यादवांच्या काळात हा चंपावती प्रदेश अलाउद्दीन खिल्जीने जिंकल्यावर कालांतराने मुहम्मद तुघलकाच्या अमदानीत या नगराचे नाव ‘बीड’ असे होऊन हा सुभा बनला. फारशी भाषेत 'भीर' या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. त्याचा अपभ्रंश होऊन बीड हे नाव मोघल काळात रुढ झाले. बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात. पुढे याचा समावेश प्रथम बहमनी व नंतर निजामशाहीत झाला. मराठी सत्तेचा उदय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन व खर्डा येथे लढाया झाल्या आणि हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठी सत्तेच्या अस्तानंतर हा भाग पुन्हा निजामी अमंलाखाली गेला व भारत स्वतंत्र होईपर्यत तो हैदराबाद संस्थानातच राहिला.
बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात. शहरातील कंकालेश्वर, जटाशंकर, खंडेश्वरी व खंडोबा ही प्राचीन मंदिरे आजही या सर्व ऐतिहासिक घटनांची साक्ष देत दिमाखात उभी आहेत.
किल्ले मैदान, लक्ष्मीबाग- बीडचा तुरुंग इ.स. १९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकाऱ्याच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.
खंडोबा मंदिर बीड
बीड शहरामध्ये आजही इतिहास कालीन वास्तू आपल्याला दिसून येतात. याच इतिहास कालीन वास्तू पैकी खंडोबा मंदिर आजही दिमाखात उभे आहे. मुघलांचे शूर सरदार सुलतानजी निंबाळकर (हैबतराव) दख्खनचा सुभेदार आसेफजहॉ बहादुरच्या काळात सन १७२२ ते १७५१ च्या कालखंडात खंडोबा मंदिर आणि दीपमाळ उभारल्या असाव्यात असे इतिहासकार सांगतात. काहींच्या मते हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधले असे मानले जाते.
प्रत्येक इतिहास कालीन मंदिरावर शिल्प आढळतातच असे नाही, मात्र, बीड येथील खंडोबा मंदिरासमोरील दीपमाळेवर टेराकोटा शैलीतील शिल्पांनी अलंकृत केलेले चित्तवेधक शिल्प आहेत. दिपमाळेच्या प्रवेशद्वारावर गणेश नागदेवता आधी महत्वपूर्ण शिल्प आहेत. या शिल्पांवर ग्रीक युद्धांचा परिणाम झालेला दिसतो. पशुपक्ष्यांचे देखील शिल्प दिपमाळेवर कोरण्यात आली आहेत. दीपमाळेवर शिल्पा शिवाय अतिशी सुंदर अशा चित्रांचे रेखाटण्यात करण्यात आले असून आजही या चित्रातील रंग थळकपणे दिसतात. दोन देह मात्र, एकच तोंड असणाऱ्या बैलाचे शिल्प देखील अधिकच आकर्षक करणारे आहे.
बीडमधील खंडोबा हा नवसाला पावणारा खंडोबा म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे अनेक लोक प्रत्येक रविवारी येथे येऊन मनोभावे दर्शन घेतात. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस निजामशाही आली, त्यावेळेस खंडोबा मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. खंडोबा मंदिरात बोगदा आहे. या मंदिरापासून बीडच्या बलभीम चौकापर्यंत बोगद्यातून येत असायचे. आता हा बोगदा आहे, तो बंद झालेला आहे.
कसे पोहोचाल खंडोबा मंदिरात?
खंडोबा मंदिर हे शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर ४५० किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून येत असाल ३०० किलोमीटरचे अंतर आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर १५० किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेसदेखील इथंपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास ते देखील या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात. या ठिकाणांना भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट नाही.
चंपाषष्टी सोहळ्याला मंदिरात गर्दी
सोमवती अमावस्या आणि चंपाषष्टी सोहळ्याला खंडोबा मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यानिमित्त धार्मिक महोत्सवाचे आयोजन आणि भव्य अशी आरती देखील करण्यात येते. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते. राज्य पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारकांच्या यादीत या मंदिराचा समावेश केला असून मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे.

खंडेश्वरी माता मंदिर, बीड –
बीड शहरातील खंडोबा मंदिराच्या टेकडीच्या बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरी मातेचे प्राचीन देवालय आहे. मंदिर प्रकारात असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर खंडेश्वरीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे. हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधले असे सांगितले जाते. खंडोबा मंदिराचे टेकडी पायथ्याचे स्थान व खंडेश्वरी नावावरून हे बाणाईचे स्थान असावे असे वाटते. या मंदिरा समोर काळोबा वीर धनगराची समाधी आहे.
खंडेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात आख्यायिका सांगितली जाते. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली, त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुका मातेने वर माग म्हणून सांगितले, तेव्हा देवी तू माझ्या सोबत चल असं मेंढपाळ म्हणाला. मात्र मी तुझ्या पाठीमागे येते पण तू परत फिरून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी तू परत फिरून पाहशील त्याच ठिकाणी मी राहील, असं मेंढपाळाला वचन दिलं. मेंढपाळ चालत असताना देवी खरच आपल्या पाठीमागे आली का ? हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा वचनाचा भंग केला म्हणून देवी बीड शहराच्या उत्तरेस, त्याच ठिकाणी थांबली. वचनभंग झालं आणि सेवेत खंड पडला म्हणून खंडेश्वरी असं नाव रुढ झालं.
नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाविक खंडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. नऊ दिवस मंदिरात विविध कार्यक्रम साजरे होतात. जवळच काही अंतरावर प्राचीन खंडोबा मंदिर असून हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर, खंडोबा टेकडीवरील खंडेश्वरी माता मंदिर व खंडोबा मंदिर ही तीन प्राचीन मंदिरे आपण एका दिवसात आरामात पाहून, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट दिल्याचा आनंद घेऊ
खजाना विहीर :-
बीड शहरापासून पाच कि.मी. अंतरावर खजाना बावडी ही विहीर आहे.सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ ( हिजरी 991 ) मधे ही विहीर बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला 'खजिना विहीर' म्हणतात.
जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली ७ मी. आहे. जमीनीपासून ४.७ मी. खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास १९ मी. इतका आहे. आणि त्या खाली विहीराचा मूख्य व्यास १२.६० मी. एवढा आहे. विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे, त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं आणि ते कधीच आटत नाही.
या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीतला उत्तर दिशेचा बोगदा हा एक कालवा आहे. त्या काळात शेताला ह्याच कालव्याद्वारे पाण्याचा पुरवठा व्हायचा. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही पाणी येतं. या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता सिंचनाखाली आहे.
पण आज ही वैभवसंपन्न विहीर एका मोठ्या संकटात सापडली आहे. विहीर बघायला येणारे पर्यटक बिलकूलच स्वच्छता बाळगत नाहीत. विहिरीच्या पाण्यात बॉटल्स, कचरा वगैरे साचत आहे. विहिरीपर्यंत जायला पक्का रस्ता नाही. यावरून सरकारचं या जलवास्तूबद्दलचं दूर्लक्ष दिसून येतं. विहिरीला तातडीने संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. शिवाय दुष्काळामुळे विहिरीची सिंचन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या कन्स्ट्रकशन्समुळे ह्या कालव्याच्या झडपा बुजत आहेत. शहराजवळून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे ह्या कालव्याचं शेवटचं टोक 'फुटका नळ'ही उध्वस्त केला असून पुढे शेताला जाणारं पाणी नदीत वळवलं आहे. याने विहीराचं आणि शेतीचं नुकसानच झालं आहे. या बारवाच्या बाजूला एक मंदिर होते (बहुतेक महादेवाचे) जे मुसलमानी राजवटीत नष्ट झाले. त्याचे काही अवशेष या कोरड्या बारवात पहायला मिळाले. आता तिथे केवळ एक छोटेखानी मंदिर उरलेले आहे.
हे जर असंच सुरू राहिलं तर लवकरच या विहीरचं अस्तित्व धोक्यात येऊन हे सगळं नष्ट होण्याची शक्यता आहे.
बशीरगंज
बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो.
बीड शहराच्या पूर्वेला बिंदूसरेच्या तिरावर असलेले हे महादेवाचे हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर पुराणांमध्ये तसेच रामायणातही उल्लेखलेले आहे. काही पुराणांमध्ये परशुरामाने येथे महादेवाची स्थापना केली असा उल्लेख आहे. याचे बांघकाम हेमाडपंथी स्वरुपातले आहे... केवळ दगडांवर दगड गुंफून हजारो वर्षे उभे असलेल्या या देवळाने केवळ ऊन, पाऊस, वारा यांचाच नव्हे तर मुसलमानी आक्रमकांच्या पहारी, हातोडे, तोफा, यांचाही सामना केला आहे.
दहाव्या ते ११ व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणार्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराचा आकार तारकाकृती असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद आहे.अल्लाउद्दीन खिलजीचा मूळचा गुजराथ/राजस्थान या भागातला सेनापती महादेव कपूर ज्याचे धर्मांतर केल्यानंतर मलिक कपूर असे नामकरण करण्यात आले त्याने पहिल्यांदा या देवळावर आक्रमण केले. पुढे औरंग्याच्या कर्दनकाळी सैन्याने या मंदिरावर कमीत कमी २७ वेळा हल्ले केले. त्यात एकून एक सर्व मुर्ती भग्न केल्या गेल्या. हे मंदीर त्या नंतर बहुतेक वेळा हिंदूंसाठी बंदच होते. ते परत हिंदूंच्या हाती यायला १९४८ साल उजडावे लागले.या देवळाच्या आत सर्व भिंतीवर देवदेवतांच्या सुबक व कोरीव भग्न मूर्ती त्या आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष आजही देतात.

कंकालेश्वर मंदिर अनेक वर्ष बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजार्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला १९१५ साल उगवावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला.१७ सप्टेंबर १९४८ अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खर्या अर्थाने मुक्त झाले. या पुरातन मंदिराचा उल्लेख पुरण ग्रंथात ही आहे .अत्री ऋषी व अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रम्ह-विष्णू -महेशाला प्रसन्न करून घेतल्याची दंतकथा सांगितली जाते . बीडचं ग्रामदैवत असल्यानं इथं दरवर्षी महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते. याच मंदिराच्या पूर्वेस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं खंडेश्वरी देवीच मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शहराचं भूषणच. आदिशक्ती माहूरवासिनी रेणूकादेवी सूर्यसुरी या भक्ताच्या विनंतीवरुन ही देवी इथं आली, अशी आख्यायिका आहे. दरवर्षी नवरात्रात येथे फार मोठी यात्रा भरते.
मंदिराची रचना
या दुष्काळी/कोरड्या भागातही कोरडे न पडणार्या या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या देवळात जायला एक छोटा दगडी पूल आहे जो पावसाळ्यात पाण्याखाली असतो. त्यावरुन आत गेलो की हे प्रवेशद्वार दिसते.
कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा तलविन्यास या मंदिराचा आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभजोडी आहे.
मंडप आणि गर्भगृहामधील स्तंभांची रचना चौरस तलविन्यासाची असून चौरस तळखड्याच्या वर काही अंतरावर अनुक्रमे अष्टकोनी, चौरस आणि वर्तुळाकार बनणारा चौरस खांब आणि खांबाच्या वर्तुळाकृती भागावर किचकहस्त असा या स्तंभांचा घटकक्रम आहे.
कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांची द्वारे पंचशाखा प्रकारची असून त्यावर कमळदल, पुष्प आणि व्याल यांचे अलंकरण आहे. या द्वरशाखांच्या खालच्या भागात कुंभ आणि चौरी धारण करणार्या दासी आणि निधी दाखविले आहेत. मुख्य गर्भगृहाच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे.
गाभ्यार्याच्या छताचे मूळ कोरिवकाम सुदैवाने आजही सुरक्षित आहे. ते पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या देवळाला त्याच्या या श्रीमंतीमुळे/वैभवामुळे कनकालेश्वर हे नाव पडले. (कनक = सोने, सूवर्ण).
मंदीराभोवती असणार्या तलावाचे पाणी सहसा आटत नाही. पावसाळ्यात हा तलाव भरुन वाहतो. बहेर रणरणते ऊन असू देत पण येथे मात्र थंड वाटते. कनकालेश्वराच्या या तळ्यात एक ते दोन फूट लांबीचे वेगवेगळ्या रंगाचे चमकदार मासे हे बच्चे कंपनीचे विषेश आकर्षण होते. पण या काही वर्षात ते मासे नष्ट झाल्याचे कळते. तसेच या तळ्यात गाळही खूप साचला आहे. लोक या तळ्यात गणपती विसर्जन करतात. तसेच निर्माल्यही फेकतात. ते थांबायला हवे नाहीतर हे तळेच नष्ट व्हायचे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिर परीसर प्रदूषित होत आहे या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

https://www.facebook.com/namastebeed2019/posts/khandoba-temple-and-deepmal-it-is-often-considered-as-the-symbol-of-the-beed-cit/269855983963918/
खंडेश्वरी माता मंदिर, बीड | Discover Maharashtra
शकता.
©️ रोहन गाडेकर
https://www.discovermh.com/khandeshwari-mata-temple-beed/
बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या खांबांची मोजणी प्रत्येकवेळी वेगवेगळी येते…
मराठवाडा, महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित असलेला भाग अशी हाक ऐकायला मिळते. पण भिडू हा भाग तितकाच समृद्ध सुद्धा आहे. मग तो भाषेच्या बाबतीत असो, किंवा इतिहासाच्या आणि पौराणिक गोष्टींच्या बाबतीत. तिथल्या लेण्या, ऐतिहासिक इमारती बघून मराठवाड्याला आपली ऐतिहासिक ओळख सांगायची गरज पडत नाही. याच ऐतिहासिक वारश्यात आणखी एक भर म्हणजे कंकालेश्वर मंदिर.
बीड शहरातलं हे कंकालेश्वर मंदिर यादव काळातील असल्याचं म्हटलं जातं. त्याला बीडच ग्रामदैवत सुद्धा म्हटल जात. म्हणजे पार १५०० वर्ष जुनं. ८४ मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिव मंदिर, बिंदुसरा नदीच्या काठावर उभं आहे. चारही बाजूने भर भक्कम आणि नक्षीदार खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
असं म्हणतात की, १० ते ११ व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा यानं हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असायच्या, त्यामुळे या मंदिरावर लढणार्या स्त्रियांचं सुद्धा शिल्पकाम करण्यात आलंय. या कंकालेश्वर मंदिरात आणि त्यांच्या स्तंभावर ग्रीक शिल्पकलेची छाप पाहायला मिळते. आणि फक्त हिंदूच नाही तर जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही या मंदिरावर सापडतात.
कंकालेश्वर मंदिर जरी पुरातन काळातलं असलं तर ते अनेक वर्ष बंद होतं. फक्त महाशिवरात्रीच्या यात्रेला तिथं गर्दी पाहायला मिळायची. पण पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळानं घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजार्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले.
दरम्यान, क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाच्या या हुकूमाला भीक न घालता पोलिसांचा बंदोबस्त मोडीत काढून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक घातला होता, यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली. तसं पाहिलं तर आपला देश १५ अगस १९४७ साली स्वतंत्र झाला. पण मंदिर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालं ते १७ सप्टेंबर १९४८ साली म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्यदिनादिवशी.
जसं प्रत्येक ऐतिहासिक गोष्टीबाबत जशा दंतकथा प्रसिद्ध असतात तशा या मंदिराबाबत सुद्धा आहेत. म्हणजे जसं कि आपण आधी म्हटलं हे मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्यने बांधलं होत, तर कोणी म्हणतं असुराने बांधलंय.
पण या कंकालेश्वर मंदिराबाबत स्थानिक लोकांकडून एक इंटरेस्टिंग गोष्ट कायम सांगितली जाते. असं म्हणतात या मंदिराच्या खांबाची मोजणी प्रत्येक वेळी वेगवेगळी येते. म्हणजे तुम्ही जर मंदिराच्या चारही बाजूचे खांब एकदा मोजले आणि दुसऱ्यांदा परत मोजायला गेलात तर पहिल्यांदा मोजलेल्या आकड्यापेक्षा आकडे जास्त तरी असतील किंवा कमी तरी.
तिथं येणारे भाविक हे खांब मोजून आकडा बरोबर यावा म्हणून त्या खांबावर
खडूने आकडे सुद्धा टाकतात. पण तरी सुद्धा मोजणी कमी-जास्तच होत असते, असं
स्थानिकांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर तिथले गावकरी सांगतात कि,
बीडच ग्रामदैवत असणाऱ्या या मंदिराच्या खाली एक रहस्यमय एक तळघर आहे, हे
इत्येक वर्षांपासून बंद आहे. आजपर्यंत तिथं कोणीच गेलं नाहीये. असं म्हणतात
तिथी अनेक रहस्य दडलेली आहेत.
ते काही असलं तरी तुम्ही बीडला कंकालेश्वर मंदिरात गेलात, तर खांब मोजायला तेवढं विसरु नका.
https://bolbhidu.com/interesting-story-of-kankaleshwar-temple-standing-on-a-pillar-of-beed-01/
या' मंदिराला सोन्याचं मंदिर का म्हणतात? इथं आहेत लढणाऱ्या स्त्रियांची शिल्पं, पहा अफलातून मंदिराचा ...
बीड, 14 जून : बीड शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्प (Historic Temple) पहायला मिळतात. असंच एक बीड शहरातील प्रसिद्ध मंदिर आज आपण पहाणार आहोत. त्या मंदिराचं नाव आहे, कंकालेश्वर मंदिर. (The Famous Kankaleshwar Temple in Beed) शहरापासून अवघ्या काही अंतरावरच हे गाव आहे. या मंदिराला 1 वर्षांचा इतिहास आहे. त्याचा इतिहास, वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, ते पाहुया...
बीड शहरामधून बिंदुसरा नदी वाहते. याच नदीच्या पूर्व काठावर एका जलकुंडात दिसणारे सुंदर असे हे कंकालेश्वर मंदिर आहे. मागील हजारो वर्षापासून हे मंदिर याठिकाणी इतिहासाची साक्ष देत आहे. कनक म्हणजे सोने. सोन्याप्रमाणे चमकणारे हे मंदिर म्हणूनच या मंदिराचे नाव कंकालेश्वर पडले असावे, असे इतिहासकार सांगतात महादेवांची पिंड याच मंदिरात आहे. जलकुंडात असणारे हे मंदिर नेहमीच भाविकांसाठी आकर्षण ठरते. श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते
...असा आहे मंदिराचा 1 हजार वर्षांचा इतिहास
-
मुलगी बेपत्ता, तिचा शोधण्याऐवजी पोलीस वडिलांकडेच मागतायत पैसे; दाद कुणाकडे मागायची?
-
हनिमूनच्या प्लॅनिंगमध्ये तो दंग, नव्या नवरीने केलं सगळंच बेरंग, बीडमधील धक्कादायक घटना
-
सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखाची गाडी फोडली!
-
आंबे खात आहात, तर ही बातमी वाचाच; परराज्यातून आलेला आंबा खरंच खाण्यायोग्य आहे का?
-
आयुर्वेदिक उपचारासाठी म्हणून घरी आला अन् महाराजाने मुलगी पळवली; बीडमध्ये नेमकं काय घडलं?
-

बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी; जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीनंतर अंधारेंवर गंभीर आरोप
-

व्हॉट्सऍप स्टेटसला पतीसह तिघांचे फोटो ठेवले, अन्... बीडच्या नर्सने उचललं धक्कादायक पाऊल
-

कोर्टाच्या निकालानंतर दूर झाले अंतर, संजय राऊत भाजपसोबतच्या युतीबद्दल असं का बोलले?
-

सुषमा अंधारेंशी पंगा महागात; बीडमध्ये झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय
-

'चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे' राऊतांचा नोटबंदीवरुन घणाघात
-

Beed Weather Update : बीडमध्ये उष्मतेचा जोर कायम, आजचं तापमान इथं चेक करा
-

मुलगी बेपत्ता, तिचा शोधण्याऐवजी पोलीस वडिलांकडेच मागतायत पैसे; दाद कुणाकडे मागायची?
-

हनिमूनच्या प्लॅनिंगमध्ये तो दंग, नव्या नवरीने केलं सगळंच बेरंग, बीडमधील धक्कादायक घटना
-

सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखाची गाडी फोडली!
-

आंबे खात आहात, तर ही बातमी वाचाच; परराज्यातून आलेला आंबा खरंच खाण्यायोग्य आहे का?
-

आयुर्वेदिक उपचारासाठी म्हणून घरी आला अन् महाराजाने मुलगी पळवली; बीडमध्ये नेमकं काय घडलं?
-
बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी; जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीनंतर अंधारेंवर गंभीर आरोप
-
व्हॉट्सऍप स्टेटसला पतीसह तिघांचे फोटो ठेवले, अन्... बीडच्या नर्सने उचललं धक्कादायक पाऊल
-
कोर्टाच्या निकालानंतर दूर झाले अंतर, संजय राऊत भाजपसोबतच्या युतीबद्दल असं का बोलले?
-
सुषमा अंधारेंशी पंगा महागात; बीडमध्ये झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय
-
'चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे' राऊतांचा नोटबंदीवरुन घणाघात
चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर 11 ते 12 शतकात बांधले असावे, असा यामागचा इतिहास आहे. 1 हजार वर्षांहून अधिक जुने असे हे ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर महाराष्ट्रामध्ये असे एकही मंदिर नाही, जे कृत्रिमरीत्या जलकुंडात उभे आहे. मंदिरासाठी त्याच परिसरातील दगडांचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे मंदिराच्या परिसरात खड्डा निर्माण झाला आणि त्यावेळी त्याला तलावाचा आकार देण्यात आला.
वाचा : BEED : जिलेबी आणि भजी मिक्स असणारा ‘टक्कर’ पॅटर्न माहितीय का? पहा या भन्नाट पदार्थाचा VIDEO
या मंदिरावर कुठल्या प्रकारची शिल्पं सापडतात?
चिनी प्रवासाचे शिल्प अपवादाने महाराष्ट्रामध्ये सापडतात. मात्र, या मंदिरावर चीन प्रवासाचे शिल्प आपण पाहू शकतो. भारतीय प्रवाशांचे शिल्प या ठिकाणी दिसून येतात. त्याचप्रमाणे या मंदिरावर पाश्चात्य संस्कृतीच्या मुर्तीही येथे दिसतात. या शिल्पांमध्ये ग्रीक आणि रोमन जे युद्ध होते, त्यांची वेशभूषा दिसून येते. त्याच पद्धतीचे शिल्पे तिथे आढळतात.
गुगल मॅपवरून साभार
कंकालेश्वर मंदिराला कसे पोहोचायचे?
कंकालेश्वर मंदिर हे शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर 450 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून येत असाल 300 किलोमीटरचे अंतर आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर 150 किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेसदेखील इथंपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास तेदेखील या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात. या ठिकाणांना भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट नाही.
https://lokmat.news18.com/maharashtra/beed/the-famous-kankaleshwar-temple-in-beed-716793.html
पाहा आणखी आकर्षक फोटो
कृत्रिम तळ्याच्या मधोमध असलेल्या या मंदिरावरील रोषणाई डोळ्याचं पारणं फेडते. आकाशातून एकद्या रेखीव रांगोळीप्रमाणे हे मंदिर दिसतंय.
बीडमध्ये हेमाडपंथी कंकालेश्वर मंदीर 11 व्या शतकात बांधण्यात आलं.
यंदाचा हा उत्सव ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला.
दरवर्षी दिवाळीनंतर या मंदिरात संस्कार भारतीच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.
बीड शहरातील कंकालेश्वर महादेव मंदिरावर नेत्रदिपक दिपोत्सव साजरा करण्यात आला आहे.
Beed News: जलकुंडात उभे आहे 'हे' मंदिर, पाहा 1 हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा, Photos
बीड शहरात ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे. या मंदिराला 1 हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे.
- News18 Lokmat
- Last Updated : |
- Bid (Beed), India
![,[object Object], ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरं आणि शिल्पं पहायला मिळतात.](https://images.news18.com/ibnlokmat/uploads/2023/04/2-18.jpg?im=Resize,width=904,aspect=fit,type=normal)
बीड शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरं आणि शिल्पं पहायला मिळतात.







































No comments:
Post a Comment