मनसर हे वाकाटक काळातील राजधानीचे ठिकाण म्हणून विशेष महत्त्वाचे असल्याचे उत्खननात प्राप्त झालेल्या विविध पुराव्यांवरून सिद्ध होते. मनसर येथून प्राप्त ताम्रपत्र, शंख लिपीतील लेख, धार्मिक पुरावशेष, सुंदर शिल्पे आणि भव्य स्थापत्यावरून वाकाटक काळातील राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती तसेच कला, स्थापत्य आणि धर्म इत्यादींविषयी नवीन माहिती समोर आली; तथापि उत्खननकर्त्यांनी येथील उत्खननाबाबतीत नमूद केलेल्या कालानुक्रमातील आणि काही अवशेषांवरील स्पष्टीकरणासंदर्भात इतर विद्वानांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. मनसर येथुन रामटेकला जाणारा फाटा आहे. येथुन रामटेक ७ कि.मी. अंतरावर आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या स्थळाच्या उत्तरेस असलेल्या तलावाच्या ‘मणीकालसरʼ या नावावरून या स्थळाला मनसर असे संबोधले जाते. रामटेकच्या लक्ष्मण मंदिरातील यादव राजा रामचंद्रांच्या शिलालेखात या स्थळाचा उल्लेख मणीकालकुंड असा येतो, तर सिंदूरगिरी माहात्म्य आणि महानुभावांच्या स्थान पोथीमध्ये यास अनुक्रमे मणीकाल आणि माणसील असे संबोधले जात होते.

महाराष्ट्रात टेकडीवर अथवा डोंगरात मंदिर बांधण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. मनसर येथे हिडींबा टेकडीवर झालेल्या उत्खननात असेच एक टेकडीवरील शिवमंदिर उजेडात आले आहे. मनसर गावाच्या पुर्वेला साधारण १ कि.मी.वर हि हिडींबा टेकडी व नव्याने उजेडात आलेले भव्य शिवालय आहे. वाकाटक हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. सातवाहन काळात आताचे मनसर म्हणजे पुर्वीचे प्रवरपूर हे एक महत्त्वाचे शहर होते. इ.स. २५० मध्ये वाकाटक राजांनी त्यांचा पराभव करून विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला. या राजवंशाच्या काळातील अनेक मंदिरांचे अवशेष विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननात सापडले आहेत. वाकाटकांच्या काळात दगडांबरोबर विटांनी देखील मंदिरे बांधली गेली.
ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मनसर या स्थळाचे सर्वप्रथम सर्वेक्षण टी. वेलस्टेड याने १९२८ मध्ये केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील १९३३ च्या संशोधन प्रपत्रात मनसर येथील वाकाटककालीन पुरावशेष, स्थापत्य आणि हिंदू व बौद्ध धर्माशी निगडित वास्तू इत्यादीचे वर्णन वेलस्टेडने केले आहे. या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने केले. या नंतर १९९४-९५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उत्खनन शाखा क्र. १, नागपूरतर्फे आणि अलीकडील उत्खनन बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्थेच्यावतीने जगत पती जोशी आणि अरुण शर्मा यांच्या संयुक्त निर्देशनाखाली १९९७ पासून नऊ सत्रामध्ये विस्तृत प्रमाणात करण्यात आले.
उत्खननांती मनसर येथे सातवाहन, वाकाटक आणि विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी शासन केल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मनसर येथे स्थापत्य परंपरेची सुरुवात सातवाहन काळात झाली (इ. स. पू. २०० ते इ. स. २५०) असावी. मनसरच्या टेकाड क्र.१ मधील उत्खननात सर्वांत खालच्या स्तरात राजप्रासादाचे अवशेष मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे मत आहे. विटांनी बांधलेल्या या विस्तीर्ण राजप्रासादाचा आकार पूर्व-पश्चिम ५१ मी. तर उत्तर-दक्षिण ४४ मी. इतका होता. प्रासादात राहण्याकरिता अनेक लहान-मोठ्या खोल्या होत्या. राजप्रासादाच्या सुरक्षेकरिता चारही बाजूंनी विटांची संरक्षक भिंत देखील बांधली होती. राजप्रासादाच्या पश्चिमेकडे भव्य मंडप असून याचे आकारमान लांबी २३ मी. आणि रुंदी १९.५० मी. इतके आहे. या विशाल मंडपात विटांनी निर्मित ४२ चौकोनी स्तंभ एकमेकांशेजारी (२.२० मी. अंतरावर) स्थित आहेत. मंडपाच्या सभोवताल विटांच्या भिंतीचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. तसेच मनसर येथील हिडिंबा टेकडी (उत्खनन स्थळ क्र.३) परिसरात दोन बौद्ध स्तूपाचे आणि एका चैत्याचे अवशेष प्राप्त झाल्याचे उत्खननकर्त्यांनी नमूद केले आहे. स्थापत्याच्या अवशेषाव्यतिरिक्त सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे नाण्याचे साचे, लाल चकाकीयुक्त खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, रोमन मद्यकुंभ (अम्फोरा), लज्जागौरी आणि कार्तिकेय यांचे शिल्प आणि लोह उपकरणे आदी प्राप्त झाली आहेत.
सातवाहनांच्या अस्तानंतर मनसर येथे विदर्भातील आद्य नरेश वाकाटकांनी प्रत्यक्ष शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत (इ.स. २५० ते ५५०). सातवाहन काळातील काही स्थापत्य अवशेषांवर वाकाटक काळात बांधकाम करण्यात आले आणि उर्वरित बांधकामाला भर टाकून समतल करण्यात आले. उत्खननकर्त्यांच्या मते, वाकाटक काळातील राजप्रासादाचे अवशेष हे वाकाटक नृपती प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१०–४४०) याच्या काळातील असावे, कारण या राजाने नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतर केली होती. उत्खननकर्त्यांनी मनसरची ओळख प्राचीन ‘प्रवरपूरʼ म्हणून केली आहे. वाकाटक काळातील राजप्रासाद तीन मजली असून आकाराने भव्य होता. यामध्ये पश्चिमेकडून पायऱ्याद्वारे प्रवेश करता येत होता. राजप्रासादामध्ये अतिथी कक्ष, सभागृह व त्याला परस्पर जोडलेल्या खोल्या अशी एकूण राजप्रासादाची रचना होती. तसेच प्रासादात लहान-मोठ्या अनेक खोल्या एकमेकांशेजारी बांधलेल्या होत्या. राजप्रासाद आणि त्यामधील कोनाडे व अर्धस्तंभ, चुन्याचा गिलावा आणि चित्रांनी अलंकृत केला होता. राजप्रासादाच्या बाहेर देखील अनेक खोल्यांचे अवशेष आढळले आहेत. इ. स. ४९३ मध्ये नल राजांनी वाकाटक साम्राज्यावर केलेल्या आक्रमणात प्रवरपूर येथील प्रासादाला जाळल्याचे आणि नष्ट केल्याचे पुरावे मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्खननकर्त्यांना याच स्तरात कूर्मचिती, श्येनचिती व त्या संबंधित पुरुषमेध यज्ञाचे अवशेष आढळले आहे. उत्खननात वाकाटक काळातील अनेक मुद्रा आणि मुद्रांके प्राप्त झाली असून त्याद्वारे वाकाटकांच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. प्रवरसेन द्वितीयची पेटिका-शीर्षक लिपीत लिहिलेली ‘प्रवरस्यʼ मुद्रांक विशेष महत्त्वपूर्ण असून वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयने राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केल्यानंतर या मुद्रांकाचा वापर केला असावा. वाकाटक काळातील अभ्रकयुक्त लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त आणि साधी लाल रंगांची खापरे उत्खननात मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
वाकाटकांनंतर मनसरवर विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी काही काळ शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. विष्णूकुंडीन काळातील स्थापत्य अवशेष मनसर येथील वाकाटक काळाच्या अवशेषांवर मिळाले. या काळातील बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहेत. वाकाटकांच्या भव्य राजप्रासादाचे रूपांतर नंतर बौद्ध स्तूप आणि विहारात झाले असावे. राजप्रासादाच्या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खुंच्या निवासाकरिता होत होता. विष्णूकुंडीन नरेश महेंद्रवर्मन द्वितीयची तांब्याची नाणी हिडिंबा टेकडी परिसरात मिळाली आहेत. लाल रंगाची खापरे, अभ्रकमिश्रित लाल रंगाची खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, दगडी पाटे-वरवंटे, लोह आणि ताम्र उपकरणे इ. मिळाली आहेत. मनसर येथील उत्खननात वाकाटक काळातील अनेक मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. येथील मंदिरे प्रामुख्याने शैव पंथीय असून केवळ एक वैष्णव (नरसिंह) मंदिर होते. हिडिंबा टेकडीवरील मंदिराला विद्वानांनी प्रवरसेन द्वितीयच्या ताम्रपत्रात उल्लेखित प्रवरेश्वरदेवकुलस्थान ‘प्रवरेश्वरʼ मंदिर मानले आहे. मनसर येथील नैसर्गिक गुहेत विटांचे बांधकाम करून शिवलिंग प्रस्थापित केले होते, तसेच जाडजूड संरक्षण भिंतीच्या पश्चिम आणि उत्तर-दक्षिणेस लघु आकारांच्या अनेक देवकुलिकात शिवलिंगे मिळाली आहेत. मनसर येथे आणखी एका विटांनी बांधलेल्या ताराकृती आकाराच्या शैव मंदिराच्या जोत्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
मनसर हे वाकाटक काळातील शिल्प परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वाकाटकांच्या काळातील अन्य कोणत्याही स्थळापेक्षा जास्त प्रमाणात शिल्पे मनसर येथून प्राप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने शैव देव-देवता यांची शिल्पे असून गण, यक्ष, किन्नर, प्राणी, साधू आणि स्त्री-पुरुष इत्यादींचे अनेक शिल्पे सुद्धा मिळालेली आहेत. भारताच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयामधील प्रवेशद्वाराच्या मुख्य कक्षात प्रदर्शित ‘शिव-वामनʼ चे अद्वितीय शिल्प मनसर येथील शिल्प कलेचा परमोच्च बिंदू आहे. मनसर येथील यक्ष, विद्याधर, किन्नर इ. शिल्पांचे अजिंठा येथील चित्रांशी समरूपता दिसून येते, म्हणूनच प्रसिद्ध विद्वान हान्स बाकर यांच्या मते, मनसरची कला आणि अजिंठा येथील चित्रकला यांमध्ये विलक्षण साम्य आहे.

मनसर गावात पोहोचल्यावर बोधिसत्व नागार्जुन संस्थेच्या मागील बाजुने हिडींबा टेकडीवर जाण्यासाठी वाट आहे. टेकडीवर जाताना टेकडीच्या मागील बाजुस एक मोठा नैसर्गिक तलाव पहायला मिळतो. टेकडी लहान असल्याने १० मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. टेकडीवर असलेले अवशेष हे चौकोनी आकाराच्या बौद्ध स्तुपांचे असून त्यात विटांनी चैत्यगृह बांधलेले आहे. टेकडीवर एक लहान भुयार असून हे बहुदा ध्यानमंदिर असावे. येथे पत्र्याच्या निवाऱ्यात काही मुर्ती ठेवलेल्या आहे. शिवालय : या मंदिराचे अवशेष हिडिंबा टेकडीच्या पश्चिम बाजुस आहेत. हि वास्तु विटांनी गर्भगृह व मंडप अशी दोन भागात बांधलेली असुन वास्तुचा पाया मात्र दगडात बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास पूर्वेकडे अर्धमंडपास प्रवेशाकरिता पायऱ्या असून अर्धमंडपाच्या पश्चिमेला मंडप व त्यालगत गर्भगृहाचे अवशेष आहेत. गर्भगृह व मंडपाभोवती रुंद प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराचा वरचा भाग विटांनी बांधलेला तसेच अलंकारित केलेला असावा. १९७० साली या भागात सापडलेल्या मुर्ती याच मंदिराच्या गर्भगृहातील असावी. हे मंदिर वाकाटक नृपती प्रवरसेन (पहिला) याने बांधले असावे तर त्याचा नातु प्रवरसेन (दुसरा) याने आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ त्याची पुनर्रचना केलेले प्रवरेश्वर देवकुलस्थान असावे असे पुरातत्व अभ्यासकांना वाटते. शिवमंदिर समूह : वाकाटक काळातील दुसरे विटांचे भव्य मंदिर फक्त चौथऱ्याच्या स्वरूपात हिडिंबा टेकडीच्या उत्तर-पश्चिम उतारावर आढळले. या मंदिराची रचना दोन टप्प्यात केलेली आहे. टेकडीची उंची कायम ठेवण्यासाठी जाड भिंतीच्या मदतीने टेकडीच्या माथ्यावर सपाट चौथरा करून त्यावर हे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या पहिल्या भागात मुख्य मंदिराभोवती चौथऱ्यावर लहान प्रतिमागृहे असून त्यात कोनाडे आहेत. उत्तरेकडील प्रतिमागृहांतून काही मुर्तींचे भग्नावशेष मिळाले तर पश्चिम व दक्षिणेकडील सहा प्रतिमागृहात वेगवेगळी शिवलिंगे आहेत. पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांच्या मते वाकाटक काळातील ही मंदिरे पाशुपत संप्रदायाशी संबंधित असावी. टेकडीच्या पायथ्याशी वाकाटक राजा प्रवरसेनचा विटांनी बांधकाम केलेला प्रचंड मोठा राजवाडा आहे. या राजवाडयाला लहानमोठी अशी अनेक दालने आहेत. हा संपुर्ण राजवाडा विटांच्या तटबंदीने चहूबाजूंनी वेढलेला असुन त्याबाहेर खंदक खोदलेला होता. हिडींबा टेकडीच्या मागे असलेल्या तलावातील पाणी या खंदकात आणुन सोडलेले होते. या राजवाडयाच्या उत्खननात राजा प्रवरसेन व राणी प्रभावती गुप्त यांच्या राजमुद्रा या महत्वाच्या गोष्टी सापडल्या. हिडींबा टेकडी व मंदिरे हे सर्व अवशेष बारकाईने पाहण्यास ३ तास पुरेसे होतात.
संदर्भ :-
१) नागपुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) www.durgbharari हि वेबसाईट
४) Bakker, Hans, ‘Religion and Politics in the Eastern Vakataka Kingdomʼ, South Asian Studies, Vol. 18, pp. 1-25. 2002.
५) Indian Archaeology: A Review, Archaeological Survey of India, New Delhi, 1994-95.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलमधील एक शहर, मनसर हे देशातील प्रमुख पुरातत्व स्थळांपैकी एक आहे, अनेक मनोरंजक उत्खननांसाठी ओळखले जाते ज्यामुळे विविध देवस्थानांचा शोध लागला, प्रवरपुरा म्हणून ओळखले जाणारे राजवाडा संकुल जे वाकाटकाची राजधानी होती. राजा प्रवरसेन दुसरा आणि एक विस्तृत मंदिर परिसर. हे असे ठिकाण आहे जे इतिहासकार, जिज्ञासू आणि पर्यटकांना तितक्याच मोठ्या संख्येने इशारा देते.
नागपूर शहराच्या ईशान्येला ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनसरला १९७२ मध्ये प्रसिद्धी मिळाली जेव्हा या भागातील एका टेकडीवरून १९७२ मध्ये एका देवतेची प्रतिमा, ज्याला नंतर शिव वामन म्हणून ओळखले जाते, हिडिंबा टेकरी म्हणून ओळखले जाते. १९९७-९८ पासून मानसरच्या प्राचीन स्थळांवर महत्त्वाचे उत्खनन करण्यात आले आणि आतापर्यंत पाच स्थळांचे उत्खनन करण्यात आले आहे ज्यातून हिंदू देवतांच्या ५व्या शतकातील शिल्पे, कलाकृती आणि काही नाणी सापडली आहेत. साइटभोवतीचा पाण्याचा साठा आणि प्राचीन साधने आणि इतर वस्तूंचे निष्कर्ष या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात की १,६०० वर्षांपूर्वी मोठ्या लोकसंख्येची वस्ती होती.
मनसरच्या जागेचे उत्खनन नागपूर विद्यापीठ, त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्था संशोधन केंद्र, नागपूर यांनी केले आहे. उत्खननाने चार सांस्कृतिक कालखंड उघड केले: कालखंड I - मौर्य-सुंग (३०० BC ते २०० BC), कालखंड II - सातवाहन (२०० BCE ते २५० CE), कालखंड III - गुप्त-वाकाटक (२७५ ते ५५० CE) आणि कालखंड IV म्हणून नियुक्त विष्णुकुंडिनचा नियम. मानसर येथील अवशेषांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेकडून प्रवेशद्वार असलेल्या उंच उंच घन विटांच्या चबुतऱ्यावर बांधलेला एक मोठा राजवाडा परिसर आहे. त्यामध्ये अनेक मोठ्या आणि लहान खोल्या आहेत, ज्याच्या भोवती राजवाड्याच्या आतील आणि बाहेरील मुख्य भिंतींमध्ये लॉबी (कॉरिडॉर) आहे.
राजवाड्याच्या बाहेरील भिंती आणि ‘अधिस्ताना’ (मोल्डेड प्लॅटफॉर्म) पिलास्टर मोल्डिंग्जने सुशोभित केलेले आहेत जे आळीपाळीने लाल आणि पांढर्या रंगाने चुना-प्लास्टर केलेले होते. ‘कपोता’ स्तर ठराविक अंतराने विटांच्या ‘मकारा’ आकृत्यांनी सजवला जात असे. राजवाड्याला चारही बाजूंनी विटांनी बांधलेली मोठी तटबंदी होती. पूर्वेकडील व दक्षिणेकडील तटबंदीला खंदक होता तर उत्तर व पश्चिमेला एका मोठ्या टाक्याने वेढलेले होते. अनेक सरळ आणि वळणावळणाच्या पायऱ्या, विविध उंची आणि आकारांच्या गोल विटांच्या प्रक्षेपणांच्या अॅरेसह तिची वैचित्र्यपूर्ण टेरेस्ड मांडणी हे येथील वास्तूंचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. वारंवार, मोल्डेड विटांच्या सहाय्याने तयार केलेल्या इन्क्युस लोझेंजच्या नमुन्यांद्वारे विटांच्या पृष्ठभागाचा आकार बदलला जातो.
उत्खननातून प्रतिकात्मक मानवी बलिदानाचे पुरावे पुढे आले आहेत. हडिंबा टेकडी नावाच्या त्याच कॉम्प्लेक्समधील टेकडीवरील साइट्सनी एक बौद्ध 'स्तुप' उघड केला आहे जो खडकाळ जमिनीवर बांधलेला आहे आणि ३८ उंच मार्ग आहेत. स्तूपाजवळ जाण्यासाठी पूर्वेला पायऱ्या दिल्या होत्या. दुसरा बॉक्स पॅटर्नचा विटांचा स्तूप मूळ स्तूपावर बांधला गेला होता आणि त्यात लहान दगड, विटा आणि मातीने भरलेले आयताकृती बॉक्स आहेत. स्तूपात चुनखडीच्या अवशेषाच्या ताबूतचा पाया आणि गाठ सापडली. स्तूप आणि 'चैत्यगृह' सुमारे ३०० ईसापूर्व ते २०० ईसापूर्व मौर्य-सुंग कालखंडातील आहेत.
एका टेकडीवर विटांनी बांधलेले शिवमंदिर सापडले ज्यामध्ये काळ्या ग्रॅनाइटचे 'लिंग', 'अंतराळा' आणि 'मंडप' आणि पायऱ्यांसह अष्टकोनी गर्भगृह आहे. शिवमंदिर वाकाटक काळातील आहे. मुख्य संकुलाच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला १६ विटांनी बांधलेल्या शिवमंदिरांची रांग तीन टेरेसवर पायऱ्यांच्या उड्डाणाने वसलेली आढळली. यापैकी सहा शिवलिंगे आहेत. येथील उत्खननात वामन-शिव (आता राष्ट्रीय संग्रहालयात), 'त्रिनेत्र' पार्वती, पगडी घातलेला पुरुषाचे डोके, शिव-पार्वती, गरुडावर स्वार झालेला नरसिंह आणि मोरावर स्वार झालेला कार्तिकेय इत्यादी अनेक सुंदर शिल्पे समोर आली आहेत. .
मुंबईपासून अंतर: ८८१ किमी






No comments:
Post a Comment