असा अंदाज आहे. मंडपावरील छप्पर पुर्णपणे नष्ट झाले आहे. तर गर्भगृहावरील छप्पर काही प्रमाणात शिल्लक आहे.
नाशिक शिर्डी मार्गावर सिन्नर जवळ आडवा फाटा लागतो नाशिकहून येतांना तिथून डावीकडे वळलं की लगेचच आपण आयेश्वर मंदिराजवळ पोचतो. तिथे पहिल्यांदा एका लहानसा बगीचा लागतो आणि त्याला लागून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रोडवर वळलो की लगेच आयेश्वर मंदिर दिसतं. ह्या मंदिराला एश्वर्येश्वर मंदिर (Aishwaryeshvar Temple)  असं ही म्हणतात.चक्रधर स्वामी यांच्या स्थानपोथी मध्ये ऐश्वर्येश्वर या देवळाचे उल्लेख येतात
 
   या मंदीराची माहिती घेण्यापुर्वी थोडे इतिहासात डोकावूया.  महाराष्ट्रात साधारण आठ्शे ते एक हजार वर्षांपूर्वीची देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. सेऊणदेशचे यादव. देवगिरी ही राजधानी म्हणून स्थापित व्हायची होती. यादव तेव्हा इथे राज्य करत होते ते राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणूनच. यादवांचीच एक शाखा अंजनेरीला होती. सेऊणचंद्र तिसरा ह्याचा शिलालेखच अंजनेरीच्या एका जैन मंदिरात आहे. अंजनेरीचे यादव हे बहुधा जैन धर्मीय होते. यादवांची दुसरी शाखा होती सिंदिनेरात, शिलालेखामध्ये श्रीनगर किंवा सिंदीनगर म्हणुन उल्लेखलेले आजचे सिन्नर त्याकाळात व्यापार उदीमाने भरभराटीला आलेले एक शहर होते. हे शहर यादवांच्या राजधानीचे शहर होते.त्यानंतर यादवांनी त्यांची राजधानी देवगिरीला हलवली. आजही या गावात यादवकालीन स्थापत्यशैलीचे अनेक मंदीरांचे अवशेष एकेकाळच्या वैभवाची साक्ष देत टिकून आहेत.  त्यातलं प्रमुख म्हणजे गोंदेश्वर अथवा गोविंंदेश्वर मंदिर. हे मंदिर यादवराजा गोविंद ह्याने बांधले असावे असे मानले जाते. भूमिज शैलीतले हे महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर. १३ व्या शतकातले. हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती. मात्र त्याहीआधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते. ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे ऐश्वर्येश्वराचे. ह्यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव ह्याने हे बांधले असावे असे मानले जाते. हा आईरमदेव म्हणजे सेऊणचंद्र द्वितिय ह्याच्या नंतरचा. आईरमदेवाचा कालखंड फारसा ज्ञात नाही. बहुधा हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत ह्याचा उल्लेख आहे.बहुधा हि दोन्ही मंदिरे राजाश्रयातून निर्मिली गेली असावीत. यातील गोंदेश्वर मंदिर भुमिज प्रकारचे तर आयेश्वर वेसर प्रकारचे आहे.
   असं म्हणतात की चालुक्य (कल्याणी) ज्याला द्राविडी शैली असं ही म्हणतात त्या शैलीतील सर्वात उत्तरेकडील मंदिर हे आयेश्वर मंदिर आहे. कालादृष्ट्या देखील जाणकारांच्या मते हे हेमाडपंती गोंदेश्वर मंदिरापेक्षा ही वरच्या क्रमावार आहे. हे मंदिर सुद्धा साधारण १०-११ व्या शतकातील आहे. पण मंदिर निर्मात्याची माहिती इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेलेली आहे. चालुक्य शैलीतील मंदिर महाराष्ट्रात ते ही यादव राज्यात कसे ह्याचा एक कयास असा मांडला जातो की त्याकाळी व्यापारी लोक विविध प्रदेशात व्यापार निमित्त फिरत, देश बघत आणि एखाद मंदिर किंवा त्याची कलाकुसर जरा मनात भरली तर हे श्रीमंत व्यापारी त्या कलाकारांना आपल्या भागात घेऊन येत आणि राजाच्या परवानगीने एखादा नवस किंवा आपल्या कडून धर्मिक कार्य घडावे म्हणून मंदिर निर्माण करत. कदाचित राजदरबारातील एखादा मंत्री सुद्धा अश्या प्रकारे मंदिर निर्मिती करत असे.

   मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदीराचा तलविन्यास आहे. मंदीराच्या मंडपाची अचुक मोजमापे या घडीला ज्ञात नसली तरी त्याची काही वास्तुशास्त्रॉय वैशिष्ट्ये उल्लेखनीय असून ती खालीलप्रमाणे आहेत.
१) अंतराळाच्या कमानीवर असलेले नृत्य करणार्या शिवाचे शिल्प
२) त्याच कमानीवर असलेले लक्ष्मीचे शिल्प आणि गर्भगृहाच्या द्वारावरील ललाटावर कोरलेल्या सप्तमातृकांच्या मुर्ती
३) अंतराळाच्या छतावर दाखवण्यात आलेले अष्टदिकपाल.
४) उत्तरचालुक्यकालीन मंदिरात आढळणार्या स्तंभासारखे मंदिराचे स्तंभ
५) गर्भगृहाच्या बाह्यांगावर नंतरच्या काळातील कर्नाट शैलीचे अर्धस्तंभ आहेत.
  या सर्व वैशिष्ट्यामुळे हे मंदीर अकराव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकात दुसर्या सेउणचंद्राचा मुलगा परमदेव याने बांधले असावे असे तज्ञांचे मत झाले असावे. त्यामुळे या मंदीरांची शैली कर्नाटकातील मंदीराशी मिळतीजुळती असावी असा समज झाला. परिणामी हे मंदीर स्थानिक कलाकारांची कृती असूनही याला उत्तर चालुक्यकालीन असे कालवाचक विशेषण प्राप्त झाले. या मंदीरातील स्तंभावर कीचकहस्त आहेत. हे वैशीष्ट्य त्याकाळी गुजरातमध्ये प्रसिध्द असलेल्या सोळंकी वास्तुशैलितून आलेले आहे.
a 
   या मंदीराची तीन वैशिष्ट्य आपण अभ्यासली पाहीजेत.
  पहिले वैशीष्ट्य म्हणजे या मंदीराच्या गर्भगृहाचे पीठ हे कर्नाटकातील मंदीराच्या पीठाशी अधीक मिळतेजुळते आहे. दुसरे वैशिष्ट्य  म्हणजे गर्भगृहाच्या बाह्यांगावर असलेले अर्धस्तंभ आणि दोन अर्धस्तंभाच्या मध्ये असलेले मंजरीचे अलंकरण
तिसरे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहाच्या भद्रावरील कपोतालीच्या वरच्या विमानभागावर शूरसेनका एवजी येणारे शालाशिखर. दुर्दैवाने आज शिखराचा मुख्य भाग आज शिल्लक नाही. तो जर शिल्लक असता तर महाराष्ट्रातील सुरवातीच्या वेसर मंदीरांचा आणि याच काळातील उत्तर कर्नाटकातील वेसर मंदीरांचा अभ्यास होउ शकला असता.वेस्सर शैलीत शिखरभागात आडव्या पट्ट्या ठेवून ती उभारली जातात त्यामुळे मंदिरांची उभारणी झटपट होते पण शिखरभाग तसा कमकुवतही बनतो. मंदिराचे शिखर नाहीसे झाले आहे, त्यामुळे गाभारा भुंडा वाटतो.
 तर हे आयेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसं. अगदीच १०/१५ मिनिटात पाहून होईल असं. किंचित वेगळ्या शैलीच. द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं. मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. ऩक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना. मात्र अंतराळ खुप छोटे आहे.  आयेश्वर मंदिराचे ठळक असे दोनच भाग आहेत गाभारा आणि मंडप.  मंदिराचा चौथरा विस्तीर्ण आहे आणि त्यावर आणखी एक मंडप बांधण्याचा विचार ही असावा असं दिसतं पण ते काम पूर्ण झालं नाही. तिथे उभारलेले स्तंभ फक्त दिसतात.




सभामंडपातले स्तंभ बहुत नक्षीदार. मधूनच सुरसुंदरींची शिल्पे स्तंभांवर कोरलेली दिसतात.


मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षी कामा बरोबरच उत्तम मूर्तिकाम सुद्धा ह्या खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर बघून थक्क व्हायला होतं. 
    सभामंडपात दोन ओळीत मिळून चार खांब शिल्लक आहेत. या भागातील भिंतीही नाहीशा झाल्या आहेत. या मंदीराच्या तळभागी गजथर असावा. सध्या मात्र काहीच शिल्लक नाही. तीन ओळीत नउ शिल्पपट्ट बसवून येथे छत साधले आहे. या शिल्पपट्टात चालुक्य पध्दतीप्रमाणे अष्टदिकपाल कोरले आहेत. मधल्या पट्टावर काय असावे याबबत अंदाज बांधता येत नाही. याठिकाणी उत्तरेला घोड्यावर बसलेला कुबेर, इशान्येला बैलावर आरुढ झालेला ईश, पुर्वेला गजारुढ इंद्र, आग्नेयेला मेंढ्यावर बसलेला अग्नी, दक्षिणेला रेडयावर स्वार झालेला यम, नैऋत्येला मानवावर बसलेला निऋत्ती, वायव्येला हरणारुढ वायु हवेत, पण अग्नी आणि कुबेराची जागा येथे उलटसुलट झालेली दिसते. हे ही चालुक्य शैलीचे वैशिष्ट्य आहे. 
सभामंडपातील स्तंभावरची शिल्प समजावून घेउया.
a

शालभंजिका
a

 गंगा
a

ही कर्पुरसुंदरी का कोण
a
हा देव नक्की कोणता ते ओळखता आलं नाही
a

हा मात्र विष्णूच
a

सर्वच स्तंभ फार नजाकतीने कोरलेले आहेत.

a-a

स्तंभावर मंदिराचा डोलारा आपल्या हातांनी पेलणारे भारवाहक यक्ष आहेत. ह्यांनाच किचक असेही म्हणतात. यक्षांची संकल्पना पश्चिमेकडून आली, म्हणजे ग्रीकांकडून.ग्रीक किंवा पर्शियामधून. काही जण यक्षांचा उगम भारतातलाच असे काही अभ्यासक मानतात. यक्षदेवता कुबेर बाहेरून आलाय. सातवाहनकाळच्या शिल्पांत यक्ष मोठ्या प्रमाणावर दिसतात. बटबटीत डोळे,विद्रूप स्वरुप, बाहेर आलेल्या दाढा असे.आत वितानावर अष्ट दिक्पाल कोरलेले आढळतात.  या देवळात सप्तमातृकापट, भैरव,गणपती यांच्या  बरोबर ललाट बिंबावर गजलक्ष्मी दिसून येते.
मात्र या सप्तमातृकात अकरा आकृती आहेत. हे ही चालुक्यशैलीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. डाव्या बाजुस एका गणासह शिव तर उजव्या बाजुस गणपती व भैरव आहेत. गजलक्ष्मीच्या शिल्पाच्या वर शेषशायी विष्णु आहेत तसेच ब्रम्हाही कोरला आहे. दाराच्या दोन्ही अंगास द्वारपाल आहे.
      ह्याच्यापुढे अंतराळ आणि त्यापलीकडे गर्भगृह आहे. अंतराळावरही काही शिल्पे कोरलेली आहेत पण अंधारामुळे छायाचित्रे घेता येत नाहीत.

a

a

a

पण ह्या मंदिरच खर वैशिष्ठ आहे तर गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरलेले मकर तोरण.! गर्भगृहाच्या द्वारावर जे एक शिल्प आहे ते इथलं खरं वैभव. नटराज शिव.! 

    ह्या अर्धवर्तुळाकार तोरणाची सुरवात दरवाज्याचा खांबांपासून होते. दोन्ही खांबावर दोन मकर असून दरवाज्यावर गंधर्व कीचक ह्यांचे तोरण आहे आणि मध्यावर कीर्तिमुख आहे. मकराच्या शेपटीची नक्षी बनवण्यात आलेली आहे. मकरांच्या मुखातून निघालेली अर्धगोलाकार नक्षीदार शिल्पपट्टिका. दोन्ही बाजूंना शिवाचा एकेक अनुयायी मकरांचे सारथ्य करतोय. शिल्पपट्टीकेवर वादक वाद्य वाजवताहेत, भारवाहक यक्ष पट्टीका तोलत आहेत, मधेच शरभादि प्राणी आहेत तर त्याच्या वरच्या पट्टीकेवरील मोरांची रांगच आहे. तर संपूर्ण पटाच्या मध्यभागी शिव तांडवनृत्य करतोय. त्याच्या एका बाजूला पार्वती आहे तर दोन्ही बाजूला अनुयायी आहेत. पखवाजसदृश वाद्य वाजवताना एकजण तर अगदी स्पष्ट दिसतोय. नैसर्गिक झीज सोडली तर हे तोरण फारच अप्रतिम दिसत असणार.

a

 

 
 गाभारा साधा असून कोपऱ्यात अर्धे खांब आहेत. गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि मंडपात नंदी विराजमान आहेत. नंदीच्या गळ्यात माळ आणि पाठीवर झूल आहे पण दगडाची झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. . मंदिराच्या गाभार्यात सुबक अशी शिवपिंड आहे. कदाचित रोज कोणीतरी पूजेसाठी येत असावं पण सिन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे मंदिर इतकं शांत पाहून आश्चर्य वाटते.
     गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस सुद्धा सुंदर नक्षीकाम तर उरलेल्या कळसाच्या एका थरावर काही मूर्त्याही दिसतात. मंदिराचं शिखर मात्र आज जागेवर नाही , केवळ शिखराचा एक स्तर दिसतो. द्राविडी शैली प्रमाणे ते अनेक थरांचे शिखर असावे.
 सभामंडप आणि गाभारा पाहून झाला कि मंदीराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली शिल्प बघण्यासाठी मंदिराच्या बाहेर येऊन फेरी मारायला बाहेर पडावे.


a
 मंदिराचा बाह्यभाग
 a
 
 मंदिराची मागील बाजु
 a

अर्धस्तंभाचे नक्षीदार शिखर
a

स्तंभांवरही भारोत्तोलन करता करता शरभ आदि प्राण्यांवर स्वार होणारे यक्ष आहेतच.

a

एका हाताने तो भिंत तोलून धरणारा, त्याचवेळी आपल्या वाहनावर चाबूकही उगारणारा यक्ष

a

तर हे यक्ष चक्क कसरती करताहेत

a

मधूनच काही भग्न शिल्पं आहेत. बरीचशी अनाकलनीय आहेत. एकंदरीत इथे संशोधनाला बराच वाव आहे.

a

हे राम, लक्ष्मण, सीता का कृष्ण बलभद्र सुभद्रा काहीच कळत नाही.
a

हे  इंद्रजिताचे लक्ष्मणासोबतचे द्वंद्व असावे. अगदी अशाच प्रकारचा रामायणातील पट जवळच्याच गोंदेश्वर मंदिरात आहे.

मंदिराच्या बाह्यभिंतीच्या चौथर्‍यावर बाणासारखे सरळ वर जाणारे स्तंभ अशी बाह्यभागाची रचना. मधेमध्ये काही देखणी शिल्पेही कोरलेली आहेत.

   सुरसुंदरींच्या विविध प्रकारांची शिल्पे मात्र येथे फार आढळत नाहीत. जितकी आहेत ती सभामंडपाच्या स्तंभांवरच.

मंदिराच्या आजूबाजूस काही ढसाळलेली दगड ही दिसतात. गोंदेश्वर आणि आयेश्वर दोन्ही मंदिरामध्ये मुलं अभ्यास करतांना दिसतात आणि खरोखरच ह्या दोन्ही मंदिरा मधलं वातावरण सुद्धा खूपच शांत असतं..


संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर
४) 
५) 






  


Aishwaryeshwar Temple, Sinnar, Maharashtra

Aishwaryeshwar Temple is a Hindu Temple dedicated to Lord Shiva located in Sinnar City in Sinnar Taluk in Nashik District in Maharashtra, India. The temple is believed to be built in 12th century CE. The temple is situated close to Sinnar Gondeshwar Temple. This temple is protected as monuments of national importance by the central Archaeological Survey of India.

The Temple

The temple is facing towards east and stands over a low raised platform. The temple consists of sanctum, antrala and a pillared mandapa. The mandapa is supported by eight intricately carved pillars. The roof between the mandapa and antrala is lost completely. The torana at the entrance of the antrala has an intricate carving of Nataraja. The sanctum enshrines the presiding deity,  Aishwaryeshwar, in the form of Shiva Linga within circular yonipitha.

Connectivity

The Temple is located at about 1 Km from Sinnar Bus Stand, 28 Kms from Nashik, 21 Kms from Nashik Road Railway Station, 40 Kms from Sangamner, 58 Kms from Shirdi, 58 Kms from Kopargaon, 184 Kms from Mumbai and 185 Kms from Mumbai Airport. Sinnar is situated on Nashik to Sangamner route. 

https://hindutemples-india.blogspot.com/2022/04/aishwaryeshwar-temple-sinnar-maharashtra.html


















a

इतके सारे अवघे बघून होता होईता संध्याकाळ दाटून आलेली असते. मन मात्र अजूनही आयेश्वरातच गुंतलेले असते. असं वाटतं की येथेच काही काळ तसंच बसून राहावं अशाच काही आठवणी काढत.



तसं पुण्यावरुन एका दिवसात जाउन येता येईल. गोंदेश्वर आणि आयेश्वर एकत्र करायचं.

तो अपरिचित देव बलराम है का नांगरधारी?

मला पण तेच वाटल पण आकार नांगरासारखा वाटेना, मग छत्रीधारी वामन वाटतोय! पण नक्की नाही सांगता येत.

वामन नक्की नाही. कारण मुकुट आणि चार हात आहेत. बलरामदेखील असायची शक्यता कमी आहे कारण चार हात. ह्या अवतारमूर्ती मानवी असल्यामुळे द्विहस्त असतात. तशी बलरामाची वेरुळला चार हातांची मूर्ती आहे पण ती कृष्ण आणि सुभद्रा यांसह आहे आणि ही तिन्ही भावंडे त्यांच्या पूर्णावतारात दाखवलेली आहेत.

मला तरी ही मूर्ती प्रतिहारीची वाटते.

त्रिविक्रम वामन मुर्तीला चार हात असतात आणि उंच किरिट सुद्धा असतो. ह्या मुर्तीचा उजवा पाय उचललेला आहे इथे तो नेमका भंगलेला आहे. बाकी पुढे ज्याला तुम्ही विष्णु मुर्ती म्हणले आहे,तो प्रतीहारी-व्दारपालच आहे असे वाटते. 

हो. त्रिविक्रम चतुर्हस्त असतो पण छत्री नसते.

त्रिविक्रम मुर्तीत छत्री नसते हे मात्र खरय.अग्नी पुरणाच्या शिल्प शस्त्राच्या अनुसार संकर्षण-बलराम हा विष्णुचा नववा अवतार आहे. त्याची मुर्ती चतुर्भुज असुन त्याने- हल,चक्र,शंख आदी आयुधे धारण केली आहेत. अता नक्की काय हे तेच समजेना झालय.


ती विष्णूमूर्ती मलाही द्वारपाल वाटत होती पण हाती शंख चक्रासारखे अस्पष्टसे असे काहीसे दिसते. त्या मूर्तीचा पाय मात्र अगदी द्वारपालासारखाच उंचावलाय हे खरेच.


तसे काहीसे म्हणता यावे. पण 

अंजनेरीचं हे वेस्सर शिखर बघ

a


आयेश्वर मंदिर - Ayeshwar Temple












गाभारा साध असून कोपऱ्यात अर्धे खांब आहेत. गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि मंडपात नंदी विराजमान आहेत. नंदीच्या गळ्यात माळ आणि पाठीवर झूल आहे पण दगडाची झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. मंदिराचं शिखर मात्र आज जागेवर नाही , केवळ शिखराचा एक स्तर दिसतो. द्राविडी शैली प्रमाणे ते अनेक थरांचे शिखर असावे.



मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षी कामा बरोबरच उत्तम मूर्तिकाम सुद्धा ह्या खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर बघून थक्क व्हायला होतं. 

त्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस सुद्धा सुंदर नक्षीकाम तर उरलेल्या कळसाच्या एका थरावर काही मूर्त्याही दिसतात.


पण ह्या मंदिरच खर वैशिष्ठ आहे तर गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरलेले मकर तोरण. ह्या अर्धवर्तुळाकार तोरणाची सुरवात दरवाज्याचा खांबांपासून होते. दोन्ही खांबावर दोन मकर असून दरवाज्यावर गंधर्व कीचक ह्यांचे तोरण आहे आणि मध्यावर कीर्तिमुख आहे. मकराच्या शेपटीची नक्षी बनवण्यात आलेली आहे. नैसर्गिक झीज सोडली तर हे तोरण फारच अप्रतिम दिसत असणार




 हे अप्रतिम मंदिर बघून मग आम्ही गोंदेश्वर मंदिर बघायला निघालो

आयेश्वर मंदिर - गुगल नकाश्यावर 

आमचा प्रवासाचा पहिला टप्पा होता ऐश्वर्येश्वर! तिथे पोचल्यावर पटापट सगळ्यांचे कॅमेरे आणि मोबाईल्स बाहेर निघाले. विविध अँगल्स टिपण्यात सगळे मश्गुल झाले. मंदिराच्या मागच्या बाजूची शिल्पे गर्दी नसताना टिपावीत या हेतूने मी आधी तिकडे धाव घेतली पण ती व्यर्थ  ठरली कारण तिथे Pre – Wed  शूट साठी टीम जमली होती त्यामुळे नवरा , नवरी आणि कॅमेरामन यांना त्रास न देता अस्मादिक परत मंदिराच्या पुढील भागात परत आले. 

ऐश्वर्येश्वर हे मंदिर ऐरम राजाने बांधलेले आहे. सरस्वती नदीच्या काठी बांधलेले हे मंदिर साधारण १० व्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. यादव काळातील पहिली राजधानी हा मान सिन्नर ला मिळतो.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भ गृह पाहता येते. या मंदिराची रचना द्राविड शैलीत आहे. या मंदिरातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मकर तोरण. सामान्यतः अंतराळाच्या प्रवेशाचे वरच्या बाजूस हे मकर तोरण आढळते.

या तोरणात व्याल, कीर्तिमुख,यक्ष, अप्सरा आणि मयूर असे थर दिसून येतात. दोन मगरीच्या तोंडांतून निघालेली ही वैशिष्टयपूर्ण शिल्पे आणि मधोमध नृत्यरत शिव. 

 ही माहिती पण ग्रुप लीडर अनुरागने पुरविली.

देवळात एक माणूस शांत चित्ताने शिवपिंडीला अभिषेक घालत होता. बाहेरचा कोलाहल, गटागटाने येणारी, मोबाईल,  कॅमेरे हातात घेऊन आसपास भिरभिरणारी माणसे, मंदिर परिसरातच  चाललेले Pre – Wed  शूट याचा काहीही परिणाम न होता शांत एकाग्र चित्ताने तो तन्मय झाला होता.



जवळच असलेल्या ऐश्वर्येश्वर मंदिराकडे वाटचाल चालू केली.


 ऐश्वर्येश्वर मंदिर
            ऐश्वर्येश्वर मंदिर हे नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अगोदरच आहे पण आजही बरेच लोक ह्या मंदिरापासून अनभिज्ञ आहेत . गोंदेश्वर मंदिरापासून हे मंदिर सुमारे २० मिनिटाच्या अंतरावर असल्याने आम्ही पायीच जायचं ठरवलं. ऐश्वर्येश्वर मंदिर हे द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे आजही ह्या मंदिरावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची कलाकृती असलेले तोरण आजही आपल्याला आकर्षित करते.
प्रवेशद्वारावरील तोरण
  मंदिरात सुबक अशी शिवपिंड आहे. कदाचित रोज कोणीतरी पूजेसाठी येत असावं पण सिन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे मंदिर इतकं शांत पाहून आश्चर्य वाटलं  
 
 ऐश्वर्येश्वर मंदिरातील शिवपिंड 

          
       



 
  
 मंदिराच्या बाहेरील बाजूची शिल्प 
            आज सुमारे ८ शतकापासून हे मंदिर निसर्गाशी झुंज देत उभेआहे. ह्या मंदिराबद्दल जास्त कोणालाही माहिती नसल्यामुळे इथे कोणीच नसते. त्यामुळे इथे गेल्यावर लगेचच शांततेचा प्रत्यय येतो. 









No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...