Tuesday, March 7, 2023

महाराष्ट्रातील काही देखणी मंदिर

 

 

प्रा.वर्षा मिश्रा यांचे ४ छोटे लेख

१.कसबन (मंगरुळ पीर,जि.वाशीम)

कसबन म्हणजे पेशेवर तवायफ !!
धन घेऊन नाच गाणं करणारी कंचनी !!
मनोहर लालास माहिती देतात की’ कसबने ये मुसलमान हैं मगर पहिले हिन्दू थीं और ‘गनिका’ क
हलाती थीं ‘…. ….कदीम से पेशा इनका कसब कमाने का है । इसी सबब से मुसलमान होने के पीछे ‘कसबन’ कहलाने लगीं ।
इस संबंध में कहा जाता है कि पहिले ये छोकरियों को मोल लेकर उनसे पोशीदा कसब कराया करती थीं । एक दफै एक मुसलमान छोकरी इस काम से इनकारी हो कर परदे में बैठी कुरान पढ़ा करती थीं । उसके वास्ते खुदा के घर से एक सोने का टका उतरा करता था । दूसरी छोकरियां बदनीयती से छुप छुप कर परदा खोल के उसको देखा करतीं थीं कि वह अंदर बैठी क्या करती हैं ? आखिर एक दिन उसने इनको यह बद्दुआ दी कि तुम मेरा परदा उघाड़ कर देखती हो, जाओ ! तुम्हे बदुवा लगे । उस दिन से उनका नाम ‘कसबन’ हो गया । पहिले छुपी हुई थीं अब बाजार में बैठ कर कसब कमाने लगीं ।
………. ये ‘गनिका’ को एक खास औरत समझती हैं और उससे अपनी परंपरा मिला कर कहतीं हैं कि वह श्रीकृष्णजी के समय में थीं । मुसलमान होने की ये यह वजह बताती हैं कि अव्वल तो मुसलमान जियादा आते जाते थे, दूसरे मुरदे अकसर पड़े रहते थे, क्योंकि इनकी जात में मर्द थोड़े थे और दूसरी कौम के जलाने को आते नहीं थे ।
मारवाड़ में कसबनें बहुत कम हैं और जो थोड़ी सी जोधपुर शहरों में हैं वे अपने को ठेट में गुजरात की रहने वाली बताती हैं । वे कहती हैं कि जिस जमाने में यहां के हाकिमों के अहदी मारवाड़ में आते थे, उसी जमाने से हम भी यहां आई।’’ इनकी खांप चैहान, चांपावत, सोढ़ा और भाटी वगैरा हैं । ये हिन्दू थीं जब शक्ति और रामदेवजी को मानती थीं । अब खंदा और रसूल का नाम लेती हैं । मुसलमानी ढंग बरतती हैं पर इनमें नाम अब तक मूली, चूनी, बिरधी और छोगी वगैरा हिन्दुओं के से होते हैं ।
………ये शराब पीती हैं, सूअर और झटके का मांस नहीं खातीं । ये पोशाक रंडियों और ग्रहस्थनों से मिलती हुई रखती हैं । गाना बजाना नहीं जानती । ये बहुत आसूदा भी नहीं होती हैं । ये अकसर दूकानों और सरायों में रहा करती हैं और रस्ते चलते आदमियों को बुलाती हैं । इनकी लड़कियां कसब कमाती है और लड़को का व्याह होता है । घांची, तेली, तमोली वगैरा निम्न कौमों की औरतें बिगड़ कर वैसे ही मुसलमानों के घर में पड़ जाती है और उनसे लड़कियां होती हैं वे उन लड़कों को व्याही जाती हैं । इनमें शादी गमी के दस्तूर मुसलमानों के माफिक हैं । बेवा औरत का नात नहीं होता है, वैसे चाहे किसी के घर में भले ही घुस जावे ।
……. मर्दों का पेशा मजदूरी है । बंट भाई बहनों का बराबर है । इनमें ‘खोले’ नजदीकी रिश्तेदार आता है । पंचायत भी कौमी झगड़ों में होती है । इनमें पंच मर्द औरत दोनों होते हैं । व्याही औरत को गैर आदमी के पास जाने और कसबन को वांभी, बावरी, भील, थोरी और भंगी वगैरा निम्न जाति के पास रहने से जात बाहर करने की सजा मिलती है । उसे जब जात में लेना चाहते हैं तो अजमेर में भेज देते हैं । वहां वह गुनहगारी में पंचों का हुक्का भरकर फिर जात में आ जाती है …(c/p)
With ©®

फोटो साभार –
Sachin Kulkarni

२. पार्डा दरडे येथील मल्लिकार्जुन मंदिर

विस्मयचकित करणारे..
जुन्या धाटनिचे मल्लिकार्जुन शिवमंदिर पार्डा (दराडे)ला आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ अंगाने स्थुल,ठेंगणे,दिड ते दोन फुटाचे हातात दिवा व मशाल असलेल्या यक्ष,यक्षिणी प्रसन्न मुद्रेत स्वागतासाठी आहेत.
शिवपुराणात चिलया बाळाची कथा येथेच घडली म्हणतात.देवगिरी यादवांच्या काळात खुपच महत्त्वाचे ठाणे हे असायला हवे.कारण राजा रामदेवराय यांनी दोन रात्रीचा मुक्काम करून मंदिराचे जिर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळतो.(श्रीपाद चितळे)मंदिराच्या समोर हजारो लोकांनी पर्व काळात एकत्र येऊन स्नान करावे अशी मोठी पुष्करणी आहे.अजूनही या पुष्करणी च्या पाण्यात कित्येक मोडतोड झालेल्या मुर्ती आढळतात.
शिवमंदिरात जवळपास चार शिलालेख आतापर्यंत मिळाले आहेत. अक्षरांच्या वळणावरुन ते १४ व्या शतकातील आहेत असे म्हणतात.
यादव काळातील गध्देगळीचा लेख अजूनही ठळकपणे वाचता येतो.गध्देगाळी वरील शापवचनात म्हटलं आहे की ,’दर्शन घेताना देवासमोर ठेवलेल्या मुद्रा जो घेइल त्याला २० आसुंचा दंड देण्यात येईल आणि जो हा दंड देणार नाही त्याला गाढव लागेल’.पण यासोबतच देवळातील देवतेची जो पुजाअर्चा करेल तो विजयी होईल असा आशिर्वाद दिला आहे.मोठ्या प्रमाणात चक्र, चांदण्या, बदाम, गोल,त्रिकोणी ,चौकोनी आकाराच्या शिवपिंडी आहेत…मंदिराच्या बाह्यांगावर विष्णुचे अवतार कोरलेले आहेत. परीसरात दोन तिन अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात ही झाकलेली बारव आहे….सप्तमातृका पट्ट, क्षिरसागर विष्णु…. मंदिरात आहेत..लोणार पासून हे गाव आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे..

ठिकाण –
पार्डा दराडे
पो.येवती
देऊळगाव कुंडपाळ जवळ
ता.लोणार जि.बुलढाणा
लोणार ते मंठा रोडवर
लोणारच्या दक्षिणेकडे
Pc.. Sachin Dixit ji साभार👏👏

३. सासू सुनेची विहीर

◆● सासु-सुनेची विहीर…
सासु-सुनेची विहीर च का म्हणतात??याचे समाधानकारक ऊत्तर नाही किंवा यामागे या भागात सांगितली जाणारी कोणतीहि आख्यायिका नाही आहे.कोणी बांधली याचाही पुरावा किंवा नोंद नाही.
पुर्वी माळी समाजाची भरपूर शेती तलावाच्या परीसरात होती विशेषतः केळीच्या बागा /मळे होते.तेव्हा कोणी त्यांनी बांधली असेल असा ही तपशील आढळत नाही आताची हयात असलेली वयस्कर मंडळी सांगतात की कमळजा देवी च्या मंदिरासोबतच ही विहीर भाविकांच्या सोयीसाठी बांधलेली असावी.
कमळजा देवीच्या जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार व सभामंडप बांधकाम देवगिरीचे राजे कान्हेरदेव लोणारला शके ११६३ ला केल्याचे महानुभाव संताच्या पोथीत ऊल्लेख येतो.विहीरीचे स्थापत्य (विटाचे आकार )मिळते जुळते आहे.
मंदिरकडील भाग गोड्या पाण्याचा व सरोवरांकडील भागात खारट पाणी असे सांगत आले आहेत जुनी मंडळी….
पण कै.या.मा काळे (लेखक- वर्हाडाचा ईतिहास )यांनी समाधान कारक लिहिले आहे ते म्हणतात,विदर्भात दहीहांडा पासून ते अकोल्यापर्यत जमीनीच्या पोटात हा खारया पाण्याचा मोठा पट्टा असावा असा तज्ञ लोंकाचा कयास आहे.(याला आताची काही नवीन संशोधन ही दुजोरा देतात सरोवराच्या बाबतीत )
आता ही सरोवरांच्या काठात जमिनीत थोड ही खणले तर गोड पाणी झिरयात लागते म्हणजेच
सासु- सुनेची ७०-८० फुट असलेल्या या विहीरीच्या वरच्या भागात गोड पाण्याचे झरे आहेत पण पाणी जसे जसे खोल(आटत) जाईल तसे तेव्हा तळाशी खारपाण पट्ट्या मुळे पाणी खारे लागेल….
या मुळेच मिठ वगैरे तयार करण्याचे उद्योग धंदाच्या नोंद या भागात (बुलढाणा जिल्ह्यात) आढळते पण या सर्व प्रक्रिया इ.स.१८७० च्या सुमारास इंग्रज सरकारने बंद केल्या होत्या….
या विहिरीचा ऊपयोग तर भाविक भक्तांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नक्कीच असावा पण जुन्या काळात बुलढाणा जिल्ह्यातील ‘आडविहीर’ येथे विहीरीच्या पाण्यापासून मिठ तयार करीत असत …ती मजेशीर पध्दत काळे लिहतात की,
सदरहू विहीर खणण्याची रित अशी होती की एका ठरावीक खोलीपर्यंत विहीर खणित गेले म्हणजे नेहमीच्या अनुभवावरून आता पाणी जवळ आहे असे खणणारे लोक ओळखित व कामबंद करून एक दोन खणणारे पाळण्यात बसून खणित व पाणी जवळ आले असे पाहताच एक जोराचा शेवटचा घाव घालीत व वरच्या लोकास ईशारा करीत त्याच क्षणी वरील लोक त्यांना वर ओढून घेत.ईकडे विहीरीत पाणी एकदम ऊसळुण क्षणात सर्व विहीर भरून जाई.सदरहू पाणी वर काढून खाचामध्ये सोडीत व ऊन्हाने सुकवून त्याचे मीठ करीत….
(ऊत्तरार्ध ☺️)

ठिकाण- कमळजा देवी मंदिर समोर.. लोणार (सरोवर )
जिल्हा-बुलढाणा. फोटो-साभार..

४. चोर विहीर

चोर विहीर
(मंगरुळ पिर,जि.वाशिम)
यादव काळानंतर महाराष्ट्रात (बेरार) बारवांच्या ऐवजी एक नवीन प्रकारच्या शैलीचे पायविहीरी ,कुपेगार इ. स्थापत्य लोकप्रिय झाले.ही चोरविहीर ४००वर्षे जुनी आहे किंवा शाहजहाँच्या काळात बांधली गेली असे स्थानिक लोक सांगतात. पण येथे शहजादा मुराद (अकबर पुत्र) चा संदर्भ असावा कारण या परिसरापासुन बाळापूर जवळच आहे आणि स्थानिकाच्या सांगण्यानुसार ‘मुराद’चा एकमेव असलेला फार्सी शिलालेख ही येथे कोरलेला आहे.
मधल्या काळात चोर विसावा घेत असतील म्हणून चोर विहीर😀😀पण तसं नव्हे विहीरीत लपण्यासाठी चोरवाटा आहेत.
चोरविहीर चे वैशिष्ट्ये म्हणजे जमिनीच्या समांतर असलेली वरवर अर्धे वर्तुळाकार दिसणारी विहिर आतल्या बाजूला चौरस आकाराचे बांधकाम आहे.
एका बाजुस मोटेचा धक्का /दगडी प्रणाल बांधला आहे.
….विहिरीला दगडी प्रवेशद्वार असून खाली तळमजल्यावर जाण्यासाठी छोट्या आखूड पायर्यां आहेत. पायरीलगत प्रशस्त सज्जा (बाल्कनी ) मजल्यावर आहे. पावसाच्या पाण्याकरीताही विहीरीत आगम मार्ग काढलेले आहेत.
विहीरीच्या आतील भिंतीला चुन्याच्या कमानी आहेत. कुंडात ऊतरण्यासाठी किंवा तळापर्यंत तोडशिला आहेत आणि वरच्या बाजूस दोन दगडी सोंड /कठडे
मोटेकरीता बसवले आहेत.
जलव्यवस्थापनाची या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जनकल्याण करीता मोठ्या परिश्रमाने, बुध्दीमतेने,कुशल तंत्रज्ञानाने परीपूर्ण आजही ऊन, पाऊस, वारा सहन करत शतकोत्तर अखंड अबाधित आहेत.जतन व्हावीत हीच मनोमन प्रार्थना….

सर्व. फोटोग्राफ..Sachin kulkarni यांच्या कडून साभार सौजन्याने👏👏

  • प्रा.वर्षा मिश्रा , लोणार , जि. बुलडाणा
  • मेल : varshamishra7385@gmail.com

पारडा येथील शिलालेख -डॉ. वि. भा. कोलते

प्रकाशक : म.रा. साहित्य व सांस्कृ. मंडळ

 मराठवाड्यातील उपेक्षीत प्राचीन मंदिरे



दै. लोकमत 10 जानेवारी 2021 (वर्धापन दिन पुरवणी)

मराठवाड्यातील पर्यटनाचा शिल्पांचा प्राचीन वारश्याचा विषय समोर आला की अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा इथपर्यंत  विचार होतो आणि विषय संपून जातो. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही नावं उच्चारली की मुद्दा संपून जातो. या शिवाय मराठवाड्यात चालूक्यांच्या यादवांच्या काळातील अप्रतिम अशी मंदिरे आहेत, त्यावरील शिल्पाविष्कार चकित करणारा आहे हे लक्षातच घेतले जात नाही.

पर्यटन, अभ्यास, स्थानिक सहलींसाठी स्थळे असा विचार केल्यास मराठवाड्यातील काही प्राचीन मंदिरांचा विचार अग्रक्रमाने झाला पाहिजे. (या ठिकाणी विषयाच्या जागेच्या मर्यादेमुळे केवळ मंदिरांचा विचार केला आहे. लेण्या, किल्ले, दर्गे, कबरी, मकबरे यांचा समावेश यात विस्तारभयास्तव नाही. हे विषय स्वतंत्रपणे मांडल्या गेले पाहिजेत.)

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई वडगांव, रहिमाबाद व पिशोर  (सर्वांचा ता.सिल्लोड) येथील मंदिरे प्राचीन आहेत. तिन्ही ठिकाणी स्थानिक लोकांनी मंदिराचा जिर्णाद्धार केला आहे. शिवुर बंगला (ता. वैजापूर) येथे रावणेश्वराचे मंदिर आहे.  परिसराचा विकासही केला आहे. पण याची माहिती बाहेरच्या पर्यटकांना अभ्यासकांना होत नाही. औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत खंडोबा मंदिर आहे. पण त्याची ख्याती धार्मिक स्थळ इतकीच आहे. मराठेशाहीतील वास्तुशिल्पाचा हा एक उत्तम नमुना आहेे हे लक्षातच घेतले जात नाही. वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळ मुख्य रस्त्याला लागूनच अहिल्याबाईंनी बांधलेली अप्रतिम अशी बारव आहे. या बारवेत 8 छोटी मंदिरं आहेत. या ठिकाणी पर्यटक भेट देत नाहीत.

पैठणला सातवाहन कालीन स्तंभ हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचे पान आहे. त्या परिसरांचा विकास पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पर्यटक पोचत नाहीत.

औरंगाबाद जिल्ह्यातील या मंदिरांसोबतच पैठणच्या गोदावरी काठचे घाट मोठे सुंदर आहे. या घाटांवर विविध उत्सव प्रसंगी दिव्यांची आरास करून पर्यटकांना इथे आकर्षित करून घेता येवू शकते.

जालना : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील महादेव मंदिर 12 व्या शतकातील अतिशय उत्कृष्ठ असा स्थापत्य अविष्कार आहे. या मंदिरावरील विष्णुच्या शक्तिरूपातील मुर्ती भारतभरच्या अभ्यासकांचे आकर्षण ठरलेल्या आहेत. अतिशय भव्य आणि उंच पीठावर हे मंदिर स्थापित आहे. पुरातत्त्व खात्याने मंदिराचा जिर्णाद्धार चांगल्या पद्धतीने केला आहे. पण तिथपर्यंत जाताना कुठलाही माहिती फलक उभारलेला नाही. मंदिराच्या भोवताली बकाल वस्ती आहे. ग्रामस्वच्छता अभियानात या परिसराची स्वच्छता का झाली नाही हे कळत नाही.

अंबड तालुक्यात जामखेड येथील खडकेश्वर मंदिर हे अतिशय एक महत्त्वाचे प्राचीन मंदिर. गावकर्‍यांनी चांगल्या पद्धतीने याचा जिर्णाद्धार केला आहे. अंबड शहरातील मत्सोदरी मंदिर सर्वपरिचित आहे. पण याच शहरांत अहिल्याबाईंच्या काळातील सुंदर पुष्करणी बारव आहे. त्यात एक शिवमंदिरही आहे. या परिसराचा नगर पालिकेच्या वतीने विकासही करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पोचणारा रस्ता, बाहेरच्या परिसरांतील आक्रमणे, नाला यांनी हे ठिकाण दूर्लक्षित राहिले आहे. अंबड शहरांतच खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम आजही संपूर्ण शाबूत उत्तम अवस्थेत आहे.

अंबड तालुक्यातच चिंचखेड येथील खंडोबा मंदिरही प्राचीन काळातील आहे. या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी गावकर्‍यांनी उत्तम केली आहे. मंठा तालुक्यात हेलस येथे प्राचीन मंदिर आहे.

बीड : शहरांतील कंकालेश्वर मंदिर सर्वपरिचित आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार संस्थानने केला. पण मंदिराचा परिसर अतिशय बकाल आहे. ज्या कुंडात मंदिर आहे त्या जलाशयाच्या पाण्याच्या निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने साठलेल्या पाण्याची दुर्गंधी येते. परिसराचे सुशोभन होण्याची नितांत गरज आहे. माजलगांव नजीक केसापुरी येथे केशवराज मंदिर आहे. आताचे जे मंदिर गावात आहे त्याचे बांधकाम दोनशे वर्षांपूर्वीचे आहे. पण मुळ मंदिर गावाबाहेर चार किमी अंतरावर भग्नावस्थेत आहे. त्याचा जिर्णाद्धार होण्याची गरज आहे. हा परिसर तळ्याकाठी असून जवळच मराठा कालखंडातील हनुमान मंदिर आहे. त्याला भव्य असा दगडी ओटा आहे.  

अंबाजोगाई परिसर तर असंख्य शिल्पे आणि प्राचीन मंदिर अवशेषांनी भरलेला आहे. बाराखंबी भागात उत्खननाने काम चालू आहे. ते अपूर्ण अवस्थेत पडून आहे. जवळच धर्मापुरी येथे केदारेश्वर मंदिर आहे. तेथे जिर्णाद्धाराचे काम पुरातत्त्व खात्याने पूर्णत्वास आणले आहे. याच गावात भुईकोट किल्ला आहे. मादळमोही गावात तर बारवेत आख्खे मंदिरच आहे. या परिसराचा विकास गावकर्‍यांनी आस्थेने केला आहे.

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील प्राचीन माणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील मोजक्या अप्रतिम मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांवरी शिल्पे अभ्यासकांना कायम आकर्षित करत आलेली आहेत. सात द्वारशाखा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. चालुक्यांच्या काळातील अतिशय उत्कृष्ठ अशा कोरीव कामांनी येथील स्तंभ सजलेले आहेत.
उमरगा येथील शिव मंदिर अतिशय चांगल्या स्वरूपात आहे. स्थानिकांची मंदिराचा जिर्णाद्धार केलेला असून परिसरही उत्कृष्ठ राखला आहे.

लातुर : निलंगा येथील शिवमंदिर आणि पानगांव येथील विठ्ठल मंदिर ही दोन मंदिरे लातुर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी सगळ्यात सुस्थितीत असलेली मंदिरे आहेत. निलंगा मंदिरातील हरगौरीचे शिल्प अप्रतिम आहे. मंदिरावरील भैरव शिल्पे किंवा केवल शिवाची शिल्पे विशेष आहेत.

पानगावच्या विठ्ठल मंदिराकडे खुपसे दुर्लक्ष पर्यटकांकडून झाले आहे. या मंदिर परिसराचा विकास, तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता याचा विचार झाला पाहिजे. हे मराठवाड्यातील प्राचीन काळातील महत्त्वाचे मंदिर आहे.

नांदेड : होट्टल (जि. देगलुर) हे आख्खे गावच शिल्पांनी समृद्ध असे गांव आहे. मंदिरांचे गाव म्हणूनच या परिसराची ओळख आहे. दोन मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. आता उर्वरीत मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. होट्टलच्या मंदिरावरील नृत्य गणेशाची मृर्ती आणि येथील सुरसुंदरींच्या मृर्ती विशेष आहेत.

राहेरचे नृसिंह मंदिर आणि मुखेडचे मंदिर ही मंदिरे प्राचीन आहेत. राहेर गोदावरी काठी असल्याने हा परिसर रम्य आहे. राहेरला गोदावरीचे नाभीस्थान आहे असा उल्लेख दासगणु महाराजांच्या काव्यात आहे.
नांदेड शहरातील गोदावरीवरील घाट पण पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय होवू शकतात. या परिसराचे सुशोभन झाले पाहिजे.

हिंगोली : औंढा नागनाथ मंदिर प्रसिद्ध आहे पण याच गावात अजून प्राचीन मंदिरे आहेत त्याची दखल फारशी घेतली जात नाही. जवळच राजापुर गावात सरस्वती, अर्धनारी नटेश्वर आणि योग नरसिंहाच्या अप्रतिम मुर्ती आहेत. येहेळेगांव तुकाराम या गावांत प्राचीन बारव आहे.

परभणी :  धारासुर (ता. गंगाखेड) येथील गुप्तेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांमध्ये त्याच्या शिखरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरावरील विष्णुच्या विविध मुर्ती अप्रतिम अशा आहेत. गोदावरीच्या काठावर हे मंदिर असल्याने सर्व परिसर धार्मिक आणि इतर पर्यटनासाठी अतिशय योग्य असा आहे. या मंदिराचा अर्धा भाग ढासळला असून जिर्णोद्धाराचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पडून आहे. त्यावर तात्काल कार्यवाही झाली पाहिजे.

चारठाणा (ता. जिंतूर) येथील विविध मंदिरे, नृसिंह तीर्थवरील नदीचा घाट, पुष्करणी बारव या सगळ्याचा विचार करून संस्कृती ग्राम म्हणून या परिसराचा विकास झाला पाहिजे. आजही या परिसरांत प्राचीन शिल्पे सापडतात. याच परिसरांत अजून उत्खनन होण्याची गरज आहे.

गंगाखेड हे नदीकाठी वसलेले प्राचीन गाव. संत जनाबाईंची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात नदीकाठी सुंदर असे घाट आहेत. या घाटांच सौंदर्य वाढवून परिसर विकसित केला गेला पाहिजे.  

पैठण, गंगाखेड, नांदेड येथील नदीकाठ हा एक स्वतंत्र विषय पर्यटनासाठी विचारात घेतल्या गेला पाहिजे.
लेखात अतिश त्रोटकपद्धतीने काही मोजक्या मंदिरांचा विचार केला आहे. गावोगावची प्राचीन मंदिरे, गावोगावच्या बारवा, मठ, समाधीस्थळे यांचा जिर्णोद्धार झाला पाहिजे. ही कामे तीन पातळीवर होवू शकतात.

1. पुरातत्त्व खात्यातर्फे  त्यांच्या अखत्यारीतील पुरातत्त्वीय स्थळांचा विकास केला जावू शकतो. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
2. सामाजिक कृतज्ञता निधी (सी.एस.आर.) या माध्यमांतून काही निधी इतर स्थळांसाठी वापरला जावू शकतो. मराठवाड्यातील औद्योगीक क्षेत्रात काम करणार्‍या संघटना व्यक्ती आस्थापना यांनी यात लक्ष घालून आपल्या निधीतील काही रक्कम या कामासाठी वळवली पाहिजे.
3. स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करूनही काही कामं होवू शकतात. हतनुर (ता.सेलू जि. परभणी) येथील ग्रामस्थांनी आपल्या परिसरांतील शेतमालाच्या विक्रीतून 1 कोटी इतकी विक्रमी रक्कम पाच वर्षांत गोळा केली. गावातील प्राचीन शिव मंदिर आणि बारव यांची दुरूस्ती केली. जवळच मंगल कार्यालय उभारले. हा एक आदर्श या परिसरांतील लोकांनी उचलला पाहिजे.

या लेखात केवळ मंदिरांचा विचार केला आहे. पण किल्ले, दर्गे, मकबरे, कबरी यांचा विचार केल्यास किमान 50 स्थळे अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने पर्यटकांसाठी म्हणून सहज विकसित करता येवू शकतात. त्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याच परिसरांत प्राचीन वाडे आहेत. त्यांची डागडुजी करून पर्यटकांना राहण्याची पण वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था करता येवू शकते. उंडणगांव (ता.सिल्लोड जि. औरंगाबाद) अशी चाचपणी आम्ही केली आहे. परदेशी पर्यटक येथे राहून गेले आहेत. शाश्‍वत पर्यटनाचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.  
मराठवाड्यात प्राचीन वारसा जतन व संवर्धनाची चळवळ आता सुरू झाली आहे. त्याला सगळ्यांनी मिळून गती देण्याची गरज आहे.
 
       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

  गावकर्‍यांनी जिर्णाद्धार केलेले प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना)


 उरूस, 2 ऑक्टोबर 2020 

 हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20 कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्‍यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते. 

जामखेडचे हे शिवमंदिर खडकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. जामखेड या गावाबद्दल पौराणिक आख्यायिका आहे. जाबुवंत आणि हनुमानाची लढाई याच गावात झाल्याचे सांगितले जाते. गावजवळच्या टेकडीवर जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे डोंगरातील कपारीत कोरलेली एक गुहाच आहे. इथे लेणी कोरण्याचा प्रयास झाला होता. पण दगड ठिसुळ असल्याने हे काम अर्धवट सोडण्यात आले. याच जागी आता जांबुवंताचे मंदिर आहे. या परिसरांतील 12 गावांमध्ये हनुमानाचे मंदिर आढळत नाही. नसता मारूतीचे मंदिर नाही असे एकही गाव नसते. पण हा परिसर याला अपवाद आहे. जांबुवंत व हनुमानाच्या लढाईत जाबुवंताचा घाम गळाला म्हणून या गावच्या नदीचे नावच ‘घामवती’ असे आहे. 

याच घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात. 

मराठवाड्यात अकराव्या शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच एक. (याच ब्लॉगमधील पूर्वीच्या लेखात अशा मंदिरांची यादीच दिली आहे.) मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्‍यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे. 

मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपालाआठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्‍या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू,  नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण 20 नक्षीदार स्तंभ आहेत. 


मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही. 

मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की 11 व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून 12 व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे. 

खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्‍यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते. 


मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्‍यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.


या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्‍यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.  


गावकर्‍यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे. 

जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्‍यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.

औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.

(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)

(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार


उरूस, 7 ऑक्टोबर 2020 

 महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा  जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व. 

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.


एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्‍या चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील  नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत. 


माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्‍या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत. 

मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्‍यांचा आहे. 


मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.


मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्‍यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.) 


अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते. 

मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते. 

या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.

बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे,  भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे  या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)

महादेव मंदिर, माणकेश्वर, भूम, उस्मानाबाद
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले माणकेश्वर येथील महादेवाचे मंदिर खरंच एक मंदिर माणिक आहे. अत्यंत सुंदर शिल्पकामाने नटलेले हे मंदिर इ.स.१२१७च्या दरम्यान, यादव नृपती सिंघणच्या काळात बांधले गेले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिरासमोर नंदी मंडपाचा गजथरयुक्त चौथरा आहे. मुखमंडपात बसण्यासाठी कक्षासने असून त्याच्या पाठच्या वामन भिंतींवर अर्ध स्तंभ व मानवी आकृती, गजथरयुक्त आहेत. मंदिरातील स्तंभ, मुख्यतः सभामंडपातील रंगशिळे भोवतीचे स्तंभ आकर्षक आहेत व त्याच्या पायथ्याशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती कोरल्या आहेत.त्यातील वेणुगोपालची हातात कालिया नाग असलेली मूर्ती वेगळी आहे. स्तंभ व अर्धा स्तंभाचे स्तंभ शीर्ष भारवाहक किचकांचे आहेत व स्तंभ मध्यावर व्याल, देवता मूर्ती व प्राणी कोरलेले आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा ७ शाखांची हस्तिनी प्रकारची ज्येष्ठद्वारा असून महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये दुर्मिळ आहे.

प्रदक्षिणा पथ मंदिराच्या तलविन्यासाप्रमाणे फिरतो व आपल्याला बाह्य अंगावरील मूर्ती बघता येतात. चार दिशेला दिशांचे स्वामी दिक्पाल इंद्र, वरूण, यम आणि कुबेर आपल्या वाहनांसोबत दिसतात. मर्दला, पुत्रवल्लभा, दर्पणा, पत्रलेखिका ह्या सूरसुंदरींबरोबर शिवाची विविध रूपे, महिषमर्दिनी, सरस्वतीची शिल्पे आहेत. लक्ष्मी, कौमारी, ब्राह्मणी, इंद्राणी इत्यादी मातृका आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी कोरीव मकर प्रणाल आहे.

एकूण मूर्तींचे सौष्ठव, मोजके आकर्षक अलंकार व आखीव रेखीव स्थापत्यामध्ये कल्याणी चालुक्य कलेची छाप जाणवते. जवळच प्रसिद्ध सटवाईचे मंदिर व नदी परिसर आहे.    

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-saili-palande-datar-writes-about-five-beautiful-temples-in-maharashtra-5331498-PHO.html

(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism) 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 प्राचीन वारसा जपणार्‍या हतनुरचा आदर्श घ्या..


उरूस, 30 डिसेंबर 2020 

प्राचीन मंदिरांचा जिर्णाद्धार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभेत केली, मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साहजिकच हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. जागजागच्या प्राचीन मंदिरांकडे लोकांचे लक्ष जायला लागले. आपल्या आपल्या भागातील प्राचीन मंदिर कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जिर्णोद्धार कसा झाला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. पत्रकारांनी अशा काही बातम्या आपल्या परिसरांतील प्राचीन मंदिरांबाबत द्यायला सुरवात केली. एरव्ही गावाकडे न फिरकणारेही आपल्या गावच्या प्राचीन मंदिरांबाबत भरभरून बोलायला लागले. 

या सगळ्या धामधुमीत एक गांव शांतपणे आपलं काम करत आहे. ही सगळी चर्चा समोर येण्याच्या पाच वर्षे आधीच त्यांनी आपल्या गावातील 700 वर्षे जून्या मंदिराचा, तेथील बारवेचा जिर्णोद्धार केला. आणि त्यासाठी कुणाकडेही हात पसरले नाहीत. अगदी शासनाकडेही नाहीत. कुठल्या धनाढ्य माणसाकडे, आमदार खासदाराकडे अगदी एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधूनही पैसा घेतला नाही. 

हे आदर्श काम केलं आहे हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्‍यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल त्याच्या 1 टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची. 

पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्‍यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. 1301 चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले. 

गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी वापस आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. 2019 च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल 22 लाख रूपये त्याला खर्च आला. 

मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला. 

हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्‍यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात. 

याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे. 

बारव आणि मंदिराला लागूनच नविन पद्धतीने मंगल कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. सर्वच परिसर आता विकसित झाला आहे. एकूण 1 कोट रूपये खर्च याला आला. आणि हा सगळा निधी गावकर्‍यांच्या शेतमालाच्या विक्रीतून देणग्यांतून गोळा झाला हे विशेष. 

मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे.

जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्‍न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.

हतनुरच्या कामाचा आदर्श यासाठी घेण्याची गरज आहे की त्यामुळे ग्रामीण पर्यटनाला गती येईल. गावोगाची प्राचीन मंदिरं आपण होवून गावकर्‍यांनी शास्त्रीय पद्धतीनं दुरूस्त केली पाहिजेत. दगडांना भडक वार्निश फासणे, सिमेंेट लावून टाईल्स बसवणे म्हणजे जिर्णोद्धार नव्हे. त्यामुळे प्राचीन वास्तूकलेचा सत्यानाश होतो. तेंव्हा अश कामं करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. 

मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत. 

प्रत्येक जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अभ्यास झाला पाहिजे. जिल्ह्याचा नकाशा, या वास्तूंचे चांगले छायाचित्र, ठिकाणाची माहिती असे संकेतस्थळ तयार केले गेले पाहिजे. या सगळ्यांसाठी शासनावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्वयंस्फुर्तपद्धतीनं काम करता येते हे हतनूरने दाखवून दिले आहेच. 

रोहन काळे नावाचा एक तरूण महाराष्ट्रभर बारवा शोधत आणि त्यांची माहिती गोळा करत फिरतो आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्रांतील बारवांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करावयाचा आहे. हे कुण्या एकाच्या आवाक्यातले काम नाही. तूम्ही तूमच्या परिसरांतील बारवांची/प्रचीन मंदिरांची/ नदीवरच्या घाटांची/ स्मारकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवा. आपण सर्व मिळून महाराष्ट्रात आज ज्या बारवा शिल्लक आहेत त्यांची साफसफाईची मोहिम राबवूया. रोहन काळे चा मो. नं. देत आहे. माझा तर खाली दिलेला आहेच. सर्वांना कळकळीचे आवाहन आपण सर्व मिळून आपला प्राचीन वारसा जतन करू या. 

रोहन काळे मंुंंबई- 9372496819  

(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)

  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  दिवे लागले रे दिवे लागले । प्राचीन मंदिर उजळून निघाले ।।


  उरूस, 1 डिसेंबर 2020 

 त्रिपुरारी पौर्णिमेला मराठवाड्यात प्राचीन मंदिरांवर दिपोत्सव करण्याची संकल्पना देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने काही गावांमध्ये मांडली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या अगदी तालूकाही नसलेल्या गावांची निवडी यासाठी केली होती. चार गावांत प्रातिनिधीक स्वरूपात हा दिपोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. 

शेदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या ठिकाणी खाम नदीच्या काठावर प्राचीन गणेश मंदिर आहे. तिथे नृत्य, गायन वादन असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता. खाम नदीच्या पात्रात दिवे सोडून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गिरीजा गोळे ही गुरू मुक्ता सोमण यांची विद्यार्थीनी. तिने भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर सचिन नेवपुरकर आणि वर्षा जोशी यांनी विविध भक्तिगीते गाउन श्रोत्यांना चिंब भिजवले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रेषित रूद्रवार याने केले. 

औरंगाबादहून खास या कार्यक्रमासाठी आलेले रसिक गणेश मंदिर, छोटी बारव, नदीचा घाट आणि मध्वमुनीश्वर समाधी परिसर फिरून पाहताना ‘इतकी सुंदर जागा आपल्या शहराच्या अगदी जवळच आहे आणि आपल्या माहित नाही हे दुर्दैवी आहे’ अशी भावना व्यक्त करत होते. शेंदूरवाद्याच्या ग्रामस्थांना आपल्या छोट्या गावात असा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होवू शकतो आणि त्यासाठी रसिक 30 किमी दूर अंतरावरून गाड्या करून येवू शकतात याचेच अप्रूप वाटत होते. 

चाराठाणा हे औरंगाबाद नांदेड महामार्गावर जिंतूरच्या अलीकडे असलेले छोटे गाव. या गावाला अतिशय उज्वल अशी परंपरा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या गावाला महत्व आहे. हेमाडपंथी मंदिरांनी गाव नटलेले आहे. भव्य अशी दगडी ओवर्‍यांची सुरेख बारव (पुष्करणी) गावात आहे. या गावी असलेल्या प्राचीन मानस्तंभ परिसराची स्वच्छता गावकर्‍यांनी मेहनतीने केली. स्त्रीयांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या. जमिनीवर मानस्तंभाची प्रतिकृती केली. त्याप्रमाणे दिव्यांची रचना केली. 

आपल्या गावच्या प्राचीन स्थळांबाबत अभिमान, स्थानिकांमध्ये जागृती ही सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे. त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधणे, पर्यटकांना तिथपर्यंत आणणे ही कामे स्थानिक लोकांनी पुढाकार घेवून केली पाहिजेत.  चारठाणा या गावात गेली 3 वर्षे गावकरी पुढाकार घेवून इतिहास विषयक जागृती अभियान चालवत आहेत. विविध निमित्ताने उपक्रम हाती घेतले जात आहेत. जानेवारी महिन्यात सांस्कृतिक पदयात्रेचे  (हेरिटेज वॉक) आयोजन करण्यात आले होते. आताही पर्यटकांसाठी नियोजन केले जात आहे.

तिसरं ठिकाण होतं धारासुर. या ठिकाणी पूरातत्त्वीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले गुप्तेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्व खात्याकडून सुरू होत आहे. शिखर शिल्लक असलेले महाराष्ट्रातले हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्वच्छता दिवसभर गावकर्‍यांनी केली. रात्री मंदिरावर अक्षरश: दिवाळीच वाटावी अशी रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या जोत्यावर समोर दिवे लावले होते. गावकर्‍यांनी यात उत्सुर्त सहभाग नोंदवला. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम विविध निमित्ताने घेण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम जलद गतीने व्हावे ही गावकर्‍यांची तळमळ आहे. 

चौथे ठिकाण होते परभणी तालूक्यात असलेले जाम. या गावी जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांवरील शिल्पांची दखल तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात घेतली आहे. पण सखोल अभ्यासाची अजूनही गरज आहे. गावकर्‍यांना मंदिराचे महत्त्व पटल्याने त्यांनी परिसराची साफसफाई व मंदिराचा जिर्णाद्धार केलेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरावर दिपोत्सव घेवून त्यांनी गावकर्‍यांत जागृती निर्माण केली. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत सकारात्मकता गावकर्‍यांनी दाखवली आहे.

या चार गावांत झालेला दिपोत्सव आणि सांगितिक कार्यक्रम याचे महत्त्व यासाठी आहे की ही गावे अगदी तालूकाही नसलेली छोटी गावे आहेत. सहसा आपण सगळे सांस्कृतिक नियोजन करत असताना मोठी शहरे केंद्रभागी ठेवतो. त्यासाठी मोठे प्रयोजक मिळतात. पण लहान गावांतील प्राचीन स्थळांपाशी सांस्कृतिक उपक्रम करण्याला वेगळे महत्त्व आहे. एक तर आपली जी अतिशय अभिमानास्पद उज्वल परंपरा आहे तिचे जतन या निमित्ताने केले जाते, लहान गावांतील वातावरण सांस्कृतिक कलात्मकतेला पोषक आहे त्याचीही दखल घेतली जाते. पूर्वीच्या काळी मंदिरे ही कलेची आश्रयदाती होती. म्हणूनच चित्र संगीत शिल्प साहित्य मंदिर परिसरांत फुलले. आज मंदिरांवर धार्मिक अंगाने टिका करणारे हे विसरतात की ही ठिकाणं कलेची स्फुर्ती स्थळे आहेत. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. त्याची बूज या निमित्ताने राखली जाते आहे. भरतनाट्यम शेंदूरवाद्याला सादर झाले. प्राचीन मंदिरं लेण्या आहेत त्यावरील नृत्य मुद्रा आजही अभ्यासकांना खुणावतात. त्याची दखल घेतल्या शिवाय पुढे जाताच येत नाही. जी वाद्ये या मंदिरांवर दर्शविली आहेत त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. लेण्यांमधील चित्रांवर तर जगभरचे अभ्यासक काम करत आहेत. 

नदीच्या काठी संस्कृती निर्माण झाली असं मानलं जातं. तसे पुरावेच मंदिरांच्या रूपाने उपलब्ध आहेत. मग याची आठवण म्हणून या मंदिरांच्या ठिक़ाणी सांस्कृतिक उपक्रमांचा विचार का केला जात नाही? 

सरकारी पातळीवर वेरूळ महोत्सव अयोजीत केला जात होता. त्या आयोजनाचे पुढे काय झाले ते आपण बाजूला ठेवू. पण असा विचार सर्वच प्राचीन मंदिर परिसरांत छोट्या प्रमाणात करण्याचा विचार आपण का करत नाही? त्यासाठी फारश्या निधीची गरजही नाही. अगदी छोट्या प्रमाणात अभिजात कलांसाठी काम करणारे झटणारे कलाकार कार्यकर्ते रसिक आणि स्थानिक गावकरी यांच्या सहकार्याने प्रत्येक मंदिर परिसरांत, नदीच्या घाटांवर, प्राचीन बारवांच्या परिसरांत सांस्कृतिक उपक्रम सहज शक्य आहेत. त्या निमित्ताने या स्थळांकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. पर्यटकांचे पाय इकडे वळतील. अभ्यासकही इथे येतील. या ठिकाणांचा अजून सखोल अभ्यास होईल. 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यासाठी पुढाकार घेत आहे. आपल्या परिसरांतील अशा वास्तुंबद्दल आम्हाला जरूर कळवा. त्यांचे फोटो पाठवा. त्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करा. आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहोत. इतिहास प्रेमी मंदिर मुर्ती प्रेमी रसिकांनी जरूर संपर्क साधावा. या चळवळीत सहयोग नोंदवावा. 

(हे केवळ हिंदूंसाठी आहे असे नाही. औरंगाबाद परिसरांतील शेकडो मजारी धुळखात पडून आहेत. बौद्ध लेण्याची अवस्थाही अतिशय वाईट आहे. त्यावर मी सविस्तर लिहीणार आहेच नंतर. तेंव्हा हा उपक्रम सर्वांसाठीच आहे.)    

     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

 अन्वा महादेव मंदिर : देखणा शिल्पाविष्कार!

 

उरूस, 19 सप्टेंबर 2020 

अजिंठा डोंगररांगा आणि परिसरांत अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे, कातळात कोरलेल्या लेण्या आहेत. या शिवाय दोन अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे महाराष्ट्राच्या एकुणच मंदिर स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. यातील जंजाळा किल्ल्या जवळचे अंभईचे वडेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे पण त्याची बरीच पडझड झालेली आहे. नविन बांधकाम करताना जून्या बर्‍याच गोष्टी नाहिशा झाल्या. 

पण दूसरे जे मंदिर वडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. 1000 ते 1100 या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत.    त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.

औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर 8 कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे. 


हे मंदिर उत्तर चालूक्यांच्या काळातील आहे. याला लागूनच भोकरदन ही एकेकाळची राष्ट्रकुटाची राजधानी असलेले गाव आहे. राष्ट्रकुटांची सत्ता लयाला गेल्यावर या परिसरावर उत्तर चालुक्यांची सत्ता होती. त्या काळातील हे मंदिर आहे.

अन्व्याच्या तूल्यबळ त्याकाळातील फारच थोडी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. बदलापुर अंबरनाथचे शिवमंदिर, कोल्हापूरजवळील खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर शिवाय विदर्भातील काही मंदिरे या काळातील आहेत.

अतिशय देखणे असे कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच सहा फुटी उंच पीठावर हे मंदिर विराजमान आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याला दक्षिण आणि उत्तर दिशेनेही पायर्‍या आहेत. तिन्ही बाजूच्या पायर्‍यांवरून आपण प्रदक्षिणापथावर येतो. पण मंदिरात प्रवेश मात्र फक्त पूर्व दिशेनेच ठेवलेला आहे. 

एक दोन नाही तर तब्बल 50 कोरीव देखण्या स्तंभावर हे मंदिर तोलल्या गेलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे. 


गर्भगृहाचे द्वार अतिशय कोरीव कामगिरीने नटलेले आहे. एकानंतर एक अशा चार द्वारशाखा या ठिकाणी आढळून येतात. गर्भगृहात मध्यावर महादेवाची पिंड आहे. 

मंदिराच्या मंडप छताला मध्यभागी अर्धवट उमलते खाली लोबलेले फुल कोरलेले आहे. त्याच्या भोवती आठ दिशांना म्हणून आठ फुले कोरलेली आहेत. ही सर्व रचना एक चौरस दगडी चौकटीत  बसवलेली आहे. मंडपाच्या जमिनीवर वर्तूळाकार असे उंचावलेले पीठ आहे. त्यावर नंदी बसवलेला आहे. तिन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे आहेत. खांबांची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो. एकही खांब मध्ये येत नाही. यावर हा अंदाज लावता येतो की या ठिकाणी नृत्य, संगीत सेवा अर्पण केली जात असावी. आणि त्यासाठी गर्भगृहाची दिशा सोडून इतर तिनही ठिकाणी लोक बसून त्याचा आनंद घेत असावेत.


भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.  

मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या  बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात. 

अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकाली पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.

हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.

हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.   

(अन्व्या शिवायची इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).  

(फोटो सौजन्य AKVIN tourism)  

  

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  उद्ध्वस्त प्राचीन केशव मंदिर (माजलगांव-केसापुरी)!


उरूस, 21 सप्टेंबर 2020 

माजलगांव शहराच्या पश्चिमेला अगदी लागूनच केसापुरी गावात उत्तर बाजूला तळ्याच्या काठी शिवारात जीर्ण मंदिराचे अवशेष दिसून येतात. हे मंदिर आहे अकराव्या शतकांतील एकेकाळी शिल्पसौंदर्यदृष्ट्या अप्रतिम असे प्राचीन केशव मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही आता शिल्लक नाही. जंगली झाडोर्‍याने परिसर वेढला गेला आहे. गुप्तधनाच्या मोहात मंदिरात खोदाखोद केल्याने कोरीव दगडी चिरे ढासळले आहेत.

मंदिराचा मुख्य मंडप अजून बर्‍यापैकी शिल्लक आहे. मंडपाच्या छताला चौरसाकृती चौंकटीत कोरीव दगडांत नरसिंहाची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच शिव गणेश कार्तिकेय यांच्या मुर्ती आहेत.


 मंदिराच्या बाह्य अंगावर अतिशय सुंदर अशा सुरसुंदरिंच्या मुर्ती होत्या. त्यातील दोन अजूनही शिल्लक आहेत. इतरत्रही कुठे परिसरांत शोध घेतल्यास या मुर्ती विखुरलेल्या मातीत आढळून येतीलही. मंदिराचे कोरीव खांब सुंदर आहेत. सध्या शिल्लक जे खांब आहेत त्यांच्यावरची नक्षी उत्तम अवस्थेत आहे. गाभारा पूर्णत: ढासळलेला आहे. 

बाराव्या शतकात मंदिर शैली विकसित होवून त्रिदल पद्धतीची (तीन गाभारे असलेली) मंदिरे बांधली गेली. लक्षणीय अशी सहा मंदिरे मराठवाड्यात आहेत. केशव मंदिर हे त्यातीलच एक. 


या मंदिरात विष्णुची अतिशय देखणी अशी मूर्ती होती. दीडएकशे वर्षांपूर्वी ही मुर्ती गुराख्यांना सापडली. मुर्ती आता गावातील केशवराज मंदिरात विराजमान आहे. हे मंदिरही अहिल्याबाईंच्या काळातील उत्तम दगडी बांधणीचे भक्कम कमानींचे असे आहे. मुळ मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखा उचलून इथे नव्याने दरवाजाला लावण्यात आल्या आहेत. मुळ मंदिराचे खांबही काही नविन मंदिरात बसवण्यात आले आहेत.  ब्रह्मदेवाचीही एक अतिशय सुरेख मुर्ती विष्णुच्या मुर्तीशेजारीच ठेवण्यात आली आहे. 

महादेव मंदिराच्या गाभार्‍याबाहेर गोमुख असते. त्यातून अभिषेकाचे पाणी बाहेर येते. त्याप्रमाणे विष्णुचे जे अवतार आहेत त्या मंदिरांच्या गाभार्‍यांतून पाणी बाहेर जाण्यासाठी मकर प्रणाली कोरल्या जातात. केसापुरीच्या मंदिराला अतिशय देखणी अशी मकर प्रणाली आहे. ही आता नविन मंदिरात प्रवेशद्वाराजवळच्या ओट्याला बसवली आहे. 


आज केसापुरीचे मुळ केशव मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी या परिसरांची दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे. नविन मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व सहकार्य करण्यास हात पुढे केला आहे. 


आता गरज आहे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक/ विद्यार्थी यांनी पुढे येवून या मंदिराचा जिर्णाद्धार कसा होवू शकतो यासाठी प्रयत्न करण्याची. अशा मंदिरांचा जिर्णाद्धार शास्त्रशुद्ध पद्धतीने होट्टल येथे करण्यात आला आहे. ते एक अतिशय चांगले उदाहरण समोर आहे. विदर्भातील मार्कंडा मंदिराचा जिर्णाद्धार अशाच पद्धतीनं पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. सर्वच कामे पुरातत्त्व विभागाकडून होतील असे नाही. होट्टलचे काम इंटॅक या संस्थेने केले आहे. आता केसापुरीच्या कामासाठी इतर संस्था व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. 

गोदावरी खोर्‍यात विष्णुमुर्ती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिरे पडली आणि मुर्ती मात्र शिल्लक असाही प्रकार दिसून येतो. गोदावरीला काठावरच पार्थपुरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे म्हणजेच विष्णुचे मंदिर आहे. आता अधिक मासात तिथे मोठी जत्रा भरते. सध्या कोरोनामुळे हे मंदिर बंद आहे.

महाविष्णु शेळगांव (ता. सोनपेठ, जि. परभणी) हे गांवच विष्णुमंदिरामुळे ओळखले जाते. धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर अकराव्या शतकांतील अतिशय महत्त्वाचे असे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी असलेली विष्णुमूर्ती आता गावातच दुसर्‍या मंदिरात विराजमान आहे. सेलू जवळ ढेंगळी पिंपळगांव येथेही हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. आश्वर्य म्हणजे गावातच दुसर्‍या मंदिरात बालाजीची अशीच प्राचीन देखणी मुर्ती आहे. परभणीला वडगल्लीच्या जबरेश्वर महादेव मंदिरात विष्णुच्या दोन प्राचीन मुर्ती नंदीजवळ ठेवलेल्या आहेत.  

गोदावरी काठी गंगाखेड या प्रसिद्ध तीर्थस्थळी बालाजीचे मंदिर आहे. चारठाणा येथील नृसिंह तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंदिरात नृसिंहाची मुर्ती नाही. ती गावात देवीच्या मंदिरात एका भिंतीवर आढळते.  जिंतूरला नृसिंह मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठी राहेर येथील नृसिंह मंदिर तेराव्या शतकांतील अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पोखर्णी (जि. परभणी) येथे नृसिंह मंदिर आहे.  

खामनदीच्या काठी शेंदूरवादा (ता. बीडकीन जि. औरंगाबाद) येथे शिवकालीन सुंदर विठ्ठल मुर्ती आहे. विठ्ठलाला विष्णुचा अवतार मानला गेला आहे. पानगांव (ता. परळी जि. बीड) येथील विठ्ठल मंदिर अकराव्या शतकांतील प्रसिद्ध असे मंदिर आहे. ही विठ्ठलाची मुर्तीही देखणी आहे.  औंढा नागनाथ या ज्यांतिर्लिंग मंदिरात तळ्यात सापडलेली अप्रतिम अशी विष्णुमूर्ती काचेत ठेवलेली आढळून येते. मराठावाड्यात अशा पद्धतीनं विष्णुमुर्ती आढळून येतात.

पूर्वीच्या काळी आक्रमणाच्या भितीने मंदिरातील मुर्ती तळ्यात विहिरीत लादणींत लपवून ठेवल्या गेल्या. मग कालांतराने भिती ओसरल्यावर संकट टळल्यावर या मंदिरात घडविण्यास सोपी म्हणून महादेवाची पिंड ठेवल्या गेली. अभ्यासकांनी अशी मंदिरे शोधून त्यावरच्या मुर्तींचा अभ्यास करून माहिती लिहून ठेवली आहे. अजून बर्‍याच मंदिरांचा अभ्यास होण्याची गरज आहे. 

मुळात सगळ्यात पहिल्यांदा सामान्य माणसांची प्राचीन मंदिरं- बारवा-लेण्या-गढ्या-किल्ले-दर्गे यांच्याबाबतची अनास्था दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मगच हा विषय ऐरणीवर येईल आणि काहीतरी मार्ग सापडेल.(जून्या दर्ग्यांचा मकबर्‍यांचा विषय निघाला की काही जण झटकून टाकतात. याचा आपला काहीच संबंध नाही असे म्हणतात. पण या वास्तू भारतीय परंपरेतील आहेत याचा त्यांना विसर पडतो. मूळात समाधी स्थळे बांधणे आणि त्यांची पूजा करणे ही आपलीच परंपरा आहे). 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संस्कृती जागृती अभियान राबवितो आहोत. तूमच्या परिसरांतील जूनी मंदिरे, मुर्ती, जून्या वास्तू, गढी, वाडे, दर्गे-मकबरे यांची माहिती जरूर कळवा. व्हॉटसअप वर त्याचे फोटो पाठवा. स्थानिक सहकार्य करू इच्छिणार्‍यांची नावेही पाठवा. 

चारठाणा येथे संस्कृती संवर्धनाच्या अभियानात स्थानिक लोकांनी मोठी चळवळ चालवली आहे. त्यांनी एक आदर्श मराठवाड्यात आपल्या कृतीने  समोर ठेवला आहे.याप्रमाणे इतरत्रही काम सुरू झाले पाहिजे.

(या विषयात रस आसणार्‍यांसाठी खाली मंदिरांची यादी परत एकदा देत आहे.)          

(इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील सुंदर मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.8. अन्वा शिव मंदिर ता. भोकरदन जि. जालना.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल मंदिरे 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)

(इ.स. 1200 ते 1300 या काळातील उत्तर यादव कालीन मंदिरे. 1. अमलेश्वर मंदिर 2. सकलेश्वर मंदिर 3. खोलेश्वर मंदिर -तिन्ही मंदिरे अंबाजोगाई येथील 4. नरसिंह मंदिर राहेर जि. नांदेड 5. शिवमंदिर येळूंब जि. बीड 6. नरसिंह मंदिर-चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी (येथे अजूनही 5 मंदिरे आहेत) 7. नागनाथ मंदिर-पाली जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).    

 नागेश्वर मंदिर, खिरेश्वर

एका बाजूला अथांग पसरलेला नितांत सुंदर पिंपळगाव जोगा जलाशय, दुसऱ्या बाजूला आकाशापर्यन्त उंच हरीश्चन्द्रेश्वराचा पहाड, तिसऱ्या बाजूस माळशेज घाट, सतत विविध पक्ष्यांची व फुलपाखरांची वर्दळ, मनातलेही दुसऱ्याला ऐकू जाईल एवढी निरव शांतता. अशा ठिकाणी खिरेश्वर गावात नागेश्वर महादेवाचे मंदिर वसलेलं आहे. 
ठिकठिकाणी पडायला झालेल्या या मंदिराचे सौंदर्य आजही टिकून आहे. बाहेरून मंदिर साधारणच दिसते पण आत गाभाऱ्याबाहेर दरवाज्याच्या वरच्या बाजूला निद्रिस्त विष्णुंची प्रतिमा कोरलेली आहे. चेहऱ्यावरील भाव लक्ष्यवेधी आहेत. छतावर नंदीवर आरूढ झालेल्या शिवांच्या प्रतिमा आहेत. मंदिराबाहेर काही भग्न शिवलिंग व नंदी सापडतात.
मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यात एक ओढा आहे. पावसाळ्यात या ओढ्याला पाणी असते.
खिरेश्वर गावातून तोलार खिंडी ओलांडून हरिश्चंद्रगडावर जाता येते.
   












No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...