महाबळेश्वर- कृष्णाबाई मंदीर
प्रकार : प्राचीन मंदीर
जिल्हा : सातारा
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे
ठिकाण तसेच पर्यटन स्थळ आहे. इतिहासात डोकावले असता यादव कालापासूनच
महाबळेश्वरचा उल्लेख मिळतो. तेथील जुने महाबळेश्वर हे क्षेत्र महाबळेश्वर
या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्वर येथे अतिप्राचीन असे श्री
महाबळेश्वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे.
महाबळेश्वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्विर, श्री
पंचगंगा देवालयाला भेट देतात, परंतु श्री महाबळेश्वर देवालयाच्या मागच्या
भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र कमी प्रमाणात पर्यटक
जातात. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. कृष्णा
नदीचा उगम येथे झालेला असुन ती महाराष्ट्, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र
प्रदेश या राज्यातून वहाते. महाबळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात रुद्राक्षरूपी
श्री शंकराच्या पिंडीच्या मस्तकावर पाच नद्यांचे वास्तव्य आहे.
बारा महिने तेवढेच पाणी असते, त्या प्रवाही नाहीत व तेथूनच गुप्त होतात व
नंतर महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराचे जवळील गोमुखातून उगम
पावतात अशी कथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की सावित्रीने विष्णुला शाप
दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या
उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी
स्वतंत्र वहाते. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर
आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही
म्हणतात. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस तसेच मुख्य खांबावरती नागप्रतीमा
कोरल्या आहेत. कृष्णेच्या पुढे पितृमुक्ती कुंड, अरण्यकुंड व मलापटतीर्थ ही
कुंडे आहेत. पितृमुक्ती कुंडावर सध्या क्रियाकर्म विधी केले जातात. येथे
कृष्णा नदी प्रकट होते व खोऱ्यात उतरते. १३ व्या शतकात इ.स १२१५ मध्ये
सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण
देवालय दगडांपासून बनविलेले आहे. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे
विशेष वैशिष्ट्य आहे. तेथील गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून
पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे. गर्भगृहासमोर
एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच
पुढे नदीरूपाने वाहत जाते. गोमुखातून वाहणारे हे पाणी म्हणजे चैतन्यमय
तीर्थ आहे. या देवळासमोर मनमोहक असा नैसर्गिक देखावा आहे. या देवालयाच्या
मागच्या बाजूने कळस आणि भिंतीच्या भागाची पडझड झालेली आहे. वर्षभरात लाखो
पर्यटक महाबळेश्वयर येथे येतात, परंतु त्यातील अल्प लोक श्री कृष्णामाईच्या
देवालयाला भेट देतात कारण येथील मुख्य दर्शनीय स्थळांमध्ये श्री
कृष्णामाईच्या देवालयाचे नाव नाही तसेच देवालयापर्यंत जाणारा मार्ग कच्चा
मातीचा व काही ठिकाणी कच्च्या पायऱ्याचा आहे. प्रत्यक्ष देवळाच्या परिसरात
प्रवेश करण्यासाठीच्या पायऱ्याही केवळ दगड रचून केलेल्या आहेत. श्री
कृष्णामार्इ देवळाकडे जाण्यासाठी अरुंद वाट असुन स्थानिक मार्गदर्शक
पर्यटकांना तेथपर्यंत नेत नाहीत. मंदिराजवळ अथवा मार्गात कोठेही या
वास्तुची माहिती सांगणारा कोणताही फलक लावलेला नाही. भारतीय पुरातत्व
खात्याकडे देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असुन ते
प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे अन् देवालये स्वत:च्या ताब्यात घेण्याचेच काम
करत आहे, परंतु प्राचीन इतिहासाचे वैभवाचे प्रतीक असलेल्या या स्थळांच्या
देखरेखीविषयी मात्र उदासीनता दाखवत आहे. महाबळेश्वर येथील श्रीकृष्णामाईचे
देवालय पुरातत्व विभागाकडून अत्यंत दुर्लक्षिले गेलेले आहे. आपण आपल्या
अस्मितेची प्रतीके असलेल्या स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व
विभागाकडे आग्रह धरायला हवा. ऐतिहासिक स्रोत असलेली स्थळे नष्ट
होण्यापूर्वी जागृत होऊन आपल्या लक्षात आलेली आणि पुरातत्व खात्याद्वारे
दुर्लक्षिलेली वास्तू संदर्भातील माहिती लोकांसमोर आणावी यासाठी हा छोटासा
प्रयत्न!
© Suresh Nimbalkar
इतिहास समजलात तर वर्तमान सोपे जाईल.10महिना
जर महाबळेश्वरला जाऊन तुम्हाला तेच ते नेहमीचे पॉईंट्स, नेहमीची मंदिरे आणि तलाव बघायचे नसतील, काहीतरी हटके बघायचं असेल, तर कृष्णामाई विष्णू मंदिर तुमच्यासाठीच आहे!
कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या पंचगंगा मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे हेमाडपंथी वास्तुकलेनुसार बांधलेले शिव मंदिर.
कृष्णा नदीचा उगम इथूनच झाला म्हणून याचे नाव कृष्णामाई मंदिर! तसे हे मंदिर कृष्णाबाई अथवा कृष्णाई मंदिर या नावानेदेखील ओळखले जाते.
हे मंदिर कधी बांधलं गेलं याबद्दल अनेक मतांतरे आहेत. कोणी म्हणतात 1000 वर्षांपूर्वी तर कोणी, 5000 वर्षांपूर्वी!
पंचगंगा मंदिरापर्यंत वाहनाने जाऊन पुढे मंदिरापर्यंत चालत जाणे श्रेयस्कर. पण चालताना, असे काही प्राचीन मंदिर इथे असेल, याची पुसटशी जाणीवदेखील होत नाही.
या मंदिराची अधिकृत माहिती कुठेच उपलब्ध नाही.
मुख्य मंदिर, आवाराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे दगडांचे, आवाराचे बांधकाम केलेले आहे. त्याच्या बाजूनेच ओढा वाहतो. त्याला कृष्णा नदीच म्हणतात.
मुख्य मंदिराच्या उत्तरेला एक टेकडीवजा भाग आहे. त्याच्या पुढे, दरीच्या बाजूला भग्नावस्थेतील गणेशाचे एक मंदिर देखील आहे. या गणेश मंदिराच्या समोर एक बांधीव कुंड आहे. ते अलीकडच्या काळात बांधले असल्याचे स्थानिक सांगतात. असेच कुंड कृष्णामाई मंदिर आणि त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या समाधीवजा बांधकामाच्या बाजूला आहे. (हे देखील नंतरच्या काळातील आहे). या सगळ्यांची रचना एकसारखी असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
समाधीचे बांधकाम सोळाव्या शतकाच्या सुमारास केलेले असावे. पण ती समाधी कोणाची आहे माहिती उपलब्ध नाही. इथे पडणाऱ्या पावसामुळे आणि त्याकाळात होणाऱ्या मातीच्या धूपेमुळे काही प्रमाणात मुख्य मंदिराचा काही भाग जमिनीखाली जातो.
मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या कुंडाच्या अलीकडेच एक लहान गोलाकार कुंड आहे. कृष्णेचे लुप्त होऊन येणारे पाणी पहिल्यांदा त्याच कुंडत येते आणी त्याला जोडून असलेल्या गोमुखातून ते मुख्य कुंडात येते.
मंदिराला दोन्ही पुढच्या बाजूस ओसऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये, पुढच्या बाजूस असलेल्या पूर्ण खांबांची संख्या दहा आहे तर त्याच ओळीमध्ये दोन अर्धस्तंभ देखील आहेत. त्याच्यामधल्या प्रत्येक खांबावर एकसारखेच नक्षीकाम केलेले आहे. शिवाय खांबांच्या मागील बाजूस, भिंतीमध्ये देखील तितकेच अर्धस्तंभ आहेत त्यावर मात्र नक्षीकाम नाही. त्या दोन्ही खांबांना जोडणारी महिरप आहे. याच्या छताच्या भागामध्ये एकूण दहा शिल्पे घडविलेली आहेत.
शिखराच्या रचनेमध्ये महाबळेश्वर मधील काही मंदिरांच्या शिखरांची रचना कृष्णामा्ईच्या मंदिराच्या शिखरासारखी आहे. अर्थात त्यांचा जीर्णोद्धार झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी महाबळेश्वराच्या मंदिरात जिजाबाईंची सुवर्णतुला केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला. परंतु त्यांनी त्या मंदिराच्या शिखरामध्ये बदल केला नाही. त्याची बांधणी जुन्याच पद्धतीची ठेवली, जी आज पाहायला मिळते. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही मंदिरे चौदाव्या- पंधराव्या शतकात बांधली गेली आहेत कारण महाबळेश्वर मधील मुख्य बहुतांशी मंदिरे ही यादव काळातच बांधलेली आहेत. कालांतराने त्यावर जीर्णोद्धाराचे संस्कार होत आजची मंदिरे पहावयास मिळतात.
नमोस्तुते !
प्रकार : प्राचीन मंदीर
जिल्हा : सातारा
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे
ठिकाण तसेच पर्यटन स्थळ आहे. इतिहासात डोकावले असता यादव कालापासूनच
महाबळेश्वरचा उल्लेख मिळतो. तेथील जुने महाबळेश्वर हे क्षेत्र महाबळेश्वर
या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्वर येथे अतिप्राचीन असे श्री
महाबळेश्वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे.
महाबळेश्वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्विर, श्री
पंचगंगा देवालयाला भेट देतात, परंतु श्री महाबळेश्वर देवालयाच्या मागच्या
भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र कमी प्रमाणात पर्यटक
जातात. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. कृष्णा
नदीचा उगम येथे झालेला असुन ती महाराष्ट्, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र
प्रदेश या राज्यातून वहाते. महाबळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात रुद्राक्षरूपी
श्री शंकराच्या पिंडीच्या मस्तकावर पाच नद्यांचे वास्तव्य आहे.
बारा महिने तेवढेच पाणी असते, त्या प्रवाही नाहीत व तेथूनच गुप्त होतात व
नंतर महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराचे जवळील गोमुखातून उगम
पावतात अशी कथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की सावित्रीने विष्णुला शाप
दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या
उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी
स्वतंत्र वहाते. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर
आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही
म्हणतात. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस तसेच मुख्य खांबावरती नागप्रतीमा
कोरल्या आहेत. कृष्णेच्या पुढे पितृमुक्ती कुंड, अरण्यकुंड व मलापटतीर्थ ही
कुंडे आहेत. पितृमुक्ती कुंडावर सध्या क्रियाकर्म विधी केले जातात. येथे
कृष्णा नदी प्रकट होते व खोऱ्यात उतरते. १३ व्या शतकात इ.स १२१५ मध्ये
सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण
देवालय दगडांपासून बनविलेले आहे. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे
विशेष वैशिष्ट्य आहे. तेथील गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून
पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे. गर्भगृहासमोर
एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच
पुढे नदीरूपाने वाहत जाते. गोमुखातून वाहणारे हे पाणी म्हणजे चैतन्यमय
तीर्थ आहे. या देवळासमोर मनमोहक असा नैसर्गिक देखावा आहे. या देवालयाच्या
मागच्या बाजूने कळस आणि भिंतीच्या भागाची पडझड झालेली आहे. वर्षभरात लाखो
पर्यटक महाबळेश्वयर येथे येतात, परंतु त्यातील अल्प लोक श्री कृष्णामाईच्या
देवालयाला भेट देतात कारण येथील मुख्य दर्शनीय स्थळांमध्ये श्री
कृष्णामाईच्या देवालयाचे नाव नाही तसेच देवालयापर्यंत जाणारा मार्ग कच्चा
मातीचा व काही ठिकाणी कच्च्या पायऱ्याचा आहे. प्रत्यक्ष देवळाच्या परिसरात
प्रवेश करण्यासाठीच्या पायऱ्याही केवळ दगड रचून केलेल्या आहेत. श्री
कृष्णामार्इ देवळाकडे जाण्यासाठी अरुंद वाट असुन स्थानिक मार्गदर्शक
पर्यटकांना तेथपर्यंत नेत नाहीत. मंदिराजवळ अथवा मार्गात कोठेही या
वास्तुची माहिती सांगणारा कोणताही फलक लावलेला नाही. भारतीय पुरातत्व
खात्याकडे देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असुन ते
प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे अन् देवालये स्वत:च्या ताब्यात घेण्याचेच काम
करत आहे, परंतु प्राचीन इतिहासाचे वैभवाचे प्रतीक असलेल्या या स्थळांच्या
देखरेखीविषयी मात्र उदासीनता दाखवत आहे. महाबळेश्वर येथील श्रीकृष्णामाईचे
देवालय पुरातत्व विभागाकडून अत्यंत दुर्लक्षिले गेलेले आहे. आपण आपल्या
अस्मितेची प्रतीके असलेल्या स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व
विभागाकडे आग्रह धरायला हवा. ऐतिहासिक स्रोत असलेली स्थळे नष्ट
होण्यापूर्वी जागृत होऊन आपल्या लक्षात आलेली आणि पुरातत्व खात्याद्वारे
दुर्लक्षिलेली वास्तू संदर्भातील माहिती लोकांसमोर आणावी यासाठी हा छोटासा
प्रयत्न!
© Suresh Nimbalkar
मागे जा
No comments:
Post a Comment