तांबडी सुरला येथील शिव मंदिर
Edited by amitsamant - 04 Jul 2015 at 5:13pm
Edited by amitsamant - 31 Jul 2015 at 2:28pm
Edited by amitsamant - 14 Jan 2015 at 12:36pm
| लक्ष्मी नारायण मं� Posted: 13 Dec 2013 at 8:19pm |
|
गावाचे नाव :- वालावल जिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, कुडाळ, परूळे. सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या
गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील
नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर,
दर्या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून
हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे
प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा
घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य
होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत
प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही
वालावल गावात होते. इ.सनाच्या
११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे
महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात
आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते.
त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले.
मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्या कल्याण
पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा
काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य
पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली. दंतकथेनुसार
श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल
गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री
नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक
चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच
जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो
डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग
आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या
मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न
जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले
आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे.
दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची
पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.) नारायणाची
मुर्ती उभी असून अंदाजे ४ फूट उंच आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या
मुर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरूड कोरलेला आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या दारावर शेषशाही विष्णु कोरलेला आहे. मंदिराच्या
सभामंडपात कोरीव काम केलेले लाकडी खांब व तुळया आहेत. काळाच्या ओघात
त्यावरील कोरीवकाम पुसट झालेल आहे. त्यातील एक खांब तुळशीचा आहे अशी वदंता
आहे. मंदिराच्या सभामंडपातील अंतराळाच्या (छताच्या) लाकडी पट्ट्य़ांवर पुराण
कथांमधील प्रसंग कोरलेले आहेत. याशिल्पाच्या बाजूच्या पट्टीवर "गंडभेरुंड"
कोरलेला आहे. (गंडभेरुंड म्हणजे एक धड, २ पाय,२ पंख व २ डोकी असलेला
पक्षी, हे विजयनगर साम्राज्याचे चिन्ह होते.) हा "गंडभेरुंड" पटकन
दिसण्यासाठी नारायणाच्या मुर्तीच्या नजरेच्या सरळ रेषेत पाहावे. या कौलारू
मंदिराच्या बाहेर ५ दिपमाळा आहेत. त्यापैकी ४ बाजूला ४ एकाच उंचीच्या ४
दिपमाळा आहेत. त्यांच्या वरच्या टोकावर कलश बनवलेले आहेत. मध्यभागी असलेली ५
वी दिपमाळ इतर दिपमाळांपेक्षा उंच आहे. या दिपमाळेच्या एका बाजूला तुळशी
वृंदावन आहे. त्यावर देवळाच्या बाजूला हनुमान कोरलेला आहे. दिपमाळेच्या
दुसर्या बाजूला " कल्याण पुरुषाची" घुमटी आहे. या घुमटीतील मोठी मुर्ती
वीरासनात बसलेली आहे. त्याच्या शेजारी छोटी मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या
बाजूस तळे आहे. जाण्यासाठी
:- वालावलला जाण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील कुडाळ गाठावे. कुडाळ -
वालावल हे अंतर १० किमी आहे. या मार्गावर एसटीची सेवा व रिक्षा उपलब्ध
आहेत. मालवण - वालावल हे अंतर ३० किमी आहे. मालवणहून परुळे गावापर्यंत एसटीने जाऊन पुढे रिक्षाने वालावलला जाता येते. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) निवती किल्ला, निवती ३) वेतोबा मंदिर, परुळे ४) भोगवे बीच, भोगवे सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. Ancient Temples of Maharashtra Narayan Mandir , Village :- Walawal , Dist :- Sindhudurg, Nearest city :- Kudal, Malvan, Vengurla. |
| कर्णेश्वर मंदिर , स� Posted: 03 Dec 2013 at 3:58pm |
|
गावाचे नाव :- संगमेश्वर जिल्हा :- रत्नागिरी जवळचे मोठे गाव :- चिपळूण. रत्नागिरी
जिल्ह्यातील संगमेश्वर हे प्राचीन गाव आहे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे
प्राचीन घाटमार्ग या परीसरात उतरत होते. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी
या भागात प्रचितगड, भवानीगड, महिमतगड हे किल्ले बांधण्यात आले. चालुक्या़चा
पुत्र कर्ण याची राजधानी कोल्हापूर येथे होती. त्याने इ.सनाच्या दुसर्या
शतकात संगमेश्वर ही नगरी वसवली. या नगरीत शास्त्री, वरुणा आणि अलकनंदा या
नद्यांच्या संगमावर कर्णेश्वराचे मंदिर बांधले. हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे
आहे. मंदिर ४ फूट उंच जोत्यावर बांधलेले आहे. जोत्यावर फुलांची नक्षी
काढलेली आहे. मंदिराचे गर्भगृह व प्रवेशमंडप असे दोन भाग असून
प्रवेशमंडपाच्या बाहेरच्या भिंतीवर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या
बाहेरील बाजूस (प्रवेशमंडप सोडून) कोणतेही कोरीव काम केलेले नाही.
मंदिराच्या गर्भगृहात छताखाली शंकराची पिंड आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळ
आहे. मंदिर परीसरात एक वैशिष्ट्यपूर्ण "गध्देगाळ" पाहायला मिळतो. या
"गध्देगाळावर वरच्या व खालच्या बाजूला देवनागरीत मजकूत लिहिलेला आहे. जाण्यासाठी
:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) ने चिपळूणहून संगमेश्वरकडे
येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल
लागतो. शास्त्री पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळल्यास जो रस्ता सुरु होतो
तेथून १ कि.मी. अंतरावर कसबा गाव लागते. तिथे "जनता सहकारी बँक" जवळ
डावीकडे वळल्यास पुढे ३०० मीटर वर श्री कर्णेश्वर मंदिर आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) प्रचितगड २) भवानीगड . ३) महिमतगड ४) छ.संभाजी महाराज स्मारक ५) मार्लेश्वर सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Karneshwar Mandir , Village :- Sangmeshwar, Dist :- Ratnagiri , Nearest city :- Chiplun. Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:01pm |
| रीराम मंदिर, फलट� Posted: 02 Dec 2013 at 1:37pm |
|
गावाचे नाव :- फलटण जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे. फलटण
हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा
उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथीयांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव
पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे. फलटणचे
नाईक निबाळकर हे घराणे ७५० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे.
मालोजी राजे व शिवाजी राजे यांना या घराण्यातील अनुक्रमे दिपाबाई व सईबाई
या मुली दिल्या होत्या. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी या घराण्यात दिली
होती. म्हणजे हिदवी स्वराज्याशी नातेसंबंध असलेले घराणे आहे. फलटण शहरातील
श्रीराम मंदिर हे फलटण शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर
महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटणचे
श्रीराम मंदिर २२५ वर्षापूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे.
भव्य प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या
बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर तीन
दिपामाळा आहेत. मंदिराच छ्त शिसवी खांबांवर तोललेल आहे. खांबांना वरच्या
बाजूस लाकडी कमानी आहेत. मंदिराच्या बाजूने ३ ते ४ फूट उंचीचे कोरीव काम
केलेल्या लाकडी जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक जाळीवर वेगवेगळई नक्षी
कोरलेली आहे.गाभार्यात राम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती आहेत. जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) श्रीराम मंदिर, फलटण २) निंबाळकर छ्त्री (समाधी), फलटण. ३) राजवाडा, फलटण ४)संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra. Shriram Mandir , Village :- Phaltan, Dist :- Satara , Nearest city :- Pune, Satara. |
| जरबेश्वर मंदिर, फल� Posted: 02 Dec 2013 at 1:35pm |
|
गावाचे नाव :- फलटण जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे. फलटण
हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा
उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव
पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे. फलटण
शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली.
त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा
यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.
जरबेश्वर
हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व
ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे
मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या
पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून
तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात
छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे
द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी
यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच
फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, तर उजव्या बाजूला
कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत.
गाभार्यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर
दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची
बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे. जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) श्रीराम मंदिर, फलटण २) निंबाळकर छ्त्री (समाधी), फलटण. ३) राजवाडा, फलटण ४)संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Jarabeshwar Mandir, Village:- Phaltan, Dist. Satara |
| भगवती मंदिर, कोटका� Posted: 30 Nov 2013 at 10:36pm |
|
गावाचे नाव :- कोटकामते (जिल्हा :- सिंधुदुर्ग) जिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, देवगड. ‘‘श्री भगवती ।।श्री।। मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ।। सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ।।१।। याशिवाय कान्होजींनी साळशी, आचरा, कामते, किंजवडे ही गावे मंदिराला इनाम म्हणून दिली होती. देवगड
- मालवण रस्त्यावरील नारिंग्रे गावाकडून कोटकामते गावात जाताना
रस्त्याशेजारी डाव्या बाजूस कोटकामते किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष दिसतात.
बुरुजाजवळील तटबंदी व खंदकाचे अवशेष आज नष्ट झालेले आहेत. भगवती
मंदिराबाहेर ३ तोफा उलट्या पुरुन ठेवलेल्या आढळतात. मंदिरातील सभामंडपात
कान्होजी आंग्रे यांचे नाव असलेला शिलालेख पाहता येतो. भगवती देवीची पुरातन
मुर्ती काळ्या पाषाणात बनवलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या वरच्या बाजूस २
हत्ती देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खडग
आहे. देवीच्या सभा मंडपाचे खांब लाकडी असून त्यावर कोरीव काम केलेले आहे.
त्यापैकी एक खांब तुळशीचा असल्याची वदंता आहे. मंदिराच्या परिसरात दोन
पुरातन मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यास स्थानिक लोक रामेश्वर व पावणाई
म्हणतात. भगवती मंदिरामागे रामेश्वर मंदिर आहे. त्यात एक पुरातन मूर्ती
आहे. याशिवाय पुरातन दुमजली वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात. जाण्यासाठी :- १)
मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून ३० किमी अंतरावर नारिंग्रे गाव आहे.
या गावातून उजव्या बाजूस जाणारा रस्ता ५ किमी वरील कोटकामते गावात जातो. २) देवगड - जामसांडे - तळेबाजार - तिठा यामार्गे (अंतर अंदाजे २० किमी) कोटकामते गावात जाता येते. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) देवगड किल्ला, देवगड ३) विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग ४) कुणकेश्वर मंदिर सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Bhagawati Mandir , Village :- kotkamate, Dist :- Sindhudurg, Nearest city :- Malvan, Devgad, Vijaydurg. |
| कुणकेश्वर Posted: 30 Nov 2013 at 10:25pm |
|
गावाचे नाव :- कुणकेश्वर जिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, देवगड. कुणकेश्वर
हे समुद्र किनार्याला लागून असलेले निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात
इ.सनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर बांधले.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार
केला. या मंदिरा संबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. प्राचीनकाळी एक मुस्लिम
व्यापारी कुणकेश्वराजवळच्या समुद्रात वादळात सापडला. त्यावेळी त्याला दुरवर
एक दिवा दिसला. त्या दिव्याला पाहून त्याने प्रार्थना केली की, मी जर या
संकटातून वाचलो तर त्याठिकाणी मंदिर बांधीन. थोड्याच वेळात वादळ शमल,
किनार्यावर येऊन व्यापार्याने पाहीले तर त्याठिकाणी छोटे शंकराचे मंदिर
होते. त्याने तिथे मोठे मंदिर बांधले. मुर्तीपुजा निषिध्द मानणार्या
मुस्लिम धर्मातील लोक आपल्याला वाळीत टाकतील या भितीने त्या व्यापार्याने
मंदिराच्या कळसावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याची कबर आजही मंदिराच्या
बाजूला दाखवतात. कुणकेश्वर
मंदिर समुद्र किनार्यावर असल्यामुळे त्याची बांधणी उंच जोत्यावर करण्यात
आली आहे. त्या जोत्याला बसणारे लाटांचे तडाखे सहन करण्यासाठी त्याची
बाहेरच्या बाजूने पायर्या पायर्यां सारखी रचना करण्यात आली आहे. मंदिराची
बांधणी द्राविडी पध्दतीची आहे. या बांधणीत मंदिराचा कळस बहुमजली व
साधारणपणे चौकोनी आकाराचा असतो. कळ्सा खालील गाभार्यात देवताची मुर्ती
किंवा शिवलिंग असते. कळसाच्या पुढच्या बाजूस मंडप असतो. कुणकेश्वर
मंदिराच्या परीसरात ६ दिपमाळा आहेत. मंदिराच्या परीसरात गणपती, जोगेश्वरी,
भैरव, मंडलिक, नारायण या देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या उत्तरेस छोटा
तलाव आहे. जाण्यासाठी :- १) मालवण कुणकेश्वर अंतर ३९ किमी आहे. २)
मुंबई - गोवा महामार्गावरील नांदगावातून देवगडला जाण्यासाठी रस्ता आहे. या
रस्त्यावर कुणकेश्वरला जाणारा फाटा आहे.(मुंबई - कुणकेश्वर ४४८ किमी) आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) देवगड किल्ला, देवगड ३) विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra kunkeshwar Mandir , Village :- kunkeshwar, Dist :- Sindhudurg, Nearest city :- Malvan, Devgad, Vijaydurg. |
| मौनी महाराज मंदिर Posted: 30 Nov 2013 at 8:47pm |
|
गावाचे नाव :- पाटगाव जिल्हा :- कोल्हापूर जवळचे मोठे गाव :- गारगोटी, भूदरगड. इ.स.
१६७६ च्या विजयादशमीला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या
मोहिमेवर निघाले. त्यावेळी महाराजांनी मौनी महाराजांचे पाटगाव येथे जाऊन
आशिर्वाद घेतले होते. ही नोंद ९१ कलमी बखरीत ७६ व्या कलमात वाचायला मिळते
.दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येई पर्यंत मौनी महाराजांनी जिवंत समाधी
घेतली होती. दिनांक ३ जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्त्र भोजनासाठी सनद दिली
होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या काळात
सुरुवात झाली होती. भुदरगड
तालुक्यात पाटगाव आहे. पाटगाव मध्ये मौनी महाराजांची समाधी आहे. समाधीकडे
जाणार्या वाटेवर ताराराणीनीं बांधून घेतलेले भव्य प्रवेशव्दार आहे. समाधी
मंदिरावर शरभ कोरलेला आहे. त्याने पाच हत्तीना पकडलेले दाखवण्यात आले आहे.
मंदिराच्या लाकडी बांधकामातील कलाकुसर पाहाण्यासारखी आहे. मौनी महाराजांची
समाधी एकसंध दगडात असून खालील दगड मोठा व वरील दगड उतरत्या बांधणीने छोटे
होत गेलेले आहेत. जाण्यासाठी :- पाटगावाला
जाण्यासाठी कोल्हापूर गाठावे. कोल्हापूर (५३ किमी) - गारगोटी (३५ किमी) -
पाटगाव. पाटगावात रस्त्याला लागून मौनी महाराजांचे समाधी मंदिर आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- रांगणा किल्ला. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Mauni Maharaj Samadhi Mandir , Village :- Patgaon, Dist :- Kolhapur, Nearest city :- Gargoti, Kolhapur. |
| शिखर शिंगणापूर Posted: 30 Nov 2013 at 6:19pm |
|
वाचे नाव :- शिंगणापूर जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- दहीवडी, गोंदवले, फलटण, अकलूज. सातारा
जिल्ह्यातील माण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर
आहे. माण तालुक्यातून जाणार्या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या
डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच
रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर
शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे. पुराणातल्या
कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर
तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य
करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान
शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा
आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर
गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा
मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री
शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह
चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला. आजही
दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह
सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या
लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी
या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या
देवळाच्या कळसाला बांधतात. इतिहासात
डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते.
त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा
अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे. शिखर
शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा
मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव
हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला
येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून
मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही
हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी
महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील
प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे
प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी
रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे
लागते. इ.स.१७३५
मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार केला. त्यावेळेच्या स्थापत्य
शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला
असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते.
त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी
महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही
स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या
पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या
व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत.
इ.स. १९७८ मध्ये शिखर शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात
आला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची
डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे. शिंगणापूर
टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे
खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या
जाणार्या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे.
तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ
वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो.
रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात
प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला
नगारखाना आहे. काळ्या
पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८
दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व
पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन
शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने
झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील
शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष
कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले
आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या
गाभार्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या
व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात भगवान शंकराचे
आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्याच्या समोर जमिनीवर दगडात
कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे
आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर
रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात
बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे. मंदिराच्या
पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून
देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने
अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग
आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे. जाण्यासाठी :- सातारा
जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्या
पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी.
अंतरावर शिखर शिंगणापूर आहे. पुण्याहून
फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला
जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात. २) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ. ३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा. ४) अकलूजचा किल्ला ४५ किमी. सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Shikhar
Shinganapur Shiv Mandir , Village :- Shikhar Shinganapur , Dist :-
Satara, Nearest city :- Dahiwadi, Gondawale, Phaltan, Akluj. |
| भैरवनाथ मंदिर (किक� Posted: 23 Nov 2013 at 8:01pm |
|
गावाचे नाव :- किकली जिल्हा:- सातारा जवळचे मोठे गाव :- भुईंज, वाई ,सातारा. सातारा
जिल्हयात वाई पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या किकली गावात भैरवनाथाचे
प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले असे
गावकरी सांगतात. मंदिराचा दरवाजा पूर्वाभिमूख आहे. दरवाज्यामधे डाव्या
बाजुला कोनाड्यात गणपतीची मूर्ती आणि उजव्या बाजूला कोनाड्यात सिद्धनाथ
मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच भैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर
दिसते. आजमितिस मंदिराची पडझड झालेली असून जिर्णोद्धाराचे काम चालू आहे.
मंदिरासमोर डाव्या बाजूस तीन दीपमाळा आहेत. उजव्या बाजूस एक छोटे मंदिर
आहे. या छोट्या मंदिरात आज दत्ताची मूर्ती आहे. दत्त मंदिराच्या उजवीकडे एक
पडके मंदिर असून त्यात शंकराची दगडी पिंड आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण
झालेच नाही असे गावकरी सांगतात. या पडक्या मंदिराच्या थोड पुढे आल्यावर
सध्या बांधलेले एक भैरवनाथ मंदिर आहे. मंदिरासमोरच्या चौथर्यांवर दोन शंकर
पिंडी आणि नंदी आहे. मुख्य मंदिरामध्ये समोर नंदी, तिथून आत प्रवेश
केल्यावर मंदिराचा मंडप व त्यामध्ये अनेक खांब आहेत ज्यावर कोरीव काम
केलेले आहे. मंदिरात एकूण तीन पिंडी आहेत. उजव्या डाव्या बाजूस एक एक व
गाभार्यात एक. मंदिरावर सध्या कळस नाही, पडझड झाली आहे. मंदिराच्या परिसरात
शाळा आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) चंदन आणि वंदन किल्ले चंदन आणि वंदन किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. जाण्यासाठी : चंदन
आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणार्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे -
सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथुन २० कि.मी अंतरावर किकली गाव आहे. वाई
आणि सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहेत. किकली गावात
भैरवनाथ मंदिर आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची
गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची,
येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो
चंदन तर उजवीकडे वंदन किल्ला आहे. Ancient Temples of Maharashtra Bhairavnath Mandir , Village :- Kikali , Dist :- Satara, Nearest city :- Bhuinj, Satara, Vai. |
| सिध्देश्वर मंदिर (� Posted: 23 Nov 2013 at 6:32pm |
|
गावाचे नाव :- माचणूर जिल्हा :- सोलापूर जवळचे मोठे गाव :- पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर माचणूर
गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह
काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात
साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून मंदिर संकुलात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला
पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला शंकराचे छोटे
मंदिर आहे. प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता
येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर
तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूट
उंचीचा नंदी आहे. शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार
५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे. या खिडकी वजा दरवाजातून
बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो.मंदिराच्या मागील बाजूस नदीवर दगडी
प्रशस्त घाट बांधलेला आहे. नदीत एक पूरातन छोटे मंदिर आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) माचणूरचा किल्ला २) मंगळवेढ्याचा किल्ला ३) पंढरपूर माचणूरचा किल्ल्याची माहीती साईटवर दिलेली आहे. जाण्यासाठी : माचणूर
गाव सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून
२१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात
जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे
माचणूरचा किल्ला आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Sidhheshwar Mandir , Village :- Machanur , Dist :- Solapur, Nearest city :- Pandharpur, Mangalvedha. |
| इंद्रेश्वर मंदिर व Posted: 15 Nov 2013 at 2:04pm |
|
ब्रम्हेश्वर मंदिर व इंद्रेश्वर मंदिर गावाचे नाव :- इंदुरी जिल्हा :- पुणे जवळचे मोठे गाव :- तळेगाव, चाकण, पुणे तळेगाव
- चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात
इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून
ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून
मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. ब्रम्हेश्वर मंदिर इंदुरी
किल्ल्याच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या काठी पुरातन ब्रम्हेश्वर मंदिर
आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू
मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्याचे व कळसाचे काम काळ्या दगडात
केलेले आहे. गाभार्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या चौकटीवर
वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे, तर खालच्या बाजूला कोरलेले आहे. मंदिरा बाहेर जूना दगडात कोरलेला नंदी व दोन पिंडी आहेत. इंद्रेश्वर मंदिर इंदुरी
गावात तळेगाव चाकण रस्त्याला लागून तलावाकाठी पुरातन इंद्रेश्वर मंदिर
आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू
मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्याचे व कळसाचे काम काळ्या दगडात
केलेले आहे. गाभार्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या चौकटीवर
वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. मंदिरा बाहेर दगडात कोरलेला जूना नंदी व गणपती आहेत. ऋषींच्या
शापाने अंगावर आलेले कोड घालवण्यासाठी इंद्राने येथे तपश्चर्या करून येथील
तलावात आंघोळ केल्यावर त्याच्या अंगावरचे कोड निघून गेले अशी या मंदिरा
बद्दल दंतकथा आहे. या मंदिरासमोरील तलाव आता पाण वनस्पतींनी भरल्यामुळे
दिसेनासा झालाय. जर हा तलाव साफ करून सुशोभित केला, तर या परीसराची शोभा
वाढू शकते. जाण्यासाठी :- मुंबई-पुणे
रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण
रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील
डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील
रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला
इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने
जाणार्या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक
गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो.
किल्ल्या समोर उभे राहील्यावर डावीकडे एक रस्ता खाली उतरतो, त्या रस्त्यावर
किल्ल्यापासून २ मिनिटाच्या चालीवर ब्रम्हेश्वर मंदिर आहे. इंद्रेश्वर मंदिर इंदुरी गावात आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) इंदुरीचा किल्ला २) इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत. ३) राजवाडा व बनेश्वर मंदिर , तळेगाव ४) चाकणचा किल्ला इंदुरीचा किल्ला व चाकणचा किल्ला यांची माहीती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Bramheshwar & Indreshwar Mandir , Village :- Induri, Dist :- Pune, Nearest city :- Talegaon, Chakan. Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:18pm |
| भीमाशंकर Posted: 15 Nov 2013 at 1:14pm |
|
गावाचे नाव :- भीमाशंकर जिल्हा:- पुणे जवळचे मोठे गाव :- घोडेगाव भीमाशंकर
हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. हे सुमारे साडेतीन हजार
फूट उंचीवर , दाट वनश्रीत वसलेले एक पवित्र, पूरातन देवस्थान आहे.
भीमाशंकरचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.
महाराष्ट्र सरकारने हा भाग "भिमाशंकर अभयारण्य" म्हणुन घोषित केलेला आहे.
या जंगलात राक्षसी खार / उड्णारी खार म्ह्णजेच शेकरु पाहायला मिळते. तसेच
पावसाळ्यात येथील जंगलात अंधारात चमकणारी "ज्योतिवंती" ही वनस्पती पाहायला
मिळते. झाडाच्या सालीवर जमा झालेल्या बुरशीमुळे ही वनस्पती अंधारात चमकते.
सर्व डोंगरप्रेमींचा तसेच नविन भट्क्यांचा भीमाशंकर हा आवडता ट्रेक आहे. पूराणातील
कथेनुसार त्रेतायुगात त्रिपुरासुराने भीमाशंकराच्या अरण्यात तपश्चर्या
केली. त्यावर प्रस्न्न होऊन शंकराने त्याला वर दिला. या वरामुळे
त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी शंकराने
पार्वतीची (कमलजा माता) मदत घेतली. शिव- पार्वतीने अर्धनारी नटेश्वराच्या
(अर्धा पुरुष व अर्धी स्त्री) रुपात त्रिपुरासुराचा कार्तिकी पौर्णिमेला वध
केला, तेव्हा पासून तिला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. भीमाशंकरचे
मंदिर १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे असून, त्याची बांधणी हेमाडपंथी पद्धतीचे
आहे. मंदिराचा सभामंडप व शिखर १८ व्या शतकात नाना फडणवीसांनी बांधले.
मंदिराचे मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते.
मंदिराच्या बाह्यभागात सिंहासनाधिष्ठीत देवता व त्यांवर छत्रचामर ढाळणारे
त्यांचे सेवक यांच्या मूर्ती आढळून येतात. देवळा समोरच १७२९ सालातील धातूची
एक प्रचंड घंटा लटकवलेली आहे. ही पोर्तुगिज बनावटीची घंटा, चिमाजी
आप्पांनी वसई वरील विजया नंतर भिमाशंकर मंदिराला अर्पण केली. मंदिराच्या
आवारात ५ ते २० फूट उंचीची दीपमाळ आहे, या दीपमाळेवर एक शिलालेख आढळतो.
भीमा नदीचा उगम याच भीमाशंकरच्या डोंगरावर आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) नागफणीचे टोक :- घाटाच्या
रस्त्याने वर आल्यावर एक तळे लागते. या तळ्याच्या उजव्या बाजूने वर जाणारी
वाट आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जाते. मंदिरावरून सरळ वर जाणार्या
वाटेने आपण नागफणीच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथून समोरच उभा असणारा
पेठचा किल्ला, पदरचा किल्ला, पेब आणि माथेरानचे पठार दिसते. २) गुप्त भीमाशंकर :- राम
मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट खाली उतरते. या वाटेने सरळ
गेल्यास आपण घनदाट जंगलात प्रवेश करतो. पुढे २५ मिनिटानंतर एक मंदिर लागते.
या मंदिरापासून डावी कडे उतरणारी वाट आपणांस पाण्यामुळे तयार झालेल्या
पिंडी कडे घेऊन जाते. यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. पावसाळ्यात येथे
फार मोठा धबधबा तयार होतो. ३) भीमा नदीचा उगम. ४) भिमाशंकरचे जंगल. ५) कमलजा मंदिर. जाण्यासाठी :- भीमाशंकरला
जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे. पुणेकरांनी स्वारगेटवरून एसटी अथवा
ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे.खांडस ते कर्जत सुमारे
१४ कि.मी चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने जाण्याची सोय
आहे. खांडस गावातून शिडी घाट , गुगळ घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी
भीमाशंकर गाठता येते. १) गणेश घाट :- खांडस
गावातून दोन किमी अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी
कच्च्या रस्त्याची वाट गणेश घाटाची आहे. ही वाट अत्यंत सोपी आहे. या वाटेने
तासभराच्या अंतरावर एक गणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७
तास लागतात. २) शिडी घाट :- पुलाच्या
डावीकडे जाणारा रस्ता आपणास खांडस गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या
डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड
आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते.या वाटेने दीड तासांत ३
शिड्या लागतात. तिसर्या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडी
मध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप
लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. येथे
चहापाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यापाशी
पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते. ३) गुगळ घाट :- हि
वाट धबधब्यातून जाणारी वाट आहे.पुढे ही वाट व गणेश आणि शिडी घाटातील वाटा
एकत्र येतात. या वाटेने शिडी घाटा एवढाच वेळ लागतो. ही वाट फारशी प्रचलित
नसल्याने वाटाड्या बरोबर न्यावा लागतो. ४) अहुपे घाट :-
कल्याण - मुरबाड मार्गे- देहरी - खोपवली या गावात पोहोचावे. हे अहुपे
घाटाच्या पायथ्याचे गाव आहे. येथुन ३ ते ४ तासात घाट पार करुन आपण अहुपे
गावात पोहोचतो.अहुपे गावाच्या मागे भट्टीचे रान आहे. या रानातून जाणारी वाट
८ कि.मी.वरील कोंढवळ गावापर्यंत जाते. येथुन बसने किंवा चालत ८ कि.मी.वरील
भीमाशंकरला जाता येते. (अहुपे गाव - कोंढवळ - भीमाशंकर अंतर अंदाजे १६
कि.मी.) ५)वाहनांची वाट :- भीमाशंकरला
जाण्यासाठी वर गावापर्यंत डांबरी सडक बांधलेली आहे. या साठी मुंबई अथवा
पुणे येथुन, तळेगाव - चाकण - घोडेगाव मार्गे भीमाशंकरला (अंतर अंदाजे २६५
कि.मी.) जाता येते. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Bhimashankar ( Jyotirlinga) :- Village :- Bhimashankar, Dist :- Pune, Nearest city :- Ghodegaon Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:19pm |
| पाटणादेवी मंदिर Posted: 14 Nov 2013 at 10:47pm |
|
गावाचे नाव :- पाटणादेवी जिल्हा :- जळगाव जवळचे मोठे गाव :- चाळीसगाव चाळीसगाव
येथील गौताळा अभयारण्याच्या गेटपासून २ किमी अंतरावर डोंगरी नदीच्या काठी
पाटणा देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या समोर कन्हेरगड आहे. पाटणा
देवी म्हणजेच चंडीकादेवी हे शक्तीपिठ आहे. पौराणिक कथेनुसार भगवान
विष्णूंनी सुदर्शनचक्र सोडून पार्वतीच्या शवाचे १०८ तुकडे केले. ते
तुकडे(अवयव) ज्या ज्या ठिकाणी पडले , तेथे शक्तीपिठ निर्माण झाले आणि त्या
अवयवावरून शक्तिपिठाचे नामकरण केले गेले. पाटण येथील डोंगरावर पार्वतीच्या
उजव्या हाताचा पंजा तुटून पडला म्हणून या ठिकाणी वरदहस्त शक्तीपिठाची
निर्मिती झाली. पूर्वीच्या
काळी गोविंदस्वामी हे देवीचे उपासक होऊन गेले. त्यांनी आयुष्यभर देवीची
उपासना केली. वृध्दापकाळामुळे त्यांना उपासनेसाठी डोंगरावर जाणे जमेना
म्हणून त्यांनी देवीला डोंगराखाली येण्याची विनंती केली. आपल्या प्रिय
भक्ताच्या विनंतीला मान देऊन देवी डोंगराखाली आली. त्या ठिकाणी
गोविंदस्वामी यांनी देवीची तपश्चर्या केली. देवीने प्रसन्न होऊन वर दिला मी
स्वयंभू मुर्तीच्या रुपाने प्रकट होईन. त्याप्रमाणे देवीची मुर्ती
गोविंदस्वामीना कुंडात मिळाली. त्यांनी तिची स्थापना मंदिरात केली. त्याच
ठिकाणी इसवी सनाच्या १२ व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी येथे मंदिर बांधुन
शीव, शक्ती व विष्णूची स्थापना केली. या मंदिरा समोर गोविंदस्वामींची
समाधी आहे. पाटणादेवी
जवळ असलेली पितळखोरे लेणी निर्मिती सातवहानांच्या काळात झाली असे मानले
जाते. त्यानंतर ५- ६ व्या शतकात वाकटाकांच्या काळात या लेण्यांना पुन्हा
उर्जितावथा आली. देवगिरीच्या यादवांच्या काळात हा भाग विज्जलगड या नावाने
प्रसिध्द होता. पाटणादेवीचे मंदिर यादवराय खेमचंद्र व गोविंदराज मौर्य
यांनी ११२० मध्ये जनतेसाठी खुले केले. शुन्याचा
शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्य यांचा जन्म व वास्तव्य विज्जलगड
परीसरात इ.स.१११४ ते इ.स. ११८५ या काळात होते. त्यांचे सिध्दांत शिरोमणी,
करण कुतुहल, वासनाभास्य, भास्कर व्यवहार, विवाहपटल, सर्वोतोभद्र यंत्र,
वासिष्ठतुल्य असे ग्रंथ प्रसिध्द आहेत. सिध्दांत शिरोमणी ग्रंथातील लिलावती
हा गणितावरील खंड प्रसिध्द आहेत. डोंगरी
नदी वरचा पुल ओलांडून आपण पाटणादेवी मंदिराच्या समीप येतो. मंदिर १५ फूट
उंच दगडी चौथर्यावर हे पश्चिमाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्यावर चढून
जाण्यासाठी पायर्या केलेल्या आहेत. पायर्यांच्या दोनही बाजूला २५ फूट उंच
दिपमाळा आहेत. चौथर्यावर फरसबंदी केलेली आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला ४
फूट उंच चौथरा आहे. त्यावर भंगलेला नंदी ठेवलेला आहे. येथेच कोनाड्यात
अनेक पुरातन मुर्ती व कोरीवकाम केलेले दगड ठेवलेले आहेत. मंदिराचा सभामंडप
१८ खांबांवर तोललेला आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूच्या कोपर्यात
भास्कराचार्यांचा शिलालेख कोरलेला दगड ठेवलेला आहे. लोक त्याला हळदी कुंकू
वाहातात म्हणून सध्या तो उलटा करून ठेवण्यात आला आहे, त्यामुळे वाचता येत
नाही. मंदिरात मधोमध देवीची मुर्ती आहे. ऑगस्ट - सप्टेंबर हा पाटणादेवीला
मंदिराला भेट देण्याचा योग्य काळ आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) पाटणादेवी मंदिरापासून १ कि.मी अंतरावर महादेवाचे पूरातन मंदिर आहे. २) महादेव मंदिरामागिल डोंगरावर कन्हेरगड आहे. ३) पाटणादेवी परीसरातील डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, व पितळखोरे लेणी आहेत. जाण्यासाठी
:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व
महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर
पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा
अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत
उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला
जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला
जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Patanadevi Mandir :- Village :- Patana, Dist :- Jalgaon, Nearest city :- Chalisgaon |
| राम मंदिर (जटायू मं� Posted: 10 Nov 2013 at 11:32pm |
|
गावाचे नाव :- टाकेद जिल्हा:- नाशिक जवळचे मोठे गाव :- घोटी, भंडारदरा मुंबई
- नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता
सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या
भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर धामणी गावाच्या पुढे टाकेद गावाला
जाणारा फाटा आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत (२० किमी) पोहचण्यास पाऊण तास
लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. मंदिर परीसरात पूरातन वृक्ष
आहेत. गावापासून लांब असल्याने वातावरण शांत आहे. रामायणातील
जटायु व रावणाचे युध्द याच ठिकाणी झाले होते. जखमी जटायूला रामाने याच
ठिकाणी पाणी पाजले होते. त्यानंतर जटायूने इथेच प्राण सोडला अशी येथील
लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे.
त्यात रामाने जटायूला माडीवर घेतले आहे, अशी मुर्ती आहे. मंदिरा समोरच
रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व
पाण्याचे कुंड आहे.पाण्याच्या कुंडाजवळ शंकराची पिंड आहे. काठावर एक
विष्णूची पुरातन मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) टाकेदहून पट्टा गड (विश्रामगड) १५ किमीवर आहे. २) टाकेदहून बितनगड २० किमीवर आहे. ३) टाकेदहून भंडारदरा डॅम २९ किमीवर आहे. ४) टाकेदहून कळसूबाई ३२ किमीवर आहे. कळसूबाई, बितनगड व पट्टा गड (विश्रामगड) ची माहिती साईट्वर दिलेली आहे. जाण्यासाठी
:- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक
रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या
भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर धामणी गावाच्या पुढे टाकेद गावाला
जाणारा फाटा आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत (२० किमी) पोहचण्यास पाऊण तास
लागतो. टाकेद गावा पुढे १ किमीवर प्राचीन राममंदिर आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Ram Mandir ( Jatayu Mandir) :- Village :- Taked, Dist :- Nasik, Nearest city :- Ghoti, Igatpuri, Bhandardara. |
| गोंदेश्वर मंदिर (स� Posted: 10 Nov 2013 at 10:41pm |
|
गावाचे नाव :- सिन्नर जिल्हा:- नाशिक जवळचे मोठे गाव :- सिन्नर, नाशिक मुंबई
- शिर्डी मार्गावर सिन्नर नावाच गाव आहे. या गावात रस्त्यालगत
गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधल याचा उल्लेख
मिळत नाही. यादवांच्या राजवटीत १२ व्या शतकात बांधल असावे. गोंदेश्वर
मंदिरा भोवती ५ फूट उंच तटबंदी आहे.या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून
मंदिराच्या परीसरात प्रवेश केल्यावर समोर ५ फूटी उंच चौथर्यावर (अधिष्ठाण)
मध्यभागी गोंदेश्वराचे उंच मंदिर व त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दोन
छोटी कलाकुसरींनी युक्त मंदिर आपल लक्ष वेधून घेतात. गोंदेश्वराचे
मंदिर संकुलात ५ मंदिर आहेत. हे शिव पंचायतन असून यात मुख्य मंदिर शिवाचे
असून चार बाजूला पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूचे मंदिर आहे. या शिवाय
शिव मंदिरा समोर नंदिचा मंडप आहे. शिव मंदिराचे सभामंडप चार खांबांवर
तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेले असून खांबांवर व छ्तावर नक्षी कोरलेली
आहे. खांबाबर काही शिल्पपट व मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात
शंकराची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपाला पूर्वेकडे असून मंदिराचे मुख्य
दार उत्तरेकडे आहे. मंदिराच्या दरवाजा समोर नंदिचा मंडप आहे. मंदिराचे शिखर
भूमिजा पध्दतीचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत
कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर
हत्ती कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही
कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) गारगोटी म्युझियम , सिन्नर. २) नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य २५ किमी. ३) नाशिक शहर ३० किमी. जाण्यासाठी :- नाशिकहून
३० किमी अंतरावर सिन्नर गाव आहे. नाशिक - शिर्डी मार्गावर हे गाव आहे.
सिन्नर गावातील तहशीलदार कार्यालयाच्या बाजूला रस्त्यालगतच गोंदेश्वराचे
मंदिर आहे. नाशिक ते सिन्नर अशी बस सेवा उपलब्ध आहे. मुंबई
- घोटी - सिन्नर हे अंतर १८५ किमी आहे. मुंबई ते घोटी मुंबई आग्रा हायवेने
येऊन घोटी येथे हायवे सोडून (नाशिक बायपास) रस्त्याने सिन्नर गाठावे. याच
रस्त्याने पुढे शिर्डीला जाता येते. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Gondeshwar Mandir :- Village :- Sinnar, Dist :- Nasik, Nearest city :- Sinnar, Nasik, Shirdi, Ghoti, Igatpuri. Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:23pm |
| नारायणेश्वर मंदिर Posted: 06 Nov 2013 at 1:17pm |
|
गावाचे नाव :- नारायणपूर जिल्हा:- पुणे जवळचे मोठे गाव :- नारायणपूर , सासवड पुरंदर
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात चालुक्य कालिन प्राचीन
नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे. कापूरहोळ - सासवड
रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे.
या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून आपला मंदिराच्या परीसरात प्रवेश
होतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला रामेश्वराचे छोटे देऊळ आहे. या
देवळाबाहेर ४ फूट उंचीची हनुमानाची मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या
मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाने पायाखाली अवकळेला दाबून ठेवल्याचे
दाखवण्यात आलेले आहे. नारायणेश्वर
मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या
सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी भंगलेली नंदीची मुर्ती
ठेवलेली आहे. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला स्टेडीयम मधे असते तशी
पायर्या पायर्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या मंदिराच्या
भरभराटीच्या काळात या सभामंडपात होणारे कार्यक्रम प्रेक्षकांना समोरून व
बाजूने पाहांयासाठी ही व्यवस्था केली असावी. पायर्यांच्या डाव्या बाजूला
खालील बाजूस गध्देगाळ बसबलेला आहे. मंदिराचे छ्त कोसळल्यावर त्यातील दगड
आजूबाजूच्या बांधकामात वापरलेले आढळतात. नारायणेश्वर मंदिराचा कळस काळाच्या
ओघात नष्ट झालेला आहे. या कळसाच्या जागी सिमेंटचा (अतिशय भयानक)
मंदिराच्या रचनेला न शोभणारा कळस बांधलेला आहे. मंदिराच्या
व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे.
दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक
उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी
दिसतो. मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या
खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे. सभामंडपात ३
एक अक्षरी शिलालेख आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस खांबावर
"चांगा वटेश्वर" व त्याच्या पुढे शेवटच्या खांबावर "चांगा वटेश्वराचा
श्रीधरयोगी" असे शिलालेख कोरलेले आहेत. सभामंडपाला असलेल्या उत्तरेकडील
प्रवेशव्दाराच्या डावीकडील बाजूवर "अंचालध्वज" कोरलेले आहे.सभामंडपाच्या
दक्षिणेकडील भिंतीवर २ गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश
मुर्ती आहे. चांगदेव व त्यांच्या शिष्यांनी या मंदिरात तपश्चर्या केली
होती. मंदिरातील
गाभार्याच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या आहेत.हे
दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या असल्या तरी
त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा बाहेर
आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो "राक्षस" गण असून दुसरा
"देव" गण आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्यात
उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार खड्डा दिसतो.
त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना ब्रम्हा, विष्णू
व महेश म्हणतात. यातील सर्वात मोठी पिंड विष्णुची (नारायणेश्वराची) असून
ती बाराही महीने पाण्यात असते. पुरंदर किल्ल्यावर उगम पावणार्या
केदारगंगेचे पाणी येथून वाहाते अशी श्रध्दा आहे. गाभार्याच्या उजव्या
कोपर्यातील भिंतीत एक दगडी पात्र बसवलेले आहे. पावसाळ्याचे ४ महीने छतावर
पडणारे पाणी यात जमा होते. वर्षाचे बाकीचे महीने मंदिरा मागिल बांधीव
कुंडातून पाणी आणून मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या कोनाड्यात ओततात
तेथून ते दगडी पात्रात येते व तेच पाणी अभिषेकासाठी वापरतात. अशा प्रकारची
वैशिष्ट्यपूर्ण रचना या मंदिरात पाहायला मिळते. मंदिराच्या गाभार्यात
पार्वतीची भग्न मुर्ती आहे. गाभारार्यातील
नारायणेश्वराचे दर्शन घेऊन सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराने बाहेर
पडावे. या दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. या व्दारासमोर
धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार
आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला
चंद्रभागा म्हणतात. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) पुरंदर व वज्रगड किल्ला. २) मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), सासवड मार्गे २० किमी अंतरावर आहे. ३) नारायणपूरचे बालाजी मंदिर १५ किमी अंतरावर आहे. जाण्यासाठी :- पुण्याहून
३० किमी अंतरावर सासवड गाव आहे. सासवड ते नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आणि एकमुखी दत्ताच्या
देवळा यामुळे प्रसिध्द आहे. नारायणपूर गावातच एकमुखी दत्त मंदिराच्या
बाजूला रस्त्यालगतच नारायणेश्वराचे मंदिर आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस
सेवा देखील उपलब्ध आहे. पुणे
- बंगलोर हायवेने (४६ किमी वरील) कापुरहोळ गावापर्यंत यावे. येथे हायवे
सोडून कापूरहोळ - सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर (३.५ किमीवर) बालाजीचे
प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे. सूचना :- १) खाजगी वाहानाने पुण्याहून पुरंदर किल्ला व लेणी आणि नारायणेश्वराचे मंदिर ही ठिकाणे एका दिवसात पाहून होतात. २) पुरंदर, वज्रगड आणि मल्हारगड किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Narayaneshwar Mandir :- Village :- Narayanpur, Dist :- Pune, Nearest city :- Narayanpur, Saswad Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:29pm |
१.कसबन (मंगरुळ पीर,जि.वाशीम)
कसबन म्हणजे पेशेवर तवायफ !!
धन घेऊन नाच गाणं करणारी कंचनी !!
मनोहर लालास माहिती देतात की’ कसबने ये मुसलमान हैं मगर पहिले हिन्दू थीं और ‘गनिका’ क
हलाती थीं ‘…. ….कदीम से पेशा इनका कसब कमाने का है । इसी सबब से मुसलमान होने के पीछे ‘कसबन’ कहलाने लगीं ।
इस
संबंध में कहा जाता है कि पहिले ये छोकरियों को मोल लेकर उनसे पोशीदा कसब
कराया करती थीं । एक दफै एक मुसलमान छोकरी इस काम से इनकारी हो कर परदे में
बैठी कुरान पढ़ा करती थीं । उसके वास्ते खुदा के घर से एक सोने का टका उतरा
करता था । दूसरी छोकरियां बदनीयती से छुप छुप कर परदा खोल के उसको देखा
करतीं थीं कि वह अंदर बैठी क्या करती हैं ? आखिर एक दिन उसने इनको यह
बद्दुआ दी कि तुम मेरा परदा उघाड़ कर देखती हो, जाओ ! तुम्हे बदुवा लगे । उस
दिन से उनका नाम ‘कसबन’ हो गया । पहिले छुपी हुई थीं अब बाजार में बैठ कर
कसब कमाने लगीं ।
………. ये ‘गनिका’ को एक खास औरत समझती हैं और उससे अपनी
परंपरा मिला कर कहतीं हैं कि वह श्रीकृष्णजी के समय में थीं । मुसलमान
होने की ये यह वजह बताती हैं कि अव्वल तो मुसलमान जियादा आते जाते थे,
दूसरे मुरदे अकसर पड़े रहते थे, क्योंकि इनकी जात में मर्द थोड़े थे और दूसरी
कौम के जलाने को आते नहीं थे ।
मारवाड़ में कसबनें बहुत कम हैं और जो
थोड़ी सी जोधपुर शहरों में हैं वे अपने को ठेट में गुजरात की रहने वाली
बताती हैं । वे कहती हैं कि जिस जमाने में यहां के हाकिमों के अहदी मारवाड़
में आते थे, उसी जमाने से हम भी यहां आई।’’ इनकी खांप चैहान, चांपावत, सोढ़ा
और भाटी वगैरा हैं । ये हिन्दू थीं जब शक्ति और रामदेवजी को मानती थीं ।
अब खंदा और रसूल का नाम लेती हैं । मुसलमानी ढंग बरतती हैं पर इनमें नाम अब
तक मूली, चूनी, बिरधी और छोगी वगैरा हिन्दुओं के से होते हैं ।
………ये
शराब पीती हैं, सूअर और झटके का मांस नहीं खातीं । ये पोशाक रंडियों और
ग्रहस्थनों से मिलती हुई रखती हैं । गाना बजाना नहीं जानती । ये बहुत आसूदा
भी नहीं होती हैं । ये अकसर दूकानों और सरायों में रहा करती हैं और रस्ते
चलते आदमियों को बुलाती हैं । इनकी लड़कियां कसब कमाती है और लड़को का व्याह
होता है । घांची, तेली, तमोली वगैरा निम्न कौमों की औरतें बिगड़ कर वैसे ही
मुसलमानों के घर में पड़ जाती है और उनसे लड़कियां होती हैं वे उन लड़कों को
व्याही जाती हैं । इनमें शादी गमी के दस्तूर मुसलमानों के माफिक हैं । बेवा
औरत का नात नहीं होता है, वैसे चाहे किसी के घर में भले ही घुस जावे ।
…….
मर्दों का पेशा मजदूरी है । बंट भाई बहनों का बराबर है । इनमें ‘खोले’
नजदीकी रिश्तेदार आता है । पंचायत भी कौमी झगड़ों में होती है । इनमें पंच
मर्द औरत दोनों होते हैं । व्याही औरत को गैर आदमी के पास जाने और कसबन को
वांभी, बावरी, भील, थोरी और भंगी वगैरा निम्न जाति के पास रहने से जात बाहर
करने की सजा मिलती है । उसे जब जात में लेना चाहते हैं तो अजमेर में भेज
देते हैं । वहां वह गुनहगारी में पंचों का हुक्का भरकर फिर जात में आ जाती
है …(c/p)
With ©®
फोटो साभार –
Sachin Kulkarni
२. पार्डा दरडे येथील मल्लिकार्जुन मंदिर



विस्मयचकित करणारे..
जुन्या धाटनिचे मल्लिकार्जुन शिवमंदिर पार्डा (दराडे)ला आहे.
मंदिराच्या
प्रवेशद्वारा जवळ अंगाने स्थुल,ठेंगणे,दिड ते दोन फुटाचे हातात दिवा व
मशाल असलेल्या यक्ष,यक्षिणी प्रसन्न मुद्रेत स्वागतासाठी आहेत.
शिवपुराणात
चिलया बाळाची कथा येथेच घडली म्हणतात.देवगिरी यादवांच्या काळात खुपच
महत्त्वाचे ठाणे हे असायला हवे.कारण राजा रामदेवराय यांनी दोन रात्रीचा
मुक्काम करून मंदिराचे जिर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळतो.(श्रीपाद
चितळे)मंदिराच्या समोर हजारो लोकांनी पर्व काळात एकत्र येऊन स्नान करावे
अशी मोठी पुष्करणी आहे.अजूनही या पुष्करणी च्या पाण्यात कित्येक मोडतोड
झालेल्या मुर्ती आढळतात.
शिवमंदिरात जवळपास चार शिलालेख आतापर्यंत मिळाले आहेत. अक्षरांच्या वळणावरुन ते १४ व्या शतकातील आहेत असे म्हणतात.
यादव
काळातील गध्देगळीचा लेख अजूनही ठळकपणे वाचता येतो.गध्देगाळी वरील शापवचनात
म्हटलं आहे की ,’दर्शन घेताना देवासमोर ठेवलेल्या मुद्रा जो घेइल त्याला
२० आसुंचा दंड देण्यात येईल आणि जो हा दंड देणार नाही त्याला गाढव
लागेल’.पण यासोबतच देवळातील देवतेची जो पुजाअर्चा करेल तो विजयी होईल असा
आशिर्वाद दिला आहे.मोठ्या प्रमाणात चक्र, चांदण्या, बदाम, गोल,त्रिकोणी
,चौकोनी आकाराच्या शिवपिंडी आहेत…मंदिराच्या बाह्यांगावर विष्णुचे अवतार
कोरलेले आहेत. परीसरात दोन तिन अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात ही झाकलेली बारव
आहे….सप्तमातृका पट्ट, क्षिरसागर विष्णु…. मंदिरात आहेत..लोणार पासून हे
गाव आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे..
ठिकाण –
पार्डा दराडे
पो.येवती
देऊळगाव कुंडपाळ जवळ
ता.लोणार जि.बुलढाणा
लोणार ते मंठा रोडवर
लोणारच्या दक्षिणेकडे
Pc.. Sachin Dixit ji साभार👏👏
३. सासू सुनेची विहीर

◆● सासु-सुनेची विहीर…
सासु-सुनेची विहीर च का म्हणतात??याचे
समाधानकारक ऊत्तर नाही किंवा यामागे या भागात सांगितली जाणारी कोणतीहि
आख्यायिका नाही आहे.कोणी बांधली याचाही पुरावा किंवा नोंद नाही.
पुर्वी
माळी समाजाची भरपूर शेती तलावाच्या परीसरात होती विशेषतः केळीच्या बागा
/मळे होते.तेव्हा कोणी त्यांनी बांधली असेल असा ही तपशील आढळत नाही आताची
हयात असलेली वयस्कर मंडळी सांगतात की कमळजा देवी च्या मंदिरासोबतच ही विहीर
भाविकांच्या सोयीसाठी बांधलेली असावी.
कमळजा देवीच्या जुन्या मंदिराचा
जिर्णोद्धार व सभामंडप बांधकाम देवगिरीचे राजे कान्हेरदेव लोणारला शके ११६३
ला केल्याचे महानुभाव संताच्या पोथीत ऊल्लेख येतो.विहीरीचे स्थापत्य
(विटाचे आकार )मिळते जुळते आहे.
मंदिरकडील भाग गोड्या पाण्याचा व सरोवरांकडील भागात खारट पाणी असे सांगत आले आहेत जुनी मंडळी….
पण
कै.या.मा काळे (लेखक- वर्हाडाचा ईतिहास )यांनी समाधान कारक लिहिले आहे ते
म्हणतात,विदर्भात दहीहांडा पासून ते अकोल्यापर्यत जमीनीच्या पोटात हा खारया
पाण्याचा मोठा पट्टा असावा असा तज्ञ लोंकाचा कयास आहे.(याला आताची काही
नवीन संशोधन ही दुजोरा देतात सरोवराच्या बाबतीत )
आता ही सरोवरांच्या काठात जमिनीत थोड ही खणले तर गोड पाणी झिरयात लागते म्हणजेच
सासु-
सुनेची ७०-८० फुट असलेल्या या विहीरीच्या वरच्या भागात गोड पाण्याचे झरे
आहेत पण पाणी जसे जसे खोल(आटत) जाईल तसे तेव्हा तळाशी खारपाण पट्ट्या मुळे
पाणी खारे लागेल….
या मुळेच मिठ वगैरे तयार करण्याचे उद्योग धंदाच्या
नोंद या भागात (बुलढाणा जिल्ह्यात) आढळते पण या सर्व प्रक्रिया इ.स.१८७०
च्या सुमारास इंग्रज सरकारने बंद केल्या होत्या….
या विहिरीचा ऊपयोग तर
भाविक भक्तांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नक्कीच असावा पण जुन्या काळात
बुलढाणा जिल्ह्यातील ‘आडविहीर’ येथे विहीरीच्या पाण्यापासून मिठ तयार करीत
असत …ती मजेशीर पध्दत काळे लिहतात की,
सदरहू विहीर खणण्याची रित अशी
होती की एका ठरावीक खोलीपर्यंत विहीर खणित गेले म्हणजे नेहमीच्या
अनुभवावरून आता पाणी जवळ आहे असे खणणारे लोक ओळखित व कामबंद करून एक दोन
खणणारे पाळण्यात बसून खणित व पाणी जवळ आले असे पाहताच एक जोराचा शेवटचा घाव
घालीत व वरच्या लोकास ईशारा करीत त्याच क्षणी वरील लोक त्यांना वर ओढून
घेत.ईकडे विहीरीत पाणी एकदम ऊसळुण क्षणात सर्व विहीर भरून जाई.सदरहू पाणी
वर काढून खाचामध्ये सोडीत व ऊन्हाने सुकवून त्याचे मीठ करीत….
(ऊत्तरार्ध ☺️)
ठिकाण- कमळजा देवी मंदिर समोर.. लोणार (सरोवर )
जिल्हा-बुलढाणा. फोटो-साभार..
४. चोर विहीर

चोर विहीर
(मंगरुळ पिर,जि.वाशिम)
यादव काळानंतर महाराष्ट्रात
(बेरार) बारवांच्या ऐवजी एक नवीन प्रकारच्या शैलीचे पायविहीरी ,कुपेगार इ.
स्थापत्य लोकप्रिय झाले.ही चोरविहीर ४००वर्षे जुनी आहे किंवा शाहजहाँच्या
काळात बांधली गेली असे स्थानिक लोक सांगतात. पण येथे शहजादा मुराद (अकबर
पुत्र) चा संदर्भ असावा कारण या परिसरापासुन बाळापूर जवळच आहे आणि
स्थानिकाच्या सांगण्यानुसार ‘मुराद’चा एकमेव असलेला फार्सी शिलालेख ही येथे
कोरलेला आहे.
मधल्या काळात चोर विसावा घेत असतील म्हणून चोर विहीर😀😀पण तसं नव्हे विहीरीत लपण्यासाठी चोरवाटा आहेत.
चोरविहीर
चे वैशिष्ट्ये म्हणजे जमिनीच्या समांतर असलेली वरवर अर्धे वर्तुळाकार
दिसणारी विहिर आतल्या बाजूला चौरस आकाराचे बांधकाम आहे.
एका बाजुस मोटेचा धक्का /दगडी प्रणाल बांधला आहे.
….विहिरीला
दगडी प्रवेशद्वार असून खाली तळमजल्यावर जाण्यासाठी छोट्या आखूड पायर्यां
आहेत. पायरीलगत प्रशस्त सज्जा (बाल्कनी ) मजल्यावर आहे. पावसाच्या
पाण्याकरीताही विहीरीत आगम मार्ग काढलेले आहेत.
विहीरीच्या आतील भिंतीला
चुन्याच्या कमानी आहेत. कुंडात ऊतरण्यासाठी किंवा तळापर्यंत तोडशिला आहेत
आणि वरच्या बाजूस दोन दगडी सोंड /कठडे
मोटेकरीता बसवले आहेत.
जलव्यवस्थापनाची
या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जनकल्याण करीता मोठ्या परिश्रमाने,
बुध्दीमतेने,कुशल तंत्रज्ञानाने परीपूर्ण आजही ऊन, पाऊस, वारा सहन करत
शतकोत्तर अखंड अबाधित आहेत.जतन व्हावीत हीच मनोमन प्रार्थना….
सर्व. फोटोग्राफ..Sachin kulkarni यांच्या कडून साभार सौजन्याने👏👏
- प्रा.वर्षा मिश्रा , लोणार , जि. बुलडाणा
- मेल : varshamishra7385@gmail.com
पारडा येथील शिलालेख -डॉ. वि. भा. कोलते




प्रकाशक : म.रा. साहित्य व सांस्कृ. मंडळ
मराठवाड्यातील उपेक्षीत प्राचीन मंदिरे
दै. लोकमत 10 जानेवारी 2021 (वर्धापन दिन पुरवणी)
मराठवाड्यातील पर्यटनाचा शिल्पांचा प्राचीन वारश्याचा विषय समोर आला की अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा इथपर्यंत विचार होतो आणि विषय संपून जातो. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही नावं उच्चारली की मुद्दा संपून जातो. या शिवाय मराठवाड्यात चालूक्यांच्या यादवांच्या काळातील अप्रतिम अशी मंदिरे आहेत, त्यावरील शिल्पाविष्कार चकित करणारा आहे हे लक्षातच घेतले जात नाही.
पर्यटन, अभ्यास, स्थानिक सहलींसाठी स्थळे असा विचार केल्यास मराठवाड्यातील काही प्राचीन मंदिरांचा विचार अग्रक्रमाने झाला पाहिजे. (या ठिकाणी विषयाच्या जागेच्या मर्यादेमुळे केवळ मंदिरांचा विचार केला आहे. लेण्या, किल्ले, दर्गे, कबरी, मकबरे यांचा समावेश यात विस्तारभयास्तव नाही. हे विषय स्वतंत्रपणे मांडल्या गेले पाहिजेत.)
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई वडगांव, रहिमाबाद व पिशोर (सर्वांचा ता.सिल्लोड) येथील मंदिरे प्राचीन आहेत. तिन्ही ठिकाणी स्थानिक लोकांनी मंदिराचा जिर्णाद्धार केला आहे. शिवुर बंगला (ता. वैजापूर) येथे रावणेश्वराचे मंदिर आहे. परिसराचा विकासही केला आहे. पण याची माहिती बाहेरच्या पर्यटकांना अभ्यासकांना होत नाही. औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत खंडोबा मंदिर आहे. पण त्याची ख्याती धार्मिक स्थळ इतकीच आहे. मराठेशाहीतील वास्तुशिल्पाचा हा एक उत्तम नमुना आहेे हे लक्षातच घेतले जात नाही. वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळ मुख्य रस्त्याला लागूनच अहिल्याबाईंनी बांधलेली अप्रतिम अशी बारव आहे. या बारवेत 8 छोटी मंदिरं आहेत. या ठिकाणी पर्यटक भेट देत नाहीत.
पैठणला सातवाहन कालीन स्तंभ हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचे पान आहे. त्या परिसरांचा विकास पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पर्यटक पोचत नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यातील या मंदिरांसोबतच पैठणच्या गोदावरी काठचे घाट मोठे सुंदर आहे. या घाटांवर विविध उत्सव प्रसंगी दिव्यांची आरास करून पर्यटकांना इथे आकर्षित करून घेता येवू शकते.
जालना : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील महादेव मंदिर 12 व्या शतकातील अतिशय उत्कृष्ठ असा स्थापत्य अविष्कार आहे. या मंदिरावरील विष्णुच्या शक्तिरूपातील मुर्ती भारतभरच्या अभ्यासकांचे आकर्षण ठरलेल्या आहेत. अतिशय भव्य आणि उंच पीठावर हे मंदिर स्थापित आहे. पुरातत्त्व खात्याने मंदिराचा जिर्णाद्धार चांगल्या पद्धतीने केला आहे. पण तिथपर्यंत जाताना कुठलाही माहिती फलक उभारलेला नाही. मंदिराच्या भोवताली बकाल वस्ती आहे. ग्रामस्वच्छता अभियानात या परिसराची स्वच्छता का झाली नाही हे कळत नाही.
अंबड तालुक्यात जामखेड येथील खडकेश्वर मंदिर हे अतिशय एक महत्त्वाचे प्राचीन मंदिर. गावकर्यांनी चांगल्या पद्धतीने याचा जिर्णाद्धार केला आहे. अंबड शहरातील मत्सोदरी मंदिर सर्वपरिचित आहे. पण याच शहरांत अहिल्याबाईंच्या काळातील सुंदर पुष्करणी बारव आहे. त्यात एक शिवमंदिरही आहे. या परिसराचा नगर पालिकेच्या वतीने विकासही करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पोचणारा रस्ता, बाहेरच्या परिसरांतील आक्रमणे, नाला यांनी हे ठिकाण दूर्लक्षित राहिले आहे. अंबड शहरांतच खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम आजही संपूर्ण शाबूत उत्तम अवस्थेत आहे.
अंबड तालुक्यातच चिंचखेड येथील खंडोबा मंदिरही प्राचीन काळातील आहे. या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी गावकर्यांनी उत्तम केली आहे. मंठा तालुक्यात हेलस येथे प्राचीन मंदिर आहे.
उस्मानाबाद :
भूम तालुक्यातील प्राचीन माणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील मोजक्या अप्रतिम
मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांवरी शिल्पे अभ्यासकांना कायम आकर्षित करत
आलेली आहेत. सात द्वारशाखा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर.
चालुक्यांच्या काळातील अतिशय उत्कृष्ठ अशा कोरीव कामांनी येथील स्तंभ
सजलेले आहेत.
उमरगा येथील शिव मंदिर अतिशय चांगल्या स्वरूपात आहे. स्थानिकांची मंदिराचा जिर्णाद्धार केलेला असून परिसरही उत्कृष्ठ राखला आहे.
लातुर : निलंगा येथील शिवमंदिर आणि पानगांव येथील विठ्ठल मंदिर ही दोन मंदिरे लातुर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी सगळ्यात सुस्थितीत असलेली मंदिरे आहेत. निलंगा मंदिरातील हरगौरीचे शिल्प अप्रतिम आहे. मंदिरावरील भैरव शिल्पे किंवा केवल शिवाची शिल्पे विशेष आहेत.
पानगावच्या विठ्ठल मंदिराकडे खुपसे दुर्लक्ष पर्यटकांकडून झाले आहे. या मंदिर परिसराचा विकास, तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता याचा विचार झाला पाहिजे. हे मराठवाड्यातील प्राचीन काळातील महत्त्वाचे मंदिर आहे.
नांदेड : होट्टल (जि. देगलुर) हे आख्खे गावच शिल्पांनी समृद्ध असे गांव आहे. मंदिरांचे गाव म्हणूनच या परिसराची ओळख आहे. दोन मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. आता उर्वरीत मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. होट्टलच्या मंदिरावरील नृत्य गणेशाची मृर्ती आणि येथील सुरसुंदरींच्या मृर्ती विशेष आहेत.
1.
पुरातत्त्व खात्यातर्फे त्यांच्या अखत्यारीतील पुरातत्त्वीय स्थळांचा
विकास केला जावू शकतो. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
2.
सामाजिक कृतज्ञता निधी (सी.एस.आर.) या माध्यमांतून काही निधी इतर
स्थळांसाठी वापरला जावू शकतो. मराठवाड्यातील औद्योगीक क्षेत्रात काम
करणार्या संघटना व्यक्ती आस्थापना यांनी यात लक्ष घालून आपल्या निधीतील
काही रक्कम या कामासाठी वळवली पाहिजे.
3.
स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करूनही काही कामं होवू शकतात. हतनुर (ता.सेलू
जि. परभणी) येथील ग्रामस्थांनी आपल्या परिसरांतील शेतमालाच्या विक्रीतून 1
कोटी इतकी विक्रमी रक्कम पाच वर्षांत गोळा केली. गावातील प्राचीन शिव
मंदिर आणि बारव यांची दुरूस्ती केली. जवळच मंगल कार्यालय उभारले. हा एक
आदर्श या परिसरांतील लोकांनी उचलला पाहिजे.
या
लेखात केवळ मंदिरांचा विचार केला आहे. पण किल्ले, दर्गे, मकबरे, कबरी
यांचा विचार केल्यास किमान 50 स्थळे अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने पर्यटकांसाठी
म्हणून सहज विकसित करता येवू शकतात. त्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात
चालना मिळेल. याच परिसरांत प्राचीन वाडे आहेत. त्यांची डागडुजी करून
पर्यटकांना राहण्याची पण वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था करता येवू
शकते. उंडणगांव (ता.सिल्लोड जि. औरंगाबाद) अशी चाचपणी आम्ही केली आहे.
परदेशी पर्यटक येथे राहून गेले आहेत. शाश्वत पर्यटनाचा विचार आपण सर्वांनी
केला पाहिजे.
मराठवाड्यात प्राचीन वारसा जतन व संवर्धनाची चळवळ आता सुरू झाली आहे. त्याला सगळ्यांनी मिळून गती देण्याची गरज आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
गावकर्यांनी जिर्णाद्धार केलेले प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना)
उरूस, 2 ऑक्टोबर 2020
हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20 कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते.
जामखेडचे हे शिवमंदिर खडकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. जामखेड या गावाबद्दल पौराणिक आख्यायिका आहे. जाबुवंत आणि हनुमानाची लढाई याच गावात झाल्याचे सांगितले जाते. गावजवळच्या टेकडीवर जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे डोंगरातील कपारीत कोरलेली एक गुहाच आहे. इथे लेणी कोरण्याचा प्रयास झाला होता. पण दगड ठिसुळ असल्याने हे काम अर्धवट सोडण्यात आले. याच जागी आता जांबुवंताचे मंदिर आहे. या परिसरांतील 12 गावांमध्ये हनुमानाचे मंदिर आढळत नाही. नसता मारूतीचे मंदिर नाही असे एकही गाव नसते. पण हा परिसर याला अपवाद आहे. जांबुवंत व हनुमानाच्या लढाईत जाबुवंताचा घाम गळाला म्हणून या गावच्या नदीचे नावच ‘घामवती’ असे आहे.
याच घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात.
मराठवाड्यात अकराव्या शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच एक. (याच ब्लॉगमधील पूर्वीच्या लेखात अशा मंदिरांची यादीच दिली आहे.) मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे.
मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपालाआठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू, नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण 20 नक्षीदार स्तंभ आहेत.
मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही.
मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की 11 व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून 12 व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे.
खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते.
मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.
या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.
गावकर्यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे.
जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.
औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.
(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)
(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार
उरूस, 7 ऑक्टोबर 2020
महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व.
माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.
एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्या चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत.
माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत.
मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्यांचा आहे.
मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.
मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.)
अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते.
मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते.
या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.
बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे, भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.
(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)
(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
प्राचीन वारसा जपणार्या हतनुरचा आदर्श घ्या..
उरूस, 30 डिसेंबर 2020
प्राचीन मंदिरांचा जिर्णाद्धार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभेत केली, मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साहजिकच हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. जागजागच्या प्राचीन मंदिरांकडे लोकांचे लक्ष जायला लागले. आपल्या आपल्या भागातील प्राचीन मंदिर कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जिर्णोद्धार कसा झाला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. पत्रकारांनी अशा काही बातम्या आपल्या परिसरांतील प्राचीन मंदिरांबाबत द्यायला सुरवात केली. एरव्ही गावाकडे न फिरकणारेही आपल्या गावच्या प्राचीन मंदिरांबाबत भरभरून बोलायला लागले.
या सगळ्या धामधुमीत एक गांव शांतपणे आपलं काम करत आहे. ही सगळी चर्चा समोर येण्याच्या पाच वर्षे आधीच त्यांनी आपल्या गावातील 700 वर्षे जून्या मंदिराचा, तेथील बारवेचा जिर्णोद्धार केला. आणि त्यासाठी कुणाकडेही हात पसरले नाहीत. अगदी शासनाकडेही नाहीत. कुठल्या धनाढ्य माणसाकडे, आमदार खासदाराकडे अगदी एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधूनही पैसा घेतला नाही.
हे आदर्श काम केलं आहे हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल त्याच्या 1 टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची.
पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. 1301 चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले.
गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी वापस आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. 2019 च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल 22 लाख रूपये त्याला खर्च आला.
मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला.
हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात.
याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे.
बारव आणि मंदिराला लागूनच नविन पद्धतीने मंगल कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. सर्वच परिसर आता विकसित झाला आहे. एकूण 1 कोट रूपये खर्च याला आला. आणि हा सगळा निधी गावकर्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून देणग्यांतून गोळा झाला हे विशेष.
मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे.
जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.
हतनुरच्या कामाचा आदर्श यासाठी घेण्याची गरज आहे की त्यामुळे ग्रामीण पर्यटनाला गती येईल. गावोगाची प्राचीन मंदिरं आपण होवून गावकर्यांनी शास्त्रीय पद्धतीनं दुरूस्त केली पाहिजेत. दगडांना भडक वार्निश फासणे, सिमेंेट लावून टाईल्स बसवणे म्हणजे जिर्णोद्धार नव्हे. त्यामुळे प्राचीन वास्तूकलेचा सत्यानाश होतो. तेंव्हा अश कामं करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत.
प्रत्येक जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अभ्यास झाला पाहिजे. जिल्ह्याचा नकाशा, या वास्तूंचे चांगले छायाचित्र, ठिकाणाची माहिती असे संकेतस्थळ तयार केले गेले पाहिजे. या सगळ्यांसाठी शासनावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्वयंस्फुर्तपद्धतीनं काम करता येते हे हतनूरने दाखवून दिले आहेच.
रोहन काळे नावाचा एक तरूण महाराष्ट्रभर बारवा शोधत आणि त्यांची माहिती गोळा करत फिरतो आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्रांतील बारवांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करावयाचा आहे. हे कुण्या एकाच्या आवाक्यातले काम नाही. तूम्ही तूमच्या परिसरांतील बारवांची/प्रचीन मंदिरांची/ नदीवरच्या घाटांची/ स्मारकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवा. आपण सर्व मिळून महाराष्ट्रात आज ज्या बारवा शिल्लक आहेत त्यांची साफसफाईची मोहिम राबवूया. रोहन काळे चा मो. नं. देत आहे. माझा तर खाली दिलेला आहेच. सर्वांना कळकळीचे आवाहन आपण सर्व मिळून आपला प्राचीन वारसा जतन करू या.
रोहन काळे मंुंंबई- 9372496819
(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
दिवे लागले रे दिवे लागले । प्राचीन मंदिर उजळून निघाले ।।
उरूस, 1 डिसेंबर 2020
त्रिपुरारी पौर्णिमेला मराठवाड्यात प्राचीन मंदिरांवर दिपोत्सव करण्याची संकल्पना देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने काही गावांमध्ये मांडली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या अगदी तालूकाही नसलेल्या गावांची निवडी यासाठी केली होती. चार गावांत प्रातिनिधीक स्वरूपात हा दिपोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा झाला.
शेदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या ठिकाणी खाम नदीच्या काठावर प्राचीन गणेश मंदिर आहे. तिथे नृत्य, गायन वादन असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता. खाम नदीच्या पात्रात दिवे सोडून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गिरीजा गोळे ही गुरू मुक्ता सोमण यांची विद्यार्थीनी. तिने भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर सचिन नेवपुरकर आणि वर्षा जोशी यांनी विविध भक्तिगीते गाउन श्रोत्यांना चिंब भिजवले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रेषित रूद्रवार याने केले.
औरंगाबादहून खास या कार्यक्रमासाठी आलेले रसिक गणेश मंदिर, छोटी बारव, नदीचा घाट आणि मध्वमुनीश्वर समाधी परिसर फिरून पाहताना ‘इतकी सुंदर जागा आपल्या शहराच्या अगदी जवळच आहे आणि आपल्या माहित नाही हे दुर्दैवी आहे’ अशी भावना व्यक्त करत होते. शेंदूरवाद्याच्या ग्रामस्थांना आपल्या छोट्या गावात असा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होवू शकतो आणि त्यासाठी रसिक 30 किमी दूर अंतरावरून गाड्या करून येवू शकतात याचेच अप्रूप वाटत होते.
चाराठाणा हे औरंगाबाद नांदेड महामार्गावर जिंतूरच्या अलीकडे असलेले छोटे गाव. या गावाला अतिशय उज्वल अशी परंपरा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या गावाला महत्व आहे. हेमाडपंथी मंदिरांनी गाव नटलेले आहे. भव्य अशी दगडी ओवर्यांची सुरेख बारव (पुष्करणी) गावात आहे. या गावी असलेल्या प्राचीन मानस्तंभ परिसराची स्वच्छता गावकर्यांनी मेहनतीने केली. स्त्रीयांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या. जमिनीवर मानस्तंभाची प्रतिकृती केली. त्याप्रमाणे दिव्यांची रचना केली.
आपल्या गावच्या प्राचीन स्थळांबाबत अभिमान, स्थानिकांमध्ये जागृती ही सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे. त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधणे, पर्यटकांना तिथपर्यंत आणणे ही कामे स्थानिक लोकांनी पुढाकार घेवून केली पाहिजेत. चारठाणा या गावात गेली 3 वर्षे गावकरी पुढाकार घेवून इतिहास विषयक जागृती अभियान चालवत आहेत. विविध निमित्ताने उपक्रम हाती घेतले जात आहेत. जानेवारी महिन्यात सांस्कृतिक पदयात्रेचे (हेरिटेज वॉक) आयोजन करण्यात आले होते. आताही पर्यटकांसाठी नियोजन केले जात आहे.
तिसरं ठिकाण होतं धारासुर. या ठिकाणी पूरातत्त्वीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले गुप्तेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्व खात्याकडून सुरू होत आहे. शिखर शिल्लक असलेले महाराष्ट्रातले हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्वच्छता दिवसभर गावकर्यांनी केली. रात्री मंदिरावर अक्षरश: दिवाळीच वाटावी अशी रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या जोत्यावर समोर दिवे लावले होते. गावकर्यांनी यात उत्सुर्त सहभाग नोंदवला. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम विविध निमित्ताने घेण्याचा निर्धार गावकर्यांनी केला आहे. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम जलद गतीने व्हावे ही गावकर्यांची तळमळ आहे.
चौथे ठिकाण होते परभणी तालूक्यात असलेले जाम. या गावी जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांवरील शिल्पांची दखल तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात घेतली आहे. पण सखोल अभ्यासाची अजूनही गरज आहे. गावकर्यांना मंदिराचे महत्त्व पटल्याने त्यांनी परिसराची साफसफाई व मंदिराचा जिर्णाद्धार केलेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरावर दिपोत्सव घेवून त्यांनी गावकर्यांत जागृती निर्माण केली. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत सकारात्मकता गावकर्यांनी दाखवली आहे.
या चार गावांत झालेला दिपोत्सव आणि सांगितिक कार्यक्रम याचे महत्त्व यासाठी आहे की ही गावे अगदी तालूकाही नसलेली छोटी गावे आहेत. सहसा आपण सगळे सांस्कृतिक नियोजन करत असताना मोठी शहरे केंद्रभागी ठेवतो. त्यासाठी मोठे प्रयोजक मिळतात. पण लहान गावांतील प्राचीन स्थळांपाशी सांस्कृतिक उपक्रम करण्याला वेगळे महत्त्व आहे. एक तर आपली जी अतिशय अभिमानास्पद उज्वल परंपरा आहे तिचे जतन या निमित्ताने केले जाते, लहान गावांतील वातावरण सांस्कृतिक कलात्मकतेला पोषक आहे त्याचीही दखल घेतली जाते. पूर्वीच्या काळी मंदिरे ही कलेची आश्रयदाती होती. म्हणूनच चित्र संगीत शिल्प साहित्य मंदिर परिसरांत फुलले. आज मंदिरांवर धार्मिक अंगाने टिका करणारे हे विसरतात की ही ठिकाणं कलेची स्फुर्ती स्थळे आहेत. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. त्याची बूज या निमित्ताने राखली जाते आहे. भरतनाट्यम शेंदूरवाद्याला सादर झाले. प्राचीन मंदिरं लेण्या आहेत त्यावरील नृत्य मुद्रा आजही अभ्यासकांना खुणावतात. त्याची दखल घेतल्या शिवाय पुढे जाताच येत नाही. जी वाद्ये या मंदिरांवर दर्शविली आहेत त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. लेण्यांमधील चित्रांवर तर जगभरचे अभ्यासक काम करत आहेत.
नदीच्या काठी संस्कृती निर्माण झाली असं मानलं जातं. तसे पुरावेच मंदिरांच्या रूपाने उपलब्ध आहेत. मग याची आठवण म्हणून या मंदिरांच्या ठिक़ाणी सांस्कृतिक उपक्रमांचा विचार का केला जात नाही?
सरकारी पातळीवर वेरूळ महोत्सव अयोजीत केला जात होता. त्या आयोजनाचे पुढे काय झाले ते आपण बाजूला ठेवू. पण असा विचार सर्वच प्राचीन मंदिर परिसरांत छोट्या प्रमाणात करण्याचा विचार आपण का करत नाही? त्यासाठी फारश्या निधीची गरजही नाही. अगदी छोट्या प्रमाणात अभिजात कलांसाठी काम करणारे झटणारे कलाकार कार्यकर्ते रसिक आणि स्थानिक गावकरी यांच्या सहकार्याने प्रत्येक मंदिर परिसरांत, नदीच्या घाटांवर, प्राचीन बारवांच्या परिसरांत सांस्कृतिक उपक्रम सहज शक्य आहेत. त्या निमित्ताने या स्थळांकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. पर्यटकांचे पाय इकडे वळतील. अभ्यासकही इथे येतील. या ठिकाणांचा अजून सखोल अभ्यास होईल.
देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यासाठी पुढाकार घेत आहे. आपल्या परिसरांतील अशा वास्तुंबद्दल आम्हाला जरूर कळवा. त्यांचे फोटो पाठवा. त्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करा. आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहोत. इतिहास प्रेमी मंदिर मुर्ती प्रेमी रसिकांनी जरूर संपर्क साधावा. या चळवळीत सहयोग नोंदवावा.
(हे केवळ हिंदूंसाठी आहे असे नाही. औरंगाबाद परिसरांतील शेकडो मजारी धुळखात पडून आहेत. बौद्ध लेण्याची अवस्थाही अतिशय वाईट आहे. त्यावर मी सविस्तर लिहीणार आहेच नंतर. तेंव्हा हा उपक्रम सर्वांसाठीच आहे.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
अन्वा महादेव मंदिर : देखणा शिल्पाविष्कार!
उरूस, 19 सप्टेंबर 2020
अजिंठा डोंगररांगा आणि परिसरांत अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे, कातळात कोरलेल्या लेण्या आहेत. या शिवाय दोन अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे महाराष्ट्राच्या एकुणच मंदिर स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. यातील जंजाळा किल्ल्या जवळचे अंभईचे वडेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे पण त्याची बरीच पडझड झालेली आहे. नविन बांधकाम करताना जून्या बर्याच गोष्टी नाहिशा झाल्या.
पण दूसरे जे मंदिर वडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. 1000 ते 1100 या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत. त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.
औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर 8 कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे.
हे मंदिर उत्तर चालूक्यांच्या काळातील आहे. याला लागूनच भोकरदन ही एकेकाळची राष्ट्रकुटाची राजधानी असलेले गाव आहे. राष्ट्रकुटांची सत्ता लयाला गेल्यावर या परिसरावर उत्तर चालुक्यांची सत्ता होती. त्या काळातील हे मंदिर आहे.
अन्व्याच्या तूल्यबळ त्याकाळातील फारच थोडी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. बदलापुर अंबरनाथचे शिवमंदिर, कोल्हापूरजवळील खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर शिवाय विदर्भातील काही मंदिरे या काळातील आहेत.
अतिशय देखणे असे कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच सहा फुटी उंच पीठावर हे मंदिर विराजमान आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याला दक्षिण आणि उत्तर दिशेनेही पायर्या आहेत. तिन्ही बाजूच्या पायर्यांवरून आपण प्रदक्षिणापथावर येतो. पण मंदिरात प्रवेश मात्र फक्त पूर्व दिशेनेच ठेवलेला आहे.
एक दोन नाही तर तब्बल 50 कोरीव देखण्या स्तंभावर हे मंदिर तोलल्या गेलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे.
गर्भगृहाचे द्वार अतिशय कोरीव कामगिरीने नटलेले आहे. एकानंतर एक अशा चार द्वारशाखा या ठिकाणी आढळून येतात. गर्भगृहात मध्यावर महादेवाची पिंड आहे.
मंदिराच्या मंडप छताला मध्यभागी अर्धवट उमलते खाली लोबलेले फुल कोरलेले आहे. त्याच्या भोवती आठ दिशांना म्हणून आठ फुले कोरलेली आहेत. ही सर्व रचना एक चौरस दगडी चौकटीत बसवलेली आहे. मंडपाच्या जमिनीवर वर्तूळाकार असे उंचावलेले पीठ आहे. त्यावर नंदी बसवलेला आहे. तिन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे आहेत. खांबांची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो. एकही खांब मध्ये येत नाही. यावर हा अंदाज लावता येतो की या ठिकाणी नृत्य, संगीत सेवा अर्पण केली जात असावी. आणि त्यासाठी गर्भगृहाची दिशा सोडून इतर तिनही ठिकाणी लोक बसून त्याचा आनंद घेत असावेत.
भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.
मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात.
अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकाली पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.
हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.
हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.
(अन्व्या शिवायची इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)
(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)
(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).
(फोटो सौजन्य AKVIN tourism)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
उद्ध्वस्त प्राचीन केशव मंदिर (माजलगांव-केसापुरी)!
उरूस, 21 सप्टेंबर 2020
माजलगांव शहराच्या पश्चिमेला अगदी लागूनच केसापुरी गावात उत्तर बाजूला तळ्याच्या काठी शिवारात जीर्ण मंदिराचे अवशेष दिसून येतात. हे मंदिर आहे अकराव्या शतकांतील एकेकाळी शिल्पसौंदर्यदृष्ट्या अप्रतिम असे प्राचीन केशव मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही आता शिल्लक नाही. जंगली झाडोर्याने परिसर वेढला गेला आहे. गुप्तधनाच्या मोहात मंदिरात खोदाखोद केल्याने कोरीव दगडी चिरे ढासळले आहेत.
मंदिराचा मुख्य मंडप अजून बर्यापैकी शिल्लक आहे. मंडपाच्या छताला चौरसाकृती चौंकटीत कोरीव दगडांत नरसिंहाची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच शिव गणेश कार्तिकेय यांच्या मुर्ती आहेत.
मंदिराच्या बाह्य अंगावर अतिशय सुंदर अशा सुरसुंदरिंच्या मुर्ती होत्या. त्यातील दोन अजूनही शिल्लक आहेत. इतरत्रही कुठे परिसरांत शोध घेतल्यास या मुर्ती विखुरलेल्या मातीत आढळून येतीलही. मंदिराचे कोरीव खांब सुंदर आहेत. सध्या शिल्लक जे खांब आहेत त्यांच्यावरची नक्षी उत्तम अवस्थेत आहे. गाभारा पूर्णत: ढासळलेला आहे.
बाराव्या शतकात मंदिर शैली विकसित होवून त्रिदल पद्धतीची (तीन गाभारे असलेली) मंदिरे बांधली गेली. लक्षणीय अशी सहा मंदिरे मराठवाड्यात आहेत. केशव मंदिर हे त्यातीलच एक.
या मंदिरात विष्णुची अतिशय देखणी अशी मूर्ती होती. दीडएकशे वर्षांपूर्वी ही मुर्ती गुराख्यांना सापडली. मुर्ती आता गावातील केशवराज मंदिरात विराजमान आहे. हे मंदिरही अहिल्याबाईंच्या काळातील उत्तम दगडी बांधणीचे भक्कम कमानींचे असे आहे. मुळ मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखा उचलून इथे नव्याने दरवाजाला लावण्यात आल्या आहेत. मुळ मंदिराचे खांबही काही नविन मंदिरात बसवण्यात आले आहेत. ब्रह्मदेवाचीही एक अतिशय सुरेख मुर्ती विष्णुच्या मुर्तीशेजारीच ठेवण्यात आली आहे.
महादेव मंदिराच्या गाभार्याबाहेर गोमुख असते. त्यातून अभिषेकाचे पाणी बाहेर येते. त्याप्रमाणे विष्णुचे जे अवतार आहेत त्या मंदिरांच्या गाभार्यांतून पाणी बाहेर जाण्यासाठी मकर प्रणाली कोरल्या जातात. केसापुरीच्या मंदिराला अतिशय देखणी अशी मकर प्रणाली आहे. ही आता नविन मंदिरात प्रवेशद्वाराजवळच्या ओट्याला बसवली आहे.
आज केसापुरीचे मुळ केशव मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी या परिसरांची दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे. नविन मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व सहकार्य करण्यास हात पुढे केला आहे.
आता गरज आहे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक/ विद्यार्थी यांनी पुढे येवून या मंदिराचा जिर्णाद्धार कसा होवू शकतो यासाठी प्रयत्न करण्याची. अशा मंदिरांचा जिर्णाद्धार शास्त्रशुद्ध पद्धतीने होट्टल येथे करण्यात आला आहे. ते एक अतिशय चांगले उदाहरण समोर आहे. विदर्भातील मार्कंडा मंदिराचा जिर्णाद्धार अशाच पद्धतीनं पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. सर्वच कामे पुरातत्त्व विभागाकडून होतील असे नाही. होट्टलचे काम इंटॅक या संस्थेने केले आहे. आता केसापुरीच्या कामासाठी इतर संस्था व्यक्तींनी पुढाकार घ्यावा.
गोदावरी खोर्यात विष्णुमुर्ती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिरे पडली आणि मुर्ती मात्र शिल्लक असाही प्रकार दिसून येतो. गोदावरीला काठावरच पार्थपुरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे म्हणजेच विष्णुचे मंदिर आहे. आता अधिक मासात तिथे मोठी जत्रा भरते. सध्या कोरोनामुळे हे मंदिर बंद आहे.
महाविष्णु शेळगांव (ता. सोनपेठ, जि. परभणी) हे गांवच विष्णुमंदिरामुळे ओळखले जाते. धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर अकराव्या शतकांतील अतिशय महत्त्वाचे असे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी असलेली विष्णुमूर्ती आता गावातच दुसर्या मंदिरात विराजमान आहे. सेलू जवळ ढेंगळी पिंपळगांव येथेही हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. आश्वर्य म्हणजे गावातच दुसर्या मंदिरात बालाजीची अशीच प्राचीन देखणी मुर्ती आहे. परभणीला वडगल्लीच्या जबरेश्वर महादेव मंदिरात विष्णुच्या दोन प्राचीन मुर्ती नंदीजवळ ठेवलेल्या आहेत.
गोदावरी काठी गंगाखेड या प्रसिद्ध तीर्थस्थळी बालाजीचे मंदिर आहे. चारठाणा येथील नृसिंह तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्या मंदिरात नृसिंहाची मुर्ती नाही. ती गावात देवीच्या मंदिरात एका भिंतीवर आढळते. जिंतूरला नृसिंह मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठी राहेर येथील नृसिंह मंदिर तेराव्या शतकांतील अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पोखर्णी (जि. परभणी) येथे नृसिंह मंदिर आहे.
खामनदीच्या काठी शेंदूरवादा (ता. बीडकीन जि. औरंगाबाद) येथे शिवकालीन सुंदर विठ्ठल मुर्ती आहे. विठ्ठलाला विष्णुचा अवतार मानला गेला आहे. पानगांव (ता. परळी जि. बीड) येथील विठ्ठल मंदिर अकराव्या शतकांतील प्रसिद्ध असे मंदिर आहे. ही विठ्ठलाची मुर्तीही देखणी आहे. औंढा नागनाथ या ज्यांतिर्लिंग मंदिरात तळ्यात सापडलेली अप्रतिम अशी विष्णुमूर्ती काचेत ठेवलेली आढळून येते. मराठावाड्यात अशा पद्धतीनं विष्णुमुर्ती आढळून येतात.
पूर्वीच्या काळी आक्रमणाच्या भितीने मंदिरातील मुर्ती तळ्यात विहिरीत लादणींत लपवून ठेवल्या गेल्या. मग कालांतराने भिती ओसरल्यावर संकट टळल्यावर या मंदिरात घडविण्यास सोपी म्हणून महादेवाची पिंड ठेवल्या गेली. अभ्यासकांनी अशी मंदिरे शोधून त्यावरच्या मुर्तींचा अभ्यास करून माहिती लिहून ठेवली आहे. अजून बर्याच मंदिरांचा अभ्यास होण्याची गरज आहे.
मुळात सगळ्यात पहिल्यांदा सामान्य माणसांची प्राचीन मंदिरं- बारवा-लेण्या-गढ्या-किल्ले-दर्गे यांच्याबाबतची अनास्था दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मगच हा विषय ऐरणीवर येईल आणि काहीतरी मार्ग सापडेल.(जून्या दर्ग्यांचा मकबर्यांचा विषय निघाला की काही जण झटकून टाकतात. याचा आपला काहीच संबंध नाही असे म्हणतात. पण या वास्तू भारतीय परंपरेतील आहेत याचा त्यांना विसर पडतो. मूळात समाधी स्थळे बांधणे आणि त्यांची पूजा करणे ही आपलीच परंपरा आहे).
देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संस्कृती जागृती अभियान राबवितो आहोत. तूमच्या परिसरांतील जूनी मंदिरे, मुर्ती, जून्या वास्तू, गढी, वाडे, दर्गे-मकबरे यांची माहिती जरूर कळवा. व्हॉटसअप वर त्याचे फोटो पाठवा. स्थानिक सहकार्य करू इच्छिणार्यांची नावेही पाठवा.
चारठाणा येथे संस्कृती संवर्धनाच्या अभियानात स्थानिक लोकांनी मोठी चळवळ चालवली आहे. त्यांनी एक आदर्श मराठवाड्यात आपल्या कृतीने समोर ठेवला आहे.याप्रमाणे इतरत्रही काम सुरू झाले पाहिजे.
(या विषयात रस आसणार्यांसाठी खाली मंदिरांची यादी परत एकदा देत आहे.)
(इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील सुंदर मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.8. अन्वा शिव मंदिर ता. भोकरदन जि. जालना.)
(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल मंदिरे 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)
(इ.स. 1200 ते 1300 या काळातील उत्तर यादव कालीन मंदिरे. 1. अमलेश्वर मंदिर 2. सकलेश्वर मंदिर 3. खोलेश्वर मंदिर -तिन्ही मंदिरे अंबाजोगाई येथील 4. नरसिंह मंदिर राहेर जि. नांदेड 5. शिवमंदिर येळूंब जि. बीड 6. नरसिंह मंदिर-चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी (येथे अजूनही 5 मंदिरे आहेत) 7. नागनाथ मंदिर-पाली जि. बीड)
(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव
यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ.
कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).























No comments:
Post a Comment